त्रिशुंड
गणपती मंदिर हे इ.स १७५४ मध्ये नाथपंथी गोसावींनी बांधलेले आहे. मंदिराला
कळस नाही. मंदिर पूर्वाभिमुख असून पुरूषभर उंचीच्या दगडी जोत्यावर उभारलेले
आहे. राजस्थानी, माळवा आणि दाक्षिणात्य शैलींचा संमिश्र वापर येथे करण्यात
आला आहे. प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या दोन्ही बाजूंना विष्णूच्या जय-विजय
या द्वारपालांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. गणेशपट्टीच्या वर शिल्पसमृद्ध
कमान कोरलेली असून सर्वात वरील बाजूस शेषशायी भगवान विष्णू कोरलेला आहे.
मंदिराच्या दर्शनी भागावर यक्ष, किन्नर, गंधर्व, मोर, पोपट, भैरव, गजांतलक्ष्मी, मर्कटे अशी अनेक मांगल्यसूचक शिल्पे कोरलेली आहेत.
१. त्रिशुंड गणपती मंदिराची दर्शनी बाजू
२ व ३. चौकटीच्या बाजूस कोरलेले द्वारपाल

४. चौकटीवरील कमान
५. काही नक्षीदार शिल्पे
६. हत्तीशिल्प
७ व ८. भारवाहक यक्ष व गंधर्व प्रतिमा

इथले सर्वात वेगळे आणि एकमेवाद्वितीय असे म्हणता येईल असे जे शिल्प आहे ते एकशिंगी गेंड्याचे. काही शिपाई हे गेंड्याला साखळदंडाने बांधताना दिसत आहेत. हिंदुस्थानच्या तत्कालीन राजकीय परिस्थितीचे चित्रीकरण करणारे हे शिल्प असावे असा काही अभ्यासकांचा कयास आहे. प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी बंगाल आणि आसाम प्रांतावर आपली सत्ता प्रस्थापित केली लवकरच हिंदुस्थानात इंग्रज आपला पाय रोवतील जणू याची भविष्यवाणीच ह्या शिल्पाद्वारे व्यक्त केलेली आहे. हे शिल्प बहुतेक १७५७ नंतर कोरलेले असावे.
९. एकशिंगी गेंड्याचे एकमेवाद्वितीय असे शिल्प
१०. डाव्या बाजूस कोरलेला गेंडा
११. उजव्या बाजूस कोरलेला गेंडा
मंदिराच्या दर्शनी बाजूच्या डाव्या कोपर्यात रखुमाईचे शिल्प तर डाव्या बाजूच्या प्रदक्षिणा मार्गावर विठ्ठ्लाचे शिल्प कोरलेले आहे. तसेच पुढे जाता एका चौकटीत नटराजाची अतिशय देखणी मूर्ती कोरलेली दिसते.
१२ व १३. विठ्ठल रखुमाई

१४. नटराजाची अतिशय रेखीव मूर्ती
मंदिराच्या पाठीमागील बाजूस आगळ्या पद्धतीचे सहसा कुठेही न आढळणारे शिवलिंग आहे. ही लिंगोद्भव शिवप्रतिमा आहे. यात फक्त शाळुंका असून वरच्या दिशेने उडणारा हंस, खाली मुसंडी मारणारा वराह आणि शिवलिंगावर छत्र धरणारा नाग अशा प्रतिमा कोरलेल्या आहेत. पुराणातील एका कथेवर हे शिल्प आधारीत आहे. एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांत श्रेष्ठत्वावरून वाद निर्माण झाला. तेव्हा एक दैदिप्यमान अग्निस्तंभ प्रकट झाला. याचा आदी आणि अंत जो शोधून काढेल तो श्रेष्ठ असे ठरले. विष्णू हंसाचे रूप घेऊन अंत शोधायला गेला तर ब्रह्माने वराहरूप घेऊन पाताळात मुसंडी मारली. जेव्हा कुणालाही कसलाही थांग लागेना तेव्हा ते दोघेही शिवाला शरण गेले तेव्हा दोघेही आपापल्या परीने श्रेष्ठ आहेत असे सांगून लिंगोद्भव स्वरूपात आपले रूप प्रकट केले.
१५. अद्भूत शिवलिंग
१६. शिवलिंग अधिक जवळून
हे
सर्व बघूनच मंदिराच्या आत प्रवेश केला. आतमध्येच एक तळघर असून ते फक्त
गुरुपौर्णिमेच्या दिवशीच उघडले जाते अशी माहिती मिळाली. तळघरात नेहमीच
कंबरभर पाणी असते.
गर्भगृहाच्याही
दोन्ही बाजूंस द्वारपाल कोरलेले असून वर नक्षीदार कमान आहे. त्याच्यावर तीन
शिलालेख कोरलेले आहेत. पैकी दोन संस्कृतात असून एक फारसी भाषेत कोरलेला
आहे. पहिल्या शिलालेखात मंदिराच्या स्थापनेचा काल व रामेश्वराची
प्रतिष्ठापना केल्याचा उल्लेख असून दुसर्या शिलालेखात गीतेतील नमनाचा
श्लोक कोरलेला आहे तर फारसी शिलालेखात हे स्थान गुरुदेवदत्तांचे असलेले
नमूद केले आहे.
१७. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील कमानीवरील गजांतलक्ष्मी शिल्प
१८. कमानीवरील संस्कृत आणि फारसी शिलालेख
गाभार्यात
गेलो. नावाप्रमाणेच गणेश मूर्तीला तीन सोंडा आहेत. कदाचित ही
दत्तस्वरूपातील गणेशमूर्ती असावी म्हणूनही मंदिराच्या बांधणीत ब्रह्मा,
विष्णू, शंकराच्या संदर्भातील शिल्पे येथे बरीच कोरलेली दिसतात.
एकमुख,
तीन सोंडा आणि सहा हात अशीरचना असलेली ही मयुरारूढ मूर्ती मूळची काळ्या
पाषाणातील असून आता पूर्णपणे शेंदूरविलेपीत आहे. सत्व, तम आणि रजोगुणांनी
युक्त असलेला ह्या गणेशाच्या मांडीवर शक्तीदेवता बसलेली आहे. हातात परशू,
अंकुश आदी आयुधे आहेत.
मूर्तीच्या
पाठीमागच्या भिंतीवर अतिशय रेखीव अशी शेषशायी विष्णूची प्रतिमा कोरलेली
असून त्यावरील कमानीवर देखणे गणेश यंत्र कोरलेले आहे.
