Saturday, April 11, 2026

हरिहर

      महाराष्ट्रातील प्रत्येक गडाला स्वतःचे असे वेगळेपण आहे. काही किल्ले त्यावर घडलेल्या इतिहासामुळे प्रसिद्ध आहेत तर काही किल्ले त्यांच्या दुर्गवैशिष्ठमुळे प्रसिध्द आहेत   उभ्या कड्यात ७० अंशाच्या कोनात असलेल्या खोदीव पायऱ्या या दुर्गवैशिष्ठमुळे प्रसिध्द असलेला असाच एक गड म्हणजे हरिहरगड.  संपुर्ण महाराष्ट्रातील गड-किल्यांत अतिशय दुर्मिळ असा प्रवेशमार्ग या गडावर आजही शिल्लक आहे .काही किल्ले असे आहेत की ज्यांचे नुसते फोटो पाहिलेत की तेथे भेट द्यावेसे असे वाटते. त्यापैकीच एक असलेला नाशिक जिल्ह्यातील ब्रम्हगिरीच्या पश्चिमेस साधारण २० कि.मी. अंतरावरील सोपानाचा गड म्हणून ओळखला जाणारा हरिहरगड किंवा हर्षगड  समुद्रसपाटी पासून ११२० मी. उंची लाभलेला, त्रिकोणी माथ्याचा हा गड दुर्गयात्रीच्या परिचयाचा आहे तो म्हणजे त्याच्या काताळ कोरीव पायऱ्यांनी व अंतिम टप्प्यापर्यंत खोदलेल्या बोगद्यातून तर कधी नाळेतून कराव्या लागणाऱ्या चढाईनं, या पायऱ्या नुसत्या डोळ्यांच पारणं फेडीत नाही तर अक्षरश: मोहून टाकतात.

      या सोपानांची किंवा पायऱ्यांची महती एवढी थोर की इस.१८१८ सालात मराठाशाही बुडविण्यासाठी आलेल्या इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिग्ज हा इंग्रज अधिकारी याच्या नुसत्या पायऱ्या बघूनच आश्चर्यचकीत झाला व उद्गारका ” या किल्ल्याच्या पायऱ्यांच वर्णन शब्दात करणं कठीणच. सुमारे २०० फुट सरळ व तिव्र चढाच्या या पायऱ्या अति उंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारख्या वाटतात.” गड किल्ल्यांच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफांनी उद्ध्वस्त करुन क्रांतिकारकांचे मनोध्येर्य खच्ची करणाऱ्या इंग्रजाने हरिहर किल्ल्याचे यथार्थ केलेले वर्णन किल्ल्याच्या महतीत अधिक भर घालते. अर्थात कॅप्टन ब्रिग्ज याने या सुंदर पायऱ्यांच्या मार्गला मात्र हात लावला नाही हे वेगळ सांगायला नको.
 
https://lh3.googleusercontent.com/-pw29YPa89N0/Vi3FJ5poIDI/AAAAAAAAO3w/RDO54dHDwTA/s640-Ic42/IMG_4369.jpg

https://lh3.googleusercontent.com/-HpHAiKvqBpA/Vi3Fp-f1boI/AAAAAAAAO6s/YZSs9Wf94Bg/s640-Ic42/IMG_4392.jpg
हरिहर गड मागच्या बाजूने

      पण आज त्याचे हे सौंदर्य त्याच्या मुळावर उठले आहे. मुंबई-पुणे-नाशिक या शहराशी असलेली या गडाची जवळीक यामुळे या गडावर आयोजकांकडून भटकंतीचा बाजार भरत आहे. शनिवार-रविवार या दिवशी गडावर होणाऱ्या भयानक गर्दीमुळे येथे एखादा अपघात होण्याची शक्यता आहे. अशा गोष्टीना वेळीच आवर घालायला हवा. नाशिक जिल्ह्यात सेलबारी- डोलबारी, अजंठा- सातमाळ, त्र्यंबक या डोंगररांगा आहेत. यातील नाशिकच्या पुर्वेस व इगतपूरीच्या दक्षिणेस पसरलेल्या त्र्यंबक डोंगररांगेत भास्करगड, हर्षगड, त्र्यंबकगड, अंजनेरी, रांजणगिरी, गडगडा, बहुला असे अनेक किल्ले दिसुन येतात. हरिहर हा या त्र्यंबक रांगेतील त्र्यंबकगडा पाठोपाठ महत्त्वाचा दुसरा किल्ला. प्राचिन काळापासून नाशिक हे बाजारपेठ म्हणून प्रसिध्द आहे. डहाणु बंदरातून नाशिककडे येणाऱ्या डहाणु- जव्हार- गोंडाघाट -अंबोली घाट- त्रिंबक- नाशिक या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी घाटावर बांधलेल्या दुर्गशृंखलेत गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हरीहर भास्करगड या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली.
  हरिहर या गडाचे नाव हरिहर कसे पडले याची एक कथा पद्मपुराणातील कथा आहे 

    पौराणीक साहीत्यानुसार त्रिंबक हे त्रिसंध्या क्षेत्र होते. जगात काहीच नव्हते त्यावेळी ब्रम्हा आणी विष्णु यांनी सृष्टीच्या आदी आणि अंताचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला. ब्रम्हाने आदीचा म्हणजे मस्तकाचा शोध घेतला तर विष्णुने अंताचा म्हणजे पायाचा! पुर्ण रुपाचे ज्ञान मात्र दोघांनाही झाले नाही  आपणच नीर्माण केलेल्या सृष्टीचा शोध न लागल्याने ब्रम्हाला कमीपणा वाटला.त्याने गायीची साक्ष ठेवुन खोटेच सांगीतले कि त्याला मस्तक सापडले,  त्यावर केतकीचे फुल होते .या खोटेपणाचा राग येऊन भगवान शंकरांनी  तु पृथ्वीवर अपुज्य होशील असा शाप दिला  .त्यावर ब्रम्हदेवानेही रागाने ' तु पर्वत होशील असा शाप दिला, तोच ब्रम्हगीरी पर्वत प्रत्यक्ष  शिवशंकर डोंगर बनुन पृथ्वीवर स्थापीत झाला. ब्रम्हाला दिलेला शाप त्यांच्या भोळ्या रुपास बघवला नाही व त्यांने  हा पर्वत ब्रम्हगीरी म्हणुन ओळखला जाईल असा वर दिला , अशी ही पद्मपुराणातील कथा

  या कथेनुसार विष्णु हरीहर रुपात डोंगर बनुन प्रकटले तर इंद्र अंजनेरी पर्वताच्या रुपाने ! त्यांच्या जोडीला आसपास वेगवेगळे पर्वत देवी देवताच्या रुपाने प्रकटले\
हरीहर म्हटले की त्याचा ब्रम्हगीरीशी येणारा संबंध अटळ आहे. या दोन्ही किल्ल्यात अनेक बाबतीत साम्य आहे
. दोन्हीही डोंगर बेलाग आहेत. 
. त्यावर प्राचीन काळात बलदंड आणि देखण्या स्वरुपाचे कातळ कोरीव बांधकाम करुन अजोड किल्ले बांधण्यात आले . दोन्ही किल्ल्यांचे कर्ते अज्ञात आहेत
     या गडाला हर्षगड असे नाव का पडले याची मनोरंनात्मक दंतकथा सागितली जाते ती अशी. मुगल सैन्याचा गडाला वेढा पडला. गडावर कमी शिबंदी असून सुध्दा ती गडावरुन दगडधोंडे फेकून मोगलांना वर चढू देत नव्हती. दोन महिने गड झुंजला. गडावरची धान्यसामुग्री संपत चालली होती. त्यामुळे आता काय करावे हा प्रश्न किल्लेदाराला पडला. तेव्हा त्याच्या म्हाताऱ्या आईला एक कल्पना सुचली. तिने आपल्या मुलाला म्हणजे किल्लेदाराला हजार दीड हजार पत्रावळ्या आणि मोठा टोप भर भात व वरण करायला सांगितले. दोन अडीज महिन्याचा वेढा बाहेरून कुमक, रसद मिळण्याची शक्यता मावळलेली. त्यातून गडावरील शिधा संपत आलेला. अश्यावेळी या म्हातारीला काय खा खा सुटलीय. परंतु मातृ हट्टपायी किल्लेदाराला आईचे बोलणे मान्य करावे लागले. गडावर पत्रावळ्या बनविल्या गेल्यात. भात डाळ शिजविले गेले. नंतर किल्लेदाराच्या आईने गडकऱ्यांच्या मदतीने तो भात वरणात कालवून पत्रावळीला फासला आणि वाजंत्री लावून नाचत गाणी गात आरडाओरडा करत त्या खरकट्या पत्रावळ्या गडावरुन खाली भिरकावल्या. गडावर वाजणारी वाध्ये, चाललेला जल्लोष व आतषबाजी पाहून अगोदरच दोन अडीज महिन्याच्या वेढ्याने  कातावलेल्या मुगल सैन्याच्या सरदाराला आश्चर्य वाटले.  वर लेकाचे खुशाल गाणी काय गाताहेत, नाच काय करताहेत, जेवणावळी काय उठताहेत, आनंदोत्सव काय साजरा करताहेत. या अर्थी गडावर शिधा साहित्य भरपूर आहे आणि इथे आपण अन्न-पाण्याशिवाय गडाखाली तळ ठोकून वेढा घालून बसलोय. अशीच परिस्थिती पुढेही राहिली तर आपण मात्र नक्कीच उपासमारीने मारून जावू. असा विचार करून मुगलांनी वेढा उठविला आणि चालते झाले. हे पाहून किल्लेदाराला प्रचंड हर्ष झाला. तेव्हा पासून या गडाचे नाव पडले हर्षगड.

  याच हरिहर गडाच्या संदर्भात आण्खी एक दुर्गकथा सांगितली जाते. 

        एकदा हर्षगडाला इंग्रजांच्या सैन्याने वेढा घेतला होता. किल्ल्यावर दारूगोळ्ळा व शिबंदी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्यांना तो किल्ला सर करता येईना. इंग्रजांच्या तोफांच्या माऱ्यामुळे किल्ल्यातील वास्तू कोसळून दगडाविटांच्या मलब्याखाली दबून किल्ल्यावरील बहुतांशी शिबंदी गारद झाली. पण इतकी हानी होऊनही किल्ला इंग्रजांच्या हाती येण्याची चिन्ह दिसेनात. या गोष्टीचे इंग्रजांना आश्चर्य वाटले. इतका दारूगोळा खर्च करून, अनेक वेळा तोफा डागून निष्पन्न काय, तर फक्त धूर आणि आवाज!
       इंग्रजांच्या तोफांच्या सरबत्तीला किल्ल्यावरून प्रत्युत्तर मिळत होते, पण तेही अधूनमधून 'परंतु एक गोष्ट मात्र नियमितपणे सुरू होती आणि ती म्हणजे उष्ट्या पत्रावळ्या! दररोज सकाळी व संध्याकाळी बऱ्याचशा उष्ट्या पत्रावळ्या किल्ल्यावरून खाली पडत होत्या. त्या पत्रावळ्यांच्या संख्येवरून इंग्रज चांगलेच चक्रावून गेले होते. किल्ल्यावर अजून किती शिबंदी आहे याचा अंदाज त्यांना काही केल्या लागत नव्हता. किल्ल्यावरून नित्यनियमाने भिरकावल्या जाणाऱ्या पत्रावळ्यांबरोबरच कधी कधी काही पागोटीही तटबुरुजांवरून वर डोकावत आणि अचानक नाहीशी होत! त्यामुळे इंग्रजांना या सर्व गोष्टींचा काहीच उलगडा होईना.
         शेवटी इंग्रज सेनापतीने किल्ल्यातील नेमकी परिस्थिती जाणून घेण्याकरिता दोन हुशार हेरांना किल्ल्यावर पाठवले. त्यांनी आडवाटेने कड्याकपाऱ्यांवरून किल्ल्यात प्रवेश केला. आत गेल्यावर त्यांना समजले की, किल्ल्यात शिबंदी नसून आत फक्त म्हातारेकोतारेच आहेत! तरणेबांड असे कोणीच नाही! थोड्याबहुत स्त्रिया आहेत, त्याच किल्ला झुंजवण्याची कामे करतात! आणि किल्ल्यावर मोठी शिबंदी अजूनही शिल्लक आहे हे भासवण्यासाठी त्या पत्रावळ्यांना पिठले-भात चोपडून खाली भिरकावून देतात! इतकेच नाही, तर अधूनमधून त्या डोक्याला पागोटे गुंडाळून तटबुरुजांवरून खाली डोकावत असतात! मग ते हेर किल्ल्यावरून खाली उतरले आणि इंग्रजांच्या छावणीत येऊन पोहोचले. त्यांनी किल्ल्यावरची सर्व बित्तंबातमी इंग्रज सेनापतीला सांगितली.
भग सेनापतीने काही सैनिक किल्ल्यावर पाठवले. त्यांना किल्ल्यावरून फारसा प्रतिकार झाला नाही. ते किल्ल्यात शिरले आणि मुख्य दरवाजा उघडून किल्ल्याची वाट मोकळी केली. तशी इंग्रजांची फौज भराभर डोंगर चढून वर गेली. इंग्रजांनी हर्षगडात प्रवेश करून तो रीतसर काबीज केला आणि आपला युनियन जॅक त्यावर फडकवला. हर्षगड पडला खरा, पण त्या दुर्दैवी स्त्रियांचे नशीब झोपले, ते कायमचे.
      वरील दंतकथेला ऐतिहासिक साधनामधून दुजोरा देणारा पुरावा अजूनही समोर आलेला नाही. 'चतुर आजीबाई' या दंतकथेपेक्षा ही थोडी वेगळी आह

P1310569-a.jpg
   आता पाहूया या गडाचा इतिहास…
हरिहर  उर्फ हर्षगड हा कुणी बांधला हे नक्की सांगता येण कठीण पण त्याची बांधणी पहाता तो प्राचिन काळात बांधला गेला असावा. याबाबत दुमत नाही.
   तेराव्या शतकत देवगीरीच्या यादवांचा त्रिंबकगड व परीसरावर अंमल होता . इसवीसन १२९४ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीच्या यादवांचा पाडाव करताच मुसलमानी राजवटींने या परीसरात आपले हातपाय पसरायला सुरुवात केली .१३४७च्या सुमारास दक्षिणेत बहामनी राज्य निर्माण झाले ;१४००च्या सुमारास त्याची शकले होऊन दक्षिणेत पाच मुसलमान शाह्या निर्माण झाल्या .इसवीसन १५५३ ला त्रिंबकची लिखीत नोंद आढळते . बिझामशाहाने ३० डिसेंबर १५५३ मध्ये तो ताब्यात घेतला
        त्यावेळची ५८ किल्ल्यांची यादी सैय्यद अली तबातबा हा त्याच्या बुऱ्हाने मासीर या फार्सी ग्रंथात करतो   १५६५ च्या तालीकोटच्या लढाईत विजयनगरचे वैभवशाली राज्य लयास गेले आणि दक्षिण भारताला एकप्रकारचा सांस्कृतीक धक्का बसला .मुसलमानी राजवटीची राळ उठताना त्रिंबक परीासरातले सत्ताधीश इथले मुळ निवासी हिंदु महादेव कोळ्यांनी जोरदार प्रतीकार केला पण तो शेवट पर्यंत टिकु शकला नाही. 
      शहाजींची १६३६ ला सोडचिठ्ठी   दक्षिणेत मुघलांचा प्रवेश तब्बल चाळीस वर्षे रोखला गेला तो मलिक अंबरच्या कडव्या प्रतीकारामुळे  यात मलिक अंबरला बहुतांशी काळ  ‘स्वराज्य संकल्पक   शहाजी महाराजांची मोलाची साथ होती . मुघलांसारखी प्रबळ सत्ता दक्षिणेत आली तर हिंदवी स्वराज्य संकल्पनेला धोका पोहोचु शकते यासाठी शहाजींनी मुघलांच्या विरोधात खटाटोप केला.  शहाजी महाराजांनी क्षीण होत चाललेली अहमदनगरची निझामशाही वाचविण्याचा अटोकाट प्रयत्न केला
        मलीक अंबरच्या मृत्युपश्चात  निजामशाहीत मोठी अंधाधुंदी माजली . निजामशाहीला वारस उरला नाही तेव्हा शहाजी महाराजांनी ९ वर्षांच्या मुर्तझा निझामला पेमगीरी किल्ल्यावर नेऊन गादीवर बसविले .त्यांनी अनेक मुसलमान सरदारांकडे निजाामशाही वाचविण्यासाठी याचना केली , पण त्यांना हवी तशी साथ मिळाली नाही.
         इकडे मुघलाच्या आक्रमणाचा धोका भेडसावत होता . शेवटी त्यांनी गुप्तपणे राजधानी माहुली किल्ल्यावर हलवली . त्यांच्या हालचालीचा सुगाव लागल्याने मुघल व आदीलशाहा यांनी शाहजींचे व त्यांच्या सोबतच निजामशाहीचे पारीपत्य केले हा संघर्ष शहाजींनी शरणागती पत्कारल्यानंतर संपुष्टात आला . शहाजी राजांनी लहानग्या मुर्तझाला मुघलांकडे सुपुर्द केले . त्याच बरोबर त्यांच्या ताब्यातील निजामशाही प्रदेश देऊन टाकला . त्यात त्रिंबकगड व हरीहरगडाचाही समावेश होता . इसवीसन १६३६ ची ही हरीहरची नोंद अत्यंत महत्वाची . त्यानंतर या दोन्ही गडांवर फार अल्पकाळ हिंदुंचा अंमलाखाली राहीला.
     शिवाजी महाराजानी स्वराज्याची भरपाई करण्यासाठी सुरतेची दुसऱ्यांदा लुट केली . लुट घेऊन परतत असताना १७ ओक्टोबर १६७० ला दिंडोरी येथे लढाई झाली . त्याच सुमारास मोरोपंत पिंगळे यांनी त्रिंबकगड घेतला . देवगीरीच्या यादवांनंतर शहाजी आणि त्यानंतर मोरोपंत पिंगळें असा हा मोठा कालखंड . शिवाजी महाराजांनी या गडाचे नाव बदलुन श्रीगड ठेवले अशी नोंद सभासद बखरीत आढळते .इतीहासात युद्ध करुन त्रिंबकगड घेतल्याची उदाहरणे फारच दुर्मीळ ,त्यातलेच हे एक !
     त्रिंंबकगड पडल्यानंतर हरीहर , भास्करगड ,अंजनेरी गडाचे काय झाले याचा मात्र कोणताच उल्लेख सापडत नाही  .एकदा ताब्यात आल्यानंतर त्रिंबकगड किमान दहा वर्षे तरी मराठ्यांकडे राहीला .शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर औरंगजेब स्वत  :दक्षीणेत उतरला . त्याने आदीलशाही व कुतुबशाहीचा घास गिळला . मराठेशाहीकडुन त्याला कडवा प्रतीकार होत राहीला . १६८२ मध्ये अंकाईचा किल्ला मसलत करुन मिळाल्यानंतर औरंगजेबने रामसेज या नाशिक जवळच्या लहानशा किल्ल्याच्या रुपाने दक्षीणेचे प्रवेशद्वार खुले करण्याचा प्रयत्न केला . हे द्वार त्याला दीर्घ काळ उघडता आले नाही . असे म्हणतात की , हा संघर्ष दीड किंवा तीन वर्षे तरी चालला असावा
        रामसेज युद्धाच्या वेळेस त्रिंबकगडालाही मुघलांचा वेढा पडला . पण त्रिंबकगड काही त्यांच्या ताब्यात आला नाही .याच कालावधीत हरीहरचा किल्ला सुद्धा मराठ्यांकडेच असावा त्रिंबकगडावरुन रामसेजकडे मराठ्यांना पोहोचणारी रसद मुघलांनी रोखुन धरली . युद्दात यश येत नाही असे पाहुन औरंगजेबने फंदफीतुरीने गड घेण्याचा प्रयत्न केला . ते सगळे प्रयत्न विफल ठरत होते . १६८३ मध्ये संभाजी महाराजांच्या पदरी असलेल्या राघो खोरा (खोपडा )हा मुघलांना जाऊन मिळाला. त्याने  त्रिंनकगडाच्या किल्लेदारास वश करुन गड मिळवुन देतो असे आश्वासन बादशाह औरंगजेबला दिले ,त्याने ते मंजुर करुन त्यास ७०० जात व २०० स्वार अशी मनसब दिली . त्याने त्रिंबकगडाच्या किल्लेदारास मोठ्या मनसबीचे आश्वसन दिले . किल्लेदाराने त्याची खरडपट्टी काढुन त्यास परत पाठवीले . त्यामुळे राघो खोरा पळुन गेला

     त्याच्या मार्फत मध्यस्ती करणाऱ्या जमनाजी नावाच्या माणसाला मुघलांनी अटक केली . आपला राघो खोराशी काहीच संबंध नाही हे वारंवार पटवुन दिल्यानंतर जमनाजीची सुटका झाली व त्याची मनसब कायम ठेवण्यात आली  त्रिंबकगड औरंगजेबच्या दृष्टीने प्रतीष्ठेचा प्रश्न बनला . त्याने नासीक उर्फ गुलशनाबादचा ठाणेदार मातबरखान यास त्र्यंबकगड घेण्यास पाठविले . त्याने सहा महीने वेढा घातला .गडावर रसदेचा एक दाणाही जाऊ दिला नाही . गडाची शिबंदी हवालदिल झाली . अखेर १६८४ मध्ये किल्लेदार शिवाजी तेलंगराव व शामराज हे गडावरुन उतरुन खाली आले . त्यांना मुघलाईत मनसबी मिळाल्या . दहावर्षे शिवशाहीत राहीलेला गड मराठ्यांच्या हातुन पुन्हा गेला .येणे प्रमाणे हा टकोरबंद गड जाताच परीसरातले इतर गड मुगलांच्या ताब्यात गेले . मुघलांकडे आता मराठ्यांचे लहानसे राज्य सोडुन अवघा हिदुस्तान ताब्यात होता . खुद्द बादशाह दक्षिणेत तळ ठोकुन होता  . कुतुबशाही व आदीलशाही बुडवुन त्याचा मराठी मुलुख घेण्याचा निकराचा प्रयत्न सुरु होते
.एक गड , एक मुलुख घेत मुघल फौजा पुढे जात व त्या माघारी मराठे पुन्हा तो जिंकुन घेत . १६८९च्या फेब्रुवारी महीन्यात संभाजी महाराजांची औरंगजेबने क्रुरपणे हत्या केली .त्यानंतर त्याला मराठ्यांचा लढा संपला असे वाटले .पण त्याचे स्वप्न शेवट पर्यंत पुर्ण होऊ शकले नाही .मराठेशाही खिळखिळी झाली तरी राजाराम महाराज आणि त्यांच्या पश्चात ताराबाईंनी पुढे हा लढा चालु ठेवला .शेवटी १७०७ साली वयाच्या ८९ व्या वर्षी तो मरण पावला  औरंगजेबच्या मृत्युनंतर भारतीय राजकारणातले चित्र वेगाने बदलत गेले .संभाजी पुत्र शाहु मुघलांच्या कैदेतुन सुटले . महाराष्ट्रात येताच त्यांनी राज्याची सुत्रे हाती घेतली . अनेक नामांकीत सरदारा मंडळी त्यांनी गोळा केली . बाळाजी विश्वानाथ पेशवा आणि मग त्या पाठोपाठ पहीला बाजारीव यांच्या नेतृत्वाखाली रणमैदानात मराठेशाहीचा वारु चौखुर उधळला . त्याने मुघलांच्या इतकाचअटक ते कटक असा विशाल प्रदेश काबीज केला . दिल्लीच्या सुलतानास त्यांनी अंकीत केले .त्रिंबक परीसरातुन चौथाई वसुलीचे अधीकार पेशव्यांकडे होते . त्रिंबकगड मात्र अजुनही मुघलांच्या वतीने हैदराबादच्या निजामाकडे होता . त्र्यंबकेश्वर येथील इनामदार जोगळेकर यांच्या बखरीतील हकीगतीत पेशव्यांनी त्रिंबकगड कशा प्रकारे काबीज केला याचे वर्णन आहे . १७५१च्या सुमारास निजामाने तहाची बोलणी करण्याची तयारी दर्शविली . त्यासाठी त्याने त्रिंबकगड आपल्याकडेच ठेवण्याची मागणी केली . पेशव्यांनी तहाची बोलणी केली .पण गड निजामाला काही दिला नाही .अशा रीतीने तब्बल ६२ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्रिंबकगड मुसलमानी जोखडातुन मुक्त झाला . त्रिंबक पडला की रांगेतले इतर किल्ले सुपुर्द होतात तोच कित्ता यावेळी कायम राहीला असण्याची शक्यता आहे . हरीहर किल्ला कोणत्या परीस्थीतीत पेशव्यांनी घेतला या संबंधीचे उल्लेख मिळु शकले नाहीत , परंतु तो पेशव्यांनी घेतला हे नक्की .तो त्रिंबकगडापुर्वीच पेशव्यांना मिळालाअसावा. हरीहर शिलालेखाचे वाचन त्याकडे संकेत करते.  शेवटी सन १८१८ मधे इतर किल्ल्यांप्रमाणे इंग्रजांनी हा ही गड मराठ्यांकडून जिंकून घेतला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांकडून भारताने स्वतंत्र मिळविले आणि सर्वच किल्ल्यांसह हरिहर उर्फ हर्षगडही  स्वतंत्र झाला.  
Harihar Fort
Fort

Fort
हरिहर गडाचा  नकाशा

      किल्ल्यावर जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत, पुढे दोन्ही मार्ग एकाच ठिकाणी येऊन मिळतात. हर्षवाडी व निरगुडपाडा ही हरिहर किंवा हर्षगडाखाली परस्पर विरुद्ध दिशेला वसलेली पायथ्याकडील गावे. "निरगुडपाडा" हे गाव खोडाळा - त्र्यंबकेश्वर मार्गावर आहे. त्र्यंबकेश्वर पासून २० किमी वर निरगुडपाडा गाव आहे. येथे जाण्यासाठी मुंबईहून २ मार्ग आहेत.
१)मुंबई - कल्याण - कसारा - खोडाळा - निरगुडपाडा ( १९४ किमी),
२) मुंबई - कल्याण - भिवंडी - वाडा - खोडाळा - निरगुडपाडा (१९० किमी)
    तसेच इगतपूरी व नाशिकहून त्र्यंबकेश्वरमार्गे निरगुडपाड्याला जाता येते. हरीहरगड व भास्करगड या दोनही गडांच्या पायथ्याचे गाव निरगुडपाडा आहे.
३. कसारा किंवा नाशिक मार्गे :-
         कसारा किंवा नाशिक मार्गे इगतपूरी गाठावे. इगतपूरीहून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी बस पकडावी. वाटेत असणारे निरगुडपाडा हे हरिहरच्या पायथ्याचे गाव आहे. गावातून किल्ल्यावर जाण्यास दोन तास पुरतात. हरिहरच्या कातळभिंती जवळ पोहोचल्यावर पुढे किल्ल्यावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायर्‍या आहेत.

४. इगतपूरी - त्र्यंबकेश्वर - खोडाळा मार्गे :-
निरगुडपाडा गावाच्याच पुढे कासुर्ली नावाचे गाव आहे. इगतपूरी-त्र्यंबकेश्वर-खोडाळा या बसने या गावात उतरता येते. या गावातून समोरच्या डोंगरावर चढून गेल्यावर हर्षेवाडी नावाची वाडी लागते. या वाडीतून या किल्ल्यावर पोहोचण्यास १ तास लागतो. ही वाट सोपी आणि कमी दमछाक करणारी आहे. कमी वेळात व कमी श्रमात संपुर्ण किल्ला पहायचा असल्यास हर्शेवाडी हा योग्य पर्याय आहे. मुंबई-नाशीक महामार्गावरून घोटीमार्गे निरगुडपाडा हे अंतर साधारण १७० कि.मी.आहे. स्वतःचे वाहन असल्यास तेथुन ५ कि.मी. अंतरावर असलेल्या हर्शेवाडी गावात कच्च्या रस्त्याने जाता येते अन्यथा निरगुडपाडा येथूनच गड चढण्यास सुरवात करावी. नाशिक-हर्शेवाडी हे अंतर त्रिंबकमार्गे ४१ कि.मी. असुन नाशीक व पुणेकरांसाठी हा मार्ग सोयीचा आहे.

. हरिहर ची कातळ समशेर

.डोंगरा पलीकडे उभा असलेला हरि

.हरिहर पहाडी कडा....कातळात खोदलेल्या पायऱ्या येथूनही दिसतायेत पहा

फ़निचा डोंगर आणि सभोवताल
.हरिहर दुसऱ्या बाजूने

..

 https://lh3.googleusercontent.com/-d69XxZuth38/Vi3FOgyRJxI/AAAAAAAAO4M/WAyT59PQnao/s640-Ic42/IMG_4373.jpg

9 
हर्शेवाडी गावामधून समोरच हरिहर ऊर्फ हर्षगडचा डोंगर दिसतो. येथून एका बंधा-याच्या काठाने पुढे साधारण पाऊण तासाची खडी चढाई केल्यानंतर आपण हरिहर किल्ल्याखालील मोकळ्या पठारावर येऊन पोहोचतो.  तर आपण निरगुडपाड्यातून आलो तर साधारणपणे १५-२० मिनिटांमध्ये आपण किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचतो. नंतरचा चढ चांगलाच दमछाक करणारा आहे. तो चढून एका तासात आपण पठारावर येतो. 

हरीहरच्या जुन्या वसाहतीलगत दगडात कोरलेले शीवशंकर

      इथून पठारावरून किल्ल्यावर जाणारी व किल्ला उजवीकडे ठेवून अर्ध्या तासात आश्रमाजवळ जाणारी अशा दोन वाटा लागतात. आश्रमाजवळून अर्ध्या तासात किल्ल्याच्या पायऱ्यांजवळ पोहोचता येते. आपल्याला जो सोयीचा मार्ग वाटेल तो मार्ग निवडावा.
माचीवर जोत्यांचे अवशेष
 
      निरगुडपाड्यावरून किंवा हर्षवाडीकडून जाताना आश्रम लागतो. वाटेत दगडी घडीव वस्तू लागते ती काय आहे त्याचा बोध होत नाही. 
त्याच्या मागे असलेल्या डोंगर उतारावरील पायथ्याकडील जागी एका उंचीवर  काही अंतरावर एक ढासळलेले कोरडे बांधीव टाके आहे.

https://lh3.googleusercontent.com/-AaGB7RNKF6c/Vi3FHHi8J-I/AAAAAAAAO3g/mrmrX7CJKjc/s640-Ic42/IMG_4368.jpg
आश्रम

https://lh3.googleusercontent.com/-qDbhUIJz2TM/Vi3E4q3QIRI/AAAAAAAAO2g/jtkhCYlmoKQ/s512-Ic42/IMG_4359.jpg
आश्रमाच्या आवारातील मारुतीराया

 टाक्याच्या पुढे एक आश्रम उभारलेला आहे. आश्रमाच्या मागे असलेल्या झाडीत काही अंतरावर हनुमान मंदीर आहे. 
11
 
वेताळ
    
आश्रमाच्या ओट्यावर शिवलिंग असून त्यामागे भगवान शिव गणरायाला मांडीवर घेऊन बसलेली नजीकच्या काळातील पीओपी ची मूर्ती आहे. त्या पुढे त्रिशूळ रोवून ठेवलेला आहे. 
हरीहर तीर्थ

त्याखाली चौकोनाकृती पुष्कर्णी आहे. पुष्कर्णीच्या घाटावरील दगडी भिंतीवर डावीकडील बाजूस गणेश प्रतिमा तर उजव्या बाजूस दगडी मकारात पुष्पाकार शिक्का सदृश्य उठावदार शिलालेख आहे.  या शिलालेखाभोवती महिरप कोरलेली असुन बाजुला दोन नक्षीदार खांब व वरील बाजुस कमळाची नक्षी व त्या खाली समोरा समोर तोंड करून चोचीत वेल धरलेले दोन मोर कोरलेले आहेत. हा शिलालेख तैलरंगात रंगवलेला असल्यामुळे काही अक्षरे वाचता येत नाहीत. सध्या येथे एका साधुचा मुक्काम असतो. गडावर मुक्काम करावयाचा झाल्यास हे सर्वात सुंदर ठिकाण आहे. 

आठ ओळीतील शिलालेख देवनागरी संस्कृत लिपीतील असून तो असा…

श्री
।।श्री गणेशाय नमः।।
धात्रवर्णा
मि शुक्रेधवल शरतिथौशंकरात्म:सु
तः श्रीमन्नारायणख्येगजगिरिरसक्यु क्तसत्शालिवाहोशकेदाण्यूपनामा
हरिहरविलसद्देवताकंसुतीर्थंप्रादद्दी ण्यातलोकश्रमनीरहरुतेश्रेयसे
             मंगलाय
या शिलालेखाची साधारणपणे शब्द फोड करता येईल ती अशी…
धात्रवर्णामि= धोतऱ्याच्या फुलांच्या रंगासारखा शुभ्र किंवा चमकदार, शुक्रेधवल= शुक्रधवल ( पांढरेशुभ्र ), शरतिथो= शर म्हणजे बाण, तिथो= तिथि म्हणजे पवित्र दिवस ( कदाचित हा शब्द क्षयतिथि असावा=  सूर्योदयानंतर प्रारंभ होणारी तिथी ), शंकरात्म:सुत:=  शंकराचा पुत्र, श्रीमन्नारायण= श्रीमन् नारायण, गजगिरिरसक्यु= गज=८ गिरि=७ रस=६ क्=१, सत्शालिवाहोशके= सत्= चांगले, शालिवाहन शके (शक संवत्सर- वर्षगणना ), दाण्यूपनामा= दाण्यू या शब्दातून दानी व दाणी असे दोन वेगवेगळे अर्थ  प्रेरित होतात. दानी= दानशूर मनुष्य किंवा धान्यावरील कर वा महसूल गोळा करणारा अधिकारी, दाणीपनामा= दाणी हे उपनाव असलेला, हरिहरविलसत्= हरिहर, विलसत्= तळपणे, चमकणे, शोभून दिसणे, देवताकंसुतीर्थंप्रादद्दी= देवतांच्या कृपेने, तीर्थंप्रादद्दीण्यात= पुण्यमय झालेली भूमी व परिसर, लोकश्रमनीरहरुतेश्रेयसे= ( लोक+श्रम+नीर+हरुते ) लोकांचे श्रम पाण्याने, हृ ( हर् ) – हरण करणे, दूर करणे, नष्ट करणे, श्रेयसे= यशासाठी, मंगलाय= कल्याणासाठी
वरील शब्द फोडीच्या क्रमानुसार वाक्यरचना न धरता शिलालेखातून खालील अर्थ निघतो ….
   श्री. श्री गणेशाला वंदन असो. धातृ नाम संवत्सरात ज्येष्ठ महिना असताना शुद्ध पक्ष पंचमी तिथीला दाणी उपनावाने विख्यात असलेल्या शंकराचा मुलगा श्रीमन् नारायण,  यांनी शालिवाहन शके १६७८ (चवथी ओळ- गज = ८, गिरि = ७, रस = ६, क् = १ याप्रमाणे ८७६१ ही संख्या येते मात्र शक मांडताना वामतो गती पध्दतीनुसार-१६७८) हरिहर पर्वतावर विलास करणाऱ्या देवतांच्या नावाने दीनजनांचा त्रास कमी करण्यास आणि आर्त लोकांचे श्रमहरण करून पुण्यप्राप्तीसाठी या तिर्थाची निर्मिती केली.

 शिलालेखाचे वाचन कसे केले ?

 हरीहरचा शिलालेख म्हणजे  इतिहासाच्या पुस्तकातले एक खुले पान ! . उन वारा पाऊस सोसत तो आव्हान देत होता,‘माझ्या अंतरंगात या,  किल्ला डोळे भरुन पाहा,  लेखातल्या अक्षराची कुट भाषा जाणा. आपण मात्र त्याला शेंदुर फासुन अत्यंत मोलाची माहीती झाकोळुन टाकत होतो.गेली अनेक वर्षे शेंदराचा थरावर थर साठत होते. कोणा भल्या माणसाला हे थर काढण्याची बुद्धी झाली . त्याने त्याच्या परीने  तो काढण्याचा प्रयत्न केला . पण मग कोणी तरी त्यास चक्क ओईलपेंटने रंगवले . वर्षानुवर्ष या शिलालेखाची अक्षरे झीजु लागली . त्यातील काही तर उध्वस्त झाली . हरीहर किल्ल्याच्या उत्तर माचीवर भल्या मोठ्या पुष्कर्णीवरचा हा शिलालेख फार अगोदर पासुन बघण्याचा योग यायचा तो श्रावणातल्या ४० मैल अंतराच्या ब्रम्हगिरी -हरीहर प्रदक्षिणेच्या निमीत्ताने  जुने नाशिक भागातली मंडळी ही प्रदक्षिणा नित्यनियमाने करत असतात.  .अनेक वर्षे हा खटाटोप चालला. जुन्या काळात कोणी तरी दगडात कोरलेली काही अक्षरे इतकेच सर्वांच्या ठायी त्याचे महत्व होते . 
               शिलालेखावरचा शेंदुर काढल्या नंतर अक्षरांचा उठाव अधीक स्पष्ट झाला होता. .छायाचित्रातुन मात्र तो स्पष्ट होत नव्हता काही अक्षरे अजिबत लागत नव्हती. काही अक्षरे ओईल पेंटच्या रंगमुळे अस्पष्ट झाली तर उजव्या बाजुची काही उध्वस्त झाल्याचे जाणवले.  शिलालेख कुंडातल्या पाण्याने स्वच्छ धुवुन अक्षरांची वरची बाजु कोळशाने गिरवली. त्यामुळे अक्षरांचे वळण कळण्यास मदत झाली . मग त्याची छायाचित्रे घेतली . नंतर शिलालेख चुलीतल्या राखेने धुवुन ओल्या विटेच्या रंगाने अक्षरे गिरवुन पाहीली
. ही छायाचीत्रे वेगवेगळ्या कोनातुन घेतली .अगोदर वाचन करताना अडचण जाणवणारी अक्षरे हाताने चाचपुन ओळखण्याचा प्रयत्न केला . त्याची टीपणे तयार केली  घरी परतल्यानंतर छायाचित्रांचे आवलोकन केले तेव्हा शक ,संवत्सर वाचता आले . दुसऱ्या ओळीतली श्री गणेशायनम  हे अक्षर पटकन वाचता येते. अभ्यासकांनी ते वाचले आहे .त्यापुढची चार अक्षरे लागत नव्हती . पाचव्या ओळीत शेवटच्या भागात पनामा हा शब्द वाचता येत होता .हा पनामा काय असेल याचा बोध होत नव्हता .

शेंदुर फासल्याने बुजलेलीअक्षरे

       . सहाव्या ओळीत हरीहर वीलसद्देवता ही अक्षरे लागतात ,पण शेवटचे अक्षर लागत नव्हते . त्या खालचे अक्षरही लागत नव्हते . शंकरात्म सुत श्रीमन्नारायण ही अक्षरे स्पष्टपणे वाचता आली . शक संवत्सर कळाले होते , त्यावरुन शंकराचा मुलगा नारायण ...नारायण शंकर ...या शब्दावरुन सरदार नारोशंकर यांच्याकडे संकेत जात होते   त्रिंबकचे महत्व मराठ्यांच्या राजकारणात अनन्यसाधारण होते  . म्हणजे त्रिंबकगड मुघलांकडे असला तरी शिवाजी महाराज त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत . नानासाहेब पेशव्यांच्या वेळी त्रींबकगड पेशवाईत नव्हता तरी ते त्रिंबकराजाच्या भेटीस यायचे . गडाच्या पायथ्याला कुशावर्त तीर्थात सिंहस्थ कुंभमेळ्यात स्नान करत . आता गड अधीकृतरीत्या ताब्यात आला म्हटल्यावर त्यांनी मंदीराच्या जागी मुघलांनी  बांधुन ठेवलेली  मशीद पाडुन १६५५ मध्ये नवे मंदीर बांधण्याचे काम सुरु केले . त्यावर पेशव्यांनी १० लक्ष रुपये खर्च केला .हे काम सतत ३१ वर्षे सुरु होते . हे काम सुरु असतानाच हरीहर  किल्याच्या उत्तर माचीवर विस्तीर्ण आकाराची पुष्कर्णी बांधण्यात आली असावी . ही कोणी बांधली याबद्दल आजवर अनभीज्ञता होती . पुष्कर्णीवर उठावाचा सुंदर असा शिलालेख शेंदुर फासल्यामुळे वाचणे कठीण होते . इतीहासाच्या अभ्यासकांनी वेळोवेळी शिलालेख वाचण्याचा प्रयत्न केला पण कोणीच त्याचे पुर्ण वाचन केले नव्हते.  .अमीत बोरोले यांचे दुर्गभ्रमंती नाशीकची या पुस्तकात हरीहर शिलालेखाचे वाचन असल्याची माहीती  मिळाली , त्यानुसार ते पुस्तक बघीतले पण त्यात पुर्ण वाचन नव्हते.
       जी अक्षरे लागत नव्हती याकरीता काही जुन्या छायाचित्रांचा संदर्भ मिळवील . या कामी नाशिकच्या वैनतेयचे अंबरीश मोरे यांच्या एका छायाचित्राची बरीच मदत झाली . पण ते छायाचित्र सुद्धा ओईलपेंटचा रंग दिल्यानंतरचे होते . तथापी ते उत्तम कॅमेऱ्यातुन घेतल्याने त्यावरुन शकाची व पु्ष्कर्णी बांधली त्याची माहीती वाचण्यास मदत झाली . शिलालेखावरचर हरीहराचे नाव मात्र स्पष्ट दिसत होते .ते इतर वाचकांनी त्यांच्या साहीत्यात नमुद केले आहे . आता हळु हळु एक एक गोष्ट उलगडायला लागली . शंकराचा मुलगा नारायण हे नाव स्पष्ट झाले . खालच्या ओळीत पनामा हा शब्द छळत होता . हा पनामा काय असावा  ?यावर खल सुरु असताना नाशिकमधल्या एका संस्थानीक घराण्यातुन  राजेबहाद्दर हे मुळचे दाणी असल्याचे व ते सासवडचे असल्याची माहीती मिळाली . मग या पनामा अक्षराच्या अगोदर असलेल्या दाणी नावाचा उलगडा झाला - दाण्युपनामा ही उकल झाली
.शिलालेखावरचे शक व तिथी मिळाली पण संवत्सर व महीन्याचे नाव स्पष्ट होत नव्हते . पंधराच दिवसांपुर्वी त्र्यंबकेश्वर मंदीराच्या शिलालेखाचे वाचन करण्याचा योग आल्याने त्याच्या लगतचे म्हणुन संवत्सराचे नाव वाचण्यास मदत झाली . जुन्या संस्कृत ग्रंथातुन मासाचे नाव स्पष्ट करता आले . अशा प्रकारे हरीहराच्या शिलालेखाचे पुर्ण वाचन झाले . राजेश दीक्षीतने खरोखरच मोठे कसब लावत लेखाचे वाचन व त्याचे भाषांतर करुन दिले. 

   हा शिलालेख शके १६७८ म्हणजे सन १७५६ काळातील असून तेंव्हा नानासाहेब हे पेशवे पदावर होते. नारायण शंकर दाणी म्हणजेच नारोशंकर हे पेशव्यांचे बिनीचे म्हणजे आघाडीचे किंवा पहिल्या फळीतील सरदार होते.
नारोशंकर हे नांव आलेच आहे तर त्यांच्या विषयी थोडेसे जाणून घेवू.

कोण होते नारोशंकर
          वेगवेगळ्या कालखंडात नाशिक हे महत्वाच्या राजवटींच्या राजधानीचे केंद्र होते .जसे यादव, अभीर ,राष्ट्रकुट, त्रैकुटक , बागुल इत्यादी .तद्वताच नाशिक शहर हे सरदारांचे शहर म्हणुन ओळखले जाते . सरदार रास्ते , सरदार  विंचुरकर , सरदार राजेबहाद्दर , पवार घराणे,अशी काही नावे आजच्या पिढीला कळतात ती त्यांच्या शहरात पसरलेल्या वास्तु ,मंदीरे आदींशी निगडीत नावांमुळे .गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर नारोशंकराचे मंदीर प्रसिद्ध आहे .हे रामेश्वराचे शिवालय १७४७ साली  बांधण्यात आले .त्यास १८ लाख रुपये खर्च आला .उत्तर महराष्ट्रातले मराठा काळातल्या सर्वोत्तम मंदीरात याची गणना केली जाते .  या मंदीराची भली मोठी घंटा नाशिकची सांस्कृतीक ओळख बनली आहे . नाशिक महानगरपालीकेच्या मानचिन्हात तीचा वापर करण्यात आला आहे.

    नारोशंकर यांचे वडिल शंकरपंत विजापूर दरबारी दिवाण होते. वडिलांच्या मृत्यु पश्चात त्यांची तीनही मुले आबाजी, लक्ष्मण व नारायण सासवडला परत आलेत. कुटुंबाची परिस्थिती बिकट झाली म्हणून पत्नीला सासुरवाडीला ठेवून नशीब आजमाविण्यासाठी नारोशंकर स्वतः मात्र वानला येथे नोकरीला गेलेत. तेथे एका मोठया सावकाराचा उमदा घोडा खूप आजारी पडला. नारोशंकर विजापूरला असताना काही वैद्यकीय ज्ञान मिळविले होते. त्या अनुभवावर सावकाराच्या घोड्यावर उपचार करताच तो बरा झाला. सावकाराचा शब्द होता की जो कोणी घोड्याला आजारातून बरा करील त्याला दोन हजार रुपये इनाम देईन. त्याप्रमाणे नारोशंकराला ते इनाम तर मिळालेच पण त्या सावकाराने नारोशंकराला दरमहा दीडशे रुपयाची नोकरीही दिली. काही वर्षानंतर त्यांनी सावकाराची नोकरी सोडली व ते सासवडला परत आलेत. नारोशंकर राजेबहाद्दुर यांच्या कामगिरीवर नजर टाकली तर ते पेशवाईतले पहील्या फळीतले सरदार कशामुळे गणले जात याची प्रचीती येते .घोड्याच्या पागेची निगा राखणाऱ्या साधारण शिपायापासुन त्यानी इतकी मोठी मजल मारली 
      सन १७२० पर्यंत ते उदाजी पवारांच्या हाताखाली शिलेदार होते. या काळात सन १७२८ मध्ये मराठ्यांच्या माळव्यात हालचाल सुरू केल्यात यात त्यांचा सहभाग होता. थोरले बाजीराव यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी  सन १७२९ मध्ये पोर्तुगीजांविरुद्ध मोहीम सुरू केली त्यात नारोशंकर सहभागी होते.  त्यांनी वसईचा किल्ला जिंकला. सन १७३० नंतर त्यांचा उल्लेख मल्हारराव होळकर यांच्या पदरी असल्याबद्दलचा सापडतो. त्यांच्या सैन्यात राहून नारोशंकराने काही लहान मोठ्या लढायात भाग घेऊन पराक्रम गाजवला. मल्हाररावांनी नारोशंकराची हुशारी व कर्तबगारी ओळखून त्यांना वरच्या हुद्याच्या जागाही दिल्यात. पुढे मल्हाररावांच्या शिफारशीवरून थोरल्या बाजीरावाने नारोशंकराला इंदूरचा सुभेदार नेमले.
     बुंदेलखंडाच्या छत्रसाल राजाने थोरल्या बाजीरावाने मदत केली म्हणून मराठ्यांना बुंदेलखंडाचा एक भाग देऊन टाकला. त्या भागातील नवास या भांडखोर जमातीने बंडाळी माजवून चौथाई व सरदेशमुखी मराठ्यांना देणं बंद केले. त्यांच्या बंदोबस्तासाठी पेशव्यांनी मल्हारराव किसन व ज्योतिबा शिंदे यांना रवाना केले. परंतु या कामी त्यांना अपयश आले. तेंव्हा होळकरांच्या सल्ल्याने पेशव्यांनी ही कामगिरी नारोशंकरावर सोपविली. नारोशंकरांनी आपल्या सैन्याच्या मदतीने नवास जमातीचे बंड मोडून काढले व चौथाई सुरळीत केली. त्यानंतर पेशव्यांनी नारोशंकराला ओरिसा प्रांतातील राजावर स्वारीस पाठविले. नारोशंकरांनी त्या स्वारीत अकरा लाख रुपये महसुलाचा भाग मिळविला. पेशवे खुष झाले. त्यांनी त्यांना झाशीचे सुभेदार नेमले व राजे ही पदवी दिली.    .नारोशंकरांच्या तलवारीचा उत्तरेत मोठा दरारा होता . 
      सन १७४२ साली पेशव्यांनी नारोशंकराची रवानगी ओर्छा राज्यावर केली. झाशी जवळील ओर्छा हे छोटे राज्य. तेथील मुसलमान राजाने पेशव्यांविरुद्ध पुंडाई केली होती. नारोशंकर ओर्छावर चालून गेले. त्यांनी त्या राजाला कैद करून शृंखला बांधून झाशीच्या किल्ल्यात ठेवले व ओर्छा राज्यावरुन गाढवांचा नांगर फिरविला. सर्व ओर्छा राज्यावर पेशव्यांचा अंमल झाला. नंतर राजाशी नारोशंकरांनी तह केला. झाशीचा किल्ला मराठ्यांना मिळाला. त्या किल्ल्याखाली नारोशंकरांनी गाव वसविले. ते गाव म्हणजेच आजचे झाशी शहर. सन १७४२ ते १७५६ पर्यंत नारोशंकराचा अंमल झाशीवर होता. झाशी शहरात अजूनही नारोशंकर तळ या नावाचा एक भाग आहे. झाशीच्या सुभेदारीची सूत्रे हातात घेतल्यानंतर त्यांनी झाशीचे वैभव वाढविले. नारोशंकर १७४२ ते १७५९ असे पुढची पंधरा वर्षे झांसीचे सुभेदार होते . (मराठी विश्वकोष खंड ६) त्यांच्या काळात झांसी शहराची भरभराट झाली. तिकडे झासी शहर वसत होते,पेठा निर्माण होत होत्या, किल्ला मजबुत केला जात होता . इकडे पेशव्यांना एक छदामही मिळत नव्हता . त्यावरुन पेशव्यांकडे दरबारातच नारोशंकरच्या कारवायांची कागाळी करण्यात आली. त्यांनी जातीने हजर राहुन पेशव्यांना उत्तरेत महत्वाचे ठाणे उभे केल्याचे पटवुन दिले . 
       त्यामुळे पेशव्यांची नाराजी संपुष्टात आली. इतकेच नव्हे तर पेशव्यांकडून जी जी कामगिरी त्यांच्यावर सोपविण्यात येई ती ते चोख रितीने बजावत असत. महसूलाच्या रकमा वसूल करण्यात त्यांची कामगिरी विशेष असे. यामुळे पेशवे संतुष्ट झाले व त्यांनी त्यांना मोत्याचा चौकडा दिला. हा चौकडा नारोशंकर नेहमी वापरीत. त्यामुळे त्यांना गमतीने मोतीवाले नारोशंकर असे म्हटले जाई.
सन १७४७ मध्ये त्यांनी नाशिक पंचवटी परिसरातील गोदावरी तटावर रामेश्वर मंदिर बांधले.व पोर्तुगीजांकडून एक भली मोठी घंटा घेऊन ती मंदिरावर बांधली आजही तिला नारोशंकरी घंटा असे म्हणतात.  अहमदशाह अब्दालीने ११ ऑगस्ट १७५७ ला दिल्लीवर दुसऱ्यांदा व उत्तरेत चौथी स्वारी केली. त्याने  दिल्लीचे राज्य काबीज करुन नजीब उद्दोला या रोहील्याकडे दिल्लीच्या राजवटीची कमान दिली .मुघल बादशाह आलमगीर ( दुसरा ) हा अब्दालीचा मांडलीक बनवीला गेला.  वार्षीक २० लाखाची खंडणी निश्चीत करण्यात आली. अब्दाली माघारी फिरताच आलमगीरने अब्दालीच्या वारंवार होणाऱ्या चढायांना कंटाळुन मराठ्यांकडे मदतीची याचना केली . तोवर अब्दाली निघुन गेला होता.मराठी फौजांनी दिल्ली चहुकडुन घेरली. दोन आठवड्यांपर्यंत युद्ध चालले. १७५७च्या ओगस्ट महीन्यात पेशव्यांनी निर्णायक विजय मिळवुन लाल किल्ल्यात प्रवेश मिळवला. दिल्लीत सदाशिवराव भाऊंनी दरबार भरवला. यात नारोशंकर यास राजेबहाद्दुर ही पदवी देण्यात आली. त्यांना दिल्लीच्या सुल्तानाच्या रक्षणाची जबाबदारी देण्यात आली.  त्यांच्या कामगिरीबद्दल खुश होऊन बादशाहने त्यास मालेगाव व लगतच्या ८ गावांची जहागीरी दिली. पुढे दक्षिणेत परतल्यावर नारोशंकरांनी ती सनद श्रीमंतांस दाखवुन मालेगावात घर बांधण्याची परवानगी मागीतली . घर बांधले तरी ते दीर्घकळ टिकत नाही,असा विचार करुन त्यांनी दिल्लीहुन कुरैशी या प्रशिक्षीत बेलदार समुदायाची माणसे बोलावुन १७५७ मध्ये दिल्लीच्या किल्ल्यासारखा भव्य असा किल्ला बांधला. त्यावर त्यांनी अठरा लाख रुपये खर्च केले.  तत्कालीन इंग्रज लष्करी अधीकाऱ्यांनी यास खानदेशाचे नाक असे म्हटले .किल्ला पुरा झाला तेव्हा  नारोशंकर मुघलांना फितुर असल्याची दरबारात कागाळी झाली आणि श्रीमंतांनी जासुद पाठवुन किल्ला खाली करुन देण्याचे फर्मान दिले. तोवर किल्ल्याचे वास्तु पुजन झाले नव्हते . नारोशंकरांनी आपण श्रीमंतांचेच नोकर असल्याचे प्रतिपादन करुन किल्ला खाली करुन दिला तेव्हा कुठे पेशव्यांना त्यांच्या निष्ठेची प्रचिती आली. 
    मालेगावचा किल्ला बांधला त्याच्या आसपासची तारीख हरीहर शिलालेखावर आढळते. इतका सुबक शिलालेख व त्यावरची अक्षरे कोरण्याची पद्धत या परीसरात दुसरी आढळत नाही .पुष्कर्णी पन्नास फुट लांब व पन्नास फुट रुंद असुन तीची बांधणी अतीशय सुबक पद्धतीने करण्यात आली आहे .यावरुन मालेगावचा किल्ला बांधणाऱ्या कुरैशी बेलदारांकडुन हे कौशल्याचे काम करवुन घेतले असावे याचा अंदाज लावला जाऊ शकतो .पेशव्यांनी १७५५ मध्ये त्र्यंबकेश्वर मंदीराचे बांधकाम सुरु केले . झासीवरुन नारोशंकरांस परत बोलावल्यानंतर त्यांची हरीहरवर कुठली कामगीरी झाली असावी का ? ज्यामुळे त्यांनी किल्ल्याच्या उत्तर माचीवर विशाल आकाराची पुष्कर्णी बांधली. हा माचीचा परीसर किल्ल्याच्या मुख्य वस्तीचा परीसर असावा. हरीहर किल्ल्यावर जाणारा मार्ग दुष्कर असल्याने किल्लेदाराचा वाडा व महत्वाच्या कचेऱ्या या माचीवरच असाव्यात. ही माची म्हणजे वेताळाचा पायथा उतरुन पुर्व बाजुने ब्रम्ह्याच्या डोंगराच्या बाजुला असलेला परीसर .तिथे मोठ्या प्रमाणावर वाड्यांची जोती दृष्टीस पडतात . हरीहर किल्ल्यावर मोठ्या वस्तीच्या दृष्टीने मर्यादीत पाणीसाठा उपलब्ध असल्याने युद्धकाळात गडमाध्यावर वस्ती स्थलांतरीत होत असावी
    नारोशंकरांची महत्वपुर्ण कामगीरी ही उत्तर भारतात झाल्याने त्याच्या नावानिशी हरीहरावर इतके माठे बांधकाम करण्यास पेशव्यांनी उगाचच परवानगी देण्याची शक्यता कमी दिसते. पेशवाईतली किंवा राजेबहाद्दरांशी संबंधीत कागदपत्रे तपासली तर नारोशंकर व हरीहर हा नेमका संबंध कशामुळे आले याचा उलगडा होऊ शकतो मालेगाव येथील वकील एडव्होकेट व डॉक्टर डी.एस. कुलकर्णी यांनी अस्सल कागदपत्रे व महीतीच्या आधारे सरदार नारोशंकर राजेबहाद्दुर हे पुस्तक प्रकाशित केले आहे
.त्यात त्यांनी राजेबहाद्दुर यांची जुनी कागदपत्रे इंग्रजांच्या १८१८च्या स्वारीच्या वेळी नष्ट झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
सन १७५७ नंतर त्यांची रवानगी गुजरात प्रांतात झाली. तेथे त्यांनी गुजरातसह सावनूर लढ्यातही पराक्रम गाजवले. तेथून ते दत्ताजी शिंदे यांच्या मध्यस्थीने उत्तरेला गेलेत.
     अहमदशा अब्दाली याने इ. स. १७५६ मध्ये भारतावर चौथ्यांदा स्वारी केली. त्याचा मुकाबला करण्यासाठी पेशव्यांनी राघोबादादास पाठविले. मात्र राघोबादादा उत्तरेत पोचण्यापूर्वीच अहमदशहा निघून गेला होता. सन १७६० मध्ये अब्दाली पाचव्यांदा भारतावर स्वारी करण्यासाठी पूर्ण तयारीनिशी आला. त्याचा प्रतिकार करण्यासाठी पेशव्यांनी सदाशिवराव भाऊस आज्ञा केली व मुलगा विश्वासराव यास बरोबर दिले. अब्दाली पूर्ण तयारीनिशी आला होता. याही मोहीमेत नारोशंकर सामील होते कारण उत्तरेकडे ते बराच काळ असल्याने त्यांना या प्रदेशाची माहिती होती. चौथ्या स्वारीत अहमदशाने दिल्लीवर कबजा मिळविला होता. अब्दालीच्या देखत दिल्लीला पेशव्यांनी वेढा दिला आणि दिल्ली घेतली. सदाशिवभाऊंना धीर आला  आता मराठ्यांची हिंम्मतही वाढली होती. या प्रित्यर्थ दरबार भरविला गेला. या दरबारात पेशव्यांनी नारोशंकरास ‘राजेबहाद्दूर’ ही पदवी दिली. शिवाय पाच हजार सैन्य व पेशव्यांचा ५/६ लाखांचा खजिनाही दिला यासाठी की त्याने दिल्ली शहर सांभाळावे. तसेच  शिंद्यांनीही पाच सहा लाख असा एकूण चाळीस लाखांचा खजिना त्यांच्या हवाली केला.
    १४ जानेवारी १७६१, सकाळी १० वाजता युध्दाला तोंड फुटले. दुपारी विश्वासरावाला गोळी लागून ते घोड्यावरुन खाली पडले. त्यामुळे सदाशिवरावभाऊ गोंधळून गेले. त्यांचे देहभान सुटले व ते गर्दीत बघताबघता दिसेनासे झालेत. आता आपला निभाव लागत नाही हे पाहून मल्हारराव होळकर, विठ्ठल शिवदेव व दत्ताजी गायकवाड यांनी युद्धातून पाय काढला. नारोशंकर वगैरे दिल्लीच्या किल्लयात होते. होळकरांनी नारोशंकरास दिल्लीतून निघून जाण्याचा सल्ला दिला. दिल्लीतील मंडळी गुरुवारपर्यंत धीर धरून होती. संध्याकाळी होळकर यांचे दिवाण गंगोबा तात्या पळत आले व वर्तमान सांगितले व सल्ला दिला की “ज्यास जो मार्ग भगवंत देईल, त्या मार्गे निघोन जावे.” त्यामुळे खजिना काढण्यास अनुकुल सापडले नाही. सैन्य इतके भेदरले की दिल्लीतील सैन्याची पळापळ सुरू झाली. होळकर, नारोशंकर, पवार हे पानिपतहून पळून आले. त्यांचे सरंजाम पेशव्यांनी जप्त केले. पळून जाण्याऐवजी नारोशंकर दिल्लीस दडून बसला असते तर खजिना वाचला असता. पळणाऱ्या सैनिकांना अन्नपाणी देता आले असते व अब्दालीच्या सैन्याला अटकाव करता आला असता पण नारोशंकराने होळकरांच्या सांगण्यावरून पळ काढला व पेशव्यांची गैरमर्जी ओढवून घेतली.
पानिपतानंतर लवकरच पुत्र व भाऊंच्या वियोगाने नानासाहेबांनी प्राण सोडला व राघोबादादाने सन १७६१ मध्ये पेशवाईचा कारभार आपल्या हाती घेतला. सन १७६२ मध्ये नारोशंकरांना प्रतिनिधीचे काम देण्यात आले. पुढे ते महादजी शिंदे यांच्या पदरी दिवाणगिरी करीत. पण ती रघुनाथरावांच्यामुळे गेल्याने प्रतिनिधी भवानराव यांचेकडे कारभारी म्हणून नोकरीस असताना इ.स.१७७५ च्या २३ जानेवारीला त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांना रघुनाथराव (मालेगाव शाखा) व त्रिंबकराव (नाशिक शाखा) अशी दोन मुले होती.
श्री चित्रावशास्त्रीलिखित मध्ययुगीन चारित्राकोशात असा उल्लेख आढळतो की दिल्लीस असताना एका शिकारीच्या प्रसंगी त्याने बादशहाचे प्राण वाचवले. यावर बादशहाने संतुष्ट होऊन त्यांना राजेबहादूर हा किताब व मालेगाव हा गाव जहागीर देऊन इतर गावे सरंजामादाखल दिलीत.
भीमसेन कुलकर्णी संपादित पेशव्यांच्या बखरीत असाही उल्लेख मिळतो की सन १७५९ मध्ये सदाशिवराव भाऊने बऱ्याच जहागिऱ्या वाटल्या. त्या वेळी नारोशंकरांनी मालेगावची जहागिरी मागितली. भाऊंनी ती दिली. या जहागिरीत मालेगावातील एकुण आठ गाव व निंबायती परगणा यांचा समावेश होता. अशा रितीने नारोशंकराचा मालेगांव शहराशी प्रथम संबंध आला.
   नारोशंकर हे उत्तर हिंदुस्थानात मोहिमेवर होते. पानिपत युद्धानंतर त्यांनी मालेगावला किल्ला बांधण्यासाठी घेतला. तत्पुर्वी मालेगाव हे एक खेडे होते. तेथे किल्लाही अस्तित्वात नव्हता. गिरणा व मोसम अथवा मोक्षगंगा या नद्यांच्या संगमापासून उत्तरेला सुमारे एक मैल अंतरावर हा मालेगांवचा भुईकोट किल्ला उभा आहे. किल्ल्याला लागूनच मालेगांव शहर वसले आहे. हा किल्ला खानदेशकी किल्ली म्हणूनही प्रसिद्ध होता. किल्ला पुर्ण होण्यास दहा वर्षे लागली. नारोशंकराने मालेगावला येऊन किल्ला बांधला असला तरी स्वत: येथे कधीही वास्तव्यास नव्हते.
     शिलालेखानिमीत्ताने इतिहासात डोकावून झाल्यानंतर पुन्हा गड चढाई सुरु ठेवुया.
हे सर्व पाहुन मुळ वाटेवर येऊन काही अंतर गेल्यावर आपण किल्ल्यासमोरील पठारावर पोहोचतो. निरगुडपाडा येथुन येणारी वाट या पठारावर आपल्याला येऊन मिळते. या ठिकाणी काही शेंदूर फासलेले दगड ठेवलेले आहेत. येथुन समोर दिसणाऱ्या उंचवट्याला डावीकडे ठेवत चढाई करायची. येथे येणाऱ्या गर्दीमुळे सध्या गावकऱ्यांनी येथे चहा-पाणी,सरबत, जेवण-नाश्ता याची दहा बारा दुकाने थाटली आहेत. या दुकानामधुन वाट काढत मळलेल्या वाटेने दहा- पंधरा मिनिटे समोरचा चढ चढत पुन्हा एका उंचवट्याला उजवीकडे ठेवत गेलो कि आपण हरिहर गडाच्या कातळभिंतीत कोरलेल्या पायऱ्यां असलेल्या लहानशा खिंडीत पोहचतो. या पायऱ्या सुरु होण्यापुर्वी त्याच्या विरुध्द दिशेला खालील बाजुस एक खडकात कोरलेले पाण्याचे लहानसे टाके आहे. किल्ल्यावर जाणारा हा ७० अंशी कोनात कोरलेला सरळसोट दगडी जिन्याचा मार्ग व त्यावरील दरवाजा हा पहाताक्षणी त्याच्या प्रेमात पाडणारा आहे. १८१८सालच्या मराठा-इंग्रज लढाईत इंग्रज अधिकारी कॅप्टन ब्रिग्ज याने हरिहरगड जिंकला. सुमारे २०० फूट सरळ व तीव्र चढाच्या उंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारखा या पाय-या बघून तो आश्चर्यचकित झाला. जिंकलेल्या किल्ल्यांच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करणे हे इंग्रजांचे धोरण होते पण हरिहर किल्ल्याच्या या पाय-यांनी कॅप्टन ब्रिग्ज भारावला. त्याने हरिहरगड जिंकला पण त्याच्या सुंदर पायरीमार्गाला मात्र हात लावला नाही. दोनशे वर्षांपुर्वी इंग्रज अधिकारी कॅप्टन जॉन ब्रिग्जने हरिहर किल्ल्याला भेट दिली त्यावेळेस त्याने याचं वर्णन लिहून ठेवलंय…
  “Truly wonderful! ‘Words’ are not  be able to give an idea of its dreadful steepness!!! It is perfectly 
straight for, I suppose 200 feet, and can only compared ladder over a height of this nature. The steps badly broken and holes were cut in the rock to support the hands. So difficult was the hill to climb that. I  was satisfied that five men could hold it (Fort) against any odds”
प्राचिन स्थापत्य शास्त्राचा उत्तुंग आविष्कार असलेल्या या गडोत्तमाच्या मुळाशी सुरूंग लाऊन ठिक-या-ठिक-या उडवण्याच्या कामगिरीवर गोरा कॅप्टन ब्रिग्ज निघाला देखील. अशा अघोरी कामावर नेमणूक झाली असली तरी त्याच्या कलासक्त वृत्तीला खरंतर आपण भटक्यांनी सलामच केला पाहिजे. हे येडपट त्यावेळी या पायऱ्यांच्या नादाने खुळावलं नसतं तर आज हरिहराचा उध्वस्त सांगाडा पाहून आपल्याला वेड लागायची वेळ नक्कीच आली असती.
किल्ले हरिहरानेही त्यावेळी केलेली लबाडी तर पहा. आपल्या अमोघ मोहिनी अस्त्राच्या लपेट्यात टोपीकर कॅप्टन ब्रिग्जला अस्सा काही लपेटला कि हा गड मुळापासून उखडून टाकायला आलोय हे विसरून ते खुळं गडाचं गुणगान करत परत गेलं. एका फाकड्या लष्करी अधिकाऱ्याची हि कथा... तर तुम्ही आम्ही किस झाडकि पत्ती?
      हरिहर किल्ल्याचे हे पहिले प्रवेशद्वार व त्याच्या दोन्ही बाजूस असणारे दोन लहान बुरूज कातळात खोदून काढलेल्या या मार्गाची शोभा वाढवितात. या पाय-यांनी एकावेळी एकच मनुष्य वर किंवा खाली जाऊ शकतो. इथून किल्ल्याच्या चढाईस प्रारंभ होतो. अंदाजे ६०-७० अंशाच्या कोनात गगनाला भिडणाऱ्या पायऱ्या पाहून छाती दडपतेच.  या प्रत्येक पायरीची लांबी ही सरासरी दोन ते अडीच फूट असून दोन्ही बाजुंना  हाताने घट्ट धरण्यासाठी खोबणी तयार केलेल्या आहेत. त्यामुळे दोन्ही पाय व दोन्ही हात असे चार पकडींनी (holds) घेऊन कुणीही वर जाऊ शकतो. सह्याद्रीत अशा प्रकारच्या उभ्या कड्यावर किंवा कातळभिंतीवर कोरलेले जीन्याचे मार्ग अनेक किल्ल्यांवर आहेत. हे सर्व मार्ग काही ठिकाणी दोन्ही बाजुंनी बंदीस्त आहेत तर काही मार्ग एका बाजूने मोकळा/उघड (exposed) आहेत. परंतु हरिहर हा फक्त सह्याद्रीत नव्हे तर संपूर्ण भारतात दोन्ही बाजुंनी आणि पाठमोरा मोकळा  (exposure) असलेला अनोखा दुर्गाविष्कार आहे. उभी नाळ असलेला पायरी मार्ग  पहिल्या प्रवेशद्वारात जातो.  ते कुशल हात ज्यांनी हे काळ्या फत्तरातील हे अद्भुत शिल्प घडवलं. मनोमन त्यांच्या या बेमिसाल कलाकारीस लाख-लाख दुवा देत गडचढाईला सुरूवात करायची.   विश्ववंदनिय ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभवावी असं हरिभक्तपरायणांकडून सांगितलं जातं. त्याच धर्तीवर या हरिहराची एकतरी पायरी प्रत्येक भटक्याने, दुर्ग अभ्यासकाने बारकाईने अनुभवली पाहिजे असं आवर्जून सांगावंसं वाटतं. काय त्याचा आब अन् काय तो दरारा, काय त्याचं सौष्ठव अन् काय ते बेमिसाल सौंदर्य याच्यापुढे तर प्रत्येक दुर्गयात्रीने साष्टांग दंडवतच घातला पाहिजे.

हरिहरच्या उभ्या पायऱ्या
 
.

उतरणीच्या वेळेस असलेली हा गर्दी
एका अवघड वळणा
 
हरीहर महादरवाजा

      आता या पायऱ्या चढायच्या कशा हा प्रश्न मनात उभा रहातो. पण प्रत्यक्षात मनाचा हिय्या करून एक एका पायरीशी आपण सलगी करतो तेंव्हा त्या पायऱ्यांच्या दोन्ही टोकाशी हाताची बोटे रुतावीत इतपत खोबण्या कोरल्याचे लक्षात येते. आणि जीव भांड्यात पडतो. चढून येणाऱ्या प्रत्येकाच्या मनाची विलक्षण भयावह घालमेल लक्षात घेऊन पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना हाताची बोटं मजबूतीनं रुतवण्यासाठी खोबण्यांचे खोल आधार ईथे कोरुन ठेवलेत. काळ्याकुट्ट, दगडातून खोदलेल्या ओबड-धोबड पायऱ्यांनादेखील कमालीचं सौंदर्य असतं हे इथं आल्यावर कळतं. खडक फोडून तराशलेल्या या पायऱ्या... बलाकि खुबसुरत आहेत. यांच्या नजाकतीपुढे तर एखाद्या अय्याश, गुलाबी रंमहालाच्या, बारीक, नक्षीदार कलाकुसरीच्या संगेमरमरी तेजाच्या महालांनीही झक्कत मान खाली घालावी. असा हा गडसोपान  गर्दीने ओसंडत असला तरी प्रत्येक पायरी न पायरी बारकाईने न्याहाळायची. जसजशा आपण पायऱ्या वर चढत जातो तसतसा आपला आत्मविश्वासही वाढत जातो.  या जिन्यावर हाता-पायांचा भरपूर वापर झाल्याने हा खट्याळ गड आपल्याला पुन्हा एकदा उत्क्रांतीच्याही आधीच्या काळात पाठवून नराचा पुरता वा'नर बनवून सोडतो.

