मुख्य मंदिराच्या डावीकडील २ मंदिरे अत्यंत भग्नावस्थेत आहेत. हा जर पंचायतन समूह असेल तर उजवीकडील २ मंदिरांचा मागमूसही दिसत नाही. आवारातील १ ल्या मंदिराचं छप्पर व गाभारा साफ ढासळलेला आहे. मात्र शाबूत असलेल्या खांबांवरील व तुळईवरील कोरीव काम गतवैभवाची साक्ष देतात.
यातील मंदीर क्र. १ व ४ हि मंदीरे भुमिज आहेत. या मंदीराची शिखरे अस्तित्वात नसली तरी काही प्रमाणात शिल्ल्क आहेत. हि दोन्ही मंदीरे एकाच काळातील म्हणजे इ.स. अकराव्या शतकाच्या उत्तरार्धातील आहेत. या दोन्ही मंदीरात एकच फरक आहे, तो म्हणजे क्रमांक ४ च्या मंदीराला एकच गर्भगृह आहे, तर क्र. १ च्या मंदीर त्रिदल गर्भगुह पध्दतीचे आहे.

मंदीर क्र. १ हे पश्चिमाभिमुख असून हे मंदीर अंबरनाथच्या मंदीरासारखेच आहे. मात्र याचा आकार अंबरनाथच्या मंदीरापेक्षा लहान आहे. बाजुच्या दोन अर्धमंडपाएवजी त्याजागी दोन गर्भगृहे आहेत. सर्व म्हणजे तिन्ही गर्भगृहांचा तलविन्यास पंचरथ प्रकारचा आहे. मुखमंडप, चौरस नंडप ( ५.१८ मीटर ५.१८ मीटर ) चौरस मंडपाला लागून तीन अंतराळे आणि त्याच्या मागे गर्भगृह असा एकुण तलविन्यास आहे. बाजुच्या दोन गर्भगृहाची अंतराळे मुख्य गर्भगृहापेक्षा लहान आहेत. मुख्य गर्भगृहात शिवलिंग आहे.इतर दोन गर्भगृहाच्या द्वारशाखेवरील मुर्ती आणि उत्तरांगावरील मुर्ती विचारात घेता हि गर्भगृहे विष्णु आणि शक्तीच्या स्वरुपाची असावीत असे दिसते. या मंदीराचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे मुख्य गर्भगृहाच्या मागील भिंतीत असलेले देवकोष्ट. हे मंदीर शिवाचे असल्यामुळे या देवकोष्टातील मुर्ती शिवाची असावी.
मंडपामध्ये चतुष्की असून या चतुष्कीवर घुमटाकार छत आहे. या घुमटावर शिखराकडे लहान होत जाणारी वर्तुळे आहेत. स्तंभ अंबरनाथच्या मंदीरासारखे आहेत. चौरसाकृती तळखडा, चौरसाकृती खांब, त्यावर अष्टकोनी व वर्तुळाकृती घटक, वर पीठाकृती शीर्ष आणि त्याच्याही वर कीचकहस्त असे त्याचे स्वरुप आहे.
गजथराचा अभाव हि बाब सोडली तर पीठ अंबरनाथच्या मंदीरासारखेच आहे. जंघा भागावर नटेश्वर, भैरव, दुर्गा, नरसिंह, त्रिविक्रम आणि पार्वती यांच्या मुर्ती आहेत. या मुर्तिंमुळे बाजुच्या दोन गर्भगृहामध्ये विष्णु आणि शक्तीची मुर्ती असावी या शक्यतेला पृष्टी मिळते. मुख्य गर्भगृहावर चार बाजुला चार लतापट्ट असलेले भुमिज शिखर आहे. शिखराच्या पायाजबळ तीन बाजुस तीन शुरसेनक आहेत.मात्र एका बाबतीत हे मंदीर अंबरनाथच्या मंदीरापेक्षा वेगळे आहे. शिखरावरील शिखर प्रतिकृती या मुख्य शिखराच्याच आहेत. आणि मधूनमधून मनुष्याकृती दाखवल्या आहेत.
पुढच्या व मागच्या भिंतीत म्हणजे मुखमंडपात आणि अंतराळात जाणार्या दोन्ही मार्गाच्या बाजुस प्रत्येकी एक दालन आहे. म्हणजे मंडपाला लागून एकुण दहा दालने आहेत. मुख्य गर्भगृहात आणि मंडपाला लागून असलेल्या विष्णुमुर्तीमुळे विद्वानांनी या मंदीराला 'दशावतार मंदीर' म्हणले आहे. विष्णूचे दहा अवतार या मंदीरात दाखवण्याकरीता या आगळ्यावेगळ्या तलविन्यासाची निर्मिती झाली आहे.

