मंदिर सभामंडप
शिवमंदिरासमोरील देखणा नंदी
मंदिराच्या प्रवेशद्वारातील जय विजय द्वारपाल
सभामंडपातील नक्षीदार छतावर कृष्णाच्या विविध मूर्ती कोरलेल्या दिसतात अर्थात सभामंडपातले कोरीव काम इतके आकर्षक नाही. मंदिराचे गर्भगृह मात्र प्रशस्त असून आतमध्ये शिवलिंग स्थापित केले आहे.
सभामंडप व गर्भगृह
मंदिर अर्वाचीन (पेशवे) काळातील असल्याने दरवाजावर गणेशपट्टीका कोरलेली आहे. गणेशपट्टीका शिवकाळापासून (कदाचित यादवकाळाच्या शेवटापासून) कोरली जाऊ लागली. राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, यादव इत्यादी राजवटींमध्ये बांधल्या गेलेल्या मंदिरांत मात्र व्याल अथवा किर्तीमुखे कोरलेली दिसतात.
दशावतार पट्टिकेवरची शिल्पे अतिशय देखणी आहेत. विष्णूचे मत्स्यावतारापासून कल्की अवतारांपर्यंतचे दहा अवतार येथे पाहावयास मिळतात.
मत्स्यावतार
वास्तविक विष्णूने मत्स्याचे रूप धराण करून मनु राजाला प्रलयातून वाचवले अशी ही कथा आहे पण शिल्पातला वार करणारा दैत्य शंखासुर असावा. काही ठिकाणी मत्स्यावतारात विष्णूने शंखासुराला मारले असे मानतात तर भागवतपुराणात त्यानी हयग्रीव नावाच्या असुराला मारले अशी कथा आहे मात्र हयग्रीव हा असुर नसून खुद्द विष्णूचाच एक अवतार मानला जातो. हयग्रीव अवतारात विष्णूचे मुख हे घोड्याचे असते. हय-घोडा, ग्रीवा-मान.
मत्स्य पुराण व विष्णू पुराणातली अशी गोष्ट आहे- पंचजन शंखासूर हा दैत्य खोल समुद्रात एका प्रचंड शंखात राहायचा. त्याने ब्रह्मदेवावर हल्लाकरून वेद पळवले आणि तो समुद्रात जाऊन लपला. वेद निघून गेले म्हणजे जगात बोंबाबोंब झाली. त्यावेळी विष्णू ने मत्स्य अवतार घेतला आणि त्या दैत्याचा वध केला व ब्रह्म्याला वेद परत आणून दिले. त्याचे घर जो शन्ख त्याने विश्वकर्म्याकडून दुरुस्त करून वापरायला घेतला. पंचजन पासून मिळवलेला म्हणून विष्णूच्या शंखाला पांचजन्य म्हणतात. ही कथा गोवा-कोकणात दशावतारी नाटकात फेमस आहे. कधी दशावताराची'आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्मा' ही आरती ऐकली असेल तर त्याच्या पहिल्याच कडव्यात ह्या कथेचा उल्लेख आहे. फक्त गंमत अशी कि बऱ्याचवेळा ही कथा कृष्णाची म्हणून पण सांगितली जाते.
आता हि कथा शतपथ ब्राह्मणात थोडी वेगळी सांगितली आहे. त्यात मत्स्याला प्रजापती ब्रह्मदेवाचा अवतार मानले आहे. आता अजून एक गडबड म्हणजे भागवत पुराणात अशीच एक हायग्रीवाची कथा आलेली आहे. विष्णूने मत्स्य अवतारात हयग्रीव-नावाच्या घोड्याच्या तोंडाच्या दानवाला मारले आणि त्याने चोरलेले वेद परत आणले अशी काहीशी ती कथा आहे. पण पुढे हाच हयग्रीव साधारण इसवीसनपूर्व २००० च्या आसपास विष्णूचा एक अवतार मानला गेला आणि त्यामुळे मग 'रसातळाला' गेले वेद त्याने ब्रह्म्याला परत आणून दिले आणि मग म्हणून तो ज्ञानाचे प्रतीक झालेला दिसतो. इतकेच नाही तर शाक्त परंपरेत त्याला विष्णूच्या मुख्य दशावतारात स्थान दिले गेलेले आहे आणि त्याने शंखासुर नाही तर मधू-कैटभ या दैत्यांना मारून वेद परत आणले अशी गोष्ट आहे. त्यावरून त्याला-विष्णूला मधुसूदन -मधू दैत्याचे सुदन/त्याला बदडून काढणारा असे नाव आहे.
कूर्मावतार
परशुराम अवतार
इथे सहस्त्र हात असलेल्या कार्तवीयाचा परशुराम परशुच्या साहाय्याने वध करताना दाखवलेला आहे. तर बाजूलाच सहस्त्रार्जुनाने परशुराम पिता जमदग्नीची बळजबरीने हरण केलेली धेनु दाखवलेली आहे.
रामावतार
कृष्णावतार
हा विष्णूचा दहावा अवतार. पुरांणाप्रमाणे हा भविष्यातला अवतार आहे. हा नेहमी पांढर्या छत्रधारी सालंकृत घोड्यासह दाखवला जातो. शस्त्रधारी कल्की काहीवेळा घोड्यावर बसलेला तर काही वेळा लगाम हातात धरलेल्या अशा दोन्ही स्वरूपात दाखवला जातो.
मंदिरातील दशावतार पट्टिका
मंदिरातील दशावतार पट्टिका
शिव मंदिरासमोर भव्य नंदी असून एका व्यक्तीवर मत्स्यभेद करणाऱ्या अर्जुनाचा शिल्पपट कोरलेला आहे. याशिवाय श्री कृष्ण लीला, गणेश लीला यांचे शिल्पपट कोरलेले आहे.
मंदिराच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींवर पुराणांमधील प्रसंग कोरलेले आहेत.
डाव्या बाजूच्या भिंतीवर एक शिल्पपट कोरलेला आहे. त्यामागची कथा नेमकी कोणती हे ध्यान्यात येत नाही परंतु माझ्या अंदाजाप्रमाणे ती ह्याच मंदिराची प्रतिकृती असावी. कारण शिल्पामधले कोरलेले मंदिर प्रत्यक्षातही याच रचनेचे आहे. मंदिरात दर्शनाला राजा (बहुधा पेशवे) हत्तीवरून दर्शनाला येताना दाखवला आहे. बरोबर त्याचे भालदार चोपदार आणि सेवक आहेत तर मंदिराच्या मागच्या बाजूला गरूडाने दोन्ही हातांवर विष्णू आणि लक्ष्मीला तोलून धरलेले आहे तर मस्तकी शेषनाग धारण केलेला आहे.
मंदिराचे दर्शन घेताना दाखवलेला राजा आणि पाठीमागे गरूडाचे शिल्प
याच भिंतीवर अजूनही काही शिल्पे कोरलेली आहेत.
अशोक वनात झाडावर बसलेला हनुमान व विलाप करणारी सीता
कृष्णाच्या गोपिकांसोबतच्या लीला
पुराणातली मूळ कथा अशी की अर्जुनाला आपल्या धनुर्विद्येचा गर्व होऊन तो हनुमानाला म्हणाला की रामाने इतके सामर्थ्य असतानाही बाणांनी सेतू उभारण्याऐवजी दगडांचा सेतू का उभारला. आता माझ्या बाणांचे सामर्थ बघ, मी तुला कधीही न तुटणारा बाणांचा सेतू उभारून दाखवतो. अर्जुनाचे हे गर्विष्ठ बोलणे पाहून हनुमानाने त्याला आव्हान दिले. जसजसा अर्जुन बाणांचा सेतू उभा करी तसातसा हनुमान त्याखाली बसून तो सेतू उद्धस्त करून टाकी.