भीरभीर नजर अनं पायऱ्यातल्याखोबण्या

दगडातुन कोरलेला वैशीष्ट्यपुर्णप्रवेश मार्ग
बालेकील्ल्यावर कोरलेलीअक्षरे व चीन्हे

  खडकांशी धडका घेण्याची सवय असलेल्यांचं एक ठिकंय, पण कुणाचंतरी ऐकून फुकाचा माज करण्यासाठी आलेले अन् भितीने हात पाय गाळून सैराट खाली उतरणारेही काही महाभाग दिसतात. कमजोर हृदयाच्या गड्यांनी तर याच्या नादाला न जाणंच चांगलं. अर्थात् त्यांनी आपल्या 'पायरीनेच' राहिलेलं बरं...अखेर ९०-९५ सोपानाची वाट चढताना स्वर्ग सुखाचा आनंद घेत घेत आपण महाद्वाराजवळ पोहोचतो आणि सुटलो बुवा एकदाचे करीत प्रवेशद्वारातून आत प्रवेशतो. हा दरवाजा छोटेखानी पण देखण्या स्वरूपाचा आहे. इथ वर येई पर्यंत मागे वळून पहाण्याचे घाडस होत नाही. मात्र येथून खाली नजर फेकताच एवढ्या चिंचोळ्या, अरूंद व खड्या जिन्याच्या खोल दरीतून वर आल्याबद्दल आपणच आपली पाठ थोपटून घ्यायची व पुढे निघायचे. छोटेखानीच पण मोठ्या मानाचा मानकरी असलेल्या महाद्वाराच्या दर्शनाने उर भरून येतो. पायऱ्या न तोडण्याचा निर्णय घेतलेल्या फिरंगी कॅप्टन ब्रिग्जला जाता-जाता गडाचं हे एकमेव प्रवेशद्वार सहज उद्ध्वस्त करता येण्यासारखं होतं. पण हा गोरा साहेब जसा या सोपानाच्या प्रेमात पडला होता तस्साच तो या महाद्वारातही गुंतला होता. त्याच्या रसिक मनाने हे पक्कं जाणलं होतं कि या पायऱ्यांशिवाय महाद्वाराला आणि महाद्वाराशिवाय पायऱ्यांना शोभा नाहीच. म्हणूनच तो उदार फिरंगी कॅप्टन, तृप्त होऊन आल्या वाटेने परत गेला. 

पायऱ्या संपताच दिसतो तो पहिला दरवाजा

28

प्रवेशद्वारातून टिपलेल्या पायर्‍या

गडाचं हे महाद्वार असलं तरी इतरांसारखं हे अवाढव्य अन् प्रशस्त नाही. तर आत झुकूनच प्रवेश करावा लागतो, इतकं हे लहान आहे प्राचीन मांदिरं, लेणी आणि गडांचे दरवाजे कमी उंचीचे ठेवण्याची हि पद्धत कदाचित  वाकून गेल्यामुळे त्या महान वास्तूदेवतेला, त्यांच्या रचनाकारांना नकळत नमस्कार तर घडतोच पण आपलीही 'उंची' समजते .

16

आत प्रवेश करताच उजवीकडे दिसतो तो शेंदूर फासलेला गणपती

17

मारूतीराया

 तत्पूर्वी गडाच्या प्रवेशव्दारा शेजारी उजव्याहाती कातळात  स्थानापन्न असलेल्या शेंदूरचर्चित गणेशाचे व मारुतीरायाचे दर्शन घेण्यास विसरायचे नाही. त्या शेजारी अस्पष्ट असे काही कोरून ठेवलेले आहे. दरवाज्याची कमान व तटाबुरुजावरील फांजीचे बांधकाम विटांनी केलेले आहे.

नेढे 

19

20

21

खडक फोडून त्यातून मधूनच काढलेली वाट आपल्याला पाहायला मिळते.

23

22

26

उत्तरबाजुच्या कड्यातकोसळणाऱ्या पायऱ्या

 या दरवाजाच्या पुढे डोंगरांची कातळ कपार खोदून आडवी वाट तयार केली आहे. ह्या मार्गाची उंची जास्त नसल्यामुळे थोडे वाकूनच हा टप्पा पार करावा लागतो.  उजव्या हाती गडाचा काताळ, डाव्या हाती पाताळ दरी आणि वरच्या बाजूस कपाळमोक्ष करणारा काताळ अश्या अद्भुत मार्गाने आपला पुढचा प्रवास सुरू होतो. त्यावेळी इंग्रज अधिकाऱ्यांनी या मार्गाचा उल्लेख “रॉक कट् गॅलरी” (Rock Cut Gallery of Harihar Fort) असा केला.  या सज्जात आपण डोकं आणि तोल सांभाळत गडपायथ्याच्या रहाळावर एक राजेशाही नजर फिरवायची आणि पुढे व्हायचं. या गॅलरीला गोऱ्या साहेबाने सन्मानपूर्वक "राॅक कट गॅलरी" असं भारदस्त नांव दिलंय.एखाद्या भ्रमर भुंग्याने मजबूत लाकूड पोखरून आपल्या पिढ्यांची वहिवाट सुकर करावी अगदी तश्शाच  पद्धतीने ईथून पुढची गडवाट त्या बेनाम शिल्पकारांनी जीव ओतून कोरलेली दिसते. या वाटचालीत आपण त्यांच्या या अजरामर कलाकृतीची तारीफ करण्यात कंजुषी मात्र करायची नाही. अंग चोरत पुढे गेल्यानंतर काताळात कोरलेले आणखी दोन दरवाजे लागतात. हे पार केल्यावर परत पायऱ्यांचा दगडी जिना लागतो. याच्या दोन्ही बाजूस आधारासाठी खोबण्या केलेल्या आहेत. तो पार केला की आपण अंतिम प्रवेशद्वारापाशी येतो. हा संपूर्ण १३० पायऱ्यांचा अद्भुत प्रवास कधी गुहेतून तर कधी नाळेतून झालेला असल्यामुळे कायम स्मरणात राहतो. 

      गॅलरीच्या शेवटी वाट उजवीकडे उभ्या कड्यात बेधडक घुसते. आपणही अनमान न करता पाऊले चालतीच्या चालीवर मनोभावे चढत-चालत रहायचं. पुढच्या टप्प्यात तर मोठमोठया महालांमध्ये विशेषतः पाश्चिमात्य वाडे-बंगल्यांत असतो तसा अर्धगोल, सर्पिलाकार जिनाही इथं तपशिलाने खोदून काढलेला आहे. आता लावा हिशेब, कि तो गोरा साहेब इथून जाताना काय-काय घेऊन गेला ?

घुमटाकृती वीटकाम

24

18

दुसरे प्रवेशद्वार

              या मार्गाने पुढे गेल्यावर कातळातच खोदलेले दोन पश्चिमाभिमुखी दरवाजे पार करताना साधारण ३०-४० पाय-या लागतात. या जिन्याच्या दोन्ही बाजूंस आधारासाठी असलेल्या खोबणीची मदत घेत आपण गडाच्या अंतिम दरवाजा असलेल्या भुयारी मार्गात येऊन पोहोचतो. हा जिना सांभाळून चढून जायचं आणि दरवाजातून खालून वर चढत हरिहर किल्ल्याचा चक्क लहानशा विटांनी बांधून काढलेल्या मोडक्या घुमटीचं छत असलेल्या हा शेवटचा  छोटा दरवाजा पार केल्यावर गडावर थाटात प्रवेश करायचा.. या दरवाजावर असलेला विटांचा घुमट मोठया प्रमाणात ढासळलेला असुन या विटा दरवाजातच पसरलेल्या आहेत. 

या मोडकळीस आलेल्या घुमटीची रचना आपल्याला दाद द्यायलाच लावते. तीच्याकडे निरखुन पहात असतांनाच एक उर्दू शेरवजा कहावत आठवली. अर्ज है... “खंडहर बयाँ कर रहें हैं, के इमारत कभी बुलंद थी”... पुढच्या पावसाळ्यात हि असेल याची का… ही शाश्वती नाही.

                   एका मोठ्या भुलभुलय्यातून सहीसलामत सुटून जग जिंकल्याचा आनंद चेहऱ्यावर घेऊन आपण गडमाथ्यावर अवतरतो. इथंपर्यंत पोहोचल्यानंतर स्वतःला एक मस्त शाब्बासकि बिनधास्त देऊन टाकायची. शांतपणे बसून धपापणारा श्वास एकसुरी करून घ्यायचा. थोडं पाणी तोंडावर मारायचं आणि थोडंसं आतही सोडायचं. पूर्व-पश्चिम पसरलेला चिंचोळ्या माथ्याचा गड उभा-आडवा नापायला फार वेळ लागत नाही. दरवाजाच्या पुढील भागात काही उध्वस्त वास्तुंचे अवशेष असुन ते पार केले कि आपण किल्ल्याच्या पठारावर पोहोचतो. 

     साधारण त्रिकोणी आकाराचा हा किल्ला पुर्व-पश्चिम पसरलेला असुन त्याचा विस्तार १६ एकरात सामावलेला आहे. आकाशातून पहिले असता या किल्ल्याचा आकार पंख पसरलेल्या गरुडासारखा दिसतो. गडाची उंची समुद्रसपाटीपासून ३४४५ फुट उंच असून गडाला चारही बाजुने ताशीव कडे असल्यामुळे तटबंदीची गरज भासली नाही. गडावर येण्यासाठी आपण आलो ती एकमेव पायऱ्यांची वाट आहे. 

दरवाजातून काही अंतर पुढे आल्यावर डाव्या हाताला खालच्या बाजूस दरीत कड्यालगत कोरलेल्या उध्वस्त दरवाज्याचे व प्रवेशमार्गाचे अवशेष दिसतात परंतु या दरवाज्यापर्यंत जाणारी वाट उध्वस्त झाली आहे. हा गडाच्या मूळ बांधकामातील दरवाजा कालांतराने दरड कोसळुन उध्वस्त झाला असावा. या दरवाजाच्या वरील बाजुस एक ५० फुट खोल कोठार आहे पण तिथे उतरण्यासाठी दोर सोबत असणे गरजेचे आहे अन्यथा हे कोठार वरूनच पहावे लागते. 

कोठाराच्या वरील बाजूस एक खडकात कोरलेले बुजलेले टाके आहे. ते पाहुन पुढे गेल्यावर आपल्याला एका मोठया वास्तुचे अवशेष दिसुन येतात. हि बहुदा गडाची सदर अथवा वाडा असावा. या वाटेवर डाव्या बाजुला खडकात कोरलेली एक गुहा दिसुन येते. 

34

 गोड्या पाण्याचं छोट्टसं तळं

धुक्याची चादर

तलाव आणि मंदिर  

 32

ती पार करून पुढे गेल्यावर कातळात कोरलेली पाण्याची तीन मोठी टाकी व एक प्रशस्त तलाव दिसतो. या तलावाला पश्चिमेकडे दगडी भिंत बांधून पाणी अडविले असुन तलावाच्या काठावर लोखंडी देव्हाऱ्यात हनुमंताची मुर्ती ठेवलेली आहे. 

हनुमानाचे मंदिर 

29

 30

 31

हर हर  महादेव 
शंभू महादेव

33

हनुमंताचं आणि शिवशंभूचं छोटेखानी मंदिर.

तलावाच्या काठावर दोन लहान चौथरे असुन एका चौथऱ्यावर शिवलिंग व नंदी तर दुसऱ्या चौथऱ्यावर मारुतीची भग्न मूर्ती ठेवलेली आहे. दोघांनाही वंदन करून तसेच सरळ रेषेत पुढे निघायचं. त्या विस्तीर्ण पठारसदृश माथ्यावरील अनेक  लहान-मोठ्या कोरीव टाक्यांमध्ये डोकावत इकडम-तिकडम करत गडावरील एकमेव सुस्थितीत असलेली वास्तूकडे आपला मोर्चा न्यायचा.

तलावाच्या उजव्या बाजुला असलेल्या उंबराच्या झाडाखाली एक खडकात खोदलेले टाके असुन या टाक्यातील व तलावातील पाणी पिण्यायोग्य आहे. या तलावाकडून समोरच आपल्याला एक घुमटाकार माथा असलेली दारुगोळा कोठाराची दगडी इमारत दिसते. तलावाकडून या इमारतीकडे जाताना वाटेत डाव्या बाजुला एक साचपाण्याचा खोदीव तलाव दिसुन येतो. या तलावाच्या मध्यभागी खडकात खोदलेले चौकोनी टाके आहे. 

गोल घुमटाकार इमारत आणि टाक्या
गडावर पाण्याच्या ५ टाक्या आहेत 
 
ते पाहुन पुढे आल्यावर डाव्या बाजुला दुसरे खडकात खोदलेले खांब टाके आहे. सध्या हे टाके मातीने पुर्णपणे भरून गेले आहे. या परिसरात असलेले तुरळक वाड्याचे अवशेष व इतर उध्वस्त बांधकाम पहात आपण ३० x १२ फूट लांबरुंद अशा दगडी कोठाराकडे पोहोचतो. दारूगोळा कोठाराची हि वास्तू गडावरील छत शिल्लक असलेली एकमेव इमारत आहे. या कोठाराचे आत दोन भाग केलेले असुन आत शिरण्यासाठी एक लहान खिडकीवजा दरवाजा आहे. या कोठीत दिवसासुद्धा काळोख असल्याने कोठाराच्या भिंतीत एक मोठी लोखंडी पणती ठोकलेली दिसुन येते. गडावर मुक्काम करणे आवश्यक असल्यास एकतर "निली छत्री" किंवा या कोठीशिवाय पर्याय नाही. बुलंद गडावरचं हे एकमेव सहिसलामतीचं बांधकाम. आतापासूनच संवर्धनाची पुरेशी काळजी न घेतल्यास कालाय तस्मै नमः म्हणण्यशिवाय आपल्याला काहीच करता येणार नाही. आणि तसंही... आपण दुसरं काय करतो म्हणा. या कोठारात १० ते १२ जण सहज राहु शकतात.

कोठाराच्या पुढील बाजूस खडकात खोदलेली ५ लहानमोठी टाकी असुन मागील बाजूस एक मोठे टाके व त्यामागे एक लहान तळे खोदलेले आहे. यात एका टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. येथे डावीकडे खाली उतरुन तटापर्यंत जाता येते. दारुकोठार आणि आजूबाजूचा परिसर भटकून झाल्यानंतर किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी म्हणजे टेकडीकडे निघायचे. टेकडीवर जाणारी वाट थोडी निसरडी असल्यामुळे काळजीपूर्वक चढाई करावी लागते. दारूगोळा कोठारा समोर असलेली ६०-७० फूट उंचीची टेकडी म्हणजे हरिहर किल्ल्याचा सर्वोच्च माथा आहे. या टेकडीवर जाताना आपल्याला शेवटचा कातळटप्पा चढून पार करावा लागतो. माथ्यावर ध्वजस्तंभाची जागा असुन येथे भगवा ध्वज डौलाने फडकताना दिसतो. इथून बैजवार परिसर न्याहाळण्याची मजा बाकी जब्बरदस्तच आहे. किल्ल्यावरील सर्वांत उंच जागा असलेल्या या ठिकाणावरून संपुर्ण हरीहर किल्ला तसेच त्रिबक डोंगररांगेत उत्तरेला वाघेरा तर दक्षिणेला कावनाई व त्रिंगलवाडी पूर्वेला कापडया, ब्रह्मा व त्यामागे ब्रह्मगिरी किल्ला तर पश्चिमेला फणी डोंगर, बसगड, उतवड, अंजनेरी किल्ला, वैतरणा जलाशय इ. परिसर दिसतो. घड्याळाच्या दिशेने थोड्या उजवीकडे नजर फिरवली तर वैतरणेच्या प्रचंड जलाशयाने समृद्ध झालेलं विस्तीर्ण खोरं दिसतं. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. गडाचा घेरा निमुळता असला तरी वर असलेल्या अवशेषांमुळे संपूर्ण गडफेरी करण्यास दोन तास लागतात. 

बालेकील्ला

अनाम वीराची समाधी

तसं म्हटलं तर खडकाळ माथ्याचा हा गड उजाड बोडकाच. पण शांत जळाने भरलेली छान पुष्करणी, आध्यात्माशी आपलं एक वेगळं नातं जोडणारी तिच्या काठची देवालयं, वा-यावर फडफडणारा रेशमी भगवा आणि एक भारदस्त  पर्णसंभाराचा, विशाल छायेचा वृक्ष इथल्या सा-या कमतरतेवर पांघरुण घालून "कमी तिथे आम्ही" म्हणत पैसावसुल भरपाई करुन जातात. गड पाहून परत उतरताना मात्र काळजीपूर्वक उतरावे लागते

फणी 

.पावसाळ्यात पायऱ्यांवर शेवाळ जमा होत असल्याने चढताना किंवा उतरताना पाय घसरण्याची शक्यता असते त्यामुळे पावसाळ्यात हरिहर किल्ल्यावर जाणे टाळावे.

हरिहरगड आणि सुरक्षा :-

          गेल्या काही वर्षात हरिहर किल्ल्यावर गिर्यारोहकांबरोबरच हौशी पर्यटकांचा ओघ वाढलेला आहे. विशेषतः आठवड्यांच्या शेवटी आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी शेकडोंच्या संख्येने पर्यटक या किल्ल्याला भेट देतात. सोशल मिडियाच्या माध्यमातून हरिहर प्रकाश झोतात आला आहे. यावरूनच सुरक्षिततेचे काही प्रश्न उभे राहतात.   नाशिकच्या प्रशासनालाही यामुळे हरिहरवर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या संदर्भात पावले उचलावीशी वाटतात. कारण जर कुणाचा अपघात झाला किंवा दुर्दैवाने मृत्यू ओढावला तर मात्र प्रशासकिय अधिकाऱ्यांनाच धारेवर धरलं जातं. हरिहर किल्ला हा वनविभाग, नाशिक पश्चिम यांच्या अखत्यारित येतो. त्यामुळे सर्व विकासकामे आणि सुरक्षेची कामे वनविभागामार्फतच केली जाणार आहेत. या सर्व सुरक्षेच्या आणि विकासकामांना जिल्हाधिकारी, नाशिक यांचेतर्फे फंडींग होत असते. सुरक्षेच्या कारणात्सव ही विकासकामे व्हावीत याबद्दल आक्षेप अथवा शंका नाही परंतु त्याआधी हरिहर किल्ल्याविषयी जाणून घेऊन गिर्यारोहणातील तज्ञांकरवी ह्याची आखणी व्हावी ही आपेक्षा.
        पर्यटनाच्या अंगाने कुठल्या भागात एकावेळी किती पर्यटकांनी जावं याबाबत कुठलेही निर्बंध नाहीत. परंतु शासन-प्रशासनाच्या वतीने गर्दीचं नियंत्रण आणि नियमन करण्याच्या उपाययोजना अनेक स्थळांवर केलेल्या आढळतात. हरिहर हा वनविभागाच्या अखत्यारित येतो. त्यामुळे वनविभागाची काही उदाहरणं द्यायची झाली तर सिंहगडावर सोडली जाणारं प्रत्येक वाहन नोंद करून तसंच तपासणी करून वरच्या बाजूस सोडलं जातं. मद्यपान आणि मांसाहारास पूर्णतः बंदी आहे. संपूर्ण घाट मार्ग वन क्षेत्रातून जात असल्याने धुम्रपान करण्यास मनाई आहे जेणे करून वणवा पेटणार नाही. गडमाथ्यावरील खाद्यगृहांतही धुम्रपान केल्यास जागेवर दंडाची व्यवस्था दिसून येते. ठिकठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरेही बसविलेले आहेत. पर्यटकांच्या सोयीसाठी काही ठिकाणी प्रसाधनगृहांचीही निर्मिती करण्यात आलेली आहे.
       दुसरं उदाहरण आपण वासोटा किल्ल्याचे बघू. बामणोली येथे पर्यटकांना वनविभागाच्या कार्यालयात परवानगी घ्यावी लागते. परवानगी असलेल्या पर्यटकांनाच बोटीत बसून वासोट्याच्या पायथ्याशी सोडले जाते. पायथ्याशी असलेल्या चौकीत वनकर्मचारी परवानगी तपासून वर जाण्यासाठी सोडतात. संध्याकाळच्या आंत पर्यटक, गिर्यारोहक आदिंनी परत यायचे असते. रात्री वासोटा किल्ल्यावर मुक्काम करण्यास बंदी आहे.
       1. वरील दोन उदाहरणांच्या धर्तीवर हरिहर परिसरात वनविभागाने पर्यटकांसाठी छोटे कक्ष किंवा चौकी निर्माण करावे. हरिहरला येणारे लोक प्रामुख्याने हर्षेवाडीच्या घाटमार्गातून किंवा पायथ्याच्या निरगुडपाडा गावातून हरिहरच्या दिशेने पायी ट्रेक करण्यास सुरुवात करत असतात. या दोन ठिकाणांवर म्हणजेच हर्षवाडी आणि निरगुडपाडा येथे या चौकी असाव्यात. शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या संयुक्त वनव्यवस्थापन समिती मार्फत येथे स्थानिक लोकांना रोजगार देऊन नेमणूक करावी. या दोन चौकींपैकी कुठल्याही एकातून हरिहर किल्ल्यावर जाण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची शासकीय ओळखपत्राद्वारे नोंदणी करावी. या चौकी केंद्रांचे कामकाज चालण्यासाठी पर्यटकांकडून प्रवेशशुल्क तसेच वाहन पार्किंग शुल्क आकारण्यात यावे. त्याची रीतसर पावती पर्यटकाना देण्यात यावी.
       2. पहिला टप्पा म्हणजेच डोंगरउताराचा माती आणि जंगलाचा भाग चढून गेल्यावर वेताळटेकडी पठारी भागावर एक वनचौकी असावी. ही वनचौकी अवघड पायरी मार्गाच्या दिशेने असावी. खालील केंद्रात नोंदणी केलेली पावती वरच्या चौकीत दाखविणे पर्यटकांना बंधनकारक असावे. ज्यांच्याकडे नोंदणी नाही ते पर्यटक पायरीमार्ग चढून गडमाथ्यावर जाऊ शकत नाहीत. परंतु असे पर्यटक पहिल्या टप्प्यातील पठार, वेताळटेकडी परिसर, आश्रम, पुष्करिणी या भागात फिरण्यास हरकत नसावी.
     3. गर्दीच्या वेळी एकावेळेस किती जणांना पायऱ्यांवरून सोडावे तसेच उतरवावे याचा निर्णय चौकीतील वनकर्मचारी घेतील. ते पर्यटकांना बंधनकारक असेल. अन्यथा केलेल्या नोंदीवरून नियम न पाळणाऱ्या पर्यटकाना दंडात्मक कारवाई करावी.
     4. एका दिवसात किती पर्यटक गडमाथ्यावर सोडावे याचा गिर्यारोहण क्षेत्रातील तज्ञांकडून अभ्यास करून संख्या ठरवावी. त्यानुसार खालील केंद्रातून तेवढ्याच पर्यटकांना वर जाण्यास परवानगी द्यावी.
      5. राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये तसेच कास पठारासारखी संरक्षित ठिकाणी पर्यटकांना जाण्यासाठी ज्याप्रमाणे वेबसाईहून नोंदणी करण्याची सोय आहे तशी हरिहरच्या बाबतीत लवकरच तयार करावी. वेबसाईटहून होणाऱ्या नोंदीसाठी भेट देण्याच्या निदान 15 दिवस आधी होणे आवश्यक असल्याची अट असावी.
6. 20/30 च्या वरील संख्येने मोठा ग्रुप येत असल्यास त्यांनी अधिकृत/नोंदणीकृत गिर्यारोहण संस्थेमार्फतच बुकिंग करणे आवश्यक आहे. कारण, अशा ग्रुपला सांभाळणे, काळजी घेणे आणि शिस्तशीर ट्रेक करणे संस्थेमार्फतच सोयीचे होत असते.
7. अतिवृष्टी असलेल्या दिवसात हरिहर गडमाथ्यावर जाण्यासाठी पर्यटकांना नोंदणी देऊ नये. हा निर्णय सर्वतः पायथ्याच्या चौकी/केंद्रातील वनकर्मचारी घेतील. या दिवसात पायऱ्या मार्ग शेवाळलेला असतो. पायरी मार्गा वर पाणी वाहत असते. तसेच हरिहरचा माथ्याकडून खालील ३०० मीटरचा भाग हा दाट धुक्याखाली असल्याने दृष्यमानता (visibility) फार कमी असते. त्यात वरील वाटा चुकण्याची शक्यता अधिक असते.
     8. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी असणाऱ्या ब्रह्मगिरी-हरिहर प्रदक्षिणा दिवसात ज्या भाविकांना वेताळटेकडीकडून गडमाथ्यावर जायचे आहे त्यांना वर जाण्यास मनाई नसावी.
    9. खालील वनकेंद्र/चौकी पासून ते थेट गडमाथ्यापर्यंत महत्त्वाच्या ठिकाणांवर सूचना फलक असावेत. त्यावरील सूचना गिर्यारोहणातील तज्ञाकरवी मागवून तयार कराव्यात.
     10. हरिहर गडमाथ्यावर रात्री मुक्कामास पूर्णतः बंदी असावी. वेताळटेकडी पठारावरील आश्रम बाजूस मुक्काम करण्यास हरकत नसावी.
     11. निरगुडपाडा, हर्षवाडी परिसरातील ग्रामस्थ, आदिवासी बांधवांच्या घराघरातून मुक्कामाच्या व्यवस्थेसाठी (Home stay) प्रोत्साहन आणि प्रसिद्धी देण्यात यावी. त्यांना पर्यटकांच्या सेवेसाठी सोयी उपलब्ध करून देण्यात याव्यात.
       12. साम्रद-सांधण दरी तसेच कळसूबाई परिसरात जसे झाले आहे तसे हरिहर परिसरातील स्थानिक तरुणांना गिर्यारोहणांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात यावे. शासनाकरवी अशा प्रशिक्षितांची नोंद करून त्यांना गिर्यारोहणाचे साहित्य उपलब्ध करून द्यावे. अशा प्रशिक्षित तरूणांनी अनुभव नसलेल्या पर्यटकांना मार्गदर्शन करून गाईडचे काम करावे. त्यातून त्यांना मिळकतीची सोय होऊ शकते. जेणे करून नवख्या पर्यटकांमुळे अपघाती परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता उरत नाही.
13. उभ्या पायरी मार्गावर शिडी/जीना/रेलिंग्ज लावणे हा पर्याय नाही. यामागे खालील कारणं आहेत
– या नाळेच्या पायरीमार्गाचा विचार केला तर त्याचे सौंदर्य नष्ट न होता लोखंडी मार्ग बनविणे शक्य नाही.

– त्यासाठी जागतीक पातळीवरील अशी कामं केलेले तज्ञ अभियंता, अभ्यासू स्थपति किंवा आव्हानात्मक बांधकामातील अभ्यासू लोकांची मदत घ्यावी लागू शकते.

– आहे त्या मार्गावर हातांच्या पकडीसाठी खोबणी केलेल्या आहेत. त्यावर कुठल्याही मेखा किंवा रॉड बसविण्यासाठी केल्याजाणाऱ्या ड्रील मूळे आहे त्या रचनेला तडे पडणे, धक्के बसणे, छोटा टवका किंवा मोठा भाग कोसळण्याची (collaps) शक्यता अधिक आहे.

– आता आहे त्या मार्गाचा असा कुठला मूळ रचनेचा भाग भंग पावला किंवा कोसळला तर तो कायमस्वरूपी ना दुरुस्त अवस्थेत जाऊ शकतो.

14. उभा पायरी मार्गावर गर्दी होत असल्याने धोकेदायक स्थिती वाटते. या खड्या मार्गावर एकावेळी वरून खाली किंवा खालून वर असा फक्त एकेरी वापर होत असतो. त्यामुळे याला पर्याय म्हणून हरिहर किल्ल्याच्या दुसऱ्या कातळभिंतीवरून शिडी/जीना/ट्रॉलीमार्ग किंवा रोप वे यांचा पर्याय करण्यास वाव आहे. त्यामुळे प्राचीन मार्गावरून माथ्यावर जाणे आणि आधुनिक मार्गाने खाली परतणे अशी यंत्रणा सोयीची होऊ शकते.
15. गडमाथ्यावर अति धोकेदायक ठिकाणी रेलिंग्ज लावावेत. परंतु संपूर्ण परिघाला रेलिंग्ज लावण्याची आवश्यकता नाही. कारण त्या रेलिंग्जचे निर्माण करताना खालील पायऱ्यांच्या रचनेला हादरे बसू शकतात. तडे आदी पडून ह्या अनोख्या रचनेचे कायम स्वरूपी नुकसान होऊ शकते.
16. हरिश्चंद्रगड येथील कोकणकडा, धोडपमाची आदी ठिकाणी तयार करण्यात आलेले रेलिंग्ज आज कोसळलेले आहेत. त्यातून नैसर्गिक खडक रचनेचे अतोनात नुकसान होते. हरिहर गडमाथ्यावर रेलिंग्ज करू नयेत. यातून काही वर्षात रेलिंग्ज सकट कातळाचा काही टप्पा कायमस्वरूपी ढासळण्याची शक्यता अधिक आहे.
17. अनेक गडकोटांवर पायथ्याच्या गावापासून ते किल्ल्याच्या पोटापर्यंत जाण्यासाठी डांबरी गाडी रस्ते तयार करण्यात आलेले आहेत. काही किल्ल्यांच्या थेट माथ्यावर वाहने जातात. हरिहर किल्ल्याच्या पठारापर्यंत गाडी रस्ता करण्याची माहिती गावकरी आणि वनविभागाशी संबंधित कर्मचारी कडून मिळाली. डांबरी गाडी रस्ता करण्याचे धोके खालीलप्रमाणे
– डोंगर उतारावरील वनं आणि वृक्ष मोठ्या प्रमाणावर कापावे लागतील.
– रस्त्यासाठी सुरुंग लावून स्फोट करावे लागणार. त्यामुळे हादऱ्यांनी वरच्या उभे कडे असलेल्या भागावरून दरड कोसळण्याची दाट शक्यता आहे.
– हादऱ्यांमुळे पायरी मार्गावरील प्रवेशद्वार कोसळून खाली पडण्याची शक्यता आहे. कारण ह्या प्रवेशद्वाराचे दगडी चीरे कुठलाही चुना आदी पदार्थ न भरता रचीव पद्धतीने द्वार तयार केलेले आहे.
– हातगड आदी किल्ल्यावर वनविभागाने जो गाडी रस्ता केला आहे त्यावर सतत दरड कोसळत असते आणि पर्यटकांना गाडी खाली लावून पायी जावं लागतं. यातून रस्ता बनविण्याचा मुळ उद्देश साधत नाही.
– ज्या अनोख्या पायरी मार्गाला जपण्यासाठी ही नियमावली आहे त्यात रस्ता बनविण्याची कार्यप्रणाली बाधक ठरेल.
– जर गाडी रस्ता झाला तर हरिहरच्या गडमाथ्यावर जाण्यासाठी गर्दीला रोखणे नियंत्रणाबाहेर होईल. हरिहरवरील गर्दी रोखणे हा सध्यस्थितित तरी शासनाचा प्रमुख हेतू आहे.
– वाहनांचे प्रदूषण, कचऱ्याचे प्रदूषण या प्रश्नांना मोठ्याप्रमाणावर सामोरं जावं लागणार आहे.
– परिसरातील वन्यजीवन आणि जैवविविधता धोक्यात येईल.
18. शासनाने विविध माध्यमातून मोठ्याप्रमाणावर लोकजागृती आणि लोकशिक्षण मोहिम राबविण्याची आवश्यकता आहे. त्यात गिर्यारोहण, आनंददायी पर्यटन, स्वयंशिस्त, सुरक्षित पर्यटन आदी बाबींचा सामावेश असेल. रेडियो, टी.व्ही., वर्तमानपत्र, फलक, पत्रके, विविध कार्यशाळा वगैरे अनेक माध्यमांचा यासाठी वापर केला जाऊ शकतो.

हरिहर शिलालेख

हरिहर शिलालेख
तो भीषण आहे.तो रौद्र आहे.तो सुंदर आहे.तो कधी कुणा समोर व्यक्त होत नाही. प्रयत्न केला तरी तो ताकास तुर लागु देत नाही. यामुळेच त्र्यंबकेश्वर रांगेतला हरीहर कील्ला इतीहासातली एक गुढरम्य कथा बनला आहे. आज मात्र तो थोडा मेहेरबान झाला. त्याच्या जुन्या शीलालेखाचे गुपीत  उलगडले आणी हरीहराच्या इतीहासातले एक मानाचे पान नजरेस पडले.
हरीहरचा शीलालेख म्हणजे
, इतीहासाच्या पुस्तकातले एक खुले पान
. उन वारा पाऊस सोसत तो आव्हान देत होता
,‘माझ्या अंतरंगात या
...कील्ला डोळे भरुन पाहा
...लेखातल्या अक्षराची कुट भाषा जाणा
’. आपण मात्र त्याला शेंदुर फासुन अत्यंत मोलाची माहीती झाकोळुन टाकत होतो
.गेली अनेक वर्षे शेंदराचा थरावर थर साठत होते
. कोणा भल्या माणसाला हे थर काढण्याची बुद्धी झाली
. त्याने त्याच्या परीने
. तो काढण्याचा प्रयत्न केला
. पण मग कोणी तरी त्यास चक्क ओईलपेंटने रंगवले
.पीढी दर पीढी या शीलालेखाची अक्षरे झीजु लागली
. त्यातील काही तर क्षतीग्रस्त झाली
.
मागच्या पंधरवड्यात म्हणजे २०२० सालच्या मार्च महीन्याच्या पहील्या सप्ताहात त्र्यंबकेश्वर मंदीरातील दोन क्षतीग्रस्त संस्कृत शीलालेखांचे वाचन जुन्या ग्रंथातुन शोधुन त्यांचे मराठीत भाषांतर करण्यात त्रींबकचे राजेश दीक्षीत यांना यश आले होते
. त्याने हुरुप वाढला होता
.आता हरीहर कील्ल्याच्या शीलालेखाची माहीती मीळवावी असे मनात आले
. त्यावरुन
,या शीलालेखाचे वाचन कोणत्या पुस्तकात उपलब्ध आहे
,याचा शोध सुरु झाला
. सर्वात प्रथम मुंबईचे प्रसीद्ध ब्लॉगर तथा सतीशीळा
, वीरगळ
, गद्देगळाचे अभ्यासक पंकज समेळ यांच्या महाराष्ट्र देशा या ब्लॉगमध्ये
, हरीहर शीलालेख भागश
:वाचायला मीळाला
. पुण्यातील संशोधक महेश तेंडुलकर यांनी
,मराठी
- संस्कृत शीलालेखाच्या वीश्वात या ६८८ पानी पुस्तकात या शीलालेखाचे
,त्यांना जेवढे शब्द वाचता आले तीतकेच त्यांनीनमुद केले होते
.
हरीहर पुष्कर्णी
हरीहर कील्ल्याच्या उत्तर माचीवर भल्या मोठ्या पुष्कर्णीवरचा हा शीलालेख फार अगोदर पासुन बघण्याचा योग यायचा तो श्रावणातल्या ४० मैल अंतराच्या ब्रम्हगीरी
-हरीहर प्रदक्षीणेच्या नीमीत्ताने
. आमची जुने नासीक भागातली मंडळी ही प्रदक्षीणा नीत्य नीयमाने करत असु
.अनेक वर्षे हा खटाटोप चालला
. जुन्या काळात कोणी तरी दगडात कोरलेली काही अक्षरे इतकेच आमच्या ठायी त्याचे महत्व होते
. सुबक दगडात घडवीलेल्या या पुष्कर्णीवर गणपतीचे एक पुर्वाभीमुख शील्प कारले आहे
.त्यावरुन त्यास गणेश कुंड संबोधले जायचे
. त्रींबकची मंडळी यास हरीहरवरचे कुशावर्त संबोधत. त्र्यंबकेश्वर पासुन पावसात भीजत
,इथवर अनवाणी चालत आल्यानंत या पुष्कर्णीत पोहण्याची फार मजा यायची
. सगळा शीण नीघुन जायचा
. शेंदुर फासल्यामुळे शीलालेखावरची अक्षरे स्पष्टपणे वाचता येत नसायची
. ती काळजीपुर्वक वाचण्याचा कधी प्रयत्न केला नव्हता
.
शीलालेखाचे वाचन करतानाराजेश दीक्षीत
घरात पीढीजात संस्कृत अध्ययनाची
.परंपरा
. आजोबांकडुन शीकलेले ज्योतीष व गणीत
. त्र्यंबकेश्वर परीसराच्या इतीहसाबद्दलची आस्था
. धार्मीक व ऐतीहासीक वीषयांवरील पुस्तके
, लेख
,चर्चासत्र आदींत नीयमीत सहभाग या गोष्टींमुळे मीत्रवर्य राजेश दीक्षीतने  हरीहर शीलालेख वाचनाचे शीवधनुष्य पेलण्याची तयारी दर्शवीली
.शीलालेखावरचा शेंदुर काढल्या नंतर अक्षरांचा उठाव अधीक स्पष्ट झाला होता
.छायाचीत्रातुन मात्र तो स्पष्ट होत नव्हता
. मग प्रत्यक्षात शीलालेख बघण्याची छोटेखानी मोहीम हाती घेतली
.लागोलाग हरीहर कील्ल्याला भेट दीली
. वरच्या भागात इतीहासाचा अभ्यास करण्याजागे काय काय सापडते याचा आढावा घेतला
. परतताना उशीर झाला
. सुर्य मावळतीला गेल्याने पुरेशा उजेडात शीलालेखाचे अवलोकन करण्याची पुरेशीसंधी मीळु शकली नाही
.मग दोन दीवसांनी फक्त शीलालेख बघण्याचा बेत आखला
. काही अक्षरे अजीबत लागत नव्हती
.काही अक्षरे ओईल पेंटच्या रंगमुळे अस्पष्ट झाली तर उजव्या बाजुची काही क्षतीग्रस्त झाल्याचे जाणवले
. शीलालेख कुंडातल्या पाण्याने स्वच्छ धुवुन अक्षरांची वरची बाजु कोळशाने गीरवीली
.त्यामुळे अक्षरांचे वळण कळण्यास मदत झाली
. मग त्याची छायाचीत्रे घेतली
. नंतर शीलालेख चुलीतल्या राखेने धुवुन ओल्या वीटेच्या रंगाने अक्षरे गीरवुन पाहीली
. ही छायाचीत्रे वेगवेगळ्या कोनातुन घेतली
.अगोदर वाचन करताना अडचण जाणवणारी अक्षरे हाताने चाचपुन ओळखण्याचा प्रयत्न केला
. त्याची टीपणे तयार केली
.
देखणी अक्षरे व सुंदरनक्षीचा हरीहर शीलालेख
घरी परतल्यानंतर छायाचीत्रांचे आवलोकन केले तेव्हा शक
,संवत्सर वाचता आले
. दुसऱ्या ओळीतली श्री गणेशायनम
:हे अक्षर पटकन वाचता येते
. अभ्यासकांनी ते वाचले आहे
.त्यापुढची चार अक्षरे लागत नव्हती
. पाचव्या ओळीत शेवटच्या भागात पनामा हा शब्द वाचता येत होता
.हा पनामा काय असेल याचा बोध होत नव्हता
. सहाव्या ओळीत हरीहर वीलसद्देवता ही अक्षरे लागतात
,पण शेवटचे अक्षर लागत नव्हते
. त्या खालचे अक्षरही लागत नव्हते
. शंकरात्म सुत श्रीमन्नारायण ही अक्षरे स्पष्टपणे वाचता आली
. शक संवत्सर कळाले होते
, त्यावरुन शंकराचा मुलगा नारायण
...नारायण शंकर
...या शब्दावरुन सरदार नारोशंकर यांच्याकडे संकेत जात होते
.
नाशीकचे नारोशंकर मंदीर प्रसीद्ध आहे
. मालेगावचा राजेबहाद्दुरांचा कील्ला प्रसीद्ध आहे
. आता नारोशंकर यांच्या बद्दलची माहीती जाणुन घेण्याची जीज्ञासा नीर्माण झाली
. सुदैवाने राजेशचा स्वत
:चा पुस्तकांचा मोठा संग्रह आहे
.या कामी त्याचा मोठा उपयोग झाला. पेशवाईतला हा अव्वल दर्जाचा सरदार होता
. यांचे उल्लेख ठीकठीकाणी वाचायला मीळाले
.पेशवे घराण्याचा इतीहास
- लेखक प्रमोद ओक
, पेशव्यांची बखर
- संपादक काशीनाथ नारायण साने
, बखर संस्थानची
- सुनीत पोतनीस
, मराठ्यांचा इतीहास
- संपादक अ
. रा
.कुलकर्णी
- ग
. ह
.खरे
, सातारचे श्रीमंत छत्रपती शीवाजी महाराज यांचे वंशज व प्रतीनीधी आणी अष्टप्रधान यांचा इतीहास
- वीष्णु गोपाळ भीडे
,दक्षीणेतील सरदारांच्या कैफीयती
- पुरुषोत्तम वीश्राम मावजी व डी
.बी
. पारसनीस अशा काही पुस्तकातुन नारोशंकर यांचे अनेक उल्लेख वाचायला मीळाले
. एका सरदार घराण्याकडुन
, राजेबहाद्दर हे मुळचे सासवडचे दाणी असल्याची महत्वपुर्ण माहीती मीळाली
. त्यामुळे पनामा शब्दाला जोडुन असेले अक्षर दाण्युपनामा असल्याचा उलगडा झाला
.
उठावाची अक्षरे
एकीकडे राजेशची एक एक अक्षराची संगती लावण्याचा प्रयत्न सुरु असताना
. हरीहर कील्ल्याची माहीती घेण्यासाठी पुस्तके
,ब्लॉग्ज धुंडाळण्याची लगबग सुरु झाली
. महत्वाच्या ऐतीहासीक ग्रंथात हरीहरवर दहा पाच ओळींचे परीच्छेद शोधणे म्हणजे दुरापास्त गोष्ट
. आज हरीहर कील्ल्याचे राकट रुप बघीते की प्रश्नांचा कोंडावळा उठतो
: हरीहर कील्ला कोणी बांधला
? ‘त्याच्या भीषण कड्याला अमुर्त पायऱ्या बांधल्या जाऊ शकतात
’,असे अचाट स्वप्न कोणी रंगवले आणी मग ते प्रत्यक्षात साकार केले
? ते कोण बेलदार होते जे एखाद्या योद्द्या प्रमाणे कड्याला लटकुन शेकडो टनाचा दगड फोडत राहीले
? एखाद्या डोंगराला इतक्या सुंदर पायऱ्या घडवील्या तरी जाऊ शकतात का
? हा समज सत्यात उतरवीणारी ती राजवट होती कोणाची
?
हरीहर म्हटले की त्याचा ब्रम्हगीरीशी येणारा संबंध अटळ आहे. या दोन्ही कील्ल्यात अनेक बाबतीत साम्य आहे
. दोन्हीही डोंगर बेलाग
. त्यावर प्राचीन काळात बलदंड आणी देखण्या स्वरुपाचे कातळ कोरीव बांधकाम करुन अजोड कील्ले बांधण्यात आले
. दोन्ही कील्ल्यांचे कर्ते अज्ञात आहेत
.पौराणीक साहीत्यानुसार त्रींबक हे त्रीसंध्या क्षेत्र होते
. जगात काहीच नव्हते त्यावेळी ब्रम्हा आणी वीष्णु यांनी सृष्टीच्या आदी आणी अंताचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला
. ब्रम्हाने आदीचा म्हणजे मस्तकाचा शोध घेतला तर वीष्णुने अंताचा म्हणजे पायाचा
.पुर्ण रुपाचे ज्ञान मात्र दोघांनाही झाले नाही
. आपणच नीर्माण केलेल्या सृष्टीचा शोध न लागल्याने ब्रम्हाला कमीपणा वाटला
.त्याने गायीची साक्ष ठेवुन खोटेच सांगीतले
, त्याला मस्तक सापडले
. त्यावर केतकीचे फुल होते
.या खोटेपणाचा राग येऊन भगवान शंकरांनी
,तु पृथ्वीवर अपुज्य होशील असा शाप दीला
. ब्रम्हदेवानेही रागाने
,तु पर्वत होशील असा शाप दीला
.तोच ब्रम्हगीरी पर्वत प्रत्यक्ष शीवशंकर डोंगर बनुन पृथ्वीवर स्थापीत झाला
. ब्रम्हाला दीलेला शाप त्यांच्या भोळ्या रुपास बघवला नाही व त्यांने
, हा पर्वत ब्रम्हगीरी म्हणुन ओळखला जाईल असा वर दीला
, अशी ही पद्मपुराणातील कथा
. या कथेनुसार वीष्णु हरीहर रुपात डोंगर बनुन प्रकटले
,तर इंद्र अंजनेरी पर्वताच्या रुपाने
. त्यांच्या जोडीला आसपास वेगवेगळे पर्वत देवी देवताच्या रुपाने प्रकटले
.
हरीहराचे सोपान - सह्याद्रीचेदीव्य स्वप्न
वीज्ञानाच्या अंगाने या कथेची जोड पृथ्वीवर सह्याद्रीची डोंगररांग नीर्माण झाली त्याच्याशी जोडली जाऊ शकते
.शास्त्रज्ञांनी या डोंगरांगेचा काळ साडे तीन कोटी वर्षांपुर्वीचा नीश्चीत केला आहे
. ७० टक्के पाणी व ३० टक्के भुभाग असे स्वरुप असलेल्या पृथ्वीवर सगळी जमीन ही अस्थीर म्हणजे तरंगती आहे व या जमीनीचा प्रवास अखंडपणे सुरु आहे
. साडे सात कोटी वर्षांपुर्वी ओस्ट्रेलीया खंड हा युरेशीया कडे तरंगत तरंगत एकमेकांच्या जवळ कुर्मगतीने सरकत राहीले गोंडवाना काळात ते एकमेकांना भीडले
. या महाटक्करीतुन पृथ्वीच्या गाभ्यात असलेला तप्त अग्नीरस जमीनीचे बंध झुगारुन उफाळुन आला
. त्यातुन पृथ्वीवरची सगळ्यात जुनी डोंगररांग सह्याद्रीच्या रुपाने नीर्माण झाली
.स्कंद पुराणाच्या सह्याद्री खंडा नुसार सह्याद्री डोंगररांगेचे उत्पत्ती स्थान ब्रम्हगीरी पर्वत आहे
. पुराणांच्या रचनकारांना याचे ज्ञान कसे झाले असावे हे देखील एक कोडेच आहे
. कदाचीत अग्नीरस त्रीसध्या क्षेत्रातुन म्हणजे त्रींबक परीसरातुन उद्दीप्त झाला असावा
. तीथुन तो दक्षीणोत्तर पसरला
. काळांतराने थंड झाल्यानंतर त्यावर जीवसृष्टी अवतरली ही मांडणी वैज्ञानीकांनी करुन ठेवली आहेच
.
अग्नीयुग संपुन पृथ्वी थंड झाली तसे डोंगरांवरुन नद्या जन्मल्या
. त्या सोबत वृक्ष
, वेली
,द्रुम नीर्माण झाले
.वीवीध जीव नीर्माण झाले
, ही कथा वीज्ञान व पुराणांनी आपापल्या परीने कथन केली आहे
. आपले भरण पोषण करणाऱ्या सृष्टीची आराधना करण्यासाठी हे डोंगर देवस्वरुप
, म्हणुन पुर्वीच्या लोकांनी त्यांचे पुजन केले
.मानववंश प्रगती पथावर असताना कालांतराने यातील काही डोंगरांचा वापर राजशकट हाकण्यासाठी महसुल जमा करण्याचे केंद्र व संरक्षण केंद्र म्हणुन झाला
.नेमके कोणत्या काळात ही नीर्मीती झाली याचा शोध इतीहासकारांना लावता आलेला नाही
.त्यावरील बांधकामांवरुन त्यांच्या प्राचीनत्वाचे अनुमान काढले गेले
.
त्रींबकचा परीसर हा पुर्वपार उपजाऊ
. येथुन मोठा महसुल गोळा होत असे
.सर्व जुन्या राजवटीचे येथे अस्तीत्व होते
.याचे दाखले जुन्या साहीत्यातुन तसेच गडांवरच्या बंधकामांच्या अवशेषांवरुन अभ्यासकांनी मांडले आहेत
. त्र्यंबकेश्वर व हरीहर हे दोन्ही कील्ले शब्दश:
बेलाग
. त्यावरील यादव काळाच्या खुणांकडे अभ्यासक नीर्देश करतात
. तर काहींच्या मते त्या अगोदरच्या राजवटींचे त्यावर अस्तीत्व असावे
.
हरीहर कील्ल्याची थरारकवाट
शतक तेरावे
तेराव्या शतकत देवगीरीच्या यादवांचा त्रींबकगड व परीसरावर अंमल होता
. इसवीसन १२९४ मध्ये अल्लाउद्दीन खीलजीने देवगीरीच्या यादवांचा पाडाव करताच मुसलमानी राजवटींने या परीसरात आपले हातपाय पसरायला सुरुवात केली
.१३४७च्या सुमारास दक्षीणेत बहामनी राज्य नीर्माण झाले
;१४००च्या सुमारास त्याची शकले होऊन दक्षीणेत पाच मुसलमान शाह्या नीर्माण झाल्या
.इसवीसन १५५३ला त्रींबकची लीखीत नोंद आढळते
. नीझामशाहाने ३० डीसेंबर १५५३ मध्ये तो ताब्यात घेतला
. त्यावेळची ५८ कील्ल्यांची यादी सैय्यद अली तबातबा हा त्याच्या बुऱ्हाने मासीर या फार्सी ग्रंथात करतो
.
१५६५ च्या तालीकोटच्या लढाईत वीजयनगरचे वैभवशाली राज्य लयास गेले आणी दक्षीण भारताला एकप्रकारचा सांस्कृतीक धक्का बसला
.मुसलमानी राजवटीची राळ उठताना त्रींबक परीासरातले सत्ताधीश इथले मुळ नीवासी हींदु महादेव कोळ्यांनी जोरदार प्रतीकार केला पण तो शेवट पर्यंत टीकु शकला नाही
.
शहाजींची १६३६ला सोडचीठ्ठी
दक्षीणेत मुघलांचा प्रवेश तब्बल चाळीस वर्षे रोखला गेला तो मलीक अंबरच्या कडव्या प्रतीकारामुळे
. यात मलीक अंबरला बहुतांशी काळ
‘स्वराज्य संकल्पक
’शहाजी महाराजांची मोलाची साथ होती
. मुघलांसारखी प्रबळ सत्ता दक्षीणेत आली तर हींद्वी स्वराज्य संकल्पनेला धोका पोहोचु शकते यासाठी शहाजींनी मुघलांच्या वीरोधात खटाटोप केला
.शहाजी महाराजांनी क्षीण होत चाललेली अहमदनगरची नीझामशाही वाचवीण्याचा अटोकाट प्रयत्न केला
. मलीक अंबरच्या मृत्युपश्चात नीझामशाहीत मोठी अंधाधुंदी माजली
. नीझामशाहीला वारस उरला नाही तेव्हा शहाजी महाराजांनी ९ वर्षांच्या मुर्तझा नीझामला पेमगीरी कील्ल्यावर नेऊन गादीवर बसवीले
.त्यांनी अनेक मुसलमान सरदारांकडे नीझामशाही वाचवीण्यासाठी याचना केली
, पण त्यांना हवी तशी साथ मीळाली नाही
. इकडे मुघलाच्या आक्रमणाचा धोका भेडसावत होता
. शेवटी त्यांनी गुप्तपणे राजधानी माहुली कील्ल्यावर हलवली
. त्यांच्या हालचालीचा सुगाव लागल्याने मुघल व आदीलशाहा यांनी शाहजींचे व त्यांच्या सोबतच नीझामशाहीचे पारीपत्य केले
.
हा संघर्ष शहाजींनी शरणागती पत्कारल्यानंतर संपुष्टात आला
. शहाजी राजांनी लहानग्या मुर्तझाला मुघलांकडे सुपुर्द केले
. त्याच बरोबर त्यांच्या ताब्यातील नीझामशाही प्रदेश देऊन टाकला
. त्यात त्रींबकगड व हरीहरगडाचाही समावेश होता
. इसवीसन १६३६ची ही हरीहरची नोंद अत्यंत महत्वाची
. त्यानंतर या दोन्ही गडांवर फार अल्पकाळ हींदुंचा अंमलाखाली राहीला
.
हरीहर - कर्मकठीण
मोरोपंत गड घेतात...
शीवाजी महाराजानी स्वराज्याची भरपाई करण्यासाठी सुरतेची दुसऱ्यांदा लुट केली
. लुट घेऊन परतत असताना १७ ओक्टोबर १६७०ला दींडोरी येथे लढाई झाली
. त्याच सुमारास मोरोपंत पींगळे यांनी त्रींबकगड घेतला
. देवगीरीच्या यादवांनंतर शहाजी आणी त्यानंतर मोरोपंत पींगळें असा हा मोठा कालखंड
. शीवाजी महाराजांनी या गडाचे नाव बदलुन श्रीगड ठेवले अशी नोंद सभासद बखरीत आढळते
.इतीहासात युद्ध करुन त्रींबकगड घेतल्याची उदाहरणे फारच दुर्मीळ
,त्यातलेच हे एक
.त्रींबकगड पडल्यानंतर हरीहर
, भास्करगड
,अंजनेरी गडाचे काय झाले याचा मात्र कोणताच उल्लेख सापडत नाही
.
एकदा ताब्यात आल्यानंतर त्रींबकगड कीमान दहा वर्षे तरी मराठ्यांकडे राहीला
.शीवाजी महाराजांच्या मृत्युनंतर औरंगजेब स्वत
:दक्षीणेत उतरला
. त्याने आदीलशाही व नीझमशाहीचा घास गीळला
. मराठेशाहीकडुन त्याला कडवा प्रतीकार होत राहीला
. १६८२ मध्ये अंकाईचा कील्ला मसलत करुन मीळाल्यानंतर औरंगजेबने रामसेज या नाशीक जवळच्या लहानशा कील्ल्याच्या रुपाने दक्षीणेचे प्रवेशद्वार खुले करण्याचा प्रयत्न केला
. हे द्वार त्याला दीर्घ काळ उघडता आले नाही
. असे म्हणतात की
, हा संघर्ष दीड कींवा तीन वर्षे तरी चालला असावा
. रामसेज युद्धाच्या वेळेस त्रींबकगडालाही मुघलांचा वेढा पडला
. पण त्रींबकगड काही त्यांच्या ताब्यात आला नाही
.याच कालावधीत हरीहरचा कील्ला सुद्धा मराठ्यांकडेच असावा
.
त्रींबकगडावरुन रामसेजकडे मराठ्यांना पोहोचणारी रसद मुघलांनी रोखुन धरली
. युद्दात यश येत नाही असे पाहुन औरंगजेबने फंदफीतुरीने गड घेण्याचा प्रयत्न केला
. ते सगळे प्रयत्न वीफल ठरत होते
. १६८३ मध्ये संभाजी महाराजांच्या पदरी असलेल्या राघो खोरा
(खोपडा
)हा मुघलांना जाऊन मीळाला
. त्याने त्रींबकगडाच्या कील्लेदारास वश करुन गड मीळवुन देतो असे आश्वासन बादशाह औरंगजेबला दीले
,त्याने ते मंजुर करुन त्यास ७०० जात व २०० स्वार अशी मनसब दीली
. त्याने त्रींबकगडाच्या कील्लेदारास मोठ्या मनसबीचे आश्वसन दीले
. कील्लेदाराने त्याची खरडपट्टी काढुन त्यास परत पाठवीले
. त्यामुळे राघो खोरा पळुन गेला
. त्याच्या मार्फत मध्यस्ती करणाऱ्या जमनाजी नावाच्या माणसाला मुघलांनी अटक केली
. आपला राघो खोराशी काहीच संबंध नाही हे वारंवार पटवुन दील्यानंतर जमनाजीची सुटका झाली व त्याची मनसब कायम ठेवण्यात आली
.
हरीहर तीर्थाच्या शेजारीअसलेले छोटे कुंड
त्रींबकगड औरंगजेबच्या दृष्टीने प्रतीष्ठेचा प्रश्न बनला
. त्याने नासीक उर्फ गुलशनाबादचा ठाणेदार मातबरखान यास त्र्यंबकगड घेण्यास पाठवीले
. त्याने सहा महीने वेढा घातला
.गडावर रसदेचा एक दाणाही जाऊ दीला नाही
. गडाची शीबंदी हवालदीली झाली
. अखेर १६८४ मध्ये कील्लेदार शीवाजी तेलंगराव व शामराज हे गडावरुन उतरुन खाली आले
. त्यांना मुघलाईत मनसबी मीळाल्या
. दहावर्षे शीवशाहीत राहीलेला गड मराठ्यांच्या हातुन पुन्हा गेला
.येणे प्रमाणे हा टकोरबंद गड जाताच परीसरातले इतर गड मुगलांच्या ताब्यात गेले
.
मुघलांकडे आता मराठ्यांचे लहानसे राज्य सोडुन अवघा हींदुस्तान ताब्यात होता
. खुद्द बादशाह दक्षीणेत तळ ठोकुन होता
. कुतुबशाही व आदीलशाही बुडवुन त्याचा मराठी मुलुख घेण्याचा नीकराचा प्रयत्न सुरु होते
.एक गड
, एक मुलुख घेत मुघल फौजा पुढे जात व त्या माघारी मराठे पुन्हा तो जींकुन घेत
. १६८९च्या फेब्रुवारी महीन्यात संभाजी महाराजांची औरंगजेबने क्रुरपणे हत्या केली
.त्यानंतर त्याला मराठ्यांचा लढा संपला असे वाटले
.पण त्याचे स्वप्न शेवट पर्यंत पुर्ण होऊ शकले नाही
.मराठेशाही खीळखीळी झाली तरी राजाराम महाराज आणी त्यांच्या पश्चात ताराबाईंनी पुढे हा लढा चालु ठेवला
.शेवटी १७०७ साली वयाच्या ८९व्या वर्षी तो मरण पावला
.
औरंगजेबच्या मृत्युनंतर भारतीय राजकारणातले चीत्र वेगाने बदलत गेले
.संभाजी पुत्र शाहु मुघलांच्या कैदेतुन सुटले
. महाराष्ट्रात येताच त्यांनी राज्याची सुत्रे हाती घेतली
. अनेक नामांकीत सरदारा मंडळी त्यांनी गोळा केली
. बाळाजी वीश्वानाथ पेशवा आणी मग त्या पाठोपाठ पहीला बाजारीव यांच्या नेतृत्वाखाली रणमैदानात मराठेशाहीचा वारु चौखुर उधळला
. त्याने मुघलांच्या इतकाचअटक ते कटक असा वीशाल प्रदेश काबीज केला
. दील्लीच्या सुलतानास त्यांनी अंकीत केले
.त्रींबक परीसरातुन चौथाई वसुलीचे अधीकार पेशव्यांकडे होते
. त्रींबकगड मात्र अजुनही मुघलांच्या वतीने हैदराबादच्या नीझामाकडे होता
. त्र्यंबकेश्वर येथील इनामदार जोगळेकर यांच्या बखरीतील हकीगतीत पेशव्यांनी त्रींबकगड कशा प्रकारे काबीज केला याचे वर्णन आहे
. १७५१च्या सुमारास नीझामाने तहाची बोलणी करण्याची तयारी दर्शवीली
. त्यासाठी त्याने त्रींबकगड आपल्याकडेच ठेवण्याची मागणी केली
. पेशव्यांनी तहाची बोलणी केली
.पण गड नीझामाला काही दीला नाही
.अशा रीतीने तब्बल ६२ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्रींबकगड मुसलमानी जोखडातुन मुक्त झाला
. त्रींबक पडला की रांगेतले इतर कील्ले सुपुर्द होतात तोच कीत्ता यावेळी कायम राहीला असण्याची शक्यता आहे
. हरीहर कील्ला कोणत्या परीस्थीतीत पेशव्यांनी घेतला या संबंधीचे उल्लेख मीळु शकले नाहीत
, परंतु तो पेशव्यांनी घेतला हे नक्की
.तो त्रींबकगडापुर्वीच पेशव्यांना मीळालाअसावा. हरीहर शीलालेखाचे वाचन त्याकडे संकेत करते.

हरीहर पुष्कर्णीचे गुढ उकलले
त्रींबकचे महत्व मराठ्यांच्या राजकारणात अनन्यसाधारण होते
. म्हणजे त्रींबकगड मुघलांकडे असला तरी शीवाजी महाराज त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत
. नानासाहेब पेशव्यांच्या वेळी त्रींबकगड पेशवाईत नव्हता तरी ते त्रींबकराजाच्या भेटीस यायचे
. गडाच्या पायथ्याला कुशावर्त तीर्थात सींहस्थ कुंभमेळ्यात स्नान करत
. आता गड अधीकृतरीत्या ताब्यात आला म्हटल्यावर त्यांनी मंदीराच्या जागी मुघलांनीबांधुन ठेवलेली  मशीद पाडुन १६५५ मध्ये नवे मंदीर बांधण्याचे काम सुरु केले
. त्यावर पेशव्यांनी १० लक्ष रुपये खर्च केला
.हे काम सतत ३१ वर्षे सुरु होते
. हे काम सुरु असतानाच हरीहर कील्याच्या उत्तर माचीवर वीस्तीर्ण आकाराची पुष्कर्णी बांधण्यात आलीअसावी
. ही कोणी बांधली याबद्दल आजवर अनभीज्ञता होती
. पुष्कर्णीवर उठावाचा सुंदर असा शीलालेख शेंदुर फासल्यामुळे वाचणे कठीण होते
. इतीहासाच्या अभ्यासकांनी वेळोवेळी हा शीलालेख वाचण्याचा प्रयत्न केला पण कोणीच त्याचे पुर्ण वाचन केले नव्हते
.अमीत बोरोले यांचे दुर्गभ्रमंती नाशीकची या पुस्तकात हरीहर शीलालेखाचे वाचन असल्याची माहीती मीळाली
, त्यानुसार ते पुस्तक बघीतले पण त्यात पुर्ण वाचन नव्हते
.
जी अक्षरे लागत नव्हती याकरीता काही जुन्या छायाचीत्रांचा संदर्भ मीळवील
. या कामी नाशीकच्या वैनतेयचे अंबरीश मोरे यांच्या एका छायाचीत्राची बरीच मदत झाली
. पण ते छायाचीत्र सुद्धा ओईलपेंटचा रंग दील्यानंतरचे होते
. तथापी ते उत्तम कॅमेऱ्यातुन घेतल्याने त्यावरुन शकाची व पु्ष्कर्णी बांधली त्याची माहीती वाचण्यास मदत झाली
. शीलालेखावरचर हरीहराचे नाव मात्र स्पष्ट दीसत होते
.ते इतर वाचकांनी त्यांच्या साहीत्यात नमुद केले आहे
. आता हळु हळु एक एक गोष्ट उलगडायला लागली
. शंकराचा मुलगा नारायण हे नाव स्पष्ट झाले
. खालच्या ओळीत पनामा हा शब्द छळत होता
. हा पनामा काय असावा
?यावर खल सुरु असताना नाशीकमधल्या एका संस्थानीक घराण्यातुन
, राजेबहाद्दर हे मुळचे दाणी असल्याचे व ते सासवडचे असल्याची माहीती मीळाली
. मग या पनामा अक्षराच्या अगोदर असलेल्या दाणी नावाचा उलगडा झाला
- दाण्युपनामा ही उकल झाली
.शीलालेखावरचे शक व तीथी मीळाली पण संवत्सर व महीन्याचे नाव स्पष्ट होत नव्हते
. पंधराच दीवसांपुर्वी त्र्यंबकेश्वर मंदीराच्या शीलालेखाचे वाचन करण्याचा योग आल्याने त्याच्या लगतचे म्हणुन संवत्सराचे नाव वाचण्यास मदत झाली
. जुन्या संस्कृत ग्रंथातुन मासाचे नाव स्पष्ट करता आले
. अशा प्रकारे हरीहराच्या शीलालेखाचे पुर्ण वाचन झाले
. राजेश दीक्षीतने खरोखरच मोठे कसब लावत लेखाचे वाचन व त्याचे भाषांतर करुन दीले
.

