Saturday, April 11, 2026

मार्कंड्या

महाराष्ट्रातील काही किल्ल्यांना केवळ ऐतिहासिकच नव्हे तर अध्यात्मिक वारसा देखील लाभला आहे. नाशिक जिल्हा खरोखरच गड-किल्ल्यांच्या बाबतीत केवढा समृद्ध आहे हे तेथील किल्ले पाहिल्याशिवाय समजायचे नाही. महाराष्ट्राच्या इतर कोणत्याही जिल्ह्यात नसतील एवढे किल्ले केवळ एकट्या नाशिक जिल्ह्यात आहेत. दहा नाही, वीस नाही, तर एकूण मिळून ५८ डोंगरी किल्ल्यांचा मिळून हा नाशिक जिल्हा तयार झालेला आहे. सह्याद्रीच्या तीन मुख्य रांगा, तर ११ उपरांगा या नाशिक जिल्ह्यामधून एखाद्या वृक्षाच्या फांद्यांसारख्या पसरलेल्या आहेत. ऋषीमुनींचे वास्तव्य असलेला आणि प्रभुरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीतील अनेक किल्ल्यांना धार्मिक महत्त्व लाभलेले आहे.नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडापासून सुरु होणार्‍या डोंगररांगेत अनेक किल्ले वसलेले आहेत. सप्तशृंगीगड, मार्कंड्या, रवळ्याजावळ्या, धोडप इ. किल्ले या डोंगररांगेत येतात. सप्तशृंगी गडासमोरच दिसणार्‍या डोंगरावर मार्कंड्या किल्ला आहे. सप्तशृंगीगड व रावळ्याजावळ्या गडांपासून खिंडीमुळे वेगळ्या झालेल्या डोंगरावर पूरातन काळी मार्कंडेय ऋषींचे वास्तव्य होते. त्यामुळे हा डोंगर व त्यावरील किल्ला मार्कंड्या या नावाने ओळखला जातो. सातमाळा रांगेमधील किल्ले म्हणजे जणू काय माळेत गुंफलेले मणीच होय. मार्कंड्या किल्ला सातमाळ डोंगररांगेत आपल्या भोवती अनेक किल्ल्यांचा गोतावळा घेऊन ठाण मांडुन बसला आहे. सप्तशृंगी व रवळ्याजवळ्या या गडांच्या मध्यभागी असलेल्या या डोंगरावर प्राचीनकाळी मार्कंडेय ऋषींचे वास्तव्य असल्याचे मानले जाते व त्यामुळे हा डोंगर व किल्ला मार्कंड्या ऋषींच्या नावाने ओळखला जातो. इथे वास्तव्यास असलेले मार्कंडेय ऋषी सप्तशृंगी मातेला रोज स्तोत्रे आणि पुराणे ऐकवत असत अशी कथा अनेक ठिकाणी पुराणात आलेली आहे.मार्कंड ऋषींचे वास्तव्य होते, म्हणून त्यास मार्कंडेय पर्वत म्हणून ओळखले जाते. त्यामुळे सोमवती अमावस्या आणि ऋषिपंचमीला भाविकांची गर्दी होत असते.  





मार्कंड्या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल दोन ठिकाणी उल्लेख आलेला आहे. त्यातील पहिला उल्लेख तिसरा गोविंद राष्ट्रकूट याने चांदूर पर्वतश्रेणीतील मार्कड गडावरून काढलेला सन ८०८ चा ताम्रपट प्रसिद्ध झालेला आहे. त्यात त्याने या किल्ल्याचा उल्लेख मयूरखंडी या नावाने केलेला आहे. मार्कंडा किल्ल्याचा दुसरा उल्लेख जयरामपिण्ड्येकृत 'राधामाधवविलासचंपू' या ग्रंथात आलेला आहे. त्यात कवी जयराम पिण्ड्ये स्वतः म्हणतो, माझ्या वडिलांचे नाव गंभीरराव व आईचे नाव गंगाबिका असे असून तो जामदग्निवत्स, गात्रिय, पिंण्ड्ये आडनावाचा देशस्थ ब्राम्हण आहे. सप्तशृंगीच्या समोरील मार्कंडेयाच्या डोंगराखाली कवीचे गाव असल्याचे तो म्हणतो. मार्कंडेय पर्वत ते अहिवंतगडापर्यंत जे सात किल्ले आहेत त्यांची किल्लेदारी गंभीररावांकडे होती, असे देखील तो म्हणतो. यावरून दोन गोष्टी सिद्ध होतात. एक म्हणजे गंभीररावांकडे या परिसरातील किल्ल्यांची किल्लेदारी हाती, पण या गंभीररावांची कोणत्या सत्तेकडून इथे नेमणूक झाली होती ते मात्र निश्चितपणे सांगता येत नाही. हा जयराम पिण्ड्ये शहाजीराजांच्या समकालीन होता. त्यामुळे या गंभीररावांकडे साधारण १६०० च्या सुमारास या परिसरातील किल्ल्यांची किल्लेदारी असावी असे वाटते.
कवी म्हणतो, मार्कडेयाअहिवंतादिसप्तपर्वताध्यक्षतां अविरतं वितन्यमाना गंभरराय इत्यभिधाप्रसिद्धः स्वाभिमिर्नयनपथं नीतः भविष्यति।। ॥ चंडीपर्वतपुरता मार्कंडेयास्तिअ पर्वता विपुलः तत्राद्मदवेन जयरामेण।।
इ.स.आठव्या शतकातील ताम्रपटानुसार तिसरा राष्ट्रकुट राजा गोविंद याच्या ताब्यात असलेला हा किल्ला मयुरखंडी नावाने प्रसिद्ध होता. त्यानंतर इ.स.१६३५-३६ मध्ये शहाजहान याने निजामशाही सांभाळणाऱ्या शहाजी राजांचा पाडाव करण्यासाठी खानदौरान, खानजमान व दिलेरखान असे तीन सरदार पाठवले. दिलेरखानवर नाशिक-त्रिंबक भागातील किल्ले घेण्याची जबाबदारी होती. अलावर्दीखान या दिलेरखानाच्या हाताखालील सरदाराने इ.स.१६३६ मध्ये या परिसरातील सर्व किल्ले जिंकून घेतले. याबद्दलचा फारसीतील शिलालेख आपल्याला इंद्राई किल्ल्यावर पाहाता येतो. वणी– दिंडोरीच्या लढाई नंतर या परिसरातील किल्ले शिवाजीमहाराजांनी स्वराज्यात सामील केले त्यात मार्कड्या किल्ल्याचा समावेश होता. सभासद बखरीमधील वर्णनानुसार इ.स.१६७१ मध्ये दिलेरखान याने या किल्ल्यांना घातलेला वेढा मोरोपंत यांनी पाठवलेल्या सैन्याने उधळून लावला. त्यानंतर आलेल्या महाबतखानाने मात्र हा किल्ला जिंकून घेतला. पेशवे काळात हा किल्ला पुन्हा स्वराज्यात सामील झाला.
मार्कंड्या किल्ल्यावर जाण्यास दोन मार्ग आहेत. किल्ल्यावर जाणारा एक मार्ग सप्तशृंग गडावरून जातो. सप्तशृंग गडाच्या पठारावरून एक वाट थेट सप्तशृंग आणि मार्कंड्या किल्ल्याच्या खिंडीत उतरते. खिंडीतून डाव्या हाताला एक वाट मार्कंड्याच्या दिशेला जाते. मध्ये थोडे सोपे प्रस्तरारोहण करून पुन्हा डाव्या अंगास वळायचे. थोड्याच वेळात आपली वाट इंग्रजी 'यू' आकाराचे वळण घेऊन मार्कड्याच्या पठारावर पोहोचवते. या वाटेने मार्कड्या गाठायला तीन-साडेतीन तास सहज लागतात.
      किल्ल्यावर जाणारा दुसरा मार्ग 'बावापूर' नावाच्या गावातून जातो. पिंपरी मार्कंड हे जरी किल्ल्याच्या पायथ्याचे गाव असले तरी बाबापुर हे गाव किल्ल्याच्या जास्त जवळ आहे. सापुतारा रस्त्यावर नाशिकपासून ४० किलोमीटरवर वणी नावाचे गाव आहे. या गावातून एक रस्ता कळवण गावाकडे जातो. या रस्त्यावर वणीपासून ९ किमीवर बाबापूर नावाचे गाव आहे.  बाबापूरला जाण्यासाठी नाशिकहून वणी गाठायचे आणि वणीहून जगदंबा मातेच्या मंदिराशेजारून एक रस्ता कळवणला जातो. या मार्गावर प्रथम मुळाणे गाव लागते. मग तिथून चार कि.मी.वर बाबापूर गाव लागते. बाबापूरच्या वर पूर्व बाजूस दोन कि.मी.वर एक खिंड आहे. कळवणहून सकाळी, दुपारी आणि सायंकाळी अशा तीन एस.टी.च्या गाड्या बाबापूरमार्गे वणीला जातात.  बाबापुरहुन कळवणकडे जाणाऱ्या रस्त्यावर बाबापुर खिंड येथुन किल्ल्यांवर जाणारी वाट आहे. याशिवाय सप्तशृंगी गडावरून एक खिंड व त्यातील घसारा-चढण पार करत बालेकिल्ल्याखालील खिंडीत पोहचता येते. नाशीकहुन वणीमार्गे बाबापुर खिंड हे अंतर ५३ कि.मी.असुन वणीपासुन हे अंतर ९ कि.मी.आहे.मुळणबारी हे गावाचे नाव नसुन रवळ्या-जवळ्या आणि मार्कंड्या यांच्यामधील खिंड, बारी म्हणजेच खिंड.

वणीहुन बाबापूर मार्गे या खिंडीत आल्यास डावीकडील वाट मार्कंडेय किल्ल्यावर जाते तर उजवीकडील वाट रवळ्या जवळ्या खालील पठारावर जाते. खिंडीत वनखात्याने पर्यटन निवारा उभारला असुन वाहनतळाची सोय केली आहे. वनखात्याने मार्कंड्या किल्ल्याला पर्यटनस्थळ घोषित केले असुन पर्यटनस्थळ विकासासाठी मोठया प्रमाणात कामे केली आहेत.
गडावर जाणारी वाट संपुर्णपणे पायऱ्या व दगडांनी बांधण्यात आली असुन कड्यावरील वाटेला लोखंडी कठडे लावलेले आहेत तसेच वाटेच्या अवघड टप्प्यावर लोखंडी शिडी बसवलेली आहे. त्यामुळे गडावर जाणे जरी सोपे झाले असले तरी चालण्याची व चढ चढण्याची तयारी असायला हवी.  खिंडीतूनच खडी चढण चालू होते.  मधे मधे बसायला बाकडे केले आहेत. 

खिंडीतून गड चढायला सुरवात केल्यावर पाउण तासात उभी चढण व वाटेच्या शेवटच्या टप्प्यात असलेली लोखंडी शिडी पार करून आपण किल्ल्याखालील पठारावर म्हणजेच गडाच्या माचीवर येतो. शिडी चढताना या भागात शिल्लक असलेली गडाची तटबंदी दिसुन येते. गडाची माची साधारण २६५ एकर परिसरावर दक्षिणोत्तर पसरलेली आहे. पठाराला कातळकड्याचे नैसर्गीक सरंक्षण असल्याने काही ठिकाणी तुरळक तटबंदी दिसुन येते. सध्या या माचीवर काही साधु रहात असुन त्यांच्या आश्रमात रहाण्याची सोय होते पण जेवणाची सोय मात्र आपल्यालाच करावी लागते. पिण्याचे पाणी माचीवर असलेल्या रामकुंडात वर्षभर उपलब्ध असते. हे टाके व तुरळक तटबंदी वगळता माचीवर इतर कोणतेही अवशेष दिसत नाहीत.