हीच कथा येथे मूर्तस्वरूपात कोरलेली आहे.
ही महाभारतातली कथा आहे. आरण्यकपर्वात द्रौपदीच्या हट्टापायी कुबेराच्या संरक्षित सरोवरातली सौगंधिक कमळे आणायला जाताना भीम जातो. तेथे भीमाला कुबेराच्या यक्षांशी लढावे लागू नये म्हणून काळजीपोटी हनुमान वृद्ध वानराचे रूप धारण भीमाचा मार्ग अडवतो तसेच आपली शेपटी उचलता येत नाही हे सांगून त्यालाच शेपटी उचलून बाजूला ठेवायला सांगतो. पण हनुमानाची शेपटी उचलू न शकल्याने शेवटी भीमाचे गर्वहरण व हनुमान मूळ रूपात प्रकट होऊन आपले दैदिप्यमान रूप त्याला दाखवतो व यक्षांच्या संकटाविषयी सावध करतो.
मंदिराच्या उजव्या बाजूच्या भिंतींवर पण काही रोचक शिल्पे आहेत. इथल्या पट्टिकेवर स्त्रियांच्या विविध भावमुद्रा, नृत्यमुद्रा कोरलेल्या आहेत.
नृत्यमुद्रा
नर्तकी, तीचा पोषाख आणि त्यावरची नक्षी बघण्यासारखी
बहुतेक शिकार करणारी स्त्री असावी
मोरारुढ झालेली आणि वीणावादन करणारी सरस्वती असावी
गोवर्धन पर्वत उचलणारा श्रीकृष्ण
गरुडाशी संबधीत कोणती कथा आहे हे समजत नाही
एका पायावर उभारुन तपश्चर्या करणारा मुनी
हि कथा बहुधा जगप्रदक्षीणेची असावी. शंकर-पार्वती यांना गणपतीने प्रदक्षिणा घालून पैज जिंकली, मात्र कार्तिकेय प्रत्यक्ष पृथ्वी परिक्रमेला गेला, वरच्या कोपर्यात कार्तिक स्वामी असावा
हा बहुधा श्वासावर नियंत्रण करणारा हटयोगी असावा. त्याची केशरचना वैशिष्ट्यपुर्ण आहे
संपूर्ण शिल्प
द्रौपदीस्वयंवर
इथल्याच भिंतीवर कोरलेले द्रौपदी स्वयंवराचे शिल्प अतिशय सुरेख आहे. द्रौपदी दासीसह गजरथात बसलेली दाखवली आहे. अर्जुन छतावरील मत्स्याचा डोळ्यावर नेम धरून खालच्या दिशेने पाहात उभा आहे. त्याच्या बाजूला युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव बसलेले आहेत. बाजूला द्रुपद राजा आणि त्याचे सैन्य तसेच स्वयंवराला आलेले इतर राजे दाखवले आहेत तर वरच्या बाजूला कृष्ण आणि संकर्षण कोरलेले आहेत.
लक्ष्यभेद
याच भिंतीच्या एका कोपर्यात रामायणातील अशोकवनाचा प्रसंग कोरलेला आहे. सीता अशोकवाटीकेतल्या एका वृक्षाखाली बसलेली असून हनुमान त्या वृक्षाच्या फांदीवर बसून आपली ओळख तिला करवून देत आहे.
विष्णूमंदिर
आता मंदिराच्याच उजव्या बाजूला असलेले विष्णूमंदिर पाहायला आम्ही सुरुवात केली. हे मंदिर सुद्धा लहान लहान शिखरांच्या रचनेने बनलेले आहे. मंदिर तसे लहानसेच असून विष्णूमूर्तीच्या समोर हात जोडलेल्या अवस्थेत गरूडाची मूर्ती स्थापन केलेली आहे.
विष्णूमंदिर
विष्णूमंदिर
मंदीराच्या अंतर्भागात असणारा कृष्णलीला पट
विष्णूमूर्ती

ह्या मंदिराचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे मंदिराच्या बाहेरच्या भिंतींवर कोरलेल्या दिक्पालांच्या मूर्ती.
पूर्व दिशेचा स्वामी देवराज इंद्र त्याच्या ऐरावत हत्तीसह उभा आहे.जपमाळ जपमाळ ,अंकुश, गदा/दंड कमंडलु आहेत, वाहन हत्ती असल्यानी हे शिल्प इंद्राचे आहे कारण हाती अंकुश आहे.
आग्नेय दिशेचा स्वामी अग्नी त्याचे वाहन एडका यांसह.
दक्षिण दिशेचा स्वामी यम त्याचे वाहन रेडा यांसह
हा नैऋत्य दिशेचा स्वामी निऋती. हा नेहमीच क्रूर दाखवलेला असतो (हा बहुधा असूर होता) याचे प्रमुख शस्त्र खड्ग असून याने हातात शत्रूचे कापलेले मुंडके पकडलेले आहे.अथर्ववेदात हा निऋती स्त्री देवता आहे त्यामुळे तिचे नावही. ही मृत्यू आणि दुर्भाग्याची देवता आहे पुढे सगळेच दिक्पाल पुरुष असल्यानी तिलाही पुरुष केले गेले. निऋतीचे वाहन बघितले तर ती नरवाहना म्हणजे प्रेतावर बसलेली आहे ह्या शिल्पात देखील पायाशी एक माणूस दाखवला आहे.
हा आहे पश्चिम दिशेचा स्वामी वरुण
हे शिल्प म्हणजे वायव्य दिशेचा स्वामी वायू आहे पण त्याचे वाहन हरीण आहे.वायू वेगाने वाहणारा असल्याने आणि शीतलता देणारा असल्याने त्याला सोम-चंद्राशी जोडले गेले आणि त्यामुळे दोघांची वाहने देखील हरणं आहेत.
उत्तर दिशेचा स्वामी कुबेर त्याचे नक्रासह (मगर) यांसह उभा आहे.
वरील दिक्पालांपैकी अग्नी, कुबेर आणि वरूणाच्या वाहनांमध्ये विविध पुराणांमध्ये वेगवेगळी वाहने दिली आहेत. अग्नीचे वाहन काही ठिकाणी बैल तर वरूणाचे नक्र अथवा मगर (वरूण जलदेवता असल्याने) असे दाखवलेले आहे. यक्षराज कुबेर लक्ष्मीचा सोबती असल्याने, आपल्याकडे मुंगसाला देखील गुप्तधनाच्या राखणदार मानले गेले आहे.अनेकदा मात्र कुबेराला देखील नरवाहन म्हणजे माणसांनी खांद्यावर उचललेला असतो. माणूस पैशाचा गुलाम हे किती पूर्वीपासून लोकं सांगत होते.
ईशान्य दिशेचा स्वामी ईशान, हाती त्रिशुळ, डमरू, कमंडलू आणि नाग धारण करून वाहन नंदीसह उभा आहे.,पौराणिक काळात त्याला शिवाचेच रूप मानले गेले.ईशान हा पाच महाभुतांपैकी-आकाश तत्वाचे प्रतीक असल्यानी घरात देवघर ईशान्य कोपऱ्यात करावं असा वास्तू शास्त्राचा निर्देश आहेत.
