Monday, June 19, 2023

मला आवडलेल ऐतिहासिक पात्र

    अखंड हिंदुस्थानातील साम्राज्य बुडवून इंग्रजांनी संपुर्ण भारतभुमी युनियन जॅकच्या पट्टेरी विळख्यात आणली आणि सुरु झाला एक स्वातंत्र्यलढ्याचा धगधगता प्रवास ! सोळा वर्षाच्या मुलापासून ते एंशी वर्षाच्या वृध्दापर्यंत सर्वांनी या होमात सर्वस्वाचे दान केले. पण या लढ्याला एक खंबीर नेतृत्व आवश्यक होते. फिरंगी वरवंटा ज्या वेळी  आपल्या देशाला चिरडून टाकत होता  त्यावेळी एक सिंहगर्जना झाली ते होते केशव टिळक , रत्नागिरी मध्ये बाळ गंगाधर टिळकांचा जन्म झाला आणि आपल्या देशबांधव साठी एक आशा निर्माण झाली.
      आई, वडीलांचे छत्र हरपलेल्या टिळकांनी आपले बी.ए., एल.एल.बी. हे शिक्षण पुर्ण केले आणि आर्यभूषण छापखाना काढून केसरी (मराठी) व मराठा(इंग्रजी) ही दोन वृत्तपत्रे सुरू केली आणि लोकचळवळीचे आणि समाज जागृतीचे कार्य सुरु केले. .डेक्कन एज्युकेशन सोसायटी, न्यू इंग्लिश स्कूल, फर्ग्युसन कॉलेज हे टिळक आणि आगरकरांची देणगी आहे आपल्याला .
       टिळकांची विवीध प्रश्नावरील  भूमिका ही त्यांच्या धर्मविषयक श्रद्धेतून घडविली गेली होती, असे दिसते. यात  संमतिवयाचा कायदा, ग्रामण्य प्रकरण, रमाबाईंचे शारदासदन किंवा हिंदुमुसलमानांचे दंगे याच हेच प्रकर्षाने दिसून येते. टिळकांना राष्ट्राइतकाच हिंदू धर्माचाही जाज्वल्य अभिमान होता. धर्म हा त्यांच्या व्यासंगाचा विषय होता. त्यांनी वेद, उपनिषदे, तत्त्वज्ञान, धर्मशास्त्रे, गीता व आचार्याची भाष्ये यांचा अभ्यास केला होता. हिंदुत्व हे स्वत्वाचे फळ आहे असे ते मानीत. ज्यास हिंदुत्वाचा अथवा हिंदू धर्माचा अभिमान नाही, त्यास हिंदू लोकांनी काय समाजसुधारणा कराव्यात ते सांगण्याचा अधिकार नाही, असे ते म्हणत.
सुधारणा पाहिजे, परंतु ती सरकारी कायद्याने होणे योग्य नाही, ही विचारसरणी टिळकांनी पुरस्कारिली. त्यांनी काही मौलिक सुधारणांची वाच्यताही केली होती, जसे  सोळा वर्षांच्या आत मुलींची व वीस वर्षांच्या आत मुलांची लग्ने करू नयेत; कोणी कोणास हुंडा देऊ नये; विधवांचे वपन करू नये इत्यादी.पुण्यात प्रतिष्ठित झालेली सार्वजनिक सभा त्यांनी नेमस्तांचा पराभव १८९५ मध्ये करून आपल्या ताब्यात घेतली आणि दुष्काळनिवारणाचे महत्त्वाचे कार्य सुरू केले. यात शेतकर्यांना त्यांच्या सारामाफीची जाणीव करुन दिली.
      आणि मग आले भयंकर पर्व ! दुष्काळाच्या पाठोपाठ प्लेग आला. त्या वेळी प्लेगप्रतिबंधासाठी नेमलेल्या कमिशनर रँड याच्या हाताखालील गोऱ्‍या अधिकाऱ्‍यांनी धुमाकूळ घातला, तेव्हा त्यावर टिळकांनी टीकेची झोड उठविली. आपद्ग्रस्तांसाठी स्वस्त धान्य दुकाने काढली व सार्वजनिक रुग्णालये उघडली. २२ जून १८९७ रोजी चाफेकरबंधूंनी रँडचा खून केला. त्या वेळी सरकारने पुण्यावर अनन्वित जुलूम केला. टिळकांनी ‘राज्य करणे म्हणजे सूड उगविणे नव्हे’, ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असे एकापाठोपाठ एक प्रखर लेख लिहिले. परिणामतः त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात येऊन खटला झाला आणि त्यांना अठरा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. मात्र त्यांपैकी सहा महिने शिक्षा सरकारने कमी केली व ते ६ सप्टेंबर १८९८ रोजी तुरुंगातून मुक्त झाले.
       टिळकांच्या खऱ्‍या कारकीर्दीला आणि अखेरपर्यंत चालविलेल्या त्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामाला १८९९ नंतरच अधिक तेज चढले. पुढे टिळकांना ताईमहाराज प्रकरणामुळे फार मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या प्रकरणातील शेवटचा निकाल टिळकांच्या मृत्यूपूर्वी काही दिवस अगोदर त्यांच्याच बाजुने लागला आणि त्यांचे निर्दोषत्व सिध्द झाले.
     लॉर्ड कर्झन याने २० जुलै १९०५ रोजी बंगालची फाळणी जाहीर केली. सर्व देशभर प्रक्षोभ उसळला आणि उग्र आंदोलन सुरू झाले. टिळकांनी बंगालमधील चळवळीला पाठिंबा दिला. स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य या चतुःसूत्रीचा त्यांनी हिरिरीने पुरस्कार केला. मात्र सुरतेस १९०७ च्या अखेरीस भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात फूट पडली. टिळकांनी अध्यक्षांच्या निवडीलाच हरकत घेतली होती, त्यावरून गडबड झाली. टिळकांच्या अंगावर काठ्या, जोडे फेकण्यात आले तरी टिळक निश्चल होते. पुढे पोलिसांनी मंडप ताब्यात घेतला. काँग्रेसमधील या फाटाफुटीनंतर लवकरच २४ जून १९०८ रोजी टिळकांना मुंबईस पुन्हा राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात येऊन त्यांच्यावर खटला भरण्यात आला. याला कारण म्हणजे ‘देशाचे दुर्दैव’ व ‘हे उपाय टिकाऊ नाहीत’ हे अनुक्रमे १२ मे १९०८ व ९ जून १९०८ च्या केसरीतील जळजळीत अग्रलेख होत.  
        ही शिक्षा ऐकवल्यानंतर टिळकांनी काढलेले धीरोदात्त उद्‌गार संस्मरणीय झाले. ते म्हणाले, ‘ज्यूरींनी काहीही निकाल दिला असला, तरी मी पूर्ण निर्दोषी आहे, अशी माझी धारणा आहे. न्यायालयाची सत्ता श्रेष्ठ असेल, पण वस्तुजाताच्या नियतीचे नियमन करणारी सत्ता त्याहूनही श्रेष्ठ आहे. माझ्या स्वातंत्र्यापेक्षा माझ्या हालाअपेष्टांनीच मी अंगीकृत केलेले कार्य अधिक भरभराटीस यावे, असाही परमेश्वराचा संकेत असेल’. टिळकांना झालेल्या या शिक्षेच्या निषेधार्थ मुंबईत गिरणी कामगारांनी प्रथमच हरताळ पाळला, काही प्रमाणात दंगाही झाला. काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी टिळकांना ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात ठेवण्यात आले. मंडालेच्या तुरुंगात असताना टिळकांच्या जीवनात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. या बंदिवासात त्यांनी आपला गीतारहस्य हा अत्यंत मौलिक ग्रंथ लिहिला, तर पुण्यास त्यांच्या पत्नी सत्यभामाबाई यांचे १९१२ मध्ये निधन झाले. सहा वर्षांच्या कारावासानंतर १५ जून १९१४ रोजी सरकारने त्यांना मुक्त केले. सर व्हॅलेंटाइन चिरोल यांच्या इंडियन अनरेस्ट या १९१५ साली प्रसिद्ध केलेल्या ग्रंथातील मजकुराच्या खटल्यात टिळकांचे फार नुकसान झाले; पण याच ग्रंथाने ‘फादर ऑफ इंडियन अनरेस्ट’–भारतीय असंतोषाचे जनक, हे टिळकांचे गौरवास्पद अभिधान रुढ केले. अर्थात त्याआधीचे ते लोकांचे 'लोकमान्य' व सर्वसामान्यांसाठी 'तेल्या तांबोळ्याचे' पुढारी होते. लोकमान्य म्हणजे लोकांनी स्वीकारलेला नेता. लोकमान्यांशिवाय त्यांना हिंदू राष्ट्रवादाचे जनक देखील म्हटले जाते. प्रत्येकाची आपापल्या पार्शवभूमीनुसार वेगवेगळी विचारसरणी असते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर एकमत होत नसतं. कुठल्याही माणसाचं १००% आपल्याला पटेल असं सांगता येत नाही. त्यामुळे टिळकांच्या काळात त्यांचे विरोधकही बरेच असले तरी त्यांची लोकमान्यता निर्विवाद होती. ते प्रवासात जातील तिथे त्यांना पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी होत असे, त्यांच्या मिरवणूका निघत असत, ठिकठिकाणी सत्कार होत असत. रेल्वेने प्रवास करताना स्टेशन सुशोभित करून त्यांना निरोप दिला जात असे, प्रत्येक स्टेशनवर त्यांना भेटायला लोक येत असत. अर्थात अशा कार्यक्रमांमुळे ट्रेनचा प्रवास लांबत असे, तशा ट्रेन्सना टिळक स्पेशल म्हणायचे.
    पुढे ॲनी बेझंट यांनी मद्रासला होमरूल लीग ही संस्था स्थापन केली होती. होमरूलची चळवळ टिळकांनी व बेंझटबाईंनी संयुक्तपणे चालविली. १९१८ च्या मार्चमध्ये ते होमरूल लीगचे शिष्टमंडळ घेऊन इंग्लंडला गेले. त्याचवेळी रौलट कायदा जाहीर झाला आणि त्याच्या निषेधार्थ महात्मा गांधींच्या आदेशानुसार झालेल्या हरताळातून जालियनवाला बागेतील हत्याकांड घडले होते. ‘गांधीच्या सत्याग्रहात व नंतर घडलेल्या भयंकर प्रसंगात मी तुमच्याबरोबर नव्हतो, याचे मला वाईट वाटते’; असे उद्‌गार टिळकांनी मुंबईस उतरल्याबरोबर काढले. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या घटनेचा बाळ गंगाधर टिळक यांच्यावर खोलवर परिणाम झाला होता, त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळू लागली.व नंतर त्यांना मधुमेहाच्या त्रासाने देखील विळखा घातला. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली. त्यांच्या अंतयात्रेत लाखो लोक समाविष्ट झाले.
     या राजकीय कार्याबरोबरच टिळकांची अनेकविध सामाजिक कार्ये चालू होती. सुरत काँग्रेसनंतर त्यांनी दारूबंदीची चळवळ सुरू केली.  टिळकांनी पैसाफंड ही संस्था वृद्धिंगत करून लाखो रुपयांचा निधी सामाजिक हितासाठी जमा केला. पंचांगसंशोधन हा व्यासंग त्यांना लहानपणीच जडला होता. पुढे त्यांनी तो अधिक शास्त्रशुद्ध रीत्या आपल्या स्वतंत्र पंचांगाद्वारा प्रसिद्ध केला. इंग्लंडमध्ये असताना त्यांच्या ह्या खटपटीस यश आले व मराठी टंकांमध्ये त्यानुसार अनेक सुधारणा करण्यात आल्या.
     टिळकांचा संस्कृत व इंग्रजी वाङ्‌मयाचा गाढा अभ्यास होता. भारतीय तत्त्वज्ञान हा त्यांचा आवडीचा विषय. त्यांनी पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचेही अध्ययन केले होते. त्यांच्या व्यापक व्यासंगाचे उत्कृष्ट प्रतिबिंब गीतारहस्यात पहावयास मिळते.त्यांच्या मते गीता निवृत्तिपर नसून ती प्रवृत्तिपर आहे. त्यांचे बहुतेक लेखन संशोधनपर असून प्रत्येक ग्रंथात त्यांनी काही स्वतंत्र मते प्रतिपादन केली आहेत. त्यांचे प्रमुख ग्रंथगीतारहस्य, ओरायन, आर्क्टिक होम इन द वेदाज आणि वेदांगज्योतिष.ओरायन हा एक त्यांचा संशोधनात्मक प्रबंधात ज्योतिषाच्या गणिताने वेदांचा काळ सु. इ. स. पू. ४५०० वर्षे हा ठरविला. तर १८९८ साली टिळक येरवड्याच्या तुरुंगात असताना  त्यांनी आर्यांचे मूलस्थान उत्तर ध्रुवाच्या प्रदेशातच असले पाहिजे, हे अनुमान मुख्यतः वेदांतील ऋचांच्या आधारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हे संशोधन आहे आर्क्टिक होम इन द वेदाज या ग्रंथात. 
     टिळकांनी महाराष्ट्रात गणपती महोत्सव आणि शिवाजयंती सुरू करून सार्वजनिक जनतेला एकत्र आणून ऐक्याचा संदेश दिला आणि लोकांमध्ये स्वातंत्र्यप्रेम जागृत केले.त्यांनी सुरू केलेले असे उत्सव किंवा चालविलेल्या चळवळी एका विशिष्ट जातीसाठी नव्हत्या हे त्यांनी आपल्या लेखातून तर मांडलेच त्याहीपेक्षा अधिक ठाशीवपणे आपल्या कृतीतून दाखवून दिले.
      तेव्हा मराठी रंगभुमी जोरात होती. अनेक नाटककारांनी टिळकांकडुन प्रेरणा घेतली होती. कधी थेट तर कधी कधी आडुन आडुन लोकांना संदेश जाईल अशा पद्धतीचे विषय घेऊन तेव्हा नाटके केली जात होती. काही नाटकांमध्ये चक्क टिळकांवर आधारित पात्रे असायची. टिळकांसारखीच वेशभूषा, बोलण्याची लकब वापरून कलाकार अभिनय करायचे. अशा एका नाटकात स्वतः टिळकांनी त्यांची हुबेहूब नक्कल करणाऱ्या कलाकाराचं कौतुक केलं होतं.  'वंगभंग ' हे नाटक स्वदेशीचा प्रसार करी . दामोदर विश्वनाथ नेवाळकर ह्यांचे' दंडधारी ' हे नाटक टिळक आणि त्यांचे धर्मकारण ह्या वर भाषय करणार होत .ह्या नाटकाने खळळजनक वातावरण तयार केलं त्यातील पात्र हातात काठी घेऊन वावरे आगदी टिळक सारखे.त्यावेळी सेन्ससोर् न्हेवते तर कलेक्टर ची परवानगी लागे ह्या अश्या नाटकानं साठी .
      अनेक राष्ट्रवादी नेत्यांनी अर्थशास्त्र हा विषय तज्ज्ञांवर सोडला होता, टिळकांनी मात्र तसे केले नाही. राजकीय अर्थकारणाच्या खाचाखोचा पूर्णपणे जाणून त्या लोकांपर्यंत पोहोचवून त्यांनी जनमत तयार केले.
   भारतभुमीसारख्या खंडप्राय पसरलेला देश जेव्हा परकीय टाचेखाली येतो तेव्हा त्याच्या मुक्तीसंग्रमात टिळकांसारखे अष्टपैलु व्यक्तीमत्वच प्रेरणा आणि नेतृत्व देउ शकते. दरवेळी स्वातंत्र्यसंग्रामाची गाथा वाचताना टिळक नव्याने भेटतात, नव्याने समजतात आणि नव्याने आवडू लागतात.



 

 
 
       ह्या फुल्ल स्क्रीन chya जगात आणि मॉडर्न युगात पण गीता उपयुक्त आहे , हे पटवून देणारे आधुनिक भाषकार , गीतेचा अभ्यास केला त्याच्या तील जाणकार लोकांची मदत घेतली आणि  ह्या ग्रंथा वर 'गीतारहस्य '  हा ग्रंथ टिळकांनी लिहला तो ही कारागृहात . बर्मा देशात ठेवलं होत त्यांना , प्रतिकूल परिस्थितीत हे लिहता येणं किती मोठी गोष्ट आहे? त्यांचा खगोलशास्त्र चा ही गाढा अभ्यास होता.३६० दिवस पृथ्वी सूर्याभोवती फिरते ह्याचे दिवस किमी जास्त कसे होतात ??ह्या सारखे प्रश्न त्यांना पडू लागले आणि त्यांनी त्याचा अभ्यास केला. पंचांगात बदल करणे त्यांना आवश्यक वाटले आणि टिळक पंचांग चालू केलं.
                 त्यांना बाळ गंगाधर टिळक ह्या नावाने ओळखले जाते पण आजकाल इंग्रजाळलेले आपण ज्या वेळी त्यांचा उल्लेख बाल गंगाधर टिळक करतो त्यावेळी मात्र मी जहाल मतवादी होते . महापुरुष लोकमान्य झाले कारण लोकांनी त्यांना लोक ही पदवी दिली.ह्या परकीय सत्ते ने सतत भासावल की तुमच्या देशात शिक्षण नाही आणि तुम्हाला शिक्षित करायला आम्ही आलो आहोत आणि तुम्ही शिकलात की आम्ही निघून जाऊ हेच बिंबवल आपल्या मनात आणि आज ही आपल्यात ले काही ही धारणा तशीच बाळगून आहेत.आपला jdp १९४७ साली तीन टक्के नी खाली आला .सतत वेस्ट ला कॉपी करत राहिलो ."सरकार च डोकं ठिकणावर आहे का " असं ठणकावनारे टिळक जहाल मतवादी करून टाकले आपण!!!
     गणित, खोगलशास्त्र, संस्कृत ह्या विषयावर त्यांचे प्रभुत्व होते. राष्ट्रीय विचाराचा प्रसार,प्रचार त्यांनी केसरी ह्या वृत्तपत्रा तून केला .त्यांचा इंग्रजी न्याय बुद्धी वर विश्वास नाही होता. हातात लोखंड घेऊन परीस शोधणारे आपण . नशाबंदी,बाल विवाह, विधवा विवाह,दलीत, पीडित यांच्या सकट नवीन भारत उभा केला पाहिजे हे स्वप्न बाळगली आणि ती पूर्ण करण्यास साठी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे काढून महाराष्ट्र पेटून काढला . इतिहासाचे नायक ते चतु्थीनिमित्त गणपती बाप्पा चौकात आणून ,आपल्या परंपरेचं तोरणं त्यांनी प्रत्येकाच्या  मनात बांधलं. आठरा पगड जातींच्या लोकांची अरोळी ने आसमंत दणाणून गेला  ." पुनरागमनाय च म्हणत लोकांनी सार्वजनिक गणपती उत्सव सुरू केला . गणपती हा गोरगरीब जनतेसाठी ऊर्जेचा स्रोत आहे आणि ऐकी च प्रतीक , शिवजयंती सुरू केली , छत्रपती शिवाजी हे व्यवस्थापन कसं असावं ,आपलं प्रशासन कसं असावं हे पटवून देता येईल त्या साठी शिवजयंती असे उपक्रम हाती घेतले.
            काश्मीर फाईल, केराला स्टोरी,असे सिनेमे आले की आपली डोकी फिरतात, सोशल मीडिया वर व्यक्त होऊन द्वेष पसरवला जातो ,त्यावर उपाय व्यक्त होण हा नाही .जाती वाद त्यांना नको होते म्हणून तर बंगालची फाळणी १९०५  वेळी त्या आंदोलनाचे टिळकांनी नेतृत्व केलं होत.
                   मेळा करून जनजागृती करणं हे ते करत. टिळक नाटक, रंगभूमी शी निगडित होते पण त्यांनी नाटकातून पण स्वदेशी,देशप्रेम ह्याचा प्रसार केला. 'वंगभंग ' हे नाटक स्वदेशी चा प्रसार करी . दामोदर विश्वनाथ नेवाळकर ह्यांचे' दंडधारी ' हे नाटक टिळक आणि त्यांचे धर्मकारण ह्या वर भाषय करणार होत .ह्या नाटकाने खळळजनक वातावरण तयार केलं त्यातील पात्र हातात काठी घेऊन वावरे आगदी टिळक सारखे.त्यावेळी सेन्ससोर् न्हेवते तर कलेक्टर ची परवानगी लागे ह्या अश्या नाटकानं साठी .१९१४ मधून टिळक मंडाले कारागृहातून परतले तर त्यावेळी जिन्हा, मौलाना आझाद,ह्याचा राजकारणात उदय झाला होता. महायुद्ध सुरू झालं होत आणि ब्रिटन ला भारता काढून जर्मनी विरुद्ध लढायला सैन्य, सहनभुती, संपती हवी होती .ह्याचा फायदा टिळकांनी उचलला. अँनी बेझंट यांची होमरूल चळवळ सुरू झाली.त्यात सहभागी झाले त्याच वेळी कुठेतरी ठाम राहिले " स्वराज हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच" .
                    प्रचंड वाचन, ध्येय धरून काम करने,चिकाटी हे गुण त्यांच्या अंगी होते. गांधी,पटेल यांच्या आधी आपल्या निद्रिस्त समाजाला त्यांनी जाग केलं. प्लेग ची साथ आली आणि लोकांच्यात भीती च वातावरण निर्माण झालं आणि त्या साठी इंग्रजांनी कमिश्नर नेमले आणि टिळकांच्या लेखणी ने चाफेकर बंधू पेटून उठले आणि मग हीच ठिणगी पुढे टिळकांना त्याच्या दोन नवीन मित्रा ना जोडण्यात मदतीला आली आणि लाल, बाळ,पाल ह्या त्रीयी चा उदय झाला.
                   सिंहगर्जना होत होती आणि देश त्याच्या लेखणी वर पेटून उठत होता पण मग जालियनवाला बाग हत्या कांड नी टिळक अगदी मोडून पडले ह्यात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. 


लोकमान्य बाळ गंगाधर : (२३ जुलै १८५६–१ ऑगस्ट १९२०). थोर भारतीय नेते,भगवद्‌गीतेचे आधुनिक भाष्यकार व प्राच्यविद्या पंडित. त्यांचा जन्म रत्नागिरीस झाला. त्यांचे जन्मनाव केशव; परंतु बाळ हेच नाव पुढे रूढ झाले. टिळक कुटुंबाचे मूळ गाव चिखलगाव (ता. दापोली, जि. रतिनागिरी).

चिखलगावची खोतीदारी त्यांच्याकडे होती. पणजोबा केशवराव यांनी पेशव्यांच्या काळात मानाची जागा मिळवली होती. आजोबा रामचंद्रपंत यांनी उत्तर आयुष्यात संन्यास घेतला. टिळकांचे वडील गंगाधरपंत व आई पार्वतीबाई. गंगाधरपंतांना कौटुंबिक अडचणीमुळे इंग्रजी शिक्षण सोडून पुण्याहून गावी जावे लागले. पुढे त्यांनी मराठी शाळेत शिक्षकाची नोकरी केली. बाळ गंगाधऱ टिळकांचे पारंपरिक संस्कृत अध्ययन घरातच झाले. १८६६ मध्ये गंगाधरपंतांची बदली पुण्यास झाल्यामुळे टिळक आपल्या मातापित्यांबरोबर पुण्यास आले. पुण्यास आल्यावर थोड्याच दिवसांत टिळकांची आई मरण पावली आणि गंगाधरपंतांची बदलीही ठाण्यास झाली. तथापि पुण्यात राहूनच ते १८७२ मध्ये मॅट्रिक झाले.

तत्पूर्वी १८७१ मध्येच त्यांचा कोकणातील लाडघर गावच्या बल्लाळ बाळ कुटुंबातील सत्यभामाबाई (माहेरचे नाव तापीबाई) यांच्याशी विवाह झाला. त्यांना तीन मुली आणि विश्वनाथ, रामभाऊ व श्रीधर असे तीन मुलगे होते. त्यांचे नातू ज. श्री. टिळक हे केसरीचे विद्यमान संपादक असून खासदार आहेत.

गंगाधरपंत १८७२ मध्ये निधन पावले. मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी काही रक्कम ठेवली होती. त्यामुळे टिळकांनी डेक्कन कॉलेजमध्ये नाव घालते. महाविद्यालयातील पहिल्या वर्षी नियमित व्यायाम करून प्रकृती सुदृढ व निकोप राखण्यावर त्यांनी भर दिला. या कमावलेल्या शरीराचा पुढे दगदगीच्या राजकीय जीवनात व कारावासात त्यांना फार मोठा उपयोग झाला. १८७६ मध्ये ते बी.ए. पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. एम्. ए. मात्र होऊ शकले नाहीत. अखेर त्यांनी एल्एल्.बी. ही पदवी घेतली.

डेक्कन कॉलेजमध्येच टिळक आणि आगरकर यांचा स्नेह जमला. दोघांनी देशकार्याला वाहून घेण्याचा संकल्प केला. याच सुमारास निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सरकारी नोकरी सोडून शाळा काढण्याचे ठरविले होते; तेव्हा टिळक व आगरकर दोघेही त्यांना मिळाले. १ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. टिळकांनी विनावेतन शिक्षकी पेशा पतकरला. चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी १८८१ मध्ये आर्यभूषण छापखाना काढला आणि केसरी (मराठी) व मराठा(इंग्रजी) ही दोन वृत्तपत्रे सुरू केली.

प्रारंभी आगरकर केसरीचे व टिळक मराठ्यांचे संपादक होते. वृत्तपत्रांच्या द्वारे लोकशिक्षण, राजकीय जागृती व शासकीय अन्यायाचा प्रतिकार हे त्यांचे ऐतिहासिक कार्य येथूनच सुरू झाले. वृत्तपत्रीय जीवनाच्या प्रारंभीच कोल्हापूर संस्थानचे दिवाण माधवराव बर्वे यांच्यावर केसरी व मराठ्यातून अनेक लेख प्रसिद्ध झाले. त्यांच्या गैरकारभारावर तसेच इंग्रज सरकारच्या छत्रपती शिवाजींसंबंधीच्या वर्तणुकीवर त्यांनी कडाडून टीका केली. त्याबद्दल टिळक व आगरकर यांना चार महिन्यांची शिक्षा होऊन डोंगरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले. २६ ऑक्टोबर १८८२ रोजी त्यांची सुटका झाली.

विष्णुशास्त्री १८८२ मध्ये मरण पावले; तथापि १८८४ मध्ये वेडरबर्न, वर्ड्‌स्वर्थ, मंडलिक, तेलंग, दांडेकर, य.मो. केळकर, भांडारकर वगैरे प्रभृतींच्या मदतीने टिळक–आगरकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि या संस्थेतर्फे १८८५ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली.

टिळक गणित व संस्कृत विषय शिकवीत. पुढे टिळकांचे संस्थेतील एकंदर धोरणासंबंधी मतभेद झाले. आपल्या चाळीस पानी राजीनाम्यात टिळकांनी ‘निर्वाहापुरते वेतन’ या तत्त्वाऐवजी ‘सांपत्तिक स्थितीनुसार वेतन’ तसेच ‘राष्ट्रीय शिक्षण संस्थे’च्या उद्दिष्टाविरुद्ध ‘सरकारच्या मदतीवर चालणारी संस्था’ हे धोरण संस्थेच्या मूळ धोरणाला धक्के देणारे आहे, असे आग्रहाने सांगितले. या प्रश्नावर त्यांचा आगरकरांशी वाद झाला. याशिवाय दुसरा वाद ‘आधी कोण? राजकीय की सामाजिक?’ या विषयावर झाला होता.

आगरकरांना सामाजिक सुधारणा महत्त्वाच्या वाटत होत्या आणि देश सुधारण्यासाठी किंवा स्वातंत्र्यासाठी ते सामाजिक सुधारणांना प्राधान्य देत. स्वतंत्रतेचा किंवा राष्ट्रीयत्वाचा अभिमान म्हणून जो काही जोम आहे, तो जोपर्यंत जाज्वल्य व जागृत आहे; तोपर्यंत समाजरचना कशीही असली, तरी तीतील दोष राष्ट्राच्या उन्नतीस अथवा भरभराटीस आड येत नाहीत, अशी टिळकांची भूमिका होती. स्वाभिमान, उत्साह, स्वराज्यनिष्ठा हाच राष्ट्राचा खरा आत्मा किंवा जीव आहे आणि हा जिवंतपणा जेथे वसत आहे, त्या ठिकाणी सुईच्या मागोमाग जसा दोरा तद्वतच सामाजिक सुधारणाही मागोमाग येत असतात, अशी इतिहासाची साक्ष आहे; असे ते आग्रहपूर्वक प्रतिपादीत. राष्ट्राची सामाजिक प्रगती होऊ नये, असे त्यांचे म्हणणे नव्हते; पण ती राजकीय प्रगतीच्या आणि स्वाभिमानाच्या अनुषंगानेच झाली पाहिजे.

मात्र आगरकरांची भूमिका याच्या बरोबर विरुद्ध होती. सामाजिक सुधारणेशिवाय देश स्वातंत्र्याला पात्र होणार नाही, म्हणून प्रथम समाजातील रूढी, अज्ञान, अंधश्रद्धा, पापपुण्याच्या कल्पना यांच्या पाशांतून त्याची मुक्तता झाली पाहिजे, जातिभेद नष्ट झाले पाहिजेत, असे ते निकराने मांडीत. परकीय सरकारने लोकमताची पर्वा न करता सुधारणेसाठी योग्य ते कायदे करावेत, असे आगरकरांचे मत होते. टिळकांचे म्हणणे असे होते की, ‘आमच्या सुधारणा आम्हीच करू, परकीय सत्तेची ढवळाढवळ आमच्या सामाजिक वा धार्मिक बाबतीत होऊ नये. मात्र लोकमत अनुकूल असेल आणि धर्मवचनांच्या बाबतींत तडजोड होत असेल, तर असा कायदा करण्यास आमची काही हरकत नाही ’.

