महाराष्ट्र हा गडकिल्ल्यांचा प्रदेश म्हणुन ओळखला जातो. येथील प्रत्येक दुर्गाला स्वतःची अशी एक ओळख आहे. यातील काही किल्ले त्याच्या दुर्गमतेसाठी तर काही किल्ले त्यावर घडलेल्या इतिहासाने तर काही किल्ले त्यावरील वास्तुंसाठी प्रसिध्द आहेत. नाशिक!!! किल्ल्यांचा जिल्हा!! कित्त्येक ट्रेकर्स चं आपुलकी आणि जिव्हाळ्याचं ठिकाण!! किल्ल्यांच्या बाबतीत नाशिक म्हणजे ट्रेकर्स ची पंढरीच. नाशिक मध्ये ५० हुन अधिक किल्ले आणि सगळेच बलदंड. दोन अडीच तासांची तंगडतोड केल्याशिवाय किल्ल्याचा माथाच येत नाही. नाशिक मध्ये अनेक डोंगर रांगा ठाण मांडून उभ्या आहेत, त्यातल्या प्रामुख्याने अजंठा सातमाळ, आंबोली, डोलबारी, सेलबारी, त्रम्ब्यकेश्वर, गाळणा टेकड्या इत्यादी. ह्या डोंगररांगे मध्ये "सातमाळ" रांग स्वतःचे एक वेगळे अस्तित्व जपून आहे.सातमाळ रांग सुरगाणा तालुक्यातून सुरु होऊन दिंडोरी, कळवण, चांदवड पर्यंत अस्ताव्यस्त पसरली आहे. ह्या डोंगर रांगेत १५ किल्ले येतात, हातगड,अचला ,अहिवंत, मोहनदरी, सप्तशृंगी, मार्कनंडया, कण्हेरा, रवळ्या, जवळ्या, धोडप, कांचना-मांचना, कोळदेहेर, राजदेहेर, इंद्राई ,चांदवड.
या मधील प्रत्येक किल्ल्याच एक वेगळं महत्व आहे. सातमाळ रांगेतला सर्वात उंच किल्ला म्हणजे धोडप, धोडप किल्ल्यामुळे सातमालेला एक प्रचंड मोठं वैभव लाभलय.हे किल्ले जेव्हा राबते असतील तेव्हा काय वैभव असेल हो ह्यांचं!!! सह्याद्रीच्या ह्या कडेकपाऱ्यात, दरी खोर्यात स्वराज्याचं रक्षण कारण काय अवघड असेल हो त्यावेळेस?? यांतील सातमाळा रांगेची सुरुवात हातगडापासून होते. या रांगेतील अनेक किल्ले गिरणा नदीच्या खोऱ्यात येतात. नाशिक-सापुतारा मार्गावरील महाराष्ट्राच्या सीमेवरील सर्वांत शेवटचा गड 'हातगड'. हातगड हा नावाप्रमाणेच नाशिकहून सापुताऱ्याला जाणाऱ्या लोकांना हात दाखवून महाराष्ट्राचा निरोप देतो.
नाशिक–सापुतारा मार्गावर, महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या सीमेवर उजव्या बाजूस दिसणारा दुर्गस्थापत्याने नटलेला दुर्ग म्हणजे हस्तगिरी, ज्याला हातगड म्हणून ओळखले जाते. भक्कम तटबंदी असणारा हा दुर्ग दुरूनही उठून दिसतो. समुद्रीसपाटीपासून सुमारे ३५०० फूट उंचीवर असणाऱ्या हातगडाला जायचे असल्यास सर्वप्रथम नाशिक गाठावे लागते. नाशिक बसस्थानकावरून सापुताऱ्याला जाणाऱ्या एसटीमध्ये स्थानापन्न झालो की, थेट ९६ कि.मी. अंतरावर असणाऱ्या बोरगाव फाट्याला उतरायचं. नाशिक - सापुतारा मार्गावर, नाशिक पासून ७४ कि.मी अंतरावर (सापुतार्या पासून ६ कि.मी अंतरावर) बोरगाव नावाचा फाटा आहे. येथून एक रस्ता सुरगण्याला जातो, तर दुसरा सापुतार्याला जातो. सापुतार्याला जाणार्या रस्त्यावर बोरगावपासून ४ कि.मी अंतरावर हातगडवाडी नावाचे गाव आहे. हेच गडाच्या पायथ्याचे गाव आहे. बोरगाव फाट्यापासून हातगडवाडी ४ कि.मी. लांब आहे. आपले नशीब बलवत्तर असेल तर हातगडवाडीपर्यंत जायला एखादं खाजगी वाहनही मिळू शकेल, नाहीतर ४ कि.मी.ची ही डांबरी रस्त्यावरची तंगडतोड पायीच करावी लागते.
हातगडवाडीने आपला पुरातन ठेवा आजही जपलेला दिसतो. गावात बऱ्याच जुन्या वाड्याहुड्यांचे अवशेष दिसतात. रस्त्याच्या एका बाजूला विटांची जुनी घरे दिसतात. त्याच्या बाजूला विटांची एक जुनी विहीर आणि चुन्याचा घाणा पडलेला दिसतो. गावात एक जुनी कमान असलेली इमारत दिसते. या इमारतीला घोड्याच्या पागा म्हणतात. याच्या बाजूला एक बांधीव तलाव आहे. तेथुन गावात येणार्या रस्त्यावर एक चुन्याच्या घाण्याचा दगड पडलेला आहे. दगड पाहून रस्त्याने नाशिक सापुतारा रस्तावर आल्यावर डाव्या बाजूला शेड खाली गोमाजी मोरे यांची समाधी आहे. हा सर्व भाग पाहाताना जाणवतं की हातगडवाडी ही गडाखालची मेटाची जागा असावी. कदाचित पूर्वी इथे तटबंदी सुद्धा असावी, पण आज तिच्या खाणाखुणा मात्र इथे शिल्लक नाहीत हेही तितकेच खरं. याशिवाय गावामध्ये काही जुने अवशेष ,घडीव दगडात बांधलेला लहान तलाव या वास्तु पहायला मिळतात. याशिवाय गावाची सफर केल्यास गावाभोवती तटबंदी असल्याच्या काही खाणाखुणा पाहायला मिळतात.
वाडीतून गडाच्या डाव्या टोकाला नजर टाकल्यावर कातळातील एक प्रवेशद्वार दिसते. हे गडाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. तिथपर्यंत जाण्यासाठी मात्र शाळेत शिकलेल्या भूमितीचा आधार घ्यावा लागतो. गडाच्या उजवीकडच्या पायथ्यापासून अंदाजे १/३ अंतरावर एक आंब्याचे डेरेदार झाड आहे. वाडीपासून तिथपर्यंत जाण्यास साधारण १५ मिनिटे लागतात. या झाडापासून प्रवेशद्वारापर्यंत कातळावर एक तिरकी रेघ मारायची. ही रेघ म्हणजे गडावर जाण्याची वाट. गडावर जाण्याची ही वाट वयापैकी मळलेली असल्याने ती चुकण्याचा फारसा संभव नाही. गावातून उजवी बाजूस जाणारी डांबरी सडक कळवणला जाते. या सडकेवरून पुढे जायचे ,हातगडवाडी डाव्या हाताला ठेवायची. पुढे डावीकडे एक चुन्याच्या घाण्याचा दगड दिसतो येथे डांबरी सडक सोडून गावातील घरे पार करुन डावीकडे दिसणार्या आंब्याच्या झाडा पर्यंत पोहोचावे. येथुन गडावर जाणार्या पायर्या आहेत. पायथ्यापासून गडमाथा गाठण्यास पाऊण तास लागतो. खाजगी वाहानाने थेट गडाच्या प्रवेशव्दारा पर्यंत जाता येते. नाशिक सापुतारा मार्गावर हातगड गावाच्या फ़ाट्याच्या पुढे एक चढण लागते. या चढणीवर क्लब महेंद्र आणि इतर हॉटेल्स आहेत. त्याच्या पुढेच हातगड किल्ल्यावर जाणार्या रस्य्ताचा फ़ाटा आहे. याठिकाणी वनखात्याची चौकी आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी प्रवेश फ़ी भरावे लागते.
गडाकडे निघाल्यावर आपण या गडाच्या इतिहासात थोडे डोकावुया. इतिहासात या गडाच्या फारशा नोंदी नसल्या तरी गडाचा इतिहास थेट १३ व्या शतकापर्यंत जातो. १३ व्या शतकापासून अस्तित्वात असलेला हा गड हस्तगिरी, होलगड, हातगा दुर्ग, हद्दगड, अशा विविध नावानी ओळखला जात होता. बागलाणात बागूल राजांची राजवट इ.स.१३०० ते इ.स.१७०० अशी होती. बागूल राजांचा कवी रुद्र याने इ.स.१५९६ मध्ये लिहिलेल्या राष्ट्रौढवंशम महाकाव्यम् या ग्रंथात बागूल राजांनी हस्तगिरी किल्ला ताब्यात घेतल्याचा उल्लेख मिळतो. नंतर हा किल्ला बागूल राजाकडून पुन्हा निजामशाहीत गेला. १६ व्या शतकात निजामशाहने जिंकून घेतलेल्या ५८ किल्ल्यांच्या यादीत हातगडचा उल्लेख हातगा असा येतो.हा किल्ला १५४७ मध्ये निजामशाहीतून बागूल राज्यकर्त्यांच्या ताब्यात असल्याचे शिलालेखावरून दिसते. मोगलांच्या १६३८ मधील बागलाण मोहिमेत औरंगजेबाच सरदार सईद अब्दुल वाहाब खानदेशी याने भिकुजी मोहिते याच्याकडून हा किल्ला जिंकून मोगल साम्राज्यात आणला. हा किल्ला छ. शिवाजी महाराजांच्या १६७० नंतरच्या बागलाण मोहिमेत स्वराज्यात दाखल झाला असावा; परंतु याबाबत पुरावे सापडत नाहीत. शिवाजी महाराजांच्या काळात गंगाजी ऊर्फ गोगाजी मोरे-देशमुख हे सुरगणा प्रांतात मोहिमेवर असता त्यांनी आदिलशाही किल्लेदार शुराबखान याच्याकडून शके १५८६ (सन १६६३) मध्ये हातगड किल्ला ताब्यात घेतला. पेशवाईत किल्ला मराठय़ांकडे असताना रंगराव औढेकर किल्लेदार होते. त्यावेळेस सुपकर्ण भिल्ल याने या गडावर हल्ला केला पण किल्लेदाराने हा हल्ला परतवल्याने चिडलेल्या सुपकर्ण भिल्लाने पायथ्याचे गाव पेटवून पळ काढला असे सांगितले जाते. या गडावर मराठ्यांपेक्षा मोगलांचे वर्चस्व जास्त काळ होते. त्याबद्दल आलेला उल्लेख असा आहे : होलगड किल्ला बागलाणात असून तो कठीण अशा पाषाणाचा मजबूत किला आहे. सय्यद अब्दुश याने त्याचा मुलगा हसन अली याला किल्ला घेण्यासाठी पाठविले होते. किल्लेदाराने त्याच्याशी लढा दिला. पण किल्लेदाराजवळ जास्त सैन्य नसल्याने त्याला युद्ध करण्याची हिंमत झाली नाही. त्याने किल्ला मोगलांच्या हवाली केला. हसन अलीने किल्ला जिंकला. त्याचे चिन्ह म्हणून सोन्याच्या किल्ल्या ९ ऑगस्ट १६८८ राजी बादशहाला सादर केल्या. बादशहाने हसन अलीला 'खान' ही पदवी दिली आणि पाचशेची मनसब, दीडशे जात आणि पन्नास स्वारांनी वाढवली. इ.स. १७५४-५५ मध्ये येथील किल्लेदार खोजा महमदौला याने हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात दिला, तेव्हा त्यास काही इनाम दिल्याची नोंद सापडते. १७५८-५९ च्या एका पत्रानुसार हतगड किल्ल्यावर १७५ हशमांची नेमणूक असल्याचे दिसते. १७६८ मधील एका पत्रानुसार पेशव्यांची फौज रघुनाथरावांच्या पाठलागवर असताना रघुनाथरावांच्या काही लोकांनी या किल्ल्याचा आश्रय घेतला होता. १७७३ च्या एका पत्रात येथील किल्लेदार खोजे दायम यास बागलाणमधील कळवण हा गाव इनाम दिलेला होता. १८०३-०४ मध्ये झालेल्या बंडात येथील अधिकारी खांडेराव त्रिंबक यास किल्ल्याच्या परिसरातील घटमार्ग दगड-धोंडे व झाडे टाकून बंद करण्याची आज्ञा दिलेली होती.
वाडीपासून गडाचा पहिला दरवाजा गाठण्यास सुमारे पंचवीस मिनिटे पुरतात.
गडाचा पहिला दरवाजा हा पूर्वाभिमुख असून, त्याच्या अलीकडे उजवीकडच्या कड्यामध्ये पाण्याचे एक टाके खोदलेले आहे. यातील पाणी मात्र पूर्णपणे खराब झालेले आहे.
या टाक्याच्या बाजूला कातळभिंतीवर 'हनुमंतांचे' एक शिल्प कोरलेले आहे.
