









गर्भगृहाच्या दरवाज्याला पाच द्वारशाखा आहेत. दरवाज्यावर नवग्रह आणि इतर भौमितीक आकृत्या कोरल्या आहेत. वरच्या भागात दोन शिल्प दिसतात, पण ती झिजली असल्यामुळे ओळखता येत नाहीत. गर्भगृहाच्या आत उमा- महेश्वराची आणि नंदीची मुर्ती आहे.









वाघळी येथील सिध्देश्बर मंदीर :-
सध्या महानुभाव संप्रदायाचे असलेले हे मंदीर कदाचित महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन मंदीर असेल. मंडपाच्या भिंतीवर असलेला शिलालेखही याचा पुरावा देतो. हे मंदीर सिध्देश्वर म्हणून ओळखले जाते. महामंडलेश्वर सेउणाचा मांडलिक गोविंद याने हे मंदीर शके ९९१ ( इ.स. १०६९ ) मध्ये बांधले असा शिलालेखात उल्लेख आहे. मंदीराची बरीच पडझड झालेली असल्यामुळे मंडप सोडला बाकी भागाचा तलविन्यास कसा असेल याचा अंदाज येत नाही. पण बहुधा पुढच्या भागत मुखमंडप आणि मागच्या भागात गर्भगृह असावे. नागशीर्ष आणि कीचकहस्त असलेल्या अर्धस्तंभावर उभ्या असणार्या या साध्या मंडपाचे उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे घुमटाकार छतावर सर्वात वरच्या वर्तुळाकृती भागात असलेले कृष्ण आणि गोपींचे शिल्प होय.
संदर्भ :-
१) जळगाव जिल्हा गॅझेटीयर
२) स्थापत्य - महाराष्ट्र शासन
३) https://asiaurangabadcircle.com/monuments/ajanta/mudhaiDeviTemple.php
४)
५)

Mudhai Devi Temple
The temple locally known as Mudhai temple was originally dedicated to Surya whose image is seen in the back niche of the temple. The main shrine has been built on the star-shaped plan of twenty-eight points. The garbhagriha, mandapa and mukhamandapa are the main elements on plan. The central ceiling and that of the porch are square in plain and rise as hollow truncated pyramids, the sides being decorated with a series of horizontal concave mouldings. From the top hang five rosette pendants. The antechamber is similar except that it has but one central rosette. The shrine ceiling is circular in plan, rising in diminishing circles of plain moundings. Among the images of gods and goddesses can be seen that of Ganpati, Mahakali, Surya, Gajalaxmi and Siva-Parvati. The temple is datable to 13th century AD.
The temple is located on an artificial mound and is now partly ruined. It was built around 1150–1200 AD. The temple faces east and is in stellate plan consisting of a garbhagriha, ardhamandapa, mandapa, and pottico leading to the mandapa. The structure is supported with 24 pillars.
The temple is not fully preserved, its parts like pitha, vedibandha, and jangha are well preserved while shikhara is missing and in place of that roof has covered with stone slabs and concrete which is a latter addition done for its protection. The walls of the temple are bedecked with the least decorations including ratnas, foliage, geometrical and grassamukha designs. Main sculptures on the central walls at the north, west, and south are the standing images of Chandika, Surya, and Ganesha, respectively.
Inside the shrine doorframe, ceilings and pillars are decorated. The doorframe is composed of five shakhas and embellished with navagrahas at the upper and foliage and geometrical motifs at the lateral and lower parts. There are two images at the lintel one above the other which are unidentified as badly wear out. Inside the garbhagriha has an image of Uma-Maheshwar with mount Nandi installed on an altar.
