आमच्या महाराष्ट्रात-सह्याद्रीत, गड-किल्ल्यांची कमी नाही! आणि त्यात भटकणाऱ्या मावळ्यांचीही!...काही गड नावाजलेले प्रसिध्द..आणि खूप सारे...दुर्लक्षित!
'हरिहर' असाच एक नावाजलेला आणि बाजूचा 'भास्करगड' दुर्लक्षित...कॉलेजातल्या अगणित सुंदर बालांमध्ये...एखादी फार देखणी नाही पण सावळी-नीटस-सुबक-ठेंगणी असते, अगदी तसंच... आणि आम्हीही.....तिथेच भुलतो!!!
एखादी पाटी घ्यावी आणि त्यावर हव्या तशा रेघोट्या माराव्यात, तशाच सह्याद्रीच्या डोंगररांगा महाराष्ट्राच्या पाटीवर उमटलेल्या आहेत. कधी पूर्वेकडे, तर कधी पश्चिमेकडे, कधी उत्तरेकडे, तर कधी दक्षिणेकडे पसरलेल्या या रांगांवर मध्ययुगीन राज्यकर्त्यांनी मोक्याची जागा पाहून किल्ले बांधलेले आहेत.नाशिक जिल्ह्यात सेलबारी- डोलबारी, अजंठा- सातमाळ, या डोंगररांगा आहेत. याशिवाय नाशिकच्या पश्चिम बाजूस आणि इगतपुरीच्या उत्तरेकडील बाजूस पसरलेल्या सह्यपर्वताच्या रांगेला त्रिंबकरांग असे म्हणतात. या रांगेची सुरुवात बसगड, हरिहर किल्ल्यांनी होते. ही रांग पुढे ब्रह्मगिरी आणि अंजनेरीमध्ये खंडित होते. पुढे याच रांगेचे दोन फाटे फुटतात. एक फाटा अंजनेरीकडे वळतो, तर दुसरा ब्रह्मगिरीच्या किल्ल्यापासून पुढे वाघेरा, खैराई आणि सोनगिर या किल्ल्यांना कवेत घेत दमणगंगेच्या खोऱ्यांमध्ये विलीन होतो.
एका बाजूला पश्चिम किनारपट्टी आणि दुसऱ्या बाजूला देश, या सर्वांचा विचार करून या सर्व किल्ल्यांची बांधणी केलेली आहे. देशावरून जर कोकणात उतरायचे' असेल, तर प्रथम नाशिकची गाळणारांग लागते. त्यानंतर सातमाळारांग लागते आणि मग लागते ती त्रिंबकरांग, म्हणजे या तिन्ही रांगेतील किल्ल्यांशी भांडल्याशिवाय शत्रू काही कोकणात उतरू शकणार नाही. नाशिक हे पुर्वीपासुनच बाजारपेठ म्हणून प्रसिध्द आहे. प्राचिनकाळी सोपारा डहाणु बंदरातून नाशिककडे येणाऱ्या डहाणु- जव्हार- गोंडाघाट -अंबोली घाट- त्रिंबक- नाशिक या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी घाटावर बांधलेल्या किल्ल्यांच्या माळेत गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हरीहर व भास्करगड या दोन किल्ल्यांचे मणी ओवले गेले. प्राचीन काळी नालासोपारा, डहाणू, वसई इत्यादी बंदरात येणारा माल वेगवेगळ्या घाटमार्गानी देशावर येत असे त्यापैकीच गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी भास्करगडाची निर्मिती झाली. पेशव्यांच्या काळात या किल्ल्याचा तुरुंग म्हणून देखील उपयोग केला गेला.
त्र्यंबक डोंगररांगेच्या दक्षिण टोकावर असलेल्या या किल्ल्याचा इतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही. पण काताळात खोदलेल्या किल्ल्यावर जाण्याचा सर्पिलाकार मार्ग व पाण्याची सातवहान कालीन टाकी किल्ल्याच प्राचिनत्व सिध्द करतात. इ.स १२७१ ते १३०८ पर्यंत हा किल्ला देवगिरीच्या अधिपत्याखाली होता. नंतर बहामनी पुढे निजामशाही यांच्याकडे किल्ला होता. निजामशाहीच्या अंतकाळात इ.स १६२९ मध्ये शहाजी राजांनी बंड केले, तेव्हा भास्करगड त्यांच्या ताब्यात गेला. १६३३ मध्ये शहाजी राजांकडून हा किल्ला मोगलांकडे गेला १६७० मध्ये शिवरायांचा पेशवा मोरोपंत पिंगळे याने हा किल्ला जिंकून घेतला.१६८८ मध्ये मोगलांनी भास्करगड जिंकून घेतला. इ.स १७३० मध्ये कोळ्यांनी बंड करुन तो घेतला पूढे १८१८ पर्यंत हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता.
हरिहर किल्ला हा कातळात खोदून काढलेल्या पायऱ्यासाठी प्रसिद्ध असल्याने तेथे सतत वर्दळ असते मात्र त्याच्या अगदी जवळ असून देखील भास्करगडाकडे फार कमी भटक्यांचे पाय वळतात. निरगुडपाडा हे हरीहर व भास्करगड या दोन्ही गडाच्या पायथ्याचे गाव असुन वेळेचे नीट नियोजन केल्यास एका दिवसात हे दोन्ही किल्ले सहज पाहुन होतात. खोडाळा-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर खोडाळ्यापासून १५ कि.मी. अंतरावर 'निरगुडपाडा' नावाचे गाव आहे. गडावर जाण्यासाठी जवळचे स्टेशन कसारा. कसाऱ्यावरून निरगुडपाड्यास जाण्यासाठी जीप मिळते. कसारा ते निरगुडपाडा , खोडाळामार्गे जाऊन येऊन साधारण १०० किमी असेल. दुसरा एक मार्ग इगतपुरी, घोटी- वैतरणा रस्ता ,मार्गे जातो ह्या मार्गे तुम्हाला जाऊन येऊन १३०/१४० किमी आहे. पण बहुतेक गाडीवाले खोडाळामार्गे लवकर पोहचतात म्हणून ह्या रस्त्याने जातात. निरगुडपाड्या पर्यंत रस्ता चांगला आहे फक्त मध्ये थोडा २/३ किमी खराब आहे. बसगड हा हरिहर गडाच्या समोरच आहे दोघांचा मुख्य गाव एकच निरगुडपाडा. पण निरगुडपाड्याला गेल्यावर एके ठिकाणी एक रास्ता सरळ हरिहरगडाला जातो आणि एक डावीकडे पाठी वळला आहे तो बसगडला जातो, किंवा मग नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गाने देखील येथे पोहोचता येते. समुद्रसपाटीपासून या किल्ल्यांची उंची अंदाजे ३५०० फूट असून पायथ्याच्या निरगुडपाडा गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी किमान २ तास लागतात.
निरगुडपाडा हा बऱ्यापैकी मोठा पाडा असल्याने गावात आगाऊ सांगितल्यास जेवणाची व शाळेत राहण्याची सोय होते. निरगुडपाड्याच्या समोरील बाजुस हरिहर किल्ला तर गावाच्या डाव्या बाजुला डोक्यावर टोपी ठेवल्यासारखा दिसणारा बसगड किल्ला आहे.
या दोन्ही किल्ल्यांच्या मध्ये नागाच्या फण्यासारखे शिखर असलेला फणी डोंगर आहे. हरिहर, बसगड आणि फणी डोंगर या तीनही ठिकाणी निरगुडपाडा येथून जाता येते. गावातुन किल्ला जरी समोर दिसत असला तरी त्यावर जाण्यासाठी संपुर्ण डोंगराला वळसा घालुन विरुध्द बाजुच्या टोकाला जावे लागते. गावातुन गडपायथ्याला जाण्यास दिड तास तर किल्ल्यावर जाण्यास दोन ते अडीच तास लागतात.
निरगुडपाडा गावातुन घोटीच्या दिशेने काही अंतरावर एक कच्चा रस्ता फणीच्या डोंगराला उजव्या बाजूला ठेवत फणीचा डोंगर व भास्करगड यांच्या मधील खिंडीत जातो. भास्करगड व उतवडचा डोंगर असलेली एक सोंड या खिंडीत उतरलेली आहे. गावाच्या अलीकडून एक कच्चा गाडीरस्ता गडाक्डे जातो. गावाच्या डाव्या बाजूने एक कच्चा रस्ता जातो, पुढे गेल्यावर तुम्हाला एका नाल्यावर पूल लागतो तो पार करून हा रस्ता मधेच तोडून डावीकडे डोंगराची सोंड आम्ही धरायची. आधी दगड असणारा रस्ता तुम्हाला शेवट पर्यंत कळू देत नाही की वर चढायला रस्ता कुठून आहे ते पण लक्ष दिलं तर कळून येत तिथे एक ठिकाणी लिहून ठेवलं आहे. स्त्याला एक मोठा दगड आहे. त्याला काही ठिकाणी शेंदूर लावला आहे. तिकडून एक पायवाट गडाकडे जाते. रस्त्याच्या डाव्या बाजूने वर जाणारा रास्ता थेट गडावर जातो. गडावर जाईपर्यंत ठिकठिकाणी दिशादर्शक लावलेले आहेत. काही काही ठिकाणी रस्ता चुकू नये म्हणून दगडांचे मनोरे रचलेले आहेत. जेणे करून कोणी वाट चुकू नये. एक चांगली गोष्ट म्हणजे ठिकठिकाणी दिशादर्शक बाण असल्यामुळे चुकण्याचा संभव अजिबात नाही.येणाऱ्या वाटेत बऱ्याच वाटा निघतात. पण गड डाव्या बाजूला असल्याकारणाने आपण डाव्या बाजूची वाट धरूनच वर चढायचं हे पक्क मनात ठेवायचे. बसगड चार टप्प्यांमधे विभागला गेला आहे, पाहिले तीन टप्पे हे टेकड्यांचे आहेत. आपण एकामागोमाग तीन चढ ५० अंशांत चढतो, छातीवरचा चढ अजिबात नाहीये. आणि अगदी शेवटच्या टप्यात वाट बसगडच्या पूर्वेकडच्या टोकावरून उजवीकडे कड्याच्या बाजूने वळते आणि मग पुढे दहा मिनटं आपण कातळ कड्याच्या बाजूने चालत रहातो. मधे सुकलेले तीन ते पाच धबधबे लागले त्यामुळे पावसाळ्यात इथे येणं कठीण असल्याची जाणीव होते.
हि वाट अनेक वळणे घेत भास्करगडावर जाते. किल्ल्याच्या पायथ्याशी घनदाट जंगल असल्याने उन्हाळय़ातही चढताना फारसा त्रास होत नाही. गडावर फारसे दुर्गभटके जात नसल्याने वाटा मळलेल्या नाहीत. नेहमी भटकणाऱ्या दुर्गभटक्यांना वाट शोधणे फारसे कठीण काम नाही पण नवख्यांनी मात्र गावातून एखादा माहितीगार माणूस बरोबर घ्यावा. खिंडीतील सोंडेवरून पहिल्या पठारावर आल्यावर सतत भास्करगडाच्या दिशेने डावीकडची वाट घ्यावी
बसगाडच्या कातळाच्या बाजूने घनदाट रानटी झाडातून वाटकडून जातेवेळी
भास्करगडाच्या समोरच उतवडचा डोंगर हे भास्करगडापेक्षा उंच त्र्यंबक रांगेतील सर्वोच्च शिखर आहे. भास्करगडावर जाणाऱ्या वाटेशी सलंग्न अशी एक वाट उतवड डोंगरावर जाते. आपण थोडे जरी भरकटलो तर उतवड डोंगराच्या पायथ्याशी पोहोचण्याची शक्यता असते. एका बाजूला आ वासून उभा असलेला उतवडचा डोंगर, भास्करगड फिरताना सदैव आपली पाठराखण करत असतो. त्याला पाहून 'किल्यासमीप दुसरा डोंगर असू नये आणि असल्यास त्याचेही किल्ल्यात रूपांतर करावे,' या रामचंद्रपंत अमात्यांच्या आज्ञापत्रातील ओळींची पुन्हा एकदा आठवण येते. इथे मात्र बसगडाच्या समोरचा उतवड मात्र नुसताच डोंगर आहे, त्यावर ना तटबंदी ना पाण्याचे टाके.बाजूच्या गावातील लोक ह्याला उताड्या म्हणतात.
