महाराष्ट्र हा जसा दगडांचा देश आहे, तसाच किल्ल्यांचाही. आजच्या घडीला मोजायला गेले तर संपूर्ण महाराष्ट्रात अंदाजे साडेतीनशेच्या वर किल्ले आहेत. आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की, या किल्ल्यांना ही विविध नावे मिळाली कुठून?
किल्ल्यांच्या नावांचे हे प्रकरण खरोखरच अद्भुत आहे. काही किल्ल्यांना त्यावर असणाऱ्या देवदेवतांमुळे नावे पडली, तर काहींचे नामकरण शिवरायांनी केले, काही किल्ल्यांची फारसी नावे खुद्द औरंगजेबाने ठेवली आहेत, तर काही किल्ल्यांची नावे ही पायथ्याच्या किंवा नजीकच्या गावावरून ठेवली गेलेली आहेत. यामध्ये समावेश होतो तो राजदेहेरवाडीचा राजदेहेर, साल्हेरवाडीचा साल्हेर, मुल्हेरवाडीचा मुल्हेर आणि वाघेरा गावचा वाघेरा किल्ला.
'वाघेरा किल्ल्याच्या पायथ्याला वाघेरा नावाचे गाव आहे, त्यावरूनच या किल्ल्याचे नाव वाघेरा पडले असावे. दमणगंगेच्या खोऱ्यात सत्ती घाटाच्या रक्षणासाठी वाघेरा आणि खैराई या दोन किल्ल्यांची निर्मिती केली गेली. वाघेरा गावातील गावकरी सांगतात की, किल्ल्यावरून 'कश्यप' नदीचा उगम होतो आणि हीच नदी पुढे जाऊन गोदावरी नदीला मिळते.
 |
| वाघेरा किल्ला |
नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यात वाघेरा किल्ला आहे. नाशिक-हरसूल मार्गावर नाशिकपासून ३५ कि.मी.वर वाघेरा गावाचा फाटा आहे. या फाट्यावरून आत शिरल्यावर पाच मिनिटांच्या अंतरावरच सुमारे हजार-बाराशे लोकवस्तीचे वाघेरा गाव लागते. हे गाव सत्ती घाटाच्या तोंडावर उभे आहे. आकाशात घुसलेला वाघेरा किल्ल्याचा उत्तुंग उंचवटा आणि त्यावर फडकणारा हिंदवी स्वराज्याचा ध्वज, यामुळे किल्ला दूरवरूनच आपले लक्ष वेधून घेतो. नुकतेच वाघेरा याचे मुळी कागदपत्रांमधून कश्यपगड किंवा किल्ले कश्यप या नावानेही कागद सापडले आहेत.
नाशिक-त्रिंबक– जव्हार या प्राचीन व्यापारी मार्गावरील दमणगंगेच्या खोऱ्यातील सती घाटावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली गेली. गावात शिरल्यावर उजव्या बाजूस असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात एक मोठा वाटोळा दगड तसेच मागील बाजूस एक भलामोठा नंदी, शिवलिंग व गणेशमुर्ती दिसुन येतात.
गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार वाघेरा हा प्राचीन किल्ला असुन काश्यप ऋषींची तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या किल्ल्यावर काश्यपी नदीचे उगमस्थान आहे. पुढे हि नदी गोदावरी नदीस जाऊन मिळते.
किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी उलटा घास नक्कीच घ्यावा लागतो. कारण गावाच्या मागे एक भले मोठे धरण बांधलेले दिसते. या धरणाच्या पार्श्वभूमीवर वाघेरा किल्ला उभा आहे. धरणाला वळसा घातल्यावर एक वाडी लागते तिचे नाव 'राजविहीर वाडी.
सध्या असलेले वाघेरा गाव हे किल्ल्याचे पायथ्याचे गाव नसुन राजविहीर वाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव वाघेरा गावापासुन ४ कि.मी. अंतरावर आहे. ... पुर्वी वाघेरा गाव राजविहीर वाडीच्या वरच्या भागात असल्याचे ग्रामस्थ सांगतात. राजविहीर वाडीला राजविहीर हे नाव पडण्याबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. राजविहीर म्हणजे राजाची विहीर. वाघेरा किल्ल्यावरील राजाची माणसे या वाडीतील दगडी बांधणीच्या विहिरीतून पाणी नेत असतं म्हणून या विहिरीला राजविहीर असे नाव पडले आजही गावाच्या शेवटच्या टोकाला ही विहीर आपल्याला पाहावयास मिळते. आपण मोठ्या उत्साहाने ही पुरातन विहीर पाहावयास जातो, पण सध्या या विहीरीचे रूपांतर आधुनिक विहिरीत झालेले असल्यामुळे आपला मोठा हिरमोड होतो. राजविहीरवाडी पर्यंत गाडीनेही जाता येते.

