रावणाचा छेदिला आंगोठा
तेथे झाला औंढापट्टा
त्रिंबकीच्या बिकटघाटा
अवंढा-पट्टा प्रसिध्द !!
या पट्टा किल्ल्याच्या डोंगरात उगम पावणार्या आढळा नदीच्या काठावर किल्ल्यापासून २५ किमी अंतरावर ‘टाहाकारी’ हे लहानसे गाव आहे. नगर जिल्ह्यातील अकोले तालुका अगदी निसर्गसमृद्ध आहे. घाटमाथ्याला लागून असल्यामुळे भरपूर पाऊस, घनदाट झाडी, दिग्गज गडकोट, भंडारदरा धरण, विविध सुंदर मंदिरे यांनी हा प्रदेश नटलेला आहे. रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर असो की अकोले गावातील सिद्धेश्वर मंदिर असो. ही शिल्पजडीत मंदिरे अत्यंत देखणी आहेत आणि त्यावरील पाषाणात केलेली कलाकुसर मुद्दाम पाहण्याजोगी आहे. याच देखण्या मंदिराच्या पंक्तीमध्ये येते टाहाकारी इथले जगदंबामाता मंदिर ! अहमदनगर जिल्हयातील, अकोले तालुक्यात येणार्या टाहाकारी गावात "जगदंबेचे " प्राचिन मंदिर आहे. मंदिर म्हटल की दंतकथा आलीच. टाहाकारी या नावाची उत्पत्ती खूप रंजक आहे.नाशिक परीसर रामायणाशी संबंधित आहे. त्यामुळे या मंदिराची दंतकथाही रामाशी निगडीत आहे. गावकऱ्यांकडून टाहाकारी या नावाच्या उत्पत्तीबाबत दोन कथा सांगितल्या जातात. हा परिसर रामायणातील दंडकारण्याशी संबंधीत असल्याने येथील कथाही रामायणाशी संबंधित आहे. पहिली कथा म्हणजे रावणाने सीताहरण केले तेव्हा सीतेने रामासाठी जिथे टाहो फोडला ते ठिकाण म्हणजे टाहोकरी नंतर टाहाकारी म्हणून प्रसिद्धीला आले व दुसरी कथा अशी प्रभू राम सीतेचा शोध घेत या परिसरातून जात असता शिव-पार्वती आकाशातून विहार करीत होते. रामाला पत्नीसाठी विलाप करताना पाहून पार्वतीने प्रभू रामचंद्राची परीक्षा घेण्याचे ठरविले. कुणाचा टाहो कानावर पडली की माणसाचे मन हेलावते. ती तर आदीशक्ती, कुणा लढवैय्या पुरूषांला असे रडताना बघून ती देखिल हेलावली. 'हा कुण्या असामान्य व्यक्तीचा विलाप नाही, खुद्द राम सीतेच्या आठवणीने व्याकुळ झालेत', शिवानी समजावले तर पार्वतीला रामाची परिक्षा पाहण्याची हुक्की आली. सीतेचे रूप घेऊन पार्वती रामाला सामोरी गेली पण प्रभू रामचंद्रांनी पार्वतीला ओळखले आणि वंदन केले.
१) मुंबई - नाशिक रस्त्यावर इगतपुरीनंतर - घोटी गाव आहे. घोटी गावतून एक रस्ता सिन्नरला जातो. या रस्त्यावर भंडारदर्याला जाणारा फाटा फुटतो. या भंडारदर्याला जाणार्या रस्त्यावर टाकेद गाव आहे. घोटी पासून टाकेद पर्यंत पोहचण्यास पाऊण तास लागतो. टाकेदहुन टाहाकारीला जाणारा रस्ता आहे. इगतपुरी ते टाहाकारी अंतर ५८ किमी आहे.
२) पट्टा किल्ला मार्गे टाहाकारी :- मुंबई - नाशिक रस्त्यावर इगतपुरीनंतर - घोटी गाव आहे. घोटी गावतून एक रस्ता सिन्नरला जातो. या रस्त्यावर भंडारदर्याला जाणारा फाटा फुटतो. या भंडारदर्याला जाणार्या रस्त्यावर टाकेद गाव आहे. घोटी पासून टाकेद पर्यंत पोहचण्यास पाऊण तास लागतो. टाकेद गावा बाहेर प्राचीन राममंदिर आहे. रामायणातील जटायुने रावणाशी युध्द करुन इथेच प्राण सोडला अशी येथिल लोकांची श्रध्दा आहे. त्यामुळे या मंदिर संकुलात जटायुचे मंदिर सुध्दा आहे. जवळच रामाने जटायुला पाणी पाजण्यासाठी जमिनीत बाण मारुन तयार केलेला झरा व पाण्याचे कुंड आहे. टाकेदहून राम मंदिराला जाणार्या रस्त्यावर उजव्या हाताचा फाटा कोकणवाडी मार्गे पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी जातो. कोकणवाडी ते पट्टावाडी अंतर अर्ध्या तासाचे आहे. पट्टावाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. पट्टावाडी पासुन ठाणगाव मार्गे २५ किलोमीटर वर टाहाकारी गाव आहे.
३) नाशिक सिन्नर- ठाणगांव - टाहाकारी
४) नाशिक सिन्नर - डुबेर - पाडळी - समशेरपुर फाटा - टाहाकारी
५) पुण्यातून इथे यायचे असल्यास पुणे-नाशिक रस्त्यावर संगमनेर शहर आहे.इथून अकोले या तालुक्याच्या गावी जाण्यासाठी परिवहन मंडळाच्या बस तसेच खाजगी वहातुक करणारी वाहने असतात.अकोलेच्या वायव्येला २६ कि.मी. अंतरावर टाहाकारी आहे. पुणे संगमनेर १४७ कि.मी. आहे तर संगमनेर -अकोले २४ कि.मी. आहे.
रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेला दंडकारण्याचा परिसर म्हणून ओळखला जातो. या गावासह सभोवताली असलेले हिरवाईने नटलेले डोंगर गावाची शोभा वाढवितात. या गावाच्या प्रवेशद्वारातच आढळा नदीच्या तीरावर श्री जगदंबा मातेचे मंदिर आहे. श्री जगदंबा मातेचे हे मंदिर संपूर्ण चिर्या॔नी बा॔धलेले आहे. आज अगदी अडगळीत गेल्या सारखे बाजुला पडले असले तरी गतकाळी टाहाकारीत व्यापाराची भरभराट होती. पांथस्तांची ये-जा होती. विश्वास बसणार नाही इतका हा परिसर आज रूक्ष वाटतोय. इथली शेती ओस पडली आहे. आढळा तर पूर्ण आटली-रूसली. आपल्या अमिट सौंदर्याची छाप सोडणारे पुरातन मंदिर, या गावचे कोणे एकेकाळी केवढे मोठे वैभव होते याची साक्ष देत उभे आहे.
![]() |
| पट्टा गडावून १२ कोसाचा प्रवास करून येणारी आढळा नदी |
![]() |
| घाटावरच्या आंबेच्या मंदिराचे अंतराल...पूर्वी यावर कातळात कोरलेले नक्षीदार छत असावे |
![]() |
| आढळा नदीत मंदिराचे अनेक जुने दगड व भग्न मुर्त्या टाकून दिल्या आहेत. |
![]() |
| मंदिराचे प्रवेश द्वार की बंगला? |
![]() |
| ११व्या शतकाचा निर्देश करणारा टाहाकारीचा सगळ्यात महत्वाचा दस्तावेज... |
![]() |
| ''हे आढळा! आमचे काय महत्व! त्यापेक्षा तुला पूर येऊ दे...त्यात आम्हाला वाहून ने'' |
![]() |
| 'आपल्या सर्व वासना बाहेर ठेवून शुद्ध अंतकरणाने मंदिरात प्रवेश करायचा', हा मोक्षप्राप्तीचा संदेश? |
मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. डाव्या व उजव्या स्तंभावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी प्रसूत होणार्या स्त्रीयांचे शिल्प लक्ष्यवेधी ठरते. पुत्रप्राप्तीसाठी आवाहन करणारी मुर्ती, स्त्रीप्रसूत होतानाचे शिल्प आणि लहान बाळासोत असलेली स्त्री, असाहे शिल्प संयोजन म्हणजे कातळात कोरलेल्या कथेचाच एक भाग. कोणी तरी या स्त्रीयांच्या योनीला शेंदूर लावला आहे.
![]() |
| प्रसूत होणारी स्त्री उजव्या कोपर्यातला स्तंभ...अपत्य झाल्यानंतर बालकासोबत. |
![]() |
| प्रसूत होणार्या स्त्रीचे डाव्या बाजूच्या स्तंभावरचे शिल्प |
![]() |
| मंदिराचे छत तोलून धरणारे यक्ष... |
![]() |
| छताचा भाग कोसळू नये या साठी दिलेला चौकोनी कॉंक्रिट खांबांचा आधार |
![]() |
| प्रमाणबद्ध नक्षीकाम...काही खांबांची शिल्प भिंतीवरच्या शिल्पकथेची मेळ खाणारी |
![]() |
| उजेड सहजासहजी पोहोचत नाही अशा ठिकाणी छतावरची सुंदरशी नक्षी |
![]() |
| फरसबंदीच्या एका दगडावर रॉकेट सदृष्य तीन आकृत्या कोरण्यात आल्या आहेत... |
![]() |
| सजधजणार्या सुरसूंदरी |
![]() |
| बाह्य भिंतीवर सुंरसुंदरींची देखण्या शिल्पांची मालिका |
![]() |
| मध्यभागी लहान ढोल वाजविणारी सूरसुंदरी |
![]() |
| डावीकडच्या सुरसुंदरीचा वैशिष्ट्यपूर्ण पेहेराव... |
मंदिराचा अंतर्भाग पाहुन मंदिराला बाहेरुन प्रदक्षिणा घालायला सुरुवात केल्यावर अनेक कोनात दुमडलेला बाह्यभाग समोर येतो. यामुळे निर्माण झालेल्या कोनाड्यांमधे सुरसुंदरींच्या मुर्ती बसवलेल्या आहेत. कधी आरशात स्वत:चे सौंदर्य पाहणाऱ्या, कर्णभूषणे घालणाऱ्या, केसात गजरा घालणाऱ्या, केशशृंगार करणाऱ्या अशा दर्पणा, तर कुठे नृत्य करणारी नृत्यसुंदरी, बासरी, मृदंग वादन करणारी, हाती पोपट घेतलेली शुकसारिका, मुलाला घेतलेली मातृमूर्ती, मांडीवर विंचू असणारी विषकन्या, डोक्यावर छत्र धारण केलेली, मर्कट लीलांनी हैराण झालेली अशा अनेक सुरसुंदरींच्या मूर्ती आहेत. एका सुंदरीच्या अंगावर आज दिसतो तसा गाऊन किंवा पाश्चात्य पद्दतीच्या कोट सारखा पेहेराव दिसतो, विशेष म्हणजे तो दगडात उत्तमरित्या कोरण्यात आला आहे. अत्यंत विलोभनीय अशा या सगळ्या प्रतिमा आहेत.सुरसुंदरीची ही शिल्पांकने इथे टाहाकारीच्या भवानी मंदिरात आवर्जून पाहावीत अशी आहेत.
