भुलेश्वर
महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील यादवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध असलेले एक स्थळ. येथील मंदिर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्यापासून पूर्वेस सु. ४३ किमी. वर असलेल्या यवत गावाच्या नैर्ऋत्येस सु. पाच किमी. अंतरावर असून ते सस. पासून २१३ मी. उंच अशा एका टेकडीवर बांधलेले आहे.
या टेकडीकडे यवतकडून बैलगाडीच्या रस्त्याने, तसेच दक्षिणेकडील माळशिरस या गावाकडूनही पायवाटेने जाता येते. भुलेश्वर या महादेवाच्या नावामुळे या टेकडीस भुलेश्वर टेकाड म्हणतात. पंचक्रोशीतील ग्रामीण लोकांत यवतेश्वर डोंगर असाही याचा उल्लेख केला जातो.
मराठी अंमलामध्ये मराठे व मुसलमान यांनी स्वरक्षणार्थ या टेकडीचा उपयोग किल्ल्यासारखा केल्याचे काही उल्लेख मिळतात. शिवपूर्व काळात या ठिकाणाला गढीचे स्वरूप येऊन तिला दौलतमंगळ हे नाव मिळाले होते. इ. स. १६४२-४३ मध्ये तेथे विजापूरच्या आदिलशाहीतील एक मुत्सद्दी सुभेदार या नात्याने रहात होता.
पेशवाईच्या आरंभकाळात पहिला बाजीराव व छत्रपती शाहू आणि काही मराठे सरदार यांचे गुरू ब्रह्मोंद्रस्वामी धावडशीकर यांच्याकडे या देवस्थानाची वहिवाट होती. मंदिरासमोरचा नगारखाना आणि बाजूचा बुरूज त्यांनीच उभारला. तसेच भुलेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी एक लाख, समाधीस बसण्याच्या जागेसाठी पाचशे आणि माळशिरस व यवत येथील विहिरीसाठी चौऱ्याहत्तर हजार रुपये स्वामीनी खर्च केले. टेकाडावर मूळ भुलेश्वर मंदिराव्यतिरिक्त फार थोड्या वास्तू आहेत.
भुलेश्वराचे मूळ मंदिर एका भव्य प्रकारात चौथऱ्यावर तारकाकृती विधानात बांधले असून प्रकाराला दक्षिण व पूर्वेकडून दोन द्वारे आहेत. मूळ मंदिर पूर्वाभिमुख असून ते नागर वास्तूशैलीतील भूमिज या उपवास्तूशैलीत बांधले आहे. मंदिर वास्तूत नेहमी आढळणारे गर्भगृह, अंतराल, सभामंडप आणि नंदिमंडप (सभामंडपापासून थोडा पुढे) असे चार भाग आहेत. मंदिराचे शिखर विटांचे असून ते नंतर बांधलेले असावे. मंदिराच्या समोरच्या बाजूस दक्षिणेकडे नगारखाना आहे.
प्रकाराच्या आतील बाजूंस ओवरीयुक्त सोपे (अंकणे) असून त्यांच्या पानपट्टीवर (आर्किट्रेव्ह) शिल्पे आहेत आणि अधूनमधून देवकुलिकाही आढळतात. त्यांतूनही मूर्ती बसविल्या आहेत. मंदिरातील काही मूर्ती फोडलेल्या आढळतात. गर्भगृह चौरस असून अंतरालातून तीन पायऱ्या उतरून आत खाली गेले म्हणजे गर्भगृह लागते. त्यात शिवलिंग आहे.
गर्भगृहाच्या भिंतीच्या आतील पृष्ठभागावर नक्षीकाम नाही. अंतराल म्हणजे सभामंडप व गर्भगृह यांत एक अरुंद जोडमार्ग असून द्वारशाखांवर नक्षीकाम आहे. त्यात द्वारपाल, कीर्तिमुख, मकर आदी मूर्ती आढळतात.
उंबरठ्यावर दोन्ही बाजूंस कीर्तिमुखे आहेत. सभामंडपात कक्षासने (अर्ध भिंती) असून त्यांवर बाहेरच्या बाजूने (मागील बाजूस) शिल्पे आहेत. सभामंडपाचे स्तंभ फारसे अलंकृत नाहीत; मात्र त्यांची स्तंभशीर्षे नागशीर्षक किंवा कीचक पद्धतीची आहेत. मंदिराच्या मंडोवरावर तिन्ही बाजूंनी मूर्तिकाम असूनही दक्षिण, उत्तर व पश्चिमेकडील प्रमुख मध्यकोनाड्यांत मूर्ती नाहीत. स्वतंत्र नंदिमंडपातील नंदिची मूळ मूर्ती सुस्थितीत आहे.
मंदिराच्या पीठावर गज, अश्व, नर असा कोणताही सांकेतिक थर नाही; परंतु हंस, लतावेल, मकर, कीर्तिमुख इ. प्रतिमा आढळतात. मूर्तिसंभारात मातृका मूर्तीचे प्रमाण अधिक असून नारसिंहीव्यतिरिक्त ब्राम्ही, ऐंद्री, माहेश्वरी, गणेशी, कौमारी, वैष्णवी, वाराही, भैरवी, चामुंडी इ. मातृकांची रेलचेल आहे.
त्याखालोखाल नृत्यांगना, मृदुंगवादक, दर्पणधारी इ. सुरसुंदरीच्या मूर्ती असून कक्षासनाच्या मागील बाजूस रामायण-महाभारतांतील घटनांचे कथात्मक शिल्पांकन आहे. याशिवाय प्राण्यांच्या शिल्पांकनात हत्ती, सिंह, माकडे, घोडे यांबरोबरच उंटाच्या प्रतिमा आहेत.
एकूण शिल्पसंभारातील काही प्रतिमा विलक्षण चित्तवेधक असून लक्षणीय आहेत. त्यांना छायाप्रकाशामुळे उठाव आला आहे. बहुतेक मातृका मूर्ती पर्यंकासनात भद्रपीठावर खोदलेल्या आहेत आणि त्यांची आयुधे व काहींची वाहने स्पष्ट दर्शविलेली आहेत. कथानकातील द्रौपदी स्वयंवर, अर्जुनाचा मत्स्यभेद आदी प्रसंग तसेच पश्चिमेकडील भिंतीवर असलेले तीन स्वतंत्र धडांचे परंतु कमर एक असलेले दोन पायांचे एक चमत्कृतिपूर्ण पुरुष-शिल्प सुरेख आहे.
सुरसुंदरींमधील उत्तरेकडील भिंतीवरील दर्पणधारीचे उत्थित शिल्प मनोवेधक असून ते भग्न झाले असले, तरी अवशिष्ट भागावरून त्याचा सुरेख ढंग दृग्गोचर होतो. डाव्या हातात गोल आरसा घेतलेली ही सुरसुंदरी त्रिभंगात उभी आहे.
ती आरशात सौंदर्य पाहून उजव्या हाताने आपले केस व्यवस्थित करीत आहे. तिचे उत्तान पुष्ट स्तन, विशाल नितंब आणि रेखीव हनुवटी, नाक व डोळे तिच्या यौवनात भर घालतात. एकूण मूर्तीला लय असून रेखांकन आकर्षक आहे.
भुलेश्वराच्या मंदिरात मातृकापट्टांत भैरव आणि गणेश यांच्या मूर्ती आढळत नाहीत, मात्र गणेशीची किंवा वैनायकीची मूर्ती दिसते. ही मूर्ती यादवकालीन शिल्पात इतरत्र क्वचित आढळते. त्याचप्रमाणे उंटाचे शिल्पांकन महाराष्ट्रात अकोला (अहमदनगर जिल्हा) येथील तत्कालीन सिध्देश्वराच्या मंदिरातच फक्त दिसते. त्यामुळे वास्तूशिल्पशैलीच्या आधारे या मंदिराचा काळ तज्ञांनी इ. स. तेराव्या शतकाचा प्रारंभ असा ठरविला आहे.
संदर्भ : 1. Deglurkar, G. B. Temple Architecture and Sculpture of Maharashtra, Nagpur, 1974.
2. Naik, A. V. The Bhuleshvar Temple Near Yavat; Bulletin of the Deccan College
Research Institute, Vol. IV No.2, December, 1942, Poona.
३. पारसनीस, द. ब. श्रीमहापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर चरित्र व पत्रव्यवहार, मुंबई, १९००.
४. पुरंदरे, कृ. वा. शिवचरित्रसाहित्य, खंड १, पुणे, १९२६.
देशपांडे, सु. र
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अद्भूत शिल्पकृतींचे भुलेश्वर मंदिर (Bhuleshwar Temple)
पुण्यापासून पन्नांस किलोमीटर अंतरावर असलेले भुलेश्वर हे ठिकाण तेथे तेराव्या शतकात बांधण्यात आलेल्या शंकराच्या प्राचीन मंदिरासाठी ओळखले जाते. देवगिरी राजांच्या कालखंडात हेमाडपंथी मंदिरे मोठ्या संख्येने बांधण्यात आली होती. भुलेश्वरचे मंदिर इ.स. 1230 मध्ये निर्माण करण्यात आले असे मानले जाते. त्या मंदिरातील शिल्पे हा शिल्पसौंदर्याचा उत्तम आविष्कार आहे. भुलेश्वरच्या मंदिरात स्त्रीरुपातील गणेशमूर्तीचे दुर्मिळ शिल्प पाहता येते.
