Saturday, May 27, 2023

कर्णेश्वर मंदिर अंतिम

 कोकणची भूमी ही प्राचीन आख्यायिका आणि ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे.  त्यात कोकणातील अनेक प्राचीन मंदिरे म्हणजे वास्तुकलेचे उत्तम नमुने. संगमेश्वर तालुक्यातून मुंबई-गोवा महामार्ग जातो. येथे  कसबा  नावाचे गाव आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अलकनंदा, वरुणा व शास्त्री नदीच्या संगमाचे ठिकाण असलेले संगमेश्वर एक पवित्र धार्मिक स्थळ आहे. संगमेश्वर गावाला पुरातन काळापासून फार महत्त्व आहे. पुराणात संगमेश्वर महात्म्य म्हणून संगमेश्वरबाबतचे महत्त्व आढळते. सह्याद्री खंडामध्ये या प्रदेशाला रामक्षेत्र असे म्हटले आहे. सातव्या शतकात चालुक्य राजा कर्ण याने आपली राजधानी करवीर, कोल्हापूर इथून संगमेश्वर येथे स्थापन केली. त्यानंतर या गावाला मोठी तटबंदी बांधून मंदिरे आणि महाल उभारले. शंकरभक्त कर्णराजा याला संगमेश्वरचे नैसर्गिक सौंदर्य फारच भावले. त्यामुळे त्याने संगमेश्वरच्या कसबा गावामध्ये प्रतिकाशी बनवायचा संकल्प केला. शंकराची छोटी-मोठी मिळून बारा मंदिरे बांधली.मंदिराचे सर्व बांधकाम काळ्या दगडामध्ये करण्यात आलेले आहे. अलकनंदा नदी व शास्त्री नदीच्या काठावर संगम मंदिराचे बांधकाम केले. सूर्यनारायण मंदिरही बांधले. आजच्या घडीला या दोन मंदिरांसोबत मुख्य कर्णेश्वर मंदिर मिळून बारापैकी तीन मंदिरे सुस्थितीत उभी आहेत.सभोवताली हिरवेगार डोंगर आणि बारमाही वाहणाऱ्या नद्या, सुंदर-सुंदर ठिकाणे, बारमाही पिकणारी शेती ही या भागातली श्रीमंती आहे. संगमेश्वरला फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.
         रत्नागिरी जिल्ह्यातील ‘अलकनंदा’ आणि ‘वरुणा’ या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले ‘संगमेश्वर’ हे ‘कसबा संगमेश्वर’ म्हणून ओळखले जाते. त्या गावात दोन गोष्टी प्रमुख आहेत, त्या म्हणजे चालुक्यकालीन श्रीकर्णेश्वर मंदिर आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे तेथील वास्तव्य. कसबा हे गाव समुद्र किनाऱ्यालगत नाही, पण तेथील नव्वद ते पंच्याण्णव टक्के घरांमधील तरुण हे होड्या बांधणीचे काम करतात. कसब्याची ती एक महत्त्वपूर्ण ओळख आहे.
     ‘कसबा’ या फारसी शब्दाचा अर्थ ‘वस्ती’. ‘संगमेश्वर’ गावाचे खरे नाव ‘नावडी’. इसवी सनापूर्वी महाराष्ट्रामध्ये जैन आणि लिंगायत धर्मीय राज्ये होती, त्यांपैकी जैन पंथीयांची राजधानी कपिलतीर्थ (कोल्हापूर) येथे होती, परंतु संगमेश्वर हे त्यांचे राज्यकारभाराचे प्रमुख केंद्र होते. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सूर्यवंशी घराण्याचे राज्य आले. त्यांच्यापैकी एका राजाची राजधानी संगमेश्वर येथे होती.
     राष्ट्रकूट वंशातील राजांनी चालुक्य घराण्याचा नाश सन ७५३ मध्ये करून येथे सुमारे दोनशे वर्षें राज्य केले. पुन्हा चालुक्य घराण्यातील काही राजांनी राष्ट्रकुटांचा पराभव केला. त्यांदची सन ९७३ पासून सन ११३० पर्यंत सत्ता होती. इसवी सन ११३० च्या सुमारास कपिलतीर्थ येथील जैन राजा शोणभद्र याने चालुक्य राजांचा पराभव करून संगमेश्वरचे राज्य त्याच्या राज्याला जोडले. नंतर पुन्हा चालुक्य राजांनी राजा शोणभद्र याच्या वंशजांचा पराभव करून त्याचे राज्य प्रस्थापित केले, ते १४७० पर्यंत! त्या घराण्याचा शेवटचा राजा ‘जाखुराय’ याचा मुसलमानांनी पराभव केला आणि संगमेश्वर येथे मुसलमानांचा प्रवेश झाला. ती मुसलमानी सत्ता पुढे सुमारे एकशेएक्याण्णव वर्षें म्हणजे १६६१ पर्यंत होती. त्या सुमारास शिवाजी महाराजांनी तेथे स्वारी करून विजापूरकरांचे अंकित सरदार शिर्के, दळवी, सुर्वे, सावंत, मोहिते इत्यादींचा पराभव केला व मराठी राज्याची सत्ता स्थापन झाली. 
गुजरातचा चालुक्य (चौलुक्य) राजा कर्ण त्या ठिकाणी इसवी सन १०६४ च्या सुमारास राज्य करत होता. तो कदंब राजांचा जावई होता. त्याने त्या काळात दहा हजार सुवर्णमुद्रा खर्च करून तेथे शिवमंदिर बांधले. ते त्याच्या नावाने ‘कर्णेश्वर शिवमंदिर’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ते मंदिर शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे. मंदिराची रचना हेमाडपंथीय असल्‍याचे म्‍हटले जाते. मात्र हेमाद्री तथा हेमाडपंडीत तेराव्‍या शतकातील आहे. त्‍यामुळे ते मंदिर हेमाडपंथी असू शकत नाही. प्रत्‍यक्षात ते भूमीज शैलीतील मंदिर आहे. श्रीकर्णेश्वर मंदिर सुमारे हजार वर्षांनंतरही सुस्थितीत पाहण्यास मिळते. सुमारे चारशे चौरस मीटर क्षेत्रात काळ्या पाषाणात कोरीव काम केलेले असे ते मंदिर कसब्याचे पौराणिक महत्त्व टिकवून आहे.
   कर्णराजाने कर्णेश्वराच्या पूजाअर्चेच्या वेगवेगळ्या कामांसाठी सात गावे दिली होती. धर्मकार्यार्थ-धर्मपूर (धामापूर), सुपारीसाठी गुणवल्लिका, भेट म्हणून देवजी भूचल, तुपासाठी शिवनी (शिवने), यज्ञासाठी लवल (लोवले), फळांसाठी धमनी (धामणी), धर्मसेवकांसाठी करंबव (कळंबस्ते), निवासार्थ आम्रवल्ली (अंत्रवली). त्यां पैकी गुणवल्लिका आणि भूचल या गावांचे संदर्भ सापडत नाहीत. कर्णराजाने कर्णेश्वर मंदिराच्या निमित्ताने त्यावेळी तीनशेसाठ प्रासाद म्हणजे मंदिरे बांधली होती. त्यांतील काही मंदिरे त्या ठिकाणी पाहण्यास मिळतात. त्यांमध्ये कुंभेश्वर, सोमेश्वर, काशीविश्वेश्वर, रावणेश शंकर, जलयुक्त नंदिकेश (संगम मंदिर) व कालभैरव यांचा समावेश आहे. कोकण परिसरात वैष्णवपंथीयांचे प्रमाण अधिक आहे. त्यांनी नंतरच्या काळात कर्णेश्वर मंदिराला कळस चढवला असावा. कारण सबंध मंदिर एका दगडात आहे. कळस दगड, माती आणि विटा यांनी बांधलेला आहे. त्या काळात देवळे दगडात कोरली जात होती, त्यांचे कळस माती-विटांनी तयार झालेले नसत. वैष्णवपंथीयांनी बांधलेल्या देवळांना कळस उंच असतात. पण दक्षिणेकडील शैवपंथीयांनी बांधलेल्या मंदिरांना तसे उंच कळस नसतात. कर्णेश्वर मंदिरात पावसाचे पाणी गळत होते, म्हणून २००३-०४ या वर्षी मंदिराच्या तीन छोट्या कळसांमध्ये थोडी दुरूस्ती करण्यात आली. तेव्हा ते कळस दगडमाती, विटांचे आहेत आणि त्यांना गूळ आणि चुना यांचे प्लास्टर करण्यात आले आहे ही बाब स्पष्ट झाली.
   कर्णेश्वर मंदिरात आतील बाजूच्या दगडात देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आढळतात. मंदिरावर जे चार कळस आहेत ते खालच्या बाजूने झुंबरासारखे कोरण्यात आले आहेत. मूळ मंदिर हे कळसरहित होते. नंतरच्या काळात कधीतरी त्यावर कळस चढवण्यात आले. त्यातून पावसाचे पाणी गळते, म्हणून त्या कळसांचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्याखेरीज त्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याची वेळ आलेली नाही. ते मंदिर आहे तसेच सुबक दिसते.
    सह्याद्री खंडातील वर्णनाप्रमाणे कसबा क्षेत्राच्या आठ दिशांना आठ तीर्थे होती. पूर्वेला कमलजा तीर्थ, गोष्पदतीर्थ, दक्षिणेला अगस्तीतीर्थ, आग्नेयेला गौतमीतीर्थ, नैऋत्येला एकवीरातीर्थ, पश्चिमेला वरुणतीर्थ, वायव्येला गणेशतीर्थ, उत्तरेला मल्लारी मयतीर्थ व ईशान्येला गौरीतीर्थ अशी त्यांची नावे आहेत. त्यांपैकी आग्नेय दिशेचे गौतमीतीर्थ युक्त असे ते तीर्थ भैरवाने व्यापले आहे (त्या ठिकाणी स्नान करून व ते जलप्राशन करून मनुष्यप्राणी ब्रह्मलोकाला जातो अशी समजूत) व त्याच्या पश्चिमेला ज्ञानव्यापी या नावाने विख्यात महातीर्थ अशी तीर्थे त्या ठिकाणी पाहण्यास मिळतात. दक्षिणकडे डोंगरात वसलेले सप्तेश (सप्तेश्वर) हे ठिकाणही कसब्याचे वैभव म्हणावे असे आहे. रामक्षेत्रामध्ये पवित्र अशी दहा क्षेत्रे सांगितली आहेत. त्यांपैकी सहा विशेष श्रेष्ठ आहेत. त्यांची नावे- गोकर्ण, सप्तकोटीश, कुणकेश, संगमेश्वर, हरिहर आणि त्र्यंबकेश्वर. म्हणजेच, रामक्षेत्रात सांगितलेल्या पहिल्या सहा श्रेष्ठ अशा क्षेत्रांत चौथे क्षेत्र ‘संगमेश्वर’ आहे.
    कसबा संगमेश्वराचे आध्यात्मिक महत्त्वही सर्वोच्च आहे. कार्तिकस्वामी व सूर्यनारायण अशी अभावाने आढळणारी दोन मंदिरे कसब्यात आहेत. चालुक्य घराण्यातील शेवटचा राजा ‘जाखुराय’ याच्या नावावरूनच त्या गावाच्या ग्रामदेवतेचे नाव ‘जाखामाता’ असे पडले असावे असा एक समज आढळतो. मात्र जाखमाता ही स्‍त्रीदेवता आहे आणि पुरूषाची स्त्री देवता होत नाही. त्यामुळे तो अंदाज चुकीचा असल्याचा तर्क करता येतो. जाखामातेचा ‘शिंपणे’ उत्सव महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.