याच विष्णू मंदिराच्या मागील भिंतीवर हत्ती आणि मर्कटांचे अनोखे शिल्प कोरलेले आहे. मर्कट तर इतके खुबीने कोरलेले आहेत की त्यांच्या जबड्यातील दातही अगदी स्पष्टपणे दिसावेत.
देवीमंदिर
या विष्णूमंदिरातील विलोभनीय मूर्ती बघून मुख्य शिवमंदिराच्या पलीकडच्या बाजूस असलेले देवीचे उपमंदिर पाहण्यास निघावे. देवीचे मंदिर तारा कृती आहे. या मंदिरालाही राजस्थानी पद्धतीची भोसरी आहे.
देवीचे मंदिर थोडे लहान असून बाह्य भिंतीवर देवीची विविध रूपे कोरलेली आहेत.

तारकाकृती आकाराचे देवी मंदिर व त्यावरील देवी शिल्प
राजस्थानी-मोगल कला परंपरांचा प्रभाव किती खोलवर पोहोचला होता व हा शिल्प प्रकार साकार करण्यात मराठी शिल्पकारांनी किती यश मिळविले होते याची यथातथ्य कल्पना टोके येथील सिद्धेश्वर मंदिरातील दगडी ओहरी व स्तंभावरून येते.
उत्तरी बांधणीचे खांब आणि ओसरी
ओहरी संपूर्ण दगडी बांधणीची आहे. दोन्ही बाजूला सुरुच्या अत्यंत घाटदार खांबाच्या ओळी आहेत. स्तंभाच्या ओळी जोडण्यासाठी दगडाच्या मेहरपीच्या कमानी आहेत. दोन्हीसाठी साधा काळा पत्थर वापरलेला आहे व दोन्हीवर कसलेही विशेष नक्षीकाम नाही पण त्यांचे आकारमान इतके डौलदार आहे त्यांची मांडणी अशा कल्पकतेने केलेली आहे की पाहणाऱ्यांचे मनावर हे शिल्प कायमचा ठसा उमटवून जाते.
देवी मंदीराचे प्रवेशद्वार
ह्या मंदिराची रचना पण साधारण विष्णूमंदिरासारखीच असून याच्या भिंतीवर देवी तसेच अष्टमातृकांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.
देवीचे मंदिर
देवी मंदीराच्या बाह्यभिंतीवर म्हणजे मंडोवरावर अष्टमातृकांच्या मुर्ती आहेत
हे शिल्प भवानीचे आहे,हाती शस्त्र धारण करून ती असुराचा नाश करत आहे. (प्रेतवाहन) बरेच जण हिला चामुंडा मानतात मात्र चामुंडेच्या शिल्पात हे संपूर्ण हाडाचा सापळा असतो,सापळ्यावर फक्त कातडं, खोबणीत गेलेले डोळे, विवस्त्र, हाती नरमुंड असा साधारण तिचा अवतार असतो. हे शिल्प शुंभ-निशुंभाला मारणाऱ्या भवानीचे आहे. हि कथा खूप प्रसिध्द आहे.
वाराही
मातृकांमधली एक माहेश्वरी शस्त्रे त्रिशूळ, डमरू, खङग वाहन नंदी
हाती कमंडलू धारण केलेली ही कौमारी. हिने एका हातावर बीजपूरक (म्हाळूंगाच्या फळांचा घोस ) धारण केले आहे जे नवनिर्माणाचे /पुन:निमिर्तीचे, मांगल्याचे प्रतिक आहे.
कमळावर बसलेली महालक्ष्मी
सिंह हे वाहन असलेली ही नारसिंही. नारसिंही ही सिंहमुखी दाखवली नाहीये हे अजून एक विशेष!
हत्ती हे वाहन असलेली ऐन्द्री अथवा इन्द्राणी
गरूड वाहन असलेली ही वैष्णवी
याच मंदिराच्या सभामंडपातील चारही भिंतींवर वरील बाजूस विविध शिल्पपट कोरलेले आहेत. त्यातला हा एक
मंदीराच्या शिखरावर देखील देवीचे मुखवटे दिसतात
एका मुखवट्याचा जवळून फोटो
देवीचे मंदिर (डावीकडचे) आणि मुख्य मंदिर
हे सर्व अद्भूत शिल्पसौंदर्य डोळ्यांत साठवत सिद्धेश्वर मंदिरातून निघावे. थोड्या जवळच अजून दोन मंदिरे आहेत पण त्यांचे बांधकाम पेशवेकालीनच तरी साधे आहे.
हे तिथे असलेले घंटेश्वर शिवमंदिर
इतके सुबक कोरीव काम असलेली अलीकडच्या काळातली मंदिरे तशी फारशी पाहण्यात नाहीत. त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर यासारख्या मोठ्या मंदिरांचा जीर्णोद्धार याच काळात झाला आहे तरीही तिथे असे कोरीव काम बघायला मिळत नाही. नाही म्हणायला नाशिकमधली नारोशंकर, सुंदरनारायण अशी मंदिरे बरीच देखणी आहेत पण तिथेही मूर्तीकाम कमीच.
एकंदरीतच हे
संदर्भ :-
१) अहमदनगर जिल्हा गॅझेटीयर
२) स्थापत्य- महाराष्ट्र शासन
३) श्री. सागर बोरकर, श्री. बाविस्कर यांचे लिखाण
४) https://divyamarathi.bhaskar.com, http://punetopune.com,https://faktitihas.wordpress.com हि वेबसाईट
टोका येथील सिद्धेश्वर मंदिर- उत्तरेतील शिल्पकलेचा आविष्कार
सामान्यांचे आयुष्य आणि मानवतेची कहाणी हाच इतिहासाचा विषय असतो. ही गाथा आहे त्याच्या साहसाची, जिद्दीची, शौर्याची, कठीण प्रसंगी दाखविलेल्या धैर्याची, राष्ट्रभक्तीची, त्यागाची, बलीदानाची, स्वामीनिष्ठेची अन् स्वाभिमानाची ! हे चींतन आहे त्याच्या मनाला लागलेल्या लोभ, मोह, सत्तादि अहंकाराचे आणि परीणामांचे! ही गोष्ट आहे त्याच्या जय पराजय आणि सत्याची, मरनास हरवलेल्या दिव्य तेजस्वी पुरूषार्थाची! कृपया गल्लत करू नका, इतिहासाला जाती-धर्मात बघु नका, महान दृष्टीने बघा तो तुम्हाला इतिहास पुरूषांच्या महान गुणांचा खजीना सुपुर्द करेल.! सुज्ञांस बहुत ते लिहिणे काय…
सिद्धेश्वर मंदिर-टोके, हे मंदिर औरंगाबाद जिल्ह्यात नेवासा येथून सहा किमी. अंतरावर आहे. मंदिरांचा प्रकार म्हणजे हिंदुस्थानी किंवा नागर शैली होय.
नाशिकचे काळाराम मंदिर, त्रंबकेश्वर चे मंदिर, गोदा प्रवरा संगमावरील कायगाव व टोके येथील शिवमंदिरे तसेच नेवासे येथील मोहिनीराज मंदिर ही देवालय या प्रकारातली आहेत.
