विदर्भातील शक्तीपीठ - महाकाली, चंद्रपूर
महाकाली मंदिर चंद्रपुरातील गोंडकालीन इतिहासाची साक्ष देते . या मंदिराला वाकाटक काळाचेही संदर्भ सांगितले जातात . हे गुफा मंदिर आहे . रंगीत चित्रकला हे या मंदिराचे सर्वांत मोठे आणि अनोखे वैशिष्ट्य . अजिंठा - वेरूळ लेण्यांतील रंगीत चित्रांच्या परंपरेतील अशी चित्रकारी विदर्भात दुसरीकडे नाही . विदर्भातील अष्ट शक्तिपीठांपैकी एक म्हणजे चंद्रपूरचे महाकाली मंदिर . या महाकाली देवीचे संदर्भ स्कंद पुराणातही आढळतात . मध्य भारतातील एक महत्त्वाचे तीर्थस्थळ म्हणून या महाकाली मंदिराचा उल्लेख होतो . वर्षभर येथे भाविकांचा राबता असतो . चैत्रात मोठी यात्रा भरते . विदर्भ , मराठवाड्यासह आंध्र प्रदेशातील भाविकांची या यात्रेला अलोट गर्दी उसळते . महाकालीची ही यात्रा ' नांदेडची यात्रा ' म्हणूनही ओळखली जाते .
चंद्रपूरची महाकाली आणि माहूरची रेणुका माता ही दोन तीर्थस्थळे विदर्भ आणि मराठवाड्याला परंपरेने जोडतात . महाकाली मंदिर चंद्रपुरातील गोंडकालीन इतिहासाची साक्ष देते . या मंदिराला वाकाटक काळाचेही संदर्भ सांगितले जातात . हे गुफा मंदिर आहे . रंगीत चित्रकला हे या मंदिराचे सर्वांत मोठे आणि अनोखे वैशिष्ट्य . अजिंठा - वेरूळ लेण्यांतील रंगीत चित्रांच्या परंपरेतील अशी चित्रकारी विदर्भात दुसरीकडे नाही .
येथील मूळ मंदिराची निर्मिती कशी झाली , याविषयी अनेक दंतकथा आहेत . एका कथेनुसार , गोंडराजा खांडक्या बल्लाळशाह ( १४७२ ते १४९७ ) हा शिकारीच्या निमित्ताने या परिसरातील जंगलात फिरत होता . फिरता फिरता तो देवीच्या या मूळ गुफेकडे आला . तेथील पाण्याने त्याने व्रण साफ केले . त्याचे व्रण नाहीसे झाले . पुढे त्याला स्वत : महाकालीने दृष्टांत दिला . स्वत : चे स्थान सांगितले . दुसऱ्याच दिवशी राजाने जंगलातील भुयारी मार्ग मोकळा केला . गुफा मोकळी केली . त्यात देवीची कोरीव मूर्ती सापडली . राजाने तेथे पहिले छोटेखानी मंदिर बांधले .
आजच्या मंदिराची निर्मिती ही राणी हिराईने १७व्या शतकात केली . १७०७ ते १७०९ हा या मंदिराच्या उभारणीचा काळ . देवगडचा राजा दुर्गशाह व गोंडराजा वीरशाह ( बिरसिंग ) यांच्यात लढाई झाली . वीरशाहाचा पाडाव होऊ लागला होता . अचानक ' जय महाकाली ' चा जयघोष झाला . वीरशाहाच्या सैन्यात चैतन्य संचारले आणि राजा वीरशाहचा विजय झाला . महाकालीच्या कृपेनेच लढाईत विजय झाल्याचा राणी हिराईचा दृढ समज झाला . या कृतज्ञतेतून तिने मंदिराचा कायापालट केल्याचे सांगितले जाते . ही राणी हिराई ( सन १७०४ - १७१९ ) कर्तृत्ववान होती . मदनापूर होशंगाबाद येथील मोगल सरदार