पायरी चढून वर गेलो की संगमरवरी नंदी दिसतो. गाभार्याच्या बाहेरील भिंतींवर द्वारपाल, श्रीकृष्ण, राधा, शेषशयनी व्यंकटेश, समुद्रमंथन इत्यादी कोरीवकाम आहे. गर्भगृहात शंकराची संगमरवरी नवीन पिंड बसविली आहे. नित्यपूजनाने वातावरण अत्यंत शांत आणि प्रसन्न वाटते.
मंदीराच्या बाहेरील भिंतींवरील कलाकुसर तर डोळ्याचे पारणे फेडते. विष्णूचे दशावतार , मुनी, गोपिका, वादक, नर्तिका, अनेक पौराणिक प्रसंग कोरलेले आहेत.
मंडिराच्या सभामंडपावर कोणतेही शिखर नसल्यामुळे याला भोंड महादेव मंदीर म्हंटले जाते. हे मंदिर मिलेट्रीच्या आवारात येते, म्हणून मंदिराची देखभाल, सफसफाई वेळेवर आणि नीट होते. या मंदीरात कार्तिक महिन्यात विशेष पुजा केली जाते. त्या काळात इथे भजन, महाप्रसाद आयोजित केले जातात.
https://durgvihartrek.blogspot.com/2016/12/blog-post_39.html
https://hindutemples--india-blogspot-com.translate.goog/2022/07/bhonda-mahadev-temple-nagpur-maharashtra.html?_x_tr_sl=en&_x_tr_tl=hi&_x_tr_hl=hi&_x_tr_pto=tc
कळसाविना असलेले भोंडा महादेव मंदिर :-
कालौघात काही वास्तू नष्ट झाल्या, काही आजही आपला सुवर्ण इतिहासाच्या कथा सांगत उभ्या आहेत. अशीच एक वास्तू म्हणजे "भोंडा महादेव' मंदिर. उत्कृष्ट शिल्पकलेची साक्ष देत हजारो वर्षांपासून हे मंदिर उभे आहे. इस ८-९ व्या शतकात राष्ट्रकूट राजांनी सँडस्टोन नी बांधलेले मंदिर.. मंदिरात ५ फूट उंचीचे भव्य शिवलिंग आहे. हे शिवलिंग विदर्भातील सर्वात मोठे शिवलिंग म्हणून ओळखले जाते. मंदिराच्या समोर लोकांनी सिमेंट काँक्रीटचे कॉलम बांधून मंदिराच्या मूळ सौन्दर्याला बाधा आणली आहे.
वरोरा-चिमूर मार्गावर सालोरी गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या भटाळा या गावात हे मंदिर आहे. चंद्रपूर जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. चंद्रपूर शहरात असलेल्या अनेक प्राचीन वास्तू गोंड साम्राज्याची साक्ष देत आजही उभ्या आहेत. चांदागड उर्फ चंद्रपुर हि गोंड साम्राज्याची दक्षिणेतील राजधानी होती. इ.स. ८७० पासून इ.स. १८१८ पर्यंत ते चांदागड म्हणून ओळखले जात होते. सध्या या चांदागडच्या राजघराण्याचे वंशज चंद्रपुर जिल्ह्यातील वरोडा येथे तर काही उटनुर-आदिलाबाद, भोपाळ येथे आहेत. गोंड राजाचे राज्य प्रस्थापित व्हायच्या हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास जिल्ह्याच्या भूगर्भात दडला आहे. मौर्य, सातवाहन, वाकाटक, गुप्त, परमार, चालुक्य, नागवंशीय राजांनी चंद्रपूरच्या भूमीवर राज्य केल्याचे दाखले इतिहासात सापडतात. या राजांनी आपल्या राज्यकाळात अनेक वास्तू आणि मंदिरांची निर्मिती केली होती.माणिकगडाचे राजे परमार यांनी या मंदिराची निर्मिती केली. मंदिराचा कालखंड दहावे शतक आहे. परमार राजे शिवभक्त होते. त्यांनी अनेक शिवमंदिरांची निर्मिती केली.परमार राजाच्या चलनावर शिवपिंडाचे प्रतीक कोरले असायचे. राजुरा तालुक्यातील विहीरगाव येथे परमार राजाला सोन्याची नाणी सापडली होती.
