अवघ्या महाराष्ट्रात ४०० च्या वर गडकोट असले तरी, त्यांचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केलेला दिसतो. शत्रुच्या आक्रमणात या किल्ल्यांचे स्थान अचल आहे. त्यामुळेच त्यांच्या स्थानाला सर्वात जास्त महत्त्व दिले आहे. या किल्ल्यांचे उपयुक्ततेनुसार दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार मुख्य किल्ल्यांचा ज्याला Primary Forts (मुख्य किल्ले) असे म्हटले जाते. या किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणात शिबंदीचा राबता असे, दुसऱ्या प्रकारातील किल्ले Secondary Forts (सहाय्यक किल्ले) म्हणून बांधलेले असत. यांना दुय्यम प्रकारातील किल्ले असे देखील म्हणत असत. या किल्ल्यांचा मुख्य उपयोग किल्ल्यांच्या आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवणे आणि शत्रुसैन्याची आगाऊ सूचना 'सिग्रलिंग' मार्फत देणे हे असे. त्यामुळे साहजिकपणे या दुसऱ्या प्रकारच्या किल्ल्यांवर शिबंदी खूपच कमी असे.
या परिसरातील इतर गड पाहून नांदुरी, अभोणे, नाकोडे मार्गे घालत कळवण मार्गे पाटविहीर गावामार्गे देखील प्रेमगिरीला जाता येते.. दरेगाव ते पाटविहीर हे अंतर साधारण २८ किमी आहे. कळवण-जयदर रस्ता सोडल्यावर रस्ता खराब आणि खडकाळ आहे त्यामुळे या रस्त्यावर जास्त वेळ जातो.
कळवण गावातुन हिंगलवाडी गावाकडे जाताना २ कि.मी.अंतरावर डावीकडे एकलहरे गावात जाणारा फाटा आहे. खाजगी गाडीने नाशिक सप्तशृंगी मार्गे (७३ किलोमीटर) प्रेमगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी एकलहरे गावात पोहोचता येते. या गावापुढे साधारण २ कि.मी.अंतरावर एक कच्चा रस्ता उजवीकडील डोंगराच्या दिशेने जातो. येथुन सरळ गेल्यास २ कि.मी.अंतरावर हिंगलवाडी गाव आहे तेथुन परत मागे यावे लागते. हे गाव म्हणजे मोजून चार ते पाच घरांची वस्ती. गावाच्या एका टोकाला प्रेमगिरीचा किल्ला आहे. गावकरी या किल्ल्याला 'एकलहरेचा' किल्ला म्हणूनच ओळखतात. प्रेमगिरी किल्ल्यावर जायला दोन गावातुन वाटा उपलब्ध आहे, एक वाट हिंगुलवाडी मधुन वर येते तर दुसरी वाट पटविहीर गावातून येते. किल्ल्याच्या डाव्या बाजूला 'कोठ्या' नावाचा डोंगर आहे. त्याच्यापुढे लांबलचक पसरलेला अजून एक डोंगर आहे, त्याला 'इंद्रमाळचा डोंगर' असे म्हणतात. किल्ल्याच्या उजव्या अंगास एक कातळभिंतीसारखा डोंगर आहे, त्याचे नाव 'कराळ्या डोंगर'. मुळातच या किल्ल्यावर फारसे कोणी फिरकत नसल्याने गावकऱ्यांना किल्ल्याबद्दल कधी विचारले तर, ते इथे किल्लाच नाही असे सांगतात. त्याचसोबत हेदेखील सांगतात की, इथे एकलहरे नावाचा डोंगर आहे तिथं जावा, अन् जातांना हनुमंताला दावायला नारळ, गूळ, पेढे घेऊन जावा. नवसाला पावणारं देवं हाय ह्यो, मांगा तुमाले जे पाहिज्ये ते, पण नवस चुकविल्याबिना राहू नक्का बरं का! पुढे अधिक चौकशीअंती आम्हाला समजले की, प्रेमगिरीवरील हनुमंत नवसाला पावतो. त्यामुळे कळवण, अभोणा, हिंगुळवाडीहून खूप लोक नवस मागायला आणि फेडायला प्रेमगिरीवर येतात. प्रेमगिरीवर जाण्याची वाट मात्र सहज सोपी आणि मळलेली आहे.
पहिला मार्ग थोडा अवघड आणि सराईत ट्रेकर्सनीच जाण्यायोग्य आहे. गावाची वस्ती पार करुन पुढे गेल्यावर डाव्या बाजूला एक कच्चा रस्ता किल्ल्याच्या दिशेला जातो. या रस्त्याने ५ मिनिटे चालत गेल्यावर एक पाण्याची टाकी लागते. या टाकीपासून किल्ल्यावर जाण्यासाठी तीव्र चढाचा पण घसार्याची (स्क्री) पायवाट आहे. या पायवाटेच्या शेवटच्या टप्प्यात २० फ़ूटाचा कातळ टप्पा चढून जावे लागते. पाटविहीर मधुन येणारी वाट किल्ल्याच्या मागच्या टोकावरून किल्ल्यावर घेऊन येते. ही वाट घसाऱ्याची आणि सरळ चढाईची आहे. या वाटेने शेवटच्या टप्प्यात एक १०-१२ फुटाचे कातळारोहण आहे. रोपचा वापर ना करता हा पॅच पार करता येतो. हा शेवटचा पॅच पार करून आपण गडाच्या माथ्यावर प्रवेश करतो.
