Saturday, April 11, 2026

बळवंतगड

 नाशिक हे पुर्वीपासुनच बाजारपेठ म्हणून प्रसिध्द आहे. प्राचिनकाळी कल्याण,सोपारा, डहाणु बंदरात आलेला माल विविध घाटवाटांनी या बाजारपेठेत येत असे. यातील काही घाटवाटांचे आज महामार्गात रुपांतर झाले आहे. आज कसारा घाट म्हणुन ओळखला जाणारा घाटमार्ग म्हणजे प्राचीन थळ घाट. नाशिक परिसरातून उत्तर कोंकणात उतरणाऱ्या थळ घाटावर लक्ष ठेवण्यासाठी घाटासमोर असलेल्या व मुख्य डोंगररांगेपासून वेगळे झालेल्या एका लहान डोंगरावर बळवंतगड हा टेहळणीचा किल्ला बांधण्यात आला. 

प्राचीन थळ घाटाचा रखवालदार असलेला हा किल्ला आजही दुर्लक्षित आहे.  मुंबईहुन एका दिवसात करता येण्यासारखा हा छोटासा ट्रेक आहे. किल्ला छोटा असल्याने सर्व ऋतूत करता येतो. किल्ल्यावर पाणी नसल्याने पाणी मात्र सोबत बाळगावे.

   बळवंतगडाचा नकाशा

 बळवंतगडाला भेट देण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला विहिगाव गाठावे लागते. मुंबई ते विहीगाव हे अंतर ११० कि.मी.असुन कसारा घाटातील खोडाळा फाट्याहून तेथे जाता येते तर नाशिकहून हे अंतर ५५ कि.मी.असुन घाटनदेवी मार्गे तेथे जाता येते. विहिगाव कसारा रेल्वे स्टेशनपासून १३ किलोमीटर अंतरावर आहे. या गावातून बळवंतगडाच्या बाजूबाजूने माल गावात एक घाट रस्ता जातो. या ऱस्त्याने दिड किलोमीटर गेल्यावर डाव्या बाजूला किल्ल्यावर जाण्यासाठी पायवाट आहे.बस किंवा जीपने विहीगावच्या माल फाट्यावर उतरून अर्ध्या तासात आपण किल्ल्याच्या पाउल वाटेपाशी पोहोचू शकतो. कसार्‍याहून माल गावासाठी थेट जाणार्‍या जीप्स मिळाल्यास त्यांना बळवंतगड फाट्यावर उतरवायला सांगावे.

विहिगावाच्या अलीकडे वनखात्याच्या कार्यालयापासून एक रस्ता डावीकडे माल गावाकडे जातो. या ठिकाणी रिल्याक्स कंट्री रिसोर्टचा फलक लावलेला आहे. या वाटेने १.५ कि.मी. चढण चढल्यावर १/४०० ते १/६०० या कि.मी. अंतर दर्शविणाऱ्या दोन दगडा दरम्यान डाव्या बाजूला किल्ल्यावर जाणारी पायवाट आहे. सध्या येथे सांगण्यासारखी इतर कोणतीही खुण नाही. नाही म्हणायला थोड्या अंतरावर एक मैलाचा दगड आहे, त्यावर १.४ हा आकडा लिहिला होता बाकी नाव गाव काही नाही.

Balwantgad


या वाटेने टेकडीच्या दिशेने चढताना किल्ल्याची तटबंदी दिसायला सुरवात होते व १० मिनिटात किल्ल्याच्या दक्षिणेकडील ढासळलेल्या तटबंदीतून आपला किल्ल्यावर प्रवेश होतो. किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची ७१० फुट असुन किल्ल्याचा माथा पुर्वपश्चिम साधारण १.५ एकरवर पसरलेला आहे. किल्ल्याच्या पूर्वेकडील तटबंदीत दोन बुरुज असुन एक बुरुज किल्ल्याच्या पश्चिम टोकाला पहायला मिळतो. किल्ल्याची तटबंदी आजही बऱ्यापैकी शिल्लक असुन या रचीव तटबंदीत सांधण्यासाठी कोणतेही मिश्रण वापरलेले नाही. तटबंदीच्या फांजीवर मोठया प्रमाणात माती जमा झाली असुन तटबंदीत एका ठिकाणी पाणी वाहुन जाण्यासाठी नाली पहायला मिळते. तटबंदीवर फेरी मारताना किल्ल्याच्या मधोमध असलेला उंचवटा दिसतो. या उंचवट्यावरील झाडाखाली शेंदुर फासलेले काही दगड ठेवलेले आहेत. 

IMG-20180127-WA0009.jpg

उंचवट्याच्या पुढील भागात दोन उध्वस्त घरांचे अवशेष पहायला मिळतात. 

वेताळ , बळवंतगड




IMG-20180127-WA0013.jpg

हे अवशेष पाहुन पुढे आल्यावर उतारावर एका हातात तलवार तर दुसऱ्या हातात गदा घेऊन पनवतीला पायाखाली दाबून ठेवलेली मारूतीची मुर्ती पहायला मिळते. मूर्तीसमोर एक लहान पिंड व नंदी ठेवलेला आहे.   हि मुर्ती  उन पावसाने झिजलेली आहे. या मुर्तीच्या उजव्या हातात तलवार तर पायाखाली आडवी पडलेली एक मानवाकृती दिसते. झिज झाल्याने तिचे कांगोरे नष्ट झाले आहेत.  मुर्तीशास्त्र हा खुप मोठा विषय आहे. वेद,रामायण, महाभारत, पुराण इत्यादीतून आलेल्या वर्णनानुसार ,कथेनुसार मुर्ती बनवल्या जात. पण या गोष्टींचा अभ्यास न करता सरसकट काही पण ठोकून द्यायची सवय अनेकांना असते. या ठिकाणी जी मुर्ती आहे ती भवानीची नसून हनुमानाची आहे आणि त्याच्या पायाखाली पनवती आहे .

येथे खालच्या बाजुला किल्ल्यावर पाण्याचा एकमेव स्त्रोत असलेले खडकात खोदलेले प्रचंड मोठे टाके दिसते पण हे टाके भंगलेले असल्याने व त्यात मोठया प्रमाणात दगडमाती आल्याने पाणी साठत नाही. टाके पाण्यासाठी थोडे पुढे जाउन उजवीकडे वळसा घालून खाली उतरावे लागते. टाक पाहुन तसेच पुढे निघाल्यावर आपण किल्ल्याच्या पश्चिम भागात पोहोचतो.

IMG-20180127-WA0008.jpg

IMG-20180127-WA0006.jpg

IMG-20180127-WA0010.jpg

येथील ढासळलेली तटबंदी व इतर अवशेष पहाता या ठिकाणी किल्ल्याचा दरवाजा असल्याचे जाणवते. तटबंदीत एका ठिकाणी दरवाजाला अडसर घालण्याची खाच दिसुन येते. येथुन वर आल्यावर आपण किल्ल्याच्या पश्चिम टोकावरील बुरुजावर पोहोचतो. 





IMG-20180127-WA0012.jpg

IMG-20180127-WA0007.jpg

या बुरुजावरून थळ घाट, मुंबई नाशिक महामार्ग तसेच लोहमार्ग आणि कसारा गाव इतका लांबवरचा प्रदेश नजरेस पडतो तर पुर्वेकडील बुरुजावरून त्रिंगलवाडी व माल गावाचे पठार यावर नजर ठेवता येते. संपुर्ण गड फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो. बळवंत गडावरील घटनाबाबत इतिहासात कोणत्याही नोंदी आढळत नाही.




 
     परतीचा मार्ग 


टनेल ..



