Sunday, March 19, 2023

होट्टल

नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुक्यात असलेल्या होट्टल गावाला ऐतिहासिक वारसाबरोबर ११ व्या शतकातील मंदिरांचा सांस्कृतीक वारसा लाभलेला आहे. राष्ट्रकुटांचा कलाविष्कार जसा कंधारला पाहायला मिळतो. तसा चालुक्य शिल्पशैलीचा वारसा देगलूर तालुक्यातील होट्टल या चालुक्यनगरीने जोपासलेला आढळतो.  होट्टल हे गाव चालुक्यकालीन शिल्पस्थापत्य अवशेषांचे आगारच आहे. होट्टल येथील शिल्पसंपदा फक्त मराठवाड्याचीच नव्हे तर साऱ्या महाराष्ट्राची सौभाग्यलेणी ठरावीत अशी आहे. इसवी सनाच्या ११ व्या शतकात कल्याणीच्या चालुक्यांचा प्रभाव नांदेड परिसरावर होता. पोट्टलनगरी म्हणजे आजचे होट्टल हे गाव. त्यांच्या राज्यातले महत्त्वाचे ठाणे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांच्या सीमेवर असलेल्या या गावात सिद्धेश्वर, रेब्बेश्वर,सोमेश्वर व परमेश्वर या नावानी ओळखली जाणारी चार प्राचीन मंदिरे आहेत. यातील सोमेश्वर मंदीर , सिध्देश्वर किंवा परमेश्वर मंदीराना सहाव्या विक्रमादित्याच्या काळात दान मिळाली होती. 



    कल्याणी-चालुक्य राजवटीने बांधलेली हि मंदिरे मूर्तिभंजकांनी विध्वंस केल्याने पडून होती पण पुरातत्व खात्याने यातील सिद्धेश्वर व रेब्बेश्वर मंदिराची अलीकडील काळात पुनर्बांधणी केल्याने हि दोन मंदिरे आज पुन्हा दिमाखात उभी आहेत. मुंबई - देगलूर हे अंतर साधारण ६५० कि.मी. असुन देगलूर या तालुक्याच्या ठिकाणावरून होट्टल गाव १० कि. मी. अंतरावर आहे. रेल्वेने जाण्यासाठी उदगीर हे जवळचे रेल्वेस्थानक असुन उदगीर ते होट्टल हे अंतर ५५ कि.मी.आहे. सकाळी ६ ते संध्याकाळी ६ असे मंदिर वर्षभर पर्यटकांसाठी खुले असते.
        होट्टल गावात प्रवेश करताना सर्वप्रथम नजरेस पडते ते सिद्धेश्वर मंदिर. परमेश्वर किंवा सिध्देश्वर हे नाव चालुक्य राजाचा मांडलिक वन्हीकुलचा सिध्दुगी याच्या नावावरुन पडले असावे. त्याचाच शिलालेख या मंदीरात नंदीमंडपात आहे.तथापि त्या शिलालेखात या मंदीराचा उल्लेख रोक्बेश्वर असा केला आहे. लक्ष्मणाने कार्तिक पौर्णिमेला लिहिलेल्या या लेखाच्या मजकुरातून सिद्धुगी या अधिकारी व सामंताने ते देऊळ बांधल्याचे कळते. त्याने स्वतःला महामंडलेश्वर ही पदवी लावली होती. या शिलालेखात “ तेन संस्थापित: स्थाणु: कल्याणे गुणिनां गृहे पुरे चालुक्यचंद्रस्य सोमेश्वरमहिपते: ।।३३।। निष्कं द्रम्मं च भूमिशो ग्रामे ग्रामे पुरे पुरे ददौ तस्मै स देवाय चंद्रराशिगुरो: पुर: ।।३४।। ” अशी अक्षरे येतात. हा शिलालेख नागरी भाषेत पद्यात्मक कोरलेला असून त्यात एकूण ४३ कडवे येतात. पैकी ३३, ३४, ४१ व ४२ क्रमांकाचे कडवे प्रत्येकी दोन ओळींचे व उरलेली ३९ कडवी प्रत्येकी चार ओळींचे म्हणजे एकूण १६४ ओळीत शिलास्तंभाच्या दोन बाजूंवर हा लेख लिहिलेला आहे. या शिलालेखात काळाचा उल्लेख येत नसला तरी हा लेख चालुक्य नृपती सोमेश्वर दुसरा याच्या काळातील म्हणजेच इ.स. १०६८ ते १०७६ काळातील असावा. सुरुवातीला शिवाच्या स्तुतीनंतर गोदावरीची उपनदी असलेल्या मांजरा नदीच्या तीरावरील अगस्ती आश्रमाचे वर्णन सदर शिलालेखात येते. त्यानंतर चालुक्यांचे मांडलिक घराणे वन्हीकुळाची माहिती दिलेली आहे. या कुळातील ढोरराजाने चालुक्य राजा तैल दुसरा व परमार मुंजा यांच्यात झालेल्या लढाईत महत्त्वाची कामगिरी केलेली होती. त्याचा मुलगा उत्तम. उत्तमचा मुलगा कालिचोर आणि कालिचोरचा मुलगा अर्ग याची स्तुती पुढील काही कडव्यात येते. अर्ग यास रैभेय असेही म्हटलेले आहे. त्याचा मित्र सिद्धुगी याने चालुक्यांची राजधानी कल्याणी येथे सिद्धेश्वराचे मंदिर बांधले व या मंदिरासाठी अर्ग याने त्याच्या अधिकारातील हजार गावातून प्रत्येकी एक द्रम्म (सुवर्ण नाणे) व एक निष्क (चांदिचे नाणे) गोळा केले असा उल्लेख या शिलालेखात आहे. याच शिलालेखातील एका कडव्यात शिलालेख करवून घेणाऱ्याने “ कवी हा राजाचा खरा मित्र असतो कारण तोच राजाला त्याच्या काव्यातून अजरामर बनवितो ” असे म्हटलेले आहे. शेवटच्या ओळीत लक्ष्मणाने हा लेख लिहिल्याचा संदर्भ येतो.शिलालेखाच्या माध्यमातून त्या काळातील ऐतिहासिक संदर्भ कळतात. इथे तीनशे वर्षांतले म्हणजे ११ व्या व १२ व्या आणि तेराव्या शतकातले चार शिलालेख सापडले आहेत. होट्टल आणि परिसरात आजपासून हजार, आठशे वर्षांपूर्वीचे संस्कृत भाषेतले आणि कन्नड व मराठी लिपीत कोरले गेलेले आहेत. नांदेड जिल्ह्यात चालुक्यकालीन 40 शिलालेख आहेत. एकूण शिलालेखांपैकी चार शिलालेख होट्टल येथे पाहायला मिळतात. 
दगडी कोरीव काम आणि हिंदू मूर्ती आणि देवतांच्या शिल्पांनी मंदिर हेमाडपंती शैलीत बांधले आहे.


