Thursday, March 23, 2023

करवीरवासिनी महालक्ष्मी

 

बाराशे वर्षांपासून 'या' शिलालेखातून प्रकट होतो अंबाबाईचा समृद्ध इतिहास

Swaliya Shikalagar

Kolhapur Ambabai
श्री महालक्ष्मी मंदिरात गणपती मंदिराच्या बाह्यमंडपातील एका खांबावरील शिलालेख. सिंघणदेव यादव दुसरा याच्या कारकीर्दीतील हा शिलालेख आहे.

काही संशोधकांच्या मते इसवी सनाच्या दुसर्‍या शतकापासून महालक्ष्मी मंदिराचे अस्तित्व आहे, तर इसवी सन 634 मध्ये मंदिराच्या गर्भकुटीत देवीची स्थापना झाल्याचे इतिहासतज्ज्ञ मानतात. करवीरनगरीचा ज्ञात इतिहास सर्वसाधारणपणे अडीच हजार वर्षांचा आहे. (Kolhapur Ambabai) अडीच हजार वर्षांपूर्वी करवीरनगरीचा रोमशी व्यापार होता, असे उल्लेख आहेत. या समृद्ध नगरीत श्री महालक्ष्मी देवीचे वास्तव्य आहे. गेल्या बाराशे वर्षांपासून ‘या’ शिलालेखातून श्री महालक्ष्मी देवीचा समृद्ध इतिहास प्रकट झालेला आहे. (Kolhapur Ambabai)

प्राचीन काळातील प्रगत संस्कृतीचा प्रभावशाली वारसा असलेल्या भारतात या प्राचीन संस्कृतीतून साकारलेली अनेक नगरे त्या समृद्धीच्या इतिहासाच्या पाऊलखुणा जपत आजही दिमाखदारपणे उभी आहेत. कालमानाप्रमाणे या क्षेत्रांच्या स्वरूपात काही बदल होत गेले; पण भारतातील अनेक तीर्थक्षेत्रे आजसुद्धा आपल्या प्राचीन इतिहासाच्या भक्कम समृद्ध पायावर अभ्यासक, पर्यटक तसे भाविकांना आकर्षित करत आहेत. प्राचीन संस्कृती विकसित झाली ती प्रथमतः नदी तीरावर आज आपण अभिमानाने ज्या आपल्या भारतीय संस्कृतीचा गौरवपूर्वक उल्लेख करतो, त्या संस्कृतीचा इतिहास मूलतः नद्यांच्या तीरावर घडत गेला. (Kolhapur Ambabai)

गंगा, यमुना, सिंधू, सरस्वती या सर्वच जीवनदायिनी नद्यांनी भारतीय संस्कृतीला आकार दिला. उत्तरेच्या या महानद्यांचा उगम हिमालयासारख्या भव्य पर्वतरांगांतून होत असल्याने या सर्वच नद्या अफाट जलसंचय असणाऱ्या होत्या, तर दक्षिणेत सह्याद्रीच्या मध्यगिरीच्या वा विध्याद्रीच्या पर्वतरांगातून जन्मलेल्या कृष्णा, कावेरी, गोदावरी इ. नद्यांनी आपल्या कुशीतून अशाच एका संस्कृतीला जन्म देऊन तिची समृद्धी वाढविली. या प्रत्येक नद्यांनी आणि तिच्या उपनद्यांनी भारताचा सांस्कृतिक इतिहास पडविला. हा इतिहास देदीप्यमान करणारे भूमिपुत्र घडवले. मानवी प्रगतीतला महत्त्वाचा घटक म्हणजे श्रद्धा आणि या श्रद्धेची बीजे निर्माण करणारी अनेक तीर्थक्षेत्रे या नदीतीरावर उदयाला आली. कृष्णा नदीची एक महत्वाची उपनदी म्हणजे पंचगंगा आणि या पंचगंगेच्या कुशीतून जन्माला आलेली मातृपूजक संस्कृती म्हणजे महामातृक क्षेत्र या पौराणिक नावाने उदयाला आलेली जगतजननी करवीरनिवासिनीचे मूळ स्थान असलेली कोल्हापूरनगरी. (Kolhapur Ambabai)

कोल्हापूरचा सांस्कृतिक इतिहास संशोधकांना इतक्या प्राचीन काळापर्यंत घेऊन जातो. डॉ. रघुना पासारख्या संशोधकांनी या कोल्हापुरातील मानवाच्या अश्मयुगीन काळातील पुरावे शोधून काढले आहेत. ताणलेल्या धनुष्याच्या दोरीप्रमाणे तसेच वैशिष्ट्यपूर्ण वळण घेऊन वाहणाऱ्या नदीप्रवाहाने काही भूभागांची नैसर्गिक समृद्धी वाढवली. बुद्धिमान मानवाने अशी स्थाने ओळखली. यातीलच एक स्थान म्हणजे कोल्हापूर. इथे विकसित झालेल्या संस्कृतीचे मुख्य श्रद्धास्थान मातृदेवता होते. म्हणून देवीच्या अनेक रूपातील उपासना इथे पूर्वीपासून प्रचलित झाल्या.

मंदिराचे गर्भागार कर्णदेव नामक एका चालुक्याच्या सुभेदाराने ६३४ साली बांधले, असा इतिहासतज्ञांचा तर्क आहे. पुढे शिलाहार वंशातल्या मारसिंह राजाने या मंदिराचा कलापूर्ण विस्तार केला व त्याच वंशातल्या गंडरादित्याने त्यावर कळस चढविला. यादवांच्या सत्ताकाळात १२१८ साली या मुख्य मंदिराला महाकालीचे व महासरस्वतीचे अशी दोन मंदिरे जोडली गेली.

देवी भागवतात महालक्ष्मी व करवीरनगरी यांचे दोन ठिकाणी संयुक्त उल्लेख आहेत. पार्वतीच्या रूपाला महालक्ष्मी असे नाव असल्याचेही त्यात सांगितले आहे. मुसलमानी अमलापर्यंत या महालक्ष्मीचे महत्त्व सातत्याने वाढत होते. मुसलमानी राजवटीत देवीची मूर्ती एका पुजाऱ्याच्या परी सुरक्षित ठेवण्यात आली. १७१५ माली मंदिरात तिची पुनर्प्रतिष्ठा झाली.

नवव्या शतकातील राष्ट्रकूट राजा अमोघवर्षाच्या एका ताम्रपटात (इ.स. ८७१) महालक्ष्मीचा गौरवपूर्ण उल्लेख आहे. प्रजेच्या कल्याणासाठी श्री महालक्ष्मीला आपली करांगुली अर्पण करणारा या राजाला वीरनारायण या पदवीने गौरविण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील संजान गावात सापडलेल्या या सर्वप्रथम ऐतहासिक लिखित पुराव्यावरून महालक्ष्मीच्या अस्तित्वाचे प्राचीनत्व कळते. (Kolhapur Ambabai)

ऐतिहासिक लिखित पुराव्यावरून महालक्ष्मीच्या अस्तित्वाचे प्राचीनत्व कळते. या ताम्रपटात कोल्हापूर क्षेत्राचा उल्लेख नसला तरी स्थात वर्णन केलेली महालक्ष्मी म्हणजे करनवाली, असे अनेक संशोधकांनी मान्य केले आहे. या ताम्रपटात राजाने देवीची स्थापना केल्याचा उल्लेख नाही. त्या काळाच्या कितीतरी आधी जनमानसा श्रद्धेचे स्थान बनलेली ही देवी या क्षेत्रात होती, हे ताम्रपटामधील प्रसंगावरून सिद्ध होते. ग. ह. खेर यांच्यासारखे ज्येष्ठ संशोधक या देवीचे स्थान अमोघवर्षापूर्वी किमान दोनशे वर्षे इथे स्थापित झाले असावे, असे मानतात. तर प्रा. के. जी. कुंदनगरसारखे संशोधक मंदिराच्या अस्तित्वाचा हा काल इ.स.च्या दुसऱ्या शतकापर्यंत असावा, असे मत व्यक्त करतात.

इतिहास संशोधकांच्या या मतमतांतरापलीकडे जाऊन आपण देवीचे स्थान आठव्या शतकाच्या पूर्वीपासून स्थापित होते, असे मानूया. याबाबत ताम्रपट शिलालेख यासारख्या साधनांच्या माध्यमातून श्री महालक्ष्मी मंदिराच्या इतिहासाचा मागोवा घेऊया.

इ. स. १०३८ सालच्या सवाइ ताम्रपटात कदंब कुळातील राजा पष्ठदेव हा तीर्थयात्रा करत असताना कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेत असे, असा उल्लेख येतो. या ताम्रपटातील ‘सदाराधिता (म्हणजे नित्य आराधना करणारा हा शब्द महत्वाचा आहे. हा राजा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचाच उपासक असावा म्हणून तो तिची सतत आराधना करीत असे. कोल्हापूरच्या क्षेत्रस्वामिनी देवतेचे नाव एक हजार वर्षांपूर्वीपासून महालक्ष्मी हे प्रचलित होते. याचा हा ताम्रपट म्हणजे अस्सल दस्तऐवजी पुरावाच होय.

विजापूर जिल्ह्यातील बागलकोट तालुक्यात शिरूर गावातल्या सिद्धेश्वराच्या मंदिरातील शिलालेखातून महालक्ष्मीच्या स्वरूपाचे सविस्तर वर्णन येते. चाणक्य राजा सामेश्वर पहिला व दुसरा यांच्या कालखंडात म्हणजे इ.स. १०४८ ते १०६८ या काळातील या शिलालेखाची लिपी कानडी व भाषा संस्कृत आहे. या शिलालेखात कोल्हापूर हे स्थान शिवक्षेत्र असून ६४ योगिनी आणि सिद्ध गणांनी परिवेष्टित महालक्ष्मी ही रुद्राची अर्धांगिनी असल्याचे म्हटले आहे. देवीचे वाहन सिंह असल्याचाही उल्लेख यात आहे. करवीरनगरी विशाल तीर्थांसह सातशे तीर्थांनी पवित्र नगरी असल्याचे यात वर्णन आहे. ‘करवीर महात्म्य’ ग्रंथातसुद्धा या क्षेत्रातील तीर्थांची संख्या नेमकी इतकीच वर्णन केलेली आहे…

शिलाहार राजा मारसिंह याच्या १०५८ सालच्या ताम्रपटात या राजाने स्वतःला ‘श्री मन्महालक्ष्मी लब्धवर प्रसादादी’ अशा बिरुदाने गौरवले आहे. या कालखंडातील शिलाहारांच्या अनेक ताम्रपटात व शिलालेखातून राजांनी स्वतःचा उल्लेख श्री महालक्ष्मीचा कृपाप्रसाद प्राप्त असणारा, असे केले आहे. महालक्ष्मी मंदिराच्या इतिहासावर प्रकाश टाकणारा सिंघणदेव यादव दुसरा याच्या कारकीर्दीतील अत्यंत महत्त्वपूर्ण शिलालेख श्री महालक्ष्मी मंदिराच्या प्राकारातच आहे. (या शिलालेखावरील मजकुराचा अन्वयार्थ जाणून घेण्यापूर्वी या शिलालेखाच्या सध्याच्या अवस्थेबद्दल मनात व्यक्त होणारी हळहळ या ठिकाणी मांडली पाहिजे. महाद्वारातून मंदिर प्रकारात प्रवेश करताना डाव्या बाजूस गणपती मंदिराच्या बाह्यमंडपावरील एका खांबावर कोरलेला हा श्री महालक्ष्मीच्या इतिहासाचा महत्त्वाचा साक्षीदार काळ्या ऑईलपेंटने रंगविल्यामुळे पुसट झाला आहे. हे असेच चालू राहिले तर लवकरच हा अनमोल ऐतिहासिक दस्तऐवज अदृश्य होईल.) या शिलालेखात महालक्ष्मीच्या मूर्तीचे वर्णन आहे आणि मजकुरापूर्वी शंकराला वंदन केले आहे. शिवक्षेत्र आणि शक्तिपीठ अशा दोन्ही उपासना पद्धतीचे तीर्थधाम म्हणून कोल्हापूरची ख्याती होती, हे यावरून समजते. मस्तकावर शेष आणि लिंग धारण करणारी, पापांचा ओघ हरण करणारी, भवसागरातून तारून नेणारी महालक्ष्मी, जिला सिंघणदेव या राजाने अनेक आभूषणे दिली आहेत, असा उल्लेख या शिलालेखात आहे. या सिंघणदेवाच्या आज्ञेने त्याच्या तैलंग नामक सेवकाने महालक्ष्मीसमोर भव्य तोरण निर्मिती केल्याचा उल्लेख असलेला हा शिलालेख इ.स. १२१८ मधील आहे. (हे तोरण म्हणजे महाद्वार!)

