महाराष्ट्राचं शिल्पवैभव सर्वश्रुतच आहे. डोंगराच्या पोटातली लेणी, मंदिरे आणि इतरही अनेक कोरीव शिल्पे यांचा अनमोल वारसा आपल्याला आपसुकच मिळालाय. अनेक अज्ञात हातांनी हा स्वर्ग निर्माण केलाय. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या लेणी, मंदिरे या सर्वानी मराठमोळ्या संस्कृतीला अतिशय समृद्ध केलंय. महाराष्ट्रात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात लेण्या आणि काळय़ा दगडातली हेमाडपंती बांधणीतली सुंदर मंदिरे आढळतात.
मराठवाडय़ात असंच एक शिल्पवैभव दडलंय, पण पूर्णपणे दुर्लक्षित आणि उपेक्षित. अंबाजोगाई आणि परळी-वैजनाथ या बीड जिल्ह्य़ातल्या तालुक्यांच्या ठिकाणापासून सारख्याच अंतरावर- साधारणत: ३० कि.मी. धर्मापुरी नावाचं छोटंसं गाव आहे. तर धर्मापूरी हे एक प्राचीन धर्मक्षेत्र मानले जाते व ते अंबेजोगाई पासून २७ किमी अंतरावर ! मराठवाडय़ातल्या इतर चार गावांसारखं. एक मुख्य रस्ता आणि त्याच्या दुतर्फा वस्ती. याच धर्मापुरी गावातील किल्ल्याला भेट देउन धर्मपुरी किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाला पाठ करून उजवीकडे जाणाऱ्या चकचकीत सिमेंट रस्त्याने निघावे. गाव ओलांडून पलीकडे गेल्यावर मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूला एक छोटं शेत पार केलं की सामोरं येतं एक सुंदर मंदिर- ‘केदारेश्वर’. एका पिंपळाच्या झाडाखाली असलेले मंदिर झाडाकडे पाहिल्यास एखाद्या घरासारखे दिसते पण डावीकडे त्याची प्राचीन बांधणी लक्षात येते.



महाराष्ट्रात नांदलेल्या आणि विस्तारलेल्या काही आद्य राजवटींपैकी ‘चालुक्य’ राजवटीत सुमारे ११ ते १२ व्या शतकात याचं बांधकाम झाल्याचे सांगितले जाते. चालुक्य शैलीतील अप्रतिम स्थापत्य व शिल्पकलेचे उदाहरण म्हणजे येथील केदारेश्वर मंदिर.अतिशय शांत आणि रम्य परिसर असलेलं हे मंदिर मनाला वेड लावेल असंच आहे. कोणे एके काळी मराठवाडयात भारतीय संस्कृती आणि स्थापत्याचे माहेरघर होते .. १९०१ ते १९०२ या काळात कझिन्स या इतिहास अभ्यासकाने अनेक मंदिरांना भेटी दिल्या होत्या पुढे १९७२ ला डॉ . प्रभाकर देव यांनी या विषयावर खूप अभ्यासपूर्ण प्रबंध लिहिला आहे.
धर्मापुरीत आजपावेतो तीन कानडी आणि एक नागरी शिलालेख उपलब्ध आहे. नागरी शिलालेखाचे वाचन पुरातत्त्व खात्याच्या वतीने डॉ.वि.भी. कोलते यांनी केले.हा शिलालेख संस्कृत भाषेत कोरलेला असून लेखनाचा काळ 'शके संवत १०५६ आनंदसंवत्सांतर्गत आषाढ वदी १५ सोमे' हा दिलेला आहे. इसवीसनाप्रमाणे त्यादिवशी तारीख होती २३ जुलै ११३४ वार सोमवार.[१] या शिलालेखात श्रीपती नामक इसमाने धर्मापुरीत मुरारीचा मठ बांधल्याचा उल्लेख येतो.
प्रशासनाच्या सोयीसाठी त्यावेळी राज्याचे विभाग आणि उपविभाग पाडले जात होते. विभागलेल्या भागांचा बेळगोळ ३००, बनवासी १२०००अशाप्रकारे गावाच्या किंवा प्रदेशाच्या समोर आकडे देऊन उल्लेख करणे ही पद्धत होती. हे आकडे त्या त्या विभागातील खेड्यांची संख्या सुचवत असल्याचे आता सिद्ध झाले आहे. धर्मापुरीतीलच दुसऱ्या शिलालेखात लोक्कीगुंडी ५०० असा उल्लेख येतो. हे लोक्कीगुंडी म्हणजे आजचे लोखंडे होय.[२] याच शिलालेखात धर्मापुरीत काळेश्वर देवालय व बंकीसेट्टी बस्ती असल्याच्या नोदी आढळतात.
ही पूर्ण वास्तू ५७×४८ फूट लांबी रुंदीची असून महीमंडप अत्यंत विस्तीर्ण आणि भव्य आहे. या मंडपातील १६ खांब अत्यंत कल्पकतेने उभारलेले आहेत. महामंडपातील ९×९×६ च्या चौथर्यावरील एक रंगशिळा मन वेधून घेते. त्याच्या चारही कोपऱ्यांवर चार प्रचंड शिल्पांकीत खांब आहेत. रंगशिळेच्या छतावरही कीर्तीमुख,सप्तमातृका,वराह इत्यादिंची मोहक शिल्पकारीता आहे. रंगशिळेवरील छताच्या मध्यभागी पूर्ण विकसित कमळ आहे. या छताचा इंचन इंच भाग भौमितिक आकृत्या व लतापल्लवींच्या गुंफणीने शिल्पित केलेला आहे.
केदारेश्वर मंदिराची रचनासुद्धा अतिशय सुंदर आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशा चार विभागात याचं बांधकाम आहे. मंदिर पश्चिमाभिमुख असून एक मुखमंडप आणि दोन बाजुस असलेले दोन अर्धमंडप यांनी युक्त असलेला अर्धखुला मंडप, गर्भगृहाईतकेच रुंद अंतराळ आणि गर्भगृह असा या मंदीराचा तलविन्यास आहे, मंदिराला पश्चिम, उत्तर आणि दक्षिण अशी तीन प्रवेशद्वारे आहेत.मंदिराच्या दरवाजापाशी असलेल्या पायरीच्या अलीकडे एका सिहाची भग्न मूर्ती आहे. दरवाजातील चौकटीच्या दुबाजूस तेजस्वी कांतीचे दोन द्वारपाल पाहून थक्क होतो..
आत प्रवेश केल्यावर समोरच लक्षात येतं ते लक्षणीय कोरीव काम केलेल्या खांबावर तोललेलं सभामंडपाचं बांधकाम, आता बरंच पडझड झालेलं पण जुना रूबाब राखून असलेलं. सभामंडपात दोन खांबांच्या मध्ये नंदीचे एक शिल्प ठेवलंय. त्याची मूळ जागा ती नसावी. त्याच्या पाठीमागे एक चौथरा आहे, त्यावर त्याचं मूळ स्थान असावं. पण कालौघात तो विस्थापित झाला असावा. बरीचशी विद्रुप झालेली नंदीची ही मूर्ती अजूनही छानच दिसते.
बाह्यांगावर पीठावर जाडंबासारखे थर असून त्यावर मंंची आहे.मंचीच्या वर मंडोवराला सुरवात होते.९.१४ मीटर आकाराच्या मंडपाला अलिकडे झालेल्या जीर्णोध्दारात पुर्ण भिंती बांधल्या गेल्या असल्या तरी मुळात हा मंडप अर्धखुला होता व त्याच्या तिन्ही बाजुने वेदीका होती हे दाखवून देणारे पुरावे आहेत. पीठाका नेहमीचे थर असून त्यावर गजथर आहे. त्यावर राजसेनक, वेदीका आणि आसनपट्ट आहेत. या मंदीरावरील राजसेनकाचे स्वरुप दोन कपोतालीमध्ये असलेल्या अर्धस्तंभाच्या ओळीत दोन अर्धस्तंभाच्या मधील भागात चौकटचे आकार आणि मनुष्याकृती यांचा पट्ट आहे. वेदीकेवर अर्धस्तंभामुळे निर्माण झालेल्या देवकोष्टामध्ये नृत्यांगणा आणि वादक दाखवलेले आहेत. मंडपाच्या मध्यभागी रंगशीला आहे. मंडपाच्या मागील भिंतीत अंतराळाच्या दोन्ही बाजुस प्रत्येकी एक अशी एकुण दोन देवकोष्टे आहेत.





गर्भगृहाचा तलविन्यास नवरथ प्रकारचा आहे. गर्भगृहाच्या तीन भद्रावर प्रत्येकी एक रथिका आहे. अंतरा़ळाचा आकार ( १.०४ मीटर X १.०४ मीटर ) गर्भगृहा इतकाच आहे. गर्भगृहाचे द्वार पंचशाख पध्दतीचे आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरती द्वारशाखा कोरली असून, त्यामध्ये पत्रशाखा, पुष्पशाखा, व्यालशाखा, स्तंभशाखा आणि इतरही अनेक प्रकारचं भौमितिक नक्षीकाम आहे. द्वारशाखाच्या खालच्या भागात अनुक्रमे गंगा व यमुना चौरीधारक आणि निधी दाखवले आहेत. याच्या दोन्ही बाजूस द्वारपाल ज्याचं वैष्णव रचनेशी साम्य आहे ते कोरलेले आहेत. शंख, चक्र, गदा इत्यादी आयुधं स्पष्टपणे ओळखू येतात. गर्भगृहाच्या दरवाज्याच्या अलीकडे डाव्या हातास एका कोनाडय़ात गणेशाची एक प्रतिमा कोरलेली आहे. का कुणास ठाऊक, ही गणेशमूर्ती इतर सर्वासोबत विसंगत वाटते. कदाचित दरम्यानच्या कालखंडात तिची तेथे प्रतिष्ठापना झाली असावी. आत चौकोनी गर्भगृहामध्ये पुरातन शिवलिंग आहे. गर्भगृहाच्या छताकडे बघितल्यास हेमाडपंती रचना लक्षात येते. मंदिराच्या सभामंडपातील स्तंभावरील कोरीव काम अगदी वाखाणण्यासारखं आहे. फार कमी ठिकाणी आढळणारं कीर्तिमुख प्रकारचं शिल्प इथं सभामंडपाच्या छतावर आढळतं. मंदिराचा गर्भगृहाचा भाग शाबूत असला तरी सभामंडप बऱ्याचअंशी मोडकळीला आला आहे. बाहेरच्या बाजूने तर दगडांनी केलेली सभामंडपाची डागडुजी विशेष करून लक्षात येते.
मंदिराच्या उत्तर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला पूर्वी सिंहाकृती असाव्यात. त्यातील एक समोरच भग्नावस्थेत आढळते. मंदिराच्या बाह्य़ भागावर मानवी रूपातल्या अतिशय सुंदर आकृती कोरलेल्या आहेत. मंदिराचे मुख्य आकर्षण आहे त्याच्या बाहेरील बाजूस असलेल्या अतिशय देखण्या मुर्ती. कदाचित हेच या मंदिराचं पुनर्निमाण होण्यामागचं मुख्य कारण असावे.

साधारणत: ३-४ फूट उंचीपर्यंत विशेष कोरीव काम नाही. परंतु, त्याच्या वरच्या बाजूला असलेलं कोरीव काम अगदी नजर लागण्याजोगं आहे. गजरथ, विष्णू, शिव, सुरसुंदरी इत्यादी मूर्ती मंदिराच्या अधिष्ठानावर सुंदररीत्या कोरलेल्या दिसतात. अनेक हातांमध्ये विविध शस्त्रे घेतलेले आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देत उभे असलेले, क्वचित असुराचा वध करताना दिसणारे नाना प्रकारचे देव, अनेक अलंकार ल्यालेल्या सुंदर स्त्रिया, पायात काटा गेल्याने सैरभैर झालेली देखणी युवती आणि तिच्या पायातला काटा काढणारा तिचा नोकर, पावा वाजवणारा युवक, आकर्षक केशरचना केलेली आणि मधाळ हास्यानं आपल्याला घायाळ करणारी कमनीय बांध्याची स्त्री, हातात आंब्याची डहाळी घेतलेली लावण्यवती आणि आंबा समजून तिच्या उरोजावर चोच मारणारा पोपट अशा अनेक एकाहून एक सरस मूर्त्या इथे आहेत. कदाचित कठीण दगडात बनवल्यामुळे असतील, पण बहुतांश मूर्ती आजही सुस्थितीत आहेत.


येथील एका पत्रलेखिकेचे शिल्प विलक्षण सुंदर आहे. हे चिरतारुण्ययाने मुसमुसलेले मोहक सौंदर्य पाठमोरे उभे आहे. या शिल्परचनेची कल्पना मोठी काव्यमय आहे. एक सौंदर्यसंपन्न अप्सरा पाठमोरी उभी राहून शिलालेख लिहीत आहे. अशा या मोहक शिल्परचनेच्या चार ओळी पूर्ण झाल्या असून पाचव्या ओळीवर हात थबकला आहे. हा क्षण येथील शिल्पीने आपल्या कलासामर्थ्याने गोठवून ठेवला आहे.

