'कोपरगाव' शहर गोदावरी काठी वसलेले एक प्राचीन शहर असून अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. नगर-मनमाड महामार्गालगत असणारे हे शहर शिर्डी पासून (उत्तरेला) सुमारे 15 किलोमीटर अंतरावर आहे.
कोपरगावचे जुने नाव 'कर्पूरग्राम'. दक्षिणगंगा समजल्या जाणाऱ्या गोदावरीच्या उत्तर काठावर शहर वसलेले आहे. नदीच्या दक्षिण भागाला 'बेट कोपरगाव' म्हणतात. नदी येथे दोन प्रवाहात विभागली गेल्याने हा भाग चहूबाजूंनी पाण्याने वेढलेला असे. सध्या मात्र बेट अस्तित्वात नाही. या भागास 'बेट कोपरगाव' अथवा 'कचेश्वराचे बेट' म्हणतात.गावच्या इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर कोपरगाव आणि आसपासचा परिसर पुराणकथांनी समृध्द आहे. १३व्या शतकात हा परिसर देवगिरीच्या यादव राजांच्या ताब्यात होता. त्यानंतर इथे बहामनी राज्य आले. पुढे निजामशाही आणि नन्तर मोगल
बेटाला पुरातन महत्व असून बेट कोपरगाव ही दैत्यगुरू शुक्राचार्यांची कर्मभूमी समजली जाते. येथे शुक्राचार्यांचा प्राचीन मंदिर असून ते जगातील एकमेव शुक्राचार्यांचे मंदिर असल्याचे मानले जाते. त्याजवळच संजीवनी पार असून याठिकाणी कचेश्वराला शुक्राचार्यांनी संजीवनी विद्या (मृत व्यक्तीला जिवंत करण्याची विद्या) दिली. येथे शुक्राचार्य व कचेश्वर लिंगरूपात आहेत. त्यालगतच गणपती, श्रीविष्णु, शिवशंकर इत्यादी दैवतांची मंदिरे आहेत. बेटातील बहुतांशी मंदिरे यादवकालीन आहेत.
नगर जिल्ह्यातल्या कोपरगाव या तालुक्याच्या ठिकाणापासून जेमतेम ८ कि. मी. अंतरावर कोकमठाण गावात प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर इ.स. च्या १३ व्या शतकातील असावे. मुख्य सभामंडप, त्याला तीन दरवाजे आणि त्याच्या पुढे मुख्य गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे.
कोकमठाण मंदीराची विवीध रुपे
हे मंदीर पुरातत्वखात्याच्या अधीन आहे
कोकमठाण गावात भुमिज प्रकारचे मंदीर असून त्याचे शिखर वीटांनी तर बाकी भाग दगडांनी बांधला आहे. मंदिराचे शिखर बारीक नक्षीकाम केलेल्या छोट्या शिखारांपासून बनलेले आहे.या मंदीराचा तलविन्यास तारकाकृती असून वीटा आणि चुना याच्या सहाय्याने बांधलेले शिखर आजमितीस पुर्णपणे शिल्लक नाही. अमलसार, भुमि आणि दोन कलश आज शिल्लक नाही. हे मंदीर कदाचित सप्तभुम भुमिज प्रासाद याप्रकारचे असावे. मुख्य शिखरावर लिंग आणि अनंतासायी विष्णू यांचे शिल्प आहे. मंदिराचा वरचा भाग भौमितिक शैलीने बांधला गेलेला आहे. मंदिराच्या कळसावर मोठे पदक फुलाच्या आकाराचे आहे त्यामुळे शोभा वाढली आहे. त्याच्यावर नृत्य करणाऱ्या आणि वाद्य वाजवणाऱ्या मूर्त्याची नक्षीकाम केलेले आहेत.
मंदीराचा मुखमंडप
मुखमंडपातून दिसणारा सभोवतालचा परिसर व गोदावरी नदीचे पात्र
मुखमंडपातून सभामंडपात प्रवेश
मंदीराच्या स्तंभाचे घटक आणि स्तंभशीर्ष
मंदिराला पूर्वेला मुख्य प्रवेशद्वार असून पश्चिम बाजूने सुद्धा प्रवेशद्वार आहे. गाभाऱ्यात शिवपिंड आहे, आणि त्याच्या पाठीमागे एका चौथऱ्यावर शेषशायी विष्णूचे शिल्प उभे करून ठेवले आहे. ललाटावर गरुड असल्यामुळे हे मूळचे विष्णूमंदिर असावे. मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाह्यांगावर मंदिराच्या शिखराच्या प्रतिकृती सुंदर आहेत. तसेच इथे असलेली नक्षीदार जालवातायाने लक्ष वेधून घेतात.
मंदीराच्या सभामंडपाच्या छतावर असलेली शिल्पे
मंदीराचा सभामंडप व त्यातील अप्रतिम कोरीवकाम असलेले छत
सभामंडपातील शिल्पकला
सभामंडपाच्या स्तंभावर असलेले यक्ष
लज्जागौरीचे शिल्प
ताहाकारीच्या मंदिरासारखे या मंदिराचे छतही दगडात कोरलेल्या देठाला लगडलेल्या फुलांच्या आकाराच्या झुंबरांनी अलंकृत आहे.
मंदीर उत्तराभिमुख असून त्याच्या तलविन्यासाप्रमाणे त्यातील काही वास्तुशास्रीय घटकांचे निर्माण तंत्र वैशिष्ट्यपुर्ण आहे. मंदीर द्विगर्भ प्रकारचे आहे. मुख्य गर्भगृहात आज शिवलिंग असले तरी त्यात विष्णुची मुर्ती असावी असे मानण्यास जागा आहे.
मंदीराचे तीन गाभारे व त्यातील मुर्ती
मंडपाच्या पुर्वेला पण मंडपाला जोडून असलेल्या दुय्यम गर्भगृहात देवीची मुर्ती असुन आज ती देवी जगदंबा म्हणून ओळखली जाते. दुय्यम गर्भगृहाचा तलविन्यास साधा चौकोनी असून त्याला कोणतेही अंग नाही. त्यामुळे हे मंदीर तीन अर्धमंडपांनी युक्त असलेला मंडप आणि एकच गर्भगृह असलेले होते. परंतु नंतरच्या काळात पुर्वेकडील अर्धमंडप गर्भग्रूहात रुपांतरील करण्यात आला असावा असा निष्कर्श काही विद्वानांनी काढला आहे. गर्भगृहाच्या वितानावर नृत्य करणाऱ्या आणि वाद्य वाजवणाऱ्या यक्ष व गंधर्वांची शिल्पे आहेत.
मंदीराच्या मंडोवर उर्फ बाह्यभिंत आणि त्यावर असलेली शिल्प
तसेच सुरसुंदरी, वाद्य वाजवताना यक्ष-गंधर्व, दिगपाल, आणि बरेच देवी देवतांची शिल्पे आहेत पण मंदिराची पडझड झाल्यामुळे शिल्प मात्र ओळखता येत नाही. शांत निवांत गोदावरीच्या काठावर वसलेले हे मंदिर कोपरगावचे भूषण आहे. मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाह्यांगावर मंदिराच्या शिखराच्या प्रतिकृती सुंदर आहेत. तसेच इथे असलेली नक्षीदार जालवातायाने लक्ष वेधून घेतात. तसेच सुरसुंदरी, वाद्य वाजवताना यक्ष-गंधर्व, दिगपाल, आणि बरेच देवी देवतांची शिल्पे आहेत पण मंदिराची पडझड झाल्यामुळे शिल्प मात्र ओळखता येत नाही. शांत निवांत गोदावरीच्या काठावर वसलेले हे मंदिर कोपरगावचे भूषण आहे.
मंदीराचे भुमिज शैलीतील शिखर
मंदीराचा परिसर
गोदावरी नदीच्या अगदी तीरावरच असल्याने एखाद्या मोठ्या पुराचा फटका बसला असावा असे त्या परिसरातील लहान भग्न मंदिरे पाहून जाणवते. या मंदिराच्या मूळ बांधणीनंतर पडझड झालेली आणि त्यानंतर ते पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो, याचे कारण म्हणजे मूळ दगडी मंदिरावर असलेले चुना आणि खडी यांचे मिश्रण असलेले बांधकाम. ते साधारण दोन-तीनशे वर्षांपूर्वीचे असावे. पण त्या प्रयत्नांतही मूळ मंदिराचे सौंदर्य कायम राखण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.
अनोखी प्रथा :-
या कोकमठाण गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी अक्षयतृतीयेला गोदावरीच्या पलीकडील संवत्सर नावाच्या गावाला शिव्या देण्याचा आणि गोफणीने दगडफेक करण्याचा रिवाज. या दिवशी दोन्ही तीरांवर त्या त्या गावांतील युवक एकत्र येऊन एकमेकांना यथेच्छ शिव्या देतात, एकमेकांवर दगडफेक करतात. दोन्ही गावांच्या दरम्यान दगड युद्धाची परंपरा असलेले युद्ध खेळले जाते. गोफण या अस्त्राने दगड मारून प्रतिपक्षास पराभूत करणे हीच मुख्यत्वे भावना असते. नदीपात्राच्या मधोमध हे युद्ध अक्षयतृतीयेपासून ५ दिवस दररोज सायंकाळी ४ वा. सुरू होऊन सूर्यास्तापर्यंत चालते. युद्ध थांबावे यासाठी कोणीही एका पक्षाने पांढरे निशाण वर करून दाखविणे हा या युद्धबंदीचा संकेत होय. तद्नंतर दोन्ही गावातील मंडळी खेळाडू आपआपल्या दैवतांचा म्हसोबा की जय, लक्ष्मी माता की जय असे म्हणत घरी परततात. हे युध्द केले नाही तर गावात पाऊस पडत नाही, अशी अंधश्रद्धा समाजात होती.अलीकडच्या काळात दोन्ही गावांतील समंजस नागरिकांनी पुढाकार घेऊन ही शिव्यांची प्रथा अगदी उपचारापुरती सीमित केली असून गोफणगुंडा युद्ध पूर्णपणे बंद करवले आहे.
व्हिडिओ - https://www.youtube.com/watch?time_continue=49&v=G8KjATcJfxs).
दैत्यगुरु शुक्राचार्य मंदिर, बेट कोपरगाव
प्राचीन काळापासून दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगांव तालुक्यात दैत्यगुरू शुक्राचार्याचे एकमेव मंदिर आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार रघुनाथराव पेशवे यांनी कोपरगाव ला कैदेत असताना केले होते.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगांव तालुक्याच्या पंचक्रोशीत अनेक पौराणिक कथा व त्यांची स्मारके यांची रेलचेल आहे. श्रीरामचंद्र याच परिसरातून वनवासाला गेले असे मानले जाते. दक्षिण गंगा गोदावरी याच परिसरातून वाहते. प्राचीन काळी अनेक ऋषीमुनी, तपस्वी, महापुरुष, साधुसंतांनी गोदावरीच्या तटी यज्ञ याग तपश्चर्या - ध्यानधारणा केलेली आहे.

