Saturday, April 11, 2026

कण्हेरगड

  महाराष्ट्रात कण्हेरगड नावाने ओळखले जाणारे दोन किल्ले आहेत. यातील अजंठा डोंगर रांगेतील चाळीसगावचा कण्हेरगड इतिहासाबद्दल मूक आहे तर बागलाणातील कण्हेरगड रामजी पांगेरा व त्याच्या सहकाऱ्यांच्या पराक्रमाची गाथा उराशी कवटाळून अबोल झाला आहे. सातमाळा डोंगररांगेतुन काहीसा सुटावलेला इतिहासप्रसिध्द असा हा किल्ला आडवाटेवर असल्याने दुर्गप्रेमींकडून बराच दुर्लक्षित आहे. कण्हेरवाडी व सादडविहीर हि किल्ल्याच्या दोन बाजुच्या पायथ्याची गावे असुन या दोन्ही गावातुन किल्ल्यावर जाण्यासाठी ठळक वाटा आहेत. या दोन्ही गावातुन येणाऱ्या वाटा किल्ल्याची उतरत आलेली सोंड व समोरचा डोंगर यामधील खिंडीत एकत्र येतात व पुढे एकच वाट कण्हेरगड माथ्यावर जाते.
 या दोन्ही मार्गांनी गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी दोन तास लागतात. कण्हेरवाडी हे गडाच्या पलीकडचे गाव आहे. कळवण ओतूरमार्गे कण्हेरवाडी गावात आपल्याला पोहोचता येते. कळवणहून कण्हेरवाडीला जाण्यास अनेक एस.टी. बसेस आहेत.
   सादडविहीर गावात जाण्यासाठी नाशिक–नांदुरी-आठंबा-सादडविहीर असा ६५ कि.मी.चा मार्ग असून नाशिक-वणी-मुळाणे-कन्हेरवाडी हे अंतर ६० कि.मी.आहे. नाशिकहून नांदुरीच्या दिशेला निघाले की, किल्ल्यांची रांगच रांग दिसते, मध्येच एके ठिकाणी गाडीरस्ता नांदुरीच्या जवळ डोंगररांगेला दुभंगून पुढे कळवणला जातो. या नांदुरी-कळवण रस्त्यावर नांदुरीपासून ६ कि.मी.वर आठंबा नावाचे गाव लागते, आणि आपण या आठंब्याजवळ थांबायचे. जिथे गाव तिथं वस्ती, त्यामुळे या आठंबा गावात शिरण्याअगोदर एका नाल्यावर मोठा पूल बांधलेला आहे. या पुलाजवळून एक पायवाट थेट कण्हेरगडाच्या पायथ्याच्या गावात जाते. या गावाचे नाव आहे सादडविहीर !
  सादड विहीर गावातून सरळ गेलेला रस्ता पिंप्रीपाडा या गावामार्गे पुन्हा वणी-कळवण रस्त्याला जाऊन मिळाला आहे. सादड विहीर गावातुन किल्ल्याचा पायथा २ कि.मी.वर आहे. येथुन वाट जास्त मळलेली आहे, तसेच सादडविहीर मधुन वेळही कमी लागतो.  खाजगी वाहन असल्यास आपण थेट गडाच्या पायथ्याशी जाऊ शकतो.
 या रस्त्यावरून जाताना खिंडीकडे पाहत गेल्यास वाटेतच डावीकडे खिंडीकडे जाणारी मळलेली पायवाट दिसते. किल्ल्याच्या पायवाटेसाठीची महत्वाची खूण म्हणजे सादड विहीर गाव ते पिंप्रीपाडा रस्त्यावरून जाताना  सादडविहीर गावाकडून पुढे जाणाऱ्या रस्त्याने साधारण 500 मीटर अंतरावर  खिंडीच्या खालील भागात रस्त्याखालून मोरी बांधलेली आहे (पाणी जायला जागा) हीच खूण. इथून उजवीकडे बुरुजावर फडकत असलेला ध्वज दिसतो.  या पुलाच्या थोडेसे अलीकडे डावीकडे खिंडीत जाणारी पायवाट आहे. पायवाट ठळक नसली तरी झाडीतुन वर चढत जाणारी वाट आपल्याला अर्ध्या तासात कण्हेरगड व त्याच्या शेजारील डोंगराच्या खिंडीत आणून सोडते. इथून डावीकडे डोंगरावरही वाट जाते. पलीकडच्या कण्हेरवाडीतून लोक इथे ससे पकडायला जातात, तसेच वर बहुतेक डोंगरदेवाचे मंदिरही आहे. 


     कण्हेरगडाचे मोठे आव्हान...घसार्‍याची वाट!

खिंडीतुन वर किल्ल्याकडे पाहीले असता टोकावरील बुरुज दिसतो. खिंडीतून या बुरुजाकडे जाणारा चढ साठ-सत्तर अंशातला आणि प्रचंड मुरमाड घसा-याने भरलेला आहे. या वाटेवरून जाताना चांगलीच भंबेरी उडते. इथे आपल्याला साध्य व्यवस्थित दिसत असले तर तिथे नेणारा मार्ग सोपा नाहीये. 

सरळ नाकाडाने चढल्यास अगदी घसाऱ्याची वाट आहे. परंतु जरा उजवीकडची वाट पकडल्यास नाकाडाच्या कडेने पण झुडुपातून वाट वरच्या बाजूला जाते. परंतु ह्या वाटेने जाताना आपले साध्य नक्की कुठे आहे त्याचा अंदाज ठेवावा, कारण आपण जात असलेली ही कडेची वाट सरळ आपल्याला बुरुजकडे न जाता पुढे कुठेतरी घेऊन जाते. म्हणून वाटेत अंदाज घेऊन डावीकडे वरच्या बाजूला जावे लागते. इथून परत आपले साध्य म्हणजे ध्वज दिसू लागतो. आता मात्र पर्यायी रस्ता नाही. सरळ वर जायचे.

Fort


हा किल्ला चार टप्प्यात आहे. घसाऱ्याचा हा भाग संपला कि कातळटप्पा सुरु होतो. या कातळात काही ठिकाणी पायऱ्या कोरलेल्या आहेत. खिंडीतुन खडी चढण पार करत पाउण तासात आपण किल्ल्याच्या उध्वस्त बुरुजाखाली पोहोचतो.  पहिल्या टप्प्यात पोचतानाच गडाचे अवशेष म्हणजे पायऱ्या दिसू लागतात. इथून मागे बघितल्यास उंच वाटत असलेले गडाच्या डावीकडचे डोंगर खुजे वाटू लागतात. 

इथे पाण्याची छोटी विश्रांती घेऊन बुरुज उजवीकडे ठेवत डाव्या बाजूने पुढे व्हायचे. परत पायऱ्या आपल्याला बुरुजाला वळसा मारून त्याच्या वरच्या लपून बसलेल्या बुरुजावर घेऊन जातात. इथे एक पाण्याचे कोरडे टाके आहे. मागे बुरुजकडे गेल्यास दोन्ही बाजूला तटबंदी दिसते, तर मधेच मोठा चर खोदलेला दिसतो. समोरच खालच्या बुरुजवरचा ध्वज आणि समोर डोंगर दिसतो. या बुरुजाच्या डावीकडे काही खोदीव पायऱ्या असून बुरुजाचा तळातील भाग कातळात कोरून काढलेला आहे तर वरील भागात दगडी बांधकाम केलेले आहे. आता मागे फिरून कोरड्या टाक्याजवळून वरच्या टप्प्याकडे जाणाऱ्या वाटेने पुढे जायचे. सरळ टप्प्या-टप्प्यातल्या पायऱ्या आणि अगदी उंचावर अर्धवट तुटका दरवाजा सदृष अवशेष दिसतात.  बुरुजाच्या डावीकडुन आपला किल्ल्यात प्रवेश होतो. या ठिकाणी असलेला किल्ल्याचा दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला असुन तटबंदी मात्र काही प्रमाणात शिल्लक आहे. बुरुजाच्या वरील भागात मातीने बुजलेले एक फुटके टाके आहे. येथुन किल्ल्याचा माथा दिसायला सुरवात होते. माथ्याकडे जाणारी वाट काही ठिकाणी बांधीव पायऱ्याची तर काही ठिकाणी कातळात कोरलेली असुन या वाटेवर पाण्याचे कोरडे टाके पहायला मिळते. 

कन्हेरगड नेढ 

 टाक्याकडून पुढे आल्यावर उजवीकडे किल्ल्याचा दागिना शोभेल असे छोटेखानी पण सुंदर असे गडाच्या कातळास नैसर्गिक छिद्र (नेढे) आहे. अगदी 5 फूट उंचीचे आणि 25 एक फूट लांब असे त्यात आरामात वारा खात बसावे असे वाटणारे हे नेढे आहे.  या नेढ्यातुन वाहणारा वारा थकलेल्या शरीराला सुखावणारा आहे. नेढ्यातून पलीकडचा प्रदेश तसेच गडाची माची न्याहाळता येते. गडाचा माथा माचीसारखा पसरला आहे.
नेढ्यासमोर कातळकड्याला चिटकुन पायऱ्या कोरलेल्या आहेत. याची रचना व इतर खुणा पहाता या ठिकाणी एखादा लहान दरवाजा असावा. या पायऱ्या चढून वर आल्यावर नेढ्याच्या माथ्यावर जाता येते. या वाटेवरून आपल्याला किल्ल्याच्या वरच्या टप्प्यावर दोन छोटे दगडी स्तंभ दिसतात. हा बहुधा किल्ल्याच्या खालील भागात नजर ठेवण्यासाठी तटबंदीतील झरोका असावा. या स्तंभांमधुन चढता उतरता येत असले तरी गडमाथ्यावर जाणारी वाट त्याच्या बाजुला आहे. या वाटेने आपण गडाच्या तिसऱ्या टप्प्यावर येतो. या भागात असलेल्या कातळाला (फोडण्यासाठी) मोठ्या प्रमाणात गोलाकार खळगे कोरलेले असुन एक बुजलेले पाण्याचे टाके आहे. हा तिसरा टप्पा पार केल्यावर आपल गडमाथ्यावर प्रवेश होतो. समुद्रसपाटीपासुन ३५१० फुट उंचावर असलेल्या कण्हेरगडाचा विस्तार दक्षिणोत्तर चार टप्प्यात झाला असुन त्रिकोणी आकाराचा बालेकिल्ला चौथ्या टप्प्यावर १२ एकरात सामावला आहे. गडमाथ्यावर बऱ्यापैकी सपाटी असुन गडाचे बहुतांशी अवशेष या माथ्यावरच विखुरले आहेत. माथ्यावर प्रवेश केल्यावर सुरवातीला काही घरांचे चौथरे तसेच दोन मोठया वास्तुंचे चौथरे पहायला मिळतात.

