Wednesday, June 21, 2023

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग

  हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे. सर्व १२ ज्योतिर्लिंगापैकी हे विशेष आहे. हे स्वयंभू मंदिर नाशिक शहरापासून २८ किमी अंतरावर सह्याद्रीचा एक मानबिंदू असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत त्र्यंबकेश्वर वसले आहे.देशभरातील बारा ज्योत‌िर्लिंगांपैकी एक आणि भारतातील प्रमुख व प्राचीन तीर्थक्षेत्रांमध्ये त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राची गणना होते. दक्षिण गंगा म्हणून ओळख असलेल्या गोदावरीचे हे मूलस्थान, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या चार पवित्र स्थानांपैकी एक तीर्थक्षेत्र, नाथ पंथीयांचे पवित्रस्थान, निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीचे स्थान म्हणजे त्र्यंबक. एवढेच नाही तर त्र्यंबकेश्वर ऐतिहासिक बालेकिल्ला म्हणूनही ओळखला जातो. त्र्यंबकेश्वर खऱ्या अर्थाने बहरले ते छत्रपती शिवाजी महाराज व पेशवाईच्या काळात. स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी उठावांमुळेही हे गाव सर्वांच्या लक्षात रहाते. चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके व स्वातंत्र्यकवी गोविंद यांचे गाव म्हणूनही त्र्यंबकेश्वरची ख्याती आहे. त्यामुळेच त्र्यंबकेश्वर अद्भुत वाटते...
त्र्यंबकेश्वर मंदिराचा इतिहास : 
   एका कथेनुसार सृष्टीचा निर्माता ब्रम्हदेवाला एकदा गर्व झाला व तो स्वतःला मोठा समजु लागला. शंकराच्या भोळ्या रुपासमोर त्याचे गर्वहरण झाले व तो त्रिंबकेश्वरी पर्वतरुपाने वास करु लागला. श्रीविष्णू हरिहर पर्वताच्या रुपात तर सोबत म्हणून इंद्रदेव अंजनेरी पर्वताच्या रुपात राहु लागले. गोदेच्या जन्माच्या आधीपासून ब्रम्हगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. प्रभु रामचंद्राने दशरथाचे श्राद्ध येथे घातले, त्यामुळे 'मुक्तिची भुमी 'अशी याची ओळख आहे.   
   पौराणिक संदर्भानुसार असे सांगितले जाते की, ब्रह्मदेवांनी इथे एका पर्वतावर श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केले जे पुढील काळात “ब्रह्मगिरी पर्वत” नावाने विख्यात झाले. 
 महर्षी गौतम ऋषिंचा जन्म शारद्वत झाला होता. लहानपणापासूनच गौतम ऋषी वैज्ञानिक व धार्मिक विचारधारेचे होते. गौतम ऋषींच्या हृदयात प्रेम आणि त्यागाची भावना होती. बाल अवस्थेपासूनच गौतमऋषी शिवभक्त होते. म्हणून तरूण अवस्थेत ते एक महान योगीराज तपस्वी झाले. त्यांचे हृदय अभयदानासाठी तत्पर असे तर संताप आल्यावर त्यांनी दिलेल्या शापापासून देवगण सुद्धा मुक्ती देत नसे. ऋषीवर गौतम न्यायशास्राचे प्रवर्तक होते व त्र्यंबकेश्वर क्षेत्रात ते दक्षिण दिशेला निवास करत होते. गौतम ऋषींना देवादिदेव महादेवाकडून असे वरदान मिळाले होते की, त्यांच्या दृष्टीमध्ये दिव्यतेज असून ते कोणत्याही अदृश्य व अनोळखी माणसाला सहज ओळखू शकतात. गौतमऋषी त्र्यंबकराजाचे अनन्य भक्त होते. त्र्यंबकराजाची कथा गौतमऋषींच्या जीवनाशी जुळलेली आहे.. 
नाथांचे नाथ भगवान आदिनाथ भोलेशंकर आपल्या चरणी येणाऱ्या भक्तांचे दुःख, संकट दूर करतात. नाथांचे नाथ भोलेनाथांनी अमृत मंथनाच्या वेळी विष पिऊन स्वर्ग लोकातील देवांचे संकट दूर केले तर गंगेच्या पवित्र धारेला आपल्या जटांत समाविष्ट करून महादेव भक्त भागीरथीचे संकट दूर केले होते.  एकदा माता पार्वतींनी भगवान भोलेनाथ व गंगामातेला एकांतात बोलताना बघितले तेव्हापासून माता-पार्वतीला गंगामातेविषयी घृणा निर्माण झाली. त्यामुळे माता पार्वती कायम चिंताग्रस्त राहु लागल्या.
श्री गणपती आपल्या माता पार्वतीला चिंतीत बघून फारच दुःखी झाले आणि माता पार्वतीला चिंतेचे कारण विचारले, माता पार्वतीने सांगितले की, गंगामातेला नाथांपासून दूर करा, कसेही करून माता गंगा नाथांपासून दूर जायलाच हवी, श्री गजानन गणेश विचारात पडले आणि मातेच्या इच्छेनुसार त्यांनी वचन दिले की, मी माता गंगेला पिता भोलेनाथांपासून दूर करण्याचा उपाय अवश्य शोधून काढील. श्री गणेशांनी भगवान वरुणदेवाला विनंती केली आणि त्यांनी पृथ्वीलोकांवर वर्षानुवर्षे भयंकर दुष्काळ उत्पन्न करायला लावले. भगवान वरुणदेवाने श्री गौरीपुत्र गजाननाच्या विनंतीनुसार तसेच केले असे म्हणतात की, त्यावेळी पृथ्वीवर भयंकर दुष्काळ पडला ज्यामुळे अनेक जिवजंतु, पशु-पक्षी, अकारण मरण पावले आणि चारही दिशेला त्राही त्राही झाली. पाण्याचा भयंकर दुष्काळ पडला तेव्हा गौतमऋषीवर त्यांच्या सौभाग्यवती अहिल्यामातेने भगवान वरुणदेवाची पुजा अर्चना केली व त्यांना प्रसन्न करून घेतले.भगवान वरुणदेव श्री गजाननाच्या विनंती वरदानात अडकले होते तरीही त्यांनी गौतमऋषींना कष्ट न करता एक उपाय सुचविला. मुनिवर तुम्ही एक खड्डा तयार करा आणि मग मी तो खड्डा अक्षय शितल पाण्याने तुडुंब भरून देईन. नंतर या खड्ड्याचे पाणी कधीही संपणार नाही. गौतम ऋषींनी तसेच केले आणि बघता बघता तो खड्डा अक्षय शितल पाण्याने भरून गेला. पृथ्वीलोकावर भयंकर दुष्काळ आणि प्रलय उत्पन्न करण्याचे कारण गंगामातेला पृथ्वीवर पाठविण्यासाठी होते पण तसे झाले नाही. असे म्हणतात की,गौतम तलावाजवळ आजूबाजूचे साधुसंत येऊ लागले व नंतर तेथेच निवास करून राहु लागले. हळूहळू गौतम तलावाजवळ नंदनवन वस्ती होत गेली पण श्री गणेशांना माता पार्वतीचे वचन पूर्ण करावयाचे होते. म्हणून त्यांनी दुसरी योजना अंमलात आणली. तरीही त्यात परत गौतम ऋषींचाच उध्दार झाला.
एके दिवशी गौतम तलावाजवळ पाणी भरण्यावरून माता अहिल्याचे दुसऱ्या ऋषी पत्नीबरोबर भांडण झाले. ही गोष्ट अन्य ऋषीपत्नींनी वाढवून आपल्या ऋषीपतींना सांगितली. तेव्हा ऋषीपतींनी आपापल्या सौभाग्यवतींना आश्वासन केले की, आम्ही सगळे मिळून गौतम ऋषींना त्र्यंबकेश्वर स्थान सोडून जाण्यास भाग पाडतो मग तुम्हा लोकांना पाणी भरायला कोणताही त्रास होणार नाही. सर्व ऋषीमुनींनी श्री गणेशांची आराधना करून त्यांना विनंती केली की गौतम ऋषींवर कोणत्याही पापांचा दोष लावा. त्यामुळे गौतम ऋषी कलंकित होऊन त्र्यंबकेश्वर क्षेत्र सोडून लांब जातील. तेव्हा गणेश तथास्तु म्हणाले आणि नंतर ऋषींना येऊन सांगितले की, यामुळे गौतम ऋषींचाच उध्दार होईल.
    नंतर गौरीपुत्र गणेशाने गायीचे रूप धारण केले व गौतम ऋषींच्या शेतावर चरायला गेले. गौतम ऋषींनी गायीला चरताना बघितले व तिला हुसकवण्यासाठी दर्भाच्या काडीने मारले. दर्भाच्या काडीचा स्पर्श होताच गाय मरण पावली तेव्हा सर्व ऋषी तेथे आले आणि त्यांनी गौतम ऋषींवर गोहत्या पापांचा दोष लावला. असाह्य गौतम ऋषीमुनींनी अन्य ऋषींना या महापाप दोषांचे निवारण विचारले. तेव्हा सगळे ऋषीगण म्हणाले, तुमच्याकडे फक्त दोनच उपाय आहेत एकतर तुम्ही ब्रम्हगिरी पर्वत सोडून जाणे नाहीतर तीन वेळा पृथ्वीची आणि १०१ वेळा शिवस्वरूप ब्रम्हगिरी पर्वताची प्रदक्षिणा करून नाथांचे नाथ भोलेनाथाला प्रसन्न करून त्यांच्या जटेतील गंगामातेला ब्रम्हगिरीत आणून त्या पवित्र जलधारेने स्नान करा आणि त्या पाण्याने शिवस्वरूप १०१ शिवलिंगावर अभिषेक करा. तेव्हा तुम्ही या गोहत्येच्या महापापातून दोषमुक्त होवू शकाल.  गौतम ऋषींनी समस्त ऋषीमुनींनी सांगितल्याप्रमाणे पृथ्वीची ३ वेळा प्रदक्षिणा व ब्रम्हगिरी पर्वताची १०१ वेळा प्रदक्षिणा  सर्व कार्य पूर्ण करून तल्लीन होऊन भगवान शिवाची आराधना केली. मग त्यानंतर भगवान शिव त्यांच्यावरती प्रसन्न झाले आणि प्रकट होऊन त्यांनी महर्षी गौतम यांना वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा महर्षी गौतम म्हणाले मला माझ्या गो हत्येच्या पापा मधून मुक्त करा. तेव्हा शंकर म्हणाले की तुझ्यावर कुठलंच पाप नाही आहे. तू निष्पाप आहेस. गोहत्येचा अपराध तुझ्यावरती जाणीपूर्वक तुझ्या आश्रमातल्या ब्राह्मणांनी लावला होता. त्यामुळे मी त्यांना शिक्षा देऊ इच्छितो. असे म्हंटल्यावर महर्षी गौतम म्हणाले की प्रभू त्यांच्या मुळेच तर मला तुमचं दर्शन प्राप्त झाला आहे. तुम्ही त्यांच्यावरती क्रोधित नका होऊ. म्हणून मग ऋषी आणि देवगण एकत्र येऊन गौतम यांच्या बोलण्यास सहमती देत भगवान शिवाना या ठिकाणी कायमस्वरूपी निवास करण्याची प्रार्थना केली.मग भगवान शिवांनी त्रंबक ज्योतिर्लिंग मध्ये भगवान शिव ज्योतिर्लिंग मध्ये कायमस्वरूपी स्थित‌ झाले. गौतम ऋषींनी त्यांच्या जटेतील गंगेची मागणी केली. पण गंगा मात्र येण्यास राजी नव्हती. तेंव्हा भगवान शंकराने आपल्या जटा या इथे आपटल्या व ब्रम्हगिरीवर गंगा अवतीर्ण झाली. गौतम ऋषींनी गोहत्येचे पाप निवारण करून गाईला पुन्हा सजीव केले. म्हणून तीच नाव पडलं गोदावरी.
गौतम ऋषींच्या विनंतीवरून महादेव इथे त्रिमूर्ती होऊन ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान झाले. तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. 