ब्रिटीश कालातील उपलब्ध चित्रानुसार येथे पुर्वी रेखाप्रसाद शिखर होते, येथील एका शिलालेखानुसार कान्हेर या राजाचा युध्दात मृत्यु झाल्याचे समजते. कदाचित कान्हेरदेव या यादव राजा असावा व त्याची पत्नी कानबाई असावी.

मंदीराच्या जवळ एका चौथर्यावर एक वीरगळ दिसते. या वीरगळावरील शिल्पपटात काही ठिकाणी मुर्तीपुजा करताना दाखवली आहे तर काही पटात युध्द प्रसंग दाखवले आहेत. तसेच एक स्त्री योध्दा घोड्यावर बसलेली दाखबलेली आहे. मुख्य म्हणजे यात अश्वदल व गजदल दाखवलेली आहेत. कदाचित हि वीरगळ कानबाईशी निगडीत असावी.


इथेच एक विष्णु मंदीर असून ते नष्ट झाले आहे.मात्र त्याच्या आवारात सध्या शेंदुर लावलेली यज्ञवराहाची मुर्ती दिसते. या मुर्तीवर समुद्रमंथनाचे अंकन केलेले आहे. तसेच येथे जय, विजय यांच्या मुर्ती देखील दिसतात.



मंदीर क्र. १ हे पश्चिमाभिमुख असून हे मंदीर अंबरनाथच्या मंदीरासारखेच आहे. मात्र याचा आकार अंबरनाथच्या मंदीरापेक्षा लहान आहे. बाजुच्या दोन अर्धमंडपाएवजी त्याजागी दोन गर्भगृहे आहेत. सर्व म्हणजे तिन्ही गर्भगृहांचा तलविन्यास पंचरथ प्रकारचा आहे. मुखमंडप, चौरस नंडप ( ५.१८ मीटर ५.१८ मीटर ) चौरस मंडपाला लागून तीन अंतराळे आणि त्याच्या मागे गर्भगृह असा एकुण तलविन्यास आहे. बाजुच्या दोन गर्भगृहाची अंतराळे मुख्य गर्भगृहापेक्षा लहान आहेत. मुख्य गर्भगृहात शिवलिंग आहे.इतर दोन गर्भगृहाच्या द्वारशाखेवरील मुर्ती आणि उत्तरांगावरील मुर्ती विचारात घेता हि गर्भगृहे विष्णु आणि शक्तीच्या स्वरुपाची असावीत असे दिसते. या मंदीराचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे मुख्य गर्भगृहाच्या मागील भिंतीत असलेले देवकोष्ट. हे मंदीर शिवाचे असल्यामुळे या देवकोष्टातील मुर्ती शिवाची असावी.
मंडपामध्ये चतुष्की असून या चतुष्कीवर घुमटाकार छत आहे. या घुमटावर शिखराकडे लहान होत जाणारी वर्तुळे आहेत. स्तंभ अंबरनाथच्या मंदीरासारखे आहेत. चौरसाकृती तळखडा, चौरसाकृती खांब, त्यावर अष्टकोनी व वर्तुळाकृती घटक, वर पीठाकृती शीर्ष आणि त्याच्याही वर कीचकहस्त असे त्याचे स्वरुप आहे.
याच समुहातील मंदीर क्रमांक ५ चा तलविन्यास वेगळा आहे. या मंदीराला मंदीराच्याच रुंदीचा खुला मुखमंडप आहे. त्याच्या बाहेरच्या बाजुची रुंदी आतील बाजुपेक्षा जास्त वाटते. कारण आतील बाजुला दोन कोपर्यावर दोन दालने आहेत. या दालनात प्रवेश मंडपामधून करता येतो. मुखमंडपाच्या मागे मंडप आहे. या मंडपाचा तलविन्यास चौरसाकृती असून त्याच्या बाजुच्या दोन भिंतीमध्ये प्रत्येकी तीन दालने आहेत.
पुढच्या व मागच्या भिंतीत म्हणजे मुखमंडपात आणि अंतराळात जाणार्या दोन्ही मार्गाच्या बाजुस प्रत्येकी एक दालन आहे. म्हणजे मंडपाला लागून एकुण दहा दालने आहेत. मुख्य गर्भगृहात आणि मंडपाला लागून असलेल्या विष्णुमुर्तीमुळे विद्वानांनी या मंदीराला 'दशावतार मंदीर' म्हणले आहे. विष्णूचे दहा अवतार या मंदीरात दाखवण्याकरीता या आगळ्यावेगळ्या तलविन्यासाची निर्मिती झाली आहे.