ढिल्लनसिंग मडावी यांची ती मुलगी . कुशाग्र बुद्धीची हिराई शस्त्रविद्येत पारंगत होती . गोंडराजा किसनशाह याने हिराईतील गुण ओळखले होते . त्यामुळेच त्याने तिला आपला मुलगा वीरशाह याच्यासाठी मागणी घातली . १७०४च्या सप्टेंबरमध्ये राजा वीरशाहची हत्या झाली . वयाच्या २२ - २३व्या वर्षी हिराईला वैधव्य झाले . जबाबदारी आली . गादीला वारस नव्हता . राणीने तीन वर्षांच्या रामशाहला दत्तक घेऊन नेटाने राज्यकारभार सुरू केला . आपल्यापुढे अनेक आव्हाने आहेत , याची तिला जाणीव होती . तिच्या काळात पाच मोठी युद्धे झाली . या युद्धांमध्ये राणीचे युद्धकौशल्य दिसले . मुत्सद्देगिरीही जाणवली . तिचा पराभव झाला . अर्धे राज्य गेले . पण ती खचली नाही . ती जितकी युद्धनिपूण , तितकीच धार्मिक वृत्तीचीही होती . महाकाली मंदिरासोबतच अंचलेश्वर , एकवीरा , खटीचा गणपती मंदिर , मुरसा येथील शिवमंदिर , गिलबिली येथील महादेव मंदिर , वैरागड येथील भवानी मंदिर तिनं बांधली . मार्कंडादेव येथील मार्कंडेश्वर मंदिर दुरुस्त केले . वीर पतीची आठवण कायम राहावी , म्हणून राजा वीरशाह याची मोठी समाधी हिराईने बांधली . आज मात्र ही समाधी दुरवस्थेत आहे .
महाकाली मंदिराच्या संरक्षणाची जबाबदारी भारतीय पुरातत्त्व विभागाकडे आहे . रामायण , महाभारतातील प्रसंग हे या मंदिराच्या शिल्पकलेतील आणखी एक वैशिष्ट्य . हे सारे शिल्प म्हणजे गोंडकालीन हस्तकलेचा उत्तम नमुना आहेत . महाकाली मंदिराला चार दरवाजे आहेत . आतील भागात कमानी आहेत . बाहेरील शिल्पांमध्ये राणीचे स्नान , राजा - राणी , मल्लयुद्ध आदी प्रसंग आहेत . एका शिल्पात मदारी पुंगी वाजवित असून समोर नाग फणा काढून आहे . एका खिडकीच्या बाजूला कोरलेल्या प्रसंगात यशोदेसमोर गवळणी एकत्र आल्या आहेत आणि त्या श्रीकृष्णाच्या तक्रारी करीत असल्याचे दिसते . आतील बाजूस गाईवरून झेप घेऊन शिकार करणारा वाघ , दोन सैन्यांतील युद्धप्रसंग , नमस्कार करीत असलेले भक्तगण , घोडेस्वार , गजस्वार , उंटस्वार आहेत . या मंदिरासंदर्भात पुरातत्त्वाचे अभ्यासक डॉ . रघुनाथ बोरकर सांगतात , ' चवथ्या - पाचव्या शतकात हे गुफा मंदिर होते . ते वाकाटक काळातील असावे . चंद्रपूर जिल्ह्यात अशा अनेक गुफा आढळतात . या मंदिराची स्थापत्यरचना ही गोंड - भोसलाशैलीची आहे . राज्य सार्वभौम आणि संपन्न असले की स्थापत्यरचना तयार होतात . त्यात त्या - त्या शासकाचे प्रतिबिंब उमटते . चंद्रपूरमध्ये गोंडांचा शासनकाळ साधारणत : ५५० वर्षे होता . पण बहुतांश काळ ते मोगलांचे मांडलिक होते . आताच्या महाकाली मंदिरात राणी हिराईच्या कल्पकतेचा प्रभाव दिसतो .