गोदावरी नदीच्या दक्षिण तीरावर अगदी हाकेच्या अंतरावर कोपरगांव (बेट) हे भृगू ऋषींचे पुत्र व दैत्यांचे गुरू शुक्राचार्य यांचे कर्मस्थान आहे. येथे त्यांनी तप व वास्तव्य केले असे मानले जाते. त्याबाबत अशी आख्यायिका संगितली जाते की समुद्रमंथनातून अमृत मिळाल्यामुळे देवांना अमरत्व प्राप्त झाले. त्यामुळे दैत्य कुळांचा नाश निश्चित झाला. तो होऊ नये, दैत्यानांही अमरत्व प्राप्ती व्हावी यासाठी दैत्यांचे गुरू शुक्राचार्य यांनी शंकराची तपश्चर्या करून संजीवनी मंत्र प्राप्त करून घेतला. त्या मंत्राच्या आधारे ते मृत झालेल्या दैत्यांना पुन्हा जिवंत करत. देवांना त्यामुळे त्यांच्याशी युद्ध करणे कठीण झाले. त्यामुळे दैत्यांचा संहार व नाश करणे हे देवांना क्रमप्राप्तच झाले. बृहस्पतींनी देवांना असे सांगितले की, हा संजीवनी मंत्र लोप पावला तर मृत झालेले दैत्य पुन्हा जिवंत होऊ शकणार नाहीत. मग बृहस्पतीपुत्र कच याला शुक्राचार्य यांच्याकडे पाठविले. कच जेथे संजीवनी विद्याप्राप्तीसाठी आला ते हे स्थान असून ते शुक्राचार्य मंदिर होय, असे मानले जाते.
शुक्राचार्य मंदिरा समोर श्री विष्णू व गणपती यांची मंदिरे आहेत. श्री विष्णुचे मंदिर हे काळया गुळगुळीत दगडातून बांधलेले असून दोन्ही मंदिराच्या मध्यात “संजीवनी पार” म्हणजे येथे कचास “संजीवनी” विद्या प्राप्त झाली व कच आणि देवयानी यांनी एकमेकांस शापित केले ते स्थान आहे. संजीवनी मंत्र देते वेळी श्री शंकर भगवान (त्र्यंबकेश्वर) गुप्त रुपाने तेथे आल्यामुळे त्यांचेही श्री त्रिंबकेश्वर मंदिर आहे. श्री शंकर भगवान येथे गुप्त रुपाने आल्यामुळे सदर मंदिरासमोर नंदीची स्थापना झालेली नाही. मंदिरा समोर नंदी नसलेले हे भगवान शंकराचे दुर्मिळ मंदिर आहे.

यादवकालीन कचेश्वर मंदिर
कोपरगाव बेट भागातील कचेश्वर मंदिर परिसर हा श्री निवृत्तिनाथ व त्यांची बहीण संत मुक्ताबाई यांच्या वास्तव्याने पावन झालेला आहे. निवृत्तिनाथ व मुक्ताबाई प्रत्यक्ष पांडुरंगासह (विठोबा) पुणतांबे येथील योगीराज श्री चांगदेव महाराज यांच्या समाधी सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याकरता बेटातील कचेश्वर मंदिरात माहे पौष मासी पूर्ण एक महिनाभर वास्तव्यास राहिले होते. निवृत्तिनाथ व मुक्ताबाई यांचे आगमन ज्ञानेश्वर व सोपानदेव यांचा समाधी विधी संपल्यानंतर झाले. ते मांडवगण पारनेरमार्गे आले. त्यांचा हेतू गोदास्नान व कचेश्वर दर्शन असा होता. पुढे, त्यांनी माघ मासी चांगदेव महाराजांच्या समाधी सोहळ्यासाठी म्हणून पुणतांबा गावी प्रयाण केले. ते तो समाधी सोहळा झाल्यावर नेवासा येथे गेले. तसा उल्लेख नामदेव गाथा या ग्रंथातील ओवी नंबर ११३८ (पृष्ठ क्रमांक ४७७ वर) मध्ये आलेला आहे.
चालिले घेवूनी देव ऋषीश्वरा । अवघिया पुढारा गरूडदेव ॥1॥
दिवसानुदिवस चालिले सत्वर । पहावे गोदातीर म्हणोनिया ॥2॥
धन्य गोदातीर धन्य कचेश्वर । जाती ऋषींवर स्नानालागी ॥3॥
सारा पौष मास गेलो कचेश्वरी । नित्य गंगातीरी स्नानसंध्या॥4॥
पाहिला कचेश्वर पाहिली ती गोदा । आली प्रतिपदा माघमास ॥5॥
नामा म्हणे देवा जावे पुण्यस्तंभा । मनोहर जागा सिद्धेश्वर ॥6॥
कचेश्वर मंदिराची देखभाल पुजारी श्री. प्रभाकर जनार्दन क्षीरसागर व काशिनाथ क्षीरसागर करतात. कचेश्वर मंदिरात राहून सेवा करणारी त्यांची पाचवी पिढी सध्या आहे. कचेश्वरांचे मंदिर दैत्यगुरू शुक्राचार्यांच्या मंदिरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. महाशिवरात्रीला तेथे मोठी जत्रा भरते. गुरू शुक्राचार्य व शिष्य यांची त्या दिवशी वाजतगाजत भेट होते. मंदिराच्या चारीही बाजूंस भिंती असून आवारात ऐसपैस जागा आहे. मंदिरात मुंज, लहान मुलांचे जावळ काढणे, लघुरूद्र असे धार्मिक कार्यक्रम होतात. त्या ठिकाणी मुहूर्त नसतानादेखील विवाह होऊ शकतात.
त्र्यंबकेश्वराचे देवस्थान कचेश्वर मंदिराच्या पाठीमागील बाजूस असून त्या मंदिराची देखभाल व पूजा यांसाठी इंग्रज राजवटीतून सनदा दिल्या गेलेल्या आहेत. मंदिराचे बांधकाम दगडी असून ते घुमटाकार आहे. मंदिरापुढे दगडात कोरीव काम केलेला सभामंडप आहे. त्र्यंबकेश्वराची पिंड ही पाच ते सहा फूट लांबीची आहे.
श्री कचेश्वर देवस्थान (तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर) हे कोकमठाण ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे. ते सुस्थितीत आहे. रामजी गुरव यांनी १२२९ पासून मंदिर परंपरा, संस्कृती जपली, ती पिढ्यान् पिढ्या चालत आली आहे.
कचेश्वर देवस्थानाची स्थापना यादव राजांच्या काळात झालेली आहे. मोगल बादशहाने हल्ला केल्यानंतर त्यावेळच्या गुरवांनी त्या ठिकाणी मोगलांशी लढा दिला असा इतिहास सांगितला जातो. ब्रिटिश सरकारने जमिनीबाबत सनद ३ डिसेंबर १८६१ रोजी दिली. पुजार्यााची सनद वहिवाटदार म्हणून दिनांक २५ ऑक्टोबर १८७५ रोजी दिली गेली आहे. देवापुढे भाविकांनी वाहिलेले धान्य, दक्षिणा, पैसाअडका ही बाब गुरवांची खाजगी असल्याने, त्याच्याशी गावकरी वा इतर कोणाचाही संबंध नाही. जिजाबा गुरव यांनी स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरूद्ध लढा दिला, त्यासाठी तुरूंगवास भोगला.
भाऊ वल्लभा जिजाबा गुरव आणि पत्नी भिकाबाई गुरव यांनी १८६१ मध्ये कायम सनद दिलेली आहे. त्यात नमूद केले आहे, की मंदिराची सेवा, पूजा-अर्चा, आरती, दिवाबत्ती गुरव पुजार्याेने करावी व त्याच्या पत्नीने देवीपुढे स्वच्छता राखावी, सडा-रांगोळी घालावी.
मंदिरासमोर महादेवाची पिंड आहे. तेथे पूर्वी नारायण नागबलीचा विधी केला जात असे. पिंडीजवळ वटवृक्ष आहे. तेथे ग्रहशांती केली जाते, नैवेद्य दाखवला जातो. घाटाजवळ गणपती मंदिर आहे, घाट मातीत बांधलेला आहे. भाविकांना राहण्यासाठी खोल्या बांधल्या गेल्या असून, त्यांचे बांधकाम भाविक भक्तांनी केले आहे.
कोकमठाण येथील संत विभूती परमपूज्य रामदासी महाराज यांनी कचेश्वर मंदिराच्या छताचे बांधकाम १९७२ मध्ये करून दिले आहे.
कोपरगाव व रघुनाथराव पेशवे
कोपरगावास एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले ते पेशवाईच्या काळात रघुनाथराव पेशव्यांमुळे. रघुनाथराव हे पहिल्या बाजीराव पेशव्यांचे पुत्र व नानासाहेबांचे धाकटे बंधू. अटकेपार मराठेशाहीचे झेंडे फडकवणारे पराक्रमी पुरुष. त्यांना राघोबादादा, राघोभरारी अथवा दादासाहेब या नावांनी ओळखले जाते. हि राघो भरारी पेशावरच्या पुढे पर्यंत देखील पोहचली असती पण रघुनाथराव पुण्याच्या राजकारणाच्या ओढीने आततायीपणे परतले. त्यांच्या याच चुकीचा परिणाम पुढे पानिपतात अब्दालीकडून मराठ्यांचा मोठा पराभव झाला. सेनापती पेशवे सदाशिवराव,पेशव्यांचे वारसदार विश्वासराव मारले गेले. अगणित सैन्य संपत्ती लुटली गेली. या धक्यात रघुनाथरावांचे जेष्ठ बंधू नानासाहेब पेशवे यांचा मृत्यू झाला.
नानासाहेब पेशवे यांच्या नंतर माधवराव पेशवे सत्तेत आले. राघोबादादां त्यांचे काकाश्री. पण रघुनाथराव पेशवे यांची महत्वाकांक्षा आणि स्वभाव यामुळे त्यांना कोपरगावात नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. भलेही राघोबादादा नजरकैदेत होते, पण आपल्यासाठी त्यांनी तिथं भव्य वाडा बांधला.सन १७८२ मध्ये श्रीमंत थोरले माधवराव पेशवे आणि राघोबादादा यांच्यात पेशवाईच्या पदावरून एकदा संघर्ष पेटला.
