संगमेश्वर मंदिर तसं उंचावर वसलेलं आहे. म्हणजे एक लहानसा कोट उभारुन त्यावर मंदिर बांधलेलं आहे. मंदिरात शिल्पं अजिबात नाहीत पण एकंदरीत मंदिराचं बांधकाम देखणं आहे. सभामंडप आणि गाभारा हे यादवकालीन शैलीत तर कळसाचा भाग हा नंतर पेशवेकालीन मराठा शैलीत बांधला गेला किंवा जीर्णोद्धारीत झाला. येथे नंदीमंडप नाही किंवा तो पूर्वीच भग्न झाला असावा. एक जुना भग्न नंदी मंदिराच्या आवारात दिसतोच. सभामंडपात पेशवेकाळात कधीतरी नव्या नंदीची स्थापना झालेली दिसते.
देखण्या स्थापत्यशैलीतले ‘संगमेश्वर’
| Maharashtra Times | Updated: 20 Mar 2020, 4:00 am
म टा...
![]()
सासवडचे संगमेश्वर मंदिर
म. टा. प्रतिनिधी, पुणे
उत्तर यादवकाळातली देखणी वास्तुरचना, कऱ्हामाई आणि चरणावती वा भोगवती (चांबळी) या नद्यांच्या संगमावर वैशिष्ट्यपूर्ण रचनेने लक्षवेधी ठरलेले संगमेश्वराचे मंदिर आज वर्तमानात उपेक्षित आहे. अनेक चित्रपट, मालिका आणि माहितीपटांमध्ये झळकूनही हा वारसा दुर्लक्षित आहे. वारसा अभ्यासकांसह विविध प्रकारच्या चित्रीकरणांसाठी इथे येणाऱ्यांनी त्याच्या या उपेक्षेकडे लक्ष द्यावे, अशी सासवडकरांची अपेक्षा आहे.
सासवड हे ऐतिहासिक गाव. शिवपूर्वकाळापासून एक महत्त्वाचे ठाणे म्हणून भौगोलिकदृष्ट्याही त्याचे महत्त्व वेगळे आहे. महाराज शहाजीराजे यांच्या जहागिरीतले हे गाव. विविध वाटा इथे एकत्र येतात. त्यामुळे त्याकाळी पुण्याच्या संरक्षणासाठी सासवडला महत्त्व होते. याच सासवड आणि परिसरात संगमेश्वर, चांगावटेश्वर, सिद्धेश्वर, नारायणेश्वर अशा देखण्या मंदिरांची निर्मिती झाली. तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि चौदाव्या शतकाच्या सुरुवातीस संगमेश्वर मंदिराची निर्मिती झाल्याचे अभ्यासक सांगतात. मात्र, ती कुणी आणि नेमकी केव्हा केली याचे उल्लेख नाहीत.
गेली अनेक वर्षे सासवड आणि परिसराचा अभ्यास करणारे तसेच 'पुरंदरचे धुरंधर', 'किल्ले पुरंदर आणि परिसर','सासवड दर्शन' या पुस्तकांचे लेखक निवृत्त प्राध्यापक शिवाजीराव एक्के म्हणाले, 'मंदिराच्या रचनेवरून ते निश्चितपणे उत्तर यादवकालीन आहे. मात्र, कुणी आणि केव्हा बांधले याचे दाखले मिळत नाहीत. त्यासाठी मी अनेक कागदपत्रे आणि शिलालेखांचाही शोध घेतला मात्र, उल्लेख मिळाला नाही. मंदिर छोट्या टेकडीवजा उंच जागी आहे. या ठिकाणी खडकेश्वर मंदिरही आहे, त्यामुळेच या जागी असणाऱ्या उंच खडकावर ही मंदिरे बांधली गेल्याचे लक्षात येते. संगमेश्वरासह वटेश्वर, सिद्धेश्वर, नारायणेश्वर ही मंदिरे समान कालखंडातली असल्याने त्यांचा निर्मितीकाल हा परिसरात समृद्धी नांदत असल्याचे सांगतो. नंदी वा वाहनमंडप, त्याच्या सभोवतीचे कक्षासन त्याच्या कालखंडाची साक्ष देतात. पेशवाईत सखारामबापू बोकील यांनी पायऱ्यांचा घाट इथे बांधला, तर ब्रिटिश अधिकारी रॉबर्ट मॅकविल ग्रिंडलेने या मंदिराचे चित्रही काढले. हा सगळा परिसरच इतिहासाच्या पाऊलखुणांनी समृद्ध आहे.'
.
दुर्दैव म्हणजे, सासवड परिसराचा परकीयांनी जेवढा अभ्यास केला, तेवढा स्वकियांनी अद्याप केलेला नाही. इथली मंदिरे ही इतिहासकाळातल्या समृद्धीची साक्ष देतात. अशी अनेक ठिकाणे आज काळाच्या पडद्याआड आहेत, नव्या पिढीच्या अभ्यासकांनी ती पाहून अभ्यासण्याची गरज आहे.
