Saturday, April 11, 2026

रवळ्या जवळ्या

महाराष्ट्रात आढळणारी दुर्ग विविधता इतरत्र कोठेही आढळत नाही आणि म्हणुनच महाराष्ट्राला दुर्गाचा देश म्हणुन ओळखले जाते. नाशिक!!! किल्ल्यांचा जिल्हा!! कित्त्येक ट्रेकर्स चं आपुलकी आणि जिव्हाळ्याचं ठिकाण!! किल्ल्यांच्या बाबतीत नाशिक म्हणजे ट्रेकर्स ची पंढरीच. नाशिक मध्ये ५० हुन अधिक किल्ले आणि सगळेच बलदंड. दोन अडीच तासांची तंगडतोड केल्याशिवाय किल्ल्याचा माथाच येत नाही. नाशिक मध्ये अनेक डोंगर रांगा ठाण मांडून उभ्या आहेत, त्यातल्या प्रामुख्याने अजंठा सातमाळ, आंबोली, डोलबारी, सेलबारी, त्र्यंबकेश्वर, गाळणा  टेकड्या  इत्यादी. ह्या डोंगररांगे मध्ये "सातमाळ" रांग स्वतःचे एक वेगळे अस्तित्व जपून आहे. सातमाळ रांग सुरगाणा तालुक्यातून सुरु होऊन दिंडोरी, कळवण, चांदवड पर्यंत अस्ताव्यस्त पसरली आहे. ह्या डोंगर रांगेत १५ किल्ले येतात, हातगड,अचला ,अहिवंत, मोहनदरी, सप्तशृंगी, मार्कनंडया, कण्हेरा, रवळ्या, जवळ्या, धोडप, कांचना-मांचना, कोळदेहेर, राजदेहेर, इंद्राई ,चांदवड.  सातमाळ डोंगररांगेत रवळ्या जवळ्या हे असेच दोन किल्ले आपल्याला एका पठारावर पहायला मिळतात. हे किल्ले साधारण ३.५ कि.मी. लांब व १.५ कि.मी.रुंद अशा मोठ्या पठारावर वसलेले दोन स्वतंत्र किल्ले आहेत. या दोन किल्ल्यांमधील अंतर साधारण १ कि.मी. असुन पठार चढुन आल्यावर एका दिवसात हे दोन्ही किल्ले पाहुन होतात. यातील रावळ्या किल्ला चढण्यास कठीण आहे.  रवळ्या-जवळ्याची नावे ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर येते ती मराठी सिनेमामधील ढवळ्या-पवळ्याची बैलजोडी. पण ती आहे बैलजोडी, तर ही आहे किल्ल्यांची जोडी.  "चंदन-वंदन", "कांचन-मंचन", "अंकाई-टंकाई" ह्या जोड्या म्हणजे अगदी जोड-किल्लेच आहेत. "रवळ्या-जवळ्या" ह्यांना जोड किल्ले म्हणायचं की नाही त्यावर चर्चा होऊ शकते. कारण हे इतर जोड्यांसारखे तेवढे जोडलेले नाहीत. पण एकाच पठारावर आहेत, म्हणजे दोन्ही किल्ल्यांचा पायथा, हा एक मुख्य डोंगर म्हणता येईल. दोन मदारी असलेला उंट कसा असतो, तसं काहीसं ही नांवं रांगडी वाटतात, मराठा साम्राज्याला शोभणारी. बादशाहनामा ग्रंथात ह्यांचा उल्लेख रांगडेपणा पार बाजूला राहील असा, अगदीच पिचकवणी म्हणजे रोला-जोला ह्या नावाने आहे. ह्यात मजा नाही. असो..

ओतुरच्या वाटे वरिल खुणावणारे.. रावळ्या-जावळ्या.

रवळ्या-जवळ्याची नावे ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर येते ती मराठी सिनेमामधील ढवळ्या-पवळ्याची बैलजोडी. पण ती आहे बैलजोडी, तर ही आहे किल्ल्यांची जोडी. रवळ्या-जवळ्या हे दोघेही एकमेकांवर प्रेम करणारे. एवढे की एकावर कुणी हल्ला केला तर दुसरा लगेच लढायला सज्ज. खरोखर किती नवलाईची गोष्ट आहे? निसर्गाची अद्भुत किमया... महाराष्ट्रातील किल्ल्यांची वैशिष्ट्ये सांगायची तरी किती... कुठल्या किल्ल्यांवर भरपूर वास्तू आहेत, तर कुठे जंगल आहे, तर कुठे केवळ कडेच आहेत; तर कुठे मंदिर आहे, कुठे फक्त पाण्याची टाकी, तर कुठे गुहा आहेत; तर कुठे भलं मोठं पठार आणि काय नि काय !.. किल्ल्यांवर पठार असणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे. मात्र पठारावर किल्ले असणे ही मात्र साधी गोष्ट नाही. रवळ्या-जवळ्या देखील अशाच एका मैलोन्मैल पसरलेल्या पठारावर कायम खडा पहारा देत उभे आहेत. एखादा किल्ला खरोखर मनात घर करून बसतो आणि मग आपण त्यात फसतो, असला काहीसा प्रकार माझा रवळ्या जवळ्याच्या बाबतीत झालेला आहे. नाशिकपासून अवघ्या ५० कि.मी.वर असणारे हे किल्ले एका दिवसात सहजपणे पाहून येण्यासारखे आहेत. मात्र एवढ्या सुंदर ठिकाणी केवळ एका दिवसातून परत येणे म्हणजे या किल्ल्यांचा तर अपमानच आहे. पण इथल्या निसर्गाचा देखील अपमान आहे.

नाशिकपासून वणी सुमारे ४० कि.मी.वर आहे. वणी गावातून बाबापूर-मुळाणे मार्गे एक रस्ता कळवणला जातो. या रस्त्यावर बाबापूर नावाचे एक छोटेसे गाव आहे. या गावातून १५ मिनिटांवर एक घाट चढून गेल्यावर खिंड लागते. या खिंडीला बाबापूरची खिंड असे म्हणतात. मार्कड्याचा डोंगर आणि रवळ्या जवळ्याच्या पठाराची डोंगरसोंड या ठिकाणी एकत्र आल्यामुळे ही खिंड तयार झालेली आहे.  गावापासून हे अंतर साधारणपणे १० कि.मी. आहे. खिंडीत डावीकडे महादेवाचे छोटेसे मंदिर आहे. या मंदिराच्या मागच्या बाजूने पायऱ्यांची एक वाट मार्क किल्ल्यावर जाते. तर रस्त्यापलीकडची उजवीकडची वाट रवळ्या जवळ्याकडे जाते पावसाळा संपल्यावर रवळ्या जवळ्याचा टेक म्हणजे एक सुखद अनुभव आहे कारण पठारावर इवलीइवलीशी गवताची रोपे वाऱ्यामुळे डोलत असतात. पावलापावलांवर सोनकीची, पांगळ्याची. डिंगळ्याची आणि घाणेरीची फुलं आढळतात. केवळ फुलेच नाही. तर वेगवेगळ्या प्रकारची औषधी वनस्पती देखील या परिसरात आढळतात. 
जर गाडी असेल तर मुळणे गावात जाणार्‍या मुळणबारी खिंडीत गाडी लावुन... डावी कडच्या डोंगररांगे वरुन मार्कंड्या वर जाता येते तर उजवी कडच्या रांगेवरुन रावळ्या जावळ्या वर जाता येते. खिंडीत वनखात्याने पर्यटन निवारा उभारला असुन वाहनतळाची सोय केली आहे.  अर्थात हे रवळ्या-जवळ्यासाठी नाही बरं. इकडे फक्त खास भटके येतात, पर्यटक नाही. पर्यटक जाणार बारीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या मार्कंड्यावर. मग खातीरदारी पण जिकडे ओढा जास्ती त्यासाठीच असणार! पण आपल्याला काय फरक पडतो  
पठारावर जाणारी वाट मळलेली असल्याने चुकण्याची शक्यता नसली तरी दोन्ही गड संपुर्णपणे पहायचे असल्यास बाबापुर गावातुन अनुभवी वाटाड्या घेणे उत्तम. त्यामुळे कमी वेळात संपुर्ण गड व त्यावरील सर्व अवशेष पहाता येतात. 
वणीहून खिंडीत एसटीने येण्यास अर्धा तास लागतो. खिंडीतून उतर्ल्यावर जांभूळपाडा गाव आहे. गावातून रावळ्या जावळ्याचे डोंगर दिसतात.इथूनही रवळ्या जवळ्यावर चढाई करता येते. उजवीकडील सोंडेवरून पठार चढायला सुरवात करायची. वाट चांगली मळलेली असल्याने चुकण्याचा फारसा संभव नाही. 
कळसुबाई सारखे या किल्ल्यांना डोंगरांचे ४ टप्पे लागतात. पहिल्या २० मिनिटात आपण पहिल्या पठारावर येतो. मागे नजर टाकल्यास कण्हेरगड दिसतो. 
साधारण अर्ध्या तासाने समोर पठाराचा दुसरा भाग दिसतो व येथुन वाट डावीकडे वळते आणि परत उजवीकडे वळून पठारावर जाते. वाट जेथुन उजवीकडे त्या ठिकाणी उध्वस्त दरवाजाचे अवशेष पहायला मिळतात. खिंडीतुन पठारावर जाण्यास साधारण एक तास लागतो.  इथवर आल्यावर एक मार्किंग  करून ठेवावे अन्यथा परत येताना रास्ता चुकण्याचे चान्स जास्त आहेत.
या पठारावर पोहोचल्यावर लक्षात येतं की, दिलेरखानाने किंवा महाबतखानाने या किल्ल्यांना कसा वेढा घातला असेल. मैलोन्मैल पसरलेल्या या पठारावर मध्यभागी दोन किल्ले उभे आहेत, ज्यांना वेढा घालायचा म्हणजे संपूर्ण पठाराला वेढा घालावा लागेल आणि जी खरोखरच अशक्य कोटीतील गोष्ट आहे. कारण या संपूर्ण पठाराला वेढा घालयचा असेल, तर किमान लाखभर सैन्य हवे आणि जर कमी सैन्य असेल तर हे किल्ले जिंकण्यासाठी गनिमीकाव्याशिवाय दुसरा उपाय नाही. गनिमीकावा हा असा प्रकार आहे, जो मोगलांना कधीच जमला नाही. त्यांना केवळ किल्ल्यांना वेढा घालून जिंकणे हेच तंत्र अवगत होते आणि रवळया-जवळ्याच्या बाबतीत देखील हेच झाले.
रवळ्या-जवळ्याचा पहिला उल्लेख मिळतो तो, अब्दुल हमीद लाहोरीच्या 'बादशहानामा' ग्रंथात. शहाजी राजांच्या पाडावासाठी मुघल बादशहा शहाजहान याने इ.स. १६३५-३६ मध्ये खानदौरान, खानझमान व शाहिस्तेखानास पाठविले होते. शाहिस्तेखानाकडे नाशिक-त्रिंबक भागातील किल्ले जिंकण्याची जबाबदारी दिली होती. त्याच्या हाताखालच्या अलावर्दीखानाने १६३६ मध्ये हा जुळा किल्ला जिंकून घेतला. बादशहानामामध्ये याचा उल्लेख 'रोला-जोला' असा केला आहे. रवळ्या किल्ल्याच्या दरवाजावरील शिलालेखात याचा उल्लेख येतो 
नोव्हेंबर १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटले, त्या सुमारास रवळा-जवळा किल्ला घेतला. त्यामुळे इ.स. १६७१-७२ च्या सुमारास दिलेरखानाने या गडाला वेढा घातला. तो मराठ्यांनी उठविला. सभासद याबद्दल म्हणतो. दिलेरखान येऊन रवळाजवळ्यास लागले. गडकरी वर भांडले. मोठ युद्ध जाले. गड हातास नाही. मोरोपंत पेशव्यांनी उपराळियास मावळे लोक बारा हजार रवाना केले. दांनी जाऊन छापे घातले. ऐसा घाबरा केला. यावरून मोगलांना मागे हटावे लागले सिद्ध होते. यानंतर दुसऱ्यांदा मोगल सरदार महाबतखान हा गड घेण्यासाठी आला. त्याने पुन्हा किल्ल्याला वेढा घातला. मे १६७१ मध्ये त्याने रवळ्या-जवळ्यासह कंड्या आणि अचला हे किल्ले वेढा घालून घेतले. पुढे पेशवेकालात या किल्ल्यांचा बाबा पुन्हा मराठ्यांकडे आला.
इ.स. १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात प्रतिकाराशिवाय आला. यानंतर नाशिकचा कलेक्टर कॅप्टन ब्रिग्ज हा किल्ल्यावर गेला. जुलै १८१९ मध्ये कॅप्टन मकिन्टॉशने रवळ्या किल्ल्याची तटबंदी आणि पायऱ्या तोफांनी उद्ध्वस्त करून हा गड चढता येणार नाही असा करून टाकला.
आपण हा इतिहास आठवत पठारावरून पावले भराभर टाकत पुढे निघायचे.
  रवळ्या जवळ्या किल्ले ओळखण्यात गोंधळ होऊ नये यासाठी मार्कंड्याच्या बाजुस असलेला जवळ्या व धोडपच्या बाजुस असलेला रवळ्या हे लक्षात ठेवावे. पठारावर आल्यावर समोरच त्रिकोणी आकाराचा जवळ्या किल्ला दर्शन देतो. किल्ल्यावर जाण्यासाठी पुर्वेकडून वाट असल्याने आपल्याला किल्ल्याच्या दुसऱ्या टोकास जावे लागते. येथुन उजवीकडून तसेच डावीकडुनही रवळ्या जवळ्या मधील खिंडीत जाण्यासाठी वाट आहे. जाताना डावीकडुन गेल्यास व येताना उजवीकडून आल्यास जवळ्या किल्ल्याला संपुर्ण फेरी मारून होते व पठारावरील सर्व अवशेष पहाता येतात. या दोन्ही वाटा पुर्णपणे मळलेल्या आहेत. पठारावर भरपुर झाडे आहेत, पठारावरील हे जंगल बऱ्याच अंशी दाट आहे. त्यात करवंदी, बाभळी, हरडा आणि सागाचे प्रमाण जास्त आहे. रवळ्या किल्ला उजव्या हाताला ठेऊन आपण मळलेल्या पायवाटेने चालायला लागायचे. वाटेत जाता जाता आपल्याला बरेच अवशेष बघायला मिळतात.  काही ठिकाणी झाडीत लपलेले वास्तुचे अवशेष पहायला मिळतात.


 किल्ल्याला वळसा घालताना पुर्व बाजुस एका ठिकाणी ८-१० कबर व त्यावर कोरीव दगड दिसुन येतात. या कोरीव दगडावर दिवा ठेवण्याची सोय केलेली आहे. 

तिवारी वस्ती आणि पाणवठा

वाटेच्या पुढील भागात खडकात खोदलेले लहान पाण्याचे टाके असुन टाक्यात माती वाहुन येऊ नये यासाठी टाक्याचा डोंगराकडील भाग घडीव दगडांनी बांधुन काढला आहे. गडावर पिण्यायोग्य पाण्याचे हे एकमेव टाके असुन या टाक्यातील पाणी वर्षभर पुरते. टाक्याच्या काठावर दगडी ढोणी असुन काही अंतरावर कोरीव नंदी,शिवलिंग व पादुका पहायला मिळतात. टाक्याच्या समोर एक दगडी रांजण पडलेला  दिसतो. त्याचे इथले प्रयोजन काही समजत नाही. कदाचित नाणेघाटासारखा हा देखील पूर्वीच्या काळचा एखादा व्यापारी मार्ग असावा. टाक्याच्या वरील बाजुस अजुन एक खोदीव टाके असुन या टाक्यात जमा झालेले पाणी पाझरून खालील टाक्यात येते. 


टाक्याच्या समोरील बाजुस पठारावर ४-५ घरे असुन हि वस्ती तिवारी वस्ती म्हणुन ओळखली जाते. हे तिवारी सध्या नाशीक येथे राहायला असुन पावसाळ्यात किल्ल्याखालील गावातील गुराखी गुरांसह येथे राहायला असतात. तिवारी व परदेशी नावांची मंडळी आपल्या गाई व म्हशी चरण्यासाठी सोडून देतात...रोज दोन्ही वेळ वस्तीवर येऊन दुध काढले जाते...गडावरच्याच गवत, गोवर्‍यांवर हे दुध आटवून त्याचा खवा तयार केला जातो...हा खवा कळवणच्या बाजारात चांगल्या भावात विकला जातो. काही हौशी लोक हा खवा घेण्यासाठी नाशिकहून इथपर्यंत येतात. पावसाळा संपल्यानंतर संक्रांतीपर्यंत, तर कधी होळीपर्यंत हे लोक इथं असतात. या वस्तीच्या समोर लांबवर रामजीचा कण्हेरगड आहे, तर डाव्या हाताला रवळ्या आहे, आणि उजव्या हातास जवळ्या आहे. त्याच्या मागे पुन्हा पठार आहे. पठाराखाली मुळाणे बारी नावाचे खेडे आहे. तर त्याच्या पलीकडे धोडपचा किल्ला. असा सर्व नयनरम्य परिसर इथून दिसतो. इतर वेळी हि तिवारी लोकांची घरे रिकामी असल्याने येथे राहण्याची चांगली सोय होते.  या वस्तीपासून उजवीकडील वाट आपल्याला रवळ्या किल्ल्यावर घेऊन जाते तर डावीकडील वाट आपल्याला जवळ्यावर घेऊन जाते. पहिले आपण रवळ्याच्या दिशेने निघायचे. पठारावरून इथवर येण्यास पाउण तास लागतो. जांभूळपाडा गावमार्गे २ तास लागतात. बाबापूर मार्गे पठार २ तास, मुळाणे बारी मार्गे पठार २ तास लागतात.पठारावरील वस्तीमधील घरात ४ ते ५ लोकांना रहाता येते किंवा उघड्यावर सुध्दा मुक्काम करता येतो. या घरांकडे जाताना एक वाट उजवीकडे जवळ्याच्या धारेखाली असलेल्या जंगलाकडे जाते. या वाटेवर एक खोदीव टाके असुन त्यातील पाणी शेवाळ जमा झाल्याने पिण्यायोग्य नाही. 
Rawlya From the palteu between Rawlya & Jawlya

या जोडगोळीपैकी सर्वांत कठीण किल्ला प्रथम सर करायचा, म्हणून आपण आपला मोहरा रवळ्याकडे वळवायचा. वस्तीच्या समोरून एक वाट तिरक्या रेषेत जंगलात शिरते आणि रवळ्या किल्ल्याकडे जाते. रवळ्याकडे जाणारी वाट म्हणजे  बाभळी आणि करवंदाच्या काट्यांची सोबत आहे. किल्ल्यावर जाणारी वाट सुरुवातीला जंगलातून असल्याने पटकन सापडत नाही पण एकदा वाटेल लागलो की वाट अवघी २० मिनिटांची आहे.
किल्ल्याच्या पोटातलं भुयार
  आपण खालून दिसणार्‍या गुहांच्या समुहापर्यंत पोहचतो...ट्रॅव्हर्स छोटा असला तरी थोडा घसारा आहे..थोडे चढून गेल्यावर वाटेच्या आडबाजूला कातळात खोदलेली  एक माणुस रांगत आत शिरेल अशी एक गुहा लागते. जी दोन्ही बाजूने उघडी आहे. थोडस पुढे चालत गेलं की कातळाच्या दुसया बाजुला ही गुहा उघडते. कातळाला वळसा मारत पुढे गेल्यावर गुहेचे दुसरे तोंड पहायला मिळते. .गुहांचे काम अपूर्ण राहिले आहे...जेमतेम एक माणूस उभा राहू शकेल इतकीच जागा त्यात आहे...समोरचा भाग मात्र दगडात व्यवस्थित कोरण्यात आला आहे...या गुहेतून  पठार, तिवारी वस्ती व धारण केलेला रवळ्या असा एकुण नजारा मनाला कमालीचा सुखावतो.. 





