Saturday, April 11, 2026

अचला

नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेला सुरगणा, कळवण, चांदवड आणि नांदगाव तालुक्यांमधून एक डोंगररांग पूर्वपश्चिम जाते. या रांगेला 'सातमाळा' डोंगररांग म्हणतात. अतिशय लक्षवेधक अशी ही रांग आहे, कारण ह्या रांगेच्या दक्षिणेला सपाट मैदान असल्यामुळे ती आगंतुक असल्यासारखी दिसते. या रांगेत पश्चिमेकडून हातगड, मग अचला किल्ला, अहिवंत, सप्तशृंगी, मार्कंडा, रवळ्या-जवळ्या, धोडप, हंड्या सुळका, ईखारा सुळका, कांचना किल्ला, इंद्राई, चांदवड, राजदेहेर आणि काळदेहेर हे महत्त्वाचे किल्ले येतात. मुळातच हे किल्ले खूप प्राचीन आहेत आणि निसर्गतः ते एवढे अभेद्य आहेत' की, अगदी इंचभर तटबंदीने आणि मूठभर शिबंदीने देखील मोठ्या सैन्याशी लढू शकतील. उत्तरेकडून आणि गुजराथमधून येणाऱ्या शत्रूना अडविण्याचे सामर्थ्य या रांगेतील किल्ल्यांमध्ये आहे.  या गिरीदुर्गांच्या मालिकेमध्ये नामवंत दुर्गांबरोबरच काही अपरिचित दुर्गही सामावलेले आहेत. या अजंठा-सातमाळा रांगेची सुरवात होते ती अचला नावाच्या अपरिचित किल्ल्यापासुन. अचला हा या रांगेतील दुसऱ्या क्रमांकाचा किल्ला आहे. दगड पिंप्रि गावामागे असलेला अचला गड हा छोटेखानी किल्ला अहिवंत गडाचा साथिदार आहे. अचला गडाचे स्वरुप पाहाता हा टेहळणीचा किल्ला असावा. या किल्ल्याच्या डाव्या बाजूला असलेल्या डोंगराला टवल्या नावाने ओळखतात, तर उजव्या बाजूच्या डोंगराला भैरवाचा डोंगर म्हणतात.

Achala

खाजगी वाहानाने अचला, अहिवंत आणि मोहनदर हे तीन किल्ले दोन दिवसात व्यवस्थित पाहून होतात. पहिल्या दिवशी अचला,अहीवंत पाहून दरेगावातील मारुती मंदिरात किंवा मोहनदरी गावातील आश्रमशाळेच्या व्हरांड्यात मुक्काम करुन दुसर्‍या दिवशी मोहनदर किल्ला पाहाता येईल.

डावीकडे तौल्या - उजवीकडे अचला

मुंबई किंवा पुणे मार्गे नाशिक गाठाव. नाशिकहुन वणी गाठावे. वणीहून एस.टी.ने पिंपरी अचलाकडे जावे. हे अंतर साधारण १२ किमी आहे.

नाशिक-सापुतारा महामार्गावरील पिंपरी अचला हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव असुन खाजगी वाहनाने आपल्याला थेट पिंपरीपाडा या किल्ल्याजवळ असलेल्या वस्तीपर्यंत जाता येते. नाशिकहून सापुतारा आणि बोरगावला जाणाऱ्या अनेक एसटी बसेस आहेत. यांपैकी कोणतीही पकडायची आणि वणीच्या पुढील १५ कि.मी.वर असणाऱ्या 'पिंपरीअचला' नावाच्या गावी उतरायचे. नाशीकहुन वणीमार्गे पिंपरी अचला हे अंतर ५४ कि.मी. तर वणीपासुन हे अंतर १२ कि.मी. आहे. पिंपरी अचला ते पिंपरीपाडा हे अंतर २.५ कि.मी. असुन या वाडीतील हनुमान मंदिराकडून किल्ल्यावर जाणारी वाट आहे. पिंपरीअचला गाव बऱ्यापैकी मोठे असल्याने कंडक्टरच्या ते चांगल्या लक्षात असते. गाव हमरस्त्याला लागून असल्याने दिवसभर वाहनांची वर्दळ चालू असते. पिंपरीअचला हे काही किल्ल्याच्या पायथ्याचे गाव नाही, तर किल्ल्याच्या पायथ्याने गाव आहे 'पिंपरीपाडा' हे गाव पिंपरीअचलापासून सुमारे अर्ध्या तासावर आहे. तिथपर्यंत जाण्याची वाट कधी बांधाबांधावरून तर कधी शेताडीतून जाते. आजूबाजूच्या डोगरदऱ्यांमधून वाहणारे धबधबे, रंगीबेरंगी झाडेझुडपे, त्यावर असणारा पक्ष्यांचा किलबिलाट यामुळे पावसाळ्यात तर ही वाट आल्हाददायी वाटते. निसर्गाचे हे सौंदर्य न्याहाळण्याच्या नादात पिंपरीपाडा कधी येते हे समजतच नाही.
पिंपरीपाडा गावात एक छोटंसं जुनं मंदिर आहे. दगड पिंपरी हे अचला किल्ल्याच्या पायथ्याचे गावं आहे. येथे एक दगड देखील आहे जो शेंदुरा (नारंगी रंग) मध्ये रंगलेला दगड आहे. हा दगड सुमारे ७  फूट ( २.१३ मीटर) आहे. सर्वात लांब आणि मोठा दगड असल्यामुळे, येथील एका गावाला पिंपरीवाडी किंवा “दगड पिंपरी” या नावाने ओळखले जाते.खाजगी वाहानाने थेट दगड पिंपरी गावात जाता येते.  दगड पिंपरी ते बेलवाडी असा कच्चा रस्ता झालेला आहे. काही वर्षात गाडीने थेट सतीचे देऊळ असलेल्या सोंडेपर्य़ंत पोहोचता येईल. तेथून गडमाथा १ तासात गाठता येईल.अचला गावात उतरून दगड पिंपरी गावाकडे सरळ चालत निघावे. हे अंतर अर्ध्या तासाचे आहे.

 पिंपरी अचला गावातुन पिंपरीपाडाकडे जाताना वाटेत ५-६ फुट उंचीच्या अलीकडील काळातील ६  वीरगळ नजरेस पडतात.

 गावाच्या मागील बाजुस असलेला डोंगर म्हणजे अचला किल्ला तर त्याच्या डाव्या बाजुस असलेला डोंगर टवल्या डोंगर म्हणुन ओळखला जातो.  अचला किल्ला हा गावाच्या वेशीवर पाठमोरा उभा आहे. किल्ल्याच्या अर्ध्या उंचीवर एक पठार दिसते, त्या पठारावर मध्येच एक खिंड आहे.

 या खिंडीच्या तोंडावर एक मंदिर आहे. पिंपरीपाड्यातून हे मंदिर व्यवस्थित दिसते.  अचला किल्ल्याच्या उजव्या बाजुस एक डोंगरसोंड खाली आलेली असुन या सोंडेखालील खिंडीत एका पत्र्याचा निवारा दिसतो. या निवाऱ्याखाली एका घुमटीत शेंदुर फासलेले दगड असुन स्थानिक लोक या स्थानाला सतीचे देऊळ म्हणतात. किल्ल्यावर जाणारी वाट या मंदिराकडून वर जात असल्याने हे मंदीर नजरेसमोर ठेऊनच डोंगर चढण्यास सुरवात करावी.  गावाच्या थोडं पुढे शेतातून चालत गेल्यावर द्राक्षांच्या बाग लागतात. या बागांमधुनच वाट पुढे जाते.  पाऊलवाट प्रथम शेतातून आणि नंतर वनखात्याने लावलेल्या जंगलातून वर चढत जाते. साधारणपणे अर्ध्या तासात आपण सोंडेवरील सतीच्या देवळापाशी पोहोचतो. देवळापासून डाव्या बाजूला दिसणारा किल्ला "अचला", तर उजवीकडे धावत जाणारी सोंड थेट "अहिंवत" गडाला जाऊन मिळते. डाव्या बाजूने किल्ल्याच्या नाकाडावरून अंगावर येणारी वाट पकडावी. संपुर्ण वाटेत कुठेही सावली किंवा झाडही नाहीये.

 

आपण गडाचा पहिला टप्पा पार करतो. येथुन थोडंस पुढे गेल्यावर आपण गडाच्या दुसऱ्या टप्प्यात येतो. येथे एक हनुमंताचे सुंदर छोटंस मंदिर केले आहे. या मंदिराला शेड नाही. हनुमंताची मुर्ती शेंदुराने फासली आहे. पिंपरीपाडा वस्तीतील हनुमान मंदिराबाहेर एक सुंदर दगडी किर्तीमुख पहायला मिळते. 
इथून डावीकडची वाट सरळ अचला च्या माथ्यावर नेउन सोडते आणि उजवीकडच्या वाटेच्या सोंडेने सरळ उतरून अहिवंत गडाची वाट आहे.  कड्याच्या नाकाडा खाली आल्यावर उजवीकडे वळून , कडा डावीकडे आणि दरी उजवीकडे ठेवून आडवे चालत गेल्यावर कातळात खोदलेल्या पायर्‍या लागतात. पायर्‍या चढुन गेल्यावर आपला गडावर प्रवेश होतो. दगड पिंपरी गावातून गडमाथा गाठण्यास दीड तास लागतो.