मंदिराच्या बाहय भिंतीवर ६८ मूर्ती कोरलेल्या आहेत .. यात शैव व वैष्णव दोन्ही प्रकारची शिल्पे आहेत. काली , ब्रह्मा, नरसिंह, वराह, विष्णू या मूर्ती आहेत तसेच बाहयभिंतीवर एकूण तीन देवकोष्ठ आहेत त्यावरही उत्तम कोरीव काम आहे .बाह्य़ भागावर असलेल्या कोनाडय़ांमध्ये उत्तरेला केशव, पूर्वेला शिव आणि दक्षिणेला हिरण्यकश्यपूचा वध करणारी नरसिंह मूर्ती कोरली आहे. याशिवाय पूर्वेच्या भिंतीवर शिव मूर्तीच्या बाजूला दाढी अन् तीन मुखे असलेली एक आकृती आहे. ती कदाचित ब्रह्माची असावी.जणु नृसिंह-सरस्वती, लक्ष्मी-नारायण, राधा-कृष्ण, वराहअवतारातील विष्णू, ब्रम्हा, बासरीधारी कृष्ण अशी देवांची महासभाच या केदारेश्वर मंदिराच्या अवतीभवती भरल्याचे दिसते. बहामनी सत्तेच्या मूर्ती तोडो अभियानातून हे मंदिर बचावल्याचे पाहून आनंद होतो. देवांच्या दिमतीला स्वर्गीय अप्सरांचा खासा राबता होता. मध्येच हिरण्यकश्यपूचा कोथळा बाहेर काढणारा नरसिंह तर एखाद्या जिवंत शिल्पासारखा.. या मुख्य मंदिराच्या एका भिंतीतून लांबून गोमुखासारखी रचना आहे. इकडे नीट पाहिलं तर हा भरजरी कलाकुसर केलेला एक वराहरथ आहे असे दिसते.. या शिल्पातील वराहाच्या पायात तोडे.. गळ्यात पोवळ्याची माळ, मानेवर करकचून लगाम ओढून बसलेला सारथी आणि मागे नक्षीदार मखर असलेली अंबारी..महाराष्ट्रातील हेमाडपंती मंदिराच्या इतिहासाच्या पुस्तकात हे मंदिर म्हणजे एक सोनेरी पान आहे.. गर्भगृहाच्या द्वारावरील वैष्णव द्वारपाल, भद्रावरील देवकोष्टामधील मुर्ती, मोठ्या संख्येने आढळणार्या वैष्णव शिल्पाकृती यावरुन हे मंदीर मुळात विष्णूचे असल्याचे निसंशय स्पष्ट होते.
हे मंदीर बघून काही विचार मनात येतात. किती वर्षं लागली असतील हे मंदिर बांधायला? ७/८ वर्षं तरी सहज. मंदिर बांधणा-या शिल्पकारांनी तेव्हा इथंच मुक्काम ठोकला असेल - इथंच कुठेतरी बांधलेल्या कच्च्या झोपड्यांत ते राहिले असतील. त्यांची लहान मुलं मंदिराशेजारी खेळली असतील आणि त्यांच्या बायकांनी तिथेच बसून भाक-या रांधल्या असतील. आणि मंदिर पूर्ण झाल्यावर? त्याच्या उद्घाटनाचा सोहळा मंदिराइतकाच भव्य आणि डोळे दिपवणारा झाला असेल. हे मंदिर बांधणारा शिवभक्त राजा मग रोज सकाळी आपल्या घोड्यावर बसून इथं येत असेल आणि शिवलिंगाचं दर्शन घेऊन आपल्या दिवसाची सुरूवात करत असेल. आणि धर्मापुरी? कसे असेल हे धर्मापुरी गाव तेव्हा? “चालुक्य राजवटीतील विक्रमादित्य सहावा याचा पुत्र सोमेश्वर तृतीय याने धर्मापुरी नगरी निर्माण केली. या राजाला साहित्याची आवड होती. त्याने 'अभिलषितार्थ चिंतामणी' (राजमानसोल्लास) या ग्रंथाची निर्मिती केली होती. या धर्मापुरीत सर्व सोयी होत्या. भव्य राजप्रासाद, नृत्यशाळा, तलाव, मनोहारी उद्याने, सुंदर वनराई, उत्तुंग देवालये आणि भव्य बाजारपेठ यांनी ही नगरी सजलेली व गजबजलेली होती.” आज भारतातल्या मोठ्या शहरांचा जो दिमाख आहे, शान आहे, ती कदाचित धर्मापुरीनं तेव्हा अनुभवली असेल. आज मात्र परिस्थिती खिन्न करणारी आहे. या गावात खूप अप्रतिम शिल्प लोकांनी आपल्या घराच्या बांधकामासाठी वापरली आहेत ... एकूणच ऐतिहासिक ठेवा जतन करण्याबाबत आपल्याकडे उदासिनता पाहावयास मिळते .
मंदिराच्या परिसरातही बरीच शिल्पे इतस्तत: विखुरलेली आढळतात. त्यात एक शिल्प द्वारपालाचं तर एक हिरण्यकश्यपूचा वध करणारा नरसिंह आणि त्याच्या बाजूला प्रल्हाद असं आहे. दुर्लक्षित आणि निगाविरहित असं हे मंदिर काही प्रमाणात भग्नावस्थेत असलं तरीही उर्वरित भाग मात्र अत्यंत सुंदर आहे. पुरातत्त्व विभागाचा कुणी कर्मचारी देखरेखीसाठी नसला तरी त्यांनी मंदिराची माहिती देणारा फलक येथे लावला आहे. या भागातील विशेषत: अंबाजोगाईच्या आसपास शिव मंदिरांचे एक वैशिष्टय़ आहे. केदारेश्वर, अमलेश्वर, अमृतेश्वर, कोपरनाथ, बारखांबी महादेव अशा सर्वच मंदिरांना कळस नाही.

आधी:

नंतर:

आधी:

नंतर:
(दोन्ही आधी छायाचित्रे इंटरनेटवरून साभार)
आता मात्र त्यातल्या त्यात एक चांगली बातमी म्हणजे पुरातत्त्व खात्याने या मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम हाती घेतले आहे आणि तेही मूळ स्थापत्य शैलीत कोणताही बदल न करता सध्या मंदिर बांधून पूर्ण झाले आहे आणि मंदिराच्या जोत्याभोवती फरशी बसचलेली दिसते. कधी या भागात आलात तर अप्रतिम शिल्पाविष्कार पाहण्यासाठी या मंदिरास नक्की भेट द्या ....
पोहोचण्याच्या वाटा:
१) मुंबई, पुण्याहून आंबेजोगाई जाण्यासाठी थेट बस सेवा आहे. आंबेजोगाई – धर्मापूरी अंतर २७ किमी आहे. खाजगी गाडीने किंवा रिक्षाने धर्मापूरीला जाता येते. वहानानेही थेट किल्ल्याच्या प्रवेशव्दारापर्यंत जाता येते.
२) मुंबई, पुण्याहून लातूर एक्सप्रेसने लातूरला जावे. लातूरहून खाजगी वहानाने किंवा बसने लातूर – आंबेजोगाई हे अंतर ६५ किमी आहे.
३) मुंबई, पुण्याहून रेल्वेने परळी वैजनाथ किंवा परभणी गाठावे. परळी वैजनाथ हे १२ जोर्तिलिंगापैकी एक आहे. परळी वैजनाथ ते आंबेजोगाई २५ किमी व आंबेजोगाई -धर्मापूरी २७ किमी अंतर आहे. परभणी ते आंबेजोगाई ९५ किमी अंतर आहे.
राहाण्याची सोय: धर्मापूरी गावात राहण्याची सोय नाही. आंबेजोगाई आणि परळी वैजनाथ येथे रहाण्याची चांगली सोय आहे.
जेवणाची सोय: धर्मापूरी गावात जेवणाची सोय आहे.
पाण्याची सोय: किल्ल्यात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, सोबत पाणी बाळगावे.
लागणारा वेळ: किल्ला पहाण्यासाठी अर्धा तास लागतो.
आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :-
१) धर्मापूरी पासून २७ किमीवर असलेल्या आंबेजोगाई येथे प्राचीन हिंदू लेणी (हत्तीखाना) व योगेश्वरी मंदिर पहायला मिळते.
२) आंबेजोगाई पासून २५ किमी अंतरावर परळी वैजनाथ हे १२ जोर्तिलिंगापैकी एक जोर्तिलिंग आहे.
३) धर्मापूरी पासून आंबेजोगाई मार्गे ५२ किमीवर धारूर किल्ला आहे.
४) धर्मापूरी पासून किनगाव , अहमदपूर मार्गे ७७ किमीवर उदगीर किल्ला आहे.
सूचना :-
१) खाजगी वाहानाने आंबेजोगाई मंदिर व लेणी आणि धर्मापूरी किल्ला ही सर्व ठिकाणे एका दिवसात पाहून होतात.
धर्मापुरी किल्ला :-
मराठवाडयातील किल्ल्यांची भटकंती करताना आपल्याला सोलापुर, औसा, परांडा, उदगीर, कंधार, धारूर यासारखे सहा-सात बलदंड भुईकोट वगळता फार कमी प्रमाणात दुर्ग पहायला मिळतात. स्वतंत्रपुर्व काळात या भुभागावर निजामाची सत्ता असल्याने हे किल्ले अलीकडील काळापर्यंत नांदते राहील्याने आजही सुस्थितीत आहेत. मराठवाडयातील हा प्रांत सह्याद्रीच्या मुख्य पर्वतरांगेपासुन दुर असून बहुतांशी सपाट मैदानी प्रदेशाचा व लहानमोठया टेकड्यांचा आहे. सह्यादीच्या भागांपेक्षा हा भाग पुर्णपणे वेगळा असल्याने येथील लहानमोठ्या टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात गढी व एखाद-दुसऱ्या किल्ल्याची रचना केली गेली. यामुळेच आपल्याला संपुर्ण बीड जिल्ह्यात धर्मापुरी व धारूर हे दोन किल्ले व अनेक गढी पहायला मिळतात. यातील धर्मापुरी हे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात आहे. हे ठिकाण अंबेजोगाई – अहमदपूर मार्गावरील मोठे गाव आहे. परळी, अंबाजोगाई, अहमदपूर, गंगाखेड आणि पानगाव शहरांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. इथे एक प्राचीन किल्ला असून एक तळे आहे. गावापासून जवळच मरळशीद मंदिर आहे. गावामधेच एक जुने राम मंदिर आहे.
धर्मापुरी किल्ला लातुर शहरापासुन ४५ कि.मी. अंतरावर असून बीड शहरापासून ११५ कि.मी.म्हणजे बराच दूर अंतरावर आहे. त्यामुळे लातूर येथे रेल्वेने अथवा अंबाजोगाई येथे बसने येऊन धर्मापुरी किल्ल्यास जाणे जास्त सोयीचे आहे. धर्मापुरी हे गाव अंबेजोगाई – अहमदपूर या महामार्गावर वसलेले आहे. अंबेजोगाईहून धर्मापुरी गावाकडे जाण्यासाठी बस असली तरी या भागातील वाहन व्यवस्था पहाता येथे प्रवास करण्यासाठी शक्यतो खाजगी वाहनाचा वापर करावा. येथे बस स्थानक असून सर्वच बस इथे थांबतात. जवळील रेल्वे स्थानक परळी आहे.आंबेजोगाई पासून २७ किमी अंतरावर धर्मापूरी हे एक प्राचीन धर्मक्षेत्र आहे.
बीडला पांडवकालीन ‘दुर्गावतीनगर’ म्हणत असत. पुढे चालुक्यकालीन चंपावतीराणीच्या नावावरून देण्यात आलेले ‘चंपावतीनगर’ हे या शहराचे दुसरे नाव आहे. पूर्वी राणी चंपावतीने या भागावर राज्य केल्याचा उल्लेख काही पुराणांमध्ये आहे. शहरात पूर्वी चंपावतीचा किल्ला असल्याच्या खुणाही आहेत. शहराच्या आजूबाजूला तटबंदी आहे.सातवाहन, चालुक्य, कलचूरी, वाकाटक, कदंब इत्यादी घराण्यांचे बीडवर राज्य होते. उपरोक्त परिसर पुढे यादवांच्या अंमलाखाली होता. अल्लाउद्दीन खिलजीने हा प्रदेश यादवांकडून जिंकून घेतल्याचा उल्लेख मिळतो(१२९६-१३१६). हा भाग मुहम्मद बिन तुघलकाने जिंकून घेतल्याने ‘भीर’ म्हणून ओळखला जाऊ लागला(१३२५-५१). बहामनी साम्राज्याच्या उदयानंतर या प्रदेशावर बहामनी सत्ता प्रस्थापित झाली. त्या राजवटीच्या विघटनानंतर हा प्रदेश निजामशाहीचा एक भाग बनला. पेशवाईच्या कालखंडात निजाम व मराठे यांच्यामध्ये राक्षसभुवन व खर्डा येथे झालेल्या लढाया इतिहासात प्रसिद्ध आहेत. मराठ्यांनी निजामाकडून हा प्रदेश जिंकून घेतला होता. तथापि, मराठेशाहीच्या अस्तानंतर या प्रदेशावर पुन्हा निजामाची राजवट प्रस्थापित झाली, ती थेट १८ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने हैदराबाद संस्थानाच्या भारतातील विलीनीकरणास मान्यता देईपर्यत. बहामनी व निजामशाही राजवटीखालीदेखील काही काळ हा जिल्हा होता. त्यानंतर १९५६ पर्यंत हैद्राबादचा भाग होता. १ नोव्हेंबर १९५६ राजी राज्य पुनर्रचनेदरम्यान बीड जिल्ह्यासहित मराठवाडातील सर्व जिल्हे तत्कालीन द्वैभाषिक मुंबई राज्यास जोडण्यात आले. शेवटी १ मे १९६० रोजी मध्ये महाराष्ट्र व गुजरात ही राज्ये वेगळी झाल्यावर बीड जिल्हा महाराष्ट्रातील एक जिल्हा बनला. निजाम व ब्रिटीश यांच्या विरोधात बीडमध्ये १८१८ सालीच (मराठवाड्यात सर्वप्रथम) आंदोलन छेडले गेले होते. जिल्ह्यातील धर्माजी प्रताप राव हे या लढ्याचे मार्गदर्शक होते.बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई हे प्राचीन गाव तेथील ब्राम्हणी (हिंदू) लेणी व योगेश्वरी देवीच मंदिर यामुळे प्रसिध्द आहे. या गावात चालुक्य कालिन प्राचीन केदारेश्वर मंदिर याची साक्ष देत आजही उभ आहे. या गावात मुसलमानी राजवटीच्या काळात किल्ला बांधला गेला. हा किल्ला धर्मापूरीचा किल्ला म्हणून ओळखला जातो. या किल्ला बांधण्यासाठी जे दगड वापरले गेले आहेत त्यात मंदिरांवरील अनेक शिल्प पहायला मिळतात. या वरून या गावात अनेक मंदिरे होती व त्यांचेच दगड वापरून हा किल्ला बांधला गेला. धर्मापूरीचा किल्ला व अप्रतिम कोरीव शिल्पे असलेले केदारेश्वर मंदिर ही दोनही ठिकाण आवर्जून पाहाण्यासारखी आहेत.

