बऱ्याच
वर्षांपासून सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर पहावयाचे मनात होते. श्री.वल्ली
यांचा लेख आल्यावर तर इच्छा अजूनच प्रबळ झाली होती. पण योग येत नव्हता.
गेल्या बुधवारी मात्र हा योग जुळून आला. आमचे पारिवारिक मित्र सौ.व श्री.
मुजावर यांच्यासोबत त्यांचीच गाडी घेऊन गोंदेश्वर आणि हरिश्चंद्र गड पहायचे
ठरले.
ठरल्याप्रमाणे पहाटे बरोबर साडे पाचला नव्या मुंबईतून प्रवास सुरु झाला.
ठाणे, शहापूर, इगतपुरी मार्गे नऊ वाजता घोटीला पोहचलो. येथे उजवीकडे वळण
घेत जुन्या मार्गाने सिन्नरला पोहचायचे होते. भूक लागली होती आणि सकाळच्या
औषध गोळ्याही घ्यायची वेळ झाली होती . त्यामुळे वळल्यावर बाजूच्याच
ढाब्यावर झणझणीत वडा रस्सा खाल्ला, चहा घेतला आणि पुढे निघालो.
चुकून समृद्धी मार्गाला लागलो पण पुढे एका ठिकाणी रस्ता बंद असल्याने माघारी फिरून परत योग्य रस्ता पकडला आणि अकरा वाजता गोंदेश्वर मंदिराजवळ येऊन पोहचलो.
मध्यावरचे मुख्य शिव मंदिर आणि चार उपदिशाना असलेली गणेश, विष्णू ,
पार्वती आणि सूर्य यांची चार मंदिरे यामुळे हे शैवपंचायतन म्हणून ओळखले
जाते.
पुरातत्त्व खात्यातर्फे लावलेल्या फलकावरील माहिती जशीच्या तशी -
गोंदेश्वर महादेव मंदिर
गोंदेश्वर महादेव दख्खनमधील शैलीच्या मंदिराचे पूर्ण संरक्षित आणि
सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. हे मंदिर अंदाजे इ. स. १२ व्या शतकाच्या सुरवातीस
बांधले गेले. हे पंचायतन मंदिराचे ( चार कोपन्यावर स्थित चार छोट्या
मंदिराच्या केंद्रभागी स्थापित मुख्य मंदिर) विलक्षण उदाहरण आहे. पाच
मंदिराचा समूह एका ३८ ४२८ मीटर अशा प्रशस्त जोत्यावर उभा असुन येथे
मध्यभागी मुख्य शिवमंदिर असुन इतर चार छोटी मंदिरे विष्णु, गणपती, सूर्य
आणि पार्वती आदि देवी-देवतांना समर्पित आहेत. मंदिराचा संपूर्ण परिसर चारी
बाजूंनी भिंतीनी घेरलेला आहे, जिथे दक्षिण आणि पूर्व दिशेस प्रवेशद्वाराची
योजना आहे. मुख्य मंदिरात गर्भगृह, अंतराळ, महामंडप आणि उत्तर, दक्षिण आणि
पूर्व दिशांना अर्धमंडप अशी योजना आहे. पूर्व दिशेस मुख्य मंदिरापासुन
निराळ्या मंडपात बसलेला नंदी आहे. मुख्य मंदिराचे वक्ररेखिय शिखर अनेक
छोट्या होत जाणाऱ्या लघु अंग-शिखरांनी बनलेला आहे. महामंडपाचे शिखर
शंक्वाकृती आहे.
मंदिराचा बाह्यभाग रामायणातील दृश्ये, देवी, देवता आणि नृत्यमग्न
अप्सरांच्या शिल्पांनी सुशोभीत आहे. मुख्य मंदिराच्या भिंतीवर ब्राह्मी,
पार्वती, शिव, भैरव मूर्ति प्रमुख आहेत. नंदी मंडपावरील वराह आणि नरसिंह या
प्रतिमा उल्लेखनीय आहेत. गर्भगृहातून निघणारे पाणी उत्तर दिशेस असलेल्या
एका अलंकृत मकरमुखाच्या माध्यमातून बाहेर निघते. गोंदेश्वर महादेव मंदिराचे
खरे सौंदर्य त्याच्या सममित रुपात आणि भव्य आकारमानातच सामावलेले आहे.
फलकावर सर्वसाधारण माहिती दिलेली आहे. अधिक माहितीसाठी वल्लींचा हा लेख जास्त उपयुक्त ठरेल. अत्यंत ओघवत्या भाषेत त्यांनी मंदिराची संपूर्ण ओळख करून दिलेली आहे.
त्यामुळे फक्त फोटोतुनच हे मंदिर आपल्याला दाखवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.
मंदिर दर्शन वेळ
मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडे असले तरी सध्या रस्त्याच्या बाजूकडील (दक्षिण)
दरवाजानेच प्रवेश आहे.
प्रवेश करताच हे भव्य मंदिर संकुल नजरेस पडते.
मुख्य शिव मंदिराचे सभागृह. सभामंडपाच्या खांबावर अप्रतिम कोरीव काम आहे.
मैथुन शिल्पही दिसतात.
काही मैथुन शिल्प नंदी मंडपावरही दिसतात.
भिंतीवर पौराणिक, रामायणातील प्रसंगही कोरलेले आहेत.
इतर काही शिल्पं
दरवाजाच्या चौकटीवरील सुंदर कोरीव काम
शिवलिंग
शाळुंकेतील पाणी बाहेर जाण्यासाठी असलेले सुंदर मकरमुख.
पार्वती मंदिराच्या पुढे मकरमुखातून पडलेले शाळुंकेचे पाणी वाहून जाण्याचा मार्ग असल्याने तो ओलांडून ईशान्येकडील सूर्य मंदिराकडे जाऊ नये असे सुचविण्यात आल्याने मागे वळून परत गणेश मंदिराकडून फेरी मारून पलीकडे जावे लागले. वास्तविक मकरमुखातून पडलेले पाणी एका कुंडात जमा करून पाणी जाण्यासाठी भूमिगत व्यवस्था केली तर ही अडचण दूर होऊ शकते.
नंदी मंडप
चार कोपऱ्यांना असलेली मंदिरं. शिल्प वेगळी असली तरी रचना सारखीच.
पश्चिम बाजूने दिसणारे मंदिर
स्वर्ग मंडप असलेले पूर्वेकडील प्रवेशद्वार (आतील बाजूने). सध्या बंदच आहे. उत्सव, यात्रेच्या वेळी उघडतात.
स्वर्ग मंडप असलेले पूर्वेकडील प्रवेशद्वार (बाहेरील बाजूने).
स्वर्ग मंडप. अतिशय सुंदर. नुकतीच मेघालायची सहल केली. तेथल्या पर्यटन
मंडळाचे घोषवाक्य आहे "Half Way To Heaven". तेथे अर्ध्या वाटेहुन स्वर्ग
पाहण्याचा प्रयत्न केला पण येथे तर प्रत्यक्ष स्वर्ग पाहिल्याचा आभास झाला.
मंदिर पाहून थोडा वेळ पायऱ्यांवर विसावलो
दुपारचे साडे बारा वाजले. आम्ही हरिश्चंद्र गडासाठी सिन्नर-अकोले-राजूर-पाचनई मार्गाने निघालो. वाटेत चहा घेतला. रस्ता जरा लहान असला तरी खूप चांगला आहे. रहदारीही विशेष नव्हती. वातावरण थोडेसे ढगाळ असल्याने ऊन अजिबात जाणवत नव्हते. आजूबाजूचे डोगर, दऱ्या , नद्या, धरणाचे अडलेले पाणी यांचे देखावे असा नयनरम्य प्रवास होता.
पाणवठे
शेती
निळेशार आकाश, आणि विखुरलेले ढग
नदी
उत्तुंग डोंगर माथे
सहल - श्री गोंडेश्वर पंचायतन सिन्नर.प्रचि.१ प्रचि.२ प्रचि. ३ यौवनाची दोन रुपं, एक शतकांपुर्वी दगडांत उतरवलेलं दुसरं जिवंत पण दगडातलं देखील तेवढंच जिवंत.. प्रचि.४ प्रचि. ५ प्रचि. ६ प्रचि. ७ प्रचि.८ प्रचि.९ प्रचि.१० प्रचि. ११ हे मंदिर संपुर्ण फिनिश केलेलं नसल्यानं हेमाडपंती बांधकाम पद्धतीचा अभ्यास करणं इथं शक्य आहे. प्रचि. १२ प्रचि. १३ प्रचि. १४ प्रचि. १५ प्रचि. १६ संपुर्ण मंदिराला ह्या हत्तीशिल्पांनी उचलुन धरलेलं आहे, प्रचि. १७ प्रचि. १८ एकतर काम अपुर्ण राहिलंय किंवा ही मंदिरं त्याकाळची आर्किटेक्ट किवा इंजिनियरिंग किंवा आर्टस कॉलेजेसची ऑन साईट प्रयोगशाळा असावीत बहुधा. प्रचि. १९ प्रचि. २० प्रचि. २१ हे मुख्य मंदिराचं शिखर प्रचि.२२ बहुधा दगडाच्या क्वालिटिमुळं देखील इथलं नक्षिकाम पुर्ण होउन अपुर्ण वाटतंय, निसर्गाचा परिणाम जास्त जाणवतोय... प्रचि. २३ प्रचि. २४ प्रचि. २५ प्रचि. २६ प्रचि. २७ प्रचि.२८ हा सादर मानाचा मुजरा त्याकाळच्या इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट्सना, आणि अर्थात त्या प्रत्येक मजुराला ज्यानं हे काम धर्मासाठी केलं का पोटासाठी केलं का मरणाच्य भितीपोटी केलं माहित नाही, पण का करतोय या पेक्षा कसं करतोय याचं जास्त भान ठेवुन ह्या कलाकृतीला जन्म दिला, निसर्गातल्या दगडांना एक नविन रुप दिलं एक व्याख्या दिली, जगण्याची दिशा दिली, जगण्याचा आशय दिला. हे सगळं घडताना तो निसर्ग पाहात होताच, तो या सगळ्यांचा बाप, पिता, पितामह , प्रपितामह का त्याहुनही मोठा, एखाद्या उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडं आलेल्या चिल्यापिल्यांनी संध्याकाळी खेळुन दमल्यावर हात पाय धुवुन देवासमोर बसुन शुभंकरोती म्हणुन संपवावी, आणि मग एक क्षण शांतता अनुभवावी तेवढ्यात बाहेरच्या ओट्यावरुन आजोबांचा आवाज घुमावा एखादं मोठं अवघड स्त्रोत्र म्हणणारा हा जो अनुभव आहे.. तो दुस-या भागात. प्रवासमाहिती स्थळ - श्री शिवगोंडेश्वर पंचायतन देवस्थान, सिन्नर. प्रवाससोय - सिन्नर गाव हे नाशिक - पुणे हमरस्त्यावर नाशिकच्या आधी ३० किमी अंतरावर आहे, पुण्याहुन जाणा-या सर्व एसटी या ठिकाणी थांबतातच, मुंबईहुन नाशिकला येउन मग पुण्याच्या बाजुला यावं लागेल,अहमदनगरकडुन येताना सुद्धा सिन्नर नाशिकच्या आधीच आहे, प्रवासाची सोय रात्री १० पर्यंत उत्तम आहे. हा मंदिरसमुह सिन्नर गावातच पोलिस स्टेशन / कोर्टाच्या मागच्या बाजुला आहे, सिन्नर एस्टिस्टँडपासुन रिक्षाने ४० रुपये खर्च होतो, चालत गेल्यास २० मिनिटांचा रस्ता आहे. जेवणखाण - सिन्नर औद्योगिक शहर असल्यानं इथं सर्व प्रकारचं, जेवण खाण उपलब्ध आहे, स्टँडसमोरचं पंचवटी गुजराथी थाळी ही नो रिस्क जेवणाची सोय. सिन्नरचं एस्टि स्टँड हे एखाद्या कार्पोरेट ऑफिससारखं दिसतं निदान बाहेरुन तरी. |
| गोंदेश्वर मंदिर (स� Posted: 10 Nov 2013 at 10:41pm |
गावाचे नाव :- सिन्नर जिल्हा:- नाशिक जवळचे मोठे गाव :- सिन्नर, नाशिक मुंबई - शिर्डी मार्गावर सिन्नर नावाच गाव आहे. या गावात रस्त्यालगत गोंदेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर केव्हा व कोणी बांधल याचा उल्लेख मिळत नाही. यादवांच्या राजवटीत १२ व्या शतकात बांधल असावे. गोंदेश्वर मंदिरा भोवती ५ फूट उंच तटबंदी आहे.या तटबंदीत असलेल्या छोट्या दरवाजातून मंदिराच्या परीसरात प्रवेश केल्यावर समोर ५ फूटी उंच चौथर्यावर (अधिष्ठाण) मध्यभागी गोंदेश्वराचे उंच मंदिर व त्याच्या दोन्ही बाजूला असलेली दोन छोटी कलाकुसरींनी युक्त मंदिर आपल लक्ष वेधून घेतात. गोंदेश्वराचे मंदिर संकुलात ५ मंदिर आहेत. हे शिव पंचायतन असून यात मुख्य मंदिर शिवाचे असून चार बाजूला पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णूचे मंदिर आहे. या शिवाय शिव मंदिरा समोर नंदिचा मंडप आहे. शिव मंदिराचे सभामंडप चार खांबांवर तोललेला आहे. मध्यभागी कासव कोरलेले असून खांबांवर व छ्तावर नक्षी कोरलेली आहे. खांबाबर काही शिल्पपट व मुर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या गर्भगृहात शंकराची पिंड आहे. मंदिराच्या सभामंडपाला पूर्वेकडे असून मंदिराचे मुख्य दार उत्तरेकडे आहे. मंदिराच्या दरवाजा समोर नंदिचा मंडप आहे. मंदिराचे शिखर भूमिजा पध्दतीचे आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूसही पायापासून छतापर्यंत कोरीवकाम व नक्षीकाम केलेले आहे. सर्वात खालच्या बाजूच्या शिल्पपट्टीवर हत्ती कोरलेले आहेत. मुख्य मंदिराच्या बाजूला असलेल्या मंदिरांवरही कोरीवकाम व नक्षीकाम केलेले आहे. आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) गारगोटी म्युझियम , सिन्नर. २) नांदुर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य २५ किमी. ३) नाशिक शहर ३० किमी. जाण्यासाठी :- नाशिकहून ३० किमी अंतरावर सिन्नर गाव आहे. नाशिक - शिर्डी मार्गावर हे गाव आहे. सिन्नर गावातील तहशीलदार कार्यालयाच्या बाजूला रस्त्यालगतच गोंदेश्वराचे मंदिर आहे. नाशिक ते सिन्नर अशी बस सेवा उपलब्ध आहे. मुंबई - घोटी - सिन्नर हे अंतर १८५ किमी आहे. मुंबई ते घोटी मुंबई आग्रा हायवेने येऊन घोटी येथे हायवे सोडून (नाशिक बायपास) रस्त्याने सिन्नर गाठावे. याच रस्त्याने पुढे शिर्डीला जाता येते. Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra Gondeshwar Mandir :- Village :- Sinnar, Dist :- Nasik, Nearest city :- Sinnar, Nasik, Shirdi, Ghoti, Igatpuri. |
गोंदेश्वर मंदिर, सिन्नर | Discover Maharashtra