यांचे एक वैशिष्ट्य असे की यापैकी कोणतेच सतराशेसाठ च्या आधीचे नाही. दुसरी उल्लेखनीय गोष्ट अशी की ही मंदिरे बांधणाऱ्याचा इंदूरदरबार, ग्वाल्हेर दरबार म्हणजेच माळवा प्रांत किंवा दिल्लीशी प्रत्यक्ष संबंध होता.
कोणी सावकारी साठी, कोणी चाकरीसाठी या ठिकाणचे पेशव्यांचे वकील म्हणून आपापली गावे सोडून तिकडे बराच काळ स्थायिक झालेले होते. थोडाफार धनसंचय झाल्यावर त्यांनी आपल्या जहागिरीच्या गावी किंवा मूळ गावी जाऊन मंदिरे बांधली. तीच मंदिरे नाशिक, नेवासा, कायगाव आणि टोका येथे पाहायला मिळतात.
नवीन परिचय झालेल्या त्या मुलखातील मंदिर शैली व त्यासाठी कदाचित त्या प्रदेशातील कारागीरही त्यांनी महाराष्ट्रात आपापल्या गावी आणले व मंदिर निर्माण केले. तेव्हा जे मंदिराचे रुप साकारले ते म्हणजेच हिंदुस्तानी किंवा नागर शैली होय.
हिंदुस्तानी मंदिरे संपूर्ण दगडी बांधणीची आहेत तसेच येथील काळा दगड असला तरी तो गुळगुळीत केला आहे आणि बांधकाम सफाईदार केले आहे. या मंदिरांचा पदविन्यास हा यादव मंदिरापेक्षा बराच निराळा आहे. गाभारा, अंतराळ, मंडप व मुखमंडप हीच प्रमुख अंगे असली तरी येथे चौरसाच्या चौकटीतून कोठेही सुटका झालेली नाही.
गाभारा आतून चौरस आहे तसा बाहेरूनही. बाहेरच्या भिंतीची जाडी मध्यभागी उभ्या पठानी वाढविलेली असते व त्यामुळे यादव मंदिरा सारखेच रथ निर्माण होतात.
टोके येथील सिद्धेश्वर मंदिर भव्य परिसरात असून त्याला तटबंदी आहे. प्रमुख द्वार भव्य असून हिंदुस्तानी पद्धतीचे आहे. काटकोनातील द्वार आणि महिरपी तसेच द्वारावरील गॅलरी हिंदुस्तानी पद्धतीची आहे.
मंदिरात विष्णू शिव आणि शक्ती अशी तीन मंदिरे आहेत आहे.
विष्णू मंदिर-
विष्णू मंदिर भव्य असून त्यासमोर वज्रासनात गरुड बसलेला आहे. या मंदिराच्या बाह्य भिंतीवर विष्णूची रूपे कोरलेली आहेत.
| विष्णू मंदिरासमोरील पंख तुटलेला गरुड |
![]() |
| विष्णू मंदिर |
| विष्णू मंदिराच्या भिंतीवरील वराह आणि वामन अवतार |
| विष्णू मंदिराचा बाह्यभाग |
शिव मंदिर-
शिव मंदिरासमोर भव्य नंदी असून एका व्यक्तीवर मत्स्यभेद करणाऱ्या अर्जुनाचा शिल्पपट कोरलेला आहे. याशिवाय श्री कृष्ण लीला, गणेश लीला यांचे शिल्पपट कोरलेले आहे.
![]() | |
| शिव मंदिरासमोरील नंदी |
| मंदिराच्या तटावरून दिसणारे शिव मंदिराचे भव्य शिखर |
| शिवमंदिराच्या भिंतीवरील मत्स्यभेद करणाऱ्या अर्जुनाचे शिल्पपट |
| शिवमंदिराच्या भिंतीवरील श्री कृष्ण लीला गणेश लीला आदी शिल्पपट |
![]() |
| वरील शिल्प पटातील श्री कृष्ण लीला-कालियामर्दन शिल्प |
देवी मंदिर-
देवीचे मंदिर तारा कृती आहे. या मंदिरालाही राजस्थानी पद्धतीची भोसरी आहे.
देवीचे मंदिर थोडे लहान असून बाह्य भिंतीवर देवीची विविध रूपे कोरलेली आहेत.
| तारा कृती देवी मंदिर व त्यावरील देवी शिल्प |
राजस्थानी-मोगल कला परंपरांचा प्रभाव किती खोलवर पोहोचला होता व हा शिल्प प्रकार साकार करण्यात मराठी शिल्पकारांनी किती यश मिळविले होते याची यथातथ्य कल्पना टोके येथील सिद्धेश्वर मंदिरातील दगडी ओहरी व स्तंभावरून येते.
| उत्तरी बांधणीचे खांब आणि ओसरी |
ओहरी संपूर्ण दगडी बांधणीची आहे. दोन्ही बाजूला सुरुच्या अत्यंत घाटदार खांबाच्या ओळी आहेत. स्तंभाच्या ओळी जोडण्यासाठी दगडाच्या मेहरपीच्या कमानी आहेत. दोन्हीसाठी साधा काळा पत्थर वापरलेला आहे व दोन्हीवर कसलेही विशेष नक्षीकाम नाही पण त्यांचे आकारमान इतके डौलदार आहे त्यांची मांडणी अशा कल्पकतेने केलेली आहे की पाहणाऱ्यांचे मनावर हे शिल्प कायमचा ठसा उमटवून जाते.
मग औरंगाबाद वरून जाताना किंवा येताना दहा मिनिटे थांबून एकदा तरी बघा महाराष्ट्राचा अनमोल वारसा.!
महाराष्ट्राचे पुरातत्त्व यातून माहिती घेतल्यानंतर आम्ही मंदिराला प्रत्यक्ष भेट देऊन व्हिडिओ बनवला आहे, त्यामधून मंदिराचे वर्णन व विश्लेषण समजणे सोपे जाईल.
असो,. आपल्या हेमाडपंथी मंदिरा मध्ये हे मंदिर पाहुण्यासारखे वाटते उत्तरेतील..!
… .!… वारसा माझ्या महाराष्ट्राचा.!.. साक्षीदार इतिहासाचा.!
||फक्तइतिहास||
गंगापूर फाट्याच्या थोडेसे पुढे असलेले टोका गावातील शिल्पसमृद्ध सिद्धेश्वर मंदिर. वास्तविक औरंगाबादला येतानाच हे मंदिर बघायचे होते पण वेळेअभावी ते परतीच्या वेळी पाहायचे ठरले. हे मंदिर गोदावरी आणि प्रवरेच्या संगमानजीकच आहे. अगदी महामार्गाला लागूनच, प्रवरेवरच्या पुलानजीकच.
सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात आलो. हे मंदिर सर्व बाजूंनी तटांनी बंदिस्त केले आहे. मुख्य प्रवेशद्वार बंद करून मंदिराच्या मागच्या दरवाजाने प्रवेश आहे. प्रवेशद्वारावर नगारखाना उभारलेला आहे. सिद्धेश्वर मंदिराची रचना पेशवेकालीन आणि हेमाडपंती शैलीची. ह्या मंदिराच्या आवारात मुख्य मंदिराच्या एका बाजूला विष्णूचे आणि दुसर्या बाजूला देवीचे अशी अजून दोन मंदिरे आहेत आणि ह्या तिन्ही मंदिरांवर विविध शिल्पे कोरलेली आहेत.