 

   बाराव्या शतकात लिंगायत समाजाचे बसव यांचे वास्तव्य संगमेश्वरमध्ये होते, तर सोळाव्या शतकात विजापुरी अंमल होता.घाटमाथ्यावरून कोकणात उतरणारे प्राचीन घाटमार्ग या परीसरात उतरत होते. त्यामुळे त्यांचे रक्षण करण्यासाठी या भागात प्रचितगड, भवानीगड, महिमतगड हे किल्ले बांधण्यात आले. 
               कोकणातील समाज जीवनावर प्राचीन काळापासून विविध देशातील व्यापारी लोकांच्या रूढी,चाली,बोली भाषा,संस्कृतीचा विशेष प्रभाव राहिला आहे.निसर्गाने भरभरून दिले असल्याने संपूर्ण कोकण प्रेक्षणीय आहे.अनेक एतदेशीय व परकीय राजसत्तांनी हा भूभाग आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी अनेक लढाया झालेल्या इतिहासाने पाहिल्या आहेत.प्रत्येक राजसत्तेला कोकण किनारपट्टी आपल्या अमलात हवी होती कारण अनेक देशाशी व्यापार उदीम व शस्त्रास्त्र आयात करणे सुलभ होते.कोकणी जीवन व देशावरचे जीवन यात मह्तअंतर आहे.निसर्ग पूजा ही कोकणी माणसाच्या रक्तात आहे.
           छ.शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सुरवात पुणे जिल्ह्यातील बारा मावळातून केली होती.स्वराज्य विस्तार करीत असताना दूरदृष्टी असलेल्या छत्रपतींची नजर कोकणी मुलूखावर होतीच.चंदरराव मोरेचे पारिपत्य करून जावळीचे खोरे व रायरीचा(रायगड )किल्ला स्वराज्यात घेऊन कोकणात प्रवेशाची सुरवात केली.छ.शिवाजी महाराजांनी शृंगारपूर घेतल्यानंतर म्हणजे १६६१ सालानंतर संभाजी महाराजांचा विवाह पिलाजी शिर्के यांच्या कन्ये बरोबर झाला,तिचे नाव “येसूबाई” ठेवण्यात आले.शिर्के हे दाभोळ मामले रायरीचे देशमुख होते.त्यांना रायरी-शिरकाण येथील सरदेशमुखीचे वतन होते.शिर्केंचे कुलस्वामिनी शिर्काई म्हणून त्यांच्या ताब्यातील प्रदेशास ” शिरकाण” म्हणून संबोधण्यात येत होते. याच शृंगारपूर मध्ये १८/५/१६८२ रोजी छ.संभाजी महाराज व येसूबाई यांना मुलगा झाला ज्याचे शिवाजी असे ठेवण्यात आले.मात्र तेच पुढे छ.शाहू या नावाने ओळखण्यात येऊ लागले.
                शृगारपूर व संगमेश्वर दोन्ही ठिकाणे जवळजवळ एकच आहेत.छ.शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून छ.संभाजी महाराज कारभार पाहू लागले.छ.संभाजी महाराजांची अनेक कसोट्यावर निकराचा संघर्ष सुरू होता.सिद्दी,इंग्रज,पोर्तुगेज फिरंगी,मुघल,आदिलशाही,कुतुबशाही आणि गृहकलहाशी छ.संभाजी महाराज यशस्वी लढा देत होते. मुघल बादशाह औरंगजेब लाखों सैन्यानिशी दक्षिणेत आला होता.त्याने दिडशे वर्षे राज्य करणारी आदिलशाही व कुतूबशाही नष्ट केली होती.आता मुघल बादशाहचे लक्ष शिवप्रभूंने निर्माण केलेल्या स्वराज्यावर होते.
                   राज्य कारभारात कवी कलशाचे असलेले महत्त्व इतरांच्या नजरेला खूपत होते आणि विशेषतः छ.संभाजी महाराजांना अडचणीत आणण्यासाठी जवळचे कौटुंबिक सदस्य व नातेवाईक वेगवेगळ्या छुप्या कुलूप्त्या आखित होते.छ.संभाजी महाराजांना मात्र मोलाची साथ “श्री सखीराज्ञी जयति” म्हणजेच महाराणी येसूबाई या खंबीरपणे देत होत्या.छ.संभाजी महाराजांची मुद्रा अशी होती,

“श्री शंभोः शिवजातस्य मुद्राद्यौरिवराजते !
यद् कसेविनी लेखा वर्तते कस्यनो परि !!”

(ही मुद्रा सूर्याच्या प्रभेप्रमाणे शोभते आणि त्या मुद्रेचा आश्रय करणारी लेखासुद्धा कोणावरही सत्ता चालविते.ती ही शिवाजीचा पुत्र शंभूची-संभाजीची मुद्रा प्रकाशित होत आहे.)