या आदिशक्ती महाकालीच्या यात्रापरंपरेविषयीही आख्यायिका आहेत . एका प्रचलित आख्यायिकेनुसार , नांदेड जिल्ह्यातील तळेगाव उमरी येथील राजाबाई देवकरीण ही धार्मिक वृत्तीची स्त्री . ती आदिशक्तीची उपासक होती . १९०५ - ०६च्या दरम्यान चंद्रपूरची आदिशक्ती देवी महाकाली ही राजाबाई देवकरीणीच्या स्वप्नात आली . ' मी चंद्रपूर परगण्यात आहे . तेव्हा तू माझ्या भक्तीचा प्रसार कर ', अशी आज्ञा तिला दिली . देवीची आज्ञा स्वीकारून राजाबाई आपल्या भागातील लोकांचा एक जत्था घेऊन चंद्रपूरला महाकाली देवीच्या दर्शनास आली . दर्शन घेऊन गावी परतली . तेव्हापासूनच या देवीच्या यात्रेला नांदेडसह मराठवाड्यातील भाविक मोठ्या संख्येने येऊ लागल्याचे सांगितले जाते . चैत्र शुक्ल षष्ठी ते पौर्णिमेपर्यंत ही यात्रा चालते . यात्रेच्या नऊ दिवसांत देवी व्रतस्थ असते . वरण , भात , पोळी असा नेवैद्य देवीला दिला जातो . दहीदुधाचा अभिषेक केला जातो . पुरणाच्या आरतीनंतर घट हलविला जातो . त्यानंतर भक्त नारळ फोडतात . पोतराज हे या यात्रेत आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात . आली आली या महाकाली। तिचा कळेना अनुभऊ। साऱ्या जगाला घालते खाऊ। माय माझी काली।। अशी लोकगीते म्हणत भक्त महाकाली देवीचा महिमा गातात . देवीचे भक्त देवकर व देवकरीण आंबिल घेतल्याशिवाय जात नाहीत . या मंदिराचे पुजारीपण दिवंगत नामदेवराव गोविंदराव महाकाले यांच्याकडे आले . गेल्या १३ पिढ्यांपासून त्यांच्या वंशजांकडे ही परंपरा सुरू आहे . गोंडकालीन इतिहास आणि अध्यात्माची परंपरा असा दुहेरी संदर्भ असलेले हे महाकाली मंदिर विदर्भाचीच नव्हे तर मध्य प्रांताची एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे .
अक्षांश-रेखांश : 19°56'32"N 79°18'14"E
http://wikimapia.org/9611368/mr/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0
श्री महाकाली देवी, चंद्रपूर
कृतयुगात, हल्लीच्या चंद्रपूर शहराच्या जागी ‘लोकपूर’ या नावाचे मोठे शहर होते व तेथे कृतध्वज नावाचा राजा राज्य करीत होते. त्याच्यानंतर त्याचा पुत्र सुनंद हा राज्य करू लागला. त्याच काळात तेथे महाकाली देवी प्रगट झाली अशी आख्यायिका आहे. पुढे परशुरामाने पृथ्वी नि:क्षत्रीय करण्यासाठी अनेक राज्ये नष्ट केली. त्यातच लोकपूरचे राज्यही नष्ट झाले. त्याच युगात श्रीरामचंद्र हे दक्षिणेस वनवासास निघाले असता लोकपुरातून पुढे गेले व त्याच वेळी त्यांनी हल्लीच्या चंद्रपूरच्या ईशान्येस ५० मलांवर असलेल्या चिमूर जवळच्या ‘चिमूर’ टेकडय़ातील एका टेकडीवर निवास केला असे मानतात, ती जागा आज रामदेगी (रामदिघी) म्हणून प्रसिद्ध आहे. तिथेच ‘सीताकुंड’ आहे. या टेकडीच्या पायथ्याशी राममंदिरही आहे. कलीयुगाच्या सुरुवातीस चंद्रहास्य नावाच्या राजाने महाकाली आणि अंचलेश्वर (महादेव) ही ठिकाणे पाहून तेथे राजधानी वसविली व त्याच्या नावावरून त्या नगरीस इंदूपूर किंवा चंद्रपूर असे नाव पाडले अशीही आख्यायिका आहे. (चांदा सेटलमेंट रिपोर्ट १८६९ मध्ये देण्यात आलेल्या व नंतर चांदा गॅझिटिअर १९०७ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका आख्यायिकेनुसार.) पुढे त्याचे राज्य नष्ट झाले व त्यानंतर भद्रावती ही नवीन राजधानी निर्माण झाली.
