गडावर जाण्यासाठी दरेगाव,बेलवाडी,अचला अशा विविध गावातुन वाटा असल्या तरी दरेगावातून जाणारी वाट हि कमी थकवता कमी वेळात माथ्यावर नेत असल्याने या वाटेने गडावर जाणे हा उत्तम पर्याय आहे. या वाटेने गड चढुन बेलवाडी खिंडीत उतरल्यास कमी वेळात संपुर्ण किल्ला पाहुन होतो. किंवा याचे उलट देखील करता येते. खाजगी वाहनाने बेलवाडी खिंडीत गेल्यास आपण किल्ल्याचा अर्धा डोंगर चढुन जातो. अहिवंतगडचा आकार प्रचंड असल्याने अहिवंत आणि त्याच्या बाजूचा बुध्या डोंगर पहाण्यासाठी ६-७ तास लागतात. दरेगाव हे अहिवंत किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गाव नाशीकहुन वणीमार्गे ५५ कि.मी.अंतरावर असुन वणी ते दरेगाव हे अंतर १० कि.मी आहे. गावात शिरल्यावर गावामागे पसरलेला C आकाराचा डोंगर म्हणजेच अहिवंतगड. गावातुन किल्ला जरी C आकाराचा दिसत असला तरी या किल्ल्याच्या मागील बाजुस असलेल्या पाच सोंडा वेगवेगळ्या दिशांना पसरलेल्या आहेत. किल्ल्यावर जाणारी वाट मारुती मंदिरामागुन सुरु होते. वाट तशी मळलेली असल्याने चुकण्याचा संभव नाही पण किल्ल्यावर काही वास्तु अगदी दरीच्या काठावर असल्याने दिसत नाही त्यामुळे गावातुन एखादा वाटाड्या घेणे योग्य.
या मार्गाने दरेगाव मारुती मंदिरापासुन सुरुवात करुन बुधा आणि अहिवंत गडाच्या दुसर्या टोकाला असलेल्या दरेगाव बेलवाडी रस्त्यावरील खिंडीत उतरल्यास किल्ला कमीत कमी वेळात संपूर्ण पाहुन होतो. किल्ला नीट पाहाण्यास किमान 3 तास लागतात. किल्ल्यावर येण्यासाठी अजून एक वाट वणी-नांदुरी रस्त्यावरील दरेगावावरून येते. या शिवाय किल्ल्याची एक डोंगरसोंड थेट वणी-नांदुरी रस्त्यावर उतरलेली आहे. या सोंडेवरूनसुद्धा अहिवंतवर पोहोचता येते.
पोहोचण्याच्या वाटा :

१) नाशिक शहर देशातल्या सगळ्या शहरांशी रस्त्याने आणि रेल्वेने जोडलेले आहे. नाशिकहुन सप्तशृंगी देवीचे वणी गाठावे. वणीहून नांदुरी, कळवणकडे जाणार्या एस.टी.ने दरेगाव फ़ाट्यावर उतरावे. हे अंतर साधारण १२ किमी आहे. फ़ाट्यावर उतरून चालत १० मिनिटात दरेगावातल्या मारुती मंदिरापाशी पोहोचावे. दरेगाव हे अहिवंत किल्ल्याच्या पायथ्याचे गावं आहे. खाजगी वाहानाने थेट दरेगावात जाता येते. दरेगावातून पाहील तर अहिवंतगडाचा डोंगर नालेच्या आकारात पसरलेला दिसतो. अहिवंतगडाच्या बाजुला बुध्या डोंगर आहे. त्याच्या बाजुला अजुन एक डोंगर आहे.

पिंपरी अचला - नांदुरी रस्त्यावरून दिसणारा अहिवंतचा अनोखा आकार. उजवीकडे बुध्या डोंगर
![]() |
हनुमान मंदीर![]() |
गावातील मारुती मंदिरापासुन चढायला सुरुवात केल्यावर आपण बुध्या आणि त्याच्या बाजूचा डोंगर या मधिल घळीत पोहोचतो. घळ चढुन बुध्या डोंगराला वळसा घालुन आपण बुध्या आणि अहिवंत गडाच्या मधल्या घळीत येतो. घळ चढुन गेल्यावर डाव्या बाजुला बुध्यावर कोरलेल्या कातळ कोरीव पायर्या दिसतात. उजव्या बाजूच्या वाटेने गडाच्या माथ्यावर जाता येते. दरेगावातून गडमाथा गाठण्यास दीड तास लागतो. दरेगाव मारुती मंदिरापासुन सुरुवात करुन बुधा आणि अहिवंत गडाच्या दुसर्या टोकाला असलेल्या दरेगाव बेलवाडी रस्त्यावरील खिंडीत उतरल्यास किल्ला कमीत कमी वेळात संपूर्ण पाहुन होतो. किल्ला नीट पाहाण्यास किमान ३ तास लागतात. ह्या मार्गात खडकात खोदलेल्या पायऱ्या आणि एका बुरुजाचे बांधकाम दिसते. ह्या पायऱ्यांवर नेहमी मुरमाड माती पडलेली असल्याने इथून काळजीपूर्वक चढावे लगते. या तुलनेने दुसरा मार्ग खुप सोपा आहे. किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला असलेले बेलवाडी आणि दरेगाव ह्या गावांना जोडणारी खिंडीची वाट अहिवन्तगडाला खेटूनच जाते.
दरेगाव ते बेलवाडी रस्त्याचे काम चालू आहे. हा रस्ता झाल्यावर खिंडी पर्यंत थेट गाडीने जाता येईल आणि तेथुन राजमार्गाने किल्ल्यावर जाता येईल.
२) बेलवाडी मार्गे
अहिवंत किल्ल्यावर जाणारी दुसरी वाट बेलवाडी गावातून किल्ल्यावर येते. वणी बेलवाडी असा ३० किमीचा फ़ेरा मारावा लागतो. बेलवाडीतून २ तासात गडावर पोहोचता येते. बिलवाडीपर्यंत पोहोचायला दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे नाशिक-सापुतारा रस्त्यावरील पिंपरी-अचला गावात उतरून अचला किल्ल्याच्या खिंडीतून तीन तासांत बिलवाडीला पोहोचता येते. दुसरा मार्ग म्हणजे वणीहून एक गाडीरस्ता बिलवाडीत आलेला आहे. यावरून एकही एस.टी. गावात येत नाही. बिलवाडी हे बऱ्यापैकी मोठे गाव.

वणी - नांदुरी रस्त्यावरून अहिवंत
![]() |
| Traverse route to reach Fort Ahivant....we followed the route to Belwadi and then to Ahivant |
गावातून किल्ल्यावर जाण्यास दोन वाटा आहेत. यांपैकी उजवीकडची वाट प्रचलित वाट आहे. किल्ल्याच्या दोन डोंगरसोंडा गावात उतरलेल्या आहेत. जणू काय त्याचे अजय बाहुच. या दोन सोंडाच्या मधील एका नाल्यामधून किल्ल्यावर जाणारी ही वाट आहे. खिंडीमधील ही वाट मात्र दगड-धोंड्यांमधून कधी आपटत, तर कधी ठेचाळत आपल्याला किल्ल्यावर घेऊन जाते. बिलवाडी सोडल्यापासून अंदाजे सव्यादीन तासांत आपण किल्ल्याच्या कड्यापाशी पोहोचतो, पण तिथं रस्ता संपतो. मग इये कड्याला उजवं मारायचं आणि पलीकडच्या बाजूस जायचे. उंचावरून पडणाऱ्या धबधब्याच्या ओहोळाच्या पांढऱ्या खुणा इथे आपल्याला दिसतात. पुन्हा थोडासा दगड धोंड्यांचा चढ असल्यामुळे पाऊले सांभाळीतच पुढे जावे लागते. किल्ल्याची ही खडबडीत वाट आपल्याला पुरती दमवून सोडते.
३) अचला मार्गे
मुंबई किंवा पुणे मार्गे नाशिक गाठाव. नाशिकहुन वणी गाठावे. वणीहून एस.टी.ने पिंपरी अचलाकडे जावे. हे अंतर साधारण १२ किमी आहे. अचला गावात उतरून दगड पिंपरी गावाकडे सरळ चालत निघावे. हे अंतर अर्ध्या तासाचे आहे. दगड पिंपरी हे अचला किल्ल्याच्या पायथ्याचे गावं आहे. खाजगी वाहानाने थेट दगड पिंपरी गावात जाता येते. गावातून समोरच्या डोंगरसोंडेवरील खिंडीत छोटेसे सतीचे देऊळ दिसते. त्याच्या दिशेने वर चढत जावे. पाऊलवाट प्रथम शेतातून आणि नंतर वनखात्याने लावलेल्या जंगलातून वर चढत जाते. साधारणपणे अर्ध्या तासात आपण सोंडेवरील सतीच्या देवळापाशी पोहोचतो. देवळापासून डाव्या बाजूला दिसणारा किल्ला अचला, तर उजवीकडे धावत जाणारी सोंड थेट अहिंवत गडाला जाऊन मिळते. ही वाट मात्र खूप निसरडी आहे, त्यामुळे तिच्या नादी न लागणेच बरे.

दरेगाव मार्गे दिड तास आणि बेलवाडी मार्गे २ तास लागतात.किल्ल्यावर राहण्याची सोय नाही. दरेगावातील मारुती मंदिरात ३० जणांची सोय होते.
अहिवंतगड किल्ल्याचा आकार प्रचंड असून, जवळपास ३२० एकर परिसरात हा किल्ला अष्टदिशांना पसरलेला आहे. किल्ल्यावर विपुल प्रमाणात स्थापत्य अवशेष असून, सद्यःस्थितीत अस्तव्यस्त पडलेले हे सर्व स्थापत्य अवशेष आपल्या अस्तित्वाची अखेरची लढाई लढत आहेत. या किल्ल्याच्या विस्तीर्ण पठारावर देग इमारतींचे जोते. घडीव दगड व चिरे मोठ्या प्रमाणात असून दगड व चिरेसुद्धा अनमोल ऐतिहासिक ठेवाच आहेत. या दर अवशेषांचा विचार करता मध्ययुगीन कालखंडात अहिवंतगड मोठी लोकवस्ती होती, हे खात्रीने सांगता येते.
अहिवंतगडाच्या दक्षिण टोकाला बुध्या नावाचा डोंगर असू हा बुध्या डोंगर अहिवंतगड किल्ल्याचाच भाग असला तरी त्याल स्वतंत्र नावाने ओळखले जाते. या बुध्या डोंगरावर पडझड झालं बुरूज, प्रवेशद्वार, तटबंदी व पाण्याची टाकी इत्यादी अवशेष आहेत

दरेगाव मधून (डावीकडे) बुध्या डोंगर आणि (उजवीकडे ) अहिवंत

बुध्या डोंगर क्लोजअप
किल्ल्यावर जाणारी वाट मारुती मंदिरामागुन सुरु होते. वाट तशी मळलेली असल्याने चुकण्याचा संभव नाही पण किल्ल्यावर काही वास्तु अगदी दरीच्या काठावर असल्याने दिसत नाही त्यामुळे गावातुन एखादा वाटाड्या घेणे योग्य. अहिवंतगडाकडे जाताना आपल्याला किल्ल्याच्या डोंगराशेजारी दिसणारा सुळका म्हणजे बुध्या डोंगर व त्याशेजारी अजुन एक डोंगर आहे. गड चढायला सुरुवात केल्यावर आपण गावात उतरलेल्या डावीकडील सोंडेवरून बुध्या डोंगर व त्याशेजारी असलेल्या डोंगराला वळसा घालुन बुध्या डोंगर व अहिवंत गडाखालील घळीत येतो. घळ चढुन या दोन डोंगरामधील खिंडीत आल्यावर उजवीकडील वाट अहीवंतगडावर तर डावीकडील वाट बुध्या डोंगरावर जाते.

अहिवंत माथ्यावरून बुध्या
बुध्या डोंगर हा अहीवंतगडाचाच एक भाग असल्यने सर्वप्रथम तो पाहुन घ्यावा. खिंडीतून डाव्या बाजुला बुध्या डोंगरावर जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या व त्याच्या वरील बाजुस बुरुज दिसतो. या पायऱ्या काही ठिकाणी तुटल्या असल्याने थोडे सांभाळूनच वर चढावे लागते. या पायर्यांवर माती पडलेली आहे. त्यामुळे या पायर्या काळजीपूर्वक चढाव्यात. या बुरूजाशेजारी असलेला गडाचा पूर्वाभिमुख दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला असुन शेजारील बुरुज देखील उध्वस्त झाला आहे. दरवाजाच्या आतील बाजुस एक कोरडे टाके पहायला मिळते. येथुन गडमाथा चढत गेल्यावर वाटेत एका रांगेत कोरलेली तीन कोरडी पडलेली टाकी पहायला मिळतात. वाटेच्या पुढील भागात वळणावर खालील बाजुस एक भलामोठा बुरुज असुन या बुरुजावर गोलाकार बांधकाम दिसते. बुध्याच्या माथ्यावर एक लहान टाके व दोन चौथरे वगळता इतर कोणतेही अवशेष दिसत नाही. माथ्यावर एक शेंदुर लावलेला दगड आहे. गडाचा माथा अतिशय लहान असल्याने अर्ध्या तासात आपण परत खिंडीत पोहोचतो. बुध्या डोंगरास असलेली तटबंदी, बुरुज,पाण्याची टाकी व दरवाजा पहाता हा डोंगर अहीवंतगडाचा उपदुर्ग असावा.
आता खिंडीतील उजवीकडील वाटेने कातळात कोरलेल्या काही पायऱ्या चढत कड्यावरून १०-१५ मिनिटात आपण अहिवंतगडच्या माथ्यावर पोहोचतो.


अहिवंत गडाचा नकाशा
किल्ल्याची समुद्रसपाटी पासुन उंची ३८९० फुट असुन किल्ल्याचा विस्तार साधारण २५० एकरवर पसरलेला आहे. अहीवंतगडाचा विस्तार नजरेत सामावण्याच्या पलीकडे असल्याने सरळ वाटेने समोरील टेकडीच्या दिशेने चालण्यास सुरवात करावी. गडावरील महत्वाचे अवशेष गडाच्या मध्यभागी दिसणार्या टेकडीच्या आसपास आहेत. त्यामुळे टेकडीच्या दिशेने चालायला सुरुवात करावी.
![]() |
अहिवंत वरील उध्वस्त अवशेष![]() |
साधारणपणे आपण १० मिनिटाची पायपीट केल्यावर आपण एका उध्वस्त वास्तुपाशी पोहोचतो. या वास्तुच्या भिंती आजही शिल्लक असुन वरील छप्पर मात्र ढासळलेले आहे. हे बहुधा कोठार असावे. या भागात मोठया प्रमाणात घरांचे अवशेष असुन त्यात काही वाड्यांचे अवशेष पहायला मिळतात. एकुण अवशेष पहाता या भागात मोठया प्रमाणात वस्ती असल्याचे जाणवते.
कोठाराच्या पुढील बाजुस उजवीकडे कातळात खोदलेला तलाव असुन तलावाच्या पुढील उंचवट्यावर पत्र्याच्या निवाऱ्याखाली एक हनुमानाची व दुसरी भग्न झालेली सप्तशृंगी देवीची मुर्ती ठेवली आहे. या उंचवट्याच्या अलीकडे एक बुजलेले तळघर दिसुन येते. हे अवशेष पाहुन गडावरील टेकडी उजव्या हाताला ठेउन कडयाच्या काठाने पुढे निघावे. इथे डाव्या बाजुला कडयाखाली कातळात कोरलेली गुहा आहे. ही गुहा वरील बाजुने दिसत नसल्याने गुहा पहाण्यास सोबत वाटाडया असणे गरजेचे आहे.

अहिवंतवरील गुहा (आतल्या बाजूने)
गुहेकडे उतरण्यासाठी कातळात पायऱ्या कोरल्या आहेत. पण आता त्या नष्ट झाल्याने काळजीपूर्वक खाली उतरावर लागत. गुहेत एक सुकलेल पाण्याच टाक आहे. गुहा सध्या राहाण्यायोग्य नाही. गुहेतून दुरवरचा परिसर दिसतो. गुहेच्या आतील बाजुस दोन खांब कोरलेले असुन एक कोरडे पडलेले पाण्याचे टाके आहे. या गुहेत १०-१२ जण सहज राहू शकतात पण त्यासाठी थोडे लवकर पोहोचुन गुहा साफ करणे गरजेचे आहे. गुहा पाहुन टेकडीला वळसा घालत आल्यावर जागोजागी घरांचे अवशेष दिसतात.
अहिवंतवरील भग्न झालेला वाडा
अहिवंत वरचा अजून एक तलाव आणि त्याच्या पलीकडे झाडाखाली दिसणा-या देवी आणि मारुतीच्या मूर्ती

अहिवंतवरील पाण्याचे कुंड.
वाटेच्या पुढील भागात पाण्याचे एक अष्टकोनी आकाराचे लहान बांधीव टाके असुन या टाक्यात वर्षभर पिण्यायोग्य पाणी असते.
टाक्या शेजारी एक तुटकी दगडी ढोणी असुन त्याशेजारी खंडोबाची भग्न झालेली अश्वारुढ मुर्ती आहे.

कुंडाच्या शेजारील खंडोबाची मूर्ती
हे सर्व पाहुन टेकडीवर जावे. टेकडीवर मोठया प्रमाणात घरांचे अवशेष असुन यात विटांनी बांधलेले एक टाके पहायला मिळते. किल्ल्याचा हा सर्वात उंच भाग असल्याने येथुन संपुर्ण किल्ला नजरेस पडतो.
येथुन अचला, मोहनदर ,सप्तशृंगी, मार्कंड्या, रावळ्या-जावळ्या, धोडप हे किल्ले सहजपणे नजरेस पडतात. आपण आलेल्या विरुद्ध दिशेस टेकडीखाली प्रचंड मोठा बांधीव तलाव नजरेस पडतो.

अहिवंतवरील छोटा तलाव

अहिवंत वरील उध्वस्त अवशेष

अहिवंतमाचीवरील भग्न दरवाजा व पाय-या
गुहा पाहुन परत फिरल्यावर सरळ जाणारी वाट आपल्याला किल्ल्याच्या उध्वस्त दरवाजाकडे घेऊन जाते. या वाटेने जाताना उजव्या बाजुस कड्यावर काही प्रमाणात तटबंदीचे अवशेष दिसतात. किल्ल्याचा हा प्रवेशमार्ग कातळात कोरून काढलेला असुन येथे असलेला दरवाजा व आजुबाजुची तटबंदी व बुरुज पुर्णपणे ढासळलेले आहेत. कधीकाळी किल्ल्यावर येणारा हा मुख्य मार्ग असावा. दरवाजा उतरुन आपण किल्ल्याखालील पठारावर येतो. येथे सपाटीवर कातळात खोदलेले पाण्याचे मोठे पण कोरडे टाके दिसते. टाक्याच्या पुढील बाजुस डावीकडे एक वाट खाली उतरताना दिसते. हि गडाखाली उतरणारी वाट आहे पण पठाराच्या पुढील भागात काही अवशेष असल्याने ते फिरून नंतर या वाटेवर यावे. टाक्यावरून पुढे गेल्यावर मोठया प्रमाणात घराचे चौथरे पहायला मिळतात. हे चौथरे पार करून पुढे आल्यावर पठाराच्या उतारावर एका रांगेत खडकात खोदलेली पाण्याची तीन टाकी दिसतात. यातील दोन टाकी कोरडी पडलेली असुन तिसरे टाके मातीने भरलेले आहे. पठाराचा पुढील भागात उभा कडा असुन या भागात कोणतेही अवशेष नाहीत. येथुन मागे फिरून आधी पाहिलेल्या वाटेने गड उतरण्यास सुरवात करावी.

अहिवंत वरून दिसणारा अचला किल्ला. पायथ्याला बिलवडी गाव

अहिवंतची ईशान्येकडील (दरेगावाच्या उजवीकडील माची)

अहिवंतमाचीवरील पाण्याचं टाकं

माचीवरून दिसणारा अहिवंतगडाचा विस्तार व बुध्या डोंगर
.
अहिवंतमाचीच्या कडयातली गुहा. ही गुहा जनावरांनी खराब केल्याने मुक्कामायोग्य नाही.