  खिंडीमधून किल्ल्यावर दोन वाटा जातात. एक वाट बरोबर समोरच्या नाकाडावरून सरळसोट वर जाते. खालून बघितल्यावर जणू कुठे वाट नाहीच की काय असे वाटते. पण एकदा का पायाखाली घातली की समोरचा रस्ता आपोआप मिळतो. ही वाट बरीच दमछाक करणारी आहे, त्यामुळे उतरण्यासाठी तिचा वापर करणे जास्त योग्य. दुसरी वाट जरा लांबची आहे. खिंडीतील मंदिरापासून डाव्या अंगास एक पठार आहे. या पठारावरून थोडा वेळ चालत गेले की निवडुंग आणि बाभळीचे जंगल लागते. याच जंगलातून एक वाट डावीकडे अचलाच्या कातळकड्याकडे जाते. वाट ओळखण्याची खूण म्हणजे किल्ल्यावरून एक डोंगरसोंड थेट पठारावर उतरलेली आहे, त्या डोंगरसोंडेकडे पाहिल्यावर असे वाटते, जणू काय ही डोंगरसोंड आपल्यासाठीच खाली उतरलेली आहे. या सोंडेवरून चढत गेल्यावर आपण थेट अचला किल्ल्याच्या कोरलेल्या पायऱ्यांपाशी पोहोचतो. या कातळकोरीव पायऱ्या आपल्याला किल्ल्याच्या उध्वस्त दरवाज्यापाशी आणून सोडतात. खिंडीपासून या उद्ध्वस्त पर्यंत पोहोचायला नाही म्हटले तरी साधारण दीड तास सहजच लागतो.

पुढे सोंडेवरील घसाऱ्याचा चढ चढत आपण किल्ल्याच्या डोंगराला भिडतो. येथुन किल्ल्याचा डोंगर डाव्या बाजूला ठेवत डोंगराला वळसा मारून आपण किल्ल्याच्या दुसऱ्या बाजुस येतो. येथुन गडावर जाणारी वाट इंग्रजांनी उध्वस्त केल्याने मोठमोठे दगड ढासळून पडले आहेत. या कोसळलेल्या दगडावरून किल्ला चढायला सुरवात करायची. वाटेच्या सुरवातीला डाव्या बाजुस थोडे वर खडकात कोरलेली ३ x ३ आकाराचे तोंड असलेली गुहा असुन या गुहेच्या आत दुसरी मोठी गुहा खोदलेली आहे. सध्या हि गुहा पाण्याने भरलेली आहे. या गुहेच्या पुढील भागातुन गडावर जाण्यासाठी कातळ कोरीव पायऱ्या सुरु होतात. या पायऱ्याच्या शेवटी खडकात कोरलेले मातीने भरलेले टाके दिसते. टाक्याच्या वरील बाजुस गडाची तटबंदी पहायला मिळते. या टाक्यापासुन थोडा चढ चढल्यावर आपला गडावर प्रवेश होतो. या वाटेवर असलेला गडाचा दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला असुन त्याचे ठिकाणही समजत नाही. आपला गडावरील प्रवेश हा ढासळलेल्या तटबंदी वरून होतो. 

Fort

Fort

दगड पिंपरी गावातून गडमाथा गाठण्यास साधारण दोन तास लागतात. किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासुन ३७६६ फुट असुन किल्ल्याचा पसारा पुर्वपश्चिम ११ एकरवर पसरलेला आहे. किल्ल्याचा डोंगर चारही बाजूनं ताशीव असल्याने फारशी तटबंदी बांधलेली दिसत नाही. गडावर प्रवेश केल्यावर प्रथम उजवीकडील भाग पाहुन घ्यावा.


 येथे समोरच एका रेषेत कोरलेली पाण्याची तीन टाकी दिसुन येतात. यातील दोन टाकी पुर्णपणे मातीने भरलेली असुन तिसरे टाके कोरडे पडलेले आहे. या टाक्याच्या आसपास कपडे पडलेले दिसतात. कुठल्याही मोठया आजारातून बरे झाल्यावर गावकरी या ठिकाणी येऊन अंघोळ करतात व जुने कपडे येथे सोडुन नविन कपडे घालून जातात. 

टाक्यांच्या पुढील बाजुस एका झाडाखाली काही झिज झालेल्या मुर्ती ठेवलेल्या आहेत. त्यामागे काही वास्तुंचे चौथरे दिसुन येतात. 

येथे वाटेच्या उजव्या बाजुस असलेल्या घळीत उतारावर एकाखाली एक असा आठ टाक्यांचा समुह पहायला मिळतो. यातील तीन टाक्यात पाणी असले तरी गावकरी वरील टाके आटल्यावर या टाक्यात अंघोळ करत असल्याने ते पिण्यायोग्य नाही. गडाचा हा भाग फिरून झाल्यावर आपण गडावर प्रवेश केला तेथुन डावीकडील भाग फिरून घ्यावा. या भागात आपल्याला एका मोठया वास्तुचा चौथरा तसेच मातीने भरलेले एक टाके पहायला मिळते. सध्या गावकऱ्यानी या टाक्यातील माती काढण्याचे कामास सुरवात केली आहे. 

अचला किल्ल्याचा गडमाथा अत्यंत अरुंद असुन माथ्यावर टाकी वगळता फारसे अवशेष नसल्याने अर्ध्या तासात आपली गडफेरी पुर्ण होते. किल्ल्यावरून अहिवंतगड, सप्तशृंगी, मार्कंड्या, रवळ्या-जवळ्या, धोडप,साल्हेर-सालोटा,रामसेज, देहेर,मोहनदर तसेच कंडाणा हे किल्ले तसेच तौल्या, भैरवनाथ डोंगर, देवळी धरण, चणकापूर धरण, उनंदा  नदीच्या काठावर वसलेले पुणेगाव धरण, हरण टेकडी असा परिसर  पहायला मिळतो.

 पर्णालपर्वतग्रहणाख्यानं या ग्रंथात शिवाजी महाराजांनी अहीवंत गडासोबत अचलागड जिंकल्याचा उल्लेख येतो तर जेधे शकावलीत शिवाजी महाराजांनी नोव्हेंबर १६७० मध्ये अहिवंत गडासोबत इतर किल्ले घेतल्याचा उल्लेख येतो. सभासद बखरीत अचला गडाचा उल्लेख अचलगिरी गड असा येतो. १७५३-५४ दरम्यान मराठ्यांनी नाशिकमधील निजामाकडून जिंकलेल्या किल्ल्यांच्या यादीत अचला किल्ल्याचे नाव सामील आहे. जुन १८१८ मध्ये इंग्रज अधिकारी कॅप्टन ब्रिग्ज याने अहिवंत गडाबरोबर अचला किल्ला देखील ताब्यात घेतला.


 

 





You can clearly observe the temple near a col in between Fort Achala and adjacent Bhairavnath hill.


Confirming directions, we headed towards col. Facing col, Fort towards left is Achala and route going towards right will lead to traverse route to Fort Ahivant or to Belwadi village.


We reached to temple at col , through farms and then ascending small hill.

 

 

 

 

 

 



डावीकडून रवी डंबाळे - साकेत - सुनील भुसार
खिंडीत छोटेसे देऊळ त्याला गावकरी सतीचे देऊळ असं संबोधतात.

सतीचे देऊळ 
खिंडीतून डावीकडची वाट अचला च्या कातळा कडे जाते तर उजवीकडची सोंड थेट अहिवंत किल्ल्याला जाऊन मिळते. आता मात्र अचला चे रौद्र रूप दिसायला सुरुवात झाली. पुढील १५-२० मिंटात अचला च्या कातळटोपी च्या खाली  फासलेल्या हनुमानाचे दर्शन घेतले आणि घसाऱ्याच्या वाटेने ये रे माझ्या मागल्या करत पायर्यांपाशी पोहोचलो.



दरी उजवीकडे व अचला चे कातळ नाक डावीकडे ठेवत निम्म्या पायऱ्या चढून वर आलो. वर गेल्यावर वाटेत गुहा लागते, पायऱ्या संपल्यावर एक टाकं व उजवीकडे एक बुजलेले टाकं आहे.