खिंडीतून साधारण एक तासाची चढाई केल्यानंतर आपण भास्करगडाच्या सोंडेसमोरील छोट्या पठारावर येऊन पोहोचतो. या पठारावरून समोरच भास्करगडाच्या सोंडेवर असलेला उध्वस्त बुरुज दिसुन येतो. या पठारावरून गडाला वळसा मारत गडाचा कातळकडा डावीकडे व दरी उजवीकडे ठेवत एक वाट किल्ल्यावर जाते. या वाटेने साधारण २० मिनिटे गेल्यावर आपण भास्करगडाच्या पायऱ्याजवळ पोहोचतो.

| किल्ल्यावर जाण्यासाठी चक्क कातळ खोदून सर्पाकार जिना तयार केलाला दिसतो. |
| या दगडी जिन्याच्या दोन्ही बाजूला १० फूट उंचीच्या कातळभिंती आहेत |
| कातळकोरीव पायर्यांचा वरुन दिसणारा नजारा |
येथे कातळकड्यात किल्ल्यावर जाण्यासाठी कातळ खोदून पायऱ्या कोरलेल्या आहेत. या वाटेच्या दोन्ही बाजूस साधारण १०-१२ फुट उंचीच्या कातळभिंती आहेत.बसगडच्या पायऱ्या कड्यात उभ्या खोदलेल्या नसल्या तरी अतिशय सुंदर आणि विलक्षण रित्या बांधल्या आहेत. या भिंतीच्या वरील बाजुस असलेली तटबंदी मोठया प्रमाणात ढासळलेली असुन हे ढासळलेले दगड पायरीमार्गावर आल्याने या पायऱ्या मोठया प्रमाणात गाडल्या गेल्या आहेत. यातील सुरवातीच्या काही पायऱ्या हिंदवी स्वराज्य मावळा प्रतिष्ठान या संस्थेने श्रमदानाने साफ केलेल्या आहेत.
| किल्ल्याचा अर्धा जमिनीत गाडला गेलेला व कातळात कोरलेला दरवाजा |
गडाचा मुख्य दरवाजा आर्धा मातीमध्ये गेला आहे त्यामुळे आत वाकून किंवा बसून शिरायला लागते |
या पायऱ्या चढून आपण किल्ल्याच्या कातळात कोरलेल्या व जमीनीत अर्धवट गाडलेल्या पश्चिमाभिमुख दरवाजा समोर पोहोचतो. किल्ल्याचा दरवाजा जरी अर्धा गाडला गेला असला तरी दरवाज्याच्या दोन्ही बाजूस कोरलेली कमळाची फुले आजही चांगल्या स्थितीत आहेत. या दरवाजातुन थोडे वाकुनच आपल्याला किल्ल्यात प्रवेश करावा लागतो. दरवाजाच्या आत उजव्या बाजूस पहारेकऱ्यासाठी देवडी असुन येथुन १०-१२ पायऱ्या चढुन आपण दरवाजासमोरील सपाटीवर येतो. येथुन किल्ल्याच्या पठारावर जाताना समोर व उजव्या बाजूला अशा दोन वाटा फूटतात. उजव्या बाजूच्या पायवाटेने १० मिनीटे चढल्यावर आपण किल्ल्याच्या पठारावर पोहचतो.

बसगडचा नकाशा
निमुळते पण प्रशस्त पठार असलेला हा किल्ला समुद्रसपाटी पासून ३३४० फुट उंचीवर पुर्वपश्चिम पसरलेला असुन किल्ल्याचे क्षेत्रफळ साधारण ३२ एकर आहे. भास्करगडचा माथा हा निव्वळ खडकच असल्याने आपल्याला सर्वत्र दगड पसरलेले दिसतात.
पठारावर जाताना वाटेत उजव्या बाजुला एका वास्तुचे अवशेष असुन त्यात काही कोरीव दगड दिसुन येतात. हि वास्तु म्हणजे एखादे मंदिर असावे. पठारावर आपण जेथे पोहोचतो तेथे पाण्याचे एक बुजलेले जोडटाके असुन या टाक्यासमोर एक मोठया वास्तूचे अवशेष दिसुन येतात.
गडावर मोठया प्रमाणात असलेले वास्तुअवशेष पहाता गडावर मोठया प्रमाणात वस्ती असावी असे वाटते. या पठारावरून आपण गडाखालुन वर येताना जो बुरुज दिसतो त्या बुरुजाकडे जाताना वाटेत पाण्याची दोन कोरडी टाकी दिसुन येतात. सध्या हिंदवी स्वराज्य मावळा प्रतिष्ठान या नाशिकच्या संस्थेने येथे दुर्गसंवर्धनाचे काम हाती घेतलेले असुन अगदी मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात देखील हि मंडळी येथे काम करीत आहेत. यातील एका टाक्याची पुर्णपणे सफाई झालेली असुन दुसरे टाके अर्धवट साफ केलेले आहे. साफ केलेल्या टाक्यात या पावसाळ्यात पाणी जमा होऊन नंतरच्या काळात गडावर काही प्रमाणात पाण्याची सोय होईल. गडासाठी झुंजणाऱ्या हिंदवी स्वराज्य मावळा प्रतिष्ठानच्या या मावळ्यांच्या कार्याला मनापासुन धन्यवाद व प्रणाम. गडावर काही या टाक्याच्या खाली टोकाला असलेल्या बुरुजाला काही प्रमाणात तटबंदी असुन बुरुजावर जाण्यासाठी असलेला दरवाज उध्वस्त झालेला आहे.
किल्ल्याला या भागात काही प्रमाणात रचीव तटबंदी दिसुन येते. हे पाहुन आपण सुरवातीला पाहिलेल्या जोडटाक्याकडे येऊन गडफेरीला सुरवात करावी. या फेरीत सुरवातीला आपल्याला एका मोठया वाडयाच्या भिंतींचे अवशेष दिसुन येतात. हा बहुदा किल्लेदाराचा वाडा असावा. या वाड्यावरून पुढे गेल्यावर एक साचपाण्याचा तलाव दिसुन येतो. या तलावातच खडकात एक टाके खोदलेले आहे.
तलावाच्या काठावर असलेल्या चार उध्वस्त भिंतीच्या आत एक शेंदुर फसलेली हनुमानाची मुर्ती आहे.
किल्ल्याच्या या भागात पठाराच्या काठावर मोठया प्रमाणात दगडाची रचीव तटबंदी दिसुन येते. येथुन पुढे जाताना उजव्या बाजुला एका झाडाखाली बुजलेले टाके असुन पुढे वाटेवरच मातीने भरून पुर्णपणे बुजलेले दुसरे टाके दिसते. येथुन दहा मिनिटे चालत उध्वस्त अवशेष पहात आपण किल्ल्याच्या उतवड डोंगरासमोर असलेल्या दुसऱ्या टोकाला पोहोचतो. या टोकाला असलेला बुरुज व अवशेष पुर्णपणे मातीखाली गाडले गेले आहेत. येथुन पठाराच्या दुसऱ्या बाजुने आपण आलो त्या दरवाजाच्या दिशेने निघावे. या वाटेवर आपल्याला सुरवातील एक समाधीचा कोरीव दगड व त्यापुढील भागात एक खडकात खोदलेले टाके दिसते. या टाक्याच्या पुढील बाजूस ३-४ वास्तुंचे अवशेष दिसुन येतात. या पुढील भागात वाटेच्या डाव्या बाजुस व पठाराच्या खालील अंगास एका योजनाबद्ध वस्तीचे उध्वस्त अवशेष दिसतात. किल्ल्यावर खुप मोठया प्रमाणात वास्तु अवशेष दिसुन येतात.
किल्ल्यावर फिरताना एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे, या गडावर कुठेही मानवनिर्मित तटबंदी नाही. यामागचे कारण म्हणजे, मुळात हा किल्ला ज्या स्थानावर बांधला आहे, त्याच्या चारही बाजूने सरळसोट तुटलेले कातळकडे आहेत, त्यामुळे किल्ल्याला आयते संरक्षण मिळालेले आहे.
दूरवर वैतरणेच्या जलाशयाचे चमकते पाणी लक्ष वेधून घेते. उत्तरेकडे फणी डोंगराचा 'फणा', त्यामागे हरिहर म्हणजेच हर्षगड, ब्रह्माडोंगर, मग ब्रम्हगिरीचा किल्ला आणि त्याच्या मागे घाटमाथ्यावरील वाघेरा, तर त्याच्या उजवीकडील अंजनेरीचा खडा पहाड आणि या सर्वांमध्ये वसलेली मानवी संस्कृती, असं सारं काही विलोभनीय दृश्य गडमाथ्यावरून नजरेस पडते.
किल्ल्याच्या दरवाजात आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. संपुर्ण गडफेरीस दोन तास लागतात. गडावर ७-८ टाकी असली तरी पिण्याच्या पाण्याची सोय नाही त्यामुळे पुरेसे पाणी सोबत बाळगावे.
संदर्भ :-
| Main gate as seen from top of stairs |
After coming out from that stairs We saw that there is a little more section of climb to be undertaken to reach the topmost portion. So making our way through the overgrown grass we climbed further and reached the top. All through this walking and climbing among the overgrown grass the worry of snake popping it's head was always on my mind, I treaded carefully and thanked my stars on reaching the top.
As I always say that the view from the top is always beautiful and it was no different here because far on the horizon one can see Fani Dongar perched majestically on the top and the huge Harihar and beyond that Bharmagiri fort in its full glory everything was enveloped in clouds the breeze so lovely and lush greenery spread far and wide made the atmosphere magical.
| Nature at its best |
We started to explore the top, right at the entrance there was this water cistern.
| Water Cistern |
From this water cistern we started moving towards the right of the top,the next thing we see is the ruined structure
| Ruined structure |
After walking along this structure we come across another natural water pond and beyond that there was an Hanuman Idol.
पठारावर पोहचताच समोर बसगड दिसतो आणि पाठी फिरून पहिले असता तुम्हाला ३ डोंगर दिसतात त्यात पहिला फणीचा डोंगर, उजिवाकडचा हरिहरगडआणि डावीकडचा ब्रह्म डोंगर
बसगाडच्या कातळाच्या बाजूने घनदाट रानटी झाडातून वाटकडून जातेवेळी
गडाचा मुख्य दरवाजा आर्धा मातीमध्ये गेला आहे त्यामुळे आत वाकून किंवा बसून शिरायला लागते
Just taking the detour to your left from the road there is a muddy trail leading into the woods. This is the start point of the trek from where the actual climb starts.
उतवड डोंगर, गडावर आलेली बाजूच्या गावातील मुलं ह्याला उताड्या बोलत होती
गडावरील हनुमंताचे मंदिर
हरिहरगडाचा दिशेला असलेल्या माथ्यावरील पठाराचा शेवटी एक छोटा बुरुज लागते
वैतरणा नदीचे पात्र आणि पाठबंधारा
'हरिहर' असाच एक नावाजलेला आणि बाजूचा 'भास्करगड' दुर्लक्षित...कॉलेजातल्या अगणित सुंदर बालांमध्ये...एखादी फार देखणी नाही पण सावळी-नीटस-सुबक-ठेंगणी असते, अगदी तसंच... आणि आम्हीही.....तिथेच भुलतो!!!
