Saturday, April 11, 2026

खैराई किल्ला

   महाराष्ट्राच्या  कानाकोपर्यात पसरलेले किल्ले बघताना प्रश्न पडतो को खरोखरच या किल्ल्यांचा काही उपयोग व्हायचा का? किंवा या किल्ल्यांचे कर्तृत्व ते काय? किल्ल्यांच्या उपयुक्ततेबद्दल प्रश्न पडणे अगदी साहजिकच आहे. हे किल्ले म्हणजे मराठ्यांच्या स्वातंत्र्याची आणि अस्मितेची प्रतीके आहेत. एकेकाळच्या अनेक लढाया या किल्ल्यांच्या साहाय्याने लढविल्या गेल्या आहेत. शिवाजीराजांचे तर जन्मापासून मृत्यूपर्यंतचे सर्व आयुष्य याच किल्ल्यांवर गेले. राजांनी या किल्ल्यांचे महत्त्व ओळखून त्यांच्या साहाय्याने मराठ्यांचे स्वतंत्र असे राष्ट्र निर्माण केले, एवढेच नव्हे, तर एक नाही, दोन नाही, तर उणीपुरी पंचवीस वर्षे मराठ्यांनी या किल्ल्यांच्या साहाय्याने औरंगजेबाला सतावून सोडले होते. आजमात्र इतिहास घडविणाऱ्या या किल्ल्यांची अवस्था फारच दयनीय झाली आहे, त्यांच्याकडे सर्वांत जास्त दुर्लक्ष झाले आहे. आज या किल्ल्यांचा वापर केवळ मजामस्ती, पिकनिक आणि करमणुकीचे ठिकाण यासाठी केला जातो.
        वास्तविक या किल्ल्यांचा उपयोग मुख्यतः तीन कारणांसाठी होत असे. एक म्हणजे शांततेच्या काळात बंदोबस्तासाठी, दुसरा म्हणजे रहदारीच्या नियंत्रणासाठी, आणि तिसरा म्हणजे आक्रमणाच्या काळात संरक्षणासाठी. किल्ले कसे बांधायचे याचे निश्चितपणे एक शास्त्र आहे. ते मात्र कुठे लिखित नाही. त्यामुळे एवढे मात्र खरे की, त्यांचा आकार, बांधणी ही त्यासाठी निवडलेल्या भूमीच्या ठेवणीवर अवलंबून असते.
त्र्यंबकेश्वर तालुका हा घाटाच्या तोंडाशी असणारा प्रदेश, त्यामुळे साहजिकपणे घाटसंरक्षणासाठी या भागात अनेक किल्ले बांधले गेले. कोकणातून गुजराथकडे जव्हारमार्गे उतरण्याऱ्या घाटावर नजर ठेवण्यासाठी प्रामुख्याने खैराई आणि सोनगीर
      किल्यांची निर्मिती केली गेली. खुद्द खैराईबद्दल सांगायचे तर, खैराईपासून हारकडे उतरणारा घाट १५ कि.मी. वर आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळी यामार्गे चालणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खैराई किल्ल्याचा उपयोग केला जात शिवाजीराजांनी जव्हारमार्गे सुरत गाठली, त्या वेळी त्यांनी खैराई किल्ला जिंकला. या असे. आजही खैराई गावातील गावकरी सांगतात की, पहिल्या सुरतलुटीच्या वेळी संबंधीची कागदपत्रे गावातील एका घरात होती. नंतर ती सर्व गहाळ झाली. गावकऱ्यांनी वर्तवलेली ही शक्यताही नाकारता येत नाही. कारण ३१ डिसेंबरला राजे अंबकेश्वरला गेले आणि तिथून पश्चिमेला जाऊन ते सह्याद्रीचा घाट उतरले आणि जव्हारला गेले. दमणगंगा ओलांडून त्यांनी गणदेवी, उधनामार्गे सुरत गाठले. खैराई दुर्गाचे स्थान त्र्यंबकेश्वरच्या पश्चिमेला आहे, आणि त्याच्या जवळच्या सावळा घाटातून जव्हारला उतरता येते. मग या वेळीच शिवाजीराजांनी खैराईदुर्ग जिंकला असण्याची दाट शक्यता आहे. अर्थात हा आपला एक अंदाज, याला पक्के ठरवण्यासाठी लागणारा लिखित पुरावा  उपलब्ध नसल्याने त्याबद्दल निश्चितपणे विधान करणे योग्य नाही. त्र्यंबकेश्वरच्या आजूबाजूचे किल्ले राजांकडे असल्याची एक नोंद 'जेधे शकावली'मध्ये आली आहे.
      खैराईचा किल्ला जरी त्र्यंबकेश्वराच्या जवळ असला, तरी तिथपर्यंत जाण्यासाठी खास करून त्र्यंबकेश्वराला जायची गरज नाही. खैराईला जाण्यासाठी नाशिकमार्गे हरसूल गाठायचे, नाशिक ते हरसूल हे साधारण ५० कि.मी.चे अंतर आहे. त्र्यंबकेश्वरपासून हरसूलला जाण्यासाठी जीपगाड्या मिळतात. हरसूलपासून १० कि.मी.वर खैरपाली गाव आहे. खैरपाली हे काही किल्ल्याच्या पायथ्याचे गाव नाही. किल्ल्याचे पायथ्याचे गाव आहे 'साट्याचापाडा'. हे गाव खैरपाली गावापासून चालत १० मिनिटांवर आहे. स्वतःचे वाहन असल्यास आपण खैराईपाली गावाच्या अलीकडील साटयाचापाडा या किल्ल्याच्या अगदी पायथ्यालगत असलेल्या वाडीपर्यंत जाऊ शकतो. येथुन गडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. वाडीच्या मागील बाजुस दक्षिणोत्तर पसरलेल्या या गडाची उजवीकडील एक डोंगरधार वाडीच्या बाजूस उतरताना दिसते ... तर डावीकडे असलेल्या सपाटीवर या किल्ल्याची माची असुन त्या माचीवर माचीपाडा नावाची १०-१२ घरांची वस्ती आहे. वाडीतून एक कच्चा रस्ता गडाच्या दिशेने जाताना दिसतो. हाच रस्ता पुढे पायवाट बनुन माचीपाडा वस्तीपर्यंत जातो.
       साट्याचा पाडा या पायथ्याच्या गावातून मळलेली पायवाट गडावर जाते. गड चढायला सुरुवात केली की सुरुवातीला वळणा वळणाची पायवाट आहे. गडाचा चढ सुरुवातीला मध्यम तर नंतर खडा चढ आहे. वाटेत जास्त झाडे नसल्याने चढताना दमछाक होते. शेवटच्या टप्प्यात मध्यम रॉक पॅच आहे. साधारण तासाभरात आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोचतो.
Khairai
गडावर जाण्याची दुसरी वाट म्हणजे या पायवाटेने सरळ जाऊन खैराई माचीवरचा माचीपाडा गाठायचा व तेथुन दिसणाऱ्या तटबंदीच्या दिशेने बुरुज समोर ठेवून गड चढायला सुरवात करायची. बुरुजाच्या पायथ्याशी आल्यावर बुरूज व गडमाथा उजव्या बाजुला ठेवत त्याला वळसा घालत गडाच्या मागील बाजूस असलेल्या उध्वस्त दरवाजाने गडावर प्रवेश करायचा. हि वाट पहिल्या वाटेच्या तुलनेत खूपच सोपी असुन या वाटेने गडावर पोहोचण्यास दिड तास लागतो. पहिली वाटही फारशी अवघड नसल्याने या वाटेने चढुन दुसऱ्या वाटेने उतरल्यास आपला वेळही वाचतो आणी कमी श्रमात संपुर्ण किल्ला फिरून होतो.
Fort

