


लासुर येथील आनंदेश्वर मंदिर उभारण्यासाठी ज्या दगडांचा वापर करण्यात आला आहे तसे दगड लासुर परिसरात किंवा संपूर्ण दर्यापूर तालुक्यात कुठेही आढळत नाही. यामुळे हे मंदिर बांधण्यासाठी हे दगड कुठून आणले असावे याचा ठोस पुरावा उपलब्ध नसला तरी हे दगड दीडशे किलोमीटर अंतरावरून सालबर्डी येथील सातपुडा पर्वतरांगेतून आणले असावे असा अंदाज आहे. मंदिर परिसरातून वाहणारा पूर्णा नदीतून हे दगड आणले असावे किंवा हत्तीच्या साह्याने हे दगड या परिसरात आणण्यात आले असावेत.
तर कोणी म्हणते देवांनी बांधले तर कोणी म्हणते राक्षसांनी हे बांधकाम केले. अनेकांची वेगवेगळी मते असली तरी अष्टकोनी आकाराच्या या मंदिरावर छत नाही. कोणी म्हणत छत बांधायचं राहून गेलं तर काही तज्ञ म्हणतात गाभाऱ्यात लख्ख प्रकाश यावा यासाठी हे असंच खुलं ठेवण्यात आलं. या न बांधलेल्या छताबद्दल आख्यायिका अशी आहे, की ते मंदिर दैत्यांनी एका रात्रीत बांधले, दैत्य सकाळ होताच पळून गेले, छताचा भाग बांधण्याचा राहून गेला !
मंदिर उंचावर आहे. त्याचा परिसर रम्य आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यास, नजर जरा सभोवताली डोकावून फिरवली, की सगळीकडे हिरवेगार दृश्य दिसते ! झाडे आणि खाली पसरलेले कुरण- त्यात चरत असलेल्या गायी आणि वर पसरलेले, मळभ दाटून आलेले आभाळ. फार छान देखावा !
मंदिराचे लोखंडी फाटक ओलांडून आत आवारात गेले, की उजव्या हाताला आहे पिंपळ ! मस्त पसरलेल्या हिरवागार… वाऱ्यावर मनसोक्त झुलणारा… झाडाभोवती पार बांधलेला.. पाराशी निवांत बसलेली गावातील एक-दोन जुनी खोडे… अंगात बंडी-धोतर, सोबत पाण्याची जुनाट बाटली आणि काठी… डोक्यात असंख्य विचार.. विचारांची मालिका तोडत कोणी पाहुणा बोलला तर मात्र त्यांच्या गावरान भाषेत संवाद साधणारी !

सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह रचना :
गाभारा
मंदिर गाभाऱ्यात १२ खांब असून सर्व खांब विविधतेने नटलेले आहेत.
अञ्जनीगर्भसम्भूत कपीन्द्रसचिवोत्तम । रामप्रिय नमस्तुभ्यं हनूमन् रक्ष सर्वदा ॥

गोलाकार छताचा भाग संपूर्ण मोकळा. त्या छतातून दिसणारे निळे आकाश आणि तेथे चालणारा उनसावल्यांचा खेळ- सगळेच अचंबित करणारे. उत्तरायण काळात दुपारी बाराला सूर्य माथ्यावर असतांना इथे पडणारा प्रकाश व सावल्या पाहताना गणित आणि खगोलचे मिश्रण स्तंभीत करणारे आहे.
मंदिर त्रिदल आहे, म्हणजे तीन गाभाऱ्यांनी बनलेले, प्रवेश केल्यावर उजव्या आणि डाव्या बाजूंना दोन उपगाभारे व समोर एक मुख्य गाभारा. डावीकडील गाभाऱ्यात मंदिर परिसरात सापडलेल्या काही मूर्ती ठेवल्या आहेत तर उजवीकडील गाभाऱ्यात एक विहीर होती असे म्हणतात. तेथून तळघरात जाण्यासाठी छुपा रस्ता होता. ती विहीर बुजवलेली दिसते. तसेच तो गाभारा कुलूपबंद आहे.
तर पूर्व आणि पश्चिमेकडे बांधण्यात आलेल्या गाभाऱ्यांमध्ये कोणत्याही मुर्त्या नाहीत. मात्र या ठिकाणी अनेक कोरीव दगड पडलेली असून या गाभाऱ्यांमध्ये स्थापन केल्या जाणाऱ्या मुर्त्यांचे काम अर्धवट राहिले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो.

मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यास रुंद दगडी चौथरा आहे. खाली उतरून देखील प्रदक्षिणा मारता येते, त्यासाठी सिमेंटची पाऊलवाट बनवली आहे, ती अलिकडे बनवली असावी. मंदिराची सुबकता बाहेरूनदेखील ठायी ठायी जाणवते, विशिष्ट रचनेत मांडलेले दगड लक्ष वेधून घेतात. कोरीव काम बाहेरच्या बाजूनेसुद्धा आहे. पाना-फुलांची नक्षी, कोरलेले गायक-नर्तक-वादक यांच्यासोबतच नरसिंह अवतार आणि कृष्णासह गोपिका यांच्या मूर्ती मोहक दिसतात. काही नक्षीकाम काळाच्या ओघात भंगलेले आढळते. मंदिराच्या बाहेर भिंतीवर अनेक कोनाडे ( देवकोष्ट ) असून त्यामध्ये विष्णू, शिवब्रम्हा, राधाकृष्ण, गोवर्धन यांच्या कोरीव मुर्त्या आहेत. यासोबतच हत्ती, घोडे, लढवय्ये, डोंबारी, नर्तक, भक्तगण, माकड, हनुमान, गणपती असे अनेक चित्र मंदिराच्या लावलेल्या दगडांवर करण्यात आले आहे.
मंदिराच्या आवारात लोकांना बसण्यासाठी लोखंडी बेंचेस आहेत. मंदिराचा परिसरदेखील स्वछ आहे. मंदिरात ना दानपेटी आहे, ना देणगी देण्यासाठी पावती फाडण्याची व्यवस्था. पण मंदिराचे एकूण कामकाज सुरळीत चाललेले दिसते. हे मंदिर एक संरक्षित स्मारक म्हणून पुरातत्त्व स्मारकासंबंधीच्या 1958 च्या अधिनियमानुसार घोषित करण्यात आले आहे. तसा सूचनावजा फलक फाटकाबाहेर लावण्यात आला आहे. या परिसरात फोटो तर इतके सुंदर येतात की अकोल्याच्या एका साडीच्या ब्रॅण्डने त्यांच्या जाहिरातीसाठी तेथे फोटोशूटदेखील केले आहे.