धर्मापुरी किल्ल्याचा पॅनोरमीक व्ह्यु
धर्मापुरी किल्ला गावामागील लहानशा टेकडीवर वसलेला असुन गावात प्रवेश करताना दुरूनच किल्ल्याची तटबंदी दिसुन येते. गावात प्रवेश केल्यावर किल्ल्याकडे जाताना जागोजागी उघडयावर पडलेली शिल्प धर्मापुरी हे गाव प्राचीन काळापासुन नांदत असल्याची साक्ष देतात. धर्मापूरी गावातून गाडीने आपण थेट किल्ल्याच्या दरवाजा पर्यंत जाऊ शकतो. धर्मापुरीच्या अलीकडे असणाऱ्या पठारावरून धर्मापुरी किल्ला आणि शेजारचा तलाव यांचा एक मस्त नजारा दिसतो. धर्मापुरी गाव संपायच्या अलीकडे उजवीकडे एक सिमेंटचा चकाचक रस्ता धर्मापुरी किल्ल्याकडे जातो. किल्ल्याच्या अलीकडे एका घराच्या ओसरीवर २ गणेश शिल्प आणि कैक वीरगळ धूळ खात पडल्याचे दिसत्तात.. मुख्य रस्त्यापासून साधारण १०० मीटर उजवीकडे जाताच समोरच किल्ल्याकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत. किल्ल्याच्या दरवाजाजवळ नव्याने बांधलेले राममंदीर असुन तेथे गाडी थांबवुन आपल्या गडफेरीस सुरवात करावी. किल्ला सुस्थितीत असला तरी प्रवेशाच्या भागात काटेरी झुडुपे उगवलेली असुन मोठ्या प्रमाणात घाण झालेली आहे. काही गावकरी किल्ल्याचा वापर हागणदारी म्हणून करत असल्याने नाकाला रुमाल लावुन पाय सांभाळतच किल्ल्यात प्रवेश करावा लागतो.



धर्मापुरी किल्ल्याची तटबंदी
किल्ला हा गावा मागील छोट्याश्या उंचवट्यावर उभारलेला आहे. किल्ल्याची तटबंदी मात्र उंचवट्याच्या खालपासून बांधून काढलेली आहे. किल्ल्याला ऎकेरी तटबंदी आहे. तटबंदीची उंची ७० फूट असून त्यात ९ अष्टकोनी बुरुज आहेत. चर्या, तटबंदी व बुरूज यावरून मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या बनवलेल्या आहेत.
किल्ल्याला एकामागोमाग एक असे २ दरवाजे आहेत.
किल्ल्याचा मुख्य दरवाजा दगड चिणून बंद केला आहे.
किल्ल्याच्या मुख्य दरवाजाला संरक्षण देण्यासाठी तेवढ्याच भागात परकोट बांधलेला आहे. हि भिंत टेकडीवरील तटबंदी पासुन खाली जमीनीपर्यंत बांधण्यात आली असुन त्यात दोन लहान दरवाजे बांधण्यात आले आहेत.या परकोटाच्या तटबंदीत छोटे पूर्वाभिमूख प्रवेशव्दार आहे. किल्ल्याचा बाह्य दरवाजा फक्त चौथऱ्यापुरता तग धरून आहे. मुख्य दरवाजाकडे जाणारी वाट मात्र चढणीची आहे, पायऱ्यांच्या उजवीकडे काही आधुनिक घरे बांधली आहेत. ५०-६० पायऱ्या चढत परकोटातील दोन लहान दरवाजे पार करून आपण किल्ल्याच्या मुख्य दरवाजा समोर पोहोचतो.डावीकडे षटकोनी आकाराचा देखणा आणि भला दांडगा बुरुज पाहून किल्ला पाण्यासाठी केलेला आटापिटा सार्थकी लागतो.
किल्ल्याचा मुख्य दरवाजा उत्तराभिमुख असुन एका मोठ्या षटकोनी बुरुजात बांधलेला आहे. १० फुट उंचीचा हा मोठा दरवाजा नंतरच्या काळात दगडी भिंतीने बंदिस्त केलेला असुन त्यात केवळ एक माणुस वाकुन प्रवेश करू शकेल इतपत लहान दिंडी दरवाजा ठेवलेला आहे. या शिवाय किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी अजुन दोन लहान दरवाजे आहेत. यातील एक दरवाजा दगडांनी बंद करण्यात आला असुन दुसऱ्या दरवाजात दगड कोसळल्याने तो बंद झाला आहे. हे उर्वरीत दोन्ही दरवाजे आत बाहेर भटकंती करताना पहाता येतात. मुस्लीम राजवटीत या किल्ल्याची निर्मीती करण्यात आली असल्याने या किल्ल्याच्या बांधकामात आपल्याला खुप मोठ्या प्रमाणात मंदिराचे कोरीव दगड,शिल्प तसेच काही मुर्ती दिसुन येतात. याची सुरवात या दरवाजा पासुनच होते. दरवाजाबाहेर डावीकडील तटबंदीवर मोठ्या प्रमाणात कोरीव शिल्पाचे दगड तसेच एक गणेश मुर्ती दिसुन येते. दरवाजा समोरील बुरुजावर व तटबंदीत फूले, नक्षी, व्याल यांची शिल्पे आढळतात. या दरवाजाच्या आतील बाजूस देवड्या आहेत. या देवड्यांवर व्यालमुखाच्या पट्टया बसवलेल्या आहेत.
तटबंदीत चिणलेली शिल्पपट्टीका
दिंडी दरवाजाने आत शिरल्यावर काटकोनात आतील दरवाजा असुन उजवीकडे पहारेकऱ्याची देवडी व डाव्या बाजुस किर्तीमुखाची शिल्पपट्टिका दिसते. कमानीच्या उजव्या बाजूस एक शिल्पपट्टिका मात्र किल्ल्याच्या दर्शनी भागाची शोभा वाढवणारी आहे. डावीकडे भिंतीमध्ये काही कोरीव चिरे लक्ष वेधून घेतात. मराठवाड्यातील बऱ्याच किल्ल्यामध्ये हे सर्रास आढळते. हेमाडपंती मंदिराच्या खुणा या अशा किल्ल्याच्या भिंतीवर पाहायला मिळतात.
चौकटीतून वाकून आत जावे आणि समोर काटकोनात वळून गडाच्या आतल्या भागात प्रवेश करावा.तेथून पायर्या चढून वर जाऊन किल्ल्याचे मुख्य प्रवेशव्दार आहे. गडाच्या हा तिसरा दरवाजा मात्र भग्नावस्थेत आहे. दरवाजाची वरचा खांब अदृश्य झाला असून उंबरा आणि बाजूच्या भिंती तेवढ्या शिल्लक आहे. आतील दरवाजावरील कमान पुर्णपणे ढासळलेली असुन या दरवाजाने आपला किल्ल्यात प्रवेश होतो. साधारण त्रिकोणी आकाराचा हा किल्ला १.५ एकरवर पसरलेला असुन तटबंदीला अष्टकोनी आकाराचे लहानमोठे ९ बुरुज आहेत. तटबंदीची समोरची बाजु निमुळती होत गेलेली असुन साधारण ४० फूट उंचीच्या तटबंदीत जागोजागी तटावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत.
तटबंदीजव़ळ असलेल्या खोल्या
किल्ल्यात शिरल्यावर उजव्या हाताला दोन तटबंदी लगत दोन खोल्या बांधलेल्या आहेत आणि उजवीकडे तटावर चढण्यासाठी व्ही आकाराचा दगडी चिऱ्याचा जिना आहे. समोर नजर फेकली तर चारही बाजूस मोकळे मैदान दिसते. सर्वप्रथम आपण किल्ल्याचा आतील परीसर पाहुन घ्यावा व नंतर तटावरून फेरी मारावी. त्यामुळे कमी वेळात आपला संपुर्ण किल्ला पाहुन होतो. उजवीकडील तटातील खोलीच्या पुढील भागात काही घरांचे अवशेष असुन तेथुन थोडे पुढे आल्यावर आपल्याला तटाला लागुन असलेले कमानीयुक्त कोठार दिसते. या कोठारात आत जाण्यासाठी २ x २ आकाराचे दोन दरवाजे असुन त्यातील डावीकडील दरवाजाने कोठारात उतरता येते. उजवीकडील दरवाजाच्या पायऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. या दरवाजांच्या चौकटीलाही नक्षीकाम केलेले दगड वापरलेले आहेत. दरवाजाच्या वरील बाजुस तीन सुंदर शिल्प असुन त्यातील एका शिल्पात भगवान गौतम बुद्धांच्या वेगवेगळ्या मुद्रांमधील चाळीस ध्यानस्थ प्रतिमा आहेत.
देखणी अष्टकोनी विहीर
कोठाराच्या पुढील भागात अष्टकोनी आकाराची ७० फुट खोल विहीर असुन या विहिरीच्या तळाशी जाण्यासाठी तटबंदीच्या बाजुने वळणदार बंदिस्त पायरीमार्ग आहे. पायऱ्यांच्या सुरवातीच्या एका पायरीसाठी कमलपुष्प कोरलेला दगड वापरलेला असुन वरील बाजुस तटबंदीत एक देवनागरी लिपीतील शिलालेख आडवा रचलेला आहे.
२५ पायर्या उतरल्यावर मार्ग काटकोनात वळतो. इथे दगडात बांधलेल्या दोन कमानी आहेत.या विहिरीच्या तळाशी असलेल्या कमानी खालच्या पायरीजवळ एक सुंदर किर्तीमुख तसेच एक शिल्प पहायला मिळते. विहिरीच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात मंदिराच्या शिल्पपट्टिका वापरलेल्या आहेत. वापर नसल्याने विहिरीचे पाणी खराब झाले आहे. गडावरील हि सर्वात सुंदर वास्तु असुन केवळ विहिरीसाठी या गडाला भेट दिली तरी ती सार्थकी लागेल. विहिरीच्या वरील बाजुस पाणी साठविण्याची दगडी ढोणी ठेवलेली आहे.
विहीरीतील पाणी काढण्यासाठी असलेली दगडी डोणी
विहिर पाहुन थोडे पुढे आल्यावर तटबंदीतील एका दगडावर हनुमानासारखे दिसणारे शिल्प असुन त्याच्या पुढे काही अंतरावर सप्तमातृका असलेला शिल्पपट रचलेला आहे. या शिल्पपटात एका बाजुस गणपती तर दुसऱ्या बाजुस भैरव कोरलेला आहे. या शिल्पपटाच्या खालील बाजुस किल्ल्याचा दुसरा लहान दरवाजा असुन दगडमाती ढासळल्याने हा मार्ग बंद झाला आहे. हा दरवाजा बाहेरील बाजूने पहाता येतो. येथे किल्ल्याचा टोकावरील बुरुज असुन त्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत पण त्यावर न जाता आधी तटबंदीलगत असलेले अवशेष पाहुन घ्यावेत.

तटबंदीच्या पुढील भागात एक लहान दरवाजा असुन या दरवाजाने आत शिरल्यावर आपण एका मोठ्या दालनात पोहोचतो. या दालनाच्या पुढील भागात एकामागे एक अशा तीन कमानी आहेत. या कमानीतुन आत शिरल्यावर तटबंदीत असलेले शौचकुप पहायला मिळते. यांची रचना सिंधुदुर्गावरील शौचालयासारखी आहे. येथे तटबंदीतील एका दगडावर उड्डाण करणार्या मारूतीचे शिल्प आहे. या कमानी म्हणजे बहुदा किल्लेदाराचा वाडा असावा. तटबंदीचं कडेने तसेच पुढे आल्यावर अजुन एक शौचकुप पहायला मिळते. या शौचकुपाच्या पुढील भागातील तटबंदीत किल्ल्याचा मध्यम आकाराचा तिसरा दरवाजा आहे. हा दरवाजा दगडाची भिंत घालुन व्यवस्थित बंद करण्यात आला आहे. बाहेरील बाजुने हा दरवाजा पहाता येतो. तटबंदीच्या कडेने त्यात असलेली शिल्प पहात आपण प्रवेश केलेल्या ठिकाणी येऊन पोहोचतो.