या वास्तुच्या पुढील भागात डावीकडे पाण्याचे एक सुकलेले तळे तर उजवीकडे पाण्याने भरलेले कातळात कोरलेले टाके पहायला मिळते. 

या टाक्याच्या उजव्या बाजुस आल्यावर पाण्याने भरलेले दुसरे कोरीव टाके असुन या टाक्याच्या काठावर तुळशी वृंदावन, नंदी व शिवलिंग ठेवलेले आहे. 

याच्या उजव्या बाजुला घडीव दगडात बांधलेली दोन मोठी व एक लहान टाके असून यातील लहान टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.  उन्हाळ्यात या टाक्यांमधील पाणी खाली सादडविहीर गावात आणले जाते. गडमाथ्यावर एक सुकलेला पाण्याचा तलाव आहे, यात केवळ पावसाळ्यातच पाणी असते. 

Pleateu of Kanhergad




येथुन तुळशी वृंदावनाच्या पुढील बाजुस गेले असता गडाची लांबवर पसरलेली माची दिसून येते. या माचीच्या डाव्या बाजुस कातळात कोरलेली ५ टाकी असुन लांबवर पसरलेल्या माचीवर १-२ चौथरे वगळता इतर कोणतेही अवशेष नाहीत. ही सोंड डाईक भूरचनेसारखी आहे.  या माचीच्या टोकाला खाच मारून किल्ल्याला शेजारच्या डोंगरापासून वेगळे केले आहे.  पलीकडे धोडप किल्ल्याच्या माचीला जशी भलीमोठी खाच आहे, तशीच इथेही आहे. पण इथे जाता येत नाही. त्यामुळे धोडपचा वाण नाही, पण गुण नक्कीच कण्हेरगडाला लागलेला दिसतो.





या खाचेपर्यंत जाऊन येण्यास पाऊण तास लागतो. माचीवरून मागे परतल्यावर धोडपच्या दिशेला म्हणजेच उजव्या बाजुच्या कड्याच्या काठाने निघावे. या वाटेने आपण आधी पाहिलेली ५ टाकी ओलांडल्यावर डाव्या बाजुस सुरवातीला पाहिलेला वाड्याचा मोठा चौथरा दिसतो. या चौथऱ्याच्या उजवीकडील दरीच्या काठाने एक वाट खाली उतरली आहे. या वाटेने २ मिनिटे खाली उतरल्यावर आपण धोडपच्या दिशेने कातळात कोरलेल्या दोन गुहांपाशी येतो. या गुहेत ७-८ जण सहजपणे मुक्काम करू शकतात. या ठिकाणी आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण किल्ला पाहण्यास एक तास पुरेसा होतो. 

गडमाथ्यावरून सातमाळा रांगेतील अचला, अहिवंत, सप्तशृंग, मार्कंड्या, मोहनदर, धोडप, रवळ्या-जवळ्या, कांचन मंचन, इंद्राई, कोळदेहेर, राजदेहेर, चौल्हेर, प्रेमगिरी, भिलाई इतके किल्ले नजरेस पडतात. गड उतरताना चढण्यापेक्षा जास्त काळजीपूर्वक उतरावा लागतो. गड पायथ्याच्या सादडविहीर गावापासुन गड पाहुन परत येण्यासाठी ४ तास लागतात. 

        ह्या गडाचा इतिहास अंगात वीरश्री निर्माण करणारा आहे. हा फारसा प्रसिद्ध नसलेला गड आपल्या पराक्रमाने अजरामर करून ठेवलेला आहे "रामजी पांगेरा" नावाच्या मराठी रक्ताने. पावनखिंड म्हणजे वीर बाजीप्रभू, पुरंदर म्हणजे मुरारबाजी देशपांडे, सिंहगड म्हणजे तानाजी मालुसरे असे समीकरणच आहे जणू, तसेच कण्हेरगड म्हणजे रामजी पांगेरा.
महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीत अनेक वीरांनी जन्म घेतला आणि आपल्या मराठी भूमीचे नाव मोठे केले. आजही या सर्व वीरांच्या अतुलनीय पराक्रमाच्या कथा आपण ऐकत असतो. अशाच एका वीराची कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. या वीररत्नाचे नाव आहे रामजी पांगेरा. कोण बरे हा रामजी ? कुठून आला? काय त्याचे कूळ ? तर रामजीच्या बाबतीत चक्क इतिहासानेही मूग गिळले आहेत. खरोखर किती दुर्दैवाची गोष्ट आहे ही! एवढा मोठा वीर झाला, पण त्याच्याबद्दल कुठेच काही माहिती उपलब्ध नाही. शिवकाळात सन १६७२च्या पर्यंत या रामजीचा अगदी कुठेच उल्लेख येत नाही. जो येतो तो थेट कण्हेरगडाच्या लढाईत.

सन १६७२च्या जानेवारी महिन्यातील ही गोष्ट !!! राजांचा मुलूख मारून फस्त करून त्यांचे गड काबीज करू, मग राजे ते काय करणार? असा दिलेरखानाचा मनसुबा होता. या विचाराने दिलेरखान व बहादूरखान हे दोघेही वेगवेगळ्या दिशेने स्वराज्यावर तुटून पडले. सातमाळा रांगेतील धोडपच्या वायव्येला असणाऱ्या कण्हेरगडावर त्यांचे लक्ष गेले. कळवण, नांदुरी यांच्या वाटेवर हा किल्ला आहे. या वेळी गडाचा किल्लेदार होता, 'रामजी पांगेरा', दिलेरखानाच्या सैन्यावर छापे मारून सुमारे ८०० मावळे कण्हेरगडाच्या आश्रयाला आले होते. गड फारच लहान होता, त्यामुळे तेथे असणारी साधनसामग्रीदेखील बेताचीच. त्यामुळे अर्थातच गड खूप दिवस भांडणे फार जिकिरीचे काम होते. मात्र किल्लेदार रामजी जातीचा जिद्दी मराठा. शरणागती हा शब्द त्याच्या शब्दकोशातच नव्हता. रामजीने ठरविले की, काही हशम सोबत घेऊन मोगलांवर तुटून पडायचे. मारता मारता मरून जायचे पण हार खायची नाही. मोगलांचे पाय पुन्हा या पावन भूमीला लागू द्यायचे नाहीत. कारण त्याला त्याही आठवत होता तो मुरारबाजीचा पुरंदरचा पराक्रम. याच दिलेरखानाशी लढता लवता मुरारबाजीला वीरगती प्राप्त झाली होती. तोच मुरारबाजी रामजीचा आदर्श होता. नियतीने सुद्धा आज परिस्थितीशी हातमिळवणी केली होती, कारण आज तोच खान रामजीला आव्हान देत गडाच्या पायथ्याशी उभा होता. पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार होती. 


सुमारे सातशे मावळे रामजीच्या खांद्याला खांदा लावून या आगीत उतरायला तयार झाले. बघता बघता सकाळी गडाचे प्रवेशद्वार उघडले आणि पाण्याच्या एका प्रचंड लोंढ्याप्रमाणे रामजीचे मावळे दिलेरखानाच्या फौजेवर तुटून पडले. सर्वजण कमरेचे वस्त्र तेवढे ठेवून बाकी उघडे झाले होते. हातात नागव्या तलवारी घेऊन हरहर महादेवाची गर्जना करीत खानाच्या सैन्यावर तुटून पडले. ध्येय एकच- जेवढे मोगल मिळतील तेवढे कापणे आणि मारता मारता स्वतः खस्त होणे. याचे वर्णन बखरकारांनी केलेले आहे ते असे टिपरी जैसी सिमगियाची दणाणते. युद्धोन्माद चढलेले मराठे अक्षरशः नाचत मोगलांवर तुटून पडले. एकेकाला वीसवीस जखमा झाल्या. बहुतेकजण रणास आले. अंदाजे बाराशे मोगल मारले गेले. दिलेरखानाने रामजीचा हा पराक्रम पाहून तोंडातच बोटे घातली. मुरारबाजीनंतर सात वर्षांनी खान हे दुसरे आश्चर्य पाहत होता. गड पडला. रामजी हुतात्मा झाला.
सागरबुद्धी, धैर्यधुरंधर शक्तीबुद्धीचे ते नटसागर मरणासंगे ज्यांचे संगर आत्मबलाने दिपवतात ते ही धरती
शिवप्रभूच्या सामर्थ्यशाली स्वराज्याविषयी या रामजीचा केवढा हा थोर विश्वास ! शिवशाही हे सुराज्य, स्वधर्मासाठी उभे केलेले राज्य!! लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेले राज्य. या राज्याला ईश्वरीय अधिष्ठान लाभलेले होते. समाजातील सर्व लहान-थोरांचा निष्ठेचा, त्यागाचा आधार त्याला होता, याचे चांगले उदाहरण म्हणजे रामजीचे हौतात्म्य.


हि बहुधा रामजी पांगेराची समाधी असावी

    मोगलांनी किल्ला जिंकल्यानंतर हा किल्ला पुन्हा मराठ्यांकडे आलेला दिसतो. १७५३-५४ च्या सुमारास मुघलांकडून घेतलेला हा किल्ला नवाब सलाबतजंगला परत करून तशी पोचपावती घेण्याबाबत किल्ल्याच्या हवालदारास पेशवे बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेबांनी आदेश दिला होता. १७८९-९० च्या सुमारास कोळ्यांनी हा किल्ला बंड करून आपल्या ताब्यात घेतला. इ.स. १८१८ मध्ये त्रिंबकचा पराभव केल्यानंतर जे सतरा मजबूत किल्ले ब्रिटिशांनी स्वतःकडे घेतले त्यांत कन्हेरगडाचा समावेश होता.

      संपूर्ण गड पाहिल्यावर एक खंत मात्र मनाला कायम खात राहते. एवढी मोठी लढाई झालेला हा किल्ला मात्र आजही ऊन, वारा आणि पावसाचा मारा खात, परिस्थितीशी सामना करीत उभा आहे. गडसंवर्धन तर सोडाच, पण कण्हेरगडाच्या युद्धाचे एक पर्व गाजविले अशा रामजीच्या नावाची एक साधीसुधी पाटी देखील इथे दिसत नाही. सरकारला तर त्याची कधी गरज देखील भासली नसावी? अन् यात भरीस भर म्हणजे आठंबा गावातील लोकांशी झालेल्या चर्चेअंती असे समजले की, या किल्ल्याला कण्हेरगड म्हणतात हे त्यांना ठाऊकच नाही. आणि एवढेच काय, इथं एखादा किल्ला आहे, हे देखील त्यांना माहिती नाही. मग रामजीबद्दल तर विचारणेच सोडा.