राज्य सरकारने या प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी काही निधी मंजुर केला आहे. या निधीत ही कामे प्रस्तावित आहेत. पहिल्या टप्प्यात मंदिरांची पडझड झालेले छत, प्रवेशद्वार, संरक्षण भिंत, शिखर, ओवऱ्या, खांब व घुमटावरील नक्षीकाम आदींची दुरुस्ती केली जाणार आहे. तसेच नवीन पद्धतीचे बांधकाम, फरशा, लोखंडी नळ्या उतरवून त्याजागी मंदिराच्या मूळ बांधकामाला साजेशी पुनर्बांधणी केली जाणार आहे. तसेच यामध्ये दगडांची भुकटी, चुना यांच्या सहाय्याने तडे भरून मूळ रूप देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात मंदिरांच्या पर्यटकांसाठी सोयीसुविधा, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे, भाविक निवास आदी कामे प्रस्तावित होती. तसेच मंदिरांच्या परिसरात अस्ताव्यस्त वाढलेल्या दुकानांचे व्यवस्थापन करून त्यांची पुनर्बांधणी प्रस्तावित होती. तर तिसऱ्या टप्प्यात मंदिर परिसरात पोहचण्यासाठी रस्त्यांचे जाळे आणि अन्य सुविधा सुधारण्याची कामे केली जाणार आहेत.
संदर्भ :-
१) अमरावरी जिल्हा गॅझेटीयर२) https://www.discovermh.com
३) https://www.lokmat.com
४) https://www.etvbharat.com
५) https://www.thinkmaharashtra.com
६) http://vidarbha-darshan.blogspot.com
७) http://shilpanandi.blogspot.com
कळस नसलेले लासूरचे प्राचीन आनंदेश्वर मंदिर, वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना
आनंदेश्वर मंदिर, लासूर, ता.दर्यापूर, जि.अमरावती.
वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले लासूरचे आनंदेश्वेर मंदिर अमरावती जिल्ह्याचे सांस्कृतिक वैभव आहे. दर्यापूर तालुका मुख्यालयापासून अकोला मार्गावर १२ कि.मी. अंतरावर पूर्णा नदीच्या काठावर लासूर नावाचे एक छोटेसे गाव आहे. गावाच्या दक्षिण दिशेला हेमाडपंथी प्राचीनकलेचा अप्रितम नमुना असलेले शिवमंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात जागृत शिवलिंगाची स्थापना केली आहे. १२ व्या शतकात बांधलेले हे शिवमंदिर आनंदेश्वर मंदिर या नावाने ओळखले जाते.
सद्यस्थितीत जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या तीन शाबूत हेमाडपंथी मंदिरांपैकी अग्रगण्य असलेले हे मंदिर ३५०० चौ. फुटांच्या अतिभव्य दगडी बांधकामात आहे. वरुन स्वस्तिक आकार असणाऱ्या या मंदिराला कळस नाही. हे मंदिर अष्टकोनी असून समोरच्या भागाकडून एखाद्या भल्यामोठ्या रथाला हत्ती जुंपल्यासारखे दिसते. या मंदिराचा दर्शनी भाग उत्तरेकडे असून दारे व खिडक्या पुर्व-पश्चिम व उत्तर दिशेला आहेत. संपुर्ण मंदिराचे बांधकाम एकावर एक दगडी शिळा रचून नंतर त्यावर कोरीव काम केलेले आहे. मंदिराच्या आतील भागात १२ खुले व भिंतीमधील ६ असे एकूण १८ खांब आहेत. लासूरचे हे मंदिर अतिशय देखणे आणि उत्तरायण काळात दुपारी बाराला सूर्य माथ्यावर असतांना इथे पडणारा प्रकाश व सावल्या पाहताना गणित आणि खगोलचे मिश्रण स्तंभीत करणारे आहे. सध्या लासूर येथील पुरातन वास्तु भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखमध्ये आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या तीन शाबूत हेमाडपंथी मंदिरांपैकी अग्रगण्य असलेले हे मंदिर ३५०० चौ. फुटांच्या अतिभव्य दगडी बांधकामात आहे. वरुन स्वस्तिक आकार असणाऱ्या या मंदिराला कळस नाही. हे मंदिर अष्टकोनी असून समोरच्या भागाकडून एखाद्या भल्यामोठ्या रथाला हत्ती जुंपल्यासारखे दिसते. या मंदिराचा दर्शनी भाग उत्तरेकडे असून दारे व खिडक्या पुर्व-पश्चिम व उत्तर दिशेला आहेत. संपुर्ण मंदिराचे बांधकाम एकावर एक दगडी शिळा रचून नंतर त्यावर कोरीव काम केलेले आहे. मंदिराच्या आतील भागात १२ खुले व भिंतीमधील ६ असे एकूण १८ खांब आहेत. लासूरचे हे मंदिर अतिशय देखणे आणि उत्तरायण काळात दुपारी बाराला सूर्य माथ्यावर असतांना इथे पडणारा प्रकाश व सावल्या पाहताना गणित आणि खगोलचे मिश्रण स्तंभीत करणारे आहे. सध्या लासूर येथील पुरातन वास्तु भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखमध्ये आहे.
माहिती साभार – फेसबुक काका आणि गुगल मामा.
कळस नसलेले लासूरचे प्राचीन आनंदेश्वर मंदिर, वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2022 03:12 PM2022-03-27T15:12:04+5:302022-03-27T15:19:19+5:30
कळस नसलेले लासूरचे प्राचीन आनंदेश्वर मंदिर, वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना
धनंजय धांडे
अमरावती : अकोला मार्गावर लासूरचा बसथांबा लागतो. पूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या या छोट्याशा खेडेगावाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त करून देणारी प्राचीन वास्तू या गावात शेकडो वर्षांपासून एखाद्या इतिहासपुरुषाप्रमाणे धीरोदात्तपणे उभी आहे. ती म्हणजे हेमाडपंथी स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना असलेले प्राचीन आनंदेश्वर शिवमंदिर. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या मंदिराच्या आतील, बाहेरील, छतावरील कोरीव नक्षीकाम हे अजिंठा-वेरूळ लेण्यातील कोरीव कामाशी साधर्म्य सांगणारे आहे.
आनंदेश्वर शिवालयाची उभारणी इ.स. बाराव्या शतकात देवगिरीच्या यादववंशीय राजाच्या काळात झाल्याची माहिती मंदिर अभ्यासक सांगतात.
साधारणत: साडेतीन हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेले अतिभव्य बांधकामाचे हे दगडी शिल्प दुरून एखाद्या मजबूत किल्ल्याप्रमाणे भासते. स्वस्तिक चिन्हाच्या आकारात बांधकाम आहे. ऐतिहासिक मंदिरांच्या उलट या मंदिराला कळस नाही. अभ्यासकांचे मते, ते कदाचित मंदिराच्या आतील भागत व सभामंडपात भरपूर प्रकाश यावा, या हेतूने मंदिरावर कळसाची उभारणी केली नसावी.
मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण रचना
उत्तरमुखी मंदिराचा आकार अष्टकोनी आहे. दक्षिण भाग हा चिरेबंदी दगडी भिंतीने बंद असून पूर्व-पश्चिम व उत्तर दिशेला खिडक्या व दरवाजे आहेत. दर्शनी भागाकडून या वास्तूकडे बघितल्यास एखाद्या भल्यामोठ्या रथाला हत्ती जुंपल्याचा भास होतो. मुख्य प्रवेशद्वारासमोर मोठा दगडी ओटा (पार) बांधलेला आहे. मंदिराचे बांधकाम मोठ्या दगडी फाड्या चढत्या-उतरत्या क्रमात एकावर एक रचून, पकड घट्ट रहावी याकरिता प्रत्येक फाडीच्या टोकाला खड्डे करून त्यामध्ये लोखंडी कांबा बसविण्यात आल्या. मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्याचे कोनातील माप ९० अंशाचे भरते.
नक्षीदार कोरीव काम
पाच पदरी दगडी चौकट असलेल्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच भव्य, खुला सभामंडप दृष्टीस पडतो. बारा खुले आणि सहा भिंतीत बंदिस्त असणारे दगडी स्तंभ या मंदिराला भक्कम आधार देतात. प्रत्येक खांबावर कोरीव, कातीव असे शिल्पकाम आढळते. मंदिराच्या आतील व बाहेरील भिंतीवर विविध भौमितिक आकार, लता-वेली, फुले-फळे यांची वेल-बुट्टी शैलीत कोरीव कलाकुसर आहे. मंदिराची एकंदर रचना ही शिल्पकला व स्थापत्यकला याचा वैशिष्ट्यपूर्व संगम साधणारी आहे. मंदिराच्या प्रत्येक दालनाला नक्षीदार खिडक्या आहेत. पूर्व-पश्चिम दिशेने हिरवीगार वनश्री, दक्षिणेला जीवनदायी पूर्णा नदी या विहंगम पार्श्वभूमीवर या ऐतिहासिक वास्तूभोवती असलेल्या प्रशस्त प्रदक्षिणा मार्गावर उभे राहिल्यास आसपासची टुमदार गाव-खेडी व निसर्गसौंदर्य मानवी मनाला निश्चितपणे भुरळ घालतात.
आत्मशुद्धी, मनशांतीचे प्रतीक
शिवालयातील गाभाऱ्यात जागृत असे आनंदेश्वर शिवलिंगाच्या रूपाने स्थापित आहे. त्यावर ताम्र धातूची नागप्रतिमा विराजमान आहे. दैनंदिन पूजेसह या मंदिरात महाशिवरात्रीचा सोहळा म्हणजे लासूर ग्रामवासीयांकरिता दिवाळीच असते.
चिंता, काळजी आणि काही अपेक्षा....
पूर्णानदीच्या पुरामुळे वास्तूला धोका पोहोचू नये म्हणून संरक्षक भिंतीचे बांधकाम शासनाच्यावतीने करण्यात आले. मात्र, कालौघात मंदिरावरील नक्षीकाम लुप्त होत आहे. भेगा मोठ्या होत आहेत. काही कोनाड्यामधील मूर्ती नाहीशा झाल्या आहेत. या वास्तूची देखभाल भारतीय पुरातत्त्व विभाग, औरंगाबाद यांच्याकडे आहे.
https://www.lokmat.com/amravati/vidarbha-famous-no-roof-temple-the-ancient-anandeshwar-temple-lasur-a736/
पाहिल तो नक्कीच थक्क राहिल छत नसलेले आनंदेश्वर मंदिर आहे आश्चर्याचा खजिना
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात एका छोट्याशा गावात आश्चर्याचा खनिजा असलेले एक हेमाडपंथी महादेव मंदिर ( Anandeshwar Mahadev Temple ) आहे. या अष्टकोनी आकाराच्या मंदिरावर छत नाही. श्रावण महिना असल्यामुळे सध्या या मंदिर परिसरात अमरावती आणि अकोला या दोन जिल्ह्यातील भाविकांची गर्दी पाहायला मिळते आहे.
अमरावती - कोणी म्हणते देवांनी बांधले तर कोणी म्हणते राक्षसांनी हे बांधकाम केले. अनेकांची वेगवेगळी मते असली तरी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात येणारे लासुर येथील स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असणारे हेमाडपंथी शैलीचे आनंदेश्वर अर्थात महादेव मंदिर ( Anandeshwar Mahadev Temple Amravati ) जो कोणी पाहिल तो थक्क होईल, असा आश्चर्याचा खजिनाच आहे. अष्टकोनी आकाराच्या या मंदिरावर छत नाही. कोणी म्हणत छत बांधायचं राहून गेलं तर काही तज्ञ म्हणतात गाभाऱ्यात लख्ख प्रकाश यावा यासाठी हे असंच खुलं ठेवण्यात आलं. या भागात दूरपर्यंत कुठेही न सापडणाऱ्या दगडांनी रचलेल्या ह्या मंदिरावर अतिशय कोरीव नक्षीकाम आहे. श्रावण महिना असल्यामुळे सध्या या मंदिर परिसरात अमरावती आणि अकोला या दोन जिल्ह्यातील भाविकांची गर्दी पाहायला मिळते आहे. ( amaravati lasur Anandeshwar mahadev temple )
असे आहे मंदिराचे वैशिष्ट्य - अमरावती आणि अकोला या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर अमरावती जिल्ह्यात पूर्णा नदीच्या काठावर लासुर या गावात महादेवाचे मंदिर आहे. अष्टकोणी आकाराचे हे मंदिर जणू भल्या मोठ्या रथाला हत्ती जुमला असावा अशाच स्वरूपाचे दिसते. मंदिराचे संपूर्ण बांधकाम दगडीपाड्या एकावर एक रचून करण्यात आले असून प्रत्येक दगडावर कोरीव काम करण्यात आले आहे. मंदिराच्या आत मध्ये व सभागृहात भरपूर प्रकाश यावा या उद्देशाने मधला सभागृह मंडप उघडा ठेवण्यात आला असावा असे काहींचे म्हणणे आहे तर मंदिराचे बांधकाम अर्धवट राहिल्यामुळे हा घुमट उघडाच असल्याचे काही मंडळी सांगतात. मात्र हा उघडा असणारा घुमट या मंदिराच्या सौंदर्यात अफाट भर घालतो आहे.