उजवीकडील डोंगर म्हणजे प्रेमगिरी किल्ला असुन या कच्च्या रस्त्याने सरळ गेल्यावर आपण किल्ला व त्याशेजारचा डोंगर यांना जोडणाऱ्या सोंडेखाली पोहोचतो. (प्रेमगिरी किल्ल्यासाठी गुगलवर हा मार्ग व्यवस्थित अधोरेखित झालेला आहे) या सोंडेखाली वनखात्याने झाडे लावलेली आहेत. (येथपर्येंत गाडी येते). येथे एक शेतघर व गोठा असुन किल्ल्यावर पिण्याचे पाणी नसल्याने येथुनच पाणी भरून घ्यावे. या घराच्या मागील बाजुने मळलेल्या वाटेने उभा चढ चढुन १५ मिनीटात आपण किल्ला व त्याच्या शेजारील डोंगराला जोडणाऱ्या सोंडेवर पोहोचतो. सुरुवातीची वाट जंगलातील आहे.येथे निरनिराळे पक्षी दिसतात, मोर - लांडोर, विविध साप, पक्ष्यांची घरटे असे बरच काही दिसते.
किल्ला फारसा परीचीत नसला तरी गडावर असलेल्या हनुमान मंदिरामुळे आसपासच्या गावातील लोकांचा किल्ल्यावर वावर असल्याने वाट चांगलीच मळलेली आहे. या सोंडेवर आल्यावर उजवीकडे वळुन किल्ला चढण्यास सुरवात करावी. वाटेवर काही ठिकाणी घसारा असल्याने हि वाट सांभाळून पार करावी. या वाटेने थोडे वर आल्यावर कातळात कोरलेल्या १०-१२ पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढुन गेल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो.पायऱ्यांवर एका अरुंद कपरीला शेंदूर लावलेला दिसतो. मात्र दरवाजा आणि तटबंदी चे अवशेष कुठेही दिसत नाहीत.
किल्ल्यावर प्रवेश केल्यापासून संपूर्ण किल्ला फिरताना या किल्ल्याची निर्मिती एक संरक्षक ठाणे म्हणून केली असावी याची जाणीव सातत्याने होत रहाते. किल्ल्यावर ना कुठे तटबंदी ना कुठे बुरूज, आहेत ती फक्त काटकोनात कोरलेली दोन पाण्याची टाकी. ५ मीटर लांबीची ही टाकी चांगली कातळात खोदलेली आहेत. स्थानिक लोक या टाक्यांना रामकुंड व सिताकुंड म्हणुन ओळखतात. यातील एका टाक्यात पाणी असले तरी स्थानिक त्यात अंघोळ करत असल्याने ते पिण्यायोग्य नाही.. हिंगुलवाडीतून सोंडेने येणारी वाट आपल्याला येथे मिळते, पुर्ण गडमाथ्यावर नजर फिरवली असता, गडावर कुठेही सावली, झाड नव्हते. फक्त एकच झाड मंदिरापाशी उभे आहे.
हनुमान मंदिरहनुमान मंदिर
टाक्यांच्या समोर मारुतीचे एक मंदिर आहे. इथे एक ध्वज आहे.आतमध्ये हनुमंताची मुर्ती आहे जी संपुर्ण शेंदुराने फसलेली आहे. नवसाच्या या हनुमंताचे आपणही दर्शन घ्यायचे, इतर गडावरील हनुमंत मूर्तीपेक्षा ही मूर्ती जरा वेगळीच आहे. हनुमंताच्या दर्शनास पंचक्रोशीतील भाविक गडावर येत असतात.. ह्या मंदिराच्या बाहेरील बाजुस श्रीरामांची पाऊले शेंदुराने फासलेली आहेत. मंदिराच्या बाहेरच उजव्या बाजुस २-३ विरगळी आहेत तसेच झाडाखाली एका चौकोनी उंबऱ्यावर शिवलिंग आणि नंदीची मुर्ती आहे. मंदिराबाहेर एका लाकडावर वाघ-चंद्र-सिंह यांच्या प्रतीमा कोरलेल्या आहेत.