 
 


– – –


– – –




 
 

 

IMG-20180127-WA0011.jpg




गिरीदुर्ग ठाणे त्र्यंबकेश्वर
🏔️
श्रेणी नुसार स्तर
मध्यम
📏
समुद्र सपाटीपासून उंची (फ़ूट)
630
🏰
किल्ल्याचा प्रकार
गिरीदुर्ग
📍
जिल्हा
ठाणे

किल्ल्याची छायाचित्रे

किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा

मुख्य छायाचित्र

Balwantgad

सर्व छायाचित्रे पहा

नकाशे व मार्ग

किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा

सर्व नकाशे पहा

प्रस्तावना

कसारा ते इगतपुरी दरम्यान असलेल्या प्राचीन थळ घाटावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच जव्हार त्र्यंबकेश्वर मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी थळ घाटाच्या समोरच्या डोंगरावर बळवंतगड हा टेहळणीचा किल्ला बांधण्यात आला होता . थळ घाटाच्या समोर मुख्य डोंगर रांगेपासून वेगळ्या झालेल्या डोंगरावर बळवंतगड किल्ला आहे. मुंबईहुन एका दिवसात करता येण्यासारखा हा छोटासा ट्रेक आहे. किल्ला छोटा असल्याने सर्व ऋतूत करता येतो. किल्ल्यावर पाणी नसल्याने पाणी मात्र सोबत बाळगावे.

महत्त्वाची ठिकाणे

किल्ल्याचा डोंगर पूर्व पश्चिम पसरलेला आहे . पश्चिमे कडील ढासळलेल्या तटबंदीतून आपला गडावर प्रवेश होतो. या भागात एकावर एक दगड रचून तटबंदी बनवण्यात आलेली आहे . याठिकाणी तटबंदी आणि फांजीचे अवशेष अजूनही पाहायला मिळतात . तटबंदी पाहून पश्चिममेकडे निघाल्यावर किल्ल्याच्या मधोमध छोटा उंचवटा आहे . तो चढून गेल्यावर एका झाडाखाली काही शेंदुर लावलेले दगड पाहायला मिळतात. स्थानिक लोक याला वेताळ म्हणून ओळखतात. वेताळाचे दर्शन घेउन पुढे गेल्यावर दोन घरांची जोती पाहायला मिळतात.

उंचवट्यावरुन खाली उतरुन पुढे गेल्यावर उजव्या बाजूला खळग्यात पिंड ,नंदी आणि हातात तलवार घेतलेली आणि पायाखाली पनवतीला दाबून ठेवलेली मुर्ती पाहायला मिळते. या ठिकाणाच्या खालच्या अंगाला किल्ल्यावरचे पाण्याचे प्रचंड मोठ टाक आहे . पण ते पाहाण्यासाठी थोडे पुढे जाउन उजवीकडे वळसा घालून खाली उतरावे लागते . टाक्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्यात पाणी साठत नाही . टाक पाहुन परत किल्ल्याच्या पठारावर येउन पश्चिम टोकाकडे चालत गेल्यावर लांबवरचा प्रदेश दृष्टीपथात येतो. थळ घाट , मुंबई आग्रा महामार्ग , रेल्वेलाईन आणि कसारा गाव इथून दिसते . किल्ल्यावरुन दिसणारा प्रदेश पाहुन या डोंगरावर टेहळणीचा किल्ला का बांधला हे समजते.

कसे पोहोचावे

१) रेल्वेने :- कसारा लोकलने किंवा मेल एक्सप्रेस गाडीने कसारा गाठावे. कसारा स्थानका बाहेरुन विहीगावला जाण्यासाठी एसटी बसेस व जीप्स मिळतात. त्याने मालफाट्यावर उतरावे. विहीगावातून माल गावात जाणारा रस्ता इथूनच सुरु होतो. या घाट रस्त्याने १.५०० किमी चढल्यावर डाव्या बाजुस एक पायवाट डोंगरात शिरते. (या ठिकाणी खास अशी खुण नाही रस्त्यावर जे मैलाचे दगड असतात त्यावरील १/४०० आणि १/६०० च्या मध्ये किल्ल्यावर जाणारी पायवाट डाव्या बाजुस आहे.) या पायवाटेने माल गावाच्या दिशेने चढत गेल्यावर १० मिनिटात किल्ल्याच्या उध्वस्त तटबंदीतून आपला किल्ल्यावर प्रवेश होतो.

कसार्‍याहून माल गावासाठी थेट जाणार्‍या जीप्स मिळाल्यास त्यांना बळवंतगड फाट्यावर उतरवायला सांगावे.

२) खाजगी वाहानाने :- मुंबई - आग्रा महामार्गावरील कसार्‍याच्या पुढे थळ घाट सुरु होतो . घाटात ३ किमी अंतर कापल्यावर एक रस्ता डावीकडे खोडाळ्याकडे जातो. या रस्त्यावर विहीगाव आहे. विहीगावातून माल गावात एक रस्ता जातो. या रस्त्यावर १/४०० ते १/६०० मैलाच्या दगडा दरम्यान डाव्या बाजूला किल्ल्यावर जाणारी पायवाट आहे .

ट्रेकसाठी लागणारा वेळ

⏱️ विहीगावातून चालत पाउण तास लागतो.

सुविधा व सोयी

🏠

निवास व्यवस्था

किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही

🍽️

अन्न व्यवस्था

किल्ल्यावर किंवा विहीगावात जेवणाची सोय नाही .

💧

पाणी उपलब्धता

किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही

सर्वोत्तम काळ

🌤️ सर्व ऋतूत किल्ल्यावर जाता येते.

जवळील गावे

विहीगाव 

 

 

 

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : ठाणे

उंची : १८९६ फुट

श्रेणी : सोपी

नाशिक हे पुर्वीपासुनच बाजारपेठ म्हणून प्रसिध्द आहे. प्राचिनकाळी कल्याण,सोपारा, डहाणु बंदरात आलेला माल विविध घाटवाटांनी या बाजारपेठेत येत असे. यातील काही घाटवाटांचे आज महामार्गात रुपांतर झाले आहे. आज कसारा घाट म्हणुन ओळखला जाणारा घाटमार्ग म्हणजे प्राचीन थळ घाट. नाशिक परिसरातून उत्तर कोंकणात उतरणाऱ्या थळ घाटावर लक्ष ठेवण्यासाठी घाटासमोर असलेल्या व मुख्य डोंगररांगेपासून वेगळे झालेल्या एका लहान डोंगरावर बळवंतगड हा टेहळणीचा किल्ला बांधण्यात आला. प्राचीन थळ घाटाचा रखवालदार असलेला हा किल्ला आजही दुर्लक्षित आहे. बळवंतगडाला भेट देण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला विहिगाव गाठावे लागते. मुंबई ते विहीगाव हे अंतर ११० कि.मी.असुन कसारा घाटातील खोडाळा फाट्याहून तेथे जाता येते तर नाशिकहून हे अंतर ५५ कि.मी.असुन घाटनदेवी मार्गे तेथे जाता येते. विहिगावाच्या अलीकडे वनखात्याच्या कार्यालयापासून एक रस्ता डावीकडे माल गावाकडे जातो. या ठिकाणी रिल्याक्स कंट्री रिसोर्टचा फलक लावलेला आहे. या वाटेने १.५ कि.मी. चढण चढल्यावर १/४०० ते १/६०० या कि.मी. अंतर दर्शविणाऱ्या दोन दगडा दरम्यान डाव्या बाजूला किल्ल्यावर जाणारी पायवाट आहे. सध्या येथे सांगण्यासारखी इतर कोणतीही खुण नाही. या वाटेने टेकडीच्या दिशेने चढताना किल्ल्याची तटबंदी दिसायला सुरवात होते व १० मिनिटात किल्ल्याच्या दक्षिणेकडील ढासळलेल्या तटबंदीतून आपला किल्ल्यावर प्रवेश होतो. किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची ७१० फुट असुन किल्ल्याचा माथा पुर्वपश्चिम साधारण १.५ एकरवर पसरलेला आहे. किल्ल्याच्या पूर्वेकडील तटबंदीत दोन बुरुज असुन एक बुरुज किल्ल्याच्या पश्चिम टोकाला पहायला मिळतो. किल्ल्याची तटबंदी आजही बऱ्यापैकी शिल्लक असुन या रचीव तटबंदीत सांधण्यासाठी कोणतेही मिश्रण वापरलेले नाही. तटबंदीच्या फांजीवर मोठया प्रमाणात माती जमा झाली असुन तटबंदीत एका ठिकाणी पाणी वाहुन जाण्यासाठी नाली पहायला मिळते. तटबंदीवर फेरी मारताना किल्ल्याच्या मधोमध असलेला उंचवटा दिसतो. या उंचवट्यावरील झाडाखाली शेंदुर फासलेले काही दगड ठेवलेले आहेत. उंचवट्याच्या पुढील भागात दोन उध्वस्त घरांचे अवशेष पहायला मिळतात. हे अवशेष पाहुन पुढे आल्यावर उतारावर एका हातात तलवार तर दुसऱ्या हातात गदा घेऊन पनवतीला पायाखाली दाबून ठेवलेली मारूतीची मुर्ती पहायला मिळते. मूर्तीसमोर एक लहान पिंड व नंदी ठेवलेला आहे. येथे खालच्या बाजुला किल्ल्यावर पाण्याचा एकमेव स्त्रोत असलेले खडकात खोदलेले प्रचंड मोठे टाके दिसते पण हे टाके भंगलेले असल्याने व त्यात मोठया प्रमाणात दगडमाती आल्याने पाणी साठत नाही. टाके पाण्यासाठी थोडे पुढे जाउन उजवीकडे वळसा घालून खाली उतरावे लागते. टाक पाहुन तसेच पुढे निघाल्यावर आपण किल्ल्याच्या पश्चिम भागात पोहोचतो. येथील ढासळलेली तटबंदी व इतर अवशेष पहाता या ठिकाणी किल्ल्याचा दरवाजा असल्याचे जाणवते. तटबंदीत एका ठिकाणी दरवाजाला अडसर घालण्याची खाच दिसुन येते. येथुन वर आल्यावर आपण किल्ल्याच्या पश्चिम टोकावरील बुरुजावर पोहोचतो. या बुरुजावरून थळ घाट, मुंबई नाशिक महामार्ग तसेच लोहमार्ग आणि कसारा गाव इतका लांबवरचा प्रदेश नजरेस पडतो तर पुर्वेकडील बुरुजावरून त्रिंगलवाडी व माल गावाचे पठार यावर नजर ठेवता येते. संपुर्ण गड फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो. बळवंत गडावरील घटनाबाबत इतिहासात कोणत्याही नोंदी आढळत नाही.
© Suresh Nimbalkar