छ.संभाजी महाराजांनी पराकोष्ठीचे प्रयत्न करून स्वराज्याचे रक्षण केले होते.मात्र त्याचवेळी शिर्के मंडळीच्या बंडाळी चालू होत्या.कविकलशशी शिर्केंनी भांडण उकरून काढल्याने छ.संभाजी महाराजांना लक्ष घालावे लागले.औरंगजेबाचे सैन्य मराठी राज्याच्या नाशासाठी अनेक कुलुप्त्या करीत होते आणि नाराज मंडळी शत्रूच्या बाजूला जात होते.शेख निजाम हा खेळणा(विशाळगड)घेण्यासाठी वेढा देण्याच्या तयारीत होता.छ.संभाजी महाराज खेळण्याहून रायगडला जाण्यासाठी संगमेश्वर आले होते.तेथील कलह थांबविण्याचे महत्त्वाचे काम होते.मोजके सैन्य सोबतीला होते कारण इतक्या दुर्गम ठिकाणी मुघल सैन्य कधी येईल ही अपेक्षा नसावी.फितुरांनी आपली कामगिरी अगदी चोख बजावली म्हणजे शेख निजामाला छ.संभाजी महाराजांच्या हालचालींची सविस्तर माहिती दिली.
                     इ.स.१६८९ च्या जानेवारीत आलेले छत्रपती व कविकलश विविध सनदा देणे किंवा काढून घेणे इत्यादी महत्त्वाची कामे करीत होते.शेख निजाम (मुकर्रबखान) आपले सैन्य घेऊन घनदाट डोंगरातून संगमेश्वरला पोहोचला.मराठी सैन्याला ज्याची अपेक्षा नव्हती तेच घडले होते.जोराचा प्रतिकार सुरू झाला पण तो अपुरा होता.सरदेसाईच्या वाड्याच्या परिसरात घनघोर हातघाई झाली.या युद्धात जेष्ठ सेनानी म्हालोजी घोरपडेंना वीर मरण आले तर कविकलश पकडला गेला.साकी मुस्तैदखानाने स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना कैद केले.अशाप्रकारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मुघलांच्या कैदेत गेले यांच्या दुःखद स्मृती आजही मनाला वेदना देतात.देव,देश आणि धर्माला सर्वोच्च प्राधान्य देणारा मराठ्यांचा राजा शत्रूच्या कैदत गेला ती हीच भूमी.कसबा संगमेश्वरने जसे म्हालोजी सारख्या पराक्रमी पुरूषाचे शौय पाहिले तसे वैयक्तिक स्वार्थासाठी आपल्या राजा विरूध्द स्वकीयांनी केलेली फितूरी पाहिली.अशा फितूरांना अंगा खांद्यावर वाढविल्याचे दुःख ही संगमेश्वरची भूमी कशी विसरू शकेल ? 
           कसबा गावातच सरदेसाइंच्या वाड्यात संभाजीमहाराज आलेले असताना शत्रूला खबर मिळाली. याच ठिकाणी संभाजीमहाराजांना कैद करण्यात आले. महाराष्ट्राचा इतिहास ज्या जागेवर एक क्षणात बदलला त्या कसबात्यातील सरदेसाइंचा वाडा आज जमिनदोस्त झालेला आहे. संभाजी महाराजांच्या काळात न्याय-निवाडय़ाची कामे या सरदेसाईंच्या वाडय़ात चालायची. महाराष्ट्रातील मराठय़ांचा इतिहास ज्या जागेवर बदलला, संभाजी महाराज जिथे बंदिवान झाले त्या जागेतील सरदेसाईंचा वाडा उद्ध्वस्त झालेला आहे. मात्र वाडय़ाच्या चौथऱ्याच्या काही खाणाखुणा पाहायला मिळतात.या जागेत येथील लोकांनी घाण, मानवी विष्ठा टाकून पवित्र जागा अपवित्र करून टाकली आहे. येथील रस्त्याला ‘संभाजी महाराज पथ’ म्हणून नाव दिलेले आहे. एवढीच काय ती संभाजी महाराजांची ऐतिहासिक ओळख येथे पाहायला मिळते. याच ऐतिहासिक जागेशेजारी सातव्या शतकात बांधलेली शंकराची मंदिरे आहेत.येथील गावकºयांना विचारले असता वाड्याच्या काहीच खाणाखुणा शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले. काय दुर्देवी योगायोग म्हणावे लागेल की अलखनंदा, वरुणा आणि शास्त्री या नद्यांच्या संगमावर असलेले कसबा हे गाव. त्यावरून या भागाला संगमेश्वर म्हणू लागले. छत्रपती संभाजीमहाराजांना येथे पकडले गेले. तेथून पुढे पुण्याजवळील तुळापूरजवळील भीमा, भामा, इंद्रायणी या त्रिवेणी नद्यांच्या संगमाजवळ  त्यांचा क्रूर वध करण्यात आला. दोन्ही ठिकाणी तीन नंद्यांचा संगम झाला.


 
        संभाजीमहाराजांचा अर्धपुतळा कसबा गावात शिरल्या शिरल्या दिसतो. याच पुतळ्याच्या मागे जाणारा रस्ता आपल्याला कर्णेश्वर मंदिरापर्यंत घेऊन जातो.  कसबा गावाची आणखीन एक ओळख म्हणजे येथील पांडवकालीन श्री कर्णेश्वराचे हेमाडपंथी मंदिर. कसबा संगमेश्वर या गावांना फार पूर्वी ‘रामक्षेत्र’ असंही ओळखलं जात असे. मुंबई- गोवा महामार्गावर शास्त्री पुल ओलांडल्यावर डावीकडे कसबा नावाच्या या गावात हे कर्णेश्वराचे मंदिर आहे.  संगमेश्वरपासून दोन किलोमीटर अंतरावर अत्यंत रम्य परिसरात असलेले हे मंदिर स्थापत्यकलेचा अद्भूत अविष्कार आहे. भल्या मोठ्या दगडांना आकार देत अप्रतीम शिल्पकला साकारून हे मंदिर उभारण्यात आले आहे. समोर मोठ्या आकारातील कर्णेश्वराचे मंदिर पाहून एकदम जुन्या काळात गेल्याचा भास होतो. अत्यंत सुंदर असे हे मंदिर प्रथम दर्शनीच मनमोहून टाकते.याला सन २०१२ मध्ये पुरातत्व विभागाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले.
मंदिर एक आख्यायिका अनेक
     सह्याद्री खंडातील श्लोकांवर आधारित श्रीकरण सुधानिधी ग्रंथावरून शेषकवीने संकलित केलेल्या संगमेश्वर महात्म्य या संस्कृत पोथीमध्ये या मंदिराची माहिती आढळून येते.   कर्णेश्वर मंदिराबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. कोणी हे मंदिर पांडवांनी एक रात्रीत बांधले असते सांगतात. तर कोणी पांडवांनी आपला मोठा भाऊ कर्णाची आठवण राहावी म्हणून हे मंदिर बांधले असे सांगतात. भगवान परशुराम यांनी हे मंदिर बांधल्याची सुद्धा आख्यायिका आहे. वनवासात असताना पांडव परशूरामांकडे धर्नुविद्या शिकले. परशरामांनी सहावा मोठा भाऊ कर्णाबद्दल सांगितले. तेव्हा पांडवांनी कर्णेश्वर मंदिर बांधले असेही सांगितले जाते. या मंदिरांच्या वास्तुरचनेवरून सातव्या शतकातील चालुक्य घराण्यातील कर्ण नावाच्या राजाने हे मंदिर उभारले असे इतिहासतज्ज्ञ सांगतात. बाकी आख्यायिका काहीही असो. मंदिरावरील कलाकुसर पाहून मंदिर कोणी बांधले या पेक्षा ते कसे बांधले असेल याचा विचार करतानाच आश्चर्य वाटू लागते. कसबा गावात पूर्वी ३०० ते ४०० मंदिरे असल्याच्या नोंदी आहेत. सध्या यातील काही मोजकीच मंदिरे तग धरून आहेत.कर्णेश्वराच्या मंदिराची निर्मिती इ. स. १०७५ ते १०९५ या कालखंडात गुजरातच्या चालुक्य कुळातील राजा कर्णदेव याने केली असावी, असे अभ्यासकांचे मत आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या दार्शनिकेमध्ये हा कर्ण राजा कोल्हापूरचा असण्याची शक्यता नमूद केली आहे.
       कर्ण राजाने या मंदिराच्या धर्मकार्यार्थ धर्मपूर (म्हणजे आत्ताचे धामापूर), सुपारीसाठी गुणवल्लिका, तुपासाठी शिवणी, यज्ञासाठी लवल (म्हणजे लोवले), फळांसाठी पनसगाव, उत्सवासाठी धमनी (आजचे धामणी), धर्मसेवकांच्या राहण्यासाठी कदंब-आम्रपाली ही गावे नेमून दिल्याचे पोथीमध्ये म्हटले आहे. या मंदिराच्या जवळपासच्या परिसरात अनेक पुरातन मंदिरांचा समूह आहे. ही सर्व देवालये आजही अपरिचित आणि दुर्लक्षित आहेत. कर्णेश्वर मंदिराच्या व्यतिरिक्त अलकनंदा नदीच्या उगमापाशी सप्तकोटीश्वर मंदिर आहे. इतर ठिकाणी सोमेश्वर, कुंभेश्वर, काशी विश्वेश्वर, केदारेश्वर, रावणेश शंकर, जलयुक्त नंदिकेश (संगम मंदिर), काळ भैरव, लक्ष्मी नृसिंह, दूधपिता गणपती अशी मंदिरेही आहेत. यापैकी एका मंदिराच्या मंडपाच्या बाहेरील पट्टीकेवर कामशिल्पे कोरलेली आहेत. या सर्व मंदिरांचा निर्मितीकाळ निश्चित झालेला नाही. पण ही मंदिरे इ. स. ५७५पासून पुढील काळात निर्माण झाली असावीत, असा कयास आहे.