![]() |
| हेन्री कझीन्सने मंदिरातल्या ज्या स्तंभावर शिलेलाख बघितला तो स्तंभ घाटावर उन वारा पाऊस खात उभा |
![]() |
| कपडे धुण्यासाठी आढळेच्या डब्यातले साबण मिश्रीत पाणी पुन्हा पुन्हा वापरायचे |
![]() |
| तीन मंदिरांचा समूह...आढळा नदीवरचा जुना मोठा घाट |
![]() |
| घाटावरचे आंबाबाईचे मंदिर, याच्याच डाव्याबाजूला शेषनागाचे पुर्णपणे उध्वस्त झालेले मंदिर आहे. |
|
संदर्भ :-
१) नाशिक जिल्हा गॅझेटीयर
२) www.durgbharai.in हि वेबसाईट
३) स्थापत्य - महाराष्ट्र शासन
४) http://www.pankajz.in हा ब्लॉग
५) https://www.discovermh.com
६) http://bhimashankarsahane.blogspot.com
७) आशुतोष बापट यांचे लिखाण
८) http://prashantpardeshi.blogspot.com
पुढचा टप्पा होता ताहाकारी जगदंबा मंदिर. देवठाणमार्गे ताहाकारीला जाणारा रस्ता तसा थोडा खराबच होता. त्यात आता ऊनही चढायला लागले होते. देवठाण-सावरगावपाटच्या दरम्यान डावीकडे एक सुंदर जलाशय दिसला. हिवाळ्यात सोनेरी झालेली गवताळ कुरणे, काढणीला तयार असलेल्या गव्हाची शेते आणि त्यांच्या पलीकडे निळाशार जलाशय डोळे निववत होता. त्या जलाशयापासून वीसच मिनिटांवर ताहाकारी समोर दिसू लागले. मंदिर मोठे सुरेख. या मेगाराईडसाठी ध्रुवने जागाच अशा शोधून काढल्या होत्या की हरएक मंदिर पाहताना डोळ्यांचे पारणे फिटावे. पण या मंदिरात मात्र तथाकथित जीर्णोद्धराच्या नावाखाली गावातल्या प्रगतीशील (?) कारभार्यांनी कॉंक्रीटचे खांब आणि वरुन तसलेच घुमट उभारले होते. त्यामुळे गावात शिरताना ’आढळा’ नदीच्या अलीकडून पाहूनही हीच ती मंदिरे अशी खात्री पटत नव्हती. बाईक्स पार्क करुन आधी थंड पाण्याने शिणवटा घालवला आणि मंदिरात प्रवेशते झालो. मंदिर मोठे नेत्रदीपक होते. चोहोबाजूंनी शिलाखंडांनी बांधलेल्या पुरुषभर उंचीच्या भिंतींनी आवार बंदिस्त केलेले होते.
रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेला दंडकारण्याचा परिसर म्हणून ओळखला जातो. या गावासह सभोवताली असलेले हिरवाईने नटलेले डोंगर गावाची शोभा वाढवितात. या गावाच्या प्रवेशद्वारातच आढळा नदीच्या तीरावर श्री जगदंबा मातेचे मंदिर आहे. श्री जगदंबा मातेचे हे मंदिर संपूर्ण चिर्या॔नी बा॔धलेले आहे. ह्या मंदिराची बा॔धणी हेमाडपंथी पध्दतीची असून मंदिरा बाहत्तर दगडी खा॔ब आणि पाच कळस आहेत. मंदिराच्या बाहेरील भि॔तीवर शिल्पे कोरलेली आहेत.
मंदिरात प्रवेश करताच समोर श्री जगदंबा मातेच्या उभ्या मुर्तींचे दर्शन घडते. श्री जगदंबा मातेची मुर्तीं संपूर्ण लाकडात कोरलेली आहे. या देवीच्या मुर्तींला अठरा हात आहेत आणि याहाता॔मध्ये विविध प्रकारची आयुधे आहेत. या मुर्तींचे वैशिष्ट असे की, श्री जगदंबा माता वाघावर आरूढ असून ‘महिषासुरमर्दनाचा’ देखावा येथे सादर केला आहे. मूळ मुर्तींच्या पुढे ता॔दळारूपी देवीची स्थापना केलेली आढळते. मंदिराच्या गाभार्यात दोन्ही बाजूस-पूर्वस महालक्ष्मी आणि पश्चिमेस भद्रकाली (महाकाली) अशा देवीच्या सुबक मुर्तीं आहेत. हे मंदिर यादव कालीन असल्याचे म्हटले जाते. एका ब्रिटिश छायाचित्रकाराने (हेनरी कौन्से) इ.स. १८८० रोजी काढलेले मंदिराचे छायाचित्र संकेतस्थळावर उपलब्घ आहे. मंदिराचा मुळ कळस तोडून पाच नवीन कळस बा॔धल्याचे दिसते (संदर्भ).
सभामंडपाच्या छताचा मी आजवर पाहिलेला महाराष्ट्रातील सर्वोत्तम नमुना. आठ व्याल आणि स्त्रीरुपातील अष्टदिक्पालांनी तोलून धरलेलं छत. छताच्या मधोमध दगडात कोरलेलं आश्चर्य म्हणजे लटकते दगडी एकसंध झुंबर. आजही उत्तम अवस्थेत आहे. सभामंडपाच्या बाह्यभागात बरीच मैथुनशिल्पे कोरलेली असून मंदिरसमूहाच्या बाह्यभिंतींवर देवादिकांची अतिशय प्रमाणबद्ध शिल्पे आढळतात. मंदिराची आधीची शिखरे विटांमध्ये बांधली असल्याने कालौघात ती नामशेष झाली आणि त्यावर सध्याची कॉंक्रीटची बेढब शिखरे चढवली गेली. मंदिराच्या भागातले ऑईलपेंटचे रंगकाम पदोपदी दाताखाली मिठाचा खडा चावला जावा असे नजरेत खुपते. परंतु सध्या पुरातत्त्वखात्याने मंदिर ताब्यात घेतल्याने पुढील कॉंक्रिटीकरण थांबले आहे ही त्यातल्या त्यात जमेची बाजू समजायची.
http://www.pankajz.in/2016/08/TempleRide-1.html
चार स्तंभ आणि दोन स्तंभाच्या पलिकडे अंतराल आहे. अंतराळाला आयताकृती छत असून त्यात मधोमध छोटा घुमट आहे. अंतराळाच्या मागे चौरसाकृती गर्भगृह असून त्यात मधोमध छोटा घुमट आहे. गर्भगृहात मुर्तीकरता पीठ आहे. दोन उपगर्भगृहामध्येही अशीच पिठे आहेत.
मंदीराचा अंतर्भाग शिल्पकलेने समृध्द असला तरी बाह्य भाग मात्र साधा आहे.खाली मध्यम आकाराचे पीठ असून त्यावर साधी सपाट जंगा आहे. पीठामध्ये तीन थर आहेत. सर्वात वरच्या थरामध्ये चौकटची नक्षी आहे. त्यावर कपोताली, कलश आणि मंची आहे. मंडोवराच्या खालच्या थरानंतर साध्या सपाट जंगा भागाला प्रारंभ होतो. या प्रकारच्या जंघेला शिल्प संहितेमध्ये 'शुध्द जंगा' असे म्हणतात.जंघाभागामध्ये नक्षीकाम नसले तरी गर्भगृहाच्या तीन भद्रावर म्हणजे बाह्यभिंतीच्या सपाट भागावर तीन देवकोष्ठे असून त्यात मुर्ती आहेत. तर बाह्यभिंतीमध्ये खोलगट भागात म्हणजे सलीलांतरात जंघा भागात अप्सरांच्या मुर्ती आहेत. फक्त मंडपाच्या बाजुंना असलेल्या गर्भगृहांना आणि अंतराळाच्या बाह्य अंगावर मंजिरी आढळतात.मात्र अन्य ठिकाणी त्या दिसत नाहीत.
मंडपाच्या मुख्य स्तंभावर खांबाच्या चारही बाजुला शिल्प आहेत. स्तंभावर कीचकहस्त आहेत. याउलट अर्धस्तंभ आणि चर्तुथक स्तंभ तुलनेने साधे असून त्यावर कोणतीही शिल्पे नाहीत. या स्तंभावर नागशीर्षेहस्त आहेत.भद्रावरील देवकोष्टात असलेल्या मुर्ती, मंडोवरावर मोठ्या प्रमाणात असलेल्या स्त्रीमुर्ती, तिन्ही गर्भगृहामध्ये आढळणारा कट्टा किंवा पदस्थल आणि परंपरेने चालत आलेले 'भवानी मंदीर' हे नाव इत्यादी बाबीवरुन हे देवीचे मंदीर असावे याचा अंदाज येतो. या तिन्ही गर्भगृहामध्ये महासरस्वती, महाकाली आणि महालक्ष्मीच्या मुर्ती असाव्यात. कोल्हापुरचा महालक्ष्मी संप्रदाय त्याकाळी चांगला फोफावला होता. टाहाकारी कदाचित त्या पंथाचे केंद्र असावे.
छतावरील आणि मुखमंडपावरील शिल्पकला, स्तंभप्रकार आणि मंडपाच्या बाजुंच्या गर्भगृहाची असलेली द्रविडी जंघा आणि शिल्पशैली हि वैशिष्ट्ये विचारात घेता हे मंदीर इ.स. १२ व्या शतकाच्या सुरवातील बांधले गेले असावे.
महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात अनेक छोट्या गावात प्राचिन कलाकुसर केलेली मंदिर आहेत. एकेकाळी त्याकाळच्या व्यापारी मार्गावर बांधलेली ही मंदिर आज आडबाजुला पडली आहेत. प्राचिन काळी घाटवाटांचे/ व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी ज्याप्रमाणे किल्ले बांधले गेले तशीच त्याकाळच्या राज्यकर्त्यांनी या मार्गांवर मंदिरांचीही निर्मिती केली. या मार्गांवरुन प्रवास करणार्या व्यापारी तांड्यांची, पांथस्थांची विश्रांतीची राहाण्याची सोय या मंदिरात होत असे. व्यापार्यांनी केलेल्या दानामुळे या मंदिरांचा दैनंदिन खर्च आणि डागडुजीची कामे होत अशी परस्पर पूरक रचना होती. इसवी सनाच्या बाराव्या शतकात टाहाकारीच्या मंदिराची निर्मिती यादव वंशीय राजांनी केली असावी.