Post Views: 1,364

 
samantfort.blogspot.com

बळवंतगडाचा वेढा (Balwantgad)

अमित सामंत ( AMIT S. SAMANT)

कसार्‍या जवळचा बळवंतगड हा छोटेखानी किल्ला. गेली अनेक वर्ष किल्ल्यांवर फिरतोय,  पण का कोण जाणे हा किल्ला पाहायचा राहुन गेला होता. जुन महिन्याच्या शेवटी पावसाला सुरुवात झाली. शनिवारी धो धो पाउस कोसळायला लागला, किल्ल्यावर जाण्याचे वेध लागले आणि बळवंतगडाच नाव आठवल . नेहमीच्या वेबसाईट, पुस्तक चाळली पण बळवंतगड माझ्यासारखाच त्यानी पण ऑप्शनला टाकला होता. मग काही ब्लॉग वाचले त्यात किल्ल्यावर कस जायच याची माहिती फारच त्रोटक होती . नशिबाने किल्ला गुगल मॅपवर मार्क केलेला होता. त्याच्या आधाराने जायच ठरल.  नेहमीच्या सवंगड्याना फोन केले. मी आणि महेंद्र गेली ९ वर्ष किल्ल्यावर फिरतोय.  किल्ल्यांचे नकाशे बनवणे आणि जीपीएस मॅपिंग करण हे त्याच काम तर किल्ल्याची माहिती गोळा करण माझ काम हे ठरलेल आहे. त्यामुळे किल्ल्यावर जायच म्हटल्यावर तो तयार झाला. माझा मुलगा कौस्तुभ लहानपणापासूनच माझ्याबरोबर किल्ल्यांवर हिंडतोय, तोही होताच. विराज , उमेश , सचिन आणि अभिषेक तयार झाले. सकाळी डोंबिवलीहून पहिली कसारा पकडली. उमेशला बर नसल्याने आलाच नाही. टिटवाळ्याच्या पुढे उजाडायला लागल. पाउस नव्हता, पण धुक होत. कसार्‍याला पोहोचलो तेंव्हा कळल माल या गावात जाणार्‍या जीप्स सकाळी ८ नंतर सुरु होतात. किल्ल्याच्या पायथ्याच्या विहिगावात जाणारी बस पण निघून गेली होती. मग प्रथम पेटपूजा करुन घेतली. ट्रेन जाउन बराच वेळ झालेला. नाशिकला जाणारेही बस , टॅक्सीने निघून गेले होते. त्यामुळे टॅक्सीवाल्यांशी घासाघिस करण्याची योग्य वेळ होती. पाउस नसला तरी धुक असल्याने बळवंतगडाची माहिती असलेला टॅक्सीवाला आम्ही शोधत होतो. अनेकांना बळवंतगडच माहिती नव्हता..... शेवटी बळवंतगड माहिती असलेला एक टॅक्सीवाला मिळाला आणि थोडी घासाघिस करुन प्रवासाला सुरुवात केली.

बळवंतगडाच्या पायथ्याचे विहिगाव कसारा रेल्वे स्टेशनपासून १३ किलोमीटर अंतरावर आहे. या गावातून बळवंतगडाच्या बाजूबाजूने माल गावात एक घाट रस्ता जातो. या ऱस्त्याने दिड किलोमीटर गेल्यावर डाव्या बाजूला किल्ल्यावर जाण्यासाठी पायवाट आहे.

बस किंवा जीपने विहीगावच्या माल फाट्यावर उतरून अर्ध्या तासात आपण किल्ल्याच्या पाउल वाटेपाशी पोहोचू शकतो.

धुक्यात  हरवलेली  वाट 

      आमच्या ड्रायव्हरला किल्ल्यावर जाण्याची वाट कुठून सुरु होते हे माहिती असल्याने त्याने माल फाट्यावर न उतरवता तुम्हाला थेट किल्ल्याच्या वाटेवर सोडतो सांगून गाडी थेट माल रोडवर घेतली. घाट चढायला लागलो तसंतसं धुके दाट व्हायला लागल . समोरच धुकं आणि काचेवर जमलेल धुकं यामुळे ड्रायव्हर खिडकीतून डोक बाहेर काढुन गाडी चालवत होता . शेवटी एके ठिकाणी त्याने गाडी थांबवली आणि सांगितले डाव्या बाजूला जी पायवाट जाते ती थेट किल्ल्यावर जाते. पैसे घेउन ड्रायव्हर निघून गेल्यावर त्या दाट धुक्यात आम्ही ५ जणच राहीलो. किल्ल्या संबंधी माहिती लिहिताना नक्की कसली खुण सांगायची (लिहायची) ते आजूबाजूला शोधत होतो. थोड्या अंतरावर एक मैलाचा दगड दिसला. त्यावर ३.४ हा आकडा लिहिला होता बाकी नाव गाव काही नव्हत. खुणेची नोंद डायरीत करुन धुक्यात हरवलेल्या पाउलवाटेवर पाउल ठेवल आणि आम्हीही धुक्यात विरुन गेलो. पाच फुटा पलिकडचा माणूसही दिसेना. त्यामुळे सर्वाना एकत्र चालायच्या सूचना दिल्या. दरवर्षी उन्हाळ्यात जी फळ खातो किंवा ज्या बिया पडलेल्या मिळतात त्या सुकवून साठवायची सवय लागली आहे. पावसाळ्यात ट्रेक चालू झाले की ह्या बिया त्या ठिकाणी पेरतो. यावेळीही आंबा, जांभूळ, बहावा, इत्यादी  झाडांच्या अंदाजे ४० बिया बरोबर घेतल्या होत्या. चालता चालता योग्य जागा बघून व्यवस्थित खड्डा खणून बिया लावायला सुरुवात केली. त्यामुळे अर्थात चालण्याचा वेग मंदावला. किल्ला १५ मिनिटात चढून होणार हे माहिती असल्याने सगळे वातावरणाचा आनंद घेत चालत होते. (निसर्ग सौंदर्याचा म्हणू शकत नाही कारण धुक्यामुळे काहीच दिसत नव्हत.) अर्धा तास झाला तरी किल्ल्याची चढण येत नाही हे पाहिल्यावर आम्ही अस्वस्थ झालो. एका पठारावर पोहोचलो तर ठळक पायवाट खाली उतरत होती. ती पायवाट बरोबर आहे का ते पाहाण्यासाठी मी आणि सचिन पायवाटेने खाली उतरायला लागलो. पाच मिनिटात आम्ही दुसर्‍या पठारावर पोहोचलो. इथून मुंबई - नाशिक हायवे वरच्या गाड्यांचे आवाज खालच्या बाजूने एकदम जवळ येत होते. अस वाटत होते की, थोड खाली उतरलो तर थेट हायवेवरच उतरु .धुक्यामुळे अंतराचा अंदाज येत नव्हता. खरतर हायवे म्हणजेच थळ घाटातून जाणारा रस्ता आम्ही उभे असलेल्या डोंगराच्या उंचीवरुन समोरच्या डोंगरातून जात होता. भौगोलिक अंतर जास्त असले तरी शांत वातावरणामुळे वहानांचा आवाज जवळून येत असल्यासारखा वाटत होते. रस्ता चुकलाय हे लक्षात आल्यावर आम्ही परत पहिल्या पठारावर आलो. कौस्तुभने तो पर्यंत वेळेचा सदुपयोग करत खड्डे खोदुन बिया पेरायला सुरुवात केली होती.

