© Suresh Nimbalkar
अंबरेश्वर मंदिर :- ( Ambareshwar Mandir)
मुंबई उपनगरातील अंबरनाथ येथे असलेले अंबरेश्वर मंदिर हे एक प्राचीन आणि भारतीय शिल्प्कारीतेचा एक उत्तम नमुना आहे. हे मंदिर बघायचा योग आज आला आणि इतके वर्ष ह्या ठिकाणी का आलो नाही हा प्रश्न पडला इतकं अप्रतिम मंदिर आहे. मंदिर परिसर स्वच्छ आणि आवरलेला बघून खरच आनंद वाटला. मंदिराची देखरेख करण्याऱ्या समितीचे मनपासून आभार.
मंदिराचे बांधकाम साधारण शके ९८२ इतके पुरातन आहे. शिलाहार राजा चीत्तारजा ह्याने ह्या अप्रतिम मंदिराचे बांधकाम केले असून त्याचा मुलगा राजा महामंडलेश्वर माम्बानी ह्याने १०६० रोजी मंदिराची पुनर्बांधणी केली असे मानले जाते. हेमाडपंथी बांधकाम पद्धतीने मंदिराची बांधणी केलेली आहे.
काळ्या दगडात बांधलेल्या ह्या मंदिरात अनेक देवी देवतांची शिल्पे बघायला मिळतात. लक्ष्मीची मूर्ती, शिवलिंग, शंकराची मूर्ती ,पार्वती, नरमुंडधारी महाकाली, शंकर पार्वती विवाह, हंसा वर आरूढ ब्रम्हदेव, वराहरुढ विष्णू ,ऊजव्या सोंडेचा गणपती, त्याच बरोबर विविध नृत्यांचे आविष्कार व काही शृगांरिक कामशिल्पे कोरलेली दिसतात. मंदिराला एकूण तीन दरवाजे आहेत आणि मंदिरा चा प्रमुख दरवाजा हा पश्चिमेला आहे.
मंदिराच्या दरवाजात दोन नंदी आहेत त्यातला खाली असलेला नंदी हा मंदिरा इतका प्राचीन आहे तर चौथऱ्यावर स्थापित नंदी हा अलीकडचा आहे. तो कोणी नवस केल्यावर मंदिराला दान केला असं तिथे विचारणा केल्यावर कळलं. मंदिराच्या मागच्या बाजूला एक पाण्याच्या वाटी सारखी दगडी वाटी दिसते तिथून शंकराची पिंड सरळ दिसायची असं समजलं पण सध्या ते दर्शन बंद करण्यात आलेलं आहे.
मंदिराचे कोरीव काम हे खरोखरीच अप्रतिम आहे अर्थात दगडाची जी झीज होते ती झालेली आहे. हे मंदिर सुद्धा इंग्रजांच्या काळात कोणा एका इंग्रजाला सापडलं आणि परत ते वावरत आलं असं समजलं. मंदिराचा गाभारा हा जमिनीपेक्षा खाली असल्याने छोट्याश्या दरवाजातून १०-१२ पाहिऱ्या उतरून मग शिवलिंगापर्यंत पोचता येते. दोन नंदी प्रमाणे मंदिरात शिवलिंग सुद्धा दोन आहेत. त्यातले एक शिवलिंग काळ्या रंगाचे आहे जे स्वयंभू आहे तर दुसरे शिवलिंग गारगोटीचे आहे. गाभाऱ्यात बरून सूर्यप्रकाश व हवा यायला झरोका आहे. आणि गाभाऱ्यात काही चिमण्यांनी आपली घरटी सुद्धा मांडली आहेत. मंदिरात असलेले चार खांब आणि छतावरील कोरलेली झुंबर खरोखर आपलं लक्ष लगेच वेधून घेतात .
मंदिरा शेजारी बांधलेला तलाव आहे आणि त्यात उन्हाळात ही पाणी बघायला मिळतं. ह्या छोट्या तलावात मासे कासवं सोडलीली आहेत. हा तलाव देखील दगडात कोरून काढला असून पायऱ्या तसेच चारी कोपऱ्यात शिल्प कोरलेली आहेत.
मलंग गडाच्या पायथ्याशी उगम पावणारी वालधुनी नदी मंदिराला लागुनच वाहते. पण उन्हाळ्यात मात्र नदीचे पात्र फारच रोडावते आणि त्यात नदीत सोडलेल्या गटारीमुळे असेल अदाचीत पण नदीचे पाणी अतिशय खराब दिसते. नदीच्या मध्ये सुद्धा एक शिवलिंग आणि त्याच्या भोवती एक भगवा झेंडा रोवलेला दिसतो. अंबरेश्वर मंदिरामुळेच ह्या गावाला अंबरनाथ असं नाव पडलं असावं असं वाटत.
इथे पोचण्यासाठी अंबरनाथ पर्यंत लोकलने जाऊन , अंबरनाथ पूर्व बाजूला शेअर रिक्षा उपलब्ध आहेत, साधारण १० रुपये प्रती प्रवासी दराने ह्या रिक्षा आपल्याला मंदिरापर्यंत नेतात. मंदिर साधारण २ कि मी लांब आहे त्यामुळे वेळ असल्यास चालत २५ मिनिटात मंदिरापर्यंत पोचता येते
अम्बरेश्वर मंदिर गुगल नकाश्यावर : -

