लोणीभापकर मल्लिकार्जुन मंदीर
प्रकार : प्राचीन शिवमंदीर
जिल्हा : पुणे
मल्लिकार्जुन मंदिर बारामती तालुक्यात लोणी भापकर येथे मोरगाव –बारामती
रोडवर असुन बारामती लोणीभापकर हे अंतर ३० कि.मी. तर पुणे लोणीभापकर हे अंतर
७५ कि.मी. आहे. बारामतीहुन पुण्याकडे जाताना लोणीभापकर गावाबाहेर पडल्यावर
मल्लिकार्जुन मंदिर दुर्लक्षित अस्वस्थेत दिसुन येते. मल्लिकार्जुन मंदिर
हे येथील प्राचीन मंदिर असुन नागर शैलीतील या उत्तराभिमुख मंदिराची
गर्भगृह, अंतराळ, सभामंडप व मंदिरासमोर पुष्करणी अशी रचना आहे. हे मंदिर व
पुष्करणी यादव काळात बांधले गेले असावे. मुळच्या विष्णुमंदिराचे काळाच्या
ओघात शिवमंदिरात रुपांतर झाले आहे. मंदिराचा मूळ कळस कोसळल्याने नव्याने
विटांचा वेढब कळस बांधलेला आहे. मंदिराचा दर्शनी भागच तैलरंगात रंगवलेला
असुन सुदैवाने उर्वरीत मंदिर आजही काळ्या पाषाणात आहे. सभामंडप कोसळल्याने
आपण थेट गाभाऱ्यापुढील अंतराळात प्रवेश करतो.
अंतराळाच्या प्रवेशद्वारावरील रत्न, रूप,स्तंभ शाखावर व्याल, वेलबुट्टी आणि
मूर्ती कोरलेल्या असुन तळात द्वारपाल कोरलेले आहेत. अंतराळाबाहेरील भिंतीत
नक्षीदार व जाळीदार खिडक्या आहेत. हा अंतराळवजा मंडप एखाद्या लेणीसारखा
घडवीला आहे. अंतराळाचा मंडप कोरीव नक्षीदार स्तंभांवर तोललेला असुन
प्रत्येक स्तंभांवर वरील बाजूला भारवाहक यक्षिणी आहेत. या य़क्षिणींना चार
हात दाखवलेले असून त्या हातांवर त्यांनी ते स्तंभ तोललेले आहेत प्रत्येक
य़क्षिणीमध्ये काही ना काही फरक आहेच. यातील एका यक्षिणीने स्तंभ तीन
हातांवर तोललेला असून एक हात कानावर ठेवलेला आहे जणू मंदिराच्या सभामंडपात
चाललेले गायन वादन ती ऐकत आहे. स्तंभांच्या मधल्या चौकटीत विविध प्रसंग
कोरलेले आहेत. एका खांबांबर वादक वाद्य वाजवतांना तर नर्तिका नृत्यमुद्रेत
दाखविलेल्या आहेत तर दुसरीकडे एका खांबांबर सीताहरणाचा प्रसंग कोरलेला आहे.
एका स्तंभावर कुस्तीचा प्रसंग कोरलेला असुन दुसरीकडे नागकन्यांबरोबर
नृत्य दाखवलेले आहे. याशिवाय एका स्तंभावरील शिल्पात शरभ हत्तीचा पाठलाग
करताना दाखवलेला असुन हंस आणि व्यालमुखे कोरलेली दिसतात. मंदिराच्या छतावर
कोरलेली दगडी झुंबरे अप्रतिम आहेत. याशिवाय विविध कृष्णलीला, शिवपार्वती
आराधना यासारखी अनेक शिल्पे पहायला मिळतात. मंदिराबाहेरील पुष्करणी देखील
पुर्णपणे अलंकारिक आहे. चारही बाजूंनी बांधीव असे मोठे कुंड, आत
उतरण्यासाठी एका बाजुला पायऱ्या व कोरीव मंडप, भिंतीत जागोजागी देवतांसाठी
२८ देवकोष्टके आणि मध्यभागी पाणी अशी या पुष्करणीची रचना आहे. पुष्करणीतील
देवकोष्टकावर मंदिराप्रमाणे कोरीव शिखरांची रचना केली आहे. यातील एकाही
कोष्टकात सध्या मूर्ती दिसत नाही. पुष्करणीतील कोरीव मंडप बहुधा
विष्णूच्या वराह अवतारासाठी बांधण्यात आला असावा. पुष्करणीच्या पश्चिम
दिशेला असलेला हा वराहमंडप एका चौथऱ्यावर उभा असुन मंडपाच्या तळात
हत्तींमस्तके कोरलेली आहे. जणू या मंडपाचा भार त्यांनी पेललेला आहे.
त्याच्या वरील थरात रामायणातील काही प्रसंग व दशावतार कोरलेले आहेत.
याशिवाय काही ठिकाणी पौराणिक प्रसंग व कामशिल्पे साकारली आहेत. हा मंडप
सध्या रिकामा असुन यातील वराहमुर्ती पुष्करणीच्या मागे एका मोकळय़ा जागेत
पडली आहे. वराह हा दशावतारातील तिसरा अवतार. या वराह अवताराची मूर्ती
नृवराह आणि यज्ञवराह रूपात दाखवली जाते. यातील नृवराहाचे धड मानवाचे तर शिर
वराहाचे असते तर यज्ञवराह मूळ वराहाच्या रूपातच दाखवला जातो. लोणी भापकर
येथील यज्ञवराहाचे हे सुंदर शिल्प तीन फूट लांब आणि दोन फूट उंच असुन
यज्ञवराहाचे सालंकृत रूप आहे. या वराहाच्या पायाशी शेषनाग असुन चार
पायांजवळ शंख, चक्र, गदा आणि पद्म ही विष्णूची प्रतीके कोरलेली आहेत.
पायांना नागदेवतेचे तोडे घातलेले असुन पाठीवर लहान आकाराच्या १४२
विष्णुमुर्ती कोरलेल्या आहेत. संपुर्ण मंदिर पहाण्यास १ तास पुरेसा होतो.
