आता सुरतेहून परतताना ज्या मार्गाने आले तो मार्ग न स्वीकारता राजांनी देशावरून जायचे ठरविले.किनारपट्टीने आल्यास पाठलागाचे भय आहे आणि लपण्यास सुरक्षित जागा नाही, त्यामुळे देशावरून जाणेच जास्त सोईस्कर असा विचार त्यांनी केला. पंधरा हजार सैन्य आणि शेकडो घोडे, खेचरे व बैल यांवर लादलेले लुटीचे सामान बरोबर घेऊन राजे पूर्वेला निघाले. सुरतेच्या पूर्वेला सह्याद्रीचा घाट आहे. तो चढून नाशिक जिल्ह्यातील सटाण्याच्या बाजूने देशावर येता येते. सुरत, बारडोलीहून डांग जिल्ह्यातील आहवामार्गे राजे घाट चढून साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी आले. इथून पूर्वेला सहा मैलांवर मुल्हेर किल्ला आहे. हे दोन्ही किल्ले मोगलांकडे होते व प्रांतही मोगलांकडे होता. मुल्हेर ताहराबाद, सटाणा, कळवण, वणी, दिंडोरी, नाशिक, सिन्नर, अकोला, जुन्नर, खेड, पुणे अशा मार्गाने राजे राजगडावर जाणार होते. या मार्गावर कळवण सोडले की, सातमाळाची डोंगररांग आडवी येते. (नाशिक जिल्यातुन सह्याद्रीला भेदत पूर्व-पश्चिम डोंगररांग जाते ती म्हणजे सातमाळ). ही महाराष्ट्राची एक संरक्षक रांग आहे. इथले किल्ले थोड्या शिबंदीसह अनेक दिवस शत्रूशी भांडू शकतील याची माहिती राजांना होती. या डोंगररांगेच्या दक्षिणेला व उत्तरेला मोठी सपाट मैदाने आहेत. या रांगेत अनेक किल्ले आहेत जसे हातगड, धोडप, कांचना वगैरे किल्ले. या रांगेतील ‘कांचन’ किल्ला ज्याच्या पश्चिमेला एक घाट आहे ज्याला ‘कांचनबारी’ असे म्हणतात थोडक्यात खिंड. आजूबाजूचा सर्व भाग आणि बरेचसे किल्ले हे मोगलांकडे होते त्यामुळे कोणाच्याही नजरेत न येता प्रवास करण्याच्या हेतूने महाराजांनी कांचनबारीची खिंड निवडली होती.
कांचना किल्ल्याच्या पश्चिमेला जो घाट आहे, तो 'कांचनबारी'. या घाटाच्या उत्तर पायथ्याशी कांचने गाव आहे. घाटाच्या पूर्वेस कांचना किल्ला आहे, तर पश्चिमेला हंड्या शिखर आहे. कांचना किल्ला चढायला अवघड आहे. कांचनावर जागा कमी आहे. सातमाळा रांगेच्या पश्चिमेला डोंगराळ परिसर वाढत जातो, तर पूर्वेला चांदवडच्या पलीकडे डोंगरांची उंची कमी-कमी होत जाते, त्यामुळे पूर्वेकडून सातमाळा रांग ओलांडणे फारच धोकादायक होते. शिवाय चांदवड हे मोगली ठाणे होते आणि औरंगाबादहून मोगलांचा दक्षिणेकडील सुभेदार औरंगजेबाचा मुलगा शहाजादा मुअज्जम आपले सैन्य घेऊन येण्याची शक्यता होती. त्यामुळे पूर्वेकडून सातमाळा रांग ओलांडणे जास्त सोईस्कर आहे, हे राजांना समजून चुकले होते आणि म्हणूनच साधारण मध्यावरची कांचनबारीची खिंड त्यांनी यासाठी निवडली. जेमतेम पाऊण मैलांची ही खिंड आहे. तसे पाहिले तर सुरत ते पुणे अंतर खूप जास्त असल्यामुळे आपला सामना मोगलांशी होणार हे निश्चितच आहे, हे राजांनी ओळखले होते.
महाराज आता मुल्हेरच्या पायथ्याला आले होते. पायथ्याची पेठ महाराजांनी लुटली. मुल्हेरचा किल्लेदार होता नेकनामदार खान. हा गडी गडावरून खाली उतरलाच नाही कारण त्याला माहित होते की आपण मराठ्यांचा सामना करू शकणार नाही. इकडे औरंगाबादला दक्षिणेचा सुभेदार होता खुद्द औरंगजेबाचा मुलगा ‘शहाजादा मुअज्जम’. याची महाराजांच्या प्रत्येक हालचालीवर नजर होती आणि वेळोवेळी त्याला बातम्या पोहचत होत्या. त्याने बुऱ्हाणपूरला असलेला मातब्बर मोगल सरदार दाऊदखान कुरेशी याला महाराजांचा समाचार घेण्यासाठी पाठवले. या वेळी दाऊदखानचा मुक्काम वैजापूरला होता. दाऊदखानासोबत मीर अब्दुल मबूद, इख्लासखान मियाना राय मकरंद खत्री, गालीबखान, नारोजी, वसंतराय, शेख सफी, संग्रामखान घोरी भान पुरोहित हे सरदार होते. याशिवाय मोठा तोफखाना, हत्ती, उंट व विपुल सामग्री होती. या सैन्यात 'तारीखे दिलकुशा'चा लेखक भीमसेन सक्सेना हाही होता.
तो त्यावेळी दाऊदखानाचा अधिकारी होता. प्रचंड सैन्य घेऊन दाऊदखान मुल्हेरच्या दिशेने निघाला. राजांना पुण्याला जायचे आहे, तर कुठल्या तरी मार्गे त्यांना सातमाळा रांग ओलांडावी लागणार, हे दाऊदखानास ठाऊक होते. परंतु नक्की कुठून ओलांडणार याची खात्री करण्यासाठी तो चांदवड (म्हणजे सातमाळेचे पूर्वेचे टोक) येथे येण्याचे ठरवले. सातमाळा रांगेचे पूर्वेचे टोक म्हणजे चांदवड आणि चांदवड ते वैजापूर अंतर साधारणपणे पंचेचाळीस मैलाचे होते, त्यामुळे खानास घाई करणे आवश्यक होते. दाऊदखान चांदवडला पोहोचताक्षणी त्याला बातमी मिळाली की, शिवाजीराजे कांचनामांचनाच्या खिंडीतून सातमाळा ओलांडून नाशिकच्या मार्गाला लागणार आहेत.
दाऊदखान येतोय ही बातमी मिळताच महाराजांनी मुल्हेरचा तळ उठवला व दक्षिणेच्या वाटेला लागले. इकडे बागीखान हा चांदवडचा फौजदार होता. मराठे कांचनबारी किंवा कांचनमंचनच्या घाटाने सातमाळ ओलांडून नाशिककडे जाणार आहेत ही बातमी त्याला समजली आणि त्याने मराठ्यांना कांचनबरीच्या दक्षिणेला रोखायचे असे ठरवले. राजांचे सैन्य रात्रीदेखील प्रवास करते हे त्याला ठाऊक होते. त्यामुळे त्वरा करणे आवश्यक होते.
युद्ध हे होणारच हे महाराजांना अचूक ठाऊक होते. प्रश्न एकच होता की सुरतेवरून आणलेला खजिना कसा राखायचा. खजिन्यासकट पळ काढणे हे शक्य नव्हते आणि खजिना सोबत ठेवला तर शत्रूचा खजिन्यावरच हल्ला होऊ शकतो आणि मोठा अवघड प्रसंग निर्माण होऊ शकतो. आणि काही लोकांना खजिना घेऊन पुढे जाण्यास सांगणे हे ही शक्य नव्हते कारण खजिना पुढे पाठवायचा म्हणजे घोडदळ सोबत द्यावे लागेल कारण पायदळ लवकर पुढे जाणार नाही. जर घोडदळ पुढे पाठवले तर दाऊदखानाचा सामना फक्त पायदळानिशी करणे ही सोपे नव्हते, आणि आपल्या सैनिकांना सुद्धा याची भनक लागू द्यायची नव्हती. शेवटी शिवराय ते शिवरायच, शेवटच्या क्षणाला कोणाच्या डोक्यात कधी येऊच शकणार नाही असे निर्णय घेण्याचे त्यांचे कौशल्य कामी आले. १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री त्यांना समजले की पहाटेच्या वेळी आपली व दाऊदखानाच्या सैन्याची गाठ पडणार. म्हणून रात्रीच्या वेळी खजिना वाहणारी घोडी व बैले पायदळासोबत सप्तशृंगी व वणीच्या मार्गाने पाठवली आणि मुख्य सैन्य दाऊदखानाच्या दिशेने पाठवले.
महाराजांकडे या वेळी पायदळाचे सेनापती मोरोपंत पिंगळे आणि दहा हजारांचे घोडदळ होते आणि घोडदळ प्रमुख प्रतापराव गुजरही सोबत होते. महाराजांचे नियोजन असे होते की काही तासात दाऊदखानाचा फडशा पडायचा आणि दिवस मावळेपर्यंत खजिन्याचा दिशेने निघायचे.

१६ ऑक्टोबरच्या रात्री राजांना दाऊदखानाच्या हालचालींची माहिती कळली आणि त्यांनी पहाटे पहाटे मोगली सैन्याशी आपली गाठ पडणार हे ओळखले, म्हणून रात्रीच्या वेळी त्यांनी खजिना सुरक्षिततेच्या कारणास्तव मागे ठेवल्याचे दर्शविले. मुख्य सैन्य पुढे चालविले आणि लुटीचा माल चार-पाच हजार पायदळासोबत सप्तशृंगी-वणी या वेगळ्या मार्गाने पुढे पाठवला. हे सर्व करताना या कानाची बातमी त्या कानाला लागू न देता राजांनी हे सर्व घडवून आणले.

१७ ऑक्टोबरच्या पहाटे इख्लासखान कांचना किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचला. त्या वेळी मराठे युद्धाच्या आवेशाने तयार होते, खुद्द राजे चिलखत घालून दोन्ही हातात पट्टे चढवून फिरत होते आणि स्वतः सेनेचे नेतृत्व करत होते.
इखलासखानाने हंड्या शिखराच्या खाली असणाऱ्या पठारावर उभे राहण्याचे ठरविले, कारण तिथून मराठ्यांवर चांगला मारा होऊ शकतो. दाऊदखानाने आपल्या सैन्याचे दोन भाग केले होते.
पण खानाचा हा डाव मराठ्यांना आधीच समजला आणि त्यांनी खानाच्या सैन्यावर छापे घालून मोगली तोफखाना बसवायच्या अगोदरच उधळून लावला. या वेळी राजांसोबत प्रतापराव सरनोबत, मकाजी, आनंदराव, बंकाजी दत्तो, मोरोपंत पिंगळे, निळोपंत, जीपंत, दत्ताजीपंत व बाळप्रभू चिटणीस होते. राजांनी आपल्या सैन्याचे चार केले. राजांनी घोडेस्वारांची एक तुकडी पश्चिमेच्या अंगास डोंगररांग पार करून मोघलांच्या सैन्याच्या पिछाडीला धाडली. दुसऱ्या दोन तुकड्या त्याच्या सैन्याच्या डाव्या उजव्या बगलांवर हल्ला करायला पाठविल्या. चौथ्या तुकडीत स्वतः राजे होते.
इखलासखान घोडेस्वारांची एक मोठी तुकडी घेऊन कांचन किल्ल्याच्या पायथ्याला आला होता. एका उंचवट्यावर उभे राहून त्याने पाहिले तर मराठे युद्धाच्या तयारीने उभे असल्याचे त्याला दिसले आणि खुद्द शिवाजी महाराज चिलखत घालून , दोन्ही हातात पट्टे चढवून फिरत होते. या युद्धाचे नेतृत्व स्वतः शिवाजी महाराज करत होते. (हे वाक्य वाचल्यावर माझ्यातरी अंगावर काटा येतो बर का ).
या युद्धामध्ये मराठयांना मुख्य धोका हा खानाच्या तोफखान्याचा होता. इखसालखानाने आपला तोफखाना पुढे आणून हंड्या डोंगराच्या खालच्या पठारावर उभा केला होता. आपल्या उजव्या हाताला मोगलांचा तोफखाना उभा राहत आहे हे महाराजांच्या लक्षात येताच एक तुकडी पाठवून मोगलांचा संपूर्ण तोफखाना उध्वस्त करून टाकला. इखसालखानाला बसलेला हा मराठ्यांचा पहिला फटका होता जिथे त्याचा मुख्य डावच फसला होता.
महाराजांनी या युद्धात ‘तुलूघ्मे’ पद्धतीचा वापर केला. म्हणजे शत्रूला चारी बाजूने कोंडीत पकडायचे. महाराजांनी आपल्या घोडदळाचे चार भाग केले. इखलासखान आपल्या सैन्यासोबत खिंडीच्या दक्षिण बाजूस होता. महाराजांनी आपली एक तुकडी पश्चिमेच्या बाजूने वळसा घालून खानाच्या पिछाडीला धाडली. दोन तुकड्या खानाच्या सैन्याच्या उजव्या व डाव्या बाजूने पाठवल्या, आणि शेवटची तुकडी जिचे नेतृत्व राजे स्वतः करीत होते खिंडीतच खानाचा समोरून सामना करण्यासाठी थांबली. मराठ्यांनी चारी बाजूने एवढे वेगवान हल्ले केले की, ना खानाला ना त्याच्या सैन्याला समजले की आपण कोंडले गेलो आहोत. खान तसा निडर होता तो जोमाने मराठ्यांवर धावून गेला परंतु त्याच्यावर तलवारीचे अनेक वार झाले व तो जखमी होऊन घोड्यावरून खाली पडला. पहाटेच्या वेळी हे युद्ध सुरु झाले होते आता सूर्य उजाडला होता.
दाऊदखान कांचना किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचला. आपले हत्ती, नौबती व निशाणे त्याने बाकीखान व इब्राहीम पन्नी यांच्यासोबत पिछाडीची काही फौज देऊन भाऊडबारीच्या पठारावर ठेवली. राय मकरंद खत्रीला आघाडीला पाठवले. त्याच्या मागे मधल्या फळीत शेख सफी, बुंदेल्यांचा प्रमुख पुरोहित भान व संग्रामखान घोरी यांच्याबरोबर स्वतः राहिला. पिछाडीच्या फळीत गालिबखान, नारोजी आणि वसंतराव होते.आता नव्या दमाच्या सैन्याचा मराठ्यांवर हल्ला होणार होता. नव्या दमाच्या दाऊदखानाने मराठ्यांवर हल्ला केला, मात्र अल्पावधीत तोदेखील कोंडला गेला. संग्रामखान घोरी जखमी झाला. मराठे दाऊदखानाच्या सैन्याच्या भोवती घिरट्या घालू लागले. दाऊदखानाने मोठ्या हिमतीने आपल्या तुकडीनिशी हल्ला करून जखमी इखलासखानाला बाहेर काढले. पण दाऊदखानाच्या सैन्याचा मराठ्यांपुढे टिकाव लागला नाही.

मुघलसैन्याची वाट पहाणारे कांचनखिंडीच्या पायथ्यापाशी जमवाजमव करून राहिलेले महाराजांचे सैन्य.