किल्ल्याची तटबंदी
येथे सुरवातीला पाहीलेल्या पायऱ्यानी तटावर चढुन आपली उर्वरीत गडफेरी सुरु करावी. तटावरून आपण प्रवेश केलेल्या मुख्य दरवाजाचे सुंदर दर्शन घडते. किल्ल्याच्या आतील भागात असलेले अवशेष पुर्णपणे नामशेष झाल्याने सपाट मैदान झाले आहे. येथील अवशेषांचे दगड बहुदा किल्ल्याबाहेरील घरे बांधण्यासाठी वापरले असावेत. तटबंदीचा फांजीपर्यंतचा भाग घडीव दगडात बांधलेला असुन त्यावरील संरक्षक भिंत बांधण्यासाठी सफेद चिकणमातीचा वापर केलेला आहे. या भिंतीत बाणाचा व बंदुकीचा मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या बांधण्यात आलेल्या आहेत. किल्ला लहानशा टेकडीवर असल्याने दरवाजाकडील भाग वगळता इतर बाजुंनी काही प्रमाणात उंचीचे नैसर्गिक संरक्षण आहे. तटबंदीचा वरील मातीचा भाग वगळता पुर्ण तटबंदी सुस्थितीत आहे. तटावरून फेरी मारताना त्यात असलेले बुरुज मोजत बाह्यांगाचे सुंदर दर्शन होते.
किल्ल्याच्या बुरुजावर असलेले पीर
किल्ल्याच्या समोरील टोकाशी असलेल्या बुरुज हा किल्ल्याचा सर्वात मोठा बुरुज असुन त्यावर पिराची कबर आहे.
बुरुजावर प्रवेश करण्यासाठी तटबंदीच्या दोन्ही बाजुस कमानी असुन यातील एका कमानीजवळ भगवान गौतम बुद्धांचे शिल्प आहे.
किल्ल्याची तटबंदी व बाहेर दिसणारा पाण्याचा तलाव
किल्ल्याबाहेर एक मोठा तलाव असुन येथील मंदीरे व किल्ला बांधण्यासाठी दगड काढल्याने हा तलाव निर्माण झाला असावा. या बुरुजावरून- तटावरून मुख्य दरवाजाकडे जाताना आपण दरवाजाच्या अलीकडील बुरुजावर पोहोचतो. या बुरुजावर ध्वजस्तंभाचा चौथरा बांधलेला आहे. बुरुजाच्या अलीकडे असलेल्या पायऱ्यानी खाली उतरून दरवाजाकडे आल्यावर आपली गडाची आतील फेरी पुर्ण होते. आता किल्ल्याबाहेर पडुन डाव्या बाजूने म्हणजे राम मंदिराच्या दिशेने आपल्या गड प्रदक्षिणेला सुरवात करावी.रस्त्याने २ मिनिटे चालल्यावर आपल्याला वाटेच्या डाव्या बाजुस एका चौथऱ्यावर ओळीत मांडलेली पाच नागशिल्पे दिसतात. या शिल्पांच्या विरुद्ध दिशेस तटबंदीत भवानी देवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या दरवाजाला प्राचीन मंदीराच्या द्वारशाखेची दगडी चौकट असुन त्यावर नक्षी व खालील बाजुस जय-विजय यांच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत. मंदिराच्या डावीकडील तटबंदीवर मोठ्या प्रमाणात शिल्प असुन बुरुजाजवळ मंदिराच्या तळाशी असणारी गजथराची शिल्पपट्टिका पहायला मिळते. मंदिराकडून तटबंदीच्या कडेने काटेरी झाडीतुन व घाणीतुन वाट काढत पुढे गेल्यावर आपण आत पाहीलेल्या बुजलेल्या दरवाजाच्या बाहेरील बाजुस पोहोचतो. हा संपुर्ण दरवाजा मंदिराच्या शिल्पांनी मढवलेला आहे. या दरवाजाची चौकट देखील मंदीराची असुन वरील कमानीत गजलक्ष्मीचे शिल्प व त्यावर दुसरे सुंदर शिल्प रचलेले आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूस दोन कोनाड्यात दोन व्याघ्रमुख असुन खालील बाजुस जयविजय यांचे शिल्प आहे. दरवाजा समोर व्यालाची पूर्णाकृती मूर्ती पडलेली आहे.
किल्ल्याचे दगडी व मातीच्या मिश्र बांधणीचे बुरुज
हे पाहून आपण आपली गडफेरी पूर्ण करू शकतो किंवा संपुर्ण किल्ल्याला फेरी मारत त्यातील शिल्प पाहू शकतो. तटबंदी बाहेरील दोनही ठिकाणे झाडीत लपलेली असल्याने शोधणे कठीण जाते, त्यासाठी स्थानिकांची मदत घ्यावी. बाहेरील तटबंदी व बुरूजांवर अनेक नक्षीकाम केलेले दगड आहेत. किल्ला आत बाहेर पुर्णपणे पहाण्यासाठी दीड तास पुरेसा होतो. धर्मापुरी गावाबाहेर केदारेश्वरचे प्राचीन मंदिर आहे. अप्रतिम कोरीव शिल्पांनी नटलेले हे मंदिर आवर्जुन पहावे असेच आहे.
प्राचीन काळी धर्मापुरी हे धर्मक्षेत्र म्हणुन ओळखले जात होते. धर्मापूरी किल्ला बांधण्यासाठी जे दगड वापरले गेले त्यात असलेली मंदिरांवरील अनेक शिल्प पहाता या गावात अनेक मंदिरे होती व त्यांचेच दगड वापरून हा किल्ला बांधला गेला. सातवाहन, चालुक्य, कलचूरी, वाकाटक, कदंब इत्यादी घराण्यांचे या भागावर राज्य होते. चालुक्य राजवटीतील विक्रमादित्य सहावा याचा पुत्र सोमेश्वर तृतीय याने धर्मापुरी नगरी निर्माण केली. त्याने अभिलषितार्थ चिंतामणी (राजमानसोल्लास) या ग्रंथाची निर्मिती केली होती. भव्य राजप्रासाद, नृत्यशाळा, तलाव, मनोहारी उद्याने, सुंदर वनराई, उत्तुंग देवालये आणि भव्य बाजारपेठ यांनी धर्मापुरी नगरी सजलेली व गजबजलेली होती. पुढे हा परिसर यादवांच्या अंमलाखाली होता. अल्लाउद्दीन खिलजीने हा प्रदेश यादवांकडून जिंकून घेतल्याचा उल्लेख येतो. (१२९६-१३१६) हा भाग मुहम्मद बिन तुघलकाने जिंकून घेतल्याने ‘भीर’ म्हणून ओळखला जाऊ लागला. (१३२५-५१) बहामनी साम्राज्याच्या उदयानंतर या प्रदेशावर बहामनी सत्ता प्रस्थापित झाली. किल्ल्याचे एकुण बांधकाम पहाता हा किल्ला बहामनी कालखंडातच बांधला गेला असावा. बहामनी सत्तेच्या अस्तानंतर हा भाग निजामशाहीच्या ताब्यात आला. पेशवाई काळात निजाम व मराठे यांच्यामधील राक्षसभुवन व खर्डा येथे झालेल्या लढाईत हा भाग मराठा साम्राज्यात आला पण पुन्हा या प्रदेशावर निजामाची राजवट प्रस्थापित झाली. १८ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने हैदराबाद संस्थानाच्या भारतातील विलीनीकरणास मान्यता दिल्यावर हा प्रदेश १९५६ पर्यंत हैद्राबादचा भाग होता. १ नोव्हेंबर १९५६ राजी राज्य पुनर्रचना दरम्यान बीड जिल्ह्यासहित मराठवाडातील सर्व जिल्हे तत्कालीन मुंबई राज्यास जोडण्यात आले. शेवटी १ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यावर बीड जिल्हा महाराष्ट्रातील एक जिल्हा बनला.
संदर्भ :-
१) बीड जिल्हा गॅझेटीयर
२) स्थापत्य - महाराष्ट्र शासन
३) http://trekshitiz.com
४) www.bhausahebumate.com
५) https://www.loksatta.com
६) https://merwynsrucksack.blogspot.com/७) https://durgbharari.in/dharmapuri/

>> नीती मेहेंदळे
बीड जिल्ह्यात अंबेजोगाईप्रमाणेच जवळ धर्मापुरी हे एक प्राचीन नगर आहे.
सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव अशा विविध राजवटींमधे मराठवाडा
विभागात सरस स्थापत्यविशेष उभारले गेले. बीड जिल्हाही असाच प्राचीन
स्थापत्यांनी समृद्ध जिल्हा. अंबेजोगाईहून 30 किलोमीटर अंतरावर धर्मापुरी
आहे. गावात निजामशाहीच्या काळात बांधलेला किल्ला प्रथम थोडय़ाच उंचशा
जोत्यावर उभा लक्ष वेधून घेतो. किल्ल्याची काही प्रमाणात पडझड झाली असली
तरी बुरुज आजही भक्कम दुर्गरचनेची ग्वाही देतात. किल्ल्याच्या उत्तरेस
खडकाळ भागी शतात केदारेश्वर मंदिर योजलेलं दिसतं. चालुक्य राजा पामादित्य
सहावा याचा मुलगा सोमेश्वर याने धर्मापुरी नगरी वसवली असे सांगितले जाते.
किल्ल्याइतकीच शिवमंदिर स्थापत्यरचनांसाठी धर्मापुरी प्रसिद्ध आहे.
पत्रलेखिकेच्या मनमोहक शिल्पासाठी व अशा अनेक शिल्पाविष्कारांसाठी
प्रसिद्ध असलेलं केदारेश्वर हे धर्मापुरीचे वैशिष्टय़पूर्ण मंदिर आहे.
मंदिराची रचना मुखमंडप, अर्धमंडप, अंतराळ, गाभारा अशी आहे. मंदिर
पूर्वाभिमुख असून मुखमंडप आणि अर्धमंडप आता पूर्ण भग्न अवस्थेत आहे.
मुखमंडप स्तंभांवर तोलून धरलेला असावा, कारण त्याचे स्तंभावशेष मंदिर
परिसरात दिसतात. मंडपाच्या उत्तर व दक्षिण बाजूला असे दोन अर्धमंडप असावेत.
मोडकळीस आलेले अर्धमंडपाचे छत त्रिकोणी आकाराचे आणि जवळच्या पानगावमधल्या
मंदिरांमधल्या छतासारखे आहे.
तीस फुटी चौरसाकारात मंडप असून मध्यभागी रंगशिळा आहे. मंडपात स्तंभ असून
त्यांनी छत तोलून धरले आहे. अंतराळाचे छतही मंडपाच्या छतासमान आहे.
गर्भगृहात कोणतेच कोरीवकाम नाही. त्याची द्वारशाखा विपुल आहे. पाच
द्वारशाखा असून लताशाखा-पुष्प, प्राणीशाखा-व्याल, स्तंभशाखा- कलश व भौमितिक
नक्षी अशा संपन्न आहेत. अंतराळ व गर्भगृहाच्या बाहेरचे भाग क्षिप्त व
प्रक्षिप्त असून त्यावर कोरीव शिल्पकाम आहे. एकूण सत्तरेक मूर्ती कोरलेल्या
आहेत. त्या शैव-वैष्णव तसेच शाक्त संप्रदायाच्याही प्रातिनिधिक आहेत. यात
सूरसुंदरी, शालभंजिका, नृसिंह, वराह, काली, ब्रम्हा, विष्णू यांच्या मूर्ती
असून वासुदेवाची मूर्ती गर्भगृहाबाहेरच्या देवकोष्ठात आहे. शिवाय
मंदिराच्या मंडोवरावरच्या शिल्पसमुदायात विष्णूच्या केशवादी चोवीस प्रतिमा
आढळतात.
गोमुखाप्रमाणे वराहमुखातून गाभाऱयातील पाणी उत्सर्जित करण्याची रचना
केलेली दिसते. हे केवळ वराहमुख नसून एक वराहरथ आहे असे निरीक्षणांती दिसते.
एक सारथी लगाम आवळून रथ ओढतो आहे. वराहाच्या पायात तोडे आहेत, गळय़ात
पोवळय़ाची माळ, मागे अंबारी असा थाट पाहून शिल्पकाराचे कौतुक वाटते. शिखर
भग्न आहे. मंदिरात एक शिलालेख असून त्यावरून या मंदिराची अकराव्या शतकातले
चालुक्य राजवटीतले मंदिर अशी कालनिश्चिती करता येते. बाह्यभिंतीवरील
पत्रलेखिका ही त्रिभंगावस्थेत उभी सुरसुंदरी आहे आणि ती राजाची प्रशस्ती
लिहिते आहे अशी शिल्परचना व प्रस्तुत संस्कृतातला शिलालेख त्याच शिल्पात
योजणे हे अतिशय कलात्मक मांडणीचे निदर्शक आहे.
याखेरीज धर्मापुरीत सोमेश्वर, रोकडेश्वर, संचारेश्वर, त्रिगुणेश्वर अशा
केदारेश्वरला समकालीन मंदिरं असणे हा निव्वळ योगायोग नसून तो तत्कालीन
श्रद्धा, समृद्धी व स्थापत्यकौशल्याचा मौल्यवान पुरावा आहे. जवळच मरळसिद्ध
मल्लिकार्जुन हे तितकेच प्राचीन शिवमंदिर असून तिथे एक आयताकृती मोठी
बारवही आहे. येथेही अनेक सुटी शिल्पं मांडून ठेवलेली दिसतात. त्यात
महत्त्वाचे एक सूर्यनारायणाचे शिल्प आहे. डोक्यावर सात फण्यांचा साप, हातात
दोन फुललेली कमळं आणि दक्षिण भारतीय संकेताप्रमाणे पाय उघडे असा हा
सूर्यनारायण मंदिराबाहेर एका कोपऱयात मांडलेल्या शिल्पांमधे दिसतो.
सोमणवाडी या शेजारच्या गावातही चालुक्यकालीन बारव आहे.
या शिल्पसमृद्ध धर्मापुरीत एखादे वस्तुसंग्रहालय असायला हरकत नसावी.