वाघेरा किल्ला वसलेल्या डोंगराची एक सोंड थेट राजविहीर वाडीकडे उतरलेली आहे. या सोंडेवर सुरवातीचे एक झाड वगळता सावलीसाठी एकही झाड नसल्याने व किल्ल्यावर पिण्याचे पाणी नसल्याने पुरेसे पाणी घेऊन सकाळी लवकरच किल्ल्यावर जाण्याचे नियोजन करावे. वाडीत उतरलेल्या या डोंगरसोंडेवरून गडाची माची गाठायला एक तास पुरेसा होतो. वाडीतून १५ मिनिटांच्या चढाईनंतर आपण पठारावर येउन पोहोचतो. या पठारावर पुर्वी येथे असलेल्या वाघेरा गावातील घरांचे विखुरलेले अवशेष दिसतात. वाघेरा गावचा मारूती व शिवलिंग आजही येथे उनपाऊस खात उघडयावर पडले आहेत. . या हनुमंताच्या मूर्तीच्या बरोबर विरुद्ध दिशेला तिरक्या रेषेत याच हनुमंताचे जन्मस्थान असणारा अंजनेरी पर्वत दिसतो, हा म्हणजे निव्वळ योगायोगच म्हणावा.
येथून पुढची वाट देखील थोडा चढ, मग पठार अशा स्वरुपाची आहे. शेवटच्या टप्प्यात अनेक छोटे पॅच आहेत. मारुतीच्या मुर्तीपासून साधारण तासाभरात आपण गडाखालील माचीवर येऊन पोहोचतो.
पण येथवर येताना चांगलीच दमछाक होते. माचीवरून वाघेऱ्याचा उंचावलेला सुळकेवजा गडमाथा दिसतो. येथुन सपाटीवरील दहा मिनिटांच्या चालीनंतर आपण गडमाथ्याच्या सुळक्याखाली येऊन पोहोचतो. येथे पहारेकऱ्याच्या चौकीचे अवशेष असुन थोडेसे प्रस्तरारोहण करून समोर असलेल्या उंचवट्यावर चढले कि आपला उध्वस्त बुरुजावरून गडावर प्रवेश होतो. हा तटबंदीच्या आतील माचीचा भाग असुन येथे उजव्या बाजुला एक लहानसे तोंड असलेले टाके नजरेस पडते. हे टाके पुर्णपणे पाण्याने भरले असले तरी यातील पाणी पिण्यायोग्य नाही. सोबत आलेल्या वाटाड्याच्या सांगण्यानुसार या टाक्याच्या आतील बाजुस दगडी खांब आहेत पण पाणी भरल्याने ते दिसत नाहीत. या टाक्याला या परिसरातील गावकरी भैऱ्याची न्हाणी असे म्हणतात. पूर्वी ही न्हाणी किल्ल्यावरील पाण्याचा एकमेव स्रोत होता.

त्रिकोणी आकाराचा हा गड दक्षिणोत्तर पसरलेला असुन गडाच्या माचीचा पसारा आठ एकरमध्ये सामावलेला आहे. माचीच्या उजव्या बाजुला ढासळलेली तटबंदी असुन या तटबंदीत चार बुरुज आहेत तसेच या भागात काही घडीव व कोरीव दगड पडलेले असुन एक उध्वस्त चौथरा दिसुन येतो. इथून गडमाथा गाठायला दोन वाटा आहेत. गडमाथा उजवीकडे ठेवत वळसा घालून पुढे गेल्यावर माथ्यावर चढत जाणारी घसाऱ्याची वाट आहे. या वाटेने जाताना आपल्याला तटबंदी व त्यातील बुरुज तसेच उतारावर खडकात कोरलेली पाण्याची पण सध्या मातीने भरलेली तीन टाकी पहाता येतात. हे सर्व आपल्याला माथ्यावरून उतरल्यावर देखील पहाता येते. दुसरी वाट म्हणजे कातळावरून १५-२०फुटांचं सोपं प्रस्तरारोहण करून सरळ माथ्यावर जाणे. या वाटेवर आपल्याला खडकात खोदलेला ५ x ५ फुट आकाराचा एक चर दिसुन येतो. या चरातील पाणी बाहेर जाण्यासाठी छिद्र कोरले आहे पण या चराचे प्रयोजन लक्षात येत नाही. शेवटचा पॅच चढून गेल्यावर समोरच आपल्याला माथ्यावरचा झेंडा दिसतो. या झेंड्याच्या अलीकडे असलेल्या एका खळग्याला गावकऱ्यांनी शेंदूर लावून देव केले आहे. झेंड्याच्या बाजुला शंकराची पिंड आणि शेंदूर लावलेली विष्णूची मुर्ती आहे़. विष्णूच्या डावीकडे आणखी एक शिर नसलेली मुर्ती असून त्याला देखील शेंदूर लावलेला आहे.

किल्ल्याच्या सर्वोच्च उंचवट्यावर जाते. या उंचवट्यावर महादेवाची पिंडी उघड्यावर ठेवून त्याला चौथरा बांधलेला दिसतो. किल्ल्याच्या माथ्यावरील या महादेवाच्या दर्शनासाठी दर महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरते. त्या वेळी राऊळातील गावेच्या गावे या महादेवाच्या दर्शनासाठी किल्ल्यावर मोठ्या भक्तिभावाने लोटतात.