खिंडीतून अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आपण तटबंदीपाशी पोहोचतो. किल्ल्याची ही पूर्व बाजूची तटबंदी असून आज ती थोड्याफार प्रमाणात शिल्लक आहे. पठारावर पोहोचल्यावर एक वाट उजव्या बाजूस मार्कंड्या किल्ल्याच्या दिशेला जाते, तर डावीकडची वाट दक्षिण बाजूच्या पठारावर जाते. या पठारावर तुरळक तटाबुरुजांचे अवशेष आहेत. ते पाहून आपण मार्कड्या किल्ल्याच्या दिशेला निघायचे. सुमारे वीस मिनिटे चालत गेल्यानंतर आपण करवंदीच्या जंगलामध्ये प्रवेश करतो. या जंगलामध्ये प्रवेश करण्यापूर्वी एक वाट किल्ल्याच्या पश्चिम बाजूस जाते. सध्या या किल्ल्यावर काही साधूंचे वास्तव्य असल्यामुळे इथल्या परिसरात काही आश्रम आहेत. गडाची माची साधारण २६५ एकर परिसरावर दक्षिणोत्तर पसरलेली आहे. पठाराला कातळकड्याचे नैसर्गीक सरंक्षण असल्याने काही ठिकाणी तुरळक तटबंदी दिसुन येते. सध्या या माचीवर काही साधु रहात असुन त्यांच्या आश्रमात रहाण्याची सोय होते पण जेवणाची सोय मात्र आपल्यालाच करावी लागते. पिण्याचे पाणी माचीवर असलेल्या रामकुंडात वर्षभर उपलब्ध असते. हे टाके व तुरळक तटबंदी वगळता माचीवर इतर कोणतेही अवशेष दिसत नाहीत. आपल्याला थेट बालेकिल्ल्याकडे जायचे असेल तर मात्र तिकडे न वळता सरळ जंगलात प्रवेश करायचा. जंगलातील वाट, किल्ला डाव्या हातास ठेवून पलीकडे किल्ल्याला उत्तर बाजूस वळसा घालून जाते. या वाटेला मध्ये एके ठिकाणी छेद देऊन एक वाट डाव्या बाजूस मार्कंडेय ऋषींच्या शिखराकडे वळते आणि सरळ जाणारी वाट पठारावरील काही आश्रमांपाशी जाते.
 पठारावरून समोर पहिले असता बालेकिल्ल्याच्या उजव्या सोंडेखाली नव्याने बांधलेले एक मंदिर दिसते.बालेकिल्ल्यावर जाणारी वाट या मंदिराकडूनच वर जाते. माचीवरील आश्रमाच्या मागील बाजुने किल्ल्याकडे जाताना वाटेत दगडात बांधलेल्या काही पायर्याक लागतात. या वाटेने दहा मिनिटांची चढण चढुन आपण माचीवरून पाहिलेल्या मंदीराकडे पोहोचतो. नव्याने बांधलेल्या या महाकाली मंदिराच्या डाव्या बाजुच्या खिंडीतून बालेकिल्ल्यावर जाणारी मूळ वाट आहे पण हि वाट उभ्या चढाची असुन काही ठिकाणी कोसळल्याने मंदिराच्या उजव्या बाजुने गडावर जाण्यासाठी नवीन वाट बनवली आहे. 
या वाटेने पुढे आल्यावर कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात. पुढे या वाटेवर डावीकडे एका कातळ कड्याखाली जमीनीच्या पातळीत दोन लहान गुहा कोरलेल्या आहेत. 
अगदी जवळ गेल्याशिवाय या गुहा दिसत नाही. या गुहेत एकावेळी एकच माणुस रांगत जाऊ शकतो. यातील उजवी कडील गुहा सरळ जाऊन डावीकडे वळते तर डावीकडील गुहा सरळ जाऊन डावीकडे व उजवीकडे दोन्ही बाजुला वळते. या गुहा आतील बाजुने एकमेकांशी जोडल्या असाव्यात पण सध्या आत दगडगोटे पडले असल्याने अनुमान करणे कठीण आहे. या गुहा ध्यान गुंफा म्हणुन ओळखल्या जातात. वाटेच्या पुढील भागात मंदिराकडून येणारी जुनी वाट या वाटेला येऊन मिळते. येथे समोर उजव्या बाजुच्या डोंगरावर कोसळलेला बुरुजाचा पाया दिसतो. येथुन पुढे उभा चढ चढुन आपण बालेकिल्ला व त्या शेजारी असलेल्या टेकडीच्या खिंडीत पोहोचतो. येथुन समोर सप्तशृंगीगड केवळ हाकेच्या अंतरावर आहे. कधीकाळी तटाबुरुजांनी बंदिस्त असलेली हि खिंड आज केवळ त्यांच्या अवशेषरुपात शिल्लक आहे. खिंडीतून उजवीकडे जाणारी वाट टेकडीवर डावीकडील वाट बालेकिल्ल्यावर तर सरळ उतरत जाणारी वाट सप्तशृंगी गडावर जाते. बाजुच्या टेकडीवर कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. येथुन डाव्या बाजूने कातळात खोदलेल्या वाटेने माथ्यावर जाताना तीन टप्पे आहेत. वाटेच्या सुरवातीला दुसऱ्या टोकावर बाबापुरच्या दिशेने असलेल्या बुरुजाच्या अलीकडे एका वास्तुचा चौथरा दिसुन येतो. येथुन वर आल्यावर बालेकिल्ल्याचा उध्वस्त पश्चिमाभिमुख दरवाजा व त्या शेजारी असलेला बुरुज व तटबंदी पहायला मिळते. बालेकिल्ल्याच्या पहिल्या टप्प्यावर एका घुमटीखाली कमंडलू तीर्थ नावाचे कोरीव टाके आहे. सध्या हे टाके गाळाने भरले असुन यात केवळ पावसाळ्यातच पिण्याचे पाणी उपलब्ध असते. या घुमटीच्या उजव्या बाजूस काही अंतरावर खडकात खोदलेले पाण्याचे एक टाके असुन डाव्या बाजुस एक कोरीव दगड व नव्याने बांधलेला आश्रम आहे. वाटेच्या दुसऱ्या टप्प्यावर शेवाळलेल्या पाण्याने भरलेली खडकात कोरलेली तीन टाकी पहायला मिळतात. त्यांच्या बाजूलाच एक सुकलेल टाक आहे. या टाक्यासमोरील झाडाखाली एक नागशिल्प पहायला मिळते. 
वाटेच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजे गडाच्या सर्वोच्च टोकावर मार्कंडेश्वराच मंदिर आहे. आपल्याला शंकर तसंच दत्ताची मूर्तींचे दर्शन घडून येते. या आश्रमात रहाण्याची व खाण्या सोय देखील होऊ शकते कारण मंदिरातील पुजारी व सेवेकरी यांचा आश्रमामध्ये मुक्काम आहे .
Nashik News India's only temple of Markandey rushi near Saptshrungi Fort of Nashik, Know History? Maharashtra news Nashik Saptshrungi : नाशिकच्या सप्तशृंगी गडाजवळचा मार्कंडेय पर्वत, मार्कंड ऋषींचे भारतातील एकमेव मंदिर, असा आहे इतिहास?





हे मंदिर किल्ल्यावरील सर्वांत उंच टोकावर बांधलेले आहे. विशेष म्हणजे मंदिराचे प्रवेशद्वार आणि सप्तशृंग गडावरच्या देवीच्या मंदिराचे प्रवेशद्वार एकाच रेषेत आहेत.
मार्केंडे्वर मंदिराच्या सर्वोच्च शिखरावर जाण्यासाठी आश्रमाच्या डावीकडून जावे लागते. येथे आपल्याला मार्केंडेय ऋषींची समाधी सोबततच शिवलिंगाचे देखील दर्शन घडते. या मंदिरामध्ये सणा-सुदीच्या दिवशी अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाते.
या ठिकाणी किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची ४१३० फुट असुन बालेकिल्ल्याचा माथा ५ एकर परिसरावर पसरलेला आहे. 
या गडाच्या पश्चिमेला सप्तश्रृंगी मंदीर तर पश्चिमेला सप्तशृंगीगड,अचला,अहीवंत तर पुर्वेला रवळ्या-जवळ्या, धोडप,  कण्हेरगड, मोहनदर, कंचना, कोळधेर, राजधेर, इंद्राई अशी संपुर्ण सातमाळ डोंगररांगच नजरेस पडते, तसेच बालगण तालुक्यातील जैन धर्मीयांची तीर्थस्थान असलेल्या मांगी-तुंगी किल्ले आणि साल्हेर-सालोटा सारखी शिखरे पहावयास मिळतात. 

मार्कंड्यच्या सर्वोच्च शिखराच्या डावीकडच्या मार्गाने आपल्याला सप्तश्रृंगी मंदिराच्या दिशेने पण जाता येऊ शकते. तटबंदी नसल्यामुळे चालताना फक्त काही प्रमाणात खबारदारी बाळगावी . गडावरुन विहंगम दृश्याचे दर्शन होत असल्यामुळे फोटोग्राफर्सना “उत्तम क्लिक्स” मिळू शकतात. जर तुम्हाला दोन दिवसांची सुट्टी असेल तर मार्कंडे्य, रवळ्या-जवळ्या आणि सप्तश्रृंगी मंदीराला एकत्रितपणे भेट देता येऊ शकते. त्यामुळे ट्रेकिंग सोबतच अध्यात्माचा आनंद तुम्ही घेऊ शकता. माथ्यावरून रवळ्या जवळ्या,. बालेकिल्ल्यातुन पठारावर आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. पठारावरून बालेकिल्ला फिरण्यास एक तास पुरेसा होतो.

 संदर्भ :-

१) नाशिक जिल्हा गॅझेटीयर
२) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स
३) दुर्गभ्रमंती नाशिकची - अमित बोरोले
४)  शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा- सतिश अक्कल्कोट
५) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
६) www.trekshitiz.com हि वेबसाईट
७)  www.durgbharari.in   हि वेबसाईट
८ ) thinkmaharashtra.com
























 
 गिरीदुर्ग नाशिक अजंठा सातमाळ
🏔️
श्रेणी नुसार स्तर
मध्यम
📏
समुद्र सपाटीपासून उंची (फ़ूट)
4383
🏰
किल्ल्याचा प्रकार
गिरीदुर्ग
📍
जिल्हा
नाशिक

किल्ल्याची छायाचित्रे

किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा

मुख्य छायाचित्र
Markandeya

Markandeya

सर्व छायाचित्रे पहा

नकाशे व मार्ग

किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा

सध्या कोणतेही नकाशे उपलब्ध नाहीत

सर्व नकाशांचा संग्रह पहा

प्रस्तावना

नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडापासून सुरु होणार्‍या डोंगररांगेत अनेक किल्ले वसलेले आहेत. सप्तशृंगीगड, मार्कंड्या, रवळ्याजावळ्या, धोडप इ. किल्ले या डोंगररांगेत येतात. सप्तशृंगी गडासमोरच दिसणार्‍या डोंगरावर मार्कंड्या किल्ला आहे. सप्तशृंगीगड व रावळ्याजावळ्या गडांपासून खिंडीमुळे वेगळ्या झालेल्या डोंगरावर पूरातन काळी मार्कंडेय ऋषींचे वास्तव्य होते. त्यामुळे हा डोंगर व त्यावरील किल्ला मार्कंड्या या नावाने ओळखला जातो.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

शहाजाहानच्या काळात दक्षिणसुभा औरंगजेबाच्या ताब्यात होता. औरंगजेबाने अलिवर्दीखानाला नाशिक जिल्ह्यातील किल्ले जिकण्याचा हूकूम दिला. इ.स. १६३९ मध्ये अलिवर्दी खानाने वर उल्लेख केलेले सर्व किल्ले जिंकून घेतले. याबद्दलचा फारसीतील शिलालेख आपल्याला इंद्राई किल्ल्यावर पाहाता येतो.
वणी - दिंडोरीच्या लढाईनंतर नाशिक परिसरातील किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले. त्यात मार्कंड्याचा समावेश होता. महाराजांच्या निधनानंतर मुघलांनी हे किल्ले जिंकून घेतले.

महत्त्वाची ठिकाणे

मार्कंड्या व रवळ्या - जावळ्या किल्ल्याच्या मध्ये जी खिंड आहे, ती मुलनबारी या नावाने ओळखतात. या खिंडीतून मार्कंड्या गडावर चढताना पहिला टप्पा पार पडल्यावर आपण पठारावर येतो, ही गडाची माची आहे. माचीवरुन बालेकिल्ल्याकडे जाण्यासाठी असलेल्या वाटेवर दगडात कोरलेल्या; बांधलेल्या पायर्‍या दिसतात. या वाटेवरच डावीकडे एका कातळकड्या खाली कातळात कोरलेल्या दोन गुहा दिसतात. त्यांना "ध्यान गुंफा" म्हणतात. येथून वर चढताना उजव्या हाताला बुरुजाचे व डाव्या हाताला तटबंदीचे अवशेष दिसतात. हा पायर्‍यांचा टप्पा संपला की, समोरच सप्तशृंगी गड दिसतो. तो पाहून , डाव्या बाजूच्या कातळात खोदलेल्या वाटेने बालेकिल्ल्यावर जाता येते. येथे पहिल्या टप्प्यावर एका घुमटी खाली कोरलेले टाकं पाहाता येते. या टाक्याला "कमंडलू तीर्थ" म्हणतात. या टाक्यात पिण्याचे पाणी बारामाही असते. दुसर्‍या टप्प्यावर एका रांगेत खोदलेली तीन पाण्याची टाकी पाहायला मिळतात. त्यांच्या बाजूलाच एक सुकलेल टाक आहे. गडाच्या सर्वोच्च टोकावर मार्कंडेश्वराच मंदिर आहे. मंदिरात मार्कंडेय ऋषींची मूर्ती व शिवलींग आहे. गडाच्या या सर्वोच्च टोकावरुन सप्तशृंगी गड, रवळ्या जावळ्या, धोडप हे किल्ले दिसतात.

कसे पोहोचावे

नाशिक - सापूतारा रस्त्यावर नाशिकपासून ४० किमी वर वणी गाव आहे. वणी गावातून एक रस्ता कळवण गावाकडे जातो. या रस्त्यावर वणी पासून ९ किमी वर बाबापूर नावाचे गाव आहे. हे मार्कंड्या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. या गावापासून रस्ता वर चढत जाऊन २ किमी वरील मुळाणे खिंडीत येतो. येथ पर्यंत एसटीने किंवा खाजगी वहानाने जाता येते. या खिंडीतून कळवण गावाकडे जाताना उजव्या बाजूची वाट रवळ्या - जावळ्याला तर डाव्या बाजूची मार्कंड्या किल्ल्यावर जाते.
याशिवाय सप्तशृंगीचा डोंगर व मार्कंड्या यांच्या मधील खिंडीतूनही खडया चढणीच्या वाटेने गडावर जाता येते.

ट्रेकसाठी लागणारा वेळ

⏱️ मुळणबारी (मुळाणे) खिंडीतून १ तास लागतो.

सुविधा व सोयी

🏠

निवास व्यवस्था

गडावर रहाण्याची सोय नाही.

🍽️

अन्न व्यवस्था

जेवणाची सोय स्वत: करावी.

💧

पाणी उपलब्धता

गडावरील कमंडलू तीर्थ या टाक्यात बारमाही पिण्याचे पाणी आहे.

सर्वोत्तम काळ

🌤️ N/A

जवळील गावे

बाबापूर.