शेंदुर फासल्याने बुजलेलीअक्षरे

आठ ओळींच्या या शीलालेखाची भाषा संस्कृत आहे
.
काळ
, तीथी आदी अंकात न देता शब्दात दीले आहेत
.
श्री
।।श्री गणेशायनम
: ।। धात्रवर्ना
मी शुक्रेधवलशरतीथौशंकरात्मसु

:श्रीमन्नारायणा्ख्येगजगीरीरसक्
‌यु
क्तसत्
‌शालीवाहोशकेदाण्युपनामा
हरीहरवीलसद्देवताकंसुतीर्थंप्रादद्दी
ण्यार्तलोकश्रमनीरहरुतेश्रेयसे
मंगलाय ।।१।।
लेखाचे वाचन व स्वैर अनुवाद: राजेश दीक्षीत, त्र्यंबकेश्वर

) श्री
(श्री या अक्षराने शीलालेखाची सुरुवात आहे
)

) ।।श्रीगणेायनम
:।। धात्रव र्ना
(मी
) (गणेशाचे स्तवन हा दंडक आहे
. धात्रवर्‌
= धात्रृ नावाचे संवत्सर
)

) मी शुक्रेधवलशरतीथौ शंकरा त्म
: सु
(शुक्रे
= ज्येष्ठ महीना
, धवल
= शुद्धपक्ष
, शर
= पंचमीतीथी शंकरात्म सुत
: = शंकराचा मुलगा
)

) त
: श्रीमन्नारायणाख्ये गज गीरी रस क्
‌ यु
(शंकर पुत्र नारायण नामे वीख्यात
, गज
= ८
,गीरी
= ७
, रस
= ६
, क्
‌ =१
,युक्त
)

) क्त सत शालीवाहो शके दाण्युपनामा
( १६७८ या शालीवाहन शकात
- इसवीसन १७५६ साली
,दाणी उपनावाचे
)

) हरीहर वीलसद्देवताकं सुतीर्थं प्रादद्दी
(हरीहर पर्वतावरील वीलास करणाऱ्या देवतांच्या नावे उत्तम तीर्थ दीन जनांचा त्रास कमी करण्यास
)

) ण्यार्त लोकश्रम नीरहरुते श्रेयसे
(आर्त लोकांच्या श्रम हरण करुन पुण्यप्राप्तीसाठी
)

) मंगलाय
(मंगल श्रेयासाठी नीर्माण केले
)
हरीहरच्या जुन्या वसाहतीलगत दगडात कोरलेले शीवशंकर
कोण होते नारोशंकर
वेगवेगळ्या कालखंडात नासीक हे महत्वाच्या राजवटींच्या राजधानीचे केंद्र होते
.जसे यादव
, अभीर
,राष्ट्रकुट
, त्रैकुटक
, बागुल इत्यादी
.तद्वताच नासीक शहर हे सरदारांचे शहर म्हणुन ओळखले जाते
. सरदार रास्ते
, सरदार वींचुरकर
, सरदार राजेबहाद्दर
, पवार घराणे
,अशी काही नावे आजच्या पीढीला कळतात ती त्यांच्या शहरात पसरलल्या वास्तु
,मंदीरे आदींशी नीगडीत नावांमुळे
.गोदावरी नदीच्या कीनाऱ्यावर नारोशंकराचे मंदीर प्रसीद्ध आहे
.हे रामेश्वराचा शीवालय
.१७४७ साली हे मंदीर बांधण्यात आले
.त्यास १८ लाख रुपये खर्च आला
.उत्तर महराष्ट्रातले मराठा काळातल्या सर्वोत्तम मंदीरात याची गणना केली जाते
.मंदीराची ओळख मात्र मदीर अशीच आहे
. या मंदीराची भली मोठी घंटा नाशीकची सांस्कृतीक ओळख बनली आहे
. नाशीक महानगरपालीकेच्या मानचीन्हात तीचा वापर करण्यात आला आहे
.ही बहुधा वसईच्या युद्धात जींकुन आणली असावी
.चीमाजी अप्पाने वसईत पोर्तुगीजांच्या वीरुद्ध नीकराची झुंज दीली
.त्याच्या सोबत त्यांचे वीश्वासु सहकारी नारोशंकर राजोबहाद्दर हे होते
. अशा आठ पोर्तुगीज घंटा महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठीकाणी बसल्याचे उल्लेख सापडतात
.
नारोशंकराचे
नारोशंकर राजेबहाद्दुर यांच्या कामगीरीवर नजर टाकली तर ते पेशवाईतले पहील्या फळीतले सरदार कशामुळे गणले जात याची प्रचीती येते
.घोड्याच्या पागेची नीगा राखणाऱ्या साधारण शीपायापासुन त्यानी इतकी मोठी मजल मारली
.नारोशंकरांच्या तलवारीचा उत्तरेत मोठा दरारा होता
. त्यांनी बंडखोरी करणारे ओर्च्छाचे राज्य खालसा केले
. झांसी शहर त्यांनी वसवीले
.दील्लीच्या सुलत्तानाचे रक्षक म्हणुन त्यांची पेशव्यांनी नीयुक्ती केली
.पेशव्यांच्या वतीने ते उत्तरेत वसुलीचे काम करत
.त्यांनी दक्षीण भारतातही काही मोहीमा केल्या
. दील्लीत त्यांच्याकडे पेशवे व शींद्यांचा खजीना सांभाळण्याची जबाबदारी होती
. पानीपतच्या युद्धात ते अवघी दौलत टाकुन पळुन आले असे बालंट त्यांच्यावर लागले
. परंतु त्यांच्यावर जेव्हा जेव्हा आरोप झाले त्या प्रत्येक वेळेस पेशव्यांना योग्य तो खुलासा देऊन त्यांनी त्यांजी नाराजी दुर केली
.
नारोशंकर १७४२ ते १७५९ असे पुढची पंधरा वर्षे झांसीचे सुभेदार होते
. (मराठी वीश्वकोष खंड ६
) त्यांच्या काळात झांसी शहराची भरभराट झाली
. तीकडे झासी शहर वसत होते
.पेठा नीर्माण होत होत्या
. कील्ला मजबुत केला जात होता
. इकडे पेशव्यांना एक छदामही मीळत नव्हता
. त्यावरुन पेशव्यांकडे दरबारातच नारोशंकरच्या कारवायांची कागाळी करण्यात आली
. त्यांनी जातीने हजर राहुन पेशव्यांना उत्तरेत महत्वाचे ठाणे उभे केल्याचे पटवुन दीले
. त्यामुळे पेशव्यांची नाराजी संपुष्टात आली
.
माचीवर जोत्यांचे अवशेष
अहमदशाह अब्दालीने ११ ओगस्ट १७५७ला दील्लीवर दुसऱ्यांदा व उत्तरेत चौथी स्वारी केली
. त्याने  दील्लीचे राज्य काबीज करुन नजीब उद्दोला या रोहील्याकडे दील्लीच्या राजवटीची कमान दीली
.मुघल बादशाह आलमगीर दुसरा हा अब्दलीचा मांडलीक बनवीला गेला
.  वार्षीक २० लाखाची खंडणी नीश्चीत करण्यात आली
. आब्दाली माघारी फीरताच आलमगीरने अब्दालीच्या वारंवार होणाऱ्या चढायांना कंटाळुन मराठ्यांकडे मदतीची याचना केली
. तोवर अब्दाली नीघुन गेला होता
.मराठी फौजांनी दील्ली चहुकडुन घेरली
. दोन आठवड्यांपर्यंत युद्ध चालले
. १७५७च्या ओगस्ट महीन्यात पेशव्यांनी नीर्णायक वीजय मीळवुन लाल कील्ल्यात प्रवेश मीळवला
. दील्लीत सदाशीवराव भाऊंनी दरबार भरवला
. यात नारोशंकर यास राजेबहाद्दुर ही पदवी देण्यात आली
. त्यांना दील्लीच्या सुल्तानाच्या रक्षणाची जबाबदारी देण्यात आली
.  त्याच्याकामगीरीबद्दल खुश होऊन बादशाहने त्यास मालेगाव व लगतच्या ८ गावांची जहागीरी दीली
. पुढे दक्षीणेत परतल्यावर नारोशंकरांनी ती सनद श्रीमंतांस दाखवुन मालेगावात घर बांधण्याची परवानगी मागीतली
. घर बांधले तरी ते दीर्घकळ टीकत नाही
,असा वीचार करुन त्यांनी दील्लीहुन कुरैशी या प्रशीक्षीत बेलदार समुदायाची माणसे बोलावुन १७५७ मध्ये दील्लीच्या कील्ल्यासारखा भव्य असा कील्ला बांधला
. त्यावर त्यांनी अठरा लाख रुपये खर्च केले
.  तत्कालीन इंग्रज लष्करी अधीकाऱ्यांनी यास खानदेशाचे नाक असे म्हटले
.कील्ला पुरा झाला तेव्हा
, नारोशंकर मुघलांना फीतुर असल्याची दरबारात कागळी झाली आणी श्रीमंतांनी जासुद पाठवुन कील्ला खाली करुन देण्याचे फर्मान दीले
. तोवर कील्ल्याचे वास्तु पुजन झाले नव्हते
. नारोशंकरांनी आपण श्रीमंतांचेच नोकर असल्याचे प्रतीपादन करुन कील्ला खाली करुन दीला तेव्हा कुठे पेशव्यांना त्यांच्या नीष्ठेची प्रचीती आली
.
मालेगावचा कील्ला बांधला त्याच्या आसपासची तारीख हरीहर शीलालेखावर आढळते
. इतका सुबक शीलालेख व त्यावरची अक्षरे कोरण्याची पद्धत या परीसरात दुसरी आढळत नाही
.पुष्कर्णी पन्नास फुट लांब व पन्नास फुट रुंद असुन तीची बांधणी अतीशय सुबक पद्धतीने करण्यात आली आहे
.यावरुन मालेगावचा कील्ला बांधणाऱ्या कुरैशी बेलदारांकडुन हे कौशल्याचे काम करवुन घेतले असावे याचा अंदाज लावला जाऊ शकतो
.पेशव्यांनी १७५५ मध्ये त्र्यंबकेश्वर मंदीराचे बांधकाम सुरु केले
.
झासीवरुन नारोशंकरांस परत बोलावल्यानंतर त्यांची हरीहरवर कुठली कामगीरी झाली असावी का
?ज्यामुळे त्यांनी कील्ल्याच्या उत्तर माचीवर वीशाल आकाराची पुष्कर्णी बांधली
. हा माचीचा परीसर कील्ल्याच्या मुख्य वस्तीचा परीसर असावा
. हरीहर कील्ल्यावर जाणारा मार्ग दुष्कर असल्याने कील्लेदाराचा वाडा व महत्वाच्या कचेऱ्या या माचीवरच असाव्यात
. ही माची म्हणजे वेताळाचा पायथा उतरुन पुर्व बाजुने ब्रम्ह्याच्या डोंगराच्या बाजुला असलेला परीसर
.तीथे मोठ्या प्रमाणावर वाड्यांची जोती दृष्टीस पडतात
. हरीहर कील्ल्यावर मोठ्या वस्तीच्या दृष्टीने मर्यादीत पाणीसाठा उपलब्ध असल्याने युद्धकाळात गडमाध्यावर वस्ती स्थलांतरीत होत असावी
.
नारोशंकरांची महत्वपुर्ण कामगीरी ही उत्तर भारतात झाल्याने त्याच्या नावानीशी हरीहरावर इतके माठे बांधकाम करण्यास पेशव्यांनी उगाचच परवानगी देण्याची शक्यता कमी दीसते
. पेशवाईतली कींवा राजेबहाद्दरांशी संबंधीत कागदपत्रे तपासली तर नारोशंकर व हरीहर हा नेमका संबंध कशामुळे आले याचा उलगडा होऊ शकतो
.
मालेगाव येथील वकील एडव्होकेट व डॉक्टर डी
.एस
. कुलकर्णी यांनी अस्सल कागदपत्रे व महीतीच्या आधारे सरदार नारोशंकर राजेबहाद्
‌दुर हे पुस्तक प्रकशीत केले आहे
.त्यात त्यांनी राजेबहाद्दुर यांची जुनी कागदपत्रे इंग्रजांच्या १८१८च्या स्वारीच्या वेळी नष्ट झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे
.अजुनही पुण्यातले पेशवा दफ्तर खंगाळले
, अथवा अन्य संदर्भाची
, खास करुन त्रींबकगड व हरीहर कील्ला या संबंधीची माहीती तपासली तर या वीषयावर महत्वाचा प्रकाश पडु शकतो
.
धन्यवाद!
आमच्यासाठी रोजच हरीहरभटकंती...
वीशेष आभार:
भगवान बाबा, कळमुस्ते
गीरीश टकले
इलीयास सीद्दीकी
ओम दीक्षीत
बाळा उजे
मनोज खैरनार
सुयोग देवकुटे
अंबरीश मोरे
अनील दुधाणे
रवी पवार
संदर्भ:
-महाराष्ट्र देशा, पंकज समेळ
-मराठी
- संस्कृत शीलालेखाच्या वीश्वात,महेश तेंडुलक
-भटकंती नाशीक जील्ह्याची,अमीत बोरोले
-मराठ्यांचा इतीहास,संपादक अ.रा. कुलकर्णी, ग.हे.खरे
-बखर संस्थानची, सुनीतपोतनीस
-पेशवे घराण्याचा इतीहास,प्रमोद ओक
-त्र्यंबकगड-अंजनेरी-रामसेज,महेश तेंडुलकर
-पेशव्यांची बखर, काशीनाथनारायण साने
-सातारचे श्रीमंत छत्रपतीशीवाजी महाराज यांचे वंशज व प्रतीनीधी आणी अष्टप्रधानयांचा इतीहास, वीष्णु
गोपाळ भीडे

Please make your own arrangements as food is available only at base village. You can contact Sanjay Nirgude 9421035554 / 7776893098 for food and restroom at the base village 

उंची : ३५८६ फुट

श्रेणी : मध्यम

महाराष्ट्रातील प्रत्येक गडाला स्वतःचे असे वेगळेपण आहे. काही किल्ले त्यावर घडलेल्या इतिहासामुळे प्रसिद्ध आहेत तर काही किल्ले त्यांच्या दुर्गवैशिष्ठमुळे प्रसिध्द आहेत. उभ्या कड्यात ७० अंशाच्या कोनात असलेल्या खोदीव पायऱ्या या दुर्गवैशिष्ठमुळे प्रसिध्द असलेला असाच एक गड म्हणजे हरिहरगड. संपुर्ण महाराष्ट्रातील गड-किल्यांत अतिशय दुर्मिळ असा प्रवेशमार्ग या गडावर आजही शिल्लक आहे पण आज त्याचे हे सौंदर्य त्याच्या मुळावर उठले आहे. मुंबई-पुणे-नाशिक या शहराशी असलेली या गडाची जवळीक यामुळे या गडावर आयोजकांकडून भटकंतीचा बाजार भरत आहे. शनिवार-रविवार या दिवशी गडावर होणाऱ्या भयानक गर्दीमुळे येथे एखादा अपघात होण्याची शक्यता आहे. अशा गोष्टीना वेळीच आवर घालायला हवा. नाशिक जिल्ह्यात सेलबारी- डोलबारी, अजंठा- सातमाळ, त्र्यंबक या डोंगररांगा आहेत. यातील नाशिकच्या पुर्वेस व इगतपूरीच्या दक्षिणेस पसरलेल्या त्र्यंबक डोंगररांगेत भास्करगड, हर्षगड, त्र्यंबकगड, अंजनेरी, रांजणगिरी, गडगडा, बहुला असे अनेक किल्ले दिसुन येतात. हरिहर हा या त्र्यंबक रांगेतील त्र्यंबकगडा पाठोपाठ महत्त्वाचा दुसरा किल्ला. प्राचिन काळापासून नाशिक हे बाजारपेठ म्हणून प्रसिध्द आहे. डहाणु बंदरातून नाशिककडे येणाऱ्या डहाणु- जव्हार- गोंडाघाट -अंबोली घाट- त्रिंबक- नाशिक या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी घाटावर बांधलेल्या दुर्गशृंखलेत गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हरीहर भास्करगड या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली. निरगुडपाडा व हर्शेवाडी हि गडाच्या पायथ्याचे गावे असुन निरगुडपाडा येथुन गडपायथ्याला जाण्यास दिड तास तर हर्शेवाडी येथुन एक तास लागतो. या दोन्ही वाटांनी आपण एकाच ठिकाणी गडाच्या पायथ्याला पोहोचतो. कमी वेळात व कमी श्रमात संपुर्ण किल्ला पहायचा असल्यास हर्शेवाडी हा योग्य पर्याय आहे. मुंबई-नाशीक महामार्गावरून घोटीमार्गे निरगुडपाडा हे अंतर साधारण १७० कि.मी.आहे. स्वतःचे वाहन असल्यास तेथुन ५ कि.मी. अंतरावर असलेल्या हर्शेवाडी गावात कच्च्या रस्त्याने जाता येते अन्यथा निरगुडपाडा येथूनच गड चढण्यास सुरवात करावी. नाशिक-हर्शेवाडी हे अंतर त्रिंबकमार्गे ४१ कि.मी. असुन नाशीक व पुणेकरांसाठी हा मार्ग सोयीचा आहे. हर्शेवाडी गावामधून समोरच हरिहर ऊर्फ हर्षगडचा डोंगर दिसतो. येथून एका बंधा-याच्या काठाने पुढे साधारण पाऊण तासाची खडी चढाई केल्यानंतर आपण हरिहर किल्ल्याखालील मोकळ्या पठारावर येऊन पोहोचतो. या वाटेवर डाव्या बाजुला एक समाधीचा दगड असुन त्यापुढे काही अंतरावर एक ढासळलेले कोरडे बांधीव टाके आहे. टा टाक्याच्या पुढे एक आश्रम व त्याशेजारी दगडी बांधणीची पुष्करणी आहे. पुष्करणीच्या काठावर गणेश व शिवमंदीर असुन आश्रमाच्या मागे असलेल्या झाडीत काही अंतरावर हनुमान मंदीर आहे. या पुष्करणीच्या भिंतीवर एका कोपऱ्यात दगडावर कोरलेला देवनागरी लिपीतील आठ ओळींचा शिलालेख आहे. या शिलालेखाभोवती महिरप कोरलेली असुन बाजुला दोन नक्षीदार खांब व वरील बाजुस कमळाची नक्षी व खालील बाजूस दोन पक्षी कोरलेले आहेत. हा शिलालेख पुढीलप्रमाणे आहे. श्री || श्री गणेशाय नम: त्रि व मा मि श्रुके धवल श शा ने यो श क त्र त: श्री मंत्रश गि र र स सु क्त सत शालिवाहने शके हरिहर विलसदे लोक श्रमनिरहसते श्रेय मंगलाय || या शिलालेखात हरिहर किल्ल्याच्या उल्लेख आहे. याशिवाय शालिवाहन शके गणेशाय नमः अशी काही अक्षरे सहजपणे वाचता येतात. हा शिलालेख तैलरंगात रंगवलेला असल्यामुळे काही अक्षरे वाचता येत नाहीत. सध्या येथे एका साधुचा मुक्काम असतो. गडावर मुक्काम करावयाचा झाल्यास हे सर्वात सुंदर ठिकाण आहे. हे सर्व पाहुन मुळ वाटेवर येऊन काही अंतर गेल्यावर आपण किल्ल्यासमोरील पठारावर पोहोचतो. निरगुडपाडा येथुन येणारी वाट या पठारावर आपल्याला येऊन मिळते. या ठिकाणी काही शेंदूर फासलेले दगड ठेवलेले आहेत. येथुन समोर दिसणाऱ्या उंचवट्याला डावीकडे ठेवत चढाई करायची. येथे येणाऱ्या गर्दीमुळे सध्या गावकऱ्यांनी येथे चहा-पाणी,सरबत, जेवण-नाश्ता याची दहा बारा दुकाने थाटली आहेत. या दुकानामधुन वाट काढत मळलेल्या वाटेने दहा- पंधरा मिनिटे समोरचा चढ चढत पुन्हा एका उंचवट्याला उजवीकडे ठेवत गेलो कि आपण हरिहर गडाच्या कातळभिंतीत कोरलेल्या पायऱ्यां असलेल्या लहानशा खिंडीत पोहचतो. या पायऱ्या सुरु होण्यापुर्वी त्याच्या विरुध्द दिशेला खालील बाजुस एक खडकात कोरलेले पाण्याचे लहानसे टाके आहे. किल्ल्यावर जाणारा हा ७०अंशी कोनात कोरलेला सरळसोट दगडी जिन्याचा मार्ग व त्यावरील दरवाजा हा पहाताक्षणी त्याच्या प्रेमात पाडणारा आहे. १८१८सालच्या मराठा-इंग्रज लढाईत इंग्रज अधिकारी कॅप्टन ब्रिग्ज याने हरिहरगड जिंकला. सुमारे २०० फूट सरळ व तीव्र चढाच्या उंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारखा या पाय-या बघून तो आश्चर्यचकित झाला. जिंकलेल्या किल्ल्यांच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करणे हे इंग्रजांचे धोरण होते पण हरिहर किल्ल्याच्या या पाय-यांनी कॅप्टन ब्रिग्ज भारावला. त्याने हरिहरगड जिंकला पण त्याच्या सुंदर पायरीमार्गाला मात्र हात लावला नाही. हरिहर किल्ल्याचे हे पहिले प्रवेशद्वार व त्याच्या दोन्ही बाजूस असणारे दोन लहान बुरूज कातळात खोदून काढलेल्या या मार्गाची शोभा वाढवितात. या पाय-यांनी एकावेळी एकच मनुष्य वर किंवा खाली जाऊ शकतो. पायऱ्यांवर दोन्ही बाजूंनी आधारासाठी खोबण्या असुन काही पायऱ्या ढासळलेल्या असल्याने थोडे जपूनच चढावे लागते. साधारण नव्वद पायऱ्यां चढल्यावर गडाचा पहीला पश्चिमाभिमुखी लहानसा दरवाजा लागतो. या दरवाजातून आत आल्यावर समोरच उजवीकडे कातळात गणपतीची अनगड मूर्ती कोरलेली असुन त्यावर शेंदुर फासलेला आहे. दरवाज्याची कमान व तटाबुरुजावरील फांजीचे बांधकाम विटांनी केलेले आहे. या दरवाजाच्या पुढे डोंगरांची कातळ कपार खोदून आडवी वाट तयार केली आहे. ह्या मार्गाची उंची जास्त नसल्यामुळे थोडे वाकूनच हा टप्पा पार करावा लागतो. या मार्गाने पुढे गेल्यावर कातळातच खोदलेले दोन पश्चिमाभिमुखी दरवाजे पार करताना साधारण ३०-४० पाय-या लागतात. या जिन्याच्या दोन्ही बाजूंस आधारासाठी असलेल्या खोबणीची मदत घेत आपण गडाच्या अंतिम दरवाजा असलेल्या भुयारी मार्गात येऊन पोहोचतो. हरिहर किल्ल्याचा हा शेवटचा छोटा दरवाजा पार केल्यावर आपला गडात प्रवेश होतो. या दरवाजावर असलेला विटांचा घुमट मोठया प्रमाणात ढासळलेला असुन या विटा दरवाजातच पसरलेल्या आहेत. दरवाजाच्या पुढील भागात काही उध्वस्त वास्तुंचे अवशेष असुन ते पार केले कि आपण किल्ल्याच्या पठारावर पोहोचतो. साधारण त्रिकोणी आकाराचा हा किल्ला पुर्व-पश्चिम पसरलेला असुन त्याचा विस्तार १६ एकरात सामावलेला आहे. आकाशातून पहिले असता या किल्ल्याचा आकार पंख पसरलेल्या गरुडासारखा दिसतो. गडाची उंची समुद्रसपाटीपासून ३४४५ फुट उंच असून गडाला चारही बाजुने ताशीव कडे असल्यामुळे तटबंदीची गरज भासली नाही. गडावर येण्यासाठी आपण आलो ती एकमेव पायऱ्यांची वाट आहे. दरवाजातून काही अंतर पुढे आल्यावर डाव्या हाताला खालच्या बाजूस दरीत कड्यालगत कोरलेल्या उध्वस्त दरवाज्याचे व प्रवेशमार्गाचे अवशेष दिसतात परंतु या दरवाज्यापर्यंत जाणारी वाट उध्वस्त झाली आहे. हा गडाच्या मूळ बांधकामातील दरवाजा कालांतराने दरड कोसळुन उध्वस्त झाला असावा. या दरवाजाच्या वरील बाजुस एक ५० फुट खोल कोठार आहे पण तिथे उतरण्यासाठी दोर सोबत असणे गरजेचे आहे अन्यथा हे कोठार वरूनच पहावे लागते. कोठाराच्या वरील बाजूस एक खडकात कोरलेले बुजलेले टाके आहे. ते पाहुन पुढे गेल्यावर आपल्याला एका मोठया वास्तुचे अवशेष दिसुन येतात. हि बहुदा गडाची सदर अथवा वाडा असावा. या वाटेवर डाव्या बाजुला खडकात कोरलेली एक गुहा दिसुन येते. ती पार करून पुढे गेल्यावर कातळात कोरलेली पाण्याची तीन मोठी टाकी व एक प्रशस्त तलाव दिसतो. या तलावाला पश्चिमेकडे दगडी भिंत बांधून पाणी अडविले असुन तलावाच्या काठावर लोखंडी देव्हाऱ्यात हनुमंताची मुर्ती ठेवलेली आहे. तलावाच्या काठावर दोन लहान चौथरे असुन एका चौथऱ्यावर शिवलिंग व नंदी तर दुसऱ्या चौथऱ्यावर मारुतीची भग्न मूर्ती ठेवलेली आहे. तलावाच्या उजव्या बाजुला असलेल्या उंबराच्या झाडाखाली एक खडकात खोदलेले टाके असुन या टाक्यातील व तलावातील पाणी पिण्यायोग्य आहे. या तलावाकडून समोरच आपल्याला एक घुमटाकार माथा असलेली दारुगोळा कोठाराची दगडी इमारत दिसते. तलावाकडून या इमारतीकडे जाताना वाटेत डाव्या बाजुला एक साचपाण्याचा खोदीव तलाव दिसुन येतो. या तलावाच्या मध्यभागी खडकात खोदलेले चौकोनी टाके आहे. ते पाहुन पुढे आल्यावर डाव्या बाजुला दुसरे खडकात खोदलेले खांब टाके आहे. सध्या हे टाके मातीने पुर्णपणे भरून गेले आहे. या परिसरात असलेले तुरळक वाड्याचे अवशेष व इतर उध्वस्त बांधकाम पहात आपण ३० x १२ फूट लांबरुंद अशा दगडी कोठाराकडे पोहोचतो. दारूगोळा कोठाराची हि वास्तू गडावरील छत शिल्लक असलेली एकमेव इमारत आहे. या कोठाराचे आत दोन भाग केलेले असुन आत शिरण्यासाठी एक लहान खिडकीवजा दरवाजा आहे. या कोठीत दिवसासुद्धा काळोख असल्याने कोठाराच्या भिंतीत एक मोठी लोखंडी पणती ठोकलेली दिसुन येते. या कोठारात १० ते १२ जण सहज राहु शकतात. कोठाराच्या पुढील बाजूस खडकात खोदलेली ५ लहानमोठी टाकी असुन मागील बाजूस एक मोठे टाके व त्यामागे एक लहान तळे खोदलेले आहे. यात एका टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. येथे डावीकडे खाली उतरुन तटापर्यंत जाता येते. दारुकोठार आणि आजूबाजूचा परिसर भटकून झाल्यानंतर किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी म्हणजे टेकडीकडे निघायचे. टेकडीवर जाणारी वाट थोडी निसरडी असल्यामुळे काळजीपूर्वक चढाई करावी लागते. दारूगोळा कोठारा समोर असलेली ६०-७० फूट उंचीची टेकडी म्हणजे हरिहर किल्ल्याचा सर्वोच्च माथा आहे. या टेकडीवर जाताना आपल्याला शेवटचा कातळटप्पा चढून पार करावा लागतो. माथ्यावर ध्वजस्तंभाची जागा असुन येथे भगवा ध्वज डौलाने फडकताना दिसतो. किल्ल्यावरील सर्वांत उंच जागा असलेल्या या ठिकाणावरून संपुर्ण हरीहर किल्ला तसेच त्रिबक डोंगररांगेत उत्तरेला वाघेरा तर दक्षिणेला कावनाई व त्रिंगलवाडी पूर्वेला कापडया, ब्रह्मा व त्यामागे ब्रह्मगिरी किल्ला तर पश्चिमेला फणी डोंगर, बसगड, उतवड, अंजनेरी किल्ला, वैतरणा जलाशय इ. परिसर दिसतो. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. गडाचा घेरा निमुळता असला तरी वर असलेल्या अवशेषांमुळे संपूर्ण गडफेरी करण्यास दोन तास लागतात. गड पाहून परत उतरताना मात्र काळजीपूर्वक उतरावे लागते. हरिहर उर्फ हर्षगड हा किल्ला कोणत्या राजवटीत बांधला गेला ह्याबद्दल निश्चित असा पुरावा नाही पण गडाचे एकंदरीत खोदकाम पहाता हा किल्ला सातवाहन काळात त्रिंबकगडाच्या बरोबरीने बांधला गेला आहे. १६३६ साली शहाजीराजांनी निजामशाहीची पुनर्स्थापना करतेवेळी शेजारचा त्र्यंबकगड घेताना हा किल्ला जिंकून घेतला. नंतर मात्र याचा ताबा मोगलांकडे गेला. पुढे १६७०-७१ याकाळात मोरोपंत पिंगळे यांनी नाशिक परिसरातील किल्ले जिंकून घेतले त्यावेळी हा किल्ला जिंकून घेतला. ८ जानेवारी १६८९ रोजी मोगल सरदार मातब्बर खान याने हा किल्ला जिंकला. इ.स.१८१८ मध्ये ब्रिटीशांनी त्र्यंबकगड जिंकल्यावर हा गड देखील मराठयांच्या ताब्यातून घेतला. पावसाळ्यात पायऱ्यांवर शेवाळ जमा होत असल्याने चढताना किंवा उतरताना पाय घसरण्याची शक्यता असते त्यामुळे पावसाळ्यात हरिहर किल्ल्यावर जाणे टाळावे.
© Suresh Nimbalkar

मागे जा

छायाचित्रे

Discover more

Travel Guides & Travelogues

Tourist Destinations

Hiking & Camping

Historical Sites & Buildings

Adventure Travel

श्रेणी नुसार स्तर
मध्यम
📏
समुद्र सपाटीपासून उंची (फ़ूट)
3500
🏰
किल्ल्याचा प्रकार
गिरीदुर्ग
📍
जिल्हा
नाशिक

किल्ल्याची छायाचित्रे

किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा

मुख्य छायाचित्र

प्रस्तावना

नाशिक जिल्ह्यातील सेलबारी - डोलबारी रांग, अजंठा - सातमाळ रांग, त्र्यंबक रांग या डोंगररांगात अनेक गडकिल्ले आहेत. हरिहर किल्ला त्र्यंबक रांगेतील प्रमुख किल्ला आहे. प्राचिन काळापासून महाराष्ट्रातील बंदरात उतरणारा माल अनेक घाट मार्गांनी नाशिकच्या बाजारपेठेत जात असे. यातील त्र्यंबक रांगेतून जाणार्‍या गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हरीहर भास्करगड यांची उभारणी करण्यात आली होती.

नाशिकच्या पश्चिमेस आणि इगतपूरीच्या उत्तरेस त्र्यंबक रांग पसरलेली आहे या रांगेचे दोन प्रमुख भाग पडतात एका भागात बसगड, उतवड, फणीचा डोंगर, हरिहर आणि त्रिंबकगड हे किल्ले येतात. तर दुसर्‍या भागात अंजनेरी, घरगड हे किल्ले येतात. वैतरणा ही या परिसरातील प्रमुख नदी आहे. पायथ्याच्या गावातून हरिहर आयताकृती भासतो.

महत्त्वाची ठिकाणे

कोणत्याही वाटेने किल्ल्यावर येतांना आपण किल्ल्याच्या कातळ भिंतीपाशी पोहोचतो. या कातळात पायर्‍या खोदलेल्या आहेत आणि जागोजागी आधारासाठी खोबण्या सुद्धा केलेल्या आहेत. या पायर्‍या चढून गेल्यावर समोरच एक दरवाजा लागतो. पुढे डोंगरांची एक कपार आहे. येथून चालत थोडे पुढे गेल्यावर पुन्हा काही पायर्‍या लागतात. या पायर्‍या चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या मुख्य द्वारापाशी पोहोचतो. या द्वारातून आत शिरल्यावर आपण किल्ल्याच्या पठारावर पोहोचतो. किल्ल्याचे पठार तसे निमुळतेच आहे. मध्येच एक उंचवटा आलेला आहे.

पायवाटेने थोडेसे पुढे गेल्यावर डावीकडे खाली कड्यात एक गुप्त दरवाजा आढळतो, मात्र तेथे जाण्याचा मार्ग सद्यस्तिथीला अस्तित्वात नाही. थोडे पुढे गेल्यावर हनुमानाचे आणि शंकराचे छोटेसे मंदिर आहे. समोरच पाण्याचा मोठा तलाव आहे. तलावातील पाणी पिण्यास योग्य आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर एक इमारत आढळते. या इमारतीत दोन खोल्या आहेत. या इमारतीमध्ये १० ते १२ जणांना राहता येते. इमारतीच्या एका बाजूला ५ पाण्याची टाकी आहेत. यातील एका टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. गडाचा घेरा फारच निमुळता असल्याने एक तासात गड फेरी आटोपता येते.

कसे पोहोचावे

किल्ल्यावर जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत, पुढे दोन्ही मार्ग एकाच ठिकाणी येऊन मिळतात.
"निरगुडपाडा" हे गाव खोडाळा - त्र्यंबकेश्वर मार्गावर आहे. त्र्यंबकेश्वर पासून २० किमी वर निरगुडपाडा गाव आहे. येथे जाण्यासाठी मुंबईहून २ मार्ग आहेत.

१)मुंबई - कल्याण - कसारा - खोडाळा - निरगुडपाडा ( १९४ किमी),

२) मुंबई - कल्याण - भिवंडी - वाडा - खोडाळा - निरगुडपाडा (१९० किमी)

तसेच इगतपूरी व नाशिकहून त्र्यंबकेश्वरमार्गे निरगुडपाड्याला जाता येते. हरीहरगड व भास्करगड या दोनही गडांच्या पायथ्याचे गाव निरगुडपाडा आहे.

३. कसारा किंवा नाशिक मार्गे :-
कसारा किंवा नाशिक मार्गे इगतपूरी गाठावे. इगतपूरीहून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी बस पकडावी. वाटेत असणारे निरगुडपाडा हे हरिहरच्या पायथ्याचे गाव आहे. गावातून किल्ल्यावर जाण्यास दोन तास पुरतात. हरिहरच्या कातळभिंती जवळ पोहोचल्यावर पुढे किल्ल्यावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायर्‍या आहेत.

४. इगतपूरी - त्र्यंबकेश्वर - खोडाळा मार्गे :-
निरगुडपाडा गावाच्याच पुढे कासुर्ली नावाचे गाव आहे. इगतपूरी-त्र्यंबकेश्वर-खोडाळा या बसने या गावात उतरता येते. या गावातून समोरच्या डोंगरावर चढून गेल्यावर हर्षेवाडी नावाची वाडी लागते. या वाडीतून या किल्ल्यावर पोहोचण्यास १ तास लागतो. ही वाट सोपी आणि कमी दमछाक करणारी आहे.

ट्रेकसाठी लागणारा वेळ

⏱️ हर्षेवाडी मार्गे १ तास तर निरगुडपाडा मार्गे २ तास लागतात.

सुविधा व सोयी

🏠

निवास व्यवस्था

किल्ल्यावर राहण्यासाठी इमारत आहे. यात १० ते १२ जणांना राहता येते.

🍽️

अन्न व्यवस्था

किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती आपण स्वत:च करावी.

💧

पाणी उपलब्धता

गडावर बारामाही पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत.
 
Harihar Fort Trek

 https://punetrekss.blogspot.com/2019/06/harihar-fort-trek.html

Harihar Fort Trek

Harihar fort trek is one the most popular trek. It is very famous for its 80 degree steep rock cut steps. The front view of the fort is breathtaking due to its thrilling steps.

How to Reach :

Harihar fort is in near Trambakeshwar in Nashik district. Its about 300 km. from Pune. Which take almost 6 hours to reach. So it is advised to start in afternoon from Pune, reach at night , stay then trek next day and return.
There are two ways to reach the base village Nirgudpada & Harshewadi.
i)Via Nashik: Pune-Sangamner-Nashik-Ask Trambakeshwar road-NH848- ( Ask in city whenever confuse or use Google map navigation)-Trimbak-leave the highway 848 and take left turn from Metghar-Sapgaon-then take left turn (ask here)-keep on Khodala-Take Harsha road-Nirgudpada.
Base village is about 45 km from Nashik city which may take one and half hour to reach.
There is heavy traffic jams in Machar, Narayangaon, Alephata etc. So consider this in your travel plan. We were stuck in traffic jam at Narayangaon for 4 hours in December 2018 !!

ii)Via Thane – Pune- Khandala-Thane to Nashik road(160)-Vadape-Khadawli-Asangaon-Kasara-leave Kasara and take left-Vihingaon-Khodala-take right turn on Khodala-Take-Harshsroad-Vaitsrna dam-Nirgudpada.
From Thane 140 km in 3 hours and From Kasara 60 km and one and half hour journey.
  
Stay and Food :
We stayed to Shri. Nirgude's house on 30th and 31st December 2018. He provided excellent veg and non veg food which affordable charges. Due to traffic we reached there 1am, they were waiting for us. His family member was standing on the road, waiting for us to take us to house. In so late night they provided us fresh made food !!! Actually, charges are so less. They do not make it for money but for hospitality. So don't bargain but given them additional tip as they deserve.
 Shri. Nirgude - 960442 9739, 08766 514423, 77768 93098

 Nirgudpada

There are two villages at the base i.e. Nirgudpada and Harshewadi. Stay and food is available at both villages. Home stay are provided by local villagers with generous service. Veg and non veg food provided as per demand. There is no food and water on the top of fort. Better to carry food with you. There are two/three stalls for lemonade, tea, pakode, water bottles, and snacks on the trek route.

About the Trek :
It is moderate trek. 70/80 minutes are sufficient to reach on the top of the fort. When you start trekking keep eyes on the fort entrance side. There are some other routes not going to the fort. So take care. Better take a local guide from villages. There are many boys in the village who comes happily with you. 
After 40/50 minutes you will reach to the very famous, beautiful Steps. Rest here and relax. Then start ascending steps slowly with great care. There are holding crevice on each step. So put your hand in the crevice, grip properly. There are about 100 steps on head. Make proper planning in group. Don’t act to make rush on steps. Hardly two person can stand at a time on a step.
Once you reach on top after stepping up, there is narrow path with rock hanging on head. So go one by one with support of side rock. After 15 minutes, you will be on the top of the fort.
When you coming back, take great care on steps. It is very risky to step down from steps. Balancing is major issue. Best way to step down in sitting posture.

What to See :
There are not much left on the fort. God Maruti temple, water tanks, Dhanyakothar (grains storage) etc. are there on the vast plateau of the fort. The top most point has watching tower with Saffron flag.
60/70 minutes sufficient to explore the fort.

रॉक कट गॅलरी - हरीहर उर्फ हर्षगड

 https://charudattasawant.com/2021/11/08/harihar-fort/

Harihar Fort Photo Entrance

रॉक कट गॅलरी – हरीहर उर्फ हर्षगड – Harihar Fort

मराठे ज्याच्या मदतीने लढाई खेळलेत त्या निसर्गाने निर्माण केलेल्या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर दिमाखाने उभ्या असलेल्या आणि आपल्या पूर्वजांच्या वैभवांचा वारसा सांगणाऱ्या काही गड किल्ल्यांनी आपल्यातील काही ना काही खासियत आजपावेतो जपून ठेवलेली आहे. आणि तेच त्या त्या गड किल्ल्यांचे वैशिष्ट बनून राहिले आहे.

काही किल्ले असे आहेत की ज्यांचे नुसते फोटो पाहिलेत की तेथे भेट द्यावेसे असे वाटते. त्यापैकीच एक असलेला नाशिक जिल्ह्यातील ब्रम्हगिरीच्या पश्चिमेस साधारण २० कि.मी. अंतरावरील सोपानाचा गड म्हणून ओळखला जाणारा हरिहरगड किंवा हर्षगड (Harihar Fort). समुद्रसपाटी पासून ११२० मी. उंची लाभलेला, त्रिकोणी माथ्याचा हा गड दुर्गयात्रीच्या परिचयाचा आहे तो म्हणजे त्याच्या काताळ कोरीव पायऱ्यांनी व अंतिम टप्प्यापर्यंत खोदलेल्या बोगद्यातून तर कधी नाळेतून कराव्या लागणाऱ्या चढाईनं, या पायऱ्या नुसत्या डोळ्यांच पारणं फेडीत नाही तर अक्षरश: मोहून टाकतात. या सोपानांची किंवा पायऱ्यांची महती एवढी थोर की इस.१८१८ सालात मराठाशाही बुडविण्यासाठी आलेल्या इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिग्ज हा इंग्रज अधिकारी याच्या नुसत्या पायऱ्या बघूनच आश्चर्यचकीत झाला व उद्गारका ” या किल्ल्याच्या पायऱ्यांच वर्णन शब्दात करणं कठीणच. सुमारे २०० फुट सरळ व तिव्र चढाच्या या पायऱ्या अति उंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारख्या वाटतात.” गड किल्ल्यांच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफांनी उद्ध्वस्त करुन क्रांतिकारकांचे मनोध्येर्य खच्ची करणाऱ्या इंग्रजाने हरिहर किल्ल्याचे यथार्थ केलेले वर्णन किल्ल्याच्या महतीत अधिक भर घालते. अर्थात कॅप्टन ब्रिग्ज याने या सुंदर पायऱ्यांच्या मार्गला मात्र हात लावला नाही हे वेगळ सांगायला नको.

हर्षवाडी व निरगुडपाडा ही हरिहर किंवा हर्षगडाखाली परस्पर विरुद्ध दिशेला वसलेली पायथ्याकडील गावे. नाशिक-त्र्यंबकेश्वर-खोडाळा मार्गावरुन कचोर्ले येथून हर्षवाडी गाठता येते. हर्षवाडीतून तास- दीड तासात आश्रमाजवळ व तेथून अर्ध्या तासात किल्ल्याच्या पायऱ्यांजवळ मळलेल्या वाटेने पोहोचता येते. निरगुडपाडा येथे पोहोचण्याचे तीन मार्ग आहेत. पैकी कसारा-खोडाळे-निरगुडपाडा, दुसरा इगतपुरी-घोटी-निरगुडपाडा व तिसरा नाशिक-त्र्यंबकेश्वर-निरगुडपाडा. निरगुडपाड्यातून साधारणपणे १५-२० मिनिटांमध्ये आपण किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचतो. नंतरचा चढ चांगलाच दमछाक करणारा आहे. तो चढून एका तासात आपण पठारावर येतो. इथून पठारावरून किल्ल्यावर जाणारी व किल्ला उजवीकडे ठेवून अर्ध्या तासात आश्रमाजवळ जाणारी अशा दोन वाटा लागतात. आश्रमाजवळून अर्ध्या तासात किल्ल्याच्या पायऱ्यांजवळ पोहोचता येते. आपल्याला जो सोयीचा मार्ग वाटेल तो मार्ग निवडावा.

निरगुडपाड्यावरून किंवा हर्षवाडीकडून जाताना आश्रम लागतो. वाटेत दगडी घडीव वस्तू लागते ती काय आहे त्याचा बोध होत नाही. त्याच्या मागे असलेल्या डोंगर उतारावरील पायथ्याकडील जागी एका उंचीवर आश्रम उभारलेला आहे. आश्रमाच्या ओट्यावर शिवलिंग असून त्यामागे भगवान शिव गणरायाला मांडीवर घेऊन बसलेली नजीकच्या काळातील पीओपी ची मूर्ती आहे. त्या पुढे त्रिशूळ रोवून ठेवलेला आहे. त्याखाली चौकोनाकृती पुष्कर्णी आहे. पुष्कर्णीच्या घाटावरील दगडी भिंतीवर डावीकडील बाजूस गणेश प्रतिमा तर उजव्या बाजूस दगडी मकारात पुष्पाकार शिक्का सदृश्य उठावदार शिलालेख आहे. त्या खाली समोरा समोर तोंड करून चोचीत वेल धरलेले दोन मोर कोरलेले आहेत. आठ ओळीतील शिलालेख देवनागरी संस्कृत लिपीतील असून तो असा…

श्री

।।श्री गणेशाय नमः।।

धात्रवर्णा

मि शुक्रेधवल शरतिथौशंकरात्म:सु

तः श्रीमन्नारायणख्येगजगिरिरसक्यु क्तसत्शालिवाहोशकेदाण्यूपनामा

हरिहरविलसद्देवताकंसुतीर्थंप्रादद्दी ण्यातलोकश्रमनीरहरुतेश्रेयसे

              मंगलाय

या शिलालेखाची साधारणपणे शब्द फोड करता येईल ती अशी…

धात्रवर्णामि= धोतऱ्याच्या फुलांच्या रंगासारखा शुभ्र किंवा चमकदार, शुक्रेधवल= शुक्रधवल ( पांढरेशुभ्र ), शरतिथो= शर म्हणजे बाण, तिथो= तिथि म्हणजे पवित्र दिवस ( कदाचित हा शब्द क्षयतिथि असावा=  सूर्योदयानंतर प्रारंभ होणारी तिथी ), शंकरात्म:सुत:=  शंकराचा पुत्र, श्रीमन्नारायण= श्रीमन् नारायण, गजगिरिरसक्यु= गज=८ गिरि=७ रस=६ क्=१, सत्शालिवाहोशके= सत्= चांगले, शालिवाहन शके (शक संवत्सर- वर्षगणना ), दाण्यूपनामा= दाण्यू या शब्दातून दानी व दाणी असे दोन वेगवेगळे अर्थ  प्रेरित होतात. दानी= दानशूर मनुष्य किंवा धान्यावरील कर वा महसूल गोळा करणारा अधिकारी, दाणीपनामा= दाणी हे उपनाव असलेला, हरिहरविलसत्= हरिहर, विलसत्= तळपणे, चमकणे, शोभून दिसणे, देवताकंसुतीर्थंप्रादद्दी= देवतांच्या कृपेने, तीर्थंप्रादद्दीण्यात= पुण्यमय झालेली भूमी व परिसर, लोकश्रमनीरहरुतेश्रेयसे= ( लोक+श्रम+नीर+हरुते ) लोकांचे श्रम पाण्याने, हृ ( हर् ) – हरण करणे, दूर करणे, नष्ट करणे, श्रेयसे= यशासाठी, मंगलाय= कल्याणासाठी

वरील शब्द फोडीच्या क्रमानुसार वाक्यरचना न धरता शिलालेखातून खालील अर्थ निघतो ….

श्री. श्री गणेशाला वंदन असो. धातृ नाम संवत्सरात ज्येष्ठ महिना असताना शुद्ध पक्ष पंचमी तिथीला दाणी उपनावाने विख्यात असलेल्या शंकराचा मुलगा श्रीमन् नारायण,  यांनी शालिवाहन शके १६७८ (चवथी ओळ- गज = ८, गिरि = ७, रस = ६, क् = १ याप्रमाणे ८७६१ ही संख्या येते मात्र शक मांडताना वामतो गती पध्दतीनुसार-१६७८) हरिहर पर्वतावर विलास करणाऱ्या देवतांच्या नावाने दीनजनांचा त्रास कमी करण्यास आणि आर्त लोकांचे श्रमहरण करून पुण्यप्राप्तीसाठी या तिर्थाची निर्मिती केली.

हा शिलालेख शके १६७८ म्हणजे सन १७५६ काळातील असून तेंव्हा नानासाहेब हे पेशवे पदावर होते. नारायण शंकर दाणी म्हणजेच नारोशंकर हे पेशव्यांचे बिनीचे म्हणजे आघाडीचे किंवा पहिल्या फळीतील सरदार होते.

नारोशंकर हे नांव आलेच आहे तर त्यांच्या विषयी थोडेसे जाणून घेवू.

नारोशंकर यांचे वडिल शंकरपंत विजापूर दरबारी दिवाण होते. वडिलांच्या मृत्यु पश्चात त्यांची तीनही मुले आबाजी, लक्ष्मण व नारायण सासवडला परत आलेत. कुटुंबाची परिस्थिती बिकट झाली म्हणून पत्नीला सासुरवाडीला ठेवून नशीब आजमाविण्यासाठी नारोशंकर स्वतः मात्र वानला येथे नोकरीला गेलेत. तेथे एका मोठया सावकाराचा उमदा घोडा खूप आजारी पडला. नारोशंकर विजापूरला असताना काही वैद्यकीय ज्ञान मिळविले होते. त्या अनुभवावर सावकाराच्या घोड्यावर उपचार करताच तो बरा झाला. सावकाराचा शब्द होता की जो कोणी घोड्याला आजारातून बरा करील त्याला दोन हजार रुपये इनाम देईन. त्याप्रमाणे नारोशंकराला ते इनाम तर मिळालेच पण त्या सावकाराने नारोशंकराला दरमहा दीडशे रुपयाची नोकरीही दिली. काही वर्षानंतर त्यांनी सावकाराची नोकरी सोडली व ते सासवडला परत आलेत.

सन १७२० पर्यंत ते उदाजी पवारांच्या हाताखाली शिलेदार होते. या काळात सन १७२८ मध्ये मराठ्यांच्या माळव्यात हालचाल सुरू केल्यात यात त्यांचा सहभाग होता. थोरले बाजीराव यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी  सन १७२९ मध्ये पोर्तुगीजांविरुद्ध मोहीम सुरू केली त्यात नारोशंकर सहभागी होते.  त्यांनी वसईचा किल्ला जिंकला. सन १७३० नंतर त्यांचा उल्लेख मल्हारराव होळकर यांच्या पदरी असल्याबद्दलचा सापडतो. त्यांच्या सैन्यात राहून नारोशंकराने काही लहान मोठ्या लढायात भाग घेऊन पराक्रम गाजवला. मल्हाररावांनी नारोशंकराची हुशारी व कर्तबगारी ओळखून त्यांना वरच्या हुद्याच्या जागाही दिल्यात. पुढे मल्हाररावांच्या शिफारशीवरून थोरल्या बाजीरावाने नारोशंकराला इंदूरचा सुभेदार नेमले.

बुंदेलखंडाच्या छत्रसाल राजाने थोरल्या बाजीरावाने मदत केली म्हणून मराठ्यांना बुंदेलखंडाचा एक भाग देऊन टाकला. त्या भागातील नवास या भांडखोर जमातीने बंडाळी माजवून चौथाई व सरदेशमुखी मराठ्यांना देणं बंद केले. त्यांच्या बंदोबस्तासाठी पेशव्यांनी मल्हारराव किसन व ज्योतिबा शिंदे यांना रवाना केले. परंतु या कामी त्यांना अपयश आले. तेंव्हा होळकरांच्या सल्ल्याने पेशव्यांनी ही कामगिरी नारोशंकरावर सोपविली. नारोशंकरांनी आपल्या सैन्याच्या मदतीने नवास जमातीचे बंड मोडून काढले व चौथाई सुरळीत केली. त्यानंतर पेशव्यांनी नारोशंकराला ओरिसा प्रांतातील राजावर स्वारीस पाठविले. नारोशंकरांनी त्या स्वारीत अकरा लाख रुपये महसुलाचा भाग मिळविला.

पेशवे खुष झाले. त्यांनी त्यांना झाशीचे सुभेदार नेमले व राजे ही पदवी दिली.

सन १७४२ साली पेशव्यांनी नारोशंकराची रवानगी ओर्छा राज्यावर केली. झाशी जवळील ओर्छा हे छोटे राज्य. तेथील मुसलमान राजाने पेशव्यांविरुद्ध पुंडाई केली होती.

नारोशंकर ओर्छावर चालून गेले. त्यांनी त्या राजाला कैद करून शृंखला बांधून झाशीच्या किल्ल्यात ठेवले व ओर्छा राज्यावरुन गाढवांचा नांगर फिरविला. सर्व ओर्छा राज्यावर पेशव्यांचा अंमल झाला. नंतर राजाशी नारोशंकरांनी तह केला. झाशीचा किल्ला मराठ्यांना मिळाला. त्या किल्ल्याखाली नारोशंकरांनी गाव वसविले. ते गाव म्हणजेच आजचे झाशी शहर. सन १७४२ ते १७५६ पर्यंत नारोशंकराचा अंमल झाशीवर होता. झाशी शहरात अजूनही नारोशंकर तळ या नावाचा एक भाग आहे. झाशीच्या सुभेदारीची सूत्रे हातात घेतल्यानंतर त्यांनी झाशीचे वैभव वाढविले. इतकेच नव्हे तर पेशव्यांकडून जी जी कामगिरी त्यांच्यावर सोपविण्यात येई ती ते चोख रितीने बजावत असत. महसूलाच्या रकमा वसूल करण्यात त्यांची कामगिरी विशेष असे. यामुळे पेशवे संतुष्ट झाले व त्यांनी त्यांना मोत्याचा चौकडा दिला. हा चौकडा नारोशंकर नेहमी वापरीत. त्यामुळे त्यांना गमतीने मोतीवाले नारोशंकर असे म्हटले जाई.

सन १७४७ मध्ये त्यांनी नाशिक पंचवटी परिसरातील गोदावरी तटावर रामेश्वर मंदिर बांधले.व पोर्तुगीजांकडून एक भली मोठी घंटा घेऊन ती मंदिरावर बांधली आजही तिला नारोशंकरी घंटा असे म्हणतात. सन १७५७ नंतर त्यांची रवानगी गुजरात प्रांतात झाली. तेथे त्यांनी गुजरातसह सावनूर लढ्यातही पराक्रम गाजवले. तेथून ते दत्ताजी शिंदे यांच्या मध्यस्थीने उत्तरेला गेलेत.

अहमदशा अब्दाली याने इ. स. १७५६ मध्ये भारतावर चौथ्यांदा स्वारी केली. त्याचा मुकाबला करण्यासाठी पेशव्यांनी राघोबादादास पाठविले. मात्र राघोबादादा उत्तरेत पोचण्यापूर्वीच अहमदशा निघून गेला होता. सन १७६० मध्ये अब्दाली पाचव्यांदा भारतावर स्वारी करण्यासाठी पूर्ण तयारीनिशी आला. त्याचा प्रतिकार करण्यासाठी पेशव्यांनी सदाशिवराव भाऊस आज्ञा केली व मुलगा विश्वासराव यास बरोबर दिले. अब्दाली पूर्ण तयारीनिशी आला होता. याही मोहीमेत नारोशंकर सामील होते कारण उत्तरेकडे ते बराच काळ असल्याने त्यांना या प्रदेशाची माहिती होती. चौथ्या स्वारीत अहमदशाने दिल्लीवर कबजा मिळविला होता. अब्दालीच्या देखत दिल्लीला पेशव्यांनी वेढा दिला आणि दिल्ली घेतली. सदाशिवभाऊंना धीर आला  आता मराठ्यांची हिंम्मतही वाढली होती. या प्रित्यर्थ दरबार भरविला गेला. या दरबारात पेशव्यांनी नारोशंकरास ‘राजेबहाद्दूर’ ही पदवी दिली. शिवाय पाच हजार सैन्य व पेशव्यांचा ५/६ लाखांचा खजिनाही दिला यासाठी की त्याने दिल्ली शहर सांभाळावे. तसेच  शिंद्यांनीही पाच सहा लाख असा एकूण चाळीस लाखांचा खजिना त्यांच्या हवाली केला.

१४ जानेवारी १७६१, सकाळी १० वाजता युध्दाला तोंड फुटले. दुपारी विश्वासरावाला गोळी लागून ते घोड्यावरुन खाली पडले. त्यामुळे सदाशिवरावभाऊ गोंधळून गेले. त्यांचे देहभान सुटले व ते गर्दीत बघताबघता दिसेनासे झालेत. आता आपला निभाव लागत नाही हे पाहून मल्हारराव होळकर, विठ्ठल शिवदेव व दत्ताजी गायकवाड यांनी युद्धातून पाय काढला. नारोशंकर वगैरे दिल्लीच्या किल्लयात होते. होळकरांनी नारोशंकरास दिल्लीतून निघून जाण्याचा सल्ला दिला. दिल्लीतील मंडळी गुरुवारपर्यंत धीर धरून होती. संध्याकाळी होळकर यांचे दिवाण गंगोबा तात्या पळत आले व वर्तमान सांगितले व सल्ला दिला की “ज्यास जो मार्ग भगवंत देईल, त्या मार्गे निघोन जावे.” त्यामुळे खजिना काढण्यास अनुकुल सापडले नाही. सैन्य इतके भेदरले की दिल्लीतील सैन्याची पळापळ सुरू झाली.

होळकर, नारोशंकर, पवार हे पानिपतहून पळून आले. त्यांचे सरंजाम पेशव्यांनी जप्त केले. पळून जाण्याऐवजी नारोशंकर दिल्लीस दडून बसला असते तर खजिना वाचला असता. पळणाऱ्या सैनिकांना अन्नपाणी देता आले असते व अब्दालीच्या सैन्याला अटकाव करता आला असता पण नारोशंकराने होळकरांच्या सांगण्यावरून पळ काढला व पेशव्यांची गैरमर्जी ओढवून घेतली.

पानिपतानंतर लवकरच पुत्र व भाऊंच्या वियोगाने नानासाहेबांनी प्राण सोडला व राघोबादादाने सन१७६१ मध्ये पेशवाईचा कारभार आपल्या हाती घेतला. सन १७६२ मध्ये नारोशंकरांना प्रतिनिधीचे काम देण्यात आले. पुढे ते महादजी शिंदे यांच्या पदरी दिवाणगिरी करीत. पण ती रघुनाथरावांच्यामुळे गेल्याने प्रतिनिधी भवानराव यांचेकडे कारभारी म्हणून नोकरीस असताना इ.स.१७७५ च्या २३ जानेवारीला त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांना रघुनाथराव (मालेगाव शाखा) व त्रिंबकराव (नाशिक शाखा) अशी दोन मुले होती.

श्री चित्रावशास्त्रीलिखित मध्ययुगीन चारित्राकोशात असा उल्लेख आढळतो की दिल्लीस असताना एका शिकारीच्या प्रसंगी त्याने बादशहाचे प्राण वाचवले. यावर बादशहाने संतुष्ट होऊन त्यांना राजेबहादूर हा किताब व मालेगाव हा गाव जहागीर देऊन इतर गावे सरंजामादाखल दिलीत.

भीमसेन कुलकर्णी संपादित पेशव्यांच्या बखरीत असाही उल्लेख मिळतो की सन १७५९ मध्ये सदाशिवराव भाऊने बऱ्याच जहागिऱ्या वाटल्या. त्या वेळी नारोशंकरांनी मालेगावची जहागिरी मागितली. भाऊंनी ती दिली. या जहागिरीत मालेगावातील एकुण आठ गाव व निंबायती परगणा यांचा समावेश होता. अशा रितीने नारोशंकराचा मालेगांव शहराशी प्रथम संबंध आला.

नारोशंकर हे उत्तर हिंदुस्थानात मोहिमेवर होते. पानिपत युद्धानंतर त्यांनी मालेगावला किल्ला बांधण्यासाठी घेतला. तत्पुर्वी मालेगाव हे एक खेडे होते. तेथे किल्लाही अस्तित्वात नव्हता. गिरणा व मोसम अथवा मोक्षगंगा या नद्यांच्या संगमापासून उत्तरेला सुमारे एक मैल अंतरावर हा मालेगांवचा भुईकोट किल्ला उभा आहे. किल्ल्याला लागूनच मालेगांव शहर वसले आहे. हा किल्ला खानदेशकी किल्ली म्हणूनही प्रसिद्ध होता. किल्ला पुर्ण होण्यास दहा वर्षे लागली. नारोशंकराने मालेगावला येऊन किल्ला बांधला असला तरी स्वत: येथे कधीही वास्तव्यास नव्हते.

थोडेसे म्हणता म्हणता बरेचसे झाले.आता वळूयात हरिहर किल्ल्याच्या माहितीकडे (Harihar Fort) ……

आश्रम पाहून पुन्हा हर्षगडाचा डोंगर चढून गेल्यावर काही वेळात आपण किल्ल्याच्या अजस्त्र अशा काळ्या पहाडा समोर येतो. इथून किल्ल्याच्या चढाईस प्रारंभ होतो. अंदाजे ६०-७० अंशाच्या कोनात गगनाला भिडणाऱ्या पायऱ्या पाहून छाती दडपतेच. आता या पायऱ्या चढायच्या कशा हा प्रश्न मनात उभा रहातो. पण प्रत्यक्षात मनाचा हिय्या करून एक एका पायरीशी आपण सलगी करतो तेंव्हा त्या पायऱ्यांच्या दोन्ही टोकाशी हाताची बोटे रुतावीत इतपत खोबण्या कोरल्याचे लक्षात येते. आणि जीव भांड्यात पडतो. जसजशा आपण पायऱ्या वर चढत जातो तसतसा आपला आत्मविश्वासही वाढत जातो.

अखेर ९०-९५ सोपानाची वाट चढताना स्वर्ग सुखाचा आनंद घेत घेत आपण महाद्वाराजवळ पोहोचतो आणि सुटलो बुवा एकदाचे करीत प्रवेशद्वारातून आत प्रवेशतो. हा दरवाजा छोटेखानी पण देखण्या स्वरूपाचा आहे. इथ वर येई पर्यंत मागे वळून पहाण्याचे घाडस होत नाही. मात्र येथून खाली नजर फेकताच एवढ्या चिंचोळ्या, अरूंद व खड्या जिन्याच्या खोल दरीतून वर आल्याबद्दल आपणच आपली पाठ थोपटून घ्यायची व पुढे निघायचे तत्पूर्वी गडाच्या प्रवेशव्दारा शेजारी उजव्याहाती कातळात  स्थानापन्न असलेल्या शेंदूरचर्चित गणेशाचे व मारुतीरायाचे दर्शन घेण्यास विसरायचे नाही. त्या शेजारी अस्पष्ट असे काही कोरून ठेवलेले आहे.

उजव्या हाती गडाचा काताळ, डाव्या हाती पाताळ दरी आणि वरच्या बाजूस कपाळमोक्ष करणारा काताळ अश्या अद्भुत मार्गाने आपला पुढचा प्रवास सुरू होतो. त्यावेळी इंग्रज अधिकाऱ्यांनी या मार्गाचा उल्लेख “रॉक कट् गॅलरी” (Rock Cut Gallery of Harihar Fort) असा केला याची आदराने जाणीव ठेवून अंग चोरत पुढे गेल्यानंतर काताळात कोरलेले आणखी दोन दरवाजे लागतात. हे पार केल्यावर परत पायऱ्यांचा दगडी जिना लागतो. याच्या दोन्ही बाजूस आधारासाठी खोबण्या केलेल्या आहेत. तो पार केला की आपण अंतिम प्रवेशद्वारापाशी येतो. हा संपूर्ण १३० पायऱ्यांचा अद्भुत प्रवास कधी गुहेतून तर कधी नाळेतून झालेला असल्यामुळे कायम स्मरणात राहतो.

गडाचा शेवटचा दरवाजा लहान असून तो पार केला की आपण गडमाथ्यावर येतो. थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला खालच्या अंगास एक गुहा आहे. घसरण असल्यामुळे तिथ पर्यंत उतरण्यासाठी दोराची मदत घेणे गरजेचे आहे. ही गुहा पाहून वर यायचे व पुढे निघायचे. वाटेत काही घराची जोती व गडाच्या सदरेचे अवशेष दिसतात. ते पाहून पुढे गेल्यावर तीन पाण्याच्या टाक्या व पश्चिमेस भिंत बांधून पाणी अडविलेला एक प्रशस्त तलाव लागतो. या तलावाच्या काठावर आधुनिक पद्धतीने बांधलेले हनुमानाचे देऊळ व बाजूच्या उघड्या खडकावर एक शिवलिंग व नंदी आहे. उजव्या हाताला साधारण ५० फुट उंचीची एक टेकडी दिसते. शेवटचा काताळ टप्पा चढून ही टेकडी सर केली की आपण गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचतो. माथ्यावर अनेक देव-देवतांनी दाटी करून आपली जागा पटकावली आहे. कुणा एका दुर्गवी राने इथं एक भगवा ध्वज ही लावलेला आहे. आसमंताच्या निळाईवर माथ्यावरून उत्तरेला वाघेरा, दक्षिणेला वैतरणा तलाव व त्या मागे कवनाई, त्रिंगलवाडी तर पूर्वेला कापड्या, ब्रम्हा त्यामागे त्र्यंबकगड इत्यादी किल्ले पहाता येतात.

इथवरचा भाग बघून झाला की टेकडी उतरुन आल्यावाटेने परत फिरून गडाच्या पूर्वेकडील टोकाकडे चालू  लागायचे. वाटेत एका सरळ ओळीत कातळात कोरलेल्या पाच पाण्याच्या टाक्या लागतात. टाक्यापाहून पुढं गेलं की घुमटाकार माथा वर कळस असलेली व अंदाजे तीस बाय बारा फूट अशी आयताकार दगडी कोठी लागते. संपुर्ण गडावर ही एकच वास्तू बऱ्यापैकी शाबूत आहे. उंचीला चार बाय अडीज असे खिडकी सारखे दिसणारे कोठीचे प्रवेशव्दार उंचावर आहे त्यामुळे आत उडी मारूनच प्रवेश करावा लागतो. या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या  डावीकडे खालच्या भागावर काहीतरी कोरलेले आहे. कोठीला दोन खण असून आत सदैव काळोखच असतो. त्यामुळे कोठीच्या एका भागात दिवा लावण्यासाठी धातूच्या पत्र्याची पणती रुतवून बसविली आहे. गडावर मुक्काम करायचा झाल्यास या एकमेव कोठीचाच आश्रय घ्यावा लागतो. गडावरील इतर वास्तूंपेक्षा दूर असल्यामुळे ही कोठी म्हणजे नक्कीच दारूकोठार असणार.

कोठी पाहून गडाच्या पूर्वेकडील टोकावर जात असताना वाटेत दोन पाण्याच्या टाक्या लागतात. त्या पुढे खळगा असून तो फक्त पावसाळ्यातच भरलेला असतो. पूर्वेकडील भागाला किंवा संपूर्ण हर्षगडाला सातशे आठशे फुटाच्या काताळाची नैसर्गिक तटबंदी लाभल्यामुळे गडावर जवळ-जवळ तटबंदी अशी नाहीच किंवा बांधली गेल्याच्या खुणा दिसत नाहीत. इथवर तीन-साडेतीन तासाच्या भटकंतीने आपले गडदर्शन पूर्ण होते. गड पाहून परत उतरताना मात्र विशेष काळजी घेऊन काळजीपूर्वक उतरावे लागते.

आता पाहूया या गडाचा इतिहास…… (Harihar Fort)

या गडाला हर्षगड असे नाव का पडले याची मनोरंनात्मक दंतकथा सागितली जाते ती अशी. मुगल सैन्याचा गडाला वेढा पडला. गडावर कमी शिबंदी असून सुध्दा ती गडावरुन दगडधोंडे फेकून मोगलांना वर चढू देत नव्हती. दोन महिने गड झुंजला. गडावरची धान्यसामुग्री संपत चालली होती. त्यामुळे आता काय करावे हा प्रश्न किल्लेदाराला पडला. तेव्हा त्याच्या म्हाताऱ्या आईला एक कल्पना सुचली. तिने आपल्या मुलाला म्हणजे किल्लेदाराला हजार दीड हजार पत्रावळ्या आणि मोठा टोप भर भात व वरण करायला सांगितले. दोन अडीज महिन्याचा वेढा बाहेरून कुमक, रसद मिळण्याची शक्यता मावळलेली. त्यातून गडावरील शिधा संपत आलेला. अश्यावेळी या म्हातारीला काय खा खा सुटलीय. परंतु मातृ हट्टपायी किल्लेदाराला आईचे बोलणे मान्य करावे लागले. गडावर पत्रावळ्या बनविल्या गेल्यात. भात डाळ शिजविले गेले. नंतर किल्लेदाराच्या आईने गडकऱ्यांच्या मदतीने तो भात वरणात कालवून पत्रावळीला फासला आणि वाजंत्री लावून नाचत गाणी गात आरडाओरडा करत त्या खरकट्या पत्रावळ्या गडावरुन खाली भिरकावल्या. गडावर वाजणारी वाध्ये, चाललेला जल्लोष व आतषबाजी पाहून अगोदरच दोन अडीज महिन्याच्या वेढ्याने  कातावलेल्या मुगल सैन्याच्या सरदाराला आश्चर्य वाटले.  वर लेकाचे खुशाल गाणी काय गाताहेत, नाच काय करताहेत, जेवणावळी काय उठताहेत, आनंदोत्सव काय साजरा करताहेत. या अर्थी गडावर शिधा साहित्य भरपूर आहे आणि इथे आपण अन्न-पाण्याशिवाय गडाखाली तळ ठोकून वेढा घालून बसलोय. अशीच परिस्थिती पुढेही राहिली तर आपण मात्र नक्कीच उपासमारीने मारून जावू. असा विचार करून मुगलांनी वेढा उठविला आणि चालते झाले. हे पाहून किल्लेदाराला प्रचंड हर्ष झाला. तेव्हा पासून या गडाचे नाव पडले हर्षगड.

हरिहर (Harihar Fort) उर्फ हर्षगड हा कुणी बांधला हे नक्की सांगता येण कठीण पण त्याची बांधणी पहाता तो प्राचिन काळात बांधला गेला असावा. याबाबत दुमत नाही. सुरवातीच्या काळात हा गड अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात असल्याचे पुरावे सापरतात. पुढे शहाजीराजांनी निजामशाहीची पुनर्स्थापना करतेवेळी इ.स.१६३६ साली त्र्यंबकगड घेताना हा ही किल्ला जिंकून घेतला. पुढे त्याचा ताबा मुघलांकडे गेला. इस. १६७० मध्ये स्वराज्याचे पंतप्रधान मारोपंत पिंगळे यांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात दाखल केला. शिवरायांच्या मृत्यू नंतर संभाजी राजांच्या धामधुमीच्या काळात हा किल्ला दि. ८ जाने. १६८९ रोजी मुघल सरदार महाबतखान याने हा किल्ला जिंकला. त्यावर मात म्हणून ताराराणीच्या काळात मराठ्यांनी हा गड पुन्हा मुघलांकडून जिंकून घेतला. शेवटी सन १८१८ मधे इतर किल्ल्यांप्रमाणे इंग्रजांनी हा ही गड मराठ्यांकडून जिंकून घेतला.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांकडून भारताने स्वतंत्र मिळविले आणि सर्वच किल्ल्यांसह हरिहर उर्फ हर्षगडही (Harihar Fort) स्वतंत्र झाला.

लेखन, संकलन: संजय तळेकर (संजया उवाच्), मुंबई. भ्रमणध्वनी क्र. : 98202 38177

सूचना: ह्या लेखाचे संपूर्ण अधिकार लेखक संजय तळेकर, मुंबई यांच्याकडे असून त्याची नोंदणी केलेली आहे, ह्या लेखातील कुठलाही मजकुर अथवा छायाचित्रे यांचा वापर लेखकाच्या समंती शिवाय करू नये. तसे केल्यास कारवाई करण्यात येईल. 

आधार व आभार…..

  • दुर्गांच्या देशा: भगवान चिल्ले
  • वारसा अतिताचा: पंकज समेळ
  • सरदार नारोशंकर राजेबहाद्दर: डी. एस्कु. लकर्णी
  • डॉ. रूपा गणेश मेस्त्री (Ph. D. संस्कृत) 

First Published on facebook on 04/04/2020 at : https://www.facebook.com/sanjay.talekar.92

हरिहर गडाची छायाचित्रे

हरिहर किल्ला / हर्षगड : नाशिक HARIHAR FORT (२८ जुन २०१५ )

हरिहर / हरिहर

हरिहर किल्ल्याला भेट देऊन ३ वर्ष झाली .हरिहरला " हर्षगड" असे ही म्हणतात. समुद्रसपाटी पासून ३६७६ फूट उंच असा हा किल्ला सह्याद्रीच्या त्र्यंबक भागातील महत्वाचा किल्ला आहे !  मागील आठवड्यात फेसबुक वर हरिहर किल्ल्याचे फोटो पहिले आणि तेव्हा जाणवले की हरिहर किल्ल्याच्या  पायऱ्यांची छाप मनावर कायमची उमटलेली आहे. मराठ्यांचे शक्तिस्थान म्हणजे त्यांचे किल्ले ! मराठ्यांची शक्तिस्थाने कमकुवत करण्यासाठी  इंग्रज गडावर जाणऱ्या पायऱ्या आणि वाटा तोफगोळ्यांनी उडवित असत  ! इंग्रज अधिकारी कॅप्टन ब्रिग्स हा हरिहर गडाच्या कोरलेल्या पायऱ्या पाहून त्यांच्या प्रेमात पडला आणि त्याने त्या  तोफगोळ्यांनी  न उडविण्याचा निर्णय घेतला. इंग्रज तसेच निर्दयी माणसे त्यात त्यांनी ह्या वास्तूचा एक भाग जपला म्हणजे ती नक्कीच सुंदर असणार असे कुतूहल मनात होते. प्रत्यक्ष पाहिल्यावर त्या कश्या बांधल्या गेल्या असतील हा प्रश्न प्रत्येक व्यक्तीला पडेल आणि तो ही  हरिहरच्या प्रेमात पडेल हे नक्की ! एका दुर्गम सुळक्यावर मधोमध  आणि घुमावदार पायऱ्या कोरणे ही साधी बाब नव्हे ! 

हरिहर गडाच्या पायऱ्या 

टाके हर्ष गावातून दिसणारा धुक्यात लपलेला हरिहर गड 

आम्ही कसे गेलो ? 

दिनांक : २८ जुन २०१५ ! अभिनव , तुषार , शशांक , सचिन पवार , दशरथ , दिलीप आणि मी असे एकूण ७ जण शेवटची कसारा लोकल पकडून कसाऱ्याला उतरलो. अभिनवने एका खाजगी सुमोला बुक केली होती  ! कसारा - खोडाळा - निरगुडपाडा आणि टाके हर्ष असा आमचा मार्ग होता . कसाराहुन खोडाळ्याकडून त्र्यंबकेश्वर जाणाऱ्या मार्गावर हरिहर किल्ला येतो. अगदी आरामात गेलो तरी २ तासाच्या आत आपण टाके हर्ष ह्या गावी पोहोचतो . ह्या गावात रस्त्यालगतच एक प्राथमिक शाळा आहे . ह्या शाळेच्या पडवी मध्ये आपण विश्रांती करू शकतो . पहाटे लवकर ट्रेक सुरु कार्याच्या हेतूने आम्ही शाळेच्या पडवीमध्ये झोपायचे ठरवले पण खूप थंडी असल्याने कुणाचीही झोप पूर्ण झाली नसल्याचे आठवते. गाडी आणि गाडीचे चालक आमच्या सोबत टाके हर्ष ह्या गावी मुक्कामी राहणार आणि दुसऱ्या दिवशी  संध्याकाळी आम्हाला पुन्हा कसारा आणून सोडणार असे ठरले होते.

एका  थरारक वळणावर 

पाऊल  ट्रेकर्स 

ट्रेकला सुरुवात !

६.३० वाजता आम्ही ट्रेकला  सुरुवात  केली ! पावसाळी दिवस होते आणि नुकत्याच पडलेल्या पावसाने वातावरणात गारवा आणला होता. गावकऱ्यांनी आम्हाला चहा दिला  आणि आम्ही पूर्ण ताजेतवाने झालो. गडावर जाणारी पायवाट पकडून आम्ही ट्रेक ला सुरुवात केली . मौज मस्ती करत कसा एक तास निघून गेला हे कळले ही नाही . आम्ही बऱ्यापैकी उंची गाठली होती पण अजूनही दाट धुक्यामुळे हरिहर गडाचा सुळका दिसत नव्हता ! थोड्याच वेळात धुके हळू हळू सरू लागले होते ! आम्ही एका पठारावर येउन पोहचलो होतो ! धुके सरल्यावर एक प्रचंड मोठा भारदस्त सुळका आणि त्या वर एक घळ दिसली . अचानक लक्षात आले की घळ  नसून त्या हरिहरच्या पायऱ्या आहेत ! आपणास जिथे जायचे आहे ते लक्ष प्रथमदर्शनी दिसल्यावरचा आनंद हा एक ट्रेकरच समजू शकतो.

प्रथम दर्शन 

धुके सरले आणि आम्हाला पायऱ्या दिसू लागल्या 
आपण नेहमी ऐकतो की स्वर्गात जाण्यासाठी पायऱ्या असतात. त्या दिवशी हरिहरच्या पायऱ्या आम्हाला तश्याच काहीश्या वाटत होत्या . सोसाट्याचा बेभान वारा , आजू बाजूला वाहणारे धुके , हिरवीगार डोंगररांग पाहून असे वाटत होते की  इथेच झोपडी बांधून कायमचे रहावे  ! फोटो मध्ये जसे पहिले होते त्या पेक्षा पायऱ्या जास्तच सुंदर दिसत होत्या . ज्याला इतिहासाची आवड नाही अश्या व्यक्तीलाही ह्या आवडतील असे स्वरूप ह्या पायऱ्यांचे आहे . पायऱ्या ७० - ८० अंशावर आहेत असे नेटवरील माहितीमुळे  समजते. जेव्हा आम्ही पायऱ्या जवळ पोहचलो तेव्हा मन थोडे धस्स झाले ! पाहताक्षणी त्या कठीण वाटल्या !  पण चढाई करिता पायऱ्या सोप्या आहेत . सुरक्षेसाठी पायऱ्याना  कोनाडे/ खोबण्या आहेत, त्यांना पकडून आपल्याला वर जाता येते ! पायऱ्या संपल्यावर आपल्याला  महादरवाजा हा दोन  बुरुजांमध्ये दिसतो ! आपल्याला एक गणपतीचीमूर्ती कोरलेली दिसते . ह्या पायऱ्या चढताना खूप संयमाने चढाव्या लागतील . पावसाळ्यात कोणताही धसमुसळेपणा धोकादायक  ठरू शकतो . 

अभिनव 

पुढेच  एक नैसर्गिक छत तयार झाले आहे आणि त्याला एक नेढे आहे ! त्या नेढ्याला वळसा मारून आपल्याला अजून एक घुमावदार पायऱ्या  मिळतात !येथे मात्र आपणास काळजी घ्यावी लागते ! आपल्या डाव्या बाजूस दरीच आहे असे समजा ! ह्या पायऱ्या  पार पडल्या नंतर अजून एक कमान दिसते आणि आपण डोंगर माथ्यावर येतो !पायऱ्यापासून गडमाथ्यावर येण्याचा अनुभव चित्तथरारक होता ! आम्ही सगळेच खूप खुश होतो !गड फिरण्य अगोदर आम्ही निवांत बसून वेगाने वाहणारे ढग आणि धुक्यांशी लपंडाव खेळत असलेली गावे पाहत होतो ! 
दशरथ 

गणपती  बाप्पा मोरया .. दरवाज्याजवळ  गडावरचा गणपती 

गड फिरायला तासभर वेळ लागतो .  आम्ही मात्र २ तास घेतले . गडावर आपणास पाच पाण्याची टाके , एक तलाव , मारुतीचे मंदिर आणि छोटे शंकराचे मंदिर दिसते . आम्ही जेवण हे तलावाजवळ केले .  नेहमी प्रमाणे या वेळी ही  चटपटीत पदार्थ होते ! पुढे गेल्यावर एक इमारत दिसते त्यात दोन खोल्या आहेत व त्यावर घुमटकर छत आहे. महादरवाज्याच्या विरुद्ध टोकाला पण छान निसर्ग सौंदर्य पाहता येते ! तेथे  चांगला वेळ गेला !