अहिवंतमाची - खालच्या बाजूने
![]() |
या वाटेने खाली उतरताना कातळात कोरलेली दोन खांब असलेली गुहा दिसते. या गुहेच्या अलीकडे वाटेखाली दुसरी एक अर्धवट बुजलेली गुहा आहे. गावकरी या दोन्ही गुहेत पावसाळ्यात गुरे ठेवत असल्याने या गुहा रहाण्यायोग्य नाही. गुहा पाहुन पुढे आल्यावर आपण गडाच्या उध्वस्त झालेल्या दरवाजात पोहोचतो. आज या दरवाजाचा उंबरठा व त्यातुन खाली उतरत जाणाऱ्या पायऱ्या वगळता काहीही शिल्लक नाही.
या वाटेने सरळ खाली उतरत गेल्यास आपण बिलवाडी रस्त्यावर उतरतो तर कडयाच्या दिशेने गेल्यास दरेगाव-बिलवाडी रस्त्यावरील खिंडीत येतो. खिंडीतुन दरेगाव बेलवाडी रस्त्याने चालत अर्ध्या तासात आपण दरेगावला पोहोचतो. दरेगावला जाण्यासाठी उजव्या बाजुची कड्याखालुन जाणारी वाट पकडावी. कातळकडा उजवीकडे आणि दरी डावीकडे ठेवत ही वाट सरळ कड्याच्या टोकापर्यंत जाते आणि तिथुन खाली खिंडीत उतरते. खिंडीतून दरेगाव बेलवाडी रस्ता बनवल्यामुळे याठिकाणी वाट थोडी कठीण बनलेली आहे. रस्त्यावर उतरल्यावर मधल्या वाटानी दरेगावला पोहोचायला अर्धा तास पुरतो.
या मार्गाने दरेगाव मारुती मंदिरापासुन सुरुवात करुन बुधा आणि अहिवंत गडाच्या दुसर्या टोकाला असलेल्या दरेगाव बेलवाडी रस्त्यावरील खिंडीत उतरल्यास किल्ला कमीत कमी वेळात संपूर्ण पाहुन होतो. किल्ला नीट पाहाण्यास किमान 3 तास लागतात.
आता जाणून घेउया या गडाचा इतिहास.
सह्याद्री पर्वतातील आकाराने सर्वांत मोठा असलेला अहिवंतगड किल्ला ऐतिहासिकदृष्ट्याही तितकाच महत्त्वाचा आहे. पंधराव्या शतकात बहामनी सत्तेचे अहिवंतगडावर वर्चस्व सताना इसवी सन १४७८ मध्ये सरदार गणपतराव जनार्दन हाभागाचा प्रमुख अधिकारी होता. या काळात वणी हे गाव तगडाच्या पायथ्याशी होते. परंतु, अहिवंतगडावरून होणाऱ्या च्या माऱ्यामुळे पायथ्याच्या वणी गावात जीवितहानी व लहानी होत असे. त्यामुळे गणपतराव जनार्दन याने वणी गाव अहिवंतगडाच्या पायथ्यापासून दूरवर म्हणजेच हल्ली असलेल्या हिकाणी वसविले. पुढे इसवी सन १४९० मध्ये बहामनी सत्तेच्या विघटनानंतर या भागावर अहमदनगरच्या निजामशाही सत्तेचे वर्चस्व प्रस्थापित झाले व त्याचबरोबर अहिवंतगड या निजामशाहीच्या वर्चस्वाखाली गेला. पुढे इसवी सन १६३६ पर्यंत या किल्ल्यावर अहमदनगरच्या निजामशाहीचे वर्चस्व कायम राहिले. इसवी सन १६३० च्या सुमारास मोगल बादशाह शहाजहान याने अहमदनगरची निजामशाही राजवट जिंकून घेण्यासाठी प्रचंड मोहीम काढली. निजामशहाचे प्रमुख सरदार असलेले शहाजीराजे भोसले हे निजामशाही वाचविण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु, मोगलांची लष्करी ताकद प्रचंड होती. दरम्यान, इसवी सन १६३६ च्या सुमारास मोगल सरदार अलवर्दीखान याने सातमाळ डोंगररांगेतील किल्ले जिंकण्यासाठी तीव्र मोहीम सुरू केली. मार्च इसवी सन १६३६ मध्ये अलवर्दीखानाने चांदवडच्या किल्ल्याला वेढा देऊन हा किल्ला जिंकून घेतला. यानंतर अलवर्दीखानाने इंद्राई व इतर किल्ले त्या त्या किल्ल्यांच्या किल्लेदारांना लाच व मनसब देऊन हस्तगत केले. याच पद्धतीने अलवर्दीखानाने अहिवंतगड किल्लाही अहमदनगरच्या निजामशाही सत्तेकडून इसवी सन १६३६ मध्ये हस्तगत केला. याबाबतचा उल्लेख इंद्राई, राजदेर व धोडप या किल्ल्यांवरील शिलालेखांमध्ये आढळून येतो.
अहिवंतगड किल्ल्याची शिवकालीन वाटचाल
इसवी सन १६६९ पासून छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगल सत्तेविरुद्ध आक्रमक धोरण स्वीकारले. त्यानुसार इसवी सन १६६५ च्या पुरंदरच्या तहात मोगलांना दिलेला प्रदेश व किल्ले पुन्हा जिंकून घेण्याबरोबरच मोगलांचा प्रदेश व किल्लेही जिंकून घेण्याचे धोरण छत्रपती शिवाजी महाराजांनी आखले होते. दरम्यान, इसवी सन १६७० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत या मोगलांच्या श्रीमंत शहराची दुसऱ्यांदा लूट केली. यावेळी परतीचा प्रवास करीत असताना मोगल सरदार दाऊदखान कुरेशी याने शिवाजी महाराजांना चांदवडजवळील कांचना किल्ल्याच्या परिसरात रोखले. यावेळी शिवाजी महाराजांनी दाऊदखानाचा पराभव केला व सुरतहून मिळविलेली लूट सुरक्षितपणे राजगडाकडे रवाना केली. कांचना युद्धातील विजयानंतर शिवाजी महाराजांनी सातमाळ डोंगररांगेतील रवळा-जवळा, मार्कंडेय, अचला व इतर किल्ले मोगलांकडून जिंकून घेतले. याचवेळी मराठ्यांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी अहिवंतगड किल्ला मोगलांकडून जिंकून घेतला.
सुरत शहराची दुसऱ्यांदा झालेली लूट याचबरोबर कांचना युद्धातील पराभव तसेच सातमाळ डोंगररांगेतील रवळा-जवळा, मार्कंडेय व अचला या किल्ल्यांबरोबरच अहिवंतगडासारखा मोक्याचा किल्ला मराठ्यांनी हस्तगत केल्याचे समजताच मोगल बादशाह औरंगजेब याला मोठा धक्का बसला. स्वतः छत्रपती शिवाजी महाराज हे आपले बंधू व्यंकोजीराजे यांना लिहिलेल्या पत्रात अहिवंतगडाविषयी लिहितात की, अहिवंत म्हणजे जैसा काही पन्हाळा, त्याचे बरोबरी समतुल्य आहे. याचप्रमाणे कवी जयराम पिंडे आपल्या 'पर्णालपर्वतग्रहणाख्यान' या संस्कृत काव्यग्रंथात शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांना उद्देशून म्हणतात, अहिवंतगड व अचलागड नावाचे सुंदर व अजिंक्य किल्लेदेखील आपले वडील बंधू जे शिवाजी महाराज यांनी काबीज केले. याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराजांचे मंत्री रामचंद्रपंत अमात्य आपल्या आज्ञापत्रात म्हणतात, सालेरी अहिवंतापासून कावेरीतीरापर्यंत निष्कंटक राज्य संपादिले.
इ.स. १६७० उजाडलं. मुघलांच्या प्रांतात झंझावातासारख्या घुसलेल्या मराठयांनी एक एक करत पुरंदरच्या तहात दिलेले २३ किल्ले परत जिंकून घेतले. पुन्हा एकदा सुरत लुटली आणि व-हाडातलं कारंजा नावाचं गावही लुटून फस्त केलं. पण मराठे एवढयावरच थांबले नाहीत. नाशिक बागलाणच्या प्रदेशात असलेल्या साल्हेर,मार्कंडया,रवळ्या - जवळया,अहिवंत यांसारखे बुलंद दुर्ग मराठयांनी मुघलांकडून अक्षरश: ओरबाडून घेतले. मुघलांची चहु बाजूनं कोंडी झाली होती. औरंगजेब दिल्लीत डोक्याला हात लावून बसला होता. मराठयांच्या विजयाच्या बातम्या येतच होत्या. हे प्रकरण जर वेळीच रोखलं नाही तर मराठे पुढच्या काही दिवसात दिल्लीवरही हल्ला करतील असं चित्र औरंगजेबाला दिसू लागलं. एखादी मोठी मोहीम काढणं आता भागच होतं. त्याने तातडीनं गुजरातचा सुभेदार असलेल्या बहादूरखान कोकलताश याला आणि बु-हाणपुरात तळ ठोकून बसलेल्या महाबतखानाला मराठयांनी जिंकलेला बागलाणचा मुलुख पुन्हा जिंकून घेण्याचं फर्मान सोडलं. बादशाहचा आदेश मिळताच महाबतखान ब-हाणपूरहून चांदवडकडे निघाला. १० जानेवारी १६७१ रोजी तो औरंगाबादला पोहोचला. तेथे त्याने शाहजादा मुअज्जमची भेट घेतली व पुढील रणनीतीवर विचारविनिमय केला. यानंतर तो औरंगाबादहून चांदवडकडे रवाना झाला, जेथे मोगलांची प्रमुख लष्करी छावणी होती. जानेवारी १६०१ याच्या आत महाबतखान चांदवडला पोहोचला. याच ठिकाणी दाऊदखान व महाबतखान यांची भेट झाली छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध पराभव पत्करावा लागलेल्या दाऊदखानची महाबतखानाने कानउघाडणी केली असता दाऊदखान नाराज झाला. दरम्यान, महाबतखानाने सातमाळ डोंगररांगेतील मरायांनी जिंकलेले किले पुन्हा जिंकण्यासाठीची योजना आखली. दोन्ही खान आता मोहिमेच्या कामावर लागले. सल्लामसलत सुरु झाली. बराच विचार करून दोघांनी मोहीम निश्चित केली…अहिवंतगड !!!
नाशिक जिल्ह्यातल्या सातमाळा रांगेत वसलेला अहिवंतगड. उंचीने आणि विस्ताराने प्रचंड असलेलं एक बेलाग दुर्गशिल्प !!! खुद्द शिवाजीमहाराजांनी तंजावरच्या व्यंकोजीराजांना लिहिलेल्या एका पत्रात म्हटलं आहे " अहिवंत किल्ला म्हणजे जैसा काही पन्हाळा,त्याचे बरोबरी समतुल्य आहे. किल्ला नामोश्याचा. पुरातन जागा आहे." स्वराज्यात पन्हाळ्याच्या बरोबरीने अहिवंतही तितकाच महत्वाचा होता हे या पत्राने अधोरेखित केलं आहे. असा हा प्रतिपन्हाळा जिंकून घ्यायला दाऊद आणि महाबत ही खानजोडी आता निघाली. अनेक मातब्बर सरदारही साथीला होते. यामध्ये राजा रायसिंग सिसोदिया मिर्झाराजे जयसिंह यांचा मुलगा कुवर किशनसिंह, सुजानसिंह, शुभकर्ण बुंदेला, राजा अनुपसिंह राठोड, आधारखान, तुर्कताजखान इत्यादी सरदारांचा समावेश होता. इ.स. १६७१ च्या जानेवारी महिन्यात दोन्ही खान प्रचंड सैन्यासह अहिवंतच्या पायथ्याला पोहोचले.
गडावरच्या सगळ्या वाटा मुघलांनी चौकीनाके आणि मोर्चे लावून बंद करून टाकल्या. गडावरचे मराठे एक ना एक दिवस अन्न - पाणी संपल्यावर आपल्याला शरण येतीलच हा विचार करून दोन्ही खानांनी गडाला वेढा घातला. महाबतखानाने अहिवंतगडाच्या दक्षिण बाजूला असलेल्या प्रवेशद्वाराकडून आक्रमण सुरू ठेवलेले होते, तर दाऊदखान कुरेशी उत्तर बाजूच्या बुरुजाकडून तोफा व बंदुकांनी तीव्र मारा करीत होता. दाऊदखानाने आपले मोर्चे गडाच्या एका बुरुजापाशी उभारले. हे मोर्चे गडावरून येणा-या तोफगोळ्यांच्या आणि बंदुकीच्या गोळ्यांच्या मा-यापासून लांब राहतील अशा रीतीने बांधले गेले. महाबतने आपला मोर्चा गडाच्या दरवाजाच्या दिशेला उभारला. अहिवंतचा किल्लेदार कोण होता यावेळी तरी इतिहासात माहिती उपलब्ध नाही. पण या अनामिक किल्लेदाराने अहिवंतवरून तोफा - बंदुकांचा प्रचंड मारा करत मुघल सैन्याला किल्ल्याच्या जवळपासही फिरकू दिलं नाही.
अहिवंतला वेढा घालून आता एक महिना उलटला होता. पण गड ताब्यात यायची काहीच चिन्हं दिसत नव्हती. दाऊदखान चिंतेत बुडाला. हे असंच सुरु राहिलं तर काही दिवसांनी मोहीम सोडून द्यायची वेळ येईल. औरंगजेबाला काय तोंड दाखवणार आपण ?? नाही नाही… काहीतरी केलंच पाहिजे !! दाऊदखान विचार करू लागला. आता उपाययोजना आवश्यकच होती. एक दिवस दाऊदखान त्याच्या छावणीत बसलेला असताना एक सैनिक आतमध्ये आला. त्याने दाऊदला सांगितलं "आपल्याकडे एक अतिशय निष्णात असा ज्योतिषी आहे. भविष्य सांगण्यात त्याचा हातखंडा आहे. किल्ला आपल्या हातात कधी येईल याचं अचूक भविष्य फक्त तोच सांगू शकेल. " दाऊदचे डोळे आनंदानं चमकले. आपले आपल्या परीनं पूर्ण प्रयत्न सुरूच आहेत. कर्तव्यात कसलीही कमतरता नाही. तेव्हा बघू ज्योतिषी काय म्हणतोय असा विचार करून दाऊदखानाने ज्योतिषाला समोर हजर करण्याचा आदेश दिला. ज्योतिषी दाऊदखानच्या छावणीत आला. "किल्ला कधी आणि कसा जिंकला जाईल ते सांग." दाऊदने ज्योतिषाला विचारलं. त्या ज्योतिषाने दाऊदखानाला थोडी साखर आणायला सांगितली. त्या साखरेच्या मदतीनं त्याने जमिनीवर अहिवंतगडाचा नकाशा काढायला सुरुवात केली. त्याने गडावरचे बुरुज जिथे होते तिथे साखरेचे छोटे त्रिकोण काढले. तसंच मुघलांच्या पहा-याच्या जागाही नकाशात दाखवल्या.जिथे महाबतखानाचे मोर्चे होते तिथे त्याने साखरेचे छोटे ढिगारे काढले आणि जिथे दाऊदखानाचे मोर्चे होते तिथेही त्यानं साखरेचे छोटे ढिगारे काढले. तसेच, ज्या ठिकाणी बुरूज होते, त्या ठिकाणी साखरेचे लहानलहान ढिगारे रचले. गडावरील मराठा सैन्याच्या व गडाभोवतालच्या मोगल सैन्याच्या जागाही साखरेनेच तयार केल्या. अशाप्रकारे साखरेपासून अहिवंतगडाची लहानशी प्रतिकृती तयार झाली. साखरेने काढलेला अहिवंतचा तो नकाशा पूर्ण झाल्यावर त्याने आपल्याजवळ ठेवलेला एक मुंगळा बाहेर काढला आणि तो त्या जमिनीवरच्या नकाशात सोडला. श्वास रोखून मुघल सैन्य हा प्रकार बघत होतं. तो मुंगळा सुरुवातीला महाबतखानाचे मोर्चे जिथे होते तिथून आत गेला आणि परत बाहेर आला. नंतर तो दाऊदखानाचे मोर्चे जिथे होते त्या भागात गेला आणि पुन्हा बाहेर आला. असं दोन तीन वेळा झाल्यावर तो पुन्हा एकदा दाऊदखानाच्या मोर्च्यांपाशी गेला आणि शेवटी तिथून त्याने किल्ल्यात प्रवेश केला. ज्योतिषाच्या चेहे-यावर आता हास्य उमटलं होतं. त्याने चटाचटा कागदावर गणितं मांडली आणि भविष्य वर्तवलं "आजपासून सहा दिवसांनी महाबतखान किल्ल्यावर जोरदार हल्ला करेल पण किल्ला तुमच्या बाजूने ताब्यात येईल."ज्योतिषाच्या या भविष्यवाणीबाबत दाऊदखान कुरेशीच्या छावणीतील अधिकारी भीमसेन ससेना म्हणतो, अहिवंताचा किल्ला गगनाला भिडल्यासारखा होता. तो सर होई बुद्धीला पटेना. दाऊदखानाला ही भविष्यवाणी पटेचना. आभाळाला भिडलेला तो अहिवंताचा किल्ला. आपण एक महिनाभर प्रयत्नांची शर्थ चालवली आहे. त्यात महाबतखान आता किल्ल्याच्या दरवाजाजवळ जाउन पोहचला आहे आणि तरीही हा ज्योतिषी म्हणतोय की गड आपल्या बाजूने ताब्यात येईल ?? अशक्य !!!
सहावा दिवस उजाडला आणि ज्योतिषाने भविष्य वर्तवल्याप्रमाणे महाबतखानाने अहिवंतगडावर जोरदार हल्ला केला. मुघल सैन्य आता इरेला पेटलं होतं. गडावरच्या मराठयांनी मुघलांचा तो आवेश बघितला. गडावरचं धान्यही संपत आलं होतं . महिनाभराच्या हल्ल्यांमध्ये मराठयांचे अनेक लोकही मारले गेले होते. या परिस्थितीत किल्ला लढवणं कठीणच होतं. आता शरण जाणं हा एकच पर्याय मराठ्यांकडे उरला. पण समजा महाबतखानाच्या बाजूने शरण गेलो तर ते लोक आपल्याला जिवंत सोडणार नाहीत हे किल्लेदाराच्या लक्षात आलं. अखेर त्यानं गडावरची काही मातब्बर माणसं दाऊदखानाचे मोर्चे ज्या बुरुजासमोर होते त्या बुरूजाजवळून जाणा-या एका बारीक पायवाटेने दाऊदखानाकडे पाठवून दिली. जिवंत जाऊ देत असाल तर किल्ला तुमच्या हवाली करतो असा प्रस्ताव त्यांनी दाऊदखानासमोर मांडला. दाऊदखानाचं नशिबच फळफळलं !!! शामियान्यात बसून किल्ला हातात येतोय हे बघून त्याने तत्काळ मराठयांची विनंती मान्य केली. आपलं सैन्य पाठवून त्यानं गडाचा ताबा घेतला आणि महाबतखान ज्या दरवाजासमोर मोर्चे लावून बसला होता त्याच दरवाजातून त्यानं मराठयांना गडाखाली जाण्याची वाट दिली. महाबतखानाला हा प्रकार समजला आणि तो चकितच झाला. गेले महिनाभर शर्थीचे प्रयत्न करून हाती येत नसलेला अहिवंतगड आज दाऊदखानाने इतक्या सहजपणे कसा काय ताब्यात घेतला ?? गडावर सगळ्यात जास्त हल्ला आपल्या बाजूने झाला आणि मराठे दाऊदखानाला कसे काय शरण गेले हेच त्याला कळेना. आपल्याला गड मिळाल्याची साधी बातमीही दाऊदखानाला देता आली नाही ?? त्याला एकटयाने निर्णय घ्यायला कोणी सांगितलं होत ??? संतापाने महाबतखान थरथर कापत होता. महाबतखानाने प्रयत्नांची शिकस्त करूनही अहिवंतच्या विजयाचं श्रेय मात्र दाऊदखानाला मिळालं होतं. यावरून त्याची आणि दाऊदखानची अहिवंतच्या पायथ्याला प्रचंड भांडणं झाली. अखेर चिडलेला महाबतखान तिथून निघाला आणि नाशिकला जाऊन राहिला.
इकडे दाऊदखानाची मात्र दिवाळी सुरु होती. औरंगजेबाकडून आता किताब,सन्मानही मिळणार होता. दाऊदखानानं किल्ल्याचं भविष्य सांगणा-या ज्योतिषाला प्रचंड मोठं इनाम दिलं. महिनाभरापूर्वी जिंकण्यासाठी केवळ अशक्य वाटणारा अहिवंतगड एका मुंगळ्याच्या करामतीनं मुघलांच्या ताब्यात आला होता !!!!
अहिवंतसारख्या महाबलाढ्य किल्ल्याची ही कथा केवळ एक दंतकथा नसून प्रत्यक्षात घडलेली एक सत्यघटना आहे. जेधे शकावली आणि खुद्द मुघलांचा समकालीन इतिहासकार असलेल्या भीमसेन सक्सेना याने लिहिलेला "तारीखे दिल्कुशा" यांसारखी अस्सल समकालीन साधनं या घटनेची साक्षीदार आहेत !!!
अहिवंतगडाच्या या वेढ्याच्या प्रसंगी किल्लेदार कोण होता? त्याच्या हाताशी किती सैन्य होते? याबाबत माहिती उपलब्ध नसणे, हे मोठे दुर्दैवच म्हणावे लागेल. कदाचित दाऊदखान व किल्ल्यावरील मराठा अधिकारी यांच्यातील गुप्त तहानुसार ही माहिती गुप्त ठेवण्यात आली असावी. दरम्यान, अहिवंतगड किल्ला मोगलांच्या हाती आला असला तरी महाबतखान व दाऊदखान कुरेशी यांच्यातील अंतर्गत संघर्षामुळे मोगल बादशाह औरंगजेब संतप्त झाला. त्याने या दोन्ही सरदारांना बादशाहच्या सेवेत परत बोलविले.
इसवी सन १६७०-१६७१ मध्ये काही महिने अहिवंतगड किल्ला स्वराज्यात समाविष्ट झाला होता. परंतु, मार्च इसवी सन १६७१ मध्ये मोगलांनी अहिवंतगड पुन्हा जिंकून घेण्यात यह मिळविले. तेव्हापासून इसवी सन १६८० पर्यंत हा किल्ला मोगलांच्याच वर्चस्वाखाली होता. दरम्यान, १६८० मध्ये मराठ्यांनी पुन्हा एकदा किल्ला जिंकण्याचे आपले हुकुमी तंत्र अवलंबिले. त्यानुसार रात्री अचानक अहिवंतगडावर हल्ला करून एका रात्रीत हा किल्ला हस्तगत केला. मराठ्यांच्या या पराक्रमाची नोंद मराठा कागदपत्रात नव्हे, तर मोगलांच्या फारसी कागदत्रांमध्ये आली आहे. ही नोंद पुढीलप्रमाणे, 'सीवाने मध्यरात्रीनंतर हनुवंतगडावर हल्ला केला, काही लोकांना मारून, काहींना जखमी करून व काहींना कैद करून किल्ला हस्तगत भीम पराक्रम छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे मावळेच करू शकत केला.' अहिवंतगडासारखा विशाल किल्ला एका रात्रीत जिंकण्याचा होते. याचप्रकारे मराठ्यांनी सिंहगड, पन्हाळा व इतरही किल्ले एका- एका रात्रीत जिंकून दाखविले होते. तात्पर्य मराठ्यांना एका रात्रीत किल्ला जिंकण्याचा अनुभव होता, तर मोगलांना एका रात्रीत किल्ला समविण्याचा.
इसवी सन १६८० पासून मोगल व मराठे यांच्यात स्वराज्यात प्रदीर्घ संघर्ष चालू होता. या काळात इसवी सन १६८० व १६८२ मध्ये मोगलांनी अहिवंतगड जिंकण्याचे प्रयत्न केले; परंतु त्यात त्यांना यश आले नव्हते. दरम्यान, इसवी सन १६८५ च्या जानेवारी महिन्यात मोगलांनी अहिवंतगड मराठ्यांकडून जिंकून घेतला. याबाबतची नोंद मोगलांच्या दरबारी अखबारातमध्ये आली आहे. परंतु, यावेळी मोगलांनी अहिवंतगडासारखा विशाल व बलाढ्य किल्ला कशाप्रकारे जिंकला, याबाबतचे उल्लेख फारसी अथवा मराठी कागदपत्रांमध्ये मिळत नाहीत. एखाद्या मोगल सेनापतीने वेढा घालून स्वपराक्रमाने हा किल्ला जिंकला असता तर निश्चितपणे त्याबाबतची नोंद मोगल दरबाराच्या कागदपत्रांमध्ये मिळाली असती. विशेष म्हणजे, या काळात मोगल सेनापतींनी मराठ्यांचे किल्ले जिंकण्यासाठी फितुरीचा व लाचलुचपतीचा अवलंब केलेला दिसून येतो. याच काळात अंकाई-टंकाईचा किल्लाही मोगलांनी फितुरीने हस्तगत केला होता. तात्पर्य इसवी सन १६८५ मध्ये अहिवंतगडही फितुरी होऊन मोगलांच्या ताब्यात गेला असावा, असे खात्रीने म्हणता येईल.
जानेवारी १६८५ मध्ये मराठ्यांकडून हस्तगत केलेल्या अहिवंतगड किल्ल्यावर मोगल दरबाराने मतहूम बहादूरखान याचा मुलगा दिलेर याला ठाणेदार नेमले. तो १००० जात व ८०० स्वार, पैकी २०० दुघोडी स्वार असा मनसबदार होता. याअगोदर त्याचे ५०० जात व २०० स्वार कमी करण्यात आले होते, ते पुन्हा सशर्त वाढविण्यात आले. याचबरोबर दिलेर याने आपल्या स्वारांमध्ये कैलासवासी बजाजी निंबाळकर व खानजहान बहादूरच्या फौजेतील स्वार नेमावे, असा हुकूम देण्यात आला.
अहिवंतगड किल्ला मोगलांच्या ताब्यात जाऊन काही दिवसच झाले होते, तोच फेब्रुवारी १६८५ मध्ये मराठ्यांची एक फौज अहिवंतगडावर चालून गेली. यावेळी चांदवडचा मोगल ठाणेदार मराठा सेनेला रोखण्यासाठी त्वरित अहिवंतगडाजवळ पोहोचला. याप्रसंगी मोगल व मराठा सैन्यात किरकोळ लढाई होऊन दोन्ही सैन्यांनी माघार घेतली. या लढाईत मराठ्यांचे तीस सैनिक मारले गेले, तर सतरा सैनिक कैद झाले. तसेच, मोगलांना काही प्रमाणात लष्करी सामान मिळाले. मोगलांचीही काही प्रमाणात हानी झाली. अहिवंतगडावर मोगलांचे वर्चस्व मात्र कायम राहिले.
इसवी सन १६८५ पासून अहिवंतगडावर दीर्घकाळ मोगलांचे बर्चस्व कायम होते. या काळात मोगल व मराठे यांच्यातील रणक्षेत्र पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकचा प्रदेश असल्याने सातमाळ डोंगररांग तसेच अहिवंतगडाच्या परिसरात विशेष हालचाली झाल्या नसाव्यात. दरम्यान, इसवी सन १६१८ मध्ये छ राजाराम कर्नाटकातील जिंजी किल्ल्य स्वराज्यात परत आले. स्वराज्यात त्यांनी मोगलांविरुद्ध आक्रमक अवलंबिले. त्यानुसार फेब्रुवारी १६९१ मध्ये मराठा सैन्याने अहिवंतगडाच्य पायथ्याशी छावणी करून सभोवतालच्य परिसरावर नियंत्रण प्रस्थापित केले यावेळी मराठ्यांनी अहिवंतगड मोगलांकडून जिंकन घेण्याची निश्चित शयता होनी दरम्यान, मोगल ठाणेदार दौलतमंदखान तसेच सरदार तरबियतखान व राज मोहनदास यांनी आक्रमण करून मराठ्धार्य अहिवंतगडाजवळीत छावणी उठविली त्यामुळे अहिवंतगड पुन्हा मराठा सत्तेच्या वर्चस्वाखाली आणण्याची एक मोठी संधी हुकली. इसवी सन १७०० नंतर अहिवंतगड किल्ल्यावर विशेष ऐतिहासिक घटना घडल्याचे उल्लेख मिळत नाहीत. काही प्रशासकीय बदलांचे उल्लेख मात्र मिळतात त्यानुसार इसवी सन १७०३ च्या सुमारास कदीम कुलीखान हा अहिवंतगडाचा किल्लेदार होता. दरम्यान, त्याची बदली करून त्याच्या जागी रहमानदाद याला अहिवंतगडाचा किल्लेदार नेमण्यात आले. एकूणच शिवकाळात अहिवंतगड किल्ला आपापल्या वर्चस्वाखाली ठेवण्यासाठी मोगल व मराठे यांच्यात तीव्र संघर्ष घडून आले. यामध्ये कधी मोगलांचा तर कधी मराठ्यांचा विजय झाला. अठराव्या शतकापासून मात्र या किल्ल्यासाठी विशेष संघर्ष झाले नाही. इसवी सन १७२४ पर्यंत सातमाळ डोंगररांग तसेच अहिवंतगड किल्ल्यावर मोगलांचे वर्चस्व कायम होते. दरम्यान, १७२४ मध्ये मोगलांचा प्रमुख सरदार निजाम-उल-मुल्क याने दक्षिणेत हैदराबाद येथे स्वतंत्र राज्य स्थापन केले. या राज्यास हैदराबादची निजामशाही म्हटले जात असे. हैदराबादच्या निजामशाहीच्या स्थापनेबरोबरच नाशिक बागलाणसह सातमाळ डोंगररांगेचा प्रदेश या सत्तेच्या वर्चस्वाखाली गेला. अशाप्रकारे अहिवंतगड किल्ल्यावर हैदराबादच्या निजामशहाचे वर्चस्व प्रस्थापित झाले.
इसवी सन १७३०-३१ मध्ये पेशवा पहिला बाजीराव व गुजरातमधील मराठा सरदार त्र्यंबकराव दाभाडे यांच्यात गुजरातच्या धाई सरदेशमुखीच्या हक्कावरून डभोई येथे युद्ध होऊन त्यात या पहिला बाजीराव यांचा विजय झाला. या युद्धात त्र्यंबकराव भाडे मारला गेला. त्यामुळे त्र्यंबकराव दाभाडे याची आई उमाबाई उपाडे हिने चांदवड भागातील पेशव्यांच्या प्रदेशावर हल्ले सुरू इसवी सन १७३४ मध्ये उमाबाईच्या सैन्याने वणी दिंडोरी सात लुटालूट केली असता, या भागातील पाटील व जमीनदारांनी अहिवंतगड किल्ल्याचा आश्रय घेतला होता.
पुढे इसवी सन १७५२ मध्ये पेशवा बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब यांच्या काळात मराठे व निजाम यांच्यात भालकी येथे कुढ होऊन त्यात निजामाचा पराभव झाला. यावेळी निजाम व मराठे सांध्यात झालेल्या भालकीच्या तहानुसार सातमाळ डोंगररांगेतील बांदवडच्या पश्चिमेकडील सर्व किल्ले मराठ्यांच्या वर्चस्वाखाली आले. यामध्ये अहिवंतगडाचाही समावेश होता. यानंतर इसवी सन १७५४ मध्ये निजाम व मराठे यांच्यात झालेल्या करारानुसार मालकीच्या तहात मराठ्यांना मिळालेले सातमाळ डोंगररांगेतील किल्ले निजामाला परत देण्यात आले. पुढील काळात इसवी सन १७५७ मध्ये मराठ्यांनी सिंदखेड येथे निजामाचा पराभव करून सातमाळ डोंगररांगेतील सर्व किल्ले पुन्हा आपल्या वर्चस्वाखाली आणले. यानंतरच्या काळात इसवी सन १८१८ पर्यंत अहिवंतगड किल्ल्यावर मराठा सत्तेचे वर्चस्व कायम होते. परंतु, पेशवेकाळात निरिदुर्गाना राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व न राहिल्याने जवळपास ६० वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात अहिवंतगड किल्ल्यावर कुठलीही विशेष घटना घडलेली दिसून येत नाही. फक्त काही प्रशासकीय उदेख मात्र मिळतात. त्यामध्ये इसवी सन १७६०-६१ मध्ये अहिवंतगडाची जहागीर दादो अनंत यास देण्यात आली होती. इसवी सन १७६५ मध्ये मराठ्यांनी माणिकपुंज किल्ला हैदराबादच्या निजामाकडून हस्तगत केला. यावेळी धोडप किल्ल्यावरील महादजी बाबूराव यांनी मोठी कामगिरी बजावली. या कामगिरीचे बक्षीस म्हणून महादजी बाबूराव यास अहिवंतगड किल्ल्याची फडणीशी देण्यात आली. एकूणच शिवकाळात अहिवंतगड किल्ला अवघा सहा वर्षे मराठ्यांच्या वर्चस्वाखाली असूनही या काळात अनेक महत्त्वाच्या राजकीय घटना या किल्ल्यावर घडल्या. याउलट पेशवेकाळात जवळपास ६० वर्षे हा किल्ला मराठ्यांच्या वर्चस्वाखाली राहूनही कुठल्याही प्रकारच्या राजकीय घटनेचा उल्लेख मिळत नाही. यावरून शिवकाळ व पेशवेकाळ या दोन्ही कालखंडांमधील गिरिदुर्गाच्या स्थितीची कल्पना येते.
अहिवंतगड किल्ला ब्रिटिशांच्या वर्चस्वाखाली
इसवी सन १८१७-१८ मध्ये इंग्रज व मराठे यांच्यात तिसरे व निर्णायक युद्ध घडून आले. या युद्धात मराठा राज्याचा प्रमुख पेशवा दुसरा बाजीराव यांचा पराभव होऊन मराठी सत्तेचा अस्त झाला. जिंकून घेण्याची जबाबदारी या भागातील इंग्रजांचा लष्करी अधिकारी यानंतर इंग्रजांनी मराठ्यांचे किल्ले जिंकून घेण्यासाठीचे धोरण निश्चित केले. त्यानुसार, नाशिक व बागलाण भागातील किल्ले कॅप्टन जॉन ब्रिग्ज याच्यावर सोपविण्यात आली. एप्रिल व में इसवी सन १८१८ मध्ये कॅप्टन जॉन ब्रिग्ज व इतर इंग्रज अधिकाऱ्यांनी सातमाळ डोंगररांगेतील सर्व किल्ले मराठ्यांकडून जिंकून घेतले. यामध्ये अहिवंतगडाचाही समावेश होता. यावेळी कॅप्टन ब्रिग्ज अहिवंतगडावर पोहोचला असता, त्याने या किल्ल्याला विशाल व आकारहीन डोंगर म्हणून संबोधले. मराठ्यांनी सातमाळ डोंगररांगेतील किल्ल्यांच्या आधारे ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड करू नये म्हणून या किल्ल्यांवर जाण्याचे मार्ग तसेच या किल्ल्यांवरील तटबंदी, बुरूज व इमारती नष्ट करण्याचे धोरण ब्रिटिश लष्करी अधिकारी कॅप्टन जॉन ब्रिग्ज व कर्नल हुकीन्सन यांनी अवलंबले. त्यानुसार