आणि जर तुम्हाला नवस वगैरे मागायचा असेल तर तो फेडायला इथेच परत यावे लागेल, हे ध्यानात ठेवूनच नवस मागायचा. मंदिराच्या समोर पत्र्याची एक शेड आहे. इथे चार-पाच लोकांचा मुक्काम सहजपणे होऊ शकतो. किल्ल्याचा माथा खूप प्रशस्त आहे. हातात वेळ असल्यास या माथ्यावर एखादा फेरफटका मारण्यास हरकत नाही. मंदिरासमोर काही अंतरावर एक उंचवटा असुन त्यावर एका वास्तुचे अवशेष आहेत. याशिवाय गडावर कोणतेही अवशेष नाहीत. किल्ल्याची समुद्रसपाटीपासुन उंची २८९० फुट असुन निमुळत्या आकाराचा गडमाथा दक्षिणोत्तर साधारण ३० एकरवर पसरलेला आहे. किल्ला फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो. किल्ला पाहुन परत पायथ्याशी येण्यासाठी तीन तास पुरेसे होतात. किल्ल्यावर पिण्याचे पाणी नसल्याने मुक्काम करणे सोयीचे नाही. सेलबारी - डोलबारी डोंगररांगेवर असलेल्या साल्हेर, सालोटा, मुल्हेर या किल्ल्यांकडे जाणार्याा मार्गावर टेहळणी करण्यासाठी पिंपळा, प्रेमगिरी या सारख्या किल्ल्यांची निर्मीती करण्यात आली असावी.
प्रेमगिरीवरून दक्षिणेस अजिंठा सातमाळा रांगेतील गडकोटांचे उत्तर दर्शन होते. सप्तश्रृंगी, मार्कंड्या, कण्हेरगड, जावळा-रावळा, धोडप, इखारा हा सर्व परिसर अगदी जवळ दिसतो. शेजारचा इंद्रमाळही लक्ष वेधून घेतो.
कळवणवरून तीन ते चार तासांची सवड काढून प्रेमगिरीचा किल्ला पाहून यायला काहीच हरकत नाही.
प्रेमगिरी
गिरीदुर्ग नाशिक चणकापूर डोंगररांग
🏔️
श्रेणी नुसार स्तर
मध्यम
📏
समुद्र सपाटीपासून उंची (फ़ूट)
2657
🏰
किल्ल्याचा प्रकार
गिरीदुर्ग
नकाशे व मार्ग
किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा
सर्व नकाशे पहा
प्रस्तावना
नाशिक जिल्ह्यातील कळवण या तालुक्याच्यस गावापासून ५ किलोमीटर अंतरावर एकलहरे नावाचे गाव आहे या गावा जवळ प्रेमगिरी किल्ला आहे. सेलबारी - डोलबारी या डोंगररांगांवर असलेल्या साल्हेर, सालोटा, मुल्हेर इत्यादी महत्वाच्या किल्ल्यांकडे जाणार्या मार्गावर आणि आसपासच्या चणकापूर डोंगररांगेवर पिंपळा, प्रेमगिरी, भिलाई सारखे छोटे टेहळणीचे किल्ले आहेत. प्रेमगिरी गडावर असलेल्या हनुमान मंदिरामुळे आजूबाजूच्या गावातील लोक मोठ्या प्रमाणावर दर्शनाला येतात. त्यामुळे किल्ल्यावर जाणारी वाट मळलेली आहे.
महत्त्वाची ठिकाणे
एकलहरे गावाच्या मागेच प्रेमगिरी किल्ला आहे. गावाची वस्ती पार करुन पुढे गेल्यावर डाव्या बाजूला एक कच्चा रस्ता किल्ल्याच्या दिशेला जातो. या रस्त्याने ५ मिनिटे चालत गेल्यावर एक पाण्याची टाकी लागते. या टाकीपासून किल्ल्यावर जाण्यासाठी तीव्र चढाचा पण घसार्याची (स्क्री) पायवाट आहे. या पायवाटेच्या शेवटच्या टप्प्यात २० फ़ूटाचा कातळ टप्पा चढून जावे लागते. किल्ल्यावर जाणारी दुसरी वाट मळलेली आहे. कच्च्या रस्त्याने प्रेमगिरीच्या डोंगरसोंडे पर्यंत चालत जाऊन डोंगरसोंडेवरुन गडावर चढाई करायची. या मार्गात शेवट़च्या टप्प्यात कातळात कोरलेल्या पायर्या आहेत. किल्ल्याचे पठार विस्तिर्ण आहे. किल्ल्यावर हनुमानाचे मंदिर व पाण्याची कोरडी टाकी आहेत. याशिवाय गडावर कोणतेही अवशेष नाहीत. गडफ़ेरी करण्यासाठी अर्धा तास पुरतो.