इथे येण्यासाठी मध्य रेल्वेच्या अंबरनाथ, बदलापूर, कर्जत किंवा खोपोली यापैकी लोकलचा पर्याय आहे. अंबरनाथ पूर्वेला उतरुन रिक्षाने देवळापर्यंत जाता येईल.
आम्ही गेलो ती वेळ नेमकी दुपारची तीन साडेतीनची होती. देवानेही वामकुक्षी घेतली असा कदाचित भक्तजनांचा समज झाला असल्याने तिथली दोन चार टाळकी आणि सुरक्षारक्षक वगळता शुकशुकाट होता. ;)
मंदिराची बांधणी हेमाडपंती शैलीची आहे. बर्याचदा याचा उल्लेख 'हेमाडपंथी' होतो, ते हेमाडपंती असं असायला हवं. हेमाद्री पंडित अथवा हेमाडपंत जे देवगिरीच्या यादवांच्या काळात वास्तुविशारद होते, त्यांनी शोध लावलेली शैली म्हणजे हेमाडपंती शैली. ज्यात मुख्यत्त्वेकरुन दगड, व चुना यांचा बांधकामात वापर होत असे.
अशी माहिती मिळते की हे मंदिर शके ९८२ किंवा इ.स. १०६० मध्ये शिलाहार राजा महामंडलेश्वर ममवाणी राजदेव यांनी बांधलं आणि मंदिराचा इतिहास सुमारे तेराशे वर्षांपूर्वीचा आहे. पुरातत्त्व विभाग व केंद्र सरकारने हे मंदिर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे.
हा देवळाबाहेरचा नंदी, खरंतर दोन नंदी आहेत पण एकाचाच जवळून फोटो घेता आला.

खालच्या फोटोत दोन्ही नंदी.

हा देवळाचा गाभारा. गाभार्यातल्या दोन तीन फोटोंपैकी हाच एक शिल्लक राह्यला. कारण गाभार्यात फोटो काढतोय म्हणताना रखवालदार मागोमाग आला. आम्ही गाभार्यातले एकदोन फोटो त्याच्यादेखत डिलीट केले तेव्हा त्याच्या मनाची शांती झाली. असो.

नंदी परत एकदा

आता पुढचे काही फोटु हे देवळाबाहेरचं नक्षीकाम दाखवतात.

देवळाच्या मागील भाग

ही गणेशमूर्ती....

हा बहुधा नृत्य गणेश असावा.

त्यात शिवपार्वती विवाहाची पण काही दृश्य आहेत..हे बहुतेक त्या विवाहातल्या आमंत्रितांपैकी कोणीतरी...

या नर्तकी...अप्सरा..यांचे अलंकार, केशभूषा ज्या बारकाईने कोरलेत त्याचं कौतुक करावं तितकं कमी.

हे कोरीव खांब ..

आदिमायेचं रौद्ररुप !!

ही मूर्ती कसली असावी याचा अंदाज बांधणं कठीण होत होतं, शिवपार्वती म्हणावं तर आणखी दोन मुखं कोरलेली दिसत होती. कदाचित ब्रम्हदेवाची असावी. पण अशी सपत्नीक मूर्ती कधी पाह्यली नाही म्हणून कळत नाहीये काय ते.

आणखी एक अप्सरा....भग्नावस्थेत असली तरी भुरळ पाडेल अशी.

आणखी एक उत्तम कलाकुसर असलेलं शिल्प

संपूर्ण देऊळ..

