नाशिक जिल्ह्यात सेलबारी- डोलबारी, अजंठा- सातमाळ, त्र्यंबक या डोंगररांगा आहेत. यातील नाशिकच्या पुर्वेस व इगतपूरीच्या दक्षिणेस पसरलेल्या त्र्यंबक डोंगररांगेत भास्करगड, हर्षगड, त्र्यंबकगड, अंजनेरी, रांजणगिरी, गडगडा, बहुला असे अनेक किल्ले दिसुन येतात. रांजणगीरी हा या त्र्यंबक रांगेतील एक टेहळणीचा किल्ला. प्राचिन काळापासून नाशिक हे बाजारपेठ म्हणून प्रसिध्द होते. डहाणु बंदरातून नाशिककडे येणाऱ्या डहाणु- जव्हार- गोंडाघाट -अंबोली घाट- त्रिंबक- नाशिक या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी घाटावर बांधलेल्या दुर्गशृंखलेत रांजणगिरी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली. नाशिकच्या त्रिंबक उपरांगेतील अंजनेरीपासून निघालेल्या एका डोंगरसोंडेवर हा छोटेखानी दुर्ग उभा आहे. कदाचित रांजणगिरीला दुर्गाच्या व्याख्येमध्ये बसविणे जरा कठीण जाईल. त्यामुळे आपण या किल्ल्याला टेहळणीचे स्थान म्हणणेच जास्त सोयीस्कर ठरेल.

मुंबई-नाशिक महामार्गावर घोटी सोडल्यानंतर १५ कि.मी. वर डावीकडे 'जातेगाव' कडे जाणारा फाटा लागतो. या फाट्याने आत वळले की प्रथम ३ कि.मी. वर अंजनेरी बहुला गाव लागते. नंतर ७ कि.मी.वर जातेगाव लागते आणि जातेगावच्या पुढे ६ कि.मी. वर 'मुळेगाव' नावाचे गाव लागते. मुंबई-नाशिक महामार्गावर घोटी सोडल्यानंतर १५ कि.मी. वर डावीकडे 'जातेगाव' कडे जाणारा फाटा लागतो. या फाट्याने आत वळले की प्रथम ३ कि.मी. वर अंजनेरी बहुला गाव लागते. नंतर ७ कि.मी.वर जातेगाव लागते आणि जातेगावच्या पुढे ६ कि.मी. वर 'मुळेगाव' नावाचे गाव लागते. मुळेगाव हे रांजणगिरीच्या पायथ्याचे गाव. नाशिकवरून थेट जायचे झाल्यास नाशिकच्या मध्यवर्ती बसस्थानकावरून मुळेगावला जायला एसटी आहे. मुळेगाव हे बऱ्यापैकी मोठे गाव आहे. मुख्य गाव दोन भागांत विभागलेले दिसते. एका भागात लोकवस्ती तर दुसऱ्या भागात शेती. गावाच्या मध्यभागी उभे राहिले, तर एका बाजूस रांजणगिरीचा किल्ला, दुसऱ्या बाजूस अंजनेरीचा अस्ताव्यस्त पसरलेला डोंगर, तिसऱ्या कोनात डांग्यासुळका आणि त्याच्याच डोंगरसोंडेवर गडगडा किल्ला आणि समोर रांजणगिरीचा डोंगर, असा चौफेरचा नयनरम्य देखावा दिसतो. गावातील लोकांना इथे रांजणगिरीचा किल्ला आहे, हे माहितीच नाही. त्यांना रांजणगिरी विचारले तर ते अंजनेरीच्या किल्ल्याकडे बोट दाखवितात. मग नक्की गफलत कुठे होते, तर या लोकांमध्ये हा रांजणगिरीचा किल्ला 'बुधलीचा डोंगर' म्हणून प्रसिद्ध आहे.