१९. त्रिशुंड गणपती
२०. त्रिशुंड गणपती
२१. गणेशमूर्तीच्या पाठीमागील बाजूस कोरलेला शेषशायी श्रीविष्णू
२२. त्यावर कोरलेले गणेशयंत्र
२३. मंदिरात इतरत्र असलेल्या काही शिल्पप्रतिमा
२४. मंदिरात इतरत्र असलेल्या काही शिल्पप्रतिमा
२५. मंदिरात इतरत्र असलेल्या काही शिल्पप्रतिमा
मंदिराला शिखर नसल्याने बर्याच काळपर्यंत हे तसे दुर्ल़क्षितच होते. शिखराच्या जागी स्वर्गमंडपासारखे सपाट वर्तुळाकार छत आहे. पण हल्ली मंदिराची चांगली निगा राखली जातेय.
गणेशाचे
दर्शन घेऊन मी आणि अत्रुप्त आत्मा बाहेर पडलो ते आता पुढच्या टप्प्यात
पुण्यातली अशीच काही दुर्लक्षित पण शिल्पसमृद्ध मंदिरे बघण्याचे मनावर
घेऊनच.
पण आता आमची पावले वळली ती मात्र जुन्याबाजाराकडे.
अता थोडिशी आमची मंदिर व्यवस्थेविषयी भर:-तिथे जोशी नावाच्या एक आजिबाई ह्या मंदिराची देखभाल करतात...त्यांनी सांगितलं,की ६१सालच्या पुरापासुन हे मंदिर त्यांच्या कडे सांभाळायला आलं आहे...त्या स्वतः सर्व साफसफाई,झाडपुस,देवाचा नैवेद्य करणे ही कामं करतात..पण अजुनही मंदिराच्या डागडुजी साठी कुणाकडुन काही मिळत नाही, मंदिर तसं आडबाजुला,म्हणजे आत,आणी अप्रसिद्ध असल्यामुळे उत्पन्न फारसं नाही,त्यामुळे आत खराब होत चाल्लेली फरशी वगैरेंसाठी पैसे नाहित....तसच बाहेरचा उंबर जोत्यातनं मुळासह आत घुसायच्या बेतात आला आहे...(तळघरात पाणी असल्यामुळे...) तो ही तोडायला हवा आहे..पण.... !
सुंदर शिल्पाकृतींनी नटलेल्या सुरेख मंदिराचे, चोखंदळपणे निवडलेले आणि अत्यंत कौशल्याने चौकटबद्ध केलेले फोटो आवडले. आम्ही अनेकदा पुण्यास जातो. मात्र कधीही कुणी याबद्दल बोलल्याचे ऐकलेले नाही.
मंदिराच्या पाठीमागील बाजूस आगळ्या पद्धतीचे सहसा कुठेही न आढळणारे शिवलिंग आहे. ही लिंगोद्भव शिवप्रतिमा आहे. यात फक्त शाळुंका असून वरच्या दिशेने उडणारा हंस, खाली मुसंडी मारणारा वराह आणि शिवलिंगावर छत्र धरणारा नाग अशा प्रतिमा कोरलेल्या आहेत. पुराणातील एका कथेवर हे शिल्प आधारीत आहे. एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांत श्रेष्ठत्वावरून वाद निर्माण झाला. तेव्हा एक दैदिप्यमान अग्निस्तंभ प्रकट झाला. याचा आदी आणि अंत जो शोधून काढेल तो श्रेष्ठ असे ठरले. विष्णू हंसाचे रूप घेऊन अंत शोधायला गेला तर ब्रह्माने वराहरूप घेऊन पाताळात मुसंडी मारली. जेव्हा कुणालाही कसलाही थांग लागेना तेव्हा ते दोघेही शिवाला शरण गेले तेव्हा दोघेही आपापल्या परीने श्रेष्ठ आहेत असे सांगून लिंगोद्भव स्वरूपात आपले रूप प्रकट केले.>>>>> असेच एक शिल्प वेरूळलाही आहे.
मात्र तिथे मी ऐकलेली कथा अशी विष्णू वराह रूप घेऊन पाताळात गेला. थांग लागत नाही म्हणून परत आला. ब्रम्हा हंस रूपाने आकाशात गेला आणि परत येऊन थांग लागला असे खोटेच सांगू लागला. तेव्हा शिवाने रागावून ब्रम्हदेवाच्या पूर्वी पाच (चारही दिशांना चार आणि ऊर्ध्व दिशेला एक) असलेल्या शिरांपैकी ऊर्ध्व दिशेच्या शिराचा शिरच्छेद केला.
असो.
एकशिंगी गेंड्याचे शिल्प मात्र आजवर इतरत्र पाहण्यात आलेले नाही.
तळ्घरात पाणी कुठून येतं ते?
तळघरात जिवंत झरा आहे. दर गुरुपौर्णिमेला त्यातील पाणी उपसून तळघर स्वच्छ करून दर्शनासाठी खुलं ठेवलं जातं.
मंदिराचा पत्ता:
कसबा
पेठेतून मंगळवार पेठ दवाखान्याच्या दिशेने जकातेपुलानंतर उजव्या बाजूस
आहे. कमला नेहरू हॉस्पिटलच्या जवळच. पण खुद्द कसब्यातील लोकांनाही ते फारसे
माहित नसल्याने तसे विचारतच जावे लागते.
मात्र हे मंदिर हेमाडपंती शैलीत नाही. राजस्थानी, माळवा अशा मिश्र शैलींमध्ये आहे.
पुण्यातील अपरिचित त्रिशुंड गणपती
पुण्यात कधी जाण्याचा प्रसंग आला तर ह्या प्राचीन मंदिरास नक्की भेट द्या.
कसबा पेठेतील त्रिशूंड गणपती मंदिर १६ व्या शतकातील आहे. या मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती मोराच्या आसनावरील, हातात त्रिशूल असलेली आहे.
कसबा
पेठेतील नागझरी ओढ्याच्या काठावर त्रिशूंड गणपती मंदिर आहे. इंदूरजवळील
धामापूर इथून पुण्यात स्थायिक झालेले महंत भीमगिरी गोसावी यांनी त्याची
स्थापना केली. या मंदिराचे बांधकाम २६ ऑगस्ट १७५४ रोजी सुरू झाले. मात्र,
१७७० ला ते पूर्ण झाले.
मंदिराच्या बांधकामावरून पेशवे वास्तूशैलीची प्रचिती येते. मंदिराच्या भिंतींवर देवनागरी, पर्शियन आणि संस्कृतमध्ये काही तपशील आहेत, तसेच भगवद्गीतेतील श्लोक लिहिलेले शिलालेखही आहेत. या मंदिराच्या समोरील भागात काही अनोखी शिल्पे कोरलेली आहेत. त्यापैकी ब्रिटीश सैनिकाने लोखंडी साखळ्यांनी बांधलेल्या गेंड्याचे शिल्प लक्ष वेधून घेते.