या भद्रावतीचा विस्तार उत्तरेस भटाळ्यापासून तो दक्षिणेस चंद्रपूपर्यंत होता. म्हणजे सुमारे ३५ मल लांब व १६ मल रुंद पसरलेली ही भद्रावती किंवा भांदक ही राजधानी होती. ‘भटाळा’ हे गाव वरोरा ते चिमूर या रस्त्यावर सध्या एक लहानसे गाव आहे. परंतु त्या गावात अनेक ठिकाणी खणले असता पुराणकालीन नाणी सापडतात असे तेथील लोक सांगतात. प्राचीन संदर्भाचे विश्लेषण केल्यास तत्कालीन शहर हे भद्रावती नसून भांदक आहे व पुराणातले भद्रावती हे हस्तिनापूरपासून जवळ होते. एका विस्तृत पठारावर पसरलेल्या भांदक या गावाच्या पश्चिमेला विजासन टेकडय़ा आहेत. त्यांच्यात गुहा असून त्या इसवी सन दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकातल्या असाव्यात. त्यांच्यातल्या काही शिलालेखांचा काळ हा गुप्तांचा किंवा सातव्या किंवा आठव्या शतकातला असावा असे किनगहॅम यांनी म्हटले आहे. म्हणजेच भांदक ही प्राचीनकाळी विस्तृत पसरलेली नगरी होती, असे दिसते. मात्र आज त्याच नगराचा उल्लेख भांदक तसेच भद्रावती या दोन्ही नावांनी होतो. गणेशपुराणात त्याचा उल्लेख पुष्पकपूर या नावाने आला आहे. पुढे त्रेतायुगात मणिपूर, द्वापारयुगात भांदक आणि कलीयुगातही भांदक म्हणूनच ओळखले जाते. गुत्समद ऋषीने ज्या पुष्पक वनात तपश्चर्या करून श्रीगणेशाची आराधना केली व वरप्राप्तीनंतर तिथेच श्री वरदविनायक गणेशाची स्थापना केली त्या स्थानाचा उल्लेख भृगु ऋषीने लिहिलेल्या गणेशपुरात खालीलप्रमाणे आढळतो.
इदं नगरं देवयुगे पुष्पक संजितम्।
त्रेतायां मणिपुरंच, भानकं द्वापारेपिच
कलौ तु भद्रकं नामख्यातं भविष्यति॥
भानक, भद्रक या नामांचा अपभ्रंश भांदक असा होतो. भांदक हे मोठे शहर होते आणि त्यात विजासन, गवराळा, सुमठाणा इत्यादी भाग येत होते. भांदकपासून सोळा मलांवर चांदा/चंद्रपूर नावाचे खेडे आहे असे उल्लेख जुन्या साहित्यात आढळतात. भांदकच्या पश्चिमेला दोन मलांवर गौराळा हे गाव असून तिथे एक तलाव आहे. त्याला लागून असलेल्या टेकडीवर श्री वरदविनायकाचे मंदिर आहे. याच जागी गृत्समद ऋषीने तपश्चर्या केल्यानंतर श्री वरदविनायकाची स्थापना केल्याचे वरील आख्यायिकेत म्हटले आहे. याच ठिकाणी पूर्वी योवनोशाचा महाल होता असे सांगितले जाते. पुढे तो पडला व जुने देऊळ राहिले. म्हणूनच काही लोक यालाच यौवनोशाचे देऊळ किंवा महाल असे संबोधतात. याच मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूच्या (मंदिरात प्रवेश करताना डाव्या हाताच्या िभतीत) एक शिलालेख होता. त्यात संवत ११६० असा उल्लेख आहे.
त्यावरून इ.स. ११०४ मध्ये चालुक्य राजा विक्रमादित्य (सहावा) याच्या काळात हे मंदिर बांधले गेले असावे. या राजाच्या दंडनायक नावाच्या अधिकाऱ्याने इ.स. १०८७ मध्ये विजारण टेकडीजवळची काही जमीन चराईसाठी दान दिली होती.