   सिद्धेश्वर मंदिर गावाच्या पश्चिमेला असून मंदिराची रचना ताराकृती आहे.चार फूट उंचीच्या चौथऱ्यावर उभारलेले हे पुर्वाभिमुख मंदीर ७२ x ४४ फूट आकाराचे असुन त्याला मुखमंडप, दोन अर्धमंडप, मंडप, अंतराळ व गर्भगृह हे भाग असुन बाहेरून फेरी मारण्यासाठी प्रदक्षिणापथ आहे. पुढे मुखमंडप आणि दोन बाजुंना दोन अर्धमंडप असणारा अर्धखुला मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा या मंदीराचा तलविन्यास आहे. मंदीर १.२१ मीटरच्या जगतीवर उभे आहे. मंदीराचा तलविन्यास सप्तरथ प्रकारचा असून मंदीराचा कळस आज अस्तित्वात नाही. 
सिध्देश्वर मंदिर, होट्टल
सिध्देश्वर मंदिर, होट्टल

   मंदिराचा चौरस सभामंडप ३५ x ३५ फूट आकाराचा असुन त्यात नृत्यगायनाचे कार्यक्रम करण्यासाठी १५ x १५ फुट आकाराची रंगशिळा आहे. मंदिराच्या उत्तर व दक्षिण दिशेला १० x ५ फूट आकाराचा अर्धमंडप असुन संपुर्ण मंडपाचे छत म्हणजे अप्रतिम कोरीव कामाचा अविष्कार आहे. यात भौमितिक नक्षीकाम केलेले असुन सुंदर कीर्तिमुखे कोरलेली आहेत. मंदिराचे गर्भगृह सभामंडपाच्या खालच्या पातळीत असुन गर्भगृहाच्या दरवाजाच्या चौकटीवर पाने,फुले,प्राणी यांची नक्षी कोरली आहे. गर्भगृहाच्या द्वारललाटबिंबावर चालुक्य मंदिरशैलीचे वैशिष्ट्य असलेली गजलक्ष्मी कोरलेली आहे. 

मंदिराच्या सर्व भिंती मुख्यतः शिव तांडव, नृत्य गणेश आणि देवींच्या अनेक मूर्तींनी सजलेल्या आहेत. या मंदिराच्या भिंतीवर एक शिलालेख आहे






सुरसुंदरी






































सुरसुंदरी

सुरसुंदरी







































नृत्य गणेश






































मुख्य मूर्ती शिव आहे आणि ती 'निश्चलभाव' मध्ये आहे, म्हणजे अचल. इतर देवतांमध्ये लक्ष्मी आणि गणेश यांचा समावेश आहे.

मंदिराच्या बाह्यांगावर अनेक देवदेवता व सुरसुंदरी कोरलेल्या असुन त्यात षड्भुजी नृत्य गणेशाची एक सुंदर मुर्ती पहायला मिळते. 
दगडी घट,सिध्देश्वर मंदिर, होट्टल
या गणेशाच्या बाजूला एक दगडी घट बसवलेला आहे. त्यात पाणी ओतले असता ते थेट गर्भगृहातील पिंडीवर पडेल अशी व्यवस्था केलेली आहे. बाह्यांगावरील देवकोष्ठकात शिवाच्या केवल, वृषभारूढ, भैरव, नटेश, अंधकासूरवध स्वरूपातील मुर्ती पहायला मिळतात.
होट्टलचे प्राचीन नाव पोटल होते.चालुक्य काळात तहसील अधिकारी देव यांनी हे मंदिर बांधले. प्राचीन काळी होट्टल ही सोमेश्वर चालुक्यांची राजधानी होती, मंदिराचा मूळ आकार तारेचा आहे

पुरातत्व खात्याने अलीकडेच मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि अनेक शिल्पे जवळपास नष्ट झाली होती आणि आता ते सर्व पूर्वीच्या वैभवात परत आले आहेत.

सिद्धेश्वर मंदिर हे होट्टल, देगलूर येथे स्थित एक प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्र आहे. हे ठिकाण नांदेड शहरापासून 105 किलोमीटर अंतरावर आहे. सिद्धेश्वर मंदिर तीर्थयात्रेसाठी योग्य आहे. सकाळी 6:00 AM - 6:00 PM असे मंदिर वर्षभर पर्यटकांसाठी खुले असते.
गणेश आणि काली यासारख्या परिवार देवतांच्या मुर्ती , गर्भगृहाच्या तीन भद्रावर असलेल्या तीन देवकोष्ठामधील आणि अंतराळाच्या बाह्यांगावरील शिवाची उग्र रुपे आणि पट्टावर ( सलिलांतरावर ) दाखवलेली सुरसुंदरिच्या मुर्ती इतकीच शिल्पकला मंदीराच्या बाह्य अंगावर आहे. 