मंदिरातील त्रिशूंड मयुरेश्वर गणेश मोरावर विराजमान असून, या मूर्तीला त्रिशूंड म्हणजेच तीन शीर व सहा हात आहेत. शुद्ध काळ्या बेसॉल्ट दगडातून ही मूर्ती तयार केली गेली आहे. मंदिराच्या दर्शनी भागात मोर, पोपट आणि गेंडे यांच्यासह अनेक वास्तविक आणि पौराणिक संदर्भ असलेल्या पक्षी-प्राण्यांची शिल्पे आहेत. गाभार्याकडे जाणार्या रस्त्यावर प्रवेशद्वारातच महालक्ष्मीची मूर्ती असून, तिथे दोन हत्तीही आहेत.
मंदिराला एक तळघरदेखील आहे. असे मानले जाते की तपस्वींनी ध्यान करण्यासाठी ते वापरले होते. तळघरात गोसावी समाधी व दोन खांब असलेला एक खुला हॉल आहे. हे तळघर बहुतांश वेळा पाण्यानेच भरलेले असते. गुरूपौर्णिमेला मात्र तळघर स्वच्छ केले जाते, ते सुकवले जाते. त्यावेळी अनेक भाविक गोसावी यांच्या समाधीचे दर्शन घेतात.
त्रिशूंड गणपती मंदिराच्या आसपास इतर मंदिरेही आहेत. त्यापैकी सर्वांत लोकप्रिय म्हणजे नागेश्वर मंदिर. त्याभोवती इतर लहान मंदिरे आहेत. त्यात विठ्ठल, मारुती, काळाराम आणि विष्णू यांच्या मूर्ती आहेत. जुने बेलबाग मंदिर म्हणूनही हे प्रसिद्ध आहे.
मंदिरात सकाळी ८.३० वाजता रोज आरती होते. या व्यतिरिक्त मंदिरात गणेश जन्मोत्सवदेखील उत्साहात साजरा केला जातो.
समाधी मंदिर व हठयोगींचे साधनास्थळ यांच्यामुळे त्रिशुंड गणपती महाराष्ट्रातील एक अद्वितीय मंदिर आहे. पुण्यातील तुळशीबाग, पर्वती, ओंकारेश्वर, सारसबाग गणपती मंदिर प्रसिध्द आणि लोकांना परिचित आहेत. हे मंदिर दुर्लक्षित राहण्याचे दुसरे कारण म्हणजे १८व्या शतकात नागझिरा ओढ्याच्या काठावर असण्याऱ्या सोमवार आणि मंगळवार पेठेच्या काही भागात मोठे स्मशान होते. शहाजीराजांनी इ.स. १६०० मध्ये शहापुरा पेठ वसवली. १७३५ मध्ये थोरल्या बाजीराव पेशवे यांनी व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी शहापुरा पेठेचा विकास करून सोमवार पेठ असे नामकरण केले. या पेठेत गोसावीपुरा नावाचा भाग होता. गोसावी समाजाची वस्ती मोठ्या प्रमाणात होती, म्हणून ह्याला गोसावीपुरा असे म्हणत. हे गोसावी सधन होते. सावकरी, सुवर्ण-रत्न यांचा बराचसा व्यापार या गोसाव्यांच्या हातात होता. ह्या स्मशानात अनेक गोसावींच्या समाध्या होत्या. त्याकाळात समाधीशेजारी शिवमंदिर उभारण्याची प्रथा होती. मंदिरे स्मशानपरिसरात असल्यामुळे भाविकांची वर्दळ कमी होती. त्यामुळेच उत्कृष्ट कातळशिल्प असूनसुध्दा त्रिशुंड मंदिर हे समाधीमंदिर असल्यामुळे दुर्लक्षित राहिले. म्हणूनच पुण्यातील फार कमी लोकांना त्रिशुंड गणपती मंदिराची माहिती आहे आणि मंदिरापर्यंत पोहोचेपर्यंत इथे मंदिर आहे हे कळून येत नाही.
हठयोगी आणि गोसावी पंथीयांचे श्रध्दास्थळ असलेल्या त्रिशुंड मंदिराची उभारणी इंदूरजवळच्या धामपूर गावातील भीमगिरजी गोसावी ह्यांनी १७५४ ते १७५७ या काळात केली. ह्या मंदिरावर राजस्थानी, मराठी आणि दाक्षिणात्य शैलीचा प्रभाव आहे. त्रिशुंडी मंदिर पेशवेकालीन असले तरी ते पेशवेकालीन मंदिरांपेक्षा वेगळे आहे. पेशवेकालीन मंदिरांचे गर्भगृह दगडी व सभामंडप लाकडी असते, पण हे मंदिर पूर्णपणे काळ्या पाषाणात बांधलेले आहे.

पूर्वाभिमुखी असलेले त्रिशुंड गणपती मंदिर पुण्याच्या सर्वात जुन्या कसबा पेठेजवळ आणि नागझिरा ओढ्याच्या काठावर आहे. मंदिराच्या खाली तळघर असल्यामुळे हे मंदिर उंच जोत्यावर बांधले आहे. मंदिरासमोर दगडी आंगण आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिराच्या दर्शनी भागात राजस्थानी पध्दतीचे स्तंभ आहेत. स्तंभांवर घटपल्लवांचे स्तंभशीर्ष कोरलेले आहेत. स्तंभांवर किर्तीमुख आणि साखळ्यांना लटकणाऱ्या घंटा दाखवलेल्या आहेत. स्तंभांच्या वरच्या भागात कीचक किंवा भारवाहक यक्ष कोरलेले असून यक्षांनी छताचा भाग आपल्या पाठीवर व हातांनी तोलून धरला आहे. यक्षांनी हातात साखळ्यांना लटकणाऱ्या घंटा पकडलेल्या आहेत. स्तंभाच्या खालच्या बाजूस श्रीकृष्ण, विठ्ठल इ. देवता कोरलेल्या आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल कोरलेले आहेत. दोन्ही द्वारपालांच्या बाजूच्या भिंतीवर ब्रिटीश सैनिक कोरलेले असून त्यांनी एकशिंगी गेंड्याला साखळदंडानी बांधलेले आहे. हे शिल्प भारतातील तत्कालीन राजकीय परिस्थितीचे वर्णन करते. १७५७ साली झालेल्या प्लासीच्या लढाईत ईस्ट इंडिया कंपनीने बंगाल आणि आसाम प्रांतावर ताबा मिळवला. आसाम प्रांताचे प्रतिक म्हणून गेंडा कोरलेला आहे. परंतु मंदिरात असलेल्या शिलालेखानुसार मंदिराची उभारणी १७५४ झालेली आहे आणि प्लासीची लढाई