मोगली तोफखान्याचा आणि मोगली सैन्याचा संपर्क तुटला. त्यामुळे तोफखान्याचा उपयोग शून्य झाला. तोफखान्याची निशाणे मराठ्यांनी काबीज केली. अनेक तोफची त्यात मारले गेले. दाऊदखानाची फौज खचली होती. मोगलांचे २००० सैन्य मारले गेले,काही पळून गेले. आता मराठ्यांनी मोगलांच्या तोफखान्यावर हल्ला केला. तोफखान्याचे निशाण व घोडे काबीज केले. हे युद्ध अंदाजे सहा तास चालले. उरले सुरले मोगल आपल्या तळावर पळून गेले पण मराठ्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांचे तळ लुटले आणि हे युद्ध जिंकले. सुरतेवरून आणलेल्या खजिन्यात आणखीन भर पडली.
या युद्धामध्ये महाराजांबरोबर प्रतापराव गुजर, मकाजी, आनंदराव, बंकाजी दत्तो, मोरोपंत पिंगळे, निळोपंत, अण्णाजीपंत, दत्ताजीपंत व बालप्रभु चिटणीस अशी मंडळी होती. दाऊदखानाबरोबर मीर अब्दुल मबुद, इखसालखान मियाना, राय मकरंद खत्री, गालीबखान, नारोजी, बसवंतराय, शेख सफी, संग्रामखान घोरी, भान पुरोहित अशी काही सरदार मंडळी होती.
सभासद बखरीत कांचनवारीच्या लढाईबद्दल आलेला उल्लेख असा आहे-
"आवकाश थोडा म्हणून शहर मारून चालिले. ही खबर मोगलांचे सुभेदार वीस उमराव मोहबतखान व दाऊदखान असे सात गावची दवड करून बरोबर हजार स्वार एक एक सुभ्याबरोबर चालून आले. त्यांनी राजियास गाठले. गनीम आला ऐसी खबर कळली. राजा खासा घोड्यावर बैसून बख्तर, घुगी घालून, हाती पट्टे चढवून, मालमत्ता घोडी, पाईचे लोक रवाना करून आपण दाहा हजार स्वारानिशी सडेसडे राऊत उभे राहीले. वणी दिंडोरी म्हणून शहर आहे. ते जागोजागी उभे राहून सुभ्याचे लोक आले. त्यांशी घोरंदार युद्ध केले. मोहबतखान व दाऊदखान यांनी युद्ध केले. राजियांनी आपली फौज पुढे करून, पाठीवर आपण खासा राहून झगडा दिधला.
प्रतापरावं सरनोबत व व्यंकोजी दत्तो, आनंदराव वरकड सरदार पुढे होऊन मोठी कत्तल केली. आणि मोगल मारून मुडदे पाडिले. दोन प्रहर युद्ध जाले. मराठे यांनी शर्त केली. तीन हजार मोगल मारिले. तीन चार हजार घोडे पाडावे केले. दोन वजीर मोगलाई सापडले."
हे युद्ध अतिशय महत्वाचे असे होते. या युद्धाचे वैशिष्ट्य म्हणजे, मोगलांशी समोरासमोर झालेली व जिंकलेली अशी ही लढाई. या लढाईत मराठ्यांनी कमी वेळात मोठ्या फौजेचा लावलेला निकाल यामुळे कांचनबारीची लढाई इतिहासात प्रसिद्ध आहे.याचे नेतृत्व खुद्द महाराजांनी केले होते. या युद्धाची रणनीती अतिशय जबरदस्त होती. शत्रूच्या मुलखात जाऊन समोरासमोर ही लढाई महाराजांनी केली. दाऊदखानासारखा मातब्बर मोगल सरदार सुद्धा या युद्धनीतीपुढे टिकू शकला नाही. दाऊदखान म्हणजे मोगलांचा दक्षिणेतला प्रबळ सेनानी होता. तो हरल्यामुळे आता दक्षिणेत मोगलांचा एकही सेनापती अथवा सुभेदार नव्हता जो मराठ्यांपुढे उभा राहील. म्हणून कदाचित स्वतः औरंगजेब पुन्हा दक्षिणेत उतरला असावा. ही लढाई तशी निर्णायक लढाई होती कारण या लढाईनंतर मोगलांचा एकही मातब्बर सरदार उरला नव्हता जो महाराजांच्यावर चालून जाईल. या लढाईमुळे दक्षिणेतील मोगलांची विश्वनियता कमी झाली. यानंतर महाराजांनी मोगलांच्या अनेक प्रदेशावर छापे टाकून ती जिंकून घेतली आणि अगदी बुऱ्हाणपूरपर्यंत आपल्या फौजा नेल्या. वऱ्हाडातील कारंजा या संपन्न शहरावर हल्ला करुन ते जिंकले व त्यातून जवळपास एक कोटींचा खजिना स्वराज्याच्या तिजोरीत आला.
या युद्धभूमीचे नेमके स्थान आजही निश्चित नसल्याने इतिहासात काही ठिकाणी ही लढाई वणी-दिंडोरी संग्राम म्हणुन ओळखली जाते. या युद्धामुळे आपण मोगलांना समोरासमोरील युद्धात पराभुत करू शकतो हा मराठ्यांचा आत्मविश्वास दुणावला. महाराज येथुन कुंजरगडाकडे निघुन गेले. या लढाईनंतर दिंडोरीचा मुघल सुभेदार सिद्धी हिलाल मराठ्यांना मिळाला. पुढील काळात या भागातील बहुतांशी किल्ले महाराजांनी स्वराज्यात सामील केले.
कांचनबारीच्या लढाईचा नकाशा सोबत जोडला आहे ज्यामध्ये महाराजांनी केलेली मोगलांची चारी बाजूने कोंडी समजू शकेल.
नाशिकमधील बऱ्याच भागात आपल्याला नाथपंथीयांचा प्रभाव दिसुन येतो. याच नाथपंथातील गुरु गोरक्षनाथ यांनी आपला शिष्य मच्छिंद्रनाथ याची सोन्याच्या मोहापासुन मुक्ती करण्यासाठी आपल्या तपसामर्थ्याने हा डोंगर सोन्याचा केल्याची कथा सांगितली जाते. सोन्याचा डोंगर म्हणजे कांचना अशी या डोंगराच्या नावाची उत्पत्ती सांगीतली जाते. बारी म्हणजे खिंड, या खिंडीमार्गे होणार्या व्यापारावर / वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कांचन किल्ल्याची निर्मिती केली गेली असावी. मार्च १६३६ मध्ये मोगल सरदार अलावर्दीखानाने ह्या किल्ल्यास वेढा दिला. त्या वेळेस धोडपच्या किल्लेदाराच्या ताब्यात हा किल्ला होता. तेव्हा अंजनेरीचा किल्लेदार गंभीरराव यांच्या मध्यस्थीने मोगलांनी हा किल्ला काबीज केला. मोगलांकडून घेतलेला हा किल्ला 'नवाब सलाबतजंग' ह्यास परत करून तशी पोचपावती घेण्याबद्दल पेशवा नानासाहेब (बाळाजी बाजीराव) याने किल्ल्याच्या हवालदारास सूचना दिली होती.
पुढील काळात या भागातील बहुतांशी किल्ले महाराजांनी स्वराज्यात सामील केले. इ.स.१८१८ मध्ये जून महिन्यात हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
याला कांचन हे नाव पडण्यामागे एक दंतकथा सांगितली जाते की, एकदा नवनाथांपैकी मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ ही गुरू-शिष्यांची जोडी ध्यानधारणेसाठी योग्य जागेचा शोध घेत प्रवास करीत करीत सातमाळ डोंगररांगेतील एका गावात येऊन पोहोचली. पण नेमक्या त्याच वेळी त्या राज्याचा राजा मृत्यू पावला. आता त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होण्याचे काय ते बाकी होते. ही बातमी गावात नुकत्याच आलेल्या गुरूशिष्यांच्या जोडीला कळली. ते राजाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी तडक राजवाड्याकडे निघाले आणि वायूगतीने ते राजधानीत जाऊन पोहोचले.

राजाच्या निधनामुळे त्याची प्रजा शोकाकुल झाली होती. त्यांना राजाच्या मृत्यूची कल्पनाही करवत नव्हती. ते दृष्य पाहून मच्छिंद्रनाथांना त्यांची दया आली. राजाच्या निधनामुळे दुःखी झालेल्या त्याच्या प्रजेला दुःखमुक्त करण्यासाठी त्यांनी राजाच्या मृत देहात प्रवेश केला आणि काय आश्चर्य! राजाचा देह हळूहळू हालचाल करू लागला. थोड्या वेळाने तर राजा उठून बसला! आपला राजा मृत्यू पावला नसून तो जिवंत आहे हे त्याच्या प्रजेने जेव्हा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले तेव्हा त्यांना मोठा आनंद झाला. त्यांनी मोठ्या भावूकपणे त्याचे दर्शन घेतले आणि आपापल्या घरी परतले
काही महिने असेच गेले. मग गोरक्षनाथांच्या लक्षात आले की, आपल्या गुरुजींनी राजाच्या प्रजेला त्याच्या मृत्यूच्या दुःखातून मुक्त करण्यासाठी जो मार्ग अवलंबिला आहे तो आज ना उद्या बराच अडचणीत आणणारा आहे. याची जाणीव त्यांना कशी करून देता येईल यावर गोरक्षनाथ विचार करू लागले आणि एक दिवस त्यांनी राजाच्या राजवाड्यात राजनर्तकीच्या मदतीने पखवाजवादक म्हणून प्रवेश केला. 'चलो मछिंदर गोरख आया' असे बोल त्या वाद्यातून उमटवले. ते ऐकल्यावर मूळ संन्यासीवृत्तीच्या मच्छिंद्रनाथांना आपल्या कर्तव्याची जाणीव झाली, चांनी आपल्या शिष्याचे म्हणणे ऐकले आणि राजाचा देह सोड्न त्यांनी परत आपल्या देहात प्रवेश केला. त्यानंतर गुरू-शिष्यांची जोडी तिथून निघून गेली.
नेहमीप्रमाणे प्रवास करीत करीत ते एका ठिकाणी येऊन पोहोचले. तिथे त्यांना ध्यानधारणेसाठी योग्य अशी जागा मिळाली. मग त्या ठिकाणी त्यांनी आपल्या साधनेला आरंभ केला. बराच काळ तपश्चर्या केल्यावर गुरू मच्छिंद्रनाथांना परीस प्राप्त झाला. तो बरोबर घेऊन गुरुशिष्यांची वाटचाल सुरू झाली. पण गोरक्षनाथांना गुरुजींच्या झोळीत असलेला परीस योग्य वाटेना. परिसासारखी हव्यास निर्माण करणारी वस्तू आपल्या गुरुजींच्या झोळीत असणे हे लक्षणही त्यांना ठीक वाटेना. आता करायचं काय? दोघेही परत प्रवासाला निघाले. मजल-दरमजल करीत करीत ते पुढे चालले होते. एक दिवस मच्छिंद्रनाथांनी आपली झोळी गोरक्षनाथांकडे सांभाळायला दिली आणि ते प्रातर्विधीसाठी दूर निघून गेले. आता गोरक्षनाथांना हवी ती संधी मिळाली. त्याचा फायदा घेऊन त्यांनी झोळीत असलेला परीस बाहेर काढला आणि फेकून दिला. ही गोष्ट मच्छिंद्रनाथांच्या लक्षात यायला थोडा वेळ लागला. पण झोळीत परीस नसल्याची जाणीव त्यांना झाली तेव्हा ते एका डोंगराच्या पायथ्याशी जाऊन पोहोचले होते. त्यांच्या रागाचा पारा चढला. त्यांनी गोरक्षनाथांवर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. पण गोरक्षनाथ गप्प राहिले. ते पाहून मच्छिंद्रनाथ त्यांच्यावर आणखीच चिडले. तरीही गोरक्षनाथ गप्पच.