गडाच्या पहिल्या दरवाज्याच्या उजवीकडच्या खांबाचे आणि कमानीचे दगड आज विखुरलेले असले तरी डावीकडचा खांब कसाबसा तग धरून उभा आहे.
या दरवाज्याच्या एका खांबावर चौकानी शिळेवर शिलालेख कोरलेला आहे. एका शिलालेखाचा दगड या खांबासोबत निखळून पडलेला दिसतो, तर दुसरा शिलालेख खांबामध्ये अजूनही शाबूत दिसतो.
या दरवाज्याच्या बाहेरील बाजूस तळाशी शरभाचे शिल्प देखील आहे.
या दरवाज्यातून थोडे वर चढल्यावर आपण दुसर्या संपूर्ण कातळातून खोदलेल्या बोगद्या सारख्या दरवाज्यातून आत शिरतो. गडाचा हा दरवाजादेखील पूर्वाभिमुख आहे.या दरवाज्याची ठेवण हरीहर किल्ल्याच्या दरवाज्या सारखी आहे.
या दरवाज्याच्या बाजूला एक गुहा कोरलेली आहे. यात पाण्याची तीन टाकी आहेत. या दरवाज्यातून थोडे वर गेल्यावर डाया बाजूच्या भिंतीवर चढून गेल्यावर आपण एका बुरुजावर येतो. या भागाला राणीचा बगिचा म्हणतात.
येथुन थोडे पुढे चालत गेल्यावर उजव्या बाजूच्या कतळावर कोरलेला संस्कृत आणि प्राकृत भाषेतला देवनागरी लिपीतील १६ ओळींचा शिलालेख पाहायला मिळतो. या शिलालेखाची उंची ४ फूट उंच २.४इच रुंद असून सोळा ओळींचा शिलालेख असून पहिल्या १४ ओळी संस्कृत आणि शेवटच्या २ मराठी म्हणजेच संस्कृत+प्राकृत अशा भाषेत हा शिलालेख आपल्याला बघायला मिळेल.
हातगड किल्ला नाशिकच्या दुर्ग अभ्यासक श्री सुदर्शन कुलथे यांना सापडलेल्या अप्रकाशित शिलालेखाचे वाचन
शिलालेख असलेला किल्ला - हातगड
तालुका - सुरगाणा, जिल्हा - नाशिक शिलालेखाचे स्थळ* - हातगड किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडून पश्चिमेकडे वर जाताना मार्गावरून डावीकडे (स्थानिकांच्या भाषेत) 'राणीचा बाग' म्हणून असलेल्या बुरूजावरून 15 मीटर अंतरावर... दिशा - दक्षिण लिपी - देवनागरी भाषा - संस्कृत (मिश्रीत मराठी) प्रकार - कोरीव शिलालेखाचा आकार* - (उभा) आयताकृती आडवी लांबी* (रूंदी) - २ फूट ४ इंच ( २८ इंच) उंची - ४ फूट शिलालेखाचे जमिनीपासूनचे अंतर* - ६ फूट ६ इंच शिलालेखातील अक्षरांची उंची* - 3 इंच एकूण ओळी* - १६
*शिलालेखाचे वाचन* - १. स्वस्ति श्री नृप विक्र मार्क स (स्य) २. ....ती ... शाळिवाहन सकें ३. 1469 ... संवत्सरे आषा ४. ढ क्षय 11 भौमे तद्दीने महाराजा ५. धिराज प्रौढ प्रताप चक्रवर्ती वेद मा ६. र्ग प्रवर्तक आचार परायण सा ७. रासार विचारक प्रताप नाराय ८. ण धर्मधुरीण सकळ वेद शा ९. स्त्र कोविद राष्ट्रौड बागुल मुगु १०. ट मणी.... वा....... श्री मा ११. न ब्रह्मकुळ प्रदिप श्री महादेव १२. सूत तपश्री.... परित श्री १३. रा (जा) धीराज बहिरम (भैरव) सेन राजा १४ . जबळ पराक्रमे हातगा दुर्ग वेढा १५. घालुनु (न) नीजाम सहा (शहा) पासुन १६. घेतला..... विजयी भव
शिलालेखाचा वाचक - सुदर्शन कुलथे, नाशिक शिलालेखाचे भाषांतर - गिरीश टकले, नाशिक शिलालेखाचे प्रयोजन*- बागुलवंशी राजांच्या पराक्रमाबद्दल
शिलालेखाचा आशय / निष्कर्ष
हा शिलालेख शालिवाहन शके १४६९ सालच्या आषाढ माहिन्यात क्षय एकादशीला कोरलेला आहे. म्हणजेच इ.स. १५४७ साली कोरलेल्या शिलालेखाला आज ५४७ वर्ष पूर्ण झालेली आहेत. जवळपास पाचशे वर्ष जुन्या शिलालेखात बागुलवंशी राजांच्या पराक्रमाबद्दलच्या ओळी सापडल्या आहेत. या शिलालेखात बागलाण प्रांतातील बागुलराजे जे स्वतःला राष्ट्रौढ वंशीय म्हणत असत यांच्या विजयाचा आशय आहे. बागुलवंशातील राजा महादेवसेन यांचा पुत्र भैरवसेन यांनी अहमदनगर निजामाच्या (बुरहान निजाम) ताब्यातून हातगड किल्ल्याला वेढा घालून किल्ला जिंकल्याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. सोळाव्या शतकाच्या मध्यावर अहमदनगरचा बुरहान निजामशहा हा या भागातल्या राजवटीतला बलाढ्य राजा होता. त्याच्या ताब्यात असलेला मोक्यावरच्या ठिकाणी वसलेला हातगड किल्ला मिळवणे हा बागुलवंशीय भैरवसेन राजाचा मोठा पराक्रम होता. हे या शिलालेखावरून स्पष्ट होते. बागुलवंशीय राजांच्या दरबारी असलेल्या रूद्र कवी विरचित 'राष्ट्रौढवंशम् महाकाव्यम्' या ग्रंथात भैरवसेन यांनी 'हस्तगिरी' किल्ला ताब्यात घेतल्याचाही उल्लेख आलेला आहे. यावरून हातगड विजय या शिलालेखालातील मजकूराला अधिक पुष्टी मिळाली आहे. शिलालेखाचे महत्त्व* - महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवरील एकूण शिलालेखांत संस्कृत भाषेतील सर्वांत मोठा शिलालेख. पण जवळपास आता ५०० वर्ष होत असलेला हा शिलालेख आता झिजत चालला असून महाराष्ट्रातील किल्यांच्या इतिहासातील देवनागरी लिपीत कोरलेला हा सर्वात मोठा शिलालेख हतगड किल्ल्याचा असावा असे इतिहास अभ्यासकांचे मत असून या त्याचे जतन करून त्यावर अभ्यास करणे गरजेचे आहे. हा शिलालेख किल्ल्याच्या बाहेरील बाजुस असल्याने व त्याचे नक्की ठिकाण माहित नसल्याने बऱ्याच जणांना हा शिलालेख पहाता येत नाही.
हातगड किल्ला येथे सापडलेल्या अप्रकाशित शिलालेखाचे वाचन-
नाशिकहून सुरतेकडे जाणाऱ्या हमरस्त्यावरील प्रसिद्ध अशा सापुताऱ्याच्या अलिकडे हातगड नावाचा ऐतिहासिक किल्ला आहे. तिथेच नाशिकचे गिर्यारोहक आणि दुर्गअभ्यासक सुदर्शन कुलथे यांना मार्च २०१६ मध्ये हातगडावरील शोधमोहिमेदरम्यान मराठी (देवनागरी) भाषेतील सर्वात मोठा आणि आजपावेतो अप्रकाशित असा शिलालेख आढळून आला. या गडावर पहिल्या प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूने पश्चिमेकडे जाणारी एक पायवाट आहे. तिथून दगड फोडून तयार केलेल्या मार्गातून साधारण दुसर्या प्रवेशद्वारातून पुढे गेलं, की डाव्या बाजूला बाहेरच्या भिंतीवर चढून पलिकडे गेलं असता तिथे एक बुरूज दिसून येतो. सपाट आणि रुंद अशा या बुरूजासारख्या भागाला स्थानिक लोक राणीचा बाग म्हणून संबोधतात. या बुरूजावर चाफ्याची तसंच इतरही काही फुलझाडं दिसून येतात, म्हणून कदाचित हे नाव रूढ झालं असण्याची शक्यता वाटते. या राणीच्या बागेपासून कातळकड्याला चिकटून पश्चिमेकडे जाता येतं. कडा उजवीकडे ठेवत पुढे गेलं की उभ्या कातळभिंतीवर एक शिलालेख दिसून येतो.
देवनागरी लिपीत कोरलेला संस्कृत भाषेतला तब्बल सोळा ओळींचा हा शिलालेख आहे. आजही चांगल्या अवस्थेत असलेला हा उभा आयताकृती शिलालेख उंचीने चार फूट तर रुंदीला दोन फूट चार इंच मापाचा आहे. शिलालेखालतील अक्षरे तीन इंच उंचीची आहेत. त्या जागेवर उभे राहिले असता शिलालेख हा जमिनीपासून साडेसहा फूट उंचीवर आहे. अधिक शोध घेतला असता संपूर्ण महाराष्ट्रातला देवनागरी भाषेतला हा सगळ्यात मोठा शिलालेख असल्याचे कळते. हा शिलालेख कोरीव प्रकारातला असून किल्ल्यावरील वापरात नसलेल्या अवघड अशा जागेवर उभ्या कातळकड्याच्या एका भिंतीवर आजही सुस्पष्ट स्थितीत दिसून येतो. मग इतकी वर्ष हा कुणाच्या नजरेस का पडला नाही? असा प्रश्न उपस्थित झाला. कुठल्याही किल्ल्यावर किंवा वास्तूवर असणारे शिलालेख हे नेहमी दर्शनी भागावर कोरलेले असतात असं दिसून येतं. म्हणजेच हातगड किल्ल्यावरील वर जाण्याचा दगडी चर खोदून बोळीसारखा मार्ग हा नंतरच्या काळात तयार करण्यात आला असावा. त्या आधी या मार्गाने पश्चिमेकडे जाऊन तिथल्या टोकावरून वर जाणारी वाट अस्तित्त्वात असली पाहिजे. आजही ती वाट कळून येते, पण नंतरच्या काळात त्यावर दगडी तटबंदी उभी करून ती बंद झालेली आहे. त्यामुळे पूर्वी दर्शनी भागात असलेला हा महत्त्वाचा शिलालेख आडबाजूला आणि अडगळीत गेला. सुदैव असं की तो आजही अगदी स्पष्ट आणि वाचनीय आहे. शिलालेख असलेला किल्ला – हातगड तालुका - सुरगाणा, जिल्हा - नाशिक शिलालेखाचे स्थळ - हातगड किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडून पश्चिमेकडे वर जाताना मार्गावरून डावीकडे (स्थानिकांच्या भाषेत) 'राणीचा बाग' म्हणून असलेल्या बुरूजावरून १५ मीटर अंतरावर... दिशा - दक्षिण लिपी - देवनागरी भाषा – देवनागरी (मिश्रित मराठी) प्रकार - कोरीव शिलालेखाचा आकार - (उभा) आयताकृती आडवी लांबी (रूंदी) - २ फूट ४ इंच (२८ इंच) उंची - ४ फूट शिलालेखाचे जमिनीपासूनचे अंतर - ६ फूट ६ इंच शिलालेखातील अक्षरांची उंची - ३ इंच एकूण ओळी - १६
1) स्वस्ति श्री नृप विक्र मार्क स (स्य) 2) ....ती ... शाळिवाहन सकें 3)१४६९ प्लवंग संवत्सरे आषा 4) ढ क्षय ११ भौमे तद्दीने महाराजा 5) धिराज प्रौढ प्रताप चक्रवर्ती वेद मा 6) र्ग प्रवर्तक आचार परायण सा 7) रासार विचारक प्रताप नाराय 8) ण धर्मधुरीण सकळ वेद शा 9) स्त्र कोविद राष्ट्रौड बागुल मुगु 10) ट मणी.... वा....... श्री मा 11) न ब्रह्मकुळ प्रदिप श्री महादेव 12) सूत तपश्री.... परित श्री 13) रा (जा) धीराज बहिरम (भैरव) सेन राजा 14) जबळ पराक्रमे हातगा दुर्ग वेढा 15) घालुनु (न) नीजाम सहा (शहा) पासुन 16) घेतला..... विजयी भव
शिलालेखाचा शोध आणि वाचन - सुदर्शन कुलथे, नाशिक शिलालेखाचे भाषांतर - गिरीश टकले, नाशिक शिलालेखाचे प्रयोजन - बागुलवंशी राजांच्या पराक्रमाबद्दल शिलालेखाचा आशय / निष्कर्ष - हा शिलालेख शालिवाहन शके१४६९ सालच्या आषाढ माहिन्यात क्षय एकादशीला कोरलेला आहे. म्हणजेच इ.स. १५४७ साली कोरलेल्या शिलालेखाला आज ४७० वर्ष पूर्ण झालेली आहेत. जवळपास पाचशे वर्षं जुन्या शिलालेखात बागुलवंशी राजांच्या पराक्रमाबद्दलच्या ओळी सापडल्या आहेत. या शिलालेखात बागलाण प्रांतातील बागुलराजे जे स्वतःला राष्ट्रौढ वंशीय म्हणत असत, यांच्या विजयाचा आशय आहे. बागुलवंशातील राजा महादेवसेन यांचा पुत्र भैरवसेन यांनी अहमदनगर निजामाच्या ताब्यातून हातगड किल्ल्याला वेढा घालून किल्ला जिंकल्याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. सोळाव्या शतकाच्या मध्यावर अहमदनगरचा बुरहान निजामशहा हा या भागातल्या राजवटीतला बलाढ्य राजा होता. त्याच्या ताब्यात असलेला मोक्यावरच्या ठिकाणी वसलेला हातगड किल्ला मिळवणे हा बागुलवंशीय भैरवसेन राजाचा मोठा पराक्रम होता. हे या शिलालेखावरून स्पष्ट होते. बागुलवंशीय राजांच्या दरबारी असलेल्या रूद्र कवी विरचित 'राष्ट्रौढवंशम् महाकाव्यम्' या ग्रंथात भैरवसेन यांनी 'हस्तगिरी' किल्ला ताब्यात घेतल्याचाही उल्लेख आलेला आहे. यावरून हातगड विजय या शिलालेखालातील मजकूराला अधिक पुष्टी मिळाली आहे
शिलालेखाचे महत्त्व - महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवरील एकूण शिलालेखांत मराठी (देवनागरी) भाषेतील सर्वांत मोठा शिलालेख. हातगडावरील महाद्वाराच्या कमानीत बसविलेले इतर दोन शिलालेख शिलालेख क्र. १ प्रवेशद्वार क्र. १ च्या कमानीत बसविलेल्या या शिलालेखाचं वाचन - ‘श्री प्रतापस्य ही कारकीर्द शेवुजी पंडीत यांचे सर्व सूत्रसर्व छत्र छायेत आहेत. हिंदू पंडीत शेवुजी’ उंची ११.५ इंच, रूंदी १३ इंच, ओळी ४ शिलालेख क्र. २ प्रवेशद्वार क्र. १ च्या उजव्या बाजूकडील भाग कोसळल्याने त्या जागेवर खाली असलेल्या ह्या शिलालेखाचे वाचन - ‘नवीन श्रीपती प्रतापस्य कारकीर्द त्रासजी पंडीत सुत्र सर्व छत्र छायेत’ उंची ११.५ इंच, रूंदी १३ इंच, ओळी ४
दरवाज्यातून आत शिरल्यावर आपण दुसऱ्या दरवाज्यापाशी पोहोचतो. या दरवाज्यातून आत शिरल्यावर उजवीकडच्या कातळामध्ये तिसरा बोगद्यासारखा दरवाजा लागतो.