जगदंबामाता मंदिर, टाहाकारी, अकोले | Discover Maharashtra

जगदंबामाता मंदिर, टाहाकारी, अकोले –
नगर जिल्ह्यातील अकोले तालुका अगदी निसर्गसमृद्ध आहे. घाटमाथ्याला लागून असल्यामुळे भरपूर पाऊस, घनदाट झाडी, दिग्गज गडकोट, भंडारदरा धरण, विविध सुंदर मंदिरे यांनी हा प्रदेश नटलेला आहे. रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर असो की अकोले गावातील सिद्धेश्वर मंदिर असो. ही शिल्पजडीत मंदिरे अत्यंत देखणी आहेत आणि त्यावरील पाषाणात केलेली कलाकुसर मुद्दाम पाहण्याजोगी आहे. याच देखण्या मंदिराच्या पंक्तीमध्ये येते टाहाकारी इथले जगदंबामाता मंदिर. टाहाकारी या नावाची उत्पत्ती खूप रंजक आहे. रावणाने सीताहरण केले तेव्हा सीतेने रामाच्या नावाने याच ठिकाणी ‘टाहो’ फोडला. तिने जिथे टाहो केला ते ठिकाण ‘टाहोकारी’ अर्थात ‘टाहाकारी’ म्हणून प्रसिद्धीला आले अशी या नावामागची कथा सांगितली जाते.
अकोलेच्या वायव्येला २६ कि.मी. अंतरावर असलेले हे अत्यंत देखणे, शिल्पजडीत यादवकालीन मंदिर आढळा नदीच्या काठावर वसलेले आहे. तीन गाभारे असलेले हे त्रिदल प्रकारातील मंदिर आहे. गाभाऱ्यांना एक सामायिक सभामंडप आहे. मुख्य गर्भगृहात वाघावर आरुढ झालेल्या अठरा हाताच्या महिषासुरमर्दिनीची लाकडी मूर्ती आहे. अत्यंत प्रसन्न आणि देखण्या अशा या मूर्तीच्या हातामध्ये विविध आयुधे दाखवलेली दिसतात. या मूर्तीच्या पुढे देवीचा एक तांदळा असून त्यावर चांदीचा मुखवटा दिसतो. मुख्य गर्भगृहाची द्वारशाखा अत्यंत देखणी आहे. मंदिराच्या उर्वरित दोन गर्भगृहात पूर्वेला महालक्ष्मी व पश्चिमेला महाकाली च्या सुंदर मूर्ती दिसतात.
मंदिराचा सभामंडप अनेक नक्षीदार स्तंभानी नटलेला आहे. प्रत्येक स्तंभावर विविध प्रकारची नक्षी, शिल्पे, कीर्तिमुख, लज्जागौरी तसेच भौमितिक आकृत्या कोरलेल्या आहेत. या सभामंडपाचे वितान आठ दिशेला आठ पुत्तलिकांनी म्हजेच स्त्रियांनी तोलून धरलेले दाखवले आहे. मुखमंडपाच्या बाह्य भागावर आपल्याला मिथुन शिल्पे दिसतात. मंदिराच्या बाह्य भागावर सुरसुंदरी म्हणजेच अप्सरांची अप्रतिम शिल्पांकने आहेत. सुरसुंदरीची ही शिल्पांकने इथे टाहाकारीच्या भवानी मंदिरात आवर्जून पाहावीत अशी आहेत.
Rohan Gadekar
टाहकारी मंदीर
प्रकार : प्राचीन देवीमंदीर
जिल्हा : अहमदनगर
महाराष्ट्रात शैव, वैष्णव पंथांच्या खालोखाल शाक्त पंथाचा प्रसारही प्राचीन
काळापासून झालेला आहे. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी तर
माहूरगडची रेणुका ही प्राचीन शक्तिस्थाने याची साक्ष देतात. याच प्राचीन
मंदीरातील एक मंदीर म्हणजे टाहाकारीचे जगदंबा मंदीर. अहमदनगर जिल्ह्याचे
काश्मीर म्हणून ओळखला जाणा-या अकोले तालुक्यात प्राचीन व कलाकुसरयुक्त अनेक
मंदिरे आहेत. अगदी प्राचीन काळापासून येथे राज्य करणाऱ्या विविध
राजसत्तांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात लेण्या, दुर्ग व मंदिरे यांची
साखळी निर्माण केली. एकेकाळच्या व्यापारी मार्गावर बांधलेली ही मंदिरे आज
आडबाजूला पडली आहेत. प्राचीन काळी व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी
ज्याप्रमाणे किल्ले बांधले गेले त्याप्रमाणे या मार्गावर मंदिरांचीही
निर्मिती केली. यातील अप्रतिम कलाकुसरीची अनेक मंदिरे आजही दिमाखात उभी
आहेत. असेच एक सुंदर कातळशिल्प म्हणजे टाहाकारीचं जगदंबा मंदिर.
अकोल्याहून समशेरपूरमार्गे साधारण वीस कि.मी. तर सिन्नरहून ठाणगाव मार्गे
तीस कि.मी.वर आढळा नदीच्या काठावर टाहाकारी हे लहानसे गाव आहे. या
टाहाकारी गावात हे जगदंबेचे प्राचीन मंदिर आहे. गावकऱ्यांकडून टाहाकारी या
नावाच्या उत्पत्तीबाबत दोन कथा सांगितल्या जातात. हा परिसर रामायणातील
दंडकारण्याशी संबंधीत असल्याने येथील कथाही रामायणाशी संबंधित आहे. पहिली
कथा म्हणजे रावणाने सीताहरण केले तेव्हा सीतेने रामासाठी जिथे टाहो फोडला
ते ठिकाण म्हणजे टाहोकरी नंतर टाहाकारी म्हणून प्रसिद्धीला आले व दुसरी कथा
अशी प्रभू राम सीतेचा शोध घेत या परिसरातून जात असता शिव-पार्वती आकाशातून
विहार करीत होते. रामाला पत्नीसाठी विलाप करताना पाहून पार्वतीने प्रभू
रामचंद्राची परीक्षा घेण्याचे ठरविले. सीतेचे रूप घेऊन पार्वती रामाला
सामोरी गेली पण प्रभू रामचंद्रांनी पार्वतीला ओळखले आणि वंदन केले. तेव्हा
पार्वती आपल्या मूळ जगदंबा रूपात येथे प्रगटली. तेथे हे जगदंबा मंदिर
बांधले गेले. टाहाकारी गावातील आढळा नदीवरील पूल ओलांडल्यावर मंदिराचे तीन
पांढरे कळस दिसायला लागतात. मंदिराजवळ पोहोचल्यावर मंदिराभोवती असलेली सात
फूट उंच तटबंदी दिसते. तटबंदीतील पूर्व दरवाजातून आपला मंदिराच्या
प्रांगणात प्रवेश होतो. टाहाकारीचे मंदिर भूमीज पद्धतीचे असुन उत्तराभिमुख
आहे. या मंदिराचे मुख मंडप, मंडप, अंतराळ व गर्भगृह असे चार भाग आहेत.
मंदिर चार फूट उंच दगडी जोत्यावर उभे आहे. जोत्यावर पुष्पपट्टी आणि
पद्मपट्टी कोरलेली आहे. मंदिराचा मुखमंडप १० खांबांवर आधारलेला असुन या
मुखमंडपात भिंतीलगत दगडी आसनांची रचना केलेली आहे. मुखमंडपाच्या सज्जावर
वेगवेगळी शिल्पे कोरलेली असुन त्यात मैथुन शिल्पेही आहेत. मुखमंडपातून
सभामंडपात आल्यावर मंदिराचा अंतर्गत विस्तार जाणवतो. बारा खांबांवर आधारित
हा मंडप असुन समोरच खांबाला टेकवून शंकर-पार्वतीची व गणपतीची मुर्ती आहे.
खांबांवर विविध प्रकारची नक्षी, शिल्पे, कीर्तिमुख, भौमीतिक आकृत्या
कोरलेल्या असुन खांबांच्या टोकाला छत तोलणारे यक्ष कोरलेले आहेत.
सभामंडपाच्या छताला एकात एक गुंफलेली वर्तुळे व मध्यभागातून खाली लोंबणारे
दगडी झुंबर अप्रतिम आहे. या वर्तुळाकार कोरीव कामात फूल, सिंह आणि आठ
अप्सरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या सभामंडपाला पूर्व, पश्चिम व
दक्षिण या तीन दिशेला तीन गर्भगृहे आहेत. या रचनेला त्रिदल रचना म्हणतात.
मुख्य गर्भगृह आणि सभामंडप यांच्या मध्ये अंतराळ आहे. अंतराळात काही
देवकोष्टेही आहेत. मुख्य गर्भगृहाच्या दरवाजावर सुंदर नक्षीकाम केले असून
शीर्षपट्टीवर देवीची संकेतमूर्ती आहे. गर्भगृहात देवीचा तांदळा आणि अठरा
हातांच्या जगदंबेची लाकडी मूर्ती आहे. अत्यंत प्रसन्न आणि देखण्या अशा या
मूर्तीच्या हातामध्ये विविध आयुधे दाखवलेली आहेत. श्री जगदंबा माता वाघावर
आरूढ असून महिषासुरमर्दिनी अवतारात आहे. सभामंडपाच्या दोन बाजूंस असलेल्या
गर्भगृहात पूर्वेस महालक्ष्मी तर पश्चिमेस भद्रकाली देवीची मूर्ती आहे. या
गर्भगृहाच्या बाहेरील भिंतीवर उजव्या बाजुस कामाक्षी देवीचे शिल्प तर
डाव्या बाजुस कुबेराचे शिल्प कोरले आहे. मंदिराचा अंतर्भाग पाहून मंदिराला
बाहेरून प्रदक्षिणा घालायला सुरुवात केल्यावर अनेक कोनांत दुमडलेला
मंदिराचा बाह्य़भाग दिसतो. मंदिराची बाह्य़रचना तारकाकृती असुन भिंतीच्या
बाह्य़ भागावर आणि खांबांवर मोठया प्रमाणावर कोरीव काम केलेले आहे.
मंदिराच्या बाह्यांगावर दुमडलेल्या भिंतीच्या मध्यावर २२ प्रकारच्या
सुरसुंदरींच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. सुरसुंदरी म्हणजे देवांगना.