 
 
 
 

उंची : ४१३० फुट

श्रेणी : मध्यम

महाराष्ट्रातील काही किल्ल्यांना केवळ ऐतिहासिकच नव्हे तर अध्यात्मिक वारसा देखील लाभला आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात असलेला मार्कंड्या किल्ला सातमाळ डोंगररांगेत आपल्या भोवती अनेक किल्ल्यांचा गोतावळा घेऊन ठाण मांडुन बसला आहे. सप्तशृंगी व रवळ्याजवळ्या या गडांच्या मध्यभागी असलेल्या या डोंगरावर प्राचीनकाळी मार्कंडेय ऋषींचे वास्तव्य असल्याचे मानले जाते व त्यामुळे हा डोंगर व किल्ला मार्कंड्या ऋषींच्या नावाने ओळखला जातो. पिंपरी मार्कंड हे जरी किल्ल्याच्या पायथ्याचे गाव असले तरी बाबापुर हे गाव किल्ल्याच्या जास्त जवळ आहे. बाबापुरहुन कळवणकडे जाणाऱ्या रस्त्यावर बाबापुर खिंड येथुन किल्ल्यांवर जाणारी वाट आहे. याशिवाय सप्तशृंगी गडावरून एक खिंड व त्यातील घसारा-चढण पार करत बालेकिल्ल्याखालील खिंडीत पोहचता येते. नाशीकहुन वणीमार्गे बाबापुर खिंड हे अंतर ५३ कि.मी.असुन वणीपासुन हे अंतर ९ कि.मी.आहे. वणीहुन बाबापूर मार्गे या खिंडीत आल्यास डावीकडील वाट मार्कंडेय किल्ल्यावर जाते तर उजवीकडील वाट रवळ्या जवळ्या खालील पठारावर जाते. खिंडीत वनखात्याने पर्यटन निवारा उभारला असुन वाहनतळाची सोय केली आहे. वनखात्याने मार्कंड्या किल्ल्याला पर्यटनस्थळ घोषित केले असुन पर्यटनस्थळ विकासासाठी मोठया प्रमाणात कामे केली आहेत. गडावर जाणारी वाट संपुर्णपणे पायऱ्या व दगडांनी बांधण्यात आली असुन कड्यावरील वाटेला लोखंडी कठडे लावलेले आहेत तसेच वाटेच्या अवघड टप्प्यावर लोखंडी शिडी बसवलेली आहे. त्यामुळे गडावर जाणे जरी सोपे झाले असले तरी चालण्याची व चढ चढण्याची तयारी असायला हवी. खिंडीतून गड चढायला सुरवात केल्यावर पाउण तासात उभी चढण व वाटेच्या शेवटच्या टप्प्यात असलेली लोखंडी शिडी पार करून आपण किल्ल्याखालील पठारावर म्हणजेच गडाच्या माचीवर येतो. शिडी चढताना या भागात शिल्लक असलेली गडाची तटबंदी दिसुन येते. गडाची माची साधारण २६५ एकर परिसरावर दक्षिणोत्तर पसरलेली आहे. पठाराला कातळकड्याचे नैसर्गीक सरंक्षण असल्याने काही ठिकाणी तुरळक तटबंदी दिसुन येते. सध्या या माचीवर काही साधु रहात असुन त्यांच्या आश्रमात रहाण्याची सोय होते पण जेवणाची सोय मात्र आपल्यालाच करावी लागते. पिण्याचे पाणी माचीवर असलेल्या रामकुंडात वर्षभर उपलब्ध असते. हे टाके व तुरळक तटबंदी वगळता माचीवर इतर कोणतेही अवशेष दिसत नाहीत. पठारावरून समोर पहिले असता बालेकिल्ल्याच्या उजव्या सोंडेखाली नव्याने बांधलेले एक मंदिर दिसते.बालेकिल्ल्यावर जाणारी वाट या मंदिराकडूनच वर जाते. माचीवरील आश्रमाच्या मागील बाजुने किल्ल्याकडे जाताना वाटेत दगडात बांधलेल्या काही पायर्याक लागतात. या वाटेने दहा मिनिटांची चढण चढुन आपण माचीवरून पाहिलेल्या मंदीराकडे पोहोचतो. नव्याने बांधलेल्या या महाकाली मंदिराच्या डाव्या बाजुच्या खिंडीतून बालेकिल्ल्यावर जाणारी मूळ वाट आहे पण हि वाट उभ्या चढाची असुन काही ठिकाणी कोसळल्याने मंदिराच्या उजव्या बाजुने गडावर जाण्यासाठी नवीन वाट बनवली आहे. या वाटेने पुढे आल्यावर कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात. पुढे या वाटेवर डावीकडे एका कातळ कड्याखाली जमीनीच्या पातळीत दोन लहान गुहा कोरलेल्या आहेत. अगदी जवळ गेल्याशिवाय या गुहा दिसत नाही. या गुहेत एकावेळी एकच माणुस रांगत जाऊ शकतो. यातील उजवी कडील गुहा सरळ जाऊन डावीकडे वळते तर डावीकडील गुहा सरळ जाऊन डावीकडे व उजवीकडे दोन्ही बाजुला वळते. या गुहा आतील बाजुने एकमेकांशी जोडल्या असाव्यात पण सध्या आत दगडगोटे पडले असल्याने अनुमान करणे कठीण आहे. या गुहा ध्यान गुंफा म्हणुन ओळखल्या जातात. वाटेच्या पुढील भागात मंदिराकडून येणारी जुनी वाट या वाटेला येऊन मिळते. येथे समोर उजव्या बाजुच्या डोंगरावर कोसळलेला बुरुजाचा पाया दिसतो. येथुन पुढे उभा चढ चढुन आपण बालेकिल्ला व त्या शेजारी असलेल्या टेकडीच्या खिंडीत पोहोचतो. येथुन समोर सप्तशृंगीगड केवळ हाकेच्या अंतरावर आहे. कधीकाळी तटाबुरुजांनी बंदिस्त असलेली हि खिंड आज केवळ त्यांच्या अवशेषरुपात शिल्लक आहे. खिंडीतून उजवीकडे जाणारी वाट टेकडीवर डावीकडील वाट बालेकिल्ल्यावर तर सरळ उतरत जाणारी वाट सप्तशृंगी गडावर जाते. बाजुच्या टेकडीवर कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. येथुन डाव्या बाजूने कातळात खोदलेल्या वाटेने माथ्यावर जाताना तीन टप्पे आहेत. वाटेच्या सुरवातीला दुसऱ्या टोकावर बाबापुरच्या दिशेने असलेल्या बुरुजाच्या अलीकडे एका वास्तुचा चौथरा दिसुन येतो. येथुन वर आल्यावर बालेकिल्ल्याचा उध्वस्त पश्चिमाभिमुख दरवाजा व त्या शेजारी असलेला बुरुज व तटबंदी पहायला मिळते. बालेकिल्ल्याच्या पहिल्या टप्प्यावर एका घुमटीखाली कमंडलू तीर्थ नावाचे कोरीव टाके आहे. सध्या हे टाके गाळाने भरले असुन यात केवळ पावसाळ्यातच पिण्याचे पाणी उपलब्ध असते. या घुमटीच्या उजव्या बाजूस काही अंतरावर खडकात खोदलेले पाण्याचे एक टाके असुन डाव्या बाजुस एक कोरीव दगड व नव्याने बांधलेला आश्रम आहे. वाटेच्या दुसऱ्या टप्प्यावर शेवाळलेल्या पाण्याने भरलेली खडकात कोरलेली तीन टाकी पहायला मिळतात. त्यांच्या बाजूलाच एक सुकलेल टाक आहे. या टाक्यासमोरील झाडाखाली एक नागशिल्प पहायला मिळते. वाटेच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजे गडाच्या सर्वोच्च टोकावर मार्कंडेश्वराच मंदिर आहे. मंदिरात मार्कंडेय ऋषींची मूर्ती व शिवलींग असुन बाहेरील बाजूस नंदी आहे. या ठिकाणी किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची ४१३० फुट असुन बालेकिल्ल्याचा माथा ५ एकर परिसरावर पसरलेला आहे. माथ्यावरून पश्चिमेला सप्तशृंगीगड,अचला,अहीवंत तर पुर्वेला रवळ्या जवळ्या, कण्हेरगड, मोहनदर, धोडप, कंचना, कोळधेर, राजधेर, इंद्राई अशी संपुर्ण सातमाळ डोंगररांगच नजरेस पडते. बालेकिल्ल्यातुन पठारावर आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. पठारावरून बालेकिल्ला फिरण्यास एक तास पुरेसा होतो. इ.स.आठव्या शतकातील ताम्रपटानुसार तिसरा राष्ट्रकुट राजा गोविंद याच्या ताब्यात असलेला हा किल्ला मयुरखंडी नावाने प्रसिद्ध होता. त्यानंतर इ.स.१६३५-३६ मध्ये शहाजहान याने निजामशाही सांभाळणाऱ्या शहाजी राजांचा पाडाव करण्यासाठी खानदौरान, खानजमान व दिलेरखान असे तीन सरदार पाठवले. दिलेरखानवर नाशिक-त्रिंबक भागातील किल्ले घेण्याची जबाबदारी होती. अलावर्दीखान या दिलेरखानाच्या हाताखालील सरदाराने इ.स.१६३६ मध्ये या परिसरातील सर्व किल्ले जिंकून घेतले. याबद्दलचा फारसीतील शिलालेख आपल्याला इंद्राई किल्ल्यावर पाहाता येतो. वणी– दिंडोरीच्या लढाई नंतर या परिसरातील किल्ले शिवाजीमहाराजांनी स्वराज्यात सामील केले त्यात मार्कड्या किल्ल्याचा समावेश होता. सभासद बखरीमधील वर्णनानुसार इ.स.१६७१ मध्ये दिलेरखान याने या किल्ल्यांना घातलेला वेढा मोरोपंत यांनी पाठवलेल्या सैन्याने उधळून लावला. त्यानंतर आलेल्या महाबतखानाने मात्र हा किल्ला जिंकून घेतला. पेशवे काळात हा किल्ला पुन्हा स्वराज्यात सामील झाला.
 
 .





मार्कंड्या


मार्कंडेय ऋषीमुनींचा "मार्कंड्या"!!! या गडावर पुरातन काळी मार्कंडेय ऋषींचे वास्तव्य होते म्हणुन हा किल्ला मार्कंड्या नावाने ओळखला जातो. गडाच्या बालेकिल्ल्यावर मार्कंडेय ऋषींचा प्रसिद्ध आश्रम आहे. सापुतारा रस्त्यावर नाशिकपासून ४० किलोमीटरवर वणी नावाचे गाव आहे. या गावातून एक रस्ता कळवण गावाकडे जातो. या रस्त्यावर वणीपासून ९ किमीवर बाबापूर नावाचे गाव आहे. हे मार्कंड्या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. या गावापासून रस्ता वर चढत जाऊन २ किमीवरील मुळणबारी खिंडीत येतो. खासगी वाहन असल्यास आपण मुळणबारी खिंडीत गाडी लावू शकतो. या खिंडीतून कळवण गावाकडे जाताना उजव्या बाजूची वाट रवळ्याजावळ्याला तर डाव्या बाजूची मार्कंड्या किल्ल्यावर जाते.शहाजहानच्या काळात दक्षिणसुभा औरंगजेबाच्या ताब्यात होता. औरंगजेबाने अलिवर्दीखानाला नाशिक जिल्ह्यातील किल्ले जिकण्याचा हूकूम दिला. इ.स. १६३९ मध्ये अलिवर्दी खानाने सप्तशृंगीगड, मार्कंड्या, रवळ्याजावळ्या, धोडप हे सर्व किल्ले जिंकून घेतले. याबद्दलचा फारसीतील शिलालेख इंद्राई किल्ल्यावर पाहता येतो. वणी दिंडोरीच्या लढाईनंतर नाशिक परिसरातील किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले. त्यात मार्कंड्याचा समावेश होता. महाराजांच्या निधनानंतर मोगलांनी हे किल्ले परत जिंकले. अखेरीस पुन्हा एकदा मार्कंड्या मराठ्यांच्या ताब्यात आला.


सादडविहीर वरून आम्ही निघालो आता जेवायची वेळ झाली होती. सादडविहीर ते मुळणबारी खिंड अंतर साधारण १० किमी आहे. वाटेत कुठेही हॉटेल नसल्याने आम्ही कळवण ला उलटे गेलो आणि जेवण केले. परत येऊन मुळणबारी मध्ये गाडी लावली. मुळणबारी हे गावाचे नाव नसुन रवळ्या-जवळ्या आणि मार्कंड्या यांच्यामधील खिंड, बारी म्हणजेच खिंड. खिंडीत परत पोचायला आम्हाला १ वाजला. खिंडीतूनच खडी चढण चालू होते. दगडांचा राजमार्ग केला आहे, दोन्हीबाजुंना रेलिंग केले आहे तसेच मधे मधे बसायला बाकडे केले आहेत. गडाच्या पहिल्या टप्प्यात एक शंकराचे छोटे मंदिर पत्र्याच्या शेडमध्ये बनवले आहे आणि पादुका आहेत. येथून धोडप चे उत्तम दर्शन होते. तसेच राहिल्या किल्ल्याचे दर्शन होते. येथून पुढे गेल्यावर आपण गडाच्या पदरात असलेल्या पठारावर पोचतो. सरळ पुढे चालत आल्यावर कातळात बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या पायऱ्या आपल्या नजरेस पडतात. येथून पहिल्या टप्प्यात दोन गुहा कोरल्या आहेत यांना "ध्यान गुंफा" म्हणतात.