 

 

 


















 गिरीदुर्ग नाशिक सातमाळ
🏔️
श्रेणी नुसार स्तर
मध्यम
📏
समुद्र सपाटीपासून उंची (फ़ूट)
4040
🏰
किल्ल्याचा प्रकार
गिरीदुर्ग
📍
जिल्हा
नाशिक

किल्ल्याची छायाचित्रे

किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा

मुख्य छायाचित्र

Achala

सर्व छायाचित्रे पहा

नकाशे व मार्ग

किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा

प्रस्तावना

नाशिक जिल्ह्यातून पूर्व पश्चिम जाणार्‍या सातमाळ डोंगररांगेत १८ किल्ले आहेत. त्यापैकी दगड पिंप्रि गावामागे असलेला अचला गड हा छोटेखानी किल्ला अहिवंत गडाचा साथिदार आहे. अचला गडाचे स्वरुप पाहाता हा टेहळणीचा किल्ला असावा. या किल्ल्याच्या डाव्या बाजूला असलेल्या डोंगराला टवल्या नावाने ओळखतात, तर उजव्या बाजूच्या डोंगराला भैरवाचा डोंगर म्हणतात.

खाजगी वाहानाने अचला, अहिवंत आणि मोहनदर हे तीन किल्ले दोन दिवसात व्यवस्थित पाहून होतात. पहिल्या दिवशी अचला,अहीवंत पाहून दरेगावातील मारुती मंदिरात किंवा मोहनदरी गावातील आश्रमशाळेच्या व्हरांड्यात मुक्काम करुन दुसर्‍या दिवशी मोहनदर किल्ला पाहाता येईल.

महत्त्वाची ठिकाणे

दगड पिंप्री हे अचला किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. या गावात ५ फ़ूट उंचीच्या ६ वीरगळी पाहायला मिळतात. गड चढायला सुरुवात केल्यावर अचला गडाची सोंड खाली उतरते. त्या खिंडीत एक पत्र्याचे देऊळ आहे. त्या देवळाला सतीचे देऊळ म्हणतात. तेथून एक टप्पा चढून गेल्यावर भगव्या झेंड्याच्या खाली शेंदुर फ़ासलेली हनुमानाची मुर्ती पाहायला मिळते. गडाच्या कातळ टोपी खाली गडावर जाणार्‍या कातळ कोरीव पायर्‍या पाहायला मिळतात. अर्ध्या पायर्‍या चढल्यावर कातळात वरच्या बाजूला एक ३ फ़ूट लांब आणि ३ फ़ूट रुंद आकाराची चौरस प्रवेशव्दार असलेली गुहा पाहायला मिळते. गुहेत जाण्यासाठी पायर्‍या सोडून थोड चढुन जाव लागत. गुहा १० फ़ुट लांब आहे. या गुहेतून दूरवरचा परीसर चांगला दिसतो. याची योजना टेहळणीसाठी केलेली असावी. गुहा पाहून परत पायर्‍या चढायला सुरुवात करावी. पायर्‍या संपतात तेथे पाण्याचे बुजलेले एक टाक आहे. पुढे एक छोटा टप्पा चढुन गेल्यावर उजव्या बाजूला पाण्याचे बुजलेले एक टाक आहे.

गड माथ्यावर प्रवेश केल्यावर एक टाक दिसत. त्या टाक्या भोवतीच्या झुडूपांवर कपडे पडलेले दिसतात. कुठल्याही मोठ्या आजारातून बरे झाल्यावर गावकरी या ठिकाणी येऊन स्नान करतात. त्यावेळी ते गावातून घालून आलेले कपडे या ठिकाणी सोडून, नविन कपडे घालून जातात. आज मात्र हे टाक सुकलेल आहे. टाक्याच्या वरच्या बाजूला एका झाडाखाली काही मुर्ती ठेवलेल्या आहेत. पण त्या ओळखता येण्याच्या पलिकडे झिजलेल्या आहेत. त्यामागे घरांची जोती आहेत. तिथून उजव्या बाजूला वळून किल्ला आणि बाजूचा डोंगराच्या घळीत उतरायला सुरुवात केली की दोन टाकी दिसतात त्याच्या खालच्या बाजूस दोन टाकी आहेत. त्याच्या खाली एका पुढे एक पाच टाकी आहेत. अशी ८ टाक्यांची अनोखी रचना पाहायला मिळते. हि टाकी पाहून परत किल्ल्यात प्रवेश केला तेथे येऊन विरुध्द दिशेला (प्रवेश केला तेथून डावीकडे) डाव्या बाजूला गेल्यावर एक मोठ पाण्याच कोरड टाक पाहायला मिळते. त्यात दगड पडून ते बर्‍याच प्रमाणात बुजलेल आहे. टाक पाहून परत प्रवेशव्दाराशी आल्यावर गडफ़ेरी पूर्ण होते. गडमाथा छोटा असल्यामुळे गडफ़ेरीस अर्धा तास पुरतो. अहिवंतगड, सप्तशृंगी, मार्कंड्या, रावळ्या-जावळ्या, धोडप ही रांग अचला वरुन पाहायला मिळते.

कसे पोहोचावे

मुंबई किंवा पुणे मार्गे नाशिक गाठाव. नाशिकहुन वणी गाठावे. वणीहून एस.टी.ने पिंपरी अचलाकडे जावे. हे अंतर साधारण १२ किमी आहे. अचला गावात उतरून दगड पिंपरी गावाकडे सरळ चालत निघावे. हे अंतर अर्ध्या तासाचे आहे. दगड पिंपरी हे अचला किल्ल्याच्या पायथ्याचे गावं आहे. खाजगी वाहानाने थेट दगड पिंपरी गावात जाता येते. गावातून समोरच्या डोंगरसोंडेवरील खिंडीत छोटेसे सतीचे देऊळ दिसते. त्याच्या दिशेने वर चढत जावे. पाऊलवाट प्रथम शेतातून आणि नंतर वनखात्याने लावलेल्या जंगलातून वर चढत जाते. साधारणपणे अर्ध्या तासात आपण सोंडेवरील सतीच्या देवळापाशी पोहोचतो. देवळापासून डाव्या बाजूला दिसणारा किल्ला "अचला", तर उजवीकडे धावत जाणारी सोंड थेट "अहिंवत" गडाला जाऊन मिळते. डाव्या बाजूने किल्ल्याच्या नाकाडावरून अंगावर येणारी वाट पकडावी. पहिल्या टप्प्यावर मारूतीचे मंदिर आहे. पुढे ही वाट कातळ कड्यापर्य़ंत उभी चढत जाते. कड्याच्या नाकाडा खाली आल्यावर उजवीकडे वळून , कडा डावीकडे आणि दरी उजवीकडे ठेवून आडवे चालत गेल्यावर कातळात खोदलेल्या पायर्‍या लागतात. पायर्‍या चढुन गेल्यावर आपला गडावर प्रवेश होतो. दगड पिंपरी गावातून गडमाथा गाठण्यास दीड तास लागतो.

दगड पिंपरी ते बेलवाडी असा कच्चा रस्ता झालेला आहे. काही वर्षात गाडीने थेट सतीचे देऊळ असलेल्या सोंडेपर्य़ंत पोहोचता येईल. तेथून गडमाथा १ तासात गाठता येईल.

ट्रेकसाठी लागणारा वेळ

⏱️ दगड पिंप्री मार्गे दिड तास लागतो.

सुविधा व सोयी

🏠

निवास व्यवस्था

किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.

🍽️

अन्न व्यवस्था

जेवणाची व्यवस्था आपण स्वत…: करावी.

💧

पाणी उपलब्धता

गडावर पिण्या योग्य पाणी नाही.

सर्वोत्तम काळ

🌤️ जुलै ते फेब्रुवारी

जवळील गावे

दगड पिंप्री

 
 
 
 
 
 
 