आनंदेश्वर महादेव मंदिर
या मंदिरात एकूण 18 खांब आहेत यापैकी बारा खांब हे खोले असून सहा खांब हे भिंतीमध्ये आहेत. प्रत्येक खांबावर अतिशय बारीक आणि शिलाईदार शिल्पकाम आढळते कोरीव आकृत्या आणि कलात्मक नक्षीकामामुळे प्रत्येक खांब अतिशय सुंदर दिसतो मंदिराच्या आतील आणि बाहेरील भिंतीवर भूमितीय आकृत्या लता वेली फुले फळे यांची कोरीव कलाकुसर आहे काही ठिकाणी भिंतीवर आलेख पद्धतीचा वापर झालेला आढळतो. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत मध्ये भव्य खुला सभा मंडप आहे आणि मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर उभे राहिल्यास पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील भागात तेवढ्याच आकाराचे दोन दालन आहेत मंदिराच्या पूर्वेकडील दालनाच्या छतावर सुंदर आणि अप्रतिम भौमितिक आकृत्या काढलेल्या आहे. या मंदिरात एका गाभाऱ्यात शिवलिंग आहे तर पूर्व आणि पश्चिमेकडे बांधण्यात आलेल्या गाभाऱ्यांमध्ये कोणत्याही मुर्त्या नाहीत. मात्र या ठिकाणी अनेक कोरीव दगड पडलेली असून या गाभाऱ्यांमध्ये स्थापन केल्या जाणाऱ्या मुर्त्यांचे काम अर्धवट राहिले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो.
छत नसलेले आनंदेश्वर मंदिर
हेही वाचा - CNG Rate : देशात सर्वात महाग सीएनजी दर नागपुरात, अचानक झाली मोठी वाढ
मंदिराला अमर्याद कोन - अष्टकोनी दिसणाऱ्या या मंदिराला अमर्याद असंख्य कोन आहेत. प्रत्येक कोन हा 90 अंशाचा भरतो, हे या कोनांचे वैशिष्ट्य आहे. मंदिराच्या बाहेर भिंतीवर अनेक कोनाडे असून त्यामध्ये विष्णू, शिवब्रम्हा, राधाकृष्ण, गोवर्धन यांच्या कोरीव मुर्त्या आहेत. यासोबतच हत्ती, घोडे, लढवय्ये, डोंबारी, नर्तक, भक्तगण, माकड, हनुमान, गणपती असे अनेक चित्र मंदिराच्या लावलेल्या दगडांवर करण्यात आले आहे.
छत नसलेले आनंदेश्वर मंदिर
दिडशे किलोमीटर अंतरावरून आणले असावे दगड ! लासुर येथील आनंदेश्वर मंदिर उभारण्यासाठी च्या दगडांचा वापर करण्यात आला आहे तसे दगड लासुर परिसरात किंवा संपूर्ण दर्यापूर तालुक्यात कुठेही आढळत नाही. यामुळे हे मंदिर बांधण्यासाठी हे दगड कुठून आणले असावे याचा ठोस पुरावा उपलब्ध नसला तरी हे दगड दीडशे किलोमीटर अंतरावरून सालबर्डी येथील सातपुडा पर्वतरांगेतून आणले असावे असा अंदाज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या इतिहास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संतोष बनसोड यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला. मंदिर परिसरातून वाहणारा पूर्णा नदीतून हे दगड आणले असावे किंवा हत्तीच्या साह्याने हे दगड या परिसरात आणण्यात आले असावे असे देखील प्रा. डॉ. संतोष बनसोड म्हणाले.
छत नसलेले आनंदेश्वर मंदिर
हेही वाचा - Sexting : धक्कादायक: मोबाईलवरुन 'सेक्सटिंग'च्या प्रमाणात वाढ, अशी ठेवा मुलांवर नजर
खिलजीच्या आक्रमणामुळे मंदिराचे बांधकाम राहिले अर्धवट ! लासुर येथील आनंदेश्वर मंदिर हे इसवी सन 12 व्या शतकात यादव राज्याच्या काळात देवगिरीच्या राज्याचे प्रधान हेमांद्री पंथ यांनी साडेसातशे वर्षांपूर्वी बांधले असावे असा इतिहासकारांचा अंदाज आहे. याच काळात अल्लाउद्दीन खिलजीने अचलपूर मार्गाने देवगिरी अर्थात दौलताबादवर आक्रमण केले होते. या प्रवासाचा मार्ग अचलपूर वरून दर्यापूर असा होता. याच काळात ह्या भागात मंदिर उभारले जात असताना अल्लाउद्दीन खिलजीच्या सैन्याची संख्या आणि त्यांची आक्रमकता पाहता या मंदिराच्या बांधकामासाठी असणारे शिल्पकार ,मूर्तिकार, विशारद, मजूर हे सर्वजण पळून गेले असावे. यामुळे भारताच्या इतिहासात स्थापत्यकलेत वैशिष्ट्यपूर्ण असणारे लासूरचे हे मंदिर अर्धवटच राहिले अशी माहिती देखील इतिहास तज्ञ प्रा. डॉ. संतोष बनसोडे यांनी दिली.
छत नसलेले आनंदेश्वर मंदिर
श्रावण महिन्यात भाविकांची गर्दी - दर्यापूर अकोला मार्गावर दर्यापूर पासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या लासुर गावात असणाऱ्या शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असणारे आनंदेश्वर मंदिर हे तसे दुर्लक्षित राहिले आहे. आजही अनेकांना हे मंदिर ठाऊक सुद्धा नाही. आता गत काही वर्षांपासून या ठिकाणी श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला भाविकांची गर्दी वाढायला लागली आहे.
हेही वाचा - viral video : नागाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल; जीवाचा धोका पत्करून तरूणांचा खेळ
पातोडीच्या भाजीचा नैवेद्य - महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी लासुर येथील आनंदेश्वर मंदिरात महाप्रसाद वितरित केला जातो. लासूरच्या महादेवाला पातोडीच्या भाजीचा नैवेद्य अर्पण केला जातो. आणि हाच महाप्रसाद वितरित होतो. या परिसरात कोळी लोकांची वसाहत आहे. फार पूर्वीपासून या भागात कोळी समाज राहतो आणि लग्न सोहळ्यात कोळी समाजात पातोडीची भाजी मोठ्या आवडीने केली जाते. यामुळेच या महादेव मंदिरात देखील महादेवाला पातोडीच्या भाजीचाच नैवेद्य अर्पण केला जातो, अशी माहिती देखील प्रा. डॉ. संतोष बनसोड यांनी दिली.