थोड्या वेळाने गुरुजी शांत झाले. मग गोरक्षनाथांनी शांतपणे आपल्या कमंडलूतील तीर्थ तळहातावर घेतले आणि ते जवळ असलेल्या डोंगरावर शिंपडले. मग काय चमत्कार ! पाहता पाहता तो डोंगर सोन्याचा झाला! सबंध डोंगर सोन्याचा झाला आणि त्याच्यावर सूर्यकिरण पडल्यामुळे सोन्यासारखी त्याला झळाळी आली ते पाहून मच्छिंद्रनाथांना आपली चूक कळून आली. परंतु हा सोन्याचा डोंगर जर असाच ठेवला तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत हे गोरक्षनाथांनी जाणले आणि त्यांनी तो डोंगर परत पाषाणाचा केला. ही घटना ज्या डोंगराच्या पायथ्याशी घडली त्या डोंगरावर जेव्हा किल्ला बांधण्यात आला तेव्हा वरील घटनेला अनुसरून नव्या किल्ल्याला नाव देण्यात आले 'कांचन.'
या दंतकथेला ऐतिहासिक साधनांमधून दुजोरा देणारा पुरावा मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.
खिंडीमार्गे होणार्या व्यापारावर / वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कांचन किल्ल्याची निर्मिती केली गेली असावी. मार्च १६३६ मध्ये मोगल सरदार अलावर्दीखानाने ह्या किल्ल्यास वेढा दिला. त्या वेळेस धोडपच्या किल्लेदाराच्या ताब्यात हा किल्ला होता. तेव्हा अंजनेरीचा किल्लेदार गंभीरराव यांच्या मध्यस्थीने मोगलांनी हा किल्ला काबीज केला. मोगलांकडून घेतलेला हा किल्ला 'नवाब सलाबतजंग' ह्यास परत करून तशी पोचपावती घेण्याबद्दल पेशवा नानासाहेब (बाळाजी बाजीराव) याने किल्ल्याच्या हवालदारास सूचना दिली होती.
पुढील काळात या भागातील बहुतांशी किल्ले महाराजांनी स्वराज्यात सामील केले. इ.स.१८१८ मध्ये जून महिन्यात हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
खेळदरी गावातून बाहेर पडलो कि गाव गेल्यावर 'पासुंदी मळा' नावाची छोटीशी वाडी लागते, पुढे चालत राहिलो कि वीस मिनिटांनंतर 'बडारवाडी' नावाची चार-दोन घरांच्या वस्तीत पोहोचलो कि.किल्ल्यावर जाणारी मुख्य वाट याच वडारवाडीतून आहे. या रस्त्याने साधारण १००० फुट आत आल्यावर डावीकडे एक कच्चा रस्ता कांचन मंचन किल्ल्याच्या दिशेने जाताना दिसतो. या कच्च्या रस्त्याने १ कि.मी.आत आल्यावर हा रस्ता काटकोनात उजवीकडे वळतो. या वळणावर डावीकडे एक शेतघर असुन तेथुनच किल्ल्यावर जाण्यासाठी मळलेली वाट आहे.वाडीतून बाहेर पडल्यावर थोड्या वेळात आपण कांचनाच्या पायाशी उतरलेल्या एका डोंगरसोंडेपाशी पोहोचतो. या डोंगरसंडिला अर्ध्या तासात आपल्या पायाखाली घालायचे, म्हणजे, आपण कांचनाच्या आणखी जवळ पोहोचतो. याशिवाय वडारवाडीच्या पुढे असलेल्या कांचनेबारी वाडीतूनदेखील वर जायला वाट आहे, पण ती वाट देखील याच वाटेला येऊन मिळते. वर पोहोचल्यावर एक वाट उजवीकडे कांचनावर जाते, आपणही तीच वाट धरायची म्हणजे साधारणतः अर्ध्या तासात आपण किल्ल्याखालच्या पठारावर पोहोचतो. इथून कांचनाचे पूर्वेकडील टोक एकदम व्यवस्थित दिसते. आपण मात्र त्या पूर्वकड्याला डावीकडे ठेवून पठारावरील छाती छाती गवतातून वाट काढीत पठार जिथे संपते त्या टोकापर्यंत पोहोचायचं. इथून कंचना किल्ला दोन भागांत विभागलेला दिसतो आणि या दोन भार्गामध्ये एक सुळका उभा आहे. या सुळक्यामुळे दोन खिंडी तयार झालेल्या दिसतात. यांपैकी पहिली खिंड सोडून दुसऱ्या खिंडीतून किल्ल्यावर जाण्याची वाट आहे. मात्र तिथपर्यंत जाण्यासाठी पुन्हा एकदा पुरुषभर उंचीच्या गवतातून वाट काढावी लागते. सुमारे अर्ध्या तासानंतर आपण सुळका आणि त्याच्या उजव्या बाजूला असणाऱ्या खिंडीमध्ये पोहोचतो.
कांचने गावातुन येणाऱ्या वाटेच्या तुलनेने हि वाट सोपी पण वेळ खाणारी आहे. एका वाटेने चढुन दुसऱ्या वाटेने खाली उतरल्यास कमी वेळात व कमी श्रमात दोन्ही किल्ले पाहू होतात. सुमारे अर्ध्या तासानंतर आपण सुळका आणि त्याच्या उजव्या बाजूला असणाऱ्या खिंडीमध्ये पोहोचतो. खिंडीतून उजव्या बाजूस म्हणजे किल्ल्याचा कातळकडा डावीकडे ठेवून एक वाट पढे गेलेली दिसते. खिंडीतून पलीकडच्या बाजूने कातळकडा उजव्या हाताला ठेवून देखील एक वाट पुढे गेलेली दिसते, पण ही फसवी वाट असल्यामुळे ती सोडून द्यायची. आपण किल्ल्याच्या ज्या भागावर जाणार आहोत, हा मुख्य कांचना किल्ल्यापासून तुटलेला आहे. कदाचित याचाच उल्लेख इतिहासात 'मांचना' म्हणून आला असावा. कारण हा भाग जरी कांचनापासून अलग असला तरी, त्याच्या एकंदर धाटणीवरून तो स्वतंत्र किल्लाच आहे असे म्हणावे लागेल. फरक एवढाच आहे की कांचनाबद्दल बरेच उल्लेख आढळतात, मात्र मांचनाबद्दल फारच कमी माहिती मिळते.
या दरवाज्यापासून थोडे अंतर पुढे गेल्यावर उजव्या बाजूस एक कबर दिसते. या कबरीच्या चौथऱ्याच्या पायाशी एक कोनाडा आहे. ही कवर पाहून सर्वोच्च माथ्यावर जाणारा रस्ता धरायचा.
आपण कांचना किल्ला व त्याशेजारील सुळका यामध्ये असलेल्या खिंडीत पोहोचतो. या खिंडीत डावीकडे असलेल्या सुळक्यात कातळात एक कोनाडा तसेच हनुमान शिल्प कोरलेले आहे. उघडयावर असल्याने या शिल्पाची मोठ्या प्रमाणात झीज झालेली आहे. येथे कधीकाळी कांचना किल्ल्याचे प्रवेशद्वार असावे. कांचना किल्ल्यावर जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पावट्या असुन त्यावर आधारासाठी खोबण्या आहेत. हि वाट काही प्रमाणात कठीण असली तरी अवघड नाही. नव्याने भटकंती करणाऱ्यानी दोरीच्या आधाराशिवाय या वाटेने जाणे टाळावे. या वाटेने प्रस्तरारोहण करत अर्ध्या पावट्या चढुन वर गेल्यावर डावीकडे एक पुसटशी पायवाट कड्याला बिलगुन पुढे जाताना दिसते.घसाऱ्यामुळे हि वाट काहीशी धोकादायक आहे. या वाटेने सरळ गेल्यास आपल्याला कातळात कोरलेल्या चार लहान गुहा व एक दोन खांब असलेली मोठी गुहा पहायला मिळते, या शिवाय या वाटेवर पाण्याने भरलेली दोन मोठी खांबटाकी आहेत. हा सर्व भाग अतिशय सावधगिरीने पार करावा लागतो. हे सर्व पाहुन मागे फिरावे व उर्वरीत चढ पार करत गडमाथ्यावर दाखल व्हावे. निमुळता गडमाथा समुद्रसपाटीपासुन ३७१० फुट उंचावर असुन पुर्वपश्चिम साधारण अर्धा एकरवर पसरलेला आहे.
कोळधेर, राजदेहेर, इंद्राई, चंद्रगड रेंज
![]() |
| सूर्यासोबत आमचा देखील ट्रेक चालू झाला. |
तसेच किल्ल्याच्या उत्तरेस भाऊडबारी, तर पश्चिमेस कांचनबारी अशा दोन बाऱ्या आहेत. मग अशी मोक्याची जागा शिवाजीराजांसारख्या चाणाक्ष नजरेच्या राजाच्या डोळ्यात 'न भरती तरच नवल!' म्हणून दुसऱ्या सुरत लुटीनंतर पळ काढण्यासाठी या भौगोलिक परिस्थितीचा राजांनी व्यवस्थित उपयोग करून घेतला.
वर चढलो त्या मार्गाने सावधगिरीने खाली खिंडीत उतरल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. गुहेतील टाक्यापासून उर्वरीत किला पहाण्यास एका तास पुरेसा होतो
ची जाणीव करून देत होते. दत्ताभाऊ आणि त्यांच्या परिवाराशी बोलता बोलता आणि छोट्या बच्चेकंपनीची मजा घेत घेत चाळीसाव्या मिनिटाला आम्ही आश्रमात पोचलो देखील. इथे आम्हाला खालून येणारा मातीचा रस्ता देखील लागला, या मार्गाने गाडी देखील आश्रमापर्यंत आणली जाते.
गोरक्षनाथांच मंदिर आणि बाजूला असलेलं आश्रम पाण्यासाठी विहीर आणि आजूबाजूला बहरलेली हिरवाई त्यामुळे मुक्कामासाठी ही जागा खरंच खूप सुंदर आहे. इथे दुपारचं जेवण उरकू अस ठरवलं होतं, पण तासाभरापूर्वीच केलेला पोटभर नाश्ता अजून तरी गरम होता,म्हणून पुढची चाल धरूया अस ठरलं. मंदिरात दर्शन वगैरे घेऊन पुढची वाट विचारू लागलो. दत्ताभाऊ पुढे कधी गेले नव्हते म्हणून त्यांनी अगोदरच हात वर केले, त्यांच्यासोबत असलेल्या एका वयस्कर आजोबांनी सांगितलं पण ते खूप वर्षांपूर्वी गेले होते त्यामुळे त्यांच्याकडून पण हवी तशी माहिती मिळाली नाही, एक दोन जणांना अजून विचारल पण ते देखील फक्त आश्रमात दर्शनासाठी आलेले असल्याने त्यांच्याकडून पण माहिती मिळाली नाही. सांगाती हे पुस्तक काढून पंचवीस पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत, त्यामुळे ती माहिती असली तरी स्थानिकांचा सल्ला घ्यायचाच हे मनाशी पक्क केलेलं होतं. एवढ्यात एक म्हातारे आजोबा आश्रमात आले, त्यांना कांचना किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेबद्दल विचारलं असता ते सांगू लागले.
एव्हाना आम्हाला तिथल्या लोकांनी आश्रमाच्या पुढे दहा मिनिटांवर असलेल्या गरुड टाकल्याबद्दल सांगितलं होतं. पुढची वाट ते सांगू लागले आणि त्यांनी पुढे एक मंदिर वाटेत लागेल अस ते म्हणाले, मी सांगाती मध्ये पुढच्या दोन्ही डोंगरांची नावे वाचली होती, म्हणून त्यांना बोललो की हंड्या डोंगराला की लेकुरवाळी डोंगराला ते मंदिर आहे. स्थानिक नाव घेतल्यावर ते आजोबा देखील चकित झाले आणि मग ते अजून नीट पणे समजावू लागले. आमची ही चर्चा ऐकायला आम्ही सगळे तर होतोच त्या बरोबर आश्रमात आलेले इतर लोकही आमच्या चर्चेत सामील झाले.आजोबा असे मस्त दरवाजाला रेलून पायावर पाय ठेऊन सर्व सांगत होते. माझ्यादेखील एक एक प्रश्नाची उकल होत चालली होती. पुढचा प्रवास लक्षात घेऊन जो काही गप्पांचा फड रंगला होता त्याला विराम देऊन आश्रमातील सर्वांना निरोप दिला आणि आता पुढचा टप्पा होता हंड्या, लेकुरवाळी या डोंगरांना वळसा घालून कांचना किल्ल्यावर पोहोचणे.
घड्याळाच्या काट्यांनी बाराचा आकडा पार केल्यानंतर आम्ही आश्रम सोडलं, आता पुढची चाल ही लेकुरवाळी आणि हंड्या या डोंगरांना वळसा घालत सपाटीवरून जाणारी असली तरी या भागात झाडांचं प्रमाण नगण्य सगळा बोडका भाग त्यामुळे रखरखीत उन्हातून जाण्यावाचून आमच्याकडे पर्याय नव्हता. चाल धरली अगदी बाराव्या मिनिटाला आम्ही गरुड टाक्याच्या इथे पोहोचलो. आश्रमात येणारे बरेच लोक इथे येऊन अंघोळ करून आश्रमात दर्शनासाठी जातात, अस केल्याने आपली इच्छा पूर्ण होते असा समज इथे रूढ झाला आहे. तिथल्या लोकांना चालता चालताच पुढची वाट विचारून पुढे मार्गस्थ झालो.
टाक्याच्या पुढे थोड्याच अंतरावर एक घोडा मरून पडला होता. इथून पुढे वाट पठारावर गेली पठारावर भरपूर सारी गुर चरत होती. त्या गुरांपैकी एखादं दुसरं उधळल तर आपल्यापैकी एकाची गेम अशा विचाराने अंगावर एकदम काटा आला. लवकरात लवकर तिथून निसटून पुढे वाटेला लागलो, त्या कडक उन्हात मोकळ्या पठारावरून जात असलो तरी वाऱ्याची झुळूक हळूच स्पर्शून जायची त्यामुळे हायस वाटत होतं.
ही वाट समोर पठारावर जाणारी असली तरी मध्येच एका घळीत उतरली,घळीत उतरायच्या अगोदर इथे तटबंदी देखील पहावयास मिळाली, घळीत असलेल्या छोट्या टेकाडांना वळसा घालून पुढच्या पठारावर चढली. याच पठारावर दोन्ही लेकुरवाळी आणि हंड्या या डोंगरांना वळसा मारत पुढचा पल्ला गाठायचा होता. इखाऱ्याकडून पहिला आणि मोठा लागतो तो लेकुरवाळी डोंगर तर दुसरा आणि लेकुरवाळीच्या तुलनेत छोटा आहे तो हंड्या डोंगर अशी दोन्ही डोंगरांची नाव आहेत. आणि या दोहोंच्या मागे कांचना-मंचना ही जोडगोळी देखील आता नजरेत भरत होती. पठारावरची ही चाल मात्र एकदम रुक्ष होती, कारण समोर दिसणारे डोंगर सोडले तर विशेष अस काहीच नव्हतं. झाड तर नव्हतंच त्यामुळे सावली म्हणजे काय हे आम्हाला न विचारलेलंच बरं. आमचं नशीब म्हणून वाऱ्याची गार झुळूक या सबंध मार्गावर आमच्या सोबत होती, नाहीतर या उष्म्याने काय झालं असतं कुणास ठाऊक. झाड नाहीच शिवाय गवतही सगळीकडे सुकलेल आणि हा पठार दूरवर पसरलेला आणि आमच्याशिवाय तिथे दुसरं चिटपाखरूही नव्हतं. आमची अकरा नंबरची गाडी पाठीवर ओझी मिरवत चालू होती.
पठारावरच्या चालीचा आम्हा प्रत्येकाचा वेग वेगवेगळा होता आणि त्यातूनच मी प्रमोद पुढे, आकाश-अलंकार मध्ये तर प्रिसी-सागर मागे अशा आमच्या तीन जोड्या चालल्या होत्या. लेकुरवाळी डोंगर उजवीकडे ठेऊन वळसा मारत असताना एक ठिकाणी गवताच्या झाडोऱ्याने सावली झाली होती तिथे पाचेक मिनिटांचा विसावा घेऊन पुढची पायपीट लगेच चालू केली. वेळ आमच्या हातात खूप बऱ्यापैकी होता आणि कांचना-मंचना किल्ले देखील आता टप्प्यात आलेले दिसत होते. त्यामुळे कांचना किल्ल्यावर जाऊन इथे राहायचं की खाली हे कांचनावर जाऊन ठरवणार होतो ते आता खाली उतरून तांगडी गावाच्या देखील पुढे जाऊ अस गणित आम्हाला वाटू लागलं. तसही या तीन दिवसात आजच्याच दिवशीची चाल जरा मजबूत होणार होती, सकाळपासून आमची चाल बघता आम्ही वेळेच्या पुढेच होतो. त्यामुळे तांगडी गाव गाठून तिथे किंवा त्याच्याही पुढे मुक्काम करू यावर सर्वांनी होकारार्थी मान डोलवली आणि पुढे निघालो, बघता बघता लेकुरवाळी डोंगर मागे पडला आणि हंड्या डोंगराचा वळसा चालू झाला, इथे देखील हंड्या डोंगर उजवीकडे ठेऊन डाव्या बाजूने वळसा मारू लागलो, इखाऱ्याच्या खाली आश्रमात सांगितलेल्या बाबांनी हंड्या डोंगराच्या उजव्या बाजूने गेले असता सप्तश्रृंगी देवीचं मंदिर लागणार होतं पण आम्ही सांगातीप्रमाणे डाव्या बाजूची वाट धरली. एकमेकांच्यात अंतर असलं तरी सगळे हाकेच्या अंतरात आणि सर्वांची पावले एका लयीत होती. डोक्यावर ऊन देखील होतंच पण आपलं गंतव्य समोर दिसत असल्यामुळे त्या उन्हाची कुणाला फिकीर नव्हती. हंड्या डोंगर देखील पार केलं आणि परत पठारावरची चाल. या पठारावरून चालताना कांचना-मंचना अगदी समोर दिसत होते.
पावलागणिक कांचना-मंचना जसे जवळ येत होते तसे मागे पाहिलं असता हंड्या, लेकुरवाळी, इखारा आमच्यापासून लांब होत होते. पठारावरून खाली डाव्या बाजूला डांबरी रस्ता दिसत होता आणि कांचना गावातील घरे देखील नजरेत भरत होती. कांचना किल्ला समोर दिसत असला तरी ही पायपीट खाली थेट त्या डांबरी रस्त्याला खिंडीत नेणार होती आणि तिथून वर कांचना किल्ल्यावर चढवणार होती किंवा डांबरी रस्त्यावरून कांचना गावाकडे वाट वाकडी करून गावाच्या जवळून जाणारी वाट वर गडावर नेणार होती. पठाराच्या टोकाला पोचलो खालची ती खिंड,डांबरी रस्ता, त्या खिंडीतून वर चढणारी वाट तसेच कांचना गावातून किल्ल्यावर जाणाऱ्या वाटेवर लावलेला भगवा, आणि समोर कांचना-मंचना पल्ला अवघा दोन तासांचा देखील वाटत नव्हता. घडाळ्यात पाहतोय तर दोन वाजलेत, सकाळचे ब्रेड आणि शेवभाजी अजूनही पोटात तरतरीत होते त्यामुळे खाण्यासाठी थांबण्याची इच्छा नव्हती आणि त्याहून महत्वाचं थांबण्यासाठी सावली नावाचा काही प्रकारच नव्हता.
पठार सोडलं खाली उतरायची वाट धरली, आणि वाटेने रूपच बदललं. पूर्ण वाट घसऱ्याने(स्क्री) भरली होती. गुर चालून चालून त्या बारीक मुरुमाचा वाटेवर पडलेला सडा पाय वाटेवर थांबूच देत नव्हता. पुढे पाऊल टाकायचं सोडा, ठेवलेलं पाऊल उचलायची देखील हिंमत नव्हती. आणि खाली लगेच तीव्र उतार त्यात आधाराला क्वचितच काही ठिकाणी एखादं-दुसरं झाड होतं.