गोंदेश्वर मंदिर, सिन्नर –
मंदिर स्थापत्य :
नाशिकमध्ये दुर्मिळ आणि प्राचीन मंदिरांचा खजिना आहे. यापैकी सिन्नर येथील पंचायतन प्रकारातील गोंदेश्वर मंदिर एक. यादव काळातील हे मंदिर नाशिकचं सौंदर्य आहे. सुमारे आठशे वर्षांपूर्वी सिन्नरवर यादव वंशातील राजा राव गोविंद यांचे शासन होते. या राजावरूनच मंदिराचे नाव गोविंदेश्वर अन् पुढे गोंदेश्वर पडले असावे. हे मंदिर इ. स. ११६० साली बांधले असावे, असा अंदाज अभ्यासक लावतात. हे एकटे मंदिर नसून, शिवपंचायतन स्वरूपात असणारा हा पाच मंदिरांचा समूह आहे. म्हणूनच गोंदेश्वराचे महत्त्व फक्त सिन्नर अथवा नाशिकपुरते मर्यादित नाही तर महाराष्ट्राच्या स्थापत्यशिल्प वैभवात या मंदिराने भर घातलेली आहे.
सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर हे मंदिर पुरातन भूमिज स्थापत्यशैली बांधकामाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. यांतील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पुर्वेला असून दक्षिण व उत्तर दिशेलाही प्रवेशद्वार आहे. मंदिराची संरचना स्वर्गमंडप, नंदीमंडप, मुखमंडप, सभामंडप व अंतराळ व गर्भगृह अशी असून गर्भगृहावर बांधलेले, आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंड आहे. मंदिराला विस्तृत आवार आहे.
शिल्पकला :
महाराष्ट्रावर सुमारे पाचशे वर्षे यादव राजघराण्यानी राज्य केलं. यादव राजवटीत ‘मराठी’ भाषेच्या साहित्यकृतीनी मराठीचे साहित्यभांडार अलंकृत झाले. असे हे यादव घराणे स्वतःला श्रीकृष्णाचे वंशज म्हणवून घेत. यादवांनी बांधलेले किल्ले, राजवाडे, मंदिरे, मठ, रस्ते, बारव आजही महाराष्ट्रात पाहायला मिळतात. यादव काळात स्थापत्य व शिल्पकला बहरात होती. त्याचा उत्तम नमुना म्हणजे शिवपंचायतन प्रकारातील सिन्नर चे गोंदेश्वर मंदिर.
मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणार्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे देखणेपण अधिकच उठावदार दिसते. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यावर आणि मंदिरांच्या बाह्य भिंतींवर सुरसुंदरी, देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत.
(मंदिराच्या बाह्य अंगावरील व अंतरंगातील काही शिल्पांची मी माझ्या माहिती नुसार वर्णने केली आहेत. वर्णन करताना कुठे चूक झाली असल्यास आणि जाणकारांनी ती चूक निदर्शनास आणून दिल्यास ज्ञानात भर पडून आनंदच होईल.)
Rohan Gadekar
गोंदेश्वर पंचायतन मंदिर : जहां पत्थर सुनाते हैं कथा
सिन्नर, नासिक और शिर्डी दोनो स्थानों के पास है और दोनों ही स्थानों की आधुनिकता तथा अध्यात्म की एक समृद्ध परंपरा रही है । वो लोग जो इतिहास के बारे में जानना चाहते हैं, उनके लिये यहां बहुत कुछ है।
हमारी कहानी आपके शहर में दाख़िल होते ही शुरु हो जाती है। यहां एक
से एक ऐतिहासिक नगीने हैं और इनमें से एक है शिव मंदिर। स्थानीय लोग ने
इसका नाम गोंदेश्वर रखा है । मंदिर परिसर की देखरेख भारतीय पुरातत्व विभाग
की औरंगाबाद शाखा करती है। यहां शिव के अलावा आसपास के मंदिरों में अन्य
देवी-देवताओं की भी पूजा होती है।मंदिर परिसर में क़दम रखते ही इतिहास,
वास्तुकला और धार्मिक आस्था जीवंत हो उठती है । तो चलिये एक नज़र डालते हैं
इसके इतिहास पर ।
गोंदेश्वर मंदिर।
शहर का इतिहास सेऊना यादवों के शिला-लेखों से मिलता है जिन्होंने 9वीं शताब्दी में उत्तर महाराष्ट्र में अपना शासन स्थापित किया था। उनकी राजधानी सिन्नर हुआ करती थी। सेऊना चंद्र प्रथम (835-860) को कई इतिहासकार सेऊना राजवंश का पहला शासक और शहर का संस्थापक मानते हैं।
अनुदान से संबंधित तांबे की प्लेट संगमनर और कलस बुद्रक में इसका उल्लेख सिंदीनगरा नाम से है। ये अनुदान यादव शासक भिल्लमा द्वतीय (970-1005) और भिल्लमा तृतीय ने दिये थे।एक शिला-लेख में छोटी नदी सरस्वती का उल्लेख देवनदी के रुप में है जहां ये शहर स्थापित है। शहर का इतिहास नासिक क्षेत्र के इतिहास से जुड़ा हुआ है। शहर को अगर उसके राजनीतिक और आर्थिक परिप्रेक्ष्य से देखें तो ये बहुत दिलचस्प लगता है।
सेऊना चंद्र के बाद ढ़ाडियाप्पा प्रथम, भिल्लमा प्रथम और राजुगी आए लेकिन इनके बारे में बहुत कम जानकारी उपलब्ध है। बहरहाल इनके बाद वड्डिगा प्रथम (935-970) का शासन आया जिसने राष्ट्रकुट राजा कृष्ण तृतीय के भाई ढ़ोरप्पा महानरपा की बेटी से शादी की थी।
सन 970 में भिल्लम द्वतीय के राज्याभिषेक के बाद दक्कन की राजनीति में भारी बदलाव आया। सन 968 में राष्ट्रकुट शासक कृष्ण तृतीय की मृत्यु के बाद इस राजवंश का राजनीतिक सितारा डूब गया और उनकी जगह कल्याणी (मौजूदा समय में उत्तर कर्नाटक में बसव कल्याण) के चालुक्य शासकों ने ले ली। उनकी जगह लेने वाला पहला चालुक्य राजा तैला द्वतीय था।
Support Live History India
अगर आपको लिव हिस्ट्री इंडिया का काम पसंद आता है, तो अपने सहयोग से हमें प्रोत्साहित करें। कोई भी योगदान छोटा नहीं होता और इसमें आपका ज़्यादा समय भी नहीं लगेगा। आपके योगदान के लिए धन्यवाद।
भिल्लम द्वतीय ने चालुक्य शासक का आधिपत्य स्वीकार कर परमार राजा मुंजा
की सेना को खदेड़ने में मुख्य भूमिका निभाई। तब सेऊनादेस के उत्तरी प्रांत
(नासिक और अहमदनगर ज़िले) पर परमार राजा मुंजा का शासन हुआ करता था।
भिल्लम की रानी और उत्तर कोंकण के शिलहारा राजा झंझा की पुत्री लक्ष्मी ने सन 1010 में अपने पुत्र और उत्तराधिकारी वसुगी तृतीय के असमायिक निधन के कारण राजपाट की ज़िम्मेदारी संभाल ली। उन्होंने राज्य संरक्षक की तरह काम किया क्योंकि उनका पोता भिल्लम तृतीय उस समय नाबालिग़ था।
भिल्लम तृतीय ने भी चालुक्य राजा सोमेश्वर प्रथम के मातहत ही काम किया और उनकी बेटी अव्वलादेवी से विवाह किया। यादव शासकों को अपनी सीमाओं का एहसास था इसलिये उन्होंने अपनी स्थिति मज़बूत करने के लिये चालुक्य घरानों में शादी-ब्याह किया।
भिल्लम पंचम (1173-1192) के राज्याभिषेक तक सिन्नर भावी साम्राज्य
तक राजधानी बनी रही। सिन्नर नासिक में व्यापार केंद्र के क़रीब था और शहर
का समुद्र तटों से गहरा संबंध था। शायद इसीलिये सिन्नर सत्ता का केंद्र बना
रहा। भिल्लम का राज्याभिषेक ऐसे समय में हुआ जब कल्याणी चालुक्य साम्राज्य
पतन की ओर था। एक तरफ़ जहां चालुक्य साम्राज्य की जड़ें कमज़ोर हो रही
थीं, वहीं इस क्षेत्र में कोई शक्तिशाली राजा नहीं था। इस स्थिति का फ़ायदा
उठाकर यादव शासक ने ख़ुद को स्वतंत्र घोषित कर दिया।
यादव शासक का शासन अब उत्तर महाराष्ट्र और पूर्वी महाराष्ट्र के कुछ हिस्सों तक फैल गया था। इनमें मौजूदा समय का औरंगाबाद ज़िला भी शामिल था। 1259 से 1274 के दौरान यादव शासक महादेव और रामचंद्र के मंत्री रहे हेमाद्री पंडित ने चतुरवर्ग चिंतामणी में लिखा है कि देवगिरी (दौलताबाद) शहर भिल्लम पंचम ने बनवाया था।
भिल्लम पंचम ने अपना सत्ता केंद्र देवगिरी शिफ़्ट कर लिया था क्योंकि सामरिक दृष्टि से ये स्थान सिन्नर से कहीं बेहतर था। उसने यहां पहाड़ी पर किलेबंद शहर बनाया था जिसकी दीवारे नीचे की तरफ झुकी हुई थीं जिसकी वजह से दुश्मनों के लिये शहर पर हमला करना मुश्किल होता था। इसके अलावा ये स्थान व्यापारिक केंद्र पैठन और तर के नज़दीक था जिससे इस क्षेत्र में यादवों के लिये व्यापार पर नियंत्रण करना आसान हो गया था।
यादव राजवंश के बाद के शासकों के दौर में यादव साम्राज्य ने सबसे सुनहरा समय देखा। इस दौर में न सिर्फ़ उनका साम्रज्य फैला बल्कि व्यापारिक गतिविधियां भी बढ़ीं। यादवों का सुनहरा काल तब ख़त्म हुआ जब दिल्ली के भावी सुल्तान अलाउद्दीन ख़िलजी ने तीन हज़ार घुड़सवारों और दो हज़ार पैदल सैनिकों के साथ 26 फ़रवरी सन 1296 को देवगिरी पर हमला बोल दिया।
हमले के समय यादव शासक रामचंद्र (1271-1312) अपनी सेना के साथ शहर
के बाहर वरंगल के ककातिया से लड़ रहा था और ऐसे समय में उसने अलाउद्दीन
ख़िलजी की शर्तें मानकर आत्मसमर्पण करने में ही अक़्लमंदी समझी।
अलाउद्दीन ख़िलजी
भावी सुल्तान काफ़ी दौलत लेकर दिल्ली वापस आया और इसके बाद से ही दक्कन की राजनीति में यादवों का दख़ल ख़त्म हो गया। यादवों के शासनकाल में मज़बूत अर्थव्यवस्था में कृषि और उत्पादन के अलावा व्यापार की भी अहम भूमिका रही। उस समय नासिक इस क्षेत्र के व्यापारिक गढ़ के रुप में पहले से स्थापित था और मगध के मौर्य, सातवाहनों से लेकर कल्याणी चालुक्य शासकों ,सभी ने इसके महत्व को समझा था क्योंकि ये कोंकण तटों पर बंदरगाहों के क़रीब था।
इस शहर का उल्लेख पांडु लेना (नासिक शहर के बाहर) में गुफाओं में मिले शिला-लेखों और यूनानी भू-वैज्ञानिक टालेमी की किताब में मिलता है। टालेमी ने लिखा है कि 200 ई.पू. और 200 ई. के दौरान ये शहर व्यापार का एक महत्वपूर्ण केंद्र था। तीसरी सदी की साहित्यिक कृति ‘पेरीप्लस ऑफ़ द् एरीथ्रियन सी’के अज्ञात लेखक ने बेरीगाजा (मौजूदा समय में गुजरात का भारुच शहर) बंदरगाह शहर का उल्लेख किया है जहां से माल असबाब का आयात-निर्यात होता था। यहां से माल पैठन (औरंगाबाद ज़िला) और टागर (उस्मानाबाद ज़िले में टर) भेजा जाता था। शायद इस तरह की व्यापारिक गतिविधियां नासिक ज़िले में भी होती थीं।
सोपाड़ा बंदरगाह (ठाणे ज़िला) से 112वीं शताब्दी के अंत तक व्यापार होता रहा। यहां से सामान विदेशों में भी निर्यात किया जाता था। तटीय शहरों से लेकर आंतरिक इलाक़ों तक माल लाने लेजाना में ठाणे बंदरगाह की बड़ी भूमिका थी। नासिक चूंकि थाल दर्रे जिसे कसारा घाट भी कहा जाता था, के पास था इसलिये भी वह व्यापार का मुख्य केंद्र बन गया था।
चंदोर दर्रे (मौजूदा समय में चांदवाड़) के ज़रिये पैठन और टर जैसे पूर्वी शहरों में भी व्यापार होता था। सिन्नर अंतर्रदेशी व्यापार नेटवर्क का हिस्सा था। ये नेटवर्क नासिक से शुरु होता था और संगमनर से होता हुआ पुणे तक जाता था।
यादव शासकों ने उत्तर कोंकण के सिल्हारा राजवंश के राजाओं के साथ दोस्ती कर ली थी और इस वजह से वे ठाणे बंदरगाह का इस्तेमाल व्यापार के लिये करते थे। वे यहां से अरबी घोड़ों, रेशम औऱ कपास का निर्यात करते थे।
सिन्नरचे अतिप्राचीन असे गोंदेश्वर मंदिर
सिन्नरचे अतिप्राचीन असे गोंदेश्वर मंदिर
3 weeks ago
सिन्नर
58 Views
प्रतिनिधी : योगेश म्हाळणकर
सिन्नर : लोक म्हणतात की उत्तम शिल्पकला पाहावयाची असेल तर दक्षिणेत जावे असे म्हटले जाते, पण दक्षिणेतील शिल्पकलेची
तुलना करता येईल, असा शिल्पकलेचा नमुना सिन्नरमध्ये हेमाडपंथी गोंदेश्वर
मंदिराच्या रुपाने नांदतो आहे. इ. स. १०२५ च्या सुमारास भिल्लम तिसरा यांचे
राज्य चालुक्यांच्या अधिपत्याखाली होते. सिन्नरची स्थापना यादव किंवा गवळी
राजा शिंगुनी केली. त्याचा मुलगा राव
गोविंदराजा नावाच्या यादवराज पुत्रावरुन या मंदिरास गोंदेश्वर हे नाव
पडले असावे. बाराव्या शतकातील गोंदेश्वर बांधकाम असून हेमाडपंथी स्वरुपाचे
आहे. हेमाडपंथ या नावाचे गृहस्थ देवगिरीचे रामदेव राय यांचे पदरी नोकरीस
होते. या मंदिराची रचना अत्यंत कल्पकतेने केली आहे.
मध्यभागी मोठे शिवमंदिर असून वायव्य दिशेला पार्वती मंदिर, नैऋत्येला गणपती
मंदिर, ईशान्येस सुवर्ण मंदिर व आग्येय दिशेला विष्णू मंदिर असून पूर्व
दिशेला स्वतंत्र असे नंदिचे मंदिर आहे. काळ्या दगडातील मंदिराचे बांधकाम
असून चुना सिमेंट आणि जोड देणारे माध्यम नसून उखळी पद्धतीचे हे बांधकाम
एकास एक दगड जोडून केले आहे. मुख्य देवळाची लांबी २१ मीटर उंची ५० मीटर
आहे. मुख्य मंदिराचे तळ बांधकाम करतांना हत्तीच्या नक्षीची योजना करुन
देवालयाचा संपूर्ण भार हत्तीच्या पाठीवर पेलावला आहे. देवालयाचा मुख्य
भागात आणि त्या प्रत्येक जोडलेल्या दगडावर अप्रतिम कोरीव नक्षीकाम केले
असून आजतागायात ते जशेच्या तसे आहे. गाभान्या समोरील जो सभामंडप आहे. तो तर
अतिशय प्रेक्षणीय आहे संपूर्ण मंडपाचा भार चार खांबावर समातेने ठेवून वरती
निमूळता होत जाणाऱ्या छताकडे बघताना त्या काळच्या स्थापत्य शास्त्रातील
प्रगती पाहून प्रेक्षक हैराण होतात. देवालयाचे ते कळसापर्यंत देव-देवता,
लक्ष्मी, हंसावर बसलेली सरस्वती अशी कितीतरी चित्रे आपले कसब पणाला लावून
निर्माण केले आहे. पिंडी जवळ पाणी बाहेर पाडण्यासाठी गोमुख ऐवजी अप्रतिम
कोरीव काम केले आहे. मंदिराचे सभोवार दगडी बांधकामाचा कोट आहे. सन१९७७
मध्ये मंदिराच्या भोवतालच्या कोटामधील जागेचे उत्खनन झाले. त्यावेळी
देव-देवतांच्या पुरातन मूर्ती सापडल्या. महाशिवरात्री व श्रावण महिन्यात
मंदिरावर रोषणाई केली जाते. सिन्नरकरांचे गोंदेश्वर मंदिर हे एक अभिमानाचे
स्थान आहे.
हजारो दिव्यांनी उजळले पुरातन गोंदेश्वर मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 12:52 AM2021-11-19T00:52:08+5:302021-11-19T00:52:44+5:30