तर माधवराव जिवंत असताना राघोबा दादांना काही हालचाल करता आली नाही. मात्र, नंतरच्या काळात कट-कारस्थानं रचून त्यांनी पेशवे पदाच्या गादीवर आलेला धाकटा पुतण्या नारायणराव पेशवे यांना मारून टाकलं. श्रीमंत नारायण पेशवेंच्या मृत्यूनंतर पेशवाईचा इतिहास बदलला. राघोबा आणि आनंदीबाईंना न्यायासनापुढे उभं केलं गेलं. न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांनी आनंदीबाईंना कोपरगांव इथं नजरकैदेत ठेवलं तर राघोबादादांना देहांताची शिक्षा ठोठावली. राघोबादादांची देहान्ताची शिक्षा प्रत्यक्षात झाली नाही. पण नंतर त्यांनाही कोपरगावच्या वाड्यात नजरकैदेत ठेवण्यात आले.
दादांना गोदाकाठ फारच आवडे. दादा अधूनमधून पुण्याहून कोपरगावला वास्तव्यास येत. त्यांचे दोन वाडे कोपरगावात होते. एक बेट-कोपरगाव येथे शुक्राचार्य मंदिराच्या जवळ असून दुसरा शहरात होता. बेटातील वाडा सध्या अस्तित्वात नाही. दुसरा वाडा शहरात आहे. तसेच १७८३ मध्ये कोपरगावजवळील 'हिंगणी' येथे एक वाडा बांधण्याचे काम त्यांनी सुरू केले होते परंतु तो पूर्ण होऊ शकला नाही.
१७ मे १७८२ ला इंग्रज व मराठे यांच्यात सालबईचा तह झाला त्यानुसार इंग्रजांनी राघोबादादास महादजींच्या स्वाधीन केले. राघोबादादांनी कोपरगाव हे ठिकाण पुढील वास्तव्यासाठी निवडले. त्यांना पेशव्यांकडून दरसाल तीन लक्ष रुपये पेन्शन मंजूर करण्यात आले. १७८३ मध्ये दादासाहेब कोपरगाव आले व पत्नी आनंदीबाई, पुत्र अमृतराव (दत्तक) व बाजीराव यांच्यासोबत कोपरगावी राहू लागले.
पुढे थोरल्या वहिनी गोपिकाबाई (श्रीमंत नानासाहेबांच्या पत्नी) यांची भेट घेण्याची इच्छा दादांनी त्यांच्याकडे व्यक्त केली. नाशिकमध्ये वास्तव्यास असणाऱ्या गोपिकाबाईंनी तत्पूर्वी त्यांना नारायणरावांच्या खुनाबद्दल प्रायश्चित्त घेण्यास सांगितले. दादांनी ४ ऑगस्ट १७८३ रोजी गोदावरी व दारणा संगमावरील 'सांगवी' येथे यथाविधी प्रायश्चित्त घेतले. नंतर नाशिकजवळील गंगापूर येथे उभयतांची भेट झाली. दादा कोपरगावी परतले. त्यानंतर दादांची प्रकृती खालावली व काही महिन्यांतच आजाराने ११ डिसेंबर १७८३ ला बेटातील वाड्यात दादांचे निधन झाले. त्यांचे अंत्यसंस्कार हिंगणी येथे करण्यात आले. दादांच्या निधनावेळी आनंदीबाई गरोदर होत्या. पुढे त्यांनी ३० मार्च १७८४ ला कोपरगावातील वाड्यात मुलाला जन्म दिला. त्याचे नाव 'चिमणाजी' ठेवण्यात आले. आनंदीबाई मुलांसमवेत कोपरगावातील वाड्यात राहू लागल्या. १७९२ पर्यंत कोपरगावात राहिल्यानंतर त्या 'आनंदवल्ली' येथे गेल्या व मार्च १७९४ मध्ये त्यांचा तेथे मृत्यू झाला.
हिंगणी येथील अपूर्ण वाडा व समाधी-
हिंगणी हे छोटेसे गाव कोपरगावापासून साडेपाच किलोमीटर अंतरावर गोदावरी काठी आहे. कोपरगावात आल्यावर (१७८३ ) रघुनाथरावांनी येथे एक भव्य वाडा बांधावयास सुरुवात केली. पूर्ववाहिनी गोदावरी ज्या स्थानावर दक्षिणवाहिनी होते त्या काटकोनाच्या स्थानावर ही वास्तू बांधण्यास प्रारंभ झाला. वाड्याच्या तीन भिंतींचे बांधकाम झाल्यानंतर पूर्वेकडील चौथ्या भिंतीचे बांधकाम चालू असताना राघोबादादांचे ११ डिसेंबर १७८३ रोजी कोपरगाव बेटात निधन झाले. राघोबांनी ते आजारी असताना, त्यांचा अंत्यविधी या वाड्यात व्हावा व तेथेच त्यांची राख पडावी अशी इच्छा व्यक्त केली होती.. त्याप्रमाणे राघोबांचे दहन या तीन भिंतींच्या वाड्यात केले गेले व त्या ठिकाणी सांबाची स्थापना करण्यात आली. राघोबादादांचा वाडा बांधताना चुना तयार करण्यासाठी वापरलेले मोठे दगडी चाक तेथे बघण्यास मिळते.वाड्याचा पूर्व बाजूचा पाया अक्षरशः गोदावरीच्या पात्रात आहे. आता पर्यंत गोदावरीला अनेक महापूर येऊन गेले तरी देखील वाडा आजही जश्याचा तसा उभा आहे हे विशेष. दगडातील बांधकाम अतिशय मजबूत आहे. वाड्याच्या तीन भिंती अजूनही भक्कमपणे गोदेतटी उभ्या आहेत. त्यांची उंची प्रचंड असून नदीच्या बाजूने दोन्ही बाजूंना उंच व भक्कम बुरुज आहेत. वाड्याच्या प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकाम असून वर गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. आत गेल्यावर रघुनाथरावांच्या समाधीचं मंदिर दिसतं. वाड्याच्या मधोमध जे पिवळ्या रंगाचं मंदिर आहे ती राघोबा दादांची समाधी आहे.त्यात शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. वाडा खरोखरच पूर्ण झाला असता तर एक भक्कम, प्रशस्त व रेखीव वास्तू या गोदेकाठी पहावयास मिळाली असती.वाड्याची सध्याची रचना पाहून लक्षात येते कि याचा नियोजित आराखडा कीती विस्तीर्ण असावा. बहुदा शनिवार वाडया प्रमाणे बहू मजली ही असेल, पण दुर्दैवाने तो पूर्ण होऊ शकला नाही आणि वाड्याला कुणाचेही वास्तव्य लाभले नाही.
राघोबादादांचा वाडा, कोपरगाव-
राघोबादादांना गोदाकाठ फारच आवडे. दादा अधूनमधून पुण्याहून कोपरगावला वास्तव्यास येत. त्यांचे दोन वाडे कोपरगावात होते. एक बेट-कोपरगाव येथे शुक्राचार्य मंदिराच्या जवळ असून दुसरा शहरात होता. बेटातील वाडा सध्या अस्तित्वात नाही. दुसरा वाडा शहरात आहे.
शहरातील वाडा गोदावरीच्या उत्तर काठावर आहे. हा वाडा अठराव्या शतकाच्या मध्यावधीत बांधण्यात आला. वाड्याच्या नक्षीदार जाळीवजा महिरपी खिडक्या आपले लक्ष वेधून घेतात. वाडा सुमारे २६ फूट उंचीच्या भक्कम दगडी चौथऱ्यावर आहे. नदीच्या संभाव्य पुराच्या धोक्यामुळे त्याची उंची प्रचंड घेतलेली असावी.भिंतींच्या वाड्याचे बांधकाम मजबूत, भक्कम व उत्कृष्ट दर्जाचे आहे. भिंतीची लांबी दोन हजार फूट रुंदी एक हजार फूट आणि उंची पंचेचाळीस फूट असून भिंतीची माथ्यावरील जाडी सात फूटांची आहे. सर्व बांधकामाला आतबाहेर कातीव स्वरूपाचा काळा दगड व चुना वापरला गेलेला आहे. वाड्याच्या उत्तर व दक्षिण भिंतीला एकेक उंच बुरूज बांधलेला आहे. उत्तरेकडील भिंतीमध्ये प्रशस्त प्रवेशद्वार ठेवलेले आहे.

वाड्यात उत्तर बाजूने पायऱ्यांनी प्रवेश करता येतो. आत एक पूर्वाभिमुख द्वार दिसते त्यातून मुख्य वाड्यात प्रवेश करता येतो. आत गेल्यावर दिसतो तो दिवाणखाना. त्याच्या छताचे नक्षीकाम अप्रतिम आहे. पुढे गेल्यावर एक मोठा चौक दिसतो. वाड्यात दिवाणखान्यात सोबतच सदर, मुदपाकखाना, कोठीघर, खलबतखाना इत्यादी असावे. श्रीमंत दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे बालपण गेले तो हाच वाडा. पुढे पेशवेपदी असतानाही अनेकदा ते कोपरगावी येत. १८१८ ला मराठेशाहीच्या पतानानंतर वाडा इंग्रजांच्या ताब्यात आला. त्यांनी तेथे अनेक प्रशासकीय कार्यालये सुरू केली. मात्र, इंग्रजांच्या जाण्यानंतर या वाड्याला कोणी वालीच उरला नाही. आणि वाडा तसाच पडून राहिला. आपल्या नक्षीकाम आणि कलाकुसरीने आकर्षित करणारा हा वाडा आज मात्र पूर्णतः कोलमडून गेलाय, वारा, वादळ, पाऊसाने लाकडी दरवाजे, खिडक्या, महिरपी जमीनदोस्त झाल्या. वाड्याचे वैभव असणारा मोठा चौकही उध्वस्त झालाय. वाड्याच्या आत एक तळघर सुद्धा आहे, पण अलिकडच्या काळात ते कोणीही उपडण्याचा प्रयत्न केलेला नाही..दरम्यान, वाड्यातून बेटापर्यंत नदीच्या खालून भुयारी मार्ग आहे, असे म्हणतात की, या मागनि कधी कधी सैन्याच्या गुप्त हालचाली केल्या जातात.मधल्या काळात वाड्यात अनेक फेरबदल व दुरुस्त्या झाल्याने तसेच वाड्याची बरीच पडझड झाल्याने वाड्याची अंतर्गत रचना पूर्वी कशी होती याचा अंदाज बांधणे कठीण आहे. राघोबांच्या इच्छेनुसार बांधला जाणारा तो वाडा पूर्ण झाला असता तर प्रशस्त, भक्कम आणि रेखीव नक्षीकामाचा वाडा पाहण्यास मिळाला असता!