श्री महालक्ष्मीबरोबरच महाकालीचेही मंदिर होते, असा स्पष्ट उल्लेख असलेला १२३६ सालचा शिलालेख पूर्वीच्या रावणेश्वर तलावाजवळ होता. (सध्या तो टाऊनहॉल म्युझियममध्ये आहे.) या शिलालेखातही जंबुद्वीपातील शिवक्षेत्र असलेल्या आणि साऱ्या यैलोक्याला वंदनीय असणाऱ्या श्री महालक्ष्मी व महाकाली या देवतांना वंदन करण्यात आले आहे. चौसष्ट योगिनींसह महालक्ष्मी व महाकाली मंदिरामुळे हे क्षेत्र दक्षिण वाराणसी शिवक्षेत्र म्हणून प्रसिद्ध होते व श्री महालक्ष्मी पीठाधिपती होती, असा उल्लेख असलेला शिलालेख शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट इथे असून त्याचा काळ १२५२ इ. स. असा आहे.

वरुणतीर्थ नावाच्या सरोवराचे रक्षण करणाच्या महालक्ष्मीस वंदन करणारा शिलालेख यादव नृपती रामदेव याच्या कारकीर्दीतील (१२७२) असून तो या तळ्यानजीक सापडला आहे. (वरुणतीर्थ तलाव आता बुजवण्यात आला आहे. त्या ठिकाणी गांधी मैदान उभे राहिले आहे.)

देवी भागवतात महालक्ष्मी व करवीर यांचे दोन ठिकाणी संयुक्त उल्लेख आहेत. कोल्हापुरातील पार्वतीच्या रूपाला महालक्ष्मी असे नाव असल्याचेही ‘देवी भागवतात’ सांगितले आहे. या देवीला अंबाबाई असेही म्हणतात. महाराष्ट्रातल्या स्त्रिया अंबाबाईला सौभाग्याची देवता मानतात. तिच्यावर त्यांची नितांत श्रद्धा आहे. त्या तिची खणा-नारळाने ओटी भरतात व शुक्रवारी, मंगळवारी तिच्या कृपेसाठी उपवास करतात. कोल्हापूर हे शक्तिक्षेत्र म्हणून समजले जाते व कोल्हापुरातील महालक्ष्मी देवी म्हणजे आदिशक्तीचे रूप आहे.

अशा अनेक शिलालेख व ताम्रपटातून करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराचा इतिहास उलगडत जातो. धारवाड जिल्ह्यातील सोर्डर गावातल्या कल्लेश्वर मंदिरातील संस्कृत, भाषा व कानडी लिपीमधील एका शिलालेखात महालक्ष्मीचे। वर्णन आहे. विक्रम वर्ष १६ प्रजापती संक्रांत (२५ डिसेंबर, १०११) चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा याच्या कारकीर्दीतील या शिलालेखात कोल्हापुरची महालक्ष्मी ही सोर गावची रक्षण करणारी देवी आहे, असा उल्लेख आहे. यावरून राज परिवार, एखादे क्षेत्र यांचा संपूर्ण प्रतिपाळ करणारी देवी म्हणून कोल्हापूरच्या महालक्ष्मीची ख्याती दूरवर पसरली होती, हे सिद्ध होते..

सन ११०६ च्या शिलालेखात शके १०२८ मधल्या चंद्रग्रहणाच्या निमित्ताने याच चालुक्य राजाने महालक्ष्मीच्या पूजा-अर्चेसाठी जमीन व घर दान केल्याचा उल्लेख आहे. यावरून या कालखंडात श्री महालक्ष्मी मंदिरात प्रस्थापित असणारी देवी होती, हे सिद्ध होते. शिलाहार वंशाचा कोल्हापुरातील अखेरचा राजा भोज द्वितीय याने २५ डिसेंबर, ११९० रोजी संक्रातीच्या निमित्ताने पन्हाळ्यातील उमामहेश्वराबरोबर कोल्हापूरच्या महालक्ष्मीसाठी: त्रिकाल : नवेद्यासाठी दान केल्याचे वर्णन भोजराजाच्या शिलालेखात येते. शिलाहार राजपरिवाराचा पराभव करून सत्तेवर आलेल्या देवगिरीच्या यादवाचीसुद्धा महालक्ष्मीवर तितकीच श्रद्धा होती व आज दिसणाऱ्या भव्य मंदिराची बांधणी याच दोन राजवंशाच्या कारकीर्दीत झाला असावी, असे मंदिराचा अभ्यास करताना लक्षात येत.

 

 

 

Wednesday, 21 February 2018




Kolhapur Photo D: 10/02/2018

Ho

 कोल्हापूरचा प्राचीन ईतीहास

प्राचीन काल -
हा काल श्री महालक्ष्मीच्या स्थापनेपूर्वीचा म्हणजे इसवीसनाच्या सुमारे ९व्या शतकापर्यंतचा मानला जातो. या काळात नदीकाठावरील टेकडीवर ब्रह्मपुरी हे वसाहतीचे केंद्र होते.

भगवान श्रीकृष्ण आणि कोल्हापूर
आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल की मथुरे जन्मलेला द्वारकेचा राणा भगवान श्रीकृष्ण कोल्हापुरात आला कधी आणि त्यांचा आणि कोल्हापूरचा संबंध काय? तर या विषयी हरिवंशपुराण आणि करवीर महात्म्य या दोन ग्रंथांत फार सुंदर उल्लेख मिळतात करवीर महात्म्य उल्लेखाप्रमाणे भगवान श्रीकृष्ण दोन वेळेला कोल्हापुरात आले एकदा बलरामा सोबत कालयवन वधासाठी आणि दुसऱ्या वेळी आपल्या सोळा सहस्त्र स्त्रियांच्या मानसिक पापाच्या परिवारासाठी. हरिवंशात मात्र भगवान एकदाच कोल्हापुरात आले तेही कालयवन राक्षसाच्या वधावेळेला असा उल्लेख आहे .कालयवन अर्थात जरासंधाने बोलावलेला दुष्ट सेनापती. कंसाचा सासरा असलेल्या जरासंधाने श्रीकृष्णाचा सूड घेण्याच्या उद्देशाने सतरा वेळेला मथुरेवर आक्रमण केले सतरा वेळा तो पराजित ही झाला पण मथुरेचे अतोनात नुकसान झाले अठराव्या वेळी मात्र त्याने कालयवन नावाच्या दुष्ट दैत्याला पाचारण केले हा दैत्य गांधार देशाच्या पलीकडून आला असा उल्लेख आहे अशा कालयवनाला रणांमध्ये लढण्याचा दांडगा अनुभव होता त्यामुळे सर्व मथुरावासी यांनी भगवंतांना सांगितले की कालयवनाचे वैर हे तुमच्याशी आहे मथुरेच्या बाकी जनांशी नाही तेव्हा योग्य तो निर्णय करा. भगवंतांनी युद्धाला आव्हान दिले आणि आपला रथ कालयवन त्याच्यासमोर येऊन उभा केला कालयवन आला बघून भगवान रथातून उतरले आणि रणातून पळत सुटले असा उल्लेख आहे यामुळेच भगवान श्रीकृष्णाला रणछोड असे नाव मिळाले. भगवंतानी रण सोडलं खरं पण त्यांनी सह्याद्री पर्वताच्या घनघोर करण्यामध्ये ओढले आणि त्यांचा पाठलाग करत सध्याच्या विशाळगडाच्या पाठीमागे असलेल्या मुचकुंद नावाच्या राजाच्या गुहेत शिरले मुचकुंद राजाला वरदान होते की जो कोणी त्यांची झोप मोडेल तो जळून भस्म होईल .भगवंत गुहेत आले आणि त्यांनी आपला शेला मुचकुंद राजावर पांघरला कालयवनाने रागाने कृष्ण समजून मुचकुंदाची झोपमोड केली आणि तो जळून भस्म झाला. करवीर महात्म्य आपल्या कथेप्रमाणे इथे येताना भगवान श्रीकृष्णांनी गाय रुपी रंभेचा चा उद्धार केला तो परिसर म्हणजे केखले आणि जाखले तसंच कालयवनाबरोबर युद्ध करताना भगवंताने मारलेल्या उडी मुळे पर्नाळपर्वत दोन योजन खाली आला असा उल्लेख आहे आजही जाखले गावात गोपालेश्वराचे मंदिर आहे. पुढे करवीर महात्म्य तल्या कथेप्रमाणे भगवान श्रीकृष्णाच्या सोळा सहस्त्र राण्यांच्या हातून काही मानसिक पाप घडले त्याची निष्कृती करायला भगवान आपल्या परिवारासह करवीरात आले. इथे आल्यानंतर आज जयंती आणि गमतीचा संगम असलेल्या म्हणजे हुतात्मा पार्क च्या परिसरात त्यांनी वास्तव्य केले इथे जणू प्रती द्वारका तयार झाली या द्वारकेला पाहून ,या द्वारकाधीशाला आणि भगवान शंकरांना एकत्र पाहून नारद मुनी आपला शाप विसरले अशा ठिकाणी करवीर यात्रा करताना एके वेळी माता देवकीने भगवान श्रीकृष्णाला विनंती केली हे पुत्रा तुझ्या बाल लीलांचे कौतुक अवघ्या जगात गायलं जातं पण तुझी जन्मदाती असूनही मला मात्र हे भाग्य नाही तेव्हा भगवान श्रीकृष्णाने बाळ रूप धारण करून मातेला अगदी पूतना वध आतापासून ते गोवर्धन पर्वताच्या उद्धारा पर्यंत सर्व बाळलीला करून दाखवल्या जिथं भगवंतांनी यमुनेचे खेळ केले ती जागा म्हणजे गोकुळ शिरगाव. जिथं पर्वत उचलला ती जागा गिरगाव याच परिसरात असलेले वसुदेव ग्राम अर्थात वाशी इथे वसुदेव आणि तप केले अशा रीतीने या करवीर क्षेत्राला व्रजभूमी चा महात्म्य प्राप्त करून देणारे भगवान श्रीकृष्ण यांनी आपल्या मुखाने पंचगंगा महात्म्य सांगितले याशिवाय सर्व पापांचा परिवारासाठी शक्ती चतुष्क म्हणजे एकवीरा पद्मावती प्रत्यंगिरा आणि अनुगामिनी अशा चार देवतांचे दर्शन घेण्याची आज्ञा केली आहे .भगवंताची ही बाळलीला या क्षेत्री झाली याचा संदर्भ कोणी खोटा म्हणेल तर याला जोडून दुसरा संदर्भ देतो तो म्हणजे माशेल गावच्या देवकी कृष्णाचा. कथेनुसार भगवान श्रीकृष्ण कालयवनाचा वध करण्यासाठी दक्षिणेत आल्यावर माता देवकी आणि संपूर्ण परिवार ओढीनं दक्षिणेला आले. सावळ्या परब्रम्हाला बघून देवकीचा उर वात्सल्याने भरून आला. तिने जगदीश्वर श्रीकृष्णाला बाळ रूप कल्पून उचलून घेतलं आणि आपल्या छातीशी धरलं तिथल्या तिथल्या पुराणातल्या उल्लेखानुसार हा प्रसंग करवीर घडला म्हणून आजही गोव्यातील माशेल गावी एकमेव अशी देवकीने कडेवर घेतलेल्या बाळकृष्णाची एकमेव मूर्ती आहे एकूणच या जगात व्यापक श्रीकृष्णाचे करवीराशी अर्थात कोल्हापूर बरोबर देखील अनोखे नाते आहे.
श्रीमातृचरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीकः
 कोल्हापूर आणि नारदमुनीवर्य
भारतीय पुराणकथातील चेष्टेचं, कलह करवणारं किंवा वेळ आलीच तर घाबरून पळ काढणारं एक विदुषकी पात्र अशी एक चुकीची व्यक्तिरेखा म्हणून नारदांची प्रतिमा उभी केली गेलीय आणि टि व्ही मालिकांनी याला खत पाणीच घातल .
वास्तविक देवर्षी नारद हे ब्रम्हदेवाचे मानसपुत्र विख्यात गायक आणि हरिभक्त. त्यांनी लिहिलेली भक्तीसुत्र म्हणजे परमेश्वर प्राप्तीचा राजमार्गच . अखंड ईशस्मरण हे यांचं वैशिष्ट्य.नारद ही अशी विभूती आहे जी मनोवेगान सर्वत्र संचार करते. त्यांना देव मानव दैत्य तिघेही आदराने नमन करतात. नारद मुनी प्रत्येकाला त्याच्या हिताचा सल्ला देतात. आपण अनेक व्रते क्षेत्र माहात्म्यं पाहीली तर लक्षात येईल की नारदांनी वेळप्रसंगी लोकहितार्थ प्रश्न विचारून ती व्रते क्षेत्र माहात्म्ये प्रकाशित केली आहेत.
नारद हे पहिले वार्ताहर पण या वार्ता पोहचवण्यात त्यांचा वैयक्तिक स्वार्थ काहीच नाही सृष्टी चक्राचा समतोल साधण्या करता घटनाक्रमाला गती आणण्याच काम नारद करतात. साध उदाहरण घ्या सोडा किंवा मोहन न घालता देखिल भजी होतात पण जर मोहन किंवा सोडा घातला तर त्यांची खुसखुशीत होण्याची प्रक्रिया जलद आणि सोपी होते हेच नारदांच अस्तित्व . विधिलिखित घटना जलद घडून येण्यासाठी देवर्षींची भूमिका महत्वाचीच. भक्तांचा आवाज देवा पर्यंत पोहोचवणारे माध्यम म्हणजे नारद मुनी. यामुळे त्यांना शाप ही मिळाले त्यातील एक म्हणजे दक्ष प्रजापतीने दिलेला चंचल पणाचा शाप त्यामुळे नारद कुठेही स्थीर राहू शकत नाहीत अपवाद फक्त कोल्हापूराचा . उद्यम नगर भागात हुतात्मा पार्क बाग आहे तिथे द्वारकाधिश श्रीकृष्णाचे एक मंदिर आहे जे प्रति द्वारका म्हणवले जाते त्याच्या समोर आज फक्त नारदांच्या पादुका आहेत.तिथली नारदांची मूर्ती आता टाऊन हाॅल मध्ये आहे एकदा नारद कृष्ण दर्शनाला करवीरात आले आणि शिव हरीला , देवीला एकत्र पाहून आणि या क्षेत्राच्या प्रभावाने शाप मुक्त होऊन कोल्हापूरातच राहीले त्या आदि वार्ताहर किर्तनकुल शिरोमणी देवर्षीना अभिवादन !
श्रीमातृचरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तिकः