भुलेश्वरचे मंदिर पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावाजवळ आहे. ते मंदिर दौलतमंगल या किल्ल्यामध्ये सामावलेले आहे. पुणे शहराच्या दक्षिणेकडे असलेली सह्याद्री पर्वताची उपरांग ‘भुलेश्वरची रांग’ म्हणून ओळखली जाते. ती रांग पूर्व-पश्चिम अशी पसरलेली आहे. त्या रांगेत सिंहगड आणि मल्हारगड यांच्या सोबतीने दौलतमंगल किल्ला उभा आहे. त्या किल्ल्याचे काही बुरूज आणि प्रवेशद्वार वगळता केवळ भग्नावशेष उरले आहेत.
भुलेश्वर मंदिराबाबत एक दंतकथा प्रसिद्ध आहे. देवी पार्वतीने भगवान शंकरासाठी नृत्य केले आणि महादेवांना पार्वतीची भुरळ पडली. त्यानंतर त्यांचा हिमालयात विवाह झाला. महादेवाला पार्वतीच्या सौंदर्याने भूल पाडली, म्हणून ते ठिकाण भुलेश्वर नावाने ओळखले जाऊ लागले.
भुलेश्वरचे
मुख्य मंदिर भव्य असून ते एका पठारावर उभारले आहे. मंदिराची उभारणी
जमिनीपासून उंच चौथऱ्यावर केली आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. संपूर्ण मंदिर
दगडात कोरण्यात आले आहे. मंदिराच्या चौथऱ्यावर प्रवेश करायच्या आधी
पाय-यांजवळ असलेल्या द्वारपालांच्या मूर्ती लक्ष वेधून घेतात. मूर्तींच्या
शरिरावरील दागिन्यांचे कोरीवकाम आकर्षक आहे. उजव्या बाजूच्या मूर्तीशेजारी
वाघ हत्तीवर आक्रमण करत आहे असे शिल्प कोरलेले आहे. मुख्य मंदिरासमोर मोठी
पितळी घंटा टांगलेली आहे. मंदिरासमोर प्रशस्त फरसबंद आवर आहे. आवारातून
दर्शनी मंडपात प्रवेश करण्यासाठी तिन्ही बाजूना प्रवेशद्वारे आहेत. त्या
दगडी मंडपात दरवाजे आणि जाळीदार गवाक्षांच्या सहाय्याने हवा खेळती ठेवली
आहे. आतील बाजूस उत्तुंग घुमटाकृती रचना असल्याने दगडातला थंडावा
उन्हाळ्यातही टिकून असतो.
भुलेश्वरच्या मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आयताकृती आणि पाकळ्यासदृश्य आहे. इतर हेमाडपंती मंदिरांच्या तुलनेत भुलेश्वर मंदिरातील शिल्परचना उच्च प्रतीची आहे. पूर्वाभिमुख असलेल्या त्या मंदिराच्या बाहेरील प्राकाराची रचना उत्तरेतील जैन मंदिरांच्या धर्तीवर आहे. अर्धखुला मंडप, मधला भाग आणि मुख्य गाभारा असा त्या मंदिराचा परिसर आहे. तेथील शिवमंदिरास भुलेश्वर-महादेव किंवा यवतेश्वर म्हणतात. मंदिराच्या गाभा-यात शिवलिंग आहे. मंदिराच्या सभोवतालची भिंत, नगारखाना व शिखरे अठराव्या शतकातील मराठा शैलीतील आहेत. पूर्वी, मूळ मंदिरास भव्य प्राकार होता व नंदीचा मंडप स्वतंत्र होता. अठराव्या शतकात झालेल्या जीर्णोद्धारानंतर हे मंदिर एकाच छताखाली आले.
मंदिरात मोठ्या प्रमाणात मानवी व देवतांची शिल्पे आहेत. देवळाभोवती असलेल्या ओवऱ्यांमध्ये देवतांच्या अनेक मूर्ती आहेत. काही ओवऱ्या रिकाम्या आहेत. भिंतींवर कोरीवकाम, मूर्तीकाम केलेले आहे. मुख्य सभामंडपाच्या भोवती असलेल्या अर्धभिंतींवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण-महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. महाभारतातील प्रसंग भारतातील इतर मंदिरांपेक्षा तेथे जास्त रेखीव आहेत. द्रौपदी-स्वयंवर, शरपंजरी भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही कथानकशिल्पे, तसेच मातृकादेवी, गणपती, विष्णूंचे अवतार, योद्धे, पक्षी इत्यादी विविध प्रकारचे शिल्पांकन त्या मंदिरात आढळते. कुंभ, कमळ कीर्तिमुख, मकर, पाने-फळे, वेलबुट्ट्या, घंटा ही शुभचिन्हे मंदिराच्या सुशोभनात वापरलेली आहेत. तेथील दर्पणधारी स्त्रीमूर्ती शिल्पकलेचा सुंदर नमुना आहे. दक्षिण दरवाज्यावर असलेल्या भरत-शत्रुघ्नाच्या डाव्या बाजूस दोन चौघडावाले उंट दाखवलेले आहेत. दक्षिणेकडील मंदिरात उंटाचे शिल्प क्वचितच आढळते. माळव्यात प्रचलित असलेल्या भूमिज उपशैलीचा प्रभाव तेथील काही शिल्पांवर ठळक रीत्या आढळतो. यादव साम्राज्य संपुष्टात आल्यानंतर यवनांकडून महाराष्ट्रातील अनेक मंदिरांची, शिल्पांची नासधूस करण्यात आली. भुलेश्वर मंदिरातील शिल्पांचेही त्या काळात नुकसान झाले.
विजापूरचा सरदार मुरार जगदेव याने भुलेश्वराच्या डोंगरावर ‘दौलत मंगल’ नावाचा किल्ला
१६३४ मध्ये बांधला (संदर्भ – शिवचरित्र प्रदीप – १९२५). त्या किल्ल्याचा
भग्न बुरूज मंदिराकडे जाताना उजव्या बाजूस दृष्टीस पडतो. त्यासोबत तटबंदी,
ताशीव दगडात बांधलेला किल्ल्याचा दरवाजा, पाय-यांचे मार्ग, पायाचे टाके
पाहायला मिळतात. पहिले बाजीराव पेशवे व साताऱ्याचे शाहू छत्रपती यांचे गुरू
ब्रह्मेंद्रस्वामी
यांनी अनेक हेमाडपंथी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. भुलेश्वरचे मंदिर
त्यापैकी एक. स्वामींनी १७३७ मध्ये एक लाख रुपये खर्चून तीन कमानींचा
नगारखाना, सभामंडप व तीन चुनेगच्ची शिखरे बांधली. ते बांधकाम संभाजी व
व्यंकोजी नाईक या गवंड्यांनी केले. देवळाच्या बांधकामात स्वामी जातीने लक्ष
पुरवत असत. दमाजी गायकवाड या सरदाराने पवारांवर मिळवलेल्या
विजयाप्रीत्यर्थ जीर्णोद्धारास पंचवीस हजार रुपये दिले. वसईच्या विजयानंतर
चिमाजी अप्पांनी भुलेश्वरास मुकुटाकरता सव्वाशे रुपये व सोन्याच्या सव्वाशे
पुतळ्या अर्पण केल्याची नोंद आहे. ब्रह्मेंद्रस्वामींनी माळशिरस व यवत या
ठिकाणी विहिरी व तळी बांधून दिली. तेराव्या शतकात बांधलेल्या त्या मंदिराचे
प्रवेशद्वार शिवकालिन गोमुखी प्रकारचे असल्यामुळे मंदिराचा जिर्णोद्धार
झाला असल्याचे स्पष्ट होते. त्या जीर्णोद्धारामुळे ते मंदिर
हेमाडपंथी-मराठा संमिश्र वास्तुशैलीचे झालेले आहे.
मंदिराचे गर्भगृह खोल असून गर्भगृहासमोर उंचावर काळ्या दगडातील कोरीव काम केलेला नंदी आहे. नंदीच्या उजव्या बाजूस ओटा असून त्यावर कासवावर बसलेला नंदी असावा. हल्ली त्याचे फक्त डोके शिल्लक असल्यामुळे तो प्राणी कोणता असावा ते कळत नाही. गर्भगृहातील शिवलिंगाच्या संगमरवरी बाणावर पितळी मुखवटा बसवलेला आहे. बाण काढल्यानंतर खाली आत तीन मुख्य लिंगे, तीन कोपऱ्यांत उंचवट्याच्या स्वरूपात असून ती ब्रह्मा, विष्णू व महेश यांची प्रतिके आहेत. पिंडीच्या खाली असलेल्या खोलगट भागात नैसर्गिक रीत्या पाणी पाझरत असते. अन्य शिवमंदिरांपेक्षा भुलेश्वर येथे अनेक वैशिष्ट्ये आढळतात. कीर्तिमुख, उंबरठ्यांच्या मध्यभागी न काढता दोन्ही अंगांस कोरलेली आहेत. गाभाऱ्याच्या गणेशपट्टीवर गणपतीचे चित्र असले तरी देवळाभोवती असणाऱ्या दक्षिणाभिमुख पट्ट्यांवर गणेशाऐवजी भैरवाचे शिल्प कोरलेले आहे. ओवऱ्या व दगड यामध्ये कोरलेल्या खिडक्या यांची एकाआड एक मांडणी केलेली आहे.