Trimbakeshwar Temple History in Marathi
      दुसरी आख्यायिका अशी की, एकदा विष्णु ब्रम्हदेवाला म्हणाले, मी पुष्कळ तप केले, परंतु अजूनही मला शिवाचे ज्ञान झाले नाही. तेव्हा त्यांनी ठरवले की, ब्रम्हाने शिवाच्या मस्तकाचा व विष्णूने चरणाचा शोध घ्यायचा. पुष्कळ शोध घेऊनही दोघांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. केतकी व पुष्प यांची खोटी साक्ष उभी करून ब्रम्हाने सांगितले की मी शिवाचा शोध लावला आणि केतकीच्या फुलांनी व दुधाने अभिषेकही केला. त्यावर कृद्ध होऊन शिवाने केतकीला व दूध देणार्‍या गाईला शाप दिला. त्यावर चिडून जाऊन ब्रम्हदेवाने शिवाला प्रतिशाप दिला, ‘‘तू भूतलावर पर्वत होऊन राहशील.’’ रागाचा आवेग ओसरल्यावर ब्रम्हाने दिलेला शाप मागे घेतला आणि स्वत:च भूतलावर पर्वताचे रूप घेवून त्याचे नाव ब्रम्हगिरी असे ठेवले. या मंदिरात खडकावर जटा आपटल्याची खूण (खर तर हा लाव्हारसचा एक भाग आहे) व एखादी पाण्याची धार दिसते.
त्र्यंबकेश्वर फोटो
  

 ज्योतिर्लिंग हा शब्द “प्रकाशस्तंभ” ला दर्शवतो. त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची वास्तविक रचना इतर ११ ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळी आहे, कारण त्र्यंबकेश्वर येथे शिवपिंडी मध्ये अंगठ्याच्या आकाराच्या तीन कपार आहेत ज्यात त्रिमूर्ती म्हणजेच “ब्रह्मा-विष्णु-महेश” विद्यमान आहेत. या शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह सातत्याने सुरु असतो. या स्वरूपाचे हे जगात एकमेव शिवलिंग आहे. आणखी ह्या मंदिराची विशेषता अशी आहे कि ज्योतिर्लिंगावर “त्रिकाल पूजा” केली जाते जी स्थानिक माहितीप्रमाणे ३५० वर्षांपासून चालू आहे, जी द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी केवळ त्र्यंबकेश्वर मंदिरातच होते.

"सह्याद्रिशीर्षे विमले वसन्तं गोदावरितीरपवित्रदेशे |
यद्धर्शनात्पातकमाशु नाशं प्रयाति तं त्र्यम्बकमीशमीडे ||"
- श्री आदिगुरू शंकराचार्य कृत द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र

श्लोकाचा अर्थ - पवित्र गोदावरीच्या देशात सह्याद्रीच्या शिखरावर सदा निवास करणाऱ्या त्रिमूर्तीरूप श्री त्र्यंबकेश्वराचे मी अनन्य भक्तिभावाने ध्यान करतो. शुद्ध भावाने जे भक्त इथे दर्शनाला येतात त्यांचे सर्व पाप नष्ट होतात.

पेशवाईपूर्वीचे त्र्यंबकेश्वर

पेशवाईपूर्वी ‌त्र्यंबकेश्वर कसे होते याचे उत्तर पुराणांमधील विव‌िध अख्यायिकांमधून मिळते. साक्षात शिव शंकराचा येथे निवास असल्याचा उल्लेख पुराणांमध्ये आहे. याची साक्ष ब्रह्मगिरी पर्वत असल्याचेही म्हटले जाते. याच ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी आद्यज्योतर्लिंग त्र्यंबकेश्वराचे मंदिर आहे. आजचे भव्य मंदिर ही पेशवाईची देणगी आहे. नानासाहेब पेशव्यांनी या मंदिराची उभारणी केली. इ. स.१७५५ मध्ये मंदिराचे बांधकाम सुरू झाले ते १७८६ मध्ये सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात पूर्ण झाले. या पूर्वाभिमुखी मंदिराची रचना पंचदालनी आहे. पाच कळस असलेले अन् सुबक कलाकुसरींनी मढलेले हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. दिल्लीचा जामदारखाना जेव्हा पेशव्यांच्या हाती आला, तेव्हा मोगलांनी म्हैसूरमधून लुटलेला रत्नजडित मुकुट या जामदारखान्यात होता. पेशव्यांनी हा मुकुट त्र्यंबकेश्वरी आणून शिवाला अर्पण केला. दर सोमवारी त्र्यंबकेश्वराचा मुकुट कुशावर्त तीर्थावर मिरवणुकीने स्नानासाठी नेण्याची प्रथा आहे. मंदिराबाहेरील लाकडी रथ अन् पुरातन त्रिमूर्ती पहाण्यासारखी आहे. मंदिरातील पिंडीच्या शिवलिंगाच्या जागी असणाऱ्या खळग्यात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची बारा लिंगे असून, या पिंडीतून सतत गोदा वाहते. ही गोदा म्हणजे गौतम ऋषीच्या तपश्चर्येचे फळ होय. गोदावरी शंकराच्या जटेतून बाहेर येण्यास तयार नसल्याने शंकराने आपल्या जटा ब्रह्मगिरी पर्वतावर आपटल्याने गोदावरी प्रवाहित झाल्याची आख्यायिका आहे. आजही ब्रह्मगिरीवर याच्या खाणाखुणा पहायला मिळतात. दर्भाच्या कुशाने चौकोन रेखून गोदावरीला अडवले ते त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थ होय. कुशावर्त तीर्थचा मंडप असंख्य अप्रतिम मूर्तीनी सजविलेला आहे. तोही आवर्जून पाहण्यासारखा आहे. कश्यप ऋषींनी श्रीरामाला त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर जाऊन पितरांच्या मुक्तीसाठी श्राद्ध दिक कर्मे करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार श्रीरामाने इथे हे कर्म केले असाही उल्लेख स्कंद पुराणात आहे. मात्र याबाबत दोन मतप्रवाह आहेत.

सिंहस्थ

                   भारतात कुंभपर्व चार ठिकाणी साजरे केले जातात. हरिद्वार, अलाहाबाद, उज्जैन व त्र्यंबकेश्वर, नाशिक. याविषयीची अख्यायिका अशी….देव व दानवांनी समुद्र मंथन केले. त्यावेळी त्यातून १४ रत्ने निघाली. त्यातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा ते मिळविण्यासाठी देव व दानवांमध्ये युध्द सुरू झाले. इंद्राचा मुलगा जयंत अमृत कलश घेऊन पळू लागला. दानवांनी त्यांचा पाठलाग केला. या झटापटीत अमृत कलश पृथ्वीवर चार ठिकाणी ठेवला गेला. ज्या चार ठिकाणी अमृत कलश ठेवण्यात आला तीच ठिकाणे कुंभमेळयाची होत. या प्रसंगी अमृत कलशाचे फुटण्यापासून सूर्याने रक्षण केले. दैत्यांपासून गुरूने रक्षण केले. अमृत सुकू नये म्हणून चंद्राने काळजी घेतली. इंद्रपुत्र जयंताने स्वत:च अमृत पिऊ नये यासाठी पहारेदारी शनीने केली. सूर्य, चंद्र व बृहस्पती अमृत कलशाच्या रक्षणाचे वेळेस ज्या ज्या राशीमध्ये होते ती ती वेळ पुन्हा आली की त्या त्या ठिकाणी कुंभमेळा भरत असतो. याविषयी स्कंदपुराण, ब्रम्हपुराण व पद्मपुराण यांमध्ये माहिती दिली आहे. हरिद्वार, अलाहाबाद, किंवा उज्जैन याठिकाणी फक्त कुंभमेळा म्हटले जाते. परंतु ज्यावेळेस कुंभमेळा त्र्यंबकेश्वर व नाशिक येथे भरतो त्यावेळेस गुरु, सूर्य व चंद्र ही तीनही ग्रह सिंह राशीत असतात म्हणून यास सिंहस्थ कुंभमेळा असे म्हणतात. गुरूने सिंह राशीत प्रवेश केल्यापासून सिंह राशी पार करेपर्यंतचा तेरा महिन्याचा कालावधी सिंहस्थ कुंभमेळा म्हणून ओळखला जातो. व ज्या वेळेस तिन्ही ग्रह सिंह राशीत असतात. त्यावेळेस अशी ग्रहस्थिती श्रावणी अमावास्या अर्थात पोळयाच्या दिवशी असते तो दिवस महापर्वणी म्हणून ओळखला जातो. सिहस्थ पर्वकाळात गोदावरीत स्नान करणे विशेष पुण्यकारक आहे. सिंहस्थ काळात गोदावरीत एक स्नान केल्याने साठ हजार वर्षे गंगेत स्नान केल्याचे पुण्य लाभते. नर्मदेच्या तीरावर तपाचे, कुरुक्षेत्रावर दानाचे व गंगेकाठी मरणाचे जे पुण्य असते ते सर्व गौतमी गंगेच्या स्नानाने मिळते. गंगा गोदावरीचे अवतरण माघ शुध्द दशमीला सिंहेचा गुरू असतांना झाले आहे. गौतमांना गोहत्येच्या पातकापासून मुक्ती दिल्या नंतर गंगा परत मुळस्थानी म्हणजे शंकराच्या जटेत निघून जात होती परंतु लोकांच्या कल्याणाकरिता तिने पृथ्वीवरच रहावे असे शंकरांनी सांगितले. लोकांचे पाप दूर करून मला मलिनता येईल तेव्हा मी काय करावे असे गोदावरीने विचारताच शंकरांनी सर्व नद्या तीर्थ सरोवरे व ऋषीमुनींना आज्ञा केली की सध्या सिंह राशीस गुरू आहे तोपर्यत तुम्ही सर्वांनी याठिकाणी वास करावा. त्याप्रमाणे सर्वांनी कबूल केले की सिंहेचा गुरू असेपर्यंत आम्ही सर्व येथे राहून रोज गोदावरीत स्नान करून त्र्यंबकराजाचे दर्शन पूजन करू. त्याप्रमाणे ती प्रथा आजही चालू आहे. सर्व साधू महात्मे पर्वणीचे दिवशी कुशावर्तावर स्नान केल्यानंतर श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शनास जात असतात. इतर तीन कुंभमेळयाचे ठिकाणी फक्त स्नाने केली जातात. परंतु येथे स्नानानंतर त्र्यंबकेश्वराचे  दर्शनाची परंपरा आहे.
              दर बारा वर्षांनी भरणारा सिंहस्थ त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थावर भरतो.नागा साधू हे त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे वैशिष्ट्य मानले जाते.त्र्यंबकेश्वरमध्ये आखाड्यांचे मठ व आश्रम आहेत. साधूमहंतांचा सहवास हे त्र्यंबकेश्वरचे वैभवच म्हटले पाहिजे. पापांतून मुक्ततेसाठी येथे अनेक विधी केले जातात. यासाठी नेहमीच देशविदेशातून भक्तांची मांदियाळी येथे पहायला मिळते. इ. स. तेराव्या शतकात ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत आपल्या मुलांना घेऊन त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आले होते असेही म्हटले जाते. याभूमीला चक्रधरस्वामी, समर्थ रामदास, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताबाईंचा स्पर्श लाभला आहे. निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीमुळे त्र्यंबकेश्वरच्या स्थान माहात्म्यात आणखी भर पडली आहे. म्हणूनच वारकरी संप्रदायाचे ते श्रद्धास्थान म्हटले जाते.
त्रयंबकेश्वर मंदिर का इतिहास