झाली १७५७ साली. ह्याचाच अर्थ हे शिल्प प्लासीच्या लढाईनंतर कोरले असावे आणि कारागिरांनी गेंड्याला प्रत्यक्ष बघितलेले असावे. ह्या शिल्पाच्या खाली अर्धउठावातील एकमेकांशी झुंजणारे हत्ती दाखवले आहेत. द्वारशाखेच्या खालती अधिष्ठानावर (जोत्यावर) दोन्ही बाजूला गजलक्ष्मीचे (लक्ष्मीवर दोन्ही बाजूंनी दोन हत्ती सोंडेत धरलेल्या कलशाने अभिषेक करणारे) शिल्प कोरले आहे. द्वारशाखेच्या ललाटबिंबावर मध्यभागी उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती कोरली आहे. मूर्तीच्या खालच्या भागात गणेशयंत्र कोरले आहे. द्वारशाखेच्या वर गजलक्ष्मीचे शिल्प कोरलेले आहे. ह्या शिल्पाच्या दोन्ही बाजूला असलेल्या मकरमुखातून निघालेली महिरप आहे. ह्या महिरपीच्या वर पिसारा फुलवलेला मोर आणि त्याच्या बाजूस अजून दोन मोर आहेत. महिरपीच्या दोन्ही बाजूला एकमेकांचे हात धरून उभी असलेली वानर आहेत. सर्वात वरच्या पट्टीवर विष्णूचे विविध अवतार दाखवले आहेत. ह्याच पट्टीवर डाव्या बाजूच्या कोपऱ्यात एका साधूने स्वतःच्या हाताने दुसऱ्या साधूला खाली डोके आणि वरती अश्या स्थितीत पकडले आहे असे आगळेवेगळे शिल्प आहे. दर्शनी भागात दोन्ही बाजूंना राजस्थानी शैलीची रिकामी गवाक्षे आहेत. ह्या गवाक्षांच्यावरती पक्षी बसलेले आहेत. मंदिराच्या दर्शनी भागात सर्वात वरती शेषशायी विष्णूची मूर्ती कोरली आहे. मंदिराचे शिखर एकतर बांधले गेले नसावे किंवा पडले असावे आणि त्यामुळे शिखराच्या आतील घुमट आपल्याला बघायला मिळतो. मंदिराच्या दर्शनी भागात काल्पनिक प्राणीसुद्धा दाखवले आहेत.

प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश करताना उंबरठ्याच्या शेजारील डाव्या आणि उजव्या भिंतीत बंद असलेले दरवाजे आपले लक्ष वेधून घेतात. ह्या बंद दरवाज्यांच्या मागे तळघरात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दरवर्षी फक्त गुरुपोर्णिमेला तळघरात जाऊन गुरूंच्या समाधीचे दर्शन घेता येते. बाकीच्या दिवशी हे दरवाजे बंद असतात. वर्षभर ह्या तळघरात गुढघाभर पाणी असते. दगडी सभामंडपाच्या भिंतीत रिकामे कोनाडे आहेत. सभामंडपातून अंतराळात प्रवेश करण्यासाठी असलेल्या प्रवेशद्वाराच्यावर गजलक्ष्मीचे सुरेख शिल्प आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल आणि कोनाडे आहेत. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर उजव्या सोंडेचा गणपती व गणपतीच्या खालच्या बाजूला गणेशयंत्र कोरलेले आहे.
सभामंडपातून अंतराळात आल्यानंतर गर्भगृहाला प्रदक्षिणा घालण्यासाठी उजव्या आणि डाव्या बाजूला दोन लहान दरवाजे आहेत. गर्भगृहात शिरण्यापूर्वी डाव्या बाजूला असलेल्या दरवाज्याने बाहेर पडल्यानंतर गर्भगृहाच्या बाह्यभिंतीवर दक्षिणेला असलेल्या देवकोष्ठामध्ये नटराजाची सुबक मूर्ती आहे. पश्चिमेच्या देवकोष्ठामध्ये लिंगोद्भव शिव शिल्प आहे. लिंगोद्भवाची कथा पुराणामध्ये येते. कथेनुसार एकदा विष्णू आणि ब्रह्मा यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण असा वाद चाललेला असतो. हा वाद चालू असताना भगवान शंकर तिथे प्रकट होतात व म्हणतात जो कोणी आदीलिंगाचा उगम आणि अंत शोधेल तोच श्रेष्ठ. त्याप्रमाणे ब्रह्मा हंसाचे रुप आकाशात जातो आणि विष्णू वराहाचे रुप घेऊन पाताळात जातो. परंतु दोघांनाही उगम आणि अंत शोधण्यात यश येत नाही. शेवटी ब्रह्मा आणि विष्णू शंकराचे श्रेष्ठत्व मान्य करतात. येथील शिल्पात ब्रह्म हंसरुपात व विष्णू वराहरुपात कोरलेले आहेत. शिवलिंगावर नागाचा फणा दाखवलेला आहे. अनेक शैवलेण्यांमध्ये आणि शिवमंदिरामध्ये लिंगोद्भव गोष्ट दाखवलेली असते. पण त्रिशुंडी मंदिरातील लिंगोद्भव शिव वेगळे आहे. उत्तरेच्या देवकोष्ठामध्ये कोणत्या देवतेची मूर्ती आहे हे ओळखता येत नाही. उत्तरेकडील देवकोष्ठ बघून उजव्या बाजूच्या दरवाज्याने आपण पुन्हा अंतराळात येतो.


गर्भगृहाच्या दरवाज्याच्या दोन्ही बाजूला द्वारपाल म्हणून हातामध्ये साखळी पकडलेले जटाधारी साधू आहेत. दरवाज्याच्या ललाटबिंबावर उजव्या सोंडेचा गणपती व गणपतीच्या खालच्या बाजूला गणेशयंत्र कोरलेले आहे. दरवाज्याच्या वरती शिव आणि त्याच्या एका मांडीवर पार्वती बसलेली असून दुसऱ्या मांडीवर बसलेली स्त्री कोण आहे हे सांगता येत नाही. मूर्तीच्या एका बाजूला शंकराचे वाहन नंदी व दुसऱ्या बाजूला पार्वतीचे वाहन सिंह कोरलेले आहे. दरवाज्यावर सुबक महिरप कोरलेली आहे. दरवाज्याच्या वरती दोन देवनागरी लिपीत व संस्कृत भाषेत आणि एक फारशी शिलालेख कोरलेला आहे.