मंदिराच्या गाभा-याच्या बाहेरील बाजूस वर तीन सप्तमातृकांच्या समूहात गणेशाचे स्त्रीरूपी दुर्मीळ शिल्प आहे. वेरूळच्या कैलासलेण्यात त्या प्रकारचे शिल्प आढळते. प्राचीन वाङ्मयात व स्कंदपुराणाच्या पंधरा हजार श्लोक असलेल्या काशिखंडात चौसष्ट योगिनींच्या यादीत या गणेशाचा ‘वैनायकी’ असा उल्लेख आढळतो. देवीसहस्त्रनामात त्या देवतेस ‘विनायकी, लंबोदरी, गणेश्वरी’ अशा विशेषणांनी संबोधले आहे. ‘शिल्परत्न’ या ग्रंथात वैनायकीचा उल्लेख ‘शक्तिगणपती’ असा केलेला आहे. गुप्तकाळात प्रथम सप्तमातृका शिल्पाचा उगम झाला. मध्ययुगात शक्तिपूजक संप्रदायात वैनायकी पूजनाचे महत्व वाढले. वैनायकी शिल्पे गजमुख, चतुर्भुज आणि गणपती यांच्याप्रमाणे आयुधे धारण केलेली आढळतात. भुलेश्वर येथील वैनायकी शिल्पे पद्मासनात बसलेली असून सालंकृत आहेत. खाली मूषक हे वाहन आहे. तेथे वेरूळच्या लेण्याप्रमाणे पूर्ण शिल्पपट्टीका नसून तीन सप्तमातृकांच्या शिल्पपट्टीत वैनायकीची शिल्पे आहेत.
भुलेश्वरला पोचण्यासाठी पुणे–सोलापूर महामार्गाद्वारे उरुळी कांचन, लोणी काळभोर मार्गे यवतजवळ यावे. यवतच्या अलिकडे उजवीकडे भुलेश्वर आणि माळशिरस यांच्याकडे जाणारा फाटा आहे. त्या रस्त्याने घाट चढून आठ किलोमीटर गेले, की पठारावर सपाटीकडे जाणारा रस्ता सोडून उजवीकडे चढावर दूरध्वनी मनो-याच्या शेजारीच भुलेश्वराचे मंदिर आहे.
मंदिराच्या आत छायाचित्रणास बंदी आहे. महाशिवरात्रीला तेथे भाविकांची गर्दी होते. पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावातून श्रावण महिन्यात मंदिरात भुलेश्वराची पालखी नेली जाते.
पुरातत्त्व खात्याने ते मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
– आशुतोष गोडबोले
https://www.thinkmaharashtra.com/%E0%A4%85%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87/
आपली संस्कृती म्हणजे पौराणिक आणि प्राचीन शिल्पकला, वास्तुकला आणि कला कौशल्याचे भांडार आहे. आजच्या विज्ञान युगात आणि पुरोगामी विचारसरणीची मुळ आपल्या मनात एवढी खोलवर रुजली आहे की, आपल्याला आज विज्ञान युगात पण काही गोष्टी अशक्य आहेत, जे प्राचीन काळी अत्यंत कला कौशल्याने साकार केले, त्यावर आपले पुरोगामी विचार अभ्यास आणि निष्कर्ष काढण्यासाठी कमी पडतात. कालाच्या ओघात या शिल्पकला दुर्लक्षित झाल्याने त्यांची पडझड झाली असली तरी त्यांचे महत्व मात्र कमी होऊ शकत नाही. आज त्यांच्यामुळे पौराणिक वारसा, आणि सांस्कृतिक अभिमान जोपासला जात आहे.
महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील यादवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध असलेले सर्वज्ञात असेच एक स्थळ, म्हणजे भुलेश्वर मंदिर होय. सर्वज्ञात म्हंटल तरी आपला पौराणिक अभ्यास हा फक्त कामचलाऊ असल्याने येथील कलाकुसरी आणि शिल्पपटाबद्दल आपल्याला जुजबी माहिती तरी असेल, असे पण गृहीत धरता येत नाही.
हे भुलेश्वर मंदिर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्यापासून पूर्वेस सु. ४३ किमी. वर असलेल्या यवत गावाच्या नैर्ऋत्येस सु. पाच किमी. अंतरावर असून ते समुद्र सपाटी पासून २१३ मी. उंच अशा एका टेकडीवर बांधलेले आहे.
या टेकडीकडे यवतकडून बैलगाडीच्या रस्त्याने, तसेच दक्षिणेकडील माळशिरस या गावाकडूनही पायवाटेने जाता येते. भुलेश्वर या महादेवाच्या नावामुळे या टेकडीस भुलेश्वर टेकाड म्हणतात. पंचक्रोशीतील ग्रामीण लोकांत यवतेश्वर डोंगर असाही याचा उल्लेख केला जातो.
भुलेश्वराचे मूळ मंदिर एका भव्य प्रकारात चौथऱ्यावर तारकाकृती विधानात बांधले असून प्रकाराला दक्षिण व पूर्वेकडून दोन द्वारे आहेत. मूळ मंदिर पूर्वाभिमुख असून ते नागर वास्तूशैलीतील भूमिज या उपवास्तूशैलीत बांधले आहे. मंदिर वास्तूत नेहमी आढळणारे गर्भगृह, अंतराल, सभामंडप आणि नंदिमंडप (सभामंडपापासून थोडा पुढे) असे चार भाग आहेत. मंदिराचे शिखर विटांचे असून ते नंतर बांधलेले असावे. मंदिराच्या समोरच्या बाजूस दक्षिणेकडे नगारखाना आहे.
चित्रस्त्रोत : गुगल
भुलेश्वर मंदिरात रामायण आणि महाभारताचे काही शिल्पपट आहेत. ह्या शिल्पपटांची मूळची जागा म्हणजे नंदीमंडप आणि सभामंडपातील दर्शनी भाग आणि त्याच्या काटकोनात डाव्या उजव्या बाजूंना. या पैकी डाव्या बाजूला रामायण तर उजवे बाजूस महाभारत शिल्पपट आहेत. पैकी महाभारताचे तीन शिल्पपट संपूर्ण आहेत मात्र सध्याच्या जागेवर रामायणाचा एकच पट चांगल्या स्थितीत अस्तित्वात असून इतर दोन पट सध्याच्या जागेवर नाहीत. पैकी त्या उरलेल्या दोन पटांचे काही तुकडे (fragments) मात्र आपल्याला मंदिरातच इतरत्र चुकीच्या जागी जोडलेल्या स्थितीत पाहण्यास मिळतात जे शोधण्यास खूपच जिकिरीचे आहे.
सर्वात प्रथम रामायणातील काही शिल्पपटांची माहिती करून घेऊ या ;
१. राम लक्ष्मण सीता :-
इस्लामी वावटळीत मंदिराची झालेली नासधूस आणि नंतर पेशव्यांचे गुरु ब्रह्मेन्द्रस्वामी यांनी केलेला मंदिराचा जीर्णोद्धार यात हे रामायणाच्या शिल्पपटांचे तुकडे चुकीच्या जागी बसवले गेले.
चित्रस्त्रोत : गुगल
रामायणपटाचा पहिला तुकडा आपल्याला दिसतो तो मंदिराच्या बाहेर. पायर्यांनजीकच्या उजवे बाजूच्या भिंतीत. ह्याच भिंतीत शैव द्वारपालांच्या प्रतिमा सुद्धा बसवलेल्या आहेत.
दोन धनुर्धारी पुरुष आणि पाठीमागे एक भग्न स्त्री प्रतिमा असा हा प्रसंग. बहुधा राम लक्ष्मण आणि सीता. हा रामायणातला प्रसंग आहे याबद्दल यत्किंचितही शंका नाही, मात्र हा प्रसंग नेमका कुठला हे ओळखणे अवघड आहे. बहुधा राम, लक्ष्मण आणि सीता वनवासाला निघाल्याचा हा प्रसंग असावा.
२. रामायण अखंड शिल्पपट:-
दुसरा शिल्पपट थेट मंदिराच्या सभामंडपातच दिसतो. नंदीमंडप आणि सभामंडप यामधील डाव्या बाजूने काटकोनात वळताच उजव्या हाताला हा रामायणाचा अखंड शिल्पपट आहे. हा पट बराच विस्तृत असून पाच भागात कोरलेला आहे. मध्यभागी राम लक्ष्मण आणि त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूंना प्रत्येकी २/२ प्रसंग कोरलेले अशी याची रचना. अगदी अशाच पद्धतीचा महाभारतातील एक शिल्पपट याच्या बरोबर विरुद्ध बाजूस आपणास दिसतो.
चित्रस्त्रोत : गुगल
मध्यभागी जे दोन धनुर्धारी दिसत आहेत ते बहुधा राम-लक्ष्मण असावेत. तसेच हा प्रसंग सीतास्वयंवराच्या आधीचा असावा. कारण राम लक्ष्मण हे दोघेही दागदागिने तसेच राजवस्त्रांमध्ये येथे आहेत. विश्वामित्रांसोबर त्राटिका वध तदनंतर मिथिला नगरीच्या प्रवासापर्यंतचा हा प्रसंग असावा, अशी शक्यता आहे.