खिद्रापूरच्या कोपेश्वराच्या मंदिराशी ह्या मंदिराचे बरेचसे साम्य दिसत आहे. अतिशय अप्रतिम शिल्पकला.
शिलाहार भोज राजांनी महाराष्ट्रात विशेषतः कोकण आणि घाटमाथ्यावर अनेक शिवमंदिरे बांधली. हेमाद्रीपंडित जरी यादवकालातअसला तरी मंदिरनिर्माणाची ही शैली बर्याच आधीपासून प्रचलित होती. चुन्याचा वापर बहुधा होत नसे. खाचा असलेले दगड आणि त्यात अडकणारे उंचवटा असलेले दगड अशीच एकावर एक रचना होत असे.
हेमाडपंती म्हटली जाणारी कित्येक मंदिरं हजार वर्षाहून जुनी आहेत, म्हणजे हेमाडपंतांच्या दोन्-चारशे वर्षे आधीची.
अवांतर १ :- शिलाहारांनी नुसती मंदिरे बांधली असे नाही तर पन्हाळगडा सारखा भव्य दिव्य किल्लाही बांधलाय.
अवांतर २ :- अंबरनाथचे पांडवकालीन शिल्प्/मंदिर वगैरे म्हणतात ते हेच का?
अवांतर३ :- आपल्याकडे नक्की काय आणि किती पांडवकालिन आहे? परवा रायगडाला जाताना पाली ह्या ठिकाणीलेणी दिसली; तीही म्हणे पांडवकालीन आहेत.
अवांतर४:- ह्या मंदिरावरून भुलेश्वर ची काही छायाचित्रे पाहिली होती मिपावरच ५०फक्त ह्यांच्या धाग्यावर, त्यांची आठवण झाली; राजेंचा धागा होता १०० वर्षांचा त्रिकोण्-द्वारसमुद्र-होयसळ सत्तेबद्द्लचा, तिथलीही काही शिल्पे अशीच वाटली. उपक्रमावर ऐहोळे आणि बदामी ह्याविषयी चंद्रशेखर ह्यांचा धागा होता, चाल्लुक्यांनी केलेल्या वास्तुरचनांबद्द्ल तेही दूरून पाहून असेच वाटत होते. परवा महाबळेश्वरात एका कोअपर्यात ओस पडलेले कृष्णामाइचे मंदिर(पंचगंगा मंदिर नव्हे;ते वेगळे) होते, तेही बरेचसे असेच होते.
अवांतर १ :- शिलाहारांनी नुसती मंदिरे बांधली असे नाही तर पन्हाळगडा सारखा भव्य दिव्य किल्लाही बांधलाय.शिलाहारांनी पन्हाळाच नव्हे तर चंदन-वंदन, वैराटगड, कमळगड, पांडवगड, केंजळगड, कल्याणगड असे किल्लेही बांधलेत.
अवांतर २ :- अंबरनाथचे पांडवकालीन शिल्प्/मंदिर वगैरे म्हणतात ते हेच का?हेच ते. जे जे भव्य दिव्य ते पांडवांनीच बांधलेले आहे असे म्हणण्याची येथे प्रथाच पडली आहे.
अवांतर३ :- आपल्याकडे नक्की काय आणि किती पांडवकालिन आहे? परवा रायगडाला जाताना पाली ह्या ठिकाणीलेणी दिसली; तीही म्हणे पांडवकालीन आहेत.प्रत्य़क्ष बघायला जाता पांडवकालीन काहीही नाही. महाराष्ट्रातील वास्तूंचा ज्ञात इतिहास सातवाहनांपासून सुरु होतो. म्हणजे साधारण २२०० वर्षांपासून. रायगडाजवळच्या गांधारपाल्याची लेणी बौद्ध लेणी आहेत. २००० वर्षे जुनी इतकी.
अवांतर४:- ह्या मंदिरावरून भुलेश्वर ची काही छायाचित्रे पाहिली होती मिपावरच ५०फक्त ह्यांच्या धाग्यावर,भुलेश्वरची शिल्पकला साधारण अशीच आहे. एकूणात ह्या मंदिरांवर दाक्षिणात्य शैलीची छाप आहे. खुद्द जुने महाबळेश्वराच्या मंदिराजवळही थोडेसे आडबाजूला शिल्पकलेने समृद्द असलेले अजून एक शिवमंदिर आहे तेही शिलाहारांनीच बांधलेले आहे. अमृतेश्वर, नागेश्वर, कुकडेश्वर, हरिश्चंद्रेश्वर ही अजून काही शिलाहारकालीन मंदिरे (भोज राजा झंझ याच्या कारकिर्दीत बांधलेली.)
हत्ती आणि माहूत
काम दिलेल्या माणसाने मनसोक्त कोरीवकाम केलेले आहे.
येथे विष्णूचे ९ अवतार कोरलेले आहेत.
कुठे काय कोरले आहे तेही समजत नाही एवढे कमाल मंदिर आहे. पूर्ण प्रदक्षिणा मारायला आम्हाला दोन तास लागले एवढे चवीने बघत, फोटो काढत, अर्थ लावत आमची स्वारी चालली होती.
वालधुनी नदीच्या काठावरील, हेमाडपंती शैलीतील हे मंदिर सन १०२२ ते १०६० या कालावधीमध्ये बांधून पूर्ण झाले. शिलाहार घराण्यातील छित्तराज याने १०२२ ते ३५ या काळात हे मंदिर बांधण्यास सुरुवात केली. त्याचा धाकटा भाऊ माम्वाणी राजाच्या काळात सन १०६०मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. हे मंदिर वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना समजले जाते.
मंदिराचे प्रमुख प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख असून त्याशिवाय आणखी दोन प्रवेशद्वारे आहेत. मंदिराच्या प्रवेशदाराजवळ एक शिलालेख आहे. रॉयल एशियाटिक सोसायटीच्या एका खंडात इ. स. १०६०च्या शिलालेखाचा उल्लेख आहे. मंदिराचे गर्भागृह हे सभामंडपापेक्षा थोडे खोलगट जागी आहे. छत व कळस यामध्ये पोकळी ठेवलेली आहे. कोनात जोडलेल्या गाभाऱ्यामुळे ऊन-सावल्यांचे वेधक दृश्य पाहायला मिळते. मंदिरासमोरील नंदीमंडप व संरक्षक भिंत अस्तित्वात नाही.
अंबरेश्वर मंदिर :- ( Ambareshwar Mandir)
मुंबई उपनगरातील अंबरनाथ येथे असलेले अंबरेश्वर मंदिर हे एक प्राचीन आणि भारतीय शिल्प्कारीतेचा एक उत्तम नमुना आहे. हे मंदिर बघायचा योग आज आला आणि इतके वर्ष ह्या ठिकाणी का आलो नाही हा प्रश्न पडला इतकं अप्रतिम मंदिर आहे. मंदिर परिसर स्वच्छ आणि आवरलेला बघून खरच आनंद वाटला. मंदिराची देखरेख करण्याऱ्या समितीचे मनपासून आभार.
मंदिराचे बांधकाम साधारण शके
९८२ इतके पुरातन आहे. शिलाहार राजा चीत्तारजा ह्याने ह्या अप्रतिम मंदिराचे
बांधकाम केले असून त्याचा मुलगा राजा महामंडलेश्वर माम्बानी ह्याने १०६० रोजी
मंदिराची पुनर्बांधणी केली असे मानले जाते. हेमाडपंथी बांधकाम पद्धतीने मंदिराची
बांधणी केलेली आहे.
काळ्या दगडात बांधलेल्या ह्या मंदिरात अनेक देवी देवतांची
शिल्पे बघायला मिळतात. लक्ष्मीची मूर्ती, शिवलिंग, शंकराची मूर्ती ,पार्वती, नरमुंडधारी महाकाली, शंकर पार्वती विवाह, हंसा वर आरूढ ब्रम्हदेव, वराहरुढ विष्णू ,ऊजव्या सोंडेचा गणपती, त्याच बरोबर विविध नृत्यांचे आविष्कार व काही शृगांरिक कामशिल्पे कोरलेली दिसतात. मंदिराला एकूण तीन
दरवाजे आहेत आणि मंदिरा चा प्रमुख दरवाजा हा पश्चिमेला आहे.
मंदिराच्या दरवाजात
दोन नंदी आहेत त्यातला खाली असलेला नंदी हा मंदिरा इतका प्राचीन आहे तर चौथऱ्यावर
स्थापित नंदी हा अलीकडचा आहे. तो कोणी नवस केल्यावर मंदिराला दान केला असं तिथे
विचारणा केल्यावर कळलं. मंदिराच्या मागच्या बाजूला एक पाण्याच्या वाटी सारखी दगडी
वाटी दिसते तिथून शंकराची पिंड सरळ दिसायची असं समजलं पण सध्या ते दर्शन बंद
करण्यात आलेलं आहे.
मंदिराचे कोरीव काम हे
खरोखरीच अप्रतिम आहे अर्थात दगडाची जी झीज होते ती झालेली आहे. हे मंदिर सुद्धा इंग्रजांच्या काळात कोणा एका
इंग्रजाला सापडलं आणि परत ते वावरत आलं असं समजलं. मंदिराचा गाभारा हा जमिनीपेक्षा
खाली असल्याने छोट्याश्या दरवाजातून १०-१२ पाहिऱ्या उतरून मग शिवलिंगापर्यंत पोचता
येते. दोन नंदी प्रमाणे मंदिरात शिवलिंग
सुद्धा दोन आहेत. त्यातले एक शिवलिंग काळ्या रंगाचे आहे जे स्वयंभू आहे तर दुसरे
शिवलिंग गारगोटीचे आहे. गाभाऱ्यात बरून सूर्यप्रकाश व हवा यायला झरोका आहे. आणि
गाभाऱ्यात काही चिमण्यांनी आपली घरटी सुद्धा मांडली आहेत. मंदिरात असलेले चार खांब
आणि छतावरील कोरलेली झुंबर खरोखर आपलं लक्ष लगेच वेधून घेतात .
मंदिरा शेजारी बांधलेला तलाव आहे आणि त्यात उन्हाळात ही पाणी बघायला मिळतं. ह्या छोट्या तलावात मासे कासवं सोडलीली आहेत. हा तलाव देखील दगडात कोरून काढला असून पायऱ्या तसेच चारी कोपऱ्यात शिल्प कोरलेली आहेत.
मलंग गडाच्या पायथ्याशी उगम पावणारी वालधुनी नदी मंदिराला लागुनच वाहते. पण उन्हाळ्यात मात्र नदीचे पात्र फारच रोडावते आणि त्यात नदीत सोडलेल्या गटारीमुळे असेल अदाचीत पण नदीचे पाणी अतिशय खराब दिसते. नदीच्या मध्ये सुद्धा एक शिवलिंग आणि त्याच्या भोवती एक भगवा झेंडा रोवलेला दिसतो. अंबरेश्वर मंदिरामुळेच ह्या गावाला अंबरनाथ असं नाव पडलं असावं असं वाटत.
इथे पोचण्यासाठी अंबरनाथ पर्यंत लोकलने जाऊन , अंबरनाथ पूर्व बाजूला शेअर रिक्षा उपलब्ध आहेत, साधारण १० रुपये प्रती प्रवासी दराने ह्या रिक्षा आपल्याला मंदिरापर्यंत नेतात. मंदिर साधारण २ कि मी लांब आहे त्यामुळे वेळ असल्यास चालत २५ मिनिटात मंदिरापर्यंत पोचता येते