या दरवाज्यातून आत शिरल्यावर उजव्या हाताला कातळकड्यामध्ये एक गुहा लागते. या गुहेमध्ये तीन दालने आहेत. त्यांपैकी दोन दालनांमध्ये जाण्याचे मार्ग जरी नष्ट झाले असले, तरी पूर्वी यांचा उपयोग पहारेकऱ्यांच्या निवासासाठी होत असावा. या गुहेच्या कातळावर गणेशाचे शिल्प कोरलेले आहे. समोरच्या दगडामध्ये मारुतीचे आणखी एक शिल्प कोरलेले दिसते.
गडाच्या या तिसऱ्या दरवाज्याची मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली असून, तिसऱ्या दरवाज्यापासून चौथ्या दरवाज्यापर्यंत जाण्यासाठी दगडांमध्ये वीस ते पंचवीस पायऱ्या खोदलेल्या आहेत. गडाचा चौथा दरवाजा उत्तराभिमुख असून तो बराच सुस्थितीत आहे.
दुर्गवास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिले तर हातगडाचा प्रवेशमार्ग खूप अभ्यासनीय संपूर्ण कातळकोरीव वाट आणि त्यामध्ये एकामागोमाग एक असे कातळात कोरलेले चार दरवाजे अशा पद्धतीने बांधलेले आहेत की. केवळ एकच सशस्त्र निक या वाटेने पुढे जाऊ शकतो. एवढेच नव्हे, तर उजव्या बाजूचा नैसर्गिक कातळकडा आणि डाव्या बाजूची मानवनिर्मित तटबंदी व बुरूज यांचा सुरेख मिलाफ इथे आपल्याला पाहावयास मिळतो. चौथ्या दरवाज्यातून आत शिरले की हातगडाचा माथा लागतो.. चौथ्या दरवाजाला ग्रिल लावलेले आहे. संध्याकाळी ६ नंतर किल्ला बंद करण्यात येतो. चौथ्या प्रवेशव्दरातून आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो.
हातगड किल्ल्याचा नकाशा
गडाची उंची समुद्रसपाटीपासुन ३२८० फुट असुन गडमाथा ८ एकर परिसरावर पुर्वपश्चिम पसरलेला आहे. माथ्यावर आल्यावर समोरच गडाची आजही मोठया प्रमाणात शिल्लक असलेली तटबंदी दिसुन येते. ती आजही बर्यापैकी शाबूत आहे.आपण प्रवेश केलेल्या ठिकाणाहुन किल्ला उजवीकडे व डावीकडे असा दोन भागात विभागला असुन सर्वप्रथम डावीकडील लहान भाग पाहुन घ्यावा.
या तटबंदीत असलेल्या जंग्या व त्यावरील चर्या लक्ष वेधणाऱ्या आहेत. समोरील वाटेने खाली उतरत डावीकडे वळल्यावर तटबंदीतील फांजीवरून आपण बुरुजावर पोहोचतो.
या बुरुजावर कुण्या पिराची अलीकडेच बांधलेली कबर आहे. हा बुरुज पाहता रतनगडावरील बुरुजाची आठवण होते. बुरुजाच्या उजवीकडे तटबंदीची उंच भिंत असुन समोरील बाजुस पाण्याने भरलेले
आयताकृती आकाराचे मोठे टाके आहे पण यातील पाणी पिण्यायोग्य नाही.
हा बुरुज किल्ल्याच्या एका सोंडेवर बांधला असुन खालील बाजूने या बुरुजापर्यंत येता येऊ नये यासाठी हि सोंड एका खाचेने किल्ल्यापासून वेगळी केली आहे. गाडीमार्गाने किल्ल्यावर येताना
या बुरुजाच्या तळात एक दरवाजा दिसतो पण वरील बाजूने त्या दरवाजात जाण्याचा मार्ग दिसत नाही. हा मार्ग काळाच्या ओघात बुजून गेला असावा. गडाची डावी बाजु पाहून दरवाजाकडे येऊन उजवीकडील भाग पाहण्यास सुरवात करावी. या भागात खूप मोठया प्रमाणात वास्तु अवशेष असुन या सर्व बांधकामावर मुघलशैलीचा प्रभाव आहे. वाटेच्या सुरवातीला डाव्या बाजुस जमीनीवर कातळात कोरलेले शिवलिंग असुन त्याशेजारी मातीने भरलेले टाके तर त्यापुढे उजवीकडे पाण्याचे टाके आहे.
येथुन पुढे गेल्यावर डाव्या बाजुस बुरुजासारखी गोलाकार इमारत दिसते. इमारतीच्या आतील बाजुस असलेला चुन्याचा गिलावा व त्यातील खापरी नळ पहाता या इमारतीचा उपयोग खालील तलावातील पाणी येथे आणुन हवेच्या दाबतंत्राने ते संपुर्ण गडावर फिरविण्यासाठी केला जात होता. या इमारती समोर उतारावर कातळात कोरलेले एकाखाली एक असे पाण्याचे दोन मोठे तलाव पहायला मिळतात.
यातील खालील तलावाच्या मध्यभागी पाण्याची पातळी मोजण्यासाठी खांब उभारलेला असुन तलावात उतरण्यासाठी दोन ठिकाणी पायऱ्या बांधल्या आहेत. टाके पाहुन पुढे आल्यावर तटाला लागुन असलेल्या इमारतीच्या उध्वस्त भिंती दिसतात. इमारतीच्या आतील भागात कारंज्यासाठी असलेला हौद दिसतो.
येथे समोरील बाजुस चौकोनी आकाराची अर्धगोलाकार छत असलेली इमारत असुन या इमारती समोर एक चौकोनी खोल टाके आहे. हि इमारत म्हणजे हमामखाना असुन इतका सुस्थितीतील हमामखाना कोणत्याही किल्ल्यावर पहायला मिळत नाही.
हमामखान्याच्या छताला वाफ कोंडण्यासाठी असलेली गवाक्षे तसेच भिंतीबाहेर गरम पाण्यासाठी असलेले चुलाणे, पाण्याचे खापरी नळ, छतावर फिरवलेले पाणी, आतील पाण्याचे हौद व येथील जलव्यवस्थापान हे सारेच अभ्यासनीय आहे. येथील एकुण अवशेष पहाता हा भाग म्हणजे गडावरील राजवाडा आहे.त्याला किल्लेदाराचा वाडा म्हणतात. या भागात मोठया प्रमाणात वास्तुंचे चौथरे पसरलेले आहेत.हमामखाना पाहुन पुढे आल्यावर तटाला लागून उजवीकडे नव्याने उभारलेला ध्वजस्तंभ आहे तर डावीकडे एक पायऱ्याशेजारी एक जुनाट इमारत दिसते.
हि इमारत गडावरील अंबरखाना म्हणजेच धान्यकोठार आहे. या वास्तुच्या आतील बाजुस अनेक कमानी असून पूर्व-पश्चिम भिंतीत झरोके आहेत. अंबरखान्याशेजारी पाण्याचे एक मोठे टाके असुन त्यापुढील भागात अजून दोन टाकी पहायला मिळतात. गडावर मोठया प्रमाणात पाणी उपलब्ध असले तरी एकही टाक्यात पिण्यायोग्य पाणी नाही. हे पाहुन परत ध्वजस्तंभाकडे यावे. ध्वजस्तंभावरून पुढे जाणारी वाट गडाच्या उजवीकडील टोकापर्यंत जाते. गडाच्या या निमुळत्या होत जाणाऱ्या सपाट भागावर एक चौथरा वगळता इतर कोणतेही अवशेष दिसत नाहीत. संपुर्ण किल्ल्याच्या काठाला दगडी तटबंदी असुन वनखात्याने या तटबंदीला लोखंडी कठडे बसविले आहेत. गडाच्या या टोकावरून किल्ल्यावर येणारी संपर्ण वाट नजरेस पडते. येथुन डावीकडील तटबंदी व त्यावरील बुरुज पहात दरवाजाजवळ आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. संपूर्ण गडमाथा फिरण्यास १ तास पुरतो.
गडावरुन अचला, अहिवंतगड, सप्तशृंगी, मार्कंडय़ा, रवळ्या-जवळ्या, धोडप, इखारा, भिलई, सालोटा, साल्हेर, न्हावी रतनगड हे किल्ले तसेच धानोली धरण(गुजरात), घोडामबे धरण, भोवरील डोंगर, निऱ्ही डोंगर नजरेस पडतात. हातगड किल्ला हा महाराष्ट्र - गुजरात सीमेवर असल्या कारणाने समोर सापुतारा(गुजरात मधील सुप्रसिद्ध हिल स्टेशन) स्पष्ट दिसते. भक्कम तटाने नटलेला हा छोटेखानी किल्ला दूरवरून उठून दिसतो. इतिहास, अवशेष आणि दुर्गस्थापत्याने नटलेला हा दुर्ग नाशिकला गेल्यावर नक्कीच पाहिला पाहिजे!
संदर्भ :- १) नाशिक जिल्हा गॅझेटीयर २) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स ३) दुर्गभ्रमंती नाशिकची - अमित बोरोले ४) Gazetteer of Bombay Presidency (District Nasik), Government Central Press, Bombay, Nasik, 1883. ५) खरे, ग. ह. संपा., ऐतिहासिक फार्सी साहित्य, खंड २, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, १९३७. ६) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा- सतिश अक्कल्कोट ७) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे ८) www.trekshitiz.com हि वेबसाईट ९) www.durgbharari.in हि वेबसाईट १०) https://marathivishwakosh.org/54976/ ११) https://trekhunt.blogspot.com/2017/12/blog-post.html १२) http://sagarshivade07.blogspot.com/2014/08/blog-post.html
त्वरित संपर्क
तालुका - सुरगाणा, जिल्हा - नाशिक, महाराष्ट्र, ४२२२११ +९१ ८८८८७ ९७९३७ +९१ ९६८९६ २६२९८ +९१ ९४२३० ७१७३२ info@grampanchayathatgad.co.in
आपत्कालीन हेल्पलाईन पोलीस: १०० किंवा ११२ अग्निशमन सेवा: १०१ रुग्णवाहिका: १०२ किंवा १०८ राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक: ११२
किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा
प्रस्तावना
सुरगणा हे नाशिक
मधील एक तालुक्याचे गाव आहे, सह्याद्रीच्या पूर्व भागातील एका डोंगररांगेची
सुरुवात याच तालुक्या पासून होते. यालाच "सातमाळ रांग" असे म्हणतात. याच
रांगेच्या उपशाखेवर एक छोटासा किल्ला आहे, त्याचे नाव "हातगङ".
महत्त्वाची ठिकाणे
गडावर प्रवेश करण्यापूर्वी चार दरवाजे लागतात.