उंची : ३७६६ फुट

श्रेणी : मध्यम

नाशिक जिल्ह्याच्या मध्यभागातून अजंठा-सातमाळा ही सह्याद्रीची एक उपरांग पुर्वपश्चिम पसरली आहे. पुर्वपश्चिम पसरलेल्या या रांगेमध्ये अनेक दुर्ग आहेत. या गिरीदुर्गांच्या मालिकेमध्ये नामवंत दुर्गांबरोबरच काही अपरिचित दुर्गही सामावलेले आहेत. या अजंठा-सातमाळा रांगेची सुरवात होते ती अचला नावाच्या अपरिचित किल्ल्यापासुन. नाशिक-सापुतारा महामार्गावरील पिंपरी अचला हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव असुन खाजगी वाहनाने आपल्याला थेट पिंपरीपाडा या किल्ल्याजवळ असलेल्या वस्तीपर्यंत जाता येते. नाशीकहुन वणीमार्गे पिंपरी अचला हे अंतर ५४ कि.मी. तर वणीपासुन हे अंतर १२ कि.मी. आहे. पिंपरी अचला ते पिंपरीपाडा हे अंतर २.५ कि.मी. असुन या वाडीतील हनुमान मंदिराकडून किल्ल्यावर जाणारी वाट आहे. पिंपरी अचला गावातुन पिंपरीपाडाकडे जाताना वाटेत ५-६ फुट उंचीच्या अलीकडील काळातील ६ विरगळ नजरेस पडतात. पिंपरीपाडा वस्तीतील हनुमान मंदिराबाहेर एक सुंदर दगडी किर्तीमुख पहायला मिळते. गावाच्या मागील बाजुस असलेला डोंगर म्हणजे अचला किल्ला तर त्याच्या डाव्या बाजुस असलेला डोंगर टवल्या डोंगर म्हणुन ओळखला जातो. अचला किल्ल्याच्या उजव्या बाजुस एक डोंगरसोंड खाली आलेली असुन या सोंडेखालील खिंडीत एका पत्र्याचा निवारा दिसतो. या निवाऱ्याखाली एका घुमटीत शेंदुर फासलेले दगड असुन स्थानिक लोक या स्थानाला सतीचे देऊळ म्हणतात. किल्ल्यावर जाणारी वाट या मंदिराकडून वर जात असल्याने हे मंदीर नजरेसमोर ठेऊनच डोंगर चढण्यास सुरवात करावी. गडावर व वाटेत कोठेही पाण्याची सोय नसल्याने पुरेसे पाणी सोबत ठेवावे. वाटेच्या सुरवातीला द्राक्षांच्या बागा असुन पुढे हि वाट चढ चढत दाट जंगलातुन अर्ध्या तासात आपल्याला सतीच्या देवळापाशी नेते. देवळाच्या डाव्या बाजुस असलेल्या डोंगरसोंडेवरील वाट आपल्याला अचला किल्ल्यावर तर डावीकडे जाणारी वाट बिलवाडीमार्गे अहिवंत गडावर नेते. अहिवंत गडावरून या मार्गे आपल्याला अचला किल्ल्यावर येता येते. डाव्या बाजुंच्या सोंडेवरून डोंगर चढायला सुरवात केल्यावर १५ मिनिटात आपण किल्ल्याच्या डोंगराखाली असलेल्या पठारावर येऊन पोहोचतो. येथे एका झुडुपात शेंदुर फ़ासलेली हनुमानाची मुर्ती पहायला मिळते. पुढे सोंडेवरील घसाऱ्याचा चढ चढत आपण किल्ल्याच्या डोंगराला भिडतो. येथुन किल्ल्याचा डोंगर डाव्या बाजूला ठेवत डोंगराला वळसा मारून आपण किल्ल्याच्या दुसऱ्या बाजुस येतो. येथुन गडावर जाणारी वाट इंग्रजांनी उध्वस्त केल्याने मोठमोठे दगड ढासळून पडले आहेत. या कोसळलेल्या दगडावरून किल्ला चढायला सुरवात करायची. वाटेच्या सुरवातीला डाव्या बाजुस थोडे वर खडकात कोरलेली ३ x ३ आकाराचे तोंड असलेली गुहा असुन या गुहेच्या आत दुसरी मोठी गुहा खोदलेली आहे. सध्या हि गुहा पाण्याने भरलेली आहे. या गुहेच्या पुढील भागातुन गडावर जाण्यासाठी कातळ कोरीव पायऱ्या सुरु होतात. या पायऱ्याच्या शेवटी खडकात कोरलेले मातीने भरलेले टाके दिसते. टाक्याच्या वरील बाजुस गडाची तटबंदी पहायला मिळते. या टाक्यापासुन थोडा चढ चढल्यावर आपला गडावर प्रवेश होतो. या वाटेवर असलेला गडाचा दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला असुन त्याचे ठिकाणही समजत नाही. आपला गडावरील प्रवेश हा ढासळलेल्या तटबंदी वरून होतो. दगड पिंपरी गावातून गडमाथा गाठण्यास साधारण दोन तास लागतात. किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासुन ३७६६ फुट असुन किल्ल्याचा पसारा पुर्वपश्चिम ११ एकरवर पसरलेला आहे. किल्ल्याचा डोंगर चारही बाजूनं ताशीव असल्याने फारशी तटबंदी बांधलेली दिसत नाही. गडावर प्रवेश केल्यावर प्रथम उजवीकडील भाग पाहुन घ्यावा. येथे समोरच एका रेषेत कोरलेली पाण्याची तीन टाकी दिसुन येतात. यातील दोन टाकी पुर्णपणे मातीने भरलेली असुन तिसरे टाके कोरडे पडलेले आहे. या टाक्याच्या आसपास कपडे पडलेले दिसतात. कुठल्याही मोठया आजारातून बरे झाल्यावर गावकरी या ठिकाणी येऊन अंघोळ करतात व जुने कपडे येथे सोडुन नविन कपडे घालून जातात. टाक्यांच्या पुढील बाजुस एका झाडाखाली काही झिज झालेल्या मुर्ती ठेवलेल्या आहेत. त्यामागे काही वास्तुंचे चौथरे दिसुन येतात. येथे वाटेच्या उजव्या बाजुस असलेल्या घळीत उतारावर एकाखाली एक असा आठ टाक्यांचा समुह पहायला मिळतो. यातील तीन टाक्यात पाणी असले तरी गावकरी वरील टाके आटल्यावर या टाक्यात अंघोळ करत असल्याने ते पिण्यायोग्य नाही. गडाचा हा भाग फिरून झाल्यावर आपण गडावर प्रवेश केला तेथुन डावीकडील भाग फिरून घ्यावा. या भागात आपल्याला एका मोठया वास्तुचा चौथरा तसेच मातीने भरलेले एक टाके पहायला मिळते. सध्या गावकऱ्यानी या टाक्यातील माती काढण्याचे कामास सुरवात केली आहे. अचला किल्ल्याचा गडमाथा अत्यंत अरुंद असुन माथ्यावर टाकी वगळता फारसे अवशेष नसल्याने अर्ध्या तासात आपली गडफेरी पुर्ण होते. किल्ल्यावरून अहिवंतगड, सप्तशृंगी, मार्कंड्या, रवळ्या-जवळ्या, धोडप,साल्हेर-सालोटा,रामसेज, देहेर,मोहनदर तसेच कंडाणा हे किल्ले पहायला मिळतात. पर्णालपर्वतग्रहणाख्यानं या ग्रंथात शिवाजी महाराजांनी अहीवंत गडासोबत अचलागड जिंकल्याचा उल्लेख येतो तर जेधे शकावलीत शिवाजी महाराजांनी नोव्हेंबर १६७० मध्ये अहिवंत गडासोबत इतर किल्ले घेतल्याचा उल्लेख येतो. सभासद बखरीत अचला गडाचा उल्लेख अचलगिरी गड असा येतो. १७५३-५४ दरम्यान मराठ्यांनी नाशिकमधील निजामाकडून जिंकलेल्या किल्ल्यांच्या यादीत अचला किल्ल्याचे नाव सामील आहे. जुन १८१८ मध्ये इंग्रज अधिकारी कॅप्टन ब्रिग्ज याने अहिवंत गडाबरोबर अचला किल्ला देखील ताब्यात घेतला.
 
 
 
 .







अचला


आत्तापर्यंत ९.३० झाले होते. आमचे पुढचे लक्ष्य होते अचला किल्ला. दगड पिंपरी हे अचला किल्ल्याच्या पायथ्याचे गाव. आम्ही दळवट लिंक रोड मार्गे बोरगावला आलो, कडकडून भुक लागल्याने यथे वाटेतच एका हॉटेल मध्ये मिसळपावावरती ताव मारला, मस्त गरमागरम चहा प्यायलो आणि पुढे दगड पिंपरी गावाच्या दिशेने निघालो. हातगाडवाडी ते दगड पिंपरी हे अंतर साधारण २४ किमी आहे. साधारण १०.३० वाजता आम्ही दगड पिंपरी गावात पोहोचलो. येथे गावातच ५-६ वीरगळी आपल्या नजरेस पडतात. हे पाहून आम्ही पुढे निघालो, या गावाच्या थोडं पुढे शेतातून चालत गेल्यावर द्राक्षांच्या बाग लागतात. या बागांमधुनच वाट पुढे जाते. अचलाची एक सोंड थेट खालपर्येंत उतरलेली आहे, या सोंडेवरून सरळ चढाई चालु करायची. द्राक्षांच्या बागेतुन एक पत्र्याची शेड आपल्या नजरेस पडते, या शेड च्या दिशेने वाटचाल करायची. ही शेड म्हणजेच एक छोटेसे मंदिर आहे, गावातल्या लोकांना विचारता त्यांनी सांगितले त्याला सतीचे मंदिर म्हणतात. संपुर्ण वाटेत कुठेही सावली किंवा झाडही नाहीये. इथे पोहोचल्यावर आपण गडाचा पहिला टप्पा पार करतो. येथुन थोडंस पुढे गेल्यावर आपण गडाच्या दुसऱ्या टप्प्यात येतो. येथे एक हनुमंताचे सुंदर छोटंस मंदिर केले आहे. या मंदिराला शेड नाही. हनुमंताची मुर्ती शेंदुराने फासली आहे. या मंदिराच्या जवळ एक छोटे झाड होते, हा सावली असलेला शेवटचा टप्पा. आत्तापार्येंत १२ वाजले होते. अजुन बरेच जायचे होते, डोळ्यांना दिसणारी सरळ चढाई नकोशी वाटत होती. रविराज डोक्यावर थैमान घालायला लागले होते. सकाळी असणारी कडाक्याची थंडी आणि आता रणरणते ऊन पण तरीही उन्हाचा चटका लागत नव्ह्ता. जरावेळ विश्रांती घेतली, थोडे आणि प्यायलो आणि पुढे कूच केली.