जातेगाववरून मुळेगावकडे जाताना उजव्या हाताला आपल्याला एक लांबलचक निमुळता माथा असलेला डोंगर नजरेस पडतो तोच हा रांजणगीरी किल्ला. रस्त्याच्या डाव्या बाजुस घरगड व डांग्या सुळका नजरेस पडतो. किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला मुळेगावपर्यंत जाण्याची गरज नाही. आपण जात असलेल्या रस्त्याला दाहेगाव येथुन येणारा रस्ता मिळतो.


या तिठ्यावरून रांजणगीरी किल्ल्याच्या खाली असलेले पठार दिसते. हे पठार डोळ्यासमोर ठेऊनच डोंगर चढायला सुरवात करायची. किल्ल्यावर जाणारी वाट फारशी मळलेली नसल्याने वाट शोधत शोधतच गड गाठावा लागतो.




काही ठिकाणी गडासमोर असणारा डोंगर रांजणासारखा असल्याने या किल्ल्याला रांजणगिरी नाव पडले. किल्ल्याच्या समोर एक लहानशी गोलाकार टेकडी असुन या टेकडीला वळसा घालुन हि टेकडी व किल्ला यांच्यामधील खिंडीत जावे लागते.



या खिंडीतून वर चढताना येथे मोठया प्रमाणात घसारा असल्याने सांभाळूनच वर चढावे लागते कारण वर चढणाऱ्याच्या पायाखालुन घसरणारे दगड त्याच्यानंतर असणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर येतात. हे छोटेसे प्रस्तरारोहण करुन आपण खिंडीत पोहोचतो.

खिंडीतून समोर दिसणाऱ्या चार-पाच पायऱ्या चढल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. येथे खडकात असलेल्या खाचा पहाता पुर्वी काही प्रमाणात बांधकाम असण्याची शक्यता आहे आता मात्र केवळ खुणाच दिसतात. पायथ्यापासुन गडावर पोहोचण्यास दिड तास लागतो. समुद्रसपाटीपासुन २९२७ फुट उंचीवर असलेल्या या गडाचा माथा निमुळता असुन पूर्व-पश्चिम लांबवर पसरला आहे. गडाचे क्षेत्रफळ साधारण चार एकर असुन गडाच्या माथ्यावर चढताना लागणाऱ्या ४-५ पायऱ्या लागतात. कातळकोरीव पायऱ्या चढून गेल्यावर किल्ल्याच्या माथ्यावर फुटलेले पाण्याचे तळे लागते. सध्या या तळ्यात पाणी नाही.
इथून पुढे गेल्यावर बांधीव पाण्याचे एक टाके लागते. यात पिण्यायोग्य पाणी आहे. टाक्यांपासून थोडे पुढे गेल्यावर एक उंचवटा लागतो. या उंचवट्यावरून पलीकडच्या डोंगरसोंडेवर जाण्याची वाट आहे. या डोंगरसोंडेवर एखादा फेरफटका मारायला काहीच हरकत नाही, पण तिथे कोणत्याही प्रकारचे अवशेष नाहीत हे लक्षात ठेवायचे. गडावर एकही झाड नसल्याने विश्रांतीची काहीही सोय नाही त्यामुळे हा किल्ला शक्यतो सकाळच्या वेळेतच करावा.
किल्ल्याचा माथा आटोपशीर आहे, त्यामुळे निश्चितपणे या किल्ल्याचा उपयोग टेहळणीचे ठिकाण म्हणून केला जात असावा. कारण माथ्यावरून अंजनेरीचा किल्ला, डांग्यासुळका, गडगडा आणि बहुला किल्ल्यांचे विलोभनीय दृश्य दिसते. रांजणगिरीचा किल्ला पाहून दोन-अडीच तासात मुळेगावात सहज परतता येते आणि शक्य असल्यास गडगडा किल्ला देखील आपल्याला पाहता येतो.