गडावर प्रवेश केल्यावर गडाचा आटोपशीर घेरा नजरेस पडतो. साधारण आयताकृती आकार असलेला हा गडमाथा दक्षिणोत्तर ३ एकरवर पसरलेला असुन गडाच्या तटबंदीत एकुण बारा बुरुज आहेत. आपण प्रवेश केल्यावर समोरच खडकात खोदलेली चार पाण्याची टाकी दिसुन येतात तर उजव्या बाजुला गडाचा आजही सुस्थितीत असलेला बुरुजाचा माथा दिसतो. टाक्याच्या मागील बाजूस असलेल्या उंचवट्यावर एका मोठया वास्तुचा चौथरा दिसुन येतो. चौथऱ्याच्या आकारावरून हा किल्लेदाराचा वाडा अथवा सदर असावी. चौथऱ्याच्या पुढील भागात एक लहानसे तळे असुन या तळ्यात उतरण्यासाठी खोदीव तसेच बांधीव पायऱ्या आहेत. 


तळ्याच्या मागील भागात पत्र्याने झाकलेले एक लहानसे भिंती नसलेले मंदिर आहे. या मंदिरात शेंदूर फासलेला एक दगड असुन स्थानिक लोक त्याला वेताळदेव म्हणुन ओळखतात. मंदिर म्हणजे केवळ एक शिवलिंग. त्याला एक छोटीशी चौकट, अन् त्या चौकटीच्या कमानीवर वीस-बावीस घंटा लावलेल्या आहेत.

मंदिराच्या आवारातच दोन भग्न तोफा पडलेल्या आहेत. यातील एक तोफ सुत्तरनाळ प्रकारातील आहे. मंदिराच्या उजव्या व डाव्या बाजुची तटबंदी व बुरुज आजही शिल्लक असुन डाव्या बाजुच्या तटबंदीत एक शौचकुप दिसुन येते. मंदिरा मागील उंचवटा हा गडावरील सर्वात उंच भाग असुन तेथुन संपुर्ण गड परीसर दिसतो. गडावरील तटबंदी मोठया प्रमाणात ढासळत चालली असुन या उंचवट्याच्या खालील भागात पुर्णपणे नामशेष झालेल्या दरवाजाचे अवशेष दिसुन येतात. दरवाजाच्या या उत्तरेकडील खोलगट भागातील तटबंदी आजही शिल्लक असुन उंचवट्याच्या डाव्या बाजुला मातीने भरलेले एक कोरडे टाके दिसुन येते. गडाच्या या उंच भागातुन वाघेरा किल्ला, हरिहर, त्र्यंबकगड व दूरवर पसरलेली उतवड डोंगररांग इतका दूरवरचा प्रदेश दिसतो. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. संपुर्ण गड फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो. एकंदर किल्ला फिरताना या किल्ल्यावर पाच पंचवीसपेक्षा जास्त शिबंदी नसावी, त्यामुळे याचा उपयोग केवळ एक संरक्षक ठाणे म्हणूनच होत असावा असं जाणवतं.

खैराई किल्ल्यावरील बुरुजाचे अवशेष






गडाच्या उध्वस्त दरवाजातून खाली उतरताना दरवाजासमोरील वाटेत उंचवटा फोडुन दगडी चिरे काढण्याचे काम अर्धवट सोडल्याच्या खुणा तसेच एक अर्धवट खोदलेले बुजलेले टाके दिसुन येते. आधी वर्णन केलेल्या या वाटेने आपण माचीपाडा वस्तीच्या वरील बाजुस येतो पण या वाटेने माचीपाडा येथे न जाता डावीकडे साटयाचापाडा वाडीकडे जाणाऱ्या वाटेकडे वळावे. या वाटेने काही अंतर गेल्यावर खालील बाजुस गर्द झाडी दिसुन येते. या झाडीत डोंगर उतारावर खडकात खोदलेली दोन पाण्याची टाकी असुन या टाक्याशेजारील खडकावर शिवलिंग कोरलेले आहे. या टाक्याशेजारी निर्मळ पाण्याचा झरा असुन त्याला वर्षभर पाणी असते. गडावर जाणारी मूळ वाट येथूनच वर जात होती पण काळाच्या ओघात ती नष्ट झाली आहे. गडावर पाण्याची एकुण सहा टाकी असली तरी पिण्यायोग्य पाणी एकाही टाक्यात नसल्याने सोबत पाणी बाळगावे.
खैराई किल्ला 
     शिवकाळात हा गड मोघलांचे जहागीरदार असलेल्या जव्हारच्या कोळी राजांच्या पर्यायाने मोघलांच्याच ताब्यात होता. खैराई गावातील लोकांनी दिलेल्या माहिती नुसार पहिल्या सुरतेच्या मोहिमेवर जाताना शिवाजी महाराजांनी जव्हारमार्गे सुरत गाठली व याकाळात खैराई किल्ला जिंकला. या किल्ल्यावर १ जानेवारी इ.स.१६६४ रोजी महाराजांचा पदस्पर्श झाला पण याला कागदोपत्री काही पुरावा नाही. इ.स. १६७६ मध्ये रामनगर म्हणुन ओळखला जाणारा हा भूभाग जिंकताना शिवरायांनी खैराई किल्ला स्वराजात सामील करून घेतल्याची अधिकृत नोंद आहे. इ.स. १७९० मध्ये पेठचे संस्थानिक चिमणाजी दलपतराव यांनी कर्जापोटी हा गड नरहर गोपाळ पेशवे सरकार यांना दिला.





