Tuesday, May 16, 2023

पानगाव विठ्ठल मंदीर

 मराठवाडयाच्या भूमीत असलेली एकापेक्षा एक सरस मंदिरे म्हणजे एक फार मोठे आश्चर्य मानावे लागेल .लातूर पासून अवघ्या ३५ किमी वर असलेले पानगाव येथील विठ्ठल मंदिर म्हणजे चालुक्य काळातील स्थापतीना पडलेले जणू सुंदर स्वप्नच ! 
    लातूर अर्थात लत्तलूर हे मध्ययुगीन राजेशाहीच्या काळातले ” राजकीय चुंबकीय क्षेत्र होते” असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. बदामी चालुक्य दुसरा कीर्ती वर्मन कडून इस ७५३ मध्ये लत्तलूर ( राष्ट्रकूट ) निवासी राष्ट्रकूट राजा दंतीदुर्ग यांनी सत्ता हस्तगत केली. या लातूरच्या राष्ट्रकुटांनी आपली सत्ता दक्षिण भारत, पश्चिम भारत ( कोकणासह ) आणि मध्य भारत इथं पर्यंत विस्तारली. पुढे इस ९७३ ला चालुक्य दुसरा तैलप याने राष्ट्रकुटांचा पराभव करून चालुक्याची सत्ता स्थापन केली. या सत्ता स्थापन करणाऱ्या दुसऱ्या चालुक्य तैलप जो उत्तर चालुक्य राजघराण्याचा संस्थापक होता, त्याची सासुरवाडी लत्तलूर म्हणजेच लातूर होती. लत्तलूरच्या “महारट्ट मम्मह ” याच्या मुलीशी राणी जाकव्वा तथा लक्ष्मी बरोबर राजा तैलप याचा विवाह झाला होता. ज्या लातूरच्या रट्टाची मुलगी कल्याणी चालुक्याच्या संस्थापकाला दिली. त्या रट्ट यांच्या ताब्यात आंध्र प्रदेशातील कुल्पक आणि ओरिसातील संभलपूर या संस्थानावर राज्य होतं… या सर्व घटनावरून लातूरचे महत्व अधोरेखित होते. पुढे कल्याणीचा ( अर्थात बस्वकल्याण जि. बिदर ) चालुक्य सोमेश्वर पहिला हा अत्यंत पराक्रमी निघाला आणि त्यांनी राष्ट्रकुट काळापेक्षाही अधिक भूभागावर आपले राज्य निर्माण केले.लातूर जिल्ह्याची आजची सीमा बस्वकल्याण पासून फक्त २५ किलो मीटर आहे. निजामकाळात लातूर भागाचा जिल्हा बिदर असल्यामुळे हे एकच प्रादेशिक भाग होता. कल्याणी चालुक्य सोमेश्वर यांनी मराठवाड्यासह आजचा पश्चिम महाराष्ट्र कोकण, विदर्भ, गुजरात, मध्यप्रदेश ( मावळा प्रांत ) काही राजस्थानचा भाग. दक्षिणेत आंध्रप्रदेश, कर्नाटक, तंजावर पर्यंत राज्य विस्तारले. चाळीस वर्षे राज्य केले.
बदामी चालुक्याच्या काळात दक्षिणेत मोठ्या प्रमाणात मिश्र मंदिर बांधले गेली पण कल्याणी चालुक्याच्या काळात बहुतांश मंदिर बांधली गेली ते विष्णूच्या विविध नावानी.  राजा सोमेश्वरचा सेनापती मधुसूदन यांनी इस १०६२ मध्ये नागदा ( मध्य प्रदेश ) उज्जैन पासून जवळच असलेली आजची औद्योगिक नगरी येथे विष्णू मंदिर बांधल्याचा उल्लेख शिलालेखात आहे ( संदर्भ :- मुजुमदार आर सी, द क्लासीकल एज, यजदानी जी. द अर्ली हिस्ट्री ऑफ द डेक्कन 2, भाग -1 ) आणि याच शिला लेखात त्यांचे राज्य असलेल्या अनेक ठिकाणी या पूर्वी विष्णू मंदिरे बांधल्याचा उल्लेख आहे.नागदा येथील मंदिरावर मिथुन शिल्प कोरलेले आहेत. तसेच मिथुन शिल्प येथेही कोरलेले आहेत

काय काय होते या विष्णू मंदिरात ?
     हे मंदिर त्या भागाचे प्रचंड मोठे सांस्कृतिक केंद्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंदिर प्रतीकात्मक असले तरी त्याच्या आजूबाजूला नाट्यादि करिता नाट्यालय, मुनींच्या ध्यान धारणे करिता अनुष्ठानभवन, गुरुकुल पठण आणि पठणाकरिता मठ इत्यादीचा अंतर्भाव या मंदिर परिसरात असायचा. एका अर्थाने हे मंदिर लोक शिक्षणाचे केंद्र होते. या बरोबर या मंदिरात अनेक तोरणे व प्रासाद ( राहण्यासाठीची जागा ) असून त्यांना सुंदर मूर्तिनी अलंकृत केले होते. त्या समोर गरुड स्तंभ आणि सभोवार तट होता.
पानगावचे मंदिर आणि नागद मंदिरातील साम्य स्थळ
पानगाव ( ता. रेणापूर जि. लातूर ) येथील आजचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर जे प्राचीन काळी विष्णू मंदिर होते पण कालोघात विष्णू आणि विठ्ठल एकच आहेत ही विचारधारा असल्यामुळे हे मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर झाले असेल
… हे मंदिर आणि नागद मंदिरातील साम्य दुवे म्हणजे…
मंदिरावर कोरण्यात आलेले शिल्पामध्ये वराह अवतार, मत्स अवतार, कुर्म अवतार, नृसिंह अवतार, वामन अवतार, हत्ती, फुलांची नक्षी, सिंह, नागकन्या, मुंगूस धारण केलेली , विंचू धारण केलेली स्त्री, मर्कटी, गौरी, चामरा, पद्मगंधा, शुकसारिका, गुढशब्दा, कर्पुरमंजीरी, शुभगामिनी, नर्तकी, लिलावती, सुरसंदरी अशा अनेक शिल्पांचा समावेश आहे. मंदिराचे गर्भगृह चौकोनी आहे. द्वारशाखांवर वैष्णव द्वारपाल कोरण्यात आलेले आहेत तसेच गणेश प्रतिमा सुध्दा कोरण्यात आलेली आहे.