पहिल्या दरवाज्याच्या अगोदरच उजवीकडे वरच्या बाजूला कातळात कोरलेले
पाण्याचे टाके आहे. येथेच कातळात कोरलेली हनुमानाची मूर्ती आहे. गडाच्या
पहिल्या दरवाज्याचे फक्त खांब शिल्लक आहेत. दरवाजाच्या बाजूला शरभ शिल्प
आहेत. या दरवाज्या आतील बाजूस दोन शिलालेख कोरलेले आहेत. या दरवाज्यातून
थोडे वर चढल्यावर आपण दुसर्या संपूर्ण कातळातून खोदलेल्या बोगद्या सारख्या
दरवाज्यातून आत शिरतो. या दरवाज्याची ठेवण हरीहर किल्ल्याच्या दरवाज्या
सारखी आहे. या दरवाज्याच्या बाजूला एक गुहा कोरलेली आहे. यात पाण्याची तीन
टाकी आहेत. या दरवाज्यातून थोडे वर गेल्यावर डाया बाजूच्या भिंतीवर चढून
गेल्यावर आपण एका बुरुजावर येतो. या भागाला राणीचा बगिचा म्हणतात. येथुन
थोडे पुढे चालत गेल्यावर उजव्या बाजूच्या कतळावर कोरलेला संस्कृत आणि
प्राकृत भाषेतला देवनागरी लिपीतील १६ ओळींचा शिलालेख पाहायला मिळतो.
*हातगड किल्ला नाशिकच्या दुर्ग अभ्यासक श्री सुदर्शन कुलथे यांना सापडलेल्या अप्रकाशित शिलालेखाचे वाचन* -
*शिलालेख असलेला किल्ला* - हातगड *तालुका* - सुरगाणा, *जिल्हा* - नाशिक *शिलालेखाचे स्थळ* - हातगड किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडून पश्चिमेकडे वर जाताना मार्गावरून डावीकडे (स्थानिकांच्या भाषेत) 'राणीचा बाग' म्हणून असलेल्या बुरूजावरून 15 मीटर अंतरावर... *दिशा* - दक्षिण *लिपी* - देवनागरी *भाषा* - संस्कृत (मिश्रीत मराठी) *प्रकार* - कोरीव *शिलालेखाचा आकार* - (उभा) आयताकृती *आडवी लांबी* (रूंदी) - 2 फूट 4 इंच (28 इंच) *उंची* - 4 फूट *शिलालेखाचे जमिनीपासूनचे अंतर* - 6 फूट 6 इंच *शिलालेखातील अक्षरांची उंची* - 3 इंच *एकूण ओळी* - 16
*शिलालेखाचा आशय / निष्कर्ष* - हा
शिलालेख शालिवाहन शके 1469 सालच्या आषाढ माहिन्यात क्षय एकादशीला कोरलेला
आहे. म्हणजेच इ.स. 1547 साली कोरलेल्या शिलालेखाला आज 470 वर्ष पूर्ण
झालेली आहेत. जवळपास पाचशे वर्ष जुन्या शिलालेखात बागुलवंशी राजांच्या
पराक्रमाबद्दलच्या ओळी सापडल्या आहेत. या शिलालेखात बागलाण प्रांतातील
बागुलराजे जे स्वतःला राष्ट्रौढ वंशीय म्हणत असत यांच्या विजयाचा आशय आहे.
बागुलवंशातील राजा महादेवसेन यांचा पुत्र भैरवसेन यांनी अहमदनगर निजामाच्या
(बुरहान निजाम) ताब्यातून हातगड किल्ल्याला वेढा घालून किल्ला जिंकल्याचा
स्पष्ट उल्लेख केलेला आहे. सोळाव्या शतकाच्या मध्यावर अहमदनगरचा बुरहान
निजामशहा हा या भागातल्या राजवटीतला बलाढ्य राजा होता. त्याच्या ताब्यात
असलेला मोक्यावरच्या ठिकाणी वसलेला हातगड किल्ला मिळवणे हा बागुलवंशीय
भैरवसेन राजाचा मोठा पराक्रम होता. हे या शिलालेखावरून स्पष्ट होते.
बागुलवंशीय राजांच्या दरबारी असलेल्या रूद्र कवी विरचित 'राष्ट्रौढवंशम्
महाकाव्यम्' या ग्रंथात भैरवसेन यांनी 'हस्तगिरी' किल्ला ताब्यात
घेतल्याचाही उल्लेख आलेला आहे. यावरून हातगड विजय या शिलालेखालातील
मजकूराला अधिक पुष्टी मिळाली आहे.
*शिलालेखाचे महत्त्व* - महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवरील एकूण शिलालेखांत संस्कृत भाषेतील सर्वांत मोठा शिलालेख.
शिलालेख
पाहून आल्या मार्गाने परत पायर्यांपाशी येऊन वर चढत गेल्यावर गडाचा तिसरा
आणि चौथा दरवाजा लागतो. चौथ्या दरवाजाला ग्रिल लावलेले आहे. संध्याकाळी ६
नंतर किल्ला बंद करण्यात येतो. चौथ्या प्रवेशव्दरातून आपला गडमाथ्यावर
प्रवेश होतो. गडमाथा खूप विस्तीर्ण आहे. संपूर्ण गडमाथा फिरण्यास १ तास
लागतो. प्रवेशव्दारातून वर आल्यावर पायर्यांची एक वाट डावीकडे खाली उतरते.
येथे मोठ्या प्रमाणावर तटबंदी आहे, ती आजही बर्यापैकी शाबूत आहे.
तटबंदीच्या कडेकडेने चालत गेल्यावर समोरच एक पीर आहे. उजव्या बाजूच्या तटात
एक कमान कोरलेली आहे. पीराच्या समोरील बाजूस पाण्याचे प्रचंड मोठे टाक
आहे. हे पाहून परत प्रवेशव्दारापाशी येऊन उजव्या बाजूला चालायला सुरुवात
केल्यावर कातळात कोरलेले शिवलिंग आणि त्याच्या बाजूला पाण्याचे एक कोरडे
टाके आहे. पुढे चालत जाऊन डाव्यास बाजूला खाली उतरल्यावर बुरुजासारखी रचना
असलेली एक इमारत दिसते. या ठिकाणी धान्य कोठार होते. त्याच्या बाजूला
पाण्याचे एक मोठे टाक आहे. धान्य कोठाराच्या खालच्या बाजूला उतरुन गेल्यावर
कातळात कोरलेला पाण्याचा मोठा तलाव आहे. तलावाच्या मध्यभागी एक खांब आहे.
तलावातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी हा खांब उभारला असावा. तलाव पाहून वर
चढून गेल्यावर एक गजपृष्ठाकार रचनेचे छत असलेली इमारत दिसते. हे किल्ल्याचे
दारु कोठार आहे. दारु कोठाराच्या बाजूला पाण्याचे टाक आहे. दारु कोठार
पाहून खाली उतरुन गडाची तटबंदी डाव्या बाजूला ठेवत पुढे चालत गेल्यावर आपण
गडाच्या पूर्व टोकावर पोहोचतो. वाटेत एक टाक आणि काही उध्वस्त वास्तूंचे
चौथरे पाहायला मिळतात. गडाचे पूर्व टोक पाहून विरुध्द बाजूने (म्हणजे हातगड
गावाच्या बाजूने) पुढे चालत गेल्यावर नविन उभारलेला ध्वजस्तंभ दिसतो.
त्याच्या उजव्या बाजूला जी इमारत आहे त्या ठिकाणी मुदपाकखाना होता. पुढे
गेल्यावर डाव्या बाजूला एका भव्य वाड्याचे अवशेष दिसतात. त्याला
किल्लेदाराचा वाडा म्हणतात. वाडा पाहून प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली
गडफ़ेरी पूर्ण होते. संपूर्ण गडफेरीस एक तास लागतो. गडावरुन साल्हेर,
सालोटा, वणी, मार्कंडेय, रावळ्या जावळ्या, धोडप हे किल्ले दिसतात. सापुतारा
परीसर दिसतो.
हातगड गावात काही अवशेष आहेत. त्यासाठी किल्ल्याच्या
पहिल्या प्रवेशव्दारा समोर असलेल्या रस्त्याच्या टोका पासून गावात
उतरण्यासाठी पायर्या आहेत. पायर्या संपल्यावर उजव्या बाजूने गावात जाणारी
वाट पकडावी. ५ मिनिटावर एक जुनी कमान असलेली इमारत दिसते. या इमारतीला
घोड्याच्या पागा म्हणतात. याच्या बाजूला एक बांधीव तलाव आहे. तेथुन गावात
येणार्या रस्त्यावर एक चुन्याच्या घाण्याचा दगड पडलेला आहे. दगड पाहून
रस्त्याने नाशिक सापुतारा रस्तावर आल्यावर डाव्या बाजूला शेड खाली गोमाजी
मोरे यांची समाधी आहे.
कसे पोहोचावे
हातगडवाडी मार्गे :- हातगडाला जाण्यासाठी
नाशिक गाठावे. नाशिक - सापुतारा मार्गावर, नाशिक पासून ७४ कि.मी अंतरावर
(सापुतार्या पासून ६ कि.मी अंतरावर) बोरगाव नावाचा फाटा आहे. येथून एक
रस्ता सुरगण्याला जातो, तर दुसरा सापुतार्याला जातो. सापुतार्याला
जाणार्या रस्त्यावर बोरगावपासून ४ कि.मी अंतरावर हातगडवाडी नावाचे गाव
आहे. हेच गडाच्या पायथ्याचे गाव आहे. गावातून उजवी बाजूस जाणारी डांबरी सडक
कळवणला जाते. या सडकेवरून पुढे जायचे ,हातगडवाडी डाव्या हाताला ठेवायची.
पुढे डावीकडे एक चुन्याच्या घाण्याचा दगड दिसतो येथे डांबरी सडक सोडून
गावातील घरे पार करुन डावीकडे दिसणार्या आंब्याच्या झाडा पर्यंत पोहोचावे.
येथुन गडावर जाणार्या पायर्या आहेत. पायथ्यापासून गडमाथा गाठण्यास पाऊण
तास लागतो.
खाजगी वाहानाने थेट गडाच्या प्रवेशव्दारा पर्यंत जाता
येते. नाशिक सापुतारा मार्गावर हातगड गावाच्या फ़ाट्याच्या पुढे एक चढण
लागते. या चढणीवर क्लब महेंद्र आणि इतर हॉटेल्स आहेत. त्याच्या पुढेच हातगड
किल्ल्यावर जाणार्या रस्य्ताचा फ़ाटा आहे. याठिकाणी वनखात्याची चौकी आहे.
किल्ल्यावर जाण्यासाठी प्रवेश फ़ी भरावे लागते.
ट्रेकसाठी लागणारा वेळ
⏱️
हातगडवाडी मार्गे पाऊण तास लागतो.
सुविधा व सोयी
🏠
निवास व्यवस्था
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
🍽️
अन्न व्यवस्था
किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती आपण स्वत:च करावी.
💧
पाणी उपलब्धता
किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही.
सर्वोत्तम काळ
🌤️
N/A
जवळील गावे
हातगडवाडी
उंची : ३२४८ फुट
श्रेणी : सोपी
महाराष्ट्र हा गडकिल्ल्यांचा प्रदेश म्हणुन ओळखला जातो. येथील प्रत्येक
दुर्गाला स्वतःची अशी एक ओळख आहे. यातील काही किल्ले त्याच्या दुर्गमतेसाठी
तर काही किल्ले त्यावर घडलेल्या इतिहासाने तर काही किल्ले त्यावरील
वास्तुंसाठी प्रसिध्द आहेत. नाशीक जिल्ह्यातील सुरगणा तालुक्यात सापुतारा
या थंड हवेच्या ठिकाणापासुन जवळच असलेला हातगड किल्ला त्यावर असलेला
महाराष्ट्रातील किल्ल्यावरील सर्वात मोठा शिलालेख असलेला किल्ला यासाठी
प्रसिध्द आहे. हातगडाला जाण्यासाठी सर्वप्रथम नाशिक गाठावे. नाशिक –
सापुतारा मार्गावर नाशिकहुन वणीमार्गे ७४ कि.मी अंतरावर तर
सापुताऱ्यापासून ६ कि.मी अंतरावर बोरगाव नावाचा फाटा आहे. येथून एक रस्ता
सुरगण्याला जातो तर दुसरा सापुताऱ्याला जातो. सापुताऱ्याला जाणाऱ्या
रस्त्यावर बोरगावपासून ४ कि.मी अंतरावर हातगडवाडी हे गडाच्या पायथ्याचे गाव
आहे. गावातुन किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या असुन खाजगी
वाहनाने वनखात्याचे शुल्क भरून थेट किल्ल्याच्या दरवाजापर्यंत जाता येते.
...
