पिंगळी हे गाव परभणी शहरापासून अंदाजे २७ कि.मी. अंतरावर आहे. परभणी पासुन १० कि.मी अंतरावर पिंगळी हे गाव आहे.पिंगळी स्टेशन म्हणुन सुद्धा हे गाव ओळखले जाते.हैदराबाद-औरंगाबाद लोह मार्गावर हे पिंगळी स्टेशन आहे. पिंगळी येथील शिवलींग मंदिर व बारंव पाहण्यासारखी आहे.

मंदिराची उत्तरेकडील बाजू

मंदिराची दक्षिणेकडील बाजू
पिंगळेश्वर मंदिर हे पिंगळी गावाच्या मध्यभागी आहे. त्रिदल पद्धतीचे हे मंदीर आहे.स्थपती आणि शिल्पी यांच्या संयुक्त कारागिरीतुन याची निर्मिती झाली.याचा निश्चित निर्मिती काळ आपण सांगु शकत नाही परंतु शिल्पाविष्कारावरुन हे मंदिर १२ व्या किंवा १३ व्या शतकातील असावे असे वाटते.
हे मंदीर पाच फुट उंचीच्या पिठावर बनवलेले आहे.मंदीराचा मुखमंडप अर्धमंडप प्रकारातला आहे.मंदीराला एक मुख्य गर्भगृह असुन दक्षिण-उत्तर दोन छोटी गर्भगृहे आहेत.मंदिर त्रिदल (तीन गर्भग्रुह असलेले) असुन मंदिरातील मुख्य देवता शिव आहे. गर्भगृहात शिवलींग आहे.गर्भगृह आकाराने लहान आहे.एका वेळेस जास्तीत-जास्त दोन व्यक्ती दर्शन घेऊ शकतात.दक्षिणेकडील गर्भगृहात गावकऱ्यांनी आता नविन पलास्टर ऑफ पॅरीसची गणपतीची मुर्ती बसवली आहे तर उत्तरेकडील गर्भगृहाला स्टोअर रुम बनवले आहे.

मंदिराचा सभामंडप व खांब

मंदिराचा सुंदर कोरीव काम असलेला पण र्ंगवुन वाट लावलेला खांब
मंदीराचा रंगमंडप चार स्तंभावर असुन वितान आकर्षक आहे.रंगमंडपात नंदीचे शिल्प आहे.गर्भगृहाच्या बाहेरील भिंतीवर दोन देवकोष्ट आहेत.या देवकोष्टकात सध्या मुर्ती नाहीत.अंतरालानंतर गर्भगृहाची द्वारशाखा आहे.या द्वारशाखेच्या ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे.द्वारशाखेच्या दोन्ही बाजुस अप्सरा,यक्ष व द्वारपाल आहेत.

नरसिंहाची भग्न मूर्ती
मंदिरातील स्तंभाच्या मध्यावर व्याल,हत्ती,कृष्णलिला,वराह अवतार,भौमीतीय शिल्पकला,अप्सरांचे नृत्यशिल्प,मोर व राजहंस शिल्प आहेत.स्तंभाच्या कर्णावर नागशिल्पे आहेत.मंदीराच्या पिठावरुनचं प्रदक्षिणा मार्गाची सोय केलेली आहे.मंदीराच्या बाहेरुन तिन देवकोष्ट आहेत जे आपल्याला रिकामे दिसतात.अर्धमंडपाच्या भिंतीवर भौमीतीय शिल्प जे रत्नासारखे दिसते,तसेचं अप्सरा व कामक्रीडा शिल्पे आहेत.मंदीराला शिखर नसुन छताच्या बाह्यांगाची पुनर्रचना करण्यात आली आहे.मंदीराच्या पिठावरील भिंतीवर सुद्धा भौमीतीय रत्न शिल्पे चोहोबाजुंनी आहेत.
संपूर्ण मंदिर दगडात बांधलेले असुन कदाचित कधीकाळी या मंदिराला विटांचे शिखर असावे असे वाटते. मंदिर अंदाजे अडीच ते तीन फुट उंच अधिष्ठानावर उभे आहे. मंदिराच्या समोरचा कक्षासनाचा भाग सोडल्यास मंदिर बाहेरुन खुपच साधे आहे. मंदिराच्या तीनही बाजूंच्या बाह्य भिंतीवर एकच नक्षिचा पट्टा आहे. देवकोष्ठे आहेत पण त्यात सध्या देवतांच्या मूर्ती नाहीत. मंदिराजवळच्या परिसरात इतरही छोटी मंदिरे आहेत तसेच अनेक जुन्या मंदिरांचे व वास्तुंचे अवशेष दिसुन येतात. अजुनही मंदिर चांगल्या अवस्थेत असुन गावक-यांचा राबता मंदिरात दिसुन येतो.
संपूर्ण मंदिर दगडात बांधलेले असुन कदाचित कधीकाळी या मंदिराला विटांचे शिखर असावे असे वाटते. मंदिर अंदाजे अडीच ते तीन फुट उंच अधिष्ठानावर उभे आहे. मंदिराच्या समोरचा कक्षासनाचा भाग सोडल्यास मंदिर बाहेरुन खुपच साधे आहे. मंदिराच्या तीनही बाजूंच्या बाह्य भिंतीवर एकच नक्षिचा पट्टा आहे. देवकोष्ठे आहेत पण त्यात सध्या देवतांच्या मूर्ती नाहीत. मंदिराजवळच्या परिसरात इतरही छोटी मंदिरे आहेत तसेच अनेक जुन्या मंदिरांचे व वास्तुंचे अवशेष दिसुन येतात. अजुनही मंदिर चांगल्या अवस्थेत असुन गावक-यांचा राबता मंदिरात दिसुन येतो.