तासाभरात हरसूल गाठले. हरसूल वरून ठाणापाडा वरून खैरपाली(खैराइ चा पायथा) गावात जाउन धडकलो. गावात एका गृहस्थांकडे गाडी लावली. पाण्याची बाटली भरून खैराइकडे निघालो. या गावातून किल्ला दिसत नव्हता..पहिल्या पठारावर येउन पोहोचलो..आणि किल्ला अजून बराच लांब आहे असा कळाल. तासाभराच्या पायपीटी नंतर माथ्यावर पोहोचलो. किल्याच्या पसारा तसा मोठा असून माथा छोटाच आहे. बुरुज, २ तोफा, पाण्याची टाकी, शेंदूर फासलेला गणपती आणि हनुमान ह्यांचे दर्शन घेतले आणि अर्ध्या-पाउण तासात गडफेरी पूर्ण केली. गडावरून हरिहर, उतवड , त्रिंबक रांगेला पाया पडत सुंदर पण दुर्लक्षित किल्ला पदरात पडून घेतला.



श्रेणी नुसार स्तर
कठीण
📏
समुद्र सपाटीपासून उंची (फ़ूट)
2296
🏰
किल्ल्याचा प्रकार
गिरीदुर्ग
📍
जिल्हा
नाशिक

किल्ल्याची छायाचित्रे

किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा

मुख्य छायाचित्र

Khairai

सर्व छायाचित्रे पहा

नकाशे व मार्ग

किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा

सर्व नकाशे पहा

प्रस्तावना

त्र्यंबकेश्वर हा घाटांचा प्रदेश. कोकणातून जव्हारमार्गे गुजरातेत जाणाऱ्या घाटांवर लक्ष ठेवण्यासाठी खैराई आणि सोनगीर या किल्ल्यांची निर्मिती केली गेली. खैराई पासून जव्हारकडे उतरणारा घाट हा साधारण १५ किमी आहे. प्रामुख्याने या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी खैराई किल्ल्याचा वापर केला जात असे. इसवीसन १६७६ मध्ये छ. शिवाजी महाराजांनी खैराई किल्ला जिंकून घेतला.

महत्त्वाची ठिकाणे

साट्याचा पाडा या पायथ्याच्या गावातून मळलेली पायवाट गडावर जाते. गड चढायला सुरुवात केली की सुरुवातीला वळणा वळणाची पायवाट आहे. गडाचा चढ सुरुवातीला मध्यम तर नंतर खडा चढ आहे. वाटेत जास्त झाडे नसल्याने चढताना दमछाक होते. शेवटच्या टप्प्यात मध्यम रॉक पॅच आहे. साधारण तासाभरात आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोचतो. किल्ल्याचा माथा आकाराने लहान आहे. किल्ला चढून आल्यावर समोर एक बुरुज आहे. बुरुजाच्या मागे पाण्याची तीन टाकी आहेत. ही टाकी पाहून पुढे गेले की टाक्यांच्या मागे वाड्याच्या जोती आहेत. या वाड्याचा घेर मोठा आहे. वाड्याच्या उजव्या बाजूस कड्यावर एक पडका बुरुज दृष्टीस येतो. वाड्याच्या जोती ओलांडून पलीकडे गेले की पाण्याचे एक मोठे टाके लागते. या टाक्याला पायऱ्या आहेत. कदाचित वाड्यातील लोकांसाठी हे टाके वापरले जात असेल. टाके पाहून आपण पुढे आलो की आपल्याला एक मंदिर लागते. हे वेताळाचे मंदिर आहे. मंदिरात फक्त एक शिवलिंग आहे. येथे रोज गावातून गावकरी येउन पूजा करतो. मंदिरासमोरच दोन तोफा पडलेल्या दिसतात. यातील एक तोफ लहान आहे तर दुसरी साधारण अडीच मीटर लांबीची आहे. ही तोफ सुतरनाळ प्रकारातील आहे. मंदिराच्या डाव्या बाजूस कड्याजवळ तुटलेली तटबंदी आहे. ही तटबंदी उजव्या बाजुला ठेवून आपण पुढे गेलो की डाव्या बाजूला थोड्या उंचवट्यावर तुटलेल्या वाडा सदृश वास्तूचे अवशेष आहेत. येथून उजव्या बाजुने एक वाट खाली उतरते. पण ही वाट मळलेली नाही. वाटाड्याशिवाय या वाटेवरुन जाउ नये. या अवशेषांमागे मोठा तलाव आहे. हा तलाव पाहून आपण पुढे जाउन वाड्याला वळसा घालतो आणि परत वेताळाच्या मंदिरापाशी येतो. येथून आपण पुढे चालत गेलो की मगाशी पाहिलेले पायऱ्या असलेले टाके आणि वाड्याच्या जोती आपल्या डावीकडे असतात. येथूनच पुढे आपण आलो त्या रस्त्याने उतरायला सुरुवात करु शकतो. गड संपूर्ण पाहायला साधारण पाउण तास पुरेसा होतो. संपूर्ण किल्ला तटबंदीने घेरलेला आहे. तशा खुणा दिसतात.

कसे पोहोचावे

किल्ल्यावर जाण्यासाठी पायथ्याच्या साट्याचा पाडा या गावात यावे लागते. साट्याचा पाड्यात जाण्यासाठी नाशिक मार्गे हरसूल या गावी जावे. हे अंतर साधारण ५२ किलोमीटरचे आहे. हरसूल पासून १० किमी वरील खैरपाली गाव गाठावे. हे अंतर १४ किलोमीटर आहे. येथे वाहन ठेवून आपण चालत १० मिनिटात साट्याचा पाडा या गावी पोहोचतो. या भागात एसटी आणि खाजगी गाड्यांची सोय कमी असल्याने शक्यतो प्रवास खाजगी वाहनाने करावा.

ट्रेकसाठी लागणारा वेळ

⏱️ साट्याचा पाडा वरुन एक तास लागतो.

सुविधा व सोयी

🏠

निवास व्यवस्था

किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.

🍽️

अन्न व्यवस्था

किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.

💧

पाणी उपलब्धता

किल्ल्यावर पिण्यायोग्य पाणी आहे.