नाशिकाच्या पश्चिमेकडे आणि इगतपुरीच्या उत्तरेला 'त्रंबक डोंगररांगेच्या दक्षिण टोकाला भास्करगड उभा आहे. लोकल नाव 'बसगड'..का ते त्याचा घेरा पाहून कळलं! कल्याण-कसारा-इगतपुरी वरून त्रंबकेश्वरकडे जाणाऱ्या वाटेवर 'निरगुडपाडा' हे गडाच्या पायथ्याचं गाव ! गावाच्या डाव्या बाजूने एक कच्चा रस्ता जातो, हा रस्ता मधेच तोडून डावीकडे डोंगराची सोंड आम्ही धरायची. ही लांबलचक आणि वर चढत नेऊन थकवणारी वाट १ तास तुडवली कि आपण बसगडाच्या कातळकड्यासमोर येतो. या चढईने चांगलाच दम काढला जातो . इथून उजव्याबाजूने जाणारी पायवाट कातळकड्याला वळसा घालून कातळात खोदलेल्या पायर्यांपाशी जाते. वाटेत दोन-तीन गुफा, पाण्याची टाकी लागतात. ही वाट ४५ मिनिटात संपते आणि आपण पोहोचतो या गडाच्या वैशिष्ट्यासमोर. काताळात खोदून काढलेला सर्पिलाकार जिना. ढोपर उंचीच्या पायर्या असलेल्या या जिन्याच्या दोन्ही बाजूला १० फूट उंचीच्या कातळभिंती आहेत. बुरुजवरची तटबंदीचे दगड पडून काही जिने झाकले गेलेले होते. जिन्याचा मार्ग आपल्याला प्रवेशद्वारासमोर घेऊन गेला. प्रवेशद्वार अर्धअधिक मातीत गाडल गेलेल आहे. यातून वाकून किल्ल्यात प्रवेश करायचा.. प्रवेशद्वाराला लागूनच पहारेकर्यांसाठी देवड्या दिसतात.. आजून काही पायऱ्या चढून आपण गडावर प्रवेश करतो. गडाच्या डाव्या हाताला दोन पाण्याची टाकी दिसतात आणि समोर त्रंबक रांगेतील फणीचा डोंगर, हरिहर पलीकडे ब्रह्मगिरी दिसतो. त्या डोंगरांना. एका बाजूला वैतरणा जलाशय दिसतो त्यामागचे AMK, कळसुबाई ठळकपणे दिसत नव्हते. परत मागे फिरून उजवीकडे मारुतीची मूर्ती, पावसाळी तलाव, वाड्याचे अवशेष पाहून घेतले आणि परतलो निरगुडपाड्यात.
इतिहासात हा किल्ला जास्त नावाजलेला नाही. इ.स १२७१ ते १३०८ पर्यंत हा किल्ला देवगिरीच्या अधिपत्याखाली होता. नंतर बहामनी पुढे निजामशाही यांच्याकडे किल्ला आला. निजामशाहीच्या अंतकाळात इ.स १६२९ मध्ये शहाजी राजांनी बंड केले, तेव्हा भास्करगड त्यांच्या ताब्यात गेला. १६३३ मध्ये शहाजी राजांकडून हा किल्ला मोगलांकडे गेला १६७० मध्ये शिवरायांचा पेशवा मोरोपंत पिंगळे याने हा किल्ला जिंकून घेतला.१६८८ मध्ये मोगलांनी भास्करगड जिंकून घेतला. इ.स १७३० मध्ये कोळ्यांनी बंड करुन तो घेतला पूढे १८१८ पर्यंत हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता.
भास्करगडाचा माथा बेसॉल्ट खडकाचा बनलेला आहे. याचे मुख्य आकर्षण म्हणजे काताळात खोदून काढलेला सर्पिलाकार जिना. एका दिवसाचा ट्रेक म्हणून हा उत्तम पण २-२.३० तास दमवणारा पर्याय आहे ज्यांना हरिहर पुन्हा करायचा नाही त्यांसाठी.
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे आणि इगतपुरीच्या उत्तरेस एक डोंगररांग पसरली आहे ज्याला ‘त्र्यंबक रांग’ म्हणतात. याच त्र्यंबक रांगेत येणारा भास्करगड अथवा बसगड हा हरिहर किल्ल्याचा सख्खा शेजारी. हरिहर किल्ला हा त्याच्या कातळात खोदुन काढलेल्या पायऱ्यासाठी खूप प्रसिद्ध आहे मात्र त्याच्या अगदी जवळ असून देखील भास्करगडाकडे मात्र खूप कमी ट्रेकरचे पाय वळतात.
पायथ्याच्या निरगुडपाडा गावातून दिसणारा बसगड aka भास्करगड. समुद्रसपाटीपासून या किल्ल्यांची उंची अंदाजे ३५०० फूट असून नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकरांगेत हा किल्ला येतो.
प्राचीन काळी नालासोपारा, डहाणू, वसई इत्यादी बंदरात येणारा माल वेगवेगळ्या घाटमार्गानी देशावर येत असे त्यापैकीच गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी भास्करगडाची निर्मिती झाली. पेशव्यांच्या काळात या किल्ल्याचा तुरुंग म्हणून देखील उपयोग केला गेला. समुद्रसपाटीपासून या किल्ल्यांची उंची अंदाजे ३५०० फूट असून पायथ्याच्या निरगुडपाडा गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी किमान २ तास लागतात. याच निरगुडपाडा गावातून हरिहर (हर्षगडावर) जाणारा मार्ग आहे. त्र्यंबक-घोटी या मार्गावर खोडाळा मार्ग निरगुडपाडा गाठता येते किंवा मग नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गाने देखील येथे पोहोचता येते.
साधारण १ १/२ तासाची डोंगर चढाई केल्यानंतर आपण भास्करगडाच्या कातळकड्या समोरील या छोट्या पठारावर येऊन पोहोचतो
निरगुडपाडा गावाच्या अलीकडेच एक कच्चा गाडीरस्ता भास्करगड व फणीचा डोंगर यांच्या मधील खिंडीत जातो. येथून पुढे कच्चा रस्ता सोडून वाट अनेक वळणे घेत भास्करगडावर जाते. पायथ्यापासून भास्करगडाकडे जाणारा मार्ग शोधणे थोडे जिकीरीचे काम आहे त्यामुळे गावातून एखादा वाटाड्या बरोबर घ्यावा. हा किल्ला तसा अल्पपरिचित असल्याने त्याच्या पायवाटा लवकर सापडत नाहीत. शिवाय या किल्ल्याच्या पायथ्याशी खूप घनदाट जंगल आहे. साधारण १ १/२ तासाची डोंगर चढाई केल्यानंतर आपण भास्करगडाच्या कातळकड्या समोरील छोट्या पठारावर येऊन पोहोचतो.
किल्ल्यावर जाण्यासाठी चक्क कातळ खोदून सर्पाकार जिना तयार केलाला दिसतो.
या दगडी जिन्याच्या दोन्ही बाजूला १० फूट उंचीच्या कातळभिंती आहेत
कातळकड्याच्या उजवीकडून वाट किल्ल्यावर जाते. या वाटेने साधारण १५ मिनिटे चालत गेल्यावर आपण भास्करगडाच्या कातळकोरीव पायऱ्याजवळ पोहोचतो. येथून किल्ल्यावर जाण्यासाठी चक्क कातळ खोदून सर्पाकार जिना तयार केलाला दिसतो. मात्र पाण्याच्या प्रवाहामुळे अनेक मोठमोठाले दगड या जिन्यावर वाहून आलेले आहेत. या दगडी जिन्याच्या दोन्ही बाजूला १० फूट उंचीच्या कातळभिंती आहेत. या पायऱ्या काळजीपूर्वक चढून गेलो कि समोर येतो किल्ल्याचा अर्धा जमिनीत गाडला गेलेला व काळ्या कातळात कोरलेला दरवाजा. हा दरवाजा जरी अर्धा गाडला गेला असला तरी दरवाज्याच्या दोन्ही बाजूस कोरलेली कमळ पुष्पे अजूनही उत्तम स्थितीत आहेत. या दरवाज्यातून रांगतच आपल्याला किल्ल्यात प्रवेश करावा लागतो.
दरवाज्याच्या आता गुहा खोदलेल्या आहेत. बहुदा पहारेकऱ्यासाठी देवड्या असाव्यात
किल्ल्याच्या पठारावर पडक्या वास्तूंचे व मंदीराचे अवशेष, बुजलेली पाण्याची टाकी, एक साचपाण्याचा तलाव व दगडात कोरलेली हनुमंताची मूर्ती असे अवशेष पाहायला मिळतात. गड माथ्यावरून जवळच असणारा उतवड व फणीचा डोंगर, हरिहर, श्रीगड (ब्रम्हगिरी), अंजनेरी व ब्रम्हा डोंगर आपले लक्ष वेधून घेतात.
कसारा ते निरगुडपाडा , खोडाळामार्गे जाऊन येऊन साधारण १०० किमी असेल. दुसरा एक मार्ग इगतपुरी, घोटी- वैतरणा रस्ता ,मार्गे जातो ह्या मार्गे तुम्हाला जाऊन येऊन१३०/१४०किमी आहे. पण बहुतेक गाडीवाले खोडाळामार्गे लवकर पोहचतात म्हणून ह्या रस्त्याने जातात. निरगुडपाड्या पर्यंत रस्ता चांगला आहे फक्त मध्ये थोडा २/३ किमी खराब आहे. बसगड हा हरिहर गडाच्या समोरच आहे दोघांचा मुख्य गाव एकच निरगुडपाडा. पण निरगुडपाड्याला गेल्यावर एके ठिकाणी एक रास्ता सरळ हरिहरगड ला जातो आणि एक डावीकडे पाठी वळला आहे तो बसगड ला जातो, तिकडून आम्ही डावीकडे आत शिरलो. पुढे गेल्यावर तुम्हाला एका नाल्यावर पूल लागतो तो पार करून थोडा अजून पुढे जायायला लागते. पुढे रस्ता खराब होता त्यामुळे आम्ही गाडी तितेच थांबून चालू लागलो. वाटेत काही गावकरी भेटले त्यांना गडावर जायायला वाट विचारली. तिथेच थोडा अंतरावर पुढे रस्त्याला एक मोठा दगड होता त्याला काही ठिकाणी शेंदूर लावला होता. तिकडून एक पायवाट जात होती त्या दिशने आम्हाला जायला सांगितलं. आम्हाला कसारावरून बसगाडच्या पायथ्याशी पोहोचायला १.३० लागला ट्रेकला सुरवात करताच थोड्या वर गेल्यावर एका ठिकाणी बऱ्याच वाटा फुटलेल्या होत्या तिथेच शेळ्या चारवात असलेल्या काकांना विचारले, त्यांनी पुन्हा कसा जायायचा सांगितले. पण काही दुर्गप्रेमी आणि गिर्यारोहण प्रेमीने गडावर जाण्यासाठी दगडावर दिशादर्शवणारे बाण केले होते. बहुतेक बाण पुसट झाले होते. तरी पण त्यामुळे आम्हाला वाट शोधायला खूप मद्त झाली. अशा प्रकारे आम्ही एका पठारावर पोहोचलो.
तिकडून आता आम्हाला बसगडचा कातळ दिसत होता. त्यामुळे आता वाट चुकण्याचा काही प्रश्न नव्हता. पठारावरून सरळ रस्त्याने गडाच्या कातळाजवळ पोहचलो तिकडून उजवीकडची वाट धरून आम्ही गडाच्या पायऱ्यांजवळ पोहचलो. गडाच्या पायऱ्या सुंदर कातळात घडवल्या होत्या पण प्रत्येक गडाचा पायऱ्या प्रमाणे ह्या गडाच्या हि पायऱ्या उद्धवस्त झालेल्या होत्या. सुरवातीच्या थोड्या पायऱ्या चांगल्या होत्या. पायऱ्या चडून वर गेल्यावर मुख्य दरवाजा लागतो, तो अर्धा जमिनीत बुजला गेला आहे त्यामुळे तुम्हाला वाकून /बसून आत जायायला लागते. नंतर तुम्ही थोडे अजून वर गेल्यावर गडाच्या माथ्यावर पोहचतात. उतवड डोंगर, गडावर आलेली बाजूच्या गावातील मुलं ह्याला उताड्या बोलत होती तिथून तुम्हाला एकीकडे समोर हरिहरगड आणि आजूबाजूचे गड दिसतात . आणि एकीकडे बाजूला उताड्या डोंगर. आणि एकी कडे वैतरणा नदीचे पात्र आणि काही छोटे छोटे धरण /पाटबंधारे दिसतात . आम्हाला गडावर पोहचायला २ तास लागले. आम्ही जरा हळू चालत होतो म्हणून आम्हाला थोडा अर्धा तास जास्तच लागला नाही तर सव्वा ते दिड तासात हि पोहचू शकतो.