दीपोत्सव.. सिन्नर येथील प्राचीन गोंदेश्वर मंदिरात पणती पौर्णिमेनिमित्त सुमारे १ हजार पणत्या प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. पणत्यांच्या मंद प्रकाशात पुरातन गोंदेश्वर मंदिराची दृष्ये डोळ्याची पारणे फेडणारी ठरली. (छाया : दत्ता जोशी)
ठळक मुद्देदीपोत्सव : डोळ्याची पारणे फेडणारा क्षण
सिन्नर : सिन्नरचा ऐतिहासिक व धार्मिक ठेवा असलेल्या पुरातन गोंदेश्वर मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवाच्या मंद उजेडात गोंदेश्वर मंदिर उजाळून निघाले होते. पणती पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात हजारों पणत्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघालेल्या गोेंदेश्वर मंदिराची दृष्ये डोळ्याची पारणे फेडणारी ठरली.
प्राचीन गोंदेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून गुरुवारी (दि.१८) सायंकाळी सूर्यास्तानंतर गोंदेश्वर सेवा संघ व इतर सेवाभावी संघटनांनी मिळून गोंदेश्वर मंदिरात दीपोत्सव साजरा केला. याआधी काही सेवाभावी संस्थांमार्फत गोंदेश्वर मंदिरात छोटेखानी दीपदानाचा कार्यक्रम करून पणती पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जात होता. तथापि, गेल्या तीन वर्षांपासून गोंदेश्वर सेवा संघाच्यावतीने भव्य अशा दीपोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी श्री गोंदेश्वर महादेव यांची हरिहर स्वरूपात शृंगारपूजा थाटण्यात आली होती. मंदिर परिसरात एक हजारपेक्षा अधिक दीप पेटवून हर्षोल्हासात हा दीपोत्सव साजरा केला. यावेळी गोंदेश्वर सेवा संघ, युवा फाऊंडेशन, रुद्र वाद्य पथक व इतर सेवाभावी संस्थांनी परिश्रम घेतले. पर्यटनाच्या दृष्टीने व परिसराचा विकास व्हावा, या उद्देशाने गोंदेश्वर सेवा संघासह विविध सेवाभावी संस्था उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहेत.
बाहेर पडलो आणि एकदम सुंदर नजारा, एक बाजूला चंद्र उगवत होता आणि दुसऱ्या बाजूला सूर्य मावळत होता..
विचार केला दोन्ही एक फ्रेम मध्ये बसवलं तर किती छान होईल. एक विचार
आला..आपल्या आयुष्यात पण अशाच गोष्टी घडत असतात, काही नव्याने सुरुवात
होतात आणि काही संपत असतात.दोन्ही जर आपल्या आयुष्याच्या फ्रेम मध्ये
घेतल्या, तर जगणं अजून सुंदर होईल..
काही अशाच इतर फ्रेम्स घेऊन निघालो ते परत निवांत येण्यासाठी..
~ योगेश पुराणिक
Gondeshwar temple travel guide tips sinnar » VARAD PRASAD
Gondeshwar temple travel guide tips sinnar
Hello everyone, today we are going to visit Gondeshwar temple. About 1000 to 1500 years ago, the temple is still little known. Between Mumbai to Shirdi road, Gondeshwar Temple is a fine example of ancient Vastu art. In this section we are sharing our road trip experience with you complete information, history, images, current status and how to reach here, some important tips. Which you can use like a travel guide during a family trip. Stay Post, Sinnar, District Nashik, Maharashtra State, India.

नमस्कार मंडळी, आज आपण गोंदेश्वर मंदिराला भेट देणार आहोत. साधारण 1000 te पंधराशे वर्षा पूर्वीचे मंदिर तरीही फारसे माहीत नसलेले. मुंबई ते शिर्डी रोड दरम्यान, पुरातन वास्तु कलेचे उत्तम उदाहरण म्हणजे गोंदेश्वर मंदिर. या भागात येथील संपूर्ण माहिती, इतिहास, सध्याची स्थिती आणी येथे कसे पोहोचायचे, काही महत्व पूर्ण टिप्स आमचा रोड ट्रीप चा अनुभव आपल्या बरोबर शेअर करीत आहे. ज्याचा उपयोग आपणास फॅमिली ट्रीप दरम्यान travel guide सारखा करता येईल. मुक्काम पोस्ट, सिन्नर, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र राज्य, भारत.

Gondeshwar temple travel Guide
History and information of Gondeshwar temple

The Gondeshwar temple is generally believed to have been built 1000 years ago. Earlier we have seen the same artwork Karaneshwar temple at Sangameshwar both the temple architecture and craftsmanship are similar. Therefore, it is considered to be a temple of Yadav period i.e. a temple of Pandava period. A little more study shows that the design and construction of this object is of the Yadava period. Yadav means the community of Shri Krishna. Over time, this society ruled the entire Indian world. Many temples have been built during this period to preserve the religious and spiritual heritage.

गोंदेश्वर मंदिर हे सर्वसाधारण पणे 1000 वर्षांपूर्वी बांधले गेले असावेत. यापूर्वी आम्ही समान कलाकृती असलेले संगमेश्वर येथील करणेश्वर मंदिर दोन्ही मंदिराची वास्तु रचना आणी कलाकुसर ही समान आहे. त्यामुळे हे यादव कालीन मंदिर म्हणजेच पांडव कालीन मंदिर मंदिर असल्याचे समजते. अजून थोडा अभ्यास केल्यावर या यादव कालीन वस्तूची रचना आणी उभारणी असल्याचे दिसून येते. यादव म्हणजे श्री कृष्ण यांचा गवळी समाज. कालांतरानं या समाजाने अखंड भारत विश्वावर राज्य केले. धार्मिक आणी आध्यात्मिकतेचा वारसा जतन करण्यासाठी याकाळात अनेक मंदिरे बांधली गेली आहेत.

There is a panchayat style temple. Panchayat means a group of five temples where the main temple is of Shri Shiva Shankar, the other four surrounding temples are Jagdamba i.e. Parvati, Shri Vishweshwar i.e. Shri Vishnu, Shri Vinayak i.e. Ganapati, and Surya Narayan i.e. Sun who is the best of all planets. These temples are established at the four corners of the main temple. Due to the fine craftsmanship on the entire black stone and the equally strong construction, this temple stands still today i.e. even after more than 1000 years.

एक पंचायतन पद्धतीचे मंदिर आहे. पंचायतन म्हणजे पाच मंदिरांचा समूह जेथे मुख्य मंदिर हे श्री शिव शंकराचे असून, सभोवतालची इतर चार मंदिरे ही जगदंबा म्हणजेच पार्वती, श्री विश्वेश्वर म्हणजे श्री विष्णु, श्री विनायक म्हणजे गणपती, आणी ग्रहां मध्ये सर्व श्रेष्ठ असे सूर्य नारायण म्हणजेच सूर्य असे आहे. ही मंदिरे मुख्य मंदिराच्या चार कोपर्यावर स्थापित आहेत. संपूर्ण पणे काळ्या दगडावर बारीक कलाकुसर आणी तेव्हढीच भक्कम उभारणी यामुळे हे मंदिर आजही म्हणजेच तब्बल 1000 हून अधिक वर्षानंतरही दिमाखात उभे आहे.
Personal experience and current status of Gondeshwar temple

We visited Gondeshwar during our Mumbai Nashik Sinnar road trip. To reach here you have to take Mumbai Agra Highway to Kasara Ghat, Igatpuri to Ghoti. From there turn to the right side and on the way to Shirdi is Sinnar village. Gondeshwar temple is located just 500 meters from the city.

आम्ही आमच्या नाशिक सिन्नर रोड ट्रिप दरम्यान गोंदेश्वर येथे भेट दिली होती. येथे जाण्यासाठी आपणास मुंबई आग्रा महामार्ग मार्गे कसारा घाट इगतपुरी मार्गे घोटी पर्यंत जावे लागेल. तेथून उजव्या बाजूस वळून शिर्डी येथे जाण्याचा मार्गावर सिन्नर हे गाव आहे. येथे शहरापासून अगदी 500 मीटर अंतरावर गोंदेश्वर मंदिर आहे.
The outside of the temple is like an ordinary village. The road leading to the temple from the main town is a bit narrow. After parking the car in the parking space outside the temple, we entered the temple. At first we saw a strong rampart, in the center of which was the main entrance. We reached the premises of the temple. And in front Gondeshwar temple which is a fine example of Vastu art came into view.