पाऊल  ट्रेकर्स 

परतीचा प्रवास : 

 परतीचा प्रवास हा जलद झाला. खाली उतरताना मात्र थोडीशी भीती वाटली. पूर्ण अंग डाव्याबाजूच्या भिंतीला ठेवूनच उतरत होतो . पावसामुळे वाट पण निसरडी झाली होती . आमच्या मनातील भीती आमच्या पुढे असणाऱ्या एका गावकरी  माणसाला मात्र नक्कीच नव्हती . डोंगरावरील पळसाची पाने एकत्र करून त्यांने त्याचे भारे आपल्या डोक्यावर ठेवले होते . रोजचीच वाट असल्याने तो भले मोठे भारे घेणून निवांत उतरत होता . हरिहर गडाचा आकर्षणबिंदू म्हणजे कातळात कोरलेल्या पायऱ्या ! आम्ही भल्या पहाटे ट्रेक सुरु केल्याने आम्हाला पायऱ्या चढताना गर्दी नव्हती . उतरणीच्या वेळी अनेक ग्रुप तिथे आले होते . त्या पायऱ्या उतरायलाच आम्हाला अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ गेला . योगायोग असा कि माझा मामे भाऊ अमितेश मला भेटला ! अमितेश मला एका आठवड्यापूर्वीच म्हणाला होता की तो हरिहर किल्ल्यावर जाणार आहे . आणि योगायोग असा की आमची भेट परतीच्या मार्गावर हरिहर किल्ल्यावरच झाली . त्याला भेटून पण मस्त वाटले ! साधारण दीड तासात आम्ही टाके हर्ष ला पोहोचलो आणि पुन्हा एकदा गडाचे दर्शन घेऊन कसारा गाठला .

हरिहर

http://www.misalpav.com/node/34558

रात्री ३ वाजता एका आश्रमात पोचलो, तिथे थोडा वेळ आराम करून सकाळी हरिहर गडासाठी निघणार होतो.

https://lh3.googleusercontent.com/-AaGB7RNKF6c/Vi3FHHi8J-I/AAAAAAAAO3g/mrmrX7CJKjc/s640-Ic42/IMG_4368.jpg
आश्रम

https://lh3.googleusercontent.com/-qDbhUIJz2TM/Vi3E4q3QIRI/AAAAAAAAO2g/jtkhCYlmoKQ/s512-Ic42/IMG_4359.jpg
आश्रमाच्या आवारातील मारुतीराया

https://lh3.googleusercontent.com/-pw29YPa89N0/Vi3FJ5poIDI/AAAAAAAAO3w/RDO54dHDwTA/s640-Ic42/IMG_4369.jpg

सकाळी ६ वाजता ट्रेक लिडरच्या शिटीने जाग आली तर सर्वात शेवटी उठणारा मीच असल्यामुळे थोडस शरमल्यासारख झाल. मग पटापट आन्हिक उरकून ब्याग भरून ठेवली, आणि ग्रुप च्या सदस्यांनी केलेला फक्कड चहा घेतला. ट्रेक लीडरने सर्वाना सूचना दिल्या, नवीन ओळखी झाल्या.

https://lh3.googleusercontent.com/-d69XxZuth38/Vi3FOgyRJxI/AAAAAAAAO4M/WAyT59PQnao/s640-Ic42/IMG_4373.jpg

https://lh3.googleusercontent.com/-HpHAiKvqBpA/Vi3Fp-f1boI/AAAAAAAAO6s/YZSs9Wf94Bg/s640-Ic42/IMG_4392.jpg
हरिहर गड मागच्या बाजूने

हरिहर गडाच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या, ते नेढ, वरून दिसणारा अप्रतिम नजारा डोळ्यात साठवत फिरत होतो. ग्रुपचा नाशिक मधील एक सदस्य क्रिकेट मैच सोडून सर्वांसाठी गरम गरम पुलाव घेऊन आला होता. दोघांच्या खांद्यावर ५० लोकांच जेवण होत आणि इतका गड चढून आले होते. त्यांना कोपरापासून हात जोडले, कारण इतक गरम जेवण ब्यागेत भरून चालण म्हणजे तव पाठीवर घेऊन चालण्यासारख होत. सर्व गड फिरून झाल्यावर उतरताना रोप लावून उतरलो. चढताना पायाऱ्याकडे तोंड करून चढल्यामुळे त्या सरळसोट पायऱ्या धोकादायक वाटल्या नव्हत्या, पण आता उतरताना ती उंची बघून ……… कपाळात आल्या होत्या.

https://lh3.googleusercontent.com/-ynapSQUq0FQ/Vi3GFcV7gEI/AAAAAAAAO9Y/b6lQRD7Fw1w/s512-Ic42/IMG_4413.jpg
कातळ पायऱ्या ज्याकरता हा ट्रेक करावा

गड उतरताना एक ग्रुप फोटो काढण्याच्या नादात रस्ता चुकून दुसऱ्या रस्त्याने गावात उतरला. ट्रेक लीडरने तिथल्या तिथे त्यांची कान उघडणी केली, आणि पुढच्या ट्रेक साठी सूचना दिल्या. बसमध्ये बसून आता कळसुबाई साठी चाललो होतो, एका गावातल्या बोर्ड वर लिहील होत "कळसुबाई माता मंदिर" तर चुकून आम्ही त्या गावात शिरलो. विचारल्यावर कळलं कि आम्हाला पुढच्या बारी गावात जायचं होत. मग परत बस फिरवून एकदाच मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो. जेवून लवकर झोपी गेलो कारण सकाळी लवकर उठून ट्रेकला लवकर सुरुवात करायची होती.

थोड्या चालीतच आम्ही बऱ्यापैकी उंचीवर पोचलो होतो. चढत असताना एका ठिकाणी थांबून लिंबू सरबत पियालो. लिंबू सरबताने अशी काही एनर्जी आली की डायरेक्ट शिडीजवळ येउन थांबलो. आता पायऱ्या आणि शिड्यांची वाट होती. बऱ्यापैकी थंडावा आणि धुकं होत. शेवटच्या टप्प्यावर येताना एका टपरीवजा दुकानात ग्रुपचे काही मेंबर कांदा भजीवर ताव मारताना दिसले मग काय आक्रमण, मनसोक्त हादडून झाल्यावर समोरच असलेल्या विहिरीतून थंड बर्फासारख पाणी पियालो. त्या पाण्याची चव खूपच छान होती. वरती जाऊन कळसुबाईच दर्शन घेतलं, तिची खणा-नारळाने ओटी भरली.

https://lh3.googleusercontent.com/--aYsyrclVKA/VjC62yVg0fI/AAAAAAAAQIg/7FKEIB96jaM/s512-Ic42/IMG_20151025_102234.jpg
कळसुबाई माता प्रसन्न

वरून दिसणारा नजारा

ग्रुप मध्ये (नवीन) लग्न झालेले आमचे जोडपे असल्यामुळे आमच्याकडून मातेची ग्रुपकडून ओटी भरली. नंतर माझ्या बायकोला उखाण्यासाठी सगळ्यांनी पिडलं, म्हटलं माझ्यावर पण हे सरकणार म्हणून थोडस मागे मागे जात होतो. बायकोचा उखाणा संपताच ज्याची भीती होती तेच झाल मला उखाणा घ्यायला सांगितलं मग काय रहाणेचा उखाणा घेऊन सर्वांची वाहवा मिळवली. नशीब ग्रुप मधले कोणी होम मिनिस्टर बघणारे नव्हते नाहीतर काय खर नव्हत. प्रत्येक ट्रेकला अशा काही न काही गोष्टी घडतात की तो ट्रेक चांगलाच आठवणीत राहील.

ओटी भरून झाल्यावर देवीची आरती केली, ग्रुप मधील शार्दुलने प्रतिज्ञा म्हटली. ग्रुप मधील एका मुलाचा त्याच दिवशी वाढदिवस होता, हरिहर गडावर पाय लचकल्यामुळे तो खरतर कळसुबाई ट्रेक करणार नव्हता पण फोनवरून वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे सावकाश चालत त्याने ट्रेक पूर्ण केला. प्रतिज्ञा झाल्यावर त्याने महाराजांवर एक छानसा पोवाडा गाऊन दाखवला. सर्वांनी टाळ्या वाजवून दाद दिली आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवस इतक्या चांगल्या ठिकाणी साजरा झाल्यामुळे तो खूप खुश होता.

उतरताना ग्रुप मधील सौरभच आणि माझ लदाख प्रेम सारखच असल्यामुळे त्याच्याशी चांगली गट्टी जमली. येताना लदाखचा प्लान केला, कस जायचं कुठे थांबायचं अस बोलण चालू होत. नंतर निवांत भेटून प्लानिंग करू अस ठरवून ट्रेक ची सांगता केली.

यावेळेला फोटो खूपच कमी काढले त्याबद्दल माफी असावी.

 https://susheelrajagolkar.blogspot.com/2018/01/17012018.html

 हरिहरगड उर्फ हर्षगड HARIHAR HARSHGAD

"हरिहरगड गिर्यारोहकांसाठी प्रसिद्ध आहे तो म्हणजे 'सरळ उभ्या' 'बोगदयामधुन जाणाऱ्या' कातळ कोरीव चित्तथरारक पायऱ्यासासांठी."
कितेक दिवसापासुन हरिहरगड पहायची खुप ईच्छा होती पण नियोजण होत नव्हते, एक दिवस अरूण गवेकर यांचा संदेश आला "जाणता राजा ट्रेकर्स" आयोजित हरिहरगड रविवार दि. 07/01/2018 ला आहे, लगेचच मि अजितला फोन केला, तो म्हणाला पप्पा व मि जाणारा आहे आणि तु पण येत आहेस, अजितने माझे येणे त्याच्यासाठी निश्चित केले,
मला मात्र प्रश्न पडला ट्रेकचे नियोजन ठाणेहून आहे ? मला ठाणे पुण्याहून गाठायचे आहे ? ट्रेकला जायचे तर आहेच, मग कसे ? मग मी ठरवले व शुक्रवारी रात्रीच अजितकडे मुंबईला गेलो व तेथून आम्ही शनिवारी रात्री १२:०० वाजता ठाणे येथुन नियोजणा प्रमाणे निघालो.
रविवार दि. ०७/०१/२०१८ पहाटे ०४:३० वाजता आम्ही "आद्य ज्योतिर्लिंग श्री त्रंबकेश्वर" येथे पोहचलो, तेथेच थोडे आवरून त्रंबकेश्वरचे दर्शन घेतले व नाश्ता उरकुन "हर्षेवाडी" गाठली, सकाळचे ०८:३० वाजले होते, तेथेच एकमेकांचा परिचय सत्र झाले, तज्ञ सदस्यांनी गडाचा परिचय व ट्रेक मधील खाच खळग्यांची माहिती दिली. .३० तासाचा चढाई नंतर आम्ही १०:३० वाजता पायऱ्यांपाशी पोहचलो, सरळ व तीव्र चढाईच्या या पायऱ्या बांधलेल्या जिन्यासारख्या वाटतात, तशा या चढाईसाठी अवघड आहेत पण जागोजागी आधारासाठी खोबण्या केलेल्या आहेत त्याचा सहाय्याने आम्ही पार केल्या, पायऱ्यांचा शेवटी बांधलेला मुख्यदरवाजा अजूनही सुस्थितीत आहे, तेथेच एका दगडामध्ये कोरलेला लहानसा पण सुंदर सुबक असा गणपती आहे, त्याला नमस्कार करून आम्ही पुढे कातळ कोरून तयार केलेला रस्ता, याच्या एकबाजूला कातळ तर दुसऱ्या बाजूला आहे खोल दरी. तसेच पुढे गेल्यावर पायऱ्यानिशी असलेला बोगदा व पुढील दोन दरवाजे असा हा पुर्ण अदभुत मार्ग सावधगिरीनेच पार करून गडावरती पोहचलो.
"इतिहास असे सांगतो, कॅप्टन ब्रिग्ज हा इग्रंज अधिकारी या पायऱ्या नष्ट करायला आला होता पण तो या पायऱ्या पाहताच त्यांचा मोहात पडला व तसाच माघारी परतला, ज्यांनी हे निर्माण केले आहे त्याचे कौतुक करावे तितके कमीच, या मार्गाचे वर्णन शब्दात करणं कठिणच."
गडावरती पाहायला पडझड झालेल्या वास्तू, गुप्त दरवाजा, पाण्याची टाके, पावसाळी तलाव, नंदी , शिवलिंग, हनुमान मंदिर, कोठार व गडाची सर्वोच माथ्याची टेकडी आहे, हे सर्व गडावरती पाहून झाल्यानंतर आम्ही तलावाकाठी झाडाच्या सावलीमध्ये सर्वानी आणलेले डबे एकत्र बसून खाले व परत तितक्याच काळजीपूर्वक गड उतरण्यास सुरुवात केली.
निम्म्यात आल्यावर पठारावरती हर्षेवाडीच्या बाजूस एक आश्रम, दगडी बांधलेला कुंड (तलाव), कुंडाचा भिंतीवरती कोरलेला शिलालेख व गणपती आहे ते पाहुन तेथून थोडेसे जंगलामध्ये पुढे जाताच तेथे हनुमानाचे मंदिर आहे व मंदिराचा समोर दगडामध्ये शिव शंकराची प्रतिमा कोरलेली आहे हे सर्व पाहून दुपारचे २:३० वाजता आम्ही हर्षेवाडी येथे पोहचलो व लगेचच मुंबईचा दिशेने निघालो व रात्री ०८:०० वाजता ठाणे येथे पोहचलो. अशाप्रकारे या वर्षीच्या ट्रेक चा श्रीगणेशा झाला.
"इतिहासाची साक्ष देत असलेला हा गड पहायला व अनुभवायला मिळाला, हे आमचे भाग्यच!!!"
©सुशील राजगोळकर

/

हरिहर (हर्षगड, हरिशगड) Fort Harihar

हरिहर ट्रेक येथे जेवण भेटलं हर्षेवाडी गावात सोमनाथ बांगारे
7498313768

संवर्धन आणि विकासकामांसंबंधी-

गेल्या काही वर्षात हरिहर किल्ल्यावर गिर्यारोहकांबरोबरच हौशी पर्यटकांचा ओघ वाढलेला आहे. विशेषतः आठवड्यांच्या शेवटी आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी शेकडोंच्या संख्येने पर्यटक या किल्ल्याला भेट देतात. सोशल मिडियाच्या माध्यमातून हरिहर प्रकाश झोतात आला आहे. यावरूनच सुरक्षिततेचे काही प्रश्न उभे राहतात.

नाशिकच्या प्रशासनालाही यामुळे हरिहरवर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या संदर्भात पावले उचलावीशी वाटतात. कारण जर कुणाचा अपघात झाला किंवा दुर्दैवाने मृत्यू ओढावला तर मात्र प्रशासकिय अधिकाऱ्यांनाच धारेवर धरलं जातं. हरिहर किल्ला हा वनविभाग, नाशिक पश्चिम यांच्या अखत्यारित येतो. त्यामुळे सर्व विकासकामे आणि सुरक्षेची कामे वनविभागामार्फतच केली जाणार आहेत. या सर्व सुरक्षेच्या आणि विकासकामांना जिल्हाधिकारी, नाशिक यांचेतर्फे फंडींग होत असते. सुरक्षेच्या कारणात्सव ही विकासकामे व्हावीत याबद्दल आक्षेप अथवा शंका नाही परंतु त्याआधी हरिहर किल्ल्याविषयी जाणून घेऊन गिर्यारोहणातील तज्ञांकरवी ह्याची आखणी व्हावी ही आपेक्षा. त्यासाठी हा लेखप्रपंच…

सर्वप्रथम आपण हरिहरच्या रचनेबद्दल जाणून घ्यायला हवं-

हरिहर समुद्रसपाटीपासून 3674 फूट उंच असून हा किल्ला नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर पर्वतरांगेत येतो. पायथ्याच्या निरगुडपाडा गावापासून काही अंतर चालून गेल्यावर पहिला डोंगरउतार असलेला माती आणि जंगलाचा भाग चढून गेल्यावर वेताळ टेकडी भागावर जाता येते. वेताळटेकडी असलेल्या पठारावर वेताळादेवा पासून साधारण हरिहरच्या पूर्वे दिशेला जाणारी पायवाट आश्रम आणि शिलालेख असलेल्या प्राचीन पुष्करिणी (कुंड) कडे जातो.

पठाराच्या वर उभा कातळकडा दिसतो. हा कातळभाग प्रिझम (Prism) आकाराचा असून त्याच्या तीन बाजू आणि दोन कडा संपूर्णतः नव्व्द अंश कोनात उभे आहेत. वेताळटेकडीपासून वरच्या बाजूस उठावलेला जो कातळकडा दिसतो. तो मात्र सुमारे 70 ते 75 अंश कोनात असून त्यावरून नाळ कोरून त्यात अवघड असा पायऱ्यांचा मार्ग बनविलेला आहे. हरिहर किल्ल्याच्या प्राचीन पायरी मार्गावरून गडमाथ्यावर जाण्यासाठी एकावेळेस एकच माणूस वर चढू शकतो किंवा खाली उतरू शकतो. हा मार्ग थोडा अवघड असला तरी अशक्यप्राय नाही. सुमारे 150 ते 200 फूट उंचीचा हा सरळ मार्ग आहे. या प्रत्येक पायरीची लांबी ही सरासरी दोन ते अडीच फूट असून दोन्ही बाजुंना हाताने घट्ट धरण्यासाठी खोबणी तयार केलेल्या आहेत. त्यामुळे दोन्ही पाय व दोन्ही हात असे चार पकडींनी (holds) घेऊन कुणीही वर जाऊ शकतो. सह्याद्रीत अशा प्रकारच्या उभ्या कड्यावर किंवा कातळभिंतीवर कोरलेले जीन्याचे मार्ग अनेक किल्ल्यांवर आहेत. हे सर्व मार्ग काही ठिकाणी दोन्ही बाजुंनी बंदीस्त आहेत तर काही मार्ग एका बाजूने मोकळा/उघड (exposed) आहेत. परंतु हरिहर हा फक्त सह्याद्रीत नव्हे तर संपूर्ण भारतात दोन्ही बाजुंनी आणि पाठमोरा मोकळा (exposure) असलेला अनोखा दुर्गाविष्कार आहे. उभी नाळ असलेला पायरी मार्ग पहिल्या प्रवेशद्वारात जातो.

या प्रवेशद्वाराच्या पुढेही थेट माथ्यावर जाण्यासाठी कोरीव मार्ग आणि कोरीव पायऱ्या आहेत परंतु ही कोरीव ठिकाणं एका बाजूने बंदीस्त आहेत. गडमाथा हा सुमारे 20 ते 24 एकर क्षेत्रफळाचा असून फार विस्तिर्ण नाही. माथ्यावर काही गडावशेष आहेत. साधारण मध्यभागी टोकदार उठावलेला सर्वोच्च बिंदू आहे.

हरिहरचे सौंदर्य ब्रिटिशांच्या अंगाने-

सन 1818 मध्ये त्र्यंबकगड उर्फ ब्रम्हगिरीला ब्रिटिशांनी वेढा दिला. तिव्र संघर्षाला सामोरे जावूनही ब्रिटिशांनी मराठ्यांचा पाडाव केला. त्र्यंबकगडाच्या अखत्यारित असणारे 17 किल्ले ब्रिटिशांच्या ताब्यात आले. हरिहर देखील त्यांपैकी एक. आजच्या बरोबर दोनशे वर्षांपुर्वी इंग्रज अधिकारी कॅप्टन जॉन ब्रिग्जने हरिहर किल्ल्याला भेट दिली त्यावेळेस त्याने याचं वर्णन लिहून ठेवलंय…

“Truly wonderful! ‘Words’ are not be able to give an idea of its dreadful steepness!!! It is perfectly straight for, I suppose 200 feet, and can only compared ladder over a height of this nature. The steps badly broken and holes were cut in the rock to support the hands. So difficult was the hill to climb that. I was satisfied that five men could hold it (Fort) against any odds”

महाराष्ट्रातील अनेक गड-किल्ल्यांवरून पुन्हा संघर्ष होऊ शकतो हे जाणून इंग्रजांनी अनेक किल्ल्यांवर जाणारे मार्ग आणि पायऱ्या दारूगोळ्यांनी उडवले आणि त्यांना न वापरते केले. परंतु हरिहरच्या या अनोख्या रचनेच्या ते मात्र प्रेमात पडले आणि त्याला आहे तसा ठेवला.

P1310573-a.jpg

आता आपण येणाऱ्या भाविक, हौशी लोक आणि पर्यटकांच्या होणाऱ्या गर्दीसाठी काय उपाययोजना कराव्यात याचा विचार केला पाहिजे.

पर्यटनाच्या अंगाने कुठल्या भागात एकावेळी किती पर्यटकांनी जावं याबाबत कुठलेही निर्बंध नाहीत. परंतु शासन-प्रशासनाच्या वतीने गर्दीचं नियंत्रण आणि नियमन करण्याच्या उपाययोजना अनेक स्थळांवर केलेल्या आढळतात. हरिहर हा वनविभागाच्या अखत्यारित येतो. त्यामुळे वनविभागाची काही उदाहरणं द्यायची झाली तर सिंहगडावर सोडली जाणारं प्रत्येक वाहन नोंद करून तसंच तपासणी करून वरच्या बाजूस सोडलं जातं. मद्यपान आणि मांसाहारास पूर्णतः बंदी आहे. संपूर्ण घाट मार्ग वन क्षेत्रातून जात असल्याने धुम्रपान करण्यास मनाई आहे जेणे करून वणवा पेटणार नाही. गडमाथ्यावरील खाद्यगृहांतही धुम्रपान केल्यास जागेवर दंडाची व्यवस्था दिसून येते. ठिकठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरेही बसविलेले आहेत. पर्यटकांच्या सोयीसाठी काही ठिकाणी प्रसाधनगृहांचीही निर्मिती करण्यात आलेली आहे.

दुसरं उदाहरण आपण वासोटा किल्ल्याचे बघू. बामणोली येथे पर्यटकांना वनविभागाच्या कार्यालयात परवानगी घ्यावी लागते. परवानगी असलेल्या पर्यटकांनाच बोटीत बसून वासोट्याच्या पायथ्याशी सोडले जाते. पायथ्याशी असलेल्या चौकीत वनकर्मचारी परवानगी तपासून वर जाण्यासाठी सोडतात. संध्याकाळच्या आंत पर्यटक, गिर्यारोहक आदिंनी परत यायचे असते. रात्री वासोटा किल्ल्यावर मुक्काम करण्यास बंदी आहे.

1. वरील दोन उदाहरणांच्या धर्तीवर हरिहर परिसरात वनविभागाने पर्यटकांसाठी छोटे कक्ष किंवा चौकी निर्माण करावे. हरिहरला येणारे लोक प्रामुख्याने हर्षेवाडीच्या घाटमार्गातून किंवा पायथ्याच्या निरगुडपाडा गावातून हरिहरच्या दिशेने पायी ट्रेक करण्यास सुरुवात करत असतात. या दोन ठिकाणांवर म्हणजेच हर्षवाडी आणि निरगुडपाडा येथे या चौकी असाव्यात. शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या संयुक्त वनव्यवस्थापन समिती मार्फत येथे स्थानिक लोकांना रोजगार देऊन नेमणूक करावी. या दोन चौकींपैकी कुठल्याही एकातून हरिहर किल्ल्यावर जाण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची शासकीय ओळखपत्राद्वारे नोंदणी करावी. या चौकी केंद्रांचे कामकाज चालण्यासाठी पर्यटकांकडून प्रवेशशुल्क तसेच वाहन पार्किंग शुल्क आकारण्यात यावे. त्याची रीतसर पावती पर्यटकाना देण्यात यावी.

2. पहिला टप्पा म्हणजेच डोंगरउताराचा माती आणि जंगलाचा भाग चढून गेल्यावर वेताळटेकडी पठारी भागावर एक वनचौकी असावी. ही वनचौकी अवघड पायरी मार्गाच्या दिशेने असावी. खालील केंद्रात नोंदणी केलेली पावती वरच्या चौकीत दाखविणे पर्यटकांना बंधनकारक असावे. ज्यांच्याकडे नोंदणी नाही ते पर्यटक पायरीमार्ग चढून गडमाथ्यावर जाऊ शकत नाहीत. परंतु असे पर्यटक पहिल्या टप्प्यातील पठार, वेताळटेकडी परिसर, आश्रम, पुष्करिणी या भागात फिरण्यास हरकत नसावी.

3. गर्दीच्या वेळी एकावेळेस किती जणांना पायऱ्यांवरून सोडावे तसेच उतरवावे याचा निर्णय चौकीतील वनकर्मचारी घेतील. ते पर्यटकांना बंधनकारक असेल. अन्यथा केलेल्या नोंदीवरून नियम न पाळणाऱ्या पर्यटकाना दंडात्मक कारवाई करावी.

4. एका दिवसात किती पर्यटक गडमाथ्यावर सोडावे याचा गिर्यारोहण क्षेत्रातील तज्ञांकडून अभ्यास करून संख्या ठरवावी. त्यानुसार खालील केंद्रातून तेवढ्याच पर्यटकांना वर जाण्यास परवानगी द्यावी.

5. राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये तसेच कास पठारासारखी संरक्षित ठिकाणी पर्यटकांना जाण्यासाठी ज्याप्रमाणे वेबसाईहून नोंदणी करण्याची सोय आहे तशी हरिहरच्या बाबतीत लवकरच तयार करावी. वेबसाईटहून होणाऱ्या नोंदीसाठी भेट देण्याच्या निदान 15 दिवस आधी होणे आवश्यक असल्याची अट असावी.

6. 20/30 च्या वरील संख्येने मोठा ग्रुप येत असल्यास त्यांनी अधिकृत/नोंदणीकृत गिर्यारोहण संस्थेमार्फतच बुकिंग करणे आवश्यक आहे. कारण, अशा ग्रुपला सांभाळणे, काळजी घेणे आणि शिस्तशीर ट्रेक करणे संस्थेमार्फतच सोयीचे होत असते.

7. अतिवृष्टी असलेल्या दिवसात हरिहर गडमाथ्यावर जाण्यासाठी पर्यटकांना नोंदणी देऊ नये. हा निर्णय सर्वतः पायथ्याच्या चौकी/केंद्रातील वनकर्मचारी घेतील. या दिवसात पायऱ्या मार्ग शेवाळलेला असतो. पायरी मार्गा वर पाणी वाहत असते. तसेच हरिहरचा माथ्याकडून खालील ३०० मीटरचा भाग हा दाट धुक्याखाली असल्याने दृष्यमानता (visibility) फार कमी असते. त्यात वरील वाटा चुकण्याची शक्यता अधिक असते.

8. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी असणाऱ्या ब्रह्मगिरी-हरिहर प्रदक्षिणा दिवसात ज्या भाविकांना वेताळटेकडीकडून गडमाथ्यावर जायचे आहे त्यांना वर जाण्यास मनाई नसावी.

9. खालील वनकेंद्र/चौकी पासून ते थेट गडमाथ्यापर्यंत महत्त्वाच्या ठिकाणांवर सूचना फलक असावेत. त्यावरील सूचना गिर्यारोहणातील तज्ञाकरवी मागवून तयार कराव्यात.

10. हरिहर गडमाथ्यावर रात्री मुक्कामास पूर्णतः बंदी असावी. वेताळटेकडी पठारावरील आश्रम बाजूस मुक्काम करण्यास हरकत नसावी.

11. निरगुडपाडा, हर्षवाडी परिसरातील ग्रामस्थ, आदिवासी बांधवांच्या घराघरातून मुक्कामाच्या व्यवस्थेसाठी (Home stay) प्रोत्साहन आणि प्रसिद्धी देण्यात यावी. त्यांना पर्यटकांच्या सेवेसाठी सोयी उपलब्ध करून देण्यात याव्यात.

12. साम्रद-सांधण दरी तसेच कळसूबाई परिसरात जसे झाले आहे तसे हरिहर परिसरातील स्थानिक तरुणांना गिर्यारोहणांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात यावे. शासनाकरवी अशा प्रशिक्षितांची नोंद करून त्यांना गिर्यारोहणाचे साहित्य उपलब्ध करून द्यावे. अशा प्रशिक्षित तरूणांनी अनुभव नसलेल्या पर्यटकांना मार्गदर्शन करून गाईडचे काम करावे. त्यातून त्यांना मिळकतीची सोय होऊ शकते. जेणे करून नवख्या पर्यटकांमुळे अपघाती परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता उरत नाही.

13. उभ्या पायरी मार्गावर शिडी/जीना/रेलिंग्ज लावणे हा पर्याय नाही. यामागे खालील कारणं आहेत

या नाळेच्या पायरीमार्गाचा विचार केला तर त्याचे सौंदर्य नष्ट न होता लोखंडी मार्ग बनविणे शक्य नाही.

त्यासाठी जागतीक पातळीवरील अशी कामं केलेले तज्ञ अभियंता, अभ्यासू स्थपति किंवा आव्हानात्मक बांधकामातील अभ्यासू लोकांची मदत घ्यावी लागू शकते.

आहे त्या मार्गावर हातांच्या पकडीसाठी खोबणी केलेल्या आहेत. त्यावर कुठल्याही मेखा किंवा रॉड बसविण्यासाठी केल्याजाणाऱ्या ड्रील मूळे आहे त्या रचनेला तडे पडणे, धक्के बसणे, छोटा टवका किंवा मोठा भाग कोसळण्याची (collaps) शक्यता अधिक आहे.

आता आहे त्या मार्गाचा असा कुठला मूळ रचनेचा भाग भंग पावला किंवा कोसळला तर तो कायमस्वरूपी ना दुरुस्त अवस्थेत जाऊ शकतो.

14. उभा पायरी मार्गावर गर्दी होत असल्याने धोकेदायक स्थिती वाटते. या खड्या मार्गावर एकावेळी वरून खाली किंवा खालून वर असा फक्त एकेरी वापर होत असतो. त्यामुळे याला पर्याय म्हणून हरिहर किल्ल्याच्या दुसऱ्या कातळभिंतीवरून शिडी/जीना/ट्रॉलीमार्ग किंवा रोप वे यांचा पर्याय करण्यास वाव आहे. त्यामुळे प्राचीन मार्गावरून माथ्यावर जाणे आणि आधुनिक मार्गाने खाली परतणे अशी यंत्रणा सोयीची होऊ शकते.

15. गडमाथ्यावर अति धोकेदायक ठिकाणी रेलिंग्ज लावावेत. परंतु संपूर्ण परिघाला रेलिंग्ज लावण्याची आवश्यकता नाही. कारण त्या रेलिंग्जचे निर्माण करताना खालील पायऱ्यांच्या रचनेला हादरे बसू शकतात. तडे आदी पडून ह्या अनोख्या रचनेचे कायम स्वरूपी नुकसान होऊ शकते.

16. हरिश्चंद्रगड येथील कोकणकडा, धोडपमाची आदी ठिकाणी तयार करण्यात आलेले रेलिंग्ज आज कोसळलेले आहेत. त्यातून नैसर्गिक खडक रचनेचे अतोनात नुकसान होते. हरिहर गडमाथ्यावर रेलिंग्ज करू नयेत. यातून काही वर्षात रेलिंग्ज सकट कातळाचा काही टप्पा कायमस्वरूपी ढासळण्याची शक्यता अधिक आहे.

17. अनेक गडकोटांवर पायथ्याच्या गावापासून ते किल्ल्याच्या पोटापर्यंत जाण्यासाठी डांबरी गाडी रस्ते तयार करण्यात आलेले आहेत. काही किल्ल्यांच्या थेट माथ्यावर वाहने जातात. हरिहर किल्ल्याच्या पठारापर्यंत गाडी रस्ता करण्याची माहिती गावकरी आणि वनविभागाशी संबंधित कर्मचारी कडून मिळाली. डांबरी गाडी रस्ता करण्याचे धोके खालीलप्रमाणे

– डोंगर उतारावरील वनं आणि वृक्ष मोठ्या प्रमाणावर कापावे लागतील.

– रस्त्यासाठी सुरुंग लावून स्फोट करावे लागणार. त्यामुळे हादऱ्यांनी वरच्या उभे कडे असलेल्या भागावरून दरड कोसळण्याची दाट शक्यता आहे.

– हादऱ्यांमुळे पायरी मार्गावरील प्रवेशद्वार कोसळून खाली पडण्याची शक्यता आहे. कारण ह्या प्रवेशद्वाराचे दगडी चीरे कुठलाही चुना आदी पदार्थ न भरता रचीव पद्धतीने द्वार तयार केलेले आहे.

– हातगड आदी किल्ल्यावर वनविभागाने जो गाडी रस्ता केला आहे त्यावर सतत दरड कोसळत असते आणि पर्यटकांना गाडी खाली लावून पायी जावं लागतं. यातून रस्ता बनविण्याचा मुळ उद्देश साधत नाही.

– ज्या अनोख्या पायरी मार्गाला जपण्यासाठी ही नियमावली आहे त्यात रस्ता बनविण्याची कार्यप्रणाली बाधक ठरेल.

– जर गाडी रस्ता झाला तर हरिहरच्या गडमाथ्यावर जाण्यासाठी गर्दीला रोखणे नियंत्रणाबाहेर होईल. हरिहरवरील गर्दी रोखणे हा सध्यस्थितित तरी शासनाचा प्रमुख हेतू आहे.

– वाहनांचे प्रदूषण, कचऱ्याचे प्रदूषण या प्रश्नांना मोठ्याप्रमाणावर सामोरं जावं लागणार आहे.

– परिसरातील वन्यजीवन आणि जैवविविधता धोक्यात येईल.

18. शासनाने विविध माध्यमातून मोठ्याप्रमाणावर लोकजागृती आणि लोकशिक्षण मोहिम राबविण्याची आवश्यकता आहे. त्यात गिर्यारोहण, आनंददायी पर्यटन, स्वयंशिस्त, सुरक्षित पर्यटन आदी बाबींचा सामावेश असेल. रेडियो, टी.व्ही., वर्तमानपत्र, फलक, पत्रके, विविध कार्यशाळा वगैरे अनेक माध्यमांचा यासाठी वापर केला जाऊ शकतो.

P1310500-a.jpg

हरिहर किल्ल्याची रचना अवघड आणि अजस्त्र भासत असली तरी आजपर्यंत हरिहर पायरी मार्ग तसेच गडमाथ्याहून पडल्याने अपघात झाला किंवा मृत्यू झाला अशी नोंद ऐकवत नाही. तरी सोशल मिडियामधून पायरी मार्गावर होणारी गर्दीची भीषण वास्तवता समोर येत आहे. त्यामुळे जलदीने उपाययोजना आवश्यक आहेत. यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी, वनाधिकारी, पुरातत्त्व अधिकारी, दुर्ग अभ्यासक, तज्ञमंडळी, गिर्यारोहण क्षेत्रात रेस्क्यू करणारी टीम, काही तज्ञ गिर्यारोहक यांनी संयुक्त हरिहर किल्ल्याला भेट द्यावी. यातून स्थानिक लोकांच्याही सूचना महत्त्वाच्या असतील. शासकिय कार्यालयात होणाऱ्या किल्ल्यासंदर्भातील प्रत्येक बैठकीत महाराष्ट्र शासनाने गठित केलेल्या गड-किल्ले संवर्धन समितीतील सदस्यांना पाचारण करण्यात यावे.

धन्यवाद.

हरिहर गड - वास्तुस्थापत्याचे सौंदर्य

     नाशिक !!! किल्यांचा प्रदेश ...  नाशिक जिल्यात एवढे किल्ले तर नक्कीच आहेत कि आपण संपूर्ण किल्ले फिरायचे म्हंटले तर दर वीकएंड ला एक ट्रेक केला  तरी एक महिना आपणाला पुरणात नाही आणि नाशिक जिल्ह्यतील सर्वच किल्ले म्हणजे बुलंद , अवघड या श्रेणी मध्ये मोडणारे, किल्ला सर करायचं म्हंटल कि २ ते ३ तासांची तांगडतोड करावी लागणारच . बरेच दिवस ऑफिस आणि PC च्या जगात घालवल्यावर आता ओढ होती सह्यद्रीची बऱ्याच दिवसापासून हरिहर या किल्यावर जाण्याची इच्छा होती काही कारणास्तव जाणे होत नव्हतं .शेवटी योग  आला ऑफिस वरून शिफ्ट नंतर बॅगा भरून रात्री ११.५० ची कसाऱ्याला जाणारी लोकल पकडली आणि मोहिमेची सुरवात झाली , यावेळी बरेच रोजचे साथीदार नव्हते.  लहू ,तन्मय आणि मी रोजचे आणि विजय , सचिन , हॅरी आणि आशिष हे नवीन चार जण मिळून आम्ही ७ जण होतो . कसाऱ्याला १.५० चा दरम्यान पोहचलो कसाऱ्या वरून मी आधीच हरिहर ला जाणयासाठी  गाडी बुक केली होती .

सकाळच्या मंद प्रकाशात दिसणारा हरिहरगड
रात्री २ वाजता हरिहर गडाच्या पायथ्यला असलेल्या निरगुनपाडाया   गावाच्या दिशेने प्रवास सुरु झाला .५० किलोमीटरचा हा प्रवास होता . मध्ये एका हॉटेल मध्ये थांबून एक फक्कड चहा झाला आणि पुन्हा प्रवास चालू झाला .  निरगुनपाडा गावाच्या जवळ जवळ पोहचलो आणि रांगडा गड रात्रीच्या चांदण्यांच्या प्रकाशात दिसू लागला. गावात बरीच ट्रेकर मंडळी आली होती. 

 गावात पोहचल्यावर गावात जेवणाची आणि नाश्त्याची सोय करायची होती .  गावात पोहचून गाडीवाल्या ओळखीच्या एका दादांना जेवणाची आणि नाश्त्याची सोय केली आणि मग सर्वचजण रस्त्यावरच बसून गप्पा मारू लागले , मोकळ्या आभाळाकडे बघत चांदण्या न्हाहळत  गप्पा मारण्याचा अनुभव काही औरच होता. गप्पा मारत मारत सकाळचे ५ कधी वाजले समजलंच नाही . गावातल्या दादांकडे पोहे आणि चहा चा नाश्ता करून आम्ही किल्याचा दिशेने प्रवास सुरु केला . 

किल्याचा उजवीकडे चालत राहा असा सांगणारा दिशादर्शक 
डांबरी रस्ता  ओलांडून शेताच्या मळ्यातून रस्ता किल्याकडे जातो .साधारण हा दोन ते तीन तासाचा सोपी श्रेणीचा ट्रेक आहे पण , ८० डिग्री असलेल्या कातळात कोरलेल्या पायऱ्या मुळे हा गड मध्यम  श्रेणी मध्ये मोडतो. प्रवास सुरु झाला आणि किल्याचा डाव्या बाजूला जायला आम्ही सुरवात केली पण  , गावातले एक आजोबा भेटले आणि त्यानी सांगितलं कि तुम्ही वाट चुकलायत , डाव्या बाजूने नका जाऊ उजव्या बाजूने जा तेव्हा तुम्ही मुख्य पठारावर पोहचाल. किल्याकडे जाताना नेहमी उजव्या बाजूने चालत जावे. सुरवातीला झाडा झुडपात जाणारी सोपी वाट आता अवघड होतचाली होती .एक ट्रेकर ग्रुप वाट चुकून एका उंच कातळ मध्यावर अडकले होते त्याना आवाज देऊन मुख्य  वाटेस  मागे येण्यास सांगितले आणि आमचा प्रवास सुरु केला .मे महिना असल्यामुळे वाटे मध्ये करवंद आणि आंबे हा गावरान मेवा मानस्तोक्त खात खात प्रवास चालू होता .
कातळामध्ये कोरलेल्या सुंदर पायऱ्या 
गावापासून बराच लांबचा टप्पा पार केला आणि सहयाद्री ची अजस्त्र रांग दिसू लागली ..दीड  तासा मध्ये आम्ही मुख्य पठारावर पोहचलो .पठारावरून आपणाला आपल्या उजव्या बाजूस फणी हा एक नागाच्या फण्यासारखी सुळका असलेला डोंगर दिसतो आणि त्याचा बाजूस भास्करगड दिसतो  .बराच वेळ आराम आणि फोटो काडून  झाल्यावर मुख्य दगडी पायऱ्याकडे जाणारी वाट पकडली .  हि वाट अवघड आहे ,उन्हा मुळे माती निसरडी झालेली त्यामुळे  पाय अगदी जपूनच टाकावा लागत होता.
सरळ पायऱ्या 
थोड्याच वेळात आम्ही हरिहरच खास वैशिष्ट्य असलेल्या कातळपायऱ्याच्या जवळ पोहचलो.कितीवेळ तरी एकटक त्या पायऱ्यांकडे  फक्त बघतच रहावं असं सौन्दर्य या पायऱ्यांच आहे. बराच वेळ इथे पायऱ्यांचा  पायथ्याशी घालवल्यावर एक एक करून आम्ही चढाईला सुरवात केली. एका वेळी एकच जण वरती जाईल एवडीचं वाट आहे .प्रत्येक पायरी मध्ये केलेल्या खोबणी मुळे चढाई सुखरूप होते . सावधगिरीने चढाई केली कि आपणाला दोन बुरुजांमध्ये असलेला महादरवाजा लागतो .भगवा शेंदूर फासलेला महादरवाजा पार झाला कि गणेशाची सुंदर कोरीव मूर्ती कातळात कोरलेला आहे. इथून पुढे जाणारा मार्ग म्हणजे अचंबित करून सोडणार आहे ,दगडी कातळामध्ये कोरलेला अर्ध वर्तुळकाळ भुयारी मार्ग म्हणजे आश्चर्यच ! इथून आपणाला भास्करगड , फणी डोंगर दिसतो.  पुढे चालत गेलो कि परत आपणाला ६० ते ७० वरती जाणाऱ्या एकेरी पायऱ्या लागतात .हरिहर गड म्हणजे वास्तू स्थापत्याचा अप्रतिम नमुना एक आश्चर्य संपलं कि पुढे एक आश्चर्य पुढे आहेच ... आम्ही सर्वानी सावधगिरीने कातळातमधील  हा मार्ग पार करून .दुसऱ्या भग्न दरवाजातून आम्ही  मुख्य पठारावर येऊन पोहचलो. 
ब्रह्मगिरी पर्वत रांग 
किल्यावर जास्त काही अवशेष शिल्लक नाही आहेत . आपणाला पूर्वेकडे लहानसा तलाव लागतो  .काठावरच हनुमानाची शेंदूर फसलेली सुंदर मूर्ती एका छोट्याशा मंदिरात विराजमान आहे .  त्याचाच बाजूला महादेवाची पिंड आणि नंदी च दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो . वाटेत आम्हला वाड्याचे काही अवशेष दिसले ते पाहत आम्ही पुढे गेलो . तसच पूर्वेकडे चालत गेलो कि आपणाला लागते सुस्थितीत असलेली एक खोली लागते.  या खोलीचा वापर पूर्वी दारुगोळा साठा ठेवण्यासाठी किंवा धान्यसाठा ठेवण्यासाठी होत असावा . गडावर राहायचं म्हंटल तर या इमारतीमध्य १० ते १५ जणांची राहण्यासाठी सोय होऊ  शकते . ऊन बरंच वाढलं होत खोलीच्या सावली मध्य बराच वेळ बसून गप्पा मारल्यानंतर आम्ही पुढे किल्यावरच्या सर्वात उंच ठिकाणी निघालो . गडाच्या या टेकडीवर चढताना मात्र रॉक पॅचिंगच थ्रिल अनुभवायला आपणाला मिळालं . वरती चढताना मात्र सर्वांचीच दमछाक झाली. टेकडीवरचा उंच भगवा फडकताना पहिला कि मराठ्यांचा इतिहासाची आठवण होते आणि अंगात वेगळाच उत्साह संचारतो .सर्वजण वरती चढले  आणि सर्वानी महाराजांच्या नावाचा गजर  करत एकच जल्लोष केला. आमचा रोजचा विडिओ सेल्फी घेऊन झाला .
वरून आपणाला उत्तरेला दिसते  ब्रह्म गिरी पर्वत रांग , दक्षिणेकडे वैतरणा नदीचं खोर फार मनमोहक दिसत , शेजारी भास्करगड आणि फणी डोंगर दिसतो. आम्ही  चढाईला फारच उशीर केल्यामुळे खूप जास्त वेळ झाला होता मग , उतरताना पटापट उतरायचं ठरलं. उतरताना सुद्धा ८०डिग्री पायऱ्यांमुळे  हरिहरचा ट्रेकचा  थ्रिल अनुभवायला मिळतो . उतरताना मात्र आम्ही रस्ता चुकलो आणि थोड्याच वेळात परत  मुख्य वाटेवर आलो आणि १ ते १. ३० तासामध्ये गावात पोहचलो . गावा मध्य जेवण तयारच होत ,मग जेवण करून परतीच्या प्रवासाला निघालो. कातळातील पायऱ्यामुळे उतरतानाही ट्रेकच  भन्नाट थ्रील देणारा हरिहरचा  ट्रेक चिरस्मरणीय ठरतो .
किल्याचा इतिहास - हरिहर उर्फ हर्षगड हा प्राचीन काळात बांधलेला असून तो अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी १६३६ साली निजामशाहीची पुनर्स्थापना करतेवेळी त्र्यंबकगडासोबत हा किल्ला सुद्धा जिकला. 
किल्ला हरिहर - हर्षगडतालुका त्रिंबकेश्वर जिल्हा नाशिकउंची - ११२० मीटरचढाई श्रेणी - मध्यमयोग्य कालावधी - सपेंबर ते फेब्रुवारी ( भर पावसात हा ट्रेक करू नये )हरिहर गड ला कसे जाल - मध्य रेल्वेने कसारा या स्टेशन पर्यंत पोहचावे .
तिथून आपणाला बस किंवा खाजगी वाहनाने निर्गूणपाडा या गाव मध्य जाऊ शकतो
खाजगी वाहन आधीच बुक करण्यासाठी
प्रकाश - ९८२३९८६२३३   ( private  गाडी साठी यांना संपर्क करा )
 
आपल्या महाराष्ट्राला खरोखर एक भौगोलिक वारसा लाभला आहे तो म्हणजे एक सह्याद्री
तर दुसरा कळसूबाई पर्वत रांग...!! दोन्ही डोंगररांगा तेवढ्याच भयानक, कातळ कड्यानी अजस्त्र रूप धारण केलेल्या, सह्याद्रीला भर म्हणून घनदाट झाडी आहे त्यामुळे सह्याद्रीमधले किल्ले आदिकच सुरक्षित झाले तर याऊलट नाशिक जवळील पर्वतरांगांमध्ये (कळसुबाई) जंगल तुलनेने कमी असले तरी इथले किल्ल्यांचे काळे कातळ लांबून जरी पहिले तरी शत्रूला कापरे भरले पाहिजेत असे एकदम अजस्त्र, भयानक व राकट रूप आहे इथल्या किल्ल्यांचे, काळे कुळकुळीत तासून तयार केल्यासारखेच जणू. इथले बहुतांशी किल्ले हे दगडातच घडवलेले गेले असल्यामुळे शिवकालीन कारागिरांचा व त्या कारागिरांच्या प्रयत्नाला शिवविचारांचा जोड साधला गेल्यामुळे  दुर्गबांधनी कशी असावी हे पाहण्यासाठी नाशिक जिल्हा एकदा भटकूनच पहा.....
भरपूर दिवसापासून किल्ले हरिहर ला भेट देण्याचा बेत केला होता परंतु तो काय लवकर झालाच नाही पण काल मात्र गडाला भेटून मनाची शांतता करून घेतली. नाशिक जिल्हयातील किल्ले तसे दुर्गभटक्यांसाठी एक आव्हानच आहे कारण इथला प्रत्येक किल्ला नैसर्गिकरित्या अगोदरच भीषण रौद्र रूप घेऊन जन्माला आला व त्यावर नंतर राजेमहाराजानी त्यावर तटबंदी घालून मुकूटरुपी जणू साजच चढविला. सकाळी लवकर उठून गाडीवरून नाशिक गाठले, नाशिकमधून हायवेने इगतपुरीला गेलो थोडा रस्ता चुकला त्यामुळे खूप धांदल झाली कारण इथल्या लोकांना हरिहर किल्लाच माहित नाही हि शोकांतिका. इगतपुरीहून त्र्यंबकेश्वर रोड ला निरगुडपाडा या खेडेगावला जाण्यासाठी फाटा लागतो, आसपासचे भीषण डोंगररांगा बगत आमची गाडी रस्ता कापत होती, वास्तविकता हा संपूर्ण भाग आदिवासी म्हणून प्रचिलीतला जातो, येतील लोकांचे राहणीमान, बोलणे हे सर्व अनुभवत आम्ही गडाच्या पायथ्याशी असलेल्या निरगुडपाडा या गावी पोचलो. गाडी गावातील एका जुन्या शाळेत लावून गडाची पायवाट धरली, लांबूनच गडाचा घेरा जाणून घेत गडावर कधी पोचेन याची उत्कंठा लागली होती. उन्हाचा वरून तडाखा चालूच होता पण त्याकडे लक्षच नव्हते. गायरानातील लोकांना रस्ता विचारत गडाकडे चालते राहलो, जसजस गड जवळ येईल तसतसा गडाचा दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या व दरवाजा लांबूनच दिसू लागला आता तर उत्कंठा आणखी शिगेला पोचली. एव्हाना आम्ही दोन डोंगर सर करून बालेकिल्याच्या पायथ्याशी आलो मात्र पायामध्ये कसलाच त्राण उरला नव्हता एवढे भयंकर ऊन व त्याचा चालताना होणारा त्रास.... पण हे सर्व एकाच गोष्टीपुढे विरळ व्हायचे ते म्हणजे शिगेची उत्कंठा..!!
🛡🗡🛡🗡🛡🗡🛡🗡🛡🗡🛡
गडाच्या काळ्या कातळात खोदलेल्या 60° अँगल च्या पायऱ्या व पायऱ्या चढताना काळजी घेण्यासाठी पायऱ्याच्या बाजूला तयार केलेल्या खोबण्या हे काम खरच पाहण्यासारखं आहे, पायऱ्या छोटया असल्यामुळे योग्य ती काळजी घ्यावी लागते अन्यथा जीवाशी मुकु शकतो कारण खाली दरी आहे व इथे माती कमी पण दगडच जास्त आहेत. पायऱ्या चालून वर गेल्यावर गडाच्या पहिल्या दरवाजापाशी आपण पोचतो, गडावर यायचा हा एकमेव मार्ग आहे. दरवाजा नीट न्याहाळून आपण पुढे जावे कातळकडा कोरून वाकून जाण्यासाठी 5 फुटी चीर तयार केली आहे इथून जाताना योग्य काळजी घ्यावी कारण खाली सरळ कडा आहे व वारे तर भन्नाट वाहत असते. यातून थोडे पुढे गेल्यावर सरळ खडा डोंगर फोडून आतमध्ये गुहेसारखा रस्ता केला आहे.... भयग्रस्त व थरारक मार्ग. यातून आपण सावरत वर गडाच्या मुख्य दरवाजाजवळ पोचतो. दरवाजातून पुढे डाव्या बाजूने पठारावर चालते राहावे, प्रथम डाव्या बाजूला कड्यामध्ये 2 पाण्याची टाके कोरलेली आहेत ज्यात सध्या पाणी नाही व तिथे पोचता पण येत नाही, येथून पुढे गेल्यावर 3 पाण्याची मोठी टाके दिसतील पण यातील पाणी पिण्यायोग्य नाहीये , या टाक्यापासून पुढे गेल्यावर आपण गडावरील मुख्य तलावाजवळ पोचतो. याच्या समोर मारुतीची मूर्ती असून दगडी चौथर्यातून तलावात जाण्यासाठी पायऱ्या आहेत, हनुमान मंदिराच्या मागील बाजूस उघड्यावर शंकराचे शिवलिंग आहे. तलावात सध्या पाणी नाहीये. तलावापासून पुढे गडाच्या अंतिम टोकाकडे चालते व्हावे तिथे आपल्याला दारूगोळा कोठार दिसते व त्याच्या बाजूस 3 पाण्याची टाके कोरलेली दिसतील. गडावर याव्यतिरिक्त पडझड झालेल्या वाड्यांचे अवशेष व पाण्याची टाकेच जास्त पाहायला मिळतील. गडावर एक मुद्दा खूप अनुभवायला मिळाला ते म्हणजे दुर्गबांधणी करताना केला गेलेला दगडांचा अभ्यास, पाण्याची जमिनीत मुरून प्रवाह कोणत्या दिशेने होईल त्याजागी कपार्यामध्ये खोदलेले पाण्याचे टाके खरोखर विलक्षण म्हणावे लागेल.
दुर्ग भटक्यानी हा किल्ला एकदा पाहूनच या.
🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
शब्दांकन-
✒ मनोज शिवाजीराव महाडिक
🎪..स्वराज्य योद्धा प्रतिष्ठान..🎪
🚩⚔9890354353,  9156571313 ⚔🚩

किल्ले हरिहर - दिगंताच्या छायेत... दिग्गजांसमवेत... - भाग १

प्रास्ताविक ....

र्दी आणि माझं फार वितुष्ट. त्यामुळे गर्दीत मिसळणं मला कधी जमलंच नाही. खूपदा चांगले, कौटुंबिक, सामाजिक, कार्यक्रम, सोहळे निव्वळ गर्दीपायी टाळून मी अनेकांच्या शिव्या-शापांचा धनी झालो आहे.

मुंबापुरीसारख्या अखंड धावत्या आणि गर्दीच्या माहेरघरातील अष्टौप्रहर वास्तव्यामुळे असेल असं. दैनंदिन शहरी जीवनात तर गर्दी टाळायचा मी आतोनात प्रयत्न करतो. पण पाण्यात राहून... म्हणतात ना अगदी तस्संच या गर्दीचे अन् माझे संबंध आहेत. आणि मग…. या गर्दीत हरवलेल्या आत्म्याशी, माझ्या हक्काच्या स्व'शी, पुन्हा एकरूप व्हायला मी गडकिल्ल्यांचा 'बेमिसाल याराना बडे सुकून के साथ' जवळ करतो. त्यांच्या भेटीला जाताना मात्र मोजकेच गिने-चुने सवंगडी सोबतीला, नाहीतर "हा माझा मार्ग एकला..." च्या धर्तीवर सरळ चालू पडतो. अनेक वर्षांचा हा शिरस्त्याचा नियम.
पण शेवटी काय तर... नियम हे अपवादानेच सिद्ध होतात. होय ना ? असेच काही गडकोटांइतकेच भव्य अन् दिलदार अपवाद माझ्या वाटेला आलेत. त्यापैकी एक प्रमुख म्हणजे चारकोपला राहून दैदीप्यमान इतिहासाचा चौदिशांनी ठाव घेणारा परममित्र आणि जाणता मार्गदर्शक म्हणजे संजय तळेकर. वाहत्या झऱ्यासारखा तळनितळ माणूस. तरीही अजब वल्ली असलेला हा गिरीचर गिर्यारोहणातील माझ्या जन्मापासूनच माझ्या राशीला आहे.
गडकोट आणि त्यांचा प्रज्वल इतिहास खोलातून जाणुन घेणे, इतरांना त्याची सखोल जाणिव करुन देणे, अन् त्या अमाप धगीवर माणसं "चेतवणे" हा याचा धंदा. बाकी याची नोकरी-बिकरी हि सारी... अंधश्रद्धा.
या पुरातन माणसाच्या वयाबद्दल एक अघोरी शंका मला नेहमीच येते. याच्या उच्चविद्याविभुषित संगिनीबरोबर (रायफलीची नाही) माझा यावरून कैकवेळा वादही झालेला आहे. लौकिकदृष्ट्या याच्या वयाचा अंदाज लावायचाच झाला तर शिवनेरी, नाणेघाट परिसरातील गुंफा खोदल्या जात असतांना हा तिथल्या कुशल कारागीरांचा खमक्या मुकादम असणार. किल्ले शिवनेरीपेक्षा हा किंचीतसा लहान तर रायगडापेक्षा २-४ वर्षांनी थोराडच असावा.
आम्हां भटक्यांसाठी प्रातःस्मरणीय अशा गोनिदांबरोबर भटकंती केलेल्या संजयवर बाबासाहेबांचा जीव इतका कि शिवशाहिर याच्या घरी चहापानाला येतात. दिवंगत निनादकाका बेडेकरांशी याचं मोठं सख्य. इतिहासाचार्य सरदार बलकवडे यांचा तर हा जीवश्च-कंठश्च. चालता-बोलता इतिहास कोष म्हणजे आप्पा परब, ईतिहास तज्ञ तु.वि.जाधव, ऐतिहासिक शस्त्रांचे संग्राहक आणि विशेषज्ञ गिरीश जाधव अन् इतिहासाला  बोलायला लावणारे रवींद्र लाडांच्या हा खाजगीतला. आता बोला... याच्याबद्धल  आंम्हांला असूया का होऊ नये? असो.

तर, अशा तळेकर कुलोत्पन्न राजे संजयजींनी ऐनवेळी हुकुम सोडला ... हर्षगडला जायचं... बस्स्स... वनीं आनंद, भुवनी आनंद अशीच साऱ्यांची अवस्था होऊन गेली. झाडून सारे (कामा) धंद्याला लागले. आमच्या पक्षिमित्र मनिष नाखवा साहेबांनी थेट एक खाजगी बसच आरक्षित केली. वर्षाच्या सुरुवातीलाच अशी रांगड्या गडोत्तमाची भेट नाकारण्याचं महापाप कोण करेल?
जाणता राजा या महानाट्यातील कलाकारांच्या नसा-नसांत सह्याद्रीचा भर्राट वारा आणि गडकोटांचं भन्नाट पाणी भिनवून त्याचा विशुद्ध अर्क त्यांच्या अभिनयात उतरवण्याकरीता संजयने “जाणता राजा ट्रेकर्स” या दुर्गभ्रमण पथकाची निर्मिती केली. संजयच्या फुकट फौजदारी अर्थात् लष्कराच्या भाकऱ्या असलेल्या ( गिर्यारोहण साहित्य तयार करणे, मंडळांचे हिशेब तपासणे, सार्वजनिक देवादिकांना वस्त्रं नेसवणे, उत्सवांची सजावट करणे ) अशा अनेक उद्योगांपैकीच हा एक. त्या पथकातील कलाकारांच्या या मोहिमेवर अक्षरशः उड्या पडल्या. ऐनवेळी अनेकांना नकार द्यावा लागला. अन् लगोलग ३० धारकऱ्यांची एक मोहिम हर्षगड उर्फ किल्ले हरिहराच्या दिशेने क्षेत्र नाशिककडे रवानासुद्धा झाली.

शनिवार, दि. ६ जानेवारीच्या रात्री उशिरा ठाण्यातून निघालो तोपर्यंत सारंकाही आलबेल होतं. पण जसं आमच्या खाजगी बसने कल्याण सोडलं तसं पुढ्यातल्या संकटाची चाहूल लागली. नाशिकमध्ये तपमान ९ डिग्री सें.ग्रे. पर्यत घसरल्याच्या माहितीने पोटात गोळाच आला. पुरेसा जामानिमा सोबतीला असूनही मध्यरात्री कसाऱ्याला चहापान करतांना थंडीचा आवाका जाणवला.

मोहिमेचा शुभारंभ… क्षेत्र नाशिक येथे आगमन आणि देवदर्शन...

पहाटे साडेचाराच्या सुमारास त्र्यंबकेश्वर गाठलं. पण त्या चिवट गारठ्यात, उबदार बसच्या कुशीतून बाहेर पडण्याची हिंमत काही होत नव्हती. शेवटी काही हौशी कलाकारांना भरीस घालून संजयने वाहनतळाच्या कोपऱ्यात मस्त शेकोटी पेटवून घेतली. तेंव्हा कुठे मेहेरबानी केल्यासारखे.... लोक खाली उतरले... तेही... स्वतःच्या प्रातःविधिसाठी.
शेकोटीची ऐश चालू असतांनाच ब्राम्हमुहुर्ताच्या त्या अकलंक, निरव शांततेत, एका नादमधूर लकेरीने भान वेधून घेतलं. खेचल्यासारखा शेजारच्या मैदानात गेलो. तर तेथे एका मिनीबसच्या बाहेर १०-१२ दाक्षिणात्यांचा जत्त्था दिसत होता. घनघोर गारठ्यात आंघोळी (छटट यार ... मला तर कल्पनाच सहन होत नाहिये) उरकून ओलेत्यानेच त्या भक्तांनी कमरेला फक्त पंचा गुंडाळून अय्यप्पा स्वामींचे गुणगान आरंभले होते.
त्यांतील एका वयोवृद्ध स्वामीभक्ताने अय्यप्पां स्वामींना जागविण्याकरीता त्यांच्या प्रौढ पण कमावलेल्या गळ्यातील परिपक्व सुरांचा सुरेल साज चढवून आळवणी चालवली होती. पाठोपाठ भक्तगण कोरसमध्ये त्यांना साथ करत होते. त्यातील मंगलम्... मंगलम् शिवाय काहीही आमच्या पल्ले पडत नव्हतं. पण त्या मंगलम आळवणीने  समां बांधला होता. तरल सुरावटींनी एक उंची लय गाठली होती. मंत्रोच्चारणाच्या नादमाधुर्याचा ठेका तर असा खुब होता कि सारे भक्तगण एका संथ लयीत नाचू लागले होते.
नादब्रम्हाच्या तालावर भक्तांच भान हरपलेलं ते दृश्य इतकं लुभावनं कि माझं थट्टेखोर अागाऊ पोर आणि त्याचा डब्बल आगाऊ अस्मादिक बाप... आम्ही दोघांनीही त्या ठेक्यावर कधी ताल धरला ते कळलंच नाही. सुमारे दहाऐक मिनिटांच्या कर्णमधुर सोहळ्याने अंतर्बाह्य तृप्त होऊन अाम्ही एका अपूर्व एनर्जीने चार्ज्ड होऊन गेलो. भानावर आलो तेंव्हा मंत्रपठण संपून प्रसादाचे वाटप सुरु होते.
प्राचीन तिर्थक्षेत्रांचा आणि त्यातही जागृत ज्योतिर्लिंगाचा महिमा हा असा अगाध असतो. पहाटे-पहाटे खरंच जाग आली होती... भक्तिरसात चिंब होऊन पर्वतप्रिय, शंभूमहादेव अर्थात् त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाकरीता आम्ही प्राचीन आणि अद्वितीय असं शिवालय गाठलं.

झिम्माड थंडीचा कडाका अस्सा आशिकाना होता कि मी मंदिरात, शिवाय "तसा एकटाच" आहे हे विसरून जनाब गालिब साहेबांच्या बेभान, प्रणयरंगी शायरीच्या, भावभोर दुनियेत काही क्षण मुशाफिरी करून आलो. "इश्कने (भटकंतीच्या) हमको निकम्मा कर दिया, वरना आदमी हम भी थे कामके".

हिमालयाच्या ओढीने आतुरले होऊन त्याच्या भेटीला नेहमीच जातो. पण यंदा, हिमालयच अपल्या भेटीला  येतोय कि काय अस्संच गोठवणारं वातावरण होतं. भव्यदिव्य मंदिराच्या प्रांगणातील फरसबंदीवरील उघड्या पायांमुळे थंडी थेट हाडांपर्यंत पोहोचत होती. माझ्या 'सायंटिफिक वांड' लेकाने तर हिमालयाशी नेहमीच पंगा घेणा-या बापालाही  'फ्राॅस्टबाईटची' भिती घालून टाकली.

महाखट पुजारीवर्गाच्या 'कृपे'मुळे झटापटीचं दर्शन उरकून बाहेर फेकला गेलो. तसा मंदिरासमोरच्या टपरीवरून मिसळीच्या ठसक्याचा गंध सुरसुरत्या नाकातून थेट मेंदूपर्यंत पोहोचून डोक्याचं भजं घालू लागला. मग आव देखा ना ताव ... त्या टपरीवर जोरदार हल्लाबोल केला. सक्काळी सक्काळी ६-७च्या गारेगार गारठ्यात कानातून धुर निघेल अश्शा... आगजाळ, 'तर्री मारके' गर्मा-गर्म मिसळीबरोबर काहि लाद्या पाव चेपून व डब्बल अद्रक मारके कोरा करकरीत टमरेलभर चहा नरड्यात ओतून पुढच्या अतिमहत्वाच्या कामगिरीला सज्ज झालो.

किल्ले हरिहराच्या रोखाने...

सामीये अय्यप्पा, त्र्यंबकेश्वरीचा महादेव आणि खमंग मिसळ, चहाने चित्तवृत्ती बहरुन आल्या होत्या. अनेक वर्षांपासून हुलकावणी देत हुकलेल्या हर्षगडाचे वेध आता थांबू म्हटलं तरी थांबू देत नव्हते. लगोलगीने तिथून सुमारे २०-२२ कि.मी. वरच्या हर्षवाडीला पोहोचलो तर गावात अनेक गाड्यांनी गर्दी केलेली.
एव्हाना चांगलंच फटफटल होतं. थंडीची तिव्रताही बरीच अोसरली होती. गावातील एका छोट्याशा खळ्यातच ओळखपरेड उरकून घेतली त्यावेळी संजय आणि इतिहास प्रेमी अरुण गवेकर यांनी खूपच छान माहिती दिली.

अरुण गवेकर हे आणखी एक मस्तमौला व्यक्तीमत्व आमच्यात होते. नाही.... असं म्हणणं योग्य होणार नाही, तर आम्ही त्यांच्यासोबत गड भटकंती करीत होतो हे जास्त सयुक्तिक होईल. कमालीची व्यस्त आणि तणावपूर्ण अशी उच्चपदस्थ शासकिय नोकरी आणि पंचावन्नाच्या पुढे-मागे वय असलं तरी हा माणूस, वेळ उपलब्ध होतोय असं दिसलं कि त्याच्या सदुपयोगाकरीता एखाद्या गडकिल्ल्यावरच आढळून येईल... मजबूत शरीरयष्टी राखून असलेले अरुणजी सह्यांगणातील रानवा-यासारखे भिरभरत असतात. लेखनाचं उत्तम अंग असलेले हे साहेब लिहायला मात्र जाम कंटाळा करतात ही एक यांच्याविरूद्ध माझी कायमची तक्रार. अशा चांगलं लिहिणाऱ्यांनी लेखण्या म्यान केल्यामुळे माझ्यासारख्यांना हे असं काहीतरी खरडावं लागतं.
सह्याद्री आणि गडकोटांशी नातं जुळलेले अरुण गवेकर इतिहात चांगलेच रमतात. सह्याद्रीतीलच नाही तर शिवरायांच्या पावन पदचिन्हांचा त्यांच्या अमोघ कर्तृत्वाचा ठसा जिथं-जिथं म्हणून उमटला असेल तिथं-तिथं जाऊन ते सारसर्वस्व न्याहाळणे हा त्यांचा प्रमुख छंद. बरं हे सारं फिरतांना आपला कुटुंब कबिलाही सोबत ठेवण्याकडे यांचा कटाक्ष असतो.

अस्सल कोल्हापूरकर असलेल्या गवेकरांचं नरकेसरी सुभेदार तानाजीराव मालुसरे यांच्या घराण्यात चांगलीच जानपछान. जंजी-याच्या नबाबाकडे यांचा वशिला. आता बोला...  या अडनिड्या वयातही ते नुकतेच कुलंग-मदन-अलंग या सर्वांत अवघड दुर्गत्रयींच्या भेटीला जाऊन आले. त्यांच्या सोबत, गडफेरीदरम्यान इतिहासाची पानं उलटणे हि एक वेगळीच अनुभूती असते. आणि का असू नये? अहो, श्रीमान योगी, स्वामी अशा दिग्गज ग्रंथांची श्रीमान रणजित देसाई यांनी ज्या वाड्यात रचना केली, तिथंच आमच्या अरुणजींचं बालपण गेलंय. आता बोला?

या ट्रेकला, वाटलं होतं कि एका नव्या टिमबरोबर जातोय, त्यातून गड असा हा कस लावणारा. त्यामुळे मी चांगल्या तयारीनेच आलो होतो. प्रस्तरारोहणाचं ब-यापैकि साहित्य मी सोबत नेलं होतं. गेल्या दोन-अडीच दशकात विपुल प्रमाणात केलेल्या भटकंती आणि आरोहणादरम्यान असं एक एक पाहिलंय, अनुभवलंय कि अगदी डोंगरातल्या १००% सुरक्षित ठिकाणी जातांनाही माझ्याकडे थोडीफार सुरक्षासाधनं मी ठेवतोच. (इतकंच काय लग्नाच्या वाढदिवसानिमित्त जोडीने करावयाच्या भटकंतीच्यावेळी सोबत घेतलेल्या या साधनांमुळे मी सालाबादप्रमाणे बोलणी खातो… कुणाची हे सांगायलाच हवं का? ) 
साधारण तीस लोकांचा भक्कम जमाव सोबत आहे म्हटल्यावर यावेळी त्याचं ओझं जरा जास्तच झालं. आमच्या जमावात असा एक अत्यंत उत्साही मावळा मला सापडला. त्याला या साधनांची गरज आणि महत्व समजावून सांगीतल्यावर जबराट उत्साहाने मुसमुसलेल्या आमच्या कृणाल जांभळनेे संपूर्ण मोहिमेत ती जडशीळ जबाबदारी शेवटपर्यंत अगदी नेटाने वागवली.

करारी कारवीची करुण कहाणी...

हर्षवाडीतील ठळक पायवाटेने गडाचा रोख धरुन पुढे निघालो असता, सपाटीवरील अंतर पार करून गडचढाईवरील झाडीत शिरण्यापुर्वी एका दृश्यामुळे जगीच थबकलो. काही गावकरी तेथे ढिगावारी पडलेल्या काटक्यांच्या सुबक पद्धतीने मोळ्या बांधायचं काम करीत होते. निरखून पाहिलं असता, त्या बांधेसूद काटक्या कारवीच्या होत्या. शेणा-मातीत लिंपून घेऊन वनचरांच्या घरभिंतीत चिणल्या जाण्याबरोबरच, धनदांडग्यांच्या शेतशिवारातील टोमॅटो, शिराळी, पडवळांच्या वेला-रोपांचा आधार होणारी कारवी, थोड्याफार अर्थप्राप्तीमुळे निष्कांचन गिरिजनांच्या संसारवेलीच्या मांडवाचाही आधार होते हे पाहून माझं कारवीवरचं प्रेम आणि आदर दुणावला.

७-८ फुट लांब एका रेषेतल्या सरळसोट इंचभर जाडीच्या काठ्या बुंध्यापासून तोडून त्यावरचं पान न् पान छाटून तासलेल्या ताज्या-ओल्या कारवीची ती कलेवरं पाहून आत, कुठंतरी खोलवर गलबलून अालं. कारवी आणि माझं नातं आता लपून राहिलेलं नाही. या अनवट, अनकही नात्यात डोकवायचं असेल तर पुढील लिंकवर अगदी प्रेमाने एक टिचकि माराच. ( पर्वतकन्या कारवी http://anandvaari.blogspot.com/2017/06/blog-post_5.html )

गडसोपान... एक अद्भुत, उत्तुंग पाषाणशिल्प...