The temple is one of the more important temples of the early medieval period where a goddess form is worshipped.
https://templesofindia.org/temple-view/shree-mudhai-devi-temple-satara-maharashtra-244zim
हे मंदीर नदीकाठी असून काहीसे गावाच्या बाहेर आहे. हे जगतीवर उभे असून एकेकाळी त्याला दुय्यम गर्भगृहे असावीत असा अंदाज आहे. मुखमंडप, मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे त्याचे सध्याचे स्वरुप आहे. गर्भगॄहाचा तलविन्यास तारकाकृती आहे. मंडपाचे बाह्यांग शिल्पविरहीत आहे. फक्त गर्भगृहाच्या बाह्यांगावर तीन मुख्य दिशांना असलेल्या देचकोष्टामध्ये मुर्ती आह्ते.उत्तरेकडील देवकोष्टात महाकालीची दक्षिणेकडील देवकोष्टात गणपतीची आणि मागील बाजुच्या देवकोष्टात सुर्याची मुर्ती आहे. मंदीराच्या बाह्यांगावर खालच्या बाजुला असलेला चौकटच्या नक्षीचा थर आणि वरच्या बाजुला असलेले उदगम एवढेच काय ते अळंकरण आहे. या मंदीराच्या परिसरात सापडलेल्या शिल्पाकृती आणि गणेशाचे शिल्प असलेल्या ललाटबिंब दाखवलेला सुर्य यावरुन हे मंदीर इ.स. बाराव्या शतकातील सुर्यमंदीर असावे असे अनुमान काढता येते. मंदीराचे छत चौरसाकृती तलविन्यासाच्या चार स्तंभावर पेलेले आहे. शिखराकडे निमुळत्या होत जाणार्या चौरसावर गजतालु प्रयोजने आहेत. छतामधून खालच्या दिशेन पाच कमलाकार भाग पुढे आलेले आहेत. शिल्पशास्त्रीय भाषेत याला 'क्षिप्तोक्षिप्त वितान' असे म्हणतात. मुखमंडपाचे आणि अंतरा़ळाचे छतही अशाच प्रकारचे आहे. मात्र अंतराळाच्या छतावर असा एकच कमलाकार भाग पुढे आलेला दिसतो.
चालीसगांव से मात्र १२ किमी. मे वाघली नामक एक छोटा सा गांव है। यहाँ से तीतूर नदी बहती है। यह नदी के तट पर स्थित एक सुंदर नक्काशीदार मंदिर है।
इ.स. १२वीं सदी में बने इस मंदिर को 'मुधई देवी का मंदिर' कहा जाता है। हालांकि वर्तमान में मंदिर में देवी की मूर्ति मौजूद है, लेकिन यह मूल सूर्य मंदिर होगा।
क्योंकि इस मंदिर में सूर्य की ढेर सारी मूर्तियां खुदी हुई हैं। इसके अलावा, मंदिर की ओर देवता मंदिर की दीवार पर बाहरी कोने में खड़ी एक सुंदर सूर्य की मूर्ति है। मंदिर के अन्य दो किनारों पर देवी गणपति और देवी चामुंडा की मूर्तियों को देखा जा सकता है। पूर्वमुखी यह मंदिर तारे के आकार का है। मंदिर की अब कोई चोटी नहीं है। लेकिन मंदिर के दरवाजे पर नवग्रह की मूर्तियां हैं। यह प्रकार महाराष्ट्र में बहुत दुर्लभ है।
मंदिर परिसर बहुत ही शांत है। आसपास पड़े कुछ अवशेषों पर भी सूर्य की छवि देखी जा सकती है। मंदिर के हॉल में २४ स्तंभ हैं। एक तरफ इस मंदिर का परिवेश बेहद खूबसूरत है। बगल में तीतूर नदी चुपचाप बह रही है। खानदेश की यात्रा पर, आपको यहां रुकना चाहिए और आसपास और मंदिर की भव्यता को देखना चाहिए।
जलगाँव से चालीसगाँव तक सड़क के बाईं ओर एक प्राचीन मंदिर आसानी से देखा जा सकता है। मंदिर के निर्माण से यह तुरंत स्पष्ट हो जाता है कि यह एक हेमाडपंथी मंदिर होना चाहिए। इस मंदिर का नाम मुढाई देवी मंदिर, वाघली है। संपर्क करने पर ऐसा पैनल तुरंत दिखाई देता है। मंदिर आंशिक रूप से नष्ट कृत्रिम पत्थर पर बनाया गया है। इसका निर्माण लगभग ११५० से १२०० इ.स में हुआ था।