गडाच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्यावर आपण गडाच्या कातळाच्या खालील बाजूस पोहोचतो. येथे कातळात कोरलेल्या पायऱ्या चालु होतात. येथुन थोडं वरती पायऱ्या सोडून गेल्यावर एक मोठी गुहा आहे. हे पाहुन आम्ही खाली आलो आणि पायऱ्यांच्या मार्गे पुढे निघालो. डाव्या बाजूस बुजलेले एक पाण्याचे टाके आहे
, ते बघुन आम्ही १० मिनिटात गड माथ्यावर प्रवेश केला. साधारण १२.३० वाजले होते. येथुन मागे नजर टाकल्यास अहिवंतगड, सप्तशृंगी, मार्कंड्या, रवळ्या-जवळ्या, धोडप ही डोंगररांग दिसते. थोडं पुढे गेल्यावर पाण्याची दोन वाळलेली टाके आहेत. या टाक्यांच्या बाजुलाच कपडे टाकलेले दिसतात. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की कुठल्याही मोठ्या आजारातून बरे झाल्यावर या ठिकाणी येऊन स्नान करतात. त्यावेळी ते गावातून घालून आलेले कपडे या ठिकाणी सोडून, नवीन कपडे घालुन जातात." आम्ही येथून थोडे पुढे गेलो, थोडासा खाली उतरून गेले की ५, २ आणि १ अशी पाण्याची टाकी आहेत. येथेही असेच कपडे फेकलेले आपल्याला दिसतात. या टाक्यात गावातील लोक स्नान करत असल्याने यातील पाणी पिण्यालायक नाही. थोडासा वळसा मारून पुढे आल्यावर इमारतींच्या ज्योती आपणास दिसतात. आता पर्येंत १ वाजला होता, एका झाडाखाली बसुन आम्ही सोबत आणलेले खजुर, पराठे वगैरे खाल्ले आणि परतीच्या वाटेल लागलो. परत येताना द्राक्षांच्या बागांमध्ये द्राक्षांचा आस्वाद घेतला. साधारण ३ वाजता आम्ही दगड पिंपरी गावात परतलो. हा संपुर्ण किल्लाभर रवी डांबळे आणि सुनील भुसार आमच्या सोबत होते. त्यांनी आम्हाला थंडगार लिंबुपाणी पाजले आणि आम्ही त्यांचा निरोप घेतला.



 
 

अचला

   दुसऱ्या दिवशी जाग आली तेव्हा सगळे उठून केव्हाच तयार झाले होते. माझी आवरावरीची गडबड उरकु वणीला पुन्हा मिसळ हादडून गाडी अचला किल्ल्याच्या पायथ्याच्या गवाट दगड पिंपरीमध्ये पोहोचली तेव्हा सकाळचे १० वाजले असतील. अचलाकडे पाहत असताना उजव्या हाताला एक मंदिरा आणि त्यावर फडाडणारा भगवा झेंडा दिसतो. बस आधी तेच गाठायचे आहे असे नानांनी सांगितले. आजच्या दिवशी नाशिक मधले अजून जुने सहकारी सहभागी झाले.  आजची भटकंती अजून दर्जेदार होणार ह्याने जोश चढला. पण तो फार काळ टिकला नाही. शेताच्या बांधाबांधावरून जाताना बुटात चिखल चिपकू लागला. हायला क्षणभरात बर्फाच्या ग्लेशियर वरच चालतोय की काय ह्याची शंका यायला लागली. काल रात्री पडलेल्या पावसाने माती चांगलीच भिजली होती आणि ती सर्व बुटाला चिपकत होती, बूट चांगलेच जड व्हायला लागले.. १० पावले चालून बुटाची सर्व माती काढायची आणि पुढे जाऊन पुन्हा १० पावलांवर तोच कार्यक्रम. असा खेळ चांगला १० मिनिटे रंगला आणि एकदाचे अचला किल्ल्याच्या पायथ्याच्या दा जंगलात घुसलो. तेथून उजव्या हाताला थोडीशी वाकडी चाल करीत एका छोट्याशा छप्पर तग धरून असलेल्या मंदिरापाशी पोहचलो. ही पहिल्या टप्प्याची चढाई करून गडाच्या दुसऱ्या टप्प्यात मोकळ्या पठारावर पोहचलो.  पठारावर शेंदूर फासलेला चपट दान मारुती इथे पण आहे. ह्या परिसरात मंदिरामध्ये मारुतीचीच मूर्ती आहेत आणि त्यांची रचना चपट दान मारुती अशीच आहे. काल अहिवंतच्या माथ्यावर - दरेगावात - आज अचला किल्ल्यावर आणि त्याच्या पिंपरी गावात ही सेम मूर्ती. असो.. किल्ल्याचा डोंगर डाव्या हाताला ठेवत अगदी टोक गाठले.




      येथून थेट उभी चढाई चालू केली. अगदी ७० अंश कोणातली चढाई कातळपोटापर्यंत झिकझॅक पद्धतीने चढलो आणि थोडेशे अस्ताव्यस्त दगडातून मार्ग काढून खोदीव पावट्या चढून माथ्याच्या उजव्या बाजूला आलो. शोध पुस्तक वाचल्याने पाठीमागे तवल्याचा डोंगर उगाच मनात काहूर माजवत होता. खरंतर मी अचला कडे कमी आणि तवल्या डोंगराकडेच जास्त पाहत होतो. समोर अहिवंत आणि भैरोबाच्या डोंगर उठावदार दिसत होते. सप्तशृंगीच्या माथ्यावरचे ढग आजही हटले नव्हते.  त्याच्या मागचा मार्कंड्या विशेष भाव खात होता. रवळ्या जवळ्या  अंधुकशा नजरेने आपले अस्तित्व दाखवत होते.  कंबरेभर वाढलेल्या गवतात रस्ता शोधताना चांगलीच तारांबळ उडाली. पूर्वेकडील बाजूने दोन पाण्याच्या टाक्या पाहून विश्रांती ब्रेक मध्ये थोडी पोटशांती  केली. माथ्यावरूनच पश्चिम बाजू गाठली. मागे अहिवंत गडाची सुटावलेली सोंड अचलाला मिळते तो नजारा जबराटच. गडावर अवशेष म्हणून जे काही पाहण्यासारखे असेल ते म्हणजे  येतायेता वाटेतल्या ७-८ टाक्यांचा समूह पाहून काळजीपूर्वक गड उतरायला घेतला. दुपारचे २ वाजून गेल्याने हातगड ला कात्री लागली होती.






मधल्या पठारावर शिदोरी उघडली आणि धगधगते पोट पुन्हा शांत केले. पिंपरी गावात पोहोचलो. लहान मुलांचा क्रिकेटचा खेळ रंगात आला होता त्यांनीही पोरांसोबत खेळाचा आनंद घेतला. फ्रेश होऊन, आज सहभागी झालेल्या भटक्यांचा निरोप घेऊन नाशिक ला नानांचा निरोप घेऊन पुण्याकडे मार्गस्थ झालो तेव्हा घड्याळात ६ वाजले होते.
      सातमाळ रांगेतील तीन माणिक मोती हाताशी आले होते. तिन्ही ऐतहासिक पण थोडे आडवाटेवरचे किल्ले सर केल्याने उमटणारे पूर्णत्वाचे भाव सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसून येत होते. नाशिक कडे भरधाव निघालेल्या गाडीतून दिसणारे हे मोदकासारखे ठेवलेले गडकोट व त्याचे कातळकडे ह्यांचे रांगडे रूप हृदयात साठवले. सह्याद्रीच्या शिरपेचात अढळ स्थान मिळालेल्या ह्या रांगांची प्रश्नार्थक नजर आमच्यावर खिळली होती. आता पुन्हा केंव्हा येणार राहिलेलं पहायला? या त्यांच्या प्रश्नाला आता तरी माझ्याकडे उत्तर नव्हते. पण आमच्या सारख्या उनाडांची वाट बदलून सरळ मार्गी लावणाऱ्या, अवघड परिस्थीती विनासायास हाताळण्याचे बळ देणारा, निसर्गाच्या शिकवणीतून माणुसकी शिकवणारा आणि अपुर्णात्वाकडून पूर्णत्वाकडे नेणारा हा प्रवास - ह्या उनाडक्या आजन्म सुरू ठेऊ. असे वचन देवून आमची शरीरे धावत्या गाडीसह पुण्याकडे निघाली.


