Saturday, April 11, 2026

सोनगिरी (नाशिक)

 महाराष्ट्रात सोनगीर अथवा सोनगिरी या नावाने एकुण चार किल्ले आहेत. यातील पहिला सोनगीरी म्हणजे धुळ्याचा दुसरा सोनगिरी म्हणजे रायगड जिल्ह्यात पेणजवळील मिरगड उर्फ सोनगिरी, तिसरा सोनगिरी म्हणजे पुणे जिल्ह्यातील कर्जत जवळ आवळसचा किल्ला उर्फ सोनगिरी आणी चौथा पुर्णपणे अपरीचीत असा पेठ तालुक्यातील नाशिकचा सोनगीर उर्फ सोनगिरी. नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात सोनगीर नावाचा किल्ला आहे हे आजही अनेक दुर्गप्रेमीना माहीत नाही. सह्य़ाद्रीच्या रांगेवरील पेठच्या उपरांगेत हा किल्ला असून भुवन गावाच्या मागे पुर्वपश्चिम पसरलेल्या डोंगराच्या एका टेकडीवर तो वसला आहे. नाशिकपासून वायव्य दिशेस साधारण ५५ किमी अंतरावर पेठ हे तालुक्याचे ठिकाण आहे. पेठच्या पश्चिमेस साधारण दहा किलोमीटर वर गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांची सीमा आहे. हा पूर्ण प्रदेश अनेक छोट्या छोट्या टेकड्यांनी व्यापलेला आहे. पेठच्या साधारण नैऋत्येस पाच-दहा किलोमीटरवर तोंडवळ आणि भुवनही गावे आहेत. या दोन गावांना एका घाट रस्त्याने जोडले आहे. नाशीक-पेठ—सुरत या मध्ययुगीन व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व प्रसंगी त्याचे रक्षण करण्यासाठी सोनगीर या टेहळणी किल्ल्याची बांधणी करण्यात आली असावी.  त्यामुळे तोंडवळ आणि भुवन ही दोन्ही या किल्ल्याच्या पायथ्याची गावे आहेत.  भुवन हे या किल्ल्याचे पायथ्याचे गाव असुन नाशिकहून पेठमार्गे किंवा हरसूलमार्गे तेथे जाता येते. पेठ ते भुवन हे अंतर २० कि.मी असुन हरसूल ते भुवन हे अंतर साधारण ३५ कि.मी. आहे. किल्ला जरी भुवन गावामागे असला तरी किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला भुवन गावात जाण्याची गरज नाही. पेठवरून गाडीमार्गे भुवन गावात जाताना एक घाट लागतो. 
सोनगिरी किल्ला 
     पण किल्ल्यावर जाण्यासाठी भुवन गाव गाठण्याची गरज नाही. पेठपासून ६ कि.मी.वर तोंडवळ नावाचे गाव आहे. या तोंडवळ गावाच्या अलीकडून एक हमरस्ता भुवन गावाकडे जातो. जिथून हा रस्ता  भुवन गावाकडे वळतो त्याला 'भुवन फाटा' असे म्हणतात. हा सर्व रस्ता म्हणजे एक घाटवाटच. या घाटरस्त्यावरून उजवीकडे एक लाल मातीची वाट मुख्य रस्ता सोडन अंगलातून डोंगरावर गेलेली दिसते. नेमकी हीच वाट हेरायची म्हणजे झाले. कारण थोडेजरी पुढे निघून गेलात, तर मग थेट भुवन गावाशिवाय पर्याय नाही. हा घाट चढुन उतरताना पहिल्याच मोठया वळणावर उजव्या बाजुला एक पायवाट दिसते. या पायवाटेपासूनच किल्ल्याची चढाई सुरू होते.या वाटेवर एकदाचे पायउतार झालात म्हणजे तुम्ही किल्ल्यावर पोहोचल्यातच जमा ! लालमातीचा रस्ता धरून थोडे वर चढल्यावर एक खिंड लागते. या खिंडीतून समोर जाणारी लालमातीची वाट पलीकडच्या गावात जाते, तर डावीकडे वर चढत जाणारी वाट सोनगीरला जाते. किल्ल्याकडे जाणारी वाट चांगली मळलेली आहे. वाट हिरव्या झाडांच्या छत्रछायेखाली पुढे गेलेली आहे. मध्येच बुलबुल, वटवटे, शिंपी पक्ष्यांचा आवाज जंगलातील निरव शांततेला भग्न करत असतो.

हरसुलमार्गे आल्यास भुवन गावाकडून पेठकडे जाताना हा घाट चढतेवेळी हे दुसरे मोठे वळण आहे. या वळणावरून डाव्या बाजुस असलेल्या पायवाटेने सुरवात करून पाच मिनिटात आपण उजवीकडे असलेल्या दोन डोंगरांमधील खिंडीत पोहोचतो. या खिंडीतून डावीकडे असलेल्या डोंगरावर चढत आपण सोनगिरी किल्ला असलेल्या डोंगराच्या पठारावर पोहोचतो. हे पठार खुप लांबवर पसरलेले असुन या पठारावर दोन टेकडया आहेत. यातील आपण पठार चढुन आल्यावर समोरच दिसणारी पहिली टेकडी म्हणजे सोनगिरी किल्ला आहे.