मंदिर के अंदर दरवाजे की चौखट, छत और खंभों पर बहुत कम सजावट है और गर्भगृह की चौखट में पांच शाखाएं हैं। एक या दो मूर्तियों को दरवाजे पर घिस दिया जाता है, जिससे उनकी पहचान करना मुश्किल हो जाता है। गर्भगृह में नंदी पर विराजमान उमा महेश्वर की मूर्ति है।
इसके पुरातात्विक महत्व के कारण, इसे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण द्वारा राष्ट्रीय स्मारक घोषित किया गया है।
सड़क
निकटतम राज्य परिवहन बस स्टैंड ( MSRTC ) चालीसगाँव में है। चालीसगाँव एमएसआरटीसी बसों के माध्यम से शेष महाराष्ट्र से अच्छी तरह से जुड़ा हुआ है। चालीसगांव मुंबई से 328 किमी दूर है। चालीसगांव-पुणे की दूरी 304 किमी है।
रेलवे
निकटतम रेलवे स्टेशन वाघाली रेलवे स्टेशन है। एक्सप्रेस ट्रेनें वाघाली में नहीं रुकती हैं। चालीसगांव जंक्शन रेलवे स्टेशन मंदिर से 11 किमी दूर है। चालीसगाँव रेलवे द्वारा पूरे भारत से अच्छी तरह से जुड़ा हुआ है। मुंबई, पुणे, दिल्ली और भारत के अन्य प्रमुख शहरों के लिए लगातार ट्रेनें उपलब्ध हैं।
https://www.tripoto.com/trip/tripoto-62930b91ed4c4
हरिहरेश्वर मंदिर पिंपळगाव | Discover Maharashtra

हरिहरेश्वर मंदिर पिंपळगाव –
खानदेशातील पाचोरा तालुक्यात अजिंठा पर्वत रांगेच्या पायथ्याशी वसलेले टुमदार गाव म्हणजे पिंपळगाव हरेश्वर. साधारणत: तीस हजार लोकवस्तीचे हे गाव व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. डोंगर पायथ्याची कसदार जमीन ,बऱ्यापैकी जलसाठा, पोषक वातावरण त्यामुळे फळबागा क्षेत्रात या गावाचा चांगलाच लौकिक आहे .बहुळा आणि डुब्बा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले असल्याने या गावाला विशेष धार्मिक, ऐतिहासिक तसेच पौराणिक महत्त्व पण आहे.(हरिहरेश्वर मंदिर पिंपळगाव)
पुराणात भस्मासुराची एक कथा सांगितली जाते.ती अशी की, दररोज चितेचे ताजे भस्म मिळावे म्हणून शिवशंकरांनी एका बालकाची नियुक्ती केली होती. एकदा भस्म न मिळाल्याने चितेतले निखारेच तो घेऊन आला .त्याचे हात पोळले. त्याच्या एकनिष्ठ पणावर शंकर प्रसन्न झाले व भस्म शोधण्यासाठी तुझी वणवण होणार नाही म्हणून तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचे भस्म होईल असा त्याला वर दिला. परंतु त्याचा दुरुपयोग करू नकोस असा सल्ला पण दिला.
काही दिवस सर्व व्यवस्थित सुरू असताना त्याच्या मनात अहंकार शिरला. त्याला त्याच्या शक्तीचा गर्व चढला आणि तो वाटेल त्याचे भस्म करू लागला. त्याच्या असुरी शक्ती जागृत झाल्या. तो भस्मासुर म्हणून कुख्यात झाला. त्याने भूतल त्राही त्राही करून सोडले. आपल्या शक्तीने आपण कुणालाही परास्त करू शकतो असा उन्मत्त भाव त्याच्या मनात जागृत झाला.
एके दिवशी तो शंकराच्या च्या पाठीमागे लागला. त्यांनी कैलास सोडला. भस्मासुराची व त्यांची दृष्ट भेट झाली ती पाचोरा येथील पाताळेश्वर परिसरात. शंकर तेथून उत्तरेकडे बहुळाच्या दिशेने निघाले .बहुळेच्या काठी त्यांनी भैरवांना वर दिला. खेड्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांना तिथेच थांबवले. ते स्थान वरखेडी म्हणून प्रसिद्ध झाले. सावखेड्याच्या पुढे गेल्यानंतर ते गुप्त झाले. ती जागा गुप्तेश्वर महादेव म्हणून ओळखली जाते.
