नृसिंह-वराह मंदिर (हलशी)
कदंब राजवंशाच्या राजा रवि वर्मनची राजधानी "हलशी". बेळगाव जिल्ह्यातील
खानापूर तालुक्यापासुन अंदाजे १४ किमी अंतरावर हलशी गाव आहे. येथील १२व्या
शतकातील पुरातन नृसिंह-वराह हे एक देखणे मंदिर. या मंदिरात नृसिंह, वराह
नारायण, सूर्य, विष्णु यांच्या पुरातन मूर्ती आहेत.
या मंदिराच्या आत दोन गर्भगृह एकमेकांसमोर असुन दोघांच्या मध्ये एक विशाल
कासव आहे. एका गाभार्यात श्री विष्णुची बसलेली मूर्ती असुन त्याच्या
समोरच्याच गाभार्यात भूवराह नारायणाची ११८६-८७ सालातील पुरातन आणि अतिशय
देखणी मूर्ती आहे. सध्या पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असलेल्या कंदब
स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ठ नमुना असलेल्या या अतिशय सुंदर आणि पुरातन
मंदिराला अवश्य भेट द्या.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
मुख्य मंदिरापासुन जवळच असलेले भग्नावस्थेतील एक पुरातन शिवमंदिर.
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
(क्रमश:)
खानापूर-रामनगर रस्त्यावर खानापूरच्या साधारण १०-१२ किमी नंतर नंदगड गावाला जायचा फाटा आहे. खानापूरात नंदगडला जायचा रस्ता विचारायचा. खानापूरहून दर १ तासाला नंदगड-हलशीसाठी टेम्पोही मिळतात. स्वतःचे वाहन असेल, तर सरळ या गाड्यांच्या मागे जाणे हा उत्तम पर्याय! हलशीला जायला व्हाया नंदगड जावे लागते. नंदगड-हलशी अंतर जेमतेम ६-७ किमी आहे.
जिप्सी फोटो भन्नाट आले आहेत. इतक्या वेळेला हलशीला जाऊनसुद्धा एवढे बारकाईने कधीच फोटो काढले नाहीत. लहानपणी बर्याचदा जायचो हलशीला, पण त्यावेळी मंदिर आणि परिसर याचा एकच उपयोग माहित होता... क्रिकेट/लपाछपी खेळणे :).... नाही म्हणायला प्रचि २ मधल्या विहीरीचा वापर गणपती विसर्जनासाठी व्हायचा, हल्लीच हा परिसर पुरातत्व विभागाकडे गेलाय. त्यामुळे विहीरीत गणपती विसर्जनाला बंदी आहे.
नृसिंह मंदिरातील नृसिंहाची मूळ मूर्ती (ही मूर्ती प्रचि ५ च्या गाभार्यातच आहे) :-
नृसिंह आणि वराह या देवतांची मंदिरं मुळातच कमी असतील. वराह देवतेची इतकी सुंदर-सुबक मूर्ती (प्रचि ४) अजून कुठे पहाण्यातही नाही आली.
प्रचि ३ मधला रथ लाकडी आहे. हलशीमधे दर १२ वर्षांनी लक्ष्मीची जत्रा असते, तेव्हा हा वापरतात. वर उल्लेखलेल्या नंदगड गावातही असाच रथ आहे. पण तो प्रचि ३ मधल्या रथाच्या दुप्पट ते तिप्पट आकाराचा आहे.हलशी आणि सिद्दी
-राकेश साळुंखे
कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात असलेल्या हलशी या ठिकाणाला भेट देण्याचे आम्हा काही मित्रांचे ठरले. प्राचीन कदंब राजवटीची दुसरी राजधानीअसलेले हे ठिकाण बेळगाव ते दांडेली या मार्गावर आहे . बनवासी ही कदंबांची पहिली राजधानी होती . अनेक प्राचीन मंदीरे त्यातही तेथील एक मंदिर जे राष्ट्रीय स्मारक आहे ते पाहण्याची तसेच पुरातत्व विभागाचे उत्खनन चालू असणारे ठिकाणही पाहण्याची आम्हा सर्वांना उत्सुकता होती .