कसे पोहोचावे
मुंबई - पुण्याहून नाशिकमार्गे कळवण हे ७३ किलोमीटर वरील तालुक्याचे गाव गाठावे. कळवनहून ५ किलोमीटरवर एकलहरे हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. एकलहरे गावाच्या मागेच प्रेमगिरी किल्ला आहे. गावाची वस्ती पार करुन पुढे गेल्यावर डाव्या बाजूला एक कच्चा रस्ता किल्ल्याच्या दिशेला जातो. या रस्त्याने ५ मिनिटे चालत गेल्यावर एक पाण्याची टाकी लागते. या टाकीपासून किल्ल्यावर जाण्यासाठी तीव्र चढाचा पण घसार्याची (स्क्री) पायवाट आहे. या पायवाटेच्या शेवटच्या टप्प्यात २० फ़ूटाचा कातळ टप्पा चढून जावे लागते. किल्ल्यावर जाणारी दुसरी वाट मळलेली आहे. कच्च्या रस्त्याने प्रेमगिरीच्या डोंगरसोंडे पर्यंत चालत जाऊन डोंगरसोंडेवरुन गडावर चढाई करायची. या मार्गात शेवट़च्या टप्प्यात कातळात कोरलेल्या पायर्या आहेत. खाजगी गाडीने नाशिक सप्तशृंगी मार्गे (७३ किलोमीटर) प्रेमगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी एकलहरे गावात पोहोचता येते.
ट्रेकसाठी लागणारा वेळ
⏱️ एकलहरे गावतून गडमाथ्यावर पोहोचण्यास एक तास लागतो.
सुविधा व सोयी
🏠
निवास व्यवस्था
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही.
🍽️
अन्न व्यवस्था
किल्ल्यावर आणि गावात जेवणाची सोय नाही.
💧
पाणी उपलब्धता
किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही.
प्रेमगिरी | Durgbharari
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : नाशिक
उंची : २८९० फुट
श्रेणी : मध्यम
बागलाणची भटकंती करताना साल्हेर,सालोटा,मुल्हेर,हरगड, धोडप यासारखे
प्रसिद्ध व प्रचंड विस्ताराचे किल्ले पहाताना पिंपळा,प्रेमगिरी यासारखे
अपरीचीत लहान आकाराचे चौकीवजा किल्ले पहायला मिळतात. हे किल्ले फारसे
परीचीत नसल्याने दुर्गप्रेमींची पाउले या किल्ल्यांकडे वळत नाही त्यामुळे
किल्ल्यांवर जाणाऱ्या वाटा देखील फारशा मळलेल्या नाहीत. प्रेमगिरी नावाने
ओळखला जाणारा असाच एक अपरीचीत दुर्ग आपल्याला नाशिक जिल्ह्यातील कळवण
तालुक्यात पहायला मिळतो. कळवण या तालुक्याच्यस ठिकाणाहुन ६ कि.मी. अंतरावर
असणारा हा किल्ला नाशिक शहरापासुन वणीमार्गे ७७ कि.मी.अंतरावर आहे. किल्ला
आसपासच्या भागात फारसा परीचीत नसल्याने किल्ल्याकडे जाणारा मार्ग व्यवस्थित
माहीती करून घ्यावा. कळवण गावातुन हिंगलवाडी गावाकडे जाताना २
कि.मी.अंतरावर डावीकडे एकलहरे गावात जाणारा फाटा आहे. या गावापुढे साधारण २
कि.मी.अंतरावर एक कच्चा रस्ता उजवीकडील डोंगराच्या दिशेने जातो. येथुन सरळ
गेल्यास २ कि.मी.अंतरावर हिंगलवाडी गाव आहे व तेथुन परत मागे यावे लागते.
उजवीकडील डोंगर म्हणजे प्रेमगिरी किल्ला असुन या कच्च्या रस्त्याने सरळ
गेल्यावर आपण किल्ला व त्याशेजारचा डोंगर यांना जोडणाऱ्या सोंडेखाली
पोहोचतो. (प्रेमगिरी किल्ल्यासाठी गुगलवर हा मार्ग व्यवस्थित अधोरेखित
झालेला आहे) या सोंडेखाली वनखात्याने झाडे लावलेली आहेत. येथे एक शेतघर व
गोठा असुन किल्ल्यावर पिण्याचे पाणी नसल्याने येथुनच पाणी भरून घ्यावे. या
घराच्या मागील बाजुने मळलेल्या वाटेने उभा चढ चढुन १५ मिनीटात आपण किल्ला व
त्याच्या शेजारील डोंगराला जोडणाऱ्या सोंडेवर पोहोचतो. किल्ला फारसा
परीचीत नसला तरी गडावर असलेल्या हनुमान मंदिरामुळे आसपासच्या गावातील
लोकांचा किल्ल्यावर वावर असल्याने वाट चांगलीच मळलेली आहे. या सोंडेवर
आल्यावर उजवीकडे वळुन किल्ला चढण्यास सुरवात करावी. वाटेवर काही ठिकाणी
घसारा असल्याने हि वाट सांभाळून पार करावी. या वाटेने थोडे वर आल्यावर
कातळात कोरलेल्या १०-१२ पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढुन गेल्यावर वाटेच्या
शेवटच्या टप्प्यात २० फ़ूटाचा सोपा कातळटप्पा आहे. हा टप्पा चढुन गेल्यावर
आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. वाटेत तटबंदी,बुरुज, दरवाजा यासारखे
किल्ल्याचे कोणतेही अवशेष दिसत नाहीत. किल्ल्यावर प्रवेश केल्यावर समोर
काटकोनात कोरलेली पाण्याची दोन टाकी दिसतात. स्थानिक लोक या टाक्यांना
रामकुंड व सिताकुंड म्हणुन ओळखतात. यातील एका टाक्यात पाणी असले तरी
स्थानिक त्यात अंघोळ करत असल्याने ते पिण्यायोग्य नाही. टाक्यासमोर काही
अंतरावर एका झाडाखाली दगडी बांधणीचे मंदिर असुन यात हनुमानाची मुर्ती आहे.