इथे येण्यासाठी मध्य रेल्वेच्या अंबरनाथ, बदलापूर, कर्जत किंवा खोपोली यापैकी लोकलचा पर्याय आहे. अंबरनाथ पूर्वेला उतरुन रिक्षाने देवळापर्यंत जाता येईल.
आम्ही गेलो ती वेळ नेमकी दुपारची तीन साडेतीनची होती. देवानेही वामकुक्षी घेतली असा कदाचित भक्तजनांचा समज झाला असल्याने तिथली दोन चार टाळकी आणि सुरक्षारक्षक वगळता शुकशुकाट होता. ;)
मंदिराची बांधणी हेमाडपंती शैलीची आहे. बर्याचदा याचा उल्लेख 'हेमाडपंथी' होतो, ते हेमाडपंती असं असायला हवं. हेमाद्री पंडित अथवा हेमाडपंत जे देवगिरीच्या यादवांच्या काळात वास्तुविशारद होते, त्यांनी शोध लावलेली शैली म्हणजे हेमाडपंती शैली. ज्यात मुख्यत्त्वेकरुन दगड, व चुना यांचा बांधकामात वापर होत असे.
अशी माहिती मिळते की हे मंदिर शके ९८२ किंवा इ.स. १०६० मध्ये शिलाहार राजा महामंडलेश्वर ममवाणी राजदेव यांनी बांधलं आणि मंदिराचा इतिहास सुमारे तेराशे वर्षांपूर्वीचा आहे. पुरातत्त्व विभाग व केंद्र सरकारने हे मंदिर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे.
हा देवळाबाहेरचा नंदी, खरंतर दोन नंदी आहेत पण एकाचाच जवळून फोटो घेता आला.

