“श्री शंभोः शिवजातस्य मुद्राद्यौरिवराजते !
यद् कसेविनी लेखा वर्तते कस्यनो परि !!”
(ही मुद्रा सूर्याच्या प्रभेप्रमाणे शोभते आणि त्या मुद्रेचा आश्रय करणारी लेखासुद्धा कोणावरही सत्ता चालविते.ती ही शिवाजीचा पुत्र शंभूची-संभाजीची मुद्रा प्रकाशित होत आहे.)
सोमेश्वर, काशीविश्वेश्वर मंदीर :-
संगमेश्वरच्या कर्णेश्वर मंदीराजवळ असलेल्या सोमेश्वर आणि काशीविश्वेश्वर हि मंदीरे त्यावर असलेल्या नागर शिखरामुळे उल्लेखनीय आहेत. देवपाली मार्गावरुन कार्तिकस्वामीच्या मंदीराकडे जाताना बाजुच्या शेतामध्ये हि मंदीरे असून ती एकमेकांना लागून आहेत. दोन्ही मंदीरे पुर्वाभिमुख असून नंतरच्या काळातील हेमाडपंती मंदीराप्रमाणे या मंदीरानाही मुखमंडप नाही. त्याचप्रमाणे गुढमंडपाला पुढच्या बाजुला वामनभिंत आहे. वामनभिंत व वरच्या तुळ्या यामध्ये दगडी जाळी आहे. हि जाळी जांभ्या दगडाची आहे.हेमाडपंती मंदीराचे वैशिष्ट्य म्हणजे मंडपाच्या बाजुला दोन भिंतीची जाडी मुख भागाजवळ बर्यापैकी पुढे आलेली असते. आणि इथे देवकोष्ट असते. म्हणजेच मंदीराच्या मुखभागावर दोन टोकावरील कोपर्यापुढे आलेले भाग असून अश्या प्रत्येक भागात एक अशी दोन देवकोष्टे असतात. हे वैशिष्ट्य दोन्ही मंदीरात आढळते. आज मात्र हि दोन्ही देवकोष्टे रिकामी आहेत.
सोमेश्वर मंदीर जगतीवर उभे असून त्यात जाण्यासाठी पायर्या आहेत. मंडपाचे द्वार साधे असून त्यावर ठळक स्तंभशाखा आहे. मात्र द्वारावर उत्तरांग नाही. मंडपाचे छत आठ कडेला असलेल्या स्तंभावर आणि चार मध्ये असलेल्या स्तंभावर पेलले आहे. या चार स्तंभापैकी दोन स्तंभ अंतराळात आणि दोन वामनस्तंभ मंडपाच्या मुखभागात आहेत. मंडपाच्या चार कोपर्यातील स्तंभ सोडले तर कोणत्याही स्तंभावर शिल्पाकृती नाहीत.अर्थात हि शिल्पसुध्दा झिजलेली असल्यामुळे ओळखून येत नाहीत. बहुतेक हि शिल्प दिग्पालाची असावीत. अंतराळाच्या प्रत्येक बाजुच्या भिंतीत देवकोष्टाशिवाय काहीही नाही. गर्भगृहाचे द्वारही मंडपाच्या द्वाराइतके साधे असून त्याच्या खालच्या अंगावर प्रतिहारीच्या मुर्ती दिसत नाहीत. मात्र द्वारावर उत्तरांग असून त्यावर तीन रथिका दिसतात. कडेच्या दोन्ही रथिकावर नागर शिखरे तर मधल्या रथिकावर वेसर शिखर दिसते.
मंदीराचा जगतीचा भाग गाडला गेला असल्यामुळे त्यावर कोणते थर असावेत याचा अंदाज येत नाही.मात्र मंदीराचे मंडोवर साधे आहे त्यामुळे जगतीवर विशेष थर नसावेत. मंदीरावरील शिखर लतिन नागर पध्दतीचे आहे.
काशीविश्वेश्वर मंदीर आकाराने काहीसे मोठे आहे.पण या दोन्ही मंदीराच्या एकंदरीत रचनेत फार फरक नाही.
१) रत्नागिरी जिल्हा गॅझेटीयर
२) स्थापत्य- महाराष्ट्र शासन
३) https://maharashtratimes.com
४) https://mr.wikipedia.org
५) https://varadprasadtours.com/2022/06/11/karneshwar-temple-travel-guide-tips/
६) https://maharashtramaza.live/karneshwar-temple-of-sangameshwar-is-an-example-of-ancient-architecture-in-konkan/
७) https://daryafirasti.com/2020/07/11/mkarneshwar/
८) http://trekshitiz.com/discussionboard/_topic206.html
९) http://indianclicker.blogspot.com/2013/04/karneshwar-temple-sangameshwar.html
१०) https://www.discovermh.com/kasba-sangameshwar/
११) धीरज वाटेकर यांचे लिखाण
१३)
प्राचीन जलव्यवस्थापन - सप्तेश्वर !!! | Discover Maharashtra

प्राचीन जलव्यवस्थापन – सप्तेश्वर !!!
कोकण म्हणजे अलिबाबाची गुहा आहे. इतका खजिना इथे दडलेला आहे की शोधून शोधून दमायला होईल. एखादा परिसर सगळा बघून झालाय असं वाटेपर्यंत तिथलं काहीतरी सुंदर आपल्यासमोर येऊन उभं रहातं, आणि हे आधी कसं बघितलं नाही असं वाटून जातं. सप्तेश्वरबद्दल पण असंच झालं. कसबा संगमेश्वर परिसरात अनेकदा फिरणं झालेलं पण त्याच्याच समोरच्या डोंगरावर हे सुंदर ठिकाण दडलेलं माहिती नव्हतं.सप्तेश्वर.
मुंबई-गोवा महामार्गावर शास्त्रीनदीवरील पूल ओलांडून आपण संगमेश्वरकडे जातो. डावीकडे रस्ता कसबा संगमेश्वरला जातो. तिकडे न वळता संगमेश्वरकडे जायचे. जरा पुढे गेल्यावर उजवीकडे मुळ्ये हॉस्पिटल आहे आणि त्याच्याच समोर डोंगरावर रस्ता चढलेला दिसतो. चांगली डांबरी सडक आहे. त्या रस्त्याला चांगलाच चढ आहे. डोंगरावर चढणारा रस्ता सागाच्या जंगलातून जातो. अंदाजे ३ कि.मी. गेल्यावर ओढ्यावरील पुलावर रस्त्याला दोन फाटे फुटतात. उजवीकडे ऐन गर्द झाडीत आहे सप्तेश्वर महादेवाचे मंदिर. डावीकडचा रस्ता देवपाट वस्तीकडे जातो. काही अंतर चालत गेल्यावर भक्कम बांधणीचे मंदिर दिसते. मंदिराच्या बाजूनेच पाण्याचा प्रवाह वाहतो आहे. मंदिराच्या प्राकाराला भिंत बांधून बंदिस्त केलेले आहे.
जसे आपण प्रांगणात प्रवेश करतो आपल्यासमोर इथला खजिना उघडलेला दिसतो. आपल्या समोर एक पाण्याचे कुंड दिसते. त्याच्या मागे अजून एक कुंड आहे. आणि त्याच्या मागे चिऱ्याच्या दगडात बांधलेले सुंदर बांधकाम नजर खिळवून ठेवते. दोन बाजूला खोलीसारखे बांधकाम आणि मधल्या बांधकामाला ५ खिडक्या. या बांधकामात चुन्याचा वापर केलेला आहे. चुन्याच्या घाणीचे दगडी चाक आजही तिथे दिसते. अलकनंदा नदीचा उगम इथेच डोंगरावर होतो. त्याचे खाली येणारे पाणी इथे सात प्रवाहात विभागून ते परत मोठ्या कुंडात सोडले जाते. सात प्रवाहांचा स्वामी तो ‘सप्तेश्वर’ अशी साधी सोपी व्याख्या. बाजूच्या दोन खोल्यांचे प्रयोजन समजत नाही. त्यांच्या डोक्यावर शिखरासारखे साधे बांधकाम केलेले आहे. पण याच्या पाठीमागे जाऊन पाहिले तर डोंगरावरून आलेला प्रवाह विशिष्ट चॅनेल मधून आणला आहे. प्रत्येक खिडकीपाशी त्याला ‘टी सेक्शन’ सारखे बांधकाम करून प्रवाहित केलेला आहे. जिथे तो जोडलेला आहे तिथे एक चौकोनी खड्डा केलेला आहे. अतिशय सुबक आणि उत्तम तंत्रज्ञान वापरून हे जलव्यवस्थापन केलेलं दिसतं. या सर्व सातही खिडक्या आतून एकमेकांना सलग जोडलेल्या आहेत. त्यांच्या कमानी एका रेषेत सरळ दिसतात. या सगळ्या स्थापत्यावर इस्लामिक स्थापत्य कलेचा प्रभाव प्रकर्षाने जाणवतो. मध्ययुगीन काळात हे जलव्यवस्थापन केलेलं आहे. शिवाय हे सगळे बांधकाम देखणेसुद्धा केलेले आहे. समोरच्या बाजूला प्रत्येक खिडकीच्या वर व्यालासारखा एक काल्पनिक पशु कोरलेला दिसतो. त्याशिवाय पानाफुलांची सजावट केलेली दिसते. बाजूला आणि डोक्यावर लहान-लहान कोनाडे केलेले आहेत. कदाचित तिथे उजेडासाठी पणत्या ठेवत असावेत. या सातही विभागातून वाहणारे सगळे प्रवाह पुढच्या बाजूला एकत्र येऊन एका गोमुखातून मोठ्या कुंडात पडतात. कुंड तरी किती मोठे.. ३० फुट लांबी रुंदीच्या कुंडात आत उतरायला पायऱ्या केलेल्या आहेत. स्वच्छ आणि निवळशंख असे हे पाणी इथून जमिनीखालून दुसऱ्या कुंडात जाते. आणि ते कुंड भरले की तिथून पुढे एका ओढ्याला जाऊन मिळते. हाच ओढा पुढे गावात जातो.
सप्तेश्वर शिवमंदिर पश्चिमाभिमुख आहे. ऐसपैस सभामंडप आणि मोठा गाभारा असे याचे स्वरूप. गाभाऱ्याच्या दरवाजावर गणपतीची सुंदर मूर्ती. मंदिराला लागूनच वैजनाथाचे एक छोटेसे मंदिर बांधलेले आहे. हा सगळा परिसर अतिशय शांत आणि रमणीय आहे. अव्याहत वाहणाऱ्या महामार्गाजवळ डोंगरावर इतके रम्य ठिकाण असेल असे चुकूनही वाटत नाही. इथून आजूबाजूचा मोठा परिसर दृष्टीक्षेपात येतो. पूर्वेकडे सह्याद्रीची मुख्य रांग, आणि खाली दरीत कसबा संगमेश्वर परिसर, तिथली मंदिरे, मुख्यत्वे करून काळभैरव मंदिर आणि तिथे जाणारा रस्ता हे सगळे फार सुंदर दिसते. आंबा, साग, ऐन, शिवण, फणस अशा वृक्षांची दाटी असलेला हा परिसर फारच सुंदर आहे.
निसर्गाचा वरदहस्त लाभलेले हे नितांत रमणीय ठिकाण संगमेश्वराच्या डोंगरावर ऐन झाडीत दडलेले आहे. इतक्या उंचावर मुद्दाम निर्माण केलेले प्राचीन जलव्यवस्थापन आणि या रमणीय परिसरात मिळणारी शांततेची अनुभूती घेण्यासाठी कोकणात दडलेला हा खजिना आवर्जून पाहायला हवा. इथून खरोखरच पाय निघत नाही.
Ashutosh Bapat
रत्नागिरी : राजापुरात पाहायला जा 'ही' अद्भूत ठिकाणे (photos)
स्वालिया शिकलगार : पुढारी ऑनलाईन डेस्क – रत्नागिरीत अनेक प्रसिध्द पर्यटनस्थळे आहेत. खूप सारे पर्यटक समुद्र किनारी जायला पसंती देतात. खळखळत्या समुद्रकिनारी पर्यटकांची नेहमीच रेलचेल असते. पण, रत्नागिरीमध्ये अशी काही ठिकाणे आहेत, जिथे फार कमी लोक जातात किंवा तेथे फार गर्दी नसते. अशाच काही उत्तम ठिकाणांविषयीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. (Ratnagiri best Tourism) राजापूर, कसबा, संगमेश्वर, जुवे बेट आणि तुम्ही कादाचित या ठिकाणी कधी गेला नसाल अशा स्थळांबद्दल आम्ही सांगणार आहोत. लाँग ड्राईव्हसोबत वेगळी कला-संस्कृती आणि कोकणचा साद घालणारा निसर्ग यांचा तिहेरी संगम या रत्नागिरीच्या ट्रीपमधून तुम्हाला अनुभवता येईल. यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. यानंतर तुम्ही या ठिकाणांना नक्कीच भेट द्याल! तुमच्या नेहमीच्या टूरपेक्षा ही हटके टूर असेल. (Ratnagiri best Tourism)


राजापूरची गंगा – देवगिरीच्या यादव काळापासून राजापूर ही प्रसिद्ध व्यापारी पेठ होती. रत्नागिरी जिल्ह्यातील ‘राजापूरची गंगा’ तीर्थस्थानला खूप महत्त्व आहे. ऐतिहासिक काळापसून या ठिकाणाला महत्त्व आहे. जमिनीत असलेल्या १४ कुंड अचानक पाण्याने भरून जातात. सामान्यपणे तीन वर्षांतून एकदा राजापूरची गंगा अवतरते. साधारणपणे तीन महिने ही गंगा थांबते. गंगेचे दर्शन घेऊन स्नान करण्यासाठी येथे भाविक गर्दी करतात.