अति सुंदर शिल्पांनी नटलेल्या या मंदिराच्या निर्मिती इ.स. १००० ते इ.स. १२०० या दरम्यान झाली असावी असे मानले जाते. मंडप, अंतराळ , गर्भगृह असे मंदिराचे मुख्य तीन भाग आहेत. हे मंदिर पुर्वाभिमुख असून पुर्वेस मुखमंडप, दक्षीणेस आणि उत्तरेस अर्धस्तंभ असलेला अर्धखुला मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा त्याचा तलविन्यास आहे. होट्टल येथील सिध्देश्वर मंदीर आणि धर्मापुरी येथील केदारेश्वर मंदीर हि देखीळ पुर्वाभिमुख असून त्यांचाही तलविन्यास असाच आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. मंदीराचा समोर एक मोठा मंडप आहे.डॉ,प्रभाकर देव यांच्या मते त्याचे स्वरुप गोपुर असावे. तसेच या मंडपाला जोडून मंदीराची सीमाभिंत असली पाहिजे. 

     मंदिराला तीन प्रवेशद्वारे आहेत.पण सध्या यापैकी एकच प्रवेशद्वार वापरात आहे.  या मंदिराचे विधान जरी आयताकृती असले तरी मुखमंडप मात्र चौरसाकृती आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस वेदिकापट्ट आहेत. अर्धभिंतीवर जमिनीला समांतर असे पट्ट आहेत. त्यावर हत्ती , लघुस्तंभ, त्यावर लघुशिल्पे असे विविध प्रकारचे कोरीव काम आहे.   



  गर्भगृहाचा तलविन्यास सप्तरथ प्रकारचा असून त्याचे बाह्यांग व मंडपाचा अंतर्भाग सुरसुंदरींनी शिल्पांकीत केलेला आहे. गर्भगृहाच्या तिन्ही दिशांना तीन  देवकोष्ठे आहेत. ह्या मंदिराचे एक महत्वाचे  वैशिष्ट्य म्हणजे मुखमंडपातील खांबांच्या तिरप्या हस्तांवर असलेल्या मोहक सुरसुंदरी..डॉ.प्रभाकर देव सर या शिल्पांचे स्त्री सौंदर्याचा काव्यात्म शिल्पाविष्कार असा उल्लेख करतात.तो उल्लेख   ही शिल्पे पाहिल्यानंतर मनोमन स्वीकार्य वाटतो. या सुरसुंदरी ह्या कल्याणी चालुक्यांच्या मूर्तीच्या घाटाच्या आहेत. त्यातल्या काहीचे हात पाय भग्न झाले असले तरीही सौंदर्य अजूनही टिकून आहे. सपाट पट्टावर या सुरसुंदरी कोरल्या आहेत. होयसाळांच्या आश्रयाखाली बांधलेल्या मंदीरात अशाच मुर्ती आढळतात. मात्र शैलीच्या दृष्टीने त्या उत्तर चालुक्य काळातील म्हणजेच कर्नाटक शैलीच्या शिल्पाशी मिळत्याजुळत्या आहेत. 

  अर्धमंडप खुला असून प्रवेशमार्गाचा अपवाद वगळता सर्व बाजुंनी वेदीकेच्या भिंती आहेत. वेदीकेच्या बाह्यअंगावर आलटून पालटून अर्धस्तंभ व कोष्ट कोरली आहेत. कोष्टांमध्ये नृत्यांगणा आणि वादकाच्या मुर्ती आहेत. अर्धस्तंभावर शिखरे दाखवली आहेत. 
या मंदिरातील एक वेगळेपण म्हणजे येथील मुख मंडप आणि सभामंडपामध्ये वामन भिंतींवर आरपार नक्षी केलेली जाल-वातायने. मंडपाचा अंतर्भाग एकुण बावीस पुर्ण स्तंभावर आणि आठ वामनस्तंभावर पेललेला आहे. त्यातील अठरा स्तंभ मंडपाच्या कडेला म्हणजे परिघ भागात आहेत, तर मध्यभागी असलेले चार स्तंभ चतुष्कीच्या स्वरुपात आहेत. शिवाय मंदीराच्या वेदीकेवर आठ वामनस्तंभ आहेत.
या परिसरात असणार्या इतर मंदीरात ज्याप्रमाणे स्तंभाची रचना आहे, तशीच रचना म्हणजे चौरस तळखडा, तीन अष्टकोनी घटकांनी युक्त खांब, त्यातील प्रत्येक दोन लगतच्या अष्टकोनी घटकांच्या मधोमध वर्तुळाकार घटक, वर चौरस घटक, त्यावर उदगमासारखे दिसणारे घटक, त्यावर भरणी आणि शिरावटी असा क्रम आहे. 

खांबाचा वरचा भाग आणि वरची तुळई यांना जोडणार्या मधल्या सपाट भागात सुरसुंदरीच्या मुर्ती आहेत. सभामंडपात समोरील भिंतीवर दोन कोनाडे असून एकात गणेशाची मूर्ती आहे आणि दुसऱ्या कोनाड्यात एक नवीन देवीची मूर्ती बसवलेली आहे. मंदिरातील सर्व द्वारशाखा पंचशाखा आहेत. अंतराळाच्या द्वारशाखेवर ललाटबिंबावर गणपती तसेच त्यातील  उत्तररंगावर विष्णू आणि नरसिंहाच्या प्रतिमा आहेत. आतील गर्भगृहाच्या द्वारेशाखेवर गजलक्ष्मीची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या द्वाराच्या खालच्या भागात शैव द्वारपाल आहेत. गर्भगृह आतून मात्र सपाट आणि साधे आहे.अश्या गर्भगृहाला समतलवितान म्हणतात. 