१
**या मंदिरात इतरही असंख्य शिल्पे असून विस्तारभयास्तव ती येथे देणे शक्य नसल्याने महत्वाच्या सर्व शिल्पांचा येथे थोडक्यात आढावा घेतला आहे.
मंदिराची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद,मंदिर सभामंडप विशेष आवडला !
एक प्रश्न आहे वल्लोबा वरच्या मंदिरात आणि हळेबिडू येथील मंदिराची काही शिल्पे समान आहेत पण शिल्पाच्या कोरीवकामात म्हणजे क्वालिटी मध्ये एवढा फरक का ? उदाहरणा दाखल हि २ चित्रे पहा

नृसिंहअवतार

वराहअवतार
हळेबीडूची मंदिरे होयसाळ राजांनी बांधलेली होती. हे राजे अत्यंत वैभवशाली असून शिल्पकलेचे ते सुवर्णयुगच होते. तर ही टोकाची मंदिरे पेशवेकाळातली आहेत. बहुधा पेशव्यांनी किंवा त्यांच्या सरदारांनी बांधलेली असावीत. खुद्द पेशव्यांना तर पैशाची कायमच चणचण भासे तसेच मधल्या काळातल्या इस्लामी आक्रमकांमुळे इथल्या शिल्पकलेचा तसा र्हासच झाला होता.
कोणत्याही प्रदेशातील शिल्पाकृती यावर सर्वात जास्त प्रभाव स्थानिक दगडाचा असतो. पहा मायकेल एंजेलो याने केलेली इटालियन मार्बल मधील शिल्पे व आपल्याकडील राजस्थानी मार्बल मधील जैन शिल्पे. तोच फरक महाराष्ट्र व कर्नाटकातील
शिल्पकृती मधे दिसून येतो. महाराष्ट्रातील बेसाल्ट व कर्नाटकातील ग्रानाईट यांच्या गुणवत्तेत मुळात फरक आहे. बेसाल्ट पेक्षा ग्रानाईट हा अधिक शिल्पयोग्य टणकपणाने बनलेला आहे. कर्नाटक हे ग्रानाईट व फरशी या दगडांचे माहेरघर आहे असे म्हटले तर गैर होणार नाही. (त्यासाठी हिरापन्ना हा चित्रपट पहावा.) मी बेल्लारीचा किल्ल्ला पाहिलेला नाही पण आपलेकडील किल्ला व बेल्लारीचा किल्ल्ला यांच्यातील गुणात्मक फरक दिसून येईल याची खात्री आहे.ग्रानाईट इज ग्रानाईट!
टोका हे गावाचं पूर्वीचं नाव. नदीच्या पात्रात असलेलं गाव सततच्या पुरामुळे उठलं आणि त्याचं एक नवं कायगाव आणि जुन कायगाव अशा नव्या गावात रुपांतर झालं. आणि हे जे मंदिर आता आहे, ते प्रवरासंगम या गावाच्या हद्दीत येतं. [आमचा गाववाला मन याने जी पौराणिक कथा सांगितली त्याचाही संदर्भ इथे आहेच.
-दिलीप बिरुटे
१.काही ठिकाणी मत्स्यावतारात विष्णूने शंखासुराला मारले असे मानतात तर भागवतपुराणात त्यानी हयग्रीव नावाच्या असुराला मारले अशी कथा आहे
३८.पश्चिम दिशेचा स्वामी वरुण असेल तरी वरुणाचा पाश कुठेच दिसून नाही,जपमाळ जपमाळ ,अंकुश, गदा/दंड कमंडलु आहेत, वाहन हत्ती असल्यानी हा वरुण नाही तर बृहस्पती वाटतोय.
४१. मधे निऋतीच दाखवला गेला आहे,
४२. मधे वायू आहे पण त्याचे वाहन बैल नसून हरीण आहे.वायू वेगाने वाहणारा असल्याने आणि शीतलता देणारा असल्याने त्याला सोम-चंद्राशी जोडले गेले आणि त्यामुळे दोघांची वाहने देखील गॅझेल-हरणं आहेत.
४४. मधला ईशान हा मुळात कधीच रुद्र नव्हता,पौराणिक काळात त्याला शिवाचेच रूप मानले गेले.ईशान हा पाच महाभुतांपैकी-आकाश तत्वाचे प्रतीक असल्यानी घरात देवघर ईशान्य कोपऱ्यात करावं असा वास्तू शास्त्राचा निर्देश आहेत.
४५. मधे कुबेराचे वाहन मकर नसून मुंगूस आहे. यक्षराज कुबेर लक्ष्मीचा सोबती असल्याने, आपल्याकडे मुंगसाला देखील गुप्तधनाच्या राखणदार मानले गेले आहे.अनेकदा मात्र कुबेराला देखील नरवाहन म्हणजे माणसांनी खांद्यावर उचललेला असतो. माणूस पैशाचा गुलाम हे किती पूर्वीपासून लोकं सांगत होते.
४८. हे शिल्प भवानीचे आहे, चामुंडा हे संपूर्ण हाडाचा सापळा असतो,सापळ्यावर फक्त कातडं, खोबणीत गेलेले डोळे, विवस्त्र, हाती नरमुंड असा साधारण तिचा अवतार असतो. हे शिल्प शुंभ-निशुंभाला मारणाऱ्या भवानीचे आहे. हि कथा खूप फेमस होती.
५३. नारसिंही ही सिंहमुखी दाखवली नाहीये हे अजून एक विशेष!
बाकी फोटो अप्रतिम!लहान तोंडी मोठा घास घेतला असेल तर कान धरा.
१.काही ठिकाणी मत्स्यावतारात विष्णूने शंखासुराला मारले असे मानतात तर भागवतपुराणात त्यानी हयग्रीव नावाच्या असुराला मारले अशी कथा आहे
शंखासुराची ही कथा मला नवीन आहे. बाकी हयग्रीव हा असुर नसून खुद्द विष्णूचाच एक अवतार मानला जातो. हयग्रीव अवतारात विष्णूचे मुख हे घोड्याचे असते. हय-घोडा, ग्रीवा-मान
३८.पश्चिम दिशेचा स्वामी वरुण असेल तरी वरुणाचा पाश कुठेच दिसून नाही,जपमाळ जपमाळ ,अंकुश, गदा/दंड कमंडलु आहेत, वाहन हत्ती असल्यानी हा वरुण नाही तर बृहस्पती वाटतोय.
इथे वरुणामध्ये माझी गल्लत झाली खरी. ३८ क्रमांकाचे शिल्प वरुणाचे नसून इंद्राचे आहे कारण हाती अंकुश आहे आणि वाहन हत्ती, ४३ व्या क्रमांकाचे शिल्प कुबेराचे आहे कारण हाती धनाची पिशवी किंवा मुंगूस आहे. कुबेराची नंतरची बरीचशी शिल्पे वाहन हत्तीसह दाखवतात. आणि ४५ क्रमांकाचे शिल्प हे वरुणाचे आहे मारणं वरुणाचे वाहन हे मगर.
क्र. ४२चे शिल्पाचे, वायूचे वाहन हरीणच. वाहन आधी नीटसे ओळखू ते नव्हते.
४८ क्र. चे शिल्प देखील भवानीचेच. त्या मंदिरावर ह्या शिल्पसमूहात असलेली उतार सर्व शिल्पे ही मातृकांची असल्याने हिला चुकून चामुंडा समजले गेले.
तुम्ही ह्या विषयांवर अवश्य काही लिहा. वाचायला आवडेल.