या व अशा प्रकारच्या वर्णव्यवस्था, वेदोक्त प्रकरण आदी धार्मिक बाबींशी संबंध येणाऱ्‍या गोष्टींवर जे वाद झाले, त्यांसंबंधी टिळकांची भूमिका ही त्यांच्या धर्मविषयक श्रद्धेतून घडविली गेली होती, असे दिसते. टिळकांना राष्ट्राइतकाच हिंदू धर्माचाही जाज्वल्य अभिमान होता. धर्म हा त्यांच्या व्यासंगाचा विषय होता. त्यांनी वेद, उपनिषदे, तत्त्वज्ञान, धर्मशास्त्रे, गीता व आचार्याची भाष्ये यांचा अभ्यास केला होता. हिंदुत्व हे स्वत्वाचे फळ आहे असे ते मानीत. ज्यास हिंदुत्वाचा अथवा हिंदू धर्माचा अभिमान नाही, त्यास हिंदू लोकांनी काय समाजसुधारणा कराव्यात ते सांगण्याचा अधिकार नाही, असे ते म्हणत.

डेक्कन एज्युकेशन संस्था सोडल्यानंतर १८९०–९७ या प्रारंभीच्या काळात टिळकांनी केलेले कार्य त्रिविध स्वरूपाचे होते. या काळात पुढील प्रकरणे उद्‌भवली :

(१) संमतिवयाचा कायदा,

(२) ग्रामण्य प्रकरण,

(३) रमाबाईंचे शारदासदन,

(४) हिंदुमुसलमानांचे दंगे,

(५) सार्वजनिक समाजकार्य इत्यादी. या सर्व प्रकरणांत त्यांची भूमिका राजकारणी पुरुषाची होती आणि स्वराज्य हा त्यांचा प्रधान हेतू होता. याकरिता ब्रिटिश सरकारच्या राज्यकारभारातील दोष व अन्याय यांवर वृत्तपत्रांतून उघड टीका करून त्यांनी कायद्याची मर्यादा प्रथम सांभाळली. तसेच प्रांतिक परिषदा व काँग्रेसच्या कार्यात भाग घेऊन त्याचे स्वरूप जहाल राष्ट्रवादी बनविले व जनतेच्या मनात ज्वलंत देशाभिमान व स्वातंत्र्यप्रेम चेतवून, स्वातंत्र्यासाठी प्रत्यक्ष संघर्ष करण्यास लोकांची मनोभूमिका तयार करण्याचा प्रयत्न केला, स्वातंत्र्याची भावना वृद्धिंगत करण्यासाठी त्यांना अर्जविनंत्यांचे राजकारण करणाऱ्‍या नेमस्त पक्षाविरुद्ध सतत संघर्ष करावा लागला. ब्रिटिश सत्ता हा ईश्वरी अंश आहे व उदारमतवादी इंग्रज हळूहळू भारताचे राजकीय हक्क मान्य करतील, त्यांच्या सदिच्छेवर अवलंबून राहणे, हीच उत्तम नीती होय; ही नेमस्त भूमिका सोडून ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच’, या भूमिकेपर्यंत लोकांना नेण्याचे कार्य, हा लोकमान्यांचा संकल्प होता. केसरी व मराठ्यातील तेजस्वी लेखांनी तसेच प्रसंगोपात्त प्रखर भाषणांनी लोकजागृतीचे कार्य त्यांनी प्रभावीपणे केले

संमतिवयाच्या कायद्यावरून भारतभर जी धामधूम माजली, तिच्यात कायदाविरोधी पक्षाचे अग्रेसरत्व टिळकांकडे आले. सुधारणा पाहिजे, परंतु ती सरकारी कायद्याने होणे योग्य नाही, ही विचारसरणी टिळकांनी पुरस्कारिली. या वादात धर्मशास्त्राची गुंतागुंत होती म्हणून डॉ. भांडारकरांनी कायद्याला पुष्टी देणारा लेख लिहिला. त्या वेळी टिळकांनी त्याचा निकराने प्रतिवाद केला. टिळकांनी जरी कायद्याविरुद्ध आंदोलन आरंभिले, तरी काही सुधारणा अंमलात याव्यात यासाठी एक संस्था स्थापण्याचा ते विचार करीत होते. त्या संस्थेतर्फे काही मौलिक सुधारणांची वाच्यताही झाली होती. उदा., सोळा वर्षांच्या आत मुलींची व वीस वर्षांच्या आत मुलांची लग्ने करू नयेत; कोणी कोणास हुंडा देऊ नये; विधवांचे वपन करू नये इत्यादी.

पुण्यातील पंचहौद मिशनच्या चालकांनी १८९० मध्ये शहरातील काही प्रतिष्ठितांना व्याख्यानाच्या निमित्ताने पाचारण केले. त्या सर्व गृहस्थांसाठी चहा-बिस्किटांचा पाहुणचार ठेवण्यात आला होता. हा सर्व समारंभ गोपाळराव जोशी यांनी घडवून आणला व पुणे वैभव या पत्रात यासंबंधीची सविस्तर हकीकत प्रसिद्ध केली. काहींनी अब्रुनुकसानीचा दावा पुणे वैभववर लावला. टिळकांनी तेथे चहा घेतला असल्यामुळे, पुढे प्रायश्चित्ताचा विषय निघाला. या सर्व पाप्यांना शिक्षा कुणी द्यावयाची, हा प्रश्न उपस्थित होऊन शंकराचार्यांकडे वादी या नात्याने काहींनी फिर्याद केली. अनेक कारणांवरून बाकीचे सुटले. टिळकांनी काशीक्षेत्रात सर्व प्रायश्चित्त केल्याचा दाखला दाखविला; यामुळे ते त्या प्रकरणातून मुक्त झाले.

पंडिता रमाबाईंनी स्त्रीशिक्षणासाठी शारदासदन ही संस्था काढली होती. पं. रमाबाई मुळच्या हिंदू; पण पुढे ख्रिस्ती झाल्या होत्या. यामुळे ही संस्था म्हणजे प्रौढ मुलींच्या अगर विधवांच्या बौद्धिक आणि व्यावहारिक उन्नतीसाठी निघालेली नसून तिचा मूळ उद्देश ख्रिस्ती धर्मप्रसाराचा आहे, असे टिळकांचे मत होते. बाईंनी ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या संस्थांकडून मदत घेण्यास सुरुवात केली आणि ख्रिस्ती लोकांचे साहाय्य मिळविले. शारदासदनमधील दोन मुलींनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. त्या वेळी टिळकांनी कडक शब्दांत टीका केली. याचा परिणाम असा झाला की, बाईंनी पुणे सोडले व स्त्रीशिक्षणाचे आपले कार्य केडगावी सुरू ठेवले.

हिंदुमुसलमानांचे अनेक ठिकाणी १८९३ मध्ये दंगे झाले. या संघर्षात हिंदू आणि मुसलमान असे दोनच पक्ष नसून सरकार हा एक तिसरा पक्ष आहे, हे लक्षात घेतल्याशिवाय दंग्यांच्या कारणांची उपपत्ती लागणार नाही, असे टिळकांचे मत होते. सरकारचे पक्षपाती धोरण, म्हणजेच फोडा आणि झोडा ही नीती, दंग्यांस कारणीभूत होते अशी टीका ते करीत. नेहमी सर्वांनी सुख-संतोषाने राहून एकमेकांच्या हक्कांस जपावे, असे ते म्हणत. या दंग्यांनंतरच लोकजागृतीची साधने म्हणून गणपती व शिवजयंती या उत्सवांना सार्वजनिक स्वरूप देण्याची कल्पना पुढे आली. १८ सप्टेंबर १८९४ आणि १५ एप्रिल १८९६ या अनुक्रमे केसरीच्या दोन अंकांत त्यांनी या उत्सवांचे उद्देश स्पष्ट केले: राष्ट्रीय जागृती करणे, स्वातंत्र्याकांक्षा वृद्धिंगत करणे, महापुरुषांचे स्मरण करणे आणि धर्म व संस्कृती यांचे ज्ञान सामान्यजनांस करून देणे.

पुण्यात प्रतिष्ठित झालेली सार्वजनिक सभा त्यांनी नेमस्तांचा पराभव १८९५ मध्ये करून आपल्या ताब्यात घेतली आणि दुष्काळनिवारणाचे महत्त्वाचे कार्य सुरू केले. १८९६ च्या दुष्काळात शेतकऱ्‍यांना त्यांनी सांगितले की, पीक कमी असेल तर सारामाफी हा तुमचा हक्क आहे, तो मागून घ्या. सरकारच्या धोरणानुसार लोकांनी हक्काने मदत मागावी. दुष्काळाच्या पाठोपाठ प्लेग आला. त्या वेळी प्लेगप्रतिबंधासाठी नेमलेल्या कमिशनर रँड याच्या हाताखालील गोऱ्‍या अधिकाऱ्‍यांनी धुमाकूळ घातला, तेव्हा त्यावर टिळकांनी टीकेची झोड उठविली. आपद्ग्रस्तांसाठी स्वस्त धान्य दुकाने काढली व सार्वजनिक रुग्णालये उघडली. २२ जून १८९७ रोजी चाफेकरबंधूंनी रँडचा खून केला. त्या वेळी सरकारने पुण्यावर अनन्वित जुलूम केला. टिळकांनी ‘राज्य करणे म्हणजे सूड उगविणे नव्हे’, ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असे एकापाठोपाठ एक प्रखर लेख लिहिले. परिणामतः त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात येऊन खटला झाला आणि त्यांना अठरा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. टिळक मोठे विद्वान म्हणून शिक्षा करणे बरे नव्हे, असे माक्स म्यूलर यांनी सरकारला सांगितले; त्यामुळे त्यांपैकी सहा महिने शिक्षा सरकारने कमी केली व ते ६ सप्टेंबर १८९८ रोजी तुरुंगातून मुक्त झाले.

टिळकांच्या खऱ्‍या कारकीर्दीला आणि अखेरपर्यंत चालविलेल्या त्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामाला १८९९ नंतरच अधिक तेज चढले. त्या वेळी राजद्रोहाची शिक्षा भोगून टिळक परत आले होते व त्यांची लोकप्रियता वाढली होती. शिक्षा भोगूनही त्यांच्या ध्येयधोरणांत तीळमात्रही बदल झाला नाही, हे त्यांच्या ४ जुलै १८९९ रोजी लिहिलेल्या ‘पुनश्च हरिः ॐ !’ या केसरीतील अग्रलेखावरून स्पष्ट होते. त्यांनी लॉर्ड कर्झन याच्या कारकीर्दीवर, विशेषतः त्याने लादलेल्या शिक्षणसंस्थांवरील बंधनांवर, टीका केली. शिवाय वसाहतवादाच्या धोरणावर कडाडून हल्ला केला व केसरीच्या अग्रलेखात इंग्लंडचा नैतिक व बौद्धिक अधःपात होत आहे, असे निक्षून सांगितले. याच वेळी त्यांनी राष्ट्रसभेच्या कार्याविषयी नवीन विचार मांडले. जनतेत प्रचंड चळवळ उभारून सर्व राष्ट्राची शक्ती राष्ट्रसभेच्या मागण्यांच्या मागे उभी केली पाहिजे, असे त्यांचे मत होते.

या सुमारास टिळकांना ताईमहाराज प्रकरणामुळे फार मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या प्रकरणातील शेवटचा निकाल टिळकांच्या मृत्यूपूर्वी काही दिवस अगोदर लागला. केवळ मित्रप्रेमामुळे हे प्रकरण उद्‌भवले. यात इंग्रज अधिकारी, कोल्हापूरचे संस्थानाधिपती व बळवंतराव नागपूरकर यांनी टिळकांचे चारित्र्यहनन करण्याच्या उद्देशाने, खोटी साक्ष देण्याच्या आणि खोटे दस्तऐवज करण्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर फौजदारी खटला केला; पण टिळकांची सर्वांमधून निर्दोष मुक्तता होऊन त्यांनी दत्तक घेतलेल्या जगन्नाथमहाराज यांची वारसदार म्हणून पुढे निश्चिती झाली.

लॉर्ड कर्झन याने २० जुलै १९०५ रोजी बंगालची फाळणी जाहीर केली. सर्व देशभर प्रक्षोभ उसळला आणि उग्र आंदोलन सुरू झाले. टिळकांनी बंगालमधील चळवळीला पाठिंबा दिला. स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य या चतुःसूत्रीचा त्यांनी हिरिरीने पुरस्कार केला. आपली उन्नती करून घ्यावयाची, ती स्वदेशी आणि बहिष्कार यांसारख्या मार्गांनीच केली पाहिजे; ती स्वदेशी हतभागी झालेल्या आमच्या लोकांस वर येण्याचा जर काही मार्ग असला, तर तो स्वावलंबन व स्वार्थत्याग हाच होय; असा संदेश देऊन ते आता लोकांना प्रतिकाराचे आवाहन करू लागले.

बारिसाल येथे प्रांतिक परिषदेच्या निमित्ताने निघालेल्या मिरवणुकीत वंदेमातरम्‌च्या घोषणा देण्यात आल्या, म्हणून पोलिसांनी निर्घृण लाठीमार केला आणि लोकांची डोकी फोडली. त्यासंबंधी लिहिताना टिळक सांगतात, ‘अधिकाऱ्‍यांनी कायदेशीरपणे लोकांच्या तोंडास गवसणी अडकविली किंवा कायदेशीरपणे लोकांची डोकी फोडली म्हणून लोकांनी हा कायदेशीर छळ निमूटपणे सोसावयाचा किंवा कसे, हा बंगालच्या लोकांपुढे प्रश्न होता. ज्याप्रमाणे कायदेशीर जुलूम लोकांवर करण्यात येतो, त्याप्रमाणे शांततेने, स्थिरबुद्धीने आणि संकटास धीमेपणाने तोंड द्यावयाचे पण हार जावयाचे नाही, या दृढ निश्चयाने जुलुमी हुकूमांचा प्रतिकार लोकांस करता येतो.

जुलूम तो जुलूम; मग तो कायदेशीर असो किंवा बेकायदेशीर असो’. एकीकडे ही फाळणीविरोधी चळवळ अधिकाधिक उग्र होत असताना राष्ट्रीयसभेत नेमस्त आणि जहाल यांच्या कार्यक्रमांबद्दल मतभेद झाले. स्वदेशी, बहिष्कार आदी चतुःसूत्री कलकत्त्याला मान्य झाली होती; पण सुरतेस १९०७ च्या अखेरीस भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात फूट पडली. टिळकांनी अध्यक्षांच्या निवडीलाच हरकत घेतली होती, त्यावरून गडबड झाली.

टिळकांच्या अंगावर काठ्या, जोडे फेकण्यात आले तरी टिळक निश्चल होते. पुढे पोलिसांनी मंडप ताब्यात घेतला. काँग्रेसमधील या फाटाफुटीनंतर लवकरच २४ जून १९०८ रोजी टिळकांना मुंबईस पुन्हा राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात येऊन त्यांच्यावर खटला भरण्यात आला. याला कारण म्हणजे ‘देशाचे दुर्दैव’ व ‘हे उपाय टिकाऊ नाहीत’ हे अनुक्रमे १२ मे १९०८ व ९ जून १९०८ च्या केसरीतील अग्रलेख होत.

ज्यूरीत सात इंग्रज व दोन हिंदी गृहस्थ होते. सात विरुद्ध दोन मतांनी ज्यूरींनी त्यांना दोषी ठरविले व कोर्टाने सहा वर्षे काळे पाणी व १,००० रु. दंडाची शिक्षा फर्मावली. ही शिक्षा ऐकवल्यानंतर टिळकांनी काढलेले धीरोदात्त उद्‌गार संस्मरणीय झाले. ते म्हणाले, ‘ज्यूरींनी काहीही निकाल दिला असला, तरी मी पूर्ण निर्दोषी आहे, अशी माझी धारणा आहे. न्यायालयाची सत्ता श्रेष्ठ असेल, पण वस्तुजाताच्या नियतीचे नियमन करणारी सत्ता त्याहूनही श्रेष्ठ आहे. माझ्या स्वातंत्र्यापेक्षा माझ्या हालाअपेष्टांनीच मी अंगीकृत केलेले कार्य अधिक भरभराटीस यावे, असाही परमेश्वराचा संकेत असेल’.

टिळकांना झालेल्या या शिक्षेच्या निषेधार्थ मुंबईत गिरणी कामगारांनी प्रथमच हरताळ पाळला, काही प्रमाणात दंगाही झाला. काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी टिळकांना ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात ठेवण्यात आले. मंडालेच्या तुरुंगात असताना टिळकांच्या जीवनात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. या बंदिवासात त्यांनी आपला गीतारहस्य हा अत्यंत मौलिक ग्रंथ लिहिला, तर पुण्यास त्यांच्या पत्नी सत्यभामाबाई यांचे १९१२ मध्ये निधन झाले. सहा वर्षांच्या कारावासानंतर १५ जून १९१४ रोजी सरकारने त्यांना मुक्त केले.

टिळकांनी १९१५ मध्ये हिंदी स्वराज्यसंघ या विषयावर चार लेख लिहून कोणत्या प्रकाराची राज्यव्यवस्था इष्ट होईल, याचे विवेचन केले. १ मे १९१६ रोजी होमरूल लीग वा हिंदी स्वराज्यसंघ त्यांनी बेळगाव येथे स्थापन केला. तत्पूर्वी १९१५ मध्येच ॲनी बेझंट यांनी मद्रासला होमरूल लीग ही संस्था स्थापन केली होती. होमरूलची चळवळ टिळकांनी व बेंझटबाईंनी संयुक्तपणे चालविली. १९१८ च्या मार्चमध्ये ते होमरूल लीगचे शिष्टमंडळ घेऊन इंग्लंडला गेले.

तत्पूर्वी १९१६ मध्ये लखनौ येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे वेळी त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याच काँग्रेस अधिवेशनात मुख्यतः टिळकांच्या प्रयत्नांनी काँग्रेस-लीग करार झाला व काँग्रेस-लीग संयुक्त अधिवेशन होऊन स्वराज्याच्या मागणीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या काँग्रेसमध्ये जहाल व नेमस्त या दोन पक्षांच्या आणि हिंदू व मुसलमान यांच्या एकीचे अपूर्व दृश्य दिसले.

भारतमंत्री सर एडविन माँटेग्यू यांनी २० ऑगस्ट १९१७ रोजी भारताला भेट देऊन अनेक संस्थांचे चालक, विविध शिष्टमंडळे व पुढारी यांच्या भेटी घेतल्या. त्यांनी टिळकांचीही व्यक्तिशः भेट घेतली. या वेळी माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा जाहीर झाल्या. टिळक इंग्लंडमध्ये असताना रौलट कायदा जाहीर झाला होता व त्याच्या निषेधार्थ महात्मा गांधींच्या आदेशानुसार झालेल्या हरताळातून जालियनवाला बागेतील हत्याकांड घडले होते. ‘गांधीच्या सत्याग्रहात व नंतर घडलेल्या भयंकर प्रसंगात मी तुमच्याबरोबर नव्हतो, याचे मला वाईट वाटते’; असे उद्‌गार टिळकांनी मुंबईस उतरल्याबरोबर काढले.

१९१९ मध्ये अमृतसर येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात हिंदुस्थान आजच जबाबदारीच्या स्वराज्यास पात्र आहे; माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा अपुऱ्‍या, असमाधानकारक व निराशाजनक आहेत, असा ठराव मंजूर करून घेण्यात त्यांना यश आले; परंतु सुधारणा अपुऱ्‍या असल्या तरी त्यांचा त्याग करू नये; आज जे मिळेल तेवढे तर पदरात घ्याच, पण तेवढ्याने संतुष्ट होऊन चळवळ सोडू नका, असा टिळकांचा सल्ला होता.

सर व्हॅलेंटाइन चिरोल यांच्या इंडियन अनरेस्ट या १९१५ साली प्रसिद्ध केलेल्या ग्रंथात आपल्याविरुद्ध बदनामीकारक मजकूर छापल्याबद्दल टिळकांनी लंडनच्या कोर्टात अब्रुनुकसानीची फिर्याद केली होती. १९१९ च्या फेब्रुवारीत तिचा निकाल टिळकांच्या विरुद्ध लागला. या खटल्यात टिळकांचे फार नुकसान झाले; पण याच ग्रंथाने ‘फादर ऑफ इंडियन अनरेस्ट’–भारतीय असंतोषाचे जनक, हे टिळकांचे गौरवास्पद अभिधान रुढ केले.

टिळकांना १९१६ च्या जून महिन्यात ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पुण्याला मोठा समारंभ होऊन त्यांना एक लाखाची थैली अर्पण करण्यात आली. ती सर्व रक्कम राष्ट्रकार्यासाठी वापरण्याची घोषणा करून ते म्हणाले, ‘आपली मातृभूमी आपणा सर्वांस या उद्योगास लागण्याबद्दल आवाहन करीत आहे. मातृभूमीच्या या आव्हानाकडे लक्ष देऊन कोणताही भेदभाव मनात न ठेवता, आपण सर्व राष्ट्रदेव होऊ या’.

गव्हर्नरांनी १० जून १९१८ रोजी मुंबईला युद्धपरिषद भरविली. त्याला टिळक हजर होते; पण लॉर्ड विलिंग्टन यांनी प्रास्ताविक भाषणात होमरूल मागण्यावर टीका केली. टिळकांनी आपल्या भाषणात बजावले की, हिंदुस्थानवर आज ना उद्या स्वारी झाली, तर हिंदी लोक तिच्या प्रतिकारासाठी आपले देहही खर्ची घालतील; पण स्वराज्य, स्वदेश व संरक्षण यांची साखळी मात्र तोडता येणार नाही. विलिंग्टन यांनी त्यांना थांबविले, तेव्हा टिळकांनी सभात्याग केला.

सुधारणा राबविण्यासाठी त्यांनी डेमॉक्रॅटिक स्वराज्य पक्षाची स्थापना केली. या पक्षाचा जाहीरनामा २० एप्रिल १९२० रोजी प्रसिद्ध केला. हा जाहिरनामा म्हणजे ऐतिहासिक दस्तऐवजच. साम्राज्यात ग्रेट ब्रिटनच्या बरोबरीने भारताचे स्थान, जागतिक शांततेची प्रस्थापना, व्यापारी लुटीपासून मुक्तता वगैरे तत्त्वे त्यात नमूद केली आहेत. हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यापूर्वी त्यांनी म. गांधींना दाखविला होता आणि त्यांनी त्यास संमती दर्शविली होती.

टिळकांनी आपले तन, मन, धन प्रामुख्याने राजकीय चळवळीकडे लावलेले असले , तरी त्यांनी ज्या इतर काही कार्यांत लक्ष पुरविले; तीही महत्त्वाची आहेत. या राजकीय कार्याबरोबरच टिळकांची अनेकविध सामाजिक कार्ये चालू होती. सुरत काँग्रेसनंतर त्यांनी दारूबंदीची चळवळ सुरू केली. त्यावर लेख लिहून त्यांनी व्याख्यानेही दिली. प्रत्यक्ष निरोधन करण्यापर्यंत चळवळीची मजल गेली. टिळकांनी पैसाफंड ही संस्था वृद्धिंगत करून लाखो रुपयांचा निधी सामाजिक हितासाठी जमा केला.

पंचांगसंशोधन हा व्यासंग त्यांना लहानपणीच जडला होता. पुढे त्यांनी तो अधिक शास्त्रशुद्ध रीत्या आपल्या स्वतंत्र पंचांगाद्वारा प्रसिद्ध केला. आपल्या देशाच्या औद्योगिक प्रगतीचा विचार टिळक सदैव करीत होते आणि थोड्या भांडवलात कोणते धंदे काढता येतील याची चर्चा ते प्रसंगपरत्वे करीत असल्याची पुष्कळ उदाहरणे ‘आठवणी-आख्यायिकां’च्या स्वरूपात आढळतात. मराठी वर्णमाला छापण्याच्या दृष्टीने सुधारण्याची कल्पना टिळकांच्या मनात पुष्कळ वर्षे घोळत होती. तिचा १९०४ साली प्रत्यक्षात त्यांनी प्रयोगही केली होता. पुढे इंग्लंडमध्ये असताना त्यांच्या ह्या खटपटीस यश आले व मराठी टंकांमध्ये त्यानुसार अनेक सुधारणा करण्यात आल्या.

कलकत्ता येथील ऐतिहासिक काँग्रेस अधिवेशनासाठी अध्यक्ष म्हणून टिळकांचे नाव पं. मालवीय यांनी सुचविले होते; पण तत्पूर्वीच टिळकांचे मुंबईस काही दिवसांच्या आजारानंतर सरदारगृहात देहावसान झाले. सु. १५ वर्षे त्यांना मधुमेहाचा विकार होता. अखेरीस मलेरियाचा ताप व अतिश्रम यांमुळे थकवा आला होता. या वेळीसुद्धा देशाच्या स्वातंत्र्याची त्यांची तळमळ दिसते. मृत्यूसमयी त्यांच्याजवळ त्यांचे मुलगे, मुली व इतर आप्तेष्ट, तसेच न. चिं. केळकर, डॉ. साठे, डॉ. देशमुख, कृ. प्र. खाडिलकर वगैरे मित्रमंडळी होती. टिळकांच्या मृत्यूची बातमी वाऱ्‍यासारखी मुंबईत व देशभर पसरली. सारा देश दुःखाच्या सागरात लोटला गेला. म. गांधींनी १ ऑगस्ट हा दिवस असहकाराच्या चळवळीचा शुभारंभ म्हणून मुक्रर केला. त्यांनी आपल्या श्रद्धांजलीत सांगितले, ‘त्यांची राष्ट्रभक्ती म्हणजे आसक्त्ती होती. त्यांचा धर्म म्हणजे देशप्रेम. ते जन्मतःच लोकशाहीवादी होते. त्यांचे जीवन म्हणजे ग्रंथच म्हणावा लागेल. त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांनी देशहितासाठी खर्ची घातली. त्यांचे खाजगी जीवन धुतलेल्या तांदळासारखे स्वच्छ होते. त्यांनी आपली प्रखर बुद्धिमत्ता देशकार्यासाठी समर्पित केली. लोकमान्यांइतके सातत्याने कोणत्याही व्यक्तीने स्वराज्याचे तत्त्व आतापर्यंत सांगितले नव्हते. इतिहासामध्ये त्यांचे नाव आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून नोंदले जाईल आणि भावी पिढी लोकमान्य नेता म्हणून आदराने त्यांचे स्मरण करील.’

वृत्तपत्रकार चिपळूणकर, टिळक, आगरकर, नामजोशी वगैरे चालक मंडळींनी केसरी–मराठा ही वृत्तपत्रे काढली. केसरी मराठीतून, तर मराठा इंग्रजीतून निघत असे. प्रथम आगरकर केसरी पहात व त्यातून लिहीत आणि टिळक मराठा पहात व त्यातून लेखन करीत. कोल्हापूर संस्थानच्या बर्वे दिवाणावरील लेखांमुळे केसरी–मराठावर अब्रुनुकसानीची फिर्याद झाली आणि टिळक व आगरकर या संपादकद्वयाला १०१ दिवसांची कैद भोगावी लागली.

चिपळूणकरांच्या मृत्यूप्रसंगी केसरीने अग्रलेखात ध्येयनिष्ठेचा आत्मविश्वास प्रगट केला, तो असा : ‘चिपळूणकर गेले, तथापि आमची अशी उमेद आहे की, देशोन्नतीसाठी झटण्याचा केलेला संकल्प होता होईल तो आम्ही ढळू देणार नाही.’ आरंभी टिळकांचा ओढा इंग्रजी लेखनाकडेच जास्त होता. त्यामुळे केसरीतून ते क्वचितच लिहीत.

सुरुवातीच्या व्यवस्थेत पुढे वैचारिक मतभेदांमुळे फरक पडला. शिवाय वृत्तपत्रांचे व्यवहार सोसायटीबाहेर ठेवल्याशिवाय सभासदांच्या विचारांची ओढाताण थांबणार नाही, असे वाटून वृत्तपत्रांची जबाबदारी केळकर–टिळकांनी स्वतंत्र रीत्या अंगावर घेतली (१८८७). टिळक केसरी–मराठा या वृत्तपत्रांचे व आर्यभूषण या छापखान्याचे कर्जासह रीतसर मालक झाले, पण त्यात वासुदेवराव केळकर व हरि नारायण गोखले हे भागीदार होते. पुढे १८९१ मध्ये टिळक डेक्कन एज्युकेशन सोसायटीमधून बाहेर पडले आणि त्यांनी कर्जासह केसरी–मराठा ही वृत्तपत्रे स्वतंत्र रीत्या चालविण्यास घेतली.

मात्र आर्यभूषण छापखाना केळकर–गोखल्यांकडेच राहिला. तत्संबंधी ‘सालगुदस्ता’ याकेसरीच्या अग्रलेखात वृत्तपत्रांना कठीण प्रसंगातून जावे लागत आहे, हा विषय हाताळला आहे. त्यांनी केसरीचे स्वरूप कसे असेल, हे स्पष्ट करताना लिहिले आहे की, ‘केसरी हा निर्भयपणे व निःपक्षपातीपणे सर्व प्रश्नांची चर्चा करील. ब्रिटिश सरकारची खुशामत करण्याची जी वाढती प्रवृत्ती आज दिसून येते आहे, ती देशहिताची नाही.केसरीतील लेख केसरी या नावाला साजेसे असतील.’