- प्रा. शिवाजीराव एक्के, सासवड अभ्यासक
सासवड परिसरात काय पाहाल?
पुरंदर आणि वज्रगड, संगमेश्वर, सिद्धेश्वर, चांगावटेश्वर, नारायणेश्वर, संत सोपानकाका समाधी मंदिर, ग्रामदैवत भैरोबा मंदिर, मामलेदार कचेरी, पुरंदरे वाडा, सोनोरी गावची वेस, सरदार पानसेंचा वाडा, गावातली मंदिरे आणि मल्हारगड व दिवे गावाजवळील जाधवगढी. या परिसरात येताना किंवा जाताना दिवेघाट पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक तलावालाही भेट देता येईल. चांबळीचा बंधारा, गराडे धरण, बोपदेव घाटमार्गे आल्यास कोडीतचे म्हस्कोबा मंदिर, मरिआई घाट, कानिफनाथ गड आणि या मार्गावरील अनेक जुने वाडे आणि मंदिरे पाहण्याजोगे आहेत.
संगमेश्वर मंदिर
कर्हेच्या काठावरील संगमेश्वर
यादवकालीन सभामंडप
गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर डाव्या सोडेचा गणेश असलेली गणेशपट्टीका आहे.
मंदिराच्या बाह्य भिंतीवरील दगडी नक्षीकाम कमालीचं देखणं आहे. येथे असलेली शिल्पांची उणीव ही नक्षी भरुन काढते हे अगदी निश्चित,
मंदिराचे पेशवेकालीन कळस तर अतिशय सुंदर दिसतात. ह्याच कळसांवर विविध मूर्ती कोरलेल्या आहेत.
वटेश्वर मंदिर
यानंतर आमचा पडाव होता ते सासवडच्या वटेश्वर मंदिरात. ह्यालाच चांगावटेश्वर मंदिर असंही म्हणतात. हे तसं गावापासून थोडं दूर. सासवड पूर रस्त्यावर. गाव संपलं की साधारण दिडेक किमी अंतरावर. हे मंदिर पण कर्हेच्याच काठी, उंचावर. इथे नदीकाठी भरपूर झाडी आहेत आणि त्या झाडीत भरपूर मोर विहरताना दिसतात.
ह्या मंदिराचा बाह्यभाग हा संगमेश्वर मंदिरासारखाच. दगडी सभामंडपावर केलेलं कळसांचं विटांचं बांधकाम हे मराठा शैलीतलं. मात्र मंदिराच्या सभामंडपातल्या भिंतींवर विविध प्रकारची शिल्पं आहेत ते येथलं वैशिष्ट्य.
मंदिराचा दर्शनी भाग.
स्तंभांवरील शरभ
येथे एका स्तंभावंवर दोन ठिकाणी महिषासुरमर्दिनीची शिल्पे आहेत. हाती शस्त्र घेऊन दुर्गा महिषाचा संहार करतेय. वध होत असताना महिष आपले महिषरुप टाकून धडातून प्रकट होताना दिसतोय.
शरभ आणि अश्व
गजाबरोबर असलेलं हे शिल्प गेंड्याचं का रानडुकराचं हे मला नीटसं कळत नाहीये.
ताक घुसळणारी स्त्री
नर्तक
सुबक नक्षीकाम
शाखामृग
कुस्तीगीर आणि नर्तक
अजून काही शिल्पे
--
--
मंदिराच्या सभामंडपातील स्तंभांवरच उपरोक्त शिल्पे आहेत. सभामंडप आणि गर्भगृहाच्या मध्ये अंतराळ आहे.
मंदिराचा अंतर्भाग
अंतराळ व गाभारा
वर सांगितल्याप्रमाणेच मंदिराचा बाह्यभाग हा संगमेश्वरासारखाच आहे. पेशवेकालीन कळस मात्र हल्लीच सोनेरी रंगाने रंगवुन काढलेला आहे.
पेशवेकालीन कळस
मंदिराच्या बाह्यभिंती
मंदिरातून दिसत असलेले उडणारे मोर :)
चांगावटेश्वर मंदिर पाहून आम्ही निघालो ते पुरंदरच्या पायथ्याला असणार्या पूर गावात. ह्याच गावात आहे ते नारायणेश्वराचं सुरेख मंदिर.
चांगावटेश्वर मंदिर - सासवड | Discover Maharashtra

चांगावटेश्वर मंदिर – सासवड
सासवड – कापूरहोळ रस्त्यावर अतिशय निसर्गरम्य आणि शांत परीसरात चांगावटेश्वर मंदिर आहे. सासवड बसस्थानकापासून ३ ते ४ कि.मी अंतरावर हे मंदिर आहे.