   मंदीरासमोरील गोपुर सदृष्य मंडपात नंदी असल्यामुळे हे मुळचे शिवालय असावे.नंतर त्याचे रुपांतर विठ्ठल मंदीरात म्हणजे वैष्णव मंदीरात झाले असावे, असे डॉ. प्रभाकर देव यांचे मत आहे. तसेच गर्भगृहातील विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती  मात्र नंतरच्या काळात बसवलेली असावी. मात्र गर्भगृहाच्या भद्रावर देवकोष्टावरील वैष्णव मुर्ती लक्षात घेता हे मंदीर मुळचे वैष्णव असणे शक्य आहे. यातील कोरीव काम पाहताना आपण थक्क होऊन जातो आणि आपली भेट सार्थकी लागली याचे समाधान आपोआपच आपल्या चेहऱ्यावर दिसू लागते. 
या मंदिराचा मुख्य मंडप मात्र नव्याने आधुनिक पद्धतीने बांधला आहे त्यामुळे मूळ मंदिराच्या शैलीशी मेळ बसत नाही तसेच   सध्याचे  शिखर ही विजोड वाटते .मंदिराच्या बाह्य भिंतीवरील कोरीव काम मात्र अप्रतिम आहे.या मंदिराचा नंदी मंडप ही उल्लेखनीय आहे.

मंदिरावर मिथून शिल्प :-
    नागद येथील मंदिरावर मिथून शिल्प कोरलेले आहेत तसेच मिथून चिल्प इथेही कोरलेले आहेत. नागद येथील मंदिरासाठी शिलालेख असल्यामुळे व तो कल्याणी चालुक्य सोमेश्वर पहिला याचा सेनापती मधुसूदन यांनी बनविल्याचा उल्लेख आहे. त्यात अशी अनेक विष्णू मंदिर बनविल्याचा उल्लेख आहेत. पानगाव येथे असलेल्या मंदिराचे साम्य असलेल्या मंदीरांना वेगवेगळी नाव दिलेली असले तरी त्यात आणि पानगाव मंदिरात कमालीचे साम्य आहे. त्यात दैत्य सुदन मंदिर लोणार जि. बुलढाणा, कालिंका मंदिर, बार्शी टाकळी जि. अकोला , आनंदेश्वर मंदिर, लासूर ता. दर्यापूर जि. अमरावती, भैरवनाथ मंदिर, किकली ता. वाई जि. सातारा, धारासूर मंदिर ता. गंगाखेड जि. परभणी, कोपेश्वर मंदिर खिद्रापूर जि. कोल्हापूर आणि या सर्व मंदिरावर कोरीव शिल्प आणि मिथून शिल्प आहेत.
      या गावाचे अंतर बस्वकल्याण पासून बरेच आहे पण पानगाव हे फक्त शंभर किलोमीटरच्या परिघात येते आणि चालुक्याचे आजोळ होतं. नागदा हे मध्यप्रदेशात सर्वात दूर आहे… त्या मंदिराच्या संदर्भात शिलालेख लिहला आहे. या सर्व मंदिराच्या जागा प्रचंड विस्तीर्ण आहेत. बाकी ठिकाणी ओवऱ्या शिल्लक नाहीत पण त्याचे बेसमेंट अवशेष शिल्लक आहेत. पानगाव मध्ये मात्र दोन भव्य ओवऱ्या सभा मंडप, दर्शनी मंडप आणि मठ शिल्लक आहे.
 मंदिराच्या जीर्णोद्धाराला गावकरी एकवटले
गावकऱ्यांना जाणीव झाली की हे प्राचीन मंदिर आहे याचे जतन व्हायला हवे म्हणून त्यांनी एकत्र येऊन 1 कोटी रुपयाचा निधी गोळा केला. त्यातून पहिलं काम या मंदिर परिसरात शेकडो वर्षांपासून झालेले अतिक्रमण काढणे. ज्यांची घर आहेत त्यांना योग्य तो मोबदला देऊन ते काढले जात आहेत. त्यात दडलेल्या दोन ओवऱ्या आता स्पष्ट दिसत आहेत. चारही बाजूनी अशा ओवऱ्या असण्याची शक्यता आहे पण उत्तर बाजुला फक्त दगडाचे अवशेष शिल्लक आहेत पण दक्षिण भागात अत्यंत रेखीव ओवऱ्या सापडल्या आहेत. या मंदिरापासून काही अंतरावर मठ आहे जो आज बालाजी मंदिर म्हणून ओळखला जातो.
   मंदिर हे समाजाच्या दैवीकरणाचा हिस्सा नव्हते तर त्या काळी ते त्या संस्कृतीचे अधिष्ठान होते पण म्हणून तत्कालीन विद्या या मंदिराभोवती शिकविल्या जात होत्या. त्यामुळे आपल्याला अधिक डोळस करणारे हे प्राचीन दाखले आहेत. त्या पासून आपण पण शिकू या! पानगावच्या मंदिराला आवश्य भेट द्या आणि त्या काळाच्या सांस्कृतिक खुणा पाहुन या एक सुंदर शिल्पकला पहिल्याचा आनंद मिळेल हे नक्की…!!
   हे आपलं सांस्कृतीक वैभव आहे. याची जाणीव गावकऱ्यांना झाली आहे. त्यामुळे त्यांनी अत्यंत धाडसी पाऊल टाकले आहे त्या बद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. मुळात प्राचीन काळी मंदिरा भोवती सगळ्या सांस्कृतिक वैभवाच्या खुणा होत्या त्यामुळे याचे महत्व अनन्य साधारण आहे. या मंदिरामुळे देशातील इतर ठिकाणी उल्लेख केलेल्या मंदिराचा इतिहासही पुढे येईल. बार्शी टाकळी जि. अकोला मंदिरातील विष्णू मूर्ती नागपूरच्या केंद्रीय संग्राहलयात ठेवण्यात आलेली आहे.पानगावचे मंदिरावरील नक्षी अजूनही अत्यंत चांगल्या स्थितीत आहे. इतर मंदिरावरील शिल्पावर वातावरणाचा मोठा परिणाम झाला आहे.ग्रामस्थांच्या वतीने एक कोटी रुपये जमवत या मंदिराभोवती असलेले अतिक्रमण काढून येथे सुशोभिकरणाचे काम केले जात आहे. पानगावकरांनी हे मंदिर तन मन आणि धन खर्चून संवर्धन केलं आहे. त्यासाठी त्यांचे अभिनंदन !
        वास्तविक पाहता होट्टल व धर्मापुरी या ठिकाणच्या मंदिराप्रमाणे या मंदिराचा हा ऐतिहासिक ठेवा जतन व्हावा यासाठी शासकीय मदत मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी पानगाव येथील ग्रामस्थ व लोकप्रतीनिधिंनी पुरातत्त्व विभागाकडे   मागणी करावी व त्या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करावा, तरच हा अनमोल ठेवा जतन करता येऊ शकेल.अन्यथा या मंदिरांच्या रूपाने त्या अलौकिक प्रतिभेच्या कलावंतानी घडवलेला हा ठेवा येणाऱ्या पिढ्यांना दाखवणार कसा ? याचा विचार निश्चितच करावा लागेल. 
जावे कसे ?
लातूर पासून अवघ्या ३५ किमी वर पानगाव आहे तर परळी वैजनाथपासून हे अंतर ३० कि.मी. आहे. रेणापुरला रेणुका देवीचे दर्शन घेऊन हालती दीपमाळ बघत पानगावच्या दिशेने  पुढे निघावे .हैदराबाद – परळी या रेल्वे मार्गावरील एक स्टेशन म्हणजे पानगाव .या ठिकाणचे देवदेवतांनी नटलेले विठ्ठल मंदिर  अगदी गावच्या मध्यभागी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ  जवळ आहे. 
संदर्भ :-
१) लातुर जिल्हा गॅझेटीयर
२) स्थापत्य - महाराष्ट्र शासन
३ ) https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nanded/news/the-temple-of-pangaon-during-the-chalukya-period-in-kalyani-was-glorified-by-the-initiative-of-the-villagers-129840436.html
४) https://mediawatch.info/ancient-temple-of-pangaon-cultural-link-connecting-central-india-by-yuvraj-patil/
५) http://www.bhausahebumate.com/2019/12/blog-post_27.html
६) https://www.facebook.com/2242868322708239/posts/vithal-temple-pangaonlaturmaharastra/2256317128030025/