देवांच्या खालोखाल यांचा मान. टाहाकारी मंदिराचे हे मुख्य आकर्षण असुन
त्यांच्या रचना शैलीतून तत्कालीन कलासौंदर्याचे अनेक आविष्कार उलगडतात. कधी
आरशात स्वत:चे सौंदर्य पाहणाऱ्या, कर्णभूषणे घालणाऱ्या, केसात गजरा
घालणाऱ्या, केशशृंगार करणाऱ्या अशा दर्पणा, तर कुठे नृत्य करणारी
नृत्यसुंदरी, बासरी, मृदंग वादन करणारी, हाती पोपट घेतलेली शुकसारिका,
मुलाला घेतलेली मातृमूर्ती, मांडीवर विंचू असणारी विषकन्या, डोक्यावर छत्र
धारण केलेली, मर्कट लीलांनी हैराण झालेली अशा अनेक सुरसुंदरींच्या मूर्ती
आहेत. एका सुंदरीच्या अंगामध्ये विदेशी पद्धतीचा कोट घातलेला स्पष्टपणे
दिसतो. मंदिर प्रदक्षिणा सुरू केल्यावर पूर्वेकडील भिंतीवर कोरलेली गणपतीची
मूर्ती पाहायला मिळते. पूर्वेकडील गर्भगृहामागील देवकोष्टात चामुंडेची
मूर्ती आहे. चामुंडा हे देवीचं क्रूर रूप आहे. हडकुळं शरीर, पोटावर विंचू,
गळ्यात मुंडमाळा, हातातल्या दंडावरची कवटी, डाव्या हाताच्या करंगळीचे नख
कुरतडताना ही मूर्ती दाखवलेली आहे. या देवकोष्टकाखाली गर्भगृहातील पाणी
जाण्याच्या पन्हाळीवर मकरमुख कोरलेलं आहे. त्यावरील नक्षीकाम अप्रतिम आहे.
मुख्य गर्भगृहामागील देवकोष्टात नृत्य करणाऱ्या शंकराची मूर्ती कोरलेली
आहे. त्याच्या पायाशी डमरू वाजवणारा गण तर डाव्या कोपऱ्यात बासरी वाजवणारा
गण कोरला आहे. या कोष्टाच्या महिरपीवर ब्रह्मा, विष्णू, महेश कोरलेले
आहेत. पश्चिमेकडच्या गर्भगृहाच्या मागील देवकोष्टात डमरू, तलवार आणि
त्रिशूळ घेतलेल्या शंकराची मूर्ती कोरण्यात आलेली आहे. मूर्तीचा एक हात
तुटलेला आहे. मंदिरासमोरील नदीच्या घाटाच्या पायऱ्यांवर एक कोरीव खांब आहे.
त्यावर एक संस्कृत शिलालेख असून त्यामध्ये शके १०५० म्हणजेच इ.स. ११२८ असा
उल्लेख सापडतो. हा शिलालेख पुसट झाल्याने आता वाचता येत नाही. खांबाच्या
बाजूला शेषनागाचे एक पडकं मंदिर असुन मंदिराबाहेर समाधीचे दोन फूट उंचीचे
अष्टकोनी दगड आहेत. त्यावर पावले शिवलिंग आणि नंदी कोरला आहे. मंदिर
परिसरातील झाडी, जवळून वाहणारी नदी यामुळे हा परिसर रम्य झालेला आहे.
चैत्रामध्ये देवीची मोठी यात्रा भरते तर नवरात्रीत एकूण बारा दिवस इथे
मोठा उत्सव केला जातो. मंदीर नीटपणे पहायचे असल्यास या काळात येथे जाणे
टाळावे. येथील स्थानिक जनतेला या कलेचं भान व ज्ञान नसल्याने हजार वर्षे
प्राचीन असलेल्या या कोरीव मंदिराचे ऐतिहासिक मोल पार धुळीस मिळत असले तरी
टाहाकारी मंदिर आवर्जून पाहण्यासारखेच आहे. --------------(टिप—सदर
मंदिराच्या मुर्तींची माहीती श्री.अनिल शिरसाट यांनी दिलेली असुन शब्दांकन
श्री. सुरेश निंबाळकर यांनी केले आहे.)
© Suresh Nimbalkar
हेमाडपंथी जगदंबा मंदिर : टाहाकारी, अकोले
पट्टा किल्ल्याच्या डोंगरात उगम पावणाऱ्या आढळा नदीच्या काठावर किल्ल्यापासून २५ किमी अंतरावर ‘टाहाकारी’ हे लहानसे गाव आहे.
राम सीतेच्या शोधात भटकत असताना पार्वती त्याची परीक्षा घेते ही आख्यायिका टाहाकारी गावाजवळ असलेल्या या जगदंबा मंदिराशी जोडलेली आहे. हेमाडपंथी शैलीतलं हे मंदिर पाहन्यासारखे आहे. इसवी सनच्या बाराव्या शतकात टाहाकारीच्या मंदिराची निर्मिती यादव वंशीय राजांनी केली असावी.
सह्यद्रीच्या उत्तर-दक्षिण रांगेची सुरुवात इगतपुरी परिसरातून थळ (कसारा) घाटाच्या पूर्वेकडे जाते. याच रांगेला ‘कळसूबाई रांग’ म्हणतात. याच रांगेच्या पश्चिमेकडे अलंग, मदन, कळसूबाई तर पूर्वेकडे औंढा, पट्टा, बितनगड, आड हे किल्ले आहेत. श्री एकनाथ महाराजकृत श्री भावार्थ रामायणाच्या अरण्यकांडात या पुरातन अवंध व पट्टा किल्ल्यांच्या परिसराचा उल्लेख आढळतो.
अहमदनगर जिल्ह्य़ातील, अकोले तालुक्यात येणाऱ्या टाहाकारी गावात ‘जगदंबेचे’ प्राचीन मंदिर आहे. मंदिर म्हटलं की दंतकथा आलीच. नाशिक परिसर रामायणाशी संबंधित आहे. त्यामुळे या मंदिराची दंतकथाही रामाशी निगडित आहे. प्रभू श्रीराम सीतेचा शोध घेत या परिसरातून जात होते. सीतेच्या विरहाने व्याकूळ होऊन श्रीराम विलाप करीत होते. त्याच वेळी शिव-पार्वती आकाशातून विहार करीत होते. त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रांना व्याकूळ झालेल्या अवस्थेत पाहिले. श्रीरामाला पत्नीसाठी विलाप करताना पाहून माता पार्वतीने प्रभू श्रीरामचंद्राची परीक्षा घेण्याचे ठरविले. सीतेचे रूप घेऊन पार्वती रामाला सामोरी गेली. प्रभू श्रीरामचंद्रांनी सीतेच्या रूपातील पार्वती मातेला ओळखले आणि तिला वंदन केले. तेव्हा माता पार्वती खजील होऊन येथेच अंतर्धान पावली आणि श्री जगदंबा रूपाने पुन्हा प्रगटली. तेथेच आता जगदंबेचे मंदिर बांधलेले आहे.
आढळा नदीवरील टाहाकारी मंदिर तीन पांढरे कळस असलेले आणि मंदिराभोवती असलेली सात फूट उंच तटबंदी दिसते. तटबंदीतील पूर्व दरवाजातून आपला मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिराची बांधणी हेमाडपंथी पद्धतीची आहे. या प्रकारात चुन्याचा वापर न करता मंदिराचे दगड एकमेकांत अडकवले जातात.
टाहाकारीचे हेमाडपंथी मंदिर भूमीज पद्धतीचे आहे. या मंदिराचे मुख मंडप, मंडप, अंतराळ व गर्भगृह असे चार भाग आहेत. मंदिर चार फूट उंच दगडी जोत्यावर (ज्याला ‘अधिष्ठान’ म्हणतात) उभे आहे. जोत्यावर पुष्प पट्टी आणि पद्म पट्टी कोरलेली आहे, मंदिराच्या मुख मंडपाच्या सज्जावर वेगवेगळी शिल्पे कोरलेली आहेत, त्यात मैथुन शिल्पेही आहेत. मुख मंडपातून सभामंडपात शिरल्यावर समोरच खांबाला टेकवून ठेवलेल्या दोन मूर्ती दिसतात. त्यातील एक शंकर-पार्वतीची आहे, तर दुसरी गणपतीची आहे. मंदिराचे छत ७२ खांबांवर तोललेले आहे. खांबांवर विविध प्रकारची नक्षी, शिल्पे, कीर्तिमुख, भौमित्तिक आकृत्या काढलेल्या आहेत. खांबांच्या टोकाला छत तोलणारे यक्ष कोरलेले आहेत. मुख्य मंडपाच्या छतावरचे वर्तुळाकार नक्षीकाम अप्रतिम आहे. या वर्तुळाकार कोरीव कामात फूल, सिंह आणि आठ अप्सरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या सभामंडपाच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण या तीन बाजूंस तीन गर्भगृहे आहेत. या रचनेला त्रिदल रचना म्हणतात. मुख्य गर्भगृह आणि सभामंडप यांच्या मध्ये अंतराळ आहे.
मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. गर्भगृहात देवीचा तांदळा आणि जगदंबेची अठरा भुजा असलेली काष्ठमूर्ती आहे. देवीच्या हातांमध्ये विविध प्रकारची आयुधे आहेत. श्री जगदंबा माता वाघावर आरूढ असून ‘महिषासुरमर्दनिीच्या’ अवतारात आहे. सभामंडपाच्या दोन बाजूंस असलेल्या गर्भगृहात पूर्वेस महालक्ष्मी आणि पश्चिमेस भद्रकाली (महाकाली) देवीच्या सुबक मूर्ती आहेत.
मंदिराचा अंतर्भाग पाहून झाल्यावर मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा घालायला सुरुवात केल्यावर अनेक कोनांत दुमडलेला बाह्य़भाग समोर येतो. यामुळे निर्माण झालेल्या कोनाडय़ांमध्ये सुरसुंदरींच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. यात शुकसारिका, नृत्य करणारी, वादन करणारी, शस्त्र धारण केलेली इत्यादी अनेक प्रकारच्या सुरसुंदरींच्या मूर्ती आहेत. मंदिर प्रदक्षिणा सुरू केल्यावर पूर्वेकडील भिंतीवर कोरलेली गजाननाची मूर्ती पाहायला मिळते. पूर्वेकडील गर्भगृहामागील देवकोष्टात चामुंडेची मूर्ती आहे. चामुंडा हे देवीचं क्रूर रूप आहे. हडकुळं शरीर, पोटावर विंचू, गळ्यात मुंडमाळा, हातातल्या दंडावरची कवटी, डाव्या हाताच्या करंगळीचे नख कुरतडताना दाखवलेली ही मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते. या देवकोष्टकाखाली गर्भगृहातील पाणी जाण्यासाठी पन्हाळी आहे. तिथे नेहमीप्रमाणे गोमुख न कोरता मकरमुख कोरलेलं आहे. त्यावरील नक्षीकाम अप्रतिम आहे.