मंदिर बाहेरील भाग हा साधारण गावा प्रमाणे आहे. मुख्य शहरातून मंदिराजवळ जाण्यासाठी असलेला रोड हा थोडा अरुंद आहे. मंदिराच्या बाहेर असलेल्या पार्किंग स्पेस मध्ये गाडी पार्क करुन आम्ही मंदिरात प्रवेश केला. सुरुवातीस आम्हाला भक्कम अशी तटबंदी दिसली, जिच्या मध्य भागी मुख्य प्रवेशद्वार होते. Je पत्करून आम्ही मंदिराच्या आवारात पोहोचलो. आणी समोर वास्तु कलेचे उत्तम उदाहरण असलेले गोंदेश्वर मंदिर दृष्टीस पडले.
Architecture of Gondeshwar temple and current situation

The temple is surrounded by a fine stone wall and the main structure of the Gondeshwar temple is erected on a grand square about four feet high in the middle. Built entirely of black stone, this temple is standing in Dimakh, but the condition of the surrounding panchayat temples is pathetic. Amazing carvings and craftsmanship can be seen all over the temple. There are some more steps to reach the main temple. A pillar has been erected in the middle of the door to support the weight of this grand door and the structure of temple.

मंदिरास सभोवताली उत्तम दगडी तटबंदी आहे आणी मध्यभागी एका साधारण चार फुट उंचीच्या भव्य चौथर्यावर गोंदेश्वर मंदिराची मुख्य वास्तू उभारली गेली आहे. संपूर्ण काळ्या दगडात बनवलेली हे मंदिर दिमाखात उभे आहे मात्रं सभोवतालच्या पंचायतन मंदिरांची अवस्था दयनीय आहे. संपूर्ण मंदिरावर अप्रतिम नक्षी काम आणी कलाकुसर दिसून येते. येथे रामायण महाभारतातील, दृश्य कैक अप्सरा असलेला स्वर्ग, भैरवनाथ अश्या असंख्य मुर्ती कोरलेली आहेत. मंदिरात जाण्यासाठी अजून काही पायर्या आहेत. हे भव्य दरवाजा आणी त्यावर असलेला कळसाचा डोलारा याचे वजन झेलण्यासाठी येथे दरवाज्याच्या मध्यभागी एक खांब उभारण्यात आला आहे.

As soon as you enter through the door, you will see a beautiful setting. The magnificent Pindi of Shiva Shankar here is very impressive. Seeing the floral decorations around the Shiva Pindi here, one realizes that the overall cleanliness and maintenance of the temple is well done. When he came out with darshan, he saw the foundation and culmination of the temple together at one place. After seeing that we started our return journey. As the Sinnar to Ghoti route is a bit dangerous to travel at night, we decided to reach Igatpuri directly without stopping anywhere in between. And at night we had dinner at a dhaba in Kasara and reached Mumbai at midnight.

दरवाज्यातून आत गेल्यावर सुंदर असा गाभारा दृष्टीस येतो. येथे असलेली शिव शंकराची भव्य पिंडी फारच मनमोहक आहे. ती येथील शिव पिंडीच्या भोवती असलेल्या फुलांच्या सजावटीला पाहून एकंदर मंदिराची साफसफाई आणी देखरेख उत्तम प्रकारे केली जात आहे याची जाणीव झाली. दर्शन घेऊन बाहेर आल्यावर एका जागी मंदिराचा पायथा आणी कळस यांचे एकत्रीत दर्शन झाले. ते पाहून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो. सिन्नर ते घोटी हा मार्ग रात्री प्रवास करण्यासाठी थोडा धोकादायक असल्याने आम्ही मध्ये कोठे ही न थांबता थेट इगतपुरी गाठण्याचे ठरवले. आणी रात्री कसारा येथील धाब्यावर रात्रीचे जेवण करून मध्यरात्री मुंबईत पोहोचलो.
Tips and Things to do at Gondeshwar temple sinnar
- You can visit Gondeshwar temple on the way to Shirdi as well as Bhandardhara.
- Parking is available near temple.
- Do not touch any of stones of panchayatan Temple. It’s might be risky.
- Don’t kept important or valuable items in car while parking.
- It’s a beutiful place no restrictions for photography.
- Best place for priveding photo shoot but you have to take prior Permission for same.
- Visite during day light or early morning.
- Food courts :- all types of food facilities available at Sinnar Speshality is Rassa Pohe and Missal.
- Accommodation near Gondeshwar temple = you can get affordable accommodation at Sinnar city, You can also stay near Nashik or Shirdi for 30 to 50 km from Sinnar
- Gondeshwar temple time – No restrictions.
- Best time to visit is winter and Mahashivratri
How to reach Gondeshwar temple Sinnar travel guide
- Gondeshwar temple is just 30 Km away from Nashik city so you will get multiple transportation options from Nashik.
- Nearest railway station is Nashik = 24 Km
- Nearest airport is Ozar = 44 Km
- Distence by road from nearby cities
- Mumbai to Gondeshwar temple Nashik Distence = 185 Km
- Dule = 335 Km
- Pune = 183 Km
- Aurangabad = 153 Km
- Nashik = 30 Km
- Indore = 427 Km
- Surat = 261 Km
- Ahmedabad = 514 Km
Places to visit Near Gondeshwar temple
- Igatpuri
- Randha waterfall
- Dabhosa waterfall
- Trimbakeshwar
- Tansa lake
- Nashik Flower Park
- Bhavali waterfall and Dam
- Myanmar Gate – Vipassana meditation center.
- Someshwar waterfall nashik
- Gurupeet Shree Swami Samarth
- Gargoti the meaniral exhibition
Published by PRASAD NAMDEV
My name is Prasad Namdev, wanderlust is inherent into me by my parents, way too passionate for riding my bike. Wish to share beautiful moments from travelling experience, come join my journey… View all posts by PRASAD NAMDEV
सिन्नरचे शिल्पवैभव : गोंदेश्वर , ऐश्वर्येश्वर
अरे हा कुठला फोटो आहे? काय भारी लोकेशन आहे, स्वर्गमंडप म्हणतात तो हाच का रे? खिद्रापूर आहे का हे? इतके मोठे देऊळ साऊथ मधले आहे का काय? शंतनू आणि अनुराग यांच्या फोटोंवर अशी प्रश्नांची सरबत्ती झाली होती सुमारे वर्षभरापूर्वी. बरोबर तोच प्रसंग आज माझ्याबरोबर घडत होता. उत्साहाने स्टेटस वर फोटो अपलोड केले होते आणि फोटो अपलोड केल्यापासून साधारण १ तासात सुमारे १०० लोकांना या मंदिरांचे नाव आणि जागा सांगत रिप्लाय करत होते.
.पुण्याहून सुमारे 190 Km वर सिन्नर मधील गोंदेश्वर मंदिर भेटीची ही किमया. पूर्वापार तीर्थ क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेले नाशिक /नासिक आणि त्याच्या जवळच असलेला हा सिन्नरचा संपन्न परिसर

फिरस्ती महाराष्ट्राची या ग्रुप बरोबर आधीच्या अनेक ट्रिप्स चा अनुभव गाठीशी असल्यामुळे या ट्रिपचा चान्स तर मी सोडणारच नव्हते. आधीची ट्रीपची तारीख माझ्या सोयीची नव्हती पण नशिबाने त्यांची ट्रिप पुढे ढकलली गेली आणि या मंदिराला भेट देण्याचा योग जुळून आला.
भल्या पहाटे ५ ला आम्ही निघालो होतो तरी कोणीही डुलक्या काढण्याच्या मूड मध्ये नव्हते त्यामुळे सुरवातीपासूनच गप्पांचा फड जमायला लागला. अगदी चेडोबा मंदिर, रिचर्ड बर्टनचे पुस्तक तसेच भौगोलिक वर्णने ज्यात नाशिकचे वर्णन प्रामुख्याने येते अशा ‘विविध तीर्थ कल्प’ या ग्रंथाची चर्चा रंगू लागली. मध्ये थोडी विश्रांती घेऊन, श्री गुरु या हॉटेलमध्ये चविष्ट नाश्ता करून आमची गाडी परत सिन्नरच्या दिशेने धावू लागली.
आमचा प्रवासाचा पहिला टप्पा होता ऐश्वर्येश्वर! तिथे पोचल्यावर पटापट सगळ्यांचे कॅमेरे आणि मोबाईल्स बाहेर निघाले. विविध अँगल्स टिपण्यात सगळे मश्गुल झाले. मंदिराच्या मागच्या बाजूची शिल्पे गर्दी नसताना टिपावीत या हेतूने मी आधी तिकडे धाव घेतली पण ती व्यर्थ ठरली कारण तिथे Pre – Wed शूट साठी टीम जमली होती त्यामुळे नवरा , नवरी आणि कॅमेरामन यांना त्रास न देता अस्मादिक परत मंदिराच्या पुढील भागात परत आले.
ऐश्वर्येश्वर हे मंदिर ऐरम राजाने बांधलेले आहे. सरस्वती नदीच्या काठी बांधलेले हे मंदिर साधारण १० व्या शतकात बांधल्याचे उल्लेख मिळतात. यादव काळातील पहिली राजधानी हा मान सिन्नर ला मिळतो.
सभामंडप, अंतराळ आणि गर्भ गृह पाहता येते. या मंदिराची रचना द्राविड शैलीत आहे. या मंदिरातील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मकर तोरण. सामान्यतः अंतराळाच्या प्रवेशाचे वरच्या बाजूस हे मकर तोरण आढळते.

या तोरणात व्याल, कीर्तिमुख,यक्ष, अप्सरा आणि मयूर असे थर दिसून येतात. दोन मगरीच्या तोंडांतून निघालेली ही वैशिष्टयपूर्ण शिल्पे आणि मधोमध नृत्यरत शिव. आत वितानावर अष्ट दिक्पाल कोरलेले आढळतात. या देवळात सप्तमातृकापट, भैरव,गणपती यांच्या बरोबर ललाट बिंबावर गजलक्ष्मी दिसून येते.
चक्रधर स्वामी यांच्या स्थानपोथी मध्ये ऐश्वर्येश्वर या देवळाचे उल्लेख येतात ही माहिती पण ग्रुप लीडर अनुरागने पुरविली.
देवळात एक माणूस शांत चित्ताने शिवपिंडीला अभिषेक घालत होता. बाहेरचा कोलाहल, गटागटाने येणारी, मोबाईल, कॅमेरे हातात घेऊन आसपास भिरभिरणारी माणसे, मंदिर परिसरातच चाललेले Pre – Wed शूट याचा काहीही परिणाम न होता शांत एकाग्र चित्ताने तो तन्मय झाला होता.

त्यानंतर आमचा मोर्चा वळला ते मुख्य मंदिराकडे म्हणजे गोंदेश्वरकडे. अवघ्या १० मिनिटात आम्ही तिथे पोचलो. दगडी तटबंदीयुक्त देवळात मुख्य दरवाजातून प्रवेश केला. भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. आत प्रवेश करतानाच भव्य परिसरात वसलेले पंचायतन (मध्यभागी मुख्य मंदिर व चार बाजूला उपमंदिरे) दिसून आले. गोंदेश्वर हे शैव पंचायतन आहे. मध्यभागी शिव आणि बाकीच्या चार कोपऱ्यात गणपती, सूर्य, देवी व विष्णू यांची मंदिरे आहेत. A.S.I. ने ह्या मंदिराची वेळोवेळी डागडुजी करून मंदिराचे सौंदर्य अबाधित राखले आहे.

पूर्व आणि दक्षिण दिशांना दरवाजे असून सध्याच्या वापरासाठी दक्षिण दरवाजा खुला आहे. आत शिरताच डाव्या हाताला एक खोलीवजा जागा आहे. पूर्वीच्याकाळी भांडार गृह, स्वयंपाकाची खोली असा त्याचा वापर होत असावा.
आत शिरताच मी, शिवराज आणि सविता मॅडम ने एका अमेझिंग फोटो स्पॉट च्या दिशेने धाव घेतली तो स्पॉट म्हणजे गोंदेश्वर च्या मंदिरातील, मुख्य मंदिरासमोर असलेली धर्मशाळा किंवा मठ. यातील वरचा भाग पडून गोलाकार भाग उघडा झाला आहे त्यामुळे तिथे खिद्रापूरच्या स्वर्गमंडपासारखी जागा निर्माण झाली आहे. बाकी टीम इकडे तिकडे फिरण्यात व्यस्त आहे हे बघून आम्ही निवांतपणे एकमेकांचे मस्त फोटो काढले. बाकीच्या टीम ला हा स्पॉट न सांगण्याचा एक कुचका प्लॅन पण आमच्यात शिजला पण टीम मध्ये आधीच रथी महारथी होते आणि बाकीचे स्मार्ट लोकं इन्टरनेट वरून सगळी माहिती घेऊन आले होते त्यामुळे लवकरच तिथे गर्दी जमली व आम्हालाच काढता पाय घ्यावा लागला.