इथून पुढची माथ्यावर जाणारी वाट थोडी खड्या चढणीची आणि शेताडीला तिरकी कापत पुरुषभर उंचीच्या गवतातील असल्याने, पावले जरा सांभाळून टाकावी लागतात.किल्ला म्हणावे असे कोणतेच अवशेष येथे सहजपणे दिसुन येत नाही.


गडमाथ्यावर पोहोचल्यावर एक चौथरा दिसतो. हा चौथरा म्हणजे किल्ल्याचे अस्तित्व दर्शवणारी एकमेव खूण आहे.त्यावर वाढलेल्या झाडावर भगवा झेंडा रोवण्यात आला आहे.  यावर पूर्वी देवीचे एक मंदिर होते, पण आता त्याचा मागमूसही नाही. मंदिराची पडझड झालेली असल्यामुळे गावकऱ्यांनी त्यातील देवीची मूती भुवन गावात नेलेली आहे. इथेच माथ्यावर एक पाण्याचे टाकेही आहे.
 किल्ल्याचा हा माथा समुद्रसपाटीपासून १५९२ फुट उंचावर असुन टेकडीचा हा परीसर ८ एकरमध्ये पसरलेला आहे. या उंचवट्याच्या मागील बाजुस उतरल्यावर एक मातीने अर्धवट बुजलेले कोरडे टाके दिसुन येते. टाक्याच्या उजव्या बाजुला काही प्रमाणात रचीव दगड असलेली कोसळलेली तटबंदी दिसुन येते. या टेकडीच्या टोकावरील उतारावर असलेल्या झाडीत काही शेंदुर लावलेले दगड दिसतात. या उताराच्या खालील बाजूस असलेल्या एका मोठया झाडाला बांधीव पार आहे. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. गाडीमार्गापासुन किल्ला चढण्यास अर्धा तास व फिरण्यास अर्धा तास असा एक तास संपुर्ण किल्ला फिरण्यास पुरेसा होतो. किल्ल्यावर पाण्याची कोणतीच सोय नसल्याने पाणी सोबत बाळगावे. पठारावर गावकरी आजही मोठया प्रमाणात शेती करत असल्याने कदाचित तेथे असणारे अवशेष नष्ट झाले असावेत. किल्ल्यावर करवंदे व आवळ्यांची झाडे मोठया प्रमाणात असुन वृक्षतोडही मोठय़ा प्रमाणावर होत आहे. अपरीचीत अशा या किल्ल्याची इतिहासात कोठेही नोंद आढळत नाही.  किल्ल्यावरून वाघेरा, रामशेज, दमणगंगा नदीचं खोर असा नजारा दिसतो.
खरोखर किल्ला म्हणावी अशी एकही खुण यावर शिल्लक नाही तर, मग याला किल्ला तरी कशासाठी म्हणावे? यामागचे कारण आहे, ते म्हणजे 'मोक्याची जागा'. सह्याद्रीच्या बहुतेक घाटांवर किल्ले बाधेलेले आहेत. या किल्ल्यांचा मुख्य उपयोग व्यापार करणाऱ्यांच्या संरक्षणासाठी होत असे आणि शत्रूच्या हालचालींना जेरबंद करण्यासाठीसुद्धा करता येत असे. म्हणूनच प्रत्येक किल्ल्याचे स्वरूप त्याच्या उपयोगावरून ठरवले जात असे. नाशिकपासून सुरतला जाणारे अनेक मार्ग आहेत. यांपैकी एक मार्ग नाशिक-पेठ-धरमपूर असा होता. या मार्गावर नजर ठेवण्यासाठी सोनगीरसारख्या संरक्षक ठाण्याची निर्मिती करण्यात आली.
    नाशिकवरून एका दिवसात सोनगीरचा किल्ला सहजपणे पाहून परतता येते. अनेक ट्रेकर्स मंडळी सोनगीर, खैराई आणि वाघेरा, ब्रह्मगिरी असा तीन दिवसांचा ट्रेकसुद्धा करतात.
 