हर्षवाडी लगत गडवाटेवरील कारवीच्या बनात एक छान, मंदसा सुगंध आस्मंतात भरून राहिला होता. याच वाटेवरून अोझरता दिसणारा हर्षगड आता चांगलीच जवळीक साधू लागला. चोरट्या अन् बेजबाबदार तोडीमुळे कमालीच्या विरळ होत चाललेल्या गडपायथ्याच्या झाडीतून तासाभरातच पांढऱ्या मुरमाड अशा नागव्या चढाई धारेवर येताच ते जगद्विख्यात अफलातून पायऱ्यांचं दृश्य अक्षरशः मोहिनी घालतं. काय, कसं, कधी, का? कश्शा कश्शाचं भान म्हणून उरत नाही. त्याची ती अप्रतिम सुंदरता सौंदर्यासक्त, आशिकमिजाज प्रकृतीच्या मनावर अघोरी जादू करतं.

दिलोदिमागकि बत्तीयाँ गुल हो जाती हैं... तिथल्या कातळी भानामतीचं भल्या-भल्यांना लागिरं होऊन जातं. त्या नशेमन नजाऱ्याच्या खुबसुरत गारूडातून बाहेर पडणं मात्र सोपं नाही.
वेळीच सावध होऊन भानावर येणंही क्रमप्राप्त होतं. कारण हरिहरच्या त्या दिव्य स्वर्गसोपानावर बरीच गर्दी झाली होती. जमलेल्या सर्व हौशा-नवशा-गवश्यांना स्वर्गात जाण्याची घाई झाली होती. आमच्या सर्व जाणत्यांना पुन्हा एकदा सावधगिरिच्या सुचनांचा एक हेवी डोस दिला गेला. कारण या स्वर्गसोपानावर शिस्त मोडणं म्हणजे खऱ्या-खु-या स्वर्गदर्शनाची हमखास गॅरंटी.

सावधपणे पुढे सरकत असतांना अचानक गर्दितला एक आवाज अोळखीचा वाटला. अरुण सावंत... हा आणखी एक अवलिया तेथे हजर होता नजरा-नजर होताच अरुण दादाने नेहमीप्रमाणे एक घट्ट मिठी मारली. त्याच्या भेटीची हि नेहमीची पद्धत मला खुप आवडते.
महाराष्ट्रातील ज्येष्ठ गिर्यारोहकांच्या आघाडीच्या फळीतला हा "नवतरुण" नुकताच ६० वर्षांचा होऊन त्याच्या 'अंशकालीक' नोकरीतून निवृत्त झाला अन् सह्यसेवेच्या चाकरीत पूर्णकालीक रुजू झाला आहे. सह्याद्रीचं बारसं जेवलेल्यांपैकि एक (असं कौतुकानं) म्हणता येईल अशा अरुणदादाकडे बघून त्याच्या वयाचा अंदाज येणे शक्य नाही. उच्चपदस्थ नोकरीत जखडलेला असतांना या माणसाने सह्याद्री उभा-आडवा खंगाळून काढला आता 'मोकाट' सुटल्यावर काय करेल काहि नेम नाही.
अरुणदादाबद्धल बोलावं तितकं कमीच. सह्याद्री, प्रस्तरारोहण, गडकोट, सागरसफरी, गुहासंशोधन, हिमालयीन मोहिमा, पाकसंशोधन, आणि इतर अनेक साहसी क्रीडाप्रकारांचं त्याने कधीच लोणचं घातलंय. आणि आत्ता कुठे ते मस्त मुरू लागलंय. या हुन्नरी व्यक्तिमत्वाची अशा झुंजार ठिकाणी भेट झाल्याने आमच्या या भटकंतीला  मात्र चार चांद लागले.

एकंदर झालं काय? तर २-२ सिनियर अरूण आणि नभांगणातील सर्वांनाच सिनियर अरुणरावांमुळे आमच्या या मोहिमेत खणखणीत अरुणोदय होऊन सबंध गड अपुर्व प्रकाशाने न्हाऊन निघाला. दिलखुश हवामानाच्या साथीनं हरिहराचं असं अपरंपार तेजाने निथळण्याचा सोहळा पाहून तबियत खुष होऊन गेली.
दरम्यान गडाच्या स्वर्गीय सोपानावर गर्दी वाढू लागली होती. गडाच्या त्या कातळकोरीव जिन्याला भिडण्यापुर्वी मी तेथे माथा टेकवला. तो मान या गडाचा तर होताच पण त्याचबरोबर मानाचे मानकरी होते ते कुशल हात ज्यांनी हे काळ्या फत्तरातील हे अद्भुत शिल्प घडवलं. मनोमन त्यांच्या या बेमिसाल कलाकारीस लाख-लाख दुवा देत गडचढाईला सुरूवात केली.
अशा थरारक वाटेवरही कर्कश्श्य आवाजात पोर्टेबल ब्लुटूथ स्पिकरवर बाजारू संगीताच्या तालावर माकडचाळे करणा-या जमातीचा तेथेही सुळसुळाट होता. ते माझ्या गडनिरीक्षणात अकारण व्यत्यय आणत होते. काहींना प्रेमाने तर काहींना "विशेष प्रेमाने" त्यांची 'ईंपोर्टेड' डबडी  बंद करायला लावली.

गडकोटांवर यायचं ते इथल्या खडका-मातीत झिरपलेला अभिमानास्पद इतिहास टिपायला, टिपकागदासारखं स्वच्छ, हळुवार मन घेऊन. यांना चांगल न् वाइट यातला फरक कधी समजणार आहे कोण जाणे? खऱ्या थ्रिलभऱ्या अॅडव्हेंचरची न् यांची कधी गाठच पडली नाही. इन्स्टंट फुडवर पोसलेली ही पिढी. एक गावरान झटका द्यायचा विचार होता पण थोडक्यात आवरतं घेतलं.
या धुरंधर गडाच्या हर्षगड, हरीष अशा अनेक नावांपैकी हरिहर हे नांव मला खुप आवडतं. याच्या इतिहासात थोडं डोकावलं तर दिसून येतं कि, सन १८१८ मध्ये मराठेशाहीचं विधीवत् विसर्जन केल्यानंतर टोपीकरांनी त्यांचे शेंडे-बुडखे ओले करणाऱ्या अशा अनेक बळवंत गडकोटांच्या निर्घृण शिरकाणाचं काळंकुट्ट काम सुरु केलं होतं.
प्राचिन स्थापत्य शास्त्राचा उत्तुंग आविष्कार असलेल्या या गडोत्तमाच्या मुळाशी सुरूंग लाऊन ठिक-या-ठिक-या उडवण्याच्या कामगिरीवर गोरा कॅप्टन ब्रिग्ज निघाला देखील. अशा अघोरी कामावर नेमणूक झाली असली तरी त्याच्या कलासक्त वृत्तीला खरंतर आपण भटक्यांनी सलामच केला पाहिजे. हे येडपट त्यावेळी या पायऱ्यांच्या नादाने खुळावलं नसतं तर आज हरिहराचा उध्वस्त सांगाडा पाहून आपल्याला वेड लागायची वेळ नक्कीच आली असती.
किल्ले हरिहरानेही त्यावेळी केलेली लबाडी तर पहा. आपल्या अमोघ मोहिनी अस्त्राच्या लपेट्यात टोपीकर कॅप्टन ब्रिग्जला अस्सा काही लपेटला कि हा गड मुळापासून उखडून टाकायला आलोय हे विसरून ते खुळं गडाचं गुणगान करत परत गेलं. एका फाकड्या लष्करी अधिकाऱ्याची हि कथा... तर तुम्ही आम्ही किस झाडकि पत्ती?

विश्ववंदनिय ज्ञानेश्वरीची एक तरी अोवी अनुभवावी असं हरिभक्तपरायणांकडून सांगीतलं जातं. त्याच धर्तीवर या हरिहराची एकतरी पायरी प्रत्येक भटक्याने, दुर्ग अभ्यासकाने बारकाईने अनुभवली पाहिजे असं आवर्जून सांगावंसं वाटतं. राजेहो... काय त्याचा आब अन् काय तो दरारा, काय त्याचं सौष्ठव अन् काय ते बेमिसाल सौंदर्य याच्यापुढे तर प्रत्येक दुर्गयात्रीने साष्टांग दंडवतच घातला पाहिजे.

काळ्याकुट्ट, दगडातून खोदलेल्या ओबड-धोबड पायऱ्यांनादेखील कमालीचं सौंदर्य असतं हे इथं आल्यावर कळतं. खडक फोडून तराशलेल्या या पायऱ्या... बलाकि खुबसुरत आहेत. यांच्या नजाकतीपुढे तर एखाद्या अय्याश, गुलाबी रंमहालाच्या, बारीक, नक्षीदार कलाकुसरीच्या संगेमरमरी तेजाच्या महालांनीही झक्कत मान खाली घालावी. असा हा गडसोपान गर्दिनं अोसंडत असला तरी माझी बेकल नजर प्रत्येक पायरी न पायरी बारकाईने न्याहाळत होती.
चढून येणाऱ्या प्रत्येकाच्या मनाची विलक्षण भयावह घालमेल लक्षात घेऊन पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना हाताची बोटं मजबूतीनं रुतवण्यासाठी खोबण्यांचे खोल आधार ईथे कोरुन ठेवलेत. या जिन्यावर हाता-पायांचा भरपूर वापर झाल्याने हा खट्याळ गड आपल्याला पुन्हा एकदा उत्क्रांतीच्याही आधीच्या काळात पाठवून नराचा पुरता वा'नर बनवून सोडतो.

आमच्यासारखी खडकांशी धडका घेण्याची सवय असलेल्यांचं एक ठिकंय, पण कुणाचंतरी ऐकून फुकाचा माज करण्यासाठी आलेले अन् भितीने हात पाय गाळून सैराट खाली उतरणारेही काही महाभाग दिसले. कमजोर हृदयाच्या गड्यांनी तर याच्या नादाला न जाणंच चांगलं. अर्थात् त्यांनी आपल्या 'पायरीनेच' राहिलेलं बरं...
येक येक पायरी शांतपणे अनुभवत गडाचं महाद्वार गाठलं. छोटेखानीच पण मोठ्या मानाचा मानकरी असलेल्या महाद्वाराच्या दर्शनाने उर भरून आला. पायऱ्या न तोडण्याचा निर्णय घेतलेल्या फिरंगी कॅप्टन ब्रिग्जला जाता-जाता गडाचं हे एकमेव प्रवेशद्वार सहज उद्ध्वस्त करता येण्यासारखं होतं. पण हा गोरा साहेब जसा या सोपानाच्या प्रेमात पडला होता तस्साच तो या महाद्वारातही गुंतला होता. त्याच्या रसिक मनाने हे पक्कं जाणलं होतं कि या पायऱ्यांशिवाय महाद्वाराला आणि महाद्वाराशिवाय पायऱ्यांना शोभा नाहीच. म्हणूनच तो उदार फिरंगी कॅप्टन, तृप्त होऊन आल्या वाटेने परत गेला.
गडाचं हे महाद्वार असलं तरी इतरांसारखं हे अवाढव्य अन् प्रशस्त नाही. तर आत झुकूनच प्रवेश करावा लागतो, इतकं हे लहान आहे. हि गोष्ट मात्र मला चांगलीच भावली. प्राचीन मांदिरं, लेणी आणि गडांचे दरवाजे कमी उंचीचे ठेवण्याची हि पद्धत मला खूप आवडते. दुसरं काही नाही हो ... वाकून गेल्यामुळे त्या महान वास्तूदेवतेला, त्यांच्या रचनाकारांना नकळत नमस्कार तर घडतोच पण आपलीही 'उंची' समजते .

बिकट ही वाट... गडाची... 

महाद्वारातून अंतर्भागात प्रवेश करताच समोरच्या खडकातील लोभस गणेशमुर्तिचं दर्शन घडतं. गणपती बाप्पा मोरया म्हणून लगेच वाटेला लागायचं. पुढची वाट इथं डावीकडे वळते आणि एका अद्भुत सज्जात आणून सोडते. या सज्जात अापण डोकं आणि तोल सांभाळत गडपायथ्याच्या रहाळावर एक राजेशाही नजर फिरवायची आणि पुढे व्हायचं. या गॅलरीला गोऱ्या साहेबाने सन्मानपूर्वक "राॅक कट गॅलरी" असं भारदस्त नांव दिलंय.
एखाद्या भ्रमर भुंग्याने मजबूत लाकूड पोखरून आपल्या पिढ्यांची वहिवाट सुकर करावी अगदी तश्शाच  पद्धतीने ईथून पुढची गडवाट त्या बेनाम शिल्पकारांनी जीव अोतून कोरलेली दिसते. या वाटचालीत आपण त्यांच्या या अजरामर कलाकृतीची तारीफ करण्यात कंजुषी मात्र करायची नाही.

गॅलरीच्या शेवटी वाट उजवीकडे उभ्या कड्यात बेधडक घुसते. आपणही अनमान न करता पाऊले चालतीच्या चालीवर मनोभावे चढत-चालत रहायचं. पुढच्या टप्प्यात तर मोठमोठया महालांमध्ये विशेषतः पाश्चिमात्य वाडे-बंगल्यांत असतो तसा अर्धगोल, सर्पिलाकार जिनाही इथं तपशिलाने खोदून काढलेला आहे. आता लावा हिशेब, कि तो गोरा साहेब इथून जाताना काय-काय घेऊन गेला ?
हा जिना सांभाळून चढून जायचं आणि चक्क लहानशा विटांनी बांधून काढलेल्या मोडक्या घुमटीचं छत असलेल्या दरवाजातून खालून वर चढत गडावर थाटात प्रवेश करायचा. या मोडकळीस आलेल्या घुमटीची रचना आपल्याला दाद द्यायलाच लावते. तीच्याकडे निरखुन पहात असतांनाच एक उर्दू शेरवजा कहावत आठवली. अर्ज है... “खंडहर बयाँ कर रहें हैं, के इमारत कभी बुलंद थी”... पुढच्या पावसाळ्यात हि असेल याची का… ही शाश्वती नाही.
एका मोठ्या भुलभुलय्यातून सहीसलामत सुटून जग जिंकल्याचा आनंद चेहऱ्यावर घेऊन आपण गडमाथ्यावर अवतरतो. इथंपर्यंत पोहोचल्यानंतर स्वतःला एक मस्त शाब्बासकि बिनधास्त देऊन टाकायची. शांतपणे बसून धपापणारा श्वास एकसुरी करून घ्यायचा. थोडं पाणी तोंडावर मारायचं आणि थोडंसं आतही सोडायचं. पूर्व-पश्चिम पसरलेला चिंचोळ्या माथ्याचा गड उभा-आडवा नापायला फार वेळ लागत नाही.

गडावर प्रवेश केलेल्या उगवतीच्या दिशेने तसंच सरळ रेषेत पुढे गेलं कि सुबकरीत्या बांधून काढलेल्या एका पुष्करणीच्या काठचा शेंदूरचर्चीत हनुमान आपली वाट अडवतो.

त्याशेजारीच एका चौथऱ्यावर शिवलिंग स्थापलेले आहे. दोघांनाही वंदन करून तसेच सरळ रेषेत पुढे नीघायचं. त्या विस्तीर्ण पठारसदृश माथ्यावरील अनेक  लहान-मोठ्या कोरीव टाक्यांमध्ये डोकावत इकडम-तिकडम करत गडावरील एकमेव सुस्थितीत असलेली वास्तू अर्थात् धान्याच्या  कोठीकडे आपला मोर्चा न्यायचा.

गडावर मुक्काम करणे आवश्यक असल्यास एकतर "निली छत्री" किंवा या कोठीशिवाय पर्याय नाही. बुलंद गडावरचं हे एकमेव सहिसलामतीचं बांधकाम. आतापासूनच संवर्धनाची पुरेशी काळजी न घेतल्यास कालाय तस्मै नमः म्हणण्यशिवाय आपल्याला काहीच करता येणार नाही. आणि तसंही... आपण दुसरं काय करतो म्हणा.

याच दिशेने पुढ्यात दिसणाऱ्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत सहज जाता येतं. इथून बैजवार परिसर न्याहाळण्याची मजा बाकी जब्बरदस्तच आहे. हरिहरापासून एका खिंडीमुळे वेगळा झालेल्या, अगदी शेजारच्याच डोंगरातील एका निरूंद, खड्या घळीतून काही गावकरी चढून जातांना दिसले. अधिक चौकशी करता तेथे परिसरातील स्थानिक  ग्रामस्थांचं दुर्गम देवस्थान असल्याचं समजलं. त्या 'देवाच्या डोंगरामागे' भंडारदुर्ग लपल्यासारखा दिसत होता. तर थोडं उजवीकडे खेटून उभा असलेला आणि स्वतःचं अस्तित्व ठळकपणे दर्शवणारा ब्रम्हगिरी अर्थात त्रिंबकगड मोठ्या दिमाखात भाव खात होता.
घड्याळाच्या दिशेने थोड्या उजवीकडे नजर फिरवली तर वैतरणेच्या प्रचंड जलाशयाने समृद्ध झालेलं विस्तीर्ण खोरं दिसतं. तसंच नजरेचा फेरा आणखी उजवीकडे अर्थात् पश्चिमेकडे फिरवला तर बसगड, उतवड दिसतात.फण्या डोंगर तर तोंडाचा चंबू करून आपल्याकडे पहात असतो. "तुम्ही सगळे हरिहरलाच भेटता, मी काय कुणाच घोडं मारलंय व्हंय?" अशा रुसलेल्या अविर्भावातच तो कायम असतो. असो बापडा.

तसं म्हटलं तर खडकाळ माथ्याचा हा गड उजाड बोडकाच. पण शांत जळाने भरलेली छान पुष्करणी, आध्यात्माशी आपलं एक वेगळं नातं जोडणारी तिच्या काठची देवालयं, वा-यावर फडफडणारा रेशमी भगवा आणि एक भारदस्त  पर्णसंभाराचा, विशाल छायेचा वृक्ष इथल्या सा-या कमतरतेवर पांघरुण घालून "कमी तिथे आम्ही" म्हणत पैसावसुल भरपाई करुन जातात.
गडपुष्करणीच्या नितांत सुंदर परिसराची ती अफलातून फोटोजेनिक फ्रेम पाहून तिथे क्षणभर विश्रांतीचा मोह अनावर झाला. त्याच छान ठिकाणी आमच्या अरुणदादाचा एक छोटेखानी सत्कारसमारंभ घडवण्यात आला. त्यावेळी आजवरच्या गिर्यारोहणातील यशस्वी वाटचालीचं आणि साठीतल्या उत्तम आरोग्याचं रहस्य त्यांनी थोडक्यात उलगडलं. नवोदितांसाठी मार्गदर्शनाचा एक उत्तम धडा आमच्या सावंतगुर्जींच्या वर्गात इथं चांगलाच रंगला.
पाठोपाठचा प्रायोजित कार्यक्रम म्हणजे आमच्या रा.रा.श्री.संजय तळेकरांची एक खासियत. अर्थात् प्रत्येक ट्रेकसदस्याला त्यांच्याकडून मिळणारी एक अपुर्वाईची भेट. ट्रेकपुर्वी संजय स्वतःच्या सुवाच्च्य हस्ताक्षरात भेटीला जात असलेल्या किल्ल्याच्या संपुर्ण माहितीचं, ढोबळ नकाशासह एक हस्तलिखीत काढतो. त्या बेशकिमती हस्तलिखिताच्या प्रतिचं प्रत्येक सदस्याला वाटप केलं जातं. इतकंच नाही तर गडभुमीवर त्याचं जाहिर वाचन-विवेचन करुन चर्चासत्राची मस्त फैर झडते.

काही वर्षांपूर्वी थोर दुर्गसाहित्यकार सर्वश्री आनंद पाळंदे आणि समकालीन जेंव्हा भ्रमंतीच्या गडघाटवाटा धुंडाळू लागले होते तेंव्हा पुण्यातील विख्यात गिर्यारोहक डाॅ. जी. आर. पटवर्धन अर्थात् बापूकाकांनी अशी प्रथा सुरू केली होती. अशा माहितीपूर्ण हस्तलिखितांची त्यावेळी अत्यंत मौलिक मदत व्हायची. बापूकाकांचं ते कार्य आणि साहित्य इतकं परिणामकारक होतं कि त्यावर पिढ्या पोसल्या गेल्या. आमच्या संजयचं हे कामदेखील असंच  निखालस, निगर्वी अन् मार्गदर्शनपर आहे.

आजच्या इंटेरनेटच्या जगात, एका क्लिकवर सर्वकाही उपलब्ध असतांना त्याच्या या कार्याचं महत्व फारसं जाणवणार नाही. पण शेवटी आभासी जग ते आभासीच असणार. हस्तलिखितांच्या पुढे त्याचं महत्व ते काय? अशा अनेक हस्तलिखितांचं आता त्याच्याकडे एक चांगलंच बाड तयार झालंय. त्यावर एक वजनदार माहितीचा ग्रंथ कधी तयार होतोय? याची मी आतुरतेने वाट पाहतोय.
संजयची, उच्चविद्याविभुषित वज्रचुडेमंडीत सकल सौभाग्यसंपन्न सहधर्मचारिणी सौ. शरयुराजे अर्थात् नीता तळेकर उर्फ आमच्या ताईसाहेब यांनी त्यांच्या सुस्पष्ट स्वरात हस्तलिखिताचं वाचन करून गडदर्शनाची लज्जत चांगलीच वाढवली. प्रोफेसरकी करुन या मॅडम थकत नाहीत मग त्यांचा वर्ग अशा पद्धतीने गडकिल्ल्यांवरही भरतो.

गेल्या २५ वर्षांहुनही अधिक काळ मी नीताराजेंना सह्याद्रीच्या कडेकपारी पिंजून काढतांना पहात आलोय. वाढतं वय असो कि नोकरी, संसाराच्या अनुषंगाने आलेल्या संकटांची भरमार असो शिवछत्रपती, किलेकोट आणि आमच्यासारखा चाहतावर्ग यांच्यावरच्या प्रेमात तसूभराची उणीव म्हणून दिसली नाही. झालीच तर यात दिवसेंदिवस वाढच होतांना पहातोय.
आता तर वैद्यकिय उच्चशिक्षण घेत असलेलं त्यांचं एकमेवाद्वितीय, अनेक खेळात पारंगत कन्यारत्न प्रांजली हीसुद्धा सह्यसेवेत रुजू झालीय. अगदी लहान असल्यापासून माता-पित्यांसह भटकंती करतच वाढलेली प्रांजली आता पालकांप्रमाणेच दुर्गाभ्यासी होतांना दिसतेय. थोडक्यात सांगायचं तर संपुर्ण कुटुंबच त्यांच्या 'तळेकरवाड्यातून' सह्यशिवाराधनेत कायम व्यग्र असतं. त्यांच्या वाड्यात' निगुतीने जपलेल्या ऐतिहासिक ऐवजांचा ठेवा याची साक्ष पटवायला पुरेसा आहे.
आमच्या किल्ले हरिहर दर्शनाचा मध्यांतर झालेला असूनही आमच्या मावळ्यांनी चांगलाच धीर धरला होता.आक्रमणाची इशारत होताच भाजी-भाकरी, धपाटे, चटण्या, मेथीचे लाडू अशा खास मराठमोळ्या खाद्यान्नांचे डबे खणखणू लागले. तलवारींचा खणखणाट ऐकण्याची सवय असलेला गडपुरुष या आवाजाने नक्कीच चकित होऊन गेला असणार.
वर्षारंभीच या मोहिमेच्या निमित्ताने अाम्ही "प्लॅस्टिकमुक्त सह्याद्री" या आणखी एका मोहिमेचाही शुभारंभ केला. यापुढे हि मोहीम अधिक व्यापक स्वरूप धारण करेल अशी खात्री आहे.
मोहिमेवर निघण्यापूर्वीच सर्वांना याची सविस्तर माहिती देण्यात आली होती. प्लेट चमचे, वाट्या, डबे यातलं काहीही प्लॅस्टिकचं असणार नाही अन् तसं काही आणलंच तर त्याच्या योग्य पद्धतिने विल्हेवाटीची सर्वांना तंबीच दिली होती. अनेक वर्षांनी या वेगळ्या खणखणाटाने गडपरिसर नक्कीच सुखावला असणार. सविस्तर पोटपूजा आवरल्यानंतर दुर्गजागराचा एक फक्कड फड "त्या तरूतळी" छानच रंगला.
मोहिमेत छायाचित्रकार हा घटक खुप महत्वाचा असतो. पण आपल्याकडे अजून त्यांना हवं तितकं महत्व दिसून येत नाही ही एक मोठी खंत आहे. आमच्या पथकातला देहेरकर असं वजनदार आडनांव असलेला अवधूत एक गुणी भटक्या. आणि होऊ घातलेला एक उत्तम छायाचित्रकार. मोहिमेत जिथं आपला जीवही आपल्याला जड झालेला असतो तिथं हा पठ्ठ्या सर्वांना आग्रहाने थांबवून त्यांचे फोटो घेत होता. आमच्यातल्या निखील हळबे या गोंडस बाळाने आणि नारायण बेबले या गुंतवणूक तज्ञाने त्याच्या कॅमे-यात स्वतःच्या छबींची भली भक्कम गुंतवणूक केली. आणि महिला आघाडीने तर याचा मामा बनवून भरपूर फोटो काढून घेतले. छायाचित्रणावरचंं त्याचं निरतिशय प्रेम त्याला आयुष्यात खुप काही मिळवून देईल यात मात्र शंका नाही.

धार्मिक बाबतीत जगभरात आपलं वर्चस्व राखणारी नाशिकनगरी, नैसर्गिक आणि ऐतिहासिकदृष्टयाही परमवैभवसंपन्न आहे. एकट्या नाशिक परिसरात सह्याद्रीच्या पहाडी बाण्याचे ५०हुन अधिक आणि एकापेक्षा एक रौद्र-बळवंत अशा दुर्गम गडकोटांचं वास्तव्य आहे. त्यामुळे नाशिकला मी तर कौतुकाने “किल्ल्यांचा जिल्हा” असंच म्हणतो.

सुखद हवामान आणि महामुर पावसामुळे बारमाही ताजातवाना निसर्ग, पूजनीय नद्या, प्राचीन मंदिरे, सरोवरे अन् प्रचूर मात्रेतील पाषाणसौंदर्य अशा विविधतेने नटलेला हा प्रदेश भटक्यांसाठी स्वर्गासमान आहे. याच स्वर्गातल्या किल्ले हरिहराच्या भेटीमुळेे खूप काही मिळवल्याचं एक वेगळंच चमकदार समाधान गडावरील प्रत्येक चेह-यावर दिसत होतं.

धन्यवाद

 हरीहरगडाचा फोटो मी खुप वर्षापुर्वी फेसबुकला पाहीला होता. तो फोटो बघुनच भीतीने मनात धडकी भरली होती. तेव्हा ट्रेकचे भूत लागलं नव्हतं. कोणी लाख रूपये दिले तरी इथे जाणार नाही आणि आता जेव्हा पासुन ट्रेकींगचे वेड लागलयं तेव्हा पासून या गडावर जायचे वेध लागले होते. चार पाच वेळा प्लान्स बनून पण फिसकटले होते. हरीहरगड ओळखला जातो तो पायऱ्यांमुळे! त्या गडावरील कातळात कोरलेल्या पायऱ्या मनावर छाप उमटवतात! भटका माणूस रायगडावर जाऊन जसे टकमक टोक, बाजारपेठ, दरबार विसरत नाही किंवा राजगडावर जाऊन जसे तेथील बालेकिल्ल्याचे चित्र पुसून टाकू शकत नाही किंवा हरिश्चंद्रगडावर जाऊन जसा कोकणकड्याचा अजस्त्र आविष्कार आयुष्यभर मनात ठेवून वावरत राहील, तसाच
प्रकार हरिहरगडाच्या पायऱ्यांच्या बाबतीत घडतो! गडांच्या यादीतील थोडे वेगळे नाव आणि तसेच आडवाटेवरचे स्थान म्हणजे हरिहर!
गेल्याच महीन्यात गोरखगड केला तेव्हा काहीजण बोलले होते गोरखगडच्या तुलनेत हरीहर गड ट्रेकींगसाठी सोपा आहे. गोरखगडने आपली अवघडता कायम ठेवलीय पण लोक हरीहरच्या प्रेमात जास्त आहेत. त्यातलाच मी.
आमच्या रेग्यूलर ग्रुपचे कलावंतीन स्टे पाठोपाठ इरशाळगडचा प्लान देखील फसला. त्यात सलग तीन सुट्टया काही प्लान नाही बनवले तर महाराज मात्र रागवतील. म्हणुन मी आणि माझा एक मित्र अमित जो पहील्यांदाच ट्रेक ला तयार झाला होता, माहुलीगडाचे प्लान करत होतो. त्याची माहीती घेण्यासाठी मी माझ्या एक फ्रेंडला कॉल केला. पण ते सर्व जण नाशिकला जाणार होते आणि त्यांच्या अजेंड्यामध्ये हरीहर गड पहीला होता. हे ऐकून माझ्या तोंडाला पाणी सुटले. डोक्यातून माहूलीगड तात्पुरता बाजूला झाला आणि त्याची जागा हरीहरने घेतली. मी संध्याकाळी रेल्वेच्या तिकीट्स बुक केल्या.
रात्रीच्या ट्रेनने आम्ही मुंबईहून सहा जण नाशिकला निघालो तेव्हा थोडीफार थंडी होती. पण जेव्हा पहाटे ४ वाजता नाशिकला उतरलो तेव्हा थंडीचा कहर अनुभवयास मिळाला. त्यावेळी माझ्या मनात आले आपले एवरेस्ट बेस कँप ट्रेकचे स्वप्न कसे पुरे होणार? आम्हाला नाशिक स्टेशनला न्यायला आमचे मित्र बाईक घेऊन आले होते. मी पहील्यांदाच भल्या पहाटे दातओठ खाणाऱ्या थंडीत बाईक राईड अनुभवली. हॉटेलला पोहोचेपर्यंत ५ वाजले होते. तिथे फ्रेश होऊन मित्रांनीच बनवलेला वर्डक्लास चहा आणि पोह्यावर यथेच्च ताव मारत आम्ही सकाळी ७ ला त्रिंबक हर्शवाडी च्या दिशेने रवाना झालो. सुर्य उगवला तरी थंडी कमी झाली नव्हती. मुंबई आग्रारोडने जात असताना काही अंतरावर अंजनेरी पर्वत लागला. पुढे रस्त्याच्या बाजुला सर्व पर्वतच उभे ठाकले होते. आम्ही हर्षवाडी गावात पोहोचलो तेव्हा सकाळचे ९ वाजले होते. उन्ह वर येऊन पण हवेत कमालीचा गारवा होता.
हरीहरच्या मुख्य पायऱ्यांपर्यंत पोहोचायला आम्हाला १ तास लागला. पायथ्या पासून तिथपर्यंत जायला दोन खड्या चढणी पार कराव्या लागतात. वाट मळलेली आहे पण बऱ्याच ठीकाणी निसरडी आहे. चढताना खुप जपून चढावे लागते. आम्ही हरिहर गडाच्या रेखीव पायऱ्यांपर्यंत तासाभरात पोचलो. समोर पाहीले तर तेथील दगडी जिना मनातील धाकधुक वाढवत होता. ही दगडी वाट वाटही वैशिष्ट्यपूर्ण आहे. साधारण ऐंशी अंशाच्या कोनामध्ये सरळ रेषेत ती जणू आभाळात घुसते. ती वाट चढण्यास सुरुवात केली, की त्याला तिचा खरा अंदाज येतो. एकावेळी एकच मनुष्य वर किंवा खाली जाईल अशा पद्धतीची तिची रचना आहे. पायऱ्यांवर दोन्ही बाजूंनी खोबण्या आहेत. त्‍यात पंजा रुतवता येतो व वर चढताना त्यांचा आधार मोठा ठरतो. सुमारे नव्‍वद पायऱ्यांचा सोपान चढल्‍यानंतर गडाचे पहिले छोटेखानी पण सुरेख प्रवेशद्वार लागते. त्या प्रवेशद्वारातून आलेली वाट पाहिली तर असे लक्षात येते, की वर येणे एकवेळ सोपे, मात्र उतरणे महाकठीण. आम्ही एका मागोमाग एक असे फक्त आणि फक्त पायऱ्यांवर लक्ष केंद्रीत करत वर चढत होतो. मागे वळून बघायची हिम्मत होत नव्हती. आ वासलेली भयानक काताळी दरी पाठीशी होतीच. एका छोट्याश्या चुकीचे थेट मृत्युत रूपांतर. मला फक्त प्रत्येक पायरीच्या खोबण्या दिसत होत्या. तसेच वरून खाली येणाऱ्या एखाद्या ट्रेकरला जागा करून देताना मात्र आमची पंचायत होत होती. पण आम्ही तो अवघड जिना चढलो. त्यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्या सारखा होता. आमच्या मध्ये पहील्यांदाच ट्रेक करणारे दोघेजण होते. त्यांचा आनंदाला तर सीमाच उरली नव्हती. या पायऱ्या चढून आल्यावर शेंदुरी रंगाच्या प्रवेशद्वाराच्‍या शेजारी गणेशाची शेंदूर फासलेली छोटी मूर्ती दिसते. प्रवेशद्वाराच्या पुढे, गडाच्या पोटात खोदलेला रस्ता आहे. उलट्या ‘सी’ इंग्रजी आकारासारखा किंवा नारळाच्या अर्ध्या करवंटीसारखा. कातळात कोरलेले दोन दरवाजे पार केल्‍यानंतर सुमारे एकशे तीस पायऱ्यांचा दगडी जिना लागतो. त्‍या जिन्‍यासही दोन्‍ही बाजूंस आधारासाठी खोबणी आहेत. त्याच्याच पुढे, वर जाण्यासाठी अप्रतिम असा दगडी बोगदा आहे. गडावर एकापेक्षा एक सरस सौंदर्याकृती पायघड्या टाकून पुढे येत राहतात. त्यामुळे एका रचनेचे कौतुक करायला जावे तर दुसरी समोर! वास्तुस्थापत्याचे ते सौंदर्यतुषार झेलतच गडाच्या माथ्यावर वावर चालू राहतो. त्या पायऱ्या चढताना विशेष काही वाटले नाही. एक बाजू एक्सपोज होती पण दोन्ही बाजूला आधार होता.
हरिहर किल्ल्याचा शेवटचा छोटा दरवाजा पार करून थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला खालच्या बाजूस गुहा दृष्‍टीस पडते. पण तेथे उतरण्यासाठी दोराची आवश्‍यकता भासते. गडमाथ्यावर मोठा तलाव आहे. पश्चिमेकडे भिंत बांधून त्या तलावाचे पाणी अडवण्‍यात आले आहे. तलावाच्‍या काठावर हनुमानाचे मंदिर असून शेजारी उघड्यावर असलेले शिवलिंग आणि नंदी आहेत. गडाच्या टोकाला दारुगोळा कोठाराची इमारत आहे. त्या इमारतीभोवती पाण्याची सहा टाकी दिसतात. लहान मोठ्या टाक्यांची रचना मन मोहवून जाते किल्ल्यावरील सर्वांत उंच जागा चढायला पण थोडी कसरत करावी लागली. गडाच्या माथ्यावरून सभोवारचे विहंगम दृश्‍य फार छान दिसते. तेथून पूर्वेकडे दिसणारे त्र्यंबक डोंगररांगेचे चित्र डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. उत्तरेच्‍या दिशेला वाघेरा किल्‍ला तर दक्षिणेकडे वैतरणा तलावाच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले कावनाई व त्रिंगलवाडी किल्ल्यांचे डोंगर फार आकर्षक दिसतात. हरीहरच्या सर्वात उंचीच्या माथ्यावरून दिसणारे दृश्य विहंगम होतेच पण पहील्यांदाच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आम्ही तिरंगा फडकविला होता. खरोखर माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण ठरला. त्याचे सर्व श्रेय अजिंक्यला जाते, त्याची ती आयडीया. सर्वात उंच माथ्यावर राष्ट्रगीत म्हणताना आमची छाती मात्र अभिमानाने फुलली होती. एक वेगळाच रोमांच अंगावर आला होता.
तिथून खाली उतरल्‍यानंतर आम्ही उतराच्या वाटेवर एका झाडाखाली नाशिकमधल्या रवी या मित्राने घरून आणलेल्या जेवनाचा आस्वाद घेऊन पुढच्या मार्गाला लागलो. थोडं खाली उतरल्यावर समोर घुमटाकार माथा असलेली तीस फूट लांब व बारा फूट रुंद अशी दगडी कोठी दिसते. पूर्वीच्‍या काळी तेथे दारूगोळा साठवला जाई. कोठीचे प्रवेशद्वार छोट्या खिडकीसारखे असून त्या कोठीत दिवसासुद्धा काळोख असतो. ती गडावरील छत शाबूत असलेली एकमेव इमारत आहे. तेथून समोर दिसणारा ब्रह्मा डोंगर फार सुंदर दिसतो. हरिहरगडाची फेरी पूर्ण करण्यास सुमारे दोन तास लागतात. गड पाहून परत उतरताना पुन्‍हा त्‍या सरळसोट पायऱ्या समोर येतात. त्या फारच धडकी भरवणाऱ्या होत्या. त्‍यामुळे उतरताना विशेष काळजी घ्‍यावी लागत होती. प्रत्येक पाऊल योग्य दिशेने पडायला हवं होतं. काही ठिकाणी पायऱ्या एवढ्या बाहेर आल्यात की थोडं जरी पाऊल पुढे पडले तरी थेट दरीत रवानगी होणार होती. त्यामुळे दरीकडे पाठ करूनच उतरावे लागत होते. याच कारणास्तव उतरायला वेळ लागत होता. तेही पार करत आम्ही गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराशी पोचलो पण खालून वर येणाऱ्या ट्रेकर्सची संख्या खुप होती. त्यामुळे आम्हाला उतरायला जागा मिळत नव्हती . पंधरा मिनिटांच्या प्रतिक्षेनंतर उयरायला जागा मिळाली. तेव्हा मला कळसुबाई ट्रेकची आठवण झाली. तिथे पण लोखंडी शिडीवर जाणाऱ्या येणाऱ्यांची गर्दी झाली होती आणि एका एका शिडीवर ६० ते ७० लोक जाण्या येण्याचा प्रयत्न करत होते. इथे पण ट्रेकला जत्रेचे रूप आले होते. यात रात्री स्टे करणारे उशीरा चढत होते. प्रवेशद्वारापासूनच्या पायऱ्या उतरताना पण खुप काळजी पूर्वक उतरावे लागत होते. इथे पण आम्ही दरी कडे पाठ करत एक एक पायरी खाली उतरलो. खऱ्या अर्थाने इथेच ट्रेक संपते असं काहीना वाटते पण त्या नंतर चढताना लागली खडी चढण उतरताना मात्र अवघड होऊन बसते. काही ठीकाणी बसून उतरल्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा रितीने एक रोमांचकारी ट्रेक पुर्ण करून नाशिकहून मी आणि अमित मुंबईकडे परत निघालो.
हरीहरचा इतिहास (माहीती whatsapp वरून प्राप्त)
गडावरील कातळात पायऱ्या कोरण्‍याची पद्धत सातवाहन राजवटीपासून चालत आली आहे. बहुतांशी गडांवर तशा पायऱ्या दिसतातही; परंतु अनेक ठिकाणी त्या कालौघात, विशेषत: इंग्रजांनी १८१८ मध्ये केलेल्या विध्वंसात नष्ट झाल्या.
हरिहर हा नाशिक जिल्ह्यातील क्षेत्र त्र्यंबकजवळील हर्शवाडी गावानजीक वसलेला गड. त्‍याचे स्‍थान ब्रम्‍हगिरीच्‍या पश्चिमेस सुमारे वीस किलोमीटर अंतरावर आहे. हरिहर किल्‍ला अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी १६३६ साली त्‍याशेजारच्‍या त्र्यंबकगडासोबत तोही किल्ला जिंकून घेतला. नंतर त्याचा ताबा मोगलांकडे गेला. पुढे, १६७० मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी तो गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली. मोगल सरदार मातब्बरखान याने हरिहर किल्ला ८ जानेवारी १६८९ रोजी जिंकला. शेवटी, १८१८ मध्ये तो गड मराठयांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला. इतिहासात अशी विविध मालकी अनुभवणारा त्र्यंबकगडापाठोपाठ हरिहरगड हा त्या भागातील दुसरा महत्त्वाचा किल्ला आहे.
हरिहरगड ‘हर्शगड’ या नावानेदेखील ओळखला जातो, त्याचे कारण त्याच्या पायथ्याला ‘हर्शवाडी’ नावाचे गाव आहे. हरिहरगडाचा त्रिकोणी आकार, त्‍याच्‍या कातळात कोरलेल्या पायऱ्या, पुढे कोठालीगड (पेठ) प्रमाणे उभ्या कोरलेल्या पायऱ्या आणि गडावरील इतर दुर्गावशेष अशा साऱ्याच गोष्‍टी वैशिष्‍ट्यपूर्ण आहेत. तो किल्‍ला समुद्रसपाटीपासून ११२० मीटर उंचीवर उभा आहे. मराठेशाही बुडवण्याच्या १८१८ सालच्या इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिग्ज या इंग्रज अधिकाऱ्याने हरिहरगड जिंकून घेतला. मात्र गडाच्या पायऱ्या बघून तो आश्चर्यचकित झाला व उद्गारला, “या किल्ल्याच्या पायऱ्यांचे वर्णन शब्दांत करणे कठीणच. सुमारे दोनशे फूट सरळ व तीव्र चढाच्या या पायऱ्या अतिउंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारख्या वाटतात”. त्या वेळी इंग्रजांचे धोरण गिरिदुर्गांच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करण्याचे होते. त्यानुसार त्यांनी अनेक गडांचे मार्ग उद्ध्वस्त केले. त्‍यात अलंग-मदन-कुलंगगड, सिद्धगड, पदरगड, औंढा इत्‍यादी किल्‍ल्‍यांचा समावेश होतो. पण हरिहर किल्ल्याच्या अनोख्या पायऱ्यांनी त्‍यांच्‍या राकट सौंदर्याची मोहिनी कॅप्टन ब्रिग्जवर घातली. त्‍यामुळे त्याने हरिहरगड जिंकून घेतला, पण त्या सुंदर पायऱ्यांच्या मार्गाला धक्‍काही लावला नाही. यावरूनही त्‍या पायऱ्यांची आकर्षकता किती विलोभनीय असेल याचा अंदाज बांधता येतो.

4 am

1

मागे मिपावर कि आंतरजालावर हरिहरच्या अजस्त्र कड्याचं आणि त्यात खोदलेल्या पायर्‍यांचं दर्शन झालं तेव्हाच या दुर्गाने मला प्रचंड भुरळ घातली होती. विशेषत: अखंड कातळात खोदलेल्या उभ्या चढणीच्या त्या पायर्यांनी!! केव्हातरी तिथे जायची संधी मिळेलच या आशेवर मधली वर्षे-दिड वर्षे लोटली आणि शेवटी एकदाचं जून महिन्यातल्या यशस्वी माहुली ट्रेकनंतर जुलैच्या मध्यावर आम्ही (खरेतर मीच!! ;) ) हरिहरची निवड केली. प्लॅन केल्यानंतर नक्की येण्यासाठी तयार झालेले आठजण शेवटी कमी होत होत, १२ जुलैला सकाळी साडेसहा वाजता ठाण्यात इगतपुरीकडे जाणार्या तपोवनमध्ये आम्ही फक्त चौघेजणच चढलो. :)

हरिहरची भेट पहिल्यांदाच! त्यामुळे जाण्याआधी कुठून कसे जायचं, कुठे उतरायचं याची पुरेशी माहीती आंतरजालावर वाचली, त्याचबरोबर ओळखीच्या काही जणांकडून मार्गदर्शनही घेतलं. यासगळ्या शिदोरीच्या जोरावर आणि वेळेच्या गणितानुसार आपला ट्रेक व्यवस्थितरित्या पार पडेल असा फुकाचा आत्मविश्वास मी माझ्या मनाचा करून घेतला. पण प्रत्येक वेळेला तुम्ही ठरवल्याप्रमाणे होईलच याची खात्री नसते. कधी कधी अगदी तुम्ही ठरवल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत जातात अन् मनातल्या मनातच आपण आपली पाठ थोपटून घेत असतो. पण कधी कधी याच्या नेमकं विरूध्द घडत जातं, वेळेचं गणित चुकत जातं, काही गोष्टीत आपला अंदाज चुकतो आणि याची परिणती ट्रेकच्या आरंभी असलेला आपला जबर आत्मविश्वास मोक्याच्या क्षणी उणा पडायला लागतो. हरिहरच्या भेटीदरम्यान या सगळ्या गोष्टींचा मी पुरेपूर अनुभव घेतला. या ट्रेकने मला बर्‍याच सकारात्मक गोष्टी शिकवल्या.

हरिहरला जाण्यासाठी इगतपुरी गाठायचं अन् तिथे मागुन ठाण्याहून येणारी त्र्यंबकेश्वरची एसटी पकडून वाटेत गडाच्या पायथ्याशी असलेल्या निरगुडपाड्याला उतरायचं आणि ट्रेक सुरू करायचा असा सर्वसाधारण प्लॅन आम्ही बनवला. त्याप्रमाणे सकाळी पावणेसातला निघालेल्या तपोवनने आम्हाला नऊच्या दरम्यान इगतपुरी स्थानकात सोडलं आणि ती तशीच पुढे नांदेडला गेली. आता पोचलोच आहोत इगतपुरीला तर थोडासा नाश्ता करून त्र्यंबकेश्वरची गाडी पकडू आणि तासाभरात गडाच्या पायथ्याशी पोहचू असा छानसा विचार मी मनाशीच केला. बाकीचे तिघे माझ्यावर सगळं सोपवून निर्धास्त होते. पण तिथून पुढे ते तसं मुळी घडायचंच नव्हतं असंच त्या दिवसाने ठरवलं होतं. तिथे आम्हाला ट्रान्सपोर्टेशनबद्दल दोन-तीन वेगवेगळ्या सुचना मिळाल्या त्यामुळे आमचा थोडा गोंधळ उडाला.

हरिहरला मुंबईहून दोन-तीन मार्गांनी जाता येतं. मुंबईहून लोकलने कसारा गाठावं, तिथून खोडाळा या गावी पोचावं. कसार्याहून खोडाळ्याला जाण्यासाठी शटल लागलेल्या असतात. त्याचबरोबर काही खासगी वाहनेही कसारा-खोडाळा अशा फेर्या करतात. खोडाळ्याहून त्र्यंबकेश्वरची गाडी पकडायची आणि वाटेतच असणार्या निरगुडपाडा या गडाच्या पायथ्याशी असणार्या गावात उतरावं. खोडाळा ते त्र्यंबकेश्वर अशी एसटी महामंडळाची बससेवाही आहे. कसारा ते खोडाळा हे अंतर साधारण ३७ किमी आणि खोडाळा ते निरगुडपाडा हे अंतर साधारण २५ किमी, कसार्याहून असा साठ किमीचा प्रवास केल्यानंतर तुम्ही गडाच्या पायथ्याला पोहचू शकता. दुसर्या मार्गाने मुंबई-भिवंडी-वाडा-खोडाळा-निरगुडपाडा असं करतही तुम्हाला पोचता येतं. किंवा मग डायरेक्ट नाशिकला पोचून तिथून खोडाळ्याची गाडी पकडावी. पण त्यातल्या त्यात जरा सोप्पी पद्धत म्हणजे मुंबई सेंट्रलहून सकाळी सहाला सुटणारी त्र्यंबकेश्वरची एसटी पकडावी आणि त्र्यंबकेश्वरच्या सात किमी अलीकडे असणार्या पहिने फाट्यावर उतरावं. तिथून खासगी वाहनाने तुम्हाला निरगुडपाड्याला जाता येतं. आंतरजालावर बर्याच ठिकाणी मुंबई किंवा इगतपुरीहून त्र्यंबकेश्वरला जाणारी एसटी ही निरगुडपाड्यामार्गे त्र्यंबकेश्वरला जाते असं सांगितलं आहे, पण प्रत्यक्षात ही माहीती चुकीची वाटते. कारण तो मार्ग पुर्णतः वेगळा आहे हे त्या दिवसाच्या प्रवासावरून मला कळालं. मुंबई-इगतपुरी-घोटी मार्गे त्र्यंबकेश्वरला जाणारी गाडी एसटी महामंडळाच्या रूटमध्ये घोटीनंतर नाशिकच दाखवते. निरगुडला जाण्यासाठी मध्येच उतरून तुम्हाला दुसरी गाडी पकडावी लागते. अर्थात हा सगळा खटाटोप तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरत असाल तरच करावा लागतो. खाजगी वाहनाने जात असाल तर निवांतपणे मुंबई-नाशिक हायवेमार्गे तुम्ही सरळ निरगुडपाड्याला पोहचू शकता.

इगतपुरीला पोचल्यानंतर त्र्यंबकेश्वरची गाडी आम्ही जायच्या आधीच आठ वाजता निघून गेलेली होती. त्यानंतरची गाडी दुपारी एक वाजता येणार होती. एसटी स्थानकापाशी बहुतेक लोकांना निरगुडपाडा नावाचं गावच ठाऊक नव्हतं. मुख्य रेल्वे स्थानकात खासगी गाड्या डायरेक्ट निरगुडपाड्याला जाण्यासाठी हजार ते बाराशेपर्यंत भाव सांगतात असं ऐकून होतो ते त्यादिवशी प्रत्यक्ष पाह्यलं. त्यामुळे त्या फंदात न पडता शेवटी जिथे मिसळ खाल्ली त्या हॉटेलवाल्याला विचारून त्याच्या सांगण्यानुसार आम्ही एका शेअर रिक्षाने घोटीला पोचलो. कदाचित त्र्यंबकची गाडी तिथून पटकन मिळेल या आशेने घोटीला पोचलो खरे पण तिथेही आमच्या प्लॅनचे "बारा" वाजण्याची चिन्हे दिसत होती. घोटीहून त्र्यंबक फाटा पुन्हा तिथून मागे घोटी स्थानक अशा फेर्‍या मारत आम्ही घोटी स्थानकातून त्र्यंबकसाठी जाणारं 'जीपडं' पकडलं तेव्हा दुपारचे साडेबारा वाजत आले होते. त्यातून जीपवाल्याने त्र्यंबकला जाणारी गाडी निरगुडपाड्यामार्गे जात नाही, तुम्हाला पहिने फाट्याला उतरायला लागेल असं सांगितल्याबरोबर हरिहर आमच्यापासून अजूनही 'कोसो' दूर आहे याची आम्हाला खात्रीच पटली.

"तुमी चलाओ भो! फाट्यावरनं कि नय तुमाला दोन दोन मिनिटाला गाड्या मिळतील."

"तुमी चला. मी बरोबर सोडतो तुमाला.!"

ड्रायव्हर प्रचंड आत्मविश्वासात आमच्याशी बोलत होता. त्याच्या भुलथापांना बळी पडून तासाभराच्या प्रवासानंतर आम्ही पहिने फाट्याला पोचलो. तिथून त्र्यंबकेश्वर सरळ सात किमी होतं आणि डावीकडे खोडाळा ३८ किमी दाखवत होतं.

पहिने फाटा
2

त्र्यंबक सरळ सात किमी
3

खोडाळा (घोटीहून येताना) डावीकडे ३८ किमी
4

पहिने फाट्याला जवळ जवळ अर्धा तास थांबून सुध्दा एकाही गाडीचा यायचा पत्ता दिसत नव्हता. शेवटी अर्ध्या तासाने एक 'छोटा हाथी' वाला आम्हाला निरगुडपाड्याला जाण्यासाठी थांबला. तो थांबला खरा पण त्याच्या गाडीत सुतभरही जागा दिसेना. कसही करून जायचंच या जिद्दीने आम्ही त्याला गाडीच्या टपावरून न्यायला विनंती केली.

एक प्रवास...टपावरून! ;)
5

सुमारे अर्ध्या-पाऊण तासानंतर पंधरा-वीस घरांची वस्ती असणार्या कोटमवाडीत पोचलो, जी हरिहर गडाच्या अगदी पायथ्याला आहे. तिथे उतरल्यानंतर समोर सगळीकडे प्रचंड धुकं पसरलेलं दिसत होतं, जिथे झाडाची साधी फांदीसुद्धा दिसत नव्हती तिथे गडाचा तो प्रचंड कातळ कुठून दिसायचा.?! उशीरा का होईना पण पावसाने लावलेल्या हजेरीमुळे तिथला स्थानिक बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त दिसत होता. एकीकडे वाडीतली बरीचशी मोठी मंडळी शेतात राबताना दिसत होती तर दुसरीकडे त्यांच्या रिकाम्या घरातून त्यांची लहानशी चिल्ली पिल्ली बाहेर डोकावताना दिसत होती. कधी त्या लहानग्यांना तर कधी नांगरणीसाठी निघालेल्या एखाद्या शेतकर्‍याला विचारत शेवटी गडाच्या वाटेला लागलो तोपर्यंत घड्याळातले काटे अडीच वाजल्याचं दाखवत होते.

कोटमवाडीतली प्राथमिक शाळा अन् त्यामागे डावीकडे फणीचा डोंगर
8

13

6

पाहिलीये का कधी अशी रंगसंगती :)
7

भाताची खाचरं
10

'बरोबर पोहचू कि नाही?', 'नेमकी हीच वाट आहे का?', 'इथे तर काहीच दिसत नाही', 'आत्ता अडीचला चढतोय तर मग वर पोचणार कधी आणि खाली उतरणार कधी?' मनातल्या या सगळ्या प्रश्नांना अनुत्तरीत ठेऊन मुकाट गड चढायला सुरूवात केली.

9

जसजसं वर चढत होतो तसं वाट योग्यच असल्याची खात्री पटत गेली आणि आणखी उत्साहाने वर चढायला सुरूवात केली. सोबतीला धुकं कधी धुसर होत होतं तर कधी पुन्हा दाटून येतं होतं. सुमारे दिड तासाच्या भराभर चढाईनंतर आम्ही एका पठारावर पोचलो जिथे त्या पठाराच्या मधोमध एक त्रिशूळ उभा केला होता आणि त्यासभोवतीने शेंदूर फासलेले अनवट देव आम्हाला पाहायला मिळाले. एवढा चढून आलो होतो पण ती प्रसिद्ध कातळभिंत आणि त्या पायर्‍या काही दिसण्याची लक्षणं दिसत नव्हती. त्या अनवट देवांभोवती पाच मिनिटं विसावा घेतल्यानंतर डाव्या बाजूची वाट पकडून आम्ही पुन्हा निघालो.

11

अवघ्या पाचच मिनिटात एक छोटासा रॉकपॅच चढून आम्ही त्या कातळपायर्‍यांच्या पायथ्याला पोचलो. मागाहून मला कळालं, पठारावर ज्याठिकाणी शेंदूर फासलेले देव होते तिथून तो प्रचंड मोठा कातळ आणि त्या पायर्‍या समोरच दिसतात. पायर्‍यांपाशी पोचलो तेव्हा चार वाजले होते. वेळ फक्त घड्याळातच पुढे सरकत होती पण आमच्या आजुबाजूचा निसर्ग मात्र एखाद्या चित्रासारखा स्तब्ध झाला होता. सरळ उभ्या चढत जाणार्‍या त्या पायर्‍या पाहून आमच्यातल्या नेहमी आघाडीवर असणार्‍या 'सुपरमॅन'ला वर चढावं कि नाही असा प्रश्न क्षणभर पडला. त्याला कारणही तसंच होतं. सरळ आभाळात घुसलेल्या फक्त दिड-दिड फुटाच्या पायर्‍या, दोन्ही बाजूने धुक्याने वेढलेली खोल दरी, वरून रिपरिप पडणारा पाऊस. हे सगळं पाहून आम्ही जागेवरच थबकलो. बाकीचे दोघेही पार गपगार झाले. मनाशी विचार केला 'या पायर्‍यांना बघण्यासाठी इतक्या दूरवर आलोय आणि त्या पाह्यंल्याच आहेत तर आता पुन्हा माघारी फिरावं.'

हरिहरला यायचं ते फक्त अखंड कातळात खोदलेल्या या दगडी पायर्‍यांठीच!
12

त्याची भव्यता कळावी म्हणून आंजावरून हा फोटो साभार.
16

आणखी एक आंजा साभार.
27

आमच्यामागून आलेल्या नाशिकच्या काही लोकांनी दोन घटका तिथे विसावा घेत लगेचच भराभर त्या पायर्‍या चढायला सुरूवात केली. त्याचं पाहून आम्हालाही थोडासा हुरूप आला आणि त्यांच्यामागे आम्हीही हळूहळू वर चढायला सुरूवात केली. खालून प्रचंड अवघड वाटणार्‍या पायर्‍या प्रत्यक्ष चढताना मात्र त्यामानाने सोप्या वाटत होत्या. प्रत्येक पायरीवर दोन्ही बाजूस खोबण्या असल्यामुळे त्यांच्या आधाराने वर चढायला सोपं जात होतं. पण त्यातूनही खाली वळून पाहायला भिती वाटत होती.

14

सरळसोट उभ्या!!
15

25

साधारण सत्तर एक पायर्‍या चढल्यानंतर आपण गडाच्या पहिल्या दरवाजातून आत प्रवेश करतो. आत शिरल्यानंतर लगेचच उजवीकडे खडकात कोरलेली, शेंदूर फासलेली गणरायाची मुर्ती पाहायला मिळते. त्याच्या थोडेच पुढे मारूतीरायाही असाच पाहायला मिळतो. उजवीकडे कातळ आणि डावीकडे सरळ खाली जाणारी दरी यामधून निमुळत्या होत गेलेल्या वाटेने आपण पायर्‍यांच्या दुसर्‍या टप्प्यापाशी येतो. या वाटेने जाताना मध्येच एका ठिकाणी दरीकडच्या बाजूल वरच्या बाजूस एक छोटंस नेढ पाहायला मिळतं.

प्रवेशद्वार
18

प्रवेशद्वारातून टिपलेल्या पायर्‍या
28

गणपती बाप्पा
16

मारूतीराया
17

नेढं
19

तिथून थोडं पुढे गेल्यानंतर लगेचच कपार फोडून काढलेल्या पायर्‍या लागतात, तिथून सावकाशीने वर चढत अवघ्या दहा मिनिटात दुसर्‍या प्रवेशद्वाराने आपण गडाच्या पठारावर पोचतो. तिथे चढताना फार सांभाळून चढायला लागतं, घाई गडबड करून चालत नाही.

20

21

खडक फोडून त्यातून मधूनच काढलेली वाट आपल्याला पाहायला मिळते.

23

22

26

दुसरे प्रवेशद्वार
24

समुद्रसपाटीपासून गडाची उंची ३५०० फुट इतकी आहे खरी, पण त्यामानाने गडाचा घेरा फारच छोटा आहे. गडाचा इतिहास बहुत प्राचिन असावा असं वाटतं. अगदी सातवाहन काळापासूनचा. गडाचा घेरा फार छोटा असल्यामुळे वर गड वसवला गेला नसावा, परंतू तळकोकणातून वर नाशिकला आलेल्या व्यापारी वाटा आणि आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी लष्करी तळ म्हणून याची निर्मिती झाली असावी असं म्हणता येईल. गडावर असलेली एकमेव इमारत म्हणजेच दारूगोळ्याचे कोठार पाहिले की याची खात्री पटते. कालौघात याची मालकी शहाजी राजांकडे, कधी अहमदनगरच्या निजामशाहीकडे, तर कधी मुघलाकडे जात राहीली. तदनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारी पेशवे असलेल्या मोरोपंत पिंगळ्यांनी हा गड १६७० साली स्वराज्यात सामील केला. सरतेशेवटी इंग्रजांच्या १८१८ सालच्या 'गड उडवा, मराठे बुडवा' या मोहिमेत याचा ताबा इंग्रजांकडे गेला. त्र्यंबकच्या रांगेत हरिहरसोबत असणार्‍या बसगड, भास्करगड, फणीचा डोंगर, त्र्यंबकगड या रांगेमुळे गडाचे लष्करीदृष्ट्या महत्व अधोरेखित होते.

दुसर्‍या प्रवेशद्वारातून आत शिरल्यानंतर एक छोटीशी टेकडी चढायला लागते. ती चढून गेल्यावर डावीकडच्या वाटेने जाताना मध्येच पाण्याची काही टाकी आणि काही उरलेले अवशेष पाहायला मिळतात. त्याच वाटेने थोडंस पुढे चालत राहिल्यानंतर एका ठिकाणी पठारावर मारूतीचे आणि शिवाचे छोटेसे मंदिर आपल्याला पाहायला मिळते. हनुमंताच्या छोटेखानी मंदिरामागे पाणी अडवून केलेला एक छोटासा तलाव आपल्याला पाहायला मिळतो, त्यातलं पाणी पिण्यायोग्य आहे.

पाण्याची टाकी
32

33

हनुमंताचं आणि शिवशंभूचं छोटेखानी मंदिर.
29

30

31

गोड्या पाण्याचं छोट्टसं तळं
34

त्याचमार्गाने थोडं पुढे गेल्यावर दगडात बांधलेली एक आयताकृती इमारत म्हणजे अर्थातच दारूगोळ्याचं कोठार पाहायला मिळते. आत प्रवेश करण्यासाठीचं त्याचं प्रवेशद्वार म्हणजे दिड फुट बाय दोन फुटाची दगडी चौकट आहे. त्या इमारतीत दोन खोल्या समोरासमोर आहेत. १०-१२ लोकांच्या राहाण्याची व्यवस्था तिथे आरामात होऊ शकते. आम्ही गेलो तेव्हा तिथे शिवमगिरी नावाचे नाथपंथी योगी राहात होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी अखंड मौन पाळलं आहे आणि पुढच्या वर्षीच्या कुंभमेळ्यानंतर ते आपलं मौन सोडणार आहेत अशी माहीती मिळाली. पोटात भुकेचे कावळे ओरडल्याची जाणिव झाली आणि त्या इमारतीत बॅगा टाकत आम्ही व्यवस्थित पोटपुजा उरकली.

35

गडावरच्या इमारतीत राहणारे नाथपंथी योगी शिवमगिरी महाराज.
36

तिथे दहा-पंधरा मिनिटे विश्राम केल्यानंतर आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. खाली उतरायली सुरूवात केली तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते. खालच्या वाडीतून शेवटची गाडी कुठे जाणारी आहे आणि किती वाजता आहे याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती म्हणून उतरताना अगदी भराभर उतरायला सुरूवात केली. अगदी तासाभरातच म्हणजे सातला खाली उतरलो. तोवर आजुबाजूच्या भागातलं सगळं धुकं निवळून सगळा प्रदेश अगदी स्वच्छ धुतल्यासारखा दिसायला लागला होता. हरिहर, त्यासमोरचा फणीचा डोंगर, त्यापुढचा भास्करगड सगळं लख्ख दिसू लागलं होतं.

धुक्यात हरवलेला फणीचा डोंगर
37

भास्करगड
38

हरिहर
39

40

पायथ्याची कोटमवाडी
41

खाली पोचल्यावर जाता जाता वाटेतच एका काकांनी शेवटची खोडाळ्याला जाणारी गाडी आता अगदी पाच मिनिटातच येईल हे ऐकल्यानंतर पळतच मुख्य रस्ता गाठला. खोडाळ्याहून कुठच्याही गाडीने नाशिक किंवा घोटी गाठता येईल या आशेने आम्ही आठ वाजता खोडाळ्याला पोचलो, पण तिथेही आम्हाला धक्का बसायचा बाकी होता. शेवटची शटल खोडाळ्याला मुक्कामी येऊन थांबली होती आणि तिथून पुढच्या आमच्या प्रवासाला फुलस्टॉप पडतोय की काय असं वाटून दोघांनी मुक्कामाची सोय पाहायला सुरूवात केली नि दोघांनी एखाद्या खाजगी गाडीची व्यवस्था पाहायला सुरूवात केली. शेवटी स्थानिक मुलांच्या मदतीने बर्‍याच घासाघिसीनंतर खोडाळा ते कसारा या ३७ किमीच्या अंतरासाठी अन् पाऊणतासाच्या प्रवासासाठी हजार रूपये देऊन खाजगी गाडीवाला एकजण यायला तयार केला. त्यावेळी पैशांपेक्षा आम्हाला वेळ खुप महत्वाची वाटली. त्या गाडीने कसारा स्थानकात सोडल्यानंतर तिथून मुंबईकडे येणार्‍या ९.२१ च्या लोकलमधल्या बाकड्यावर जेव्हा आम्ही चौघांनी देह पसरून दिला तेव्हा आम्हा चौघांच्याही चेहर्‍यावर एक वेगळं समाधान झळकत होतं. त्याची तुलना अखंड वारी चालून पंढरपुरातल्या गाभार्‍यात विठुरायाचे दर्शन घेतलेल्या वारकर्‍याच्या मुखावर दाटलेल्या समाधानाशी करता येईल किंवा करवीरच्या अंबाबाईचा पौषातला किरणोत्सव पाहताना तिच्या लेकरांच्या चेहर्‍यावर जे समाधान उमटतं त्याच्याशी करता येईल!!

सह्याद्री, त्यातल्या डोंगररांगा, त्यावरचे गडकोट किल्ले, त्यावरच्या अनवट घाट-वाटा, या सर्व दुर्गम दुर्गांचे अधिपती छत्रपती शिवराय या सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्यासाठी गुरूतुल्य! माता-पित्याच्या जोडीने या गुरूचे स्थानही तितकेच महत्वाचे. सह्याद्री तुम्हाला अंगाखांद्यावर खेळवत अनेक चांगल्या वाईट गोष्टी शिकवत असतो. तुमचे अनुभव समृद्ध करत असतो. त्याचा राकटपणा जितका कणखर तितकीच त्याची माया अपार आहे. १२ जुलैच्या गुरूपौर्णिमेला या समाधिस्त योग्याने मला अनेकाविध अनुभवांनी समृद्ध करताना माझ्या आयुष्यातलं त्याचं गुरूपद आणखी अढळ केलं.!!

- इति लेखनसीमा

हरिहर मुंबईहून (स्वतःची गाडी बरोबर नसताना) करायचा असल्यास आदल्या दिवशी रात्री त्र्यंबकेश्वरला येणे अथवा पहाटेपर्यंत इगतपुरीला येणे श्रेयस्कर.

स्वतःच्या गाडीने यायचे असल्यास कोटमवाडीला न जाता घोटी त्र्यंबकेश्वर रस्त्यावरून मध्ये घाटात गाडी लावून सपाटीवरची अर्ध्या पाऊण तासाची चाल करून थेट हरिहरच्या पायर्‍यांपाशी पोहोचता येते. ह्यात दीड तासाची चढण पूर्णपणे टाळता येते.

बाकी ते नेढं नैसर्गिक नसून दुर्गस्थपतींनींच कोरवलेले आहे. ह्या नेढ्याजवळाची जी डोक्यावर कातळ असलेली आडवी वाट आहे अगदी तशीच ब्रह्मगिरीला पण आहे.

दोरखंड ओवण्यासाठी हे तर सरळच आहे.

पण दोरखंड का ओवायचा हा प्रश्न समोर येतो.

आता बहुधा मग ही किल्ल्याची वाट कोरून काढताना सुरुवातीला आधारासाठी हे नेढं कोरलेले असावं किंवा ही वाट कोरून काढल्यावर दोराचा उपयोग तिथले (अजून एक लाकडी) प्रवेशद्वार बंद करण्यासाठी करीत असावेत किंवा निव्वळ पहिला दरवाजा शत्रूच्या ताब्यात गेल्यावर तिथून दोराचा आधार घेऊन निसटून खाली येण्यासाठीही कोरलेलं असावं.

व्यक्तिश: मला पहिला तर्कच जास्त योग्य वाटतो.

 हरिहर किल्ला / हर्षगड : नाशिक HARIHAR FORT

हरिहर किल्ला / हर्षगड : नाशिक HARIHAR FORT (२८ जुन २०१५ )

हरिहर / हरिहर

हरिहर किल्ल्याला भेट देऊन ३ वर्ष झाली .हरिहरला " हर्षगड" असे ही म्हणतात. समुद्रसपाटी पासून ३६७६ फूट उंच असा हा किल्ला सह्याद्रीच्या त्र्यंबक भागातील महत्वाचा किल्ला आहे !  मागील आठवड्यात फेसबुक वर हरिहर किल्ल्याचे फोटो पहिले आणि तेव्हा जाणवले की हरिहर किल्ल्याच्या  पायऱ्यांची छाप मनावर कायमची उमटलेली आहे. मराठ्यांचे शक्तिस्थान म्हणजे त्यांचे किल्ले ! मराठ्यांची शक्तिस्थाने कमकुवत करण्यासाठी  इंग्रज गडावर जाणऱ्या पायऱ्या आणि वाटा तोफगोळ्यांनी उडवित असत  ! इंग्रज अधिकारी कॅप्टन ब्रिग्स हा हरिहर गडाच्या कोरलेल्या पायऱ्या पाहून त्यांच्या प्रेमात पडला आणि त्याने त्या  तोफगोळ्यांनी  न उडविण्याचा निर्णय घेतला. इंग्रज तसेच निर्दयी माणसे त्यात त्यांनी ह्या वास्तूचा एक भाग जपला म्हणजे ती नक्कीच सुंदर असणार असे कुतूहल मनात होते. प्रत्यक्ष पाहिल्यावर त्या कश्या बांधल्या गेल्या असतील हा प्रश्न प्रत्येक व्यक्तीला पडेल आणि तो ही  हरिहरच्या प्रेमात पडेल हे नक्की ! एका दुर्गम सुळक्यावर मधोमध  आणि घुमावदार पायऱ्या कोरणे ही साधी बाब नव्हे ! 

हरिहर गडाच्या पायऱ्या 

टाके हर्ष गावातून दिसणारा धुक्यात लपलेला हरिहर गड 

आम्ही कसे गेलो ? 

दिनांक : २८ जुन २०१५ ! अभिनव , तुषार , शशांक , सचिन पवार , दशरथ , दिलीप आणि मी असे एकूण ७ जण शेवटची कसारा लोकल पकडून कसाऱ्याला उतरलो. अभिनवने एका खाजगी सुमोला बुक केली होती  ! कसारा - खोडाळा - निरगुडपाडा आणि टाके हर्ष असा आमचा मार्ग होता . कसाराहुन खोडाळ्याकडून त्र्यंबकेश्वर जाणाऱ्या मार्गावर हरिहर किल्ला येतो. अगदी आरामात गेलो तरी २ तासाच्या आत आपण टाके हर्ष ह्या गावी पोहोचतो . ह्या गावात रस्त्यालगतच एक प्राथमिक शाळा आहे . ह्या शाळेच्या पडवी मध्ये आपण विश्रांती करू शकतो . पहाटे लवकर ट्रेक सुरु कार्याच्या हेतूने आम्ही शाळेच्या पडवीमध्ये झोपायचे ठरवले पण खूप थंडी असल्याने कुणाचीही झोप पूर्ण झाली नसल्याचे आठवते. गाडी आणि गाडीचे चालक आमच्या सोबत टाके हर्ष ह्या गावी मुक्कामी राहणार आणि दुसऱ्या दिवशी  संध्याकाळी आम्हाला पुन्हा कसारा आणून सोडणार असे ठरले होते.

एका  थरारक वळणावर 

पाऊल  ट्रेकर्स 

ट्रेकला सुरुवात !