गडाला मानव निर्मित तटबंदी दिसत नाही. आणि गडावर काही पाण्याचा सुकलेल्या टाक्या आहेत . आणि एक टाकीच्या बाजूला हनुमंताची मूर्ती. त्याचा वरच उंच ठिकाणी काही उधवस्त वस्तू चे अवशेष आहेत. पूर्ण गड फिरायला तुम्हाला १ ते १. ३० तास पूर्ण होतो . पण गडावर गवतातून वाट काडत आणि नकाशातले बुरुज शोधण्याचा वेळात आणि जेवण ह्या गोष्टीमुळे आम्हाला ३ तास लागले. गुगलवर नकाशात तुम्हाला २ बुरुज दाखवले आहेत, पण प्रत्येक्षात तुम्हाला दगडाचा एक साधा बुरुज दिसतो . तो बुरुज न वाटता छोटीशी दगडाची ३ फुटाची भिंत वाटते
निर्गुडपाड्यात पाणी भरून घेतले कारण बसगड वर पाणी आहे पण पिण्यायोग्य नसल्याकारणाने आम्हाला गावकऱ्यांनी योग्य सल्ला दिला आणि आम्ही तो लगेच आमलात आणला. निर्गुड पाड्यातून थोडं मागे येऊन उजव्या बाजूस आत एक फाटा जातो तो एकदम बसगड आणि फण्या डोंगराच्या खिंडीत, रस्ता अतिशय खराब आहे. त्यामुळे आम्ही एखादं किलोमीटर पायी चालत गेलो आणि खिंडीतून डावीकडे जाणाऱ्या पायवाटेला लागलो. बर एक चांगली गोष्ट म्हणजे ठिकठिकाणी दिशादर्शक बाण असल्यामुळे चुकण्याचा संभव अजिबात नाही. बसगड 4 टप्प्यांमधे विभागला गेलाय, पाहिले 3 टप्पे हे टेकड्यांचे आहेत. आपण एकामागोमाग 3 स्लेज 50 अंशांत चढतो, छातीवरचा चढ अजिबात नाहीये. आणि अगदी शेवटच्या टप्यात वाट बसगड च्या पूर्वेकडच्या टोकावरून उजवीकडे कड्याच्या बाजूने वळते आणि मग पुढे 10 मिनटं आपण कातळ कड्याच्या बाजूने चालत रहातो. मधे सुकलेले 3 ते 5 धबधबे लागले त्यामुळे पावसाळ्यात इथे येणं कठीण असल्याची जाणीव झाली. आम्ही 12.09 मिनिटांनी चालायला सुरू केलं होतं ते पायऱ्यांपाशी आम्ही 2 वाजता पोचलो. बसगड च्या पायऱ्या कड्यात उभ्या खोदलेल्या नसल्या तरी अतिशय सुंदर आणि विलक्षण रित्या बांधल्या आहेत. इथे मुद्दामून फोटो देतोय जेणेकरून तो छान प्रकार सर्वांना पाहता येईल.
साधारण 100 एक पायऱ्या चढुन गेल्यावर पुढच्या काही पायऱ्या ढासळल्या आहेत त्यामुळे दगड सांभाळत जावं लागतं. पुढे शेवटचं डावं वळण घेतलं की दिसतो बसगडचा बुजला गेलेला अर्धा दरवाजा. बुजला गेला असला तरी जेवढा ओपन आहे तेवढा सुंदर आहे आणि मराठ्यांच्या स्थापत्य कलेचा ठेवा असल्याची खूण पटते. थोडं वाकून आत जावं लागत आणि मग परत 15 पायऱ्या चढून आपण गडावर येतो. वर अजूनही एक छोटं टेपाड चढून आपण मुख्य माथ्यावर येतो आणि मग लक्षात येतं की गडावर फारसं असं काहीच नाही. एक मारुती 2 टाकी तीही सुकलेली बस बसगड एवढाच आहे. विस्तार खूप आहे व शिल्लक काही नाही. वरून वैतरणा जलाशय, हरिहर, फण्या डोंगर, त्रंबकेश्वर ब्रम्हगिरी दिसतो. तो सगळा नजारा पाहून आम्ही परत खाली उतरलो.
आधी दगडी असणारा रस्ता तुम्हाला शेवट पर्यंत कळू देत नाही की वर चढायला रस्ता कुठून आहे ते पण लक्ष दिलं तर कळून येत तिथे एक ठिकाणी लिहून ठेवलं आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूने वर जाणारा रास्ता थेट गडावर जातो. गडावर जाईपर्यंत ठिकठिकाणी दिशादर्शक लावलेले आहेत. काही काही ठिकाणी रस्ता चुकू नये म्हणून दगडांचे मनोरे रचलेले आहेत. जेणे करून कोणी वाट चुकू नये
येणाऱ्या वाटेत बऱ्याच वाटा निघतात. पण गड डाव्या बाजूला असल्याकारणाने आपण डाव्या बाजूची वाट धरूनच वर चढायचं हे पक्क मनात होतं. त्यादिशेने वाटचाल चालू होती. उंचीने कमी असले तरीही हे प्रवेशद्वार रेखीव आणि देखणे आहे. महाराजांचा मान राखत ह्या प्रवेशद्वारातून वाकुनच प्रवेश करावा लागतो. त्यातून आत गेल्यावर सुमारे सात आठ पायऱ्या चढल्यावर आपणास समोर दिसते ती सरळ चढाई ही चढल्यावर आपण बसगडावर पोहोचतो.
काही महत्वाच्या गोष्टी
गडावर जाण्यासाठी जवळचे स्टेशन कसारा. कसाऱ्यावरून निरगुडपाड्यास जाण्यासाठी जीप मिळते. नंबर हवा असल्यास कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करावा.
गडावर जाण्यासाठी जरी गाईड लागत नसला तरी दिशादर्शकाकडे लक्ष ठेवून वाटचाल करावी.
भास्करगड/बसगड
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे आणि इगतपुरीच्या उत्तरेस एक डोंगररांग पसरली आहे ज्याला ‘त्र्यंबक रांग’ म्हणतात. याच त्र्यंबक रांगेत येणारा भास्करगड अथवा बसगड हा हरिहर किल्ल्याचा सख्खा शेजारी. हरिहर किल्ला हा त्याच्या कातळात खोदुन काढलेल्या पायऱ्यासाठी खूप प्रसिद्ध आहे मात्र त्याच्या अगदी जवळ असून देखील भास्करगडाकडे मात्र खूप कमी ट्रेकरचे पाय वळतात.
| पायथ्याच्या निरगुडपाडा गावातून दिसणारा बसगड aka भास्करगड. समुद्रसपाटीपासून या किल्ल्यांची उंची अंदाजे ३५०० फूट असून नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकरांगेत हा किल्ला येतो. |
| साधारण १ १/२ तासाची डोंगर चढाई केल्यानंतर आपण भास्करगडाच्या कातळकड्या समोरील या छोट्या पठारावर येऊन पोहोचतो |
| किल्ल्यावर जाण्यासाठी चक्क कातळ खोदून सर्पाकार जिना तयार केलाला दिसतो. |
| या दगडी जिन्याच्या दोन्ही बाजूला १० फूट उंचीच्या कातळभिंती आहेत |
| किल्ल्याचा अर्धा जमिनीत गाडला गेलेला व कातळात कोरलेला दरवाजा |
| दरवाज्याच्या आता गुहा खोदलेल्या आहेत. बहुदा पहारेकऱ्यासाठी देवड्या असाव्यात |
| किल्ल्यावरून समोर दिसणारा फणीचा डोंगर, मागे हरिहर aka हर्षगड, त्यामागे अजस्त्र ब्रम्हा डोंगर आणि सर्वात मागे श्रीगड aka ब्रम्हगिरी. तर उजवीकडे अंजनेरीचा डोंगर |
| पठारावर कोरड्या तलावाकाठी हि बलभीमाची मूर्ती आहे |
| Fork Road |
Left side road is the one which is coming from Kasara so we should take the road on our right from this Fork junction and as you are walking you will see Harihar and Fani Dongar on your right too.
| Fani Dongar from the road |
| Who would not like to take such pleasant walk |
| Basgad or Bhasker Gad fort on Top left side |
We took our sweet time clicking pictures
Actually the scenery on both the side was so eye pleasing ki photo ka break toh banta hi tha
| amazing eye catching views |
as we were not knowing the route so we kept inquiring with the locals whenever we happen to see some hut.
| Checking with locals about the route |
| Katcha road after the tar section gets over |
A little walk from here and we come across a bridge and just 100 metres ahead of this you have to take left detour to start the trek.
| Katcha road and the bridge |
| Your trek starts from this muddy trail |
| View after a little climb |
This muddy path is just a gentle climb initially with some rocky sections but can be trekked easily.
| Rocky section |
| Moving to the left from the plateau |
| Time to refresh |
![]() |
| Mesmerizing beauty of Fani and Harihar |
| Taking right turn we come across a large clearing |
| Switch back climb |
and keep walking towards the left and while you are doing so, most of the time Fani Dongar and Harihar will be on your left and keep your eye on the top and once you reach the top another plateau is there.
| walking on the plateau toward the rock formation ahead of me |
| Gigantic Rock Formation |
| Traversing from the right |
While traversing this path we have to be very careful because at few portions there are stream water flowing and crossing them becomes an extremely risky,
![]() |
| Risky crossings |
It's a different matter that we were not carrying rope with us but we took help of each other and managed to cross. In summer crossing this kind of stone section may not be difficult.
| Helping each other cross the slippery patches |
After traversing for few minutes we came across the entrance steps. This steps are cut through the mountain stone, The steps are quite high almost 2 feet each, these stones steps are currently in a very bad state and with moss on it it has become all the more slippery.
| Slippery stone cut steps |
| View from the top of the steps |
![]() |
| OMG !!! how I wish I was little taller to conquer these steps |
we gradually climbed and entered a narrow stone wall passage ( I think keeping this passage narrow must have helped to trap or control the enemy from entering the fort).
| climbing through narrow passage |
| In ruins, Neglected !! |
This narrow passage section is in complete ruins today. after passing through this passage we come across the main entrance of the fort. The only peculiar thing about this fort entrance is that it is buried in the soil perhaps due to negligence over passage of time.
| Main gate partly buried in the soil |
| Small steps after entering |
| Main gate as seen from top of stairs |
| View after coming out from that stairs |
After coming out from that stairs We saw that there is a little more section of climb to be undertaken to reach the topmost portion. So making our way through the overgrown grass we climbed further and reached the top. All through this walking and climbing among the overgrown grass the worry of snake popping it's head was always on my mind, I treaded carefully and thanked my stars on reaching the top.
| View from the top is always beautiful |
| Fani behind that Harihar and behind that Bhramgiri |
| Nature at its best |
| Water Cistern |
| Ruined structure |
| Natural water pond with Hanuman idol behind it |
I offered my prayers and thanked for the safe trek.
| Hanuman Idol |
| Our restless friends and Swapnali watching them |
Sitting on Top of the fort and having lunch with friends is the most fulfilling experience, Some discussion , some time management strategy for the descend and we were over with our lunch and bid adieu to the top but not before Selfie le le re (La Salman Style)
![]() |
| Le le le le Selfie lele |
back finishing the descend in almost 1:15 minutes and then relaxing in the stream which was flowing.
Return transport is a big issue from Nirgudpada, we were lucky to get transport from there to khondala village and jeep back to Kasara to catch 6.18 local to CST.
We were told that there is a bus at 5 pm from Nirgudpada for Kasara, But we didn't wait for that. If you have any information regarding bus please help me to update.
दिवाळीच्या सुट्टीनंतर २ आठवड्याने विकेंड ट्रेककर ग्रुप वर बसगड करायचा ठरला. त्यासाठी सकाळची लोकल पकडायची का रात्रीची ह्या विषयावर विचारविनिमष होऊन ठरल, सकाळी ५ची मुंबई कसारा गाडी पकडायची. मी ५. १२ ला करीरोड स्थानकावरून गाडी पकडली. माझ्या सोबत सचिन हि त्या गाडीत होता. अनिल आणि सर्वेश ठाण्याला भेटणार होते. आणि विनय आणि प्रणव डोंबिवलीला. पण अनिल वेळेत पोहचू शकला नाही त्यामुळे त्याची गाडी ५ मिनिटासाठी सुटली. त्याला कल्याण वरून ६.५२ ची गीतांजली एक्सप्रेस पकडायला सांगतली बाकी सगळ्यांनी आपआपल्या ठरलेल्या ठिकाणी गाडी पकडली. ठाणे येईपर्यंत गाडी भरली होती. त्यामुळे डोंबिवलीच्या आमच्या २ गिरिमित्रांपैकी एकाला बसायला भेटले नाही. कसारा येईपर्यंत मग आमच्या नेहमीच्या वेगवेगळ्या विषयावर चर्चा चालल्या होत्या.
कसाऱ्याला पोहचेपर्यंत ८ वाजले. अजून अनिल येण्याचा बाकी होता. तो पर्यंत आम्ही नाश्ता करून घेतला. तितक्यात १० मिनिटांनी अनिल हि पोहचला.