कसे जाल – बालिंगे- घरपण – साळवण – असळज-गगनबावडा-भूईबावडा घाट-तिरवडे तर्फ खारेपाटण-मेहबूबनगर-कोळपे-तीथवली-मुंबई-गोवा हायवे- पनवेल कोची कन्याकुमारी हायवे-हातखंबा गोवा रोड-राजापूर गाव-राजपूरची गंगा.

उन्हाळे – गरम पाण्याचे झरे येथे आढळतात. उन्हाळे हे राजापूर तालुक्यातीस गाव आहे. या गावात प्रसिध्द महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे. या मातेच्या चरणापासून झऱ्याची निर्मिती झाल्याचे सांगितले जाते. येथे १२ महिने गरम पाण्याचे झरे प्रवाहित होतात. राजापूर तालुक्यात असे अनेक छोटे-छोटे गरम पाण्याचे कुंड पाहायला मिळतात. उन्हाळे गावातील महालक्ष्मी मंदिरासमोर एक कुंड आहे. या कुंडात गरम पाण्याचे दोन वेगवेगळे झरे आहेत. यास गंगा तीर्थ असे म्हटले जाते. या गरम पाण्याच्या झऱ्यापासून ३०० मीटर अंतरावर श्री. स्वामी समर्थ महाराजांचा मठदेखील आहे. हा मठ पाहण्यासारखा आहे. नारळी, आंबा, पोफळी, फणस या झाडांच्यामध्ये हे गाव वसलेले आहे. आजूबाजूला नदी, हिरवागार निसर्ग, रम्य शांत वातावरणात हे मठ आहे. हे मठ कौलारु जांभ्या दगडापासून बनवलेले आहे. गंगा तीर्थ उन्हाळे येथे गंगा ही मूळगंगा, चंद्रकुंड, सूर्यकुंड, बाणकुंड, यमुना कुंड, सरस्वती कुंड, गोदावरी कुंड, कृष्ण कुंड, नर्मदा कुंड, कावेरी कुंड, अग्नि कुंड, भीमा कुंड, चंद्रभागा कुंड आणि काशी कुंड या चौदा कुंडाकडे वाहते. यापैकी काशीकुंड आणि मूळ गंगा हे प्रमुख मानले जाते.

कसे जाल – राजापूरची गंगा पासून उन्हाळे गरम पाण्याचे झरे हे दीड किलोमीटरचे अंतर आहे. राजापूरची गंगा- रेल्वेस्टेशन रोड-उन्हाळे गरम पाण्याचे कुंड/हॉट वॉटर स्प्रिंग.

संगमेश्वर तालुका :

उक्षी ब्रीज – संगमेश्वरला जाताना डाव्या बाजुलाच मुंबई गोवा हायवेला लागून उक्षी ब्रीज आहे. अतिशय सुंदर हे ब्रीज असून कोकण म्हणजे काय? हे इथं अनुभवता येतं. सुंदर वातावरण, नदीवर पुल, आजूबाजूला विस्तीर्ण पसरलेली माडाची झाडे, पोफळीच्या बागा आणि सुपारीचे मळे तुम्हाला निदर्शनास पडतील. फोटोग्राफी करण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.

कसबा पेठ – कसबा पेठेतून पुढे गेल्यानंतर छोटे संगमेश्वरचे मंदिर आहे. जरा अतिशय सुंदर शिल्पकाम असलेले कर्णेश्वर मंदिर दृष्टीस पडते. येथे जुनी गावे, गावातील जुने घरे, लाकडी वाडे, लाकडी वाड्यांवर केलेले कोरीव काम आणि निरामय शांतता अनुभवता येते. येथील बहुतांशी घराला कुलूप दिसते. जवळ असलेल्या मुंबईच्या ठिकाणी येथील माणसे बहुदा कामासाठी गेली असावीत, असा अंदाज लावता येईल. कसबा गावात सोमेश्वराचेदेखील दगडी बांधकाम असलेले प्राचीन मंदिर आहे.

संगमेश्वर मंदिर – संगमेश्वर येथे अनेक मंदिर पाहायला मिळतात. ही मंदिरे प्राचीन काळातील आहेत. कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूरपेक्षाही संगमेश्वर खूप जुनं मंदिर असल्याचे म्हटले जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री नदीच्या संगमाचे ठिकाण म्हणजे संगमेश्वर. यास ‘रामक्षेत्र’ असेही म्हटले जाते. संगमेश्वरला जाण्यासाठी राजापूरची गंगा ठिकाणापासून अडीच तासांचा रस्ता आहे. सुरुवातीलाच संगमेश्वर हे छोटेखानी महादेवाचं मंदिर दिसतं. नदीच्या किनारी वसलेलं खूप सुंदर असं संगमेश्वर मंदिर आहे. पण, ५ मिनिटाच्या अंतरावर कर्णेश्वराचं मंदिर आहे. पण, ते सहजासहजी दृश्यास पडत नाही. एका लोखंडी पुलावरून पुढे गेल्यानंतर एखाद्या घराच्या पायऱ्या असल्याप्रमाणे जांभा दगडी पायऱ्या नजरेस पडतात. या पायऱ्या चढून वर गेल्यानंतर एक विस्तीर्ण मैदान लागते. या मैदानावर कर्णेश्वराचे प्रसिध्द महादेव मंदिर आहे.

कर्णेश्वर मंदिर – हे महादेवाचे प्रसिध्द मंदिर आहे. कोल्हापुरातील खिद्रापूरच्या मंदिराच्या स्थापत्यशैलीशी मिळते-जुळते असलेले कर्णेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर खिद्रापूरपेक्षाही जुने असल्याचे येथील मंदिराच्या स्थापत्यशैलीवरून ओळखते. काही जण हे मंदिर कर्ण राजा (कोल्हापूर) ने बांधले असावे असे म्हणतात. तर काही जण इ.स. १०७५ ते १०९५ या काळात गुजरातच्या चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले असावे, असे अभ्यासकांचे मत आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरावर गणपती, लक्ष्मी, महिषासूरमर्दिणी, विष्णू अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. अतिशय आखीव रेखीव कोरीव काम असलेल्या या मूर्ती भक्तांच्या चटकन लक्ष वेधून घेतात. त्याकाळात इतकी सुंदर शिल्पे कशी काय घडवली असावीत, असा प्रश्न तुम्हाला नक्की पडेल. मंदिरात गेल्यानंतर भूमीज शैलीची मंडप, महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना आढळते. बाहेर कितीही ऊन पडलेलं असो वा गर्मी असो, मंदिरात पाऊल ठेवताच मनाला आणि शरीराला शितलता वाटते. गर्भगृहात कर्णेश्वराची पिंड आहे. सोबत पार्वतीची मूर्तीही आहे. येथे सुंदर प्रभावळदेखील दिसते.

कसे जाल –१) राजापूर-मांडवकरवाडी-नेरकेवाडी-मुंबई गोवा हायवे-हातखंबा गोवा रोड-पाली फाटा-निवळी घाट-उक्षी ब्रीज साईट रोड- संगमेश्वर रोड-संगमेश्वर मंदिर आणि कर्णेश्वर मंदिर.
२) मुंबई-गोवा महामार्ग-कसबा गाव – संगमेश्वर मंदिर आणि कर्णेश्वर मंदिर.
३) रेल्वेने यायचे असेल तर कोकण रेल्वे आहे. संगमेश्वर रेल्वे स्थानकाजवळ थांबता येते.
४) रत्नागिरी, ठाणे, मुंबई, पुण्याहून एसटी आहे.

पण, शक्यतो स्वत:ची गाडी असलेली चांगली. यामुळे तुम्हाला जागोजागी थांबून विविध पॉईंट्स पाहता येतात. शिवाय वेळही वाचेल.

छत्रपती संभाजी महाराज स्मारक – संगमेश्वरात कसबा या गावात छत्रपती संभाजी महाराज स्मारक आहे. 
छत्रपती संभाजी महाराज स्मारकश्री सप्तेश्वर मंदिर – संगमेश्वरापासून सप्तेश्वर मंदिर हे अंतर सव्वा तासांचे आहे. कुठेही पाहायला मिळणार नाही असा सप्तेश्वराचा मंदिर परिसर आहे. स्वच्छ नितळ पाण्याचे कुंड असलेला हा परिसर हिरवाईने नटलेला आहे.

कसे जाल – संगमेश्वर – मुंबई गोवा हायवे-संगमेश्वर सप्तेश्वर मार्ग- कसबा लावगणवाडी (Kasba lavganwadi) – पुढे आतमध्ये फाटा गेलेला आहे-सप्तेश्वर मंदिर

मल्लिकार्जुन मंदिर – शिरंबे येथील पाण्यातील मल्लिकार्जुन मंदिर पाहण्यासारखं आहे.

कसे जाल – मुंबई गोवा हायवेवर चिपळूण नंतर सावर्डे बस स्थानक- मल्लिकार्जुन मंदिर

जुवे बेट – राजापूर तालुक्यातील जुवे नावाचे गाव आहे. जुवे बेटाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हे ठिकाण सप्तेश्वर मंदिरापासून ५० कि.मी अंतरावर आहे. पावणे दोन तासात हे अंतर कापता येते. या जुवे गावात पारंपरिक पद्धतीची कौलारू घरे आहेत. आंबा, फणस, नारळ, काजूची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. गावात आल्हाददायक वातावरण आहे. भौतिक सुख-सुविधांपासून हे गाव दूर आहे. गावात श्री रवळनाथ, श्री सीमराई देवीची मंदिरे आहेत. समुद्रकिनाऱ्यामुळे या गावाचे निसर्ग आणखी बहरले आहे. अर्जुना नदीच्या मुखाशी जुवे बेट असून याठिकाणची शांतता तुम्हाला मोहून टाकणारी आहे.

कसे जाल- सप्तेश्वर मंदिर-कसबा लावगणवाडी-मुंबई गोवा हायवे-शास्त्री पुल-पनवेल कोची कन्याकुमारी हायवे-कोल्हापूर रत्नागिरी रोड-निवखोळ रोड- कर्ला रोड- खालची गल्ली-जुवे.

आणखी काय पाहाल?
- कोल्हापूरहून जाताना घाटकडा धबधबा पाहू शकता. पुढे व्हयू पॉईंट पाहू शकता.
- राजापूर गढी, वखार, ब्रिटीश वेअरहाऊस
- भूईबावडा घाट येथे सनसेट पॉईंट पाहण्यासाठी थांबू शकता.
- कसबा पेठ येथे गणेश मंदिर, श्री लक्ष्मी-नृसिंह मंदिर येथे दर्शनासाठी जाऊ शकता.
- राजापुरात तुम्हाला जितवणे धबधबा, कातळकडा धबधबा (हर्डी) अशा ठिकाणांनाही भेटी देता येतील.
- हक्रावाने वाडी (Hakrawane Wadi) हे देखील पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.
- तसेच कुंभेश्वर, काशी विश्वेश्वर, केदारेश्वर, रावणेश शंकर, जलयुक्त नन्दिकेश (संगम मंदिर), काळभैरव अशा मंदिरांनादेखील भेटी देऊ शकता.
- तुम्ही प्रसिध्द महादेवाचे मंदिर मार्लेश्वर आणि मार्लेश्वर धबाधबा देखील पाहू शकता.

काय खाल?
मासे, सोलकडी, तांदळाची भाकरी, भात, गोलमा, ऑम्लेट, पोहे, चहा, अंडाकरी, चिकन, गोलमा, चपाती, ताक, शाकाहारी जेवण आदी.

- Travel Tips : ‘फिरण्याची आवड अन् पैशांची अडचण’ दोघांचा ताळमेळ बसवण्यासाठी खास टिप्स भाग 1
- Travel to Bhutan : या १० कारणांसाठी भूतानला भेट दिलीच पाहिजे
- travel india : भारतातील या ६ सुंदर ठिकाणी तुम्ही ‘भारतीय’ असला तरी नो एन्ट्री !

