३. रामायण शिल्पपट (उजवी बाजू -पायसदान (खालचा पट) व सीतास्वयंवर (वरचा पट) )
चित्रस्त्रोत : गुगल
मध्यभागातील राम-लक्ष्मणांच्या डावीकडे असेच दोन शिल्पपट आपणास दिसतात.
यातील दोन्ही प्रसंग नक्की कुठले हे ओळखू येत नाहीत पण बहुधा हे प्रसंग रावणवधानंतर राम सीतेसह अयोध्येला परत येतात तेव्हाचे असावेत. कारण हे दोघेही आसनस्थ असून सेवक उभे आहेत तर वानरांनाही उच्चासन दिलेले असून ते हात जोडून नम्र भावाने बसलेले दिसतात.
४. रामायण शिल्पपट
चित्रस्त्रोत : गुगल
यातील एक भाग जो पायर्यांपाशी असलेल्या भिंतीत आहे तो आपण यापूर्वीचा पाहिला आहे. यातीलच दुसरा एक शिल्पपट येथेच नंदीमंडपाच्या उजवीकडील भिंतीत छताच्या खालच्या बाजूला आणि छताला जोडून असा लावलेला असल्याचा आपणास दिसतो. तर अजून एक भाग भाग याच्या बरोबर समोरील बाजूस छताच्या खालीच असा दिसतो. हे दोन्ही पट पूर्णपणे अंधारी आणि चुकीच्या जागेत लावलेले असल्याने शोधणे तसे जिकीरीचेच आहे.
५. मारिचवध
उजव्या बाजूस सुवर्णमृगाचे रूप ल्यालेल्या मारीचाचा वध राम करत आहे. मृगाच्या धडातून राक्षसदेहधारी मारिच प्रकट होत असून मृगशीर खाली पडलेले आहे.
चित्रस्त्रोत : गुगल
मरताना रामाच्या आवाजात 'लक्ष्मणा धाव' असा आर्त टाहो फोडल्यामुळे भयशंकित झालेल्या सीतेने लक्ष्मणाला रामाचा परामर्श घेण्यासाठी पाठवलेले आहे आणि ही संधी साधून ऋषीवेषातील कमंडलूधारी रावण रामकुटीसमोर सीतेला भि़क्षा मागण्यासाठी पुढे आला असून सीता त्याला भिक्षा देण्याच्या अगदी बेतात आहे.
६. अगम्य शिल्पपट
चित्रस्त्रोत : गुगल
ह्या पटात वृक्ष्, त्यावर वानरे, पक्षी आदी दाखवलेले असून काह्ली वनांमध्ये प्राणी दाखवलेले आहेत. एक अंदाज म्हणाल तर ह्यात सुग्रीवाच्या किष्किंधानगरीतला किंवा रावणाच्या अशोकवनापैकी एखादा प्रसंग असू शकेल.
महाभारतातील काही शिल्पपट :-
महाभारतातील शिल्पपट रामायणातील शिल्पपटाच्या तुलनेत संपूर्ण आणि सलगपणे बर्यापैकी अवस्थेत आहेत. पैकी एक अखंड पट हा द्रौपदी स्वयंवराचा असून हा सभापर्वातील आहे तर इतर दोन पट हे भारतीय युद्धातील भीष्मपर्व, द्रोणपर्व आणि शल्यपर्व ह्या पर्वांमधील आहेत.
रामायण पटाच्या विरुद्ध बाजूला म्हणजे मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूपासून हे पट सुरु होतात.
१. द्रौपदीस्वयंवर संपूर्ण शिल्पपट:-
चित्रस्त्रोत : गुगल
यातील सर्वात उजवीकडे द्रुपद राजा हा सिंहासनावर बसलेला असून खालच्या बाजूला द्रौपदीची शिवपूजा दाखवलेली आहे.
द्रुपदाच्या
डाव्याकडे शंख चक्र गदा, पद्मधारी श्रीकृष्ण द्रुपदाशी बोलताना दाखवलेला
आहे. भुलेश्वर मंदिरातील हे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे जे की येथील
शिल्पांमध्ये श्रीकृष्णाला त्याच्या विष्णूरुपी दैवी स्वरुपात दाखवते.
कृष्णाच्या डावीकडे तीन पांडव आहेत. युधिष्ठिर, नकुल आणि सहदेव, ज्यांची वेषभूषा मृगाजिने धारण केल्यामुळे ऋषींसारखी आहेत. नुकतेच ते वारणावतातील लाक्षागृहातून सुटून आल्याने ते ओळख लपवण्यासाठी मृगाजिने धारण करुन द्रौपदी स्वयंवर पाहण्यासाठी आलेले आहेत. अर्जुन मात्र मत्स्यभंग पण पूर्ण करण्यासाठी सज्ज असल्यामुळे तसेच भीम हा त्याच्या संरक्षणासाठी गेल्यामुळे ह्यात तीनच पांडव दाखवलेले आहेत. पांडवांच्या बाजूला द्रौपदी हाती वरमाला घेऊन सज्ज असून तिच्या शेजारी बंधू खङगधारी दृष्टद्द्युम्न आहे.
२. अर्जुनकृत मत्स्यभंग (मधली बाजू)
चित्रस्त्रोत : गुगल
या मधल्या पटात अर्जुन खालच्या पाण्यात बघून वरच्या बाजूस चक्राकार फिरत असलेल्या मत्स्याचा नेत्र भंग करण्यासाठी प्रत्यंचेला बाण जोडून सज्ज आहे. अर्जुनाचा मृगाजीनधारी वेष स्पष्ट दिसतोय.
३. अर्जुन -भीष्म युद्ध :-
चित्रस्त्रोत : गुगल
कितीही प्रयत्न करूनही भीष्म अवध्य असल्याचे बघून रात्री कौरवशिबिरात जाऊन पांडव भीष्मालाच त्याच्या वधाचा उपाय विचारतात तेव्हा भीष्म पूर्वी स्त्री असलेल्या शिखंडीशी मी युद्ध करणार नाही असे म्हणून अप्रत्यक्षपणे शिखंडीच्या आडून युद्ध करण्याचे पांडवांना सुचवतात.
ह्या पटात डावीकडे तालध्वजासहित भीष्म असून उजवीकडे कपीध्वजधारी अर्जुन आहे अर्जुनाच्या पुढ्यात शिखंडी त्याच्या मेषध्वजासह भीष्मावर शरवर्षाव करताना दिसत आहे. सध्या जरी भग्न असले तरी मूळतून अतिशय सुंदर असे हे शिल्प आहे.
४. भीष्म शरशय्या:-
चित्रस्त्रोत : गुगल
भीष्म हा शरशय्येवर पडलेला असून त्याच्या आजूबाजूला कौरव पांडव हे शोक व्यक्त करत बसलेले आहेत. अर्जुन मात्र उभा असून तो भीष्माला तहान लागली म्हणून भूमीत बाण मारून पाणी काढण्याच्या अविर्भावात आहे.
५. अर्जुन- कौरववीर युद्ध:-
चित्रस्त्रोत : गुगल
कपीध्वज अर्जुन एका कौरवाबरोबर युद्ध करताना दाखवलेला असून कौरवयोद्ध्या त्याच्या ध्वजासहित भग्न असल्याने ओळखू येत नाही.
६. भीम-गजयुद्ध
चित्रस्त्रोत : गुगल
द्रोणपर्वात
अर्जुनाची खबरबात घ्यायला जाताना एकटा भीम कौरवांच्या महाप्रचंड सैन्यात
घुसतो तो एकेका हत्तीलाच आपल्या बाहूंच्या साहाय्याने उचलून फेकतच.
एकेक
करुन हत्ती भीमावर चालून येत आहेत आणि भीम त्यांना भिरकावून देत देत
मार्गक्रमण करत चालला आहे. भीमाच्या भग्न झालेल्या हाताची बोटे हत्तीच्या
पायाभोवती घट्ट आवळलेली दिसून येतात.
७. शल्ययुद्ध
चित्रस्त्रोत : गुगल
शल्याचा वध युधिष्ठिराकडून होतो मात्र युधिष्ठिराच्या ध्वजावर नंद आणि उपनंद अशा नावाचे दोन मृदंग आहेत जे ह्या शिल्पाशी जुळत नाहीत. मात्र विरोधातला कौरववीर शल्य मात्र त्याच्या नांगरधारी ध्वजामुळे अगदी सहज ओळखू येतोय.
हे शिल्पपट पौराणिक आणि रामायण , महाभारत यांची अनमोल माहिती देतात. असे हे दुर्मिळ शिल्पपट रामायण आणि महाभारताचा सखोल अभ्यास असेल तर अत्यंत बारकाईने निरीक्षण केल्यानंतर काही अंशी तर ओळखता येतात.