चंद्रपूर येथील महाकाली मंदिर विदर्भ तसेच मराठवाडय़ातील लोकांचे श्रद्धास्थान आहे. तसेच ते गोंड जमातीच्या लोकांचेही श्रद्धास्थान आहे. या देवीच्या संबंधातील उल्लेख स्कंध पुराणातील सह्य़ाद्री खंडात आढळतो. त्यानुसार असे सांगतात की, त्रेतायुगातील राजा कृतध्वज यास सुनंद नावाचा मुलगा होता. त्याला देवीने दृष्टांत दिला आणि एका विशिष्ट जागी उत्खनन करण्यास सांगितले. तेव्हा त्याला भुयारातील शिळेवर एक भव्य अशी मूर्ती दृष्टीस पडली. ती त्याने पाषाणात एक गुहा करून त्याच जागी स्थापित केली. तीच ही महाकाली देवी होय. आणखी एक आख्यायिका अशी की, खांडक्या बल्लाळ या गोंड राजाच्या राज्याची राजधानी बल्लारपूर येथे होती. ती पुढे त्याने चंद्रपूर येथे हलविली. झरपट नदीच्या कोरडय़ा पात्रात त्याला एक कुंड दिसले. त्यातील पाण्याने त्याने तोंड धुतले आणि तो ते पाणी प्यायला. त्याबरोबर त्याच्या चेहऱ्यावरील खांडके नष्ट झाली. दुसऱ्या दिवशी त्याने तेथे जाऊन कुंडातील पाण्याने स्नान केले तेव्हा त्याच्या सर्व अंगावरील खांडके नाहीशी झाली व त्याचे शरीर तेजस्वी दिसू लागले. राजाला स्वप्नात महादेवाने दर्शन दिले. त्यामुळे राजाने ते प्राचीन कुंड महादेवाच्या पिंडीच्या आकाराचे बनविले आणि तेथे अंचलेशर महादेवाचे मंदिर बांधले. याच मंदिराच्या दक्षिण बाजूला थोडय़ा अंतरावर राजाला एक भुयार दिसले आणि त्या भुयारात खडकात कोरलेली भव्य अशी देवीची मूर्ती आढळली. तीच ही महाकाली होय. राजाने ते भुयार स्वच्छ करून तेथे देवीचे मंदिर बांधले. या तपशीलांकडे पाहता इ.स. १४९५ ते १४९७ या काळात ही मंदिरे बांधण्यात आली असावीत. नंतरच्या काळात गोंड हिराई हिने मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि महाकालीच्या जवळ एकवीरा देवीचेही मंदिर बांधले. त्यामुळे हल्लीचे मंदिर इ.स. १७०४ ते १७१९ ते या काळात बांधले गेले असावे. हल्लीच्या देवीच्या मूर्तीच्या मागच्या बाजूला छोटय़ा भुयारात देवीचा पलंग असून निद्रा घेत असलेल्या स्वरूपात महाकाली देवीच्या मूर्तीचे दर्शन होते. याच ठिकाणी ही मूर्ती सापडली असावी. या दोन्ही कथा लक्षात घेता कृतध्वजाचा पुत्र सुनंद याने भुयारात आढळलेली देवीची जी मूर्ती गुहेत स्थापन केली तीच खांडक्या बल्लाळ राजाला सापडली असावी.
श्री महाकाली देवीची मूर्ती पाच फूट उंचीची असून उंच पाषाणात कोरलेली आहे. मूर्तीला शेंदूर अर्चन करण्यात आलेले आहे. मुखवटासुद्धा बसविण्यात आला आहे. तिच्या एका हातात खड्ग व दुसऱ्या हातात ढाल आहे. मंदिरात गेल्यावर सुमारे आठ-दहा पायऱ्या उतरून गेल्यानंतर गुहेसारखे दगडी गर्भगृह आहे. त्याच्या मध्यभागी श्री महाकालीची मूर्ती विराजमान आहे. गर्भगृहाचा दरवाजा आणि मूर्ती याच्यामध्ये फार थोडे म्हणजे दोन-तीन फुटांचेच अंतर आहे. गर्भगृह हे एखाद्या गुहेसारखेच वाटते. देवीचे मंदिर चौरस बांधणीचे व दगडी आहे. मंदिर ६० बाय ६० फुटांचे असून उंची ५० फूट आहे. त्यावर मुगल स्थापत्य शैलीची छाप आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. देवीचे गर्भगृह हे दहा फूट खोल असून १८ बाय १८ फुटांचे आहे. महाकालीची मूर्ती ही एका ३.१५ मीटर बाय १.६० मीटर बाय १.८५ मीटर आकाराच्या गुहेत स्थापित आहे. मूर्तीसमोरच्या गर्भगृहाच्या मोकळ्या जागेत महादेवाची मोठी पिंड/शिविलग स्थापित केले आहे. मंदिराच्या वर चार कोपऱ्यांवर चार घुमट आणि मध्यभागी एक मोठय़ा आकाराचा घुमट आहे. या महाकाली मंदिराभोवती मोठा परकोट असून तो इंग्रजांच्या राजवटीत सुपरिटेंडेंट कॅप्टन पिट यांनी बांधल्याचे उल्लेख आढळतात.