एका आख्यायिकेनुसार, प्राचीन काळी केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासुर हा इथं राज्य करत होता. त्यानं सगळ्यांना त्रस्त करून सोडलं होतं म्हणून देवांच्या प्रार्थनेवरून महालक्ष्मीनं त्याच्याशी युद्ध केलं. हे युद्ध नऊ दिवस चाललं होतं.अश्विन शुद्ध पंचमीला महालक्ष्मीनं कोल्हासुराचा वध केला. कोल्हासुर महालक्ष्मीला शरण गेला आणि त्यानं तिच्याकडं, आपल्या नगराची कोल्हापूर व करवीर ही जी नावं आहेत ती तशीच पुढंही राहावीत, असा वर मागितला. त्यानुसार या नगरीला कोल्हापूर वा करवीर या नावानं ओळखलं जातं. कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठांपैकी एक आहे.प्राचीन भारतातील विभिन्न पुराणांनी १०८ शक्तीपीठांची सूची तयार केली आहे कि जिथे शक्तीची देवी प्रकट झाली आहे.यामध्ये करवीर क्षेत्राची श्री महालक्ष्मी (जेथे आजचे वर्तमान कोल्हापूर शहर आहे) चे विशेष महत्त्व आहे.श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरच्या सहा शक्तीपैकी एक आहे कि जिथे कोणतीही इच्छा पुरी होण्याबरोबर मुक्तीही मिळू शकते.यासाठी या स्थळाला काशीच्या तुलनेत अधिक महत्त्व प्राप्त होते. ही ती जागा आहे कि जिथे विष्णू ची पत्नी श्री महालक्ष्मी ला मोक्ष मिळण्यासाठी प्रार्थना करते.

श्री महालक्ष्मी आणि श्री विष्णू दोघेही नेहमी करवीर क्षेत्रामध्ये राहतात असे म्हंटले जाते आणि ते दोघेही हे करवीर निवास महाप्रकाश्याच्या वेळेस पण सोडणार नाहीत.करवीर क्षेत्र नेहमीच धन्य आहे असे मानले जाते कारण महालक्ष्मी आपल्या उजव्या हाताने आई जगदंबेच्या रुपात प्रकट होते यासाठी हे क्षेत्र सर्वच प्रकारच्या विनाशापासून सुरक्षित आहे.भगवान विष्णू स्वतः या क्षेत्राला वैकुंठ आणि क्षीरसागर या दोन स्थानांपेक्षाही अधिक पसंत करतात.कारण इथे त्यांची पत्नी लक्ष्मी चे निवासस्थान आहे.म्हणूनच या क्षेत्राच्या महानतेने अनेक संताना व कवींना आपल्याकडे आकर्षित केले आहे. या करवीर क्षेत्राने आपल्या भक्तांवर केलेले प्रेमानी दिलेले आशीर्वाद हे अतुलनीय आहे.असेही मानले जाते कि श्री दत्तात्रेय अजून पण या ठिकाणी दान करण्यासाठी दुपारच्या वेळेस येतात.

महालक्ष्मी मंदिर वास्तुकला रचनेवर जे नक्षी कामाचे संकेत आहेत त्यावरून असे सांगण्यात येईल कि हे मंदिर चालुक्य शासन काळातील म्हणजेच ६०० ते ७०० काळातील असावे.मंदिराची बाहेरची संरचना आणि स्तंभांची कलाकृती हा कलेचा एक अद्भूत नमुना आहे. देवीची मूर्ती रात्नापासून बनवली आहे ही जवळ जवळ ५००० ते ६००० वर्षापूर्वीची असावी असे मानले जाते.महालक्ष्मी ची मूर्ती ही ४० किलो वजनाची आहे.कोल्हापूर पर्यटनामध्ये महालक्ष्मी मंदिर हे प्रमुख स्थान आहे.यासाठीच देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक भेट देतात

कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर असून प्राचीन काळापासून दक्षिण काशी या नावाने ते प्रसिद्ध आहे.महालक्ष्मी मंदिर आणि जोतिबाचे मंदिर यामुळे हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. तसेच ऐतिहासिकदृष्ट्या कोल्हापूर महत्त्वाचे शहर असून प्राचीन काळापासून ते विविध राजघराण्याचे राजधानीचे ठिकाण होते.

हिंदू धर्मशास्त्रानुसार, प्राचीन काळी केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासुर हा इथे राज्य करीत होता. याने राज्यात अनाचार व सर्वाना त्रस्त करून सोडले होते. म्हणून देवांच्या प्रार्थनेवरून महालक्ष्मीने त्याच्याशी युद्ध केले. हे युद्ध नऊ दिवस चालले होते . आणि अश्विन शुद्ध पंचमीस महालक्ष्मीने कोल्हासूर या राक्षसाचा वध केला होता. त्यावेळेस कोल्हासूर महालक्ष्मीला शरण गेला आणि त्याने तिच्याकडे आपल्या नगराची कोल्हापूर व करवीर ही नावे आहेत तशीच चालू ठेवावीत असा वर मागितला. त्याप्रमाणे या नगरीला कोल्हापूर वा करवीर या नावाने ओळखले जाते. ["श्री करवीर निवासिनी"]

श्री महालक्ष्मी देवालयाचा परिसर
महालक्ष्मीचे देवालय हे धार्मिक केंद्र बनल्यावर पुजारी वर्ग, भक्तगणांच्या व्यवस्थेसाठी जरूर असणारे व्यापार, उद्योगधंदा, नोकरी वगैरे करणारी माणसे हळूहळू वाढू लागली. काही भक्तगण तिथेच कायम वास्तव्य करून राहिले. अशारितीने वस्ती वाढत असतानाच मुसलमानांनी देखील आपल्या वसाहती तिथे केल्या. त्यांनी त्या भोवताली मातीचा कोट बांधला व खंदक खणून किल्ल्याचे स्वरूप आणले. पुढे-पुढे मराठा अमलदारामध्ये इथे राजधानी आल्यावर वसाहतीत मोठीच वाढ झाली. राजवाडा झाल्यामुळे तर इतर सर्व जहागिरदार व मानकरी मंडळींनी देखील आपापले वाडे इथेच बांधले. मग इतर इनामदार आले. सर्वांची इच्छा ही की आपण किल्ल्यातच राहावे. यामुळे किल्ला भागात गर्दी झाली. पुढे राजधानीच्या संरक्षणासाठी मातीचा तट पाडून दगडी तट बांधला गेला.