सातारहून सकाळी लवकर निघून कोल्हापूरमध्ये सोलापूरहून आलेल्या मित्रांना घेवून बेळगावकडे सकाळी सात च्या दरम्यान निघालो. कोल्हापूर ते हलशी हे अंतर १६५ किमी आहे. बेळगाव ते हलशी अंतर ४५ किमी आहे. बेळगावमध्ये प्रथम आम्ही प्रसिद्ध कन्नड साहित्यिकांना भेटलो. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते मराठी भाषिक आहेत पण त्यांचे संपूर्ण साहित्यिक योगदान कन्नड भाषेत आहे. त्यांच्या सोबत संवाद साधत असताना २-३ तासाचा वेळ कसा निघून गेला समजलेच नाही. शेवटी माझ्या प्रकाशनाच्या काही पुस्तकांचे कन्नड भाषेमध्ये भाषांतर करण्याचे ठरवून बाहेर पडलो. बेळगाव वरून निघून खानापूर ला दुपारी १ च्या दरम्यान पोहचलो .
खानापूरला स्वातंत्र्यपूर्व काळातील चळवळींचा खूप मोठा इतिहास आहे . स्वातंत्र्यपूर्व काळातील सर्वात जुनी प्रिंटींग प्रेस येथीलच आहे .खानापूरस्थित पहिला सत्यशोधक मठ पाहिला . मलप्रभा नदी काठी असणारा हा मठ सध्या खंडहर स्वरूपात उभा आहे . तो पाहून खानापूर येधील मित्रांच्या सोबतीने हलशीच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला .
दुपारचे दोन वाजले असल्याने सगळ्यांना भुकेची जाणीव होऊ लागली . त्यामुळे वाटेत सोबतचे डबे उघडून एका शेतात पंगत मांडली. हा तसा रिमोट एरिया असल्याने येथे हॉटेल वगैरे नाहीत . येथून पुढे जंगल सुरु होते . नंदगडमार्गे हलशी ला पोहचायला अडीच वाजले .
पूर्वी
राजधानी असलेले हे ठिकाण सध्या एका छोट्याशा खेड्याच्या स्वरूपात दिसते .
आम्ही प्रथम वराह नरसिंह मंदिर पहायला गेलो . भारतीय पुरातत्व खात्याच्या
अखत्यारीत असणारे हे मंदीर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे . या
मंदिरात दोन गर्भगृहे आहेत . त्यांची तोंडे एकमेकांकडे आहेत . त्यापैकी एका
गर्भगृहात वराह मूर्ती तर दुसऱ्या मध्ये नरसिंहाची मूर्ती आहे . दुपार
असल्याने दोन्ही गर्भगृहे बंद होती . आम्ही मग मंदिर पाहून घेतले . थोड्या
वेळाने तेथील पुजारी आला . त्याने गर्भगृहाचे दार उघडून दिले . आत गेलो
असता मूर्तींना वस्त्रे घातली असल्याचे दिसले त्यामुळे त्या मूर्तींचे मूळ
रूपच बदलून गेले असे वाटले . सकाळी पूजेच्या वेळी तुम्हाला मूळ मुर्त्या
पाहता येतील असे तो पुजारी म्हणाला . तेथील वराह मूर्तीच्या सोंडेवर एक
छोटीशी देवीची मूर्ती आहे . तिला पृथ्वीचे रूपक समजतात . संपूर्ण
ग्रॅनाईटमध्ये या मूर्ती घडवल्या आहेत . मंदिरात एक मोठा शिलालेख काचेत
ठेवला आहे . जयकेशीन कदंब की जो सहाव्या विक्रमादित्य चालुक्य राजाचा जावई
होता त्याचा हा शिलालेख आहे . तो देवनागरी लिपीत आहे . त्या शिलालेखावरील
मजकूर जर इंग्रजी भाषेत त्याच्या शेजारी बोर्ड वर असता तर तो पर्यटकांना
समजू शकला असता असे वाटले . तेथे येणारे उत्सुकतेने तो शिलालेख पहात होते
पण मजकूर वाचता येत नसल्याने त्यांची निराशा होत होती . या मंदिराच्या
परिसरात अनेक छोटी छोटी मंदिरे आहेत . हे सर्व पाहून येथून एक किमी अंतरावर
असलेल्या सुवरनेश्वर मंदिराकडे निघालो . वाटेत कलमेश्वर मंदीर आहे . तेथे
गर्भगृहात मध्यम आकाराची पिंड असून बाहेरच्या बाजूला गणपतीची व
सप्तमातृका यांची सुस्थितीतील मूर्त्या आहेत . पुढे एके ठिकाणी सतीची शिला
बघायला मिळाली . ही शिला इतर शिलांपेक्षा वेगळी होती . त्यावर असणारा हात
आकाराने छोटा होता व त्यावर स्त्री व पुरुषाचे शिल्प कोरले होते .