गिरीदुर्ग
नाशिक
त्र्यंबकेश्वर
🏔️
श्रेणी नुसार स्तर
मध्यम
📏
समुद्र सपाटीपासून उंची (फ़ूट)
2790
🏰
किल्ल्याचा प्रकार
गिरीदुर्ग
किल्ल्याची छायाचित्रे
किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा
नकाशे व मार्ग
किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा
सर्व नकाशे पहा
प्रस्तावना
नाशिक
जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर रांगेत रांजणगिरी हा किल्ला आहे. नाशिक शहर हे
प्राचिन काळापासून मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिध्द होते. डहाणू बंदरात
उतरलेला माल जव्हार - गोंडाघाट - अंबोली घाट या मार्गे नाशिकला येत असे. या
व्यापारीमार्गाचे रक्षण करण्यासाठी जव्हार जवळ भूपतगड तर घाटमाथ्यावर
त्र्यंबकगड, बसगड(भास्करगड), हर्षगड, रांजणगिरी, अंजनेरी या किल्ल्यांची
निर्मिती करण्यात आली.
रांजणगिरीच्या दक्षिण टोकाला असलेल्या सुळक्याचा आकार रांजणासारखा असल्यामुळे या किल्ल्याला "रांजणगिरी" हे नाव पडले असावे.
महत्त्वाची ठिकाणे
या किल्ल्याचे प्रवेशद्वार, तटबंदी, बुरुज आज
अस्तित्वात नाहीत. आडव्या पसरलेल्या या गडावर पाण्याची दोन टाकं आहेत.
गडावर प्रवेश करण्यापूर्वी रांजणासारख्या वैशिष्ट्यपूर्ण आकार असलेल्या
सुळक्याला वळसा घालून जावे लागते. प्रस्तरारोहणाचे प्राथमिक तंत्र वापरुन
हा सुळका सर करता येतो.
कसे पोहोचावे
मुंबई - नाशिक महामार्गावर नाशिकच्या अलिकडे
१५ किमी वर मुळेगावकडे जाणारा रस्ता लागतो. मुळेगाव हे रांजणगिरीच्या
पायथ्याचे गाव आहे. डोंगराच्या सोंडेवरुन साधारण १ तासात किल्ल्यावर जाता
येते.
ट्रेकसाठी लागणारा वेळ
⏱️
मुळेगावातून गडावर जाण्यास एक तास लागतो.
सुविधा व सोयी
🏠
निवास व्यवस्था
गडावर रहाण्याची सोय नाही.
🍽️
अन्न व्यवस्था
गडावर जेवणाची सोय नाही.
💧
पाणी उपलब्धता
गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
उंची : ३०७० फुट
नाशिक जिल्ह्यात सेलबारी- डोलबारी, अजंठा- सातमाळ, त्र्यंबक या डोंगररांगा
आहेत. यातील नाशिकच्या पुर्वेस व इगतपूरीच्या दक्षिणेस पसरलेल्या त्र्यंबक
डोंगररांगेत भास्करगड, हर्षगड, त्र्यंबकगड, अंजनेरी, रांजणगिरी, गडगडा,
बहुला असे अनेक किल्ले दिसुन येतात. रांजणगीरी हा या त्र्यंबक रांगेतील एक
टेहळणीचा किल्ला. प्राचिन काळापासून नाशिक हे बाजारपेठ म्हणून प्रसिध्द
होते. डहाणु बंदरातून नाशिककडे येणाऱ्या डहाणु- जव्हार- गोंडाघाट -अंबोली
घाट- त्रिंबक- नाशिक या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी घाटावर
बांधलेल्या दुर्गशृंखलेत रांजणगिरी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली.
मुळेगाव हे गडाच्या पायथ्याचे गाव असुन मुंबई-नाशीक महामार्गावरून
जातेगावमार्गे तेथे जाता येते. मुंबई-नाशीक महामार्गावरून मुळेगाव हे अंतर
साधारण ११ कि.मी.आहे. अंजनेरी गडाच्या मागील बाजूस असलेल्या रांजणगिरी
किल्ल्याबद्दल फारशी कोणाला माहिती नाही.