मंदिराचा दर्शनी भाग

मंदिर व समोरील पुष्करणी

मंदिर व समोरील पुष्करणी
मंदिर व समोरील पुष्करणी
बारंव(पुष्कर्णी)आहे.प्राचीन बारंव स्थापत्य शास्ञाचा उत्कृष्ट नमुना म्हणुन आपण या बारवेकडे पाहु शकतो.चारही बाजुंनी बारवेला उतरण्यासाठी पायऱ्या आहेत.बारवेच्या आतुन सात देवकोष्ट आहेत ज्यात शिल्पमुर्ती आहेत माञ भग्नावस्थेत त्या आपणास पहायला मिळतात.बारवेच्या तळातील एका पायरीवर नागाचे शिल्प आहे.सध्या बारवेला पाणी आहे माञ त्याचा उपयोग केल्या जात नाही.उन्हाळ्यात हा बारवं आटतो.
स्थानिक येथील शिवलींगाला पिंगळी या गावाच्या नावावरुन "पिंगळेश्वर" असे संबोधतात.या मंदीराची पुरातत्व खात्यामध्ये नोंद नाही.स्थानिकांनी निधी जमा करुन मंदीराचा छत दुरूस्त केला आहे.मंदीरातील आतील भागाला ऑईल पेंट कलर मारल्यामुळे जुनं रुप मंदीर हरवुन बसले आहे.
स्थानिक येथील शिवलींगाला पिंगळी या गावाच्या नावावरुन "पिंगळेश्वर" असे संबोधतात.या मंदीराची पुरातत्व खात्यामध्ये नोंद नाही.स्थानिकांनी निधी जमा करुन मंदीराचा छत दुरूस्त केला आहे.मंदीरातील आतील भागाला ऑईल पेंट कलर मारल्यामुळे जुनं रुप मंदीर हरवुन बसले आहे.

