1 ) मधू-मकरंद गड
महाबळेश्वरला गेल्यावर संध्याकाळ झाली कि गर्दीची पावले वळतात, मुंबई पॉंईटला सुर्यास्त बघायला.. बहुतेक वेळा सुर्य बुडतो, तो एका खोगीराच्या आकाराच्या डोंगरामागे.जो एक प्राचीन गड आहे, या गडाचे नाव मोठे गोड आहे, "मधु-मकरंदगड". ईंग्रजांनी त्याला "सॅडलबॅक" असे यथार्थ नावही दिले आहे.
हा गड नेमका कोणी उभारला ते अज्ञात असले तरी, गडावर असलेल्या खांब टाक्यावरुन गड प्राचीन नक्कीच आहे, ई.स. १६५६ मधे जावळी ताब्यात घेतल्यानंतर हा गड शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. एन उन्हाळ्यात घनदाट झाडीचा गारवा अनुभवत तुम्हाला ट्रेकींग करायचे असेल तर या मधुमकरंद गडाला नक्की जा! या गडावर जायचे तर तीन पर्याय आहेत. स्वतःचॉ गाडी नसेल तर महाबळेश्वरवरुन कोयनेच्या खोर्यात दुधगाव या ठिकाणी थेट बस आहे. दुधगाववरुन कोयना नदी ओलांडून चतुरबेट या गावी जायचे किंवा स्वताची गाडी असेल तर थेट चतुरबेटला जाता येते. गावातूनच एक पायवाट थेट गडावर जाते.
गडावर जाणारा दुसरा मार्ग हातलोट गावातून. सव्वा तासाच्या खड्या चढाने गडाच्या डाव्या कड्यापाशी पोहचतो. तिथे उजवीकडे वळाल्यानंतर वीस मिनीटात मल्लिकार्जुनाच्या मंदिरात पोहचतो.. तिसरा मार्ग अर्थातच पदभ्रमंतीची हौस भागवणार्यांसाठी. यासाठी, महाबळेश्वरवरुन तापोळा रस्त्यावर असणार्या बॅबिंग्टन पॉईंटमार्गे तीन-साडे तीन तासात गडावर पोहचता येते.
चतुरबेट गावातून गडाकडे निघाल्यावर थोड्या वेळात आपल्याला मातीची कच्ची सडक आडवी जाते. थोड्या वेळात समोर दिसते गडाच्या खांद्यावर वसलेले, जंगम लोकांच्या वस्तीचे "घोणसपुर". आपल्याजवळ शिधा असल्यास इथे दिला तर जेवण तयार करुन मिळते.
इथून गडाकडे निघा;यावर प्रशस्त मातीच्या रस्त्याने थोडे अंतर चालल्यानंतर समोर मल्लिकार्जुन मंदिर दिसु लागले. गडाच्या या परिसरात घनदाट जंगल असल्याने या वाटेवर नीट लक्ष दिले तर वन्यप्राण्यांचे ठसे दिसु शकतात. दाट वनराईत लपलेले हे मंदिर म्हणजे सह्याद्रीत मुक्काम करण्याजोग्या आदर्श जागातील एक.. शिवकालापुर्वी चंद्रराव मोर्यांनी ज्या सात शिवमंदिरांना ईनामे दिलेली होती,
यानंतर सामोरी येते खडी चढणारी वाट, एका वळणावर आलो, तो फार मोठा पॅनोरमा समोर आला. गडाची मधू आणि मकरंद हि दोन्ही शिखरे आणि त्यांना जोडणारी धार पश्चिम क्षितीज्यावर महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड हे दुर्ग त्रिकूट असलेली रांग. इथून पुढचा रस्ता आपल्याला थेट माथ्यावर नेतो. यापुर्वी हि वाट थोडी अवघड होती. आता हि वाट रुंद आणि सोपी करण्यात आली आहे..गडमाथा त्रिकोणी आकाराचा आहे. सुरवातीला एक गदडी स्तंभ दिसतो.याच्या समोर प्राचीन दगडी बांधणीचे कौलारू मल्लिकार्जुन मंदिर दिसते. आतमधे काहीसा एकांतवास भोगणारा शंभु महादेव नागराजाच्या सोबत बसला आहे..
प्रचंड मोठा परिसर नजरेत मावत नाही. एका बाजुला पुर्वेकडे महाबळेश्वरचे पठार आणि सह्याद्रीची रांग दुभागणारी कोयनामाई धरणाच्या पाण्याचे शिवसागर रुपात सोबतीला असते. उतरताना मुद्दाम उत्तर बाजुला असलेल्या दुसर्या वाटेने खाली उतरावे , मात्र जपून, इथे पाय घसरल्यास क्षमा नाही.
इथून खाली उतरलो कि गडाच्या प्राचिनत्वावर शिक्कामोर्तब करणार्या उभ्या कड्यात खोदलेल्या प्रचंड मोठ्या खांब टाक्यापाशी येतो. टाक्याच्या वरच्या बाजुला चक्क मारुतीचे शिल्प आहे. पाण्यावर पिवळ्या शैवालाचा तरंग असला तरी तो बाजुला करुन पाणी पिता येते. मकरंदगडाचा आठवणीचा मध सोबत घेउन परतीची वाट धरायची
2 ) गुरसाळेचे रामेश्वर मंदिर :-
आज जगभरात असलेल्या प्राचीन वास्तूंकडे कलेइतिहासाचा वारसा तसेच पर्यटनाचे साधन म्हणून पाहिलं जातं. महाराष्ट्रात तर हा ठेवा खेडोपाडी विखुरलेला आहे.सातारा जिल्ह्यातही अनेक प्राचीन मंदिरे, किल्ले, गड अशा अनेक ऐतिहासिक वास्तू आजही आपले अस्तित्व टिकवून उभ्या आहेत. मध्यप्रदेशातील खजुराहो येथील हजारो वर्षे जुनी असलेली मंदिरे कामशिल्पासाठी प्रसिद्ध आहेत.अशाच प्रकारचे एक मंदिरे सातारा जिल्ह्यातील गुरसाळे, येथे आहे. मंदिरावर कामशिल्पे का असावीत, याबाबत संशोधकांचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. परंतु ही मंदिरे तांत्रिक उपासना सांप्रदायाच्या प्रभाव असणाऱ्या काळात उभारली गेली, यावर बहुतांश संशोधकांचे एकमत आहे. मद्य, मांस, मस्य, मुद्रा व मैथुनी या पाच गोष्टींना मिळून पंच मकार अशी संज्ञा तयार होते. याच गोष्टीचे वा उपासनामार्गाचे शिल्पांकन साताºयातील या तीन मंदिरांवर केलेले आढळते.
वडूज-कराड मार्गापासून ५ किलोमीटर अंतरावर आतल्या बाजुला हे गाव आहे. इथे .सोमलिंग, गुपितलिंग, रामलिंग, भावलिंग, शिवलिंग अशी एकूण पाच लिंग आहेत. ही पाच शिवलिंग पूजली जातात. तिथं महाशिवरात्रीला मोठ्या उत्साहात यात्रा भरवली जाते.
गुरसाळे गावात प्रवेश केला कि भव्य सोमेश्वर मंदीर सामोरे येते. आवारात नव्याने बांधलेले मंदीर ही आकर्षक आहे. इथेच आत गुप्तलिंग मंदीर आहे. पायर्या उतरुन त्यालाही भेट द्यावी. मंदीराच्या बांधकामात चक्क वीरगळ पुरलेले दिसतात. मंदीराचा सभामंड्प गजपृष्ट आकाराचा म्हणजे गोलाकार आहे. मुखमंडपाच्या उजव्या भिंतीवर काही कामशिल्प तसेच प्रसवेचे आगळेवेगळे शिल्प बघायला मिळते. सभामंडप दगडी स्तंभावर तोलून धरला आहे. शिवपिंडीचे दर्शन घेउन जवळच्या सोमलिंग मंदीराकडे निघायचे. आवारात बंदीस्त आणि प्रंचड वृक्षाच्या सावलीत या मंदीराच्या परिसरात गेल्यावर मन प्रसन्न होते. प्रथम मंदीरात जाउन चार स्तंभावर तोललेला सभामंडप, त्याच्या खांबावर असलेली उलट्या नागाची नक्षी बघायची, सोनेरी रंगाने रंगवलेले गर्भगृहाचे दार आणि त्यावर असलेली गणेश पट्टी आणि तळाशी असणारे कीर्तिमुख निरखायचे , शिवपिंडीचे दर्शन घेउन मंदीराचा बाह्य भाग बघायला जाउया मंदिराची बाहेरील दर्शनी बाजू पाने, फुले, वेगवेगळ्या भौमितिक रचनाच्या थरांनी सजवलेल्या आहेत. यातीलच सर्वात वरच्या थरात कामशिल्पांचे चित्रांकन केले आहे. या शिल्पात युगूल शिल्पे, मैथून शिल्पे, दिसतात. या मंदिराच्या प्रांगणात असणारी पु्ष्करणी हे आणखी एक वैशिष्ट्य. पुष्करणी किंवा बारव म्हणजे चौकोनी आकाराचा उतरत्या पायºयांची रचना केलेले कुंड. एकात एक लहान होत जाणारे तीन ते सात टप्पे हे बारवाचे स्वरुप असते. या बारवांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या बारवांत पाण्याचे अंतर्गत स्त्रोत असतात. आपण पावसाचे पाणी अडविणे, ते मातीत जिरवणे आणि साठवणे यासाठी अनेक योजना केल्या आहेत. पाऊस पडला नाही तरी बारवातील अंतर्गत स्त्रोतातून भूगर्भातील पाणी झिरपून बारवात पाणी भरते. दुष्काळात या पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच बारवातील पाण्याची स्वच्छता राखणे, बारवातील गाळ काढून अंतर्गत स्त्रोताचा मार्ग मोकळा करणे, बारवाच्या भिंतीतून होणारी गळती थांबवणे, झाडे, झुडपे, पाण्यातील वेली काढून टाकणे या सर्व प्रक्रिया करून बारवाची निगा राखली तर दुष्काळातही पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकते.हा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या वतीने ठोस पावले उचलली जावी अशी अपेक्षा आहे.
वडूज-कराड मार्गापासून ५ किलोमीटर अंतरावर आतल्या बाजुला हे गाव आहे. इथे .सोमलिंग, गुपितलिंग, रामलिंग, भावलिंग, शिवलिंग अशी एकूण पाच लिंग आहेत. ही पाच शिवलिंग पूजली जातात. तिथं महाशिवरात्रीला मोठ्या उत्साहात यात्रा भरवली जाते.
गुरसाळे गावात प्रवेश केला कि भव्य सोमेश्वर मंदीर सामोरे येते. आवारात नव्याने बांधलेले मंदीर ही आकर्षक आहे. इथेच आत गुप्तलिंग मंदीर आहे. पायर्या उतरुन त्यालाही भेट द्यावी. मंदीराच्या बांधकामात चक्क वीरगळ पुरलेले दिसतात. मंदीराचा सभामंड्प गजपृष्ट आकाराचा म्हणजे गोलाकार आहे. मुखमंडपाच्या उजव्या भिंतीवर काही कामशिल्प तसेच प्रसवेचे आगळेवेगळे शिल्प बघायला मिळते. सभामंडप दगडी स्तंभावर तोलून धरला आहे. शिवपिंडीचे दर्शन घेउन जवळच्या सोमलिंग मंदीराकडे निघायचे. आवारात बंदीस्त आणि प्रंचड वृक्षाच्या सावलीत या मंदीराच्या परिसरात गेल्यावर मन प्रसन्न होते. प्रथम मंदीरात जाउन चार स्तंभावर तोललेला सभामंडप, त्याच्या खांबावर असलेली उलट्या नागाची नक्षी बघायची, सोनेरी रंगाने रंगवलेले गर्भगृहाचे दार आणि त्यावर असलेली गणेश पट्टी आणि तळाशी असणारे कीर्तिमुख निरखायचे , शिवपिंडीचे दर्शन घेउन मंदीराचा बाह्य भाग बघायला जाउया मंदिराची बाहेरील दर्शनी बाजू पाने, फुले, वेगवेगळ्या भौमितिक रचनाच्या थरांनी सजवलेल्या आहेत. यातीलच सर्वात वरच्या थरात कामशिल्पांचे चित्रांकन केले आहे. या शिल्पात युगूल शिल्पे, मैथून शिल्पे, दिसतात. या मंदिराच्या प्रांगणात असणारी पु्ष्करणी हे आणखी एक वैशिष्ट्य. पुष्करणी किंवा बारव म्हणजे चौकोनी आकाराचा उतरत्या पायºयांची रचना केलेले कुंड. एकात एक लहान होत जाणारे तीन ते सात टप्पे हे बारवाचे स्वरुप असते. या बारवांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या बारवांत पाण्याचे अंतर्गत स्त्रोत असतात. आपण पावसाचे पाणी अडविणे, ते मातीत जिरवणे आणि साठवणे यासाठी अनेक योजना केल्या आहेत. पाऊस पडला नाही तरी बारवातील अंतर्गत स्त्रोतातून भूगर्भातील पाणी झिरपून बारवात पाणी भरते. दुष्काळात या पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच बारवातील पाण्याची स्वच्छता राखणे, बारवातील गाळ काढून अंतर्गत स्त्रोताचा मार्ग मोकळा करणे, बारवाच्या भिंतीतून होणारी गळती थांबवणे, झाडे, झुडपे, पाण्यातील वेली काढून टाकणे या सर्व प्रक्रिया करून बारवाची निगा राखली तर दुष्काळातही पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकते.हा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या वतीने ठोस पावले उचलली जावी अशी अपेक्षा आहे.