बळवंतगड  परिसरात  बिया  लावतांना

आता महेंद्र आणि विराजच्या दुसर्‍या टिमने पठारावरुन सरळ जाणार्‍या वाटेने वर चढत जायचे आणि वाट सापडली नाही तर १० मिनिटात परत याच ठिकाणी यायचे असे ठरले. त्याप्रमाणे महेंद्र आणि विराज धुक्यात शिरले. आम्ही आमचे प्लास्टिक पिशव्यात गुंडाळून ठेवलेले मोबाईल काढले आणि गुगल मॅप चालू केला . नशिबाने नेटवर्क होते. त्यामुळे आम्ही उभे होतो त्याच्या डाव्या बाजूला बळवंतगड आहे हे नक्की झाले. पुढे जाण्याची वाट संपल्याने १० मिनिटात महेंद्र आणि विराज परत आले. आता गूगल मॅप ऑन करुन आम्ही चालायला सुरुवात केली तर त्याने आम्हाला मी आणि सचिन गेलेल्या वाटेने खाली नेल. पुढे तो अजून अजून खाली नेउ लागला डोंगर चढायच्या ऐवजी आम्ही उतरायला लागलोय हे कळत होत. त्यामुळे गुगल मॅपवरचा टेरेन हा ऑप्शन ओपन केला. या ऑप्शन मध्ये जमिनीचे, डोंगराचे वेगवेगळे स्तर (पातळ्या) दाखवलेले असतात. या मॅपवर ज्या कोणी बळवंतगड मार्क केलेला होता तो अंदाजे मार्क केल्यामुळे खुप खालच्या स्तरावर मार्क केलेला त्यामुळे गुगल मॅप आम्हाला तिकडे घेउन जात होता. मोबाईल बंद करुन आता आम्ही खाली न उतरता सरळ डोंगराला भिडायच ठरवल. वाट अशी नव्हतीच करवंदीच्या जाळ्या , खुरटी झुडप यातून वाट काढत अंगावर येणारा चढ चढायला सुरुवात केली . पाच सात मिनिटातच पायाखाली एखाद दुसरा घडीव दगड दिसू लागला. किल्ल्याच्या तटबंदीसाठी वापरले जाणारे घडीव दगड कालौघात ढासळून खाली येतात. ही किल्ला असल्याची खुण पाहून आमचा उत्साह वाढला आणि आम्ही जोमाने डोंगर चढू लागलो. १० मिनिटात विराज डोंगर माथ्यावर पोहोचला. धुक्यात थोडी शोधाशोध केल्यावर त्याला भवानी मंदिराकडे आणि पाण्याच्या टाक्याकडे अशी दिशा दर्शवणारा बाण दिसला. त्याने ओरडून आम्हाला ही आनंदाची गोष्ट कळवली. आम्ही एकामागोमाग एक गडमाथ्यावर पोहोचलो. दिशादर्शक बाणाच्या समोर बसून भरपूर पाणी प्यायलो. किल्ला चढायला सुरुवात केली तेंव्हापासून आत्तापर्यंत सव्वातास निघून गेला होता आणि आम्ही शोधाशोध करतांना पाणी प्यायचे विसरुन गेलो होतो. पावसाळी आणि हिवाळी ट्रेक मध्ये वातावरणामुळे आपल्याला घाम येत असल्याची जाणीव होत नाही तसेच तहान पण लागत नाही, पण त्यावेळीही ठरावीक वेळानंतर थोडे थोडे पाणी पित रहाणे आवश्यक असते . कारण शरीरातली पाण्याची पातळी श्रमामुळे हळूहळू कमी होत असते आणि पायात गोळे येणे थकवा जाणवणे या गोष्टी व्हायला लागतात.

वेताळ , बळवंतगड

हनुमान, बळवंतगड

थोडी विश्रांती झाल्यावर आम्ही भवानी मंदिराच्या दिशेने चालायला सुरुवात केली. उजव्या बाजूला एका खोलगट भागात उन पावसाने झिजलेली एक मुर्ती होती. त्या मुर्तीच्या उजव्या हातात तलवार तर पायाखाली आडवी पडलेली एक मानवाकृती होती. झिज झाल्याने तिचे कांगोरे नष्ट झाले होते.  मुर्तीशास्त्र हा खुप मोठा विषय आहे. वेद,रामायण, महाभारत, पुराण इत्यादीतून आलेल्या वर्णनानुसार ,कथेनुसार मुर्ती बनवल्या जात. पण या गोष्टींचा अभ्यास न करता सरसकट काही पण ठोकून द्यायची सवय अनेकांना असते. या ठिकाणी जी मुर्ती आहे ती भवानीची नसून हनुमानाची आहे आणि त्याच्या पायाखाली पनवती आहे .

पाण्याचे टाकं , बळवंतगड 

हनुमानाला नमस्कार करुन आम्ही खालच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या टाक्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली. ५ मिनिटात कड्यावर कातळात खोदलेल्या भल्यामोठ्या टाक्यापाशी पोहोचलो. टाक पाहून पुन्हा वर चढून किल्ल्याच्या पूर्व टोकापाशी पोहोचलो. सकाळपासून पिच्छा पुरवणार धुक विरायला सुरुवात झाली आणि धुक्याचा पडदा सरकायला लागला तसतसे आजूबाजूचे हिरवेगार डोंगर त्यामधून जाणारा रेल्वेमार्ग, बाजूचा थळ घाट, दुरवरचे कसारा गाव असा प्रचंड मोठा परिसर दृष्टीक्षेपात येत होता. बळवंतगड हा टेहळणीचा किल्ला का याच उत्तरही मिळल होते. कसारा स्टेशनातून सुटलेल्या ट्रेनचा मागोवा घेत ती बळवंतगडाच्या डोंगराच्या बाजूने बोगद्यात जाताना बघताना आम्ही सगळेच लहान होउन गेलो. त्याचवेळी नाशिकहून कसार्‍याच्या दिशेने जाणारी ट्रेन बाहेर आली तीच्या मागून आमची नजर ही कसार्‍याकडे जायला लागली. मुकपणे हा खेळ खेळत आम्ही कितीही वेळ बसू शकलो असतो. पण  भुकेची जाणीव झाली आणि आम्ही आमचे डबे त्याच ठिकाणी उघडून खायला सुरुवात केली .