शंखासुराची ही कथा मला नवीन आहे. बाकी हयग्रीव हा असुर नसून खुद्द विष्णूचाच एक अवतार मानला जातो. हयग्रीव अवतारात विष्णूचे मुख हे घोड्याचे असते. हय-घोडा, ग्रीवा-मान
मत्स्य पुराण व विष्णू पुराणातली अशी गोष्ट आहे- पंचजन शंखासूर हा दैत्य खोल समुद्रात एका प्रचंड शंखात राहायचा. त्याने ब्रह्मदेवावर हल्लाकरून वेद पळवले आणि तो समुद्रात जाऊन लपला. वेद निघून गेले म्हणजे जगात बोंबाबोंब झाली. त्यावेळी विष्णू ने मत्स्य अवतार घेतला आणि त्या दैत्याचा वध केला व ब्रह्म्याला वेद परत आणून दिले. त्याचे घर जो शन्ख त्याने विश्वकर्म्याकडून दुरुस्त करून वापरायला घेतला. पंचजन पासून मिळवलेला म्हणून विष्णूच्या शंखाला पांचजन्य म्हणतात. ही कथा गोवा-कोकणात दशावतारी नाटकात फेमस आहे. कधी दशावताराची'आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्मा' ही आरती ऐकली असेल तर त्याच्या पहिल्याच कडव्यात ह्या कथेचा उल्लेख आहे. फक्त गंमत अशी कि बऱ्याचवेळा ही कथा कृष्णाची म्हणून पण सांगितली जाते.
आता हि कथा शतपथ ब्राह्मणात थोडी वेगळी सांगितली आहे. त्यात मत्स्याला प्रजापती ब्रह्मदेवाचा अवतार मानले आहे. आता अजून एक गडबड म्हणजे भागवत पुराणात अशीच एक हायग्रीवाची कथा आलेली आहे. विष्णूने मत्स्य अवतारात हयग्रीव-नावाच्या घोड्याच्या तोंडाच्या दानवाला मारले आणि त्याने चोरलेले वेद परत आणले अशी काहीशी ती कथा आहे. पण पुढे हाच हयग्रीव साधारण इसवीसनपूर्व २००० च्या आसपास विष्णूचा एक अवतार मानला गेला आणि त्यामुळे मग 'रसातळाला' गेले वेद त्याने ब्रह्म्याला परत आणून दिले आणि मग म्हणून तो ज्ञानाचे प्रतीक झालेला दिसतो. इतकेच नाही तर शाक्त परंपरेत त्याला विष्णूच्या मुख्य दशावतारात स्थान दिले गेलेले आहे आणि त्याने शंखासुर नाही तर मधू-कैटभ या दैत्यांना मारून वेद परत आणले अशी गोष्ट आहे. त्यावरून त्याला-विष्णूला मधुसूदन -मधू दैत्याचे सुदन/त्याला बदडून काढणारा असे नाव आहे. खूप गडबड आहे आपल्याकडे. अश्या काही विषयावर जरूर लिहायला आवडेल मला. धन्यवाद!
सिद्धेश्वर मंदिर, कायगाव टोके, नेवासा, अहमदनगर
प्रवरा संगमच्या पवित्र परिसरातील सिद्धेश्वर मंदिर आतापर्यंत
पाहिलेल्या मंदिरांइतके पुरातन नसले तरी पेशवेकाळातील संमिश्र शैलीचा उत्तम
नमुना आहे. यात उत्तरेतील नागरशैलीचा व प्रचलित मुस्लिम स्थापत्याचा
प्रभाव जाणवतो. मूळ मंदिर बहुदा गद्रे कुटुंबाच्या देणगीतून बांधले असावे
असे घाटावरील शिलालेखावरून म्हणता येईल. मुख्य मंदिराचा सभामंडप घुमटाकार
असून आतील स्तंभ विरहित छतावर कृष्णलीलेची शिल्पे आढळतात. आतील गाभारा
शिल्पविरहीत असून मध्यस्थानी शिवलिंग आहे.
मुख्य मंदिराच्या बाह्यभिंतींवर पौराणिक व लौकिक जीवनातील शिल्पपट्ट कोरले आहेत. कालिया मर्दन, कृष्ण गोपी लीला, कंसवध,रामायण, महाभारतातील प्रसंग पारंपरिक अंकनाहून वेगळे असल्यामुळे मूर्तिशास्त्राचे व प्रसंगाचे तपशील शोधून ओळखण्यात गंमत येते. समुद्रमंथन व विष्णूच्या दशवतारांची शिल्पे येथे दिसून येतात. पौराणिक कथांचे पेशवे व मुसलमान पद्धतीच्या पेहेरावातील शिल्पांकन मजेशीर वाटते. गरुड, हनुमान व गणेशाच्या मोठ्या मूर्ती प्राकारात असून वसई विजयानंतर पोर्तुगीज चर्चमधील एक घंटा सिद्धेश्वराच्या प्रांगणात ठेवली आहे.
बंदिस्त प्राकारात मुख्य सिद्धेश्वर मंदिराबरोबर योगिनींचे व आठ दिशांचे दिक्पाल असलेली दोन छोटी मंदिरे आहेत. योगिनी मंदिरांमध्ये नाथपंथीय साधूंच्या विविध आसन मुद्रा कोरल्या आहेत. प्राकाराच्या मागील बाजूला नदीकडे जाणारा दुसरा दरवाजा असून पुढे घाट आहेत. अभ्यासक, पर्यटक व भाविकांना हे संक्रमण काळातील मंदिर बघण्याचा आनंद मिळेल.
https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-saili-palande-datar-writes-about-five-beautiful-temples-in-maharashtra-5331498-PHO.html
Lord vishnu’s black stone idol with Shankha, Gada, Chakra looks very attractive!
Explore My Trip to Vishnu Temple at Siddheshwara – Newasa
Dikpalas : Names & Attributions
(Thanks to WikiPedia.org )
| Name | Direction | Mantra | Weapon | Consort | Graha (Planet) | Guardian Mātṛkā |
|---|---|---|---|---|---|---|
| Kubera | North | Oṃ Śaṃ Kuberāya Namaḥ | Gadā (mace) | Kuberajāyā | Budha (Mercury) | Kumārī |
| Yama | South | Oṃ Maṃ Yamāya Namaḥ | Daṇḍa (staff) | Yami | Maṅgala (Mars) | Varahi |
| Indra | East | Oṃ Laṃ Indrāya Namaḥ | Vajra (thunderbolt) | Śacī | Sūrya (Sun) | Aindri |
| Varuṇa | West | Oṃ Vaṃ Varuṇāya Namaḥ | Pāśa (noose) | Nalani | Śani (Saturn) | Varuṇī |
| Īśāna | Northeast | Oṃ Haṃ Īśānāya Namaḥ | Triśūla (trident) | Pārvatī | Bṛhaspati (Jupiter) | Māheśvarī |
| Agni | Southeast | Oṃ Raṃ Agnaye Namaḥ | Śakti (Spear) | Svāhā | Śukra (Venus) | Meṣavāhinī |
| Vāyu | Northwest | Oṃ Yaṃ Vāyuve Namaḥ | Aṅkuśa (goad) | Bhāratī | Candra (Moon) | Mṛgavāhinī |
| Nirṛti (sometimes Rakṣasa) | Southwest | Oṃ Kṣaṃ Rakṣasāya Namaḥ | Khaḍga (sword) | Khaḍgī | Rāhu (North Lunar Node) | Khaḍgadhāriṇī |
| Brahmā | Zenith | Oṃ Hriṃ Brahmaṇe Namaḥ | Padma (lotus) | Sarasvatī | Ketu (South Lunar Node) | Brahmāni |
| Viṣṇu | Nadir | Oṃ Kliṃ Viṣṇave Namaḥ | Cakra (discus) | Lakṣmī | Lagna | Vaiṣṇavī |
Siddheshwara Temple – Newasa – Maharashtra
Siddheshwara temple is part of the famous group of temples of God Shiva which are placed around the confluence (Sangam) of Pravara and Godavari rivers at Toka near Newasa (Pravara Sangam). The group includes Siddheshwar, Rameshwar, Mukteshwar, Ghoteshwar and Sangameshwar. All these ancient temples are built with black stone and lime in Hemadpanti style.