अत्यंत प्रेक्षणीय असे हे स्थळ आहे.परभणी वरुन पिंगळी-परभणी अशी बससेवा आहे.तसेचं नांदेड-औरंगाबाद लोहमार्गावर पिंगळी स्टेशन आहे त्यामुळे तुम्ही रेल्वेने सुद्धा जाऊ शकता.स्वतःचे वाहन टु-व्हिलर,फोर-व्हिलर असल्यास परभणी वरुन वसमत रोडवरील खानापुर फाट्यावरुन पिंगळीला रस्ता जातो.येथुन फक्त ९ कि.मी अंतरावर पिंगळी आहे.पिंगळी हे ६५००+ लोकसंख्येचे गाव आहे.येथे चहा-फराळ साठी हॉटेल उपलब्ध आहेत.तसेचं परभणी वरुन पिंगळीला जाताना दोन पेट्रोल पंप सुद्धा आहेत.रस्ता सुद्धा प्रवास करण्या लायक आहे.त्यामुळे मराठवाड्यातील हे अविश्वसनीय स्थळ एकदा पहाचं. या मंदिरासोबतच परभणी परिसरातील जांब, बोरी, चारठाणा, जिंतुर अशा अनेक प्राचीन मंदिरे व अवशेष असलेल्या ठिकाणांनाही भेट देता येइल.
संदर्भ :-
१) परभणी जिल्हा गॅझेटीयर
२) http://sandipdake.blogspot.com/2017/11/Parbhani-pingali-mahadev-temple.html हा ब्लॉग
३) श्री . पराग पुरंदरे यांचे लिखाण
पिंपळगाव (गोसावी) येथील प्राचीन शिल्पकलेची बारवं/विहीर!
![]() |
| पिंपळगाव (गोसावी) येथील प्राचीन शिल्पकलेची बारवं/विहीर! |
सेलु तालुक्यातील पिंपळगाव गोसावी येथे प्राचीन शिवलींग मंदिर आहे.या मंदीराच्या पुर्वेला एक बारवेसारखी विहीर आहे.या विहीरीचा आकार चौकोनी आहे.विहीरीच्या आतील भिंतीवर आपल्याला विवीध शिल्पपट्ट पहायला मिळतात.या मध्ये गजपट्ट,अश्वपट्ट,राजहंस,तोरणपट्ट,भौमीतीय शिल्पपट्ट,रत्नशिल्प,युद्धप्रसंग व उठावदार कामक्रीडा शिल्प आहेत.येथील कामक्रीडा शिल्प हे खजुराओ येथील शिल्पांशी साम्य दर्शवनारे आहेत.
प्राचीन मंदिर स्थापत्यात बारवं/पुष्कर्णीला महत्व होते.पाण्याची साठवण व स्ञोत म्हणुन बारवं व विहीरींची निर्मीती केली जायची.शिल्पींनी आपल्या हाताने या बारवं व विहीरींच्या आतील भागावर शिल्प चितारली आहेत.ही विहीर सध्या सुस्थीतीत आहे.खरचं मराठवाड्यात शिल्पींच्या शिल्पकलेचा शिल्पाविष्कार आहे.ही अज्ञात ठिकाणं पर्यटक व अभ्यासकांच्या दृष्टीस आणुन देणे हाचं #IncredibleMarathwada चा उद्देश आहे.
![]() |
| PimpalgaoGosavi(Pushkarni) |
![]() |
| PimpalgaoGosavi(Pushkarni) |
![]() |
| PimpalgaoGosavi(Pushkarni) |
![]() |
| PimpalgaoGosavi(Pushkarni) |
![]() |
| PimpalgaoGosavi(Pushkarni) |
![]() |
| PimpalgaoGosavi(Pushkarni) |
![]() |
| PimpalgaoGosavi(Pushkarni) |
![]() |
| PimpalgaoGosavi(Pushkarni) |
![]() |
| PimpalgaoGosavi(Pushkarni) |
![]() |
| PimpalgaoGosavi(Pushkarni) |
![]() |
| PimpalgaoGosavi(Pushkarni) |
![]() |
| PimpalgaoGosavi(Pushkarni) |
![]() |
| PimpalgaoGosavi(Pushkarni) |
![]() |
| PimpalgaoGosavi(Pushkarni) |
![]() |
| PimpalgaoGosavi(Pushkarni) |
वझर(खु) ता.जिंतुर जि.परभणी
मराठवाडा आणि विदर्भाच्या सिमेवर हे ठिकाण आहे.या ठिकाणी प्राचीन
शिवलिंगमंदीर आहे.मंदीराच्या बाहेर एका झाडाच्या खाली ही जोड शिव-नंदीची
शिल्प आहेत.
स्थानिकांना मी विचारल्यानंतर कळाले की,येथील महादेवाला भक्त नवस बोलतात
आणि तो पुर्ण झाल्यानंतर या झाडाखाली दगडाचे शिवलींग व नंदी ठेवुन नवस
फेडतात.
या परंपरेने आज इथे या झाडाखाली शिवलींग व नंदींच साम्राज्यचं तयार
झालयं.#IncredibleMarathwada चा प्रवास करताना वाटेतं आढळलेलं हे ठिकाण.
#StoneSclupture #BlindFaith #Shivlinga
हेमाडपंती मंदीर,रामदरा,वाघी धानोरा,ता.जिंतुर जि.परभणी
रामदरा येथील स्थापत्य शिल्पाविष्कार!
वाघीधानोरा ता.जिंतुर जि.परभणी या गावापासुन १ कि.मी अंतरावर दक्षीणेला
ओढ्याच्या काठावर रामदरा हे ठिकाण आहे.येथे हेमाडपंती शिवलींग महादेव मंदीर
व दोन देवीचे मंदीर आहेत.येथील मंदीराच्या खांबावर शिल्पकलेचा अविष्कार
बघावयास मिळतो.
मंदीराच्या अर्धमंडपाच्या भिंतीवर कामक्रीडा शिल्पे आहेत.तसेचं
ऋषी-मुनी,व्याल,गज,मानव शिल्प आहेत.स्थानिक येथील महादेवाला ओमकारेश्वर
म्हणतात.मंदीराचा जिर्णोद्धार करताना येथील शिल्पांना पेंट कलर दिला
आहे.त्यामुळे जुणं रुप हे मंदीर हरवुन बसले आहे.देवीच्या मंदीरात एकुण तिन
शिल्प आहेत.माञ भक्तांनी शेंदुर लावल्यामुळे शिल्प समजण्यास अडथळा
येतो.स्थानिक या देवीला तुळजाभवानी म्हणतात.शिल्पांचे निरीक्षण केल्यानंतर
असे लक्षात आले की हि तुळजाभवानी नसुन महिषासुरमर्दिनी आहे.
तसेचं येथील डोंगरावर काही शिल्प आहेत.जे बहुधा विरगळ प्रकारातील असावे.
मराठवाड्यात स्थपती आणि शिल्पी यांचा शिल्पाविष्कार आहे माञ कुठे ऑईल पेंट
मारुन तर कुठे शेंदुर फासुन हा प्राचीन वारसा संपवण्याचे काम येथील लोक करत
आहेत.संवर्धन करणे तर लांबचं पण शिल्पकलेचे हे दगड धुने धुन्यासाठी
वापरतात हे आमच्या मराठवाड्याचं शिल्पकलेवर असलेले प्रेम आहे.
#incrediblemarathwada
✍संदीप डाके ।Blogger
©२०१७
ब्लॉग व येथील संपुर्ण फोटो खालील लिंकवर
https://www.misalpav.com/node/35576

















































































































































No comments:
Post a Comment