डबे खाउन झाल्यावर किल्ल्याच्या पश्चिम टोकाला चालायला सुरुवात केली वाटेत उध्वस्त वास्तूंचे दोन चौथरे, वेताळ आणि त्यामागे दगड एकावर एक रचून केलेली तटबंदी होती. या तटबंदीच्या कोसळलेल्या भागातूनच किल्ल्यावर येण्याचा सध्याचा मार्ग होता. या मार्गाने किल्ला उतरायला सुरुवात केली आणि दहाव्या मिनिटाला आम्ही किल्ल्या खालील रस्त्यावर पोहोचलो. किल्ल्यावर जाण्याच्या मार्गाची नोंद करण्यासाठी थोडी आजूबाजूला शोधाशोध केल्यावर मैलाचा दगड सापडला त्यावर लिहिले होते १.४. सकाळी आम्हाला जीपवाल्याने ३.४ जवळ सोडले होते. आता सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. जीपवाल्याने आम्हाला किल्ल्याच्या दुसर्‍या टोकाला म्हणजेच पूर्व टोकाला सोडले होते. तिथून किल्ल्यावर जाण्याची वाटच नव्हती. किल्ल्याचा डोंगर पूर्व पश्चिम पसरलेला आहे. आम्ही किल्ल्याला पूर्ण वेढा घालून आग्नेय दिशेकडून नसलेल्या वाटेने गडावर चढलो होतो. जीपवाल्याच्या कृपेने एक सोपा ट्रेक मस्त कठीण झाला होता.

जी.पी. एस. ने नोंदवलेली  बळवंतगडा वरील पायपीट  


बळवंतगडावर जाण्यासाठी :-

१) रेल्वेने :- कसारा लोकलने किंवा मेल एक्सप्रेस गाडीने कसारा गाठावे. कसारा स्थानका बाहेरुन विहीगावला जाण्यासाठी एसटी बसेस व जीप्स मिळतात. त्याने मालफाट्यावर उतरावे. विहीगावातून माल गावात जाणारा रस्ता इथूनच सुरु होतो. या घाट रस्त्याने १.५०० किमी चढल्यावर डाव्या बाजुस एक पायवाट डोंगरात शिरते. (या ठिकाणी खास अशी खुण नाही रस्त्यावर जे मैलाचे दगड असतात त्यावरील १/४०० आणि १/६०० च्या मध्ये किल्ल्यावर जाणारी पायवाट डाव्या बाजुस आहे.) या पायवाटेने माल गावाच्या दिशेने चढत गेल्यावर १० मिनिटात किल्ल्याच्या उध्वस्त तटबंदीतून आपला किल्ल्यावर प्रवेश होतो.

कसार्‍याहून माल गावासाठी थेट जाणार्‍या जीप्स मिळाल्यास त्यांना बळवंतगड फाट्यावर उतरवायला सांगावे.

२) खाजगी वाहानाने :- मुंबई - आग्रा महामार्गावरील कसार्‍याच्या पुढे थळ घाट सुरु होतो. घाटात ३ किमी अंतर कापल्यावर एक रस्ता डावीकडे खोडाळ्याकडे जातो. या रस्त्यावर विहीगाव आहे. विहीगावातून माल गावात एक रस्ता जातो. या रस्त्यावर १/४०० ते १/६०० मैलाच्या दगडा दरम्यान डाव्या बाजूला किल्ल्यावर जाणारी पायवाट आहे .


नकाशातून दुर्गभ्रमंती या पुस्तकाचे लेखक महेंद्र गोवेकर यांनी बनवलेला नकाशा

सूचना:-

पावसाळ्यात किल्ल्यावर जाताना बर्‍याचदा आपण धुक्यात हरवतो. अशा वेळी होकायंत्र , किल्ल्याचा नकाशा जवळ बाळगावा . किल्ल्यावर जाण्यापूर्वी किल्ल्याची माहिती जमा करावी . गुगल मॅप वरुन किल्ल्याचा भूगोल जाणून घ्यावा . गावातील स्थानिकांशी संवाद साधावा त्याना माहिती विचारावी.

धुक्यात वाट चुकल्यास घाबरुन न जाता शांतपणे निर्णय घ्यावे. एकावेळी एका टिमनेच रस्ता शोधण्यासाठी जावे. एकाच वेळी सर्वांनी वेगवेगळ्या दिशेला जाउ नये. ठरलेल्या ठिकाणी वेळेवर परत यावे. एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी शिट्टी जवळ बाळगावी . वारा, पावसाळ्यात झाडावर पडणार्‍या पाण्याच्या, ओढ्या, धबधब्यांच्या आवाजामुळे आपले आवाज विरुन जातात अशावेळी शिट्टीचा उपयोग होतो.


रस्ता शोधण्याच्या नादात वेडी साहस करु नयेत. रस्ता न मिळाल्यास गावात सुखरुप परत जाउन वाटाड्या बरोबर घ्यावा . 

 
 
 
forttrekkers.com

Balwantgad Fort, Balwantgad Fort Trek, Balwantgad Fort Trekking, Thane


कसारा ते इगतपुरी दरम्यान असलेल्या प्राचीन थळ घाटावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच जव्हार त्र्यंबकेश्वर मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी थळ घाटाच्या समोरच्या डोंगरावर बळवंतगड हा टेहळणीचा किल्ला बांधण्यात आला होता. थळ घाटाच्या समोर मुख्य डोंगर रांगेपासून वेगळ्या झालेल्या डोंगरावर बळवंतगड किल्ला आहे. मुंबईहुन एका दिवसात करता येण्यासारखा हा छोटासा ट्रेक आहे. किल्ला छोटा असल्याने सर्व ऋतूत करता येतो. किल्ल्यावर पाणी नसल्याने पाणी मात्र सोबत बाळगावे.

Balwantgad Fort, Balwantgad Fort Trek, Balwantgad Fort Trekking, Thane

गडावरील पहाण्याची ठिकाणे

किल्ल्याचा डोंगर पूर्व पश्चिम पसरलेला आहे. पश्चिमे कडील ढासळलेल्या तटबंदीतून आपला गडावर प्रवेश होतो. या भागात एकावर एक दगड रचून तटबंदी बनवण्यात आलेली आहे. याठिकाणी तटबंदी आणि फांजीचे अवशेष अजूनही पाहायला मिळतात. तटबंदी पाहून पश्चिममेकडे निघाल्यावर किल्ल्याच्या मधोमध छोटा उंचवटा आहे. तो चढून गेल्यावर एका झाडाखाली काही शेंदुर लावलेले दगड पाहायला मिळतात. स्थानिक लोक याला वेताळ म्हणून ओळखतात. वेताळाचे दर्शन घेउन पुढे गेल्यावर दोन घरांची जोती पाहायला मिळतात.

उंचवट्यावरुन खाली उतरुन पुढे गेल्यावर उजव्या बाजूला खळग्यात पिंड ,नंदी आणि हातात तलवार घेतलेली आणि पायाखाली पनवतीला दाबून ठेवलेली मुर्ती पाहायला मिळते. या ठिकाणाच्या खालच्या अंगाला किल्ल्यावरचे पाण्याचे प्रचंड मोठ टाक आहे. पण ते पाहाण्यासाठी थोडे पुढे जाउन उजवीकडे वळसा घालून खाली उतरावे लागते. टाक्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्यात पाणी साठत नाही. टाक पाहुन परत किल्ल्याच्या पठारावर येउन पश्चिम टोकाकडे चालत गेल्यावर लांबवरचा प्रदेश दृष्टीपथात येतो. थळ घाट , मुंबई आग्रा महामार्ग , रेल्वेलाईन आणि कसारा गाव इथून दिसते. किल्ल्यावरुन दिसणारा प्रदेश पाहुन या डोंगरावर टेहळणीचा किल्ला का बांधला हे समजते.