येथील मंदिराचे वैशिष्ट्य असे की, येथे शिवपिंड नाही. पाषाणालाच शाळुंखेचा नैसर्गिक आकार असून त्यातून जिवंत पाण्याची धार सतत वाहत असते. पूर्वी ती झऱ्यासारखी वाहत असे. आता थोडाफार ओलावा दिसतो. भस्मासुर शंकराचा पिच्छा पुरवत तिथपर्यंत आला.
शंकर भोजे परिसरात रुद्रेश्वर येथे प्रकट झाले. येथील मंदिरात शंकराची भलीमोठी पिंड आहे. ही पूर्णपणे चिखल गाळात रुतलेली होती. मंदिर भग्न झालेले होते. गावकऱ्यांनी खोदकाम करून ती मोकळी केली व नवीन मंदिर निर्माण केले. या परिसरात प्राचीन शिवमंदिराचे अवशेष सापडतात.( येथील रुद्रेश्वर मंदिराविषयी एक स्वतंत्र लेख लवकरच प्रकाशित करतो.)
भस्मासुर रुद्रेश्वर स्थानापर्यंत पाठलाग करत आला. त्यामुळे शंकरांनी पूर्वेकडे बहुळेच्या काठाने बहुळा व डूबा या संगमावर विश्रांती घेतली. शंकरांचा पिच्छा पुरवत भस्मासुर तिथे जाऊन पोहोचला. शंकरांची अशी अवस्था पाहून विष्णूने मोहिनी रूप धारण केले व भस्मासुराला या संगमावर रोखून धरले .शंकर बहुळेच्या काठाने थेट अजिंठा पर्वत रांगेत तिच्या उगमापर्यंत जाऊन पोहोचले. तिथून त्यांनी मागे वळून पाहिले. म्हणून या जागेला मुरडेश्वर असे नाव प्राप्त झाले .
शंकरांनी मागे वळून पाहिले तर काय ,एक सुंदर ललना भस्मासुराला मोह पाशात अडकवण्याचा पूरेपूर प्रयत्न करत होती .मोहिनीने नृत्य प्रारंभ केले व आपल्या तालावर भस्मासुराला नाचायला भाग पडले. नृत्यात तल्लीन झालेल्या मोहिनीने आपला एक हात डोक्यावर ठेवला. तिचे अनुकरण करत भस्मासुराने देखील आपला हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि त्या क्षणी तो धाडधाड पेटत जमिनीवर कोसळला. त्याचा अंत झाला. विष्णूने मोहिनी रूपाचा त्याग केला. ते आपल्या मूळ स्वरूपात प्रकट झाले. शंकरांनी हर्षातिरेकाने त्यांना मिठी मारली. दोघांची कडकडून गळाभेट झाली.
हा प्रसंग जेथे घडला ते स्थान म्हणजे हरिहरेश्वर मंदिर होय. आता या आख्यायिकेतील महत्त्वाचा भाग बघू .पाचोर्यातील पाताळेश्वर ते अजिंठा पर्वतरांगेतील मुर्डेश्वर असा शंकरांनी केलेला प्रवास हा मध्य काळापर्यंत व्यापारी मार्ग होता .मराठवाड्यातील व्यापारी घाटमाथ्यावरचा माल जोगेश्वरी मुर्डेश्वर येथील घाटातूनच खाली उतरवून खानदेशात प्रवेश करत असत. आजही सावखेडा येथील भैरवनाथ यात्रेत मराठवाड्यातील गुळाला मोठ्या प्रमाणात मागणी असते.
येथील भैरवनाथाला सव्वाच्या पटीत गुळाचा नैवेद्य देण्याची परंपरा आहे. मुर्डेश्वर ,हरिहरेश्वर, रुद्रेश्वर या मंदिरांचे प्राचीनत्व व तेथील दगडी शिल्पे इतिहासात डोकवायला भाग पाडतात.
या आख्यायिकेतील अजून महत्त्वाचा भाग म्हणजे भस्मासुराचे मागे लागणे आणि शंकराचे पलायन ही प्रतीकात्मक रूपे आहेत. जीवनात अनावश्यक संकटे मागे लागली की प्रत्येकाला तोंड देत शक्ती विनाकारण वाया न घालवता त्यापासून माघार घ्यावी लागते .ही यशस्वी माघार असते. अनेक महापुरुषांनी अशी यशस्वी माघार घेतल्याचे दिसून येते.