अर्धमंडप आणि मंडपाला वामनभिंती असून त्याला कक्षासने आहेत. कक्षासनावर वेदीका आहे. स्तंभावर वेसर प्रकारचे शिखर दिसते तर दोन स्तंभाच्या मध्ये सुरसुंदरी कोरल्या आहेत. मंडप आणि अंतराळाच्या छताच्या चार तुळ्या एकमेकांना छेदतील अश्या प्रकारे बसवल्या आहेत. स्तंभाची शैली उत्तर चालुक्यकालीन आहे. गर्भगृहाच्या दराच्या ललाटबिंबावर गजांतलक्ष्मी कोरली आहे. अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या तुलापट्टावर नटराज शिव कोरलेला दिसतो. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराला सहा द्वारशाखा आहेत. द्वारशाखाच्या खालच्या बाजुला शैव आणि वैष्णव प्रतिहार कोरलेले आहेत. छतावर सुंदर नक्षीकाम आहे. सोमेश्वर मंदीर हे त्रिदल प्रकारचे मंदीर असून पुढे मुखमंडप व तीन बाजुना तीन गर्भगृहे असलेला मंडप असे त्याचे स्वरुप आहे. मुख्य गर्भगृह शिवाचे असून ते पुर्वाभिमुख आहे. मात्र आज त्यात शिवलिंग नाही. उत्तराभिमुख असलेले दुय्यम गर्भगृह विष्णुचे असून त्याच्या ललाटबिंबावर गणेशा एवजी गजलक्ष्मी आहे आणि द्वारशाखाच्या खालच्या भागात वैष्णव द्वारपाल आहेत. शिलालेखात या म्ंदीराचा उल्लेख त्रैपुरुष देवालय असल्यामुळे तिसरे गर्भगृह ब्रम्हदेवाचे असावे असा अंदाज आहे. हे गर्भगॄह सध्या रिकामे आहे. गर्भगृहाच्या द्वारावर पाश, अंकुश आणि फळ धारण केलेली लक्ष्मी दाखवली आहे. गर्भगृह दक्षिणाभिमुख आहे, त्यामुळे ते एखाद्या शक्तीच्या स्वरुपाचे असावे. या मंदीराची वास्तुशास्त्रीय वैशिष्ट्ये, शैली आणि सहाव्या विक्रमादित्याच्या कारकीर्दीतील सहविसाव्या वर्षीचा ( सन ११०१) शिलालेख याबाबी लक्षात घेता हे मंदीर बाराव्या शतकाच्या पहिल्या दशकात बांधले गेले असावे.

त्रिदल पध्दतीच्या गाभार्याचा तलविन्यास

     सोमेश्वर मंदीर हे त्रिदल प्रकारचे मंदीर असून पुढे मुखमंडप व तीन बाजुना तीन गर्भगृहे असलेला मंडप असे त्याचे स्वरुप आहे. मुख्य गर्भगृह शिवाचे असून ते पुर्वाभिमुख आहे. मात्र आज त्यात शिवलिंग नाही. उत्तराभिमुख असलेले दुय्यम गर्भगृह विष्णुचे असून त्याच्या ललाटबिंबावर गणेशा एवजी गजलक्ष्मी आहे आणि द्वारशाखाच्या खालच्या भागात वैष्णव द्वारपाल आहेत. शिलालेखात या म्ंदीराचा उल्लेख त्रैपुरुष देवालय असल्यामुळे तिसरे गर्भगृह ब्रम्हदेवाचे असावे असा अंदाज आहे. हे गर्भगॄह सध्या रिकामे आहे. गर्भगृहाच्या द्वारावर पाश, अंकुश आणि फळ धारण केलेली लक्ष्मी दाखवली आहे. गर्भगृह दक्षिणाभिमुख आहे, त्यामुळे ते एखाद्या शक्तीच्या स्वरुपाचे असावे. या मंदीराची वास्तुशास्त्रीय वैशिष्ट्ये, शैली आणि सहाव्या विक्रमादित्याच्या कारकीर्दीतील सहविसाव्या वर्षीचा ( सन ११०१) शिलालेख याबाबी लक्षात घेता हे मंदीर बाराव्या शतकाच्या पहिल्या दशकात बांधले गेले असावे.



