अनेक जण रामटेकला त्याच्या धार्मिक महत्त्वामुळे जातात, काही कालिदासाच्या संबंधांमुळे तर काही भोसल्यांच्या मंदिरांमुळे. पण, बहुतांशी लोकांना येथील वाकाटककालीन मंदिरांबद्दल माहिती नसते. आता आतापर्यंत, रामटेक परिसरात तुलनेने साधी दिसणारी काही मंदिरे, त्यावरील चुन्याच्या थरांमुळे भोसले काळातील (त्या काळात जीर्णोद्धार झाला होता) दुय्यम समजली गेली. पण, तत्कालीन राज्य पुरातत्व खात्याचे संचालक, डॉ. अ. प. जामखेडकरांनी प्रयत्नपूर्वक चुना काढून या मूळ वाकाटककालीन (इ.स. ४-५वे शतक) दगडी मंदिरांचे स्वरूप सर्वांसमोर आणले. यामध्ये रुद्र नरसिंह मंदिर, केवल नरसिंह मंदिर, भोगराम मंदिर, गुप्तराम मंदिर, वराह मंडपाचा समावेश आहे.
रामटेकच्या टेकडीवरील शुष्कसांधी ( म्हणजे चुना न वापरता उभारलेली ) मंदीरे अनेक तर्हांनी आगळीवेगळी आहेत. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील शुष्कसांधी मंदीरांची उभारणी उत्तर भारताप्रमाणे इ.स. सहाव्या शतकाच्या काळात झाली.त्या आधी महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन शुष्कसांधी मंदीर इ.स. १०६० मधील अंबरनाथ येथील शिवमंदीर हे असावे असे संशोधकांना वाटत बोते.
मुख्य म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात एकत्रित मंदीरे दुसर्या कोठे पहायला मिळत नाहीत. अगदी गुप्त राजाच्या मुलुखात ही नाहीत. त्याचप्रमाणे मंदीरातील शिल्पांची वैशिष्ट्यपुर्ण शैली आणि केवल नरसिंह मंदीरात सापडलेला प्रभावती गुप्ताचा प्रशस्तीलेख यावरुन हि मंदीरे इ.स.पाचव्या शतकात बांधली गेली हे निसंशयपणे सांगता येते.
तिसरे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इथले मंदीर उभारणारे स्थपती खुपच कल्पक आणि सर्जनशील होते. त्यांनी मंदीराची उभारणी करताना हेतुपुरस्पर दोन प्रकारचे दगड वापरले. मुर्तीशास्त्राच्या दृष्टीकोणातूनही महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन वैष्णव मुर्ती या मंदीरात होत्या.
आपल्याला गुप्त वाकाटक काळ हा मंदिर विकास प्रक्रियेतील आरंभीचा काळ या मंदिरांच्या बांधणीतून दिसतोच व त्यांचा वाकाटक काळातील असण्याचा सबळ पुरावा आपल्याला केवलनरसिंह मंदिरातील प्रभावती गुप्त (वाकाटकांची सून असलेली गुप्त राजकन्या) हिच्या ब्राह्मीलिपीतील शिलालेखात आढळतो. रुद्र नरसिंह व केवल नरसिंह मंदिरातील महाकाय नरसिंहांच्या मूर्ती विलक्षण असून सुखासनात एका हातात चक्र घेतलेले आढळतात. जगतीवर (पीठावर) उभ्या असलेल्या रुद्र नरसिंह मंदिरात बाहेरील बाजूने आठ पाण्याची कुंडं दिसतात. दोन्ही मंदिरांच्या द्वारशाखेवरील तुंदिलतनु यक्षगणांच्या मूर्ती अजिंठ्यातील यक्षप्रतिमांची आठवण करून देतात. भोगराम मंदिर हे द्विगर्भी मंदिर एका आयताकृती मंडपाने जोडले आहेत; सध्या तिथे महानुभवांचे ठाणे आहे. यज्ञवराह हे विष्णू अवतारातील प्राणीस्वरूप आपल्याला चारखांबी वाहन मंडपात दिसते. त्रिविक्रम मंदिर बहुतांशी नष्ट झाले असले तरी त्रिविक्रम मूर्ती सौष्ठवयुक्त असून मंदिराच्या भागांवरील कोरीव काम लक्ष वेधून घेते.
नरसिंहाचे आपण अनेक प्रकारची शिल्पे पाहिली असतील..
पण केवल नृसिंह हे त्यातील एक दुर्मिळ शिल्प..