 त्याच्या पुढे एक घळ लागते. त्यात सोपे चिमणी क्लायंविंग करून वर चढायचे. वर चढ्न गेल्यावर एक झाड लागते. अन झाडाच्या मागे एक कातळकडा आहे. या कड्यावरून किल्ल्यावर जाणारी वाट थोडीशी कठीण आहे. पूर्वी किल्ल्यावर जाण्यासाठी पायया होत्या. त्या मॅकिंटॉश नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने तोडून टाकल्या. आज जरी इंग्रज आपल्या देशात नसले तरी त्यांचे परिणाम मात्र आपल्यासारख्या ट्रेकर्सला भोगावे लागत आहेत. याचे हे जिवंत उदाहरण आहे. विशेष म्हणजे हा कातळकडा चढण्यासाठी दोर लावण्याची कुठेही सोय नाही. कड्याच्या एका कोपऱ्यात 'गणपती बाप्पा'ची एक मूर्ती कोरून त्यावर शेंदूर फासलेला आहे. आपणही गणपती बाप्पा मोरया म्हणून सावकाशपणे नराचा वानर होऊन कातळटप्पा चढायला सुरुवात करायची. क्लाइंबिंग चे ज्ञान आणि सराव असेल तर हा पटच आपण रोपशिवाय चढु शकतो पण शक्यतो रोप सोबत घेतलेला उत्तम. मधल्या भागात एक रोप लावलेली आहे पण त्याच्या भरवश्यावर राहु नये. हा पॅच केल्यावर आपण गडाच्या माथ्यावर पोहोचतो. 
पलीकडे रवळ्या आणि धोडप
कातळटप्पा

हा कातळटप्पा चढल्यावर किल्ल्यावर जाणारी वाट आहे. कातळाच्या वरील बाजुस किल्ल्याची उध्वस्त तटबंदी दिसते.  हा कातळटप्पा पार करून आपण गडाच्या माथ्यावर पोहोचतो. येथुन थोडासा चढ चढुन वर आल्यावर उजवीकडील वाटेने आपण गडाच्या दुसऱ्या भागाकडे निघतो. माथ्यावर मोठया प्रमाणात गवत वाढलेले असुन या गवतात लपलेले अनेक वास्तुचे चौथरे दिसुन येतात.  रवळ्याचा माथा बराच प्रशस्त आहे. त्यावर फारसे कुणाचे येणे-जाणे नसल्यामुळे सर्वदूर गवत माजलेले दिसते. महाराष्ट्रातील बऱ्याच किल्ल्यांवर जसे गावकरी सर्व गवत पेटवून देतात आणि त्याचसोबत हिरवी झाडे-झुडपेही जळून खाक होतात, तशीच परिस्थिती रवळ्यावरही आढळते. ही गवत जाळण्याची वाईट प्रथा बंद होण्यासाठी तुम्हा-आम्हा ट्रेकर मंडळींनी गड-किल्ल्यांच्या परिसरातील वाड्यांमधील लोकांचे प्रबोधन करणे फार गरजेचे आहे.
वाटेच्या पुढील भागात उजव्या बाजुला डोंगर उतारावर गडाचा उत्तराभिमुख उध्वस्त व अर्धवट गाडलेला दरवाजा दिसुन येतो. या अवशेषात दरवाजाची अर्धवर्तुळाकार कमान तसेच दरवाजाचे दगडी बिजागर दिसतात. दरवाजाच्या दोन्ही बाजुस बुरुज असुन यातील एक बुरुज गुप्तधनाच्या लालसेने आतील बाजुस खोलवर खणलेला आहे. दरवाजाच्या खालील बाजुस उतारावर पडझड झालेल्या कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसुन येतात. 
पाण्याची टाकी
दरवाजा पाहुन मुळ वाटेवरुन पुढे निघाल्यावर कातळात खोदलेली तीन टाकी दिसतात. यातील एक टाके मोठया प्रमाणात बुजलेले आहे तर एका टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्याकडून वाट गडाच्या माथ्याकडे वळते.
 या वाटेने ५ मिनिटाचा उभा चढ चढल्यावर वाटेच्या उजवीकडे व डावीकडे अशी पाण्याची दोन टाकी पहायला मिळतात. या दोन्ही टाक्यातील पाणी शेवाळलेले आहे. या टाक्यापासून सरळ वर जाणारी वाट गडाच्या सर्वोच्च माथ्यावर जाते. किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची ४१७० फुट असुन त्रिकोणी आकाराचा गडमाथा २२ एकर परिसरावर पसरलेला आहे. माथ्यावर काहीही अवशेष नसले तरी मार्कंड्या त्या मागे असलेला सप्तशृंगीगड, कण्हेरगड, मोहनदर पुर्वेला रवळ्या त्यामागे धोडप, कंचना, कोळधेर, राजधेर, इंद्राई असे ८-१० किल्ले नजरेस पडतात. खरे तर हे सातमाळा रांगेचे एक वैशिष्ट्य आहे की, कुठल्याही एका डोंगरावर उभे रहा म्हणजे चार-दोन किल्ले तुम्हाला दिसल्याशिवाय राहणारच नाहीत.गडमाथा फिरून आल्या वाटेने कातळ टप्पा उतरल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. संपुर्ण गडफेरी करण्यास दिड तास पुरेसा होतो. आपला फेरफटका मारून झाल्यावर आल्या मागनि जरा जपून कातळकडा उतरायचा आणि पठारावरील तिवारी वस्ती गाठायची. 
Jawlya

  रवळ्या बघून  पुन्हा तिवारी वस्ती पाशी येउन जवळ्या किल्ल्याच्या दिशेने कूच करायची. जवळ्या किल्ल्यावर जायला २ वाटा आहेत. एक वाट डावीकडील सोंडेवरून सरळ वर चढते. ही वाट पुर्ण घसाऱ्याची असल्याने शक्यतो टाळावी. दुसरी वाट तिवारी वस्तीमधुन समोर चालत गेल्यावर उजवीकडील सोंडेवरून नागमोडी मार्गे वर चढते. ही वाट मळलेली आहे, सोंडेच्या मध्ये डोंगराच्या पदरात पोहोचल्यावर वाट डावीकडे वळते. कातळ उजव्या हाताला ठेऊन कातळाला लागुन सरळ चालत जावे.
वाटेवरच किल्ल्याच्या पोटातली पाण्याची टाकी

 
थोडं पुढे गेल्यावर उजव्या हाताला गुहा आहे. कदाचित येथे लेण्या कोरण्याचा प्रयत्न केला असावा.जेमतेम एक माणूस उभा राहू शकेल इतकीच जागा त्यात आहे...समोरचा भाग मात्र दगडात व्यवस्थित कोरण्यात आला आहे.या गुहेची खोली काही जास्त नाही, पण त्यात ५ ते ६ खांब आहेत. या गुहेतून पठार, तिवारी वस्ती व  रवळ्या असा एकुण नजारा मनाला कमालीचा सुखावतो.

अजून थोडं पुढे गेल्यावर डावीकडच्या सोंडेवरून चढून येणारी वाट इथे मिळते. इथे कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात, अगदी तळपायाचा अर्धा भाग मावेल एवढ्या या पायऱ्या आहेत. ही वाट थोडी बिकट आहे. पायर्‍या जरा जपूनच चढाव्या लागतात. अवघ्या २५ फुटांचा रॉकपॅच आहे.  इथे २०-२५ फुट वर जायचं मग उजवीकडे तिरपं चढत जाताच पायऱ्या सुरु होतात.. 
कातळटप्पा

या पायऱ्या मात्र मदन गडची आठवण करून देतात.. त्यामुळे जिवाला जपत आणि पायरीला धरत वर जायचं.. १०० एक फुट चढताच पायऱ्या डावीकडे वळून एक ट्राव्हर्स येतो.. इथे मुरमाड घसाऱ्याने धिम्याने १५-वीस फुट जाताच पुन्हा उजवीकडे.. पायऱ्या दिसतात. हात व पायांना पकड घेण्यासाठी नैसर्गिक, पण पर्याप्त खाचा जरूर आहेत.पण पावसाळ्यात इथे गेल्यास निसरड्या बनलेल्या दगडावर पकड ठेवताना संयमाचा चांगलाच कस लागतो. थोडे चढून गेल्यावर कातळात कोरलेला किल्ल्याचा दरवाजा लागतो.
दरवाजातून खालचं दृश्य





 हा एका वेळेस एक जण जाऊ शकेल इतक्या रूंदीचा बोगद्यासारखा मार्ग बघून.पेठच्या कोथळीगडाची आठवण होते. अर्थात कोथळीगडाचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. तरीपण दगडातून खोदून काढलेला चिंचोळा मार्ग वैशिष्ट्यपुर्ण आहे. जावळ्याचा दरवाजा पाहणे हि मात्र एक पर्वणी आहे.. कातळाला आरपार बोगदा पाडून गडावर प्रवेश आहे.. बोगद्यामध्ये पुन्हा मोठ्या पायऱ्या. इथे आपण किल्ल्याच्या दरवाज्यात पोहोचतो. या दरवाज्याचे वैशिष्ट्य म्हणजे उभा कातळ फोडून त्यातून दरवाजा कोरून काढला आहे.दरवाजा खूप थिटुकला आहे. 

याच्या उजव्या भिंतीवर शिलालेख कोरलेला आहे. जो धोडपच्या शिलालेखाची आठवण करून देतो. यात अलावर्दीखानाने रवळ्या जवळ्या आणि धोडपसह सातमाळ रांगेतील जिंकलेल्या किल्ल्यांचा उल्लेख मिळतो. 

रवळ्या किल्ल्यावरील शिलालेख :

किल्ला : रवळ्या
शिलालेखाचे स्थान : रवळ्या किल्ल्याच्या दक्षिणेकडील दरवाज्याच्या उजवीकडच्या कड्यावर हा शिलालेख पश्चिमेकडे तोंड करून बसविलेला आहे.
भाषा : फारसी
लिपि : फारसी
शिलालेखाची मापे : उंची ६०० सें.मी. (अंदाजे). रुंदी ५५ सें.मी. (अंदाजे).
जमिनीपासूनचे अंतर : शिलालेख जमिनीपासून ३.२५ फूट उंचीवर आहे.
दिशा :  पश्चिम
ओळी : शिलालेखाची खूप झीज झालेली असल्यामुळे ओळींचा अंदाज लागत नाही. तरीदेखील या लेखात अंदाजे ७ ओळी असाव्यात.
शिलालेखाचा प्रकार : प्रस्तुत शिलालेख उठावाचा आहे.
भाषांतर : हा शिलालेख खूप झिजलेला असल्यामुळे त्याच्या अक्षरांची ओळख लावणे खूप कठीण आहे.
निष्कर्ष : इंद्राई, धोडप आणि चांदवड वरील शिलालेखांमध्ये रवळ्या किल्ल्याचा उल्लेख आलेला आहे. त्यात हा किल्ला इ.स. १६३६ च्या सुमारास शहाजहान बादशहाचा सरदार अलावर्दीखानाने हा किल्ला जिंकल्याचे म्हटले आहे. कदाचित हा लेख त्याच 'सुमारास कोरलेला असावा.



 भुयारासारख्या दरवाजातून आत आलं कि पायऱ्या सुरु मग भुयार.. आणि ते संपताच डोक्यावर आयताकृती चौकट दिंसते हिच गडाची वाट.. भिंतीतील चिऱ्याच्या कपारीत पावलं रोवून चढून हि चौकट चढून आलं कि आपण वर येतो.. 



    मग मोठ्या खडकातून उजवीकडे वाट तिरपी वर जाते.. दरवाज्यातुन सरळ वरती गेले की डावीकडे एक वाट वळते त्या मार्गाने जावे, पुढे गुहा आहेत आणि यातील एका गुहेत पाणी आहे. पाणी स्वछ आणि पिण्याजोगे आहे, गुहेत आत शिरायला खिडकी सुद्धा आहे. हे बघुन उलटे फिरुन पुन्हा वर चढु लागायचे. समोरच आपण एका बुरुजापाशी येऊन पोचतो आणि गडाच्या माथ्यावर दाखल होतो.
बुरुज

जवळ्या किल्ल्याचा माथादेखील रवळ्यासारखा सपाट आहे. फक्त मध्ये एक उंचवटा आहे.  इथून पाहताना इंग्रजी व्ही या आकारचा डोंगरमाथा नजरेत भरायचा आणि डावीकडची वाट धरायची..


 या वाटेने जाताना काही इमारतीचे अवशेष दिसतात आणि खुरट्या झुडूपानी भारलेले पठार.. साधारण दहा-पंधरा मिनिटात डावीकडे वाट वळते आणि समोर पाण्याची तीन हिरवीगार टाकी दिसतात.. हिच गड सर केल्याची महत्वाची खुण.याठिकाणी मुक्काम करण्याजोकी जागा नाही.  या तीन टाक्यांच्या मागे खाली डोंगराच्या एक भली मोठी पायरी झालेली दिसते.. तिथे खाली 
जोड-टाकी आणि विश्रांतीसाठी सावली
अजून काही टाकी

आणखी काही पाण्याची टाकी दिसतात. ही टाकी बऱ्याच मोठ्या आकाराची आहेत. यांपैकी एक टाके खांब टाके या प्रकारातील आहे, मात्र त्यामधील पाणी पिण्यायोग्य नाही. या टाक्यांच्या खालच्या बाजूस काही पाण्याची टाकी दिसतात. मात्र ती सर्व सुकलेली आहेत. 
जवळ्या, मार्कंड्या आणि वणीचा डोंगर-किल्ला
धोडप रांग

 वणी – बाबापूर – दुधखेड – पारेगाव – (धोडांबे रोड) – इंदिरानगर – हत्ती/हट्टी गाव धोडप किल्ला 
इथून धोडप  अलीकडचा बंड्या  त्यामागे डोंगऱ्या  त्याच्या उजव्या अंगाला इखारा  अशी दुर्गांची रांग दिसते आणि इथवर येण्यासाठी केलेले कष्ट सार्थकी लागतात.हा सर्व अप्रतिम नजारा पाहावयाचा आणि जमले तर कॅमेरामध्ये टिपून, आल्यापावली तिवारी वस्तीत परतायचे.

 

















सर्व छायाचित्रे पहा

नकाशे व मार्ग

किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा

सध्या कोणतेही नकाशे उपलब्ध नाहीत

सर्व नकाशांचा संग्रह पहा

प्रस्तावना

रवळ्या जवळ्या हे दोन जुळे किल्ले सातमाळ रांगेत आहेत. एका मोठ्या पठारावर असलेल्या या दोन डोंगरांना रवळ्या आणि जवळ्या ही नावे देण्यात आली.हे दोन्हीही किल्ले असून यातील रावळ्या किल्ला चढण्यास कठीण आहे. मुंबई - नाशिकहुन एका दिवसाच्या मुक्कामात हे दोन्ही किल्ले पाहून होतात.

जवळ्याची माहिती साईटवर दिलेली आहे , ती वाचावी.


दोन्ही गडांवर जाणार्या वाटा मोडलेल्या आहेत त्याशिवाय पठारावर अनेक ढोर वाटा असल्यामुळे चुकण्याचा संभव आहे. त्यामुळे गावातून वाटाड्या घेऊन जावा.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

ऐतिहासिक कागद पत्रात रावळ्या जाबळ्याचा उल्लेख "रोला-जोला" म्हणुन येतो.१६३६ मध्ये हा किल्ला अलवर्दीखानाने बादशहा शहाजहानसाठी जिंकून घेतला.१६७० मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. १६७१ मध्ये दिलेरखानाने या किल्ल्यांना वेढा घातला होता. तो मराठ्यांनी उधळून लावला. त्यानंतर महाबत खानाने हा किल्ला जिंकून घेतला. पेशवे काळात हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आला.इसवी सन १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात गेला. कॅप्टन ब्रिग्जने १८१९ मध्ये रवळ्या किल्ल्याच्या पायर्‍या आणि तटबंदी तोफ़ा लावून उध्वस्त केल्या.

महत्त्वाची ठिकाणे

रवळ्या आणि जवळ्या हे किल्ले ज्या पठारावर आहेत. त्या पठारावर एक वस्ती आहे. तिला तिवारी वस्ती या नावाने ओळखले जाते. वस्ती मध्ये शिरण्यापूर्वीच एक वाट जंगलामधून डावीकडे रवळ्यावर जाते. वाट सहजच सापडणारी नाही. थोडीशी शोधावी लागते. पण एकदा सापडल्यावर १५ मिनिटांतच आपण एका घळी पाशी पोहोचतो. वाटेत उजवीकडे कड्यामध्ये एक गुहा आहे. या घळीतून "चिमणी क्लाईंब" करुन वरच्या झाडापाशी जायचे. या झाडाच्या समोरच रवळ्याचा तुटलेला कडा आहे. या कड्यावरुनच किल्ल्यावर जाण्याची वाट आहे. हा कडा चढण्यासाठी दोर असणे आवश्यक आहे. ज्याला गिर्यारोहणाचे तंत्र अवगत असेल तो सहजपणे रोप न लावता सुध्दा येथून चढू शकतो. वर गेल्यावर समोरच एक भगवा झेंडा आहे. रवळ्याच्या माथ्यावर काही अवशेष नाहीत. दुसर्‍या टोकाला पाण्याची सुकलेली टाकी आहेत. माथ्यावरुन मार्कंड्याचे सुंदर दर्शन होते. आभाळ स्वच्छ असल्यास अचला आणि अहिवंत सुध्दा दिसतो.

कसे पोहोचावे

नाशिक वरुन वणी ४० किमी अंतरावर आहे. वणीहून एक रस्ता बाबापूर - मुळाणे मार्गे कळवणला जातो. या रस्त्यावर बाबापूर सोडले की ३ किमी अंतरावर एक खिंड लागते. या खिंडीत उतरायंच. येथून उजवीकडे जाणारा रस्ता रवळ्या - जवळ्याला घेऊन जातो. तर डावीकडचा रस्ता मार्कंड्यावर जातो. वणीहून खिंडीत एसटीने येण्यास अर्धा तास लागतो. खिंडीतून उतर्ल्यावर जांभूळपाडा गाव आहे. गावातून रावळ्या जावळ्याचे डोंगर दिसतात. गावाच्या मागील टेकडी चढून गेल्यावर रावळया जावळ्या मधले पठार लागते.पठारावर काही समाध्या आहेत. त्यांच्या उजवीकडून रावळ्या आणि डावीकडे जावळ्याकडे जाणारी वाट आहे. थोडी पठारावरुन मग झाडी झुडपातून वाट जाते. झाडी झुडूपांच्या पुढे आपण व्हि (V) आकाराच्या घळीत येउन पोहोचतो. तिथे कातळटप्पा चढून जावे लागते. त्यासाठी रोप आणि गिर्यारोहणाचे सामान वापरावे लागते. कातळटप्पा चढून गेल्यावर आपण गड माथ्यावर पोहोचतो.

जांभूळपाडा गाव ते पठार पाऊण तास आणि पठार ते गडमाथा एक तास लागतो.

दोन्ही गडांवर जाणार्या वाटा मोडलेल्या आहेत त्याशिवाय पठारावर अनेक ढोर वाटा असल्यामुळे चुकण्याचा संभव आहे. त्यामुळे गावातून वाटाड्या घेऊन जावा.