 संदर्भ :-

१) नाशिक जिल्हा गॅझेटीयर
२) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स
३) दुर्गभ्रमंती नाशिकची - अमित बोरोले
४)  शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा- सतिश अक्कल्कोट
५) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
६) www.trekshitiz.com हि वेबसाईट
७)  www.durgbharari.in   हि वेबसाईट
८ )  prashantpardeshi.blogspot.com
० )  http://hidevd1991.blogspot.in/2016/03/blog-post.html?view=sidebar







                                                  



























 

























गिरीदुर्ग नाशिक अजंठा सातमाळ
🏔️
श्रेणी नुसार स्तर
मध्यम
📏
समुद्र सपाटीपासून उंची (फ़ूट)
3582
🏰
किल्ल्याचा प्रकार
गिरीदुर्ग
📍
जिल्हा
नाशिक

किल्ल्याची छायाचित्रे

किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा

मुख्य छायाचित्र
Pleateu of Kanhergad

Pleateu of Kanhergad

सर्व छायाचित्रे पहा

नकाशे व मार्ग

किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा

Fort





प्रस्तावना

अजंठा सातमाळ रांग म्हणजे नाशिक आणि गुजराथच्या सीमेवरील तटबंदीच होय. याच रांगेत आडवाटेवर एक किल्ला आहे. त्याचे नावं कण्हेरगड, इतिहास प्रसिध्द असा हा कण्हेरगड आजमितिस बराच दुर्लक्षित आहे.

महत्त्वाची ठिकाणे

गडावर पोहोचल्यावर खडकात खोदलेला बुरुज दिसतो. येथून थोडे पुढे गेल्यावर एक नेढं दिसते. नेढ्याच्या समोरून जाणारी वाट थेट गडमाथ्यावर घेऊन जाते. गडमाथा बराच प्रशस्त आहे.गडमाथ्यावर पाण्याची ६ ते ७ टाकी आहेत. महादेवाची पिंड आहे. धोडप किल्ल्याच्या समोर तोंड येईल अशी गुहा एका कड्यात खोदलेली आहे. गडावर वाड्यांचे काही अवशेष आढळतात. गडाचे दुसरे टोक हे धोडपच्या माची सारखेच आहे. गडावरून पश्चिमेला सप्तश्रुंगी, मार्कंड्या ,रवळ्या जवळ्या, धोडप, कंचना ,हंड्या अशी संपूर्ण सातमाळ रांग दिसते. संपूर्ण गडमाथा फिरण्यास १ तास लागतो.

कसे पोहोचावे

कण्हेरगडावर जाण्याचे दोन मार्ग आहेत.हे दोनही मार्ग कण्हेरगड आणि समोरचा डोंगर यांच्या खिंडीत एकत्र येऊन तिथूनच वर जातात.
१ नाशिक - नांदुरी मार्गे :-
नाशिकवरून नांदुरी गाव गाठावे. नांदुरीतून कळवणला जाणार्‍या रस्त्यावरच नांदुरी गाव आहे. नांदुरी पासून ६ किमी अंतरावर आठंबा गाव आहे. या गावातून २ किमी अंतरावर असणार्‍या ‘सादडविहीर’ या गावात यावे. सादडविहीर गावातून किल्ल्यावर जाण्यास ठळक वाट आहे. या गावातून खिंड गाठण्यास अर्धा तास लागतो.

२ नाशिक - कळवण मार्गे:-
नाशिक - कळवण मार्गे ओतूर गाठावे. ओतूर मधून अर्ध्या तासाच्या अंतरावर असणार्‍या कण्हेरवाडी गावात यावे. कण्हेरवाडी गावातून वर सांगतिलेली खिंड गाठण्यास १ तास लागतो.

या दोन्ही वाटा वर खिंडीत येऊन मिळतात. गडावरून येणारी एक सोंड सुध्दा याच खिंडीत उतरते. ती सोंड पकडून एक तासाच्या खड्या चढणी नंतर आपण गडमाथ्यावर पोहचतो. वाट निसरडी आहे, त्यामुळे जरा जपूनच चढावे लागते.

ट्रेकसाठी लागणारा वेळ

⏱️ सादडविहीर गावातून दीड तास लागतो तर कण्हेरवाडीतून २ तास लागतात.

सुविधा व सोयी

🏠

निवास व्यवस्था

किल्ल्यावर राहण्यासाठी गुहा आहे. यात ५ लोकांची राहण्याची सोय होते.

🍽️

अन्न व्यवस्था

जेवणाची व्यवस्था आपण स्वत…:च करावी.

💧

पाणी उपलब्धता

किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याचे टाके आहे.

सर्वोत्तम काळ

🌤️ N/A

जवळील गावे

सादडविहीर.

 
 
 
 
 
 
 