नागपुर पासून जवळपास 40-50 किमी अंतरावर असणाऱ्या आणि भोसल्यांच्या स्थापत्यकलेने नटलेल्या 'रामटेक' शहरातील एक पुरातन मंदिर..
80 च्या दशकपर्यंत एक फार मोठे शिल्प स्थानिकांकडून पूजले जायचे.
लोकांच्या-भक्तांच्या मते ते एका मारुतीचे शिल्प होते.
पुण्यातील ज्येष्ठ इतिहास व पुरातत्व अभ्यासक जामखेडकर सर हे या हनुमानाच्या मंदिरात एका सर्वेक्षणासाठी आले होते.मंदिरातील साऱ्या भिंतीवर चुनखडीचा मोठा लेप देण्यात आलेला होता,ज्यामुळे मंदिरातील स्थापत्यशिल्प आणि कलेवर त्याचे दुष्परिणाम झाले असते,म्हणून ते साफ़ करुन त्याचे संवर्धन करण्याचे काम हाती घेण्यात आले,आणि ह्याच कामात अचानक हाती आला एक मोठा ठेवा..
इसवी सन तिसऱ्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्राच्या विदर्भ आणि थोड्याफर प्रमाणात मध्य महाराष्ट्रात एक शक्तिशाली साम्राज्य उदयास आले.दोन शाखांमधे विभागल्या गेलेले 'वाकाटक' घराणे म्हणजे एक प्रतिष्ठीत घराणे..
ह्याच घराण्यातील 'वत्सगुल्म' शाखेच्या राजांनी अजिंठा लेणीमधे आपल्या कलेची छाप उमटवली.आणि दुसऱ्या 'नंदिवर्धन' शाखेने विदर्भात अभुतपूर्व राज्यक्रांति केली.
गुप्त घराण्याशी वैवाहिक संबंध जोडून आपल्या साम्राज्याची सीमा वाढवणाऱ्या या शाखेची सून म्हणजे "प्रभावतीगुप्त"..!!
आणि तीच्या कारकिर्दीमधे हे मंदिर बांधण्यात आल्याचे उलेख मंदिरातील शिलालेखात आढळून आले.
मंदिर संवर्धन करत असताना अचानक हाती आलेल्या ह्या शीलालेखामुळे इतिहास बदलला.
वाकाटक साम्राज्याने मंदिर बांधल्याचा पहिला पुरावा हाती आला.पुरातत्वाची मदत घेऊन इतिहासचे नवे पैलू उलगडल्या गेले.
आतल्या मुर्तीवर चढवलेला शेंदुराचा थर काढण्यात आला,आणि समोर आले हे अतिविशाल शिल्प..
हे शिल्प मारुतीचे नसून,नृसिंहाचे होते.जवळ जवळ 6 फुट उंचीच्या ह्या शिल्पात असणारी अखंड नृसिंहाची मूर्ती निव्वळ अद्भुत आहे.हातात चक्र असल्याने ह्या मूर्तिला 'चक्रपाणी' ह्याही नावाने ओळखतात.
लक्ष्मीशिवाय असणाऱ्या ह्या शिल्पाचा उल्लेख 'केवल नृसिंह' असा केला जातो.
आज ही जागा पुरात्तव खात्याच्या अखत्यारित्या आहे आणि त्याचमुळे ही मूर्ती,मंदिरातील शिलालेख सुस्थितीत आहेत.
पण लोकांची ह्या मारुतीवर श्रद्धा एवढी,की अगदी हुबेहुब ह्या शिल्पासारखे छोटे शिल्प तयार करुण आणून,मंदिराच्या समोरच छोट्या मंदिरात स्थापन करुण त्याला शेंदुर लावला आणि त्याची अजूनही मारुती म्हणूनच पूजा केली जाते..!!
ह्याच मंदिरापासून थोड्या दुरवर अजून एक नृसिंहाचे मंदिर आहे.त्यातील शिल्पही तेच,मंदिर बांधनीही तीच आणि नृसिंहही एकटा..पण ह्याचे नाव 'रूद्रनृसिंह'
प्रभावतीगुप्त हिने तीच्या पतिच्या,रुद्रसेना याच्या स्मृतीमधे हे मंदिर बांधले होते.
5 व्या शतकापर्यंत मध्य भारतावर जवळ जवळ 250 वर्षे राज्य केलेल्या ह्या साम्राज्याचे स्थापत्यकलेतील योगदान उलगडले आणि समोर आला एक वैभवशाली इतिहास..!!