Bramha Vishnu and Lord Shiva ( Mahesh)



सरदेसाई वाडा |
|
ज्या वाडयामध्ये छत्रपती संभाजी राजांचे सातत्याने वास्तव्य होते तो हा सरदेसाई यांचा चौसोपी वाडा. सध्या याच्यात बराचसा बदल झालेला आहे. |
|
एक महान तीर्थक्षेत्र व ऐतिहासिक ठिकाण |
|
ज्या वाडयामध्ये संभाजीराजे विश्रांती घेत असत तो हा सरदेसाइंर्चा वाडा इतिहासाची साक्ष देतो. |
|
या सरदेसाइंर्च्या वाडयालगत असलेल्या बागेमध्ये अनेक शिवमंदिरे होती. त्यातील काही मंदिरांचे फोटो येथे देत आहे. |
|
ही मंदिरे संपूर्ण पडक्या स्थितीत असून मंदिरातील मूर्तींची तोडमोड झालेली आपण पाहू शकता. |
|
सदर चित्रामध्ये नंदीची मान तुटक्या स्थितीत आपण पाहू शकता. |
सरदेसाई वाडा |
|
ज्या वाडयामध्ये छत्रपती संभाजी राजांचे सातत्याने वास्तव्य होते तो हा सरदेसाई यांचा चौसोपी वाडा. सध्या याच्यात बराचसा बदल झालेला आहे. |
|
एक महान तीर्थक्षेत्र व ऐतिहासिक ठिकाण |
|
ज्या वाडयामध्ये संभाजीराजे विश्रांती घेत असत तो हा सरदेसाइंर्चा वाडा इतिहासाची साक्ष देतो. |
|
या सरदेसाइंर्च्या वाडयालगत असलेल्या बागेमध्ये अनेक शिवमंदिरे होती. त्यातील काही मंदिरांचे फोटो येथे देत आहे. |
|
ही मंदिरे संपूर्ण पडक्या स्थितीत असून मंदिरातील मूर्तींची तोडमोड झालेली आपण पाहू शकता. |
|
सदर चित्रामध्ये नंदीची मान तुटक्या स्थितीत आपण पाहू शकता. |
सरदेसाई वाडा |
|
ज्या वाडयामध्ये छत्रपती संभाजी राजांचे सातत्याने वास्तव्य होते तो हा सरदेसाई यांचा चौसोपी वाडा. सध्या याच्यात बराचसा बदल झालेला आहे. |
|
एक महान तीर्थक्षेत्र व ऐतिहासिक ठिकाण |
|
ज्या वाडयामध्ये संभाजीराजे विश्रांती घेत असत तो हा सरदेसाइंर्चा वाडा इतिहासाची साक्ष देतो. |
|
या सरदेसाइंर्च्या वाडयालगत असलेल्या बागेमध्ये अनेक शिवमंदिरे होती. त्यातील काही मंदिरांचे फोटो येथे देत आहे. |
|
ही मंदिरे संपूर्ण पडक्या स्थितीत असून मंदिरातील मूर्तींची तोडमोड झालेली आपण पाहू शकता. |
सरदेसाई वाडा, संगमेश्वर | Discover Maharashtra

सरदेसाई वाडा, संगमेश्वर –
संगमेश्वर येथील सरदेसाई वाडा. ३ फेब्रुवारी १६८९ रोजी मोगलांनी छत्रपति संभाजी महाराजांना याच ठिकाणी कैद केले. ही जागा नव्हे तर ही घटना दुर्दैवी आहे. संगमेश्वर आणि जवळच्या शृंगारपूर येथे संभाजी महाराजांचे वास्तव नेहमी असे. उन्हाळ्यात ते इकडे आल्यावर या सरदेसाईंच्या वाड्यात उतरत असत. विशाळगडाहून रायगडाला जाताना १ फेब्रुवारी रोजी संभाजी महाराज संगमेश्वरला या वाड्यात मुक्कामाला आले. दुसऱ्या दिवशी अर्जोजी व गिरजोजी यादव आपल्या वतनाच्या निवाड्यासाठी इथे संभाजीराजांकडे आले पण ते काम अर्धवट राहिले. अर्जोजी व गिरजोजी यादव वतनपत्रे छत्रपति शिवाजी महाराजांच्या वेळेपासून मागत होते, नंतर राजाराम महाराजांच्या काळात धामधुमीतही त्यांनी या वतनाचा सारखा पाठपुरावा केला, पुढे ताराराणींच्या काळात त्यांचे पुत्र दुसरे शिवाजीराजे यांच्याकडून ही वतनपत्रे यादवांना मिळाली. औरंगजेबाने पाठवलेला मोगल सेनापती शेखनिजाम मुकर्रबखान कोल्हापूरहून सैन्य घेऊन जलदगतीने ३ फेब्रुवारीला संगमेश्वरला आला आणि बेसावध असलेल्या संभाजी महाराजांना कैद केले. कैद कसे केले त्यावेळचे वर्णन साकी मुस्तैदखान, खाफीखान, भीमसेन सक्सेना इ. समकालिन मोगल लेखकांनी लिहून ठेवले आहे. ते सर्व वाचून खूप वाईट वाटते.
संभाजी महाराजांना पकडल्यानंतर शेखनिजामाने हा सरदेसायांचा वाडा जाळला आणि गावातली देवळे फोडली असे उल्लेख सरदेसाई यांच्या कागदपत्रात आहे (मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड २०, ले.२८९).
मेणवली दप्तरातील एका कागदात नानासाहेब पेशव्यांनी या सरदेसाई वाड्याची चौकशी केल्यासंबंधीचा उल्लेख आहे. त्यात संभाजी महाराजांनी वास्तव्य केलेल्या वाड्याच्या चौथऱ्यावर सरदेसाईंनी (पुन्हा) वाडा बांधला असा उल्लेख आहे.
संगमेश्वर येथील संभाजी महाराजांच्या वाड्याच्या चौथऱ्यावर सदाशिव दादाजी मावळंगकर याने हट्टाने बांधलेले घर मोडून ती जागा संभाजी महाराजांच्या बागेसह सवाई माधवराव पेशवेंनी सरकारात ठेवल्याचा उल्लेख सवाई माधवरावांच्या रोजनिशीत आहे. आज दिसणारा वाडा हा त्या मूळ वाड्याच्या जोत्यावर नंतर बांधलेला आहे.
कैदेत पडण्याच्या आधी संभाजी महाराजांच्या शेवटच्या आठवणीचा साक्षीदार म्हणजे हा सरदेसाई वाडा.
– प्रणव कुलकर्णी.
![]() |
| श्री. कर्णेश्वर मंदिर |
सकाळी ९.३० ला चिपळूणच्या करंजेश्वरीचे दर्शन घेऊन पुढे संगमेश्वरला श्री कर्णेश्वराचे मंदिर पाहण्यासाठी निघालो. ‘आधि पोटोबा मग विठोबा’ म्हणून चिपळूणच्या काणे बंधूंच्या हॉटेलमधील मिसळ खाऊन संगमेश्वर पाहण्यास निघालो.
चिपळूणपासून संगमेश्वर अंदाजे ४५ किलोमीटर अंतरावर म्हणजे साधारणपणे गाडी असल्यास १ तास लागतो. मुंबई-गोवा महामार्ग असल्याने रस्ता एकदमच छान होता. वाटेत काही भाग सोडला तर रस्ता एकदम छान होता. वळणदार रस्ते, पाऊस पडून गेल्यामुळे सर्वत्र दिसणारी हिरवाई यामुळे हवेत एक छानसे आल्हाददायक वातावरण तयार झाले होते. ११ वाजता कसबा गावात आम्ही रस्ता विचारत विचारत पोहोचलो.
कोकणची भूमी ही प्राचीन आख्यायिका आणि ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे. त्यात कोकणातील अनेक प्राचीन मंदिरे म्हणजे वास्तुकलेचे उत्तम नमुने. संगमेश्वर तालुक्यातून मुंबई-गोवा महामार्ग जातो. येथे कसबा नावाचे गाव आहे. या भागाला ऐतिहासिक महत्त्व आहे. औरंगजेबाच्या सरदारने छत्रपती संभाजीराजांना १६८२ मध्ये याच कसबा गावात अटक करून पुढे पुण्यातील तुळापूर येथे नेऊन त्यांची क्रूर हत्या केली. कसबा गावाची आणखीन एक ओळख म्हणजे येथील पांडवकालीन श्री कर्णेश्वराचे हेमाडपंथी मंदिर. कसबा संगमेश्वर या गावांना फार पूर्वी ‘रामक्षेत्र’ असंही ओळखलं जात असे. मुंबई- गोवा महामार्गावर शास्त्री पुल ओलांडल्यावर डावीकडे कसबा नावाच्या या गावात हे कर्णेश्वराचे मंदिर आहे. संगमेश्वरपासून दोन किलोमीटर अंतरावर अत्यंत रम्य परिसरात असलेले हे मंदिर स्थापत्यकलेचा अद्भूत अविष्कार आहे. भल्या मोठ्या दगडांना आकार देत अप्रतीम शिल्पकला साकारून हे मंदिर उभारण्यात आले आहे.
संभाजीमहाराजांचा अर्धपुतळा कसबा गावात शिरल्या शिरल्या दिसतो. याच पुतळ्याच्या मागे जाणारा रस्ता आपल्याला कर्णेश्वर मंदिरापर्यंत घेऊन जातो. आम्ही चालत चालत निघालो. कारण जेमतेम एक गाडीच जाऊ शकेल एवढा बारीक रस्ता आहे. त्या रस्त्यावर बांधकामासाठी साहित्य घेऊन आलेला एक ट्रक उभा असल्याने गाडी पुतळ्याशेजारी लावून मंदिर पाहण्यास निघालो. पाच मिनिटातच मंदिरात पोहचलो. समोर मोठ्या आकारातील कर्णेश्वराचे मंदिर पाहून एकदम जुन्या काळात गेल्याचा भास झाला. अत्यंत सुंदर असे हे मंदिर प्रथम दर्शनीच मनमोहून टाकते. मंदिरात पोहचल्यावर डाव्या बाजूला छोटसे सूर्यमंदिर दिसले. मुख्य मंदिर पुढे असल्याने परत येताना दर्शन घेऊ असे ठरले. मंदिरात पोहचल्यावर ‘ओम नमो:शिवाय’ म्हणत एक पुजारी दिसले. त्यांना मंदिराबाबत विचारले असता त्यांनी मंदिरात कोरण्यात आलेल्या मूर्तींची विस्तारपूर्वक माहिती दिली.
मंदिर एक आख्यायिका अनेक
कर्णेश्वर मंदिराबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. कोणी हे मंदिर पांडवांनी एक रात्रीत बांधले असते सांगतात. तर कोणी पांडवांनी आपला मोठा भाऊ कर्णाची आठवण राहावी म्हणून हे मंदिर बांधले असे सांगतात. भगवान परशुराम यांनी हे मंदिर बांधल्याची सुद्धा आख्यायिका आहे. वनवासात असताना पांडव परशूरामांकडे धर्नुविद्या शिकले. परशरामांनी सहावा मोठा भाऊ कर्णाबद्दल सांगितले. तेव्हा पांडवांनी कर्णेश्वर मंदिर बांधले असेही सांगितले जाते. या मंदिरांच्या वास्तुरचनेवरून सातव्या शतकातील चालुक्य घराण्यातील कर्ण नावाच्या राजाने हे मंदिर उभारले असे इतिहासतज्ज्ञ सांगतात. बाकी आख्यायिका काहीही असो. मंदिरावरील कलाकुसर पाहून मंदिर कोणी बांधले या पेक्षा ते कसे बांधले असेल याचा विचार करतानाच आश्चर्य वाटू लागते. कसबा गावात पूर्वी ३०० ते ४०० मंदिरे असल्याच्या नोंदी आहेत. सध्या यातील काही मोजकीच मंदिरे तग धरून आहेत.
![]() |
| श्री कर्णेश्वर मंदिराचा कळस. |
![]() |
कर्णेश्वर मंदिरातील ही गणेशाची छोटी मूर्ती. |
![]() |
| विठ्ठल रुखुमाई व श्री गजानन |
![]() |
| कोरीवकाम |
![]() |
| कोरीवकाम |
पालथे ताट :
कर्णेश्वराचे मंदिर एका दगडातून कोरलेले भव्य देऊळ म्हणून प्रसिद्ध आहे. कर्णेश्वर म्हणजे महादेव. प्रत्येक प्राचीन मंदिराला काहीना काही आख्यायिका असते. अशीच एक आख्यायिका या मंदिराबाबत सांगितली जाते. पांडव वनवासात असताना त्यांनी कर्ण नावाच्या राजाच्या पणानुसार एका रात्रीत एका दगडातून हे देवालय कोरले. दमल्यावर ते जेवायला बसले असता पहाटे कोंबडा आरवला. पहाट झाल्याने जेवायचे कसे म्हणून ताटे पालथी टाकून उठले. या मंदिरात ५ दगडी पालथी ताटे (पराती) कोरलेल्या आहेत. या ताटाखाली गुप्त धन परले असल्याचे सांगितले जाते. पांडवांनी त्या काळातील लिपीत दोन ओळी लिहून ठेवल्या आहेत. या ओळींचा अर्थ समजू शकल्यास ही पालथी पाने सुलटी होतील आणि त्या मनुष्याला ताटाखाली लपवलेले धन मिळेल. अंदाजे चार फूट लांबीची ही दगडात कोरलेली पाच ताटे आहेत. मंदिराला तीन दरवाजे असून, प्रत्येक दारात पालथे ताट आहे. एक ताट मंदिराच्या मध्यभागी असून, पांडवाच्या पाच ताटासोबत सहावे ताट कर्णाचे म्हणून ओळखले जाते आणि त्यावर शंकराची पिंडी आहे. त्यावर मोठे शिवलिंग आहे. गाभाºयात न बसता देखील गाभाºयाबाहेर बसून पिंड संपूर्ण दिसते. त्यामुळे ध्यानधारणा करण्यासाठी बाहेर देखील बसता येते.
मंदिराला प्रमुख तीन दरवाजे आहेत. पूर्व दिशेला असलेल्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर 'शिवपंचायत' आहे. त्याच्या डाव्या बाजूस नरकासूर आणि उजव्या बाजूस कीतीसुर्राच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. या दोन राक्षसांचे शंकराबरोबर युद्ध झाले होते. त्या युद्धा पराजय झाल्यावर आपल्या पायाशी स्थान मिळावे असे या दोन राक्षसांनी शंकराकडे वर मागितला. तेव्हा शंकराने प्रसन्न होऊन त्यांना मंदिराच्या बाहेरील दरवाज्याच्या चौकटीत स्थान दिले. यांना पाय लावून हात येण्याची प्रथा आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस सुंदर असे दशावताराचे शिल्प कोरण्यात आले आहे. श्री विष्णूच्या दहा अवतारांपैकी मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, राम, कृष्ण, परशुराम, बुद्ध, कलिंकी आदींची शिल्पे कोरलेली आहेत. संपूर्ण मंदिर मगरीच्या पाठीवर उभे असल्याचे मगरीच्या शिल्पावरून वाटते. शक्यतो महादेवाच्या मंदिरात गोमुखातून तीर्थ बाहेर येताना दिसते मात्र याठिकाणी मगरच्या शिल्पातून ही सोय केलेली आहे. कर्णेश्वर मंदिरा बाहेर गणेशाची छोटी मूर्ती आहे. ही मूर्ती पाहिल्यावर मला वाईतील महागणपतीची मूर्तीची आठवण आली.
![]() |
| पालथे ताट |
दरवाज्याजवळ पांडवांचे ताट म्हणून ओळखले जाणारे पालाथे ताट आहे. त्यावर बकुळीचे फुल कोरलेले आहे. ताटाच्या बाजूस पांडवांची आसने दिसतात. साधारणपणे चार फूट उंच असलेली आसने आहेत. मंदिराच्या मुख्य दरवाजाजवळ नंदीमंडप आणि दोन अष्टभैरव द्वारपाल आहेत. तेथून पुढे मंडप, मंदिराच्या छतावरची कोरीव शिल्प, सिंह, मुख्य छतातून झुंबराप्रमाणे दिसणारे कमलाकृती दगडी झुंबर, सभामंडपातील शिलालेख, शेषशाही विष्णूचे शिल्प कोरून ठेवलेली आहेत. मंडपात प्रवेश करताच नंदी आणि त्यानंतर शंकराची मूर्ती दिसते. मंडपाला एकूण चार खांब आहेत. विशेष म्हणजे हे चारही खांब एकसमान आहेत. दक्षिण दरवाज्याच्या मागे खांबावर शिलालेख आहे. मुख्य मंडपाच्या डाव्या हाताला श्री महालक्ष्मीची मूर्ती आणि उजव्या बाजूला शेषशायी विष्णूची मूर्ती आहे. येथील भगवान विष्णूचे शेषशायी शिल्प व दगडी झुंबर हे पाहण्यासारखे आहे.
मंदिरातील देव, दानव, नृत्यांगना, किन्नर, यक्ष-यक्षिणी, आदी मूर्तींचे कोरीव काम केलेले आहे. मंदिराच्या प्रत्येक प्रवेशद्वारावरील अलंकृत खांब, सुंदर नक्षीदार कोरलेले आहेत. कर्णेश्वर मंदिराचा कोपरानकोपरा दगडी शिल्पकलाकुसरीने कोरलेला आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूसही उत्तम कोरीवकाम केले असून शिल्पकलेचा अप्रतिम दर्शन मंदिर न्याहाळताना होते. मंदिराच्या मागील बाजूने एका ठिकाणाहून पाहिल्यास मंदिराच्या कळसाची रचना गोलाकार आकारात केलेली आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस ॐ कार आकारातील गणेश व पार्वतीची नृत्य करतानाची मुद्रेतील छान मूर्ती आहे. मंदिर आवारात उत्तर दिशेला सूर्यमूर्ती आणि समोरच्या बाजूस गणेशाचे मंदिर आहे. मंदिरापासून काही अंतरावरच अलखनंदा, वरुणा आणि शास्त्री नद्यांचा संगम पाहायला मिळतो. या नद्यांच्या संगमामुळेच 'संगमेश्वर' नाव प्रचलित झाले. मंदिराबाहेर गणपती, पार्वती, महिषासुरमर्दिनी, नृसिंह, बलराम, हनुमान या देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. तसेच मंदिरातील प्रत्येक खांबाला एकाच साच्यामधून काढल्याप्रमाणे नक्षीकाम आहे. मंदिराचे वैशिष्टय म्हणजे बांधकामामध्ये कोणत्याही धातूचा वापर केलेला नाही.
कोकणातील अनेक मंदिरे म्हणजे वास्तुकलेचे उत्तम नमुने. काळाच्या ओघात मोठमोठ्या संस्कृती नष्ट झाल्या. नुकतेच श्री केदारनाथला महाप्रलय झाला. सुदैवाने मंदिर वाचले. पण प्राणहानी प्रचंड झाली. आज जी काही प्राचीन मंदिरे महाराष्ट्रात आहे. ती अप्रतिम कलाकृतींनी साकारलेली आहे. प्राचीन कलाकृतींकडे पुरातत्त्व खात्याने लक्ष देणे गरजेचे आहे. कोकणात अनेक ऐतिहासिक ठेवे आहेत. खरे तर हे बहुमूल्य ठेवे जपून ठेवायला हवे. त्यामुळे हा प्राचीन वास्तुकलेचा खजिना टिकून राहील. कोकण सहलीत कर्णेश्वराचं मंदिर आवर्जून पाहायला हवे. मंदिराभोवती असलेली हिरवीगार दाट झाडी, डोंगर, नद्या, शेती यांनी हा परिसर बहरेला आहे. महाशिवरात्रीला कर्णेश्वर मंदिरात मोठा उत्सव होतो.
![]() |
| छतावरची कोरीव शिल्प |
![]() |
| नरकासूर आणि उजव्या बाजूस कीतीसुर्राच्या मूर्ती |
![]() |
| शेषशायी विष्णूची मूर्ती. |
![]() |
| श्री कर्णेश्वर |
![]() |
| शंख आकारातील बकुळीची फुले |
![]() |
| दरवाज्याच्या मागे खांबावर शिलालेख |
ऐतिहासिक वारसा असलेले कसबा गाव
कसबा गावातच सरदेसाइंच्या वाड्यात संभाजीमहाराज आलेले असताना शत्रूला खबर मिळाली. याच ठिकाणी संभाजीमहाराजांना कैद करण्यात आले. महाराष्ट्राचा इतिहास ज्या जागेवर एक क्षणात बदलला त्या कसबात्यातील सरदेसाइंचा वाडा आज जमिनदोस्त झालेला आहे. येथील गावकºयांना विचारले असता वाड्याच्या काहीच खाणाखुणा शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले. काय दुर्देवी योगायोग म्हणावे लागेल की अलखनंदा, वरुणा आणि शास्त्री या नद्यांच्या संगमावर असलेले कसबा हे गाव. त्यावरून या भागाला संगमेश्वर म्हणू लागले. छत्रपती संभाजीमहाराजांना येथे पकडले गेले. तेथून पुढे पुण्याजवळील तुळापूरजवळील भीमा, भामा, इंद्रायणी या त्रिवेणी नद्यांच्या संगमाजवळ त्यांचा क्रूर वध करण्यात आला. दोन्ही ठिकाणी तीन नंद्यांचा संगम झाला.
![]() |
| सुंदर असे दशावताराचे शिल्प |
![]() |
| यक्ष-यक्षिणी मूर्तींचे कोरीव काम |
![]() |
| श्री कर्णेश्वर मंदिराची माहिती सांगताना पुजारी. |
| मंदिराच्या कळसाची रचना गोलाकार आकारात केलेली आहे. |
![]() |
| मंदिराच्या बाहेरील बाजूस ॐ कार आकारातील गणेश व पार्वतीची नृत्य करतानाची मुद्रेतील छान मूर्ती आहे. |
![]() |
| श्री कर्णेश्वर |
![]() |
| मंदिराच्या बाहेरील बाजूस ॐ कार आकारातील गणेश व पार्वतीची नृत्य करतानाची मुद्रेतील छान मूर्ती आहे. |