कसारा स्थानकाच्या बाहेर पडताच गाडी वाले विचारू लागले कुठे जाणार. आम्ही बसगाडच्या पायथ्याचा गाव निरगुडपाडा चा भाव विचारला सगळ्यांनचा एकच भाव ३००० रुपये. बहुतेक कसारा वरून सकाळी st असते पण आम्ही सकाळी पहिली कसारा लोकल पकडली असती तर आम्हाला भेटली असती. त्यामुळे आम्हाला आता खाजगी गाडी करण्याशिवाय पर्याय नव्हता. शेवटी आम्ही एकाशी भाव करून २०००रू ठरवून थेट निरगुडपाडा ते पुन्हा कसारापर्यंत येऊन जाऊन गाडी ठरवली. आजून ४००ते ५०० रुपये दिले असते तर त्यांनी आम्हाला १० आसनाची बोलेरो दिली असती. पण आम्ही ७जण होतो त्यामुळे त्यांनी आम्हाला कमी भाड्यात दिलेली ओमीनी गाडी हि ठीक होती. आमचा प्रवास बसगाडच्या दिशेने सुरु झाला.
कसारा ते निरगुडपाडा , खोडाळामार्गे जाऊन येऊन साधारण १०० किमी असेल. दुसरा एक मार्ग इगतपुरी, घोटी- वैतरणा रस्ता ,मार्गे जातो ह्या मार्गे तुम्हाला जाऊन येऊन१३०/१४०किमी आहे. पण बहुतेक गाडीवाले खोडाळामार्गे लवकर पोहचतात म्हणून ह्या रस्त्याने जातात. निरगुडपाड्या पर्यंत रस्ता चांगला आहे फक्त मध्ये थोडा २/३ किमी खराब आहे. बसगड हा हरिहर गडाच्या समोरच आहे दोघांचा मुख्य गाव एकच निरगुडपाडा. पण निरगुडपाड्याला गेल्यावर एके ठिकाणी एक रास्ता सरळ हरिहरगड ला जातो आणि एक डावीकडे पाठी वळला आहे तो बसगड ला जातो, तिकडून आम्ही डावीकडे आत शिरलो. पुढे गेल्यावर तुम्हाला एका नाल्यावर पूल लागतो तो पार करून थोडा अजून पुढे जायायला लागते. पुढे रस्ता खराब होता त्यामुळे आम्ही गाडी तितेच थांबून चालू लागलो. वाटेत काही गावकरी भेटले त्यांना गडावर जायायला वाट विचारली. तिथेच थोडा अंतरावर पुढे रस्त्याला एक मोठा दगड होता त्याला काही ठिकाणी शेंदूर लावला होता. तिकडून एक पायवाट जात होती त्या दिशने आम्हाला जायला सांगितलं. आम्हाला कसारावरून बसगाडच्या पायथ्याशी पोहोचायला १.३० लागला.
हरिहरगडाचा पायथाचा वाडीतून टिपलेले बसगडचे दृश्य
ट्रेकला सुरवात करताच थोड्या वर गेल्यावर एका ठिकाणी बऱ्याच वाटा फुटलेल्या होत्या तिथेच शेळ्या चारवात असलेल्या काकांना विचारले, त्यांनी पुन्हा कसा जायायचा सांगितले. पण काही दुर्गप्रेमी आणि गिर्यारोहण प्रेमीने गडावर जाण्यासाठी दगडावर दिशादर्शवणारे बाण केले होते. बहुतेक बाण पुसट झाले होते. तरी पण त्यामुळे आम्हाला वाट शोधायला खूप मद्त झाली. अशा प्रकारे आम्ही एका पठारावर पोहोचलो.
पठारावर पोहचताच समोर बसगड दिसतो आणि पाठी फिरून पहिले असता तुम्हाला ३ डोंगर दिसतात त्यात पहिला फणीचा डोंगर, उजिवाकडचा हरिहरगडआणि डावीकडचा ब्रह्म डोंगर
बसगाडच्या कातळाच्या बाजूने घनदाट रानटी झाडातून वाटकडून जातेवेळी
तिकडून आता आम्हाला बसगडचा कातळ दिसत होता. त्यामुळे आता वाट चुकण्याचा काही प्रश्न नव्हता. पठारावरून सरळ रस्त्याने गडाच्या कातळाजवळ पोहचलो तिकडून उजवीकडची वाट धरून आम्ही गडाच्या पायऱ्यांजवळ पोहचलो.
गडाच्या पायऱ्या सुंदर कातळात घडवल्या होत्या पण प्रत्येक गडाचा पायऱ्या प्रमाणे ह्या गडाच्या हि पायऱ्या उद्धवस्त झालेल्या होत्या. सुरवातीच्या थोड्या पायऱ्या चांगल्या होत्या. पायऱ्या चडून वर गेल्यावर मुख्य दरवाजा लागतो, तो अर्धा जमिनीत बुजला गेला आहे त्यामुळे तुम्हाला वाकून /बसून आत जायायला लागते. नंतर तुम्ही थोडे अजून वर गेल्यावर गडाच्या माथ्यावर पोहचतात.
गडाचा मुख्य दरवाजा आर्धा मातीमध्ये गेला आहे त्यामुळे आत वाकून किंवा बसून शिरायला लागते
उतवड डोंगर, गडावर आलेली बाजूच्या गावातील मुलं ह्याला उताड्या बोलत होती
गडावरील हनुमंताचे मंदिर
हरिहरगडाचा दिशेला असलेल्या माथ्यावरील पठाराचा शेवटी एक छोटा बुरुज लागते
वैतरणा नदीचे पात्र आणि पाठबंधारा
तिथून तुम्हाला एकीकडे समोर हरिहरगड आणि आजूबाजूचे गड दिसतात . आणि एकीकडे बाजूला उताड्या डोंगर. आणि एकी कडे वैतरणा नदीचे पात्र आणि काही छोटे छोटे धरण /पाटबंधारे दिसतात . आम्हाला गडावर पोहचायला २ तास लागले. आम्ही जरा हळू चालत होतो म्हणून आम्हाला थोडा अर्धा तास जास्तच लागला नाही तर सव्वा ते दिड तासात हि पोहचू शकतो.
गडाला मानव निर्मित तटबंदी दिसत नाही. आणि गडावर काही पाण्याचा सुकलेल्या टाक्या आहेत . आणि एक टाकीच्या बाजूला हनुमंताची मूर्ती. त्याचा वरच उंच ठिकाणी काही उधवस्त वस्तू चे अवशेष आहेत. पूर्ण गड फिरायला तुम्हाला १ ते १. ३० तास पूर्ण होतो . पण गडावर गवतातून वाट काडत आणि नकाशातले बुरुज शोधण्याचा वेळात आणि जेवण ह्या गोष्टीमुळे आम्हाला ३ तास लागले. गुगलवर नकाशात तुम्हाला २ बुरुज दाखवले आहेत, पण प्रत्येक्षात तुम्हाला दगडाचा एक साधा बुरुज दिसतो . तो बुरुज न वाटता छोटीशी दगडाची ३ फुटाची भिंत वाटते
गड पाहून झाल्यावर आम्ही ३ वाजता उतरायला सुरवात केली. खाली उतरते वेळी , गडाच्या पायथजवळ जिथे अनेक वाट दिसत होत्या तिथे बोलण्याचा नादात आम्ही वाट चुकलो. वाट चुकल्यामुळे आमची १५/२० मिनिटे वाया गेली. तरी आम्हाला पुन्हा पायथाला पोहचायला ४. ४५ वाजले.
जाते वेळी पुन्हा आम्ही आलेल्या मार्गाने कसाऱ्याला पोहचलो.
कावनई गावातून निघालो तेव्हा 10 वाजले होते, वाटेत मीनाक्षी मंदिर फाटा लागतो त्या आधी एक घरगुती हॉटेल आहे. तेथे मस्त वाफाळता चहा घेतला आणि बरोबर आणलेले आलू पराठे कालच्या उरलेल्या भाजी बरोबर खाल्ले. ट्रेक म्हटलं की खाद्य पदार्थांची निरनिराळी combinations उत्पन्न होतात आणि त्यातला आनंद वेगळाच असतो. तर नाश्ता करून आम्ही भास्करगड कडे निघालो. 28 किलोमीटर चा रस्ता असल्यामुळं वाटेत जरा डोळा लागला पण जसं वैतरणा नगर क्रॉस झालं तशी मग वैतरणा धरणाची भिंत आणि जलसागर बघण्यात कसं निर्गुडपाडा गाव आलं समजलंच नाही. निर्गुडपाडा हे गाव प्रसिद्ध आहे ते हरिहर किल्ल्या मुळे पण बहुतेक लोकांना बसगड चा पायथाही तोच आहे हे माहीत देखील नाही. आजकाल mob following पद्धत वाढत चालल्ये. लोकं एका ग्रुप ला follow करतात आणि एका मागोमाग एक एक ग्रुप दुसऱ्यांना त्यामुळे हरिहर सारखा किल्ला त्याच्या कातळात खोदलेल्या पायऱ्यांमुळे इतका फेमस झालाय की दर शनिवार रविवार मुंबई- पुणे- नाशिक इथल्या ट्रेकिंग ग्रुप्स चा इथे पाऊस पडतो. बरं ट्रेकिंग ग्रुप्स सुद्धा कमर्शिअल असतात त्यामुळे बक्कळ पैसे घेऊन ऐश चाललेली असते. मग हरिहर च्या पायऱ्यांपाशी लहान ग्रुप्सना तासंतास घुटमळत राहावे लागते कारण एक एक ग्रुप 80-100 लोकांचा असल्यामुळे आणि पायऱ्याचा patch रिस्की असल्यामुळे दबकत दबकत उतरावं लागत. बरेचदा two वे ट्रॅफिक सुद्धा सुरू असत त्या जीवघेण्या पायऱ्यांवर. असो मी बसगड सोडून इथे का येऊन बसलो? मनात खदखदत असलेलं बाहेर येतच कधीतरी तसंच असावं.
तर मूळ मुद्दा हा की एकत्र जोडीने वसलेल्या बसगड-हरिहर किल्ल्यांच्या जोडीत हरिहर 98.50% भाव खाऊन जातो तर खरंच गड किल्ल्यांबद्दल आस्था असलेले ट्रेकिंग ग्रुप्सच बसगड वर येतात. आम्ही निर्गुडपाड्यात पोचलो आणि जिकडेतिकडे बसेस, गाड्या यांची गर्दी दिसली. पण आज आपण त्यातले नाही याचा मनोमन आनंद झाला. बसगड ला जायला निर्गुडपाड्यातून एक किलोमीटर थोडं पुढे जावं लागतं. वैतरणा नगर हुन येताना बसगड आधी तर हरिहर नंतर लागतो. आम्ही निर्गुडपाड्यात पाणी भरून घेतले कारण बसगड वर पाणी आहे पण पिण्यायोग्य नसल्याकारणाने आम्हाला गावकऱ्यांनी योग्य सल्ला दिला आणि आम्ही तो लगेच आमलात आणला. निर्गुड पाड्यातून थोडं मागे येऊन उजव्या बाजूस आत एक फाटा जातो तो एकदम बसगड आणि फण्या डोंगराच्या खिंडीत, रस्ता अतिशय खराब आहे. त्यामुळे आम्ही एखादं किलोमीटर पायी चालत गेलो आणि खिंडीतून डावीकडे जाणाऱ्या पायवाटेला लागलो. बर एक चांगली गोष्ट म्हणजे ठिकठिकाणी दिशादर्शक बाण असल्यामुळे चुकण्याचा संभव अजिबात नाही. बसगड 4 टप्प्यांमधे विभागला गेलाय, पाहिले 3 टप्पे हे टेकड्यांचे आहेत. आपण एकामागोमाग 3 स्लेज 50 अंशांत चढतो, छातीवरचा चढ अजिबात नाहीये. आणि अगदी शेवटच्या टप्यात वाट बसगड च्या पूर्वेकडच्या टोकावरून उजवीकडे कड्याच्या बाजूने वळते आणि मग पुढे 10 मिनटं आपण कातळ कड्याच्या बाजूने चालत रहातो. मधे सुकलेले 3 ते 5 धबधबे लागले त्यामुळे पावसाळ्यात इथे येणं कठीण असल्याची जाणीव झाली. आम्ही 12.09 मिनिटांनी चालायला सुरू केलं होतं ते पायऱ्यांपाशी आम्ही 2 वाजता पोचलो. बसगड च्या पायऱ्या कड्यात उभ्या खोदलेल्या नसल्या तरी अतिशय सुंदर आणि विलक्षण रित्या बांधल्या आहेत. इथे मुद्दामून फोटो देतोय जेणेकरून तो छान प्रकार सर्वांना पाहता येईल.