इतिहास

   दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंझ याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालये बांधली. त्यांतील एक हे शिवालय आहे. ती शिवालये अशी : गोदावरी नदीच्या उगमाशी त्र्यंबकेश्वर, वाकी नदीच्या उगमाशेजारचे त्रिंगलवाडीतले शिवालय, धारणा नदीच्या उगमाशेजारचे -तऱ्हेळे येथे, बाम नदीच्या उगमाशेजारचे – बेलगावला, कडवा नदीच्या उगमाशेजारचे – टाकेदला, प्रवरा नदीच्या उगमाशेजारी – रतनवाडीतील अमृतेश्वर, मुळाउगमस्थानी असलेल्या – हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर, पुष्पावतीजवळ – खिरेश्वरातील नागेश्वर, कुकडीजवळ्च्या – पूरमधील कुकडेश्वर, मीना नदीच्या उगमाशेजारच्या – पारुंडेतील ब्रह्मनाथ, घोड नदीच्या उगमस्थानी – वचपे गावातील सिद्धेश्वर आणि भीमा नदीजवळचे -भवरगिरी. ही सर्व मंदिरे शिल्प सौंदर्याने नटलेली आहेत, कोरीव कलेने सजलेली आहेत. यातच त्र्यंबकेश्वराच्या मंदिराचा समावेश आहे.डोंगरामधून लहान असा एक रस्ता आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्रंबकेश्वर : -
  छत्रपती शिवाजी महाराज बालपणी व नंतर सुरतेच्या स्वारी दरम्यान त्र्यंबकेश्वरी आल्याची नोंद मिळते. तीर्थोपाध्यायांचा वाद त्यांनी सोडविल्याची नोंदही मिळते. पहिल्या सुरत स्वारीला जाताना शिवाजी महाराजांनी त्रिंबकेश्वर येथे दर्शन घेतले याची नोंद शिवापुर दप्तरातील यादी शिवचरित्र प्रदीप पृष्ट ५१ वर दिलेली आहे. शिवाजी महाराज हे शिवभत असल्यामुळे वेरुळचा घृष्णेश्वर, शिखर शिंगणापुरचा महादेव याप्रमाणे ज्योतिर्लिंग असलेल्या त्रिंबकेश्वरावर त्यांची श्रध्दा होती. 
मात्र इतक्या महत्वाच्या मोहीमेसाठी शिवाजी महाराज त्रिंबक सारख्या मोघलांच्या प्रदेशातून जाणार नाहीत असे काही अभ्यासकांचे मत आहे. मात्र याच ठिकाणी या भेटीचा लिखीत अस्सल पुरावा आहे. श्री. ढेरगे यांच्याकडील असलेले मुळ कागदपत्र अभ्यासकांनी नेले आणि त्याच्या छोट्या फोटोकॉपी त्यांच्याकडे सुपुर्द केल्या. मात्र कालांतराने या सर्व प्रति कालौघात पुसट झाल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर असलेले नेमके पत्र कोणते ? हे ओळखणे अवघड झाले आहे. सध्या श्री. सचिन व चेतन ढेरगे यांच्याकडे २३ जुन्या कागदपत्राच्या छायाप्रति असून त्यात विवीध घराण्याच्या म्हणजे मालोजीराजे भोसले, शहाजीराजे भोसले, छत्रपती शिवाजी महाराज, एकोजीराजे, नागपुरकर भोसले,जिंजीकर भोसले अश्या विवीध घराण्यासह राजस्थानातील काही राजघराण्याची पत्रे आहेत.तसेच एक पत्र जावळीच्या चंद्रराव मोर्यांच्या घराण्याचे देखील आहे.( Sachin Dherage  7744922173 )
  या संदर्भात सविस्तर हकीकत अशी आहे कि त्रिंबकेश्वर गाव हे शिवकाळात अतिशय छोटे होते. हा मोघली प्रांत असल्यामुळे इथे मराठे सैनिक येउन धुमाकुळ घालीत. शिवाजी महाराज जेव्हा त्रिंबकेश्वर भेटीला आले, तेव्हा भोसले घराण्याचे कुलोपाध्याय ढेरगे भटांना शिवाजी ,महाराजांनी पाचारण केले. यावेळी आपदेव भट ढेरगे यांनी समस्त गावकर्यांच्या तर्फे कैफीयत मांडली कि 'साहेबाचे लोक येउन त्रास देतात'. त्यामुळे नित्यपुजेत बाधा येते. यावरुन महाराजांनी अभयपत्र दिले कि 'साहेबाचे लोक यापुढे येउन त्रास देणार नाहीत. आपण सुखी रहावे'.
    सध्या ढेरगेंच्या दप्तरातील हा कागद अनेक इतिहासकार खरा मानतात. इतिहासाचे अभ्यासक शंकर श्रीकृष्ण देव यांनी १९३९ मध्ये ढेरग्यांकडे असलेली जुनी कागदपत्रे तपासली. त्याची टीपणे करुन 'श्री रामदासाची एतिहासिक टीपणे' या ग्रंथात प्रकाशित केली. त्यात शके १५९२ चे अबदे ढेरगे यांना दिलेले अभयपत्र प्रसिध्द केले आहे. त्यात मोर्तब सुद हि अक्षरे  स्वतः शिवाजी महाराजांनी लिहील्याचे म्हणले आहे. महाराष्ट्र पुराभिलेखाचे तात्कालीन संस्थापक श्री. वि.ग. खोबरेकर यांनी शिवराज्याभिषेक त्रिशताब्धी महोत्सवानिमीत्त १९७४ साली प्रकाशित केलेल्या  'Records of The Shivaji Period' या यात ढेरगे घराण्याची कागदपत्रे प्रकाशित केली आहेत. त्यात अभयपत्राची तारीख सुहुर सन इहिदे सबैन अलफ ( २४ मे १६७० ते २३ मे १६७१ ) अशी दिली आहे. खोबरेकरांनी ढेरग्यांकडच्या सर्व कागदपत्राचे वाचन दिले आहे.मात्र पत्राची छायाचित्रे दिलेली नाहीत. श्री. संजीव देसाई यांनी महाराष्ट्र शासनाच्या डिसेंबर १९८२ च्या लोकराज्य पाक्षिकात 'अभिलेखांचे जतन' या लेखात कौलनाम्याचे छायाचित्र छापले आहे. मात्र 'श्रीराजा शिवछत्रपती' या ग्रंथाचे लेखक आणि अभ्यासक श्री. गजानन मेंहदळे यांनी हे अक्षर शिवाजी महाराजांचे आहे हा दावा खोडून काढला आहे. आजपर्यंत मराठा इतिहासाची साधनांचे संशोधन सुरु झाल्यावर खाजगी संग्रहकांकडून शिवाजी महाराजांची दोनशे पत्र गोळा झाली, मात्र त्यातील फक्त शंभर-सव्वाशे पत्रच अस्सल आहेत, बाकीची पत्रे हि नक्कल म्हणजे सध्याच्या भाषेत सांगायचे तर मुळ कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रति आहेत. अर्थातच यावर स्वतः शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर असणे शक्य नाही. अस्सल पत्रापै़की सुध्दा खुद्द शिवाजी महाराजांच्या कचेरीतून गेलेली वीसच्या आसपास पत्रे आहेत. त्यांचा साचा ठराविक आहे. मात्र यातील नेमक्या कोणत्या पत्रावर शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर आहे हे सांगणे कठीण आहे. मुळात त्या काळात राजनैतिक पत्रे कारकून लिहीत असत. फक्त काही महत्वाच्या पत्राच्या शेवटी थोडा मजकुर राज्यकर्ते लिहीत असत. मात्र हे सर्वच कागदपत्रांबाबत नसे. एका दानपत्राच्या शेवटी 'स्वहस्ते मम महाराजाधिराजश्रीहर्ष' असा मजकुर दिसतो. म्हणजे हि ओळ महाराज श्रीहर्ष यांनी लिहीली आहे. काही ताम्रपटाच्या शेवटीही असा मजकुर आढळतो. काही जुन्या मराठी कागदपत्रात अश्या ओळी वाचायला मिळतात, बहुत काय लिहीणे, बहुत लिहीणे तरी तुम्ही सुज्ञ असा, मोर्तब, मोर्तबसुद असा शेरा राज्यकर्ते स्वहस्ताक्षरात लिहीत. 
ज्या पत्रावर स्वतः शिवाजी महाराजांनी स्वहस्ताक्षरात लिहीले असेल असे मानले जाते ती सर्व एकाच प्रकारची नाहीत. तसेच हि अक्षरे मुळ पत्रातील हस्ताक्षरापेक्षा वेगळी दिसतात. ढेरगे शास्त्री यांच्याकडे असलेले पत्र हे अभयपत्र आहे, ते फार महत्वाचे नाही.त्यामुळे हे शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर असण्याची शक्यता कमी आहे. यासंदर्भात अभ्यासक एक उदाहरण देतात कि बाजी घोरपड्याचा मुलगा मालोजी, पिराजी घाटगे व एकोजीराजे यांना लिहीलेल्या पत्रात शेवटी असलेली ओळ 'बहुत काय लिहीणे' हे कदाचित शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर असु शकते. 
   अर्थात याला दुसरी बाजु अशी कि ढेरगे हे भोसले घराण्याचे कुलोपाध्याय असल्यामुळे त्यांनी त्यावर स्वहस्ताक्षरात मोर्तबसुद लिहीले असणे शक्य आहे. तसेच दुसरी शक्यता म्हणजे ढेरगे यांच्याकडे असलेल्या नामवळीत अनुष्ठाण विधीची माहिती कदाचित महाराजांनी स्वहस्ते लिहून ठेवली असावी. अर्थात यासाठी ढेरगेंच्या कडील नामावळी बारकाईने बघाव्या लागतील 
त्रिंबकेश्वरला येउन कोणी कोणते अनुष्ठान केले, पुजाविधी करण्याचा त्यांचा अनुभव कसा होता याची संक्षिप्त नोंद नामावळीच्या वहीत केली जाते. शिवाजी महाराजांच्या संदर्भात दोन कागद मिळाले असून दोन्ही शके १५९२ ( इ.स. १६७०-७१) मधील आहेत.यात ढेरगे घराण्यातील आपदेव ढेरगे यांचा उल्लेख आहे.
   या तारखेवरून एक स्पष्ट होते कि दोन्ही पत्राचा पहिल्या सुरत लुटीशी संबंध नाही. पहिल्या सुरत लुटीच्या वेळी ढेरगे घराण्यातील आपदेव भट होते कि अन्य कोणी होते हे स्पष्ट होत नाही. शके १५९२ मधील दोन्ही कागदपत्रातील वृत्तांत असा आहे.
 ( अ) 'आषाढ शुध्द १० शके १५९२ १८ जुन १६७० ( शिवकालीन पत्रसार संग्रह ले. २७२१) सिवाजी राजे भोसले वे. आपदेवभट ढेर्गे वास्तव्य त्र्यंबकेश्वर 
श्रींचे उपाध्येपण तुम्हास पुर्वीपासून दिले आहे.एसियास श्रींची पुजा, नैवेद्य व ब्राम्हणभोजन दक्षिणा मोइन सालिना होनु पातशाही ६० श्रींची पुजा व नैवेद्य व नित्य दक्षिणा चाळीस दक्षिणा ब्राम्हण अभिषेकाचे असे १०० केले असते..'
    हे पत्र १८ जुन १६७० चे असल्यामुळे त्याचा दुसर्या सुरत मोहीमेशी काही संबंध नाही.पत्रातील वर्णनानुसार ढेरगे हे भोसल्यांचे पुर्वीपासून तीर्थोपाध्याय असून त्यांची वार्षीक दक्षिणा १०० होन असल्याचे म्हणले आहे. 
  ( ब ) दुसरा कागद ( शिवकालीन पत्रसार संग्रह ले. २७३३) 
कौलनामा शके १५९२
इसवी सन १६७०- ७१ 
शिवाजी राजे -
 आबदे ढेर्गे यांनी मालुम केले कि साहेबाचे लोक येता जाता तसवीस देतात, तरी ते देणार नाहीत...'
   वरील कौलनाम्याची तारीख मुळ कागदपत्रातून समजलेली नाही.या कौलनामा दुसर्या सुरत मोहीमेच्या नंतर म्हणजे ऑक्टोबर १६७० नंतरचा असला पाहिजे, कारण दुसर्या मोहीमेपर्यंत त्रिंबकचा किल्ला शिवाजी महाराजांना मिळाला नव्हता. तो नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये त्यांच्या ताब्यात आला. त्रिंबकचा किल्ला व तीर्घक्षेत्र ताब्यात आल्यावरच हे कौलपत्र शिवाजी महाराजांनी दिले असले पाहीजे. पहिला कागद दुसर्या मोहीमेच्या अगोदरचा आहे तर दुसरा कागद मोहीम झाल्यावरचा असला पाहीजे. 