चांगावटेश्वर मंदिर हे पांडवकालीन शिवमंदिर स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिर पुर्वाभिमुखी असून मंदिराला २५ दगडी पायऱ्या आहेत. या ही मंदिराची रचना संगमेश्वरशी मिळतीजूळती आहे. मंदिरावरील नक्षिकाम अप्रतिम आहे तसेच दीपमाळ, कासव, नंदी, सुंदर आहे.
या मंदिराची आख्यायिका : (ही आख्यायिका मंदिरात असलेल्या माहिती फलकाच्या आधारे)
“चांगदेव पावसाळ्यातील चातुर्मासातले ४ महिने मौनव्रताने व अंधत्व धारण करून म्हणजेच डोळे मिटुनच सर्व व्यवहार करीत. त्यांचे नित्य पार्थिव लिंग पुजेचे असे. त्यांचा शिष्य काळ्या मातीने मळुन केलेले लिंग डाव्या हातावर घेऊन त्याची विधीयुक्त पुजा करीत असे. एक दिवशी सारख्या कोसळत असलेल्या पावसामुळे शिष्याने कंटाळुन एका मोठ्या पालथ्या वाटीवरच थोड्याशा मातीचे लिंपन तयार करून तेच पार्थिक लिंग म्हणुन तयार करून ठेवले. चांगदेवाने नित्यनियमाने स्नान उरकुन पार्थिव लिंगास आव्हानात्म मंत्रोक्षता वाहून ते उचलून हातावर घेण्याचा प्रयत्न केला पण तो व्यर्थ गेला. ते हलविले न जाणारे स्वयंभू लिंगच चांगदेवास दिसुन आले. त्याने छोटेसे मंदीर बांधून त्या स्वयंभू लिंगाची उपासना कायम ठेवली. यावरूनच या मंदिरास चांगावटेश्वर असे नाव पडले. या मंदिराचा जिर्णोद्धार सरदार अंबाजीपंत पुरंदरे यांनी सन १७०० मध्ये केला. सध्या देवस्थान मालकी हक्क सरदार जयसाहेब राघवेंद्र पुरंदरे यांच्याकडे आहे.”
पूरचा नारायणेश्वर
पूर गाव सासवडपासून तसं १०/१२ किमी अंतरावर. गावात जाताना पुरंदर किल्ला
सतत नजरेसमोर राहात असून जवळजवळ येत असतो. ह्याच गावात आहे नारायणेश्वराचं
सुंदर देऊळ.
माझ्या अंदाजाप्रमाणे संगमेश्वर आणि वटेश्वरापे़क्षाही हे अधिक प्राचीन
आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावरील शैव द्वारपालांवरुन हा निष्कर्ष काढता
येतो.
ह्याही मंदिराच्या बाह्यभिंतीवर तसेच सभामंडपातही शिल्पे नाहीत. जी काही मोजकी शिल्पे आहेत ती मंदिराच्या प्रवेशद्वारावरील द्वारपालांच्या रुपात आणि गाभार्याच्या द्वारपट्टीकेवरील भैरवांच्या रुपात आणि ह्याखेदीज नटराज शिवाचे एकमेव शिल्प येथे आहे.
मंदिराचं आवार विस्तृत आहे. आवारातच एका ठिकाणी चपेटदान मुद्रेतल्या वीर मारुतीची मूर्ती ठेविली आहे. हा मारुती शिवकालीन आहे.
वीर मारुती
नारायणेश्वर मंदिर
काही भग्न स्तंभ आणि द्वारचौकट
द्वारचौकटीवर दोन्ही बाजूसं शैव प्रतिहारी आहेत. कडेच्या बाजूस असणार्या मूर्तीच्या हातात लआंबटसर अशी पिशवी दिसते. ह्याचा अर्थ हे मंदिराच्या बांधकामासाठी धन आणत आहेत असा होतो.
नटराज शिव
द्वारचौकटीवरील नक्षीकाम
सभामंडप हा पुष्कळ स्तंभांवर तोललेला आहे मात्र ह्या स्तंभांवर शिल्पे नाहीत शिवाय नक्षीसुद्धा नाही.
गर्भगृहाच्या दोन्ही बाजूस असलेले भैरव द्वारपाल अतिशय देखणे आहेत. एकाच्या हाती त्रिशुळ आणि डमरु आहे तर दुसर्याच्या हाती डमरु आणि नाग आहे.
----
गाभार्याचं कमळाच्या आकृतीत कोरलेलं नक्षीदार छत
मंदिराच्या दगडी बाह्यभिंती अतिशय सुंदर दिसतात. भिंतीत काही ठिकाणी देवकोष्ठे केलेली दिसतात पण ह्यात आज मूर्ती नाहीत.