स्थानीक लोक या किल्ल्याला बुधलीचा डोंगर म्हणुन ओळखतात. जातेगाववरून
मुळेगावकडे जाताना उजव्या हाताला आपल्याला एक लांबलचक निमुळता माथा असलेला
डोंगर नजरेस पडतो तोच हा रांजणगीरी किल्ला. रस्त्याच्या डाव्या बाजुस घरगड व
डांग्या सुळका नजरेस पडतो. किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला मुळेगावपर्यंत
जाण्याची गरज नाही. आपण जात असलेल्या रस्त्याला दाहेगाव येथुन येणारा रस्ता
मिळतो. या तिठ्यावरून रांजणगीरी किल्ल्याच्या खाली असलेले पठार दिसते. हे
पठार डोळ्यासमोर ठेऊनच डोंगर चढायला सुरवात करायची. किल्ल्यावर जाणारी वाट
फारशी मळलेली नसल्याने वाट शोधत शोधतच गड गाठावा लागतो. काही ठिकाणी
गडासमोर असणारा डोंगर रांजणासारखा असल्याने या किल्ल्याला रांजणगिरी नाव
पडले असे वाचनात आले होते पण मला मात्र तो आकार रांजणासारखा जाणवला नाही.
किल्ल्याच्या समोर एक लहानशी गोलाकार टेकडी असुन या टेकडीला वळसा घालुन हि
टेकडी व किल्ला यांच्यामधील खिंडीत जावे लागते. या खिंडीतून वर चढताना येथे
मोठया प्रमाणात घसारा असल्याने सांभाळूनच वर चढावे लागते कारण वर
चढणाऱ्याच्या पायाखालुन घसरणारे दगड त्याच्यानंतर असणाऱ्या व्यक्तीच्या
अंगावर येतात. हे छोटेसे प्रस्तरारोहण करुन आपण खिंडीत पोहोचतो. खिंडीतून
समोर दिसणाऱ्या चार-पाच पायऱ्या चढल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो.
येथे खडकात असलेल्या खाचा पहाता पुर्वी काही प्रमाणात बांधकाम असण्याची
शक्यता आहे आता मात्र केवळ खुणाच दिसतात. पायथ्यापासुन गडावर पोहोचण्यास
दिड तास लागतो. समुद्रसपाटीपासुन २९२७ फुट उंचीवर असलेल्या या गडाचा माथा
निमुळता असुन पूर्व-पश्चिम लांबवर पसरला आहे. गडाचे क्षेत्रफळ साधारण चार
एकर असुन गडाच्या माथ्यावर चढताना लागणाऱ्या ४-५ पायऱ्या, साचपाण्याचा एक
तलाव व खडकात खोदलेली दोन टाकी याशिवाय किल्ल्यावर कोणतेही अवशेष नाहीत.
गडावरून गडगडा,अंजनेरी,बहुला हे किल्ले तसेच खुप लांबवरचा प्रदेश नजरेस
पडतो. संपुर्ण गडफेरी करण्यास अर्धा तास पुरेसा होतो. गडावर एकही झाड
नसल्याने विश्रांतीची काहीही सोय नाही त्यामुळे हा किल्ला शक्यतो सकाळच्या
वेळेतच करावा. टेहळणीचा किल्ला अशी ओळख असणारा रांजणगिरी किल्ला
इतिहासाबद्दल पुर्णपणे अबोल आहे.
रांजणगिरीचा किल्ला
रणरणत्या उन्हामुळे तापून भेगाळलेल्या, तडकलेल्या जमिनीवर पावसाचे टपोरे टपोरे थेंब जेव्हा पडू लागतात आणि बघता-बघता क्षणार्धात या थेंबांचा वेग वाढतो, वाऱ्याने रानातली झाडं गदागदा हलतात, वाळलेला पालापाचोळा इतस्ततः उडतो, पावसाने फेर धरताच जमिनीवरून गढूळ पाण्याचे पाट वाहू लागतात, हवेत एक प्रकारचा गारवा निर्माण होतो, त्यातच मातीचा सुगंध दरवळू लागतो.