 photography by Suresh Bhange Degloor..@ all copy right 2012


             या मंदिरासमोर काही अंतरावर महादेवाचे दुसरे मंदिर असुन ते चालुक्यांचा एक अधिकारी रेब्बनायकाने बांधल्यामुळे त्याला रेब्बेश्वर नावाने ओळखले जाते.बाजूला असलेल्या महादेव मंदिरात सिध्देश्वर मंदिरापेक्षा शिल्प कमी प्रमाणात आहेत. चार फूट उंचीच्या चौथऱ्यावर पुर्वाभिमुख असलेले हे मंदिर ७२ x ५५ फुट आकाराचे असुन त्याचे मुखमंडप, गूढमंडप, अंतराळ व गर्भगृह असे भाग पाडले आहेत. गर्भगृहाच्या दरवाजाच्या ललाट बिंबस्थानावरही गजलक्ष्मी शिल्प आहेत. देवळाचे बाह्यांग व अंतर्भाग सुंदर शिल्पाकृतींनी सुशोभित केल असला तरी सिध्देश्वर मंदिरापेक्षा शिल्प कमी प्रमाणात आहेत. या रेब्बेश्वर मंदिराजवळ २४.१०.११२० चा कन्नड भाषेतील शिलालेख मिळाला असुन यात राजा विक्रमादित्य सहावा याचा अधिकारी रेब्बनायकाने हे देऊळ बांधून त्याला होट्टल व मदनूरचे काही उत्पन्न दान दिल्याचे कळते. या शिलालेखाची अक्षरे“ स्वस्ती श्रीमक चालुक्य विक्रमा वर्शदा ४५ नेया सर्वारी संवत्सरदा अस्वाईजाद अमावस्ये सूर्य ग्र हनादाम्दु कालेयनायकन अनातीयीम बिरारासम श्री स्वयंभू रेब्बेश्वरदेवा रग्गा अल्वा पोट्टाला मा(दा)नुरा अम्का(दे)रेया धारापुरव्वकम मदि बितारु मंगला महा(श्री) ” या शिलालेखातील वर्ष चालुक्य विक्रमवर्ष ४५ सर्वरी अश्वयुज अमावस्या सूर्यग्रहण असे आहे. इ.स. प्रमाणे त्यादिवशी वार होता रविवार दिनांक २४ ऑक्टोबर ११२०. कालेयनायकाच्या आज्ञेवरुन बिरारसाने पोट्टाला आणि मदनुरु म्हणजेच हल्लीचे होट्टल आणि मदनूर हि गावे स्वयंभू रेब्बेश्वराला दान दिल्याचा उल्लेख येतो. यानंतर गावाबाहेरील एका शेतात असलेले तिसरे मंदीर म्हणजे सोमेश्वर मंदिर. त्रिदलीय म्हणजे तीन गर्भगृहाची रचना असणारे हे मंदिर ७६ x ६५ फूट आकाराचे असुन मंदीराचा चौथरा पुर्णपणे मातीत गाडला गेला आहे. हे मंदीर त्रिपुरुषदेव म्हणजे ब्रह्मा, विष्णू व महेश या तीन देवतांचे असुन मंदिरात शिव, विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्यासाठी स्वतंत्र अशी तीन गर्भगृहे आहेत. या गर्भगृहांच्या दरवाजावर त्या देवतांचे द्वारपाल असुन ललाटबिंबावर गणेश व गजलक्ष्मी कोरलेली आहे. या मंदिराचे मुखमंडप, गूढमंडप व अंतराळ असे भाग पडले असुन गूढ मंडपाला १४ कोरीव स्तंभ आहेत. मंदिरांचे बाह्यांग देवदेवता व सूरसुंदरींनी जागोजाग सजले असले तरी बाहेर वाढलेल्या दाट काटेरी झुडूपामुळे मंदिराची प्रदक्षिणा करता येत नाही. या मंदीरात विष्णू, नृसिंह, सुर्य यांच्या सुंदर मुर्ती पहायला मिळतात. दुर्दैवाने या मंदिराची सध्याची स्थिती खूपच वाईट असुन समोर उकीरड्यावर अनेक कोरीव शिल्प पडलेली आहेत. शिवाय सांडपाण्याच्या नालीजवळ शिव-हरेश्वराची सुंदर मुर्ती पडली आहे. येथे मंदिराबाहेर दोन्ही बाजुस कोरलेला कन्नड भाषेतील शिलालेख असून त्यावर खालीलप्रमाणे अक्षरे कोरली आहेत. “(स्व)स्ती श्रीमत रेब्बे(यना)य(कं) अवरा........(मम)डळीकन इरेया.......नम अवरा प्रधानरम (श्री)(म)क चालुक्य विक्रमा (व)र्शदा २६ नेया विशा (साम)वत्सरदा कार्तिका सु ८ ब्रिहावारदा उत्तरायणा संक्रातीनिमित्तदल आग्रहा राव इरियेगा साळेया त्राईपुरुषदेवरीगम आलिया.......बाळिया .....सर्वनामस्या......कालगरच्ची धारा.....कामयादी....स्वदत्तम परदरा....वा यो हा संधराम शा... हसरानी “या शिलालेखाच्या दुसऱ्या बाजूची झीज झाली असुन यामध्ये उल्लेख केलेले वर्ष म्हणजे चालुक्य विक्रम वर्ष २६ विशु कार्तिकी ८ गुरुवार, उत्तरायण संक्रांती. इ.स. प्रमाणे या दिवशी तारीख होती ३१ ऑक्टोबर ११०१. संक्रमणाच्या पर्वावर चालुक्य नृपती विक्रमादित्य सहावा याचा अधिकारी रेब्बेनायक व इतरांनी मंदिराच्या दैनंदिन विधीकार्यासाठी त्रैपुरुषदेवालयाला व जवळच्या एरिगे (येरगी) येथील अग्रहाराला दान दिल्याचा उल्लेख या शिलालेखात येतो. या मंदिराजवळ घडीव दगडात बांधलेली पुष्करणी असुन शेवाळाने तिचे पाणी हिरवेगार झाले आहे. यानंतर गावाबाहेर असलेले चौथे मंदिर म्हणजे परमेश्वर मंदिर. तीन फूट उंच चौथऱ्यावर असलेले हे मंदिर ५४ x २५ फुट आकाराचे असुन त्याचे मंडप, अंतराळ व गर्भगृह असे भाग पाडले आहेत. गर्भगृहाच्या ललाटबिंबावर गजलक्ष्मी कोरली असुन संपुर्ण मंदिराभोवती प्रदक्षिणापथ बांधलेला आहे. या मंदिराची बांधणी चालुक्य नृपती विक्रमादित्य सहावा याने केली आहे. होट्टलची हि शिल्पसंपदा संपुर्ण महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आहे. मध्ययुगात मराठवाडा व दक्षिणेत सत्ता असणाऱ्या कल्याणीच्या चालुक्यांचे मांडलिक असलेले वान्हीकुलची पोट्टल / होटलूर या नावाने ओळखली जाणारी हि उपराजधानी होती. पोटल म्हणजे उंच डोंगर होय. भौगोलिकदृष्ट्या ते गावच मुळात उंच जागेवर वसलेले असून, भाषाशास्त्रानुसार कन्नड भाषेत 'प' चे 'ह'मध्ये रुपांतर होते. शिवाय या घराण्यातील राजा जयसिंह द्वितीय याच्या शिलालेखात उल्लेखिलेले होट्टलकेरे हे स्थळ म्हणजेच होट्टल होय. त्याचे होट्टलला इ.स. १०३३ मध्ये वास्तव्य होते.
याचबरोबर या जिल्ह्यात नांदेडचा किल्ला, बिलोली मशिद, श्री गुरुगोविंदसिंह यांचा गुरुद्वारा हीसुद्धा पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.


  तडखेडचे मंदीर :-

देगलूर ते तडखेड अंतर १२ किलोमीटर आहे. गावात भरवस्तीत सिमेंटने बांधलेले हे मंदिर आपल्याला बघायला मिळते . ते ओबडधोबड सिमेंटमध्ये बांधलेले मंदिर पाहून आल्या पावली मागे फिरावे अस वाटायला लागते. मात्र मंदिराच्या जवळ दोन गाय वासरु खांब खांब पडलेले दिसतात . त्यावर सुबक गाय वासरु कोरलेले होते आणि खाली तेलगू लिपीतला शिलालेख होता .
धेनुगळ, तडखेड 
 गाय वासरू दगड महाराष्ट्रात अनेक गावात गायवासरु दगड उर्फ़ धेनुगळ पाहायला मिळतात धेनूगळ हे एक दानपत्र आहे. दान दिलेल्या गावाची, जमिनीची सीमा दाखवण्यासाठी धेनूगळ वापरला जात असे. या आयताकृती उभ्या दगडावर गाय आणि वासरू कोरलेले असते. वरच्या बाजूला सूर्य आणि चंद्र कोरलेले असतात. गाय हे राजाचे प्रतिक असून वासरू हे प्रजेचे प्रतिक आहे. गाय ज्याप्रमाणे वासराचे पालन करते तसेच राजा प्रजेचे पालन करतो. या गाय वासरू दगडांवर काही ठिकाणी शिलालेखही कोरलेले पाहायला मिळतात.
शिलालेख , तडखेड 
मंदिरात गर्भगृहाच्या बाजूला ४.' ५ " उंच आणि २ ' रुंद शिलालेख आहे . त्याची वरील बाजूस कलश कोरलेला आहे . त्याख्हालच्या पट्टीवर मध्यभागी पिंड कोरलेली आहे. त्या बाजूला चंद्र सुर्य कोरलेले आहेत आणि सर्वात बाहेरील बाजूस दोन्ही बाजूला बैल आणि तलवार कोरलेली आहे. . खाली तब्बल ४० ओळींचा तेलुगू लिपीतील शिलालेख आहे . कल्याणी चालुक्यांची सत्ता या भागावर होती त्यावेळी त्यांनी कोरुन घेतलेले अनेक तेलगु लिपीतील शिलालेख महाराष्ट्र पाहायला मिळतात. मंदिराच्या आजूबाजूच्या घरांचा बांधणीमध्ये जुन्या मंदिराचे अनेक अवशेष वापरलेले दिसत होते . एक चांगला ठेवा काळाच्या उदरात गडप झाला . 