ट्रेकसाठी लागणारा वेळ

⏱️ जांभूळपाडा गावमार्गे २ तास लागतात. बाबापूर मार्गे पठार २ तास, मुळाणे बारी मार्गे पठार २ तास लागतात.

सुविधा व सोयी

🏠

निवास व्यवस्था

पठारावरील वस्तीमधील घरात ४ ते ५ लोकांना रहाता येते किंवा उघड्यावर सुध्दा मुक्काम करता येतो.

🍽️

अन्न व्यवस्था

गडावर जेवणाची सोय नाही, स्वत: करावी.

💧

पाणी उपलब्धता

गडावर पाण्याची सोय आहे.

सर्वोत्तम काळ

🌤️ सप्टेंबर ते मार्च

जवळील गावे

जांभूळपाडा,बाबापूर

 

जवळ्या

गिरीदुर्ग नाशिक सातमाळ
🏔️
श्रेणी नुसार स्तर
मध्यम
📏
समुद्र सपाटीपासून उंची (फ़ूट)
4055
🏰
किल्ल्याचा प्रकार
गिरीदुर्ग
📍
जिल्हा
नाशिक

किल्ल्याची छायाचित्रे

किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा

मुख्य छायाचित्र

Jawlya

सर्व छायाचित्रे पहा

नकाशे व मार्ग

किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा

सध्या कोणतेही नकाशे उपलब्ध नाहीत

सर्व नकाशांचा संग्रह पहा

प्रस्तावना

रवळ्या जवळ्या हे दोन जुळे किल्ले सातमाळ रांगेत आहेत. एका मोठ्या पठारावर असलेल्या या दोन डोंगरांना रवळ्या आणि जवळ्या ही नावे देण्यात आली.हे दोन्हीही किल्ले असून यातील रवळ्या किल्ला चढण्यास कठीण आहे. तो प्रथम पाहून नंतर जवळ्या किल्ला पाहावा. मुंबई - नाशिकहुन एका दिवसाच्या मुक्कामात हे दोन्ही किल्ले पाहून होतात.

रवळ्याची माहिती साईटवर दिलेली आहे , ती वाचावी.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

ऐतिहासिक कागद पत्रात रावळ्या जाबळ्याचा उल्लेख "रोला-जोला" म्हणुन येतो.१६३६ मध्ये हा किल्ला अलवर्दीखानाने बादशहा शहाजहानसाठी जिंकून घेतला.१६७० मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. १६७१ मध्ये दिलेरखानाने या किल्ल्यांना वेढा घातला होता. तो मराठ्यांनी उधळून लावला. त्यानंतर महाबत खानाने हा किल्ला जिंकून घेतला. पेशवे काळात हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आला.इसवी सन १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात गेला. कॅप्टन ब्रिग्जने १८१९ मध्ये रवळ्या किल्ल्याच्या पायर्‍या आणि तटबंदी तोफ़ा लावून उध्वस्त केल्या.

महत्त्वाची ठिकाणे

जवळ्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. एक वाट, वस्तीपासून समोर सरळ चालत गेल्यावर एक डोंगरसोंड लागते. या डोंगरसोंडेवर चढून गेल्यावर एका ठिकाणी वाट डावीकडे वळते. वाट मळलेली असल्याने चुकायचा संभव नाही. वाटेत जातांना उजवीकडच्या कड्यामध्ये कोरलेल्या काही गुहा आहेत. या गुहा म्हणजे कधीतरी अपूर्ण सोडून दिलेल्या लेण्यांचा भाग आहे. वाटेने तसेच पुढे जायचे, एका डोंगरसोंडेवर येऊन वाट वर चढते. इथेच खालून डोंगरसोंडेवर चढत येणारी दुसरी वाट येऊन मिळते. इथून पुढे जाणारा रस्ता म्हणजे कड्यात कोरलेल्या पायर्‍या आहेत. पायर्‍या जरा जपूनच चढाव्या लागतात. थोडे चढून गेल्यावर कातळात कोरलेला किल्ल्याचा दरवाजा लागतो. त्याच्या उजव्या भिंतीवर शिलालेख कोरलेला आहे. पायर्‍या चढून गेल्यावर आपण दरवाजाच्या दुसर्‍या टोकाशी पोहोचतो. दरवाज्यातून वर आल्यावर एक वाट वर जाते. दुसरी वाट डावीकडे वळते. इथे कातळात कोरलेल्या गुहा आहेत. या गुहेत एक पाण्याचे टाके आहे. हे पाहून परत माथ्यावर जायचे. वर चढून गेल्यावर एक वाट समोर टेकाडावर जाते. ही वाट किल्ल्याच्या दुसर्‍या टोकाशी जाते. या टोकावरुन डावीकडे खाली गेले की कड्यात खोदलेली खांब टाकी आहेत. त्याच्या समोरच पाण्याची दोन कातळात खोदलेली टाकी सुध्दा आहेत. या पैकी कोणत्याही टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. या शिवाय किल्ल्यावर घोड्याच्या पागा आहेत. किल्ल्यावरुन घोडप, इखारा, कण्हेरगड, कंचना इंद्राई किल्ले दिसतात. जवळ्या पाहून पून्हा पठारावर परतायचे. दोन्ही किल्ले पाहून पठारावर यायला ६ ते ७ तास लागतात. या पठारावर जी वस्ती आहे तिचे नाव ‘तिवारी’ वस्ती. तिवारी नामक व्यक्तीने इथे ३ ते ४ घरे बांधली आहेत. सध्या त्यांचा उपयोग गोठा म्हणून होतो. वस्तीच्या समोरच पठारावर एक पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. त्याच्याच पुढे समाधी आहेत. या पठारावरचा मुक्काम म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव ठरतो.

कसे पोहोचावे

नाशिक वरुन वणी ४० किमी अंतरावर आहे. वणीहून एक रस्ता बाबापूर - मुळाणे मार्गे कळवणला जातो. या रस्त्यावर बाबापूर सोडले की ३ किमी अंतरावर एक खिंड लागते. या खिंडीत उतरायंच. येथून उजवीकडे जाणारा रस्ता रवळ्या - जवळ्याला घेऊन जातो. तर डावीकडचा रस्ता मार्कंड्यावर जातो. वणीहून खिंडीत एसटीने येण्यास अर्धा तास लागतो. खिंडीत उतरल्यावर उजवीकडच्या डोंगरसोंडेवरची वाट धरायची. वाट चांगली मळलेली असल्याने चुकण्याचा फारसा संभव नाही. अर्धातास चढून गेल्यावर वाट डावीकडे वळते आणि परत उजवीकडे वळून पठारावर जाते. खिंडीपासून पठारावर पोहोचण्यास १ तास लागतो. पठारावर पो्होचल्यावर समोरच रवळ्या किल्ला दिसतो. पण आपल्याला प्रथम रवळ्या आणि जवळ्याच्या खिंडी मध्ये जायचे आहे. पठारावरुन जवळ्याच्या पायथ्याला जाण्यास पाऊण तास लागतो. वाट थोडी पठारावरुन मग जंगलातून अशी जाते. पठारावर अनेक वाटा असल्यामुळे वाटा चुकण्याचा संभव आहे. लक्षात ठेवण्याची खूण म्हणजे रवळ्याचा डोंगर नेहमी आपल्या डाव्या हाताला असतो. मध्ये जंगल लागते ते पार केल्यावर आपण वस्ती पाशी येऊन पोहोचतो. पठारावर खिंडीमध्येच ही वस्ती आहे.

ट्रेकसाठी लागणारा वेळ

⏱️ बाबापूर मार्गे पठार २ तास, मुळाणे बारी मार्गे पठार २ तास लागतात.

सुविधा व सोयी

🏠

निवास व्यवस्था

पठारावरील वस्तीमधील घरात ४ ते ५ लोकांना रहाता येते किंवा उघड्यावर सुध्दा मुक्काम करता येतो.

🍽️

अन्न व्यवस्था

गडावर जेवणाची सोय नाही, स्वत: करावी.

💧

पाणी उपलब्धता

गडावर पाण्याची सोय आहे.

सर्वोत्तम काळ

🌤️ सप्टेंबर ते मार्च

जवळील गावे

बाबापूर,

 
 

उंची : ४१७० फुट

श्रेणी : कठीण

महाराष्ट्रात आढळणारी दुर्ग विविधता इतरत्र कोठेही आढळत नाही आणि म्हणुनच महाराष्ट्राला दुर्गाचा देश म्हणुन ओळखले जाते. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात सातमाळ डोंगररांगेत रवळ्या जवळ्या हे असेच दोन किल्ले आपल्याला एका पठारावर पहायला मिळतात. हे किल्ले साधारण ३.५ कि.मी. लांब व १.५ कि.मी.रुंद अशा मोठ्या पठारावर वसलेले दोन स्वतंत्र किल्ले आहेत. या दोन किल्ल्यांमधील अंतर साधारण १ कि.मी. असुन पठार चढुन आल्यावर एका दिवसात हे दोन्ही किल्ले पाहुन होतात. मुळाणे व बाबापुर हि या दोन्ही किल्ल्याच्या पायथ्याची गावे असुन या दोन गावाच्या मध्ये असलेली मुळाणे बारी किंवा बाबापुर खिंड येथुन या किल्ल्यांवर जाण्यासाठी सोयीचा मार्ग आहे. याशिवाय मुळाणे गावातुन देखील किल्ल्याखालील पठारावर जाता येते. नाशीकहुन वणीमार्गे बाबापुर खिंड हे अंतर ५३ कि.मी.असुन वणीपासुन हे अंतर ९ कि.मी.आहे. वणीहुन बाबापूर मार्गे या खिंडीत आल्यास डावीकडील वाट मार्कंडेय किल्ल्यावर जाते तर उजवीकडील वाट रवळ्या जवळ्या खालील पठारावर जाते. खिंडीत वनखात्याने पर्यटन निवारा उभारला असुन वाहनतळाची सोय केली आहे. पठारावर जाणारी वाट मळलेली असल्याने चुकण्याची शक्यता नसली तरी दोन्ही गड संपुर्णपणे पहायचे असल्यास बाबापुर गावातुन अनुभवी वाटाड्या घेणे उत्तम. त्यामुळे कमी वेळात संपुर्ण गड व त्यावरील सर्व अवशेष पहाता येतात. उजवीकडील सोंडेवरून पठार चढायला सुरवात केल्यावर साधारण अर्ध्या तासाने समोर पठाराचा दुसरा भाग दिसतो व येथुन वाट डावीकडे वळते आणि परत उजवीकडे वळून पठारावर जाते. वाट जेथुन उजवीकडे त्या ठिकाणी उध्वस्त दरवाजाचे अवशेष पहायला मिळतात. खिंडीतुन पठारावर जाण्यास साधारण एक तास लागतो. रवळ्या जवळ्या किल्ले ओळखण्यात गोंधळ होऊ नये यासाठी मार्कंड्याच्या बाजुस असलेला जवळ्या व धोडपच्या बाजुस असलेला रवळ्या हे लक्षात ठेवावे. पठारावर आल्यावर समोरच त्रिकोणी आकाराचा जवळ्या किल्ला दर्शन देतो. किल्ल्यावर जाण्यासाठी पुर्वेकडून वाट असल्याने आपल्याला किल्ल्याच्या दुसऱ्या टोकास जावे लागते. येथुन उजवीकडून तसेच डावीकडुनही रवळ्या जवळ्या मधील खिंडीत जाण्यासाठी वाट आहे. जाताना डावीकडुन गेल्यास व येताना उजवीकडून आल्यास जवळ्या किल्ल्याला संपुर्ण फेरी मारून होते व पठारावरील सर्व अवशेष पहाता येतात. या दोन्ही वाटा पुर्णपणे मळलेल्या आहेत. पठारावर काही ठिकाणी झाडीत लपलेले वास्तुचे अवशेष पहायला मिळतात. किल्ल्याला वळसा घालताना पुर्व बाजुस एका ठिकाणी ८-१० कबर व त्यावर कोरीव दगड दिसुन येतात. या कोरीव दगडावर दिवा ठेवण्याची सोय केलेली आहे. वाटेच्या पुढील भागात खडकात खोदलेले लहान पाण्याचे टाके असुन टाक्यात माती वाहुन येऊ नये यासाठी टाक्याचा डोंगराकडील भाग घडीव दगडांनी बांधुन काढला आहे. गडावर पिण्यायोग्य पाण्याचे हे एकमेव टाके असुन या टाक्यातील पाणी वर्षभर पुरते. टाक्याच्या काठावर दगडी ढोणी असुन काही अंतरावर कोरीव नंदी,शिवलिंग व पादुका पहायला मिळतात. टाक्याच्या वरील बाजुस अजुन एक खोदीव टाके असुन या टाक्यात जमा झालेले पाणी पाझरून खालील टाक्यात येते. टाक्याच्या समोरील बाजुस पठारावर ४-५ घरे असुन हि वस्ती तिवारी वस्ती म्हणुन ओळखली जाते. हे तिवारी सध्या नाशीक येथे राहायला असुन पावसाळ्यात किल्ल्याखालील गावातील गुराखी गुरांसह येथे राहायला असतात. इतर वेळी हि घरे रिकामी असल्याने येथे राहण्याची चांगली सोय होते. पठारावरून इथवर येण्यास पाउण तास लागतो. या घरांकडे जाताना एक वाट उजवीकडे जवळ्याच्या धारेखाली असलेल्या जंगलाकडे जाते. या वाटेवर एक खोदीव टाके असुन त्यातील पाणी शेवाळ जमा झाल्याने पिण्यायोग्य नाही. जंगलातील या वाटेने उभा चढ चढुन अर्ध्या तासात आपण एका घळीपाशी येऊन पोहोचतो. घळीच्या या कातळात अलीकडे एक माणुस रांगत आत शिरेल अशी गुहा कोरलेली असुन या कातळाला वळसा मारत पुढे गेल्यावर गुहेचे दुसरे तोंड पहायला मिळते. गुहा पाहुन घळीत परत आल्यावर सोपे प्रस्तरारोहण करून आपण घळीच्या वरच्या भागात पोहोचतो. येथे समोरच २० फुट उंचीचा कातळटप्पा असुन हा कातळटप्पा चढल्यावर किल्ल्यावर जाणारी वाट आहे. कातळाच्या वरील बाजुस किल्ल्याची उध्वस्त तटबंदी दिसते. कातळावर दोर बांधण्यासाठी बोल्ट मारलेला असुन हा कडा चढण्यासाठी दोर असणे आवश्यक आहे. नेहमी गडकिल्ले फिरणारे दोर न लावता हा कातळ चढू शकतात पण सुरक्षेसाठी दोर लावणे गरजेचे आहे. हा कातळटप्पा पार करून आपण गडाच्या माथ्यावर पोहोचतो. येथुन थोडासा चढ चढुन वर आल्यावर उजवीकडील वाटेने आपण गडाच्या दुसऱ्या भागाकडे निघतो. माथ्यावर मोठया प्रमाणात गवत वाढलेले असुन या गवतात लपलेले अनेक वास्तुचे चौथरे दिसुन येतात. वाटेच्या पुढील भागात उजव्या बाजुला डोंगर उतारावर गडाचा उत्तराभिमुख उध्वस्त व अर्धवट गाडलेला दरवाजा दिसुन येतो. या अवशेषात दरवाजाची अर्धवर्तुळाकार कमान तसेच दरवाजाचे दगडी बिजागर दिसतात. दरवाजाच्या दोन्ही बाजुस बुरुज असुन यातील एक बुरुज गुप्तधनाच्या लालसेने आतील बाजुस खोलवर खणलेला आहे. दरवाजाच्या खालील बाजुस उतारावर पडझड झालेल्या कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसुन येतात. दरवाजा पाहुन मुळ वाटेवरुन पुढे निघाल्यावर कातळात खोदलेली तीन टाकी दिसतात. यातील एक टाके मोठया प्रमाणात बुजलेले आहे तर एका टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्याकडून वाट गडाच्या माथ्याकडे वळते. या वाटेने ५ मिनिटाचा उभा चढ चढल्यावर वाटेच्या उजवीकडे व डावीकडे अशी पाण्याची दोन टाकी पहायला मिळतात. या दोन्ही टाक्यातील पाणी शेवाळलेले आहे. या टाक्यापासून सरळ वर जाणारी वाट गडाच्या सर्वोच्च माथ्यावर जाते. किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची ४१७० फुट असुन त्रिकोणी आकाराचा गडमाथा २२ एकर परिसरावर पसरलेला आहे. माथ्यावर काहीही अवशेष नसले तरी मार्कंड्या त्या मागे असलेला सप्तशृंगीगड, कण्हेरगड, मोहनदर पुर्वेला रवळ्या त्यामागे धोडप, कंचना, कोळधेर, राजधेर, इंद्राई असे ८-१० किल्ले नजरेस पडतात. गडमाथा फिरून आल्या वाटेने कातळ टप्पा उतरल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. संपुर्ण गडफेरी करण्यास दिड तास पुरेसा होतो. इ.स.१६३५-३६ मध्ये शहाजहान याने निजामशाही सांभाळणाऱ्या शहाजी राजांचा पाडाव करण्यासाठी खानदौरान, खानजमान व दिलेरखान असे तीन सरदार पाठवले. दिलेरखानावर नाशिक-त्रिंबक या भागातील किल्ले घेण्याची जबाबदारी होती. त्यात अलावार्दीखन या दिलेरखानाच्या हाताखालील सरदाराने इ.स.१६३६ मध्ये हे दोन्ही किल्ले जिंकुन घेतले. रवळ्या किल्ल्याच्या दरवाजावरील शिलालेखात याचा उल्लेख येतो तसेच बादशहानामा या ग्रंथात या किल्ल्यांचा रोला-जोला म्हणुन उल्लेख येतो. इ.स.१६७० साली नोव्हेंबर मध्ये शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सरत लुटली त्या काळात हा किल्ला स्वराज्यात सामील केला. सभासदाच्या बखरीमधील वर्णनानुसार इ.स.१६७१ मध्ये दिलेरखान याने या किल्ल्यांना घातलेला वेढा मोरोपंत यांनी रवाना केलेल्या सैन्याने उधळून लावला. त्यानंतर आलेल्या महाबतखानाने मात्र वेढा घालुन हा किल्ला जिंकून घेतला. पेशवेकाळात हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आला. इ.स. १८१८ मध्ये कॅप्टन ब्रिग्जने ब्रिटीशांच्या वतीने किल्ला ताब्यात घेतला. १८१९ मध्ये ब्रिटीश अधिकारी म्याकीन्तोष याने किल्ल्याच्या पायऱ्या व तटबंदी तोफ़ा लावुन उध्वस्त केली.
© Suresh Nimbalkar

 
 
रवळ्या - जवळ्या


रवळ्या - जवळ्या या जोडकिल्ल्यांना दोन वाटा आहेत. एक वाट मुळणबारी खिंडीतुन, मार्कंड्याच्या समोरचा डोंगर चढुन गेल्यावर आहे आणि दुसरी वाट मुळाणे गावातून आहे. आम्ही मुळाणे गावातुन चढणार होतो. चला बराच वेळ आराम झाला, आता निघायला हवे. सोबत खायला, पाण्याच्या बाटल्या वगैरे घेतले आणि चालायला सुरुवात केली. आता पहाटेचे ७ वाजले होते, रविराज बऱ्यापैकी वर आले होते. मुळाणे गावातुन डोंगराच्या डाव्या कोपऱ्यातुन एक सोंड सरळ खाली उतरलेली दिसते. या सोंडेवरून आपण सरळ चढाई सुरु करायची. शेतातून एक पायवाट डोंगराला भिडते आणि हीच वाट सरळ वर चढत जाते. या पायवाटेने आपण थोडं तिरप चढायला सुरुवात करायची. कळसुबाई सारखे या किल्ल्यांना डोंगरांचे ४ टप्पे लागतात. पहिल्या २० मिनिटात आपण पहिल्या पठारावर येतो. मागे नजर टाकल्यास कण्हेरगड दिसतो. आम्ही पायवाट सोडुन थोडी सरळ चढाई चालु केली कारण थोड्या वेळाने पायवाट नाहीशी होते आणि पुर्ण वळसा न मारता सरळ नागमोडी मार्गे चढायला सुरुवात करायची. साधारण तासाभरात आपण गडाच्या पदरात असलेल्या पठारावर पोहोचतो. इथवर आल्यावर एक मार्किंग  करून ठेवावे अन्यथा परत येताना रास्ता चुकण्याचे चान्स जास्त आहेत.