किल्ले भास्करगड उर्फ बसगड (BASGAD)
सकाळी ८ च्या सुमारास कसारा स्टेशन गाठलं. तिथून ठरल्याप्रमाणे जीप घेऊन निरगुडपड्याला जायला सुरवात केली. मधेच फक्त पेट्रोल भरायला आणि नाश्त्यासाठी "बाबा दा ढाबा" वर थांबलो. तिथे चहा पिऊन पुढच्या वाटेला लागलो सुमारे एक तासच पुढे गेलो असुत आणि तिथूनच धुकं सुरू झालं तेव्हाच समजलो आजचा ट्रेक अफलातून असणार आहे. सव्वा दहाच्या सुमारास आम्ही गडाच्या पायथ्याशी पोचलो. आणि चढाईला सुरवात केली.
आधी दगडी असणारा रस्ता तुम्हाला शेवट पर्यंत कळू देत नाही की वर चढायला रस्ता कुठून आहे ते पण लक्ष दिलं तर कळून येत तिथे एक ठिकाणी लिहून ठेवलं आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूने वर जाणारा रास्ता थेट गडावर जातो. गडावर जाईपर्यंत ठिकठिकाणी दिशादर्शक लावलेले आहेत. काही काही ठिकाणी रस्ता चुकू नये म्हणून दगडांचे मनोरे रचलेले आहेत. जेणे करून कोणी वाट चुकू नये
अजून ही धुकं अजिबात कमी झालं नव्हतं. एव्हाना आजूबाजूचे दृश्य पाहून जंगलात केलेला प्रवेश हा जाणवायला लागला होता. धुक्यामुळे आपली माणसे आपल्या जवळ येईपर्यंत ती आपल्यासोबत आहेत ह्याचा विश्वास बसत नव्हता म्हणून आमची चाल थोडी धीम्या गतीने चालू होती आणि त्याचा परिणाम आमच्या परतीच्या प्रवासावर होणार ह्याचा आम्हाला अंदाज होता. पण हे निसर्ग सौंदर्य सोडून पुढे जाणे व्यर्थ होते.
ह्या क्षणाचा थोडासा आनंद घेत चालतच होतो तोच पुढे एक छोटासा खरतर पॅच लागला. ह्या वाटेवरचा हाच एक खडतर क्षण बाकी सगळीकडे पाऊल वाट आणि बाजूला मन मोहित करणारा निसर्ग. ह्या वातावरणामुळे थकव्याचा अंदाज सुद्धा आला नाही.
गडावर आजमितीस काही अवशेष शिल्लक नसले तरी एक बुरुज दोन पाण्याचे टाके आणि एक हनुमानाची मूर्ती अस्तित्वात आहे.गडाचा इतिहास पाहता इ.स १२७१ ते १३०८ पर्यंत हा किल्ला देवगिरीच्या अधिपत्याखाली होता. नंतर बहामनी पुढे निजामशाही यांच्याकडे किल्ला होता. निजामशाहीच्या अंतकाळात इ.स १६२९ मध्ये शहाजी राजांनी बंड केले, तेव्हा भास्करगड त्यांच्या ताब्यात गेला. १६३३ मध्ये शहाजी राजांकडून हा किल्ला मोगलांकडे गेला १६७० मध्ये शिवरायांचा पेशवा मोरोपंत पिंगळे याने हा किल्ला जिंकून घेतला.१६८८ मध्ये मोगलांनी भास्करगड जिंकून घेतला. इ.स १७३० मध्ये कोळ्यांनी बंड करुन तो घेतला पूढे १८१८ पर्यंत हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता.
एव्हाना आम्हाला कळून चुकलं होता की ६ ची गाडी मिळणं अशक्य आहे. त्यामुळे आम्ही आरामात जायचं ठरवलं. पुन्हा एकदा "बाबा दा धाब्या"वर थांबलो. मनसोक्त चहा नाश्ता केला आणि संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास पुन्हा कसारा स्टेशनला पोचलो. सव्वाआठची लोकल पकडून साडेनऊ ला घरी.
त्यांनंतर संपूर्ण आठवड्यात मला कोणीही विचारलं की कुठे गेलेला ह्या रविवारी?? तर माझं उत्तर ठरलेलं होतं "ढगात"!!!
काही महत्वाच्या गोष्टी
- गडावर जाण्यासाठी जवळचे स्टेशन कसारा. कसाऱ्यावरून निरगुडपाड्यास जाण्यासाठी जीप मिळते. नंबर हवा असल्यास कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करावा.
- गडावर जाण्यासाठी जरी गाईड लागत नसला तरी दिशादर्शकाकडे लक्ष ठेवून वाटचाल करावी.
दिवाळीच्या सुट्टीनंतर २ आठवड्याने विकेंड ट्रेककर ग्रुप वर बसगड करायचा ठरला. त्यासाठी सकाळची लोकल पकडायची का रात्रीची ह्या विषयावर विचारविनिमष होऊन ठरल, सकाळी ५ची मुंबई कसारा गाडी पकडायची. मी ५. १२ ला करीरोड स्थानकावरून गाडी पकडली. माझ्या सोबत सचिन हि त्या गाडीत होता. अनिल आणि सर्वेश ठाण्याला भेटणार होते. आणि विनय आणि प्रणव डोंबिवलीला. पण अनिल वेळेत पोहचू शकला नाही त्यामुळे त्याची गाडी ५ मिनिटासाठी सुटली. त्याला कल्याण वरून ६.५२ ची गीतांजली एक्सप्रेस पकडायला सांगतली बाकी सगळ्यांनी आपआपल्या ठरलेल्या ठिकाणी गाडी पकडली. ठाणे येईपर्यंत गाडी भरली होती. त्यामुळे डोंबिवलीच्या आमच्या २ गिरिमित्रांपैकी एकाला बसायला भेटले नाही. कसारा येईपर्यंत मग आमच्या नेहमीच्या वेगवेगळ्या विषयावर चर्चा चालल्या होत्या.
कसाऱ्याला पोहचेपर्यंत ८ वाजले. अजून अनिल येण्याचा बाकी होता. तो पर्यंत आम्ही नाश्ता करून घेतला. तितक्यात १० मिनिटांनी अनिल हि पोहचला.
कसारा स्थानकाच्या बाहेर पडताच गाडी वाले विचारू लागले कुठे जाणार. आम्ही बसगाडच्या पायथ्याचा गाव निरगुडपाडा चा भाव विचारला सगळ्यांनचा एकच भाव ३००० रुपये. बहुतेक कसारा वरून सकाळी st असते पण आम्ही सकाळी पहिली कसारा लोकल पकडली असती तर आम्हाला भेटली असती. त्यामुळे आम्हाला आता खाजगी गाडी करण्याशिवाय पर्याय नव्हता. शेवटी आम्ही एकाशी भाव करून २०००रू ठरवून थेट निरगुडपाडा ते पुन्हा कसारापर्यंत येऊन जाऊन गाडी ठरवली. आजून ४००ते ५०० रुपये दिले असते तर त्यांनी आम्हाला १० आसनाची बोलेरो दिली असती. पण आम्ही ७जण होतो त्यामुळे त्यांनी आम्हाला कमी भाड्यात दिलेली ओमीनी गाडी हि ठीक होती. आमचा प्रवास बसगाडच्या दिशेने सुरु झाला.
कसारा ते निरगुडपाडा , खोडाळामार्गे जाऊन येऊन साधारण १०० किमी असेल. दुसरा एक मार्ग इगतपुरी, घोटी- वैतरणा रस्ता ,मार्गे जातो ह्या मार्गे तुम्हाला जाऊन येऊन१३०/१४०किमी आहे. पण बहुतेक गाडीवाले खोडाळामार्गे लवकर पोहचतात म्हणून ह्या रस्त्याने जातात. निरगुडपाड्या पर्यंत रस्ता चांगला आहे फक्त मध्ये थोडा २/३ किमी खराब आहे. बसगड हा हरिहर गडाच्या समोरच आहे दोघांचा मुख्य गाव एकच निरगुडपाडा. पण निरगुडपाड्याला गेल्यावर एके ठिकाणी एक रास्ता सरळ हरिहरगड ला जातो आणि एक डावीकडे पाठी वळला आहे तो बसगड ला जातो, तिकडून आम्ही डावीकडे आत शिरलो. पुढे गेल्यावर तुम्हाला एका नाल्यावर पूल लागतो तो पार करून थोडा अजून पुढे जायायला लागते. पुढे रस्ता खराब होता त्यामुळे आम्ही गाडी तितेच थांबून चालू लागलो. वाटेत काही गावकरी भेटले त्यांना गडावर जायायला वाट विचारली. तिथेच थोडा अंतरावर पुढे रस्त्याला एक मोठा दगड होता त्याला काही ठिकाणी शेंदूर लावला होता. तिकडून एक पायवाट जात होती त्या दिशने आम्हाला जायला सांगितलं. आम्हाला कसारावरून बसगाडच्या पायथ्याशी पोहोचायला १.३० लागला.
हरिहरगडाचा पायथाचा वाडीतून टिपलेले बसगडचे दृश्य
ट्रेकला सुरवात करताच थोड्या वर गेल्यावर एका ठिकाणी बऱ्याच वाटा फुटलेल्या होत्या तिथेच शेळ्या चारवात असलेल्या काकांना विचारले, त्यांनी पुन्हा कसा जायायचा सांगितले. पण काही दुर्गप्रेमी आणि गिर्यारोहण प्रेमीने गडावर जाण्यासाठी दगडावर दिशादर्शवणारे बाण केले होते. बहुतेक बाण पुसट झाले होते. तरी पण त्यामुळे आम्हाला वाट शोधायला खूप मद्त झाली. अशा प्रकारे आम्ही एका पठारावर पोहोचलो.
पठारावर पोहचताच समोर बसगड दिसतो आणि पाठी फिरून पहिले असता तुम्हाला ३ डोंगर दिसतात त्यात पहिला फणीचा डोंगर, उजिवाकडचा हरिहरगडआणि डावीकडचा ब्रह्म डोंगर
बसगाडच्या कातळाच्या बाजूने घनदाट रानटी झाडातून वाटकडून जातेवेळी
तिकडून आता आम्हाला बसगडचा कातळ दिसत होता. त्यामुळे आता वाट चुकण्याचा काही प्रश्न नव्हता. पठारावरून सरळ रस्त्याने गडाच्या कातळाजवळ पोहचलो तिकडून उजवीकडची वाट धरून आम्ही गडाच्या पायऱ्यांजवळ पोहचलो.
गडाच्या पायऱ्या सुंदर कातळात घडवल्या होत्या पण प्रत्येक गडाचा पायऱ्या प्रमाणे ह्या गडाच्या हि पायऱ्या उद्धवस्त झालेल्या होत्या. सुरवातीच्या थोड्या पायऱ्या चांगल्या होत्या. पायऱ्या चडून वर गेल्यावर मुख्य दरवाजा लागतो, तो अर्धा जमिनीत बुजला गेला आहे त्यामुळे तुम्हाला वाकून /बसून आत जायायला लागते. नंतर तुम्ही थोडे अजून वर गेल्यावर गडाच्या माथ्यावर पोहचतात.
गडाचा मुख्य दरवाजा आर्धा मातीमध्ये गेला आहे त्यामुळे आत वाकून किंवा बसून शिरायला लागते
उतवड डोंगर, गडावर आलेली बाजूच्या गावातील मुलं ह्याला उताड्या बोलत होती
गडावरील हनुमंताचे मंदिर
हरिहरगडाचा दिशेला असलेल्या माथ्यावरील पठाराचा शेवटी एक छोटा बुरुज लागते
वैतरणा नदीचे पात्र आणि पाठबंधारा
तिथून तुम्हाला एकीकडे समोर हरिहरगड आणि आजूबाजूचे गड दिसतात . आणि एकीकडे बाजूला उताड्या डोंगर. आणि एकी कडे वैतरणा नदीचे पात्र आणि काही छोटे छोटे धरण /पाटबंधारे दिसतात . आम्हाला गडावर पोहचायला २ तास लागले. आम्ही जरा हळू चालत होतो म्हणून आम्हाला थोडा अर्धा तास जास्तच लागला नाही तर सव्वा ते दिड तासात हि पोहचू शकतो.