- केतन पुरी
गडमंदिर टेकडीच्या पायथ्याशी रामटेक गावातील 'गवळीपुरा' वस्तीत अठराभुजा गणपतीचं अतिशय प्राचीन मंदिर आहे. हा गणपती विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक आहे. या मंदिरापासून दीड किलोमीटरवर 'शांतीनाथ जैनमंदिर' आहे. भगवान शांतीनाथाचं मुख्य मंदिर असलेल्या या परिसरात एकूण नऊ मंदिरं आहेत. या देखण्या मंदिरांचं कोरीवकामही पाहण्यासारखं आहे. विदर्भातील जैन बांधवांची इथं नेहमी वर्दळ असते. येथील एका हॉलमध्ये जैन देवतांच्या, पंचधातूंच्या २४ मूर्ती ठेवलेल्या असून नव्यानं आकारास येणाऱ्या 'श्री चोबीसी जैन मंदिरा'त त्यांची प्रतिष्ठापना व्हायची आहे. गडमंदिराच्या खाली तीन-चार किलोमीटरवर हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेला नयनरम्य खिंडसी तलाव आहे. तेथील उद्यानात नौकाविहारासाठी पॅडल बोट, वॉटर स्कूटर, स्पीड बोट या नौका तसंच अॅडव्हेंचर स्पोर्ट्स उपलब्ध आहेत. इथं असलेल्या एम.टी.डी.सी. हॉलीडे होम आणि खासगी हॉटेल्समध्ये राहण्याची सोय होऊ शकते. येथील अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि बोटींगच्या सोयीमुळे रामटेकला जाणारे बहुतेक पर्यटक खिंडसीला गेल्याशिवाय रहात नाहीत. इथं लवकरच पॅराग्लायडिंगचीही सोय उपलब्ध होणार आहे.
गुप्तराम या दर्शनी बांधीव खांब असलेल्या मंदीरासमोर शीर्षविरहीत विष्णुची प्रतिमा आढळली. यावरुन मिराशी म्हणतात तसे वराहाची प्रतिमा उत्तरकालीन नसून वाकाटककालीन आहे हे समजले.तसेच केवल नरसिंह मंदीराच्या दाराची चौकट बघीतल्यावर असे लक्षात आले कि असेच यक्ष गण भोगराम या जोड मंदीराच्या वेदीच्या भागावर ओळीत कोरले आहेत.आतमधील चौकटीच्या भागावर एक रेखीव मगर ( मकर ) कोरलेला आढळला. भोगराम मंदीराच्या दर्शनी वितीमध्ये व गाभार्याच्या छतावर आढळलेली कमलाची तबके हुबेहुब केवल नरसिंह मंदीराच्या छतावरील तबकाप्रमाणे होती.यापुर्वी या परिसराचे संशोधन अकेक्झांडर त्याचा मदतनीस बेगलर व कंपनी सरकारचा अधिकारी वेलस्टेड यांनी केले होते. मात्र हे सर्व ख्रिश्चन असल्यामुळे रामटेकगडाच्या मुख्य प्रवेशद्वारापलीकडे जाण्याची त्यांना परवानगी मिळाली नाही. सहाजिकच बेगलर यांनी मिळवलेल्या माहितीला मर्यादा आल्या. मात्र बेगलर यांना केवल नरसिंह, भोगराम, गुप्तराम आणी वराह हे मंदीर जवळून बघण्याची संधी मिळाली. नागपुरमधील भोसले घराण्याची राजवट जरी इंग्रजांनी संपुष्टात आणली असली तरी रामटेकगडावरील राम, लक्ष्मण मंदीरे , बाहेरची लेणी भोसले संस्थानाच्या ताब्यात होती. या ठीकाणची पुजा आणी उत्सव मोठ्या उत्साहाने दरवर्षी पार पाडले जात असत. प्रथेप्रमाणे दरवर्षी भिंतींना सफेदी केली जात असे. नरसिंहाच्या कृपेने प्राप्त झालेल्या पुत्रप्राप्तीच्या आनंदात मुर्तीला लाल शेंदराचा लेप चढवला जात असे. आधी जानोजी भोसले जेव्हा बंगाल-ओरिसाच्या मोहीमेवर निघाले होते, तेव्हा जबलपुरच्या