Siddheshwara temple, among all, is of significant temple. The temple belongs to the period of the Peshwas as per the Devanagari inscriptions which are placed on the south-gate of the temple. It seems that Vishnu Mahadev Gadre had built the temple in the year 1767 for the cost of Rs. 93,000. Nana Phadnis contributed further in repairing of the temple and also built six flights of steps from the temple to the Godavari River (called as Ghat).
The beautifully carved temple portrays various mythological themes like Ramayana & Mahabharata and elegantly carvings of God & Goddesses.
In the temple compound, temples of Vishnu & Maa Durga are present on the both sides of the main temple dedicated to Lord Shiva i.e. Vishnu on left & Durga on right. As per local villagers these three temples represent the name of their constructor – Vishnu (Vishnu Temple) Mahadev (Shiva Temple) Gadre (Maa Durga Temple – which is also called as ‘Gajara Mata’ by locals). Lord Ganesha & Dattatreya’s mini temples are also part of the campus.
Main temple is abode of Lord Shiva with Shiva linga. Surprisingly, the roof-top of the sabha-mandapa (hall at the entrance) is ornamented with Lord Krishna & Radha’s idols. Even the outer walls of the Shiva temple bear many scenes about Krishna leelas, Ramayana and Mahabharata.
Notable carvings of Vishnu-Avatars (incarnations of Lord Vishnu) include:
- Narasimha – the half man / half lion,
- Varaha – the boar,
- Matsya – the fish,
- Kurma – the tortoise,
- Vamana – the dwarf,
- Rama – the prince & king of Ayodhya &
- Krishna – the eighth son of Devaki & Vasudeva
We must say that this entire temple campus represent one the best example of Vaishnava (who follows Lord Vishnu) & Shaishav (who follows Lord Shiva) unity.
On the entrance of the Shiva temple very attractive and mighty idol of Nandi grabs attention. Made of black stone and well ornamented.
http://punetopune.com/siddheshwara-temple-newasa-maharashtra/
Ashtamatrika Devi Temple at Siddheshwara – Newasa
Ashtamatrika Devi Temple on the right side of the main temple of Lord Shiva i.e. Siddheshwara Temple, is amazingly constructed on Star Shaped base. Such design of the temple i.e. Star shape can be seen at Bellur (Karnataka). Devi is called as Gajara Devi by villagers, named after the founder’s surname i.e. Gadre (Gajre).
The best attraction here is ‘Ashtamatrika‘ (Eight Mother Goddesses of War, Children and Emancipation) idols on the walls of the temple which include Varahi, Brahmini, Vaishnavi, Indrani, Maheshwari, Kaumari, Chamunda & Narasimhi. Its rare to see Ashta Matrikas in temples. The temple is definitely a great hemadpanthi construction style in recent past.
Dikpalas (Guardians of the directions)
कायगाव टोका -प्रवरासंगम

भूयस्तु शरमुद्धृत्य कुपितस्तत्र राघवः।
सूर्यरश्मिप्रतीकाशं ज्वलन्तमरिमर्दनम्॥ १३॥
संधाय सुदृढे चापे विकृष्य बलवद्बली।
तमेव मृगमुद्दिश्य श्वसन्तमिव पन्नगम्॥ १४॥
मुमोच ज्वलितं दीप्तमस्त्रं ब्रह्मविनिर्मितम्।
शरीरं मृगरूपस्य विनिर्भिद्य शरोत्तमः॥ १५॥
मारीचस्यैव हृदयं बिभेदाशनिसंनिभः।
तालमात्रमथोत्प्लुत्य न्यपतत् स भृशातुरः॥ १६॥
अरण्यकांड सर्ग ४४, वाल्मिकी रामायण
रामाने रागाने पुन्हा बाण उचलला
ते सूर्याच्या किरणांसारखे चमकत होते आणि शत्रूंना चिरडत होते 13. 13.
त्याने ते मजबूत धनुष्याने निश्चित केले आणि जोराने खेचले
मोठ्याने श्वास घेणाऱ्या सापाप्रमाणे त्याने त्या हरणाकडे पाहिले १४॥
त्यांनी ब्रह्मदेवाने बनवलेले ज्वलंत अस्त्र सोडले
सर्वोत्तम बाणांनी हरणाच्या शरीराला छेद दिला 15. 15.
गडगडाटाने मारिचाच्या हृदयालाच छेद दिला.
अत्यंत व्यथित होऊन त्याने ताडाच्या झाडावरून उडी मारली आणि खाली पडला 16.
****
मायावी हरणाने म्हणजे मारीची याने गोदावरीच्या कडे कडेने प्रभूराम यांना
झुंजवत या कायगाव टोके या ठिकाणा पर्यंत आणले. त्याचवेळेस प्रभुराम
यांच्या लक्षात आले की हा नक्कीच कोणीतरी मायावी आहे. तेव्हा त्यांनी बाण
मारून त्याचा वध केला. त्या बाणाचे टोक येथेच जमिनीत रुतले होते. म्हणून
गावाचे नाव तीर्थ क्षेत्र टोका, असे पडले. या ठिकाणी गोदावरी नदीला
धनुष्याचा आकार असल्याने तिला बाणगंगा असेही म्हणतात.
रामाने कार्य सिद्ध होऊन स्थापन केलेले शिवाचे सिद्धेश्वर मंदिर, मारीच नावाच्या राक्षसाने सुवर्णमृगाचे रूप धारण केले होते त्याचा देह म्हणजे काया जेथे पडली ते कायगाव, रामेश्वर व मारीच राक्षसाला ज्या ठिकाणी मुक्ती मिळाली ते मुक्तेश्वर असे विविध संदर्भ अनेक ग्रंथांत कायगाव टोके या गावाचे आढळतात.
प्रवरा ही महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातून उगम पावणारी नदी आहे.
हिला मुळा, आढळा, म्हाळुंगी या उपनद्या मिळतात. ही नदी पुढे गोदावरीला जाऊन
मिळते. प्रवरानदीच्या किनाऱ्यावर अकोले, संगमनेर, कोल्हार, नेवासा ही
प्रमुख गावे आहेत. नदी रतनवाडीला उगम पावुन प्रवरासंगम येथे गोदावरी नदीस
मिळते.

प्रवरा आणि गोदावरी यांचा संगम नेवासापासून जवळ असलेल्या टोका या गावी झाला
आहे. या गावाला एक तीर्थक्षेत्र म्हणून संबोधले जाते. हा भाग म्हणजे
रामायणातील दण्डकरण्याचा भाग आहे, असे आजही त्याचे महत्व आहे.