आयुष्याच्या एका सायंकाळी ही सारी स्मरणे पुन्हा आठवेण आणि पुन्हा नव्याने जगेन.


__________________________________________________________________
______________________________________________________________


नोंदी: वेळेचे काटेकोर नियोजन केल्यास अचला - अहिवंत-मोहनदरी - हातगड हे चार किल्ले दोन दिवसात होतात. 
पाण्याची व्यवस्था: अहिवंत वर पाण्याची व्यवस्था आहे पण फ्रेब्रुवारी ते जून मध्ये असेल कि नाही यात शंका आहे. 
मोहनदरी: पाण्याची व्यवस्था नाही. 
अचला: पाण्याची व्यवस्था आहे पण फ्रेब्रुवारी ते जून मध्ये असेल कि नाही यात शंका आहे. 

कसे जाल: 
अहिवंत: वणी - दिंडोरी मार्गे दरेगाव हे पायथ्याचे गाव आहे. बुध्याचा चढाईचा थरार आवर्जून अनुभवावा. हा किल्ला खूप मोठा आहे आणि वाटाड्या सोबत घेतल्यास एक मुक्कामायोग्य गुहा आहे टी सापडण्यास सोपी जाईल. किल्ला बुध्याच्या डोंगराकडून चालू करून पश्चिमेकडे उतरायचा. 
मोहनदरी: दरेगाव पासून अंदाजे ४ किमी अंतरावर मोहनदरी गाव आहे. मुख्य आकर्षण इथले नेढं आहे. तरीसुद्धा त्याच्या माथ्यावर चढून जो स्वर्गीय नजारा दिसतो तो जरूर पाहावा. इथेही वाटाड्याची गरज आहे. कारण माथ्यावर चढाईचा मार्ग शोधाशोध करावी लागेल. 
अचला.: गाडी रस्ता वणी मार्गे थेट दगड पिंपरी गावात जातो. गावातून लहान दिसत असला तरी बराच वेळखाऊ किल्ला आहे. चढाई दमदार आहे. किल्ल्याच्या अर्ध्याभागात चढाई एका बाजूने होते आणि अर्धी चढाई वेगळया वाटेने होते त्यामुळे वाटाड्या असेल तर वेळ वाचू शकतो.  

सहभागी भटके: पहिल्या दिवशी:  संजय अमृतकर( नाना), तुषार कोठावदे, प्रशांत कोठावदे, तुषार पोमण, अश्विन अलाई, शलभ पारिक, नितीन मोरे, देवा घाणेकर.

तर काही वावग ठरणार नाही त्यापैकीच एक म्हणजे दुरवर पसरलेली सातमाळ पर्वतरांग. यात
सप्तशृंगी गडासोबत अचला ,अहिवंत, धोडप, कान्हेरगड, रवल्या-जवळ्या, मोहनदार (शिडका)
इत्यादी किल्ले आहेत… त्यापैकी आमच्या २ दिवसाच्या प्लान मध्ये  अचला , अहिवंत आणि मोहनदार होते. परत एकदा मला ट्रेकक्षितीज
संस्थेसोबत जाण्याची संधी चालून आली. या वेळेस ची ट्रेक लीडर निमिशा जोशी होती. शुक्रवार
रात्री आम्ही सर्वजण डोंबिवली हून "गणपती बाप्पा मोरया " चा गजर करून निघालो.
वाटेत ठरलेल्या ठिकाणी "बाबा का ढाबा " ला वाफाळलेला चहा पोटात ढकलला आणि
मार्गस्थ झालो…पुणे आणि नगरहून येणारी मंडळीना नाशिक ला पिक करून आमची बस वणी कडे सुसाट
धावू लागली. पहाटे ४ वाजता दगडपिंपरी या base village ला पोचलो आणि नेहमीप्रमाणे जवळच्या
मंदिरात आडवे झालो.


सकाळी च्या Wakeup call  नंतर सगळे तयार झाले आणि च्या सुमारास आम्ही अचला कडे निघालो. सुरुवातीला द्राक्षांच्या बागेतून जाणारा रस्ता हळू हळू चढणीचा झाला

अचलाच्या डोंगरांला डावीकडे ठेवत आम्ही उजवीकडच्या घळीत येउन पोचलो इथे एक छोटे मंदिर आहे गावाकडची लोक त्याला सतीचे देउळ म्हणतात. इथून डावीकडची वाट सरळ अचला च्या माथ्यावर नेउन सोडते आणि उजवीकडच्या वाटेच्या सोंडेने सरळ उतरून अहिवंत गडाची वाट आहे.
दगडपिंपरी हून गडमाथा गाठण्यास तास पुरेसे होतात. वर चढून गेल्यावर सुरुवातीला - पाण्याची टाकी लागली पण ती कोरडी होती. एका टाक्याजवळ जुने कपडे पडलेले दिसलेगावाकडील लोकांची अशी समजूत आहे की इथे स्नान करून नवीन कपडे परिधान केले आणि जुने कपडे इथेच सोडून दिल्याने ती व्यक्ती रोगमुक्त होते


थोडे अंतर चालल्यावर एक भग्न असलेले मंदिर दिसले. गडाचा माथा अरुंद आहे आणि पाहण्यास अर्धा तास पुरेसा आहे. अजून पुढे गेल्यावर उजवीकडे एक वाट खाली गेली आहे तिथे पाण्याची - टाकी उतरत्या अश्या मांडणीची आहेत इथले पाणी पिण्यायोग्य नाही

गडाची उंची फारशी नसली तरी आजूबाजूचा प्रदेश नजरेत भरू लागला उजवीकडे भैरवाचा डोंगर डावीकडे अहिवंत समोर धोडप आणि सप्तश्रुंगी गड पाहून परत एकदा या मल्हार सह्याद्री ने आम्ही त्याच्यासमोर किती खुजे आहोत याची जाणीव करून दिली.

थोडावेळ आम्ही सर्वजण माथ्यावर बसून वारा पीत होतो, थोडीशी पेटपूजा करून आम्ही या सातमाळच्या सदस्याचा निरोप घेतला. या गडाच्या इतिहासाबद्दल तशी फारशी नोंद नाही बाजूच्या अहिवंत गडावर पहारा ठेवायला याचा उपयोग होत असावा. आल्या वाटेने आम्ही परत दगडपिंपरीत येउन पोचलो. सोबत आणलेल्या आलू पराठ्यावर ताव मारून झाल्यावर मग बसने निघून सरळ दरेगाव गाठले.
सोबत असलेली पाठीवरचे वजनदार गाठोडे बस मध्ये ठेऊन फक्त पाणी आणि खाण्याचे समान सोबत घेऊन अहिवंत कडे निघालो सोबतीला गावातले एक काका होते. दरेगावातून चालत गेल्यावर डावीकडे बुध्या डोंगर आणि समोर अहिवंत बघत आम्ही चढणीला लागलो. इथे वळसा घालून अर्ध्या आपण एका खिंडीत येतो. डावीकडे कोरलेल्या पायऱ्या आहेत ज्या वरती बुरुजाकडे नेतात. हा ढासळलेला बुरुज बुध्या डोंगराचा एक भाग आहे. या बुरुजावरून अहिवंत गड आणि आजूबाजूचा परिसर पाहणे हि एक पर्वणी आहे.. सातमाळच्या प्रवासातले बुध्या नावाचे स्टेशन हे बेलाग आणि देखणे आहे.. इतकं देखणं किप्रेमात पडावे अशीच कलाकुसर.’ सह्याद्रीने या बुध्यावर केली आहे.
बुध्या वरचा बुरुज 
ट्रेक लीडर निमिशा समवेत अमित दादा आणि श्रीकृष्ण दादा 
“सह्य पर्वताची माळ.. उभी साता डोंगराची    होड लागली नभाशी.. तिथं
डोंगरमाथ्यांची..!!
 उंच माथ्यावरी उभा.. एक अचल
संन्यासी
      
बुध्याच्या शेजारी.. असे अहिवंत आभासी..!!”







We traveled towards old bus stand (just behind new CBS). We had breakfast near old stand and grabbed bus matching towards Vani. It took us 2 hours to reach Vani. From then we caught Surgana bus and after 15 minutes alighted at Pimpri or Pimpri Achala. It was clocked 10.40am in the clock.
In this village there are 5 Virgal of height 6 ft. It's really good to see it in very good condition. We walked 2 km to reach to base village Dagad Pimpri.

Virgal

You can clearly observe the temple near a col in between Fort Achala and adjacent Bhairavnath hill.

Confirming directions, we headed towards col. Facing col, Fort towards left is Achala and route going towards right will lead to traverse route to Fort Ahivant or to Belwadi village.