या गुहांपाशी आम्ही जरावेळ विश्रांती घेतली आणि पुढे पायऱ्यांच्या मार्गे निघालो. येथे तुलेल्या तटबंदीचे अवशेष नजरेस पडतात तसेच उजच्या बाजुला बुरुजांचे अवशेष दिसतात. खिंडीमध्ये पोचल्यावर समोर सप्तशृंगी गडाचे दर्शन होते. हे पाहुन आपण कातळकोरीव पायऱ्यांनी बालेकिल्ल्याकडे जावे. येथे पहिल्या टप्प्यात एक नव्याने उभारलेला आश्रम आहे. तसेच घुमटाखाली एक टाके आहे. या टाक्याला "शिवकुंड" अथवा "कमंडलु तीर्थ" म्हणतात. या टाक्याला बारमाही पिण्याजोगे पाणी असते. तसेच सामोर एका झाडाखाली गणेशाची, श्रीकृष्णाची आणि शंकराची मूर्ती आहे. थोडंस वर चढुन गेल्यावर ३ पाण्याची टाके आहेत पण यातील पाणी खराब आहे. बालेकिल्ल्याच्या माथ्यावर मार्कंडेय ऋषींचे मंदिर आहे. मंदिरासमोर धातूचा नंदी आहे तसेच मंदिरामध्ये ऋषींची मुर्ती, पादुका आणि शिवलिंग आहे. या मंदिरामध्ये एक साधूबाबा असतात. येथे आम्ही जरा वेळ अराम केला आणि बाहेर पडलो. गडाच्या या सर्वोच्च माथ्यावरून धोडप, सप्तशृंगी, रवळ्या-जवळ्या हा प्रदेश न्याहाळता येतो तसेच वातावरण साफ असल्यास सालेर-मुल्हेर डोंगररांग (डोलबारी रांग) दिसते.

मार्कंड्याच्या बालेकिल्ल्यावरून दिसणारे हे सर्व दृश्य आम्ही मनात साठवलं आणि गाद उतरायला सुरुवात केली. बालेकिल्यापर्येंत पोहोचायला आम्हाला ३ वाजले होते. आता बऱ्यापैकी ऊन होते. गडाच्या पदरात असलेल्या पठारावर सद्गुरू महाराजांचा एक मोठा आश्रम बांधण्यात आला आहे, येथे १०० लोकांची राहायची तसेच जेवणाची सोय होते.या म्हाला थोडा उशीर झाल्याने प्रसादाचा स्वादास्वाद घेता आला नाही. या आश्रमाशेजारीचे सप्तशृंगीचे नव्याने मंदिर उभारले आहे. आश्रमाच्या पटांगणात सद्गुरू रंगनाथ महाराज यांची समाधी आहे.आश्रमामध्ये शिरल्यावर सभामंडपात तीन मंदिरे बनवली आहेत आणि त्या समोर एक तुळशी वृंदावन आहे. एका मंदिरात श्रीकृष्ण, दुसऱ्या मंदिरात गणपती आणि तिसऱ्या मंदिरात श्रीदत्त आहेत. आश्रमाच्या मुख्य दालनात सद्गुरू महाराजांची मुर्ती व इतर देवांचे फोटो आहेत. बाहेर एक शनीची मूर्ती आहे तसेच त्यासमोर  शंकर, नंदी,गणपती आणि हनुमंताचे मंदिर आहे.




आता आम्ही परतीच्या वाटेल लागलो. आत्तापार्येंत दुपारचे ४ वाजले होते, आमच्या हातात बराच वेळ शिल्लक होता. ४.३० वाजता आम्ही मुळणबारी खिंडीत पोचलो. सर्व सामान आवरून आम्ही मुळाणे गावाकडे निघालो. मुळणबारी खिंड ते मुळाणे हे फक्त ४ किमीचे अंतर आहे. आज आमचा मुक्काम मुळाणे गावात होता. ५ वाजता आम्ही मुळाणेमध्ये पोचलो,डांबरी रस्त्याला लागुन गावाच्या सुरुवातीला एक शाळा आहे. या गावात सुभाष ठाकरे यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्याकडुन शाळेची चावी घेतली. शाळेच्या समोरच धोडप दिसत होता, समोर पाण्याचा हापसा होता, अजून काय सुख पाहिजे आयुष्यात. आम्ही सगळ्यात पहिले झोपायची तयारी करून ठेवली , थंडी एवढी होती की आम्हाला शाळेतही टेन्ट उघडावा लागला, शिधा साहित्य बाहेर काढुन ठेवले. चहाचे साहित्य बाहेर काढले आणि चहा बनवला. एकीकडे सुर्य मावळतीला जात होता तर एकीकडे आमच्या हातात चहाचा कप. सूर्यास्ताचा आनंद लुटत असतानाच खबर मिळाली आमचे अजून ३ मित्र आज रात्री येत आहेत. ते आम्हाला उद्याच्या सफर साठी म्हणजेच रवळ्या-जवळ्या साठी साथ देणार आहेत. आम्ही रात्रीचे जेवण बनवले आणि झोपून गेलो. पहाटे ३ वाजता तिघेही मित्र (निलेश, श्री आणि पराग) पोचले. पहाटेच्या कडाक्याच्या थंडीत मी आणि हर्षल त्यांना घेऊन आलो आणि मग परत एकदा आम्ही सुप प्यायलो आणि थोडी ऊर्जा अंगात निर्माण करून कुडकुडत झोपुन गेलो.
 
 
 

मार्किंड्या

We started descending from Ahivant at 6.30 am. We followed the same route from which we ascended yesterday till the point where one route traverses towards a col. No need to follow route towarda Aamrai. The traverse route descend down to col. From col, there is  road construction going on; which will connect Bilwadi to Daregaon. This route is quite straight. We descended down to Sindhipada first and then to Daregaon. Our next aim was Saptshringi gad. We needed to reach Nanduri from which we planned to climb Pahilya payricha route. This route is well built using concrete steps.


Daregaon phata to Nanduri is 3km distance. We waited for 30 minutes for bus or jeep but no one stopped. We decided to walk but luckily one jeep owner from Daregaon gave us free ride till Nanduri. We fuelled ourselves with pav-vada, misal, Bhaji and tea.
You can also extend your trek by adding Mohandari fort in itinerary. It is near to Nanduri.We skipped that fort as it was not included in original plan.

The route to Saptshringi gad is simple. But the heat and heavy backpack made us drained completely. It took us 1.5 hrs to reach near Saptshringi temple. Mahadeo joined us there. He waited there for more than 3 hrs. Nobody interested to go to Goddess Saptshringi. Me and Mahadeo headed to took blessings. As usual there was rush and it took us 1.5hrs to complete the queue and darshan. It was 12.30pm and heat was at its peak. Gaurav declared that he was not continuing the trek due to health reason. So we were 4 again.We decided in unison to had lunch. Shev bhaji and bhakri was my weak point. It made my day :).

Our next aim was to climb Markandya. You can easily spot it from the Saptshringi gad. At its pick , there is temple of Sage Markandya.


Confirming the directions with local people, we started descending the the plateau on which Saptshringi gad situated. Route is well trodden. Many people goes to Markandya due to its mythological connection. Once you descend down completely you need to start ascend from the khind.

Ascend was really challenging due to scree, its steepness and unbearable heat. We were drained  so much during this climb. Once you ascend first patch, follow the traverse patch going in left direction(when you are facing Markandya hill). At the end of this traverse, nalicha route starts. Climb it and you will reach on vast plateau. There is small water body which can quench your thirst. We spent 15 minutes there to relax. From the plateau, distinct route goes into small jungle patch and then ascends again through a nalicha route( not literally though). At the apex of this nali, go towards right side hill. After small climb you will reach on the top. There are two ashrams on the top where pujari of the temple resides. We took blessing of Sage Markandya; chatted with the pujari and started descending. On the plateau, there are multiple ashrams. For what purpose they are so much in number is still question for me.
Sage Markandeya idol

Pujari




Our next destination was Ravlya-Javlya; the twin forts adjacent to Markandya hill.We followed the descending route which grounds at the ghat(also resembles like col); which connects Mulane and Babapur village. Route to descend is pretty easy and well marked by forest department by installing iron stairs and railings at appropriate place. It's already 6.30 pm in the clock. It took 45 minutes to reach the ghat. From there we started ascending the hill on which Ravlya-Javlya situated. It was simple route and our aim was to reach as near as possible towards the plateau area before it gets dark. At one point it was difficult for us to judge the route so we decided to stay in open space. God was certainly favorable with us that no rain registered during our trek schedule.
cooking and resting place
Mahadeo had brought ration with him.Ganesh and Mahadeo prepared fantastic khichadi again. With fulfilled mind and tummy, we slept with content feeling.

Second was more tiring than first day due to heat. But we were happy that we climbed 2 forts and reached near to 3rd one.
 