सर्वोत्तम काळ

🌤️ N/A

जवळील गावे

साट्याचा पाडा

स्थान नकाशे

सविस्तर नकाशे व ट्रेकिंग मार्ग पहा

 

उंची : २१५० फुट

श्रेणी : मध्यम

नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात हरसूलजवळ खैराईगड नावाचा अवशेषांनी परिपुर्ण असा छोटेखानी किल्ला आहे. नाशिक जिह्यातील पेठ ह्या सह्याद्रीच्या उपरांगेत येणारा हा किल्ला नाशिकहुन त्रिंबकेश्वर- जव्हारमार्गे उत्तर कोकणात उतरणाऱ्या मध्ययुगीन व्यापारी मार्गावर व घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला. समुद्रसपाटीपासून २२७१ फूट उंचीवर असलेल्या या किल्ल्याच्या आसपास माचीपाडा, साटयाचापाडा, बेहेडपाडा, बोरीपाडा, फणसपाडा, सावरपाडा,ठाणापाडा असे अनेक लहान आदिवासी पाडे आहेत. नाशिक–त्रिंबक-वाघेरा-हरसूल-ठाणपाडा-खैराईपाली हे अंतर ७०कि.मी.असुन खैराईपाली हे जरी किल्ल्याच्या पायथ्याचे गाव असले तरी स्वतःचे वाहन असल्यास आपण खैराईपाली गावाच्या अलीकडील साटयाचापाडा या किल्ल्याच्या अगदी पायथ्यालगत असलेल्या वाडीपर्यंत जाऊ शकतो. येथुन गडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. वाडीच्या मागील बाजुस दक्षिणोत्तर पसरलेल्या या गडाची उजवीकडील एक डोंगरधार वाडीच्या बाजूस उतरताना दिसते ... तर डावीकडे असलेल्या सपाटीवर या किल्ल्याची माची असुन त्या माचीवर माचीपाडा नावाची १०-१२ घरांची वस्ती आहे. वाडीतून एक कच्चा रस्ता गडाच्या दिशेने जाताना दिसतो. हाच रस्ता पुढे पायवाट बनुन माचीपाडा वस्तीपर्यंत जातो. ह्या रस्त्याचे जेथे पायवाटेत रुपांतर होते तेथुन समोर असलेला उभा चढ चढून गेल्यावर किल्ल्याचा बुरुज दिसतो. येथे छोटेसे सोपे प्रस्तरारोहण करून आपला तुटलेल्या तटावरून गडावर प्रवेश करता येतो. या वाटेने गडावर प्रवेश करण्यास एक तास लागतो. गडावर जाण्याची दुसरी वाट म्हणजे या पायवाटेने सरळ जाऊन खैराई माचीवरचा माचीपाडा गाठायचा व तेथुन दिसणाऱ्या तटबंदीच्या दिशेने बुरुज समोर ठेवून गड चढायला सुरवात करायची. बुरुजाच्या पायथ्याशी आल्यावर बुरूज व गडमाथा उजव्या बाजुला ठेवत त्याला वळसा घालत गडाच्या मागील बाजूस असलेल्या उध्वस्त दरवाजाने गडावर प्रवेश करायचा. हि वाट पहिल्या वाटेच्या तुलनेत खूपच सोपी असुन या वाटेने गडावर पोहोचण्यास दिड तास लागतो. पहिली वाटही फारशी अवघड नसल्याने या वाटेने चढुन दुसऱ्या वाटेने उतरल्यास आपला वेळही वाचतो आणी कमी श्रमात संपुर्ण किल्ला फिरून होतो. पहिल्या वाटेने गडावर प्रवेश केल्यावर गडाचा आटोपशीर घेरा नजरेस पडतो. साधारण आयताकृती आकार असलेला हा गडमाथा दक्षिणोत्तर ३ एकरवर पसरलेला असुन गडाच्या तटबंदीत एकुण बारा बुरुज आहेत. आपण प्रवेश केल्यावर समोरच खडकात खोदलेली चार पाण्याची टाकी दिसुन येतात तर उजव्या बाजुला गडाचा आजही सुस्थितीत असलेला बुरुजाचा माथा दिसतो. टाक्याच्या मागील बाजूस असलेल्या उंचवट्यावर एका मोठया वास्तुचा चौथरा दिसुन येतो. चौथऱ्याच्या आकारावरून हा किल्लेदाराचा वाडा अथवा सदर असावी. चौथऱ्याच्या पुढील भागात एक लहानसे तळे असुन या तळ्यात उतरण्यासाठी खोदीव तसेच बांधीव पायऱ्या आहेत. तळ्याच्या मागील भागात पत्र्याने झाकलेले एक लहानसे भिंती नसलेले मंदिर आहे. या मंदिरात शेंदूर फासलेला एक दगड असुन स्थानिक लोक त्याला वेताळदेव म्हणुन ओळखतात. मंदिराच्या आवारातच दोन भग्न तोफा पडलेल्या आहेत. यातील एक तोफ सुत्तरनाळ प्रकारातील आहे. मंदिराच्या उजव्या व डाव्या बाजुची तटबंदी व बुरुज आजही शिल्लक असुन डाव्या बाजुच्या तटबंदीत एक शौचकुप दिसुन येते. मंदिरा मागील उंचवटा हा गडावरील सर्वात उंच भाग असुन तेथुन संपुर्ण गड परीसर दिसतो. गडावरील तटबंदी मोठया प्रमाणात ढासळत चालली असुन या उंचवट्याच्या खालील भागात पुर्णपणे नामशेष झालेल्या दरवाजाचे अवशेष दिसुन येतात. दरवाजाच्या या उत्तरेकडील खोलगट भागातील तटबंदी आजही शिल्लक असुन उंचवट्याच्या डाव्या बाजुला मातीने भरलेले एक कोरडे टाके दिसुन येते. गडाच्या या उंच भागातुन वाघेरा किल्ला, हरिहर, त्र्यंबकगड व दूरवर पसरलेली उतवड डोंगररांग इतका दूरवरचा प्रदेश दिसतो. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. संपुर्ण गड फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो. गडाच्या उध्वस्त दरवाजातून खाली उतरताना दरवाजासमोरील वाटेत उंचवटा फोडुन दगडी चिरे काढण्याचे काम अर्धवट सोडल्याच्या खुणा तसेच एक अर्धवट खोदलेले बुजलेले टाके दिसुन येते. आधी वर्णन केलेल्या या वाटेने आपण माचीपाडा वस्तीच्या वरील बाजुस येतो पण या वाटेने माचीपाडा येथे न जाता डावीकडे साटयाचापाडा वाडीकडे जाणाऱ्या वाटेकडे वळावे. या वाटेने काही अंतर गेल्यावर खालील बाजुस गर्द झाडी दिसुन येते. या झाडीत डोंगर उतारावर खडकात खोदलेली दोन पाण्याची टाकी असुन या टाक्याशेजारील खडकावर शिवलिंग कोरलेले आहे. या टाक्याशेजारी निर्मळ पाण्याचा झरा असुन त्याला वर्षभर पाणी असते. गडावर जाणारी मूळ वाट येथूनच वर जात होती पण काळाच्या ओघात ती नष्ट झाली आहे. गडावर पाण्याची एकुण सहा टाकी असली तरी पिण्यायोग्य पाणी एकाही टाक्यात नसल्याने सोबत पाणी बाळगावे. शिवकाळात हा गड मोघलांचे जहागीरदार असलेल्या जव्हारच्या कोळी राजांच्या पर्यायाने मोघलांच्याच ताब्यात होता. खैराई गावातील लोकांनी दिलेल्या माहिती नुसार पहिल्या सुरतेच्या मोहिमेवर जाताना शिवाजी महाराजांनी जव्हारमार्गे सुरत गाठली व याकाळात खैराई किल्ला जिंकला. या किल्ल्यावर १ जानेवारी इ.स.१६६४ रोजी महाराजांचा पदस्पर्श झाला पण याला कागदोपत्री काही पुरावा नाही. इ.स. १६७६ मध्ये रामनगर म्हणुन ओळखला जाणारा हा भूभाग जिंकताना शिवरायांनी खैराई किल्ला स्वराजात सामील करून घेतल्याची अधिकृत नोंद आहे. इ.स. १७९० मध्ये पेठचे संस्थानिक चिमणाजी दलपतराव यांनी कर्जापोटी हा गड नरहर गोपाळ पेशवे सरकार यांना दिला.
© Suresh Nimbalkar