स्रोत:-
https://mr.vikaspedia.in/education/apala-maharashtra/92e93993e93093e93794d91f94d930-91593f93294d932947/92d94193294793694d935930भुलवून टाकणारे सौंदर्य: दौलत-मंगळ भुलेश्वर
इतके कांदे-पोहे खाऊन दर रविवारी इतका पकलो आहे कि बास आता म्हणून मी घरातून जवळपास पळूनच गेलो काल. आणि गेलो ते डायरेक्ट सौंदर्य नगरीत.मूक सौंदर्य, शिल्प सौंदर्य, शब्दशहा भुलवून टाकणारे सौंदर्य! कमाल !
बरेच दिवस येथे जायचा मानस होता पण भूषण पुण्याला येणार मग आम्ही जाणार असा योग काही जुळत नव्हता. आज तो सकाळीच ९ वाजता शिवाजीनगर ला उपस्थित झाला आणि मग गाडीवर दोघेच चालू झालो.
पुण्याहून खाली सासवड, इंदापूर भागात बरेच काही बघण्यासारखे आहे. इंदापूर हे गाव कायम मला अवर्षण ग्रस्त गाव वाटायचे का काय माहित.
खाली नकाशात गोल केलेले बघितले तर एका दिवसात फिरायला बरेच काही आहे. एक दिवस मंदिर स्पेशल ठेऊन थेउर, भुलेश्वर, जेजुरी, मोरगाव, लोणी भापकर, पांडेश्वर, बसवेश्वर अशी बरीच प्राचीन वा जुनी मंदिरे पाहता येतात. एक ट्रीप मारून एक मंदिर बघितले तरी ते वर्थ आहे. पांडवकालीन, हेमांडपंथी पद्धतीने बांधलेली ही देवालये आणी त्यातली शिल्पकला,स्थापत्यकला केवळ अद्भुत आहे.
बोपदेव घाटाचा परीसर फोटो काढायला फार मस्त आहे सध्या. ( आम्हीही काही दाखवायचे फोटो काढून घेतले हेही जाता जाता)
एवढा पाऊस पडून, संपूर्ण प्रदेश हिरवागार होऊनही याच्या नशिबात नव पालवी नसावी. वार्धक्याच्या खुणा सोसतच काही आयुष्ये सुखाला समांतर जातात.
येथून सरळ गेले की माळशिरस गाव आणी डावीकडे बोपदेव घाट.
पाऊस थांबला तसे आम्ही मंदिरात पोहोचलो. गणपतीचे दिवस असल्याने गर्दी जास्त नव्हती. मंदिराच्या कळसाची डागडुजी चालू असून शिल्पांना चुनकळीच्या रंगाने लेप देण्याच्या प्रकार सुरु आहे असे समजले. जो माणूस हे सांगत होता त्याच्या मित्राने सगळे ऐकून एकाच प्रश्न विचारला. "जमणार आहे का पण आपल्या लोकांना हे?"
तेही खरच आहे म्हणा,कारण इतके बारीक आणी तपशिलात हे कोरीवकाम केलेले आहे की त्याचे कोटिंग करणे पण सोपे काम नाहीये. असो.
इतकी वर्षे स्वतःचे अस्तित्व जपून उभे असलेले हे मंदिर म्हणजे दौलत मंगळ किल्ल्याचा भाग आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार ढासळलेल्या अवस्थेत असून पायरी वाटेने आल्यास त्याचे अवशेष दिसतात.
बाकी एक भलामोठा बुरुज आणी एक मोठे प्रवेशद्वार आजही भक्कम स्थितीत आहे.
आता येथून सुरु झाली ऐतिहासिक शिल्पांची अद्भुत सफर आणी स्थापत्यकलेच्या सौंदर्याची मुक्त उधळण.
कॅमेरे सरसावून, बूट काढून दोन पाऊले चाललो तेवढ्यात पहिल्याच प्रवेशद्वारापासून अत्यंत सुबक आणि प्रेक्षणीय शिल्पांचे दर्शन घडले. निव्वळ शब्दातीत.
मंदिरात प्रवेश केला आणी एकदम यादवकाळात गेलो. ऐतिहासिक श्रीमंती म्हणजे काय ते क्षणा क्षणाला कळत होते. मंदिरात पूर्णतः काळोख आणी काही ठिकाणी केलेली नैसर्गिक प्रकाशव्यवस्था.
Entry Fee : There is nominal entry charges are taken by per vehicle Rs. 10 to 50.
Bhuleshwar AKA Daulatmangal Fort
Bhuleshwar AKA Daulatmangal Fort
Type: Hill fortsGrade: Easy (You can drive till top)
Base Village: Off Urali Kanchan, beforeYevat
Distance: 45 KMs from Pune
Route: Pune-Solapur Road
Time visited: Feb 2011
Time to see around: 1 hour max
How to visit: From swargate hit Pune-Solapur highway. After the
toll road ends at Urali-Kanchan, (2 Kms before Yevat) take right turn
along eastern bank of canal. The fort should be around 8 Km. There is
small ghat but the road is good condition. This raod further goes down
to Saswad. There is right side diversion just as the Ghat ends and a
bumpy road with pretty steep with sharp turn’s lead you right till the
temple on the top of the fort.
Every time I visit Solapur I promise myself that I need to take
out time and visit Bhuleshwar temple on the Daulatmangal fort. This
Sunday finally I headed for this amazing place. Started at 6.45/7 we hit
the cool breezy road. The Sun was out smiling as the sleepy traffic
moved calmly at Magarpatta and Hadapsar.
After the toll ended we stopped at our favourite stop- Kanchan for steamy breakfast. Mouth-watering Hot Idlis and Dosa on fresh green leaf with yummy sambar recharged our energy that we would need for next few hours. We strolled for few minutes in the Nishigand and Marigold farms on the opposite side.
I could easily locate Bhuleshwar behind the hotel. After turning on right the road from Solapur highway it become lonely amid the dry arid landscape. A few leafy green of mostly Banana and Papai farms are only ones that add beauty to the parched yellows and muddy browns. Well just at the ghat starts, the large number of misty Jacoranda tress adds the delightful voilets. Throughout this road, the temple is always visible in front of you.
The striking Buruj towers at both ends draw you attention. There are two connected towers probably now a home to a few people is at the centre. Not sure if these were built recently...
There is good stairway built from half of the fort to the
temple but since the road is pretty steep with barely one vehicle could
pass safely I could locate a place to park my car. We finally reached
the top from the left side. I could locate 2 Buruj on the way. The fort
is supposed to be built around the temple in 16th century by Murar
Jagdev after he had looted Pune.
Bhuleswar Temple is very old and said to be built in 12th century
by Choula Rulers. The temple is centrally located on a huge platform.
The closer look of the roof towers highlights the magnificient artistic
detailed designs.
The Hemadpanthi temple is amazing built using Black besalt rock. Somehow this temple gave me memories of Halebidu-Bellur temples. The beautiful carving starts right from the door of the temple. A right climb traverse in the dark lead you to a huge opening to the main temple. A beautifully carved Nandi draws you attention. Every inch on the main temple wall and every pillar has extremely fascinating and wonderful intricate carvings with some having mythological references.
The temple bears many signs of invasion and destruction as you
can see typical destruction of all the artistic work- where hands and
heads are chopped off. It said that Aurangzeb had invaded this fort
before invasion of Jejuri.
With a promise to myself that I would visit back this mystic place
once again in rains when the scorched yellows would turn into radiant
greens, we proceeded to Ramdara.
http://ekpravas.blogspot.com/2011/02/bhuleshwar-aka-daulatmangal.html
सिंहगडावरून निघालेल्या सह्याद्रीच्या रांगेत माळशिरस गावाच्या उत्तरेस व यवतच्या नैऋत्येस ७०० फूट उंचीवर मध्यास भुलेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या भिंतीवरील शिल्पात कोरीवकाम व मूर्तिकाम अद्वितीय आहे. लढाईच्या काळात बऱ्याच मूर्तींची तोडफ़ोड करण्यात आली. या मंदिरात स्त्री रूपातील गणपतीची मूर्ती आहे. गाभाऱ्यात शिवलिंग आहे. मात्र फ़क्त पूजेसाठीच ते पिंडीवर ठेवण्यात येते. मंदिराच्या आत छायाचित्रणास बंदी आहे. महाशिवरात्रीला येथे गर्दी होते.पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावातून श्रावण महिन्यात येथे भुलेश्वराची पालखी नेली जाते. दर सोमवारी यात्रा भरते. ही जुनी परंरपरा आहे.या मंदिराविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात. परंतु पत्रकार कवी दशरथ यादव यांनी संशोधन करून यादवकालीन भुलेश्वर हे एतिहासिक संशोधनपर पु्स्तक लिहिले आहे.हे एकमेव पुस्तक असून, महिमा भुलेश्वराचा गाण्याचा अल्बमही त्यांनी काढला आहे. शहाजीराजे यांच्या सुपे परगण्यातील हे ठिकाण असून राजामाता जिजाऊ बालशिवबाला घेऊन येत असत.सुरुवातीला हा गड निजामाचा सरदार मुरारजोगदेव याच्याकड़े होता. पुणे जाळल्यावर प्रांताचा कारभार मामले दॅालत मंगळ भुलेश्रर येथून होत होता.