स्वातंत्र्यानंतर तेथे मामलेदार कचेरी सुरू करण्यात आली. नंतरच्या काळात वाडा पुरातत्व विभागाकडे देण्यात आला. पेशवेकालीन वैभवाचा मुक साक्षीदार असणारा हा वाडा काष्टकामाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. राज्य शासनाच्या पुरातत्व विभागाच्या राज्य संरक्षित स्मारकात वाड्याची नोंद असून वाड्याच्या डागडुजीचे काम सध्या प्रशासनातर्फे चालू आहे.
संदर्भ :-१) अहमदनगर जिल्हा गॅझेटीयर
२) https://www.santsahitya.in
३) https://www.discovermh.com
४) स्थापत्य - महाराष्ट्र शासन
५) http://www.pankajz.in/
६) New history of the Marathas (Vol III)- G.S.Sardesai
७) History of Mahrattas- James Grant Duff
८) Last days of Peshwa Raghunathrao (article)- P.L.Saswadkar
९) Ahmednagar district Gazetteer-Kopargaon
१०) Bet Kopargaon Devasthan Trust
https://in.worldorgs.com/catalog/kopargaon/golf-course/mahanubhav-panth-kokamthan-sthan
औरंगाबाद मंडलात सर्वाधिक 28 संरक्षित वास्तू नगर जिल्ह्यात आहेत. संरक्षित
नसलेल्या वास्तूंची संख्या तर कितीतरी अधिक आहे. नगरचा भुईकोट किल्लाही
संरक्षित वास्तूंच्या यादीत नाही.
नगर शहरातील संरक्षित वास्तू -
1) दमडी मशीद, 2) न्यामतखानी दरवाजा, 3) कोटला, 4) मक्का मशीद, 5)
चंगेजखान महालाजवळील सज्रेखान मकबरा (दोबोटी चिरा), 6) अहमद निजामशाहचा
मकबरा, बागरोजा, 7) सलाबतखान मकबरा (चांदबीबी महाल) 8) फराहबख्क्ष महाल.
जिल्ह्यातील संरक्षित वास्तू - 1)
ढोकेश्वर लेणी (ता. पारनेर), 2) जैन मंदिर, घोटण, ता. शेवगाव, 3)
मल्लिाकार्जुन मंदिर, घोटण, 4) हेमाडपंती मंदिर, 5) गुहा व मंदिर,
हरिश्चंद्रगड (ता. अकोले) 6) जरासंधनगरी, जोर्वे (ता. संगमनेर), 7)
मल्लिकार्जुन मंदिर व 8) नकटीचे देऊळ, कर्जत, 9) जुने महादेव मंदिर,
कोकमठाण (ता. कोपरगाव), 10) देवी मंदिर, मांडवगण (र्शीगोंदा), 11)
सिद्धेश्वर मंदिर, पारनेर, 12) बाळेश्वर मंदिर व 13) लक्ष्मीनारायण मंदिर,
पेडगाव बहाद्दूर(र्शीगोंदा), 14) अमृतेश्वर मंदिर, रतनवाडी (ता. अकोले),
15) भवानी मंदिर, टाहाकारी (ता. अकोले), 16) तिसगावच्या वेशी (ता.
पाथर्डी), 17) सिद्धेश्वर मंदिर, 18) देवी मंदिर व 19) विष्णू मंदिर व घाट,
कायगाव टोका (ता. नेवासे), 20) दायमाबाद (ता. र्शीरामपूर) व 21) लाडमोड
टेकडी (नेवासे).
कोकमठाण गावात भुमिज प्रकारचे मंदीर असून त्याचे शिखर वीटांनी तर बाकी भाग दगडांनी बांधला आहे. या मंदीराचा तलविन्यास तारकाकृती असून वीटा आणि चुना याच्या सहाय्याने बांधलेले शिखर आजमितीस पुर्णपणे शिल्लक नाही. अमलसार, भुमि आणि दोन कलश आज शिल्लक नाही. हे मंदीर कदाचित सप्तभुम भुमिज प्रासाद याप्रकारचे असावे.
मंदीर उत्तराभिमुख असून त्याच्या तलविन्यासाप्रमाणे त्यातील काही वास्तुशास्रीय घटकांचे निर्माण तंत्र वैशिष्ट्यपुर्ण आहे. मंदीर द्विगर्भ प्रकारचे आहे. मुख्य गर्भगृहात आज शिवलिंग असले तरी त्यात विष्णुची मुर्ती असावी असे मानण्यास जागा आहे. मंडपाच्या पुर्वेला पण मंडपाला जोडून असलेल्या दुय्यम गर्भगृहात देवीची मुर्ती असुन आज ती देवी जगदंबा म्हणून ओळखली जाते. दुय्यम गर्भगृहाचा तलविन्यास साधा चौकोनी असून त्याला कोणतेही अंग नाही. त्यामुळे हे मंदीर तीन अर्धमंडपांनी युक्त असलेला मंडप आणि एकच गर्भगृह असलेले होते. परंतु नंतरच्या काळात पुर्वेकडील अर्धमंडप गर्भग्रूहात रुपांतरील करण्यात आला असावा असा निष्कर्श काही विद्वानांनी काढला आहे.
तथापि या बिनखांबी मंडपाचे, अर्धस्तंभाचे आणि तीन चर्तुथक स्तंभाचे नीट निरीक्षण केले आणि दोन अम्तराळातील साधर्म्य लक्षात घेतले तर हे दुसरे गर्भगृह मुळ मंदीराचाच भाग होता हे लक्षात येईल.या मंदीराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदीराच्या बाह्यांगावरील भद्रांना देण्यात आलेले लहान भुमिज मंदीराचे स्वरुप होय. गर्भगृहावरिल प्रंचड वजन पेलण्यासाठी, भिंती अधिक भक्कम करण्यासाठी हि योजना करण्यात आलेली असावी असे कझिन्सचे मत आहे. पण मंदीराच्या तलविन्याचे अगदी बारकाईने निरिक्षण केले तर गर्भगृहाच्या दोन बाजुंना बर्यापैकी पुढे आलेल्या भद्र अंगामध्ये खोल्या नसल्या तरी देवकोष्टे आहेत हे लक्षात येईल. मंडप बिनखांबी असून त्याचे छत शिखराकडे लहान होत जाणर्या वर्तुळाकर थरांनी बनलेले आहे. छताच्या मध्यावर फुलाच्या कळीची नक्षी असलेला उत्क्षेप आहे. अंतराळाच्या दरवाज्यावर पाच रथिका असून त्यात देवीच्या मुर्ती आहेत.अंतराळाचे छतही घुमटाकार आहे.
दोन्ही गर्भगृहाच्या दरवाज्यावरील गरुडमुर्ती आणि मुख्य गर्भगृहाच्या अंतराळाच्या दरवाज्याच्या उत्तरांगावरील देवीच्या मुर्ती यावरुन या मंदीरात मुख्य दैवत म्हणून विष्णु आणि लक्ष्मी असाव्यात असा अंदाज बांधता येतो. मंदीराचा तलविन्यास , वास्तुशास्त्रीय शैली आणि शिल्प यावरुन हे मंदीर इसवी सनाच्या तेराव्या शतकात हे मंदीर बांधले गेले असावे.
हे मंदिर १३ व्या शतकातील आहे. येथे गर्भगृह , अंतराळा आणि मंडप यांचा सामावेशांनी बनलेले असून त्यांच्यावरती बारीक नक्षी काम केले आहे.मंदिराचे शिखर, विटांचे असून, बारीक नक्षीकाम केलेल्या क छोट्या शिखारांपासून बनलेले आहे.मंदिराचा वरचा भाग भौमितिक शैलीने बांधला गेलेला आहे. मंदिराच्या कळसावर मोठे पदक फुलाच्या आकाराचे आहे त्यामुळे शोभा वाढली आहे. त्याच्यावर नृत्य करणाऱ्या आणि वाद्य वाजवणाऱ्या मूर्त्याची नक्षीकाम केलेले आहेत.मुख्य शिखरावर लिंग आणि अनंतासायी विष्णू यांचे चित्र आहे.
https://ahmednagar.nic.in/tourist-place/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%BE/
कोकमठाण शिवमंदिर, कोकमठाण | Discover Maharashtra
Discover Maharashtra

कोकमठाण शिवमंदिर, कोकमठाण –
नगर जिल्ह्यातल्या कोपरगाव या तालुक्याच्या ठिकाणापासून जेमतेम ८ कि. मी. अंतरावर कोकमठाण
गावात प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर इ.स. च्या १३ व्या शतकातील असावे.
अंतराळ, सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची पूर्वाभिमुख संरचना आहे.
मंदिराचे शिखर विटांचे असून बारीक नक्षीकाम केलेल्या छोट्या शिखारांपासून
बनलेले आहे. गर्भगृहाच्या वितानावर नृत्य करणाऱ्या आणि वाद्य वाजवणाऱ्या
यक्ष व गंधर्वांची शिल्पे आहेत. मुख्य शिखरावर लिंग आणि अनंतासायी विष्णू
यांचे शिल्प आहे.
मंदिराला पूर्वेला मुख्य प्रवेशद्वार असून पश्चिम
बाजूने सुद्धा प्रवेशद्वार आहे. गाभाऱ्यात शिवपिंड आहे, आणि त्याच्या
पाठीमागे एका चौथऱ्यावर शेषशायी विष्णूचे शिल्प उभे करून ठेवले आहे.
ललाटावर गरुड असल्यामुळे हे मूळचे विष्णूमंदिर असावे. मंदिराच्या
गाभाऱ्याच्या बाह्यांगावर मंदिराच्या शिखराच्या प्रतिकृती सुंदर आहेत. तसेच
इथे असलेली नक्षीदार जालवातायाने लक्ष वेधून घेतात. तसेच सुरसुंदरी, वाद्य
वाजवताना यक्ष-गंधर्व, दिगपाल, आणि बरेच देवी देवतांची शिल्पे आहेत पण
मंदिराची पडझड झाल्यामुळे शिल्प मात्र ओळखता येत नाही. शांत निवांत
गोदावरीच्या काठावर वसलेले हे मंदिर कोपरगावचे भूषण आहे. मंदिराच्या
गाभाऱ्याच्या बाह्यांगावर मंदिराच्या शिखराच्या प्रतिकृती सुंदर आहेत. तसेच
इथे असलेली नक्षीदार जालवातायाने लक्ष वेधून घेतात. तसेच सुरसुंदरी, वाद्य
वाजवताना यक्ष-गंधर्व, दिगपाल, आणि बरेच देवी देवतांची शिल्पे आहेत पण
मंदिराची पडझड झाल्यामुळे शिल्प मात्र ओळखता येत नाही. शांत निवांत
गोदावरीच्या काठावर वसलेले हे मंदिर कोपरगावचे भूषण आहे.