कुवत नसताना प्रचंड शक्ती हाती आली की व्यक्ती किती पाशवी वर्तन करू शकते याचे उदाहरण म्हणजे भस्मासूर होय. व्यक्ती कितीही सामर्थ्यशाली असली तरी स्वतःचा विवेक गहाण ठेवून दुसऱ्या च्या तालावर नाचू लागली की त्याची फलनिष्पत्ती काय होते हे भस्मासुर कथेतून शिकायला मिळते.
अविवेकी अनिर्बंध वर्तनाला वेसण घालण्यासाठी शांत संयमी व विवेकशील बुद्धिने घेतलेला निर्णय म्हणजे विष्णूचे मोहनी रूप होय. मानवी वर्तनाच्या प्रत्येक निकषावर या कथा घासून पहिल्या तर त्यातील यथार्थता लक्षात येते. खुळचट आणि अनैतिहासिक म्हणून त्यांची हेटाळणी करण्यापेक्षा मानवी व्यवहाराचे ते एक निष्कर्ष आहे असे मानले तर या कथा त्रासदायक ठरत नाहीत. हरी आणि हर यांची भेट म्हणजे शैव आणि वैष्णव या संप्रदायांचे मनोमिलन आहे .त्यांच्यातील समन्वय सांस्कृतिक इतिहासाला मोठी कलाटणी देणारी घटना आहे .त्याचे प्रतिबिंब सांस्कृतिक भाव धारेत आढळून येते. हा समन्वय प्राचीन भारताच्या सांस्कृतिक इतिहासात खूपच मोलाचा ठरला .
पिंपळगाव हरेश्वर येथील हरिहरेश्वर मंदिर निर्मितीचा कालखंड पूर्व पेशवाई कालीन असावा याबाबत मते मतांतरे आहेत. मंदिराच्या पायऱ्या व घाट निर्मितीचा कालखंड शके1841 म्हणजे 1919 असा आहे. येथील पायरी लेख हा जगातील सर्वात लांबीचा शिलालेख आहे .
या शिलालेखाचे वाचन, हस्तलिखित संशोधन विभाग ,दख्खन पुरातत्त्व व सांस्कृतिक संशोधन केंद्र भारत सरकारचे संचालक तथा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील गांधी संशोधन केंद्राचे समन्वयक श्री भुजंगराव बोबडे यांनी केले आहे. या शिलालेखाची लांबी 15 मीटर नऊ इंच रुंदी 9 इंच आहे. शिलालेखांची भाषा मराठी असून लिपी देवनागरी आहे. भुजंगराव बोबडे व शेंदुर्णी येथील प्राध्यापक डॉक्टर प्रशांत देशमुख यांनी या शिलालेखाचे वाचन केले आहे.
ते पुढील प्रमाणे ….।। ओम श्री हरिहरेश्वराय नमः या फरशी चे काम शके१८४१ मध्ये झाले. त्यात मेहनत व लक्ष घालणारे सद्गृहस्थ मे. मामलेदारसो. श्रीधर आर.टी. देव जहागीरदार सीताभ्रतार श्रीधर यांच्यातर्फे मुखत्यार रामभाऊ रामचंद्र जोशी यांनी जहागिरीचे उत्पन्नातून खर्च रुपये २५००शे केला. जमाखर्च लिहिण्याचे काम रा नथू कुंता पाटील यांनी केला. बाकी कामात लागणारी सर्व सिद्धता व देखरेक देवराज मरडाजी पाटील यांनी केली. कारागीर कुऱ्हाडकर रामभाऊ, दगडू शिंपी, व. द. पंचाळ, ब्राह्मण व मंडळी, दगड पाडणारे पांडू गोविंदा माळी व मंडळी ।। ।। देह त्यागिता किर्ती मागे उरावी, मना सज्जना हेचि क्रिया धरावी ।। श्री समर्था चे म्हणण्यावरून पुढे रा —केल्या कामास कोणी आश्रय देतील अशी आशा आहे. रा. त्यांनी वाड्यातील— फरशी चे प्रमुख खर्चाने केला. लेखक केशव दगडू मिस्त्री पतर दिले.