उंची : ३५०० फुट

श्रेणी : कठीण

महाराष्ट्रात कण्हेरगड नावाने ओळखले जाणारे दोन किल्ले आहेत. यातील अजंठा डोंगर रांगेतील चाळीसगावचा कण्हेरगड इतिहासाबद्दल मूक आहे तर बागलाणातील कण्हेरगड रामजी पांगेरा व त्याच्या सहकाऱ्यांच्या पराक्रमाची गाथा उराशी कवटाळून अबोल झाला आहे. सातमाळा डोंगररांगेतुन काहीसा सुटावलेला इतिहासप्रसिध्द असा हा किल्ला आडवाटेवर असल्याने दुर्गप्रेमींकडून बराच दुर्लक्षित आहे. कण्हेरवाडी व सादडविहीर हि किल्ल्याच्या दोन बाजुच्या पायथ्याची गावे असुन या दोन्ही गावातुन किल्ल्यावर जाण्यासाठी ठळक वाटा आहेत. या दोन्ही गावातुन येणाऱ्या वाटा किल्ल्याची उतरत आलेली सोंड व समोरचा डोंगर यामधील खिंडीत एकत्र येतात व पुढे एकच वाट कण्हेरगड माथ्यावर जाते. या दोन्ही मार्गांनी गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी दोन तास लागतात. सादडविहीर गावात जाण्यासाठी नाशिक–नांदुरी-आठंबा-सादडविहीर असा ६५ कि.मी.चा मार्ग असून नाशिक-वणी-मुळाणे-कन्हेरवाडी हे अंतर ६० कि.मी.आहे. सादड विहीर गावातून सरळ गेलेला रस्ता पिंप्रीपाडा या गावामार्गे पुन्हा वणी-कळवण रस्त्याला जाऊन मिळाला आहे. सादड विहीर गावातुन किल्ल्याचा पायथा २ कि.मी.वर आहे. खाजगी वाहन असल्यास आपण थेट गडाच्या पायथ्याशी जाऊ शकतो. या रस्त्यावरून जाताना खिंडीकडे पाहत गेल्यास वाटेतच डावीकडे खिंडीकडे जाणारी मळलेली पायवाट दिसते. किल्ल्याच्या पायवाटेसाठीची महत्वाची खूण म्हणजे सादड विहीर गाव ते पिंप्रीपाडा रस्त्यावरून जाताना खिंडीच्या खालील भागात रस्त्याला एक लहानसा पुल आहे. या पुलाच्या थोडेसे अलीकडे डावीकडे खिंडीत जाणारी पायवाट आहे. पायवाट ठळक नसली तरी झाडीतुन वर चढत जाणारी वाट आपल्याला अर्ध्या तासात कण्हेरगड व त्याच्या शेजारील डोंगराच्या खिंडीत आणून सोडते. खिंडीतुन वर किल्ल्याकडे पाहीले असता टोकावरील बुरुज दिसतो. खिंडीतून या बुरुजाकडे जाणारा चढ साठ-सत्तर अंशातला आणि प्रचंड मुरमाड घसा-याने भरलेला आहे. या वाटेवरून जाताना चांगलीच भंबेरी उडते. घसाऱ्याचा हा भाग संपला कि कातळटप्पा सुरु होतो. या कातळात काही ठिकाणी पायऱ्या कोरलेल्या आहेत. खिंडीतुन खडी चढण पार करत पाउण तासात आपण किल्ल्याच्या उध्वस्त बुरुजाखाली पोहोचतो. या बुरुजाच्या डावीकडे काही खोदीव पायऱ्या असून बुरुजाचा तळातील भाग कातळात कोरून काढलेला आहे तर वरील भागात दगडी बांधकाम केलेले आहे. बुरुजाच्या डावीकडुन आपला किल्ल्यात प्रवेश होतो. या ठिकाणी असलेला किल्ल्याचा दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला असुन तटबंदी मात्र काही प्रमाणात शिल्लक आहे. बुरुजाच्या वरील भागात मातीने बुजलेले एक फुटके टाके आहे. येथुन किल्ल्याचा माथा दिसायला सुरवात होते. माथ्याकडे जाणारी वाट काही ठिकाणी बांधीव पायऱ्याची तर काही ठिकाणी कातळात कोरलेली असुन या वाटेवर पाण्याचे कोरडे टाके पहायला मिळते. टाक्याकडून पुढे आल्यावर उजवीकडे गडाच्या कातळास नैसर्गिक छिद्र (नेढे)आहे. या नेढ्यातुन वाहणारा वारा थकलेल्या शरीराला सुखावणारा आहे. नेढ्यासमोर कातळकड्याला चिटकुन पायऱ्या कोरलेल्या आहेत. याची रचना व इतर खुणा पहाता या ठिकाणी एखादा लहान दरवाजा असावा. या पायऱ्या चढून वर आल्यावर नेढ्याच्या माथ्यावर जाता येते. या वाटेवरून आपल्याला किल्ल्याच्या वरच्या टप्प्यावर दोन छोटे दगडी स्तंभ दिसतात. हा बहुधा किल्ल्याच्या खालील भागात नजर ठेवण्यासाठी तटबंदीतील झरोका असावा. या स्तंभांमधुन चढता उतरता येत असले तरी गडमाथ्यावर जाणारी वाट त्याच्या बाजुला आहे. या वाटेने आपण गडाच्या तिसऱ्या टप्प्यावर येतो. या भागात असलेल्या कातळाला (फोडण्यासाठी) मोठ्या प्रमाणात गोलाकार खळगे कोरलेले असुन एक बुजलेले पाण्याचे टाके आहे. हा तिसरा टप्पा पार केल्यावर आपल गडमाथ्यावर प्रवेश होतो. समुद्रसपाटीपासुन ३५१० फुट उंचावर असलेल्या कण्हेरगडाचा विस्तार दक्षिणोत्तर चार टप्प्यात झाला असुन त्रिकोणी आकाराचा बालेकिल्ला चौथ्या टप्प्यावर १२ एकरात सामावला आहे. गडमाथ्यावर बऱ्यापैकी सपाटी असुन गडाचे बहुतांशी अवशेष या माथ्यावरच विखुरले आहेत. माथ्यावर प्रवेश केल्यावर सुरवातीला काही घरांचे चौथरे तसेच दोन मोठया वास्तुंचे चौथरे पहायला मिळतात. या वास्तुच्या पुढील भागात डावीकडे पाण्याचे एक सुकलेले तळे तर उजवीकडे पाण्याने भरलेले कातळात कोरलेले टाके पहायला मिळते. या टाक्याच्या उजव्या बाजुस आल्यावर पाण्याने भरलेले दुसरे कोरीव टाके असुन या टाक्याच्या काठावर तुळशी वृंदावन, नंदी व शिवलिंग ठेवलेले आहे. याच्या उजव्या बाजुला घडीव दगडात बांधलेली दोन मोठी व एक लहान टाके असून यातील लहान टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. येथुन तुळशी वृंदावनाच्या पुढील बाजुस गेले असता गडाची लांबवर पसरलेली माची दिसून येते. या माचीच्या डाव्या बाजुस कातळात कोरलेली ५ टाकी असुन लांबवर पसरलेल्या माचीवर १-२ चौथरे वगळता इतर कोणतेही अवशेष नाहीत. या माचीच्या टोकाला खाच मारून किल्ल्याला शेजारच्या डोंगरापासून वेगळे केले आहे. या खाचेपर्यंत जाऊन येण्यास पाऊण तास लागतो. माचीवरून मागे परतल्यावर धोडपच्या दिशेला म्हणजेच उजव्या बाजुच्या कड्याच्या काठाने निघावे. या वाटेने आपण आधी पाहिलेली ५ टाकी ओलांडल्यावर डाव्या बाजुस सुरवातीला पाहिलेला वाड्याचा मोठा चौथरा दिसतो. या चौथऱ्याच्या उजवीकडील दरीच्या काठाने एक वाट खाली उतरली आहे. या वाटेने २ मिनिटे खाली उतरल्यावर आपण धोडपच्या दिशेने कातळात कोरलेल्या दोन गुहांपाशी येतो. या गुहेत ७-८ जण सहजपणे मुक्काम करू शकतात. या ठिकाणी आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण किल्ला पाहण्यास एक तास पुरेसा होतो. गडमाथ्यावरून सातमाळा रांगेतील अचला, अहिवंत, सप्तशृंग, मार्कंड्या, मोहनदर, धोडप, रवळ्या-जवळ्या, कांचन मंचन, इंद्राई, कोळदेहेर, राजदेहेर, चौल्हेर, प्रेमगिरी, भिलाई इतके किल्ले नजरेस पडतात. गड उतरताना चढण्यापेक्षा जास्त काळजीपूर्वक उतरावा लागतो. गड पायथ्याच्या सादडविहीर गावापासुन गड पाहुन परत येण्यासाठी ४ तास लागतात. इ.स. १६७१ ऑक्टोबर महिन्यात दिलेरखान व बहादूरखान यांच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्य बागलाणात घुसले व त्यांनी साल्हेरला वेढा घातला. साल्हेर बरोबर दुसरा एखादा किल्ला ताब्यात घ्यावा या आशेने काही मुघल सैन्य घेऊन दिलेरखानाने रवळ्या किल्ल्याला वेढा घातला पण मराठ्यांनी रवळ्याला वेढा घालून बसलेल्या मुघल सैन्यावर वेळी-अवेळी छापे घालुन त्यांना हैराण केले. त्यामुळे कंटाळून दिलेरखानाने रवळ्याचा नाद सोडला व आपला मोर्चा ह्या परिसरातील कमी उंचीच्या कण्हेरा गडाकडे वळवला. यावेळी कण्हेराचा किल्लेदार होता रामाजी पांगेरा. अफझलखान वधावेळी जावळीत ज्या पाच मराठा सरदारांनी आदिलशाही सैन्यावर हल्ला चढवला त्यात कमळोजी साळुंके, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, कोंडाजी वरडवले यांसोबत रामाजी पांगेराचे नाव येते. कवींद्र परमानंद यांनी शिवभारतात रामाजीला 'अग्निसारखा शूर' या शब्दात गौरवलं आहे. कण्हेरगडावर त्यावेळी रामाजी सोबत हजारभर मावळे होते. दिलेरखानाने गडाला वेढा घालायला सुरुवात केली. रामाजीने कण्हेरगडावरून मुघलांचे सैन्य पाहीले व युद्ध टळणार नाही हे त्याने जाणले. तीनशे मावळे गडाच्या रक्षणासाठी गडावरच ठेवुन उर्वरित सातशे मावळे घेऊन या वेढ्यावर अचानक हल्ला चढवण्याची व्यूहरचना रामाजी पांगेरा यांनी आखली. मोगल सैन्याचा वेढा पूर्ण होण्याच्या आत वेढा तोडणे आणि सैन्य उधळणे हा हेतू त्यात होता. त्यामुळे पहाटेच्या अंधारात रामाजी पांगेरा यांच्या नेतृत्वाखाली ७०० मावळ्यांनी मुघल सैन्यावर हल्ला केला. अचानक पडलेल्या छाप्याने मुघल सैन्य गोंधळले. संख्येने कमी असूनही सातशे मावळ्यांनी सुमारे बाराशे मोगल कापून काढले. साधारण तीन तास कण्हेरगडाच्या परिसरात हे रणकंदन सुरू होते. रामाजी आणि त्याच्या मराठ्यांनी शौर्याची कमाल केली. कोणतीही कुमक शिल्लक नसल्याने सर्व मावळ्यांनी स्वराज्यासाठी प्राण दिले. सभासदाची बखर यात या लढाईविषयी लिहताना सभासद म्हणतो." टिपरी जैसी सिमगीयाची दणाणते तैसे मराठे कडाडले." म्हणजे शिमग्याच्या दिवशी जशी टिपरी हलगीवर वारंवार कडाडते तसे मावळे मुघलांवर तुटून पडले होते. या लढाईने आपण मुघलांना उघडया मैदानावर पराभूत करू हा आत्मविश्वास मराठ्यांच्या मनात जागृत झाला तर मुघल सैन्याचे मनोधैर्य खचले. किल्ला काही दिलेरखानाला जिंकता आला नाही. रामजी पांगेरा व ७०० मराठयांच्या अतुनलीय पराक्रमाने कण्हेरगड इतिहासात अमर झाला. या नंतर इ.स.१६८२ साली डिसेंबर महिन्यात इजाजतखान याने किल्ला घेण्याचा प्रयत्न केला पण त्यालाही किल्ला जिंकता आला नाही. यानंतर १७५३-५४ च्या दरम्यान नानासाहेब पेशव्यांनी हा किल्ला नबाब सलाबतजंगला देऊन त्याच्याकडुन पोचपावती घेण्याच्या सूचना किल्लेदाराला दिल्याचे दिसून येते. १७८९-९० च्या सुमारास कोळ्यांनी बंड करून हा किल्ला ताब्यात घेतला. इ.स.१८१८मध्ये त्रिंबकगड घेतल्यावर ब्रिटिशानी जे इतर महत्वाचे किल्ले ताब्यात घेतले त्यात कण्हेरगडचा उल्लेख येतो.
© Suresh Nimbalkar

मागे जा

छायाचित्रे

 
 
 
आमचे पुढचे ध्येय होते सादडविहीर या गावी पोहोचणे. सादडविहीर म्हणजे कण्हेरगडाचा पायथा. पटविहीर ते सादडविहीर हे अंतर २४ किमी आहे. आम्ही साधारण ५.३० वाजता सादडविहीर गावी पोचलो. येथे शांताराम भोईर यांच्याशी आमचा संपर्क झालेला, त्यांनी आम्हाला शाळेची चावी दिली. शाळेत मस्त मार्बल टाईल्स टाकलेल्या आहेत, आजही या गावातील लोक डोंगरदेवाच्या सणात व्यस्त होते. आम्ही शाळेत जरावेळ अराम केला सुर्यास्ताचे फोटो काढले. शाळेच्या बाहेर वार्ताफलक लावलेला, त्यावर आजच्या दिवशीचा (२४ डिसेंबर २०१७) दिनविशेष, तिथी, नक्षत्र, सुर्योदय, सुर्यास्ताची वेळ लिहिलेली. तसेच आजच्या बातम्या "थंडीचा पारा वाढला, BCCI ला खेळपट्टीवरून समज" लिहिल्या होत्या. हे बघितल्यावर शाळेचे दिवस आठवले आणि खरंच शाळा का आपुलकीची वाटते हे समजले. रात्री ७ वाजले होते, आता मात्र पोटात कावळे ओरडु लागले. आज पहिल्यांदा आम्ही आमच्या सोबत आणलेला स्टोव्ह बाहेर काढला आणि जिभेचे चोचले पुरवायला सुरुवात केली. पहिल्यांदा hot and sour chicken सुप  आणि मग त्यावर गरम गरम maggie चा ताव मारून भुक भागवली. आमचा बिस्तर म्हणजेच sleeping bag मांडली आणि कधी झोप लागली कळले नाही.
 

दिवस तिसरा (२५ डिसेंबर २०१५)




आज आमच्या सफारीचा तिसरा दिवस. नाशिकमधले जवळपास सर्वच किल्ले समुद्रसपाटीपासुन  उंचावर आहेत. नेहमीच्या सवयीप्रमाणे पहाटे ६ वाजता जाग आली, स्टोव्ह आणि इतर शिधा साहित्य आम्ही बाहेरच ठेवले होते. बाकीचं सर्व सामान आवरून आम्ही गरमागरम शिरा ब्रेकफास्ट साठी बनवला आणि त्यावर एक कप भर चहा घेतला. ३ दिवस सतत फिरत असल्याने आज व्यवस्थित नाश्ता करूनच किल्ल्यावर जायचं आम्ही ठरवलं. गावातील लोक सकाळीच उठुन कामाला लागले होते. डोंगरदेव सणानिमित्त गडबड चालु होती, कण्हेरगडाच्या बाजुस असलेल्या डोंगरात डोंगरदेव वसले होते. सर्वगाव आज तिकडेच जमा होत होते, त्यामुळे आमचा रस्ता चुकायला वावच नव्हता. आमचा नाश्तापाणी आणि इतर विधी उरकले आणि आम्ही छोटी बॅग घेऊन कण्हेरगडाच्या दिशेने निघालो.