३ ) वसंतगड
पुणे बेंगळुरू महामार्गावरुन प्रवास करताना कराडजवळ पश्चिमेला एक डोंगर तटा, बुरुजाचे शेलापागोटे लेउन उभा दिसतो, हा आहे एतिहासिक गड वसंतगड. पायथ्याचे तळबीड गावालाही मोठा इतिहास आहे. शिवछत्रपतींचे सेनापती हंबीरराव मोहीते यांचे हे गाव. तसेच शिवाजी महाराजांच्या पत्नी सोयराबाई व ताराराणी यांचेही गाव तळबीडच.प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाचा कोथळा बाहेर शिवाजी महाराजांनी आदिलशाहीस मोठा दणका दिला आणि कोल्हापूरपर्यंतचा सर्व मुलूख व किल्ले ताब्यात घेतले त्यात वसंतगडाचा समावेश होता. पुढे औरंगजेबाच्या ताब्यात हा किल्ला गेला असताना वसंतगडाचे त्याने केले "किली - द - फतह" असे नामकरण केले होते. मात्र फार दिवस तो मोगलांच्या ताब्यात राहिला नाही. महाराणी ताराराणीच्या वतीने परशुराम त्र्यबंक प्रतिनिधींनी मोगलांच्या ताब्यातील हा किल्ला जिंकून घेतला.१३ मे १८१८ मधे ब्रिटिश मन्रोच्या नेतृत्वाखाली हा किल्ला इंग्राजांनी जिंकून पहिल्यांदा मुख्यदरवाजा पाडून टाकला.
इतिहास प्रसिध्द गडाला भेट द्यायची तर पुणे-बेंगळुरू अशियायी महामार्गावरुन तळबीड फाट्यावरुन गावार पोहचले कि समोर दिसते अतिशय देखणे असे सेनापती हंबीरराव मोहीते यांचे स्मारक. इथे अभिवादन करुन श्रीराम मंदीराला भेट देउन गडावर चढाई सुरु करायची. गावातून किल्ल्यावर जाण्यास ४५ मिनीटे लागतात. गडमाथ्याजवऴ डाव्या बाजूला एका घुमटीत श्री गणेशाची चार साडेचार फूट उंच सुंदर मूर्ती पाहून आपले दोन्ही हात नकळतच जोडले जातात. मोठया मोठ्या नैसर्गिक दगडी पायऱ्या चढत आपण इंग्रजांनी नष्ट केलेल्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो. तटबंदीच्या आतील भागात शेजारीच चपेटदान म्हणजे उजवा हात जणू शत्रूला मारण्यासाठी उगारलेला अश्या हनुमानाचे इवलेसे मंदिर व चुन्याचा घाणा दिसतो. गडावर प्रवेश करताच समोर एक झोपडीवजा हाॅटेल आहे आधी आपण जाउया गडमाथ्याच्या मध्यभागी. इथे चहा नाश्त्याची सोय होवू शकते इथे मोठ्या प्रमाणात झाडी व काही मंदीर आहेत. त्यातील महत्वाचे मंदीर आहे, चंद्रसेन महाराजांचे.
चंद्रसेन महाराज हे अनेक मराठे घराण्यांचे कुलदैवत आहे. दगडी मंदिर असून प्रशस्त सभामंडप आहे. मंदिर सुरेख असून आत गाभार्यात चंद्रसेन महाराजांची मूर्ती आहे. चंद्रसेन हा शूर्पणखेचा मुलगा. महादेवाची खूप तपश्चर्या करून खड्ग प्राप्त करून घेतले. शेवटी लक्ष्मणाने त्याचे दोन्ही हात तोडले. सध्याच्या मूर्तीचे दोन्ही हात अर्धेच आहेत. मात्र उत्सवमूर्ती पूर्ण हातांची आहे.इकडे याला चंद्रोबा / चांदोबा असेही म्हणतात.
गडाच्या मध्यभागी असलेली मंदिरे आणि इतर अवशेष पाहून पुन्हा गडाच्या पुर्व दरवाज्याक्डे यावे.ईथून तटबंदीवर चढून गडाच्या माथ्याचा फेरफटका करुया. बारकाईने बघीतले तर बुरुजांच्या बांधणीचे एक वेगळे वैशिष्ट्य ईथे दिसून येते.बहुतेकदा तटबंदीच्या बाहेर बुरुज आलेले असतात.ईथे मात्र तटबंदी पुढे आणि बुरुज मागे अशी वेगळीच रचना पहावयाला मिळते. दोन बुरुज तर तटबंदीपासून आत सुटे बांधले आहेत. गडाच्या तटबंदीवरुन वाट्चाल सुरु ठेवायची. या दक्षिण बाजुला आडवा तिडवा पसरलेला बौध्द लेण्यांनी पोखरलेला आगाशिवाचा डोंगर दिसतो. गडाच्या पश्चिम बाजुला कोयना नदी आणि तिचे अफाट पसरलेले खोरे दिसते.याच बाजुला कमळ फुलांनी लगडलेले कोयना तळे आहे. गडाच्या उत्तर टोकाकडे. पश्चिम बुरुजाजवळ किल्ल्याचे दुसरा सुस्थितीतील दरवाजा असून याचे बांधकाम गोमुखी पद्धतीचे आहेत. या दरवाजाचे चौकटीचे बाहेरील बाजुस डोक्यावर शेपुट असणारी लढाऊ वीर हनुमानाची मुर्ती आहे. या दरवाज्यातून बाहेर पडणारी वाट खाली बेलदरे गावाच्या हद्दीतील नाईकबा देवस्थानाकडे जात असल्याने याला 'नाईकबा दरवाजा' म्हणतात. याशिवाय गडावर आणखी एक प्रशस्त तलाव कृष्णा तळे आहे. या तळ्याच्या काठावर अनेक अज्ञात समाध्या व सतीशिळा आहेत. एकंदरीत इतिहासप्रसिध्द निसर्गरम्य गड आवर्जून बघायला हवाच.
4 ) फलटणची मंदीरे :-
फलटण हे भारतातील एक पुरातन शहर आहे. महानुभाव साहित्यात याचा ‘पालेठाण’ असा उल्लेख आढळतो. इथल्या काही मंदीराला आज आपण भेट देणारा आहोत. फलटण शहरात यादव काळात अनेक मंदिरे बांधली गेली. त्यापैकी एक प्राचीन "जरबेश्वर मंदिर" आजही राजवाडा व श्रीराम मंदिरा यांच्या जवळ रस्त्याच्या मधोमध उभे आहे.हे मंदिर एकाच प्रचंड आकाराच्या शिळेमधून कोरून काढल्यासारखे वाटते. जबरेश्वर या मंदीरात चोवीस तीर्थकरांच्या मूर्ती व ललाटबिंबातील जिनाची मूर्ती बघायला मिळते. चौथे मुधोजीराव निंबाळकर यांनी जबरेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीची स्थापना केली. या उत्तराभिमुख मंदिरास गर्भगृह व प्रवेशमंडप असून बाहेरील भिंतीवर मुर्ती मोठ्या संख्येने बघायला मिळतात. मंदिराच्या भिंतीवरील मूर्तीत अष्टदिक्पाल व सुरसुंदरी यांच्या मूर्ती लक्षणीय आहेत. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराशेजारी पाच फण्यांची नागीण व तिची दोन पिल्ले यांची शिल्प आहेत उजव्या बाजूला कोनाड्यात विठ्ठल-रुक्मिणी, नंदी, कासव, गणपती अशा मूर्ती आहेत.पिंडीवर दोन शाळुंका असून, त्यांचा आकारही वेगळा आहे. अशा प्रकारची पिंडी सहसा कोठे आढळत नाही.श्रीराम मंदिर :
फलटणमधील
श्रीराम मंदिर हे शहराचे भूषण आहे. हे मंदिर २२५ वर्षांपूर्वीचे आहे.
मंदिराभोवती उंच दगडी भिंत आहे. भव्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर
डाव्या बाजूला राजवाडा, तर उजव्या बाजूला श्रीरामाचे मंदिर आहे. मंदिर
पूर्वाभिमुख असून, मंदिरासमोर तीन दीपमाळा आहेत. गाभाऱ्यात श्रीराम,
लक्ष्मण व सीता यांच्या नयनमनोहर मूर्ती आहेत. हे मंदिर हेमाडपंती शैलीतील
असून, याचा शिखर व कळस अत्यंत प्रेक्षणीय आहे. श्रीराम मंदिराला लागूनच
राधाकृष्ण, एकमुखी दत्त व गरुड यांची मंदिरे आहेत. त्याच्या उत्तरेला
श्रीमंत मुधोजीराव नाईक-निंबाळकर यांनी बांधलेले दत्तात्रयाचे मंदिर आहे.श्री चक्रपाणि प्रभूं मंदीर
फलटण येथे महानुभाव पंथियांची मंदिरे असून फलटणला, महानुभाव पंथीयांची "दक्षिणकाशी" म्हणून ओळखले जाते. फलटण शहरातील चक्रपाणि प्रभूं मंदिर श्री अप्पासाहेब मंदिर या नावाने ओळखले जाते.या आधी हे रंभाइसा याचे मंदिर म्हणून ओळखले जात होते..चक्रपाणी प्रभु फलटणमध्ये दहा वर्ष राहीले.
जुन्या मंदिराचे पुढे नुतनीकरण झाले.महानुभाव पंथाची जी सुंदर देवस्थान आहेत त्यापैकी एक हे फलटणचे मंदिर.हे मंदिर चक्रपाणी महाराजांचे चरणांकित स्थान मानले जाते.
फलटण येथे महानुभाव पंथियांची मंदिरे असून फलटणला, महानुभाव पंथीयांची "दक्षिणकाशी" म्हणून ओळखले जाते. फलटण शहरातील चक्रपाणि प्रभूं मंदिर श्री अप्पासाहेब मंदिर या नावाने ओळखले जाते.या आधी हे रंभाइसा याचे मंदिर म्हणून ओळखले जात होते..चक्रपाणी प्रभु फलटणमध्ये दहा वर्ष राहीले.
जुन्या मंदिराचे पुढे नुतनीकरण झाले.महानुभाव पंथाची जी सुंदर देवस्थान आहेत त्यापैकी एक हे फलटणचे मंदिर.हे मंदिर चक्रपाणी महाराजांचे चरणांकित स्थान मानले जाते.
थेट फलटणमध्ये नसलेले पण आवर्जून पहावे असे एक मंदीर म्हणजे गिरवी गावातील श्रीकृष्ण मंदीर ! फलटण पासून साधारण ८,१० किमी अंतरावर असलेले हे गिरवी गाव.गावातून जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या हाताला असलेले हे मंदिर.निरव शांतता, बाहेर मोठा वृक्ष,त्या वृक्षाखाली एक छोटे खोलीवजा मंदिर, ज्यामध्ये देवाकडे पाहत असलेली हनुमंत, नंदी आणि गरुडाची मूर्ती.