पठारावर भरपुर झाडे आहेत, रवळ्या किल्ला उजव्या हाताला ठेऊन आपण मळलेल्या पायवाटेने चालायला लागायचे. वाटेत जाता जाता आपल्याला बरेच अवशेष बघायला मिळतात जुन्या इमारतींच्या ज्योती, पीर, खांबांचे अवशेष, समाधी आणि इतर अर्धवट तुटलेले अवशेष आहेत. १०-१५ मिनिटे चालले की आपण दोन्ही किल्ल्यांच्या मध्ये असलेल्या पठारावर येऊन पोहोचतो. इथे एक ३-४ घरांची वस्ती आहे याला तिवारी वस्ती म्हणतात. इकडे आम्हाला मुंबईचे काही ट्रेकर्स भेटले,ते सुद्धा नुकतेच आले होते. आमच्या सफरीत ते सुद्धा सहभागी झाले. या वस्तीच्या बाजुलाच एक पुरातन टाके आहे पण यातील पाणी गुरे-ढोरे प्यायला वापरतात त्यामुळे यातील पाणी पिण्यालायक नाही. या वस्तीपासून उजवीकडील वाट आपल्याला रवळ्या किल्ल्यावर घेऊन जाते तर डावीकडील वाट आपल्याला जवळ्यावर घेऊन जाते. पहिले आपण रवळ्याच्या दिशेने निघायचे. इथे एक पाण्याचे कुंड आहे, यातील पाणी पिण्यालायक आहे. किल्ल्यावर जाणारी वाट सुरुवातीला जंगलातून असल्याने पटकन सापडत नाही पण एकदा वाटेल लागलो की २० मिनिटात आपण एका घळीपाशी येऊन पोहोचतो. या घळीतून आपण चिमणी climb करत वर जायचे. इथे कातळात कोरलेली एक गुहा आहे जी दोन्ही बाजूने ओपन आहे. थोडस पुढे चालत गेलं की कातळाच्या दुसया बाजुला ही गुहा उघडते.





आत्तापार्येंत ९.३० वाजले होते. येथे  झाडांच्या थंड सावलीत आम्ही जरावेळ अराम केला आणि परत झाडापाशी आलो. समोर आपण एका rock patch पाशी येतो. क्लाइंबिंग चे ज्ञान आणि सराव असेल तर हा पटच आपण रोपशिवाय चढु शकतो पण शक्यतो रोप सोबत घेतलेला उत्तम. मधल्या भागात एक रोप लावलेली आहे पण त्याच्या भरवश्यावर राहु नये. हा पटच केल्यावर आपण गडाच्या माथ्यावर पोहोचतो. उजव्या हाताने सरळ गेल्यावर २ पाण्याची टाकी आहेत, यातील पाणी पिण्यालायक आहे. गडाचा माथा संपुर्ण चढाईचा आहे. या टाक्यांपाशी आम्ही जरावेळ आराम केला आणि बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो. जाताना वाटेत फक्त एकच झाड आहे आणि बाकी वाळलेले गवत. बालेकिल्ल्याच्या मध्याच्या थोडं वर आल्यावर एक खराब पाण्याचे टाके आहे. हे बघुन आपण सर्वोच माथ्यावर दाखल व्हायचे. येथे गडाचे कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. येथून संपुर्ण सातमाळ डोंगररांगेचे दर्शन उत्तम घडते. रवळ्या किल्ल्याचा माथा जवळ्या किल्ल्यापेक्षा मोठा आहे. सर्व नजारा बघुन मन मोहुन जात होतं, धोडप नजरेला नजर भिडवुन उभा होता. आज तो वेगळ्या रूपात आम्हाला दिसत होता, एकदम देखणा!! हा नजर बघुन आम्ही किल्ला उतरायला सुरुवात केली आणि पुन्हा टाक्यांपाशी येऊन पोहोचलो. टाक्यांपासुन उजवीकडील वाटेने गेल्यावर आपल्याला बुरुजांचे अवशेष दिसतात. येथुन गडावर यायला जुनी वाट असणार कारण पायथ्यापासुन नीट बघितले असता, बुरुजाच्या खालच्या बाजुस कातळात पायऱ्या कोरलेल्या दिसतात. पण या वाटेची पडझड झाल्याने येथून जाण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही परत आल्या वाटेने तिवारी वस्तीमध्ये जायला निघालो आणि ११ वाजता वस्तीत परतलो.


आम्ही तिवारी वस्तीत न थांबता जवळ्या किल्ल्याच्या दिशेने कूच केली. जवळ्या किल्ल्यावर जायला २ वाटा आहेत. एक वाट डावीकडील सोंडेवरून सरळ वर चढते. ही वाट पुर्ण घसाऱ्याची असल्याने शक्यतो टाळावी. दुसरी वाट तिवारी वस्तीमधुन समोर चालत गेल्यावर उजवीकडील सोंडेवरून नागमोडी मार्गे वर चढते. ही वाट मळलेली आहे, सोंडेच्या मध्ये डोंगराच्या पदरात पोहोचल्यावर वाट डावीकडे वळते. या उजवीकडील वाटेने आम्ही सरळ चालु लागलो. कातळ उजव्या हाताला ठेऊन कातळाला लागुन सरळ चालत जावे. थोडं पुढे गेल्यावर उजव्या हाताला गुहा आहे. कदाचित येथे लेण्या कोरण्याचा प्रयत्न केला असावा. अजून थोडं पुढे गेल्यावर डावीकडच्या सोंडेवरून चढून येणारी वाट इथे मिळते. इथे कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात, अगदी तळपायाचा अर्धा भाग मावेल एवढ्या या पायऱ्या आहेत. ही वाट थोडी बिकट आहे. पायऱ्यांचा मार्गे गेल्यावर गडाचा कातळ कोरून काढलेला दरवाजा आहे. दरवाजाच्या उजव्या बाजुला शिलालेख कोरलेला आहे. दरवाज्यातुन सरळ वरती गेले की डावीकडे एक वाट वळते त्या मार्गाने जावे, पुढे गुहा आहेत आणि यातील एका गुहेत पाणी आहे. पाणी स्वछ आणि पिण्याजोगे आहे, गुहेत आत शिरायला खिडकी सुद्धा आहे. हे बघुन आम्ही उलटे फिरलो आणि वर चढु लागलो. समोरच आपण एका बुरुजापाशी येऊन पोचतो अँड गडाच्या माथ्यावर दाखल होतो.





येथुन अप्रतिम नजर पाहायला मिळतो. इंद्राई, चांदवड, कण्हेरा, धोडप, इखारा, कांचन तसेच रवळ्या, मार्कंड्या, सप्तशृंगी सुद्धा दिसतात. बाकीचे मंडळी वर पोहोचेपर्येंत आम्ही या नजाऱ्याचा आनंद लुटत होतो. उंचच्या उंच कातळकडे आणि खोलच्या खोल दऱ्या बघुन मन मोहुन जात होते. या गडांचे एक वैशिट्य असे की प्रत्येक किल्ल्याच्या पदरात मोठे पठार आहे. (रवळ्या - जवळ्या, मार्कंड्या, सप्तशृंगी). असे वाटते जणू काही डोंगरांवर डोंगर चढवले आहेत. गडावरून खाली पदरात असलेल्या पठारावर नजर टाकली असता जुन्या इमारतींच्या ज्योती नजरेस पडतात. गडाच्या माथ्यावर जुन्या इमारतींचे अवशेष आहेत तसेच घोड्यांच्या पागा बघण्यासारख्या आहेत. थोडसं पुढे गेल्यावर पाण्याची तीन टाके आहेत, या पाण्यात थोडं शेवाळ आहे. पण थोडे गाळुन घेतले असता यातील पाणी पिण्यालायक आहे. येथे थोड्या वेळ विश्रांती घेऊन आम्ही परतीच्या वाटेला लागलो. परत उतरताना आम्ही पायर्यांचा मार्गे खाली आलो आणि डावीकडे ना जाता उजवीकडे वळुन गुरवाटेने झाडीमधुन पठारावर पोहोचलो आणि आमचा आनंद अगदी पोटात मावेनासा झाला. समोरच एक शिवलिंग उघड्यावर आहे आणि त्याबाजुलाच पाण्याचे छोटे कुंड आहे. गुरे-ढोरे यातील अपनी पीत असल्याने हे पाणी खराब असुन पिण्यालायक नाही. पुन्हा पठारावरून चालत आम्ही तिवारी वस्ती मध्ये परतलो. आत्तापार्येंत दुपारचा १ वाजला होता. आतमधुन दादांनी आम्हाला ताक आणुन दिले. ते पिऊन आम्ही मुंबईकरांचा निरोप घेतला आणि १.३० वाजता परतीच्या वाटेल लागलो. आल्या वाटेने सावकाश उतरत ३.३० वाजता मुळाणे गावात दाखल झालो.





मुळाणे गावात पोचल्यावर हापस्यावर हात-पाय धुतले आणि शाळेच्या आवारात जरावेळ आडवे झालो. येथुन पुढे धोडपला जायचे होते पण आमच्यातील एका मित्राला परत घरी जायचे होते त्यामुळे आम्ही धोडप पुढच्या खेपेस करायचे ठरवले आणि सातमाळ सफरला आळा घातला. तिघंही मित्रांची झोप नीट न झाल्याने हर्षल बाईकवर आणि मी कार घेऊन संध्याकाळी ५ वाजता परतीच्या वाटेवर निघालो. निघताना धोडपला मुळाणे गावामधुन नमस्कार केला आणि पुढच्या खेपेस परत येऊ असे म्हणत त्याचा निरोप घेतला. गेले तीन दिवस आम्ही बाईक वर आणि किल्ले फिरूनसुद्धा गाडी चालवत होतो. वाटेत एका ठिकाणी जेवण करून आम्ही पुण्याचा रास्ता पकडला आणि रात्री १ वाजता बाकीच्या मित्रांचा निरोप घेऊन मी आणि हर्षल, हर्षलच्या घरी मुक्कामाला गेलो. हे ५ दिवस अविस्मरणीय होते/आहेत, आमच्या आयुष्यातले/ ट्रेकिंग लिफे मधले सगळ्यात आठवणींचे दिवस. आज (१९ नोव्हेंबर २०१७) रोजी हा ब्लॉग/आठवण लिहीत असुन सुद्धा एक न एक क्षण जसाच्या तसा आठवत आहे. हे सगळं लिहिताना असा वाट आहे गेल्या आठवड्यातमध्येच आपण सातमाळ सफर करून आलो आहे. पुढे कधी संधी मिळाली तर सातमाळ सफर पुन्हा एकदा नक्कीच करेन आणि या वेळेस धोडपसहित करेन. चला आता निरोप घेतो आणि पुढल्या वारीच्या तयारीला लागतो. :)
 
 

रवळ्या व जवळ्या

बाबापूरच्या आयकॉनिक खिंडीत एक ग्रूप फोटो घेतला आणि थोड्याच वेळात आमचा ट्रेक सुरू झाला...पावसाने आल्या आल्या सलामी दिली...बाबापूरच्या खिंडीची पश्चिम बाजू म्हणजे मार्कंडेयचा डोंगर, तर पूर्व बाजु ही रवळ्या व जवळ्या या जोड दुर्गांच्या पठारावर घेऊन जाते... याठिकाणहून मार्कंडेयवर पर्यटन विकासाच्या नावाखाली सुरू असलेली बांधकामे दृष्टीस पडली...लोखंडी पाईपच्या रेलिंगची नागमोडी वाट...तर वरच्या बाजुली सिमेंटची काही पक्कीबांधकामे दृष्टीस पडतात..खिंडीतच एका बाबाची भली थोरली राहूटी आहे...त्याच्यापलिकडे अनेक दुचाकी पार्क केलेल्या दिसल्या...डोंगर धारेच्या वर पासून तर मध्यापर्यंत शुभ्र दुधी धारेचा आभास करणारी छानश्या धबधब्याची लंबी चौडी धार मनाला सुखावत होती... डोंगरातल्या रस्त्यावर पकड घेण्याच्या बाबतीत बदनाम असलेल्या वूडलॅन्डस्‌ नामक पादत्राणांनी पहिल्या काही मिटर्सवरच मला, 'हा ट्रेक फार जपुन चालावा लागेल' याचे संकेत दिले...वरच्या टप्प्यावर आम्ही पंधरा मिनीटात पोहोचलो...त्याठिकाणी उजव्या बाजुने जाण्याचा प्रयत्न करून बघितला, पण वाट बर्‍यापैकी निसरडी असल्याने नेहमीच्या डाव्या बाजूचा पर्याय सोपवा वाटला व आम्ही डावीकडून वळसा घेऊन एका छोट्या खड्या चढणीला लागलो...ही चढण करत असताना पूर्वेला काही सेकंदासाठी काळ्या ढगा आडऊन सूर्य डोकावून गेला... पठाराच्या वरच्या भागात आल्याबरोबर आपल्याला रवळ्याचे दर्शन घडत असते...पण आज असे झाले नाही...ढगाच्या दाट अच्छादनातून आमचा स्वर्गसुखाचा प्रवास सुरू होतो...बेधुंद करणार्‍या या वातावरणात सवंगड्यांसोबत सर्व जण हरखून गेले होते... पंधरा फुटाच्या पलिकडचे काहीही दिसत नव्हते...त्यामुळे व्हायचे तेच झाले...आम्ही रस्ता चुकलो...रवळ्याला डावीकडे ठेऊन दोन किल्ल्यांच्या मधोमध असलेल्या तिवारी वस्तीत आम्हाला जायचे होते...अखेर पंधरा वीस मिनीटे वाट बघुनही वाट मिळेना...तेव्हा काहींनी गुगल मॅपवर मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला....त्यामुळे दिशा स्पष्ट झाली...पण वाट स्पष्ट होत नव्हती... अखेर थोड्या वेळात ढगांची चादर बाजुला झाली आणि समोर भला मोठा पहाड दिसू लागला...वरच्या बाजुने निम्मा अधिक ढगांनी वेढलेला...हाच रवळ्या... रवळ्याकडे जाताने आम्हीला रानकेळीची अनेक झाडे दिसली...अवघ्या पंधरा मिनीटात आम्ही तिवारी वस्तीत पोहोचलो...प्रत्येकाच्या पायांना किलो किलोभर चिखल लटकलेला होता....काही जण तो सारखा काढण्याचा प्रयत्न करत होते...तिवारी वस्ती म्हणजे गडावरच्या जुन्या वसाहतीचे भग्नावशेष... याठिकाणी अजूनही तिवारी व परदेशी नावांची मंडळी आपल्या गाई व म्हशी चरण्यासाठी सोडून देतात...रोज दोन्ही वेळ वस्तीवर येऊन दुध काढले जाते...गडावरच्याच गवत, गोवर्‍यांवर हे दुध आटवून त्याचा खवा तयार केला जातो...हा खवा कळवणच्या बाजारात चांगल्या भावात विकला जातो...पाच वर्षांपूर्वी मी ७०/- रूपये किलो दराने एक किलो खवा घरी नेला होता...हल्ली दिडशेच्या आसपास भाव असावा...वस्ती निर्मनूष्य असल्याने भाव समजु शकला नाही... तिवारी वस्ती लगत दगडातच पाण्याची काही टाकी आहेत...पाणी गढूळ होते...त्यामुळे थोडी पोटपुजा करताना, आम्ही सोबत आणलेले पाणी पिणे पसंद केले... रवळ्याचा शेवटचा टप्पा अवघड असल्याने आम्ही जवळ्याच्या दिशेने कुच केली...वीसेक मिनीटात आपण खालून दिसणार्‍या गुहांच्या समुहापर्यंत पोहचतो...ट्रॅव्हर्स छोटा असला तरी थोडा घसारा आहे...त्यामुळे जपुन चालावे...गुहांचे काम अपूर्ण राहिले आहे...जेमतेम एक माणूस उभा राहू शकेल इतकीच जागा त्यात आहे...समोरचा भाग मात्र दगडात व्यवस्थित कोरण्यात आला आहे...या गुहेतून हिरवे कंच पठार, तिवारी वस्ती व ढगांचा मुकुट धारण केलेला रवळ्या असा एकुण नजारा मनाला कमालीचा सुखावत होता... ट्रॅव्हर्स ओलांडून आपण पूर्व बाजुकडे येतो...याठिकाणी अवघ्या २५ फुटांचा रॉकपॅच आहे...हात व पायांना पकड घेण्यासाठी नैसर्गिक, पण पर्याप्त खाचा जरूर आहेत...पण पावसामुळे निसरड्या बनलेल्या दगडावर पकड ठेवताना संयमाचा चांगलाच कस लागला... पॅच ओलांडून आम्ही वरच्या बाजुला आलो तोच पायर्‍यांच्या पुढे आम्हाला एका वेळेस एक जण जाऊ शकेल इतक्या रूंदीचा बोगदा दिसला...पेठच्या कोथळीगडाची आठवण करून देणारा...अर्थात कोथळीगडाचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे...तरीपण दगडातून खोदून काढलेला चिंचोळा मार्ग पाहून आम्ही आनंदाच्या भरात यू्ऽऽहूऽऽ अशी आरोळी ठोकली... वरच्या बाजुला जाण्यासाठी पूर्वी या ठिकाणी दरवाजा असावा...बाहेरच्या भिंतीवर फारसी भाषेतला शिलालेख कोरला आहे...जो धोडपच्या शिलालेखाची आठवण करून देतो...त्यातल्या पायर्‍यांवर चिखल व माती असल्याने बरीच सावधगिरी बाळगत आम्ही वर आलो...वर एक छोटा बुरूज थोडा चांगल्या स्थितीत आढळला... याठिकाणी आम्हीला जो वेगवान वारा व पाऊस लागला तो कायमचा स्मरणात राहील...अगदी अॅक्यूप्रेशर सारखा पावसाचा मारा झेलत आम्ही माथ्याच्या दक्षिण बाजुला जाऊ लागलो, तोच शिगोशिग भरलेली कातळ कोरीव पाण्याची टाकी लागली....आणि आभची भर पावसात शिखरावर जाण्याची कसरत अगदी सफल झाली... पावसाचा मार संपल्यानंतर पुन्हा ढगांनी माथ्यावर दाटी केली...त्यांची सोबत काय चीज असते...हे प्रत्यक्ष अनूभवून बघावे...माथ्यावर काही ठिकाणी वस्तीचे अवशेष आढळतात...याठिकाणी मुक्काम करण्याजोकी जागा नाही...कातळकोरिव टाक्यात स्वच्छ पाणी आहे...उन्हाळ्यातही पुरेल इतका पर्याप्त साठा आहे... ढगांची साथसंगत सोडवे ना, पण आमचे काही सवंगडी खालच्या टप्प्यावर होतो...शिवाय रावळ्याही करायचा होता...त्यामुळे आम्ही इतके सुंदर वातावरण असतानाही गड माथा सोडला...अधुन मधुन अगदी थोड्या वेळासाठी...फक्त काही सेकंदाकरिता सूर्य ढगाआडून डोकावत होता...आसमंत काळ्या ढगांनी व्यापलेला असल्याने निकटच्या डोंगररांगा नीट दिसत नव्हत्या...रामजी पांगेराच्या स्मृतींचा गंध पसरवणारा कणेरगड मात्र सर्ववेळ आम्हाला खुणावत होता...थोड्या वेळाने धोडपवरचे ढग बाजुला झाल्याने त्यानेही दर्शन दिले... ट्रॅव्हर्स खुपच निसरडा असल्याने आम्ही पूर्व टोकाचे खुरटे जंगल उतरून पठारावर आलो...समोर या पठाराला बिलगुन उभा असलेला गोरसर डोंगर लक्ष वेधून घेत होता...त्यावर काही पाण्याची तळी असल्याचे जवळ्याच्या वरून उतरदाना दिसत होते... तिथून अवघ्या वीस मिनीटात आम्ही परत त्रिवारी वस्तीत आलो...वेळ न दवडता आम्ही लागोलाग रावळ्याच्या दिशेनेकुच केली...पुन्हा जोरदार पावसाचा मारा...पण हा पावसाळी ट्रेक असल्याने खुप आनंद वाटला... आमच्यातला एक गडी पाय दमडल्याने जायबंदी झाला होता, तर काहींना थकवा जाणवत होता, त्यामुळे निम्मा चमु रावळ्यावर गेला...निसरड्या वाटातून माग काढत आम्ही शेवटच्या दगडाच्या टप्प्यावर पोहोचलो...उजव्या बाजुने वर जाण्याचा मार्ग बंद झालेला आढळला...याठिकाणी एक २.५ बाय २.५ फुटाची चौकीनी कातळकोरिव गुहा दिसला...दहा फुटानंतर तिचा मार्ग बंद होता...काम अर्धवट राहिल्याची ही खुण... डावी वाटबंद असल्याने आम्ही परतण्याचा निर्णय घेतला...पण हेमंत हार मनायला तयार नव्हता...नखशिखांत भिजलेल्या स्थितीत त्याने चिंचोळ्या जागेतून वर जाण्याचा निर्णय घेतला...एका लहान झर्‍याची ती वाट होती...तो पार करून आम्ही एका विस्तीर्ण अशा दगडी टप्प्यावर आलो...तिथे वीस फुटांचा दगडी पॅच आमची वाट आडवून उभा होता...वर तटबंती व बुरजाचे ढासळलेले अवशेष दिसत होते...कोणी तरी बोल्ट मारून त्याला दहा फुटाचा दोर अडकवला होता... निसरड्या दगडावर आमच्या तील काहींनी सुमारे पंधरा एक मिनीटे दोर पकडून वर जाण्याचा प्रयत्न केला...पण सुरक्षितता वाटत नव्हती...शिवाय वेळेत परतायचे असल्याने आम्ही नाद सोडला व या पॅचवरच पोटपुजा करण्याचा निर्णय घेतला...गडावरचे भग्न प्रवेशद्वार, गणेशाची मुर्ती, कातळकोरिव पायर्‍या व पाण्याची टाकी...हे सर्व बघायचे राहूनच गेले... या पॅचवरून सभोतालचा विस्तीर्ण परिसरावर नजर टाकता येते....रावळ्या जावळच्याचे संपूर्ण पठार एका टप्प्यात दृष्टीस पडते...इथून कणेरगड, धोडप पुर्णपणे दिसत होते...अधून मधून ढग, तर मधूनच पाऊस अशा वातावरणाचा आम्ही मनमुराद आनंद लूटला... खालच्या सवंगड्यांना परतण्याचा संदेश देऊन आम्हीही पॅच सोडला...तोच दोन गुराखी झर्‍याच्या मार्गाने दुडूदूडू धावत वर आलो...आपल्या बकर्‍या शोधण्यासाठी ते रावळच्याच्या माध्यावर चाललो होते...ज्या दोरावरून कसे जायचे हे समजत नव्हते...तो दोर त्यांनी, घड्याळाच्या लोलकासारखा झोका घेऊन वरच्या टप्प्यावर जाण्याचा कसब आम्हाला दाखवून दिले...आम्हाला किल्ली सापडली होती...पण आमचे सवंगडी त्याअगोदरच पुढे निघाल्याने आम्ही माथा नंतर केव्हा तरी, अशी मनाची समजूत घालून माघारी परतलो... आमचा हा निर्णय खुपच योग्य होता...कारण नंतर मुसळधार पाऊस लागला...असा पाऊस की, वर्षोनूवर्षे मनाच्या तिजोरीत दागिन्यासारखा आठवणीत रहावा...हिरवाईने नटलेले पठार, दरीतून वर येणारे तलम ढगांचे पुंजके...जणू कोणीतरी रेशमाचे धागे पिंजून...वर लयदार पद्धतीने सोडत आहे...अचानक सोसाट्याचा वारा हे पुंजके दूर सारतो...नी सोबतीला घेऊन येतो आपला सखा...पाऊस...पाऊसही असा...की धोऽऽधोऽऽ कोसळणारा...वेगवान वारे व पावसाची संगत म्हटल्यावर सारी सृष्टी या दोन सवंगड्यांची मस्ती डोळे भरून बघत राहते...त्यांची मस्ती काही साधी सुधी नाही...त्यात असते प्रचंड ताकद...त्या ताकदीपुढे आम्हा पामरांचे काय चालणार...तेव्हा आम्ही सुद्धा जागीच खिळून त्याचा स्पर्ष झेलत...सुखावत होतो... निसरड्या खडकावरच्या वाटांशी झुंजत आम्ही एकदाचे परतलो...दुपारी ५-००च्या आत बाबापुरच्या खिंडीत परतण्याचा आमचा निर्धारही सफल ठरला... या पावसाळ्यातला हा आमचा पहिला वहिला ट्रेक...तसे आम्हाला कोणत्याही ऋतूचे बंधन नसते, डोंगर-दर्‍यात भटकण्यासाठी...पण पावसाची बात न्यारी आहे...भर उन्हाळ्यात आम्ही असंख्य ट्रेक्स यापूर्वी केले असतील...पण गडावर जाणे असो की, तिथून येणे, उन्हात चालणे खुप जिकीरीचे होऊन जाते... पावसाळ्यात मी धबधबे करण्यावर जास्त भर देतो...शिवाय, 'तो वार्षिक सोहळा' असतोच, ब्रम्हगिरी प्रदक्षिणेचा...अनवाणी ६० किलो मिटर्स चालण्याचा...पण यंदा बर्‍याच वर्षांनी भरपावसात किल्ल्यावर गेलो...एक नव्हे दोन किल्ले केले...रवळ्या व जवळ्याला भेट देण्याचे भाग्य लाभले...