श्री महालक्ष्मी देवालयाचा पूर्वीच्या सहा नैसर्गिक केंद्रावर झालेला परिणाम:
श्री महालक्ष्मीचे देवालय हे ब्रम्हपूरी, उत्तरेश्वर, खोलखंडोबा, रंकाळा, पद्माळा, व रावणेश्वर या सहाही केंद्राच्या मध्यभागी स्थापिले गेले आणि देवालयाभोवती वसाहती होऊन त्यांना धार्मिक व राजकीय महत्व प्राप्त झाल्यामुळे ही सहाही केंद्राकडून मध्यवर्ती केंद्राकडे वसाहत वाढू लागली. सर्व सहा नैसर्गिक केंद्र व महालक्ष्मी देवालयाची वसाहत पूर्णपणे एक होण्यास जवळ जवळ एक हजार वर्षाचा कालावधी लागला. मध्यवर्ती केंद्रात अनेक कारणांमुळे जागा न मिळाल्यामुळे इतर सहाही केंद्राची वस्ती वाढू लागली व काही काळाने शहर व उपनगरे अशी स्थिती निर्माण झाली. पुढे उपनगरे विस्तृत पावून ती शहरात मिसळून गेली. त्यामधून १९ व्या शतकातील मोठ्या कोल्हापूर शहराचा जन्म झाला.
ही सर्व जागा एकत्र जोडली जाऊनही नवीन वसाहतीची गरज भासू लागली. त्यातूनच काही नवीन वसाहती निर्माण झाल्या. प्रामुख्याने त्यामध्ये शनिवार पेठ व सोमवार पेठ या दोन पेठांचा उल्लेख केला जातो. कुंभार व लोणारी यांचेकरिता किल्ल्याबाहेर खंदकापलिकडे (सध्याची पापाची तिकटीजवळ) सखल भागातील जागा देण्यात आली. शहरानजीक उत्तम शेती असलेली जमीन व तलावांनी व्यापलेली जागा सोडून इतर सर्व जागेवर वसाहतींची स्थापना झाली व जुन्या वसाहतीमध्ये वाढ झाली.

 करवीरवासिनी महालक्ष्मी :

महालक्ष्मीच्या प्रतिष्ठापनेनंतर शहराचा उल्लेख करवीर असा आढळतो.तत्पुर्वी कोल्लापुर,कोल्लपुर,कोल्लगिरी,कोल्लादिगिरीपट्टण अशी नावे प्रचिलत होती. कोल्ल म्हणजे दरी व द-यांचे गाव म्हणजे कोल्हापुर,अशी ही व्युत्पत्ती मानली जाते. सारांश काय तर ब्रम्हपुरी,करवीर व कोल्हापुर अशी स्थल नामांची बहुविध रुपे उपलब्ध होतात.महालक्ष्मी देवालयाच्या स्थापनेमुळे कोल्हापुरात धार्मिक केंद्राचे स्वरुप प्राप्त झाले त्यातुनच सांस्कृतिक व आर्थिक क्रांतीची नानाविध रुपे प्रकट झाली.

इ.स.१२ व्या शतकाच्या कोल्हापुरात शिलाहारांचे राज्य होते. इ.स.१२१0 मध्ये देवगिरीचा राजा सिंधणदेव याने कोल्हापुराच्या शिलाहार सम्राट भोजराजाचा पराभव केला.त्यानंतर देवगिरीच्या यादवांच्या एका प्रांताची राजधानी म्हणुन कोल्हापुर अग्रेसर राहिले.१२९८ मध्ये देवगिरीच्या यादवांचा पराभव झाल्यानंतर 1306-1307 मध्ये कोल्हापुर शहरात मुस्लिम सत्तेचा अम्मल स्थापन झाला. श्रीछत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगड जिंकल्यानंतर (१६६९) पुनश्च कोल्हापुर परिसर स्वराज्यात समाविष्ठ झाला.पुढे स्वातंत्र्य युध्दाच्या व कोल्हापुर शहराने मोलाचा इतिहास घडविला आहे.महाराणी ताराबाईच

महालक्ष्मी मंदिर संकुल...

महालक्ष्मी मंदिराचे गर्भगृह आधी बांधले व पुढील राजवटींमध्ये हे मंदिर पूर्ण झाले, पण मंदिरस्थापत्य व मूर्ती प्रतिष्ठापन शास्त्रांचा आधार घेता वरील विधान तितकेसे संयुक्तिक वाटत नाही. शिवाय याला पुष्टी देणारे सबळ पुरावेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे मंदिर निर्माण कर्ता अजूनही अंधारातच आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.

महालक्ष्मी मंदिर समूह व त्याची एकंदर स्थिती विचारात घेता असे आढळून येईल की, हा त्रिकूट प्रासाद टेकडीवर वसलेला असावा. मंदिरापासून पश्चिमेकडे रंकाळा तलावापर्यंत जाणवण्याइतपत उतार आहे. शिवाय मुख्य त्रिकूट प्रासादाभोवतीची मंदिरे ही त्या मानाने खूपच खालच्या पातळीवर आहेत. महालक्ष्मी मंदिर हे पश्चिमाभिमुख आहे. (पूर्णत: पश्चिमेकडे नसून 50 ने वायव्येकडे तोंड करून आहे) नोव्हेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांमध्ये सूर्यास्तावेळी सूर्याची किरणे महालक्ष्मीच्या विग्रहावर काही काळ स्थिरावतात.


कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती सुप्रसिद्ध असे महालक्ष्मी मंदिर आहे. किंबहुना, आपण असे म्हणू शकतो की, कालांतराने महालक्ष्मी मंदिराभोवती वस्ती वाढल्याने हे मंदिर शहराच्या मध्यवर्ती आले. प्राचीन कोल्हापूरसंबंधी विस्तृत माहिती देणारा एकमेव ग्रंथ म्हणजे 'करवीरमाहात्म्य' कोल्हापूर आणि परिसरातील जवळजवळ सर्व देवता व त्यांच्या स्थानांची माहिती या ग्रंथात मिळते. या ग्रंथात प्रमुख वर्णन आढळते ते महालक्ष्मी व तिच्या विजयगाथांचे! करवीर महात्म्यानुसार महालक्ष्मीच सर्वाची जननी असल्याचे घोषित केलेले आहे. करवीरमाहात्म्य ग्रंथाच्या रचनेचा काळ मात्र अद्यापि वादाचा मुद्दा आहे. याच्या रचनेच्या काळासंदर्भात एकमत  नाही. कोल्हापूरला 'कोल्हापूर' (मूळ नाव : कोल्लापूर) हे नाव कशामुळे मिळाले याची कथा 'करवीर माहात्म्यात' पाहायला मिळते. महालक्ष्मीने कोल्लासुराचा वध केला व त्याच्या प्रार्थनेवरून या क्षेत्राला 'कोल्लापूर' असे नाव प्राप्त झाले. भारतातील प्रमुख शक्तिपीठांमध्ये महालक्ष्मीचे पीठ म्हणजेच कोल्हापूर किंवा करवीरक्षेत्र हे प्रमुख आणि पूर्ण पीठ आहे. इथे महालक्ष्मीचे स्थानिक नाव 'अंबाबाई' आहे. कोणे एके काळी हे क्षेत्र तीर्थयात्रेचे प्रमुख केंद्र होते आणि त्यामुळेच याला 'दक्षिण काशी' असे नाव प्राप्त झाले. (या क्षेत्राची तुलना 'काशी' बरोबर केली जाते.)

महालक्ष्मी मंदिर कोणी बांधले, हा संशोधकांसमोर अद्यापि एक प्रश्नच आहे. या अनुषंगाने अनेक संशोधकांनी इतिहास व त्याच्या ताम्रपट, दस्तऐवज, शिलालेख यांसारख्या पुराव्यांच्या आधारे महालक्ष्मी मंदिर बांधणीच्या कालखंडाचा अभ्यास करून अनेक आडाखे बांधले आहेत. तसे पाहता, चालुक्या (बदामीचे) राजांनी महालक्ष्मी मंदिर बांधले अथवा बांधकामाला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांच्या पुढील राजवटींनी हे बांधकाम पुढे वाढवले असा एक समज सर्वमान्य झाला आहे. इतिहास सांगतो की, शालिवाहन, बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार (कल्याणी चालुक्यांचे मांडलिक व नंतर स्वतंत्र राजवट घोषित) यादव, बहामनी, मराठेशाही यांसारख्या सत्ता कोल्हापूरवर राज्य करून गेल्या; पण बदामीचे चालुक्य ते देवगिरीच्या यादवांपर्यंतच्या कोणत्या राजवटीत महालक्ष्मी मंदिर बांधले गेले याचा अजून मागमूस लागलेला नाही वा कोणताही सबळ पुरावा उपलब्ध नाही.

कोल्हापुरातच सापडलेल्या एका भग्न शिलालेखानुसार अशी माहिती मिळते की, परकीय आक्रमणे होण्याआधी महालक्ष्मी मंदिरावर स्वकियांनी हल्ला केला. दक्षिणेतील चोल राजांनी कल्याणी चालुक्यांच्या विरोधी मोहीम राबवून त्यांचे राज्य कोल्हापूरपर्यंत जिंकून घेतले. या विजयोन्मादात त्यांनी महालक्ष्मी मंदिर जाळण्याचा प्रयत्न केला. या नुकसानीतून मंदिराचे रक्षण व्हावे यासाठी कोणी मुथ्थैय्या नामक लढवय्याने आपले प्राण गमावले. कालगणनेनुसार ही घटना अकराव्या शतकात घडली, असा अनुमान निघतो. या सर्व वर्णनातून एक गोष्ट स्पष्टच प्रतीत होते की, जर महालक्ष्मी मंदिर जाळण्याचा प्रयत्न झाला होता, त्या अर्थी ते त्या काळी लाकडाचे (पूर्णत: वा अंशत:) होते. म्हणून आपल्याला असा अंदाज बांधण्यास काही हरकत नाही की, सध्या दृश्यमान असलेले महालक्ष्मी मंदिर हे कल्याणी चालुक्यांच्या राजवटीत बांधले गेले असावे.

डॉ. मिराशी जे शिलाहार राजवंशाच्या इतिहासाचे तज्ज्ञ मानले जातात. त्यांच्या मते, महालक्ष्मीचे मंदिर हे शिलाहार राजवटीच्याही आधीचे असून कदाचित ते 'िंसद' राजवटीत बांधले गेले असावे. या सिंद राजांनी (करहाटपुराधीश्वर) कोल्हापूर-कराड या भागावर काही काळ राज्य केले) आणि शिलाहारांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असावा. कोल्हापूरचे शिलाहार हे जरी 'महालक्ष्मीलब्धवरप्रसाद' असे बिरुद धारण करणारे असले तरी बहुतकरून या राजवटीत स्यादवादाला (जैनमत) प्राधान्य होते.

महालक्ष्मी मंदिर प्रकारात चार जैन द्वारपालांच्या मूर्ती आढळतात. त्यातील दोन मूर्ती महाकाली मंदिराच्या उपमंदिरामध्ये 'भरत' आणि 'शत्रुघ्न' या नावाने विराजमान आहेत, तर उर्वरित दोन सभामंडपाच्या प्रवेशिकेच्या दोन्ही अंगास कोनाडय़ांमध्ये स्थित आहेत.

तर अश्या या कोल्हापुरातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या ठिकाणापासून म्हणजे महालक्ष्मी मंदिरापासून भटकंतीची सुरवात करुया. महालक्ष्मीलाच  अंबाबाई हे नाव आहे.  देवी अंबाबाईच्या महालक्ष्मी मंदिराला करवीर निवासिनी देखील म्हटले जाते. कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर (अंबाबाईचे देऊळ) हे पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक व महाराष्ट्रात असलेल्यादेवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे.