खालच्या फोटोत दोन्ही नंदी.

हा देवळाचा गाभारा. गाभार्यातल्या दोन तीन फोटोंपैकी हाच एक शिल्लक राह्यला. कारण गाभार्यात फोटो काढतोय म्हणताना रखवालदार मागोमाग आला. आम्ही गाभार्यातले एकदोन फोटो त्याच्यादेखत डिलीट केले तेव्हा त्याच्या मनाची शांती झाली. असो.

नंदी परत एकदा

आता पुढचे काही फोटु हे देवळाबाहेरचं नक्षीकाम दाखवतात.

देवळाच्या मागील भाग

ही गणेशमूर्ती....

हा बहुधा नृत्य गणेश असावा.

त्यात शिवपार्वती विवाहाची पण काही दृश्य आहेत..हे बहुतेक त्या विवाहातल्या आमंत्रितांपैकी कोणीतरी...

या नर्तकी...अप्सरा..यांचे अलंकार, केशभूषा ज्या बारकाईने कोरलेत त्याचं कौतुक करावं तितकं कमी.

हे कोरीव खांब ..

आदिमायेचं रौद्ररुप !!

ही मूर्ती कसली असावी याचा अंदाज बांधणं कठीण होत होतं, शिवपार्वती म्हणावं तर आणखी दोन मुखं कोरलेली दिसत होती. कदाचित ब्रम्हदेवाची असावी. पण अशी सपत्नीक मूर्ती कधी पाह्यली नाही म्हणून कळत नाहीये काय ते.

आणखी एक अप्सरा....भग्नावस्थेत असली तरी भुरळ पाडेल अशी.

आणखी एक उत्तम कलाकुसर असलेलं शिल्प

संपूर्ण देऊळ..

खिद्रापूरच्या कोपेश्वराच्या मंदिराशी ह्या मंदिराचे बरेचसे साम्य दिसत आहे. अतिशय अप्रतिम शिल्पकला.
शिलाहार भोज राजांनी महाराष्ट्रात विशेषतः कोकण आणि घाटमाथ्यावर अनेक शिवमंदिरे बांधली. हेमाद्रीपंडित जरी यादवकालातअसला तरी मंदिरनिर्माणाची ही शैली बर्याच आधीपासून प्रचलित होती. चुन्याचा वापर बहुधा होत नसे. खाचा असलेले दगड आणि त्यात अडकणारे उंचवटा असलेले दगड अशीच एकावर एक रचना होत असे.
हेमाडपंती म्हटली जाणारी कित्येक मंदिरं हजार वर्षाहून जुनी आहेत, म्हणजे हेमाडपंतांच्या दोन्-चारशे वर्षे आधीची.
अवांतर १ :- शिलाहारांनी नुसती मंदिरे बांधली असे नाही तर पन्हाळगडा सारखा भव्य दिव्य किल्लाही बांधलाय.
अवांतर २ :- अंबरनाथचे पांडवकालीन शिल्प्/मंदिर वगैरे म्हणतात ते हेच का?
अवांतर३ :- आपल्याकडे नक्की काय आणि किती पांडवकालिन आहे? परवा रायगडाला जाताना पाली ह्या ठिकाणीलेणी दिसली; तीही म्हणे पांडवकालीन आहेत.
अवांतर४:- ह्या मंदिरावरून भुलेश्वर ची काही छायाचित्रे पाहिली होती मिपावरच ५०फक्त ह्यांच्या धाग्यावर, त्यांची आठवण झाली; राजेंचा धागा होता १०० वर्षांचा त्रिकोण्-द्वारसमुद्र-होयसळ सत्तेबद्द्लचा, तिथलीही काही शिल्पे अशीच वाटली. उपक्रमावर ऐहोळे आणि बदामी ह्याविषयी चंद्रशेखर ह्यांचा धागा होता, चाल्लुक्यांनी केलेल्या वास्तुरचनांबद्द्ल तेही दूरून पाहून असेच वाटत होते. परवा महाबळेश्वरात एका कोअपर्यात ओस पडलेले कृष्णामाइचे मंदिर(पंचगंगा मंदिर नव्हे;ते वेगळे) होते, तेही बरेचसे असेच होते.
अवांतर १ :- शिलाहारांनी नुसती मंदिरे बांधली असे नाही तर पन्हाळगडा सारखा भव्य दिव्य किल्लाही बांधलाय.शिलाहारांनी पन्हाळाच नव्हे तर चंदन-वंदन, वैराटगड, कमळगड, पांडवगड, केंजळगड, कल्याणगड असे किल्लेही बांधलेत.
अवांतर २ :- अंबरनाथचे पांडवकालीन शिल्प्/मंदिर वगैरे म्हणतात ते हेच का?हेच ते. जे जे भव्य दिव्य ते पांडवांनीच बांधलेले आहे असे म्हणण्याची येथे प्रथाच पडली आहे.
अवांतर३ :- आपल्याकडे नक्की काय आणि किती पांडवकालिन आहे? परवा रायगडाला जाताना पाली ह्या ठिकाणीलेणी दिसली; तीही म्हणे पांडवकालीन आहेत.प्रत्य़क्ष बघायला जाता पांडवकालीन काहीही नाही. महाराष्ट्रातील वास्तूंचा ज्ञात इतिहास सातवाहनांपासून सुरु होतो. म्हणजे साधारण २२०० वर्षांपासून. रायगडाजवळच्या गांधारपाल्याची लेणी बौद्ध लेणी आहेत. २००० वर्षे जुनी इतकी.
अवांतर४:- ह्या मंदिरावरून भुलेश्वर ची काही छायाचित्रे पाहिली होती मिपावरच ५०फक्त ह्यांच्या धाग्यावर,भुलेश्वरची शिल्पकला साधारण अशीच आहे. एकूणात ह्या मंदिरांवर दाक्षिणात्य शैलीची छाप आहे. खुद्द जुने महाबळेश्वराच्या मंदिराजवळही थोडेसे आडबाजूला शिल्पकलेने समृद्द असलेले अजून एक शिवमंदिर आहे तेही शिलाहारांनीच बांधलेले आहे. अमृतेश्वर, नागेश्वर, कुकडेश्वर, हरिश्चंद्रेश्वर ही अजून काही शिलाहारकालीन मंदिरे (भोज राजा झंझ याच्या कारकिर्दीत बांधलेली.)
Ambernath Shiva Temple
Not very far from Mumbai there is a marvelous 11th century temple of Lord Shiva. Very few people know about it and navigating to this place without gps can be tricky. But the grand monument is mostly intact with its rock carved sculptures and structural grace .. therefore, a must visit for heritage enthusiasts. Another unconfirmed trivia about this temple is it was visited by the great Guru Nanak in 1415 CE.