झेंड्याची जागा ही गडावरील सर्वात उंच स्थान आहे. गडाचा हा माथा समुद्रसपाटीपासून ३४१८ फूट उंचावर आहे. गडाचा हा सर्वात उंच भाग असुन येथुन माचीवर खुप मोठया प्रमाणात विखुरलेले उध्वस्त अवशेष दिसतात माथ्यावरून वाघेराच्या परिसरातील चिमुकली खेडी आणि त्याच्या समोरची हिरवीगार शेतं दिसतात. एवढेच नव्हे, तर नाशिक, पेठ आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील किल्ल्यांचे मोहक दर्शन होते. माथ्यावरून वाघेराच्या परिसरात नजर फिरवली तर, जणू काही हिरव्या तपकिरी रंगाची ठिगळं लावलेली गोधडीच पसरलेली आहे असे भासते. निसर्गाच्या या गालिच्यावर रामसेज, भोरगड म्हणजेच देहेरचा किल्ला, ब्रह्मगिरी, हरिहर, अंजनेरी, खैराई, सोनगिरी असे सर्वदूर विखुरलेले किल्ले दिसतात.

या उंचवट्यावरून घसाऱ्याच्या पायवाटेने खाली उतरल्यावर समोरच एका भल्यामोठ्या वाड्याचे व शेजारी सदरेचे अवशेष दिसतात. त्या शेजारी इतरही काही वास्तुंचे अवशेष विखुरलेले आहेत. वाटेच्या उजव्या बाजुला आधी वर्णन केलेली तटबंदी व टाक्या असुन डाव्या बाजुला गडमाथ्याला लागुन एका सलग रांगेत कोरलेली ४ मातीने बुजलेली टाकी दिसुन येतात. यातील एका टाक्यात भले मोठे उंबराचे झाड आहे. या टाक्यांच्या जवळच एक औदुंबराचे झाड आहे, त्याच्या बुंध्यामधून वर्षभर पाणी ठिबकत असते, त्यामुळे गावकरी लोक त्याचीदेखील पूजा करतात. इथेच एका दगडावर शिवशंकराने आपल्या जटा आपटून कश्यपी नदीचा प्रवाह बदलल्याच्या खाणाखुणाही आहेत.


या टाक्याच्या पुढे एक साचपाण्याचा तलाव असुन कडयाच्या दिशेला उतारावर अजून एक कातळात खोदलेले टाके दिसुन येते. येथुन मागे फिरून परत वाडयाच्या अवशेषांकडे यावे. वाडयाच्या समोरील बाजुस ढासळलेल्या दोन बुरूजामध्ये कधीकाळी गडावर प्रवेश करण्यासाठी पुर्वाभिमुख दरवाजा असल्याच्या खुणा दिसुन येतात. येथुन खडकात कोरलेल्या पायऱ्यांनी आपण गडावरील माचीच्या खालील भागात येतो. या भागात बऱ्यापैकी झाडे असुन मोठया प्रमाणात घरांचे अवशेष आहेत. येथे असलेली झाडे पहाता येथे पाण्याची टाकी असण्याची शक्यता आहे. येथे असलेल्या झाडाखाली काही काळ विश्रांती घेऊन किल्ल्याला समांतर असलेल्या पायवाटेने परतीच्या प्रवासाला सुरवात करायची. वाट बरीच निसरडी असल्याने अगदी सांभाळून उतरावी.
माचीवरून खाली गावात उतरण्यासाठी पूर्वी एक वाट होती, पण काळाच्या ओघात ती पूर्णपणे नष्ट झाली. या वाटेला कोकणदरवाज्याची वाट असे म्हणतात. गडाच्या पायथ्यापासून माथ्यापर्यंत संपूर्ण गडफेरीस साधारण ३ ते ४ तास लागतात.
या परिसरात ब्रह्मगिरीचा किल्ला, अंजनेरी आणि हरिहरचे किल्ले हे या परिसरातील सुप्रसिद्ध असे किल्ले आहेत. त्यामुळे आपली सर्वांची पावले त्यांच्याकडे नेहमीच वळतात. पण थोडीशी वाट वाकडी करून सती घाटाच्या तोंडावर असणारं हे अनोख दुर्गलेण आपण नक्कीच पाहायला पाहिजे.
संदर्भ :-
१) नाशिक जिल्हा गॅझेटीयर
२) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स
३) दुर्गभ्रमंती नाशिकची - अमित बोरोले
४) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !! - प्र.के. घाणेकर
५) दुर्ग या दिवाळी अंकातील प्रा. नितीन जाधव यांचा लेख
६) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा- सतिश अक्कल्कोट
७) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
८) www.trekshitiz.com हि वेबसाईट
९) www.durgbharari.in हि वेबसाईट
१०) http://sagarshivade07.blogspot.com/2013/11/blog-post.html
११) http://bhushankarmarkarworld.blogspot.com/2016/07/
१२) http://narendralakhan7.blogspot.com/2019/03/dhodap-fort.html
श्रेणी नुसार स्तर
मध्यम
📏
समुद्र सपाटीपासून उंची (फ़ूट)
3444
🏰
किल्ल्याचा प्रकार
गिरीदुर्ग
नकाशे व मार्ग
किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा
सर्व नकाशे पहा
प्रस्तावना
नाशिकपासून
वायव्य दिशेस साधारण ३५ किमी अंतरावर वाघेरा हे गाव लागते. हे गाव सत्ती
घाटाच्या तोंडावर आहे. या सत्ती घाटावर लक्ष ठेवण्यासाठी वाघेरा किल्ल्याची
निर्मिती केली गेली असावी. पायथ्याच्या वाघेरा गावाच्या नावावरुन
किल्ल्याचे नावही वाघेरा असे पडले. गावकरी सांगतात की या किल्ल्यावरुन
कश्यप नदीचा उगम होतो आणि ही नदी नंतर गोदावरी नदीला जाउन मिळते.