![]() |
| मगरीचे शिल्प. |
![]() |
| बाहेरील बाजूसही उत्तम कोरीवकाम . |
![]() |
| सूर्यमंदिर |
![]() |
| श्री. कर्णेश्वर मंदिराचा परिसर |
![]() |
| बाहेरील बाजूसही उत्तम कोरीवकाम. |
![]() |
| बाहेरील बाजूसही उत्तम कोरीवकाम. |
![]() |
अलखनंदा, वरुणा आणि शास्त्री नद्यांचा संगम |
आणखीन काय पहाल :
- मुंबई-गोवा महामार्गालागूनच असलेल्या आरवली, राजावाडी आणि गोळवली येथील गरम पाण्याची कुंडे.
- प्रसिद्ध मार्लेश्वराचे देऊळ येथून सुमारे ३५ कि. मी. अंतरावर आहे.
- संभाजीमहाराजांची सासूरवाडी व मुख्य ठाणे असलेले श्रृंगारपूर हे देखील संगमेश्वरच्या जवळ आहे.
कर्णेश्वर देवस्थानाकडे जाण्याचा रस्ता :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (एन. एच. १७) वर चिपळूणहून संगमेश्वरकडे येताना संगमेश्वर एस. टी. स्थानकाच्या २ कि.मी. अलीकडे शास्त्री पूल लागतो. पूल ओलांडल्यावर लगेचच डावीकडे वळून साधारणपणे दीड किलोमीटर अंतरावर कसबा गाव लागते. तिथे छत्रपती संभाजीमहाराजांचा अर्ध पुतळा आहे. त्या पुतळ्यामागे काही अंतरावर हे मंदिर आहे. मंदिरापर्यंत चांगला गाडी रस्ता आहे. कर्णेश्वराच्या मंदिराचे दर्शन घेऊन परतीच्या मार्गास निघालो. परतीचा मार्ग चिपळूण, कुंभार्ली घाट मार्गे उंब्रज व तेथून सातारा व पुणे असा होता.
कुंभार्ली घाट
कुंभार्ली घाट चिपळूण-कराड-सातारा पुणे-बंगलोर शहरांना जोडतो. जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद झालेल्या पश्चिम घाटातील एक प्रमुख घाट म्हणजे कुंभार्ली घाट. कोकण व घाटांना जोडणारा या कुंभार्ली घाटात थंडगार पण आल्हाददायक वारे, धो-धो कोसळणारे धबधबे व निसर्गरम्य असे ठिकाण आहे. जवळच असणाºया कोयना अभयारण्यामुळे या ठिकाणी प्रचंड झाडी आहे. कोयनानगर पोपळी जलविद्युत प्रकल्पामुळे हा परिसर नवारुपाला आलेला आहे. महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात वीज उपलब्ध करून देण्याचे काम येथे केले जाते. गर्द झाडीने हा भाग वेढलेला आहे.
प्राचीन काळी मौर्य व मुघलांच्या पूर्वीपासून प्रमुख व्यापारी मार्ग म्हणून प्रसिध्द असलेल्या या कुंभार्ली घाटातून देशावरती येण्यासाठी रस्त्याचा वापर केला जाई. थंड हवेची ठिकाणे इंग्रजांना आवडायची यासाठी त्यांनी माथेरान, महाबळेश्वर, आंबोली अशा घाटातून जाण्यासाठी मार्ग शोधून काढले. हा घाट रस्ता सोनू नावाच्या धनगराच्या मदतीने इंग्रजांनी शोधून काढला. त्यानंतर त्याला मारण्यात आले. त्याची समाधी या ठिकाणी आपणास दिसते. एका वळणावर हे स्थान आहे. प्रत्येक चालक येथे नमस्कार करून पुढे जातात. तसे प्रत्येक घाटामध्ये मंदिरे आहेत.
कुंभार्ली घाटातून पुण्याकडे येण्यासाठी उंब्रजमार्गे रस्ता आहे. कराडकडे एक फाटा गेलेला आहे. हा संपूर्ण रस्ता मी आलो तेव्हा व यापूर्वीही अनेकवेळा खराबच होता. सकाळी १० ला चिपळूण सोडले होते. तेथून संगमेश्वरमधील कसाब्यातील कर्णेश्वर मंदिरात दुपारी १२ वाजता पोहोचलो. तासभर थांबून तेथून निघालो. परत चिपळूणमार्गे- कुंभार्ली घाट (दुपारी २.००) उंब्रजमार्गे - सातारा - पुणे (६.३०) असा २७० किलोमीटरचा प्रवास करून घरी परतलो.
संगमेश्वरचे कर्णेश्वर मंदिर
रत्नागिरी जिल्ह्यातील अलकनंदा, वरुणा व शास्त्री नदीच्या संगमाचे ठिकाण असलेले संगमेश्वर एक पवित्र धार्मिक स्थळ आहे. सह्याद्री खंडामध्ये या प्रदेशाला रामक्षेत्र असे म्हटले आहे. सातव्या शतकात चालुक्य राजा कर्ण याने आपली राजधानी करवीर, कोल्हापूर इथून संगमेश्वर येथे स्थापन केली. त्यानंतर या गावाला मोठी तटबंदी बांधून मंदिरे आणि महाल उभारले. बाराव्या शतकात लिंगायत समाजाचे बसव यांचे वास्तव्य संगमेश्वरमध्ये होते, तर सोळाव्या शतकात विजापुरी अंमल होता. सतराव्या शतकात शेख मुकर्रबखानाने छत्रपती संभाजीराजांना बेसावध स्थितीत संगमेश्वरातच कैद केले होते. या संगमेश्वरामध्ये कर्णेश्वर मंदिर आहे. याला सन २०१२ मध्ये पुरातत्व विभागाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले.
मुंबई-गोवा महामार्गावरून संगमेश्वरच्या कसबा पेठेकडून थोडे पुढे गेल्यावर अप्रतिम शिल्पकाम असलेले कर्णेश्वर मंदिर दृष्टीस पडते. सह्याद्री खंडातील श्लोकांवर आधारित श्रीकरण सुधानिधी ग्रंथावरून शेषकवीने संकलित केलेल्या संगमेश्वर महात्म्य या संस्कृत पोथीमध्ये या मंदिराची माहिती आढळून येते. कर्णेश्वराच्या मंदिराची निर्मिती इ. स. १०७५ ते १०९५ या कालखंडात गुजरातच्या चालुक्य कुळातील राजा कर्णदेव याने केली असावी, असे अभ्यासकांचे मत आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या दार्शनिकेमध्ये हा कर्ण राजा कोल्हापूरचा असण्याची शक्यता नमूद केली आहे.
हे मंदिर भूमीज नागर शैलीतील पूर्वाभिमुख मंदिर आहे. हे मंदिर तारकापीठावर स्थित असून, त्याचे महाद्वार पूर्वाभिमुख असून पश्चिम आणि उत्तर दिशांनासुद्धा प्रवेशद्वारे आहेत. मंदिरावर अनेक शिल्पपट कोरलेले आहेत. भूमीज शैलीची मंडप, महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी याची परिपूर्ण रचना आहे. मंदिरावर आतमध्ये आणि बाहेरील बाजूस विष्णूचे दशावतार, कमल वेलींच्या मालिका, महिषासुरमर्दिनी, नृसिंह, गणपती, सरस्वती, कीर्तिमुख, सुरसुंदरी आणि अनेक देवदेवतांच्या मूर्ती अशी असंख्य अलंकरणे अंकित केलेली आहेत. या सर्वांची काळ्या पाषाणातील कलाकुसर आपल्याला मंत्रमुग्ध करते. मंदिर काळया पाषाणात बनविलेले असले, तरी याचा कळस मात्र दगड-माती, विटांपासून बनवून त्यावर गूळ-चुन्याचा गिलावा दिलेला आहे. कर्णेश्वर मंदिराची रचना करणाऱ्या स्थापतीला १० हजार सुवर्णमुद्रा दिल्या होत्या. मुख्य मंदिराच्या पूर्व प्रवेशद्वारावर द्रम्म आणि गद्याण या चलनांचा उल्लेख असणारा एक शिलालेख आहे. इथे एक गद्धेगळही आहे. त्याच्यावरील लेखही (म्हणजेच शापवाणी) झिजलेला आहे. मंदिराच्या आतमध्ये ब्रम्हदेव, शेषधारी विष्णू आणि बसलेली वरदलक्ष्मी यांची शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराच्या गर्भगृहात कर्णेश्वराची पिंडी असून, पार्वतीची मूर्तीही आहे. मंदिराच्या प्रांगणात सूर्यनारायण आणि गणपतीचे मंदिर आहे. सात घोड्यांच्या रथावर सूर्यमूर्ती उभी असून, मूर्तीच्या प्रभावाळीमध्ये १२ राशींचे अंकन केले आहे.
कर्ण राजाने या मंदिराच्या धर्मकार्यार्थ धर्मपूर (म्हणजे
आत्ताचे धामापूर), सुपारीसाठी गुणवल्लिका, तुपासाठी शिवणी, यज्ञासाठी लवल
(म्हणजे लोवले), फळांसाठी पनसगाव, उत्सवासाठी धमनी (आजचे धामणी),
धर्मसेवकांच्या राहण्यासाठी कदंब-आम्रपाली ही गावे नेमून दिल्याचे
पोथीमध्ये म्हटले आहे. या मंदिराच्या जवळपासच्या परिसरात अनेक पुरातन
मंदिरांचा समूह आहे. ही सर्व देवालये आजही अपरिचित आणि दुर्लक्षित आहेत.
कर्णेश्वर मंदिराच्या व्यतिरिक्त अलकनंदा नदीच्या उगमापाशी सप्तकोटीश्वर
मंदिर आहे. इतर ठिकाणी सोमेश्वर, कुंभेश्वर, काशी विश्वेश्वर, केदारेश्वर,
रावणेश शंकर, जलयुक्त नंदिकेश (संगम मंदिर), काळ भैरव, लक्ष्मी नृसिंह,
दूधपिता गणपती अशी मंदिरेही आहेत. यापैकी एका मंदिराच्या मंडपाच्या बाहेरील
पट्टीकेवर कामशिल्पे कोरलेली आहेत. या सर्व मंदिरांचा निर्मितीकाळ निश्चित
झालेला नाही. पण ही मंदिरे इ. स. ५७५पासून पुढील काळात निर्माण झाली
असावीत, असा कयास आहे.
कसे जाल?
मुंबई-गोवा महामार्गावर कसबा संगमेश्वर तालुक्याचे ठिकाण लागते. एसटी स्टॅन्डपासून दोन किलोमीटरवरून कसबा गावात जाण्यासाठी फाटा लागतो. कोकण रेल्वे मार्गावरही संगमेश्वर नावाचे रेल्वे स्थानक आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पुणे इत्यादी ठिकाणांहून थेट एसटी सेवा आहे किंवा जवळच्या रत्नागिरी, चिपळूण या ठिकाणी पोहोचून पुढील वेगळ्या एसटीने जाता येते.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील कर्णेश्वर हे एक प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. हे मंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. देवीने दिलेल्या आदेशानुसार एका रात्रीत हे मंदिर बांधण्याचा संकल्प पांडवांनी केला होता. त्यानुसार या मंदिराचे बांधकाम करण्यात आले होते.
-गोवा महामार्गालगत असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा भागात प्राचीन मंदिरे पाहायला मिळतात. या भागाला ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांना याच भागात अटक करून तुळापूर येथे नेऊन त्यांचा क्रूर हत्या केली. कसबाची अशीच वेगळी ओळख म्हणजे येथील पांडवकालीन श्री कर्णेश्वराचे हेमाडपंथी मंदिर.
संगमेश्वरपासून दोन किलोमीटर अंतरावर अत्यंत रम्य परिसरात असलेले हे मंदिर उत्तम स्थापत्यकलेचा नमुना आहे. पांडवांनी अज्ञातवासाच्या काळात सहावा भाऊ कर्ण याच्या स्मरणार्थ या मंदिराची उभारणी केली, अशी आख्यायिका येथे प्रचलित आहे. म्हणून हे मंदिर 'कर्णेश्वर' नावाने ओळखले जाते. वास्तूचे काम सुरू असतानाच पांडव येथून निघून गेले आणि पुढे शिलाहार राजाच्या काळात शिखराचे काम पूर्ण करण्यात आले, अशी माहिती मंदिर व्यवस्थापनाकडून मिळते.
कर्णेश्वर मंदिराला तीन दरवाजे आहेत. पूर्वाभिमुख मंदिराच्या प्रवेशद्वारावर 'शिवपंचायत' आहे. त्याच्या डाव्या बाजूस नरकासूर आणि उजव्या बाजूस किर्तीसुराच्या मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस दशावताराचे शिल्प कोरण्यात आले आहे. द्वाराजवळ पांडवांचे ताट म्हणून ओळखले जाणारे उपडे ताट आहे. त्यावर बकुळीचे फुल कोरलेले आहे. ताटाच्या बाजूस पांडवांची आसने दिसतात. मंदिराच्या महाद्वाराजवळ नंदीमंडप आणि दोन अष्टभैरव द्वारपाल आहेत.
मुख्य मंडपात प्रवेश करताच नंदी आणि त्यानंतर शंकराच्या मूर्तीचे दर्शन घडते. मंडपाला चार एकसमान खांब आहेत. दक्षिण द्वाराजवळील खांबावर शिलालेख कोरलेला आढळतो. मंदिरात पांडवाच्या पाच ताटासोबत सहावे ताट कर्णाचे म्हणून ओळखले जाते आणि त्यावर शंकराची पिंडी आहे. मुख्य मंडपाच्या डाव्या हाताला श्री महालक्ष्मीची मूर्ती आणि उजव्या बाजूला शेषशायी विष्णूची मूर्ती आहे. मंदिरातील देव, दानव, नृत्यांगना, किन्नर, यक्ष-यक्षिणी, आदी मूर्तींचे कोरीव काम अत्यंत सुंदर आहे.
मंदिराच्या बाहेरील बाजूसही उत्तम कोरीवकाम केले असून शिल्पकलेचा अप्रतिम दर्शन मंदिर न्याहाळताना होते. मंदिर आवारात उत्तर दिशेला सूर्यमूर्ती आणि समोरच्या बाजूस गणेशाचे मंदिर आहे. मंदिरापासून काही अंतरावरच अलखनंदा, वरुणा आणि शास्त्री नद्यांचा संगम पाहायला मिळतो. या नद्यांच्या संगमामुळेच 'संगमेश्वर' नाव प्रचलित झाले. संगमाचा परिसर निसर्गरम्य असून संगमाला दिलेली भेट तेवढीच आनंद देणारी असते.
अप्रतिम कलाकुसरीचा नमुना असलेल्या या मंदिराला भेट दिल्यानंतर महामार्गाला लागूनच असलेल्या आरवली, राजावाडी आणि गोळवली येथील गरम पाण्याच्या कुंडांनाही भेट देता येते. जवळच असलेल्या बुरबांडच्या प्राचीन मंदिरालाही जाता येते. प्राचीन आख्यायिका आणि ऐतिहासिक घटनांशी जोडल्या गेलेल्या या परिसराची भेट इतिहासाचे अभ्यासक आणि कलाप्रेमींसाठी मोठी पर्वणीच ठरते.
कर्णेश्वर मंदिर संगमेश्वर
Karneshwar Temple is about a thousand years old. कर्णेश्वर मंदिर It is a live example of an amazing and irrational architectural art in history. In spite of such an ancient temple, I try to bring you in front of such a world. From our experience in this area, information about the history, photographs, how to get here, tips, things to see, which you will use as a travel guide during the family trip of ratnagiri konkan tourism.
कर्णेश्वर मंदिर हे अंदाजे एक हजार वर्षांपूर्वीचे हे मंदिर म्हणजे इतिहासातील एक अप्रतिम आणी अतर्क्य वास्तु कलेचे जिवंत उदाहरण आहे. एवढे पुरातन मंदिर असूनही फार कमी पर्यटकांना. या ठिकाणांबद्दल माहिती आहे. अश्या कोकणातील अजरामर वास्तूस जगा समोर आणण्याचा हा प्रयत्न. या भागात आमच्या अनुभवातून येथील इतिहास, छायाचित्रे, येथे कसे पोहोचायचे, टिप्स, पाहण्यासारख्या गोष्टी, याची माहिती जी तुम्हाला प्रवास मार्गदर्शक म्हणुन कौटुंबिक सहली दरम्यान उपयोगास येईल. कर्णेश्वर मंदिर, संगमेश्वर, कळंबस्ते रोड, कसाबा, वाडा ठिकनाट, महाराष्ट्र.
Personal Experience of Karneshwar Temple