 संदर्भ :-
१) नाशिक जिल्हा गॅझेटीयर
२) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स
३) दुर्गभ्रमंती नाशिकची - अमित बोरोले
४) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा- सतिश अक्कल्कोट
५)  डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
६) www.trekshitiz.com हि वेबसाईट
७) www.durgbharari.in   हि वेबसाईट
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
श्रेणी नुसार स्तर
सोपी
📏
समुद्र सपाटीपासून उंची (फ़ूट)
1571
🏰
किल्ल्याचा प्रकार
गिरीदुर्ग
📍
जिल्हा
नाशिक

किल्ल्याची छायाचित्रे

किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा

मुख्य छायाचित्र
Songir (Nashik)

Songir (Nashik)

सर्व छायाचित्रे पहा

नकाशे व मार्ग

किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा

सध्या कोणतेही नकाशे उपलब्ध नाहीत

सर्व नकाशांचा संग्रह पहा

प्रस्तावना

नाशिकपासून वायव्य दिशेस साधारण ५५ किमी अंतरावर पेठ हे तालुक्याचे ठिकाण आहे. पेठच्या पश्चिमेस साधारण दहा किलोमीटर वर गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांची सीमा आहे. हा पूर्ण प्रदेश अनेक छोट्या छोट्या टेकड्यांनी व्यापलेला आहे. पेठच्या साधारण नैऋत्येस पाच-दहा किलोमीटरवर तोंडवळ आणि भुवनही गावे आहेत. या दोन गावांना एका घाट रस्त्याने जोडले आहे. या घाटावर सोनगिरी हा टेहळणीचा किल्ला आहे. त्यामुळे तोंडवळ आणि भुवन ही दोन्ही या किल्ल्याच्या पायथ्याची गावे आहेत.

महत्त्वाची ठिकाणे

तोंडवळ वरुन भुवनकडे येताना जिथे घाटरस्ता भुवन गावाकडे वळतो, त्या ठिकाणाला भुवन फाटा म्हणतात. या भुवन फाट्यावरुन एक लाल मातीची वाट मुख्य रस्ता सोडून उजवीकडे जाते. या वाटेवरुन साधारण पंधरा मिनिटे चढल्या नंतर समोर भुवन गाव आणि त्यामागे दमणगंगा नदी दिसते. पठारावर खुरासणीच्या फुलांची शेती आहे. येथून साधारण पाच मिनिटात आपण गड माथ्यावर पोहोचतो. गड माथ्यावर आल्यावर फक्त एक चौथरा दिसतो. येथे पूर्वी रेणुकामातेचे मंदिर होते. आता त्या मंदिराची पडझड झाली आहे. त्यामुळे रेणुकामातेची मुर्ती गावकऱ्यांनी भुवन गावात नेली आहे. माथ्यावर एक बुजलेले पाण्याचे टाके आहे. किल्ल्यावर पहाण्या सारखे बाकी काहीही नाही. नाशिकवरुन सुरतला जाणारानाशिक - पेठ - धरमपूर या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली असावी.

कसे पोहोचावे

नाशिकपासून वायव्येस साधारण ५५ किलोमीटरवर पेठ हे गाव आहे. येथून नैऋत्येस साधारण १० किलोमीटरवर भुवनफाटा आहे. या भुवन फाट्यावरुन भुवन किल्ल्यावर जाता येते. हा प्रदेश मुख्य शहरापासून दूर असल्याने खाजगी वाहन असल्यास उत्तम.

ट्रेकसाठी लागणारा वेळ

⏱️ भुवन फाट्यावरुन साधारण पाउण तास लागतो.

सुविधा व सोयी

🏠

निवास व्यवस्था

किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.

🍽️

अन्न व्यवस्था

जेवणाची सोय पेठ येथे होवू शकते.

💧

पाणी उपलब्धता

किल्ल्यावर पाण्याची सोय नाही.

सर्वोत्तम काळ

🌤️ जून ते मार्च

अतिरिक्त माहिती

खैराई सोनगिरी वाघेरा आणि ब्रम्हगिरी असा तीन दिवसांचा ट्रेक करता येतो. खैराई वाघेरा आणि ब्रम्हगिरी या किल्ल्यांची माहिती साईटवर उपलब्ध आहे.

जवळील गावे

भुवन आणि तोंडवळ

 
 
 
 
 
 