 






  
 e: खैराईचा किल्ला
 
माझा ट्रेकिंगचा नाद बघून कित्येकदा लोक मला प्रश्न विचारतात की, तू एवढा डोंगरदऱ्यांमध्ये भटकतोस. या किल्ल्यांवर वावरतोस, खरोखरच या किल्ल्यांचा काही उपयोग व्हायचा का? किंवा या किल्ल्यांचे कर्तृत्व ते काय? किल्ल्यांच्या उपयुक्ततेबद्दल प्रश्न पडणे अगदी साहजिकच आहे. हे किल्ले म्हणजे मराठ्यांच्या स्वातंत्र्याची आणि अस्मितेची प्रतीके आहेत. एकेकाळच्या अनेक लढाया या किल्ल्यांच्या साहाय्याने लढविल्या गेल्या आहेत. शिवाजीराजांचे तर जन्मापासून मृत्यूपर्यंतचे सर्व आयुष्य याच किल्ल्यांवर गेले. राजांनी या किल्ल्यांचे महत्त्व ओळखून त्यांच्या साहाय्याने मराठ्यांचे स्वतंत्र असे राष्ट्र निर्माण केले, एवढेच नव्हे, तर एक नाही, दोन नाही, तर उणीपुरी पंचवीस वर्षे मराठ्यांनी या किल्ल्यांच्या साहाय्याने औरंगजेबाला सतावून सोडले होते. आजमात्र इतिहास घडविणाऱ्या या किल्ल्यांची अवस्था फारच दयनीय झाली आहे, त्यांच्याकडे सर्वांत जास्त दुर्लक्ष झाले आहे. आज या किल्ल्यांचा वापर केवळ मजामस्ती, पिकनिक आणि करमणुकीचे ठिकाण यासाठी केला जातो.
वास्तविक या किल्ल्यांचा उपयोग मुख्यतः तीन कारणांसाठी होत असे. एक म्हणजे शांततेच्या काळात बंदोबस्तासाठी, दुसरा म्हणजे रहदारीच्या नियंत्रणासाठी, आणि तिसरा म्हणजे आक्रमणाच्या काळात संरक्षणासाठी. किल्ले कसे बांधायचे याचे निश्चितपणे एक शास्त्र आहे. ते मात्र कुठे लिखित नाही. त्यामुळे एवढे मात्र खरे की, त्यांचा आकार, बांधणी ही त्यासाठी निवडलेल्या भूमीच्या ठेवणीवर अवलंबून असते.
त्र्यंबकेश्वर तालुका हा घाटाच्या तोंडाशी असणारा प्रदेश, त्यामुळे साहजिकपणे घाटसंरक्षणासाठी या भागात अनेक किल्ले बांधले गेले. कोकणातून गुजराथकडे जव्हारमार्गे उतरण्याऱ्या घाटावर नजर ठेवण्यासाठी प्रामुख्याने खैराई आणि सोनगीर
किल्यांची निर्मिती केली गेली. खुद्द खैराईबद्दल सांगायचे तर, खैराईपासून हारकडे उतरणारा घाट १५ कि.मी. वर आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळी यामार्गे चालणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खैराई किल्ल्याचा उपयोग केला जात शिवाजीराजांनी जव्हारमार्गे सुरत गाठली, त्या वेळी त्यांनी खैराई किल्ला जिंकला. या असे. आजही खैराई गावातील गावकरी सांगतात की, पहिल्या सुरतलुटीच्या वेळी संबंधीची कागदपत्रे गावातील एका घरात होती. नंतर ती सर्व गहाळ झाली. गावकऱ्यांनी वर्तवलेली ही शक्यताही नाकारता येत नाही. कारण ३१ डिसेंबरला राजे अंबकेश्वरला गेले आणि तिथून पश्चिमेला जाऊन ते सह्याद्रीचा घाट उतरले आणि जव्हारला गेले. दमणगंगा ओलांडून त्यांनी गणदेवी, उधनामार्गे सुरत गाठले. खैराई दुर्गाचे स्थान त्र्यंबकेश्वरच्या पश्चिमेला आहे, आणि त्याच्या जवळच्या सावळा घाटातून जव्हारला उतरता येते. मग या वेळीच शिवाजीराजांनी खैराईदुर्ग जिंकला असण्याची दाट शक्यता आहे. अर्थात हा आपला एक अंदाज, याला पक्के ठरवण्यासाठी लागणारा लिखित पुरावा माझ्याकडे उपलब्ध नसल्याने त्याबद्दल निश्चितपणे विधान करणे योग्य नाही. त्र्यंबकेश्वरच्या आजूबाजूचे किल्ले राजांकडे असल्याची एक नोंद 'जेधे शकावली'मध्ये आली आहे.
खैराईचा किल्ला जरी त्र्यंबकेश्वराच्या जवळ असला, तरी तिथपर्यंत जाण्यासाठी खास करून त्र्यंबकेश्वराला जायची गरज नाही. खैराईला जाण्यासाठी नाशिकमार्गे हरसूल गाठायचे, नाशिक ते हरसूल हे साधारण ५० कि.मी.चे अंतर आहे. त्र्यंबकेश्वरपासून हरसूलला जाण्यासाठी जीपगाड्या मिळतात. हरसूलपासून १० कि.मी.वर खैरपाली गाव आहे. खैरपाली हे काही किल्ल्याच्या पायथ्याचे गाव नाही. किल्ल्याचे पायथ्याचे गाव आहे 'साट्याचापाडा'. हे गाव खैरपाली गावापासून चालत १० मिनिटांवर आहे. आम्ही पोहोचलो तेव्हा नुकताच भाद्रपद संपून आश्विन लागला होता. थंडीचे गार वारे नुकतेच वाहू लागले होते. पहाटे पहाटे गवतावर दवाचे बिंदू जमू लागले होते. जणू काय मोतीच इतस्ततः पसरलेले होते. सोनावळी, जांभळीची इवलीइवलीशी फुलं या मोत्यांनी झाकोळलेली होती. खैराईचा चढावही तीव्र, जणू काही ऊर फाटून जातो की काय असं वाटत होतं. तोंडातून फेस तेवढा यायचा बाकी होता, पण माथा काही यायचे नाव घेत नव्हता. थोड्याच वेळात एका कातळकड्यापाशी पोहोचलो. त्याला पोटाखाली घालून उगवतीच्या बाजूने किल्ल्यात प्रवेश मिळवला. किल्ल्यावर पाऊल ठेवल्या ठेवल्या एक गोष्ट लगेचच आपल्या ध्यानात येते ती म्हणजे किल्ल्याचा घेरा बऱ्याच अंशी आटोपशीर आहे.