शिवमंदिरांच्या राज्यात – पन्नगेश्वराचे प्रतिष्ठान

सामना ऑनलाईन

>>नीती मेहेंदळे

लातूर शहरातलं आजच्या बीड जिह्याच्या सीमेला खेटून असलेलं पानगाव. चालुक्य आणि काकतीय राजवटींच्या वास्तव्याचा प्रभाव पानगाववर होता. ज्याच्या खुणा आजही आपल्याला ठळक दिसून येतात.

या गावाचं पन्नगनगरी किंवा पन्नगपूर असं प्राचीन नाव असावं. याचा काही प्रमाणात पुरातत्त्वीय पुरावा आज तिथे उपलब्धही आहे. पन्नगेश्वराचं प्राचीन शिवालय ही पानगावची खरी ओळख. पन्नगनगरीचा पन्नगेश्वर हा गावाचा अधिष्ठाता देव. त्याचं लहानसं मंदिर स्थापत्य इतिहासाच्या खुणा जपत आहे. दुसरं खंडोबा मंदिर. या मंदिरांची आधुनिक रंगरंगोटी, मुलामे जरी केले तरी या दोन्ही देवळांमध्ये इतस्तत: मांडून ठेवलेले शिल्पावशेष पाहता त्या या काळातल्या नाहीत हे त्वरित समजते.

गावातलं प्रमुख आकर्षण म्हणजे विठ्ठल मंदिर. गाभाऱयातली शिवपिंड आणि द्वारशाखेवरचे शिव द्वारपाल हे मुळात शिवमंदिर असावं हा कयास बळकट करतात. हे बऱयाच अर्थी महत्त्वाचं मंदिर मानलं जातं. या मंदिराच्या स्थापत्यावर चालुक्य, होयसळ तसेच काकतीय स्थापत्याचा प्रभाव आहे. मंदिराची रचना मुखमंडप, मंडप, अंतराळ व गर्भगृह अशी असून ते चार फूट उंच पीठावर उभं आहे. हे उंच पीठ व त्यावर असलेले आडवे समांतर पट्ट, वरचे कोरीव थर हे होयसळ मंदिर स्थापत्याचं वैशिष्टय़ या मंदिरात दिसून येतं.

मुखमंडपासमोर मोठा व बंदिस्त नंदी मंडप आहे. मंडपाला तीन बाजूंनी प्रवेशद्वारं आहेत. मधोमध रंगशिळा आहे. मुखमंडपाच्या प्रवेशालाच चार स्तंभ आहेत. मंडपाला उत्तर व दक्षिण बाजूंना अर्धमंडप आहेत. त्यांचे खांब कक्षासनावर उभे आहेत. या खांबांवर कर्णिकांवर अप्रतिम अशी देवांगनांची शिल्पं कोरलेली आढळतात. अशा प्रकारे कर्णिकांवर शिल्पं कोरलेलं हे मराठवाडय़ातलं एकमेव मंदिर असावं!

मंदिराच्या बाह्यांगावर शिव, विष्णू, ब्रह्मा यांच्या मूर्ती देवकोष्ठांमध्ये दिसतात. योगविष्णू, आसनस्थ वराह या वैष्णव परंपरा सांगणाऱ्या व अनेक शिवप्रतिमा शैव संप्रदाय मांडणाऱ्या असाही एक मिलाफ आढळतो. बाह्य भिंतींवर अनेक शिल्प थर दिसतात. सर्वात खाली गजधर, मग पुष्पपट्ट, भौमितिक आकृतींचा पट्ट, कीर्तिमुख पट्ट, वर वादक-नर्तक पट्ट आढळतात. यातही शिल्पांमध्ये लय जाणवते. मंदिराच्या मंडपाच्या भिंती जालयुक्त वातायन (खिडक्या) असलेल्या दिसतात. हे पूर्ण विकसित स्थापत्य शैलीचे नसून प्राथमिक स्वरूपाचे दिसते.