कित्येक दिवस लोणी भापकरची मंदिरे आणि तिथल्या वीरगळांना भेट द्यायचा विचार चालूच होता. शेवटी एकदाचा बेत नक्की झाला. पुण्यात अत्रुप्त आत्म्याच्या घरापाशी भेटून त्याच्या गाडीने मी, ५० फक्त आणि आत्मा असे तिघेजण निघालो. वाटेत हडपसरला सूडला घेतले आणि पुढे मार्गक्रमण चालू केले. सासवडपर्यंत धूम धूम कोसळणारा पाऊस जेजुरीपाशी येईतो प्रायः थांबला होता. मोरगाव मागे टाकून थोड्याच वेळात रूक्षश्या भासणार्या लोणी भापकर गावात शिरलो. गावात शिरता शिरताच डावीकडे अनेक समाध्या लक्ष्य वेधून घेत होत्या. लगेचच एका मंदिरापाशी पोहोचलो. ते गावातील ग्रामदैवत काळभैरवनाथाचे मंदिर.
मंदिरापाशी गाडी पार्क करून प्रवेशद्वारातून आत शिरलो. मंदिराला तीन प्रवेशद्वारे असून मुख्य द्वार म्हणजे प्रशस्त नगारखाना असून दरवाजाच्या दोन्ही बाजूंना शरभाचे शिल्प कोरलेले आहे. पायातळी हत्ती पकडलेले आहेत. मंदिराच्या एका बाजूला देखणी बारव असून तिथल्याच एका कोपर्यात कृष्णाची छोटीशी मूर्ती दुर्ल़क्षित अवस्थेत पडलेली आहे. मंदिराच्या पुढयात दोन भव्य दिपमाळा आहेत. मूळचे मंदिर काळवत्री पाषाणात बनवलेले असून शिखर नागरी शैलीचे आहे जे अलीकडच्या काळातील असावे. सबंध मंदिराला ऑईलपेंटने रंगवलेले असल्यामुळे त्याचे मूळचे पाषाणी सौंदर्य जरी उणावले असले तरी ते लपत मात्र नाही. मंदिराचा सभामंडप हेमाडपंथी शैलीच्या अनेक नक्षीदार खांबांवर तोललेला असून त्या खांबांवर वेगवेगळी चित्रे चितारली आहेत. कधी त्यात वादक संगीतात तल्लीन झालेले दिसतात तर कधी रानडुकराच्या शिकारीचा प्रसंग कोरलेला दिसतो. मंदिराच्या स्तंभांवर असलेले नाग आणि नागाच्या वेटोळ्यांपासून बनवलेली नक्षीदार शिल्पे हे मंदिर मूळचे शिवमंदिर असल्याचे सूचित करत जातात, कालांतराने येथे काळभैरवाची स्थापना झालेली असावी. अर्थात काळभैरव हेही शंकराचेच एक रूप. गाभार्यात भैरवाच्या दोन तर योगेश्वरीची एक अशा तीन मूर्ती आहेत. भैरवाच्या हातात त्रिशूळ, शंख अशी आयुधे आहेत.
१. काळभैरवनाथ मंदिर
२. नगारखान्यावरील शरभाची शिल्पे

३. स्तंभांवर असलेली नागशिल्पे



४. मंदिराच्या आतील कोरीव स्तंभ
५. स्तंभांवर कोरलेली विविध शिल्पे

६. काळभैरवाची मूर्ती
दर्शन घेऊन मंदिराला फेरी मारण्यास निघालो. मंदिराच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर गंडभेरूंडाचे शिल्प आहे. पशूचे शरीर आणि पक्ष्याचे तोंड असा आकार असलेला हा काल्पनिक पशू. ह्यानेही पायातल्या नख्यांत हत्ती पकडलेले असून शेपटीनेही एक हत्ती पकडलेला दिसतो आहे. त्याच्या शेजारीच सहस्त्रदलकमलाचे नक्षीदार शिल्प कोरलेले आहे. गंडभेरूंड, सहस्त्रदलकमल, आणि सर्पांकित नक्षीदार स्तंभ हे मंदिर यादवकालीन असल्याचे निं:सशय सिद्ध करतात.
७. गंडेभेरूंड
८. मंदिराचा बाह्यभाग जो अर्वाचीन काळातला आहे.
मंदिराच्या उजवीकडेच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडलो. समोरच एक छोटेखानी मंदिर असून आतमध्ये मारूतीची भव्य मूर्ती आहे. मंदिराच्या चौथर्याला लागूनच एक पुरूषभर उंचीचा वीरगळ आहे. वीरगळाच्या सर्वात वरच्या बाजूला वीर शिवलिंगाची पूजा करताना दाखवलेला आहे. वीर मृत्युलोकातून कैलासास शंकरापाशी पोचला आहे असे याचे सूचन. त्याच्या खालच्या चौकटीत तोच वीर दोन स्त्रियांसह दाखवलेला असून ते त्याचे कौटुंबिक जीवन किंवा स्वर्गपाप्ती झाल्यावर अप्सरांसहित जीवन सूचित करतात. त्याखालच्या चौकटीत वीर हा शस्त्रधारी सैनिकांशी लढताना दाखवलेला आहे. वीराने थोर युद्ध केल्याचे हे प्रतिक. तर सर्वात खालच्या चौकटीत वीर धारातीर्थी पडलेला दाखवलेला असून त्याच्याबरोबर बैलाचे शिल्प कोरलेले दिसते. याचा अर्थ हा वीर नंदीगणांपैकीच एक झाला असा असावा. सर्वसाधारणपणे सर्वच वीरगळांची रचना काहीशी अशीच.