किल्ल्याच्या उगवतीच्या बाजूला पाण्याची तीन टाकी खोदलेली आहेत. या टाक्यांत पाणी असले तरी, ते पिण्यायोग्य नाही. टाक्यांच्या मागील बाजूस काही वास्तूंचे उद्ध्वस्त अवशेष आहेत.
टाक्यांच्या अगदी समोर थोडी तटबंदी आणि बुरूज आहे. इथल्या तटबंदीवरून समोरचा सर्व परिसर न्याहाळता येतो. किल्ल्याभोवतालच्या वनसृष्टीचं हे आगळं वेगळं रूप पाहून ज्ञानेश्वरांच्या एका ओवीची आठवण येते, मागलिया क्षणे अंगे । पारूसी म्हणुनीया वेगे ।
दृष्टी सांडूनी रिगे । नवेया रूपा ।।
अगदी आदल्या क्षणाचं रूप शिळं झालं, ते टाकायचं, नवं धारण करायचं, तेही बदलायला क्षणार्ध लागायचा नाही. पुनः नवी पालवी, नवे धुमारे, नवे तुरे, नवी फुले, नवी फळे, नवा हिरवा रंग, नवं रूप; अशा सुंदर वनसृष्टीतून आमची भटकंती चालू असल्याने आम्ही मनोमन सुखावून गेलो होतो. किल्ल्याच्या पठारावर एक उंचवटा आहे, त्याच्या मागील बाजूस तटबंदीचा काही भाग शिल्लक आहे. या उंचवट्याच्या डाव्या अंगास पाण्याचं एक भलंमोठं टाकं आहे. हे गडावरील एकमेव पिण्याच्या पाण्याचे टाके. टाक्यांच्या समोरच महादेवाचे एक उघड्यावरील मंदिर आहे. यालाच 'वेताळाचे मंदिर' असे म्हणतात. मंदिर म्हणजे केवळ एक शिवलिंग. त्याला एक छोटीशी चौकट, अन् त्या चौकटीच्या कमानीवर वीस-बावीस घंटा लावलेल्या आहेत. मंदिराच्या बाजूलाच दोन तोफा पडलेल्या दिसतात. यांतील एक तोफ अडीच मीटर लांबीची आहे. ही तोफ सुतरनाळ प्रकारातील आहे. यांपैकी एका तोफेवर काही आकडे कोरलेले आहेत, मात्र ते खराब झालेले असल्याने त्यांचा अर्थ लावता येत नाही. इथून पुढे चालू होतो तो किल्ल्याच्या मावळतीकडचा भाग. गडाचे हे टोक तटाबुरुजांनी चांगले बांधून काढलेले दिसते. इथून ढासळलेल्या बुरुजातून वळणवळणांची एक वाट 'माचीपाड्यावर' जाते. या वाटेवर कधीकाळी उभ्या असणाऱ्या दरवाज्याच्या खुणा दिसतात. एकंदर किल्ला फिरताना या किल्ल्यावर पाच पंचवीसपेक्षा जास्त शिबंदी नसावी, त्यामुळे याचा उपयोग केवळ एक संरक्षक ठाणे म्हणूनच होत असावा असं जाणवतं.
माचीपाड्यातील गावकरी सांगतात की, कुण्या एकेकाळी या किल्ल्यावर 'माळवी' राजाचे राज्य होते. केवळ किल्लाच नव्हे, तर आजूबाजूचा सर्व परिसर त्याच्याच आधिपत्याखाली येत असे. पण प्रत्यक्षात या किल्ल्यावर जव्हारच्या कोळी राजाचे राज्य होते. पुढे जव्हारचा राजा मोगलांचा जहागीरदार बनला आणि खैराई किल्ला
ोगलांकडे गेला. मराठ्यांनी जेव्हा जव्हार ते रामनगरचा संपूर्ण परिसर आपल्या आधिपत्याखाली आणला, तेव्हा खैराई मराठ्यांकडे गेला. किल्ल्याच्या माथ्यापासून माचीपाडा गाठायला सुमारे वीस मिनिटे लागतात आणि माचीपाड्यापासून चालत सुमारे अर्ध्या तासात आपल्याला 'साट्याचीवाडी' गाठता येते. त्यामुळे आता खाली उतरण्यासाठी आमच्यासमोर दोन पर्याय उपलब्ध होते. आलो त्याच मार्गाने परतायचे किंवा माचीपाड्यावरून खाली निघायचे. अर्थात आम्ही 'माचीपाडा'मार्गे साट्याची बाडी गाठणे पसंत केले.
किल्ल्याची उंची : समुद्रसपाटीपासून ७०० मीटर (२२९६ फूट)
तालुका : त्र्यंबकेश्वर
किल्ल्याची श्रेणी : सोपी
डोंगररांग : पेठ उपरांग
पायथ्याचे गाव : खैरपाली-साट्याचापाडा
पायथ्याच्या गावापासूनचे अंतर साट्याचापाड्यापासून दीड तास.
माचीपाड्यापासून एक तास.
जवळचे एस.टी. स्थानक : हरसूल
राहण्याची सोय : किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय : नाही.
पिण्याचे पाणी : किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत.
जाण्यासाठी उत्तम कालावधी : जून ते मार्च
किल्ला फिरायला लागणारा वेळ : अर्धा तास.
जवळपासची गावे : माचीपाडा, खैरपाली
 
 
 
 
 

  Fort Khairai :


 Fort Khairai : 7th December 2020

First Trek after Lockdown with old team mates of Vainateya but with new generation excellent team leaders. Fort Khairai. A fort on the boundary of Maratha Empire and Mughals in the era of Chhatrapati Shivaji Maharaj. Koli King of Jawahar, Marathas and Mughals had owned it. No actual history available. 