या संगमाच्या बाजुलाच भगवान शंकराचे मंदिर आहे. बाजूलाच सिद्धेश्वर,
घोटेश्वर, रामेश्वर, मुक्तेश्वर, संगमेश्वर, बाण गंगा अशी मंदिरे आहेत.
पेशवेकालीन सन १७०० नंतरची ही मंदिरे हेमांडपंथी आणि नागरशैलीचा वापर करत
बांधली आहे.नगरच्या टाकळी ढोकेश्वरच्या पळशीचे मंदिरही जमीनदारी मिळालेल्या
पेशवे सरदाराने बांधले होते तसेच कोण्या सरदारांच्या मदतीने (धन) ही
मंदिरे बांधली असावीत.
नगर- संभाजी नगर रस्त्याच्या देवगड पुढेच डावीकडे नदीवरचा पुल सुरू
होण्यापूर्वी एक रस्ता या मंदिराकडे आपल्याला घेऊन जातो.पहिल्यांदा घटेश्वर
मंदिर यांचे दर्शन होते.मग पुढे गेल्यावर रेखीव शिल्पांच्या सौंदर्याने
नटलेले सिद्धेश्वर मंदिर आहे.मंदिर प्रवरासंगमाच्या काठावर पूर्वाभिमुख पण
प्रवेशद्वार पश्चिमेसही आहे.पूर्वेच्या प्रवेशद्वारवर मोठा सज्जा म्हणजेच
नगारखाना? आहे.
हे मंदिर तीन देवतांच्या मंदिरात विभागले आहे.
१.सिद्धेश्वर
मधोमध भव्य मुख्य शंकराचे सिद्धेश्वरचे मंदिर आहे.शिववाहन नंदी मंडपात घुंगरूमाळ चढवलेली आकर्षक नंदीची भव्य मूर्ती आहे.

मंदिर मंडपामध्ये खांबांवर भारवाहक यक्ष आहेतच.गर्भगृहातील शंभूची पिंड
अत्यंत सुखदायक आहे.(योगायोगाने आम्हांला पुजाऱ्यांनी आरतीची संधी
दिल्याने तिथले वातावरण माझ्यासाठी आणखीच आनंददायी झाले.)तिथेच कुठल्यातरी
देवीची २ फूट उंच ही मूर्ती आहे,ती कोणती समजली नाही.
मंदिराच्या बाहेरील बाजूला रेखीव शिल्पांची रेलचेल आहे .आता मिपा उघडून
प्रचेतस यांचे लेख वाचत मूर्ती ओळखण्याची माझी परेड सुरु झाली ;).
https://www.misalpav.com/node/23854
यात पहिल्यांदा एक हत्तीवर बसलेले पेशवे? याच मंदिराची प्रतिकृती असलेले शिल्प आहे.

पुढे ताक घुसळणाऱ्या गोपी, कालिया मर्दन, अर्जुन आणि भीम गर्वहरण,
शिवपार्वती नंदी ही छोटी शिल्पे आपल्याच उंचीसमोर कोरलेली आहेत.समोरच्या
भिंतीवर विष्णू दशावतार कोरलेले आहेत.हा दशावतार पट निश्चितच
आतापर्यंत पाहिलेल्या पटांपैकी खूप सरस आहे.कारण यातल्या प्रत्येक
अवताराच्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने दाखवल्या आहेत.राम अवतारात
रावणाचे शिल्प अधिक संशोधन करण्यासारखे आहे,त्याने हातात अनेक आयुधे धारण
केलीआहेत.तसेच मत्स्य आणि कूर्म अवताराचे आहे.कली अवतार मी पहिल्यांदाच नीट
पाहिला.आता दुसऱ्या भिंतीवर विविध वाद्ये टाळ,पखवाज,वीणा वाजवणाऱ्या
सुंदरी आहेत.तर एक शिल्पात सुंदरीने धनुष्य धरले आहे?.



एक आयताकृती मोठे शिल्प म्हणजे द्रौपदी स्वयंवरपट ,अर्जुन धनुष्य घेत वर असलेल्या माशाचा वेध घेत आहे.जवळच बाकी पांडव,द्रुपद आहे.

२.विष्णू मंदिर
डाव्या बाजूला सुंदर अशा विष्णूवाहन गरूड देवाची २-३ फूट गुडघ्यांवर बसलेली
गरूड मुर्ती आहे.पण वरती कृष्ण गोपी शिल्प आणि रासलीलेचे गोलाकार नृत्य
शिल्प आकर्षक आहे.
छोटेखानी या मंदिरावर चहू बाजूंनी अष्ट दिक्पाल यांची शिल्पे आहेत.


आठ दिशांचे पालन करणाऱ्या आठ देवांना ही संज्ञा आहे. इंद्र, अग्नी, यम,
निर्ऋती, वरुण, वायू, कुबेर आणि ईशान हे अनुक्रमे पूर्व, आग्नेय, दक्षिण,
नैर्ऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर आणि ईशान्य ह्या आठ दिशांचे पालन करणारे
अष्टदिक्पाल म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची वाहने अनुक्रमे ऐरावत, छाग
(मेंढा), महिष, पुरुष, मकर, हरीण, दशाश्वथ (अथवा अश्व अथवा शश) व वृषभ ही
होत. आयुधे अनुक्रमे वज्र, शक्ती, पाश व दंड, खड, नागपाश, ध्वज, गदा आणि
त्रिशूल ही होत.

३.देवी मंदिर
उजव्या बाजूला देवीचे मंदिर आहे.मंदिराच्या बाहेरील भिंतींवर सप्तमातृकांची
शिल्पे आहेत.आदिशक्तीचे भिन्नभिन्न रुपे आहेत. प्रमुख पुरुष देवतांच्या
शक्ती आहेत. ब्रह्मापासून ब्रह्माणी, विष्णूपासून वैष्णवी, शिवापासून
माहेश्वरी, कार्तिकेया पासून कौमारी, इंद्रापासून इंद्राणी/ऐन्द्री वराह
अवतारापासून वाराही तर देवीपासून चामुंडा अशी शक्ती उत्पन्न झाली. आणि काही
ठिकाणी चौसष्ट योगिनीपैकी नारसिंही (प्रत्यंगिरा देवी), देवीचाही अन्य
मातृकामध्ये उल्लेख आढळतो. अशा वेळी त्यांना अष्टमातृका असे म्हणतात.
या मंदिरात नारसिंही मातृदेवताही आहे हे विशेष!
मंदिराच्या एका बाजूला सुंदर महिरपी असलेल्या असंख्य खांबांच्या रांगांची एक पडली आहे.अगदी राजस्थानीशैलीच्या महालांसारखी..

आता मंदिराच्या समोरच तो प्रसन्न दोन जीवनदायिनी प्रवरा -गोदावरी संगमांचा शांत वाहणारा प्रवाह मनाचा ठाव घेत राहतो.
तूनळी संदर्भ
https://youtu.be/K1QToBq9-9E?si=fscewFL25qWzv-H8
-भक्ती














































































































































No comments:
Post a Comment