उंची : १८९० फुट

श्रेणी : मध्यम

महाराष्ट्रात सोनगीर अथवा सोनगिरी या नावाने एकुण चार किल्ले आहेत. यातील पहिला सोनगीरी म्हणजे धुळ्याचा दुसरा सोनगिरी म्हणजे रायगड जिल्ह्यात पेणजवळील मिरगड उर्फ सोनगिरी, तिसरा सोनगिरी म्हणजे पुणे जिल्ह्यातील कर्जत जवळ आवळसचा किल्ला उर्फ सोनगिरी आणी चौथा पुर्णपणे अपरीचीत असा पेठ तालुक्यातील नाशिकचा सोनगीर उर्फ सोनगिरी. नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात सोनगीर नावाचा किल्ला आहे हे आजही अनेक दुर्गप्रेमीना माहीत नाही. सह्य़ाद्रीच्या रांगेवरील पेठच्या उपरांगेत हा किल्ला असून भुवन गावाच्या मागे पुर्वपश्चिम पसरलेल्या डोंगराच्या एका टेकडीवर तो वसला आहे. नाशीक-पेठ—सुरत या मध्ययुगीन व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व प्रसंगी त्याचे रक्षण करण्यासाठी सोनगीर या टेहळणी किल्ल्याची बांधणी करण्यात आली असावी. भुवन हे या किल्ल्याचे पायथ्याचे गाव असुन नाशिकहून पेठमार्गे किंवा हरसूलमार्गे तेथे जाता येते. पेठ ते भुवन हे अंतर २० कि.मी असुन हरसूल ते भुवन हे अंतर साधारण ३५कि.मी. आहे. किल्ला जरी भुवन गावामागे असला तरी किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला भुवन गावात जाण्याची गरज नाही. पेठवरून गाडीमार्गे भुवन गावात जाताना एक घाट लागतो. हा घाट चढुन उतरताना पहिल्याच मोठया वळणावर उजव्या बाजुला एक पायवाट दिसते. या पायवाटेपासूनच किल्ल्याची चढाई सुरू होते. हरसुलमार्गे आल्यास भुवन गावाकडून पेठकडे जाताना हा घाट चढतेवेळी हे दुसरे मोठे वळण आहे. या वळणावरून डाव्या बाजुस असलेल्या पायवाटेने सुरवात करून पाच मिनिटात आपण उजवीकडे असलेल्या दोन डोंगरांमधील खिंडीत पोहोचतो. या खिंडीतून डावीकडे असलेल्या डोंगरावर चढत आपण सोनगिरी किल्ला असलेल्या डोंगराच्या पठारावर पोहोचतो. हे पठार खुप लांबवर पसरलेले असुन या पठारावर दोन टेकडया आहेत. यातील आपण पठार चढुन आल्यावर समोरच दिसणारी पहिली टेकडी म्हणजे सोनगिरी किल्ला आहे. किल्ला म्हणावे असे कोणतेच अवशेष येथे सहजपणे दिसुन येत नाही. हि टेकडी चढुन आल्यावर टेकडीच्या मध्यभागी असलेल्या उंचवट्यावर एका चौथऱ्याचे अवशेष असुन त्यावर वाढलेल्या झाडावर भगवा झेंडा रोवण्यात आला आहे. किल्ल्याचा हा माथा समुद्रसपाटीपासून १५९२ फुट उंचावर असुन टेकडीचा हा परीसर ८ एकरमध्ये पसरलेला आहे. या उंचवट्याच्या मागील बाजुस उतरल्यावर एक मातीने अर्धवट बुजलेले कोरडे टाके दिसुन येते. टाक्याच्या उजव्या बाजुला काही प्रमाणात रचीव दगड असलेली कोसळलेली तटबंदी दिसुन येते. या टेकडीच्या टोकावरील उतारावर असलेल्या झाडीत काही शेंदुर लावलेले दगड दिसतात. या उताराच्या खालील बाजूस असलेल्या एका मोठया झाडाला बांधीव पार आहे. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. गाडीमार्गापासुन किल्ला चढण्यास अर्धा तास व फिरण्यास अर्धा तास असा एक तास संपुर्ण किल्ला फिरण्यास पुरेसा होतो. किल्ल्यावर पाण्याची कोणतीच सोय नसल्याने पाणी सोबत बाळगावे. पठारावर गावकरी आजही मोठया प्रमाणात शेती करत असल्याने कदाचित तेथे असणारे अवशेष नष्ट झाले असावेत. किल्ल्यावर करवंदे व आवळ्यांची झाडे मोठया प्रमाणात असुन वृक्षतोडही मोठय़ा प्रमाणावर होत आहे. अपरीचीत अशा या किल्ल्याची इतिहासात कोठेही नोंद आढळत नाही.
 
 
  