मंदिराबाहेर एका लाकडावर वाघ-चंद्र-सिंह यांच्या प्रतीमा कोरलेल्या आहेत.
मंदिरासमोर काही अंतरावर एक उंचवटा असुन त्यावर एका वास्तुचे अवशेष आहेत.
याशिवाय गडावर कोणतेही अवशेष नाहीत. किल्ल्याची समुद्रसपाटीपासुन उंची २८९०
फुट असुन निमुळत्या आकाराचा गडमाथा दक्षिणोत्तर साधारण ३० एकरवर पसरलेला
आहे. किल्ला फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो. किल्ला पाहुन परत पायथ्याशी
येण्यासाठी तीन तास पुरेसे होतात. किल्ल्यावर पिण्याचे पाणी नसल्याने
मुक्काम करणे सोयीचे नाही. सेलबारी - डोलबारी डोंगररांगेवर असलेल्या
साल्हेर, सालोटा, मुल्हेर या किल्ल्यांकडे जाणार्याा मार्गावर टेहळणी
करण्यासाठी पिंपळा, प्रेमगिरी या सारख्या किल्ल्यांची निर्मीती करण्यात आली
असा
© Suresh Nimbalkar
प्रेमगिरी
गडकोटांच्या सहाय्याने शिवाजी महाराजांनी केवळ स्वराज्यच स्थापन केले नाही, तर त्याचा राज्यविस्तार देखील केला. सभासद म्हणतो, राजियांनी या प्रांती १११ नवे गड वसविले, तर ७९ कर्नाटक प्रांती गड वसविले. अर्थात शिवरायांच्या अगोदरही सातवाहन, शिलाहार, राष्ट्रकूट, अहिरांनी गडकिल्ले बांधले. परंतु या कोणत्याही राज्यकर्त्यांपेक्षा महाराजांनी गडकिल्ल्यांना अनन्यसाधारण महत्त्व दिले. यामागचे मुख्य कारण म्हणजे राज्यविस्तारासाठी, राज्यसंवर्धनासाठी आणि राज्य चालविण्यासाठी त्यांनी दुर्गाचा पुरेपूर वापर करून घेतला. शिवरायांनी आपल्या एका पत्रात म्हटले आहे, दिल्लीद्रासारखा शत्रू उरावर आहे, तो आला तरी नवे-जुने तीनशेसाठ किल्ले हजरतीस आहेत. एकएक किल्ला वर्ष वर्ष लढला तरी तीनशेसाठ वर्षे पाहिजेत, त्यामुळे मराठ्यांचे राज्य संपवायचे तर त्यांचे हे किल्ले जिंकले पाहिजेत असे औरंगजेबाचे मत होते. तो म्हणतो, या दुष्टांचे (मराठ्यांचे) निवासस्थान म्हणजे ते किल्ले, जिंकून घ्यावे आणि कुटील जमातीची पाळेमुळे खणून काढावी, या कामाच्या मागे लागले पाहिजे. आणि किल्ल्यांच्या या नादापायी हा आलमगीर बादशहा पंचवीस वर्ष खपला आणि शेवटी इथेच महाराष्ट्रात संपला.
अवघ्या महाराष्ट्रात ४०० च्या वर गडकोट असले तरी, त्यांचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केलेला दिसतो. शत्रुच्या आक्रमणात या किल्ल्यांचे स्थान अचल आहे. त्यामुळेच त्यांच्या स्थानाला सर्वात जास्त महत्त्व दिले आहे. या किल्ल्यांचे उपयुक्ततेनुसार दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार मुख्य किल्ल्यांचा ज्याला Primary Forts (मुख्य किल्ले) असे म्हटले जाते. या किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणात शिबंदीचा राबता असे, दुसऱ्या प्रकारातील किल्ले Secondary Forts (सहाय्यक किल्ले) म्हणून बांधलेले असत. यांना दुय्यम प्रकारातील किल्ले असे देखील म्हणत असत. या किल्ल्यांचा मुख्य उपयोग किल्ल्यांच्या आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवणे आणि शत्रुसैन्याची आगाऊ सूचना 'सिग्रलिंग' मार्फत देणे हे असे. त्यामुळे साहजिकपणे या दुसऱ्या प्रकारच्या किल्ल्यांवर शिबंदी खूपच कमी असे. नाशिक जिल्ह्यातील बागलाणात साल्हेर, मुल्हेर, गाळणा, मालेगाव हे सर्व घाटमाथ्यावरील महत्त्वाचे गिरिदुर्ग असून, हे किल्ल्यांच्या पहिल्या प्रकारात मोडतात. यांच्या आजूबाजूला चौल्हेर, प्रेमगिरी, भिलाई आणि पिंपळागड अशा दुय्यम प्रकारच्या किल्ल्यांची निर्मिती केली गेली, जेणेकरून त्यांचा उपयोग या सर्व भागांवर नियंत्रण ठेवण्यासाठी होत असे. चौल्हेर, प्रेमगिरी आणि पिंपळागड हे सह्याद्रीच्या चणकापूर या उपरांगेतील किल्ले. किल्ला म्हणावा अशी एकही खूण आजमितीस प्रेमगिरीवर शिल्लक नाही. प्रेमगिरीचा उपयोग मुख्यत्वे साल्हेर, मुल्हेरचा परिसर आणि कळवण या मोगली ठाण्यावर लक्ष ठेवण्यासाठी होत असावा असा अंदाज आहे. अतिदुर्गमता, उपेक्षितपणा आणि फारसा कुठे उल्लेख नसल्यामुळे अशा किल्ल्यांवर जाणे एक मोठे दिव्य आहे. सह्याद्रीमधील 'भोराई' डोंगरापासून निघालेल्या 'पुणंद' अणि 'गिरणा' नदीच्या खोऱ्यांमध्ये प्रेमगिरीचा किल्ला उभा आहे.