 
  मार्कड्या
 
नाशिक जिल्हा खरोखरच गड-किल्ल्यांच्या बाबतीत केवढा समृद्ध आहे हे तेथील किल्ले पाहिल्याशिवाय समजायचे नाही. महाराष्ट्राच्या इतर कोणत्याही जिल्ह्यात नसतील एवढे किल्ले केवळ एकट्या नाशिक जिल्ह्यात आहेत. दहा नाही, वीस नाही, तर एकूण मिळून ५८ डोंगरी किल्ल्यांचा मिळून हा नाशिक जिल्हा तयार झालेला आहे. सह्याद्रीच्या तीन मुख्य रांगा, तर ११ उपरांगा या नाशिक जिल्ह्यामधून एखाद्या वृक्षाच्या फांद्यांसारख्या पसरलेल्या आहेत. ऋषीमुनींचे वास्तव्य असलेला आणि प्रभुरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीतील अनेक किल्ल्यांना धार्मिक महत्त्व लाभलेले आहे.
सातमाळा रांगेमधील किल्ले म्हणजे जणू काय माळेत गुंफलेले मणीच होय. या रांगेतील मार्कंड्याचा डोंगर धार्मिक दृष्ट्या तर प्रसिद्ध आहे, तसा किल्ला म्हणून देखील प्रसिद्ध आहे. मार्कंडेय किल्ल्यावर मार्कंडा ऋषींचे वास्तव्य असल्यामुळे या डोंगराला मार्कंड्या हे नाव पडणे साहजिकच आहे. इथे वास्तव्यास असलेले मार्कंडेय ऋषी सप्तशृंगी मातेला रोज स्तोत्रे आणि पुराणे ऐकवत असत अशी कथा अनेक ठिकाणी पुराणात आलेली आहे. सध्या मात्र मार्कंड्या किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर मार्कंडेय ऋषींचे एक मंदिर आहे.
मार्कंड्या किल्ल्यावर जाण्यास दोन मार्ग आहेत. किल्ल्यावर जाणारा एक मार्ग सप्तशृंग गडावरून जातो. सप्तशृंग गडाच्या पठारावरून एक वाट थेट सप्तशृंग आणि मार्कंड्या किल्ल्याच्या खिंडीत उतरते. खिंडीतून डाव्या हाताला एक वाट मार्कंड्याच्या दिशेला जाते. मध्ये थोडे सोपे प्रस्तरारोहण करून पुन्हा डाव्या अंगास वळायचे. थोड्याच वेळात आपली वाट इंग्रजी 'यू' आकाराचे वळण घेऊन मार्कड्याच्या
पठारावर पोहोचवते. या वाटेने मार्कड्या गाठायला तीन-साडेतीन तास सहज लागतात.
किल्ल्यावर जाणारा दुसरा मार्ग 'बावापूर' नावाच्या गावातून जातो. बाबापूरला जाण्यासाठी नाशिकहून वणी गाठायचे आणि वणीहून जगदंबा मातेच्या मंदिराशेजारून एक रस्ता कळवणला जातो. या मार्गावर प्रथम मुळाणे गाव लागते. मग तिथून चार कि.मी.वर बाबापूर गाव लागते. बाबापूरच्या वर पूर्व बाजूस दोन कि.मी.वर एक खिंड आहे. कळवणहून सकाळी, दुपारी आणि सायंकाळी अशा तीन एस.टी.च्या गाड्या बाबापूरमार्गे वणीला जातात. रवळ्या-जवळ्या आणि मार्कंड्या किल्ल्यांमुळे ही खिंड निर्माण झालेली आहे. या खिंडीतून एक वाट डाव्या बाजूस मार्कड्या किल्ल्याकडे जाते. किल्ल्यावर जाणारी ही प्रचलित वाट आहे.
खिंडीतून अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आपण तटबंदीपाशी पोहोचतो. किल्ल्याची ही पूर्व बाजूची तटबंदी असून आज ती थोड्याफार प्रमाणात शिल्लक आहे. पठारावर पोहोचल्यावर एक वाट उजव्या बाजूस मार्कंड्या किल्ल्याच्या दिशेला जाते, तर डावीकडची वाट दक्षिण बाजूच्या पठारावर जाते. या पठारावर तुरळक तटाबुरुजांचे अवशेष आहेत. ते पाहून आपण मार्कड्या किल्ल्याच्या दिशेला निघायचे. सुमारे वीस मिनिटे चालत गेल्यानंतर आपण करवंदीच्या जंगलामध्ये प्रवेश करतो. या जंगलामध्ये प्रवेश करण्यापूर्वी एक वाट किल्ल्याच्या पश्चिम बाजूस जाते. सध्या या किल्ल्यावर काही साधूंचे वास्तव्य असल्यामुळे इथल्या परिसरात काही आश्रम आहेत. आपण मात्र तिकडे न वळता सरळ जंगलात प्रवेश करायचा. जंगलातील वाट, किल्ला डाव्या हातास ठेवून पलीकडे किल्ल्याला उत्तर बाजूस वळसा घालून जाते. या वाटेला मध्ये एके ठिकाणी छेद देऊन एक वाट डाव्या बाजूस मार्कंडेय ऋषींच्या शिखराकडे वळते आणि सरळ जाणारी वाट पठारावरील काही आश्रमांपाशी जाते.
डाव्या बाजूच्या वाटेला वळल्यावर साधारण पंधरा मिनिटांच्या चढणीनंतर कातळामध्ये खोदलेली दोन भुयारे नजरेस पडतात. या भुयारांचे वैशिष्ट्य म्हणजे ही वक्राकार असून त्यांचा शेवट आणि सुरुवात एकाच ठिकाणी होते. कदाचित हे भुयार नसून तप करण्यासाठी तयार केलेली एखादी गुहा असावी. आत शिरून त्याचा शोध नक्कीच घेतला पाहिजे. ही गुहा पाहून पुन्हा आपल्या नागमोडी चढावाच्या वाटेला नागायचे. थोड्याच वेळात आपण एका उद्ध्वस्त दरवाज्याच्या अवशेषापाशी येऊन पोहोचतो. हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा असून तो उत्तराभिमुख आहे. इथून थोडे चदन गेल्यावर आपण मार्कंड्याचा बालेकिल्ला आणि बाजूच्या डोंगरामुळे निर्माण
झालेल्या खिंडीमध्ये पोहोचतो. इथून समोर सप्तशृंग देवीचे मंदिर दिसते. मुख्य किला डाव्या बाजूस असल्यामुळे आपण डावीकडे वळायचे. वाट कड्याला उजव्या हाताव्य ठेवून वर जाते. ही वाट माथ्यावरील पश्चिमाभिमुख दरवाज्याच्या अवशेषापानी आणून सोडते. इथे बाजूला थोडी तटबंदी आणि बुरूज आहेत.
यातून प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला एक आश्रम दिसतो. आपण त्या दिशेल्य चालायला लागायचे. आश्रमाच्या बाजूला एक भुयारी पाण्याचे टाके आहे. यात बारामाही पाणी असते, पण मार्चनंतर यातून पाणी काढण्यासाठी सोबत दोर असणे आवश्यक आहे. या भुयारी टाक्याच्या उजव्या बाजूस थोडेसे वर आणखी एक फुटलेले पाण्याचे टाके आहे. या फुटलेल्या पाण्याच्या टाक्यांजवळून वाट सर्वोच्च माथ्यावरील मंदिरापाशी जाते. या वाटेने थोडे पुढे गेल्यावर पुन्हा कातळात खोदलेली पाण्याची तीन टाकी लागतात. या टाक्यांमधील पाणी बऱ्याच प्रमाणात खराब झालेले आहे. टाकी पाहून थोड्या अंतरावर मार्कडेय ऋषींचे मंदिर लागते. हे मंदिर किल्ल्यावरील सर्वांत उंच टोकावर बांधलेले आहे. या मंदिरात मार्कंडेय ऋषींची मूर्ती आहे. मंदिराच्या समोर एक नंदी आहे. विशेष म्हणजे मंदिराचे प्रवेशद्वार आणि सप्तशृंग गडावरच्या देवीच्या मंदिराचे प्रवेशद्वार एकाच रेषेत आहेत.
मार्कंड्या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल दोन ठिकाणी उल्लेख आलेला आहे. त्यातील पहिला उल्लेख तिसरा गोविंद राष्ट्रकूट याने चांदूर पर्वतश्रेणीतील मार्कड गडावरून काढलेला सन ८०८ चा ताम्रपट प्रसिद्ध झालेला आहे. त्यात त्याने या किल्ल्याचा उल्लेख मयूरखंडी या नावाने केलेला आहे. मार्कंडा किल्ल्याचा दुसरा उल्लेख जयरामपिण्ड्येकृत 'राधामाधवविलासचंपू' या ग्रंथात आलेला आहे. त्यात कवी जयराम पिण्ड्ये स्वतः म्हणतो, माझ्या वडिलांचे नाव गंभीरराव व आईचे नाव गंगाबिका असे असून तो जामदग्निवत्स, गात्रिय, पिंण्ड्ये आडनावाचा देशस्थ ब्राम्हण आहे. सप्तशृंगीच्या समोरील मार्कंडेयाच्या डोंगराखाली कवीचे गाव असल्याचे तो म्हणतो. मार्कंडेय पर्वत ते अहिवंतगडापर्यंत जे सात किल्ले आहेत त्यांची किल्लेदारी गंभीररावांकडे होती, असे देखील तो म्हणतो. यावरून दोन गोष्टी सिद्ध होतात. एक म्हणजे गंभीररावांकडे या परिसरातील किल्ल्यांची किल्लेदारी हाती, पण या गंभीररावांची कोणत्या सत्तेकडून इथे नेमणूक झाली होती ते मात्र निश्चितपणे सांगता येत नाही. हा जयराम पिण्ड्ये शहाजीराजांच्या समकालीन होता. त्यामुळे या गंभीररावांकडे साधारण १६०० च्या सुमारास या परिसरातील किल्ल्यांची किल्लेदारी असावी असे वाटते.
कवी म्हणतो, मार्कडेयाअहिवंतादिसप्तपर्वताध्यक्षतां अविरतं वितन्यमाना गंभरराय इत्यभिधाप्रसिद्धः स्वाभिमिर्नयनपथं नीतः भविष्यति।। ॥ चंडीपर्वतपुरता मार्कंडेयास्तिअ पर्वता विपुलः तत्राद्मदवेन जयरामेण।।
या मंदिर परिसरातून सप्तशृंग गड, रवळ्या जवळ्या, धोडप, कण्हेरगडसारखे किल्ले लक्ष वेधून घेतात. या परिसरातील अनेक लोक मोठ्या भक्तिभावाने सर्वात प्रथम नर्मदा परिक्रमा करणाऱ्या मार्कंडेय ऋषींच्या मंदिराला भेट द्यायला येतात. श्रावणमासी तर इथे लोकांची चांगली रीघ लागलेली असते. मार्कंडेय ऋषींनी तप केलेल्या या पवित्र स्थानाला आपले पाय लागल्याची धन्यता उरात बाळगून आम्ही सर्व मंडळी पुन्हा खिंडीच्या वाटेला लागलो.
किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून १३३६ मीटर (४३८३ फूट)
तालुका : कळवण
किल्ल्याची श्रेणी: सोपी
किल्ल्याची इतर नावे : मार्कंडेयगड, मयूरखंडी
डोंगररांग : सातमाळा
पायथ्याची गावे : बाबापूर, मुळाणे बारी, नांदुरी
पायथ्याच्या गावापासूनचे अंतर बाबापूर खिंडीपासून दीड तास,
सप्तशृंग गडाहून अडीच तास.
जवळचे एसटी स्थानक : वणी, कळवण
राहण्याची सोय : किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय : जेवणाची सोय नाही.
पिण्याचे पाणी : किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी उत्तम कालावधी: जून ते मार्च.
किल्ला फिरायला लागणारा वेळ किल्ला फिरायला १ तास पुरतो.
जवळपासची गावे : बाबापूर, मुळाणेबारी, वणी.
 
 
 
 

धोडप ते सप्तश्रुंगी

Submitted by Yo.Rocks on 22 December, 2014 - 11:01

क्षणात दिसून जाशी क्षणात लपून.. असाच काहीतरी खेळ सुरु होता.. ढगांच्या महासागरात सारा आसमंत बुडालेला.. पाच फुटापलिकडे काही दिसत नाही असे म्हणेस्तोवार बेफाम वारा येउन थैमान घालायचा नि क्षणात ढगाचा पडदा दूर लोटून भवतालाचा नजारा दिसायचा.. अगदी मंद धुंद वातावरण.. 'धोडप' च्या "रेलिंगबंद" अशा भिंती वरुन चालताना ह्या वातावरणाचा आस्वाद घेत होतो.. मग तो ढगांच्या अभिषेकात न्हाहून गेलेला धोडपचा माथा असो वा निसर्गाचा आविष्कार समजली जाणारी 'डाईक' भिंत असो !

जेव्हा नाशिक-आग्रा हायवे सोडून वडाळभोई फाट्यावरून 'हट्टी' गावात आलो होतो तेव्हा 'धोडप' चा किल्ला धुक्याच्या साम्राज्यात विलीन झालेला.. पाउस नव्हता पण कधीही येइल असा संदेश अवतीभवती भिरभिरणाऱ्या ढगांकडून मिळत होता.. त्या छोट्याश्या 'हट्टी' गावातून वस्तीची एसटी सुटण्याची वेळ झालेली.. इथल्या शाळकरी मुलांसाठी हीच स्कूलबस ! झेंडावंदनला जाण्यासाठी लगबग सुरु होती.. तर एकीकडे म्हशीचे दूध काढून बाहेर विकण्यासाठी दुधाच्या मोठ्या किटल्या भरल्या जात होत्या.. हनुमान मंदिराच्या आवारातच आम्ही गाडी उभी केली नि थोडीशी पेटपूजा करून घेतली.. तिथल्याच एका गावकऱ्याने येउन चहा नि गाइड अशी दोन्हीची ऑफर दिली.. चहाला नाही कसे म्हणणार.. दुधासाठी पैसे देताना भाव कळला फ़क्त वीस रूपये लीटर !! तेही अगदी ताजं नि भेसळविरहीत ! मनात आले बाटल्याच भरुन घेउया..

आमच्यातल्या मुकादम उर्फ़ गिरी ने आणलेले 'तिरंगा' बिल्ले इंद्रा, रो.मा, मी व आमच्यासोबत पहिल्यांदाच आलेला आ.का असे सगळयांना लावले नि आझादी दिन का जशन मनाने हम निकल पडे ! खरे तर धोडप वर राहण्याचा मानस होता पण भल्या सकाळीच पोहोचलेलो.. तेव्हा दिवसभर धोडपवर धुक्याच्या साम्राज्यात काय रहायचे म्हणून प्लान बदलला.. धोडप बघून खाली उतरायचे नि दुसऱ्या किल्ल्याच्या पायथ्याशी रहायचे ! अजब गजब अचानक निर्णय घेण्यात आम्ही पटाईत.. शिवाय आता पाठीवरचे ओझे गाडीतच ठेवून ट्रेक करायची सवय जडलेली.. आमच्यामागून अजुन एक ग्रुप गाडी घेउन आला त्यात 'ऑनलाइन' ओळख असलेले श्रीकांत शिंपी, अनुप बोकील भेटले.. त्यांना हाय-बाय करून धोडप च्या दिशेने चिखल तुडवत निघालो !

'हट्टी' गाव मागे पडले नि डोळ्यांसमोर धोडपची अंधुकशी डोंगररांग तरळू लागली.. निसर्गाच्या हिरव्यागार गालीच्यातून चालताना मोर, बुलबुल, सातभाई अश्या विविध पक्ष्यांची किलबील कानी पडत होती.. पावसाचे तुरळक तुषार आनंदाने झेलत धोडपच्या डोंगराजवळ पोचलो.. संपूर्ण धोडपचा आकार नजरेला पडत नव्हता पण किल्ल्याची प्रसिद्ध नैसर्गिक 'खाच' ढगांमधून मध्येच डोकावत होती..

डोंगराच्या पायथ्याशी शेंदुरी रंगाच्या घाणेरी फुलांमध्ये मारुतीरायांची शेंदुर फासलेली मूर्ति विलोभनीय वाटत होती.. नमन करुन आम्ही धोडपला भिडलो.. वाट अगदी मळलेली व चढ फारसा अंगावर न येणारा..फारसी थकबाकी न होता कातळात कोरलेल्या गणेशमूर्ती जवळ पोहोचलो.. समोरच्या पाण्याच्या टाकीतल्या पाण्याने ताजेतवाने झालो.. धोडपचा माथा अजुनही ढगांमध्येच गुरफटलेला.. पावसाची मधुनच अगदी नावाला शिवार पडत होती.. पण भणाणता वारा सुरूच होता..

- - -

- - -

माथ्यावर ढगांची जत्रा भरली असली तरी तिथवर पोहोचेस्तोवर वातावरण स्पष्ट होइल अशी आशा होती.. पुढेच धोडपच्या खांद्यावर वसलेली चार- पाच घरांची 'सोनारवाडी' लागली.. ह्या वाडीत दुधाचा खवा मस्त मिळतो ऐकून होतो पण तिथे पोहोचलो तेव्हा काही तयार नव्हता.. आम्ही वरती सरकलो तसा हवेचा जोर वाढू लागला.. वाटेत पक्ष्यांची माहिती देणारे फलक दिसू लागले ! नि पुढे रेलिंग बंदिस्त वाटही नजरेस पडली.. ! तर एका बाजूस कातळात कोरलेल्या पायऱ्यांची वाट दिसली.. फारशी अवघड वाटली नाही पण पावसात रिस्क नको म्हणून फ़क्त रोमा व मी या वाटेने वरती चढलो.. तर बाकी सवंगडी रेलिंग वाटेने वळसा घालून आले.. इथेच उध्वस्त दरवाजा नि सुस्थितीत असलेल्या देवडया नि बुरुज दिसले.. बुरुजावरती पाण्याचे खोदीव टाके नि वरच्या अंगाची तटबंदी सारे बऱ्यापैंकी शाबूत..

--

आता वाऱ्याने रौद्ररूप धारण केलेले.. जमेल तसे ढगांना पांगवत होता.. मध्येच सुर्याची किरणे भवतालच्या डोंगररांगेवर पडत होती नि चहुबाजुंची हरितसृष्टि चमकून निघत होती.. धोडपचा शेजारी 'इखारा' सुळका मात्र ढगांमध्येच मशगुल होता.. ढग - वाऱ्याच्या खेळात दुरदुरची डोंगररांग अधुनमधून अंधुक दर्शन देत होती..

पुन्हा पायऱ्याच्या वाटेने मुख्य दरावाज्यापाशी पोचलो.. फारसी शिलालेख, दरवाज्याच्या उंबरावर असणारे किर्तीमुख , दोन्ही बाजुस असणाऱ्या खोबण्या सारं काही मस्त.. हा दरवाजा म्हणजे अगदी कातळात भोगदा करून मार्ग काढला आहे.. त्यामुळे देवड्या अगदी प्रशस्त.. दरवाज्यातून वरती आलो नि पुन्हा ढगांचा हल्लाबोल झाला..

धोडपचा माथा आता कुठे दिसत होता तर लगेच धुक्यात नाहीसा झाला.. वाटेच्या उजव्या बाजूला उध्वस्त वास्तू असली तरी एक बाजू अजुनही तग धरून आहे हेच आपलं नशिब.. उरल्यासुरल्या अवशेषांमध्ये सुद्धा पूर्वीची कलकौशल्य दिसून येते.. डाव्याबाजूला सुद्धा काही अवशेष नि पाण्याच्या टाक्या नजरेस पडतात..