This temple was built by Mahamandaleswara Chittaraj in the 11th century. He belonged to the Silahara dynasty … Chittaraj’s younger brother Mummuniraj completed the temple in 1060 CE. The origins of this temple can be traced due to a stone inscription inside.
श्री अंबरनाथ देवकुला समुद्धारित
It is said that there was a swayambhu Shiva-linga situated next to the river stream and the kings decided to build this black stone temple over it. Therefore to enter the garbha-gruha one has to climb down about 9 stairs and the temple is west facing in direction which is quite rare. This is a temple built in a Bhumija structure and since this temple goes a few years before the similar temple in Udaipur MP … it is important as the first documented example of a bhumija temple.

Garbhabruha and mandapa are like to stars coming together separated by free space known as antaral which is in pragriv form here. The wall has beautiful projections and recesses. There are about 73 sculputed statues on the walls with some special improvisations in gods and godesses which unfortunately did not notice thanks to my ignorance in iconography (this demands another visit) and Sur-sundari nymphs too. The vertical decorations on the shikhara are known as latas and this temple is built in the saptarath-saptabhum-bhumij-prasad structure. Since this is built by a king it could be categorized as Asiddhyatan temple. The element I would love to design for my house was figurines on the rectangular faces on the columns

The pillars are ornately carved and have some similarities with the pillars of the Modhera sun temple built by the Solanki kings … I am sharing a photo from my trip to Modhera in 2008 … but that full story in another blog post.

Modhera Sun temple, Gujarat
https://chinmaye.com/2017/06/13/ambernath-shiva-temple/
मुंबईजवळच्या अंबरनाथ मंदिराची गोष्ट जे हजार वर्षांपूर्वी आम्रनाथ होतं
अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर

संपूर्ण जगाचा सांस्कृतिक वारसा म्हणून युनेस्कोने United Nations Educational, Scientific and Cultural Organization (UNESCO) जाहीर
केलेल्या २१८ कलासंपन्न असलेल्या वास्तूंपैकी अंबरनाथ चे हे एक प्राचीन
मंदिर. १९९९ साली युनेस्कोने या मंदिराला दर्जा दिला आहे. हे प्राचिन
शिवमंदिर शिलाहार छित्तराज याने इ.स. १०२० मध्ये बांधण्यास प्रारंभ केला व
त्यानंतर त्यांचा मुलगा मुण्मणिराजाच्या कारकीर्दीत १० जुलै १०६० रोजी
बांधकाम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याची नोंद इतिहास दरबारी आढळते. मंदिर
बांधण्यासाठी ४० वर्षे लागली. काही पौराणिक कथांमध्ये हे मंदिर पांडवकालीन
असून हे मंदिर ५ पांडवांनी बांधल्याचे बोलले जाते. शिलाहार राजे हे
शिवभक्त होते. त्यांनी अनेक मंदिरे उभारली. काही काळाच्या पडद्याआड गेली तर
काही मंदिरे आजही त्यांचं अस्थित्व टिकवून आहेत. अंबरनाथ चे मंदिर त्या
पैकीच एक, अंबरनाथचे हे भूमिज शैलीतील मंदिर सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या
पर्यटकांसाठी पाहण्या सारखे आहे. तसेच देशभरातील लाखो शिवभक्तांसाठी हे
श्रद्धेचे ठिकाण आहे, मंदिरातील शिवलिंगाला अंबरेश्वर असे म्हंटले
जाते, याच नावावरून अंबरनाथ हे नाव शहराला पडल्याचे बोलले जाते. 