महत्त्वाची ठिकाणे
वाघेरा गावाच्या पुढे वाघेरा धरण लागते. या
धरणाच्या काठाने पुढे चालत गेलो की साधारण दहा मिनिटात आपण राजविहीरवाडी या
गावी पोहोचतो. राजविहीरवाडी पर्यंत गाडीनेही जाता येते. गावा बाहेरहून एक
मळलेली वाट गडावर जाते त्यामुळे रस्ता चुकण्याची भीती नाही. साधारण पंधरा
मिनिटात आपण एका पठारावर येतो. या पठारावर उजवीकडे एक शेंदूर लावलेली
हनुमानाची मुर्ती आहे. येथून पुढची वाट देखील थोडा चढ, मग पठार अशा
स्वरुपाची आहे. शेवटच्या टप्प्यात अनेक छोटे पॅच आहेत. मारुतीच्या
मुर्तीपासून साधारण तासाभरात आपण शेवटच्या पॅचपाशी पोहोचतो. याच्या अलीकडे
उजव्या बाजुला एक छोटे टाके आहे. टाके पाहून परत पॅचपाशी यायचे. पॅच सोपा
असला तरी थोडा निसरडा आहे, त्यामुळे जरा जपून चढावे लागते. शेवटचा पॅच चढून
गेल्यावर समोरच आपल्याला माथ्यावरचा झेंडा दिसतो. या झेंड्याच्या अलीकडे
असलेल्या एका खळग्याला गावकऱ्यांनी
शेंदूर लावून देव केले आहे.
झेंड्याच्या बाजुला शंकराची पिंड आणि शेंदूर लावलेली विष्णूची मुर्ती आहे़.
विष्णूच्या डावीकडे आणखी एक शिर नसलेली मुर्ती असून त्याला देखील शेंदूर
लावलेला आहे. झेंड्याची जागा ही गडावरील सर्वात उंच स्थान आहे. येथून
डाव्या बाजुला खाली पडक्या वाड्याच्या जोती दिसतात. डावीकडची वाट उतरुन
त्या जोतींपाशी जायचे. वाट बरीच निसरडी असल्याने अगदी सांभाळून उतरावी.
वाड्याच्या बाजुला पाण्याची अनेक टाकी आहेत. वाड्या वरुन पुढे गेले की एक
वाट खाली उतरते. येथे सुस्थितीत असलेल्या कातळ पायऱ्या आहेत. ही गावातून
येणारी मुख्य वाट. पण आज ही वाट मळलेली नाही, त्यामुळे वाटाड्या शिवाय या
वाटेने जाउ नये. ही वाट गडाच्या अग्नेय दिशेस आहे. पायऱ्या पाहून आपण परत
वर वाड्यापाशी यायचे. आणि मगाशी उतरलो तो रस्ता चढून गडमाथ्यावर न जाता
वाड्यापासून उजवीकडे वळायचे. पुढील दहा मिनिटात आपण शेवटच्या रॉक पॅच पाशी
येतो आणि येथून आलो त्या वाटेने गड उतरतो.
कसे पोहोचावे
नाशिक हरसूल मार्गावर नाशिकपासून साधरण ३५
किमी वर वाघेरा फाटा आहे. फाट्यापासून वाघेरा गाव साधारण ७०० मीटर वर आहे.
नाशिक वरुन हरसूल ला जाणाऱ्या एसटीने आपण वाघेरा फाट्या पर्यंत येउ शकतो.
किंवा खाजगी वाहनाने आपण थेट राजविहीरवाडी पर्यंत जाउ शकतो.
सुविधा व सोयी
🏠
निवास व्यवस्था
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
🍽️
अन्न व्यवस्था
किल्ल्यावर आणि गावात जेवणाची सोय नाही.
💧
पाणी उपलब्धता
किल्ल्यावर पिण्यायोग्य पाणी आहे.
स्थान नकाशे
सविस्तर नकाशे व ट्रेकिंग मार्ग पहा
उंची : ३४६० फुट
नाशिक – हरसूल रस्त्यावर नाशिक पासून ४५ कि.मी. अंतरावर वाघेरा हे
घाटमाथ्यावरचं गाव आहे. या गावामागे असलेल्या धरणाच्या पलीकडे त्रिकोणी
आकाराचा उत्तुंग गडमाथा लाभलेला पण आता फक्त अवशेषांच्या रूपाने शिल्लक
असलेला वाघेरा किल्ला उभा आहे. नाशिक-त्रिंबक– जव्हार या प्राचीन व्यापारी
मार्गावरील दमणगंगेच्या खोऱ्यातील सती घाटावर लक्ष ठेवण्यासाठी या
किल्ल्याची निर्मिती केली गेली. गावात शिरल्यावर उजव्या बाजूस असलेल्या
ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात एक मोठा वाटोळा दगड तसेच मागील बाजूस एक
भलामोठा नंदी, शिवलिंग व गणेशमुर्ती दिसुन येतात. गावकऱ्यांच्या
सांगण्यानुसार वाघेरा हा प्राचीन किल्ला असुन काश्यप ऋषींची तपोभूमी म्हणून
ओळखल्या जाणाऱ्या या किल्ल्यावर काश्यपी नदीचे उगमस्थान आहे. पुढे हि नदी
गोदावरी नदीस जाऊन मिळते. सध्या असलेले वाघेरा गाव हे किल्ल्याचे पायथ्याचे
गाव नसुन राजविहीर वाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव वाघेरा गावापासुन ४
कि.मी. अंतरावर आहे.