मुख्य गर्भगृहामागील देवकोष्टात नृत्य करणाऱ्या शंकराची मूर्ती कोरलेली आहे. त्याच्या पायाशी तालवाद्य वाजवणारा गण आहे, तर डाव्या कोपऱ्यात बासरी वाजवणारा गण कोरलेला आहे. या कोष्टाच्या महिरपीवर ब्रह्मा, विष्णू, महेश कोरलेले आहेत. पश्चिमेकडच्या गर्भगृहाच्या मागील देवकोष्टात डमरू, तलवार आणि त्रिशूळ घेतलेल्या शंकराची मूर्ती कोरण्यात आलेली आहे. मूर्तीचा एक हात तुटलेला आहे.
मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करून मंदिरासमोर येऊन नदीवरील घाटाच्या पायऱ्यांवर एक कोरीव खांब आहे. त्यावरील शिलालेख पुसट झाल्याने वाचता येत नाही. खांबाच्या बाजूला शेषनागाचे मंदिर आहे. मंदिराबाहेर काही वैशिष्टय़पूर्ण समाधीचे दगड ठेवलेले आहेत. दोन फूट उंचीचे हे दगड अष्टकोनी असून त्याच्यावर शिवलिंग, नंदी आणि पावले कोरलेली आहेत.
टाकेद गावाबाहेर प्राचीन राममंदिर आहे. रामायणातील जटायूने रावणाशी युद्ध करून इथेच प्राण सोडला, अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या मंदिर संकुलात जटायूचे मंदिरसुद्धा आहे. जवळच रामाने जटायूला पाणी पाजण्यासाठी जमिनीत बाण मारून तयार केलेला झरा व पाण्याचे कुंड आहे. टाकेदहून राम मंदिराला जाणाऱ्या रस्त्यावर उजव्या हाताचा फाटा कोकणवाडी मार्गे पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी जातो. कोकणवाडी ते पट्टावाडी अंतर अध्र्या तासाचे आहे. पट्टावाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.
http://bhimashankarsahane.blogspot.com/2019/05/blog-post.html
आडवाटेवरची वारसास्थळे : जगदंबा मंदिर – टाहाकारी
मंदिराच्या उर्वरित दोन गाभाऱ्यांमध्ये पूर्वेला महालक्ष्मी आणि पश्चिमेला महाकालीच्या सुंदर मूर्ती दिसतात.

नगर जिल्ह्य़ातला अकोले हा तालुका अगदी
निसर्गसमृद्ध आहे. हरिश्चंद्रगड, कलाड, कुंजर, आड, औंढा, पट्टा, बितिंगा,
रतनगड, अलंग-मदन-कुलंग हे बेलाग किल्ले, कळसूबाईसारखे महाराष्ट्रातले
सर्वोच्च शिखर, भंडारदरा धरण, घनदाट झाडी, घाटमाथ्याला अगदी लागून
असल्यामुळे भरपूर पाऊस आणि विविध सुंदर मंदिरे यांनी अकोलेचा सारा प्रदेश
खरंच नटला आहे. रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर असो की अकोले गावामधले
सिद्धेश्वर मंदिर असो. ही शिल्पजडित मंदिरे अत्यंत देखणी आहेत आणि त्यावरील
कलाकुसर मुद्दाम पाहण्याजोगी आहे. याच देखण्या मंदिरांच्या पंक्तीमध्ये
येते ते म्हणजे टाहाकारी इथले श्रीभवानी किंवा जगदंबा मंदिर.
टाहाकारी
या नावाची उत्पत्ती खूप रंजक आहे. रावणाने सीताहरण केले तेव्हा सीतेने
रामाच्या नावाने याच ठिकाणी टाहो फोडला. जिथे तिने टाहो फोडला ते ठिकाण
टाहो करी, आणि मग टाहाकारी म्हणून प्रसिद्धीला आले असे इथे सांगितले जाते.
अकोल्याच्या वायव्येला १६ कि.मी. अंतरावर असलेले हे अत्यंत देखणे,
शिल्पजडित यादवकालीन मंदिर आढळा किंवा आरदळा नदीच्या काठावर वसलेले आहे.
तीन गाभारे असलेले हे काहीसे निराळे मंदिर आहे. तीनही गाभाऱ्यांना एक
सामायिक सभामंडप आहे. मुख्य गाभाऱ्यात वाघावर आरूढ झालेल्या अठरा हातांच्या
महिषासुरमर्दिनीची लाकडी मूर्ती आहे. अत्यंत प्रसन्न आणि देखण्या अशा या
मूर्तीच्या हातामध्ये विविध आयुधे दाखवलेली दिसतात. मंदिराच्या उर्वरित दोन
गाभाऱ्यांमध्ये पूर्वेला महालक्ष्मी आणि पश्चिमेला महाकालीच्या सुंदर
मूर्ती दिसतात. छताला मध्यभागातून खाली लोंबणारे एक दगडी झुंबर अप्रतिम
आहे.
मंदिराच्या बाह्य़ अंगावर अनेक अप्सरा ज्यांना सुरसुंदरी असे
म्हणतात त्यांचे मोठय़ा प्रमाणावर अंकन केलेले दिसते. काही सुरसुंदरींच्या
डोक्यावर छत्र दिसते तर एका सुंदरीच्या अंगामध्ये युरोपियन पद्धतीचा कोट
घातलेला अगदी स्पष्टपणे दाखवलेला आहे. अत्यंत विलोभनीय अशा या सगळ्या
प्रतिमा आहेत. जवळच एक पडकं देऊळ आहे. तिथे एक संस्कृत शिलालेख असून
त्यामध्ये शके १०५० म्हणजेच इ.स. ११२८ असा उल्लेख सापडतो. चैत्रामध्ये
देवीची मोठी यात्रा भरते, तर नवरात्रीत एकूण बारा दिवस इथे मोठा उत्सव केला
जातो, ज्यात वीणा भजन हा एक आगळावेगळा कार्यक्रम सादर केला जातो. इथे
मिळणारे अस्सल खव्याचे फिके पेढे आवर्जून खावेत असे असतात.
ashutosh.treks@gmail.com
Tahakari: a temple that laments!
टाहाकारी: अनोखे शिल्प, देखण्या बांधणीचे शाक्त मंदिर
कुणाचा टाहो कानावर पडली की माणसाचे मन हेलावते. ती तर आदीशक्ती, कुणा लढवैय्या पुरूषांला असे रडताना बघून ती देखिल हेलावली. 'हा कुण्या असामान्य व्यक्तीचा विलाप नाही, खुद्द राम सीतेच्या आठवणीने व्याकुळ झालेत', शिवानी समजावले तर पार्वतीला रामाची परिक्षा पाहण्याची हुक्की आली. आपल्या हातून त्याची कुचेष्टा होतेय हे लक्षात येताच आदी माता खजिल झाली. मग ती आंबेच्या रूपाने गावात विराजमान झाली. तिच्या आगमनाने गावाला वैभव मिळाले. टाहोकरी, टाहाकारी जुन्या व्यापार मार्गावरचे वैभवशाली केंद्र बनले.
आज अगदी अडगळीत गेल्या सारखे बाजुला पडले असले तरी गतकाळी टाहाकारीत व्यापाराची भरभराट होती. पांथस्तांची ये-जा होती. विश्वास बसणार नाही इतका हा परिसर आज रूक्ष वाटतोय. इथली शेती ओस पडली आहे. आढळा तर पूर्ण आटली-रूसली. आपल्या अमिट सौंदर्याची छाप सोडणारे पुरातन मंदिर, या गावचे कोणे एकेकाळी केवढे मोठे वैभव होते याची साक्ष देत उभे आहे.
महाराष्ट्रात जिथे असंख्य मंदिरं जिर्णशिर्ण अवस्थेत शेवटची घटका मोजताहेत,
तिथे टाहाकारी उत्तमरित्या टिकून आहे. शेवटी हा माणूसच! त्याला ना
मंदिराचे वैभव जोपासता आले ना आढळाचा मान राखता आला. त्यामुळे जीवनाची गती
येथे मंदावली असावी.
आढळा रूसली तसे गावात पिण्यालाही पाणी शिल्लेक राहिले नाही. शेती जर्जर
झाली, वृक्ष, वन्यसंपदा या परिसरातापासून दूरावली. परिसर भकास झाला.
आंबामाई वाट बघतेय! माणसाची बुद्धी केव्हा ठिकाणावर येईल याची. 'पुरातन
वैभवशाली वास्तूंचे जतन कशा प्रकारे करायला हवे', याची माणसाला जाणिव
होण्याची. केव्हा तो पाण्याचे मोल जाणेल. केव्हा त्याला, आयुष्यातली खरी
संपत्ती कशात? याची ओळख होईल. 'पैशापेक्षा पाण्याचे मोल अधिक असते', हे
त्रिवार सत्य उमगेल! 'शेती, जंगलाशिवाय माणसाच्या आयुष्यात समृद्धी नाही',
याचा बोध घडेल! सुख: समृद्दीचा खरा मार्ग जोवर माणसाला उमगत नाही, तोवर
आंबाबाई अंधारात तशीच उभी रहील!
श्री एकनाथ महाराजकृत श्री भावार्थ रामायणाच्या अरण्यकांडात या पुरातन अवंध व पट्टा किल्ल्यांच्या परिसराचा उल्लेख आढळतो.
रावणाचा छेदिला आंगोठा
तेथे झाला औंढापट्टा
त्रिंबकीच्या बिकटघाटा
अवंढा-पट्टा प्रसिद्ध!!
पट्टा किल्ल्यावरून १२ कोसाचा प्रवास करून वाहत येणारी आढळाही आंबेच्या
भेटीने आनंदलेली असे. चांगले आठ नऊ महिने ती खळाळत्या पाण्याचा प्रवाह घेऊन
नित्य नियमाने आंबेच्या दर्शनाला येई तशी टाहाकारी पंचक्रोशीत सुबत्ता
निर्माण होत असे. समुद्र मार्गोने थळच्या घाटातून माल घेऊन येणारे व्यापारी
आवंढा-पट्टा घाटातून देशावर तसेच पूर्व-पूर्व-उत्तराच्या प्रदेशात
मालवाहतूक करत, तशी टाहाकारी पंचक्रोशीला झळाळी लाभत.