टिळकांनी केसरीतून एकापेक्षा एक असे अनेक सरस अग्रलेख लिहिले. त्यांच्या या प्रखर आणि ब्रिटिशांविरुद्ध लेखांबद्दलच्या राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना तीन वेळा कारावास भोगावा लागला. तथापि त्यांनी आपल्या लेखनविषयक धोरणात किंचितही बदल केला नाही. त्यामुळे केसरीचा खप झपाट्याने वाढला व तो लोकप्रिय झाला.

टिळकांचे केसरीतील लेख व भाषणे यांतील प्रत्येक शब्द सरळ, स्पष्ट, युक्तिवादात्मक, व्यावहारिक, सामान्य मनुष्याला समजणारा व उमजणारा असल्यामुळे त्याचे मर्म समजले नाही, असा वाचक किंवा श्रोता आढळलाच नाही; असे न. चिं. केळकर म्हणतात. १८९६ पासून केसरी–मराठा ही वृत्तपत्रे चालविताना टिळकांना न. चिं. केळकर, कृ. प्र. खाडिलकर आणि दे. गो. लिमये ही सहकारी मंडळी लाभली. त्यामुळे टिळकांच्या अनुपस्थितीतही केसरी–मराठा नेहमीच्याच आवेशाने प्रसिद्ध होत राहिले.

ग्रंथलेखन

टिळकांनी बहुतेक मराठी स्फुटलेखन केसरीतून केले. केसरीव्यतिरिक्त काही लेखन टिळकांनी मराठा या त्यांच्या इंग्रजी वृत्तपत्रातून केले. या साप्ताहिकांच्या बाहेर टिळकांनी केलेले स्फुटलेखन फार थोडे आहे. त्यात उल्लेखनीय म्हणजे लिमयेकृत भारतीय युद्ध, अवंतिकाबाई गोखलेकृत गांधीचरित्र व डॉ. गर्देकृत ईशगुणादर्श या पुस्तकांच्या प्रस्तावना होत.

टिळकांचा संस्कृत व इंग्रजी वाङ्‌मयाचा गाढा अभ्यास होता. भारतीय तत्त्वज्ञान हा त्यांचा आवडीचा विषय. त्यांनी पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचेही अध्ययन केले होते. त्यांच्या व्यापक व्यासंगाचे उत्कृष्ट प्रतिबिंब गीतारहस्यात पहावयास मिळते.

राजकीय क्षेत्रात टिळक काम करीत असताना कधी तुरुंगात व अन्य वेळी त्यांना थोडीशी उसंत मिळाली, त्या काळात त्यांनी काही ग्रंथ लिहिले. बहुतेक त्यांचे लेखन संशोधनपर असून प्रत्येक ग्रंथात त्यांनी काही स्वतंत्र मते प्रतिपादन केली आहेत. त्यांचे प्रमुख ग्रंथगीतारहस्य, ओरायन, आर्क्टिक होम इन द वेदाज आणि वेदांगज्योतिष.

मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी श्रीमद्‌भगवद्‌गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र हा ग्रंथ १९१०–११ च्या हिवाळ्यात लिहिला व १९१५ मध्ये प्रसिद्ध केला. हा ग्रंथ म्हणजे गीतेवरचे भाष्य असून ते कर्मयोगपर आहे. तत्पूर्वी सर्व भाष्ये व टीका बाजूला ठेवून नुसते गीतेचेच स्वतंत्रपणे पारायण करून टिळकांना गीतेचा जो बोध झाला, तो त्यांनी यात विवेचकपणे प्रतिपादन केला आहे. त्यांच्या मते गीता निवृत्तिपर नसून ती प्रवृत्तिपर आहे.

ओरायन हा एक त्यांचा संशोधनात्मक प्रबंध आहे. १८९२ च्या लंडन येथील ओरिएंटल परिषदेसाठी त्यांनी तो तयार केला. त्यात वेदाचा कालनिर्णय हा विषय हाताळला. माक्स म्यूलरने जो वेदांचा काळ ठरविला तो भाषिक संशोधनावर ठरविला असल्याने तो बरोबर नाही; संशोधनाची ही पद्धत एकांगी होय, असे टिळकांचे मत होते. म्हणून त्यांनी दैवतशास्त्र, भाषाशास्त्र, संहिता आणि ब्राह्मणे यांतील ज्योतिषशास्त्रविषयक सर्व संदर्भ एकत्रित करून ज्योतिषाच्या गणिताने वेदांचा काळ सु. इ. स. पू. ४५०० वर्षे हा ठरविला. या ग्रंथाची याकोबी व ब्लूमफील्ड या पाश्चात्त्य प्राच्यविद्या पंडितांनी स्तुती केली आहे.

आर्क्टिक होम इन द वेदाज हाही टिळकांचा एक संशोधनपर प्रबंध असून १८९८ साली टिळक येरवड्याच्या तुरुंगात असताना त्याची कल्पना त्यांना सुचली. या पुस्तकात त्यांनी आर्यांचे मूलस्थान उत्तर ध्रुवाच्या प्रदेशातच असले पाहिजे, हे अनुमान मुख्यतः वेदांतील ऋचांच्या आधारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

आपल्या गीतारहस्यातून ज्या कर्मयोगाचा पुरस्कार टिळकांनी केला, तोच कर्मयोग प्रत्यक्ष जीवनात आचरून दाखविला. लोकसंग्रहाची दृष्टी राखून लोकमान्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीला समाजाच्या सर्व थरांतील लोकांचे अधिष्ठान मिळवून दिले. गीतारहस्य हे त्यांचे अक्षय विचारधन असून ते आधुनिक भारतातील एक श्रेष्ठ तत्त्वज्ञान होय. गांधींच्या सर्वांगीण व सर्वंकष राजकीय-सांस्कृतिक कार्याला अनुकूल अशी पार्श्वभूमी निर्माण करण्याचे श्रेय लोकमान्यांना द्यावे लागते. म्हणून आधुनिक भारताच्या इतिहासात टिळकयुग हा फार महत्त्वाचा टप्पा मानण्यात येतो.

 

संदर्भ :

1. Keer, Dhananjay, Lokamanya Tilak, Bombay, 1959.

2. Parvate T. V. Bal Gangadhar Tilak, Ahamedabad, 1958.

3. Ram Gopal, Lokamanya Tilak, Bombay, 1965.

४. केळकर, न. चिं. लोकमान्य टिळक यांचे चरित्र, ३ खंड, पुणे, १९२३–२८.

५. जावडेकर, शं. द. लोकमान्य टिळक व गांधी, पुणे, १९४६.

६. जोशी, लक्ष्मणशास्त्री, संपा. लोकमान्य टिळक लेखसंग्रह, नवी दिल्ली, १९६९.

७. फाटक, न. र. लोकमान्य, मुंबई, १९७२.

८. बनहट्टी, श्री. ना. टिळक आणि आगरकर, पुणे, १९५७.

देशपांडे, सु. र.

लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव ‘बाळ गंगाधर टिळक’. ब्रिटिश अधिकारी त्यांना ‘भारतीय अशांततेचे जनक’ म्हणत असत. भारतीय सावतंत्रलढ्यात त्यांचा खूप मोलाचा वाटा होता. इंग्रजांविरोधात त्यांचे विचार खूप आक्रमक होते. त्यामुळे लोकांनी त्यांना ‘लोकमान्य’ म्हणून पदवी बहाल केली होती.

  ’’ स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ’’

अशी सिंहगर्जना देणारे लोकमान्य टिळक हे एक वकील, शिक्षक,सामाजिक कार्यकर्ता, भारतीय क्रांतिकारी, भारतीय स्वतंत्र सेनानी देखील होते.

आज आपण ह्याच थोर स्वतंत्रसैनिक लोकमान्य टिळक ह्यांची माहिती बघणार आहोत.

पुर्ण नाव (Name):बाळ (केशव) गंगाधर टिळक
उपाधीलोकमान्य
जन्म (Birthday):23 जुलै 1856
जन्मस्थान (Birthplace):चिखलगांव ता. दापोली जि. रत्नागिरी
वडिल (Father Name):गंगाधरपंत
आई (Mother Name):पार्वतीबाई
शिक्षण (Education):1876 मध्ये बी.ए. (गणित) प्रथम श्रेणीत उत्तीर्ण आणि 1879 रोजी एल.एल.बी. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
पत्नीचे नाव (Wife Name):सत्यभामाबाई
मुले (Childrens)रमाबाई वैद्य, पार्वतीबाई केळकर,
 विश्वनाथ बळवंत टिळक, रामभाऊ बळवंत टिळक,
 श्रीधर बळवंत टिळक आणि रमाबाई साने
मृत्यु (Death):1 ऑगस्ट 1920

लोकमान्य टिळक यांचे सुरुवातीचे जीवन

बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे मुळगांव कोकणातील चिखली हे होते. टिळकांचे वडिल एका शाळेत शिक्षक म्हणुन कार्यरत होते व संस्कृताचे चांगले ज्ञानी होते. टिळक अवघे 16 वर्षांचे असतांना त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई गंगाधर होते वडिलांच्या बदलीनंतर त्यांचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. त्याच वेळी, 1871 मध्ये त्यांचा (तापीबाईंशी) विवाह झाला, ज्यांना नंतर (सत्यभामा बाई) म्हणून ओळखले जाऊ लागले.

लोकमान्य टिळक यांचे शिक्षण

बाल गंगाधर टिळक (लोकमान्य टिळक) हे लहानपणापासूनच अतिशय बुद्धीचे हुशार विद्यार्थी होते, गणित त्यांचा आवडता विषय होता. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण वडिलांकडून घरीच घेतलेले.

नंतर त्यांचे शिक्षण पुण्यातील एंग्लो-वर्नाकुलर स्कूलमधून झाले. 

1872 मध्ये गंगाधर यांचे निधन झाले. त्यांनी काही रक्कम मुलाच्या शिक्षणासाठी ठेवली होती. त्यामुळे डेक्कन कॉलेज मध्ये लोकमान्य टिळक यांनी नाव घातले.

1876 मध्ये बी.ए. पहिल्या वर्गात लोकमान्य टिळक उत्तीर्ण झाले. व त्यानंतर १८७९ मध्ये त्यांनी एल. एल. बी. ही पदवी लोकमान्य टिळक यांनी घेतली.

लोकमान्य टिळकांचे सामाजिक जीवन

शिक्षण संपल्यानंतर लोकमान्य टिळक हे पुणे येथील एका खासगी शाळेत गणित व इंग्रजीचे शिक्षक झाले.

पण त्यांचे विचार शाळेतील इतर शिक्षक आणि अधिकाऱ्यांशी जुळले नाहीत कारण ते भारतीय विद्यार्थ्यांना दुहेरी वागणुक देत असत. आणि या मतभेदांमुळे त्यांनी 1880 मध्ये शाळेत शिकवणे सोडले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना –

भारतीय विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रवादी शिक्षणाची प्रेरणा देण्यासाठी तसेच, देशातील तरुणांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी बाळ गंगाधर टिळक व त्यांचे महाविद्यालयीन बॅचमेट आणि थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णूशास्त्री चिपुळणकर यांनी २४ ऑक्टोबर १८८४ मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी ची स्थापना केली.

1885 मध्ये याच सोसायटीने माध्यमिक शिक्षणासाठी नवीन इंग्रजी स्कुल आणि उच्च शिक्षणासाठी फर्ग्युसन कॉलेज स्थापन देखील केली.

केसरी व मराठा वृत्तपत्राची स्थापना –

सन 1881 मध्ये, लोकमान्य टिळकांनी ‘भारतीय जनता आणि लोकांच्या समस्या समजून घ्याव्यात आणि स्वत: च्या कारभाराची भावना निर्माण व्हावी आणि त्यांच्या हक्कांसाठी लढा द्यावा’ या उद्देशाने मराठी भाषेत ‘केसरी’ आणि इंग्रजी भाषेत ‘मराठा’ या दोन मासिकांची सुरूवात केली. ही दोन्ही वर्तमानपत्र लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाली.

लोकमान्य टिळकांचे राजकीय जीवन

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (Indian Nation Congress)

लोकमान्य टिळक यांनी 1890 मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

त्यानंतर त्यांनी स्वराज्य पक्षाविषयी पक्षाच्या उदारमतवादी विचारांचा तीव्र निषेध करण्यास सुरुवात केली.

या दरम्यान बाळ गंगाधर टिळक म्हणाले की ब्रिटिश सरकारच्या विरोधात एक साधी घटनात्मक चळवळ करणे व्यर्थ आहे, त्यानंतर पक्षाने त्यांना त्यावेळचे काँग्रेसचे प्रमुख नेते गोपाळ कृष्ण गोखले यांच्या विरोधात उभे केले.

लोकमान्य टिळकांना स्वराज्य मिळवण्यासाठी आणि इंग्रजांना पळवून लावण्यासाठी जोरदार बंड करायचे होते. त्याच वेळी त्यांनी स्वदेशी चळवळीस आणि बंगालच्या फाळणीच्या वेळी ब्रिटीश वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे समर्थन केले.

कॉंग्रेस पक्ष आणि लोकमान्य टिळक यांच्यातील विचारसरणीतील फरकामुळे त्यांना कॉंग्रेसची चरमपंथी विंग म्हणून मान्यता मिळाली.

यावेळी टिळकांना बंगालचे राष्ट्रवादी बिपीन चंद्र पाल आणि पंजाबचे लाला लाजपत राय यांनी पाठिंबा दर्शविला. त्याचवेळी या तिघांना ‘लाल-बाल-पाल’ म्हणून प्रसिद्ध झाली.

1907 मध्ये कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात कॉंग्रेस पक्षाच्या उदारमतवादी आणि चरमपंथी गटात वाद निर्माण झाला. यामुळे कॉंग्रेस दोन स्वतंत्र गटात विभागली गेली.

लोकमान्य टिळकांची तुरुंगातील जीवन

लोकमान्य टिळकांनी ब्रिटीश सरकारच्या दडपणाच्या धोरणाला कडाडून विरोध दर्शविला आणि आपल्या वर्तमानपत्रांद्वारे ब्रिटीशांविरूद्ध चिथावणीखोर लेख लिहिले.

व या लेखाच्या प्रेरणेमुळे चापेकर बंधूनी 22 जून 1897 रोजी, कमिश्चनर रैंड औरो लेफ्टडिनेंट आयर्स्टचा खून केला. त्यानंतर लोकमान्य टिळकांवर हा खून केल्याबद्दल देशद्रोहाचा खटला चालविला गेला आणि 6 वर्षे ‘हद्दपार’ अशी शिक्षा सुनावण्यात आली.

1908 ते 1914 दरम्यान त्यांना बर्माच्या मांडले तुरुंगात पाठविण्यात आले. तुरुंगात असतानाही त्यांनी लिखाण सुरू ठेवले, त्यांनी तुरुंगात ‘गीता रहस्या’ हे पुस्तक लिहिले.

त्याच वेळी टिळकांच्या क्रांतिकारक पायऱ्यांमुळे इंग्रज बौखला येथे गेले होते आणि त्यांनी त्यांच्या वर्तमानपत्रांचे प्रकाशन थांबवण्याचा प्रयत्नही केला होता. पण तोपर्यंत टिळकांची लोकप्रियता बरीच वाढली होती आणि लोकांमध्ये स्वराज्य मिळण्याची इच्छा निर्माण झाली होती.

ब्रिटिशांनाही या आक्रमक विचाराच्या स्वतंत्र सेनानी समोर झुकावे लागले.

लोकमान्य टिळकांचा मृत्यू

1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांनी अखेरचा श्वास घेतला. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या घटनेचा बाळ गंगाधर टिळक यांच्यावर खोलवर परिणाम झाला होता, त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळू लागली.

व नंतर त्यांना मधुमेहाच्या त्रासाने देखील विळखा घातला. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली. त्यांच्या अंतयात्रेत लाखो लोक समाविष्ट झाले.

 

गंगाधर टिळक पुण्यतिथी : बाळ गंगाधर टिळक संपूर्ण माहिती मराठी


'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच', हे वाक्य आजचे नाही, पण ते वाचून, ऐकल्यावर बाळ गंगाधर टिळक आठवतात, हे वाक्य प्रत्येक वेळी बोलताना किंवा ऐकताना जोश, उत्साह आणि उमेद जाणवते. बाळ गंगाधर टिळक हे लोकमान्य टिळक म्हणूनही ओळखले जातात. लोकमान्य ही पदवीही त्यांना देण्यात आली. लोकमान्य म्हणजे लोकांनी स्वीकारलेला नेता. लोकमान्यांशिवाय त्यांना हिंदू राष्ट्रवादाचे जनक देखील म्हटले जाते.
 
जन्म
बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला आणि 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचे निधन झाले. ते एक भारतीय राष्ट्रवादी, शिक्षक, समाजसुधारक, वकील आणि स्वातंत्र्यसैनिक होते. ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील पहिले लोकप्रिय नेते बनले. ते हिंदू म्हणून ओळखले जात होते. त्यांना राष्ट्रवादाचे जनक देखील म्हटले जाते. बाळ गंगाधर टिळक हे ब्रिटीश राजवटीत स्वराज्याचे पहिले आणि खंबीर पुरस्कर्ते मानले जातात. त्या काळात त्यांनी मराठी भाषेत नारा दिला, त्यांचा मराठी भाषेत दिलेला नारा आहे. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" खूप प्रसिद्ध झाला. त्यांनी बिपिन चंद्र पाल, लाला लजपत राय, अरविंद घोष, व्ही.ओ. चिदंबरम पिल्लई आणि मुहम्मद अली जिना यांच्यासह भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनेक नेत्यांशी घनिष्ठ युती केली.
 
सुरुवातीचे जीवन
बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावात झाला. रत्नागिरी गावातून आधुनिक महाविद्यालयात शिक्षण घेतलेले ते भारतीय पिढीतील पहिले सुशिक्षित नेते होते. त्यांनी काही काळ शाळा-महाविद्यालयांमध्ये गणित शिकवले. ते इंग्रजी शिक्षणाचे टीकाकार होते. यामुळे ते भारतीय सभ्यतेचा अनादर शिकवते, असा त्यांचा समज होता. भारतातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या दिशेनेही बरेच काम झाले आहे.
 
राजकीय प्रवास
बाळ गंगाधर टिळकांनी इंग्रजीत मराठा दर्पण आणि मराठीत केसरी नावाची दोन दैनिके सुरू केली, ही दोन्ही दैनिके लवकरच लोकांमध्ये लोकप्रिय झाली. टिळकांनी ब्रिटीश राजवटीच्या क्रौर्याबद्दल आणि भारतीय संस्कृतीच्या न्यूनगंडावर टीका केली होती. ब्रिटीश सरकारने ताबडतोब भारतीयांना पूर्ण स्वराज्य द्यावे, अशी त्यांची मागणी होती. केसरी या वृत्तपत्रात ते इंग्रजांविरुद्ध अतिशय आक्रमक लेख लिहीत असत. या लेखांमुळे त्यांना अनेकवेळा तुरुंगात पाठवण्यात आले.
 
काँग्रेसमध्ये सामील
त्या काळी काँग्रेसचे राज्य असल्यामुळे ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्येही सामील झाले, परंतु लवकरच ते काँग्रेसच्या संयमी वृत्तीच्या विरोधात गेले आणि त्यांच्या विरोधात बोलू लागले. याशिवाय इतर अनेक नेतेही अशाच प्रकारे निषेधार्थ बोलू लागले आणि अनेकजण समर्थनार्थ बोलू लागले. त्‍यामुळे 1907 मध्‍ये कॉंग्रेस अतिरेकी आणि मॉडरेट दलात विभागली गेली. लाला लजपत राय आणि बिपिन चंद्र पाल हे टिळकांना गरम दलात सामील झाले, ते तिघेही लाल-बाल-पाल म्हणून ओळखले जाऊ लागले. 1908 मध्ये टिळकांनी क्रांतिकारक प्रफुल्ल चाकी आणि खुदीराम बोस यांच्या बॉम्ब हल्ल्याचे समर्थन केले, ज्यामुळे त्यांना बर्मा (आता म्यानमार) मंडाले तुरुंगात पाठवण्यात आले. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर, ते पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाले आणि 1916 मध्ये अॅनी बेझंट आणि मुहम्मद अली जिना यांच्यासमवेत ऑल इंडिया होम रूल लीगची स्थापना केली.
 
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (बाल-पाल-लाल त्रिकूट) 
1889 मध्ये टिळक यांनी सर विल्यम वेडरबर्न यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मुंबई अधिवेशनात भाग घेतला. टिळक तेव्हा 33 वर्षांचे होते. त्यांचे समकालीन बनलेले इतर दोन युवक काँग्रेस देखील प्रथमच काँग्रेसच्या मंचावर दिसले - लाला लजपत राय वय 34 आणि गोपाळ कृष्ण गोखले वय 33. 1885 मध्ये काँग्रेसमध्ये मध्यमवर्गाचे वर्चस्व होते, ज्यांचा ब्रिटिशांच्या न्याय आणि निष्पक्षतेच्या भावनेवर आणि चळवळीच्या घटनात्मक आणि कायदेशीर पद्धतींवर विश्वास होता. तथापि, नंतर लॉर्ड कर्झनच्या बंगाल राज्याच्या फाळणीच्या निर्णयामुळे हे बदलले. भारतातील तरुणांनी अतिरेकी राजकारण आणि थेट कृतीकडे वाटचाल केली. बिपीन चंद्र पाल आणि लाला लजपत राय यांच्यासोबत टिळकांनी ब्रिटीशांच्या विरोधात मोहभंगाची संधी साधली आणि मध्यमवर्गाच्या "राजकीय भिक्षा" चा निषेध केला.
 
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बाळ गंगाधर टिळक 1890 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले. ते त्यांच्या काळातील सर्वात प्रमुख कट्टरपंथी होते. याशिवाय लवकर लग्नालाही त्यांचा विरोध होता. म्हणूनच ते 1891 च्या संमती वयाच्या विधेयकाच्या अगदी सुरुवातीपासूनच विरोधात होते, कारण ते हिंदू धर्मावरील अतिक्रमण आणि एक धोकादायक उदाहरण म्हणून पाहत होते. या कायद्याने मुलीचे लग्न करण्याचे किमान वय 10 वरून 12 वर्षे केले.
 
लेखामुळे देशद्रोहाचा आरोप
बाळ गंगाधर टिळकांनी एकदा त्यांच्या ‘केसरी’ या पत्रात ‘देशाचे दुर्दैव’ असा लेख लिहिला होता, त्यात ब्रिटिश सरकारच्या धोरणांना विरोध करण्यात आला होता. यामुळे, त्यांना 7 जुलै 1897 रोजी देशद्रोहासाठी अटक करण्यात आली. त्यांना मंडाले (ब्रह्मदेश) तुरुंगात 6 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली.
 
6 वर्षे कारावास
ब्रिटिश सरकारने त्यांना 6 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तुरुंगवासाच्या काळात टिळकांनी तुरुंग व्यवस्थापनाला आणखी काही पुस्तके लिहिण्यास सांगितले, परंतु ब्रिटिश सरकारने त्यांना राजकीय क्रियाकलाप असलेले असे कोणतेही पत्र लिहिण्यापासून रोखले. टिळकांनी तुरुंगात एक पुस्तकही लिहिले, बाळ गंगाधर टिळकांच्या पत्नीचे त्यांची शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच निधन झाले. कारागृहातील एका पत्रावरून त्याला ही बातमी कळली. ब्रिटीश सरकारच्या तुघलकी धोरणामुळे त्यांना त्यांच्या मृत पत्नीचे शेवटचे दर्शनही घेता आले नाही.
 
मृत्यू
सन 1919 मध्ये काँग्रेसच्या अमृतसर सभेला उपस्थित राहण्यासाठी मायदेशी परतत असताना टिळक इतके मवाळ झाले होते की त्यांनी माँटेग्यू-चेम्सफोर्ड रिफॉर्म्सने स्थापन केलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याच्या गांधींच्या धोरणाला त्यांनी विरोध केला नाही. त्याऐवजी टिळकांनी प्रतिनिधींना प्रादेशिक सरकारांमध्ये काही प्रमाणात भारतीय सहभागाची ओळख करून देणार्‍या सुधारणांच्या अंमलबजावणीसाठी त्यांच्या सहकार्याचे धोरण अवलंबण्याचा सल्ला दिला. परंतु नवीन सुधारणांना निर्णायक दिशा देण्याआधीच 1 ऑगस्ट 1920 रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल आदरांजली वाहताना महात्मा गांधींनी त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हटले, जवाहरलाल नेहरूंनी त्यांना भारतीय क्रांतीचे जनक म्हटले.

लोकमान्य टिळक मराठी निबंध Essay on Lokmanya Tilak in Marathi

Amar Shinde

Essay on Lokmanya Tilak in Marathi हा निबंध आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या शब्दांत लिहून देणार आहोत. तुम्ही यापैकी कोणताही निबंध तुमच्या परीक्षेमध्ये वापरू शकता.

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच!” या घोषणेशी संपूर्ण देश परिचित आहे. ही सिंह गर्जना करणारे लोकमान्य टिळक भारताचे महान नेते होते.

Also Read: लोकमान्य टिळक माहिती मराठी (Lokmanya Tilak Information in Marathi)

Essay on Lokmanya Tilak in Marathi

Set 1 is Helpful for Students of Classes 1, 2, 3 and 4.

  1. बाल गंगाधर टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी महाराष्ट्राच्या रत्नागिरीतील चिखली गावात झाला.
  2. टिळकांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे जनक म्हणून ओळखले जाते.
  3. टिळकांचे राजकीय उद्दीष्ट म्हणजे लोकांसाठी स्वावलंबन आणि स्वराज्य मिळवणे किंवा स्वराज्य मिळवणे हे होते.
  4. त्यांनी स्वदेशी आणि देशभरात मोठ्या प्रमाणावर परदेशी वस्तूंवर बहिष्कार घालण्यात सहभाग घेतला होता.
  5. टिळकांनी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘केसरी’ आणि ‘मराठा’ ही वृत्तपत्रे प्रकाशित केली.
  6. त्यांनी लोकांना एकत्र आणून त्यांना स्वातंत्र्याबद्दल प्रोत्साहीत करण्यासाठी गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाची सुरुवात केली.
  7. १९०६ मध्ये टिळकांवर राजद्रोहाचा आरोप लावून ब्रिटिशांनी त्यांना अटक केली.
  8. मंडालेच्या या कारावासात त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.
  9. १९१४ मध्ये कारावासातून सुटका झाल्यानंतर त्यांनी अनेक सामाजिक कार्ये केली.
  10. शेवटी वयाच्या ६४ व्या वर्षी १ ऑगस्ट १९२० रोजी टिळकांना वीरमरण आले.

लोकमान्य टिळक मराठी निबंध Essay on Lokmanya Tilak in Marathi (१०० शब्दांत)

Set 2 is Helpful for Students of Classes 5, 6, 7 and 8.

बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधरपंत तर आईचे नाव पार्वतीबाई होते. त्यांचे वडील शिक्षक होते. लहानपणापासूनच बाळ टिळक बुद्धिमान आणि तेजस्वी होते. त्यांना कोणावर अन्याय झालेला सहन होत नसे.

१८७९ मध्ये टिळकांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. त्यांना ब्रिटीश सरकार सामान्य जनतेवर करत असलेल्या अत्याचाराचा प्रचंड राग येत असे. म्हणूनच त्यांनी १८८० मध्ये स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली. त्यांनी जनतेला स्वातंत्र्याचे महत्व पटवून देण्यासाठी ‘केसरी’ आणि ‘मराठा’ ही वृत्तपत्रे सुरु केली. जनतेला एकत्र आणण्यासाठी त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरु केले. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना ‘लोकमान्य’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

स्वातंत्र्य चळवळीत असताना टिळकांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. मंडालेच्या तुरुंगात असताना टिळकांनी ‘गीतारहस्य’ ग्रंथाची निर्मिती केली. अशा या महान थोरपुरुषाने १ ऑगस्ट १९२० रोजी या भूमीचा निरोप घेतला.


लोकमान्य टिळक मराठी निबंध Essay on Lokmanya Tilak in Marathi (२०० शब्दांत)

Set 3 is Helpful for Students of Classes 9, and 10.

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच!” या घोषणेशी संपूर्ण देश परिचित आहे. ही सिंह गर्जना करणारे लोकमान्य टिळक भारताचे महान नेते होते.

टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावात झाला. त्याच्या वडिलांचे नाव गंगाधरपंत आणि आईचे नाव पार्वती होते. लहानपणी प्रत्येकजण टिळकांना ‘बाळ’ म्हणून संबोधत असे. नंतर हेच त्यांचे नाव पडले.

टिळक लहानपणापासूनच हुशार, तेजस्वी आणि धाडसी होते. त्यांना कोणावर अन्याय झालेला पाहवत नसे. टिळकांचे माध्यमिक शिक्षण पुण्यात झाले, त्यानंतर त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेज मधून आपले पदवीचे शिक्षण घेतले.

त्याकाळात राष्ट्रीय सभा देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होती  नंतर टिळकही या संघर्षात सामील झाले. लोकमान्य टिळकांनी नेहमीच इंग्रजांच्या अन्याय आणि अत्याचाराला विरोध केला. त्यांना सामान्य लोकांना इंग्रजांच्या अन्यायी शासनाविरुद्ध जागृत करायचे होते. म्हणून त्यांनी लोकांमध्ये स्वातंत्र्याची भूक निर्माण करण्यासाठी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे प्रकाशित करण्यास सुरुवात केली. त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती यांसारखे उत्सव सुरु करून जनतेला एकत्र आणले.