सुवर्णेश्वर मंदिर हे उंच चौथऱ्यावर पडझड झालेल्या स्थितीत असून त्याच्या सभामंडपाचे दगडी खांब व तुळया फक्त शिल्लक आहेत . तेथे भव्य नंदीची मूर्ती पहायला मिळते . तसेच सुस्थितीत असलेल्या गर्भगृहात शंकराची मोठी पिंड असून त्याची पूजा केली जाते . या मंदिराच्या आवारात मोठी शिला असून ब्रह्मदेव समजून त्याला पुजले जाते . सुवर्णेश्वर मंदिर पाहून जेथे पुरातत्व खात्याचे उत्खनन चालू होते तिकडे गेलो . जाताना वाटेत एक प्राचीन काळापासून असलेले तळे लागले . तेथे थोडा वेळ रेंगाळलो . जेथे उत्खनन चालले होते तेथे जाण्यासाठी शेतातून पायवाटेने जावे लागते . भातशेतीतून जाणारी ही पायवाट खूप सुंदर आहे . काही ठिकाणी पिक काढले होते तर काही ठिकाणी ते शेतातच मोठ्या दिमाखात डौलत होते.
खूप मोठ्या शेडमध्ये उत्खननाचे काम चालू असलेले दिसत होते . त्या उत्खननात प्राचीन इमारतीचा ढाचा दिसत होता . संध्याकाळची वेळ असल्याने तेथे कोणी जबाबदार कर्मचारी उपस्थित नव्हता त्यामुळे त्या उत्खननासंदर्भात काही माहिती मिळू शकली नाही . वॉचमनला काही सांगता येत नव्हते . त्यानंतर गावात चहा पिण्यासाठी गेलो तर तेथील काही गावकऱ्यांनी आम्हाला वेढा घातला . त्यांना आम्ही पुरातत्व खात्याचे लोक आहोत असे वाटले . ज्यांच्या जमिनी सरकारने ताब्यात घेतल्या मात्र त्याचा मोबदला अजून दिला नाही ते हे लोक होते . आमच्या खानापूरमधील कन्नड येणाऱ्या मित्राने त्यांचा गैरसमज दूर केला . आम्हाला दांडेलीला मुक्कामी जायचे होते . हलशीतील रामलिंगेश्वर मंदिर डोंगरावर असल्याने आम्ही ते नंतर पहायचे ठरवून दांडेलीच्या दिशेने निघालो. हिवाळ्यातील संध्याकाळ असल्याने लवकर अंधार पडला होता .दांडेलीला जाण्यासाठी जंगलातून वाट असल्याने प्रवास चांगलाच थरारक झाला . अनायसे आमची रात्रीची जंगल सफारी घडली .
दुसऱ्या दिवशी सकाळी हुलियाल नजीकच्या काही गावांमध्ये जायचे होते . या गावात हबशी म्हणजेच सिद्दी लोक राहतात, त्यांना भेटायचे ठरले होते . त्याप्रमाणे आम्ही तिकडे गेलो . सुमारे चारशे वर्षांपासून हे लोक भारतात वास्तव्यास आहेत . पूर्व आफ्रिकेतून ( इथिओपिया ) या लोकांचे वंशज भारतात आले . यांपैकी काही गुलाम म्हणून तर काही सैनिक म्हणून आले . या लोकांच्या वसाहती भारतात उत्तर कर्नाटक , गुजरात , हैद्राबाद येथे आहेत . इतिहासात आपल्या पराक्रमाचा ठसा उमटविलेल्या या लोकांचे वंशज सध्या काय करतात , कसे राहतात याबद्दल कुतूहल वाटल्याने त्यांना भेटायचे ठरवले होते . आम्ही जेथे गेलो ते गाव दुर्गम भागात असूनही एकदम स्वच्छ होते . आपल्याकडे कोकणात जशा वाड्या असतात तसे त्याचे स्वरूप होते .