कुण्या राजाला या गोष्टीची कुणकुण लागली, 'टाकेदला प्रभू श्रीराम सीतेचा
शोध घेण्यासाठी येऊन गेले', तिथे रावणाशी दोन हात करून मरणप्राय झालेल्या
जटायूकडून रामाला सीतेची कर्मकहाणी समजली, आढळेच्या काठावर त्याने विलाप
केला. आदिशक्तीने रामाची परिक्षा घेण्यासाठी सीतेचे रूप धारण केले. रामाने,
माते म्हणून हाक मारताच, आदीशक्ती आपल्या कृत्याने खजिल झाली. आंबेचे रूप
धारण करून आढळेच्या काठी ती विराजमान झाली. 'हे स्थान म्हणजे शिव-पार्वती,
राम-लक्ष्मण यांच्या पावन चरणांनी परम पवित्र झाले. या परिसराच्या जवळच
जटायूने लंकापती रावणाला लढा दिला'. या लौकिकास साजेशे एखादे मंदिर येथे
बांधावे', येणार्या-जाणार्या वाटसरूंना या मंदिराचा आसरा मिळेल. आढळा
नदीमुळे त्यांची पाण्याची सोय होईल, असा यादव कुलोत्पन्न राजाने विचार
केला. भौतिक सुखाच्याही पलिकडे जाऊन, मनुष्य जीवनाचे तत्वज्ञान उलगडणारे
भव्य मंदिर साकार करण्याचा संकल्प राजाने केला. शिल्पांमधुन जीवनाचे सार
लोकांसमोर उलगडण्यासाठी विद्वान बोलावले, त्याकाळचे सर्वोत्तम शिल्पी
बोलावले, कलेचा असाधाण अंग असलेल्या कला निर्देशकांना पाचारण केले.
हा सह्याद्री म्हणजे काळ्या सोन्याची खाणच. ओबड धोबड दगडांवर छिन्नी,
हाथोड्याचे घाव पडू लागले. स्थपतींच्या मनातले शिल्प आकार घेऊ लागले. ७२
भले मोठे खांब उभे राहिले. प्रत्येक खांब आणि भिंतीवरचे शिल्प जीवनाची कथा
उलगडू लागले. कथाही कशा, तर डोळसपणे बघितल्या तरच त्या समजतात, नाही तर
निव्वळ दगडात कोरलेली सौंदर्यपूर्ण कलाकृती म्हणूनही त्याला दाद दिली जाऊ
शकते.
![]() |
| पुरातन विटांच्या कळसाच्या जागी बांधलेले सिमेंटचे कळस |
![]() |
| ११व्या शतकाचा निर्देश करणारा टाहाकारीचा सगळ्यात महत्वाचा दस्तावेज... |
माणसाच्या आयुष्यातल्या कामवासना, मद, मोह, मत्सराची प्रतिके मंदिराच्या
प्रवेशद्वारावर कोरली गेली, 'या भावना बाहेर ठेऊन आत प्रवेश करायचा', हा
संदेश त्या देतात. येथे भेट देणार्या भाविकांनी या कथांचा अन्यवार्थ
जोडायचा आणि आपले जीवन समृद्ध बनवायचे. आज टाहाकारी मंदिर बघताना, त्याची
रया राहिली नाही, हे जाणवत राहते. त्या शीर्णदशेतही हे मंदिर पाहणे एक रभ्य
अनूभूती ठरते. याचा कोपरान कोपरा कोणती तरी कथा सांगतो. डोळसपणे बघितले तर
ते शिल्प जणू आपल्याशी बोलताहेत असे भासते.
अठराव्या शतकात भारतीय पुरातत्व विभागाच्या पुणे कार्यालयाचे संचालक हेन्री
कझीन्स याने भारतातील अनेक पुरातन मंदिरे, शिल्प, लेख आदींचा धांडोळा
घेतला. १८९२च्या नोव्हेंबर महिन्यात रतनवाडी वरून तो टाहाकारीलाआला. त्यात
त्याने याशिलालेखावर शके १०५० म्हणजेच इसवी सन ११२८ ही तारीख वाचल्याचे
आपल्या मिडिवल टेंपल्स ऑफ डेक्कन इंडिया या पुस्तकाच्या २७व्या खंडात
नोंदवून ठेवले आहे. या शिलालेखाचा काळ हा यादवकालीन असून तो वाचण्याचा
प्रयत्न केल्यास मंदिरासंबंधी महत्वाच्या माहितीवर प्रकाश पडू शकतो. हा
संपुर्ण लेख फारच पूसट झाला असून त्याचे वाचन करणे कष्टप्रद आहे. कझिन्सने
मंदिर आणि घाटामधल्या एका उधवस्त मंदिराच्या स्तंभावर हा शिलालेख असल्याचे
नोंदवून ठेवले आहे. आज घाटावरचे दोन्ही मंदिरे बरेच क्षतिगस्त झाले असून
त्यातलाच शिलालेखाचा स्तंभ पायर्यांच्या मधोमध बसविला आहे. शिलालेख हे
महत्वाचे दस्त असतात याची कल्पना नसल्यामुळे इतिहसाचा अनन्यसाधारण महत्वाचा
दुवा व्यवस्थित जतन न करता उघड्यावर ठेवण्यात आला. सततच्या उन वारा व
पावसाचा मारा पडल्याने अक्षरे क्षतिग्रस्त झालीत.
![]() |
| ''हे आढळा! आमचे काय महत्व! त्यापेक्षा तुला पूर येऊ दे...त्यात आम्हाला वाहून ने'' |
या पायर्यांच्या दुतर्फा मंदिराच्या कळसाचे अवशेष आणि अनेक मुर्त्या
इस्तत: ठेऊन देण्यात आल्या आहेत. उन, वारा, पाऊस आणि कदाचित नदीच्या
पुराच्या हवाली करण्याऐवजी त्यांचे जतन करणे आवश्यक आहे. या मुर्त्या भग्न
झाल्या असल्या तरी इतिहासाचा तो अनमोल ठेवा आहे. भारताच्या धार्मिक परंपरेत
भग्न मुर्तीचा दोष लागत नाही, तर ती मुळ स्थानावर विराज मान असेल तर. अगदी
जागृत देवस्थानातल्या मुर्तीचा जिर्णोद्दार धर्मसिंधू, निर्णयसिंधू या
हिन्दू पिनल कोड प्रमाणे कायद्याने संमत केलेल्या ग्रंथातही तेच सांगितले
आहे हे ध्यानात घेतले तर या मुर्त्या त्यांच्या मुळस्थानी नेऊन बसवाव्यात.
मुळस्थान माहित नसेल तर त्यांची आडोशात रचना करून अभ्यासकांसाठी आणि तिथे
येणार्या अभ्यागतांना, भारताचा भूतकाळ केवढा प्रगत होता, याची साक्ष
देण्यासाठी तरी सांभाळून ठेवाव्यात.
टाहाकारीला पोहोचायचे तर सिन्नर किंवा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून
आडवळणाचा प्रवास करून यावे लागते. मंदिराच्या वीस, पंचवीस किलो मिटर
परिसरात खाण्यापिण्याची कोणतीही चांगली सुविधा नाही, इतका हा परिसर आता
आडबाजूला पडला आहे. कोणे एकेकाळी येथून आंतरराष्ट्रीय व्यापार चालायचाय,
यावर विश्वास ठेवणे अवघड ठरते.
![]() |
| आढळा नदीच्या घाटावर दुतर्फा अशा अनेक मुर्त्या विखूरलेल्या |
सिन्नरचे गोंदेश्वर आणि ऐश्वर्येश्वर मंदिर ज्यांनी बघितले असेल, ज्याचा
वैभवशाली इतिहास ज्याने वाचला असेल त्याने टाहाकारीचे मंदिर जरूर बघावे.
तसेया परिसरात आणखी एक पुरातन मंदिर जिज्ञासूंची वाट बघत आहे, अकोल्याचे
सिद्देश्वर मंदिर. गोंदेश्वर, ऐश्वर्येश्वर, सिद्धेश्वर, टाहाकारी ही
मंदिरे काय सांगतात, गोदावरीची एक मोठी उपनदी असलेल्या प्रवरेच्या काठी
पुरातन मनुष्य संस्कृतीचा वैभवशाली काळ नांदत होता. त्यामुळेच नदीच्या
किनार्यावर अत्यंत देखण्या कातळकोरीव मंदिरांची मांदियाळीच वेगवेगळ्या
राजवटीत उभी केली गेली.
सह्याद्रीत भटकंती करणार्यांसाठी औंढा, पट्टा उर्फ विश्रामगड, जिथे शिवाजी
महाराजांनी दुसर्या सुरतेच्या स्वारीनंतर महिनाभर मुक्काम केला आणि
थोरले बाजीराव पेशवांचे जन्मस्थळ डुबेरा उर्फ डुबेरगड या तिन किल्ल्यांच्या
भटकंतीला जोडन या परिसरातील पुरातन मंदिरांची भटकंती जोडणे एक परिपूर्ण
डोंगरयात्रेची अनूभूती देणारे ठरेल.
वैशाखाच्या ऐन मध्याला भटकंतीला जायचे तरी कुठे, इतका तो भडकलाय! तेव्हा
आम्ही अनेक दिवसांपासून मनात राहिलेला टाहाकारीचा मनसुबा तडीस नेण्याचे
ठरवले. नाशिकशहरातून नाशिकरोड पर्यंतचा प्रवास हा वाहतुकीच्या वर्दळूतून
होतो, इतका हा नाशिक पुणे रस्ता वाढत्या वाहनांमुळे संकोचला गेला आहे.
नाशिकरोडच्या दत्तमंदिर पासून उड्डाण पुलापासून रस्ता भला प्रशस्त व वेगवेन
होता. नाशिक-पुणे राज्य मार्गाचा विस्तार झाल्यापासून सिन्नर आणि अगदी
संगमनेर पर्यंत रस्त्याचा प्रवास म्हणजे वेगवान, विना अडथळा सहजपणे पार
होतो. मोहदरी घाटात दोन मार्गिका झाल्यापासून घाटातली वाहतूक कोंडी कमी
झाली आहे तर पळते येथे नविन पुल झाल्यामुळे तिथलेही वाहतूक कोंडी आता होत
नाही. येथे चारचागी मोटरवाहनांना पथकर भरून पुढे जाता येते.
आजचे सिन्नर म्हणजे सगळीकडेच रखरखीतपणा. हा पर्जन्यछायेतला तालुका,
त्यामुळे येथे पाण्याचे मोठेच दुर्भिक्ष आहे. इथले पर्जन्यमान गेल्या काही
शतकांपासून कमी कमी होत गेले असावे, अन्यथा देवगिरीला राजधानी नेण्यापूर्वी
यादवांची सिन्नरला राजधानी होती असे उल्लेख सापडतात. त्याकाळी पूरेसे पाणी
असल्याशिवाय यादवांनी राजधानी या पसिरात हलवली नसती.