शिव मंदिर, मुखेड
कंधारहुन मुखेड ३२ किलोमीटरवर आहे . मुखेड छोट गाव आहे . गावातल्या दाट वस्तीत शंकराचे पुरातन मंदिर आहे . मंदिराच्या आवारात प्रवेश केला आणि सिमेंटीकरणाने त्यामुळच्या सुंदर मंदिराचे केलेले विद्रूपीकरण डोळ्यात सलायला लागल होते. मंदिराच्या सभागृहाच्या पुढे कॉंक्रीटचा स्लॅब आणि पिलर टाकून एक्सटेंशन दिल होते. मुळचा कळस कोसळलेला आहे त्या जागी अतिशय बेढब कळस बांधला होता. मंदिरातील खांबावर सुंदर नक्षीकाम आणि मुर्ती कोरल्ता आहेत . त्या खांबावर आणि सर्वच दगडी बांधकामांवर गुलाबी ऑईलपेंट लावला होता. गर्भगृहाचे तर निळ्या टाईल्स लावून बाथरुम करुन टाकल होते . मंदिराच्या बाह्यभिंती कशा काय माहिती नाही पण या अत्याचारापासून वाचल्या होत्या . त्यावर सुरसुंदऱ्यान्च्या मुर्ती आहेत . एकंदरीत मुखेडच्या मंदिराने निराशाच केली.  
मुखेड - होट्टल अंतर ५० किलोमीटर आहे. (नांदेड - होट्टल ९० किमी) आता होट्टल गाठण आवश्यक होते. पावसाळी वातावरण आणि वेळेशी चाललेली मारामारी यामुळे आम्ही जेवणाचा विचार सर्वानुमते रद्द केला आणि देगलूर गाठले . महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांच्या सीमेवर असलेल हे मोठ गाव. इथल्या लोकांच्या पेहरावात आणि भाषेच्या लहेजातही थोडा फरक होता. होट्टलचा रस्ता विचारुन आणि अमृततुल्य चहा पिउन होट्टल गाठल. गावा बाहेर दोन मंदिरांच संकुल आहे . जसजस मंदिरांच्या जवळ जायला लागलो तसतशी त्याची भव्यता आणि सुंदरता डोळ्यात भरायला लागली  संध्याकाळची वेळ असल्याने गावातली सगळी मुल मंदिर परिसरात खेळायला जमली होती. आम्ही म्हणजे त्यांना आयतीच करमणूक होती. जेथे जाऊ तेथे तू माझा सांगाती या उक्तीप्रमाणे ते आमच्या मागेमागे फिरत होते. फोटो काढणे कठीण झाले होते . त्यावर उपाय म्हणून त्यासर्वाना गोळा करुन एक ग्रूप फोटो काढला . त्यांना प्रत्येकाला तो दाखवला , मग मुल पांगली आणि आम्ही शांत पणे मंदिर पाहायला सुरुवात केली . 
या ठिकाणी दोन मंदिर बाजूबाजूला असून एका मंदिराला सिध्देश्वर मंदिर आणि दुसर्‍या मंदिराला महादेव मंदिर या नावाने ओळखले जाते.  पुरातत्व खात्याने मंदिराची नुकतीच पुनर्बांधणी करुन त्याला गतवैभव प्राप्त करुन दिलेले आहे. होट्टल गावात चालुक्यांनी बांधलेली अनेक मंदिरे आहेत. त्यातील सोमेश्वर मंदिराला चालुक्य राजा विक्रमादित्य याने इसवीसन ११०१ मध्ये त्याच्या २६ व्या राज्यारोहण दिनानिमित्त दान दान दिल्याचा शिलालेख मंदिरात आहे. त्या अर्थी हे मंदिर ११ व्या शतकापूर्वी अस्तित्वात होते. या सिध्देश्वर मंदिराच्या बाह्यभिंतींवर अनेक सुरसुंदरी कोरलेल्या आहेत. नृत्य गणेशाची एक सुंदर मुर्ती बाह्यभिंतीवर पाहायला मिळते. या गणेशाच्या बाजूला एक दगडी घट बसवलेला आहे. त्यात पाणी ओतले असता ते थेट गर्भगृहातील पिंडीवर पडेल अशी व्यवस्था केलेली आहे. देवकोष्ठात शंकराच्या विविध मुर्ती आहेत. गर्भगृहाच्या व्दारपट्टीवर गजलक्ष्मीचे शिल्प कोरलेले आहे. छतावर सुंदर नक्षीकाम आहे. बाजूला असलेल्या महादेव मंदिरात सिध्देश्वर मंदिरापेक्षा शिल्प कमी प्रमाणात आहेत.   शिवाय गावात सोमेश्वर मंदिर आहे. सोमेश्वर मंदिर त्रिदल रचनेचे असून याला तीन गर्भगृहे आहेत.  ती अनुक्रमे ब्रम्हा, विष्णू, महेश यांची आहेत. 
देगलूर ते तडखेड अंतर १२ किलोमीटर आहे. गावात शिरलो तेंव्हा अंधार पडायला सुरुवात झाली होती. शंकर मंदिर कुठेय ? अस विचारल्यावर गावातल्या लोकांनी आम्हाला भरवस्तीत नेल आणि सिमेंटने बांधलेले एक मंदिर दाखवल . ते ओबडधोबड सिमेंटमध्ये बांधलेले मंदिर पाहून आल्या पावली मागे फिरावे अस वाटायला लागले. पण एवढे आलोच आहोत तर पाहून जाउया म्हणून मंदिराच्या जवळ गेलो तर दोन गाय वासरु खांब खांब पडलेले होते . त्यावर सुबक गाय वासरु कोरलेले होते आणि खाली तेलगू लिपीतला शिलालेख होता . गाय वासरू दगड महाराष्ट्रात अनेक गावात गायवासरु दगड उर्फ़ धेनुगळ पाहायला मिळतात धेनूगळ हे एक दानपत्र आहे. दान दिलेल्या गावाची, जमिनीची सीमा दाखवण्यासाठी धेनूगळ वापरला जात असे. या आयताकृती उभ्या दगडावर गाय आणि वासरू कोरलेले असते. वरच्या बाजूला सूर्य आणि चंद्र कोरलेले असतात. गाय हे राजाचे प्रतिक असून वासरू हे प्रजेचे प्रतिक आहे. गाय ज्याप्रमाणे वासराचे पालन करते तसेच राजा प्रजेचे पालन करतो. या गाय वासरू दगडांवर काही ठिकाणी शिलालेखही कोरलेले पाहायला मिळतात.
मंदिरात शिरलो गर्भगृहाच्या बाजूला ४.' ५ " उंच आणि २ ' रुंद शिलालेख आहे . त्याची वरील बाजूस कलश कोरलेला आहे . त्याख्हालच्या पट्टीवर मध्यभागी पिंड कोरलेली आहे. त्या बाजूला चंद्र सुर्य कोरलेले आहेत आणि सर्वात बाहेरील बाजूस दोन्ही बाजूला बैल आणि तलवार कोरलेली आहे. . खाली तब्बल ४० ओळींचा तेलुगू लिपीतील शिलालेख आहे . कल्याणी चालुक्यांची सत्ता या भागावर होती त्यावेळी त्यांनी कोरुन घेतलेले अनेक तेलगु लिपीतील शिलालेख महाराष्ट्र पाहायला मिळतात. मंदिराच्या आजूबाजूच्या घरांचा बांधणीमध्ये जुन्या मंदिराचे अनेक अवशेष वापरलेले दिसत होते . एक चांगला ठेवा काळाच्या उदरात गडप झाला . आता पाऊसही सुरु झाला होता . रात्री उशिरा नांदेडला पोहोचलो.