पेशवाई :-
त्र्यंबकेश्वर ह्या मंदिराच्या पुर्णनिर्माणाचे कार्य तिसरे पेशवे बाळाजी म्हणजेच नानासाहेब पेशवे यांच्या हस्ते झाले होते.इ.स. १७५५ मध्ये ह्या मंदिराच्या बांधकामास सुरूवात करण्यात आली होती. तब्बल ३१ वर्षाच्या कालावधीनंतर १७८६ मध्ये ह्या मंदिराचे बांधकाम पुर्णत्वास आले होते. गेल्या काही वर्षांत मंदिराचे अनेक नूतनीकरण आणि जीर्णोद्धार झाले आहेत आणि सध्याची रचना १९ व्या शतकातील आहे. हे मंदिर त्याच्या नागर शैलीसाठी ओळखले जाते, ज्यामध्ये उंच शिखर आणि गुंतागुंतीचे कोरीव काम आहे.भारत सरकारने या मंदिराला दिनांक ३० एप्रिल, इ.स. १९४१ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
शिवकाळात व नंतर पेशवाईत त्र्यंबकेश्वरला स्थैर्य लाभले आणि उपजीविकेसाठी कोकण तसेच पश्चिम-दक्षिण महाराष्ट्रातून अनेक ब्राह्मण त्र्यंबकेश्वर व नाशिकला स्थिरावले. त्यामुळे त्र्यंबकेश्वरला ब्राह्मणांचे गाव असेही म्हटले जाते. श्रावणात त्र्यंबकेश्वराचे दर्शन आणि ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करण्याची परंपरा जुनी आहे. ब्रह्मगिरी, ब्रह्मगिरी-हरिहरगिरी व ब्रह्मगिरी-हरिहरगिरी-अंजनेरी असे प्रदक्षिणेचे तीन प्रकार आहेत. ब्रह्मगिरी हा सह्याद्रीच्या रांगेतील एक विशाल पर्वत अन् त्र्यंबकेश्वरची शान आहे. ब्रह्मगिरीतून वैतरणा, अहिल्या आणि गोदावरी या नद्यांचा उगम होतो.ब्रह्मगिरीवरचा त्र्यंबकगड हे त्या काळातील राजकीय घडामोडींचे केंद्र होते. इ. स.१२७१-१३०८ दरम्यान त्र्यंबकेश्वर गड आणि आजूबाजूच्या परिसरावर देवगिरीचा राजा रामचंद्र्रदेव यादव याच्या भावाची राजवट होती.
पैठणच्या विठ्ठलपंतांनी धर्ममार्तंडाच्या त्रासाला कंटाळून त्रंबकेश्वरी अनुष्ठाण केले. त्यावेळी ब्रम्हगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालताना एक वाघ मागे लागला. तेव्हा त्यांची व त्यांच्या चार मुलांची म्हणजे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई यांची ताटातूट झाली तसेच निवृत्तीनाथांना नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाली. ती अनुपम शिळा वारकर्यांमध्ये पुजनीय आहे. महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायाची ध्वजा येथून फडकली. पंढरपुरच्या वारीत ज्ञानेश्वर महाराजांचे गुरुबंधू म्हणून संत निवृत्तीनाथांच्या पालखीला अग्रमान देण्यात येतो. निवृत्तीनाथांचे दर्शन घेण्यासाठी दर पौष मासात षटतिला एकादशीला फार मोठ्या संख्येने भाविक येतात. नाथांच्यास समाधीचे दर्शन घेतात व ब्रम्हगिरी पर्वताला वीस मैलाची अनवाणी प्रदक्षिणा घालतात.  मोगल इतिहासकार गडाचा उल्लेख नाशिक किल्ला असा करतात. पुढे बहामनी,अहमदनगरच्या निजामशहा त्यानंतर शहाजीराजे भोसले, छत्रपती शिवाजी महाराज, मोरोपंत पिंगळे यांच्या ताब्यात हा किल्ला होता. त्रिंबक सार्जी प्रभू यांनी हा गड जिंकून पेशवाईत दाखल केला. त्र्यंबकगड ताब्यात यावा म्हणून तिसरे पेशवे नानासाहेबांनी त्र्यंबकेश्वराला साकडे घातले होते. गड ताब्यात आल्यानंतर त्यांनी हा नवस फेडल्याची नोंद पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये मिळते. पुढे पेशवाईच्या पतनानंतर हा गड ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. आज या गडाचे फक्त भग्नावशेष आढळतात. ब्रह्मगिरीच्या वाटेवर एक दगडी विश्रामगृह आवर्जुन पाहण्यासारखे आहे. हे फार कोणाच्या लक्षात येत नाही. पण दगडातील कोरीव कामाचा हा उत्कृष्ट नमुना आहे. इंग्रजांविरूद्धच्या बंडात त्र्यंबकेश्वरनेही वासुदेव भगवंत जोगळेकरांच्या पुढाकाराने मोठा लढा दिला. अखेर जोगळेकरांना त्र्यंबकमध्ये इंग्रजांनी फाशी दिली. यावरून त्र्यंबकेश्वरचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग स्पष्ट होतो. कवी गोविदांच्या स्वातंत्र्यकवितांनी तर सावकरकरांच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राण शिंपडले होते. मात्र आता कवी गोविंदांच्या आठवणीच फक्त पिंगा घालतात. त्र्यंबकेश्वरमध्ये कवी गोविंदांचे साधे स्मारकही दिसत नाही.
    पेशवाईच्या काळात अनेक मातब्बर मंडळींनी त्र्यंबकेश्वरमधील मंदिरांचा, तीर्थांचा जीर्णोद्धार केला. त्र्यंबकेश्वरांचे मंदिर, कुशावर्ताजवळील केदारेश्वर मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, श्री गंगामंदिर, परशुराम मंदिर, श्रीराममंदिर, श्री लक्ष्मीनारायण मंदिर, ब्रह्म आणि सावित्रीचे दुर्मिळ मंदिरही त्र्यंबकेश्वरमध्ये पहायला मिळते. गंगासागर तलावाजवळ निवृत्तिनाथांचे मंदिर व समाधी सह असंख्य मंदिरे व त्र्यंबकेश्वरमध्ये अनेक तीर्थे आहेत. स्नान,दान, श्राद्ध करण्यासाठी कुशावर्त तीर्थ व इतरही असंख्य तीर्थे अत्यंत पवित्र स्थान मानले जातात. यात कनखळ तीर्थ, कंचन तीर्थ, गंगाद्वाराजवळ वराह तीर्थ, रामलक्ष्मण तीर्थ,बिल्व तीर्थ, प्रयाग तीर्थ, इंद्र तीर्थ, पल्लाळ तीर्थ, गंगालय इत्यादींचा समावेश होतो. मात्र या तीर्थांमध्ये भारताच्या चित्रपटसृष्टीला जन्म देणाऱ्या दादासाहेब फाळके नावाचे एकही तीर्थ त्र्यंबकेश्वरला भटकताना पहायला मिळत नाही. ज्या महापुरूषांची ख्याती त्र्यंबकेश्वर आपल्या उराशी मिरविते त्या चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके व स्वातंत्र्यकवी गोविंद यांचे स्मृतीस्थळ येथे नसावे हे पर्यटकांना चुकल्याचुकल्यासारखे वाटते. त्र्यंबकेश्वराचे आणि ब्रह्मगिरीचे नुकतेच समोर आलेले एक गुपित म्हणजे इतिहासकार म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतहून लुटलेल्या खजिन्याचा काही भाग त्र्यंबकेश्वर परिसरातील ब्रह्मगिरीवर लपविलेला आहे अशी स्थानिक लोकांची समजुत आहे.. याबाबत पुरातत्त्व विभागाने संशोधन करण्याची गरज आहे.
त्रिंबकेश्वरची शाई:-
  एकेकाळी त्रिंबकेश्वर येथे उत्तम दर्जाची शाई बनत असे. अर्थातच याचे कारण कारखान्यात तयार केली जाणारी शाई हे होते. हि शाई तयार करण्यासाठी एका मोठ्या लोखंडी कढईत टाकणखार, लाख कुटून ती आटवली जात असे. रोज काही तास शाई भट्टीत उगाळण्याचे काम काही तास चालत असे. हे द्रावण नव्वद टक्के आटले कि घट्ट पदार्थ ज्याला शिरं म्हणत ते शिल्लक राही. हा पदार्थ लाल रंगाचा असे, त्याला काळा रंग देण्यासाठी दिव्यावर काजळी जमा करुन ती वस्त्रगाळ करुन त्या घट्ट शिरंमध्ये मिसळली जाई. हे काम बरेच दिवस चालत असे. एकदा हि प्रक्रिया पुर्ण झाली कि काचेच्या भांड्यात हि शाई भरुन वापरली जाई. शाईला सुवास येण्यासाठी त्यात गुलाबाच्या पाकळ्या त्याचा अर्क घातला जाई. काहीवेळा केशराचा अर्कही घातला जाई. या शाईचे वैशिष्ट्य म्हणजे या शाईने लिहिळेल्या मजकुराला पाणी लागले तरी ती पुसली जात नसे. या शाईने लिहीलेला मजकुर उन्हात धरला तर त्यावर पडलेल्या प्रकाशाचे रंग दिसतात. याशिवाय बाजरीची कणसे व बाभळीचा डिंक उकळून त्यापासून सुध्दा शाई तयार केली जात असे. शिवकाळात पाण्यापासून संरक्षक शाई बनविण्यासाठी डिंक, जायफळ, सालगुडीचे साल, काजुची साल यांचा वापर केला जायचा. साजुक तुपात हि शाई आटवली जात असे. यातील सालगुडीचे साल हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी सापडते. राजुरला टिटवीची बी सापडते. या बी पासून त्रंग तयार केला जात असे. शाई बनविण्यासाठी जुन्या काळातील १९ विधी ठाउक आहेत. 

 The Temple....


हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. मंदिराच्या चहूबाजूस दगडी तटबंदी आहे. मंदिराची उंची ९० फूट आहे. मंदिराच्या पूर्वेला आपल्याला एक चौकोनी मंडप पाहायला मिळतो, आणि मंदिराच्या चहूकडे चार दरवाजे आहेत, पश्चिमेला असलेला दरवाजा हा फक्त विशेष कार्यप्रसंगी उघडला जातो, बाकी दिवस भक्तगण बाकी तीन दरवाज्यांतून प्रवेश करून ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ शकतात.कळसावर पाच सुवर्णकलश असून ध्वजा पंचधातूंची आहे. कलश आणि ध्वजा अण्णासाहेब विंचुरकरांनी अर्पण केली आहे. मंदिराच्या बाजूस असलेल्या कुशावर्त तीर्थाचा जीर्णोद्धार होळकरांचे फडणीस असलेल्या पारनेरकरांनी केला.
trimbakeshwar temple nasik

trimbakeshwar temple in nashik
इथे येणाऱ्या भक्तांना दर्शनाची सोय व्हावी म्हणून मंदिरात प्रवेशासाठी ६ ते ७ रांगा करण्यात आल्या आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ नंदीची संगमरवरी मूर्ती स्थापित आहे. अशी मान्यता आहे कि नंदी हा शंकरांचा परम भक्त आहे म्हणून नंदीच्या कानात सांगितलेली इच्छा शंकर ऐकतात. मंदिरात एक प्रशस्त मंडप आणि गर्भगृह आहे. सभागृहाला तीन प्रवेशद्वार आहेत. मंदिराच्या खांबांवर फुले, हिंदू देवता, मानव आणि प्राणी यांची शिल्प कोरली आहेत.
मुख्य मंदिरातील गर्भगृहात प्रवेश केल्यावर भाविकांना पवित्र ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडते.शिवलिंग डोळ्यांच्या आकाराचे दिसते आणि त्यामध्ये पाणी भरलेलं असत जेव्हा आपण लक्षपूर्वक बघितले तर त्यामध्ये आपल्याला तीन छोटे छोटे लिंग दिसतात.ही लिंगे, ब्रह्मा, विष्णु आणि शिव, म्हणजे, विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या शक्तींची प्रतिके आहेत. ही लिंगे स्वयंभू असून पवित्र गंगा त्यांना अभिषेक करताना दिसते. हे पंचमुखी आराध्य दैवत इथे दिवसातून तीन वेळा पूजिले जाते. मुघलांकडून मिळवलेला पाचू-हिरे जडित मुकूट भाऊसाहेब पेशवे यांनी श्रींचे चरणी अर्पण केला आहे. हा मुकूट मोघलांनी म्हैसूरच्या राजाकडून बळकावला होता. रुद्र, रुद्री, लघुरुद्र, महारुद्र किंवा अतिरुद्र यांचे पठन करुन त्र्यंबकेश्वरीचा हा शिव पूजला जातो..मंदिरात इतर देवतांना समर्पित अनेक छोटी तीर्थे देखील आहेत.
 या मंदिराच्या जवळ तीन वेगवेगळे पर्वत आहेत, ते असे निलगिरी, ब्रम्हगिरी, आणि गंगाद्वार, ब्रम्हगिरी पर्वताला शिवाजींच्या स्वरूपा मध्ये पहिले जात. आणि निलगिरी पर्वतावर निलाम्बिका देवीचे तसेच दत्तात्रयाचे मंदिर आहे.

Trimbakeshwar unveiled through Inscriptions




शिलालेखात दडलेले त्र्यंबकेश्वर
दगडावर कोरलेले शिलालेख मोलाचा ऐतिहासिक वारसा. उन-वारा पावसाच्या माऱ्यात पुसट झालेले लेख वाचता नाही आले तर मोठी डोकेदुखी ठरते. त्र्यंबकेश्वर मंदिरातील दोन मोठे शिलालेख जीर्ण अवस्थेत असल्यामुळे त्यांचे वाचन हे एक कोडे बनले होते. त्र्यंबकेश्वरचे इतिहास अभ्यासक राजेश दीक्षित यांनी या लेखांचे वाचन शोधून काढले असून दोन्ही लेखांचे मराठीत भाषांतर करून दिल्याने एक महत्वाचा दस्तावेज अभ्यासकांसाठी उपलब्ध झाला आहे.
निमित्त घडले ते एका शिलालेखाचे. त्यातून त्र्यंबकेश्वर नगरीचा एक मोठा कालपट नजरेसमोर उभा राहिला. जणू काही हजार वर्षांचा वेगवान स्मृतिचित्रमय आढावा. त्र्यंबक...साडे तीन अक्षरांचे हे नाव आपल्या समोर किती वेगवेगळ्या रूपात समोर येते. मध्ययूगापासून ह्या प्रदेशाच्या राजसत्तेचे ते प्रमुख केंद्र होते. गंगावतरणाच्या निमीत्ताने पुराणकाळात येथे मोठी हलचल झाली. खुद्द शिवशंकराला येथे पर्वत रूपात यावे लागले व पर्वत बनून कायमचे रहावे लागले. स्वर्गीची गोदावरी येथे आणावी लागली. जोडीला ब्रम्हा आणि विष्णूंनी शिवाची साथ संगत केली. भारतीय तत्वज्ञानातील तीनही प्रमुख देवतांचे अस्तित्व. प्रत्येक काळात प्रमुख राजे, सरदार, विद्वान मंडळींनी येथे दिलेल्या भेटी. दक्षिण भारतातील एकमात्र सिंहस्थ कुंभमेळा अशा विविध कारणांमुळे या नगरीची ख्याती जगभर पसरली. आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वराचे हे मोठे जागृत स्थान असल्याची मान्यता. मोठी संकटे आली की, राजसत्तेची धाव त्र्यंबकेश्वरी. गणित, न्याय, सांख्य दर्शन, नाथ, महानूभाव, वारकरी अशा कित्येक परंपराचे उद्‌गार या भूमित सर्वप्रथम उठले. इतकेच काय मनोरंजन जग व्यापणाऱ्या भारतीय चित्रपट सृष्टीचा उगम येथेच झाला. ह्या पटाची आठवण झाली ती त्र्यंबकेश्वर मंदिरात अज्ञाताच्या गर्तेत दडलेल्या दोन शिलालेखांचे वाचन उपलब्ध झाल्याने.  ३/३/२०२० तो हा दिवस. हे शिलालेख कित्येक वर्ष दुर्बोध बनले होते ते त्यांची अक्षरे पुसट व जीर्ण झाल्यामुळे. या अक्षरांच्या आड नेमके दडलेय तरी काय? असा प्रश्न या शिलालेखांकडे बघून भेडसावत होता. त्यात काही काळापासून हे शिलालेख असलेली मंदिरे पुरातत्व खात्याने कुलूपबंद करून ठेवल्याने त्यांचे दर्शनही दुर्मिळ झाले होते.