मंदिराची रचना
अर्धखुला मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा या मंदिराचा तलविन्यास आहे. या मंदिरासमोर नंदीमंडपही आहे. गर्भगृहाच्या बाह्यभिंतीवर पाच देवकोष्ठे तर अंतराळाच्या बाह्यभिंतीवर दोन देवकोष्ठे आहेत. अर्धखुल्या मंडपाच्या खालच्या थरावर सिंह आणि हत्ती तर वरच्या थरावर पुराणकथांमधील दृश्ये कोरलेली आहेत. मंदिराच्या आवाराभोवती असलेल्या भिंतीला सोळा देवकुलिका आहेत.
मंदिराची शैली
या मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आयताकृती व पाकळ्यासदृश आहे. इतर हेमाडपंती मंदिरांच्या तुलनेत या मंदिरातील शिल्परचना अधिक उच्च प्रतीची आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरांच्या बाहेरील प्राकाराची रचना उत्तरेतील जैन मंदिरांच्या धर्तीवर आहे. येथील शिवमंदिरास भुलेश्वर-महादेव किंवा यवतेश्वर म्हणतात.पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावाजवळील हे मंदिर यादवकाळात बांधले आहे. मंदिराची मूळ बांधणी १३व्या शतकातील असून सभोवतालची भिंत, नगारखाना व शिखरे १८व्या शतकातील मराठा शैलीतील आहेत. पूर्वी मूळ मंदिरास अतिभव्य प्राकार होता व नंदीचा मंडप स्वतंत्र होता. १८व्या शतकात झालेल्या जीर्णोद्धारानंतर हे मंदिर एकाच छताखाली आले.
मंदिराचा गाभारा
या मंदिराचे गर्भगृह खोल असून गर्भगृहासमोर उंचावर काळ्या दगडातील कोरीव काम केलेला नंदी आहे. नंदीच्या उजव्या बाजूस एक ओटा असून त्यावर कासवावर बसलेला नंदी असावा. हल्ली त्याचे फक्त डोके शिल्लक असल्यामुळे हा प्राणी निश्चित कोणता असावा हे कळत नाही. गर्भगृहातील शिवलिंगाच्या संगमरवरी बाणावर पितळी मुखवटा बसवलेला आहे. बाण काढल्यानंतर खाली आत तीन मुख्य लिंगे, तीन कोपऱ्यात उंचवट्याच्या स्वरूपात असून ती ब्रह्मा, विष्णू व महेश यांची प्रतीके आहेत. पिंडीच्या खाली असलेल्या खोलगट भागात नैसर्गिकरीत्या पाणी पाझरत असते. अन्य शिवमंदिरापेक्षा येथे अनेक वैशिष्ट्ये आढळतात. कीर्तिमुखे, उंबरठ्यांच्या मध्यभागी न काढता दोन्ही अंगास कोरलेली आहेत. गाभाऱ्याच्या गणेशपट्टीवर गणपतीचे चित्र असले तरी देवळाभोवती असणाऱ्या दक्षिणभिमुख पट्ट्यांवर गणेशाऐवजी भैरवाचे शिल्प कोरलेले आहे. ओवऱ्या व दगडात कोरलेल्या खिडक्या यांची एकाआड एक मांडणी केलेली आहे.
मंदिरातील शिल्पे
या मंदिरात मोठ्या प्रमाणात मानवी व देवतांची शिल्पे आहेत. देवळाभोवती असलेल्या ओवऱ्यांमध्ये अनेक देवतांच्या मूर्ती असून काही ओवऱ्या रिकाम्या आहेत. मुख्य सभामंडपांच्या भोवती असलेल्या अर्ध भिंतींवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण-महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. महाभारतातील प्रसंग भारतातील इतर मंदिरांपेक्षा येथे जास्त ठसठशीत व रेखीव आहेत. द्रौपदी-स्वयंवर, शरपंजरी भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही कथाशिल्पे अधिक जिवंत वाटतात. मातृकादेवी, गणपती, विष्णूंचे अवतार, योद्धे, पक्षी इत्यादी विविध प्रकारचे शिल्पांकन मंदिरात आढळते.
कुंभ, कमळ कीर्तिमुख, मकर, पाने-फळे, वेलबुट्ट्या ही शुभचिन्हे मंदिराच्या सुशोभनात वापरलेली आहेत. येथील दर्पणधारी स्त्रीमूर्ती शिल्पकलेचा सुंदर नमुना आहे. दक्षिण दरवाज्यावर असलेल्या भरत-शत्रुघ्नाच्या डाव्या बाजूस दोन चौघडावाले उंट दाखवलेले आहेत. दक्षिणेकडील मंदिरात उंटाचे शिल्प क्वचितच आढळते. माळव्यात प्रचलित असलेल्या भूमिज उपशैलीचा प्रभाव येथील काही शिल्पांवर ठळकरीत्या आढळतो. यादव साम्राज्याची इतिश्री झाल्यानंतर यवनांकडून महाराष्ट्रातील अनेक मंदिरांची, शिल्पांची नासधूस करण्यात आली. भुलेश्वर मंदिरातील शिल्पांचेही या काळात अतोनात नुकसान झाले. (युद्ध आणि परकीय आक्रमण) इतके असूनही या मंदिरातील शिल्लक राहिलेल्या शिल्पांमुळे येथील सौंदर्य अद्यापि टिकून आहे.
मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस वर तीन सप्तमातृकांच्या समूहात गणेशाचे स्त्रीस्वरूपातले दुर्मीळ शिल्प आहे. वेरूळच्या कैलास लेण्यात या प्रकारचे शिल्प आढळते. प्राचीन वाङ्मयात व स्कंदपुराणाच्या काशीखंडात चौसष्ट योगिनींच्या यादीत या गणेशाचा ‘वैनायकी’ असा केलेला आढळतो. देवीसहस्रनामांत या देवतेस ‘विनायकी, लंबोदरी, गणेश्वरी’ अशा विशेषणांनी संबोधले आहे. ‘शिल्परत्न’ या ग्रंथात वैनायकीचा उल्लेख ‘शक्तिगणपती’ असा केलेला आहे. गुप्तकाळात प्रथम सप्तमातृका शिल्पाचा उगम झाला. मध्ययुगात शक्तिपूजक संप्रदायात वैनायकी पूजनाचे महत्त्व वाढले. वैनायकी शिल्पे गजमुख, चतुर्भुज आणि गणपतीप्रमाणे आयुधे धारण केलेली आढळतात. भुलेश्वर येथील वैनायकी शिल्पे पद्मासनात बसलेली असून सालंकृत आहेत. खाली मूषक हे वाहन आहे. येथे वेरूळच्या लेण्याप्रमाणे पूर्ण शिल्पपट्टिका नसून तीन सप्तमातृकांच्या शिल्पपट्टीत वैनायकीची शिल्पे आहेत.
दौलतमंगल किल्ला आणि मंदिरांचा जीर्णोद्धार
१६३४मध्ये विजापूरचा सरदार मुरार जगदेव याने या डोंगरावर ‘दौलत मंगळ’ नावाचा किल्ला मांडला. (शिवचरित्र प्रदीप – १९२५) या किल्ल्याचा भग्न बुरूज अद्यापही देवळाकडे जाताना उजव्या बाजूस दृष्टीस पडतो. पहिले बाजीराव पेशवे व सातारचे शाहू छत्रपती यांचे गुरू ब्रह्मेंद्रस्वामी यांनी अनेक हेमाडपंथी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. १७३७मध्ये स्वामींनी एक लाख रुपये खर्चून तीन कमानींचा नगारखाना, सभामंडप व तीन चुनेगच्ची शिखरे बांधली. हे बांधकाम संभाजी व व्यंकोजी नाईक या गवंड्यांनी केले. देवळाच्या बांधकामात स्वामी जातीने लक्ष पुरवित असत. दमाजी गायकवाड या सरदाराने पवारांवर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ जीर्णोद्धारास पंचवीस हजार रुपये दिले. वसईच्या विजयानंतर चिमाजी अप्पांनी भुलेश्वरास मुकुटाकरिता १२५ रुपये व सव्वाशे सोन्याच्या पुतळ्या अर्पण केल्याची नोंद ऐतिहासिक साधनांमध्ये आहे. ब्रह्मेंद्रस्वामींनी माळशिरस व यवतमध्ये विहिरी व तळी बांधून दिली. येथील जीर्णोद्धारामुळे हे मंदिर भूमिज -मराठा समिश्र वास्तुशैलीचे झालेले आहे.
भुलेश्वर मंदिरातील शिल्पे, शिल्पसौंदर्याचा उत्तम आविष्कार आहेत. पुरातत्त्वखात्याने हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्थळ म्हणून घोषित केलेले आहे.
भुलेश्वर – ना भुलेंगे कभी
१५ डिसेंबर २०१९ (फिरस्ती महाराष्ट्राची बरोबर)
धवल रामतीर्थकर


































































































तर मित्रहो हाच तो क्षण, हीच ती वेळ… या फोटो बरोबरच आमची सहल समाप्त.