कण्हेरगड


कण्हेरगड हा सातमाळ रांगेपासुन थोडा हटके आहे म्हणजेच थोडासा बाजुला/आडवाटेवर आहे. गडावर पोचायला दोन वाटा आहेत. एक वाट कण्हेरवाडी मधुन आहे तर दुसरी वाट सादडविहीर गावातुन आहे. आमच्या planning  प्रमाणे आम्ही सादडविहीर गावातुन चढणार होतो कारण प्रेमगिरी मधुन आम्हाला हे गाव जास्त जवळ होते आणि येथुन वाट जास्त मळलेली आहे, तसेच सादडविहीर मधुन वेळही कमी लागतो. गावातुन एक डांबरी सडक पुढे सरळ जाते, आपण या मार्गावरून चालत जायचे. पुढे सडक उजव्या बाजुस वळते आणि आपल्या डाव्या हाताला कण्हेरगड राहतो. या रस्त्यावरून जाताना आम्हाला बऱ्याच लोकांची गर्दी लागत होती. निरनिराळ्या, आसपासच्या गावातुन लोक डोंगरीदेव उत्सव साजरा करायला येत होते. आम्ही नजर उचलुन वर बघितले तर कण्हेरगडाच्या डाव्या बाजुच्या डोंगरात डोंगरदेव वसलेले. इथे बरेच लोक जमले होते आणि त्याची पूजा करत होते. आम्ही डांबरी रोड सोडुन डाव्या हाताची मळलेली वाट पकडली आणि चढाईला सुरुवात केली. २-३ जणांना विकविचारले असता माहित पडले काही लोक कण्हेरवाडी मधून आले होते. आम्ही डावीकडील डोंगराच्या मध्यावर पोचलो. येथुन डावीकडील वाट डोंगरदेवाकडे घेऊन जाते तर उजवीकडील वाट कण्हेरगडाच्या खिंडीत घेऊन जाते. आम्ही उजवीकडील वाट पकडली आणि खिंडीच्या दिशेने चढायला सुरुवात केली.


वाटेत जाताना मागे वळून बघितले असता समोर डोंगर, सादडविहीर आणि गावात धुकं, पक्ष्यांचे थवे एकदम मस्त नजर दिसत होता, अगदी आपण थंडीतील चित्र काढतो तसच. थंडी तर विचारूच नका, दोन दिवस अंगात घातलेले स्वेटर अजुन उतरवले नव्हते. पायथ्यापासून अर्ध्यातासात आम्ही खिंडीत येऊन पोहोचलो. येथे जरावेळ आम्ही अराम केला. पलीकडे कण्हेरवाडीमधून येणारी वाट या खिंडीत मिळते. कण्हेरवाडी लांबवर उन्हात न्हाऊन निघत होते. कण्हेरवाडी मधुन खिंडीपर्येंत यायला १ तास लागत असावा. खिंडीतुन सरळ वर बघितले असता अजून तासाभराची चढाई बाकी होती. इथुन पुढची सर्व चढाई छातीवर आहे आणि प्रचंड घसाऱ्याची वाट आहे. पण वाट रुंद असल्याने अपघाताची भिती नाही. खिंडीपर्येंत तर नुसता warm up होता खरी कस आता लागणार होती. जरा वेळ विश्रांती घेऊन आम्ही चढायला सुरुवात केली. गडावरच्या महादेवाच्या पाया पडुन बरेच लोक गड उतरून खाली येत होते. आम्ही आपले पावले हळू हळू टाकत, आधार घेत पुढे पुढे जात होतो. समोरच गडाचा एक बुरुज दिसतो. आम्ही या बुरुजाच्या दिशेने चढाई करत होतो. बुरुजाच्या जवळ पोहोचल्यावर आपण कातळात कोरलेल्या पायऱ्यांपाशी येतो.




बुरुजापाशी पोचल्यावर आम्ही जरा वेळ आराम केला. आत्तापार्येंत ८. वाजले होते. पायऱ्यांच्या मार्गाने आम्ही गडाच्या पहिल्या टप्प्यात आलो, येथे एक पाण्याचे सुकलेले टाके आहे. हे बघुन आम्ही सरळ वर न चढता पायवाटेच्या मार्गाने डावीकडून सरळ चालू लागलो. पुढे परत पायऱ्यांच्या मार्गाने आपण गडाच्या प्रमुख आकर्षणापाशी म्हणजेच नेढ्यापाशी येऊन पोहोचतो. नेढ्यातून पलीकडचा प्रदेश तसेच गडाची माची न्याहाळता येते. गडाचा माथा माचीसारखा पसरला आहे. पत्ता गावाचे doom version अगदी. नेढ्यापाशी आम्ही जरावेळ अराम करून पुढे निघालो, नेढ्याच्या बाजूने जाणारी वाट आपल्याला गडाच्या माथ्यावर घेऊन जाते. येथे दोन फूट उंचीचे दोन खांब बसवले आहेत. इथे पोचलो की आपण गडाच्या माथ्यावर पोचतो. माथ्यावर पोहोचताच मन मोहून जाते. धोडप, रवळ्या-जवळ्या, मार्कंड्या, सप्तशृंगी किल्ले  डोळ्यासमोर दिसतात.


माथ्यावर येथे दोन सुकलेली टाके आहे. थोडस पुढे गेल्यावर झाडांमध्ये जुन्या इमारतींचे बरेच अवशेष पाहायला मिळतात. अजून थोडं पुढे गेल्यावर अजुन एक खराब पाण्याचे टाके आहे. टाक्यांपासून उजवीकडे गेल्यावर एक महादेवाचे उघड्यावर मंदिर आहे, त्याच्या बाजुलाच तुळशी वृंदावन आहे. मागील बाजूस मोठ्या इमारतीचे अवशेष शिल्लक आहेत, तसेच बाजूला पाण्याचे टाके आहे, पाणी पिण्यालायक आहे. हे  बघुन आपण सरळ चालत जायचं माचीच्या दिशेने. गडाची माची अगदी धोडप सारखीच आहे, मध्ये तुटलेली आहे. उलटे येताना आपण धोडपच्या दिशेने चालायचे येथे कड्यात एक गुहा कोरली आहे. गुहेत सहज ४-५ जणांना मुक्काम करता येतो. आत्तापार्येंत ९. वाजले होते, आम्ही सोबत आणलेले खजूर खाऊन घेतले, पाणी प्यायलो आणि परतीच्या वाटेवर निघालो. गडावर गुहा सोडून कोठेही निवारा अथवा सावली नाही. सांभाळत उतरत, तोल सावरत आम्ही खिंडीत येऊन पोचलो. इथून पुढे मळलेल्या वाटेने पटापट उतरत, ११ वाजता सादडविहीर गावात दाखल झालो. सगळं सामान आवरून, शांताराम भोईरांचा निरोप घेतला आणि मार्कंड्या किल्ल्याच्या दिशेने कूच केली.
 
 
 
 

कण्हेरगड

सादडविहीर. इथून 2 पोरांना आमच्याबरोबर येण्यास तयार केले, पण गाडी थांबवायच्या जागेवर आल्यावर त्यांनी माघार घेतली. त्यांना घरी काम निघाले आणि अर्थातच शेतीचे काम जास्ती महत्वाचे. पण त्यांनी गडाकडे जायची वाट दाखवून दिली.
किल्ले कण्हेरगडचा खालपासून दर्शन देणारा बुरुज
                 सादडविहीर गावाकडून पुढे जाणाऱ्या रस्त्याने साधारण 500 मीटर अंतरावर रस्त्याखालून मोरी बांधलेली आहे (पाणी जायला जागा) हीच खूण. इथून उजवीकडे बुरुजावर फडकत असलेला ध्वज दिसतो. वाट बऱ्यापैकी मळलेली आहे. पहिला टप्पा परत डावीकडचा डोंगर आणि उजवीकडे किल्ला ह्या मधल्या खिंडीचा. इथे पोचायला आधारानं 15-20 मिनिटं लागतात. इथून डावीकडे डोंगरावरही वाट जाते. पलीकडच्या कण्हेरवाडीतून लोक इथे ससे पकडायला जातात, तसेच वर बहुतेक डोंगरदेवाचे मंदिरही आहे. आपण उजवीकडे वर बुरुजावर फडकणाऱ्या ध्वजाकडे बघत सरळ वरती जायची वाट धरायची. हा गड दक्षिणोत्तर पसरलेला आहे. इथे आपल्याला साध्य व्यवस्थित दिसत असले तर तिथे नेणारा मार्ग सोपा नाहीये. सरळ नाकाडाने चढल्यास अगदी घसाऱ्याची वाट आहे. परंतु जरा उजवीकडची वाट पकडल्यास नाकाडाच्या कडेने पण झुडुपातून वाट वरच्या बाजूला जाते. परंतु ह्या वाटेने जाताना आपले साध्य नक्की कुठे आहे त्याचा अंदाज ठेवावा, कारण आपण जात असलेली ही कडेची वाट सरळ आपल्याला बुरुजकडे न जाता पुढे कुठेतरी घेऊन जाते. म्हणून वाटेत अंदाज घेऊन डावीकडे वरच्या बाजूला जावे लागते. इथून परत आपले साध्य म्हणजे ध्वज दिसू लागतो. आता मात्र पर्यायी रस्ता नाही. सरळ वर जायचे.
छोटेखानी पण शीण दूर करणारे नेढे
                 हा किल्ला 4 टप्प्यात आहे. पहिल्या टप्प्यात पोचतानाच गडाचे अवशेष म्हणजे पायऱ्या दिसू लागतात. इथून मागे बघितल्यास उंच वाटत असलेले गडाच्या डावीकडचे डोंगर खुजे वाटू लागतात. इथे पाण्याची छोटी विश्रांती घेऊन बुरुज उजवीकडे ठेवत डाव्या बाजूने पुढे व्हायचे. परत पायऱ्या आपल्याला बुरुजाला वळसा मारून त्याच्या वरच्या लपून बसलेल्या बुरुजावर घेऊन जातात. इथे एक पाण्याचे कोरडे टाके आहे. मागे बुरुजकडे गेल्यास दोन्ही बाजूला तटबंदी दिसते, तर मधेच मोठा चर खोदलेला दिसतो. समोरच खालच्या बुरुजवरचा ध्वज आणि समोर डोंगर दिसतो. आता मागे फिरून कोरड्या टाक्याजवळून वरच्या टप्प्याकडे जाणाऱ्या वाटेने पुढे जायचे. सरळ टप्प्या-टप्प्यातल्या पायऱ्या आणि अगदी उंचावर अर्धवट तुटका दरवाजा सदृष अवशेष दिसतात. पुढचा पायऱ्यांचा टप्पा पार केला कि ह्या किल्ल्याचा दागिना शोभेल असे छोटेखानी पण सुंदर असे नेढे आहे. अगदी 5 फूट उंचीचे आणि 25 एक फूट लांब असे त्यात आरामात वारा खात बसावे असे वाटणारे हे नेढे आहे. त्यात बसायचा मोह तात्पुरता टाळून डावीकडच्या पायऱ्यांनी पुढच्या टप्प्याकडे जायचे. इथे वरती कातळात काही खड्डे आहेत. अजून वरच्या तुटक्या दरवाजा वाटणाऱ्या अवशेषांकडे पोचायचे. हे अवशेष दरवाजाचे वाटत नाहीत आणि मुख्य वाटही इथून नाही, तर त्याच्या डावीकडून आहे. इथे अजून काही खड्डे, गोलाकार आकार कोरलेले आहेत. इथे अजून एक कोरडे टाके आहे. आता गड माथ्यावर म्हणजे एका पठारावर पोचायचे. इथे समोरच तुळशी वृंदावन, शंकराची पिंड, नंदी वगैरे उघड्यावरच आहेत. जवळच पाण्याची टाकी, खोल्यांचे चौथरे वगैरे अवशेष आहेत. पाणी पिण्यायोग्य नाही. समोर विस्तीर्ण पठार आहे आणि पलीकडे धोडप किल्ल्याच्या माचीला जशी भलीमोठी खाच आहे, तशीच इथेही आहे. पण इथे जाता येत नाही. इथून डावीकडे गेल्यावर टाक्यांचा समूह आहे. सगळ्यात उजवीकडच्या टाक्यातले पाणी पिण्यायोग्य असले तरी त्यात शेवाळे खूप आहे, पाणी रुमालात गाळून घ्यावे.
टाकी, गुहा आणि इतर अवशेष
                 ह्या गड माथ्यावरून सप्तश्रुंगी, मार्कंड्या, रवळ्या-जवळ्या, धोडप, कांचना हे किल्ले, तर हंड्या, बंड्या आणि इखारा हे सुळके दिसतात.
                 कडेने परतीच्या वाटेकडे येताना उजव्या बाजूला खालच्या बाजूला एक वाट जाते. इथे पूर्वाभिमुख 2 गुहा लपलेल्या आहेत. विस्तीर्ण अश्या ह्या दोन गुहा आहेत. जागा सपाट नसली तरी गरज लागल्यास पाऊस-पाण्यापासून संरक्षित आहे. ह्या गुहेतून समोरच धोडप आणि उजवीकडे जावळ्या दिसतो. धोडपच्या डावीकडे ईखारा सुळकाही स्पष्ट दिसतो. आता गडफेरी पूर्ण होते. साधारण 10 टाकी हा किल्ला बाळगून आहे. येताना नेढ्यात निवांत बसून जेवण करावे. इथून आपण आल्या वाटेने पाऊण तासांत आपण अगदी गडाच्या पायथ्याशी पोचतो.
गुहेतून समोरच धोडप आणि उजवीकडे जावळ्या
                 ह्या गडाचा इतिहास अंगात वीरश्री निर्माण करणारा आहे. हा फारसा प्रसिद्ध नसलेला गड आपल्या पराक्रमाने अजरामर करून ठेवलेला आहे "रामजी पांगेरा" नावाच्या मराठी रक्ताने. पावनखिंड म्हणजे वीर बाजीप्रभू, पुरंदर म्हणजे मुरारबाजी देशपांडे, सिंहगड म्हणजे तानाजी मालुसरे असे समीकरणच आहे जणू, तसेच कण्हेरगड म्हणजे रामजी पांगेरा.