 त्र्यंबकेश्वर नगरीचा जुना इतिहास उलगडतो तो वेगवेगळ्या कालखंडात लिहीलेल्या धार्मिक, तत्वज्ञान आदी ग्रंथातून, पोथ्या पुराणातून, ऐतिहासिक दस्तावेजातून, काही प्रमाणात जुन्या नाण्यांच्या माध्यमातून. स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज भोसलेंच्या पासूनची इतिहासाची असंख्य पाने, ‘त्र्यंबकेश्वरी काय घडले याची माहिती देतात’. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची त्र्यंबकेश्वरावर नितांत श्रद्धा होती. त्यांनी येथे महत्वाच्या प्रसंगी अनुष्ठाने केल्याचे, न्याय निवाडे केल्याचे दाखले जुन्या पत्रातून आणि त्यांनी जारी केलेल्या आदेशपत्रातून बघायला मिळतात.
रघुनाथरावांनी बांधलेली शिवमंदिरे
जुनी नाणी आणि त्या जोडीला शिलालेखांचेही महत्व आहे. आज घडीला त्र्यंबकेश्वरात सात जुने शिलालेख उपलब्ध आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर संगमरवरी दगडात पेशव्यांनी बांधलेल्या मेरू प्रासादाचा लेख कोरला आहे. मंदिराच्या आतील बाजुस दक्षिण तटभिंतीलगतच्या ३० शिवालयांपैकी पहिल्या व शेवटच्या अशा दोन शिवालयात अदमासे २ फुट रूंद, ३ फुट उंचीचे दोन लेख कारले आहेत. ह्या लेखाची अक्षरे अजिबात वाचता येत नाहीत. थोडी थोडी अक्षरे वाचता येतात, पण सलग एक ओळ वाचणेही अशक्य. मध्यंतरी त्र्यंबकेश्वर संस्थानाने काही अभ्यासकांना पाचरण करून लेखांचे वाचन करून घेण्याचा प्रयत्न केला, परंतू अक्षरे कळत नसल्याने वाचन होत नव्हते. धार्मिक आणि ऐतिहासिक विषयांवर अलिकडे दोन उपयूक्त पुस्तके लिहीणारे त्र्यंबकेश्वरचे राजेश दीक्षित यांना आगामी लेखन कार्यासाठी माहिती जमवताना या शिलालेखांची माहिती असलेल्या शंभरवर्षापूर्वीच्या पुस्तकाचा सुगावा लागला. नोव्हेंबर २०१२मध्ये न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी स्मरणयात्रा ही जुन्या दुर्मिळ पुस्तकांची माहिती देणारी लेखमाला लिहीली होती. त्यात ‘तीर्थयात्रा प्रबंध’, ह्या गणेश लेले यांनी लिहीलेल्या ग्रंथावरील परिक्षणात त्र्यंबकेश्वर मंदिरातील शिलालेखाची माहिती असल्याचे लिहीले होते. स्वत:चा उत्तम संग्रह असलेल्या राजेश दीक्षित यांनी आपल्या लेखनकार्यासाठी लागणारे दुर्मिळ ग्रंथ मिळविण्यासाठी विविध ग्रंथालये पालथी घातली. नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयात त्यांना तीर्थयात्रा प्रबंधाची प्रत बघायला मिळाली. त्याची नक्कल मागवून घेतली तरी ती वाचनाचा योग येत नव्हता.
पेशवाईतील शिल्पकलेचा सुंदर अविष्कार श्री त्र्यंबकेश्वर मंदिर...
‘मंदिरातील दोन्ही शिलालेख पुसट झाल्याने त्याचे वाचन अवघड झाले असून ते करणे गरजेचे आहे’,  अशी निकड संस्थानचे विश्वस्त तथा त्र्यंबकेश्वराचे माध्यान्य पुजक सत्यप्रिय शुक्ल यांनी व्यक्त केली होती. ‘मंदिरातील दोन्ही शिलालेख पुसट झाल्याने त्याचे वाचन अवघड झाले असून ते करणे गरजेचे आहे’,  अशी निकड संस्थानचे विश्वस्त तथा त्र्यंबकेश्वराचे माध्यान्य पुजक सत्यप्रिय शुक्ल यांनी व्यक्त केली होती. हे निमीत्त घडले आणि विशवस्त दिलीप तुंगार व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने या शिलालेखाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. दोन्ही शिलालेखांची छायाचित्र त्यांनी उपलब्ध करून दिली. सद्या दक्षिण कोटाच्या लगत असलेली ३० शिवमंदिरे दरवाजा लाऊन बंद करण्यात आली आहेत. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर दुध, जल, फळे व हळदी कुंकी चढविण्यात येत असल्याने सर्व शिवालयातील शिवलिंगाची मोठी झीज झाली आहे. हल्ली हे पदार्थ भेसळयूक्त मिळत असल्याने दगडाची वाजवीपेक्षा अधिक वेगाने झिज होते. त्यातच आतील दोन्ही शिलालेख वाचण्याच्या पलिकडे इतके पुसट झाले आहेत.
मंदिराची ध्वजा, कळस आणि शिखराचे सुंदर कातळ कोरिव काम
तीर्थयात्रा प्रबंध
त्र्यंबकेश्वरमध्ये १८२५ मध्ये जन्मलेले गणेश सदाशिवशास्त्री लेले यांनी पेशवा काळातील प्रसिद्ध सरदार घराण्यातील रघुनाथराव विंचूरकर यांनी भारतभर केलेल्या तीर्थयात्रांवर हा ग्रंथ लिहीला आहे. त्यांनी कालिदासाच्या रघुवंशमचे भाषांतर केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, गंगाचरित्र काव्यात लिहीले आहे. आपल्या मराठी भाषेत प्रवासवर्णनावरची पुस्तके कमी आहेत. त्यातही शंभर दिडशे वर्षांपूर्वीच्या कालखंडातली पुस्तके फारशी नाहीत. गोडसे भटाचा १८५७ चा प्रवासवर्णन ग्रंथ आहे, पण तो शुद्ध प्रवासवर्णन ग्रंथ नाही. इंग्रज अंमलच्या आरंभीच्या काळात होऊन गेलेले तंजावरचे राजे सर्फोजी यांनी भारतात बऱ्याच ठिकाणी प्रवास केला, त्याची वर्णने उपलब्ध आहे.
वयाच्या अकराव्या वर्षी सरदार विंचूरकर घराण्यांचा कारभार सांभाळणारे रघुनाथराव उर्फ अण्णासाहेबांनी वयाच्या २४व्या वर्षी प्रापंचिक सुखाचा त्याग करून हिमालया पासून कन्याकुमारी अशा विविध भागात तिर्थयात्रा केल्या. एक मोठा लवाजमा सोबत घेऊन त्यांनी या यात्रा केल्या. अनेक ठिकाणी दानधर्म केले. शके १७८२ मध्ये रघुनाथराव सात महिने त्रिंबक मुक्कामी राहिले. त्रिंबकेश्वर महादेवावर त्यांनी संतत सात महिने जलधारा अभिषेक अनुष्ठान चालविले. ब्रम्हगिरीच्या दोन प्रदक्षिणा केल्यानंतर शके १७८३ साली वद्य ९ रोजी त्र्यंबकेश्वराच्या देवालयावर कळस नसल्याने त्यांनी तांब्याचे सोन्याचा मुलामा असलेले कळस स्थापन केले.
देवळाच्या शिखरावर एक मोठा, सभामंडपावर मध्यम आकाराचा, बाजूस लहान तीन व नंदीच्या देवळावर एक असे एकुण सहा कळस बसविले. शके १७८७ साली कार्तिक शुद्ध पौर्णिमेस लाकडाचा रथ श्री त्र्यंबकेश्वरास अर्पण करून प्रतिवर्षी रथाचा उत्सव होण्याकरिता विंचूर येथील जमिन आकार रूपये ६१८ चे दानपत्र करून दिले. शके १७८८ साली त्यांनी कुशावर्ताच्या चार बाजूस चार, .... केदारेश्वर देवळावर दोन, त्रिभूवनेश्वर देवळावर दोन, ज्वरेश्वर देवळावर एक असे असे एकुण दहा सोन्याच्या मुलाम्याचे कळस बसविले. पावसाळ्यात त्र्यंबकेश्वर देवालय गळत असे त्यास चुन्याची टिपगारी करविली. शके १७९४ साली त्यांनी कार्तिक शुद्ध द्वितीयेला त्र्यंबकेश्वर देवळावर चांदी व सोन्याचा मुलामा असलेली ध्वजा बसविली. शके १७७५ साली देवालय ते कुशावर्त हा गोदावरी नदीच्या दुतर्फा रस्ता रूंद करवून चालण्यास व रथ नेण्यास प्रशस्त करून घेतला. शके १७९६ साली इंग्रजांनी गोदावरी नदीवर पुल बांधला त्याचा खर्च रघुनाथरावांनी केला. संत निवृत्तीनाथ समाधिस पुजा व नैवैध्य नित्य होत नसे, त्यासाठी त्यांनी नेमणूक करून दिली जी अद्याप पर्यंत चालू आहे. शके १८०० साली रघुनाथरावांनी त्र्यंबक देवालयात लहान लहान अशी ३० देवालये बांधून त्यात शिवलिंगांची स्थापना केली. यातील पहिल्या देवालयास त्यांनी जगदगुरू शंकराचार्यांचे नाव दिले तर दुसऱ्या देवालयास कुलयजमान बाजीराव पेशवा यांचे नाव दिले. अन्य देवालयांना आपल्या कुळातील व पितरातील व्यक्तींची नावे दिली. शेवटचे दोन देवालये पिशाच्चमोचनेश्वर व सर्व पापहरेश्वर अशी नावे दिली. राजेश दीक्षित यांनी या दोन्ही शिलालेखांचे वाचन तिर्थयात्रा प्रबंधावरून घेतले. हा एकच लेख दोन भागात कोरण्यात आला आहे. हे लेख संस्कृत भाषेत असून त्यांचे त्यांनी मराठीत स्वैर भाषांतर करून दिले. त्र्यंबकेश्वराचे केवढे मोठे महत्व होते हे इतिहासात झालेल्या संघर्षावरून आपल्याला कळते.
नंदीमंडपावरील कळस
बाळाजी बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीत सुरू झालेले बांधकाम सतत ३१ वर्षे चालले व त्यावर त्या काळात दहा लक्ष रूपये असा अफाट खर्च करण्यात आला. विंचूरकरादी मोठे प्रस्थ मंदिराच्या बांधकामावर लक्ष ठेवून होते. स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज, छत्रपती शिवाजी व संभाजी महाराजांनी त्र्यंबकेश्वराचे महत्व ओळखून येथे अनुष्ठाने केली, इथल्या लोकांना अभयपत्र दिले. स्वराज्याची राजधानी उभारताना रायगडावर शिवाजी महाराजांनी खास कुशावर्त तलावाची निर्मीती केली. राजधानीतही कुशावर्तासारखे पवित्र तिर्थ असावे अशी त्यामागची भावना तर नसेल? कदाचित महाराजांना गर्दीत येऊन त्र्यंबकेश्वरी कुंभ पर्वकाळात स्नान करणे शक्य नसेल तेव्हा त्यांनी रायगडाच्या कुशावर्ततच कुंभस्नान तर केले नसेल?
शिलालेख, ताम्रपट, जुने दस्तावेज, नाणी यातून सापडणारा हा अस्सल इतिहास आपला मोलाचा वारसा आहे. तो जोपासण्यासाठी पूर्वी राजाश्रय होता. आता इतिहसाची ही पाने जिर्ण होत आहेत. याकरिता शासनाच्या, विध्यापिठांच्या आश्रयाशिवाय तो जोपासणे शक्य होणार नाही. त्र्यंबकेश्वरचे पुरातन काळापासूनचे धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक महत्व पाहता येथे अध्ययन व संशोधन केंद्र होणे गरजेचे आहे. त्याच प्रमाणे या परिसरातील दुर्मिळ ग्रंथसंपदा जतन करण्यासाठी मोठे सुसज्ज ग्रंथालय निर्माण होण्याची आवश्यकता आहे. त्रिंबकगडाचे अनेक अवशेष विखुरलेल्या स्थितीत आहेत. त्यावर उत्खनन, संशोधन करण्याची आवश्यकता आहे. ते करण्यात जितकी दिरंगाई होईल तितका त्यांचा नाश होण्याची शक्यता वाढेल. पूर्वी त्र्यंबकनगरीत जुने नक्षिकाम केलेले, घडवलेले दगड रस्त्याच्या कडेला विखुरलेले दिसायचे. मधल्या काळात बरीच बांधकामे झाली. रस्त्यांची कामे झाली त्यात हे दगड कुठे गेले याचा थांगपत्ता लावायला हवा. मुसलमानपूर्व काळात त्र्यंबकगडावर हिंदू राजवटीत फार मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली. त्याचा इतिहास गडाच्या ढिगाऱ्याखाली दबला आहे.
महादरवाजा मोठ्या दरडीखाली चिनून गेला आहे. ते ढिगारे गेल्या पंचेचाळीस वर्षांहून अधिक काळापासून थरावर थर साठत आहेत. महादरवाजाचे बांधकाम कोणत्या शैलीतले. कोणत्या कालखंडातले. त्यावर कोणती शिल्पे, हे ढिकारा उपसला जात नाही तोवर यावर काहीच प्रकाश टाकला जाऊ शकत नाही. दिवसेंदिवस कातळातला हा अनमोल इतिहास नष्ट होण्याच्या वाटेवर चाललेला आहे. दुर्गभांडारचा पायरी मार्ग, आज घडीला सर्वाधिक वापर असलेला गडाचा उत्तर बाजुचा पायरी मार्ग ही सगळी कामे हिंदू राजवटीतली, आश्चर्याने तोंडात बोटे घालायला लावणारी. इतिहासाचे अभ्यासक महेश तेंडुलकर यांनी ब्रम्हगिरी आणि देवगिरी या दोन्ही किल्ल्यांचे बांधकाम एकाच काळात म्हणजेच यादवांच्या काळात झाल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. ‘दरडीखाली दबलेल्या महादरवाजावरची काही शिल्पे सातवाहन काळाकडे निर्देश करतात’, अशी अभ्यासकांची निरीक्षणे आहेत.  जुन्या लेखातून या संबंधी शाश्वत माहितीचा उलगडा होऊ शकतो, परंतू आपल्याकडे जुन्या माहितीचा अभ्यास व त्यावरील संशोधन हे कुर्मगती असून काळाच्या ओघात तर बरीच साधने नष्ट होत आहेत. पुण्याच्या पेशवा दफ्तरात म्हणे मराठ्यांच्या विविध कालखंडातील अस्सल कागदपत्रांच्या जंत्र्या अभ्यासकांच्या अभावी म्हणे पडून आहेत. याकरिता मोडी जाणणाऱ्या व इतिहासाची आवड असणाऱ्या अभ्यासकांची आवश्यकता असल्याचे आवाहन मध्यंतरी समाजमाध्यमातून करण्यात आले होते.
त्र्यंबकेश्वर मंदिरावरचे शिलालेख हे पेशवा/इंग्रज कालखंडातील आहेत. निलपर्वतावरील निलांबिका मंदिरावर दोन जुने शिलालेख दष्टीस पडतात, परंतू जुन्या आखाड्याच्या आख्यारित असलेल्या या मंदिराला संपुर्ण ऑईलपेंटने रंगविल्याने हे लेख वाचता येत नाहीत. उदाशांच्या आखाड्यात एक लेख आहे.
भातखळ्याच्या बारवेजवळ अनेक वर्षे पडून असलेल्या जुन्या शिलालेखाचा भाग.
सद्या त्याचा मागमूस नसून त्याचे वाचनही उपलब्ध नाही.

