घनदाट जंगल, निसर्गाच्या डोंगरकुशीत वसलेले पुरातन मंदिर, मनमोहक धबधबा, असे वैशिष्ट्य असलेले रामदेगी हे स्थळ चिमुरपासून २५ की. मी. आणि वरोरापासून ३५ की. मी. अंतरावर आहे. रामदेगीला जाण्यासाठी गुजगव्हान गावावरून ५ की.मी.चा रस्ता करण्यात आलेला आहे. निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आस्वाद घेण्यासाठी पावसाळा हा योग्य वेळ आहे. प्रभू श्री राम आणि सीता माता हे त्यांच्या वनवासाच्या काळात भ्रमंती करत काही दिवस रामदेगीला वास्तव्यास होते, अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यांच्या वास्तव्याच्या खुणा येथे कायम असल्याचेही सांगण्यात येते. रामदेगी येथे दरवर्षी मार्गशिष महिन्यात सोमवारला लाखोंच्या संख्येत भाविक या ठिकाणी येतात.
रामदेगी देवस्थानाचाही प्राचीन इतिहास आहे. रामदेगी हे ऋषीमुनींच्या तपश्चर्येचे ठिकाण होते, असे सांगितले जाते. रामदेगीचा परिसर १९५५ मध्ये तयार झालेल्या ताडोबा अभयारण्याचा भाग आहे.
रामदेगी येथे एक जुने देवस्थान असून हे मंदिर काळ्या पाषाणाने बांधले आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर शिवलिंग आणि चार फूट उंचीची पितळेची नागधारी शंकराची मूर्ती दृष्टीस पडते. या परिसरात जमनागड नावाची मोठी टेकडी आहे, या टेकडीवर जमनामतेचे मंदिर आहे. या टेकडीवरून सभोवतालचा परिसर बघितला की मन भारावून जाते.
जमनागडपासून उत्तरेस दोन की. मी. अंतरावर रामाच्या विश्रांतीचे ठिकाण आहे, या ठिकाणाला भीमनचापरा या नावाने ओळखतात, मंदिरापासून भीमनचापरापर्यंतचा प्रवास अंगावर शहारे आणणारा आहे. या प्रवासातील पर्वतांमध्ये वाघाच्या गुफा पहावयास मिळतात.
याच रामदेगीला बौद्ध बांधव संघरामगिरी (संघ-आराम-गिरी) असेही संबोधतात. भिमनचापरा येथे बौद्धकालीन झोपण्याचे आसन आहे. याचा संबंध गौतम बुद्धांशी असल्यामुळे या ठिकाणी बौद्ध भिख्खू नेहमी वास्तव्यास असतात. बऱ्याच टेकड्यांवर विहार बांधलेले आहेत. विदेशातील भिख्खूही रामदेगीला येतात, हे विशेष. हा परिसर ताडोबाच्या बफर झोनमध्ये येत असल्याने येथे प्रदूषणाचे नियम पाळले जातात. हा परिसर प्लास्टिकमुक्त ठेवण्यात आला आहे. (माहिती - प्रशांत मोरे) छाया चित्र
Ram degi temple which belongs to the 16th century is now a part of the buffer zone in Tadoba, and no longer a public place.
It’s a historical place where Lord Rama visited and worshipped while returning to Ayodhya after defeating Ravana.
Lord Hanuman and Lord Ram temples are near the main temple, and if you climb about 400 steps you will find an old banyan tree where once Lord Buddha visited.
The lesser know fact is a scary 20/30 steps there is a cave where you find a Buddha statue and it’s also said to be place where porcupines are found.
रामदेगी मंदिराला भेट देणारा नागपूरचा ‘मटका’ वाघ
कधी वाघ रामदेगी मंदिराच्या पायऱ्या चढताना, तर कधी मंदिरातून दर्शन घेऊन उतरताना दिसतो
No comments:
Post a Comment