 








होट्टलचे प्राचीन नाव पोटल होते.चालुक्य काळात तहसील अधिकारी देव यांनी हे मंदिर बांधले. प्राचीन काळी होट्टल ही सोमेश्वर चालुक्यांची राजधानी होती, मंदिराचा मूळ आकार तारेचा आहे


मुख्य मूर्ती शिव आहे आणि ती 'निश्चलभाव' मध्ये आहे, म्हणजे अचल. इतर देवतांमध्ये लक्ष्मी आणि गणेश यांचा समावेश आहे.


मंदिराच्या सर्व भिंती मुख्यतः शिव तांडव, नृत्य गणेश आणि देवींच्या अनेक मूर्तींनी सजलेल्या आहेत. या मंदिराच्या भिंतीवर एक शिलालेख आहे


पुरातत्व खात्याने अलीकडेच मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि अनेक शिल्पे जवळपास नष्ट झाली होती आणि आता ते सर्व पूर्वीच्या वैभवात परत आले आहेत.


सिद्धेश्वर मंदिर हे होट्टल, देगलूर येथे स्थित एक प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्र आहे. हे ठिकाण नांदेड शहरापासून 105 किलोमीटर अंतरावर आहे. सिद्धेश्वर मंदिर तीर्थयात्रेसाठी योग्य आहे. सकाळी 6:00 AM - 6:00 PM असे मंदिर वर्षभर पर्यटकांसाठी खुले असते.

https://www.esakal.com/image-story/historical-place-siddheshwar-temple-hottal-in-nanded-hemadpanti-architecture-bsi96/image-5


http://vaibhavarts.blogspot.com/2011/

Tuesday, 18 October 2011

Hottal: Hottal is located in Degloor Taluka. It is 8 km away from Degloor. The place holds its significance from the temple of Lord Siddheshwar. The temple exhibits characteristic Art of The Chalukya Era. It is carved out of stones.