स्वातंत्र्य चळवळींमध्ये टिळकांना अनेक वेळा तुरुंगातही जावे लागले. मंडालेच्या तुरुंगात त्यांनी गीतेवर भाष्य करणारा ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर ते इतके लोकप्रिय झाले की  त्यांना लोकांकडून ‘लोकमान्य’ ही पदवी मिळाली.

टिळकांची मंडालेच्या जेलमधून १९१४ मध्ये सुटका झाली, त्यानंतर त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी अनेक सामाजिक कार्ये केली. टिळकांनी पुण्यात ‘न्यू इंग्लिश स्कूल’ सुरू केले. लोकांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले.

शेवटी १ ऑगस्ट १९२० रोजी वयाच्या ६४ व्या वर्षी लोकमान्य टिळक या थोर महापुरुषाची जीवनज्योत मावळली.


लोकमान्य टिळक मराठी निबंध Essay on Lokmanya Tilak in Marathi (३०० शब्दांत)

Set 4 is Helpful for Students of Classes 11, 12 and Competitive Exams.

लोकमान्य टिळक हे त्या स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक मानले जातात जे त्यांच्या लढाऊ चेतना, विचारधारा, धैर्य, बुद्धिमत्ता आणि अटल देशभक्तीसाठी ओळखले जातात. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच’ ही सिंह गर्जना लोकमान्यांनी केली होती.

लोकमान्य टिळक हे केवळ राजकारणी नव्हते तर एक महान अभ्यासक आणि तत्वज्ञ होते. त्यांचे मूळ नाव बाळ गंगाधर टिळक होते. त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात चिखली या गावी झाला. त्यांचा जन्म एका मध्यमवर्गी ब्राह्मण कुटुंबात झाला होता.

त्यांच्या आजोबांचे नाव केशवराव होते, ते पेशवे राज्यात उच्च पदावर होते. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई गंगाधर टिळक आणि वडिलांचे नाव रामचंद्र गंगाधरपंत टिळक होते. टिळकांचे वडील गंगाधरपंत हे एक शिक्षक होते. त्यांनी बाळ टिळकांना घरी संस्कृत, मराठी, गणिताचे उत्तम ज्ञान दिले होते.

टिळकांनी १८६६ मध्ये पुण्याच्या एका शाळेत प्रवेश घेतला. टिळक शाळेत असताना खूप आशादायक विद्यार्थी होते. त्याचे शिक्षक, आई, वडील आणि इतरांचा त्यांचा अत्यंत अभिमान वाटायचा. १८७१ मध्ये वयाच्या १५ व्या वर्षी टिळकांचे सत्यभामाबाई नावाच्या मुलीशी लग्न झाले. त्यानंतर त्यांनी डेक्कन कॉलेजमधून कला शाखेचे शिक्षण घेतले.

टिळकांनी १८८० मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यांनी वासुदेव बळवंतच्या मदतीने बंडखोरीचा झेंडा फडकावून ब्रिटीश सरकारविरूद्ध निषेध केला. त्यांनी १८८० मध्ये पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली आणि आपले शिक्षण क्षेत्रातील कार्य सुरु केले. त्यानंतर त्यांनी १८८१ मध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. त्यांनी जनतेमध्ये स्वातंत्र्याबद्दल जनतेत जनजागृती आणि ब्रिटीश सरकारच्या अन्यायची जनतेला जाणीव करून देण्यासाठी ‘केसरी’ आणि ‘मराठा’ ही दोन वृत्तपत्रे प्रकाशित करण्यास सुरुवात केली.

मराठा केसरी या वृत्तपत्रकाच्या माध्यमातून त्यांनी जनतेची बाजू मांडली होती, त्यामुळे दीड वर्षासाठी त्यांना तुरूंगात जावे लागले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. टिळकांनी महाराष्ट्रात गणपती महोत्सव आणि शिवाजी जयंती सुरू करून सार्वजनिक जनतेला एकत्र आणून ऐक्याचा संदेश दिला आणि लोकांमध्ये स्वातंत्र्यप्रेम जागृत केले.

सन १९०६ मध्ये लोकमान्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली कारावासाची शिक्षा झाली, त्यांना मंडालेच्या तुरुंगात ठेवण्यात आले. त्यांनी येथे वाचन आणि लिखाण करण्यात आपला वेल घालवला. त्यांनी गीतेवर भाष्य करणाऱ्या ‘गीतारहस्य’ ग्रंथाची निर्मिती येथेच केली.

१९१४ मध्ये कारावासातून मुक्तता मिळाल्यानंतर देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटलेल्या या थोर पुरुषाचे १ ऑगस्ट १९२० रोजी निधन झाले.


लोकमान्य टिळक मराठी निबंध Essay on Lokmanya Tilak in Marathi (४०० शब्दांत)

Set 5 is Helpful for Students of Classes 11, 12 and Competitive Exams.

बाळ गंगाधर टिळक हे भारतीय राष्ट्रीय चळवळीचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. ते समाज सुधारक, स्वातंत्र्यसैनिक, राष्ट्रीय नेते आणि भारत इतिहास, संस्कृत, हिंदुत्व, गणित आणि ते खगोलशास्त्राचे महान अभ्यासकदेखील होते. त्यांना लोकांनी ‘लोकमान्य’ पदवी बहाल केली होती. स्वातंत्र्यलढ्यादरम्यान त्यांनी सिंहगर्जना केली होती, “स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच” या गर्जनेने कोट्यावधी भारतीयांना स्वातंत्र्यासाठी प्रेरणा दिली होती.

जन्म आणि कुटुंब

बाळ गंगाधर टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी महाराष्ट्रात रत्नागिरीतील चिखली गावात झाला. ते जातीने ‘चितपावन’ ब्राह्मण होते. त्यांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक संस्कृत अभ्यासक आणि लोकप्रिय शिक्षक होते. टिळक एक हुशार विद्यार्थी होते आणि गणितामध्ये खूप निपुण होते. लहानपणापासूनच टिळकंच्या मनात अन्याय करणाऱ्याबद्दल रागाची भावना होती. ते स्वभावानेही प्रामाणिक होते आणि त्यांचा सत्यावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास होता. भारताच्या त्या पहिल्या तरुणांच्या गटात त्यांचा समावेश आहे, ज्यांना आधुनिक महाविद्यालयीन शिक्षण प्राप्त झाले.

शिक्षण

टिळक दहा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे रत्नागिरीतून पुण्यात बदली झाली. त्यामुळे टिळकांच्या जीवनात बरेच मूलभूत बदल झाले. पुण्यात त्यांनी डॉ एंग्लो-व्हर्नाक्युलर स्कूलमध्ये प्रवेश घेतला, तेथील नामांकित शिक्षकांकडून शिक्षण घेण्याची संधी त्यांना मिळाली. पुण्यात आल्यानंतर टिळकांना आईच्या निधनाचा आघात सहन करावा लागला आणि जेव्हा ते १६ वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांचाही मृत्यू झाला. तेव्हा टिळक मॅट्रिकची परीक्षा देत होते आणि त्यांचे  सत्यभामा या १० वर्षीय मुलीशी लग्न झालेले होते. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला.

१८७७ मध्ये बाळ गंगाधर टिळक यांनी गणित विषयातील प्रथम श्रेणीसह कला शाखेत पदवी संपादन केली. त्यानंतरही त्यांनी शिक्षण सुरूच ठेवले आणि कायद्याच्या शिक्षणासाठी एलएलबीची परीक्षाही उत्तीर्ण केली. यानंतर टिळकांनी पुण्यातील एका खासगी शाळेत गणित शिकवण्यास सुरुवात केली.

शैक्षणिक कार्य

त्यानंतर त्यांनी पत्रकाराची भूमिका स्वीकारली. ते पाश्चात्य शिक्षण व्यवस्थेचे कडक टीकाकार झाले आणि ते म्हणत की या शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून भारतीय विद्यार्थ्यांना दुय्यम पहिले जाते आणि हे भारताच्या अस्मितेसाठी असन्मानपूर्ण आहे. ते निष्कर्षाप्रत आले की चांगले शिक्षण दिले जाईल तेव्हाच सुनागरिक तयार होतील.

त्यांचा असा विश्वास होता की प्रत्येक भारतीयाला भारतीय संस्कृती आणि राष्ट्रीय आदर्शांचे शिक्षण मिळणे आवश्यक आहे. युवांना उच्च संस्कारांचे शिक्षण मिळावे म्हणून टिळकांनी आपले वर्गमित्र आगरकर आणि थोर समाज सुधारक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यासमवेत ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ ची स्थापना केली.

स्वातंत्र्य चळवळीतील कार्य

‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ स्थापनेच्या पुढच्याच वर्षी त्यांनी ‘केसरी’ आणि ‘मराठा’ या वृत्तपत्रांचे प्रकाशन सुरू केले. ‘केसरी’ मराठी भाषेचे वृत्तपत्र होते तर ‘मराठा’ हे इंग्रजी भाषेचे साप्ताहिक वृत्तपत्र होते. लवकरच दोन्ही वर्तमानपत्रे अत्यंत लोकप्रिय झाली. टिळकांनी त्यांच्या वर्तमानपत्रात भारताची दुर्दशा विशिष्ट प्रकारे प्रदर्शित केली. वर्तमानपत्राद्वारे त्यांनी लोकांच्या समस्या आणि वास्तविक घटनांचे सजीव चित्रण केले.

प्रत्येक भारतीयाने आपल्या अधिकारांसाठी लढा देण्याचे आवाहन त्यांनी केले. १८९० मध्ये बाळ गंगाधर टिळक हे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्येही दाखल झाले. ते म्यूनिसिपल कौंसिल पुणेचे सदस्यही होते. टिळक एक महान समाज सुधारकही होते. त्यांनी बालविवाह रोखण्यासाठी आणि विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी लोकांना प्रेरित केले. त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवादरम्यान लोकांना एकत्र आणून संघटीत करण्याचे कार्य केले.

तुरुंगवास आणि तुरुंगवासातील कार्य

१८९७ मध्ये टिळकांवर जनतेला ब्रिटिशांविरोधात भडकवत असल्याचा आरोप लावण्यात आला. कोर्टाने त्याला दीड वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. १८९८ मध्ये त्यांची जेलमधून सुटका झाली. सुटकेनंतर टिळकांनी स्वदेशी चळवळ सुरू केली. वर्तमानपत्र आणि भाषणांद्वारे टिळकांनी महाराष्ट्रातील प्रत्येक गावात स्वदेशी चळवळीचा संदेश पोहचवला.

दरम्यान, कॉंग्रेस दोन छावण्यांमध्ये विभागली. हे दोन गट जहाल व मवाळ. मवाळांचे नेतृत्व बाल गंगाधर टिळक आणि जहाल लोकांचे नेतृत्व गोपाळकृष्ण गोखले करीत होते. १९०६ मध्ये टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. टिळकांना सहा वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावून मंडालेच्या कारागृहात नेण्यात आले. टिळकांनी तुरूंगात वाचन आणि लिखाण करण्यात वेळ घालवला. बंदिवासात आयुष्य जगताना त्यांनी ‘गीतारहस्य’ हे पुस्तकही लिहिले.

निधन

८ जून १९१४ रोजी टिळकांची सुटका झाली. त्यांची सुटका झाल्यानंतर टिळकांनी कॉंग्रेसच्या दोन्ही गटांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या प्रयत्नांना विशेष परिणाम दिसले नाही. लोकांच्या हक्कांसाठी लढत लढत  १ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळक यांचे वयाच्या ६४ व्या वर्षी निधन झाले.

अशा या थोर पुरुषाला आमचे भावपूर्ण अभिवादन!


लोकमान्य टिळक माहिती – Lokmanya Tilak Information In Marathi

Lokmanya Tilak Information In Marathi
Lokmanya Tilak Information In Marathi

बाळ गंगाधर टिळक अर्थात लोकमान्य टिळक यांचा जन्म रत्नागिरी येथे एका ब्राम्हण कुटुंबात 23 जुलै, 1856 साली झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावात त्यांचा जन्म झाला. टिळकांचे वडील त्यावेळी एका शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. तर संस्कृताचे अगाध ज्ञान त्यांना होते. केवळ 16 व्या वर्षी टिळक वडिलांच्या मायेला पोरके झाले. टिळकांच्या आईचे नावे पार्वतीबाई गंगाधर टिळक. तर वडिलांच्या बदलीनंतर टिळकांचे संपूर्ण कुटुंब हे पुण्यात स्थायिक झाले. त्यामुळे टिळकांनी तिथेच आपले शिक्षण पूर्ण केले. लोकमान्य टिळक यांची माहिती आपणा सर्वांना असलीच पाहिजे. लोकमान्य टिळक जयंती निमित्ताने दरवर्षी खास कार्यक्रमही आपल्याकडे आयोजित केले जातात. लोकमान्य टिळक यांच्या शिक्षणाबाबतची माहिती घेऊया. 

लोकमान्य टिळक यांचे शिक्षण (Education Of Lokmanya Tilak)

लोकमान्य टिळक हे लहानपणापासूनच अत्यंत हुशार होते. त्यामुळे त्यांचे शाळेतील किस्सेही प्रसिद्ध आहे. त्यांच्या बुद्धिचे आणि त्यांच्या धाडसाचे किस्से आजही लहान मुलांना ऐकविले जातात. गणित हा टिळकांचा अत्यंत आवडता विषय होता. आपल्या वडिलांकडूनच टिळकांनी धडे घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांचे शिक्षण पुण्यातील अँग्लो – वर्नाक्युलर स्कूलमध्ये झाले. शाळेतील ‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत, तर मी टरफले उचलणार नाही’ हा किस्सा खूपच गाजला आहे. त्यांनी फारच लहानपणी वडिलांचे छत्र गमावले. वडील गमावल्यानंतर 1877 मध्ये लोकमान्य टिळकांनी पुण्यातील डेक्कन महाविद्यालयातून पदवी मिळवली. त्या काळात पदवी मिळवणारी व्यक्ती म्हणजे अत्यंत नगण्य होती. अत्यंत हुशार असल्याने टिळकांनी त्याकाळी महाविद्यालयीन पदवी संपादन केली होती. पुण्यातील डेक्कन महाविद्यालयातून संस्कृत आणि गणितामध्ये बी. ए. ही पदवी लोकमान्य टिळकांनी मिळवली. त्यानंतर मुंबईतील सरकारी लॉ महाविद्यालयात त्यांनी एल. एल. बी. चा अभ्यास पूर्ण केला आणि 1878 मध्ये त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली. दोन वेळा प्रयत्न करूनही एम. ए. मात्र त्यांना पूर्ण करता आले नाही. 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची माहिती (Lokshahir Annabhau Sathe Information In Marathi)

  • शिक्षण संपल्यानंतर लोकमान्य टिळकांनी पुणे येथील एका खासगी शाळेमध्ये गणित आणि इंग्रजी या विषयाचे शिक्षक म्हणून नोकरी पत्करली. मात्र त्यांचे विचार इतर शिक्षक आणि अधिकाऱ्यांशी न जुळल्याने आणि त्यांच्यातील मतभेदांमुळे 1880 मध्ये नोकरी सोडून दिली. 
  • यानंतर पत्रकार म्हणून कार्यरत अशताना अेक सामाजिक चळवळींमध्ये लोकमान्य टिळक सहभागी होऊ लागले. आपल्या भाषणातील ज्वलंत विचारांमुळे टिळक अधिक प्रसिद्ध होऊ लागले. 
  • आपले महाविद्यालयीन मित्र आणि समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्यासह भारतीय विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाला प्रेरणा देण्यासाठी आणि देशातील तरूणांना उच्च गुणवत्तेचे शिक्षण देण्यासाठी आणि त्यात चांगल्या गुणवत्तेचा दर्जा आणण्यासाठी एकत्र येत ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना केली

महात्मा ज्योतिबा फुले विचार मराठीमध्ये

लोकमान्य टिळक राजकीय कारकीर्द – Political Career Of Lokmanya Tilak

Political Career of Lokmanya Tilak
Political Career of Lokmanya Tilak
  • 1890 मध्ये बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांनी स्वराज्य पक्षाविषयी पक्षाच्या उदारमतवादी विचारांचा तीव्र निषेध करण्यास सुरूवात केली
  • स्वराज्य मिळविण्यासाठी आणि इंग्रजांना देशातून घालवून लावण्यासाठी लोकमान्य टिळकांना जोरदार बंड करायचे होते आणि त्यासाठी त्यांनी स्वदेशी चळवळीला आणि बंगालच्या फाळणीच्या वेळी ब्रिटीश वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे समर्थन केले 
  • 1907 मध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनामधअेय गटात वाद निर्माण झाला आणि दोन स्वतंत्र गटात विभागणी झाली. त्यावेळी लोकमान्य टिळकांनी सरकारच्या धोरणाला कडाडून विरोध केला. ब्रिटिशांविरुद्ध चिथावणीखोर लेख टिळकांनी लिहीत चापेकर बंधूना प्रेरणा दिली
  • लोकमान्य टिळकांवर देशद्रोहाचा खटला चालविण्यात आला. त्यांना 6 वर्षे हद्दपार करण्यात आले तसंच असंतोषाचे जनक अशीही पदवी त्यांना यावेळी देण्यात आली. बर्माच्या मांडले तुरूंगात सहा वर्ष त्यांना पाठविण्यात आले पण तिथेही त्यांनी ‘गीता रहस्य’ हे पुस्तक लिहिले
  • टिळकांची प्रसिद्धी खूपच वाढल्याने ब्रिटीश सरकारलाही त्यांच्यासमोर झुकावे लागले 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार

लोकमान्य टिळक भाषण – Lokmanya Tilak Speech In Marathi

Lokmanya Tilak Speech In Marathi
Lokmanya Tilak Speech In Marathi

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे अत्यंत उत्कृष्ट वक्ते म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे त्यांची भाषणेही (Speech On Lokmanya Tilak In Marathi) खूपच प्रसिद्ध आहेत. लोकमान्य टिळकांची अनेक प्रेरणादायी भाषणे आहेत. इतकंच नाही तर लोकमान्य टिळकांचे कोट्स आजही आपल्याला प्रेरणा देतात. असेच लोकमान्य टिळकांचे प्रेरणादायी भाषण – 

मी स्वभावाने तरूण आहे. जरी माझे शरीर वृद्ध झाले असले तरी आत एक तरूण अजूनही जगतो आहे. जे काही मी आज बोलत आहे ते माझ्यातील तरूणास वाटत आले आहे. शरीर जरी क्षीण आणि कमजोर आणि नाशवंत असू शकते परंतु, शरीरात वास करणारा आत्मा नेहमी तरूण असतो याच प्रकारे आपले स्वराज्यामधील क्रियाकरणात नक्कीच गती मंद होईल तेव्हा आपल्या अंतरआत्म्याची स्वतंत्रता शाश्वत आणि अविनाशी न राहता तिचे दमन होईल आणि आपण स्वतःस गुलाम समजू.

स्वतंत्रता आपला जन्मसिद्ध अधिकार आहे जेव्हापर्यंत हे माझ्यात जिवंत आहे मी म्हातारा होणार नाही. स्वतंत्रता या भावनेस कोणी हत्याराने कापू शकत नाही, अग्नीने जाळू शकत नाही तर पाण्यात बूडवूही शकत नाही. कोणी हवेत उडवू शकत नाही. आपण आपले स्वराज्य मागतो आहे आणि आपण यास नक्कीच प्राप्त करू. राजकारणाचे विज्ञान हेच आहे की जे स्वराज्याने प्राप्त होते ते गुलामगिरीने प्राप्त होत नाही. राजकारणाचा उत्कर्ष हा देशाचा आधार आहे. मला तुमच्यातील आत्मा जागृत करायचा आहे. जो या देशाच्या राजकारणाच्या उत्कर्षातून निर्माण होईल.

मला या अंधविश्वासाला नष्ट करायचे आहे. जो गुलामगिरीमुळे तुमच्या आत्म्यावर बसला आहे हा अंधविश्वास तुम्हाला अज्ञानी धूर्त आणि स्वार्थी लोकांकडून पिडा आणि कष्ट देत आहे. राजकारणाच्या विज्ञानाचे दोन भाग आहेत एक ईश्वरीय आहे आणि दुसरा असुरीनिर्मित आहे. कोणत्याही राष्ट्राची गुलामगिरी असुरीनिर्मित असते. या दृष्ट भागाचा सद्कार्याशी कोणताच संबंध नसतो.

जे राष्ट्र यास योग्य ठरवतो तो ईश्वराच्या कोपाचा भाग ठरतो. जे असुरी निर्मीत राजकारणास साहसाने अमान्य करतात तर काही यासाठी साहसही करू शकत नाहीत त्यांना आपल्यासाठी हानिकारक गोष्टीची घोषणा ही करता येत नाही. राजनैतिक आणि धार्मिक शिक्षण याच सिद्धांताचे ज्ञान देण्यास सक्षम आहेत परंतु तरीही याबाबत योग्य शिक्षण सामान्यांना देत नाहीत.

स्वराज्याचा अर्थ कोण नाही जाणत कोणास ते हवे हवेसे वाटत नाही. जर मी तुमच्या घरी पाहुणा म्हणून येऊ आणि तुमच्या घरी कायमचा राहण्यास अडून बसू आणि तुम्ही विरोध केल्यास त्यास न जुमानता मी ठाम राहिलो तर काय परिस्थिती होईल? काहींच्या मते आपणा सर्वांना स्वराज्याचा अधिकार नाही एका शतकाच्या कालावधी नंतर ही आपल्यावर राज काध्ससो इंग्रज म्हणतात आजही तुम्ही स्वराज्याच्या लायकीचे नाहीत.

ठीक आहे, मग आपण त्याच लायकीसाठी स्वतःला प्रबळ बनवूया. आपल्या देशवासीयांनी स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणे त्यांना लाजिरवाणे वाटते. इंग्लंड सरकार भारतीय जवानांच्या मदतीने बेल्जियमसारख्या छोटया राज्यास वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. मग हा काय लाजीरवाणा प्रकार नाही? जे लोक आपल्या मागण्यांमागे निरर्थक बोलतात त्यात त्यांचा कोणता तरी स्वार्थ असावा असे लोक ईश्वरातही दोष शोधतात.

आपण सर्वांनी देशाच्या आत्म्यास पारतंत्र्यापासून वाचवायला हवे, आपणा सर्वांना कठीण परिश्रम करावे लागतील आपल्या देशाची रक्षा करणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे काॅंग्रेस पक्षाने स्वराज्य प्राप्तीचा प्रस्ताव पारित केला आहे.

व्यवहारिक राजकारणात स्वराज्याचा अधिकार मागण्याच्या ईच्छेचा प्रतिकार करणारे काही स्वार्थी भारताच्या काही समस्यांचा दाखला देणारे समस्यांना पुढे करून त्यांचा स्वार्थ साधत आहेत. निरक्षरता ही एक अशीच समस्या आहे परंतु आपण सर्वांनी मिळून ती दूर करता येते. ध्यानात ठेवा की या समस्या सर्वांना सोबत मिळूनच दूर करता येतात आपल्यासाठी याचे समाधान आहे की निरक्षरांच्या मनात ही स्वराज्यासाठी उत्कट इच्छा आहे जी आपण सर्वांची ताकद बनू दया. जे लोक आपले काम सहजतेने निपटून पूर्ण करतात ते निरक्षर असू शकतात परंतु मूर्ख नाही. ते तितकेच बुद्धीजिवी असू शकतात जितके शिक्षित लोक.

स्वराज्य मिळविणे हा इतका कठीण मामला नाही त्यामुळे स्वराज्यासाठी निरक्षरता कधीच समस्या बनू शकत नाही. अशिक्षित देशवासी या देशाच्या स्वराज्यासाठी नक्कीच हितकारी आहेच. त्यांना इतकाच अधिकार आहे जितका इतर जे स्वतःस सभ्य समजतात. परिस्थिती बदलण्यास वेळ लागत नाही आज सर्वत्र एकच आवाज गुंजतो आहे. आता नाहि तर कधीच नाही. त्यामुळे या ईश्वराने दिलेल्या संधीचा आपण नक्कीच फायदा घेणार आहोत आपण आपले सर्व प्रयत्न त्याच्या उच्चांकास नेऊ. आत्मविश्वास हा आपल्या सर्वांचा एक महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे आपण सर्व प्रयत्न करूया.

सावरकरांचे विचार सावरकरांच्या जयंतीनिमित्त

Lokmanya Tilak Social Work In Marathi
Lokmanya Tilak Social Work In Marathi
  • लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाला सुरूवात केली 
  • सुरत काँग्रेसनंतर लोकमान्य टिळकांनी दारूबंदीची चळवळ सुरू केली. यावर लेख लिहून त्यांनी व्याख्यानेही दिली. प्रत्यक्ष निरोधन करण्यापर्यंत चळवळीची मजल गेली होती. यासाठी टिळकांनी पैसा फंड ही संस्था वृद्धिंगत करून लाखो रुपयांचा निधी सामाजिक हितासाठी जमा केला
  • तसंच लोकमान्य टिळकांनी लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी आणि आपल्या हक्कांसाठी लढा देता यावा यासाठी 1881 मध्ये केसरी आणि मराठा या दोन वृत्तपत्रांची सुरूवात केली आणि त्यातून अन्यायाविरूद्ध वाचा फोडली. ही दोन्ही वृत्तपत्र त्याकाळी तुफान प्रसिद्ध झाली
  • 1885 मध्ये पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू केले 
  • 1916 मध्ये डॉ. अॅनी बेझंट यांच्या सहकार्याने ‘होमरूल लीग’ या संघटनेची स्थापना लोकमान्य टिळकांनी केली. आपल्या राज्याचे प्रशासन आपणच करावे अर्थात स्वशासन करावे यासाठी याची स्थापन करण्यात आली. 
  • हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळविण्यासाठी पुढाकारही लोकमान्य टिळकांनीच घेतला.

लोकमान्य टिळक यांची पुस्तके – Lokmanya Tilak Books In Marathi

Lokmanya Tilak Books In Marathi
Lokmanya Tilak Books In Marathi

भारतीय इतिहास, संस्कृती आणि हिंदू धर्म यावर अनेक पुस्तके लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी लिहिली. टिळकांचा संस्कृत आणि इंग्रजी वाङ्‌मयाचा सखोल अभ्यास होता. भारतीय तत्त्वज्ञान हा त्यांचा अत्यंत आवडीचा विषय होता. त्यांनी पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचाही अभ्यास केला होता. राजकीय क्षेत्रात टिळक काम करीत असताना कधी तुरुंगात व अन्य वेळी त्यांना थोडीशी उसंत मिळाली, त्या काळात त्यांनी काही ग्रंथ लिहिले. बहुतेक त्यांचे लेखन संशोधनपर असून प्रत्येक ग्रंथात त्यांनी काही स्वतंत्र मते प्रतिपादन केली असल्याचे दिसून येते. त्यांची प्रमुख पुस्तके म्हणजे 

ग्रंथ गीतारहस्य – आपल्या गीतारहस्यातून ज्या कर्मयोगाचा पुरस्कार टिळकांनी केला, तोच कर्मयोग प्रत्यक्ष जीवनात त्यांनी आचरणात आणून दाखविला. लोकसंग्रहाची दृष्टी राखून लोकमान्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीला समाजाच्या सर्व थरांतील लोकांचे अधिष्ठान मिळवून दिले. गीतारहस्य हे त्यांचे अक्षय विचारधन असून ते आधुनिक भारतातील एक श्रेष्ठ तत्त्वज्ञान ठरले आहे. 

ओरायन – ओरायन हा एक लोकमान्य टिळकांचा संशोधनात्मक प्रबंध आहे. 1892 च्या लंडन येथील ओरिएंटल परिषदेसाठी तो तयार करण्यात आला होता. त्यात वेदाचा कालनिर्णय हा विषय हाताळला. माक्स म्युलरने जो वेदांचा काळ ठरविला तो भाषिक संशोधनावर ठरविला असल्याने तो बरोबर नाही; संशोधनाची ही पद्धत एकांगी होय, असे टिळकांचे मत होते. म्हणून त्यांनी भाषाशास्त्र, दैवतशास्त्र, संहिता आणि ब्राह्मणे यामधील ज्योतिषशास्त्रविषयक सर्व संदर्भ एकत्रित केले आणि  ज्योतिषाच्या गणिताने वेदांचा काळ सु. इ. स. पू. 4500 वर्षे हा ठरविला. 

दी आर्क्टिक होम इन दी वेदाज – लोकमान्य टिळकांचा एक संशोधनपर प्रबंध असून 1898 मध्ये टिळक येरवड्याच्या तुरुंगात असताना याची कल्पना त्यांना सुचली. या पुस्तकात त्यांनी आर्यांचे मूलस्थान उत्तर ध्रुवाच्या प्रदेशातच असले पाहिजे, हे अनुमान वेदांतील ऋचांच्या आधारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

लोकमान्य टिळक जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने तुम्ही लोकमान्य टिळक माहिती (Lokmanya Tilak Information In Marathi), लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य, लोकमान्य टिळक यांचे भाषण ((Lokmanya Tilak Speech In Marathi) नक्की वाचा.

लोकमान्य टिळकांची पत्रकारिता

सकाळ वृत्तसेवा

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक – देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक सोनेरी व्यक्तिमत्त्व. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवीनच’हा दुर्दम्य आशावाद घेऊन देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची सुरुवात केली ती टिळकांनी! पुण्यात शिकत असतानाच त्यांच्या मनात ब्रिटिश सरकारविरुद्ध असंतोष धुमसत होता. तो त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवला आणि ते ‘भारतीय असंतोषाचे जनक’ झाले. समाजातल्या तळागाळातल्या घटकांची बाजू त्यांनी घेतली म्हणून ते ‘तेल्या तांबोळ्यांचे पुढारी ’ झाले. त्यांची स्वातंत्र्याची चळवळ ही नियोजन बद्ध होती. स्वराज्याचे ध्येय गाठण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा काढली, लोकांना संघटित करण्यासाठी गणेश –उत्सव आणि शिवाजी-उत्सव सुरू केले. लोकांचे प्रबोधन करण्यासाठी ‘केसरी’ मराठा’ सारखी वृत्तपत्रे काढली.

बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी आपल्या इतर काही सहकार्‍यांच्या मदतीने 1881 च्या जानेवारीत केसरी (मराठी)आणि मराठा (इंग्रजी) ही वृत्तपत्रे सुरू केली. जनतेला स्वातंत्र्य चळवळीसाठी उद्युक्त करणे, सामाजिक परिवर्तनासाठी जनजागृती व शासकीय अन्यायाचा प्रतिकार हा त्यामागचा मूळ उद्देश होता. केसरीच्या पाहिल्याच अंकात ‘ रस्तोरस्ती रात्री दिवे लावलेले असल्याने व पोलिसांची गस्त सारखी फिरत असल्याने जो उपयोग होतो तोच ज्या त्या जागी वर्तमानपत्रकर्त्यांची लेखणी सदोदित चालू असल्याने होत असतो ’ अशा शब्दात केसरीचे धोरण स्पष्ट करण्यात आले होते. 1982 च्या अखेरीस केसरी हे भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमानपत्र बनले.1884 मध्ये केसरीचा खप 4200, 1897 च्या जुलै मध्ये तो 6900 पर्यन्त वाढला.1902 मध्ये ब्रह्मदेश (म्यानमार), सिलोन (श्रीलंका),आफ्रिका,अफगाणिस्तान या देशातही केसरी जात असे. सुरूवातीला केसरीचे संपादक आगरकर तर मराठाचे संपादक टिळक होते. 3 सप्टेंबर 1891 रोजी केसरी आणि मराठा या दोन्ही वर्तमानपत्रांचे संपादक म्हणून टिळकांनी स्वत:च्या नावाचे डिक्लरेशन केले. दरम्यानच्या काळात त्यांनी दारूबंदी, वंगभंग, बहिष्कार, प्लेग, दुष्काळ निवारण तसेच विविध शासकीय प्रश्नांसाठी आंदोलने, चळवळी केल्या. त्यात एक लढा वृत्तपत्र स्वातंत्र्याचाही होता. केसरी, मराठा सुरू झाल्यानंतर काही काळातच कोल्हापूर संस्थानचे दिवाण माधवराव बर्वे यांच्याविषयी प्रसिद्ध झालेल्या लिखाणामुळे टिळक आणि आगरकरांना चार महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा झाली.

1896 चा दुष्काळ आणि त्या पाठोपाठ आलेली प्लेगची साथ, या दोन्ही प्रकरणात केसरीने महत्त्वाची भूमिका बजावली. केसरीत प्रसिद्ध झालेल्या ब्रिटीशांविरुद्धच्या लेखांबाबत टिळकांना तीन वेळा राजद्रोहाच्या खटल्याला सामोरे जावे लागले. 1897 व 1908 च्या या दोन्ही खटल्यांना टिळकांचे केसरीतले लिखाण कारणीभूत ठरले तर 1916 चा खटला त्यांच्या भाषणांमुळे दाखल करण्यात आला होता. प्लेगाच्या प्रतिबंधासाठी नेमलेल्या कमिशनर रॅन्ड याच्या हाताखालील गोर्‍या अधिकार्‍यानी पुण्यात धुमाकूळ घातला त्यामुळे 22 जून 1897 रोजी चाफेकर बंधूंनी रॅन्डचा खून केला. त्यासंदर्भात टिळकांनी ‘ सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ आणि ‘राज्य करणे म्हणजे सूड उगविणे नव्हे ’ असे अग्रलेख लिहिले. त्याचा परिणाम म्हणून त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेऊन खटला चालवण्यात आला. त्यात टिळकांना 18 महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा झाली. तुरुंगातून सुटल्यावर चार जुलै 1899 रोजी ‘ पुनश्च हरि:ओम !’ हा अग्रलेख लिहून टिळकांनी पुन्हा नव्या जोमाने स्वराज्यप्राप्तीच्या कामाला सुरुवात केली. ‘देशाचे दुर्दैव’ (12 मे 1908) आणि ‘हे उपाय टिकाऊ नाहीत ’(9 जून 1908) या अग्रलेखांमुळे टिळकांवर पुन्हा राजद्रोहाचा खटला चालविण्यात आला, त्यात टिळकांना सहा वर्षे काळे पाणी व 1000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

आपल्या वर्तमानपत्रात कोणता शब्द कशाप्रकारे छापून आला पाहिजे याबाबत त्यांनी खास पुस्तिका तयार केली होती त्या पुस्तिकेत जवळपास तीन-साडेतीन हजार शब्द होते. मराठी भाषेची लेखन पद्धती या विषयावर त्यांनी चार अग्रलेख लिहिले. प्रत्येक वर्तमानपत्राची भाषा त्या त्या संपादकाच्या भाषेवरुन ठरवली जाते. टिळकांची भाषा ही त्यांच्यासारखीच जहाल, लोकांच्या मनात घर करणारी होती. त्यांच्या अग्रलेखांची शीर्षके नजरेखालून घातली तरी याची प्रचिती येते. 1881 ते 1920 या काळात टिळकांनी सुमारे 513 अग्रलेख लिहिले.

पत्रकार,पंडित,राजकारणी आणि भविष्यदर्शि नेता अशा विविध भूमिकातून लोकमान्यांनी लेखन केले. राष्ट्रीय अभ्युदय आणि मानव जातीचे कल्याण या त्यांच्या राजकीय जीवनाच्या मुख्य प्रेरणा होत्या. दुष्काळ असो की प्लेग, त्या संकटांना तोंड देण्यासाठी त्यांनी आपल्या लेखांद्वारे जनतेत धैर्य निर्माण केले आणि गणेश- उत्सव, शिवाजी –उत्सव यांच्या द्वारा संघटना बांधली. त्यांनी सुरू केलेले असे उत्सव किंवा चालविलेल्या चळवळी एका विशिष्ट जातीसाठी नव्हत्या हे त्यांनी आपल्या लेखातून तर मांडलेच त्याहीपेक्षा अधिक ठाशीवपणे आपल्या कृतीतून दाखवून दिले.

शेतकर्‍यांची स्थिति, शेती सुधारणा, सारा पद्धती यावर त्यांनी ‘जमिनीची मालकी बुडाली’, ‘सावकार मेला कुणबिहि मेला!’, ‘फेरपहाणीचा जुलूम’ असे अनेक अग्रलेख लिहिले. ते म्हणत ‘ हिंदुस्थानातील शेतकरी हा राष्ट्राचा आत्मा आहे. त्याच्यावरील मालीन्याचा पडदा दूर करता आला तरच हिंदुस्तानचा उद्धार होईल. या करिता शेतकरी आपला व आपण शेतकर्‍यांचे, असे आपणास वाटवयास हवे.’

‘देश सधन असो व निर्धन असो, जित असो व अजित असो, लोकसंख्येच्या मानाने हलक्या दर्जाचे म्हणजे काबाडकष्ट करून निर्वाह करणार्‍या लोकांची संख्या जास्त असावयाचीच. या करिता या समाजाची स्थिति सुधारली नाही तोपर्यंत देशस्थिती सुधारली, असे कधीही म्हणता येणार नाही.’ देश म्हणजे काय,लोक म्हणजे कोण हे लोकमान्यांनी आपल्या मनाशी निश्चित केले होते. देश म्हणजे शेतकरी, देश म्हणजे काबाडकष्ट करणारी जनता.खरा हिंदुस्थान म्हणजे खेड्यापाड्यात आहे आणि तेथे राष्ट्र निर्माण करायचे म्हणजे या खेड्यापाड्यात जागृती करायची अशी त्यांची धारणा होती. अर्थात गिरणी- कारखान्यात काम करणारा कामगारवर्गही त्यांना तेव्हडाच महत्त्वाचा वाटत असे. 1902-3 पासून टिळकांनी त्या वर्गातही राष्ट्रीय जागृती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केले. म्हणूनच टिळकांना 1908 मध्ये झालेल्या शिक्षेच्या निषेधार्थ कामगारांनी संप पुकारला आणि सरकारी अत्याचारांना न जुमानता तो सहा दिवस चालू ठेवला.

जे हिन्दी राजकारण पूर्वी सरकारसन्मुख होते व बौद्धिक पातळीवरून चालत होते ते लोकमान्यांनी लोकांच्या बोलीत बोलून लोकाभिमुख केले आणि त्याला कृतीची जोड दिली म्हणून त्यांच्या वाणीला मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले. त्यामुळेच त्यांच्या पाठीशी सारे राष्ट्र उभे राहिले आणि लोकमान्य भारतातील ‘लोकयुगाचे निर्माते‘ ठरले.

- विद्याविलास पाठक

लोकमान्यांची लोकमान्यता – मराठी गोष्टी

Post author:आकाश खोत

महान व्यक्तींच्या नावासोबत एखादी उपाधी कशी रूढ होते हा एक गमतीशीर आणि प्रेरणादायक विषय असतो. टिळकांना लोकमान्य, गांधींना महात्मा, सावरकरांना स्वातंत्र्यवीर, अत्र्यांना आचार्य, अण्णाभाऊ साठेंना लोकशाहीर अशी अनेक उदाहरणे आहेत. एखादा वक्ता आपल्या भाषणात, किंवा एखाद्या पत्रकाराच्या लेखात किंवा लेखकाच्या पुस्तकात असा शब्द पहिल्यांदा वापरला जातो आणि जर तो शब्द सार्थ असेल तरच लोकप्रिय होऊन रूढ होतो. 

राहुल द्रविडने त्याच्या “द वॉल” (म्हणजे भिंत) या टोपणनावाविषयी छान टिपणी केली होती. तो म्हणाला मी कुठल्यातरी मॅचमध्ये छान टिकुन खेळलो म्हणुन कोणीतरी बातमीत लिहिलं भिंतीसारखा खंबीर उभा राहुन तो खेळला. आणि ते नाव मला चिटकलं. त्यालापण कल्पना नसेल कि हे नाव किती वेगवेगळ्या प्रकारे वापरलं जाईल. चांगला खेळलो कि द ग्रेट वॉल ऑफ इंडिया, भिंत खंबीर, भिंतीने हल्ले परतवले, अशा बातम्या, आणि वाईट खेळलो कि भिंत ढासळली, भिंतीला भगदाड पडलं अशा बातम्या. 

एखादा माणुस स्तुती करताना एखादा शब्द वापरतो, पण त्यात तथ्य असेल, सर्वांना ते मनापासुन पटलं असेल तरच तो रूढ होत राहतो. ज्याला अशा पदव्या मिळतात त्याला त्या पदवीला साजेल असं जगत राहावं लागतं नाहीतर लोकांचा भ्रमनिरास व्हायला वेळ लागत नाही. लहान वयात नारायण राजहंस यांना गाताना बघुन बालगंधर्व हा स्वतः टिळकांनी वापरलेला शब्दही असाच रूढ होऊन बसला. 

लोकमान्य म्हणजे लोकांना मान्य असलेला नेता. 

टिळकांनी अनेक वर्षे राजकारण केलं, अनेक विषयांमध्ये वेगवेगळ्या भूमिका घेतल्या, ब्रिटिशांशी लढले. चार माणसं एकत्र आली कि प्रत्येकाची आपापल्या पार्शवभूमीनुसार वेगवेगळी विचारसरणी असते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर एकमत होत नसतं. कुठल्याही माणसाचं १००% आपल्याला पटेल असं सांगता येत नाही. त्यामुळे टिळकांच्या काळात त्यांचे विरोधकही बरेच असले तरी त्यांची लोकमान्यता निर्विवाद होती. 

भारताच्या लोकांनी टिळकांचं नेतृत्व मनापासुन स्वीकारलं होतं. टिळक काँग्रेसचे अधिवेशन, होमरूल लीगच्या बैठका, वेगवेगळ्या संघटनांच्या सभा, जाहीर भाषणे, इतर नेत्यांच्या, ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी अशा कार्यक्रमांसाठी सतत प्रवास करत असत. 

ते प्रवासात जातील तिथे त्यांना पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी होत असे, त्यांच्या मिरवणूका निघत असत, ठिकठिकाणी सत्कार होत असत. रेल्वेने प्रवास करताना स्टेशन सुशोभित करून त्यांना निरोप दिला जात असे, प्रत्येक स्टेशनवर त्यांना भेटायला लोक येत असत. अर्थात अशा कार्यक्रमांमुळे ट्रेनचा प्रवास लांबत असे, तशा ट्रेन्सना टिळक स्पेशल म्हणायचे. 

टिळक स्वतः विद्वान होते, त्यांनी गीतारहस्यासारखा अभिनव ग्रंथ लिहिला होता, त्यामुळे त्यांना अनेक जण गुरुस्थानी मानत असत. बरेच जण त्यांचा उल्लेख आपल्या भाषणात टिळक महाराज असा करत असत. 

महात्मा गांधी आफ्रिकेतुन भारतात परत आले आणि आधी भारतभ्रमण करून देश समजुन घेतला. मग एक एक करत स्थानिक प्रश्नांना हाती घेत त्यांनी सत्याग्रहाची लढाई सुरु केली होती. तेव्हा ते भारतात प्रस्थापित होऊ घातलेले तरी नवोदित नेते होते, आणि टिळक लोकप्रियतेच्या शिखरावर होते. 

तेव्हाच्या एका अधिवेशनात टिळकांचं दर्शन घ्यायला लोकांची एवढी गर्दी व्हायची, अनेक जण आपल्या लहान बाळांना टिळकांचा आशीर्वाद मिळावा म्हणुन घेऊन यायचे. गर्दी ओसरावी म्हणुन पुन्हा पुन्हा टिळकांना बैठकीतून उठून बाहेर जावं लागायचं. टिळक नाहीत म्हणजे कामाचा खोळंबा. त्यामुळे गांधीजी थोडे नाराज झाले, त्यांनी टिळकांकडे आपली नाराजी व्यक्त केली. 

टिळक त्यांना म्हणाले “अहो इतकी वर्षे लोकांसाठी काम करत आलोय म्हणुन लोकांचं हे प्रेम मिळतंय. तुम्हीही असेच काम करत राहिलात तर तुम्हालाही हेच बघायला मिळेल.” टिळकांचे शब्द खरे ठरले. टिळकांच्या निधनानंतर गांधीजी भारतातले सर्वात मोठे नेते बनले. त्यांनाही केवळ भेटायला आणि दर्शन घ्यायला अनेक लोक यायचे आणि गांधीजींना त्यांच्या भावनेचा आदर करत त्यांना वेळ द्यावा लागायचा. 

लोकांमध्ये मिसळुन राहतो तोच नेता मोठा बनतो. लोकांशी फ़टकून राहुन लोक त्याचं नेतृत्व कसं मान्य करतील? 

तेव्हा मराठी रंगभुमी जोरात होती. अनेक नाटककारांनी टिळकांकडुन प्रेरणा घेतली होती. कधी थेट तर कधी कधी आडुन आडुन लोकांना संदेश जाईल अशा पद्धतीचे विषय घेऊन तेव्हा नाटके केली जात होती. काही नाटकांमध्ये चक्क टिळकांवर आधारित पात्रे असायची. टिळकांसारखीच वेशभूषा, बोलण्याची लकब वापरून कलाकार अभिनय करायचे. अशा एका नाटकात स्वतः टिळकांनी त्यांची हुबेहूब नक्कल करणाऱ्या कलाकाराचं कौतुक केलं होतं. 

ब्रिटिशांना टिळक हे आपले एक नंबरचे शत्रु वाटत असत. भारतात जो असंतोष पसरलाय त्यात टिळकांचा फार मोठा हात आहे हे त्यांना माहित होतं. ते टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणत. त्यामुळे त्यांनी टिळकांना दडपून टाकायचा बराच प्रयत्न केला. तीनदा राजद्रोहाचा आरोप करून खटला चालवला. त्यात टिळकांना दोनदा तुरुंगवास सहन करावा लागला. एकदा ते निर्दोष सुटले. 

व्हॅलेंटाईन चिरोल या इंग्रज लेखकाने भारतात येऊन इथली परिस्थिती समजुन घेऊन “इंडियन अनरेस्ट” म्हणजेच भारतीय असंतोष या नावाचं पुस्तक लिहिलं. 

भारतीय असंतोषाचे जनक हि भारतीयांच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट असली तरी त्यात टिळकांबद्दल काही अवमानकारक उद्गारसुद्धा होते. त्यामुळे टिळकांनी त्या लेखकावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला. गुलाम देशातल्या नागरिकाने राज्यकर्त्या देशातल्या नागरिकावर असा खटला करणे हि धाडसाची आणि दुर्मिळ गोष्ट होती. 

टिळक राजकारणाचा भाग म्हणुन इंग्लंडला जायला निघाले होते. तेव्हा त्यांनी तिकडे जाऊन खळबळ माचवु नये म्हणुन सरकारने त्यांना कोलंबोमध्ये पोहोचले असतानाच अडवले. पुढे जाण्याची परवानगी नाकारली. त्यांना दौरा अर्धवट सोडून परत यावे लागले. 

मग त्यांनी ह्या चिरोल खटला इंग्लंडमध्ये लढवायचा म्हणुन तिकडे जाण्याची परवानगी मागितली. त्यानिमित्ताने इंग्लंडमध्ये पोहोचल्यावर मग त्यांनी त्यांच्यावरचे निर्बंध उठवण्याची परवानगी मागितली. ब्रिटिशांनी अनेक देशात राज्य चालवले असले तरी त्यांना आपली राज्ययंत्रणा, न्यायव्यवस्था सर्वश्रेष्ठ आहे असा गोड समज होता आणि आपल्या देशातल्या नागरिकांसमोर प्रतिमा फार खराब होऊ नये याचंसुद्धा दडपण असायचं. 

टिळकांनी आपल्या ह्या खटल्याचा वापर इंग्लंडला जाऊन तिथे भारतीयांच्या मागण्या, त्यांचे प्रश्न इंग्लंडच्या जनतेसमोर, तिथल्या विविध पक्षाच्या नेत्यांसमोर मांडण्यासाठी केला. इंग्रजांनी भारत सोडावा यासाठी ते भारतात किती छान राज्य करत आहेत, भारताला इंग्रजांच्या राज्याची गरजच आहे असे तिथल्या लोकांचे गैरसमज दूर होणे फार महत्वाचे होते. 

टिळकांनी आपल्या सहकाऱ्यांना पण तिकडे नेऊन तिकडे सभा परिषदा घेतल्या, तिथेसुद्धा वृत्तपत्र चालवुन आपले विचार मांडले. भारतीयांच्या प्रश्नाचा पाठपुरावा केला. ह्या सर्वात प्रचंड खर्च झाला आणि शेवटी टिळक हरले. इंग्रजांनी आपल्याच एका लेखकाला भारतीयाच्या तक्रारीवरून दोषी ठरवणे जवळपास अशक्य होते. टिळकांना ते हरले यापेक्षा त्यांना त्यांचं कार्य पुढे नेता आलं, ब्रिटिश न्यायव्यवस्था ते म्हणतात तितकी निष्पक्ष नाही हे जगाला दाखवता आलं याचं समाधान होतं. 

हा इंग्लंडचा दौरा करून आणि तिथे खटला लढुन टिळकांना फार मोठं आर्थिक नुकसान झालं. त्यात त्यांचं जवळपास दिवाळं निघालं होतं. तरीही ते खचले नव्हते. गीतेचा त्यांनी लावलेला अर्थ आणि त्यांनी गीतारहस्यात मांडलेला विचार ते स्वतः आयुष्यभर स्स्थितप्रज्ञ राहुन आचरणात आणत होते. त्यांच्याच एका पत्रात त्यांनी लिहिलंय “माझ्यावर अगदी आकाश जरी कोसळले तरी निराश न होता मी त्या कोसळलेल्या आकाशाचासुद्धा माझ्या उद्दिष्टांसाठी कसा वापर होईल ते पाहीन. परिस्थितीला आपल्यावर सत्ता गाजवु देता कामा नये.”

सुबोध भावेच्या “लोकमान्य” या चित्रपटात टिळकांच्या तोंडी “कितीही संकटं आली, अगदी आभाळ जरी कोसळलं तरी त्याच्यावर पाय देऊन मी पुन्हा उभा राहीन” हे वाक्य आलं आहे. सुबोध भावेने ते प्रचंड त्वेषाने फार प्रभावी पद्धतीने म्हटलंय. त्या चित्रपटातलं हे माझं सर्वात आवडतं वाक्य आहे. ते ह्या पत्रात स्वतः टिळकांनी लिहिल्यासारखंच आहे. 

टिळकांना फार मोठा आर्थिक फटका बसलाय ह्याची लोकांना कुणकुण लागलीच. त्यांचे चाहते अस्वस्थ झाले. लोकमान्यांना लोकांनी वाऱ्यावर सोडणे शक्य नव्हते. असेच एक अनुयायी पराडकर टिळकांचे सहकारी आणि केसरीचे संपादक न. चि. केळकर यांना जाऊन भेटले.  

ते म्हणाले “आपण अनुयायांनी यासाठी काहीतरी करायला हवे. “

केळकर म्हणाले “अहो पण, त्यांना बसलेला आघात काही सामान्य नाही.”

पराडकर : “लोकमान्यांची लोकमान्यतादेखील सामान्य नाही. आपण सर्वानी मनावर घेतलं तर आपण ह्या आघाताचे निवारण करू शकतो.” 

केळकर: “बोलणं ठीक आहे, पण तुम्ही प्रत्यक्ष करू काय शकता?”

पराडकर: “आज मला हे समजले आणि मी पुढे आलो. आज माझ्या व्यवसायातुन जी काही पुंजी जमा होईल ती मी टिळकांसाठी देईन. असंच सर्वांनी जमेल ते करावं.”

केळकर: “म्हणजे किती रक्कम म्हणताय तुम्ही?”

पराडकर: “अंदाजे दीड हजार.” 

दीड हजार हि आजही छोटी रक्कम नाही आणि त्याकाळी तर अजिबात नव्हती. केळकर चकित झाले.  

केळकर: “एवढी रक्कम तुम्ही देणार? मग पुढे काय करणार?”

पराडकर: “पुढचं पुढे बघु. आज मी हा संकल्प सोडला.” 

यातुनच अनेकजण पुढे आले आणि टिळकांसाठी मोठा निधी गोळा झाला. टिळकांना मानणाऱ्या इतर नेत्यांनी सुद्धा सभा घेऊन लोकांना आवाहन केले. गांधीजीसुद्धा त्यात सहभागी होते. टिळक एक व्यक्तिगत खटला लढण्याच्या नावाखाली जाऊन या संकटात सापडले असले तरी त्यांनी अंगावर घेतलेले कार्य हे त्यांच्या एकट्याच्या इभ्रतीसाठी नव्हते याची लोकांना जाणीव होती. त्यामुळेच लोकांनी उत्स्फूर्तपणे हा निधी उभा केला आणि आपल्या लाडक्या नेत्याला संकटातुन बाहेर काढलं. 

काही जणांनी यावर टीका केली आणि लोकमान्यांना पत्र लिहुन तक्रार केली तेव्हा ईंग्लंडमधून स्वतः टिळकांनी भारतात पत्र पाठवुन निधी गोळा करणे थांबवण्याची विनंती केली. 

लोकमान्यांची लोकमान्यता दाखवणारे भरपूर प्रसंग आणि किस्से आहेत, त्यातले मोजकेच मी इथे दिलेत. आभाळ कोसळलं तरी त्यावर पाय देऊन उभं राहण्याचा आत्मविश्वास असलेल्या लोकमान्यांनी हाच आत्मविश्वास, स्वाभिमान, देशाभिमान त्यांच्या काळातल्या लोकांमध्ये जागवला आणि ब्रिटिशांना आव्हान दिलं. त्यांच्या आयुष्याबद्दल माहिती मिळाली कि आजही लोकांना प्रेरणा मिळते


मंडालेचे ‘काळे पाणी’
व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन याने 20 जुलै 1905 मध्ये बंगालची फाळणी जाहीर केली. त्या वेळी बंगालमध्ये प्रक्षोभ उसळला. सरकारविरुद्ध उग्र आंदोलन सुरू झाले. टिळकांनी या चळवळीला पाठिंबा देत ‘स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य’ या चतु:सूत्रीचा पुरस्कार केला. ब्रिटिश सरकारला विरोध करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी 12 मे 1908 रोजी ‘देशाचे दुर्दैव’ आणि 9 जून 1908 रोजी ‘हे उपाय टिकाऊ नाहीत’ असे दोन अग्रलेख लिहिले. त्यामुळे ब्रिटिशांनी टिळकांविरुद्ध राजद्रोहाचा खटला भरला. त्यांना दोषी ठरवून 6 वर्षे ‘काळ्या पाण्या’ची शिक्षा ठोठावली. टिळकांना ब्रह्मदेशातील ‘मंडाले’च्या तुरुंगात ठेवण्यात आले. तुरुंगवास काळात त्यांनी ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहिला. 15 जून 1914 रोजी त्यांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका करण्यात आली. टिळकांच्या मंडालेच्या तुरुंगातील सुटकेचे हे शताब्दी वर्ष आहे.

दुसर्‍या बाजूने ‘टिळक हे बहुजनांचे शत्रू होते’, ‘ते कुठले आले तेल्यातांबोळ्यांचे पुढारी’, असे म्हणणारेही लोक दिसून आले. माँटेंग्यु-चेम्सफर्डच्या सुधारणा आल्या. एतद्देशीयांनी कौन्सिलात निवडून जावे, काही ठरावीक लोकांना मतदानाचा हक्क मिळावा हे मान्य झाले. मग त्या वेळच्या लोकांच्या मागण्यांप्रमाणे शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांसाठी रिझर्व्हेशन पाहिजे, असा मुद्दा आला तसे जातीनिहाय रिझर्व्हेशन झाले. सुरुवातीला टिळकांचा याला विरोध होता. टिळकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते अत्यंत लवचिक होते. एखादी गोष्ट त्यांनी केली आणि त्यांच्या लक्षात आले की लोकांना हे चालणार नाही तर ते शिकायचे. फीडबॅकमधून स्वत:ला बदलायचे. त्याप्रमाणे त्यांनी राखीव जागांना पाठिंबाही दिला. टिळकांचे नेतृत्वा आणि त्यांचे राजकीय व्यक्तिमत्त्व हे ‘प्रगमनशील’ आहे.

०ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादातून टिळकांची प्रतिमा प्रतिगामी, चातुर्वर्ण्याचे पुरस्कर्ते म्हणून मांडली जाते. विशेषत: कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आणि टिळक यांच्यातील संघर्षानंतर...
डॉ. मोरे : ‘वेदोक्त प्रकरण’ ही टिळकांच्या आयुष्यातील एकमेव चूक. उभ्या आयुष्यात टिळक फक्त एकाच ठिकाणी घसरलेले आढळून येतात. वेदोक्त प्रकरणात टिळकांनी वैयक्तिक आणि सामाजिक भूमिकांची गल्लत केली. त्यांच्याविरोधात ‘ताई महाराज खटला’ चालू होता. या खटल्यात शाहू महाराजांनी टिळकांच्या विरुध्द बाजू घेतली होती. म्हणून टिळकांनी ‘वेदोक्त’वेळी शाहूंना विरोध केला. पण वैयक्तिक शाहू महाराजांच्या वेदोक्त अधिकाराला टिळकांनी विरोध केला नव्हता. छत्रपतींचे वंशज या नात्याने शाहूंचा तो अधिकार टिळकांना मान्यच होता. मतभेद दोन ठिकाणी झाले. शाहू म्हणायला लागले की सगळ्याच मराठ्यांना वेदोक्तचा अधिकार आहे. टिळकांनी हे म्हणणे अमान्य केले. या ठिकाणी समाजव्यवस्था म्हणून विचार केला तर टिळक स्थितिवादी होते; रॅडिकल नव्हते, हे कबूलच करायला हवे. वेदोक्त प्रकरणात विरोध केलेल्या राजवाड्यातल्या पुरोहितांची वतनेही शाहूंनी जप्त केली. या कृतीवरही ‘असा जुलूम करायचा नाही,’ असे टिळकांचे म्हणणे पडले. ते बरोबर नव्हते.

० ‘वेदोक्त’मुळे शाहू व टिळक यांच्यात कायमचा दुरावा आला? वैयक्तिक वादातून समाजाचे दूरगामी नुकसान होते आहे हे त्या दोन थोरांनी लक्षात घेतले नाही?
डॉ. मोरे : या दोन महापुरुषांमधील दुराव्यामुळे महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान झाले. ब्राह्मण व ब्राह्मणेतर आणि खास करून ब्राह्मण व मराठा ही तेढ निर्माण झाली. माणूस जेव्हा कुठलीही कृती करतो त्या वेळी त्या कृतीचे सगळेच्या सगळे परिणाम लक्षात येतातच असे नाही. कितीही माणूस थोर असला तरीही. ‘येथ मोहवले गा कांतदर्शी,’ असे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेच आहे. आपल्या कर्माचा परिणाम काय होईल, हे कुठल्याही माणसाला शंभर टक्के कळत नाही. छत्रपती शाहू व टिळक यांच्याबाबतीतही असेच काहीसे घडले असावे.