We woke-up early at around 5.30 am so as to avoid heat and to trek faster. As we stayed near to plateau where Ravlya-Javlya located, we directly started walking on the plateau from the left edge (keeping  Ravlya on right side). En-route there were jungle of Karvand which we enjoyed a lot. It took us 30 minutes to reach exactly in between Ravlya and Javlya. There were 3-4 abandoned houses which now uses as shelter for cows.


We read on the trekshitiz that for climbing Ravlya, one requires rock climbing. We were unable to do that so we decided to climb only Javlya which is easier to climb. Before that we searched for water tank which is near to those houses. On Wikimapia, these tanks are also shown. But there is some confusion with naming of the forts . There is clear mismatching between the content given in Wikimapia and Trekshitiz. Here I followed Trekshitiz naming for the forts.

Confirming the directions, we started walking towards Javlya. We were busy searching the correct route when one shepherd appeared from nowhere. Lucky for us!!! We asked him about the route to Javlya and also route to Ravlya. Route to Javlya is easier. When we asked about climbing Ravlya, shepherd told us that the climbing patch of Ravlya is now secured with iron grilles. You can easily climb it. This was new and good information for us!!

Route to Javlya starts from ascending a small hill and then traverse for a while. On the traverse we found some caves. Probably Buddhist caves.


At the end of traverse, rock cut steps starts which leads to the top of the fort. Steps to be negotiated carefully as some steps have been broken; some are exposed to valley.

Fort entrance

Entrance to the fort is still somewhat intact. Near the entrance there is farsi script carved on stone.

There are lot of remnants on the fort. 5-6 water tanks with some having potable water. The view was amazing from the top. You can see Dhodap. Ikhara pinnacle, Kanhergad, Markandya , Saptshringi clearly.


Remnants


Plateau on which Ravlya-Javlya stands. In the center, you can see houses.

Spending some time on the fort, we started descending. It took us 2.5 hrs to climb and descend the fort. We decided not to climb Ravlya because of time constraint. Still I am giving route to reach Ravlya.


Our next target was Fort Dhodap. We first reached to abandoned houses and then started towards Mulane village. Route is well trodden.In the middle of the route , we again greeted by same shepherd. We inquired about the Dhodap fort and he told that we shouldn't have come to Mulane route. After ending rock steps of Javlya, if we descend further more and then follow the ghal route towards right side, we could have descended to the Wadala bhoir village. From there , it is convenient to reach the base of Dhodap. From Mulane, it is difficult to get vehicle towards Dhodap. So we skipped the plan and opted to climb Kanhergad.


We had cold-drinks in a shop on the main road. Fortunately we got a truck who took us directly to the Taharabad. Otherwise we would have to reach Kalvan first and then take a bus towards Satana or Sakri. It saved our time a lot.

We reached Taharabad at 6.30pm. We were hungry so we started searching hotels. But there were limited choice. Fortunately one middle age person guided us to the home-made food. That aunty runs mess. We were so happy to get homely food. She cooked Shev-bhaji, chapati and khichadi, the ultimate Khandeshi menu!!!!

हट्टीवरुन परत धोडांबेला न जाता पारेगाव वरुन मुळबारी खिंडीत आलो. पावसाळ्यामुळे या मार्गावर गाडी चालवणे जिकरीचे झाले होते. एके ठिकाणी गुढघाभर चिखलातुन गाडी बाहेर काढताना चांगलीच तंतरली होती.

मार्कंड्या करायचा तर बाबापुर गावात उतरावे लागते. पण जर गाडी असेल तर मुळणे गावात जाणार्‍या मुळणबारी खिंडीत गाडी लावुन... डावी कडच्या डोंगररांगे वरुन मार्कंड्या वर जाता येते तर उजवी कडच्या रांगेवरुन रावळ्या जावळ्या वर जाता येते.

खिंडीत पोहचलो तेव्हा साडे चार वाजुन गेले होते.. आणि वर जाण्यात कोणालाच उत्साह नव्हता. खिंड उतरुन गाडी मुळण गावात थांबवली. मुक्कामासाठी मंदिर किंवा शाळेत आसरा मिळवण्याची चाचपणी सुरु झाली. यो रॉक्सने गावात जाऊन चौकशी सुरु केली. संध्याकाळचे पाच वाजले होते, पण पावसाने अंधार केल्यामुळे सात वाजल्याचा माहोल तयार झाला होता. योच्या प्रयत्नांना यश आलं.. आम्हाला मुळण गावातील अंगणवाडीत आसरा मिळाला.

कालचा रात्रीचा प्रवास आणि दिवस भराच्या भटकंतीने सगळेच गळपटले होते. कुणी गावकर्‍याने आयता चहा आणुन द्यावा अशी सगळ्यांची इच्छा होती. पण ते शक्य नव्हते... सगळे गावकरी शेतीच्या कामात व्यस्त.. नाईलाजाने शाळेच्या पडवीत चुल पेटवण्याच अशक्य काम सुरु झालं.. बाहेर पावसाची ओल त्यात सरपणाचा अभाव अश्या बिकट परिस्थीतून वाट काढत सरते शेवटी चुल पेटवली... नी चहा ऐवजी गरमा गरम सुप पोटात ढकललं... लागलीच पेटत्या चुलीवर रेडी टु ईटचा सांबार राईस गरम केला.. तोंडी लावायला पापड भाजुन घेतले. दिवस भराच्या श्रमाने थकलेले जीव रात्री ८ वाजताच ढाराढूर झाले.

सकाळी उठवल्यावर मॅगी बनवायचा प्लॅन एकमताने धुडकावण्यात आला.. परत चुलीशी झटापट करण्यात कोणालाच रस नव्हता.. सुका खाऊ खाऊन गपगुपान परत खिंडी कडे गाडी वळवली.

मार्कड्या गड हा मार्कंडेय ऋषींच्या वास्तव्याने पावन झालेला गड अशी याची ओळख... मुघलांकडे असलेला हा किल्ला वणीच्या लढाई नंतर महारांजांनी जिंकुन घेतला. महाराजां नंतर परत मुघलांनी तो त्याब्यात घेतला .

मार्कंड्या पुर्ण पणे धुक्यात लपला होता.. मुळणबारी खिंडी पासुन मार्कंड्यावर जायला रेलींग लावलेल्या पायर्‍यांची वाट आहे. धुक्यामुळे चढाईचा अंदाज बिलकुल येत नव्हता... पायर्‍या संपल्यावर पहिला दरवाजा लागला.. हा पहिला टप्पा पार करुन आम्ही गडाच्या माची वर आलो. मार्कंड्या गडाची माचीही धोडप प्रमाणे ऐसपैस पसरलेली आहे. बाले किल्ल्या पर्यंत जाणारी मळलेली पायवाट आहे. धुक्यामुळे गडावर काहीच दिसत नव्हते. नेट वरुन रोमाने गडाची माहिती डाऊन्लोड केली.. त्या माहितीच्या आधारे आम्ही बालेकिल्ल्याची वाट धरली. माचीच्या डावीकडे एक प्रचंड कातळकडा आहे. तो वर चढुन गेल्या वर त्या कड्याच्या पोटात खोदलेल्या दोन ध्यानगुंफा दिसल्या.. २ चौ.मि. आकाराच्या चौकोनाकृती कुंडातुन ध्यानगुंफेत जाण्याची वाट आहे.

कुंडात उतरलेल ध्यान.

या भुयारातुन गुढघ्या वर सरकत पुढे गेल्यावर ध्यानगुंफा आहे. पावसाळी वातावरण आणि त्यातच माणसांचा वावर नसलेल्या या गुहेत पुढे जायच आम्ही टाळलंं. या गुंहा पासुन उजवी कडचा चढ चढत वर गेल्यावर मार्कंड्याचा बालेकिल्ला येतो... ध्यानगुंफा येई पर्यंत आम्ही बरिच उंची गाठली होती. तरी चढाईचा अंदाज येत नव्हता. त्यातच जोराचा वारा आणि पाऊस सुरुच होता. त्यामुळे मी आणि गिरिने बालेकिल्ल्या वर न जाता खालीच थांबण्याचा निर्णय घेतला. आनंद, यो आणि रोमा वर बालेकिल्ल्या कडे निघुन गेले.

बराच वेळ झाला तरी तिघांचा काहीच पत्ता नव्हता.. म्हणुन आम्ही परत माची वर आलो. वाटेत एक आश्रम दिसला. याच आश्रमात रहाण्याची सोय होते, हे नंतर यो कडुन कळलं. खाली उतरताना मधेच गडावरच धुकं नाहिस झालं आणि बालेकिल्ल्याच्या टोकावरिल मार्कंडेश्वराच मंदिर दिसलं.

सकाळचे नऊ वाजत आले होते आणि धुकं हळु हळु विरळ होऊ लागलं होतं... धुक्याचा पडदा हटल्यावर खालचा परिसर आता स्पष्ट दिसू लागला. पुर्वेकडच्या डोंगररांगेतील रावळ्या-जावाळ्या या जोडगोळीने दर्शन दिले.

खिंडीच्या डावी कडील.. आम्हाला रात्रीचा आसरा देणारं मुळीण गाव.

तर खिंडीच्या उजवी कडील... बाबापुर गाव.

आम्ही दोघं गड उतरुन खाली खिंडीत आलो, तेव्हा या तिघांची स्वारी वरच्या माची वर दिसली.

दहा नंतर धुकं पुर्णपणे नाहिस झाल्यावर मार्कंड्याच दिसणारं अवाढव्य रुप.

ओतुरच्या वाटे वरिल खुणावणारे.. रावळ्या-जावळ्या.

खाली उतरल्यावर गाडी मुळीण गावच्या बांधार्‍यावर थांबवली... कारण शुचिर्भुत होऊन पुढे सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाण्याचा बेत होता. आंघोळीचा कार्यक्रम आटोपुन ओतुर - साकोरे मार्गे नांदुरीला निघालो. वाटेत गगनाशी हातमिळवणी करणारा धोडप दिसत होता.

 
 
omkarkelkar.blogspot.com

किल्ले रवळ्या-जवळ्या


"रवळ्या-जवळ्या" ही नांवं ऐकून बरीच वर्षं झालेली. तेव्हा "अहि-मही" अशी राक्षसाची जोडी माहिती होती. पण ही किल्ल्यांची जोडी पहिल्यांदाच ऐकलेली. नंतर "चंदन-वंदन", "कांचन-मंचन", "अंकाई-टंकाई" अश्या जोडगोळ्या ऐकल्या आणि भेटही दिली गेली. हे रवळ्या-जवळ्या मात्र हुलकावणी देत होते. एक तर नाशकातले किल्ले पुण्याहून जाऊन पहायचे म्हणजे पटकन उठलं आणि गेलं असं होतं नाही. वेळ आणि पैसे, असा विचार करता खरं तर एकदिवसीय भटकंती परवडतही नाही. पण एकच दिवस होता आणि ह्यांचं नियोजन ठरलं. मग त्यात बदल केला नाही. एक दिवस तर एक दिवस... राहून जाण्यापेक्षा हे बरं.

"चंदन-वंदन", "कांचन-मंचन", "अंकाई-टंकाई" ह्या जोड्या म्हणजे अगदी जोड-किल्लेच आहेत. "रवळ्या-जवळ्या" ह्यांना जोड किल्ले म्हणायचं की नाही त्यावर चर्चा होऊ शकते. कारण हे इतर जोड्यांसारखे तेवढे जोडलेले नाहीत. पण एकाच पठारावर आहेत, म्हणजे दोन्ही किल्ल्यांचा पायथा, हा एक मुख्य डोंगर म्हणता येईल. दोन मदारी असलेला उंट कसा असतो, तसं काहीसं 😄

ही नांवं रांगडी वाटतात, मराठा साम्राज्याला शोभणारी. बादशाहनामा ग्रंथात ह्यांचा उल्लेख रांगडेपणा पार बाजूला राहील असा, अगदीच पिचकवणी म्हणजे रोला-जोला ह्या नावाने आहे. ह्यात मजा नाही. असो... पण हे किल्ले अलावर्दीखानाने जिंकून घेतले. शिवाजी महाराजांच्या काळात परत स्वराज्यात आले जे महाबतखानाने जिंकून स्वराज्यातून ओढून घेतले. त्याआधी दिलेरखानानेही प्रयत्न केला होतान, पण तो मोरोपंतांच्या सैन्याने हाणून पाडला होता. महाबतखानाकडून मात्र शिरस्त्याप्रमाणे पेशवेकाळात ते स्वराज्यात आले आणि नंतर इंग्रजांकडे जाऊन इतिहासात किल्लेपण संपुष्टात आलं. इंग्रजांनी इतर ठिकाणाप्रमाणे इथेही सगळ्यात आधी तोफा लावून पायऱ्या उध्वस्त केल्या.