त्यांचा मुखिया ७५ वर्षांचा गृहस्थ होता . त्याने आम्हाला सिद्दी समाजाविषयी माहिती सांगितली . सिद्दी लोक हे मुस्लिम ,हिंदू व ख्रिश्चन देखील आहेत . या लोकांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे . त्यांच्यातील काही वनविभागाच्या अंतर्गत असणाऱ्या भागात शेती करतात तर काही आसपासच्या खेडेगावातील शेतात मजुरी करतात . शिक्षणाच्या बाबतीत मात्र अजूनही हे मागासच आहेत . त्यांच्यात एक गोष्ट विलक्षण वाटली, त्यांची लग्ने आपापसात होतात परंतु त्यात त्यांचा धर्म आड येत नाही . म्हणजे कोणत्याही धर्मातील व्यक्ती दुसऱ्या कोणत्याही धर्मातील व्यक्तीशी लग्न करू शकते . त्यांच्या बाह्य रंगरूपामुळे ते मुख्य सामाजिक प्रवाहापासून तुटलेले आहेत असे वाटत रहाते . मार्गारेट अल्वा या केंद्रीय मंत्री असताना त्यांना अनुसुचित जमाती (ST ) अंतर्गत आरक्षण त्यांना देण्याचा प्रयत्न झाला . परंतु अजूनही हे प्रकरण प्रलंबित आहे . त्या काळात त्यांच्या तगड्या शरीरयष्टीमुळे त्यांना काही क्रीडाप्रकारात संधी दिली गेली परंतु ते भारतीय वंशाचे नाहीत या गैरसमजुतीतून त्यांना नंतर डावलण्यात आले, ही खंत त्यांच्या बोलण्यात जाणवली .
(लेखक ‘लोकायत’ प्रकाशनाचे संचालक आहेत)
84849 77899
प्रकार : प्राचीन विष्णुमंदीर (वराहमंदीर)
जिल्हा : बेळगाव
नाशिक जिल्ह्य़ातील बागांचा आणि जागोजागी असलेल्या लानींचा प्रदेश म्हणजे
बागलाण. याच बागलाण तालुक्यात देवळाणे हे गाव सटाण्यापासून १६ कि.मी.
अंतरावर वसले आहे. खानदेशच्या या गावात बाराव्या शतकातले एक सुंदर मंदिर
आहे. इ.स. ७८५ ते ८१० या काळात देवळाणे येथे कामदेव जोगेश्वराचे मंदिर
बांधले गेले. खजुराहोच्या मैथुनशिल्पांप्रमाणेच इथे मैथुनशिल्पे आहेत.
हेमाडपंथी बांधणीचे हे पुर्वाभिमुख मंदिर शंकराचे असुन या मंदिराला
जोगेश्वर कामदेव मंदिर म्हणून ओळखले जाते. दोधेश्वरहून येणारी दोध्याड नदी व
ओढा या जलप्रवाहांच्या संगमावर हे देखणे शिल्पमंदिर साकारले आहे.
प्रथमदर्शनी मंडपावरील शिखराला केलेला सिमेंटचा गिलावा मात्र खटकतो. या
देखण्या शिल्पमंदिराची रचना गर्भगृह, अंतराळ सभामंडप आणि मुखमंडप अशा
स्वरूपाची आहे. चांदणीच्या आकाराच्या अष्टकोनी दगडी चौथऱ्यावर मंदिराची
सुरेख उभारणी केली आहे.