चुकून जरी पाय घसरला आणि पायातील अंतर वाढलं की गटांगळ्या खाल्ल्याच म्हणून समजा. भरीस भर म्हणून पाठीवरच्या सॅक होत्याच. अकरा नंबरची चाल आता बाजूला हात टेकून कुठे आधार घेऊन चालली होती. मी पुढे, माझ्या मागे प्रमोद, सागर प्रिसीची बॅग घेऊन उतरतोय प्रमोद त्याला गाईड करतोय,त्याच्या मागे प्रिसी हळू हळू सरकत सरकत खाली उतरत होती, तर मागे अलंकार आकाशचा हात धरून त्याला उतरवत होता. घसाऱ्याचा पहिला टप्पा पार झाला आणि झाडांच्या मध्ये आलो वाटलं संपली स्क्री आता चांगला रस्ता असणार, पाहतोय तर आताच समीकरण अजून बदललं होतं. आगीतून फुफाट्यात असं झालं होत. पाच पायांनी चालण्यावाचून आता पर्याय नव्हता, त्या घसऱ्यावरून जणू काही आम्ही रेंगाळत चाललो होतो, सगळं अंग धुळीने भरलं होत पण याची कुणालाच परवा नव्हती. घड्याळाच्या काट्यांनी इथे वेग घेतला होता, वाट जर नीट असती तर हा उतार उतरून खिंडीत पोचायला पंधरा मिनिटे देखील फार झाली असती पण या स्क्रीने आमचा तासाभरापेक्षा जास्त वेळ खाल्ला. सरकत-रेंगाळत का होईना पण सगळे सुखरूप पणे त्या खिंडीत पोचलो. खिंडीतून वर जाणारी वाट दिसली मात्र आता सर्वांना प्रचंड भूक लागली होती अंगातुन घाम देखील चांगलाच निघाला होता, परिणामतः विसाव्याचीदेखील गरज होती. खिंडीत झाड होतं तिथे पोचलो पण तिथे कुठला तरी मेलेला प्राणी टाकला असल्याने त्याच्या दुर्गंधीने खिंड सगळी दुमदुमली होती. त्यामुळे तिथे थांबणं शक्य नव्हतं. पुढे वाट चढायला घेतोय तर थकलोत भरपूर आणि भूकही लागलीय, आणि वर चढायला जातोय तर वर देखील थांबायला काही नसणार म्हणजे त्या वाटेने चढायचा सोडून कांचना गावाकडे जो भगवा ध्वज दिसला होता तिकडे जाऊन बघूया, सावलीच माहीत नाही पण या दुर्गंधीपासून तर सुटका मिळेल.
डांबरी रस्त्याची चाल म्हणजे अजून किचकीच, त्यात वरून आग ओकणारा सूर्य, पोटात उसळलेला भुकेचा कल्लोळ आणि या सर्वात सावलीचा मागमूस देखील नव्हता, त्यामुळे थांबाव तर कुठे या सर्व विचाराने डोकं भनभणत होत. भगव्यापाशी पोचलो, पण तिथे देखील थांबायला काहीच नव्हतं, गाव आमच्यापासून चार-पाच मिनिटांवर होतं पण आहे ती वाट सोडून दुसरीकडे जाऊन वेळ वाया घालवण्यात अर्थ नव्हता, एक छोटं झाड दिसलं त्याच्या खालीच बस्तान मांडून भाकरी काढल्या, सोबतीला सुका खाऊ देखील होताच. जेवणं उरकली, पाणी बऱ्यापैकी संपलं होतं, वर किल्ल्यावर गेल्यावर पाणी आहे हे माहीत होतं, तरी देखील जवळ पाणी असावं या उद्देशाने प्रमोद नको म्हणत असताना देखील सागरला गावात पाठवून चार-पाच बॉटल भरून आणायला सांगितल्या, तोवर आम्ही इथलं सर्व आवरून घेतलं, सागर आला आणि आम्ही कांचनाच्या दिशेने पावले टाकली, वाट दिसत होती ती धरली तरी देखील माघारी फिरून एका गावकऱ्याकडून वाटेची पुष्टी केली. मामांनी सांगितल्या प्रमाणे वाट धरली खरी, पण वाट इतकी काही मळलेली नव्हती, मात्र सध्या दुसरी कुठलीच वाट दिसत नव्हती म्हणजे आहे ती वाट योग्य असं समजून चाल धरली. चढ जरा छातीचा असल्याने गती जरा कमी होती. मघाशी घसाऱ्यावरून उतरताना आकाशचा वेग कमी होता त्यामुळे तो स्वतः मला येऊन बोलला आता नाही मागे थांबणार आता बरोबर चालेल विशाल. त्याचा हा दांडगा उत्साह बघून मला देखील बरं वाटलं. चढ चढत असताना पोटात जे काही ढकललं होतं ते छातीवरच राहील होतं, मध्ये थांबे घेत घेत उन्हाची तिरीप सहन करत गवतातून वाटेचा मागोवा घेत आमची पायपीट चालू होती. हा चढ चढून झाल्यानंतर एकाएकी भरपूर साऱ्या ढोरवाटा फुटलेल्या दिसल्या, आता झाली गच्छंती. कांचना-मंचनाची खिंड आम्हाला दिसत होती, पण गवत इतकं फोफावलं होत आणि ढोरवाटा इतक्या होत्या त्यात योग्य वाट मिळत नव्हती. आणि या वाटांपैकी वर जाणारी वाट दिसतच नव्हती किंबहुना नव्हतीच, सगळे शोधाशोध करायला लागलो पण काही नाही. शेवटी प्रमोदने एका ठिकाणी बोलावलं तिथे जाऊन पुढे वाट काही आहे का बघावं म्हणून घुसलो तर पायाखालची वाट कधी गुडूप झाली कळलं देखील नाही आणि हे इथे कितीतरी वेळा झालं. जायचय कुठे हे दिसत असून देखील कसं जायचं काही कळायला मार्ग नव्हता. कारण कुठूनही घुसलो आणि नंतर कडा लागला तर परत उतरण्याची पंचाईत. घुसूया अस मनाशी निर्धार केला आणि माहीत नाही कुठून कसा सरकत सरकत गेलो पण गेलो तो पहिल्या कड्याच्या वरच गेलो आणि तिथून वर जाऊन पाहिलं तर एक चांगली मळलेली वाट दिसली. कांचना वर जायचा पहिला टप्पा तर पार केलाय आणि आता वाट ही मिळालीय(बहुतेक तरी) म्हणून सर्वांना वर यायला सांगितलं. निरोप देताना इतकाच दिला -"ऐका रे! मी जिथे आहे... या दगडावरच तुम्हाला यायचं आहे, वाट काहीच नाही, पण पुढे वाट आहे चांगली मळलेली, मी ती बघतो पुढे, तुम्ही इथपर्यंत या,मी पुढे जाऊन येतो".
कांचना मंचना या दोहोंच्या खिंडीच्या बरोबर खाली मी होतो, आणि माझ्यासमोर जी वाट होती ती त्या खिंडीच्या बरोबर खाली या जोडकिल्ल्यांना समांतर चालली होती, कुठे तरी वाट वळून वर जाणार अस समजून सुरुवातीला मी खिंडीकडे बघताना डाव्या बाजूला चालू लागलो, चालतोय चालतोय वर जाणारी वाट काहीच दिसत नाही आणि खिंडीच्या तर भरपूर पुढे आलो होतो पार कांचना किल्ल्याच्या ईशान्येला असलेल्या पठारावर मी येऊन धडकलो, इकडे येताना परत माघारी फिरायचं आहे म्हणून बॅग एका ठिकाणी ठेऊन चालत होतो. पाणी प्यायला बघतोय तर ब्लॅडर मधलं पाणी संपलं होतं. वाट शोधण्यात इतका वेळ गेला आणि पाणी कधी संपलं ते कळलंच नाही.(बॅकअप वाली बॉटल होती, पण होता होईस्तोवर ते पाणी काढायचं नाही,म्हणून जवळच पाणी संपलय या अविर्भावतच मी पुढचा रस्ता धरला). पठारावरून पुढे त्या वाटेवरून गेलो असता किल्ल्याच्या मागच्या बाजूला जाऊन खाली उतरणारी वाट दिसली, एवढा वाटेचा गोंधळ उडाला होता, किल्ल्यावर कसे जाणार आणि त्याहून महत्वाच पुढच्या वाटेला कसं लागणार याच उत्तर ती समोर दिसणारी वाट देऊन गेली होती. पुढे जाणाऱ्या पावलांना माघारी खेचून घेतलं आणि योग्य वाट सापडली याचा मनात जल्लोष करत बाकी टीम गाठली. खालून सगळे चढत होते, पुरते दमून गेले होते, छातीचा चढ आणि त्यात पूर्णतः गवताने भरलेला डोंगर यामुळे एकंदरीतच सर्वांची हौस झाली होती. म्हणजे मलासुद्धा आश्चर्य वाटत होतं की या वाटेने मी वर चढलो होतो. आकाश पार थकला होता तरी तो असा काही त्या चढाला भिडला होता की जर तो पटकन घसरला तर काय होईल या विचाराने मी त्याला सावकाश रे, बस थोडावेळ आणि मग ये अस सांगितलं, त्याच्यामागे सागर होता, तर बाकीचे तिघे दुसऱ्या बाजूने चढत होते. आकाशला जसा मी सावकाश ये बोललो तसा त्यावर तो -"अरे विशाल, थांबलो तर संपलो" एवढंच बोलला आणि घोरपड जशी सरसर जाते तसा हा भाऊ वर यायला लागला, गवत-काट्यांची कोणतीही तमा न बाळगता. थोड्यावेळापूर्वी तो जे बोलला होता, की आता नाही मागे राहणार हे शब्द मला आठवले. सागर ला त्याच्या मागेच राहायला सांगून या सर्वांकडे मी वरून लक्ष देऊ लागलो. आकाश आला, सागर आला, मागोमाग अलंकार, प्रमोद आणि प्रिसी पण मी असलेल्या खडकपाशी येऊन पोचले. आकाशने तर आल्या आल्याचं बॉडी आडवी टाकून दिली. पाणी पिण्याचं देखील त्याच्यात अवसान नव्हतं. सर्वांना बसायला सांगितलं, आता इथे किल्ल्यावर जाणारी वाट शोधण्याबरोबरच पाण्याचा साठा बघणं जास्त गरजेचं होतं. सागरने जर ते गावातून पाणी आणलं नसत तर आमची एव्हाना पुरती वाट लागली असती. प्रमोद, मी, सागर पाणी आणि वाट दोन्ही शोधायला निघालो, मला जी चांगली मळलेली पायवाट दिसली होती तिच्या डाव्या बाजूला मी जाऊन आलो होतो, आता उजव्या बाजूला मोर्चा नेला होता.
गवत वगैरे हिरवळ दिसत होती पण पाण्याचा काही मागमूस नव्हता, किल्ल्यावर घळीत पोचल्यावर टाकं असणार हे माहीत होत पण तिकडे जायलाही काही मार्ग नव्हता आता मागे फिरणार होतो तरी अजून पन्नास शंभर पावलं पुढे जाऊन बघतो असं म्हणून पुढे गेलो तर एक खोदीव टाक्यासरशी दिसलं पण ते गवताने आणि मातीने भरलं होतं, पुढे बघूया काहीतरी असणार. शोधण्याचा उत्साह म्हणण्यापेक्षा इथवर आलोय तर अजून शोधुय कारण ज्या वाटेवर थोड्या वेळापूर्वी जाऊन आलो होतो तिकडे काहीच नाही हे निश्चित होतं. पावले पुढे टाकतोय, इतक्यात एका खडकात हंड्या एवढ्या आकाराचा डोह होता आणि त्यात पाणी पाझरत होत. पाणी पाझरून त्या हंडाभर डोहात साठत असल्याने स्वच्छ होत, गाळ होता त्यात पण तो तळाला होता.सागर आणि प्रमोदला आवाज देऊन सोबत आणलेल्या बॉटल आणि ब्लॅडर भरून घेतले, आम्ही देखील पोटभर पाणी पिऊन मागे थांबलेल्यांसाठी ही वार्ता घेऊन गेलो. उजेड असला तरी घड्याळाच्या काट्यांनी सहाचा आकडा पार केला होता. आकाशात देखील मावळतीला रंगछटा पसरत चालल्या होत्या.
दुपारी दोन वाजता समोरच्या पठारावर असताना एक भाकीत केलं होत की दोन तासात आपण कांचना वर पोचू आणि किल्ला पाहून आपण पुढे तांगडी गाव देखील गाठू. पण पठार उतरताना लागलेल्या घसाऱ्याने आणि नंतर कांचनाच्या चढावर वाटांच्या गुंत्यामुळे दोनाचे चार तास कधी झाले समजले नाही आणि दिवसभराचे श्रम देखील आता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होते. विशेषतः आकाशची झालेली हालत. आता जर पुढे ट्रेक सुरू ठेवतोय आणि आपल्या टीम पैकी एकाला जरी काही झालं तर पुढचं दोन दिवसाच गणित कोलमडणार त्यापेक्षा आज जर नीट आराम केला तर पुढचे दोन दिवस नीट जातील, तसही हा ट्रेक ठरवताना आजच्या दिवशीचा मुक्काम शक्यतो कांचनावर करायचा किंवा वेळ असल्यास तिथे जाऊन पुढे जायचं की नाही ते ठरवायचं असं ठरलं होत.
छोटा का होईना पण पाण्याचा साठा जवळ होता त्यामुळे उजेड आहे तरच त्या ईशान्येला असलेल्या पठारावर आपण मुक्काम करू शकतो, तिथून सात-आठ मिनिटांवरच पाणी असल्याने चिंतेच कारण नव्हतं. बॅगा पाठीला लावल्या आणि चाल धरली पठाराची, त्याचवेळी आम्ही जिथे बसलो होतो त्याच्या मागेच अलंकारला गवतात बसलेला फुरसे(saw scaled viper) दिसला, तोच विषय चघळत पुढची वाट धरली. आता देखील वर घळीत कुठून रस्ता जातोय का याकडे नजर भिरभिरत होती. पठारावर पोचलो, नीट जागा बघून ताडपत्री अंथरली आणि एकंदरीत गंतव्यावर पोचलो असं म्हणून पाठीवरून बॅग मोकळी केली आणि आजच्या दिवसापूरता सुटकेचा निश्वास टाकला. प्रमोद आणि मी पुढे जाऊन चक्कर मारून आलो.
पाण्याच्या सगळ्या बॉटल कॅन काढून प्रिसी ला मुक्कामाच्या इथे थांबवून आम्ही सगळे पाण्याच्या इथे गेलो. पाण्याच्या त्या हंडाभर आकाराच्या डोहातून हळुवार पाणी काढत असताना त्या डोहात असलेला बेडूक मध्येच उधळायचा आणि म सगळा गाळ वर यायचं की थांबायचं, पाणी पाझरत असल्याने डोहात पुरेस पाणी साचायला वेळ लागायचा एकंदरीत हात पाय धुवून सर्व पाणी भरून होईपर्यंत अंधार पडला होता. खरंतर दिवसभराच्या इतक्या तंगडतोडीनंतर अंघोळीची गरज होती, पण पाण्याची कमतरता बघून हा मोह सर्वांनी टाळला. मुक्कामाच्या ठिकाणी आलो, फ्रेश झाल्यामुळे बरं वाटत होतं, गरमागरम सूप, चहा, आणि लगेच डाळ-भात पापड लोणचं कोशिंबीर अस साग्रसंगीत जेवण आणि हे सार महाशिवरात्रीच्या रात्री अब्जावधी चांदण्यांखाली कांचना किल्ल्याच्या कुशीत आम्ही अनुभवत होतो. दिवसभराच्या पायपीटीचा केव्हाच विसर पडला होता, हे अस काही आता आम्ही अनुभवत होतो की ते शब्दात सांगता येत नव्हतं. थकली भागली शरीरं आता विसाव्याच्या जागी असल्याने निवांत होती. कांचना किल्ला हा तिथे झालेल्या कांचनबारीच्या लढाईसाठी प्रसिद्ध होता. ऑक्टोबर १६७० मध्ये दुसऱ्या सुरत लुटीच्या वेळी महाराजांनी बागलाणकडे कूच केली असता दाऊदखान बऱ्हाणपूर वरून महाराजांना गाठण्यासाठी चांदवडला येऊन थांबला. स्वराज्यात जाण्यासाठी सातमाळा रांग ओलांडणे गरजेचे होते आणि दाऊदखान मध्ये येण्याची भीती होती, त्यामुळे महाराजांनी सेनेची दोन भागात विभागणी करून ५००० सेनेसह लुटीचा माल पुढे पाठवला तर १०००० सेनेसोबत महाराज त्यांच्या मागेच राहिले. १७ ऑक्टोबर १६७० साली सकाळीच कांचन बारीत युद्धाला तोंड फुटले, सहा तासांच्या या युद्धात प्रतापराव गुजर, मोरोपंत पिंगळे, आनंदराव,भिकाजी दत्तो यांच्यासह मोगलांवर आक्रमण करून ३००० मोगलांना कापून काढून मोगलांचा दारुण पराभव केला. गनिमी कावा न वापरता मैदानात उतरून मोठ्या फौजेचा लावलेला निकाल यामुळे ही कांचनबारीची लढाई इतिहासात प्रसिद्ध आहे. या युद्धाच्या परिणामामुळे दिंडोरीचा मुघल सुभेदार सिद्धी हिलाल महाराजांना येऊन मिळाला पुढे या भागातील सर्व किल्ले महाराजांनी स्वराज्यात सामील करून घेतले. ही गोष्ट आणि इतर गप्पा ठोकत आडवे होऊन डोळ्याला डोळा कधी लागला हे समजलं देखील नाही.
सातमाळा रेंज(धोडप-इखारा-कांचना-मंचना-कोळधेर-राजधेर) भाग-१ वाचण्यासाठी या दुव्यावर जा
कांचनाच्या चढाने आणि त्याच्या अगोदरच्या घसाऱ्यामुळे कालचा दिवस लवकर आटोपता घ्यावा लागला आणि त्याच्या थकव्यामुळे रात्री डोळा लागला तो लवकर जाग न येण्यासाठीच, रात्री अचानक अंगावरून काहीतरी उडून गेल्याची चाहूल लागली, पण स्लीपिंग बॅगच्या बाहेर यायचं सोडा, डोळे उघडायची पण इच्छा झाली नाही, काय गेलं असेल उडून ते उद्या समजेल. साडेपाचच्या अलार्मने जाग आली, डोळे चोळीत उठलो आणि सर्वांना उठवण्याचं पाप देखील मस्तकी घेतलं. सकाळचा विधी उरकायला गेलेल्या प्रमोदला आम्ही ज्या पठारावर थांबलो होतो तिथून अवघ्या एक मिनिटांवर असलेलं पाण्याच टाकं दिसलं, काल पाण्यासाठी केलेली वणवण, त्या हंडाभर आकाराच्या डोहातून तासभर थांबून भरलेलं ते पाणी, पाणी नसल्यामुळे जी अंघोळ करायची इच्छा मारली होती, हे सार चित्र ते टाक्यातील पाणी पाहून झरझर नजरेसमोरून गेलं.
आजच्या दिवसासाठी लागणार पाणी देखील कालच भरून आणलं असल्याने या टाक्यातील पाण्याला स्पर्श करण्याची देखील कुणाची इच्छा झाली नाही. चहा-नाश्ता उरकून बरोबर सुर्यनारायणाच्या त्या तांबूस गोळ्याचे दर्शन व्हायला आणि आम्ही मुक्काम सोडायला एकच घटका झाली.
सकाळी सात वाजता आजच्या दिवसाचा ट्रेक सुरू झाला, एकंदरीत शनिवारची सुरुवात तर चांगली झाली होती. आजचा टप्पा कांचना-मंचना वरून निघून कोळधेर करून पुढे राजधेरवर जायच आणि मुक्कामाला राजधेरवाडीत जायचं जे की इंद्राई किल्ल्याचं देखील पायथ्याचं गाव आहे. रविवारी इंद्राई करून पुढे परतीचा प्रवास करता येईल अस अपेक्षित समीकरण जुळवल होतं.