या वेळी मी लिखाण चित्रांच्या माध्यमातून केले आहे. पण सर्व फोटो पाहता एक
लक्षात आले की माझा कॅमेरा खराब झाला आहे. आदल्या दिवशीच तो माझ्या हातातून
पडला होता आणि त्याचे परिणाम बऱ्याच फोटो मध्ये स्पष्ट दिसून येतात.
सांभाळून घ्यावे ही विनंती.
जाता जाता फिरस्ती महाराष्ट्राची ने आयोजित केलेल्या भुलेश्वर – सासवड सहली बद्दलचे माझे प्रामाणिक मत, ज्याने ग्रुपवर खळबळ उडवली होती…
https://titbitz.wordpress.com/2019/12/18/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%AD%E0%A5%80/
भुलेश्वर मंदिर, माळशिरस
भुलेश्वर एक अप्रतिम आविष्कार पण भूललेला ! पण तीथे गेल्यावर तो आजही
आम्हास सर्व विश्व भुलावयास भाग पडतो असा त्याचा सुरेख सुंदर लोभस नजारा
!!!
भुलेश्वर हे पुण्याजवळील(भुलेश्वर मुंबई चे नव्हे) प्राचीन मंदिर
असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे. हे ठिकाण महादेवाच्या पांडवकालीन मंदिरासाठी
प्रसिद्ध आहे. मूलतः हे ठिकाण “मंगलगड” असे होते. तेराव्या शतकात देवगिरीकर
यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंती मंदिरे निर्माण
करण्यात आली. याच शतकाच्या मध्यास भुलेश्वर मंदिराचे बांधकाम झाले असावे.
सिंहगडावरून निघालेल्या सह्याद्रीच्या रांगेत माळशिरस गावाच्या उत्तरेस व
यवतच्या नैऋत्येस ७०० फूट उंचीवर मध्यास भुलेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या
भिंतीवरील शिल्पात कोरीवकाम व मूर्तिकाम अद्वितीय आहे. लढाईच्याकाळात
बर्याच मूर्तींची तोडफ़ोड करण्यात आली. या मंदिरात स्त्री रूपातील गणपतीची
मूर्ती आहे. गाभार्यातशिवलिंग आहे. मात्र फ़क्त पूजेसाठीच ते पिंडीवर
ठेवण्यात येते. मंदिराच्या आत छायाचित्रणास बंदी आहे. महाशिवरात्रीला येथे
गर्दी होते.पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावातून श्रावण महिन्यात येथे
भुलेश्वराची पालखी नेली जाते. दर सोमवारी यात्रा भरते. ही जुनी परंरपरा
आहे.या मंदिराविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात. परंतु पत्रकार कवी दशरथ
यादव यांनी संशोधन करून यादवकालीन भुलेश्वर हे एतिहासिक संशोधनपर पु्स्तक
लिहिले आहे.हे एकमेव पुस्तक असून, महिमा भुलेश्वराचा गाण्याचा अल्बमही
त्यांनी काढला आहे. शहाजीराजे यांच्या सुपे परगण्यातील हे ठिकाण असून
राजामाता जिजाऊ बालशिवबाला घेऊन येत असत.सुरवातीला हा गड निजामाचा सरदार
मुरारजोगदेव याच्याकड़े होता. पुणे जाळल्यावर प्रांताचा कारभार मामले दॅालत
मंगळ भुलेश्रर येथून होत होता.
मंदिराची रचना
अर्धखुला मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा या मंदिराचा
तलविन्यास आहे. या मंदिरासमोर नंदीमंडपही आहे. गर्भगृहाच्या बाह्यभिंतीवर
पाच देवकोष्ठे तर अंतराळाच्या बाह्यभिंतीवर दोन देवकोष्ठे आहेत. अर्धखुल्या
मंडपाच्या खालच्या थरावर सिंह आणि हत्ती तर वरच्या थरावर पुराणकथांमधील
दृश्ये कोरलेली आहेत. मंदिराच्या आवाराभोवती असलेल्या भिंतीला सोळा
देवकुलिका आहेत.
या मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होयसळ
मंदिराप्रमाणे आयताकृती व पाकळ्यासदृश आहे. इतर हेमाडपंती मंदिरांच्या
तुलनेत या मंदिरातील शिल्परचना अधिक उच्च प्रतीची आहे. पूर्वाभिमुख
असलेल्या या मंदिरांच्या बाहेरील प्राकाराची रचना उत्तरेतील जैन
मंदिरांच्या धर्तीवर आहे. येथील शिवमंदिरास भुलेश्वर-महादेव किंवा यवतेश्वर
म्हणतात.पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावाजवळील हे मंदिर यादवकाळात बांधले
आहे. मंदिराची मूळ बांधणी १३व्या शतकातील असून सभोवतालची भिंत, नगारखाना व
शिखरे १८व्या शतकातील मराठा शैलीतील आहेत. पूर्वी मूळ मंदिरास अतिभव्य
प्राकार होता व नंदीचा मंडप स्वतंत्र होता. १८व्या शतकात झालेल्या
जीर्णोद्धारानंतर हे मंदिर एकाच छताखाली आले.
या मंदिराचे गर्भगृह खोल
असून गर्भगृहासमोर उंचावर काळ्या दगडातील कोरीव काम केलेला नंदी आहे.
नंदीच्या उजव्या बाजूस एक ओटा असून त्यावर कासवावर बसलेला नंदी असावा.
हल्ली त्याचे फक्त डोके शिल्लक असल्यामुळे हा प्राणी निश्चित कोणता असावा
हे कळत नाही. गर्भगृहातील शिवलिंगाच्या संगमरवरी बाणावर पितळी मुखवटा
बसवलेला आहे. बाण काढल्यानंतर खाली आत तीन मुख्य लिंगे, तीन कोपर्यात
उंचवट्याच्या स्वरूपात असून ती ब्रह्मा, विष्णू व महेश यांची प्रतीके आहेत.
पिंडीच्या खाली असलेल्या खोलगट भागात नैसर्गिकरीत्या पाणी पाझरत असते.
अन्य शिवमंदिरापेक्षा येथे अनेक वैशिष्ट्ये आढळतात. कीर्तिमुखे,
उंबरठ्यांच्या मध्यभागी न काढता दोन्ही अंगास कोरलेली आहेत. गाभार्याच्या
गणेशपट्टीवर गणपतीचे चित्र असले तरी देवळाभोवती असणार्या दक्षिणभिमुख
पट्ट्यांवर गणेशाऐवजी भैरवाचे शिल्प कोरलेले आहे. ओवर्या व दगडात
कोरलेल्या खिडक्या यांची एकाआड एक मांडणी केलेली आहे.
मंदिरात मोठ्या
प्रमाणात मानवी व देवतांची शिल्पे आहेत. देवळाभोवती असलेल्या ओवर्यांमध्ये
अनेक देवतांच्या मूर्ती असून काही ओवर्या रिकाम्या आहेत. मुख्य
सभामंडपांच्या भोवती असलेल्या अर्ध भिंतींवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती
इत्यादी प्राणी व रामायण-महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. महाभारतातील
प्रसंग भारतातील इतर मंदिरांपेक्षा येथे जास्त ठसठशीत व रेखीव आहेत.
द्रौपदी-स्वयंवर, शरपंजरी भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही कथाशिल्पे
अधिक जिवंत वाटतात. मातृकादेवी, गणपती, विष्णूंचे अवतार, योद्धे, पक्षी
इत्यादी विविध प्रकारचे शिल्पांकन मंदिरात आढळते.
कुंभ, कमळ कीर्तिमुख,
मकर, पाने-फळे, वेलबुट्ट्या ही शुभचिन्हे मंदिराच्या सुशोभनात वापरलेली
आहेत. येथील दर्पणधारी स्त्रीमूर्ती शिल्पकलेचा सुंदर नमुना आहे. दक्षिण
दरवाज्यावर असलेल्या भरत-शत्रुघ्नाच्या डाव्या बाजूस दोन चौघडावाले उंट
दाखवलेले आहेत. दक्षिणेकडील मंदिरात उंटाचे शिल्प क्वचितच आढळते. माळव्यात
प्रचलित असलेल्या भूमिज उपशैलीचा प्रभाव येथील काही शिल्पांवर ठळकरीत्या
आढळतो. यादव साम्राज्याची इतिश्री झाल्यानंतर यवनांकडून महाराष्ट्रातील
अनेक मंदिरांची, शिल्पांची नासधूस करण्यात आली. भुलेश्वर मंदिरातील
शिल्पांचेही या काळात अतोनात नुकसान झाले. इतके असूनही या मंदिरातील शिल्लक
राहिलेल्या शिल्पांमुळे येथील सौंदर्य अद्यापि टिकून आहे.