० टिळकांना हिंदुत्ववादी ठरवून त्यांच्यावर ‘मुसलमानविरोधी’ असा शिक्का मारला जातो...
डॉ. मोरे : एकोणीसशे साल उजाडण्यापूर्वी मुंबईत हिंदू-मुस्लिमांचे दंगे झाले होते. त्या वेळी टिळकांनी अग्रलेखांमधून स्वच्छपणे हिंदूंची बाजू घेतली होती. टिळक मुसलमानविरोधी, असा लोक प्रचार करतात, तो अत्यंत चुकीचा आहे. टिळकांचे म्हणणे व्यवहार्य होते. टिळकांचे म्हणणे की, मुसलमानांनी ब्रिटिश सरकारच्या कच्छपी लागू नये. ब्रिटिशांच्या पाठिंब्यावर मुसलमान जर दंडेली करत असतील तर तशी हिंदूही करू शकतात. म्हणून आपले प्रश्न आपण मिळून सोडवू. मग त्यांनी ब्रिटिशांना सुनावले, ‘मुसलमानांची चूक असेल तर त्यांना चाप लावा, हिंदूची असेल तर हिंदूनांही लावा.’

० ‘मंडालेनंतरचे आणि आधीचे टिळक’ हा फरक नेमका काय आहे?
डॉ. मोरे : ही संकल्पना प्रबोधनकार ठाकरे यांनी प्रथमत: मांडली. असा फरक करावा लागतो. तेवढाच का, इंग्लंडला जाण्यापूर्वीचे आणि इंग्लंडहून आल्यानंतरचे असाही फरक करावा लागतो. इंग्लंडला जाऊन आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की स्वातंत्र्यलढा फक्त देशापुरता ठेवून चालणार नाही. तो आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायला हवा. त्यासाठी त्यांनी कम्युनिस्टांशी जुळवून घेतले. मंडालेतून टिळक परतल्यानंतर झालेल्या पहिल्या महायुद्धाने राजकारणाची परिमाणेच बदलली. मंडालेच्या तुरुंगात असताना टिळकांनी पूर्ण काळ तत्त्वचिंतन केले. गीतारहस्यातल्या चातुर्वर्ण्याबाबत त्यांनी घेतलेली भूमिका याचे प्रतिबिंबच आहे. सगळ्याच समाजात कुठल्यातरी प्रकारची ‘डिव्हिजन आॅफ लेबर’ असते. व्यवस्था असतेच. मात्र ती सर्वकाळ चातुर्वर्ण्य व्यवस्थाच असली पाहिजे असे नाही, हे त्यांनी मान्य केले.

० टिळकांचा ‘कर्मयोग’ काय होता?
डॉ. मोरे : देशाबद्दलची निस्सीम प्रीती आणि क्लेश सहन करण्याची तयारी. वैयक्तिक क्लेश सहन करून, त्यागातून टिळकांनी देशाचा आदर कमावला; मागितला नाही. ‘निष्काम कर्मयोग’ हा गीततेला शब्द राजकीय जीवनात कोणी आचरणात आणला असेल तर तो टिळकांनीच. कर्मयोगी टिळकांनी देशाचे नेतृत्व केले. पण 1920 नंतर महाराष्ट्राचा एकही नेता राष्ट्राचे नेतृत्व करू शकला नाही, हे टिळकांचे अपयश नाही. टिळकांच्या काळातील ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादामुळे महाराष्ट्राची पीछेहाट झाली हे जसे एक कारण देशपातळीवर मराठी नेतृत्व न पोहोचण्याचे, तसेच व्यापक भूमिका घेण्यात ब्राह्मणांना आलेले अपयश हे दुसरे एक कारण. बहुजनांच्या आकांक्षांची वाढती क्षितिजे ब्राह्मणांना समजली नाहीत. ती टिळकांना कळली होती. गांधीजींना कळत होती. म्हणूनच गांधींजी म्हणाले, ‘भंग्याची मुलगी राष्ट्रपती होईल तेव्हा भारत खºया अर्थाने स्वतंत्र झाल्याचे मी समजेन.’

० शंभर वर्षांपूर्वीच्या ‘लोकमान्यां’कडून आजच्या पिढीने काय घ्यावे आणि काय घेऊ नये...
डॉ. मोरे : प्रश्न अवघड आहे. टिळकांकडून काय घेऊ नये, असे नकारात्मक मी काही सांगणार नाही. कारण काही गोष्टी करण्यास व्यवस्था तुम्हाला भाग पाडते. जागतिक पातळीवरच्या नव्या अर्थव्यवस्थेचे भागीदार झाल्याने संयम नावाची गोष्ट पाळणे फार अवघड झाले आहे. पारतंत्र्य नसल्याने राष्ट्रभक्ती करायची म्हणजे काय, हे समजत नाही. निस्सीम राष्ट्रप्रेम, ध्येयाप्रती पूर्ण समर्पित भाव हा टिळक चरित्राचा गाभा होय. मोहांना बळी न पडणारा व सुखोपभोगांना दूर ठेवणारा टिळकांचा पराकोटीचा संयम घ्यायला हवा. टिळकांनंतर भारतीय पातळीवरच्या नेतृत्वासंदर्भात महाराष्ट्र मागे पडला. तो मुद्दा परत आणायचा असेल तर आदर्श टिळकच असू शकतात. स्वातंत्र्यलढ्याला आंतरराष्ट्रीय परिमाण प्राप्त करून दिले टिळकांनी. तेच सूत्र पुढे गांधी-नेहरूंनी कळसावर नेले. टिळकांइतका भारत फिरलेला माणूस तेव्हा कोणीच नव्हता. शेजारी देशांमध्येही ते जाऊन आले. ब्राह्मणांनी बहुजनांसाठी त्याग केला पाहिजे, हे त्यांचे ब्राह्मणांना सांगणे होते. हिंदुस्थानच्या राजकारणात महाराष्ट्राने अग्रेसर राहावे, हे त्यांचे महाराष्ट्राला सांगणे होते. देशवासीयांकडून त्यांनी आदर कमावला होता; मागितला नाही.


टिळकांचा 'अर्थ'विचार


सोहम ठाकूरदेसाई

'केसरी'तील आपल्या सहज-सोप्या मराठी लेखांतून लोकमान्यांनी अनेक विद्याक्षेत्रांची दारं सामान्य मराठी वाचकांसाठी किलकिली केली. अर्थशास्त्र हाही त्यातील महत्त्वाचा विषय. शेतसारा, कररचना, उद्योगधंदे, शेती, दुष्काळ, गरिबी, कामगार, चलन अशा बहुविध आर्थिक विषयांवर लोकमान्यांनी मुबलक लिखाण केलं.

शशी थरूर यांचं ब्रिटिशांच्या 'benevolent despotism'चं किंवा 'परोपकारी हुकूमशाही' नावाच्या फसवणुकीचा बुरखा फाडणारं इंग्रजीमधील, मुद्देसूद मांडणी असलेलं एक भाषण मध्यंतरी समाज माध्यमातून फिरत होतं. ब्रिटिशांनी भारतात 'भारताला सुसंस्कृत आणि समृद्ध' करणाऱ्या 'परोपकारी हुकूमशाही'च्या नावाखाली स्वतःच्या तुंबड्या भरल्या. औद्योगिकीकरणातून इंग्लंडचा विकास साधून भारतात भयाण गरिबी जन्माला घातली. राजकीय शोषणामुळेच हे आर्थिक शोषणही साधलं गेलं. या मुद्यांचा थोडक्यात छान ऊहापोह त्यात आहे. त्यानिमित्ताने चर्चेत आलेला हा विषय, पहिल्यांदा मांडला होता दादाभाई नौरोजींसारख्या आर्थिक आणि राजकीय विचारवंताने! ब्रिटिशांच्या अर्थधोरणाचा आणि त्यायोगे ते करत असलेल्या भारताच्या अर्थशोषणाचा सिद्धांत मांडण्याचं ऐतिहासिक कार्य दादाभाईंनी केलं. तो सिद्धांत आत्मसात करून स्वार्थत्याग, दीर्घोद्योग, मुत्सद्दीपणा आणि संघटना कौशल्य, या गुणांच्या जोरावर राष्ट्रव्यापी जनजागृती करून, आधुनिक भारताच्या पायाभरणीसाठी - स्वराज्यासाठी - 'भारतीय असंतोष' जन्माला घालण्याचं महान ऐतिहासिक कार्य लोकमान्य टिळकांचं आहे!

टिळक हे एखादा आर्थिक सिद्धांत मांडणारे अर्थशास्त्री नव्हते. परंतु 'टिळक - दी इकॉनॉमिस्ट' या पुस्तकात श्री. टी. व्ही. पर्वते म्हणतात- 'अनेक राष्ट्रवादी नेत्यांनी अर्थशास्त्र हा विषय तज्ज्ञांवर सोडला होता, टिळकांनी मात्र तसे केले नाही. राजकीय अर्थकारणाच्या खाचाखोचा पूर्णपणे जाणून त्या लोकांपर्यंत पोहोचवून त्यांनी जनमत तयार केले.'

आचार्य जावडेकर यांनी म्हटल्याप्रमाणे- 'हिंदी स्वराज्य हा केवळ वरिष्ठ वर्गाच्या स्वाभिमानाचा किंवा संस्कृतिरक्षणाचा अथवा वैभवाचा प्रश्न नसून, तो सामान्य जनतेतील कोट्यवधी जिवांच्या पोटाचा, प्राणधारणेचा आणि क्लेशरहित व रोगरहित जीवनाचा प्रश्न आहे...'- याची लोकांमध्ये राजकीय जाणीव रुजवली लोकमान्यांनी. ब्रिटिशांनी आणलेली कायदा आणि सुव्यवस्था, जीवित आणि मालमत्तेचं संरक्षण, परचक्रापासून रक्षण या तथाकथित फायद्यांना काहीही अर्थ नव्हता. कारण भारताचा औद्योगिक विकास व्हावा यासाठी ब्रिटिश सरकार कुठलीही धोरणं आखत नव्हतं. तसंच भारतीय भांडवलाचा आणि असलेल्या उद्योगधंद्यांचा क्षय होऊन भारत कायमस्वरूपी पिढ्यान् पिढ्या भयानक गरिबीत ढकलला जाईल, अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. लोकमान्यांनी अत्यंत मार्मिकपणे याचं वर्णन केलं आहे. त्यांच्या अग्रलेखातील एक उतारा उदाहरणादाखल खाली देत आहे-

'...काही काळापर्यंत ईश्वराने दयाळू होऊन आमच्यावर राज्य करण्याकरिता हे कोणी तरी दैवशाली पुरुष पाठविले आहेत, असा सर्वांचा समज झाला... इंग्रजांच्या राज्यात आंधळ्याने काठीस सोने बांधून काशीपासून रामेश्वरापर्यंत जावे असे लोक म्हणू लागले; परंतु दारूचा अंमल ज्याप्रमाणे फार वेळ टिकत नाही, त्याचप्रमाणे राज्यक्रांतीपासून उत्पन्न झालेला हा भ्रमही उत्तरोत्तर दूर होत चालला. आंधळ्याने काठीस सोने बांधून जावे खरें; पण सोनेच उत्तरोत्तर दुर्मिळ होत चालले ही गोष्ट दिवसानुदिवस लोकांच्या जास्त लक्षात येऊ लागली.

...सारांश, इंग्रजी अमलाने आमची दृष्टी जी अगदी दिपून गेली होती, ती आता सुधारत जाऊन आमच्यावर जुलूम कसा होतो व आमचे नुकसान कशाने होते हे शोधण्यास आम्ही लागलो आहों.' - आमच्यावर जुलूम कसा होतो?

(अग्रलेख, २४ जानेवारी १८९३)

अर्थतज्ज्ञांची Drain Theory, लोकमान्य अशाप्रकारे सोप्या भाषेत लोकांपर्यंत नेत होते आणि ब्रिटिश भारताच्या आर्थिक प्रश्नांवर लक्ष वेधून स्वराज्यासाठीच्या राजकीय लढ्याला धार चढवत होते. 'केसरी'तील आपल्या सहज-सोप्या मराठी लेखांतून लोकमान्यांनी अनेक विद्याक्षेत्रांची दारं सामान्य मराठी वाचकांसाठी किलकिली केली. अर्थशास्त्र हाही त्यातील महत्त्वाचा विषय. शेतसारा, कररचना, उद्योगधंदे, शेती, दुष्काळ, गरिबी, कामगार, चलन अशा बहुविध आर्थिक विषयांवर लोकमान्यांनी मुबलक लिखाण केलं.

हिंदू-मुस्लिम दंगे आणि त्यातील ब्रिटिशांचं पक्षपाती धोरण, वंगभंग, क्रॉफर्ड प्रकरण, दारूबंदी इत्यादी राजकीय-प्रशासकीय, तसेच सामाजिक प्रश्नांच्या माध्यमातून लोकमान्य, ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध जनमत तयार करत होते. तसंच ते आर्थिक प्रश्नांच्या माध्यमातूनही राजकीय असंतोष निर्माण करत होते. परतंत्र देशातील लोकांचे नेते, या नात्याने होत असलेल्या आर्थिक अन्यायाला वाचा फोडणे, त्यावर तत्कालीन उपाय शोधून लोकांचा त्रास कमी व्हावा यादृष्टीने प्रयत्न करणे, भारतीयांचे आर्थिक हितसंबंध जपणे, या कार्यातून त्यांनी भारताच्या आर्थिक राष्ट्रवादाची सुरुवात केली. त्याचा राजकीय दृष्ट्या वापर करून घेतला. परदेशी मालावर बहिष्कार, स्वदेशीचा पुरस्कार वगैरे माध्यमातून लोकांची मोठ्या दीर्घकालीन लढ्याची तयारी पक्की करून घेतली. त्यांनी त्या पायावर स्वराज्याची लढाई उभी केली!

'पाऊस न पडल्याने दुष्काळ पडतो, यासंबंधाने कोणाचाच वाद नाही. वादाचा प्रश्न असा आहे की, दुष्काळाशी टक्कर देण्याचे सामर्थ्य रयतेत कां असू नये? दुष्काळाच्या वेळी निर्वाह चालविता येण्याइतकी शिल्लक प्रजेपाशी कां नसावी?... दुष्काळामुळे येथे धान्य उत्पन्न झाले नाही तर मद्रास, बंगाल, ब्रह्मदेश या प्रांतांतून तेथील लोकांना पुरून आम्हांस पुरेसे धान्य यंदा उपलब्ध झालेले आहे; पण ते धान्य विकत घेण्यास आमच्या रयतेपाशी पैसेच नाहीत... वर्षाच्या अखेरीस सरकार-सारा देऊन टाकल्यावर रयतेपाशी काहीच शिल्लक न राहून नवीन सालच्या प्रारंभी धुतलेल्या तांदळाप्रमाणे आम्हांस उघडे-नागडे का व्हावे लागते?... हिंदुस्तानच्या दारिद्र्याचे कारण सांप्रतची राज्यव्यवस्था होय.'

(- दुष्काळाची कारणे, अग्रलेख, ८ मे १९००)

दुष्काळ ही नैसर्गिक घटना नसून राजकीय कारणांमुळे तो घडतो, हा मुख्य सिद्धांत लोकमान्य इथे मांडत आहेत. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनीही राजकीय लोकशाहीचा अभाव आणि लोकांची क्रयशक्ती कमी असणे ही दुष्काळामागची मुख्य मानवनिर्मित कारणे आहेत, हे म्हटले आहे. टिळकांचा हा विचार अशाप्रकारे आजही जगात अनेक देशांबाबत लागू होतो आणि त्यांची अर्थविषयक इतर मांडणी ही भारताच्या आजच्या आर्थिक प्रश्नांसंदर्भातही उपयुक्त ठरते, हे त्यांच्या विचारांचे महत्त्व आहे.

भारतातील ब्रिटिश राज्यव्यवस्था गरिबांवर कराचा बोजा टाकते. साम्राज्यातील इतर खर्चही त्यातून निभावते. इकडचे जुने उद्योग मेले आणि नवे वाढणार नाहीत, याची व्यवस्था केली जाते. दरवर्षी अशी दिवसाढवळ्या होणारी लूट, पुन्हा भारतात कर्जाऊ रक्कम म्हणून आणली जाते किंवा गुंतवली जाते आणि व्याजाच्या रूपाने किंवा नफ्याच्या रूपाने पुन्हा एकदा पैशाचा ओघ देशाबाहेरच जातो… अशा दुष्टचक्रात देश, स्वराज्य नसल्याने अडकून पडला आहे, असे टिळक म्हणतात. आज पूर्ण राजकीय स्वातंत्र्याच्या काळातही काहीशा याच पद्धतीने इथून लुटलेला काळा पैसा पुन्हा एकदा एफ.पी.आय किंवा एफ.आय.आय.च्या स्वरूपात नफेखोरीसाठी परत येण्याची शक्यता राहते. त्यातून देशाच्या अर्थव्यवस्थेला काहीच लाभ होत नाही, हे आपल्याला माहिती आहे. योग्य पद्धतीने येणाऱ्या परकीय भांडवलाला मात्र टिळकांचा विरोध नव्हता, किंबहुना परकीय भांडवल वापरलं जावं, याविषयी ते आग्रही होते.

महाराष्ट्राची जमीन ही साखर उद्योगाला योग्य आहे, हे टिळकांनी पहिल्यांदा मांडलं. 'कोणत्याही देशाची सांपत्तिक स्थिती निव्वळ शेतीवरच अवलंबून असल्यास ती सदासर्वकाळ चांगली राहणे संभवनीय नसते' असं म्हणून शेती किफायतशीर करणं आणि शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांचं प्रमाण कमी होऊन त्यांच्या रोजगारासाठी उद्योगधंदे हाच पर्याय ठरतो, हा त्यांनी मांडलेला विचार आजही कालसुसंगत आहे. 'बोले तैसा चाले' या उक्तीप्रमाणे त्यांनी जे लिहिलं ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी परिश्रम घेतले. 'पैसा फंड'सारख्या उपक्रमांना प्रेरणा देऊन उद्योगांसाठी भांडवल उभं केलं. औद्योगिक परिषदा भरवल्या. काडेपेट्यांचा कारखाना, ग्लास कारखाना यांसारख्या लघु आणि मध्यम उद्योगांना त्यांनी प्रोत्साहन दिलं, याची अनेक उदाहरणं आहेत. एम.एस.एम.इ.च्या संदर्भात त्यांचे विचार हे आजही राष्ट्रनिर्माणासाठी उपयुक्त आहेत. विखुरलेले लघु आणि मध्यम उद्योगधंदे उभारल्यानेच फ्रँको-जर्मनी युद्धानंतर जर्मनी पुन्हा एकदा आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ शकला, हे ते नमूद करतात.

टिळकांची साम्राज्यमीमांसा आणि मूलभूत तत्त्वविचार

ब्रिटिश साम्राज्यशाही ही मूलतः व्यापारी आणि आर्थिक आहे आणि मध्ययुगीन पंथीय आणि धार्मिक प्रेरणा त्यात नाहीत अथवा कमी आहेत असं टिळक म्हणतात. तसंच अशी अनिर्बंध आर्थिक सुबत्तेकडे घेऊन जाणारी सत्ता ही उभयपक्षी कशी घातक असते, हे ही ते सांगतात. कारण साम्राज्य हे अंतिमतः जेत्या राष्ट्रातीलही व्यापक हिताकडे दुर्लक्ष करून मोजक्यांचं आर्थिक हितसंबंध जोपासण्याचं एक साधन होतं, हे त्यांनी फार सोप्या रीतीने स्पष्ट केलं. या साम्राज्यामीमांसेची परिणती म्हणूनच टिळकांनी ब्रिटिश मजूर पक्षाशी जोडलेले संबंध आणि त्याच पक्षाच्या कारकिर्दीत पुढे भारताला मिळालेलं स्वातंत्र्य, यावरून निश्चितच त्या मांडणीची सत्यता इतिहाससिद्ध आहे. आजच्या काळातही अनिर्बंध आर्थिक सत्ता गाजवू पाहणाऱ्या चीनसारख्या देशाला ती मीमांसा लागू आहे.

अनेक शतकं भारतातील विविध महान तत्त्वचिंतकांनी तयार केलेल्या वैचारिक बैठकीमुळे ऐहिक जीवनाच्या उन्नतीबाबत भारतीय मन उदासीन झालं होतं. टिळकांच्या 'गीतारहस्या'ने ती विचारपद्धती बदलून ऐहिकता आणि आध्यात्मिकता यांच्यात भांडण नसून, ऐहिक उन्नती सुद्धा साधली पाहिजे, हा विचार विद्वत्तापूर्वक मांडला. भारतीय मानसिकतेसाठी हा बदल क्रांतिकारक होता. पाश्चात्य तत्त्वज्ञानातील 'पॉझिटिव्हिझम' या तत्त्वप्रणालीमुळे युरोप विज्ञान, तंत्रज्ञानात पुढे गेला आणि त्याची परिणती त्याच्या आर्थिक सुबत्तेत झाली. टिळकांना भारतानेही त्याचा अंगीकार करून आपली प्रगती साधावी असं वाटत होतं. परंतु त्याचबरोबर समाजधारणशास्त्र, नीतिशास्त्र या विषयांमध्ये मात्र ते 'पॉझिटिव्हिझम' आणि 'पुष्कळांचे पुष्कळ सुख' मांडणारे उपयुक्ततावादी नीतिशास्त्र नाकारतात आणि वेदांत तत्त्वज्ञानाचा अंगीकार करतात. असा हा विचार आधुनिक भारतासाठी आणि जगासाठीही उपयुक्त ठरणार आहे. टिळकांच्या राजकीय अर्थविचाराचं मूळ अशा रीतीने त्यांनी 'गीतारहस्या'त मांडलेल्या तत्त्वविचारात आहे.

उदारमतवादावर आधारित जागतिक भांडवलशाही असो की शेतकरी-कामगारांची जागतिक सत्ता स्थापन करू पाहणारा कम्युनिझम या 'जगाचे कल्याण' करू पाहणाऱ्या विचारसरणी खरेतर श्रीमंत राष्ट्रांना आपल्या सोयीने वागून अधिक श्रीमंत, अधिक प्रबळ होण्यासाठी असतात, असा अनुभव टिळकपूर्व आणि टिळकांच्या काळात लोकांना इंग्लंडबाबत येत होता आणि टिळकोत्तर काळात तो आता आपल्याला अमेरिका आणि चीनबाबत येत आहे. श्रीमंत राष्ट्र आपल्या सोयीने 'मुक्त व्यापार' किंवा 'संरक्षणवाद' याची निवड करतात. राष्ट्रहित डोळ्यांसमोर ठेवून भारतही धोरणांची आखणी करू शकतो, हे टिळकांच्या अर्थविचाराला जे राष्ट्रवादाचे सातत्याने कोंदण आहे, त्यावरून आपल्याला लक्षात येते.

सध्याची अर्थव्यवस्था ही अधिकाधिक तंत्रज्ञानाधारित होत चालली आहे. Data is the new oil असं म्हटलं जात आहे. भारतीय शासनव्यवस्था, प्रशासन (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इत्यादी) डेटा संरक्षण आणि स्थानियीकरण संबंधी कायदे, नियम करण्यासंदर्भात पावलं उचलत आहेत. परंतु त्याबाजूने जनमत तयार झालं आहे का? जनमत तयार होण्याकरिता आधी त्याबाबतीत जनजागृती आहे का? तर ती म्हणावी तशी नाही, असंच म्हणावं लागेल. तशी ती परिस्थिती फक्त भारतातच नव्हे, तर इतर प्रगत देशांमध्येही आहे. त्यातूनच डेटा वर खाजगी कंपन्यांची मालकी की व्यक्तीची मालकी (डेटा मधेही स्वराज्य!)? असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. या सगळ्याकडे डोळसपणे पाहण्यासाठी, स्वराज्याचे राजकीय, आर्थिक, अध्यात्मिक अर्थ समजावून घेण्यासाठी आपल्याला पुन्हा टिळकविचारांकडे वळावे लागणार आहे!


लोकमान्य टिळकांचे मंडाले तुरुंगातील दिवस

Spm hii Jul 21, 2022

23 जुलै 1856 ते 1 ऑगस्ट 1920 असे 64 वर्षांचे आयुष्य लोकमान्य टिळक यांना लाभले. त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आले तेव्हा, म्हणजे 1956 मध्ये त्यांचे चरित्र लिहिण्याची स्पर्धा अखिल भारतीय काँग्रेस समितीने घोषित केली. त्या स्पर्धेत पहिला क्रमांक तीन पुस्तकांना विभागून दिला. त्यातील एक पुस्तक होते अ. के. भागवत व ग. प्र. प्रधान यांनी लिहिलेले इंग्रजी चरित्र. ते दोघेही त्यावेळी इंग्रजीचे प्राध्यापक होते आणि त्यांनी वयाची पस्तिशी ओलांडली नव्हती. ते पुस्तक जयको पब्लिशिंग हाऊस, दिल्ली यांनी प्रकाशित केले. त्याला त्यावेळचे उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी प्रस्तावना लिहिली. नंतर त्या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या आल्या. मात्र त्याचा मराठी अनुवाद प्रकाशित झाला नव्हता. म्हणून लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दी वर्षाचा समारोप आणि ग. प्र. प्रधान यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ, ही दोन निमित्तं साधून अवधूत डोंगरे यांनी केलेला प्रस्तुत अनुवाद साधना प्रकाशनाकडून आला आहे. त्यातील 'सार्वजनिक जीवनापासून दूर' या प्रकरणातील हा एक भाग.

लोकमान्य टिळक मंडालेमध्ये सार्वजनिक जीवनापासून दूर होते. दैनंदिन घडामोडींची व्यग्रता व गदारोळ त्यांच्या आसपास नव्हता. एकांत बंदीवासाच्या काळात कैद्याचं एक नवं जग निर्माण होतं. या जगामध्ये काळ गोगलगाईच्या वेगाने पुढे सरकतो, गुदमरवून टाकणारा एकसुरीपणा येतो आणि दडपून टाकणारा एकटेपणाही सहन करावा लागतो. कैद्याच्या जीवनाचा केवळ एक छोटा भाग या वस्तुनिष्ठ वर्णनातून मांडलेला आहे. संपूर्ण सत्य समजून घेण्यासाठी संबंधित कैद्याची मन:स्थिती व प्रतिक्रिया जाणून घेणं गरजेचं असतं. ‘मन स्वतःच्या मर्जीचं मालक असतं, ते स्वर्गाचा नरक करू शकतं आणि नरकाचा स्वर्ग करू शकतं,’ ही मिल्टन यांच्या कवितेतली ओळ तुरुंगात खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात अवतरते. टिळकांच्या वैयक्तिक जीवनाचा धांडोळा घेण्यासाठी त्यांनी तुरुंगातून पाठवलेल्या पत्रांचा विचार आपण करू शकतो, पण तिथेही त्यांचा मितभाषीपणा कायम असल्याचं दिसतं. स्थितप्रज्ञ मनोवृत्तीमुळे ते वैयक्तिक भावभावनांपासून अलिप्त राहत असत. सगळ्या सर्वसामान्य माणसांप्रमाणे त्यांनाही अर्थातच या भावना स्पर्श करून जात असतील. तुरुंगामध्ये राजकीय जीवनातील व्यग्रतेपासून दूर असताना कोणाही व्यक्तीने अधिक व्यक्तिनिष्ठ, वैयक्तिक व काहीसं हळवं होणंही स्वाभाविक वाटतं. परंतु, टिळकांच्या तात्त्विक स्वभाववृत्तीमुळे त्यांना कल्पनांचं जग निर्माण करून वैयक्तिक सुख-दुःख त्यात मिसळून टाकणं शक्य होत असे. या कल्पना त्यांच्या आत्म्याला होणारे क्लेश कमी करत असत आणि त्यांना व इतरांनाही कृतीचा मार्ग दाखवत. तुरुंगात असताना ते क्वचितच स्वतःबद्दल काही बोलल्याचं दिसतं. त्यामुळे तुरुंगातील त्यांच्या जीवनक्रमाबद्दल फारसं काही ज्ञात नाही. भावी पिढ्यांच्या सुदैवाने तुरुंगात टिळकांचा एक नम्र चरित्रकार होता- या चरित्रकाराने अपेक्षेपेक्षा खूपच मोठी कामगिरी केली.