इतिहासाच्या अंधारगुहेत अनेक रंजक कथा दडून बसल्या आहेत. अशीच एक कथा आहे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात येत असलेल्या भटाळा या गावातील प्राचीन मंदिराची. हे मंदिर "भोंडा महादेव' नावाने ओळखले जाते. कधीकाळी या प्राचीन मंदिराच्या कळसावर वीज कोसळली होती. पुनर्निर्मिती करताना कळसाविनाच बांधकाम केले. मंदिराच्या डोक्यावर कळस आणि अमलक नसल्याने या मंदिराला "भोंडा महादेव' असे नाव पडले. उत्कृष्ट शिल्पकलेची साक्ष देत हजारो वर्षांपासून हे मंदिर उभे आहे. हे मंदीर पांढर्या वालुकाश्माचा वापर करुन बांधले आहे. तीन मजली उंचीच्या या मंदीराचे बांधकाम एका वेगळ्याच शैलीचे वाटते.
भटाळा येथील मंदिरात विदर्भातील सर्वात मोठे शिवलिंग आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे पिंडीचा वारीमार्ग सरळ भिंतीत गेला असून, त्यामुळे प्रदक्षिणेला आपसूकच अटकाव होतो. वारीमार्गाच्या या रचनेमुळे हे मंदिर एक परिपूर्ण मंदिर समजले जाते. महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा भरत असते. मंदिरावर कोरलेली उत्कृष्ट शिल्पकला बघण्यासाठी पर्यटकांचा ओढा असतो.
भवानी माता मंदिर, भटाळा, चंद्रपूर :-
गोंड घराण्यातील राजे कर्णशाह इ.स. १५४७ ते १५७२ या कालावधीत सत्तेवर होते. न्यायी, प्रजादक्ष म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या कारकीर्दीत भटाळा परिसरात काली कंकलीचे देवालय उभारले आहे. या मंदीराच्या परिसरात तात्कालीन गोंड राजे युध्दावर जायच्या आधी काही विधी करत. युध्दावर जाण्याआधी काही तांत्रिक साधना करुन देवीला प्रसन्न करुन घेतले जाई.
हे मंदीर उभारण्यासाठी सध्याच्या तेलंगणा राज्यातील कापेवार समाजातील शिल्पकार लोक येथे बोलावून या मंदीराची उभारणी केली असे मानले जाते. गोंडराजे कर्णराव आत्राम यांचा एक सरदार या भटाळा परिसरात ससैन्य आला असता त्याचा मृत्यु झाला. त्यामुळे महादेव मंदीराच्या टेकडीनजीक त्याला पुरण्यात आले. त्याच्या दफनाच्या जागी समाधीचा दगड ज्यावर तलवारीचे शिल्प असलेला दगड दाखविला आहे, गोंड समाजात मृत्यु झाल्यस दहनाच्या एवजी दफन केले जाते. हत्तीवर हल्ला करणारा सिंह हे गोंड राजघराण्याचे चिन्ह आपल्याला पहायला मिळते.
विदर्भातील मोठा प्राचीन लोह कारखाना :-
आठशे वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या लोह कारखान्याचे पुरावे चंद्रपूर जिल्ह्यात सापडले. विदर्भातील हा सर्वात मोठा कारखाना असावा. परमार काळात या कारखान्यात अवजारे व इतर वस्तू तयार केली जात असावी, जवळपास एक कि.मी. परिसरात या कारखान्याचे अवशेष आढळून आले आहेत.
चंद्रपूर इथून पंधरा कि.मी. अंतरावर घंटाचौकी नावाचे खेडे आणि प्राचीन प्रसिद्ध शिव मंदिर आहे. याच मंदिर परिसरात तब्बल एक कि.मी. परिसरात 800 वर्षांपूर्वी लोह अवजारे बनविण्याचा प्राचीन कारखाना येथील भूगर्भशास्त्र आणि पुरातत्व अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांना आढळला आहे. हे मंदिर आणि इतर मंदिरे बांधतेवेळी दगड फोडण्यासाठी लागणारी छिन्नी आणि इतर अवजारे बनविण्यासाठी मातीचे साचे आणि गाळलेले लोखंड येथे मोठ्या प्रमाणावर आढळले.