अहिवंतगड किल्ल्याचे प्रवेशमार्ग, तटबंदी, बुरूज व या किल्ल्यावरील इमारती नष्ट करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासाठी या किल्ल्याचे सर्वेक्षणही करण्यात आले. ब्रिटिशांच्या वरील धोरणानुसार अहिवंतगड किल्ल्यावरील प्रवेशमार्ग, तटबंदी, बुरूज व इमारती हे सर्व नष्ट करण्यात आले. याचबरोबर या वैभवशाली किल्ल्याचे वैभव संपुष्टात येऊन फक्त आठवणी शिल्लक राहिल्या.
"तुमच्या दृष्टीने एका मुंगळ्याची किंमत काय ???" मी उपस्थितांना
विचारलं. त्रिमूर्तींसकट सगळे जण माझ्याकडे 'याला नक्कीच गडावरच्या
टाक्यातलं पाणी चढलं आहे' असल्या विचित्र नजरेने बघायला लागले !!!
"मुंगळ्याला काय किंमत असणारे. पायाखाली चिरडून टाकण्याच्या लायकीचा असतो. " पका.
"पण समजा हा मुंगळा तुमचं भविष्य सांगत असेल तर ???" मी. रस्त्यावरच्या हात
बघणा-या ज्योतिषांनी पोपट सोडून मुंगळ्याची प्लेसमेंट कधी केली असला विचार
सगळ्यांच्या मनात येउन गेला असावा.
"मुंगळा भविष्य सांगतो ??? म्हणजे ??" ऋग्वेद.
जास्त कसलीही चर्चा न करता मी सगळ्यांना एक मस्त जागा बघून तिथं बसायला
लावलं. गडावरचं धुकं हळूहळू कमी होत चाललं होतं . वा-याचा वेग आणि आवाज
वाढू लागला. त्या वाहत्या वा-याने इतिहासाची पानं आता उलगडली होती……
इ.स. १६७० उजाडलं. मुघलांच्या प्रांतात झंझावातासारख्या घुसलेल्या
मराठयांनी एक एक करत पुरंदरच्या तहात दिलेले २३ किल्ले परत जिंकून घेतले.
पुन्हा एकदा सुरत लुटली आणि व-हाडातलं कारंजा नावाचं गावही लुटून फस्त
केलं. पण मराठे एवढयावरच थांबले नाहीत. नाशिक बागलाणच्या प्रदेशात असलेल्या
साल्हेर,मार्कंडया,रवळ्या - जवळया,अहिवंत यांसारखे बुलंद दुर्ग मराठयांनी
मुघलांकडून अक्षरश: ओरबाडून घेतले. मुघलांची चहु बाजूनं कोंडी झाली होती.
औरंगजेब दिल्लीत डोक्याला हात लावून बसला होता. मराठयांच्या विजयाच्या
बातम्या येतच होत्या. हे प्रकरण जर वेळीच रोखलं नाही तर मराठे पुढच्या काही
दिवसात दिल्लीवरही हल्ला करतील असं चित्र औरंगजेबाला दिसू लागलं. एखादी
मोठी मोहीम काढणं आता भागच होतं. त्याने तातडीनं गुजरातचा सुभेदार असलेल्या
बहादूरखान कोकलताश याला आणि बु-हाणपुरात तळ ठोकून बसलेल्या महाबतखानाला
मराठयांनी जिंकलेला बागलाणचा मुलुख पुन्हा जिंकून घेण्याचं फर्मान सोडलं.
महाबतखान १६७१ च्या जानेवारीमध्ये चांदवडला पोहोचला. चांदवडला त्या वेळी
मुघलांची छावणी होती. त्या छावणीचा प्रमुख असलेल्या दाऊदखान कुरेशीची
त्यानं भेट घेतली. दोन्ही खान आता मोहिमेच्या कामावर लागले. सल्लामसलत सुरु
झाली. बराच विचार करून दोघांनी मोहीम निश्चित केली…अहिवंतगड !!!
नाशिक जिल्ह्यातल्या सातमाळा रांगेत वसलेला अहिवंतगड. उंचीने आणि
विस्ताराने प्रचंड असलेलं एक बेलाग दुर्गशिल्प !!! खुद्द शिवाजीमहाराजांनी
तंजावरच्या व्यंकोजीराजांना लिहिलेल्या एका पत्रात म्हटलं आहे " अहिवंत
किल्ला म्हणजे जैसा काही पन्हाळा,त्याचे बरोबरी समतुल्य आहे. किल्ला
नामोश्याचा. पुरातन जागा आहे." स्वराज्यात पन्हाळ्याच्या बरोबरीने अहिवंतही
तितकाच महत्वाचा होता हे या पत्राने अधोरेखित केलं आहे. असा हा
प्रतिपन्हाळा जिंकून घ्यायला दाऊद आणि महाबत ही खानजोडी आता निघाली. इ.स.
१६७१ च्या जानेवारी महिन्यात दोन्ही खान प्रचंड सैन्यासह अहिवंतच्या
पायथ्याला पोहोचले.
गडावरच्या सगळ्या वाटा मुघलांनी चौकीनाके आणि मोर्चे लावून बंद करून
टाकल्या. गडावरचे मराठे एक ना एक दिवस अन्न - पाणी संपल्यावर आपल्याला शरण
येतीलच हा विचार करून दोन्ही खानांनी गडाला वेढा घातला. दाऊदखानाने आपले
मोर्चे गडाच्या एका बुरुजापाशी उभारले. हे मोर्चे गडावरून येणा-या
तोफगोळ्यांच्या आणि बंदुकीच्या गोळ्यांच्या मा-यापासून लांब राहतील अशा
रीतीने बांधले गेले. महाबतने आपला मोर्चा गडाच्या दरवाजाच्या दिशेला
उभारला. अहिवंतचा किल्लेदार कोण होता यावेळी तरी इतिहासात माहिती उपलब्ध
नाही. पण या अनामिक किल्लेदाराने अहिवंतवरून तोफा - बंदुकांचा प्रचंड मारा
करत मुघल सैन्याला किल्ल्याच्या जवळपासही फिरकू दिलं नाही.
अहिवंतला वेढा घालून आता एक महिना उलटला होता. पण गड ताब्यात यायची काहीच
चिन्हं दिसत नव्हती. दाऊदखान चिंतेत बुडाला. हे असंच सुरु राहिलं तर काही
दिवसांनी मोहीम सोडून द्यायची वेळ येईल. औरंगजेबाला काय तोंड दाखवणार आपण
?? नाही नाही… काहीतरी केलंच पाहिजे !! दाऊदखान विचार करू लागला. आता
उपाययोजना आवश्यकच होती. एक दिवस दाऊदखान त्याच्या छावणीत बसलेला असताना एक
सैनिक आतमध्ये आला. त्याने दाऊदला सांगितलं "आपल्याकडे एक अतिशय निष्णात
असा ज्योतिषी आहे. भविष्य सांगण्यात त्याचा हातखंडा आहे. किल्ला आपल्या
हातात कधी येईल याचं अचूक भविष्य फक्त तोच सांगू शकेल. " दाऊदचे डोळे
आनंदानं चमकले. आपले आपल्या परीनं पूर्ण प्रयत्न सुरूच आहेत. कर्तव्यात
कसलीही कमतरता नाही. तेव्हा बघू ज्योतिषी काय म्हणतोय असा विचार करून
दाऊदखानाने ज्योतिषाला समोर हजर करण्याचा आदेश दिला. ज्योतिषी दाऊदखानच्या
छावणीत आला. "किल्ला कधी आणि कसा जिंकला जाईल ते सांग." दाऊदने ज्योतिषाला
विचारलं. त्या ज्योतिषाने दाऊदखानाला थोडी साखर आणायला सांगितली. त्या
साखरेच्या मदतीनं त्याने जमिनीवर अहिवंतगडाचा नकाशा काढायला सुरुवात केली.
त्याने गडावरचे बुरुज जिथे होते तिथे साखरेचे छोटे त्रिकोण काढले. तसंच
मुघलांच्या पहा-याच्या जागाही नकाशात दाखवल्या.जिथे महाबतखानाचे मोर्चे
होते तिथे त्याने साखरेचे छोटे ढिगारे काढले आणि जिथे दाऊदखानाचे मोर्चे
होते तिथेही त्यानं साखरेचे छोटे ढिगारे काढले. साखरेने काढलेला अहिवंतचा
तो नकाशा पूर्ण झाल्यावर त्याने आपल्याजवळ ठेवलेला एक मुंगळा बाहेर काढला
आणि तो त्या जमिनीवरच्या नकाशात सोडला. श्वास रोखून मुघल सैन्य हा प्रकार
बघत होतं. तो मुंगळा सुरुवातीला महाबतखानाचे मोर्चे जिथे होते तिथून आत
गेला आणि परत बाहेर आला. नंतर तो दाऊदखानाचे मोर्चे जिथे होते त्या भागात
गेला आणि पुन्हा बाहेर आला. असं दोन तीन वेळा झाल्यावर तो पुन्हा एकदा
दाऊदखानाच्या मोर्च्यांपाशी गेला आणि शेवटी तिथून त्याने किल्ल्यात प्रवेश
केला. ज्योतिषाच्या चेहे-यावर आता हास्य उमटलं होतं. त्याने चटाचटा कागदावर
गणितं मांडली आणि भविष्य वर्तवलं "आजपासून सहा दिवसांनी महाबतखान
किल्ल्यावर जोरदार हल्ला करेल पण किल्ला तुमच्या बाजूने ताब्यात येईल."
दाऊदखानाला ही भविष्यवाणी पटेचना. आभाळाला भिडलेला तो अहिवंताचा किल्ला.
आपण एक महिनाभर प्रयत्नांची शर्थ चालवली आहे. त्यात महाबतखान आता
किल्ल्याच्या दरवाजाजवळ जाउन पोहचला आहे आणि तरीही हा ज्योतिषी म्हणतोय की
गड आपल्या बाजूने ताब्यात येईल ?? अशक्य !!!
सहावा दिवस उजाडला आणि ज्योतिषाने भविष्य वर्तवल्याप्रमाणे महाबतखानाने
अहिवंतगडावर जोरदार हल्ला केला. मुघल सैन्य आता इरेला पेटलं होतं.
गडावरच्या मराठयांनी मुघलांचा तो आवेश बघितला. गडावरचं धान्यही संपत आलं
होतं . महिनाभराच्या हल्ल्यांमध्ये मराठयांचे अनेक लोकही मारले गेले होते.
या परिस्थितीत किल्ला लढवणं कठीणच होतं. आता शरण जाणं हा एकच पर्याय
मराठ्यांकडे उरला. पण समजा महाबतखानाच्या बाजूने शरण गेलो तर ते लोक
आपल्याला जिवंत सोडणार नाहीत हे किल्लेदाराच्या लक्षात आलं. अखेर त्यानं
गडावरची काही मातब्बर माणसं दाऊदखानाचे मोर्चे ज्या बुरुजासमोर होते त्या
बुरूजाजवळून जाणा-या एका बारीक पायवाटेने दाऊदखानाकडे पाठवून दिली. जिवंत
जाऊ देत असाल तर किल्ला तुमच्या हवाली करतो असा प्रस्ताव त्यांनी
दाऊदखानासमोर मांडला. दाऊदखानाचं नशिबच फळफळलं !!! शामियान्यात बसून
किल्ला हातात येतोय हे बघून त्याने तत्काळ मराठयांची विनंती मान्य केली.
आपलं सैन्य पाठवून त्यानं गडाचा ताबा घेतला आणि महाबतखान ज्या दरवाजासमोर
मोर्चे लावून बसला होता त्याच दरवाजातून त्यानं मराठयांना गडाखाली जाण्याची
वाट दिली. महाबतखानाला हा प्रकार समजला आणि तो चकितच झाला. गेले महिनाभर
शर्थीचे प्रयत्न करून हाती येत नसलेला अहिवंतगड आज दाऊदखानाने इतक्या
सहजपणे कसा काय ताब्यात घेतला ?? गडावर सगळ्यात जास्त हल्ला आपल्या बाजूने
झाला आणि मराठे दाऊदखानाला कसे काय शरण गेले हेच त्याला कळेना. आपल्याला गड
मिळाल्याची साधी बातमीही दाऊदखानाला देता आली नाही ?? त्याला एकटयाने
निर्णय घ्यायला कोणी सांगितलं होत ??? संतापाने महाबतखान थरथर कापत होता.
महाबतखानाने प्रयत्नांची शिकस्त करूनही अहिवंतच्या विजयाचं श्रेय मात्र
दाऊदखानाला मिळालं होतं. यावरून त्याची आणि दाऊदखानची अहिवंतच्या पायथ्याला
प्रचंड भांडणं झाली. अखेर चिडलेला महाबतखान तिथून निघाला आणि नाशिकला जाऊन
राहिला.
इकडे दाऊदखानाची मात्र दिवाळी सुरु होती. औरंगजेबाकडून आता
किताब,सन्मानही मिळणार होता. दाऊदखानानं किल्ल्याचं भविष्य सांगणा-या
ज्योतिषाला प्रचंड मोठं इनाम दिलं. महिनाभरापूर्वी जिंकण्यासाठी केवळ अशक्य
वाटणारा अहिवंतगड एका मुंगळ्याच्या करामतीनं मुघलांच्या ताब्यात आला होता
!!!!
अहिवंतसारख्या महाबलाढ्य किल्ल्याची ही कथा केवळ एक दंतकथा नसून
प्रत्यक्षात घडलेली एक सत्यघटना आहे. जेधे शकावली आणि खुद्द मुघलांचा
समकालीन इतिहासकार असलेल्या भीमसेन सक्सेना याने लिहिलेला "तारीखे
दिल्कुशा" यांसारखी अस्सल समकालीन साधनं या घटनेची साक्षीदार आहेत !!!
गोष्ट संपून दोन तीन मिनिटं झाली तरी कोणाच्या तोंडून शब्दच फुटेना.
आश्चर्याचा सगळ्यात मोठा धक्का बसला होता तो सुनील,सुरेश आणि सागरला.ज्या
गडाच्या पायथ्याला आपण राहतो त्याचा इतिहास इतका रोमांचकारी आहे यावर
विश्वास ठेवणं त्यांना कठीण जात असावं. "दादा,आजपर्यंत इतक्या लोकांना
गडावर घेऊन आलो पण ही गोष्ट फक्त तुम्हीच सांगितलीत. आम्ही आता यापुढे जे
लोक येतील त्यांना पण हा इतिहास सांगू !!!" ही त्यांची प्रतिक्रिया म्हणजे
मी हा इतिहास सांगताना केलेल्या वेळेच्या गुंतवणुकीचं ख-या अर्थाने झालेलं
चीज होतं !!!
सह्याद्री पर्वतातील आकाराने सर्वांत मोठा असलेला अहिवंतगड किल्ला ऐतिहासिकदृष्ट्याही तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणूनच स्वतः छत्रपती शिवाजी महाराज हे आपले बंधू व्यंकोजीराजे यांना लिहिलेल्या पत्रात अहिवंतगडाविषयी लिहितात की, अहिवंत म्हणजे जैसा काही पन्हाळा, त्याचे बरोबरी समतुल्य आहे. याचप्रमाणे कवी जयराम पिंडे आपल्या 'पर्णालपर्वतग्रहणाख्यान' या संस्कृत काव्यग्रंथात शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांना उद्देशून म्हणतात, अहिवंतगड व अचलागड नावाचे सुंदर व अजिंक्य किल्लेदेखील आपले वडील बंधू जे शिवाजी महाराज यांनी काबीज केले. याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराजांचे मंत्री रामचंद्रपंत अमात्य आपल्या आज्ञापत्रात म्हणतात, सालेरी अहिवंतापासून कावेरीतीरापर्यंत निष्कंटक राज्य संपादिले. इसवी सन १६७१ मध्ये अहिवंतगडाला मोगलांनी वेढा घातलेला असताना मोगलांचा अधिकारी भीमसेन सक्सेना आपल्या 'तारिखे दिल्कुशा' ग्रंथात लिहितो, अहिवंताचा किल्ला म्हणजे गगनाला भिडल्यासारखा, तो सर होईन हे बुद्धीला पटेना. अशाप्रकारे शत्रू पक्षाकडून प्रशंसा मिळविणारा किल्ला म्हणजे अहिवंतगड होय. पुढे इसवी सन १८१८ मध्ये अहिवंतगड किल्ला जिंकणारा इंग्रज लष्करी अधिकारी कॅप्टन जॉन ब्रिग्ज याने अहिवंतगडाला विशाल किल्ला संबोधले होते. वरील ऐतिहासिक संदर्भ अहिवंतगडाचे ऐतिहासिक महत्त्व सांगण्यास पुरेसे आहेत. विशेष म्हणजे, पन्हाळा व साल्हेर यांसारख्या इतिहास प्रसिद्ध किल्ल्यांच्या बरोबरीने अहिवंतगडाचा येणारा उल्लेख म्हणजे या किल्ल्याचा गौरवच म्हणता येईल.
नकाशे व मार्ग
किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा
प्रस्तावना
नाशिक
जिल्ह्यातून पूर्व पश्चिम जाणार्या सातमाळ डोंगररांगेत १८ किल्ले आहेत.
त्यापैकी अहिवंतगड हा प्रमुख किल्ला होता. किल्ल्याचा प्रचंड आकार,
त्यावरील अनेक वाड्यांचे अवशेष, मोठी तळी हे किल्ल्याचे मोठेपण अधोरीखित
करतात. अचला, मोहनदर या दोन टेहळणीच्या किल्ल्यांची निर्मिती अहिवंतगडाच्या
संरक्षणासाठी करण्यात आली असावी. अहिवंतगडचा आकार प्रचंड मोठा असल्यामुळे
अहिवंत आणि त्याच्या बाजूचा बुधल्या (बुध्या) डोंगर पाहाण्यासाठी अर्धा
दिवस लागतो.
खाजगी वाहानाने अचला, अहिवंत आणि मोहनदर हे तीन किल्ले
दोन दिवसात व्यवस्थित पाहून होतात. पहिल्या दिवशी अचला,अहीवंत पाहून
दरेगावातील मारुती मंदिरात किंवा मोहनदरी गावातील आश्रमशाळेच्या
व्हरांड्यात मुक्काम करुन दुसर्या दिवशी मोहनदर किल्ला पाहाता येईल.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
इसवीसन १६३६ मधे अहिवंतगड निजामशाहीच्या
ताब्यात होता. मुघल बादशाहा शहाजहानने नाशिक भागातील किल्ले काबिज करण्याची
जबाबदारी शाहिस्तेखानावर सोपवली. शाहिस्तखानाचा सरदार अलिवर्दीखानाने
अहिवंतगड जिंकून घेतला.इसवीसन १६७० मधे शिवाजी महाराजांनी हा किल्ला
मुघलांकडून जिंकून घेतला.सुरत, करंजा सारख्या शहरांची लुट, मुघलांचे किल्ले
जिंकून घेणे या शिवाजी महारांजांच्या कारवायांमुळे औरंगजेब बादशहा संतापला
होता.त्याने आपल्या दक्षिणेत असलेल्या सरदाराला महाबतखानास अहिवंतगड
घेण्याची आज्ञा केली.महाबतखान नाशिकला असलेल्या दिलेरखानाला सोबत घेऊन
त्याने अहिवंतगडाला वेढा घातला.महाबतखानाने महादरवाजावर तर दिलेरखानाने
पिछाडीला मोर्चे लावले.एक महिना झाला तरी अहिवंतगड दाद देत नव्हता.या
दरम्यान दंतकथेत शोभावी अशी घटना घडली.या घटनेची नोंद भिमसेन सक्सेनाच्या
तारीखे दिल्कुशा आणि जेधे शकावलीतही सापडते.दिलेरखानाच्या छावणीत एके दिवशी
एक ज्योतिषी आला.त्याला दिलेरखाना समोर पेश करण्यात आल.त्याला किल्ला कधी
हाती येईल अस विचारल्यावर त्याने साखर मागवली.साखरेने त्याने अहिवंत गडाचा
नकाशा काढला.साखरेनेच महाबत खान आणि दिलेरखानाचे मोर्चे दाखवले.त्यानंतर
त्याने आपल्या पिशवीतील पेटीतून एक मुंगळा बाहेर काढला आणि त्या साखरेच्या
किल्ल्यावर सोडला.त्या मुंगळ्याने महाबत खानाने महादरवाजावर लावलेल्या
मोर्च्याकडे गेला त्यानंतर तो दिलेरखानाच्या मोर्च्याकडे गेला.तिकडून
किल्ल्यात प्रवेश केला.त्यावरून ज्योतिषाने गणित मांडली आणि सांगितले की,
महाबतखानाकडून महादरवाजावर निकराचा हल्ला होईल.पण ६ दिवसांनी किल्ला
दिलेरखानाच्या मोर्च्याकडून हस्तगत होईल.
ज्योतिषाने सांगितलेले
भविष्य सहा दिवसांनी खरे ठरले.महाबतखानाने महादरवाजावर तिखट मारा
केला.किल्ल्यावरील दारूगोळा, धान्य संपत आले होते.त्यामुळे मराठ्यानी
किल्ला सोडण्याचा निर्णय घेतला.महाबतखान निकराने किल्ला लढवत असल्यामुळे
त्याच्याकडे जाण्यात अर्थ नव्हता म्हणुन मराठ्यानी आपला दुत दिलेरखानकडे
पाठवला व किल्ला देण्याची इच्छा व्यक्त केली.दिलेरखानाने मराठ्यांना
किल्ल्या बाहेर सुखरुप जाण्याचा मार्ग दिला आणि किल्ला ताब्यात घेतला.
इसवीसन १८१८ मध्ये सर प्रॉथर याने किल्ला मराठ्यांकडून जिंकुन घेतला.
महत्त्वाची ठिकाणे
दरेगावातून अहिवंतगडाचा डोंगर नालेच्या आकारात
पसरलेला दिसतो. अहिवंतगडाच्या बाजुला बुध्या डोंगर आहे. त्याच्या बाजुला
अजुन एक डोंगर आहे. गावातील मारुती मंदिरापासुन चढायला सुरुवात केल्यावर
आपण बुध्या आणि त्याच्या बाजूचा डोंगर या मधिल घळीत पोहोचतो. घळ चढुन
बुध्या डोंगराला वळसा घालुन आपण बुध्या आणि अहिवंत गडाच्या मधल्या घळीत
येतो. घळ चढुन गेल्यावर डाव्या बाजुला बुध्यावर कोरलेल्या कातळ कोरीव
पायर्या आणि वरच्या बाजूस बुरुज दिसतो. या पायर्यांवर माती पडलेली आहे.
त्यामुळे या पायर्या काळजीपूर्वक चढुन गेल्यावर आपण बुरुजा पाशी पोहोचतो.
बुरुजाच्या पुढे एक सुकलेल टाक आहे. पुढे गेल्यावर दोन खराब टाकी आहेत.
बुध्याच्या माथ्याला वळसा घातल्यावर अजुन एक बुरुज पाहायला मिळतो.
बुध्याच्या माथ्यावर चार पाण्याची टाकी आहेत. त्यापैकी एक बुजलेल आहे.
माथ्यावर एक शेंदुर लावलेला दगड आहे. बुध्याचा माथा छोटा असल्याने अर्ध्या
तासात बुध्या पाहुन परत अहिवंतगड आणि बुध्याच्या मधल्या घळीत उतरुन १०
मिनिट चढल्यावर आपण अहिवंत गडाच्या माथ्यावर पोहोचतो. माथ्यावर पोहोचल्यावर
डाव्या बाजुला एक टेकडी आहे पण त्यावर कुठलेही अवशेष नाहीत. गडावरील
महत्वाचे अवशेष गडाच्या मध्यभागी दिसणार्या टेकडीच्या आसपास आहेत.
त्यामुळे टेकडीच्या दिशेने चालायला सुरुवात करावी. साधारणपणे आपण १०
मिनिटात उध्वस्थ वाड्यांच्या अवशेषांपाशी पोहोचतो. इथे भरपूर उध्वस्थ
वाड्यांचे अवशेष पसरलेले आहेत. त्यावरुन या ठिकाणी गडावरील मुख्य वस्ती
होती याचा अंदाज बांधता येतो. यापैकी एका मोठ्या कोसळलेल्या वाड्याच्या
मागच्या बाजुला तलाव आहे. त्या तलवाच्या काठावर मारुती आणि सप्तशृंगी
देवीची मुर्ती आहे. तलावाच्या काठी एक उध्वस्थ कोठाराची इमारत आहे.
तलावाच्या
आजुबाजूचे हे अवशेष पाहुन गडावरील टेकडीच्या दिशेने चालायला सुरुवात
करावी. टेकडीपाशी पोहोचल्यावर टेकडी उजव्या हाताला ठेउन व दरी डाव्या
हाताला ठेउन चालायला सुरुवात करावी. इथे डाव्या बाजुला दरीच्या टोकाला
कातळात कोरलेली गुहा आहे. ही गुहा खालच्या अंगाला असल्यामुळे वरुन दिसत
नाही. गुहेत जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पायर्या होत्या पण आता त्या नष्ट
झाल्याने काळजीपूर्वक खाली उतरावर लागत. गुहेत एक सुकलेल पाण्याच टाक आहे.
गुहा सध्या राहाण्यायोग्य नाही. गुहेतून दुरवरचा परिसर दिसतो.
गुहा
पाहुन वर येउन परत टेकडी उजवेकडे ठेवत पुढे गेल्यावर पाण्याच टाक लागत.
यातील पाणी पिण्यायोग्य आहे. टाक्याच्या बाजूला एक दगडाची तुटलेली ढोणी
आहे. खंडोबाची एक अश्वारुढ मुर्ती आहे. टाक्यातल पाणी पिउन टेकडी चढुन
जावे. टेकडीवर उध्वस्त घरांचे चौथरे आहेत आणि एक बुजलेल टाक आहे. टेकडीवरुन
गडाचा पसारा आणि टेकडीच्या टोकाखाली असणारा बांधीव तलाव दिसतो. या
तलावाच्या दिशेने खाली उतरावे. तलाव पाहुन पुढे गेल्यावर उजव्या बाजुला
कड्याखाली (दरेगावाच्या दिशेला) कातळात कोरलेली गुहा आहे. ती पाहाण्यासाठी
जाण्यासाठी अरुंद वाट आहे त्यावर घसारा (स्क्री ) असल्याने जपुन जावे
लागते. गडावरील या दोनही गुहा गडाच्या पठाराच्या खालच्या बाजुस खोदलेल्या
असल्याने वरुन त्यांचा अंदाज येत नाही. माहितगार बरोबर असल्यास या गुहा
पाहाता येतात.
गुहा पाहुन परत पठारावर येउन पुढे चालत गेल्यावर आपण
उध्वस्त प्रवेशव्दारापाशी येतो. प्रवेशव्दारातून बाहेर पडल्यावर कातळात
कोरुन काढलेला सर्पिलाकार मार्ग आणि पायर्या पाहायला मिळतात. हा त्याकाळी
किल्ल्यावर येण्याचा राजमार्ग होता. राजमार्ग उतरुन गेल्यावर आपण एका अरुंद
पठारावर येतो. येथे एक पाण्याचे मोठे सुकलेले टाक आहे. टाक पाहुन पुढे
गेल्यावर वाट खाली उतरते. या वाटेन एक छोटा वळसा मारल्यावर कातळात कोरलेली
एक खांब असलेली गुहा दिसते. ही गुहा राहाण्यायोग्य नाही. गुहा पाहुन खाली
उतरल्यावर आपण उध्वस्त दरवाजापाशी पोहोचतो. या दरवाजाच्या बाजुचे बुरुज आणि
देवड्याही नष्ट झालेल्या आहेत . या दरवाजातून खालचा दरेगाव बेलवाडी रस्ता
दिसतो. या दरवाजातून बाहेर पडुन थोड खाली उतरल्यावर दोन वाटा आहेत. एक वाट
सरळ खाली उतरत रस्त्यावर गेलेली आहे. बिलवाडीला उतरायचे असल्यास ही वाट
पकडावी.
दरेगावला जाण्यासाठी उजव्या बाजुची कड्याखालुन जाणारी वाट
पकडावी. कातळकडा उजवीकडे आणि दरी डावीकडे ठेवत ही वाट सरळ कड्याच्या
टोकापर्यंत जाते आणि तिथुन खाली खिंडीत उतरते. खिंडीतून दरेगाव बेलवाडी
रस्ता बनवल्यामुळे याठिकाणी वाट थोडी कठीण बनलेली आहे. रस्त्यावर उतरल्यावर
मधल्या वाटानी दरेगावला पोहोचायला अर्धा तास पुरतो.
या मार्गाने
दरेगाव मारुती मंदिरापासुन सुरुवात करुन बुधा आणि अहिवंत गडाच्या दुसर्या
टोकाला असलेल्या दरेगाव बेलवाडी रस्त्यावरील खिंडीत उतरल्यास किल्ला कमीत
कमी वेळात संपूर्ण पाहुन होतो. किल्ला नीट पाहाण्यास किमान 3 तास लागतात.
किल्ल्यावरुन अचला, मोहनदर ,सप्तशृंगी, मार्कंड्या, रावळ्या-जावळ्या, धोडप ही रांग पाहायला मिळते.
कसे पोहोचावे
पोहोचण्याच्या वाटा :
१) नाशिक शहर
देशातल्या सगळ्या शहरांशी रस्त्याने आणि रेल्वेने जोडलेले आहे. नाशिकहुन
सप्तशृंगी देवीचे वणी गाठावे. वणीहून नांदुरी, कळवणकडे जाणार्या एस.टी.ने
दरेगाव फ़ाट्यावर उतरावे. हे अंतर साधारण १२ किमी आहे. फ़ाट्यावर उतरून चालत
१० मिनिटात दरेगावातल्या मारुती मंदिरापाशी पोहोचावे. दरेगाव हे अहिवंत
किल्ल्याच्या पायथ्याचे गावं आहे. खाजगी वाहानाने थेट दरेगावात जाता येते.
दरेगावातून पाहील तर अहिवंतगडाचा डोंगर नालेच्या आकारात पसरलेला दिसतो.
अहिवंतगडाच्या बाजुला बुध्या डोंगर आहे. त्याच्या बाजुला अजुन एक डोंगर
आहे. गावातील मारुती मंदिरापासुन चढायला सुरुवात केल्यावर आपण बुध्या आणि
त्याच्या बाजूचा डोंगर या मधिल घळीत पोहोचतो. घळ चढुन बुध्या डोंगराला वळसा
घालुन आपण बुध्या आणि अहिवंत गडाच्या मधल्या घळीत येतो. घळ चढुन गेल्यावर
डाव्या बाजुला बुध्यावर कोरलेल्या कातळ कोरीव पायर्या दिसतात. उजव्या
बाजूच्या वाटेने गडाच्या माथ्यावर जाता येते. दरेगावातून गडमाथा गाठण्यास
दीड तास लागतो. दरेगाव मारुती मंदिरापासुन सुरुवात करुन बुधा आणि अहिवंत
गडाच्या दुसर्या टोकाला असलेल्या दरेगाव बेलवाडी रस्त्यावरील खिंडीत
उतरल्यास किल्ला कमीत कमी वेळात संपूर्ण पाहुन होतो. किल्ला नीट पाहाण्यास
किमान ३ तास लागतात.
दरेगाव ते बेलवाडी रस्त्याचे काम चालू आहे. हा
रस्ता झाल्यावर खिंडी पर्यंत थेट गाडीने जाता येईल आणि तेथुन राजमार्गाने
किल्ल्यावर जाता येईल.
२) बेलवाडी मार्गे
अहिवंत किल्ल्यावर
जाणारी दुसरी वाट बेलवाडी गावातून किल्ल्यावर येते. वणी बेलवाडी असा ३०
किमीचा फ़ेरा मारावा लागतो. बेलवाडीतून २ तासात गडावर पोहोचता येते.
३) अचला मार्गे
मुंबई
किंवा पुणे मार्गे नाशिक गाठाव. नाशिकहुन वणी गाठावे. वणीहून एस.टी.ने
पिंपरी अचलाकडे जावे. हे अंतर साधारण १२ किमी आहे. अचला गावात उतरून दगड
पिंपरी गावाकडे सरळ चालत निघावे. हे अंतर अर्ध्या तासाचे आहे. दगड पिंपरी
हे अचला किल्ल्याच्या पायथ्याचे गावं आहे. खाजगी वाहानाने थेट दगड पिंपरी
गावात जाता येते. गावातून समोरच्या डोंगरसोंडेवरील खिंडीत छोटेसे सतीचे
देऊळ दिसते. त्याच्या दिशेने वर चढत जावे. पाऊलवाट प्रथम शेतातून आणि नंतर
वनखात्याने लावलेल्या जंगलातून वर चढत जाते. साधारणपणे अर्ध्या तासात आपण
सोंडेवरील सतीच्या देवळापाशी पोहोचतो. देवळापासून डाव्या बाजूला दिसणारा
किल्ला अचला, तर उजवीकडे धावत जाणारी सोंड थेट अहिंवत गडाला जाऊन मिळते.
ट्रेकसाठी लागणारा वेळ
⏱️ दरेगाव मार्गे दिड तास आणि बेलवाडी मार्गे २ तास लागतात.
सुविधा व सोयी
निवास व्यवस्था
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही. दरेगावातील मारुती मंदिरात ३० जणांची सोय होते.
अन्न व्यवस्था
जेवणाची व्यवस्था आपण स्वत
: करावी.
पाणी उपलब्धता
गडावर पाण्याची पाण्याची टाकी आहे. त्यात फेब्रुवारी पर्यंत पाणी मिळू शकते.
सर्वोत्तम काळ
🌤️ जुलै ते फेब्रुवारी
जवळील गावे
दरेगाव , बेलवाडी
उंची : ३८८० फुट
श्रेणी : मध्यम
मुंगळ्याच्या भविष्याच्या जोरावर जिंकलेला 'अहिवंतगड'
प्राचीन कालखंडापासून महाराष्ट्रामधील ‘नाशिक’ शहराला खूप महत्व आहे ‘नाशिक’ आणि संपूर्ण परिसर हा प्राचीन काळापासून महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र म्हणूनच प्रसिद्ध आहे. याच उक्तीप्रमाणे ‘नाशिक’ परिसरात विविध कालखंडात वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी आपल्या राज्याचे संरक्षण व्हावे यासाठी तेथील भौगोलिक परिस्थिती अनुसरून विविध किल्ले उभारले. याच ‘नाशिक’ जिल्ह्यातील ‘सातमाळा डोंगररांगेत’ विस्तीर्ण पठार आणि ऐतिहासिक महत्व असलेला ‘अहिवंतगड’ आजही उभा आहे.
नाशिक जिल्ह्यातील सातमाळा डोंगर रांगेतील ‘अहिवंतगड’ बघायचा असेल तर आपल्याला नाशिक वरून ‘सप्तशृंग गडावर’ जाणारी किंवा ‘नांदुरी’ या गावाची बस पकडणे कधीही सोयीचे ठरते या बसने आपल्याला नांदुरीच्या अलीकडील ‘दरेगाव’ या गावाच्या अगदी बाहेर उतरता येते. हे ‘दरेगाव’ म्हणजेच ‘अहिवंत’ गडाच्या पायथ्याचे गाव असून वणी – नांदुरी या मुख्य रहदारीच्या रस्त्यावरून अगदी १ किलोमीटर परिसरात ‘अहिवंतगडाच्या’ कुशीत वसलेले एक छोटेसे सुंदर टुमदार गाव आहे.