रात्री चांगला आराम करून सकाळी लवकर सुरू झाल्याने सगळ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. काल मी आणि प्रमोद थोडी वाट बघून आलो होतो. कांचनाला ट्रॅव्हर्स मारून कांचना किल्ल्याच्या मागे आलो आणि इथून एक डोंगरधार खाली उतरून घळीत जाते आणि तिथून समोरच्या बाफळ्या डोंगरावर चढून डांबरी रस्त्याला येऊन उतरते. येथून खिंडीतील चढ चढून कोळधेर साठी वाट वर चढते. कांचनाचा सुरुवातीचा उतार उतरायला लागलो, पूर्वेला पसरलेल्या रंगछटा जणू आमच्यावर रंगांचा शिडकाव करत होत्या, त्या सोनपिवळ्या रंगांत चालत असताना एक प्रसन्नतेची लकेर आमच्या चेहऱ्यावरडून वाहत होती.
उतारावर मध्ये मध्ये स्क्री होती पण ती कालच्या सारखी भयानक नव्हती. सांभाळत सावरत एकएक जण उतरत होते. पाऊणएक तासात तो उतार संपवून पहिल्या खिंडीत उतरलो. इथे खिंडीत एक शेंदूर फासलेला देव होता, त्याच्या चाहुबाजूने नारळाच्या करवंट्या पडल्या होत्या, झाडाला लावलेला भगवा ध्वज देखील होता. इथून समोर असलेला बाफळ्या डोंगर आम्हाला चढायचा होता. उजवीकडे एक वस्ती होती आणि वाट तिकडूनच वर चढते हे कांचनाचा उतार उतरत असताना पाहिले होते. वस्ती म्हणजे अवघी पाच-सहा माळावरची घरे, तिथे विचारलं असता त्यांनी समोरचा बाफळ्या डोंगर न चढता खालून एक मातीचा गाडीरस्ता बाफळ्या डोंगराच्या पलीकडे खिंडीत उतरणाऱ्या रस्त्याला जाऊन मिळत असल्याचे सांगितले. डोंगर चढून उतरायचं या कामात वेळ आणि श्रम दोन्हीही जास्त खर्ची पडले असते, पर्यायाने खालून जो मातीरस्ता दिसत होता त्याने जाणं जास्त सोईस्कर पडणार होतं. माळावरची वाट पकडली, वाट कुठे हा तर हायवे होता. दुरदूरवर पसरलेला माळ समोर दूरवर एक दोन शेती दिसत होती, मागे कांचना मंचना जोडगोळी आमच्या कडे पाहत होती, डाव्या बाजूला बाफळ्या डोंगर तर समोर शिंगमाळ डोंगर आणि त्याच्या पलीकडे डाव्या बाजूला कोळधेरच अवाढव्य रूप नजरेस येत होतं.
निजामशाही पासून ते आदिलशाही आणि मुघलांपर्यंत ज्या पट्ट्यात आणि मुख्यतः शिवकाळात खूप साऱ्या घडामोडी जेथे घडल्या तो पट्टा म्हणजे नाशिक-बागलाण चा. ह्याच नाशिकच्या थोडं पुढे चांदवड भागातील डोंगराळ भागात उत्तमोत्तम किल्ले आजही आपल्या अस्तित्वासह दिमाखात उभे आहेत.त्यातील ५ किल्ल्यांची सफर मी येणाऱ्या २ किंवा ३ भागात मांडणार आहे.नेहमीप्रमाणे ट्रेकक्षितिज सोबत डोंबिवलीहून प्रवासाला सुरुवात करून पहिले दोन जोड किल्ले कंचना आणि मंचना ह्यांच्या पायथ्याच्या खेळदरी गावात पोहोचलो.
पाण्याचे टाके कंचना
खिंडीतून उजव्या बाजूस म्हणजे किल्ल्याचा कातळकडा डावीकडे ठेवून एक वाट पढे गेलेली दिसते. खिंडीतून पलीकडच्या बाजूने कातळकडा उजव्या हाताला ठेवून देखील एक वाट पुढे गेलेली दिसते, पण ही फसवी वाट असल्यामुळे ती सोडून द्यायची. आपण किल्ल्याच्या ज्या भागावर जाणार आहोत, हा मुख्य कांचना किल्ल्यापासून तुटलेला आहे. कदाचित याचाच उल्लेख इतिहासात 'मांचना' म्हणून आला असावा. कारण हा भाग जरी कांचनापासून अलग असला तरी, त्याच्या एकंदर धाटणीवरून तो स्वतंत्र किल्लाच आहे असे म्हणावे लागेल. फरक एवढाच आहे की कांचनाबद्दल बरेच उल्लेख आढळतात, मात्र मांचनाबद्दल फारच कमी माहिती मिळते. असो !
सुमारे अर्ध्या तासानंतर आपण सुळका आणि त्याच्या उजव्या बाजूला असणाऱ्या खिंडीमध्ये पोहोचतो.
खिंडीतून उजव्या बाजूस म्हणजे किल्ल्याचा कातळकडा डावीकडे ठेवून एक वाट पढे गेलेली दिसते. खिंडीतून पलीकडच्या बाजूने कातळकडा उजव्या हाताला ठेवून देखील एक वाट पुढे गेलेली दिसते, पण ही फसवी वाट असल्यामुळे ती सोडून द्यायची. आपण किल्ल्याच्या ज्या भागावर जाणार आहोत, हा मुख्य कांचना किल्ल्यापासून तुटलेला आहे. कदाचित याचाच उल्लेख इतिहासात 'मांचना' म्हणून आला असावा. कारण हा भाग जरी कांचनापासून अलग असला तरी, त्याच्या एकंदर धाटणीवरून तो स्वतंत्र किल्लाच आहे असे म्हणावे लागेल. फरक एवढाच आहे की कांचनाबद्दल बरेच उल्लेख आढळतात, मात्र मांचनाबद्दल फारच कमी माहिती मिळते. असो !
आता आपण मघाशी धरलेल्या वाटेने साधारण दहा मिनिटांत काही कातळकोरीव पायऱ्यांपाशी पोहोचतो. कातळकोरीव पायऱ्या आपल्याला एका उद्ध्वस्त दरवाज्यापाशी घेऊन जातात. हा दरवाजा उत्तराभिमुख असून त्याची कमान पडलेली आहे. त्याच्या उजव्या बाजूस घडीव दगडांची एक तटबंदी बांधलेली दिसते. दरवाज्यातून आत शिरल्यावर एक वाट डावीकडे पूर्व टोकापाशी जाते. या टोकावरून कांचना किल्ल्याचे आणि त्यावरील सुळक्याचे भेदक दर्शन होते. इथून सुळका व्यवस्थित निरखून पाहिल्यावर बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या खोदलेल्या दिसतात. समोरच्या कड्यात खोदलेली गुहा आपले लक्ष वेधून घेत असली तरी, तिच्याकडे नंतर जाणार असल्याने या गुहेकडे, तूर्तास तरी आपण पाठ फिरवायची आणि किल्ला फिरायला सुटायचे. पुन्हा दरवाज्यापाशी जाऊन आता उजवीकडची वाट धरायची. वाटेत पाण्याची तीन खोदलेली टाकी लागतात. या टाक्यांच्या मागील बाजूस कातळात खोदलेली दोन खांब टाकी दिसतात. यावरून हा किल्ला नक्कीच पुरातन असावा असे लक्षात येते. टाक्यांच्या थोडे वर गेल्यावर जमिनीत बुजलेल्या दरवाज्याचे अवशेष दिसतात. हे किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार असावे असे वाटते. कारण या दरवाज्याला पहारेकऱ्यांच्या देवड्या देखील बांधलेल्या दिसतात. पण आता काळाच्या ओघात हे सर्व नष्ट झालेले दिसते. मघाशी आपण खिंडीतून कडा उजव्या हातास ठेवणारी जी वाट सोडली ती या दरवाज्यात येते, पण या वाटेची मध्येच पडझड झालेली असल्याने ती पूर्णपणे नष्ट झालेली दिसते.
या दरवाज्यापासून थोडे अंतर पुढे गेल्यावर उजव्या बाजूस एक कबर दिसते. या कबरीच्या चौथऱ्याच्या पायाशी एक कोनाडा आहे. ही कवर पाहून सर्वोच्च
माथ्यावर जाणारा रस्ता धरायचा. थोडेसे वर उजवीकडे खालच्या बाजूस पुन्हा एक पाण्याचे टाके लागते. याशिवाय गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पाण्याची दोन टाकी आहेत. सकाळपासून पायाला भिंगरी लावल्यासारखे आपण भटकत असल्याने इथं थोडं निवांत पडायला काहीच हरकत नाही.
आता आपण आलो त्या खिंडीपाशी पोहोचायचे आणि सुळक्याला आणि पहिल्या खिंडीला डावीकडे ठेवत कांचना किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गुहेपाशी पोहोचायचे. इथेच कातळात खोदलेली पाण्याची एक नव्हेत तर तब्बल दहा पाण्याची टाकी आहेत. हीच गुहा आणि त्यामधील टाकी समोरच्या मंचनाच्या किल्ल्यावरून आपले लक्ष वेधून घेतात. यांपैकी काही टाक्यांमधील पाणी पिण्यास योग्य आहे. आपण टाकी पाहून बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी माघारी वळायचे आणि जिथून गुहेत जाण्यासाठी उजवीकडे वळलो तिथून सरळ वर जाणाऱ्या बालेकिल्ल्याच्या मार्गाला लागायचे. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. मदतीसाठी जागोजागी कातळात खोबण्या कोरलेल्या आहेत. गुहेपासून सुमारे पंधरा मिनिटांत आपण बालेकिल्ल्यावर दाखल होतो. वर सपाटी थोडकीच आहे आणि जेवढी आहे त्या जागेत मात्र पाण्याची भली मोठी पाच टाकी खोदलेली आहेत. माथ्यावर केवळ एक सुळका आहे. या सुळक्यावर जाण्यासाठी मात्र प्रस्तरारोहणाची साधने आणि तंत्र अवगत असणे आवश्यक आहे. याशिवाय बालेकिल्ल्यावर वाड्याहुड्यांचे अवशेष फार कमी आहेत. मात्र इथून सभोवतालचा जो काही विहंगम नजारा दिसतो त्याला काही तोड नाही.
हंड्याचे शिखर, ईखारा सुळका आणि धोडपची शिवलिंगी, त्याही पलीकडे रवळ्या-जवळ्याची शिखरे, आणखी मागे सप्तशृंगी देवीचा पर्वत खरोखर-किती पाहू नि किती नाही असे झाले होते. एवढेच नव्हे, तर पलीकडच्या बाजूस इंद्राई, राजदेहेर आणि कोळदेहेरची शिखरे देखील 'हम किसी से कम नही' म्हणून शक्ती-प्रदर्शने दाखवितात. हे झाले किल्ल्यांचे. याशिवाय वरून उत्तरेस सटाण्यापर्यंतचा मुलूख न्याहाळता येतो, तर पश्चिमेस कळवणपर्यंतचा मुलूख न्याहाळता येतो.
तसेच किल्ल्याच्या उत्तरेस भाऊडबारी, तर पश्चिमेस कांचनबारी अशा दोन बाऱ्या आहेत. मग अशी मोक्याची जागा शिवाजीराजांसारख्या चाणाक्ष नजरेच्या राजाच्या डोळ्यात 'न भरती तरच नवल!' म्हणून दुसऱ्या सुरत लुटीनंतर पळ काढण्यासाठी या भौगोलिक परिस्थितीचा राजांनी व्यवस्थित उपयोग करून घेतला.
खेळदरी गावाच्या दिशेला असलेल्या वाटेने किल्ला चढायला सुरवात केल्यास साधारण दीड तासात आपण कांचन किल्ल्याच्या सुळक्याखालील गुहेत पोहोचतो. या गुहेत कातळात कोरलेली पाण्याची एकुण दहा टाकी असुन त्यातील काही टाक्यात पिण्यायोग्य पाणी आहे. हि टाकी पाहुन डावीकडुन वर जाणाऱ्या वाटेने आपण कांचना किल्ला व त्याशेजारील सुळका यामध्ये असलेल्या खिंडीत पोहोचतो. या खिंडीत डावीकडे असलेल्या सुळक्यात कातळात एक कोनाडा तसेच हनुमान शिल्प कोरलेले आहे. उघडयावर असल्याने या शिल्पाची मोठ्या प्रमाणात झीज झालेली आहे. येथे कधीकाळी कांचना किल्ल्याचे प्रवेशद्वार असावे. कांचना किल्ल्यावर जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पावट्या असुन त्यावर आधारासाठी खोबण्या आहेत. हि वाट काही प्रमाणात कठीण असली तरी अवघड नाही. नव्याने भटकंती करणाऱ्यानी दोरीच्या आधाराशिवाय या वाटेने जाणे टाळावे. या वाटेने प्रस्तरारोहण करत अर्ध्या पावट्या चढुन वर गेल्यावर डावीकडे एक पुसटशी पायवाट कड्याला बिलगुन पुढे जाताना दिसते.घसाऱ्यामुळे हि वाट काहीशी धोकादायक आहे. या वाटेने सरळ गेल्यास आपल्याला कातळात कोरलेल्या चार लहान गुहा व एक दोन खांब असलेली मोठी गुहा पहायला मिळते, या शिवाय या वाटेवर पाण्याने भरलेली दोन मोठी खांबटाकी आहेत. हा सर्व भाग अतिशय सावधगिरीने पार करावा लागतो. हे सर्व पाहुन मागे फिरावे व उर्वरीत चढ पार करत गडमाथ्यावर दाखल व्हावे. निमुळता गडमाथा समुद्रसपाटीपासुन ३७१० फुट उंचावर असुन पुर्वपश्चिम साधारण अर्धा एकरवर पसरलेला आहे. गडमाथ्याच्या टोकाला अजुन एक सुळका असुन या सुळक्याकडे जाताना एका रेषेत कातळात कोरलेली एकुण सात टाकी पहायला मिळतात. या टाक्यात मोठ्या प्रमाणात निवडुंग वाढलेले असुन एका टाक्यात पिण्यायोग्य पाणी आहे. माथ्याच्या टोकाशी असलेल्या सुळक्यावर कोणतेही अवशेष नसुन तेथे जाण्यासाठी गिर्यारोहण साहित्याची गरज आहे. सुळक्याच्या पोटात डावीकडील बाजुस एक लहान गुहा कोरलेली आहे. गडाचा माथा हा एकप्रकारे सुळकाच असल्याने त्याच्या काठावर कोणतीही बांधीव तटबंदी दिसुन येत नाही. किल्ल्याच्या माथ्यावरून धोडप,राजधेर,कोळधेर,इंद्राई हे किल्ले सहजपणे नजरेस पडतात. वर चढलो त्या मार्गाने सावधगिरीने खाली खिंडीत उतरल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. गुहेतील टाक्यापासून उर्वरीत किला पहाण्यास एका तास पुरेसा होतो. खेळदरी गावातुन आल्यास कांचन किल्ला पाहुन झाल्यावर शेजारील सुळक्याला डावीकडील बाजूने वळसा घालत मंचना किल्ल्याकडे प्रस्थान करावे.
पंधरा मिनिटात गुहा गाठली.. इथे कातळाच्या पोटात तब्बल ८-९ टाकी कोरली आहेत.. आत पोचलो तर इथे.. विशिष्ट प्रकारच्या लाखो किड्यांनी या गुहेच्या छतावर एक स्तर तयार केला होता.. टाक्यातील पाणी मात्र बऱ्यापैकी हिरवं झालं होतं..
इथे क्षणभर रेंगाळून मग कातळाला खेटून एक ट्राव्हर्स मारीत कांचना आणि मंचना च्या खिंडीच्या पायथ्याला आलो आता एक तीव्र घसरडी चढण पार केली कि खिंडीत.. कांचना-मंचन जंक्शन जवळ आले होते.. त्यामुळे घसरत्या वाटेला आणि दुखऱ्या गुडघ्याला न जुमानता वर निघालो.. आणि दहा मिनिटात खिंड गाठली.. इथला नजारा मात्र बेभान असा होता.. निसर्गाची मनसोक्त उधळण कांचना-मंचना वर विश्वकर्माने केल्याचे दिसले आणि त्याचा हा निसर्गाविष्कार पहात एका पायरीवर बसून राहिलो.. इथे लंच कम अल्पोपहार ब्रेक डिक्लेअर करण्यात आला.. आता इथे दोन-डोंगराच्या मधल्या खिंडीत आपण उभे असतो इकडे.. डावीकडे बेलाग कांचना आणि उजवीकडे ढासळत्या कातळाचा डोंगर म्हणजे मंचना.. डावीकडे वर जाण्यासाठी मात्र जीवावर उदार होऊनच जावे लागेल.. दरीमध्ये पडलेला दगडांचा सडा बरेच काही सांगून जातो.. इथल्या ठिसूळ खडकाचा एक्स-रे आता उघड्या डोळ्यांनी पाहिल्यावर मात्र डावीकडे वर जाण्याचे धाडस होईना.. इथे वर जाण्यासाठी मात्र.. डोक्याच्या वर उंच असा दिड-पुरुषभर उंचीचा कातळ टप्पा चढून जावं लागते.. नितीनभाऊ.. उप्या.. आणि दादा इकडे वर चढून गेले.. आणि पुढचा टप्पा जीवावर बेतणारा असल्याचे त्यांनी सांगितले.. इथे कातळात कोरलेला एक हनुमान आहे.. इथे समोरच्या डोंगर मात्र सह्याद्री चे राकट कणखर आणि बेलाग रूप सिद्ध करतो असा.. अंगावर येणारा कातळ टप्पा इथे आहे.. वर जाण्याची वाट मात्र.. जिकिरीची.. कातळ खोबणीतून जाणारी.. खिंडीतून डोंगराला खेटून साधारण आठ-दहा फुट डावीकडे जायचं आणि मग वर जाण्यासाठी पायऱ्या दिसतात.. इथून सरळ रेषेत थोडं उजवीकडे जायचं मग पुन्हा डावीकडे तिरपं.. कि आपण गड-माथ्यावर येवून पोहचतो.. इथे काही पाण्याची टाकी आणि किरकोळ अवशेष आहेत.. आणि डावीकडे.. एक शेंडी.. म्हणजे सुळका.. हा सुळका सर करायचा म्हणजे प्रस्तरारोहण येणे आवश्यक आहे.. इथे एक रोप त्या शेंडीला लटकत होता.. म्हणजे इथे काही अपघात झाल्याची शक्यता उप्या ने वर्तवली.. त्यामुळे इथला बेत रद्द करून पायथ्याकडे निघालो.. उतरताना आ वासून उभी अशी खोल काळदरी उरात धडधड आणि पायात कापरं देत होती.. त्यामुळे.. ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सह्य सुपंथ’ हे ब्रीद मानून वाटेला जवळ करून उतरू लागलो.. अर्ध्या तासात पुन्हा खिंड गाठली..
*मोहम्मद सुलतान अकबर नामक मोठ्या भावाला बापाच्या पश्चात गादी मिळणार असेल तर कट कारस्थान करून त्याला शह देण्यासाठी आपल्या बाजूने सेना उभी हवी या विचाराने संभाजीच्या नावे ५ हजारी जहागिरी देऊन त्याच्या वतीने लढणाऱ्या ‘सिवा’ ला विरोध तर करायला हवा पण इतका नको की नंतर तोच सत्ता हस्तगत करायच्या गळेकापू स्पर्धेत कामाला यायला नाकारेल याची जाणीव ठेवून दाऊदखानाला काही सैन्य आणि दारूगोळा पाठवून तो स्वस्थ बसून राहिला असावा.
*हा १६७६ सालात वारला. नंतर मुअज्जम बहादूर शाह (प्रथम) उर्फ शाहआलमला औरंगजेबाची गादी १७०७ नंतर मिळवता आली. भाऊ शाह आझम गादीवर हक्क बजावला निघाला असताना वाटेत त्यांनी संभाजी पुत्र शाहूंना काही सरदासमावेत मराठा राज्यात परत जायची परवानगी दिली. मात्र दिल्लीत पोचण्याआधी तो मारला गेला. उरलेला औरंगजेबाचा त्यातल्या त्यात आवडता मुलगा कामबक्ष १७०९ मधे मारला गेला.
सुरत ते औरंगाबाद,