कुठे गेला भातखळ्याचा लेख?
ब्रम्हगिरीवर भातखळे म्हणून प्रसिद्ध असलेल्या व मुलतानच्या सिंध व्यापाऱ्याने बांधलेल्या धर्मशाळेच्या मागिल बाजूस एक जूनी बारव आहे. त्या परिसरास मेटघर किल्ला असे वनखात्याचे फलक लागलेले दिसतात. वस्तविक किल्ला हा ब्रम्हगिरीच आहे. आणि त्याच्या परिसरात गंगाद्वाराची मेट, विनायक मेट, हत्तीदरवाजाची किंवा महादरवाजाची मेट, सुपल्याची मेट अशा मेटा म्हणजेच गडाच्या परिघातल्या वस्त्या व युद्ध प्रसंगीच्या लढाऊ फळ्या आहेत. ही बारव पुर्णपणे ढासळलेली होती. तिच्या बाजूला एक जुन्या शिलालेखाचा तुकडा बरीच वर्षे पडलेला होता. त्याचा दुसरा भाग सापडलेला नाही. यंदाच्या सिंहस्थ पर्वाच्या दरम्यान या बारवेचे ढासळलेले चिरे गोळा करून तिची पुनर्बांधणी करण्यात आली. त्यावर किंवा तिच्या आसपास हा उरला सुरला तुकडाही आता दिसत नाही. सुदैवाने त्याचे छायाचित्र उपलब्ध आहे.
त्र्यंबकेश्वर इतिहास मंडळात त्र्यंबकेश्वर येथे सापडलेल्या नाण्यांच्या माहितीचे सादरीकरण
त्र्यंबकेश्वर हे मोठे राजकीय केंद्र होते हे इथे सापडणाऱ्या नाण्यांवरूनही स्पष्ट होते. १९४० साली नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावरील वाढोली येथे एका शेतात दिल्लीच्या तिन विविध सुल्तानांची ३८७७  इतकी आवाढव्य संख्येने नाणी सापडली. हे घबाड सापडले त्याची माहिती सी. आर. सिंघल यांनी जेएनएसआय १९४२ च्या चौथ्या खंडात प्रकाशित केली आहे. अर्थात हे घबाड इंग्रज आमदनीत सापडल्याने ते इंग्रजांनी त्यांच्या तिजारीत किंवा संग्रहालयात जमा केले असावे. त्याच ठिकाणी
नाण्यांवर संशोधन करणारे हे महत्वपूर्ण संशोधन केंद्र वाढोली येथे असून विविध ठिकाणच्या नाण्यांचा संग्रह येथे करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे केंद्र त्याच ठिकाणी उभारले आहे जिथे ही नाणी सापडली.
शिवाजी महाराजांनी स्वराज्याची भरपाई करताना सुरतेची लुट करण्यापूर्वी त्र्यंबकेश्वरी अनुष्ठान केल्याची वदंता आहे. शिवापूर दप्तराचा उल्लेख करून महेश तेंडुलकर यांनी सुरतेच्या स्वारीवरून परतल्यानंतर महाराजांनी त्र्यंबकेश्वरी वास्तव्य करून अनुष्ठान केल्यांची नोंद, त्र्यंबकगड-अंजनेरी-रामसेज यापुस्तिकेत केली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातल्या दोन शिलालेखांवर नव्याने प्रकाश पडल्याने या परिसराच्या इतिहास संशोधनाला चालना मिळण्याची आवश्यकता आहे.
संस्कृत शिलालेखाचा अनुवाद करणारे इतिहासाचे अभ्यासक राजेश दीक्षित



त्र्यंबकेश्वर मंदिरातील शिलालेखांचा राजेश दीक्षित यांनी केलेला स्वैर अनुवाद:
मौन ऋषींनावाचे उत्तम गोत्र असलेले रघूनाथ नावाचे कुलीन राजे।। दानी उप नावाने ओळखले जाणारे दैवतरूपी गंगा आणि विठ्ठल (माता व पिता) यांच्या पासून उत्पन्न झालेले ।। १।।
त्र्यंबक क्षेत्रातील त्र्यंबकेश्वर देवालयावर सुवर्णमय।। कुशावर्ताच्या द्वार व कळसावर निर्माण केले ।। २ ।।
कळस व छत्र स्थापन केले वृषसांड (वृषोत्सर्ग विधी) समर्पित केले ।। शंकराच्या मंदिरावर चांदीची ध्वजा समर्पित केली ।। ३ ।।
वार्षिकोत्सव (त्रिपूरारी उत्सव) यात्रेसाठी घंटाध्वजांनी यूक्त असा ।। लाकडी रथ विधिवत दान केल्याची घोषणा केली ।। ४।।
स्वत:ची पत्नी, मुलगा, आई अशा परिवार समवेत ।। वर्तमान समयी (या घडीस) स्वत:च्या पितरांच्या मुक्तीसाठी ।। ५।।
श्रीगुरू शंकराचार्य यांच्यासाठी पहिले लिंग (मंदिर) असून दुसरे।। स्वत:च्या वंशाचे स्वामी (यजमान) असलेल्या श्री बाजीराव (पेशवे) यांच्या नावे ।। ६।।
स्वत:च्या सर्व पुर्वजांचे पाप हरण करण्यासाठी ।। क्रमाने त्यांची नावे वृषभध्वजावर ।। ७ ।।
त्या शिवलिंग मंदिरांसोबत त्यांची नावे तो राजा लिहीता झाला ।। सर्वांना आकलन होण्याकरिता क्रमाने ।।
जगतगुरू शंकराचार्य, पालनकर्ता बाजीराव ।। विठ्ठल नावाने विख्यात असे पणजोबा ।।
आजोबा खंडेराय आणि गंगा नावे आजी ।। राजाचे पिता विठ्ठल व गंगा नाव असलेली जन्मदात्री आई ।। आई समान इतर माता रूक्मिणी, रूक्मिणी ।। लक्ष्मी व सत्यभामा क्रमाने ।। मातामह (आजोबा) गोविंद उडपीत प्रमातामह (आईचा आजा) ।। नरसिंह नावाचे प्रमातामह (आईचा पणजा) आदित्यरूप ही मातामह त्रयी ।। श्रीनिवास, गणपती, कृष्ण हे मामा ।। क्रमाने मामा व पुढील सासरे व केशव हा मंत्रगुरू ।। गोपाल नावाचा आप्त व रघूनाथ या स्वनावे ।। काशी, रमा, जानकी या क्रमाने राण्या ।। सावत्रभाऊ कृष्ण व माधव नावाने प्रसिद्ध ।। पिशाच्यांना मुक्ती देणारा शंभू आणि सर्व पाप हरणारा शिव ।। या मंदिरांच्या नावांचा संबंध या क्रमाने आहे ।। शके १८०० बहूधान्य संवत्सरात ।।
वसंत ऋतू चैत्र (मधु) शुद्ध प्रतिपदा तिथीला बुधवारी ।। या सुश्र्लोक निर्मितीसाठी सुश्र्लोकांचे सूचक ।। रघुनाथ राजाचे आश्रित यांनी शिलालेख कोरण्याचे काम ।। गौरीशंकर याने आनंदाने केले ।।
दक्षिण तटालगतच्या ३० शिवमंदिराची नावे:
(सौजन्य: तिर्थयात्रा प्रबंध)
१) जगदगुरू शंकराचार्य
२) बाजीराय: कुलयजमान:
३) विठ्ठलोवृद्धप्रपितामह:
४) खंडेराय: प्रपिताह:
५) गंगेतिप्रपितामही
६) नृसिंहेतिपितमह:
७) रमेतिपितामही
८) विठ्ठल:स्वपिता
९) गंगेतिस्वमाता
१०) रुक्मिणीतिमातृसपत्नी
११) रुक्मिणीतिमातृसपत्नी
१२) लक्ष्मीतिमातृसपत्नी
१३) सत्यभामेतिमातृसपत्नी
१४) गोविंदेतीमातामह:
१५) उडपितीमातु:पितामह:
१६) नृसिंहइतिमातु:प्रपितामह:
१७) श्रीनिवासामातुल:
१८) गणपति:श्वशुर:
१९) कृष्ण:श्वशुर:
२०) गोविंद:श्वशुर:
२१) केशवोगुरू:
२२) गोपालआप्त:
२३) रघुनाथ:स्वयंराजा
२४) काशीतिराराजमहिषी
२५) रमेतिराजश्री
२६) जानकीतिराजश्री
२७) कृष्णाख्य:सापत्नोबंधु:
२८) माधवाख्या:सापत्नोबंधु:
२९) पिशाचमोचनेश्वर:शिव:
३०) सर्वपापहरेश्वर:शिव:
विशेष आभार: श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट, श्री दिलीप तुंगार, श्री सत्यप्रिय शुक्ल, मनोन खैरनार, सुयोग देवकुटे, अजय हातेकर, समिर वैद्य.
संदर्भ: तिर्थयात्रा प्रबंध, गणेश लेले
पेशवे कालिन त्र्यंबकेश्वर, दिलीप बलसेकर
गौतमी, भारत इतिहास संकलन समिती, नाशिक जिल्हा
त्र्यंबकगड- अंजनेरी-रामसेज, महेश तेंडुलकर
मराठा सरदार विठ्ठल शिवदेव विंचुरकर, डॉ. डी.एस. कुलकर्णी/प्रा. डॉ. एस.डी.खैरनार
सह्याद्री ट्रेकर ब्लॉगर
सरदार विंचूरकरांचा वंशवेल

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या महादरवाजावरचा शिलालेख:

या शिलालेखाचा भावार्थ: श्रीमंत बाजीरावसाहेब (पहिले) पंतप्रधान ह्यांचे पुत्र नानासाहेब यांनी या शिवमंदिरास शके १६७७ संयुवानामवत्सर मार्गशिर्ष अष्टमी भृगूवासर (शुक्रवार) या दिवशी आरंभ केला. पुढे त्यांचे नातू श्रीमंत माधवराव नारायण (सवाई माधवराव) यांच्या अंमलात शके १६०८ पराभव नामसंवत्सर माग वद्य चतुर्दशी रोजी हे कार्य समाप्त झाले. या कामावर नारायण भगवंत म्हणून कारकुन योजिला होता. त्याचे हातून आरंभ होऊन त्याचा पुत्र नागेश नारायण याच्या हातून कार्य समाप्ती झाली. (हे काम एकंर ३ वर्ष चालले होते असे दिसते).
Add caption

पेशवाईतील सर्वोच्च शिल्पकलेचा अविष्कार त्र्यंबकेश्वर मंदिराचे बारीक नक्षीकाम








निलांबीका मंदिरावरचे शिलालेख

निलांबीका मंदिरावरचे शिलालेख

कुशावर्त तीर्थावरील नंदी...