गोंदेश्वर मंदिराच्या एका देवळाच्या सावलीत आम्ही कोंडाळे करून बसलो. ग्रुप लीडर शंतनूने मंदिर कल्पना कशी अस्तित्वात आली हे सुंदररित्या समजावले. मला देगलूरकर सरांच्या ‘मंदिर कसे पाहावे’ या पुस्तकाची आठवण आली. त्यात परिपूर्ण मंदिर वास्तू म्हणजे काय? मूर्तीसंबंधीच्या कल्पना, मंदिरे, त्यावरील शिल्पकृती यांच्या निर्मितीमागील उद्दिष्टे, तसेच त्यातील कलात्मकता आणि तात्विकता अतिशय उत्तम पद्धतीने उलगडून दाखवली आहे.
गोविंद नावाच्या व्यापाऱ्याने हे मंदिर बांधल्याचा संदर्भ शंतनूने दिला. देवळाला साधारण पुरुषभर उंचीचे अधिष्ठान आहे, त्यावर मंडोवर, शिखर व कलश अशी रचना आहे. शंतनू ने जवळच गोंदे गाव असल्याचाही उल्लेख केला. या देवळाचे भूमिज शिखर साप्तभौम पद्धतीचे आहे. पूर्ण मंदिर भूमिज वेसर पद्धतीत बांधलेले आहे. मंदिराच्या पूर्वदिशेला नंदीमंडप आहे, तोही अनेक पौराणिक शिल्पे, फुले पाने वेलबुट्टी याने सुशोभित आहे. सभामंडपात रंगशिळा आहे त्यापुढे अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना आहे. या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मकरमुख. मकर हे गंगेचे वाहन असल्यामुळे इथे अभिषेकाचे पाणी बाहेर जाण्यासाठी मकरमुखाची रचना आहे.

मंदिराला सर्वात खाली गज थर आहेत पण त्याच्या सोंडा कापून टाकलेल्या आहेत.

या बाबत एक आख्यायिका सांगितली जाते की चोराला या हत्तीपैकी एका हत्तीच्या सोंडेत हिरा सापडला आणि त्यांनी लालसेपोटी बाकीच्या हत्तीच्या सोंडा कापून टाकल्या. या गजथरावर यादव कालीन देवळांचे वैशिष्ट्य असलेली पानाफुलांची नेहमीची वेलबुट्टी आढळते.
आमच्या ट्रिप मध्ये नाशिकहुन महेश शिरसाठ हे इतिहास अभ्यासक एक छोटा ग्रुप घेऊन आम्हाला जॉईन झाले. त्यांची इतिहासाची, मूर्तिशास्त्राची आवड आणि अंगी असलेली नम्रता प्रकर्षाने जाणवली. त्यांनीही अनेक शिल्पे आम्हाला उलगडून दाखवली.
मंदिराच्या बाहेरील बाजूस असलेल्या अनेक अप्रतिम नर्तकी, सुरसुंदऱ्या, दर्पण सुंदरी, हातात कलश घेतलेली जया,डालंबिका,आलसा तसेच रामायणाचे शिल्पपट, देवी देवता यांच्या मूर्ती, मैथुन शिल्प, आजूबाजूच्या समाजव्यवस्थेचे चित्रण करणारी शिल्पे, वामन अवतार, वराह अवतार तसेच अनेक पौराणिक प्रसंग दिसून येतात. या कमनीय बांध्याच्या सुरसुंदरी नर्तिका पाहताना मनात कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या कवितेच्या काही ओळी मनात रुंजी घालत होत्या
‘केशी तुझिया फुले उगवतील तुला कशाला वेणी?
चांदण्यास शृंगार कशाला बसशील तेथे लेणी ‘

मंदिरातील आतील खांबसुद्धा अनेक शिल्पांनी सुशोभित आहेत. कुठे नरसिंह अवतार तर कुठे वामन अवतार, कुठे मैथुन शिल्पे तर कुठे आई, बाळाला झोळीत झोका देता देता ताक घुसळत घरगुती कामे करतीय अशी शिल्पे. सर्व भिंती, छत, प्रत्येक स्तंभ कोरीवकामाने नखशिखांत लगडलेले दिसतात. मंदिराची द्वारशाखा, स्तंभ शाखा, वेलबुट्टी शाखा अशा विविध शाखांनी नटलेली आहे.

या मंदिराच्या रचनेत चुना किंवा मातीचा वापर न करता एकावर एक दगड रचून इंटरलॉकिंग पद्धतीने याची रचना केलेली आहे. इथे सूर्यमंदिर असल्याने रथसप्तमी ला इथे उत्सव असतो तसेच अनेक जण त्या उत्सवात सूर्यनमस्कार घालतात.
चहा नाश्त्याचे सेंटर चालवणारे भरत शिंदे आमच्यासाठी अतिशय उत्तम जेवण घेऊन आले होते, मटकी उसळ, पिठले, पोळ्या, बटाटा भाजी, भात, डाळ, पापड आणि जोडीला झणझणीत मिरचीचा ठेचा असा मस्त बेत रंगला. मंदिर परिसरात सावलीत आमचे अतिशय उत्तम भोजन झाले. भरत शिंदे हे रोजच्या नफ्यातील पहिली जी काय मिळकत असेल ती समाजोपयोगी कामासाठी देतात हे ऐकून खूपच आनंद वाटला.

आमच्या गटातील मंजुघोषा पवार या पंढरपूरच्या. तिथे त्या एक उपहारगृह चालवतात. आषाढ शुद्ध द्वादशीला सर्व भक्त गणांसाठी, वारकऱ्यांसाठी आणि पांथस्थांसाठी त्या पहाटे पासून ते रात्रीपर्यंत पुलावाचे / खिचडीचे वाटप पूर्णपणे मोफत, विठूरायाची एक सेवा या भावनेतून करतात.
एक छोटीशी ट्रिप सुद्धा किती नवनवीन अनुभवांची, विचारांची शिदोरी देऊन जाते ना?

खरे सांगायचे तर अशा शिल्पांच्या दुनियेत प्रवेश केल्यावर माझी अवस्था थोडीशी भांबावल्यासारखीच होते. काय काय पाहू, समजून घेऊ, कॅमेऱ्यात बंदिस्त करू ….. दुबळी माझी झोळी अशी काहीशी अवस्था. त्यामुळे एकाभेटीत संपणारा हा विषय नक्कीच नाही. परत परत या ठिकाणी येऊन अजून काही शिल्पकलेचे बारकावे बघायचे आहेत.