समोरच, सकृतदर्शनी एखादा चौसोपी, ऐसपैस वाडा वाटावा अश्या धाटणीचे, चिरेबंदी मंदिर. समोर देवळाचे सभागृह आणि थेट गर्भगृह. श्रीकृष्णाची काळ्या शाळीग्रामात साकारलेली मूर्ती. हरि आणि हर, दोहोंना एकात पाहण्याची.खाली चौकोनी पिंड आणि त्यावर साकारलेली हरीची, बासरीवादन करणाऱ्या प्रभू श्रीकृष्णाची मूर्ती, या परिसरात सत्पुरुष येऊन गेले, त्यांच्या अनुभूतीप्रमाणे भगवंत त्यांच्या एका जिवलग भक्तासाठी - इथे गहाण रुपी राहिला आहे, म्हणून या स्थानाचे नाव गिरवी,
समोरच, सकृतदर्शनी एखादा चौसोपी, ऐसपैस वाडा वाटावा अश्या धाटणीचे, चिरेबंदी मंदिर. समोर देवळाचे सभागृह आणि थेट गर्भगृह. श्रीकृष्णाची काळ्या शाळीग्रामात साकारलेली मूर्ती. हरि आणि हर, दोहोंना एकात पाहण्याची.खाली चौकोनी पिंड आणि त्यावर साकारलेली हरीची, बासरीवादन करणाऱ्या प्रभू श्रीकृष्णाची मूर्ती, या परिसरात सत्पुरुष येऊन गेले, त्यांच्या अनुभूतीप्रमाणे भगवंत त्यांच्या एका जिवलग भक्तासाठी - इथे गहाण रुपी राहिला आहे, म्हणून या स्थानाचे नाव गिरवी,
5 ) जाधव वाडा- भुईंज :-
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील भुईंज गावात छत्रपती शिवाजीमहाराज व राणी सईबाई यांची मुलगी राणूबाई जाधव यांच्या वंशजांचा वाडा आहे.साधारण ३०० वर्षापूर्वीचा हा वाडा आहे. राणुआक्का या शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब यांच्या द्वितीय कन्या. राणूबाईंचा जन्म राजगडावर झाला. राणुआक्कांचे आपले छोटे बंधु शंभूराजे यांच्यावर अतिशय प्रेम होते. शंभूराजेंना आईची ऊणीव राणुआक्कानी कधीच भासु दिली नाही. सईबाई यांच्या मृत्यूनंतर इ.स.१६६० मधे जिजाऊ माँसाहेब व शिवाजी महाराज यांनी राणुबाई यांचा विवाह शिंदखेडचे अचलोजी जाधवराव यांच्याशी राजगडावर लावून दिला. जाधवरावांच्या घरी राणुबाईंचा विवाह करून जिजाऊ आऊसाहेबांनी आपले माहेर व शिवाजी महाराजांनी आपले आजोळ नव्या नात्याने जवळ केले.
जाधव घराण्याचे दोन वाडे भुईंज गावात होते. त्यापैकी एक वाडा पडला आहे. एक सुस्थितीतील चौसोपी आहे. त्या वाड्याचे दोन बुरुज दिसतात. वाड्यात जाण्यासाठी दोन बाजूंनी दहा-दहा रुंद पाय-या आहेत. वाड्याचा दरवाजा भक्कम स्थितीत आहे. वाड्याचा दिवाणखाना उत्तम स्थितीत असून तेथे प्रशस्त देवघर आहे. देवघरातील मूर्ती सुंदर असून त्यातील गणपतीची मूर्ती विलोभनीय आहे. दिवाणखान्याच्या बाजूस असलेल्या प्रशस्त दालनात प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती आहेत. ते दालन ‘राममंदिर’ असल्याचे मानले जाते. वाड्यात रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो. राममूर्तीसंबंधी आख्यायिका सांगितली जाते. ती अशी - एकदा एक घोडा गावात फिरत होता. त्या घोड्यास पकडून जाधवरावांच्या वाड्यावर आणले गेले. त्या घोड्याच्या गळ्यात वस्त्रात गुंडाळलेली प्रभू रामचंद्राची मूर्ती दिसून आली. त्या मूर्तीची प्रतिष्ठापना जाधवरावांनी त्यांच्या वाड्यात केली. जाधव घराण्याचे वारस त्यांच्याकडे ती मूर्ती ‘समर्थ रामदास स्वामींकडून आली’ असे सांगतात..अनेक चित्रपटांचे चित्रिकरण पण ह्या वाड्यात झाले.बाड्याबाहेर एक शिवकालीन बारव आहे. जवळच राणूबाई यांची समाधी आहे. सद्यस्थितीत वाड्यात जाधवरावांचे वंशज राहतात.
लुकजीराजे निजामशहाकडे पाच हजारी मनसबदार होते. त्यांच्या कर्तबगारीच्या जोरावर पुढे त्यांना दहा हजारी मनसबदारी, अठ्ठावीस महाल व बावन्न चावड्यांचे वतन मिळाले. त्यामुळे त्यांना निजामशाहीत मोठे महत्त्व प्राप्त झाले. अकबराने निजामशाहीवर आक्रमणे केली त्यावेळी चाँदबीबीने त्यास यशस्वी तोंड दिले, ते जाधवरावांच्या सहकार्यामुळेच. चाँदबीबीचा खून झाल्यावर, निजामशाही अस्तंगत होत असताना, ती वाचवण्यासाठी, मुर्तजा नावाच्या वारसास परिंडा येथे तख्तावर बसवण्याचा जो प्रयत्न झाला, त्यात जाधवरावांचा सहभाग होता. निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न करणा-या जाधवरावांची पुढे मुला-नातवांसह निजामशहाकडूनच हत्या झाली! त्यानंतर जाधव कुटुंबातील काहीजण स्थलांतरित झाले. त्यांतील खंडोजीराव हे भुईंज येथे वास्तव्यास आले. जाधवांचे ते घराणे भुईंज येथे नांदत आहे.
जाधव घराण्यातील रायाजीराव नावाचे पुरुष २५ फेब्रुवारी १७२८ रोजी पालखेडच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांची छत्री (समाधी/घुमट) भुईंज गावात उभी आहे. दगडकाम भक्कम आहे. त्या समाधीवरील शिल्पांमुळे तिला विशेष सौंदर्य प्राप्त झाले आहे. ती शिल्पे म्हणजे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. समाधीच्या जोत्यावर चारही बाजूंस सिंहाच्या तोंडात हत्ती असल्याचे शिल्प आहे. ते शिल्प यादवकालीन शिल्पकलेत पाहण्यास मिळते, त्यामुळे ते घराणे सिंदखेडकर जाधवराव या घराण्यातील आहे हे सिद्ध होते.
6 ) साखरगड निवासिनी: देवी यमाई अर्थात अंबाबाई :-
कोरेगावच्या उत्तरेला ११ कि. मी. वर वसना नदीच्या उपनदीकाठी किन्हई वसले आहे.हे पंत प्रतिनिधींचे मूळ गाव असून ते या गावचे कुलकर्णी होते. त्यांनी पुढे औंध संस्थानाची स्थापना केली. औंध संस्थान विलीन झाल्यावर किन्हईचा कोरेगाव तालुक्यात समावेश करण्यात आला. गावात पंत प्रतिनिधींचा मोठा वाडा असून तो सुंदर व मजबूत आहे. वाड्याभोवती तटभिंत असून इमारतीचा खालील भाग दगडी व वरील विटांचा आहे.येथील स्वागत कक्ष भव्य आहे. वाड्याच्या पाठीमागे ओढ्याच्या उजव्या तीरावर महादेवाचे मंदिर असून त्यास ओढ्याच्या पात्रापर्यंत पायर्या आहेत. मंदिरास सर्व बाजुने खुला मंडप आहे. त्यास गाभारा व शिखर आहे.
गावाच्या अग्नेयेस असलेल्या टेकड्यांपैकी पूवेकडील टेकडीवर साखरगड निवासिनी पंत प्रतिनिधींची कुलदेवता यमाई देवीचे मंदिर आहे. मंदिराकडे जाण्यासाठी गावातून सरळ रस्ता आहे. टेकडीच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत दगडी पायर्या आहेत. मंदिराभोवती तटभिंत असून तिला आतून मारा करण्यासाठी जंग्या आहेत. मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमेला असून त्यास कमान आहे. कमानीवर नगारखाना आहे. मंदिराच्या डाव्या बाजुस छताजवळ लहान प्रवेशद्वाराच्या उत्तरेस दोन्ही बाजुला दीपमाळा आहेत. एका दीपमाळेवर दोनदा वीज पडून पडझड झाल्याने ती पुन्हा बांधण्यात आली. परंतु तीच्यावर तिसर्यांदा वीज पडली तेव्हा तो अपशकून समजण्यात आला. दीपमाळेचे नंतर केव्हातरी बांधकाम केले आहे. एका दीपमाळेवर शिलालेख कोरला आहे.
मंदिराच्या डाव्या बाजूला काही ओवऱ्या आहेत. मंदिर हेमांडपंती पद्धतीचे असून एक मीटर उंचीच्या जोत्यावर बांधलेले आहे. मंदिराचा मंडप मात्र लाकडाचा आहे. यामध्ये काही चित्रे लावलेली आहेत. ती औंध गावात असणाऱ्या मंदिरामधील चित्रांची आठवण करून देतात. मूळ मंदिरामध्ये या मंडपाला जोडलेला आणखी एक (पहिला) मंडप आहे. याला तीनही बाजूला दरवाजे आहेत. गाभारा मात्र पूर्णपणे बंदिस्त असून, देवीच्या दर्शनासाठी गाभाऱ्याला एक काचेची फ्रेम बसविलेली आहे. गाभाऱ्याच्या चौकटीवर सुंदर कोरीवकाम केलेले आहे. याच्या दोन्ही बाजूला व्यालांचे शिल्प आहे. गाभाऱ्यातील देवीच्या मूर्तीला पितळी मुखवटा असून तिला अनेक दाग-दागिने घातलेले आहेत.. गाभाऱ्यात देवी अंबाबाई आहे तर मंदिराच्या प्रवेशद्वाराशी नंदी. हे या मंदिराच एक वैशिष्ट्य. मूर्ती दागिन्याने मढवलेली असून मूर्तीवर पडणारा प्रकाश परावर्तीत होण्यासाठी दागिन्यात काचेचा वापर केला आहे.या देवीची यात्रा कार्तिक पौर्णिमेपासून १५ दिवस असते. मंदिराच्या कळसावर भरपूर शिल्पं कोरलेली आहेत. यांमध्ये विष्णू दशावतार, राम-भरत भेट, देवी-देवता यांची शिल्पं असून त्यावर काही ठिकाणी जुन्या काळातील रंगही शिल्लक आहे. कळस वगळता मंदिराची रंगरंगोटी केलेली आहे. शिवाय काही भागांची वेळोवेळी योग्य प्रकारे डागडुजीही केलेली आहे. मंदिरावर असंख्य दगडी कोरीव शिल्प आहेत.देवादिकांच्या किती सुंदर, रेखीव , रंगीत आणि सुबक मुर्ती कोरल्या आहेत. नुकतेच त्यांचे नूतनीकरण झाले आहे. साखरगड आणि परिसराला भेट द्यायची असेल तर सातार्यावरुन सातारा रोड-नांदगिरीमार्गे किन्हईला जाता येते.
७ ) जंगली जयगड
कोयना नदी म्हणजे सुजलाम, सुफलाम महाराष्ट्राच्या संपन्नतेत भर घालणारी एक भाग्यवाहीनी. महाबळेश्वरास उगम पावून कराडजवळ कृष्णेत समर्पित होणाऱ्या कोयना नदीने एक देखणे खोरे निर्माण केले आहे. या नदीवर जेव्हा हेळवाक जवळ कोयना धरण उभारले गेले तेव्हापासून कोयनानगर पर्यटनाच्या नकाशावर आले. याच घनदाट वनात दबा धरुन बसलेला जंगली जयगड मात्र डोंगर भटक्यांना फारसा माहिती नाही.सध्या हा परिसर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अखत्यारीत येत असल्यामुळे सहसा इथे जायची परवामगी मिळत नाही. मात्र परवानगी नसल्यास इथे जाण्याचा प्रयत्न करु नये.
इथे जायचे तर कोयनानगरच्या पुढे असलेले नवजा हे ठिकाण सोयीचे. नवजामधुन एक घाटमार्ग पंचधारा बोगद्यामार्गे वीजनिर्मितीच्या तिसर्या टप्प्याजवळून उतरतो. मात्र सुरक्षेच्या कारणाने हा घाटमार्ग सध्या खाजगी गाड्यांना बंद आहे. वनखात्याचा गाईड बरोबर घेउन सुर्यप्रकाश जमीनीला स्पर्श करत नाही अश्या गर्द झाडीतून आपला प्रवास सुरु होतो. खरेच ज्याने कोणी जंगली जयगड हे नाव ठेवले, ते अगदी यथार्थ आहे.