माहिती साभार – Rohan Gadekar फेसबुक वरून
https://www.discovermh.com/kokmathan-shiv-mandir/
| थिंक महाराष्ट्र
See author's posts
कोपरगाव
बेट भागातील कचेश्वर मंदिर परिसर हा श्री निवृत्तिनाथ व त्यांची बहीण संत
मुक्ताबाई यांच्या वास्तव्याने पावन झालेला आहे. निवृत्तिनाथ व मुक्ताबाई
प्रत्यक्ष पांडुरंगासह (विठोबा) पुणतांबे येथील योगीराज श्री चांगदेव महाराज यांच्या समाधी सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याकरता बेटातील कचेश्वर मंदिरात
माहे पौष मासी पूर्ण एक महिनाभर वास्तव्यास राहिले होते. निवृत्तिनाथ व
मुक्ताबाई यांचे आगमन ज्ञानेश्वर व सोपानदेव यांचा समाधी विधी संपल्यानंतर
झाले. ते मांडवगण पारनेरमार्गे आले. त्यांचा हेतू गोदास्नान व कचेश्वर
दर्शन असा होता. पुढे, त्यांनी माघ मासी चांगदेव महाराजांच्या समाधी
सोहळ्यासाठी म्हणून पुणतांबा गावी प्रयाण केले. ते तो समाधी सोहळा झाल्यावर
नेवासा येथे गेले. तसा उल्लेख नामदेव गाथा या ग्रंथातील ओवी नंबर 1138
(पृष्ठ क्रमांक 477 वर) मध्ये आलेला आहे.
चालिले घेवूनी देव ऋषीश्वरा । अवघिया पुढारा गरूडदेव ॥1॥
दिवसानुदिवस चालिले सत्वर । पहावे गोदातीर म्हणोनिया ॥2॥
धन्य गोदातीर धन्य कचेश्वर । जाती ऋषींवर स्नानालागी ॥3॥
सारा पौष मास गेलो कचेश्वरी । नित्य गंगातीरी स्नानसंध्या॥4॥
पाहिला कचेश्वर पाहिली ती गोदा । आली प्रतिपदा माघमास ॥5॥
नामा म्हणे देवा जावे पुण्यस्तंभा । मनोहर जागा सिद्धेश्वर ॥6॥
कचेश्वर मंदिराची देखभाल पुजारी श्री. प्रभाकर जनार्दन क्षीरसागर व
काशिनाथ क्षीरसागर करतात. कचेश्वर मंदिरात राहून सेवा करणारी त्यांची पाचवी
पिढी सध्या आहे. कचेश्वरांचे मंदिर दैत्यगुरू शुक्राचार्यांच्या
मंदिरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. महाशिवरात्रीला तेथे मोठी जत्रा
भरते. गुरू शुक्राचार्य व शिष्य यांची त्या दिवशी वाजतगाजत भेट होते.
मंदिराच्या चारीही बाजूंस भिंती असून आवारात ऐसपैस जागा आहे. मंदिरात मुंज,
लहान मुलांचे जावळ काढणे, लघुरूद्र असे धार्मिक कार्यक्रम होतात. त्या
ठिकाणी मुहूर्त नसतानादेखील विवाह होऊ शकतात.
त्र्यंबकेश्वराचे देवस्थान कचेश्वर मंदिराच्या पाठीमागील बाजूस असून
त्या मंदिराची देखभाल व पूजा यांसाठी इंग्रज राजवटीतून सनदा दिल्या
गेलेल्या आहेत. मंदिराचे बांधकाम दगडी असून ते घुमटाकार आहे. मंदिरापुढे
दगडात कोरीव काम केलेला सभामंडप आहे. त्र्यंबकेश्वराची पिंड ही पाच ते सहा
फूट लांबीची आहे.
श्री कचेश्वर देवस्थान (तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर) हे कोकमठाण
ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे. ते सुस्थितीत आहे. रामजी गुरव यांनी 1229
पासून मंदिर परंपरा, संस्कृती जपली, ती पिढ्यान् पिढ्या चालत आली आहे.
श्री
कचेश्वर देवस्थानाची स्थापना यादव राजांच्या काळात झालेली आहे. मोगल
बादशहाने हल्ला केल्यानंतर त्यावेळच्या गुरवांनी त्या ठिकाणी मोगलांशी लढा
दिला असा इतिहास सांगितला जातो. ब्रिटिश सरकारने जमिनीबाबत सनद 3 डिसेंबर
1861 रोजी दिली. पुजार्यााची सनद वहिवाटदार म्हणून दिनांक 25 ऑक्टोबर 1875
रोजी दिली गेली आहे. देवापुढे भाविकांनी वाहिलेले धान्य, दक्षिणा, पैसाअडका
ही बाब गुरवांची खाजगी असल्याने, त्याच्याशी गावकरी वा इतर कोणाचाही संबंध
नाही. जिजाबा गुरव यांनी स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरूद्ध लढा दिला,
त्यासाठी तुरूंगवास भोगला.
भाऊ वल्लभा जिजाबा गुरव आणि पत्नी भिकाबाई गुरव यांनी 1861 मध्ये कायम
सनद दिलेली आहे. त्यात नमूद केले आहे, की मंदिराची सेवा, पूजा-अर्चा, आरती,
दिवाबत्ती गुरव पुजार्याेने करावी व त्याच्या पत्नीने देवीपुढे स्वच्छता
राखावी, सडा-रांगोळी घालावी.
भाऊराव दादा क्षीरसागर, प्रभाकर जनार्दन क्षीरसागर यांच्या नावाची
व्यवस्थापक म्हणून नोंद 1952 मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारच्या धर्मादाय
आयुक्त यांच्याकडे पंच कमिटीने केलेली आहे. वसंत नरहरी क्षीरसागर हेही गुरव
पुजारी 1952 पासून होऊन गेले. त्यानंतर काशिनाथ ऊर्फ रमेश भाऊराव
क्षीरसागर व प्रभाकर जनार्दन क्षीरसागर (मयत) यांचा वारसदार म्हणून मुलगा
सुंदर प्रभाकर क्षीरसागर हे गुरव पुजार्यांचे काम करत आहेत.
मंदिरासमोर महादेवाची पिंड आहे. तेथे पूर्वी नारायण नागबलीचा विधी केला जात असे. पिंडीजवळ वटवृक्ष
आहे. तेथे ग्रहशांती केली जाते, नैवेद्य दाखवला जातो. घाटाजवळ गणपती मंदिर
आहे, घाट मातीत बांधलेला आहे. भाविकांना राहण्यासाठी खोल्या बांधल्या
गेल्या असून, त्यांचे बांधकाम भाविक भक्तांनी केले आहे.
कोकमठाण येथील संत विभूती परमपूज्य रामदासी महाराज यांनी कचेश्वर मंदिराच्या छताचे बांधकाम 1972 मध्ये करून दिले आहे.
– सुंदर प्रभाकर क्षीरसागर
About Post Author
सुंदरलाल प्रभाकर क्षीरसागार हे अहमदनगरमधील कोपरगाव तालुका येथे राहतात. ते कचेश्वर मंदिराचे वंशपरंपरागत पुजारी.
लेखकाचा दूरध्वनी
9689627803
https://www.thinkmaharashtra.com/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0-2/
नगर जिल्ह्यातल्या कोपरगाव या तालुक्याच्या ठिकाणापासून जेमतेम ८ कि. मी. अंतरावर कोकमठाण गावात प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर इ. स. च्या १३ व्या शतकातील असावे. अंतराळ, सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची पूर्वाभिमुख संरचना आहे. मंदिराचे शिखर विटांचे असून बारीक नक्षीकाम केलेल्या छोट्या शिखारांपासून बनलेले आहे. गर्भगृहाच्या वितानावर नृत्य करणाऱ्या आणि वाद्य वाजवणाऱ्या यक्ष व गंधर्वांची शिल्पे आहेत. मुख्य शिखरावर लिंग आणि अनंतासायी विष्णू यांचे शिल्प आहे.
मंदिराला पूर्वेला मुख्य प्रवेशद्वार असून पश्चिम बाजूने सुद्धा प्रवेशद्वार आहे. गाभाऱ्यात शिवपिंड आहे, आणि त्याच्या पाठीमागे एका चौथऱ्यावर शेषशायी विष्णूचे शिल्प उभे करून ठेवले आहे. ललाटावर गरुड असल्यामुळे हे मूळचे विष्णूमंदिर असावे. मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाह्यांगावर मंदिराच्या शिखराच्या प्रतिकृती सुंदर आहेत. तसेच इथे असलेली नक्षीदार जालवातायाने लक्ष वेधून घेतात. तसेच सुरसुंदरी, वाद्य वाजवताना यक्ष-गंधर्व, दिगपाल, आणि बरेच देवी देवतांची शिल्पे आहेत पण मंदिराची पडझड झाल्यामुळे शिल्प मात्र ओळखता येत नाही. शांत निर्वात गोदावरीच्या काठावर वसलेले हे मंदिर कोपरगावचे भूषण आहे.
https://www.santsahitya.in/tirthkshetra/kokmathan-shivmandir-kokmathan/
ताहाकारीच्या मंदिरासारखे या मंदिराचे छतही दगडात कोरलेल्या देठाला
लगडलेल्या फुलांच्या आकाराच्या झुंबरांनी अलंकृत आहे. मंदिर भूमिज शैलीत
बांधले असून शिखर विटांमध्ये रचलेले आहे. मुख्य सभामंडप, त्याला तीन दरवाजे
आणि त्याच्या पुढे मुख्य गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. गोदावरी
नदीच्या अगदी तीरावरच असल्याने एखाद्या मोठ्या पुराचा फटका बसला असावा असे
त्या परिसरातील लहान भग्न मंदिरे पाहून जाणवते. या मंदिराच्या मूळ
बांधणीनंतर पडझड झालेली आणि त्यानंतर ते पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न
झालेला दिसतो, याचे कारण म्हणजे मूळ दगडी मंदिरावर असलेले चुना आणि खडी
यांचे मिश्रण असलेले बांधकाम. ते साधारण दोन-तीनशे वर्षांपूर्वीचे असावे.
पण त्या प्रयत्नांतही मूळ मंदिराचे सौंदर्य कायम राखण्याचा प्रयत्न केलेला
दिसतो.
आजच्या काळातील राज्यकर्त्यांना अशी सुबुद्धी लाभो अशी प्रार्थना त्या शंभूमहादेवाजवळ करुन आम्ही कोकमठाणचा निरोप घेतला.
