Monday, May 4, 2026

नाशिकचा किल्ले रायगड.....

 
नाशिक शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर रायगड नगर म्हणून एक गाव आहे हे गाव मुंबई आग्रा या  महामार्गावर स्थित आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी तशी परवानगी नाही  पण रविवारी जीव मुठीत धरून तुम्ही जाऊ शकता कारण लष्करांने देवळाली कॅम्प वसविले आणि 1944 दरम्यान फायरिंग रेंजसाठी मोठ्या प्रमाणात जागा ताब्यात घेतल्या यात बहुला किल्ला व रायगड हे दोन्ही किल्ले व आजूबाजूची गावे यामध्ये गेली. बहुला या किल्ल्यावर तोफांचा मारा सतत होत असतो, असो रायगड नाशिक या गडाच्या पहिल्या पठारावर रायगड बाबा यांचे आत्ताच्या सिमेंटच्या बांधणीतले मंदिर आहे तिथे रायगड नगर गावातील रहिवासी रविवारी पूजा करण्यासाठी येतात. मंदिराच्या बाजूला पडझड झालेली वास्तू आपल्याला दिसून येते ती नक्कीच जुना काळातील असावी असा अंदाज दर्शवता येतो त्याच वास्तूपासून वरती चढत गेल्यानंतर सोप्या श्रेणीतील चढाई करून आपण गड माथ्यावर पोहोचतो गडमाथा तसा फारसा मोठा नाही. पूर्ण माथा काही मिनिटात फिरता येतो पण नेमका गडावर वास्तु काय हे शोधण्यात खूप वेळ जातो माथ्यावर दोन ठिकाणी कातळात छोट्या आकाराचे चौकोनी खड्डे केलेले आहेत तसेच गडाच्या पश्चिमेकडील बाजूस आपल्याला पाणी दिसून येते तिथे नेमक तलाव आहे की पाण्याचे टाक यात शंका आहे, त्याच्याच थोडे खाली दहा फूट कातळात कोरलेली गुहा आपल्याला दिसून येते त्यामुळेच आपण त्याला गड हे समजू शकतो असे श्री गिरीश टकले सर यांनी यावरूनच या डोंगराची नोंद  किल्ले म्हणून केली असावी.

 















 
 
 https://www.facebook.com/groups/1879620169023234/user/100003022694868
 
Nilesh Balasaheb Bathe
 
 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...