कळवण हे नाशिकमधील तालुक्याचे शहर आहे. या कळवणपासून ५ कि.मी.वर प्रेमगिरीचा किल्ला आहे. कळवणहून हिंगुळवाडीला जाणाऱ्या रस्त्यावर, हिंगुळवाडीच्या १ कि.मी. अगोदर 'एकलहरे शिवफाटा' नावाचा एक फाटा मुख्य रस्त्यापासून उजवीकडे आत गेलेला आहे. या फाट्याहून १ कि.मी.ची पायपीट केल्यावर 'एकलहरे शिवफाटा' नावाचे गाव लागते. हे गाव म्हणजे मोजून चार ते पाच घरांची वस्ती. गावाच्या एका टोकाला प्रेमगिरीचा किल्ला आहे. गावकरी या किल्ल्याला 'एकलहरेचा' किल्ला म्हणूनच ओळखतात. किल्ल्याच्या डाव्या बाजूला 'कोठ्या' नावाचा डोंगर आहे. त्याच्यापुढे लांबलचक पसरलेला अजून एक डोंगर आहे, त्याला 'इंद्रमाळचा डोंगर' असे म्हणतात. किल्ल्याच्या उजव्या अंगास एक कातळभिंतीसारखा डोंगर आहे, त्याचे नाव 'कराळ्या डोंगर'.
मुळातच या किल्ल्यावर फारसे कोणी फिरकत नसल्याने गावकऱ्यांना किल्ल्याबद्दल कधी विचारले तर, ते इथे किल्लाच नाही असे सांगतात. त्याचसोबत हेदेखील सांगतात की, इथे एकलहरे नावाचा डोंगर आहे तिथं जावा, अन् जातांना हनुमंताला दावायला नारळ, गूळ, पेढे घेऊन जावा. नवसाला पावणारं देवं हाय ह्यो, मांगा तुमाले जे पाहिज्ये ते, पण नवस चुकविल्याबिना राहू नक्का बरं का! पुढे अधिक चौकशीअंती आम्हाला समजले की, प्रेमगिरीवरील हनुमंत नवसाला पावतो. त्यामुळे कळवण, अभोणा, हिंगुळवाडीहून खूप लोक नवस मागायला आणि फेडायला प्रेमगिरीवर येतात. प्रेमगिरीवर जाण्याची वाट मात्र सहज सोपी आणि मळलेली आहे. प्रेमगिरीचा किल्ला आणि त्याच्या डाव्या बाजूला असलेला 'कोठ्या डोंगर' यांच्यामध्ये एक खिंड आहे आणि खिंडीला छेदणारी एक डोंगरसोंड थेट एकलहरे शिवफाटा गावात उतरलेली आहे. या सोडेवरून चढून गेल्यावर पाऊण तासात आपण प्रेमगिरीच्या मुख्य डोंगरधारेवर पोहोचतो. या धारेवरून उजवीकडे जाणारी पायवाट धरायची आणि अर्ध्या तासात प्रेमगिरीच्या माथ्यावर पोहोचायचं.