   
karneshwar temple
   हे मंदिर भूमीज नागर शैलीतील पूर्वाभिमुख मंदिर आहे. हे मंदिर तारकापीठावर स्थित असून, त्याचे महाद्वार पूर्वाभिमुख असून पश्चिम आणि उत्तर दिशांनासुद्धा प्रवेशद्वारे आहेत. मंदिरावर अनेक शिल्पपट कोरलेले आहेत. भूमीज शैलीची मंडप, महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी याची परिपूर्ण रचना आहे. दहा चौरस मीटर आकाराचा मुखमंडप मग पुढे अंतराळ आणि नंतर गर्भगृह अशी मंदिराची साधारण रचना आहे. मंदिर हे जोत्यावर बांधलेले असल्याने तीन बाजूला पायऱ्यांची सोय केलेली दिसते. या पायऱ्या चढून गेल्यावर जी अर्धमंडपाची जागा येते तिथं वर्तुळाकार शिळा कोरलेल्या आहेत. अप्रतिम दगडी झुंबरे इथं दिसतात.मंदिराच्या बाहेरील बाजूस (प्रवेशमंडप सोडून) कोणतेही कोरीव काम केलेले नाही. 



मंदिराच्या मुख्य दरवाजातून प्रवेश करताच समोरच वर्तुळाकार नक्षी पहायला मिळते. मंदिराच्या चारही दरवाजांमध्ये अशा प्रकारच्या वर्तुळाकार नक्षी आहेत. डोक्यावर दगडात कोरलेला सुंदर झुंबर पाहायला मिळतो. प्रवेशद्वारात डोक्यावरच आठही कोनांमध्ये अष्टदिक्पालांच्या मूर्ती पाहायला मिळतात. प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश केल्यानंतर येथील खांबांचे नक्षीकाम डोळ्यात भरते.

karneshwar temple




या खांबांची रचना कोल्हापूरमधल्या महालक्ष्मी मंदिरातील नक्षीकामाशी जुळते. मंदिरात अत्यंत कलात्मक अशी नंदीबैलाची मूर्ती आहे. गाभाऱ्यात शंकराची एक फूट उंच  पिंड पाहायला मिळते.

पालथे ताट :
          कर्णेश्वराचे मंदिर एका दगडातून कोरलेले भव्य देऊळ म्हणून प्रसिद्ध आहे. कर्णेश्वर म्हणजे महादेव. प्रत्येक प्राचीन मंदिराला काहीना काही आख्यायिका असते. अशीच एक आख्यायिका या मंदिराबाबत सांगितली जाते. पांडव वनवासात असताना त्यांनी कर्ण नावाच्या राजाच्या पणानुसार एका रात्रीत एका दगडातून हे देवालय कोरले. दमल्यावर ते जेवायला बसले असता पहाटे कोंबडा आरवला. पहाट झाल्याने जेवायचे कसे म्हणून ताटे पालथी टाकून उठले. या मंदिरात ५ दगडी पालथी ताटे  (पराती) कोरलेल्या आहेत. या ताटाखाली गुप्त धन परले असल्याचे सांगितले जाते. 
कर्णेश्वर मंदिर शिलालेख

पांडवांनी त्या काळातील लिपीत दोन ओळी लिहून ठेवल्या आहेत. या ओळींचा अर्थ समजू शकल्यास ही पालथी पाने सुलटी होतील आणि त्या मनुष्याला ताटाखाली लपवलेले धन मिळेल. अंदाजे चार फूट लांबीची ही दगडात कोरलेली पाच ताटे आहेत. मंदिराला तीन दरवाजे असून, प्रत्येक दारात पालथे ताट आहे. एक ताट मंदिराच्या मध्यभागी असून, पांडवाच्या पाच ताटासोबत सहावे ताट कर्णाचे म्हणून ओळखले जाते आणि त्यावर शंकराची पिंडी आहे. त्यावर मोठे शिवलिंग आहे. गाभाºयात न बसता देखील गाभाºयाबाहेर बसून पिंड संपूर्ण दिसते. त्यामुळे ध्यानधारणा करण्यासाठी बाहेर देखील बसता येते.
    
    मंदिराला प्रमुख तीन दरवाजे आहेत. पूर्व दिशेला असलेल्या  मंदिराच्या प्रवेशद्वारावर 'शिवपंचायतन' आहे. त्याच्या डाव्या बाजूस नरकासूर आणि उजव्या बाजूस कीतीसुर्राच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. या दोन राक्षसांचे शंकराबरोबर युद्ध झाले होते. त्या युद्धा पराजय झाल्यावर आपल्या पायाशी स्थान मिळावे असे या दोन राक्षसांनी शंकराकडे वर मागितला. तेव्हा शंकराने प्रसन्न होऊन त्यांना मंदिराच्या बाहेरील दरवाज्याच्या चौकटीत स्थान दिले. यांना पाय लावून हात येण्याची प्रथा आहे. 
शेषशायी श्री विष्णु

मंडपाच्या करोटक वितानाच्या बाजूला शेषशायी विष्णू दिसतो. त्याची दृष्टी कोरीव दशावतारांकडे आहे असं भासतं. समुद्र मंथन, यशोदा दधि मंथन असे प्रसंग इथं कोरलेले दिसतात. इथली करोटक वितानाची रचना अहमदनगरच्या ताहकरी मंदिराशी साधर्म्य असलेली आहे असं ज्येष्ठ पुरातत्व शास्त्रज्ञ गो. ब. देगलूरकर सांगतात.प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस सुंदर असे दशावताराचे शिल्प कोरण्यात आले आहे.  श्री विष्णूच्या दहा अवतारांपैकी मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, राम, कृष्ण, परशुराम, बुद्ध, कलिंकी आदींची शिल्पे कोरलेली आहेत. संपूर्ण मंदिर मगरीच्या पाठीवर उभे असल्याचे मगरीच्या शिल्पावरून वाटते. 

Karneshwar Temple Inscription – 

 


Mimusops elengi Design chandelier at  karneshwar Temple

 भगवान विषाणूंचे दशावतार शिल्प

  
श्री महेश
श्री ब्रह्मदेव
  

  मंडपातील स्तंभशीर्षांवर कीचक कोरलेले असतात तिथं गणेश, सरस्वती, चामुंडा, भैरव अशा बसलेल्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात. या मंदिरात सिंहग शिवाच्या मूर्ती दिसतात. म्हणजे नंदी ऐवजी स्थानक शिवाबरोबर सिंह प्रतिमा कोरलेली दिसते. मथुरा येथील संग्रहालयात अशी मूर्ती असल्याचे देगलूरकर सांगतात. त्यांच्यामते अशा मूर्ती साधारणपणे ४-५व्या शतकानंतर नाहीत. त्यामुळे १२व्या शतकातील ही मूर्ती विशेष महत्त्वाची ठरते. मुखमंडप, अर्धमंडप आणि मुख्य मंडप या सर्वांना करोटक पद्धतीची विताने आहेत.. म्हणजे ceiling आहेत. तिथं कर्णदुर्दरक, गजतालू, लूम आणि लोलक-झुंबर अशी रचना असल्याचे देगलूरकर वर्णन करतात.