                 १६७२ च्या जानेवारी महिन्यात दिलेरखान आपली १० हजारांची भलीमोठी फौज घेऊन कण्हेरगडाच्या पायथ्याशी आला. त्याने कण्हेरगडाला वेढा घातला. त्यावेळी रामजी हे कण्हेरगडाचे किल्लेदार होते. गडावर शिबंदी होती अवघी 800 ते हजार. गडावर उपलब्ध रसद जास्त काळ पुरणार नाही हे रामजी जाणून होते. ह्या रामोश्याने आपले कपडे फाडले, दोन्ही हातात समशेरी घेऊन रामजीने मावळ्यांना आव्हान केले. 'आरं गनिम येतुया, चलाऽऽऽऽ मरायला कोन कोन तयार हाय त्येनं माज्या म्हागं यावं...' त्याचे आव्हान शब्दशः सत्य होते. हजारी सैन्यापुढे हे वेडे वीर अक्षरशः मरण्यासाठीच जात होते. ह्या वेड्याची साथ द्यायला असेच सातशे वेडे वीर तयार झाले आणि गडाचे दरवाजे अचानक उघडले. कमरेचे वस्त्र फक्त अंगावर ठेऊन उघडे बंब असे हे रामोशी हातात नागव्या तलवारी घेऊन 'हर हर महादेव' अशी गर्जना करत गनिमावर अक्षरशः कोसळत गेले. अंगावर असंख्य जखमा झाल्या. सभासद या लढाईचे वर्णन करताना लिहतो, 'टिपरी जैसी शिमग्याची दणाणते, तैसे मावळे भांडीले'. खरंच रामजी पांगेरा आणि त्याच्या मावळ्यांचा आवेश पाहून दिलेरखानाने अक्षरशः तोंडात बोटे घातली. त्याच्या डोळ्यासमोर पुरंदरच्या युद्धात उभा ठाकलेला मुरारबाजी देशपांडे आला नसेल तरच नवल. 'ये मराठे नही, भूत है' असे म्हणत दिलेरखान परत फिरला. अवघ्या सातशे मावळ्यांनी गड राखला.



कन्हेरगड नेढ 
आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो
उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचे शिक्षण जरूर घ्या, पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ
 ह्यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, 
पण कलेशी जमवलेली मैत्री तुम्ही का जगायचे हे सांगून जाईल.    
पु.ल. देशपांडे
........./\........

       
     गाडीत बसलो तेंव्हा कण्हेर गडासाठी नकाराची घंटा वाजायला लागली एक दोन करता करता ५ जण तयार झाले. आजच्या दिवसभरात फक्त हाच गड करायचा आणि पुणे गाठायचे असे नियोजन असल्याने हा ही वगळणे स्वभावाच्या परस्पर विरुद्ध होते. त्यामुळे जे येतील त्यांच्या सोबत जायचे असे ठाम मत झाले.   

       जखमी मोबाईल वर दिसणाऱ्या नकाशावरून केपी चालकाला सादडविहीरचा रस्ता दाखवत होते. ओतूरहून वणी- नाशिककडे जाणाऱ्या तुळतुळीत रस्ता आणि मग पुढे ४-५ किमी च्या मधेच खडबडीत मधेच चांगला अशा रस्त्याने मजल दरमजल करीत एकदाचा सादडविहीर पोहचलो. समोर दिसणाऱ्या किल्ल्याचा उंच डोंगर पाहून आधीच ह्या किल्यावर न येण्याच्या निर्णयात असलेल्यांना पाच जणांत अजून कोणाची तरी भर पडणार अस वाटायला लागल. आता बच्चन करावी लागणार बहूतेक... अरे १५ मिनिटात चढू, नेढ खूप भारी आहे हां, वरून व्हिव लय भारी दिसतो, अक्खी सातमाळ रांग दिसते..... आम्ही वरून येईपर्यंत तुम्हाला ताटकळत बसाव लागणार त्यापेक्षा वर चला.
        एक भिडू वगळून बाकीचे बारा मावळ्यानसहीत काही खाण्याचे पदार्थ आणि पाण्याच्या बॉटल घेवून मार्गस्थ झालो. पाचच मिनिटांनी चढ अंगावर आला. सुरवातीला किल्ल्याचा मुख्य डोंगर सोडून दुसऱ्या डोंगरातून मळलेली वाट पकडली. सर्वात पुढे राहून पहिल्यांदा top गियर टाकलेला मी मग फर्स्ट वर गाडी गुरगुरवत हक्काचा लास्ट नंबर राखून खिंडीत पोहचलो. 

        आता समोरचा अर्धगोलाकार बुरुज, घसारा आणि उभा चढ दिसू लागला. पाण्याचा घोट घेतल्यावर चढाईस सर्वात शेवटून सुरवात केली. सोबतीला दुखऱ्या पायाने चढणारा शंकर होता आणि दुसरा स्पेशल एनर्जी ड्रिंक घेतलेला राजू होता( ह्याने शेवट पर्यंत त्या स्पेशल ड्रिंक चे नाव सांगितले नाही). वर गेलेल्यानी मस्त भेळ तयार केली असेल आणि आपण जावून आयते ताव मारणार ह्या असुरी आशेने जरा जास्तच जोर लावला. पण कसले काय .... आधी आलेले उनाड रस्ता चुकून आमच्या मागून वर येताना दिसले आणि सगळ्या भेळ प्रोग्रॅमचे पाणी पाणी झाले. आता सोबतीनेच कन्हेरगडचे दुर्गवैभव असलेल्या नेढ्यात पोहचलो.
        हवेने सारा थकवा क्षणात नाहीसा झाला. सातमाळानी खुलवून ठेवलेलं नाशिक सौंदर्य, मोदकांसारखे ठेवलेले डोंगर - गडकोटांचे रांगडे रूप मनाच्या श्रीमंतीत आणि आठवणींच्या शिदोरीत कित्येक काळ ठाण मांडून बसतील याचा काहीच अंदाज नाही.

         थोड्याफार विश्रांतीने गड फेरीस सुरवात केली. पायऱ्या आणि जवळ जवळ पूर्ण नामशेष झालेल्या दरवाज्यातून गडाचा अखेरचा टप्पा गाठला. इतरस्त्र परिसर चांगलाच नजरेच्या टप्प्यात येत होता. मार्कंड्या, सप्तशृंगी, रवळ्या, जवळ्या, धोडप, इखारा सुळखा, कांचना मंचना, हंड्या अशा कित्येकांनी दर्शन दिले. तसे अजून खूप होते पण एक धोडप वगळता सारे डोंगर चीनी माणसासारखे. चांगला परिचय झाल्याखेरीज पटकन लक्षात न येण्यासारखे.
सात आठ खराब पाण्याच्या टाक्या, एक उघड्यावर महादेवाची  पिंड किंवा मंदीर. पण त्यात दिवा लावण्याची सोय होती आणि अजूनही तिथ दिवा लावला जातो हे कळण्यासाठी तिथे काळसर आणि ओलसर तेल दगडाला चिपकलेले होते एवढा पुरावा पुरेसा होता. धोडपकडे तोंड करून कड्यात असलेली गुहा, गावतात हरवलेले वाड्यांचे अवशेष
आणि...........
        रामजी पांगेर्याने सोबतीच्या ६०० मावळ्यांनीशी आणि नंग्या तलवारींचा खणखणाट करीत दिलेरखानाने वेढा दिलेल्या मोगल सैन्यावर अचानक तुटून पडलेले . साडेतीन प्रहर चाललेल्या या युद्धात सहाशे मर्द मावळ्यानी त्यांच्यापेक्षा दुप्पट मोघलाना कापून काढलेले. पराक्रमाची शिकस्त झाली. रामजी आणि त्याच्या मावळ्यानी शौर्याची कमाल करून हिंदवी स्वराज्याच्या यज्ञात प्राणांची आहुती दिली. सभासद बखर ह्या रणसंग्रामाची भेदकता अशी स्पष्ट करते, -
“टिपरी जैसी सिमागीयाची दणाणते तसे मराठे कडाडले” 
शिमगोत्सवात हलगीवर टिपरी जशी दणकवली जाते तसे मराठे मोघल सैन्यावर तुटून पडले. ह्या साऱ्या रणसंग्रामाची पहिली ‘हर हर महादेव’ अशी गर्जना येथूनच साऱ्या आसमंतात दुमदुमलेली. क्षणात अंगावर शहारे आले.    
        दोन टप्प्याची गडफेरी आटोपून पहिल्या टप्प्यावर असणारे नेढ् पुन्हा गाठले. सगळ्यानी अगोदरच पुरण पोळी वर ताव मारला होता. आपला जाम आवडता पदार्थ असल्याने पुरणपोळी होत्याची नव्हती केली. पाण्याच्या कमतरतेमुळे भेळ कार्यक्रम पुढे ढकलला. आणि गड उतरायला सुरवात केली.