वाटेवर पहिला मुक्काम रामटेकला पडला. जानोजी भोसलेनी इथल्या देवतांना असा नवस केला कि जर मोहीमेत यशस्वी झालो तर वनवासाच्या काळात ज्या रामटेक क्षेत्री श्रीरामाची पावले उमटली, त्या रामटेकचा जीर्णोध्दार करु. जानोजी भोसले जरी भोसले वंशातील असले तरी सातारकर भोसल्यांच्या प्रमाणे त्यांचे कुलदैवत शिखर शिंगणापुर नसून त्यांचे कुलदैवत श्रीराम होते. आजही त्यांच्या घरी पुजेत श्रीराम पंचायतन व चांदीची श्री समर्थ रामदास स्वामींची मुर्ती आहे. अर्थात ओरिसा मोहीमेत भव्य यश मिळवल्यावर जानोजींनी या सर्वच मंदीराचा जीर्णोध्दार मनापासून केला. अर्थ्यात यामुळे रामटेकगडाचे लष्करी महत्व संपुष्टात आले. सहाजिकच गडाच्या पायथ्याशी बांधलेले तलाव, जीर्णोध्दार केलेली मंदीरे यावर ओरिसाच्या शैलीचा प्रभाव दिसून येतो. यामुळे इथे असलेली सर्व मंदीरे भोसलेकालीन असल्याचा समज पसरला. अगदी बेगलर याचाही स्मज असाच झाला. वराहमुर्तीवर कोणतेही शेंदराचे लेप नसले त्यरी ती मुर्ती सहाव्या शतकातील असल्याचा कोणालाही अंदाज आला नव्हता, अगदी वा.वि.मिराशीसारख्या कसलेल्या संशोधकानाही ही बाब लक्षात आली नाही. नरसिंह देवळाच्या भिंतीशी असलेली नक्षी, चौकटीवरील यक्षगण आणि निधी, वराह मुर्ती आणि भोगराम मंदीरातील कमळाची यबके हे सर्व वाकाटककालीन अवशेष बेगलरच्या लक्षात आले नाहीत. त्याचवेळी मनसर येथील हिंडीबा टेकडी आणि अवतीभवतीचे पुरातन अवशेष वाकाटककालीन आहेत हे वेलस्टेड यांनी ठासून मांडले. मात्र रामटेकला तळ्याच्या उतारावर सापडलेला शंखलिपीतील शिलालेख सोडला तर वाकाटककालीन काहीच नव्हते.वामनशिवाची मुर्तीही नंतर सापडली. हे सर्व १९८३-८४ याच स्थितीत होते.तोपर्यंत केवल नरसिंहाच्या मुर्तीवर दोन इंच सफेदीचा थर चढला होता. पाठीमागून जरी नरसिंहाच्या जटा आणी वस्त्र दिसत असले तरी शेंदराची जाड पुटे जमा झाल्यामुळे हि हनुमानाची मुर्ती असल्याचा समज झाला होता. मंडीराच्या भिंती पाण्याच्या फवार्याने ओल्या करुन पापुद्रे खरवडून काढले. हलक्या हाताने छिन्नीने शेंदराचे थर दुर केले. त्यामुळे मंदपाच्या खांबावरील यादवकालीन संस्कृत शिलालेख उजेडात आला.तसेच ब्राम्ही लिपीतील विस्तृत शिलालेख सापड्ला.त्याच्या वाचनातून हा शिलालेख प्रवरसेनाच्या काळातील असून मंदीरातील मुर्तीचे नाव प्रभावतीस्वामीन आहे, हे समजले. रुद्रनरसिंहाच्या मंदीरावरील मध्ययुगीन चौकट काढली असता. केवल नरसिंहाच्या मंदीराप्रमाणेच इथे गणप्रतिमा सापडल्या. तसेच बाहेर मनुष्याच्या उंचीपेक्षा जास्त भीमकाय अशी द्वारपालाची मुर्ती सापडली. यावरुन व मंदीराच्या खांबावरील अलंकरणावरून हि मंदीरे व शिल्पे इ.स. पाचव्या शतकाच्या प्रथमार्धातील म्हणजे इ.