 
: सोनगीर
 
एका ब्राह्ममुहुर्ताचे वेळी आम्ही नाशकात दाखल झालो. जाण्याचा बेत होता. अनेक दिवसांपासून मनसुबे रचलेले; नाशिकच्या पश्चिमेकडील पेठजवळील अपरिचित अशा 'सोनगीर' किल्ल्यावर हल्लाबोल करण्याचे. मध्यरात्री दोन वाजता नाशिकच्या सीबीएसच्या बसस्थानकावर पोहोचलो अन् पहाटेच्या पेठच्या एसटीची वाट पाहत बसलो. पहाटे साडेपाचला पेठ गावामध्ये जाणाऱ्या एसटीमध्ये बसलो, बसलो काय? ते पेंगलोच. अन् थेट जाग आली ती साडेसातला पेठच्या एसटी स्थानकावरच. एखाद्या नवख्या गावी जेव्हा आपण जातो, तेव्हा अनायसेच आपल्या मनात त्या ठिकाणाबद्दल उत्कंठा निर्माण झालेली असते, आणि पेठ या शहराबद्दलही अशाच प्रकारची उत्सुकता माझ्या मनात निर्माण झालेली होती. एसटी स्थानकावरून बाहेर पडल्यावर गावाचा आटोपशीर घेरा एका नजरेतच ध्यानात येतो. रस्त्याच्या दुतर्फा असणारी दुमजली टुमदार घरे गावाच्या वेशीपर्यंत आपला पिच्छा सोडत नाहीत. पेठ गाव नाशिक-धरमपूर महामार्गावर नाशिकपासून सुमारे ५३ कि.मी.वर आहे. पेठ गावात शिरल्या शिरल्या लोकांशी रामराम झाला. अनेकांना 'सोनगीर'ला जायचा रस्ता विचारला, पण सर्वांनी त्र्यंबकेश्वरचा ब्रह्मगिरी हा एकच किल्ला या भागात असल्याचे सांगितले. शेवटी एक जीपवाला भेटला, ज्याला सोनगीर किल्ला या परिसरात नक्की कुठे आहे हे माहीत होते. त्या भल्या माणसाच्या कृपेने आमची किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाण्याची सोय देखील झाली.
सोनगीरच्या पायथ्याचे गाव आहे 'भुवन', पण किल्ल्यावर जाण्यासाठी भुवन गाव गाठण्याची गरज नाही. पेठपासून ६ कि.मी.वर तोंडवळ नावाचे गाव आहे. या तोंडवळ गावाच्या अलीकडून एक हमरस्ता भुवन गावाकडे जातो. जिथून हा रस्ता
सुन गावाकडे वळतो त्याला 'भुवन फाटा' असे म्हणतात. हा सर्व रस्ता म्हणजे एक घाटवाटच. या घाटरस्त्यावरून उजवीकडे एक लाल मातीची वाट मुख्य रस्ता सोडन अंगलातून डोंगरावर गेलेली दिसते. नेमकी हीच वाट हेरायची म्हणजे झाले. कारण बोडेजरी पुढे निघून गेलात, तर मग थेट भुवन गावाशिवाय पर्याय नाही. या वाटेवर एकदाचे पायउतार झालात म्हणजे तुम्ही किल्ल्यावर पोहोचल्यातच जमा आहात असे आम्हाला जीपवाल्याने सांगितले. लालमातीचा रस्ता धरून थोडे वर चढल्यावर एक खिंड लागते. या खिंडीतून समोर जाणारी लालमातीची वाट पलीकडच्या गावात जाते, तर डावीकडे वर चढत जाणारी वाट सोनगीरला जाते. किल्ल्याकडे जाणारी वाट चांगली मळलेली आहे. वाट हिरव्या झाडांच्या छत्रछायेखाली पुढे गेलेली आहे. मध्येच बुलबुल, वटवटे, शिंपी पक्ष्यांचा आवाज जंगलातील निरव शांततेला भग्न करत होता. ऑक्टोबरचा दाहकपणा चांगलाच जाणवत होता. हवेतही फार उकाडा होता, वायाचा कुठेही मागमूस नव्हता, झाडाचे पानही हलत नव्हते. उण्याच्या दाहकपणामुळे वळणावळणाची वाट कधीही न संपणारी वाटत होती. चढताना झाडाची पाने पायाखाली चुरडली जात होती. डाव्या हाताला दमणगंगा नदीचे खोरे दिसत होते, पात्र चांगलेच उथळ होते. आम्ही किल्ला पाहून झाला की नदीत यथेच्छ डुंबायचे बेत रचत होतो.