कुशावर्ताच्या बाहेरच्या भिंतीवरील गणपती आणि महिषासुर मर्दिनीस शेंदूर लावण्याचे प्रकार सुरू झालेत...

कुशावर्ताचे नक्षीकलांनीयुक्त प्रवेशद्वार


मुर्त्यांना शेंदूर लावण्याची प्रक्रिया: खरेतर मंदिरावरच्या कातळातल्या मुर्तींना शेंदूर लावण्याचीजुनी प्रथा, परंपरा नाही...तरही काही लोक गणपती, हनूमानाच्या मुर्तींना शेंदूर लावतात.
मग ते लोण इतर मुर्त्यांकडे जाऊन पसरते. एखाद्या मुर्तीला शेंदूर लावल्यानंतर शेंदराचे हात कशाला पुसायचे तर बाजुच्या दगडाला किंवा मुर्तीला. असे करत करत
नंतर तो दगड किंवा ती मुर्ती शेंदूरमय केली जाते. अरे या मुर्तीला कमी शेंदूर लावलेला दुसतो, असे वाटून पुढच्या वेळेस त्यामुर्तीला शेंदूर लावला जाते. कालांतराने हा समज रूढ होऊन
ही जुनीच परंपरा वाटू लागते...

त्र्यंबकेश्वर महादेवाची आरती

॥ आरती त्र्यंबकराजाची ।।

जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो ।।
त्रिशूलपाणी शंभो नीलग्रीवा शशिशेखरा हो।।
वृषभारूढ फणिभुषण दशभुज पंचानन शंकरा हो।।
विभूतिमाला जटा सुंदर गजचर्माबरधरा हो ।। ध्रु० ।।

पडलें गोहत्येचें पातक गौतमक्रषिच्या शिरीं हो।।
त्यानें तप मांडिलें ध्याना आणुनि तुज अंतरीं हो ।।
प्रसन्न होउनि त्यातें स्नाना दिधली गोदावरी हो ।।
औदुंबरमुळिं प्रगटे पावन त्रैलोक्यातें करी हो ।। जय० ॥ १ ।।

धन्य कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णू किती हो ।
आणिकही बहू तीर्थे गंगाद्वारादिक पर्वतीं हो ।।
वंदन मार्जन करिती त्यांचे महादोष नासती हो ।।
तुझिया दर्शनमात्रे प्राणी मुक्तीतें पावती हो ।। जय० ॥ २ ।।

ब्रह्मगिरीची भावें ज्याला प्रदक्षिणा जरि घडे हो ।।
तैं तै काया कष्टे जंव जंव चरणीं रुपती खडे हो ।।
तंव तंव पुण्य विशेष किल्मिष अवघें त्यांचें झडे हो ।।
केवळ तो शिवरूप काळ त्याच्या पायां पडे हो ।। जय० ॥ ३ ।।

लावुनियां निजभजनीं सकळहि पुरविसि मनकामना हो ।।
संतति संपति देसी अंतीं चुकविसि यमयातना हो।।
शिव शिव नाम जपतां वाटे आनंद माझ्या मना हो ।।
गोसावीनंदन विसरे संसारयातना हो ।। जय जय० ॥४॥

त्र्यंबकेश्वर येथे साजरे केले जाणारे उत्सव |

Trimbakeshwar Palkhi

त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे त्यामुळे बाराही महिने भाविकांची सतत गर्दी होत असते. श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरी भक्तांची प्रचंड गर्दी होते.

श्री त्र्यंबकराजाच्या ज्ञात इतिहासाप्रमाणे सुमारे ३५० वर्षांपासून श्री त्र्यंबकराजांची त्रिकाल पूजा श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे करण्यात येत आहे. श्री त्र्यंबकराजांची त्रिकाल पूजा – अर्चन – तांत्रिक पध्दतीनुसार अखंडितपणे चालु आहे. संपूर्ण भारत वर्षामध्ये अशा प्रकारची त्रिकाल तांत्रिक – अर्चन – पूजा अन्य कोठेही होत नाही. ही पूजा श्री त्र्यंबकेश्वर येथेच होते. हे श्री त्र्यंबकेश्वरचे एक वेगळे खास वैशिष्टय समजले जाते.ह्या पूजा कौल संप्रदायानुसार अतिप्राचीन काश्मिरी शैवागम शास्त्रानुसार परंपरेने चालत आलेल्या असून या पूजा पध्दतीचा मुठ उगम काश्मिरमध्ये झाला आहे. इ.स. पूर्व सुमारे २००० वर्षांपासून या कौल संप्रदायाचा उगम झालेला आहे. यामध्ये कुल अधिक अकुल म्हणजेच कौल.

शिव आणि शक्ति यांचा एकत्रित अभ्यास व उपासना करून मानवाचे अंतिम ध्येय म्हणजेच परमेश्वर प्राप्ती हा ह्या उपासनेचा मुख्य उद्देश आहे. या साधनेत शिवोभुत्वा शिवंयजेत म्हणजेच साधक स्वत: शिवरुप होऊन स्वत:चीच परमेश्वर म्हणून पूजा करून घेत असतो. वसुगुप्त नावाच्या परम शिवभक्ताला श्री. शिवांनी दृष्टांत देऊन हिमालयातील एका शीलेवर ज्ञान असल्याचे सांगितले. तेथे सांगितल्याप्रमाणे वसुगुप्त गेले असतांना त्यांना शीलेवर लिहिलेले ज्ञान प्राप्त झाले. ते ज्ञान आज स्पंद करिका म्हणून प्रसिध्द आहे. हेही ज्ञान याच कौल संप्रदायातील असुन या स्पंद कारिकेमध्ये आध्यात्मशास्त्राचे अत्यंत गुढ असे ज्ञान दिलेले आहे. जिज्ञासूंनी जरूर स्पंद करिकेचा अभ्यास करावा.पेशवे काळापासून पेशव्यांनी ह्या त्रिकाल पूजा चालू राहण्यासाठी श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानची निर्मिती केली, व ह्या पूजा अखंडित चालू राहण्यासाठी व्यवस्था लावली.

पेशव्यानंतर इंग्रंज सरकार व भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत ह.या त्रिकाल पूजा परंपरेने अखंडितपणे चालू आहेत. ह्या पूजेमध्ये प्रात:काळची पूजा दशपुत्रे घराणे, माध्यान्ह काळची पूजा शुक्ल घराणे व संध्याकाळची पूजा तेलंग घराणे यांच्याकडे वंशपरंपरेने चालत आलेल्या आहेत. ह्या पूजेमध्ये तिनही वेळेस देवस्थानतर्फे नैवेद्य तसेच पूजा साहित्य व शार्गिद यांची व्यवस्था केली असून ग्रहण, महाशिवरात्री, वैकुंठ चर्तुदशी इ. पर्व काळात विशेष पूजा करण्यात येतात.संस्थानचे उत्सवचैत्रचैत्र पाडव्यास पहाटे ५ वाजेला श्री त्र्यंबकेश्वराची(trimbakeshwar) विशेष पूजा असते.

ही पूजा विश्वस्त करतात. सायंकाळी देवाची स्वारी असते. संस्थानमध्ये गुढी उभारतात. तसेच ग्रामजोशी पंचांगवाचन करतात. वैशाख तृतीयेस म्हणजेच अक्षय तृतीयेस मंदिरात असलेला हर्ष महाल उघडला जातो. श्रावण महिन्यात नागपंचमी व नारळी पौर्णिमेस देवास पोशाख असतो. पिठोरी अमावस्येला बैलांची मिरवणूक काढली जाते. भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला विष्वस्तांकडून पार्थिव गणेश मुर्ती बसविली जाते, व मूळ नक्षत्रावर गणेश विसर्जन केले जाते.

अश्विन शुध्द अष्टमीस भुवनेश्वरी, कोलंबिका, निलंबिका इ. देवीस साडी, चोळी असते. विजयादशमीस शस्त्र व अवांतर देवता पुजन असते. पहाटे ५ वाजेला श्री त्र्यंबकेश्वराची(trimbakeshwar) विश्वस्तांच्या हस्ते पूजा असते. सायं. ४ वाजेला देवाची स्वारी सिमोल्लंघनाकरिता निघते. नरकचतुर्थीचे दिवशी पहाटे ५ वाजेला श्री त्र्यंबकेश्वराची विशेष पूजा विश्वस्तांच्या हातुन असते. लक्ष्मीपूजनाचे दिवशी सायंकाळी संस्थानमध्ये लक्ष्मीपूजन केले जाते.

कार्तिक शु. प्रतिपदेस पाडव्याच्या दिवशी पहाटे पहाटे ५ वाजेला श्री त्र्यंबकेश्वराची विशेष पूजा विश्वस्तांच्या हातुल केली जाते. सायंकाळी ५ वाजेला देवाचा सुवर्ण मुखवटा मंदिरात पिंडीवर ठेवला जातो. देवास पोशाख असतो. कार्तिक त्रयोदशी, चर्तुदशी व पौर्णिमा हे तीन दिवस किर्तन असते. वैकुंठ चर्तुदशीचे दिवशी रात्री देवाची विशेष पूजा असते.

पौर्णिमेच्या दिवशी सांय. ४ वाजता श्री त्र्यंबकराजाची रथातून मिरवणूक निघते. कुशावर्त तीर्थावर पूजा असते. रथ मंदिरात परत आल्यावर सायंकाळी ७.३० वाजेला दिपमाळेची पूजा करून पेटवली जाते. हीपूजा श्री. रूईकर सांगतात. माघ शुध्द पंचमी – वसंत पंचमीस देवास पोशाख असतो. महाशिवरात्रीचे दिवशी दुपारी ३ वाजेला देवाची पालखी संपूर्ण गावातून मिरविली जाते. रात्री १० ते १२ किर्तन असते. फाल्गुन पौर्णिमेस होलिकापूजन केले जाते. धुलिवंदनाचे दिवशी देवास पोशाख असतो. रंगपंचमीचे दिवशी देवास रंग लावला जातो.याप्रमाणे दर सोमवारी श्री त्र्यंबकेश्वराची पालखीतून मिरवणूक काढून कुशावर्त तिर्थावर पूजा होत असते.

महाशिवरात्री

महाशिवरात्री” हा भारतातील प्रमुख सणांपैकी एक आहे. हा दिवस फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला असतो. पौराणिक संदर्भानुसार ह्या दिवशी श्री शंकरांनी सृष्टीची रचना केली. त्याचप्रमाणे ह्या दिवशी शिव-पार्वती विवाह झाला. हा पवित्र दिवस भक्तांसाठी मनोकामना पूर्ण करण्यासाठी अति उत्तम मानला जातो. ह्या पवित्र दिवशी भक्त कुशावर्त तीर्थावर पहाटे स्नान करून त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी एकत्र येतात. मंदिरात दर्शनासाठीची वेळ सकाळी ५.३० ते रात्री ९ पर्यंत असते तरीही ह्या दिवशी मुख्य मंदिरात हा उत्सव दिवसाचे २४ तास साजरा होतो. अनेक प्रकारे महादेवाची पूजा ह्या दिवशी होते. ज्यात ज्योतिर्लिंगावर जलाभिषेक व रुद्राभिषेक केले जाते. अनेक प्रकारचे होम-हवन तसेच आरती ह्या दिवशी केली जाते. अनेक भक्त ह्या दिवशी रुद्रजाप करतात. प्राचीन परंपरेनुसार महाशिवरात्रीच्या एक दिवस अगोदर अनेक भक्त “प्रदोष व्रत” करतात. प्रदोष व्रत केल्याने शरीरातील चंद्राचे तत्व सुधारले जाते. अशी मान्यता आहे कि चंद्र सुधारल्याने शुक्र व बुध देखील बळावतात. शुक्राने ऐश्वर्य व बुधाने नौकरी व व्यापाराच्या ठिकाणी लाभ होतात. अशा प्रकारे प्रदोष हे मन व शरीर ह्या दोघांवर प्रभाव टाकणारे आहे. शिव महापुराणात प्रदोष व्रताबद्दल अधिक माहिती आहे. ह्या प्राचीन मंदिराची देखभाल पाहण्यासाठी "त्र्यंबकेश्वर संस्थान (ट्रस्ट)" स्थापन करण्यात आले आहे. संस्थानातर्फे भाविकांसाठी भक्तनिवासाची देखील सोय करण्यात आली आहे.