सहाजिकच एन उन्हाळ्यातही इथे दुर्गभ्रमंती करणे शक्य आहे. रस्त्यावर या गडाची वाट दर्शवणारा एकही फलक अस्तित्वात नाही. त्यामुळे पहिल्यांदाच येणारा दुर्गप्रेमीसुद्धा वाट हमखास चुकतोच. सध्या किल्ल्यावर पाणी नसल्यामुळे गावातूनच आपल्याकडील बाटल्या भरून घ्यायच्या. साधारण तासाभराचं अंतर हे घनदाट जंगलातून पार करावं लागतं. जंगली जयगडावर जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे, कोकणातून थेट कडा असल्याने त्याबाजुने गडावर जाता येत नाही..गडावर जातांना वाटेत असलेल्या झर्यात जानेवारी – फेब्रूवारी महिन्यापर्यंतच पाणी असते. शक्यतो गडावर जाण्यासाठी नोव्हेंबर ते मे हा काळ उत्तम. फक्त थोडी माहिती असेल तर अस्वलाने नख्याने झाडावर काढलेली नक्षी, पायवाटेच्या बाजुला असणारे जनावरांच्या खुराच्या खुणा या सर्व जगंलाच्या जिवंतपणाची लक्षणे. क्वचित कर्णकटू असे एखाद्या प्राण्याचे किंचाळणे एकु येते आणि अंगावर सर्ररकन काटा येतो. नशीबात असेल तर एखाद्या वन्यप्राण्याचे दर्शनसुध्दा होउ शकते.
पायवाट थोडय़ा वेळेतच सपाटीवर घोडेतळ या निसर्गरम्य ठिकाणी येऊन पोहोचतो. या ठिकाणी पाण्याचा एक जिवंत झरा असून, इंग्रजांच्या काळात जंगली जयगडला येणारे अधिकारी या ठिकाणी आपली घोडी उभी करून पुढे पायी गडाकडे जात असत. त्यामुळे या ठिकाणास घोडेतळ म्हटले जाते. नीट निरखुन पाहिल्यास या पाणवठ्यावर येणार्या प्राण्यांचे ठसे आपणाला दिसू शकतात.
जंगलातून वर चढणाऱ्या पायवाटेने लता-वेलींचे अडथळे पार करत आपण दरी काठाच्या माथ्यावर येऊन पोहोचतो. दरीच्या या माथ्यावर छोटेखानी झेंडय़ाचा गोलाकार बुरूज असून, त्यावर चढण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत..हा गड सह्य़ाद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटावलेल्या डोंगरावर उभा असून, गडाच्या टोकाकडे जातांना आपल्याला दोन छोटे कातळ सुळके ज्यांना स्थानिक लोक "दिपमाळ" या नावाने ओळखतात ते दिसतात. इथे जांभ्या दगडातील तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात.किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी सरळ दरी असल्यामुळे जंगली जयगडाच्या निर्मात्यास याच्या रक्षणासाठी तटबंदी बांधण्याची फारशी गरज उरलेली नाही. इथेच एक दगडी चौथरा दिसतो.तो पाहून पुढे जाताच भग्न मंदिर दिसते. गडाच्या पश्चिम टोकावरुन खाली दरीत पोफळी लाईट हाऊस, समोर सर्ज वेल, तर उजव्या हातास कोळकेवाडी जलाशय, त्याच्या काठावरचा अपरिचित कोळकेवाडी दुर्ग आणि या सर्व ठिकाणी पोहोचण्यासाठी केलेला नागमोडी पोफळी घाटही व्यवस्थित न्याहाळता येतो. माणसांच्या आणि सिमेंटच्या जंगलातून बाहेर पडून या अनोख्या जंगली जयगडाचा अनुभव हा अविस्मरणीय ठरतो.
8 ) पसरणी गावचा शेख मीरा यांचा वाडा :-
वाई सह्याद्रीच्या कुशीत घनदाट वनराईत अनेक छोटी-छोटी गावं वसली आहेत. पूर्वी डोंगररांगांच्या पायथ्याला असलेल्या जंगलात मोकळ्या जागेत शेती करून लोक शेताजवळ वस्ती करून राहू लागले. जागा मिळेल तिथे चार-दोन घरांची वस्ती निर्माण झाली. पसरून पसरून असणाऱ्या लोकवस्तीमुळं ‘पसरणी’ गावाची निर्मिती झाली. लोकवस्तीच्या आजूबाजूला असलेल्या जंगलात गायरानं होती. गुराखी गुरं चरायला नेत. दगडी बारवातलं पाणी पिऊन जनावरं वनराईत विश्रांतीसाठी पसरत. यावरूनही लोकवस्तीला ‘पसरणी’ नाव पडले, अशी आख्यायिका सांगितली जाते. शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा परिसर. वाईहून पांचगणी-महाबळेश्वरला जाताना सह्याद्रीच्या डोंगररांगेत नागमोडी वळणाच्या घाटाला ‘पसरणी घाट’ असे नाव आहे.
गावाच्या अलिकडे एक किलोमीटर अंतरावर एका ऐतिहासिक वाड्याच्या खुणा पाहण्यास मिळतात. तो शेख मीरा यांचा वाडा. संभाजीराजांचे पुत्र शाहुराजे हे औरंगजेब बादशहाच्या कैदेतून १७०७ मध्ये सुटले. त्यांचा आणि ताराराणींचा संघर्ष झाला. खेड येथे लढाई होऊन शाहूराजांचा विजय झाला. शाहुराजांच्या सैन्याने अजिंक्यतारा किल्ल्याला वेढा नोव्हेंबर १७०७ मध्ये घातला. त्या वेळी शेख मीरा किल्ल्याचा हवालदार होता. त्यानी साताऱ्याच्या किल्ल्याचा दिंडी दरवाजा शाहुराजांना मोकळा करून दिला. अशा त-हेने ताराराणीची सातारा ही राजधानी शाहूराजांच्या ताब्यात डिसेंबर १७०७ मध्ये गेली. शाहुराजांचा संकल्प आठ दिवसांत किल्ला ताब्यात घेण्याचा होता, तो पूर्ण झाला. तो दिवस शनिवारचा होता. तेव्हापासून शनिवारी ‘फत्तेची नौबत’ वाजवण्याची प्रथा पडली.
महाबळेश्वरला जाताना पाचगणी घाटातून आजही आपणास पसरणी गाव व शेख मीराचा वाडा दिसतो. शेख मीराचा वाडा पसरणी येथील कोराळा ओढ्याच्या जवळ उभा आहे. तो वाडा शेख मीराच्या तत्कालीन सरदारी थाटाची साक्ष देतो. वाडा सहा एकरांच्या परिसरात पसरला आहे. वाड्याचे प्रवेशद्वार त्याच्या भव्यतेची ग्वाही देते. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच चार मोठ्या कमानी असलेली इमारत नजरेत भरते. बाहेरचे दालन खुले असून, त्याला जोडूनच चार-पाच खोल्या आहेत. एका खोलीत शेकोटीची कमान आहे. त्यावर चुन्यात बांधलेले धुरांडे आहे. एक खोली नमाजाची आहे. मुख्य दालनातून खोल्यांमध्ये प्रवेश करण्यास जिना आहे. मागच्या बाजूस कमानी असलेले दालन आहे. वाड्यास जोडूनच एक उंच टेहळणी बुरूज किंवा मनोरा उभा असल्याचे दिसते. एका बाजूस घोड्याची पागा असून, जवळच मोटेची विहीर आहे. शेख मीरा याला पसरणीचे नवाब म्हणून ओळखले जात असे. सध्या त्या वाड्यास नवाब बंगला असे म्हटले जाते. तेथून जाणारा एक कच्चा रस्ता आहे. तो पाचगणीला जातो. तो नवाबाच्या खासगी मालकीचा होता. त्याच्या परवानगीशिवाय त्या रस्त्याने जाता येत नसे अशी आठवण सांगितली जाते.
पसरणी गावात रघुनाथस्वामी नावाच्या संतांची समाधी असून, तेथे राममंदिर आहे. कालभैरवनाथ हे गावाचे मुख्य दैवत आहे. त्याचे मंदिर हेमाडपंथी आहे. पसरणी गावात महराष्ट्र शाहीर कृष्णराव साबळे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बी. जी. शिर्के, बँकिंग क्षेत्रातील अर्थतज्ज्ञ गजानन दाहोत्रे, साहित्यिक, स्वातंत्र्यसेनानी जन्माला आले. त्यांनी गावची कीर्ती सर्वदूर पोहोचविली आहे.
9 ) शिखर शिंगणापूर :-
शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव हा महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव दोनीही यादव कुळातील सिंधण राजाने वसवली आहेत, असे म्हणतात. देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंघण राजा येथे येऊन राहिला होता. त्यानेच शिंगणापूर गाव वसविले.त्यावरुन गावाचे पूर्वीचे नाव सिंघणापूर पडले असावे. पुढे या नावाचा अपभ्रंश होऊन आजचे शिंगणापूर नाव प्रचलित झाले असावे.
शिखर शिंगणापूर हे भोसले घराण्याचे कुलदैवत. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत असत. माण - खटाव हा पूर्वी पासून दुष्काळी प्रदेश होता. त्यामुळे शिखर शिंगणापूरला येणार्या भाविकांचे पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे होणारे हाल पाहून मालोजीराजांनी इ.स. १६०० साली येथे एक मोठे तळे बांधले, त्यास पुष्करतीर्थ असे म्हणत; त्यालाच आता शिवतीर्थ म्हणतात. आजही हा तलाव शिखर शिंगणापूरच्या टेकडीच्या पायथ्याशी पाहायला मिळतो. शिवाजी महाराजांनी या मंदिराची २ भव्य प्रवेशव्दारे बांधली. त्यातील पूर्वेकडील प्रवेशव्दार ६० फूट उंच असून त्यावर सापाचे सुंदर शिल्प कोरलेले आहे. दुसरे प्रवेशव्दार उत्तरेकडे असून ते ४० फूट उंच आहे. मंदिरापर्यंत येण्यासाठी रस्ता झाल्यामुळे ही दोन्ही महाव्दारे पाहाण्यासाठी वाट वाकडी करून जावे लागते.
पूर्वीचे देऊळ पडल्यामुळे १७३५ मध्ये शाहू महाराजांनी सध्याचे देऊळ बांधले.वीर सरदार बाजी गोळे यांच्या देखरेखीखाली (हवालदार म्हणून नियुक्ती होती)बांधकाम पूर्णत्वास आले, पुढे १९७८ मध्ये त्याचाही जीर्णोद्धार झाला. दक्षिणेतील रामस्वामी नावाच्या एका स्थापत्यतज्ज्ञाकडून शिखराची व मंदिराची डागडुजी करून त्यांना आकर्षक रंग देण्यात आला आहे. शाहू महाराजांनी मंदिराच्या पश्चिमेला शहाजी महाराज, शिवाजी महाराज व संभाजी महाराज या तिघांची स्मारके (स्मृती मंदिरे) बांधली. ही पाहाण्यासारखी आहेत. काळ्या पाषाणात बांधलेल्या या स्मारकामध्ये तीन शिव मंदिरे आहेत. मंदिरांच्या व्दारपट्टीवर गणपती कोरलेला आहे. मंदिरांसमोर तुळशी वृंदावन आहेत. मंदिराच्या डाव्या बाजूला कमानीयुक्त ओवर्या आहेत.
या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या घंटा आहेत. या घंटापैकी एक घंटा ब्रिटीशांकडून मंदिराला मिळाली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दोन शिवलिंग आहेत. त्यांनाच शिव पार्वतीचे प्रतिक मानतात. शिवाजी महाराजांच्या घराण्यामध्ये शिखर शिंगणापूरच्या महादेवाचे अतिशय महत्त्व होते. मंदिरात चार वेळा पुजा केली जाते. दरवर्षी चैत्र शु. अष्टमीला शंकर पार्वती विवाह सोहळा अगदी साग्रसंगीत साजरा केला जातो. पंचमीला हळदीचा कार्यक्रम असतो. या लग्नासाठी एक भले मोठे ५५० फुट लांब पागोटे विणले जाते. ज्या कुटूंबाला हे काम दिले जाते ते कुटूंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात.
या महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात. या कावडींमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भुत्या तेल्याची. या कावडीला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात. ते वर घेऊन जाणे हे तसे कष्टाचे काम. आणि मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचे त्यालाच मदतीला बोलवतात. आणि हाकही हक्काचे माणूस असावे तशी म्हणजे, हे म्हादया, धाव, मला सांभाळ अशी. असा सगळा द्रविडी प्राणायाम करत ही कावड वर नेली जाते आणि महादेवाचा अभिषेक होतो.
असं हे शिखर शिंगणापूर ऐतिहासिक, पौराणिक कथांशी जोडलेले एक रम्य ठिकाण आणि तीर्थक्षेत्रही!