९. हनुमान मंदिराच्या चौथर्यापाशी असलेला वीरगळ
काळभैरवनाथाचे मंदिर पाहून त्यापासून जवळच असलेल्या सोमेश्वर मंदिरापाशी आम्ही निघालो. हे मंदिर तसे अगदी साधेच. मंदिराच्या समोरच देखणा नंदीमंडप असून आतमध्ये स्तंभ व गाभार्यात मोठ्या आकाराचे देखणे शिवलिंग आहे. इथल्या स्तंभांवर फारसे कोरीव काम आढळत नाही. या मंदिराचे वेगळेपण आहे ते मंदिराच्या आवारात असलेल्या कित्येक वीरगळांत. एकाच ठिकाणी असलेले १३/१४ वीरगळ मी तरी पहिल्यांदाच पाहिले. येथल्या वीरगळांमध्ये लढाईचे विविध प्रसंग कोरलेले आढळतात. वीर कधी एकाचवेळी दोन जणांशी लढतो आहे तर कधी अनेकांशी लढतो आहे, कधी खड.गयुद्ध करतो आहे तर कधी अश्वावर स्वार होऊन युद्ध करत आहे. हे सर्व वीरगळ ४/५ फूट उंचीचे पण आज निम्मेअधिक जमिनीत गाडले गेले आहेत. वीरगळांची इतकी मोठी संख्या लोणी भापकर हे गाव लढावांचे असल्याचे सूचित करते. आणि जे अर्थातच वाजवीही आहे. विजापूरहून पुण्याला येणार्या प्रमुख मार्गावरील हा प्रदेश. साहजिकच मूर्तीभंजकांची परचक्रे इथे सतत होतच असावीत. इस्लामी आक्रमकांशी संघर्ष करतांना येथले वीर धारातीर्थी पडत असावेत.
१०. सोमेश्वर मंदिर
११. सोमेश्वर मंदिराच्या आवारातील असंख्य वीरगळ
१२. सोमेश्वर मंदिराच्या आवारातील असंख्य वीरगळ
पेशव्यांचे भापकर हे सरदार. त्यांची प्रचंड भुईकोट किल्लेवजा गढी आज गावात बेवसाऊ अस्वस्थेत आहे. भक्कम बुरुज आणि तटाचे अवशेष झाडाझाडोर्यांत लुप्त होऊन गेले आहेत. हे सर्व पाहातच आम्ही थोड्या पुढे असलेल्या इथल्या सर्वाधिक चर्चेतल्या श्री मल्लिकार्जुन मंदिरापाशी पोहोचलो.
मल्लिकार्जुन
मंदिर हे बहुधा इथले सर्वात प्राचीन मंदिर असावे. संपूर्ण हेमाडपंथी
बांधणीचे हे मंदिर, कोरीव प्रवेशद्वारे, सभामंडपात कोरलेले नक्षीदार स्तंभ
आणि गर्भगृह आणि मंदिराच्या पुढ्यात पुष्करीणी अशी या मंदिराची रचना. हेही
मंदिर यादवकालीनच.
सुदैवाने या
मंदिराचा फक्त दर्शनी भागच तैलरंगात रंगवलेला आहे आणि उर्वरीत मंदिर
अजूनतरी काळ्या पाषाणातच आहे त्यामुळे हे मंदिर सर्वाधिक देखणे दिसते.
मंदिराचे प्रवेशद्वार व्याल, नक्षीदार वेलबुट्टट्या आणि काही मूर्ती
कोरलेल्या आहेत, जाळीदार खिडक्या आहेत. प्रवेशद्वार बघून सभामंडपात प्रवेश
केला. सभामंडप कोरीव नक्षीदार स्तंभांवर तोललेला आहे. प्रत्येक स्तंभांवर
वरच्या बाजूला भारवाहक यक्षिणी आहेत. या य़क्षिणींना चार हात दाखवलेले असून
त्या हातांवर त्यांनी ते स्तंभ तोललेले आहेत प्रत्येक य़क्षिणीमध्ये काही
ना काही फरक आहेच. एक यक्षिणी मात्र वेगळ्या प्रकारची दाखवली आहे. तीने तो
स्तंभ तीन हातांवर तोललेला असून एक हात मात्र कानावर ठेवलेला आहे, जणू
मंदिराच्या सभामंडपात चाललेले गायन, वादन ती तन्मयतेने ऐकत्ये आहे.
स्तंभांच्या मधल्या चौकटीत विविध प्रसंग कोरलेले आहेत. कधी वादक वाद्य
वाजवतांना दाखवलेले आहेत तर एका खांबांबर सीताहरणाचा प्रसंग कोरलेला आहे.
एका स्तंभावर नर्तिका नृत्यमुद्रेत दाखविलेल्या आहेत तर दुसरीकडे कुस्तीचा
प्रसंग कोरलेला आहे. कधी नागकन्यांबरोबर नृत्य दाखवलेले आहे तर कधी हंस आणि
व्यालमुखे कोरलेली दिसतात. एका स्तंभावरचे कोरीव शिल्प तर मला सर्वात आगळे
वाटले. त्या शिल्पात शरभ हत्तीचा पाठलाग करताना दाखवलेला आहे. भुलेश्वर
मंदिराच्या पायर्यांच्या कडेलाही अगदी असेच एक लहानसे शिल्प आहे.
१३. मल्लिकार्जुन मंदिर
१४. मंदिराचा दर्शनी भाग
१५. सभामंडप
१६. भारवाहक यक्षिणी

१७. कानावर हात असलेली यक्षी
१८. स्तंभांवरील विविध कोरीव कलाकृती


१९. स्तंभांवरील विविध कोरीव कलाकृती


२०. शरभ हत्तीचा पाठलाग करत असतानाचे शिल्प
सभामंडपाचे
छत तर अगदी निरखून बघण्यासारखेच. फुलाफुलांचे अतिशय सुंदर कोरीवकाम इथल्या
छतावर केले आहे. छताच्या चौकटीच्या भागावर अनेक शिल्पे कोरलेली आहेत. हे
बहुधा कृष्णाच्या जीवनातले प्रसंग असावेत. अंधार आणि उंचीमुळे ते नीटसे
पाहता येत नाहीत. पण गोपगोपी आणि गाईगुरांसह असलेला कृष्ण नजरेत भरतोच.