परतीचा प्रवास काहीसा कंटाळवाणा झाला. बरीचशी मंडळी आता दिवसभरामुळे दमून गेली होती पण मी मात्र टक्क जागी आणि इतर काही अजून वाटेत बघता येईल का ही चाचपणी करत होते. डुबेर इथला बर्वे वाडा (बाजीराव पेशवे यांचे जन्म स्थळ), मुक्तेश्वर, टाहाकारीचे भवानी मातेचे मंदिर , गारगोटी म्युझियम अशी बरीच मोठी लिस्ट पुढच्या ट्रिप साठी मनात तयार होत होती.
चाकण जवळ आल्यावर मंडळी हळू हळू जागी होऊ लागली, स्वप्नाली, स्वानंदच्या कोकणच्या गप्पा सुरु झाल्या. स्वप्नालीच्या काकूंना वाटेत एका ठिकाणाहून चहा ची पावडर घ्यायची होती. आम्हा सगळ्यांना आता चहाला घरी बोलावलेच पाहिजे असे आम्ही चिडवले, त्यांनीही ते अगदी मजेत घेत होकारही दिला.असा आमचा परतीचा उरलेला प्रवास छान खेळीमेळीत पार पडला.
गोंदेश्वरचे शैव पंचायतन म्हणजे स्थापत्यकलेचा आणि शिल्पकलेचा एक अत्युत्तम नमुना. फिरस्ती बरोबरची ऐश्वर्येश्वर आणि गोंदेश्वर ही ट्रिप नेहमीप्रमाणेच खूप आनंद देऊन गेली, अजून नवीन गोष्टी शिकण्याचा, पाहण्याचा, वाचण्याचा उत्साह देऊन गेली.
मूळ लेखक
श्री अमोल बनकर यांनी खूप व्यासंगानंतर लिहिलेली माहिती
History of Region:
Govindeshvar or Gondeshvar temple is situated about 26 Kilometres from Nasik .The earliest historical mention of Sinnar appears to be Sindiner in a copper-plate grant of 1069 A. D. Sinnar was known as Sindinagar or Seunpura and was ruled by Bhillama III of the Yadava family . In 1025 AD the Mahasamanta Bhillama III was ruling his hereditary province of Seundesa as feudatory of the Western Chalukya King Jayasimha II .Tradition ascribes the founding of the town to a Gavali ( Yadava) chief by name Rav Shinguni, perhaps Seunendu of the copper-plate about 800 years ago. His son Rav Govinda is supposed to have built the great temple of Govindeshvar or Gondeshvar at a cost of 2 lakh of the currency of that period . It may have been named after Govindaraja a Yadava Prince of the 12 th century .Yet another tradition assigns the building to Govindaraja, a Yadava king who ruled about the beginning of the twelfth century A. D. Be it as it may, it is still the largest, most complete and the best preserved example of mediaeval temples of the Deccan built on a variation of the Indo-Aryan style, which had penetrated into a part of the Deccan during the middle ages.
Gondeshvar Temple:
Gondeshvar or Govindeshvar temple of the numerous
shrines in Sinnar, the ones sacred to Gondeshvar and Aieshvar are the
most significant as also antique. To the north-east outside the town
stands the splendid black-stone temple of Gondeshvar weathered by the
wind and sun of centuries. It is still the largest, most complete and
the best preserved example of mediaeval temples of the Deccan built on a
variation of the Indo-Aryan style, which had penetrated into a part of
the Deccan during the middle ages. It is a Shaiva Panchayatan, or a
group of five temples, within a large enclosure, the central shrine
being dedicated to Shiva, and the remaining four around it to Parvati,
Ganapati, Surya and Vishnu.
The central shrine con�sists of the sabhamandap or the assembly hall and
the gabhara or the towered cell enshrining the Shiva linga. It is
beautifully proportioned and entered by three imposing and pillared
porticos. The design of the shikhars or the towers and the pillars are
original and unlike those of any other region. The temples of the Deccan
are different from other northern or Indo-Aryan temples, in that the
shikhar does not have turrets or urushringas grouped around the lower
part of the structure. Instead the shikhara has a distinct vertical band
rising upwards along each of its angles and taking the form of a spine
or quoin. The space between the quoins is filled with smaller
reproduc�tions of the shikhara. The pillared hall itself, though small,
is elegant and is one of the finest in this part of the country. Facing
the main or the eastern entrance is a Nandi pavilion housing a
stone-bull, Shiva�s vehicle. An unusual feature of the Gondeshvar
temple, and one peculiar to this part of the Deccan, is the deep
projections and the recesses on the wall surfaces. Rising upwards these
catch the light or fall in deep shade and to counterpart this upward
trend a series of horizontal mouldings have been laid across the entire
composition.
Many of these mouldings have a knife-edge section called koni. Koni�-mouldings are found not only on the walls but are particularly notice�able on the pillars. On its walls are sculptured scenes from the Ramayana, gods and goddesses, apsaras and myriad other figures, male and female, from the Hindu mythology. Many of the missing panels, how�ever, appear to have been deliberately removed by curio-hunters. The sculptures, though well executed, do not stand comparison with the best of Indian carving and authoritative references tell us that it shows a decline in style at this date. The real beauty of Gondeshvar temple lies in its symmetrical disposition on a moulded and stepped platform only 125' X 95'. Lying around are the crumbling remains of the temple walls and the entrance gate. It is still frequented by worshippers.
गोंदेश्वराच्या शिवपंचायतनात
सिन्नरचं आयेश्वर मंदिर पाहण्याच्या आधीच जवळपास दोनेक तास गोंदेश्वर मंदिरात थांबलो होतो. माध्यान्ह संपून नुकतीच कुठे मावळतीला सुरुवात होत होती. भर एप्रिलचाच काळ असल्याने उन्ह मात्र अगदी रणरणत होतं. सिन्नर हा दुष्काळी भाग, सगळं कसं रखरखीत, कोरडं, रुक्ष. उन्ह अक्षरशः भाजून काढत होतं. मात्र त्या उन्हातही मंदिर सोन्यासारखं झळकत होतं.
गोंदेश्वराचं आवार विस्तीर्ण. भलं प्रशस्त. तटबंदीयुक्त. तटबंदीतच यात्रेकरुंसाठी देवड्या बांधलेल्या. तटबंदीच्या आत पटांगण, इतकं मोठं की क्रिकेटची मॅच सहज खेळता यावी. पटांगण मोकळं ठेवूनही मध्यभागी भलं थोरलं अधिष्ठान. त्या चौथर्याच्याही मध्यभागी एक प्रचंड मंदिर. इतकं उंच भूमिज मंदिर महाराष्ट्रात दुसरं नसावं. भूमी म्हणजे मजला. मंदिराचा शिखरभाग मुख्य शिखराच्या लहान लहान प्रतीकृतींनी जोडत जोडत जाऊन थेट कळसास पोहोचलेला. त्या शिखरप्रतीकृतींच्या मधूनच जाणारी सरळसोट जीवा. हीच ती भूमिज शैली. मुख्य मंदिराच्या चारही बाजूंना चार लहान आयतनं. मुख्य मंदिर भूमिज पण त्याच्या बाजूची उप आयतनं मात्र नागर शैलीतली, मधूनच एखादं वेस्सर शिखर. ह्या विभिन्न शैलींमुळे मुख्य आयतनाला येथे कमालीचा उठाव मिळालाय. मुख्य मंदिर शिवाचे त्यामुळे हे शिवपंचायतन.
मंदिराच्या पटांगणातच उभा राहून मी हे सर्व पाहात होतो. अप्रतिम, सुपर्ब, मार्व्हलस अशी विशेषणं फिकी पडावीत असंच ह्याचं प्रथमदर्शन. मंदिराचे हे प्रवेशद्वार मात्र आडबाजूचे. मंदिरात येणारा मुख्य रस्ता ह्याच मार्गाने आल्यामुळे, मूळचे मुख्य प्रवेशद्वार मात्र पूर्वाभिमुख, नदीच्या बाजूने. पाण्याच्या स्त्रोताच्या बाजूनेच मुख्य द्वार हवे किंवा त्याबाजूने एकतरी द्वार हवे हा नियम येथेही पाळला गेल्याचे दिसतो.
मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे ते पूर्व बाजूनं. येथेही एक आश्चर्य दडलेले आहे. खिद्रापूरच्याच स्वर्गमंडपाची लहानशी पुनरावृत्ती ह्या प्रवेशद्वाराच्या छतावर केलेली आढळते. खिद्रापूरचा स्वर्गमंडप हा तर अतिशय सुंदर आणि तो सभामंडपाच्या अगोदर, त्याला अगदी लागूनच. त्यामानाने गोंदेश्वरचा स्वर्गमंडप हा प्रवेशद्वारावर, मंदिरापासून थोडासा लांबच. पण ह्याचेही सौदर्य अजिबात उणावत नाही. आकाशाची निळाई काय खुलून दिसते येथून. भन्नाट
स्वर्गमंडपाच्या पुढ्यात खोलवर गेलेली नदी व तिचे आटलेलं, शेवाळलेलं पात्र. मागे फिरलो. मुख्य मंदिराच्या पुढ्यातच नंदीमंडप आहे. शिल्पकामाने कोरुन काढलाय. हा नंदीमंडप खुलामंडप ह्या प्रकारात मोडतो. नंदीमंडपाच्या भिंतीवर रामायणातील विविध प्रसंग, सुरसुंदरी , वादक, मैथुनशिल्पं आदी कोरलेले आहेत. मूर्तींची अगदी सहजच संगती लागत असते. पहिल्यांदाच इथे येऊनही, मूर्ती अगदी झिजलेल्या असूनही अगदी सहज ओळखल्या जातात, जणू ह्यांचे आपले जन्माजन्मांतरीचे नाते आहे.
मला आठवतंय, लोणी भापकरला असाच एक नंदीमंडप आहे. तिथल्या मंडपात सध्या नंदी नाही मात्र बाह्य भिंतीवरील शिल्पेही अगदी अशीच.
नंदीमंडपाच्या भिंतीवरील मैथुनशिल्पे
हे रामायणातील काही प्रसंग
ह्या सुरसुंदरी, त्यात कुणी पुत्रवल्लभा, कुणी दर्पणा, कुणी मर्कटलीलांनी त्रस्त झालेली अभिसारिका
तर मध्येच विष्णूचे अवतार, वराह, नरसिंह
इतकी सारी शिल्पं बघत बघतच नंदीमंडपाला फेरी मारत निघावी आणि मुख्य आयतनात यावं. द्वाराच्या शेजारीच एक भयप्रद व्याल आपलं स्वागत करतो. इतके मोठे व्याल इकडील मंदिरांत तसे दुर्मिळच. दक्षिणेत मात्र अगदी विपुल.
प्रवेशद्वाराची चौकट येथेही व्यालांनी, वादकांनी, प्रतिहारींनी, द्वारपालांनी सजलेली आहे. प्रवेशद्वार हे मुखमंडपात आहे. मुखमंडपाचं छतही कमळासारख्या फुलांच्या आकृतीने नक्षीदार कोरलेले आहे.
गोंदेश्वराचा सभामंडप अंधारी, इथे छायाचित्रं काढणं तसं जिकिरीचं काम. इथला सभामंडपही भरजरी स्तंभांवर तोललेल्या आहे. स्तंभांवर असंख्य शिल्पं आहेत.
ही पुत्रवल्लभा, आपल्या लहानग्या बाळाला हातांवर तोलत ही त्याचे कौतुक करीत आहे.
ही दर्पणा, सतत आरशातच बघत असते :)
ही आपल्या सेवकाच्या पाठीवर पाय ठेवून स्वतःची केशरचना करीत आहे
हे बहुधा शिवाचे तांडवनृत्य. नंदी आणि भृंगी शेजारी असावेत.
हे मैथुनशिल्प. असा उघडा शृंगार चाललेला पाहून एका सेविकेने चक्क पाठ फिरवलीय तर दुसर्या सेविकेने लाजून आपले डोळेच झाकून घेतलेले आहेत. :)
मध्येच काही ठिकाणी द्वंद्व कोरलेले आहे
तर इथे एक मर्कट शिंकाळ्यातले दही चोरते आहे.