औरंगाबाद ते बऱ्हानपुर,

बऱ्हानपुर ते चांदवड

वरील नकाशातून वर उल्लेख केलेल्या ठिकाणांतील अंतर, रस्ते, बऱ्हानपुर ते चांदवड २५० किमी अंतर (जिथून शिवा चे सैन्य सातमाळाच्या डोंगरातून नाशिकच्या (त्या वेळचे नाव गुलशनाबाद) भागात उतरायची जास्त शक्यता वाटून आपले सैन्य एकत्र केले असावे)
वरील गावातील सूरत ते औरंगाबाद ३५० किमी, औरंगाबाद ते बऱ्हानपुर २१३ किमी, बऱ्हानपुर ते चांडवड २५० किमी अंतरे, रस्त्यांची सोय, हव्या त्या सैन्याला एकत्र करायचे झाल्यास लागणारा वेळ आणि नंतर त्याचा पुढे सरकण्याचा वेग पाहता महाराज आरामात सातमाळाच्या बाजूने सटकून सिन्नर, अकोले करत कोकणात उतरून गेले असते. परंतु दाऊदखान कदाचित चांदवडच्या आसपास काही कारणांनी सैन्यासह तयार असावा. त्याला सुरतच्या प्रकाराची माहिती मिळताच सिवा चांदवडच्या खिंडीतून सातमाळ उतरेल असा सैनिकी अंदाज बांधून चांदवडच्या किल्लेदारापाशी धनुष्यबाण, तलवारी, शस्त्रे, मोहिमेचे सामान, जनावरांचा दाणागोटा, तोफा, बंदुका, त्यांची ठासणीची दारू, लोखंडी, दगडी गोळे वगैरेची सोय करण्यात गुंतला असावा.
लढाई करायची वेळ आली की काय नियोजन करावे यावर दाऊदखानाने आपल्या बरोबरच्या सरदारांसमावेत विमर्ष केला असेल. सुरतहून मिळवलेल्या संपत्तीच्या रक्षणासाठी सिवा ला तांड्यांसोबत राहूनच आपल्याशी संघर्ष करावा लागेल. म्हणून आपल्या सैनिकांनी ‘शिवा’ च्या सैन्याला गुंतवून ठेवून आपले मुख्य काम म्हणजे त्वरित तांड्यातील मालजनावरांच्या चालकांना ताब्यात घेऊन त्यांना परत उलटे फिरवून शक्य तितकी संपत्ती सूरतेच्या मालिकांकडे परत करावी हे असेल.
अशावेळी कोणी काय कामे करायला हवीत याचा तपशील मुघलांच्या सैन्यात काम करणाऱ्या भीमसेन सक्सेना यांनी नमूद केले आहे. डॉ श्रीनिवास सामंत, प्रा. नामदेव जाधव, श्री गजानन मेहेंदळे यांनी विविध संदर्भ तपासून निष्कर्ष काढले आहेत. त्यातून ह्या लढाईचे रणक्षेत्र एकच ठिकाण, खिंड, गाव किंवा रस्ता असे न मानता त्या तांड्यांसोबत विविध भागात सैन्य संचलन करत ठिक ठिकाणी हातघाईच्या समरातून शिवाजी महाराजांच्या सेनेने मुघल सेनेला जबर जखमी करून नामोहरम अवस्थेत पाठलाग करणे सोडून द्यायला लावले असेल.
हजारो मालजनावरांच्या पाठीवरील ओझ्यातून नेत तो तांडा नंतर कुठे कुठे थांबत गेला? मधल्या मधे कुठे तरी तो ठेवून त्यात इतर ठिकाणाहून हल्ले करून हस्तगत करून नंतर एकत्रित करून मग टप्प्या टप्प्याने पोचला? महाराज तो रायगडावर पोहोचेपर्यंत बरोबर होते का? मालवाहक जनावरांच्या चाऱ्याचा, विश्रांतीचा, पुन्हा अदलाबदलीकरिता कुठेतरी थांबायला लागले असेल तर ते कुठे असावे? यावर प्रकाश टाकायची गरज आहे…..
कांचन बारीतील संघर्षानंतर …
वणी - दिंडोरी च्या वाटेवरील झालेल्या संघर्षांत मुघल सेनेच्या वाताहतीमुळे महाराज उत्साहित झाले असावेत. मुघलांच्या सैन्याला पुन्हा जोमाने लढायला तयार करायला नंतर तीन ते चार महिन्याचा कालखंड लागला असावा. त्या दरम्यानच्या वेगवान घडामोडींच्या तपशीलातून महाराजांच्या आधीच्या समरापेक्षा ह्या मोहिमा बदलत्या रणतंत्रामुळे जास्त धीट, प्रहारशील आणि मुघलांच्या संघर्षाची मानसिकता (विल टू फाईट) नष्ट करायला कारणीभूत झाल्या असाव्यात हे जाणवते. खुद्द महाराजांच्या आणि प्रतापराव गुजर, मोरोपंत पिंगळे, आनंद राव मकाजींच्या सारख्या धडाडीच्या सेनानायकांच्या नेतृत्वाखाली घोडदळाने वेगवेगळ्या दिशांनी केलेल्या चढाया, जिंकलेले किल्ले आणि ४३० किमी अंतरावर कारंजा (लाड) या बाजारपेठेतजाऊन कदाचित सुरतपेक्षा जास्त मौल्यवान वस्तू हस्तगत करता आल्या असाव्यात. इतक्या लांब पल्ल्याची मोहीम हाती घेण्याचे धाडस उत्पन्न व्हायला काय तात्कालिक घटना घडल्या असाव्यात.महाराजांनी मुगलांच्या सैनिकी संचलनाची, लढाईच्या तंत्राची बारीक माहिती करून घेऊन आपले रण तंत्र बनवले असावे. प्रथम मुघलांच्या सैनिकी संचलनाची ओळख करून घेतली तर कांचनबारीतील हुलकावणी व नंतर झालेल्या चकमकीतून झालेल्या त्यांच्या जबरदस्त हानीची कारणे समजून घ्यायला सोईचे होईल.

मुघलांच्याकडून लढाईची सुरवात तोफा, बंदुका आणि दारूचे बाण यांच्या माऱ्याने होत असे. काही वेळा नंतर कोणीतरी एका फौजेतील एखादी तुकडी पुढे चालून जात असे. घोडेस्वारांजवळ बाण असत आणि पुढे दौडत असताना ते बाण सोडत असत पण मुख्य भार धक्का तंत्रावर असे. त्या बाणांचा उद्देश समोरच्या सैनिकांचे घाबरवून मनोबल खच्ची करणे असा असावा. मात्र नेम लागून सैनिक मेला किंवा जखमी असे होत नसल्याने या हत्याराचा फारसा परिणाम होत नसावा, दहापैकी नऊ बाण शत्रूच्या सैनिकांच्या डोक्यावरून जात किंवा अलिकडे पडत असत. सामूगड लढाईतील वर्णनातून हे पटकन लक्षात येते.
काही वेळानंतर जरांधार किंवा बरांधार पैकी कोणत्यातरी बाजूची एखादी तुकडी पुढे चालून जात असे. पण मुख्य भर धक्कातंत्रावर असे. स्वार शत्रूला भिडताच तलवारी, भाले,इत्यादी शस्त्रांनी हातघाईची लढाई सुरू होई. एका तुकडीपाठोपाठ इतरही तुकड्या हातघाईत सामील होत. या हातघाईवरच लढाईचा अखेरचा निर्णय होत असे. हरणाऱ्या फौजेत पळ सुरू होई आणि तिची छावणी विजयी फौजे कडून लुटली जाई.
समोरासमोर उभे ठाकून केलेल्या लढायांमध्ये अदिलशाही आणि कुत्ब फौजांचे रणतंत्र मुघल फौजांसारखेच सारखेच होते. पण मुघल फौजेविरुद्ध - बहुधा मुघलांकडे संख्याधिक्य असल्यामुळे आणि त्यांचा तोफखाना व त्यांचे घोडे सरस असल्यामुळे - निजामशाही, आदिलशाही व कुत्बशाही फौजा सहसा समोर उभ्या ठाकून लढाई करत नसत. मुघलांशी समोरासमोर लढाई करावयाची नाही आणि त्यांची दमछाक करून त्यांना जेरीस आणायचे अशी त्यांची युद्धनीती असे. या युध्दनीतीस अनुसरून त्यांचे रणतंत्र बनलेले होते.
मग महाराजांनी अमलात आणलेले तंत्र काय होते? ते नंतर समजून येईल...
पुढे चालू ....

बोजड तोफा हत्ती किंवा बैलांना कामाला लावून कशा वाहून नेत असत याचे प्रातिनिघिक चित्र