युद्धातील काही प्रसंगही येथे कोरलेले आहेत.
गर्भगृहाचे
प्रवेशद्वारही कोरीव खांब,विविध मूर्ती आणि व्यालमुखांनी नटलेले आहे.
गर्भगृह अगदी भुलेश्वर मंदिराचीच आठवण करून देते. आतमध्ये मात्र दोन
शिवलिंगे आहेत मल्लिकार्जुन म्हणजे शिव-पार्वती यांचे हे प्रतिक.
२१. छतावरील नक्षीदार फुलांचे कोरीव काम
२२. छतावरील चौकटीत कोरलेले शिल्पपट

श्री मल्लिकार्जुनाचे दर्शन घेऊन बाहेर आलो. मंदिराच्या समोरच भलीमोठी पुष्करिणी खोदलेली आहे. चतुष्कोनी अशा ह्या पुषरिणीत ठिकठिकाणी कोनाडे खोदलेले असून त्यावर लहानसे कळस उभारलेले आहेत. पूर्वी ह्या कोनाड्यांत मूर्ती असाव्यात. पुष्करणीच्या एका बाजूलाच भव्य असा नंदिमंडप आहे आणि त्याच्या चारही बाजूंना विविध शिल्पे कोरलेली आहेत.शिल्पांमध्ये धनुर्धारी राम, लक्ष्मण, गदाधारी भीम, हनुमान आदी विविध शिल्पे कोरलेली आहेत तर दोन बाजूंना मैथुनशिल्पेही आढळतात. नंदीमंडपांचे छतही फुलाफुलांच्या अतिशय देखण्या नक्षीकामाने सजलेले आहे. आज येथे नंदीची मूर्ती नाही व नंदीमंडपाच्या पुढ्यातल्या मंदिरात दत्तमूर्ती स्थापन झालेली आहे. पण पूर्वी हे शंकराचे मंदिर असावे हे निश्चित. तशा अनेक खाणाखुणा येथे दिसतातच.
२३. पुष्करिणी व नंदीमंडप
२४. नंदीमंडप व मूळच्या शिवमंदिराचे दत्तमंदिरात रूपांतरीत झालेले मंदिर
२५. नंदीमंडपाच्या बाहेरील बाजूस कोरलेली शिल्पे

२६. नंदीमंडपाच्या बाहेरील बाजूस कोरलेली शिल्पे

२७. नंदीमंडप जवळून
२८. मंडपाचे नक्षीदार छत
आता
आम्ही मंदिराच्या आवारात असलेल्या इथले सर्वाधिक चर्चित शिल्प बघायला
निघालो. किंबहुना याच कारणासाठी येथे येण्याचा अट्टाहास केला होता. हे
शिल्प आहे यज्ञवराहाचे. हे पूर्वी मंदिराच्या जवळच असणार्या एका शेतात
पडिक अवस्थेत होते, ते हल्लीच मंदिराच्या आवारात नेऊन ठेवलेले दिसते.
यज्ञवराह
म्हणजे वराहमूर्ती., विष्णूच्या वराहवताराचे हे प्रतिक. वराहवताराचे कार्य
संपुष्टात आल्यानंतर विष्णूने वराह शरीराचा त्याग केला व त्या शरीरापासून
यज्ञाची विविध अंगे बनली असे म्हणून हा यज्ञवराह अशी विष्णूपुराणातली
आख्यायिका आहे.
हे शिल्प अतिशय देखणे
आणि भव्य. वराहाच्या शरीरावर त्याने दगडाचीच झूल पांघरलेली असून त्यावर
छोट्या छोट्या चौकोनांत असंख्य विष्णूमूर्ती कोरलेल्या आहेत. त्या झूलीवर
त्याने शिवलिंगे धारण केली आहेत. वराहाच्या चारही पायांवरही विष्णूमूर्ती
कोरलेल्या असून पायातळी विष्णूची शंख, चक्र, गदा, पद्म ही आयुधेही कोरलेली
आहेत. वराहाची शेपटी गुंडाळालेल्या अवस्थेत असून त्यात त्याने पृथ्वी धरून
ठेविली आहे. वराहाच्या शरीराखाली एक नमस्कार करणार्या अवस्थेतली एक मानवी
धड असलेलीमूर्ती असून तीचे शरीर लांबलचक निमुळते दाखवले आहे. एकंदर
ठेवणीवरून ही शेषनागाची मूर्ती दिसते. मूर्तीभंजकांनी याचे मस्तक तोडलेले
आहे. खुद्द यज्ञवराहाचे मुखसुद्धा मूर्तीभंजकांच्या तडाख्यातून सुटलेले
नाही. तरीही त्याचे देखणेपण मात्र वादातीत आहे.
यज्ञवराहाचे असे शिल्प इतरत्र कुठेही आढळात आलेले नाही.
२९. यज्ञवराह (शंख, चक्र, शेषनागासह)
३०. यज्ञवराहाच्या पायाजवळील कौमोदकी गदा
३१. शेपटीत अडकलवेली पृथ्वी.
३२. शरीरावरील विष्णूमूर्तींची झूल
३३. श्री मल्लिकार्जुन मंदिर
मंदिराच्या ह्या देखणेपणाचा पुरेपुर आस्वाद घेऊन आम्ही तिथून निघालो ते मोरगांवच्या जवळच असलेल्या अजून एका शिल्पसमृद्ध मंदिराकडे, पांडेश्वराकडे. त्याविषयी पुढच्या भागात.
या स्थळाबद्दल अधिक ऐतिहासिक माहिती देता येईल काय?(कदाचित ही मंदिरे राष्ट्रकूटांच्या काळातली असावीत असा अंदाज व्यक्त करतो.)
ही सारी शिल्पांनी नटलेली मंदिरे पाहून या 'लोणी भापकर' स्थळाला मुस्लिम राजवटीपूर्वी विशेष महत्त्व असावे असे दिसते.