मुखमंडपापुढील मूळच्या विशाल नंदीचे शीर तुटलेले असुन त्याच्या घाटदार
शरीरावर सुंदर अलंकार व वस्त्रे कोरलेली आहेत. मुखमंडप नक्षीदार अशा चार
शिल्पजडित स्तंभांवर तोललेला आहे. स्तंभांची एकावर एक अशा दोन स्तरांत रचना
असून दोहोंमध्ये शिल्पाशिलांची वेगळी जोड दिलेली आहे. या छोटेखानी
मुखमंडपात बसण्यासाठी समोरासमोर दोन आडव्या शिळा बसवलेल्या आहेत.
वर्तुळाकार घुमटाकृती छताच्या मधोमध बासरीवादनात दंग झालेल्या कृष्णाची
मुर्ती कोरलेली असुन शेजारी आठ गोपिका फेर धरून वादये वाजवताना दाखवलेल्या
आहेत. मुखमंडपाच्या पुढचा सभामंडप बारा अर्धस्तंभांनी तोलुन धरलेला असुन
सभामंडपाच्या खांबावर नाजुक नक्षीकाम केलेले आहे. धार्मिक विधी करण्यासाठी
या मंडपाची रचना केलेली असावी. डाव्या व उजव्या हाताला छोटे दालन असुन
डाव्या कक्षात महिषासुर मर्दिनीचे शिल्प आहे तर उजव्या कक्षात गणपती व
रिध्दी-सिध्दी मूर्ती आहेत. सभामंडपाच्या मध्यभागी मोठय़ा वर्तुळात कासवाचे
शिल्प कोरलेले असुन छताकडे मोठय़ा संख्येने शिल्पाकृती कोरल्या आहेत.
सभामंडपातील छतावर मध्यभागी कमळशिल्प आहे. छत आपल्या पाठीवर तोलून धरणारे
यक्ष प्रत्येक स्तंभाच्या टोकाला कोरलेले आहेत. त्यांना प्रत्येकी चार हात
दाखवलेले असुन ते दोन हातांनी छताला आधार देत आहेत तर उरलेल्या दोन
हातांनी वाद्य वाजवीत आहेत. त्यातील काहीजण शंखनाद करीत आहेत. छताकडील काही
भागात युद्धाचे प्रसंग कोरलेले असुन उंटावरून लढणारे योद्धे तसेच
त्यांच्या मागेपुढे हत्ती व घोडय़ावरून आवेशात लढणारे स्वारही तेथे दाखवले
आहेत. काही ठिकाणी आवेशपूर्ण भावात कुस्ती खेळणाऱ्या मल्लांची जोडी आहे तर
कुठे नागबंध, पानेफुले व काही भौमितिक रचना आहेत. प्रत्येक कक्षाच्या
टोकाला विविध प्रकारची कीर्तिमुखे साकारली आहेत. छताच्या दक्षिणेकडे
गरुडारूढ विष्णु व त्याभोवती सर्पाची गोलाकार जाळी आहे. अर्धस्तंभावरील
हंस, मिथुन, माळा व इतर कलाकुसरही बारकाईने पाहण्यासारखी आहे. मुख्य
गाभाऱ्याच्या प्रवेशव्दाराजवळील लहान गाभाऱ्याच्या तोरणभिंतीवर
पंचमातृकांची शिल्पपट्टी कोरलेली आहे. या पंचमातृका राजहंस, ऐरावत, वृषभ,
वराह,मनुष्य यावर बसलेल्या आहेत. गाभाऱ्याच्या मुख्यप्रवेशव्दाराजवळ वरच्या
भागात शंख व चिपळया वाजविताना व नृत्य करीत असलेले स्त्री-पुरुषांचे शिल्प
तसेच वेगवेगळया पध्दतीने गुंतागुंतीचे नक्षीकाम केलेले आहे. गर्भगृहात
प्रवेश करताना दगडी उंबरठय़ावर सुरेख चंद्रशिळा आहे. सभामंडपातून गर्भगृहात
जाताना चार-पाच पायऱ्या उतरून जावे लागते. आत मधोमध उत्तराभिमुख पंचमुखी
शिवलिंग आहे. हे गर्भगृह चौरसाकृती असुन गाभाऱ्याच्या उत्तर दिशेच्या
उपगाभाऱ्यात शिवशंकर भगवान पार्वतीमातेला मांडीवर घेऊन बसलेले अतिशय सुंदर