हाणामारीला सुरवात


वरील प्रातिनिधिक व्यूहरचनेतील तोफखाना इखलासखान याच्या नेतृत्वाखाली आधी पोहोचला असावा. त्याने कांचनबारीत एका उंचवट्यावरून दूरवर सिवाचे सैन्याचा पडाव पाहिला असावा.
रसद, आणखी घोडदळ , पायदळ, शस्त्रास्त्रे यांची जमवाजमव करून दाऊदखान चांदवड किल्ल्याच्या भागातून तरातरा निघाला असावा. त्याने काही सैन्य कोलदेहेर कडील हमरस्त्यावरील खेळदरी गावापाशी नाके बंदीसाठी ठेवले असावे. इखलासखानाने (तोफखान्यावरील हा निष्णात आणि हिकमती पठानखान पुर्वी आदिलशाहीतून मुघलांच्यापदरी नोकरीला आला होता.) तोफांच्या सरबत्तीचा प्रभाव कितपत पडला असेल? त्याला काही धोका तर झाला नसेल? असा विचार करून
दाऊदखानाचे साधारण पाच हजाराच्या आसपास सैन्य इखलासखानाच्या मदतीला 14 किमी पार करून आले असावे. वाटेत त्याने खेळदरीत काही रसद व सैन्य मागे ठेवले असावे.
सिवा च्या सैन्याला हुसकावून लावून सुरतेच्या मालमत्तेला संपुर्ण मिळवायला आपले सध्याचे सैन्य अपुरे आहे. समजा ते तिथून सटकले तर त्यांना वणी ते दिंडोरीच्या रस्त्यावर अडवायला हवे वगैरे विचार करत तो 16 ऑक्टोबरच्या रात्री कांचनगडाच्या पायथ्याशी आला असावा.
कांचन
गिरीदुर्ग नाशिक अजंठा सातमाळ
श्रेणी नुसार स्तर
मध्यम
समुद्र सपाटीपासून उंची (फ़ूट)
3772
किल्ल्याचा प्रकार
गिरीदुर्ग
नकाशे व मार्ग
किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा
सर्व नकाशे पहा
प्रस्तावना
नाशिक जिल्ह्यात पूर्व - पश्चिम पसरलेल्या अजिंठा - सातमाळ रांगेत अचला, अहिवंत, मार्कंड्या, रवळाजवळा, कन्हेरगड, धोडप, कांचन हे किल्ले आहेत. शिवकालात शिवाजीमहाराजांच्या नेतृत्वाखाली मुघलांबरोबर झालेली ‘कांचनबारीची लढाई’ याच किल्ल्याच्या परिसरात झाली. बारी म्हणजे खिंड, या खिंडीमार्गे होणार्या व्यापारावर / वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कांचन किल्ल्याची निर्मिती केली गेली असावी.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
२ ऑक्टोबर ते ५ ऑक्टोबर १६७० या तीन दिवसात सुरतेची दुसर्यांदा धुळधाण उडवून प्रचंड लुट घेऊन महाराजांनी बागलाणाकडे कुच केली. ही बातमी कळताच दाऊदखान हा मोगली सरदार फौजेनीशी बर्हाणपूराहून महाराजांच्या पाठलागावर निघाला. १६ ऑक्टोबर १६७० रोजी दाऊदखान चांदवडजवळ पोहोचला. स्वराज्यात जाण्यासाठी सातमाळ डोंगररांग ओलांडणे आवश्यक होते व तेथेच दाऊदखान आडवा येण्याची शक्यता गृहीत धरुन महाराजांनी रात्रीच आपल्या १५००० फौजेची २ भागात विभागणी केली व पायदळाचे पाच हजार हशम, लुटीची घोडी व सामान मार्गी लावून स्वत: १०००० फौज घेऊन लुटीच्या पिछाडीस राहीले.
१७ ऑक्टोबरला सकाळीच युध्दाला कांचन - मंचन (कांचनबारीत) च्या परिसरात तोंड फुटले सहा - तास चाललेल्या या तुंबळ युध्दात खुद्द महाराजांसह, प्रतापराव गुजर, मोरोपंत पिंगळे, आनंदराव, भिकाजी दत्तो यांनी भाग घेतला. मोगलांवर चारही बाजूंनी हल्ला करुन ३००० मोगली सैनिक कापून काढले; मोगली सेनेचा दारुण पराभव झाला.
या युध्दाचे वैशिष्टे म्हणजे गनिमी काव्याचा वापर न करता मोठ्या फौजेनिशी (१५०००) मैदानात महाराजांच्या नेतृत्वाखाली समोरासमोर लढले गेलेले व जिंकलेले युध्द होते. या युध्दाचा परिणाम एवढा मोठा झाला की, दिंडोरीचा मुघल सुभेदार सिद्दी हिलाल महाराजांना येऊन मिळाला व महाराजांनी या भागातील जवळजवळ सर्व किल्ले पुढील काळात ताब्यात घेतले.
महत्त्वाची ठिकाणे
कांचन किल्ला तीन भागात विभागलेला आहे. यातील दोन मुख्य भाग कांचन - मंचन म्हणून ओळखले जातात. खेळदरी गावातून ३ तासात आपण कांचन गडाच्या पूर्वेकडील (दूरुन पिंडीसारख्या दिसणार्या) कातळ टप्प्यापाशी येऊन पोहोचतो. मुख्य वाट सोडून उजवीकडे गेल्यावर गुहा पाहायला मिळते. ती पाहून परत मुख्य वाटेवर येऊन कातळात खोदलेल्या पायर्यांवरुन आपण या कातळटप्प्याच्या माथ्यावर पोहोचतो. माथ्यावर रांगेत खोदलेली पाण्याची ५ टाकं आहेत. ती पाहून खाली उतरुन मधल्या कातळभिंतीला वळसा घालून पश्चिमेचा कातळटप्पा गाठावा. येथे उध्वस्त प्रवेशद्वार व थोडी तटबंदी शाबूत आहे. या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर पाण्याच टाक व गुहा पाहायला मिळतात. त्यांच्यापुढे दोन थडगी, उध्वस्त वास्तूचे अवशेष पाहायला मिळतात. गडाच्या पश्चिम टोकाला अजून दोन कातळटप्पे आहेत त्यावर प्रत्येकी एक टाकं आहे.
कसे पोहोचावे
मुंबईहून नाशिकला जावे, नाशिकच्या सेंट्रल बस डेपोतून सटाण्याला जाणारी बस पकडून खेळदरी गावात उतरावे.
ट्रेकसाठी लागणारा वेळ
⏱️ खेळदरी गावातून ३ तास लागतात.
सुविधा व सोयी
🏠
निवास व्यवस्था
गडावर रहाण्याची सोय नाही.
🍽️
अन्न व्यवस्था
गडावर जेवणाची सोय नाही.
💧
पाणी उपलब्धता
गडावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे.
सर्वोत्तम काळ
🌤️ पावसाळ्याचे ४ महीने सोडून वर्षभर गडावर जाता येते.
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा
किल्ले स्वच्छ ठेवा
किल्ल्यांवर कचरा करू नका. किल्ल्यांची आणि निसर्गाची हानी करू नका.
कांचना
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : नाशिक
उंची : ७८५ फुट
श्रेणी : कठीण
शिवाजी महाराजांनी स्वतः भाग घेतलेल्या लढाईमधील एक महत्वाची लढाई म्हणजे
कांचनबारीची लढाई’. दुसऱ्यांदा सुरत शहर लुटुन परत जात असताना मराठा सैन्य व
मुघलांची कांचनबारी येथे समोरासमोर गाठ पडली व मराठ्यांनी मुघलांचा दारुण
पराभव केला. उघड्या मैदानावर पहिल्यांदाच समोरासमोर शत्रुचा त्यांच्याच
प्रदेशात केलेला पराभव यामुळे वणी-दिंडोरीचा हा संग्राम कांचनबारीची लढाई
म्हणुन प्रसिद्ध आहे. पण हि लढाई ज्या किल्ल्यांच्या साक्षीने लढली गेली ते
किल्ले कांचना मंचना मात्र प्रसिद्धीपासून खुप दूर आहेत. कांचना मंचना हि
एकाच डोंगरावर असलेली दोन स्वतंत्र शिखरे असल्याने काहीजण यांना एकच किल्ला
मानतात तर काहीजण यांना जुळे दुर्ग मानतात. हे दोन्ही किल्ले एकाच
डोंगरावर असले तरी त्यामधील एका शिखराने या दोन्ही किल्ल्यांमध्ये दोन खिंड
निर्माण झाल्याने ते एकमेकांपासून दुरावलेले आहेत. या दोन्ही किल्ल्यांवर
जाण्यासाठी दोन दिशांना दोन वेगवेगळे मार्ग असल्याने यांचा दोन स्वतंत्र
किल्ले असाच उल्लेख करता येईल. यातील पहिला किल्ला म्हणजे किल्ले कांचना.
देवळा तालुक्यात असलेला हा किल्ला नाशिक शहरापासुन १०० कि.मी.अंतरावर असुन
देवळा या तालुक्याच्या ठिकाणाहून १४ कि.मी. अंतरावर आहे.
कांचना किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा असुन पहिली वाट हि कांचना मंचना
किल्ल्याच्या उत्तर पायथ्याशी असलेल्या कांचने गावातुन वर जाते. उभा चढ व
मातीचा घसारा असणारी हि वाट प्रथम मंचना किल्ल्याच्या पायथ्याशी जाते व
तेथुन या दोन्ही किल्ल्याच्या मध्यात असलेल्या सुळक्याला उजव्या बाजूने
वळसा घालुन कांचना किल्ल्याच्या पायथ्याशी जाते. या वाटेने गेल्यास प्रथम
मंचना करून नंतर कांचनावर जाता येते. कांचना किल्ल्यावर जाणारी दुसरी वाट
हि किल्ल्याच्या दक्षिण बाजुस आहे. कांचने गावातुन जाताना कांचनबारी (खिंड)
पार केल्यावर डावीकडील रस्ता खेळदरी गावात जातो. खेळदरी गाव येथुन ६
कि.मी.अंतरावर आहे. या रस्त्याने साधारण १००० फुट आत आल्यावर डावीकडे एक
कच्चा रस्ता कांचन मंचन किल्ल्याच्या दिशेने जाताना दिसतो. या कच्च्या
रस्त्याने १ कि.मी.आत आल्यावर हा रस्ता काटकोनात उजवीकडे वळतो. या वळणावर
डावीकडे एक शेतघर असुन तेथुनच किल्ल्यावर जाण्यासाठी मळलेली वाट आहे. या
वाटेने किल्ल्याचा डोंगर डावीकडे ठेवत आपण कांचना किल्ल्याच्या पायथ्याशी
पोहोचतो. नंतर शिखराला वळसा घालुन मंचना किल्ल्यावर जाता येते. कांचने
गावातुन येणाऱ्या वाटेच्या तुलनेने हि वाट सोपी पण वेळ खाणारी आहे. एका
वाटेने चढुन दुसऱ्या वाटेने खाली उतरल्यास कमी वेळात व कमी श्रमात दोन्ही
किल्ले पाहू होतात. या दोन्ही वाटांवर काही ठिकाणी पायऱ्या कोरलेल्या आहेत.
किल्ल्याच्या दक्षिण बाजुने म्हणजे खेळदरी गावाच्या दिशेला असलेल्या
वाटेने किल्ला चढायला सुरवात केल्यास साधारण दीड तासात आपण कांचन
किल्ल्याच्या सुळक्याखालील गुहेत पोहोचतो. या गुहेत कातळात कोरलेली
पाण्याची एकुण दहा टाकी असुन त्यातील काही टाक्यात पिण्यायोग्य पाणी आहे.
हि टाकी पाहुन डावीकडुन वर जाणाऱ्या वाटेने आपण कांचना किल्ला व
त्याशेजारील सुळका यामध्ये असलेल्या खिंडीत पोहोचतो. या खिंडीत डावीकडे
असलेल्या सुळक्यात कातळात एक कोनाडा तसेच हनुमान शिल्प कोरलेले आहे.
उघडयावर असल्याने या शिल्पाची मोठ्या प्रमाणात झीज झालेली आहे. येथे
कधीकाळी कांचना किल्ल्याचे प्रवेशद्वार असावे. कांचना किल्ल्यावर
जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पावट्या असुन त्यावर आधारासाठी खोबण्या आहेत.
हि वाट काही प्रमाणात कठीण असली तरी अवघड नाही. नव्याने भटकंती करणाऱ्यानी
दोरीच्या आधाराशिवाय या वाटेने जाणे टाळावे. या वाटेने प्रस्तरारोहण करत
अर्ध्या पावट्या चढुन वर गेल्यावर डावीकडे एक पुसटशी पायवाट कड्याला बिलगुन
पुढे जाताना दिसते.घसाऱ्यामुळे हि वाट काहीशी धोकादायक आहे. या वाटेने सरळ
गेल्यास आपल्याला कातळात कोरलेल्या चार लहान गुहा व एक दोन खांब असलेली
मोठी गुहा पहायला मिळते, या शिवाय या वाटेवर पाण्याने भरलेली दोन मोठी
खांबटाकी आहेत. हा सर्व भाग अतिशय सावधगिरीने पार करावा लागतो. हे सर्व
पाहुन मागे फिरावे व उर्वरीत चढ पार करत गडमाथ्यावर दाखल व्हावे. निमुळता
गडमाथा समुद्रसपाटीपासुन ३७१०फुट उंचावर असुन पुर्वपश्चिम साधारण अर्धा
एकरवर पसरलेला आहे. गडमाथ्याच्या टोकाला अजुन एक सुळका असुन या सुळक्याकडे
जाताना एका रेषेत कातळात कोरलेली एकुण सात टाकी पहायला मिळतात. या टाक्यात
मोठ्या प्रमाणात निवडुंग वाढलेले असुन एका टाक्यात पिण्यायोग्य पाणी आहे.
माथ्याच्या टोकाशी असलेल्या सुळक्यावर कोणतेही अवशेष नसुन तेथे जाण्यासाठी
गिर्यारोहण साहित्याची गरज आहे. सुळक्याच्या पोटात डावीकडील बाजुस एक लहान
गुहा कोरलेली आहे. गडाचा माथा हा एकप्रकारे सुळकाच असल्याने त्याच्या
काठावर कोणतीही बांधीव तटबंदी दिसुन येत नाही. किल्ल्याच्या माथ्यावरून
धोडप,राजधेर,कोळधेर,इंद्राई हे किल्ले सहजपणे नजरेस पडतात. वर चढलो त्या
मार्गाने सावधगिरीने खाली खिंडीत उतरल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते.
गुहेतील टाक्यापासून उर्वरीत किला पहाण्यास एका तास पुरेसा होतो. खेळदरी
गावातुन आल्यास कांचन किल्ला पाहुन झाल्यावर शेजारील सुळक्याला डावीकडील
बाजूने वळसा घालत मंचना किल्ल्याकडे प्रस्थान करावे. नाशिकमधील बऱ्याच
भागात आपल्याला नाथपंथीयांचा प्रभाव दिसुन येतो. याच नाथपंथातील गुरु
गोरक्षनाथ यांनी आपला शिष्य मच्छिंद्रनाथ याची सोन्याच्या मोहापासुन मुक्ती
करण्यासाठी आपल्या तपसामर्थ्याने हा डोंगर सोन्याचा केल्याची कथा सांगितली
जाते. सोन्याचा डोंगर म्हणजे कांचना अशी या डोंगराच्या नावाची उत्पत्ती
सांगीतली जाते. पश्चिम महाराष्ट्रात दोन डोंगरामधील खाच खिंड म्हणुन ओळखली
जाते तर बागलाण खानदेशात हि खिंड बारी म्हणुन ओळखली जाते. बागलाण मधील या
कांचन खिंडीमार्गे म्हणजे कांचनबारीमार्गे होणाऱ्या व्यापारावर नियंत्रण
ठेवण्यासाठी कांचन-मांचन किल्ल्याची निर्मिती प्राचीन काळात केली गेली
असावी. ऑक्टोबर १६७० मध्ये सुरतेची दुसऱ्यादा लुट करून राजगडकडे जात असता
दाऊदखान कुरेशी हा मोगली सरदार बुऱ्हाणपुर येथुन महाराजांच्या मागावर
निघाला. त्यावेळी बागलाण मोगलांच्या ताब्यात असल्याने स्वराज्यात
जाण्यासाठी सातमाळा रांग ओलांडणे गरजेचे होते शिवाय दाऊदखान बरोबर गाठ
पडण्याची शक्यता होती. यावेळी महाराजांनी सेनेची दोन भाग करून २०००
सैनिकांसोबत लुटीचा माल पुढे पाठवला तर १०००० मावळे सोबत घेऊन पिछाडीवर
थांबले. दाउदखान व इख्लासखान हे दोन सरदार सुमारे १५००० सैन्य घेऊन
कांचनबारी परीसरात पोहोचले. १७ ऑक्टोबर १६७० रोजी सकाळीच कांचनबारी परीसरात
युद्धाला तोंड फुटले. समोरासमोर झालेल्या या पहील्या लढाईचे स्वतः
महाराजांनी नेतृत्व केले. सहा तास चाललेल्या या युद्धात प्रतापराव गुजर,
मोरोपंत पिंगळे, आनंदराव,भिकाजी दत्तो यांनी मोगलांवर आक्रमण करत त्यांचे
जवळपास ३००० सैन्य कापून काढले व मोगलांचा दारुण पराभव झाला. समोरासमोर
झालेल्या या लढाईत मराठ्यांनी कमी वेळात मोठ्या फौजेचा लावलेला निकाल
यामुळे कांचनबारीची लढाई इतिहासात प्रसिद्ध आहे. या युद्धभूमीचे नेमके
स्थान आजही निश्चित नसल्याने इतिहासात काही ठिकाणी ही लढाई वणी-दिंडोरी
संग्राम म्हणुन ओळखली जाते. या युद्धामुळे आपण मोगलांना समोरासमोरील
युद्धात पराभुत करू शकतो हा मराठ्यांचा आत्मविश्वास दुणावला. महाराज येथुन
कुंजरगडाकडे निघुन गेले. या लढाईनंतर दिंडोरीचा मुघल सुभेदार सिद्धी हिलाल
मराठ्यांना मिळाला. पुढील काळात या भागातील बहुतांशी किल्ले महाराजांनी
स्वराज्यात सामील केले. इ.स.१८१८ मध्ये जून महिन्यात हा किल्ला
इंग्रजांच्या ताब्यात गेला.
© Suresh Nimbalkar
कांचन बारीची लढाई | Discover Maharashtra
कांचन बारीची लढाई –
१७ ऑक्टोबर १६७० इतिहास प्रसिद्ध वनी- दिंडोरी किंवा कांचन बारीची लढाई. याच लढाईत मराठ्यांनी मोगलांवर जनु आग ओकली होती.
शिवाजी महाराजांनी सुरतेची दुसरी लुट मारली २ ऑक्टोबर १६७० ते ५ ऑक्टोबर १६७० पर्यंत. शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह लुट घेऊन ५ ऑक्टोबर १५७० ला दुपारी सुरतेहून बाहेर पडले. सुरतेहून महाराज पेठ बागलाण मार्गे साल्हेर किल्ल्याकडे निघाले. हि वार्ता शहजादा मुअज्जम ला समजली. त्याने दाऊदखानाला महाराजांवर पाठवले.
दाऊखानासोबत राव भाऊसिह हाडा,मीर अब्दुल माबूद, इख्लासखान मियाना, राय मकरंद खत्री, गलिबखान, नारोजी, बसवंतराव, शेख सफी, संग्रामखान घोरी, मान पुरोहित इत्यादी सरदार होते. सोबत तोफखाना, हत्ती, उंट व पुष्कळ सैन्यही सोबत होते, ‘तारिखे दिल्कुशा’चा कर्ता भीमसेन सक्सेना हाही या मोहिमेत दाऊदखानासोबत होता. दाऊखानाचा तळ वैजापूर येथे पडला. तेथे हेरांनी बातमी आणली की, महाराज सुरतेहून निघून मुल्हेरपर्यंत आले व मुल्हेर उर्फ साल्हेर येथील पेठ त्यांनी लुटली, मोगली किलेदार नेकनामखान मुल्हेरच्या किल्ल्यात दडून बसला होता. पण मुल्हेरलाच महाराजांच्या हेरांनी बातमी आणली की, ‘मोगली सैन्य त्यांच्यावर चालून आलेले आहे. त्यामुळे मुल्हेरचा वेढा उठवून महाराज तातडीने पुढे निघाले. नाशिक जिल्ह्यातील चांदवडच्या पश्चिमेस १० मैलांवर असलेला कंचन मंचनचा घाट उतरून मोगली सैन्य तेथे पोहोचण्यापूर्वीच निसटून जाण्याचा महाराजांचा विचार होता. पण महाराजांच्या हालचाली दाऊदखानाला हेरांकरवी पक्क्या कळत होत्या. त्यामुळे महाराजांना गाठण्यासाठी तो तातडीने चांदवडला जाण्यासाठी निघाला.
सायंकाळी मोगली सैन्य चांदवडला पोहोचले. महाराजांच्या भयाने चांदवडचा फौजदार बागीखान किल्ल्यात दडून बसला होता. तो आता दाऊदखानाला भेटण्यासाठी त्याच्या छावणीत आला. महाराजांच्या हालचालींची निश्चित खबर अजून न मिळाल्याने दाऊदखान चांदवडलाच तळ ठोकून बसला. मध्यरात्री सुमारे बारा वाजता दाऊदखानाला खबर मिळाली की, कंचन मंचनचा घाट पार करून महाराज त्वरेने गुल्शनाबाद (म्हणजे नाशिक) च्या वाटेला लागले आहेत. त्यांचे काही सैन्य घाटमाथ्यावर जमलेले असून ते मागाहून येत असलेल्या आपल्या उर्वरित सैन्याची वाट पाहात उभे आहे. हे वृत्त कळताच दाऊदखान तडक स्वार झाला. तो एवढा उतावीळ झालेला होता की, त्याच्यासोबत असलेले स्वार त्याच्या मागोमाग जाऊही शकले नाहीत. ही शके १५९२ ची रात्र कार्तिक शुद्ध त्रयोदशीची होती. रात्र सरताना अंधार झाला त्यामुळे दाऊदखानाचे सैनिक वाट चुकले. नाइलाजास्तव त्यांना सूर्योदयापर्यंत थांबावे लागले. दाऊदखानाने आपल्याला गाठल्याचे महाराजांच्या लक्षात आले. ताबडतोब मराठी सैन्य युद्धार्थ सज्ज झाले.
सूर्योदय झाला. मोगली सैन्य घाटमाथा चढू लागले. इखलासखान मियाना आघाडीवर होता. तो घाटमाथ्यावर पोहोचला आणि समोर पाहतो तो मराठे युद्धाचा पवित्रा घेऊन शस्त्रे परजीत उभे असलेले त्याला दिसले. इखलासखानाने फारसा विचार न करता बेधडक मराठ्यांवर चाल केली. त्याचे अनेक सैनिक अजून घाटमाव्यावर पोहोचायचेच होते. अशा परिस्थितीतच घनघोर युद्धाला तोंड फुटले, आणि पहिल्याच तडाख्यात इखलासखान जबर जखमी होऊन जमिनीवर कोसळला.” एवढ्यात दाऊदखान तिथे पोहोचला. त्याने ताबडतोब राय मकरंद खत्री, शेख सफी, मान पुरोहीत, संग्रामखान घोरी यांना इखलासखानाच्या मदतीस पाठविले. विलक्षण त्वेषाने हे सर्व सरदार मराठ्यांवर तुटून पडले. पण मराठ्यांचा जोर जबरदस्त होता. तुंबळ रण माजले. संग्रामखान घोरीही त्याच्या मुलांसह व अन्यः आप्तांसह जबर घायाळ झाला. मोगलांचे अनेक शाही सैनिक व नामवंत सरदारही ठार झाले.
मराठ्यांचा प्रचंड जोर पाहून त्यांना मागे रेटण्यासाठी अखेर राय मकरंद व मान पुरोहित यांनी तोफा डागायला सुरुवात केली. तोफांचा मारा सुरू झालेला पाहून मराठे थोडे माघारी हटले. तेवढ्यात दाऊदखानाने जखमी इख्लासखानास उचलले व तो मराठ्यांशी लटू लागला. चवताळलेले मराठे पुन्हा चारही दिशांनी मोगलांना घेरून त्यांची लांडगेतोड करू लागले. मोगली तोफा डागल्या जात होत्या. पण मराठे त्यांची तमा बाळगीत नव्हते. तोफांच्या माऱ्यामुळे पन्नास मराठे ठार झाले. १००० पेक्षा ही जास्त सैन्य मोगलांचे मराठ्यांनी ठार केले होते. मीर अब्दुल माबूदची, घाटमाथ्यावरील चढ-उतारांमुळे मुख्य सैन्यापासून ताटातूट झाली. त्यामुळे आपल्या पुत्रांसह व थोड्या सैनिकांसह त्याने एका गुहेचा आश्रय घेतला. मराठ्यांचे लक्ष त्याच्याकडे गेले तेव्हा त्यांनी गुहेवर हल्ला चढविला. मीर अब्दुल, त्याचा एक मुलगा व काही सैनिक जबरदस्त जखमी झाले. मीर अब्दुल तर बेशुद्धच पडला. त्याचा एक पुत्र मराठ्यांनी ठार केला. त्याचे काही सैनिकही मारले गेले. मीर अब्दुलची शत्रे, घोडे व झेंडा हिसकावून मराठे निघून गेले. दाऊदखानावर प्रचंड विजय मिळवून महाराज पुढे निघाले.
सभासद बखरीत या युद्धाचे केलेले वर्णन काहीसे अतिशयोक्त असले तरी लक्षणीय आहे. सभासद लिहितो, राजा खासा घोड्यावर बसून, बख्तर घुगी घालून, हाती पटे चढवून मालमत्ता, घोडी, पाईचे लोक पुढे रवाना करून आपण दहा हजार स्वारांनिशी सडे सडे राऊत उमे राहिले, बणी-दिंडोरी म्हणवून शहर आहे ते जागा उभे राहून सुभ्याचे लोक आले त्याशी घोरांदर युद्ध केले… राजियांनी आपली फौज पुढे करून पाठीवर आपण खासा राहून झगडा दिला. प्रतापराव सरनीमत व व्यंकोजी दत्तो व आनंदराव वरकड सरदार पुढे होऊन मोठी कत्तल केली. आणि मोगल मारून मुरखे पाहिले, दोन प्रहर युद्ध जाले, मराठे यांणी शर्त केली. तीन हजार मोगल मारिले, तीन चार हजार घोडे पाडाव केले. दोन बजीर मोगलाई सापडले, असे फत्ते करून आले. मराठ्यांनी एक हत्ती पाडाव करून आणल्याचे जेधे शकावलीत नोंदलेले आहे. इतिहासात वणी-दिंडोरीची म्हणून प्रसिद्ध असलेली, पण प्रत्यक्षात कंचन – मंचन घाटमाथ्यावर झालेली ही लढाई शके १५९२, साधारण नाम संवत्सरा कार्तिक शुद्ध चतुर्दशी म्हणजे सोमवार दि. १७ ऑक्टोबर १६७० रोजी झाली. या सर्व लुटिसह शिवाजी महाराज कुंजरगडावर येऊन पोहचले.
संदर्भ:-
शककर्ते शिवराय खंड २
सभासद बखर,
जेधे शकावली,
मोगल व मराठे
संकलन:- दुर्गवेडा कृष्णा घाडगे (un_viral_history)
वणी-दिंडोरीची लढाई - दाऊदखानाचा पराभव
लेखांक : 10