कारण तिथे घर बांधायला खणती लावली की असा ऐवज हमखास सापडतो आणि याचं
संवर्धन करणं हे नागरिकांचं कर्तव्य आहे हे आपल्या घटनेतच लिहिलं आहे.
megmehen@gmail.com
http://www.saamana.com/neeta-mehendale-article-on-shiva-temple-in-dharmapuri/
धर्मापुरी किल्ल्यापासून मंदिर फारसे लांब नाही. फरक एवढाच की किल्ला गावात आहे तर मंदिर गावाबाहेर.
सध्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे. (खरंतर जीर्णोद्धारापेक्षा पुनर्निमाण शब्द जास्त योग्य ठरेल.) त्यामुळे येण्याआधी या मंदिराचे फोटो इंटरनेटवर पाहिलेल्या लोकांना इथे आल्यावर एक सुखद धक्का बसतो.
आम्ही गेलो तेव्हा मंदिर बांधून पूर्ण झाले होते आणि मंदिराच्या जोत्याभोवती फरशी बसवण्याचे काम चालू होते. मंदिराचे मुख्य आकर्षण (आणि माझ्या मते, ह्या मंदिराचं पुनर्निमाण होण्यामागचं मुख्य कारण) आहे त्याच्या बाहेरील बाजूस असलेल्या अतिशय देखण्या मूर्त्या. अनेक हातांमध्ये विविध शस्त्रे घेतलेले आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देत उभे असलेले, क्वचित असुराचा वध करताना दिसणारे नाना प्रकारचे देव, अनेक अलंकार ल्यालेल्या सुंदर स्त्रिया, पायात काटा गेल्याने सैरभैर झालेली देखणी युवती आणि तिच्या पायातला काटा काढणारा तिचा नोकर, पावा वाजवणारा युवक, आकर्षक केशरचना केलेली आणि मधाळ हास्यानं आपल्याला घायाळ करणारी कमनीय बांध्याची स्त्री, हातात आंब्याची डहाळी घेतलेली लावण्यवती आणि आंबा समजून तिच्या उरोजावर चोच मारणारा पोपट अशा अनेक एकाहून एक सरस मूर्त्या इथे आहेत. कदाचित कठीण दगडात बनवल्यामुळे असतील, पण बहुतांश मूर्त्या आजही सुस्थितीत आहेत.
ह्या खालील चित्राचे वर्णन करताना विकिपिडीया म्हणतो:
येथील एका पत्रलेखिकेचे शिल्प विलक्षण सुंदर आहे. हे चिरतारुण्ययाने मुसमुसलेले मोहक सौंदर्य पाठमोरे उभे आहे. या शिल्परचनेची कल्पना मोठी काव्यमय आहे. एक सौंदर्यसंपन्न अप्सरा पाठमोरी उभी राहून शिलालेख लिहीत आहे. अशा या मोहक शिल्परचनेच्या चार ओळी पूर्ण झाल्या असून पाचव्या ओळीवर हात थबकला आहे. हा क्षण येथील शिल्पीने आपल्या कलासामर्थ्याने गोठवून ठेवला आहे.
ही सुंदर शिल्पकला सोडून जावेसे वाटत नव्हते, पण अजून जेवण व्हायचे होते आणि दूरचा पल्लाही गाठायचा होता, तेव्हा निघालो. वाटेत जेवणासाठी जागा शोधताना झाडांमध्ये लपलेले धर्मापुरीचे मरळसिद्धेश्वर मंदिर (https://www.youtube.com/watch?v=0ueQwXyhjE0) दिसले. हे छोटेसे मंदिरदेखील जुने, दगडी आणि सुंदर आहे. जेवण करून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो तेव्हा उन्हे परतीला लागली होती. आम्ही बार्शीत पोचलो तेव्हा सात वाजून गेले असावेत.
एखादी जुनी वास्तू पाहिली की ती वास्तू ऐन भरात होती त्या काळाची कल्पना करणं हा माझा आवडता छंद आहे. धर्मापुरीच्या बाबतीतही हे झालं. किती वर्षं लागली असतील हे मंदिर बांधायला? ७/८ वर्षं तरी सहज. मंदिर बांधणा-या शिल्पकारांनी तेव्हा इथंच मुक्काम ठोकला असेल - इथंच कुठेतरी बांधलेल्या कच्च्या झोपड्यांत ते राहिले असतील. त्यांची लहान मुलं मंदिराशेजारी खेळली असतील आणि त्यांच्या बायकांनी तिथेच बसून भाक-या रांधल्या असतील. आणि मंदिर पूर्ण झाल्यावर? त्याच्या उद्घाटनाचा सोहळा मंदिराइतकाच भव्य आणि डोळे दिपवणारा झाला असेल. हे मंदिर बांधणारा शिवभक्त राजा मग रोज सकाळी आपल्या घोड्यावर बसून इथं येत असेल आणि शिवलिंगाचं दर्शन घेऊन आपल्या दिवसाची सुरूवात करत असेल. आणि धर्मापुरी? कसे असेल हे धर्मापुरी गाव तेव्हा? विकीपिडिया म्हणतो की “चालुक्य राजवटीतील विक्रमादित्य सहावा याचा पुत्र सोमेश्वर तृतीय याने धर्मापुरी नगरी निर्माण केली. या राजाला साहित्याची आवड होती. त्याने 'अभिलषितार्थ चिंतामणी' (राजमानसोल्लास) या ग्रंथाची निर्मिती केली होती. या धर्मापुरीत सर्व सोयी होत्या. भव्य राजप्रासाद, नृत्यशाळा, तलाव, मनोहारी उद्याने, सुंदर वनराई, उत्तुंग देवालये आणि भव्य बाजारपेठ यांनी ही नगरी सजलेली व गजबजलेली होती.” आज भारतातल्या मोठ्या शहरांचा जो दिमाख आहे, शान आहे, ती कदाचित धर्मापुरीनं तेव्हा अनुभवली असेल. आणि मी राहतो ते पुणं? पुनवडी तेव्हा कदाचित १५/२० झोपड्यांचं छोटंसं गाव असेल. १०० एक लोकसंख्या असलेलं. आज धर्मापुरी कुणाच्या खिजगणतीतही नाही - पण कोण जाणे, ते पुन्हा एकदा उभारी घेईल. राज्यं, माणसं यांबरोबरच शहरं आणि गावं यांचीही नशिबं सतत बदलत असतात. ते म्हणतात ना, Change is the only constant thing in life. कोण जाणे, अजून आठशे वर्षांनी कदाचित धर्मापुरी पुण्याच्या जागी असेल आणि पुणे धर्मापुरीच्या!
धर्मापुरी हे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात आहे. हे ठिकाण अंबेजोगाई – अहमदपूर मार्गावरील मोठे गाव आहे. परळी, अंबाजोगाई, अहमदपूर, गंगाखेड आणि पानगाव शहरांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. इथे एक प्राचीन किल्ला असून एक तळे आहे. गावापासून जवळच मरळशीद मंदिर आहे. गावामधेच एक जुने राम मंदिर आहे. येथे बस स्थानक असून सर्वच बस इथे थांबतात. जवळील रेल्वे स्थानक परळी आहे.बीडला पांडवकालीन ‘दुर्गावतीनगर’ म्हणत असत. पुढे चालुक्यकालीन चंपावतीराणीच्या नावावरून देण्यात आलेले ‘चंपावतीनगर’ हे या शहराचे दुसरे नाव आहे. पूर्वी राणी चंपावतीने या भागावर राज्य केल्याचा उल्लेख काही पुराणांमध्ये आहे. शहरात पूर्वी चंपावतीचा किल्ला असल्याच्या खुणाही आहेत. शहराच्या आजूबाजूला तटबंदी आहे.सातवाहन, चालुक्य, कलचूरी, वाकाटक, कदंब इत्यादी घराण्यांचे बीडवर राज्य होते. उपरोक्त परिसर पुढे यादवांच्या अंमलाखाली होता. अल्लाउद्दीन खिलजीने हा प्रदेश यादवांकडून जिंकून घेतल्याचा उल्लेख मिळतो(१२९६-१३१६). हा भाग मुहम्मद बिन तुघलकाने जिंकून घेतल्याने ‘भीर’ म्हणून ओळखला जाऊ लागला(१३२५-५१). बहामनी साम्राज्याच्या उदयानंतर या प्रदेशावर बहामनी सत्ता प्रस्थापित झाली. त्या राजवटीच्या विघटनानंतर हा प्रदेश निजामशाहीचा एक भाग बनला. पेशवाईच्या कालखंडात निजाम व मराठे यांच्यामध्ये राक्षसभुवन व खर्डा येथे झालेल्या लढाया इतिहासात प्रसिद्ध आहेत. मराठ्यांनी निजामाकडून हा प्रदेश जिंकून घेतला होता. तथापि, मराठेशाहीच्या अस्तानंतर या प्रदेशावर पुन्हा निजामाची राजवट प्रस्थापित झाली, ती थेट १८ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने हैदराबाद संस्थानाच्या भारतातील विलीनीकरणास मान्यता देईपर्यत. बहामनी व निजामशाही राजवटीखालीदेखील काही काळ हा जिल्हा होता. त्यानंतर १९५६ पर्यंत हैद्राबादचा भाग होता. १ नोव्हेंबर १९५६ राजी राज्य पुनर्रचनेदरम्यान बीड जिल्ह्यासहित मराठवाडातील सर्व जिल्हे तत्कालीन द्वैभाषिक मुंबई राज्यास जोडण्यात आले. शेवटी १ मे १९६० रोजी मध्ये महाराष्ट्र व गुजरात ही राज्ये वेगळी झाल्यावर बीड जिल्हा महाराष्ट्रातील एक जिल्हा बनला. निजाम व ब्रिटीश यांच्या विरोधात बीडमध्ये १८१८ सालीच (मराठवाड्यात सर्वप्रथम) आंदोलन छेडले गेले होते. जिल्ह्यातील धर्माजी प्रताप राव हे या लढ्याचे मार्गदर्शक होते.बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई हे प्राचीन गाव तेथील ब्राम्हणी (हिंदू) लेणी व योगेश्वरी देवीच मंदिर यामुळे प्रसिध्द आहे. आंबेजोगाई पासून २७ किमी अंतरावर धर्मापूरी नावाच एक प्राचीन धर्मक्षेत्र आहे. या गावात चालुक्य कालिन प्राचीन केदारेश्वर मंदिर याची साक्ष देत आजही उभ आहे. या गावात मुसलमानी राजवटीच्या काळात किल्ला बांधला गेला. हा किल्ला धर्मापूरीचा किल्ला म्हणून ओळखला जातो. या किल्ला बांधण्यासाठी जे दगड वापरले गेले आहेत त्यात मंदिरांवरील अनेक शिल्प पहायला मिळतात. या वरून या गावात अनेक मंदिरे होती व त्यांचेच दगड वापरून हा किल्ला बांधला गेला. धर्मापूरीचा किल्ला व अप्रतिम कोरीव शिल्पे असलेले केदारेश्वर मंदिर ही दोनही ठिकाण आवर्जून पाहाण्यासारखी आहेत.पहाण्याची ठिकाणे:धर्मापूरी गावातून गाडीने आपण थेट किल्ल्याच्या दरवाजा पर्यंत जाऊ शकतो. किल्ला हा गावा मागील छोट्याश्या उंचवट्यावर उभारलेला आहे. किल्ल्याची तटबंदी मात्र उंचवट्याच्या खालपासून बांधून काढलेली आहे. किल्ल्याला ऎकेरी तटबंदी आहे. तटबंदीची उंची ७० फूट असून त्यात ९ अष्टकोनी बुरुज आहेत. चर्या, तटबंदी व बुरूज यावरून मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या बनवलेल्या आहेत. किल्ल्याला एकामागोमाग एक असे २ दरवाजे आहेत. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाला संरक्षण देण्यासाठी तेवढ्याच भागात परकोट बांधलेला आहे. या परकोटाच्या तटबंदीत छोटे पूर्वाभिमूख प्रवेशव्दार आहे. तेथून पायर्या चढून वर जाऊन काटकोनात वळल्यावर किल्ल्याचे मुख्य पूर्वाभिमूख प्रवेशव्दार आहे. हा १० फूटी दरवाजा सध्या दगडानी अर्धा बंद केलेला आहे. दरवाजा समोरील बुरुजावर व तटबंदीत फूले, नक्षी, व्याल यांची शिल्पे आढळतात. या दरवाजाच्या आतील बाजूस देवड्या आहेत. या देवड्यांवर व्यालमुखाच्या पट्टया बसवलेल्या आहेत. किल्ल्यात शिरल्यावर उजव्या हाताला दोन तटबंदी लगत दोन खोल्या बांधलेल्या आहेत. या खोल्यांवरून पुढे गेल्यावर तटबंदीला लागून एक अप्रतिम चौकोनी विहिर आहे. विहिरीत उतरण्यासाठी पायर्या आहेत. दुसर्या पायरीवर कमलपुष्प कोरलेले आहे. २५ पायर्या उतरल्यावर मार्ग काटकोनात वळतो. इथे दगडात बांधलेल्या दोन कमानी आहेत. सर्वात खालच्या पायरीवर व भिंतीवर किर्तीमुख कोरलेले आहे. उपसा नसल्याने विहिरीचे पाणी खराब झालेले आहे.विहिर पाहून बाहेर आल्यावर समोरच्या तटबंदीवर जाणारा जिना दिसतो व बाजूला तटबंदी लगत काही कमानी दिसतात.या कमानी म्हणजे रहाण्यासाठीच्या खोल्या असून या खोल्यांमागे तटबंदीत २ संडास बनविलेले पहायला मिळतात. यांची रचना सिंधुदुर्गावरील शौचालयासारखी आहे. या खोल्या पाहून बुरुजावर जाणार्या जिन्याकडे जावे . येथे तटबंदीतील एका दगडावर उड्डाण करणार्या मारूतीचे शिल्प आहे. याच ठिकाणी तटबंदीखाली चोर दरवाजा आहे. पण माती पडल्यामुळे हा मार्ग सध्या बंद झाला आहे. पण तटबंदीच्या बाहेरून चोर दरवाजा पहाता येतो. जिन्याने बुरुजावर गेल्यावर तिथे एका पीराचे थडगं पहायला मिळते. तटबंदीवरून प्रवेशव्दाराकडे येतांना डाव्या बाजूला किल्ल्याच्या खाली असलेल्या रस्त्याच्या कडेला काही नागशिल्प दिसतात. तटबंदीला असलेल्या जिन्याने प्रवेशव्दाराजवळ उतरावे. किल्ल्यातून बाहेर पडून नागशिल्पांकडे जातांना तटबंदीत बाहेरच्या बाजूने एक भवानी देवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या दरवाजाला दगडाची सुंदर महिरप आहे. त्यावर नक्षी व खालच्या बाजूस काही मूर्त्या कोरलेल्या आहेत. ते पाहून परत रस्त्यावर येऊन नागशिल्पाच्या पुढे जाऊन तटबंदी पर्यंत चढून जावे. या ठिकाणी चोर दरवाजा आहे. या दरवाजाला दगडाची सुंदर महिरप आहे. महिरपीच्या वरच्या बाजूस दोन कोनाड्यात दोन व्यालमुख आहेत. दरवाजा समोर व्यालाची पूर्णाकृती मूर्ती पडलेली आहे. हे पाहून झाल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. तटबंदी बाहेरील दोनही ठिकाणे झाडीत लपलेली असल्याने शोधणे कठीण जाते, त्यासाठी स्थानिकांची मदत घ्यावी.केदारेश्वर हे प्राचीन मंदिर गावा बाहेरील शेतात आहे. मंदिरावर अप्रतिम शिल्प कोरलेली आहेत. मंदिराच्या परीसरातही अनेक शिल्प पडलेली आहेत.