गावातुन किल्ल्यावर चालत गेल्यास गावामध्ये काही जुने अवशेष दिसतात. यात
गंगाजी मोरे यांची समाधी, चुन्याचा घाणा, घोडयांच्या पागा असलेली कमानीदार
इमारत,घडीव दगडात बांधलेला लहान तलाव या वास्तु पहायला मिळतात. याशिवाय
गावाची सफर केल्यास गावाभोवती तटबंदी असल्याच्या काही खाणाखुणा पाहायला
मिळतात. पायथ्यापासून दरवाजा गाठण्यास अर्धा तास पुरेसा होतो. गाडीरस्ता
संपल्यावर पायऱ्यांनी दरवाजाकडे जाताना पहिल्या दरवाजाच्या अलीकडे उजवीकडे
वरच्या बाजूला कातळात कोरलेले हिरव्यागार पाण्याचे टाके आहे. येथे कातळात
कोरलेली मारुतीची मूर्ती असुन वाटेच्या पुढील भागात कातळात कोरलेली लहान
गुहा आहे. हे पाहून आपण गडाच्या पहिल्या उध्वस्त दरवाजात पोहोचतो. गडावर
प्रवेश करताना असे चार दरवाजे ओलांडावे लागतात. हा दरवाजा व पुढील दोन
दरवाजे पश्चिमाभिमुख असुन चौथा दरवाजा उत्तराभिमुख आहे. हा दरवाजा उजवीकडे
किल्ल्याचा कातळ तर डावीकडे बुरुजाच्या आधारे बांधलेला आहे. या दरवाजाची
कमान पडलेली असून फक्त खांब शिल्लक आहेत. याच्या डाव्या खांबावर शेंदुर
फासलेले पायात हत्ती धरलेल्या शरभाचे शिल्प असून एक मराठी शिलालेख आहे तर
उजव्या बाजूस एक शिलालेखाचा दगड पडलेला आहे. हे दोन्ही शिलालेख देवनागरीत
असुन त्यांची अक्षरे पुसट झाली आहेत. इथुन काही फुटावर असलेला गडाचा दुसरा
उध्वस्त दरवाजा पार केल्यावर डाव्या बाजुच्या तटबंदीत काही पायऱ्या दिसतात.
या पायऱ्या चढुन वर आल्यावर तटबंदीबाहेर काही सपाटी आहे. या सपाटीच्या
टोकाला एक लहान बुरुज आहे. हा बुरुज उतरुन १०-१२ पावले पुढे आल्यावर उजव्या
बाजूला किल्ल्याच्या कातळात देवनागरी लिपीत कोरलेला १६ ओळींचा मराठी
भाषेतील शिलालेख पहायला मिळतो. हा शिलालेख शालिवाहन शके १४६९ ला म्हणजेच
इ.स.१५४७ साली आषाढ माहिन्यात एकादशीला कोरलेला आहे. साधारण पाचशे वर्ष
जुना असलेल्या या शिलालेखात बागुल वंशातील राजा महादेव यांचा पुत्र
बहीरमसेन याने निजामशहाच्या ताब्यात असलेला हातगड किल्ला वेढा घालून
जिंकल्याचा उल्लेख केला आहे. हा शिलालेख किल्ल्याच्या बाहेरील बाजुस
असल्याने व त्याचे नक्की ठिकाण माहित नसल्याने बऱ्याच जणांना हा शिलालेख
पहाता येत नाही. शिलालेख पाहिल्यावर परत दरवाजाकडे येऊन गड चढण्यास सुरवात
करावी. दुसऱ्या दरवाजातून थोडे पुढे आल्यावर आपण कातळातून खोदलेल्या
तिसऱ्या भुयारी दरवाजातून आत प्रवेश करतो. या दरवाजा शेजारी असलेला उंच
बुरुज व कातळातील खाचा पहाता या दरवाजातुन पुढे जाणारी वाट पुर्णपणे
बंदीस्त केलेली दिसते. दरवाजाच्या उजव्या बाजूच्या कातळात तीन टप्प्यात एक
भलीमोठी गुहा कोरलेली असुन त्यात पाण्याची तीन कोरडी पडलेली टाकी आहेत. या
ठिकाणी बहुदा गडावरील शिबंदीची राहण्याची सोय असावी. तिसऱ्या दरवाजापासून
चौथ्या दरवाजापर्यंतचा संपुर्ण भाग कातळात कोरून काढला आहे. या कातळात
उजव्या बाजुस गणेशमुर्ती तर डाव्या बाजुस हनुमान मुर्ती कोरलेली आहे. येथुन
कातळात कोरलेल्या २०-२५ पायऱ्या चढत आपण चौथ्या दरवाजासमोर येतो. चौथ्या
दरवाजाला लोखंडी जाळी दरवाजा बसवलेला असुन संध्याकाळी ६ नंतर हा दरवाजा बंद
करण्यात येतो. या दरवाजाने कातळात कोरलेल्या काही पायऱ्या चढून आल्यावर
आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. गडाची उंची समुद्रसपाटीपासुन ३२८० फुट असुन
गडमाथा ८ एकर परिसरावर पुर्वपश्चिम पसरलेला आहे. माथ्यावर आल्यावर समोरच
गडाची आजही मोठया प्रमाणात शिल्लक असलेली तटबंदी दिसुन येते. आपण प्रवेश
केलेल्या ठिकाणाहुन किल्ला उजवीकडे व डावीकडे असा दोन भागात विभागला असुन
सर्वप्रथम डावीकडील लहान भाग पाहुन घ्यावा. या तटबंदीत असलेल्या जंग्या व
त्यावरील चर्या लक्ष वेधणाऱ्या आहेत. समोरील वाटेने खाली उतरत डावीकडे
वळल्यावर तटबंदीतील फांजीवरून आपण बुरुजावर पोहोचतो. या बुरुजावर कुण्या
पिराची अलीकडेच बांधलेली कबर आहे. बुरुजाच्या उजवीकडे तटबंदीची उंच भिंत
असुन समोरील बाजुस पाण्याने भरलेले आयताकृती आकाराचे मोठे टाके आहे पण
यातील पाणी पिण्यायोग्य नाही. हा बुरुज किल्ल्याच्या एका सोंडेवर बांधला
असुन खालील बाजूने या बुरुजापर्यंत येता येऊ नये यासाठी हि सोंड एका खाचेने
किल्ल्यापासून वेगळी केली आहे. गाडीमार्गाने किल्ल्यावर येताना या
बुरुजाच्या तळात एक दरवाजा दिसतो पण वरील बाजूने त्या दरवाजात जाण्याचा
मार्ग दिसत नाही. हा मार्ग काळाच्या ओघात बुजून गेला असावा. गडाची डावी
बाजु पाहून दरवाजाकडे येऊन उजवीकडील भाग पाहण्यास सुरवात करावी. या भागात
खूप मोठया प्रमाणात वास्तु अवशेष असुन या सर्व बांधकामावर मुघलशैलीचा
प्रभाव आहे. वाटेच्या सुरवातीला डाव्या बाजुस जमीनीवर कातळात कोरलेले
शिवलिंग असुन त्याशेजारी मातीने भरलेले टाके तर त्यापुढे उजवीकडे पाण्याचे
टाके आहे. येथुन पुढे गेल्यावर डाव्या बाजुस बुरुजासारखी गोलाकार इमारत
दिसते. इमारतीच्या आतील बाजुस असलेला चुन्याचा गिलावा व त्यातील खापरी नळ
पहाता या इमारतीचा उपयोग खालील तलावातील पाणी येथे आणुन हवेच्या
दाबतंत्राने ते संपुर्ण गडावर फिरविण्यासाठी केला जात होता. या इमारती समोर
उतारावर कातळात कोरलेले एकाखाली एक असे पाण्याचे दोन मोठे तलाव पहायला
मिळतात. यातील खालील तलावाच्या मध्यभागी पाण्याची पातळी मोजण्यासाठी खांब
उभारलेला असुन तलावात उतरण्यासाठी दोन ठिकाणी पायऱ्या बांधल्या आहेत. टाके
पाहुन पुढे आल्यावर तटाला लागुन असलेल्या इमारतीच्या उध्वस्त भिंती दिसतात.
इमारतीच्या आतील भागात कारंज्यासाठी असलेला हौद दिसतो. येथे समोरील बाजुस
चौकोनी आकाराची अर्धगोलाकार छत असलेली इमारत असुन या इमारती समोर एक चौकोनी
खोल टाके आहे. हि इमारत म्हणजे हमामखाना असुन इतका सुस्थितीतील हमामखाना
कोणत्याही किल्ल्यावर पहायला मिळत नाही. हमामखान्याच्या छताला वाफ
कोंडण्यासाठी असलेली गवाक्षे तसेच भिंतीबाहेर गरम पाण्यासाठी असलेले
चुलाणे, पाण्याचे खापरी नळ, छतावर फिरवलेले पाणी, आतील पाण्याचे हौद व
येथील जलव्यवस्थापान हे सारेच अभ्यासनीय आहे. येथील एकुण अवशेष पहाता हा
भाग म्हणजे गडावरील राजवाडा आहे. या भागात मोठया प्रमाणात वास्तुंचे चौथरे
पसरलेले आहेत.हमामखाना पाहुन पुढे आल्यावर तटाला लागून उजवीकडे नव्याने
उभारलेला ध्वजस्तंभ आहे तर डावीकडे एक पायऱ्याशेजारी एक जुनाट इमारत दिसते.
हि इमारत गडावरील अंबरखाना म्हणजेच धान्यकोठार आहे. या वास्तुच्या आतील
बाजुस अनेक कमानी असून पूर्व-पश्चिम भिंतीत झरोके आहेत. अंबरखान्याशेजारी
पाण्याचे एक मोठे टाके असुन त्यापुढील भागात अजून दोन टाकी पहायला मिळतात.
गडावर मोठया प्रमाणात पाणी उपलब्ध असले तरी एकही टाक्यात पिण्यायोग्य पाणी
नाही. हे पाहुन परत ध्वजस्तंभाकडे यावे. ध्वजस्तंभावरून पुढे जाणारी वाट
गडाच्या उजवीकडील टोकापर्यंत जाते. गडाच्या या निमुळत्या होत जाणाऱ्या सपाट
भागावर एक चौथरा वगळता इतर कोणतेही अवशेष दिसत नाहीत. संपुर्ण
किल्ल्याच्या काठाला दगडी तटबंदी असुन वनखात्याने या तटबंदीला लोखंडी कठडे
बसविले आहेत. गडाच्या या टोकावरून किल्ल्यावर येणारी संपर्ण वाट नजरेस
पडते. येथुन डावीकडील तटबंदी व त्यावरील बुरुज पहात दरवाजाजवळ आल्यावर आपली
गडफेरी पुर्ण होते. संपूर्ण गडमाथा फिरण्यास १ तास पुरतो. गडावरुन दुरवरचा
सापुतारा परीसर तसेच साल्हेर-सालोटा किल्ले नजरेस पडतात. इतिहासात या
गडाच्या फारशा नोंदी नसल्या तरी गडाचा इतिहास थेट १३ व्या शतकापर्यंत जातो.
१३ व्या शतकापासून अस्तित्वात असलेला हा गड हस्तगिरी, होलगड, हातगा
दुर्ग, हद्दगड, अशा विविध नावानी ओळखला जात होता. बागलाणात बागूल राजांची
राजवट इ.स.१३०० ते इ.स.१७०० अशी होती. बागूल राजांचा कवी रुद्र याने
इ.स.१५९६ मध्ये लिहिलेल्या राष्ट्रौढवंशम महाकाव्यम् या ग्रंथात बागूल
राजांनी हस्तगिरी किल्ला ताब्यात घेतल्याचा उल्लेख मिळतो. नंतर हा किल्ला
बागूल राजाकडून पुन्हा निजामशाहीत गेला. १६ व्या शतकात निजामशाहने जिंकून
घेतलेल्या ५८ किल्ल्यांच्या यादीत हातगडचा उल्लेख हातगा असा येतो तर मुघल
कागदपत्रात या किल्ल्याचा उल्लेख होलगड असा येतो. याबाबत असा उल्लेख येतो
कि मुघलांच्या वतीने सय्यद अब्दुल्ल याने आपला मुलगा हसनअली याला किल्ला
घेण्यासाठी पाठविले होते. किल्ला जिंकल्यावर विजयाचे प्रतिक म्हणुन
हसनअलीने बादशहाला ९ ऑगस्ट १६८८ रोजी सोन्याचा किल्ली पाठवली. बादशहाने
हसनअलीला खान ही पदवी देत त्याची मनसब वाढवली. शिवाजी महाराजांच्या काळात
गंगाजी ऊर्फ गोगाजी मोरे-देशमुख हे सुरगणा प्रांतात मोहिमेवर असता त्यांनी
आदिलशाही किल्लेदार शुराबखान याच्याकडून शके १५८६ (सन १६६३) मध्ये हातगड
किल्ला ताब्यात घेतला. पेशवाईत किल्ला मराठय़ांकडे असताना रंगराव औढेकर
किल्लेदार होते. त्यावेळेस सुपकर्ण भिल्ल याने या गडावर हल्ला केला पण
किल्लेदाराने हा हल्ला परतवल्याने चिडलेल्या सुपकर्ण भिल्लाने पायथ्याचे
गाव पेटवून पळ काढला असे सांगितले जाते.
हातगड
हातगडवाडी
हे हातगडाच्या पायथ्याचे गाव आहे,
हातगडावर जायला गाडीमार्ग आहे. घाट संपताच पुढे पायऱ्या चालु होतात.