गर्भगृहात तीन सोंडा असलेली मयुरारूढ गणेशमूर्ती आहे. मोराने चोचीत फणा उगारलेला नाग धरला आहे. मूर्तीच्या महिरपीवर व गणपतीच्या कानावर असलेल्या छिद्रांचा उपयोग दागिने घालण्यासाठी केला जात असावा. गणपतीला सहा हात आहेत. वरच्या उजव्या हातात अंकुश, मधल्या उजव्या हातात शूल, खालच्या उजव्या हातात मोदकपात्र, वरच्या डाव्या हातात परशु, मधल्या डाव्या पाश आणि खालच्या डाव्या हाताने मांडीवर बसलेल्या शक्तीला आधार दिला आहे. गणपतीची डाव्या बाजूची सोंड शक्तीच्या हनुवटीला स्पर्श करते. उजव्या बाजूची सोंड खालच्या उजव्या हातात असलेल्या मोदकपात्राला स्पर्श करते. मधली सोंड मोराच्या डोक्याला स्पर्श करते. मोराच्या उजव्या बाजूला उंदीर आणि डाव्या बाजुला स्त्री भक्त आहे. तसेच मोराच्या दोन्ही बाजूंना चवरीधारी स्त्रिया कोरलेल्या आहेत. गणपतीच्या मागच्या भिंतीवर शेषशायी विष्णु आणि गणेशयंत्र कोरलेले आहे. गाभाऱ्याच्या उजव्या भिंतीतून तळघरात जाण्याचा मार्ग असून पुजारी समाधीपाशी दिवा लावण्यासाठी ह्या मार्गाचा वापर करतात.

गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर असलेले शिलालेख
गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर एकूण तीन शिलालेख आहेत त्यापैकी पहिला आणि दुसरा शिलालेख संस्कृत भाषेत (देवनागरी लिपी) आणि तिसरा शिलालेख फार्सी भाषेत आहेत.
पहिला शिलालेख
पुण्यनगरी पुरी
|| श्री गणेशाय नमः || श्री ||
|| सरस्वत्यै नमः || श्री गुरु ||
|| दक्षिणामूर्तये नमः || स ||
|| वत् १८०१ तथा नृपशाली ||
|| वाहन शके १६७६ भावाना ||
|| म संवत्सरे मार्गशीर्ष शुक्ल ||
|| सौम्यवासरे शुभवेला ||
|| यां अस्य स्थाने श्रीमहका ||
|| ल रामेश्वर प्रतिष्ठितं सु ||
|| तिष्ठितमंस्तु || श्री देवदत्त ||
|| इह स्छान शुभं भवतु श्री रस्तु ||
सारांश
लेखाच्या पहिल्या पुण्यनगरी पुरी अर्थात पुणे शहराचा उल्लेख आहे. तसेच लेखात गणपती, सरस्वती, श्री गुरु आणि दक्षिणमूर्ती यांना नमन केले आहे. संवत १८०१ शालिवाहन शके १६७६ भावनाम संवत्सर मार्गशीर्ष महिन्यात सौम्यवार (बुधवार) रोजी श्री देवदत्त याने श्री महकाल रामेश्वराची स्थापना केली असे लेखात लिहिले आहे.
महाराष्ट्रातील शिलालेखात उत्तरेकडील विक्रम संवत दिले जात नाही. महाराष्ट्रात विक्रम संवतचा उल्लेख असलेला हा महत्वाचा लेख आहे.
दुसरा शिलालेख
|| श्री गुरुदेव ||
|| दत्त ||
|| श्री गणेशाय नमः महेशा ||
|| न्नापरो देवो महिम्नो नाप ||
|| रा स्तुति: || अघोरान्नापरो
|| मंत्रो नास्ति तत्वं गुरो: परं ||
|| जयति मंगला | काली भद्र
|| काली कपालिनी || दुर्गा
|| क्षमा शिव धात्री स्वाहा
|| स्वधा नमोस्तु ते || सर्व मंग
|| ल मांगल्ये शिवे सर्वार्थसा
|| धके || शरण्ये त्र्यंबके गौ
|| री नारायणी नमोस्तु ते ||
|| यत्र योगेश्वर: कृत्सनो यत्र पा
|| र्थो धनुर्धर: || तत्र श्रीर्विजयो
|| भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ||
सारांश
ह्या लेखात काल कोरलेला नाही तरी हा लेख पहिल्या लेखाबरोबरच कोरलेला असावा असे वाटते. लेखाच्या सुरुवातीला गुरुदेव दत्त आणि गणपती यांना वंदन केले आहे. या लेखात शंकराची व कालीची स्तुती कोरलेली आहे. सर्वात शेवटी यत्र योगेश्वर हा गीतेतील श्लोक दिला आहे.
तिसरा शिलालेख
ई मकान गुरुदेवदत्त
फुकरा फी तारीख हफ्तुम
शहर जूकअद रोज चहार शम्बेह
सनह ११६७ तअ्मीर नमूदे शुद
सारांश
फकीर गुरुदेव यांचे हे मकान (घर) तारीख ७ माहे जिल्काद हिजरी ११६७ या दिवशी बांधून पूर्ण झाले. हा शिलालेख उठावाचा असून लेखात मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याचा उल्लेख आहे. हिंदू मंदिरातील फारसी शिलालेख म्हणून ह्या लेखाला महत्व आहे.
मंदिरात असलेले तिन्ही शिलालेख मंदिराच्या बांधकामासंदर्भात आहेत. शिलालेखांनुसार हे मंदिर श्रीमहाकाल रामेश्वर आणि दत्तगुरू यांचे आहे. तिन्हीपैकी एकाही लेखांत गणपती मंदिराचा कोणताही उल्लेख नाही आहे. शंकर आणि दत्त या देवतांचा लेखात उल्लेख असताना गणपतीच्या मूर्तीची स्थापना कोणी, कधी आणि का केली? गणपतीच्या स्थापनेनंतर शंकराच्या मूर्तीचे (किंवा शिवलिंगाचे) आणि दत्ताच्या मूर्तीचे काय झाले. असे मानले मंदिर गणपतीचेच आहे, तर मग विष्णू आणि शंकर यांच्या शिल्पांबरोबर त्यांच्या विविध अवतारांची शिल्प मंदिरावर का आहेत? गणपती संदर्भात एकही शिल्प का नाही आहे? मंदिराबद्दल प्रश्न भरपूर आहेत, पण उत्तर एकाचेही मिळत नाही.
एकेकाळी महाकाल रामेश्वर व दत्ताकरिता प्रसिद्ध असलेले मंदिर आज त्रिशुंडी गणपती नावाने ओळखले जाते. भरवस्तीत असूनसुध्दा हे मंदिर पुणेकरांसाठी आजही अपरिचित आहे. समाधी मंदिर, सुबक कोरीवकाम, विष्णू मूर्ती व विविध अवतारशिल्प, शिवाचे अवतार, गणेश यंत्र, तळघर आणि वेगळ्या धाटणीची त्रिशुंड गणेशाची मूर्ती हे सर्व बघण्यासाठी मंदिराला एकदा तरी नक्कीच भेट द्यावी लागेल.