पोहोचण्याच्या वाटा:
१) मुंबई, पुण्याहून आंबेजोगाई जाण्यासाठी थेट बस सेवा आहे. आंबेजोगाई – धर्मापूरी अंतर २७ किमी आहे. खाजगी गाडीने किंवा रिक्षाने धर्मापूरीला जाता येते. वहानानेही थेट किल्ल्याच्या प्रवेशव्दारापर्यंत जाता येते.
२) मुंबई, पुण्याहून लातूर एक्सप्रेसने लातूरला जावे. लातूरहून खाजगी वहानाने किंवा बसने लातूर – आंबेजोगाई हे अंतर ६५ किमी आहे.
३) मुंबई, पुण्याहून रेल्वेने परळी वैजनाथ किंवा परभणी गाठावे. परळी वैजनाथ हे १२ जोर्तिलिंगापैकी एक आहे. परळी वैजनाथ ते आंबेजोगाई २५ किमी व आंबेजोगाई -धर्मापूरी २७ किमी अंतर आहे. परभणी ते आंबेजोगाई ९५ किमी अंतर आहे.
राहाण्याची सोय: धर्मापूरी गावात राहण्याची सोय नाही. आंबेजोगाई आणि परळी वैजनाथ येथे रहाण्याची चांगली सोय आहे.
जेवणाची सोय: धर्मापूरी गावात जेवणाची सोय आहे.
पाण्याची सोय: किल्ल्यात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, सोबत पाणी बाळगावे.
लागणारा वेळ: किल्ला पहाण्यासाठी अर्धा तास लागतो.
धर्मापुरीच्या अलीकडे असणाऱ्या पठारावरून धर्मापुरी किल्ला आणि शेजारचा तलाव यांचा एक दांडगा नजारा आहे तो पाहून धर्मापुरी गाठलं आणि किल्ल्याकडे धाव घेतली. धर्मापुरी गाव संपायच्या अलीकडे उजवीकडे एक सिमेंटचा चकाचक रस्ता धर्मापुरी किल्ल्याकडे जातो. अरुंद बोळातून लाजवंती लाजत लाजत किल्ल्याकडे निघाली. किल्ल्याच्या अलीकडे एका घराच्या ओसरीवर २ गणेश शिल्प आणि कैक विरगळ धूळ खात पडल्याचे पाहून आश्चर्य आणि दु:ख वाटले. इतिहाच्या पाउलखुणा पाहिल्याचे आश्चर्य आणि त्याबद्दलचे औदासिन्य पाहून दु:ख वाटले.. मुख्य रस्त्यापासून साधारण १०० मिटर उजवीकडे जाताच समोरच किल्ल्याकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत. किल्ल्याचा बाह्य दरवाजा फक्त चौथऱ्यापुरता तग धरून आहे. मुख्य दरवाजाकडे जाणारी वाट मात्र चढणीची आहे, पायऱ्यांच्या उजवीकडे काही आधुनिक घरे बांधली आहेत. ५०-६० पायऱ्या चढून वर आलो आणि डावीकडे षटकोनी आकाराचा देखणा आणि भला दांडगा बुरुज पाहून किल्ला पाण्यासाठी केलेला आटापिटा सार्थकी लागला. पायऱ्या चढून वर येताच उजवीकडे गडाचा मुख्य दरवाजा दिसतो. मुख्य दरवाजा मात्र आधुनिक दगडी चिरे घालून बंद केला आहे. आत-बाहेर करण्यासाठी सध्या एक छोटी चौकट तेवढी ठेवली आहे. कमानीच्या उजव्या बाजूस एक शिल्पपट्टिका मात्र किल्ल्याच्या दर्शनी भागाची शोभा वाढवणारी आहे. डावीकडे भिंतीमध्ये काही कोरीव चिरे लक्ष वेधून घेतात. मराठवाड्यातील बऱ्याच किल्ल्यामध्ये हे सर्रास आढळते. हेमाडपंती मंदिराच्या खुणा या अशा किल्ल्याच्या भिंतीवर पाहायला मिळतात. चौकटीतून वाकून आत आलो आणि समोर काटकोनात वळून गडाच्या आतल्या भागात प्रवेश केला. गडाच्या हा तिसरा दरवाजा मात्र भग्नावस्थेत आहे. दरवाजाची वरचा खांब अदृश्य झाला असून उंबरा आणि बाजूच्या भिंती तेवढ्या शिल्लक आहे. या दरवाजाच्या आत येताच डावीकडे तटबंदीतील एक खोली आणि उजवीकडे तटावर चढण्यासाठी व्ही आकाराचा दगडी चिऱ्याचा जिना आहे. समोर नजर फेकली तर चारही बाजूस मोकळे मैदान.. समोर शेवटाला तटबंदीला खेटून उभ्या असलेल्या तीन कमानी मात्र लक्षणीय वाटतात म्हणून तिकडे निघालो. कमानी पाशी पोहोचलो तर हि एक तटबंदीला खेटून बांधलेली एक इमारत असल्याचे कळले. हे दारू कोठार किंवा गुप्त चर्चा करण्याची जागा असावी. कारण इमारतीचा प्रवेश दरवाजा हा २x२ टू-बाय-टू एवढा लहान आहे.
अन्ना असं काही दिसतंय म्हटल्यावर घाईने निघाला म्हटलं भाऊ सावकाश जा.. एक तर निर्मनुष्य गड आणि त्यात असली बंदिस्त अंधारी खोली म्हणजे आत सरपटकुमार वाट बघत असणार.. हे नक्की.. तसा अन्ना सावधपणे त्या चौकटीत गुडघ्यावर रांगत आत शिरला. आतून आवाज आला काही नाही रे आत या.. आत आलो आणि अंधारल्या खोलीत समोरून प्रकाश किरणाचा एक झोत भग्नावशेषातून त्या खोलीत डोकावून.. “कोण नवीन मंडळी आली आहे हा अडगळीतला गड पाहायला”, असं म्हणत भसकन डोळ्यांवर आला. ह्या बंदिस्त खोलीतला गारवा मात्र सुखावणारा होता एखाद्या शितगृहासारखा. पुन्हा बाहेर आलो आणि तटबंदीवरून एक फेरफटका मारावा ह्या हेतूने या कोठाराच्या उजवीकडच्या पायऱ्याकडे निघालो. पायरीवर पाऊल टाकणार इतक्यात समोर तटबंदीच्या वरच्या भागातून बाहेर डोकावणाऱ्या झाडांवर काही सुगरणी घरटे विणण्यात मग्न असल्याचे दिसले. डावीकडे एक विणकर पक्षीण त्यांच्या नाकावर टिच्चून एका झुडुपाचे पान विणून घरटे बांधत होती.. या झुडुपातून विणकराच्या पिलांचा किलबिलाट ऐकू येवू लागला आणि सुगरणीची वसाहत पाहून गडाच्या तटबंदीवर प्रवेश केला. पायऱ्या चढून गडाच्या उजवीकडच्या कोपरा बुरुजावर दाखल होतो. इथे बुरुजाच्या केंद्रस्थानी एका पिराची कबर आहे त्याला पांढरा-हिरवा रंग देवून शांत निद्रिस्त पिरबाबांना एकदम रंगेबिरंगी करून टाकल्याचे दिसले. कबरीला वळसा मारून बुरुजाच्या कोपर्यावर आलो आणि इथल्या तलावाचा नजरा पाहून धर्मापुरी किल्ल्याची भटकंती पूर्ण झाल्याचे जाहीर करण्यात आले. सूर्यदेव गुड-बाय करायला क्षितिजाच्या कंगोऱ्यावर ताटकळत उभे होते. आज सूर्यदेव जणू हि भटकंती पुरी करण्यासाठी ओव्हरटाईमच करत होते.. बुरुजावर पोहोचलो तोच सूर्यदेवाने लाल बावटा दाखवून मावळतीची गाडी पकडली. संध्यासमयीचे असे विहंगम दृश्य पाहून तटबंदीवरून गडप्रदक्षिणा पूर्ण केली.. मातीच्या बुरुजावरून चालताना मात्र कधी कधी धाकधूक वाटत होती इतकंच. कोठाराला खेटून उभ्या असलेल्या तटबंदीवरून चालत बुरुजबुरुजावरून पुन्हा मुख्य दरवाजाच्या आतल्या ‘व्ही’ आकारातील जिन्यापाशी आलो. वाटेत एके ठिकाणी विहीरसदृश काहीतरी दिसले पण वाढलेले झाडीझुडुपांचे गचपण त्यामुळे नेमकं काय ते कळायला मार्ग नव्हता. इथे पोहोचलो धर्मापुरी गढीचा निरोप घेतला आणि तडक केदारेश्वर मंदिराकडे निघालो..
धर्मापुरीचे हेमाडपंती केदारेश्वर मंदिर
धर्मापुरीच्या केदारेश्वर मंदिराबद्दल बऱ्याच ठिकाणी वाचलं होतं त्यामुळे अंधार धर्मापुरीला कवेत घेण्याआधी बिगीबिगी निघालो. पायऱ्या उतरून धर्मपुरी किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाला पाठ करून उजवीकडे जाणाऱ्या चकचकीत सिमेंट रस्त्याने निघालो. मुख्य रस्ता दिसताच उजवीकडे वळून केदारेश्वर मंदिर कुठे दिसतोय का ते पाहू लागलो. मग उजवीकडे असावे असे समजून तिकडे निघालो. थोडं पुढे गेल्यावर मंदिराचा काही पोस लागेना हे पाहून. पुन्हा एका वाटाड्याला विचारलं.. ते मंदिर चढ संपल्यानंतर उजवीकडे आहे.. हिकडे कुठं आलात तुमी.. असं आपल्या अकलेचे वाभाडे काढून पुन्हा चढावर आलो.. इकडे एक कच्चा रस्ता उजवीकडे जाताना दिसतो. एका बाजूला शेत.. पाणी वाहण्यासाठी केलेला पाट आणि उजवीकडे तुरळक वसती पार करताच उजवीकडे एका पिंपळाच्या झाडाखाली असलेले मंदिर दिसू लागते. झाडाकडे पाहिल्यास एखाद्या घरासारखे पण डावीकडे त्याची हेमाडपंती बांधणी लक्षात येते.