सुंदर हिरवर माळ ! चहुकडे सुंदर हिरवे माळ जमली काळी वर घनमाला झिमझिम पाऊस खाली आला ग्रीष्मऋतूचा ताप निवला
आणि साहजिकच अशा धुंद वातावरणात चार भिंतींच्या आतमध्ये बसून राहणे म्हणजे, जीवनातील एका निस्सीम आनंदाच्या क्षणाला मुकणे. मग साहजिकच सर्व बंधनाचे पाश झुगारून पावले उंबरठ्याच्या बाहेर पडू लागतात आणि इतके दिवस घामाच्या धारांनी भिजून जाणारे शरीर आता पावसाचे थेंब अंगावर घ्यायला लागते. अशा भन्नाट वातावरणात तुमच्या-आमच्यासारखी भटकी ट्रेकर्स मंडळी, विविध ट्रेक्सचे बेत आखायला लागतात, कुठे राजमाची, कुठे लोहगड, तुंग तिकोना, पेबचा किल्ला पण आपण मात्र थोडे हटके किल्ले फिरायला निघायचे. चार-चौघांपेक्षा वेगळ्या ठिकाणी जायचं. पण नक्की जायचं कुठे? ठिकाणं तर खूप आहेत, पण नक्की कोणते ठिकाण? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 'रांजणगिरी'.
रांजणगिरी हा असाच पहिल्या पावसाच्या सुरवातीला आवर्जुन पाहण्यासारखा शिला पहिल्या पावसाच्या सुमारासच का? इतर ऋतूमध्ये का नाही? तर याला काही
इंगरसोंडेवर हा छोटेखानी दुर्ग उभा आहे. कदाचित रांजणगिरीला दुर्गाच्या व्याख्येमध्ये ठोस असे उत्तर नाही. नाशिकच्या त्रिंबक उपरांगेतील अंजनेरीपासून निघालेल्या एका इसविणे जरा कठीण जाईल. त्यामुळे आपण या किल्ल्याला टेहळणीचे स्थान म्हणणेच जास्त सोयीस्कर ठरेल.
मुंबई-नाशिक महामार्गावर घोटी सोडल्यानंतर १५ कि.मी. वर डावीकडे 'जातेगाव' कडे जाणारा फाटा लागतो. या फाट्याने आत वळले की प्रथम ३ कि.मी. वर अंजनेरी बहुला गाव लागते. नंतर ७ कि.मी.वर जातेगाव लागते आणि जातेगावच्या पुढे ६ कि.मी. वर 'मुळेगाव' नावाचे गाव लागते. मुळेगाव हे रांजणगिरीच्या पायथ्याचे गाव. नाशिकवरून थेट जायचे झाल्यास नाशिकच्या मध्यवर्ती बसस्थानकावरून मुळेगावला जायला एसटी आहे. मुळेगाव हे बऱ्यापैकी मोठे गाव आहे. मुख्य गाव दोन भागांत विभागलेले दिसते. एका भागात लोकवस्ती तर दुसऱ्या भागात शेती. गावाच्या मध्यभागी उभे राहिले, तर एका बाजूस रांजणगिरीचा किल्ला, दुसऱ्या बाजूस अंजनेरीचा अस्ताव्यस्त पसरलेला डोंगर, तिसऱ्या कोनात डांग्यासुळका आणि त्याच्याच डोंगरसोंडेवर गडगडा किल्ला आणि समोर रांजणगिरीचा डोंगर, असा चौफेरचा नयनरम्य देखावा दिसतो. गावातील लोकांना इथे रांजणगिरीचा किल्ला आहे, हे माहितीच नाही. त्यांना रांजणगिरी विचारले तर ते अंजनेरीच्या किल्ल्याकडे बोट दाखवितात. मग नक्की गफलत कुठे होते, तर या लोकांमध्ये हा रांजणगिरीचा किल्ला 'बुधलीचा डोंगर' म्हणून प्रसिद्ध आहे.