सुमारे पाऊण तासाच्या चढाईनंतर आपण एका छोट्याशा पठारावर पोहोचतो. पठारावरून समोरच सोनगीर किल्ल्याचा माथा आपले लक्ष वेधून घेतो. माथ्याकडे जाताना मध्ये 'खुरासणी'च्या फुलांची शेती आडवी आली. आजवर प्रवासात सूर्यफुलांची शेती अनेक वेळा पाहिली होती, पण आज प्रथमच त्यांना सामोरे आलो असल्याने त्यांचे किती फोटो काढू नि किती नाही असे झाले. पिवळीधम्मक फुले, त्याच्या मागे किल्याच्या माथ्यावरचे हिरवे गवत आणि त्याच्या पार्श्वभूमीवर निळे निळे आकाश असे दृश्य खूपच सुंदर दिसत होते. आजवर नाशिकमध्ये वणवण भटकलो असल्याने, या वैराण भूमीतील हे सौंदर्य पाहून मनोमन सुखावून गेलो. इथून पुढची माथ्यावर जाणारी वाट थोडी खड्या चढणीची आणि शेताडीला तिरकी कापत पुरुषभर उंचीच्या गवतातील असल्याने, पावले जरा सांभाळून टाकावी लागतात.
गडमाथ्यावर पोहोचल्यावर एक चौथरा दिसतो. हा चौथरा म्हणजे किल्ल्याचे अस्तित्व दर्शवणारी एकमेव खूण आहे. यावर पूर्वी देवीचे एक मंदिर होते, पण आता त्याचा मागमूसही नाही. मंदिराची पडझड झालेली असल्यामुळे गावकऱ्यांनी त्यातील देवीची मूती भुवन गावात नेलेली आहे. इथेच माथ्यावर एक पाण्याचे टाकेही आहे.
पण तेही सध्या बुजलेल्या अवस्थेत आहे. खरोखर किल्ला म्हणावी अशी एकही खुण यावर शिल्लक नाही तर, मग याला किल्ला तरी कशासाठी म्हणावे? यामागचे कारण आहे, ते म्हणजे 'मोक्याची जागा'. सह्याद्रीच्या बहुतेक घाटांवर किल्ले बाधेलेले आहेत. या किल्ल्यांचा मुख्य उपयोग व्यापार करणाऱ्यांच्या संरक्षणासाठी होत असे आणि शत्रूच्या हालचालींना जेरबंद करण्यासाठीसुद्धा करता येत असे. म्हणूनच प्रत्येक किल्ल्याचे स्वरूप त्याच्या उपयोगावरून ठरवले जात असे. नाशिकपासून सुरतला जाणारे अनेक मार्ग आहेत. यांपैकी एक मार्ग नाशिक-पेठ-धरमपूर असा होता. या मार्गावर नजर ठेवण्यासाठी सोनगीरसारख्या संरक्षक ठाण्याची निर्मिती करण्यात आली.
नाशिकवरून एका दिवसात सोनगीरचा किल्ला सहजपणे पाहून परतता येते. अनेक ट्रेकर्स मंडळी सोनगीर, खैराई आणि वाघेरा, ब्रह्मगिरी असा तीन दिवसांचा ट्रेकसुद्धा करतात.
किल्ल्याची उंची : समुद्रसपाटीपासून ४७९ मीटर (१५७१ फूट)
तालुका : पेठ
किल्ल्याची श्रेणी : सोपी
डोंगररांग : पेठ उपरांग
पायथ्याची गावे : भुवन, तोंडवळ
पायथ्याच्या गावापासूनचे अंतर भुवन गावापासून चालत २ तास.
जवळचे एस.टी. स्थानक : पेठ
राहण्याची सोय : किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय : जेवणाची सोय नाही.
पिण्याचे पाणी : किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी उत्तम कालावधी : जून ते मार्च
किल्ला फिरायला लागणारा वेळ : अर्धा तास.
जवळपासची गावे : पेठ, तोंडवळ, भुवन
 