१० ) संतोषगड उर्फ ताथवडा
फलटण परिसर तसा डोंगरी किल्ल्यांसाठी प्रसिध्द नाही, पण या परिसरातील म्हसोबा डोंगररंगेवर संतोषगड, वारुगड, महिमानगड आणि वर्धनगड हे किल्ले आहेत. इथली भटकंती शक्यतो पावसाळ्यात केलेली उत्तम. इथल्या एन उन्हाचा कडाका बाहेरच्या लोकांना सहन होण्यासारखा नाही. पाउस तसा जेमतेम भिजवून जातो. एन आषाढात पाउस नसला तरी ढगांची सावली इथली वणवण सुसह्य करते. इथे जायचे तर ताथवडे हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. फलटण ते ताथवडे हे साधारण १९ किमी चे अंतर आहे. गावाच्या मध्यभागी बालसिध्द शंकराचे प्रशस्त मंदिर प्रेक्षणीय असुन याचा नगारखाना अंदाजे १५ मीटर उंच आहे. मंदिराचे प्राकार प्रशस्त असून मंदिराच्या गाभार्यावर असलेल्या कळसामधे तालीम आहे. शिव मंदिरातील पिंडीवर शाळुंखेत चौमुखी शिव कोरलेले आहेत.बालसिध्द म्हणजे शंकर अर्थात अष्टभैरवापैकी एक. त्याची मुर्ती शैवपंथीयांच्या संकेतानुसार आहे.
त्रिकोणी आकाराचा हा संतोषगड तीन टप्प्यांचा बनलेला आहे. पहिल्या टप्प्यावर सरंक्षक तटबंदी तर दुसया टप्प्यावर माचीचा भाग आणि सर्वात वरचा बालेकिल्लाचा भाग आहे. गडावर चढाई करताना वाटेत मंदिर व काही घुमट्या नजरेला पडतात. वर चढणार्या वाटेवर वनखात्याने परिसरात दिसणार्या प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे फोटो लावले आहेत. पंधरा वीस मिनिटांच्या चढाई नंतर पायवाट उजवीकडे वाळलेली दिसली. मठाच्या पुढे तीन गुंफा आहेत. वाटेवरून चालत गेलो असता पुढे मानवनिर्मित गुहे म्हणजे एक खांबटाकं दिसते.इथेच असलेल्या आश्रमामधे महिषासुरमर्दिनीची सुंदर मुर्ती आहे. आश्रमाजवळ एक छोटे मंदिर आहे, जेथे दत्त व लक्ष्मी मातेच्या प्रतिमा ठेवल्या आहेत.
मठाच्याच वरच्या बाजूला एक दरवाजा आहे. जाताना वाटेतच एक छोटेसे देऊळ लागते. देवळातील या मुर्तीला वाल्मिकीची मुर्ती समजतात. दरवाज्यातून पुढे चालत गेल्यावर आपला प्रवेश किल्ल्याच्या माचीवर होतो. येथील बालेकिल्ल्याची तटबंदी आणि ताशीव कडे दृष्टीस पडतात.
माचीला सुद्धा तटबंदी आहे. किल्ल्याचा डोंगर चढायला अतिशय सोपा आहे. त्यामुळे शत्रू अगदी सहजपणे वर चढून येऊ शकतो. माचीवरील ही अभेद्य तटबंदी त्याला आत येण्यापासून रोखून ठेवू शकते.
गडमाथ्यावर पहारेकर्यांच्या देवड्या दृष्टीस मारुती आणि गणपतीचे भग्न अवस्थेतील मंदिर, हनूमानाचे टाके त्याच्याच मागे वाड्यांचे व घरांचे अवशेष,चुन्याचा घाणा आणि त्याच्या पुढे प्रशस्त सदर आहे. सदरीच्या मागच्या बाजूला तीन खोल्यांत विभागून बांधलेले धान्यकोठार आहे.
याच्यापुढे आहेगडावरचे मुख्य आकर्षण पहाण्यासाठी, "प्रचंड मोठी विहीर आणि तातोबा महादेवाचे मंदिर" धान्यकोठाराच्या मागच्या बाजूस प्रचंड मोठं विहीर वजा टाकं आहे. टाक्यात खाली वाकून बघताना भीती वाटते. एकुणच या परिसरातील पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेउन इतकी खोल विहीर खोदलेली असावी. हि विहीर पाण्याने पुर्ण भरत असल्यावर गडावरच्या लोकांना काळजीचे कारण उरत नसणार. याच विहीरीचे पाणी नळाद्वारे ताथवडा गावात आणले जात होते. टाक्यात उतरण्यासाठी खोदीव पायऱ्या काढल्या आहेत. खाली उतरताना वाटेत शंकराचे छोटे देऊळ आहे. यालाच "तातोबा महादेव" म्हणतात. याची एक कथा रहाळात सांगितली जाते.
बालेकिल्ला त्रिकोणी आकाराचा असून तिन्ही टोकाशी बुरुज आहेत. पैकी दक्षिण बाजुचा बुरुजाला चिलखती तटबंदी आहे. ह्या बुरुजावरून खाली पाहिल्यावर ह्या बुरुजाची चिलखती तटबंदी दृष्टीस पडते.इथे जाण्यासाठी बुरुजाच्या डाव्या आणि उजव्या बाजूने भुयारी मार्ग केलेले आहेत. पूर्वीच्या लोकांनी काय हेतू डोळ्यासमोर ठेऊन इतकं भव्य बांधकाम केलंय हे कदाचित आपल्या कल्पनेच्या पलीकडे असू शकते. किल्ल्याच्या पूर्व दिशेकडे असणाऱ्या बुरुजाच्या बाजुचे कातळ खडे आहेत त्याची रचना विचारात घेता हे प्रस्तरारोहणाचा सराव करण्यासाठी आदर्श आहेत. असे सांगतात कि हा किल्ला घेतल्यानंतर एकापाठोपाठ एक असे अनेक गड स्वराज्यात आले म्हणून महाराज संतोष पावले म्हणून या गडाचे नाव बदलून संतोषगड ठेवले. आपणही ताथवडा बघण्याचा संतोष मिळवायचा आणि हि दुर्गयात्रा पुर्ण करायची
11 ) लिंब बारामोटेची विहिर
मानवी वसाहती ह्या जलसंस्कृतीच्या काठावर वसल्या आणि हजारो वर्ष विकसित होत राहिल्या. पाणी ही मानवाची प्रमुख गरज असल्याने पाण्यास "जीवन" हे नाव दिले असावे. पाण्यासाठी योग्य ठिकाणी विहीर, बारव, आड खोदण्याची परंपरा फार प्राचीनकाळापासून अस्तित्वात आहे. स्वराज्याच्या सातारा गादीचे छत्रपति शिवाजी उर्फ शाहू महाराजांच्या काळात श्रीमंत विरुबाई भोसले या कर्तबगार स्त्रीने लिंबच्या शेरी वस्ती येथे बारा मोटेच्या विहिरीची निर्मिती केली. विहीरीच्या परिसरात सुमारे ३०० आंब्याची बाग लावली होती. या बागेला बारमाही पाणी मिळावे म्हणून इ. स. १७१९ - १७४० च्या दरम्यानच्या कालखंडात ही विहीर तयार करण्यात आली असावी. अष्टाकोनी साठ फूट व्यासाच्या विहिरीस पाणी उपसा करण्यासाठी बारा मोट असल्यामुळे, या विहीरीला "बारा मोटेची विहीर" म्हणून संबोधण्यात येते. हिची खोली १०० फूट व व्यास ६० फूट असून संपूर्ण बांधकाम घडीव दगडात केलेले आहे. आजही ती सुस्थितीत आहे. बारा महिने या विहिरीला पाणी असते. विहिरीचे बांधकाम कोरीव दगडात आहे. विहिरीचा आकार अष्टकोणी असून एखाद्या शिवलिंगा सारखा भासतो. विहिरीचे दोन भाग आहेत अष्टकोनी आकाराची मुख्य विहीर आणि तिला जोडणारी उप विहिर चौकोनी आकाराची आहे. विहिरीत उतरण्यासाठी दगडी फरसबंदी पायऱ्या आहेत. पायर्यावर असलेल्या कमानीवर वीरूबाईंनी ही विहीर बांधली असल्याचा शिलालेख कोरलेला आहे. काही पायऱ्या उतरुन गेल्यावर चौकोनी आकाराच्या तटबंदीत दगडी साकव लागतो. साकवाच्या दोन्हीही बाजूला रूंद दगडी बांधकामातील आयताकृती भलेमोठे हौद आहत. मुख्य विहिरीला जोडणारा दगडी कमानी भाग, तर त्याच्यावर दगडी खांबाचा नक्षीदार सज्जा असे अचंबित करणारे दृश्य दिसते. मुख्यविहिरीत उतरण्यासाठी दोन्ही बाजूला जिने आहेत ते एका महाल वजा हॉलमध्ये निघतात. येथे खांबावर गणेश , मारुती , अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांची शिल्पे कोरलेली आहेत. विविध पक्षी, चित्रे ही दगडी भिंतीतून बाहेर डोकावताना पाहून आपल्या पूर्वजांच्या कलासक्त जीवनशैलीचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. कमानीच्या दोन्ही बाजूची गजशिल्प वैभवशाली अभिरुचीची साक्ष देतात. विहीरीच्या या दालनाला असलेल्या सज्जाला पडदे अडकवण्यासाठीच्या खुंट्या दिसतात. महाराजांची गोपनीय खलबतं करण्याची ही जागा असावी. विहिरीच्या वरच्या बाजूस पत्थरात घडवलेले आसन आहे ज्याच्यावर बसून शाहूमहाराज रयतेशी हितगुज करत. विहीर बांधकामात वरच्या अंतर्गत भागात गजावर आरुढ झालेला शरभ शिल्प आहे. विहीरीच्या प्रत्येक कोनात नागदेवतेची मूर्ती आहे. विहीरीच्या परिघावर पाणी उपसणासाठीच्या मोटा बघायला मिळतात.
या विहिरीचे संपूर्ण बांधकाम चुण्यामध्ये केले असल्याने ते इतक्या वर्षानंतरही भक्कम आहे. विहिरीतील स्वच्छ पाण्यात पोहण्याचा आनंद घेऊ शकता, परंतु विहीर अतिशय खोल असल्याने काळजी घ्यावी. ज्यांना पोहायला जमत नाही अशांनी पाण्यात उतरू नये.
पुण्यापासून बेंगळुरू हायवे वरुन प्रवास करताना गौरीशंकर महाविद्यालयाच्या समोर 'लिंब फाटा' लागतो. हा फाटा अनेवाड़ी टोलनाक्या-पासून ३ किमी पुढे आहे .हायवेपासुन आत २ किमी आत लिंब गाव असून येथून पुन्हा १ किमी अंतरावर उजविकड़ील बाजुस 'शेरी' नावाचा परीसर आहे. येथेच विहीर पहावयास मिळेल.
हि विहीर पाहून शिवकाळात आपली स्थापत्यकला किती प्रगत होती याचा अभिमान वाटतो. केवळ दगडातून अतिशय कोरीव शिल्प उभं केलं आहे, ते प्रत्येक इतिहासप्रेमीने आवर्जून पाहिले पाहिजे.
12 ) कोयनेचा भैरवगड
महाराष्ट्रात पाच भैरवगड आहेत, त्यापैकी कोयनेच्या म्हणजेच सध्याच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात , सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून थोडा पुढे कोकणात झुकलेला हा गड तसा दुर्लक्षित आहे. या परिसराचे मुख्य संरक्षण म्हणजे दिवसाही सुर्यप्रकाश जमीनीवर पडू न देणारे गर्द जंगल. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सध्या वाघांचा वावर असल्यामुळे पर्यटकाचा राबता बंद केला आहे. मात्र भैरवनाथाच्या मंदीरामुळे भैरवगडाला भेट देता येते. आज आपण तिथेच जाणार आहोत.