हा शिलालेख पायरीच्या अनेक दगडांवर कोरून एकाच रांगेत बसवला आहे. त्यामुळे याला पायरी लेख असे नाव दिले गेले. पायर्या चढून वर आले की उजव्या बाजूला एक सात फूट उंचीचा अखंड पाषाण रोवलेला आहे. त्यावर एक आकृती आसन घालून बसलेल्या अवस्थेत कोरलेली दिसते. या पाषाणाला भस्मासुर म्हणतात. तिथून मंदिराचा बाह्य परकोट सुरू होतो. त्याची उंची साधारण 28 फूट आहे. परकोटा चे बांधकाम चारही बाजूंनी बंदिस्त आहे. आत जाण्यासाठी एकच मुख्य दरवाजा आहे. त्या समोर घाट पायरीवर भला मोठा नंदी लक्ष वेधून घेतो.
मुख्य दरवाजातून आत प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला सुंदर दगडी महिरपीत कोरलेल्या छत्र्या नजरेत भरतात. पाटणादेवी येथील भास्कराचार्य व त्यांची कन्या लीलावती यांच्या समाध्या पिंपळगाव येथील हरेश्वर मंदिरात पाहिल्याने आश्चर्य वाटले.( याविषयी एक स्वतंत्र लेख लवकरच प्रकाशित करतो.) पिंपळगाव हरेश्वर येथील भास्कराचार्यांची समाधी पाच बाय पाच फूट उंचीच्या चौथर्यावर उभारली आहे. त्याला आधार देण्यासाठी चार फूट उंचीचा चौकोनाकृती ओटा बांधला आहे. सुंदर कोरीव काम केलेल्या चार दगडी स्तंभावरील नक्षीकाम साधे असले तरी महिरप सुंदर आहे .त्यावर दगडी छत आकर्षक रित्या बसवले आहे .छतावरील घुमटाकार कळस अलीकडे बसवला असावा.
या संपूर्ण मंदिराला स्थानिक गावकऱ्यांनी रंगरंगोटी करण्यापूर्वी सिमेंट व नर्मदा रेतीचे लिंपण केले आहे .त्यामुळे मंदिर पेशवेकालीन वाटण्याऐवजी अलीकडच्या काळातच बांधले याचा भास होतो. पाषाणावरील कोरलेली शिल्पे किंवा पानाफुलांच्या आकृती सिमेंटच्या अतिरेकी माऱ्यात धाराशयी पडल्याचे स्पष्टपणे दिसते .जीर्णोद्धार कर्त्यांनी फक्त मजबूतीकडे लक्ष दिले. त्यात एक समृद्ध वारसा आपल्याकडून कायमचा पुसला जातो याचेही भान मंडळींना राहिले नाही.
भास्कराचार्य यांच्या बाजूला असलेली लीलावती यांची समाधी मात्र अलीकडच्या काळात बांधली गेल्याचे स्पष्टपणे दिसते. या समाधीच्या शेजारी नंदीमंडप असून स्वतंत्र नंदीची मुर्ती त्यात सुशोभित आहे. नंदीच्या गळ्यातील घंटांची माळ पाठीवरून शेपटीपर्यंत दर्शवली आहे. दोन बालिका आकृती नंदीच्या गळ्यातील घंटा वाजवताना चित्रित केल्या आहेत. नंदीमंडपाचे चारही खांब दगडी कोरीव कामाने सुशोभित केल्याचे स्पष्टपणे दिसते. त्यावरील जोतरे व तुळया लक्ष वेधून घेतात. नंदी मंडपाला आधार देण्यासाठी अलीकडे सिमेंटचे बांधकाम करून मजबूत केल्याचे स्पष्टपणे जाणवते. येथे नंदीमंडप स्वतंत्रपणे उभारला आहे. मंदिराच्या सभागृहात प्रवेश करताना दोन दगडी स्तंभावरील कलश व पाने लक्ष वेधून घेतात. त्याच्या बाजूला अलीकडच्या काळात गणपती मंदिर बांधून त्यात सुबक श्री गणेशाची संगमरवरी मूर्ती प्रतिष्ठित केली आहे.