किल्ल्यावर प्रवेश केल्यापासून संपूर्ण किल्ला फिरताना या किल्ल्याची निर्मिती एक संरक्षक ठाणे म्हणून केली असावी याची जाणीव सातत्याने होत रहाते. किल्ल्यावर ना कुठे तटबंदी ना कुठे बुरूज, आहेत ती फक्त दोन पाण्याची टाकी. ५ मीटर लांबीची ही टाकी चांगली कातळात खोदलेली आहेत. दोनपैकी एका टाक्यातील पाणी पिण्यास योग्य आहे. टाक्यांच्या समोर मारुतीचे एक मंदिर आहे. नवसाच्या या हनुमंताचे आपणही दर्शन घ्यायचे, आणि जर तुम्हाला नवस वगैरे मागायचा असेल तर तो फेडायला इथेच परत यावे लागेल, हे ध्यानात ठेवूनच नवस मागायचा. मंदिराच्या समोर पत्र्याची एक शेड आहे. इथे चार-पाच लोकांचा मुक्काम सहजपणे होऊ शकतो. किल्ल्याचा माथा खूप प्रशस्त आहे. हातात वेळ असल्यास या माथ्यावर एखादा फेरफटका मारण्यास हरकत नाही. किल्ल्याच्या माथ्यावरून अजंठा सातमाळ रांगेचे विहंगम दृश्य दिसते. कळवणवरून तीन ते चार तासांची सवड काढून प्रेमगिरीचा किल्ला पाहून यायला काहीच हरकत नाही.
किल्ल्याची उंची : समुद्रसपाटीपासून ८१० मीटर (२६५७ फूट)
तालुका : कळवण
किल्ल्याची श्रेणी : सोपी
किल्ल्याचे इतर नाव : एकलहरेचा डोंगर
डोंगररांग : चणकापूर डोंगररांग
किल्ल्याच्या पायथ्याचे गावं एकलहरे शिवफाटा
किल्ल्याची श्रेणी: सोपी
पायथ्याच्या गावापासून लागणारा वेळ : एकलहरे शिवफाट्यापासून सव्वा तास.
जवळचे एस. टी. स्थानक : कळवण
राहण्याची सोय : किल्ल्यावरील हनुमान मंदिरात ४ ते ५ लोकांची
राहण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय : आपण स्वतः करावी
पिण्याचे पाणी : किल्ल्यावर पिण्यायोग्य पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी उत्तम कालावधी : ऑगस्ट ते मार्च
संपूर्ण किल्ला फिरण्यास लागणारा वेळ : १ तास
किल्पच्या जवळपासची गावे हिंगुळवाडी, कळवण, एकलहरे शिवफाटा
लाईच्या
वेगळ्या घसरड्या अनुभवानंतर आम्ही थकलेले सर्व जीव पुन्हा अंगात त्राण
आणून निघालो दिवसातल्या शेवटच्या किल्ल्याकडे म्हणजे प्रेमगिरी
किल्ल्याकडे.प्रेमगिरी साठी कळवण गावापासून ५ किलोमीटर वर असणारे एकलहरे
गाव गाठायचे. पेमगिरी आणि प्रेमगिरी हे दोन्हीही वेगळे किल्ले आहेत ह्याची
नोंद घ्यावी.संध्याकाळच्या ५.१५ वाजता आम्ही आशेने हा किल्ला चढून अंधारातच
खाली उतरावे लागेल ह्या तयारीनेच निघालो.परंतु आमचे दुर्दैव असे कि ह्या
किल्ल्यावर जायला दोन वाटा आहे पैकी एक वाट गावाच्या मुख्य रस्त्यावरून आत
जाऊन डावीकडे वळून सरळ खडा चढ चढून जावी लागते (ज्या वाटेने आम्ही गेलो)
आणि दुसरी वाट सोपी अशी थोडी फिरून रस्त्याच्या बाजूंची शेतं पार
करून तिथून सरळ जायचे व डावीकडे वळायचे .कृपया करून सरळ खडा चढ असलेल्या
वाटेने जाऊ नये हि वाट घसरडी आणि खडतर आहे.दुसऱ्या वाटेने जावे जी शेतं पार
करून जाता येते.जाताना वाटाड्या जरूर घ्यावा.मी ७५% वाट पार केलेली मात्र
नंतर आमच्या लीडर नेच निर्णय घेतला कि सर्वांनी परत मागे फिरायचे कारण चढ
हा खडा होता आणि तिथून पुन्हा अंधारातून मागे येणे त्रासदायक झाले
असते.नाईलाजाने आम्हाला परत फिरावे लागले , आमच्यापैकी फक्त ४ जण पुढे गेली
आणि त्यांना अंधारातून काट्या कुड्यातून वाट काढून येईपर्यंत ८ वाजले.
हनुमान मंदिर
हनुमान मंदिर
प्रेमगिरी बघू न शकल्याने वाईट तर वाटले पण तो निर्णय पण योग्य होता.रात्
कळवणमधील एक किल्ला: प्रेमगिरी
प्रेमगिरी हा जोरदार सोपा आणि आनंददायक ट्रेक आहे ज्यास अवघ्या ४ तास लागतात. चणकापूर धरणाशेजारी सेलबारी रेंजमध्ये प्रेमगिरीने अनेक काळापासून आपली भूमिका कायम ठेवली आहे. प्रेमगिरी प्रदेशात सैन्याच्या कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. इतिहासाच्या नकाशावर अशी कोणतीही लढाई किंवा ऐतिहासीक घटना घडली नाही.