       चढताना जरी जास्त जाणवला नसला तरी उतरताना घसारा आपले खरे रूप दाखवायला लागला. सर्वांच्या पृष्ठभागाची दशा आणि अवस्था रंगात्मक पद्धतीने सजली होती. चढायला लागलेल्या वेळेपेक्षा उतरण्यास जास्त वेळ लागला. सादडविहीर ला आलो तेंव्हा दुपारचा प्रहर संपत आला होता. गावातल्या मराठी शाळे समोर असणाऱ्या झाडांच्या सावलीत थांबलो. बाजूलाच असणाऱ्या पाण्याच्या टाकी खाली सगळेच अंघोळीला धावले. नळाखाली बसून थंड पाणी अंगावर घेण्याचे काय ते सुख..... आ.. हा !!!

       
       अंघोळी आटपे पर्यंत जयेश रावांनी बहु प्रलंबीत भेळ बनवून तयार ठेवली होती. थंडगार पाण्याने गारेगार झाल्यावर चटकदार भेळ वर ताव मारला. आमची चाललेली गडबड गावातली लहान मुले टकामका पाहत होती. सगळ्याना एकत्र बसवून त्यांनीही भेळ वर आडवा हात मारला.
       भेळ उपक्रम राबवून संपवून स्वारी पुण्याकडे परतीला निघाली तेंव्हा ४ वाजून गेले होते.
      तिन्ही ऐतहासिक पण थोडे आडवाटेवरचे किल्ले सर केल्याने उमटणारे पूर्णत्वाचे भाव सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसून येत होते. नाशिक कडे भरधाव निघालेल्या गाडीतून दिसणारे हे मोदकासारखे ठेवलेले कातळकडे व त्यावरील गडकोट ह्यांचे रांगडे रूप हृदयात साठवले. सह्याद्रीच्या शिरपेचात अढळ स्थान मिळालेल्या ह्या रांगांची प्रश्नार्थक नजर आमच्यावर खिळली होती. आता पुन्हा केंव्हा येणार राहिलेलं पहायला? या त्यांच्या प्रश्नाला आता तरी माझ्याकडे उत्तर नव्हते. पण आमच्या सारख्या उनाडांची वाट बदलून सरळ मार्गी लावणाऱ्या, अवघड परिस्थीती विनासायास हाताळण्याचे बळ देणारा, निसर्गाच्या शिकवणीतून माणुसकी शिकवणारा आणि अपुर्णात्वाकडून पूर्णत्वाकडे नेणारा हा प्रवास - ह्या उनाडक्या आजन्म सुरु ठेऊ. असे वचन देवून आमची शरीरे धावत्या गाडीसह पुण्याकडे निघाली.
आयुष्याच्या एका सायंकाळी ही सारी स्मरणे पुन्हा आठवेण आणि पुन्हा नव्याने जगेन.


_____________________
______________
  
कन्हेरगड करायचा असल्यास- वणी नांदुरी गाव आठंबे गाव (उजव्या हाताला वळण) सादडविहीर गाव (१०- कि.मी.) किल्ले कण्हेरा. आम्ही धोडप मार्गाने आल्याने हट्टी – ओतूर – आठंबे गाव(डाव्या हाताला वळण)  सादडविहीर गाव (१०- कि.मी.) किंवा नाशिक – कळवण - ओतूर मार्गे कण्हेरगड वाडी तून सुद्धा रस्ता आहे. सादडविहीर गाव थोडे मागे सोडून पुढे आल्यावर समोरचा उंच डोंगर म्हणजेच कण्हेरगड. दुरून नेढ स्पष्ट दिसत असल्याने किल्ल्याचा डोंगर चटकन लक्षात येतो. किल्याच्या डाव्या हाताच्या कमी उंचीच्या डोंगराच्या मध्यातून जाणारी ठळक वाट आपल्याला दोन डोंगराच्या खिंडीत घेवून जाते. सादडविहीर पासून इथे यायला ४० मिनिटे खूप आहेत. इथून पुढे वर नजर टाकल्यास बुरुज दिसतो आणि किल्ला जवळ आल्याची खात्री होते. किल्ला तीन टप्यात आहे. चढण्या-उतरण्याचा रस्ता पूर्ण घसारा असल्याने योग्य ती काळजी घ्यावी.
सादडविहीर पासून किल्ला आणि किल्ल्यापासून सादडविहीर व्यवस्थित करण्यास साडेतीन तास पुरेसे आहेत.
पाणी- ७-८ पाण्याच्या टाक्या आहेत पण त्यात हिरवे पाणी आहे. त्यापेक्षा पाणी स्वतःच वर घेवून यावे.
राहण्यास- धोडपच्या दिशेने एक गुहा आहे त्यात ४-५ जणांची राहण्याची सोय होवू शकते.
खर्च: आम्ही कांचना- मंचना, धोडप आणि कन्हेरगड केला. एकूण खर्च प्रत्येकी १५००.
जेवण- जेवणाची सोय स्वताच करायची. खाली गावात सादडविहीर मध्ये सोय होऊ शकते.


prashantpardeshi.blogspot.com

कण्हेरगड


 कण्हेरगडाची ही सचित्र यात्रा

...लवकरच माहिती व छायाचित्रांच्या ओळी टाकल्या जातील.

तोवर या छायाचित्रांचा मोठ्या पडद्यावर आनंद घेता येऊ शकेल.

कण्हेरगडाची उभी खडी चढाई चढून गेल्यानंतर या नेढ्यातला विसावा काही औरच!

आणि त्याची ती प्रसिद्ध घसार्‍यांची उतराई केल्यानंतर मनाला मिळणारा विसावा!



                                                       कण्हेरगडाचे मोठे आव्हान...घसार्‍याची वाट!

the last remains of the baston on the facing side of Kanhergad

the dried water cistern on the top of Kanhergad fort.

Khadak payer...a picullar tree species that can survive on the hard rock...

relaxing in the needle hole of Kanhergad after a hectic round of the fort.

such s pleasing thing to be there...

these little girls from Kanherwadi act as guide and are barefoot.

a beautiful backdrop of the Satmala mountain range and the magestic Dhodap fort standing tall.

no one to look or maintain the water cistern

beautiful grass...no human can exploit.


on of the big remains on the Kanhergad fort top...seems to be a temple or the house of the chieftan 

water cistern guarded by grassy soldiers

is this must be the samadhi of the iconic warrior Ramji Pangera...seems to be prominent one.


though a small rock patch...good to take rope support. 


the cliff that is is broken in the western end is infact a manmade structure. 