भैरवगडावर जाण्याचे पाच मार्गे आहेत. मोरगिरीमार्गे कळे, पाथरपुंज असा कच्चा गाडी रस्ता, चिपळुण तालुक्यातील पाथ, मंजुत्री गावातून चढणारी तसेच रातांबीम मजरेकडून चढणार्या घाटवाटा, हेळवाककडून धनगारवाड्यामार्गे येणारी वाट, मात्र या सर्व वाटा दमणुकीच्या आहेत.आपण जाणार आहोत संगमनगर धक्का, नाव गावातून ओपन टॉप जीपने. हा रस्ता घनदाट जंगलातून जातो. सकाळी लवकर भटकंतीला सुरवात केली तर गवारेडा, अस्वल, शेकरु असे प्राणी बघायला मिळतात. कच्चा गाडी रस्त्याने जाताना या परिसरातील गावकरी रोजचे आयुष्य कसे जगत असतील ? असा प्रश्न पडल्यावाचून रहात नाही. थोड्यावेळात आपण वनखात्याच्या चौकीपाशॉ येतो. इथे परवानगी घेउन शुल्क भरुन सर्वाधीक पावसाची नोंद झालेल्या पाथरपुंज गावात आपण दाखल होतो. इथूनच पुर्वी प्रचितगडाकडे जाणारी वाट होती, आता मात्र पुढील परिसर कोअर झोन असल्यामुळे त्या भागात जाता येत नाही. इथून कच्चा गाडी रस्ता थेट भैरवनाथाच्या मंदीराकडे जातो. गावकरी या कच्च्या रस्त्याने ये जा करताना दिसतात. जंगलाच्या कृपेने मिळणारा आंबा, फणस, करवंदे, जांभुळ हा रानमेवा कराड, पाटण, कोयनानगर, चिपळूण येथे विकायचा हेच काय ते उत्पन्नाचे साधन असणारे हे वनवासी काय चिकाटीने बापजाद्याने वसवलेल्या जमीनीवर तगून राहिलेत. गर्द जंगलातील हा प्रवास आपल्याला वेगळ्या जगात घेउन जातो. भैरवनाथाच्या मंदीराजवळ अलिकडे एक विहीर खोदलेली दिसते. इथेच पर्यटकांच्या सफारीसाठी कच्चा रस्ता तयार केला आहे. लगेचच आपण घाटमाथ्याच्या टोकाशी पोहचतो. समोर अथांग पसरलेली दरी, खाली चिपळुण तालुका, आणि सह्याद्रीच्या रांगेतून बाहेर आलेला भैरवगड बघायला मिळतो. समोर दिसते ते नव्याने बांधलेले भैरवनाथाचे मंदीर, समोर असलेला प्रशस्त मंडप. मुक्कामाला अतिशय आदर्श जागा, मात्र इथे मुक्काम करायला बंदी आहे. दरीच्या काठाशी या मंदिराने अचुक जागा पकडली आहे. आत अरण्याचा राजा भैरोबा डोळे वटारुन बसला आहे. मंदिरात भैरी देवी, श्री तुळाई देवी, श्री वाघजाई देवी यांच्या २ ते ३ फुट ऊंचीच्या मूर्ती आहेत. चैत्र वद्य प्रतिपदेला इथे यात्रा असते, तीच ईथेली वर्दळ, एरवी सुट्टीदिवशी येणारे गडभटके आणि हौशी पर्यटक सोडले तर या भैरवनाथाला सक्तीचा एकांतवासच नशीबी लिहीला आहे. आता जाउया समोरच दिसणार्या भैरवगडावर. गडाचे कोकणात कोसळणारे कडे आणि त्याला चिकटलेला सुळका मोठा थरारक दिसतो. गडाला तीन प्रवेशद्वारे असली तरी त्यातल्या त्यात पहिला दक्षिणमुखी दरवाजा थोडाफार तग धरुन आहे, बाकीचे दरवाजे नामशेष झालेले आहेत. या दरवाजातून पुढे गेल्यावर समोरच्या टेकाडाच्या चढावावर दुसरा दक्षिणाभिमुख दरवाजा आहे. हा दरवाजाही ढासळलेला आहे.भैरवगड दोन टेकड्यांनी मिळून बनला आहे. दोघांच्या खिंडीमधुन पलीकडे जाउन पश्चिमेच्या टेकडीवर जाता येते पुर्वे बाजुच्या टेकडीवर कातळकोरीव पाण्याची दोन टाकी आहेत. यातील पाणी पिण्यास उपयुक्त असून ते बारमाही असते. माथा तसा चिंचोळा आणि फारचे अवशेष नाहीत, बहुधा झाडीने गिळून टाकले असावेत. मात्र सगळ्या बाजुने खोल दर्या आहेत.
एब उन्हाळ्यात दुर्गभ्रमंतीची हौस भागवायची असेल तर या कोयनेच्या भैरवगडाला जरुर भेट द्या.
13 ) राजपुरी लेणी :-
पाचगणी या गिरिस्थानाच्या सभोवार विखुरलेली पांडवकालीन, शिवकालीन स्थळे पर्यटकांना खुणावतात. राजपुरीच्या लेण्या ( ज्याला स्थानिक पांडवकालीन गुहा म्हणतात ) या परिसराचा इतिहास सांगतात. कार्तिकस्वामीच्या गुहा म्हणून या प्रसिद्ध आहेत. या पुरातन शैव गुंफा आहेत. स्थानिक ग्रामपंचायतीने एकदम व्यवस्थित बांधकाम केलेल्या दगडी पायऱ्या आपल्याला लेण्याकडे घेउन जातात.
वरून पडणाऱ्या पाण्यामुळे व टपकत असलेल्या पहाडी झऱ्यामुळे सर्व जागा एकदम निसरडी झालेली आहे. ह्या गुंफाबद्दल माहिती देणारा एखादा ही फलक तेथे नाही आहे ना गावातील लोकांना ह्या बद्दल काही माहिती. गावातील एक पुजारी सोडला तर कोणी येत जात नाही. खाली उतरल्यावर उजवीकडे गुंफा आहेत ऐकून सात गुंफा आहेत चार पूर्णं गुंफा तीन अर्धवट पूर्णं. तेथे तीन पाण्याचे कुंड आहेत, गुंफा मानव निर्मित आहेत व पुरातन आहेत ह्या बद्दल काही शंकाच नाही. प्रत्येक गुफेतून दुसऱ्या गुंफेत झोपून प्रवेश करता येईल अशी निमुळता खंदक वजा रस्ता आहे. शेवटची जी गुंफा आहे ती सर्वात मोठी असून त्यात पाण्याचे दोन कुंड आहेत तसेच गोमुख व विष्णू मंदिर देखील आहे. हे मंदिर इत्यादी आताच म्हणजे मागील शतकामध्ये अस्तित्वात आले असावे. पाण्याचे झरे, पुरातन काळातील मंदिराच्या स्तंभाचे, गोपुरांचे अवशेष इकडे तिकडे अस्तावस्त पडलेले आहेत. गुंफामध्ये काही भिंती शिल्पे पुजेसाठी ठेवलेली आहेत,हि शिल्पे खूप जूनी असून व्यवस्थित निगा न राखल्या गेल्यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. गुंफाच्या बाहेर एका छोट्या पुरातन मंडपामध्ये नंदी ची तीन फुट उंच मुर्ती आहे, गुंफामधील शिल्पे व बाहेर असलेली शिल्पे, नंदीची मुर्ती ह्या एकाच प्रकारच्या खडकातून निर्माण केलेले आहेत. बाकीच्या लेण्यात लक्षवेधी काही नसले तरी शैलगॄहात दहाव्या किंवा अकराव्या शतकातील सोमनाथदेवाचा मराठी देवनागरी लिपीतील शिलालेख आहे.हा शिलालेख प्रजापती सवंत्सरातील असला तरी संवत्सर आणि शक याचा उल्लेख नाही.त्यात राजवंशाचाही उल्लेख नाही.या शिलालेखात वणगृह म्हणजे राजपुरी गावाच्या उत्तरेला असलेल्या चार्,पाच कि.मी.वरच्या वणघर आणि बावधन म्हणजे वाईच्या दक्षिणेला पाच कि.मी. असलेल्या गावांच्या नावाचा उल्लेख आहे. .सध्या मात्र राजपुरीच्या लेणीपेक्षा इथे असलेली कार्तिकस्वामीची मुर्ती हे भाविकांचे खरे आकर्षण आहे.कार्तिक पौर्णिमेला इथे भाविकांची थोडीफार गर्दी होते.एरवी इथे कोणी फार फिरकत नाहीत.मात्र हि मुर्ती बरीच अलिकडची असावी.
गुंफा पांडवकालीन असाव्यात असा एक कयास असे मानतात.अर्थातच त्यात तथ्य नाही इथे असलेल्या तिन्ही कुंडातील पाणी एकदम स्वच्छ आहे व पिण्यात अतीशय मधूर आहे. वरील डोंगरातून पाझरत पाझरत आलेले पाणी देखील गुंफाच्या समोर पडत असते व गुंफाच्या समोर एक नैसर्गिंक पाण्याचा अस्पष्टसा पडदा निर्माण होतो हे दृष्य पाहण्या योग्य आहे. समोर दरी मध्ये प्रचंड झाडी आहे व पक्ष्यांच्या अनेक प्रजाती तेथे पाहवयास मिळतात जाण्यासाठी हा डिसेंबर-जानेवारी महिना योग्य आहे . अंतर – पाचगणीपासून हि लेणी ६.७ किलोमीटर अंतरावर आहेत.
१४ ) ऐतिहासिक राजाचे कुर्ले!
राजाच्या कुर्लेची. खटाव तालुक्यातलं हे ऐतिहासिक गाव. साताऱ्यापासून 55 किलोमीटरचं अंतर. त्यालाच जोडून काही अंतरावर डोंगरउंचावर गिरिजाशंकरवाडी हे प्राचीन मंदिरही विशेष प्रसिद्ध आहे. साताऱ्यातून रहिमतपूर. मग वाठार किरोली, आर्वी, नागझरी, पुसेसावळी असा हा मार्ग. कराडामधून श्यामगाव घाटातूनही कुर्लेत पोचता येतं.
राजाच्या कुर्लेला ऐतिहासिक संदर्भ आहेत. गावाच्या तोंडावरच दोन दगडी चोैथऱ्याची कमान आहे. ते गावचं प्रवेशद्वार. आता गावोगावी कमानी दिसतात खऱ्या. इथलं वैशिष्ट्यं असं, की ती जुन्या काळातील आहे. अजूनही भक्कम आहे. मात्र गावात शिरण्याचं अन् बाहेर पडण्याचं हे एकमेव ठिकाण. कमानीला जोडूनच गावाभोवती तटबंदी होती.
शाहू महाराजांच्या काळात प्रसिद्धी पावलेले फत्तेसिंह राजेभोसले हे इथले सरदार. शाहू छत्रपतींनी त्यांना अक्कलकोट परगण्याची जहागिरी दिली होती. इथला भुईकोट किल्ला ही इथल्या इतिहासाची निशाणी.
सुमारे तीन ते चार एकर परिसरात हा भुईकोट किल्ला बांधण्यात आला होता. चारी बाजूला सुमारे तीस फूट उंचीचे भक्कम बुरुज अन् भव्य प्रवेशद्वार या राजवाड्यास होते. आजही या भुईकोट किल्ल्याचे दोन बुरुज पाहावयास मिळतात. गावात जुनी घरं आजही दिसतात. गढीचा एक चौक बर्या अवस्थेत असून शेजारी असणारी पायर्यांची विहीर लक्षवेधी आहे. या भुईकोटाचा पसारा मोठा असला तरी वरीचशी तटबंदी आता नष्ट झालेली आहे. मात्र मागच्या बाजुला असलेला बुरुज सुस्थितीत असून त्याच्या पायर्या बघण्यासारख्या आहेत. इथे राजेभोसले यांचे वंशज आजही रहातात, त्यांच्याकडे असलेली शस्त्रे ते दाखवतात.
कुर्लेपासून पाचेक किलोमीटरवर गिरिजाशंकरवाडी. सगळा घाटाचा वळणदार रस्ता. अवतीभवती भिरभिरणाऱ्या पवनचक्क्या. डोंगरावर आलं, की मग स्वातंत्र्यसैनिक विठ्ठल दादू थोरात यांच्या नावाची कमान लागते. सपाटीनं पुढं गेलं, की प्राचीन शिवमंदिर. त्याचं दगडी बांधकाम लक्षवेधक आहे. मंदिराची सारी घडणावळ दगडात एकसंघ दिसते. गर्भगृहात मोठी स्वयंभू पिंड आहे. प्रांगणात दगडी नंदी, दीपमाळ, पाण्यानं काठोकाठ तळं, पुढं आणखी एक तलाव दिसतो. इथलं दगडी प्रवेशद्वारही मजबूत आहे. डाव्या हाताला काही अंतर चालून गेलं, की आणखी एक मंदिर. त्याच्या शिखराच्या कलाकुसरीमुळं ते लक्षात राहातं. इथला महाकाय दगडी नंदीही असाच लक्षात राहतो.
डोंगरमाथ्यावरुन मसूर, किवळ, आर्वी, नागझरी, पुसेसावळी गावांचा परिसर खोलवर दिसतो. ओैंधचा डोंगरही पटकन नजरेत उतरतो. पारगावच्या तलावाचं पसरलेलं निळंशार पाणी उठून दिसतं. साताऱ्यातून एका दिवसात पुरी होणारी, इतिहास अन् प्राचीनतेची सफर घडविणारी ही भटकंती मनात निसर्गाचा फुलोरा निर्माण करते, हे नक्की!