We had visited Karneshwar temple during our Ratnagiri trip. This is an attempt to bring lesser known places in Maharashtra and Indian culture to the world by visiting them.

आम्ही आमच्या रत्नागिरी सहली दरम्यान कर्णेश्वर मंदिरास भेट दिली होती. महाराष्ट्रातील आणी भारतीय संस्कृती मधील कमी माहीत असलेल्या ठिकाणांना भेट देऊन त्यांना जगासमोर आणण्याचा हा एक प्रयत्न. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आणी गगन गिरी महाराज यांनी येथे भेट दिली होती.
History of Karneshwar Temple travel guide – कर्णेश्वर मंदिराचा इतिहास
While studying the history of Karneshwar temple, we came across two narratives. The first of these is in writing in a few articles and clippings. And the other is known to us through the locals and the priests. We have summarized both here.

कर्णेश्वर मंदिराच्या इतिहासाबद्दल अभ्यास करताना आम्हास दोन आख्यायिका समोर आल्या. त्यातील पहिली ही काही लेख आणी कातरणांमध्ये लिखित स्वरुपात आहे. आणी दुसरी आम्हास तेथील रहिवाशी आणी पुजारी यांच्या मार्फत अवगत झाली आहे. आम्ही दोहोंचा सारांश येथे नमूद केला आहे.
Narrative of Karneshwar Temple कर्णेश्वर मंदिर आख्यायिका
Narrative 1,
According to the first legend, Karneshwar temple was built by King Karna during the Chalukya rule and his adored Lord Shiva was established. Hence the name of this temple is Karna ka Ishwar = Karneshwar

पाहिल्या आख्यायिकेनुसार कर्णेश्वर मंदिर हे, चालुक्य राज्यसत्ते दरम्यान राजा कर्ण यांनी या मंदिराचे निर्माण केले आणी त्यांचे आराध्य भगवान शिव यांची स्थापना केली. त्यामुळे या मंदिराचे नाव कर्णा चा ईश्वर = कर्णेश्वर
Narrative 2, आख्यायिका 2
According to another Narrative, this temple dates back to the Pandava period. This. This is the Mahendragiri mountain of that time where Parashuram taught Suryaputra Karna archery. The temple was built on the orders of Lord Parshuram and was built by the five Pandavas themselves.
दुसर्या आख्यायिकेनुसार हे मंदीर पांडव कालीन आहे. हे. त्यावेळचा हा महेंद्रगिरी पर्वत जेथे परशुराम यांनी सूर्यपुत्र कर्ण यास धनुर्विद्या शिकवली. भगवान परशुराम यांच्या आदेशानुसार या मंदिराची उभारणी करण्यात आली आणी स्वतः पाच पांडवांनी या मंदिराचे निर्माण केले आ त्यांच्या काही खुणा, जेवणाची थाळी, शिलालेख, बसण्याची जागा, खांबांवर असलेली कलाकृती, सांकेतिक भाषा, या द्वारे आम्हाला एक गोष्ट सांगण्यात आली ती खालील प्रमाणे.