...
पुर्वी वाघेरा गाव राजविहीर वाडीच्या वरच्या भागात असल्याचे ग्रामस्थ
सांगतात. राजविहीर वाडीला राजविहीर हे नाव पडण्याबाबत एक आख्यायिका
सांगितली जाते. राजविहीर म्हणजे राजाची विहीर. वाघेरा किल्ल्यावरील राजाची
माणसे या वाडीतील दगडी बांधणीच्या विहिरीतून पाणी नेत असतं म्हणून या
विहिरीला राजविहीर असे नाव पडले पण आता मात्र ही विहीर पूर्णपणे नव्याने
बांधलेली आहे. वाघेरा किल्ला वसलेल्या डोंगराची एक सोंड थेट राजविहीर
वाडीकडे उतरलेली आहे. या सोंडेवर सुरवातीचे एक झाड वगळता सावलीसाठी एकही
झाड नसल्याने व किल्ल्यावर पिण्याचे पाणी नसल्याने पुरेसे पाणी घेऊन सकाळी
लवकरच किल्ल्यावर जाण्याचे नियोजन करावे. वाडीत उतरलेल्या या
डोंगरसोंडेवरून गडाची माची गाठायला एक तास पुरेसा होतो. वाडीतून १५
मिनिटांच्या चढाईनंतर आपण पठारावर येउन पोहोचतो. या पठारावर पुर्वी येथे
असलेल्या वाघेरा गावातील घरांचे विखुरलेले अवशेष दिसतात. वाघेरा गावचा
मारूती व शिवलिंग आजही येथे उनपाऊस खात उघडयावर पडले आहेत. येथुन पाउण
तासात आपण गडाखालील माचीवर येऊन पोहोचतो. पण येथवर येताना चांगलीच दमछाक
होते. माचीवरून वाघेऱ्याचा उंचावलेला सुळकेवजा गडमाथा दिसतो. येथुन
सपाटीवरील दहा मिनिटांच्या चालीनंतर आपण गडमाथ्याच्या सुळक्याखाली येऊन
पोहोचतो. येथे पहारेकऱ्याच्या चौकीचे अवशेष असुन थोडेसे प्रस्तरारोहण करून
समोर असलेल्या उंचवट्यावर चढले कि आपला उध्वस्त बुरुजावरून गडावर प्रवेश
होतो. हा तटबंदीच्या आतील माचीचा भाग असुन येथे उजव्या बाजुला एक लहानसे
तोंड असलेले टाके नजरेस पडते. हे टाके पुर्णपणे पाण्याने भरले असले तरी
यातील पाणी पिण्यायोग्य नाही. सोबत आलेल्या वाटाड्याच्या सांगण्यानुसार या
टाक्याच्या आतील बाजुस दगडी खांब आहेत पण पाणी भरल्याने ते दिसत नाहीत.
त्रिकोणी आकाराचा हा गड दक्षिणोत्तर पसरलेला असुन गडाच्या माचीचा पसारा आठ
एकरमध्ये सामावलेला आहे. माचीच्या उजव्या बाजुला ढासळलेली तटबंदी असुन या
तटबंदीत चार बुरुज आहेत तसेच या भागात काही घडीव व कोरीव दगड पडलेले असुन
एक उध्वस्त चौथरा दिसुन येतो. इथून गडमाथा गाठायला दोन वाटा आहेत. गडमाथा
उजवीकडे ठेवत वळसा घालून पुढे गेल्यावर माथ्यावर चढत जाणारी घसाऱ्याची वाट
आहे. या वाटेने जाताना आपल्याला तटबंदी व त्यातील बुरुज तसेच उतारावर खडकात
कोरलेली पाण्याची पण सध्या मातीने भरलेली तीन टाकी पहाता येतात. हे सर्व
आपल्याला माथ्यावरून उतरल्यावर देखील पहाता येते. दुसरी वाट म्हणजे
कातळावरून १५-२०फुटांचं सोपं प्रस्तरारोहण करून सरळ माथ्यावर जाणे. या
वाटेवर आपल्याला खडकात खोदलेला ५x५ फुट आकाराचा एक चर दिसुन येतो. या
चरातील पाणी बाहेर जाण्यासाठी छिद्र कोरले आहे पण या चराचे प्रयोजन लक्षात
येत नाही. माथ्यावर उघड्यावर एक शिवलिंग असुन त्यासमोर एक नंदी व भग्न
गणेशमुर्ती आहे. गडाचा हा माथा समुद्रसपाटीपासून ३४१८ फूट उंचावर आहे.