गडावर पोहोचण्याच्या वाटा

१) रेल्वेने: कसारा लोकलने किंवा मेल एक्सप्रेस गाडीने कसारा गाठावे. कसारा स्थानका बाहेरुन विहीगावला जाण्यासाठी एसटी बसेस व जीप्स मिळतात. त्याने मालफाट्यावर उतरावे. विहीगावातून माल गावात जाणारा रस्ता इथूनच सुरु होतो. या घाट रस्त्याने १.५०० किमी चढल्यावर डाव्या बाजुस एक पायवाट डोंगरात शिरते. (या ठिकाणी खास अशी खुण नाही रस्त्यावर जे मैलाचे दगड असतात त्यावरील १/४०० आणि १/६०० च्या मध्ये किल्ल्यावर जाणारी पायवाट डाव्या बाजुस आहे.) या पायवाटेने माल गावाच्या दिशेने चढत गेल्यावर १० मिनिटात किल्ल्याच्या उध्वस्त तटबंदीतून आपला किल्ल्यावर प्रवेश होतो.

कसार्‍याहून माल गावासाठी थेट जाणार्‍या जीप्स मिळाल्यास त्यांना बळवंतगड फाट्यावर उतरवायला सांगावे.

आणखी शोधा

Travel Guides & Travelogues

Hiking & Camping

Historical Sites & Buildings

२) खाजगी वाहानाने: मुंबई - आग्रा महामार्गावरील कसार्‍याच्या पुढे थळ घाट सुरु होतो. घाटात ३ किमी अंतर कापल्यावर एक रस्ता डावीकडे खोडाळ्याकडे जातो. या रस्त्यावर विहीगाव आहे. विहीगावातून माल गावात एक रस्ता जातो. या रस्त्यावर १/४०० ते १/६०० मैलाच्या दगडा दरम्यान डाव्या बाजूला किल्ल्यावर जाणारी पायवाट आहे.

राहाण्याची सोय

किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही

जेवणाची सोय

किल्ल्यावर किंवा विहीगावात जेवणाची सोय नाही.

पाण्याची सोय

किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही

जाण्यासाठी लागणारा वेळ

विहीगावातून चालत पाउण तास लागतो.

 
 
 कसारा घाटाचा पहारेकरी “किल्ला बळवंतगड”....🚩

सह्याद्री डोंगररांगाच्या कुशीत असलेला हा घाट तसा सगळ्यांच्याच आठवणीत आहे हिरवागार शालू नेसलेली वनश्री, खोल दरी, त्यातून गेलेला वळणावळणांचा रस्ता तर मधेच डोंगराच्या कुशीत असलेला झाडाझुडपांनी वेढलेला काळाशार रस्ता काळवंडून आलेलं आकाश निसर्गसुंदर मुंबई नाशिक महामार्ग कसारा घाट....

कसारा ते इगतपुरी दरम्यान असलेल्या प्राचीन “थळ घाट” थळ घाटाला मोठा प्राचीन इतिहास आहे थळ घाटावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच जव्हार त्र्यंबकेश्वर मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी थळ घाटाच्या समोरच्या डोंगरावर बळवंतगड हा टेहळणीचा किल्ला बांधण्यात आला होता थळ घाटाच्या समोर मुख्य डोंगर रांगेपासून वेगळ्या झालेल्या डोंगरावर बळवंतगड किल्ला आहे...

गडावर किल्ल्याचे अवशेष फार काही नाहीत काही बाजूची तटबंदी मात्र आजतागायत शाबूत आहे गडाच्या मधोमध आल्यावर नंदी, पिंड आणि देवीची मूर्ती आहे ह्या मंदिराच्या खालच्याच बाजूला एक टाक आहे पण तिथे जाण्यासाठी थोड पुढे जाऊन मग खाली उतरावं लागत टाक बऱ्यापैकी मोठ आहे गडाच्या शेवटी गेल्यावर एक बुरुज आपल्या नजरेत दिसून येतो तो बुरुज अजूनही गडाची राखण करत उभा आहे गडावर दोन चौथऱ्याचे अवशेष आहेत...
 
 
 
 
yorocks.wordpress.com

कावनई व बळवंतगड !

by yorocks

बरेच दिवस ट्रेक नाही झाले की आम्हा भटक्या लोकांची पंचाईतच होते.. उगीच चुकल्यासारखे वाटते काहीतरी.. मग अश्यावेळी संधी मिळाली की संधीचे सोने करायचे.. मग एखादी टेकडी का असेना चढायची.. ट्रेक मस्ट होतो अशावेळी…

डिसेंबरमध्ये अनपेक्षितपणे कोकणातला डुंगोबा ट्रेक झाला होता.. पण नंतर दोन- तीन महीने या ना त्या कारणात्सव असेच सुके गेले.. काय करणार अरे संसार अरे संसार..

मार्च महिना उजाडला.. कालनिर्णय मध्ये असे लाल रंग बरेच येऊन गेले होते पण आता रंगपंचमीचा मुहूर्त दिसला.. नि ठरले जाऊ.. कुठेतरी जवळपास जाऊ.. तसेही केमिकल युक्त रंगांशी दोन हात करण्यात कधीच उत्साह नसतो.. ठरले .. गिरीने फर्मान सोडले.. कावनई उरकून घेऊ.. !! लगेच विन्या, मी हात वरती केले.. विन्याने गाडीसकट हात वरती केला.. राहिला एक मेंबर.. गाळलेल्या जागा भरण्याची जबाबदारी मी नेहमीच यशस्वीरीत्या पार पाडतो.. माझा ऑफिसमधला सहकारी राहुल याला बरोबर घेतले..

साडे-सहाच्या सुमारास बाहेर पडलो. हायवेला लागलो.. असेही आम्ही भुकेले असतोच त्यात नाश्त्याची वेळ.. पण एकामागून एक धाबे बंद दिसायला लागले नि आमचे धाबे दणाणले.. शेवटी एक व्यवस्थित हॉटेल लागले.. भरपेट खाऊन निघालो. आता थांबायचे होते थेट कावनईला..

नाशिक जिल्ह्यातला हा कावनई इगतपुरीहुन फार जवळ.. आतापर्यंत ट्रेकच्या निमित्ताने जेव्हा जेव्हा नाशिकला जायचो तेव्हा हायवेला घोटी लागले की हा किल्ला बघायचो.. नंतर करू नंतर करू म्हणत राहीलाच होता. ह्याचा आकारच असा की दुरून लगेच ओळखता येतो..

आमची गाडी घोटीला कावनई फाट्याकडे घातली.. नि आता कावनई अगदी नाकासमोर दिसू लागला..

पायथ्याचे गाव तसे उंचावरच आहे व चांगला डांबरी रस्ता त्यामुळे अर्धी चढाई गाडीनेच पार झाली.. पायथ्याकडच्या गावात पोचलो तेव्हा कावनई अगदीच टप्प्यात दिसत होता.. गावातले हनुमानाचे मंदिर छानच नि बजरंगबलीची मूर्ती अगदी भव्य.. मंदिरासमोरच गाडी लावणार होतो पण एका गावकऱ्याने आडोश्याची जागा दाखवली नि गाडी व्यवस्थित पार्क झाली.. इथे रंगपंचमी साजरी होत नसावी कारण तसे काही दिसले नाही..

आम्ही गावामागच्या रस्त्याने चढायला घेतले..मार्च चा महिना तेव्हा उन चढायच्या आत खाली उतरायचे होते.. वाट ठळक नि चढण अगदी सोप्पी.. नागमोडी वळसे घेत वाट डोंगराच्या सोंडेवर चढते..

पुढे सरळ चढण लागते इथून मागे पाहीले तर मुकणे धरण ते अप्पर वैतरणा जलाशयाचा सुंदर नजारा दिसतो.. व त्यामागे हरिहर, त्र्यंबकेश्वर, अंजनेरी यांना कवेत घेऊन असलेली त्र्यंबक डोंगररांग..

हा नजरा बघून आम्ही पुढे सरसावलो.. सरळ खडी चढण व त्या चढणीवर वाट अशी नव्हती.. पण चढणीला बाजूला ठेवून डावीकडून एक ठळक वाट जाताना दिसली.. नि आम्ही फसलो.. !!