गडाला मानव निर्मित तटबंदी दिसत नाही. आणि गडावर काही पाण्याचा सुकलेल्या टाक्या आहेत . आणि एक टाकीच्या बाजूला हनुमंताची मूर्ती. त्याचा वरच उंच ठिकाणी काही उधवस्त वस्तू चे अवशेष आहेत. पूर्ण गड फिरायला तुम्हाला १ ते १. ३० तास पूर्ण होतो . पण गडावर गवतातून वाट काडत आणि नकाशातले बुरुज शोधण्याचा वेळात आणि जेवण ह्या गोष्टीमुळे आम्हाला ३ तास लागले. गुगलवर नकाशात तुम्हाला २ बुरुज दाखवले आहेत, पण प्रत्येक्षात तुम्हाला दगडाचा एक साधा बुरुज दिसतो . तो बुरुज न वाटता छोटीशी दगडाची ३ फुटाची भिंत वाटते
गड पाहून झाल्यावर आम्ही ३ वाजता उतरायला सुरवात केली. खाली उतरते वेळी , गडाच्या पायथजवळ जिथे अनेक वाट दिसत होत्या तिथे बोलण्याचा नादात आम्ही वाट चुकलो. वाट चुकल्यामुळे आमची १५/२० मिनिटे वाया गेली. तरी आम्हाला पुन्हा पायथाला पोहचायला ४. ४५ वाजले.
जाते वेळी पुन्हा आम्ही आलेल्या मार्गाने कसाऱ्याला पोहचलो.
उंची : ३५७३ फुट
श्रेणी : मध्यम
नाशिक जिल्ह्यात सेलबारी- डोलबारी, अजंठा- सातमाळ, त्र्यंबक या डोंगररांगा
आहेत. यातील नाशिकच्या पुर्वेस व इगतपूरीच्या दक्षिणेस पसरलेल्या त्र्यंबक
डोंगररांगेत भास्करगड, हर्षगड, त्र्यंबकगड, अंजनेरी, रांजणगिरी, गडगडा,
बहुला असे अनेक किल्ले दिसुन येतात. याच त्र्यंबक रांगेत येणारा भास्करगड
अथवा बसगड हा हरिहर किल्ल्याचा शेजारी आहे. हरिहर किल्ला हा कातळात खोदून
काढलेल्या पायऱ्यासाठी प्रसिद्ध असल्याने तेथे सतत वर्दळ असते मात्र
त्याच्या अगदी जवळ असून देखील भास्करगडाकडे फार कमी भटक्यांचे पाय वळतात.
नाशिक हे पुर्वीपासुनच बाजारपेठ म्हणून प्रसिध्द आहे. प्राचिनकाळी सोपारा
डहाणु बंदरातून नाशिककडे येणाऱ्या डहाणु- जव्हार- गोंडाघाट -अंबोली घाट-
त्रिंबक- नाशिक या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी घाटावर बांधलेल्या
किल्ल्यांच्या माळेत गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हरीहर व भास्करगड या
दोन किल्ल्यांचे मणी ओवले गेले. निरगुडपाडा हे हरीहर व भास्करगड या दोन्ही
गडाच्या पायथ्याचे गाव असुन वेळेचे नीट नियोजन केल्यास एका दिवसात हे
दोन्ही किल्ले सहज पाहुन होतात.
मुंबई-नाशीक महामार्गावरून घोटीमार्गे निरगुडपाडा हे अंतर साधारण १७०
कि.मी.आहे तर नाशिक-निरगुडपाडा हे अंतर त्रिंबकमार्गे ४१ कि.मी. असुन नाशीक
व पुणेकरांसाठी हा मार्ग सोयीचा आहे. नाशिक-त्रिंबक रोडवर
त्र्यंबकेश्वरच्या अलीकडे असलेल्या प्रयागतीर्थ या तलावासमोरून एक रस्ता
थेट घोटी गावापर्यंत जातो. या रस्त्याने निरगुडपाडा हे अंतर २० कि.मी. आहे.
निरगुडपाडा हा बऱ्यापैकी मोठा पाडा असल्याने गावात आगाऊ सांगितल्यास
जेवणाची व शाळेत राहण्याची सोय होते. निरगुडपाड्याच्या समोरील बाजुस हरिहर
किल्ला तर गावाच्या डाव्या बाजुला डोक्यावर टोपी ठेवल्यासारखा दिसणारा बसगड
किल्ला आहे. या दोन्ही किल्ल्यांच्या मध्ये नागाच्या फण्यासारखे शिखर
असलेला फणी डोंगर आहे. हरिहर, बसगड आणि फणी डोंगर या तीनही ठिकाणी
निरगुडपाडा येथून जाता येते. गावातुन किल्ला जरी समोर दिसत असला तरी त्यावर
जाण्यासाठी संपुर्ण डोंगराला वळसा घालुन विरुध्द बाजुच्या टोकाला जावे
लागते. गावातुन गडपायथ्याला जाण्यास दिड तास तर किल्ल्यावर जाण्यास दोन ते
अडीच तास लागतात. निरगुडपाडा गावातुन घोटीच्या दिशेने काही अंतरावर एक
कच्चा रस्ता फणीच्या डोंगराला उजव्या बाजूला ठेवत फणीचा डोंगर व भास्करगड
यांच्या मधील खिंडीत जातो. भास्करगड व उतवडचा डोंगर असलेली एक सोंड या
खिंडीत उतरलेली आहे. येथे कच्चा रस्ता सोडुन डाव्या बाजुला एक पायवाट वर
जाताना दिसते. हि वाट अनेक वळणे घेत भास्करगडावर जाते. किल्ल्याच्या
पायथ्याशी घनदाट जंगल असल्याने उन्हाळय़ातही चढताना फारसा त्रास होत नाही.
गडावर फारसे दुर्गभटके जात नसल्याने वाटा मळलेल्या नाहीत. नेहमी भटकणाऱ्या
दुर्गभटक्यांना वाट शोधणे फारसे कठीण काम नाही पण नवख्यांनी मात्र गावातून
एखादा माहितीगार माणूस बरोबर घ्यावा. खिंडीतील सोंडेवरून पहिल्या पठारावर
आल्यावर सतत भास्करगडाच्या दिशेने डावीकडची वाट घ्यावी भास्करगडाच्या समोरच
उतवडचा डोंगर हे भास्करगडापेक्षा उंच त्र्यंबक रांगेतील सर्वोच्च शिखर
आहे. भास्करगडावर जाणाऱ्या वाटेशी सलंग्न अशी एक वाट उतवड डोंगरावर जाते.
आपण थोडे जरी भरकटलो तर उतवड डोंगराच्या पायथ्याशी पोहोचण्याची शक्यता
असते. खिंडीतून साधारण एक तासाची चढाई केल्यानंतर आपण भास्करगडाच्या
सोंडेसमोरील छोट्या पठारावर येऊन पोहोचतो. या पठारावरून समोरच
भास्करगडाच्या सोंडेवर असलेला उध्वस्त बुरुज दिसुन येतो. या पठारावरून
गडाला वळसा मारत गडाचा कातळकडा डावीकडे व दरी उजवीकडे ठेवत एक वाट
किल्ल्यावर जाते. या वाटेने साधारण २० मिनिटे गेल्यावर आपण भास्करगडाच्या
पायऱ्याजवळ पोहोचतो. येथे कातळकड्यात किल्ल्यावर जाण्यासाठी कातळ खोदून
पायऱ्या कोरलेल्या आहेत. या वाटेच्या दोन्ही बाजूस साधारण १०-१२ फुट
उंचीच्या कातळभिंती आहेत. या भिंतीच्या वरील बाजुस असलेली तटबंदी मोठया
प्रमाणात ढासळलेली असुन हे ढासळलेले दगड पायरीमार्गावर आल्याने या पायऱ्या
मोठया प्रमाणात गाडल्या गेल्या आहेत. यातील सुरवातीच्या काही पायऱ्या
हिंदवी स्वराज्य मावळा प्रतिष्ठान या संस्थेने श्रमदानाने साफ केलेल्या
आहेत. या पायऱ्या चढून आपण किल्ल्याच्या कातळात कोरलेल्या व जमीनीत अर्धवट
गाडलेल्या पश्चिमाभिमुख दरवाजा समोर पोहोचतो. किल्ल्याचा दरवाजा जरी अर्धा
गाडला गेला असला तरी दरवाज्याच्या दोन्ही बाजूस कोरलेली कमळाची फुले आजही
चांगल्या स्थितीत आहेत. या दरवाजातुन थोडे वाकुनच आपल्याला किल्ल्यात
प्रवेश करावा लागतो. दरवाजाच्या आत उजव्या बाजूस पहारेकऱ्यासाठी देवडी असुन
येथुन १०-१२ पायऱ्या चढुन आपण दरवाजासमोरील सपाटीवर येतो. येथुन
किल्ल्याच्या पठारावर जाताना समोर व उजव्या बाजूला अशा दोन वाटा फूटतात.
उजव्या बाजूच्या पायवाटेने १० मिनीटे चढल्यावर आपण किल्ल्याच्या पठारावर
पोहचतो. निमुळते पण प्रशस्त पठार असलेला हा किल्ला समुद्रसपाटी पासून ३३४०
फुट उंचीवर पुर्वपश्चिम पसरलेला असुन किल्ल्याचे क्षेत्रफळ साधारण ३२ एकर
आहे. भास्करगडचा माथा हा निव्वळ खडकच असल्याने आपल्याला सर्वत्र दगड
पसरलेले दिसतात. पठारावर जाताना वाटेत उजव्या बाजुला एका वास्तुचे अवशेष
असुन त्यात काही कोरीव दगड दिसुन येतात. हि वास्तु म्हणजे एखादे मंदिर
असावे. पठारावर आपण जेथे पोहोचतो तेथे पाण्याचे एक बुजलेले जोडटाके असुन या
टाक्यासमोर एक मोठया वास्तूचे अवशेष दिसुन येतात. गडावर मोठया प्रमाणात
असलेले वास्तुअवशेष पहाता गडावर मोठया प्रमाणात वस्ती असावी असे वाटते. या
पठारावरून आपण गडाखालुन वर येताना जो बुरुज दिसतो त्या बुरुजाकडे जाताना
वाटेत पाण्याची दोन कोरडी टाकी दिसुन येतात. सध्या हिंदवी स्वराज्य मावळा
प्रतिष्ठान या नाशिकच्या संस्थेने येथे दुर्गसंवर्धनाचे काम हाती घेतलेले
असुन अगदी मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात देखील हि मंडळी येथे काम करीत
आहेत. यातील एका टाक्याची पुर्णपणे सफाई झालेली असुन दुसरे टाके अर्धवट साफ
केलेले आहे. साफ केलेल्या टाक्यात या पावसाळ्यात पाणी जमा होऊन नंतरच्या
काळात गडावर काही प्रमाणात पाण्याची सोय होईल. गडासाठी झुंजणाऱ्या हिंदवी
स्वराज्य मावळा प्रतिष्ठानच्या या मावळ्यांच्या कार्याला मनापासुन धन्यवाद व
प्रणाम. गडावर काही या टाक्याच्या खाली टोकाला असलेल्या बुरुजाला काही
प्रमाणात तटबंदी असुन बुरुजावर जाण्यासाठी असलेला दरवाज उध्वस्त झालेला
आहे. किल्ल्याला या भागात काही प्रमाणात रचीव तटबंदी दिसुन येते. हे पाहुन
आपण सुरवातीला पाहिलेल्या जोडटाक्याकडे येऊन गडफेरीला सुरवात करावी. या
फेरीत सुरवातीला आपल्याला एका मोठया वाडयाच्या भिंतींचे अवशेष दिसुन येतात.
हा बहुदा किल्लेदाराचा वाडा असावा. या वाड्यावरून पुढे गेल्यावर एक
साचपाण्याचा तलाव दिसुन येतो. या तलावातच खडकात एक टाके खोदलेले आहे.