हा लोह कारखाना अकरा अथवा बाराव्या शतकातील परमार राज्यांच्या काळातील असावा. पंधरा वर्षांपूर्वी चोपणे ह्यांना हे स्थळ आढळले होते. मात्र त्यावेळी केवळ गाळलेल्या लोखंडाचे तुकडेच त्यांना सापडले. परत त्यांनी सर्वेक्षण आणि थोडे उत्खनन केले असता, गाळलेल्या लोखंडाची असंख्य लहान – मोठे तुकडे, लोखंडाची अवजारे बनविण्यासाठी दोन छिद्राची अनेक मातीचे साचे सापडले. अश्या प्रकारची विविध काळातील लोह कारखाने चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आढळली आहेत. परंतु एक कि. मी. परिसरात पसरलेला हा सर्वात मोठा प्राचीन लोह कारखाना असल्याचे चोपणे म्हणाले. पुढील काळातील राज्यांनी सुद्धा येथील लोह खडकापासून अवजारे बनविली असण्याची शक्यता आहे. अजून इथे नाणी किंवा इतर ऐतिहासिक पुरावे मिळाले नाहीत. मात्र संशोधनांअंती आणि मिळणाऱ्या पुराव्याच्या आधारे ह्या प्राचीन वारस्याची अचूक माहिती समोर येवू शकते.

लोहारा नावाचा इतिहास
अवजारांसाठी प्राचीन काळात लोह खनिज असलेल्या दगडापासून भट्टीच्या माध्यमाने तरल लोखंड तयार केले जात असे. ह्या तरल लोखंडाला साच्यात टाकून विशिष्ट आकाराची अवजारे बनविली जात असे. त्यात छन्नी, हातोडे ह्यांचा समावेश असतं. परंतु ह्यासाठी लोह खनिजे असलेल्या ठिकाणाचा शोध घेवून तिथे अशा दगडाना भट्टीत उच्च तापमानात तापवून तरल लोह बनविली जात.आजचा लोहारा आणि घंटाचौकी परिसर हा अशा लोह खनिज असलेल्या दगडांनी समृद्ध आहे. बहुदा यामुळेच जवळच्या गावाला लोहारा हे नाव पडलं असावं, असं सांगितलं जातं.
ही तरल धातू योग्य मापाच्या साच्यात ओतून अवजारे बनविली जात. आजचा लोहारा आणि घंटाचौकी परिसर हा अश्या लोह खनिज असलेल्या दगडांनी समृद्ध आहे. बहुदा ह्यामुळेच जवळच्या गावाला लोहारा हे नाव पडले असावे. शिव मंदिराच्या दक्षिणेला पूर्व-पश्चिम रेषेत १ किमी परिसरात लोखंडी अवजारे बनवण्याच्या ३० मोठ्या लोह खनिज गाळण्याच्या भट्ट्या आढळल्या. जवळच नाला असल्याने तेथील पाण्याचा वापर केला जात होता. याच ठिकाणी आजही लोह खनिज असलेले हजारो खडक आणि लोह तुकडे आढळतात. या लोखंडाची वैशिष्ट्य म्हणजे आजही त्याला गंज लागलेला नाही. त्यामुळे ही अवजारं चांगल्या धातूची आणि अतिशय मजबूत अशी बनववली गेलीये.
घंटाचौकी मंदिर परिसरात आता जंगल झालं असल्यानं आणि वन विभागाची अनेक कामे, खोदकामे झाली आहेत. सध्याही सुरू आहेत. स्थळाचं उत्खनन आणि संशोधन झाल्यास अनेक प्राचीन रहस्य उलगडण्यास साहाय्यभूत ठरणारे पुरावे सापडू शकतात.
https://www.saamana.com/chandrapur-iron-encient-company-found/




















.jpg)

















































No comments:
Post a Comment