दरेगाव येथून दिसणारा 'अहिवंतगड'.
ज्या दुर्गभटक्यांना ‘अचला किल्ला’ पाहून डोंगरयात्रा करत ‘अहिवंतगडावर’ यायचे असेल त्यांनी ‘बिलवाडी’ मार्गे जी नळीची वाट लागते तेथून यावे किंवा वणी - नांदुरी रस्त्यावर ‘अहिवंतवाडी’ येथून देखील येऊ शकतात. तसेच ‘अहिवंतवाडी’ येथील वाट ही अगदी खड्या चढणीची आहे जी चढून जाण्यात नवख्या दुर्गभटक्यांचा कस नक्कीच लागतो म्हणून ‘दरेगाव’ येथून ‘अहिवंतगडावर’ जाणारी वाट नक्कीच सोयीची ठरते.
दरेगाव गावामधील हनुमान मंदिर अत्यंत सुंदर असून येथील हनुमानाची मूर्ती अत्यंत देखणी आहे. ‘अचला किल्ला’ करून आल्यावर जर ‘अहिवंत गड तुम्हाला दुसऱ्या दिवशी करायचा असेल तर हे हनुमान मंदिर मुक्कामासाठी अत्यंत योग्य ठिकाण आहे. याच हनुमान मंदिराशेजारून वाट ‘अहिवंतगडावर’ जाते. ‘दरेगाव’ मधून साधारणपणे १.३० ते २ तास आपल्याला ‘अहिवंतगड’ गाठण्यास लागतात. ‘अहिवंतगडाच्या’ अगदी शेजारी खेटून असलेला एक डोंगर आपले लक्ष वेधून घेत असतो त्या डोंगराला ‘बुध्या’ असे ओळखले जाते. ‘दरेगाव’ मधून आपण ज्यावेळेस अहिवंत गडाकडे जाण्यास निघतो तेव्हा हा ‘बुध्या’ आणि प्रचंड मोठा विस्तार असलेला ‘अहिवंतगड’ आपले लक्ष वेधून घेत असतो.
‘दरेगाव’ येथून ‘अहिवंतगडावर’ जाणारी वाट आणि उजवीकडे कोपऱ्यात दिसणारा 'मोहनदरी उर्फ शिडका किल्ला'.
‘दरेगाव’ येथून मळलेली पाऊलवाट असल्याने ही पाऊलवाट आपल्याला सरळ घेऊन जाते ते ‘बुध्या’ आणि ‘अहिवंतगड’ यांच्यामध्ये असलेल्या घळीमध्ये. येथे एक छोटा आणि सोपा कातळटप्पा चढून गेल्यावर आपण ‘बुध्या’ आणि ‘अहिवंतगड’ यांच्या खिंडीच्या मध्यभागात पोहोचतो या खिंडीच्या मध्यभागी उभे राहिले तर आपल्या डाव्या बाजूला गडाचे काही महत्वपूर्ण अवशेष बाळगलेला ‘बुध्या’ तर उजव्या बाजूस ऐतिहासिक ‘अहिवंतगड’ असे दृश्य आपल्याला पहायला मिळते. ‘अहिवंतवाडी’ येथून येणारी खडी चढण असलेली पाऊलवाट याच ठिकाणी खिंडीत एकत्र येऊन मिळते. याच खिंडीमधून डावीकडे जाणारी पाऊलवाट ही ‘बुध्या’ येथे जाते तर उजवीकडची पाऊलवाट ही ‘अहिवंतगड’ येथे जाते.
पहिले डावीकडे जाऊन ‘बुध्यावर’ असलेले अवशेष
पहाणे जास्त सोयीस्कर ठरते. यासाठी बुध्यावर जाणारी पाऊलवाट पकडून थोडे वर गेले
असता कातळात खोदलेल्या जवळपास नव्वद अंशातल्या ५ ते ६ पायऱ्या मात्र आश्चर्यचकित
करतात. या पायऱ्यांनी वर चढून गेले असता एक छोटी पाऊलवाट पकडून वर चढून गेले असता
आपण सरळ उभे राहतो ते एका मोठ्या बुरुजासमोर. ‘बुध्यावर’ असलेला हा बुरुज आजही
बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. या बुरुजावर उभे राहिले असता समोर अहिवंतगडाचा पसारा
आपल्याला पहायला मिळतो तसेच या बुरुजावरून परत पाऊलवाटेवर येऊन थोडेसे उजवीकडे
गेले असता आपल्याला ‘बुध्यावर’ असलेले एकमेव पाण्याचे टाके पहायला मिळते. या
पाण्याच्या टाक्याच्या पलीकडे समोर सप्तशृंग गडाचा सुळका मात्र लक्ष वेधून घेतो
तसेच बाजूला थोडेसे दुरवर असलेले ओझरखेड धरण देखील आपले लक्ष वेधून घेते. वातावरण
जर स्वच्छ असेल तर ‘रामसेज किल्ला’ आणि ‘चामरलेणी’ पर्यंतचा प्रदेश येथून आपल्याला
दिसतो.
अहिवंतगडाच्या वाटेवरून दिसणारा 'मोहनदरी उर्फ शिडका किल्ला'.
दुर्ग अवशेष बिलगून असलेल्या ‘बुध्यावरून’ उतरून आपण परत खिंडीत यायचे आणि उजवीकडून ऐतिहासिक ‘अहिवंतगडाच्या पाऊलवाटेवरून काही पावट्या (खोबणी मधल्या पायऱ्या) चढून ‘अहिवंतगडाचा’ माथा गाठायचा. ‘अहिवंतगड’ याचा विस्तार फार मोठा असल्याने त्याच्या चारही बाजू दुरवर पसरलेल्या आपल्या पहायला मिळतात. तसेच गडाचे पठार अत्यंत मोठे असून संपूर्ण पठारावर आपल्याला बरेच अवशेष विखुरलेले पहायला मिळतात. गडाच्या पूर्व बाजूची वाट आपण पकडून चालत राहिलो की साधारणपणे २० मिनिटात आपण राजवाड्याच्या चौथऱ्याजवळ येऊन पोहोचतो आजही या वाड्याचे अवशेष आजूबाजूला विखुरलेले आपल्याला दिसतात. हा वाडा पाहून आपण थोडे पुढे गेले असता एक छोटा झरा आपल्याला पहायला मिळतो या झऱ्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.
या झऱ्याच्या शेजारून पुढे गेलो असता आपल्याला
गडदेवता ‘हनुमान’ आणि ‘सप्तशृंग देवी’ यांची मूर्ती उंचवट्यावर पहायला मिळते. ही
‘सप्तशृंग देवी’ थोडीशी भग्न पावलेली आहे परंतु आजही दरेगाव, अहिवंतवाडी तसेच
बेलवडी येथील कोणताही ग्रामस्थ गडावर आले असता या देवतांची पुजा करतात. या दोन्ही
मूर्ती आपल्याला उघड्यावर पहायला मिळतात. मध्ययुगामधल्या या शक्तीदेवता आजही उन,
पाऊस, वारा खात आजही गडावर उभे आहेत. या मूर्तींचे रक्षण होणे नक्कीच गरजेचे आहे.
येथे जवळच एक तळे आपल्याला पहायला मिळते आज ह्या तळयामधले पाणी शेवाळलेले आहे जर
हे तळे स्वच्छ केले तर नक्कीच गावातल्या लोकांना याचा वापर करता येईल. येथून पुढे
गेले असता आपल्याला अहिवंत गडाच्या मधोमध एक टेकडी लागते याच्यावर देखील काही
अवशेष विखुरलेले आपल्याला पाहायला मिळतात. याच टेकडीच्या डावीकडच्या डोंगर
कड्याच्या बाजूने आपण पुढे जायचे आणि दरीच्या काठाने थोडेसे खाली उतरले असता आपण
सरळ पोहोचतो ते ‘अहिवंतगडाच्या’ दक्षिणेकडील कड्यामध्ये असलेल्या गुहेत.