 
 

   सोनगिरी - खैराई - वाघेरा - बसगड - हरिहर

नोट : ७ वर्षांपूर्वी लिहिलेला लेख सापडला, बात पुरानि - हर्षल कि जुबानी!!! 


नाशिक ला जाउन भिडावे आणि प्रेमात पडावे असे हे नाशिक चे किल्ले.. प्रत्येक सह्य्वेडा या जिल्ह्यावर अतोनात प्रेम करतो.. गगनाला भिडलेले इथले किल्ले आणि देव-देवतांच्या या शहरामुळे यात्रेकरूंचे शहर "सिटी ऑफ पिलग्रिम्स" असा फलक आपल्याला नाशिक शहरात प्रवेश करतानाच नजरेस पडतो.


                                                                        
मी आणि माझा मित्र संदीप इचके आमचं लक्ष नाशिक मधील एका ऑफ-बीट अश्या किल्ल्यांकडे गेले आणि मी मोहीम आखली.. श्री आनंद पाळंदे ह्यांच्या डोंगरयात्रा हे मार्गदर्शक पुस्तक सोबत घेऊन संदर्भ घेतला.. 

साल २०११, डिसेंबर चे दिवस होते.. थंडीत कुडकुडत आम्ही बेहाल होणार होतो. १९-२१ डिसेंबर अशी तारीख ठरली. सोनगिरी - खैराइ - वाघेरा - बसगड(भास्करगड) आणि हरिहर(हर्षगड) असे किल्ले ह्या मोहिमेत पहायचे असे ठरवले होते...१९ ला संध्याकाळी ५.३० वाजता मी आणि संदीप माझ्या डिस्कवर गाडीवर निघालो.. गाडीसमोर प्रथेप्रमाणे नारळ फोडला, हार घातला आणि गणपती बाप्प्पा मोरया म्हणत नाशिक कडे कूच केली. थंडीत कुडकुडत नाशिक ला रात्री ११.३० ला पोहोचलो. तिथून पेठ चा रस्ता धरला आणि रात्री १.३० ला पेठ ला एस-टी स्थानकावर जाऊन डबा खाउन झोपी गेलो. आता आम्ही पुण्यापासून २८२ किलोमीटर चा पल्ला गाठला होता..२० तारखेला ला पहाटे ६ ला उठून स्थानकावर जो मिळेल तो नाश्ता केला आणि सोनगिरी कडे निघालो.. पेठ- सोनगिरी साधारण ८ किलोमीटर आहे.. सकाळी ८ वाजता सोनगिरी चढायला सुरुवात केली.. किल्ला चढताना शेवटच्या टप्प्यावर माणसाच्या उंचीएवढे गावात त्रास देत होते.. वाट काढत कसेबसे माथ्यावर पोहोचलो..बघतो तर काय माथ्यावर काहीही नाही..माथ्यावर भवानी देवीचे मंदिर आहे कुठेतरी वाचले होते..गावतल्या लोकांनी ती देवीची मूर्ती खालच्या भुवन गावात नेउन ठेवली होती.  एक कोरडी पडलेली विहीर, तटबंदी चे अवशेष एवढेच काय ते ह्या किल्ल्यावर पाहण्यास शिल्लक होते.. किल्ल्यावरून वाघेरा, रामशेज, दमणगंगा नदीचं खोर असा नजारा पहिला आणि झटझट खाली उतरलो. आता दुसर्या किल्ल्याच्या दिशेने निघालो..तो म्हणजे खैराइ. 
खैराई किल्ला 
तासाभरात हरसूल गाठले. हरसूल वरून ठाणापाडा वरून खैरपाली(खैराइ चा पायथा) गावात जाउन धडकलो. गावात एका गृहस्थांकडे गाडी लावली. पाण्याची बाटली भरून खैराइकडे निघालो. या गावातून किल्ला दिसत नव्हता..पहिल्या पठारावर येउन पोहोचलो..आणि किल्ला अजून बराच लांब आहे असा कळाल. तासाभराच्या पायपीटी नंतर माथ्यावर पोहोचलो. किल्याच्या पसारा तसा मोठा असून माथा छोटाच आहे. बुरुज, २ तोफा, पाण्याची टाकी, शेंदूर फासलेला गणपती आणि हनुमान ह्यांचे दर्शन घेतले आणि अर्ध्या-पाउण तासात गडफेरी पूर्ण केली. गडावरून हरिहर, उतवड , त्रिंबक रांगेला पाया पडत सुंदर पण दुर्लक्षित किल्ला पदरात पडून घेतला.

खैराई किल्ल्यावरील बुरुजाचे अवशेष
दुपारी २.३० च्या सुमारास खाली गावात परतलो. आता पोटात कावळे ओरडायला लागले होते.हरसूल मध्ये "मिस-कॉल खानावळ" ह्या खानावळीत आकंठ जेवण केले.


 आता साहजिकपणे फार कंटाळा आला होता. पण अजून एक किल्ला करायचा बाकी होता तो म्हणजे वाघेरा. आम्ही वाघेरा हा किल्ला छोटासा आहे ह्या समजुतीत होतो..आणि  दुपारी ४ वाजता आम्ही वाघेरागावात पोहोचलो. किल्ला पाहिल्यवर तोंडचे पाणीच पळाले..अबब केवढा हा किल्ला, केवढा हा त्याचा पसारा..६.१५ पर्यंत आपण कसा काय किल्ला पाहणार. कधी खालती येणार असे असंख्य प्रश्न मनात येउन घर करत होते. 
वाघेरा किल्ला
आम्ही सरळ गावातून एक वाटाड्या घेतला आणि वाघेरा किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या धरणाच्या भिंतीवरून कशीबशी गाडी चालवत छोट्याश्या पाड्यावर येउन पोहोचलो. इथून अर्ध्या तासाच्या चढाई नंतर एका पठारावर येउन पोहोचलो. आता माथा दिसू लागला पण वाटेत एकही झाड नव्हते. असा हा बोडका किल्ला चढताना चांगलीच दमछाक होत होती. माथ्यापासून थोडेसे खालती उजव्या हाताला छोटेसे टाक आपल्या नजरेस पडते. तिथून एक छोटा कातळटप्पा चढून आम्ही माथ्यावर जाउन पोहोचलो. येथे एका दगडाला गावकर्यांनी शेंदूर फासून ठेवला आहे आणि ह्या ठिकाणाला गावकरी भैरी-आई असे संबोधतात. 





पठारापासून माथ्यावर यायला आम्हाला पाउण तास लागला. आता ५.१५ वाजले होते. किल्ल्यावरून रामशेज, देहेर, त्रिंबकगड, खैराइ परिसर स्पष्ट दिसत होता. गडाच्या मागील बाजूस असलेल्या पायवाटेने उतरण्यास सुरुवात केली. घासारायुक्त पायवाटेने थोडा खाली उतरल्यावर ३ पाण्याची कोरडी टाकी दिसली. आता संध्याकाळचे ५.४५ वाजले होते. इथून आता लगेच निघावे लागणार होते. तडख निघालो आणि संध्याकाळी ६.३० च्या सुमारास वाघेरा गावात पोहोचलो. सुर्यास्ताचा आनंद घेत आम्ही त्रिंबकेश्वर च्या दिशेने निघालो.