We reached to temple at col , through farms and then ascending small hill.
Temple near col; Bhairavnath hill at backdrop

Follow the steep ascend infront of temple. This patch is full of scree. Steep climb in harsh heat made it worse for us. Once you reached at the rock face at the end of ascend, follow traverse route keeping Fort at your left side. At the end of traverse , you need to climb small rockpatch; which takes you directly on the Fort. You will also find rock cut steps. On the left side at entrance, there is totally buried water tank. At the top, there are 3-4 water tanks in semi buried condition and remnants of a temple. No water is available on the Fort Achala. It took us 2 hrs to reach on the top.
rock cut steps

water tank

water tank

remnants of fortification

temple

Tauli hill
 
 
 
  
 अचला
 
नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेला सुरगणा, कळवण, चांदवड आणि नांदगाव तालुक्यांमधून एक डोंगररांग पूर्वपश्चिम जाते. या रांगेला 'सातमाळा' डोंगररांग म्हणतात. अतिशय लक्षवेधक अशी ही रांग आहे, कारण ह्या रांगेच्या दक्षिणेला सपाट मैदान असल्यामुळे ती आगंतुक असल्यासारखी दिसते. या रांगेत पश्चिमेकडून हातगड, मग अचला किल्ला, अहिवंत, सप्तशृंगी, मार्कंडा, रवळ्या-जवळ्या, धोडप, हंड्या सुळका, ईखारा सुळका, कांचना किल्ला, इंद्राई, चांदवड, राजदेहेर आणि काळदेहेर हे महत्त्वाचे किल्ले येतात. मुळातच हे किल्ले खूप प्राचीन आहेत आणि निसर्गतः ते एवढे अभेद्य आहेत' की, अगदी इंचभर तटबंदीने आणि मूठभर शिबंदीने देखील मोठ्या सैन्याशी लढू शकतील. उत्तरेकडून आणि गुजराथमधून येणाऱ्या शत्रूना अडविण्याचे सामर्थ्य या रांगेतील किल्ल्यांमध्ये आहे. अचला हा या रांगेतील दुसऱ्या क्रमांकाचा किल्ला आहे.
नाशिकहून सापुतारा आणि बोरगावला जाणाऱ्या अनेक एसटी बसेस आहेत. यांपैकी कोणतीही पकडायची आणि वणीच्या पुढील १५ कि.मी.वर असणाऱ्या 'पिंपरीअचला' नावाच्या गावी उतरायचे. पिंपरीअचला गाव बऱ्यापैकी मोठे असल्याने कंडक्टरच्या ते चांगल्या लक्षात असते. गाव हमरस्त्याला लागून असल्याने दिवसभर वाहनांची वर्दळ चालू असते. आम्ही अचला पाहायला गेलो, ते दिवस पावसाळ्याचे असल्याने पहाटे पहाटे सर्व गाव शेतावर कामाला जाण्यासाठी गर्दी करत होते. कुणी नांगर, कुणी बैलगाडी, कुणी ट्रॅक्टर, तर कुणी नुसतीच बैलजोडी अशी आपल्या ऐपतीला झेपतील ती साधने घेऊन शेतावर निघाले होते.
गावाभवताली डोंगर । आमच्या भवताली डोंगर ।
तांबडं फुटल्यावर । जाऊ समद शेतावर ।
करू काम भराभर।
पिंपरीअचला हे काही किल्ल्याच्या पायथ्याचे गाव नाही, तर किल्ल्याच्या पायथ्याने गाव आहे 'पिंपरीपाडा' हे गाव पिंपरीअचलापासून सुमारे अर्ध्या तासावर आहे. तिथपर्यंत जाण्याची वाट कधी बांधाबांधावरून तर कधी शेताडीतून जाते. आजूबाजूच्या डोगरदऱ्यांमधून वाहणारे धबधबे, रंगीबेरंगी झाडेझुडपे, त्यावर असणारा पक्ष्यांचा किलबिलाट यामुळे पावसाळ्यात तर ही वाट आल्हाददायी वाटते. निसर्गाचे हे सौंदर्य न्याहाळण्याच्या नादात पिंपरीपाडा कधी येते हे समजतच नाही.
पिंपरीपाडा गावात एक छोटंसं जुनं मंदिर आहे. त्याच्या समोर एक वीरगन पडलेली आहे. अचला किल्ला हा गावाच्या वेशीवर पाठमोरा उभा आहे. किल्ल्याच्या अर्ध्या उंचीवर एक पठार दिसते, त्या पठारावर मध्येच एक खिंड आहे. या खिंडीच्या तोंडावर एक मंदिर आहे. पिंपरीपाड्यातून हे मंदिर व्यवस्थित दिसते. वाटेतच एक म्हातारबुवा भेटले. त्यांना अचला किल्ल्याबद्दल माहिती विचारल्यावर त्यांनी सांगितले, गड लई मोठ्ठा आहे. मावळतीला त्याच्यात एक घळ आहे, त्यातून वर जायचं, वरच्या अंगास माथ्यापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या खणलेल्या आहेत. दरवाजा नाय तिथं, माथ्यावर सताठ टाकी आह्येत, लयं पाणी हाये टाक्यात, पावसाळ्यात मात्र कडीयावर लय गवतं उगवतं. कशापायी वर जाताय तुम्ही. आम्ही म्हातारबुवांना विचारले काही वेगळेच होते आणि त्यांनी सांगितले काही वेगळेच. पण जे काही सांगितले ते आमच्या उपयोगाचेच होते. जरी किल्ल्यावर केवळ सात आठ टाकी असली तरी काय झाले, तेही नसे थोडके, असे म्हणून आम्ही खिंडीच्या दिशेने निघालो. पिंपरीपाड्यापासून खिंडीपर्यंत जाणारी वाट खड्या चढणीची आहे. त्यामुळे साधारण पाऊण तासात आपण खिंडीत सहज पोहोचतो.
खिंडीमधून किल्ल्यावर दोन वाटा जातात. एक वाट बरोबर समोरच्या नाकाडावरून सरळसोट वर जाते. खालून बघितल्यावर जणू कुठे वाट नाहीच की काय असे वाटते. पण एकदा का पायाखाली घातली की समोरचा रस्ता आपोआप मिळतो. ही वाट बरीच दमछाक करणारी आहे, त्यामुळे उतरण्यासाठी तिचा वापर करणे जास्त योग्य. दुसरी वाट जरा लांबची आहे. खिंडीतील मंदिरापासून डाव्या अंगास एक पठार आहे. या पठारावरून थोडा वेळ चालत गेले की निवडुंग आणि बाभळीचे जंगल लागते. याच जंगलातून एक वाट डावीकडे अचलाच्या कातळकड्याकडे जाते. वाट ओळखण्याची खूण म्हणजे किल्ल्यावरून एक डोंगरसोंड थेट पठारावर उतरलेली आहे, त्या डोंगरसोंडेकडे पाहिल्यावर असे वाटते, जणू काय ही डोंगरसोंड आपल्यासाठीच खाली उतरलेली आहे. या सोंडेवरून चढत गेल्यावर आपण थेट अचला किल्ल्याच्या कोरलेल्या पायऱ्यांपाशी पोहोचतो. या कातळकोरीव पायऱ्या आपल्याला किल्ल्याच्या उध्वस्त दरवाज्यापाशी आणून सोडतात. खिंडीपासून या उद्ध्वस्त पर्यंत पोहोचायला नाही म्हटले तरी साधारण दीड तास सहजच लागतो.
     उवस्त दरवाज्यामधून आत शिरल्यावर अचला किल्ल्ल्याच्या माथ्यावरील पठार दिसू लागते. किल्ल्याचा माथा म्हणजे उंचसखल पठार. त्याच्या एका टोकापासून कापर्यंत सर्वदूर गवतच गवत पसरलेले दिसते. किल्ल्याचा माथा पूर्वपश्चिम लेला आहे. म्हातारबुवांनी सांगितल्याप्रमाणे किल्ल्यावर किल्ल्याच्या खुणा जपणारी घाटवाकी आणि थोड्या प्रमाणात तटबंदी शिल्लक आहे. याशिवाय कचितच एकदोन यांचे आणि घरांचे जोतेदेखील दिसून येतात. अनेक टाक्यांमधील पाणी पिण्यास अयोग्य आहे, कारण गावकरी लोक या टाक्यांमधील पाण्याचा उपयोग आंघोळीसाठी हातात. अनेक गावकऱ्यांचा असा समज आहे की, या टाक्यांमधील पाण्याने आंघोळ सरून देवदर्शनाला गेल्याने देव पावतो. मात्र आपल्या मनात असला काही भलता-बनता विचार नसल्याने आपण टाकी पाहून गडावर आणखी काही अवशेष गवसतात का हे पाहण्यासाठी पश्चिमकड्यापर्यंत फेरफटका मारायचा. वाटेत एक-दोन घरांचे निखळलेले अवशेष दिसतात, ते पाहून माघारी वळायचं आणि आल्यापावली खिंड गाठायची. आता आपले पुढील लक्ष्य अहिवंत असल्याने खिंडीत फारसा वेळ न दवडता थेट अहिवंतवाडीची वाट धरायची.
  या किल्ल्याचा उल्लेख इतिहासामध्ये दोन ठिकाणी येतो, तो असा : अहिवंत, अचलागड नावाचे सुंदर व अजिंक्य किल्ले देखील आपले (व्यंकाजी राजे) वडील बंधू जे शिवाजी महाराज यांनी काबीज केले, असा एक उल्लेख 'पर्णालपर्वतग्रहणाख्यानम्' वात आलेला आहे. मराठ्यांनी अहिवंत व इतर किल्ले नोव्हें १६७० मध्ये घेतले. असा एक उल्लेख जेधे शकावलीमध्ये आलेला आहे. या शिवाय, अचला किल्ल्याचे नाव महाराजांच्या ताब्यातील दुर्गाच्या यादीत आलेले आहे.
किल्ल्याची उंची : समुद्रसपाटीपासून ११४५ मीटर (३७५५ फूट)
तालुका : कळवण
किल्ल्याची श्रेणी: सोपी
डोंगररांग : सातमाळा
पायथ्याचे गाव : बिलवाडी, पिंपरीपाडा, दरेगाव
पायथ्याच्या गावापासूनचे अंतर पिंपरीपाड्यापासून अंदाजे दोन तास,
बिलवाडीपासून दीड तास.
जवळचे एस.टी. स्थानक : नांदुरी, वणी
राहण्याची सोय : किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय : जेवणाची सोय नाही.
पिण्याचे पाणी : किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.
यात मार्चपर्यंत पाणी असते.
जाण्यासाठी उत्तम कालावधी : जून ते मार्च.
किल्ला फिरायला लागणारा वेळ पाऊण तास.
जवळपासची गावे : पिंपरीअचला, पिंपरीपाडा आणि अहिवंतवाडी
 