    photography by Suresh Bhange Degloor..@ all copy right 2012



 photography by Suresh Bhange Degloor..@ all copy right 2012

















प्रकार : प्राचीन शिवमंदीर/विष्णुमंदीर समुह

जिल्हा : नांदेड

नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुक्यात असलेल्या होट्टल गावाला ऐतिहासिक वारसाबरोबर ११ व्या शतकातील मंदिरांचा सांस्कृतीक वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांच्या सीमेवर असलेल्या या गावात सिद्धेश्वर, रेब्बेश्वर,सोमेश्वर व परमेश्वर या नावानी ओळखली जाणारी चार प्राचीन मंदिरे आहेत. कल्याणी-चालुक्य राजवटीने बांधलेली हि मंदिरे मूर्तिभंजकांनी विध्वंस केल्याने पडून होती पण पुरातत्व खात्याने यातील सिद्धेश्वर व रेब्बेश्वर मंदिराची अलीकडील काळात पुनर्बांधणी केल्याने हि दोन मंदिरे आज पुन्हा दिमाखात उभी आहेत. मुंबई - देगलूर हे अंतर साधारण ६५० कि.मी. असुन देगलूर या तालुक्याच्या ठिकाणावरून होट्टल गाव १० कि. मी. अंतरावर आहे. रेल्वेने जाण्यासाठी उदगीर हे जवळचे रेल्वेस्थानक असुन उदगीर ते होट्टल हे अंतर ५५ कि.मी.आहे. होट्टल गावात प्रवेश करताना सर्वप्रथम नजरेस पडते ते सिद्धेश्वर मंदिर. चार फूट उंचीच्या चौथऱ्यावर उभारलेले हे पुर्वाभिमुख मंदीर ७२ x ४४ फूट आकाराचे असुन त्याला मुखमंडप, दोन अर्धमंडप, मंडप, अंतराळ व गर्भगृह हे भाग असुन बाहेरून फेरी मारण्यासाठी प्रदक्षिणापथ आहे. मंदिराचा चौरस सभामंडप ३५ x ३५ फूट आकाराचा असुन त्यात नृत्यगायनाचे कार्यक्रम करण्यासाठी १५ x १५ फुट आकाराची रंगशिळा आहे. मंदिराच्या उत्तर व दक्षिण दिशेला १० x ५ फूट आकाराचा अर्धमंडप असुन संपुर्ण मंडपाचे छत म्हणजे अप्रतिम कोरीव कामाचा अविष्कार आहे. यात भौमितिक नक्षीकाम केलेले असुन सुंदर कीर्तिमुखे कोरलेली आहेत. मंदिराचे गर्भगृह सभामंडपाच्या खालच्या पातळीत असुन गर्भगृहाच्या दरवाजाच्या चौकटीवर पाने,फुले,प्राणी यांची नक्षी कोरली आहे. गर्भगृहाच्या द्वारललाटबिंबावर चालुक्य मंदिरशैलीचे वैशिष्ट्य असलेली गजलक्ष्मी कोरलेली आहे. मंदिराच्या बाह्यांगावर अनेक देवदेवता व सुरसुंदरी कोरलेल्या असुन त्यात षड्भुजी नृत्य गणेशाची एक सुंदर मुर्ती पहायला मिळते. बाह्यांगावरील देवकोष्ठकात शिवाच्या केवल, वृषभारूढ, भैरव, नटेश, अंधकासूरवध स्वरूपातील मुर्ती पहायला मिळतात. गर्भगृहात प्रवेश बंद असताना आतील शिवलिंगावर अभिषेक करता यावा यासाठी मंदिराच्या प्रदक्षिणापथावर दगडी रांजण बसवलेला असुन यात ओतलेल्या पाण्याचा दगडी पन्हाळीतून शिवलिंगावर अभिषेक होतो. या मंदिराबाबत राजा सोमेश्वर द्वितीय (इ.स. १०६८-१०७६) याचा शिलालेख या मंदिरात आहे. लक्ष्मणाने कार्तिक पौर्णिमेला लिहिलेल्या या लेखाच्या मजकुरातून सिद्धुगी या अधिकारी व सामंताने ते देऊळ बांधल्याचे कळते. त्याने स्वतःला महामंडलेश्वर ही पदवी लावली होती. या शिलालेखात “ तेन संस्थापित: स्थाणु: कल्याणे गुणिनां गृहे पुरे चालुक्यचंद्रस्य सोमेश्वरमहिपते: ।।३३।। निष्कं द्रम्मं च भूमिशो ग्रामे ग्रामे पुरे पुरे ददौ तस्मै स देवाय चंद्रराशिगुरो: पुर: ।।३४।। ” अशी अक्षरे येतात. हा शिलालेख नागरी भाषेत पद्यात्मक कोरलेला असून त्यात एकूण ४३ कडवे येतात. पैकी ३३, ३४, ४१ व ४२ क्रमांकाचे कडवे प्रत्येकी दोन ओळींचे व उरलेली ३९ कडवी प्रत्येकी चार ओळींचे म्हणजे एकूण १६४ ओळीत शिलास्तंभाच्या दोन बाजूंवर हा लेख लिहिलेला आहे. या शिलालेखात काळाचा उल्लेख येत नसला तरी हा लेख चालुक्य नृपती सोमेश्वर दुसरा याच्या काळातील म्हणजेच इ.स. १०६८ ते १०७६ काळातील असावा. सुरुवातीला शिवाच्या स्तुतीनंतर गोदावरीची उपनदी असलेल्या मांजरा नदीच्या तीरावरील अगस्ती आश्रमाचे वर्णन सदर शिलालेखात येते. त्यानंतर चालुक्यांचे मांडलिक घराणे वन्हीकुळाची माहिती दिलेली आहे. या कुळातील ढोरराजाने चालुक्य राजा तैल दुसरा व परमार मुंजा यांच्यात झालेल्या लढाईत महत्त्वाची कामगिरी केलेली होती. त्याचा मुलगा उत्तम. उत्तमचा मुलगा कालिचोर आणि कालिचोरचा मुलगा अर्ग याची स्तुती पुढील काही कडव्यात येते. अर्ग यास रैभेय असेही म्हटलेले आहे. त्याचा मित्र सिद्धुगी याने चालुक्यांची राजधानी कल्याणी येथे सिद्धेश्वराचे मंदिर बांधले व या मंदिरासाठी अर्ग याने त्याच्या अधिकारातील हजार गावातून प्रत्येकी एक द्रम्म (सुवर्ण नाणे) व एक निष्क (चांदिचे नाणे) गोळा केले असा उल्लेख या शिलालेखात आहे. याच शिलालेखातील एका कडव्यात शिलालेख करवून घेणाऱ्याने “ कवी हा राजाचा खरा मित्र असतो कारण तोच राजाला त्याच्या काव्यातून अजरामर बनवितो ” असे म्हटलेले आहे. शेवटच्या ओळीत लक्ष्मणाने हा लेख लिहिल्याचा संदर्भ येतो. या मंदिरासमोर काही अंतरावर महादेवाचे दुसरे मंदिर असुन ते चालुक्यांचा एक अधिकारी रेब्बनायकाने बांधल्यामुळे त्याला रेब्बेश्वर नावाने ओळखले जाते. चार फूट उंचीच्या चौथऱ्यावर पुर्वाभिमुख असलेले हे मंदिर ७२ x ५५ फुट आकाराचे असुन त्याचे मुखमंडप, गूढमंडप, अंतराळ व गर्भगृह असे भाग पाडले आहेत. गर्भगृहाच्या दरवाजाच्या ललाट बिंबस्थानावरही गजलक्ष्मी शिल्प आहेत. देवळाचे बाह्यांग व अंतर्भाग सुंदर शिल्पाकृतींनी सुशोभित केल असला तरी सिध्देश्वर मंदिरापेक्षा शिल्प कमी प्रमाणात आहेत. या रेब्बेश्वर मंदिराजवळ २४.