15 ) किकलीचे श्री भैरवनाथ मंदिर
पुणे- बेंगळुरू हमरस्त्यावरच भुईंज गावातून पुर्वेकडे वळल्यावर पाचेक किमी अंतरावर किकली गाव आहे.किकली गावात देखण्या प्रवेशद्वाराचे, दीपमाळा असणारे, चिरेबंदी बांधणीचे एक शिवमंदिर आहे. त्याला श्री भैरवनाथ मंदिर म्हणतात. खूप कलाकुसर असणारे हे ठिकाण. किकली गावाच्या अगदी सुरुवातीलाच उजवीकडे श्री भैरवनाथ मंदिराकडे जाणार्या पायर्या व मंदिराच्या नावाची कमान दिसते. १५/२० पायर्या चढूनच आपण मंदिराच्या प्रवेशद्वारात येतो. प्रवेशद्वारातून आत येताच मोठे पटांगण आहे व त्यापुढे मुख्य मंदिर आहे. उजव्या हाताला एक उद्ध्वस्त मंदिराचे अवशेष आहेत. ह्या उद्ध्वस्त मंदिराशेजारीच झाडोर्यात गणेशवंदना कोरलेला एक भग्नावस्थेतला स्तंभ आडवा पडलेला आहे.
मुख्य मंदिराच्या बाहेर २ भव्य दिपमाळा आहेत. मंदिराचा बाह्य भागा साधा आहे तर पूर्वीचे शिखर नष्ट झालेले आहे त्यामुळे मंदिराची मूळची शैली नेमकी कुठली ह्याचा अंदाज बांधता येत नाही पण महाराष्ट्रातील इतर ह्याच काळातील मंदिरांसारखी ह्याची शैली पण भूमिज असावी असा कयास बांधता येतो. ह्या मंदिराची रचना तशी अनोखी. आधी मुखमंडप. येथे नंदीमंडप हा स्वतंत्र नसून मुखमंडपातच नंदी सामावलेला आहे. त्यानंतर येतो तो सभामंडप आणि समोर मुख्य गर्भगृह आणि डाव्या-उजव्या बाजूला अजून दोन गर्भगृहे. ह्या प्रकारच्या तीन गर्भगृहांच्या रचनेला 'त्रिदल गाभारा' असे म्हणतात. मुखमंडप आणि सभामंडप हा नक्षीदार स्तंभांवर तोललेला आहे.
मंदिरांच्या बाह्यभिंतींच्या भागात कसलेही कोरीव काम नाही. ते आहे फक्त मुखमंडपाच्या समोरील आणि डाव्या-उजव्या बाजूच्या भिंतींवर. त्यावर काही मैथुन शिल्पे, काही वादक व व्यालांची विविध शिल्पे कोरलेली आहेत. सर्वसाधारणपणे व्याल म्हणजे सिंहाचे वरील दोन्ही पाय उंचावलेले असे स्वरूप. दा़क्षिणात्य मंदिरांवर व्याल मोठ्या संख्येने कोरलेले आढळतात. येथे मात्र व्यालशिल्पांना केवळ सिंहाचेच मुख नसून गज, अश्व, शुक, मेष, गर्दभ अशी विविध मुखे कोरलेली आहेत. चला तर आता मुखमंडपातून सभामंडपात जाऊयात.सभामंडपाचे प्रवेशद्वार अतिशय नक्षीदार असून त्याच्या दोन्ही बाजूंस द्वारपाल, सेवक, शैवप्रतिहारी वगैरे कोरलेले आहे. प्रतिहारींच्या खालच्या भागात हत्ती व शरभ आदी कोरलेले आहेत. द्वारपट्टिकेवरील गणपती नसून तपस्व्याची मूर्ती कोरलेली आहे. सभामंडप अतिशय नक्षीदार स्तंभांवर तोललेला आहे आणि स्तंभांवर मध्यभागी काही पौराणिक प्रसंग कोरलेले आहेत तर स्तंभाच्या खलाच्या भागात सुरसुंदरी, भैरव आदि शिल्पे कोरलेली आहेत. वामनावतार, त्रिविक्रम , रामायणातीलही विविध प्रसंग येथील स्तंभांवर कोरलेले आहेत. सभामंडपाच्या छतावरील कोरीव काम व त्यात खुबीने कोरलेले कमळ अतिशय देखणे आहे. आवर्जून बघावे असेच. तीन्ही गर्भगृहांच्या प्रवेशद्वारात द्वारपाल, प्रतिहारी यांची शिल्पे कोरलेली आढळतात. गर्भगृहांत शिवलिंगे व भैरवाची मूर्ती आढळते.
किकली हे वीरांच गाव. पूर्वी कधीतरी कदाचित शिलाहार यादव संघर्षात येथे मोठे युद्द झालेलं असावं त्याची साक्ष इकडचे शेदीडशे वीरगळ देत आहेत. गावात जिकडे बघावं तिकडे वीरगळाच दिसतात. विहिरीच्या भिंतीला वीरगळ, दुकानाच्या भिंतीपाशी वीरगळ, गटारावर उभे वीरगळ, घरांच्या भिंतीत चिणले गेलेले वीरगळ, गावच्या चावडीवर वीरगळ, पारावर वीरगळ. जिकडे बघावे तिकडे वीरगळच वीरगळ. तेही विविध प्रकारचे. तीन पट असलेले, चार पट असलेले, घोडेस्वारांशी युद्ध, पदातींशी युद्ध, तलवारीने युद्ध, गदायुद्ध. अक्षरश: पारणे फिटते डोळ्यांचे.खरोखरच वीरांचे गाव, वीरगळांचे गाव, लढावू गाव.
अश्या एतिहासिक दृष्टिने महत्वाच्या किकली गावाला आवर्जून भेट द्यायलाच हवी.
१६ ) कण्हेरखेडचे स्मारक :-
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील कण्हेरखेड गावात श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांचा भव्य वाडा आहे आणि पानिपतच्या तिसऱ्या युद्धात वीरमरण पत्करलेल्या सोळा शिंदे वीरांच्या स्मरणार्थ उभारलेले सोळा खांबी स्मारक आहे. गावात सरदार दौलतराव शिंदेंच्या पत्नी बायजाबाई यांची समाधी म्हणजे छत्री आहे, कन्हेश्वराचे सुंदर मंदिर आहे. महादजींनी वाड्याचे बांधकाम सुरू केले पण पानिपतचे युद्ध सुरू झाले आणि ते अर्धवट राहिले. त्यांना वाडा असा बांधायचा होता की त्यावर फडकणारा भगवा थेट सातारच्या राजवाड्यातून दिसला पाहिजे. कण्हेरखेड रहिमतपूरजवळ आहे. सातारापासून साधारण ३० कि.मी अंतरावर आहे.
नेसरीच्या रणमैदानात सरनौबत प्रतापराव गुजरांसोबत , असामान्य शौर्य गाजवणारे सरदार विठोजी शिंदे यांचे सुपुत्र जनकोजी शिंदे. जनकोजींचे सुपुत्र राणोजी यांनी कण्हेरखेड येथे शिंदे घराण्याची स्थापना केली. पानिपतच्या युद्धात फक्त राणोजींचे पुत्र महादजी शिंदे जिवंत राहिले पुढे त्यांनी पुन्हा मराठा साम्राज्याला उभारी दिली व साम्राज्य वाढविले. त्यांनी ग्वाल्हेरला शिंदे घराण्याची स्थापना केली.
इ.स.१७४५ ते इ.स.१७६१ च्या दरम्यान जो मराठ्यांचा स्वराज्य विस्तारातील सुवर्णकाळ मानला जातो. त्या काळात महादजी शिंदे यांनी जवळपास ५० लढायांचे नेतृत्व/ सहभाग घेतला होता. महादजींच्या महत्त्वाच्या लढाया म्हणजे चंद्रावती गंज , फतेहाबाद. मल्हाराव होळकरांच्या साथीने सरदार महादजी शिंदे यांनी अनेक राजपूत संस्थाने मराठासाम्राज्याखाली आणली. रतनगढ, लालगढ, बिकानेर, लासवारी, लाखमगढ, कुंभेर, डीग ही राजपूत संस्थाने मराठा साम्राज्याला जोडली गेली. तसेच जोधपूर व जयपूर ह्या मोठ्या राजपूत राज्यांनी मराठा वर्चस्व मान्य करून टाकले. मथुरा हे मुघल सत्तेखाली होते ते मराठा अखत्यारीत आणून त्यांनी तेथील काही हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला. इ.स जानेवारी १७५८ मध्ये महादजी यांनी ग्वाल्हेर येथे शिंद्यांचे राज्य बनवले.
पानिपतच्या युद्धात शिंदेंचे बलिदान म्हणजे न विसरण्यासारखी घटना १४ जानेवारी दिवशी पानिपतावर अनेक मराठा वीर देशरक्षणार्थ धारातीर्थी पडले.एकमेव महादजी शिंदे तेवढे वाचले.जख्मी अवस्थेतील महादजी उजैनला परतले ते सुड उगवायचे ध्येय डोळ्यासमोर ठेवुनच! आणि महादजींनी पुन्हा शिंद्यांची नव्या दमाची पलटण उभा करुन दिल्लीची सत्ता काबिज केली.नजीबाची कबर फोडुन त्याची हाडे इतस्ततः फेकून दिली. दत्ताजी शिंदेंसहीत १६ मृतात्म्यांचा आत्मा मुक्त झाला! अमर झाला !त्यातील १६ वीरांची नावे पुढीलप्रमाणे
.जय्यापाराव शिंदे .दत्ताजी शिंदे .तुकोजी शिंदे .ज्योतिबा शिंदे .जनकोजी शिंदे .साबाजी शिंदे बयाजी शिंदे .धारराव शिंदे .येसाजी शिंदे .जीवाजी शिंदे .संभाजी शिंदे हणमंतराव शिंदे .फिरंगोजी शिंदे .मानाजी शिंदे .रवलोजी शिंदे .आनंदराव शिंदे
आजही कण्हेरखेडमध्ये गेलात तर या सोळा योध्यांची सोळा खांबी स्मृतीस्थळ आपणास पहावयास मिळेल.
याशिवा सुभेदार म्हणून उदयास आलेले राणोजी शिंदे यांचा पानिपत मोहिमेवर गेल्यामुळे अर्धवट बांधकाम राहिलेला भव्य असा राजवाडा या गावच्या वैभवात आजही भर टाकत आहे. गावात अटकेपार झेंडे लावणाऱ्या साबाजी शिंदे यांचे नातू सरदार मानाजी शिंदे-फाकडे यांच्या वाड्यासह चार ते पाच मोठे वाडे पडीक प्रवेशद्वार आणि भिंतीसह आजही तग धरून उभे आहेत. हे गाव आपल्या पराक्रमाने व कार्यकर्तृत्वाने हिंदुस्थानच्या नकाशावर आजही ठळकपणे आपली कीर्ती गाजवत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येकाने आवर्जून भेट द्यावी, असे हे ऐतिहासिक ठिकाण आहे.
१७ ) हेळवाक धनगरवाड्याची रामघळ :-
कोयनानगर हे महाराष्ट्राची वरदायिनी कोयनामाईवर बांधलेल्या नहाकाय धरणामुळे आणि तिथे असलेल्या जलविद्युत प्रकल्पामुळे प्रकाशझोतात आले. अलिकडे सह्याद्रीच्या निसर्गरम्य परिसरामुळे हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत आहे.दुर्गभटक्यांसाठी जंगली जयगड, भैरवगड यासाठी हे गाव महत्वाचे .कोयनेच्या घनदाट जंगलात लपलेल्या भैरवगडावर जायचे तर एक मार्ग म्हणजे हेळवाक गाठून तिथून चालत कोंढवळ धनगरवाडा गाठायचा.पुढची वाटचाल निर्मनुष्य जंगलातून असल्यामुळे इथेव वाटाड्या घ्यायचा आणि भैरवगडाच्या दिशेन निघाल्यावर सर्वप्रथम दिसते समर्थांच्या वास्तव्यामुळे पुनित झालेली रामघळ.धनगरवाड्यापासून रामघळ अवघी दहा-पंधरा मिनीटाच्या अंतरावर आहे.
एका धबधब्याखाली खोल कपार तयार झालेली आहे. समर्थ रामदास या रम्य ठिकाणी शके १५९६ च्या आषाढात राहिले होते. रामघळ राम ओढ्याच्या वहाळात पुर्वेस तोंड करुन खोदली आहे. समोर दिसणारी अर्धगोलाकार दरी म्हणजे निसर्गनिर्मीत कलोसियमच जणु. स्वच्छ हवेत इथे आल्यास अगदी समोर पाटण जवळचा मोरगिरी किल्ला दिसतो.
आत पाच वेगवेगळी दालने असल्याचे स्पष्ट जाणवते. मधोमध असलेल्या दालनाची व्यवस्था देवघरासारखी भासते. इथे एक शिव पिंडी देखील आहे. घळीच्या माथ्यावर काताळ खडक आहे आणि पाण्याचा धबधबा घळी वरून कोसळत असतो अगदी, शिवथर घळी प्रमाणेच. इथे रात्री मुक्काम करता येऊ शकतो पण पाणवठा असल्याने वन्य श्वापदांचा वावर खूप आहे.या रामघळीतूनच एक पाण्याच्या पाइपने धनगरवाड्याला पाणी पुरवठा केला आहे.हा धबधबा जरी बारमाही असला तरी, पाउस संपता संपता इथे येणे चांगले. या परिसरात जळवांचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो.