The construction of this temple was done in one night by the Pandavas, one night of that time is six months today. This temple is built on a crocodile shaped rock. Therefore, one can walk around the temple only from the path around the temple. Inside the temple, there are five dishes of Pandavas. And there is an inscription, anyone who can understand the text in that inscription can understand the mystery of this Vastu. This is according to legend. The climax of this temple could not be completed due to dawn. Otherwise it would have gained as much importance as Kashi.
या मंदिराचे बांधकाम हे एका रात्रीत पांडवा मार्फत करण्यात आले, त्यावेळची एक रात्रं म्हणजे आजचे सहा महिने. हे मंदिर एका मगरीच्या आकाराच्या शिळेवर स्थापन केले आहे. त्यामुळे मंदिरा भोवती असलेल्या मार्गावरूनच मंदिराला प्रदक्षिणा घालता येते. मंदिराच्या आत, पांडवांच्या पाच थाळ्या आहेत. आणी एक शिलालेख आहे, जो कोणी त्या शिलालेखात असलेला मजकुर समजू शकेल त्यास या वास्तु चे गुढ समजता येइल. या आख्यायिकेनुसार असे ही सांगितले जाते. की या मंदिराचा कळस हा पाडावांना पहाट झाल्या मुळे पूर्ण करता आला नाही. अन्यथा यास काशी येवढे महत्व प्राप्त झाले असते.
The structure and architecture of the Karneshwar temple
कर्णेश्वर मंदिराची रचना आणी वास्तूकला
Karneshwar Temple is a perfect example of Hemadpanti sculpture and architecture. It has incredible carvings in black stone. The carvings of the Bakuli flower chandelier on the main door of the temple are magnificent.
कर्णेश्वर मंदिर हे हेमाडपंती शिल्प आणी वास्तु रचनेचे उत्तम उदाहरण आहे. यामध्ये काळ्या पाषाणात अगदी अविश्वसनीय असे कोरीव काम करण्यात आले आहे. मंदिराच्या मुख्य दरवाज्या वरील बकुळीच्या फुलाचे झुंबराचे नक्षीकाम हे अप्रतिम आहे.
The temple has three main entrances, with Dasavatar of Lord Vishnu, idols of deities on the pillars. The main thing is that only half figures of Lord Ganesha and other gods are carved on the pillars here. The eight-direction deity, and the combined temple of Brahma, Vishnu and Mahesh is here.
मंदिरास तीन मुख्य दरवाजे असून तेथे, भगवान विषाणूंचे दशावतार, खांबांवर असलेले देवदेवतांच्या मूर्ती. मुख्य म्हणजे येथील खांबांवर श्री गणेश, आणी ईतर देवांचे फक्तं अर्ध आकृती कोरलेली आहेत. आठ दिशांचे देव, आणी ब्रम्हा, विष्णु आणी महेश यांचे एकत्रित मंदिर येथेच आहे.
Tips and Things to do
- Meet the priest for complete information about the temple.
- The temple is just 2 km from Mumbai-Goa highway.
- Parking is not available near the temple.
- The main entrance to the temple is from the east.
- Look carefully at the inscriptions in the temple.
- Hotels and Accommodation
- Bhairi Bhavani tourist accommodation is just 10 minutes away
- Visit the memorial of Chhatrapati Sambhaji Maharaj at Sangameshwar.
- Keep the sanctity of the temple intact
- Clik on below map links
- Unknown place of ratnagiri konkan tourism.

काही महत्त्वाच्या टिपा
- मंदिराच्या संपूर्ण माहिती साठी येथील पुजारी काकांना भेटा.
- मंदिर मुंबई गोवा हायवे पासून अगदी 2 Km अंतरावर आहे.
- मंदिराच्या जवळ पार्किंग उपलब्ध नाही त्यामुळे अलीकडच्या नाक्यावर पार्किंग करता येईल.
- मंदिरात पूर्वेकडून प्रवेश करावा हा मुख्य दरवाजा आहे.
- मंदिरातील शिलालेख आवर्जून पाहावा.
- हॉटेल्स आणी रहाण्याची सोय
- भैरी भवानी पर्यटक निवास अगदी 10 मिनिटे अंतरावर आहे
- संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकास आवर्जून भेट द्या.
- मंदिराचे पावित्र्य अबाधित ठेवा
How to reach karneshwar Temple travel guide
- Nearest Airport is Ratnagiri Airport = 40 Km
- Railway station = Sangameshwar = 3.8 Km
- By road distance from Nearby cities to Karneshwar temple
- Mumbai to Karneshwar temple = 287 Km
- Pune = 294 Km
- Ratnagiri = 45 km
- Panji Goa = 247 Km
- Sawantwadi = 192 Km
- Kolhapur = 121 Km
- Bengalor = 734 Km
- Belgaum = 230 Km
- Satara = 181 Km
कोकणातील प्राचीन वास्तुकलेचा नमुना संगमेश्वरचे कर्णेश्वर मंदिर
विवेक ताम्हणकर
कोकणातील अनेक मंदिरे म्हणजे वास्तुकलेचे उत्तम नमुने. आज जमीनदोस्त झालेल्या या मंदिरांमध्ये अप्रतिम कलाकृती साकारल्या गेल्या होत्या.
मंदिराची झालेली दुरावस्था आणि नामशेष होत चाललेली प्राचीन कलाकृती याकडे सरकार , पुरातत्त्व खाते किंवा अभ्यासक यांचे लक्ष नाही. त्यामुळे हा प्राचीन वास्तुकलेचा नमुना नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
कोकणला ऐतिहासिक पाश्र्वभूमी लाभलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत: उभारलेले गडकिल्ले आणि काही मंदिरे वास्तुकलेचा सुंदर नमुना म्हणून आपल्याला अभ्यासता येतो. सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यामध्ये विमलेश्वर मंदिर, कुणकेश्वर मंदिर, रामेश्वर मंदिर आदी वास्तुकलेची सुंदर उदाहरणे आहेत.
सातव्या शतकात कोकणापर्यंत चालुक्य राजवट होती. राजा कर्णराज याने रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्याच्या कसबा गावात प्रतिकाशी निर्माण करण्याच्या विचाराने शंकराची बारा मंदिरे बांधली. शंकरभक्त कर्णराजाने हेमाडपंथी वास्तुकलेत बांधलेल्या या मंदिरापैकी फक्त दोन-तीन मंदिरे आज याठिकाणी सुस्थितीत आहेत. उर्वरित सर्व मंदिरे मानवी दुर्लक्षामुळे जमीनदोस्त झालेली आहेत.
संगमेश्वर गावाला पुरातन काळापासून फार महत्त्व आहे. पुराणात संगमेश्वर महात्म्य म्हणून संगमेश्वरबाबतचे महत्त्व आढळते. सातव्या शतकातील चालुक्य राजवटीत शंकरभक्त कर्णराजा याला संगमेश्वरचे नैसर्गिक सौंदर्य फारच भावले. त्यामुळे त्याने संगमेश्वरच्या कसबा गावामध्ये प्रतिकाशी बनवायचा संकल्प केला. शंकराची छोटी-मोठी मिळून बारा मंदिरे बांधली.
मंदिराचे सर्व बांधकाम काळ्या दगडामध्ये करण्यात आलेले आहे. अलकनंदा नदी व शास्त्री नदीच्या काठावर संगम मंदिराचे बांधकाम केले. सूर्यनारायण मंदिरही बांधले. आजच्या घडीला या दोन मंदिरांसोबत मुख्य कर्णेश्वर मंदिर मिळून बारापैकी तीन मंदिरे सुस्थितीत उभी आहेत.
संगमेश्वरमधून वाहणाऱ्या शास्त्री आणि सोनवी नदीच्या संगमामुळे त्या गावाला संगमेश्वर हे नाव पडले. सभोवताली हिरवेगार डोंगर आणि बारमाही वाहणाऱ्या नद्या, सुंदर-सुंदर ठिकाणे, बारमाही पिकणारी शेती ही या भागातली श्रीमंती आहे. संगमेश्वरला फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.

कसबा गावातच सरदेसाईंच्या वाडय़ात संभाजी महाराज आलेले असताना शत्रूला कानोसा लागला आणि याच ठिकाणी संभाजी महाराजांना कैद करण्यात आले. गुप्तहेराने सूचित करूनही या कोकणात शत्रू कसा येणार यावर विश्वास नसलेले महाराज वाडय़ातच बसून राहिले आणि शत्रूच्या तावडीत सापडले.
संभाजी महाराजांच्या काळात न्याय-निवाडय़ाची कामे या सरदेसाईंच्या वाडय़ात चालायची. महाराष्ट्रातील मराठय़ांचा इतिहास ज्या जागेवर बदलला, संभाजी महाराज जिथे बंदिवान झाले त्या जागेतील सरदेसाईंचा वाडा उद्ध्वस्त झालेला आहे. मात्र वाडय़ाच्या चौथऱ्याच्या काही खाणाखुणा पाहायला मिळतात.
या जागेत येथील लोकांनी घाण, मानवी विष्ठा टाकून पवित्र जागा अपवित्र करून टाकली आहे. येथील रस्त्याला ‘संभाजी महाराज पथ’ म्हणून नाव दिलेले आहे. एवढीच काय ती संभाजी महाराजांची ऐतिहासिक ओळख येथे पाहायला मिळते. याच ऐतिहासिक जागेशेजारी सातव्या शतकात बांधलेली शंकराची मंदिरे आहेत.
या बारा मंदिरांपैकी कर्णेश्वराचे प्रसिद्ध मंदिर आहे. हेमांडपंथी वास्तुकलेतले हे मंदिर पूर्णपणे काळ्या दगडात कोरलेल्या दगडांनी बनविलेले आहे. सुंदर नक्षीकाम, देवतांची चित्रे, दगडात कोरून त्यांना अत्यंत कलात्मकरित्या मंदिराच्या भिंतीमध्ये बसवलेले आहे.
मंदिराच्या मुख्य दरवाजातून प्रवेश करताच समोरच वर्तुळाकार नक्षी पहायला मिळते. मंदिराच्या चारही दरवाजांमध्ये अशा प्रकारच्या वर्तुळाकार नक्षी आहेत. डोक्यावर दगडात कोरलेला सुंदर झुंबर पाहायला मिळतो. प्रवेशद्वारात डोक्यावरच आठही कोनांमध्ये अष्टदिक्पालांच्या मूर्ती पाहायला मिळतात. प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश केल्यानंतर येथील खांबांचे नक्षीकाम डोळ्यात भरते.
या खांबांची रचना कोल्हापूरमधल्या महालक्ष्मी मंदिरातील नक्षीकामाशी जुळते. मंदिरात अत्यंत कलात्मक अशी नंदीबैलाची मूर्ती आहे. गाभाऱ्यात शंकराची एक फूट उंच िपडी पाहायला मिळते. मंदिरातील एका खांबावर शिलालेखही आढळून येतो. हा शिलालेख प्राचीन हस्तकलेत कोरलेला आहे. मंदिराच्या खांबांवर विविध देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.
कोरीव कामातील आणि हस्तकलेतील राखलेले तारतम्य आणि निर्माण केलेली कलाकृती त्यावेळच्या कलानिर्मितीचे सुंदर चित्र आपल्यासमोर उभे करते. त्या मंदिराच्या कलाकुसरीनुसार आणि या मंदिराच्या कलेशी साधम्र्य असलेली उर्वरित सर्व मंदिरे पाहायला मिळतात.
कर्णेश्वर मंदिराच्या परिसरातच सूर्यनारायणाचे मंदिर आहे. महाशिवरात्रीला कर्णेश्वर मंदिरात मोठा उत्सव होतो. वर्षभर मोठय़ा संख्येने भाविक या ठिकाणी भेट देतात. त्याशिवाय परदेशातील अनेक पर्यटक हे मंदिर पाहायला येतात. काही लोक या वास्तुकलेचा अभ्यास करण्यासाठी मुद्दामहून या ठिकाणी येतात.
कसबा येथील मंदिरांमध्ये असलेल्या सुंदर मूर्त्यां आणि खांबांवरील कोरीव काम केलेल्या दगडांना आंतराराष्ट्रीय बाजारपेठेत लाखो रुपये किंमत आहे. मात्र ही लाखो रुपयांची संपत्ती आज जमिनीमध्ये सडत पडली आहे.
कोकणमध्ये अनेक ऐतिहासिक ठेवे आहेत. गोवा राज्यामध्ये, राजस्थान राज्यामध्ये असे ऐतिहासिक ठेवे जपून त्याचा पर्यटनदृष्टय़ा व्यावसायिक वापर करून घेण्यात आला.
गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी बांधलेले चर्च आजही पर्यटकांचे आकर्षण स्थान आहे. लाखो पर्यटक गोव्याला भेट देतात. किंबहुना या दोनही राज्यांची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे, असं म्हणण्यापेक्षा या पर्यटन व्यवसाय निर्मितीसाठी या राज्यांनी हे ऐतिहासिक ठेवे यामध्ये मंदिरे, चर्च, ऐतिहासिक वास्तू जपल्यात. त्याची पुनर्बाधणी केली आणि आजच्या पिढीसमोर इतिहास ठेवण्यात यश मिळविले.
मात्र दुर्दैवाने पौराणिक वारसा आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात पर्यटनाच्या नावाने फक्त बोंब मारली जाते. मात्र पर्यटन रुजविण्यासाठी आणि आमचा इतिहास पुढच्या पिढीला सांगण्यासाठी काहीही केले जात नाही. याचे सुंदर उदाहरण संगमेश्वरमधील कसबा गावातील शंकराच्या मंदिराची झालेली अवस्था हे आहे.
प्राचीन कलाकृतीमधल्या वस्तुंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाखो रुपये किंमत मिळते. संगमेश्वर तालुक्यातील कसबा गावात आज जमीनदोस्त झालेल्या मंदिरांमध्ये आणि मंदिराच्या दगडांमध्ये अप्रतिम कलाकृती साकारलेल्या आहेत. याकडे अद्यापही तस्करांचे लक्ष गेलेले नाही.
म्हणून या कलाकृती इथे पडलेल्या पाहायला मिळतात. मंदिरांची झालेली दुरावस्था आणि नामशेष होत चाललेली प्राचीन कलाकृती याकडे सरकार, पुरातत्त्व खाते किंवा अभ्यासक लक्ष देत नाहीत. त्यामुळे हा प्राचीन वास्तुकलेचा नमुना नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
कर्णेश्वरचा कलाविष्कार

कोकणात प्राचीन म्हणता येतील अशी खूप मंदिरे नाहीत. संगमेश्वराच्या परिसरात सोमेश्वर, काशी-विश्वेश्वर आणि कर्णेश्वर ही मंदिरे सुस्थितीत आहेत. त्यापैकी कर्णेश्वर मंदिर दगडात केलेल्या कोरीवकामाचा उत्कृष्ट वारसा जपून आहे. संगमेश्वरला अलकनंदा आणि वरुणा या दोन नद्या जिथं एकत्र येतात तिथं जवळच हे स्थान आहे. जवळपास एक हजार वर्षे जुने असलेले हे मंदिर कर्णराजाने बांधले असे सांगितले जाते. हा चालुक्य वंशातील राजा असून या भागात त्याचे शासन असल्याची नोंद ऐतिहासिक साधनांत आहे.

