Monday, March 13, 2023

ओंकारेश्वर मंदिर , पुणे

 


 https://aaishaasma.wordpress.com/


ओंकारेश्वर मंदिर
मुठा नदीच्या काठावर वसलेले
नारायण पेठ,
स्मशानात असलेले जागृत देवस्थान
ब्राम्हण समाजातील लोकांचे उत्तरविधी होत असत

इतिहास:
आॅक्टोबर १७३६ च्या पेशवे दफ्तरातील नोंदीनुसार “नवे सिवालय बांधावे”चिमाजी आप्पा पेशवे यांनी या ठिकाणी हे मंदिर बांधून घेतले. या वाटेने गायी पाण्याला जात असत, म्हणून ही जागा पवित्र मानण्यात येत असे व या जागी मंदिर बांधण्याचे सुनिश्चित झाले. आषाढ शुद्ध त्रयोदशी, १७३८ च्या नोंदीनुसार शिवलिंग प्रतिष्ठापना करण्यात आले.
“नर्मदेहून थोर लक्षणयुक्त बाण आणण्यात आला”
नर्मदेतील स्वयंभू बाण आणण्यात आला, आणणा-यास ५०० ते ६०० रूपये मानधन देण्यात आले अशी नोंद सापडते. त्या काळात सोन्याचा भाव १५ रूपये तोळा होता. बाकी आपण सूज्ञ

तांबड्या पाषाणाची पार्थिव लिंगासारखी साळूंखी बनवून घेतली व याची प्रतिष्ठापना करण्यात आली. पेशवे दफ्तरातील नोंदीनुसार कोठेही मंदिरासाठी आलेल्या खर्चाचा ताळेबंद सापडत नाही, हे आश्चर्य कारण पेशवे दफ्तरात पेशव्यांच्या रोजनिशीतील सर्व खर्चाचे ताळेबंद पहायला मिळतात. या मंदिराच्या स्थापनेचा संपूर्ण खर्च हा चिमाजी आप्पा पेशवे यांनी खाजगी खर्चातून केला असे सांगतात.
पुण्यातील ब-याच पेशवेकालीन वास्तू या पेशव्यांनी खाजगीतील खर्चाने बांधल्या आहेत उदा. शनिवारवाडा, पर्वती

मंदिराची रचना
काळ्या पाषाणात बांधलेले सुबक मंदिर आहे. मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला नऊ कळस पहायला मिळतात. चार बाजूंना, चार कोप-यांना आणि मधे एक असे नऊ कळस मंदिराला पहायला मिळतात. हे अशा बांधणीत दुर्मिळ मंदिर आहे. मंदिराला प्रशस्त असा अंतर्गत प्रदक्षिणा मार्ग पहायला मिळतो. मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करताना गणेशमूर्ती पहायला मिळते. मध्यकलशावर किर्तीमुख शिल्प पहायला मिळतं. तसंच वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती कोरलेल्या पहायला मिळतात.
मंदीरात भव्य शिवलिंग पहायला मिळते, या शिवलिंगातील बाण हा स्वयंभू नर्मद्या बाण आहे, साळूंखी ही तांबड्या पाषाणाची आहे, आणि बाण आणि साळूंखी यांच्या रंगाचा भेद आजही स्पष्ट पणे जाणवून येतो.

मंदिराच्या समोर भव्य नंदी हे या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य. १९६१ च्या पानशेत धरण फुटल्यामुळे आलेल्या महापुरात हा नंदी उखडून पडला होता. महत्प्रयासाने तो पुन्हा बसवण्यात आला

१२ जुलै १९६२ च्या पानशेत धरण पूरानंतर वाताहात झालेले ओंकारेश्वर मंदिर

मंदिर परिसरात असलेली इतर मंदिरे आणि बांधकामे

१. चिमाजी आप्पा पेशवे यांची समाधी : १७३८ ला मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आणि १७ डिसेंबर १७४० ला चिमाजी आप्पा यांचा मृत्यू झाला, त्यांच्या पत्नी अन्नपूर्णा बाई या सती गेल्या होत्या. ओंकारेश्वर मंदिर परिसरात चिमाजी आप्पा यांची समाधी पहायला मिळते. पूर्वी या ठिकाणी वृंदावन होत्या समाधीचा जिर्णोद्धार १८६१ मधे झाला आणि १९३० नंतर या ठिकाणी आता पहायला मिळते ती छत्री बसवण्यात आली.

२. सपिंड्या मारूती मंदिर : या मंदिरात पूर्वी पिंडदान होत असे.

३. काळबुवा महाराज समाधी : हे एक सिद्धपुरूष होते, नाव विष्णूबुवा नारायण. ते सतत काळ आला काळ आला असं म्हणत म्हणून त्यांना लोक काळबुवा म्हणत.

४. महिषासुरमर्दिनी मंदिर : हिरव्या पाषाणातली मूर्ती पहायला मिळते, देवीच्या मधल्या हातात असणारे त्रिशूल या मूर्तीच्या हातात दिसत नाही

५. दीपमाळ

६. नगारखाना

७. दरभ्या मारूती मंदिर : पानशेत पुरात ही मूर्ती वाहून गेली असली तरीही मंदिराचे भग्न अवशेष पहायला मिळतात

पेशवाई पुण्यात येऊन जर या मंदिराला भेट नाही दिली तर पुणे प्रवास हा अपूर्ण राहिला असंच म्हणावं लागेल

विशेष आभार : मंदार लवाटे सर आणि फिरस्ती महाराष्ट्राची परिवार
अनुराग दादा आणि शंतनू दादा

संजय मोरे सह्यसखा व सह अभ्यासक

संकलक
आयशा आस्मा
रणरागिणी बा रायगड

९६१९९७१४९५

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...