यज्ञवराहाचे शिल्प तर अप्रतिम (महाराष्ट्रातील एकमेव?) आहे. इतक्या बारकाईने कोरलेले हे शिल्प नक्कीच एखाद्या मंदिराच्या गर्भगृहात असणार. यज्ञवराहाच्या शिल्पांबद्दल येथे काही माहिती सापडली. यानुसार गुर्जर-प्रतिहारांच्या काळात यज्ञवराहाची मूर्ती विशेष प्रचलित झालेली दिसते.
दुव्यांबद्दल धन्यवाद विसुनाना.
मंदिरे
राष्ट्रकूटकालीन असावीत का नाही ते सांगता येणार नाही. पण एकंदर आतील
शिल्पांवरून मल्लिकार्जुन मंदिर मात्र यादवकालाच्याही आधीचे असावे असे
वाटते. याचा आणि भुलेश्वर मंदिराचा काल जवळपास सारखाच असावा.
पेशवेकालात भापकर हे सरदार होतेच. इथल्या वीरगळांच्या प्रचंड संख्येवरून इथे बर्याच लढाया झालेल्या दिसतात.
यज्ञवराहाचे इथले शिल्प हे महाराष्ट्रातील एकमेवच आहे का याची मात्र कसलीही माहिती मजपाशी नाही.
या लेखामुळे विष्णुच्या 'वराह' अवताराबद्दल कुतुहल चाळवले आणि त्यानिमित्ताने अगदी थोडे वाचन झाले.
वेदात
महत्त्व असलेल्या इंद्र आणि वरुण इ. देवता मागे पडून वेदातली एक दुय्यम
देवता 'विष्णू'ला महत्त्व प्राप्त झाले तो काळ म्हणजे इ.स. पू. ३००.
मध्यप्रदेशातील विदिशा - बेसनगर येथील
गरुडध्वज त्याची साक्ष देतो. मात्र 'भगवान' विष्णूचे दशावतार नक्की केव्हा
निर्माण झाले (किंवा या अवतार शृंखलेला धार्मिक वाङ्मयात कधी स्थान
मिळाले?) ते मात्र कळत नाही. अशातच वेदांतील रुद्र देवतेपासून उत्पन्न
झालेले 'शिव' हे दैवतही तितक्याच (किंबहुना अधिक) महत्त्वाला पोचले. (वेद
-> श्वेताश्वतार उपनिषद -> शिवपुराण). उपनिषदातील ब्रह्म संकल्पना
'ब्रह्मा' नामक दैवतात रूपांतरित झाली.इ.स्.पू. २०० ते इ.स. ६०० या ८००
वर्षांच्या (शुंग + गुप्त साम्राज्य) काळात ब्रह्मा-सरस्वती,
विष्णू-लक्ष्मी आणि शिव-पार्वती अशी दैवत युगुले त्यांच्या कार्यासह
(अनुक्रमे उत्पत्ती-स्थिती-लय) पुराणांतरी प्रस्थापित झालेली आहेत. याच
काळात कधीतरी विष्णूदेवतेचे कूर्म-मत्स्य-वराह हे अमानवी अवतार, नृसिंह हा
अर्धा पशू आणि अर्धा माणूस असा अवतार आणि त्यानंतर रामकृष्णबुद्धादि
मानवावतार पृथ्वीचे पालनहार म्हणून प्रसिद्ध झाले. भागवत धर्म/पंथ
प्रामुख्याने भारताच्या उत्तरेत मध्य प्रदेशा-ओरिसापर्यंत पसरलेला होता.
मध्य प्रदेशातील राजवटींनी त्याला उदार आश्रय दिला होता आणि स्वतः
राज्यकर्तेही त्याचे पालन करीत. उदयगिरी(मप्र) येथे गुप्त वंशाची तात्पुरती
राजधानी असताना तेथील गुहांमध्ये वराह अवताराचे एक भव्य शिल्प कोरले गेले.
या नंतर गुजरात-मप्र भागात सत्तेवर आलेल्या गुर्जर-प्रतिहार
राज्यकर्त्यांना विष्णूच्या वराह-अवताराचे विशेष महत्त्व होते असे
दिसते.त्यांनी वराह अवताराची नाणी पाडलेली आहेत. तसेच मध्य प्रदेशात अनेक यज्ञ वराह शिल्पे सापडलेली आहेत.
खजुराहो येथेही एक सुस्थितीतील यज्ञवराहाचे शिल्प आहे.
( वराहावताराच्या मूर्तीचेही भूवराह,आदिवराह,नृवराह,यज्ञवराह आणि प्रलयवराह असे प्रकार आहेत.)
डॉ. भांडारकरांच्या मताप्रमाणे याच लढाऊ वंशातून पुढे दक्षिणेकडे कर्नाटक- महाराष्ट्र भागात चालुक्य राजवटीचा उदय झाला. (बदामी). या चालुक्यांच्या राजवटीचे तर 'वराह अवतार' हे राजचिन्ह (एम्ब्लेम) होते. या चालुक्य काळात/नंतरच दक्षिण भारतात अनेक ठिकाणी वराह अवताराची अनेक मंदिरे निर्माण झाली असावीत.
चालुक्यांनी प्रथमतः बांधलेल्या (इ.स. ६००?) कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरात लक्ष्मीच्या मूर्तीबरोबरच वराह-अवताराची प्रतिमा पूजली जात असावी. इ.स्.च्या आठव्या शतकात झालेल्या भूकंपात हे मंदिर क्षतिग्रस्त झाले आणि त्याकाळच्या तेथील स्थानिक राज्यकर्त्यांनी (कोल्हापुर पाती शिलाहारांनी) त्याचे पुनर्निर्माण केले. त्यावेळी फक्त महालक्ष्मीचीच प्रतिमा गाभार्यात स्थापन झाली. तरीही मूळ लक्ष्मी-वराहाच्या मूर्ती मंदिराच्या आतील भागात एका जिन्याच्या दोन्ही बाजूंना आजही पहायला मिळतात.