पुढे एक वाट उजवीकडे चढत धोडपच्या कातळभिंतीत कोरलेल्या गुहेकडे नेते तर एक वाट धोडप च्या शेंडयाला उजवीकडे ठेवत पुढे जाते.. या वाटा दिसताच धुक्याआड गडप झाल्या.. आता आमचा प्रवेश गुडुप धुक्यात झाला जिथे फक्त नि फक्त थंडगार हवा सुटलेली.. आम्ही डावीकडच्या वाटेने पुढे गेलो जी अगदी कातळाला बिलगुन जाते.. काही गुहा लागल्यानंतर शेवटी मोठी गुहा लागते जिथेच देवीचे मंदीर आहे तर बाजुला शिवलिंग नि पिण्याच्या पाण्याचे टाके आहे... इथेच भर धुक्यात पेटपूजेचा कार्यक्रम आटपून घेतला. खरे तर या गुहेत रात्रीच्या मुक्कामाचा विचार होता जो ऐनवेळी बदललेला.. पण दिवसाच इथे बिनधास्तपणे फिरणारे उंदीर बघून सुटका झाली असे वाटत होते.. शिवाय वातावरणातला गारवा वाढतच होता.. झोपेचे खोबरे वाचले म्हणायचे !

दाट धुक्यातून वाट काढत आम्ही आता धोडपच्या खाचेकडे निघालो..

धोडपचा माथा म्हणजे सुळकाच.. अगदी महादेवाच्या पिंडी सारखा आकार.. तर त्यालाच लागून असलेली सरळसोट कातळ भिंत म्हणजे 'डाईक' भूस्तर रचनेचा उत्तम नमूना.. ह्याच अजस्त्र भिंतीचा मधला काही भाग अगदी केकचा तुकडा व्यवस्थित कापल्यासारखा गायब आहे.. तो नक्की पडला की पाडला गेला की निसर्गतःच खाच आहे हे ठाउक नाही पण यामुळे धोडपला आगळेच वलय प्राप्त झालेय.. त्याचा एकूण वैशिष्टपूर्ण आकारच दुरून सहज लक्ष वेधून घेतो..

आम्ही याच भिंतीवरुन चालत खाचेच्या टोकावर पोचलो.. सभोवताल ढगांनी घेरल्यामुळे सफेद पडद्यापलीकडे काहीच दिसत नव्हते.. आतापर्यंत चालु असलेल्या वाऱ्यानेसुद्धा नेमका ब्रेक घेतला.. जल्ला नव्याने लावलेल्या रेलिंगची तटबंदीच काय ती दिसत होती.. याच टोकावरुन धोडपचा माथा अप्रतिम दिसतो हे ऐकून होतो पण आता मात्र सगळे नाहीसे झालेले..

इतक होउनही अंधुकशी आशा होती की थांबलेला वारा पुन्हा जोमाने येइल नि ढगाच्या पडदयाला भगदाड पडेल.. खाचेच्या दुसऱ्या टोकाची भिंत दिसेल.. पण काही बदलाव दिसला नाही म्हणून खाचेकडे पाठ फिरवत माघारी येणार तोच वाऱ्याने मोठ्या जोशमध्ये एंट्री घेतली... वाऱ्याचा वेग क्षणाक्षणाला वाढू लागला.. खाचेकडे वळून पाहिले तर ढगाचा पडदा हलताना दिसला.. लागलीच धावत येउन रेलिंगला खेटून उभे राहीलो.. आता कुठल्याही क्षणाला दर्शन घडणार होते... अकस्मात वाऱ्याची एक जोरकस लाट येउन थडकली.. सफेद पडदयातून ढगांचे लोट आमच्या दिशेने सुटू लागले.. नि अचानक पडद्यातून खाचेची समोरची भिंत अंगावर आल्यागत प्रकट झाली.. आनंदात्मक चीत्कार बाहेर पडले..

- -

- -

मागे वळून पाहिले तर धोडपचा माथाही आपल्या अंगावरचे ढग झटकत होता.. वारा सैरवैर बेफामपणे सुटलेला.. रो.मा ची मायबोली टोपी कधीच दरीत उडून गेलेली.. सुसाट वारा अधून मधून आम्हालाही झटके देत होता.. अशावेळी त्या रेलिंगचे महत्त्व मात्र कळले.. कदाचित त्या रेलिंग मुळे आम्ही या परिस्थितीतही कड्यावर बिनधास्त होतो.. पण हेच रेलिंग एरवी मात्र खरच सह्याद्रीकडयाच्या रांगडेपणावर घातलेल्या बेडया वाटतात..

आता 'क्षणात दिसून जाशी क्षणात लपून.' असाच काहीतरी खेळ सुरु झाला.. धोडप ची खाच दिसते तोच ढगांचा एक थवा यायचा.. तो स्थिरावेल तोच वारा एका फटक्यात उडवून लावत होता.. पण ढगांची मेजोरिटी जास्त झाली की पुन्हा सफेद पडदा आडवा यायचा..!! या निसर्गाच्या खेळात सुंदर दृश्य दिसतेच.. असेच एक दृश्य म्हणजे सह्याद्रीमध्ये हिमनग पाहतोय असा अनुभव.. आतापर्यंत ढगाच्या महासागरात खुपसून बसलेल्या धोडपच्या सर्वोच्च टोकाने मान वर काढली नि आम्हाला आगळया दुनियेत घेउन गेला.. नंतर माथ्याला ढगांचा अभिषेक चालूच राहिला.. कितीही पाहिले तरी मन भरत नव्हते..

- - -

- -

पुन्हा गायब

- -

आम्ही पुन्हा त्या मंदिरापाशी आलो.. इंद्रा त्या भन्नाट वाऱ्याने त्रासला होता सो त्याने किल्ला उतरायला पण घेतला..पण आम्ही कसरत करत त्या धोडप माथ्याच्या कातळात कोरलेल्या आयताकृती गुहेत चढून गेलो.. अगदी छोटी गुहा पण धोडपची माची इथून मस्त नजरेत भरते..

अखेरीस बेफाम वाऱ्यापासून सुटका करत आम्ही गड उतरायला घेतला.. नाही म्हटले तरी सगळे पाहता आले होते पण शेजारचा 'इखारा' सुळकाच दिसायचा बाकी होता.. त्यानेही मग दर्शन देत आम्हाला खुष केले... सोनारवाडीत पोहोचण्यापूर्वी जवळ असणारी दुमजली विहीर पाहून घेतली.. वरतून घुमटी, एका बाजूने उतरायला पायऱ्या, सुंदर कमानी अशी सुंदर विहीर पुन्हा उत्कृष्ट स्थापत्यकलेचा उदाहरण देते..

सोनारवाडीत विचारणा केली तर इथला खवा खाण्याची देखील इच्छा पूर्ण झाली.. खव्याचा आस्वाद घेत आम्ही 'इखारा' सुळक्याच्या दिशेने असणाऱ्या दरावाज्यापाशी पोचलो.. बऱ्यापैंकी सुस्थितीत नि बाजूला तटबंदी पसरलेली.. इथूनच मग एका वाटेने हट्टी गावात उतरलो..

तीन वाजेपर्यंत हट्टी गावात आलो.. आता पुढे कुठे जायचे हे अजुन ठरवायचे होते तेव्हा हनुमान मंदिरात बसून चर्चासुत्र सुरु केले.. बरीच नावं घेउन झाली शेवटी वणीदेवीचे दर्शन पक्के होते म्हणून 'मार्कंडया' ठरले.. हट्टी गावातूनच मग पारेगावजवळून शॉर्टकट घेत आम्ही 'बाबापुर' गावाच्या शोधात निघालो.. गाडीरस्ता चांगला आहे असे वाटत होते पण मध्येच एकाठिकाणी रस्ता चांगलाच उखडला होता.. गाडी जाईल की नाही प्रश्न होता.. त्याच रस्त्याने बाइक घेउन जाणारे गावाकरीदेखिल मदतीसाठी थांबले पण शेवटी इंद्रदेवांनी सहजपणे आपल्या चारचाकी रथाला चिखलदिव्यातून बाहेर काढले.. !!

- - -

संध्याकाळचे चार वाजत आले होते पण पावसाळी काळोख दाटला होता.. बाबपुर च्या शोधात आम्ही 'मार्कंडया' व 'रावल्या - जवल्या"च्या खिंडीत पोचलो.. पण आता वरती रहाण्याची सोय नाही असा गैरसमज करून आम्ही खिंडीच्या पलिकडे कळवण गावाकडे जाणाऱ्या रस्त्याने उतरलो नि 'मुळाणे' गावात मुक्कामाची सोय होते का बघू लागलो.. पाहिले एका मंदिरात रहावेसे वाटले.. अगदी डोंगराच्या कुशीत.. पण इथल्या तुफान पावासात निभाव लागायचा नाही हे जाणले नि पुढचा शोध सुरु केला..

गावातल्या शाळेच्या पटांगणात फडकलेला तिरंगा !

आता पिटुकल्या आंगणवाडीच्या ओसरीत एका कोनाडयात चुल पेटवायचे प्रयत्न सुरु होते.. बाहेरच्या पावसाची झाप ओसरीवर अधून-मधून येतच होती.. फायरक्युबच्या जोरावर पेट घ्यायला लाकडं अगदीच नाकं मुरडत होती.. हे पाहून मात्र आमचा जठाराग्नी जास्तच पेटलेला.. आंगणवाडीच्या खोलीत झोपण्याची परवानगी काढून झोपेचा प्रश्न कसाबसा सोडवलेला.. पण आता जेवणाचा प्रश्न होता.. रेडी टू इट करायला रेडी होतो पण चुल कुठं मिळेना.. निदान एक टोप गरम पाणी तरी पण तेसुद्धा नाही.. अंधार पडायच्या आत जेवून झोपायचे होते.. हवेतला गारावाही वाढत चाललेला..गावातल्यांनी पाहुणचाऱ्यासाठी फारसा उत्साह दाखवला नाही पण त्यांची शेतीची कामं असल्याने त्यांना दोष देण्यात अर्थ नव्हता.. आम्हाला झोपण्यासाठी उत्तम खोली मिळाली हेच खुप होते..

चुल पेटवेपर्यंत एकाने हेतुपरस्पर मदतीची तयारी दर्शवली.. रॉकेल देण्याच्या आमिषावर बाटलीची सोय होते का पाहत होता.. ! तरीच म्हटले इतक्या घरांमधून हाच कसा मदतीला उभा राहिला.. आमच्याकडे 'तसले' काही नसल्याचे समजुन गेला नि तो तसा गायब झाला.. इथे आम्ही सूप चे कसेबसे पडघम वाजवले.. तर एकीकडे झोपण्यासाठी मॅट अंथरुन झालेल्या.. बाहेर वारा पाउस सुरूच होता.. अंधार पडला.. मेणबत्ती - टोर्चच्या प्रकाशात आमची खादाडीसाठी शेवटची खुडबूड सुरुच होती.. अजुन एकजण विचारपूस करायला आला मग कळले खरे तर त्याच्याकडचे तांदुळ विकायला आलाय.. म्हटले आहे सगळे आमच्याकडे पण तुम्हीच दया बनवून, पैसे घ्या काय ते तर तोदेखिल अंधारात गायब झाला.. ! रोमा व गिरी एव्हाना घरुन आणलेली अंडी खाऊन कधीच आडवे झालेले.. पण बाकी आम्ही श्रावणवासी 'सांभार- राइस' तयार व्हायची वाट बघत बसलेलो...

झोपण्यासाठी उत्कृष्ट जागा मिळाल्याने शांत नि मस्त झोप घेता आली... उजाडले तरी वातावरणात काही फरक नव्हता.. आता सकाळीच चुल कुठे पेटवत बसणार म्हणून मॅगी -चहा या आवडत्या गोष्टींचा त्याग केला नि खिंडी कड़े निघालो.. शिल्लक मावाकेक वगैरे थोड खाऊन आता 'मार्कंडया' करणार होतो..
आम्ही पुन्हा त्या खिंडीत पोचलो तर ढगच आमच्या स्वागतासाठी खाली उतरलेले.. इथेही वाटेला रेलिंगने बंदीस्त केले आहे.. पायर्‍यांचे काम सुरु असल्याचे दिसले.. धुक्यात काही दिसत नव्हते पण रेलिंगमुळे माथा लवकर गाठू असे वाटले.. इथेही धोडपसारखी बोचरी हवा.. भोवताल सारा धुक्यात लुप्त झालेला.. पंधरा मिनिटांत पायर्‍या संपल्या नि भग्न दरवाजा पार करून पठारावर आलो.. पण गड कितपत सर केलाय याचा काहीच पत्ता लागत नव्हता.. फक्त पायाखालची वाट मात्र ठळक दिसत होती तिच्याच मागावर चालू पडलो..

आतापर्यंतच्या वाटेने चांगलेच दमवले होते.. पण काहीच चाहुल लागत नव्हती.. जवळपास वळसा घेतल्यावर वाटेला दोन फाटे फुटले.. इथे धुक्याच्या सान्निध्यात झाडांच्या आकृत्या अगदी गुढमय भासत होत्या.. धुक्यात बुडालेला हा शांत परिसर खरच ध्यानधारणेसाठी उत्तम ! त्या काळात मार्कंडेय ऋषींनी ह्या डोंगरावरची जागा निवडल्यामुळे हा डोंगर व किल्ला त्यांच्या नावाने ओळखला जातो..