 
कण्हेरगड
 
महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीत अनेक वीरांनी जन्म घेतला आणि आपल्या मराठी भूमीचे नाव मोठे केले. आजही या सर्व वीरांच्या अतुलनीय पराक्रमाच्या कथा आपण ऐकत असतो. अशाच एका वीराची कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. या वीररत्नाचे नाव आहे रामजी पांगेरा. कोण बरे हा रामजी ? कुठून आला? काय त्याचे कूळ ? तर रामजीच्या बाबतीत चक्क इतिहासानेही मूग गिळले आहेत. खरोखर किती दुर्दैवाची गोष्ट आहे ही! एवढा मोठा वीर झाला, पण त्याच्याबद्दल कुठेच काही माहिती उपलब्ध नाही. शिवकाळात सन १६७२च्या पर्यंत या रामजीचा अगदी कुठेच उल्लेख येत नाही. जो येतो तो थेट कण्हेरगडाच्या लढाईत.
सन १६७२च्या जानेवारी महिन्यातील ही गोष्ट !!! राजांचा मुलूख मारून फस्त करून त्यांचे गड काबीज करू, मग राजे ते काय करणार? असा दिलेरखानाचा मनसुबा होता. या विचाराने दिलेरखान व बहादूरखान हे दोघेही वेगवेगळ्या दिशेने स्वराज्यावर तुटून पडले. सातमाळा रांगेतील धोडपच्या वायव्येला असणाऱ्या कण्हेरगडावर त्यांचे लक्ष गेले. कळवण, नांदुरी यांच्या वाटेवर हा किल्ला आहे. या वेळी गडाचा किल्लेदार होता, 'रामजी पांगेरा', दिलेरखानाच्या सैन्यावर छापे मारून सुमारे ८०० मावळे कण्हेरगडाच्या आश्रयाला आले होते. गड फारच लहान होता, त्यामुळे तेथे असणारी साधनसामग्रीदेखील बेताचीच. त्यामुळे अर्थातच गड खूप दिवस भांडणे फार जिकिरीचे काम होते. मात्र किल्लेदार रामजी जातीचा जिद्दी मराठा. शरणागती हा शब्द त्याच्या शब्दकोशातच नव्हता. रामजीने ठरविले की, काही हशम सोबत घेऊन मोगलांवर तुटून पडायचे. मारता मारता मरून जायचे पण हार खायची नाही. मोगलांचे पाय पुन्हा या पावन भूमीला लागू द्यायचे नाहीत. कारण त्याला त्या
ही आठवत होता तो मुरारबाजीचा पुरंदरचा पराक्रम. याच दिलेरखानाशी लढता लवता मुरारबाजीला वीरगती प्राप्त झाली होती. तोच मुरारबाजी रामजीचा आदर्श होता. नियतीने सुद्धा आज परिस्थितीशी हातमिळवणी केली होती, कारण आज तोच खान रामजीला आव्हान देत गडाच्या पायथ्याशी उभा होता. पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार होती.
सुमारे सातशे मावळे रामजीच्या खांद्याला खांदा लावून या आगीत उतरायला तयार झाले. बघता बघता सकाळी गडाचे प्रवेशद्वार उघडले आणि पाण्याच्या एका प्रचंड लोंढ्याप्रमाणे रामजीचे मावळे दिलेरखानाच्या फौजेवर तुटून पडले. सर्वजण कमरेचे वस्त्र तेवढे ठेवून बाकी उघडे झाले होते. हातात नागव्या तलवारी घेऊन हरहर महादेवाची गर्जना करीत खानाच्या सैन्यावर तुटून पडले. ध्येय एकच- जेवढे मोगल मिळतील तेवढे कापणे आणि मारता मारता स्वतः खस्त होणे. याचे वर्णन बखरकारांनी केलेले आहे ते असे टिपरी जैसी सिमगियाची दणाणते. युद्धोन्माद चढलेले मराठे अक्षरशः नाचत मोगलांवर तुटून पडले. एकेकाला वीसवीस जखमा झाल्या. बहुतेकजण रणास आले. अंदाजे बाराशे मोगल मारले गेले. दिलेरखानाने रामजीचा हा पराक्रम पाहून तोंडातच बोटे घातली. मुरारबाजीनंतर सात वर्षांनी खान हे दुसरे आश्चर्य पाहत होता. गड पडला. रामजी हुतात्मा झाला.
सागरबुद्धी, धैर्यधुरंधर शक्तीबुद्धीचे ते नटसागर मरणासंगे ज्यांचे संगर आत्मबलाने दिपवतात ते ही धरती
शिवप्रभूच्या सामर्थ्यशाली स्वराज्याविषयी या रामजीचा केवढा हा थोर विश्वास ! शिवशाही हे सुराज्य, स्वधर्मासाठी उभे केलेले राज्य!! लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेले राज्य. या राज्याला ईश्वरीय अधिष्ठान लाभलेले होते. समाजातील सर्व लहान-थोरांचा निष्ठेचा, त्यागाचा आधार त्याला होता, याचे चांगले उदाहरण म्हणजे रामजीचे हौतात्म्य.
मोगलांनी किल्ला जिंकल्यानंतर हा किल्ला पुन्हा मराठ्यांकडे आलेला दिसतो. १७५३-५४ च्या सुमारास मुघलांकडून घेतलेला हा किल्ला नवाब सलाबतजंगला परत करून तशी पोचपावती घेण्याबाबत किल्ल्याच्या हवालदारास पेशवे बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेबांनी आदेश दिला होता. १७८९-९० च्या सुमारास कोळ्यांनी हा किल्ला
बंड करून आपल्या ताब्यात घेतला. इ.स. १८१८ मध्ये त्रिंबकचा पराभव केल्यानंतर जे सतरा मजबूत किल्ले ब्रिटिशांनी स्वतःकडे घेतले त्यांत कन्हेरगडाचा समावेश होता.
या सर्व घटनांचा साक्षीदार असलेला हा कण्हेरगड आहे नाशिकमधील सातमाळा डोंगररांगेत. गड तसा बाका. मुख्य सातमाळा रांगेच्या एका सुटावलेल्या डोंगरसोंडेवर हा किल्ला वसलेला आहे. या किल्ल्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथून धोडपपासून अचला-अहिवंतपर्यंतचा सर्व परिसर नजरेत भरतो. नाशिकहून नांदुरीच्या दिशेला निघाले की, किल्ल्यांची रांगच रांग दिसते, मध्येच एके ठिकाणी गाडीरस्ता नांदुरीच्या जवळ डोंगररांगेला दुभंगून पुढे कळवणला जातो. या नांदुरी-कळवण रस्त्यावर नांदुरीपासून ६ कि.मी.वर आठंबा नावाचे गाव लागते, आणि आपण या आठंब्याजवळ थांबायचे. जिथे गाव तिथं वस्ती, त्यामुळे या आठंबा गावात शिरण्याअगोदर एका नाल्यावर मोठा पूल बांधलेला आहे. या पुलाजवळून एक पायवाट थेट कण्हेरगडाच्या पायथ्याच्या गावात जाते. या गावाचे नाव आहे सादडविहीर. नाव थोडे अजबच आहे. कदाचित गावात विहिरींचे प्रमाण जास्त असल्यामुळे हे नाव पडले असावे. मात्र याची शहानिशा काही आम्हाला करता आली नाही. कण्हेरवाडी गावातूनही किल्ल्यावर येण्यास वाट आहे. कण्हेरवाडी हे गडाच्या पलीकडचे गाव आहे. कळवण ओतूरमार्गे कण्हेरवाडी गावात आपल्याला पोहोचता येते. कळवणहून कण्हेरवाडीला जाण्यास अनेक एस.टी. बसेस आहेत.
खुद्द किल्ल्याची एक डोंगरसोंड गावात उतरलेली आहे. या डोंगरससोंडेच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी लक्षात ठेवण्याची खूण म्हणजे, गावात एक नवीन बांधलेले मंदिर आहे. त्याच्या मागून गडावर जाणारी वाट आहे. चढ चांगला अंगावर येणारा असल्याने वाट दम खाऊन जाते. मंदिरापासून खिंडीपर्यंत पोहोचण्यास तासभर सहज लागतो. खिंडीतून सभोवार नजर टाकल्यावर कळवण खोऱ्यातील पसरलेल्या सर्व गावांचा नजारा पाहावयास मिळतो. इथून पुढे वर जाताना ७० अंशी डोंगरसोंडेच्या उतारावरील मुरुमाचा घसारा लागतो. चढताना तर आमचे कसेबसे निभावून गेले पण, उतरताना मात्र देव आठवला. वीस मिनिटांचा घसरगुंडीचा हा खेळ संपल्यावर आपण उजव्या हातास पुढे आलेल्या बुरुजाच्या खाली पोहोचतो. याला वळसा घालून गडाच्या माथ्यावर पोहोचायचे. बुरुजाचा वरचा भाग बऱ्याच प्रमाणात ढासळलेला आहे. तिथून आठंबा आणि सादडविहीरमधील सर्व घरे इवलीइवलीशी वाटतात. काही पावले पुढे गेल्यावर उजवीकडच्या कातळकड्यामध्ये एक नेढं दिसते. अर्थातच  २३ नेढे राजगडाच्या नेढ्याएवढे मोठे नसले, तरी त्याला पाहून राजगडाची आठवण मात्र निश्चितच येते. या नेढ्यात थोडा वेळ घालवून किल्ला भटकंतीला निघायचे.
 
एव्हाना सूर्य डोक्याच्या सरळ रेषेत वर आला असल्याने उन्हें चांगलीच भाजून  काढत होती. नेढ्याच्या पुढून एक वाट डावीकडे खाली उतरते, आपणही त्या वाटेने खाली उतरायला लागायचे. ही वाट थेट आपल्याला कातळात कोरलेल्या गुहांपाशी घेऊन जाते. या कपारीगुहेत ५ ते ६ लोकांची रहाण्याची सोय सहज होऊ शकते. एका चांदण्या रात्री इथे मुक्काम करायचा आणि मनभरून धोडपचे सौंदर्य पहायचे, असा बेत आखून आम्ही पुन्हा नेढ्यापाशी परतलो. गड हा पूर्व-पश्चिम पसरलेला आहे. आणि गडमाथाही बऱ्यापैकी सपाट आहे. पश्चिम बाजूच्या पठारावर मोठी पाण्याची टाकी आहेत. उन्हाळ्यात या टाक्यांमधील पाणी खाली सादडविहीर गावात आणले जाते. गडमाथ्यावर एक सुकलेला पाण्याचा तलाव आहे, यात केवळ पावसाळ्यातच पाणी असते. शिवकाळात या किल्ल्याचा उपयोग छोटे लष्करी ठाणे म्हणून केला जात असल्यामुळे गडमाथ्यावर काही चौथरे आणि वाड्याहुड्यांचे  अवशेष विखुरलेले दिसतात. गडाच्या मावळतीच्या अंगास एक उतरत गेलेली डोंगरसोंड आहे. ही सोंड डाईक भूरचनेसारखी आहे. या डोंगरसोंडेलादेखील धोडपच्या माचीसारखी एक मोठी खाच पडलेली आहे. त्यामुळे धोडपचा वाण नाही, पण गुण नक्कीच कण्हेरगडाला लागलेला दिसतो. वेळ असल्यास या खाचेपर्यंत जाऊन पाऊण तासात आरामात परतता येते.
संपूर्ण गड पाहिल्यावर एक खंत मात्र मनाला कायम खात राहते. एवढी मोठी लढाई झालेला हा किल्ला मात्र आजही ऊन, वारा आणि पावसाचा मारा खात, परिस्थितीशी सामना करीत उभा आहे. गडसंवर्धन तर सोडाच, पण कण्हेरगडाच्या युद्धाचे एक पर्व गाजविले अशा रामजीच्या नावाची एक साधीसुधी पाटी देखील इथे दिसत नाही. सरकारला तर त्याची कधी गरज देखील भासली नसावी? अन् यात भरीस भर म्हणजे आठंबा गावातील लोकांशी झालेल्या चर्चेअंती असे समजले की, या किल्ल्याला कण्हेरगड म्हणतात हे त्यांना ठाऊकच नाही. आणि एवढेच काय, इथं एखादा किल्ला आहे, हे देखील त्यांना माहिती नाही. मग रामजीबद्दल तर विचारणेच सोडा.
किल्ल्याची उंची : समुद्रसपाटीपासून ११०० मीटर (३६०८ फूट)
तालुका : कळवण
किल्ल्याची श्रेणी : मध्यम
किल्ल्याची इतर नावे कणेरा, कन्हेरा, कण्हेरगड
डोंगररांग : सातमाळा
पायथ्याची गावे : आठंबा, सादडविहीर, कण्हेरवाडी
पायथ्याच्या गावापासूनचे अंतर सादडविहीरपासून दोन तास.
कण्हेरवाडीपासून दोन तास.
जवळचे एस.टी. स्थानक : ओतूर, कळवण, नांदुरी
राहण्याची सोय : किल्ल्यावर राहण्यासाठी गुहा आहेत. यात पाच-सहा
लोकांची राहण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय : साडदविहीर गावामध्ये जेवणाची सोय होऊ शकते.
पिण्याचे पाणी : किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत.
जाण्यासाठी उत्तम कालावधी: जून ते मार्च.
किल्ला फिरायला लागणारा वेळ: सुमारे सव्वा तास.
जवळपासची गावे : ओतूर, कळवण, आठंबा, सादडविहीर



 

It took us 2 hrs to descend down completely to the Mulane village. We had small snack session there. We needed to reach Narul village. It is 3kms from Mulane. Luckily we got bus within 5 mins of waiting and alighted at the Narul phata. Narul phata to Kanherwadi(base village) is 4 km.
We kept our bags at a villagers house and started walking towards col from where we needed to start climbing the fort. Entire route is made up of scree.


Harsh heat made it worse for us. Fort is easy to climb. It took us 1.5 hrs to reach at the first nedhe( needle hole). I was completely drained. I was not willing to continue. So I decided to rest in the nedhe. All other also stayed there. It was amazing place with cool breeze. We ate there and rested for an hour.
Water tank at the entry point

first nedhe



I felt refreshed due to rest. Within 5 minuted we reached on the top. There are many remnants on the fort, one temple, water tanks and square shaped nedhe at the extreme end( this end resembles like vinchu kata of Lohgad ).




Structure resembling Vinchu kata

second nedhe


Spending some time, we started descending. It took us another hour to reach Kanherwadi and another 40 minutes to reach on the main road from where we gonna get the vehicle to reach our next destination ; which was Taharabad.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...