 


असा आटोपशीर पसरा असलेला हातगड पदरात पाडून आमची स्वारी आता अचला किल्ल्याकडे  रवाना झाली. साधारण सकाळचे ९ ची वेळ होती, थंडी आता ओसरली होती, नारायणराव आता तळपत होते आणि दुसरीकडे भूक मी म्हणत होती. हातगाडवाडी - बोरगाव - पिंपरी अचला अशी गाडी हाकत  दगड पिंपरी मध्ये पोहोचलो. पिंपरी अचला च्या फाट्याला झणझणीत मिसळ हाणण्याचा मोह मात्र आवरला नाही.  हातगडवाडी तो पिंपरी अचला (२१ कि.मी ) पिंपरीच्या अचला ते दगड पिंपरी (२ कि.मी).
डावीकडे तौल्या - उजवीकडे अचला
अचला किल्ला हा नाशिक पासून साधारण ६० कि.मी. वर आहे. अचला किल्ला आणि शेजारीच उभा असलेला तौल्या डोंगर ह्यामुळे अचला पटकन ओळखू येतो. सकाळचे अंदाजे ९.३० वाजत आले होते, गावातून रवी डंबाळे आणि सुनील भुसार ह्यांच्या मदतीने अचला किल्ल्यावर चढाईला सुरुवात केली. सुरुवातीला द्राक्षांच्या बागा, टोमॅटो, वांगं अशी शेतं ओलांडत अचला आणि भैरवनाथ डोंगराच्या खिंडीत जाऊन पोहोचलो, चढाई बऱ्यापैकी खडी होती.
डावीकडून रवी डंबाळे - साकेत - सुनील भुसार
खिंडीत छोटेसे देऊळ त्याला गावकरी सतीचे देऊळ असं संबोधतात.

सतीचे देऊळ 
खिंडीतून डावीकडची वाट अचला च्या कातळा कडे जाते तर उजवीकडची सोंड थेट अहिवंत किल्ल्याला जाऊन मिळते. आता मात्र अचला चे रौद्र रूप दिसायला सुरुवात झाली. पुढील १५-२० मिंटात अचला च्या कातळटोपी च्या खाली  फासलेल्या हनुमानाचे दर्शन घेतले आणि घसाऱ्याच्या वाटेने ये रे माझ्या मागल्या करत पायर्यांपाशी पोहोचलो.


दरी उजवीकडे व अचला चे कातळ नाक डावीकडे ठेवत निम्म्या पायऱ्या चढून वर आलो. वर गेल्यावर वाटेत गुहा लागते, पायऱ्या संपल्यावर एक टाकं व उजवीकडे एक बुजलेले टाकं आहे.

अचला वरील पायऱ्या सुनील भुसार - रवी डंबाळे 
तिथून आता गडमाथ्यावर प्रवेश केल्यावर ८ टाक्यांचा अनोखा समूह पाहायला मिळतो. टाक्याभोवती च्या झुडुपांवर कपडे पडलेले दिसतात. मोठ्या आजारातून बाहेर पडल्यावर या टाक्यात अंघोळ करण्याची पद्धत आहे व अंगावरचे जुने कपडे इथेच फेकून द्यायची रीत आहे असं गावकरी सांगतात.

टाक्यांच्या वरच्या झाडाखाली झिजलेल्या मूर्ती आहेत. त्यामागे घराची जोती आहेत. गडमाथा छोटा आहे, २०-२५ मिंट पुरतात.  माथ्यावरून अहिवंत, मोहनदरी किल्ला, मार्कंड्या, रवळ्या, जवळ्या, धोडप, तौल्या, भैरवनाथ डोंगर, देवळी धरण, चणकापूर धरण, उनंदा  नदीच्या काठावर वसलेले पुणेगाव धरण, हरण टेकडी असा परिसर दिसतो.

आल्या वाटेने दगड पिंपरी मध्ये परतलो. दगड पिंपरी मधून पिंपरी अचला मध्ये पोहोचल्यावर गावात ५-६ वीरगळी नजरेस पडल्या. साधारण दुपारचा १ वाजत आला होता, माथ्यवर सूर्य आग ओकत होता. आता पुढील टप्पा सप्तशृंगी गडाचा होता. पिंपरी अचला वरून नांदुरी(सप्तशृंगी गडाचा पायथा) येथे पोहोचण्यास साधारण २ वाटा आहेत.




 

अचला किल्ला


अचला किल्ला

अचला किल्ला  हा  सातमाळा   पर्वतरांगेत    पश्चिमेला आहे. तसेच वणीच्या उत्तरेस वसलेला आहे.

हा      किल्ला   महाराष्ट्रातील    नाशिक      जिल्ह्यात    आहे.    नाशिकपासून       ५५ कि.मी.             अंतरावर आहे.  अचला     हे वणीपासुन  २६ कि.मी.     अंतरावर  असलेल्या     बिलवाडी    गावाजवळ असून गुजरातच्या सापूताऱ्यापासून ३० कि.मी. अंतरावर दक्षिणेस आहे.

अचला किल्ला अजिंठा-सातमाळा पर्वतरांगाचा एक भाग आहे. अचला किल्ल्याची उंची ४०४०फूट म्हणजेच १२३१ मीटर समुद्र सपाटीपासून आहे.

अचला किल्ल्याचे क्षेत्रफळ खूपच लहान आहे. या किल्ल्याला बरीच तटबंदी नाही.  गडमाथा अत्यंत अरुंद आहे. गडावर फारसे पाहण्यासारखे काही अवशेष नाहीत. गडावर पाण्याची एक-दोन टाकी असून त्यापैकी एकासह पाणी आहे व दुसरे एक रिकामे आहे.

येथे एक दगड देखील आहे जो शेंदुरा (नारंगी रंग) मध्ये रंगलेला दगड आहे. हा दगड सुमारे 7 फूट (2.13 मीटर) आहे. सर्वात लांब आणि मोठा दगड असल्यामुळे, येथील एका गावाला पिंपरीवाडी किंवा “दगड पिंपरी” या नावाने ओळखले जाते.

----------------------------------------------------

Achala Fort

Achala fort is located in the Western part of Satmala mountain range. It is also located North of Vani.

This fort is located in Nashik district of Maharashtra. 55 km distance from Nashik District. Achala is 26 km from Vani. It is near Bilwadi Village.  The distance to the south of 30 km from Saputara in Gujarat. 

Achala fort is a part of Ajanta-Satmala mountain range. The height of Achala fort is 4040 feet i.e. 1231 meters above sea level.

The area of ​​Achala fort is very small. This fort does not have many ramparts. The fort is extremely narrow. There are not many remains to see on the fort. There are one or two water tanks on the fort, one of which has water and the other one is empty.

There is also a stone which is painted in Readlead (orange color). This stone is about 7 feet (2.13 meters) long. As it is the longest and largest stone, a village here is known as Pimpriwadi or "Stone Pimpri".

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...