आम्ही वर जाणारी वाट पकडली नि लवकरच एका कातळकड्याखाली कातळातच कोरलेल्या दोन भुयार सदृश गुहा दिसल्या.. चिखल नि अंधार त्यामुळे आत खोल जाणे टाळले.. ध्यान करण्यासाठी या गुहेचा वापर केला जात असे ! बाजूलाच देवीचे मंदीर बांधले आहे.. इथवर आलो नि थांबलेल्या पावसाने रिपरिप सुरु केली.. भवताल काही दिसणार नव्हता याची खात्री पटलेली त्यात इथून पुन्हा अंगावर येणारे चढ़ सुरु.. शेवटी इंद्रा व् गिरी ने कंटाळून निवृत्ती पत्करली.. बाकी आम्ही तिघे मात्र त्या वाटेला सामोरे गेलो.. वाट मार्कंडयाला जाणारी आहे की ढगांच्या महालात जाणारी आहे हे कळत नव्हते.. वाट अगदीच खड्या चढणीची.. इथे संपूर्ण वाटेत दगड टाकलेत पण अगदी असे की पावसात उतरताना पाय घसरलाच पाहिजे.. वाटले होते ही वाट लगेच माथ्यावर नेईल पण पोचलो घळीत ! उजवीकडची वाट बुरुज सदृश पठारावर नेते तर डावीकडची वाट अजुन वर नेत होती..
उजवी वाट धुंडाळून आम्ही डावीकडच्या वाटेला भिडलो.. वाटेत अधून मधून कोरलेल्या पायऱ्या लागल्या.. शेवाळ,ओघळते पाणी इत्यादी अडथळे पार करत आम्ही पुन्हा धुक्यात अंधुक दिसणाऱ्या रेलिंग पाशी आलो..

पण चढ़ काही संपत नव्हता.. इथेच एका बाबाची झोपड़ी दिसली व बाबा पण भेटला.. एवढ्या वरती थंडगार वाऱ्याचा नैसर्गिक एसी लावून ढगांच्या महालात एका झोपडीत एकटाच राहतोय ! ग्रेट ! या झोपडीच्या पलिकडे पाण्याच्या टाक्या आहेत.. त्यांच्या मागून वाट अजुन वरती सरकते जिथे मार्कंडेय ऋषींचे छोटे मंदीर आहे.. हेच मंदीर म्हणजे या डोंगराचा किल्ल्याचा सर्वात उंच भाग.. जेव्हा जेव्हा वणीला सप्तश्रुंगी देवीच्या दर्शानाला गेलो तेव्हा अगदी समोरच दिसणारा हा अवाढव्य डोंगर नि टोकाला असणारे छोटे मंदीर नेहमीच लक्ष वेधून घेत होते.. कधी तरी या मंदिरापर्यंत जायचे ही इच्छा आज पूर्ण झाली होती.. इतक्या दमछाक चाली नंतर एक आगळाच आनंद मिळाला.. इथून सप्तश्रुंगीचे दर्शन मात्र काही झाले नाही.. ढग - वाऱ्याने पुरते वेढले होते !

- - -

छोट्या मंदीरातील ऋषींच्या ध्यानस्थ मुर्तीचे दर्शन घेउन उतरायला सुरवात केली.. ध्यानस्थ गुहांपर्यंत पोचलो नि अचानक समोरचा ढगाचा पडदा हलू लागला.. निसर्गचित्र उमटायला लागले... सूर्यकिरणांनी झळाळी आली.. आम्ही ढगांच्या दुनियेतून फार नाही पण बर्‍यापैकी बाहेर आलो.. मार्कंड्या डोंगराचा माथा मात्र ढगांमध्येच लपलेला.. पण खाली पठारावर घर दिसली.. आश्रम असल्याचे लक्षात आले.. इथे निवासाची व चुलीची सोय झाली असती हे तिथे गेल्यावर कळले मग काय फ़क्त 'अरेरे अरेरे'..!

आका व रोमा तर जल्ला खायला निदान खोबरं तरी मिळतय का बघत होते.. भूकच फार लागलेली.. आता माघारी फिरताना भवताल अगदी प्रसन्न वाटत होता.. अगदी सकाळी येताना जी वाट अगदी निरुत्साही वाटत होती तीच वाट आता 'इथे बघ तिथे बघ' करत होती.. उतरताना खिंड नि खिंडीतुन जाणारा वळणाचा रस्ता अगदी सुरेख दिसत होता.. खिंडीपलीकडे रवळ्या-जवळ्या डोक्यावर ढग घेउन उभे होते..

आमचे थकलेले मित्र मात्र पायाथ्याला गाडीत आराम करत होते.. तासभरात खाली पोचलो.. पावसाने एव्हाना दडी मारली होती.. तीच मिळालेली संधी समजुन आडव्या येइल त्या ओढयावर अंघोळ करण्याचे ठरले.. तसा स्पॉट बघून ठेवला होताच.. Wink

आता भुक कडकडून लागली होती तेव्हा त्वरित वणीचा रस्ता पकडला.. कळवण रस्त्यामार्गे जाताना 'धोडप'ने आपले रांगडे सौंदर्य दाखवून दिले.. पुढे कण्हेरगड व नंतर मोहनदरी या दोन गडांचे फ़क्त मुखदर्शन घेउन आम्ही नांदुरला पोहोचलो.. वाटेत पाउस लागला नव्हता पण वरती सप्ताश्रुंगी गडावर पावसाचे चिन्ह स्पष्ट दिसत होते..
टोलनाक्यानंतर घाटरस्ता सुरु होण्याआधी चैतन्य होटेल लागले नि अगदी नाश्त्यापासून जेवणापर्यंतची ऑर्डर देऊन झाली.. !! चैतन्यपूर्ण ढेकर दिले नि देवीच्या दर्शनाला निघालो.. घाट रस्ता चढून गेलो नि मुसळधार पाउस आडवा आला..

गाडी मंदीराच्या पायाथ्याला पार्क केली.. नुकतीच मोठी सर येउन गेल्याने सगळीकडे चिंब चिंब झालेले.. रोमा, गिरी या पहिलटकरांनी नारळहार घेतले नि आम्ही पायऱ्या चढायला घेतल्या.. माझा तर यावेळी सुद्धा गडाला प्रदक्षिणा घालण्याचा विचार होता.. देवीची मुर्ती सामोरी आली आणि आतापर्यंतच्या सगळ्या त्राणाचा विसर पडला.. या मंदिराचा परिसर नि मंदिर बऱ्यापैंकी आहे तसेच आहे.. इतर सेलिब्रेटी मंदिरा सारखे मोठे बदल नाहीत.. त्यामुळे देवीदर्शन नि फिरणे अगदी मनसोक्त होते.. इथून समोरचा मार्कंडया डोंगर नि टोकावरचे मंदिर बघून तर अभिमान वाटत होता.. भरुन आलेल्या आभाळाखाली पसरलेला मार्कंडया सारखे लक्ष वेधून घेत होता.. त्याच्या एका कडेला वाऱ्यामुळे तयार झालेले पाण्याचे धुरांडे म्हणजेच 'reverse waterfalls' तर खासच.. मार्कंडयाच्या मागे 'रवळ्या-जवळ्या' नि 'धोडप' रांग उठून दिसत होती..

आमचे एकत्रितपणे असे ट्रेक वारंवार होवोत अशी मनोमन सामुहीक प्रार्थना करून आम्ही देवीचा निरोप घेतला.. ट्रेकचा शेवट सुंदर झाला यात खुप समाधान मिळून गेले.. नेहमीप्रमाणे 'ठरवले एक नि केले एक' असाच ट्रेक झाला.. मुक्काम होता धोडपवर पण राहिलो मार्कंड्याच्या पायाथ्याला.. असो सह्याद्रीसंपन्न अश्या नाशिक जिल्ह्यातील अजुन तीन किल्ले झाले हीच खरी एक आनंदाची बाब.. अजुन तर बराच आकडा गाठायचा आहे.. !!


(उजवीकडून सप्तश्रुंगी, मार्कंडया, रावळ्या व जावळ्या, नि मागे अंधुकसा धोडप)

[# कॅमेर्‍यातील सगळे फोटो तांत्रिक बिघाडामुळे उडाले Sad तेव्हा वरील सगळे फोटो मोबाइल मधले ! देवीचा फोटो गिरीच्या मोबाइलमधून ]

 

किल्ले मार्कंडे्य – वारसा ऐतिहासिक व अध्यात्मिकतेचा

सागर मालाडकर

मार्कंडे्य हा किल्ला देखील इतिहास व अध्यात्माची साक्ष देणारा किल्ला असल्यामुळे पर्यटक तसंच ट्रेकर्सच्या दृष्टीने देखील आकर्षणाचं केंद्र आहे.मार्कंडे्य किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचताच आपल्याला शंकराच्या सुबक मूर्तीचे दर्शन घडते. शेजारीच असलेल्या पायर्‍या गडाच्या दिशेने मार्गक्रमण करतात. १३३६ फुट उंची आसलेला या किल्ल्याला दगडातून कोरलेल्या पायार्‍यांमधून तर कधी कातळ खडगावरुन वाट काढावी लागते.



नाशिक म्हणजे ऐतिहासिक वारसा लाभलेला तसंच राकट व अवघड वळणाच्या गड-किल्ल्यांनी आणि डोंगरमाळांनी नटलेला जिल्हा. यापैकी काही किल्ल्यांना जितके ऐतिहासिक महत्त्व आहे तितकेच अध्यात्मिक देखील. मार्कंडे्य हा किल्ला देखील इतिहास व अध्यात्माची साक्ष देणारा किल्ला असल्यामुळे पर्यटक तसंच ट्रेकर्सच्या दृष्टीने देखील आकर्षणाचं केंद्र आहे.वणी – दिंडोरीच्या लढाई नंतर नाशिक परिसरातील अनेक किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकूले होते. त्यामध्ये मार्कंड्य किल्ल्याचा समावेश होता. महाराजांच्या निधनानंतर मुघलांनी हे किल्ले जिंकून घेतले. नाशिक – सापूतारा रस्त्यावर नाशिकपासून ४० किलोमीटर अंतरावराअसलेल्या वणी गावातून एक रस्ता कळवण गावाकडे जातो. या रस्त्यावर वणी पासून ९ किमी वर बाबापूर नावाचे गाव आहे. हे मार्कंड्या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. या गावापासून रस्ता वर चढत जाऊन २ किलोमीटर वरील मुळाणे खिंडीत येतो. येथे पोहोचण्यासाठी एसटीने किंवा खाजगी वहानाने जाता येते. या खिंडीतून कळवण गावाकडे जाताना उजव्या बाजूची वाट रवळ्या – जावळ्याला तर डाव्या बाजूची मार्कंड्या किल्ल्यावर जाते.

मार्कंडे्य किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचताच आपल्याला शंकराच्या सुबक मूर्तीचे दर्शन घडते. शेजारीच असलेल्या पायर्‍या गडाच्या दिशेने मार्गक्रमण करतात. १३३६ फुट उंची आसलेला या किल्ल्याला दगडातून कोरलेल्या पायार्‍यांमधून तर कधी कातळ खडगावरुन वाट काढावी लागते. घसरण्याची भीती नसली तरीपण चालताना सावधानता बाळगावी विशेषत: पावसाळ्यात ! या वाटेवरच डावीकडे एका कातळकड्या खाली कातळात कोरलेल्या दोन गुहा दिसतात. त्यांना “ध्यान गुंफा” असे देखील म्हणतात. येथून वर चढताना उजव्या हाताला बुरुजाचे व डाव्या हाताला तटबंदीचे अवशेष पहायला मिळतात. हा पायर्‍यांचा टप्पा संपला की, समोरच सप्तशृंगी गड दिसतो. तो पाहून , डाव्या बाजूच्या कातळात खोदलेल्या वाटेने बालेकिल्ल्यावर जाता येते. येथे पहिल्या टप्प्यावर एका घुमटी खाली कोरलेले टाकं पाहाता येते. या टाक्याला “कमंडलू तीर्थ” म्हणतात. या टाक्यात पिण्याचे पाणी बाराही माहिने असते. दुसर्‍या टप्प्यावर एका रांगेत खोदलेली तीन पाण्याची टाकी पाहायला मिळतात. त्यांच्या बाजूलाच एक सुकलेल टाक आहे. अवघ्या तासाभरातच किंवा पाऊणतासातच चढाई पूर्ण झाल्यावर एका मातीच्या सरळश्या वाटेवर आपण येऊन पोहोचतो. आणि येथेच आपल्याला मार्कंडे्य ऋषींचा आश्राम दिसतोन. या आश्रमात मंदीर देखील आहे जिथे आपल्याला शंकर तसंच दत्ताची मूर्तींचे दर्शन घडून येते. या आश्रमात रहाण्याची व खाण्या सोय देखील होऊ शकते कारण मंदिरातील पुजारी व सेवेकरी यांचा आश्रमामध्ये मुक्काम आहे . मार्केंडे्वर मंदिराच्या सर्वोच्च शिखरावर जाण्यासाठी आश्रमाच्या डावीकडून जावे लागते. येथे आपल्याला मार्केंडेय ऋषींची समाधी सोबततच शिवलिंगाचे देखील दर्शन घडते. या मंदिरामध्ये सणा-सुदीच्या दिवशी अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाते.

या गडाच्या पश्चिमेला सप्तश्रृंगी मंदीर तर पूर्वेकडे रवळ्या-जवळ्या, धोडप, बालगण तालुक्यातील जैन धर्मीयांची तीर्थस्थान असलेल्या मांगी-तुंगी किल्ले आणि साल्हेर-सालोटा सारखी शिखरे पहावयास मिळतात. मार्कंड्यच्या सर्वोच्च शिखराच्या डावीकडच्या मार्गाने आपल्याला सप्तश्रृंगी मंदिराच्या दिशेने पण जाता येऊ शकते. तटबंदी नसल्यामुळे चालताना फक्त काही प्रमाणात खबारदारी बाळगावी . गडावरुन विहंगम दृश्याचे दर्शन होत असल्यामुळे फोटोग्राफर्सना “उत्तम क्लिक्स” मिळू शकतात. जर तुम्हाला दोन दिवसांची सुट्टी असेल तर मार्कंडे्य, रवळ्या-जवळ्या आणि सप्तश्रृंगी मंदीराला एकत्रितपणे भेट देता येऊ शकते. त्यामुळे ट्रेकिंग सोबतच अध्यात्माचा आनंद तुम्ही घेऊ शकता.