मंदिराच्या दरवाजापाशी आलो तिथे पायरीच्या अलीकडे एका सिहाची भग्न मूर्ती आहे. दरवाजातील चौकटीच्या दुबाजूस तेजस्वी कांतीचे दोन द्वारपाल पाहून थक्क झालो.. एवढी वन-पिस पुरातन मूर्ती मी आजवरच्या महाराष्ट्राच्या भटकंती मध्ये पहिली नव्हती.. मंदिराला वळसा मारीत डावीकडे निघालो आणि एका मागून एक देव समोर प्रगट होवू लागले.. नृसिंह-सरस्वती, लक्ष्मी-नारायण, राधा-कृष्ण, वराहअवतारातील विष्णू, ब्रम्हा, बासरीधारी कृष्ण अशी देवांची महासभाच या केदारेश्वर मंदिराच्या अवतीभिवती भरल्याचे दिसले. बहामनी सत्तेच्या मूर्ती तोडो अभियानातून हे मंदिर बचावल्याचे पाहून आनंद झाला. देवांच्या दिमतीला स्वर्गीय अप्सरांचा खासा राबता होता. मध्येच हिरण्यकश्यपूचा कोथळा बाहेर काढणारा नरसिंह तर एखाद्या जिवंत शिल्पासारखा.. या मुख्य मंदिराच्या एका भिंतीतून लांबून गोमुखासारखी रचना आहे. इकडे नीट पाहिलं तर हा भरजरी कलाकुसर केलेला एक वराहरथ आहे असे दिसले.. या शिल्पातील वराहाच्या पायात तोडे.. गळ्यात पोवळ्याची माळ, मानेवर करकचून लगाम ओढून बसलेला सारथी आणि मागे नक्षीदार मखर असलेली अंबारी.. महाराष्ट्रातील हेमाडपंती मंदिराच्या इतिहासाच्या पुस्तकात हे मंदिर म्हणजे एक सोनेरी पान आहे.. पण सध्या याची अवस्था बघता पुरातत्व खाते हे मंदिर जमीनदोस्त होण्याच्या वाटेवर डोळे लावून बसल्याचे दिसते.. त्यात हे क्षेत्र भूकंपप्रवण असल्याने धिरे का झटका जोरसे लागण्याची शक्यता पाहून लवकरच काही पावले नं उचलल्यास.. बहामनी वरवंट्यातून सहीसलामत सुटलेले हे मंदिर भ्रष्ट शासनाच्या वरवरवंट्याखाली भरडले गेले असे भविष्यात म्हणावे लागेल.. मंदिराच्या भिंतीतून डोकावणारी झुडुपे आणि इतस्त: विखुरलेल्या कोरीव शिळा पाहून मन सुन्न होते.. मग हे सगळं शिल्पवैभव पाहून सभामंडपाकडे निघालो.. सभामंडप मोडकळीस आला असून त्याला आधार देण्यासाठी मि. पुरातत्व ने स्वस्तात अशा कामचलाऊ मस्त भिंती उभारल्या आहेत. आत आलो आणि सभामंडपाची रचना दिसू लागली डावीकडे समयीच्या प्रकाशात उजळून निघालेला केदारेश्वराचे मंदिराचा गाभारा दिसू लागला. या गाभाऱ्या समोर असलेल्या मंडपाच्या छतावर देखणे कोरीव काम आहे. उजवीकडे एका किनाद्यात विराजमान अशी देखणी गणेशमूर्ती आहे. गाभाऱ्याच्या चौकटीला नमस्कार करीत आत प्रवेश केला आणि दुर्गभ्रमंतीचा हा तिसरा दिवस केदारेश्वराच्या चरणी अर्पण केला.
केदारेश्वर मंदिर , धर्मापुरी
खूप दिवसापासून ज्या प्रकल्पाचा विचार चालू होता
त्याला आज सुरुवात झाली. (कोणे एके काळी मराठवाडयात भारतीय संस्कृती आणि
स्थापत्याचे माहेरघर होते .. १९०१ ते १९०२ या काळात कझिन्स या इतिहास अभ्यासकाने
अनेक मंदिरांना भेटी दिल्या होत्या पुढे १९७२ ला डॉ . प्रभाकर देव यांनी या
विषयावर खूप अभ्यासपूर्ण प्रबंध लिहिला आहे. आज त्या मंदिरांची अवस्था काय
आहे तेथील स्थापत्य आणि शिल्पकाम समजून घेणे हा माझ्या भटकंतीमागचा मूळ उद्देश आहे
... त्याची इतरांना माहिती व्हावी असाही प्रयत्न असेलच ... साधारणपणे माहिन्यातून
एक मंदिराला भेट देण्याचे नियोजन आहे ... ) मित्रमंडळी फारसी उत्सुक
नसल्यामुळे आज सकाळी एकटाच बाईकवर स्वार
झालो... रेणापूरला रेणुकादेवीचे दर्शन घेऊन पानगावमार्गे धर्मापुरीला
पोहचलो ... चालुक्य शैलीतील अप्रतिम स्थापत्य व शिल्पकलेचे उदाहरण म्हणजे
येथील केदारेश्वर मंदिर. धर्मापुरी हे गाव अंबेजोगाई- नांदेड रस्त्यावर अंबेजोगाई
पासून ३० किमीवर आहे. ( लातूरहून जात असल्यास रेणापूर ,पानगाव
मार्गे जावे.. एकूण अंतर 6O किमी. ) मंडप, अंतराळ, गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे.
मंदिराच्या बाहय भिंतीवर ६८ मूर्ती कोरलेल्या आहेत .. यात शैव व वैष्णव दोन्ही
प्रकारची शिल्पे आहेत. काली , ब्रह्मा, नरसिंह, वराह, विष्णू या
मूर्ती आहेत तसेच बाहयभिंतीवर एकूण तीन देवकोष्ठ आहेत त्यावरही उत्तम कोरीव काम
आहे . गर्भगृहाच्या बाह्य भिंतीवरच्या देवकोष्ठांमध्ये वासुदेवाची मूर्ती आहे .
दक्षिण आणि उत्तर बाजूच्या देवकोष्ठांत अनुक्रमे केशव आणि नरसिंह यांच्या मूर्ती
आहेत. या गावात खूप अप्रतिम शिल्प लोकांनी आपल्या घराच्या बांधकामासाठी
वापरली आहेत ... एकूणच ऐतिहासिक ठेवा जतन करण्याबाबत आपल्याकडे उदासिनता
पाहावयास मिळते ... त्यातल्या त्यात एक चांगली बातमी म्हणजे पुरातत्त्व
खात्याने या मंदिराच्या जिर्णोदवाराचे काम हाती घेतले आहे आणि तेही मूळ
स्थापत्य शैलीत कोणताही बदल न करता .... हे पाहून खरोखरच खूप आनंद झाला ... तिथेच
झाडाखाली बसून निवांतपणे जेवण केलं... थोडा वेळ वाचन , फोटो
काढले नंतर गावात असलेल्या किल्ल्याला भेट दिली .. तिथे प्रचंड अतिक्रमण आणि
दुरावस्था पाहून उदास मनाने बाहेर पडलो ... परतीचा प्रवास घाटनांदूर, अंबेजोगाई मार्गे लातूर असा केला ... दिवसभरचा एकूण प्रवास १५० कि मी ...
ना थकावट ना रुकावट ...कधी या भागात आलात तर अप्रतिम शिल्पाविष्कार पाहण्यासाठी या
मंदिरास नक्की भेट द्या ....
भाऊसाहेब उमाटे
www.bhausahebumate.com
http://www.bhausahebumate.com/2019/09/temples-in-marathwada-part-1.html
धर्मपुरी
किले की तलहटी में, बीड में जैन मूर्तियों और मंदिरों को खंडित कर दिया
गया-महाराष्ट्र के लगभग हर किले में जैन खंडहर हैं - Channel Mahalaxmi
Channel Mahalaxmi
मराठी जैन क्षत्रियों का महान इतिहास।
धर्मपुरी किले की तलहटी में, बीड में जैन मूर्तियों और मंदिरों को खंडित कर दिया गया है।
#महाराष्ट्र में ऐसे कई किलों में जैन अवशेष बिखरे हुए हैं जो मराठियों को उनके भूले हुए जैन अतीत से अवगत कराते हैं।
महाराष्ट्र के लगभग हर किले में जैन खंडहर हैं और महाराष्ट्र में भारत में सबसे ज्यादा किले हैं
Dharmapuri fort is located very near to Ambajogai. It is on
the road which leads to Ahmedpur from Ambajogai. Directions to the same are available on
Google Maps.
After visiting Nanded Fort, we decided to take rest at
Ambajogai. So we decided to first check out the Govt Guest House, if we could
get a place to stay there, we were lucky to get a place to stay for the night,
at a cost of Rs 400 for two. Dinner was again Chinese cusine at a local streetside
eatery.
Ambajogai, is a small town, which has got provision for
food, hotels,banks and ST bus stand.
It was at Ambajogai Govt Guest House that we learnt that
there is a Fort called Dharmapuri nearby. We were informed that the fort is
around 30 KM from here on the way to Ahmedpur. I immediately started by
research on the internet to check as to the whereabouts and also the looks of
the fort. The fort looked appealing as the fort walls were intact.
 |
| Ambajogai Govt Guest House |
The next morning, Manohar and me had to take a call whether
to see the fort or not, as Dharmapuri Fort is around 30 KM away. But after
exploring the fort, we had to again travel via Ambajogai to reachd Dharur Fort.
Nevertheless we still decided to visit the fort.
Due to a wrong selection of roads, thanks to Google Maps, it
took us little less than 2 hours to reach Dharmapuri Fort, the road was so bad
that we had to drive at speed of 20. It even affected the car suspension.
 |
| That's me below the blue skies |
Finally we were able to see a glimpse of the fort in a distance, the fort bastion
looked amazing. We parked the car in the base village and from there walked up
to the fort. Please note that there is provision for food and water in the
village.
After climbing a series of steps we reached the fort
entrance. There was wild vegetation growing all around the fort and to top it,
the locals also come here for their nature calls. Shameless people.
Not much is known about the history of this fort.
There used to be a Maha Darwaza to enter the fort once apon
a time, currently it is filled with rocks and only a small portion is kept
open, like a Chor Darwaza to enter the fort premises.
It was a small fort
which could be done in around 30 minutes.
There was plenty of wild vegetation
within the fort premises.
Like always we decided to climb on the walls and then try
exploring the fort. As it is a land fort the walls are not very tall in height,
they would have been a storey or two high.
What should I say, the fortification of this fort is intact
from the outside. The bastions are really big and offer a fantastic view of the
surrounding. There is a lake nearby the fort,
we could see women washing clothes by its bay.
On one of the bastions is a "Pir" (Muslim saint or
Holy man). after walking on the fort walls, we decided to get down and explore
the fort in the wild vegetation.
We were able to see this inscription on the fort walls. Not
sure what it meant,a s there were no signboards around. We also saw different
types of stone fitted into the fort walls, these stones didn't belong here and
were bought from elsewhere.
There were two rooms in the fort premises, the entrance to
them was via the Chor Darwaza. Nothing in them. But above the Chor Darwaza was
a inscription on the room wall.
 |
| Manohar and Me standing atop one of the bastions of Dharmapuri Fort located near to Ambajogai in Maharashtra |
There is also a big well in the fort premises, but due to
the thick vegetation, it is a bit difficult to reach it.
After exploring the fort premises, we heard children
screaming, it was then we realized that there was a monkey in the fort and that
the children were trying to get rid of it.
We then headed back to car, to see the last fort on our
itinerary, Dharur Fort. https://merwynsrucksack.blogspot.com/2017/11/dharmapuri-fort-located-near-to.html
महाराष्ट्राचं
शिल्पवैभव सर्वश्रुतच आहे. डोंगराच्या पोटातली लेणी, मंदिरे आणि इतरही
अनेक कोरीव शिल्पे यांचा अनमोल वारसा आपल्याला आपसुकच मिळालाय. अनेक अज्ञात
हातांनी हा स्वर्ग निर्माण केलाय. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य
घटक असलेल्या लेणी, मंदिरे या सर्वानी मराठमोळ्या संस्कृतीला अतिशय समृद्ध
केलंय.
महाराष्ट्राचं शिल्पवैभव
सर्वश्रुतच आहे. डोंगराच्या पोटातली लेणी, मंदिरे आणि इतरही अनेक कोरीव
शिल्पे यांचा अनमोल वारसा आपल्याला आपसुकच मिळालाय. अनेक अज्ञात हातांनी हा
स्वर्ग निर्माण केलाय. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या
लेणी, मंदिरे या सर्वानी मराठमोळ्या संस्कृतीला अतिशय समृद्ध केलंय.
महाराष्ट्रात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात लेण्या आणि काळय़ा दगडातली
हेमाडपंती बांधणीतली सुंदर मंदिरे आढळतात.
मराठवाडय़ात असंच एक शिल्पवैभव
दडलंय, पण पूर्णपणे दुर्लक्षित आणि उपेक्षित. अंबाजोगाई आणि परळी-वैजनाथ
या बीड जिल्ह्य़ातल्या तालुक्यांच्या ठिकाणापासून सारख्याच अंतरावर-
साधारणत: ३० कि.मी. धर्मापुरी नावाचं छोटंसं गाव आहे. मराठवाडय़ातल्या इतर
चार गावांसारखं. एक मुख्य रस्ता आणि त्याच्या दुतर्फा वस्ती. गाव ओलांडून
पलीकडे गेल्यावर मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूला एक छोटं शेत पार केलं की
सामोरं येतं एक सुंदर मंदिर- ‘केदारेश्वर’.
महाराष्ट्रात नांदलेल्या आणि
विस्तारलेल्या काही आद्य राजवटींपैकी ‘चालुक्य’ राजवटीत सुमारे ११ ते १२
व्या शतकात याचं बांधकाम झाल्याचे सांगितले जाते. अतिशय शांत आणि रम्य
परिसर असलेलं हे मंदिर मनाला वेड लावेल असंच आहे.
केदारेश्वर मंदिराची
रचनासुद्धा अतिशय सुंदर आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशा चार
विभागात याचं बांधकाम आहे. मंदिराला पश्चिम, उत्तर आणि दक्षिण अशी तीन
प्रवेशद्वारे आहेत.
आत प्रवेश केल्यावर समोरच लक्षात येतं ते लक्षणीय
कोरीव काम केलेल्या खांबावर तोललेलं सभामंडपाचं बांधकाम, आता बरंच पडझड
झालेलं पण जुना रूबाब राखून असलेलं. सभामंडपात दोन खांबांच्या मध्ये नंदीचे
एक शिल्प ठेवलंय. त्याची मूळ जागा ती नसावी. त्याच्या पाठीमागे एक चौथरा
आहे, त्यावर त्याचं मूळ स्थान असावं. पण कालौघात तो विस्थापित झाला असावा.
बरीचशी विद्रुप झालेली नंदीची ही मूर्ती अजूनही छानच दिसते.