(अवांतर: या कोकमठाण गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी
अक्षयतृतीयेला गोदावरीच्या पलीकडील संवत्सर नावाच्या गावाला शिव्या
देण्याचा आणि गोफणीने दगडफेक करण्याचा रिवाज. या दिवशी दोन्ही तीरांवर त्या
त्या गावांतील युवक एकत्र येऊन एकमेकांना यथेच्छ शिव्या देतात, एकमेकांवर
दगडफेक करतात. दोन्ही गावांच्या दरम्यान दगड युद्धाची परंपरा असलेले युद्ध
खेळले जाते. गोफण या अस्त्राने दगड मारून प्रतिपक्षास पराभूत करणे हीच
मुख्यत्वे भावना असते. नदीपात्राच्या मधोमध हे युद्ध अक्षयतृतीयेपासून ५
दिवस दररोज सायंकाळी ४ वा. सुरू होऊन सूर्यास्तापर्यंत चालते. युद्ध
थांबावे यासाठी कोणीही एका पक्षाने पांढरे निशाण वर करून दाखविणे हा या
युद्धबंदीचा संकेत होय. तद्नंतर दोन्ही गावातील मंडळी खेळाडू आपआपल्या
दैवतांचा म्हसोबा की जय, लक्ष्मी माता की जय असे म्हणत घरी परततात. हे
युध्द केले नाही तर गावात पाऊस पडत नाही, अशी अंधश्रद्धा समाजात
होती.अलीकडच्या काळात दोन्ही गावांतील समंजस नागरिकांनी पुढाकार घेऊन ही
शिव्यांची प्रथा अगदी उपचारापुरती सीमित केली असून गोफणगुंडा युद्ध
पूर्णपणे बंद करवले आहे. व्हिडिओ -
https://www.youtube.com/watch?time_continue=49&v=G8KjATcJfxs).
तर आम्ही कोकमठाणचा निरोप घेतला.
http://www.pankajz.in/2016/08/TempleRide-2.html
| Discover Maharashtra
Discover Maharashtra
दैत्यगुरु शुक्राचार्य मंदिर, बेट कोपरगाव –
प्राचीन
काळापासून दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्ह्य़ातील
कोपरगांव तालुक्यात दैत्यगुरू शुक्राचार्याचे एकमेव मंदिर आहे. अहमदनगर
जिल्ह्य़ातील कोपरगांव तालुक्याच्या पंचक्रोशीत अनेक पौराणिक कथा व त्यांची
स्मारके यांची रेलचेल आहे.दैत्यगुरु शुक्राचार्य मंदिर.
श्रीरामचंद्र
याच परिसरातून वनवासाला गेले असे मानले जाते. दक्षिण गंगा गोदावरी याच
परिसरातून वाहते. प्राचीन काळी अनेक ऋषीमुनी, तपस्वी, महापुरुष,
साधुसंतांनी गोदावरीच्या तटी यज्ञ- याग- तपश्चर्या- ध्यानधारणा केलेली आहे.
गोदावरी
नदीच्या दक्षिण तीरावर अगदी हाकेच्या अंतरावर कोपरगांव (बेट) हे भृगू
ऋषींचे पुत्र व दैत्यांचे गुरू शुक्राचार्य यांचे कर्मस्थान आहे.
शुक्राचार्य मंदिरा समोर श्री विष्णू व गणपती यांची मंदिरे आहेत. श्री
विष्णुचे मंदिर हे काळया गुळगुळीत दगडातून बांधलेले असून दोन्ही
मंदिराच्या मध्यात “संजीवनी पार” म्हणजे येथे कचास “संजीवनी” विद्या
प्राप्त झाली व कच आणि देवयानी यांनी एकमेकांस शापित केले ते स्थान आहे.
संजीवनी मंत्र देते वेळी श्री शंकर भगवान (त्र्यंबकेश्वर) गुप्त रुपाने
तेथे आल्यामुळे त्यांचेही श्री त्रिंबकेश्वर मंदिर आहे. श्री शंकर भगवान
येथे गुप्त रुपाने आल्यामुळे सदर मंदिरासमोर नंदीची स्थापना झालेली
नाही. मंदिरा समोर नंदी नसलेले हे भगवान शंकराचे दुर्मिळ मंदिर आहे.
https://www.discovermh.com/daityaguru-shukracharya-temple/
दैत्यगुरू सद्गुरू शुक्राचार्य मंदिर, कोपरगाव, अ. नगर
जगतातील एकमेव मंदिर जिथे लग्ना साठी कोणत्याही मुहूर्ताची गरज नाही

विडिओ बघा &युट्युब चॅनेल subscribe करा
प्राचीन काळापासून दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगांव तालुक्यात दैत्यगुरू शुक्राचार्याचे एकमेव मंदिर आहे.
या
मंदिराचा जीर्णोद्धार रघुनाथराव पेशवे यांनी कोपरगाव ला कैदेत असताना केले होते.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगांव तालुक्याच्या पंचक्रोशीत अनेक पौराणिक कथा व त्यांची स्मारके यांची रेलचेल आहे. श्रीरामचंद्र याच परिसरातून वनवासाला गेले असे मानले जाते. दक्षिण गंगा गोदावरी याच परिसरातून वाहते. प्राचीन काळी अनेक ऋषीमुनी, तपस्वी, महापुरुष, साधुसंतांनी गोदावरीच्या तटी यज्ञ याग तपश्चर्या - ध्यानधारणा केलेली आहे.
गोदावरी नदीच्या दक्षिण तीरावर अगदी हाकेच्या अंतरावर कोपरगांव (बेट) हे भृगू ऋषींचे पुत्र व दैत्यांचे गुरू शुक्राचार्य यांचे कर्मस्थान आहे. येथे त्यांनी तप व वास्तव्य केले असे मानले जाते. त्याबाबत अशी आख्यायिका संगितली जाते की समुद्रमंथनातून अमृत मिळाल्यामुळे देवांना अमरत्व प्राप्त झाले. त्यामुळे दैत्य कुळांचा नाश निश्चित झाला. तो होऊ नये, दैत्यानांही अमरत्व प्राप्ती व्हावी यासाठी दैत्यांचे गुरू शुक्राचार्य यांनी शंकराची तपश्चर्या करून संजीवनी मंत्र प्राप्त करून घेतला. त्या मंत्राच्या आधारे ते मृत झालेल्या दैत्यांना पुन्हा जिवंत करत. देवांना त्यामुळे त्यांच्याशी युद्ध करणे कठीण झाले. त्यामुळे दैत्यांचा संहार व नाश करणे हे देवांना क्रमप्राप्तच झाले. बृहस्पतींनी देवांना असे सांगितले की, हा संजीवनी मंत्र लोप पावला तर मृत झालेले दैत्य पुन्हा जिवंत होऊ शकणार नाहीत. मग बृहस्पतीपुत्र कच याला शुक्राचार्य यांच्याकडे पाठविले. कच जेथे संजीवनी विद्याप्राप्तीसाठी आला ते हे स्थान असून ते शुक्राचार्य मंदिर होय, असे मानले जाते.
कोपरगाव व रघुनाथराव पेशवे
'कोपरगाव' शहर गोदावरी काठी वसलेले एक प्राचीन शहर असून अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. नगर-मनमाड महामार्गालगत असणारे हे शहर शिर्डी पासून (उत्तरेला) सुमारे 15 किलोमीटर अंतरावर आहे.
कोपरगावचे जुने नाव 'कर्पूरग्राम'. दक्षिणगंगा समजल्या जाणाऱ्या गोदावरीच्या उत्तर काठावर शहर वसलेले आहे. नदीच्या दक्षिण भागाला 'बेट कोपरगाव' म्हणतात. नदी येथे दोन प्रवाहात विभागली गेल्याने हा भाग चहूबाजूंनी पाण्याने वेढलेला असे. सध्या मात्र बेट अस्तित्वात नाही. या
भागास 'बेट कोपरगाव' अथवा 'कचेश्वराचे बेट' म्हणतात.
बेटाला पुरातन महत्व असून बेट कोपरगाव ही दैत्यगुरू शुक्राचार्यांची कर्मभूमी समजली जाते. येथे शुक्राचार्यांचा प्राचीन मंदिर असून ते जगातील एकमेव शुक्राचार्यांचे मंदिर असल्याचे मानले जाते. त्याजवळच संजीवनी पार असून याठिकाणी कचेश्वराला शुक्राचार्यांनी संजीवनी विद्या (मृत व्यक्तीला जिवंत करण्याची विद्या) दिली. येथे शुक्राचार्य व कचेश्वर लिंगरूपात आहेत. त्यालगतच गणपती, श्रीविष्णु, शिवशंकर इत्यादी दैवतांची मंदिरे आहेत. बेटातील बहुतांशी मंदिरे यादवकालीन आहेत.
कोपरगावास एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले ते पेशवाईच्या काळात रघुनाथराव पेशव्यांमुळे. रघुनाथराव हे पहिल्या बाजीराव पेशव्यांचे पुत्र व नानासाहेबांचे धाकटे बंधू. अटकेपार मराठेशाहीचे झेंडे फडकवणारे पराक्रमी पुरुष. त्यांना राघोबादादा, राघोभरारी अथवा दादासाहेब या नावांनी ओळखले जाते. दादांना गोदाकाठ फारच आवडे. दादा अधूनमधून पुण्याहून कोपरगावला वास्तव्यास येत. त्यांचे दोन वाडे कोपरगावात होते. एक बेट-कोपरगाव येथे शुक्राचार्य मंदिराच्या जवळ असून दुसरा शहरात होता. बेटातील वाडा सध्या अस्तित्वात नाही. दुसरा वाडा शहरात आहे. तसेच 1783 मध्ये कोपरगावजवळील 'हिंगणी' येथे एक वाडा बांधण्याचे काम त्यांनी सुरू केले होते परंतु तो पूर्ण होऊ शकला नाही.
17 मे 1782 ला इंग्रज व मराठे यांच्यात सालबईचा तह झाला त्यानुसार इंग्रजांनी राघोबादादास महादजींच्या स्वाधीन केले. राघोबादादांनी कोपरगाव हे ठिकाण पुढील वास्तव्यासाठी निवडले. त्यांना पेशव्यांकडून दरसाल तीन लक्ष रुपये पेन्शन मंजूर करण्यात आले. 1783 मध्ये दादासाहेब कोपरगाव आले व पत्नी आनंदीबाई, पुत्र अमृतराव (दत्तक) व बाजीराव यांच्यासोबत कोपरगावी राहू लागले.