६.३० वाजता आम्ही ट्रेकला  सुरुवात  केली ! पावसाळी दिवस होते आणि नुकत्याच पडलेल्या पावसाने वातावरणात गारवा आणला होता. गावकऱ्यांनी आम्हाला चहा दिला  आणि आम्ही पूर्ण ताजेतवाने झालो. गडावर जाणारी पायवाट पकडून आम्ही ट्रेक ला सुरुवात केली . मौज मस्ती करत कसा एक तास निघून गेला हे कळले ही नाही . आम्ही बऱ्यापैकी उंची गाठली होती पण अजूनही दाट धुक्यामुळे हरिहर गडाचा सुळका दिसत नव्हता ! थोड्याच वेळात धुके हळू हळू सरू लागले होते ! आम्ही एका पठारावर येउन पोहचलो होतो ! धुके सरल्यावर एक प्रचंड मोठा भारदस्त सुळका आणि त्या वर एक घळ दिसली . अचानक लक्षात आले की घळ  नसून त्या हरिहरच्या पायऱ्या आहेत ! आपणास जिथे जायचे आहे ते लक्ष प्रथमदर्शनी दिसल्यावरचा आनंद हा एक ट्रेकरच समजू शकतो.

प्रथम दर्शन 

धुके सरले आणि आम्हाला पायऱ्या दिसू लागल्या 
आपण नेहमी ऐकतो की स्वर्गात जाण्यासाठी पायऱ्या असतात. त्या दिवशी हरिहरच्या पायऱ्या आम्हाला तश्याच काहीश्या वाटत होत्या . सोसाट्याचा बेभान वारा , आजू बाजूला वाहणारे धुके , हिरवीगार डोंगररांग पाहून असे वाटत होते की  इथेच झोपडी बांधून कायमचे रहावे  ! फोटो मध्ये जसे पहिले होते त्या पेक्षा पायऱ्या जास्तच सुंदर दिसत होत्या . ज्याला इतिहासाची आवड नाही अश्या व्यक्तीलाही ह्या आवडतील असे स्वरूप ह्या पायऱ्यांचे आहे . पायऱ्या ७० - ८० अंशावर आहेत असे नेटवरील माहितीमुळे  समजते. जेव्हा आम्ही पायऱ्या जवळ पोहचलो तेव्हा मन थोडे धस्स झाले ! पाहताक्षणी त्या कठीण वाटल्या !  पण चढाई करिता पायऱ्या सोप्या आहेत . सुरक्षेसाठी पायऱ्याना  कोनाडे/ खोबण्या आहेत, त्यांना पकडून आपल्याला वर जाता येते ! पायऱ्या संपल्यावर आपल्याला  महादरवाजा हा दोन  बुरुजांमध्ये दिसतो ! आपल्याला एक गणपतीचीमूर्ती कोरलेली दिसते . ह्या पायऱ्या चढताना खूप संयमाने चढाव्या लागतील . पावसाळ्यात कोणताही धसमुसळेपणा धोकादायक  ठरू शकतो . 

अभिनव 

पुढेच  एक नैसर्गिक छत तयार झाले आहे आणि त्याला एक नेढे आहे ! त्या नेढ्याला वळसा मारून आपल्याला अजून एक घुमावदार पायऱ्या  मिळतात !येथे मात्र आपणास काळजी घ्यावी लागते ! आपल्या डाव्या बाजूस दरीच आहे असे समजा ! ह्या पायऱ्या  पार पडल्या नंतर अजून एक कमान दिसते आणि आपण डोंगर माथ्यावर येतो !पायऱ्यापासून गडमाथ्यावर येण्याचा अनुभव चित्तथरारक होता ! आम्ही सगळेच खूप खुश होतो !गड फिरण्य अगोदर आम्ही निवांत बसून वेगाने वाहणारे ढग आणि धुक्यांशी लपंडाव खेळत असलेली गावे पाहत होतो ! 
दशरथ 

गणपती  बाप्पा मोरया .. दरवाज्याजवळ  गडावरचा गणपती 

गड फिरायला तासभर वेळ लागतो .  आम्ही मात्र २ तास घेतले . गडावर आपणास पाच पाण्याची टाके , एक तलाव , मारुतीचे मंदिर आणि छोटे शंकराचे मंदिर दिसते . आम्ही जेवण हे तलावाजवळ केले .  नेहमी प्रमाणे या वेळी ही  चटपटीत पदार्थ होते ! पुढे गेल्यावर एक इमारत दिसते त्यात दोन खोल्या आहेत व त्यावर घुमटकर छत आहे. महादरवाज्याच्या विरुद्ध टोकाला पण छान निसर्ग सौंदर्य पाहता येते ! तेथे  चांगला वेळ गेला !

पाऊल  ट्रेकर्स 

परतीचा प्रवास : 

 परतीचा प्रवास हा जलद झाला. खाली उतरताना मात्र थोडीशी भीती वाटली. पूर्ण अंग डाव्याबाजूच्या भिंतीला ठेवूनच उतरत होतो . पावसामुळे वाट पण निसरडी झाली होती . आमच्या मनातील भीती आमच्या पुढे असणाऱ्या एका गावकरी  माणसाला मात्र नक्कीच नव्हती . डोंगरावरील पळसाची पाने एकत्र करून त्यांने त्याचे भारे आपल्या डोक्यावर ठेवले होते . रोजचीच वाट असल्याने तो भले मोठे भारे घेणून निवांत उतरत होता . हरिहर गडाचा आकर्षणबिंदू म्हणजे कातळात कोरलेल्या पायऱ्या ! आम्ही भल्या पहाटे ट्रेक सुरु केल्याने आम्हाला पायऱ्या चढताना गर्दी नव्हती . उतरणीच्या वेळी अनेक ग्रुप तिथे आले होते . त्या पायऱ्या उतरायलाच आम्हाला अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ गेला . योगायोग असा कि माझा मामे भाऊ अमितेश मला भेटला ! अमितेश मला एका आठवड्यापूर्वीच म्हणाला होता की तो हरिहर किल्ल्यावर जाणार आहे . आणि योगायोग असा की आमची भेट परतीच्या मार्गावर हरिहर किल्ल्यावरच झाली . त्याला भेटून पण मस्त वाटले ! साधारण दीड तासात आम्ही टाके हर्ष ला पोहोचलो आणि पुन्हा एकदा गडाचे दर्शन घेऊन कसारा गाठला . 
उतरणीच्या वेळेस असलेली हा गर्दी 

पाऊल टीम : शशांक , अभिनव , सचिन पवार , दिलीप , दशरथ , तुषार आणि नरेंद्र

नेढे 

एका अवघड वळणावर 

खोबणी असलेल्या पायऱ्या 

तलाव आणि मंदिर  

हर हर  महादेव 

हनुमानाचे मंदिर 

धुक्याची चादर 

शंभू महादेव 

गोल घुमटाकार इमारत आणि टाक्या 

गडावर पाण्याच्या ५ टाक्या आहेत 
http://narendralakhan7.blogspot.com/2018/10/harihar-fort.html

हरिहर – देर गए पर दुरुस्त आए..!

0
0
Rate This

DSC_0032

एप्रिल २०१५ च्या वासोटा ट्रेकनंतर ट्रेकिंगशी संबंध तुटलाच. नाही म्हणायला कॅलिफोर्नियात ट्रेल केले खरे पण त्याला सह्याद्रीतल्या ट्रेकची सर नाही.सह्याद्रीत ट्रेक करताना इतिहासपुरुष आपलं बोट धरून चालवतोय असं वाटतं.त्यामुळे भारतात परतल्यावर कधी एकदा ट्रेकला जातोय असं झालं होतं. पण काही ना काही कारणाने तारीख पे तारीख होत राहिलं. अखेर गांधी जयंतीचा मुहूर्त मिळाला.ठिकाण ठरलं हरिहर उर्फ हर्षगड..!

हरिहर आपल्या त्रिकोणी माथ्याने त्र्यंबकच्या डोंगररांगेत गोंडा घाटावर नजर ठेवून दिमाखात उभा आहे. हरिहरचं वैशिष्ट्य म्हणजे कातळात जवळजवळ सत्तर अंशात कोरलेल्या साठ मीटर उंच पायऱ्या.असं म्हणतात की या पाय-यांची भुरळ ब्रिटिश अधिकारी ब्रिग्सलाही पडली आणि तोफेच्या माऱ्याने पायऱ्या उध्वस्त करण्याचा विचार त्याने बदलला. काहीसा धोकादायक पण काळजी घेतल्यास आनंद आणि थराराची अनुभूती देणारा असा हा हरिहर. इगतपुरीपासून साधारण ४८ आणि मुंबईहून सुमारे १२१ किलोमीटर.

ट्रेक ठरल्यावर कधी जायचं कसं जायचं यावर विचारमंथन सुरु झालं. आदल्या दिवशी रात्री निघायला कुणी तयार होईना. मग सकाळी लवकर निघायचं आणि पायथ्याच्या हर्षवाडीतून वर चढायचं असं ठरवलं . साधारण तासाभराची चढाई आहे. हरिहरावर निरगुडपाड्याहूनही जाता येतं. या चढाईला दोन ते अडीच तास लागतात. नितीन, त्याचा भाऊ प्रथमेश, रोहित, शैलेश, सौरभ आणि मी अशी गॅंग जमली. सागरगडाच्या ट्रेकपासून फोर व्हिलरच्या आरामदायक प्रवासाची सवय झालेले आमचे मावळे. ट्रेन,एसटी वगैरेचा प्रवास असला की पाच सहाला हजर राहाणाऱ्या मंडळींनी निघेपर्यंत सात वाजवले. नितीन, रोहित आणि मी एका गाडीत तर प्रथमेश, सौरभ आणि शैलेश एका गाडीत असे कळव्याहून निघालो. वाटेत आसनगावाजवळ नाश्ता केला आणि कसारा-विहीगाव-खोडाळा मार्गे निघालो. कसारा घाटाच्या सुरुवातीलाच एक रस्ता विहीगावला जातो. याच रस्त्यावर विहीगावचा प्रसिद्ध अशोक धबधबा आहे. याच वाटेवर पुढे वैतरणा धरणाचं बॅकवॉटर लागतं. मग तिथे थोडं फोटोसेशन केलं आणि पुढची वाट पकडली. या वाटेला पुढे घोटी वैतरणा वाट येऊन मिळते. नाशिकहून यायचं असेल तर ही वाट सोईची आहे. ही वाट पुढे त्र्यंबकला जाते. या वाटेवरून एक कच्चा रस्ता हर्षवाडीला गेला आहे. इथपर्यंतचा प्रवास सुरळीत पार पडला. अकरा वाजता पोहोचलो पण बेत ठरल्याप्रमाणे पार पडत होता. हर्षवाडीचा रस्ता दगडधोंड्यानी भरलेला आहे. एका चढावर नितीनची डिझेलभक्षक कार चढली पण प्रथमेशची सीएनजी कार प्रयत्न करूनही चढेना. शेवटी इंजिनातून धूर यायला लागला. तेव्हा तो ग्रुप मागे फिरला. पुढे गेलेले आम्ही अर्धा तास वाट बघून पुन्हा मागे आलो. नेटवर्कची बोंब असल्यामुळे काय झालं ते कळवायला मार्ग नव्हता. बऱ्याच वेळाने एकदाचा फोन लागला आणि मंडळी निरगुडपाड्याला थांबली आहेत असं कळलं. मग सगळे निरगुडपाड्याला आलो आणि तिथून किल्ल्यावर जावं असं ठरलं. पोहे खाल्ले आणि किल्ल्याच्या वाटेला लागलो तेव्हा साडेबारा वाजत आले होते. आधीच एक तास उशीर,त्यात चढाईचा एक दीड तास वाढला. टाइमटेबलाचा पार बोऱ्या वाजला. पण आता एवढे आलोच आहोत तर जाऊयाच वर असा विचार केला. रोज साडेपाचला जोरदार पाऊस होतोय तेव्हा वेळेवर उतरा असा सल्ला टपरीवरच्या मामांनी दिला. तेव्हा तीन साडेतीनला परतीचा प्रवास सुरु करायचा असं नक्की करून किल्ल्याच्या वाटेला लागलो.

IMG_0936

झपाझप पावले टाकत, वाटेत भेटेल त्याला वाट विचारत निघालो. कुठे चुकलो कुणास ठाऊक,पण आपण बऱ्याच उजवीकडे आलो आहोत असं जाणवलं. एका धबधब्याच्या माथ्यावर पोचल्यावर परत वाट शोधायला सुरुवात केली. इथून दूरवर पायऱ्या दिसत होत्या पण जाण्याची वाट सापडत नव्हती. मग डावीकडे चालत निघालो आणि थोड्या वेळाने वाट सापडली. एव्हाना उन्हाने चांगलाच घाम काढला होता. मजल दरमजल करत पाय-यांपाशी येऊन पोचलो. इथे लिंबूपाणी मिळाल्यामुळे थोडी तरतरी आली. मग पाय-यांना भिडलो. या पायऱ्या गोरखगडाची आठवण करून देतात. प्रत्येक पायरीला एक खोबण आहे जी पकडून आपण वर चढू शकतो. जसजसं वर जावं तसतशी उंचीची जाणीव होऊ लागते. नवख्या ट्रेकर्स आणि उंचीची भीती असणा-यांनी जरा काळजी घ्यावी. पहिला टप्पा  पार केल्यावर दरवाजाची कमान लागते. तिथून पुढे जाण्यासाठी डोंगराच्या पोटातून रस्ता कोरला आहे. पुढे डोंगराच्या पोटातूनच वर जाण्यासाठी पायऱ्या लागतात ज्या पेठच्या कोथळीगडाची आठवण करून देतात. भर उन्हात या पायऱ्या दमछाक करतात. अर्थात माथ्यावरचा वारा आणि समोरचा नजारा हा सगळा शीण घालवून टाकतो. समोर फणी हिल आणि ब्रह्मपर्वताचा पसारा दिसतो. हा सगळा अवकाश डोळ्यात साठवून घेतला. “राकट देशा, कणखर देशा दगडांच्या देशा” असं ज्या सह्याद्रीमुळे महाराष्ट्राचं वर्णन गोविंदाग्रज करतात त्याचं हरिहर स्वरूप अनुभवलं. खालच्या पठारावरून बघितलं की हरिहरचा माथा शिवाच्या पिंडीसारखा दिसतो आणि पाय-यांचा कातळमार्ग हरीच्या कपाळावरच्या गंधासारखा शोभून दिसतो.’हरिहर’ हे नाव अगदी पटतं. अशी कलाकृती घडवणा-या निसर्गाला,त्याला आकार देणा-या कामगारांच्या, कलाकारांच्या हातांना , त्याच्यासाठी लढणा-या सैनिकांना आणि या कलाकृतीच्या सौंदर्याचा मान ठेवणा-या ब्रिग्सच्या सौंदर्यदृष्टीलाही मनोमन दाद दिली.

IMG_6582

या सगळ्यापासून दूर, अलिप्त, निर्विकार, तटस्थ घड्याळाने चारची वेळ दाखवली आणि सगळे परत वर्तमानकाळात आलो. उशीर झाल्याची जाणीव होतीच, त्यात दुरून प्रभू रामचंद्राची सेना येताना दिसू लागली. सोबत हवेतला गारवाही वाढायला लागला होता. थोडक्यात पावसाची लक्षणं होती. तेव्हा हरिहरच्या माथ्याला भोज्या करून खाली उतरण्याचा निर्णय घ्यावा लागला. पाय-यांशी येईपर्यंत टपोरे थेंब पडायला लागले. पाय-यांकडे तोंड करून उतरताना अंदाजाने पाऊल ठेवावं लागत होतं. आधीच पाठीवरच्या सॅक्स, त्यात कड्यावर दबा धरून बसलेली वानरसेना आणि हळूहळू जोर धरू लागलेला पाऊस. चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे निसरड्या झालेल्या पाय-यांवर काही अपघात होऊ नये म्हणून काळजी घेत होतो. शैलेश एकदा घसरला होता पण लगेच त्याने स्वतः ला सावरलं. हळूहळू सर्वांनी पाय-यांचा टप्पा पार केला. तोवर पाऊसही थोडा सैलावला. मग पटापट उतरायला लागलो. वाट हरवणं सापडणं चालू होतंच,पण उतरताना त्याची तितकीशी फिकीर नसते. अखेर साडेपाचच्या सुमारास पायथ्याशी पोचलो. डांबरी सडकेशी येऊन पोचतो न पोचतो तोच मुसळधार पाऊस सुरु झाला. मागे वळून पाहिलं तर हरिहरचा माथा दिसतच नव्हता. पार पावसाळी ढगात हरवून गेला होता. उतरायला थोडा उशीर केला असता तर पावसात अडकून पडलो असतो. पावसाची काहीच तयारी सोबत नेली नव्हती. वेळेवर निघालो हे नशीब. अर्थात हरिहरचा माथा पूर्ण बघता आला नाही याची रुखरुख होतीच. असो. सर सलामत तो ट्रेक पचास.

DSC_0036

अर्धा तास कोसळल्यावर पावसाने उसंत घेतली. एव्हाना पावसात वाट काढत दुपारची टपरी गाठली होती. मग चहा घेऊन ताजेतवाने झालो आणि लगेच गाड्या मुंबईच्या दिशेने दामटल्या. येताना घाटात ट्रॅफिक वगैरे लागलं नाही. साडेदहाला कळवा स्टेशन आणि अकराला घर. ट्रेकने थकल्याभागल्या देहाचं घराने स्वागत केलं. आता काही दिवस तरी चर्चेला एक नवीन विषय.. रुटीनला कंटाळलेल्या जीवाला एक बदल.. आठवणींच्या संचितात आणखी एक भर.. मला लिहायला एक नवा हुरूप..

त्या रात्री झोपायच्या आधीच मी लेखाचं शीर्षक ठरवून टाकलं होतं – “हरिहर” – देर गए पर दुरुस्त आए..!

—  अभिजीत

https://dilkhulas.wordpress.com/2018/11/14/%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%b0-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b0-%e0%a4%97%e0%a4%8f-%e0%a4%aa%e0%a4%b0-%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4-%e0%a4%86%e0%a4%8f/#comment-412

 हर्षवणारा हर्षेवाडीतला 'हरिहर' उर्फ हर्षगड.

मला एकदा अक्षय चा फोन आला आणि म्हणाला, आपल्याला येत्या शनिवारी नाशिक येथे असणाऱ्या हरिहर ला जायायचे आहे. बोललो त्याला, जाऊया त्यात काय. व येणाऱ्या शनिवारी म्हणजेच ०७/१२/१९ या दिवशी आम्ही रात्री नाशिक येथे निघण्यासाठी सज्ज झालो. शनिवार च्या दिवशी घाई घाई मधून निघताना आम्ही एक्स्प्रेस ने जायायचे ठरवले. दादर पर्यंत मुंबई ची लाईफ लाईन म्हणून ओळखणाऱ्या लोकल चा प्रवास व पुढे आम्ही नाशिक रोड वरून जाणारी 'अमृतसर एक्स्प्रेस' पकडली, आत्ता जनरल डब्याचा प्रवास कसा असतो हे मला काय विशेष सांगायला नको. साधारण सकाळी ०३.४० च्या आसपास आम्ही नाशिक रोड ला पोहोचलो, पण पुढचा मार्ग कोणालाच माहीत नव्हता. मी मागे एकदा म्हणजे एप्रिल २०१७ मध्ये खास हरिहर साठी गेलेलो तो म्हणजे कसारा मार्गे पण तो हरिहर साथीचा पहिला प्रवास माझा वेळे अभावी पूर्ण होऊ शकला नाही. त्याची खंत मला अजूनही जाणवते. तेव्हा पासून गडावर जाण्यासाठी तरी कितीही दिवसभराच्या घाई घाई मध्ये असलो तरी निघणार व ठरलेल्या वेळेनुसार, सुरवातीला भेटावयाच्या ठिकाणी पोहोचणार.

सकाळी नाशिक रोड ला बाहेर पडताच चहाचे ५-६ स्टॉल्स दिसले. त्यातल्याच एका स्टॉल वर सर्वजण गेलो. पण आमचा चहा विक्रेता हा विशेष होता. चहा बनवताना मोठ्या आवाजात व सुरात 'घ्या चाय गरम.. चाय गरम, सुपर स्पेशल गरमा गरम... हाहाहा...  हे मात्र आम्हा सर्वांना ताजेतवाने होण्यासाठी चहासोबत मिळालेली कॉम्लिमेंटरी होती असे म्हणायला काय हरकत नाही. शेवटी त्याच्याही धंद्या निमित्त माणसांना आकर्षित करून घेणं हे त्याचं कर्तव्य होतं. चहापान वैगरे झाल्यावर, पुढे आत्ता जायायचे कसे? हा मात्र मोठा प्रश्न होता. मी एका व्यक्तीला विचारले तिथे, हरिहर गडावर जाण्यासाठी गाड्या कोणकोणत्या उपलब्ध असणार आहेत? आत्ता त्यांच्या चेहऱ्यावरची प्रतिक्रिया बघूनच मला कळून आलेले, येथे काय जास्त वेळ घालवण्यात अर्थ नाही कारण हरिहर हा शब्दच त्या व्यक्ती साठी नवीन होता. सरळ समोर असलेल्या एस. टी. स्थानकामध्ये मध्ये गेलो व एक 'पंचवटी भोग' नावाची स्थानिक फेरा मारणारी बस लागलेली, लगेचच त्या बस चालकांना विचारले. मास्तर, हरिहर गडावर जाण्यासाठी कुठची बस आहे आत्तामास्तर म्हणाले, तुम्ही एक काम करा सीबीएस रोड ला चला तिथून तुम्हाला गाड्या मिळतील. लगेच मित्रांना बोलवून म्हणजेच ७ जणं आम्ही बस मध्ये आलो, पुढे ५ ला सीबीएस च्या डेपो मध्ये येताच तिथल्या प्रवासी संपर्क केंद्र मध्ये विचारताच कळले, की त्या ठिकाणी जाणारी त्रंब्यक साठी ५ ची बस नुकतीच निघाली. म्हणजे आमच्यासाठी हे आत्ता दुर्दैवच झाले. दुसरी बस तासाभरात येणार होती व ती सुद्धा त्रंब्यक पर्यंतच पण पुढे काय? पुढे जाण्यासाठी गाड्यांची सोय असेल का नाही? यासाठी आम्ही ओला, ऊबर किंवा मिळेल ती खाजगी गाडी बघून निघायचे असे ठरवले, पण त्यात सुद्धा गाडी लगेचच मिळत नव्हती. म्हणून आम्ही ऑटो करायची ठरवले पण ऑटो वाला ७ जणं घेऊन बसवणार तरी कुठे? ही मोठी पंचायत. पण ह्याचं उत्तर त्यानेच आम्हाला दिलं. त्याने ५ जणांना मागे बसायला सांगितले. त्यात रोशन, वैभव, सौरभ, दर्शन आणि प्रसाद व पुढे एका बाजूला मी तर दुसऱ्या बाजूला अक्षय बसलेला. ५ मिनिटांवर असणाऱ्या पेट्रोल पंप पर्यंत प्रवास व्यवस्थित झाला. पुढे ह्या प्रवासाचा अक्षरशः वैताग आलेला. तरी पण जायायचे होते ना, मग तिथे 'नो आर्ग्युमेंट'. हे सर्व फक्त ध्यानात होतं व हे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून दिसून येत होते. ऑटोवाल्या काकांबरोबर गप्पागोष्टी करत प्रवास चालू होता. त्यांच्या ऑटो चालवण्याच्या अंदाज वरून आम्हाला कळून येत होते की आपण कुठे तरी सकाळ सकाळी फसलोय. फक्त ४०-५० च्या गतीने ऑटो चालवली तर कसं काय व्हायचं? वरून त्यात गती रोधक आले तर अगोदरच ३-४ मीटर ते ब्रेक मारायचे, ह्या सर्व घटना पाहून खरोखरच आम्हाला वैताग आलेला. शेवटी पुढे बसलेले अक्षय व मी म्हणालो काका द्या आमच्याकडे गाडी! तुम्ही फक्त बसा. तेवढ्यातच बाजूने एक भरघाव वेगात एस. टी. गेली हे बघून आम्ही अजून चिंतेत पडलो. ऑटोवाल्या काकांची बडबड चालू होती पण नंतर आम्हाला झोपेच्या झपक्या यायायला लागलेल्या व नाशिक ची थंडी खूप झोंबत होती. त्रंब्यक च्या पुढे आल्यावर ऑटोवाल्या काकांबरोबर आमचे पटेनासे झाले. कारण त्याला कारणच तसे आहे. सुरवातीलाच आम्ही Google Map च्या साहाय्याने सांगितले सुद्धा, त्रंब्यक च्या पुढे १४ एवढे किमी. अंतर आहे ते आम्ही तुम्हाला Google Map वरून दाखवू व त्यांनां तेव्हा हे मान्य होते. त्रंब्यक च्या पुढे आल्यानंतर त्यांच्या बोलण्यातून आम्हाला जाणवलेले हे आत्ता नाटकं करणार म्हणून व शेवटी तेच झाले. कशापायी तुम्ही मला इथं आणलंत.. इथं वाघ येतो, सिंह येतो.. कशाला सकाळ सकाळी डोकं खराब करू लागल्यात.. इत्या. तरी मात्र सौरभ पाठीमागे Google Map लाऊनच बसलेला. पुढे काही अंतरावर म्हणजेच जव्हार मार्गाने जात असताना अंबोली च्या फाटका वर आम्ही उतरलो. परत त्याची तिथे रक्कम मागणी जास्त झाली. आम्ही शब्दाला शब्द न वाढवता ते सुद्धा दिले. असो.. हे सर्व होत राहतं त्यामुळे त्याचे काय जास्त मनाला वाटले नाही. प्रत्येक प्रवास हा वेगळाच असतो व माझ्यामते तो असावाच! थंडी इतकी होती खिशातून हात बाहेर यायायला मागत नव्हते. खिशातून फोन बाहेर काढायचा म्हटलं तर हात बाहेर यायला मागत नव्हते, पुढे एक गृहस्थ समोर आला व चहा साठी विचारू लागला, व्यवस्थित ताजेतवाने होण्यासाठी चहा शिवाय आम्हाला काय पर्याय नव्हता. म्हणून रस्त्या लगतंच असणाऱ्या त्याच्या घरी तो घेऊन गेला. चहा पिताच, चहाचे पैसे देऊ नका! असे सतत तो म्हणत होता पण इतक्या थंडीत आम्हाला चहासाठी समोरून येणारा व्यक्ती म्हणून त्याच्या मुलाच्या हातात काही रक्कम ठेवली. पुढे मार्गस्थ होत होत सौरभ च्या दृष्टिक्षेपास येणारे बरेच आडवे रस्ते, शेतातून निघणारे रस्ते याचा अंदाज घेऊन आम्ही सर केले. त्यामुळे वेळ थोडफार का होईना पण वाचला. अंबोली ते हर्षेवाडी १० किमी चे अंतर मस्त गप्पा मारत व निसर्गाचा आनंद घेत आम्ही हर्षेवाडी पर्यंत पोहोचलो हे आम्हाला कळले सुद्धा नाही. हर्षे वाडी लागताच पाऊण तास तरी तिथे आम्ही आराम केला व न्याहरी साठी तेथील असलेल्या घरगुती खानावळी मध्ये कांदापोह्यांची मागणी केलेली म्हणून ते खाऊन आम्ही गड चढण्याचा दिशेला मार्गस्थ झालो.

गडाच्या दिशेने मार्गस्थ होत असताना सुरवातीला नयनरम्य पाण्याचा बांध दिसला, गड चढत असतानाच निसर्गमय वातावरणाचा आस्वाद घेण्यास आम्हाला प्रचंड आनंद होत होता. एक तासाभरात आम्ही गडाच्या मुख्य प्रवेशद्वार जेथून स्पष्ट दिसून येतो अश्या ठिकाणी पोहोचलो व मनाला एक दिलखुलास आनंद तर मिळालेलाच. पण तेवढी थोडीफार शंका सुद्धा भासू लागली. हा गड आपण सर करू का नाही ते. पण एकदा ठरवले माथ्यापर्यंत जायायचे, का मग जायायचेच! वाटेत मिळणारे लिंबूपाणी व वैभव ने आणलेलं रियो हे ह्या सर्वाचा आनंद घेत आम्ही गडाच्या मुख्य दरवाज्याची सुरुवात जेथून होते तेथे पायथ्या लगतच आम्ही बसून पाहिले पायऱ्यांचे निरीक्षण केले ८० अंशातला थरार, पहिलं तेथे भेटलेल्या शेपूट वाल्या मित्रासोबत पाहून घेतला व एकदा मार्गी लागल्यानंतर पायऱ्यांवर पाय ठेवल्यानंतर काहीच वाटले नाही.

सौरभ ने घेतलेल्या सेल्फी मध्ये संपूर्ण समूह.

हर्षवाडी मध्ये भेटलेला कोकरू. 

,१२० मीटर उंचीचा हरिहर ओळखला जातो, ते येथील विशेष पायऱ्यांमुळेच. एक आधार म्हणून प्रत्येक पायरी मध्ये खोबण्या आहेत, त्यामुळे चढाई व उतरते वेळीस आधार नक्कीच मिळतो. माहितीनुसार हा हरिहर किल्ला अहमनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी १६३६ साली त्याचाच जवळपास असलेल्या त्रंब्यक गडासोबत तोही गड जिंकून घेतला. १८१८ मध्ये हा गड मराठ्यांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला. कातळात कोरलेल्या पायऱ्या, पुढे चालून गेल्यावर डावीकडून नजरेस पडणारी वाट हे सर्व अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. गडाच्या मुख्य द्वारामधून प्रवेश केल्यावर समोरच शेंदूर लावलेला गणपती नजरेस पडतो. तिथे थोडीफार बसण्यासाठी मोकळी जागा आहे. तिथे थोडा आराम वैगरे करून आम्ही पुढे निघताच एक डाव्या बाजूला निसर्गाच्या मोहात टाकणारं दृश्य नजरेस पडते व परत जरा पुढे आल्यावर पूर्णतः ८५ अंशातली चढाई व ती सुद्धा चढाई मध्येच वळण घेतलेली वाट आहे. तेथून दिसणारी खोल दरी म्हणजे पायऱ्यांच्या खोबणी मधील हात नाही काढून देत. हा असा थरारी प्रवास झाल्यावर पुढे सरताच हनुमानाचे मंदिर व विशेष म्हणजे हा हनुमान मिश्या असलेला आहे. शेजारीच उघड्यावर शिवलिंग व नंदी आहे.  समोरच तलाव आहे पण हे पाणी पिण्यायोग्य नाही. सभोवतालच्या परिसरात ७ जोडटाके नजरेस येतात. ह्यातील पाणी मी माझ्याकडे असलेल्या पिणाच्या बाटली मध्ये घेऊन टाळू थंड करण्यासाठी बाजूला जाऊन माझ्या टाळूवर स्वतःच ओतत राहिलो व एकदम थंडावा मिळू लागला. एवढं सर्व होऊन सुद्धा वैभव म्हणाला, चला अजुन समोर जाऊन येऊ अजुन एक शेवटचा टोक ५०-६० फुटांचा बाकी आहे. सर्व जण उन्हात थकलेले असल्यामुळे इतर कोण तयारही होत नव्हते. मग वैभव मला बोल ला चल शेखर आपण जाऊन येऊ. कदाचित त्याच्यामुळेच नी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचू शकलो. अन्यथा ते ठिकाण माझं राहून गेले असते आणि मनाला तेवढीच खंत वाटत राहिली असती की किल्ल्यावरील सर्वात उंच जागा राहून गेली. गडाच्या माथ्यावरुन समोरचे मोहवणारे दृश्य तेथून पूर्वेकडे असलेले त्रंब्यक डोंगररांग, दक्षिणेला वैतरणा तलावाच्या येथील उभे असलेले कावनाई व त्रिंगल वाडी किल्ल्यांचे डोंगर फार आकर्षित करून टाकतात तर उत्तरेला वाघेरा किल्ला दृष्टीक्षेपात येतो. येथून खाली उतरल्यावर घुमटाकार माथा असलेली दगडी कोठी नजरेस पडते. तेथून दिसणारा ब्रह्मा डोंगर फार सुंदर दिसतो. ह्या सर्वांचे दर्शन घेत तिथून परतीच्या मार्गावर येत असतानाच वाटेत आमच्या कडे नजर लाऊन बसलेले आमचे साथीदार भेटले व एक मज्जा म्हणून सर्व जण टाळ्या वाजवू लागले. आत्ता ही एक कल्पना कोणाची होती हे मला अजुन कळलेली नाही. पुढे उतरते वेळी फोटोसेशन व पाठीला आराम मिळावा म्हणून वाटेत आडवे सुद्धा झालो. त्यात अक्षय तर सावलीचा आधार घेत मनापासून मस्त झोप घेण्याचा प्रयत्न करत होता. कदाचित आरामाची खूप गरज असावी त्याला त्यावेळेला. पुढे पुन्हा खाली आल्यावर  खानावळी च्या ठिकाणी थोडे फ्रेश होऊन, आम्ही परतीच्या प्रवासासाठी चंदर म्हणून असणाऱ्या एका बोलेरो मालकाला फोन केला. ह्याचा संपर्क आम्ही खानावळी मधूनच घेतलेला. त्यांना सांगितले आम्हाला त्रंब्यक पर्यंत घेऊन चला, पुढे कसं काय मुंबई ला पोहोचायचे त्याचं गाडीत बसल्यावर विचार करू. शेवटी सरकारी गाड्यांचा आधार घेत आम्ही मुंबई मध्ये राहत्या घरी, रात्री ९ च्या आसपास पोहोचलो. अश्याप्रकारे हरिहर गड हा आमच्या साठी एक विशेष प्रवास अनुभव देणारा राहिला पण हरिहर गड मनाला खूप भावला.

गडावर असलेले मारुती रायाचे मंदिर

गडावरील तलाव व सोबतच शिवलिंग तसेच नंदीचे दर्शन.

              या हरिहर च्या प्रवासात एकमेकांना साथ देणारे सर्वच मित्र अफलातून होते व आहेत.
 
 हरिहरचे सौंदर्य ब्रिटिशांच्या अंगाने-

सन 1818 मध्ये त्र्यंबकगड उर्फ ब्रम्हगिरीला ब्रिटिशांनी वेढा दिला. तिव्र संघर्षाला सामोरे जावूनही ब्रिटिशांनी मराठ्यांचा पाडाव केला. त्र्यंबकगडाच्या अखत्यारित असणारे 17 किल्ले ब्रिटिशांच्या ताब्यात आले. हरिहर देखील त्यांपैकी एक. आजच्या बरोबर दोनशे वर्षांपुर्वी इंग्रज अधिकारी कॅप्टन जॉन ब्रिग्जने हरिहर किल्ल्याला भेट दिली त्यावेळेस त्याने याचं वर्णन लिहून ठेवलंय…

“Truly wonderful! ‘Words’ are not be able to give an idea of its dreadful steepness!!! It is perfectly straight for, I suppose 200 feet, and can only compared ladder over a height of this nature. The steps badly broken and holes were cut in the rock to support the hands. So difficult was the hill to climb that. I was satisfied that five men could hold it (Fort) against any odds”

महाराष्ट्रातील अनेक गड-किल्ल्यांवरून पुन्हा संघर्ष होऊ शकतो हे जाणून इंग्रजांनी अनेक किल्ल्यांवर जाणारे मार्ग आणि पायऱ्या दारूगोळ्यांनी उडवले आणि त्यांना न वापरते केले. परंतु हरिहरच्या या अनोख्या रचनेच्या ते मात्र प्रेमात पडले आणि त्याला आहे तसा ठेवला.

P1310573-a.jpg

आता आपण येणाऱ्या भाविक, हौशी लोक आणि पर्यटकांच्या होणाऱ्या गर्दीसाठी काय उपाययोजना कराव्यात याचा विचार केला पाहिजे.

पर्यटनाच्या अंगाने कुठल्या भागात एकावेळी किती पर्यटकांनी जावं याबाबत कुठलेही निर्बंध नाहीत. परंतु शासन-प्रशासनाच्या वतीने गर्दीचं नियंत्रण आणि नियमन करण्याच्या उपाययोजना अनेक स्थळांवर केलेल्या आढळतात. हरिहर हा वनविभागाच्या अखत्यारित येतो. त्यामुळे वनविभागाची काही उदाहरणं द्यायची झाली तर सिंहगडावर सोडली जाणारं प्रत्येक वाहन नोंद करून तसंच तपासणी करून वरच्या बाजूस सोडलं जातं. मद्यपान आणि मांसाहारास पूर्णतः बंदी आहे. संपूर्ण घाट मार्ग वन क्षेत्रातून जात असल्याने धुम्रपान करण्यास मनाई आहे जेणे करून वणवा पेटणार नाही. गडमाथ्यावरील खाद्यगृहांतही धुम्रपान केल्यास जागेवर दंडाची व्यवस्था दिसून येते. ठिकठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरेही बसविलेले आहेत. पर्यटकांच्या सोयीसाठी काही ठिकाणी प्रसाधनगृहांचीही निर्मिती करण्यात आलेली आहे.

दुसरं उदाहरण आपण वासोटा किल्ल्याचे बघू. बामणोली येथे पर्यटकांना वनविभागाच्या कार्यालयात परवानगी घ्यावी लागते. परवानगी असलेल्या पर्यटकांनाच बोटीत बसून वासोट्याच्या पायथ्याशी सोडले जाते. पायथ्याशी असलेल्या चौकीत वनकर्मचारी परवानगी तपासून वर जाण्यासाठी सोडतात. संध्याकाळच्या आंत पर्यटक, गिर्यारोहक आदिंनी परत यायचे असते. रात्री वासोटा किल्ल्यावर मुक्काम करण्यास बंदी आहे.

1. वरील दोन उदाहरणांच्या धर्तीवर हरिहर परिसरात वनविभागाने पर्यटकांसाठी छोटे कक्ष किंवा चौकी निर्माण करावे. हरिहरला येणारे लोक प्रामुख्याने हर्षेवाडीच्या घाटमार्गातून किंवा पायथ्याच्या निरगुडपाडा गावातून हरिहरच्या दिशेने पायी ट्रेक करण्यास सुरुवात करत असतात. या दोन ठिकाणांवर म्हणजेच हर्षवाडी आणि निरगुडपाडा येथे या चौकी असाव्यात. शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या संयुक्त वनव्यवस्थापन समिती मार्फत येथे स्थानिक लोकांना रोजगार देऊन नेमणूक करावी. या दोन चौकींपैकी कुठल्याही एकातून हरिहर किल्ल्यावर जाण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची शासकीय ओळखपत्राद्वारे नोंदणी करावी. या चौकी केंद्रांचे कामकाज चालण्यासाठी पर्यटकांकडून प्रवेशशुल्क तसेच वाहन पार्किंग शुल्क आकारण्यात यावे. त्याची रीतसर पावती पर्यटकाना देण्यात यावी.

2. पहिला टप्पा म्हणजेच डोंगरउताराचा माती आणि जंगलाचा भाग चढून गेल्यावर वेताळटेकडी पठारी भागावर एक वनचौकी असावी. ही वनचौकी अवघड पायरी मार्गाच्या दिशेने असावी. खालील केंद्रात नोंदणी केलेली पावती वरच्या चौकीत दाखविणे पर्यटकांना बंधनकारक असावे. ज्यांच्याकडे नोंदणी नाही ते पर्यटक पायरीमार्ग चढून गडमाथ्यावर जाऊ शकत नाहीत. परंतु असे पर्यटक पहिल्या टप्प्यातील पठार, वेताळटेकडी परिसर, आश्रम, पुष्करिणी या भागात फिरण्यास हरकत नसावी.

3. गर्दीच्या वेळी एकावेळेस किती जणांना पायऱ्यांवरून सोडावे तसेच उतरवावे याचा निर्णय चौकीतील वनकर्मचारी घेतील. ते पर्यटकांना बंधनकारक असेल. अन्यथा केलेल्या नोंदीवरून नियम न पाळणाऱ्या पर्यटकाना दंडात्मक कारवाई करावी.

4. एका दिवसात किती पर्यटक गडमाथ्यावर सोडावे याचा गिर्यारोहण क्षेत्रातील तज्ञांकडून अभ्यास करून संख्या ठरवावी. त्यानुसार खालील केंद्रातून तेवढ्याच पर्यटकांना वर जाण्यास परवानगी द्यावी.

5. राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये तसेच कास पठारासारखी संरक्षित ठिकाणी पर्यटकांना जाण्यासाठी ज्याप्रमाणे वेबसाईहून नोंदणी करण्याची सोय आहे तशी हरिहरच्या बाबतीत लवकरच तयार करावी. वेबसाईटहून होणाऱ्या नोंदीसाठी भेट देण्याच्या निदान 15 दिवस आधी होणे आवश्यक असल्याची अट असावी.

6. 20/30 च्या वरील संख्येने मोठा ग्रुप येत असल्यास त्यांनी अधिकृत/नोंदणीकृत गिर्यारोहण संस्थेमार्फतच बुकिंग करणे आवश्यक आहे. कारण, अशा ग्रुपला सांभाळणे, काळजी घेणे आणि शिस्तशीर ट्रेक करणे संस्थेमार्फतच सोयीचे होत असते.

7. अतिवृष्टी असलेल्या दिवसात हरिहर गडमाथ्यावर जाण्यासाठी पर्यटकांना नोंदणी देऊ नये. हा निर्णय सर्वतः पायथ्याच्या चौकी/केंद्रातील वनकर्मचारी घेतील. या दिवसात पायऱ्या मार्ग शेवाळलेला असतो. पायरी मार्गा वर पाणी वाहत असते. तसेच हरिहरचा माथ्याकडून खालील ३०० मीटरचा भाग हा दाट धुक्याखाली असल्याने दृष्यमानता (visibility) फार कमी असते. त्यात वरील वाटा चुकण्याची शक्यता अधिक असते.

8. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी असणाऱ्या ब्रह्मगिरी-हरिहर प्रदक्षिणा दिवसात ज्या भाविकांना वेताळटेकडीकडून गडमाथ्यावर जायचे आहे त्यांना वर जाण्यास मनाई नसावी.

9. खालील वनकेंद्र/चौकी पासून ते थेट गडमाथ्यापर्यंत महत्त्वाच्या ठिकाणांवर सूचना फलक असावेत. त्यावरील सूचना गिर्यारोहणातील तज्ञाकरवी मागवून तयार कराव्यात.

10. हरिहर गडमाथ्यावर रात्री मुक्कामास पूर्णतः बंदी असावी. वेताळटेकडी पठारावरील आश्रम बाजूस मुक्काम करण्यास हरकत नसावी.

11. निरगुडपाडा, हर्षवाडी परिसरातील ग्रामस्थ, आदिवासी बांधवांच्या घराघरातून मुक्कामाच्या व्यवस्थेसाठी (Home stay) प्रोत्साहन आणि प्रसिद्धी देण्यात यावी. त्यांना पर्यटकांच्या सेवेसाठी सोयी उपलब्ध करून देण्यात याव्यात.

12. साम्रद-सांधण दरी तसेच कळसूबाई परिसरात जसे झाले आहे तसे हरिहर परिसरातील स्थानिक तरुणांना गिर्यारोहणांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात यावे. शासनाकरवी अशा प्रशिक्षितांची नोंद करून त्यांना गिर्यारोहणाचे साहित्य उपलब्ध करून द्यावे. अशा प्रशिक्षित तरूणांनी अनुभव नसलेल्या पर्यटकांना मार्गदर्शन करून गाईडचे काम करावे. त्यातून त्यांना मिळकतीची सोय होऊ शकते. जेणे करून नवख्या पर्यटकांमुळे अपघाती परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता उरत नाही.

13. उभ्या पायरी मार्गावर शिडी/जीना/रेलिंग्ज लावणे हा पर्याय नाही. यामागे खालील कारणं आहेत

या नाळेच्या पायरीमार्गाचा विचार केला तर त्याचे सौंदर्य नष्ट न होता लोखंडी मार्ग बनविणे शक्य नाही.

त्यासाठी जागतीक पातळीवरील अशी कामं केलेले तज्ञ अभियंता, अभ्यासू स्थपति किंवा आव्हानात्मक बांधकामातील अभ्यासू लोकांची मदत घ्यावी लागू शकते.

आहे त्या मार्गावर हातांच्या पकडीसाठी खोबणी केलेल्या आहेत. त्यावर कुठल्याही मेखा किंवा रॉड बसविण्यासाठी केल्याजाणाऱ्या ड्रील मूळे आहे त्या रचनेला तडे पडणे, धक्के बसणे, छोटा टवका किंवा मोठा भाग कोसळण्याची (collaps) शक्यता अधिक आहे.

आता आहे त्या मार्गाचा असा कुठला मूळ रचनेचा भाग भंग पावला किंवा कोसळला तर तो कायमस्वरूपी ना दुरुस्त अवस्थेत जाऊ शकतो.

14. उभा पायरी मार्गावर गर्दी होत असल्याने धोकेदायक स्थिती वाटते. या खड्या मार्गावर एकावेळी वरून खाली किंवा खालून वर असा फक्त एकेरी वापर होत असतो. त्यामुळे याला पर्याय म्हणून हरिहर किल्ल्याच्या दुसऱ्या कातळभिंतीवरून शिडी/जीना/ट्रॉलीमार्ग किंवा रोप वे यांचा पर्याय करण्यास वाव आहे. त्यामुळे प्राचीन मार्गावरून माथ्यावर जाणे आणि आधुनिक मार्गाने खाली परतणे अशी यंत्रणा सोयीची होऊ शकते.

15. गडमाथ्यावर अति धोकेदायक ठिकाणी रेलिंग्ज लावावेत. परंतु संपूर्ण परिघाला रेलिंग्ज लावण्याची आवश्यकता नाही. कारण त्या रेलिंग्जचे निर्माण करताना खालील पायऱ्यांच्या रचनेला हादरे बसू शकतात. तडे आदी पडून ह्या अनोख्या रचनेचे कायम स्वरूपी नुकसान होऊ शकते.

16. हरिश्चंद्रगड येथील कोकणकडा, धोडपमाची आदी ठिकाणी तयार करण्यात आलेले रेलिंग्ज आज कोसळलेले आहेत. त्यातून नैसर्गिक खडक रचनेचे अतोनात नुकसान होते. हरिहर गडमाथ्यावर रेलिंग्ज करू नयेत. यातून काही वर्षात रेलिंग्ज सकट कातळाचा काही टप्पा कायमस्वरूपी ढासळण्याची शक्यता अधिक आहे.

17. अनेक गडकोटांवर पायथ्याच्या गावापासून ते किल्ल्याच्या पोटापर्यंत जाण्यासाठी डांबरी गाडी रस्ते तयार करण्यात आलेले आहेत. काही किल्ल्यांच्या थेट माथ्यावर वाहने जातात. हरिहर किल्ल्याच्या पठारापर्यंत गाडी रस्ता करण्याची माहिती गावकरी आणि वनविभागाशी संबंधित कर्मचारी कडून मिळाली. डांबरी गाडी रस्ता करण्याचे धोके खालीलप्रमाणे

– डोंगर उतारावरील वनं आणि वृक्ष मोठ्या प्रमाणावर कापावे लागतील.

– रस्त्यासाठी सुरुंग लावून स्फोट करावे लागणार. त्यामुळे हादऱ्यांनी वरच्या उभे कडे असलेल्या भागावरून दरड कोसळण्याची दाट शक्यता आहे.

– हादऱ्यांमुळे पायरी मार्गावरील प्रवेशद्वार कोसळून खाली पडण्याची शक्यता आहे. कारण ह्या प्रवेशद्वाराचे दगडी चीरे कुठलाही चुना आदी पदार्थ न भरता रचीव पद्धतीने द्वार तयार केलेले आहे.

– हातगड आदी किल्ल्यावर वनविभागाने जो गाडी रस्ता केला आहे त्यावर सतत दरड कोसळत असते आणि पर्यटकांना गाडी खाली लावून पायी जावं लागतं. यातून रस्ता बनविण्याचा मुळ उद्देश साधत नाही.

– ज्या अनोख्या पायरी मार्गाला जपण्यासाठी ही नियमावली आहे त्यात रस्ता बनविण्याची कार्यप्रणाली बाधक ठरेल.

– जर गाडी रस्ता झाला तर हरिहरच्या गडमाथ्यावर जाण्यासाठी गर्दीला रोखणे नियंत्रणाबाहेर होईल. हरिहरवरील गर्दी रोखणे हा सध्यस्थितित तरी शासनाचा प्रमुख हेतू आहे.

– वाहनांचे प्रदूषण, कचऱ्याचे प्रदूषण या प्रश्नांना मोठ्याप्रमाणावर सामोरं जावं लागणार आहे.

– परिसरातील वन्यजीवन आणि जैवविविधता धोक्यात येईल.

18. शासनाने विविध माध्यमातून मोठ्याप्रमाणावर लोकजागृती आणि लोकशिक्षण मोहिम राबविण्याची आवश्यकता आहे. त्यात गिर्यारोहण, आनंददायी पर्यटन, स्वयंशिस्त, सुरक्षित पर्यटन आदी बाबींचा सामावेश असेल. रेडियो, टी.व्ही., वर्तमानपत्र, फलक, पत्रके, विविध कार्यशाळा वगैरे अनेक माध्यमांचा यासाठी वापर केला जाऊ शकतो.

P1310500-a.jpg

हरिहर किल्ल्याची रचना अवघड आणि अजस्त्र भासत असली तरी आजपर्यंत हरिहर पायरी मार्ग तसेच गडमाथ्याहून पडल्याने अपघात झाला किंवा मृत्यू झाला अशी नोंद ऐकवत नाही. तरी सोशल मिडियामधून पायरी मार्गावर होणारी गर्दीची भीषण वास्तवता समोर येत आहे. त्यामुळे जलदीने उपाययोजना आवश्यक आहेत. यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी, वनाधिकारी, पुरातत्त्व अधिकारी, दुर्ग अभ्यासक, तज्ञमंडळी, गिर्यारोहण क्षेत्रात रेस्क्यू करणारी टीम, काही तज्ञ गिर्यारोहक यांनी संयुक्त हरिहर किल्ल्याला भेट द्यावी. यातून स्थानिक लोकांच्याही सूचना महत्त्वाच्या असतील. शासकिय कार्यालयात होणाऱ्या किल्ल्यासंदर्भातील प्रत्येक बैठकीत महाराष्ट्र शासनाने गठित केलेल्या गड-किल्ले संवर्धन समितीतील सदस्यांना पाचारण करण्यात यावे.

धन्यवाद.

हरिहर गड - वास्तुस्थापत्याचे सौंदर्य

     नाशिक !!! किल्यांचा प्रदेश ...  नाशिक जिल्यात एवढे किल्ले तर नक्कीच आहेत कि आपण संपूर्ण किल्ले फिरायचे म्हंटले तर दर वीकएंड ला एक ट्रेक केला  तरी एक महिना आपणाला पुरणात नाही आणि नाशिक जिल्ह्यतील सर्वच किल्ले म्हणजे बुलंद , अवघड या श्रेणी मध्ये मोडणारे, किल्ला सर करायचं म्हंटल कि २ ते ३ तासांची तांगडतोड करावी लागणारच . बरेच दिवस ऑफिस आणि PC च्या जगात घालवल्यावर आता ओढ होती सह्यद्रीची बऱ्याच दिवसापासून हरिहर या किल्यावर जाण्याची इच्छा होती काही कारणास्तव जाणे होत नव्हतं .शेवटी योग  आला ऑफिस वरून शिफ्ट नंतर बॅगा भरून रात्री ११.५० ची कसाऱ्याला जाणारी लोकल पकडली आणि मोहिमेची सुरवात झाली , यावेळी बरेच रोजचे साथीदार नव्हते.  लहू ,तन्मय आणि मी रोजचे आणि विजय , सचिन , हॅरी आणि आशिष हे नवीन चार जण मिळून आम्ही ७ जण होतो . कसाऱ्याला १.५० चा दरम्यान पोहचलो कसाऱ्या वरून मी आधीच हरिहर ला जाणयासाठी  गाडी बुक केली होती .

सकाळच्या मंद प्रकाशात दिसणारा हरिहरगड
रात्री २ वाजता हरिहर गडाच्या पायथ्यला असलेल्या निरगुनपाडाया   गावाच्या दिशेने प्रवास सुरु झाला .५० किलोमीटरचा हा प्रवास होता . मध्ये एका हॉटेल मध्ये थांबून एक फक्कड चहा झाला आणि पुन्हा प्रवास चालू झाला .  निरगुनपाडा गावाच्या जवळ जवळ पोहचलो आणि रांगडा गड रात्रीच्या चांदण्यांच्या प्रकाशात दिसू लागला. गावात बरीच ट्रेकर मंडळी आली होती. 

 गावात पोहचल्यावर गावात जेवणाची आणि नाश्त्याची सोय करायची होती .  गावात पोहचून गाडीवाल्या ओळखीच्या एका दादांना जेवणाची आणि नाश्त्याची सोय केली आणि मग सर्वचजण रस्त्यावरच बसून गप्पा मारू लागले , मोकळ्या आभाळाकडे बघत चांदण्या न्हाहळत  गप्पा मारण्याचा अनुभव काही औरच होता. गप्पा मारत मारत सकाळचे ५ कधी वाजले समजलंच नाही . गावातल्या दादांकडे पोहे आणि चहा चा नाश्ता करून आम्ही किल्याचा दिशेने प्रवास सुरु केला . 

किल्याचा उजवीकडे चालत राहा असा सांगणारा दिशादर्शक 
डांबरी रस्ता  ओलांडून शेताच्या मळ्यातून रस्ता किल्याकडे जातो .साधारण हा दोन ते तीन तासाचा सोपी श्रेणीचा ट्रेक आहे पण , ८० डिग्री असलेल्या कातळात कोरलेल्या पायऱ्या मुळे हा गड मध्यम  श्रेणी मध्ये मोडतो. प्रवास सुरु झाला आणि किल्याचा डाव्या बाजूला जायला आम्ही सुरवात केली पण  , गावातले एक आजोबा भेटले आणि त्यानी सांगितलं कि तुम्ही वाट चुकलायत , डाव्या बाजूने नका जाऊ उजव्या बाजूने जा तेव्हा तुम्ही मुख्य पठारावर पोहचाल. किल्याकडे जाताना नेहमी उजव्या बाजूने चालत जावे. सुरवातीला झाडा झुडपात जाणारी सोपी वाट आता अवघड होतचाली होती .एक ट्रेकर ग्रुप वाट चुकून एका उंच कातळ मध्यावर अडकले होते त्याना आवाज देऊन मुख्य  वाटेस  मागे येण्यास सांगितले आणि आमचा प्रवास सुरु केला .मे महिना असल्यामुळे वाटे मध्ये करवंद आणि आंबे हा गावरान मेवा मानस्तोक्त खात खात प्रवास चालू होता .
कातळामध्ये कोरलेल्या सुंदर पायऱ्या 
गावापासून बराच लांबचा टप्पा पार केला आणि सहयाद्री ची अजस्त्र रांग दिसू लागली ..दीड  तासा मध्ये आम्ही मुख्य पठारावर पोहचलो .पठारावरून आपणाला आपल्या उजव्या बाजूस फणी हा एक नागाच्या फण्यासारखी सुळका असलेला डोंगर दिसतो आणि त्याचा बाजूस भास्करगड दिसतो  .बराच वेळ आराम आणि फोटो काडून  झाल्यावर मुख्य दगडी पायऱ्याकडे जाणारी वाट पकडली .  हि वाट अवघड आहे ,उन्हा मुळे माती निसरडी झालेली त्यामुळे  पाय अगदी जपूनच टाकावा लागत होता.
सरळ पायऱ्या 
थोड्याच वेळात आम्ही हरिहरच खास वैशिष्ट्य असलेल्या कातळपायऱ्याच्या जवळ पोहचलो.कितीवेळ तरी एकटक त्या पायऱ्यांकडे  फक्त बघतच रहावं असं सौन्दर्य या पायऱ्यांच आहे. बराच वेळ इथे पायऱ्यांचा  पायथ्याशी घालवल्यावर एक एक करून आम्ही चढाईला सुरवात केली. एका वेळी एकच जण वरती जाईल एवडीचं वाट आहे .प्रत्येक पायरी मध्ये केलेल्या खोबणी मुळे चढाई सुखरूप होते . सावधगिरीने चढाई केली कि आपणाला दोन बुरुजांमध्ये असलेला महादरवाजा लागतो .भगवा शेंदूर फासलेला महादरवाजा पार झाला कि गणेशाची सुंदर कोरीव मूर्ती कातळात कोरलेला आहे. इथून पुढे जाणारा मार्ग म्हणजे अचंबित करून सोडणार आहे ,दगडी कातळामध्ये कोरलेला अर्ध वर्तुळकाळ भुयारी मार्ग म्हणजे आश्चर्यच ! इथून आपणाला भास्करगड , फणी डोंगर दिसतो.  पुढे चालत गेलो कि परत आपणाला ६० ते ७० वरती जाणाऱ्या एकेरी पायऱ्या लागतात .हरिहर गड म्हणजे वास्तू स्थापत्याचा अप्रतिम नमुना एक आश्चर्य संपलं कि पुढे एक आश्चर्य पुढे आहेच ... आम्ही सर्वानी सावधगिरीने कातळातमधील  हा मार्ग पार करून .दुसऱ्या भग्न दरवाजातून आम्ही  मुख्य पठारावर येऊन पोहचलो. 
ब्रह्मगिरी पर्वत रांग 
किल्यावर जास्त काही अवशेष शिल्लक नाही आहेत . आपणाला पूर्वेकडे लहानसा तलाव लागतो  .काठावरच हनुमानाची शेंदूर फसलेली सुंदर मूर्ती एका छोट्याशा मंदिरात विराजमान आहे .  त्याचाच बाजूला महादेवाची पिंड आणि नंदी च दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो . वाटेत आम्हला वाड्याचे काही अवशेष दिसले ते पाहत आम्ही पुढे गेलो . तसच पूर्वेकडे चालत गेलो कि आपणाला लागते सुस्थितीत असलेली एक खोली लागते.  या खोलीचा वापर पूर्वी दारुगोळा साठा ठेवण्यासाठी किंवा धान्यसाठा ठेवण्यासाठी होत असावा . गडावर राहायचं म्हंटल तर या इमारतीमध्य १० ते १५ जणांची राहण्यासाठी सोय होऊ  शकते . ऊन बरंच वाढलं होत खोलीच्या सावली मध्य बराच वेळ बसून गप्पा मारल्यानंतर आम्ही पुढे किल्यावरच्या सर्वात उंच ठिकाणी निघालो . गडाच्या या टेकडीवर चढताना मात्र रॉक पॅचिंगच थ्रिल अनुभवायला आपणाला मिळालं . वरती चढताना मात्र सर्वांचीच दमछाक झाली. टेकडीवरचा उंच भगवा फडकताना पहिला कि मराठ्यांचा इतिहासाची आठवण होते आणि अंगात वेगळाच उत्साह संचारतो .सर्वजण वरती चढले  आणि सर्वानी महाराजांच्या नावाचा गजर  करत एकच जल्लोष केला. आमचा रोजचा विडिओ सेल्फी घेऊन झाला .
वरून आपणाला उत्तरेला दिसते  ब्रह्म गिरी पर्वत रांग , दक्षिणेकडे वैतरणा नदीचं खोर फार मनमोहक दिसत , शेजारी भास्करगड आणि फणी डोंगर दिसतो. आम्ही  चढाईला फारच उशीर केल्यामुळे खूप जास्त वेळ झाला होता मग , उतरताना पटापट उतरायचं ठरलं. उतरताना सुद्धा ८०डिग्री पायऱ्यांमुळे  हरिहरचा ट्रेकचा  थ्रिल अनुभवायला मिळतो . उतरताना मात्र आम्ही रस्ता चुकलो आणि थोड्याच वेळात परत  मुख्य वाटेवर आलो आणि १ ते १. ३० तासामध्ये गावात पोहचलो . गावा मध्य जेवण तयारच होत ,मग जेवण करून परतीच्या प्रवासाला निघालो. कातळातील पायऱ्यामुळे उतरतानाही ट्रेकच  भन्नाट थ्रील देणारा हरिहरचा  ट्रेक चिरस्मरणीय ठरतो .
किल्याचा इतिहास - हरिहर उर्फ हर्षगड हा प्राचीन काळात बांधलेला असून तो अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी १६३६ साली निजामशाहीची पुनर्स्थापना करतेवेळी त्र्यंबकगडासोबत हा किल्ला सुद्धा जिकला. 
किल्ला हरिहर - हर्षगडतालुका त्रिंबकेश्वर जिल्हा नाशिकउंची - ११२० मीटरचढाई श्रेणी - मध्यमयोग्य कालावधी - सपेंबर ते फेब्रुवारी ( भर पावसात हा ट्रेक करू नये )हरिहर गड ला कसे जाल - मध्य रेल्वेने कसारा या स्टेशन पर्यंत पोहचावे .
तिथून आपणाला बस किंवा खाजगी वाहनाने निर्गूणपाडा या गाव मध्य जाऊ शकतो
खाजगी वाहन आधीच बुक करण्यासाठी
प्रकाश - ९८२३९८६२३३   ( private  गाडी साठी यांना संपर्क करा )
 
आपल्या महाराष्ट्राला खरोखर एक भौगोलिक वारसा लाभला आहे तो म्हणजे एक सह्याद्री
तर दुसरा कळसूबाई पर्वत रांग...!! दोन्ही डोंगररांगा तेवढ्याच भयानक, कातळ कड्यानी अजस्त्र रूप धारण केलेल्या, सह्याद्रीला भर म्हणून घनदाट झाडी आहे त्यामुळे सह्याद्रीमधले किल्ले आदिकच सुरक्षित झाले तर याऊलट नाशिक जवळील पर्वतरांगांमध्ये (कळसुबाई) जंगल तुलनेने कमी असले तरी इथले किल्ल्यांचे काळे कातळ लांबून जरी पहिले तरी शत्रूला कापरे भरले पाहिजेत असे एकदम अजस्त्र, भयानक व राकट रूप आहे इथल्या किल्ल्यांचे, काळे कुळकुळीत तासून तयार केल्यासारखेच जणू. इथले बहुतांशी किल्ले हे दगडातच घडवलेले गेले असल्यामुळे शिवकालीन कारागिरांचा व त्या कारागिरांच्या प्रयत्नाला शिवविचारांचा जोड साधला गेल्यामुळे  दुर्गबांधनी कशी असावी हे पाहण्यासाठी नाशिक जिल्हा एकदा भटकूनच पहा.....
भरपूर दिवसापासून किल्ले हरिहर ला भेट देण्याचा बेत केला होता परंतु तो काय लवकर झालाच नाही पण काल मात्र गडाला भेटून मनाची शांतता करून घेतली. नाशिक जिल्हयातील किल्ले तसे दुर्गभटक्यांसाठी एक आव्हानच आहे कारण इथला प्रत्येक किल्ला नैसर्गिकरित्या अगोदरच भीषण रौद्र रूप घेऊन जन्माला आला व त्यावर नंतर राजेमहाराजानी त्यावर तटबंदी घालून मुकूटरुपी जणू साजच चढविला. सकाळी लवकर उठून गाडीवरून नाशिक गाठले, नाशिकमधून हायवेने इगतपुरीला गेलो थोडा रस्ता चुकला त्यामुळे खूप धांदल झाली कारण इथल्या लोकांना हरिहर किल्लाच माहित नाही हि शोकांतिका. इगतपुरीहून त्र्यंबकेश्वर रोड ला निरगुडपाडा या खेडेगावला जाण्यासाठी फाटा लागतो, आसपासचे भीषण डोंगररांगा बगत आमची गाडी रस्ता कापत होती, वास्तविकता हा संपूर्ण भाग आदिवासी म्हणून प्रचिलीतला जातो, येतील लोकांचे राहणीमान, बोलणे हे सर्व अनुभवत आम्ही गडाच्या पायथ्याशी असलेल्या निरगुडपाडा या गावी पोचलो. गाडी गावातील एका जुन्या शाळेत लावून गडाची पायवाट धरली, लांबूनच गडाचा घेरा जाणून घेत गडावर कधी पोचेन याची उत्कंठा लागली होती. उन्हाचा वरून तडाखा चालूच होता पण त्याकडे लक्षच नव्हते. गायरानातील लोकांना रस्ता विचारत गडाकडे चालते राहलो, जसजस गड जवळ येईल तसतसा गडाचा दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या व दरवाजा लांबूनच दिसू लागला आता तर उत्कंठा आणखी शिगेला पोचली. एव्हाना आम्ही दोन डोंगर सर करून बालेकिल्याच्या पायथ्याशी आलो मात्र पायामध्ये कसलाच त्राण उरला नव्हता एवढे भयंकर ऊन व त्याचा चालताना होणारा त्रास.... पण हे सर्व एकाच गोष्टीपुढे विरळ व्हायचे ते म्हणजे शिगेची उत्कंठा..!!
🛡🗡🛡🗡🛡🗡🛡🗡🛡🗡🛡
गडाच्या काळ्या कातळात खोदलेल्या 60° अँगल च्या पायऱ्या व पायऱ्या चढताना काळजी घेण्यासाठी पायऱ्याच्या बाजूला तयार केलेल्या खोबण्या हे काम खरच पाहण्यासारखं आहे, पायऱ्या छोटया असल्यामुळे योग्य ती काळजी घ्यावी लागते अन्यथा जीवाशी मुकु शकतो कारण खाली दरी आहे व इथे माती कमी पण दगडच जास्त आहेत. पायऱ्या चालून वर गेल्यावर गडाच्या पहिल्या दरवाजापाशी आपण पोचतो, गडावर यायचा हा एकमेव मार्ग आहे. दरवाजा नीट न्याहाळून आपण पुढे जावे कातळकडा कोरून वाकून जाण्यासाठी 5 फुटी चीर तयार केली आहे इथून जाताना योग्य काळजी घ्यावी कारण खाली सरळ कडा आहे व वारे तर भन्नाट वाहत असते. यातून थोडे पुढे गेल्यावर सरळ खडा डोंगर फोडून आतमध्ये गुहेसारखा रस्ता केला आहे.... भयग्रस्त व थरारक मार्ग. यातून आपण सावरत वर गडाच्या मुख्य दरवाजाजवळ पोचतो. दरवाजातून पुढे डाव्या बाजूने पठारावर चालते राहावे, प्रथम डाव्या बाजूला कड्यामध्ये 2 पाण्याची टाके कोरलेली आहेत ज्यात सध्या पाणी नाही व तिथे पोचता पण येत नाही, येथून पुढे गेल्यावर 3 पाण्याची मोठी टाके दिसतील पण यातील पाणी पिण्यायोग्य नाहीये , या टाक्यापासून पुढे गेल्यावर आपण गडावरील मुख्य तलावाजवळ पोचतो. याच्या समोर मारुतीची मूर्ती असून दगडी चौथर्यातून तलावात जाण्यासाठी पायऱ्या आहेत, हनुमान मंदिराच्या मागील बाजूस उघड्यावर शंकराचे शिवलिंग आहे. तलावात सध्या पाणी नाहीये. तलावापासून पुढे गडाच्या अंतिम टोकाकडे चालते व्हावे तिथे आपल्याला दारूगोळा कोठार दिसते व त्याच्या बाजूस 3 पाण्याची टाके कोरलेली दिसतील. गडावर याव्यतिरिक्त पडझड झालेल्या वाड्यांचे अवशेष व पाण्याची टाकेच जास्त पाहायला मिळतील. गडावर एक मुद्दा खूप अनुभवायला मिळाला ते म्हणजे दुर्गबांधणी करताना केला गेलेला दगडांचा अभ्यास, पाण्याची जमिनीत मुरून प्रवाह कोणत्या दिशेने होईल त्याजागी कपार्यामध्ये खोदलेले पाण्याचे टाके खरोखर विलक्षण म्हणावे लागेल.
दुर्ग भटक्यानी हा किल्ला एकदा पाहूनच या.
🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
शब्दांकन-
✒ मनोज शिवाजीराव महाडिक
🎪..स्वराज्य योद्धा प्रतिष्ठान..🎪
🚩⚔9890354353,  9156571313 ⚔🚩