मुळेगाव आणि रांजणगिरी किल्ल्याचा पायथा यांमध्ये अर्ध्या तासाचे अंतर आहे. वाट शेताडीच्या बांधावरून जाते. पहाटे पहाटे आम्ही मुळेगावमध्ये दाखल झालो. नुकताच पाऊस बरसून गेला होता. वाऱ्याचा थयथयाट चालू होता, त्याच्या तालावर शेतातील ज्वारी-बाजरीची कणसे डोलत होती. आम्ही देखील वाऱ्याच्या या गाण्यामध्ये आणि कणसांच्या नाचात सामील झालो आणि रांजणगिरीची वाट धरली. अर्ध्या तासात गावकऱ्यांनी सांगितलेल्या खुणेच्या झाडापाशी पोहोचलो. झाडाच्या जवळून एक पावटी किल्ल्याच्या दिशेने सुटलेली दिसते. ती पकडून आपण किल्ल्याकडे झेप घ्यायची. वीस मिनिटांच्या पायी प्रवासानंतर आपण डोंगरसोंडेवर जाऊन पोहोचल्यावर ही डोंगरसोंड डावीकडे वळते आणि आपल्याला सरळ रांजणगिरीच्या सुळक्यापर्यंत घेऊन जाते. सुळक्याच्या पलीकडच्या बाजूने किल्ल्यावर जाण्याची वाट आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी सुळक्याला प्रदक्षिणा घालावी लागते. पुढे एका छोट्याशा खिंडीतून वर चढल्यावर आपण रांजणगिरीच्या कातळकोरीव पायऱ्यांपाशी पोहोचतो.
या कातळकोरीव पायऱ्यांवरून मागे पाहिल्यावर किल्ल्याला रांजणगिरी का म्हणतात, याचे उत्तर आपल्याला आपोआप मिळेल. किल्ल्याच्या पुढे उभ्या असलेल्या दोन सुळक्यांचा आकार उपड्या ठेवलेल्या रांजणासारखा दिसतो म्हणून या किल्ल्याला रांजणगिरी हे नाव पडले असावे.
कातळकोरीव पायऱ्या चढून गेल्यावर किल्ल्याच्या माथ्यावर फुटलेले पाण्याचे तळे लागते. सध्या या तळ्यात पाणी नाही. इथून पुढे गेल्यावर बांधीव पाण्याचे एक टाके लागते. यात पिण्यायोग्य पाणी आहे. टाक्यांपासून थोडे पुढे गेल्यावर एक उंचवटा लागतो. या उंचवट्यावरून पलीकडच्या डोंगरसोंडेवर जाण्याची वाट आहे. या डोंगरसोंडेवर एखादा फेरफटका मारायला काहीच हरकत नाही, पण तिथे कोणत्याही प्रकारचे अवशेष नाहीत हे लक्षात ठेवायचे. किल्ल्याचा माथा आटोपशीर आहे, त्यामुळे निश्चितपणे या किल्ल्याचा उपयोग टेहळणीचे ठिकाण म्हणून केला जात असावा. कारण माथ्यावरून अंजनेरीचा किल्ला, डांग्यासुळका, गडगडा आणि बहुला किल्ल्यांचे विलोभनीय दृश्य दिसते. रांजणगिरीचा किल्ला पाहून दोन-अडीच तासात मुळेगावात सहज परतता येते आणि शक्य असल्यास गडगडा किल्ला देखील आपल्याला पाहता येतो.
किल्ल्याची उंची : समुद्रसपाटीपासून ९७० मीटर (३१८२ फूट)
तालुका : त्र्यंबकेश्वर
किल्ल्याची श्रेणी : मध्यम
किल्ल्याची इतर नावे : बुधलीचा डोंगर
डोंगररांग : नाशिक उपरांग (नैऋत्य)
पायथ्याचे गाव : मुळेगाव
पायथ्याच्या गावापासूनचे अंतर : मुळेगावपासून एक तास.
जवळचे एस.टी. स्थानक : त्र्यंबकेश्वर
राहण्याची सोय : किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय नाही.
पिण्याचे पाणी : रांजणगिरीवर पिण्याचे पाणी नाही.
जाण्यासाठी उत्तम कालावधी : सर्व ऋतूंमध्ये जाता येते.
किल्ला फिरायला लागणारा वेळ : किल्ला फिरायला वीस मिनिटे पुरतात.
जवळपासची गावे : जातेगाव, मुळेगाव, अंजनेरी
No comments:
Post a Comment