स. ४२५ ते ४४० या काळातील असावी हे स्पष्ट झाले. तर विशालकाय वराहमुर्तीवरील कातडीचा नितळपणा, मुर्तीचा डौल, कान, डोळे कोरताना आणलेली नजाकत यामुळे हि मुर्ती थोडी नंतर म्हणजे पृथ्वीशेष द्वितीय याच्या काळातील असावी हे स्पष्ट झाले. या मंदीराच्या व्यवस्थित जतनामुळे वाकाटककालीन मंदीराचे स्थापत्यातील वेगळेपण लक्षात आले. अंतराळ नसलेली, समोर सभागृह, गाभार्यात प्रदक्षिणापथ असलेली रुद्रनरसिंह मंदीर, समोर अर्धा उघडा मंद्प, असलेले त्रिविक्रम मंदीर, गुहेच्या स्वरुपात असलेल्या गाभार्यासमोर बांधीव अरुंद मुखमंडप हि स्थापत्यातील विवीधता कोणत्याही गुप्त किंवा वाकाटककालीन पुरातत्वस्थळी सापडत नाही. केवल नरसिंहाच्या मंदीरात भद्रासनावर , तळहाती चक्र धरलेला, एक हात उंचावलेल्या गुढग्यावर ठेवून दिमाखात बसलेला नरसिंह हे एक महत्वाचे शिल्प आहे. जीर्णोध्दार करताना या मंदिराचे वाढीव घटाक काढून टाकण्यात आल्यावर मुळ वाकाटककालीन मंदीराचा तलविन्यास तर स्पष्ट झालाच शिवाय दक्षिणेकडील भिंतीवर पंधरा ओळीचा प्रभावतीगुप्ताचा प्रशस्तीलेख सापडला. मंदीराच्या छतावर आढळणारी कमलतबके आणि पाण्याचा निचरा व्हावा यासाठी असलेले दगडी प्रणाल हे मुळ वाकाटककालीन मंदीराचे अवशेष दिसले. मुळ मंदीराचा जीर्णोध्दार करताना छपरावर जवळपास ०.९१ मीटरचा चुनेगच्ची थर टाकण्यात आला. अर्थातच वाकाटककालीन शिखर आता अस्तित्वात नाही. हे मंदीर पश्चिमाभिमुख असून त्याच्या तलविन्यासात गर्भगृह आणि मंडप याचा समावेश आहे. मंदीर जगतीवर म्हणजे जोत्यावर बांधले असून पायर्या चढून आपला मंदीर प्रवेश होते.आतमध्ये स्तंभ आणि अर्धस्तंभ आहेत. मंदीराचे प्रवेशद्वार इंग्रजी (T ) टी आकाराचे असून प्रत्येक बाजुस व त्याच्या वर तीन अशी देवकोष्ठे आहेत. खालच्या कोष्टामध्ये धनाच्या पिशव्या उलट्या करुन नाणी ओतणारे गण दाखवले आहेत तर वरच्या सहा कोष्टामध्ये निरनिराळ्या स्थितीत उभे असलेले गण दाखवले आहेत. खालच्या बाजुला असलेले गण आकाराने वरच्या गणापेक्षा मोठे आहेत.
गर्भगृहापेक्षा मंडप आकाराने लहान असून त्यात वेदीकेवर एकमागोमाग एक छोटी देवकोष्ठे आणि अर्धस्तंभ आहेत. या वेदीकेच्या वर आणि खाली पद्मपत्रपट्ट आहे. गर्भगृहाच्या बाह्यभिंतीच्या मध्यावर देखील अशी वेदीका आहे. हे सर्व अलंकरण त्रिविक्रम मंदीरासारखेच आहे. अर्धस्तंभावर रत्नपट्टाची नक्षी असून खाली मोकळ्या जागेत फुलांची नक्षी आहे.
गर्भगृह आयताकार असून त्याच्या दोन बाजुस गवाक्षे आहेत. गवाक्षावर स्तंभजालिका असून गर्भगृहामध्ये मुर्तीभोवती प्रदक्षिणापथ आहे. गर्भगृहाच्या मध्यभागी चार खांव असणारी चतुष्की आहे. हि चतुष्की एका चौथर्यावर असून याच चौथर्यावर केवल नरसिंहाची मुर्ती आहे. गर्भगृहाच्या पुढे असलेल्या मंडपातही अशीच चतुष्की आहे. गर्भगृह आणि मंडप दोन स्तंभ आणि अर्धस्तंभ यांच्या ओळीने विभागले आहेत. गर्भगृह आणि मंडपातील चतुष्कीचे स्तंभ बेसाल्टचे असून या दोघांना वेगळे करणारे स्तंभ मात्र वालुकाष्माचे ( Sand stone) आहेत. वालुकाष्माचे स्तंभ त्रिविक्रम मंदीराप्रमाणेच वामनस्तंभाप्रमाणे अलंकृत आहेत.