(डावीकडे दिसतेय ती फसवणारी वाट)

वाट ठळक होती त्यामुळे मनात काही शंका आली नाही. पण नंतर मुख्य डोंगर उजवीकडे राहतोय नि वाट काही संपत नाही असे वाटू लागले.. त्यात कावनईचा मुख्य दरवाज्यावर जाणारी शिडी दिसली.. आधी वाटले वळसा घालून वाट जात असेल.. पण नाही.. बाजूचा उघडा-बोकड डोंगर (कावनई चा बुधला / Dakson ) जास्त जवळ येतोय असे वाटू लागले. शेवटी आम्ही उजवीकडच्या शिडीला लक्ष्य केले नि मिळेल त्या ढोरवाटेने काट्याकुट्यातून चढून गेलो.. सोप्पी चढाई थोडीशी परिश्रमाची करून घेतली नि अर्धा तास फुकट घालवला..

शिडीच्या जागी कातळटप्पा आहे तेव्हा शिडी असल्याने सोयीस्कर पडते.. ही शिडी चढून गेलो की दरवाजा लागतो.. हा दरवाजा आजही तग धरून उभा आहे..

दरवाज्यानंतर पाचेक पायऱ्या चढून वरती आलो की उजव्या हाताला छोटी गुहा दिसते.. पुढे माथ्यावर आलो नि कडयावरुन दिसणारे दृश्य बघण्यात दंग झालो.. दूरवर असणारी भव्यदिव्य कळसुबाई रांग इथून छानच दिसते.. बाजूचा dakson नावाचा उघडा बोकड डोंगर तर उडी मारून ये म्हणून आव्हान देत उभा दिसतो..

कावनई चा माथा तसा छोटाच.. तरीही एक छोटा तलाव… तलावाच्या एका बाजूस पडकी इमारत व बिनछप्परात असलेले शिवलींग तर दुसऱ्या बाजूस देवीचे मंदिर.. एवढं सगळं विसावलेल आहे.. या मंदिरामागेच एक पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.. थोडं पुढे गेलो की बुरुज नजरेस पडतो..

– – –

एवढं सगळं बघेपर्यंत अर्धा तास पुरला.. आताशे अकरा वाजत होते पण उनाचा तडाखा जाणवू लागला होता.. गिरी म्हणत होता हरिहर किल्ला पण करून येऊ.. म्हटलं खाली उतरू मग बघू.. तसही कोणाची मानसिक तयारी दिसत नव्हती.. पंधरा-वीस मिनिटांत गड उतरून खाली आलो पण तप्त वातावरणामुळे हवालदिल झालो.. हरिहर सुध्दा उनात चढायला त्रासदायक असल्याने आम्ही आता त्रिंगलवाडी किल्ल्याचा विचार करू लागलो.. माझा व गिरीचा झाला होता पण म्हटलं वेळ घालवायचाय सो जाऊन येऊ..

कावनईच्या पायथ्याशीच कपिलाऋषींचा आश्रम आहे.. पण आम्ही आता गाडीतून उतरून आश्रमात जाण्यास निरुत्साही होतो.. आम्ही पुन्हा महामार्गावर आलो नि त्रिंगलवाडीसाठी इगतपुरीचा फाटा पकडला पण रस्ता चुकला नि इगतपुरी स्टेशनला पोहोचलो.. मागच्यावेळी इथूनच भलीमोठी पायपीट करत किल्ला गाठला होता त्याची आठवण झाली. पण आता त्याच वाटेने गाडी नेणे जिकरीचे असल्याने आम्ही त्या वाटेत लागणाऱ्या मोठ्या तलावापाशी येऊन थांबलो.. पावसाळ्यात येथील परिसर विविध गुणांनी नटलेला असतो मग ते हिरवे डोंगर असो वा डोंगरावर रेंगाळणारे ढग असोत वा वाटेत दुतर्फा फुललेली रानफुले असोत.. आता मात्र सगळं फ़िक्क पडलं होत.. तलवाचे पाणी देखील आटले होते.. पण इकडची शांतता मात्र मनाला भुरळ पाडते..

आता त्रिंगलवाडीचा प्लान देखील गळून पडला होता.. परतीच्या प्रवासात मात्र अजून एक पर्याय शिल्लक होता तो म्हणजे बळवंतगड.. !

साधारण दीडेक वाजत होते आणि बळवंतगड कसारा घाटाजवळ असल्याने आम्ही जायचे पक्के केले.. इगतपुरी सोडण्याआधी लालबुंद गोळा खाऊन जीव थंड केला नि चालू पडलो.. नक्की कुठे गड आहे हे माहीत नसल्याने नाशिकच्या हेम ला फोन लावला.. त्याने सांगितल्याप्रमाणे आम्ही कसारा घाटचा जुना मार्ग पत्करला.. घाटनदेवी मार्गे विचारत विचारत वन विभागाच्या कार्यालयाजवळ पोचलो.. तिथेच एक रस्ता मुख्य रस्ता सोडून वरती जात होता. तिकडे गाडी घालणार तोच आयना का बायना वाली मंडळी आडवी आली.. अर्थात त्यांना फाट्यावर मारून आम्ही पुढे आलो.. दोन्ही बाजूला जंगल लागले.. हा रस्ता तसा सुनसान.. पण एक बाईकवाला नशिबाने भेटला त्याने काही अंतरावर एका वळणापाशी डावीकडे वाट असल्याचे सांगितले.. त्याप्रमाणे डावीकडे बघत जात होतो.. एव्हाना गाडी वळणे घेत डोंगरावर आली होती तोच आमचे लक्ष डावीकडे उंचवट्यावर असलेल्या तटबंदीकडे गेले..

गाडी थांबवली खरी पण नक्की कुठून चढायचे हेच लक्षात येत नव्हते.. शेवटी रस्त्याच्या कडेला सावलीची जागा शोधली नि गड सोडून कलिंगड खायला बसलो !! भूक लागली की पहिली प्रायॉरिटी आम्ही खाण्यालाच देतो मग कुठेही असो ! उन्हाच्या काहलीत कलिंगड खाण्याची मजा काही औरच..

एव्हाना अजून एक बाईकवाल्याला विचारून झाले होते नि आम्ही किंचित पुढे आल्याचे कळले.. गाडी मागे घेतली नि खरच एका वळणावर एक अरुंद पाऊलवाट टेकडीवर जात होती.. हा गड म्हणजे या डोंगराची टेकडीच होती.. हेम ने सांगताना गडावर फार काही नाही पण गडावरून कसारा घाट छान दिसतो सांगितलेले.. रुक्ष निष्पर्ण अशा झाडांच्या मधल्या वाटेने आम्ही दहाएक मिनिटांत गडावर पोचलो पण !

आणि खरच पहिली नजर कसारा घाटावरच जाते.. बोगद्यातून जाणारी ट्रेन नि त्यावरतून जाणाऱ्या महामार्गावरून जाणाऱ्या गाड्या हे दृष्य छान दिसते.. तटबंदीचे काही अवशेष शिल्लक दिसतात.. एका उतरणीवर पाण्याच्या कोरड्या टाक्या दिसत होत्या पण तिथवर जाण्यास आळस केला.. कारण एकच होते की ही उघडी बोकड टेकडी ऊनामुळे चांगलीच तापली होती.. नंतर कळले की या गडावर एका बाजूस मूर्ती पण आहे.. या गडाचे स्थान बघता फक्त घाटावर लक्ष ठेवण्यासाठी गड बांधला असावा..

– – –

– – –

– – –

असो.. नाही नाही म्हणता आमचे ठरल्याप्रमाणे दोन गड झालेच.. मग ते चढाईच्या दृष्टीने लहान का असेना… रंगपंचमी खेळण्यापेक्षा गड भटकंतीला वेळ देता आले तेच महत्वाचे.. ! शिवाय भटकंतीचा दुष्काळ संपला तो वेगळा… !