 कोल्हापुरात सर्वोच्च स्थान कुणाला असेल तर या मातेला, महालक्ष्मीला व देवालयाला आहे. हे श्रीमहालक्ष्मीचे देवालया न उभारले जाते तर आज कोल्हापुर शहरच दिसले नसते. श्रीमहालक्ष्मीची आर्शीवादानेच श्री.शाहू छत्रपती व श्री.राजाराम महारांज्यांसारखे सुपुत्र जन्माला येऊन या शहराची वाढ व विकासाकरिता त्यांनी प्रयत्न केले.आजच्या शहराच्या सद्यस्थितीचा पाया श्री महालक्ष्मीच्या देवालयाने घातला.त्यांच्या वाढीस महारांजांचे प्रयत्न कारणाभुत झाले.श्रीमहालक्ष्मीचे देवालय शहराच्या मध्यवस्तीत,जुन्या राजवाडयानजीक आहे. भव्य व सुंदर हेमाडपंथी पद्तीचे हे देवालय प्राचीन शिल्प कौशल्याचा उत्कृष्ट नमुना आहे या देवालयाचा आकार ता-यासारखा असून ते दोन मजली आहे देवालयात श्रीमहालक्ष्मीखेरिज दक्षिणेला महासरस्वती, उत्तरेला महाकाली वरच्या मजल्यावर गणतीच्या मुर्ती आहेत या देवालयाला असंख्य खांब असून ते मोजता येत नाही असा भाविकांचा समज आहे.
मुख्य देवालयालासमोर एक प्रवेश मंडप आहे याला गरुड मंडप असे म्हणतात.नवरात्रात येथे उस्तव साजरा केला जातो इतर वेळी र्कीतन,प्रवचन,भजन,ग्रंथवाचन वा प्रदर्शनासाठी देखील याचा उपभोग केला जातो महालक्ष्मीच्या भोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी असलेला मार्ग मंदिराच्या आतल्या बाजुसच असून अगदी वैशिष्टपुर्ण आहे.
मुख्य देवालयालाच्या सुरवातीस प्रवेश करताना मुख्य मंडप लागतो. त्यांच्या दोन्ही बाजुला भिंतीवर भरत आणि शत्रुघ्ह यांच्या सुंदर मुर्ती कोरलेल्या आहेत. पुढे गेल्यावर मणिमंडप लागतो.कलात्मक कोरीव काम आणि जय विजय द्वारपालांच्या मुर्ती मनमोहक आहेत.मुळ स्थान म्हणजे देवीची स्थापना केलेली जागा सन १७२२ पर्यंत श्रीमहालक्ष्मी मुर्ती मुस्लिम हल्ल्यापासून बचाव करण्याकरिता म्हणून सुमारे दोनशे वर्षे झाकून न ठेवण्यात आली होती.मुख्य देवालयालाच्या बाहेरिल बाजुस चौसष्ट नृत्य करणा-या योगिनी व इतर कोरीवकाम केलेले दिसते.श्री महालक्ष्मीच्या देवालयाच्या भोवती आवारामध्ये सर्व बाजुंना अनेक देवदेवतांच्चा मुर्ती आहेत. त्यामध्ये शेपशायी व नवगृह किंवा अष्टदिवाळ मंडप यांचा समावेश आहे.शेपशायीची मुर्ती तितकीशी आकर्षक नसली तरी त्या समोरिल मंडपातील नाजुक व सुंदर कोरीव काम आणि जैन तीथॅकर पाहण्यासारखे आहे. नवग्रह मंडप म्हणजे प्राचीन भारतीय शिल्लपकलेचा उत्कृष्ट नमुना या व्यतिरिक्त देवालयालाच्या आवारातील लहान लहान मंदिरापैकी मुख्य म्हणजे दतात्रय, हरिहरेश्नर, मुक्तेश्री, विठोबा, काशीविश्वेर, राम, राधाकृष्ण,शनी, तुळजाभवानी, महादेव इ.मंदिरे
श्रीमहालक्ष्मी देवालयालात येण्यासाठी चार प्रवेशद्वारे आहेत. त्यापैकी मुख्य प्रवेशद्वार महाद्वार पश्चिमेला असून त्याच्यावर नगारखाना आहे. देवालयाच्या उत्तरेला काशी व मणिकार्णिका ही दोन तीर्थे आहेत. आवारात बाजुला दीपमाळांचा छोटा समुह असून दोन अधुनिक प्रकाराची पाण्याची कारंजी आहेत. उत्तरेकडील प्रवेश द्वारावर एक मोठी घंटा वाजवलि जाते. महाराष्ट्रातील काही महत्तवाच्या व मोठ्या घंटांमध्ये या घंटेचा समावेश होतो या घंटेचा निनाद चार पाच मैलाच्या परिसरात घुमतो.
दर पौष महिन्यामध्ये सायं सुर्यकिरणोत्सव साजरा केला जातो या तीन दिवसाच्या उत्सवाचे वैशिष्टय म्हणजे सायंकाळी ठराविक वेळ सुर्यकिरण हे मंदिरात शिरून श्रीमहालक्ष्मीचे मुखावर पडतात व काही वेळातच नाहीसे होतात.आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुख्य देवालय व त्या समोरील गरूड मंडप दोन्ही मिळून महालक्ष्मीच्या मुर्तीसमोर सुमारे १५० आच्छादित बांधकाम आहे. मंदिरासभोवती व पश्चिमेला अनेक घरे आहेत.या तीन दिवसाखेरीज वर्षात केव्हाही देवीच्या मुखावर सुर्यकिरणे पडत नाहीत. 

मातृलिंग मंदिर :-

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरातील श्री मातृलिंग मंदिरात सापडलेला शिलालेख हा फारसी लिपीतील असून आजवर त्यातील मुबारकखान इतकीच अक्षरे लागली आहेत. अनेक अभ्यासकांनी आपल्या महालक्ष्मी संदर्भातील आपल्या लिखाणात या शिलालेखाचा
उल्लेख केला आहे.या संंदर्भात कोल्हापूर चे जेष्ठ इतिहास संशोधक कै. अ.ब.करवीरकर यांनी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला होता.
महालक्ष्मी मंदिरातील श्री मातृलिंग मंदिर हे एक अनोखे शिल्पवैभव आहे. महालक्ष्मी मंदिराच्या अंतराल मंडपाच्या बरोबर वर या मंदिराचा नंदी मंडप येतो. या नंदी मंडपाच्या उत्तरेकडील स्तंभावर हा लेख आहे.
महालक्ष्मी ची परीवार देवता असणाऱ्या महाकाली मंदिराच्या मंडपातून समोरच्या जीन्यावरून मातृलिंग मंदिरात जाता येते. वर जाण्या येण्याच्या दृष्टीने हा जीना चिंचोळा असल्यानेच केवळ शेजारती खेरीज इतर सर्व आरती वेळी. श्रावण सोमवार वैकुंठ चतुर्दशी महाशिवरात्री अशा दिवशी हे मंदिर दिवसभर दर्शनासाठी खुले असते.
मातृलिंग म्हणजे काय?
श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्याच्या बरोबर वर मातृलिंगाचे स्थान आहे. याचा अर्थ श्री महालक्ष्मी ची मूर्ती व मातृलिंग एका रेषेत आहेत. तांदूळाची रास सुपारी शिवलिंग यावर कोणतीही देवता आवाहीत करता येते. या नियमाला धरून करवीरात स्त्री देवतांची देखील लिंग रूपाने पूजा होते.(उदा. सावित्रीश्वर गायत्रीश्वर देवहुतीश्वर). या प्रमाणे साक्षात जगदंबे च म्हणजे आईचं लिंग रुप ते मातृलिंग. यामुळे च शिवलिंगाला असलेल्या सोमसुत्री प्रदक्षिणेचा नियम मातृलिंगाला नाही. (तीथे पूर्ण प्रदक्षिणा केली जाते)
मातृलिंग स्थापनेचे कारण
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी ही परब्रम्ह आदिशक्ती आहे. त्यामुळे ती ना पुरुष ना स्त्री ना नपुंसक असून तीला लिंगत्रयातीत म्हणले जाते. त्यामुळे जे भक्त साधनेच्या अशा पातळीवर पोहोचले आहेत की जिथे मूर्ती अलंकार यांचे त्यांना काही देणे घेणे नाही. परंतु या सिद्ध स्थानाची उर्जा आकर्षित करते अशा उपासकांना उपासनेने स्थान म्हणून श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्याच्या रचनेप्रमाणे तीन खोल्या (शेजघर भांडार घर स्नान घर ) व बाहेरून स्वतंत्रप्रदक्षिणा मार्ग अशी रचना असणारे हे स्थान निर्माण करण्यात आले असावे.

महालक्ष्मी मंदिराचा जुना फोटो

आठवड्याच्या शेवटी शनिवार्,रविवार व सुट्टीच्या दिवशी विशेष दर्शनासाठी लांबच लांब रांगा असल्याने सकाळी लवकर मंदिरात गेलेले चांगले.  महालक्ष्मी मंदिरापासून रेल्वे स्टेशन आणि बसस्थानक सुमारे २-. कि.मी. अंतरावर आहे. तेथून मंदिरापर्यंत आपणास ६० किंवा ७० रुपयात पोहोचता येते. 

मुख्य शहराच्या मध्यभागी मंदिर आहे. मात्र इथे पार्किंगची जागा उपलब्ध नसल्याने येथे कार पार्किंगचा खूप प्रॉब्लेम आहे. जर तुम्ही लवकर येथे येत असाल तर तुम्हाला मंदिराजवळ पार्किंग मिळू शकेल. अन्यथा तुम्हाला वाहन मंदिरापासून खूपच दूर उभे केले पाहिजे आणि तेथून थोडेसे चालणे आवश्यक आहे.


   मंदिराच्या प्रवेशद्वाराला ४ दरवाजे आहेत, प्रत्येक प्रवेशद्वाराचे वेगळे नाव आहे आणि मुख्यद्वार “महाद्वार” म्हणून ओळखले जाते. परिसरातील रस्ते एकमार्गी आहेत ( वन वे ) म्हणून आपण वाहन चालवत असाल आणि जर आपल्याला रस्त्यांविषयी निश्चित माहिती नसेल तर स्थानिक लोकांना विचारा . आपल्याला मदत करण्यात आणि मार्गदर्शन करण्यात स्थानिक लोकांना आनंदच होईल.

मंदिराच्या बाहेर आणि आत बरेच पूजा थाळी स्टॉल दिसतात.

बहुतेकदा मंदिरात अगदी सकाळीही लांब रांग लागलेली असते. ही रांग वेळ जसजशी  पुढे जाईल तशी अधिक लांब होत जते आणि संध्याकाळी तर प्रचंड गर्दी असते. सुरुवातीला सर्वांसाठी एकच रांग असते परंतु एकदा आपण मंदिरात प्रवेश केला तर तेथे स्त्री व पुरुष साठी स्वतंत्र रांग असते.

 

आपण रांगेत असतानाच आणि मंदिराच्या आत जात असताना फोटोमध्ये दाखविले आहे त्या प्रमाणे मुख्य मंदिराच्या भिंतीच्या वरच्या बाजूला खडकात कोरलेली छोटी गणेश मूर्ती तुम्हाला दिसेल. येथील स्थानिक लोक महालक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यापूर्वी  प्रथम या गणेश मूर्तीचे दर्शन घेतात. 