योगायोग
असा की वल्ली यांच्या या लेखात दिसणारी सारीच मंदिरे बदामी चालुक्य शैलीची
आठवण करून देतात. किंबहुना मल्लिकार्जुन मंदिरातले खांब तर कोल्हापुरच्या
महालक्ष्मी मंदिरातील खांबांच्या प्रतिकृतीच वाटतात.
म्हणून
लोणी भापकरची ही मंदिरे चालुक्य राजवटीत अथवा थोडी पुढेमागे (इ.स. ७०० ते
इ.स. १०००) बांधली गेली असावीत असा कयास बांधता येतो.
या माहितीत कोणी अधिक भर घातल्यास वा मतांचे खंडन-मंडन केल्यास स्वागत आहे.
माहितीपूर्ण आणि सविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद.
चालुक्यांचे राज्य महाराष्ट्रभरही पसरले असल्याने ही मंदिरे त्यांनी बांधलेली असणेही शक्य आहे.
पण हे चालुक्य हे मुख्यतः वैष्णव होते ना? अर्थात काही शिवालयेपण त्यांनी बांधलेली आहेत. पण लोणी भापकरमध्ये फक्त शिवमंदिरेच दिसतात.
आणि शिवमंदिरापुढे यज्ञवराहाचे नेमके स्थान काय असावे किंवा त्याकाळच्या यज्ञयागांमध्ये वराहमूर्ती बनवली जात असे का?
चालुक्यांच्या
(आणि तद्नंतरच्या इतर मूर्तीपूजक राजवटींच्या) अस्तानंतर ते शहाजी
राजांच्या उदयापर्यंत महाराष्ट्रातील अनेक देवळे नष्ट झाली. त्यातच ही
देवळेही र्हास पावली असावीत. अस्तित्वात असलेल्या पण पडझड झालेल्या जुन्या
मंदिरांच्या रिकाम्या गाभार्यात उत्तरकालीन राजवटींनी/ सरदारांनी नवे देव
स्थापन केले असावेत. (जसे शिवलिंगाच्या जागी दत्तगुरू..माझ्यामते
काळभैरवाचे देवालय मुळात यज्ञवराहाचे असू शकेल. किंवा कुठेतरी इतरत्र एखादे
मंदिर नामशेष झाले असेल आणि त्याच्यातली मूर्ती शेतात फेकली गेली असेल.)
(तसेही
शिव आणि विष्णू एकाच देवालय समूहात एकत्र आलेले बर्याच ठिकाणी दिसतात.
उदा. चालुक्यांचा पराभव करून गादीवर आलेल्या राष्ट्रकूटांनी खोदलेल्या
वेरूळच्या कैलास लेण्यात प्रवेशद्वारावरच लक्ष्मीचे भव्य शिल्प आहे आणि आत रामायण कोरलेले आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस शैव देवता तर उजवीकडे वैष्णव देवता आहेत.)
दत्त
मंदिर हे मुळ शंकराचे मंदिर होते हे मात्र पटले नाही.... खुप जुन्या साला
पासुन येथे दत्त मंदिराबद्द्लच्या अख्यायिका ऐकण्यास मिळतात. अगदी माझ्या
आज्जीच्या काळापासुन च्या कथा ऐकायला मिळतात.. आज्जी लहान असतानाच्या
गोश्टी पण त्यात आहेत..
दरवर्षी नेहमी प्रमाणे यात्रा भरते तेथे.. मामाचेच गाव असल्याने बर्याच जुन्या कथा माहिती आहेत..
तुम्ही
जो भापकराचा वाडा ( ज्याचे बुरुज आता ढासळले आहेत ) म्हणता तेथे काही
वर्षांपुर्वी पर्यंत बंदुक धारी शिपाई ( स्व मालकीचे) गस्त घालत. संपुर्ण
दरारा होता.
शिवाय मल्लिकार्जुन मंदिर आणि परिसर दत्त मंदिर म्हणुनच नावारुपास आहे, सेपरेट मलिक्कार्जुन मंदिर कोणी तेथे म्हणत नाही.. मुख्य मंदिर हे दत्त मंदिर आहे, समोरील पुष्करणी ही दत्त मंदिराचीच आहे.. परंतु दत्त मंदिर खुप लहान असल्याने बर्याच जनांना तसे वाटत नाही..
दत्त मंदिरा पासुन निघुन कर्हा नदिकडे थोडे गेल्यावर 'तामखडा' म्हणुन एक पौरानिक जागा आहे ( कुंड टाईप) मी तुम्हाला सांगायचे विसरलो. तेथे जायला हवे होते आणखिन .. मी खुप लहान असताना जात होतो ( लहान असताना, मामाच्या बैलगाडीतुन मी, मामा मावश्या आणि इतर वस्तीवरील माणसे दर अष्टमीला जायचो तामख्यड्याला, अष्टमी ला भैरवनाथाची यात्रा असते... आता पुन्हा जाईन. )
आणखिन एक वेगळी गोष्ट म्हणजे, लोणी भापकर ची भेळ खुप प्रसिद्ध होती. तेथील तिखट चुरमुर्याची भेळ खुप आवडीची माझ्या.. मामा बरोबर बाजारातुन येताना एक सेपरेट पुढा रस्त्यात मध्येच आम्ही फस्त करत असु..
जवळच एक बारव आहे.. जुन्या पद्धतीचा एक उत्कृष्ट नमुना आहे.
ग्रामदैवत भैरवनाथाचे मदिर अलिकडेच कलर्ड केले आहे, आधीची शान त्यामुळे झाकली गेली आहे.
हे मंदिर दक्षिणमुखी आहे.. भैरवनाथाची बरीचशी मंदिरे पुर्वाभिमुख असतात.
तुमच्या मंदिराच्या आवडीला सलाम, यज्ञवराह मात्र मी कधी पाहिलेला नव्हता, आता आवर्जुन पाहिन..