ऐन वैशाखाचा मध्यकाल म्हणजे तर सिन्नर वाळवंटीच वाटते. पुण्याकडे जाणार्या
द्रुतगती मार्गावरून डुबेरे-ठाणगाव फाटा लक्षात येणार नसेल तर सिन्नर
गावातून जुन्या संगमनेर रस्त्याने मारूती मंदिराकडून ठाणगाव रस्त्यावर
उजवीकडे वळण घ्यावे. तिथून डुबेरगडाला कुर्निसात करत जमल्यास डुबेर्याचा
बर्वेंचा वाडा बघून घ्यावा. अखिल भारतात मराठीसत्तेचा झेंडा फडकविणार्या
या थोर सेनानायकाचा जन्म डुबेर्याच्या याच बर्वेवाड्यातला. सद्या या
वाड्याची विभागणी झाली असून बर्वे कुटुंबातील वंशजांच्या संमतीने हा वाडा
बघता येतो.
![]() |
| ठाणगावच्या बाहेर खंडोबामंदिराचा भव्य वटवृक्ष |
इथून सगळा परिसर हा लहान डोंगरांचा असून अफाटवृक्षतोडीमुळे अवघा परिसर हा
रूक्ष रूक्ष भासतो. झाडेच नसल्याने माती धरून ठेवणारी नैसर्गिक यंत्रणा
नाहीशी झालेली. त्यात इथला दगड ठिसूळ असल्याने सर्वत्र बारीक खडी-मातीचे
साम्राज्य. येथे पावसाळ्यात आलात तर हिरवाईने नटलेल्या परिसरातली
डोंगरयात्रा किंवा मंदिरयात्रा अल्हाददायक होऊ शकेल. समशेरपूर टाळून
ठाणगावात जावे. प्रत्यक्षात टाहाकारीचा रस्ता ठाणगावच्या बाहेरून जातो.
गावाच्या पुढे वाटेत एका भल्या मोठ्या वटवृक्षाखाली खंडोबाचे टुमदार मंदिर
लागते. तिथून थोडे पुढे गेल्यावर केळीचा फाटा ओलांडला की आपण अहमदनगर
जिल्ह्यात प्रवेश करतो. तिथून दहा मिनीटात टाहाकारी गाव.
टाहाकारी गावातील आढळा नदीवरील पूल ओलांडल्यावर मंदिराचे सिमेंटचे तीन
पांढरे कळस दिसायला लागतात. मंदिराभोवती असलेली सात फूट उंच तटबंद भिंत
आहे. जुनी भिंत जिर्ण झाल्यामुळे जुन्या दक्षिण बाजूकडून नवे दगड घडवून ही
भिंत बांधली आहे. पूर्व बाजूनेमंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. समोरचे
दृष्य आवाक करणारे आहे. असे वाटते की, आपण एखाद्या बंगल्याजवळ आलो आहोत.
प्रत्यक्षात कुणी तरी टाहाकारी मंदिराचा जिर्णोद्दार केला त्यात मंदिराच्या
ढासळत्या खांबांना आधार देण्यासाठी सिमेंट कॉंक्रिटचे खांब उभारलेत. वरती
सिमेंटची गॅलरी देखिल तयार करण्यात आली आहे. त्यात मंदिर पुर्णपणे झाकले
गेले आहे. असे वाटते की, आपण एखाद्या बंगल्या समोर उभे आहोत.
![]() |
| मंदिराचे प्रवेश द्वार की बंगला? |
एखाद्या पुरातन वास्तूचे संवर्धन अशा प्रकारे असू शकत नाही. हे पहिले दर्शन
मन विचालीत करते खरे, त्यानंतर मात्र जसजसे मंदिराच्या जवळ जाऊ तसतशी
शिल्पसौंदर्याची भूरळ पडायला लागते.
मंदिराचे बांधकाम भूमिज पद्दतीचे आहे. मंदिर उत्तराभिमुख आहे. त्याच्या
उत्तरे दिशेला म्हणजेच आढळा नदीवर प्रशस्त असा जुन घाट आजही बर्या स्थितीत
उभा आहे. हेमाडपंथी पद्धतीचे बांधकाम असल्याने यात चुन्याचा वापर न करता
मंदिराचे दगड एकमेकांत अडकवतात. मंदिराचे मूळचे तीन कळस कोसळलेले असून
त्याजागी सिमेंटचे घुमटाकार कळस बांधलेले आहेत. जुन्या कळसाचा कुठलाच
आराखडा किंवा कुठलीच माहिती नसल्याने तशा प्रकारचे अगदी सिमेंट
कॉंक्रिटमध्ये पुननिर्माण आता शक्य नाही.
या मंदिराचे मुख मंडप, मंडप, अंतराळ व गर्भगृह असे चार भाग आहेत. मंदिर चार
फूट उंच दगडी जोत्यावर उभे आहे. जोत्यावर पुष्प पट्टी आणि पद्म पट्टी
कोरलेली आहे, मंदिराच्या मुख मंडपाच्या सज्जावर वेगवेगळी शिल्पे कोरलेली
आहेत, त्यात मैथुन शिल्पेही आहेत.
सभामंडपात प्रवेश करताच खांबाला टेकवून ठेवलेल्या दोन मूर्ती दिसतात.
त्यातील एक शंकर-पार्वतीची आहे, तर दुसरी गणपती सरस्वतीची आहे. शेंदूर
फासण्याचा अट्टहास पुरविण्यासाठी कुणीतरी गणपतीला शेंदूर चढवला आहे तर
सरस्वती तशीच ठेवल्यामुळे काळ्या-शेंदरी रंगगाच अजब मेळ बघायला मिळतो.
![]() |
| अप्रतिम कोरीवनक्षीच्या स्तंभांनी सजलेला मुखमंडप |
![]() |
| भान हरखून बघावे टाहाकारीचे शाक्तमंदिर |
मंदिराचे छत ७२ खांबांवर तोललेले आहे. खांबांवर विविध प्रकारची नक्षी,
शिल्पे, कीर्तिमुख, भौमित्तिक आकृत्या काढलेल्या आहेत. खांबांच्या टोकाला
छत तोलणारे यक्ष कोरलेले आहेत. मुख्य मंडपाच्या छतावरचे वर्तुळाकार
नक्षीकाम अप्रतिम आहे. या वर्तुळाकार कोरीव कामात फूल, सिंह आणि आठ
अप्सरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या सभामंडपाच्या पूर्व, पश्चिम
व दक्षिण या तीन बाजूंस तीन गर्भगृहे आहेत. या रचनेला त्रिदल रचना
म्हणतात. मुख्य गर्भगृह आणि सभामंडप यांच्या मध्ये अंतराळ आहे.
प्रसूतीचे शिल्प
मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. डाव्या व
उजव्या स्तंभावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी प्रसूत होणार्या स्त्रीयांचे शिल्प
लक्ष्यवेधी ठरते. पुत्रप्राप्तीसाठी आवाहन करणारी मुर्ती, स्त्रीप्रसूत
होतानाचे शिल्प आणि लहान बाळासोत असलेली स्त्री, असाहे शिल्प संयोजन म्हणजे
कातळात कोरलेल्या कथेचाच एक भाग. कोणी तरी या स्त्रीयांच्या योनीला शेंदूर
लावला आहे.
![]() |
| प्रसूत होणारी स्त्री उजव्या कोपर्यातला स्तंभ...अपत्य झाल्यानंतर बालकासोबत. |
![]() |
| प्रसूत होणार्या स्त्रीचे डाव्या बाजूच्या स्तंभावरचे शिल्प |
गर्भगृहात देवीचा तांदळा आणि जगदंबेची अठरा भुजा असलेली भली मोठी
काष्ठमूर्ती आहे. ही मुर्ती आणि आतलली लाकडी महिरफ मुळ मंदिरा बांधले
त्यावेळची नाहीत. नंतरच्या काळात ती बसविण्यात आली असावी, असे स्थानिकांचे
मत आहे. देवीच्या हातांमध्ये विविध प्रकारची आयुधे आहेत. श्री जगदंबा माता
वाघावर आरूढ असून ‘महिषासुरमर्दनिीच्या’ अवतारात आहे. गाभार्याचे
प्रवेशद्वारावर नाजूक नक्षीकाम असून ते अजूनही उत्तम स्थितीत आहे. या
प्रवेशद्वाराच्या थोडे अगोदरचा वरच्या भागाला मोठा तडा गेल्यामुळे दोन जादा
दगडी स्तंभाचा त्यास आधार देण्यात आलेला दिसतो. हे स्तंभ जुने असले तरी
त्या दुसर्या ठिकाणहून आणून येथे उभे करण्यात आले आहेत.
सभामंडपाच्या दोन बाजूंस असलेल्या गर्भगृहात पूर्वेस महालक्ष्मी आणि
पश्चिमेस भद्रकाली (महाकाली) देवीच्या सुबक मूर्ती आहेत. घुमटाकार छताची
नक्षी देखणी असून ती सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिराची आठवण करून देते. या
तीनही गाभार्यास लोखंडी दरवाजे बसवून त्यास कुलूप बसविण्यात आले आहे.
त्यामुळे दिवसा देखिल आत जाता येत नाही. फक्त पुजेच्या वेळी किंवा
अभिषेकापूरतेच हे दरवाजे उघडले जात असावेत.
या नक्षिच्या आत गारवा व सुरक्षितता असल्यामुळे चिमण्यांनी त्यात घरटी केली असून त्या सारख्या तेथे उडताना दिसतात.
मंदिराचा अंतर्भाग पाहून झाल्यावर मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा घालायला
सुरुवात केल्यावर वेगवेगळ्या थराची सूबक रचना बघायला मिळते. मंदिराच्या
भिंतीच्या मध्यावर २२ प्रकारच्या सुरसुंदरींच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.
सुरसुंदरी म्हणजे देवांगना. देवांच्या खालोखाल यांचा मान. टाहाकारी
मंदिराचे हे मुख्य आकर्षण. सुडौल शरीर रचना, तलम वस्त्र, देखणे अलंकार
यातून तत्कालीन कलासौंदर्याचे अनेक आविष्कार उलगडतात.