पहाटेच्या वेळी, ६
वाजता सुर्यकिरण तंबूच्या खिडकीतून आत शिरू लागले आणि आमची झोप उघडली. आम्ही पटापट
सर्व सामान आवरून गावातील एका घरात सगळे सामान ठेवले. छोटीशी एक पिट्टु/बॅग सोबत
घेतली आणि गाडीमार्गे पायऱ्यांपर्येंत पोहोचलो. येथे उजव्या हाताला कातळात कोरलेले
एक टाके आहे. या गडाला एकात एक असे ४ दरवाजे आहेत. पन्नास एक पायऱ्या चढुन
गेल्यावर आपण गडाच्या पहिल्या दरवाज्यातून आत शिरतो. येथे दरवाज्याच्या
सुरुवातीलाच खांबावर सिंह कोरला आहे. या दरवाज्याचे फक्त खांब शिल्लक आहे. हे बघुन
आम्ही पुढे निघालो आणि गडाच्या दुसऱ्या दरवाज्यात प्रवेश केला. हा दरवाजा पुर्णपणे
कातळात कोरलेला आहे. आत प्रवेश केल्यावर उजव्या हाताला एक गुहा आहे, या गुहेत पाण्याची २-३ टाकी आहेत. थोडं
पुढे गेल्यावर डाव्या हाताला हनुमानाची मुर्ती कोरली आहे. हे बघुन आम्ही पुढच्या
दरवाज्यापाशी निघालो, या
दरवाज्याला ग्रीलचे दार बसवले आहे. हा दरवाजा पार करून पुढे गेल्यावर आपण गडाच्या
माथ्यावर पोहोचतो.
हा
किल्ला व्यवस्थितरित्या जोपासला आहे.गडावरून सर्पगंगा नदीचे उत्तम दर्शन होत होते. गडावर भरपूर अवशेष आजही बघायला शिल्लक
आहेत. गडाच्या शेवटच्या दरवाज्यातून प्रवेश केल्यावर आम्ही गडाच्या माथ्यावर
पोहोचलो, सुर्याची सोनेरी
किरणे सर्वत्र पसरली होती. समोरच सापुतारा (गुजराथचे थंड हवेचे ठिकाण) धुक्यामध्ये
दडून बसलेले होते. माथ्यावर प्रवेश करताच एक वाट डाव्या हाताला घेऊन जाते. येथे
अप्रतिम तटबंदी आणि एक पीर आहे. हे बघुन आम्ही परत मागे फिरलो आणि उजव्या हाताच्या
वाटेने सरळ निघालो. येथे बाजुलाच एक पाण्याचे टाके आहे आणि पडका बुरुज आहे. हा
बुरुज पाहता रतनगडावरील बुरुजाची आठवण होते. थोडासा पुढे गेल्यावर एक मोठे
पाण्याचे टाके आहे, यातील
पाणी पिण्यायोग्य नाही. या टाकायच्या थोडं पुढे गेल्यावर एक बुजलेला दरवाजा दिसतो., तटबंदी वरून वाकुन बघितले असता हा
कदाचित चोर दरवाजा असावा असा अंदाज दर्शवता येतो. येथून वाट वरच्या बाजुस जाते, येथे एक इमारत आहे आणि बाजूलाच एक
पाण्याचे तलाव आहे. इमारतीचे अवशेष अजूनही शाबुत आहेत, इमारत म्हणजे बहुधा गोडाऊनच असावं. या
इमारतीपासुन थोडं वरच्या बाजुस गेल्यावर एक ध्वजस्तंभ आहे. येथून गडाचा पूर्ण
पसारा दिसतो. पडक्या बुरुजाच्या बाजूस अजून एक इमारत आहे. हि मारत बघितली की आपली
गडफेरी पूर्ण होते. आम्हाला गडफेरी पूर्ण करण्यास १.३० तास लागला. आत्तापार्येंत
८.३० वाजले होते. आम्ही पटापट गड उतरायला लागलो आणि गाडीवरून गावात पोहोचलो.
श्रीपाद गवंडे काकांकडे आम्ही आमचा ठेवलेला संसार घेतला आणि पुढे निघालो.
कळवणी मुलुखे: हातगड
फिरस्ती – दुर्गरत्न हस्तगिरी
सामना ऑनलाईन
~3 minutes
>> प्रांजल वाघ
नाशिक–सापुतारा मार्गावर, महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या सीमेवर उजव्या बाजूस दिसणारा दुर्गस्थापत्याने नटलेला दुर्ग म्हणजे हस्तगिरी, ज्याला हातगड म्हणून ओळखले जाते. भक्कम तटबंदी असणारा हा दुर्ग दुरूनही उठून दिसतो.
सापुताऱ्याच्या निसर्गरम्य प्रदेशातील भूभाग स्वराज्य
संरक्षणाच्या दृष्टीनेही तितकाच संपन्न राहील याकडे मराठा साम्राज्याचे
लक्ष होते. याच मांदियाळीतील एक गड म्हणजे दुर्गरत्न हस्तगिरी.
1547 मध्ये भैरवसेन नामक बागुलवंशी राजाने नाशिकजवळील एका निजामशाही
किल्ल्यास वेढा दिला. मोठा पराक्रम गाजवून महादेवसेन या त्याच्या पुत्राने
हा किल्ला जिंकून घेतला. ‘राष्ट्रौढवंशम् महाकाव्यं’ या ग्रंथात हा किल्ला
जिंकून घेतल्याचे उल्लेख आलेले आहेत. तसंच भैरवसेन राजाने या किल्ल्यावर
आपल्या विजयानंतर शिलालेख कोरून घेतला आहे. हा किल्ला म्हणजे ‘हस्तगिरी’
ऊर्फ ‘हातगा’ दुर्ग ऊर्फ ‘हातगड’!
नाशिक-सापुतारा मार्गावर, महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या सीमेवर उजव्या
बाजूस आपल्याला एक प्रशस्त प्रस्तर आकाशात चढलेला दिसतो. तोच प्रस्तर
म्हणजे हातगड! सध्या या किल्ल्याच्या दरवाजापर्यंत गाडीरस्ता झालेला आहे.
तसेच हातगडवाडीतून साधारण 45 मिनिटांत किल्ल्याच्या पहिल्या दरवाजापर्यंत
आपण पोहोचू शकतो.
शरभ शिल्प असलेल्या पहिल्या दरवाजाच्या बाजूच्या कातळात पाण्याचं टाकं
आणि कोरलेला हनुमान आहे. इथून पुढे कमानीच्या दरवाजातून आत गेल्यावर
डोंगराच्या पोटात 2 मोठी टाकी आढळतात. इथूनच डावीकडची भिंत चढून गेल्यावर
वर नमूद केलेला देवनागरी लिपीमधील 4 फूट संस्कृत शिलालेख आपल्या नजरेस
पडतो. हा शिलालेख महाराष्ट्रातील किल्ल्यांवर सापडणाऱ्या संस्कृत शिलालेखात
सर्वात मोठा शिलालेख आहे.
शिलालेख पाहून गडाच्या चौथ्या दरवाजातून आत गेल्यावर डावीकडील कातळावर
हनुमान आणि समोर गुहा दिसतात. किल्ल्यात प्रवेश केल्यावर डावीकडे जाणारा
मार्ग एका पडक्या दरवाजातून आपल्याला भक्कम तटबंदीने नटलेल्या माचीकडे घेऊन
जातो. इथे पाण्याचं मोठ टाकं आणि तटांत लपलेला चोर दरवाजा दिसतो.
दुर्दैवाने चोर दरवाजाकडे जाणारा मार्ग झाडीत हरवला आहे.
उजवीकडे पायऱ्यांची वात आपल्याला गडदेवता हटकेश्वर महादेवाच्या
मंदिराकडे घेऊन जाते. तिथेच एक पाण्याचं टाकं आहे. समोरच एक बुरूजवजा कोठार
नजरेस पडते. त्यासमोरच एक दारू कोठार आहे. किल्ल्याच्या बालेकिल्ल्यात
अनेक अवशेष आहेत आणि 4 मोठी टाकी आपल्या नजरेस पडतात. किल्ल्याच्या
माथ्यावरून सभोवतालच्या प्रदेशावर नजर टाकली तर अचला, अहिवंतगड, सप्तशृंगी,
मार्कंडय़ा, रवळ्या-जवळ्या, धोडप, इखारा, भिलई, सालोटा, साल्हेर, न्हावी
रतनगड हे किल्ले स्पष्ट दिसतात. गडफेरीला साधारण तासभर लागतो. तसेच खाली
गावात उतरल्यावर कमान असलेली इमारत, बारव आणि चुन्याचा घाणा असे अवशेष
दिसतात.
भक्कम तटाने नटलेला हा छोटेखानी किल्ला दूरवरून उठून दिसतो. इतिहास,
अवशेष आणि दुर्गस्थापत्याने नटलेला हा दुर्ग नाशिकला गेल्यावर नक्कीच
पाहिला पाहिजे!
नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीच्या अनेक रांगा-उपरांगा पसरलेल्या आहेत. यांत प्रामुख्याने सेलबारी, डोलबारी, सातमाळा, चांदवड, गाळणा, त्र्यंबकेश्वर आणि पट्टा रांग यांचा समावेश होतो. यांतील सातमाळा रांगेची सुरुवात हातगडापासून होते. या रांगेतील अनेक किल्ले गिरणा नदीच्या खोऱ्यात येतात. नाशिक-सापुतारा मार्गावरील महाराष्ट्राच्या सीमेवरील सर्वांत शेवटचा गड 'हातगड'. हातगड हा नावाप्रमाणेच नाशिकहून सापुताऱ्याला जाणाऱ्या लोकांना हात दाखवून महाराष्ट्राचा निरोप देतो.
समुद्रीसपाटीपासून सुमारे ३५०० फूट उंचीवर असणाऱ्या हातगडाला जायचे असल्यास सर्वप्रथम नाशिक गाठावे लागते. नाशिक बसस्थानकावरून सापुताऱ्याला जाणाऱ्या एसटीमध्ये स्थानापन्न झालो की, थेट ९६ कि.मी. अंतरावर असणाऱ्या बोरगाव फाट्याला उतरायचं. बोरगाव फाट्यापासून हातगडवाडी ४ कि.मी. लांब आहे. आपले नशीब बलवत्तर असेल तर हातगडवाडीपर्यंत जायला एखादं खाजगी वाहनही मिळू शकेल, नाहीतर ४ कि.मी.ची ही डांबरी रस्त्यावरची तंगडतोड पायीच करावी लागते. आम्ही हातगडवाडीला पोहोचलो तेव्हा नुकताच दिनमणी क्षितिजाच्या पटलावर येऊ लागला होता. चांदण्या विझून काळोखात बुडून गेलेला आजूबाजूचा परिसर हळूहळू उजळू लागला होता. मधूनच गावातील एखादे कोंबडे आरवून पहाट झाल्याची गावाला जाणीव करून देत होते.
हातगडवाडीने आपला पुरातन ठेवा आजही जपलेला दिसतो. गावात बऱ्याच जुन्या वाड्याहुड्यांचे अवशेष दिसतात. रस्त्याच्या एका बाजूला विटांची जुनी घरे दिसतात. त्याच्या बाजूला विटांची एक जुनी विहीर आणि चुन्याचा घाणा पडलेला दिसतो. हा सर्व भाग पाहाताना जाणवतं की हातगडवाडी ही गडाखालची मेटाची जागा असावी. कदाचित पूर्वी इथे तटबंदी सुद्धा असावी, पण आज तिच्या खाणाखुणा मात्र इथे शिल्लक नाहीत हेही तितकेच खरं. वाडीतून गडाच्या डाव्या टोकाला नजर टाकल्यावर कातळातील एक प्रवेशद्वार दिसते. हे गडाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. तिथपर्यंत जाण्यासाठी मात्र शाळेत शिकलेल्या भूमितीचा आधार घ्यावा लागतो. गडाच्या उजवीकडच्या पायथ्यापासून अंदाजे १/३ अंतरावर एक आंब्याचे डेरेदार झाड आहे. वाडीपासून तिथपर्यंत जाण्यास साधारण १५ मिनिटे लागतात. या झाडापासून प्रवेशद्वारापर्यंत कातळावर एक तिरकी रेघ मारायची. ही रेघ म्हणजे गडावर जाण्याची वाट. गडावर जाण्याची ही वाट वयापैकी मळलेली असल्याने ती चुकण्याचा फारसा संभव नाही. वाडीपासून गडाचा पहिला दरवाजा गाठण्यास सुमारे पंचवीस मिनिटे पुरतात. गडाचा पहिला दरवाजा हा पूर्वाभिमुख असून, त्याच्या अलीकडे उजवीकडच्या कड्यामध्ये पाण्याचे एक टाके खोदलेले आहे. यातील पाणी मात्र पूर्णपणे खराब झालेले आहे. या टाक्याच्या बाजूला कातळभिंतीवर 'हनुमंतांचे' एक शिल्प कोरलेले आहे.