एका स्तंभावर उग्र नरसिंह हिरण्यकश्यपूला अंकावर घेऊन आपल्या नख्यांनी त्याचे पोट फाडतोय तर प्रल्हाद भक्तीभावाने प्रार्थना करतोय, गरुडही वरच्या बाजूस हात जोडून नम्रतेने उभा आहे.
नंतर बळीराजा (हा प्रल्हादाचा नातूच. वैरोचनी) हा वामनाला तीन पावले जमिनीचे दान हातांवर पाणी सोडून देतोय. दान देताच वामन त्रिविक्रमरुप प्रकट करुन पृथ्वी आणि आकाश व्यापून तिसरे पाऊल बळीच्या डोक्यावर ठेवण्यासाठी सज्ज झालाय.
ही अजून एक पुत्रवल्लभा
मग विषकन्या दिसतेय. तिच्या एका हाती सर्प तर दुसर्या हाती मुंगूस असून ती दोघांनाही भिडवतेय. जणू तुम्हा दोघांवरही माझेच वर्चस्व आहे असेच ती जाणवून देतेय.
अशी एक ना एक असंख्य शिल्पे आहे सभामंडपात. गर्भगृहाच्या दारावर देखील नेहमीप्रमाणेच दासी, प्रतिहारी, शैव द्वारपाल आहेत. आतले शिवलिंग मात्र साधेसे.
आता मंदिराला फेरी मारण्यास निघालो. मंदिराच्या अधिष्ठानावर गजथर, त्यावरील जंघेवर नरथर आणि त्यावर देवकोष्ठ आहेत. सुरसुंदरी इथे मोठ्या संख्येने दिसत नाहीत तरीही त्या मंदिरांच्या भिंतींवर काही प्रमाणात आहेत. अर्धमंडपांच्या बाहेर रामायणातील बरेच प्रसंग कोरलेले आहेत. देवकोष्ठात आज मूर्ती अभावानेच दिसतात, किंबहुना त्या नाहीतच. मी अशी देवकोष्ठं रिकामी असलेली बरीच मंदिरे पाहिलेली आहेत. मूर्तीभंजकांमुळे भग्न झालेली असावीत किंवा कसे, पण आज ती बर्याच ठिकाणी नाहीत. कित्येकदा ती मंदिरांच्या आवारातच इतस्ततः भग्नावस्थेत विखुरलेली दिसतात.
इथली भिंतीवरील रामायणपटांत विविध प्रसंग कोरलेले आहेत.
ही रावणानुग्रहशिवमूर्ती. वेरूळच्या कैलास लेण्यांत ह्याचं अतिभव्य असं स्वरुप आहे. अक्षरशः डोळे दिपवणारं. येथे मात्र हाच प्रसंग मिनिएचर रुपात मांडला गेलाय.
मारुती इथे अशोकवनाचा विध्वंस करताना दिसतो तर त्याच्याच पुढच्या पटात तो रावणकुमार अक्षाचा वध करताना दिसतो.
-
कधी रावणाचा दरबार दिसतो तर कधी राक्षसींनी वेढलेली सीता दिसते.
मधूनच सेतूबंधनाचा देखावा दिसतो तर रावणाच्या दरबारात चाललेली वानरशिष्टाई
अजूनही कित्येक शिल्पं येथे आहेत पण विस्तारभयास्तव ती येथे देणे शक्य नाही.
असेच काही रामायणातील प्रसंग मी वेरूळ, लोणी भापकर, किकली येथील मंदिरांतही पाहिलेले आहेत. प्रसंग तसे भिन्न भिन्न, शैलीही भिन्न मात्र शिल्पांची रंजकता तीच. खरंच सांगतो. हे शिल्पपट, त्यातल्या मूर्ती, त्यातले प्रसंग ओळखायला खूप मजा येतं. काही वेळा काही प्रसंग अनाकलनीयच राहतात. किकलीच्या मंदिरातला गरूड आणि हनुमानात झालेली एका फळावरुन झालेली जुगलबंदी हा प्रसंग असाच अनाकलनीय. कोडं काही वेळा सुटतं, काही वेळा नाही, पण न सुटल्याची काही खंत अशी नसते.
भिंतींच्या उपांगांवर मधूनच काही सुरसुंदर्या दिसत जातात, कुणी आरश्यात पाहून नटण्या मुरडण्यात वेळ घालवतेय तर कुणी वृक्षांचा आधार घेऊन उभी आहे, कुणी नुसतीच मुग्ध आहे तर कोणी हाती कमंडलू घेऊन उभी आहे. कुणी पोराला हाती घेऊन उभी आहे तर कुणाची नुसतीच लगबग चालू आहे.
मधूनच देवकोष्ठात चामुंडा प्रकटलेली दिसते. भयप्रद चेहरा, तोंडातून बाहेर आलेल्या कराल दाढा, हाडांचा सापळा, लोंबलेले स्तन, पोटात विंचू, प्रेतवाहना अशी ती सहज ओळखू येत असते. ही चामुंडा शीळ देखील वाजवती आहे. अशाच व्हिसलींग चामुंडा मी पिंपरी दुमाला, खिद्रापूर येथेही पाहिलेल्या आहेत. चामुंडेवरनं आठवलं, भुलेश्वरला चामुंडेचं एक अप्रतिम शिल्प आहे. मी पाहिलेल्या चामुंडांमधलं सर्वोत्तम.
चामुंडा म्हटल्यावर भैरव आलाच. येथे एक भैरवाची अष्टभुज मूर्ती आहे आणि ती देखील बैठी. अष्टभुज शिव बैठ्या अवस्थेत मी फक्त येथेच पाहिला.
गाभार्यातील शिवपिंडीच्या शाळुंकेतील पाणी बाहेर जाण्यासाठी मकरमुखाची योजना केलेली आहे. त्या मकरावर शंख, चक्र, गदाधारी विष्णूची योजना केलेली आहे. त्या मकराचे बंद होत असलेले मुख कोणी एक आकृती आपल्या हातांच्या आधारे उघडून ठेवत आहे.
मंदिराच्या बाह्यांगांवर मूर्तींची संख्या तशी कमीच. गोंदेश्वर हे भूमिज शैलीतले तुलनेने उशिरा निर्माण झालेले (१२/१३ वे शतक) मंदिर असल्याने येथे मूर्तीकामाचा थोडा अभाव जाणवतो, त्याची जागा येथे नक्षीकामाने घेतलेली आढळते.
आधीच सांगितल्याप्रमाणे हे पंचायतन आहे. मुख्य मंदिर हे शिवाचे असल्याने हे शिवपंचायतन. गोंदेश्वराचे शिवपंचायतन महाराष्ट्रात सर्वात प्रचंड. ह्या इतर चार उप आयतनांत अनुक्रमे विष्णू, गणेश, दुर्गा आणि सूर्य अशा मूर्ती आहेत. ह्यातल्या काही मूर्ती मला जास्त प्राचीन वाटल्या नाहीत. कदाचित मूळच्या मूर्ती भंग पावल्या असाव्यात.
ही चार उपायतने देखील विलक्षण सुंदर आहेत. गोंदेश्वर मंदिराभोवती फेरी मारताना विविध कोनांतून हे पंचायतन विलक्षण सुंदर दिसते. दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी प्रकाशामुळे ह्यांच्यावरील रंग सतत बदलत असतात. मावळतीला तर हे झळाळून निघत असते.
उत्तुंग पोहोचलेली शिखरं स्थापत्यशैलीचा अद्भूत आविष्कार दाखवतात.
आतापर्यंत इतकं मंदिरं पाहिली. डावं उजवं खरंच करता नाही आलं, आवडलं नाही असं कुठलंही मंदिर नाहीच. जे ८०० वर्षांच्या पलीकडचं आहे ते ते सगळंच आवडीच. मग त्यात वेरूळचं अतिभव्य लेणं येवो, कार्ल्याचा प्रचंड चैत्य येवो वा कुठेतरी झाडाझुडपात पडलेली एखादी शिळा. वेरुळच्या कैलासचं अढळ स्थान मात्र कधीच खाली उतरणार नाही. त्यासम तेच. कोपेश्वरही खूपदा पाहिलं, आवड्लं देखील. इतकं सुंदर, कोरीव पण का कोण जाणं समरस होता आलं नाही, भुलेश्वराशी मात्र मनापासून समरस झालो. काहीतरी ऋणानुबंध असणार.
गोंदेश्वराचं स्थान मात्र त्याच्या उत्तुंग शिखरांमुळे मनात एक वेगळंच स्थान पटकावून आहे.
'मैथूनशिल्पे पाहून त्याकाळातील लोक जास्तच समाजाचं वास्तव चित्रण करणारे होते असे म्हणावे लागेल.'
-याबाबतीत
एक शंका होती, अशा प्रकारची शिल्पे मंदिरांमध्ये असण्यामागे काय लॉजिक असू
शकतं, म्हणजे साधारणतः हा एक taboo विषय मानला जातो, तरीही अशी शिल्पे
पूजास्थळांमध्ये असण्यामागे काय कारण असावे ?
की हे taboo वगैरे नंतर मानलं जाऊ लागलं, आधी असा काही समज नव्हता.
'आता कुठेही मंदिरात गेलो की कुठे वीरगळ दिसतात का ? मंदिराची शैली कोणती असावी ? शिल्प दिसल्यावर हे कोण असेल बरं ? अशा गोष्टींची उत्सुकता लागते'
- अगदी, आतापर्यंत अशी मंदिरं, शिल्पं फक्त पहायचो, आता थोडे निरीक्षण आणि अभ्यास करायची सवय लागेल.
सुंदर फोटो आणि नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख.
>>>>>अशा प्रकारची शिल्पे मंदिरांमध्ये असण्यामागे काय लॉजिक असू शकतं,
लॉजिक मीही सांगू शकत नाही. पण मानवी जीवनाचे भाव, राग, लोभ, मद, मत्सर, कारुण्य, भय, या साऱ्या विकाराबरोबर सौंदर्य, मैथुन शिल्प ही हजार वर्षापूर्वीचीच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय परिस्थिती शिल्पामधुन सांगतात नव्हे तर ते शिल्प आपल्याशी बोलते. आज जी वर्गवारी आपण पवित्र अपवित्रच्या केल्या आहेत, त्या काळात तो विचार तेव्हा टोकदार नसावा असे वाटते. म्हणून वेरूळ लेणीच्या शिल्पात मुख्य कैलास लेणीत सभामण्डपात अशी असंख्य शिल्प आहेत अर्थात ती खुप मोठी नाहीत, अगदी वितभर आकाराची अशी शिल्प आहेत, पण मंदिरात अशी शिल्प का आहेत याचं ठाम कारण मी सांगू शकत नाही. (प्रश्न वल्लीकड़े पास) राष्ट्रकूट राजांच्या काळातील कैलास मन्दिरातील ही शिल्प आणि त्याचा इतिहास त्यांचा हेतू आपल्याला प्रचू उर्फ़ प्रचेतस शिवाय दुसरं कोण सांगू शकतं ?
मैथुनशिल्पांबाबतचं सरांचं म्हणणं तसं बरोबर आहे. तत्कालीन सामाजिक परिस्थितीतचं दर्शनच अशा शिल्पांद्वारे होत असतं पण ही शिल्पे आहेत म्हणून तेव्हाच्या समाजात मोकळीक, स्वैराचार असा काही होता का तर उत्तर नाही हे आहे. अर्थात तेव्हाही गणिका होत्याच. तत्कालीन साहित्यातून तसे उल्लेखही आलेले आहेत. चंद्रगुप्ताच्या पदरी अनेक विषकन्या होत्या परंतु सर्वसाधारण महिलांना आचारविचारांचं मुक्त स्वातंत्र्य होतं का तर नाही, त्यांचे जीवनही चार भिंतींंआडच व्यतीत होत असावे. तरीही ही शिल्पं का?
तर ह्याची काही कारणे असावीत असे मला वाटते.
पुरुष-
प्रकृतीचे मिलन म्हणजे मोक्ष. हे बऱ्याचदा शिवपार्वती क्रिडेच्या रुपात
आपणास दिसते. उपनिषदांतही पुरुष- प्रकृति मिलनाबाबतचे श्लोक आलेले आहेत. पण
शिव पार्वती क्रिडा सोडून इतरही युग्मशिल्पे दिसतात त्याचे काय आणि
मंदिरांच्याच भिंतींवर का असावीत?
साधकाने
अशा विचलित करणाऱ्या शिल्पांकडे पाहूनही विचलित न होता आपली साधना पूर्ण
करावी व योगस्थिती प्राप्त करून घ्यावी हां तर उद्देश नसेल?
मला सर्वात जास्त वाटते ती चार पुरुषार्थांची शक्यता.
धर्म,
अर्थ, काम, मोक्ष अर्थात ह्या चारही अर्थांचे पालन मनुष्याने आपल्या
जीवनात पूर्णांषाने करावे. एक धार्मिक व दोन ऐहिक अर्थांचे पालन करून शेवटी
मोक्षाप्रत पोचावे.
म्हणूनच ह्या चार पुरुषार्थांची प्रतिके असलेली ही शिल्पे मंदिरांत असावीत असे मला प्रकर्षाने वाटते.
फोटो पाहिल्यावर एक प्रश्न पडला. ८०० वर्ष जुन्या असलेल्या मंदिराची पडझड झालेली दिसत नाही. तसेच आत असलेल्या शिल्प कृती इतर तत्कालीन मंदिरा सारख्या कालाच्या ओघात भग्न झालेल्या दिसत नाही . याचे काय कारण असावे ?
इतर तत्कालीन मंदिरांतही बऱ्याच अभंग शिल्पकृती आहेतही. अंतर्भागात असल्याने उन, पाऊस, वारा ह्यांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो.
शिवाय इकडील(पक्षी दक्षिणेकडील) मंदिरांत तुलनेने मूर्तीभंजकांचा मारा कमी झालाय. जे काही भंजन झालंय ते सूरुवातीच्या खिलजी, मलिक काफूर इत्यादींकडुन आणि नंतर औंरंगजेबाकडून व् काही प्रमाणात अफजलखानाकडून. बहमनी, शिवाय ती फुटल्यानंतरच्या पाच शाह्या किरकोळ अपवाद वगळता काही प्रमाणात सहिष्णू होत्या असे म्हणता यावे. अर्थात ह्याची काही राजकीय कारणे आहेत.
तुम्हाला हेच अपेक्षित आहे का?
हा मंदिराच्या शिखराचा भाग आहे. स्कंधावर ही घंटा किंवा आमलक आणि त्यावर कळस.
गड झाले, विहिरी झाल्या, आता वेध लागले ते देवळांचे
म्हणून ह्या रविवारी प्राचीन मंदिरांना भेट द्यायचं ठरवलं. थोडीफार शोध
मोहीम केल्यावर जवळपासचे ठिकाण शोधण्यास मदत झाली. १२ व्या शतकातील दोन
मंदिरे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरात आहेत असं समजलं. मी अजय आणि भरत
आम्ही तिघांनी योग्य ती माहिती घेऊन रविवारी जाण्याची तयारी केली.
सकाळी ७.५५ ची कल्याणहुन कसारा लोकल पकडली. साडेनऊच्या सुमारास
कसारा गाठले. कसाऱ्यावरून सिन्नरला जाताना घोटीमार्गे जावे लागते त्यामुळे
कसार्याहून घोटीला जाण्यासाठी SHARE जीपने घोटीला गेलो व घोटीहून सिन्नर
ला जाण्यासाठी पुन्हा SHARE जीप घेतली. १२ वाजण्याच्या सुमारास सिन्नरला
पोहचलो आणि प्रथम गोंदेश्वर मंदिराच्या दिशेने वाटचाल सुरू केली.