कधी आरशात स्वत:चे सौंदर्य पाहणाऱ्या, कर्णभूषणे घालणाऱ्या, केसात गजरा
घालणाऱ्या, केशशृंगार करणाऱ्या अशा दर्पणा, तर कुठे नृत्य करणारी
नृत्यसुंदरी, बासरी, मृदंग वादन करणारी, हाती पोपट घेतलेली शुकसारिका,
मुलाला घेतलेली मातृमूर्ती, मांडीवर विंचू असणारी विषकन्या, डोक्यावर छत्र
धारण केलेली, मर्कट लीलांनी हैराण झालेली अशा अनेक सुरसुंदरींच्या मूर्ती
आहेत. एका सुंदरीच्या अंगावर आज दिसतो तसा गाऊन किंवा पाश्चात्य पद्दतीच्या
कोट सारखा पेहेराव दिसतो, विशेष म्हणजे तो दगडात उत्तमरित्या कोरण्यात आला
आहे.
![]() |
| गणपतीचे देखणे शिल्प |
सुरूवातीलाच दक्षिण बाजूच्या भिंतीवर कोरलेली गजाननाची सुंदर अशी मूर्ती
पाहायला मिळते. गर्भगृहामागील देवकोष्टात चामुंडेची मूर्ती आहे. चामुंडा हे
देवीचं क्रूर रूप आहे. हडकुळं शरीर, पोटावर विंचू, गुडघ्याच्या खालच्या
बाजूपर्यंत पसरलेली मुंडमाळा, हातातल्या दंडावरची कवटी, डाव्या हाताच्या
करंगळीचे नख कुरतडताना दाखवलेली ही मूर्ती मुर्तीमंत भय प्रकटकरणारी. या
देवकोष्टकाखाली गर्भगृहातील पाणी जाण्यासाठी पन्हाळी आहे. तिथे
नेहमीप्रमाणे गोमुख न कोरता मकरमुख कोरलेलं आहे. त्यात दोन्ही बाजूस एक
लहान व एक मोठी मुर्ती स्वार झालेली दिसते. कदाचीत आई व मुलगी असावी. हे
मकरमुख गोंदेश्वर तसेच हातगड जवळच्या देवळी कराडच्या मकरमुखाची आठवण करून
देते.
प्रभू रामाने टाहो केला तेव्हा अंबाबाईच्या रूपाने आदीशक्ती पार्वती तेथे
प्रकटली, यादवकुलोत्पन्न राजाने देखणे भव्य मंदिर उभारले. आज या मंदिराची
दूरवस्था, परिसराची पाण्यासाठी सुरू असलेली दशा बघून, 'पुन्हा एकदा
टाहाकारीचा टाहो सुरू आहे', असा आभास होतो. त्याचाविलाप कोणी ऐकेल का? जल
आणि वनांची काळजी घेऊन आढळेला समाधानी केले जाईल. मंदिराची चांगला रखरखाव
ठेऊन आंबाबाईला प्रसन्न केले जाईल?
मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करून मंदिरासमोर येऊन नदीवरील घाटावर दोन मंदिरे
आहेत. पुर्वी हा घाट सुबक दगडाचा असावा. आता त्याचे काही दगड निखळले आहेत
तर खालच्या नदीकडचे दगड मोठ्या प्रमाणात हलले आहेत. वरच्या बाजुला व मधल्या
माजूला असे दोन स्तंभ आहेत. यातला मधला स्तंभ अत्यंत महत्वाचा असून
त्याच्यावर संस्कृत भाषेतला वाचता येणार नाही इतका पुसट शिलालेख कोरला आहे.
या घाटवर एक शेषनागाचे तर दुसरे आंबाबाईची. मंदिराबाहेर काही वैशिष्टय़पूर्ण
समाधीचे दगड ठेवलेले आहेत. दोन फूट उंचीचे हे दगड अष्टकोनी असून
त्याच्यावर शिवलिंग, नंदी आणि पावले कोरलेली आहेत. अंबाबाईच्या मंदिरात
डाव्या कोपर्यात शेषनागालाह तर उजव्या बाजूला शेषशाही विष्णूमूर्ती ठेवलेली
आहे. या दोन्ही मुर्ती या मंदिरातली मुर्ती वाटत नाही. बाहेरून कुठून तरी
उचलून येथे आणल्या असाव्यात. नदीत कित्येक जुने दगड टाकून देण्यात आले
आहेत. मंदिर परिसराचा कोपरानकोपरा आज साडे नऊशे वर्षे उलटूनही गतवैभवाची
साक्ष देतो.
जाण्यासाठी :
१) नाशिकवरून सिन्नर २८ किलो मिटर. द्रुतगती मार्गावरून ठाणगाव फाटा घेऊन
ठाणगाव १९ किलो मिटर गाठावे. किंवा सिन्नर बसस्थानकाच्या थोडेसे पुढे
जुन्या संगमनेर रस्त्यावर मारूती मंदिराकडून उजवीकडे डुबेरे-ठाणगाव
रस्त्याने जावे. २१ किलो मिटर.गाठावे. तिथून टाहाकारी ९ किलो मिटर.
२) मुंबई-नाशिक रस्त्यावर इगतपुरीनंतर – घोटी गाव आहे. घोटी गावातून एक
रस्ता सिन्नरला जातो. या रस्त्यावर भंडारदऱ्याला जाणारा फाटा फुटतो. या
भंडारदऱ्याला जाणाऱ्या रस्त्यावर टाकेद गाव आहे. घोटीपासून टाकेदपर्यंत
पोहोचण्यास पाऊण तास लागतो. टाकेदहून टाहाकारीला जाणारा रस्ता आहे. इगतपुरी
ते टाहाकारी अंतर ५८ किमी आहे.
३) पट्टा किल्ला मार्गे टाहाकारी :टाकेद गावाबाहेर प्राचीन राममंदिर आहे.
रामायणातील जटायूने रावणाशी युद्ध करून इथेच प्राण सोडला, अशी येथील
लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या मंदिर संकुलात जटायूचे मंदिरसुद्धा आहे.
जवळच रामाने जटायूला पाणी पाजण्यासाठी जमिनीत बाण मारून तयार केलेला झरा व
पाण्याचे कुंड आहे. टाकेदहून राम मंदिराला जाणाऱ्या रस्त्यावर उजव्या
हाताचा फाटा कोकणवाडी मार्गे पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी जातो. कोकणवाडी
ते पट्टावाडी अंतर अध्र्या तासाचे आहे. पट्टावाडी हे किल्ल्याच्या
पायथ्याचे गाव आहे. पट्टावाडीपासून ठाणगाव मार्गे २५ किलोमीटर वर टाहाकारी
गाव आहे.
http://prashantpardeshi.blogspot.com/2019/05/tahakari-temple-that-laments.html
भटकंती : टाहाकारीचे शिल्पसौंदर्य जगदंबा मंदिर
आपण मागील भागात अकोल्याचे सिद्धेश्वर मंदिर पाहिले. त्याच परिसरातील आणखी एक शिल्पसौंदर्याने नटलेले ठिकाण म्हणजे टाहाकारीचे जगदंबा मंदिर. अकोले-देवठाण मार्गे टाहाकारीला जाणारा रस्ता आपल्याला थेट आढळा नदीच्या काठी टाहाकारी गावात घेऊन जातो. हे मंदिर खूपच सुरेख असून, पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते. मात्र, या मंदिरात तथाकथित जीर्णोद्धाराच्या नावाखाली गावातल्या प्रगतिशील (?) कारभाऱ्यांनी कॉंक्रिटचे खांब आणि वरून तसलेच घुमट उभारले आहे. त्यामुळे गावात शिरताना नदीच्या अलीकडून हीच ती मंदिरे असल्याची खात्री पटत नाही, पण अंतःपुरात मंदिर मोठे नेत्रदीपक होते. चोहोबाजूंनी शिलाखंडांनी बांधलेल्या पुरुषभर उंचीच्या भिंतींनी आवार बंदिस्त केलेले आहे.
रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेला दंडकारण्याचा परिसर म्हणून हा प्रदेश ओळखला जातो. या गावासह सभोवतालचे हिरवाईने नटलेले डोंगर गावाची शोभा वाढवतात. या गावाच्या प्रवेशद्वारातच आढळा नदीच्या तीरावर श्री जगदंबा मातेचे मंदिर आहे. हे मंदिर संपूर्ण चिऱ्यांनी बांधलेले आहे. या मंदिराची बांधणी हेमाडपंथी पद्धतीची असून, मंदिरात बहात्तर दगडी खांब आणि पाच कळस आहेत. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर शिल्पे कोरलेली आहेत. मंदिरात प्रवेश करताच समोर श्री जगदंबा मातेच्या उभ्या मूर्तीचे दर्शन घडते. ही मूर्ती संपूर्ण लाकडात कोरलेली आहे. या देवीच्या मूर्तीला अठरा हात आहेत आणि त्यांत विविध प्रकारची आयुधे आहेत.
या मूर्तीचे वैशिष्ट्य असे की, श्री जगदंबा माता वाघावर आरूढ असून, ‘महिषासुरमर्दनाचा’ देखावा येथे सादर केला आहे. मूळ मूर्तीच्या पुढे तांदळारूपी देवीची स्थापना केलेली आढळते. मंदिराच्या गाभाऱ्यात दोन्ही बाजूस-पूर्वेस महालक्ष्मी आणि पश्चिमेस भद्रकाली (महाकाली) अशा देवीच्या सुबक मूर्ती आहेत. हे मंदिर यादवकालीन असल्याचे म्हटले जाते. मंदिराचा मूळ कळस ढासळून जीर्णोद्धारात पाच नवीन कळस बा॔धल्याचे दिसते.
सभामंडपाच्या छताचा आणि शिल्पकलेचा हा एक सर्वोत्तम नमुना. आठ व्याल आणि स्त्रीरूपातील अष्टदिक्पालांनी तोलून धरलेले छत. छताच्या मधोमध दगडात कोरलेले आश्चर्य म्हणजे लटकते दगडी एकसंध झुंबर. ते आजही उत्तम अवस्थेत आहे.
सभामंडपाच्या बाह्यभागात बरीच मैथुनशिल्पे कोरलेली असून, मंदिरसमूहाच्या बाह्यभिंतींवर देवादिकांची अतिशय प्रमाणबद्ध शिल्पे आढळतात. मंदिराची आधीची शिखरे विटांमध्ये बांधली असल्याने कालौघात ती नामशेष झाली आणि त्यावर सध्याची कॉंक्रिटची शिखरे चढवली गेली आहेत. तरीही या मंदिराचे सौंदर्य अबाधित राहिले आहे. उत्तमोत्तम छताचे शिल्पकाम, मैथुनशिल्पे, लाकडी मूर्ती, कोरीव शिळास्तंभ या वैशिष्ट्यांमुळे हे मंदिर चुकवू नये असेच.




































































No comments:
Post a Comment