शिल्प आहे. पाठीमागे पुर्वाभिमुख मुख्य कोनाड्यात आदिशक्ती पार्वतीची चार
भुजा असलेली मीटरभर उंचीची मुर्ती असुन तिचे चारही हात कोपरापासून खंडित
झालेले आहेत. छताच्या मध्यभागी उमलत्या कमळपुष्पाचे शिल्प आहे. मुख्य
गाभाऱ्याच्या आत वरील टोकाच्या भागात शिवशंकर, पंचमुखी नाग, नागरदेवतेचे
प्राचीन शिल्प आहेत. पूजा साहित्य ठेवण्यासाठी दोन्ही बाजूंच्या भिंतीत
लांबरुंद कोनाडे ठेवलेले आहेत. मंदिराला चांदणीच्या आकाराचा अष्टकोनी चौथरा
ठेवल्यामुळे इथली प्रदक्षिणा अधिक अलंकारिक व मनोरंजक झालेली आहे. विविध
प्रकारची छोटीमोठी शिल्पे या मार्गावर मंदिराच्या बाहेरील अंगाने कोरलेली
आहेत. देवळाणे शिल्पमंदिराचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे मंदिराच्या दक्षिण
व उत्तरेकडील बाह्य़ांगावर खजुराहोसारखी कामक्रीडा करत असलेली विविध आसन
पध्दतीचे शृंगारशिल्पे कोरलेली आहेत. छोटय़ा आकारातील ही शिल्पे लांबलांब
शिलांवर पत्रिकेच्या स्वरूपात आधी कोरून मग ती जडवलेली आहेत. त्यातील
नागमिथुन शिल्प हे सर्वात वैशिष्टय़पूर्ण म्हणता येईल. ही दोन्ही शिल्पे
प्रथमदर्शनी श्रीगणेश असल्याचा भास होतो. व्यवस्थित निरीक्षण केल्यावर
दिसतं की एका नागाला दोन नागिणींनी विळखा घातलेला आहे. मिथुनशिल्पातील
सौंदर्य सौष्ठव उच्च प्रतीचे आहे. गर्भगृहातील शिवपिंडीवर पडणारे अभिषेकाचे
जल बाहेर वाहून जाण्यासाठी या मार्गावर दोन उत्कृष्ट मकरशिल्पे साकारली
आहेत. त्यांच्या मुखातून ते पाणी बाहेर पडते. अशी मोठय़ा आकाराची व सफाईदार
मकरशिल्पे क्वचितच आढळतात. त्या मकरांचा भेदक जबडा, अणकुचीदार दंतपंक्ती व
त्यातून बाहेर आलेली जीभ शरीराची चपळता त्याच्या अंगप्रत्यंगातून प्रकट
होताना दिसते व हे शिल्प अगदी जिवंत असल्याचा भास होतो. येथे पूर्वी कळस
कसा असावा याविषयी अनेक तर्क आहेत मात्र तज्ज्ञांच्या मते येथील कळस झोडगे
येथील मंदिराच्या कळसासारखाच असावा. मंदिराचा पाषाण जवळच असलेल्या धुंधे या
ठिकाणाच्या पाषाणाशी मिळताजुळता आहे. देवळाणे येथील ब्रिटिश गॅजेटनुसार ९
व्या शतकतील यादववंशीय राजा रामदेवराय यांचा वजीर हेमाद्री याने जोगेश्वर
शिवमंदिर या हेमाडपंथी मंदिरांचे बांधकाम केले. या मंदिराच्या परिसरात
चांदीची नाणी ब्रिटिश काळत संशोधकांना सापडली. या नाण्यांच्या
पुराव्यानुसार ही नाणी कलचुरी घराण्यातील इ.स. ४२५ ते इ.स.४३० काळातील
कृष्णराज राजाची आहेत. हि नाणी गुप्त काळातील नाण्यांशी मिळतीजुळती आहेत.
यानुसार असा अंदाज काढता येतो की पूर्वी या परीसरात कलचूरी घराण्यांतील
राजवट असावी. मंदिर डोळसपणे पहायला हाताशी कमीतकमी दोन तासाचा अवधी असायला
हवा.
© Suresh Nimbalkar


No comments:
Post a Comment