दहा चौरस मीटर आकाराचा मुखमंडप मग पुढे अंतराळ आणि नंतर गर्भगृह अशी मंदिराची साधारण रचना आहे. मंदिर हे जोत्यावर बांधलेले असल्याने तीन बाजूला पायऱ्यांची सोय केलेली दिसते. या पायऱ्या चढून गेल्यावर जी अर्धमंडपाची जागा येते तिथं वर्तुळाकार शिळा कोरलेल्या आहेत. अप्रतिम दगडी झुंबरे इथं दिसतात. वर्तुळाकार शिळांना स्थानिक पराती म्हणतात. अशा एकंदर पाच पराती मंदिरात असून पाच पांडवांच्या जेवणाची ती सोय होती अशी दंतकथा प्रचलित आहे.

मंडपाच्या करोटक वितानाच्या बाजूला शेषशायी विष्णू दिसतो. त्याची दृष्टी कोरीव दशावतारांकडे आहे असं भासतं. समुद्र मंथन, यशोदा दधि मंथन असे प्रसंग इथं कोरलेले दिसतात. इथली करोटक वितानाची रचना अहमदनगरच्या ताहकरी मंदिराशी साधर्म्य असलेली आहे असं ज्येष्ठ पुरातत्व शास्त्रज्ञ गो. ब. देगलूरकर सांगतात.

मंडपातील स्तंभशीर्षांवर (column capitals?) कीचक कोरलेले असतात तिथं गणेश, सरस्वती, चामुंडा, भैरव अशा बसलेल्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात. या मंदिरात सिंहग शिवाच्या मूर्ती दिसतात. म्हणजे नंदी ऐवजी स्थानक शिवाबरोबर सिंह प्रतिमा कोरलेली दिसते. मथुरा येथील संग्रहालयात अशी मूर्ती असल्याचे देगलूरकर सांगतात. त्यांच्यामते अशा मूर्ती साधारणपणे ४-५व्या शतकानंतर नाहीत. त्यामुळे १२व्या शतकातील ही मूर्ती विशेष महत्त्वाची ठरते. मुखमंडप, अर्धमंडप आणि मुख्य मंडप या सर्वांना करोटक पद्धतीची विताने आहेत.. म्हणजे ceiling आहेत. तिथं कर्णदुर्दरक, गजतालू, लूम आणि लोलक-झुंबर अशी रचना असल्याचे देगलूरकर वर्णन करतात.शंकराला अभिषेक झाल्यानंतर ते पाणी वाहून बाहेर पडण्यासाठी जो मार्ग आहे त्याच्या मुखाशी मकरमुख रचना आहे. मकर म्हणजे गंगेचे वाहन. इथं येणारे पाणी हे गंगाजल समजून तीर्थप्राशन करायचे असा संकेत या रचनेतून व्यक्त होतो.

या ठिकाणी नवीन बांधलेले मंदिर आहे ते श्रीगणेशाचे आहे. त्यावरून प्राचीन काळी हे गणेश पंचायतन असावे असा कयास देगलूरकर मांडतात. वायव्य कोपऱ्यात सूर्याचे छोटेसे मंदिर आहे. सात घोड्यांवर स्वार सूर्य आणि सोबत उषा-प्रत्युषा प्रतिमा अशी रचना इथं पाहता येते.
वायव्य कोपऱ्यात सूर्याचे छोटेसे मंदिर आहे. सात घोड्यांवर स्वार सूर्य आणि सोबत उषा-प्रत्युषा प्रतिमा अशी रचना इथं पाहता येते.
संदर्भ –
कोकणातील लेणी, मंदिर स्थापत्य आणि मूर्तिशास्त्र – गोरक्ष ब. देगलूरकर – कोकण: विविध दिशा आणि दर्शन (पृष्ठ क्रमांक १५८-१५९)
Karneshwar Temple, Sangameshwar
Karneshwar Temple, Kasaba, SangameshwarThis temple was built 1600 years ago by Karna of Kolhapur. This place is 384 km away from Mumbai and 41 km away from Ratnagiri City. Temple is situated 4 km away from Sangameshwar and is one of the important places in Sangameshwar taluka. The statues and carvings of many Hindu Gods can be seen on the walls of Karneshwar temple.
कसबा संगमेश्वर | Discover Maharashtra