सातारा जिल्ह्यातून आलेले एक कैदी वासुदेव रामचंद्र कुलकर्णी जवळपास दोन वर्षं टिळकांचे आचारी म्हणून काम पाहत होते. टिळकांच्या आठवणींचं संकलन करणारे सदाशिव विनायक बापट यांच्या आग्रहाखातर कुलकर्ण्यांनी टिळकांच्या मंडालेतील दिनक्रमाची उत्कृष्ट हकिगत नोंदवली आहे. कुलकर्णी शिक्षित नव्हते आणि लेखनकलेतही त्यांना गम्य नव्हते, तरीही त्यांनी ही हकिगत आश्चर्यकारक रीत्या उत्कृष्टपणे नोंदवली आहे. त्यांची टिळकभक्ती आणि या थोर माणसाची सर्वतोपरी सेवा करण्यासाठी त्यांनी केलेले प्रामाणिक प्रयत्न यांमुळे त्यांच्या साध्या व अनलंकृत वृत्तान्ताला अनन्यसाधारण मौलिकता प्राप्त झाली आहे. कुलकर्णी लिहितात : ‘एके रात्री मला येरवडा तुरुंगातून अचानकपणे उचलण्यात आले. मला कोठे नेत आहेत, याबद्दल मला काहीच माहीत नव्हते. मला मद्रासला नेण्यात आले आणि तिथे जहाजातून समुद्रापार नेले, तरीही माझा अंतिम ठावठिकाणा कोणता आहे याबद्दल मला काही कळू शकले नाही... रंगूनहून मला थेट मंडालेच्या तुरुंगात नेण्यात आले. मंडाले किल्ल्याच्या वायव्य कोपऱ्यामध्ये मंडालेचा तुरुंग आहे. सुरुवातीला मला एका स्वतंत्र कोठडीत ठेवण्यात आले. सामाइक स्वयंपाकघराच्या एका कोपऱ्यात अन्न शिजवण्याची आणि जेवणाचे ताट टिळकमहाराजांना नेऊन देण्याची सूचना मला करण्यात आली. तुरुंगात कैदी म्हणून येण्यापूर्वी मी टिळकमहाराजांना पाहिलेले नव्हते, त्यामुळे आता त्यांना पाहिल्यावर मला खूप संतोष वाटला. काही दिवस ही व्यवस्था सुरू राहिली. दरम्यान, आपला आचारी आपल्यासोबतच असावा, अशी मागणी टिळकमहाराज सातत्याने करत होते. अखेरीस त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि मी त्यांच्या सोबत राहण्यास गेलो. टिळकमहाराजांना पहिल्या मजल्यावरील कोठडीत ठेवण्यात आले होते. ही 20 बाय 12 फुटांची खोली होती आणि उर्वरित बराकीपासून लाकडी भिंत घालून ती वेगळी करण्यात आली होती. तसेच सभोवती विटांच्या उंच भिंती घालून बराकीच्या कंपाउंडपासूनही ती वेगळी करण्यात आली. महाराजांना ज्या कोठडीत ठेवण्यात आले होते, ती मुळात गोऱ्या कैद्यांच्या वापरासाठीची होती. खोलीभोवतीचे आवार सुमारे 150 फूट लांब व 60 फूट रुंद होते. त्यात काही आंब्याची व निंबाची झाडे होती. टिळकमहाराजांना केवळ या आवारातच प्रवेश करण्याची मुभा होती. आवाराचे कुलूप दिवसरात्र लावलेले असे. जेलर स्वतः जातीने रात्री कोठडीचे कुलूप लावून जात असे. तळमजल्यावर आम्हाला वरच्या कोठडीइतकीच जागा होती. तिथे अंघोळ, स्वयंपाक इत्यादींसाठी तजवीज करण्यात आली होती. उर्वरित बराकींप्रमाणे आमच्या कोठडीलाही पिंजऱ्यात असतात तसे दोन लाकडी गज लावलेले होते. टिळकमहाराजांच्या कोठडीत एक टेबल, दोन खुर्च्या, एक आरामखुर्ची, एक लोखंडी खाट आणि पुस्तके ठेवण्यासाठी दोन कपाटे होती. महाराजांना सातत्याने बरीच पुस्तके लागत असत. त्यांना त्यांचा नेहमीचा पोशाख- धोतर, पकडी, सदरा, पुणेरी चपला- घालण्याची परवानगी होती. या गोष्टींसोबतच एक कंदील व पलंग इत्यादी वस्तू त्यांच्या कोठडीत होत्या. स्वयंपाकघरात आवश्यक भांडी, लाकडी बाकडे आणि वस्तू ठेवण्यासाठी एक वा दोन टोपल्या होत्या. हे सर्व महाराजांना स्वतःच्या खर्चाने विकत घ्यावे लागले. परंतु, तुरुंगाच्या अधीक्षकाने मंजुरी दिल्याशिवाय आम्हाला काहीही मिळत नसे.

‘महाराजांचा दिनक्रम पुढीलप्रमाणे होता : ते पहाटे लवकर उठत, दात घासून झाल्यावर संस्कृतमधील काही मंत्रांचे पठण करत. मग ते त्यांच्या पलंगावर ध्यानधारणा करण्यासाठी सुमारे दीड तास बसायचे. इतका वेळ ते कशाचे चिंतन करायचे, हे ईश्वरास ठाऊक! मग ते त्यांचे प्रातर्विधी उरकत. यासाठीची व्यवस्था पुरेशी स्वच्छ होती. यादरम्यान मी त्यांच्यासाठी दात घासण्याची पावडर, पाणी (हिवाळ्यात गरम पाणी), टॉवेल इत्यादी गोष्टी तयार ठेवत असे. ते माझे मालक होते आणि मला त्यांच्या सेवेसाठी नेमलेले होते. पण मी हे सर्व करत असताना ते शरमल्यासारखे वाटत. एकदा ते मला म्हणाले, ‘‘तुम्ही बंदी आहात, तसाच मीही आहे. माझ्यासाठी तुम्ही इतकी तसदी घ्यायची जरुरी नाही. मला हे आवडत नाही. शिवाय, यावर आक्षेप घेतला जाऊ शकतो.’’ परंतु, मी त्यांच्या या म्हणण्याकडे लक्ष दिले नाही आणि माझी सुटका होईपर्यंत सर्व काही नेहमीच्या काटेकोरपणाने करत राहिलो. त्यानंतर ते चहा घेत आणि मग लेखन-वाचनात गढून जात. नऊ वाजता ते अंघोळीसाठी खाली येत. मी त्यांचे धोतर घडी घालून तयार ठेवत असे, हेही त्यांना आवडायचे नाही. स्वयंपाकघराचा एका कोपरा अंघोळीसाठी मोकळा ठेवलेला होता, तिथे ते अंघोळ करत. अंघोळीसाठी त्यांना भरपूर आणि अतिशय स्वच्छ पाणी लागत असे. आजारी असतानादेखील ते कोणालाही स्वतःच्या शरीराला स्पर्श करू देत नसत. त्यांना अशा स्पर्शाचा तिटकारा वाटत असे. ते दर आठवड्याला हजामत करत, पण एकदाही त्यांनी अंगाला तेल लावलं नाही. सुरुवातीला कोणी कैदी त्यांची हजामत करून देत असे. पण त्यासाठी वापरली जाणारी हत्यारे अगदीच खराब दर्जाची होती आणि त्या कैद्याला हे कामही फारसे जमत नव्हते. त्यामुळे टिळकांनी या व्यवस्थेबद्दल तक्रार केली आणि हजामतीसाठी न्हावी द्यावा, अशी मागणी केली. त्यांची मागणी मान्य करण्यात आली. प्रत्येक वेळी हजामतीसाठी त्यांना स्वतःच्या खिशातून एक रुपया खर्चावा लागत होता. एकदा ते म्हणाले, ‘‘आपले संस्थानिकसुद्धा हजामतीवर इतका खर्च करत नाहीत. पण मी काय करू? मला मधुमेह आहे, त्यामुळे अशा बाबतीत मी खर्चात कपात केली, तर मला गंभीर संकटाला सामोरे जावे लागू शकते.’’ हिवाळा सोडता बाकीचे दिवस ते थंड पाण्याने अंघोळ करत आणि उन्हाळ्यामध्ये दोनदा अंघोळ करत. एक ब्रह्मदेशी कैदी त्यांचे कपडे धूत असे. तो अतिशय आस्थेने हे काम करायचा... अंघोळीनंतर कपाळावर काही तरी लावण्याची टिळकांची सवय होती, त्यामुळे काही वेळा ते चिमूटभर राख मागत. नंतर आम्ही थोडेसे चंदन आणले. सुरुवातीला ते दैनंदिन पूजा-अर्चा केवळ नाममात्र स्वरूपात करत होते. पण एकदा ते मला म्हणाले, ‘‘इथे माझ्या हाताशी बराच वेळ आहे. पुण्यासारखी इथे घाई-गडबड नाही. पुण्यात मला जेवायलाही फुरसत मिळत नव्हती! त्यात आम्ही ब्राह्मण! त्यामुळे आपण इथे आहोत तोवर प्रसाद ठेवल्याशिवाय आणि गायत्री मंत्राचे पठण केल्याशिवाय अन्नग्रहण करायचे नाही, असे मी ठरवले आहे.’’ ही पद्धत आम्ही न चुकता पाळली.

‘सुरुवातीला महाराजांना दिवसातून एकदा भात दिला जात होता, एकदा पीठ व डाळी दिल्या जात होत्या. काही दिवसांनी तुरुंगाच्या महानिरीक्षकाच्या आदेशावरून दर आठवड्याला त्यांना काही फळेही देण्यात येऊ लागली. कालांतराने सर्व निर्बंध शिथिल झाले आणि महाराजांच्या मागण्यांनुसार त्यांना गोष्टी दिल्या जाऊ लागल्या. महाराजांना पुण्याहून लोणची, पापड, मसाले इत्यादी मागवायलाही परवानगी देण्यात आली. उन्हाळ्यात हापूस आंबाही मागवण्यात येत होता. परंतु, सर्व गोष्टी आमच्यापर्यंत पोचण्यापूर्वी त्यांची कसून छाननी केली जात असे. मी दर दिवशी महाराजांसाठी भात, रोटी, भाजी व चटणी असे जेवण तयार करत होतो. त्यांना वाढलेले सर्व अन्न ते संपवत, पण मुळातच थोडेसे अन्न घेत. जेवताना ते अन्नाकडे फारसे लक्ष देत नसत. पुस्तक लिहायला सुरुवात केल्यावर ते पूर्णतः त्यातच गढून गेलेले असायचे आणि मी चटणीत मीठ घालायचे विसरल्याचेही त्यांच्या लक्षात यायचे नाही. मी खायला बसलो, तेव्हा ही चूक माझ्या लक्षात आली. काम संपल्यावर मी वर गेलो आणि हात जोडून, मान खाली घालून शरमेने त्यांच्यासमोर उभा राहिलो. मी इतका का शरमून गेलोय, हे त्यांना कळले नाही. मी त्यांना म्हणालो, ‘‘कृपया मला माफ करा. तुमच्या चटणीत मीठ घालायचे मी विसरलो.’’ यावर ते हसून म्हणाले, ‘‘मीठ नसल्याचे माझ्या लक्षातही आले नाही. आणि कशातच मीठ नसते, तरी मी ते मनावर घेतले नसते. त्यामुळे माफ करण्यासारखे काही नाही. तसेही क्वचित प्रसंगी असे घडल्यास त्याची एवढी फिकीर कशाला?’’ सकाळचे भोजन झाल्यानंतर ते काही वेळ खोलीतच येरझारा घालत आणि मग पुन्हा लेखन-वाचनाला सुरुवात करत. एक क्षणभरही ते रिकामे बसल्याचे मला दिसले नाही. ते लेखन-वाचनात इतके गढून गेलेले असत की, मी त्यांच्याशी काही बोललो तरी त्यांना ऐकू जात नसे. दुपारी दीड वाजेपर्यंत ते काम करत. मंडालेमध्ये उष्णता खूप होती, त्यामुळे दररोज दुपारी दीड वाजता ते लिंबू सरबत पीत असत. भूक लागली असेल, तर ते साखर घातलेले दूध घ्यायचे किंवा काही फळे खायचे. या वेळामध्ये ते माझ्याशी तपशिलात बोलत असत. त्यांच्याइतके ज्ञान असणारेच खूपच कमी लोक आहेत. रोज ते मला काही ना काही नवी गोष्ट सांगायचेच. आता या गोष्टीला सोळा वर्षे उलटून गेली आणि वयोमानामुळे मला त्यातले फारसे काही आठवत नाही. हा सुमारे पाऊण तासाचा वेळ अत्यंत सुखद असे. मग ते पुन्हा त्यांच्या कामाला लागायचे आणि मी माझ्या. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आम्हाला आमचे जेवण आटपावे लागायचे. तुरुंगाच्या नियमांनुसार सहाचे ठोके पडल्यावर आमच्या कोठड्यांना तत्काळ कुलपे लावली जात आणि बारा तास आम्हाला त्या लहानशा कोठडीत घालवावे लागत असत... आम्ही वर जायचो तेव्हा ते मला तुकाराममहाराज, ज्ञानोबा, एकनाथ, रामदासस्वामी, श्रीकृष्ण, राम, शिवाजीमहाराज आणि कौरव-पांडवांच्या गोष्टी सांगायचे. दासबोध व तुकारामगाथा यांमधील अर्थ सांगायचे. काही वेळा ते पेशव्यांच्या किंवा इंग्रजांच्या गंमतीशीर गोष्टीही सांगत. त्यांच्याकडे जगाचा नकाशा होता. ते हा नकाशाही समजावून सांगायचे. पण मी एक अडाणी निरक्षर कुलकर्णी होतो. माझ्या संथ मेंदूला ते काय सांगत आहेत, हे फारसे कळायचे नाही. असे आमचे दोन तास जायचे. मग ते हात-पाय धुऊन पहाटेप्रमाणे सुमारे तासभर ध्यानधारणेच्या स्थितीत बसत. त्यांची ध्यानधारणा सुरू असताना मी पूर्णपणे स्तब्ध बसून राहायचो. ही समाधी झाल्यावर ते शांतपणे झोपायचे.

‘त्यांचा दिनक्रम असा होता. तुरुंगात दोन वर्षे झाल्यानंतर त्यांचा मधुमेह खूप वाढला... ते रोज औषधे घ्यायचे, पण काही सुधारणा होत नव्हती आणि त्यांची ताकद कमी होऊ लागली. मग त्यांनी पुण्याप्रमाणे इथेही आहारात पथ्य पाळायचे ठरवले. त्यानुसार त्यांनी तुरुंग अधीक्षकाला कळवले. त्यांच्या आहारात इतर अन्नधान्यांऐवजी केवळ सातूचा समावेश करायचा होता. तुरुंग अधीक्षकाने यासाठी परवानगी दिली आणि तांदूळ, गहू व डाळी यांऐवजी टिळकमहाराजांना सातू आणि पुरेसे दूध व तूप दिले जाऊ लागले. या पथ्यामुळे साखरेचे प्रमाण एका पंधरवड्यात चांगल्यापैकी खाली आले. त्यानंतर त्यांनी हाच आहार सुरू ठेवला. दृढनिश्चयी माणसांनाही अन्नावरील वासना नियंत्रणात ठेवणे खूप अवघड जाते, पण महाराजांनी त्यांच्या चवीवरही विजय मिळवला होता, याची मला खात्री पटली. यानंतर ते सातूचे पीठ, खोबरे व तूप यांनी तयार केलेल्या पुऱ्या खात असत. त्यासोबत ते दही घेत. त्यांना घट्ट व आंबटसर दही आवडायचे. ते म्हणत, ‘‘मी कोकण्या आहे. मला आंबट गोष्टी आवडतात.’’ सुरुवातीला मी त्यांच्यासाठी पालेभाज्या केल्या, तेव्हा त्यांना त्या खूप आवडल्या. ते म्हणाले, ‘‘धोंडू आणि माझी मुले यावर ताव मारतील. पण हे खाण्यासाठी त्यांना मंडालेला सहा वर्षे घालवावी लागतील.’’!’

कुलकर्णींच्या भावना उचंबळून आलेल्या होत्या, त्यामुळे त्यांना पुढील घटनाक्रम आठवत नव्हता. म्हणून ते लिहितात : ‘आता मी आठवतील तशा गोष्टी लिहितो.

‘मी शिक्षा भोगणारा अपराधी होतो, त्यामुळे मला तुरुंगातील गणवेश घालावा लागत असे. आचारी म्हणून मला इतर कैद्यांच्या तुलनेत कमी काम पडते, असे तिथला पारशी तुरुंग अधीक्षक म्हणाला आणि त्याने माझ्यावर आणखी काम लादले. त्या वेळी महाराजांनी माझी बाजू ताकदीने मांडली. ते म्हणाले, ‘‘मुळात त्याला काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आलेली नसतानाही तुम्ही इथे आणले, ही पहिली चूक. आता त्याला इथल्या तुरुंग नियमांप्रमाणे सुविधा न देणे हा त्याच्यावर आणखी अन्याय नाही का?’’ यामुळे मला तत्काळ वॉर्डर करण्यात आले, आणि मला कैदेच्या कालावधीतून दीड वर्षाची सूटही मिळाली.

‘महाराजांना वाचनाची प्रचंड आवड होती. मी तिथे असताना त्यांच्याकडे पुण्याहून आणलेली अनेक जाडजूड पुस्तके होती. ते दिवसरात्र या पुस्तकांमध्ये गढलेले असत. पण या सर्व पुस्तकांमध्ये एक कपटाही राजकारणाशी संबंधित नव्हता. त्यांना मराठी अथवा इंग्रजी मासिकांचे एकही पान दिले जात नसे, कोणतेच वर्तमानपत्रही दिले जात नव्हते. एका वेळी ते स्वतःपाशी चारच पुस्तके ठेवू शकतील, असा आदेश देण्यात आला होता. या वेळी त्यांनी ब्रह्मदेशाच्या सरकारकडे अर्ज केला. आपण एक पुस्तक लिहीत आहोत, त्यामुळे संदर्भाची सर्व पुस्तके स्वतःपाशी ठेवण्याची परवानगी दिली जावी, असे त्यांनी अर्जात नमूद केले होते. मग आधीचा आदेश रद्द झाला आणि त्यांना त्यांची सर्व पुस्तके परत मिळाली. पण प्रत्येक पुस्तकातील पानांची संख्या मोजली जात असे. ही पानसंख्या मुखपृष्ठावर लिहिली जायची, त्यावर अधीक्षक सही करायचा आणि मग ती पुस्तके महाराजांच्या हवाली केली जात.

‘मंडालेतील प्रचंड गर्मीमुळे महाराज अत्यंत अस्वस्थ होत. उष्णतेमुळे त्यांच्या अंगावर फोड उठले होते. त्यामुळे त्यांनी मुंबई सरकारकडे अर्ज केला आणि आपल्याला अंदमानात पाठवले जावे आणि आवश्यक जातमुचलका दिल्यानंतर मुक्तपणे फिरण्याची मुभा असावी, अशी त्यांनी विनंती केली. ही विनंती फेटाळण्यात आली. त्यांना याबद्दल कळल्यावर आधी ते थोडे नाराज झाले, पण मग शांतपणे म्हणाले, ‘‘ठीक आहे. मला तुरुंगात मृत्यू यावा, अशी ईश्वराची इच्छा दिसते आहे.’’

‘महाराजांनी मधुमेहामुळे पथ्य सुरू करण्यापूर्वी त्यांना अतिशय चांगल्या दर्जाचा भात दिला जात असे आणि मला सर्वसामान्य कैद्यांना मिळणारे अन्नधान्य दिले जात होते. परंतु, महाराजांनी त्यांना मिळणाराच भात मी खावा, अशी सक्त ताकीद दिली होती. मला त्यांच्यातील अन्न मिळावे यासाठी ते स्वतः पुरेसे खात नसत, असे मला वाटले. यामुळे मला खूप अवघडल्यासारखे व शरमल्यासारखे वाटले. खरे तर मला अपराधीच वाटत होते.

‘...‘‘मला दूध आणि फळे मिळतात. तुम्ही तो खराब भात खात जाऊ नका. तुम्हाला तो पचणार नाही आणि तुम्ही आजारी पडाल’’, असे ते मला म्हणाले होते. त्यानंतर मला देण्यात येणारे अन्नधान्य ते चिमण्यांना भरवू लागले. असे काही दिवस सुरू राहिल्यावर चिमण्या धीट झाल्या आणि खोलीत येऊन पुस्तकांवर व टेबलावर बसू लागल्या. कधी महाराज जेवत असताना त्यांच्या ताटाभोवतीही त्या गोळा होत. चिवचिव करत त्या माश्यांसारख्या महाराजांच्या अंगावरही बसत... एकदा या चिमण्या महाराजांच्या खोलीत जमल्या असताना अधीक्षक आला आणि हे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाला. महाराज त्याला म्हणाले, ‘‘आम्ही त्यांना खात नाही. आम्ही त्यांना घाबरवत नाही. उलट, काही वेळा आम्ही त्यांना धान्य देतो. आम्ही विषारी जीवांबद्दलही मनात अढी ठेवत नाही आणि तेही आम्हाला भीत नाहीत.’’ साहेबाला या बोलण्याचे बरेच आश्चर्य वाटले.

‘महाराज लेखनापेक्षा वाचनात अधिक वेळ घालवत; पण त्यांचा त्याहून अधिक वेळ विचार करण्यात जात असे- सुपारी खात डोळ्यांची उघडझाप करत ते खुर्चीत बसून असायचे. ‘‘तुम्ही सतत कशाचा विचार करत असता?’’ असे मी त्यांना एकदा विचारले. ते हसून म्हणाले, ‘‘माणसाच्या मस्तकामध्ये संपूर्ण विश्व असते आणि या विश्वाची खळबळ मेंदूमध्ये सुरू असते.’’ एकदा ते म्हणाले, ‘‘मी शालेय विद्यार्थी आहे. ही खोली म्हणजे माझी शाळा. हे ग्रंथ म्हणजे माझे शिक्षक. जेलर म्हणजे शाळेतला शिपाई, तर तुम्ही माझे खेळगडी. इथे मी जर्मन, फ्रेंच, पाली व इतर काही भाषा शिकतो. सुटका झाल्यावर माझी जर्मनीला जायची इच्छा आहे. तिथेही तुम्ही माझ्यासोबत आचारी म्हणून याल का?’’ एकदा महाराजांना मराठीत काही तरी लिहायचे होते. त्या वेळी ते मी लिहून घ्यावे, असे त्यांना वाटले. पण ते लगेचच म्हणाले, ‘‘नको. तुम्ही माझ्यासाठी हे कष्ट करावेत, असे मला वाटत नाही. तुमच्याकडे आधीच पुरेसे काम आहे. माझे काम मीच मार्गी लावेन.’’

‘तीन महिन्यांतून एकदा महाराजांना बाहेरच्या व्यक्तींशी बोलण्याची परवानगी होती; पण त्यांचे नातेवाईक वगळता कोणालाही भेटण्यासाठी त्यांनी ही सुविधा वापरली नाही. एकदा अमरावतीहून श्रीमंत खापर्डे आणि रंगूनहून श्री. विजापूरकर त्यांना भेटायला आले होते. त्यांचे भाचे बाबासाहेब विद्वांस अधून-मधून येत असत. या मुलाखतीवेळी तुरुंगाधिकारी उपस्थित असायचा. बाबासाहेबांशी बोलणे झाले, त्या दिवशी महाराज अतिशय आनंदी होते. त्यांना पुण्यातील कुटुंबीयांना महिन्यातून एक पत्र लिहिण्याची परवानगी होती आणि त्यांच्याकडे महिन्याला एक खासगी पत्र आलेले चालत असे. पण पत्रात कौटुंबिक घडामोडींव्यतिरिक्त काही असेल, तर त्यावर तत्काळ काट मारली जात असे. महाराजांनाही वैयक्तिक माहिती सोडून काहीही लिहायला बंदी होती. एकदा त्यांनी एक दीर्घ पत्र लिहिले, पण तुरुंगाधिकाऱ्याला त्यातील एका शब्दाबद्दल शंका आली आणि त्याने त्यांना नवे पत्र लिहायला सांगितले. त्या वेळी महाराज संतापून म्हणाले, ‘‘गुलामी सर्वार्थाने वेदनादायक असते.’’

‘मी त्यांना कायम ‘‘महाराज’’ म्हणत असे, हे त्यांना अजिबात आवडायचे नाही.

‘काही वेळा सरकारी अधिकारी महाराजांना भेटण्यासाठी येत असत. एकदा कलेक्टर, अधीक्षक, तुरुंगाधिकारी यांच्यासोबत ‘xxx’ हे अधिकारी महाराजांना भेटायला आले. मी कैद्याच्या वेशात आवारामध्ये उभा होतो. तुरुंगाधिकारी सोडून बाकीच्यांना मीच टिळक आहे असे वाटले. त्यांनी टोप्या काढल्या आणि ‘‘गुड मॉर्निंग’’ असे म्हणाले. मी हात जोडत मान तुकवली आणि हिंदीत त्यांना सांगितले की, मला इंग्रजी येत नाही. टिळकमहाराज तिकडे असल्याचे मी खुणेने त्यांना सांगितले. इतक्यात महाराज त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने खाली आले आणि सर्व जण झालेल्या चुकीबद्दल हसले. मग सर्व जण वर जाऊन बराच वेळ बोलत होते. महाराजांना जर्मनचे चांगले ज्ञान असल्याचे ‘xxx’ ना कळल्यावर ते म्हणाले, ‘‘मी माझ्या मुलीला जर्मन शिकवले आहे. तुम्ही कृपया तिची परीक्षा घ्याल का?’ महाराजांनी यासाठी संमती दर्शवली. ‘xxx’ आणि महाराज यांच्यातील या जिव्हाळ्याने तुरुंगाधिकाऱ्याला मत्सर वाटू लागला. त्याला असे वाटले की, संबंधित व्यक्तीला खूश करण्यासाठी टिळक त्याच्या मुलीच्या ज्ञानाची स्तुती करतील. परंतु, ‘xxx’ दुसऱ्या दिवशी मुलीला घेऊन आले, तेव्हा टिळकांनी तिची परीक्षा घेतली आणि तिचे ज्ञान पुरेसे नसल्याचे लक्षात आल्यावर तसे स्पष्टपणे सांगितले. तुरुंगाधिकारी आणि अधीक्षक दोघांनाही या प्रसंगी आश्चर्य वाटले.

‘महाराजांची तब्येत निःसंशयपणे धडधाकट होती. मी तीन वर्षे त्यांच्यासोबत होतो, पण वय वाढत गेल्यावरही या काळात ते फक्त एकदा वा दोनदा आजारी पडले. एकदा त्यांना पटकीसारखा कोणता तरी आजार झाला. त्यांना दोन-तीनदा शौचास झाले आणि उलटीही झाली. त्या वेळी ते खूप थकले होते, पण तरीही मला त्यांनी स्वतःच्या अंगाला स्पर्श करू दिला नाही. तुरुंगाधिकाऱ्याने डॉक्टरला बोलावून त्यांना औषधे दिली. त्या वेळी अधिकाऱ्यांनी त्यांची बरीच काळजी घेतली. मी अनेकदा आजारी पडलो, तेव्हा महाराज वडिलांप्रमाणे माझी काळजी घेत असत. मला तुरुंगातील दवाखान्यात पाठवण्याची अधिकाऱ्यांची इच्छा असायची, पण महाराज मला स्वतःसोबत ठेवून माझी शुश्रूषा करायचे! अशा वेळी ते माझ्यासाठी अन्नही शिजवत. माझे जेवून झाल्याशिवाय ते जेवत नसत. वास्तविक ते माझे मालक होते, पण त्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे त्यांनी माझी तीन वर्षे काळजी घेतली. मला सक्तमजुरीची शिक्षा झालेली होती, त्यामुळे मला कोणतीही सुविधा मिळत नसे. पण महाराज मला चहा देत, त्यांच्या जेवणातील वाटा मला देत, माझ्याशी समपातळीवरून बोलत, त्यांच्या न्हाव्याकडून माझीही हजामत होईल असे पाहत. रक्ताच्या नातलगाहून अधिक काळजीपूर्वक माझी शुश्रूषा करीत आणि माझ्या सुटकेसाठी त्यांनी कायदेशीर प्रयत्नही केले. या शेकडो गोष्टी आठवल्या की, माझ्या मनात भावना दाटून येतात, माझे डोके गरगरते आणि काय बोलावे ते सुचत नाही.

‘मंडालेच्या तुरुंगात पटकीची साथ पसरली, तेव्हा महाराजांना व मला मिक्टिला तुरुंगात नेण्यात आले. मंडालेच्या तुरुंगातून स्टेशनवर जाईपर्यंत दोन्ही बाजूंनी सशस्त्र रक्षक होते. पण गाडी स्टेशनावर पोचली, तेव्हा तिथे प्रचंड गर्दी जमलेली होती आणि लोक ‘‘टिळकमहाराज की जय’’ अशा घोषणा देत होते. त्यांना गुप्तपणे एका विशेष घोडागाडीतून मिक्टिलाला नेण्यात आले. तिथेही शेकडो लोक जमून ‘‘टिळकमहाराज की जय’’ अशा घोषणा देत होते. महाराज त्या तुरुंगात पोचले, तेव्हा तिथल्या तुरुंगाधिकाऱ्याने त्यांना विचारले, ‘‘तुम्ही कोणत्या देशावर राज्य करत होतात?’’ महाराज म्हणाले, ‘‘मी स्वतःच्या शरीराचाही मालक उरलेलो नाही. मग माझे कोणते राज्य असणार आहे?’’

‘मी मंडालेला गेलो त्यानंतर दहा-बारा दिवसांनी, स्वयंपाक करत असताना मला माझ्या पत्नीची व मुलांची आठवण आली आणि मी खूप अस्वस्थ झालो. मी अशा मन:स्थितीत असताना उकळत्या पाण्याची पातेली कलंडली आणि पिठात पाणी सांडले. खूप भीती वाटून मी रडू लागलो. आता मी महाराजांना खाण्यासाठी काय देऊ, हे काहीच मला सुचेना. महाराज याबद्दल तुरुंगाधिकाऱ्याला सांगतील तेव्हा मला शिक्षा होईल, याची मला भीती वाटत होती. अशातच महाराज स्वयंपाकघरात आले, तिथे काय घडले हे त्यांनी पाहिले. यात काही चूक झाली आहे, असे त्यांनी अजिबात दाखवले नाही. पाकासारखे झालेले पीठ त्यांनी शांतपणे एका कापडावर घेतले आणि पाणी कापडात शोषले गेल्यावर मी त्या पिठाची भाकरी केली. महाराजांनी तीही आनंदाने खाल्ली. या प्रसंगीही ते चिडले नाहीत. किंबहुना, ते इतरही एखाद्या वेळी चिडल्याचे मला आठवत नाही.