गडाचा हा सर्वात उंच भाग असुन येथुन माचीवर खुप मोठया प्रमाणात विखुरलेले
उध्वस्त अवशेष दिसतात तसेच ब्रम्हगिरी, अंजनेरी, रांजणगिरी, घरगड, सोनगिरी,
खैराई, रामसेज, देहेरगड व भोरगड हे किल्ले व त्यांच्या आसपासचा परीसर
दिसुन येतो. या उंचवट्यावरून घसाऱ्याच्या पायवाटेने खाली उतरल्यावर समोरच
एका भल्यामोठ्या वाड्याचे व शेजारी सदरेचे अवशेष दिसतात. त्या शेजारी इतरही
काही वास्तुंचे अवशेष विखुरलेले आहेत. वाटेच्या उजव्या बाजुला आधी वर्णन
केलेली तटबंदी व टाक्या असुन डाव्या बाजुला गडमाथ्याला लागुन एका सलग
रांगेत कोरलेली ४ मातीने बुजलेली टाकी दिसुन येतात. यातील एका टाक्यात भले
मोठे उंबराचे झाड आहे. या टाक्याच्या पुढे एक साचपाण्याचा तलाव असुन
कडयाच्या दिशेला उतारावर अजून एक कातळात खोदलेले टाके दिसुन येते. येथुन
मागे फिरून परत वाडयाच्या अवशेषांकडे यावे. वाडयाच्या समोरील बाजुस
ढासळलेल्या दोन बुरूजामध्ये कधीकाळी गडावर प्रवेश करण्यासाठी पुर्वाभिमुख
दरवाजा असल्याच्या खुणा दिसुन येतात. येथुन खडकात कोरलेल्या पायऱ्यांनी आपण
गडावरील माचीच्या खालील भागात येतो. या भागात बऱ्यापैकी झाडे असुन मोठया
प्रमाणात घरांचे अवशेष आहेत. येथे असलेली झाडे पहाता येथे पाण्याची टाकी
असण्याची शक्यता आहे. येथे असलेल्या झाडाखाली काही काळ विश्रांती घेऊन
किल्ल्याला समांतर असलेल्या पायवाटेने परतीच्या प्रवासाला सुरवात करायची.
गडाच्या पायथ्यापासून माथ्यापर्यंत संपूर्ण गडफेरीस साधारण ३ ते ४ तास
लागतात. वाघेरा हा वाघेरचा अपभ्रंश आहे. वाघेर ही राजस्थानची जमात आदिवासी
म्हणून ओळखली जाते. वाघेरांच्या ताब्यात असल्यामुळे या किल्ल्याला वाघेरा
हे नाव पडले असावे असे गावातील मंडळी सांगतात मात्र वाघेराचा तसा उल्लेख
कुठे मिळत नाही. पेशवाईत सवाई माधवराव यांच्या लग्नात स्वयंपाकी व
व्यवस्थेसाठी नाशिकच्या वाघेरातून लोक नेल्याची नोंद पेशवे दफ्तरात मिळते.
इ.स.१८०३ मध्ये वाघेरा जमातीने वाघेराचे नायक पात्रामल माणेक यांच्या
नेतृत्वाखाली बडोद्याच्या गायकवाडांविरूद्ध बंड पुकारले व त्यापुढील काळात
मुलू माणेक व त्याचा भाऊ बेरसी माणेक यांनीही उठाव केले. वाघेरांचे इंग्रज व
बडोद्याविरोधात वारंवार बंड होत असल्याने खंडेराव गायकवाडांनी
इंग्रजांच्या मदतीने वाघेरांचा बंदोबस्त केला. पेशव्यांच्या ताब्यात असलेला
वाघेरा किल्ला १८१८मध्ये इंग्रजंच्या ताब्यात गेला. त्यावेळी कॅ.जॉन
ब्रिग्जने किल्ल्याला भेट दिली असता त्याला घरांशिवाय तेथे काहीच आढळले
नाही. १८५७ च्या उठावात वाघेरचे सरदार जोधा माणेक यांनी स्वतःला ओखामंडळचा
राजा म्हणून जाहीर केले व नानासाहेब पेशव्यांचे सरदार बनले पण कर्नल
डोनोव्हन यांच्या सैन्याने त्यांचा पराभव केला.
वाघेरा किल्ला
महाराष्ट्र हा जसा दगडांचा देश आहे, तसाच किल्ल्यांचाही. आजच्या घडीला मोजायला गेले तर संपूर्ण महाराष्ट्रात अंदाजे साडेतीनशेच्या वर किल्ले आहेत. मला तर बऱ्याच वेळा प्रश्न पडायचा की, या किल्ल्यांना ही विविध नावे मिळाली कुठून?
किल्ल्यांच्या नावांचे हे प्रकरण खरोखरच अद्भुत आहे. काही किल्ल्यांना त्यावर असणाऱ्या देवदेवतांमुळे नावे पडली, तर काहींचे नामकरण शिवरायांनी केले, काही किल्ल्यांची फारसी नावे खुद्द औरंगजेबाने ठेवली आहेत, तर काही किल्ल्यांची नावे ही पायथ्याच्या किंवा नजीकच्या गावावरून ठेवली गेलेली आहेत. यामध्ये समावेश होतो तो राजदेहेरवाडीचा राजदेहेर, साल्हेरवाडीचा साल्हेर, मुल्हेरवाडीचा मुल्हेर आणि वाघेरा गावचा वाघेरा किल्ला.
'वाघेरा किल्ल्याच्या पायथ्याला वाघेरा नावाचे गाव आहे, त्यावरूनच या किल्ल्याचे नाव वाघेरा पडले असावे. दमणगंगेच्या खोऱ्यात सत्ती घाटाच्या रक्षणासाठी वाघेरा आणि खैराई या दोन किल्ल्यांची निर्मिती केली गेली. वाघेरा गावातील गावकरी सांगतात की, किल्ल्यावरून 'कश्यप' नदीचा उगम होतो आणि हीच नदी पुढे जाऊन गोदावरी नदीला मिळते.
नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यात वाघेरा किल्ला आहे. नाशिक-हरसूल मार्गावर नाशिकपासून ३५ कि.मी.वर वाघेरा गावाचा फाटा आहे. या फाट्यावरून आत शिरल्यावर पाच मिनिटांच्या अंतरावरच सुमारे हजार-बाराशे लोकवस्तीचे वाघेरा गाव लागते. हे गाव सत्ती घाटाच्या तोंडावर उभे आहे. आकाशात घुसलेला वाघेरा किल्ल्याचा उत्तुंग उंचवटा आणि त्यावर फडकणारा हिंदवी स्वराज्याचा ध्वज, यामुळे किल्ला दूरवरूनच आपले लक्ष वेधून घेतो. एक वेळ मनात विचार येतो की,
खरोखरच वाघाचे काळीज असलेल्यानेच किल्ल्यावर जावे, पण प्रत्यक्षात मात्र तसे काही नाही. मात्र किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी उलटा घास नक्कीच घ्यावा लागतो. कारण गावाच्या मागे एक भले मोठे धरण बांधलेले दिसते. या धरणाच्या पार्श्वभूमीवर वाघेरा किल्ला उभा आहे. धरणाला वळसा घातल्यावर एक वाडी लागते तिचे नाव 'राजविहीर वाडी'. या वाडीचे नाव 'राजविहीर' कशावरून पडले? याबद्दलची एक गमतीदार कथा गावकरी सांगतात, वाघेरा किल्ल्यावर एके काळी भैरव नावाचा राजा राज्य करीत होता. या भैरव राजाचे सेवक त्याच्यासाठी घोड्यावरून पाण्याची ने-आण करीत असत. हे सेवक पाण्याचे हंडे गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या विहिरीतून गडावर घेऊन जात असत. पायथ्याच्या या वाडीतून हे लोक राजासाठी पाणी नेत असत, म्हणून त्या वाडीला 'राजविहीर वाडी' हे नाव पडले. आजही गावाच्या शेवटच्या टोकाला ही विहीर आपल्याला पाहावयास मिळते. आपण मोठ्या उत्साहाने ही पुरातन विहीर पाहावयास जातो, पण सध्या या विहीरीचे रूपांतर आधुनिक विहिरीत झालेले असल्यामुळे आपला मोठा हिरमोड होतो.
पहाटेच्या हरसूलला जाणाऱ्या एस.टी. ने आम्ही वाघेरा गावात दाखल झालो. अजून सूर्योदयाला अवकाश होता. अंधारातच धरणाची वाट पायाखाली घालायला लागलो. हळूहळू तांबड्या लाल रंगाचा, सृष्टीमध्ये चेतना भरणारा सुवर्णगोल घाटातून वर येऊन क्षितिजावर आपले स्थान जमवू लागला. त्याची सोनेरी किरणे ढगांमधून झिरपून धरणाच्या पाण्यावर पडली होती. जणू काही सर्व आसमंत सुवर्णाने न्हाऊन निघाला होता. किल्ल्याकडे जाणारी वाट बांधाच्या कडेकडेने पुढे जाते, सकाळच्या शीतल वाऱ्याचे झोत झेलत आम्ही अर्ध्या तासात वाघेरा गावातून 'राजविहीरवाडी'मध्ये पोहोचलो. वाडीतून एक चांगली मळलेली वाट किल्ल्यावर जाते, त्यामुळे वाट चुकण्याचा फारसा संभव नाही. जस-जसे आपण किल्ल्याची उंची गाठत जातो तस-तसे घाटमाथ्यावरून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेगसुद्धा वाढत जातो. वाटेतच एका छोट्याशा पठारावर हनुमंताची उघड्यावर पडलेली मूर्ती दिसते. या मूर्तीच्या बरोबर विरुद्ध दिशेला तिरक्या रेषेत याच हनुमंताचे जन्मस्थान असणारा अंजनेरी पर्वत दिसतो, हा म्हणजे निव्वळ योगायोगच म्हणावा. इथून वर जाणारी वाट मात्र खड्या चढणीची आहे. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्याच्या वाटेवर एकही झाड नाही, पण घाटमाथ्यावरून वाहणाऱ्या शीतल वाऱ्यामुळे चढण्याचा थकवाही फारसा जाणवत नाही.
किल्ल्यावर चढताना वाटेतच एक कातळ आडवा येतो. त्यावर चढून गेले की पलेले पाण्याचे टाके दिसते. या टाक्याला या परिसरातील गावकरी भैऱ्याची न्हाणी असे म्हणतात. पूर्वी ही न्हाणी किल्ल्यावरील पाण्याचा एकमेव स्रोत होता. येथून वर जाणारी वाट किल्ल्याच्या सर्वोच्च उंचवट्यावर जाते. या उंचवट्यावर महादेवाची पिंडी उघड्यावर ठेवून त्याला चौथरा बांधलेला दिसतो. किल्ल्याच्या माथ्यावरील या महादेवाच्या दर्शनासाठी दर महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरते. त्या वेळी राऊळातील गावेच्या गावे या महादेवाच्या दर्शनासाठी किल्ल्यावर मोठ्या भक्तिभावाने लोटतात. सतत वाहणाऱ्या वाऱ्यामुळे हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज इथे मोठ्या डौलाने फडकत आपल्या स्वतंत्रपणाची ग्वाही देत होता. पायथ्यापासून माथ्यावर पोहोचायला सुमारे दीड तास लागतो. माथ्यावरून वाघेराच्या परिसरातील चिमुकली खेडी आणि त्याच्या समोरची हिरवीगार शेतं दिसतात. एवढेच नव्हे, तर नाशिक, पेठ आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील किल्ल्यांचे मोहक दर्शन होते. माथ्यावरून वाघेराच्या परिसरात नजर फिरवली तर, जणू काही हिरव्या तपकिरी रंगाची ठिगळं लावलेली गोधडीच पसरलेली आहे असे भासते. निसर्गाच्या या गालिच्यावर रामसेज, भोरगड म्हणजेच देहेरचा किल्ला, ब्रह्मगिरी, हरिहर, अंजनेरी, खैराई, सोनगिरी असे सर्वदूर विखुरलेले किल्ले दिसतात.