शिलालेख संदर्भ
१. तेंडूलकर महेश, मराठी व संस्कृत शिलालेखांच्या विश्वात, स्नेहल प्रकाशन, २०१५
तेव्हाच तळघरात जाण्याचा योग आला होता. गुरुपौर्णिमेचा दिवस नव्हता तरीही जाता आले.
दुष्काळ असल्याने तळघर प्रथमच कोरडे पडले होते. आत अक्षरश: भुलभुलैय्या
आहे. अनेक खोल्या, अनेक वाटा आहेत. संधी मिळाल्यास हे तळघर अवश्य बघावं.
बाकी हे मंदिर नाथपंथी गोसाव्यांचे असल्याने काहीसे तंत्रमार्गाचा विचार करून बांधल्यासारखं आहे. गणपतीचे नक्कीच नाही.
वरुन दुसर्या फोटोत असलेले यंत्र हे बगलामुखी / बगुलामुखी यंत्र असल्याचे
वाटते. जे शत्रु स्तंभन आणि सातत्याने शत्रुवर विजय मिळवण्यासाठी वापरले
जाते. १० महाविद्या पैकी आठव्या स्थानावर असलेल्या देवी बगलामुखी ही
मुख्यत्वे स्तंभनाची देवी आहे.

पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिर
गणपती
हे अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत. लोकमान्य टिळकांमुळे सार्वजनिक
उत्सवाची परंपरा सुरू झाली असली तरी गणेशपूजन ही इथली प्राचीन परंपरा आहे,
या गोष्टीचं प्रतीक म्हणजे ठिकठिकाणी असलेली गणेश मंदिरं. ‘लोकप्रभा’ने
यावर्षी शंभर वर्षांहूनही अधिक वर्षांची परंपरा असलेल्या गणेश मंदिरांचा
आढावा घेतला आहे.
काही काळ विस्मृतीत गेलेल्या या गणेश मंदिराची रचना वैशिष्टय़पूर्ण आहे. वरवर हे गणेश मंदिर वाटत असले तरी तिथे तळघरात एके काळी हटयोगाची साधना होत असावी. हे मूळ महादेवाचे मंदिर असावे अशी रचना दिसत असल्यामुळे ते गणेश मंदिर कधी झाले असावे, हे कोडेच आहे.
गणेश उत्सवाच्या धामधुमीत सर्व महाराष्ट्राचे लक्ष असते ते म्हणजे पुण्यातील गणपतींकडे. त्यातही दगडूशेठ हलवाई गणपती, मंडईचा गणपती या प्रसिद्ध अशा मानाच्या गणपतींकडे. यांच्याबरोबरच पुण्यामध्ये गल्लीगल्लीत ऐतिहासिक गणपती आहेत, तेसुद्धा लोकांच्या उत्सुकतेचा विषय ठरतात. पण याच शहरात १८ व्या शतकात बांधल्या गेलेल्या एका अगदी दुर्मीळ प्रकारच्या गणपतीची मात्र लोकांना अजिबात कल्पना नसते. ‘त्रिशुंड गणपती’ असे नाव धारण केलेल्या गणपतीचे हे मंदिर प्राचीन पुण्याचे अवशेष जपणाऱ्या कसबा पेठेजवळ आहे. कमला नेहरू हॉस्पिटल जवळ असलेले हे मंदिर नागझरी नावाच्या एका मोठय़ा ओढय़ाच्या काठावर बांधले आहे. पुणे शहराच्या या पूर्व भागातील परिसरात शहाजी राजांनी एक शहापुरा नावाची पेठ इ. स. १६००मध्ये वसवली. त्यानंतर १७६५ मध्ये थोरले बाजीराव यांनी याचे नाव सोमेश्वर पेठ असे ठेवले. या परिसरात गोसावी लोकांची खूप वस्ती असल्यामुळे त्याला गोसावीपुरा म्हणत असत. हे गोसावी गृहस्थाश्रमी होते आणि अतिशय सधन होते. ते सोने, रत्ने यांचा व्यापार करीत. ते सावकारीचाही व्यवसाय करीत. त्यांच्या वस्तीच्या जवळच त्यांच्या गुरूंची समाधी असलेले त्यांचे स्मशानही होते. समाध्यांच्या जवळच शिव मंदिरेही उभारण्याची पद्धत आहे. अशाच प्रकारचे एक समाधी मंदिर म्हणजे त्रिशुंड गणेश होय. भीमगिरजी गोसावी नावाच्या इंदूरजवळच्या धामपूर गावाच्या एका सधन व्यक्तीने या मंदिराची उभारणी केली. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या रचनेवर राजस्थानी, माळवा तसेच दाक्षिणात्य स्थापत्यशैलीचा प्रभाव आहे.
त्रिशुंड गणेश मंदिर हे त्याच्या समकालीन मंदिरांपेक्षा खूप देखणे आहे. संपूर्णपणे काळ्या पाषाणात केलेले मंदिर पेशवाईतील शिल्पकलेचा अनोखा नमुना आहे. मुळातच ते थोडय़ा उंच जोत्यावर बांधले आहे कारण मंदिराखाली मोठे तळघर आहे. त्यामुळे साहजिकच वरच्या मंदिराची उंची वाढवली गेली. मंदिरात प्रवेश करण्याआधी एक मोठे अंगण आहे. त्यानंतर मंडप, पुढे अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना आहे. मंदिराचे मुखदर्शन बऱ्याच शिल्पाकृतींनी सजवले आहे. मंदिराच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला दोन द्वारपाल कोरलेले आहेत. त्यांच्या बाजूच्या िभतींवर उठावातील साखळदंडाने बांधलेला गेंडा आणि त्याच्या बरोबर असलेले काही ब्रिटिश शिपाई दिसतात. त्यांच्या खाली अर्धा उठावातले मोठमोठे हत्ती एकमेकांशी लढताना दाखवले आहेत. तत्कालीन राजकीय परिस्थितीचे हे शिल्पांकन खूप रंजक आहे. १७५७ साली प्लासीच्या युद्धात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आसाम आणि बंगाल या भागांवर ताबा मिळवला. त्यानंतर ही व्यापारी कंपनी भारताच्या भूभागावर राज्य करू लागली. या परिसरातील जनतेला आणि राजांना या कटू वास्तवाची जाणीव करून देणारी ही शिल्पं खूप महत्त्वाची आहेत. याबरोबरच मंदिराच्या बाह्य़ िभतीवर बरीच इतर शिल्पं पाहायला मिळतात. मंदिराच्या द्वाराशाखेच्या मधोमध म्हणजे ललाटबिंबावरती गणपतीची छोटी मूर्ती कोरली आहे. त्या मूर्तीच्या बरोबर खाली एक गणेश यंत्रही कोरलेले दिसते. द्वारशाखेच्या वरच्या बाजूला असलेल्या अनेक शिल्पांमध्ये दोन्ही बाजूंनी लक्ष्मीला अभिषेक करणारे हत्ती (गजलक्ष्मी), त्यांच्या बाजूने मकरमुखातून बाहेर पडलेली एक महिरप आणि त्यावर पिसारा फुलवलेला मोर आणि त्याच्या बाजूस अजून दोन मोर आहेत. महिरपीच्या दोन्ही बाजूला अनेक कपी एकमेकांचे हात धरून उभे आहेत असे दाखवले आहे. पण या महिरपीच्या वरती म्हणजे सर्वात वरच्या पट्टीवर अनेक शिल्पं आहेत त्यामध्ये सर्वात डावीकडे एका साधूने दुसऱ्या साधूला स्वत:च्या डोक्यावर उलटे (खाली डोके वर पाय अशा स्थितीत) पकडले आहे. त्याशिवाय इतर अनेक शिल्पं तिथे कोरली आहेत. हठयोगाची साधना करणारे हे साधू गोसावी परंपरेतील आहेत हे स्पष्टच आहे. याबरोबरच काही यक्ष, किन्नर इ. कोरले आहेत. मुखदर्शनाच्या सर्वात वर शेषशायी विष्णूचे शिल्प कोरले आहे. तसेच बाजूच्या िभतीवर घट पल्लावासारखी अनेक शुभ चिन्हेही आहेत.