ह्या जोडगोळीला भेट द्यायची आणि पूर्ण किल्ले फिरायचे, म्हणजे पूर्ण दिवस हाताशी हवा. मग आमच्या नेहमीच्या पद्धतीने, म्हणजे पुण्यातून रात्री निघायचं, पायथ्याला अपरात्री (की पहाटे?) ३-४ ला पोचायचं आणि थोडक्यात विश्रांती घेऊन, उजडतानाच आयुधं घेऊन तयार व्हायचं असा साधा प्लॅन. ठरलेलं सामान, offline downloaded maps, खादंतीची पुरेशी व्यवस्था असं सगळं नेहमीप्रमाणे जमा करून पुण्यातून मी चिंचवडला पोचलो आणि सगळे मिळून नाशकाकडे गाडी हाणली. ह्या जोडगोळीचं पायथ्याचं ठिकाण हे मुळाणे बारी उर्फ बाबापूर खिंड. वास्तविक मुळाणे आणि बाबापूर ही खरी पायथ्याशी गावं. आणि ह्या गावांना जोडणाऱ्या डोंगरमार्गात असलेली खिंड हे चढाईची सुरुवात करण्याचं ठिकाण.

मुळाणे बारी उर्फ बाबापूर खिंड

इथे आम्ही पहाटे ३:३० वाजता पोचलो. ह्याच खिंडीतून एका बाजूला मार्कंड्या आहे, तर दुसऱ्या बाजूला ही रवळ्या-जवळ्या, नाही, to be exact जवळ्या-रवळ्या, if taken in order! इथे खिंडीत वनखात्याने विसाव्यासाठी बांधकाम केलेलं आहे. अर्थात हे रवळ्या-जवळ्यासाठी नाही बरं. इकडे फक्त खास भटके येतात, पर्यटक नाही. पर्यटक जाणार बारीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या मार्कंड्यावर. मग खातीरदारी पण जिकडे ओढा जास्ती त्यासाठीच असणार! पण आपल्याला काय फरक पडतो 😉 खिंडीत गाडी लावली. जवळच हनुमान आमच्यासाठी आधार म्हणून सिद्ध होतेच. त्यामुळे काळजी कसली करायची? वेळ न दवडता पथाऱ्या पसरल्या आणि गुडूप झालो.

२-२:३० तास पाठ टेकली आणि उजडायच्या आत उठलो पण परत. ह्यावेळी कोणतीही रहदारी नसताना काय सुंदर दिसते ही जागा... प्रसन्न वाटतं. छानसा काळोख, खिंडीतून पलीकडे चमचमतं गांव, शांतपणा जणू "हे सारं काही आत्ता तुमचंच आहे, घ्या लुटून आनंद, जग जागं व्यायाच्या आधी" अशीच जाणीव करून देत असतो. ६:३० च्या आत आवरून सिद्ध झालो.

पाठीशी मार्कंड्या

पायथ्याच्या हनुमंताला नमस्कार करून चढाईला सुरुवात केली. एकदा सुरुवात केल्यावर आमच्या पाठीशी मार्कंड्या उभा राहिला. शब्दशः पाठीशी उभा राहिला, कारण तीच खिंड ही मार्कंड्याच्या चढाईचीही सुरुवात आहे. आम्ही पूर्वेकडे तोंड करून निघालेलो असल्याने समोरचा जवळ्यापेक्षा मागचा मार्कंड्याच सोनेरी किरणांच्या उन्हात न्हाऊन निघालेला, बघण्यासारखा दिसत होता. त्यावेळी तर माझी मार्कंड्या भेटही झालेली नव्हती आणि मार्कंड्याचं असं रूपडं तसंही त्यावर गेल्यावर दिसणार नव्हतं. मग जिथवर आलो होतो त्या पठारावरूनच फोटो घेतले. त्या मार्कंड्याच्या प्रचंड परिसराच्या तुलनेत मी पण काही कमी नाहीये बरं का... असं सांगत जणू जवळ्या आपल्या सावलीने मार्कंड्याला झाकू पाहत होता. त्या सह्याद्रीच्या राकट भांडणात आपण कशाला पडा? आम्ही आपलं त्यांच्या ह्या लुटुपटूच्या लढाईकडे सरळ दुर्लक्ष केलं. आपल्याला काय दोघेही सारखेच, नाही का?

पाठारामागे डोकावणारा जवळ्या
ताठ मान करून उभा जवळ्या

विस्तीर्ण पठार आपली घडी हळू हळू उलगडत असतानाच मागून हळूच जवळ्याने डोकावून बघितलंन. ह्या किल्ल्याच्या वाटेला लागलो आणि काही वेळातच पठार सोडून वर किल्ल्याकडे मोर्चा वळवला.

किल्ल्याच्या पोटातलं भुयार

किल्ल्याच्या वाटेवर एक भुयार आहे. काहीही गरज नसताना उगाचच त्या भुयारात जाऊन आलो. म्हणजे तसं आम्ही नेहमीच प्रत्येक गोष्ट उत्साहाने बघतोच, अर्थात धोका नसेल तरच. ह्यापुढे कड्याजवळूनच चिंचोळी वाट वरच्या बाजूला जाते. वाटवरून वर येता येता उजव्या बाजूला रवळ्या दिसत राहिला.

पलीकडे रवळ्या आणि धोडप
कातळटप्पा

इथल्या कातळटप्प्यावर तटबंदीचे अवशेष आहेत. कातळतप्पा तसा फार अवघड नाही. पण दोर असल्यास उत्तम. आम्ही तर ठरवूनच दोर नेलेला होता आणि तोही तिथेच ठेवण्यासाठी. तो लावला आणि पटकन वर चढून आलो. वारा प्रचंड होता. वातावरणही चांगलं असल्याने पलीकडे रवळ्या आणि त्याच्या मागे आपल्या खास आकारात लक्ष वेधून घेत धोडप, असं चित्र निसर्गाने मांडून ठेवलं होतंन.

बाबापूर खिंड उर्फ मुळाणेबारी, मार्कंड्या आणि वणीचा डोंगर-किल्ला

सगळ्यात आधी किल्ल्याचा माथा गाठला. वाटेवर कारवीतून वाट काढावी लागली, नक्की कोणत्या दिशेने चाललोय ह्याचा अंदाज बांधत. पण पोचलो एकदाचं! ज्या बाजूने चढाईला सुरुवात केली ती बाबापूर खिंड उर्फ मुळाणेबारीकडे नजर टाकली. पूर्ण मार्कंड्या आता उन्हात चमकत होता. मस्तकावर मार्कंडेय ऋषींचं मंदिर मोठ्या दिमाखात मिरवत होता. त्याच्या पलीकडे "इकडे पण लक्ष असुद्या बरं, साडेतीन शक्तीपिठातलं एक असं महत्व आहे माझं. साक्षात देवी सप्तशृंगी वास करते" असा वणीचा डोंगर-किल्ला. चाहुबाजूचं दृश्य बघत बसावं असं ते ठिकाण. ह्या बाजूला ही अध्यात्मिक स्थानं, तर मागच्या बाजूला भौगोलिक विविधता दर्शवणारे रवळ्या आणि धोडप रांग.

पाण्याची टाकी

मन भरलं आणि पावलं सवयीने गड फिरवू लागली. ह्या गडावर किल्लेपण दर्शवणारे अवशेष म्हणजे थोडके शिल्लक तटबंदीचे दगड आणि पाण्याची टाकी.

फोटोसाठी परत चढाई.. हाय काय, नाय काय!

गडफेरी करून परत कातळटप्प्यावर आलो. येताना दोर लावलेला असल्याने उतरताना त्रासच नव्हता. त्यात अजून काही जणंही आमच्या नंतर आलेले त्यांनी त्यांचाही दोर लावलेला होता. त्यामुळे कठीण काही राहिलंच नव्हतं. उलट खाली उतरल्यावर फक्त फोटोसाठी परत अर्ध्यात चढलो. आता ऊन चांगलंच चढायला लागलं होतं. दिवस हिवाळ्याचे असले तरी ११ वाजून गेल्याने सूर्य त्याप्रमाणेच काम चालू ठेवणार ना.. मोर्चा रवळ्याकडे वळवला.

तिवारी वस्ती आणि पाणवठा

ह्या पठारावर तिवारी लोकांची वस्ती आहे. ते मोसमी मुक्कामी असतात, इतर वेळी नाशकात स्थलांतरित झालेले आहेत. जवळ्याकडून रवळ्याकडे जाताना हे वस्तीतले लोक भेटतीलच. जवळ्या उतरायला सुरुवात केली. वाटेत त्यांची घरं लागली आणि लहानश्या पाणवठ्यावर काही लोकही दिसली. सरळ किल्ल्याच्या वाटेला लागलो. आता इथे वस्ती आहे म्हणजे त्यांची शेती किंवा जमीन असणारच. तसं कुंपणही दिसलं. रस्ता तिथूनच जातो. एक बेडं ओलांडून चालत राहिलो. गवत फार वाढलेलं असल्याने बरोबर जात आहोत ना, हा विचारही येऊन गेला. पण किल्ला समोरच होता, फार फरक पडणार नव्हता, जरा इकडे तिकडे झालो वाटेवर तरी. हळू हळू चढ लागला आणि मागे वळून पाहिल्यावर मार्कंड्या आणि वणीच्या जोडीला जवळ्याही आला.

वाटेवरच किल्ल्याच्या पोटातली पाण्याची टाकी

उध्वस्त पायऱ्या लागल्या आणि डोंगराच्या मागचं किल्लेपण समोर आलं. काही वेळातच पाण्याची टाकी पण दिसली. उन्हं डोक्यावर होतीच. बाटल्यात पाणी भरून घेतलं.

कातळटप्पा

पुढे कातळतप्पा आला. मूळ पायऱ्या आता शिल्लक नव्हत्या, तर त्यांचे उरलेले अवशेष समोर होते. त्या जरी तुटलेल्या असल्या तरी आपल्यासारख्यांना त्यावरून जायला पुरेश्या होत्या. पुढे असलेल्या पायऱ्या मात्र बऱ्यापैकी शिल्लक होत्या. पायऱ्या चढून एका छोट्याश्या फोडलेल्या कातळातूनच रस्ता वर जातो.

दरवाजा आणि शिलालेख
दरवाजाची सध्याची अवस्था

इथे एक शिलालेख आहे. तो फारसी/अरेबिकमध्ये असल्याने मी गप इमानेइतबारे फक्त फोटो काढला.

बुरुज

वर पोचलो आणि समोर एक बुरुज बघायला मिळाला. चला, आधीच्या किल्ल्यापेक्षा इथे जास्ती अवशेष पाहायला मिळत होते.

जवळ्या, मार्कंड्या आणि वणीचा डोंगर-किल्ला
धोडप रांग

आजूबाजूचा परिसर आता ईथुनही न्याहाळला. फक्त आता उन्हामुळे सकाळच्या इतका तो प्रसन्न न वाटता रुक्ष भासला.

जोड-टाकी आणि विश्रांतीसाठी सावली
अजून काही टाकी

त्यात वरती सावलीला झाडीच नव्हती. म्हणजे अजूनच रखरखाट. अवशेष पाहत पाहत पाण्याच्या टाक्यांजवळ आलो. इथे मात्र मस्त एक झाड आपली सावली जणू अमच्यासाठीच पसरून बसलेलं असावं असं वाटलं. इथे निवांत बसून थोडी विश्रांती घेतली. दुसरी जागाच कुठे होती तशी टेकायला सावलीची.. विश्रांती नंतर आजूबाजूला काही पाण्याची टाकी शोधून शोधून पाहिली. अवस्था फार चांगली दिसली नाही. गवत वाढलेलं, गाळ साचलेला आणि सफाई नसल्याने वरून मातीही पडलेली. त्यामुळे पाणी पिण्यालायक राहिलेलं नाही बऱ्याच टाक्यातलं.

दरवाजातून खालचं दृश्य
डोंगराच्या पोटातल्या गुहा

ह्या गडावर एवढेच अवशेष आहेत. त्यामुळे इथे विश्रांती घेऊन परतीचा प्रवास चालू केला. आलो त्याच वाटेवरून परत खाली उतरायला सुरुवात केली. आता पठारापर्यन्त जाताना आलेल्या वाटेनेही जाता येऊ शकत होतं, पण तसं जायचंच नव्हतं आम्हाला. मध्येच आलेली वाट सोडली आणि डावीकडची वाट पकडली. ह्या बाजूला काही गुहा कोरलेल्या आहेत. उन्हाने तापलो होतो आम्ही. त्यात आमच्याकडे निवांत वेळ होता. दुपारचे २ वाजले होते. आता काय इथून पठारावर आणि तिथूनही खाली उतरायचंच होतं. चढ लागणार नव्हता आणि दमछाक होईल असाही काही टप्पा नव्हता पुढे. सगळे निवांत पडले. चक्क १ तास तिथेच काढला आम्ही. निघाल्यावर मग मात्र २० मिनिटांत पठारावर आलो.

पठारावरून रवळ्या
पाण्याची कुंड

त्यातही आलेल्या वाटेने न जाता जवळ्याला प्रदक्षिणा मारायची असं ठरलेलं होतं. त्यामुळे आता जवळ्याला डावीकडे ठेवत जरा लांबचा रस्ता घेतला. ह्या बाजूला प्यायच्या पाण्याचं कुंड, शेजारी दगडी द्रोण हेही आहे. पाणी पिऊन भरूनही घेतलं. निवांत असल्याने वाटेत भेटलेल्या लोकांशी गप्पाही मारता आल्या. काही समाधी सदृश्य बांधकामही दिसलं.

समाधी आणि वास्तू
समाधी आणि वास्तू

खरं तर इतस्ततः पसरलेले घडीव दगड, मजबूत समाध्या अश्या गोष्टी पाहता, ह्या इथे कश्या आल्या हाही प्रश्न मनात येतच होता. अश्या गोष्टी काहीही आखणी न करता इकडे तिकडे उगाच थोडीच बांधल्या जातात? म्हणजे एक तर मूळ जागा दुसरीकडे तरी असावी आणि कशाही प्रकारे त्यांना इथवर आणलं गेलं असावं. किंवा इथेच त्यांची मूळ जागा असेल, पण आजूबाजूची जागा त्याला सुसंगत दिसत नव्हती. काहीतरी अभ्यास गरजेचा आहे ह्यावर. काही दगड तर मंदिराचे वाटले. एकूणच ह्या वास्तू पाहता, इथेच काहीतरी मोठे बांधकाम आणि आखणी करून बांधणी केलेली असणार हीच शक्यता वाटते. सध्या मात्र त्याचं मूळ स्वरूप उघड करण्यासाठी अभ्यास आणि कदाचित त्याला अनुसरून सफाई गरजेची आहे.

ह्या बाजूने त्या पठाराची दुसरी बाजूही बघता आली. जवळ्याचीही इकडून दिसणारी बाजू पाहता येत होती. भेटलेल्या गावकऱ्यांशी बोलत, नवनवीन झाडंही बघत, आम्ही निवांत चाललेलो. मध्ये मध्ये तर चक्क चरायला सोडलेल्या गुरांशीही जरा चर्चा झाली. म्हणजे त्यांना समजेना की आम्हाला कुठे जायचंय आणि आम्हाला समजेना की त्यांना कुठे यायचंय. मग नजरो ही नजरोमे बात हुई आणि आपापल्या वाटेने दुसऱ्याला त्रास न देता गेलो.

ना अनपेक्षित वळण, ना कहानीमे ट्विस्ट, ना काही विशेष घटना... साधं सरळ नियोजन, साधी सरळ भटकंती आणि साधे सरळ अनुभव... असा पद्धतशीर पण निवांत, पूर्ण अवशेषांसह पण त्याचाच आनंद घेत अशी ही जोडकिल्ल्यांची भेट वेळेत संध्याकाळी संपली. अर्थात रात्रीचा प्रवास, अपरात्री ठरलेल्या ठिकाणी पोचून एकांतात चांदण्यांच्या छपराखाली मुक्काम, उजाडायच्या आधी उठून शांतता आणि अपरिचित ठिकाणाचा अनुभव, Whole वावर is our, असंच वाटावं अश्या ठिकाणी पहाटेचा गरम चहा! भटकंती समृद्ध होतेच की...

नाशकातल्या भेट देण्याचा राहिलेल्या किल्ल्यांच्या यादीतील दोन किल्ले कमी झाले आणि तेवढ्याच मापाचं समाधान खात्यात जमा झालं!
 
 
  
 रवळ्या-जवळ्या
 
रवळ्या-जवळ्याची नावे ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर येते ती मराठी सिनेमामधील ढवळ्या-पवळ्याची बैलजोडी. पण ती आहे बैलजोडी, तर ही आहे किल्ल्यांची जोडी. रवळ्या-जवळ्या हे दोघेही एकमेकांवर प्रेम करणारे. एवढे की एकावर कुणी हल्ला केला तर दुसरा लगेच लढायला सज्ज. खरोखर किती नवलाईची गोष्ट आहे? निसर्गाची अद्भुत किमया... महाराष्ट्रातील किल्ल्यांची वैशिष्ट्ये सांगायची तरी किती... कुठल्या किल्ल्यांवर भरपूर वास्तू आहेत, तर कुठे जंगल आहे, तर कुठे केवळ कडेच आहेत; तर कुठे मंदिर आहे, कुठे फक्त पाण्याची टाकी, तर कुठे गुहा आहेत; तर कुठे भलं मोठं पठार आणि काय नि काय !.. किल्ल्यांवर पठार असणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे. मात्र पठारावर किल्ले असणे ही मात्र साधी गोष्ट नाही. रवळ्या-जवळ्या देखील अशाच एका मैलोन्मैल पसरलेल्या पठारावर कायम खडा पहारा देत उभे आहेत. एखादा किल्ला खरोखर मनात घर करून बसतो आणि मग आपण त्यात फसतो, असला काहीसा प्रकार माझा रवळ्या जवळ्याच्या बाबतीत झालेला आहे. नाशिकपासून अवघ्या ५० कि.मी.वर असणारे हे किल्ले एका दिवसात सहजपणे पाहून येण्यासारखे आहेत. मात्र एवढ्या सुंदर ठिकाणी केवळ एका दिवसातून परत येणे म्हणजे या किल्ल्यांचा तर अपमानच आहे. पण इथल्या निसर्गाचा देखील अपमान आहे.
नाशिकपासून वणी सुमारे ४० कि.मी.वर आहे. वणी गावातून बाबापूर-मुळाणे मार्गे एक रस्ता कळवणला जातो. या रस्त्यावर बाबापूर नावाचे एक छोटेसे गाव आहे. या गावातून १५ मिनिटांवर एक घाट चढून गेल्यावर खिंड लागते. या खिंडीला बाबापूरची खिंड असे म्हणतात. मार्कड्याचा डोंगर आणि रवळ्या जवळ्याच्या
पठाराची डोंगरसोंड या ठिकाणी एकत्र आल्यामुळे ही खिंड तयार झालेली आहे. क गावापासून हे अंतर साधारणपणे १० कि.मी. आहे. खिंडीत डावीकडे महादेवाचे छोटेसे मंदिर आहे. या मंदिराच्या मागच्या बाजूने पायऱ्यांची एक वाट मार्क किल्ल्यावर जाते. तर रस्त्यापलीकडची उजवीकडची वाट रवळ्या जवळ्याकडे जाते पावसाळा संपल्यावर रवळ्या जवळ्याचा टेक म्हणजे एक सुखद अनुभव आहे कारण पठारावर इवलीइवलीशी गवताची रोपे वाऱ्यामुळे डोलत असतात. पावलापावलांवर सोनकीची, पांगळ्याची. डिंगळ्याची आणि घाणेरीची फुलं आढळतात. केवळ फुलेच नाही. तर वेगवेगळ्या प्रकारची औषधी वनस्पती देखील या परिसरात आढळतात.
 