सभागृहात प्रवेश केल्यावर वितानाची उंची व गाभाऱ्याची भव्यता नजरेत भरते. अलीकडे केलेले सिमेंटचे काम व रंगकाम यामुळे आपण चित्रपटातील एखादा थर्माकोलचा सेट पाहतोय की काय असा भास होतो. सभागृहाच्या दोन्ही बाजूला देवकोष्ठके आहेत पण त्यातील मूर्ती मात्र नाहीशा झालेल्या आहेत. सभागृह व गर्भगृह यातील अंतरिक्ष आठ दगडी खांबांवर तोललेला आहे. सभागृहातून प्रवेश केल्यावर सुद्धा शिव पिंडी चे दर्शन होत नाही हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.
महाद्वारा वरील नक्षीकाम पानाफुलांचे असले तरी पायथ्याला यक्ष किन्नर गंधर्व मूर्ती स्पष्टपणे दिसतात. अंतरिक्षाच्या उजव्या कोनाड्यात गणपती मूर्ती चटकन लक्षात येत नाही. ती फारच सुंदरआहे. महाद्वाराच्या उंबरठ्यावर आल्यावर गर्भगृहातील शिवपिंडीचे वरतून दर्शन होते. आठ ते नऊ पायऱ्या उतरून गर्भगृहात जावे लागते. येथील शिवपिंडी विलोभनीय आहे .संपूर्ण गर्भगृहाला आतून संगमरवरी बांधकाम केले असून पुरेशी विद्युत रोषणाई केली आहे. त्यामुळे दर्शन व्यवस्थित घेता येते. येथील गर्भगृहाची खोली अन्य शिवमंदिरापेक्षा अधिक आहे. येथील शिवपिंडीवर नित्य पूजाअर्चा व नैवेद्याचा मान गुरव घराण्याकडे सोपवला आहे.
येथील पिंडी चे वैशिष्ट्य म्हणजे शाळुंखे वरील लिंगाचे दोन भाग स्पष्टपणे दिसतात .त्यापैकी अर्धा भाग विष्णू स्वरुप तर अर्धा शिव स्वरूप मानला जातो. विष्णू स्वरूपाला तुळस तर शिव स्वरूपाला बेलपत्र वाहण्याचा प्रघात आहे. एकाच पिंडीवर शिव आणि विष्णू यांची पूजा एकाच वेळी केली जाते. अशी ही खानदेशातील आगळीवेगळी परंपरा येथे पाहायला मिळते. कारण भस्मासुर वधानंतर याच ठिकाणी शिव आणि विष्णू यांची गळाभेट झाली होती. म्हणून शैव आणि वैष्णव परंपरांचा सुंदर मिलाफ येथे पाहायला मिळतो.
आषाढी व शिवरात्रीला येथे भाविकांची प्रचंड गर्दी होते .चार वर्षांपूर्वी या पिंडीवर वज्रलेप चढवण्यात आला. गर्भगृहात रिकामे देव कोष्टक आहे. त्या वरील दगडी नक्षीकाम वाघळी येथील मुधाईदेवी मंदिरातील देव कोष्टकांत सारखेच आहे. गर्भगृहाचे वितान सुमारे पंचवीस फूट उंचीची असून त्यावर अप्रतिम नक्षीकाम केलेले आहे व पंख्यांची सोय केल्याने वायुविजनाची सोय झाली आहे.
बाहेरच्या बाजूला गणपती मंदिरा शेजारी एक गोलाकार दगडी बाणा बसवलेला दिसतो. शेगावचे संत श्री गजानन महाराज येथे दर्शनासाठी आल्यावर याच ठिकाणी ध्यान मुद्रित आसनस्थ होते असे सांगितले जाते. मंदिर गर्भगृहाचे बाह्य काम नागर शैलीतील आहे. त्यावर उडीसा मंदिर शैलीचा स्पष्टपणे प्रभाव जाणवतो. शिखरावरील कळस मात्र चौकोनी असून त्यावर गोलाकार घुमट चढवला आहे. त्याची रचना केदारनाथ मंदिर शिखर सदृश्य असल्याचा भास होतो. मंदिराच्या बाह्य भागावर तीनही बाजूंनी देवकोष्ठके आहेत परंतु त्यात मूर्ती मात्र नाहीत. कदाचित त्यांची झीज झाली असावी.