ह्याच मंदिराच्या समोर रस्त्याच्या पलीकडे शेतात काही सतीशिळा
दुर्लक्षित अवस्थेत पडलेल्या आहेत. त्यातली एक सतीशिळा तर कमालीची देखणी
आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. ह्या सतीशिळेवर सतीचे चार हात कोरलेले आहेत.
ह्याचा अर्थ चार वेगवेगळ्या वीरपत्नी येथे सती गेल्यात असा होतो. एकाच
वीराच्या चार पत्नी सती जाणे हे संभवनीय नाही.
सतीच्या हातांखाली युद्ध करण्यार्या वीराचा प्रसंग कोरलेला आहे. व त्याचे
खाली चार वीरपत्नी प्रार्थना करताना दाखवलेल्या आहेत. सर्वात खालच्या
प्रसंगात चितेवर बसून सती जाणार्या स्त्रीचा प्रसंग कोरलेला आहे. व सर्वात
वरच्या पट्टिकेवर ह्या स्त्रीया कैलासास जाऊन शिवलिंगाची आराधना करताना
दाखवलेल्या आहेत.
ह्याच सतीशिळेच्या जोडीला वीरमारुतीची एक मूर्ती आहे.
ह्याच्या समोरच शेतात असलेली एक दुर्लक्षित सतीशिळा.
ही झाली सासवडच्या काही प्राचीन मंदिरांची थोडक्यात ओळख. अजूनही काही प्राचीन मंदिरे ह्या परिसरात असतील. थोडा शोध घेतला पाहिजे. पण सासवडच्या आसपासचा परिसर हा प्राचीन अवशेषांनी अगदी वेढलेला आहे. ह्याच्या आसपासच्या नाझरे, माळशिरस, नायगाव ह्या लहानशा गावांमध्ये असणारे कित्येक वीरगळ, सतीशिळा, काही मोडलेली मंदिरे, काही अजूनही शाबूत असणारी पण मूळचे सौंदर्य हरवलेली मंदिरे मी हिंडून पाहिली आहेत त्याबद्दल पुन्हा कधीतरी.
सासवडचा इतिहास तसा खुप मोठा आहे पण वेळ कमी असल्याने भेटीची ठिकाणे पण
आटोपशीर होती. मागे एकदा इंटरनेट धुंडाळत असताना १८१३ ला इंग्रजी चित्रकार
रॉबर्ट मेलविल ग्रिंडले (Grindlay, Captain Robert Melville) याने काढलेले
“View of Sassoor in the Deccan” हे कऱ्हे काठच्या संगमेश्वर मंदिराचे
चित्र पाहिलेले.
तेव्हापासून
भर पावसाळ्यात या ठिकाणाला भेट देण्याची इच्छा होती. त्यात पेशव्यांच्या
पत्त्यात शनिवार वाड्याचे नाव येण्याआगोदर भट कुटुंब याच सासवड मुक्कामी
होते. 
आज सासवड मधले पडक्या वाड्यांचे आणि कऱ्हेच्या घाटांचे अवशेष पाहताना स्थित्यंतराच्या खुणा सोडल्या तर कॅप्टन ग्रिंडलेने अतिशयोक्ती केलेली नाही असे सहज वाटले. दुपारचे 3 वाजत आलेले असल्याने यादवकालीन संगमेश्वर मंदिराची भेट आटोपती घेऊन आम्ही क्षुधाशांतीसाठी मार्गस्थ झालो. फेसबुकवरच्या Pune Eat Outs या ग्रुपवर आधीच दुपारच्या जेवणासाठी सासवड जवळच्या गारवा हॉटेलबद्दल लोकांनी सांगितले होते. त्याला आमच्या ड्रायव्हरने दुजोरा दिल्याने गाडी सरळ गारवा हॉटेलच्या दिशेने पिटाळली. दुपारी 4 वाजता अनलिमिटेड कोल्हापुरी चिकन
![]() |
| श्री चांगावटेश्वर मंदिर - सासवड |
![]() |
| श्री चांगावटेश्वर मंदिर - सासवड |
| श्री चांगावटेश्वर मंदिर - सासवड |
| श्री चांगावटेश्वर मंदिर - सासवड |
| श्री चांगावटेश्वर मंदिर - सासवड |
![]() |
| श्री चांगावटेश्वर मंदिर - सासवड |
| श्री चांगावटेश्वर मंदिर - सासवड |
![]() |
| श्री चांगावटेश्वर मंदिर - सासवड |
![]() |
| श्री चांगावटेश्वर मंदिर - सासवड |
| संगमेश्वर मंदिर - सासवड |
| संगमेश्वर मंदिर - सासवड |
| संगमेश्वर मंदिराचा गाभाऱ्या मध्ये असलेला लाकडी कळस - सासवड |
| संगमेश्वर मंदिर - सासवड |












































No comments:
Post a Comment