गडाच्या पहिल्या दरवाज्याच्या उजवीकडच्या खांबाचे आणि कमानीचे दगड आज विखुरलेले असले तरी डावीकडचा खांब कसाबसा तग धरून उभा आहे. या दरवाज्याच्या एका खांबावर चौकानी शिळेवर शिलालेख कोरलेला आहे. एका शिलालेखाचा दगड या खांबासोबत निखळून पडलेला दिसतो, तर दुसरा शिलालेख खांबामध्ये अजूनही शाबूत दिसतो. या दरवाज्याच्या बाहेरील बाजूस तळाशी शरभाचे शिल्प देखील आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर आपण दुसऱ्या दरवाज्यापाशी पोहोचतो. गडाचा हा दरवाजादेखील पूर्वाभिमुख आहे. या दरवाज्यातून आत शिरल्यावर उजवीकडच्या कातळामध्ये तिसरा बोगद्यासारखा दरवाजा लागतो. या दरवाज्यातून आत शिरल्यावर उजव्या हाताला कातळकड्यामध्ये एक गुहा लागते. या गुहेमध्ये तीन दालने आहेत. त्यांपैकी दोन दालनांमध्ये जाण्याचे मार्ग जरी नष्ट झाले असले, तरी पूर्वी यांचा उपयोग पहारेकऱ्यांच्या निवासासाठी होत असावा. या गुहेच्या कातळावर गणेशाचे शिल्प कोरलेले आहे. समोरच्या दगडामध्ये मारुतीचे आणखी एक शिल्प कोरलेले दिसते. गडाच्या या तिसऱ्या दरवाज्याची मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली असून, तिसऱ्या दरवाज्यापासून चौथ्या दरवाज्यापर्यंत जाण्यासाठी दगडांमध्ये वीस ते पंचवीस पायऱ्या खोदलेल्या आहेत. गडाचा चौथा दरवाजा उत्तराभिमुख असून तो बराच सुस्थितीत आहे.
दुर्गवास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिले तर हातगडाचा प्रवेशमार्ग खूप अभ्यासनीय संपूर्ण कातळकोरीव वाट आणि त्यामध्ये एकामागोमाग एक असे कातळात कोरलेले चार दरवाजे अशा पद्धतीने बांधलेले आहेत की. केवळ एकच सशस्त्र निक या वाटेने पुढे जाऊ शकतो. एवढेच नव्हे, तर उजव्या बाजूचा नैसर्गिक कातळकडा आणि डाव्या बाजूची मानवनिर्मित तटबंदी व बुरूज यांचा सुरेख मिलाफ इथे आपल्याला पाहावयास मिळतो. चौथ्या दरवाज्यातून आत शिरले की हातगडाचा माथा लागतो. आत शिरल्या शिरल्या समोरचा उंचवटा लक्ष वेधून घेतो. हा उंचवटा रूणजे हातगडचा बालेकिल्ला. पण तिथं मोर्चा वळविण्याअगोदर समोर उघड्यावर पडलेल्या शिवपिंडीचे दर्शन घ्यायचे आणि डाव्या टोकाकडची वाट धरायची. गडाचे हे टोक चांगल्या तटबंदीने बांधून काढलेले आहे. काही ठिकाणी तटांवर चर्या देखील बांधलेल्या दिसतात. याशिवाय तटबंदीमध्ये तोफांवरून मारा करण्याची सोय केलेली आहे. इथल्या भागात पाण्याचे एक मोठे टाके बांधलेले दिसते, मात्र यात पाणी नाही. शेवटच्या बुरुजावर एक पीर आहे. या पीराच्या दर्शनासाठी गावातील लोकांची गडावर सतत वर्दळ चालू असते. इथल्या बुरुजावर उभे राहिल्यावर नाशिक-सापुतारा महामार्ग दिसतो. वळणावळणाच्या घाटरस्त्यावरून जाणाऱ्या चिंटुकल्या गाड्या आणि त्यांच्यातून येणारे विविध आवाज दूरवरून ऐकताना जरा मजाच वाटते. हे सर्व मनसोक्तपणे पाहून पुन्हा शिवपिंडीपाशी परतायचे. समोर तलावाकडे जाणारी वाट आहे, पण आपण तिकडे नंतर जायचे. त्याअगोदर आपण आपला मोर्चा उजवीकडे वळवायचा. वाटेत अनेक घरांचे आणि वाड्याहुड्यांचे अवशेष नजरेस पडतात. एकंदर यावरून हातगड हा मोठ्या राबत्याचा किल्ला असावा हे सिद्ध होते. आणि का नसावा? कारण नाशिकहून गुजराथकडे जाणाऱ्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हातगडाची निर्मिती केली असावी.
थोडे अंतर चालून गेल्यावर तटामध्ये एक कमानयुक्त वास्तू दिसते. ही वास्तू म्हणजे पूर्वीचा मोठा वाडा असण्याची शक्यता आहे. सध्या मात्र या वाड्याची केवळ एक भिंतच शिल्लक आहे. या वाड्याच्या समोर एक पडकी इमारत आहे. ही इमारत म्हणजे किल्ल्यावरील गतकाळाच्या खुणा दाखविणारी एकमेव वास्तू आहे. या इमारतीच्या डाव्या भागात एक खोली आहे. इमारतीच्या खालची जमीन काही धन पुरलेले असेल या आशेने गावकऱ्यांनी खोदून काढलेली आहे. इमारतीच्या धाटणीवरून ती मोगलकालीन असावी असे वाटते, कारण या गडावर मराठ्यांपेक्षा मोगलांचे वर्चस्व जास्त काळ होते. त्याबद्दल आलेला उल्लेख असा आहे : होलगड किल्ला बागलाणात असून तो कठीण अशा पाषाणाचा मजबूत किला आहे. सय्यद अब्दुश याने त्याचा मुलगा हसन अली याला किल्ला घेण्यासाठी पाठविले होते. किल्लेदाराने त्याच्याशी लढा दिला. पण किल्लेदाराजवळ जास्त सैन्य नसल्याने त्याला युद्ध करण्याची हिंमत झाली नाही. त्याने किल्ला मोगलांच्या हवाली केला. हसन अलीने किल्ला जिंकला. त्याचे चिन्ह म्हणून सोन्याच्या किल्ल्या ९ ऑगस्ट १६८८ राजी बादशहाला सादर केल्या. बादशहाने हसन अलीला 'खान' ही पदवी दिली आणि पाचशेची मनसब, दीडशे जात आणि पन्नास स्वारांनी वाढवली.
हातगडावरील बुरूज
या इमारतीच्या मागील बाजूस बालेकिल्ल्याचा सुटावलेला बुरूज आहे. बुरुजाच्या बरोबर खाली आपण मघाशी पाहिलेला तलाव आहे. या तलावाच्या मधोमध एक दगडी खांब उभा केलेला दिसतो. तलावातील पाणी पिण्यास योग्य आहे. तलावाच्या वरच्या अंगास खराब पाण्याचे टाके दिसते. या टाक्याच्या एका बाजूला धान्यकोठाराची इमारत दिसते. ही इमारत अजूनही चांगल्या अवस्थेत उभी आहे. इमारतीच्या समोर थोडी सपाटी आहे. रात्री उघड्यावर मुक्काम करण्यासाठी ही सपाटी एकदम योग्य जागा आहे. सपाटीच्या समोरून एक वाट खाली उतरून पुन्हा माचीवरील बुरुजाकडे जाते. किल्ल्यावरील माचीचा हा शेवटचा बांधीव बुरूज असून, यापुढे सर्व नैसर्गिक तटबंदी चालू होते.
हे सर्व पाहून पुन्हा धान्यकोठाराची वाट पकडून वर चढायचे. इथून गडाच्या क्षिण टोकाकडे वळायचे. वाटेत एक ध्वजस्तंभ लागतो. या ध्वजस्तंभापासून एक कट गडाच्या दक्षिण टोकापाशी जाते. गडाच्या दक्षिणेकडची तटबंदी आणि बुरूज फुटवाणे भासतात. गडाच्या दक्षिण टोकावरून हातगड कळवणचा रस्ता दिसतो. वेधून साल्हेर-सालोटा आणि पिंपळागडाचे दर्शन होते. आल्या मार्गाने परत जायचं नाही, असं आमचं सर्वांचे मत असल्याने आम्ही गडाच्या उजव्या कातळकड्याने माघारी जायला निघालो. रात्रीच्या प्रवासाने अपुरी झालेली झोप आणि त्यात सकाळपासून वणवण भटकत असल्याने पोटातील ओरडणाऱ्या कावळ्यांना शांत करण्यासाठी तळ्याकाठच्या झाडाखाली बसून जेवलो, लवकरच जेवण हातीपायी उतरले. थोडा आराम करून आम्ही सर्वजण हातगडवाडीत उतरलो आणि हातगडाला हात दाखवून परतीची दिशा धरली.
किल्ल्याची उंची : समुद्रसपाटीपासून १११४ मीटर (३६५३ फूट)
तालुका : कळवण
किल्ल्याची श्रेणी : सोपी
किल्ल्याची इतर नावे: होलगड, हातगड
डोंगररांग : सातमाळा
पायथ्याचे गाव : हातगडवाडी
पायथ्याच्या गावापासूनचे अंतर हातगडवाडीपासून पाऊण तास.
जवळचे एस.टी. स्थानक वणी, नांदुरी, बोरगाव
राहण्याची सोय : किल्ल्यावर राहण्यासाठी एक इमारत आहे,
यात सात-आठ लोकांची राहण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय : जेवणाची सोय नाही.
पिण्याचे पाणी : किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत.
जाण्यासाठी उत्तम कालावधी: जून ते मार्च.
किल्ला फिरायला लागणारा वेळ : दोन तास.
जवळपासची गावे : हातगड वाडी, बोरगाव.
हतगड_किल्याचा_गौरवशाली_इतिहास
किल्यावर_तब्बल_४७०_वर्ष_जुना_शिलालेख.
इ
स १५४८. साली कोरलेला शिलालेख हतगड किल्ल्यावर असून किल्ल्या
हतगड_किल्याचा_गौरवशाली_इतिहास हतगड_किल्याचा_गौरवशाली_इतिहास चा उजव्या
बाजूला राणीचा बाग म्हणून एक आडवाट आहे त्या ठिकाणी असून तब्बल ४७०
वर्षांपूर्वी कोरलेला शिलालेख आहे. या शिलालेखाची उंची ४फूट उंच २.४इच रुंद
असून सोळा ओळींचा शिलालेख असून पहिल्या १४ओळी संस्कृत आणि शेवटच्या २
मराठी म्हणजेच संस्कृत+प्राकृत अशा भाषेत हा शिलालेख आपल्याला बघायला
मिळेल.
बागलानच्या बागुल घरान्याच तब्बल ३५०वर्ष राज्य या
किल्य्यावर होत.निजामशाहीतील निजाम घराण्यातील सर्वात मोठा राजा बुऱहान
निजामशहा यांच्या कडून बागुल घराण्यातील भैरवसिंग राजाने हा किल्ला वेढा
घालून इ. स १५४८ साली आपल्या ताब्यात घेतला असा ह्या शिलालेखात उल्लेख आहे.
पण जवळपास आता ५०० वर्ष होत असलेला हा शिलालेख आता झिजत चालला असून
महाराष्ट्रातील किल्यांच्या इतिहासातील देवनागरी लिपीत कोरलेला हा सर्वात
मोठा शिलालेख हतगड किल्ल्याचा असावा असे इतिहास अभ्यासकांचे मत असून या
त्याचे जतन करून त्यावर अभ्यास करणे गरजेचे आहे.
Fort_470_years_old_inscription
on the fort. 1548 The inscription carved in the year is on Hatgad fort
and the fort is a glorious history of Hatgad fort. The height of this
inscription is 4 feet high, 2.4 inches wide and it is an inscription of
16 lines. The first 14 lines are in Sanskrit and the last 2 are in
Marathi ie Sanskrit + Prakrit.
The
fort was ruled by the Bagul dynasty of Baglan for 350 years. The fort
was besieged by Bhairav Singh king of the Bagul dynasty from Burhan
Nizamshah, the eldest king of the Nizam dynasty. It is mentioned in this
inscription that he took possession of it in 1548.
However, this inscription, which has been going on for almost 500 years, is now in a state of disrepair.
सातमाळेच्या कुशीत, भाग - १
नाशिक!!! किल्ल्यांचा जिल्हा!! कित्त्येक
ट्रेकर्स चं आपुलकी आणि जिव्हाळ्याचं ठिकाण!! किल्ल्यांच्या बाबतीत नाशिक
म्हणजे ट्रेकर्स ची पंढरीच. नाशिक मध्ये ५० हुन अधिक किल्ले आणि सगळेच
बलदंड. दोन अडीच तासांची तंगडतोड केल्याशिवाय किल्ल्याचा माथाच येत नाही.
नाशिक मध्ये अनेक डोंगर रांगा ठाण मांडून उभ्या आहेत, त्यातल्या
प्रामुख्याने अजंठा सातमाळ, आंबोली, डोलबारी, सेलबारी,
त्रम्ब्यकेश्वर, गाळणा टेकड्या इत्यादी. ह्या डोंगररांगे मध्ये "सातमाळ"
रांग स्वतःचे एक वेगळे अस्तित्व जपून आहे.
सातमाळ रांग सुरगाणा तालुक्यातून सुरु
होऊन दिंडोरी, कळवण, चांदवड पर्यंत अस्ताव्यस्त पसरली आहे. ह्या डोंगर
रांगेत १५ किल्ले येतात, हातगड,अचला ,अहिवंत, मोहनदरी, सप्तशृंगी, मार्कनंडया, कण्हेरा, रवळ्या, जवळ्या, धोडप, कांचना-मांचना, कोळदेहेर, राजदेहेर, इंद्राई ,चांदवड.