पानगावच्या मंदिरांमध्ये शिल्पकलेत एकूणच एक प्रकारची गतिमानता आढळते. ते या मंदिराचं अजून एक वैशिष्टय़. एक नर्तिका आहे, तिच्या हावभावांमध्ये एक लय स्पष्ट जाणवते. शालभंजिका, दर्पणा, शुकसारिका, रती, बांसरीधारिणी इ. अनेक सुरसुंदऱया या कर्णिका व मंडोवरावर कोरलेल्या दिसतात. चालुक्यकालीन शिल्पांप्रमाणे इथली शिल्पं नाजूक चणीची दिसतात. सडपातळ बांध्याची चिरतरुण वाटणारी शिल्पं लांबसडक पायांची ठेवण, नाजूक कटीप्रदेश व पुष्ट पृष्ठभाग अशी दिसतात. समृद्ध द्वारशाखा हे अजून एक चालुक्य स्थापत्यविशेष. तसेच या मंदिराच्या छतावर जेव्हा अष्टदिक्पाल कोरलेले दिसतात ते उत्तर चालुक्यकालीन शैलीचे वैशिष्टय़ समजले जाते. कीर्तिमुख छतांवर कोरलेले असणे हेही एक उत्तर चालुक्यकालीन शैलीचं वैशिष्टय़ समजलं जातं.

वरंगळजवळच्या धणापूरच्या मंदिरांप्रमाणे या कर्णिकांवरच्या शिल्पांची रचना दिसते. धणापूरची मंदिरं ही काकतीय शिल्पस्थापत्याचा उत्तम नमुना समजली जातात. अशा प्रकारे दोन स्थापत्य शैलींचा अपूर्व संगम असलेलं हे महत्त्वाचं मंदिर ठरतं. भौगोलिकदृष्टय़ासुद्धा हे गाव दोन प्राचीन राजवटींच्या सीमेवरच आहे. म्हणून दोन्ही परंपराचा मिलाफ त्यात आढळतो. याशिवाय कुंड महादेव हे अजून एक समकालीन मंदिर पानगावमध्ये सापडतं. तिथेही जुन्या दुर्मीळ मूर्ती रचलेल्या दिसतात. गावात एक पुरातन खणाची विहीरही आहे. पानगाव आणि धर्मापुरी ही काही किलोमीटरच्या अंतरावरची गावं, पण आपापली स्वतंत्र संस्कृती सांभाळून असलेली. सीमारेषेवर भाषा जशी मिश्र असते तशी शिल्पकलाही मिश्र होत जाते. पानगाव शिल्पकलेचं वारसास्थळ म्हणून सिद्ध झालं असलं तरी पुरातत्त्व खात्याकडून अधिक संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहे.
– mehmehen@gmail.com

http://www.saamana.com/pangaon-pannagnagari-pannegeshwar-the-kingdom-of-shiva-temples/





ऐतिहासिक वारसा: कल्याणी चालुक्यकालीन पानगावच्या मंदिरास ग्रामस्थांच्या पुढाकारातून गतवैभव

Divya Marathi

ऐतिहासिक वारसा:कल्याणी चालुक्यकालीन पानगावच्या मंदिरास ग्रामस्थांच्या पुढाकारातून गतवैभव

लातूरएका वर्षापूर्वी

  • कॉपी लिंक

नगाव (ता. रेणापूर) येथे ऐतिहासिक वारसा असलेले भव्य विठ्ठल-रुख्मिणी मंदिर आजही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. ग्रामस्थांच्या वतीने एक कोटी रुपये जमवत या मंदिराभोवती असलेले अतिक्रमण काढून येथे सुशोभिकरणाचे काम केले जात आहे. अतिक्रमण काढलेल्या जागेत प्राचीन काळातील अत्यंत सुबक मंदिराची पुरक स्थळे दिसून येत आहेत. चौहोबाजूंनी अशाच वास्तू असण्याची शक्यता आहे. पण उत्तर बाजूला फक्त दगडाचे अवशेष शिल्लक आहेत. पण दक्षिण भागात अत्यंत रेखीव शिल्प सापडले आहेत. या मंदिरापासून काही अंतरावर मठ आहे, जो आज बालाजी मंदिर म्हणून ओळखला जातो.

मंदिरावर वराह अवतार, पद्मगंधा, चामरा, सूरसुंदरी, नर्तकीचे शिल्प वेधताहेत लक्ष
मंदिरावर आकर्षक शिल्प कोरले आहेत. यात वराह अवतार, मत्स्य अवतार, कुर्म अवतार, नृसिंह अवतार, वामन अवतार, हत्ती, फुलांची नक्षी, सिंह, नागकन्या, मुंगूस व विंचू धारण केलेली स्त्री, मर्कटी, गौरी, चामरा, पद्मगंधा, शुकसारिका, गुढशब्दा, कर्पुरमंजिरी, शुभगामिनी, नर्तकी, लीलावती, सूरसुंदरी अशा अनेक शिल्पांचा समावेश आहे. मंदिराचे गर्भगृह चौकोनी आहे. द्वारशाखांवर वैष्णव द्वारपाल कोरण्यात आलेले आहेत. तसेच गणेश प्रतिमासुद्धा तोरण्यात आली आहे.

नागदाच्या विष्णू मंदिराशी साम्य
कल्याणी चालुक्याच्या काळात मध्य प्रदेशातील उज्जैनपासून जवळच असलेल्या नागदा येथे विष्णू मंदिर बांधण्यात आले आहे. हे मंदिर व पानगावच्या मंदिरातील शिल्पांमध्ये बरेचसे साम्य आहे. राजा सोमेश्वरचा सेनापती मधुसूदन (पहिला) यांनी इस १०६२ मध्ये नागदा येथील मंदिर बांधल्याचा उल्लेख शिलालेखात आहे. याच शिलालेखात त्यांचे राज्य असलेल्या अनेक ठिकाणी यापूर्वी विष्णू मंदिरे बांधल्याचा उल्लेख आहे. नागदा येथील मंदिरावर मिथुन शिल्प कोरलेले आहेत. तसेच मिथुन शिल्प येथेही कोरलेले आहेत, अशी माहिती इतिहास अभ्यासक तथा लातूरचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी दिली.