गर्भगृहाच्या
प्रवेशद्वारावरती द्वारशाखा कोरली असून, त्यामध्ये पत्रशाखा, पुष्पशाखा,
व्यालशाखा, स्तंभशाखा आणि इतरही अनेक प्रकारचं भौमितिक नक्षीकाम आहे.
याच्या दोन्ही बाजूस द्वारपाल ज्याचं वैष्णव रचनेशी साम्य आहे ते कोरलेले
आहेत. शंख, चक्र, गदा इत्यादी आयुधं स्पष्टपणे ओळखू येतात. गर्भगृहाच्या
दरवाज्याच्या अलीकडे डाव्या हातास एका कोनाडय़ात गणेशाची एक प्रतिमा कोरलेली
आहे. का कुणास ठाऊक, ही गणेशमूर्ती इतर सर्वासोबत विसंगत वाटते. कदाचित
दरम्यानच्या कालखंडात तिची तेथे प्रतिष्ठापना झाली असावी. आत चौकोनी
गर्भगृहामध्ये पुरातन शिवलिंग आहे. गर्भगृहाच्या छताकडे बघितल्यास
हेमाडपंती रचना लक्षात येते. मंदिराच्या सभामंडपातील स्तंभावरील कोरीव काम
अगदी वाखाणण्यासारखं आहे. फार कमी ठिकाणी आढळणारं कीर्तिमुख प्रकारचं शिल्प
इथं सभामंडपाच्या छतावर आढळतं. मंदिराचा गर्भगृहाचा भाग शाबूत असला तरी
सभामंडप बऱ्याचअंशी मोडकळीला आला आहे. बाहेरच्या बाजूने तर दगडांनी केलेली
सभामंडपाची डागडुजी विशेष करून लक्षात येते.
मंदिराच्या उत्तर
प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला पूर्वी सिंहाकृती असाव्यात. त्यातील एक
समोरच भग्नावस्थेत आढळते. मंदिराच्या बाह्य़ भागावर मानवी रूपातल्या अतिशय
सुंदर आकृती कोरलेल्या आहेत. साधारणत: ३-४ फूट उंचीपर्यंत विशेष कोरीव काम
नाही. परंतु, त्याच्या वरच्या बाजूला असलेलं कोरीव काम अगदी नजर
लागण्याजोगं आहे. गजरथ, विष्णू, शिव, सुरसुंदरी इत्यादी मूर्ती मंदिराच्या
अधिष्ठानावर सुंदररीत्या कोरलेल्या दिसतात. बाह्य़ भागावर असलेल्या
कोनाडय़ांमध्ये उत्तरेला केशव, पूर्वेला शिव आणि दक्षिणेला हिरण्यकश्यपूचा
वध करणारी नरसिंह मूर्ती कोरली आहे. याशिवाय पूर्वेच्या भिंतीवर शिव
मूर्तीच्या बाजूला दाढी अन् तीन मुखे असलेली एक आकृती आहे. ती कदाचित
ब्रह्माची असावी.
मंदिराच्या परिसरातही बरीच शिल्पे इतस्तत: विखुरलेली
आढळतात. त्यात एक शिल्प द्वारपालाचं तर एक हिरण्यकश्यपूचा वध करणारा नरसिंह
आणि त्याच्या बाजूला प्रल्हाद असं आहे.
दुर्लक्षित आणि निगाविरहित असं
हे मंदिर काही प्रमाणात भग्नावस्थेत असलं तरीही उर्वरित भाग मात्र अत्यंत
सुंदर आहे. पुरातत्त्व विभागाचा कुणी कर्मचारी देखरेखीसाठी नसला तरी
त्यांनी मंदिराची माहिती देणारा फलक येथे लावला आहे. या भागातील विशेषत:
अंबाजोगाईच्या आसपास शिव मंदिरांचे एक वैशिष्टय़ आहे. केदारेश्वर, अमलेश्वर,
अमृतेश्वर, कोपरनाथ, बारखांबी महादेव अशा सर्वच मंदिरांना कळस नाही.
धर्मापुरी
गावात एक गढीवजा किल्लासुद्धा आहे. त्याबाबत काही विशेष माहिती मिळत नाही.
परंतु, आतमध्ये एक सुंदर बांधीव विहीर आहे. सुमारे ३०-३५ पायऱ्या उतरून
गेल्यावर आपण विहिरीजवळ पोहोचतो. काळय़ा दगडात संपूर्ण बांधून काढलेली ही
विहीर अष्टकोनी आहे. सध्या वापरात नसल्याने पाणी खराब झालेले आहे. परंतु,
एकंदरीत रचना बघण्यासारखी आहे. किल्ल्यात आत जाण्यासाठी दोन दरवाजे आहेत.
परंतु, एक पूर्णत: तर दुसरा ३-साडेतीन फुटाची जागा सोडून दगडांनी बंद
केलेला आहे.
असं हे दुर्लक्षित शिल्पवैभव आणि किल्ला. अशा बऱ्याच वास्तू
अभ्यासकांच्या पर्यटकांच्या प्रतीक्षेत आपल्या आजूबाजूला आहेत. त्यांचं
जतन आणि संवर्धन वैयक्तिकरीत्या शक्य नसलं तरी त्यांचा शोध घेऊन आणि
इतरांना त्याबद्दल कळवून,
माहिती देऊन आपण त्या दिशेने प्रयत्न तर निश्चितच करू शकतो. बरोबर ना..?
https://www.loksatta.com/trekit/kedareshwar-temple-in-marathwada-999012/
गावाचे नाव :- धर्मापूरी
जिल्हा :- बीड
जवळचे मोठे गाव :- आंबेजोगाई
आंबेजोगाई पासून २७ किमी अंतरावर धर्मापूरी नावाच एक प्राचीन धर्मक्षेत्र आहे. या गावात चालुक्य कालिन प्राचीन केदारेश्वर मंदिर याची साक्ष देत आजही उभ आहे. या गावात मुसलमानी राजवटीच्या काळात किल्ला बांधला गेला. हा किल्ला धर्मापूरीचा किल्ला म्हणून ओळखला जातो. या किल्ला बांधण्यासाठी जे दगड वापरले गेले आहेत त्यात मंदिरांवरील अनेक शिल्प पहायला मिळतात. या वरून या गावात अनेक मंदिरे होती व त्यांचेच दगड वापरून हा किल्ला बांधला गेला. धर्मापूरीचा किल्ला व अप्रतिम कोरीव शिल्पे असलेले केदारेश्वर मंदिर ही दोनही ठिकाण आवर्जून पाहाण्यासारखी आहेत.
केदारेश्वर हे प्राचीन मंदिर गावा बाहेरील शेतात आहे. मंदिराचे छत अस्तित्वात नाही. मंदिरावर अप्रतिम शिल्प कोरलेली आहेत. मंदिराच्या परीसरातही अनेक शिल्प पडलेली आहेत.
आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :-
१) धर्मापूरी पासून २७ किमीवर असलेल्या आंबेजोगाई येथे प्राचीन हिंदू लेणी (हत्तीखाना) व योगेश्वरी मंदिर पहायला मिळते.
२) आंबेजोगाई पासून २५ किमी अंतरावर परळी वैजनाथ हे १२ जोर्तिलिंगापैकी एक जोर्तिलिंग आहे.
३) धर्मापूरी पासून आंबेजोगाई मार्गे ५२ किमीवर धारूर किल्ला आहे.
४) धर्मापूरी पासून किनगाव , अहमदपूर मार्गे ७७ किमीवर उदगीर किल्ला आहे.
जाण्यासाठी :-
१) मुंबई, पुण्याहून आंबेजोगाई जाण्यासाठी थेट बस सेवा आहे. आंबेजोगाई - धर्मापूरी अंतर २७ किमी आहे. खाजगी गाडीने किंवा रिक्षाने धर्मापूरीला जाता येते. वहानानेही थेट किल्ल्याच्या प्रवेशव्दारापर्यंत जाता येते.
२) मुंबई, पुण्याहून लातूर एक्सप्रेसने लातूरला जावे. लातूरहून खाजगी वहानाने किंवा बसने लातूर - आंबेजोगाई हे अंतर ६५ किमी आहे.
३) मुंबई, पुण्याहून रेल्वेने परळी वैजनाथ किंवा परभणी गाठावे. परळी वैजनाथ हे १२ जोर्तिलिंगापैकी एक आहे. परळी वैजनाथ ते आंबेजोगाई २५ किमी व आंबेजोगाई -धर्मापूरी २७ किमी अंतर आहे. परभणी ते आंबेजोगाई ९५ किमी अंतर आहे.
सूचना :-
१) खाजगी वाहानाने आंबेजोगाई मंदिर व लेणी आणि धर्मापूरी किल्ला ही सर्व ठिकाणे एका दिवसात पाहून होतात.
२) उदगिर आणि धारूर किल्ल्याची माहिती साईटवर दिलेली आहे.
Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra
Kedareshwar Mandir :- Village :- Dharmapuri, Dist :- Beed, Nearest city :- Ambajogai
http://trekshitiz.com/discussionboard/_topic184.html
मंदिराचे मुख्य आकर्षण (आणि माझ्या मते, ह्या मंदिराचं पुनर्निमाण होण्यामागचं मुख्य कारण) आहे त्याच्या बाहेरील बाजूस असलेल्या अतिशय देखण्या मूर्त्या. अनेक हातांमध्ये विविध शस्त्रे घेतलेले आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देत उभे असलेले, क्वचित असुराचा वध करताना दिसणारे नाना प्रकारचे देव, अनेक अलंकार ल्यालेल्या सुंदर स्त्रिया, पायात काटा गेल्याने सैरभैर झालेली देखणी युवती आणि तिच्या पायातला काटा काढणारा तिचा नोकर, पावा वाजवणारा युवक, आकर्षक केशरचना केलेली आणि मधाळ हास्यानं आपल्याला घायाळ करणारी कमनीय बांध्याची स्त्री, हातात आंब्याची डहाळी घेतलेली लावण्यवती आणि आंबा समजून तिच्या उरोजावर चोच मारणारा पोपट अशा अनेक एकाहून एक सरस मूर्त्या इथे आहेत. कदाचित कठीण दगडात बनवल्यामुळे असतील, पण बहुतांश मूर्त्या आजही सुस्थितीत आहेत.
ह्या खालील चित्राचे वर्णन करताना विकिपिडीया म्हणतो:
येथील एका पत्रलेखिकेचे शिल्प विलक्षण सुंदर आहे. हे चिरतारुण्ययाने मुसमुसलेले मोहक सौंदर्य पाठमोरे उभे आहे. या शिल्परचनेची कल्पना मोठी काव्यमय आहे. एक सौंदर्यसंपन्न अप्सरा पाठमोरी उभी राहून शिलालेख लिहीत आहे. अशा या मोहक शिल्परचनेच्या चार ओळी पूर्ण झाल्या असून पाचव्या ओळीवर हात थबकला आहे. हा क्षण येथील शिल्पीने आपल्या कलासामर्थ्याने गोठवून ठेवला आहे.
धर्मापुरीच्या बाबतीतही हे झालं. किती वर्षं लागली असतील हे मंदिर बांधायला? ७/८ वर्षं तरी सहज. मंदिर बांधणा-या शिल्पकारांनी तेव्हा इथंच मुक्काम ठोकला असेल - इथंच कुठेतरी बांधलेल्या कच्च्या झोपड्यांत ते राहिले असतील. त्यांची लहान मुलं मंदिराशेजारी खेळली असतील आणि त्यांच्या बायकांनी तिथेच बसून भाक-या रांधल्या असतील. आणि मंदिर पूर्ण झाल्यावर? त्याच्या उद्घाटनाचा सोहळा मंदिराइतकाच भव्य आणि डोळे दिपवणारा झाला असेल. हे मंदिर बांधणारा शिवभक्त राजा मग रोज सकाळी आपल्या घोड्यावर बसून इथं येत असेल आणि शिवलिंगाचं दर्शन घेऊन आपल्या दिवसाची सुरूवात करत असेल. आणि धर्मापुरी? कसे असेल हे धर्मापुरी गाव तेव्हा? विकीपिडिया म्हणतो की “चालुक्य राजवटीतील विक्रमादित्य सहावा याचा पुत्र सोमेश्वर तृतीय याने धर्मापुरी नगरी निर्माण केली. या राजाला साहित्याची आवड होती. त्याने 'अभिलषितार्थ चिंतामणी' (राजमानसोल्लास) या ग्रंथाची निर्मिती केली होती. या धर्मापुरीत सर्व सोयी होत्या. भव्य राजप्रासाद, नृत्यशाळा, तलाव, मनोहारी उद्याने, सुंदर वनराई, उत्तुंग देवालये आणि भव्य बाजारपेठ यांनी ही नगरी सजलेली व गजबजलेली होती.” आज भारतातल्या मोठ्या शहरांचा जो दिमाख आहे, शान आहे, ती कदाचित धर्मापुरीनं तेव्हा अनुभवली असेल. आणि मी राहतो ते पुणं? पुनवडी तेव्हा कदाचित १५/२० झोपड्यांचं छोटंसं गाव असेल. १०० एक लोकसंख्या असलेलं. आज धर्मापुरी कुणाच्या खिजगणतीतही नाही - पण कोण जाणे, ते पुन्हा एकदा उभारी घेईल. राज्यं, माणसं यांबरोबरच शहरं आणि गावं यांचीही नशिबं सतत बदलत असतात. ते म्हणतात ना, Change is the only constant thing in life. कोण जाणे, अजून आठशे वर्षांनी कदाचित धर्मापुरी पुण्याच्या जागी असेल आणि पुणे धर्मापुरीच्या!
No comments:
Post a Comment