दरेगाव येथील वाटेवरून दिसणारा अहिवंतगडाचा 'बुध्या'.
ही कातळकोरीव गुहा प्रशस्त असून साधारणपणे २० ते २५ लोकं यामध्ये नक्की राहू शकतील तसेच या गुहेमध्ये एक पाण्याचे टाके देखील पहायला मिळते परंतु ते कोरडे आहे. ही गुहा किल्ल्याच्या कड्यावर असल्याने सुरक्षितता बाळगणे महत्वाचे आहे. ही गुहा पाहून झाल्यावर सुरक्षितपणे कडा चढून परत पठारावर यायचे आजूबाजूचे छोटे मोठे पसरलेले अवशेष आणि समोर दिसणारा ‘अचला किल्ला’ नक्कीच आपले लक्ष वेधून घेत असतात. संध्याकाळच्या वेळेस जर तुम्ही या ‘अहिवंतगडाच्या’ या पठारावर असाल तर ‘पश्चिम रंगाने’ न्हाऊन निघालेला ‘अचला किल्ला’ फारच देखणा दिसतो तर दुरवर इंग्रजांच्या काळात उभारलेले ‘चणकापूर’ धरण सोनेरी किरणांनी न्हाऊन निघालेले असते.
येथून पुढे चालत आले असता आपल्याला एक दगडी
कुंड ‘अहिवंतगडावर’ पहायला मिळते. ह्या कुंडातील पाणी देखील पिण्यासाठी अत्यंत
योग्य आहे. तसेच हे कुंड वर्षाचे १२ महिने थंडगार पाण्याने भरलेले असते. याच
कुंडावर एका दगडी चौथऱ्यावर एक शिल्प आपल्याला पहायला मिळते त्यामध्ये घोड्यावर
बसलेला एक वीर आणि त्याच्या पाठीमागे एक स्त्री हात जोडून बसलेली आहे असे हे शिल्प
आहे. स्थानिक लोकं या शिल्पाला ‘खंडोबा’ असे म्हणतात आणि त्यांची पुजा देखील केली
जाते. याच कुंडाच्या जवळून एक वाट खाली ‘बेलवडी’ गावात जाते. या गडाच्या टेकडीवरून
फिरून जात असताना आपल्याला एक मोठा तलाव पहायला मिळतो आणि याच तलावाच्या अलीकडे
दगडी चौथरा देखील आपल्याला पहायला मिळतो.