गोंड राजा वीरशहा (इ.स. १६९६-१७०४ ) याची पत्नी राणी हिराई हिने हे भव्य मंदिर बांधले असून वीरशहाच्या पराक्रमी विजयाचे प्रतीक म्हणून चत्र पौर्णिमेला महाकाली देवीच्या उत्सवाची प्रथाही सुरूकेली. तेव्हापासून चत्र शुद्ध प्रतिपदेला नवरात्राची सुरुवात होते व उत्सव आणि यात्रा सुरू होते. या यात्रा काळात महाकाली मंदिरात भक्त लाखोंच्या संख्येने येतात. अश्विन महिन्यातील नऊ दिवस नवरात्र उत्सव साजरा करतात. विजयादशमीलाही भक्तांची गर्दी असते. या यात्रेला विदर्भातून लोक येतातच परंतु मराठवाडय़ातूनही हजारोंच्या संख्येने लोक येतात. याची सुरुवात नांदेड जिल्ह्य़ातल्या तळेगाव उमरी या गाव्या राजाबाई देवकरीण हिच्यापासून झाली. असे सांगतात की, तिला देवीने दृष्टांत दिला आणि सांगितले की, ‘‘मी चंद्रपूर परगण्यात आले, तू माझ्या भक्तीचा प्रचार कर.’’ राजाबाई तिच्यासोबत मोठय़ा संख्येने देवी भक्तांना घेऊन देवीच्या दर्शनास आली. तेव्हापासून नांदेड, परभणी, बेदर इत्यादी भागांतून फार मोठय़ा संख्येने लोक येतात. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तिसगड इ. भागातील गोंड आदिवासी तसेच इतरही जाती-जमातींचे लोक मोठय़ा प्रमाणावर येतात. आंध्र प्रदेश, तेलंगणा इथून पोतराज या यात्रेला येतात. पोतराज म्हणजे देवीचे गावोगाव हिंडणारे भक्त. ते इथे दर्शनाला मोठय़ा प्रमाणात येतात. देवीच्या पुरुष भक्तांना पोतराज आणि स्त्री भक्तांना देवकरीण असे म्हणतात. पुरुष पोतराज स्त्रियांप्रमाणे केस वाढवून अंबाडा बांधतात आणि कपाळावर कुंकवाचा मळवट भरतात. कमरेभोवती हिरव्या रंगाचा घागरा व त्यावर घुंगराची माळ व पायात मोठे पितळी वाळे असतात. कमरेवरचे अंग उघडे असते. त्यांच्या हातात शेवटी निमुळता होत गेलेला चार ते पाच फूट लांबीचा व तीन ते चार इंच व्यासाचा ‘साठ’ (आसूड) असतो. कौल मिळाल्यावर तो सोट ते गरगर फिरवून स्वत:च्या अंगावर मारतात. त्याच्यासोबत एक स्त्री असून तिच्या डोक्यावर एका परातीत किंवा टोपलीत देवीचा मुखवटा ठेवलेला असतो. त्याची मळवट भरून पूजा केलेली असते. तिच्या हातात एक डफ असून ती दोन काडय़ांनी त्यातून आवाज काढत असते. यात्रेला दूरदूरून आलेले लोक रात्री मंदिर परिसरात पडाव टाकून विसावतात व रात्रभर डफरे वाजवून स्तवनगीते म्हणतात. देवीच्या मंदिर परिसरात आणि बाहेरील बाजूलाही प्रसाद, पूजा साहित्य, इतर संसारोपयोगी लहान वस्तू, प्लास्टिकची भांडी इत्यादींची पक्की दुकाने आहेत. चत्र महिन्यात फिरते दुकानदारही दुकाने लावतात.

https://realtourist.blogspot.com/2020/03/#.ZFpgU9dBw2w

No comments:
Post a Comment