 



It his having destroyed Bastion's and walls. 2 water tanks and 1 well. 2 destroyed canons. It is having strategic important location to keep control on the old trading routes. Beautiful surrounding and views. Peth and Harsul are Kashmir of Maharashtra but with very bad and narrow roads. ( Speciality of Public works department of Maharashtra). All Photos by fellow trekkers.

http://ambrish-more.blogspot.com/2020/12/fort-khairai-7th-december-2020-first.html 
 
 
 
 

   सोनगिरी - खैराई - वाघेरा - बसगड - हरिहर

नोट : ७ वर्षांपूर्वी लिहिलेला लेख सापडला, बात पुरानि - हर्षल कि जुबानी!!! 


नाशिक ला जाउन भिडावे आणि प्रेमात पडावे असे हे नाशिक चे किल्ले.. प्रत्येक सह्य्वेडा या जिल्ह्यावर अतोनात प्रेम करतो.. गगनाला भिडलेले इथले किल्ले आणि देव-देवतांच्या या शहरामुळे यात्रेकरूंचे शहर "सिटी ऑफ पिलग्रिम्स" असा फलक आपल्याला नाशिक शहरात प्रवेश करतानाच नजरेस पडतो.

सोनगिरी किल्ला 
                                                                        
मी आणि माझा मित्र संदीप इचके आमचं लक्ष नाशिक मधील एका ऑफ-बीट अश्या किल्ल्यांकडे गेले आणि मी मोहीम आखली.. श्री आनंद पाळंदे ह्यांच्या डोंगरयात्रा हे मार्गदर्शक पुस्तक सोबत घेऊन संदर्भ घेतला.. 

साल २०११, डिसेंबर चे दिवस होते.. थंडीत कुडकुडत आम्ही बेहाल होणार होतो. १९-२१ डिसेंबर अशी तारीख ठरली. सोनगिरी - खैराइ - वाघेरा - बसगड(भास्करगड) आणि हरिहर(हर्षगड) असे किल्ले ह्या मोहिमेत पहायचे असे ठरवले होते...१९ ला संध्याकाळी ५.३० वाजता मी आणि संदीप माझ्या डिस्कवर गाडीवर निघालो.. गाडीसमोर प्रथेप्रमाणे नारळ फोडला, हार घातला आणि गणपती बाप्प्पा मोरया म्हणत नाशिक कडे कूच केली. थंडीत कुडकुडत नाशिक ला रात्री ११.३० ला पोहोचलो. तिथून पेठ चा रस्ता धरला आणि रात्री १.३० ला पेठ ला एस-टी स्थानकावर जाऊन डबा खाउन झोपी गेलो. आता आम्ही पुण्यापासून २८२ किलोमीटर चा पल्ला गाठला होता..२० तारखेला ला पहाटे ६ ला उठून स्थानकावर जो मिळेल तो नाश्ता केला आणि सोनगिरी कडे निघालो.. पेठ- सोनगिरी साधारण ८ किलोमीटर आहे.. सकाळी ८ वाजता सोनगिरी चढायला सुरुवात केली.. किल्ला चढताना शेवटच्या टप्प्यावर माणसाच्या उंचीएवढे गावात त्रास देत होते.. वाट काढत कसेबसे माथ्यावर पोहोचलो..बघतो तर काय माथ्यावर काहीही नाही..माथ्यावर भवानी देवीचे मंदिर आहे कुठेतरी वाचले होते..गावतल्या लोकांनी ती देवीची मूर्ती खालच्या भुवन गावात नेउन ठेवली होती.  एक कोरडी पडलेली विहीर, तटबंदी चे अवशेष एवढेच काय ते ह्या किल्ल्यावर पाहण्यास शिल्लक होते.. किल्ल्यावरून वाघेरा, रामशेज, दमणगंगा नदीचं खोर असा नजारा पहिला आणि झटझट खाली उतरलो. आता दुसर्या किल्ल्याच्या दिशेने निघालो..तो म्हणजे खैराइ. 
खैराई किल्ला 
तासाभरात हरसूल गाठले. हरसूल वरून ठाणापाडा वरून खैरपाली(खैराइ चा पायथा) गावात जाउन धडकलो. गावात एका गृहस्थांकडे गाडी लावली. पाण्याची बाटली भरून खैराइकडे निघालो. या गावातून किल्ला दिसत नव्हता..पहिल्या पठारावर येउन पोहोचलो..आणि किल्ला अजून बराच लांब आहे असा कळाल. तासाभराच्या पायपीटी नंतर माथ्यावर पोहोचलो. किल्याच्या पसारा तसा मोठा असून माथा छोटाच आहे. बुरुज, २ तोफा, पाण्याची टाकी, शेंदूर फासलेला गणपती आणि हनुमान ह्यांचे दर्शन घेतले आणि अर्ध्या-पाउण तासात गडफेरी पूर्ण केली. गडावरून हरिहर, उतवड , त्रिंबक रांगेला पाया पडत सुंदर पण दुर्लक्षित किल्ला पदरात पडून घेतला.

खैराई किल्ल्यावरील बुरुजाचे अवशेष
दुपारी २.३० च्या सुमारास खाली गावात परतलो. आता पोटात कावळे ओरडायला लागले होते.हरसूल मध्ये "मिस-कॉल खानावळ" ह्या खानावळीत आकंठ जेवण केले.