भामेरकडे वळतांनाच 'बलसाणे २५किमी' ची पाटी बघितल्यावरच डोक्यात ट्युब पेटली होती की, प्राचिन मंदिराचा ठेवा असलेलं धुळे जिल्ह्यांतलं ते हेच गांव, पण आत्तापर्यंत कुठेही वाचनात हे नव्हतं की भामेरपासून बलसाणे इतक्या जवळ आहे. पोटपूजा आटोपून बलसाण्याकडे जाण्याबाबत सगळ्यांचं एकमत झालं होतं. साक्री- नंदुरबार मार्गावर बलसाण्याचा फाटा लागतो. फाट्यापासून ३-४ किमी. आत गांव आहे. मंदिराची चौकशी केल्यावर सगळे जैन मंदिराची माहिती सांगत होते, त्यांवरून जैन मंदिराचे या गांवात बर्यापैकी प्रस्थ असल्याचे जाणवत होते. मात्र आम्ही शंकराच्या मंदिराची माहिती विचारल्यावर 'पुराना मंदिर....'म्हणून ओळखलं जाणारं मंदिर जरा उपेक्षितच असल्याचं लक्षात आलं.गांवातील मुख्य जैन मंदिराजवळून पुढे गेल्यावर गांवाबाहेर एका कुंपण घातलेल्या शेतात हा मंदिरसमुह आहे. गेट उघडंच होतं, त्यांतून आंत शिरून शेताच्या बांधावरुन या समुहापाशी आलो.
मुख्य मंदिराच्या डावीकडील २ मंदिरे अत्यंत भग्नावस्थेत आहेत. हा जर पंचायतन समूह असेल तर उजवीकडील २ मंदिरांचा मागमूसही दिसत नाही. आवारातील १ ल्या मंदिराचं छप्पर व गाभारा साफ ढासळलेला आहे. मात्र शाबूत असलेल्या खांबांवरील व तुळईवरील कोरीव काम गतवैभवाची साक्ष देतात.हे बहुधा पंचायतनातील गणपतीचं मंदिर असावं, कारण मंदिराबाहेरच पोटावरील भाग गायब असलेली गणरायाची भग्न मूर्ती पहायला मिळते, पण अशाही स्थितीतील मूर्तीच्या डाव्या हाताची बोटे, पाय व उंदीर यांच्या घडणीतली सुबकता लक्षात येते.
२ रं मंदिरही छप्पर उडालेल्या स्थितीत आहे. गाभार्यामध्ये देवीची छातीपासून खालचा भाग नाहीशा अवस्थेतील मूर्ती आहे, पण प्रभावळीच्या रचनेवरुन मूळ स्वरुपातील रेखीव मूर्तीची कल्पना येऊ शकते.
गाभार्यातील वरच्या कोपर्यांत किर्तीमुखं कोरलेली आहेत.
संपूर्ण मंदिराचं छप्पर नाहीशा स्थितीत असलं तरी कोरीव खांब, तुळया व एकूण प्रमाणबद्धतेची कल्पना येते.
बाकी २ मंदिरांपेक्षा मुख्य मंदिर बर्यापैकी अवस्थेत आहे. भूमीज शैलीचं शिखर असलेलं हे मंदिर ११ व्या शतकांतलं असावं. भूमीज शिखर स्थापत्त्यशैलीमध्ये, शिखर सुरु होते तिथल्या कोनाड्यापासून ते कळसाच्या भागापर्यंत मध्यभागी चटईसारख्या नक्षीची पट्टी असते व पट्ट्यांमधील जागेत छोट्या शिखरप्रतिकृतींचे थर असतात.
मंदिराच्या बाह्यांगावर सूरसुंदरींची शिल्पे आहेत. ही शिल्पे झिजलेल्या अवस्थेत असली तरी खिळवून ठेवतात.
हा समूह पाहून गेटमधून बाहेर पडल्यावर जवळच एका चौथर्यापाशी विष्णू, गणपती यांची भग्न शिल्पे ओळीने मांडून ठेवलेली दिसली. या गांवात आणखीही मंदिर/ शिल्पं असणार, पण मूळ कार्यक्रमांत अचानकपणे हा शिल्पपसारा शिरल्यामुळे आमच्याकडे वेळ कमी होता व प्रवासाचा पल्ला लांबचा होता, त्यामुळे पुन्हा कधीतरी शांतपणे हे बघायला यायचं ठरवून परतीचा प्रवास धरला. रात्री ९ वा. नासिकला परतलो.












































































No comments:
Post a Comment