पुढे थोरल्या वहिनी गोपिकाबाई (श्रीमंत नानासाहेबांच्या पत्नी) यांची भेट घेण्याची इच्छा दादांनी त्यांच्याकडे व्यक्त केली. नाशिकमध्ये वास्तव्यास असणाऱ्या गोपिकाबाईंनी तत्पूर्वी त्यांना नारायणरावांच्या खुनाबद्दल प्रायश्चित्त घेण्यास सांगितले. दादांनी 4 ऑगस्ट 1783 रोजी गोदावरी व दारणा संगमावरील 'सांगवी' येथे यथाविधी प्रायश्चित्त घेतले. नंतर नाशिकजवळील गंगापूर येथे उभयतांची भेट झाली. दादा कोपरगावी परतले. त्यानंतर दादांची प्रकृती खालावली व काही महिन्यांतच आजाराने 11 डिसेंबर 1783 ला बेटातील वाड्यात दादांचे निधन झाले. त्यांचे अंत्यसंस्कार हिंगणी येथे करण्यात आले. दादांच्या निधनावेळी आनंदीबाई गरोदर होत्या. पुढे त्यांनी 30 मार्च 1784 ला कोपरगावातील वाड्यात मुलाला जन्म दिला. त्याचे नाव 'चिमणाजी' ठेवण्यात आले. आनंदीबाई मुलांसमवेत कोपरगावातील वाड्यात राहू लागल्या. 1792 पर्यंत कोपरगावात राहिल्यानंतर त्या 'आनंदवल्ली' येथे गेल्या व मार्च 1794 मध्ये त्यांचा तेथे मृत्यू झाला.
राघोबादादांचा वाडा, कोपरगाव-
शहरातील वाडा गोदावरीच्या उत्तर काठावर आहे. हा वाडा अठराव्या शतकाच्या मध्यावधीत बांधण्यात आला. वाड्याच्या नक्षीदार जाळीवजा महिरपी खिडक्या आपले लक्ष वेधून घेतात. वाडा सुमारे 25 फूट उंचीच्या भक्कम दगडी चौथऱ्यावर आहे. नदीच्या संभाव्य पुराच्या धोक्यामुळे त्याची उंची प्रचंड घेतलेली असावी. वाड्यात उत्तर बाजूने पायऱ्यांनी प्रवेश करता येतो. आत एक पूर्वाभिमुख द्वार दिसते त्यातून मुख्य वाड्यात प्रवेश करता येतो. आत गेल्यावर दिसतो तो दिवाणखाना. त्याच्या छताचे नक्षीकाम अप्रतिम आहे. पुढे गेल्यावर एक मोठा चौक दिसतो. वाड्यात दिवाणखान्यात सोबतच सदर, मुदपाकखाना, कोठीघर, खलबतखाना इत्यादी असावे. श्रीमंत दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे बालपण गेले तो हाच वाडा. पुढे पेशवेपदी असतानाही अनेकदा ते कोपरगावी येत. 1818 ला मराठेशाहीच्या पतानानंतर वाडा इंग्रजांच्या ताब्यात आला. त्यांनी तेथे अनेक प्रशासकीय कार्यालये सुरू केली. मधल्या काळात वाड्यात अनेक फेरबदल व दुरुस्त्या झाल्याने तसेच वाड्याची बरीच पडझड झाल्याने वाड्याची अंतर्गत रचना पूर्वी कशी होती याचा अंदाज बांधणे कठीण आहे. स्वातंत्र्यानंतर तेथे मामलेदार कचेरी सुरू करण्यात आली. नंतरच्या काळात वाडा पुरातत्व विभागाकडे देण्यात आला. पेशवेकालीन वैभवाचा मुक साक्षीदार असणारा हा वाडा काष्टकामाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. राज्य शासनाच्या पुरातत्व विभागाच्या राज्य संरक्षित स्मारकात वाड्याची नोंद असून वाड्याच्या डागडुजीचे काम सध्या प्रशासनातर्फे चालू आहे.
हिंगणी येथील अपूर्ण वाडा व समाधी-
हिंगणी हे छोटेसे गाव कोपरगावापासून साडेपाच किलोमीटर अंतरावर गोदावरी काठी आहे. कोपरगावात आल्यावर (1783) रघुनाथरावांनी येथे एक भव्य वाडा बांधावयास सुरुवात केली. पूर्ववाहिनी गोदावरी ज्या स्थानावर दक्षिणवाहिनी होते त्या काटकोनाच्या स्थानावर ही वास्तू बांधण्यास प्रारंभ झाला. परंतु दादांच्या मृत्यूमुळे हे काम पूर्णत्वास जाऊ शकले नाही. बेटातील वाड्यात दादांचा मृत्यू झाल्यावर त्यांचे अंत्यसंस्कार इथेच करण्यात आले व समाधी बांधण्यात आली. वाड्याच्या तीन भिंती अजूनही भक्कमपणे गोदेतटी उभ्या आहेत. त्यांची उंची प्रचंड असून नदीच्या बाजूने दोन्ही बाजूंना उंच व भक्कम बुरुज आहेत. वाड्याच्या प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकाम असून वर गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. आत गेल्यावर रघुनाथरावांच्या समाधीचं मंदिर दिसतं. त्यात शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. वाडा खरोखरच पूर्ण झाला असता तर एक भक्कम, प्रशस्त व रेखीव वास्तू या गोदेकाठी पहावयास मिळाली असती.
लेखन- © सुमित अनिल डेंगळे.
संदर्भ-
1. New history of the Marathas (Vol III)- G.S.Sardesai
2. History of Mahrattas- James Grant Duff
3. Last days of Peshwa Raghunathrao (article)- P.L.Saswadkar
4. Ahmednagar district Gazetteer-Kopargaon
5. Bet Kopargaon Devasthan Trust
छायाचित्रे-
1. राघोबादादांचा वाडा, कोपरगाव
2,3. राघोबादादांचा अपूर्ण वाडा, हिंगणी
4. राघोबादादांची समाधी, हिंगणी
बाजीराव पेशवे यांचे धाकटे सुपुत्र रघुनाथराव पेशवे.
मराठयांचा अटकेपार झेंडा पोहचला तो यांनीच.
रघुनाथराव पेशवे आणि मराठा सेनेची धडकी अफगाण सैन्याला देखील बसली होती. हि राघो भरारी पेशावरच्या पुढे पर्यंत देखील पोहचली असती पण रघुनाथराव पुण्याच्या राजकारणाच्या ओढीने आततायीपणे परतले. त्यांच्या याच चुकीचा परिणाम पुढे पानिपतात अब्दालीकडून मराठ्यांचा मोठा पराभव झाला. सेनापती पेशवे सदाशिवराव,पेशव्यांचे वारसदार विश्वासराव मारले गेले. अगणित सैन्य संपत्ती लुटली गेली. या धक्यात रघुनाथरावांचे जेष्ठ बंधू नानासाहेब पेशवे यांचा मृत्यू झाला.
नानासाहेब पेशवे यांच्या नंतर माधवराव पेशवे सत्तेत आले. राघोबादादां त्यांचे काकाश्री. पण रघुनाथराव पेशवे यांची महत्वाकांक्षा आणि स्वभाव यामुळे त्यांना कोपरगावात नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. भलेही राघोबादादा नजरकैदेत होते, पण आपल्यासाठी त्यांनी तिथं भव्य वाडा बांधला.
गावच्या इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर कोपरगाव आणि आसपासचा परिसर पुराणकथांनी समृध्द आहे. १३व्या शतकात हा परिसर देवगिरीच्या यादव राजांच्या ताब्यात होता. त्यानंतर इथे बहामनी राज्य आले. पुढे निजामशाही आणि नन्तर मोगल
१७८२ मध्ये श्रीमंत थोरले माधवराव पेशवे आणि राघोबादादा यांच्यात पेशवाईच्या पदावरून एकदा संघर्ष पेटला. त्यानंतर राघोबाबादादांनी कोपरगांव येथील बेटात उंच चौथरा तयार करून भव्य असा वाडा बांधला.
तर माधवराव जिवंत असताना राघोबा दादांना हातपाय काय हलवता आले नाही. मात्र, नंतरच्या काळात कट-कारस्थानं रचून त्यांनी पेशवे पदाच्या गादीवर आलेला धाकटा पुतण्या नारायणराव पेशवे यांना मारून टाकलं.
श्रीमंत नारायण पेशवेंच्या मृत्यूनंतर पेशवाईचा इतिहास बदलला. राघोबा आणि आनंदीबाईंना न्यायासनापुढे उभं केलं गेलं. न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांनी आनंदीबाईंना कोपरगांव इथं नजरकैदेत ठेवलं तर राघोबादादांना देहांताची शिक्षा ठोठावली.
राघोबादादांची देहान्ताची शिक्षा प्रत्यक्षात झाली नाही. पण नंतर त्यांनाही कोपरगावच्या वाड्यात नजरकैदेत ठेवण्यात आले.
तसा हा वाडा पेशवाईला शोभेल असाच होता. गोदावरीच्या तीरावर २० फूट उंचीच्या चौथान्यावर ती बांधलेला वाड्यातल्या दिवाणखान्यातील छताच नक्षीकाम डोळ्यांचे पारड फिटणार आहे. वाडयात दिवाणखाना, दरबार हॉल, स्त्री पुरुषांसाठी कोठीघर, मुदपाकखाना, नाटकशाळा, घोड्यांच्या पागा होता.
याच वाड्यात राघोबादादांनी ११ डिसेंबर १७८३ रोजी अखेरचा श्वास घेतला, मात्र अंत्यविधी त्यांच्या इच्छेनुसार हिंगणे वाड्यात करण्यात आला. कोपरगावच्या वाड्यात आनंदीबाईनी समाधी उभी करून वृंदावन उभ केलं.
राघोबादादाच्या मृत्यूनंतर आनंदीबाई आणि त्यांची मुल ऑक्टोबर १७९२ पर्यंत म्हणजे तब्बल ९ वर्षे याच वाड्यात राहिल्या. मात्र, एकामागून एक अशा वाईट घटना घडल्याने आनंदीबाईनी अखेर नाशिकच्या आनंदवल्लीला जायचं ठरवलं.
पुढे हा वाडा इंग्रजानी ताब्यात घेतला. आपल्या अनेक सरकारी कामासाठी त्यांनी या वाड्याचा वापर केला, मात्र, इंग्रजांच्या जाण्यानंतर या वाड्याला कोणी वालीच उरला नाही. आणि वाडा तसाच पडून राहिला
आपल्या नक्षीकाम आणि कलाकुसरीने आकर्षित करणारा हा वाडा आज मात्र पूर्णतः कोलमडून गेलाय,
वारा, वादळ, पाऊसाने लाकडी दरवाजे, खिडक्या, महिरपी जमीनदोस्त झाल्या. वाड्याचे वैभव असणारा मोठा चौकही उध्वस्त झालाय. वाड्याच्या आत एक तळघर सुद्धा आहे, पण अलिकडच्या काळात ते कोणीही उपडण्याचा प्रयत्न केलेला नाही..