https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nanded/news/the-temple-of-pangaon-during-the-chalukya-period-in-kalyani-was-glorified-by-the-initiative-of-the-villagers-129840436.html


पानगावचे प्राचीन मंदिर- मध्य भारताला जोडणारा सांस्कृतिक दुवा - Media Watch

Team Media Watch


-युवराज पाटील

लातूर अर्थात लत्तलूर हे मध्ययुगीन राजेशाहीच्या काळातले ” राजकीय चुंबकीय क्षेत्र होते” असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. बदामी चालुक्य दुसरा कीर्ती वर्मन कडून इस 753 मध्ये लत्तलूर ( राष्ट्रकूट ) निवासी राष्ट्रकूट राजा दंतीदुर्ग यांनी सत्ता हस्तगत केली. या लातूरच्या राष्ट्रकुटांनी आपली सत्ता दक्षिण भारत, पश्चिम भारत ( कोकणासह ) आणि मध्य भारत इथं पर्यंत विस्तारली. पुढे इस 973 ला चालुक्य दुसरा तैलप याने राष्ट्रकुटांचा पराभव करून चालुक्याची सत्ता स्थापन केली. या सत्ता स्थापन करणाऱ्या दुसऱ्या चालुक्य तैलप जो उत्तर चालुक्य राजघराण्याचा संस्थापक होता, त्याची सासुरवाडी लत्तलूर म्हणजेच लातूर होती. लत्तलूरच्या “महारट्ट मम्मह ” याच्या मुलीशी राणी जाकव्वा तथा लक्ष्मी बरोबर राजा तैलप याचा विवाह झाला होता. ज्या लातूरच्या रट्टाची मुलगी कल्याणी चालुक्याच्या संस्थापकाला दिली. त्या रट्ट यांच्या ताब्यात आंध्र प्रदेशातील कुल्पक आणि ओरिसातील संभलपूर या संस्थानावर राज्य होतं… या सर्व घटनावरून लातूरचे महत्व अधोरेखित होते. पुढे कल्याणीचा ( अर्थात बस्वकल्याण जि. बिदर ) चालुक्य सोमेश्वर पहिला हा अत्यंत पराक्रमी निघाला आणि त्यांनी राष्ट्रकुट काळापेक्षाही अधिक भूभागावर आपले राज्य निर्माण केले.लातूर जिल्ह्याची आजची सीमा बस्वकल्याण पासून फक्त 25 किलो मीटर आहे. निजामकाळात लातूर भागाचा जिल्हा बिदर असल्यामुळे हे एकच प्रादेशिक भाग होता. कल्याणी चालुक्य सोमेश्वर यांनी मराठवाड्यासह आजचा पश्चिम महाराष्ट्र कोकण, विदर्भ, गुजरात, मध्यप्रदेश ( मावळा प्रांत ) काही राजस्थानचा भाग… दक्षिणेत आंध्रप्रदेश, कर्नाटक, तंजावर पर्यंत राज्य विस्तारले… चाळीस वर्षे राज्य केले.

बदामी चालुक्याच्या काळात दक्षिणेत मोठ्या प्रमाणात मिश्र मंदिर बांधले गेली पण कल्याणी चालुक्याच्या काळात बहुतांश मंदिर बांधली गेली ते विष्णूच्या विविध नावानी… राजा सोमेश्वरचा सेनापती मधुसूदन यांनी इस 1062 मध्ये नागदा ( मध्य प्रदेश ) उज्जैन पासून जवळच असलेली आजची औद्योगिक नगरी येथे विष्णू मंदिर बांधल्याचा उल्लेख शीलालेखात आहे ( संदर्भ :- मुजुमदार आर सी, द क्लासीकल एज, यजदानी जी. द अर्ली हिस्ट्री ऑफ द डेक्कन 2, भाग -1 ) आणि याच शिला लेखात त्यांचे राज्य असलेल्या अनेक ठिकाणी या पूर्वी विष्णू मंदिरे बांधल्याचा उल्लेख आहे.


काय काय होते या विष्णू मंदिरात

हे मंदिर त्या भागाचे प्रचंड मोठे सांस्कृतिक केंद्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही… मंदिर प्रतीकात्मक असले तरी त्याच्या आजूबाजूला नाट्यादि करिता नाट्यालय, मुनींच्या ध्यान धारणे करिता अनुष्ठानभवन, गुरुकुल पठन आणि पाठनाकरिता मठ इत्यादीचा अंतर्भाव या मंदिर परिसरात असायचा… एका अर्थाने हे मंदिर लोक शिक्षणाचे केंद्र होते. या बरोबर या मंदिरात अनेक तोरणे व प्रासाद ( राहण्यासाठीची जागा ) असून त्यांना सुंदर मूर्तिनी अलंकृत केले होते. त्या समोर गरुड स्तंभ आणि सभोवार तट होता.

पानगावचे मंदिर आणि नागद मंदिरातील साम्य स्थळ

पानगाव ( ता. रेणापूर जि. लातूर ) येथील आजचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर जे प्राचीन काळी विष्णू मंदिर होते पण कालोघात विष्णू आणि विठ्ठल एकच आहेत ही विचारधारा असल्यामुळे हे मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर झाले असेल….आम्ही भेट द्यायला गेलो त्यावेळी या मंदिराच्या भोवती झालेले अतिक्रमण काढण्याचे काम गावकरी करत होते. ज्यांची घर इथं आहेत त्यांना त्या जागेचा मोबदला देऊन काढली जात आहेत हे विशेष … या अतिक्रमण काढलेल्या जागेत प्राचीन काळातील अत्यंत सुबक ओवऱ्या दिसून येत आहेत… चारी बाजूनी अशा ओवऱ्या असण्याची शक्यता आहे पण उत्तर बाजुला फक्त दगडाचे अवशेष शिल्लक आहेत पण दक्षिण भागात अत्यंत रेखीव ओवऱ्या सापडल्या आहेत… या मंदिरापासून काही अंतरावर मठ आहे जो आज बालाजी मंदिर म्हणून ओळखला जातो… हे मंदिर आणि नागद मंदिरातील साम्य दुवे म्हणजे…

मंदिरावर कोरण्यात आलेले शिल्पामध्ये वराह अवतार, मत्स अवतार, कुर्म अवतार, नृसिंह अवतार, वामन अवतार, हत्ती, फुलांची नक्षी, सिंह, नागकन्या, मुंगूस धारण केलेली , विंचू धारण केलेली स्त्री, मर्कटी, गौरी, चामरा, पद्मगंधा, शुकसारिका, गुढशब्दा, कर्पुरमंजीरी, शुभगामिनी, नर्तकी, लिलावती, सुरसंदरी अशा अनेक शिल्पांचा समावेश आहे. मंदिराचे गर्भगृह चौकोनी आहे. द्वारशाखांवर वैष्णव द्वारपाल कोरण्यात आलेले आहेत तसेच गणेश प्रतिमा सुध्दा कोरण्यात आलेली आहे.