शंकराला अभिषेक झाल्यानंतर ते पाणी वाहून बाहेर पडण्यासाठी जो मार्ग आहे त्याच्या मुखाशी मकरमुख रचना आहे. शक्यतो महादेवाच्या मंदिरात गोमुखातून तीर्थ बाहेर येताना दिसते मात्र याठिकाणी मगरच्या शिल्पातून ही सोय केलेली आहे.मकर म्हणजे गंगेचे वाहन. इथं येणारे पाणी हे गंगाजल समजून तीर्थप्राशन करायचे असा संकेत या रचनेतून व्यक्त होतो.
 carasole
 
कर्णेश्वर मंदिर प्रदक्षिणा मार्ग

        मंदिरावर आतमध्ये आणि बाहेरील बाजूस विष्णूचे दशावतार, कमल वेलींच्या मालिका, महिषासुरमर्दिनी, नृसिंह, गणपती, सरस्वती, कीर्तिमुख, सुरसुंदरी आणि अनेक देवदेवतांच्या मूर्ती अशी असंख्य अलंकरणे अंकित केलेली आहेत. या सर्वांची काळ्या पाषाणातील कलाकुसर आपल्याला मंत्रमुग्ध करते. कर्णेश्वर मंदिरा बाहेर गणेशाची छोटी मूर्ती आहे. ही मूर्ती पाहिल्यावर वाईतील महागणपतीची मूर्तीशी साम्य जाणवते.मंदिराच्या आतमध्ये ब्रम्हदेव, शेषधारी विष्णू आणि बसलेली वरदलक्ष्मी यांची शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराच्या गर्भगृहात कर्णेश्वराची पिंडी असून, पार्वतीची मूर्तीही आहे. मंदिराच्या प्रांगणात सूर्यनारायण आणि गणपतीचे मंदिर आहे. सात घोड्यांच्या रथावर सूर्यमूर्ती उभी असून, मूर्तीच्या प्रभावाळीमध्ये १२ राशींचे अंकन केले आहे.
दरवाज्याजवळ पांडवांचे ताट म्हणून ओळखले जाणारे पालाथे ताट आहे. त्यावर बकुळीचे फुल कोरलेले आहे. ताटाच्या बाजूस पांडवांची आसने दिसतात. साधारणपणे चार फूट उंच असलेली आसने आहेत. मंदिराच्या मुख्य दरवाजाजवळ नंदीमंडप आणि दोन अष्टभैरव द्वारपाल आहेत. तेथून पुढे मंडप, मंदिराच्या छतावरची कोरीव शिल्प, सिंह, मुख्य छतातून झुंबराप्रमाणे दिसणारे कमलाकृती दगडी झुंबर, सभामंडपातील शिलालेख, शेषशाही विष्णूचे शिल्प कोरून ठेवलेली आहेत. मंडपात प्रवेश करताच नंदी आणि त्यानंतर शंकराची मूर्ती दिसते. मंडपाला एकूण चार खांब आहेत. विशेष म्हणजे हे चारही खांब एकसमान आहेत. दक्षिण दरवाज्याच्या मागे खांबावर शिलालेख आहे. मुख्य मंडपाच्या डाव्या हाताला श्री महालक्ष्मीची मूर्ती आणि उजव्या बाजूला शेषशायी विष्णूची मूर्ती आहे. येथील भगवान विष्णूचे शेषशायी शिल्प व दगडी झुंबर हे पाहण्यासारखे आहे.










मंदिरातील देव, दानव, नृत्यांगना, किन्नर, यक्ष-यक्षिणी, आदी मूर्तींचे कोरीव काम केलेले आहे. मंदिराच्या प्रत्येक प्रवेशद्वारावरील अलंकृत खांब, सुंदर नक्षीदार कोरलेले आहेत.  कर्णेश्वर मंदिराचा कोपरानकोपरा दगडी शिल्पकलाकुसरीने कोरलेला आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूसही उत्तम कोरीवकाम केले असून शिल्पकलेचा अप्रतिम दर्शन मंदिर न्याहाळताना होते. मंदिराच्या मागील बाजूने एका ठिकाणाहून पाहिल्यास मंदिराच्या कळसाची रचना गोलाकार आकारात केलेली आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस ॐ कार आकारातील गणेश व पार्वतीची नृत्य करतानाची मुद्रेतील छान मूर्ती आहे. मंदिर आवारात उत्तर दिशेला सूर्यमूर्ती आणि समोरच्या बाजूस गणेशाचे मंदिर आहे. या ठिकाणी नवीन बांधलेले मंदिर आहे ते श्रीगणेशाचे आहे. त्यावरून प्राचीन काळी हे गणेश पंचायतन असावे असा कयास देगलूरकर मांडतात. वायव्य कोपऱ्यात सूर्याचे छोटेसे मंदिर आहे. सात घोड्यांवर स्वार सूर्य आणि सोबत उषा-प्रत्युषा प्रतिमा अशी रचना इथं पाहता येते..महाराष्ट्रात तशी तुलनेने नृसिंह मंदिराची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतपत आहे मात्र कर्णेश्वर मंदिर परिसरात अतिशय सुरेख असे नृसिंह मंदिर आपणांस पाहावयास मिळते.या शिवाय अनेक वैशिष्ट्यपूर्ण मंदिराची साखळी येथे दिसून येते.मूर्ती शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यासाठी माहितीचा खजिना असलेली कसबा संगमेश्वरची शिल्प वैभव नेहमीच स्वागतास सज्ज आहे.
मंदिरापासून काही अंतरावरच अलखनंदा, वरुणा आणि शास्त्री नद्यांचा संगम पाहायला मिळतो. या नद्यांच्या संगमामुळेच 'संगमेश्वर' नाव प्रचलित झाले.  मंदिराबाहेर गणपती, पार्वती, महिषासुरमर्दिनी, नृसिंह, बलराम, हनुमान या देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. तसेच मंदिरातील प्रत्येक खांबाला एकाच साच्यामधून काढल्याप्रमाणे नक्षीकाम आहे. मंदिराचे वैशिष्टय म्हणजे बांधकामामध्ये कोणत्याही धातूचा वापर केलेला नाही.
मंदिर काळया पाषाणात बनविलेले असले, तरी याचा कळस मात्र दगड-माती, विटांपासून बनवून त्यावर गूळ-चुन्याचा गिलावा दिलेला आहे. कर्णेश्वर मंदिराची रचना करणाऱ्या स्थापतीला १० हजार सुवर्णमुद्रा दिल्या होत्या. मुख्य मंदिराच्या पूर्व प्रवेशद्वारावर द्रम्म आणि गद्याण या चलनांचा उल्लेख असणारा एक शिलालेख आहे. इथे एक गद्धेगळही आहे. त्याच्यावरील लेखही (म्हणजेच शापवाणी) झिजलेला आहे.


कर्णेश्वर देवालयाबाबत आख्यायिका अनेक आहेत. भगवान परशुराम यांनी पांडवांना धनुर्विद्या शिकवली आणि सहावा भाऊ कर्ण याची ओळख करून दिली. त्यामुळे पांडवांनी ते देवालय भावाच्या आठवणीसाठी उभारले! अशी अतर्क्य कथा! ते देवालय एका अखंड शिळेतून कोरून काढलेले आहे. पण त्या देवालयाला कळस नव्हता. पांडवांचा अज्ञातवासाचा काळ असल्यामुळे त्यांनी रात्रीच्यावेळी, सूर्यास्तानंतर कामाला प्रारंभ करायचा आणि सूर्योदयापूर्वी काम संपवायचे असे ठरवले होते. देवालय पूर्ण झाले आणि पांडव भोजनाला बसले. पांडव काम करत आहेत याचा सुगावा सुरमा नावाच्या एका राक्षशिणीला लागला आणि कामात व्यत्यय आणावा या उद्देशाने तिने कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज काढला. पांडवांनी सूर्योदयाची वेळ जवळ आली असे वाटून काम थांबवले आणि ते निघून गेले. त्यामुळे देवालयावरील कळसनिर्मिती राहून गेली. कालांतराने, स्थानिक कारागिरांनी तो कळस निर्माण केला. त्यामुळे कळसाचे काम अलिकडील असल्याचे जाणवते.