१०.११२० चा कन्नड भाषेतील शिलालेख मिळाला असुन यात राजा विक्रमादित्य सहावा याचा अधिकारी रेब्बनायकाने हे देऊळ बांधून त्याला होट्टल व मदनूरचे काही उत्पन्न दान दिल्याचे कळते. या शिलालेखाची अक्षरे“ स्वस्ती श्रीमक चालुक्य विक्रमा वर्शदा ४५ नेया सर्वारी संवत्सरदा अस्वाईजाद अमावस्ये सूर्य ग्र हनादाम्दु कालेयनायकन अनातीयीम बिरारासम श्री स्वयंभू रेब्बेश्वरदेवा रग्गा अल्वा पोट्टाला मा(दा)नुरा अम्का(दे)रेया धारापुरव्वकम मदि बितारु मंगला महा(श्री) ” या शिलालेखातील वर्ष चालुक्य विक्रमवर्ष ४५ सर्वरी अश्वयुज अमावस्या सूर्यग्रहण असे आहे. इ.स. प्रमाणे त्यादिवशी वार होता रविवार दिनांक २४ ऑक्टोबर ११२०. कालेयनायकाच्या आज्ञेवरुन बिरारसाने पोट्टाला आणि मदनुरु म्हणजेच हल्लीचे होट्टल आणि मदनूर हि गावे स्वयंभू रेब्बेश्वराला दान दिल्याचा उल्लेख येतो. यानंतर गावाबाहेरील एका शेतात असलेले तिसरे मंदीर म्हणजे सोमेश्वर मंदिर. त्रिदलीय म्हणजे तीन गर्भगृहाची रचना असणारे हे मंदिर ७६ x ६५ फूट आकाराचे असुन मंदीराचा चौथरा पुर्णपणे मातीत गाडला गेला आहे. हे मंदीर त्रिपुरुषदेव म्हणजे ब्रह्मा, विष्णू व महेश या तीन देवतांचे असुन मंदिरात शिव, विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्यासाठी स्वतंत्र अशी तीन गर्भगृहे आहेत. या गर्भगृहांच्या दरवाजावर त्या देवतांचे द्वारपाल असुन ललाटबिंबावर गणेश व गजलक्ष्मी कोरलेली आहे. या मंदिराचे मुखमंडप, गूढमंडप व अंतराळ असे भाग पडले असुन गूढ मंडपाला १४ कोरीव स्तंभ आहेत. मंदिरांचे बाह्यांग देवदेवता व सूरसुंदरींनी जागोजाग सजले असले तरी बाहेर वाढलेल्या दाट काटेरी झुडूपामुळे मंदिराची प्रदक्षिणा करता येत नाही. या मंदीरात विष्णू, नृसिंह, सुर्य यांच्या सुंदर मुर्ती पहायला मिळतात. दुर्दैवाने या मंदिराची सध्याची स्थिती खूपच वाईट असुन समोर उकीरड्यावर अनेक कोरीव शिल्प पडलेली आहेत. शिवाय सांडपाण्याच्या नालीजवळ शिव-हरेश्वराची सुंदर मुर्ती पडली आहे. येथे मंदिराबाहेर दोन्ही बाजुस कोरलेला कन्नड भाषेतील शिलालेख असून त्यावर खालीलप्रमाणे अक्षरे कोरली आहेत. “(स्व)स्ती श्रीमत रेब्बे(यना)य(कं) अवरा........(मम)डळीकन इरेया.......नम अवरा प्रधानरम (श्री)(म)क चालुक्य विक्रमा (व)र्शदा २६ नेया विशा (साम)वत्सरदा कार्तिका सु ८ ब्रिहावारदा उत्तरायणा संक्रातीनिमित्तदल आग्रहा राव इरियेगा साळेया त्राईपुरुषदेवरीगम आलिया.......बाळिया .....सर्वनामस्या......कालगरच्ची धारा.....कामयादी....स्वदत्तम परदरा....वा यो हा संधराम शा... हसरानी “या शिलालेखाच्या दुसऱ्या बाजूची झीज झाली असुन यामध्ये उल्लेख केलेले वर्ष म्हणजे चालुक्य विक्रम वर्ष २६ विशु कार्तिकी ८ गुरुवार, उत्तरायण संक्रांती. इ.स. प्रमाणे या दिवशी तारीख होती ३१ ऑक्टोबर ११०१. संक्रमणाच्या पर्वावर चालुक्य नृपती विक्रमादित्य सहावा याचा अधिकारी रेब्बेनायक व इतरांनी मंदिराच्या दैनंदिन विधीकार्यासाठी त्रैपुरुषदेवालयाला व जवळच्या एरिगे (येरगी) येथील अग्रहाराला दान दिल्याचा उल्लेख या शिलालेखात येतो. या मंदिराजवळ घडीव दगडात बांधलेली पुष्करणी असुन शेवाळाने तिचे पाणी हिरवेगार झाले आहे. यानंतर गावाबाहेर असलेले चौथे मंदिर म्हणजे परमेश्वर मंदिर. तीन फूट उंच चौथऱ्यावर असलेले हे मंदिर ५४ x २५ फुट आकाराचे असुन त्याचे मंडप, अंतराळ व गर्भगृह असे भाग पाडले आहेत. गर्भगृहाच्या ललाटबिंबावर गजलक्ष्मी कोरली असुन संपुर्ण मंदिराभोवती प्रदक्षिणापथ बांधलेला आहे. या मंदिराची बांधणी चालुक्य नृपती विक्रमादित्य सहावा याने केली आहे. होट्टलची हि शिल्पसंपदा संपुर्ण महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आहे. मध्ययुगात मराठवाडा व दक्षिणेत सत्ता असणाऱ्या कल्याणीच्या चालुक्यांचे मांडलिक असलेले वान्हीकुलची पोट्टल / होटलूर या नावाने ओळखली जाणारी हि उपराजधानी होती. पोटल म्हणजे उंच डोंगर होय. भौगोलिकदृष्ट्या ते गावच मुळात उंच जागेवर वसलेले असून, भाषाशास्त्रानुसार कन्नड भाषेत 'प' चे 'ह'मध्ये रुपांतर होते. शिवाय या घराण्यातील राजा जयसिंह द्वितीय याच्या शिलालेखात उल्लेखिलेले होट्टलकेरे हे स्थळ म्हणजेच होट्टल होय. त्याचे होट्टलला इ.स. १०३३ मध्ये वास्तव्य होते.
© Suresh Nimbalkar

मागे जा

 




























 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...