खिंडीतून किल्ल्यावर चढताना अर्ध्यातासाच्या खड्या चढाईनंतर वाट डावीकडे वळण घेऊन डोंगराच्या कड्यापाशी येते आणि तिथून उजवीकडे वळते. आता हळूहळू मार्कड्याचा डोंगर दिसेनासा होतो. थोडा चढ चढून गेल्यावर लगेच आपण रवळ्या-जवळ्याच्या पठारावर पोहोचतो. या पठारावर पोहोचल्यावर लक्षात येतं की, दिलेरखानाने किंवा महाबतखानाने या किल्ल्यांना कसा वेढा घातला असेल. मैलोन्मैल पसरलेल्या या पठारावर मध्यभागी दोन किल्ले उभे आहेत, ज्यांना वेढा घालायचा म्हणजे संपूर्ण पठाराला वेढा घालावा लागेल आणि जी खरोखरच अशक्य कोटीतील गोष्ट आहे. कारण या संपूर्ण पठाराला वेढा घालयचा असेल, तर किमान लाखभर सैन्य हवे आणि जर कमी सैन्य असेल तर हे किल्ले जिंकण्यासाठी गनिमीकाव्याशिवाय दुसरा उपाय नाही. गनिमीकावा हा असा प्रकार आहे, जो मोगलांना कधीच जमला नाही. त्यांना केवळ किल्ल्यांना वेढा घालून जिंकणे हेच तंत्र अवगत होते आणि रवळया-जवळ्याच्या बाबतीत देखील हेच झाले.
रवळ्या-जवळ्याचा पहिला उल्लेख मिळतो तो, अब्दुल हमीद लाहोरीच्या 'बादशहानामा' ग्रंथात. शहाजी राजांच्या पाडावासाठी मुघल बादशहा शहाजहान याने इ.स. १६३५-३६ मध्ये खानदौरान, खानझमान व शाहिस्तेखानास पाठविले होते. शाहिस्तेखानाकडे नाशिक-त्रिंबक भागातील किल्ले जिंकण्याची जबाबदारी दिली होती. त्याच्या हाताखालच्या अलावर्दीखानाने १६३६ मध्ये हा जुळा किल्ला जिंकून घेतला. बादशहानामामध्ये याचा उल्लेख 'रोला-जोला' असा केला आहे.
नोव्हेंबर १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटले, त्या सुमारास रवळा-जवळा किल्ला घेतला. त्यामुळे इ.स. १६७१-७२ च्या सुमारास दिलेरखानाने या गडाला वेढा घातला. तो मराठ्यांनी उठविला. सभासद याबद्दल म्हणतो. दिलेरखान येऊन रवळाजवळ्यास लागले. गडकरी वर भांडले. मोठ युद्ध जाले. गड हातास
नाही. मोरोपंत पेशव्यांनी उपराळियास मावळे लोक बारा हजार रवाना केले. दांनी जाऊन छापे घातले. ऐसा घाबरा केला. यावरून मोगलांना मागे हटावे लागले सिद्ध होते. यानंतर दुसऱ्यांदा मोगल सरदार महाबतखान हा गड घेण्यासाठी आला. त्याने पुन्हा किल्ल्याला वेढा घातला. मे १६७१ मध्ये त्याने रवळ्या-जवळ्यासह कंड्या आणि अचला हे किल्ले वेढा घालून घेतले. पुढे पेशवेकालात या किल्ल्यांचा बाबा पुन्हा मराठ्यांकडे आला.
इ.स. १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात प्रतिकाराशिवाय आला. यानंतर नाशिकचा कलेक्टर कॅप्टन ब्रिग्ज हा किल्ल्यावर गेला. जुलै १८१९ मध्ये कॅप्टन मकिन्टॉशने रवळ्या किल्ल्याची तटबंदी आणि पायऱ्या तोफांनी उद्ध्वस्त करून हा गड चढता येणार नाही असा करून टाकला.
आपण हा इतिहास आठवत पठारावरून पावले भराभर टाकत पुढे निघायचे. या पठारावर आल्यावर प्रथमदर्शनी एका महाकाय डोंगराचे दर्शन होते, त्याला रवळ्या असे म्हणतात. आपली पुढची वाट या रवळ्याला डाव्या हाताला ठेवून जंगलात शिरते. पठारावरील हे जंगल बऱ्याच अंशी दाट आहे. त्यात करवंदी, बाभळी, हरडा आणि सागाचे प्रमाण जास्त आहे. तासभराच्या चालीनंतर आपण रवळा आणि जवळा या दोहोंमधील खिंडीमध्ये पोहोचतो.
या खिंडीमध्ये तीन ते चार घरे आहेत. यांना 'तिवारी वस्ती' असे म्हणतात. वस्तीचे नाव तिवारी का? तर, ते काही ठाऊक नाही, पण जो कोणी तिवारी आहे, तो काही इथे राहत नाही. वर्षातील चार-सहा महिने खालच्या गावातील लोक गाई-म्हशींना चारा खाऊ घालण्यासाठी या पठारावर येतात. गाई-म्हशी या पठारावर चरतात आणि दूध देतात. त्यांच्या दुधापासून हे लोक खवा बनवतात आणि नाशिकच्या बाजारपेठेत जाऊन तो विकतात. काही हौशी लोक हा खवा घेण्यासाठी नाशिकहून इथपर्यंत येतात. पावसाळा संपल्यानंतर संक्रांतीपर्यंत, तर कधी होळीपर्यंत हे लोक इथं असतात. या वस्तीच्या समोर लांबवर रामजीचा कण्हेरगड आहे, तर डाव्या हाताला रवळ्या आहे, आणि उजव्या हातास जवळ्या आहे. त्याच्या मागे पुन्हा पठार आहे. पठाराखाली मुळाणे बारी नावाचे खेडे आहे. तर त्याच्या पलीकडे धोडपचा किल्ला. असा सर्व नयनरम्य परिसर इथून दिसतो.
या जोडगोळीपैकी सर्वांत कठीण किल्ला प्रथम सर करायचा, म्हणून आम्ही आमचा मोहरा रवळ्याकडे वळविला. वस्तीच्या समोरून एक वाट तिरक्या रेषेत जंगलात शिरते आणि रवळ्या किल्ल्याकडे जाते. रवळ्याकडे जाणारी वाट म्हणजे दिसल देखी  बाभळी आणि करवंदाच्या काट्यांची सोबत. वाट अवघी २० मिनिटांची आहे. थोडे चढून गेल्यावर वाटेच्या आडबाजूला कातळात खोदलेली एक गुहा लागते. त्याच्या पद एक घळ लागते. त्यात सोपे चिमणी क्लायंविंग करून वर चढायचे. वर चढ्न गेल्यावर एक झाड लागते. अन झाडाच्या मागे एक कातळकडा आहे. या कड्यावरून किल्ल्यावर जाणारी वाट थोडीशी कठीण आहे. पूर्वी किल्ल्यावर जाण्यासाठी पायया होत्या. त्या मॅकिंटॉश नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने तोडून टाकल्या. आज जरी इंग्रज आपल्या देशात नसले तरी त्यांचे परिणाम मात्र आपल्यासारख्या टेकर्सला भोगावे लागत आहेत. याचे हे जिवंत उदाहरण आहे. विशेष म्हणजे हा कातळकडा चढण्यासाठी दोर लावण्याची कुठेही सोय नाही. कड्याच्या एका कोपऱ्यात 'गणपती बाप्पा'ची एक मूर्ती कोरून त्यावर शेंदूर फासलेला आहे. आपणही गणपती बाप्पा मोरया म्हणून सावकाशपणे नराचा वानर होऊन कातळटप्पा चढायला सुरुवात करायची.
रवळ्याचा माथा बराच प्रशस्त आहे. त्यावर फारसे कुणाचे येणे-जाणे नसल्यामुळे सर्वदूर गवत माजलेले दिसते. महाराष्ट्रातील बऱ्याच किल्ल्यांवर जसे गावकरी सर्व गवत पेटवून देतात आणि त्याचसोबत हिरवी झाडे-झुडपेही जळून खाक होतात, तशीच परिस्थिती रवळ्यावरही आढळते. ही गवत जाळण्याची वाईट प्रथा बंद होण्यासाठी तुम्हा-आम्हा ट्रेकर मंडळींनी गड-किल्ल्यांच्या परिसरातील वाड्यांमधील लोकांचे प्रबोधन करणे फार गरजेचे आहे.
किल्ल्याच्या माथ्यावर अवशेष थोडकेच आहेत, आणि जे आहेत ते गवतात लपलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने थोड्याफार घरांचे, वाड्यांचे चौथरे दिसतात. त्याशिवाय दोन सुकलेली पाण्याची टाकी आहेत. रवळ्याचा घेरा प्रचंड मोठा आहे, त्यामुळे त्यावर फेरफटका मारण्यास पाऊण तास सहज लागतो. रवळ्या किल्ल्यावरून मार्कंड्याचा डोंगर, सप्तशृंगीचा डोंगर आणि कण्हेरगड असा सर्व परिसर दिसतो. खरे तर हे सातमाळा रांगेचे एक वैशिष्ट्य आहे की, कुठल्याही एका डोंगरावर उभे रहा म्हणजे चार-दोन किल्ले तुम्हाला दिसल्याशिवाय राहणारच नाहीत.
आपला फेरफटका मारून झाल्यावर आल्या मागनि जरा जपून कातळकडा उतरायचा आणि पठारावरील तिवारी वस्ती गाठायची. वस्तीच्या डाव्या अंगाला चालून गेल्यावर कातळात खोदलेले एक पाण्याचे टाके आहे. हे या पठारावरील एकमेव पिण्याच्या पाण्याचे टाके. टाक्याच्या समोर एक दगडी रांजण पडलेला  दिसतो. त्याचे इथले प्रयोजन काही समजत नाही. कदाचित नाणेघाटासारखा हा देखील पूर्वीच्या काळचा एखादा व्यापारी मार्ग असावा. असो!
बस्तीपासून जवळा किल्ला बऱ्यापैकी लांब असल्याने आपण इथल्या पाणवठ्यावरून भरून घ्यायचे आणि जवळ्याची वाट धरायची. पठारावरील तिवारी वस्तीपासून जवळ्यावर जाण्यास दोन मार्ग आहेत. वस्तीच्या अमोर एक डोंगरधार आहे, ती चढून जवळ्याचा कातळकडा उजव्या हाताला ठेवून कडा संपेपर्यंत चालायचं. पुढं आणखी एक वाट याच वाटेला येऊन मिळते. दुसरी बाट पठारावरून जवळ्याला उजव्या हातास ठेवून जंगलात शिरायचे. थोड्या वेळाने जंगल जिथे विरळ होते, तिथे एक डोंगरसोंड खाली उतरलेली दिसते. या डोंगरसोंडेवरून चढून जायचे, मध्ये कड्यात खोदलेली गुहा लागते. या गुहेची खोली काही जास्त नाही, पण त्यात ५ ते ६ खांब आहेत. गुहेच्या बांधणीवरून इथे लेणी खोदण्याचा प्रयत्न केलेला असावा असे वाटते. थोडे अंतर पुढे गेल्यावर या वाटेला पहिली वर सांगितलेली वाट येऊन मिळते. जिथे या सर्व वाटा येऊन मिळतात, तिथून पुन्हा थोडी चढाई करून उजवीकडे वळायचे. इथे छोटासा प्रस्तरारोहणाचा टप्पा पार करून आपण किल्ल्याच्या दरवाज्यात पोहोचतो. दरवाजा खूप थिटुकला आहे. दरवाज्याच्या बाजूला एक फारसी शिलालेख आहे, यात अलावर्दीखानाने रवळ्या जवळ्या आणि धोडपसह सातमाळ रांगेतील जिंकलेल्या किल्ल्यांचा उल्लेख मिळतो. या दरवाज्याचे वैशिष्ट्य म्हणजे उभा कातळ फोडून त्यातून दरवाजा कोरून काढला आहे.
दरवाज्यातून वर जाण्यासाठी कातळकोरीव पायऱ्या खोदलेल्या आहेत. या पायऱ्यांनी वर चढून गेले की, आपण थेट जवळ्याच्या माथ्यावर पोहोचतो. जवळ्या किल्ल्याचा माथादेखील रवळ्यासारखा सपाट आहे. फक्त मध्ये एक उंचवटा आहे. या उंचवट्याच्या एका टोकाला पायथ्याशी तीन पाण्याची टाकी आहेत. ही टाकी बऱ्याच मोठ्या आकाराची आहेत. यांपैकी एक टाके खांब टाके या प्रकारातील आहे, मात्र त्यामधील पाणी पिण्यायोग्य नाही. या टाक्यांच्या खालच्या बाजूस काही पाण्याची टाकी दिसतात. मात्र ती सर्व सुकलेली आहेत. माथ्यावर फेरफटका मारल्यावर काही वाड्याहुड्यांचे अवशेष पाहावयास मिळतात. जवळ्यावर फेरफटका मारायला तासभर पुरेसा होतो. जवळ्यावरून धोडपपासून थेट इंद्राईपर्यंतचा मुलूख दिसतो. हा सर्व अप्रतिम नजारा पाहावयाचा आणि जमले तर कॅमेरामध्ये टिपून, आल्यापावली तिवारी वस्तीत परतायचे. वस्ती गाठेपर्यंत चांगलाच अंधार दाटलेला असतो. वस्तीच्या ठिकाणी दोन झोपड्या आहेत, त्यात कुणी राहत नसेल तर, तिथे झोपायला मिळू
शकते. नाहीतर सर्व पठार आपली भूमी असल्यामुळे त्यावर आपली पथारी अंथरायची आणि ताणून द्यायची.
किल्ल्याची उंची : समुद्रसपाटीपासून रवळा १३३२ मीटर (४३६९ फूट), जवळा १२३६ मी. (४०५५ फूट)
तालुका : कळवण
किल्ल्याची श्रेणी : जवळ्याची चढाई मध्यम आहे, तर रवळ्याची चढाई कठीण प्रकारात मोडणारी आहे. किल्ल्याची इतर नावे रोला-जोला, रवळागड-जवळागड
डोंगररांग : सातमाळा
पायथ्याची गावे : बाबापूर खिंड, मुळाणे बारी पायथ्याच्या गावापासूनचे अंतर बाबापूर खिंडीपासून तीन तास
जवळचे एस.टी. स्थानक : वणी, कळवण
राहण्याची सोय पठारावरील तिवारी वस्तीमध्ये दोन झोपड्या आहेत. त्यात राहता येऊ शकते.
जेवणाची सोय : जेवणाची सोय नाही.
पिण्याचे पाणी पठारावर पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. यात मार्चपर्यंत पाणी मिळू शकते.
जाण्यासाठी उत्तम कालावधी: जून ते मार्च.
किल्ला फिरायला लागणारा वेळ दोन्ही किल्ले फिरायला सुमारे ७ तास पुरतात.
जवळपासची गावे : बाबापूर, मुळाणेबारी, वणी.
 
 
 वीस मिनिटात मुलाने बारीकडील नाकाडावर.. आणि पुढे गुडघा दुखू लागल्याने.. अर्ध्या तासात खाली.. मुलाने बारीत पोचलो तेंव्हा चार वाजून गेले होते.. रवळ्या-जावल्याचं स्टेशन आता दूर-दूर वाटू लागलं.. सातमाळा एक्स्प्रेसचा एक (सिनियर सिटीझन्स साठी आरक्षित गुडघेदुखीवाला) डबा या मुलाने बारीत घसरणार अशी शक्यता निर्माण झाली.. मग ब्यागेतील नी-कॅपची आठवण झाली.. बघू काय फरक पडतो का ते.. चिमित्कार झाला चिमित्कार.. “तांबडे बाबा चेन्नई एकस्प्रेस्वाले”.. यांच्या कृपेने दिव्य चिमित्कार झाला.. आणि मार्किंड्या वर दुडूदुडू पडणारी पावले या नी-कॅप मुळे भराभरा पडू लागली.. रवळ्या-जावळ्याची भेट घडेल याची शाश्वती दहा मिनिटात वाटू लागली..    
मुलाने बारीत बाबाजींकडे लाडक्या यशवंती गाडीला सोडून.. मार्किंड्याकडे पाठ करून समोरच्या डोंगराकडे निघालो.. खिंडीतून डोक्यावर दिसणाऱ्या डोंगराच्या.. डाव्या अंगाने तिरपी वर जाणारी मळलेली वाट आहे.. साधारण २०-२५ मिनिटांची मध्यम चढण पार करताच आपण एका पोर्टेबल पठारावर येतो… इथून पुन्हा तिरपी वाट आपल्याला.. एका समोरच्या आडव्या कातळपट्ट्यासमोर घेवून येते.. इथवरच्या प्रवासात कण्हेर-मार्किंड्या-रवळ्या-जावल्या आणि धोडप या डोंगराच्या मधोमध लांबच्या लांब पसरलेले खोरे सतत डावीकडे दिसत असते.. समोरच्या कातळाला आता गवसणी नं घालता.. काटकोनात डावीकडे वळणाऱ्या पायवाटेने निघायचं.. आता हा समोरचा डोंगर आपल्या उजव्या बाजूला येतो.. मग पुन्हा तिरपी चढण घेत.. या कातळाच्या मध्यावर पोचायचं मग वाट पुढे सरळ जाताच आणखी एक कातळ पुढ्यात येतो.. इथे उजवीकडे जाऊन मग डावीकडची वळताच.. कातळ टप्पा लागतो हा चढला कि आपण रवळ्या-जावळ्याचे पठार गाठले म्हणून समजा.. मार्किंड्या झालेला टाईमपासची इथे भरपाई करायची म्हणून सातमाळा एक्स्प्रेसचे रवळ्याकडे जाताना लागणारे स्टेशन बायपास करण्याचे उप्या आणि दादा यांनी ठरवून टाकले होते.. पठारावर पोहोचताच.. किरकोळ चढणीचे टेकाड पार करताच रवळ्याचा डोंगर समोर मधोमध दिसू लागला.. इथे.. या डोंगराच्या उजव्या बाजूची वाट धरायची.. हि वाट पठाराच्या उजव्या काठाने जाते.. उजवीकडे.. या वाटेवर चालताना उजवीकडे वणी-धोडांबे पर्यंतचा परिसर दिसत राहतो आणि डावीकडे खुरट्या झुडुपांचे जंगल.. हि वाट या जंगलाला खेटूनच समांतर पुढे जाते.. अर्ध्या तासाच्या चालीनंतर आपण पठारावर रवळ्या आणि जावल्या यांच्या मधल्या टप्प्यात येवून पोहोचतो.. इथे दोन घरांची तिवारी वसती आहे.. अनंतभाऊनी मंडळासाठी लाकूडफाटा गोळा करून आणला होता.. तिवारी वसतीच्या अलीकडे रवळ्याला खेटूनच पठारावर ब्यागा टेकवल्या.. या पेक्षा उत्तम जागा शोधण्यापेक्षा इथेच तंबू टाकण्याचे नक्की केले.. इथे आजूबाजूला फेरफटका मारला आणि एका खडकाच्या मध्येच चूल शोधून काढली.. इकडे कार्यकर्ते तंबू उभारण्यात मग्न झाले होते तर तिकडे सूर्य रवळ्याच्या मागे अंतर्धान पावला होता.. जावल्या मात्र दोन हात दूर होता.. जणू खट्टू झाला होता तंबू पलिकडे टाकल्याने.. म्हटलं येनार.. येनार उद्या नक्की येनार.. न येवून कुठं जाणार.. पठारावर दिसणाऱ्या रवळ्या-जावळ्या जोडीचे वर्णन भाऊंच्या भाषेत सांगायचं तर.. “एक घाव दोन तुकडे.. एक गड (रवळ्या) इकडे आणि एक तिकडे (जावळ्या)”
सातमाळा एक्स्प्रेस आज तिवारी वस्तीवर मुक्कामी राहणार होती.. इकडे कार्यकर्त्यांनी पठारावरील जमुना टाक्याजवळ तंबू उभारला होता आणि चहासाठी काय दुधाची सोय होईल का ते पाहण्यासाठी मी आणि अनंतभाऊ तिवारी वसतीकडे निघालो.. या तिवारी वस्तीत म्हशींचा जोरदार राबता आहे.. त्यामुळे चहासाठी धारोष्ण दुध आयतेच मिळणार होते.. यंदा रवळ्या-जावळ्या च्या या दर्दी पठारावर.. मास्टर शेफ म्हणून अनंतभाऊनी सूत्रे हाती घेतली.. चुलीसाठी दगडांची शोधाशोध सुरु झाली तसा तंबूच्या मागे एका जमिनीतून बाहेर डोकावणाऱ्या खडकाच्या इथे एक नैसर्गिक रित्या चूल तयार झाल्याचे दिसले.. खडकाचा आडोसा आणि दोन-तीन दगडांची रचना.. इथे पातेले ठेवून या नैसर्गिक चुलीचे टेस्टिंग करण्यात आले.. २-३ टेक नंतर भांडे व्यवस्थित बसले आणि हि चूल आता मंडळाची झाली.. अनंतभाऊ मास्टर शेफ.. दिपकभाऊ मदतनीस.. नितीनभाऊ पाणक्या.. मी रिकामटेकडा.. उप्या झाला जेवण टेस्टर.. सुरुवात चहाने झाली.. तिवारी वस्तीतील म्हशीचं धारोष्ण दुध आणि मंडळाचा चहा हा अस्सा त्या रेडीमेड चुलीवर ढणढणु लागला कि त्याचा दरवळ पार तंबू फाडून आत आला.. फक्कड चहाने.. दिवसभराचा शिणवटा असा अंतर्धान पावला.. की आता उजेड असता तर तासाभरात रवळ्या सर केला असता.. यंदाच्या जेवणाला ‘मिक्स व्हेज म्यागी’ ची सुप्रीम रेसिपी आज अनंतभाऊना सुचली आणि बस्स दो मिनिट में रेसिपी तयार झाली.. साडेआठ ला जेवण करून मंडळी आडवी झाली.. पठारावरची निरव शांतता मनाला अंतर्मुख करून गेली.. शांततेच्या बाबतीत या पठाराचा नंबर म्हसाईच्या पठारानंतर लावायला हरकत नाही.. डोळ्यांवरची झापड गाढ झोप कधी झाली हे कळलंच नाही.. सकाळी रवळ्या-जावल्या करून रात्री पर्यंत धोडप च्या सोनार माचीवर पोहोचायचं याबद्दल सगळ्याचं एकमत झालं..
खडतर रवळ्या- बेलाग जावळ्या – “हि दोस्ती तुटायची न्हाय”