अहिवंतगडाच्या बुध्यावर असलेले अवशेष यामध्ये आपल्याला पाण्याच्या टाक्या, वर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायऱ्या आणि बुरुज हे अवशेष पाहायला मिळतात.
येथून जवळच असलेली अहिवंतगडाची माची पाहण्यासारखी
आहे. या माचीवर दोन मोठे तलाव खोदलेले आपल्याला पहायला मिळतात यातील पाणी अत्यंत
गढूळ आहे. यामध्ये बऱ्याचदा आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी सोडलेल्या गाई, म्हशी
आणि शेळ्यांचा वावर येथे असतो. येथून जवळच ईशान्य दिशेकडे आपल्याला जाताना भग्न
दरवाजा पहायला मिळतो तसेच तेथून काही पायऱ्या उतरलेल्या आपल्याला दिसतात. या
पायऱ्यांवरून खाली उतरत गेले असता दुसरा भग्न दरवाजा देखील पहायला मिळतो. याच
बाजूने थोडे पुढे गेले असता आपल्याला २ पाण्याची टाकी पहायला मिळतात ही टाकी पाहून
आपण डाव्या बाजूने जात असताना आपल्याला काही कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात या
उतरून गेल्यावर आपण कड्याच्या बाजूने कातळात खोदलेल्या गुहांच्याजवळ आपण जाऊन
पोहोचतो.
या कातळात खोदलेल्या दोन खोल्या मुक्कामायोग्य आजिबात नाहीत यामध्ये
गडावर राहणाऱ्या जनावरांनी अत्यंत घाण केलेली आहे. या गुहा पाहून आपली गडफेरी
संपते परंतु हीच पाऊलवाट पकडून चालत जात असता आपण एका ‘बारी’ मध्ये पोहोचतो.
‘बारी’ म्हणजे दोन डोंगरांच्या मध्ये असणारी खिंड. या ‘बारी’ मधून डावीकडे वळाले
असता आता मोठा रस्ता झालेला असून हा रस्ता आपल्याला सरळ मागच्या बाजूने ‘दरेगाव’
या अहिवंत किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात घेऊन जातो. असा हा विस्तीर्ण पठार
असलेला ‘अहिवंतगड’ नक्कीच त्याच्या अवशेषांनी मनाला भुरळ पडतो.
'अहिवंत गडाच्या' बुध्यावरून दिसणारा 'सप्तशृंगी गड'
अहिवंतगडाचा इतिहास:-
‘अहिवंतगड’ नक्की कोणी बांधला हे निश्चितपणे पुराव्यानिशी सांगता येत नाही. इ.स. १५५३ साली ‘बुरहान निजामशहा’ याच्या ताब्यात नाशिक जिल्ह्यातील २६ किल्ले होते त्यामध्ये ‘अहिवंतगडाचा’ देखील समावेश होता. याचा उल्लेख हा ‘सय्यद अली तबातबा’ याने लिहिलेल्या ‘बुरहान – ई – मासिर’ या ग्रंथामध्ये आपल्याला आढळतो. यामध्ये तो ‘अहिवंतगडाचा’ उल्लेख ‘अलहवंन्त’ असा करतो. ‘अहिवंतगड’ अहमदनगरच्या निजामशाह याच्याकडे असताना त्यावेळेस ‘शहाजी महाराज’ हे निजामशाहीचे रक्षण करत होते.
याच कालावधी मध्ये दिल्लीचा बादशाह ‘शहाजहान’ याने ‘शहाजी महाराजांच्या’ पाडावासाठी इ.स. १६३६ मध्ये आपले सरदार खान दौरान, खान अमन आणि शाहिस्तेखान यांना ‘शहाजहान’ याने पाठविले. नाशिक आणि परिसरातील किल्ले मुघलांच्या ताब्यात आणण्याची कामगिरी ‘शहाजहान’ याने ‘शाहिस्तेखान’ याच्यावर सोपवली होती. शाहिस्तेखान याच्या हाताखालील ‘अलीवर्दी खान’ याने इ.स. १६३६ साली ‘अहिवंतगडाचा’ पाडाव केला. इ.स. १६६९ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या विरुद्ध मोहीम उघडली.

बुध्यावरून दिसणाऱ्या अहिवंत गडाच्या पायऱ्या आणि 'अहिवंतगड'.
या महत्वाच्या मोहिमेमध्ये मराठ्यांचे सेनापती ‘प्रतापराव गुजर’ यांनी नोव्हेंबर १६७० मध्ये ‘अहिवंतगड’ हा मोगलांकडून जिंकून घेतला या लढाईत स्वतः शिवाजी महाराज होते असे उल्लेख आपल्याला मिळतात. ‘अहिवंतगड’ मुघलांच्या जवळील फार महत्वाचा किल्ला होता. गंगथडी आणि आणि खानदेश या दोन्हीकडे जाणारे रस्ते हे अहिवंतगडाजवळून जातात म्हणून या गडाचे महत्व ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या काळात खूप जास्त होते. जेव्हा ‘अहिवंतगड’ शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला तेव्हा चांदोर (चांदवड) येथील मुघल सरदार ‘दाऊदखान’ हा खुपच अस्वस्थ झाला औरंगजेबाची आपल्यावर गैरमर्जी होणार हे त्याने ओळखले. कारण या काळात ‘अहिवंतगड’ हा ‘खानदेश आणि गंगथडी’ या दोन्ही भागाचा टेहळणी नाका होता. हवी ती किंमत देऊन ‘अहिवंतगड’ जिंकायचा असे ‘दाऊदखानाने’ ठरविले. ‘अहिवंतगड’ मराठ्यांनी त्याच्याकडून जिंकून घेतला हे त्याचे शल्य ‘दाऊदखान’ याच्या मनात सलत होते.
याचे मुख्य कारण म्हणजे मराठ्यांनी ‘दाऊदखानाला’ हातोहात बनविले होते ‘मराठे हे बुऱ्हाणपूर येथील पेठ लुटणार आहेत’, अशी बातमी शिवाजी महाराजांच्या सहकाऱ्यांनी सगळीकडे पसरवलेली होती. या बातमीचा परिणाम असा झाला की ‘दाऊदखान’ हा भली मोठी मुघलांची फौज घेऊन बुऱ्हाणपूरकडे निघाला परंतु तो अजिंठ्याच्या लेण्यांच्या जवळ पोहोचला असता त्याला त्याच्या गुप्तहेरांकडून बातमी मिळाली की ‘मराठे’ हे ‘अहिवंतगडाच्या’ रोखाने गेलेले आहेत. हे समजल्यावर ‘दाऊदखान’ याने मोठ्या गतीने ‘अहिवंतगडाच्या’ दिशेने वाटचाल सुरु केली. परंतु अर्ध्या रस्त्यात ‘दाऊदखान’ पोहोचल्यानंतर त्याला समजले की मराठ्यांनी ‘अहिवंतगड’ जिंकून घेतला आहे. प्रत्यक्षात लढा न होता ‘अहिवंतगड’ हा मराठ्यांकडे गेला आणि एवढेच नाही तर मुघलांचा सरदार ‘दाऊदखान’ हा प्रसंगी बेसावध होता ही गोष्ट ‘औरंगजेब’ याला पटण्यासारखी आजिबात नव्हती.

अहिवंतगडावरील घरांची जोती आणि अवशेष.
‘औरंगजेब’ आपल्याला आता बडतर्फ करेल ही भीती ‘दाऊदखान’ याला वाटायला लागली याचदरम्यान ‘औरंगजेब’ हा त्याच्या ‘महाबतखान’ नावाच्या सरदारास दक्षिणेकडे पाठवत असल्याची खबर ‘दाऊदखान’ याला मिळाली या गोष्टीमुळे ‘दाऊदखान’ अधिक बेचैन झाला. या त्याच्या अस्वस्थपणाचा फायदा घेऊन मराठ्यांनी इ.स. १६७१ साली ‘साल्हेर’ हा महत्वपूर्ण किल्ला देखील जिंकून घेतला. ‘साल्हेर किल्ला’ देखील मराठ्यांनी जिंकल्यामुळे ‘दाऊदखान’ याची अवस्था अत्यंत बिकट झाली.
मुळात ‘महाबतखान’ दक्षिणेत येऊन संपूर्ण
लढ्याची सूत्रे स्वतःच्या हातात घेणार ही कल्पनाच ‘दाऊदखान’ याला सहन होत नव्हती.
आपल्याला दिल्लीला परत बोलावून घ्यावे अशी विनंती ‘दाऊदखान’ औरंगजेबास केली परंतु
त्याचा काही उपयोग झाला नाही. ‘महाबतखान’ इ.स. १६७१ च्या सुरुवातीस महाराष्ट्रात
दाखल झाला. ‘दाऊदखान’ आणि ‘महाबतखान’ यांची जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात
‘चांदूर’ येथे भेट झाली. या भेटीमध्ये ‘दाऊदखान’ याने ‘महाबतखान’ याला योग्य
वागणूक दिली नाही म्हणून दोघांमध्ये वैमनस्य निर्माण झाले. हे सर्व वर्णन ‘तारीखे
दिल्कुशा’ या ‘भीमसेन सक्सेना’ याच्या ग्रंथात मिळते. ‘भीमसेन सक्सेना’ हा स्वत:
‘दाऊदखान’ याच्याकडे नोकरीस होता.
गडावरील पाण्याचा तलाव आणि मागे 'सप्तशृंग गड'.
‘चांदूर’ येथील भेटीमध्ये ‘दाऊदखान’ आणि ‘महाबतखान’ यांनी कोणती मराठ्यांच्या विरुद्ध कोणती पावले उचलावीत याचा आराखडा तयार केला आणि ‘अहिवंतगडाला’ वेढा दिला. जवळपास एक महिना हा वेढा रेंगाळत चालला होता. दाऊदखान आणि महाबतखान वेगवेगळ्या दिशांना मोर्चे बांधून हल्ले करत होते परंतु याला काही यश मिळत नव्हते. तेव्हा ‘अहिवंतगडावर’ अगदी अल्पशिबंदी होती पण ही शिबंदी या मोगलांच्या प्रचंड सेनेला आजिबात दाद लागू देत नव्हती. या वेढ्यामध्ये महाबतखान याच्यासोबत कुंवर किशनसिंग हा मुघलांचे मातब्बर सरदार मिर्झा राजा जयसिंग यांचा मुलगा, सुजाणसिंग, शुभकर्ण बुंदेला, राव कर्ण याचा मुलगा अनुपसिंग राठोड, आघारखान, तुर्क ताजखान यांच्यासारखे मातब्बर सरदार होते. या संपूर्ण लढ्याच्या वेळेस ‘तारीखे दिल्कुशा’ याचा लेखक ‘भीमसेन सक्सेना’ स्वतः हजर होता.
‘भीमसेन सक्सेना’ याने या ‘अहिवंतगडाच्या’ वेढ्याची
तपशीलवार माहिती नोंदवली आहे. महिना होत आला तरी देखील मुघलांना ‘अहिवंतगड’ जिंकून
घेण्यात अपयश येत् असल्याचे पाहून ‘दाऊदखान’ खूप कष्टी झाला. ‘दाऊदखान’ याला काय
करावे सुचेनासे झाले. त्याच दरम्यान ‘दाऊदखान’ आपल्या शामियान्यामध्ये
‘अहिवंतगडाच्या’ वेढ्याबाबत चिंतेने विचार करत बसला असताना त्याच्या एका
खिजमतगाराने त्याला सांगितले “आपल्या पदरी जो ज्योतिषी आहे तो आपल्या या
‘अहिवंतगडाच्या’ वेढ्याबाबत चिंतेचे नक्कीच निवारण करू शकेल तुम्ही जर आज्ञा केली
तर मी त्याला आपल्यासमोर घेऊन येतो”, खिजमतगाराच्या या शब्दांवर ‘दाऊदखान’ विचार
करू लागला. अहिवंतगड जिंकण्यासाठी ‘महाबतखान’ स्वत: पराक्रमाची पराकाष्ठा करत आहे
तसेच मुघल सैन्य प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून वेढा लढवत आहे तरीदेखील
‘अहिवंतगड’ आपण का जिंकू शकत नाही असे त्याला अनेक प्रश्न पडले.

अहिवंतगडावरील गडदेवता 'हनुमान आणि सप्तशृंग देवी'.
हे सगळे विचार करत असताना ‘दाऊदखानाने’ आपल्या खिजमतगाराला आज्ञा केली की आपल्या पदरी असलेल्या ‘ज्योतिषाला’ आपल्या शामियान्यामध्ये घेऊन ये. त्यावेळेस ‘तेथे भीमसेन सक्सेना’ हजर होता. ‘भीमसेन सक्सेना’ याने त्या ज्योतिषाला विचारले “किल्ला कधी फत्ते होणार? ते सांग” या गोष्टीवर विचार करत ज्योतिषाने साखर मागवली आणि त्याने मागवलेल्या साखरेपासून ‘अहिवंतगडाची’ छोटी प्रतिकृती बनवली. साखरेची तटबंदी, साखरेचा बुरुज, साखरेचे प्रवेशद्वार असे सगळे त्याने बनवून त्याचे स्वरूप तयार केले. गडावर मराठ्यांचे सैन्य ज्याठिकाणी आहे त्या जागा देखील त्याने त्या साखरेच्या किल्ल्यांमध्ये दर्शविल्या. मुघलांच्या मोर्चाच्या जागा देखील दर्शवल्या. त्याचवेळेस महाबतखान याचा मोर्चा ज्या ठिकाणी ‘अहिवंतगडाच्या’ जवळ जाऊन पोहोचला होता तो देखील ज्योतिषाने या साखरेच्या बनवलेल्या किल्ल्यांमध्ये दर्शवला.
अश्या प्रकारे अहिवंत गडाची प्रतिकृती बनवून
झाल्यावर त्या ज्योतिषाने आपल्या जवळ असलेल्या एका पिशवीमधून एक डबी बाहेर काढली
आणि त्यातून एक ‘मुंगळा’ बाहेर काढला आणि तो ‘अहिवंतगडाच्या’ साखरेच्या सहाय्याने
बनवलेल्या प्रतिकृती मध्ये सोडला. हा सोडलेला ‘मुंगळा’ साखरेच्या वासाने चक्रावून
गेला आणि तो अहिवंतगडाच्या प्रतिकृतीमध्ये दाखवलेल्या महाबतखानाच्या मोर्चाच्या ठिकाणी गेला, नंतर
तो त्या ‘अहिवंतगडाच्या’ साखरेच्या प्रतिकृतीच्या तटांरून फिरला नंतर तो ‘दाऊदखान’
याच्या मोर्च्यापाशी आला तेथून हा ‘मुंगळा’ प्रतिकृतीच्या बुरुजावरील ढिगाऱ्यावरून
चढून गेला आणि नंतर तेथून बाहेर आला. असे जवळपास २ ते ३ वेळेस झाल्यावर ज्योतिषाने
त्या ‘मुंगळ्याला’ आपल्या चिमटीत पकडले आणि परत आपल्या जवळ असलेल्या पिशवीमधल्या
डबीमध्ये सोडले.