मंदिरावर मिथून शिल्प

मी वर उल्लेख केलेल्या नागद येथील मंदिरावर मिथून शिल्प कोरलेले आहेत तसेच मिथून चिल्प इथेही कोरलेले आहेत. नागद येथील मंदिरासाठी शिलालेख असल्यामुळे व तो कल्याणी चालुक्य सोमेश्वर पहिला याचा सेनापती मधुसूदन यांनी बनविल्याचा उल्लेख आहे. त्यात अशी अनेक विष्णू मंदिर बनविल्याचा उल्लेख आहेत. पानगाव येथे असलेल्या मंदिराचे साम्य असलेली मंदिरे मी पाहिलेली आहेत पण आता त्यांना वेगवेगळी नाव दिलेली असले तरी त्यात आणि पानगाव मंदिरात कमालीचे साम्य आहे. त्यात दैत्य सुदन मंदिर लोणार जि. बुलढाणा, कालिंका मंदिर, बार्शी टाकळी जि. अकोला , आनंदेश्वर मंदिर, लासूर ता. दर्यापूर जि. अमरावती, भैरवनाथ मंदिर, किकली ता. वाई जि. सातारा हे मी प्रत्यक्ष बघितलेली तर ऐकलेली धारासूर मंदिर ता. गंगाखेड जि. परभणी, कोपेश्वर मंदिर खिद्रापूर जि. कोल्हापूर आणि या सर्व मंदिरावर कोरीव शिल्प आणि मिथून शिल्प आहेत.

या वर उल्लेख केलेल्या गावाचे अंतर बस्वकल्याण पासून बरेच आहे पण पानगाव हे फक्त शंभर किलोमीटरच्या परिघात येते आणि चालुक्याचे आजोळ होतं… नागदा हे मध्यप्रदेशात सर्वात दूर आहे… त्या मंदिराच्या संदर्भात शिला लेख लिहला आहे. मी बघितलेल्या सर्व मंदिराच्या जागा प्रचंड विस्तीर्ण आहेत… बाकी ठिकाणी ओवऱ्या शिल्लक नाहीत पण त्याचे बेसमेंट अवशेष शिल्लक आहेत… पानगाव मध्ये मात्र दोन भव्य ओवऱ्या सभा मंडप, दर्शनी मंडप आणि मठ शिल्लक आहे.

मंदिराच्या जीर्णोद्धाराला गावकरी एकवटले

गावाकऱ्यांना जाणीव झाली की हे प्राचीन मंदिर आहे याचे जतन व्हायला हवे म्हणून त्यांनी एकत्र येऊन 1 कोटी रुपयाचा निधी गोळा केला. त्यातून पहिलं काम या मंदिर परिसरात शेकडो वर्षांपासून झालेले अतिक्रमण काढणे. ज्यांची घर आहेत त्यांना योग्य तो मोबदला देऊन ते काढले जात आहेत… त्यात दडलेल्या दोन ओवऱ्या आता स्पष्ट दिसत आहेत… हे आपलं सांस्कृतीक वैभव आहे. याची जाणीव गावकऱ्यांना झाली आहे. त्यामुळे त्यांनी अत्यंत धाडसी पाऊल टाकले आहे त्या बद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे…. मुळात प्राचीन काळी मंदिरा भोवती सगळ्या सांस्कृतिक वैभवाच्या खुणा होत्या त्यामुळे याचे महत्व अनन्य साधारण आहे. या मंदिरामुळे देशातील इतर ठिकाणी उल्लेख केलेल्या मंदिराचा इतिहासही पुढे येईल. बार्शी टाकळी जि. अकोला मंदिरातील विष्णू मूर्ती नागपूरच्या केंद्रीय संग्राहलयात ठेवण्यात आलेली आहे.पानगावचे मंदिरावरील नक्षी अजूनही अत्यंत चांगल्या स्थितीत आहे… इतर मंदिरावरील शिल्पावर वातावरणाचा मोठा परिणाम झाला आहे.पण पानगावकरांनी हे मंदिर तन मन आणि धन खर्चून संवर्धन केलं आहे. त्यासाठी त्यांचे

मंदिर हे समाजाच्या दैवीकरणाचा हिस्सा नव्हते तर त्या काळी ते त्या संस्कृतीचे अधिष्ठान होते पण म्हणून तत्कालीन विद्या या मंदिराभोवती शिकविल्या जात होत्या… त्यामुळे आपल्याला अधिक डोळस करणारे हे प्राचीन दाखले आहेत… त्या पासून आपण पण शिकू या… पानगावच्या मंदिराला आवश्य भेट द्या… आणि त्या काळाच्या सांस्कृतिक खुणा पाहुन या एक सुंदर शिल्पकला पहिल्याचा आनंद मिळेल हे नक्की…!!

( फोटो सहकार्य :- धनंजय गुट्टे.)