पाठीमागे नरसिंह प्रकट व हिरण्यकश्यपूचा वध अशी दोन स्वतंत्र शिल्पे आढळतात. त्यावर कीर्तिमुख कोरलेला आहे तर उजव्या बाजूला महिषासुरमर्दिनीची आकृती स्पष्टपणे दिसते. त्या खालील मूर्तीची पूर्णपणे झीज झाल्याने मूर्ती ओळखता येत नाही. मंदिर पाठीमागे सुंदर कमळ फुले मन वेधून घेतात. त्यासाठी खास पुष्करणी तयार केलेली आहे. त्यात गुलाबी, पांढरे ,गर्द निळे, जांभळे अशा विविधरंगी कमळ फुलांचा ताटवा डोळ्यांचे पारणे फेडतो.
पिंपळगाव गावापासून साधारणता दीड किलोमीटर अंतरावर असलेले हरिहरेश्वर मंदिर हे खानदेशातील वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे .त्याला पौराणिक तसेच ऐतिहासिक संदर्भ आहेत. संत गोविंद महाराज यांची समाधीदेखील याच गावात आहे.( त्यांचे विषयी स्वतंत्र लेख लवकरच प्रकाशित करतो.)
गावातून मंदिरापर्यंत जाण्यासाठी अलीकडे स्वतंत्र सिमेंटचा रस्ता बनवल्यामुळे भाविक तसेच पर्यटकांना जाणे सुलभ झाले आहे. पावसाळ्यात हा परिसर फारच रम्य भासतो. लोकप्रतिनिधींनी व इतिहास अभ्यासकांनी या मंदिरातील सर्वात लांबीच्या शिलालेखाची गिनीज बुक मध्ये नोंद होईल यासाठी प्रयत्न करावेत ही कळकळीची विनंती.
श्री गोविंद महाराज यांच्या समाधी मंदिरापासून हरिहरेश्वर मंदिराकडे जातांना डाव्या बाजूला एक सुंदर गणपती मंदिर डोळ्यांचे पारणे फेडते. मराठा शैलीतील या मंदिराला कैची पाषणांचा वापर करून मजबुती दिली आहे. शिखरावर चुन्याचे अप्रतिम काम करून सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. त्या कदाचित अष्टसिद्धी असाव्यात असे वाटते. चारही बाजूला ऑइल पेंट ची रंगरंगोटी केल्याने त्या मूर्तीतील सूक्ष्म तरल भाव ओळखता येत नाहीत परंतु मंदिर फारच रेखीव सुबक आहे. पेशवेकालीन असलेल्या या मंदिराला आवर्जून भेट द्यावी असेच हे मंदिर आहे. मंदिरातील गणेश मूर्ती चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी, मुधाईदेवी, पाचोरा तालुक्यातील नगरदेवळे येथील संगमेश्वर मंदिरातील गणेश मूर्तीची विलक्षण साधर्म्य दर्शवते त्यामुळे ही मूर्ती परिसरातील एखाद्या मंदिरातून येथे प्रतिष्ठापित केली असावी का असाही प्रश्न निर्माण होतो.
काही असो, हा संपूर्ण परिसर निसर्गाच्या सानिध्यात असल्याने एका दिवसाच्या सहलीसाठी फारच सुंदर आहे. येथून जवळच सह्याद्रीच्या अजिंठा पर्वत रांगेत मुर्डेश्वर आचे प्राचीन मंदिर आहे. पावसाळ्यात पर्यटनाची हौस असणाऱ्या गिरी प्रेमींनी आवर्जून भेट द्यावी असे हे ठिकाण आहे. पर्यावरणप्रेमी, निसर्ग वेडे पक्षीप्रेमी चातक, धार्मिक आस्थावान व इतिहास अभ्यासक या सर्वांना हे स्थान निश्चितच भरपूर आनंद देईल असे आहे. दिवाळीच्या सुट्टीत एका दिवसाच्या सहलीसाठी अतिशय योग्य असे हे स्थान आहे.
संजीव बावसकर, नगरदेवळे, जळगाव
https://www.discovermh.com/harihareshwar-temple-pimpalgaon/















No comments:
Post a Comment