अहिवंत गडावरील गुहा आणि त्यामधील पाण्याचे टाके.
नंतर ज्योतिषाने एका कागदावर आकडेमोड करायला सुरुवात केली आणि काही गणिते मांडली. हे सगळे करून झाल्यावर ज्योतिषी विचार करू लागला आणि नंतर थोड्यावेळात ज्योतिषी ‘दाऊदखानाला’ सांगू लागला “सहा दिवसानंतर अहिवंतगड तुमचा मोर्चा ज्याठिकाणी आहे त्याठिकाणाहून ताब्यात येईल परंतु मुघलांच्या बाजूने जोरदार हल्ला होईल तो महाबतखानाच्या बाजूने होईल”. ज्योतिषाने केलेली ही भविष्यवाणी ‘दाऊदखान’ याला काही केल्या पटेना. उंच आणि अस्ताव्यस्त पसरलेला ‘अहिवंतगड’ त्याच्या एका अभेद्य असलेल्या बुरुजासमोर आपला मोर्चा तेथे जायला साधी एक पाऊलवाटपण नाही आणि तिथे हा ज्योतिषी असे भविष्य वर्तवतो की, तुमच्या बाजूच्या मोर्चाने ‘अहिवंतगड’ सर होईल ! ‘महाबतखान’ इतके दिवस झाले गडाच्या समोरील दरवाजापर्यंत जाण्यासाठी धडपडत असताना बुरुजाच्या बाजूने ‘अहिवंतगडावर’ प्रवेश कसा होणार? असे सगळे विचार ‘दाऊदखानाला’ पडले ज्योतिषाचा हा सल्ला त्याला आजिबात पटला नाही.
परंतु हा ‘मुंगळा’ आणि ‘ज्योतिषी’ यांची
भविष्यवाणी खरी ठरली बरोबर सहाव्या दिवशी ‘अहिवंतगड’ जिंकण्याच्या उद्देशाने
महाबतखानाने जोरदार हल्ला करण्याची तयारी सुरु केली. ती जोरदार हल्ल्याची तयारी
मराठ्यांनी ‘अहिवंतगडावरून’ पहिली. ही जोरदार तयारी बघून मुघल ‘अहिवंतगड’ घेणारच
अशी चिन्हे दिसू लागली तसेच ‘अहिवंतगडावरील’ अन्नधान्य आणि पाणीसाठा समाप्त झाला
होता. याच दरम्यान मुघलांनी केलेल्या हल्ल्यांना तोंड देत असताना मराठ्यांचे बरेचसे सैन्य जखमी झाले होते आणि
हल्ले जसे वाढत होते तसे मनुष्यबळ कमी पडत चालले होते आणि मुघलांचा वेढा अत्यंत
कडक असल्याने दुसरी काही मदत यायची शक्यता नव्हती. या सर्व गोष्टींना पाहून
‘अहिवंतगडावर’ असलेल्या मराठ्यांच्या किल्लेदारापुढे फक्त दोन पर्याय उपलब्ध होते
ते म्हणजे शरण जाणे किंवा मरणे. शेवटी सर्व विचार करून ‘अहिवंतगडावर’ असलेल्या
किल्लेदाराने शरण जाणे हा पर्याय निवडला.
अहिवंतगडावरील 'खंडोबा'.
परंतु ‘अहिवंतगडाबाहेर’ कसे पडणार हा
देखील मोठा प्रश्न त्या किल्लेदारासमोर उभा होता कारण किल्ल्याच्या दरवाजावर
‘महाबतखान’ सर्व तयारीनिशी बसलेला आहे त्याच्याशी बोलायला गेले तर सर्वांची कत्तल
होणार हे नक्की होते म्हणून मराठ्यांच्या किल्लेदाराने एक युक्ती लढवली त्याने
‘अहिवंतगडावरील’ मातब्बर माणसे बुरुजाच्या एका छोट्याश्या पाऊलवाटेवरून समोर
मोर्चा देऊन असलेल्या ‘दाउदखानाकडे’ पाठवून दिली. ही बुरुजाची छोटीशी पाऊलवाट
‘दाऊदखान’ याच्या मुख्य शामियान्या मधून दिसत देखील नव्हती. हे सर्व मराठे
‘अहिवंतगडावरून’ कुठून उतरून आले हे पाहून ‘दाउदखान’ याला आश्चर्य वाटले. या सर्व
मराठ्यांनी ‘दाऊदखानाकडे’ याचिका केली आणि शरण आले. मराठ्यांनी आपल्याला जीवाचे
अभय मिळत असेल तर आम्ही गड मुघलांच्या ताब्यात देऊ असा किल्लेदाराचा निरोप त्यांनी
‘दाऊदखानाला’ सांगितला.
‘दाऊदखानाने’ तला आलेल्या मराठ्यांची विनंती ताबडतोप मान्य केली. मुघलांचे सर्व सैन्य पाठवून त्याने ‘अहिवंतगडाचा’ ताबा मराठ्यांकडून मिळवला आणि गडावरील मराठ्यांना दरवाजातून वाट मोकळी करून दिली. गडावरील एकाही माणसाची कत्तल न कर्ता सर्व मराठ्यांना जीवनदान दिले हे पाहून मात्र इतके दिवस ‘अहिवंतगडाच्या’ दरवाजासमोर ठाण मांडून बसलेला ‘महाबतखान’ मात्र आवाक झाला. या झालेल्या प्रकारामुळे महाबतखान मात्र अस्वस्थ झाला. या सर्व झालेल्या प्रसंगामुळे ‘महाबतखान’ याचा स्वत:च्या डोळ्यांवर आजिबात विश्वास बसत नव्हता. त्याचे मुख्य कारण म्हणजे इतके दिवस ‘महाबतखान’ याने आणि त्याच्या सैन्याने ‘अहिवंतगड’ जिंकण्यासाठी एवढे कष्ट घेतले होते तसेच हाल सोसले होते आणि त्या बदल्यात मला काय मिळाले आणि किल्ला जिंकण्याचे श्रेय कोणाला मिळाले, तर ‘दाऊदखानाला’ या गोष्टीमुळे ‘महाबतखान’ याची तळपायाची आग मस्तकाला भिडली आणि तेथून ‘महाबतखान’ चिडून आपले सैन्य घेऊन लगेचच नाशिकला निघून गेला.

अहिवंत गडावरून दिसणारा 'अचला किल्ला आणि तौल्या डोंगर.
अश्या प्रकारे ‘दाऊदखानाशी’ वाटाघाटी करून मराठ्यांनी आपला कार्यभाग साधला आणि प्रचंड आकाराचा आणि अभेद्य असा ‘अहिवंतगड’ मुघलांच्या स्वाधीन झाला. ‘अहिवंतगड’ ताब्यात आल्यावर ‘दाऊदखान’ मात्र प्रचंड खुष होता. त्याने आपल्या पदरी असलेल्या ज्योतिषाच्या भविष्यावर प्रचंड मोठे बक्षीस दिले असे ‘तारीखे दिल्कुशा’ या ‘भीमसेन सक्सेना’ याच्या ग्रंथात लिहितो.
हे सर्व झाल्यावर काही दिवसांमध्ये महाबतखान आणि दाऊदखान यांना औरंगजेब याच्याकडून मात्र भलतेच बक्षीस मिळाले. ‘महाबतखान’ याच्या बद्दल कोणीतरी औरंगजेबाकडे चहाडी केली की तो आतून शिवाजी महाराजांना मिळालेला आहे. म्हणून संशयी औरंगजेबाने ‘महाबतखानाला’ सप्टेंबर १६७१ साली परत बोलावून घेतले. परंतु त्याच्याआधीच ‘दाऊदखानाला’ औरंगजेबाने परत बोलावून घेतले होते अश्या प्रकारे ‘अहिवंतगड’ जिंकल्याचे बक्षीस ‘महाबतखान’ आणि ‘दाऊदखान’ यांना मिळाले. ‘अहिवंतगड’ जिंकल्याचे वर्णन ‘भीमसेन सक्सेना’ आपल्या ‘तारीखे दिल्कुशा’ या ग्रंथात असे लिहितो, ‘अहिवंतचा किल्ला म्हणजे गगनाला भिडल्यासारखा. तो सर होईल हे बुद्धीला पटेना. परंतु खरोखरच सहाव्या दिवशी दाऊदखानाच्या मोर्च्यावरून अहिवंतगड सर झाला’.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत: लिहिलेल्या पत्रामध्ये काही किल्ल्यांचे उल्लेख केलेले आहेत असे हे नशीब काही किल्ल्यांनाच लाभते त्यापैकी एक नशीबवान किल्ला म्हणजे ‘अहिवंतगड’ होय. इ.स. १६८० च्या जानेवारी महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सावत्र भावाला म्हणजेच तंजावरच्या व्यंकोजीराजांना एक पत्र लिहिले. त्या पत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात “राजश्री मोरोपंत त्या प्रांती पाठविले होते, त्यांणी अहिवंत म्हणजे जैसा काही पनाळा; त्याचे बरोबरी समतुल्य आहे, दुसरा नाहवागड, बागलाणच्या दरम्यान मुलकात आहे, तोही कठीण तोही घेतला. हे दोन किल्ले नामोषाचे पुरातन जागे कबाज केले”. असे वर्णन केलेले आहे. पुढे हा किल्ला मराठ्यांनी लगेचच जिंकून घेतला आणि इ.स. १६८५ सालापर्यंत या किल्ल्याचा ताबा मराठ्यांकडे होता. इ.स. १७५३-५४ साली निजामाकडून घेतलेल्या नाशिक मधील किल्ल्यांमध्ये ‘अहिवंतगड’ देखील होता.

अहिवंतगडावरून दिसणारा दिंडोरीचा परिसर आणि ओझरखेड धरण.
शेवटी इ.स. १८१८ साली साली ‘कॅप्टन ब्रिग्ज’ याने ‘अहिवंतगड’ इंग्रजांच्या वतीने जिंकून घेतला. जेव्हा ‘कॅप्टन ब्रिग्ज’ याने ‘अहिवंतगड’ जिंकला तेव्हा त्याने किल्ल्याचे वर्णन करताना ‘अहिवंतगडाला’ विशाल आणि आकारहीन डोंगर असे म्हटलेले आहे. किल्ल्यावर प्रवेशद्वाराच्या काही खुणा आणि उध्वस्त झालेल्या भांडार गृहाचे काही अवशेष सोडल्यास बाकी काही नाही. तसेच इ.स. १८२० साली जनरल लेक याने देखील लिहिले आहे की “या किल्ल्यांची नैसर्गिक तटबंदी इतकी आश्चर्यकारक आहे की मोठ्या परिश्रमाने आणि कौशल्याने ती मुद्दाम तयार केलेली आहे असे वाटते”.
असा हा गमतीदार मुंगळ्याच्या भविष्याच्या जोरावर जिंकलेला साखरेचा ‘अहिवंतगड’ स्वराज्यासाठी किती महत्वाचा होता हे आपल्याला लक्षात येते. अश्या अभेद्य असलेल्या ‘अहिवंतगडाची’ भटकंती नक्कीच करायला हवी.

अहिवंत गडाचा भग्न दरवाजा आणि पायऱ्या.
______________________________________________________________________________________________
संदर्भग्रंथ:-
१) जेधे शकावली, शिवचरित्रप्रदीप, पृष्ठ २५:- भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे.
२) शिवापूरकर देशपांडे वहीतील शकावली, पृष्ठ ६२:- भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे.
३) तारीखे दिल्कुशा, भीमसेन सक्सेना, पृष्ठ ४१:- मोगल आणि मराठे, अनुवादक सेतुमाधवराव पगडी, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक महामंडळ, मुंबई.
४) सह्याद्री, पृष्ठ ११५:- स.आ.जोगळेकर, शुभदा सारस्वत प्रकाशन, पुणे.
५) किल्ल्यांच्या कथा आणि व्यथा:- डॉ .प्र. न. देशपांडे, शिव पब्लिकेशन्स, पुणे.
६) साद शिवकालीन दुर्गांची:- महेश तेंडूलकर, स्नेहल प्रकाशन, पुणे.
७) श्री छत्रपती नि त्यांची प्रभावळ:- सेतुमाधवराव पगडी, परचुरे प्रकाशन, मुंबई.
८) 'बुरहाने मासीर', मूळ लेखक:- सय्यद
अली तबातबा; मराठी अनुवाद; 'अहमदनगरची
निजामशाही'; अनुवादक:- भ.ग.कुंटे,
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक महामंडळ,
मुंबई.
९) गॅझेटीयर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी नासिक सेक्शन:- १८८३.
पुणे – चाकण – मंचर – नारायणगाव – संगमनेर – सिन्नर – नासिक – दिंडोरी – दरेगाव.
______________________________________________________________________________________________
१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे.
२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा.
३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या पाऊलखुणा ठेवाव्यात.
४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा
बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त
असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा
थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
behistorical.com
Ahivantgad Fort Trekkng Details, Ahivantgad Blog History | Be Historical
नाशिक
जिल्ह्यामध्ये पूर्व–पश्चिम पसरलेल्या सातमाळ डोंगररांगेमध्ये एकुण १८
किल्ले आहेत. ह्यापैकी एक प्रमुख किल्ला म्हणजे अहिवन्तगड. नाशिक शहरापासुन
अहिवंतगडास एका दिवसात भेट देणे सहज शक्य आहे. अंतर आहे सुमारे ५५ किमी.
पुण्या–मुंबईच्या दुर्गप्रेमींनी आदल्या दिवशी गडाच्या पायथ्याला असलेल्या
दरेगावतील हनुमान मंदिरात मुक्काम करावा आणि भल्या पहाटे किल्ल्याकडे कुच
करावे.
दरेवाडी गावातुन किल्ल्यावर जायला दोन प्रमुख वाटा आहेत. गावातील हनुमान मंदिराच्या मागील वाटेने सुमारे दीड तासात गडमाथा गाठता येतो. ह्या मार्गात खडकात खोदलेल्या पायऱ्या आणि एका बुरुजाचे बांधकाम दिसते. ह्या पायऱ्यांवर नेहमी मुरमाड माती पडलेली असल्याने इथून काळजीपूर्वक चढावे लगते. या तुलनेने दुसरा मार्ग खुप सोपा आहे. किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला असलेले बेलवाडी आणि दरेगाव ह्या गावांना जोडणारी खिंडीची वाट अहिवन्तगडाला खेटूनच जाते.
ह्या
मार्गाने जाताना किल्ल्याच्या साधारण अर्ध्या उंचीपर्यत गाडीने जाता येते.
सुमारे ३०–४० मिनिटांच्या सोप्या चढणीने गडमाथ्यावर प्रवेश होतो. ह्या
मार्गाने किल्ल्यावर जाताना वाटेत खडकात खोदलेल्या पायऱ्या, दरवाजा आणि
देवड्यांचे उध्वस्त अवशेष दिसतात. किल्ल्याचा मोठा विस्तार, गडमाथ्यावर
असलेले वाड्याचे, धान्य कोठाऱ्यांचे अवशेष, कातळातील खोदीव अनेक गुहा,
घोड्याची पागा, दोन मोठाली तळी हे सर्व दुर्गावशेष हे सिद्ध करतात कि
अहिवन्तगड एक प्रमुख लढाऊ किल्ला होता.
किल्ल्यावर
एक अष्टकोनी आकाराचे छोटेसे पाण्याचे टाके आहे. येथील पाणी पिण्यायोग्य
आहे. ह्या टाक्याशेजारी एक अश्वारूढ खंडोबाची मूर्ती दिसते तसेच गडाच्या
मधोमध एक हनुमानाची आणि वणीच्या सप्तशृंगीमाते प्रमाणे अष्टभुजा देवीची
मुर्ती आहे. घोड्यांच्या पागेमधील घोड्याचे दावे बांधण्यासाठी डोंगरामध्ये
कोरलेल्या खोबण्या, तलावांचे पाणी उताराकडे वाहुन जाऊ नये म्हणुन पाण्याला
घातलेला बांध असे मुद्दाम अभ्यासपूर्वक पहावेत असे दुर्गावशेष अहिवंतगडावर
पहायला मिळतील. सर्व दुर्गावशेषांसोबत गड फिरायला सुमारे तीन तास तरी नक्की
लागतात.
मोघलांच्या
ताब्यात असलेला अहिवंतगड छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७० मध्ये स्वराज्यात
शामील केला. मराठ्यांनी मोघलांचे इतर अनेक किल्ले जिंकले नन्तर सुरतेवर
हल्ला करून सुरत लुटली. या कारवायांनी संतप्त झालेल्या औरंगजेबाने महाबतखान
या सरदाराला किल्ले परत मिळवण्याचा हुकूम केला. महाबतखानाने दिलेरखानासोबत
अहिवंतगडाला वेढा दिला. महाबतखानाने किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या दिशेने
आणि दिलेरखानाने पिछाडीला मोर्चे बांधणी केली. सुमारे एक महिना उलटला तरी
अहिवंतगड मोघलांना दाद देत नव्हता. तेव्हा एखाद्या दन्तकथेत शोधावी अशी
घटना घडली.
दिलेरखानाच्या छावणीत एक ज्योतिषी आला. अहिवंतगड कधी ताब्यात येईल असे ज्योतिषाला विचारल्यावर त्याने साखरेने किल्ल्याचा नकाशा काढला आणि महाबत व दिलेरचे मोर्चे देखील काढले. ज्योतिषाने आपल्या जबळील पेटीतून एक मुंगळा काढून नकाशावर सोडला. मुंगळा प्रथम महाबतखानाच्या मोर्चाकडे गेला पण लगेच मागे वळुन दिलेरखानाच्या मोर्चाकडे गेला आणि तिथून किल्ल्याकडे वळाला.
यावरून
ज्योतिषाने असे भाकीत केले कि महाबतखानाकडून किल्ल्याच्या महादरवाजच्या
बाजुने चिवट हल्ला होईल मात्र किल्ला अखेर दिलेरखानाच्या ताब्यात
होईल.ज्योतिषाची हि भविष्यवाणी सहा दिवसांनीच खरी ठरली. किल्ल्यातील
दारुगोळा आणि धान्य संपत आल्यामुळे मराठ्यांनी किल्ला मोघलांच्या ताब्यात
द्यायचे ठरवले. महाबतखान अतिशय तीव्र व त्वेषाने हल्ला करत असल्यामुळे
मराठ्यांनी आपला दूत दिलेरखानाकडे पाठवुन किल्ला सुपूर्त केला.
अहिवंतगड एक प्रमुख किल्ला असल्यामुळे मोघल व मराठ्यांमध्ये किल्ला ताब्यात ठेवण्यासाठी नेहमीच संघर्ष घडत गेला. अखेर १८१८ साली किल्ला इंग्रजांनी जिंकला. दोन दिवसांचे वेळेचे योग्य नियोजन केल्यास मोहनदरी आणि अचला हे अहिवंतगडाचे संरक्षक दुर्गसाथीदार देखील पाहता येतील. किल्ल्याचा मोठा विस्तार आणि अनेक अभ्यासयुक्त दुर्गावशेष गडावर उपलब्ध असल्यामुळे प्रत्येक दुर्गप्रेमीने एकदा तरी अहिवंतगडास नक्की भेट द्यावी.
साखरेचा किल्ला