संध्याकाळी ७.१५ वाजता त्रिंबकेश्वर ला माझ्या मामाकडे पोहोचलो. रात्री जेवायला साजूक तुपातील शिरा असा बेत होता. ट्रेक ला जे मिळेल ते खाण्याची सवय असल्यामुळे एवढे स्वादिष्ठ जेवणाची अपेक्षाच नव्हती. साधारण ३५० किलोमीटर चा बाइक प्रवास आणि ३ किल्ले या मुळे आता दोघाही दमलो होतो. आता झोपेची नितांत आवश्यकता होती. रविवारी पहाटे ठरल्याप्रमाणे ५.३० ला चहा नाश्ता करून बसगड च्या दिशेने निघालो. थंडीने आम्हा दोघांचा हि निकाल लावला होता. 

डावीकडुन - काळवी , तळइ, गणबारी, संडे १, संडे २

त्रिंबक ते निरगुडपाडा(बसगड व हरिहर च्या पायथ्य चे गाव) २०  किलोमीटर पण थंडीमुळे हे अंतर २०० किलोमीटर वाटत होते. आता बसगड च्या पायथ्याला येउन पोचलो.
बसगड / भास्करगड 

 निरगुडपाड्यातून चालायला सुरुवात केली. १.३० तासात आम्ही बसगड जाऊन पोहोचलो. कातळात खोदलेल्या पायर्या आणि दरवाजा आता आता बराच बुजला आहे. आता थोडा पुढा गेल्यावर किल्लेदाराच्या वाड्याचे दगडी जोते , हनुमानाची मूर्ती , एक कोरडे तळे, ३-४ कोरडी पाण्याची टाकी एवढेच काय ते अवशेष शिल्लक आहेत. 
फणी - हरिहर - ब्रम्हा पर्वत 
भास्करगडावरील पायऱ्या 

बुजलेला दरवाजा 
गडमाथा बराच मोठा आहे आणि पाउण तासात किल्ला पाहून आम्ही परत खाली निघालो. आम्ही आता निरगुडपाड्यात परत न जाता फणी डोंगराच्या पोटातून डावीकडील असलेल्या पायवाटेने हरिहर ला जायचा निर्णय घेतला.
फणी 
थोडक्यात ट्रेक मधेच एक दुसरा ट्रेक करण्याचा निर्णय घेतला. साधारण २ तासात आम्ही आता हरिहर च्या पायथ्याला आलो. हरिहर च्या कातळकोरीव सरळसोट पायर्या आ वासून उभ्या होत्या. एखाद्या नवख्या भटक्याला बघता क्षणी छातीत धडकी भरेल अश्या ह्या पायर्या. 
हर्षगडाच्या सुरेख कातळ कोरीव पायऱ्या
पण प्रत्येक पायर्यांना असलेल्या दोन खोबणी यांच्या सहाय्याने आम्ही वर चढायला सुरुवात केली. माथ्यावर पोहोचलो तेव्हा दुपारचे १२.४५ वाजले होते. माथ्यावर एक हनुमानाची मुर्ती, ६-७ छोटी मोठी टाकी, एक मोठा तळ, ६-७ माणसं राहू शकतील अशी छोटी इमारत असे अवशेष आहेत. सगळ्या बाजूने मोठा कातळकडा असल्याने तटबंदी ची आवश्यकता जाणवत नाही. माथ्यावरून वैतरणा धरणाचे पाणी, फणी , बसगड, उतवड , त्रिंबकगड असा परिसर दिसतो. हा मोहिमेचा शेवटचा किल्ला होता. 



२ दिवसात ५ किल्ले तेही कुठल्याहि प्रकारची घाई न करता पूर्ण केले याचा आनंद होत होता. दुपारी ३ वाजता निरगुडपाड्यात येउन  पोहोचलो. आता जोरदार भूक लागली होती. पण आम्ही गावात न थांबता तडख पुण्याच्या दिशेने निघालो. पण या वेळी परत नाशिक मधून नाही तर घोटी - भंडारदरा - बारी - राजूर - बोटा - पुणे ह्या मार्गाने पुण्यात यायचे ठरवले. राजूर ला मातोश्री हॉटेल मध्ये शेव भाजी चा बेत ठरल्याप्रमाणे पार पडला आणि रात्री १० ला पुण्यात पोहोचलो. गाडी चालवताना डोळ्यासमोर हे पाच किल्ले जसेच्या तसे उभे होते आणि आता ३ वर्ष झाले तरी मनात घर करून बसले आहेत. २ दिवसात एकूण ६२० किलोमीटर आणि ५ नवीन किल्ले पाहिल्यामुळे एक वेगळेच धाडस केल्याचे जाणवत होते. संदीप चा तसा मोठा पहिलाच ट्रेक होता पण पट्ठ्याने चांगली साथ दिली.
 
 https://trekhunt.blogspot.com/2017/11/songirikhairai.html
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...