बाकी लोणी भापकर हे पेशवे काळापेक्षा ही शहाजीराजे यांच्या काळापासुन महत्वाचे गाव आहे, शहाजीराजेंच्या पहिल्या जहागीरी - सुपे परगण्याजवळील हे अत्यंत महत्वाचे गाव..
डीसेंबर महिन्यात दत्त जयंतीला या आमच्या मामाच्या गावाला.
---------------
आनखिन अशी जुनी मंदिरे जी जास्त परिचयाची नाहित ती पहा
'म्हसवड
' या गावाबद्दल माहित नसेल तर मी सांगने, तेथील सिद्धनाथ - जोगेश्वरी चे
मंदिर खुपच जबरदस्त आहे.. सिद्धनाथाच्या मुर्तीवरुन तर नजर हाटत नाही..
गाभार्यातील भव्य हत्ती एकमेव. शिवाय आनखिन जुने प्राचीन मंदिर १०-१२ किमी
वर डोंगरावर आहे भोजलींग म्हणुन.
आत्ताच सर्व गोष्टी सांगत नाही. कदाचीत ५० फक्त यांना हे मंदिर माहित असेन, सोलापुर वरुन जवळ आहे.
दत्त मंदिर हे मुळ शंकराचे मंदिर होते हे मात्र पटले नाही..
मूळात मंदिराच्या समोर जो आहे तो नंदीमंडप. सध्या तेथे जरी नंदी नसला तरी पूर्वी तेथे नंदी असलेल्या खुणा स्पष्टपणे दिसतात.
सध्याच्या
दत्तमंदिरात शिवपिंडीची जागा तसेच त्याची शाळुंकाही अगदी स्पष्टपणे नजरेस
येतात. शिवाय दत्तसंप्रदाय तस अलीकडच्या काळातला. मूळचे शिवलिंग इस्लामी
आक्रमकांच्या काळात भग्न झालेले असावे किंवा दुसरीकडे लपवून ठेवलेले असावे.
पेशवेकाळात किंवा त्यानंतरही (मागच्या १००/१५० वर्षांत) त्याचे
दत्तमंदिरात रूपांतर झालेले असावे तेव्हा तुमच्या आजीकडे दत्ताच्याच हकीकती
असल्यास त्यात नवल ते काय? शिवाय दत्तमूर्ती संगमरवरी आहे तेव्हा ती
अलीकडचीच यात काहीच वाद नाही पण मंदिराचे एकूण हेमाडपंथी पद्धतीचे स्तंभ,
किर्तीमुखे, समोरचा नंदीमंडप हे मूळचे शिवमंदिरच असल्याचे सिद्ध करतात.
दत्तविषयक सर्वात जुना उल्लेख माझ्या माहितीप्रमाणे तरी महाभारतात सापडतो.
महाभारतातल्या
परशुराम उपाख्यानात दत्तात्रेयाच्या आशीवार्दाने कार्तवीर्याला सहस्त्र
हात प्राप्त झाले असा आणि इतकाच उल्लेख आहे आणि तो प्रक्षिप्त आहे हे उघड
आहे. महाभारतावर गुप्त काळापर्यंत शेवटचे संस्करण होत होते म्हणजेच तो
उल्लेख साधारण ५ व्या/ ६ व्या शतकातला असावा असे मानण्यास पुरेसा वाव आहे.
पण तेव्हा दत्तसंप्रदाय नसावाच(हा माझा तर्क).
शिलाहार आणि यादवकाळात दत्तमंदिर अथवा दत्तसंप्रदायाचे उल्लेख माझ्या माहितीत तरी नाहीत. आंतरजालावरील माहितीनुसार नृसिंहसरस्वतींचा काळ १३७८ ते १४५८ म्हणजे यादवकाळानंतरचा, तेव्हा तत्पूर्वी दत्तसंप्रदाय नसावा किंवा असला तरी त्याचे अस्तित्व नाममात्रच असावे.
तरी दत्तसंप्रदायाबद्दल अधिक माहिती मूकवाचक किंवा मदनबाण देऊ शकतील.
लोकप्रभा मध्ये आलेला अभिजित बेल्हेकर यांचा लेख वाचूनच लोणी भापकर ला जायचे नक्की केले होते. मोरगाव-बारामती रोड वरून एकदाचा "लोणी भापकर" फाटा दिसला आणी हुश्श केले. सुर्य डोक्यावर आलेला आणी पोटातही डोंब उसळलेला. फाट्यापासून सुमारे १५-२० मिनिटे गाडी हाकत गेल्यावर गावात पोहोचल्याचे सुतोवाच झाले. जरा वर्दळ दिसू लागली आणी त्यातच एका मंदिराचा कळस अगदी दूरवरूनही लक्ष वेधून घेत होता. तेच हे काळभैरवनाथ मंदिर.
काळभैरवनाथ मंदिर:-
हे मंदिरही पुर्वाचीन असले पाहिजे असे आतमधील कातळकला बघून लक्षात येते.
सद्यकाळात त्यावर रंगरंगोटी करून त्याचे नूतनीकरण (??) करायचा यत्न केला
गेलाय.
गाडी मंदिराच्या बाहेर लाऊन आमचा फापट-पसारा बाहेरच ठेऊन मंदिरात जाऊन
बसलो. रखरखत्या उन्हातून एकदम दगडी मंदिरात गेल्यावर कमालीचा गारवा जाणवला.
मंदिरात महिला पुजारी होत्या. भैरवनाथाला महिला पुजारी कश्या असे एकक्षण
वाटले पण मी त्या गणिताचा उलगडा करायला आलो नव्हतो. नमस्कार करून, गुलाल
उडवून, थोडा आजूबाजूला फेरफटका मारला.
काळभैरवनाथ:
मंदिराच्या बाहेर दोन मोठ्या दगडी दिपमाळा आहेत . त्याने मंदिराचे रूप अजून
खुलून दिसले. शेजारीच एक विहीर आहे. गाडी चिंचेच्या सावलीत दम खात होती
म्हणून थोडा वेळ टीपी केल्यावर मंदिराच्या मागे गेलो.तेथे काही विरगळ
होत्या. त्या बघून थोडे पुढे गेलो तर गावातल्या मुलांचा मस्त गोट्यांचा डाव
जमला होता.