आनंदेश्वर महादेव मंदिर पिंड
मंदिर टिकण्यासाठी प्रयत्न गरजेचे - खरंतर
लासुर येथील आनंदेश्वर मंदिर हा अमरावती जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचा
पौराणिक आणि ऐतिहासिक ठेवा आहे. या मंदिराच्या काही भागातील दगड निघत असून
एका ठिकाणी खड्डा पडला आहे. पुरातत्त्व विभागाकडे या मंदिराची जबाबदारी
असून या मंदिरात अनेक ठिकाणी डागलूची झाल्याचे पाहायला मिळते मात्र हे
मंदिर कायमस्वरूपी टिकावे यासाठी मोठे प्रयत्न होण्याची गरज आहे. या
मंदिराकडे पुरातत्व विभागाने आणि शासनाने देखील काळजीपूर्वक लक्ष देणे
अत्यंत गरजेचे असल्याबाबत या परिसरातील नागरिकांसह येथे येणारे भाविक अतिशय
तळमळीने व्यक्त होतात.
https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/amravati/lasur-anandeshwar-mahadev-temple-amravati-is-roofless-mahadev-temple/mh20220802203952165165606
लासूरचे आनंदेश्वर शिवमंदिर
लासूर नावाचे खेडेगाव अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूरपासून बारा किलोमीटर अंतरावर आहे. ते प्रसिद्ध आहे तेथील आनंदेश्वर शिव मंदिरासाठी. लासूर गाव दर्यापूर-अकोला मार्गावर आहे. मंदिरापर्यंत जाण्यास सिमेंटचा रस्ता सुस्थितीतील आहे. आकर्षणाची गोष्ट म्हणजे ते शिवमंदिर आठशे वर्षे जुने, बाराव्या शतकात बांधलेले आहे.

मंदिर उंचावर आहे. त्याचा परिसर रम्य आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यास, नजर जरा सभोवताली डोकावून फिरवली, की सगळीकडे हिरवेगार दृश्य दिसते ! झाडे आणि खाली पसरलेले कुरण- त्यात चरत असलेल्या गायी आणि वर पसरलेले, मळभ दाटून आलेले आभाळ. फार छान देखावा !
मंदिराचे लोखंडी फाटक ओलांडून आत आवारात गेले, की उजव्या हाताला आहे पिंपळ ! मस्त पसरलेल्या हिरवागार… वाऱ्यावर मनसोक्त झुलणारा… झाडाभोवती पार बांधलेला.. पाराशी निवांत बसलेली गावातील एक-दोन जुनी खोडे… अंगात बंडी-धोतर, सोबत पाण्याची जुनाट बाटली आणि काठी… डोक्यात असंख्य विचार.. विचारांची मालिका तोडत कोणी पाहुणा बोलला तर मात्र त्यांच्या गावरान भाषेत संवाद साधणारी !

मंदिराचे संपूर्ण दगडी बांधकाम. ते मोठमोठ्या शिळांवर कलात्मक रीत्या रचलेले. तो हेमाडपंथी स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. त्याचा मेळ कोणार्कच्या सूर्यमंदिराशी जाणवतो. मंदिर फारच सुंदर दिसते ! दगडी पायऱ्या चढून वर गेल्यावर आत प्रशस्त सभामंडप आहे. विशेष म्हणजे त्या मंदिराला कळस नाही, गोलाकार छताचा भाग संपूर्ण मोकळा. त्या छतातून दिसणारे निळे आकाश आणि तेथे चालणारा उनसावल्यांचा खेळ- सगळेच अचंबित करणारे. या न बांधलेल्या छताबद्दल आख्यायिका अशी आहे, की ते मंदिर दैत्यांनी एका रात्रीत बांधले, दैत्य सकाळ होताच पळून गेले, छताचा भाग बांधण्याचा राहून गेला !

अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिर ज्या दगडी शिळांनी बांधले आहे, त्या प्रकारचा दगड आसपासच्या जवळपास दोनशे किलोमीटर परिघात सापडत नाही. त्यामुळे एवढे प्रचंड दगड त्या परिसरात आणले कसे? तो संशोधनाचाच विषय आहे ! मंदिर हे सभामंडपातील बारा खांब आणि भिंतीतील सहा अशा एकूण अठरा दगडी खांबांनी तोलून धरले आहे. प्रत्येक खांब खूप सुंदर, कोरीव काम असलेला, भिंतींवर- अगदी छतावरदेखील नक्षीकाम कोरलेले आहे ! छिन्नी-हातोड्यासारख्या आयुधांनी अशी सुंदर शिल्पे कोरणे म्हणजे खरेच कमाल ! मंदिर त्रिदल आहे, म्हणजे तीन गाभाऱ्यांनी बनलेले, प्रवेश केल्यावर उजव्या आणि डाव्या बाजूंना दोन उपगाभारे व समोर एक मुख्य गाभारा. डावीकडील गाभाऱ्यात मंदिर परिसरात सापडलेल्या काही मूर्ती ठेवल्या आहेत तर उजवीकडील गाभाऱ्यात एक विहीर होती असे म्हणतात. तेथून तळघरात जाण्यासाठी छुपा रस्ता होता. ती विहीर बुजवलेली दिसते. तसेच तो गाभारा कुलूपबंद आहे.

दोन यक्षमूर्ती बाहेर दाराशी डाव्या-उजव्या बाजूंला आहेत. त्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी दिसतात. शिवलिंग प्राचीन आहे. बेलपत्री आणि फुले वाहिलेली काळीशार पिंड मोठी सुरेख दिसते !

मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यास रुंद दगडी चौथरा आहे. खाली उतरून देखील प्रदक्षिणा मारता येते, त्यासाठी सिमेंटची पाऊलवाट बनवली आहे, ती अलिकडे बनवली असावी. मंदिराची सुबकता बाहेरूनदेखील ठायी ठायी जाणवते, विशिष्ट रचनेत मांडलेले दगड लक्ष वेधून घेतात. कोरीव काम बाहेरच्या बाजूनेसुद्धा आहे. पाना-फुलांची नक्षी, कोरलेले गायक-नर्तक-वादक यांच्यासोबतच नरसिंह अवतार आणि कृष्णासह गोपिका यांच्या मूर्ती मोहक दिसतात. काही नक्षीकाम काळाच्या ओघात भंगलेले आढळते. वरून बघितल्यास मंदिर स्वस्तिकाच्या आकाराचे आहे असे दिसते. एका प्रचंड रथाला हत्ती जोडलाय असादेखील भास होतो.

असे म्हणतात, की हे संपूर्ण मंदिर बऱ्याच वर्षांअगोदर जमिनीच्या आत गडप होते. हळूहळू मंदिराचा छताकडील भाग वर येऊ लागला. गावकऱ्यांनी जमिनीतून हे विहिरीसारखे वर काय येते याचा शोध घेतला, हकिगत ब्रिटिश अधिकाऱ्यांना कळल्यावर त्यांनी खोदकाम केले, उत्खननात हे लक्षवेधी मंदिर बाहेर आले ! मंदिराची वेळोवेळी डागडुजी करण्यात आली आहे, गरज पडेल तेथे सिमेंट लावून दगड सांधण्यात आले आहेत. पुरातत्त्व विभागाने ती जबाबदारी नीट पार पाडली हे दिसून येते.