 

रांगेत उभारलेल्या भाविकांना उन्हाचा त्रास होउ नये यासाठी मंदिर व्यवस्थापनाने कपड्यांच्या शेडद्वारे रांग उभा रहाण्याच्या जागेवर सावली केली आहे.

 रांगेत उभा राहून आपण अखेरीस महालक्ष्मीच्या मुर्तीसमोर लीन होतो. महालक्ष्मीची मुर्ती खुप देखणी आणि शांत भाव दाखवणारी आहे. करवीर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती-पीठांपैकी एक आहे. मंदिराच्या पश्चिमेस उघडा असलेला भाग आहे, जिथून प्रत्येक मार्च आणि सप्टेंबरच्या 21 तारखेच्या आसपास सूर्याचा प्रकाश मूर्तीच्या तोंडावर पडतो. या कार्यक्रमास “किरणोत्सव” असे म्हणतात. देवी महालक्ष्मी मूर्तीचे वजन साधारणत: 40 किलो आहे. महाराष्ट्रातील अनेक नवीन विवाहित जोडपे देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी विधीनुसार येथे येतात.
          कधी काळी मोगलांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजार्‍याने अनेक वर्षे लपवून ठेवली होती, असे म्हणतात. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत इ.स. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा.


जेव्हा तुम्ही मंदिरात जाल तेव्हा तुम्हाला दगडांच्या आत खोदलेल्या विविध मूर्ती दिसतील ज्या तुम्हाला त्या काळाच्या स्थापत्यकलेची कल्पना देतील. 

 

मंदिरात छायाचित्रणास परवानगी नाही. दररोज देवी भिन्न रंगांची साडी परिधान करतात जी येथे येणाया भक्तांनी दिलेली असते.देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर नागमुद्राआहे.अकराव्या शतकातील शिलालेखात 'लिंगशैषाघौषहारिणी' असा देवीचा उल्लेख आहे. देवीच्या संस्कृत आरतीमध्येही तिच्या मस्तकावरील नागाचे वर्णन केले जाते. करवीर माहात्म्य ग्रंथात १३ व्या अध्यायातील सातव्या श्लोकात असे म्हटले आहे की, पन्नागांकित मस्तकाम म्हणजे नागांनी आपला फणा देवीच्या मस्तकावर पाहिला आहे असा उल्लेख आहे.
       हेमाडपंथी मंदिर प्रणालीचा प्रणेता हेमाद्री यांनी रचलेल्या हेमाद्री वीरचित चतुर्वर्गचिंतामणी या व्रतखंडात मस्तकावर नाग असे वर्णन असलेली मूर्ती करवीरनिवासिनीच आहे असे नमूद केले आहे.
नाग, लिंगयोनी, पानपात्र आणि म्हाळुंग अशी महत्त्वाची चिन्हे हीच ज्या देवीची महत्त्वाची ओळख आहे.

 

तसेच, जर तुम्हाला रांगेत उभे रहायचे नसेल तर तेथे मुख दर्शन सुविधा देखील उपलब्ध आहे जिथून तुम्हाला थोड्या अंतरावरुन देवीची मूर्ती दिसते. तर आपल्याकडे वेळ नसेल तर आपण हा पर्याय वापरू शकता. येथे सशुल्क रांगेची सुविधा उपलब्ध नाही.

 

  श्री महालक्ष्मी दर्शनाचा क्रम
1 काशी विश्वेश्वर घाटी दरवाजा शेजारी
2माधव
3धुंडीराज
4दंडपाणी
5 कालभैरव
6काशी कुंड
1-6 महालक्ष्मी मंदिराशेजारी उत्तरेला विश्वेशर मंदिरात
7 गुहा विश्वेश्वराच्या नंदी शेजारी
8 गंगा स्वामी समर्थ मंदिरात भोगावती कुंभी कासारी तुळशी सरस्वती या पंचगंगा मूर्ती
9 भवानी शंकर विश्वेश्वर मंदिरा मागे मंदिर (कार्तिक स्वामी )
10 मणिकर्णिका तीर्थ घाटी दरवाजा शेजारी महालक्ष्मी उद्यान लिंग माऊली लाॅजच्या तळघरात
11श्री गणेश देवी समोर
12 श्री महाकाली देवीच्या उजवीकडे
13श्री महासरस्वती देवीच्या डावी कडे
14 श्री महालक्ष्मी स्वयमेव क्षेत्रस्वामीनी
15 रंकभैरव (कोतवाल) महालक्ष्मी बॅकेजवळ स्वतंत्र मंदिर
16 महर्गलेश्वर इंदूमती हायस्कूल च्या आवारात शिवणकाम विभागा जवळ
17 अगस्त्य लोपामुद्रा घाटीदरवाजा समोर दिपमाळेखाली
18 एकमुखी दत्त (नारायण स्वामी स्थापित) गरूड मंडपाच्या दक्षिणेला दुकानांच्या उजवी कडे

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची मूर्ती
समस्त देवी भक्तांची आराध्या असणारी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची मूर्ती ही किमान 1000 वर्षे जुनी असून स्थानिक बेसाल्ट पाषाणात घडवली असून ती शिवलिंगाकार चौथर्यावर उभी आहे . 2फूट 9 इंच उंचीची ही मूर्ती चतुर्भुज म्हणजे चार हाताची आहे.उजव्या खालच्या हातात म्हाळुंग (citrus in medica ) हे बीजफल जे कर्मवृंद किंवा ईच्छाशक्तीच प्रतिक; वरच्या हाताशी लांबसडक नाजूक बोटानी सावरून धरलेली क्रिया शक्तीची सूचक अशी गदा; डाव्या वरच्या हातात माग फीरवून धरलेली ढाल जी ज्ञानशक्ती रूप आहे.तर डाव्या खालच्या हातातल पानपात्र (वाटी) हे तिची तुरीया अवस्था दर्शवत. अंगावर भरपूर कोरलेले दागिने आणि घोट्या पर्यंत नेसलेल वस्त्र तीची संपन्नता दाखवतात.तर पुष्ट स्तन तिचा जगाबद्दलचा मातृभाव दाखवतात. कमरेला नाजूकपणा इतका की कटीच मापदंड असणारा सिंह लाजून मुकाट्यान पायाशी बसला( हे वर्णन संत दासगणू यानी पायाशी असलेल्या वामावर्ती म्हणजे डावीकडे मुख असलेल्या सिंहाच केलय) समचरण त्यात तोडे पैंजण . कपाळ रूंद चाफेकळी नाक ओठावर निरागस पण गूढ स्मित आकर्ण नेत्र त्यात वत्सलतेचा सागर. माथ्यावर कपाळपट्टी त्यावर समोर फणा धरून बसलेला साडेतीन वेटोळ्याचा नाग त्या काल रूपी नागाच्या फण्यामाग विश्वाच सृजन करणारे पुरूष प्रकृती सयोनी लिंग रूपात विराजमान आहे अशी ही आदिशक्ती ना विष्णूपत्नी ना शिवपत्नी तरी सर्व देवतांच्या भक्ताना उपास्य वाटणारी कोल्हापूरकरांची आई अंबाबाई तर मार्कंडेयांची सर्वस्याद्या श्री महालक्ष्मी!


 मंदिर आणि मंदिराच्या सभोवतालचा परिसर खूपच स्वच्छ आहे आणि सुरक्षा देखील चांगली आहे. मंदिरातील प्राचीन कोरीवकाम पहाण्यासारखे आहे, खांब आणि भिंतींवरील दगडी कोरीवकाम बारकाईने पहावे.

 

मंदिराच्या आवारात बऱ्याच दीपमाळा आहेत. विशेष काळात जसे नवरात्र त्यांच्यावर दिवे प्रज्वलित करुन त्या पाजळल्या जातात.त्या काळात रात्रीच्या वेळी ह्या दीपमाळांचे सौदंर्य पहाण्यासारखे असते.  

 

नवरात्री अश्विन प्रतिपदाच्या काळात दररोज महालक्ष्मी देवीची पालखी  काढली जाते जी दसऱ्यापर्यंत चालू असते. ही पालखी सोन्यापासून बनविली गेली आहे आणि वापरात नसताना ती बाजूच्या आरशाच्या भिंतीमध्ये ठेवली आहे. मंदिरात आपण ती पाहू शकतो.

 

 

मंदिराच्या आजूबाजूला मोठ्या संख्येने दुकान आहेत जिथे खास कोल्हापुरचे वैशिष्ट्य असलेल्या वस्तूंची विक्री केली जाते. येथे विकल्या जाणा या काही गोष्टी अतिशय खास आहेत आणि त्या तुम्हाला महाराष्ट्रात कोठेही मिळणार नाहीत. 

 उपयुक्त सूचना -
    कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराची वेळः  सकाळी 6 वाजता उघडते आणि रात्री १० वाजता बंद होते (मंदिर दरवाजे सकाळी ४ वाजता उघडले तरी त्यानंतर पूजा आणि आरती होते.)
    कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर प्रवेश शुल्क - विनामूल्य
    पार्किंग  - कोणतेही पेड कार पार्किंग नाही. रस्त्यावर पार्क करावे लागेल. कार पार्किंग स्पेस क्रंच. त्याऐवजी स्थानिक सार्वजनिक वाहतूक वापरा.
    मंदिरात छायाचित्रण करण्यास मनाई आहे परंतु आपण मंदिर परिसरात फोटो घेऊ शकता. मंदिरात मोबाइल नेण्याची परवानगी आहे.
    शनिवार व रविवार, मंगळवार आणि शुक्रवारी येथे खूप गर्दी असते जेणेकरून आपल्याला कधीकधी 3 तासांपेक्षा जास्त रांगेत थांबावे लागेल. म्हणून तयार रहा आणि शक्य तितक्या लवकर या किंवा शक्य असल्यास गर्दी नसलेल्या दिवसांवर येण्यास प्राधान्य द्या.
    मंदिराच्या अगदी जवळ असलेल्या भवानी मंडप पॅलेसला भेट नक्की द्या.
    येथे स्थानिक फेरीवाले आणि दुकानदारांनकडून खास कोल्हापुरचे वैशिष्ट्य असलेल्या गोष्टी खरेदी करण्यास विसरू नका. 


आमच्या कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर ही हेमाडपंती आहे.
प्रसिद्ध हेमाडपंती स्थापत्यशैली वास्तुशिल्प पद्धतीने या देवळाची बांधणी केलेली आहे, दरजा न भरता एकमेकांवर ठेवलेल्या अशा मोठमोठया चौकोनी किंवा आयताकॄती दगडात (अडक पद्धतीने) करण्यात आलेली आहे. देऊळ पश्चिचमाभिमुख आहे, मात्र हे महालक्ष्मीचे मंदिर कोणी बांधले हे निश्चिततपणे सांगता येत नाही.

देवळात एकूण चार शिलालेख दिसतात. हे शिलालेख देवनागरी तत्सम भाषेत आहेत असे जाणकार म्हणतात. त्यापैकी पहिला मुख्य देवळाच्या पाठीमागे असलेल्या शेषशायी मंदिराच्या डाव्या बाजूला आहे. हा शिलालेख आपल्याला पूर्वेकडे असलेल्या दरवाजामधून प्रवेश करताना लागतो. दुसरा शिलालेख मंदिराच्या परिसरातच असणाऱ्या दत्त मंदिराच्या पाठीमागे असलेल्या हरिहरेश्वगराच्या देवळाच्या भिंतीवर असून त्यावर शके ११४० मध्ये कोरलेला आहे असा उल्लेख सापडातो. तिसरा शिलालेख देवळाच्या पटांगणात प्रवेश करताना डाव्या बाजूला असलेल्या एका खांबावर असून तो शके ११५८ चा आहे. आणि चौथा शिलालेख मंदिराच्या डाव्या बाजूला (घाटी दरवाजाच्या शेजारी) असलेल्या नवग्रहांच्या छोटया देवळातील एका खांबावर आहे.