★ शिवरायांची कांचनबारीची निर्णायक लढाई ★★
★ शिवरायांची कांचनबारीची निर्णायक लढाई ★★
________________________________________

_________________________________________
शिवराय म्हंटले की एक बात जी आपल्या साऱ्यांच्या डोक्यात येते ती म्हणजे ‘गनिमी कावा’. सह्याद्रीच्या डोंगर-दऱ्यांचा फायदा घेऊन लपून-छपून वार करून शत्रूला बेजार करून अगदी कमीतकमी सैन्यानिशी शत्रूला शिकस्त द्यायची. बऱ्यापैकी लढाया या गनिमिकाव्याने झाल्या, परंतु शिवरायांच्या इतिहासात अशा काही लढाया आहेत जिथे मराठे अगदी समोरासमोर रणांगणात येऊन लढले आणि जिंकले सुद्धा. साल्हेरची लढाई जी बऱ्यापैकी आपल्याला माहीत आहे. अशीच एक दुसरी लढाई आहे ती म्हणजे ‘कांचनवारीची लढाई’. इतिहास अभ्यासकांना आणि वाचकांना नक्कीच ही लढाई माहीत असेल पण माझ्यासारख्या सामान्य माणसांना माहीत असावे म्हणून म्हणलं जरा लिहावं.
~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~
१६६६, ज्यावेळी महाराज आग्र्याहून परत आले त्यानंतरचा जो काळ आहे तो महाराजांच्या आक्रमकतेच्या धोरणांचा आहे. आग्र्याहून परत आल्यानंतर औरंगजेबाला पत्र पाठवून काही काळ शांततेत जावा म्हणून औरंगजेबाशी तहाचे बोलणे सुरू केले. तिकडे औरंगजेबाला इराणच्या शहाच्या स्वारीची भीती होती त्यामुळे त्यालाही महाराजांशी काही काळ युद्धामध्ये गुंतून रहायचे नव्हते आणि तहाला होकार दिला. पण दोघांनाही माहीत होते की हा तह काय जास्त दिवस टिकणारा नव्हता आणि झालेही तसेच. १६७० उजाडले आणि फेब्रुवारीमध्ये तानाजी मालुसरे यांनी सिहगड घेतला आणि मग पुढे पुरंदरच्या तहात दिलेले सर्व किल्ले घेण्याचे काम सुरू झाले. स्वराज्याची घडी पुन्हा नव्याने बसवायची फार मोठी जबाबदारी आता महाराजांवर होती कारण अफझलखानानंतर पुढची सात एक वर्षे फार जिकिरीची गेली होती आणि मिर्झाराजे जयसिंगची स्वारी म्हणजे स्वराज्याचे कंबरड मोडण्याचा प्रकार झाला होता. पुन्हा घडी बसवयाची म्हणजे खजिना गरजेचा होता. पैसा बक्कळ लागणार होता हे महाराजांना माहीत होते. ‘रक्कम हाय .. तर भक्कम हाय’ हा कोणत्याही राज्याचा पहिला नियम असतो. आता रक्कम पाहिजे तर मग एकच ठिकाण होते ते म्हणजे ‘सुरत’ आणि अगोदरचा अनुभव होताच. त्यामुळे महाराजांच्या पुढे आता सुरत नाचू लागली होती. सप्टेंबर १६७० च्या सुमारास महाराज पंधरा हजाराची फौज घेऊन कल्याणला आले होते. इंग्रजांना महाराजांचा मनसुबा कदाचित समजला होता आणि महाराज सुरतेवर हल्ला करणार याची बातमी त्यांनी सुरतेला पाठवली होती. सुरतेच्या सुभेदाराने याकडे दुर्लक्ष केले. कारण शिवाजी महाराज सुरतेवर हल्ला करणार आहेत अशा बातम्या अनेकदा त्याला मिळाल्या होत्या त्यामुळे ह्या सर्व अफवा आहेत असे समजून त्याने इंग्रजांची बातमी सुद्धा अफवाच आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले व गाफील राहिला. त्याच्याकडे फक्त ३०० सैन्य होते. अफवा पसरवणे व शत्रूस गाफील ठेवणे हा महाराजांच्या युद्धनीतीचा एक भागच होता हे कदाचित त्या सुभेदाराला माहीत नसावे. पण गडी फसला आणि २ ऑक्टोबर १६७० रोजी महाराज सुरतेमध्ये हजर झाले. सुरतेपासून २० मैलाच्या अंतरावर असताना महाराजांनी सुभेदाराला व काही व्यापाऱ्यांना पत्र पाठवून एकूण महसुलाच्या चौथ्या हिश्श्याची मागणी केली. नक्कीच, ही मागणी मान्य होणार नव्हती आणि सुभेदार सुरतेला जो तट बांधला होता त्यावर विश्वास ठेवून बसला होता. (पहिल्या स्वारीनंतर औरंगजेबाने सुरक्षिततेच्या कारणामुळे सुरतेला एक तट बांधून घेतला होता). मराठे जास्तवेळ वाट बघत बसले नाहीत, तट चढून सगळे सुरतेत घुसले व सुरतेवर छापा टाकला. ४ ऑक्टोबर, लक्ष्मीपूजेचा दिवस, महाराजांना अंदाजे एक कोटींचा खजाना मिळाला. जाळपोळ झाली. जेवढा खजाना मिळाला तो घेऊन महाराजांनी त्वरित सुरत सोडली.
~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~~
खजाना, पंधरा हजारांचे सैन्य आणि शेकडो घोडे, बैल वगैरे घेऊन महाराजांनी सुरत सोडली. घोड्यांच्या आणि बैलांच्या पाठीवर खजिना लादला होता. सुरतेच्या पूर्वेला सह्याद्री घाट आहे. तो चढून नाशिकच्या सटाण्याच्या दिशेला तो येतो. त्यामागे महाराज स्वराज्यात येणार होते. साल्हेर-मुल्हेर-सटाणा-वणी-नाशिक-सिन्नर-जुन्नर-खेड मार्गे राजगड असा एकंदरीत परतीचा मार्ग होता. सातमाळची डोंगररांग आडवी येत होती (नाशिक जिल्यातुन सह्याद्रीला भेदत पूर्व-पश्चिम डोंगररांग जाते ती म्हणजे सातमाळ). या डोंगररांगेच्या दक्षिणेला व उत्तरेला मोठी सपाट मैदाने आहेत. या रांगेत अनेक किल्ले आहेत जसे हातगड, धोडप, कांचना वगैरे किल्ले. या रांगेतील ‘कांचन’ किल्ला ज्याच्या पश्चिमेला एक घाट आहे ज्याला ‘कांचनबारी’ असे म्हणतात थोडक्यात खिंड. आजूबाजूचा सर्व भाग आणि बरेचसे किल्ले हे मोगलांकडे होते त्यामुळे कोणाच्याही नजरेत न येता प्रवास करण्याच्या हेतूने महाराजांनी कांचनबारीची खिंड निवडली होती.
महाराज आता मुल्हेरच्या पायथ्याला आले होते. पायथ्याची पेठ महाराजांनी लुटली. मुल्हेरचा किल्लेदार होता नेकनामदार खान. हा गडी काय गडावरून खाली उतरला नाही कारण त्याला माहित होते की आपण मराठ्यांचा सामना करू शकणार नाही. इकडे औरंगाबादला दक्षिणेचा सुभेदार होता खुद्द औरंगजेबाचा मुलगा ‘शह जादा मुअज्जम’. याची महाराजांच्या प्रत्येक हालचालीवर नजर होती आणि वेळोवेळी त्याला बातम्या पोहचत होत्या. त्याने बुऱ्हाणपूरला असलेला मातब्बर मोगल सरदार दाऊदखान कुरेशी याला महाराजांचा समाचार घेण्यासाठी पाठवले. प्रचंड सैन्य घेऊन दाऊदखान मुल्हेरच्या दिशेने निघाला. याच्याबरोबर भीमसेन सक्सेना सुद्धा होता कारण तो त्यावेळी दाऊदखानाचा अधिकारी होता. दाऊदखान येतोय ही बातमी मिळताच महाराजांनी मुल्हेरचा तळ उठवला व दक्षिणेच्या वाटेला लागले. मराठ्यांना जर दक्षिणेत जायचे असेल तर सातमाळ कुठेतरी ओलांडावी लागणार हे दाऊदखानाला माहीत होते परंतु नक्की कुठून ओलांडणार याची खात्री करण्यासाठी तो चांदवड (म्हणजे सातमाळेचे पूर्वेचे टोक) येथे आला. बागीखान हा चांदवडचा फौजदार होता. मराठे कांचनबारी किंवा कांचनमंचनच्या घाटाने सातमाळ ओलांडून नाशिककडे जाणार आहेत ही बातमी त्याला समजली आणि त्याने मराठ्यांना कांचनबरीच्या दक्षिणेला रोखायचे असे ठरवले.
~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~
युद्ध हे होणारच हे महाराजांना अचूक ठाऊक होते. प्रश्न एकच होता की सुरतेवरून आणलेला खजिना कसा राखायचा. खजिन्यासकट पळ काढणे हे शक्य नव्हते आणि काही लोकांना खजिना घेऊन पुढे जाण्यास सांगणे हे ही शक्य नव्हते कारण खजिना पुढे पाठवायचा म्हणजे घोडदळ सोबत द्यावे लागेल कारण पायदळ लवकर पुढे जाणार नाही. जर घोडदळ पुढे पाठवले तर दाऊदखानाचा सामना फक्त पायदळानिशी करणे ही सोपे नव्हते, आणि आपल्या सैनिकांना सुद्धा याची भनक लागू द्यायची नव्हती. शेवटी शिवराय ते शिवरायच, शेवटच्या क्षणाला कोणाच्या डोक्यात कधी येऊच शकणार नाही असे निर्णय घेण्याचे त्यांचे कौशल्य कामी आले. १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री त्यांना समजले की पहाटेच्या वेळी आपली व दाऊदखानाच्या सैन्याची गाठ पडणार. म्हणून रात्रीच्या वेळी खजिना वाहणारी घोडी व बैले पायदळासोबत सप्तशृंगी व वणीच्या मार्गाने पाठवली आणि मुख्य सैन्य दाऊदखानाच्या दिशेने पाठवले.
महाराजांकडे दहा हजारांचे घोडदळ होते आणि घोडदळ प्रमुख प्रतापराव गुजरही सोबत होते. महाराजांचे नियोजन असे होते की काही तासात दाऊदखानाचा फडशा पडायचा आणि दिवस मावळेपर्यंत खजिन्याचा दिशेने निघायचे.
~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~
दाऊदखानाने आपल्या सैन्याचे दोन भाग केले होते. इखलासखान घोडेस्वारांची एक मोठी तुकडी घेऊन कांचन किल्ल्याच्या पायथ्याला आला होता. एका उंचवट्यावर उभे राहून त्याने पाहिले तर मराठे युद्धाच्या तयारीने उभे असल्याचे त्याला दिसले आणि खुद्द शिवाजी महाराज चिलखत घालून , दोन्ही हातात पट्टे चढवून फिरत होते. या युद्धाचे नेतृत्व स्वतः शिवाजी महाराज करत होते. (हे वाक्य वाचल्यावर माझ्यातरी अंगावर काटा येतो बर का ).
या युद्धामध्ये मराठयांना मुख्य धोका हा खानाच्या तोफखान्याचा होता. इखसालखानाने आपला तोफखाना पुढे आणून हंड्या डोंगराच्या खालच्या पठारावर उभा केला होता. आपल्या उजव्या हाताला मोगलांचा तोफखाना उभा राहत आहे हे महाराजांच्या लक्षात येताच एक तुकडी पाठवून मोगलांचा संपूर्ण तोफखाना उध्वस्त करून टाकला. इखसालखानाला बसलेला हा मराठ्यांचा पहिला फटका होता जिथे त्याचा मुख्य डावच फसला होता.
महाराजांनी या युद्धात ‘तुलूघ्मे’ पद्धतीचा वापर केला. म्हणजे शत्रूला चारी बाजूने कोंडीत पकडायचे. महाराजांनी आपल्या घोडदळाचे चार भाग केले. इखलासखान आपल्या सैन्यासोबत खिंडीच्या दक्षिण बाजूस होता. महाराजांनी आपली एक तुकडी पश्चिमेच्या बाजूने वळसा घालून खानाच्या पिछाडीला धाडली. दोन तुकड्या खानाच्या सैन्याच्या उजव्या व डाव्या बाजूने पाठवल्या, आणि शेवटची तुकडी जिचे नेतृत्व राजे स्वतः करीत होते खिंडीतच खानाचा समोरून सामना करण्यासाठी थांबली. मराठ्यांनी चारी बाजूने एवढे वेगवान हल्ले केले की, ना खानाला ना त्याच्या सैन्याला समजले की आपण कोंडले गेलो आहोत. खान तसा निडर होता तो जोमाने मराठ्यांवर धावून गेला परंतु त्याच्यावर तलवारीचे अनेक वार झाले व तो जखमी होऊन घोड्यावरून खाली पडला. पहाटेच्या वेळी हे युद्ध सुरु झाले होते आता सूर्य उजाडला होता. दाऊदखान सुद्धा आपली दुसरी तुकडी घेऊन कांचन किल्ल्याच्या पायथ्याला आला होता. आता नव्या दमाच्या सैन्याचा मराठ्यांवर हल्ला होणार होता. परंतु हे सैन्य सुद्धा चारी बाजूने कोंडले गेले. मराठे दाऊदखानाच्या सैन्याच्या भोवती घिरट्या घालू लागले. दाऊदखानाने मोठ्या हिमतीने आपल्या तुकडीनिशी हल्ला करून जखमी इखलासखानाला बाहेर काढले. पण दाऊदखानाच्या सैन्याचा मराठ्यांपुढे टिकाव लागला नाही. दाऊदखानाची फौज खचली होती. मोगलांचे २००० सैन्य मारले गेले,काही पळून गेले. आता मराठ्यांनी मोगलांच्या तोफखान्यावर हल्ला केला. तोफखान्याचे निशाण व घोडे काबीज केले. हे युद्ध अंदाजे सहा तास चालले. उरले सुरले मोगल आपल्या तळावर पळून गेले पण मराठ्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांचे तळ लुटले आणि हे युद्ध जिंकले. सुरतेवरून आणलेल्या खजिन्यात आणखीन भर पडली.
या युद्धामध्ये महाराजांबरोबर प्रतापराव गुजर, मकाजी, आनंदराव, बंकाजी दत्तो, मोरोपंत पिंगळे, निळोपंत, अण्णाजीपंत, दत्ताजीपंत व बालप्रभु चिटणीस अशी मंडळी होती.
दाऊदखानाबरोबर मीर अब्दुल मबुद, इखसालखान मियाना, राय मकरंद खत्री, गालीबखान, नारोजी, बसवंतराय, शेख सफी, संग्रामखान घोरी, भान पुरोहित अशी काही सरदार मंडळी होती.
~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~~~
हे युद्ध अतिशय महत्वाचे असे होते. या युद्धाचे वैशिष्ट्य म्हणजे, मोगलांशी समोरासमोर झालेली व जिंकलेली अशी ही लढाई. याचे नेतृत्व खुद्द महाराजांनी केले होते. या युद्धाची रणनीती अतिशय जबरदस्त होती. शत्रूच्या मुलखात जाऊन समोरासमोर ही लढाई महाराजांनी केली. दाऊदखानासारखा मातब्बर मोगल सरदार सुद्धा या युद्धनीतीपुढे टिकू शकला नाही. दाऊदखान म्हणजे मोगलांचा दक्षिणेतला प्रबळ सेनानी होता. तो हरल्यामुळे आता दक्षिणेत मोगलांचा एकही सेनापती अथवा सुभेदार नव्हता जो मराठ्यांपुढे उभा राहील. म्हणून कदाचित स्वतः औरंगजेब पुन्हा दक्षिणेत उतरला असावा. ही लढाई तशी निर्णायक लढाई होती कारण या लढाईनंतर मोगलांचा एकही मातब्बर सरदार उरला नव्हता जो महाराजांच्यावर चालून जाईल. या लढाईमुळे दक्षिणेतील मोगलांची विश्वनियता कमी झाली. यानंतर महाराजांनी मोगलांच्या अनेक प्रदेशावर छापे टाकून ती जिंकून घेतली आणि अगदी बुऱ्हाणपूरपर्यंत आपल्या फौजा नेल्या. वऱ्हाडातील कारंजा या संपन्न शहरावर हल्ला करुन ते जिंकले व त्यातून जवळपास एक कोटींचा खजिना स्वराज्याच्या तिजोरीत आला.
कांचनबारीच्या लढाईचा नकाशा सोबत जोडला आहे ज्यामध्ये महाराजांनी केलेली मोगलांची चारी बाजूने कोंडी समजू शकेल.
संदर्भ: वेध महामानवाचा, शककर्ते शिवराय.
#जागर_इतिहासाचा
कांचना-मंचना – उपडा केलेला सोन्याचा डोंगर










































No comments:
Post a Comment