 
 

बळवंतगड
कसारा घाटाचा राखणदार
जिथे निसर्ग सौंदर्य नाही, काही वेळेला कमी उंचीचे म्हणून, काही वेळेला किल्ल्याचे अवशेष नाहीत म्हणून सुद्धा काही किल्ले दुर्लक्षित राहतात. एकीकडे कलावंतीण किंवा कळसुबाई सारख्या ठिकाणी लोक गर्दी करतात आणि एकीकडे काही किल्ल्यांच्या आजूबाजूला पण कोण फिरकत नाही. खूप कमी भटके इथे जाऊन आलेत आणि काही आपला आकडा वाढविण्यासाठी...
कसाऱ्याहुन जवळच आसलेले विहिगाव तिथे असलेल्या अशोका धबधब्यामुळे प्रसिद्ध आहे. विहिगावात प्रवेश करण्यापूर्वी डावीकडे एक फाटा फुटतो. ह्या रास्ता वळणावळणाने वर चढतो. वरती चढल्यावर एक पायवाट डावीकडच्या टेकाडावर जाताना दिसते. हीच पायवाट थेट गडावर जाते. १० मिनिटातच आपण उध्वस्त तटबंदीतून गडावर प्रवेश करतो. माथ्यावर पोचल्या पोचल्या आपल्या दृष्टीत पडतो तो कसारा घाट आणि कसारा घाटाचे सौंदर्य वाढवणारा रेल्वे ट्रॅक चे भोगदे. त्या भोगद्यातून वळवळत येणारी ट्रेन गडावरून खूपच सुंदर दिसते.
गडावर किल्ल्याचे अवशेष फार काही नाहीत. चारी बाजूची तटबंदी मात्र आजतागायत शाबूत आहे. गडाच्या मधोमध नंदी, पिंड आणि देवीची मूर्ती आहे. ह्या मंदिराच्या खालच्याच बाजूला एक टाकं आहे पण तिथे जाण्यासाठी थोडं पुढे जाऊन मग खाली उतरावं लागत. टाक बऱ्यापैकी मोठं आहे पण यात खूप गाळ साचला आहे. गडाच्या शेवटी एक बुरुज मात्र अजून गडाची राखण करत उभा आहे. आणखी गडावर दोन चौथऱ्याचे अवशेष आहेत. बाकी गडावरून किल्ल्याचे काही अवशेष नाहीत.
गडावरून दिसणारे निसर्ग सौंदर्य, खोल दऱ्या पाहण्यासारख्या आहेत.
- शुभम एडेकर
#आम्हीभटकेIMG-20180127-WA0013.jpgIMG-20180127-WA0008.jpgIMG-20180127-WA0006.jpgIMG-20180127-WA0009.jpgIMG-20180127-WA0012.jpgIMG-20180127-WA0010.jpgIMG-20180127-WA0007.jpgIMG-20180127-WA0011.jpg

विषय: 
 
 
 
 

विजयदुर्गोत्सव : किल्ले बळवंतगड

'उत्सव क्षणांचा.. आपल्या सणांचा


















           'ऋतुरंगआयुष्यात आनंद घेऊन येतात ..न्हाई ? 
बहारलेला हा निसर्ग हि चैतन्यं उसवून नाचत असतो. सदा अन सदा  ...`वर्षा ऋतूच्या आगमना-नंतर , त्याच्या परतीच्या वाटेपर्यंत ...त्याच्या एकूण सहवासात,  हिरवाईचा साज शृंगार करून उधाणलेला हा  निसर्ग ...हि अथांग चराचर सृष्टी  आणिअभिमानाची पोलादी छाती फुगवून ...ताठ मानेनं उभा असलेला हा  सह्याद्री , 
मनाला विट्ठलावणी आर्त अशी साद घालत राहतो. 

त्याच्या ह्या  भक्तिओढीनंच  ह्या देहरूपी मनाची... मग अखंड पायपीट सुरु होते. कधी रुळलेल्या त्या पायवाटेतनं  तर कधी अनवट वाटा पायदळी घेत ...आनंदाच्या स्वाधीन..आनंदी आंनदी होऊन जात ..

आनंदाचे डोही आनंदतरंग । आनंदचि अंग आनंदाचे ॥१ 

प्राचीन 'थळ घाट 'म्हणजेच आजचा 'कसारा घाटत्यावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच 'जव्हार त्रंबकेश्वर मार्ग दृष्टीक्षेपात राखण्यासाठी,
थळ घाटाच्या समोरच मुख्य डोंगरा पासून विलगलेल्या डोंगरा कड्यावर ,  तटबुरुजाचा शेला चढवून...
स्वराज्याची कडी सांभाळणारा हा  एकेकाळचा बळरक्षक म्हणजेच 
'बळवंतगड'

( 'शिलाहारांनी ह्याची निर्मिती केलीअसा उल्लेख 'सदाशिव टेटविलकरह्यांच्या ''दुर्गसंपदा ठाण्याचीह्या पुस्तकात मिळतो. 
तसेच सुरत मोहिमेच्या पाऊलखुणा हि....हा किल्ला आपल्या उराशी जपून आहेहे हि तितकंच महत्वाचं.. )

हाच बळवंतगड ...
कधीकाळी हरहर महादेवच्या गर्जनेत गजबजुन गेला असेल.
तोरण फुलांनी आणि स्वस्तिकांनी सजला रंगला असेल .
मावळ्यांच्या गस्तीने दिन रात राबता राहिला असेल.
रयतेच्या सुख दुःखात आकंठ मिसळला असेल.
आनंद अश्रूत मोकळा झाला असेल.

ह्या अश्या बळवंतगडावर... 
थळ घाटाच्या ह्या रक्षकावर  'दुर्गवीर आणि दुर्गसखाह्या निस्वार्थ  भावनेने आणि निष्ठेने शिवकार्य करणाऱ्या संस्थामार्फत 'दसराहा आनंदोस्तव हा विजयदुर्गोत्सव संयुक्तपणे..उजळ मनाने आणि मोकळ्या उत्साहात  साजरा करण्यात आला.


                                           हे  भाग्य,  पुन्हा एकदा.. माझ्या वाटेल आलं.  
मला नव्याने ते मिळालं.  (आणि ते मिळतंच रहावं ) ह्यातच सारं सौख्य आहे.  

म्हणतात ना आनंदाला परिवार हवा असतो.सगेसोयरे हवे असतात . 
तो परिवार इथे भेटला. एकत्रित मिसळला ,  रुळला आणि एकजूट हि झाला. इथल्या स्थानिकांना सोबत घेऊनत्यांना विश्वासात  घेऊन त्यांच्यात मिळून मिसळून ..
सामाजिक बांधिलकी आणि मानवी मूल्य मनाशी ठेवत आणि ती जपत. त्याचाच एक छोटासा भाग म्हणून ,
उरलेल्या पैश्यातून ...
जि. प. विहिगाव-रेंज* ह्या शाळेसाठी...हवी असणारी ५०० लिटर ची टाकीआणि गडावर फडकवण्यासाठी ६ फूट उंच असा भगवा ध्वज त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

'सोनियाची दिनी सोनियाचे क्षण '
विजयदुर्गोत्साव खऱ्या अर्थानं असा आमुचा सार्थ झाला...

संकेत पाटेकर

     जि. प. शाळा. विहिगाव रेंज ..

      विहिगाव
     गडाकडे कूच करताना




     गड माथा चढताना ..दृष्टीक्षेपात येणार दृश्य...

   गडावरील वास्तू अवशेष ...

     गड सजावट...

     गडावरील देवता...

     गडाची सजावट  होण्या पूर्वी केलेलं श्रमदान









    गडावरची वेताळ देवता
   
     गडावरची वेताळ देवता..


 

     वेताळ देवतेजी पूजा करताना ..ग्रामस्थ


स्थानिकांशी संवाद साधताना..

    निवांत क्षण

   गडावरून दिसणारा परिसर ..

गडावरची  देवता 








लल्लाटी टिळा  





गडाच्या माथ्यवरन दृष्टिक्षेपात  येणार परिसर ..


पाण्याचं टाकं ..

पाण्याचं टाकं 




      शाबूत असलेली तटबंदी
 
     परतीचा मार्ग 

टनेल ..


 
 
 


 
 
 
 
 
 
 
 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...