एकाला सांगितले की तू लांबून उडव यातली एक गोटी आणी मी फोटो काढतो. मला
वाटले खूप वेळ जाईल आणि बरेच फोटो काढावे लागतील. पण हा बघा पहिलाच शॉट.
ताडी !!!
एकाच गोटी उडवून स्ट्रायकर गोटी कोणालाही धक्का न लावता बाहेर निघून गेली. वा वा sss
भंकस झाली, गाडीही शांत झाली होती. मग निघालो मल्लिकार्जुन मंदिराकडे.
अडीच च्या सुमारास येथे पोहोचलो. पूर्ण निर्जन असे स्थान माझ्या जोडीला
मंदिरातील देव आणी काही श्वान लोक्स. येथे आल्यावर मात्र "आधी पोटोबा नंतर
विठोबा" म्हणत डबे उघडले.
कडकडून लागलेली भूक डबा उघडताच गोड शिरा पाहून अजून वाढली. आणले होते
नव्हते ते सगळे मांडून खायला सुरवात करताच अजून २ श्वानांची कंपनी लाभली.
मल्लिकार्जुन मंदिर :
ठिकठिकाणी कोरलेल्या कृष्ण-मुद्रा, कृष्ण-लिला, भारवाहक यक्षिणी व इतर अनेक अबोध अशी शिल्पे.
शिवाच्या पायाशी डोक टेकवून आपण बाहेर पडतो तोच समोर दिसते विस्तीर्ण अशी पुष्करणी.
पुष्करणीत पाणी नसल्याने आपोआप समोर लक्ष गेले ते म्हणजे कोरीवकलेच्या उत्कृष्ठ आविष्काराकडे. दगडी नंदी-मंडप.
मंडपाच्या चारही बाजूने उत्कृष्ठ असे कोरीवकाम केलेले आहे. पौराणिक शिल्पे, कामशिल्पे आणी अनेक गज-शिल्पे.
या मंडपात पूर्वी यज्ञवराह विराजमान होता असे तेथे नव्याने उपस्थित
झालेल्या आजोबांनी सांगितले. आजोबा न विचारता मला माहिती पुरवत होते
त्यावरूनच त्यांचा उद्देश्य माझ्या लक्षात आला. थोडी श्रवण-भक्ती करून मग
फोटोभक्ती चालू केली.
येथे एक मांजर होती ती सारखी माझ्या मागे मागे येउन पायात येत होती. तिच्या
पेकाटात लाथ घालून हाकलून द्यावी वाटत होत. पुल म्हणतात तसे मांजर हा
जगातला सर्वश्रेष्ठ उच्छाद आहे.
यज्ञवराह पाहिला आणी वाटले ..... वाह ss याच साठी केला होता अट्टाहास. !!
"त्या काळचे ते मुसलमान म्हणजे" अश्या हरीतात्यांच्या आवेशात जात असतानाच यज्ञ वराहाच्या देखणेपणाने मला इहलोकी आणले.
अडीच फुट उंचीच्या या वराहाच्या शिल्पाचे तोंड फोडलेले आहे पण त्याच्या
पाठीवरील असंख्य विष्णुमूर्ती कोरलेल्या पाहून कारागिराच्या नाजूक हाताची
कल्पना येते. पाठीवर छोटय़ा-छोटय़ा तब्बल १४२ विष्णू मूर्तीची झूल
चढवलेली आहे.
या
वराहाच्या पायाशी शेष कोरलेला आहे. तर चार पायांजवळ शंख, चक्र, गदा आणि
पद्म ही विष्णूची प्रतीके साकारलेली आहेत. पायांना नागदेवतेचे तोडे घातलेले
आहे.
पायाखाली दबलेली गदा आणि दोन पायांमध्ये हात जोडून असलेले मानवी मुख असलेली
शेष-रुपी शिल्प , वाराहाने शेषावर मिळवलेल्या अधिपत्त्याची जाणीव करून
देतो.
वराहाच्या शेपटीत पृथ्वी गुंढाळलेली आहे असे एका लेखात वाचलेले होते.
बरेच फोटोसेशन झाले. नाऊ टाईम टू गो होम !!
मी निघत असलेले बघताच सावलीत झोपलेले आजोबा पुन्हा प्रकटले आणी त्यांनी
"काही" मदत करा म्हणताच माहितीचे प्रयोजन कळले. त्यांना यथाशक्ती मदत करून,
तेथीलच एका मोठ्ठ्या चिंचेच्या झाडाच्या चिंचा पाडून घेतल्या भाच्चीसाठी.
आता गाडीला टांग मारून परतीच्या मार्गाला लागलो. येताना दिवे घाटातून जावे
का असा विचार करता लगेच सोनोरीचा किल्ला/ मल्हारगड आठवला. वेळही हातात
होता. आणी किल्लाही छोटेखानी होता.
सासवडची फ़ेमस अंजिरे येताना लक्ष वेधून घेत होती. थोडी घासाघीस करून १ किलो
अंजिरे घेतली. पुढे ट्रेक करायचा आहे हा विचारच नव्हता. घरी येउपर्यंत
त्यांचे पानिपत झालेच होते. असो. दिवे घाटाच्या अलीकडे एका टपरीवर सोनोरी
विचारले आणि फाट्यावरून उजवीकडे गाडी वळवली.
http://sagarshivade07.blogspot.com/2016/01/blog-post_9.html
आता एका छोट्या आणी उजाड अश्या रोडवर मी एकटाच चाललो होतो. मागे, पुढे,
समोर कुठेही चीटपाखरूही दिसेना. तसचं संभ्रमित पुढे गेलो मग एक मामांना
लिफ्ट दिली त्यांनी रस्ता समजावत भर गावात आणून सोडले. तेथून निघालो
मल्हारगडचा बेस
No comments:
Post a Comment