— सागर मालाडकर

 
 

नाशिकच्या सप्तशृंगी गडाजवळचा मार्कंडेय पर्वत, मार्कंड ऋषींचे भारतातील एकमेव मंदिर, असा आहे इतिहास?

एबीपी माझा वेब टीम

Nashik News : समुद्रसपाटीपासून 3400 मीटर उंच मार्कंडेय पर्वताच्या माथ्यावर मार्कंड ऋषींचे मंदिर असून हे भारतातील एकमेव असे मंदिर आहे.

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी देवी मंदिर महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध आहे, याच गडाच्या समोरील बाजूस उंचपुरा आणि पाहताच क्षणी नजरेत भरणारा मार्कंडेय किल्ला देखील महत्त्वाचा मानला जातो. काही दिवसांपूर्वी सोमवती अमावस्येला गडावर दरड कोसळल्याने काही भाविक जखमी झाल्याच्या घटना घडली होती. त्यानंतर ऋषिपंचमीनिमित्त भव्य यात्रेचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा खबरदारी म्हणून यात्रा रद्द करण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा मार्कंडेय पर्वत चर्चेत आला आहे. 

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात वणी गावाजवळ सप्तशृंगी देवी मंदिर आहे. सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडत असताना समोरील बाजूस किंवा सप्तशृंगी गडावरील सतीचा कडा या भागाजवळून मार्कंडेय पर्वत भाविकांच्या दृष्टीस पडतो. असं म्हटलं जात की, समुद्रसपाटीपासून 3400 मीटर उंच मार्कंडेय पर्वताच्या माथ्यावर मार्कंड ऋषींचे मंदिर असून हे भारतातील एकमेव असे मंदिर आहे. तसेच हजारो वर्षापूर्वी मार्कंडेय पर्वतावर मार्कंड ऋषींनी ध्यानसाधना करून सप्तशृंगी मातेच्या दिशेने बसून दुर्गाशक्ती नावाचा ग्रंथ लिहल्याचे स्थानिक सांगतात. त्यामुळे या पर्वतासह परिसराला महत्त्व प्राप्त झाले असून दरवर्षीं सोमवती अमावस्येला तसेच ऋषिपंचमीला हजारो भाविक गडावर दाखल होत असतात. त्याचबरोबर अनेक ट्रेकर्स सुद्धा या गडावर येत असतात. 

नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडासमोरच दिसणाऱ्या डोंगरावर मार्कंड्या किल्ला आहे. सप्तशृंगीगड व रवळ्याजावळ्या गडांपासून खिंडीमुळे वेगळ्या झालेल्या डोंगरावर पुरातन काळी मार्कंडेय ऋषींचे वास्तव्य होते, असे सांगितले जाते. त्यामुळे हा डोंगर व त्यावरील किल्ला मार्कंड्या या नावाने ओळखला जातो. मार्कंड ऋषींचे वास्तव्य होते, म्हणून त्यास मार्कंडेय पर्वत म्हणून ओळखले जाते. त्यामुळे सोमवती अमावस्या आणि ऋषिपंचमीला भाविकांची गर्दी होत असते.  तर नाशिकपासून 40 किलोमीटरवर वणी गावाजवळ सापुतारा मार्गावर हा किल्ला असून या गावातून एक रस्ता कळवण गावाकडे जातो. या रस्त्यावर वणीपासून 9 कि.मी. अंतरावर गोबापूर नावाचे गाव आहे. हे मार्कंड्या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. या गावापासून रस्तावर चढत जाऊन 2 किलोमीटरवरील मुळाणेबारी खिंडीत येतो. येथपर्यंत एसटीने किंवा खाजगी वाहनाने जाता येते. या खिंडीतून कळवण गावाकडे जाताना उजव्या बाजूची वाट रवळ्या–जावळ्याला तर डाव्या बाजूची मार्कंड्या किल्ल्यावर जाते. भाविकांच्या सोयीसाठी पायथ्यापासून थेट मंदिरापर्यंत विविध ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या आहेत.

किल्ल्याचा इतिहास काय सांगतो... 

वणीजवळच्या सप्तशृंगी देवी मंदिर जसे प्रसिद्ध आहे, तसेच अनेक भाविक सप्तशृंगी दर्शनानंतर मार्कंडेय ऋषींच्या दर्शनासाठी येत असतात. अनेक बाहेरील भाविकांना गडाची माहिती नसल्याने जिल्ह्यातील भाविक प्रामुख्याने या गडावर येत असतात. तर मार्कंडेय ऋषींचा इतिहास असा सांगितला जातो की, शहाजहानच्या काळात दक्षिणसुभा औरंगजेबाच्या ताब्यात होता. औरंगजेबाने अलिवर्दीखानाला नाशिक जिल्ह्यातील किल्ले जिकण्याचा हूकूम दिला. इसवी सन 1639 मध्ये अलिवर्दी खानाने सप्तशृंगीगड, मार्कंड्या, रवळ्याजावळ्या, धोडप हे सर्व किल्ले जिंकून घेतले. याबद्दलचा फारसीतील शिलालेख इंद्राई किल्ल्यावर असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. यानंतर वणी – दिंडोरीच्या लढाईनंतर नाशिक परिसरातील किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले. त्यात मार्कंड्याचा समावेश होता. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मोगलांनी हे किल्ले परत जिंकले, असा इतिहास सांगितला जातो. 

 
 

Markandeya Fort

Published by NB सर्व लेख पहा NB

मार्कंडेय किल्ला

महाराष्ट्राचा पश्चिम घाट त्यांच्या सह्याद्री पर्वतरांगांसाठी प्रसिद्ध आहे. येथे जवळपास ३०० हून अधिक किल्ले आहेत. 4,384 फूट उंचावर मुकुट घातलेल्या मार्कंडेय किल्ल्यामध्ये कळसूबाईसारखेच विभाग आहेत, आव्हाने आहेत आणि कळसूबाई ट्रेकच्या तुलनेत वरून चांगले दृष्टीकोन आहेत.

तथापि, यापैकी फक्त काही किल्ले आणि ट्रेक मार्ग शोधले गेले आहेत आणि त्यांचे व्यावसायिकीकरण केले गेले आहे. कळसूबाई पर्वत हा निःसंशयपणे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध ट्रेक आहे.

महाराष्ट्रातील अनेक ट्रेकर्स कळसूबाईकडे मोठ्या संख्येने येतात. मग तो आठवड्याचा कोणताही हंगाम किंवा दिवस असो; कळसूबाई शिखरावर गिर्यारोहकांचा मोठा थवा पहायला मिळेल.

जिथे गर्दी असते तिथे जाणारे तुम्ही नसाल आणि कमी प्रवासाचा रस्ता घ्यायचे ठरवले तर मार्कंडेय हा ट्रेक तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे.

नाशिक प्रदेशात राहणाऱ्या या किल्ल्याचे नाव मार्कंडेय ऋषींच्या नावावरून पडले आहे. मार्कंडेय ऋषींनी गडावर वास्तव्य करून ब्राह्मण धर्मगुरूंचे भीमासुर व इतर राक्षसांपासून संरक्षण केल्याची आख्यायिका आहे.

सप्तशृंगी टेकडीसमोर मार्कंडेय किल्ला उभा आहे आणि अजिंठा सातमाळ किल्ल्याचा एक भाग आहे. सप्तशृंगीमध्ये सप्तशृंगी गड, रावळ्य किल्ला, जावळ्या किल्ला, धोडप किल्ला हे देखील दिसतात.

Markandeya-fort

Markandeya Fort Information in marathi

  • प्रारंभ ठिकाण: मुळाणे गाव, वणी, नाशिक
  • ट्रेक ग्रेडियंट: मध्यम. मार्कंडेय ही काही वाढत्या भागांसह सतत चढावर जाणारी पायवाट आहे. पायवाटेमध्ये अनेक खडकाळ पॅचेस आणि काही स्टीलच्या शिडी आहेत.
  • जलस्रोत: पठारावर अनेक स्थिर जलस्रोत उपलब्ध आहेत. तुम्ही स्थानिकांनी बांधलेले असंख्य नळ आणि पाण्याचे स्रोत शोधू शकता. आपण किमान दोन लिटर पाणी वाहून नेत असल्याचे सुनिश्चित करा आणि ते पठारावर पुन्हा भरा.
  • भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिने: ऑगस्ट ते फेब्रुवारी महिने ट्रेक करण्यासाठी सर्वोत्तम आहेत. या वेळी तुम्हाला  किल्ल्यावरून सुंदर दृश्य पाहायला मिळतात. किल्ल्यावर पावसाळ्यात ट्रेकिंग केली जात नाही कारण वर जाणाऱ्या पायवाटेला अनेक खडकाळ भाग आहेत. मुसळधार पावसाळ्यात, वाट अंधकारमय आणि निसरडी बनते, ज्यामुळे चढणे आणि उतरणे कठीण होते. आणि उन्हाळ्यात ते ओलसर आणि दमट होते.

How to reach Markandeya Fort कसे पोहोचायचे

• नाशिकपासून ५२ किमी अंतरावर वणी-कळवण लिंक रोडवर मुळाणे हे पायथ्याचे गाव आहे. सर्वात जवळचे शहर वणी आहे, जे मुळाणे गावापासून 5.5 किमी अंतरावर आहे. हा किल्ला सप्तशृंगी टेकडीच्या समोर आहे.

• मुंबईपासून मुळाणे गावातील सुरुवातीच्या ठिकाणापर्यंतचे अंतर 221 किमी आहे. नाशिकच्या दिशेने NH160 वर जा. अमृतधाम चौक, नाशिक येथून डावीकडे जा. 3 किमी नंतर, सातपूर नाशिक रस्त्यावर जाण्यासाठी उजवीकडे जा. त्याच रस्त्यावर आणखी 32 किमी चालत राहा. एकदा तुम्ही वणी मुख्य बसस्थानक ओलांडल्यानंतर, वणी-कळवण लिंक रोडवर जाण्यासाठी उजवीकडे जा.

• वणी हे नाशिक-सापुतारा महामार्गावर नाशिकपासून ४० किलोमीटर अंतरावर आहे. वणीपासून वणी-कळवण रस्त्यावर ९ किलोमीटरवर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात पोहोचाल.

• पुण्यातील ट्रेकर्स कल्याण स्टेशनवर पोहोचू शकतात आणि कसाराला जाण्यासाठी दुसऱ्या ट्रेनमध्ये चढू शकतात. त्यांना नाशिक स्थानकावरही उतरता येते.

• मुंबईतील लोकं सीएसटी स्टेशन ते कसारा लोकल ट्रेनमध्ये चढू शकतात. कसारा येथून पायथ्याच्या गावापर्यंत जीप भाड्याने घेता येते. एसटी बसने पायथ्याचे गाव गाठण्याचा पर्यायही आहे, आणि कसारा स्टेशनजवळ बसून मुळाणे गावात उतरता येते.

• मुळाणे पासला वाहन/एसटी बसने पोहोचता येते, जे पायथ्याशी 2 किमी अंतरावर आहे. इथून कळवण गावाकडे गेल्यावर उजवीकडचा रस्ता रवळ्या-जावळ्याकडे तर डावीकडे मार्कंडेयाकडे जातो.

Markandeya Fort Trek Blog

मार्कंडेय किल्ल्याच्या माथ्यावर दोन मार्ग आहेत. सर्वाधिक पसंतीचा मार्ग मुळाणे गावापासून सुरू होतो आणि अंदाजे 3.5 किमी लांबीचा आहे, जो दोन तासांत सहज ट्रेक करता येतो. मार्कंडेय किल्ला आणि सप्तशृंगी गड, ज्याला मुळाणे व्हॅली म्हणून ओळखले जाते, त्या दरीतून मार्कंडेय ट्रेक देखील करता येतो.

हा मार्ग खूपच आव्हानात्मक आहे आणि इतर मार्गाच्या तुलनेत खड्डेमय भाग आहेत. हे जवळजवळ पाच किमी लांब आहे आणि एक मार्ग पूर्ण करण्यासाठी सुमारे साडेतीन तास लागतात. तुम्ही अनुभवी ट्रेकर असाल तरच हा प्रयत्न करा.

वर गेल्यावर बुरुजांचे उरलेले भाग आणि किल्ले दुभाजक दिसतात. कोटितीर्थ नावाचे एक छोटे तळे आहे, जिथे हिंदू प्रवासी सोमवती अमावस्येला उडी मारतात. रवळ्या-जावळ्याचा किल्ला, सप्तशृंगी तटबंदी, धोडप किल्ला, छोटा बांड्या आणि मोटा बांड्या, आणि कांचना-मंचना बघायला मिळतात.

जर हवामान उज्ज्वल असेल तर तुम्ही इंद्राई किल्ला करू शकता. गडावर मार्कंडेय ऋषींची मूर्ती आणि शिवलिंग असलेले मार्कंडेश्वराचे अभयारण्य आहे.

पायथ्यावरील गावातून उंच चढाई केल्यावर, तुम्ही अप्रतिम दृश्य, गळती दगडी चिन्हे आणि प्रचंड पर्वतांनी वेढलेले पाण्याचे भांडार असलेल्या एका मोठ्या पठारावर पोहोचता. अवघड भागांवर लोखंडी रेलिंगचा आधार घेऊन संपूर्ण चढाई सोपी केली जाते.

येथे आकर्षक अवशेष आणि ज्वालामुखी खडक दिसतील जे चांगल्या स्थितीत आहेत. हे एका अध्यात्मिक ट्रेकसारखे वाटते. तेथे तुम्ही साधू राहतात ते आश्रम शोधू शकता. किल्ल्याला शांततेचा एक अनोखा घटक आहे. तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही असा अनुभव मिळणार नाही.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...