मंदिराच्या मंडपात शिरताना उंबरठय़ाच्या शेजारील िभतीतून उजवीकडे आणि डावीकडे तळघरात जाणारे जिने दिसतात. आज जरी ते बंद केले असले तरी त्यांचे दरवाजे स्पष्ट आहेत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी यापकी एक दरवाजा उघडून तळघरातील समाधीच्या दर्शनासाठी जायला भक्तांना मुभा असते. पण एरवी मात्र ते बंद असते. चौरस मंडपाचे छत पडून गेल्यामुळे ते कसे होते हे समजायला आज मार्ग नाही. मंडपाच्या िभतीत कोनाडे आहेत, पण ते सर्व रिकामे आहेत. अंतराळात जायच्या दरवाजाच्या वरच्या बाजूला गजलक्ष्मीचे एक सुबक शिल्प आहे. या शिल्पाजवळ सुरेख पोपटही काढलेले दिसतात.
अंतराळात प्रवेश केल्यावर डावीकडून आणि उजवीकडून प्रदक्षिणा घालण्यासाठी बाहेर पडण्याचे दोन दरवाजे आहेत. दोन जटाधारी साधू हातात साखळी घेऊन गर्भगृहाच्या दोन्ही बाजूला उभे आहेत असे दाखवले आहे. दरवाजाच्या ललाटबिम्बावर उजव्या सोंडेची गणपतीची मूर्ती कोरली आहे तसेच तिच्या खाली गणेश यंत्रही कोरले आहे. दरवाजाच्या वरती शिव आणि त्याच्या एका मांडीवर पार्वती आणि दुसऱ्या मांडीवर गंगा या स्त्री रूपात बसलेल्या दाखवल्या आहेत. शिवाच्या एका बाजूला त्याचे वाहन नंदी तर दुसऱ्या बाजूला पार्वतीचे वाहन सिंह कोरलेले दिसतात. यावरून हे मूळचे मंदिर शिवाचे असणार होते या तर्काला पुष्टी मिळते. या मूर्तीच्या वरच्या बाजूला तीन शिलालेख कोरलेले दिसतात. त्यापकी दोन संस्कृत तर एक फारसी आहे. १९४६ सालीच याचे वाचन डॉ. ग. ह. खरे यांनी प्रसिद्ध केले आहे. त्यापकी पहिल्या लेखात २० नोव्हेंबर १७५४ असा कालोल्लेख येतो. तसेच या ठिकाणी ‘महाकाल रामेश्वर’ याची प्रतिष्ठापना केली असा उल्लेख आहे. त्यावरून ते महादेवाचे मंदिर असणार होते हे सिद्ध होते. तसेच या लेखाच्या शेजारच्या दुसऱ्या संस्कृत शिलालेखात शिवाची तसेच कालीची स्तुती आहे आणि शेवटी गीतेतील श्लोक दिला आहे. त्याच्या शेजारी अजून एक शिलालेख आहे, पण तो फारसीमध्ये आहे त्यामध्ये असे म्हटले आहे की हे फकीर गुरुदेव दत्ताचे घर आहे. या लेखात २६ ऑगस्ट १७५४ अशी तारीखही दिली आहे. यामुळे या सर्व देवांच्या नंतर इथे गणपती कधी आणि कसा आला हे कोडेच आहे.
या मंदिराच्या गाभाऱ्यात तीन सोंडा असलेली मोरावर बसलेली गणपतीची मूर्ती आहे. मोराच्या चोचीत नाग धरला आहे आणि त्याचा फणा तसेच शेपटी स्पष्ट दिसते आहे. गणपतीच्या मुकुटावरसुद्धा नागाचे वेटोळे दाखवले आहे. मूर्तीच्या महिरपीवर एका ओळीत छिद्र दिसतात. गणपतीच्या कानांनाही छिद्र आहेत. पूर्वी त्यात दागिने घालायची सोय ठेवली असावी. गणपतीला सहा हात आहेत. खालच्या उजव्या हातात मोदकांचे पात्र आहे, मधल्या उजव्या हातात शूल, वरच्या उजव्या हातात अंकुश धारण केलेला आहे. वरच्या डाव्या हातात परशु, मधल्या डाव्या हातात पाश असून खालच्या डाव्या हाताने मांडीवर बसलेल्या देवीला आधार दिला आहे. सुमारे पाऊण मीटर उंचीच्या या गणपतीच्या डाव्या मांडीवर शक्ती बसली आहे. त्याची त्या बाजूची सोंड शक्तीच्या हनुवटीपर्यंत जाऊन स्पर्श करताना दाखवली आहे. उजव्या बाजूची सोंड उजव्या हातात असलेल्या मोदकाच्या भांडय़ाला स्पर्श करताना दाखवली आहे. मधली सोंड गणपतीच्या पोटावरून मोराच्या डोक्यावर जाताना दिसते. मोराच्या उजवीकडे एक उंदीर आणि डावीकडे एक स्त्री भक्त दाखवली आहे. गणपतीच्या मागच्या िभतीवर एक सुबक शेषशायी विष्णूची प्रतिमा कोरली आहे. तिच्या वरच्या बाजूला एक रेखीव गणेश यंत्र कोरले आहे. त्याच्या दोन्ही बाजूस चंद्र आणि सूर्य यांच्या प्रतिमा कोरल्या आहेत. या गाभाऱ्याच्या उजवीकडच्या िभतीतून तळघरातील समाधीपर्यंत जाण्याचा मार्ग आहे. पुजारी रोज गणपतीच्या पूजेनंतर या मार्गाने समाधीपाशी असलेल्या गणपतीला दिवा लावतात.