या मधील प्रत्येक किल्ल्याच एक वेगळं
महत्व आहे. सातमाळ रांगेतला सर्वात उंच किल्ला म्हणजे धोडप, धोडप
किल्ल्यामुळे सातमालेला एक प्रचंड मोठं वैभव लाभलय.
धोडप
हे किल्ले जेव्हा राबते असतील तेव्हा काय
वैभव असेल हो ह्यांचं!!! सह्याद्रीच्या ह्या कडेकपाऱ्यात, दरी खोर्यात
स्वराज्याचं रक्षण कारण काय अवघड असेल हो त्यावेळेस??
माझं नाशिक च वेड या इहलोकातील फार कमी
व्यक्ती जाणतात ते म्हणजे साकेत घाणेकर आणि ओंकार ओक. म्हणूनच कि काय
नाशिकतले कित्त्येक किल्ले अनेक वेळा पालथे घालूनही त्या किल्ल्यांवर माझे
अतूट प्रेम अजूनही तसेच आहे, वार्षिक गाठीभेटीशिवाय मनाला चैन पडत नाही, मग
तो डोलबारी रांगेतील साल्हेर असो व सातमाळेतील धोडप. २०१० साली विकास
कडुसकर ने सातमाळ रांगेचं पिल्लू डोक्यात सोडलं होतं . गेली ४-५ वर्ष
शिक्षण व अनेक इतर कारणांमुळे सातमाळ वारी जमू शकली नाही, परंतु या ५
वर्षात सातमाळेची खडा न खडा माहिती जमा केली होती.
साधारणतः नोव्हेंबर २०१५ चा दुसरा आठवडा
असेल, साकेत आणि मी सातमाळ रांगेचा प्लॅन आखत होतो. सातमाळ रांगेची पूर्व
परीक्षा म्हणून आम्ही भिलाई - चौल्हेर - पिंपळा - मोहनदरी - प्रेमगिरी
अशी जोरदार भटकंती करून आलो, भटकंती म्हणण्यापेक्षा मुलुख पिंजून आलो.
सातमाळ रांगेच्या ट्रेक च्या प्लॅन ची तारीख ठरली व खालील किल्ले बघायचे हे निशिचीत केले:
१. हातगड
२. अचला
३. अहिवंत
४. सप्तशृंगी
५. प्रेमगिरी(सातमाळ रांगेपासून हा किल्ला
थोडा बाजूला आहे, नोव्हेंबर २०१५ च्या भटकंती ह्या किल्ल्याला वेळे अभावी
मुकावे लागलं होतं)
६. कण्हेरा
७. मार्कंड्या
८. रवळ्या
९. जवळ्या
१०. धोडप
नाताळ च्या सुट्टीतलय ह्या खिरापतीची गेली
कित्त्येक वर्ष आतुरतेने वाट पाहत होतो. गेले कित्त्येक वर्ष उराशी
बाळगलेलं स्वप्न साकार होण्याची चिन्ह स्पष्ट दिसत होती. साकेत घाणेकर ह्या
वल्ली सोबत सातमाळ पालथी घालायचं ठरवलं होत.
डिसेम्बर चा शेवटचा आठवडा उजाडला, २२
डिसेंबर संध्याकाळी ५ वाजता साकेत च्या बाईक निघालो. ५ दिवसांच सामान बाईक
वर आम्ही कस बसवलं आणि कसं नेलं हे आमचं आम्हाला च माहिती होत. साधारण
आमच्या सोबत खालील गोष्टी होत्या,
Stove
Kitkat
Stove Pin
Chikki
Rockel 2 Litre
Golya
Stove Box
Tea
Match box
Milk Powder
Gul Poli
Sugar
Upma Readymade Packet
Tea Strainer
Khichadi Readymade Packet
Salt
Shira Readymade Packet
Velchi Powder
Khajoor
Biscuits
Soup for night ( Chicken + Veg)
Enerzal/Glucon D
Maggi
Cake
शिधा
एकंदरच जय्यत
तयारीनिशी केलेल्या प्लॅन मुळे उपासमार नक्कीच होणार नाही याची खात्री
होती. चाकण - नारायणगाव - संगमनेर - सिन्नर - नाशिक - दिंडोरी - वणी -
बोरगाव मार्गे हातगडवाडी मध्ये पोहोचलो.पुण्यापासून ३०० किलोमीटर चा टप्पा
गाठला होता. ऐन थंडीचे दिवस होते. साधारण रात्रीचे १२.१५ वाजता आम्ही नाशिक
मध्ये पोहोचलो होतो. नाशिक शहर सोडून वाणीच्या रस्त्याला जसे लागलो तसा
हवेतला गारवा झटदिशी वाढायला सुरुवात झाली, ४ अंश सेल्सियस तापमानात
पुढील २ तास गाडी हाकली, फ्रोस बाईट झाल्या सारखी बोट अडकून पडली होती.
हातगड च्या पायथ्याला पोहोचल्यावर निदान पुढचा अर्धा तास एकमेकांशी काहीही
संवाद झाला नाही. पहाटेचे साधारण २.३० ची वेळ होती, थंडी पूर्ण शरीरात
शिरली होती, शरीर थंडीने कापत होतं, तसाच टेन्ट लावून दोघे हि दुसऱ्या
मिनटात घोरायला लागलो. आजपर्यंत सर्वात जास्त थंडी मी आणि साकेत ने इथे
अनुभवली होती, आणि यावरून पुढचे ५ दिवस कसे जाणार याची शाश्वती मिळाली
होती.
दिवस पहिला:
पहाटे ६.३० ला पक्ष्यांचा किलबिलाट जसा
सुरु झाला, तसं उमजायाला लागलं कि आपण आपल्या घरी नसून काल रात्री मोठा
पल्ला गाठून आपण आज हातगडच्या पायथ्याला आहोत. दोघांचे हि डोळे टम्म
सुजलेले आणि अंगात प्रचंड आळस भरलेला होता, रात्रीच्या बाईक प्रवासामुळे
कंबरेचे तीन - तेरा वाजले होते. रात्रभर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे टेन्ट चे ४
पाय कसेबसे तग धरून उभे होते.
हातगड
आज हातगड - अचला - सप्तशृंगी
असे ३ किल्ले निवांत पाहणार होतो, कसलीही घाई नव्ह्ती. सकाळची
कोवळी सुर्यकिरण अंगावर घेताना विलक्षण समाधान वाटत होतं , रात्रीचा
शीण हळू हळू कमी होत होता. आवराआवरी होताच हातगड(३५०० फूट) कडे रवाना झालो
. हातगडवाडी ते हातगड किल्ल्यापर्यंत आता डांबरी रास्ता झाला
असल्या कारणाने गाडी अगदी पायर्यांच्या तोंडापाशी येते.
हातगाडवाडी ते ह्या पायऱ्यापर्यंत साधारण १
किलोमीटर अंतर आहे. किल्ल्यामध्ये शिरताना च उजव्या हाताला लागणारी टाकी
,सुंदर कातळकोरीव पायऱ्या, कातळावर कोरलेला गणपती, पायर्यांच्या शेजारीच
लागून गुहा, माथ्यावरील अचाट मोठी टाकी, महाराष्ट्रातील गड - किल्ल्यांवरील
संस्कृत भाषेतील सर्वात मोठा शिलालेख, मोट्ठी तटबंदी, दारू कोठार, कातळात
कोरलेले शिवलिंग, खांब टाकं, किल्लेदाराचा वाडा असा छोटेखानी परंतु गर्भ
श्रीमंत किल्ला पाहिल्यावर मोठे समाधान वाटते. किल्ल्यांच्या पहिल्या
दरवाजायला ग्रील चे गेट लावले असून संध्याकाळी ६ नंतर किल्ला पर्यटनासाठी
बंद करतात. संपूर्ण गड फेरी करण्यास १. तास पुरतो. हातगड किल्ला हा
महाराष्ट्र - गुजरात सीमेवर असल्या कारणाने समोर सापुतारा(गुजरात मधील
सुप्रसिद्ध हिल स्टेशन) स्पष्ट दिसते. माथ्यावरून वातावरण धूसर नसेल तर
साल्हेर, सालोटा, सप्तशृंगी, मार्कंड्या, रवळ्या, जवळ्या, कोटंबी डोंगर,
धानोली धरण(गुजरात), घोडामबे धरण, भोवरील डोंगर, निऱ्ही डोंगर दिसतात.
महाराष्ट्रातील एक डोंगरी किल्ला. तो नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्र-गुजरात
सीमेवरील सातमाळा डोंगररांगेवर समुद्रसपाटीपासून ३६५३ फूट उंचीवर आहे.
नाशिक-सापुतारा मार्गावरील हातगड या पायथ्याच्या गावापासून गडावर पोहोचता
येते.
हातगड, नाशिक.
पायथ्याच्या हातगडपासून चढून वर गेले असता किल्ल्याच्या पहिल्या
दरवाजाचे अवशेष दिसतात. या दरवाजाजवळ एक पाण्याचे टाके असून जवळच हनुमंताचे
शिल्प कोरलेले आहे. या द्वारावर दोन देवनागरी शिलालेख, तसेच एक शरभशिल्प
आहे. या दरवाजातून आत गेल्यावर किल्ल्याचा दुसरा दरवाजा दिसतो. या
दरवाजाजवळच नव्याने उजेडात आलेला आणखी एक देवनागरी लिपीतील १६ ओळींचा
शिलालेख आहे. दूसरा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर किल्ल्याचा खडकात कोरून
काढलेला तिसरा भुयारी दरवाजा दिसतो. या दरवाजाच्या आतील बाजूस उजव्या
बाजूला कातळात कोरलेली गुहा असून तिचा वापर पहारेकऱ्यांना बसण्यासाठी केला
जात असे. या गुहेच्या कातळावर गणेशशिल्प, तर गुहेच्या समोरील बाजूस
हनुमानाचे शिल्प आहे. येथून काही पायऱ्या चढून वर गेले असता किल्ल्याचा
खडकात कोरलेला चौथा दरवाजा लागतो. हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यास
किल्ल्यावर प्रवेश होतो. जवळच एक शिवपिंड आहे. दरवाजासमोर असलेला उंचवटा
म्हणजे किल्ल्याचा बालेकिल्ला मानला जातो. किल्ल्याच्या पश्चिमेकडील टोकावर
एक कोरडे टाके व पीर असून तटबंदीत ठिकठिकाणी तोफांच्या माऱ्यासाठी जागा
आहेत. जवळच एक चोर दरवाजा आहे. मुख्य दरवाजा जवळून पूर्वेकडे जाताना वाटेत
अनेक घरांचे अवशेष दिसतात. येथून पुढे तटबंदीत एक कमानयुक्त वास्तू असून
त्या समोरच एक जुनी वास्तू आहे. जवळच बुरुजासारखे बांधकाम असून हे धान्य
कोठार असावे, असे अभ्यासकांचे मत आहे. या बुरुजाशेजारी एक लांब रुंद तलाव
असून याच्या मध्यभागी दगडी खांब उभा आहे. या टाक्याच्या बाजूला सुस्थितीत
असणारी धान्यकोठाराची इमारत आहे.
किल्ला कोणी बांधला हे ज्ञात नाही. या किल्ल्याचे हस्तगिरी, हतगादुर्ग,
हतगड असे विविध नामोल्लेख सापडतात. यातील ‘हस्तगिरी’ हा उल्लेख बागूल
राजांच्या दरबारातील रुद्र कवी विरचित राष्ट्रौढवंशम महाकाव्यम
या ग्रंथात सापडतो. हा किल्ला १५४७ मध्ये निजामशाहीतून बागूल
राज्यकर्त्यांच्या ताब्यात असल्याचे शिलालेखावरून दिसते. मोगलांच्या १६३८
मधील बागलाण मोहिमेत औरंगजेबाच सरदार सईद अब्दुल वाहाब खानदेशी याने भिकुजी
मोहिते याच्याकडून हा किल्ला जिंकून मोगल साम्राज्यात आणला. हा किल्ला छ.
शिवाजी महाराजांच्या १६७० नंतरच्या बागलाण मोहिमेत स्वराज्यात दाखल झाला
असावा; परंतु याबाबत पुरावे सापडत नाहीत. १७५४-५५ मध्ये येथील किल्लेदार
खोजा महमदौला याने हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात दिला, तेव्हा त्यास काही
इनाम दिल्याची नोंद सापडते. १७५८-५९ च्या एका पत्रानुसार हतगड किल्ल्यावर
१७५ हशमांची नेमणूक असल्याचे दिसते. १७६८ मधील एका पत्रानुसार पेशव्यांची
फौज रघुनाथरावांच्या पाठलागवर असताना रघुनाथरावांच्या काही लोकांनी या
किल्ल्याचा आश्रय घेतला होता. १७७३ च्या एका पत्रात येथील किल्लेदार खोजे
दायम यास बागलाणमधील कळवण हा गाव इनाम दिलेला होता. १८०३-०४ मध्ये झालेल्या
बंडात येथील अधिकारी खांडेराव त्रिंबक यास किल्ल्याच्या परिसरातील घटमार्ग
दगड-धोंडे व झाडे टाकून बंद करण्याची आज्ञा दिलेली होती.
संदर्भ :
Gazetteer of Bombay Presidency (District Nasik), Government Central Press, Bombay, Nasik, 1883.
खरे, ग. ह. संपा., ऐतिहासिक फार्सी साहित्य, खंड २, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, १९३७.
No comments:
Post a Comment