किल्ल्याच्या उंचवट्यावरून मागच्या बाजूने एक निसरडी वाट खाली पठारावर उतरते. या पठाराला 'वाघेरा माची' असे म्हणतात. या माचीवर डाव्या बाजूला कड्यालगत पाण्याची तीन टाकी दिसतात. ही पाण्याची टाकी केवळ नावापुरतीच आहेत, कारण त्यांत पाण्याऐवजी मातीच जास्त शिल्लक आहे. या टाक्यांच्या जवळच एक औदुंबराचे झाड आहे, त्याच्या बुंध्यामधून वर्षभर पाणी ठिबकत असते, त्यामुळे गावकरी लोक त्याचीदेखील पूजा करतात. इथेच एका दगडावर शिवशंकराने आपल्या जटा आपटून कश्यपी नदीचा प्रवाह बदलल्याच्या खाणाखुणाही आहेत. पुढे थोड्याच अंतरावर एका मोठ्या वाड्याचे भग्नावशेष दिसतात. यालाच 'भैरव राजाचा वाडा' म्हटले जाते. माचीवरून खाली गावात उतरण्यासाठी पूर्वी एक वाट होती, पण काळाच्या ओघात ती पूर्णपणे नष्ट झाली. या वाटेला कोकणदरवाज्याची वाट असे म्हणतात. माचीवर आणखी काही चार-दोन जोत्यांचे अवशेष आढळतात. संपूर्ण किल्ला फिरायला अर्धा तास पुरतो.
असा हा वाघेराचा किल्ला नाशिकपासून एका दिवसात सहजपणे पाहून होतो. ब्रह्मगिरीचा किल्ला, अंजनेरी आणि हरिहरचे किल्ले हे या परिसरातील सुप्रसिद्ध असे
किल्ले आहेत. त्यामुळे आपली सर्वांची पावले त्यांच्याकडे नेहमीच वळतात. पण थोडीशी वाट वाकडी करून सती घाटाच्या तोंडावर असणारं हे अनोख दुर्गलेण आपण नक्कीच पाहायला पाहिजे.
किल्ल्याची उंची : समुद्रसपाटीपासून १०५० मीटर (३४४४ फूट)
तालुका : त्र्यंबकेश्वर
किल्ल्याची श्रेणी : मध्यम
डोंगररांग: पेठ उपरांग
पायथ्याचे गाव : वाघेरा-राजविहीर
पायथ्याच्या गावापासूनचे अंतर राजविहीरपासून २ तास.
जवळचे एस.टी. स्थानक : त्र्यंबकेश्वर, हरसूल
राहण्याची सोय : किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय : जेवणाची सोय नाही.
पिण्याचे पाणी : किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी उत्तम कालावधी : जून ते मार्च
किल्ला फिरायला लागणारा वेळ : अर्धा तास.
जवळपासची गावे : वाघेरा, हरसूल
सूचना : किल्ल्यावर जाण्यासाठी उत्तम कालावधी जून ते मार्च आहे, कारण त्यानंतर किल्ल्यावर पाण्याचे दुर्भिक्ष असते.
नाशिक
जिल्ह्यातील विस्मृतीत गेलेल्या किल्ले सशेराविषयी आजच्या दैनिक पुढारी या
वृत्तपत्राच्या महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच एडिशनमध्ये ही बातमी लागली
आहे. याशिवाय किल्ले वाघेरा याचे मुळी कागदपत्रांमधून कश्यपगड किंवा किल्ले
कश्यप या नावानेही कागद सापडले याशिवाय अंजनेरी डोंगरावर इसवी सन 1758
साली किल्ला वसवून त्याचे नाव इंद्रगड असे ठेवण्यात आले. चांदवड येथील
इंद्रगड वेगळा आहे ही नोंद घेणे. या माझ्या संशोधनाची आजच्या पुढारीला
लागलेली बातमी
वाघेरा किल्ल्यावर इतिहासाच्या पाऊलखुणा, वीरगळी, तेल-चुन्याच्या घाण्यांना उर्जितावस्था
Nashik Waghera Fort : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळील ऐतिहासिक वाघेरा किल्ल्यावर इतिहासाच्या पाऊलखुणा आढळून येतात.
By :
गोकुळ पवार | Updated at : 22 Jan 2023 04:42 PM (IST)
https://marathi.abplive.com/photo-gallery/news/nasik-maharashtra-news-nashik-news-historic-vaghera-fort-near-trimbakeshwar-in-nashik-district-1144131
No comments:
Post a Comment