मंदिराच्या चहुबाजूने निरीक्षण केल्यास वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम दिसते. त्यावर अनेक प्रकारच्या कमानी आहेत काही ठिकाणी मंदिराचे उंच उंच कळस नजरेस पडतात

हि मंदिरे पाहिल्यावर एकदा मनात विचार आला कि आज जसे आपल्याला काही सुचलं कि कागदावर रेखाटतो त्याचप्रमाणे त्याकाळची माणसे असं काही सुचल्यास थेट दगडावरच रेखाटत असावी हि दोन्ही मंदिरे पाहिल्यावर आजही कलाकारांचे कौतुक केल्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे त्या कलाकारांचे खरंच धन्यवाद ज्यामुळे आज आम्हास अशी वास्तु पाहावयास मिळत आहे.
कधी चुकून माकून नाही तर ह्या मंदिरांना भेट देण्यासाठी म्हणून तरी मुद्दामच सिन्नर शहराला भेट द्या....
मंदिराबाहेरील काही अप्रतिम दृश्ये ...
सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर हे एक शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे. मंदिर परिसरात प्रवेश केला की अक्षरशः भारावून जायला होतं. मंदिरा भवती तटबंधी आहे. मंदिर परिसर ही अगदी स्वच्छ होता. मंदिरात शिरताना दगडी दारावरील नक्षीकामच पहिल्यांदा लक्ष वेधून घेत. दारातून प्रवेश केला की दगडी खांब आणि समोर येणाऱ्या उजेडात गोंदेश्वर मंदिरच पाहिलं दर्शन घडतं.
मंदिरा समोर मोठी मोकळी जागा ही आहे आणि डावीकडे दगडी बांधकाम आहे. बहुदा ह्या खोल्या पुजाऱ्यासाठी किंवा मंदिराला भेट द्यायला येणाऱ्या भाविकांना विश्रांतीसाठी बनवल्या असाव्या. हे मंदिर १२ व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. हे मंदिर १२५ फुट Χ ९५ फुट आहे. हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. यांतील गोंदेश्वराचे शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. हेमाडपंथी बांधकामाचा उत्तम नमुना म्हणून ह्या मंदिराकडे बोट दाखवता येईल
मंदिरात सभामंडप व गाभारा आहे. उंच आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे आणि अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. प्रमुख मंदिरा भवती असलेली इतर मंदिरं सुद्धा अप्रतिम कोरीवकाम दर्शवतात. गाभाऱ्यात पुरातन शिवलिंग आहे. आणि गाभाऱ्यातच्या दारावर अतिशय बारीक आणि सुबक नक्षीकाम केलेलं आहे .
मंदिराच्या बाहेर अनेक देवीदेवतांची शिल्प बघायला मिळतात.
संपूर्ण मंदिराभावती हत्तींची शिल्प कोरलेली आहेत जसे की ह्या हत्तींनी हे मंदिर उभारून पाठीवर तोलालय. मंदिराच्या बाजूला एक मोठा पाण्याचा तलाव ही आहे.
हे मंदिर नक्कीच खास जाऊन भेट देण्यासारखं आहे. रथसप्तमीला सूर्यपूजा थाटामाटात साजरी होते अशी माहिती मिळाली. ह्या मंदिरा जवळच असलेलं अर्येश्वर मंदिर आणि गारगोटी म्युझियम हे देखील नक्की बघा
नाशिकहून येतांना आडवा फाट्यावर डावीकडे वळलं की लगेच आयेश्वर मंदिर लागतं ते लहानसं मंदिर बघून गोंदेश्वर कडे जाण्याचा रस्ता गुगल नकाश्यात दाखवलेला आहे. पण जर रविवारी जाणार असाल तर गावात बाजार भरतो तेव्हा हायवे वरून गावाला वळसा घालून गोंदेश्वर मंदिरात जाल तर उत्तम
सिन्नरचं आयेश्वर मंदिर पाहण्याच्या आधीच जवळपास दोनेक तास गोंदेश्वर मंदिरात थांबलो होतो. माध्यान्ह संपून नुकतीच कुठे मावळतीला सुरुवात होत होती. भर एप्रिलचाच काळ असल्याने उन्ह मात्र अगदी रणरणत होतं. सिन्नर हा दुष्काळी भाग, सगळं कसं रखरखीत, कोरडं, रुक्ष. उन्ह अक्षरशः भाजून काढत होतं. मात्र त्या उन्हातही मंदिर सोन्यासारखं झळकत होतं.
गोंदेश्वराचं आवार विस्तीर्ण. भलं प्रशस्त. तटबंदीयुक्त. तटबंदीतच यात्रेकरुंसाठी देवड्या बांधलेल्या. तटबंदीच्या आत पटांगण, इतकं मोठं की क्रिकेटची मॅच सहज खेळता यावी. पटांगण मोकळं ठेवूनही मध्यभागी भलं थोरलं अधिष्ठान. त्या चौथर्याच्याही मध्यभागी एक प्रचंड मंदिर. इतकं उंच भूमिज मंदिर महाराष्ट्रात दुसरं नसावं. भूमी म्हणजे मजला. मंदिराचा शिखरभाग मुख्य शिखराच्या लहान लहान प्रतीकृतींनी जोडत जोडत जाऊन थेट कळसास पोहोचलेला. त्या शिखरप्रतीकृतींच्या मधूनच जाणारी सरळसोट जीवा. हीच ती भूमिज शैली. मुख्य मंदिराच्या चारही बाजूंना चार लहान आयतनं. मुख्य मंदिर भूमिज पण त्याच्या बाजूची उप आयतनं मात्र नागर शैलीतली, मधूनच एखादं वेस्सर शिखर. ह्या विभिन्न शैलींमुळे मुख्य आयतनाला येथे कमालीचा उठाव मिळालाय. मुख्य मंदिर शिवाचे त्यामुळे हे शिवपंचायतन.
मंदिराच्या पटांगणातच उभा राहून मी हे सर्व पाहात होतो. अप्रतिम, सुपर्ब, मार्व्हलस अशी विशेषणं फिकी पडावीत असंच ह्याचं प्रथमदर्शन. मंदिराचे हे प्रवेशद्वार मात्र आडबाजूचे. मंदिरात येणारा मुख्य रस्ता ह्याच मार्गाने आल्यामुळे, मूळचे मुख्य प्रवेशद्वार मात्र पूर्वाभिमुख, नदीच्या बाजूने. पाण्याच्या स्त्रोताच्या बाजूनेच मुख्य द्वार हवे किंवा त्याबाजूने एकतरी द्वार हवे हा नियम येथेही पाळला गेल्याचे दिसतो.
मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे ते पूर्व बाजूनं. येथेही एक आश्चर्य दडलेले आहे. खिद्रापूरच्याच स्वर्गमंडपाची लहानशी पुनरावृत्ती ह्या प्रवेशद्वाराच्या छतावर केलेली आढळते. खिद्रापूरचा स्वर्गमंडप हा तर अतिशय सुंदर आणि तो सभामंडपाच्या अगोदर, त्याला अगदी लागूनच. त्यामानाने गोंदेश्वरचा स्वर्गमंडप हा प्रवेशद्वारावर, मंदिरापासून थोडासा लांबच. पण ह्याचेही सौदर्य अजिबात उणावत नाही. आकाशाची निळाई काय खुलून दिसते येथून. भन्नाट
स्वर्गमंडपाच्या पुढ्यात खोलवर गेलेली नदी व तिचे आटलेलं, शेवाळलेलं पात्र. मागे फिरलो. मुख्य मंदिराच्या पुढ्यातच नंदीमंडप आहे. शिल्पकामाने कोरुन काढलाय. हा नंदीमंडप खुलामंडप ह्या प्रकारात मोडतो. नंदीमंडपाच्या भिंतीवर रामायणातील विविध प्रसंग, सुरसुंदरी , वादक, मैथुनशिल्पं आदी कोरलेले आहेत. मूर्तींची अगदी सहजच संगती लागत असते. पहिल्यांदाच इथे येऊनही, मूर्ती अगदी झिजलेल्या असूनही अगदी सहज ओळखल्या जातात, जणू ह्यांचे आपले जन्माजन्मांतरीचे नाते आहे.
मला आठवतंय, लोणी भापकरला असाच एक नंदीमंडप आहे. तिथल्या मंडपात सध्या नंदी नाही मात्र बाह्य भिंतीवरील शिल्पेही अगदी अशीच.
नंदीमंडपाच्या भिंतीवरील मैथुनशिल्पे
हे रामायणातील काही प्रसंग
ह्या सुरसुंदरी, त्यात कुणी पुत्रवल्लभा, कुणी दर्पणा, कुणी मर्कटलीलांनी त्रस्त झालेली अभिसारिका
तर मध्येच विष्णूचे अवतार, वराह, नरसिंह
इतकी सारी शिल्पं बघत बघतच नंदीमंडपाला फेरी मारत निघावी आणि मुख्य आयतनात यावं. द्वाराच्या शेजारीच एक भयप्रद व्याल आपलं स्वागत करतो. इतके मोठे व्याल इकडील मंदिरांत तसे दुर्मिळच. दक्षिणेत मात्र अगदी विपुल.
प्रवेशद्वाराची चौकट येथेही व्यालांनी, वादकांनी, प्रतिहारींनी, द्वारपालांनी सजलेली आहे. प्रवेशद्वार हे मुखमंडपात आहे. मुखमंडपाचं छतही कमळासारख्या फुलांच्या आकृतीने नक्षीदार कोरलेले आहे.
गोंदेश्वराचा सभामंडप अंधारी, इथे छायाचित्रं काढणं तसं जिकिरीचं काम. इथला सभामंडपही भरजरी स्तंभांवर तोललेल्या आहे. स्तंभांवर असंख्य शिल्पं आहेत.
ही पुत्रवल्लभा, आपल्या लहानग्या बाळाला हातांवर तोलत ही त्याचे कौतुक करीत आहे.
ही दर्पणा, सतत आरशातच बघत असते :)
ही आपल्या सेवकाच्या पाठीवर पाय ठेवून स्वतःची केशरचना करीत आहे
हे बहुधा शिवाचे तांडवनृत्य. नंदी आणि भृंगी शेजारी असावेत.
हे मैथुनशिल्प. असा उघडा शृंगार चाललेला पाहून एका सेविकेने चक्क पाठ फिरवलीय तर दुसर्या सेविकेने लाजून आपले डोळेच झाकून घेतलेले आहेत. :)
मध्येच काही ठिकाणी द्वंद्व कोरलेले आहे
तर इथे एक मर्कट शिंकाळ्यातले दही चोरते आहे.
एका स्तंभावर उग्र नरसिंह हिरण्यकश्यपूला अंकावर घेऊन आपल्या नख्यांनी त्याचे पोट फाडतोय तर प्रल्हाद भक्तीभावाने प्रार्थना करतोय, गरुडही वरच्या बाजूस हात जोडून नम्रतेने उभा आहे.
नंतर बळीराजा (हा प्रल्हादाचा नातूच. वैरोचनी) हा वामनाला तीन पावले जमिनीचे दान हातांवर पाणी सोडून देतोय. दान देताच वामन त्रिविक्रमरुप प्रकट करुन पृथ्वी आणि आकाश व्यापून तिसरे पाऊल बळीच्या डोक्यावर ठेवण्यासाठी सज्ज झालाय.
ही अजून एक पुत्रवल्लभा
मग विषकन्या दिसतेय. तिच्या एका हाती सर्प तर दुसर्या हाती मुंगूस असून ती दोघांनाही भिडवतेय. जणू तुम्हा दोघांवरही माझेच वर्चस्व आहे असेच ती जाणवून देतेय.
अशी एक ना एक असंख्य शिल्पे आहे सभामंडपात. गर्भगृहाच्या दारावर देखील नेहमीप्रमाणेच दासी, प्रतिहारी, शैव द्वारपाल आहेत. आतले शिवलिंग मात्र साधेसे.
आता मंदिराला फेरी मारण्यास निघालो. मंदिराच्या अधिष्ठानावर गजथर, त्यावरील जंघेवर नरथर आणि त्यावर देवकोष्ठ आहेत. सुरसुंदरी इथे मोठ्या संख्येने दिसत नाहीत तरीही त्या मंदिरांच्या भिंतींवर काही प्रमाणात आहेत. अर्धमंडपांच्या बाहेर रामायणातील बरेच प्रसंग कोरलेले आहेत. देवकोष्ठात आज मूर्ती अभावानेच दिसतात, किंबहुना त्या नाहीतच. मी अशी देवकोष्ठं रिकामी असलेली बरीच मंदिरे पाहिलेली आहेत. मूर्तीभंजकांमुळे भग्न झालेली असावीत किंवा कसे, पण आज ती बर्याच ठिकाणी नाहीत. कित्येकदा ती मंदिरांच्या आवारातच इतस्ततः भग्नावस्थेत विखुरलेली दिसतात.
इथली भिंतीवरील रामायणपटांत विविध प्रसंग कोरलेले आहेत.
ही रावणानुग्रहशिवमूर्ती. वेरूळच्या कैलास लेण्यांत ह्याचं अतिभव्य असं स्वरुप आहे. अक्षरशः डोळे दिपवणारं. येथे मात्र हाच प्रसंग मिनिएचर रुपात मांडला गेलाय.
मारुती इथे अशोकवनाचा विध्वंस करताना दिसतो तर त्याच्याच पुढच्या पटात तो रावणकुमार अक्षाचा वध करताना दिसतो.
-
कधी रावणाचा दरबार दिसतो तर कधी राक्षसींनी वेढलेली सीता दिसते.
मधूनच सेतूबंधनाचा देखावा दिसतो तर रावणाच्या दरबारात चाललेली वानरशिष्टाई
अजूनही कित्येक शिल्पं येथे आहेत पण विस्तारभयास्तव ती येथे देणे शक्य नाही.
असेच काही रामायणातील प्रसंग मी वेरूळ, लोणी भापकर, किकली येथील मंदिरांतही पाहिलेले आहेत. प्रसंग तसे भिन्न भिन्न, शैलीही भिन्न मात्र शिल्पांची रंजकता तीच. खरंच सांगतो. हे शिल्पपट, त्यातल्या मूर्ती, त्यातले प्रसंग ओळखायला खूप मजा येतं. काही वेळा काही प्रसंग अनाकलनीयच राहतात. किकलीच्या मंदिरातला गरूड आणि हनुमानात झालेली एका फळावरुन झालेली जुगलबंदी हा प्रसंग असाच अनाकलनीय. कोडं काही वेळा सुटतं, काही वेळा नाही, पण न सुटल्याची काही खंत अशी नसते.
भिंतींच्या उपांगांवर मधूनच काही सुरसुंदर्या दिसत जातात, कुणी आरश्यात पाहून नटण्या मुरडण्यात वेळ घालवतेय तर कुणी वृक्षांचा आधार घेऊन उभी आहे, कुणी नुसतीच मुग्ध आहे तर कोणी हाती कमंडलू घेऊन उभी आहे. कुणी पोराला हाती घेऊन उभी आहे तर कुणाची नुसतीच लगबग चालू आहे.
मधूनच देवकोष्ठात चामुंडा प्रकटलेली दिसते. भयप्रद चेहरा, तोंडातून बाहेर आलेल्या कराल दाढा, हाडांचा सापळा, लोंबलेले स्तन, पोटात विंचू, प्रेतवाहना अशी ती सहज ओळखू येत असते. ही चामुंडा शीळ देखील वाजवती आहे. अशाच व्हिसलींग चामुंडा मी पिंपरी दुमाला, खिद्रापूर येथेही पाहिलेल्या आहेत. चामुंडेवरनं आठवलं, भुलेश्वरला चामुंडेचं एक अप्रतिम शिल्प आहे. मी पाहिलेल्या चामुंडांमधलं सर्वोत्तम.
चामुंडा म्हटल्यावर भैरव आलाच. येथे एक भैरवाची अष्टभुज मूर्ती आहे आणि ती देखील बैठी. अष्टभुज शिव बैठ्या अवस्थेत मी फक्त येथेच पाहिला.
गाभार्यातील शिवपिंडीच्या शाळुंकेतील पाणी बाहेर जाण्यासाठी मकरमुखाची योजना केलेली आहे. त्या मकरावर शंख, चक्र, गदाधारी विष्णूची योजना केलेली आहे. त्या मकराचे बंद होत असलेले मुख कोणी एक आकृती आपल्या हातांच्या आधारे उघडून ठेवत आहे.
मंदिराच्या बाह्यांगांवर मूर्तींची संख्या तशी कमीच. गोंदेश्वर हे भूमिज शैलीतले तुलनेने उशिरा निर्माण झालेले (१२/१३ वे शतक) मंदिर असल्याने येथे मूर्तीकामाचा थोडा अभाव जाणवतो, त्याची जागा येथे नक्षीकामाने घेतलेली आढळते.
आधीच सांगितल्याप्रमाणे हे पंचायतन आहे. मुख्य मंदिर हे शिवाचे असल्याने हे शिवपंचायतन. गोंदेश्वराचे शिवपंचायतन महाराष्ट्रात सर्वात प्रचंड. ह्या इतर चार उप आयतनांत अनुक्रमे विष्णू, गणेश, दुर्गा आणि सूर्य अशा मूर्ती आहेत. ह्यातल्या काही मूर्ती मला जास्त प्राचीन वाटल्या नाहीत. कदाचित मूळच्या मूर्ती भंग पावल्या असाव्यात.
ही चार उपायतने देखील विलक्षण सुंदर आहेत. गोंदेश्वर मंदिराभोवती फेरी मारताना विविध कोनांतून हे पंचायतन विलक्षण सुंदर दिसते. दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी प्रकाशामुळे ह्यांच्यावरील रंग सतत बदलत असतात. मावळतीला तर हे झळाळून निघत असते.
उत्तुंग पोहोचलेली शिखरं स्थापत्यशैलीचा अद्भूत आविष्कार दाखवतात.
आतापर्यंत इतकं मंदिरं पाहिली. डावं उजवं खरंच करता नाही आलं, आवडलं नाही असं कुठलंही मंदिर नाहीच. जे ८०० वर्षांच्या पलीकडचं आहे ते ते सगळंच आवडीच. मग त्यात वेरूळचं अतिभव्य लेणं येवो, कार्ल्याचा प्रचंड चैत्य येवो वा कुठेतरी झाडाझुडपात पडलेली एखादी शिळा. वेरुळच्या कैलासचं अढळ स्थान मात्र कधीच खाली उतरणार नाही. त्यासम तेच. कोपेश्वरही खूपदा पाहिलं, आवड्लं देखील. इतकं सुंदर, कोरीव पण का कोण जाणं समरस होता आलं नाही, भुलेश्वराशी मात्र मनापासून समरस झालो. काहीतरी ऋणानुबंध असणार.
गोंदेश्वराचं स्थान मात्र त्याच्या उत्तुंग शिखरांमुळे मनात एक वेगळंच स्थान पटकावून आहे.
गड झाले, विहिरी झाल्या, आता वेध लागले ते देवळांचे म्हणून ह्या रविवारी प्राचीन मंदिरांना भेट द्यायचं ठरवलं. थोडीफार शोध मोहीम केल्यावर जवळपासचे ठिकाण शोधण्यास मदत झाली. १२ व्या शतकातील दोन मंदिरे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरात आहेत असं समजलं. मी अजय आणि भरत आम्ही तिघांनी योग्य ती माहिती घेऊन रविवारी जाण्याची तयारी केली.
सकाळी ७.५५ ची कल्याणहुन कसारा लोकल पकडली. साडेनऊच्या सुमारास कसारा गाठले. कसाऱ्यावरून सिन्नरला जाताना घोटीमार्गे जावे लागते त्यामुळे कसार्याहून घोटीला जाण्यासाठी SHARE जीपने घोटीला गेलो व घोटीहून सिन्नर ला जाण्यासाठी पुन्हा SHARE जीप घेतली. १२ वाजण्याच्या सुमारास सिन्नरला पोहचलो आणि प्रथम गोंदेश्वर मंदिराच्या दिशेने वाटचाल सुरू केली.








मंदिराच्या चहुबाजूने निरीक्षण केल्यास वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम दिसते. त्यावर अनेक प्रकारच्या कमानी आहेत काही ठिकाणी मंदिराचे उंच उंच कळस नजरेस पडतात


हि मंदिरे पाहिल्यावर एकदा मनात विचार आला कि आज जसे आपल्याला काही सुचलं कि कागदावर रेखाटतो त्याचप्रमाणे त्याकाळची माणसे असं काही सुचल्यास थेट दगडावरच रेखाटत असावी हि दोन्ही मंदिरे पाहिल्यावर आजही कलाकारांचे कौतुक केल्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे त्या कलाकारांचे खरंच धन्यवाद ज्यामुळे आज आम्हास अशी वास्तु पाहावयास मिळत आहे.
कधी चुकून माकून नाही तर ह्या मंदिरांना भेट देण्यासाठी म्हणून तरी मुद्दामच सिन्नर शहराला भेट द्या....
मंदिराबाहेरील काही अप्रतिम दृश्ये ...
गोंदेश्वर मंदिर
गोंदेश्वर मंदिर






































No comments:
Post a Comment