कळवणपासून जवळच एकलहरे गावाच्या मागेच प्रेमगिरी किल्ला आहे. एकलहरे गावातून हिंगळवाडी ला गाडी मार्ग आहे, हिंगळवाडी गडाच्या पायथ्याशी आहे. समुद्रसपाटीपासून ८१० मीटर उंचीचा हा गिरिदुर्ग पूर्व-पश्चिम पसरलेला आहे. प्रेमगिरी फारसा उंच नसला तरी किल्ल्यावर जाण्यासाठी तीव्र चढणीची पण घसाऱ्याची पायवाट आहे.
हिंगळवाडीतून चालत गडाच्या पूर्वेस असलेल्या टोकापासून उतरणाऱ्या धारेवर चढायचे. या पायवाटेच्या शेवटच्या टप्प्यात २० फुटाचा कातळ टप्पा चढून जावं लागतं. गडमाथ्यावर पोहचल्यावर लांबलचक पसरलेला माथा दिसतो. गडाच्या पश्चिम टोकाकडे चालत गेल्यावर सुरुवातीस घरांचे दोन तीन पाया (जोते) दिसतात.
बरंच अंतर माथा तुडवल्यावर एका उंबराच्या झाडाखाली विराजमान असलेले शिवलिंग आणि नंदी महाराज दर्शन देतात. झाडाच्या छायेतच बांधलेलं एक छोटेसं पुरातन मंदिर दिसते. मंदिरात हनुमंताची सुंदर मूर्ती पाहायला मिळते. इतर गडावरील हनुमंत मूर्तीपेक्षा ही मूर्ती जरा वेगळीच आहे. हनुमंताच्या दर्शनास पंचक्रोशीतील भाविक गडावर येत असतात.
हनुमंत मंदिराच्या शेजारीच काही अंतरावर रामकुंड आणि सीताकुंड नावाच्या पाण्याच्या टाकी पाहायला मिळतात. टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. गडाच्या उत्तर टोकास कातळ कोरीव पायऱ्यांची वाट दिसते, हा गडाचा राजमार्ग ! एकलहरे गावातून प्रेमगिरी आणि इंग्रमाळ यांच्या मधील खिंडीत मळलेली पायवाट येते. खिंडीतून गडचढाई करताना शेवटच्या टप्प्यात कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. पायऱ्यांवर एका अरुंद कपरीला शेंदूर लावलेला दिसतो. मात्र दरवाजा आणि तटबंदी चे अवशेष कुठेही दिसत नाहीत. गडाचा वापर टेहळणीसाठी करत असावेत.
प्रेमगिरीवरून दक्षिणेस अजिंठा सातमाळा रांगेतील गडकोटांचे उत्तर दर्शन होते. सप्तश्रृंगी, मार्कंड्या, कण्हेरगड, जावळा-रावळा, धोडप, इखारा हा सर्व परिसर अगदी जवळ दिसतो. शेजारचा इंद्रमाळही लक्ष वेधून घेतो.
किल्ला प्रेमगिरी, ता. कळवण
-----------------------------------------------------------------------------
A fort in Kalwan: Premgiri
Premagiri is a very easy and enjoyable trek that takes only 4 hours. Premagiri has maintained its role for a long time in the Selbari range adjacent to the Chanakapur dam. There was no movement of troops in the Premagiri region. No such battle or historical event has taken place on the map of history.
Premagiri fort is located behind Ekalhare Village near Kalwan. There is a train route from Ekalhare Village to Hingalwadi at the foot of Hingalwadi fort. It is located at an altitude of 810 m above sea level. Although Premgiri is not very high, there is a steep climb to reach the fort.
We used to walk through Hingalwadi and climb the stream coming down from the eastern end of the fort. In the last stage of this path, you have to climb a steep stage of 20 feet. When you reach the top of the fort, you can see the long spread head. Walking towards the western end of the fort, you initially see two or three foundations of the house.
After walking a long distance, Shivling and Nandi Maharaj, seated under an Umbar tree, pay homage. There is a small ancient temple built in the shade of a tree. A beautiful idol of Hanumanta can be seen in the temple. This idol is slightly different from other Hanumanta idols on the fort. Devotees from Panchkrushi come to the fort to pay obeisance to Hanumanta.
Water tanks called Ramkund and Sitakund can be seen at some distance near the Hanumanta temple. The water in the tank is not drinkable. At the northern end of the fort, you can see steep carved steps, this is the highway of the fort! From Ekalhare village comes the footpath found in the gorge between Premgiri and Ingramal. There are steps carved in the rock at the last stage while climbing through the gorge. On the steps, a narrow kapari is seen with readlid. But the remnants of the gate and the ramparts are nowhere to be seen. The fort must have been used for surveillance.
Gadkot in the Ajanta Satmala Range is seen to the south from Premgiri. Saptashrungi, Markandya, Kanhergad, Jawala-Rawla, Dhodap, Ikhara are all nearby. The neighboring Indramal also attracts attention.
Fort Premgiri, Tal. Kalwan














No comments:
Post a Comment