        कोकणातील अनेक मंदिरे म्हणजे वास्तुकलेचे उत्तम नमुने. काळाच्या ओघात मोठमोठ्या संस्कृती नष्ट झाल्या. नुकतेच श्री केदारनाथला महाप्रलय झाला. सुदैवाने मंदिर वाचले. पण प्राणहानी प्रचंड झाली.  आज जी काही प्राचीन मंदिरे महाराष्ट्रात आहे. ती अप्रतिम कलाकृतींनी साकारलेली आहे. प्राचीन कलाकृतींकडे पुरातत्त्व खात्याने लक्ष देणे गरजेचे आहे.  कोकणात अनेक ऐतिहासिक ठेवे आहेत. खरे तर हे बहुमूल्य ठेवे जपून ठेवायला हवे.  त्यामुळे हा प्राचीन वास्तुकलेचा खजिना टिकून राहील. कोकण सहलीत कर्णेश्वराचं मंदिर आवर्जून पाहायला हवे. मंदिराभोवती असलेली हिरवीगार  दाट झाडी, डोंगर, नद्या, शेती यांनी हा परिसर  बहरेला आहे.  महाशिवरात्रीला कर्णेश्वर मंदिरात मोठा उत्सव होतो.
sangmeshwar temple

संगमेश्वर मंदिर – 

संगमेश्वर येथे अनेक मंदिर पाहायला मिळतात. ही मंदिरे प्राचीन काळातील आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री नदीच्या संगमाचे ठिकाण म्हणजे संगमेश्वर. यास ‘रामक्षेत्र’ असेही म्हटले जाते.  सुरुवातीलाच संगमेश्वर हे छोटेखानी महादेवाचं मंदिर दिसतं. नदीच्या किनारी वसलेलं खूप सुंदर असं संगमेश्वर मंदिर आहे. पण, ५ मिनिटाच्या अंतरावर कर्णेश्वराचं मंदिर आहे. पण, ते सहजासहजी दृश्यास पडत नाही. एका लोखंडी पुलावरून पुढे गेल्यानंतर एखाद्या घराच्या पायऱ्या असल्याप्रमाणे जांभा दगडी पायऱ्या नजरेस पडतात. या पायऱ्या चढून वर गेल्यानंतर एक विस्तीर्ण मैदान लागते. या मैदानावर कर्णेश्वराचे प्रसिध्द महादेव मंदिर आहे.

सोमेश्वर, काशीविश्वेश्वर मंदीर :-

         कसबा पेठेतून पुढे गेल्यानंतर छोटे संगमेश्वरचे मंदिर आहे. जरा अतिशय सुंदर शिल्पकाम असलेले कर्णेश्वर मंदिर दृष्टीस पडते. येथे जुनी गावे, गावातील जुने घरे, लाकडी वाडे, लाकडी वाड्यांवर केलेले कोरीव काम आणि निरामय शांतता अनुभवता येते. येथील बहुतांशी घराला कुलूप दिसते. जवळ असलेल्या मुंबईच्या ठिकाणी येथील माणसे बहुदा कामासाठी गेली असावीत, असा अंदाज लावता येईल. कसबा गावात सोमेश्वराचेदेखील दगडी बांधकाम असलेले प्राचीन मंदिर आहे.
     संगमेश्वरच्या कर्णेश्वर मंदीराजवळ असलेल्या सोमेश्वर आणि काशीविश्वेश्वर हि मंदीरे त्यावर असलेल्या नागर शिखरामुळे उल्लेखनीय आहेत. देवपाली मार्गावरुन कार्तिकस्वामीच्या मंदीराकडे जाताना बाजुच्या शेतामध्ये हि मंदीरे असून ती एकमेकांना लागून आहेत. दोन्ही मंदीरे पुर्वाभिमुख असून नंतरच्या काळातील हेमाडपंती मंदीराप्रमाणे या मंदीरानाही मुखमंडप नाही. त्याचप्रमाणे गुढमंडपाला पुढच्या बाजुला वामनभिंत आहे. वामनभिंत व वरच्या तुळ्या यामध्ये दगडी जाळी आहे. हि जाळी जांभ्या दगडाची आहे.











  
कसबा पेठ सोमेश्वर मंदिर
कसबा पेठ सोमेश्वर मंदिर
कसबा पेठ सोमेश्वर मंदिर

  हेमाडपंती मंदीराचे वैशिष्ट्य म्हणजे मंडपाच्या बाजुला दोन भिंतीची जाडी मुख भागाजवळ बर्यापैकी पुढे आलेली असते. आणि इथे देवकोष्ट असते.  म्हणजेच मंदीराच्या मुखभागावर दोन टोकावरील कोपर्यापुढे आलेले भाग असून अश्या प्रत्येक भागात एक अशी दोन देवकोष्टे असतात. हे वैशिष्ट्य दोन्ही मंदीरात आढळते. आज मात्र हि दोन्ही देवकोष्टे रिकामी आहेत.
  सोमेश्वर मंदीर जगतीवर उभे असून त्यात जाण्यासाठी पायर्या आहेत. मंडपाचे द्वार साधे असून त्यावर ठळक स्तंभशाखा आहे. मात्र द्वारावर उत्तरांग नाही. मंडपाचे छत आठ कडेला असलेल्या स्तंभावर आणि चार मध्ये असलेल्या स्तंभावर पेलले आहे. या चार स्तंभापैकी दोन स्तंभ अंतराळात आणि दोन वामनस्तंभ मंडपाच्या मुखभागात आहेत. मंडपाच्या चार कोपर्यातील स्तंभ सोडले तर कोणत्याही स्तंभावर शिल्पाकृती नाहीत.अर्थात हि शिल्पसुध्दा झिजलेली असल्यामुळे ओळखून येत नाहीत. बहुतेक हि शिल्प दिग्पालाची असावीत. अंतराळाच्या प्रत्येक बाजुच्या भिंतीत देवकोष्टाशिवाय काहीही नाही. गर्भगृहाचे द्वारही मंडपाच्या द्वाराइतके साधे असून त्याच्या खालच्या अंगावर प्रतिहारीच्या मुर्ती दिसत नाहीत. मात्र द्वारावर उत्तरांग असून त्यावर तीन रथिका दिसतात. कडेच्या दोन्ही रथिकावर नागर शिखरे तर मधल्या रथिकावर वेसर शिखर दिसते.
  मंदीराचा जगतीचा भाग गाडला गेला असल्यामुळे त्यावर कोणते थर असावेत याचा अंदाज येत नाही.मात्र मंदीराचे मंडोवर साधे आहे त्यामुळे जगतीवर विशेष थर नसावेत. मंदीरावरील शिखर लतिन नागर पध्दतीचे आहे.
  काशीविश्वेश्वर मंदीर आकाराने काहीसे मोठे आहे.पण या दोन्ही मंदीराच्या एकंदरीत रचनेत फार फरक नाही.
लक्ष्मीनृसिंह मंदिर) कसबा, ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी
हे नरसिंहाचे मंदिर (लक्ष्मीनृसिंह मंदिर) कसबा, ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी येथे स्थित आहे. ह्या मंदिरातील मुर्ती मुल्तान वरुन आणलेली आहे असं म्हणतात. मुलतान वरुन आणलेली श्री नृसिंहाची मूर्ती हरिद्वार येथे आहे अस म्हणतात

प्राचीन जलव्यवस्थापन - सप्तेश्वर !!!

प्राचीन जलव्यवस्थापन – सप्तेश्वर !!!

कोकण म्हणजे अलिबाबाची गुहा आहे. इतका खजिना इथे दडलेला आहे की शोधून शोधून दमायला होईल. एखादा परिसर सगळा बघून झालाय असं वाटेपर्यंत तिथलं काहीतरी सुंदर आपल्यासमोर येऊन उभं रहातं, आणि हे आधी कसं बघितलं नाही असं वाटून जातं. सप्तेश्वरबद्दल पण असंच झालं. कसबा संगमेश्वर परिसरात अनेकदा फिरणं झालेलं पण त्याच्याच समोरच्या डोंगरावर हे सुंदर ठिकाण दडलेलं माहिती नव्हतं.सप्तेश्वर.