मंदिराबाहेरील
शिल्पे अनेक हिंदु देवदेवतांच्या दगडी शिल्पाचे कोरीवकाम आहे. या
शिल्पांमध्ये गरुडासन विष्णू, शिव, विवाहापूवीर्ची पार्वती, शिव-पार्वती
विवाह सोहळा, त्रिपुरा वध मूर्ती, पार्वती चामुंडा, नृत्यांगना, द्वारपाल,
विष्णू, नटराज, कालीमाता, गणेश नृत्यमूर्ती, नृसिंह अवताराची मूर्ती,
महिषासुर र्मदिनी या मूर्ती अत्यंत कुशलतेने दगडातून साकारलेल्या आहे.
विशेष म्हणजे दगडी कामातून त्या काळची वस्त्रे, आभूषणे आणि वेशभूषाही
साकारलेल्या आहेत. या मूर्तींमध्ये एक अतिशय सुरेख अशी कामदेवाची मूर्ती
आहे. ह्या मूर्तीला आठ हात आहेत. तिला त्रिमुखी मूर्ती म्हणतात. हे बहुधा
शंकर पार्वतीचेच शिल्प असावे. कारण मूर्तीच्या मांडीवर एक स्त्री प्रतिमा
कोरली आहे. मंदिर प्रदक्षिणा करताना मंदिराच्या भव्यपण लक्षात येते.
मंदिराच्या उत्तर दिशेला एक छोटे बांधकाम केलेले आहे. त्यात शिवलिंगासह
पार्वतीची मूर्ती आहे. या मंदिरात ब्रह्मा, शिव, सूर्य, विष्णू या देवता
एकाच मूर्तीत शिल्पकाराने साकारलेले आहेत. मंदिराच्या भिंतीवर शिल्पकारांनी
साकारलेल्या अनेक भव्य मूर्ती पाहून क्षणभर त्या आपल्याकडे पाहत असल्याचा
भासही होतो. गेली ९०० वर्षे या मूर्ती आपले मौन सांभाळून आहेत. पौराणिक
कथा, नृत्यात मग्न असलेली शिल्पे, हातात आयुधे घेतलेली शिल्पे असी
शिल्पकृती येथे आपणास पहावयास मिळते. मंदिराच्या बाहेर व आतमध्ये
देवतांच्या मूर्ती कोरण्यात आल्यामुळे मंदिर सुंदर वाटते. मंदिराचा कळस हा
अर्धवट च आहे त्या मागे हि अनेक काल्पनिक कथा आहेत. काही म्हणतात परकीय
आक्रमकानीं मंदिराचा कळस तोडला तर काही म्हणतात पांडवांनी सकाळ झाली म्हणून
मंदिर बांधकाम अर्धवट सोडले.
महाराष्ट्रात
अनेक ठिकाणी हेमांडपंती शैलीची मंदिरे बघायला मिळतात. त्यालाच 'भूमीज'
स्थापत्य शैली असेही म्हणतात. सर्वच पुरातन मंदिरांना 'हेमांडपंती' शैलीची
मंदिरे म्हणण्याच्या सवयच लोकांना लागून राहिलेली आहे. जुने मंदिर दिसले की
हेमांडपंती मंदिर असल्याचे छातीठोकपणे लोकं सांगतात. देवगिरीच्या
यादवांच्या काळातील वास्तुविशारद हेमाद्री पंडित अथवा हेमांडपंत यांनी
मंदिर बांधण्याची एक विशिष्ट पद्धत निर्माण केली होती. त्या पद्धतीला
हेमांडपंती शैली म्हणतात. चुन्याचा दर्जा न भरता घडीव दगडांवर दगड रचून
तयार केलेली वास्तू हे हेमाडपंती मंदिरांचे वैशिष्ट्य मानले जाते.
अंबरनाथचे हे मंदिर हेमांडपंती पद्धतीने बांधलेले असून कोकणात
आढळणाऱ्या काळ्या दगडाला आकार देऊन ते कोरलेले आह़े.
अंबरनाथ
च्या या प्राचीन शिवमंदिर परिसरात महाशिवरात्री ला मोठीजत्रा भरते लाखो
भाविक त्या दिवशी अंबरेश्वर शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून येथे
येत असतात, हि जत्रा संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी जत्रा असल्याचे
बोलले जाते. तसेच श्रावणात येथे अनेक भाविक दूरदूर हुन दर्शन साठी येत
असतात. आम्ही पण काही लहान असताना श्रावण महिन्यात दार सोमवारी पहाटे २-३
वाजता दर्शन घ्या साठी जात असे आमच्या कानसई मधील वरच्या आळीचे सर्व मिळून
आम्ही पहाटे शंकराचे गाणी/भजन बोलत पाऊसात भिजत जायचो तेव्हा शिवमंदिरात.
बाल विकस मंदिर शाळेत १ ली २री ला असताना आमची वार्षिक सहल पण कानसई
ते शिवमंदिर अशी असायची :D पण एकाच खंत वाटते कि एवढा मोठा जागतिक
सांस्कृतिक वारसा माझ्या शहरात असून वर्षातून केवळ ४-५ वेळच जण व्हायचं
मंदिरात... 
शिवमंदिर
आमच्या घर पासून फार लांब नाही तरी ज्यास्त जाण होत नसायचं आणि गेलो तरी
ज्यास्त जवळून दर्शन घ्यायला मिळत नसे पण २०११ साली माननीय राजसाहेबांच्या
वाढदिवसा निमित्त श्री. कुणाल सुभाष भोईर KB (तत्कालीन मनसे अंबरनाथ
विधानसभा क्षेत्र अध्यक्ष) यांनी शिवमंदिरात राजसाहेबाना दीर्घायुष्य
लाभण्यासाठी एक पूजेचे आयोजन केले होते, तेव्हा प्रत्येक्षात जवळून
अंबरेश्वर महादेवाची पूजा करण्याची संधी मिळाली. धन्यवाद KB... 
काळाच्या
ओघात म्हणा किंवा परकीय आक्रमणांमुळे म्हणा मंदिराच्या अनेक मूर्ती आज
भग्नावस्थेत आहेत. ऊन, वारा आणि पाऊसामुळे या मूर्ती झिजल्या आहेत. पण तरी
सुद्धा ज्या मूर्ती वाचल्या आहेत त्या मूर्तीचं शिल्पकलेचे अद्भूत दृश्य
पाहून मन सुखावते. या मंदिरावर कोरलेली अनेक शिल्पे आजही या मंदिराच्या
वैभवाची साक्ष देत आहेत. मंदिरात श्रावणात मोठी गर्दी असते. राज्यातील
विविध भागांतून दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या रांगा येथे लागतात. आपणही
एकदातरी या अश्या शिल्पकलेचा उत्कृष्ट उदाहरण असलेल्या मंदिरास नक्की अवश्य भेट द्या.. + 974 - 555 765 11