माझ्याकडे महालक्ष्मी मंदिर माहितीचे छोटे पुस्तक आहे त्यानुसार व विकिपीडियातील माहितीनुसार सध्याच्या मंदिराचा मुख्य भाग इ. स. 600 ते 700 या शतकातले असल्याचे दाखले मिळतात, परंतु प्रत्यक्ष उपलब्ध पुरावे पुढीलप्रमाणे – राष्ट्रकुल राजा पहिला अमोघवर्मा याचा इ. स. 793 मधला ठाणे जिल्ह्यात संजान गावी मिळालेला ताम्रपट या ताम्रपटात राष्ट्रकूट नॄपती प्रथम अमोघवर्ष याने काही सार्वजनिक आपत्तीच्या निवार्णार्थ आपल्या डाव्या हाताची अंगुली महालक्ष्मीला अर्पण केल्याचा उल्लेख आला आहे. सन 980 मध्ये शिलाहाराने दिलेला ताम्रशासन (म्हणजे काय? याचा फक्त उल्लेखच जागोजागी आढळतो) हे दोन प्राचीन पुरावे.
आठव्या शतकात भूकंपामुळे हे मंदिर खचल्यामुळे नवव्या शतकाच्या कालावधीत राजा गंडवादिक्ष याने मंदिराचा जीर्णोद्धार व विस्तार केला. त्याने नवीन महाकालीचे मंदिर बांधले तर सन 1178 ते 1209 या काळात शिलाहार राजा जयसिंग व राजा सिंघल यांच्या कारकीर्दीत दक्षिण दरवाजा व अतिबलेश्वार मंदिर बांधले. सन 1218 मध्ये यादव तौलम याने पश्चिम द्वार (महाद्वार) बांधले. याच राजाने देवीला जडजवाहीर अर्पण करून द्रव्य दिल्याचा उल्लेख मंदिरातील गारेचा गणपती श्री सिद्धिविनायक मंदिरातील खांबावर आढळतो.


मंदिराचे वैशिष्ठ्य म्हणजे कार्तिक आणि माघ महिन्यात ठराविक तीन दिवशी संध्याकाळी सूर्यकिरणे महाद्वारातून (पश्चिम दरवाजा) प्रवेश करून गाभाऱ्यापर्यंत पोहचतात आणि तेथून ती महालक्ष्मीच्या मूर्तीवर पडतात. ही किरणे पहिल्या दिवशी प्रथम महालक्ष्मीच्या पायावर पोहचतात, दुसऱ्या दिवशी देवीच्या कमरेपर्यंत पोहोचतात आणि तिसऱ्या दिवशी तेथून हळूहळू तिच्या मस्तकापर्यंत जातात. हा वास्तुशास्त्रातला वैशिष्टपूर्ण खेळ तीन दिवस फक्त पाच मिनिटेच चालतो. याला किरणोत्सव असे म्हणतात.
देवळाच्या मुख्य वास्तूचे दोन मजले आहेत आणि त्याची बांधणी कोल्हापूरातच मिळणाऱ्या काळया दगडात केली आहे. कोल्हापुरातील प्रसिद्ध रंकाळा तलावाचा शाहू महाराजांनी विकास करण्याआधी तिथे असणारी खण म्हणजे महालक्ष्मीच्या देवळासाठी लागणारा दगड काढलेली खाण असे मानले जाते. महालक्ष्मीच्या मूर्तीच्या बरोबर वर दुसऱ्या मजल्यावर शिवलिंग आहे आणि ते मातुलिंग म्हणून ओळखले जाते. महालक्ष्मीच्या गाभाऱ्यात उभारले असता दुसरा वर मजला असेल असे वाटत नाही.
याखेरीज महालक्ष्मी मंदिर संदर्भात बाकी विशेष काही स्थापत्यसंबंधीचीची मला माहिती मिळत नाही / मिळाली नाही.
मंदिरातील शिलालेखांविषयी काही सांगता येईल का?

तसेच,

सन 980 मध्ये शिलाहाराने दिलेला ताम्रशासन (म्हणजे काय? याचा फक्त उल्लेखच जागोजागी आढळतो)

हे म्हणजे काय? ते नेमके कळले नाही. काही अधिक प्रकाश पाडता येईल का?
 

सन 980 मध्ये शिलाहाराने दिलेला ताम्रशासन

ताम्रशासन म्हणजे ताम्रपट.

शिलालेख एकाकडून दुसरीकडे घेऊन जाणे अवघड झाल्यामुळे ताम्रपटांचा वापर सुरु झाला. वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, शिलाहार यांचे शिलालेख आणि ताम्रपट दोन्ही आढळतात.
सर्वसाधारणपणे ताम्रपटाचे एकूण तीन पत्रे असतात. पहिल्या पत्र्याची दर्शनी बाजू कोरीव असे व त्यावर लेख नसे. त्याच्या आतील बाजूस लेखाची सुरुवात होई. मधल्या पत्र्याच्या दोन्ही बाजूवर लेख कोरला जाई व तिसर्‍या पत्र्याच्या आतील बाजूवरही लेख कोरला जात असे. तिसर्‍या पत्र्याची बाहेरील बाजूही कोरीच असे. तिन्ही पत्र्याच्या कडा उंचावलेल्या व मधली बाजू खोलगट त्यामुळे पत्रे एकमेकांवर ठेवल्यावर पेटीसारखे दिसत व आतील मजकूर घासला न गेल्यामुळे सुरक्षित राही. तिन्ही पत्र्यांच्या कडेला भोक पाडून त्यातून धातूची तार ओवली जाई व तारेची दोन्ही टोके एकत्र करून त्यावर राजमुद्रा ठोकली जाई. राजेलोक दानधर्म करत हे दान ताम्रपटावर नोंदवून दात्याला दिले जाई व तो एक कायदेशीर दस्तावेज असे.

Sri Mahalakshmi Mandir, Kolhapur.

                                                 
                                                           Mahalaxami Temple view                                                    

 
                                                               Darshan Bari


                                                            Mahalalshami Rath


                                                           Darshan Bari                                  


                                                                Navagraha
                                                         

                                                                     Navagraha


                                                                   Navagraha


                                                                   Navagraha


                                                                   Navagraha                                 


                                                                  Navagraha


                                                                       Navagraha


                                                                    Navagraha
                                                       

                                                                         Navagraha


                                                                Darshan Bari


                                                                    Side view

                                                 
                                                                     Side View
                                                             

                                                                Dakshin dwar


                                                                      Sri Shani Dev


                                                                        Shilpakala


                                                                     Shilpakala


                                                                     Shilpakala


                                                                 Prati Mahalakshmi                                                    


                                                                        Mahalakshmi


                                                                         Sri Ganesh


                                                                Mukha Darshan


                                                                  Garud Mandap    


                                                                     Garud Mandap


                                                      Mahalakshmi from Garud Mandap


                                                                          Sri Garudji


                                                                        Design


                                                                   Paschim Dwar


                                                                        Paschim Dwar


                                                                           Paschim Dwar


                                                                    Mahalakshami Mandir

                                         
                                                                 Deepmala


                                                         Deep mala Ani Mahalakshmi Mandir


                                                      Deep mala Ani Mahalakshmi Mandir


                                                               Lord Bharat Maharaj


                                                                  Lord Bharat Maharaj

                                                       
                                                                 Tulasi Vrindavan


                                                                  Sri datta Mandir


                                                                   Satwai Devi


                                                                         Design


                                                                         North side

                                                 
                                                                     Deep mala


                                                                         Lord Shatrughna


                                                                    Gati darwaja
                                                 
                                                           
                                                                      Lord Vasudev


                                                                      Sculpture

         
                                                          Sakshi Ganesh Dwar


                                                                       Sakshi Ganesh


                                                                          Sculpture


                                                                   Lord Balaji


                                                                        Yantra


                                                                      Side view


                                                                          Side view


                                                                        Side view


                                                                  Navgrah Madapam


                                                          Navgrah Madapam & ghati Darvaja


                                                          Old Bell at Lord Vishnu Temple


                                                                 Nagarkhana
                                     

                                                                     Paschim dwar


                                                                      Paschim dwar

                                                                 
                                                                          Paschim dwar      

http://bcdasart.blogspot.com/2013/09/

महालक्ष्मीचे देवालय कोणी बांधले याबद्दल निश्चिती झालेली नाही. देवस्थान समितीच्या माहितीनुसार मंदिर कर्णदेव नावाच्या राजाने बांधले. ख्रिस्तोत्तर नवव्या शतकापूर्वीच देवीचे माहात्म्य प्रस्थापित झाले होते असे दिसते; कारण राष्ट्रकूट नॄपती प्रथम अमोघवर्ष याने काही सार्वजनिक आपत्तीच्या निवार्णार्थ आपल्या डाव्या हाताची अंगुली महालक्ष्मीला अर्पण केल्याचा उल्लेख त्याचा संजान ताम्रपटात आला आहे. हे देवालय हे शिलाहारांपूर्वीच करहाटक (कर्‍हाड) येथील सिंदवंशी राजाने बांधले असावे. त्यापूर्वीच ते शक्‍तिपीठ म्हणून प्रसिद्ध पावले होते. कोल्हापूरचे शिलाहार देवीचे निस्सीम भक्‍त होते. आपणास देवीचा "वरप्रसाद" मिळाला असल्याचा उल्लेख त्यांच्या अनेक लेखांत येतो.

काही विद्वानांच्या मते हल्लीच्या देवळाचा जो अतिशय जुना भाग आहे त्याचे बांधकाम उत्तर-चालुक्यांच्या काळात आहे. देवळाच्या मुख्य वास्तूचे दोन मजले आहेत आणि त्याची बांधणी कोल्हापूरच्या आसमंतात मिळणार्‍या काळया दगडात केली आहे. देवळाचे शिखर आणि घुमट संकेश्‍वर मठाचे अधिपती शंकराचार्य यांनी बांधले असे म्हणतात. या उलट जैन पंथीयांचा असा दावा आहे की, हे देऊळ मूळचे जैन देवता पद्‍मावतीचे आहे आणि त्याचे शिखर आणि घुमट हे सनातन धर्मीयांच्या ताब्यात गेल्यानंतर बांधण्यात आले. मेजर ग्रॅहम यांच्या मतानुसार चौदाव्या आणि पंधराव्या शतकामध्ये मुसलमानांनी देवळांची नासधूस केली त्यावेळी या देवळातील महालक्ष्मीची मूर्ती एका खाजगी घरात हलविण्यात आली आणि पुढे इ.स. १७२२ मध्ये दुसर्‍या संभाजीने त्या मूर्तीची हल्लीच्या देवळात प्रतिष्ठापना केली. ही प्रतिष्ठापना करण्यासाठी संभाजीने सिधोजी हिंदूराव घोरपडेला पन्हाळयाहून कोल्हापूरास रवाना केले होते.