मंदिराच्या आवारात लोकांना बसण्यासाठी लोखंडी बेंचेस आहेत. मंदिराचा परिसरदेखील स्वछ आहे. मंदिरात ना दानपेटी आहे, ना देणगी देण्यासाठी पावती फाडण्याची व्यवस्था. पण मंदिराचे एकूण कामकाज सुरळीत चाललेले दिसते. हे मंदिर एक संरक्षित स्मारक म्हणून पुरातत्त्व स्मारकासंबंधीच्या 1958 च्या अधिनियमानुसार घोषित करण्यात आले आहे. तसा सूचनावजा फलक फाटकाबाहेर लावण्यात आला आहे. या परिसरात फोटो तर इतके सुंदर येतात की अकोल्याच्या एका साडीच्या ब्रॅण्डने त्यांच्या जाहिरातीसाठी तेथे फोटोशूटदेखील केले आहे.
– विनया मगरे-सहस्त्रबुद्धे vinaya.magare@gmail.com
https://www.thinkmaharashtra.com/anandeshwar-shiva-temple-at-lasur/
महाराष्ट्रातील सर्वात मनोरंजक आणि कमी ज्ञात रॉक मंदिरांपैकी एक म्हणजे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील लासूर गावातील आनंदेश्वर मंदिर. पूर्णा नदीच्या काठावर उंच जमिनीवर बांधलेले हे मंदिर काळ्या पाषाणात बांधलेले दुरूनच एखाद्या किल्ल्यासारखे दिसते. हे मंदिर 13व्या शतकात कुठेतरी देवगिरीच्या यादवांच्या राजा रामचंद्राने बांधले असल्याचे ऐतिहासिक नोंदी सांगतात परंतु त्याचा उद्देश, बांधकाम आणि परिसरात काळ्या दगडाची उपलब्धता नसणे यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले असले तरी मंदिराची मांडणी अतिशय विलक्षण आहे. चौथ्या बाजूला तुलनेने लहान प्रवेशद्वार असलेले मंदिर तीन पाकळ्यांच्या फुलासारखे दिसते. तीन गर्भगृहे आणि मध्यभागी स्वर्ग मंडप म्हणून ओळखला जाणारा खुला सभामंडप आहे. अग्रभागी असीम निळे आकाश दिसत असताना पार्श्वभूमीत गुंतागुंतीच्या कोरीव खांबांसह ही गोल रचना दृश्यमान आनंद देणारी आहे! आणखी एक आकर्षक वास्तुशिल्प तपशील म्हणजे संपूर्ण रचना ठेवण्यासाठी वेगवेगळ्या आकाराचे खडक जोडलेले किंवा एकमेकांना जोडलेले दिसतात.शिवमंदिर मुख्य गर्भगृहात विराजमान आहे आणि त्याला बारा खांबांचा आधार आहे. छताच्या तपशीलामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात यक्षांची एक सामान्य थीम दिसते.
Anandeshwar Temple, Lasur Village, Amravati District, Maharashtra
One of the most interesting and lesser-known rock temples of Maharashtra is the Anandeshwar Temple at Lasur village in Daryapur taluka in Amravati district. Built on the bank of the Purna River on raised ground, this temple built in black stone looks very much like a fort from a distance. Historical records state that this temple was built by Raja Ramachandra of the Yadavas of Devagiri somewhere in the 13th century but its purpose, construction and lack of availability of the black stone in the vicinity has raised many questions.
Though this temple is built in the typical Hemadpanthi style, the layout of the temple is very unusual. The temple in plan appears like a three-petal flower with a relatively small entrance on the fourth side. There are three sanctums and an open sabha mandap known as swarga mandap in the middle. This round structure is a visual delight with intricately carved pillars in the background while the infinite blue sky appears to be in the foreground! Another fascinating architectural detail is that rocks of different sizes appear to be joined or interlocked to hold the entire structure.
The Shiva Temple is seated in the main sanctum and supported by twelve pillars. There appears to be a common theme of yakshas in different forms seen in the roof detailing.
It is quite unlikely that you will see the array of floral, geometrical, mandalas and other myriad patterns in any other temple structure built in this time. This centuries-old temple has elaborately carved figures of sages, apsaras, scenes from the Puranas and gods and goddesses on the pillars and cornices.
Archaeological excavations around the temple have uncovered idols and stonework in the same black stone. There is some evidence that the carving on the stones was done with the help of elephants at the time of construction.
This temple makes for a compelling study for its concept, layout, structural detailing and unique designs and relief work drawing both devotees and students of history and architecture. This temple is now a protected monument of the Archaeological Survey of India (ASI).
Written by Lakshmi Subramanian
* Photos are only symbolic (Taken from public domain/internet and any copyright infringement is unintentional and regrettable)
https://sahasa.in/2021/01/28/anandeshwar-temple-lasur-village-amravati-district-maharashtra/
Roofless Sabha mandapa of Anandeshwar temple
Anandeshwar Mandir is located at a distance of 25km from Akola in Lasur village of Daryapur taluka in Amravati district of Maharashtra.
Situated on the banks of Purna River in the midst of the green plantation, the temple structure is an excellent example of architectural marvel. The carvings and the statues on the façade as well as in the interior of the temple are of high quality.
This temple symbolises Hemadpanthi style of architecture. The entire construction is about 3,500 sq. ft. out of local stone. The temple looks like a sturdy fort. This temple is त्रिदल meaning that it has three गाभारे (sanctum). सभामंडप (hall) of this temple is open and it is termed as स्वर्गमंडप. At the entrance of the temple, there is a large platform. The entrance door is intricately carved and has a layered frame. Through this platform one enters into the Sabha Mandap which is without a roof. The similarity of this Swarg Mandap with that of the Kopeshwar Mandir of Khidrapur is striking. Entry to three Garbha Griha is through this Sabha Mandapa. The temple structure is supported by twelve beautifully carved columns and six columns are aligned along the wall.
The temple was constructed in the 12th century by kings of the Yadava dynasty of Devagiri. This Shiv Mandir is being visited by many tourists as well as devotees. Pooja of Shivling is performed daily. The temple structure is under the protection of ASI now. However better conservation of the temple is necessary. The number of beautiful sculptures is gradually reducing.