दरम्यान, वाड्यातून बेटापर्यंत नदीच्या खालून भुयारी मार्ग आहे, असे म्हणतात की, या मागनि कधी कधी सैन्याच्या गुप्त हालचाली केल्या जातात.
या वाड्याचं जतन व्हावे म्हणून सरकारी अधिकारी बऱ्याच वेळा इथं येऊन भेट देऊन गेलेत. सध्या हा वाडा पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असून तिथ डागड़जीचं काम सुरू आहे.
रघुनाथराव पेशवे उर्फ राघोबादादा वाडा व समाधी , हिंगणी, कोपरगाव, नगर
विडिओ मध्ये सर्व माहिती दिलेली आहे नक्की बघा
नगर जिल्ह्यातील कोपरगाव साखर कारखान्यांचा गाव म्हणून फेमस गावात महाशिवरात्रीला भरणाऱ्या यात्रेचा सुद्धा तितकाच डंका असतो. पण या कोपरगावाला खरी ओळख मिळते ती राघोबा दादांच्या वाड्यामूळे.
रघुनाथराव उर्फ राघोबा दादा म्हणजेच श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे धाकटे सुपुत्र. प्रचंड महापराक्रमी पण तितकेच शीघ्रकोपी. मराठ्यांचा अटकेपार झेंडा पोहचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. अफगाणिस्तानचा सुलतान अहमदशाह अब्दालीचा लेक तैमूर शाह दुर्राणी याला लाहोर मधून पळवून लावलं. शिंदे होळकर यांच्या सेनेसह अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेला पेशावरसुद्धा जिंकला.
राघोबादादा जेव्हा राजकारणातून निवृत्त होऊन कायमचे वास्तव्य करण्यासाठी कोपरगावला आले तेव्हा त्यांनी कोपरगावच्या पश्चिमेला तीन मैलांवर असलेल्या हिंगणी गावाजवळ भव्य वाडा बांधण्याचे ठरवले. गोदावरी नदी हिंगणी गावापाशी दक्षिणवाहिनी होते, त्या ठिकाणी नदीच्या पश्चिम तीरावरील जागेची निवड करून बांधकामाला सुरुवात झाली. वाड्याच्या तीन भिंतींचे बांधकाम झाल्यानंतर पूर्वेकडील चौथ्या भिंतीचे बांधकाम चालू असताना राघोबादादांचे ११ डिसेंबर १७८३ रोजी कोपरगाव बेटात निधन झाले. राघोबांनी ते आजारी असताना, त्यांचा अंत्यविधी या वाड्यात व्हावा व तेथेच त्यांची राख पडावी अशी इच्छा व्यक्त केली होती.. त्याप्रमाणे राघोबांचे दहन या तीन भिंतींच्या वाड्यात केले गेले व त्या ठिकाणी सांबाची स्थापना करण्यात आली. राघोबादादांचा वाडा बांधताना चुना तयार करण्यासाठी वापरलेले मोठे दगडी चाक तेथे बघण्यास मिळते.
भिंतींच्या वाड्याचे बांधकाम मजबूत, भक्कम व उत्कृष्ट दर्जाचे आहे. भिंतीची लांबी दोन हजार फूट रुंदी एक हजार फूट आणि उंची पंचेचाळीस फूट असून भिंतीची माथ्यावरील जाडी सात फूटांची आहे. सर्व बांधकामाला आतबाहेर कातीव स्वरूपाचा काळा दगड व चुना वापरला गेलेला आहे. वाड्याच्या उत्तर व दक्षिण भिंतीला एकेक उंच बुरूज बांधलेला आहे. उत्तरेकडील भिंतीमध्ये प्रशस्त प्रवेशद्वार ठेवलेले आहे. राघोबांच्या इच्छेनुसार बांधला जाणारा तो वाडा पूर्ण झाला असता तर प्रशस्त, भक्कम आणि रेखीव नक्षीकामाचा वाडा पाहण्यास मिळाला असता!वाड्याच्या उत्तर व दक्षिण भिंतीला एकेक उंच बुरूज बांधलेला आहे. उत्तरेकडील भिंतीमध्ये प्रशस्त प्रवेशद्वार ठेवलेले आहे. राघोबांच्या इच्छेनुसार बांधला जाणारा तो वाडा पूर्ण झाला असता तर प्रशस्त, भक्कम आणि रेखीव नक्षीकामाचा वाडा पाहण्यास मिळाला असता!
पेशवे रघुनाथराव व आनंदीबाई यांचा हिंगणी (कोपरगाव ) येथील वाडा
(रघुनाथराव पेशव्यांचे समाधी स्थळ)
कोपरगाव पासून अवघ्या 6 किमी अंतरावर पश्चिमकडे गोदावरी नदीच्या तिरावर भव्य असा बांधकाम अपूर्ण अवस्थेतील वाडा आहे.
पाहता क्षणी डोळे विस्फारतात एवढा हा भव्य वाडा आहे. वाड्याचे काम अपूर्ण अवस्थेत आहे.
कोपरगावात नजर कैदेत असताना रघुनाथरावांनी हिंगणी येथे गोदावरीच्या किनाऱ्यावर निवांत स्थळी वास्तव्यासाठी भव्य वाडा बांधायचे काम चालू केले.
परंतु बांधकाम चालू असतानाच राघोबा दादांचा अचानक मृत्यू झाला.
राघोबा दादांचे अंत्य संस्कार याच वाड्यात करण्यात आले. एका अर्थाने इथेच राघोबा दादांची समाधी आहे.
राघोबा दादा मराठा साम्राज्याचे 11वे पेशवे राहिले आहेत.
पती राघोबा दादांच्या मृत्यू नन्तर आनंदीबाई पेशवे नाशिकला निघून गेल्या व वाड्याचे काम अपूर्णच राहिले. तेव्हा पासून वाड्याच्या तीनच भिंती उभ्या आहेत. वाढ्याची उंची जवळ जवळ 40 फूट इतकी आहे. पूर्व बाजूने नदी असल्याने दक्षिणेकडील दरवाजाच मुख्य प्रवेशद्वार असावा . पश्चिम बाजूच्या भिंतीना वर जाण्यासाठी साठी पायऱ्या आहेत.
प्रवेश द्वारावर गणपतीची सुंदर मूर्ती कोरलेली आहे.
या वाड्याचं काम यदाकदाचित पूर्ण झालं असतं तर आज मितीला ही परिसरातील सर्वात भव्य आणि सुंदर वास्तू असती.
वाड्याचा पूर्व बाजूचा पाया अक्षरशः गोदावरीच्या पात्रात आहे.
आता पर्यंत गोदावरीला अनेक महापूर येऊन गेले तरी देखील वाडा आजही जश्याचा तसा उभा आहे हे विशेष.
दगडातील बांधकाम अतिशय मजबूत आहे.
वाड्याच्या मधोमध जे पिवळ्या रंगाचं मंदिर आहे ती राघोबा दादांची समाधी आहे. वाड्याची सध्याची रचना पाहून लक्षात येते कि याचा नियोजित आराखडा कीती विस्तीर्ण असावा. बहुदा शनिवार वाडया प्रमाणे बहू मजली ही असेल, पण दुर्दैवाने तो पूर्ण होऊ शकला नाही आणि वाड्याला कुणाचेही वास्तव्य लाभले नाही.
कोपरगाव व रघुनाथराव पेशवे
'कोपरगाव' शहर गोदावरी काठी वसलेले एक प्राचीन शहर असून अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. नगर-मनमाड महामार्गालगत असणारे हे शहर
शिर्डी पासून (उत्तरेला) सुमारे 15 किलोमीटर अंतरावर आहे.
कोपरगावचे जुने नाव 'कर्पूरग्राम'. दक्षिणगंगा समजल्या जाणाऱ्या गोदावरीच्या उत्तर काठावर शहर वसलेले आहे. नदीच्या दक्षिण भागाला 'बेट कोपरगाव' म्हणतात. नदी येथे दोन प्रवाहात विभागली गेल्याने हा भाग चहूबाजूंनी पाण्याने वेढलेला असे. सध्या मात्र बेट अस्तित्वात नाही. या भागास 'बेट कोपरगाव' अथवा 'कचेश्वराचे बेट' म्हणतात.
बेटाला पुरातन महत्व असून बेट कोपरगाव ही दैत्यगुरू शुक्राचार्यांची कर्मभूमी समजली जाते. येथे शुक्राचार्यांचा प्राचीन मंदिर असून ते जगातील एकमेव शुक्राचार्यांचे मंदिर असल्याचे मानले जाते. त्याजवळच संजीवनी पार असून याठिकाणी कचेश्वराला शुक्राचार्यांनी संजीवनी विद्या (मृत व्यक्तीला जिवंत करण्याची विद्या) दिली. येथे शुक्राचार्य व कचेश्वर लिंगरूपात आहेत. त्यालगतच गणपती, श्रीविष्णु, शिवशंकर इत्यादी दैवतांची मंदिरे आहेत. बेटातील बहुतांशी मंदिरे यादवकालीन आहेत.
कोपरगावास एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले ते पेशवाईच्या काळात रघुनाथराव पेशव्यांमुळे. रघुनाथराव हे पहिल्या बाजीराव पेशव्यांचे पुत्र व नानासाहेबांचे धाकटे बंधू. अटकेपार मराठेशाहीचे झेंडे फडकवणारे पराक्रमी पुरुष. त्यांना राघोबादादा, राघोभरारी अथवा दादासाहेब या नावांनी ओळखले जाते. दादांना गोदाकाठ फारच आवडे. दादा अधूनमधून पुण्याहून कोपरगावला वास्तव्यास येत. त्यांचे दोन वाडे कोपरगावात होते. एक बेट-कोपरगाव येथे शुक्राचार्य मंदिराच्या जवळ असून दुसरा शहरात होता. बेटातील वाडा सध्या अस्तित्वात नाही. दुसरा वाडा शहरात आहे. तसेच 1783 मध्ये कोपरगावजवळील 'हिंगणी' येथे एक वाडा बांधण्याचे काम त्यांनी सुरू केले होते परंतु तो पूर्ण होऊ शकला नाही.
17 मे 1782 ला इंग्रज व मराठे यांच्यात सालबईचा तह झाला त्यानुसार इंग्रजांनी राघोबादादास महादजींच्या स्वाधीन केले. राघोबादादांनी कोपरगाव हे ठिकाण पुढील वास्तव्यासाठी निवडले. त्यांना पेशव्यांकडून दरसाल तीन लक्ष रुपये पेन्शन मंजूर करण्यात आले. 1783 मध्ये दादासाहेब कोपरगाव आले व पत्नी आनंदीबाई, पुत्र अमृतराव (दत्तक) व बाजीराव यांच्यासोबत कोपरगावी राहू लागले.
No comments:
Post a Comment