रुद्रनरसिंह मंदीर एका १५.७० मीटर पुर्व-पश्चिम व १०.३० मीटर दक्षिण उत्तर जगतीवर आहे. त्याची जास्तीत जास्त रुंदी ७.१० मीटर व जास्तीत जास्त लांबी ११.४० मीटर आहे. केवल नरसिंह मंदीराप्रमाणे याही मंदीराला सांधार गर्भगृह ( म्हणजे प्रदक्षिणापथ असलेले ) आणि मंडप आहे. मंडप आणि गर्भगृह दोहोलाही चतुष्की आहे. मंदीराच्या मुळ जमीनीवर साठलेला मलबा काढून टाकल्यावर मुळ मंदीराचा तलविन्यास उघड झाला. मुळ मंदीराच्या पडून गेलेल्या भिंतीवर नव्या भिंती घाईघाईने उभारल्या गेल्यामुळे मुळ स्थापत्याशी सुसंगती राखली गेलेली दिसत नाही. मंदीरात साठलेला मलबा काढताना मकरप्रणाल देखील सापडले. तसेच मंदीराची रचना बघता, याला दहा ठिकाणी पुढे आलेले भाग व परिसरात आठ पाण्याची कुंड असावीत. या कुंडातील पाणी देवकोष्ठात असलेल्या मुर्तीच्या अभिषेकासाठी वापरत असावेत. मंडपात प्रवेश करण्यासाठी मध्ययुगीन द्वार काढल्यावर मुळ दरवाजा दिसु लागला. हा दरवाजा मात्र केवल नरसिंह मंदीरासारखा इंग्रजी टी ( ) आकाराचा नाही. या दरवाज्याच्या द्वारशाखांच्या तळाशी गणमुर्ती आहेत.मात्र या गणमुर्तींनी हातात दंड घेतले आहेत.केवल नरसिंह मंदीरावर दाखवले तसे धनाच्या पिशव्या ओतताना दिसत नाहीत. मात्र भोसले काळात या मंदीराचा जीर्णोध्दार होताना, बराच बदल झाल्यामुळे मुळ मंदीराच्या रचनेत भिंतीच्या खालच्या बाजुला वेदीका व गर्भगृहाला दोन खिडक्या होत्या कि नाही ? हे आज ठामपणे सांगता येत नाही.
रामटेक येथील जैन संकुलासमोर हे मंदीर आहे. या मंदीराच्या अंतर्भागाचा जीर्णोध्दार झाला आहे. मुळ मंदीरात केवळ गर्भगृह होते, मात्र मध्ययुगीन कालखंडात याच्या मंद्पाची उभारणी झाली. या साध्या आणि छोट्या मंदिराला त्याच्या शिखरामुळे महत्व प्राप्त झाले आहे. मंदीराच्या वर आयताकृती शालाशिखर आहे.मंदीराच्या बाह्य अंगावर कोणतेही अलंकरण नाही. भिंतीच्या वर आणि शालाशिखराच्या खाली चौरस निमुळते छप्पर आहे. यावरुन ज्याला वलभीप्रसाद म्हणतात म्हणून उल्लेख होतो त्याप्रकारात मोडणारे मंदिर असावे.
वराह मंदीराच्या समोर भोगराम मंदीर असून इथे जाण्यासाठी पायर्यांची योजना केलेली दिसते. मंदीराभोवती सपाट प्रांगणाभोवती नव्याने बांधलेली भिंत दिसत असली तरी त्याच जागी प्राचीन काळी मुळ भिंत असावी. मंदीराला दोन गर्भगृह असावीत. मध्ये चिंचोळी जागा सोडल्यामुळे ती विभक्त झाली आहेत. दोन्ही गर्भगृहे आकाराने सारखी वाटली तरी त्यांच्या मोजमापामध्ये किंचीत फरक आहे. मात्र या दोन्ही गर्भगृहांना एकच मंडप आहे. मंडपाच्या पुढे मुखमंडप असून तो सहा स्तंभावर पेलला आहे.मुखमंडपातील स्तंभ साधे चौकोनी असून त्यांचा तळखडा चौकोनी ठोकळ्यासारखा आहे. खांबाच्या वरच्या भागात अष्टकोनी भाग असून त्यावर वाकाटक शैलीतील साधे हस्त आहेत. या स्तंभावर तबक बघायला मिळत नाहीत. गर्भगृहाला दोन वातायने म्हणजे खिडक्या असून बाह्यांगावर वेदीकापट्ट आहे. तसेच अर्धस्तंभ आणि देवकोष्ठ एकाआड एक असलेला गलपाद पट्ट आहे. देवकोष्ठामध्ये निरनिराळ्या अवस्थेत उभे असलेले गण दाखवले आहेत. तसेच गर्भगृहावरील एका कोष्ठात अधोमुखी झेपावणारी मगर दाखवली आहे.मुखमंडपात तिन्ही बाजुने प्रवेश करता येतो. मंदीराच्या प्रवेशद्वाराच्या छताजवळ असलेल्या भागात कमलतबकावरुन सध्या असलेले छत मुळच्या मंदीराचे असावे असे अनुमान काढता येते. गर्भगृहातील मुळ मुर्ती आज अस्तित्वात नाही. गर्भगृहातील मागील भिंतीला लागून असलेल्या कट्ट्यावर यादवकाळात घडवलेल्या मुर्ती आहेत.