मंदिराच्या गाभार्याच्या बाहेरील बाजूस वर तीन सप्तमातृकांच्या समूहात गणेशाचे स्त्रीस्वरूपातले दुर्मीळ शिल्प आहे. वेरूळच्या कैलास लेण्यात या प्रकारचे शिल्प आढळते. प्राचीन वाङ्मयात व स्कंदपुराणाच्या काशीखंडात चौसष्ट योगिनींच्या यादीत या गणेशाचा ‘वैनायकी’ असा केलेला आढळतो. देवीसहस्रनामांत या देवतेस ‘विनायकी, लंबोदरी, गणेश्वरी’ अशा विशेषणांनी संबोधले आहे. ‘शिल्परत्न’ या ग्रंथात वैनायकीचा उल्लेख ‘शक्तिगणपती’ असा केलेला आहे. गुप्तकाळात प्रथम सप्तमातृका शिल्पाचा उगम झाला. मध्ययुगात शक्तिपूजक संप्रदायात वैनायकी पूजनाचे महत्त्व वाढले. वैनायकी शिल्पे गजमुख, चतुर्भुज आणि गणपतीप्रमाणे आयुधे धारण केलेली आढळतात. भुलेश्वर येथील वैनायकी शिल्पे पद्मासनात बसलेली असून सालंकृत आहेत. खाली मूषक हे वाहन आहे. येथे वेरूळच्या लेण्याप्रमाणे पूर्ण शिल्पपट्टिका नसून तीन सप्तमातृकांच्या शिल्पपट्टीत वैनायकीची शिल्पे आहेत.
दौलतमंगल किल्ला –
१६३४मध्ये विजापूरचा सरदार मुरार जगदेव याने या
डोंगरावर ‘दौलत मंगळ’ नावाचा किल्ला मांडला. (शिवचरित्र प्रदीप – १९२५) या
किल्ल्याचा भग्न बुरूज अद्यापही देवळाकडे जाताना उजव्या बाजूस दृष्टीस
पडतो.
पहिले बाजीराव पेशवे व सातारचे शाहू छत्रपती यांचे गुरू ब्रह्मेंद्रस्वामी यांनी अनेक हेमाडपंथी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. १७३७मध्ये स्वामींनी एक लाख रुपये खर्चून तीन कमानींचा नगारखाना, सभामंडप व तीन चुनेगच्ची शिखरे बांधली. हे बांधकाम संभाजी व व्यंकोजी नाईक या गवंड्यांनी केले. देवळाच्या बांधकामात स्वामी जातीने लक्ष पुरवित असत. दमाजी गायकवाड या सरदाराने पवारांवर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ जीर्णोद्धारास पंचवीस हजार रुपये दिले. वसईच्या विजयानंतर चिमाजी अप्पांनी भुलेश्वरास मुकुटाकरिता १२५ रुपये व सव्वाशे सोन्याच्या पुतळ्या अर्पण केल्याची नोंद ऐतिहासिक साधनांमध्ये आहे. ब्रह्मेंद्रस्वामींनी माळशिरस व यवतमध्ये विहिरी व तळी बांधून दिली. येथील जीर्णोद्धारामुळे हे मंदिर हेमाडपंथी-मराठा समिश्र वास्तुशैलीचे झालेले आहे.
भुलेश्वर मंदिरातील शिल्पे, शिल्पसौंदर्याचा उत्तम आविष्कार आहेत.
पुरातत्त्वखात्याने हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्थळ म्हणून घोषित केलेले
आहे. मात्र भिंतीवर नाव लिहिण्याचा आमचा नादच खुळा कायम आहे हे पाहून खेद
होतो.
म्हणून हे भुलेश्वरा आम्हाला केवळ सौंदर्यदृष्टी देऊ नकोस, तर सजीव-निर्जीव सर्वांचा आदर करण्याची बुद्धी नक्की दे !!!
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
।।फक्तइतिहास।।
https://faktitihas.wordpress.com/page/5/
भुलवून टाकणारे सौंदर्य: दौलत-मंगळ भुलेश्वर
इतके कांदे-पोहे खाऊन दर रविवारी इतका पकलो आहे कि बास आता म्हणून मी घरातून जवळपास पळूनच गेलो काल. आणि गेलो ते डायरेक्ट सौंदर्य नगरीत.मूक सौंदर्य, शिल्प सौंदर्य, शब्दशहा भुलवून टाकणारे सौंदर्य! कमाल !
बरेच दिवस येथे जायचा मानस होता पण भूषण पुण्याला येणार मग आम्ही जाणार असा योग काही जुळत नव्हता. आज तो सकाळीच ९ वाजता शिवाजीनगर ला उपस्थित झाला आणि मग गाडीवर दोघेच चालू झालो.
पुण्याहून खाली सासवड, इंदापूर भागात बरेच काही बघण्यासारखे आहे. इंदापूर हे गाव कायम मला अवर्षण ग्रस्त गाव वाटायचे का काय माहित.
खाली नकाशात गोल केलेले बघितले तर एका दिवसात फिरायला बरेच काही आहे. एक दिवस मंदिर स्पेशल ठेऊन थेउर, भुलेश्वर, जेजुरी, मोरगाव, लोणी भापकर, पांडेश्वर, बसवेश्वर अशी बरीच प्राचीन वा जुनी मंदिरे पाहता येतात. एक ट्रीप मारून एक मंदिर बघितले तरी ते वर्थ आहे. पांडवकालीन, हेमांडपंथी पद्धतीने बांधलेली ही देवालये आणी त्यातली शिल्पकला,स्थापत्यकला केवळ अद्भुत आहे.
बोपदेव घाटाचा परीसर फोटो काढायला फार मस्त आहे सध्या. ( आम्हीही काही दाखवायचे फोटो काढून घेतले हेही जाता जाता)
एवढा पाऊस पडून, संपूर्ण प्रदेश हिरवागार होऊनही याच्या नशिबात नव पालवी नसावी. वार्धक्याच्या खुणा सोसतच काही आयुष्ये सुखाला समांतर जातात.
येथून सरळ गेले की माळशिरस गाव आणी डावीकडे बोपदेव घाट.
पाऊस थांबला तसे आम्ही मंदिरात पोहोचलो. गणपतीचे दिवस असल्याने गर्दी जास्त नव्हती. मंदिराच्या कळसाची डागडुजी चालू असून शिल्पांना चुनकळीच्या रंगाने लेप देण्याच्या प्रकार सुरु आहे असे समजले. जो माणूस हे सांगत होता त्याच्या मित्राने सगळे ऐकून एकाच प्रश्न विचारला. "जमणार आहे का पण आपल्या लोकांना हे?"
तेही खरच आहे म्हणा,कारण इतके बारीक आणी तपशिलात हे कोरीवकाम केलेले आहे की त्याचे कोटिंग करणे पण सोपे काम नाहीये. असो.
इतकी वर्षे स्वतःचे अस्तित्व जपून उभे असलेले हे मंदिर म्हणजे दौलत मंगळ किल्ल्याचा भाग आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार ढासळलेल्या अवस्थेत असून पायरी वाटेने आल्यास त्याचे अवशेष दिसतात.
बाकी एक भलामोठा बुरुज आणी एक मोठे प्रवेशद्वार आजही भक्कम स्थितीत आहे.
आता येथून सुरु झाली ऐतिहासिक शिल्पांची अद्भुत सफर आणी स्थापत्यकलेच्या सौंदर्याची मुक्त उधळण.
कॅमेरे सरसावून, बूट काढून दोन पाऊले चाललो तेवढ्यात पहिल्याच प्रवेशद्वारापासून अत्यंत सुबक आणि प्रेक्षणीय शिल्पांचे दर्शन घडले. निव्वळ शब्दातीत.
मंदिरात प्रवेश केला आणी एकदम यादवकाळात गेलो. ऐतिहासिक श्रीमंती म्हणजे काय ते क्षणा क्षणाला कळत होते. मंदिरात पूर्णतः काळोख आणी काही ठिकाणी केलेली नैसर्गिक प्रकाशव्यवस्था.
http://sagarshivade07.blogspot.com/2014/09/blog-post_29.html
भुलेश्वर - एकदा जा नक्कीच...
त्या चढुन वर गेलात की मग आधी लक्ष जातं ते या नंदीकडे. अतिशय रेखीव्,प्रमाणबद्ध खुप मोठा आहे.
http://harshad-gaaanikha.blogspot.com/2010/11/blog-post_25.html
भाग -२ भुलेश्वर - एकदा जा नक्कीच...
या देवळांतच गर्भग्रुहाच्या बाजुला अश्या खोल्या आहेत, ज्या मध्ये विविध देवांची स्वतंत्र मंदिरे होती.
या आहेत,मंदिरात आत गेल्या गेल्या उजवीकडे असणा-या पाय-या,जे काही आहे ते या पाय-यांच्या वर आहे.
मंदिरात आत गेल्या गेल्या जी ओसरी आहे हे तिचं छत.
आणि हे एक आश्चर्यच होतं निदान माझ्यासाठी तरी,शंकराच्या मंदिरात चक्क शेषशायी विष्णुची प्रतिमा आणि मंदिर. हे जर चांगल्या अवस्थेत असतं ना तर...
त्याच वरच्या मंदिराचा जबळुन घेतलेला फोटो.
आता भुलेश्वरला जाणा-यांची संख्या वाढेल असं वाटतंय

















































































































































































