मुंबई-गोवा महामार्गावर शास्त्रीनदीवरील पूल ओलांडून आपण संगमेश्वरकडे जातो. डावीकडे रस्ता कसबा संगमेश्वरला जातो. तिकडे न वळता संगमेश्वरकडे जायचे. जरा पुढे गेल्यावर उजवीकडे मुळ्ये हॉस्पिटल आहे आणि त्याच्याच समोर डोंगरावर रस्ता चढलेला दिसतो. चांगली डांबरी सडक आहे. त्या रस्त्याला चांगलाच चढ आहे. डोंगरावर चढणारा रस्ता सागाच्या जंगलातून जातो. अंदाजे ३ कि.मी. गेल्यावर ओढ्यावरील पुलावर रस्त्याला दोन फाटे फुटतात. उजवीकडे ऐन गर्द झाडीत आहे सप्तेश्वर महादेवाचे मंदिर. डावीकडचा रस्ता देवपाट वस्तीकडे जातो. काही अंतर चालत गेल्यावर भक्कम बांधणीचे मंदिर दिसते. मंदिराच्या बाजूनेच पाण्याचा प्रवाह वाहतो आहे. मंदिराच्या प्राकाराला भिंत बांधून बंदिस्त केलेले आहे.

जसे आपण प्रांगणात प्रवेश करतो आपल्यासमोर इथला खजिना उघडलेला दिसतो. आपल्या समोर एक पाण्याचे कुंड दिसते. त्याच्या मागे अजून एक कुंड आहे. आणि त्याच्या मागे चिऱ्याच्या दगडात बांधलेले सुंदर बांधकाम नजर खिळवून ठेवते. दोन बाजूला खोलीसारखे बांधकाम आणि मधल्या बांधकामाला ५ खिडक्या. या बांधकामात चुन्याचा वापर केलेला आहे. चुन्याच्या घाणीचे दगडी चाक आजही तिथे दिसते. अलकनंदा नदीचा उगम इथेच डोंगरावर होतो. त्याचे खाली येणारे पाणी इथे सात प्रवाहात विभागून ते परत मोठ्या कुंडात सोडले जाते. सात प्रवाहांचा स्वामी तो ‘सप्तेश्वर’ अशी साधी सोपी व्याख्या. बाजूच्या दोन खोल्यांचे प्रयोजन समजत नाही. त्यांच्या डोक्यावर शिखरासारखे साधे बांधकाम केलेले आहे. पण याच्या पाठीमागे जाऊन पाहिले तर डोंगरावरून आलेला प्रवाह विशिष्ट चॅनेल मधून आणला आहे. प्रत्येक खिडकीपाशी त्याला ‘टी सेक्शन’ सारखे बांधकाम करून प्रवाहित केलेला आहे. जिथे तो जोडलेला आहे तिथे एक चौकोनी खड्डा केलेला आहे. अतिशय सुबक आणि उत्तम तंत्रज्ञान वापरून हे जलव्यवस्थापन केलेलं दिसतं. या सर्व सातही खिडक्या आतून एकमेकांना सलग जोडलेल्या आहेत. त्यांच्या कमानी एका रेषेत सरळ दिसतात. या सगळ्या स्थापत्यावर इस्लामिक स्थापत्य कलेचा प्रभाव प्रकर्षाने जाणवतो. मध्ययुगीन काळात हे जलव्यवस्थापन केलेलं आहे. शिवाय हे सगळे बांधकाम देखणेसुद्धा केलेले आहे. समोरच्या बाजूला प्रत्येक खिडकीच्या वर व्यालासारखा एक काल्पनिक पशु कोरलेला दिसतो. त्याशिवाय पानाफुलांची सजावट केलेली दिसते. बाजूला आणि डोक्यावर लहान-लहान कोनाडे केलेले आहेत. कदाचित तिथे उजेडासाठी पणत्या ठेवत असावेत. या सातही विभागातून वाहणारे सगळे प्रवाह पुढच्या बाजूला एकत्र येऊन एका गोमुखातून मोठ्या कुंडात पडतात. कुंड तरी किती मोठे.. ३० फुट लांबी रुंदीच्या कुंडात आत उतरायला पायऱ्या केलेल्या आहेत. स्वच्छ आणि निवळशंख असे हे पाणी इथून जमिनीखालून दुसऱ्या कुंडात जाते. आणि ते कुंड भरले की तिथून पुढे एका ओढ्याला जाऊन मिळते. हाच ओढा पुढे गावात जातो.

सप्तेश्वर शिवमंदिर पश्चिमाभिमुख आहे. ऐसपैस सभामंडप आणि मोठा गाभारा असे याचे स्वरूप. गाभाऱ्याच्या दरवाजावर गणपतीची सुंदर मूर्ती. मंदिराला लागूनच वैजनाथाचे एक छोटेसे मंदिर बांधलेले आहे. हा सगळा परिसर अतिशय शांत आणि रमणीय आहे. अव्याहत वाहणाऱ्या महामार्गाजवळ डोंगरावर इतके रम्य ठिकाण असेल असे चुकूनही वाटत नाही. इथून आजूबाजूचा मोठा परिसर दृष्टीक्षेपात येतो. पूर्वेकडे सह्याद्रीची मुख्य रांग, आणि खाली दरीत कसबा संगमेश्वर परिसर, तिथली मंदिरे, मुख्यत्वे करून काळभैरव मंदिर आणि तिथे जाणारा रस्ता हे सगळे फार सुंदर दिसते. आंबा, साग, ऐन, शिवण, फणस अशा वृक्षांची दाटी असलेला हा परिसर फारच सुंदर आहे.

निसर्गाचा वरदहस्त लाभलेले हे नितांत रमणीय ठिकाण संगमेश्वराच्या डोंगरावर ऐन झाडीत दडलेले आहे. इतक्या उंचावर मुद्दाम निर्माण केलेले प्राचीन जलव्यवस्थापन आणि या रमणीय परिसरात मिळणारी शांततेची अनुभूती घेण्यासाठी कोकणात दडलेला हा खजिना आवर्जून पाहायला हवा. इथून खरोखरच पाय निघत नाही.

        अप्रतिम कलाकुसरीचा नमुना असलेल्या या मंदिराला भेट दिल्यानंतर महामार्गाला लागूनच असलेल्या आरवली, राजावाडी आणि गोळवली येथील गरम पाण्याच्या कुंडांनाही भेट देता येते. जवळच असलेल्या बुरबांडच्या प्राचीन मंदिरालाही जाता येते. प्राचीन आख्यायिका आणि ऐतिहासिक घटनांशी जोडल्या गेलेल्या या परिसराची भेट इतिहासाचे अभ्यासक आणि कलाप्रेमींसाठी मोठी पर्वणीच ठरते.

काही महत्त्वाच्या टिप्स :-
१) मंदिराच्या संपूर्ण माहिती साठी येथील पुजारी काकांना भेटा.
२) मंदिर मुंबई गोवा हायवे पासून अगदी 2 Km अंतरावर आहे.
३) मंदिराच्या जवळ पार्किंग उपलब्ध नाही त्यामुळे अलीकडच्या नाक्यावर पार्किंग करता येईल.
४) मंदिरात पूर्वेकडून प्रवेश करावा हा मुख्य दरवाजा आहे.
५) मंदिरातील शिलालेख आवर्जून पाहावा.
६) हॉटेल्स आणी रहाण्याची सोय
भैरी भवानी पर्यटक निवास अगदी 10 मिनिटे अंतरावर आहे
७) संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकास आवर्जून भेट द्या.
८) मंदिराचे पावित्र्य अबाधित ठेवा
कसे जाल?

मुंबई-गोवा महामार्गावर कसबा संगमेश्वर तालुक्याचे ठिकाण लागते. एसटी स्टॅन्डपासून दोन किलोमीटरवरून कसबा गावात जाण्यासाठी फाटा लागतो. कोकण रेल्वे मार्गावरही संगमेश्वर नावाचे रेल्वे स्थानक आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ने चिपळूणहून संगमेश्वरकडे येताना संगमेश्वर एस. टी. स्थानकाच्या २ कि.मी. अलीकडे शास्त्री पूल लागतो. शास्त्री पूल ओलांडल्यावर लगेचच डावीकडे वळल्यास जो रस्ता सुरु होतो तेथून १ कि.मी. अंतरावर कसबा गाव लागते. तिथे "जनता सहकारी बँक" जवळ डावीकडे वळल्यास पुढे ३०० मीटर वर श्री कर्णेश्वर मंदिर आहे.मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पुणे इत्यादी ठिकाणांहून थेट एसटी सेवा आहे किंवा जवळच्या रत्नागिरी, चिपळूण या ठिकाणी पोहोचून पुढील वेगळ्या एसटीने जाता येते. रेल्वेने यायचे असेल तर कोकण रेल्वे आहे. संगमेश्वर रेल्वे स्थानकाजवळ थांबता येते. रत्नागिरी, ठाणे, मुंबई, पुण्याहून एसटी आहे. पण, शक्यतो स्वत:ची गाडी असलेली चांगली. यामुळे तुम्हाला जागोजागी थांबून विविध पॉईंट्स पाहता येतात. शिवाय वेळही वाचेल.
कर्णेश्वर देवस्थानाकडे जाण्याचा रस्ता :
      प्रमुख शहरापासून अंतर 
१) मुंबई ते कर्णेश्वर मंदीर =२८७ कि.मी.
२) पुणे- २९४ कि.मी.
३) रत्नागिरी - ४५ कि.मी.
४) पणजी ( गोवा ) - २४७ कि.मी.
५) सावंतवाडी -  १९२ कि.मी.
६) कोल्हापुर - १२१ कि.मी.
७) बेंगळुरु- ७३४ कि.मी.
८) बेळगावी - २३० कि.मी.
९) सातारा - १८१ कि.मी.
 