हे देवालय आकाराने एखाद्या फुलीसारखे आहे. प्रसिद्ध हेमाडपंती स्थापत्यशैली वास्तुशिल्प पद्धतीने या देवळाची बांधणी, दरजा न भरता एकमेकांवर ठेवलेल्या अशा मोठमोठया चौकोनी किंवा आयताकॄती दगडात करण्यात आलेली आहे. देऊळ पश्‍चिमाभिमुख असून मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. पश्‍चिमेला असलेल्या मुख्य दरवाजाशिवाय उत्तर, पूर्व आणि दक्षिणेला प्रवेशद्वारे आहेत. उत्तर दरवाजाला एक मोठी घंटा असून दिवसातून पाच वेळा ती वाजविली जाते. या दरवाजाला घाटी दरवाजा असे म्हणतात. देवळात वारा येण्याला कोठेही गवाक्षे नाहीत. पूर्वेकडे असलेल्या मोठया घुमटाखाली महालक्ष्मीची मूर्ती आहे व उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे असलेल्या दोन छोटया घुमटांखाली महाकाली आणि महासरस्वतीच्या मूर्ती आहेत. महालक्ष्मीची मूर्ती १.२२ मीटर उंच असून ती एका ०.९१ मीटर उंच असलेल्या दगडी चौथर्‍यावर उभी करण्यात आलेली आहे. देवळाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर जो मंडप लागतो त्या मंडपाला प्रवेश मंडप किंवा गरूड मंडप असे म्हणतात. आश्‍विन नवरात्रोत्सवात महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दगडी चौथर्‍यावर ठेवून तिची पूजा करतात.

देवळाच्या निरनिराळया भागात चार देवनागरी शिलालेख कोरलेले दिसतात. दत्त मंदिराच्या पाठीमागे असलेल्या हरिहरेश्‍वराच्या देवळाच्या भिंतीवर शके ११४० मध्ये कोरलेला एक शिलालेख आहे. दुसरा शिलालेख देवळाच्या पटांगणात प्रवेश करताना डाव्या बाजूला असलेल्या एका खांबावर असून तो शके ११५८ चा आहे. तिसरा शिलालेख मुख्य देवळाच्या डाव्या बाजूला असलेल्या नवग्रहांच्या छोटया देवळातील एका खांबावर आहे, आणि चौथा शिलालेख मुख्य देवळाच्या पाठीमागे असलेल्या शेषशायी मंदिराच्या डाव्या बाजूला आहे. हा शिलालेख आपल्याला पूर्वेकडे असलेल्या दरवाजामधून प्रवेश करताना लागतो.



शिलाहारकालीन प्राचीन असलेली नगरी म्हणजे कोल्हापूर, यास करविर असेही म्हटले जाते, ही नगरी दक्षिण काशी मानली जाते. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक पीठ. अंबाबाईची अंदाजे दोन ते अडीच फुटाची चतुर्भुज मूर्ति आहे. महालक्ष्मी ही विष्णुपत्नी मानली जाते . देवीच्या वरच्या दोन हातांपैकी उजव्या हातामध्ये लांब गदा तर डाव्या हातात ढाल आहे.खालच्या बाजूच्या दोन दोन हातांपैकी उजव्या हातावर मातुलिंग (महाळुंग) असुन डाव्या हातात पानपत्र आहे. मस्तकावरिल मुकुटावर शिवलिंग धारण केलेले असुन त्यावर नागफणा आहे.

मंदिराची बांधणी ही त्रिशूळाकृती असून शिल्प सौंदर्य अतिशय देखणे आहे. वरच्या भागाला महालक्ष्मी असून डाव्या ऊजव्या बाजूला महाकाली व गरुड मंडप आहे.

कोल्हापूरचे संभाजी महाराज यांनी सिदोजी हिंदुराव घोरपडे ममलकतमदार यांना इ स 1715 मध्ये आज्ञा केली. त्यावरून त्यांनी 26 स्प्टेबर 1715 मध्ये महालक्ष्मीच्या मूर्तिची पूर्वस्थळी देवालयात स्थापना केली. या मंदिराचे बांधकाम करताना चुन्याचा वापर केलेला नसून, घडीव दगड एकमेकांत बसवून मंदिराची उभारणी केलेली आहे. या मंदिराच्या बाहेरील भिंती ह्या शिल्पसौंदर्याने नटलेल्या आहेत. मंदिराच्या बांधणीत दिशा साधन तंत्र वापरलेले दिसून येते. माघ शुद्ध पंचमीच्या रोजी सूर्याचे किरणे हे मूर्तीच्या मुखावर पडतात.

कोल्हापूरच्या अंबाबाईचे वर्णन प्राचीन काळातील अनेक ग्रंथामध्ये आढळून येते. यादवांचा प्रधान हेमाद्रि याने आपल्या ग्रंथामध्ये महालक्ष्मीचे वर्णन केले आहे.

कोल्हापुरवर राज्य करणार्याा शिलाहार राजांची कुलदेवता महालक्ष्मीच होती. या घराण्यातील प्रसिद्ध राजा भोज याने देवीच्या त्रिकाल पूजेसाठी कोप्परवाड या गावाची जमीन ई. स. 1190 मध्ये इनाम दिली होती.

 

 

(1) कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिर फुलीच्या आकारात आहे.

(2)वर्षातून फक्त दोनदा तीन दिवस सूर्यकिरणे देविपर्यंत पोचतात. ह्यालाच किरणोत्सव म्हणतात.

(3) या मंदिराच्या आवारात महाकाली आणि महासरस्वती ही मंदिरही आहेत.

(4) हे पुर्ण शक्तीपिठ आहे. येथे सतीचे डोळे सांडले होते.

(5) जोपर्यंत ती व्यक्ती येथे येऊन महालक्ष्मीची पूजा करत नाही तोपर्यंत तिरुपतीची व्यक्तीची यात्रा पूर्ण होत नाही. येथे महालक्ष्मीला अंबाबाई म्हणूनही ओळखले जाते. दिवाळीच्या रात्री महा आरती केली जाते. अशा या अंबाबाई ला मन:पूर्वक नमस्कार

 

कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे व खूप वैशिष्ठ्यपूर्ण आहे. मी इथे थोडीच वैशिष्ठ्ये लिहीत आहे.

१. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती

मुख्य महालक्ष्मी मंदिराच्या दोन्ही बाजूला महाकाली आणि महासरस्वती मंदिरे आहेत.

२. मंदिराचे चार मंडप

रंग मंडप : सर्वात आतील पहिला मंडप जिथून देवीचे दर्शन होते.

कूर्म मंडप: ह्या मंडपातून रंग मंडपात प्रवेश करताना द्वाराचा दोन्ही बाजूला जय विजय ह्या द्वारपालांच्या मूर्ती आहेत. तसेच मंडपाच्या मध्यभागी कासव आहे.

गणपती चौक: तिसरा मंडप जिथे बरोबर समोर देवीकडे तोंड करून असलेला गणपती आहे.

गरुड मंडप: सर्वात बाहेर समोरील लाकडी बांधकाम असलेला जो नंतर बांधण्यात आला.

३. किरणोत्सव

वर्षातून फक्त दोनदा तीन दिवस सूर्यकिरणे देविपर्यंत पोचतात. ह्यालाच किरणोत्सव म्हणतात.

४. मातृलिंग

कोल्हापूर महालक्ष्मी गर्भगृहाच्या वर आणखी एक मजला आहे. तिथे एक शिवलिंग आहे, ज्याला मातृलिंग म्हणतात. मंदिराच्या डावीकडे असलेल्या जिन्यावरून वर जाता येते. मतृलिंग वर्षातून काही दिवसच दर्शनासाठी खुले असते.( महाशिवरात्री, वैकुंठ चतुर्दशी, श्रावण सोमवार वगैरे).

५. मंदिर प्रांगण व दरवाजे

मंदिर प्रांगणात अनेक छोटी छोटी मंदिरे आहेत. मंदिराच्या बाहेरील भिंतींमध्ये सुद्धा छोटी मंदिरे आणि शिल्पे कोरलेली आहेत.

मंदिर प्रांगण बंदिस्त असून चार दिशेला चार दरवाजे आहेत.

पश्चिम: महाद्वार

उत्तरेला: घाटी दरवाजा

पूर्वेला: पूर्व दरवाजा

दक्षिणेला: दक्षिण दरवाजा

जर तुम्ही अजून हे मंदिर पहिले नसेल तर लवकरात लवकर आवर्जून भेट द्या. कारण हे मंदिर ऐतिहासिक, आध्यात्मिक, शिल्पकला ह्या सर्व दृष्टीने खूप सुंदर आहे.

आदिलशाही राज्यात लपविलेली करवीरनिवासिनी अंबाबाईची मूर्ती छत्रपतींनी पुन्हा मूळ मंदिरात स्थापन केली, तो आजचा ऐतिहासिक दिनविशेष.... पातशाह्यांच्या काळात कोल्हापूर प्रांतावर आदिलशहाचा ताबा होता. या काळात सर्वत्र धामधूम माजलेली असायची. राज्यव्यवस्था स्थिर नव्हती. युद्धप्रसंगी मंदिरांची नासधूस केली जायची. अशावेळी देवीच्या मूर्तीस काही अपाय पोहोचू नये या हेतूने करवीरनिवासिनी अंबाबाईच्या पुजाऱ्यांनी देवीची मूळ मूर्ती मंदिरातून काढून नेऊन कपीलतीर्थाजवळ गुप्त ठेवली होती. पुढील काळात कोल्हापूर प्रांत स्वराज्यात आला. छत्रपतींचे स्थिरस्थावर राज्य स्थापन झाले, तेव्हा वेदशास्त्रसंपन्न नरहरभट सावगावकर यांनी करवीर राज्याचे अधिपती श्रीमंत छत्रपती संभाजीराजे (दुसरे) यांची पन्हाळगडावर भेट घेऊन महाराजांस हा सर्व वृत्तांत सांगितला व आपणांस साक्षात्कार होऊन आई अंबाबाईने आपली मूर्ती मूळ ठिकाणी स्थापन करावी, असा दृष्टांत दिल्याचे महाराजांस सांगितले. यावेळी छत्रपती संभाजीराजेंनी आपले सेनापती सिदोजी घोरपडे - हिंदूराव गजेंद्रगडकर यांना अंबाबाईच्या मूर्तीची मूळ मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना करण्याची आज्ञा दिली. महाराजांच्या आज्ञेनुसार सेनापती घोरपडेंनी सन १७१५ साली विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर करवीरनिवासिनीच्या मूर्तीची मूळ मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना केली. ती तारीख होती दिनांक २६ सप्टेंबर १७१५. तोच हा आजचा ऐतिहासिक दिवस, जेव्हा एक शतकाहून अधिक काळ गुप्तपणे लपवून ठेवलेल्या अंबाबाईच्या मूर्तीची तिच्या मूळ मंदिरात पुनर्स्थापना झाली. छत्रपतींच्या स्थिर व सुरक्षित राजसत्तेचे ते प्रतीक होते. मूर्तीबद्दलची माहिती देऊन आपल्याकडून हे शुभकार्य घडवून घेतल्याबद्दल छत्रपती संभाजीराजांनी नरहरभट यांना काही पेठा व वतने इनाम दिली व देवीच्या नित्य पूजाअर्चेसाठी सावगाव हे गाव इनाम दिले. छत्रपती संभाजीराजे (दुसरे) म्हणजे छत्रपती शिवरायांचे नातू व छत्रपती राजाराम महाराजांचे सुपुत्र होत. संदर्भ : करवीर रियासत, पान २





No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...