The Pantheon in Rome is famous for its huge dome with the central opening in the roof. The roofless Sabha Mandapa of temple Anandeshwar as well as that of Khidrapur remind us of the roof opening of Pantheon at Rome. The reason for having this roofless Sabha Mandapa needs to be researched and the accuracy with which the diameter of the opening is achieved is also to be understood by serious study of the construction technology.
https://organiser.org/2022/06/26/87852/bharat/roofless-sabha-mandapa-of-anandeshwar-temple/
https://organiser.org/2022/06/26/87852/bharat/roofless-sabha-mandapa-of-anandeshwar-temple/
आनंदेश्वर मंदिर, लासूर
#VidarbhaDarshan - आनंदेश्वर मंदिर, लासूर
वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले लासूरचे आनंदेश्वेर मंदिर अमरावती जिल्ह्याचे सांस्कृतिक वैभव आहे. दर्यापूर तालुका मुख्यालयापासून अकोला मार्गावर १२ कि.मी. अंतरावर पूर्णा नदीच्या काठावर लासूर नावाचे एक छोटेसे गाव आहे. गावाच्या दक्षिण दिशेला हेमाडपंथी प्राचीनकलेचा अप्रितम नमुना असलेले शिवमंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात जागृत शिवलिंगाची स्थापना केली आहे. १२ व्या शतकात बांधलेले हे शिवमंदिर आनंदेश्वर मंदिर या नावाने ओळखले जाते.
सद्यस्थितीत जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या तीन शाबूत हेमाडपंथी मंदिरांपैकी अग्रगण्य असलेले हे मंदिर ३५०० चौ. फुटांच्या अतिभव्य दगडी बांधकामात आहे. वरुन स्वस्तिक आकार असणाऱ्या या मंदिराला कळस नाही. हे मंदिर अष्टकोनी असून समोरच्या भागाकडून एखाद्या भल्यामोठ्या रथाला हत्ती जुंपल्यासारखे दिसते. या मंदिराचा दर्शनी भाग उत्तरेकडे असून दारे व खिडक्या पुर्व-पश्चिम व उत्तर दिशेला आहेत. संपुर्ण मंदिराचे बांधकाम एकावर एक दगडी शिळा रचून नंतर त्यावर कोरीव काम केलेले आहे. मंदिराच्या आतील भागात १२ खुले व भिंतीमधील ६ असे एकूण १८ खांब आहेत.
प्रत्येक खांबावर कोरीव शिल्पकाम आहे. त्यामुळे खांबांची सुंदरता वाढली. मंदिराच्या आतील व बाहेरील भिंतीवर भूमितीय आकृत्या, लता- वेली, फळे-फुले यांची कोरीव कलाकुसर आहे. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर अनेक कोनाडे असून त्यामध्ये ब्रम्हा विष्णु, शिव, राधा-कृष्ण, गोवर्धन यांच्या कोरीव मूर्त्या आहेत. संपुर्ण मंदिराला असंख्य कोन आहेत. कोणार्कच्या सुर्य मंदिरासारखेच हे मंदिर आहे. कोणार्क मंदिराच्या कलाकुसरीसारखेच साम्य या मंदिरात आहे.
लासूरचे हे मंदिर अतिशय देखणे आणि उत्तरायण काळात दुपारी बाराला सूर्य माथ्यावर असतांना इथे पडणारा प्रकाश व सावल्या पाहताना गणित आणि खगोलचे मिश्रण स्तंभीत करणारे आहे. हे मंदिर ज्या शिळांमध्ये बांधले आहे, त्या शिळा या ठिकाणापासून २०० कि.मी. च्या आसपास मिळणे अशक्य आहे. मग या शिळा आणल्या कुठुन हे सुध्दा एक आश्चर्यच आहे. या मंदिरावरील नक्षीकाम, कलाकौशल्य, सभागृहाचे घुमटाकार उघडे छत हे सर्व अद्वीतीय व अप्रतिम अश्या कलाकुसरीचा एक नमुना आहे. भिंतीवरील नक्षीकामात, हत्ती, घोडे, लढवैये, डोंबारी, गवयी, नर्तक, भक्तगण, माकड, हनुमान, गणपती, भगवान श्रीकृष्ण असे कितीतरी चित्र आहेत. लासूरचे हेमाडपंथी शिवालय - आनंदेश्वर मंदिर (आंधळेश्वर मंदिर) जिल्ह्याचा सांस्कृतिक वैभवाचे प्रतिक आहे. सध्या लासूर येथील वैभवाचे प्रतिक आहे. सध्या लासूर येथील पुरातन वास्तु भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखमध्ये आहे.
http://vidarbha-darshan.blogspot.com/2017/05/blog-post.html
प्राचीन मंदिरांचे संवर्धन रखडणार?
राज्य सरकारने राज्यातील आठ प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी सुमारे १०१ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. मात्र यातील ५ मंदिरे भारतीय पुरातत्त्व अखत्यारित येतात
मुंबई :
राज्य सरकारने राज्यातील आठ प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी सुमारे १०१ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. मात्र यातील ५ मंदिरे भारतीय पुरातत्त्व अखत्यारित येतात. या ५ मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम राज्य सरकारला करता येणार नसल्याचे भारतीय पुरातत्त्व विभागाने सांगितले आहे. त्यामुळे राज्य सरकारने हाती घेतलेल्या प्राचीन मंदिरांच्या संवर्धनाच्या कामाला केंद्राच्या विभागाने खोडा घातल्याचे चित्र आहे. या मंदिरांमध्ये औरंगाबाद येथील खंडोबा मंदिर आणि बीड येथील भगवान पुरुषोत्तम मंदिराचाही समावेश आहे.राज्यातील प्राचीन मंदिरे आणि लेण्या-शिल्पे यांच्या संवर्धनातून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्याचा मानस घोषित करून त्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला होता. या मंदिरांच्या जीर्णोद्धार आणि संवर्धनाच्या कामासाठी सरकारने अर्थसंकल्पात १०१ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली. त्याची जबाबदारी 'एमएसआरडीसी'वर सोपविण्यात आली. या प्रकल्पांतर्गत रत्नागिरीतील येथील धूतपापेश्वर मंदिर, कोल्हापूरमधील खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर, पुण्यातील कार्ले येथील एकविरा मातेचे मंदिर, नाशिकमधील सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर, औरंगाबादमधील खंडोबा मंदिर, बीडमधील पुरुषोतमपुरी येथील भगवान पुरुषोत्तम मंदिर, अमरावतीतील लासूर येथील आनंदेश्वर