 संदर्भ :-
१) रत्नागिरी जिल्हा गॅझेटीयर
२) स्थापत्य- महाराष्ट्र शासन
३) https://maharashtratimes.com
४) https://mr.wikipedia.org
५) https://varadprasadtours.com/2022/06/11/karneshwar-temple-travel-guide-tips/
६) https://maharashtramaza.live/karneshwar-temple-of-sangameshwar-is-an-example-of-ancient-architecture-in-konkan/
७) https://daryafirasti.com/2020/07/11/mkarneshwar/
८) http://trekshitiz.com/discussionboard/_topic206.html
९) http://indianclicker.blogspot.com/2013/04/karneshwar-temple-sangameshwar.html
१०) https://www.discovermh.com/kasba-sangameshwar/
११) धीरज वाटेकर  यांचे लिखाण
 १२) निबंध कानिटकर यांचे लिखाण
१३) आशुतोष बापट यांचे लिखाण







Bramha Vishnu and Lord Shiva ( Mahesh)




Other Temples in Same primises

Lord Ganesh and Lord Sun temple in Karneshwar Temple






































































धर्मवीर छ. संभाजी महाराज यांचे वास्तव्य असलेले संगमेश्वरातील कर्णेश्वर मंदिर

Swaliya Shikalagar

karneshwar temple
karneshwar temple

पुढारी ऑनलाईन डेस्क : रत्‍नागिरी जिल्ह्यातील ‘अलकनंदा’ आणि ‘वरुणा’ या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले ‘संगमेश्वर’ हे ‘कसबा संगमेश्वर’ म्हणून ओळखले जाते. Karneshwar Temple) त्या गावात दोन गोष्टी प्रमुख आहेत, त्या म्हणजे चालुक्यकालीन श्रीकर्णेश्वर मंदिर आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे तेथील वास्तव्य. संगमेश्वर हे देवळांचे गाव आहे. या परिसरात सुमारे ७० पांडव कालीन देवालये आहेत. त्यातील कर्णेश्वराचे एका दगडातून कोरलेले भव्य देऊळ विशेष प्रसिद्ध आहे. (Karneshwar Temple)

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर हे तसे प्रसिद्ध ठिकाण. ऐतिहासिक गाव म्हणून या गावाची ओळख आहे. या तालुक्याचे मुख्यालय संगमेश्वर गावापासून १७ किलोमीटरवर असलेल्या देवरुख येथे आहे. सोनवी आणि शास्त्री या दोन नद्यांच्या संगमावर हे शहर वसले असल्याने याला संगमेश्वर असे नाव मिळाले आहे. ते परिसरातील एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत येथून रत्‍नागिरीपर्यंत बोटीने जाता येत असे. संगमेश्वर हे मुंबई – गोवा महामार्गावर वसलेले आहे. तसेच कोकण रेल्वेने देखील संगमेश्वरला जाता येते. छत्रपती संभाजीराजांचे मुख्य ठाणे शृगारपूर हे संगमेश्वरच्या जवळच आहे. अशा ठिकाणी कर्णेश्वराचे प्राचीन मंदिर पाहायला मिळते. हे महामार्गापासून थोडे आत असल्यामुळे सहजासहजी नजरेस पडत नाही.

संगमेश्वर येथे अनेक मंदिर पाहायला मिळतात. ही मंदिरे प्राचीन काळातील आहेत. कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूरपेक्षाही संगमेश्वर खूप जुनं मंदिर असल्याचे म्हटले जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री नदीच्या संगमाचे ठिकाण म्हणजे संगमेश्वर. यास ‘रामक्षेत्र’ असेही म्हटले जाते. संगमेश्वरला जाण्यासाठी राजापूरची गंगा ठिकाणापासून अडीच तासांचा रस्ता आहे. सुरुवातीलाच संगमेश्वर हे छोटेखानी महादेवाचं मंदिर दिसतं. नदीच्या किनारी वसलेलं खूप सुंदर असं संगमेश्वर मंदिर आहे. पण, ५ मिनिटाच्या अंतरावर कर्णेश्वराचं मंदिर आहे. पण, ते सहजासहजी दृश्यास पडत नाही. एका लोखंडी पुलावरून पुढे गेल्यानंतर एखाद्या घराच्या पायऱ्या असल्याप्रमाणे जांभा दगडी पायऱ्या नजरेस पडतात. या पायऱ्या चढून वर गेल्यानंतर एक विस्तीर्ण मैदान लागते. या मैदानावर कर्णेश्वराचे प्रसिध्द महादेव मंदिर आहे.

कर्णेश्वर मंदिर –

हे महादेवाचे प्रसिध्द मंदिर आहे. हे भूमीज नागर शैलीतील मंदिर आहे. कर्णेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील संगमेश्वर तालुक्यातील संगमेश्वर गावात आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून संगमेश्वरच्या कसबा पेठेपासून थोडे पुढे गेल्यावर हे आहे. इसवी सन २०१२ मध्ये या मंदिराला पुरातत्त्व विभागाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.

कोल्हापुरातील खिद्रापूरच्या मंदिराच्या स्थापत्यशैलीशी मिळते-जुळते असलेले कर्णेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर खिद्रापूरपेक्षाही जुने असल्याचे येथील मंदिराच्या स्थापत्यशैलीवरून ओळखते. काही जण हे मंदिर कर्ण राजा (कोल्हापूर) ने बांधले असावे असे म्हणतात. तर काही जण इ.स. १०७५ ते १०९५ या काळात गुजरातच्या चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले असावे, असे अभ्यासकांचे मत आहे.

कर्णेश्वर या महादेवाच्या देवालयात ५ पालथी ताटे कोरलेली आहेत. आख्यायिकेनुसार पांडव वनवासात असताना त्यांनी कर्ण नामक राजाच्या पणानुसार एका रात्रीत एका दगडातून हे देवालय कोरले. देवालयात पांडवकालीन लिपीत कोरलेले लेख आहेत. कर्णेश्वराच्या देवालयाजवळ एक सूर्य मंदिर आहे.

kasaba peth someshwar temple

या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरावर गणपती, लक्ष्मी, महिषासूरमर्दिणी, विष्णू अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. अतिशय आखीव रेखीव कोरीव काम असलेल्या या मूर्ती भक्तांच्या चटकन लक्ष वेधून घेतात. त्याकाळात इतकी सुंदर शिल्पे कशी काय घडवली असावीत, असा प्रश्न तुम्हाला नक्की पडेल. मंदिरात गेल्यानंतर भूमीज शैलीची मंडप, महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना आढळते. बाहेर कितीही ऊन पडलेलं असो वा गर्मी असो, मंदिरात पाऊल ठेवताच मनाला आणि शरीराला शितलता वाटते. गर्भगृहात कर्णेश्वराची पिंड आहे. सोबत पार्वतीची मूर्तीही आहे. येथे सुंदर प्रभावळदेखील दिसते.

कसे जाल?

संगमेश्वर बस स्थानकापासून संगमेश्वर रेल्वेस्टेशन ४ कि. मी. अंतरावर आहे. संगमेश्वर बस स्थानकापासून देवरुख १७ कि. मी. अंतरावर आहे. साखरपाला जाण्यासाठी दर ३० मिनिटांनी देवरुख येथून बस आहेत. ‘कोल्हापूर’ला जाण्यासाठी या मार्गाचा वापर होऊ शकतो तसेच संगमेश्वराहून रत्‍नागिरी, लांजा आणि राजापूरकडे जाणाऱ्या बसेस आहेत.

https://pudhari.news/features/youthworld/622526/shravan-2023-maharashtra-sangmeshwar-karneshwar-temple/ar





No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...