कसबा संगमेश्वर –
महाराष्ट्राचे भौगोलिक दृष्ट्या प्रामुख्याने दोन भाग पडतात ते म्हणजे कोकण व देश.या राज्याला ७२० किलोमीटर लांबीची सागरी किनारपट्टी लाभली आहे.या किनारपट्टीच्या लगतचा सर्व भूप्रदेश भरपूर पर्जन्यमान व घनदाट वनश्रीने नटलेला आहे यालाच कोकण म्हणून संबोधण्यात येते.कोकणात आंब्याच्या राया,काजू,सुपारी ,नारळ ,कोकम,केळी,फणस इत्यादींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.उर्वरीत महाराष्ट्र हा देश म्हणून परिचित आहे.हिंदुस्थानातील व्यापार हा प्राचीन काळापासून प्रामुख्याने सागरी मार्गाने होत असे.परकीय आक्रमक मात्र खुष्कीच्या म्हणजेच जमिनी मार्गाने हिंदुस्थानात आले आहेत.मात्र १६ शतकात फ्रेंच ,इंग्रज ,पोर्तुगीज,डच हे सागरी मार्गाने हिंदुस्थानात आले.(कसबा संगमेश्वर)
कोकणातील समाज जीवनावर प्राचीन काळापासून विविध देशातील व्यापारी लोकांच्या रूढी,चाली,बोली भाषा,संस्कृतीचा विशेष प्रभाव राहिला आहे.निसर्गाने भरभरून दिले असल्याने संपूर्ण कोकण प्रेक्षणीय आहे.अनेक एतदेशीय व परकीय राजसत्तांनी हा भूभाग आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी अनेक लढाया झालेल्या इतिहासाने पाहिल्या आहेत.प्रत्येक राजसत्तेला कोकण किनारपट्टी आपल्या अमलात हवी होती कारण अनेक देशाशी व्यापार उदीम व शस्त्रास्त्र आयात करणे सुलभ होते.कोकणी जीवन व देशावरचे जीवन यात मह्तअंतर आहे.निसर्ग पूजा ही कोकणी माणसाच्या रक्तात आहे.
मुंबई -गोवा महामार्गावर अनेक ऐतिहासिक व प्रेक्षणीय ठिकाणे आहेत,जी पर्यटकांना नेहमीच भूरळ घालीत असतात.सह्याद्रीच्या भटक्यांना येथील गिरीशिखरे,किल्ले व घाटवाटा म्हणजे पर्वणीच असते.डोंगर द-या,धबधबे,इवल्याशा वेडीवाकडी वळणे घेऊन वाहणाऱ्या कोकणाच्या जीवन वाहिन्या (नद्या )आपले निखळ सौंदर्य भूमीपुत्रांना व भटक्यांना प्रामाणिकपणे देत आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा संगमेश्वर हे असेच ऐतिहासिक निसर्ग संपन्न ठिकाण आहे.सोनवी,अलखनंदा व शास्त्री नदीचा जेथे संगम होतो ते ठिकाण म्हणजे कसबा संगमेश्वर होय.या दोन्ही नद्यांच्या संगमामुळेच या कसब्या(गावाला) संगमेश्वर नाव मिळाल्याची शक्यता आहे.
छ.शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सुरवात पुणे जिल्ह्यातील बारा मावळातून केली होती.स्वराज्य विस्तार करीत असताना दूरदृष्टी असलेल्या छत्रपतींची नजर कोकणी मुलूखावर होतीच.चंदरराव मोरेचे पारिपत्य करून जावळीचे खोरे व रायरीचा(रायगड )किल्ला स्वराज्यात घेऊन कोकणात प्रवेशाची सुरवात केली.छ.शिवाजी महाराजांनी शृंगारपूर घेतल्यानंतर म्हणजे १६६१ सालानंतर संभाजी महाराजांचा विवाह पिलाजी शिर्के यांच्या कन्ये बरोबर झाला,तिचे नाव “येसूबाई” ठेवण्यात आले.शिर्के हे दाभोळ मामले रायरीचे देशमुख होते.त्यांना रायरी-शिरकाण येथील सरदेशमुखीचे वतन होते.शिर्केंचे कुलस्वामिनी शिर्काई म्हणून त्यांच्या ताब्यातील प्रदेशास ” शिरकाण” म्हणून संबोधण्यात येत होते. याच शृंगारपूर मध्ये १८/५/१६८२ रोजी छ.संभाजी महाराज व येसूबाई यांना मुलगा झाला ज्याचे शिवाजी असे ठेवण्यात आले.मात्र तेच पुढे छ.शाहू या नावाने ओळखण्यात येऊ लागले.
शृगारपूर व संगमेश्वर दोन्ही ठिकाणे जवळजवळ एकच आहेत.छ.शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून छ.संभाजी महाराज कारभार पाहू लागले.छ.संभाजी महाराजांची अनेक कसोट्यावर निकराचा संघर्ष सुरू होता.सिद्दी,इंग्रज,पोर्तुगेज फिरंगी,मुघल,आदिलशाही,कुतुबशाही आणि गृहकलहाशी छ.संभाजी महाराज यशस्वी लढा देत होते. मुघल बादशाह औरंगजेब लाखों सैन्यानिशी दक्षिणेत आला होता.त्याने दिडशे वर्षे राज्य करणारी आदिलशाही व कुतूबशाही नष्ट केली होती.आता मुघल बादशाहचे लक्ष शिवप्रभूंने निर्माण केलेल्या स्वराज्यावर होते.
राज्य कारभारात कवी कलशाचे असलेले महत्त्व इतरांच्या नजरेला खूपत होते आणि विशेषतः छ.संभाजी महाराजांना अडचणीत आणण्यासाठी जवळचे कौटुंबिक सदस्य व नातेवाईक वेगवेगळ्या छुप्या कुलूप्त्या आखित होते.छ.संभाजी महाराजांना मात्र मोलाची साथ “श्री सखीराज्ञी जयति” म्हणजेच महाराणी येसूबाई या खंबीरपणे देत होत्या.छ.संभाजी महाराजांची मुद्रा अशी होती,
“श्री शंभोः शिवजातस्य मुद्राद्यौरिवराजते !
यद् कसेविनी लेखा वर्तते कस्यनो परि !!”
(ही मुद्रा सूर्याच्या प्रभेप्रमाणे शोभते आणि त्या मुद्रेचा आश्रय करणारी लेखासुद्धा कोणावरही सत्ता चालविते.ती ही शिवाजीचा पुत्र शंभूची-संभाजीची मुद्रा प्रकाशित होत आहे.)
छ.संभाजी महाराजांनी पराकोष्ठीचे प्रयत्न करून स्वराज्याचे रक्षण केले होते.मात्र त्याचवेळी शिर्के मंडळीच्या बंडाळी चालू होत्या.कविकलशशी शिर्केंनी भांडण उकरून काढल्याने छ.संभाजी महाराजांना लक्ष घालावे लागले.औरंगजेबाचे सैन्य मराठी राज्याच्या नाशासाठी अनेक कुलुप्त्या करीत होते आणि नाराज मंडळी शत्रूच्या बाजूला जात होते.शेख निजाम हा खेळणा(विशाळगड)घेण्यासाठी वेढा देण्याच्या तयारीत होता.छ.संभाजी महाराज खेळण्याहून रायगडला जाण्यासाठी संगमेश्वर आले होते.तेथील कलह थांबविण्याचे महत्त्वाचे काम होते.मोजके सैन्य सोबतीला होते कारण इतक्या दुर्गम ठिकाणी मुघल सैन्य कधी येईल ही अपेक्षा नसावी.फितुरांनी आपली कामगिरी अगदी चोख बजावली म्हणजे शेख निजामाला छ.संभाजी महाराजांच्या हालचालींची सविस्तर माहिती दिली.
इ.स.१६८९ च्या जानेवारीत आलेले छत्रपती व कविकलश विविध सनदा देणे किंवा काढून घेणे इत्यादी महत्त्वाची कामे करीत होते.शेख निजाम (मुकर्रबखान) आपले सैन्य घेऊन घनदाट डोंगरातून संगमेश्वरला पोहोचला.मराठी सैन्याला ज्याची अपेक्षा नव्हती तेच घडले होते.जोराचा प्रतिकार सुरू झाला पण तो अपुरा होता.सरदेसाईच्या वाड्याच्या परिसरात घनघोर हातघाई झाली.या युद्धात जेष्ठ सेनानी म्हालोजी घोरपडेंना वीर मरण आले तर कविकलश पकडला गेला.साकी मुस्तैदखानाने स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना कैद केले.अशाप्रकारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मुघलांच्या कैदेत गेले यांच्या दुःखद स्मृती आजही मनाला वेदना देतात.देव,देश आणि धर्माला सर्वोच्च प्राधान्य देणारा मराठ्यांचा राजा शत्रूच्या कैदत गेला ती हीच भूमी.कसबा संगमेश्वरने जसे म्हालोजी सारख्या पराक्रमी पुरूषाचे शौय पाहिले तसे वैयक्तिक स्वार्थासाठी आपल्या राजा विरूध्द स्वकीयांनी केलेली फितूरी पाहिली.अशा फितूरांना अंगा खांद्यावर वाढविल्याचे दुःख ही संगमेश्वरची भूमी कशी विसरू शकेल ?
कसबा संगमेश्वर म्हणजे प्राचीन व स्थापत्य शैलीच्या अजोड नमुना असलेल्या मंदिरांचे गाव.मंदिराची निर्मिती निश्चित केव्हा झाली याची माहिती उपलब्ध नाही मात्र शिलाहारांच्या काळात जिर्णोध्दार झाल्याचे कोकणातील जाणकार सांगतात.कर्णेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी तीन दरवाजे आहे.पूर्वाभिमुखी मुख्य प्रवेशद्वारावर “शिव पंचायन ” सुबक पद्धतीने कोरलेले आहे तर डाव्या बाजूच्या दरवाज्यावर नरकासुर व उजव्या बाजूच्या दरवाजावर किर्तीसुर मूर्ती कोरलेल्या आहेत.मुख्य मंडपात भव्य असे भगवान शंकराचे वाहन नंदी आहे तर त्यानंतर शंकराची मूर्ती आहे.याच मंडापात डाव्या बाजूस श्री महालक्ष्मीची मूर्ती तर उजव्या बाजूस शेषशायी विष्णूची मूर्ती आहे.
कर्णेश्वर मंदिरात देव,दानव,नृत्यांगना,किन्नर,यक्ष-यक्षिणी आदिंच्या सुंदर मूर्ती जागोजागी दृष्टीपथास येतात.अनेक शतकापूर्वी हिंदुस्थानातील स्थापत्य शास्त्र किती प्रगत होते याची साक्ष देणाऱ्या अनेक मंदिरे,वास्तू यापैकी हे मंदिर एक उदाहरण होय.मंदिराच्या बाहेरील उत्तर बाजूस सुर्यमूर्ती व समोर प्रेक्षणीय गणेश मंदिर आहे.महाराष्ट्रात तशी तुलनेने नृसिंह मंदिराची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतपत आहे मात्र कर्णेश्वर मंदिर परिसरात अतिशय सुरेख असे नृसिंह मंदिर आपणांस पाहावयास मिळते.या शिवाय अनेक वैशिष्ट्यपूर्ण मंदिराची साखळी येथे दिसून येते.मूर्ती शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यासाठी माहितीचा खजिना असलेली कसबा संगमेश्वरची शिल्प वैभव नेहमीच स्वागतास सज्ज आहे.
कोकणातील लाल माती,कुडाच्या भिंतीची इवलीशी घरे,अंगणात फुलझाडे,बांबूच्या बेटात असलेल्या वस्त्या,प्रेमळपणाने स्वागत करणारे कोकणी रहिवासी,आणि खूप काही अनुभवयास नक्कीच येथे आले पाहिजे.कसबा संगमेश्वर पाहताना छ.संभाजी महाराजांचे राष्ट्रा प्रती दिलेले बलिदान आठवून मन व्याकूळ होते.अशा भूमीत आपल्या पराक्रमी राजाचे यथोचित स्मारक नसल्याचे भावना मराठी मनाला वेदना देते.
© सुरेश नारायण शिंदे,भोर
अपरान्तातील प्राचीनतेला संशोधन केंद्राचे कोंदण
‘अपरान्त संशोधन केंद्रा’ची मुहूर्तमेढ चिपळुणात रोवली गेली आहे.
विद्यावाचस्पती, प्राचीन मूर्तिशास्त्राचे अभ्यासक, पुरातत्त्व संशोधक डॉ.
गोरक्ष देगलूरकर, गड-किल्ल्यांचे अभ्यासक, लेखक प्र. के. घाणेकर,
अंटार्टिका संशोधक सुहास काणे, अपरान्ताचा खराखुरा प्रवासी, नऊ ताम्रपटांचा
शोध लावणारे कोकणातील नामवंत संशोधक अण्णासाहेब शिरगावकर यांनी
चिपळूणमध्ये भरलेल्या साहित्य संमेलनात या केंद्राचा संकल्प सोडला होता.
अरविंद तथा अप्पा जाधव यांनी ‘अपरान्त संशोधन केंद्रा’च्या उभारणीची घोषणा
केली. संशोधन केंद्र ‘लोकमान्य टिळक वाचन मंदिरा’च्या पुढाकाराने सुरू
होणार आहे.
विविध विषयांवरील सुमारे पासष्ट हजार पुस्तके, दुर्मीळ हस्तलिखिते व पोथ्यांचा मौलिक संग्रह वाचन मंदिरात आहे. ‘अपरान्त संशोधन केंद्रा’मध्ये कोकणातील ऐतिहासिक दस्तऐवजांची जपणूक होणार आहे. तसेच विविध लोककला, लोकवाङ.मय, पुरातन दस्तऐवज, शिल्प, हस्तलिखिते आदी वस्तूंचा संग्रह केला जाणार आहे अशी माहिती वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी दिली.
चिपळूण हे साधारणत: दोन हजार वर्षांपूर्वीचे प्राचीन शहर असल्याचा पुरावा सांगणारी ‘कोलेखाजन लेणी’ शहरालगत गुहागर बायपास मार्गावर आहेत. त्याचप्रमाणे ‘गजान्तलक्ष्मी शिल्प’, ‘विजयस्तंभ’, भोगाळेतील ‘घोडेबाव’ हेदेखील शहराच्या प्राचीनतेचे पुरावे आहेत. चिपळुणात एक पुरातन वस्तुसंग्रहालय उभे राहणार आहे. कोकण भूमी प्राचीन आहे. ते काही संशोधनाने सिद्धही झालेले आहे. त्या संशोधनाला मध्यवर्ती ठिकाणी स्थान मिळाल्याने कोकणातील अभ्यासकांची जबाबदारी वाढणार आहे.
डॉ.
गो.ब. देगलुरकर यांनी त्या शास्त्रातील अनेक संकल्पना त्या वेळी समजावून
सांगितल्या. मंदिरातील अनेक प्रकारांना असलेल्या नावांचे विश्लेषण त्यांनी
केले. मूर्तिशास्त्रातील अनेक हात, तोंड यामागील शास्त्रीय विवेचन,
मूर्तीतील प्राणिशास्त्र, मंदिररचनेवरून त्याचा काळ कसा ओळखावा, प्रमाणबद्ध
आणि सुंदरतेचे गमक, मंदिर शिखरांची रचना, किर्तिमुख व इतिहास, कर्णेश्वर
मंदिरातील रंगाशीला – तिचे महत्त्व, शास्त्राला धरून येणारी मित्थके व
त्यांची उपयोगिता आदी अनेक मुद्दे या अभ्यास दौ-यातून समजावून घेता आली.
डॉ. देगलुरकर व अन्य प्रतिनिधींनी भेट दिलेले चिपळुणातील कर्णेश्वर
शिवमंदिर इसवी सन १०० च्या सुमारास चालुक्यकालीन राजा कर्ण याने दहा हजार
सुवर्णमुद्रा खर्च करून बांधले. ते त्याच्याच नावाने पुढे कर्णेश्वर
शिवमंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले. हेमाडपंथीय शिल्पकलेचा नमुना असलेले
श्रीकर्णेश्वर मंदिर सुमारे एक हजार नऊशे वर्षानंतर सुस्थितीत पाहायला
मिळते. सुमारे चारशे चौरस मीटर क्षेत्रात संपूर्ण काळ्या पाषाणात कोरीव काम
केलेले असे हे मंदिर कसब्याचे पौराणिक महत्त्व टिकवून आहे. हेमांडपंथी
वास्तुकलेतील हे मंदिर पूर्णपणे काळ्या दगडात कोरलेल्या दगडांनी बनवलेले
आहे. सुंदर नक्षीकाम, देवतांची चित्रे, दगडात कोरून त्यांना कलात्मक रीत्या
मंदिराच्या भिंतीमध्ये बसवलेले आहे.
मंदिराच्या
चारही दरवाजांमध्ये वर्तुळाकार नक्षी आहेत. डोक्यावर दगडात कोरलेला सुंदर
झुंबर पाहायला मिळतो. प्रवेशद्वारात डोक्यावरच आठही कोनांमध्ये
अष्टदिक्पालांच्या मूर्ती आहेत. प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश
केल्यानंतर तेथील खांबांचे नक्षीकाम डोळ्यात भरते. त्या खांबांची रचना
कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिरातील नक्षीकामाशी जुळते. मंदिरात कलात्मक
अशी नंदीची मूर्ती आहे. गाभा-यात शंकराची एक फूट उंच पिंड आहे. मंदिरातील
एका खांबावर शिलालेखही आढळून येतो. तो शिलालेख प्राचीन हस्तकलेत कोरलेला
आहे. मंदिराच्या खांबांवर विविधदेवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. कोरीव
कामातील व हस्तकलेतील राखलेले तारतम्य आणि निर्माण केलेली कलाकृती त्या
वेळच्या कलानिर्मितीचे सुंदर चित्र पाहणा-यासमोर उभे करते.
कोकणाएवढी रम्य व गूढ भूमी अन्यत्र कुठे नसावी! कोकणपट्टीत खूप गुहा आढळतात. डोंगरातील खडक खोदून तयार केलेले गुहागृह म्हणजे लेणी होय. लेण्यांना शैलगृहे, शिलामंदिरे असेही म्हणतात. पुरातन काली बौद्घ भिक्खू हे धर्मप्रसारासाठी भारतभर फिरत असत. त्यांचे दिनचर्या पाळण्याचे नियम कडक असत. धर्मप्रसारासाठी फिरणा-या भिक्खूंची राहण्या-खाण्याची सोय सहज व्हावी यासाठी अशी लेणी खोदून घेतली गेली होती.
गाव
तेथे देऊळ हे सूत्र कोकणाला अचूक लागू पडते. कोकणातील काही देवस्थानांची
प्रचिती संपूर्ण भारतभर पसरली आहे. प्राचीन कलात्मक मंदिरे, तितकीच सुंदर
आशयघन शिल्पकला, मूर्तिकला हे तेथील अनेक मंदिरांचे वैशिष्ट्य आहे. कोकणात
मंदिर स्थापत्याच्या बाबतीतील वैशिष्ट्ये इतर स्थापत्यप्रकारांतसुद्धा
आढळून येतात. हे प्रकार म्हणजे बारवा (पाय-यांच्या विहिरी) आणि वीरगळ होत.
त्यांची प्राचीनता महाराष्ट्रात व कोकणात आठव्या शतकापर्यंत जाते. कोकणातील
काही विहिरी पाहण्यासारख्या असून त्यातून परिसरातील प्राचीनता सहज ध्यानी
येते. भूगर्भ संशोधक डॉ. अशोक मराठे संशोधित निक्शित कालमापन असलेली इसवी
सन १५२४ मधील केळशी – ता. दापोली – येथील वाळूची टेकडी, पालशेत सूसरोंडी
येथील अश्मयुगकालीन गुहा कोकणच्या प्राचीनतेवर प्रकाश टाकतात.
जगातील सर्वात प्राचीन संस्कृती कोकणात नांदत होती याचा पुरावा ठरू पाहणारी आठ हजार वर्षापूर्वीच्या श्रीवर्धन ते विजयदुर्ग दरम्यान रस्त्याचे बांधकाम काही वर्षापूर्वी संशोधकांना कोकणच्या समुद्रात आढळले होते
– धीरज वाटेकर
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील कर्णेश्वर हे एक प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे.मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा भागात प्राचीन मंदिरे पाहायला मिळतात.संगमेश्वरपासून दोन किलोमीटर अंतरावर अत्यंत रम्य परिसरात असलेले हे मंदिर उत्तम स्थापत्यकलेचा नमुना आहे. पांडवांनी अज्ञातवासाच्या काळात सहावा भाऊ कर्ण याच्या स्मरणार्थ या मंदिराची उभारणी केली, अशी आख्यायिका येथे प्रचलित आहे. म्हणून हे मंदिर 'कर्णेश्वर' नावाने ओळखले जाते.
कर्णेश्वर मंदिराला तीन दरवाजे आहेत. पूर्वाभिमुख मंदिराच्या प्रवेशद्वारावर 'शिवपंचायत' आहे. त्याच्या डाव्या बाजूस नरकासूर आणि उजव्या बाजूस किर्तीसुराच्या मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस दशावताराचे शिल्प कोरण्यात आले आहे. द्वाराजवळ पांडवांचे ताट म्हणून ओळखले जाणारे उपडे ताट आहे. त्यावर बकुळीचे फुल कोरलेले आहे. ताटाच्या बाजूस पांडवांची आसने दिसतात. मंदिराच्या महाद्वाराजवळ नंदीमंडप आणि दोन अष्टभैरव द्वारपाल आहेत.
मुख्य मंडपात प्रवेश करताच नंदी आणि त्यानंतर शंकराच्या मूर्तीचे दर्शन घडते. मंडपाला चार एकसमान खांब आहेत. दक्षिण द्वाराजवळील खांबावर शिलालेख कोरलेला आढळतो. मंदिरात पांडवाच्या पाच ताटासोबत सहावे ताट कर्णाचे म्हणून ओळखले जाते आणि त्यावर शंकराची पिंडी आहे. मुख्य मंडपाच्या डाव्या हाताला श्री महालक्ष्मीची मूर्ती आणि उजव्या बाजूला शेषशायी विष्णूची मूर्ती आहे. मंदिरातील देव, दानव, नृत्यांगना, किन्नर, यक्ष-यक्षिणी, आदी मूर्तींचे कोरीव काम अत्यंत सुंदर आहे.
+91 99303 65566

Karneshwar temple dates even further back than yesterday’s Bhuleshwar. It is located at the confluence of two rivers, Alaknanda and Varuna. It is about 1600 years old, twice as old as Bhuleshwar! I have seen it very falsely related to the Karna of Mahabharata, and it can’t get more imaginative than that! This temple was built by Karna, but not of Mahabharata, but King Karna of the Chaulakya Dynasty. This was the capital of the King’s empire, bejeweled with not just a handful, but a total of 360 palacial temples! In the turn of history, many of these temples didn’t last, but Karneshwar temple holds its fort strong even today.






















































































No comments:
Post a Comment