(लेखक हे लातूरचे जिल्हा माहिती अधिकारी आहेत)

https://mediawatch.info/ancient-temple-of-pangaon-cultural-link-connecting-central-india-by-yuvraj-patil/

विठ्ठल मंदिर , पानगाव :

मराठवाडयाच्या भूमीत असलेली एकापेक्षा एक सरस मंदिरे म्हणजे एक फार मोठे आश्चर्य मानावे लागेल .लातूर पासून अवघ्या ३५ किमी वर असलेले पानगाव येथील विठ्ठल मंदिर म्हणजे चालुक्य काळातील स्थापतीना पडलेले जणू सुंदर स्वप्नच .....रेणापुरला रेणुका देवीचे दर्शन घेऊन हालती दीपमाळ बघत पानगावच्या दिशेने  पुढे निघावे .......हैदराबाद – परळी या रेल्वे मार्गावरील एक स्टेशन म्हणजे पानगाव ...या ठिकाणचे देवदेवतांनी नटलेले विठ्ठल मंदिर  अगदी गावच्या मध्यभागी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ  जवळ आहे. सर्व बाजूने भरपूर बांधकाम झाल्यामुळे मूळ मंदिराच्या सौदर्यात बाधा निर्माण झाली आहे हे मात्र संबंधितांच्या लक्षात आले नाही यात आश्चर्य वाटून घेण्याचे काहीच  कारण नाही ....आपण आपलं शांतपणे मंदिर पाहावे ...


 अति सुंदर शिल्पांनी नटलेल्या या मंदिराच्या निर्मिती इ.स. १००० ते इ.स. १२०० या दरम्यान झाली असावी असे मानले जाते. मंडप, अंतराळ , गर्भगृह असे मंदिराचे मुख्य तीन भाग आहेत. मंदिराला तीन प्रवेशद्वारे आहेत.पण सध्या यापैकी एकच प्रवेशद्वार वापरात आहे.  या मंदिराचे विधान जरी आयताकृती असले तरी मुखमंडप मात्र चौरसाकृती आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस वेदिकापट्ट आहेत. अर्धभिंतीवर जमिनीला समांतर असे पट्ट आहेत. त्यावर हत्ती , लघुस्तंभ, त्यावर लघुशिल्पे असे विविध प्रकारचे कोरीव काम आहे.   

या मंदिरातील एक वेगळेपण म्हणजे येथील मुख मंडप आणि सभामंडपामध्ये वामन भिंतींवर आरपार नक्षी केलेली जाल-वातायने........ यातील कोरीव काम पाहताना आपण थक्क होऊन जातो आणि आपली भेट सार्थकी लागली याचे समाधान आपोआपच आपल्या चेहऱ्यावर दिसू लागते....

सभामंडपात समोरील भिंतीवर दोन कोनाडे असून एकात गणेशाची मूर्ती आहे आणि दुसऱ्या कोनाड्यात एक नवीन देवीची मूर्ती बसवलेली आहे. मंदिरातील सर्व द्वारशाखा पंचशाखा आहेत. अंतराळाच्या द्वारशाखेवर ललाटबिंबावर गणपती तसेच त्यातील  उत्तररंगावर विष्णू आणि नरसिंहाच्या प्रतिमा आहेत. आतील गर्भगृहाच्या द्वारेशाखेवर गजलक्ष्मीची मूर्ती आहे. गर्भगृहातील विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती  मात्र नंतरच्या काळात बसवलेली असावी.

गर्भगृहाच्या तिन्ही दिशांना तीन  देवकोष्ठे आहेत. ह्या मंदिराचे एक महत्वाचे  वैशिष्ट्य म्हणजे मुखमंडपातील खांबांच्या तिरप्या हस्तांवर असलेल्या मोहक सुरसुंदरी.....डॉ.प्रभाकर देव सर या शिल्पांचे स्त्री सौंदर्याचा काव्यात्म शिल्पाविष्कार असा उल्लेख करतात...तो उल्लेख   ही शिल्पे पाहिल्यानंतर मनोमन स्वीकार्य वाटतो. या सुरसुंदरी ह्या कल्याणी चालुक्यांच्या मूर्तीच्या घाटाच्या आहेत. त्यातल्या काहीचे हात पाय भग्न झाले असले तरीही सौंदर्य अजूनही टिकून आहे.

या मंदिराचा मुख्य मंडप मात्र नव्याने आधुनिक पद्धतीने बांधला आहे त्यामुळे मूळ मंदिराच्या शैलीशी मेळ बसत नाही तसेच   सध्याचे  शिखर ही विजोड वाटते .मंदिराच्या बाह्य भिंतीवरील कोरीव काम मात्र अप्रतिम आहे.या मंदिराचा नंदी मंडप ही उल्लेखनीय आहे.


वास्तविक पाहता होट्टल व धर्मापुरी या ठिकाणच्या मंदिराप्रमाणे या मंदिराचा हा ऐतिहासिक ठेवा जतन व्हावा यासाठी शासकीय मदत मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी पानगाव येथील ग्रामस्थ व लोकप्रतीनिधिंनी पुरातत्त्व विभागाकडे   मागणी करावी व त्या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करावा, तरच हा अनमोल ठेवा जतन करता येऊ शकेल.........अन्यथा या मंदिरांच्या रूपाने त्या अलौकिक प्रतिभेच्या कलावंतानी घडवलेला हा ठेवा येणाऱ्या पिढ्यांना दाखवणार कसा याचा विचार करतच मी परतीच्या प्रवाशाला निघालो...परतताना   पानगावचे अजून एक वैभव –भारतीय संविधानाचे शिल्पकार  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  स्मारकाला नतमस्तक होऊन मार्गस्थ झालो. मागे सात वर्षापूर्वी ही इथे आलो होतो, त्या पेक्षा कितीतरी भव्य असे स्मारक पाहून खूप समाधान वाटले.

                                                                           भाऊसाहेब शिवाजीराव उमाटे

                                                                                          लातूर 

http://www.bhausahebumate.com/2019/12/blog-post_27.html


https://www.facebook.com/2242868322708239/posts/vithal-temple-pangaonlaturmaharastra/2256317128030025/



https://varadprasadtours.com/2022/07/20/sangameshwar-temple-travel-guide-tips-saswad/



No comments:

Post a Comment

Aihole

 आयहोळ येथील डोल्मेन :        सध्या बहुतेक पर्यटक आयहोळला चालुक्यांच्या सुरवातीच्या काळात बांधलेल्या मंदीरांना भेट देण्यासाठी येतात. मात्र ल...