‘मला शिक्षेतून दोन वर्षांची सूट मिळाली. आता मला मंडालेहून हलवण्याची शक्यता होती. मग मी महाराजांना म्हणालो, ‘‘आधीप्रमाणे आताही आपण माझी बाजू मांडावी आणि आणखी दोन वर्षे आपल्यासोबत इथे राहण्याची परवानगी मिळवून द्यावी.’’ महाराजांनी मला असे विचार करण्यापासून परावृत्त केले, यासंबंधीचा कायदा समजावून दिला आणि आता मी माझ्या कुटुंबामध्ये जावे यासाठी माझे मन वळवले. त्यांनी मला आशीर्वाद देऊन माझा निरोप घेतला. मी त्यांना सोडून निघालो, तेव्हाच्या माझ्या भावना कशा व्यक्त करू? मी त्यांच्या कुटुंबीयांना काय सांगावे, असे मी त्यांना विचारले, त्यावर ते म्हणाले, ‘‘इथे सगळे ठीक आहे, असे त्यांना सांगा.’’ त्यांचे कुटुंबीय माझ्यावर कसा विश्वास ठेवतील, असे मी त्यांना विचारल्यावर त्यांनी काहीच दिवसांपूर्वी पडलेला त्यांचा दात मला दिला आणि म्हणाले, ‘‘हा दात धोंडूला दाखवा, म्हणजे मग कोणीही तुमच्यावर शंका घेणार नाही...’’ मंडालेहून मला पुण्यात आणण्यात आले. त्यानंतर माझ्या गावासाठीचे तिकीट काढून मला एम.एस.एम. ट्रेनमध्ये बसवण्यात आले. ‘‘गायकवाड वाड्याकडे गेलास तर लक्षात ठेव!’’ अशी ताकीदही मला देण्यात आली. मग मी माझ्या गावी गेलो, पण नंतर पुण्याला परत आलो आणि महाराजांच्या कुटुंबातील व्यक्तींना भेटलो. त्यांना, खासकरून महाराजांच्या पत्नींना सर्व काही सांगितले... महाराजांची सुटका झाल्यानंतर मी त्यांनाही भेटायला गेलो होतो. तिथे त्यांनी मला घरी राहण्याचा आग्रह केल्यावर मी तिथेच राहिलोदेखील... त्यांची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान मानतो. तपश्चर्या केल्यानंतरही कोणाला अशी संधी मिळणार नाही. या सेवेमुळे मला भौतिक पातळीवर आणि आध्यात्मिक पातळीवरही बराच लाभ झाला. तुरुंगवासाची शिक्षा हा माझ्या चारित्र्यावरील कलंक होता, पण एका संताच्या साहचर्यामध्ये पवित्र गंगेत स्वतःला शुद्ध करायचे सुदैव मला लाभले. मी कृतकृत्य झालो.’

‘राजकारण म्हणजे मुखवटे टिकवण्याचा खेळ असतो,’ असं एका लेखकाने म्हटलं आहे. टिळकांच्या राजकीय स्वरूपामध्ये पारदर्शक प्रसन्नता होती. त्यांच्या कठोर टीकाकारांनीही त्यांच्यावर मुखवटे घातल्याचा आरोप केला नाही. टिळकांच्या राजकीय कृत्यांमधून त्यांच्या भावभावनांबद्दल फारसं काही कळत नाही, हे आधी नमूद केलं आहेच. त्यांच्या भाषणांमध्ये व लेखनामध्ये वैयक्तिक भावनांचा अभाव ठळकपणे जाणवतो. त्यांना खासगी जीवन असं फारसं नव्हतं. पोटच्या मुलाचा मृत्यू झाला, तेव्हा अशा आपत्तीच्या वेळीदेखील ते अनन्यसाधारण शांतचित्त राहिले. शिवाय, त्या काळी महाराष्ट्रातील बहुतांश कुटुंबांमध्ये ज्येष्ठ व्यक्ती स्वतःच्या मनातील भावना फारशा व्यक्त करत नसत. सनातनी कुटुंबांमध्ये प्रचलित असलेली उग्रतेची विशिष्ट धारणा हे या मितभाषीपणामागचं मुख्य कारण होतं. त्यामुळे टिळकांच्या व्यक्तिमत्त्वातील भावनिक बाजूची झलक सापडणंही अवघड होऊन जातं. टिळकांच्या मुलांनी व मुलींनी लिहिलेले काही रोचक प्रसंग त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही अनपेक्षित पैलू उघड करणारे आहेत. त्यांची खासगी संभाषणं नेहमीच सुखद विनोदाने चैतन्यशील होत असत. टिळकांची सर्वांत धाकटी कन्या श्रीमती मथुताई साने यांनी पुढील आठवण नोंदवली आहे : ‘सकाळचा चहा घेताना दादा त्यांचा पत्रव्यवहार पाहत असत आणि ते त्यांच्या आजूबाजूच्या मंडळींशी कायमच विनोदाने बोलत. ते भयंकर अडचणींना व दिव्यांना सामोरे जात असले, तरीही घरात क्वचितच चिंताग्रस्त किंवा चिडचिडे वाटत. सुरतेतील काँग्रेसचे अधिवेशन 1908 मध्ये होण्याआधी व झाल्यानंतर नेमस्त व जहाल यांचा वर्तमानपत्रांमध्ये बराच शिवराळ वाद झाला. मग एके दिवशी चहा घेत असताना ते आम्हाला म्हणाले, ‘‘तुम्ही सर्व जण चहासोबत काही ना काही खाता. मी काय खातो, हे तुम्हाला माहीत आहे का?’’ सकाळी ते चहा सोडून काहीच घेत नसत, त्यामुळे आम्ही म्हणालो, ‘‘आम्ही तर काही खाताना पाहिलेले नाही.’’ यावर ते म्हणाले, ‘‘मी चहासोबत ताज्या शिव्या खातो.’’ अन्नाच्या चवीबाबत टिळक उदासीन होते. मधुमेहामुळे त्यांना पथ्य पाळावं लागत असे, पण हे सर्व निर्बंध पाळणं त्यांना कधीच जड गेलं नाही. असलं बेचव अन्न त्यांना कसं रुचतं, असं त्यांच्या मुलीने एकदा त्यांना विचारलं, यावर ते मिश्कीलपणे म्हणाले, ‘‘तू खाण्यासाठी जगतेस, तर मी फक्त जगण्यापुरतं खातो.’’ कामात गढलेलं असताना ते शेजारी ठेवलेला चहा प्यायचाही विसरून जात आणि अनेकदा हा चहा थंड होऊन जात असे. त्यांची दुसरी कन्या पार्वतीबाई केतकर यांनी या संदर्भात एक आठवण सांगितली आहे. एकदा पार्वतीबार्इंनी टिळकांना रात्रीच्या जेवणाची वेळ झाल्याचं सांगितलं, पण टिळकांचं तिकडे काहीच लक्ष नव्हतं; किंबहुना, मुलीचे शब्दही त्यांच्या कानांवर पडले नसावेत. थोड्या वेळाने ते म्हणाले, ‘‘देवाने एक चूक केली. आपल्या पोटाला एखादे छिद्र असते, तर आपण त्यात पोषक रस भरले असते. अशामुळे जेवणात वेळ घालवावा लागला नसता.’’

तरुणांना सतत काही तरी नवी व उद्बोधक गोष्ट सांगणं टिळकांना आवडत असे. टिळकांच्या या सवयीसंबंधीचा एक दाखला त्यांचे नातू ग. वि. केतकर यांनी नोंदवला आहे. ‘मुलांना किंवा विद्यार्थ्यांना एखाद्या विषयाची माहिती सांगण्याचे कामी दादांना मोठी हौस वाटे. लहानपणी आईने काही शास्त्रीय विषयाबद्दल माहिती सांगावी व तिला विचारले, ‘‘ही माहिती तुला कोणी सांगितली?’’ तेव्हा तिने सांगावे, ‘‘लहानपणी दादा आम्हास पुष्कळ वेळा माहिती सांगत असत.’’... माहिती सांगताना विषयाशी तादात्म्य झाल्यामुळे त्यात काळ-वेळाचेही भान राहत नसे... यामुळे जेवताना कोणताही विषय काढावयाचा नाही, अशी ती. आक्काने आम्हास सूचना दिली होती. कारण काही विषय निघाला की, बोलण्याचे भरात दादा नीट जेवत नसत. पण या सूचनेचा फारसा उपयोग झाला नाही, कारण आम्ही विषय काढला नाही तर तेच काढीत!


अ. के. भागवत , ग. प्र. प्रधान लिखित 'लोकमान्य टिळक' हे पुस्तक इथून खरेदी करता येईल.

लोकमान्य टिळक आणि राष्ट्रीय सभा

31-Jul-2020

lokmany 7_1  H

ज्याप्रमाणे एक नेता आपल्या देशाला, समाजाला, संघटनेला संघटीत करून सतत कार्यरत राहतो त्याचप्रमाणे टिळकांनी काँग्रेसला कार्यप्रवण बनवले. त्यांनी काँग्रेसचे मवाळ राजकारण जहाल करून काँग्रेसला खर्‍या अर्थाने लोकमान्यता मिळवून दिली. आपल्या मागणीपाठोपाठ लोकसंघटनेची शक्ती पाहिजे व त्यासाठी नेत्यांनी,पुढार्‍यांनी स्वार्थाचा विचार न करता पुढे आले पाहिजे. ही विचारसरणी काँग्रेसच्या राजकारणात प्रविष्ट करण्याचे पहिले श्रेय लोकमान्यांचेच !

१८८५ साली स्थापन झालेली राष्ट्रसभा अथवा काँग्रेस अखिल भारतीयांचे प्रतिनिधित्व करणारी राजकीय संस्था म्हणून उदयास आली. काँग्रेसचे कर्तव्य सांगताना टिळक म्हणतात, “हिंदुस्थानातील सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या आणि सर्व प्रांताच्या लोकांना एकदिलाचे आणि एक विचाराचे करणे हे काँग्रेसचे कर्तव्य आहे. सामाजिक, राजकीय चळवळीत कार्यरत असणार्‍या पुढार्‍यांनी काँग्रेसचे राजकारण आपल्या हाती घेतले.”

ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर विश्वास ठेऊन आपले राजकारण समोर नेण्याचे कार्य करण्यास काँग्रेसने सुरुवात केली. काँग्रेसची अधिवेशने भरत होती, अनेक ठराव मांडल्या जात होते. परंतु, १८९२ पर्यंत त्यांची एकही मागणी मान्य करण्यात आली नाही. त्यामुळे जोपर्यंत काँग्रेसला लोकांचे पाठबळ लाभत नाही तोपर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही, अशी टिळक आणि त्यांच्या नेतृत्वाखाली उदयास आलेल्या जहाल गटाची पक्की खात्री झाली. जोपर्यंत काँग्रेस सामान्य जनतेत पोहोचून तिला लोकमान्यता प्राप्त होत नाही तोपर्यंत स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता पुढार्‍यांनी समोर आले पाहिजे, अशी टिळकांची भूमिका होती. आता काँग्रेसचे जुने राजकारण मागे टाकून नवीन राजकारणास सुरुवात करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन काँग्रेसला सामान्य नागरिकांचे पाठबळ मिळावे, काँग्रेस ही जनतेचे प्रतिनिधित्व करणारी संस्था बनावी आणि तिचे राजकारण घराघरात पोहोचावे यासाठी प्रयत्न सुरु केले.

१८८६ पासून काँग्रेसची प्रांतिक परिषदे भरवण्यात येऊ लागली. महाराष्ट्रात जहाल विचारसरणीच्या प्रसारासाठी प्रांतिक परिषदांचा उपयोग करून अनेक लोकांना आपल्यात सामील करून घेण्याचे कार्य टिळकांनी अवलंबिले. या परिषदेचे महत्त्व सांगताना ते म्हणतात, “वर्षातून एकदा जमणार्‍या हजार-पाचशे लोकांच्या राष्ट्रसभेने एखादे मागणे केले, म्हणजे सरकार लागलीच कबुल होईल असे नाही. प्रत्येक प्रांतातून,जिल्ह्यातून इतकेच काय तर खेड्यातूनही तशा प्रकारचे अर्ज केले पाहिजे तरच त्या मागण्यांना काही वजन येणार आहे आणि या विचारसरणीला अनुसरून त्यांनी आपले कार्य आरंभिले. प्रांतिक अधिवेशनात अनेक अनुयायी सोबत घेऊन झंझावाती प्रचार करण्याची सुरुवात त्यांनी केली. पावसाळ्यात बेडूक ओरडतात, त्याप्रमाणे वर्षातून एकदा ओरडून फायदा नाही. त्यासाठी सातत्याने व नेटाने खटपट केली पाहिजे. आता आमच्या मागण्या कायदेशीररीत्या सरकारच्या डोक्यात घुसवणे काँग्रेसचे प्रमुख कार्य आहे,” असे टिळकांचे म्हणणे होते.

काँग्रेस अंतर्गतच जहाल आणि मवाळ पक्ष निर्माण झाले होते. दोन्हीही पक्षांचे अंतिम ध्येय एकच असले तरी त्यांच्या कार्यात तात्त्विक भेद होता. मवाळांचा सरकारच्या न्यायबुद्धीवर विश्वास होता त्यामुळे त्यांच्या मर्जीत राहूनच, सनदशीररित्या सुधारणा आपल्या पदरात पाडून घ्याव्या अशी त्यांची भूमिका होती. याउलट टिळकांच्या नेतृत्वाखाली नव्याने उदयास आलेल्या जहाल गटाचे असे मत होते की, स्वतंत्र देशातील सनदशीर चळवळ आणि परतंत्र देशातील सनदशीर चळवळ यात फरक आहे. स्वतंत्र देशात सनदशीर चळवळीकडे राज्यकर्ते लक्ष देतात, पण भारतासारख्या परतंत्र देशात ते अजिबात लक्ष देत नाहीत. त्यामुळे नि:शस्त्र प्रतिकाराची आता वेळ आली आहे असे सांगून काँग्रेसला कार्यप्रवण बनवणे हे त्यांचे प्रमुख ध्येय होते. कालानुरूप संघटनेत वा चळवळीत बदल करावे लागतात. परंतु, हे बदल करावयास मवाळ नेते तयार नव्हते. जहालांबरोबर राहिले तर इंग्रज सरकार दुखावेल, दडपशाही वाढेल त्यामुळे जहालांना काँग्रेसमध्ये राहूच देऊ नये असे मवाळांना वाटू लागले होते. टिळक म्हणतात, “सरकार चिडेल हा मंत्रच पायाशुद्ध नसून अनर्थकारक आहे असे आमचे मत आहे. काँग्रेस ही हिंदुस्थानातील सर्व लोकांच्या वतीने सरकारजवळ हक्क मागण्याकरिता भांडण्यासाठी निर्माण झाली आहे. सरकार किंवा सरकारी अधिकार्‍यांस रुचेल अथवा ते चिडले जाणार नाहीत अशा रीतीनेच जर काँग्रेसचे काम चालवायचे असेल तर तिची काय गरज? जर मवाळांना जहालांचे राजकारण पटत नसेल तर तिने काँग्रेसमध्ये राहूनच तीत आपले बहुमत स्थापन करायला हवे आणि आपले वर्चस्व प्रस्थापित करायला हवे,” असे टिळक म्हणतात.

हिंदुस्तान शस्त्रबळानेच जिंकण्यात आला आहे आणि तो शस्त्रबळानेच टिकवता येईल अशा उन्मत्त ब्रिटिश अधिकारांच्या वल्गना ,देशाचे मोठ्या प्रमाणात चाललेले आर्थिक शोषण, सुधारणांविषयी सरकारची असणारी अनास्था आणि या सर्व बाबतीत काँग्रेसला येत असलेले अपयश यांमुळे टिळक आणि त्यांचा जहाल गट अस्वस्थ झाला होता. काँग्रेसच्या निष्क्रियतेवर बोट ठेऊन तिच्या अपयशाची कारणमीमांसा करताना टिळक म्हणतात, “इंग्लंड व हिंदुस्थान या दोन्ही देशात सबंध वर्षभर एकसारखी चळवळ सुरु ठेऊन इंग्रज लोकांस सळो की पळो केल्याखेरीज ‘भिक नको पण कुत्रा आवर’ या न्यायाने यांस काहीतरी द्या, अशा पेंचात त्यांस घातल्याखेरीज तुम्हांस यशप्राप्ती व्हावयाची नाही.काँग्रेस सभा काढली तेंव्हा तिचा उद्देश हाच होता, पण दुर्दैवाने आता तिला वार्षिक श्राद्धाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. १९०५ साली लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करण्याचा निर्णय घेतला. या घोषणेने संपूर्ण बंगाल खवळून निघाला, सरकारच्या या भेदनीतीवर कडक शब्दात निषेध व्यक्त केला गेला. परंतु आता फक्त बोलून चालणार नव्हते तर प्रत्यक्ष कृतीची गरज होती.”

ज्या आशावादावर विश्वास ठेऊन काँग्रेसचे कार्य पहिले २० वर्ष चालविण्यात आले तो आशावाद आता धुळीस मिळाला होता, आता नवीन परिथिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नवा कार्यक्रम, नवे नेतृत्व यांची देशाला गरज होती आणि टिळकांच्या माध्यमातून ते नेतृत्व उदयास येत होते. बंगालमध्ये जी जनशक्ती उसळली होती ती संपूर्ण देशभर पसरवण्याचे कार्य टिळकांनी आरंभिले. आपले नि:शस्त्र प्रतिकाराचे तत्वज्ञान काँग्रेसच्या गळी उतरवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार, स्वदेशी आणि स्वराज्य या चतु:सूत्रीच्या झंझावाती प्रचारास त्यांनी सुरुवात केली. आणि हे चतु:सूत्रीचे ठराव कोलकात्त्याच्या आगामी अधिवेशनात पारित व्हावे यासाठी प्रयत्न सुरु केले. अध्यक्षपदासाठी टिळकांचे नाव सुचवण्यात आले. परंतु, मवाळ गटाने ते अमान्य करून पितामह दादाभाई नौरोजी यांना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मांडला व तो मंजूरही झाला. परंतु, या अधिवेशनात चतु:सुत्रीचे सर्व ठराव पारित करण्यात आले मवाळांना हे सर्व अनपेक्षित होते आणि खरेतर हा टिळकांच्या विचारसरणीचा, झंझावाती प्रचाराचा, लोकसंघटनेचा विजय होता. अशाप्रकारे स्वदेशी, बहिष्काराचे आंदोलन बंगालपुरतेच मर्यादित न राहता काँग्रेसने हाती घेतल्यामुळे त्याला राष्ट्रव्यापी स्वरूप प्राप्त झाले.

१८९६ पासून सुरु झालेला जहाल-मवाळ संघर्ष आता पराकोटीला पोहोचला होता आणि काँग्रेस दुभंगण्याचे अनेक प्रसंग निर्माण झाले होते. परंतु, टिळक, लाला लजपतराय यांनी एका बाजूला आणि ना. गोखले यांनी दुसर्‍या बाजूला ही दोर घट्ट पकडून ठेवली. जर काँग्रेसमधून दोन वेगवेगळे गट बाहेर पडले तर ते देशासाठी घातक आहे हे टिळकांना माहीत होते आणि त्यामुळे मोठ्या कौशल्याने आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी भावनेच्या आहारी जाऊ न देता पुन्हा आपल्यात सामावून घेतले. जर काँग्रेसचे विभाजन होऊ द्यायचे नसेल तर कोलकात्ताला झालेले चतु:सूत्रीचे सर्व ठराव सुरतच्या आगामी अधिवेशनात पारित व्हायला हवेत अशी टिळकांची भूमिका होती, याच सुमारास कोलकत्ता अधिवेशनात पारित झालेले ठराव देशाला पेलण्याजोगे नाहीत असा अभिप्राय व्यक्त करण्यास ना.गोखले यांनी सुरुवात केली. मवाळ गटाच्या या धोरणाला तोंड देण्यासाठी जहालगटाने आपला चतु:सूत्रीचा प्रचार चालूच ठेवला व आपल्याला जास्तीच जास्त लोकांचा पाठिंबा मिळावा म्हणून प्रयत्न चालू ठेवले. सुरत हा फेरोजशहा मेहतांचा बालेकिल्ला त्यामुळे अधिवेशनाचे नेतृत्व मवाळांकडे जाणार होते. याच सुमारास विषयनियामक समितीत मागील चार प्रमुख ठरावांचा समावेश न केल्याची बातमी पसरली. त्यामुळे जहालांमध्ये जास्तच साशंकता पसरली. काही तरुण जहाल राष्ट्रवादी गटाने जहालांची वेगळी काँग्रेस मांडण्याचा प्रस्ताव मांडला. परंतु, काँग्रेस मोडणे हे योग्य ठरणार नव्हते व त्यामुळे टिळकांनी त्यांना या विचारापासून परावृत्त केले. अधिवेशनाच्या उद्घाटनापूर्वी लालाजी आणि टिळक यांनी सुरेंद्रनाथ आणि गोखले यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी टाळाटाळकरण्यास सुरुवात केली. त्यामुळे या शंकांना जास्तच उत आला. रासबिहारी घोषांचे अध्यक्षपदासाठी नाव सुचवण्यात आले तेव्हा बंगाली तरुण नेत्यांनी विरोध दर्शवला व सभा बारगळली. पुढच्या दिवशी टिळकांनी व्यासपीठावर एक चिट्ठी माळवींकडे पाठवली व आपल्याला अध्यक्षांच्या निवडीबाबत बोलायचे आहे असे सांगितले माळवींनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे टिळक स्वतःच व्यासपीठावर चढले आणि माइक आपल्या हाती घेतला तोच एकच गोंधळ उडाला, खुर्च्या फेकल्या गेल्या आणि अधिवेशन बारगळले. या घटनेनंतरही टिळकांनी समेटाचे प्रयत्न केले. परंतु, मवाळांनी त्यांना दाद दिली नाही. काँग्रेसचे विभाजन झाले आणि याच दरम्यान इंग्रज सरकारने टिळकांवर खटला भरून त्यांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली.

टिळक मंडालेत असताना १९०८ ते १९१४ या दरम्यानचे सर्व राजकारणाला मरगळ आली होती. काँग्रेस पुन्हा जुनेच राजकारण करू पाहत होती. सरकारवर असलेला दबाव आता कमी झाला आणि हजारोच्या संखेत अधिवेशनास उपस्थित राहणार्‍या लोकांची संख्या एकदमच कमी झाली. १९०७ साली सुरत अधिवेशनास जवळपास १६०० प्रतिनिधी विविध प्रांतातून आले होते परंतु हीच संख्या रोडावत जाऊन १९१२ साली २०७ वर आली.याच दरम्यान काँग्रेसच्या निष्क्रियतेविरूद्ध स्टेट्समन या वृत्तपत्राने आपला अभिप्राय व्यक्त केला तो असा काही वर्षांपूर्वी भारताच्या सार्वजनिक जीवनात प्रभावशाली भूमिका बजावणारी काँग्रेस आता प्रभावी राहिलेली नाही.

१९१४ मध्ये टिळकांची मंडालेतून सुटका झाली. आता जहालांना पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. यासाठी त्यांनी ना.गोखले यांची भेट घेऊन आपल्या काँग्रेसच्या प्रवेशाबाबत अनुकूलता दर्शविली ना. गोखले यांनी टिळकांना विरोध केला व कृपया तुम्ही काँग्रेसमध्ये येऊ नका असे सांगितले. त्यावर टिळक म्हणाले, “मी काँग्रेसमध्ये येणार आणि ती काबीज करणार. ज्या काँग्रेसने आपल्याला दूर केले त्या काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश का करायचा अशी टिळकांच्या सहकार्यांचीही भूमिका होती. परंतु आपण काँग्रेसच्या बाहेर राहून नवीन पक्ष स्थापन केला तर मवाळ(काँग्रेस), मुस्लीम लिग आणि आता त्यात जहाल पक्षाची भर पडणार होती, याचा फायदा घेऊन ब्रिटिश सरकार पुन्हा अंतर्गत दुही माजवणार हे टिळकांना माहीत होते. त्यामुळे असे करणे देशहिताचे होणार नव्हते.१९१५ मध्ये ना. गोखले आणि फेरोजशह मेहता या दोन प्रमुख मवाळ नेत्यांचा मृत्यू झाला आणि काँग्रेसची सूत्रे टिळकांच्या हातात आली आणि इथून खर्‍या अर्थाने काँग्रेस मधील टिळक युगाची सुरुवात झाली. जी काँग्रेस एक थंड गोळा होऊन पडली होती त्याला उब देण्याचे कार्य टिळकांनी सुरु केले. होमरूलचा ठराव काँग्रेसमध्ये सामील करून भारतभर दौरा करून स्वराज्याचा झंझावाती प्रचारास त्यांनी सुरुवात केली.

जोपर्यंत समाजातील प्रत्येक वर्गाला, व्यक्तींना आपण काँग्रेसमध्ये सहभागी करून घेत नाही तोपर्यंत स्वराज्य प्राप्ती कठीणच होती हे टिळकांना माहीत होते. त्यातच जातीजातीत, धर्माधर्मात भेद करण्याचे काम ब्रिटिश सरकार करू पाहत होती, किंबहुना हीच त्यांची नीती होती. १९०९ साली मोर्ले-मिंटो कराराद्वारे सरकारने मुसलामांना काँग्रेसपासून वेगळे केले होते आणि लखनौ करारात सरकारला शह देऊन मुसलमांना काँग्रेसमध्ये सामील करून घेण्याचे काम टिळकांनी केले या अधिवेशनात प्रसिद्ध लखनौ करार झाला.

त्याचप्रमाणे ब्राह्मणेतर चळवलींनाही स्वराज्य कार्यात सामील करून घेणे गरजेचे होते.आणि यासाठी विठ्ठल रामजी शिंदे हे टिळकांच्या मदतीस धावून आले. टिळकांच्या स्वराज्याच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी कर्मवीर शिंद्यांनी शनिवारवाड्यावर अठरा पगडजातींच्या लोकांची व वारकरी संप्रदायाची सभा आयोजित केला. ब्राह्मणांचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी टिळकांना उपस्थित राहण्याची विनंती केली. टिळकांनी मोठ्या मनाने ही विनंती मान्य केली. या अधिवेशनात त्यांनी सर्व मतभेद, पूर्वग्रह विसरून जाऊन सर्वांनी स्वराज्याच्या कामाला लागायला हवे असे सांगितले. ते म्हणाले, “आता आपल्याला जे स्वराज्य पाहिजे आहे, ते पूर्वीच्या पेशवाईसारखे स्वराज्य नव्हे तर पाश्चात्य धर्तीवरील स्वराज्य पाहिजे. भावी स्वराज्यात ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांना सारखेच हक्क आणि त्यांचा दर्जा सारखाच राहील.” एकतेचं महत्त्व सांगून सरकारची भेदनीती उघड करताना ते म्हणतात, “चार बैल एकजुटीने होते, तोपर्यंत सिंहाचे काही चालत नव्हते. तेव्हा त्याने त्यांच्यात फूट पडली व एकेकास खाऊन टाकले. इंग्रज हा सिंह आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे चार बैल!”

पुढे शिंद्यांच्याच पुढाकाराने अस्पृश्यता निवारणाची स्वतंत्र परिषद घ्यायचे ठरले. २४ मार्च, १९१८ च्या परिषदेत टिळकांनी काँग्रेसने अस्पृश्य वर्गाचे प्रतिनिधी घेऊन आपल्या कार्यास त्यांचा पाठिंबा मिळवावा असा ठराव मांडला पुढे त्यांचे जोरदार भाषण झाले. टिळक म्हणतात, “जुन्या काळात ब्राह्मणांच्या जुलमाने ही चाल पडली हे मी नाकारत नाही; पण या रोगाचे आता निर्मूलन झालेच पाहिजे,अस्पृश्यता देवासही मान्य नाही. ब्राह्मणांसकट सार्‍या जाती जर त्यानेच निर्माण केल्या असतील तर त्याला कशी मान्य असेल अस्पृश्यता? अस्पृश्यता जर देवास मान्य असेल तर मी त्यास देवच मानणार नाही.”

विठ्ठलराव शिंदे म्हणतात, “या त्यांच्या गर्जनेने जो गजर सभेत उडाला त्यांत मंडप कोसळून पडतोसे वाटले अशा प्रकारे टिळकांनी सर्वच जातींतील, धर्मांतील लोकांना स्वराज्य कार्यात सामील करून घेण्यासाठी प्रयत्न केले आणि देशासाठी सर्वांनी एक व्हावे असे आवाहन केले. ”

टिळक आपल्या कारकिर्दीत काँग्रेसचे अध्यक्ष कधीही झाले नाही परंतु ज्याप्रमाणे एक नेता आपल्या देशाला, समाजाला, संघटनेला संघटित करून सतत कार्यरत राहतो त्याचप्रमाणे टिळकांनी काँग्रेसला कार्यप्रवण बनवले. त्यांनी काँग्रेसचे मवाळ राजकारण जहाल करून काँग्रेसला खर्‍या अर्थाने लोकमान्यता मिळवून दिली. न. चिं. केळकर म्हणतात त्याप्रमाणे आम्ही भांडू पण मोडणार नाही आणि तुम्ही मोडले तर आम्ही पुन्हा जोडू अशी टिळकांची भूमिका होती. काँग्रेसचे विभाजन झाल्यावरही समेटाचे अनेक प्रयत्न त्यांनी केले. काँग्रेसला कायम जीवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. टिळकांच्या तुरुंगवासापासून खर्‍या अर्थाने एका वेगळ्या क्रांतीला सुरुवात झाली. आपल्या मागणीपाठोपाठ लोकसंघटनेची शक्ती पाहिजे व त्यासाठी नेत्यांनी, पुढार्‍यांनी स्वार्थाचा विचार न करता पुढे आले पाहिजे. ही विचारसरणी काँग्रेसच्या राजकारणात प्रविष्ट करण्याचे पहिले श्रेय लोकमान्यांचेच!

संदर्भ-

१. आधुनिक भारत-आचार्य जावडेकर

२. टिळक विचार- भा.कृ केळकर

३. लोकमान्य ते महात्मा- डॉ. सदानंद मोरे

४. महाराष्ट्रातील काँग्रेसचा स्वातंत्रलढा -डॉ.सुमन वैद्य,डॉ.शांता कोठेकर






No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...