हरिहर शिलालेख

हरिहर शिलालेख
तो भीषण आहे.तो रौद्र आहे.तो सुंदर आहे.तो कधी कुणा समोर व्यक्त होत नाही. प्रयत्न केला तरी तो ताकास तुर लागु देत नाही. यामुळेच त्र्यंबकेश्वर रांगेतला हरीहर कील्ला इतीहासातली एक गुढरम्य कथा बनला आहे. आज मात्र तो थोडा मेहेरबान झाला. त्याच्या जुन्या शीलालेखाचे गुपीत  उलगडले आणी हरीहराच्या इतीहासातले एक मानाचे पान नजरेस पडले.
हरीहरचा शीलालेख म्हणजे
, इतीहासाच्या पुस्तकातले एक खुले पान
. उन वारा पाऊस सोसत तो आव्हान देत होता
,‘माझ्या अंतरंगात या
...कील्ला डोळे भरुन पाहा
...लेखातल्या अक्षराची कुट भाषा जाणा
’. आपण मात्र त्याला शेंदुर फासुन अत्यंत मोलाची माहीती झाकोळुन टाकत होतो
.गेली अनेक वर्षे शेंदराचा थरावर थर साठत होते
. कोणा भल्या माणसाला हे थर काढण्याची बुद्धी झाली
. त्याने त्याच्या परीने
. तो काढण्याचा प्रयत्न केला
. पण मग कोणी तरी त्यास चक्क ओईलपेंटने रंगवले
.पीढी दर पीढी या शीलालेखाची अक्षरे झीजु लागली
. त्यातील काही तर क्षतीग्रस्त झाली
.
मागच्या पंधरवड्यात म्हणजे २०२० सालच्या मार्च महीन्याच्या पहील्या सप्ताहात त्र्यंबकेश्वर मंदीरातील दोन क्षतीग्रस्त संस्कृत शीलालेखांचे वाचन जुन्या ग्रंथातुन शोधुन त्यांचे मराठीत भाषांतर करण्यात त्रींबकचे राजेश दीक्षीत यांना यश आले होते
. त्याने हुरुप वाढला होता
.आता हरीहर कील्ल्याच्या शीलालेखाची माहीती मीळवावी असे मनात आले
. त्यावरुन
,या शीलालेखाचे वाचन कोणत्या पुस्तकात उपलब्ध आहे
,याचा शोध सुरु झाला
. सर्वात प्रथम मुंबईचे प्रसीद्ध ब्लॉगर तथा सतीशीळा
, वीरगळ
, गद्देगळाचे अभ्यासक पंकज समेळ यांच्या महाराष्ट्र देशा या ब्लॉगमध्ये
, हरीहर शीलालेख भागश
:वाचायला मीळाला
. पुण्यातील संशोधक महेश तेंडुलकर यांनी
,मराठी
- संस्कृत शीलालेखाच्या वीश्वात या ६८८ पानी पुस्तकात या शीलालेखाचे
,त्यांना जेवढे शब्द वाचता आले तीतकेच त्यांनीनमुद केले होते
.
हरीहर पुष्कर्णी
हरीहर कील्ल्याच्या उत्तर माचीवर भल्या मोठ्या पुष्कर्णीवरचा हा शीलालेख फार अगोदर पासुन बघण्याचा योग यायचा तो श्रावणातल्या ४० मैल अंतराच्या ब्रम्हगीरी
-हरीहर प्रदक्षीणेच्या नीमीत्ताने
. आमची जुने नासीक भागातली मंडळी ही प्रदक्षीणा नीत्य नीयमाने करत असु
.अनेक वर्षे हा खटाटोप चालला
. जुन्या काळात कोणी तरी दगडात कोरलेली काही अक्षरे इतकेच आमच्या ठायी त्याचे महत्व होते
. सुबक दगडात घडवीलेल्या या पुष्कर्णीवर गणपतीचे एक पुर्वाभीमुख शील्प कारले आहे
.त्यावरुन त्यास गणेश कुंड संबोधले जायचे
. त्रींबकची मंडळी यास हरीहरवरचे कुशावर्त संबोधत. त्र्यंबकेश्वर पासुन पावसात भीजत
,इथवर अनवाणी चालत आल्यानंत या पुष्कर्णीत पोहण्याची फार मजा यायची
. सगळा शीण नीघुन जायचा
. शेंदुर फासल्यामुळे शीलालेखावरची अक्षरे स्पष्टपणे वाचता येत नसायची
. ती काळजीपुर्वक वाचण्याचा कधी प्रयत्न केला नव्हता
.
शीलालेखाचे वाचन करतानाराजेश दीक्षीत
घरात पीढीजात संस्कृत अध्ययनाची
.परंपरा
. आजोबांकडुन शीकलेले ज्योतीष व गणीत
. त्र्यंबकेश्वर परीसराच्या इतीहसाबद्दलची आस्था
. धार्मीक व ऐतीहासीक वीषयांवरील पुस्तके
, लेख
,चर्चासत्र आदींत नीयमीत सहभाग या गोष्टींमुळे मीत्रवर्य राजेश दीक्षीतने  हरीहर शीलालेख वाचनाचे शीवधनुष्य पेलण्याची तयारी दर्शवीली
.शीलालेखावरचा शेंदुर काढल्या नंतर अक्षरांचा उठाव अधीक स्पष्ट झाला होता
.छायाचीत्रातुन मात्र तो स्पष्ट होत नव्हता
. मग प्रत्यक्षात शीलालेख बघण्याची छोटेखानी मोहीम हाती घेतली
.लागोलाग हरीहर कील्ल्याला भेट दीली
. वरच्या भागात इतीहासाचा अभ्यास करण्याजागे काय काय सापडते याचा आढावा घेतला
. परतताना उशीर झाला
. सुर्य मावळतीला गेल्याने पुरेशा उजेडात शीलालेखाचे अवलोकन करण्याची पुरेशीसंधी मीळु शकली नाही
.मग दोन दीवसांनी फक्त शीलालेख बघण्याचा बेत आखला
. काही अक्षरे अजीबत लागत नव्हती
.काही अक्षरे ओईल पेंटच्या रंगमुळे अस्पष्ट झाली तर उजव्या बाजुची काही क्षतीग्रस्त झाल्याचे जाणवले
. शीलालेख कुंडातल्या पाण्याने स्वच्छ धुवुन अक्षरांची वरची बाजु कोळशाने गीरवीली
.त्यामुळे अक्षरांचे वळण कळण्यास मदत झाली
. मग त्याची छायाचीत्रे घेतली
. नंतर शीलालेख चुलीतल्या राखेने धुवुन ओल्या वीटेच्या रंगाने अक्षरे गीरवुन पाहीली
. ही छायाचीत्रे वेगवेगळ्या कोनातुन घेतली
.अगोदर वाचन करताना अडचण जाणवणारी अक्षरे हाताने चाचपुन ओळखण्याचा प्रयत्न केला
. त्याची टीपणे तयार केली
.
देखणी अक्षरे व सुंदरनक्षीचा हरीहर शीलालेख
घरी परतल्यानंतर छायाचीत्रांचे आवलोकन केले तेव्हा शक
,संवत्सर वाचता आले
. दुसऱ्या ओळीतली श्री गणेशायनम
:हे अक्षर पटकन वाचता येते
. अभ्यासकांनी ते वाचले आहे
.त्यापुढची चार अक्षरे लागत नव्हती
. पाचव्या ओळीत शेवटच्या भागात पनामा हा शब्द वाचता येत होता
.हा पनामा काय असेल याचा बोध होत नव्हता
. सहाव्या ओळीत हरीहर वीलसद्देवता ही अक्षरे लागतात
,पण शेवटचे अक्षर लागत नव्हते
. त्या खालचे अक्षरही लागत नव्हते
. शंकरात्म सुत श्रीमन्नारायण ही अक्षरे स्पष्टपणे वाचता आली
. शक संवत्सर कळाले होते
, त्यावरुन शंकराचा मुलगा नारायण
...नारायण शंकर
...या शब्दावरुन सरदार नारोशंकर यांच्याकडे संकेत जात होते
.
नाशीकचे नारोशंकर मंदीर प्रसीद्ध आहे
. मालेगावचा राजेबहाद्दुरांचा कील्ला प्रसीद्ध आहे
. आता नारोशंकर यांच्या बद्दलची माहीती जाणुन घेण्याची जीज्ञासा नीर्माण झाली
. सुदैवाने राजेशचा स्वत
:चा पुस्तकांचा मोठा संग्रह आहे
.या कामी त्याचा मोठा उपयोग झाला. पेशवाईतला हा अव्वल दर्जाचा सरदार होता
. यांचे उल्लेख ठीकठीकाणी वाचायला मीळाले
.पेशवे घराण्याचा इतीहास
- लेखक प्रमोद ओक
, पेशव्यांची बखर
- संपादक काशीनाथ नारायण साने
, बखर संस्थानची
- सुनीत पोतनीस
, मराठ्यांचा इतीहास
- संपादक अ
. रा
.कुलकर्णी
- ग
. ह
.खरे
, सातारचे श्रीमंत छत्रपती शीवाजी महाराज यांचे वंशज व प्रतीनीधी आणी अष्टप्रधान यांचा इतीहास
- वीष्णु गोपाळ भीडे
,दक्षीणेतील सरदारांच्या कैफीयती
- पुरुषोत्तम वीश्राम मावजी व डी
.बी
. पारसनीस अशा काही पुस्तकातुन नारोशंकर यांचे अनेक उल्लेख वाचायला मीळाले
. एका सरदार घराण्याकडुन
, राजेबहाद्दर हे मुळचे सासवडचे दाणी असल्याची महत्वपुर्ण माहीती मीळाली
. त्यामुळे पनामा शब्दाला जोडुन असेले अक्षर दाण्युपनामा असल्याचा उलगडा झाला
.
उठावाची अक्षरे
एकीकडे राजेशची एक एक अक्षराची संगती लावण्याचा प्रयत्न सुरु असताना
. हरीहर कील्ल्याची माहीती घेण्यासाठी पुस्तके
,ब्लॉग्ज धुंडाळण्याची लगबग सुरु झाली
. महत्वाच्या ऐतीहासीक ग्रंथात हरीहरवर दहा पाच ओळींचे परीच्छेद शोधणे म्हणजे दुरापास्त गोष्ट
. आज हरीहर कील्ल्याचे राकट रुप बघीते की प्रश्नांचा कोंडावळा उठतो
: हरीहर कील्ला कोणी बांधला
? ‘त्याच्या भीषण कड्याला अमुर्त पायऱ्या बांधल्या जाऊ शकतात
’,असे अचाट स्वप्न कोणी रंगवले आणी मग ते प्रत्यक्षात साकार केले
? ते कोण बेलदार होते जे एखाद्या योद्द्या प्रमाणे कड्याला लटकुन शेकडो टनाचा दगड फोडत राहीले
? एखाद्या डोंगराला इतक्या सुंदर पायऱ्या घडवील्या तरी जाऊ शकतात का
? हा समज सत्यात उतरवीणारी ती राजवट होती कोणाची
?
हरीहर म्हटले की त्याचा ब्रम्हगीरीशी येणारा संबंध अटळ आहे. या दोन्ही कील्ल्यात अनेक बाबतीत साम्य आहे
. दोन्हीही डोंगर बेलाग
. त्यावर प्राचीन काळात बलदंड आणी देखण्या स्वरुपाचे कातळ कोरीव बांधकाम करुन अजोड कील्ले बांधण्यात आले
. दोन्ही कील्ल्यांचे कर्ते अज्ञात आहेत
.पौराणीक साहीत्यानुसार त्रींबक हे त्रीसंध्या क्षेत्र होते
. जगात काहीच नव्हते त्यावेळी ब्रम्हा आणी वीष्णु यांनी सृष्टीच्या आदी आणी अंताचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला
. ब्रम्हाने आदीचा म्हणजे मस्तकाचा शोध घेतला तर वीष्णुने अंताचा म्हणजे पायाचा
.पुर्ण रुपाचे ज्ञान मात्र दोघांनाही झाले नाही
. आपणच नीर्माण केलेल्या सृष्टीचा शोध न लागल्याने ब्रम्हाला कमीपणा वाटला
.त्याने गायीची साक्ष ठेवुन खोटेच सांगीतले
, त्याला मस्तक सापडले
. त्यावर केतकीचे फुल होते
.या खोटेपणाचा राग येऊन भगवान शंकरांनी
,तु पृथ्वीवर अपुज्य होशील असा शाप दीला
. ब्रम्हदेवानेही रागाने
,तु पर्वत होशील असा शाप दीला
.तोच ब्रम्हगीरी पर्वत प्रत्यक्ष शीवशंकर डोंगर बनुन पृथ्वीवर स्थापीत झाला
. ब्रम्हाला दीलेला शाप त्यांच्या भोळ्या रुपास बघवला नाही व त्यांने
, हा पर्वत ब्रम्हगीरी म्हणुन ओळखला जाईल असा वर दीला
, अशी ही पद्मपुराणातील कथा
. या कथेनुसार वीष्णु हरीहर रुपात डोंगर बनुन प्रकटले
,तर इंद्र अंजनेरी पर्वताच्या रुपाने
. त्यांच्या जोडीला आसपास वेगवेगळे पर्वत देवी देवताच्या रुपाने प्रकटले
.
हरीहराचे सोपान - सह्याद्रीचेदीव्य स्वप्न
वीज्ञानाच्या अंगाने या कथेची जोड पृथ्वीवर सह्याद्रीची डोंगररांग नीर्माण झाली त्याच्याशी जोडली जाऊ शकते
.शास्त्रज्ञांनी या डोंगरांगेचा काळ साडे तीन कोटी वर्षांपुर्वीचा नीश्चीत केला आहे
. ७० टक्के पाणी व ३० टक्के भुभाग असे स्वरुप असलेल्या पृथ्वीवर सगळी जमीन ही अस्थीर म्हणजे तरंगती आहे व या जमीनीचा प्रवास अखंडपणे सुरु आहे
. साडे सात कोटी वर्षांपुर्वी ओस्ट्रेलीया खंड हा युरेशीया कडे तरंगत तरंगत एकमेकांच्या जवळ कुर्मगतीने सरकत राहीले गोंडवाना काळात ते एकमेकांना भीडले
. या महाटक्करीतुन पृथ्वीच्या गाभ्यात असलेला तप्त अग्नीरस जमीनीचे बंध झुगारुन उफाळुन आला
. त्यातुन पृथ्वीवरची सगळ्यात जुनी डोंगररांग सह्याद्रीच्या रुपाने नीर्माण झाली
.स्कंद पुराणाच्या सह्याद्री खंडा नुसार सह्याद्री डोंगररांगेचे उत्पत्ती स्थान ब्रम्हगीरी पर्वत आहे
. पुराणांच्या रचनकारांना याचे ज्ञान कसे झाले असावे हे देखील एक कोडेच आहे
. कदाचीत अग्नीरस त्रीसध्या क्षेत्रातुन म्हणजे त्रींबक परीसरातुन उद्दीप्त झाला असावा
. तीथुन तो दक्षीणोत्तर पसरला
. काळांतराने थंड झाल्यानंतर त्यावर जीवसृष्टी अवतरली ही मांडणी वैज्ञानीकांनी करुन ठेवली आहेच
.
अग्नीयुग संपुन पृथ्वी थंड झाली तसे डोंगरांवरुन नद्या जन्मल्या
. त्या सोबत वृक्ष
, वेली
,द्रुम नीर्माण झाले
.वीवीध जीव नीर्माण झाले
, ही कथा वीज्ञान व पुराणांनी आपापल्या परीने कथन केली आहे
. आपले भरण पोषण करणाऱ्या सृष्टीची आराधना करण्यासाठी हे डोंगर देवस्वरुप
, म्हणुन पुर्वीच्या लोकांनी त्यांचे पुजन केले
.मानववंश प्रगती पथावर असताना कालांतराने यातील काही डोंगरांचा वापर राजशकट हाकण्यासाठी महसुल जमा करण्याचे केंद्र व संरक्षण केंद्र म्हणुन झाला
.नेमके कोणत्या काळात ही नीर्मीती झाली याचा शोध इतीहासकारांना लावता आलेला नाही
.त्यावरील बांधकामांवरुन त्यांच्या प्राचीनत्वाचे अनुमान काढले गेले
.
त्रींबकचा परीसर हा पुर्वपार उपजाऊ
. येथुन मोठा महसुल गोळा होत असे
.सर्व जुन्या राजवटीचे येथे अस्तीत्व होते
.याचे दाखले जुन्या साहीत्यातुन तसेच गडांवरच्या बंधकामांच्या अवशेषांवरुन अभ्यासकांनी मांडले आहेत
. त्र्यंबकेश्वर व हरीहर हे दोन्ही कील्ले शब्दश:
बेलाग
. त्यावरील यादव काळाच्या खुणांकडे अभ्यासक नीर्देश करतात
. तर काहींच्या मते त्या अगोदरच्या राजवटींचे त्यावर अस्तीत्व असावे
.
हरीहर कील्ल्याची थरारकवाट
शतक तेरावे
तेराव्या शतकत देवगीरीच्या यादवांचा त्रींबकगड व परीसरावर अंमल होता
. इसवीसन १२९४ मध्ये अल्लाउद्दीन खीलजीने देवगीरीच्या यादवांचा पाडाव करताच मुसलमानी राजवटींने या परीसरात आपले हातपाय पसरायला सुरुवात केली
.१३४७च्या सुमारास दक्षीणेत बहामनी राज्य नीर्माण झाले
;१४००च्या सुमारास त्याची शकले होऊन दक्षीणेत पाच मुसलमान शाह्या नीर्माण झाल्या
.इसवीसन १५५३ला त्रींबकची लीखीत नोंद आढळते
. नीझामशाहाने ३० डीसेंबर १५५३ मध्ये तो ताब्यात घेतला
. त्यावेळची ५८ कील्ल्यांची यादी सैय्यद अली तबातबा हा त्याच्या बुऱ्हाने मासीर या फार्सी ग्रंथात करतो
.
१५६५ च्या तालीकोटच्या लढाईत वीजयनगरचे वैभवशाली राज्य लयास गेले आणी दक्षीण भारताला एकप्रकारचा सांस्कृतीक धक्का बसला
.मुसलमानी राजवटीची राळ उठताना त्रींबक परीासरातले सत्ताधीश इथले मुळ नीवासी हींदु महादेव कोळ्यांनी जोरदार प्रतीकार केला पण तो शेवट पर्यंत टीकु शकला नाही
.
शहाजींची १६३६ला सोडचीठ्ठी
दक्षीणेत मुघलांचा प्रवेश तब्बल चाळीस वर्षे रोखला गेला तो मलीक अंबरच्या कडव्या प्रतीकारामुळे
. यात मलीक अंबरला बहुतांशी काळ
‘स्वराज्य संकल्पक
’शहाजी महाराजांची मोलाची साथ होती
. मुघलांसारखी प्रबळ सत्ता दक्षीणेत आली तर हींद्वी स्वराज्य संकल्पनेला धोका पोहोचु शकते यासाठी शहाजींनी मुघलांच्या वीरोधात खटाटोप केला
.शहाजी महाराजांनी क्षीण होत चाललेली अहमदनगरची नीझामशाही वाचवीण्याचा अटोकाट प्रयत्न केला
. मलीक अंबरच्या मृत्युपश्चात नीझामशाहीत मोठी अंधाधुंदी माजली
. नीझामशाहीला वारस उरला नाही तेव्हा शहाजी महाराजांनी ९ वर्षांच्या मुर्तझा नीझामला पेमगीरी कील्ल्यावर नेऊन गादीवर बसवीले
.त्यांनी अनेक मुसलमान सरदारांकडे नीझामशाही वाचवीण्यासाठी याचना केली
, पण त्यांना हवी तशी साथ मीळाली नाही
. इकडे मुघलाच्या आक्रमणाचा धोका भेडसावत होता
. शेवटी त्यांनी गुप्तपणे राजधानी माहुली कील्ल्यावर हलवली
. त्यांच्या हालचालीचा सुगाव लागल्याने मुघल व आदीलशाहा यांनी शाहजींचे व त्यांच्या सोबतच नीझामशाहीचे पारीपत्य केले
.
हा संघर्ष शहाजींनी शरणागती पत्कारल्यानंतर संपुष्टात आला
. शहाजी राजांनी लहानग्या मुर्तझाला मुघलांकडे सुपुर्द केले
. त्याच बरोबर त्यांच्या ताब्यातील नीझामशाही प्रदेश देऊन टाकला
. त्यात त्रींबकगड व हरीहरगडाचाही समावेश होता
. इसवीसन १६३६ची ही हरीहरची नोंद अत्यंत महत्वाची
. त्यानंतर या दोन्ही गडांवर फार अल्पकाळ हींदुंचा अंमलाखाली राहीला
.
हरीहर - कर्मकठीण
मोरोपंत गड घेतात...
शीवाजी महाराजानी स्वराज्याची भरपाई करण्यासाठी सुरतेची दुसऱ्यांदा लुट केली
. लुट घेऊन परतत असताना १७ ओक्टोबर १६७०ला दींडोरी येथे लढाई झाली
. त्याच सुमारास मोरोपंत पींगळे यांनी त्रींबकगड घेतला
. देवगीरीच्या यादवांनंतर शहाजी आणी त्यानंतर मोरोपंत पींगळें असा हा मोठा कालखंड
. शीवाजी महाराजांनी या गडाचे नाव बदलुन श्रीगड ठेवले अशी नोंद सभासद बखरीत आढळते
.इतीहासात युद्ध करुन त्रींबकगड घेतल्याची उदाहरणे फारच दुर्मीळ
,त्यातलेच हे एक
.त्रींबकगड पडल्यानंतर हरीहर
, भास्करगड
,अंजनेरी गडाचे काय झाले याचा मात्र कोणताच उल्लेख सापडत नाही
.
एकदा ताब्यात आल्यानंतर त्रींबकगड कीमान दहा वर्षे तरी मराठ्यांकडे राहीला
.शीवाजी महाराजांच्या मृत्युनंतर औरंगजेब स्वत
:दक्षीणेत उतरला
. त्याने आदीलशाही व नीझमशाहीचा घास गीळला
. मराठेशाहीकडुन त्याला कडवा प्रतीकार होत राहीला
. १६८२ मध्ये अंकाईचा कील्ला मसलत करुन मीळाल्यानंतर औरंगजेबने रामसेज या नाशीक जवळच्या लहानशा कील्ल्याच्या रुपाने दक्षीणेचे प्रवेशद्वार खुले करण्याचा प्रयत्न केला
. हे द्वार त्याला दीर्घ काळ उघडता आले नाही
. असे म्हणतात की
, हा संघर्ष दीड कींवा तीन वर्षे तरी चालला असावा
. रामसेज युद्धाच्या वेळेस त्रींबकगडालाही मुघलांचा वेढा पडला
. पण त्रींबकगड काही त्यांच्या ताब्यात आला नाही
.याच कालावधीत हरीहरचा कील्ला सुद्धा मराठ्यांकडेच असावा
.
त्रींबकगडावरुन रामसेजकडे मराठ्यांना पोहोचणारी रसद मुघलांनी रोखुन धरली
. युद्दात यश येत नाही असे पाहुन औरंगजेबने फंदफीतुरीने गड घेण्याचा प्रयत्न केला
. ते सगळे प्रयत्न वीफल ठरत होते
. १६८३ मध्ये संभाजी महाराजांच्या पदरी असलेल्या राघो खोरा
(खोपडा
)हा मुघलांना जाऊन मीळाला
. त्याने त्रींबकगडाच्या कील्लेदारास वश करुन गड मीळवुन देतो असे आश्वासन बादशाह औरंगजेबला दीले
,त्याने ते मंजुर करुन त्यास ७०० जात व २०० स्वार अशी मनसब दीली
. त्याने त्रींबकगडाच्या कील्लेदारास मोठ्या मनसबीचे आश्वसन दीले
. कील्लेदाराने त्याची खरडपट्टी काढुन त्यास परत पाठवीले
. त्यामुळे राघो खोरा पळुन गेला
. त्याच्या मार्फत मध्यस्ती करणाऱ्या जमनाजी नावाच्या माणसाला मुघलांनी अटक केली
. आपला राघो खोराशी काहीच संबंध नाही हे वारंवार पटवुन दील्यानंतर जमनाजीची सुटका झाली व त्याची मनसब कायम ठेवण्यात आली
.
हरीहर तीर्थाच्या शेजारीअसलेले छोटे कुंड
त्रींबकगड औरंगजेबच्या दृष्टीने प्रतीष्ठेचा प्रश्न बनला
. त्याने नासीक उर्फ गुलशनाबादचा ठाणेदार मातबरखान यास त्र्यंबकगड घेण्यास पाठवीले
. त्याने सहा महीने वेढा घातला
.गडावर रसदेचा एक दाणाही जाऊ दीला नाही
. गडाची शीबंदी हवालदीली झाली
. अखेर १६८४ मध्ये कील्लेदार शीवाजी तेलंगराव व शामराज हे गडावरुन उतरुन खाली आले
. त्यांना मुघलाईत मनसबी मीळाल्या
. दहावर्षे शीवशाहीत राहीलेला गड मराठ्यांच्या हातुन पुन्हा गेला
.येणे प्रमाणे हा टकोरबंद गड जाताच परीसरातले इतर गड मुगलांच्या ताब्यात गेले
.
मुघलांकडे आता मराठ्यांचे लहानसे राज्य सोडुन अवघा हींदुस्तान ताब्यात होता
. खुद्द बादशाह दक्षीणेत तळ ठोकुन होता
. कुतुबशाही व आदीलशाही बुडवुन त्याचा मराठी मुलुख घेण्याचा नीकराचा प्रयत्न सुरु होते
.एक गड
, एक मुलुख घेत मुघल फौजा पुढे जात व त्या माघारी मराठे पुन्हा तो जींकुन घेत
. १६८९च्या फेब्रुवारी महीन्यात संभाजी महाराजांची औरंगजेबने क्रुरपणे हत्या केली
.त्यानंतर त्याला मराठ्यांचा लढा संपला असे वाटले
.पण त्याचे स्वप्न शेवट पर्यंत पुर्ण होऊ शकले नाही
.मराठेशाही खीळखीळी झाली तरी राजाराम महाराज आणी त्यांच्या पश्चात ताराबाईंनी पुढे हा लढा चालु ठेवला
.शेवटी १७०७ साली वयाच्या ८९व्या वर्षी तो मरण पावला
.
औरंगजेबच्या मृत्युनंतर भारतीय राजकारणातले चीत्र वेगाने बदलत गेले
.संभाजी पुत्र शाहु मुघलांच्या कैदेतुन सुटले
. महाराष्ट्रात येताच त्यांनी राज्याची सुत्रे हाती घेतली
. अनेक नामांकीत सरदारा मंडळी त्यांनी गोळा केली
. बाळाजी वीश्वानाथ पेशवा आणी मग त्या पाठोपाठ पहीला बाजारीव यांच्या नेतृत्वाखाली रणमैदानात मराठेशाहीचा वारु चौखुर उधळला
. त्याने मुघलांच्या इतकाचअटक ते कटक असा वीशाल प्रदेश काबीज केला
. दील्लीच्या सुलतानास त्यांनी अंकीत केले
.त्रींबक परीसरातुन चौथाई वसुलीचे अधीकार पेशव्यांकडे होते
. त्रींबकगड मात्र अजुनही मुघलांच्या वतीने हैदराबादच्या नीझामाकडे होता
. त्र्यंबकेश्वर येथील इनामदार जोगळेकर यांच्या बखरीतील हकीगतीत पेशव्यांनी त्रींबकगड कशा प्रकारे काबीज केला याचे वर्णन आहे
. १७५१च्या सुमारास नीझामाने तहाची बोलणी करण्याची तयारी दर्शवीली
. त्यासाठी त्याने त्रींबकगड आपल्याकडेच ठेवण्याची मागणी केली
. पेशव्यांनी तहाची बोलणी केली
.पण गड नीझामाला काही दीला नाही
.अशा रीतीने तब्बल ६२ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्रींबकगड मुसलमानी जोखडातुन मुक्त झाला
. त्रींबक पडला की रांगेतले इतर कील्ले सुपुर्द होतात तोच कीत्ता यावेळी कायम राहीला असण्याची शक्यता आहे
. हरीहर कील्ला कोणत्या परीस्थीतीत पेशव्यांनी घेतला या संबंधीचे उल्लेख मीळु शकले नाहीत
, परंतु तो पेशव्यांनी घेतला हे नक्की
.तो त्रींबकगडापुर्वीच पेशव्यांना मीळालाअसावा. हरीहर शीलालेखाचे वाचन त्याकडे संकेत करते.

हरीहर पुष्कर्णीचे गुढ उकलले
त्रींबकचे महत्व मराठ्यांच्या राजकारणात अनन्यसाधारण होते
. म्हणजे त्रींबकगड मुघलांकडे असला तरी शीवाजी महाराज त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत
. नानासाहेब पेशव्यांच्या वेळी त्रींबकगड पेशवाईत नव्हता तरी ते त्रींबकराजाच्या भेटीस यायचे
. गडाच्या पायथ्याला कुशावर्त तीर्थात सींहस्थ कुंभमेळ्यात स्नान करत
. आता गड अधीकृतरीत्या ताब्यात आला म्हटल्यावर त्यांनी मंदीराच्या जागी मुघलांनीबांधुन ठेवलेली  मशीद पाडुन १६५५ मध्ये नवे मंदीर बांधण्याचे काम सुरु केले
. त्यावर पेशव्यांनी १० लक्ष रुपये खर्च केला
.हे काम सतत ३१ वर्षे सुरु होते
. हे काम सुरु असतानाच हरीहर कील्याच्या उत्तर माचीवर वीस्तीर्ण आकाराची पुष्कर्णी बांधण्यात आलीअसावी
. ही कोणी बांधली याबद्दल आजवर अनभीज्ञता होती
. पुष्कर्णीवर उठावाचा सुंदर असा शीलालेख शेंदुर फासल्यामुळे वाचणे कठीण होते
. इतीहासाच्या अभ्यासकांनी वेळोवेळी हा शीलालेख वाचण्याचा प्रयत्न केला पण कोणीच त्याचे पुर्ण वाचन केले नव्हते
.अमीत बोरोले यांचे दुर्गभ्रमंती नाशीकची या पुस्तकात हरीहर शीलालेखाचे वाचन असल्याची माहीती मीळाली
, त्यानुसार ते पुस्तक बघीतले पण त्यात पुर्ण वाचन नव्हते
.
जी अक्षरे लागत नव्हती याकरीता काही जुन्या छायाचीत्रांचा संदर्भ मीळवील
. या कामी नाशीकच्या वैनतेयचे अंबरीश मोरे यांच्या एका छायाचीत्राची बरीच मदत झाली
. पण ते छायाचीत्र सुद्धा ओईलपेंटचा रंग दील्यानंतरचे होते
. तथापी ते उत्तम कॅमेऱ्यातुन घेतल्याने त्यावरुन शकाची व पु्ष्कर्णी बांधली त्याची माहीती वाचण्यास मदत झाली
. शीलालेखावरचर हरीहराचे नाव मात्र स्पष्ट दीसत होते
.ते इतर वाचकांनी त्यांच्या साहीत्यात नमुद केले आहे
. आता हळु हळु एक एक गोष्ट उलगडायला लागली
. शंकराचा मुलगा नारायण हे नाव स्पष्ट झाले
. खालच्या ओळीत पनामा हा शब्द छळत होता
. हा पनामा काय असावा
?यावर खल सुरु असताना नाशीकमधल्या एका संस्थानीक घराण्यातुन
, राजेबहाद्दर हे मुळचे दाणी असल्याचे व ते सासवडचे असल्याची माहीती मीळाली
. मग या पनामा अक्षराच्या अगोदर असलेल्या दाणी नावाचा उलगडा झाला
- दाण्युपनामा ही उकल झाली
.शीलालेखावरचे शक व तीथी मीळाली पण संवत्सर व महीन्याचे नाव स्पष्ट होत नव्हते
. पंधराच दीवसांपुर्वी त्र्यंबकेश्वर मंदीराच्या शीलालेखाचे वाचन करण्याचा योग आल्याने त्याच्या लगतचे म्हणुन संवत्सराचे नाव वाचण्यास मदत झाली
. जुन्या संस्कृत ग्रंथातुन मासाचे नाव स्पष्ट करता आले
. अशा प्रकारे हरीहराच्या शीलालेखाचे पुर्ण वाचन झाले
. राजेश दीक्षीतने खरोखरच मोठे कसब लावत लेखाचे वाचन व त्याचे भाषांतर करुन दीले
.

शेंदुर फासल्याने बुजलेलीअक्षरे

आठ ओळींच्या या शीलालेखाची भाषा संस्कृत आहे
.
काळ
, तीथी आदी अंकात न देता शब्दात दीले आहेत
.
श्री
।।श्री गणेशायनम
: ।। धात्रवर्ना
मी शुक्रेधवलशरतीथौशंकरात्मसु

:श्रीमन्नारायणा्ख्येगजगीरीरसक्
‌यु
क्तसत्
‌शालीवाहोशकेदाण्युपनामा
हरीहरवीलसद्देवताकंसुतीर्थंप्रादद्दी
ण्यार्तलोकश्रमनीरहरुतेश्रेयसे
मंगलाय ।।१।।
लेखाचे वाचन व स्वैर अनुवाद: राजेश दीक्षीत, त्र्यंबकेश्वर

) श्री
(श्री या अक्षराने शीलालेखाची सुरुवात आहे
)

) ।।श्रीगणेायनम
:।। धात्रव र्ना
(मी
) (गणेशाचे स्तवन हा दंडक आहे
. धात्रवर्‌
= धात्रृ नावाचे संवत्सर
)

) मी शुक्रेधवलशरतीथौ शंकरा त्म
: सु
(शुक्रे
= ज्येष्ठ महीना
, धवल
= शुद्धपक्ष
, शर
= पंचमीतीथी शंकरात्म सुत
: = शंकराचा मुलगा
)

) त
: श्रीमन्नारायणाख्ये गज गीरी रस क्
‌ यु
(शंकर पुत्र नारायण नामे वीख्यात
, गज
= ८
,गीरी
= ७
, रस
= ६
, क्
‌ =१
,युक्त
)

) क्त सत शालीवाहो शके दाण्युपनामा
( १६७८ या शालीवाहन शकात
- इसवीसन १७५६ साली
,दाणी उपनावाचे
)

) हरीहर वीलसद्देवताकं सुतीर्थं प्रादद्दी
(हरीहर पर्वतावरील वीलास करणाऱ्या देवतांच्या नावे उत्तम तीर्थ दीन जनांचा त्रास कमी करण्यास
)

) ण्यार्त लोकश्रम नीरहरुते श्रेयसे
(आर्त लोकांच्या श्रम हरण करुन पुण्यप्राप्तीसाठी
)

) मंगलाय
(मंगल श्रेयासाठी नीर्माण केले
)
हरीहरच्या जुन्या वसाहतीलगत दगडात कोरलेले शीवशंकर
कोण होते नारोशंकर
वेगवेगळ्या कालखंडात नासीक हे महत्वाच्या राजवटींच्या राजधानीचे केंद्र होते
.जसे यादव
, अभीर
,राष्ट्रकुट
, त्रैकुटक
, बागुल इत्यादी
.तद्वताच नासीक शहर हे सरदारांचे शहर म्हणुन ओळखले जाते
. सरदार रास्ते
, सरदार वींचुरकर
, सरदार राजेबहाद्दर
, पवार घराणे
,अशी काही नावे आजच्या पीढीला कळतात ती त्यांच्या शहरात पसरलल्या वास्तु
,मंदीरे आदींशी नीगडीत नावांमुळे
.गोदावरी नदीच्या कीनाऱ्यावर नारोशंकराचे मंदीर प्रसीद्ध आहे
.हे रामेश्वराचा शीवालय
.१७४७ साली हे मंदीर बांधण्यात आले
.त्यास १८ लाख रुपये खर्च आला
.उत्तर महराष्ट्रातले मराठा काळातल्या सर्वोत्तम मंदीरात याची गणना केली जाते
.मंदीराची ओळख मात्र मदीर अशीच आहे
. या मंदीराची भली मोठी घंटा नाशीकची सांस्कृतीक ओळख बनली आहे
. नाशीक महानगरपालीकेच्या मानचीन्हात तीचा वापर करण्यात आला आहे
.ही बहुधा वसईच्या युद्धात जींकुन आणली असावी
.चीमाजी अप्पाने वसईत पोर्तुगीजांच्या वीरुद्ध नीकराची झुंज दीली
.त्याच्या सोबत त्यांचे वीश्वासु सहकारी नारोशंकर राजोबहाद्दर हे होते
. अशा आठ पोर्तुगीज घंटा महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठीकाणी बसल्याचे उल्लेख सापडतात
.
नारोशंकराचे
नारोशंकर राजेबहाद्दुर यांच्या कामगीरीवर नजर टाकली तर ते पेशवाईतले पहील्या फळीतले सरदार कशामुळे गणले जात याची प्रचीती येते
.घोड्याच्या पागेची नीगा राखणाऱ्या साधारण शीपायापासुन त्यानी इतकी मोठी मजल मारली
.नारोशंकरांच्या तलवारीचा उत्तरेत मोठा दरारा होता
. त्यांनी बंडखोरी करणारे ओर्च्छाचे राज्य खालसा केले
. झांसी शहर त्यांनी वसवीले
.दील्लीच्या सुलत्तानाचे रक्षक म्हणुन त्यांची पेशव्यांनी नीयुक्ती केली
.पेशव्यांच्या वतीने ते उत्तरेत वसुलीचे काम करत
.त्यांनी दक्षीण भारतातही काही मोहीमा केल्या
. दील्लीत त्यांच्याकडे पेशवे व शींद्यांचा खजीना सांभाळण्याची जबाबदारी होती
. पानीपतच्या युद्धात ते अवघी दौलत टाकुन पळुन आले असे बालंट त्यांच्यावर लागले
. परंतु त्यांच्यावर जेव्हा जेव्हा आरोप झाले त्या प्रत्येक वेळेस पेशव्यांना योग्य तो खुलासा देऊन त्यांनी त्यांजी नाराजी दुर केली
.
नारोशंकर १७४२ ते १७५९ असे पुढची पंधरा वर्षे झांसीचे सुभेदार होते
. (मराठी वीश्वकोष खंड ६
) त्यांच्या काळात झांसी शहराची भरभराट झाली
. तीकडे झासी शहर वसत होते
.पेठा नीर्माण होत होत्या
. कील्ला मजबुत केला जात होता
. इकडे पेशव्यांना एक छदामही मीळत नव्हता
. त्यावरुन पेशव्यांकडे दरबारातच नारोशंकरच्या कारवायांची कागाळी करण्यात आली
. त्यांनी जातीने हजर राहुन पेशव्यांना उत्तरेत महत्वाचे ठाणे उभे केल्याचे पटवुन दीले
. त्यामुळे पेशव्यांची नाराजी संपुष्टात आली
.
माचीवर जोत्यांचे अवशेष
अहमदशाह अब्दालीने ११ ओगस्ट १७५७ला दील्लीवर दुसऱ्यांदा व उत्तरेत चौथी स्वारी केली
. त्याने  दील्लीचे राज्य काबीज करुन नजीब उद्दोला या रोहील्याकडे दील्लीच्या राजवटीची कमान दीली
.मुघल बादशाह आलमगीर दुसरा हा अब्दलीचा मांडलीक बनवीला गेला
.  वार्षीक २० लाखाची खंडणी नीश्चीत करण्यात आली
. आब्दाली माघारी फीरताच आलमगीरने अब्दालीच्या वारंवार होणाऱ्या चढायांना कंटाळुन मराठ्यांकडे मदतीची याचना केली
. तोवर अब्दाली नीघुन गेला होता
.मराठी फौजांनी दील्ली चहुकडुन घेरली
. दोन आठवड्यांपर्यंत युद्ध चालले
. १७५७च्या ओगस्ट महीन्यात पेशव्यांनी नीर्णायक वीजय मीळवुन लाल कील्ल्यात प्रवेश मीळवला
. दील्लीत सदाशीवराव भाऊंनी दरबार भरवला
. यात नारोशंकर यास राजेबहाद्दुर ही पदवी देण्यात आली
. त्यांना दील्लीच्या सुल्तानाच्या रक्षणाची जबाबदारी देण्यात आली
.  त्याच्याकामगीरीबद्दल खुश होऊन बादशाहने त्यास मालेगाव व लगतच्या ८ गावांची जहागीरी दीली
. पुढे दक्षीणेत परतल्यावर नारोशंकरांनी ती सनद श्रीमंतांस दाखवुन मालेगावात घर बांधण्याची परवानगी मागीतली
. घर बांधले तरी ते दीर्घकळ टीकत नाही
,असा वीचार करुन त्यांनी दील्लीहुन कुरैशी या प्रशीक्षीत बेलदार समुदायाची माणसे बोलावुन १७५७ मध्ये दील्लीच्या कील्ल्यासारखा भव्य असा कील्ला बांधला
. त्यावर त्यांनी अठरा लाख रुपये खर्च केले
.  तत्कालीन इंग्रज लष्करी अधीकाऱ्यांनी यास खानदेशाचे नाक असे म्हटले
.कील्ला पुरा झाला तेव्हा
, नारोशंकर मुघलांना फीतुर असल्याची दरबारात कागळी झाली आणी श्रीमंतांनी जासुद पाठवुन कील्ला खाली करुन देण्याचे फर्मान दीले
. तोवर कील्ल्याचे वास्तु पुजन झाले नव्हते
. नारोशंकरांनी आपण श्रीमंतांचेच नोकर असल्याचे प्रतीपादन करुन कील्ला खाली करुन दीला तेव्हा कुठे पेशव्यांना त्यांच्या नीष्ठेची प्रचीती आली
.
मालेगावचा कील्ला बांधला त्याच्या आसपासची तारीख हरीहर शीलालेखावर आढळते
. इतका सुबक शीलालेख व त्यावरची अक्षरे कोरण्याची पद्धत या परीसरात दुसरी आढळत नाही
.पुष्कर्णी पन्नास फुट लांब व पन्नास फुट रुंद असुन तीची बांधणी अतीशय सुबक पद्धतीने करण्यात आली आहे
.यावरुन मालेगावचा कील्ला बांधणाऱ्या कुरैशी बेलदारांकडुन हे कौशल्याचे काम करवुन घेतले असावे याचा अंदाज लावला जाऊ शकतो
.पेशव्यांनी १७५५ मध्ये त्र्यंबकेश्वर मंदीराचे बांधकाम सुरु केले
.
झासीवरुन नारोशंकरांस परत बोलावल्यानंतर त्यांची हरीहरवर कुठली कामगीरी झाली असावी का
?ज्यामुळे त्यांनी कील्ल्याच्या उत्तर माचीवर वीशाल आकाराची पुष्कर्णी बांधली
. हा माचीचा परीसर कील्ल्याच्या मुख्य वस्तीचा परीसर असावा
. हरीहर कील्ल्यावर जाणारा मार्ग दुष्कर असल्याने कील्लेदाराचा वाडा व महत्वाच्या कचेऱ्या या माचीवरच असाव्यात
. ही माची म्हणजे वेताळाचा पायथा उतरुन पुर्व बाजुने ब्रम्ह्याच्या डोंगराच्या बाजुला असलेला परीसर
.तीथे मोठ्या प्रमाणावर वाड्यांची जोती दृष्टीस पडतात
. हरीहर कील्ल्यावर मोठ्या वस्तीच्या दृष्टीने मर्यादीत पाणीसाठा उपलब्ध असल्याने युद्धकाळात गडमाध्यावर वस्ती स्थलांतरीत होत असावी
.
नारोशंकरांची महत्वपुर्ण कामगीरी ही उत्तर भारतात झाल्याने त्याच्या नावानीशी हरीहरावर इतके माठे बांधकाम करण्यास पेशव्यांनी उगाचच परवानगी देण्याची शक्यता कमी दीसते
. पेशवाईतली कींवा राजेबहाद्दरांशी संबंधीत कागदपत्रे तपासली तर नारोशंकर व हरीहर हा नेमका संबंध कशामुळे आले याचा उलगडा होऊ शकतो
.
मालेगाव येथील वकील एडव्होकेट व डॉक्टर डी
.एस
. कुलकर्णी यांनी अस्सल कागदपत्रे व महीतीच्या आधारे सरदार नारोशंकर राजेबहाद्
‌दुर हे पुस्तक प्रकशीत केले आहे
.त्यात त्यांनी राजेबहाद्दुर यांची जुनी कागदपत्रे इंग्रजांच्या १८१८च्या स्वारीच्या वेळी नष्ट झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे
.अजुनही पुण्यातले पेशवा दफ्तर खंगाळले
, अथवा अन्य संदर्भाची
, खास करुन त्रींबकगड व हरीहर कील्ला या संबंधीची माहीती तपासली तर या वीषयावर महत्वाचा प्रकाश पडु शकतो
.
धन्यवाद!
आमच्यासाठी रोजच हरीहरभटकंती...
वीशेष आभार:
भगवान बाबा, कळमुस्ते
गीरीश टकले
इलीयास सीद्दीकी
ओम दीक्षीत
बाळा उजे
मनोज खैरनार
सुयोग देवकुटे
अंबरीश मोरे
अनील दुधाणे
रवी पवार
संदर्भ:
-महाराष्ट्र देशा, पंकज समेळ
-मराठी
- संस्कृत शीलालेखाच्या वीश्वात,महेश तेंडुलक
-भटकंती नाशीक जील्ह्याची,अमीत बोरोले
-मराठ्यांचा इतीहास,संपादक अ.रा. कुलकर्णी, ग.हे.खरे
-बखर संस्थानची, सुनीतपोतनीस
-पेशवे घराण्याचा इतीहास,प्रमोद ओक
-त्र्यंबकगड-अंजनेरी-रामसेज,महेश तेंडुलकर
-पेशव्यांची बखर, काशीनाथनारायण साने
-सातारचे श्रीमंत छत्रपतीशीवाजी महाराज यांचे वंशज व प्रतीनीधी आणी अष्टप्रधानयांचा इतीहास, वीष्णु
गोपाळ भीडे

Please make your own arrangements as food is available only at base village. You can contact Sanjay Nirgude 9421035554 / 7776893098 for food and restroom at the base village

हरीहर तीर्थ

वेताळ

भीरभीर नजर अनं पायऱ्यातल्याखोबण्या

दगडातुन कोरलेला वैशीष्ट्यपुर्णप्रवेश मार्ग

बालेकील्ल्यावर कोरलेलीअक्षरे व चीन्हे

अनाम वीराची समाधी

बालेकील्ला

घुमटाकृती वीटकाम

शेवटचे प्रवेशद्वार

उत्तरबाजुच्या कड्यातकोसळणाऱ्या पायऱ्या

हरीहर महादरवाजा
धन्यवाद

 हरीहरगडाचा फोटो मी खुप वर्षापुर्वी फेसबुकला पाहीला होता. तो फोटो बघुनच भीतीने मनात धडकी भरली होती. तेव्हा ट्रेकचे भूत लागलं नव्हतं. कोणी लाख रूपये दिले तरी इथे जाणार नाही आणि आता जेव्हा पासुन ट्रेकींगचे वेड लागलयं तेव्हा पासून या गडावर जायचे वेध लागले होते. चार पाच वेळा प्लान्स बनून पण फिसकटले होते. हरीहरगड ओळखला जातो तो पायऱ्यांमुळे! त्या गडावरील कातळात कोरलेल्या पायऱ्या मनावर छाप उमटवतात! भटका माणूस रायगडावर जाऊन जसे टकमक टोक, बाजारपेठ, दरबार विसरत नाही किंवा राजगडावर जाऊन जसे तेथील बालेकिल्ल्याचे चित्र पुसून टाकू शकत नाही किंवा हरिश्चंद्रगडावर जाऊन जसा कोकणकड्याचा अजस्त्र आविष्कार आयुष्यभर मनात ठेवून वावरत राहील, तसाच
प्रकार हरिहरगडाच्या पायऱ्यांच्या बाबतीत घडतो! गडांच्या यादीतील थोडे वेगळे नाव आणि तसेच आडवाटेवरचे स्थान म्हणजे हरिहर!
गेल्याच महीन्यात गोरखगड केला तेव्हा काहीजण बोलले होते गोरखगडच्या तुलनेत हरीहर गड ट्रेकींगसाठी सोपा आहे. गोरखगडने आपली अवघडता कायम ठेवलीय पण लोक हरीहरच्या प्रेमात जास्त आहेत. त्यातलाच मी.
आमच्या रेग्यूलर ग्रुपचे कलावंतीन स्टे पाठोपाठ इरशाळगडचा प्लान देखील फसला. त्यात सलग तीन सुट्टया काही प्लान नाही बनवले तर महाराज मात्र रागवतील. म्हणुन मी आणि माझा एक मित्र अमित जो पहील्यांदाच ट्रेक ला तयार झाला होता, माहुलीगडाचे प्लान करत होतो. त्याची माहीती घेण्यासाठी मी माझ्या एक फ्रेंडला कॉल केला. पण ते सर्व जण नाशिकला जाणार होते आणि त्यांच्या अजेंड्यामध्ये हरीहर गड पहीला होता. हे ऐकून माझ्या तोंडाला पाणी सुटले. डोक्यातून माहूलीगड तात्पुरता बाजूला झाला आणि त्याची जागा हरीहरने घेतली. मी संध्याकाळी रेल्वेच्या तिकीट्स बुक केल्या.
रात्रीच्या ट्रेनने आम्ही मुंबईहून सहा जण नाशिकला निघालो तेव्हा थोडीफार थंडी होती. पण जेव्हा पहाटे ४ वाजता नाशिकला उतरलो तेव्हा थंडीचा कहर अनुभवयास मिळाला. त्यावेळी माझ्या मनात आले आपले एवरेस्ट बेस कँप ट्रेकचे स्वप्न कसे पुरे होणार? आम्हाला नाशिक स्टेशनला न्यायला आमचे मित्र बाईक घेऊन आले होते. मी पहील्यांदाच भल्या पहाटे दातओठ खाणाऱ्या थंडीत बाईक राईड अनुभवली. हॉटेलला पोहोचेपर्यंत ५ वाजले होते. तिथे फ्रेश होऊन मित्रांनीच बनवलेला वर्डक्लास चहा आणि पोह्यावर यथेच्च ताव मारत आम्ही सकाळी ७ ला त्रिंबक हर्शवाडी च्या दिशेने रवाना झालो. सुर्य उगवला तरी थंडी कमी झाली नव्हती. मुंबई आग्रारोडने जात असताना काही अंतरावर अंजनेरी पर्वत लागला. पुढे रस्त्याच्या बाजुला सर्व पर्वतच उभे ठाकले होते. आम्ही हर्षवाडी गावात पोहोचलो तेव्हा सकाळचे ९ वाजले होते. उन्ह वर येऊन पण हवेत कमालीचा गारवा होता.
हरीहरच्या मुख्य पायऱ्यांपर्यंत पोहोचायला आम्हाला १ तास लागला. पायथ्या पासून तिथपर्यंत जायला दोन खड्या चढणी पार कराव्या लागतात. वाट मळलेली आहे पण बऱ्याच ठीकाणी निसरडी आहे. चढताना खुप जपून चढावे लागते. आम्ही हरिहर गडाच्या रेखीव पायऱ्यांपर्यंत तासाभरात पोचलो. समोर पाहीले तर तेथील दगडी जिना मनातील धाकधुक वाढवत होता. ही दगडी वाट वाटही वैशिष्ट्यपूर्ण आहे. साधारण ऐंशी अंशाच्या कोनामध्ये सरळ रेषेत ती जणू आभाळात घुसते. ती वाट चढण्यास सुरुवात केली, की त्याला तिचा खरा अंदाज येतो. एकावेळी एकच मनुष्य वर किंवा खाली जाईल अशा पद्धतीची तिची रचना आहे. पायऱ्यांवर दोन्ही बाजूंनी खोबण्या आहेत. त्‍यात पंजा रुतवता येतो व वर चढताना त्यांचा आधार मोठा ठरतो. सुमारे नव्‍वद पायऱ्यांचा सोपान चढल्‍यानंतर गडाचे पहिले छोटेखानी पण सुरेख प्रवेशद्वार लागते. त्या प्रवेशद्वारातून आलेली वाट पाहिली तर असे लक्षात येते, की वर येणे एकवेळ सोपे, मात्र उतरणे महाकठीण. आम्ही एका मागोमाग एक असे फक्त आणि फक्त पायऱ्यांवर लक्ष केंद्रीत करत वर चढत होतो. मागे वळून बघायची हिम्मत होत नव्हती. आ वासलेली भयानक काताळी दरी पाठीशी होतीच. एका छोट्याश्या चुकीचे थेट मृत्युत रूपांतर. मला फक्त प्रत्येक पायरीच्या खोबण्या दिसत होत्या. तसेच वरून खाली येणाऱ्या एखाद्या ट्रेकरला जागा करून देताना मात्र आमची पंचायत होत होती. पण आम्ही तो अवघड जिना चढलो. त्यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्या सारखा होता. आमच्या मध्ये पहील्यांदाच ट्रेक करणारे दोघेजण होते. त्यांचा आनंदाला तर सीमाच उरली नव्हती. या पायऱ्या चढून आल्यावर शेंदुरी रंगाच्या प्रवेशद्वाराच्‍या शेजारी गणेशाची शेंदूर फासलेली छोटी मूर्ती दिसते. प्रवेशद्वाराच्या पुढे, गडाच्या पोटात खोदलेला रस्ता आहे. उलट्या ‘सी’ इंग्रजी आकारासारखा किंवा नारळाच्या अर्ध्या करवंटीसारखा. कातळात कोरलेले दोन दरवाजे पार केल्‍यानंतर सुमारे एकशे तीस पायऱ्यांचा दगडी जिना लागतो. त्‍या जिन्‍यासही दोन्‍ही बाजूंस आधारासाठी खोबणी आहेत. त्याच्याच पुढे, वर जाण्यासाठी अप्रतिम असा दगडी बोगदा आहे. गडावर एकापेक्षा एक सरस सौंदर्याकृती पायघड्या टाकून पुढे येत राहतात. त्यामुळे एका रचनेचे कौतुक करायला जावे तर दुसरी समोर! वास्तुस्थापत्याचे ते सौंदर्यतुषार झेलतच गडाच्या माथ्यावर वावर चालू राहतो. त्या पायऱ्या चढताना विशेष काही वाटले नाही. एक बाजू एक्सपोज होती पण दोन्ही बाजूला आधार होता.
हरिहर किल्ल्याचा शेवटचा छोटा दरवाजा पार करून थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला खालच्या बाजूस गुहा दृष्‍टीस पडते. पण तेथे उतरण्यासाठी दोराची आवश्‍यकता भासते. गडमाथ्यावर मोठा तलाव आहे. पश्चिमेकडे भिंत बांधून त्या तलावाचे पाणी अडवण्‍यात आले आहे. तलावाच्‍या काठावर हनुमानाचे मंदिर असून शेजारी उघड्यावर असलेले शिवलिंग आणि नंदी आहेत. गडाच्या टोकाला दारुगोळा कोठाराची इमारत आहे. त्या इमारतीभोवती पाण्याची सहा टाकी दिसतात. लहान मोठ्या टाक्यांची रचना मन मोहवून जाते किल्ल्यावरील सर्वांत उंच जागा चढायला पण थोडी कसरत करावी लागली. गडाच्या माथ्यावरून सभोवारचे विहंगम दृश्‍य फार छान दिसते. तेथून पूर्वेकडे दिसणारे त्र्यंबक डोंगररांगेचे चित्र डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. उत्तरेच्‍या दिशेला वाघेरा किल्‍ला तर दक्षिणेकडे वैतरणा तलावाच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले कावनाई व त्रिंगलवाडी किल्ल्यांचे डोंगर फार आकर्षक दिसतात. हरीहरच्या सर्वात उंचीच्या माथ्यावरून दिसणारे दृश्य विहंगम होतेच पण पहील्यांदाच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आम्ही तिरंगा फडकविला होता. खरोखर माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण ठरला. त्याचे सर्व श्रेय अजिंक्यला जाते, त्याची ती आयडीया. सर्वात उंच माथ्यावर राष्ट्रगीत म्हणताना आमची छाती मात्र अभिमानाने फुलली होती. एक वेगळाच रोमांच अंगावर आला होता.
तिथून खाली उतरल्‍यानंतर आम्ही उतराच्या वाटेवर एका झाडाखाली नाशिकमधल्या रवी या मित्राने घरून आणलेल्या जेवनाचा आस्वाद घेऊन पुढच्या मार्गाला लागलो. थोडं खाली उतरल्यावर समोर घुमटाकार माथा असलेली तीस फूट लांब व बारा फूट रुंद अशी दगडी कोठी दिसते. पूर्वीच्‍या काळी तेथे दारूगोळा साठवला जाई. कोठीचे प्रवेशद्वार छोट्या खिडकीसारखे असून त्या कोठीत दिवसासुद्धा काळोख असतो. ती गडावरील छत शाबूत असलेली एकमेव इमारत आहे. तेथून समोर दिसणारा ब्रह्मा डोंगर फार सुंदर दिसतो. हरिहरगडाची फेरी पूर्ण करण्यास सुमारे दोन तास लागतात. गड पाहून परत उतरताना पुन्‍हा त्‍या सरळसोट पायऱ्या समोर येतात. त्या फारच धडकी भरवणाऱ्या होत्या. त्‍यामुळे उतरताना विशेष काळजी घ्‍यावी लागत होती. प्रत्येक पाऊल योग्य दिशेने पडायला हवं होतं. काही ठिकाणी पायऱ्या एवढ्या बाहेर आल्यात की थोडं जरी पाऊल पुढे पडले तरी थेट दरीत रवानगी होणार होती. त्यामुळे दरीकडे पाठ करूनच उतरावे लागत होते. याच कारणास्तव उतरायला वेळ लागत होता. तेही पार करत आम्ही गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराशी पोचलो पण खालून वर येणाऱ्या ट्रेकर्सची संख्या खुप होती. त्यामुळे आम्हाला उतरायला जागा मिळत नव्हती . पंधरा मिनिटांच्या प्रतिक्षेनंतर उयरायला जागा मिळाली. तेव्हा मला कळसुबाई ट्रेकची आठवण झाली. तिथे पण लोखंडी शिडीवर जाणाऱ्या येणाऱ्यांची गर्दी झाली होती आणि एका एका शिडीवर ६० ते ७० लोक जाण्या येण्याचा प्रयत्न करत होते. इथे पण ट्रेकला जत्रेचे रूप आले होते. यात रात्री स्टे करणारे उशीरा चढत होते. प्रवेशद्वारापासूनच्या पायऱ्या उतरताना पण खुप काळजी पूर्वक उतरावे लागत होते. इथे पण आम्ही दरी कडे पाठ करत एक एक पायरी खाली उतरलो. खऱ्या अर्थाने इथेच ट्रेक संपते असं काहीना वाटते पण त्या नंतर चढताना लागली खडी चढण उतरताना मात्र अवघड होऊन बसते. काही ठीकाणी बसून उतरल्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा रितीने एक रोमांचकारी ट्रेक पुर्ण करून नाशिकहून मी आणि अमित मुंबईकडे परत निघालो.
हरीहरचा इतिहास (माहीती whatsapp वरून प्राप्त)
गडावरील कातळात पायऱ्या कोरण्‍याची पद्धत सातवाहन राजवटीपासून चालत आली आहे. बहुतांशी गडांवर तशा पायऱ्या दिसतातही; परंतु अनेक ठिकाणी त्या कालौघात, विशेषत: इंग्रजांनी १८१८ मध्ये केलेल्या विध्वंसात नष्ट झाल्या.
हरिहर हा नाशिक जिल्ह्यातील क्षेत्र त्र्यंबकजवळील हर्शवाडी गावानजीक वसलेला गड. त्‍याचे स्‍थान ब्रम्‍हगिरीच्‍या पश्चिमेस सुमारे वीस किलोमीटर अंतरावर आहे. हरिहर किल्‍ला अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी १६३६ साली त्‍याशेजारच्‍या त्र्यंबकगडासोबत तोही किल्ला जिंकून घेतला. नंतर त्याचा ताबा मोगलांकडे गेला. पुढे, १६७० मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी तो गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली. मोगल सरदार मातब्बरखान याने हरिहर किल्ला ८ जानेवारी १६८९ रोजी जिंकला. शेवटी, १८१८ मध्ये तो गड मराठयांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला. इतिहासात अशी विविध मालकी अनुभवणारा त्र्यंबकगडापाठोपाठ हरिहरगड हा त्या भागातील दुसरा महत्त्वाचा किल्ला आहे.
हरिहरगड ‘हर्शगड’ या नावानेदेखील ओळखला जातो, त्याचे कारण त्याच्या पायथ्याला ‘हर्शवाडी’ नावाचे गाव आहे. हरिहरगडाचा त्रिकोणी आकार, त्‍याच्‍या कातळात कोरलेल्या पायऱ्या, पुढे कोठालीगड (पेठ) प्रमाणे उभ्या कोरलेल्या पायऱ्या आणि गडावरील इतर दुर्गावशेष अशा साऱ्याच गोष्‍टी वैशिष्‍ट्यपूर्ण आहेत. तो किल्‍ला समुद्रसपाटीपासून ११२० मीटर उंचीवर उभा आहे. मराठेशाही बुडवण्याच्या १८१८ सालच्या इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिग्ज या इंग्रज अधिकाऱ्याने हरिहरगड जिंकून घेतला. मात्र गडाच्या पायऱ्या बघून तो आश्चर्यचकित झाला व उद्गारला, “या किल्ल्याच्या पायऱ्यांचे वर्णन शब्दांत करणे कठीणच. सुमारे दोनशे फूट सरळ व तीव्र चढाच्या या पायऱ्या अतिउंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारख्या वाटतात”. त्या वेळी इंग्रजांचे धोरण गिरिदुर्गांच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करण्याचे होते. त्यानुसार त्यांनी अनेक गडांचे मार्ग उद्ध्वस्त केले. त्‍यात अलंग-मदन-कुलंगगड, सिद्धगड, पदरगड, औंढा इत्‍यादी किल्‍ल्‍यांचा समावेश होतो. पण हरिहर किल्ल्याच्या अनोख्या पायऱ्यांनी त्‍यांच्‍या राकट सौंदर्याची मोहिनी कॅप्टन ब्रिग्जवर घातली. त्‍यामुळे त्याने हरिहरगड जिंकून घेतला, पण त्या सुंदर पायऱ्यांच्या मार्गाला धक्‍काही लावला नाही. यावरूनही त्‍या पायऱ्यांची आकर्षकता किती विलोभनीय असेल याचा अंदाज बांधता येतो.

4 am

1

मागे मिपावर कि आंतरजालावर हरिहरच्या अजस्त्र कड्याचं आणि त्यात खोदलेल्या पायर्‍यांचं दर्शन झालं तेव्हाच या दुर्गाने मला प्रचंड भुरळ घातली होती. विशेषत: अखंड कातळात खोदलेल्या उभ्या चढणीच्या त्या पायर्यांनी!! केव्हातरी तिथे जायची संधी मिळेलच या आशेवर मधली वर्षे-दिड वर्षे लोटली आणि शेवटी एकदाचं जून महिन्यातल्या यशस्वी माहुली ट्रेकनंतर जुलैच्या मध्यावर आम्ही (खरेतर मीच!! ;) ) हरिहरची निवड केली. प्लॅन केल्यानंतर नक्की येण्यासाठी तयार झालेले आठजण शेवटी कमी होत होत, १२ जुलैला सकाळी साडेसहा वाजता ठाण्यात इगतपुरीकडे जाणार्या तपोवनमध्ये आम्ही फक्त चौघेजणच चढलो. :)

हरिहरची भेट पहिल्यांदाच! त्यामुळे जाण्याआधी कुठून कसे जायचं, कुठे उतरायचं याची पुरेशी माहीती आंतरजालावर वाचली, त्याचबरोबर ओळखीच्या काही जणांकडून मार्गदर्शनही घेतलं. यासगळ्या शिदोरीच्या जोरावर आणि वेळेच्या गणितानुसार आपला ट्रेक व्यवस्थितरित्या पार पडेल असा फुकाचा आत्मविश्वास मी माझ्या मनाचा करून घेतला. पण प्रत्येक वेळेला तुम्ही ठरवल्याप्रमाणे होईलच याची खात्री नसते. कधी कधी अगदी तुम्ही ठरवल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत जातात अन् मनातल्या मनातच आपण आपली पाठ थोपटून घेत असतो. पण कधी कधी याच्या नेमकं विरूध्द घडत जातं, वेळेचं गणित चुकत जातं, काही गोष्टीत आपला अंदाज चुकतो आणि याची परिणती ट्रेकच्या आरंभी असलेला आपला जबर आत्मविश्वास मोक्याच्या क्षणी उणा पडायला लागतो. हरिहरच्या भेटीदरम्यान या सगळ्या गोष्टींचा मी पुरेपूर अनुभव घेतला. या ट्रेकने मला बर्‍याच सकारात्मक गोष्टी शिकवल्या.

हरिहरला जाण्यासाठी इगतपुरी गाठायचं अन् तिथे मागुन ठाण्याहून येणारी त्र्यंबकेश्वरची एसटी पकडून वाटेत गडाच्या पायथ्याशी असलेल्या निरगुडपाड्याला उतरायचं आणि ट्रेक सुरू करायचा असा सर्वसाधारण प्लॅन आम्ही बनवला. त्याप्रमाणे सकाळी पावणेसातला निघालेल्या तपोवनने आम्हाला नऊच्या दरम्यान इगतपुरी स्थानकात सोडलं आणि ती तशीच पुढे नांदेडला गेली. आता पोचलोच आहोत इगतपुरीला तर थोडासा नाश्ता करून त्र्यंबकेश्वरची गाडी पकडू आणि तासाभरात गडाच्या पायथ्याशी पोहचू असा छानसा विचार मी मनाशीच केला. बाकीचे तिघे माझ्यावर सगळं सोपवून निर्धास्त होते. पण तिथून पुढे ते तसं मुळी घडायचंच नव्हतं असंच त्या दिवसाने ठरवलं होतं. तिथे आम्हाला ट्रान्सपोर्टेशनबद्दल दोन-तीन वेगवेगळ्या सुचना मिळाल्या त्यामुळे आमचा थोडा गोंधळ उडाला.

हरिहरला मुंबईहून दोन-तीन मार्गांनी जाता येतं. मुंबईहून लोकलने कसारा गाठावं, तिथून खोडाळा या गावी पोचावं. कसार्याहून खोडाळ्याला जाण्यासाठी शटल लागलेल्या असतात. त्याचबरोबर काही खासगी वाहनेही कसारा-खोडाळा अशा फेर्या करतात. खोडाळ्याहून त्र्यंबकेश्वरची गाडी पकडायची आणि वाटेतच असणार्या निरगुडपाडा या गडाच्या पायथ्याशी असणार्या गावात उतरावं. खोडाळा ते त्र्यंबकेश्वर अशी एसटी महामंडळाची बससेवाही आहे. कसारा ते खोडाळा हे अंतर साधारण ३७ किमी आणि खोडाळा ते निरगुडपाडा हे अंतर साधारण २५ किमी, कसार्याहून असा साठ किमीचा प्रवास केल्यानंतर तुम्ही गडाच्या पायथ्याला पोहचू शकता. दुसर्या मार्गाने मुंबई-भिवंडी-वाडा-खोडाळा-निरगुडपाडा असं करतही तुम्हाला पोचता येतं. किंवा मग डायरेक्ट नाशिकला पोचून तिथून खोडाळ्याची गाडी पकडावी. पण त्यातल्या त्यात जरा सोप्पी पद्धत म्हणजे मुंबई सेंट्रलहून सकाळी सहाला सुटणारी त्र्यंबकेश्वरची एसटी पकडावी आणि त्र्यंबकेश्वरच्या सात किमी अलीकडे असणार्या पहिने फाट्यावर उतरावं. तिथून खासगी वाहनाने तुम्हाला निरगुडपाड्याला जाता येतं. आंतरजालावर बर्याच ठिकाणी मुंबई किंवा इगतपुरीहून त्र्यंबकेश्वरला जाणारी एसटी ही निरगुडपाड्यामार्गे त्र्यंबकेश्वरला जाते असं सांगितलं आहे, पण प्रत्यक्षात ही माहीती चुकीची वाटते. कारण तो मार्ग पुर्णतः वेगळा आहे हे त्या दिवसाच्या प्रवासावरून मला कळालं. मुंबई-इगतपुरी-घोटी मार्गे त्र्यंबकेश्वरला जाणारी गाडी एसटी महामंडळाच्या रूटमध्ये घोटीनंतर नाशिकच दाखवते. निरगुडला जाण्यासाठी मध्येच उतरून तुम्हाला दुसरी गाडी पकडावी लागते. अर्थात हा सगळा खटाटोप तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरत असाल तरच करावा लागतो. खाजगी वाहनाने जात असाल तर निवांतपणे मुंबई-नाशिक हायवेमार्गे तुम्ही सरळ निरगुडपाड्याला पोहचू शकता.

इगतपुरीला पोचल्यानंतर त्र्यंबकेश्वरची गाडी आम्ही जायच्या आधीच आठ वाजता निघून गेलेली होती. त्यानंतरची गाडी दुपारी एक वाजता येणार होती. एसटी स्थानकापाशी बहुतेक लोकांना निरगुडपाडा नावाचं गावच ठाऊक नव्हतं. मुख्य रेल्वे स्थानकात खासगी गाड्या डायरेक्ट निरगुडपाड्याला जाण्यासाठी हजार ते बाराशेपर्यंत भाव सांगतात असं ऐकून होतो ते त्यादिवशी प्रत्यक्ष पाह्यलं. त्यामुळे त्या फंदात न पडता शेवटी जिथे मिसळ खाल्ली त्या हॉटेलवाल्याला विचारून त्याच्या सांगण्यानुसार आम्ही एका शेअर रिक्षाने घोटीला पोचलो. कदाचित त्र्यंबकची गाडी तिथून पटकन मिळेल या आशेने घोटीला पोचलो खरे पण तिथेही आमच्या प्लॅनचे "बारा" वाजण्याची चिन्हे दिसत होती. घोटीहून त्र्यंबक फाटा पुन्हा तिथून मागे घोटी स्थानक अशा फेर्‍या मारत आम्ही घोटी स्थानकातून त्र्यंबकसाठी जाणारं 'जीपडं' पकडलं तेव्हा दुपारचे साडेबारा वाजत आले होते. त्यातून जीपवाल्याने त्र्यंबकला जाणारी गाडी निरगुडपाड्यामार्गे जात नाही, तुम्हाला पहिने फाट्याला उतरायला लागेल असं सांगितल्याबरोबर हरिहर आमच्यापासून अजूनही 'कोसो' दूर आहे याची आम्हाला खात्रीच पटली.

"तुमी चलाओ भो! फाट्यावरनं कि नय तुमाला दोन दोन मिनिटाला गाड्या मिळतील."

"तुमी चला. मी बरोबर सोडतो तुमाला.!"

ड्रायव्हर प्रचंड आत्मविश्वासात आमच्याशी बोलत होता. त्याच्या भुलथापांना बळी पडून तासाभराच्या प्रवासानंतर आम्ही पहिने फाट्याला पोचलो. तिथून त्र्यंबकेश्वर सरळ सात किमी होतं आणि डावीकडे खोडाळा ३८ किमी दाखवत होतं.

पहिने फाटा
2

त्र्यंबक सरळ सात किमी
3

खोडाळा (घोटीहून येताना) डावीकडे ३८ किमी
4

पहिने फाट्याला जवळ जवळ अर्धा तास थांबून सुध्दा एकाही गाडीचा यायचा पत्ता दिसत नव्हता. शेवटी अर्ध्या तासाने एक 'छोटा हाथी' वाला आम्हाला निरगुडपाड्याला जाण्यासाठी थांबला. तो थांबला खरा पण त्याच्या गाडीत सुतभरही जागा दिसेना. कसही करून जायचंच या जिद्दीने आम्ही त्याला गाडीच्या टपावरून न्यायला विनंती केली.

एक प्रवास...टपावरून! ;)
5

सुमारे अर्ध्या-पाऊण तासानंतर पंधरा-वीस घरांची वस्ती असणार्या कोटमवाडीत पोचलो, जी हरिहर गडाच्या अगदी पायथ्याला आहे. तिथे उतरल्यानंतर समोर सगळीकडे प्रचंड धुकं पसरलेलं दिसत होतं, जिथे झाडाची साधी फांदीसुद्धा दिसत नव्हती तिथे गडाचा तो प्रचंड कातळ कुठून दिसायचा.?! उशीरा का होईना पण पावसाने लावलेल्या हजेरीमुळे तिथला स्थानिक बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त दिसत होता. एकीकडे वाडीतली बरीचशी मोठी मंडळी शेतात राबताना दिसत होती तर दुसरीकडे त्यांच्या रिकाम्या घरातून त्यांची लहानशी चिल्ली पिल्ली बाहेर डोकावताना दिसत होती. कधी त्या लहानग्यांना तर कधी नांगरणीसाठी निघालेल्या एखाद्या शेतकर्‍याला विचारत शेवटी गडाच्या वाटेला लागलो तोपर्यंत घड्याळातले काटे अडीच वाजल्याचं दाखवत होते.

कोटमवाडीतली प्राथमिक शाळा अन् त्यामागे डावीकडे फणीचा डोंगर
8

13

6

पाहिलीये का कधी अशी रंगसंगती :)
7

भाताची खाचरं
10

'बरोबर पोहचू कि नाही?', 'नेमकी हीच वाट आहे का?', 'इथे तर काहीच दिसत नाही', 'आत्ता अडीचला चढतोय तर मग वर पोचणार कधी आणि खाली उतरणार कधी?' मनातल्या या सगळ्या प्रश्नांना अनुत्तरीत ठेऊन मुकाट गड चढायला सुरूवात केली.

9

जसजसं वर चढत होतो तसं वाट योग्यच असल्याची खात्री पटत गेली आणि आणखी उत्साहाने वर चढायला सुरूवात केली. सोबतीला धुकं कधी धुसर होत होतं तर कधी पुन्हा दाटून येतं होतं. सुमारे दिड तासाच्या भराभर चढाईनंतर आम्ही एका पठारावर पोचलो जिथे त्या पठाराच्या मधोमध एक त्रिशूळ उभा केला होता आणि त्यासभोवतीने शेंदूर फासलेले अनवट देव आम्हाला पाहायला मिळाले. एवढा चढून आलो होतो पण ती प्रसिद्ध कातळभिंत आणि त्या पायर्‍या काही दिसण्याची लक्षणं दिसत नव्हती. त्या अनवट देवांभोवती पाच मिनिटं विसावा घेतल्यानंतर डाव्या बाजूची वाट पकडून आम्ही पुन्हा निघालो.

11

अवघ्या पाचच मिनिटात एक छोटासा रॉकपॅच चढून आम्ही त्या कातळपायर्‍यांच्या पायथ्याला पोचलो. मागाहून मला कळालं, पठारावर ज्याठिकाणी शेंदूर फासलेले देव होते तिथून तो प्रचंड मोठा कातळ आणि त्या पायर्‍या समोरच दिसतात. पायर्‍यांपाशी पोचलो तेव्हा चार वाजले होते. वेळ फक्त घड्याळातच पुढे सरकत होती पण आमच्या आजुबाजूचा निसर्ग मात्र एखाद्या चित्रासारखा स्तब्ध झाला होता. सरळ उभ्या चढत जाणार्‍या त्या पायर्‍या पाहून आमच्यातल्या नेहमी आघाडीवर असणार्‍या 'सुपरमॅन'ला वर चढावं कि नाही असा प्रश्न क्षणभर पडला. त्याला कारणही तसंच होतं. सरळ आभाळात घुसलेल्या फक्त दिड-दिड फुटाच्या पायर्‍या, दोन्ही बाजूने धुक्याने वेढलेली खोल दरी, वरून रिपरिप पडणारा पाऊस. हे सगळं पाहून आम्ही जागेवरच थबकलो. बाकीचे दोघेही पार गपगार झाले. मनाशी विचार केला 'या पायर्‍यांना बघण्यासाठी इतक्या दूरवर आलोय आणि त्या पाह्यंल्याच आहेत तर आता पुन्हा माघारी फिरावं.'