http://myblogtshekhars-shivmandirambernath.blogspot.com/2016/08/blog-post.html
AMBERNATH SHIV TEMPLE, INDIA - zerobeyond
Ancient architecture in India is very rich in heritage. Structures as ancient as the 11th Century is truly unique! Ambernath Shiv Temple may have been a little dilapidated to withstand historical climatic onslaught in the last 10 Centuries, but the marvel still stands like a true testament of extraordinary architectural endeavour.

The Ambernath Shiv Temple was built during the 1060 AD in classical style by Chittaraja, King of Shi’erahala. Later on, the work was completed his son Mumunni. The temple is truly an out-of-this-world marvel, because it was built by carving a single large boulder.

The architecture of this temple is Hemadpanti style. The carvings of the outer wall are using black rock and are very exquisite.

As per UNESCO records, the first-ever photos of the temple was taken by a British named Henry Cousens. Around 1850, the then director of the ASI – Archaeological Survey of India had also taken photos of the temple. The dilapidated state was visible in these photographs. Needless to say, trees grew on the walls of the temple. The ASI carried out detailed documentation as one of its pilot projects. The temple was rediscovered by the people, having lost for nearly 800 years.

Each year, during Shivratri (Lord Shiva’s marriage to Goddess Parvati) devotees flock to Ambernath in millions. The small suburban town of Ambernath becomes the centre of attention of Indians as well as many foreigners.

History speaks about King Shilahara as a vassal of Rashtrakutas in the Konkan region. Towards the south, the mighty Kingdom of Chalukya was renowned. The temple is only a few miles away from the ancient trade route. The route leads to the Deccan Plateau. The structure’s arrangement is in a cross shape indicating an interesting fusion of architectural styles. The influence and characteristics of the Chalukyan kingdom is very much evident.

Above ground, the temple structure is up to 21 meters high. Nandi, the guardian of the main entrance to every Shiv temple is omnipresent. Interestingly, there are the two Nandis from the west porch. The two other porticoes are on the north side and the east side.

The structure’s outer wall is carved with various sculptures. The most unique sculptures are of Hari-Hara-Pitamaha-Surya. It decorates the east wall as the centre of the temple. They represent together as Shiva, Vishnu, Brahma and Surya.

Surrounded by four pillars, the Sabhagruha has a raised central altar and a carved Trabeate dome surmounted it. In total, 14 columns of decorative Ghatakam and detailed Dhaarvahakas (load-bearing supports) decorate the Sabhagruha. While the ceiling rises to 14 feet, the height of the pillars ranges from 10 to 12 feet.

It is interesting to note that the sanctum sanctorum (Garbhagruha) is an underground room, where two Shiva Lingas have been built. The depth of the underground area can be gauged by the 20 steps down from the top as a little more than 10 feet. From outside, the temple looks solid and is an orderly square, with a roof high above it.

The exterior wall have been sculpted on the stepped and faceted for identification. In total, nearly 250 elephants called ‘Gaj-thar’ cover the temple. The upstairs houses around 70 Shrungara sculpture Muthuna.

Indian mythology believes that the temple was built by the Pandavas during their exile period. Ambernath Shiv Temple is the oldest temple in India. Ambernath suburb is 60 km away from Mumbai city by local train.

The historic 11th Century Ambernath Shiv Temple is now a UNESCO heritage structure. The temple is also known as Ambreshwar Shiva Temple. Locally, it is popular as Puratana Shivalaya. The ruins of the temple still speak about great Indian architecture.

The ASI – Archaeological Survey of India has completely transformed the temple premise with beautiful landscaping and keeping the area restricted as a tourist place to safeguard the ancient beauty.

Apart from spectacular Indian architecture, Ambernath Shiv Temple is also an engineering marvel for being a jointless structural beauty!
Image Courtesy: Johnny D

No comments:
Post a Comment