तलावाच्या काठावर असलेल्या चार उध्वस्त भिंतीच्या आत एक शेंदुर फसलेली
हनुमानाची मुर्ती आहे. किल्ल्याच्या या भागात पठाराच्या काठावर मोठया
प्रमाणात दगडाची रचीव तटबंदी दिसुन येते. येथुन पुढे जाताना उजव्या बाजुला
एका झाडाखाली बुजलेले टाके असुन पुढे वाटेवरच मातीने भरून पुर्णपणे बुजलेले
दुसरे टाके दिसते. येथुन दहा मिनिटे चालत उध्वस्त अवशेष पहात आपण
किल्ल्याच्या उतवड डोंगरासमोर असलेल्या दुसऱ्या टोकाला पोहोचतो. या टोकाला
असलेला बुरुज व अवशेष पुर्णपणे मातीखाली गाडले गेले आहेत. येथुन पठाराच्या
दुसऱ्या बाजुने आपण आलो त्या दरवाजाच्या दिशेने निघावे. या वाटेवर आपल्याला
सुरवातील एक समाधीचा कोरीव दगड व त्यापुढील भागात एक खडकात खोदलेले टाके
दिसते. या टाक्याच्या पुढील बाजूस ३-४ वास्तुंचे अवशेष दिसुन येतात. या
पुढील भागात वाटेच्या डाव्या बाजुस व पठाराच्या खालील अंगास एका योजनाबद्ध
वस्तीचे उध्वस्त अवशेष दिसतात. किल्ल्यावर खुप मोठया प्रमाणात वास्तु अवशेष
दिसुन येतात. गडाच्या माथ्यावरून जवळचा उतवड व फणीचा डोंगर,
हरिहर,ब्रम्हाडोंगर, त्रिंबकगड, अंजनेरी इतका लांबचा प्रदेश दिसुन येतो.
किल्ल्याच्या दरवाजात आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. संपुर्ण गडफेरीस दोन
तास लागतात. गडावर ७-८ टाकी असली तरी पिण्याच्या पाण्याची सोय नाही
त्यामुळे पुरेसे पाणी सोबत बाळगावे. इतिहासात या किल्ल्याचा फारसा उल्लेख
आढळत नाही पण देवगिरी, बहामणी, निजामशाही मोगल, मराठे, कोळी, पेशवे आणि
इंग्रज अशा अनेक राजसत्ता या गडावर नांदल्या आहेत. कातळात खोदलेला
पायरीमार्ग व किल्ल्यावर खडकात खोदलेली पाण्याची टाकी पहाता या किल्ल्याची
निर्मिती सातवाहन काळात अथवा समकालीन राजसत्तेच्या काळात झाली असावी असे
वाटते. इ.स १२७१ ते १३०८ पर्यंत हा किल्ला देवगिरीच्या अधिपत्याखाली व नंतर
बहामनी व निजामशाहीच्या ताब्यात होता. १६३६ साली शहाजीराजांनी निजामशाहीची
पुनर्स्थापना करतेवेळी शेजारचा त्र्यंबकगड व हरीहर घेतल्यावर हा परीसर
त्यांच्या ताब्यात गेला. नंतर मात्र याचा ताबा मोगलांकडे गेला. १६७०-७१
मध्ये नाशीक प्रांत घेताना मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला जिंकून घेतला.
१६८८ मध्ये मोगलांनी भास्करगड जिंकून घेतला. इ.स १७३० मध्ये कोळ्यांनी बंड
करुन तो घेतला पुढे तो पेशव्यांच्या ताब्यात आला. इ.स. १८१८ मध्ये
ब्रिटीशांनी हरीहरगड जिंकल्यावर हा गड देखील मराठयांच्या ताब्यातून घेतला.
© Suresh Nimbalkar
मागे जा
छायाचित्रे
आणखी शोधा
Travel Guides & Travelogues
Hotels & Accommodations
City & Local Guides
किल्ल्याची छायाचित्रे
किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा
Bhaskargad
नकाशे व मार्ग
किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा
प्रस्तावना
नाशिक
जिल्ह्याच्या पश्चिमेकडे आणि इगतपूरीच्या उत्तरेस एक डोंगररांग पसरलेली
आहे, त्यास "त्र्यंबक रांग" असेही म्हणतात. ही रांग दोन भागात विभागली गेली
आहे. पहिल्या टप्प्यात बसगड, हरिहर हे गड वसलेले आहेत, तर दुसर्या
टप्प्यात ब्रम्हगिरी, अजनेरी हे किल्ले येतात.प्राचिनकाळी नालासोपारा,
डहाणू, वसई इ बंदरात उतरणारा माल वेगवेगळ्या घाटमार्गांनी नाशिक या शहराकडे
जात असे. यापैकी गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी ‘बसगड’ किल्ल्याची
निर्मिती करण्यात आली होती.
![]() |
| Bhaskargad (Busgad) |
ऐतिहासिक पार्श्वभूमी
त्र्यंबक डोंगररांगेच्या दक्षिण टोकावर
असलेल्या या किल्ल्याचा इतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही. पण काताळात
खोदलेल्या किल्ल्यावर जाण्याचा सर्पिलाकार मार्ग व पाण्याची सातवहान कालीन
टाकी किल्ल्याच प्राचिनत्व सिध्द करतात.
इ.स १२७१ ते १३०८ पर्यंत हा
किल्ला देवगिरीच्या अधिपत्याखाली होता. नंतर बहामनी पुढे निजामशाही
यांच्याकडे किल्ला होता. निजामशाहीच्या अंतकाळात इ.स १६२९ मध्ये शहाजी
राजांनी बंड केले, तेव्हा भास्करगड त्यांच्या ताब्यात गेला. १६३३ मध्ये
शहाजी राजांकडून हा किल्ला मोगलांकडे गेला १६७० मध्ये शिवरायांचा पेशवा
मोरोपंत पिंगळे याने हा किल्ला जिंकून घेतला.१६८८ मध्ये मोगलांनी भास्करगड
जिंकून घेतला. इ.स १७३० मध्ये कोळ्यांनी बंड करुन तो घेतला पूढे १८१८
पर्यंत हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता.
महत्त्वाची ठिकाणे
भास्करगडचा माथा बेसॉल्ट खडकाचा बनलेला आहे.
किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे काताळात खोदून काढलेला सर्पिलाकार जिना.
असमान उंचीच्या पायर्या असलेल्या या जिन्याच्या दोन्ही बाजूला १० फूट
उंचीच्या कातळभिंती आहेत. जिन्याचा मार्ग आपल्याला पश्चिमाभिमुख
प्रवेशद्वारासमोर घेऊन जातो. प्रवेशद्वार कमानीच्या महिरपीपर्यंत मातीत
गाडल गेलेल आहे. प्रवेशद्वारातून रांगत जाऊन किल्ल्यात प्रवेश करावा लागतो.
प्रवेशद्वाराच्या आतील रचनेवरुन तेथे पहारेकर्यांसाठी देवड्या असाव्यात.
पण आज हा सर्व भाग मातीखाली गाडला गेलेला आहे.
प्रवेशद्वारातून
किल्ल्यात शिरल्यावर समोर व उजव्या बाजूला अशा दोन वाटा फूटतात. या दोनही
वाटा किल्ल्याच्या पठारावर जातात. पण उजव्याबाजूच्या पायवाटेने १० मिनीटे
चढल्यावर आपण किल्ल्याच्या विस्तिर्ण पठारावर पोहचतो. किल्ल्याच्या पठारावर
पडक्या वास्तूंचे, मंदीराचे अवशेष, बुजलेली टाक, साचपाण्याचा तलाव
त्याच्या कठी असलेला व दगडात कोरलेला हनुमान असे अवशेष पाहायला मिळतात.
कसे पोहोचावे
खोडाळ्यातून त्र्यंबकेश्वरला जाताना
"निरगुडपाडा" या गावाच्या अलिकडे एक कच्चा रस्ता फणीच्या डोंगराला उजव्या
बाजूला ठेवत बसगडच्या पायथ्याशी पोहचतो. बसगडच्या पायथ्याशी पोहचण्यापूर्वी
एक नाला ओलांडावा लागतो. नाला ओलांडल्यावर भास्करगडच्या चढाइला सुरुवात
होते. दिड तास मळलेल्या पायवाटेवरुन केलेल्या चढाइ नंतर आपण कातळकड्याच्या
पायथ्याशी येतो. येथून उजव्याबाजूने जाणारी पायवाट कातळकड्याला वळसा घालून
कातळात खोदलेल्या पायर्यांपाशी येते. पायर्या चढून गेल्यावर
प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश करतो.
"निरगुडपाडा" हे गाव खोडाळा
- त्र्यंबकेश्वर मार्गावर आहे. त्र्यंबकेश्वर पासून २० किमी वर निरगुडपाडा
गाव आहे. येथे जाण्यासाठी मुंबईहून २ मार्ग आहेत.
१) मुंबई - कल्याण - कसारा - खोडाळा - निरगुडपाडा ( १९४ किमी),
२) मुंबई - कल्याण - भिवंडी - वाडा - खोडाळा - निरगुडपाडा (१९० किमी)
३) कसारा किंवा नाशिक मार्गे :-
कसारा किंवा नाशिक मार्गे इगतपूरी गाठावे. इगतपूरीहून त्र्यंबकेश्वरकडे
जाणारी बस पकडावी. वाटेत असणारे निरगुडपाडा हे भास्करगडाच्या पायथ्याचे गाव
आहे. गावातून किल्ल्यावर जाण्यास दोन तास पुरतात. भास्करगडाच्या कातळभिंती
जवळ पोहोचल्यावर पुढे किल्ल्यावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायर्या
आहेत.
तसेच इगतपूरी व नाशिकहून त्र्यंबकेश्वरमार्गे निरगुडपाड्याला
जाता येते. हरीहर गड व भास्करगड या दोनही गडांच्या पायथ्याचे गाव
निरगुडपाडा आहे.
ट्रेकसाठी लागणारा वेळ
⏱️ N/A
सुविधा व सोयी
निवास व्यवस्था
गडावर रहाण्याची सोय नाही, निरगुडपाड्यात होऊ शकते.
अन्न व्यवस्था
गडावर किंवा गावात जेवणाची सोय नाही.
पाणी उपलब्धता
गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.त्र्यंबक रांगेतील: भास्करगड उर्फ बसगड किल्ला
भास्करगड उर्फ बसगड किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात आहे.
नाशिक जिल्ह्यात सेलबारी-डोलबारी, अजंठा-सातमाळ, त्र्यंबक यातील नाशिकच्या पूर्वेस व इगतपुरीच्या दक्षिणेस पसरलेल्या त्र्यंबकडोंगर रांगेत भास्करगड, हर्षगड, त्र्यंबकगड, अंजनेरी, रांजणगिरी, गडगडा, बहुला असे अनेक किल्ले दिसून येतात. याच त्र्यंबकरांगेत येणारा भास्करगड किंवा बसगड हा हरिहर किल्ल्याचा सख्खा शेजारी आहे.
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे आणि इगतपूरीच्या उत्तरेस एक डोंगररांग पसरलेली आहे, त्यास "त्र्यंबक रांग" असेही म्हणतात. ही रांग दोन भागात विभागली गेली आहे. पहिल्या टप्प्यात बसगड, हरिहर हे गड वसलेले आहेत, तर दुसर्या टप्प्यात ब्रम्हगिरी, अंजनेरी हे किल्ले येतात.
निरगुडपाडा हे हरिहर व भास्करगड या दोन्ही गडाच्या पायथ्याचे गांव आहे. मुंबई - नाशिक महामार्गावरुन घोटी मार्गे निरगुडपाडा हे अंतर साधारण १७० कि. मी. आहे तर नाशिक- निरगुडपाडा हे अंतर त्र्यंबकमार्गे ४१ कि. मी. आहे. निरगुडपाडयाच्या समोरील बाजूस हरिहर किल्ला तर गावाच्या डाव्या बाजूला डोक्यावर टोपी ठेवल्यासारखा दिसणारा बसगड किल्ला आहे. या दोन्ही किल्ल्यांच्या मध्ये नागाच्या फण्यासारखे शिखर असलेला फणी डोंगर आहे. हरिहर, बसगड आणि फणी डोंगर या तिनही ठिकाणी निरगुड पाडा येथून जाता येते.
भास्करगडाचा माथा बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे. किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे कातळात खोदून काढलेला सर्पिलाकार जिना. असमान उंचीच्या पायर्या असलेल्या या जिन्याच्या दोन्ही बाजूला १० फूट उंचीच्या कातळभिंती आहेत. जिन्याचा मार्ग आपल्याला पश्चिमाभिमुख प्रवेशद्वारासमोर घेऊन जातो. प्रवेशद्वार कमानीच्या महिरपीपर्यंत मातीत गाडलं गेलेल आहे. प्रवेशद्वारातून रांगत जाऊन किल्ल्यात प्रवेश करावा लागतो.























































































No comments:
Post a Comment