मंदिर, गडचिरोलीतील मार्कंड येथील शिव मंदिर यांचे संवर्धन करण्यात येणार होते. या मंदिरांचे छत, शिखर, संरक्षक भिंतीची पडझड झाली आहे. तसेच भिंतीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी एमएसआरडीसीने त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. यातील ६ मंदिरांच्या कामाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. तर उर्वरित मंदिरे मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत. मात्र या आठपैकी कोपेश्वर मंदिर, गोंदेश्वर मंदिर, आनंदेश्वर, शिवमंदिर ही भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित मोडतात. तर एकविरा मातेच्या मंदिराचा परिसर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित मोडतो. या मंदिरांची दुरुस्ती करण्याबाबत एमएसआरडीसीने भारतीय पुरातत्त्व विभागाकडे मंजुरी मागितली आहे. मात्र एमएसआरडीसीने नेमलेल्या कंत्राटदारामार्फत या मंदिरांच्या दुरुस्तीला भारतीय पुरातत्त्व विभागाने नकार दिला आहे. तसेच एमएसआरडीसी भारतीय पुरातत्त्व विभागाच्या निर्देश आणि पर्यवेक्षणाखाली दुरुस्ती करेल, या प्रस्तावालाही पुरातत्त्व विभागाने नकार दिला आहे. दरम्यान, एमएसआरडीसीने दिलेल्या निधीतून मंदिरांची दुरुस्ती करावी, अशी विनंती भारतीय पुरातत्त्व विभागाला केली होती. मात्र त्याबाबतही नकार देण्यात आला आहे, अशी माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे आता मंदिरांची दुरुस्ती आणि जीर्णोद्धाराचे काम पूर्णतः भारतीय पुरातत्त्व विभागावर अवलंबून असल्याचे एमएसआरडीसीतील अधिकाऱ्याने सांगितले.ही कामे प्रस्तावित होती
पहिल्या टप्प्यात मंदिरांची पडझड झालेले छत, प्रवेशद्वार, संरक्षण भिंत, शिखर, ओवऱ्या, खांब व घुमटावरील नक्षीकाम आदींची दुरुस्ती केली जाणार आहे. तसेच नवीन पद्धतीचे बांधकाम, फरशा, लोखंडी नळ्या उतरवून त्याजागी मंदिराच्या मूळ बांधकामाला साजेशी पुनर्बांधणी केली जाणार आहे. तसेच यामध्ये दगडांची भुकटी, चुना यांच्या सहाय्याने तडे भरून मूळ रूप देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात मंदिरांच्या पर्यटकांसाठी सोयीसुविधा, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे, भाविक निवास आदी कामे प्रस्तावित होती. तसेच मंदिरांच्या परिसरात अस्ताव्यस्त वाढलेल्या दुकानांचे व्यवस्थापन करून त्यांची पुनर्बांधणी प्रस्तावित होती. तर तिसऱ्या टप्प्यात मंदिर परिसरात पोहचण्यासाठी रस्त्यांचे जाळे आणि अन्य सुविधा सुधारण्याची कामे केली जाणार आहेत.
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/provision-of-about-rs-101-crore-for-the-conservation-of-eight-ancient-temples-in-the-state/articleshow/91390007.cms
आनंदाचेधाम: आनंदेश्वर महादेव मंदिर, लासूर, भाग १
मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकन्ताय शंभवे अमृतेषाय सर्वाय महादेवाय ते नमः
नमस्कार वाचक मित्रांनो,
मासोत्तममासे 'श्रावण' मासाची सुरुवात झालीय. आनंद, उत्साह आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला हा महिना. याच उत्साहाला जोड मिळते ती भक्तीची आणि श्रावणात भक्ती व आनंदाच्या सरींमध्ये आपण न्हाऊन निघतो. श्रावण हा शंकर- पार्वतीच्या भक्तीला समर्पित असलेला महिना. श्रावणात लगबग होते ती महादेव दर्शनाची. मग ती मंदिरात जाऊन शंकराला बेल, शिवमूठ अर्पणकरणे असो किंवा नवविवाहितांनी मंगळागौरी च्या रूपात पुजलेला गौरीहर असो, सर्व काही सांबमय. याच साम्बसदाशिवाच्या वास्तव्याने पावनझालेलं शुभंकर असं स्थान म्हणजेच आनंदेश्वर महादेव मंदिर. हे मंदिर अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील लासूर या पूर्णानदीच्या काठी वसलेल्या गावी आहे. अमरावती पासून ६२ km आणि दर्यापूर पासून केवळ १६ km अंतरावर हे सुंदर शिल्प उभं आहे. मंदिराचा परिसर नदीकाठी असून विस्तीर्ण अश्या उंचवट्यावर हे मंदिर पसरलेला आहे. या मंदिराचा चित्ररूपात आढावा घेण्याचा छोटासा प्रयत्न.
मंदिराचा विस्तीर्ण परिसर
मंदिर बाहेरून अनेक कोनी असून आत तीन गाभारे असून मधोमध एकच गोलाकार मोठा सभामंडम आहे. हे इथलं वेगळेपण. पूर्वी मंदिर परिसराला मोठी तटबंदी असावी. मंदिर साधारण ६ फूट उंचावर आहे. ४-५ पायऱ्या चढून गेल्यावर मंदिराचे मुख्य द्वार आहे. दारातून आत जाताच दृष्टीस पडतो तो अंतरिक्ष मंडप, अर्थात गोलाकार आणि वरतून संपूर्ण उघडा असलेला मंडप, जणूकाही अंतरिक्षचं छोट्या रूपात पाहतोय हा भास निर्माण होतो.
मंदिराला तीन गाभारे असून, पैकी दोन गाभारे रिकामे आहेत आणि मुख्य गाभाऱ्यात श्री आनंदेश्वर विराजमान आहेत. सभामंडपातील सर्व खांब अतिशय कलात्मक असून त्यावर विविध आकृत्यांची तसेच देवी-देवतांच्या प्रतिमांची रेलचेल आहे. काही खांबांवर कुंभ, वेलबुट्टी, साखळ्या इत्यादी कोरले आहेत. खांब आणि तुळ्यांच्या मध्ये विविध मुद्रेतील यक्षांच्या प्रतिमा असून, जणू या यक्षांनीच या डोलारा तोलून धरल्याचा आभास निर्माण होतो.
पुढील भागात मंदिरातील इतर रचना आणि मंदिराच्या बाह्य शिल्पांचा आढावा घेऊयात........
आनंदाचेधाम: आनंदेश्वर महादेव मंदिर, लासूर, भाग २
आनंदाचेधाम: आनंदेश्वर महादेव मंदिर, लासूर, भाग १
मागील भागात आपण आनंदेश्वर मंदिराचा आढावा घेतला.
या भागात मंदिरातील इतर मूर्तिकला आणि मंदिरा बाहेरील भागाचा आढावा घेऊयात.
http://shilpanandi.blogspot.com/2017/08/blog-post_23.html











































No comments:
Post a Comment