हरिहरला यायचं ते फक्त अखंड कातळात खोदलेल्या या दगडी पायर्‍यांठीच!
12

त्याची भव्यता कळावी म्हणून आंजावरून हा फोटो साभार.
16

आणखी एक आंजा साभार.
27

आमच्यामागून आलेल्या नाशिकच्या काही लोकांनी दोन घटका तिथे विसावा घेत लगेचच भराभर त्या पायर्‍या चढायला सुरूवात केली. त्याचं पाहून आम्हालाही थोडासा हुरूप आला आणि त्यांच्यामागे आम्हीही हळूहळू वर चढायला सुरूवात केली. खालून प्रचंड अवघड वाटणार्‍या पायर्‍या प्रत्यक्ष चढताना मात्र त्यामानाने सोप्या वाटत होत्या. प्रत्येक पायरीवर दोन्ही बाजूस खोबण्या असल्यामुळे त्यांच्या आधाराने वर चढायला सोपं जात होतं. पण त्यातूनही खाली वळून पाहायला भिती वाटत होती.

14

सरळसोट उभ्या!!
15

25

साधारण सत्तर एक पायर्‍या चढल्यानंतर आपण गडाच्या पहिल्या दरवाजातून आत प्रवेश करतो. आत शिरल्यानंतर लगेचच उजवीकडे खडकात कोरलेली, शेंदूर फासलेली गणरायाची मुर्ती पाहायला मिळते. त्याच्या थोडेच पुढे मारूतीरायाही असाच पाहायला मिळतो. उजवीकडे कातळ आणि डावीकडे सरळ खाली जाणारी दरी यामधून निमुळत्या होत गेलेल्या वाटेने आपण पायर्‍यांच्या दुसर्‍या टप्प्यापाशी येतो. या वाटेने जाताना मध्येच एका ठिकाणी दरीकडच्या बाजूल वरच्या बाजूस एक छोटंस नेढ पाहायला मिळतं.

प्रवेशद्वार
18

प्रवेशद्वारातून टिपलेल्या पायर्‍या
28

गणपती बाप्पा
16

मारूतीराया
17

नेढं
19

तिथून थोडं पुढे गेल्यानंतर लगेचच कपार फोडून काढलेल्या पायर्‍या लागतात, तिथून सावकाशीने वर चढत अवघ्या दहा मिनिटात दुसर्‍या प्रवेशद्वाराने आपण गडाच्या पठारावर पोचतो. तिथे चढताना फार सांभाळून चढायला लागतं, घाई गडबड करून चालत नाही.

20

21

खडक फोडून त्यातून मधूनच काढलेली वाट आपल्याला पाहायला मिळते.

23

22

26

दुसरे प्रवेशद्वार
24

समुद्रसपाटीपासून गडाची उंची ३५०० फुट इतकी आहे खरी, पण त्यामानाने गडाचा घेरा फारच छोटा आहे. गडाचा इतिहास बहुत प्राचिन असावा असं वाटतं. अगदी सातवाहन काळापासूनचा. गडाचा घेरा फार छोटा असल्यामुळे वर गड वसवला गेला नसावा, परंतू तळकोकणातून वर नाशिकला आलेल्या व्यापारी वाटा आणि आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी लष्करी तळ म्हणून याची निर्मिती झाली असावी असं म्हणता येईल. गडावर असलेली एकमेव इमारत म्हणजेच दारूगोळ्याचे कोठार पाहिले की याची खात्री पटते. कालौघात याची मालकी शहाजी राजांकडे, कधी अहमदनगरच्या निजामशाहीकडे, तर कधी मुघलाकडे जात राहीली. तदनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारी पेशवे असलेल्या मोरोपंत पिंगळ्यांनी हा गड १६७० साली स्वराज्यात सामील केला. सरतेशेवटी इंग्रजांच्या १८१८ सालच्या 'गड उडवा, मराठे बुडवा' या मोहिमेत याचा ताबा इंग्रजांकडे गेला. त्र्यंबकच्या रांगेत हरिहरसोबत असणार्‍या बसगड, भास्करगड, फणीचा डोंगर, त्र्यंबकगड या रांगेमुळे गडाचे लष्करीदृष्ट्या महत्व अधोरेखित होते.

दुसर्‍या प्रवेशद्वारातून आत शिरल्यानंतर एक छोटीशी टेकडी चढायला लागते. ती चढून गेल्यावर डावीकडच्या वाटेने जाताना मध्येच पाण्याची काही टाकी आणि काही उरलेले अवशेष पाहायला मिळतात. त्याच वाटेने थोडंस पुढे चालत राहिल्यानंतर एका ठिकाणी पठारावर मारूतीचे आणि शिवाचे छोटेसे मंदिर आपल्याला पाहायला मिळते. हनुमंताच्या छोटेखानी मंदिरामागे पाणी अडवून केलेला एक छोटासा तलाव आपल्याला पाहायला मिळतो, त्यातलं पाणी पिण्यायोग्य आहे.

पाण्याची टाकी
32

33

हनुमंताचं आणि शिवशंभूचं छोटेखानी मंदिर.
29

30

31

गोड्या पाण्याचं छोट्टसं तळं
34

त्याचमार्गाने थोडं पुढे गेल्यावर दगडात बांधलेली एक आयताकृती इमारत म्हणजे अर्थातच दारूगोळ्याचं कोठार पाहायला मिळते. आत प्रवेश करण्यासाठीचं त्याचं प्रवेशद्वार म्हणजे दिड फुट बाय दोन फुटाची दगडी चौकट आहे. त्या इमारतीत दोन खोल्या समोरासमोर आहेत. १०-१२ लोकांच्या राहाण्याची व्यवस्था तिथे आरामात होऊ शकते. आम्ही गेलो तेव्हा तिथे शिवमगिरी नावाचे नाथपंथी योगी राहात होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी अखंड मौन पाळलं आहे आणि पुढच्या वर्षीच्या कुंभमेळ्यानंतर ते आपलं मौन सोडणार आहेत अशी माहीती मिळाली. पोटात भुकेचे कावळे ओरडल्याची जाणिव झाली आणि त्या इमारतीत बॅगा टाकत आम्ही व्यवस्थित पोटपुजा उरकली.

35

गडावरच्या इमारतीत राहणारे नाथपंथी योगी शिवमगिरी महाराज.
36

तिथे दहा-पंधरा मिनिटे विश्राम केल्यानंतर आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. खाली उतरायली सुरूवात केली तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते. खालच्या वाडीतून शेवटची गाडी कुठे जाणारी आहे आणि किती वाजता आहे याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती म्हणून उतरताना अगदी भराभर उतरायला सुरूवात केली. अगदी तासाभरातच म्हणजे सातला खाली उतरलो. तोवर आजुबाजूच्या भागातलं सगळं धुकं निवळून सगळा प्रदेश अगदी स्वच्छ धुतल्यासारखा दिसायला लागला होता. हरिहर, त्यासमोरचा फणीचा डोंगर, त्यापुढचा भास्करगड सगळं लख्ख दिसू लागलं होतं.

धुक्यात हरवलेला फणीचा डोंगर
37

भास्करगड
38

हरिहर
39

40

पायथ्याची कोटमवाडी
41

खाली पोचल्यावर जाता जाता वाटेतच एका काकांनी शेवटची खोडाळ्याला जाणारी गाडी आता अगदी पाच मिनिटातच येईल हे ऐकल्यानंतर पळतच मुख्य रस्ता गाठला. खोडाळ्याहून कुठच्याही गाडीने नाशिक किंवा घोटी गाठता येईल या आशेने आम्ही आठ वाजता खोडाळ्याला पोचलो, पण तिथेही आम्हाला धक्का बसायचा बाकी होता. शेवटची शटल खोडाळ्याला मुक्कामी येऊन थांबली होती आणि तिथून पुढच्या आमच्या प्रवासाला फुलस्टॉप पडतोय की काय असं वाटून दोघांनी मुक्कामाची सोय पाहायला सुरूवात केली नि दोघांनी एखाद्या खाजगी गाडीची व्यवस्था पाहायला सुरूवात केली. शेवटी स्थानिक मुलांच्या मदतीने बर्‍याच घासाघिसीनंतर खोडाळा ते कसारा या ३७ किमीच्या अंतरासाठी अन् पाऊणतासाच्या प्रवासासाठी हजार रूपये देऊन खाजगी गाडीवाला एकजण यायला तयार केला. त्यावेळी पैशांपेक्षा आम्हाला वेळ खुप महत्वाची वाटली. त्या गाडीने कसारा स्थानकात सोडल्यानंतर तिथून मुंबईकडे येणार्‍या ९.२१ च्या लोकलमधल्या बाकड्यावर जेव्हा आम्ही चौघांनी देह पसरून दिला तेव्हा आम्हा चौघांच्याही चेहर्‍यावर एक वेगळं समाधान झळकत होतं. त्याची तुलना अखंड वारी चालून पंढरपुरातल्या गाभार्‍यात विठुरायाचे दर्शन घेतलेल्या वारकर्‍याच्या मुखावर दाटलेल्या समाधानाशी करता येईल किंवा करवीरच्या अंबाबाईचा पौषातला किरणोत्सव पाहताना तिच्या लेकरांच्या चेहर्‍यावर जे समाधान उमटतं त्याच्याशी करता येईल!!

सह्याद्री, त्यातल्या डोंगररांगा, त्यावरचे गडकोट किल्ले, त्यावरच्या अनवट घाट-वाटा, या सर्व दुर्गम दुर्गांचे अधिपती छत्रपती शिवराय या सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्यासाठी गुरूतुल्य! माता-पित्याच्या जोडीने या गुरूचे स्थानही तितकेच महत्वाचे. सह्याद्री तुम्हाला अंगाखांद्यावर खेळवत अनेक चांगल्या वाईट गोष्टी शिकवत असतो. तुमचे अनुभव समृद्ध करत असतो. त्याचा राकटपणा जितका कणखर तितकीच त्याची माया अपार आहे. १२ जुलैच्या गुरूपौर्णिमेला या समाधिस्त योग्याने मला अनेकाविध अनुभवांनी समृद्ध करताना माझ्या आयुष्यातलं त्याचं गुरूपद आणखी अढळ केलं.!!

- इति लेखनसीमा

हरिहर मुंबईहून (स्वतःची गाडी बरोबर नसताना) करायचा असल्यास आदल्या दिवशी रात्री त्र्यंबकेश्वरला येणे अथवा पहाटेपर्यंत इगतपुरीला येणे श्रेयस्कर.

स्वतःच्या गाडीने यायचे असल्यास कोटमवाडीला न जाता घोटी त्र्यंबकेश्वर रस्त्यावरून मध्ये घाटात गाडी लावून सपाटीवरची अर्ध्या पाऊण तासाची चाल करून थेट हरिहरच्या पायर्‍यांपाशी पोहोचता येते. ह्यात दीड तासाची चढण पूर्णपणे टाळता येते.

बाकी ते नेढं नैसर्गिक नसून दुर्गस्थपतींनींच कोरवलेले आहे. ह्या नेढ्याजवळाची जी डोक्यावर कातळ असलेली आडवी वाट आहे अगदी तशीच ब्रह्मगिरीला पण आहे.

दोरखंड ओवण्यासाठी हे तर सरळच आहे.

पण दोरखंड का ओवायचा हा प्रश्न समोर येतो.

आता बहुधा मग ही किल्ल्याची वाट कोरून काढताना सुरुवातीला आधारासाठी हे नेढं कोरलेले असावं किंवा ही वाट कोरून काढल्यावर दोराचा उपयोग तिथले (अजून एक लाकडी) प्रवेशद्वार बंद करण्यासाठी करीत असावेत किंवा निव्वळ पहिला दरवाजा शत्रूच्या ताब्यात गेल्यावर तिथून दोराचा आधार घेऊन निसटून खाली येण्यासाठीही कोरलेलं असावं.

व्यक्तिश: मला पहिला तर्कच जास्त योग्य वाटतो.

 हरिहर
 
सह्याद्रीचा महिमा वर्णन करताना सह्याद्रीकार स. आ. जोगळेकर म्हणतात की, पृथ्वीला भार दोनच मोठ्या पर्वतांचा- एक उत्तरेकडील हिमालय, तर दुसरा दक्षिणेकडील सह्याद्री,
सह्याद्री नामा नग हा प्रचंड हा दक्षिणेचा अभिमानदण्ड
गुजराथ, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ हे पश्चिम किनाऱ्याचे चार मुख्य विभाग. या तिघांची विभागणी सह्याद्रीनं केली आहे. कोकण, घाटमाथा आणि पठार हे महाराष्ट्राचे मुख्य भौगोलिक विभाग भिन्न असले तरी, त्या सर्वांचे अंतर्याम एकच. हे अंतर्याम म्हणजे सह्याद्री. ह्याच सह्याद्रीची एक रांग नाशिकच्या मावळतीस मुख्य रांगेपासून वेगळी निघालेली आहे. या रांगेचे नाव आहे 'त्रिंबकरांग'. या रांगेला सह्याद्रीतील इतर डोंगररांगांपेक्षा अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण- पश्चिम महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या' 'गोदावरी' नदीचा उगमही याच पर्वतरांगेतील 'ब्रह्मगिरी' शिखरावर झाला आहे.
या रांगेत ब्रम्हगिरीच्या सोबत 'सह्याद्रीच्या स्कंधावरी दुर्गम दुर्ग ज्याच्या' असे स्तोत्रात वर्णन केल्याप्रमाणे बसगड, हरिहर, अंजनेरी, वाघेरा, खैराई, सोनगिरीसारखे एकाहून एक दुर्गम किल्ले आहेत. पावसाळ्यात पाण्याच्या अभिषेकाने देदीप्यमान झालेले, एरवी मात्र कोरडे ठणठणीत असलेले काळेकभिन्न कडे, दुर्गमवाटा आणि पाण्याचे दुर्भिक्ष ही या सर्व किल्ल्यांची एकाहून एक वैशिष्ट्ये. मुळात दुर्गम भागात असलेल्या या हरिहरला जाण्याचा मार्गही फारसा प्रचलित नाही, त्यामुळे बरीच ट्रेकर्स मंडळी इथे फिरकत सुद्धा नाहीत. हरिहर ही निसर्गाने बनविलेली एक उत्तम
कलाकृती आहे, त्याला घडविण्यात जेवढा निसर्गाचा हात आहे, तेवढाच मानवाचाही आहे. निसर्गाने त्यात जशी दुर्गमता ओतप्रोत भरलेली आहे, तशी मानवाने त्यावर मात करून त्यावर जाण्याचे मार्ग बनविले. त्यामुळे या कलाकृतीला एकदा तरी अवश्य भेट द्यायलाच हवी.
हरिहरच्या पायथ्याचे गाव आहे 'निरगुडपाडा'. या निरगुडपाड्यापर्यंत पोहोचायला तीन मार्ग आहेत. पहिला नाशिक-त्र्यंबकेश्वर-निरगुडपाडा. यामार्गे त्र्यंबकेश्वरपासून २२ कि.मी.वर निरगुडपाडा गाव लागते. दुसरा घोटी-निरगुडपाडा आणि तिसरा मार्ग कसारा-खोडाळा-निरगुडपाडा असा आहे. मुंबापुरीच्या लोकांना मात्र कसारामार्गे येणे जास्त सोयीचे. कसाऱ्याचा थळघाट चालू होण्यापूर्वी एक फाटा डावीकडे जव्हारच्या दिशेला वळतो. या वाटेवर पहिले गाव लागते ते विहीगाव, एकदा का हे विहीगाव सोडले की, चालू होतो वैतरणेच्या खोऱ्यातून जाणारा वळणावळणाचा घाटरस्ता. खोडाळ्यापर्यंत या वैतरणेची साथ आपल्याला लाभते, इथून पुढे मात्र हातात हात घालून संगे धावणारे वैतरणेचे पात्र दिशा बदलून मोखाड्याकडे वळते आणि आपली गाडी निरगुडपाड्याकडे. खोडाळ्यापासून १५ कि.मी. अंतरावर निरगुडपाडा गाव आहे.
निरगुडपाडा हा बऱ्यापैकी मोठा आदिवासी पाडा आहे. याच्या समोरच्या अंगास हरिहर आहे, तर डाव्या अंगाला बसगड आहे. हरिहर आणि बसगडाच्या मध्ये 'फणी'चा डोंगर आपला फणा उभारून आपल्या अस्तित्त्वाची जाणीव करून देतो. दोन दिवसांची सवड काढून आल्यास बसगड, हरिहर आणि त्रिंबकगड सहजपणे पदरात पाडून घेता येतात.
आम्ही निरगुडपाड्याला पोहोचलो, तेव्हा पहाटेचे तीन वाजले होते. घाटमाथ्यावरचा गारठा मोठा जबरदस्त होता. रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या घराच्या एका अंगणात पथारी पसरून ताणून दिली आणि पहाटे जाग आली ती, हरिहरच्या मागून उगवणाऱ्या लाल तांबड्या सूर्यनारायणाच्या दर्शनाने. निरगुडवाडीतून त्र्यंबकेश्वरकडे जाणाया वाटेने पायी पुढे गेल्यावर पाच मिनिटांवर एक छोटासा पूल लागतो. तो पार केला की, एक वाट डावं मारते आणि शेताडीत शिरते. या वाटेने पुढे पंधरा मिनिटे चालत गेले की, हरिहरचा पायथा येतो. समोरच्या डोंगरसोंडेवरुन नागमोडी वळणावळणाच्या वाटेने किल्ला चढताना सुरुवातीला मजा येते. पण पुढे अंगावर येणारा चढ मात्र चांगलाच घाम गाळतो. नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत या वाटेवर डिंगळा, पांगळी. गोकर्ण, कनपेट अशा निरनिराळ्या जांभळ्या-पिवळ्या रंगाची फुले फुललेली दिसतात.
पायथ्यापासून अर्ध्या तासाच्या चढाईनंतर एक मोठे पठार लागते. पठाराच्या एका कडेला हरिहरचा अजस्त्र पहाड हातपाय पसरून निवांत निद्रा घेत असलेला दिसतो.
या पठारावरून दोन वाटा फुटतात. एक वाट समोर वर किल्ल्याकडे जाते, तर दूसरी वाट डावीकडे हरिहर उजव्या हाताला ठेवून पलीकडे गेलेली दिसते. या वाटेने अर्धा तास चालत गेल्यावर एक आश्रम लागतो. या आश्रमाच्या बाहेर दगडात बांधलेली एक बारव आहे. या बारवेच्या एका भिंतीवर देवनागरी लिपीतील एक शिलालेख कोरलेला आहे. यामध्ये 'हरिहर विलसदे' असा हरिहरच्या किल्ल्याबद्दलचा उल्लेख आलेला आहे. सध्या या शिलालेखावर शेंदूर फासलेला असल्याने त्यावरील सर्व शब्द ओळखता येत नाहीत, पण या शिलालेखामध्ये 'शालिवाहन शके, गणेशाय नमः, मंगलाचरण' असे काही शब्द आलेले आहेत. जर यामधील सर्व शब्दांचा व्यवस्थित अर्थ लागला, तर हरिहरच्या मूक इतिहासाला नक्कीच वाचा फुटेल. या आश्रमाच्या समोरून एक वाट ब्रह्मा डोंगरास वळसा घालून त्रिंबकगडाकडे जाते. या वाटेने अनेक ट्रेकर्समंडळी हरिहर ते त्रिंबकगड असा ट्रेकसुद्धा करतात. आल्यापावली हे सर्व पाहून पठारावरच्या आपल्या मुख्य जंक्शन पॉईंटपाशी यायचे. इथून किल्ल्याकडे पाहिल्यावर समोरच्या कातळावरील उभी रेघ खालून स्पष्टपणे दिसते. ही रेघ कसली? असा विचार करत असताना पठारावर भेटलेल्या गावकऱ्याने सांगितले की, ही तर खुद्द किल्ल्यावर जाण्याची मुख्य वाट आहे. हे ऐकून पोटात भीतीचा गोळा आला.
क्षणभर शाळेत गणिताचा पेपर कठीण असला की, कसा देवाचा धावा करायचो तसा धावा करायला लागलो. परमेश्वरकृपेने तो पेपरही सोडविला होता आणि आता हा हरिहरचा पेपरसुद्धा त्याच्याच कृपेने सोडवायचा असे म्हणून समोरच्या नाकाडावरून चढणारी वाट धरली आणि अर्ध्या तासात कातळातील रेघेपाशी पोहोचलो. त्याच्या जवळ पोहोचताच या रेघेचे रूपांतर मोठ्या नाळेमध्ये झालेले दिसते आणि या नाळेत सुमारे १५०च्या वर पायऱ्या कोरलेल्या दिसतात. या पायऱ्यांचा चढही काही साधासुधा नाही, तर चांगलाच ७० अंशी कोनात आहे. अनेक ठिकाणी या पायऱ्यांमध्ये आधारासाठी खोवण्याही कोरलेल्या दिसतात. काही ठिकाणच्या पायऱ्या ब्रिटिशांच्या कृपेने ढासळलेल्या आहेत, त्यामुळे तिथे जरा जपूनच जावे लागते.
या पायऱ्या चढताना सन १८१८ च्या वेळेच्या ब्रिटीश कॅप्टन ब्रिग्जचे हरिहरबद्दलचे उद्‌गार आठवले. तो म्हणतो,
"Harish fort is described by captain Brigg's as truly wonderful words', he says 'can give no idea of its dreadful steepness. It is perfectly straight for, I suppose 200 feet, and can only be compared ladder over a height of this nature. The steps badly broken and holes were cut in the rock to support the hands. So difficult was the hill to climb that captain Briggs was satisfiesd that five men could hold it against any odds."
आज खरोखरच कॅ. ब्रिग्जचे उद्‌गार सार्थ ठरणार असे दिसत होते. हरिहरची ७० मीटरची ही दगडी शिडी चढून आम्ही किल्ल्याच्या पहिल्या दरवाज्यात दाखल झालो. किल्ल्याचा हा दरवाजा पश्चिमाभिमुख आहे. या प्रवेशद्वाराची विटांची कमान गतवैभवाची साक्ष देत आजही उभी आहे. या दरवाज्याच्या जवळचा कातळ आतमध्ये गेला असल्याने तिथे गुहेसारखा खोलगट भाग निर्माण झाला आहे. इथून पुढे जाणारी वाट आडवा कातळ कापून निर्माण केलेली आहे. आजही कातळाच्या वरील बाजूस कातळ खोदल्याच्या खुणा पाहावयास मिळतात. घटिकाभर इथे थांबायचे अन् पुढे निघायचं. इथून पुढची सव्वाशे मीटरची वाट म्हणजे जरा दिल थाम के चलिये अशी आहे, कारण या वाटेच्या डाव्या बाजूला डोळे फिरवणारी दरी आहे, तर उजव्या बाजूचा कातळकडा जरा खाली झुकलेला असल्यामुळे यावर आपला कधी कपाळमोक्ष होईल याचा नेम नाही. हरिहरची बोगद्यातील ही वाट आपल्याला देवगिरीच्या प्रवेशमार्गाची आठवण करून देते. यानंतर किल्ल्याचा दुसरा दरवाजा लागतो. हा दरवाजा पश्चिमाभिमुख आहे.
या दरवाज्यातून आत शिरल्यावर पुढे खडकात खोदलेल्या वीस-पंचवीस पायऱ्या लागतात. त्या चढून वर जाताना पुन्हा कॅप्टन ब्रिग्जच्या "five men could hold it against any odds." ह्या वाक्याची आठवण होते. पुढे गेल्यावर गडाचा तिसरा दरवाजा लागतो. हा दरवाजासुद्धा पश्चिमाभिमुख आहे. या दरवाज्यातून आत शिरल्यावर डाव्या बाजूच्या दरीत कड्यालगत आणखी एका दुमजली दरवाजाचे अवशेष दिसतात. या दरवाज्यापर्यंत जाणारी वाट मात्र पूर्णपणे मोडकळीस आलेली आहे. दरीमधील या दरवाज्यातून एक वाट खाली उतरते. ही वाटसुद्धा सुरुंग लावून फोडून काढलेली दिसते. पुढचा एक कातळटप्पा ओलांडला की, आपण थेट हरिहरच्या माथ्यावर पोहोचतो.
एखादा किल्ला जिंकण्यासाठी किती अडचणींना तोंड द्यावे लागते हे जर कुणाला जाणून घ्यायचे असेल, तर त्याने हरिहरचा किल्ला नक्कीच पाहायला हवा. कारण या
किल्ल्याच्या सर्व बाजूस तुटलेले कातळकडे आहेत, ज्यावर चढून जाण्यासाठी दो लावणे आवश्यक आहे, अन्यथा आडमार्गान किल्ल्यात प्रवेश करणे अशक्यच आहे जर हा पर्याय शत्रूकडे उपलब्ध नसेल, तर त्यांच्याकडे एकच पर्याय उरतो तो म्हणजे, कातळकोरीव पायऱ्यांच्या वाटेने चढायचे आणि किल्ल्यावरील शिबंदीला मारून काढायचे, पण ते सुद्धा अशक्यच, कारण या वाटेने एकावेळी एकच सशय सैनिक मार्गक्रमणा करू शकतो. शत्रूला किल्ला जिंकून घेण्याच्या मार्गात किती अडचणी याव्यात याचा पुरेपूर विचार हा किल्ला बांधताना इथे केलेला दिसतो.
किल्ल्याच्या माध्याचा घेरा लहान वाटत असला, तरी हरिहरचा माथा बराच प्रशस्त आहे. उजवीकडे पश्चिम बाजूस बालेकिल्ल्यासारखा एक उंचवटा दिसतो, पण तो काही हरिहरचा बालेकिल्ला नाही. ही म्हणजे नुसतीच एक कातळटोपी. या टोपीवर आपल्याला जायचे आहे, पण तत्पूर्वी आपल्याला किल्ल्यावर फेरफटका मारून यायचा आहे.
किल्ल्याच्या माथ्याच्या पठारावर आग्नेय टोकाकडे लांबवर एक वास्तू लक्ष वेधून घेते, तिथपर्यंत जाण्याअगोदर वाटेत एक मोठा तलाव ओलांडावा लागतो. या तलावाच्या काठावर हनुमंताचे पश्चिमाभिमुख मंदिर आहे. या हनुमंताचे या परिसरातील गावावर मोठे गारूड आहे म्हणून आजूबाजूच्या पाड्यातील लोक त्याच्या दर्शनासाठी किल्ल्यावर येतात. तलावाच्या काठावर दोन चौथरे आहेत. यांपैकी एकावर शिवपिंडी आहे, तर दुसऱ्यावर भग्नावस्थेतील हनुमंताची मूर्ती आहे. किल्ल्यावरील या तलावात बारमाही पाणी असते. किल्ल्यावर जो काही सावलीचा आडोसा आहे तो फक्त याच भागात, अन्यथा सर्व परिसर म्हणजे एकदम रखरखीत. तलावावरून थोडे पुढे सरकले की वाटेच्या डाव्या हाताला पाण्याचे एक टाके लागते. हे टाके पाहून थोडे अंतर पुढे गेल्यावर वाटेत पुन्हा पाण्याची तीन ते चार टाकी लागतात. ही टाकी पाहण्याच्या नादात नकळतच आपण लांबवरून दिसणाऱ्या इमारतीच्या अगदी पुढ्यात आलेलो असतो. ही इमारत म्हणजेच किल्ल्यावरील दारूकोठार आहे. दारूकोठाराची ही इमारत किल्ल्यावरील एकमेव सुस्थितीत उभी असणारी इमारत. या कोठाराच्या वरच्या बाजूला काही कोनाडे केलेले आहेत, त्याचे प्रयोजन काय असावे, हे मात्र समजत नाही. कोठाराच्या आत शिरण्यासाठी दोन पायऱ्या उतरून खाली जावे लागते, आतील बाजूस एक मोठा चौथरा देखील आहे. हे कोठार म्हणजे किल्ल्यावरील मुक्कामासाठी सुयोग्य अशी जागा. आपण इथे सामान ठेवून किल्ल्याच्या भ्रमंतीला निघायचे. सर्वांत प्रथम कोठाराच्या मागे असणाऱ्या पठारावरील पाण्याच्या टाक्यांपासून
सुरुवात करायची. इथे एकापुढे एक अशी रांगेत तीन ते चार पाण्याची टाकी खोदलेली आहेत. पण यांपैकी कोणत्याही टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. टाक्यांच्या घोडेसे पुढे खालच्या अंगाला पाण्याचा एक तलाव आहे.
हरिहरची कातळटोपी
पूर्वेकडील भागात फेरफटका मारून झाला की, पुन्हा आपण मोठ्या तलावापाशी यायचे. इथून झाडीतून एक वाट वर हरिहरच्या कातळटोपीवर चढते. वाट निसरडी असल्याने जरा जपून जावे लागते. हा सर्व खटाटोप कशासाठी? तर सुप्रसिद्ध स्कॉटीश कडा पाहण्यासाठी. या टोपीच्या मागे हरिहरचा प्रसिद्ध असा स्कॉटिश कडा आहे. स्कॉटिश कडा हा प्रस्तरारोहींचे मोठे आकर्षण आहे. मुंबई, पुणे आणि नाशिकचे अनेक प्रस्तरारोही हा कडा सर करण्यासाठी हरिहरला येतात. इथे वर एक ध्वजस्तंभ उभा केलेला दिसतो.या कातळटोपीवरून त्र्यंबकेश्वर रांगेमधील पहाडांचे मोठे लोभसवाणे दृश्य दिसते. वैतरणेच्या जलाशयाच्या पलीकडे अंजनेरीचा पहाड, घरगड दिसतो, तर जलाशयाच्या अलीकडे फणीचा डोंगर, बसगड आणि उतवड दिसतात. या सर्वांच्या मागे क्षितिजावर धूसरसे कळसूबाई रांगेतील अलंग, मदन, कुलंग, पट्टा, औंढा किल्लेसुद्धा दिसतात, तर त्याच्याच पुढे कावनई, त्रिंगलवाडीसारखे किल्ले देखील ठळकपणे दिसतात.
हरिहर किल्ल्याचा भूगोल आणि इतिहास मात्र एकमेकांच्या विरुद्ध आहे. किल्ल्याच्या इतिहासाबद्दल फारच तुरळक उल्लेख आढळतात. इ.स. १६३६ मध्ये मुघल अधिकारी व आदिलशाही यांच्यात झालेल्या तहानुसार संयुक्त सैन्याने शहाजी राजांचा माहुली येथे पराभव केला. त्यानंतर शहाजीराजांनी त्यांच्या ताब्यातील हा निजामशाही किल्ला खानझमानकडे दिला. पुढे इ.स.१६७०-७१ च्या सुमारास शिवाजीराजांनी नाशिक-बागलाणातील किल्ले जिंकून घेतले, त्याच वेळी हा देखील
आपल्या ताब्यात घेतला असल्याची शक्यता आहे. इ.स. १६८८ च्या शेवटी मुघल सरदार मातब्बरखानाने हरिशगड, त्रिंगलवाडी, मदनगड, मोरोदंत, औंढा, कावनई हे किल्ले फितुरीने घेतले. यापूढे सन १८१८ नंतर त्रिंबकचा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. त्यानंतर लगेच त्यांनी हरिहरचा किल्ला आपल्या पदरात पाडून घेतला.
हरिहरवरील दारूकोठार हे मुक्कामासाठी जरी सुयोग्य जागा असली, तरी बंदिस्त चार भिंतींमध्ये मुक्काम करण्यापेक्षा पठारावर मुक्काम करण्याची मजा काही आगळीच. जणू पठारावरून तासनतास या विशाल आकाशाकडे निवांतपणे पहात राहावं, त्यात दिसणाऱ्या चांदण्या मोजण्यापेक्षा त्यांना केवळ न्याहाळावं. आपण म्हणतो किल्ल्याच्या इतिहासाचे कोणीच साक्षीदार नाही, पण हे आकाश, यामधील तारका हे तर किल्ल्यांवरील घडामोडींचे एकमेव साक्षीदार. खरोखरच यांना जर बोलण्याची शक्ती असती, तर किती बरं झालं असतं, नाही?
निसर्गासारखा नाही रे सोयरा गुरु सखा बंधु मायबाप त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप मिटती क्षणात आपोआप
किल्ल्याची उंची : समुद्रसपाटीपासून ११२० मीटर (३६७४ फूट)
तालुका : त्र्यंबकेश्वर
किल्ल्याची श्रेणी : मध्यम
किल्ल्याची इतर नावे : हर्षगड, हरिहर
डोंगररांग: त्रिंबक रांग
पायथ्याचे गाव : निरगुडपाडा
पायथ्याच्या गावापासूनचे अंतर : निरगुडपाड्यापासून तीन तास.
जवळचे एस.टी. स्थानक : त्र्यंबकेश्वर
राहण्याची सोय : किल्ल्यावर एक दारूकोठाराची इमारत आहे.
त्यामध्ये ४ ते ५ लोकांची राहण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय : नाही.
पिण्याचे पाणी : किल्ल्यावर दारूकोठाराच्या समोर बारमाही पिण्याच्या
पाण्याची टाकी आहेत.
जाण्यासाठी उत्तम कालावधी : जून ते मार्च.
किल्ला फिरायला लागणारा वेळ : एक तास.
जवळपासची गावे : निरगुडपाडा,
टाकेहर्ष
 
   सोनगिरी - खैराई - वाघेरा - बसगड - हरिहर

नोट : ७ वर्षांपूर्वी लिहिलेला लेख सापडला, बात पुरानि - हर्षल कि जुबानी!!! 

नाशिक ला जाउन भिडावे आणि प्रेमात पडावे असे हे नाशिक चे किल्ले.. प्रत्येक सह्य्वेडा या जिल्ह्यावर अतोनात प्रेम करतो.. गगनाला भिडलेले इथले किल्ले आणि देव-देवतांच्या या शहरामुळे यात्रेकरूंचे शहर "सिटी ऑफ पिलग्रिम्स" असा फलक आपल्याला नाशिक शहरात प्रवेश करतानाच नजरेस पडतो.

सोनगिरी किल्ला 
                                                                        
मी आणि माझा मित्र संदीप इचके आमचं लक्ष नाशिक मधील एका ऑफ-बीट अश्या किल्ल्यांकडे गेले आणि मी मोहीम आखली.. श्री आनंद पाळंदे ह्यांच्या डोंगरयात्रा हे मार्गदर्शक पुस्तक सोबत घेऊन संदर्भ घेतला.. 

साल २०११, डिसेंबर चे दिवस होते.. थंडीत कुडकुडत आम्ही बेहाल होणार होतो. १९-२१ डिसेंबर अशी तारीख ठरली. सोनगिरी - खैराइ - वाघेरा - बसगड(भास्करगड) आणि हरिहर(हर्षगड) असे किल्ले ह्या मोहिमेत पहायचे असे ठरवले होते...१९ ला संध्याकाळी ५.३० वाजता मी आणि संदीप माझ्या डिस्कवर गाडीवर निघालो.. गाडीसमोर प्रथेप्रमाणे नारळ फोडला, हार घातला आणि गणपती बाप्प्पा मोरया म्हणत नाशिक कडे कूच केली. थंडीत कुडकुडत नाशिक ला रात्री ११.३० ला पोहोचलो. तिथून पेठ चा रस्ता धरला आणि रात्री १.३० ला पेठ ला एस-टी स्थानकावर जाऊन डबा खाउन झोपी गेलो. आता आम्ही पुण्यापासून २८२ किलोमीटर चा पल्ला गाठला होता..२० तारखेला ला पहाटे ६ ला उठून स्थानकावर जो मिळेल तो नाश्ता केला आणि सोनगिरी कडे निघालो.. पेठ- सोनगिरी साधारण ८ किलोमीटर आहे.. सकाळी ८ वाजता सोनगिरी चढायला सुरुवात केली.. किल्ला चढताना शेवटच्या टप्प्यावर माणसाच्या उंचीएवढे गावात त्रास देत होते.. वाट काढत कसेबसे माथ्यावर पोहोचलो..बघतो तर काय माथ्यावर काहीही नाही..माथ्यावर भवानी देवीचे मंदिर आहे कुठेतरी वाचले होते..गावतल्या लोकांनी ती देवीची मूर्ती खालच्या भुवन गावात नेउन ठेवली होती.  एक कोरडी पडलेली विहीर, तटबंदी चे अवशेष एवढेच काय ते ह्या किल्ल्यावर पाहण्यास शिल्लक होते.. किल्ल्यावरून वाघेरा, रामशेज, दमणगंगा नदीचं खोर असा नजारा पहिला आणि झटझट खाली उतरलो. आता दुसर्या किल्ल्याच्या दिशेने निघालो..तो म्हणजे खैराइ. 
खैराई किल्ला 
तासाभरात हरसूल गाठले. हरसूल वरून ठाणापाडा वरून खैरपाली(खैराइ चा पायथा) गावात जाउन धडकलो. गावात एका गृहस्थांकडे गाडी लावली. पाण्याची बाटली भरून खैराइकडे निघालो. या गावातून किल्ला दिसत नव्हता..पहिल्या पठारावर येउन पोहोचलो..आणि किल्ला अजून बराच लांब आहे असा कळाल. तासाभराच्या पायपीटी नंतर माथ्यावर पोहोचलो. किल्याच्या पसारा तसा मोठा असून माथा छोटाच आहे. बुरुज, २ तोफा, पाण्याची टाकी, शेंदूर फासलेला गणपती आणि हनुमान ह्यांचे दर्शन घेतले आणि अर्ध्या-पाउण तासात गडफेरी पूर्ण केली. गडावरून हरिहर, उतवड , त्रिंबक रांगेला पाया पडत सुंदर पण दुर्लक्षित किल्ला पदरात पडून घेतला.

खैराई किल्ल्यावरील बुरुजाचे अवशेष
दुपारी २.३० च्या सुमारास खाली गावात परतलो. आता पोटात कावळे ओरडायला लागले होते.हरसूल मध्ये "मिस-कॉल खानावळ" ह्या खानावळीत आकंठ जेवण केले.

 आता साहजिकपणे फार कंटाळा आला होता. पण अजून एक किल्ला करायचा बाकी होता तो म्हणजे वाघेरा. आम्ही वाघेरा हा किल्ला छोटासा आहे ह्या समजुतीत होतो..आणि  दुपारी ४ वाजता आम्ही वाघेरागावात पोहोचलो. किल्ला पाहिल्यवर तोंडचे पाणीच पळाले..अबब केवढा हा किल्ला, केवढा हा त्याचा पसारा..६.१५ पर्यंत आपण कसा काय किल्ला पाहणार. कधी खालती येणार असे असंख्य प्रश्न मनात येउन घर करत होते. 
वाघेरा किल्ला
आम्ही सरळ गावातून एक वाटाड्या घेतला आणि वाघेरा किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या धरणाच्या भिंतीवरून कशीबशी गाडी चालवत छोट्याश्या पाड्यावर येउन पोहोचलो. इथून अर्ध्या तासाच्या चढाई नंतर एका पठारावर येउन पोहोचलो. आता माथा दिसू लागला पण वाटेत एकही झाड नव्हते. असा हा बोडका किल्ला चढताना चांगलीच दमछाक होत होती. माथ्यापासून थोडेसे खालती उजव्या हाताला छोटेसे टाक आपल्या नजरेस पडते. तिथून एक छोटा कातळटप्पा चढून आम्ही माथ्यावर जाउन पोहोचलो. येथे एका दगडाला गावकर्यांनी शेंदूर फासून ठेवला आहे आणि ह्या ठिकाणाला गावकरी भैरी-आई असे संबोधतात. 

पठारापासून माथ्यावर यायला आम्हाला पाउण तास लागला. आता ५.१५ वाजले होते. किल्ल्यावरून रामशेज, देहेर, त्रिंबकगड, खैराइ परिसर स्पष्ट दिसत होता. गडाच्या मागील बाजूस असलेल्या पायवाटेने उतरण्यास सुरुवात केली. घासारायुक्त पायवाटेने थोडा खाली उतरल्यावर ३ पाण्याची कोरडी टाकी दिसली. आता संध्याकाळचे ५.४५ वाजले होते. इथून आता लगेच निघावे लागणार होते. तडख निघालो आणि संध्याकाळी ६.३० च्या सुमारास वाघेरा गावात पोहोचलो. सुर्यास्ताचा आनंद घेत आम्ही त्रिंबकेश्वर च्या दिशेने निघालो.

संध्याकाळी ७.१५ वाजता त्रिंबकेश्वर ला माझ्या मामाकडे पोहोचलो. रात्री जेवायला साजूक तुपातील शिरा असा बेत होता. ट्रेक ला जे मिळेल ते खाण्याची सवय असल्यामुळे एवढे स्वादिष्ठ जेवणाची अपेक्षाच नव्हती. साधारण ३५० किलोमीटर चा बाइक प्रवास आणि ३ किल्ले या मुळे आता दोघाही दमलो होतो. आता झोपेची नितांत आवश्यकता होती. रविवारी पहाटे ठरल्याप्रमाणे ५.३० ला चहा नाश्ता करून बसगड च्या दिशेने निघालो. थंडीने आम्हा दोघांचा हि निकाल लावला होता. 

डावीकडुन - काळवी , तळइ, गणबारी, संडे १, संडे २

त्रिंबक ते निरगुडपाडा(बसगड व हरिहर च्या पायथ्य चे गाव) २०  किलोमीटर पण थंडीमुळे हे अंतर २०० किलोमीटर वाटत होते. आता बसगड च्या पायथ्याला येउन पोचलो.
बसगड / भास्करगड 

 निरगुडपाड्यातून चालायला सुरुवात केली. १.३० तासात आम्ही बसगड जाऊन पोहोचलो. कातळात खोदलेल्या पायर्या आणि दरवाजा आता आता बराच बुजला आहे. आता थोडा पुढा गेल्यावर किल्लेदाराच्या वाड्याचे दगडी जोते , हनुमानाची मूर्ती , एक कोरडे तळे, ३-४ कोरडी पाण्याची टाकी एवढेच काय ते अवशेष शिल्लक आहेत. 
फणी - हरिहर - ब्रम्हा पर्वत 
भास्करगडावरील पायऱ्या 

बुजलेला दरवाजा 
गडमाथा बराच मोठा आहे आणि पाउण तासात किल्ला पाहून आम्ही परत खाली निघालो. आम्ही आता निरगुडपाड्यात परत न जाता फणी डोंगराच्या पोटातून डावीकडील असलेल्या पायवाटेने हरिहर ला जायचा निर्णय घेतला.
फणी 
थोडक्यात ट्रेक मधेच एक दुसरा ट्रेक करण्याचा निर्णय घेतला. साधारण २ तासात आम्ही आता हरिहर च्या पायथ्याला आलो. हरिहर च्या कातळकोरीव सरळसोट पायर्या आ वासून उभ्या होत्या. एखाद्या नवख्या भटक्याला बघता क्षणी छातीत धडकी भरेल अश्या ह्या पायर्या. 
हर्षगडाच्या सुरेख कातळ कोरीव पायऱ्या
पण प्रत्येक पायर्यांना असलेल्या दोन खोबणी यांच्या सहाय्याने आम्ही वर चढायला सुरुवात केली. माथ्यावर पोहोचलो तेव्हा दुपारचे १२.४५ वाजले होते. माथ्यावर एक हनुमानाची मुर्ती, ६-७ छोटी मोठी टाकी, एक मोठा तळ, ६-७ माणसं राहू शकतील अशी छोटी इमारत असे अवशेष आहेत. सगळ्या बाजूने मोठा कातळकडा असल्याने तटबंदी ची आवश्यकता जाणवत नाही. माथ्यावरून वैतरणा धरणाचे पाणी, फणी , बसगड, उतवड , त्रिंबकगड असा परिसर दिसतो. हा मोहिमेचा शेवटचा किल्ला होता. 

२ दिवसात ५ किल्ले तेही कुठल्याहि प्रकारची घाई न करता पूर्ण केले याचा आनंद होत होता. दुपारी ३ वाजता निरगुडपाड्यात येउन  पोहोचलो. आता जोरदार भूक लागली होती. पण आम्ही गावात न थांबता तडख पुण्याच्या दिशेने निघालो. पण या वेळी परत नाशिक मधून नाही तर घोटी - भंडारदरा - बारी - राजूर - बोटा - पुणे ह्या मार्गाने पुण्यात यायचे ठरवले. राजूर ला मातोश्री हॉटेल मध्ये शेव भाजी चा बेत ठरल्याप्रमाणे पार पडला आणि रात्री १० ला पुण्यात पोहोचलो. गाडी चालवताना डोळ्यासमोर हे पाच किल्ले जसेच्या तसे उभे होते आणि आता ३ वर्ष झाले तरी मनात घर करून बसले आहेत. २ दिवसात एकूण ६२० किलोमीटर आणि ५ नवीन किल्ले पाहिल्यामुळे एक वेगळेच धाडस केल्याचे जाणवत होते. संदीप चा तसा मोठा पहिलाच ट्रेक होता पण पट्ठ्याने चांगली साथ दिली.
 
 https://trekhunt.blogspot.com/2017/11/songirikhairai.html
 
हरिहर / हर्षगड + त्र्यंबकेश्वर

नाशिक म्हटलं कि सर्वप्रथम डोळ्यासमोर काय येत असेल तर' सह्याद्रीच्या ह्या' मनाला भुरळ पाडणाऱ्या विलोभनीय पण अजस्त्र अशा रांगा ...मग ती रांग पूर्व पश्चिमला कलनारी कळसुबाई - त्र्यंबक रांग, वा अंजठा- सातमाळा रांग असो , वा उत्तर दक्षिण अशी बागलाण कडून सुरु होणारी सेलबारी डोलबारी रांग असो मनाची घौडदौड सतत इथे धुमसत घालत राहते .
सह्याद्री तसा सदैव साद देतच असतो फक्त आपल्याला थोडी उसंत हवी असते ह्या रोजच्याच धावपळीतून बस्स ती एकदा मिळाली कि मग पाउलं फिरकू लागतात . 
आपल्याच ह्या दुर्गम दुर्ग वाटेने ...कडे कपार्यातून...नवी जिद्द ,नवा उत्साह घेऊन ...नव्या पायवाटा धुंडाळत ...

काही दिवसापूर्वीच असाच एक योग जुळवून आला असं म्हणण्यापेक्षा तो योग जुळवून ला अस मी म्हणेन , २८ जून ला , १५ जनाचा ताफा घेऊन आम्ही हरिहर च्या
वाटेने निघालो ...
हरिहर / हर्षगड नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक रांगेतील हा एक पोलादी गड . साधारण ३० किलो मीटर अंतरावर वसलेला .पायथ्याच गाव निरगुडपाडा , गावात पायउतार
होताच त्याच राकटपण मनाला भुरळ न पाडावं म्हणजे नवलच . त्याच भव्यपण काळोख्या रात्री हि उठून दिसत . बस्स थोडं चांदण हवं

पहाटे ३:४५ च्या आसपास आम्ही गडाच्या पायथ्याशी म्हणजे निरगुडपाडा गावात पायउतार झालो .तेंव्हा सर्वत्र काळोख दाटलेला. कोंबडा आरवल्याची अजून हि वेळ झाली नव्हती.
त्यामुळे गावातले कुणी एक व्यक्ती बाहेर फिरकताना दिसत न्हवती . तसं अजून हि आमच्या चौघांमध्ये शीत युध्द सुरु होत . चौघ म्हणजे कोण ? तर
मी अन माझी बहिण संपदा , मित्र यतीन आणि ड्राइव्हर काका आंम्ही शाब्दिक लढत लढत होतो .

नक्की पायवाट कुठून आहे ? नक्की कुठून आपल्याला जवळ पडेल ? येथून कासुर्ली गाव किती अंतरावर आहे ? त्यासाठी मागे जावे लागेल कि पुढे ? कि येथूनच जायचं ?
असे ना ना प्रश्नांचा भडीमार अगदी हलक्या आवाजात खेळकर मनाने एकमेकांवर करत होतो . शेवटी ' आहे त्याच ठीकान्याहून पुढे निघायचे ' असा ठराव पास करत ,
शाळेच्या आवारात निवांत शांततेत आम्ही थोडा विसावलो. .

काळोख्या रात्रीच सौम्यपण मनाला तसं ताजतवानं करत होतं . उत्साही मन पहाटेची आस धरून होतं
ह्या किल्ल्याचं तसं खास वैशिष्ट्य म्हणजे उभ्या सरळसोट कातळात खोदलेल्या त्या पायऱ्या. आणि त्याच आम्हाला इथपर्यंत घेऊन आल्या होत्या . त्यामुळे कधी एकदा पायवाट
धरतोय अन झपझप पाउलं टाकत त्या पायरयांना स्पर्श करतोय अस झालं होतं .

गडाचा इतिहास सांगायचा झाला तर ...
हरिहर किल्ला अहमदनगरच्या निजामशाहाच्या ताब्यात होता. १६३६ साली शहाजीराजांनी शेजारचा त्र्यंबकगड घेताना हाही किल्ला जिंकून घेतला. मात्र नंतर याचा ताबा मोगलांकडे गेला.
पुढे १६७० मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली. ८ जानेवारी १६८९ रोजी मोगल सरदार मातब्बरखान याने हा किल्ला जिंकला.
शेवटी १८१८ मध्ये हा गड मराठयांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला.
प्राचिन काळापासून महाराष्ट्रातील बंदरात उतरणारा माल अनेक घाट मार्गांनी नाशिकच्या बाजारपेठेत जात असे. यातील त्र्यंबक रांगेतून जाणार्‍या गोंडा
घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हरीहर- भास्करगड यांची उभारणी करण्यात आली होती.

काही क्षण आपल्या आयुष्यात असे असतात . कि जा म्हटलं तरी जात नाही .
कधी कधी हि ' वेळ' आपल्यातला ' संयमीपणा ' अगदी तोलून तपासून पाहते .
पावणेचार वाजता आम्ही येउन सुद्धा वेळ पुढे सरकत न्हवती . अस वाटावं कि वेळेने आज मौनव्रत धरलंय , पुढे सरकायचचं नाही . असा तिचा ठाम निर्णय असावा .
तर असो धारण चार ते साडे चार दरम्यान एक भली मोठी बस , तिच्या पाठोपाट दुसरी मिनी बस शांततेला छेदत खुर्खुर आवाजात रस्त्यालगत येउन पोहचली .
शाळेलगत भिंतीच्या बाजूला तिने आसरा घेतला साधारण ७० ते ८० च्या आसपास चा एक ग्रुप त्या दोन बसमधून हरिहरच्या भेटीस आला होता. त्यामुळे आमच्या मनाची घाई अजून वाढली होती.

एका वेळेस एकच व्यक्ती जावू शकेल अश्या हरिहरच्या त्या खड्या पायऱ्या . अन हा ८० जणांचा ताफा , एकदा का सुरुझाला . तर एका व्यक्तीस एक मिनिट धरला तरी
८० मिनिटे लागतील हो . तितका वेळ आपण ताटकळत राहायचं का ? . छे छे ..अजिबात नाही .
मनातच मनाची समजूत घालत , वेळच गणित मांडत . आम्ही पहाटेच्या अंधुक प्रकाशाची आतुरतेने वाट पाहत होतो .

टौर्च २-३ जण सोडून , अन सांगून हि इतर कुणी आणल्या न्हवत्या . त्यामुळे थोडा वेळ वाट पाहणं आम्हास क्रमपात होतं. त्याशिवाय पर्याय न्हवता . पण
मनाची घौडदौड आम्हाला शांत बसून देत न्हवती .

शेवटी घडाल्याचे काटे सव्वा पाच वर स्थिरावल्यावर त्या अंधुक प्रकाशात आम्ही ट्रेक ला सुरुवात केली .सुरवातीला मळलेल्या पायवाट लागली. पुढे नांगरलेली जमीन दिसत होती.
त्यामुळे पायवाट मधेच लुप्त पावत मधेच उगवत . हरिहर धुक्याच्या पुंक्ज्यात अजूनही स्वस्थ पडून होता. कुणी तरी आपल्या भेटीस येत आहे, ह्याची पुसटही कल्पना त्याला नसावी .
निद्रिस्थ अवस्थेत तो आपला शांत पहुडलेला . धुक्याची दुलई अंगावर चढवत . पण त्याच ते हि रूप मनाला
चैतन्याचं नवगंध अंतरंगात पसरवत होतं. उत्साहाला कसं उधाण आलेलं.

अन   त्याच उत्साही मनाने एक एक पाऊलं पुढे टाकत पाउलवाटा धुंडाळत आम्ही गडाकडे आगेकूच करत होतो. समोरच फ़निचा डोंगर अन त्यावर रूढ झालेला नागाच्या फणा काढल्यागत असलेला इवलासा सुळका दुरूनच साऱ्यांच लक्ष वेधून घेत होता.
एव्हाना प्रकाशाच्या डोळस छटा हि सर्वत्र उधळण घालू लागल्या होत्या . निळ्याशार आकाशात पक्षी पाखरं मुक्तपणे विहार करू लागले होते . त्याचं संगीतमय स्वर
मनाला एक तालबद्ध लयात धुंद करत होते. सगळ वातावरणाच कसं आल्हादायक होतं. भारलेल्या अवस्थेत ..

आणि अशातच काही पायवाटा दुभंगल्या गेल्या अन व्हायचं तेच झालं. चुकीच्या वाटेने निघालो .
पण म्हणतात ना ट्रेक दरम्यान वाटा चुकण्याची मजाच काही और असते. त्याशिवाय ट्रेक यादगार तरी कसा होणार , पण एक मात्र आहे ह्यात आपण ठरवलेल्या वेळेची घडी मात्र साफ विस्कटते.

आयुष्याची पायवाट हि अशीच कधी आपण चुकतो. अन एक वेगळ्या पायवाटेवर येउन ठेपतो . 
पण तो हि एक आयुष्याच्या शिकवणीचा भाग असतो . तो शिकून पुन्हा आपली पायवाट शोधत पुढे निघायचं बस्स...

साधारण ७:२५ ला आम्ही एका उंच सोंडेवर आलो. येथे शेंदूर फासलेल्या काही देवांची मांदियाळी होती. मधोमध त्रिशूल ...
हरिहर चा उभा कातळकडा अन त्यात खोदुन काढलेल्या त्या पायऱ्या येथून स्पष्ट्य दिसत होत्या . येथूनच पुढे स्वर्गरोहनचा आम्ही आनंद घेणार होतो.

' मेल्यावर स्वर्ग दिसतं ' अस म्हणतात . पण आपल्या सह्याद्रीतल्या कुठल्याही गड किल्याच्या वा शिखराच्या माथाय्वर जा ..किंव्हा दर्याखोर्यातुनी भटका ...
स्वर्ग , स्वर्ग म्हणजे तरी नक्की काय? हेच का ते ? अशी अनुभती आल्याशिवाय राहणार नाही .

सर्वत्र पसरलेली धुक्याची दुलई , त्यातून डोकावणारे पहाडी उंच कडे , अंग अंग भिडणारा बेभान वारा . त्याच तालमय संगीत , धरणी मायेने प्रेमाने पांघरलेली हिरवी शाल, कडे कपार्यातुनी धो धो उधळणारे शुभ्र धवल धबधबे ....आपल्या नेत्र कड्यांचे पारणे फेडते. 
वाटतं इथेच घर करून राहावं कायम .........पण घरची वाट पुन्हा पकडावीच लागते.

ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो , तो क्षण अगदी जवळ आला होता.
त्या खोदीव पायरया आम्हाला जणू आव्हान देत उभ्या होत्या. सोबत उनाड वारा हि चिडवायला तप्तर होता .
कलावंतीण सुळक्याची मात्र इथे आठवण आल्याशिवाय राहत नाही . पण इथल्या प्रत्येक पायरीला उजव्या डाव्या बाजूला आधारासाठी म्हणून खोबण्या आहेत. त्यामुळे मनातली भीती कुठेशी पळून जाते.
पण पायऱ्यावरून एक एक पाउल टाकताना मिळणारा आनंद काही औरच असतो. उनाड वारा आपल्याला प्रत्येक पाऊलावर आपली पीछेहाट करत असतो. त्यातच आपण गडाच्या पहिल्या प्रवेश द्वारा जवळ येउन पोहोचतो. येथून समोरील विहन्ग्मय दृश्य मनाला भुरळ पाडते. प्रवेश द्वारातून पुढे येताच उजव्या हाती आपल्याला शेंदूर फासलेल्या गणेशाची प्रतिमा दिसते . त्याला वंदन करून , एखाद्या गुहेतून चालावं तसा अनुभव घेत पुढे चालत राहायचे . पुन्हा नागमोडी वळण घेत खोदीव पायर्यांच्या संगे आपण गडाच्या अंतिम दरवाजाजवळ येउन पोहोचतो. येथून पुढे माथ्यावर आल्यावर ...घुंगावनारा वारा अन सभोवतालच दृश्य आपलां थकवा क्षणात दूर करतो.
येणाऱ्या पायवाटेच्या दिशेने पाहिल्यास समोर फनीचा डोंगर त्याच्या पाठी उतवड (ह्या रांगेतला उंच शिखर ) आणि बाजूला भास्कर गड आपले दर्शन घडवून देतो.

पूर्वेकडे चालत गेल्यास , समोरच ब्रह्मा पर्वताचं तेजपुंज रूप मनाचा हर एक कोनाडा उजळून काढतो त्याच्यापुढे कापड्या , अन भक्तिरसात कायम मग्न असणारा ब्रम्हगिरी खुणावू लागतो.
वाटेतून पुढे सरकताना , पाण्याच्या काही टाक्या लागतात . पुढे एक तलाव अन तळया काठी हनुमानच मंदिर , बाजूला छोटस शंकराचं मंदिर दिसतं.
येथूनच पुढे पुढे चालत गेल्यास ती घुमटाकार इमारत दिसते . इमारतीच्या डाव्या उजव्या अंगाला पाण्याच्या काही टाक्या आहेत अन एक तळ आहे . त्यातलं पाणीपिण्या योग्य आहे. येथूनच सभोवतालच पहाडी दृश्य मनाला घायाळ करत . निसर्गाच्या त्या सौंदर्य रूपाचा पुरेपूर आनंद लुटायचं अन परतीच्या मार्गाला लागायचं.
गडावर पाहण्यासारखं फारस तसं काही नाही. माथा निमुळता असल्याने १ तासात गड फेरी पूर्ण होते.

परतीचा मार्ग...

गडावर सर्वप्रथम आमचाच प्रवेश झाल्याने आम्ही गडफेरी करून निघण्याच्या तयारीला लागलो. साधारण सव्वा नव च्या आसपास आम्ही परतीच्या वाटेला निघालो. अन गडाच्या माथ्यावरल्या अंतिम दरवाजाजवळ येउन पोचलो. एव्हाना इतर ग्रुपचा काही ताफा गडावर येउन पोहचला होता .
तरी हि कित्येक संख्येने अजून त्यांच्या एका पाठोपाठ अश्या रांगा लागल्या होत्या .

साधारण १२०-१५० च्या आसपास त्यांची संख्या नक्कीच असावी. इतकी भरभरून ट्रेकर्स मंडळी आली होती. त्यात काही नवखी होती . काही धापा टाकत वर येत होती. बहुतेक तर गुज्जू च दिसत होती. एका वेळेस एकच अश्या पद्धतीने त्या पायर्या चढायच्या अन उतरायच्या असल्याने . आम्ही वरच खोळंबून राहिलो. कारण ह्या मंडळीचा इंजिनच्या शेवटचा डब्याचा अजून काही पत्ताच न्हवता.
जवळ जवळ पाउनतास आम्ही वरच अडकलो. मग मात्र सटकलो.

येताना चुकीच्या वाटेने आल्या कारणाने परतीची वाट आम्ही नेहमीचीच रुळलेली पकडली . अन पाउने अकराच्या सुमारास निरगुड पाडा टाकेहर्ष गावी येउन पोहोचलो.
येथून पुढे त्रंबकेश्वर ला जायचे असल्याने फार वेळ न दवडता आम्ही त्रंबकेश्वर मार्गी निघालो.
साधारण तासाभरात आम्ही तिथे पोहचलो.
समोरच ब्रह्मगिरी चा अजस्त्र डोंगर खुणाऊ लागा होता . पण त्याच्या वर जाण्या इतपत वेळ आम्हा जवळ न्हवता .
देव दर्शन घेऊन २ तासात आम्हाला निघायचे होते. नुकताच १२ चा टोला पडला होता. अडीच पर्यंत येथून निघणे भाग होते.

त्रंबकेश्वर धार्मिक स्थळ असल्याने आणि १२ ज्योतिर्लिंग पैकी एक असल्याने भाविकांची येथे सदैव गर्दी असते. आजही होती.
अन म्हणून देवाचे दर्शन घेण्या पूर्वी आम्ही 'रांगेचे ' दर्शन घ्यावयास आधी गेलो. आणि भली मोठी रांग पाहता तिथेच थोडा वेळ थबकलो. २-३ तास रांगेत उभे राहूनही शिवशंकराचे दर्शन मिळणे कठीण होते. ' पैसे देऊ करून दर्शन घ्यायचे न्हवते.' दर्शन घेण्यासाठी हि हल्ली शोर्ट कट युक्त्या वापरतात लोक .
तश्या पाट्या लावलेल्या असतात भोवताली. २०० रुपये . ह्या बाजूने ...३०० रुपये ह्या बाजूने...

' देवाच दर्शन हि हल्ली पैशाने विकत घेता येतं. इतपत पैशाने मजल मारलेय .
माणसं एखाद्या गरजूला पैसे देणार नाहीत . पण देवळात मात्र पैसे टाकतील . मग ते रुपयापासून २०० ते १००० ..लाख रुपापर्यंत असो.
मनात श्रद्धा अन भक्ती भाव असला म्हणजे झाला . माझं देवळात जाण्यामागे एक कारण असतं .
तिथल्या वातावरणात एक गंध दरवळत असतो चैतन्याचा . अन तो मन एकाग्र करण्यास अन प्रसन्न्तेचा प्रसाद देण्यास एकप्रकारे मदत करत असतो.
माणसातल्या मनावर माझी जास्त श्रद्धा आहे . देवाचा अंश मी तिथे जास्त मानतो. अन म्हणूनच फार तर मी देवळात जात नाही. पण देव मनात नाही असा अर्थ होत नाही.
तर असो दर्शना साठी इतका वेळ आम्हा समीप नसल्याने इतर मंदिरांच दर्शन घेऊन , मग जेवून खाऊन परतीच्या मार्गावर कसारा दिशेने निघालो. ते हि डुलक्या घेत घेत ...

_____________________________________________________________________________________
ह्या ट्रेक दरम्यान मनावर कोरलेले काही प्रसंग :-

खाऊ दे नाहीतर पैसे दे .

ट्रेक दरम्यान एका पायवाटेवरती ' त्या कोवळ्या चिमुरड्यांच हे वाक्य अजूनहि त्या स्वरानिशी कानाशी गुंजतंय ..
आयुष्याच्या व्याख्या ची पुन्हा नव्याने उजळणी करत .
त्यावेळेस मनालाच ते वाक्य इतकं सरकन घासून गेलं कि खोल जखम व्हावी इतपत ... त्यावेळेस हाती जे होतं ते देऊ केलं पण त्याने मन काही समाधानी झालं नाही . कुठेतरी ते चित्र अन ते वाक्य मनात सळ करून राहिलंय.

कळसुबाईची ती छोटी ताई असो . पोटाच्या खळगीसाठी म्हणून भर उन्हा तान्हात झाडाचा आडोशा पकडून ,
' दादाss दादाss ताक घ्याना ?अस म्हणत मोठ्या आशेने बघणारी .
नको म्हणताच मागे मागे पळत येउन केविलवाण्या स्वराने
' दादा काही खायला द्याना ? म्हणत काळजाच पाणी पाणी करणारी ..वा खाऊ दे नाहीतर पैसे दे ...म्हणणारी हि चिमुरडी .....
मनाला एक विचार देतात . अजूनही कुणाला कुणाची तरी गरज आहे .
प्रेमाची गरज आहे , मायेच्या स्पर्शाची गरज आहे. मदतीची गरज आहे. आपलेपणाची गरज आहे.

क्रमश :- पुढील भाग लवकरच ...
इतिहास संदर्भ :- ट्रेकक्षितीज , अन
http://www.marathiworld.com/bhramanti-m/hariharkilla
©संकेत य पाटेकर
०७.०७.२०१४

______________________________________________________________________________________
______________________________________________________________________________________
फोटो सूची :-

प्रचि २
हरिहर ची सुंदर पहाट ..

प्र

चि ३ एका टप्प्यावर

प्रचि ४ ..... डावीकडे दिसतोय तो फ़निचा डोंगर

प्र
प्रचि ५५

प्रचि ५६

प्रचि ५७

प्रचि ५९

प्रचि ६०

प्रचि ६१

प्रचि ६२

प्रचि ६३

प्रचि ६४

प्रचि ६५

प्रचि ६६

प्रचि ६७

प्रचि ६८

ह्या वेळेस भौगोलिक अभ्यावर जरा जास्त भरणा होता . म्हणून इतकी खटपट केली . आणि त्याचा फायदा हि झाला

झालेला प्रवास :-
शनिवारी रात्री प्रस्थान ...कसारा लोकल ने :-
ठाणे ठीक ११:३० कसारा १:१८
कसारा - हरिहर (निरगुड पाडा / टाकेहर्ष )- त्रंबकेश्वर मंदिर - कसारा (काळी निळी जीप ने प्रवास, ठरवून ठेवलेली )
कसारा - हरिहर - २ ते ३:४०
ट्रेक ला सुरवात - पहाटे ५:१५ , गडाचा माथा :- ८:००
९:१५ ला उतरण्यास सुरवात - पायथा निरगुडपाडा/टाकेहर्ष - १०:५०
निरगुडपाडा/टाकेहर्ष -त्रंबकेश्वर मंदिर - ११:०० - १२:००
२ तास, देवदर्शन / जेवण
त्रंबकेश्वर मंदिर - कसारा - दुपारी २:३० ते ४:००
 
 चतुर आजीबाई
 
हा किल्ला त्र्यंबकेश्वराच्या किंचित नैऋत्येस २०० मीटर उंचीच्या एका उंच डोंगरावर बांधलेला असून त्याच्या चारही बाजूला तुटलेले कडे असल्यामुळे तो बेलाग आहे. या अल्पपरिचित किल्ल्याबद्दल एक दंतकथा सांगितली जाते की, शिवाजीमहाराजांनी नाशिक प्रांतातले अनेक किल्ले जिंकून घेतले त्यांत हरिहर किल्ल्याचाही समावेश होता. पुढे अनेक वर्षे हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. एकदा पावसाळ्यात किल्ल्यावरची गडकरीमंडळी देवदर्शनाला वणी येथे गेली होती. त्यामुळे किल्ल्यावर फारसा बंदोबस्त नव्हता, फारतर तीस-चाळीस लोकच किल्ल्यावर राहत होते आणि त्यांतही पुरुषांपेक्षा बायकाच जास्त होत्या.
हरिहर किल्ल्यावरची शिबंदी देवदर्शनासाठी गेली असून किल्ल्यावर फारसा बंदोबस्त नाही, ही बातमी जेव्हा शेजारच्या राज्यातील मुघल अधिकाऱ्याला समजली, तेव्हा त्याने जोरदार हल्ला करून तो किल्ला काबीज करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे त्याने आपल्या हाताखालचे काही सैन्य हरिहरकडे रवाना केले. मुघल सैन्य किल्ल्याच्या घेऱ्यात येऊन पोहोचल्यावर त्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली. तटबंदीवरून पहारा देणाऱ्या सैनिकांनी मुघल सैन्य पाहिले, त्यांनी सुरू केलेली मोर्चेबांधणीही वरून पाहिली. मग किल्ल्यावर राहणाऱ्या सर्वांना बोलावून त्यांना सगळी परिस्थिती नीट समजावून सांगितली. ती ऐकल्यावर काहींचा हात कपाळावर गेला, काहीजणांनी भिवया उंचावल्या, तर काही जणांचे अवसानच गळाले. पण त्या बायकांमध्ये एक वयस्कर बाई होती. त्या आजीबाई बारीक नजरेने सगळ्यांच्या तोंडाकडे पाहत होत्या. सगळ्यांची बडबड त्या शांतपणे ऐकून घेत होत्या. नंतर त्या बसलेल्या जागेवरून उठून उभ्या राहिल्या आणि आपल्या खड्या आवाजात शिव्यांची मुक्तपणे उधळण करीत म्हणाल्या, "तुमी काय बी काळजी करू नका. मी म्हनते तसं करा. ऐ शेवंता,
तू भात शिजत टाक. ए रखमा, तू डाळ शिजव चल. ए हरबा, तू पत्रावळी घेऊन ये चल." आजीबाई एखाद्या सेनापतीसारख्या आज्ञा देत होत्या. त्यांचा आवेश पाहून सर्वजण अवाक झाले. प्रसंग काय अन् ही म्हातारी करते काय. लढायची गोष्ट करण्याऐवजी जेवायची बात करते! प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह ओळखण्याइतक्या त्या नक्कीच हुशार होत्या.
चार बाया पुढे आल्या अन् पदर खोचून कामाला लागल्या. आजीबाईच्या तोंडाची टकळी सुरूच होती. "अगं ए ते भांड नीट ठेव चुलीवर, डाळ जळू दिऊ नको बरंका. ए बेन्या, नीट मांड नीट मांड की त्या पत्रावळी." भात शिजला अन् डाळही शिजली. मग आजीबाईंनी सगळ्यांना बसायला सांगितलं. कशाला? जेवायला? नाही. पत्रावळीला डाळ अन् भात खरकट्यासारखं लावायला! आजीबाईच्या मनात काय चाललं आहे ते कुणालाच कळत नव्हतं. सर्वजण त्या म्हणतील तशी कामं करीत होते. सगळ्या पत्रावळींना डाळभात लावल्यावर आजीबाईने सांगितले, "आता त्या पत्रावळी उचला अन् जिथे शत्रूची लोकं मोर्चे देऊन आहेत तिथं द्या फेकून!" त्याप्रमाणे पत्रावळी फेकायला सुरुवात झाली. खाली वेढा घातलेल्या मुघलांना वर काय चाललंय तेच कळेना. तोफा-बंदुकांचा मारा होण्याऐवजी पत्रावळींचा आपल्यावर का मारा होत आहे? आणि तो ही खरकटं लावून ! किल्ल्यावरून होणारा पत्रावळींचा मारा थांबल्यावर, मोर्चातील एका सैनिकाने मोठ्या उत्साहाने त्या पत्रावळी गोळा करायला सुरुवात केली आणि इतर सैनिकांनाही तसे करायला लावले. बघता बघता दोन-तीनशे पत्रावळींची चळत उभी राहिली. ती पाहून मुघलांचा सरदार म्हणाला, "किल्ल्यावर एवढी माणसं आहेत! मग आपला त्यांच्यासमोर कसा निभाव लागणार?" त्याने लगेच आपल्या सैनिकांना वेढा उठवण्याचा हुकूम दिला आणि तो स्वतः तिथून निघून गेला. वर तटावरून आजीबाई तो सारा खेळ बघत होत्या. पदर तोंडाला लावून हसत होत्या. जणू मनातल्या मनात म्हणत होत्या, 'नुसत्या पत्रावळी बघूनशान ही गत झाली तर जेवान बघितल्याओ काय व्हईल रं मेल्यानो!'
 
।। दंतकथेतील तथ्यांश ।।
 
वरील दंतकथेला ऐतिहासिक साधनांमधून दुजोरा मिळेल असे वाटत नाही. पण पत्रावळींना अन्न लावून त्या शत्रुसैन्याच्या दिशेने भिरकावणे अन् त्यांनी त्या मोजून किल्ल्यावरील सैन्यबळाचा अंदाज घेणे ही कल्पकता मनाला नक्कीच भावणारी आहे. पण तो इतिहास नाही हे नक्की.
 
४२ ।। 
 
◇◇◇
 
No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...