रामघळीत उभारल्यास आपण धबधब्याच्या मागे उभे असल्याने पाण्याची पातळ चादर समोर पडते आहे असे वाटते. अर्थात हेळवाक, कोंढावळ धनगरवाडा हा विलक्षण कच्चा रस्ता असल्याने पावसाळ्यात धबधबा एन भरात असताना येथे येणे सोयीचे नाही.
या घळीचा इतिहासात उल्लेख आहे तो रामदास स्वामींच्या संदर्भात. रामदास स्वामींनी वेदमूर्ती रघुनाथ भट यांना या ठिकाणाची व्यवस्था पहायला सांगितली अन् ते चाफळास गेले. थंडीच्या त्रासातून रघुनाथभटांनी सुटका केली. म्हणून त्यांना पाठवलेले आभाराचे पत्र समर्थांनी स्वतः लिहून पाठवले ते उपलब्ध आहे. त्याआधी सन १६७४ मध्ये आषाढापासून कार्तिकापर्यंत समर्थांनी रामनाम घोषाने हा परिसर जिवंत केला होता. नुकताच महाराष्ट्राला राजा लाभला होता. शिवराय छत्रपती झाले होते. मग समर्थांचे "उदंड झाले पाणी, स्नानसंध्या कराया' हे आनंदवनभुवनीचे गीत त्यांना इथेच सुचले असेल का?
एकदा समर्थ या रामघळीतून भर पावसात चाफळला जाण्यास निघाले. पाटणजवळ तर होती, नावाडी त्या पाण्यात होडी घालावयास धजत नव्हता. रामदासांनी उडी घेतली. ते पाण्याच्या तळाशी समाधी लावून बसले. बराच वेळ झाला तरी स्वामी वर आले नाहीत. तेव्हा समर्थशिष्य कल्याणस्वामींनी उडी घेतली व तळ गाठलेल्या गुरुंना वर आणले. अशीही एक दंतकथा प्रचलित आहे.
18 ) अजिंक्यतारा किल्ला
अजिंक्यतार्याच्या इतिहासात डोकावल्यास कोल्हापूरच्या शिलहार वंशीय दुसºया भोजराजाने हा किल्ला बांधला. छत्रपती शिवाजीमहाराजांनी हा किल्ला जिंकून ताब्यात घेतला. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या अंगी ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली. यानंतर या गडाच्या इतिहासातील महत्वाचा प्रसंग म्हणजे औरंगजेबाने स्वराज्यावर जे आक्रमण केले त्याकाळातील ! मोगलांनी गडाच्या मंगळाई बुरुजाच्या ख्गली दोन सुरुंग पेरले. पहिला सुरुंग उडाल्यावर मराठ्यांचे नुकसान झाले , मात्र दुसरा सुरुंग उडाल्यावर मोगली फौजांचाही नाश झाला.मूठभर मावळ्यांसह किल्ला लढवीतच असताना अखेर दाणागोटा संपला, दारूगोळा संपला तेव्हा किल्लेदार प्रयागजी प्रभूना शरणागती पत्करावी लागली. या किल्ल्यावर शाहजादा आझमने निशाण चढवले म्हणून त्याचे नामांतर झाले -'अझमतारा.' मात्र अण्णाजीपंत शाहीराने, ताराराणीच्या वेषांतर केलेल्या सैनिकांच्या मदतीने एक दिवस किल्लाच ताब्यात घेतला. अन् अझमताऱ्याचा झाला 'अजिंक्यतारा !'
अश्या या इतिहास प्रसिध्द अजिंक्यतारा गडाला भेट द्यायची असेल तर सातारा शहरातून अजिंक्यतार्याच्या मुख्य दरवाज्यापर्यंत थेट डांबरी रस्ता आहे. वाटेत आपल्याला चार भिंती हे एतिहास्क ठिकाण लागते, त्याला भेट देउन पुढे जायचे.
पहिला दरवाजा सुस्थितीत असून दोन्ही बुरूज अस्तित्वात आहेत. प्रवेशद्वारावर अनेक देव देवतांची शिल्पे तसेच कमळ , दोन्ही बाजुला आपल्याला शरभ शिल्प दिसतात
महादरवाजाच्या देवड्यांच्या जोत्यावर कोरलेली वाली-सुग्रीव युद्घाची कथा , विघ्नहर्ता गणराय , मारुती आणि बुरुजावर तळवटी खोदलेले नागांचे शिल्पांकन पाहावयास मिळते.दुसरा . दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे हनुमानाचे मंदिर आहे.मोर प्रसारभारती केंद्राचे कार्यालय व मागे दोन प्रसार भारती केंद्राचे टॉवर्स आहेत. हे टॉवर्स म्हणजे दूरदर्शन (१९८६) आणि आकाशवाणी (१९९२) यांची प्रक्षेपण केंद्रे आहेत. पुढे गेल्यावर आपल्याला राजवाड्याच्या पाया आणि भिंतींचा काही भाग शिल्लक भाग दिसतो. याच ठिकाणी महाराणी ताराबाई आणि त्या नन्तर महाराज शाहूंचे वास्तव्य होते.या गडावर पुरातनकालचे मंगळाई देवीचे व हनुमान मंदिर आहे. मंदिराच्या समोरच मंगळाईचा बुरूज आहे. मंदिराच्या आवारात अनेक शिल्प आढळतात. या वाटेने थेट तटबंदीच्या साह्याने पुढे जाणे म्हणजे गडाला प्रदक्षिणा घालण्यासारखेच आहे. उर्वरित गडफेरी पूर्ण करताना अनेक टाक्या आणि तटबंदीचा भाग दिसतो. तसेच एक कोठार सदृश्य बांधकामहि दिसते.वाटेमध्ये , रत्नेश्वराचे मन्दिर दिसते.गडाच्या दक्षिणेला देखील दोन दरवाजे आहेत. मात्र नजरेत भरतो तो गडाचा पश्चिम दरवाजा. गोमुखी बांधणीचे एकामागे एक असे दोन मजबूत प्रवेशद्वार आणि बुलंद बुरुज अजूनही सुस्थितीत आहेत. याबाजुला समोर टेकडी दिसते तीला उंटाची टेकडी म्हणतात. दरवाजापाशी पाण्याचे तीन तलाव आहेत. उन्हाळ्यात मात्र तलावांत पाणी नसते. तटबंदीवरून प्रदक्षिणा मारतांना ते नजरेस पडतात.याशिवाय गडावर तेलातुपाचे रांजण, माचीवर डफळ्यांच्या घोड्यांची पागा, अक्कलकोटकरांचा वाडा, पिंगळ्यांचा वाडा व शेख मिराची घोड्यांची पागा हे शाहूकालीन अवशेष आहेत.
गडावरुन पश्चिमेला यवतेश्वराचा डोंगर, बंड्या पठार्,उत्तरेला मेरुलिंगाचा डोंगर आणि मागे पुसट वैराटगड दिसतो.ईशान्येला चंदन-वंदन हे जोड किल्ले,भुताची टेकडी,नांदगिरी उर्फ कल्याणगड्,जरंडेश्वर्,पुर्वेला जानाई-मळाई डोंगर्,पाटेश्वराचा डोंगर आग्नेयेला तर नैऋत्येला सज्जनगड दिसतो. गडाच्या उत्तर अंगाला पायथ्याशी सातारा शहराचे विहंगम दृष्य दिसते.
19 ) वामन पंडीत समाधी भोगाव : -
वामन नरहरी शेष (वामन पंडित) (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले मराठी कवी होते.वामन पंडितांबद्दल खात्रीची माहिती मिळत नाही. कोणी वामन पाच आहेत असे समजतात. ठिकठिकाणच्या दोन भिन्न गोत्रांच्या उल्लेखामुळे कोणी वामन दोन होते असेही मानतात. वामन पंडित हे रामदासकालीन कवी होते. त्यांच्याविषयी थोडी माहिती उपलब्ध आहे. त्यांचे काव्य विविध आणि विपुल आहे. वामन पंडितांचा जन्म नांदेडचा समजला जातो. मूळ विजापूरचे रहिवासी. यांच्या आईचे नांव लक्ष्मीबाई. लहानपणापासून विद्याव्यासंगी व बुद्धिमान होते असे म्हणतात. लहानपणीच फारशी भाषेचा अभ्यास केला होता. यांनी काही दिवस विजापूरच्या दरबारी काढले. पण जेव्हा विजापूरच्या बादशहास त्यांना बाटवावे असे वाटले तेव्हा त्यांनी विजापूर सोडले. उदरनिर्वाहाकरिता काही दिवस भिक्षावृत्तीवर ठिकठिकाणी हिंडून पुढे काशीक्षेत्री प्रयाण केले. तेथे एका मध्वमतानुयायी गुरूजवळ वेद व शास्त्रे यांचा उत्तम अभ्यास केला. या विद्येच्या जोरावर ठिकठिकाणी पूर्वपक्ष व उत्तरपक्ष करून अनेक सभा जिंकल्या व विजयपत्रे मिळविली. वामन पंडित प्रथमतः द्वैतमतवादी असले, तरी त्यांच्या मनाचे त्या विचारसरणीने समाधान होईना. त्यामुळे त्यांनी निरनिराळया मतांच्या ग्रंथांचे अवलोकन करून अनेक शास्त्रीपंडितांच्या गाठीही घेतल्या, परंतु मनाचे समाधान झाले नसल्याने निराशेने कंटाळून शेवटी आत्मत्यागाच्या विचारापर्यंत त्यांची मजल गेली होती. ते पुढे मलयाचल पर्वताकडे गेले. तेथे त्यांना एका यतीने गुरूपदेश दिला. ही हकीकत त्याने 'निगमसागर' नांवाच्या ग्रंथात आरंभी विस्ताराने दिली आहे. निगमसागर ग्रंथ शके १५९५ मध्ये लिहिल्याचा त्या ग्रंथातच उल्लेख आहे.
वामन पंडित यांच्या नावावर निगमसार, समश्लोकी, यथार्थदीपिका, चित्सुधा, तत्त्वमाला, श्रुतीसार कर्मतत्त्व, राजयोग, गीतार्णव सुधा इत्यादी ग्रंथ, काही छोटी प्रकरणे असे लेखन आहे. वामन यांनी रामजन्म, अहिल्योद्धार, सीतास्वयंवर, भरतभाव, लोपामुद्रासंवाद, कृष्णजन्म, बालक्रीडा, वनसुधा, वेणुसुधा, मृतिकाभक्षण, कंसवध, भामाविलास, राधाविलास, कात्यायनीवृत्त, गजेंद्रमोक्ष अशी आख्याने रचली आहेत. त्यांच्या आख्यानात नाट्यपूर्णता, रूपकात्मकता, आकर्षकता, कल्पकता, रचनेचा सफाईदारपणा, शब्दरेखाटन कौशल्य आढळते.
वामन पंडित यांचा मराठी व संस्कृत या दोन्ही भाषांवर समान अधिकार होता. त्यांची श्लोकाबद्दल विशेष ख्याती आहे. ‘सुश्लोक वामनाचा’ अशी त्यांची प्रसिद्धी आहे. यमक, अनुप्रास, स्वभावोक्ती हे त्यांचे आवडते अलंकार होते. त्यांनी त्यांचा हव्यास अधिक केल्याने त्यांना ‘वामक्या-वामन’ असेही म्हणत. वामन यांनी समश्लोकी टीका लिहिल्यानंतर ‘जगदुपयोगी’ अशी टीका लिहावी अशा आशयाची सूचना वामन यांना त्यांचे अनेक शिष्य, संत, भक्तयोगी यांनी केली. त्या सूचनेतून ‘यथार्थदीपिके’चा जन्म झाला. वामन यांनी इतर टीकाकारांचा उपहास केला आहे. वामन यांनी त्यांच्या टीकेला भावार्थदीपिकेच्या पार्श्वभूमीवर ‘यथार्थदीपिका’ असे नाव दिले आहे. धोमच्या अलीकडे भोगाव. तिथे कृष्णाकाठावर वामनपण्डिताची समाधी त्याच्या कुण्या एका भक्ताने बांधलेली आहे.
समाधीच्या अलीकडेच एक दुर्लक्षित शिवमंदिर बघायला मिळालं. मूळ स्तंभ खूप जुने, यादवकालीन आहेत तर वरचा अर्धा भाग पेशवेकाळात बांधला गेलाय असे त्याच्या मिश्र शैलीवरुन सहजच दिसते.
थेच झाडोर्यांत एक दुर्ल़क्षित वीरगळ आहे. तो जरुर बघावा.
No comments:
Post a Comment