 आता साहजिकपणे फार कंटाळा आला होता. पण अजून एक किल्ला करायचा बाकी होता तो म्हणजे वाघेरा. आम्ही वाघेरा हा किल्ला छोटासा आहे ह्या समजुतीत होतो..आणि  दुपारी ४ वाजता आम्ही वाघेरागावात पोहोचलो. किल्ला पाहिल्यवर तोंडचे पाणीच पळाले..अबब केवढा हा किल्ला, केवढा हा त्याचा पसारा..६.१५ पर्यंत आपण कसा काय किल्ला पाहणार. कधी खालती येणार असे असंख्य प्रश्न मनात येउन घर करत होते. 
वाघेरा किल्ला
आम्ही सरळ गावातून एक वाटाड्या घेतला आणि वाघेरा किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या धरणाच्या भिंतीवरून कशीबशी गाडी चालवत छोट्याश्या पाड्यावर येउन पोहोचलो. इथून अर्ध्या तासाच्या चढाई नंतर एका पठारावर येउन पोहोचलो. आता माथा दिसू लागला पण वाटेत एकही झाड नव्हते. असा हा बोडका किल्ला चढताना चांगलीच दमछाक होत होती. माथ्यापासून थोडेसे खालती उजव्या हाताला छोटेसे टाक आपल्या नजरेस पडते. तिथून एक छोटा कातळटप्पा चढून आम्ही माथ्यावर जाउन पोहोचलो. येथे एका दगडाला गावकर्यांनी शेंदूर फासून ठेवला आहे आणि ह्या ठिकाणाला गावकरी भैरी-आई असे संबोधतात. 





पठारापासून माथ्यावर यायला आम्हाला पाउण तास लागला. आता ५.१५ वाजले होते. किल्ल्यावरून रामशेज, देहेर, त्रिंबकगड, खैराइ परिसर स्पष्ट दिसत होता. गडाच्या मागील बाजूस असलेल्या पायवाटेने उतरण्यास सुरुवात केली. घासारायुक्त पायवाटेने थोडा खाली उतरल्यावर ३ पाण्याची कोरडी टाकी दिसली. आता संध्याकाळचे ५.४५ वाजले होते. इथून आता लगेच निघावे लागणार होते. तडख निघालो आणि संध्याकाळी ६.३० च्या सुमारास वाघेरा गावात पोहोचलो. सुर्यास्ताचा आनंद घेत आम्ही त्रिंबकेश्वर च्या दिशेने निघालो.

संध्याकाळी ७.१५ वाजता त्रिंबकेश्वर ला माझ्या मामाकडे पोहोचलो. रात्री जेवायला साजूक तुपातील शिरा असा बेत होता. ट्रेक ला जे मिळेल ते खाण्याची सवय असल्यामुळे एवढे स्वादिष्ठ जेवणाची अपेक्षाच नव्हती. साधारण ३५० किलोमीटर चा बाइक प्रवास आणि ३ किल्ले या मुळे आता दोघाही दमलो होतो. आता झोपेची नितांत आवश्यकता होती. रविवारी पहाटे ठरल्याप्रमाणे ५.३० ला चहा नाश्ता करून बसगड च्या दिशेने निघालो. थंडीने आम्हा दोघांचा हि निकाल लावला होता. 

डावीकडुन - काळवी , तळइ, गणबारी, संडे १, संडे २

त्रिंबक ते निरगुडपाडा(बसगड व हरिहर च्या पायथ्य चे गाव) २०  किलोमीटर पण थंडीमुळे हे अंतर २०० किलोमीटर वाटत होते. आता बसगड च्या पायथ्याला येउन पोचलो.
बसगड / भास्करगड 

 निरगुडपाड्यातून चालायला सुरुवात केली. १.३० तासात आम्ही बसगड जाऊन पोहोचलो. कातळात खोदलेल्या पायर्या आणि दरवाजा आता आता बराच बुजला आहे. आता थोडा पुढा गेल्यावर किल्लेदाराच्या वाड्याचे दगडी जोते , हनुमानाची मूर्ती , एक कोरडे तळे, ३-४ कोरडी पाण्याची टाकी एवढेच काय ते अवशेष शिल्लक आहेत. 
फणी - हरिहर - ब्रम्हा पर्वत 
भास्करगडावरील पायऱ्या 

बुजलेला दरवाजा 
गडमाथा बराच मोठा आहे आणि पाउण तासात किल्ला पाहून आम्ही परत खाली निघालो. आम्ही आता निरगुडपाड्यात परत न जाता फणी डोंगराच्या पोटातून डावीकडील असलेल्या पायवाटेने हरिहर ला जायचा निर्णय घेतला.
फणी 
थोडक्यात ट्रेक मधेच एक दुसरा ट्रेक करण्याचा निर्णय घेतला. साधारण २ तासात आम्ही आता हरिहर च्या पायथ्याला आलो. हरिहर च्या कातळकोरीव सरळसोट पायर्या आ वासून उभ्या होत्या. एखाद्या नवख्या भटक्याला बघता क्षणी छातीत धडकी भरेल अश्या ह्या पायर्या. 
हर्षगडाच्या सुरेख कातळ कोरीव पायऱ्या
पण प्रत्येक पायर्यांना असलेल्या दोन खोबणी यांच्या सहाय्याने आम्ही वर चढायला सुरुवात केली. माथ्यावर पोहोचलो तेव्हा दुपारचे १२.४५ वाजले होते. माथ्यावर एक हनुमानाची मुर्ती, ६-७ छोटी मोठी टाकी, एक मोठा तळ, ६-७ माणसं राहू शकतील अशी छोटी इमारत असे अवशेष आहेत. सगळ्या बाजूने मोठा कातळकडा असल्याने तटबंदी ची आवश्यकता जाणवत नाही. माथ्यावरून वैतरणा धरणाचे पाणी, फणी , बसगड, उतवड , त्रिंबकगड असा परिसर दिसतो. हा मोहिमेचा शेवटचा किल्ला होता. 



२ दिवसात ५ किल्ले तेही कुठल्याहि प्रकारची घाई न करता पूर्ण केले याचा आनंद होत होता. दुपारी ३ वाजता निरगुडपाड्यात येउन  पोहोचलो. आता जोरदार भूक लागली होती. पण आम्ही गावात न थांबता तडख पुण्याच्या दिशेने निघालो. पण या वेळी परत नाशिक मधून नाही तर घोटी - भंडारदरा - बारी - राजूर - बोटा - पुणे ह्या मार्गाने पुण्यात यायचे ठरवले. राजूर ला मातोश्री हॉटेल मध्ये शेव भाजी चा बेत ठरल्याप्रमाणे पार पडला आणि रात्री १० ला पुण्यात पोहोचलो. गाडी चालवताना डोळ्यासमोर हे पाच किल्ले जसेच्या तसे उभे होते आणि आता ३ वर्ष झाले तरी मनात घर करून बसले आहेत. २ दिवसात एकूण ६२० किलोमीटर आणि ५ नवीन किल्ले पाहिल्यामुळे एक वेगळेच धाडस केल्याचे जाणवत होते. संदीप चा तसा मोठा पहिलाच ट्रेक होता पण पट्ठ्याने चांगली साथ दिली.
 
 https://trekhunt.blogspot.com/2017/11/songirikhairai.html
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...