वाटाड्या मार्ग क्र. ६: वणी – (वणी-कळवण रोड) – बाबापूर – मुलाने गाव– मुलन बारी/घाट – खिंड – (१२-१४ कि.मी.) – उजवीकडे – तिवारी वस्ती – रवळ्या-जावळ्या
आधल्या दिवशीचा उशीर भरून काढण्यासाठी नितीनभाऊंनी सकाळी सहाला वेक-अप कॉल दिला.. अर्ध्या तासात सगळे तयार झाले.. रवळ्या वर प्रथम आरोहण मग जाव्ल्याची भेट असा दोनपदरी कार्यक्रम होता.. तिवारीवसती समोर पश्चिमेकडे तोंड करून उभे राहिल्यास रवळ्या चा पूर्वेकडची आडवी भिंत दिसते.. खाली खुरट्या झाडीचे जंगल.. आपली वाट या भिंतीच्या खाली दिसणाऱ्या जंगलझाडीत (साधारण मध्या तून चालू होते.. सुरुवातीची झाडांची रांग ओलांडली कि थोडं इकडे तिकडे फेरफटका मारताच एक वाट डावीकडे वर जाताना दिसते.. हि रवळ्या पूर्वेकडील टेकाडाला डावीकडे वळसा मारीत तिरपी वर जाते.. पुढे घसाऱ्याची वाट सुरु होताच.. एक रवळ्याच्या पूर्वेस असलेला पुढ्यातील टेकाड आणि रवळ्या गड यांना सांधणारी नाळ दिसते.. नाळेच्या सुरुवातीला उजवीकडे.. एक ट्राव्हर्स मारताच.. एक आरपार खोदलेली चौरस मुखाची आणि आत दहा-पंधरा फुट लांब गुहा दिसते.. अशीच एक गुहा पलीकडच्या बाजूस देखिल आहे.. त्यामुळे इथे आरपार गुहा होती या आख्यायिकेवर विश्वास ठेवून पुढे निघायचं..
गुहेच्या डावीकडे नाळेतून अंग चोरून वर शिरायचं.. साधारण वीस-एक फुट चढताच एक खडक पुढ्यात येतो.. आता.. डावीकडे जाऊन या खडकावर चढायचं.. त्यासाठी एक चिमणी क्लाइम्ब करायचा आणि  उजवीकडे कातळात तयार झालेल्या खोबणीतून समोर दिसणाऱ्या मोठ्या झाडाला उजवीकडून वळसा मारून वर यायचं.. आता आपण रवळ्या गडाच्या पुढ्यातील पूर्वेकडच्या टेकडावर येवून पोहोचतो.. डावीकडे वाट वळते आणि एक २०-२५ फुटांचा कातळटप्पा सुरु होतो आणि वाट संपते.. तेंव्हा जिगरबाज लोकं हा प्याच चढून दोर केंव्हा लावतील याची वाट बघत बसलो.. अनंतभाऊंनी एक सुरुवातीचा प्रयत्न केला पण उजवीकडे फ्री फॉल असल्याने.. या कातळटप्प्याची चढाई त्यांना सोडून द्यावी लागली.. दीपकदादांनी मग या प्याच चा सखोल मुवायना केला.. आणि अशक्य आहे असा निकाल दिला.. मग मी, नितीन भाऊ आणि उप्या उगाच एक शेवटचा प्रयत्न म्हणून चाल केली.. कातळाच्या खोबणीतून पाय रोवत या प्याचच्या अर्ध्यापर्यंत सहज जातं येते.. पण मध्यावर पोहोचलो कि पुढे उजवीकडे एक तिरपी रेघ आहे आणि डावीकडे पण.. डावीकडच्या रेघेत मात्र.. खोबणी नाहीत.. त्यामुळे मी वर जायचा बेत तिथेच रद्द केला.. उप्या भाऊ मात्र हा प्याच करायचाच या निर्धाराने.. उजव्या रेघेच्या खाली खोबणी पाय रोवून उभा राहिला.. आता एक मूव्ह केली कि.. प्याच सर.. उप्याने एक जोर लावला आणि प्याच सर केला.. सोबत एक ५० फुटी रोप होताच.. मग तिकडे एका जमिनीत रुतलेल्या दगडाला दोर बांधून उप्या पाठोपाठ अनंतभाऊ आणि नित्या वर गेले.. मी आणि दीपकभाऊंनी इथेच गड पाहिल्याचे डिक्लेअर केले.. इथून वर पाहताना जावळ्याची पूर्वेकडची तटबंदी दिसते.. आणि जावळ्याच्या माथ्यावरील टेकाडाकडे जाणारी वाट.. सातमाळा एक्स्प्रेसचं इंजिन उप्या आणि दोन डब्यांनी रवळ्याच्या प्याच सर केला तसा जल्लोष झाला.. अर्धा तास हा प्याच परीक्षा घेत होता.. त्यात तीन मावळे पास तर दोन काठावर पास झाले म्हणून काठावर राहिले.. बाकीचे गडाची जोरदार भटकंती करून पाउण तासात परत आले.. गडावर पाण्याची टाकी आणि टेकडावरच्या टाक्यात उपडा हनुमान आहे.. बाकी गडावर तसे किरकोळ अवशेष आहेत..
रवळ्याची भटकंती पूर्ण करून जावल्याकडे मोर्चा वळविला.. चिमणी प्याच जिवाच्या भितीने चिवचिव करीत उतरला आणि खाली गुहेच्या बाजूने रवळ्याला एक उजवीकडून वळसा मारीत छोटी प्रदक्षिणा मारली.. तिकडे आणखी एका गुहेशिवाय काही नसल्याने पुन्हा घसरड्या वाटेने पुन्हा पठारावर येवून पोचलो.. रवळ्या वरून पाहताना.. पूर्वेकडे जावल्याचा डोंगर, त्यामागून डोकावणारा धोड्प्या आणि पठाराचा एक आस्मानी नजरा आहे.. तसेच डावीकडे तवा नावाचा आणखी एक निसरडा डोंगर आहे.. म्हटलं तवा वर जाऊ पुन्हा कवा.. आता पहिल्यांदा जावल्या गड.. तिवारी वस्तीपाशी पोहोचलो.. तोवर नऊ वाजले होते.. इथे बाबांना वाट विचारली आणि मंडळासाठी पावशेर खवा सांगितला.. काका म्हणाले.. ते समोर नाक आहे ना उजवीकढलं तिथं वर जायचं आणि मग डोंगराला चिटकून डावीकडं फिरा.. मग डाव्या टोकाला.. ते तिकडं वाट फिरती.. अशी.. (अशी म्हणताना त्यांनी हाताने उजव्या बाजूची दिशा दाखवली..) तिकडे नाकावर वाट आहे..
तिवारी वसती मधून पूर्वेकडे म्हणजेच जावल्या कडे पाहताना जावल्या डोंगराचा आकार पसरट V सारखा दिसतो.. पायथ्याचं जंगल आणि डोंगराचा आडवा कातळपट्टा यांना जोडणारी रेष दुबाजूस स्पष्ट दिसते.. या V च्या दोन आडव्या पट्ट्यांना जोडणाऱ्या नाकाच्या खाली जाऊन पोचायचं.. म्हणून नाकाच्या रेषेत सरळ निघालो.. इथे थोडं उजवीकडे झाडीत शिरताच एक वाट थोडी उजवीकडे जात मग डावीकडे निघाली.. आणि मग झिग-झ्याग तिरपी चढण पार करीत करीत नाकाखाली येवून पोहोचलो.. आता V च्या डावीकडच्या टोकाकडे निघायचं.. जंगल आणी कातळ यांना सांधणाऱ्या रेषेवरून डोंगराला खेटूनच वाट आहे.. ती कुठेही फार खाली उतरत नाही किंवा वर जात नाही.. सरळ चालत राहायचं मग.. पुढे काही कातळकोरीव पण अर्धवट खोदलेल्या लेण्या दिसतात.. आणि कातळभिंती खेटून थोडंस वळसा घालताच पुढे डोंगराच नाक स्पष्ट दिसू लागतं.. या नाकावरच.. जावल्याच्या पायऱ्या आहेत..
पहिल्या नाकापासून इथे येण्यास साधारण अर्धा तास लागतो..  शेवटी वाट थोडी वर जाते.. आणि आपण या नाकाडाच्या पुढ्यातील एका खडकावर येवून पोहोचतो.. आता थेट नाकाडावरून कातळकोरीव खोबणीतून आरोहण आहे.. तीव्र चढाईची वाट असल्याने एक गूळ-पाणी ब्रेक घेतला.. आणि वर निघालो.. इथे २०-२५ फुट वर जायचं मग उजवीकडे तिरपं चढत जाताच पायऱ्या सुरु होतात.. या पायऱ्या मात्र मदन गडची आठवण करून देतात.. त्यामुळे जिवाला जपत आणि पायरीला धरत वर जायचं.. १०० एक फुट चढताच पायऱ्या डावीकडे वळून एक ट्राव्हर्स येतो.. इथे मुरमाड घसाऱ्याने धिम्याने १५-वीस फुट जाताच पुन्हा उजवीकडे.. पायऱ्या दिसतात आणि जावल्या गडाचा दरवाजा.. इथल्या पायऱ्या मात्र काही ठिकाणी तुटल्याने पुन्हा पायवाटेला हाताने धरत बेबी स्टेप्स ने दरवाजा गाठायचा.. जावल्या चा दरवाजा पाहणे हि मात्र एक पर्वणी आहे.. कातळाला आरपार बोगदा पाडून गडावर प्रवेश आहे.. बोगद्यामध्ये पुन्हा मोठ्या पायऱ्या.. दवाजात पोचलो आणि पहिल्या पायरीला हात लागताच गड सर झाल्याची पावती मिळाली.. इथे उजवीकडे एक फारसी भाषेतील शिलालेख आहे.. तो येताना पहायचे म्हणून पुढे निघालो.. भुयारासारख्या दरवाजातून आत आलं कि पायऱ्या सुरु मग भुयार.. आणि ते संपताच डोक्यावर आयताकृती चौकट दिंसते हिच गडाची वाट.. भिंतीतील चिऱ्याच्या कपारीत पावलं चढून हि चौकट चढून आलं कि आपण वर येतो.. मग मोठ्या खडकातून उजवीकडे वाट तिरपी वर जाते.. पुन्हा ७०-८० फुट वर गेल्यास आपण गडमाथ्यावर येवून पोहोचतो..  इथून पाहताना इंग्रजी व्ही या आकारचा डोंगरमाथा नजरेत भरायचा आणि डावीकडची वाट धरायची.. या वाटेने जाताना काही इमारतीचे अवशेष दिसतात आणि खुरट्या झुडूपानी भारलेले पठार.. साधारण दहा-पंधरा मिनिटात डावीकडे वाट वळते आणि समोर पाण्याची तीन हिरवीगार टाकी दिसतात.. हिच गड सर केल्याची महत्वाची खुण.. इथून धोडप.. अलीकडचा बंड्या.. त्यामागे डोंगऱ्या.. त्याच्या उजव्या अंगाला इखारा.. अशी दुर्गांची रांग दिसते आणि इथवर येण्यासाठी केलेले कष्ट.. सार्थकी लागतात.. या तीन टाक्यांच्या मागे खाली डोंगराच्या एक भली मोठी पायरी झालेली दिसते.. तिथे खाली आणखी काही पाण्याची टाकी दिसतात..
तिकडे एक भेट देवून पुन्हा मुख्य दरवाजाकडे निघायचं.. इथे फोटोग्राफीची हाउस भागवून घेतली आणि धोडपचा एक वेगळेच दर्शन घडल्याने.. सातमाळा एक्स्प्रेस काहीशी सुखावली होती.. यंदाच्या स्टेशनवर मात्र एक्स्प्रेस चे पाचही डबे बिनबोभाट दाखल झाले होते.. वाट जरी जिव्हारी होती तरी भटकंती एक्स्प्रेसने जीवाची बाजी लावून ती पार केलीच शेवटी.. यंदा सिनिअर सिटीझन्स चा जोर काही औरच होता.. नी कॅप ने चांगलाच आधार दिला होता..
एका शिखरावरून दुसऱ्या शिखराकडे हि सातमाळा एक्स्प्रेस आज सुसाट निघाली होती.. आज एका दमात दोन स्टेशन गाठून या एक्स्प्रेस ने कमाल केली होती.. आम्ही पहिल्या तिन टाक्यांच्या अल्याडच्या खडकावर रेंगाळलो.. इथे जोरदार गूळ-पाणी ब्रेक घेतला.. दुपारच्या तावलेल्या उन्हाचे हि आता काही वाटेनासे झाले होते.. असा अंतर्मुख करणारा माहौल होता.. जे काही चार सुखाचे क्षण या गडाच्या माथ्यावर दिसले ते वेचून जावल्याचा निरोप घेतला..
परतीच्या वाटेवर जमेल तेवढे अवशेष पाहून पुन्हा बोगद्याची वर उघडणारी चौकट गाठली.. दरवाजा शेजारी शिलालेख पहिला.. फारसी भाषा फारशी येत नसल्याने केवळ फोटो काढून घेतला.. एखाद्या जाणकार मुस्लिम बांधवाला गाठून याचा अर्थ जाणून घेण्याचे नक्की केले.. इथून उतरताना मात्र, आता धडधड वाढू लागली.. दरीचे एक्स्पोजर आता 3-डी स्वरुपात थेट अंगावर येवू लागले.. तसे पाय लटपटू लागले.. पण एक्स्प्रेसचे इंजिन म्हणजे उप्या एकही डबा या पायवाटरुपी रुळांवरून घसरणार नाही याची काळजी घेत होता.. त्याच्या मार्गदर्शनाखाली उतरण्यास सुरुवात केली.. उत्साही कार्यकर्ता नितीन यास हळुवार उतरण्याची ताकीद देण्यात आली.. पुन्हा ट्राव्हर्स आणि मग उजवीकडे.. काळ दाखवणाऱ्या करारी पायऱ्या.. पायऱ्यांना घट्ट धरून उतरू लागलो.. नाय हो करीत पुन्हा नाकाडाचे टोक गाठले.. आणि सरळ रेषेत खोबणीतून खाली उतरलो.. रवळ्या-जावल्याची स्वप्नवत वाटावी अशी भटकंती बाबाजींच्या कृपेने आज पूर्ण झाली होती.. जय बाबाजी..!! ज्येष्ठ नागरिक संघाचा विजय असो.. असा हि एक नारा देवून आनंद व्यक्त केला.. आता.. इथे दिपकभाऊनी एक डिसिजन मेकिंग प्रश्न उभं केला.. आल्या वाटे जाण्यापेक्षा सरळ खाली जाऊ म्हणजे लवकर जातं येईल.. मग इंजिन आणि दादा यांच्यात जोरदार डिस्कशन होवून.. दादा म्हणतील त्या रुळावरून एक्स्प्रेस जाणार असे ठरले.. इथे नाकाडाकडे पाठ करून उभे राहिल्यास थोडं उजवीकडे एक वाट खाली उतरते.. हि आपल्याला पाठाराकडे नेते.. त्या वाटेने निघालो.. झिग-झ्याग वळणाची पायवाट उतरताच.. जस जसे पठार जवळ येवू लागते तसं तशी पिवळ्या गवतात हि वाट हरवते.. आणि वीस-एक मिनिटात आपण पठारावर येवून पोहोचतो..  पठारावर आलो आणि मनात विचारांचा काहूर उठला तशी या भटकंतीवर एक कविता करून टाकली.. ताबडतोब ती अशी:
एक मुसाफिर आहे मी.. ह्या सह्याद्रीच्या वाटांचा
बेलाग अशा कड्यांचा.. कापरं भरवणाऱ्या दऱ्यांचा
दिव्य प्रकाश पहात राहतो.. भव्य अशा माथ्यावरून
कधी धापा टाकत राहतो.. निसरड्या त्या वाटांवरून
रक्तबंबाळ होतो कधी.. ठेच लागून.. काटे रुतून
 चालणं मात्र सोडत नाही.. सह्याद्रीच्या वाटे वरून
कधी स्वप्नांची फांदी.. पायवाटांवर बघत बघत
कधी पाखरासारखा उडत.. तर कधी रडत खडत
एक मुसाफिर आहे मी.. ह्या धूळमाखल्या वाटांचा
सोडून आलोय किनारा तिथे.. चाकोरीतल्या लाटांचा
पठार ते तिवारी वसती दरम्यान नितीनभाऊंची मुलाखत घेण्यात आली. .आणि भटकंती चा अनुभव कॅमेराने टिपण्यात आला.. चालता चालता आजचा सवाल “दिपक दादा नितीनभाऊंना घालून पडून बोलले का?” असा दर्दी कार्यक्रम सुरु झाला आणि बोलता बोलता तिवारी वसती कशी आली हे कळलंच नाही.. इथे खोपटीच्या सावलीत बूड टेकवलं आणि जरा वस्तीतील माणसांशी गुजगोष्टी सुरु केल्या.. 
 
 https://vatadya139873074.wordpress.com/2015/04/19/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%B9-2/
 
 
 
 ७:
धोडपची हिरकणी – सोन्याबाई
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...