मंदिराच्या बाह्य़ िभतींवर खूप कोरीव काम नसले तरी काही शिल्पे कोरली आहेत. प्रदक्षिणा घालताना ही पाहता येतात. दक्षिणेकडच्या िभतीतील देवाकोष्ठामध्ये नटराज ही शिवाची मूर्ती पाहायला मिळते. आकाराने फार मोठी नसली तरी ही बरीच सुबक मूर्ती आहे. पश्चिमेकडच्या देवाकोष्ठात ‘लिन्गोद्भव शिव’ ही पुराणातील शिवाच्या महानतेची कथा सांगणारे शिल्प कोरले आहे. भारतातील अनेक गुहा आणि मंदिरे या ठिकाणी लोकप्रिय असणारे हे शिल्प इथे मात्र वेगळ्याच पद्धतीने कोरले आहे. विष्णू आणि ब्रह्मा यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण असा वाद चालला असताना जेव्हा ते शिवाला हा प्रश्न विचारतात तेव्हा तो त्यांना त्याच्या आदि िलगाचा उगम आणि अंत पाहायला सांगतो. तेव्हा ब्रह्मा हंसाचे रूप घेऊन आकाशात जातो तर विष्णू वराहाचे रूप घेऊन पाताळात जातो. जरा वेळाने ते जेव्हा परत येतात तेव्हा शिवाला ब्रह्मा सांगतो की मला उगम सापडला आणि विष्णू सांगतो की मला अंत नाही सापडला. तेव्हा शिव त्या शिविलगातून प्रकट होऊन ब्रह्माला खोट बोलल्याबद्दल शाप देतो की त्याची पूजा भारतातून बंद होईल. ही सगळी कथा ज्याला माहीत असेल त्यालाच त्या शिल्पाचा अन्वयार्थ लागू शकतो. एका िलगावर वरच्या टोकाला हंस तर खालच्या टोकाला वराह दाखवले आहेत. या शिल्पाच्या वरच्या बाजूला चतुर्भुज शिव मूर्ती आहे. या दोन्ही पुराव्यांवरून हे मंदिर गणपतीचे नसून शिवाचे होते, हे सिद्ध व्हायला मदत होते. उत्तरेकडच्या देवकोष्ठात एक चतुर्भुज भरवमूर्ती कोरलेली आहे.
मंदिराचे तळघर
मंदिराला एक प्रशस्त तळघर आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचे मंदिर पाहायला मिळत नाही. मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करताना दोन्ही बाजूंच्या िभतीतून जिने तळघरात जाताना दिसतात. या तळघरातून अनेक मार्ग मंदिराजवळच्या पाण्याच्या साठय़ाकडे नेले आहेत. आज ते िभत बांधून बंद केल्याने तो मार्ग नेमका कुठे जात असे हे आज कळणे अवघड आहे. अनेक मार्गापकी एक मार्ग मंदिर ज्या नागझरी ओढय़ाच्या काठावर बांधले आहे तिथे जात असे मानले जाते. तसे जवळपासच्या घरांच्या विहिरीपर्यंतही एकदोन मार्ग जात असावेत. हे सगळे मार्ग आज बंद केले असले तरी कोणत्या तरी मार्गाने या तळघरात नेहमी पाणी शिरते आणि त्यामुळे या तळघरात कायमच घोटाभर पाणी साचलेले असते. या वर्षी उन्हाळ्यात खूप मोठी पाणी टंचाई असल्यामुळे हे तळघर कोरडे पडले होते. या लेखाबरोबरीची छायाचित्रे तेव्हा काढता आली. हे तळघर वर्षभर बंद असते. पण दर वर्षी गुरुपौर्णिमेला या तळघरात सर्वाना मुक्त प्रवेश असतो. गोसावींच्या गुरूंची पूजा करण्यासाठी या दिवशी पुणेकरांची या मंदिरासमोर रीघ लागते. या तळघरात गोसावी साधू हठयोगाची साधना करत असावेत असे मानले जाते. त्यांची काही प्रकारची साधना स्नान करून लगेच करायची असल्यामुळे बहुतेक विविध प्रकारच्या पाण्याच्या साठय़ांना जाण्यासाठी इथून मार्ग काढले असावेत. तसेच ही साधना गुप्तपणे करायची असल्यामुळे तळघरातून जाणारे काही मार्ग साधकांना तळघरातून बाहेर घेऊन जात असावेत. त्यामुळे काही अभ्यासकांचे मत आहे की जरी वरकरणी हे गणपतीचे मंदिर दिसत असले तरी खरे तर तळघरात हा एक गोसावी साधकांसाठी मठ होता. अशा प्रकारचे तळघरात मठ आणि वरती मंदिर असे स्थापत्य कुठेही पाहायला मिळत नाही.
एक गूढतेचे वलय असलेले हे मंदिर काही काळानंतर विस्मृतीत गेलेले होते. पुणेकरांनाच काय, पण या परिसरातील लोकांनाही या मठ-मंदिराचा विसर पडला. काळाच्या ओघात मंदिरावरचे शिखरही नष्ट झाल्यामुळे इथे मंदिर होते हेसुद्धा लोकांना लक्षात येत नव्हते. १९३२ ते १९५२ या काळात तर या मंदिराची अवस्था फारच वाईट होती. सभामंडपात वखार तर पुढच्या अंगणात गोठा आणि कोळसा साठवायची जागा होती. तळघर घाण आणि पाणी याने संपूर्ण भरले होते. १९५१ मध्ये ठाण्यातील गणेशभक्त यशवंत अनंत मोरे यांना एकदा नागझरी ओढय़ाच्या काठावरील या मंदिरासंबंधी दृष्टांत झाला व नंतर त्यांनी इथे सगळी साफसफाई करून हे मंदिर वहिवाटीस योग्य केले असे सांगितले जाते. तेव्हापासून या मंदिरात लोकांनी जा-ये सुरू केली. असे असूनही आज अनेक पुणेकरांना या मंदिराच्या अस्तित्वाची जाणीव नाहीये. १८ व्या शतकातील धार्मिक परिस्थितीचा साक्षीदार असलेल्या या मंदिराचा वारसा नि:संशय जपला गेला पाहिजे आणि पुढच्या पिढीपर्यंत पोचला पाहिजे.
response.lokprabha@expressindia.com
















No comments:
Post a Comment