Temples around Ambala lake, Ramtek- hidden treasures of India
I had not read or heard about Ambala lake in Ramtek and the temples around it despite visiting Nagpur several times. So when my sister took us to this place, the pleasure of finding these hidden treasures was immense. My travelogue today narrates this beautiful experience of visiting a relatively unknown & less visited destination.
Introduction
Ramtek is located at a distance of about 50 km from Nagpur. It is a small, religious town that is steeped in mythology & legends. The presence of several hills like Ramgiri hill, Kaikai hill, Motha Parvat & Narayana Tekdi hills along with water bodies like Khindsi lake, Ambala lake/tank make the place scenic & picturesque. Over the centuries, several kings built temples in Ramtek which added to its religious significance. Once upon a time there were 27 tanks in Ramtek. Two rivers Kaal & Sur meet near Ramtek and create Khindsi lake.
Ramtek is relatively unknown or lesser known to people outside Nagpur and that has actually helped the place retain its peaceful environs, pristine charm & tranquility.
Mythology & legends associated with Ramtek & Ambala Lake
There are many legends, myths & mythological stories associated with Ramtek Ambala lake.
Legend of Hiranyakashyap, Lord Narasingh and creation of Ambala Lake
It is the belief that the king of daityas, Hiranyakashyap lived here. The boon that he had received from Lord Brahma made him invincible. This made him believe that he was more powerful than the gods and he started spreading terror in the region. Lord Vishnu had to take Narsingh (half man – half lion) avtaar (incarnation) to slay him. Lord Narsingh slayed Hiranyakashyap atop a hill. Then in a fit of rage he lifted the cudgel and threw it from the top with a tremendous force. This created a crater on the ground and Ambala lake was formed.
The stones & rocks on the hills look red in colour when sunlight falls on them. The legends attribute it to the blood of Hiranykashyap falling on them!
Ramtek’s mythological connection with Ram
People believe that during his exile, Ram along with Sita & Lakshman had come to Ramtek. He spent some days on the top of Ramgiri Hills. At that time Agastya Muni along with other Rishis, was also staying in an ashram in Ramtek. The demons used to disturb their havans. When Ram came to know about it he took a vow to rid the earth of all demons. So the place acquired the name ‘Ram+Tek’ that means ‘Vow of Ram’. Another explanation is that ‘tek’ is short version of ‘tekdi’ that in Marathi means hillock. Some others believe that since Ram had rested here it gets the name Ramtek.
Kalidas’s connection with Ramtek
Legends believe that the greatest Indian poet Kalidas had visited Ramtek in the 5th century CE. He was so enamoured with the place that he stayed back for few months. He wrote his celebrated & epic Sanskrit poem ‘Meghdoot’ while staying on Ramgiri hills. It is believed to be one of the oldest travel guides in the world ! People believe that yaksha, the cloud messenger in the poem describes the beauty of Ramgiri hills of Ramtek. Through yaksha’s journey from Ramtek to the Himalayas, Kalidas gives the geographical description of India.
There is a Sanskrit University in Ramtek which carries his name. An annual cultural & literary Kalidas festival takes place in Ramtek during November. Some finest performances of music, dance and drama take place during this festival. The backdrop of picturesque setting of Ramgiri hills, celebrates its glorious cultural heritage. There is a Kalidas Smarak in Ramtek.
History of Ramtek
Ramtek had many ancient names including Ramgiri, Sindooragiri (the vermillion hill) and Tapogiri (hill of penance). In ancient times the region around Ramtek was under the Satavahana and Vakataka dynasties. Remnants of temples in ruins are still found around Ramtek. Much later it came under Yadav influence.
Rudra Temple, Dhoomreshwar, Trivikram, Bhogram and Kapatram temples are architectural remains of Vakataka period.
To commemorate Ram’s visit, there are two large, beautiful temples belonging to Ram & Lakshman on top of Ramgiri Hills. They are at an elevation of 354 metres. As these temples are inside a fortress, they also acquired the name ‘Garh Mandir’. Lakshman’s temple is in the front while Ram’s temple is behind it. This signifies that Lakshman stood in guard in front to ward off the attacks from the demons.