श्री शिवाजी महाराज ऑगस्ट १६६६ मध्ये औरंगजेबाच्या पोलादी कैदखान्यातून आग्र्याहून निसटले आणि थेट महाराष्ट्रात येऊन दाखल झाले. या घटनेमुळे मोगल सम्राट औरंगजेब संतप्त झाला. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कुशीत शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य मोगल साम्राज्याला तापदायक ठरणार याची खात्री औरंगजेबाला पटली आणि म्हणूनच त्याने दिलेरखान, दाऊदखान, महाबतखान यांसारखे मातब्बर सरदार दक्षिणेत पाठवून मराठ्यांविरूध्द जोरदार लढा सुरू केला. या संघर्षाला इ.स. १६७० मध्ये धार चढली. बागलाण भागात मोगल आणि मराठे यांच्यामध्ये जबरदस्त धुमश्चक्री सुरू झाली. बागलाण प्रदेश त्या सुमारास कुरुक्षेत्र बनले.
शिवकालातील बागलाण प्रदेशात सध्याच्या नाशिक जिल्ह्याचा बराच भाग मोडत होता. दक्षिणेतील लष्करी हलचालींच्या दृष्टीने या भागाचे मोगलांना अनन्यसाधारण महत्व वाटत होते. मोगलांची नाकेबंदी करण्यात मराठ्यांना या भागातील उत्तुंग गिरीदुर्ग उपयुक्त होते. या गिरीदुर्गांच्या आश्रयाने मराठ्यांनी मोगलांना विलक्षण त्रस्त केले. गनिमीकावा हा तर मराठ्यांच्या हातचा मळ होता. परंतु बागलाण भागात काही ठिकाणी उघड्या मैदानात लढाया जिंकून मराठ्यांनी मोगलांना चकीत केले. इ.स. १६७० चा हा संघर्ष अभूतपूर्व होता.
बागलाण भागातील विशेषत: चांदोर पर्वतराजीतील डोंगरी किल्ले नैसर्गिक दृष्टया खरोखरीच अभेद्द होते. इसवी सन १६७० मध्ये हे किल्ले जिंकून घेण्यासाठी मोगलांनी निकराचे प्रयत्न केले. परंतू मोठ्या प्रयासाने जिंकून घेतलेले किल्ले संधी येताच मराठे अल्पावधीत अगदी सहज जिंकून घेत, त्यामुळे मोगल सरदांच्या पराक्रमावर पाणी पडत असे आणि दिल्लीला औरंगजेब क्रोधायमान होत असे. अजिंठा आणि चांदोर पर्वतराजीतील अभेद्य गिरीदुर्गांविषयी इ.स. १८२० मध्ये जनरल लेकने लिहले आहे, "ह्या किल्ल्यांची नैसर्गिक तटबंदी इतकी आश्चर्यकारक आहे की मोठ्या परिश्रमाने आणि कौशल्यांने ती मुद्दाम तयार केलेली आहे असे वाटते."
चांदोर पर्वतराजीत अहिवंत हा एक असाच विलक्षण गिरीदुर्ग आहे. दिंडोरीच्या उत्तरेला पंधरा मैलावर हा किल्ला असून गंगथडी आणि खानदेश या मराठमोळ्या भागाच्या संरक्षणाच्या दृष्टीने शिवकालात त्याचे महत्व अनन्यसाधारण होते. कारण खानदेश आणि गंगथडी भागातून किल्ल्याकडे जाणारा रस्ता अतिशय अवघड असून पावसाळ्याच्या दिवसात गंगथडीकडून जाणे केवळ अशक्य आहे.
कॅप्टन ब्रिग्ज याने १८१८ मध्ये अहिवंत किल्ल्याचे वर्णन करताना विशाल आणि आकारहीन डोंगर असे म्हटले आहे. किल्ल्यावर प्रवेशद्वाराच्या काही खुणा आणि उध्वस्त झालेल्या भांडार गुहाचे काही अवशेष सोडल्यास काहीही नाही. परंतु या गिरीदुर्गाने एकेकाळी मोगलांच्या तोंडचे पाणी पळविले होते.
वर सांगितल्याप्रमाणे इ.स. १६७० मध्ये मोगलांच्या बरोबर संघर्ष सुरू झाल्यावर शिवाजीमहाराजांनी बागलाणातील किल्ले जिंकून घेण्याचा सपाटा सुरू केला. डिसेंबर १६७० मध्ये महाराजांनी अहिवंतचा किल्लाही जिंकून घेतला. यावेळी खानदेशचा मोगल सुभेदार दाऊदखान कमालीचा अस्वस्थ झाला. औरंगजेबाची आपल्यावर गैरमर्जी होणार हे त्याने ओळखले. कारण अहिवंत किल्ला म्हणजे खानदेश आणि गंगथडी या दोन्ही भागाचा टेहळणी नाका होता. वाटेल ती किंमत देऊन अहिवंत किल्ला पुन्हा जिंकून घ्यायचे दाऊदखानाने ठरविले. मराठ्यांनी अहिवंत जिंकून घेतला त्याचे शल्य दाऊदखानाच्या मनात सलत होते. कारण किल्ला जिंकताना मराठ्यांनी दाऊदखानाला हातोहात बनवले होते. 'मराठे बर्हाणपूरची पेठ लुटणार आहेत', अशी बातमी शिवाजीमहाराजांच्या सहकार्यांनी हेतुपुरस्पर पसरवली होती. त्याचा परिणाम म्हणजे दाऊदखान प्रचंड फौज घेऊन बर्हाणपूरच्या रोखाने निघाला. परंतु अजिंठ्याच्या लेण्याजवळ आल्यानंतर त्याला कळले की मराठे अहिवंतच्या रोखाने गेले आहेत. दाऊदखानाने मोठ्या शीघ्र गतीने अहिवंतकडे वाटचाल सुरू केली. परंतु रस्त्यातच मराठ्यांनी अहिवंत किल्ला जिंकून घेतल्याचे त्याला समजले. प्रत्यक्ष लढा न होता अहिवंत मराठ्यांकडे जावा, एवढेच नव्हे तर दाऊदखान या महत्वाच्या प्रसंगी बेसावध असावा ही गोष्ट औरंगजेबाला खपण्यासारखी नव्हती.
सम्राट आपल्याला बडतर्फ करील अशी भिती दाऊदखानाला वाटू लागली. दरम्यान औरंगजेबाने महाबतखान नावाच्या सरदारास दक्षिणेत पाठवले असल्याची वार्ताही दाऊदखानाला समजली. त्यामुळे तो अधिकच बेचैन झाला. त्याच्या ह्या अस्वस्थ मन:स्थितीचा फायदा घेऊन मराठ्यांनी जानेवारी १६७१ मध्ये बागलाणातील दुसरा महत्वाचा किल्ला 'साल्हेर' जिंकून घेतला. त्यामुळे तर दाऊदखानची परस्थिती शोचनीय झाली. महाबतखान दक्षिणेत येऊन लढ्याची सूत्रे स्वत: कडे घेणार ही कल्पनाच दाऊदखानला सहन होईना. 'आपल्याला, दिल्लीला परत बोलवून घ्या' अशी विनंती त्याने औरंगजेब बादशहाला केली, परंतु त्याचा उपयोग झाला नाही.
महाबतखान इ.स. १६७१ च्या प्रारंभीच महाराष्ट्रात येऊन दाखल झाला. दाऊदखान आणि महाबतखान यांची जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात चांदूर येथे भेट झाली. महाबतखानाने दाऊदखानास योग्य ती वागणूक दिली नाही. म्हणून दोघांमध्ये वैमनस्य निर्माण झाले. असे तारीखे दिल्कुशाचा लेखक भीमसेन सक्सेना लिहितो. भीमसेन स्वत: दाऊदखानाकडे नोकरीस होता. चांदूरच्या भेटीत दोघांनी मराठ्यांविरुध्द कोणती पावले उचलायची याचा आराखडा तयार केला आणि त्याप्रमाणे अहिवंतच्या किल्ल्याला वेढा दिला.
जवळ जवळ एक महिना वेढा रेंगाळत चालला. महाबतखान आणि दाऊदखान वेगवेगळ्या दिशेने मोर्चे बांधून हल्ल्याची पराकाष्टा करत होते. परंतु यश मिळत नव्हते. किल्ल्यातील मराठ्यांची अल्पशिबंदी मोगलांच्या प्रचंड सेनेला दाद देत नव्हती. महाबतखानाच्या बरोबर किशनसिंग, (मिर्झा राजे जयसिंग यांचा मुलगा) सुजाणसिंग, शुभकर्ण बुंदेला, अनुपसिंग, तुर्क ताजखान इत्यादी मातब्बर सरदार होते. परंतु किल्ला सर होण्याची आशा दिसेना.
या वेढ्याच्या वेळी 'तारीखे दिल्कुशाचा लेखक भीमसेन सक्सेना हजर होता. अहिवंतच्या वेढ्याची तपशीलवार हकिकत त्याने दिलेली आहे. दाऊदखानच्या पदरी एक जोतिषी होता. त्याला भिमसेनने 'किल्ला केंव्हा सर होईल?' म्हणून विचारले. तेंव्हा त्या ज्योतिषाने साखरेचा एक छोटासा किल्ला तयार केला. तटबंदी साखरेची, बुरूज साखरेचा, प्रवेशद्वार साखरेचे असे त्या किल्ल्याचे स्वरूप होते. किल्ल्याभोवती उभे केलेले मोर्चेही साखरेच्या प्रतिकृतीमध्ये दर्शविले होते. ज्योतिषाने मग एक मुंगळा या साखरेच्या किल्ल्यावर सोडला. मुंगळा प्रथम महाबतखानाच्या मोर्चाकडे गेला. त्यानंतर साखरेचा बुरुज ओलांडून किल्ल्यात गेला. ज्योतिषाने सांगितले, 'महाबतखानाच्या मोर्च्याकडून किल्ल्यावर जबरदस्त मारा होईल. परंतु सहा दिवसानी दाऊदखानच्या मोर्च्याकडूनच किल्ला सर होईल.'
भीमसेन लिहितो, 'अहिवंतचा किल्ला म्हणजे गगनाला भिडल्यासारखा... तो सर होईल हे बुध्दीला पटेना. परंतु खरोखरच सहाव्या दिवशी दाऊदखानच्या मोर्च्याकडून किल्ला सर झाला.'
वास्तविक महाबतखानाने निकराचे हल्ले केले होते. परंतु किल्ल्यातील मराठ्यांनी अंत:स्थपणे दाऊदखानाशी वाटाघाटी करून किल्ल्याच्या किल्ल्या त्याच्या ताब्यात दिल्या. भीमसेन लिहतो, "या वाटाघाटी महाबतखानाच्या पश्चात झाल्या, म्हणून त्याला भयंकर राग आला."
मराठ्यांनी दाऊदखानाबरोबर कोणत्या प्रकारच्या वाटाघाटी केल्या असतील?.....दाऊदखानाने गुपचूपपणे किल्ल्यातील मराठ्यांना कसे जाऊ दिले ? ...... महाबतखानाला हा बेत कसा समजला नाही ?... या सार्या प्रश्नांचे उत्तर म्हणजे किल्ला जिंकण्याचे श्रेय मिळावे, म्हणून दाऊदखानाने 'साखर पेरणी' करून मराठ्यांना वश केले असावे. ज्योतिषाने तयार केलेल्या साखरेच्या किल्ल्याचा अर्थ तोच असावा. एरवी महिन्यापेक्षा अधिक काळ मोठ्या शर्थीने लढवलेला किल्ला केवळ पाच सहा दिवसातच मराठ्यांनी मोगलांच्या स्वाधीन कसा केला असता आणि खरा जबरदस्त मारा महाबतखानाच्या मोर्च्याकडून होत होता, मग किल्ला जिंकण्याचे श्रेय महाबतखानाला का मिळाले नाही ? दाऊदखानाशी वाटाघाटी करून मराठ्यामनी कार्यभाग साधला आणि विशाल व आकारहीन अहिवंत त्यानी मोगलांच्या स्वाधीन केला. ज्योतिष्याला दाउदखानकडून मोठी बक्षिसी मिळाली असे भिमसेन सांगतो.
मात्र दाऊदखान आणि महाबतखान या दोघांना बादशहाकडून भलतेच बक्षिस मिळाले. महाबतखानबद्दल कोणीतरी बादशहाकडे चहाडी केली की तो आतून शिवाजीला सामील आहे. संशयी बादशहाने महाबतखानाला सप्टेंबर १६७१ मध्ये परत बोलावले. दाऊदखानाला तर त्यापूर्वीच बादशहाने बोलावून घेतले होते. साखरेचा किल्ला (अहिवंत) जिंकल्याचे बक्षीस त्या दोघांना अशाप्रकारे मिळाले.
Spending half n hour on the top, we descended down till temple.Descend was more challenging due to scree. Fortunate thing was we kept our bag at safe location near temple. It saved our energy while climbing the hill. Trekking in summer is challenging only due to heat and in turn dehydration. We followed the same procedure(keeping the bags downhill) for most of the fort during our Nasik expedition. But we did not forgot to take water bottles along with us.
We reached to col at 2.20 pm. En-route we enjoyed galloping karvand(reddish berry). At the col, we greeted with lady from Bilwadi village. She told us to avoid traverse route due to slight difficulty.
![]() |
| Traverse route to reach Fort Ahivant....we followed the route to Belwadi and then to Ahivant |
En-route we had seen completely destroyed temple. It looks quite old by looking at stone architecture on the pillars. We felt really bad for such condition of our ancient monuments.
![]() |
| Destroyed temple |
Moving forward we passed besides Hanuman temple. This is the landmark to remember the trek route.
![]() |
| Hanuman temple |
From the temple ascends start.At the end of the ascend , you enter into soothing and fruitful traverse called Aamrai. Villagers have planted and grown mango trees on this hill. It was great relief from the heat. We enjoyed some raw and some ripe mangoes there.
After walking few meters in the Aamrai, you need to look for right diversion which ascends the hill. If you choose correct right diversion at the end of ascend, you will directly enter onto the fort Ahivant. Entrance from this side is completely destroyed.There are two caves near the entrance. Villagers used these caves as resting place for cows and buffaloes so it not suitable for night stay now.
![]() |
| Ahivant entrance from Bilwadi side |
![]() |
| Caves near entrance |
| Sunset from Ahivant |
| We spent our night on flat surface at top of hill |
| Achala and Tauli hill on the backdrop |
Cooking for the night had started by Ganesh. We found water near end of nalichi vaat. There is small temple near water source. Gaurav ignited the fire for cooking. The one and the only menu was Khichadi :). In a hour, we finished the cooking operation. Khichadi was awesome. It was finished within 10 minutes. I must say it was wise decision to carry cooking ration with us. We slept in open area, with wind flowing wildly throughout night. First day and night went well except heat!!!!
![]() |
| Cooking done here :) |
| Sunrise...really amazing view |
Note:
During this whole trek what I appreciated is helping nature of villagers. In our 4 days trek, each and every person we greet was extremely affable and helped immensely. Also in every village we found spacious temple. So even if you need to stay in village around these forts, you can stay easily.
१५)
"दादा रस्ता दाखवायला याल का गडावर ??" आमच्या गाडीकडे कुतूहलाने बघणा-या एका मध्यमवयीन गृहस्थाला मी विचारलं.
"आवो काय बी गरज नाय माणूस संगत न्यायची. हितून…....... "
"दादा आम्ही पहिल्यांदा आलोय इथे. " मी त्याचं वाक्य मधेच तोडलं. "किल्ला
आकाराने प्रचंड आहे हे आम्हाला माहित आहे. त्यात वर धुकं आहे.आणि आजच
आम्हाला पुण्याला निघायचंय. त्यामुळे तुम्ही गावातला माहितगार माणूस बरोबर
द्या. आम्ही त्याची बक्षिसी त्याला देऊ." आता मात्र त्यांचाही निरुपाय
झाला.
"थांबा कोनी मिळतंय का बघून येतो." ते गृहस्थ आम्ही फिल्डिंग लावायच्या
मोहिमेवर निघाले . वेळ जशीजशी पुढं सरकत होती तसं ढगांआडून सूर्यकिरणं
अहिवंतच्या माथ्यावर पडू लागली. पंधरा - वीस मिनिटं हा ऊन - सावलीचा खेळ
सुरु होता. अहिवंतचा आकार डोळ्यात तर सोडाच पण कॅमे-याच्या सिंगल
फ्रेममधेही मावत नव्हता !!! अहिवंतच्या पायथ्याला मधोमध उभं राहिलं तर
दोन्ही बाजूंनी त्याचे कडे आपल्याला गिळंकृत करायला निघाल्याचा भास व्हावा
इतका अहिवंतचा आकार प्रचंड आणि अस्ताव्यस्त आहे. अहिवंतच्या डाव्या कडयाला
चिकटलेला बुध्या डोंगर ते अहिवंतचा उजव्या बाजूचा कडा हे संपूर्ण अंतर
बघण्यासाठी जवळपास १८० अंशामध्ये मान फिरवावी लागते !!! हा किल्ला एक
भन्नाट अनुभव ठरणार याची प्रचीती पायथ्यापासूनच यायला लागली होती.
पिंपरी अचला - नांदुरी रस्त्यावरून दिसणारा अहिवंतचा अनोखा आकार. उजवीकडे बुध्या डोंगर
वणी - नांदुरी रस्त्यावरून अहिवंत
"दादा,ह्यांला घेऊन जा गडावर. सगळं माहित हाये ह्यांना. अख्खा गड फिरवून
आणतील तुमाला." दरेगावच्या गावक-याचा आवाज आला. मी मागं वळून पाहिलं तर
कोणी दिसेचना. नंतर बघितलं तर तीन - साडेतीन फुट उंचीच्या आणि सात - आठ
वर्षांच्या तीन पोरांना ते महाशय घेऊन आले होते. एखाद्या किल्ल्याची
गावातल्या पोक्त आणि अनुभवी माणसाला नसेल तितकी माहिती ह्या "किडोज" ना
असते हा पूर्वानुभव असल्याने मला त्यांच्यावर अविश्वास ठेवायचं कारण उरलं
नाही.
"नावं काय तुमची ???"
"ह्यो सुनील,मी सुरेश अन हा सागर. तीन येस (तीन S !!)." ही पोरं
'एक्स्ट्राऑर्डीनरी' आहेत याविषयी आता आमची खात्रीच पटली होती. पाण्याच्या
बाटल्या भरून आम्ही गडाची वाट पायाखालून घालायला सुरुवात केली. आमच्या
ग्रुपात आज एक लईच भारी बदल झाला होता. काल शारीरिक परिस्थिती बिघडलेला
गोखले आज पुन्हा बरं न वाटू लागल्याने गाडीची चौकीदारी करत गावातच थांबला
आणि दस्तुरखुद्द काका आमच्याबरोबर अहिवंतवर यायला निघाले !! आजच्या
दिवसातला आश्चर्याचा पहिला धक्का. "घरदार आणि कामधंदे सोडून कुठं कुठल्या
गडावर तडमडायला जाता तुम्ही" हे आमच्या मृगगडच्या ट्रेकच्या वेळी म्हणणारा
ड्रायव्हर एकीकडे आणि "तुमच्या किल्ल्यांविषयीच्या चर्चा आणि इथल्या
डोंगरांचे आकार बघून मलाही तुमच्याबरोबर यावंसं वाटलं." हे म्हणणारे काका
एकीकडे. एकाच व्यवसायाच्या दोन व्यक्तींची दोन टोकाची रूपं. ट्रेकिंगविषयी
सुतराम कल्पना नसलेल्या एखाद्या माणसालाही सह्याद्री त्याच्या काही टक्केच
दर्शनानं कसं स्वत:च्या प्रेमात पाडतो याचं काका म्हणजे उत्तम उदाहरण
होतं. न जाणो उद्या या काकांना कोकणकड्यावर,राजगडाच्या बालेकिल्ल्यावर
किंवा अलंग - मदन वर घेऊन गेलो तर स्वत:चा रथ चालवण्याचा उद्योग बंद करून
ते आमच्या ग्रुपची लाईफटाईम मेंबरशीप घेतील याविषयी आता माझ्या मनात कसलीच
शंका उरली नव्हती !!!
दरेगावचे त्रिदेव !!! डावीकडून सुनील,सुरेश आणि सागर
दरेगाव मधून (डावीकडे) बुध्या डोंगर आणि (उजवीकडे ) अहिवंत
बुध्या डोंगर क्लोजअप
दरेगावमधून किल्ल्याकडे पाहिलं की अहिवंतच्या डावीकडे असलेल्या
बुध्याच्या पायथ्यापर्यंत जाणारी एक सोंड गावातल्या शेतात उतरलेली दिसते.
दरेगावमधून निघाल्यावर पंधरा वीस मिनिटात आम्ही त्या सोंडेवरून चढायला
सुरुवात केली. पहिली पाचेक मिनिटं सोडली तर पुढचा चढ खडाच होत चालला होता.
गावातली पोरं तर त्या चढावर मेंढरं धावावीत तशी सैरावैरा धावत होती आणि
त्यांच्यामागून जवळपास पंधरा वीस मिनिटांनी आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचत
होतो. त्या तिघांच्या मानानं आमचा स्पीड बघता अहिवंतवर पुण्यातून ज्येष्ठ
नागरिक संघाची पावसाळी सहल आली आहे असं कोणाही नवख्या माणसाला वाटून गेलं
असतं !! बुध्याच्या पायथ्यापर्यंतचा चढ ब-यापैकी उभा आहे. पण ट्रेकमधला
शेवटचा किल्ला काहीतरी स्पेशल वागणूक देणारंच हे डोक्यात ठेवून आम्ही पावलं
उचलत होतो. सुनील,सुरेश आणि सागरने तर कमालच चालवली होती. त्यांच्या
नजरेच्या टप्प्यात आम्ही दिसलो की आमच्या नजरेच्या टप्प्याच्या बाहेर
जाईपर्यंत ते कुठेतरी पळत जायचे आणि आम्ही दिसत नाहीये हे त्यांना कळालं की
पुन्हा तेवढंच अंतर कापून ते मागे (अर्थातच पळत ) यायचे आणि त्यानंतर
आमच्याबरोबर पुन्हा त्याच रस्त्यावरून त्याच वेगाने चढाई सुरु. (देवा….
प्लीज मला एवढा फिटनेस दे. मी पिझ्झा खाणं सोडून देईन !!!). तिघांनाही
अर्थातच दम लागणं वगैरे प्रकार माहीतच नसावा. शेवटपर्यंत आम्ही त्यांना
गाठू शकलो नाही हे तितकंच कटू सत्य आहे.
बुध्याच्या पायथ्याला आम्ही आता येउन पोहोचलो होतो. समोरच्या मोहनदरी
किल्ल्याचं नेढं आणि उजवीकडची सप्तशृंगची ढगांच्या मागून डोकावणारी शिखरं
आता स्पष्ट दिसत होती. दरेगाव बरंच खाली दिसत होतं एवढीच काय ती
अचिव्हमेंट. काकांचं मात्र करावं तेवढं कौतुक कमी आहे. दोन दिवस गाडीचं
यशस्वी सारथ्य करूनही आमच्यात सगळ्यात पुढे राहण्याचं कसब आम्ही अहिवंत
उतरून पुन्हा दरेगावात येईपर्यंत त्यांनी शेवटपर्यंत अगदी 'बरकरार' ठेवलं
होतं.
"गडावर रोज येता का तुम्ही??" दरेगावातल्या त्या समद्विभूज त्रिकोणाला मी विचारलं.
"पावसाळ्यात रोज नाय पण बाकी वेळा गडावर क्रिकेट खेळायला जातो." हे
त्यांचं वाक्य ऐकताच हे तिघं जणू गावातली बाकीची वानरसेना घेऊन चंद्रावर
क्रिकेट खेळायला जात असावीत असल्या नजरेने आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे
पाहिलं. वास्तविक अहिवंतचा आकार बघता त्याच्या माथ्यावर क्रिकेट आणि
फुटबॉलच्या मॅचेस एकाच वेळी होऊ शकतील याविषयी दुमत असण्याचं काही कारण
नाही. बुध्याच्या पायथ्यापर्यंतचा चढ संपून त्याच्या आणि अहिवंतच्या
खिंडीतली आडवी वाट आता सुरु झाली होती . ही वाट जिथे संपते तिथे उजवीकडे
वरती अहिवंतच्या कड्यात एक छोटी गुहा खोदलेली आहे. इथून डावीकडे वळलो की
मात्र अहिवंत आणि बुध्या यांच्या खिंडीतली अत्यंत खड्या आणि पूर्णपणे
अंगावर येणा-या चढाची नाळ सुरु होते. सत्तर अंश कोनातली ही नाळ चढायला जरी
पंधरा वीस मिनिटांची असली तरी पायाखालच्या सुट्या दगडांमुळे आणि भुसभुशीत
वाळूमुळे आपल्या तोंडाला चांगलाच फेस आणते. त्रिमूर्ती ती नाळ पार करून पळत
पळत जेव्हा बुध्या आणि अहिवंतच्या खिंडीत पोहोचले तेव्हा आम्ही फक्त
नाळेचे पहिले पाच फुट चढलो होतो !! सागर आम्हाला घ्यायला पुन्हा ती नाळ
उतरून आला तेव्हा उपस्थितांना भरून आलं !!! दरेगावातून निघाल्यापासून दीड
तासांच्या खड्या आणि घाम काढणा-या चढाईनंतर आम्ही आता बुध्या - अहिवंत
खिंडीत येउन पोहोचलो होतो . शेजारीच अहिवंत माथ्याकडे नेणा-या पाय-या सुरु
होत होत्या. नव्वद टक्के चढ संपला होता.
अहिवंत माथ्यावरून बुध्या
धुक्यात बुडालेला अहिवंतचा माथा
अहिवंतवरील छोटा तलाव
अहिवंत वरील उध्वस्त अवशेष
बुध्या - अहिवंत खिंडीतून अहिवंतच्या खोदीव पावट्या चढून आम्ही अर्ध्या तासात अहिवंत माथा गाठला. बुध्यावरही पाय-या तटबंदी,एक भक्कम बुरुज आणि पाण्याच्या जोड टाक्यांची मालिका आहे. त्यामुळे दरेगावातून अहिवंत चढल्यास बुध्या अजिबात चुकवू नये असा आहे. हे अवशेष लक्षात घेता बुध्याला अहिवंतचा उपदुर्ग म्हणायला हरकत नाही. अहिवंतचा विस्तार मात्र पायथ्यापासून दिसतो त्यापेक्षा जरा जास्तच प्रचंड आहे. गडाच्या माच्या चारही दिशांना अस्ताव्यस्त पसरल्या आहेत. अहिवंतच्या मुख्य पठाराच्या मध्यभागी एक छोटी टेकडी दिसते. या टेकडीवर कसलेही अवशेष नाहीत. पण टेकडीकडे जाताना अहिवंतच्या उध्वस्त वाड्याचे अवशेष आपल्याला दिसतात. गडावर ढासळलेली अनेक जोती आहेत. टेकडीच्या पायथ्याला पोहोचण्याच्या थोडं आधी एक तलाव असून त्याच्या पलीकडच्या काठावर मारुती आणि सप्तश्रुंगी देवीशी साधर्म्य असणारी एक मूर्ती आहे. अहिवंतच्या टेकडीकडे जाताना डाव्या बाजूच्या कड्याच्या पोटात एक मुक्कामायोग्य गुहा आहे. पण स्थानिक व्यक्ती बरोबर असल्याशिवाय ती गुहा सापडणं जर कठीण आहे. अहिवंतच्या मुख्य पठारावर वास्तूंचे अनेक अवशेष पसरले आहेत. टेकडी जिथे बरोब्बर आपल्या उजव्या हाताला येते तिथे पिण्यायोग्य पाण्याचं एक छोटं कुंड असून या कुंडाच्या शेजारीच खंडोबाची एक मूर्ती दगडात कोरली आहे. इथून समोर दिसणारा अचला,तौला आणि भैरोबा डोंगराचा नजारा एकदम झकास. भैरोबा डोंगराच्या पायथ्यातून सतीबरी किंवा सत्तीबारी नावाच्या खिंडीतून बिलवडीला येणारा रस्ताही अप्रतिम दिसत होता. दरेगावमधून 'दरेगाव बारी' नावाची एक छोटीशी खिंड फोडून एक दरेगाव - बिलवडी अशा रस्त्याचे काम सध्या जोरात सुरु आहे. त्यामुळे पुढच्या दीड - दोन वर्षात ट्रेकर्सना हातगड करून व दगड पिंप्री मार्गे अचला बघून पुढे या गाडीरस्त्याने बिलवडी मार्गे दरेगावला येणं सहज शक्य होणार आहे. अचला वरून अहिवंत करण्यासाठी वणी - नांदुरी रस्त्यामार्गे दरेगाव हा सध्याचा मोठा वळसा यामुळे वाचणार आहे.
अहिवंत वरील गुहा
अहिवंतवरील गुहा (आतल्या बाजूने)
अहिवंतवरील भग्न झालेला वाडा
अहिवंत वरचा अजून एक तलाव आणि त्याच्या पलीकडे झाडाखाली दिसणा-या देवी आणि मारुतीच्या मूर्ती
अहिवंतवरील देवी आणि मारुतीची मूर्ती. माझ्याकडचा फोटो व्यवस्थित न
आल्याने माझे नाशिककर गिर्यारोहक मित्र श्री. मयुरेश जोशी यांच्या पोतडीतून
साभार.
अहिवंतवरील पाण्याचे कुंड. फोटो - मयुरेश जोशी
कुंडाच्या शेजारील खंडोबाची मूर्ती
"तुमच्या दृष्टीने एका मुंगळ्याची किंमत काय ???" मी उपस्थितांना
विचारलं. त्रिमूर्तींसकट सगळे जण माझ्याकडे 'याला नक्कीच गडावरच्या
टाक्यातलं पाणी चढलं आहे' असल्या विचित्र नजरेने बघायला लागले !!!
"मुंगळ्याला काय किंमत असणारे. पायाखाली चिरडून टाकण्याच्या लायकीचा असतो. " पका.
"पण समजा हा मुंगळा तुमचं भविष्य सांगत असेल तर ???" मी. रस्त्यावरच्या हात
बघणा-या ज्योतिषांनी पोपट सोडून मुंगळ्याची प्लेसमेंट कधी केली असला विचार
सगळ्यांच्या मनात येउन गेला असावा.
"मुंगळा भविष्य सांगतो ??? म्हणजे ??" ऋग्वेद.
जास्त कसलीही चर्चा न करता मी सगळ्यांना एक मस्त जागा बघून तिथं बसायला
लावलं. गडावरचं धुकं हळूहळू कमी होत चाललं होतं . वा-याचा वेग आणि आवाज
वाढू लागला. त्या वाहत्या वा-याने इतिहासाची पानं आता उलगडली होती……
इ.स. १६७० उजाडलं. मुघलांच्या प्रांतात झंझावातासारख्या घुसलेल्या
मराठयांनी एक एक करत पुरंदरच्या तहात दिलेले २३ किल्ले परत जिंकून घेतले.
पुन्हा एकदा सुरत लुटली आणि व-हाडातलं कारंजा नावाचं गावही लुटून फस्त
केलं. पण मराठे एवढयावरच थांबले नाहीत. नाशिक बागलाणच्या प्रदेशात असलेल्या
साल्हेर,मार्कंडया,रवळ्या - जवळया,अहिवंत यांसारखे बुलंद दुर्ग मराठयांनी
मुघलांकडून अक्षरश: ओरबाडून घेतले. मुघलांची चहु बाजूनं कोंडी झाली होती.
औरंगजेब दिल्लीत डोक्याला हात लावून बसला होता. मराठयांच्या विजयाच्या
बातम्या येतच होत्या. हे प्रकरण जर वेळीच रोखलं नाही तर मराठे पुढच्या काही
दिवसात दिल्लीवरही हल्ला करतील असं चित्र औरंगजेबाला दिसू लागलं. एखादी
मोठी मोहीम काढणं आता भागच होतं. त्याने तातडीनं गुजरातचा सुभेदार असलेल्या
बहादूरखान कोकलताश याला आणि बु-हाणपुरात तळ ठोकून बसलेल्या महाबतखानाला
मराठयांनी जिंकलेला बागलाणचा मुलुख पुन्हा जिंकून घेण्याचं फर्मान सोडलं.
महाबतखान १६७१ च्या जानेवारीमध्ये चांदवडला पोहोचला. चांदवडला त्या वेळी
मुघलांची छावणी होती. त्या छावणीचा प्रमुख असलेल्या दाऊदखान कुरेशीची
त्यानं भेट घेतली. दोन्ही खान आता मोहिमेच्या कामावर लागले. सल्लामसलत सुरु
झाली. बराच विचार करून दोघांनी मोहीम निश्चित केली…अहिवंतगड !!!
नाशिक जिल्ह्यातल्या सातमाळा रांगेत वसलेला अहिवंतगड. उंचीने आणि
विस्ताराने प्रचंड असलेलं एक बेलाग दुर्गशिल्प !!! खुद्द शिवाजीमहाराजांनी
तंजावरच्या व्यंकोजीराजांना लिहिलेल्या एका पत्रात म्हटलं आहे " अहिवंत
किल्ला म्हणजे जैसा काही पन्हाळा,त्याचे बरोबरी समतुल्य आहे. किल्ला
नामोश्याचा. पुरातन जागा आहे." स्वराज्यात पन्हाळ्याच्या बरोबरीने अहिवंतही
तितकाच महत्वाचा होता हे या पत्राने अधोरेखित केलं आहे. असा हा
प्रतिपन्हाळा जिंकून घ्यायला दाऊद आणि महाबत ही खानजोडी आता निघाली. इ.स.
१६७१ च्या जानेवारी महिन्यात दोन्ही खान प्रचंड सैन्यासह अहिवंतच्या
पायथ्याला पोहोचले.
गडावरच्या सगळ्या वाटा मुघलांनी चौकीनाके आणि मोर्चे लावून बंद करून
टाकल्या. गडावरचे मराठे एक ना एक दिवस अन्न - पाणी संपल्यावर आपल्याला शरण
येतीलच हा विचार करून दोन्ही खानांनी गडाला वेढा घातला. दाऊदखानाने आपले
मोर्चे गडाच्या एका बुरुजापाशी उभारले. हे मोर्चे गडावरून येणा-या
तोफगोळ्यांच्या आणि बंदुकीच्या गोळ्यांच्या मा-यापासून लांब राहतील अशा
रीतीने बांधले गेले. महाबतने आपला मोर्चा गडाच्या दरवाजाच्या दिशेला
उभारला. अहिवंतचा किल्लेदार कोण होता यावेळी तरी इतिहासात माहिती उपलब्ध
नाही. पण या अनामिक किल्लेदाराने अहिवंतवरून तोफा - बंदुकांचा प्रचंड मारा
करत मुघल सैन्याला किल्ल्याच्या जवळपासही फिरकू दिलं नाही.
अहिवंतला वेढा घालून आता एक महिना उलटला होता. पण गड ताब्यात यायची काहीच
चिन्हं दिसत नव्हती. दाऊदखान चिंतेत बुडाला. हे असंच सुरु राहिलं तर काही
दिवसांनी मोहीम सोडून द्यायची वेळ येईल. औरंगजेबाला काय तोंड दाखवणार आपण
?? नाही नाही… काहीतरी केलंच पाहिजे !! दाऊदखान विचार करू लागला. आता
उपाययोजना आवश्यकच होती. एक दिवस दाऊदखान त्याच्या छावणीत बसलेला असताना एक
सैनिक आतमध्ये आला. त्याने दाऊदला सांगितलं "आपल्याकडे एक अतिशय निष्णात
असा ज्योतिषी आहे. भविष्य सांगण्यात त्याचा हातखंडा आहे. किल्ला आपल्या
हातात कधी येईल याचं अचूक भविष्य फक्त तोच सांगू शकेल. " दाऊदचे डोळे
आनंदानं चमकले. आपले आपल्या परीनं पूर्ण प्रयत्न सुरूच आहेत. कर्तव्यात
कसलीही कमतरता नाही. तेव्हा बघू ज्योतिषी काय म्हणतोय असा विचार करून
दाऊदखानाने ज्योतिषाला समोर हजर करण्याचा आदेश दिला. ज्योतिषी दाऊदखानच्या
छावणीत आला. "किल्ला कधी आणि कसा जिंकला जाईल ते सांग." दाऊदने ज्योतिषाला
विचारलं. त्या ज्योतिषाने दाऊदखानाला थोडी साखर आणायला सांगितली. त्या
साखरेच्या मदतीनं त्याने जमिनीवर अहिवंतगडाचा नकाशा काढायला सुरुवात केली.
त्याने गडावरचे बुरुज जिथे होते तिथे साखरेचे छोटे त्रिकोण काढले. तसंच
मुघलांच्या पहा-याच्या जागाही नकाशात दाखवल्या.जिथे महाबतखानाचे मोर्चे
होते तिथे त्याने साखरेचे छोटे ढिगारे काढले आणि जिथे दाऊदखानाचे मोर्चे
होते तिथेही त्यानं साखरेचे छोटे ढिगारे काढले. साखरेने काढलेला अहिवंतचा
तो नकाशा पूर्ण झाल्यावर त्याने आपल्याजवळ ठेवलेला एक मुंगळा बाहेर काढला
आणि तो त्या जमिनीवरच्या नकाशात सोडला. श्वास रोखून मुघल सैन्य हा प्रकार
बघत होतं. तो मुंगळा सुरुवातीला महाबतखानाचे मोर्चे जिथे होते तिथून आत
गेला आणि परत बाहेर आला. नंतर तो दाऊदखानाचे मोर्चे जिथे होते त्या भागात
गेला आणि पुन्हा बाहेर आला. असं दोन तीन वेळा झाल्यावर तो पुन्हा एकदा
दाऊदखानाच्या मोर्च्यांपाशी गेला आणि शेवटी तिथून त्याने किल्ल्यात प्रवेश
केला. ज्योतिषाच्या चेहे-यावर आता हास्य उमटलं होतं. त्याने चटाचटा कागदावर
गणितं मांडली आणि भविष्य वर्तवलं "आजपासून सहा दिवसांनी महाबतखान
किल्ल्यावर जोरदार हल्ला करेल पण किल्ला तुमच्या बाजूने ताब्यात येईल."
दाऊदखानाला ही भविष्यवाणी पटेचना. आभाळाला भिडलेला तो अहिवंताचा किल्ला.
आपण एक महिनाभर प्रयत्नांची शर्थ चालवली आहे. त्यात महाबतखान आता
किल्ल्याच्या दरवाजाजवळ जाउन पोहचला आहे आणि तरीही हा ज्योतिषी म्हणतोय की
गड आपल्या बाजूने ताब्यात येईल ?? अशक्य !!!
सहावा दिवस उजाडला आणि ज्योतिषाने भविष्य वर्तवल्याप्रमाणे महाबतखानाने
अहिवंतगडावर जोरदार हल्ला केला. मुघल सैन्य आता इरेला पेटलं होतं.
गडावरच्या मराठयांनी मुघलांचा तो आवेश बघितला. गडावरचं धान्यही संपत आलं
होतं . महिनाभराच्या हल्ल्यांमध्ये मराठयांचे अनेक लोकही मारले गेले होते.
या परिस्थितीत किल्ला लढवणं कठीणच होतं. आता शरण जाणं हा एकच पर्याय
मराठ्यांकडे उरला. पण समजा महाबतखानाच्या बाजूने शरण गेलो तर ते लोक
आपल्याला जिवंत सोडणार नाहीत हे किल्लेदाराच्या लक्षात आलं. अखेर त्यानं
गडावरची काही मातब्बर माणसं दाऊदखानाचे मोर्चे ज्या बुरुजासमोर होते त्या
बुरूजाजवळून जाणा-या एका बारीक पायवाटेने दाऊदखानाकडे पाठवून दिली. जिवंत
जाऊ देत असाल तर किल्ला तुमच्या हवाली करतो असा प्रस्ताव त्यांनी
दाऊदखानासमोर मांडला. दाऊदखानाचं नशिबच फळफळलं !!! शामियान्यात बसून
किल्ला हातात येतोय हे बघून त्याने तत्काळ मराठयांची विनंती मान्य केली.
आपलं सैन्य पाठवून त्यानं गडाचा ताबा घेतला आणि महाबतखान ज्या दरवाजासमोर
मोर्चे लावून बसला होता त्याच दरवाजातून त्यानं मराठयांना गडाखाली जाण्याची
वाट दिली. महाबतखानाला हा प्रकार समजला आणि तो चकितच झाला. गेले महिनाभर
शर्थीचे प्रयत्न करून हाती येत नसलेला अहिवंतगड आज दाऊदखानाने इतक्या
सहजपणे कसा काय ताब्यात घेतला ?? गडावर सगळ्यात जास्त हल्ला आपल्या बाजूने
झाला आणि मराठे दाऊदखानाला कसे काय शरण गेले हेच त्याला कळेना. आपल्याला गड
मिळाल्याची साधी बातमीही दाऊदखानाला देता आली नाही ?? त्याला एकटयाने
निर्णय घ्यायला कोणी सांगितलं होत ??? संतापाने महाबतखान थरथर कापत होता.
महाबतखानाने प्रयत्नांची शिकस्त करूनही अहिवंतच्या विजयाचं श्रेय मात्र
दाऊदखानाला मिळालं होतं. यावरून त्याची आणि दाऊदखानची अहिवंतच्या पायथ्याला
प्रचंड भांडणं झाली. अखेर चिडलेला महाबतखान तिथून निघाला आणि नाशिकला जाऊन
राहिला.
इकडे दाऊदखानाची मात्र दिवाळी सुरु होती. औरंगजेबाकडून आता
किताब,सन्मानही मिळणार होता. दाऊदखानानं किल्ल्याचं भविष्य सांगणा-या
ज्योतिषाला प्रचंड मोठं इनाम दिलं. महिनाभरापूर्वी जिंकण्यासाठी केवळ अशक्य
वाटणारा अहिवंतगड एका मुंगळ्याच्या करामतीनं मुघलांच्या ताब्यात आला होता
!!!!
अहिवंतसारख्या महाबलाढ्य किल्ल्याची ही कथा केवळ एक दंतकथा नसून
प्रत्यक्षात घडलेली एक सत्यघटना आहे. जेधे शकावली आणि खुद्द मुघलांचा
समकालीन इतिहासकार असलेल्या भीमसेन सक्सेना याने लिहिलेला "तारीखे
दिल्कुशा" यांसारखी अस्सल समकालीन साधनं या घटनेची साक्षीदार आहेत !!!
गोष्ट संपून दोन तीन मिनिटं झाली तरी कोणाच्या तोंडून शब्दच फुटेना.
आश्चर्याचा सगळ्यात मोठा धक्का बसला होता तो सुनील,सुरेश आणि सागरला.ज्या
गडाच्या पायथ्याला आपण राहतो त्याचा इतिहास इतका रोमांचकारी आहे यावर
विश्वास ठेवणं त्यांना कठीण जात असावं. "दादा,आजपर्यंत इतक्या लोकांना
गडावर घेऊन आलो पण ही गोष्ट फक्त तुम्हीच सांगितलीत. आम्ही आता यापुढे जे
लोक येतील त्यांना पण हा इतिहास सांगू !!!" ही त्यांची प्रतिक्रिया म्हणजे
मी हा इतिहास सांगताना केलेल्या वेळेच्या गुंतवणुकीचं ख-या अर्थाने झालेलं
चीज होतं !!!
अहिवंत वरून दिसणारा अचला किल्ला. पायथ्याला बिलवडी गाव
अहिवंतची ईशान्येकडील (दरेगावाच्या उजवीकडील माची)
अहिवंतमाचीवरील भग्न दरवाजा व पाय-या
अहिवंतमाचीवरील पाण्याचं टाकं
माचीवरून दिसणारा अहिवंतगडाचा विस्तार व बुध्या डोंगर
त्रिदेवांनी "आमी तुमाला सगळा किल्ला फिरवून पलीकडून खाली उतरवू" अशी गॅरंटी दरेगावातून निघतानाच दिली होती. अहिवंतमाचीवरून त्या गुहेमार्गे खाली उतरणा-या रस्त्यामार्गे आपण बिलवडी गावात जाऊ शकतो किंवा पुन्हा दरेगावातही येऊ शकतो. अहिवंतमाचीकडे जातानाही बरीच उध्वस्त बांधकामं दिसतात.त्रिदेवांना मुंगळ्याची गोष्ट ऐकल्यापासून इतिहासात भलताच रस निर्माण झाला होता. त्यामुळे अहिवंतमाचीकडे जाता जाता त्यांना सिंहगडाच्या तीन हत्तींची गोष्ट,रामसेजच्या वेढ्याच्या वेळी मुघलांनी केलेली काळी जादू, औरंगजेबाने तंतुवाद्यांची काढलेली अंतयात्रा वगैरे गोष्टी मी त्यांना सांगत होतो. अहिवंतचा ईशान्येकडचा दरवाजा जवळ येत चालला होता. चिन्मय आणि सेना मागून येत होती. अचानक डावीकडे दिसणा-या सह्याद्रीच्या कड्यांवरचं ढगांचं आवरण हळू हळू बाजूला होऊ लागलं. एखाद्या अनामिक शक्तीने रोखल्यासारखा मी जागीच खिळून थांबलो. पाच मिनिटं अशीच गेली आणि…….आजी म्या ब्रम्ह पाहिले !!! क्षितीजरेषेवर सह्याद्रीतलं आपलं दुस-या क्रमांकाचं शिखर उत्तुंगपणे उंचावत महाराष्ट्राचा दुर्गसम्राट अर्थात साल्हेर किल्ला ढगांच्या आडून बाहेर आला होता !!!! आनंदाला उधाण आलं !!! ट्रेकच्या पहिल्या मिनिटापासून असलेली इच्छा ट्रेकच्या शेवटच्या क्षणी पूर्ण झाली होती. शेजारचा सालोटा आणि त्याच्या उजवीकडे मुल्हेर - हरगडही आता पूर्णपणे स्पष्ट झाले होते. साल्हेरच्या मागे आपलं बोट उंचावलेला 'टकारा' सुळकाही स्वच्छ दिसत होता. भान हरपायला लावणारं एक दृश्य. केवळ अप्रतिम !!! डोळे भरून आम्ही कितीतरी वेळ हा नजारा आम्ही बघत होतो. कॅमे-याच्या टप्प्याच्या पलीकडे असले तरी साल्हेर - मुल्हेर डोळ्याला मात्र स्पष्ट दिसत होते. एक अविस्मरणीय अनुभूती आज मिळाली होती. मंत्रमुग्ध होऊन आम्ही आता पायथ्याला परतत होतो.
अहिवंतमाचीच्या कडयातली गुहा. ही गुहा जनावरांनी खराब केल्याने मुक्कामायोग्य नाही.
अहिवंतमाची - खालच्या बाजूने
अहिवंतची ईशान्य माची अर्ध्या पाऊण उतरून आम्ही खालच्या डांबरी रस्त्याला लागलो.दरेगाव आता फक्त पंधरा - वीस मिनिटांच्या अंतरावर राहिलं होतं. हे अंतर कापत असताना मनात मात्र अनेक विचारांची गर्दी झाली होती. किती रूपं सह्याद्रीने ह्या दोन दिवसात आपल्याला दाखवली. मग ते अचलाचं तौला शिखर असो किंवा मोहनदरीचं नेढं. अहिवंतचा डोळ्यात न मावणारा प्रचंड विस्तार असो किंवा साल्हेरचं आभाळाला भिडलेलं परशुराम शिखर !!! कितीही म्हणलं तरी सह्याद्रीचं देणं या जन्मात तरी फिटायचं नाही. आणि ते फेडणारे आपण कोण !!! सह्याद्रीच्या अस्मानी कड्यांपुढे कायम नतमस्तक असणारे आपण कायम त्याचे कृतज्ञच राहणार आहोत. सातमाळेच्या सहा गिरिदुर्गांनी सह्याद्रीचं एक नवं साम्राज्य उलगडून दाखवलं होतं. निसर्गाचे अनेक रंग दाखवले होते. एक परिपूर्ण डोंगरयात्रा आज सफल झाली होती !!!
ओंकार ओक















































No comments:
Post a Comment