From the 15th to 17th century, Gonds ruled over Ramtek. They built a couple of temples during their reign. By 18th century Ramtek had come under the control of the Bhonsale kings of Nagpur. During the reign of Raghuji or Raghoji Bhonsale (r: 1627-55), a lot of development took place in Ramtek. To commemorate his victory over the fort of Deogarh (Chindwara), he built many temples & ghats around Ambala lake. Beautiful Jain temple of Shantinath near the town came up during the reign of Mudhoji II Bhonsale (Appa Saheb) (r:1816-40).
My trips to Ramtek
I have visited Ramtek twice during my visit to my sister’s place in Nagpur. Once we had visited the Garh temples of Ram & Lakshman and enjoyed boating in the picturesque Khindsi lake. During the second visit we spent a considerable amount of time around Ambala lake. We walked around the lake and hopped from one temple to another that dot the bank of the lake.
Legend of Ambrish
When Ram had visited Ramtek, Ambala tank was small in size. Ambrish was the king of the region and he was suffering from leprosy. Ram advised him to take bath in the water of the tank. As a result, Ambrish was cured of his affliction. He was so happy that he enlarged the tank into a lake. Ever since then, the lake got the name Ambala after the name of the king! (reference: article by Milind Ashok Kamble & Faiz Ahmed Chundeli published in International Journal of Engineering Research & Technology)
The presence of herbs in the hills surrounding the lake add medicinal value to the water of the lake.
Legend of Ashthi visarjan and pind daan
One ghat on the lake is meant for asthi visarjan & for performing the rituals of pind daan. It is called dasakriya ghat. The local population of Ramtek and adjoining areas consider it a sacred place for this ritual.
As per legends when Ram was staying in Ramtek, the annual pitrapaksh (shraadh) period occurred. Ram performed the shraadh of his father on the banks of Ramtek Ambala tank. This act of Ram added sanctity to the place.
Virtual tour of Ramtek Ambala lake
Temples around Ambala Lake
We took a walking tour around the lake and saw a number of temples. The more significant temples were Panchmukhi Shiv temple, Surya temple, Narsingh temple and Laxminarayan temple. Renuka Temple, Bhuteshwar Mandir, Gangastrotra Temple, Chamar Temple, Chhatris, Samadhi, Dagadi Mahal are other significant architectural monuments around Ambala lake.
There is a route via which vehicles can go half the distance to the garh temples. But there is another longer route that goes from Ambala lake via 270 steps to these temples. This route is through thick vegetation and is picturesque.
There are around 12 temples on the way to gadh mandir. It is the belief that if a devotee on the way to the garh temples visits all 12 of them then it is equal to reading entire Valmiki Ramayan in one go.
The temples around Ambala lake have differing designs. Despite the diversity in form & design, there is consistency in their scale and placements. This unique & exquisite water front development of Ambala lake in a valley surrounded by several hills leave the visitors amazed. Unfortunately, today these beautiful temples stand forlorn like neglected beauties.
I understand that in recent years the State Government has realized the religious & architectural significance of these temples. They have sanctioned a separate budget for their restoration and for promotion of tourism in Ramtek. Hope Ramtek & Ambala lake sees better days.
Best season / connectivity /places to stay
The best season is winter from November to February. The monsoon months of August & September is also good.
Ramtek is easily accessible by road from Nagpur. Nagpur is well connected by air, rail & road with all the cities. Tourists use Nagpur as a gateway to visit the various Tiger sanctuaries around Nagpur. Ramtek can be easily covered from Nagpur by making a day trip.
It is better to stay in Nagpur that has many hotels to suit every budget.
Regular Updates
I have clicked all the pics.
In case you have enjoyed going through this travelogue then please comment below. I also request you to share the link with your friends. If you have missed reading my earlier blogs then you can go to the site www.travelindiathroughmyeyes.com and click on the heading of the respective blogs.
You can reach me at rameshkabra1956@gmail.com for any feedback or queries related to this post.
Please follow my Instagram Accounts @rameshkabraexplorer and @artheritageofindia_rameshkabra
I am also on Twitter as rameshkabratraveller @rameshkabra12
I am Life Member of INTACH Nasik Chapter.
Disclaimer:
I have made sincere efforts to provide you the correct information about all the places. The details have been culled out from various sources. I do not take any responsibility for any errors that might have crept in the narration. There is no intention to hurt the faith or religious sentiments of any person or community.
http://travelindiathroughmyeyes.com/temples-around-ambala-lake-ramtek-hidden-treasures-of-india/






















No comments:
Post a Comment