ह्या पुरातन ज्योतिर्लिंगावर “श्री त्र्यंबकेश्वर संस्थान (ट्रस्ट)” मार्फत पंचमुखी मुकुट स्थापित केलेले आहे. अशी आख्यायिका आहे की हे मुकुट स्वतः पांच पांडवांनी स्थापित केलेले आहे. हे “पांडवांकालीन मुकुट” दुर्मिळ असून अनेक हिरे-रत्नादिकांनी जडित आहे. दर सोमवारी दुपारी ४ ते ५ च्या दरम्यान त्र्यंबकेश्वर गावात एक रमणीय “पालखी सोहळा” आयोजित केला जातो. ज्यात श्री त्र्यंबकेश्वराचे सुवर्णमुकुट भक्तांच्या दर्शनासाठी आरूढ केले जाते. हे सुवर्णमुकुट ढोल-ताशांच्या गजरात कुशावर्त तीर्थावर अभिषेकासाठी आणले जाते, मग तिथे अभिषेक झाल्यावर आरती होते. आरती झाल्यावर नामघोष गात पुन्हा त्र्यंबकेश्वर मंदिरात हे सुवर्णमुकुट प्रस्थापित केले जाते. अशा रीतीने एका विलक्षण अशा पालखी सोहळ्याची सांगता होते आणि भक्तगण उल्हासित होतात.

श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रा

पौष शुद्ध एकादशी

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ही वैष्णव संप्रदायाची आद्यप्रवर्तन भूमी असून संत ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू व गुरु संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांचे यात्रा-उत्सवानिमित्त सायंकाळी निघणाऱ्या पालखी सोहळ्याचे श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात स्वागत करण्यात येते.
श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात आलेल्या दिंड्यांद्वारे अभंग - कीर्तन केले जाते

होलिकात्सव

फ़ाल्गुन शुद्ध १५ (होलीका पुजन)

त्र्यंबकेश्वर मंदिर समोरील मुख्य रस्त्यावर सायंकाळी होलीका दहन केली जाते. फ़ाल्युन वद्य प्रतिपदेस धुळवड तसेच फ़ाल्गुन वद्य पंचमीस रंगोस्तव साजरा केला जातो.

गुढी पाडवा|

चेत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा)

नूतन संवत्सराचे प्रारंभदिनी प्रातःकाली ब्रह्म मुहूर्तावर श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे महापूजन केले जाते।सायंकाळी परंपरेने पंचांग पुजन करुन ग्राम जोशी मुळे परिवाराकडून पंचांग वाचन केले जाते तसेच सायंकाळी श्री त्र्यंबकराजांचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा देवस्थान कार्यालयातून सवाद्य मिरवणुकीने पालखीद्वारे मंदिरात नेला जातो। गर्भगृहातील श्रींच्या मुख्यपिंडीवर प्रदोष पुष्प पूजेवेळी श्री पंचमुखी परमेश्वराचे पूजन केले जाते.
याचवेळी हर्षमहल (आरसेमहाल) उघडून श्री त्र्यंबकराजांच्या चांदीच्या मुखवट्याची हर्षमहालात स्थापना केली जाते. सायंकाळचे पूजेसमयी गर्भगृहात असलेला श्री त्र्यम्बकराजांचा सुवर्ण मुखवट्याचे सुवासीनींकडून औक्षण केले जाते. अशा रितीने चैत्र शुद्ध प्रतिपदेचा उत्सव संपन्न होतो

पार्वतीमाता पूजन

बैशाख शद्ध तत्तीया (अक्षय तत्तीया)

वैशाख शद्ध तृत्तीया म्हणजेच अक्षय तृत्तीया होय. ह्या सणास हिंद धर्मात अत्यंत महत्व आहे. त्याअनषंगाने त्र्यंबकेश्वर येथील सर्व माहेरवासिनी या व सुवासिनी या शिवकन्या आहेत या भावनेने श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात चैत्रगौर उत्सवाची सांगता म्हणून हर्षमहालात (आरसे महालात) श्री पार्वती मातेची मूर्ति स्थापित करून पूजन केले जाते. व सुवासिनिंना हळदीकुंकू हरभरे व खिरापत वाटप करून उत्सव साजरा केला जातो

वैशाख वद्य अष्टमी (पार्वती माता मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन)

वैशाख वद्य अष्टमीस श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरातील श्री पार्वतीमतेच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा १९ -०५-२०१७ रोजी विधिवत करण्यात आली. या मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनाचे औचित्य साधुन दरवर्षी पाठात्मक नवचंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी प्रस्थान सोहळा

जेष्ठ शुद्ध १५

श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढवारी करीता जाणाऱ्या संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज संस्थान यांच्या पायी दिंडीचे श्री त्र्यंबकेश्वर मंदीराचे मुख्य महाद्रारास मा. विश्वस्तांच्या हस्ते स्वागत करून परंपरेने संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या चरण-पादुकांना गर्भगृहात घेऊन श्री त्र्यंबकराजाचे दर्शन घडविले जाते. व नंतर श्री त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर पालखीस श्री क्षेत्र पंढरपुरला जाण्याकरीता निरोप दिला जातो।

श्रावण शद्ध पंचमी (नागपंचमी)

श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या संभामंडपातील भव्य कासवावर नागपंचमी निमित्त चांदीच्या नागाचे पूजन केले जाते।श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी श्री त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सुवर्ण मुखवट्याचा पालखी सोहळा दुपारी ३ ते ४ या वेळेत संपन्न होतो।
श्रावण महिन्यात नित्य त्र्यंबकेश्वर नगरीतील विविध देवतांचे (गंगा गोदावरी - तीर्थराज कुशावर्त ,केदारेश्वर महादेव, ब्रह्मगिरी वरील मूळगंगा, कर्परदीकेश्वर महादेव, श्री हनुमान, इत्यादींचे देवस्थानच्या वतीने वतनदारांमार्फत पूजन अभिषेक केले जाते.

पिठोरी अमावस्या

श्रावण शुद्ध ३० बैल पोळा उत्सव

बैल पोळ्याच्या दिवशी श्री त्र्यंबकेश्वर मंदिर स्थित आकर्षक महानंदीचे पुजन केले जाते व सांयंकाळी देवस्थानच्या असलेल्या मानाच्या बैलांचे पुजन विश्वस्तांच्या हस्ते देवस्थान कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावर केले जाते.देवस्थानच्या मानाचे बैलांच्या पुजनेनंतर त्र्यंबकेश्वर नगरीतील बैल पोळा उत्सवास प्रारंभ होतो.

भाद्रपद शद्ध ४ (गणेशोत्सव)

श्री त्र्यंबकेश्वर येथील सभागृहात पांच दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो.विश्वस्तांच्या शुभहस्ते श्री गणेशाची स्थापना करण्यात येते व नित्य विविध पांच रूपात श्री गणेशाचे विधिवत सकाळी व सायंकाळी पंचोपचार पूजा व आरती केली जात तसेच स्थानिक पुरोहीतांमार्फ़त शांतिपाठ पठन केले जाते व स्थानिक भजनी मंडळाकडून भजन व कीर्तन आदी धार्मिक/ सांस्कतीक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मुळ नक्षत्रास त्र्यंबकेश्वर नगरीतुन सवाद्य मिरवणूक काढुन श्री गणेशाचे विधिवत विसर्जन केले जाते .वरील सर्व सोहळ्यास विश्वस्त, पुजक, वतनदार, आधिकारी व कर्मचारी वर्ग उत्साहाने सहभागी होत असतात

अश्विन:- नवरात्र उत्सव

अश्विन शुध्द अष्टमीस त्र्यंबकेधर नगरीतील त्री-देवी म्हणजेच श्री कोलांबिका , श्री निलांबिका व श्री भूवनेश्वरी या ठिकाणी देवस्थानच्या वतीने नवचंडी यज्ञ अनुक्रमे दशपुत्रे, महाजन, देशमुख यांच्या मार्फत केला जातो.
सायंकाळी त्र्यंबकेश्वर नगरीतील नवदुर्गाचे विश्वस्तांकडून पंचोपचार पूजन व साडी चोळी कार्य संपन्न केले जाते .

विजयादशमी (दसरा)

प्रात:काली ब्रह्ममुहूर्तावर विश्वस्तांचे हस्ते श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे महापूजन केले जाते. नंतर सकाळी देवस्थानच्या भांडारगृहात असणाऱ्या अस्त्रशस्त्र यांचे पूजन केले जाते.
यात हर्ष महाल, व्यासपीठ, ध्वजास्तंभ, पिंपळ पार, रथ, नगार खान्यातील नगारे, गोमाता, कोठी संस्थानातील शस्त्रे, घटीका, टोल, स्वयंपाक घरातील चूल, देवस्थानचे वाहने, अन्य आधुनिक उपकरणे, संगणक, इत्यादी यांचा समावेश होतो.
सायंकाळी श्री त्र्यंबकराजांचे पंचमुखी सुवर्ण मुखवट्याचे त्र्यंबकेश्वर नगरतून पालखी सोहळ्याद्वारे पारंपरिक मार्गाने सीमोल्लंघनासाठी नगरीच्या सीमेवर नेऊन त्या ठिकाणी शमी वृक्षाचे पूजन केले जाते. ग्रामदेवी महादेवीचे दर्शन घेऊन पालखी श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात परत आणली जाते. श्रींचे मुखवट्यास सुवासिनींकडून औक्षण केले जाते. अशा रितीने विजयादशमीचा उत्सव साजरा केला जातो.

दीपावली

अश्विन वद्य १४ (नरक चतुर्दशी)

ब्रह्ममुहूर्तावर श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे महापूजा करुन ज्योतिर्लिंगास अभ्यंग स्नान करविले जाते.

अश्विन वद्य अमावस्या

श्री त्र्यंबकेश्वराचे पंचमुखी सुवर्ण मुखवट्याचे व रत्नजडीत मुकूटाचे एकत्रित पूजन करुन लक्ष्मीपूजन केले जाते. दीपावलीचे संपूर्ण पाच दिवस श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरास नयनरम्य विद्युत रोषनाई करुन दिपोत्सव साजरा केला जातो.

कार्तिक श॒ध्द प्रतिपदा (दिवाळीचा पाडवा)

प्रात:काळी ब्रह्ममुहूर्तावर श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे विधीवत महापूजन केले जाते.सायंकाळी श्री त्र्यंबकराजांचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा सवाद्य मिरवणुकीने पालखीद्वारे मंदिरात नेला जातो.

गर्भगृहतील श्रींच्या मुख्यपिंडीवर प्रदोष पुष्प पूजेवेळी श्री पंचमुखी परमेश्वराचे पूजन केले जाते. याचवेळी हर्षमहल (आरसे महाल) उघडून श्री त्र्यंबकराजांच्या चांदीच्या मुखवट्याची हर्षमहालात स्थापना केली जाते. सायंकाळचे पूजेसमयी गर्भगृहात असलेला श्री त्र्यंबकराजांचा सुवर्ण मुखवटा पुन्हा विधिवत त्याच्या जागेवर प्रस्थापित होतो व त्याचे सुवासीनींकडून औक्षण केले जाते.


कातिक शुध्द चतुर्दशी (वैकुंठ चतुर्दशी)

श्री त्र्यंबकेश्वर ज्योतीर्लिंगाचे ठिकाणी वैकुंठ चथुर्दशीचे विशेष महत्व आहे. हरिहर भेटीचे औचित्य साधुन मध्यरात्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे सप्ताधन्ययुक्त महापुजन केले जाते. श्री त्रयंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे पिंडीवर पंचमुखी सुवर्ण मुखवटा व अन्य दोन चांदीचे मुखवटे ठेऊन त्रिगुणात्मक रुपात पुजन केले जाते. मध्यरात्री आरतीने पुजेची सांगता होते. हा सोहळा अत्यंत मनोहारी असतो.

मंदिरातील पुजेची वेळ – Trimbakeshwar Temple Timings

त्र्यंबकेश्वर येथील मंदिर आठवड्यातील सातही दिवस उघडे असते, मंदिर सकाळीच उघडल्या जातं.

  • भगवान शंकर्जींच्या सोन्याच्या मुकुटाचे दर्शनाची वेळ : सकाळच्या ४.३० ते ५.०० वाजेपर्यंत
  • सकाळची मंगल आरती ची वेळ : ५.३० ते ६.०० वाजेपर्यंत.
  • मंदिरातील अभिषेक : सकाळचे ६.०० ते ७.०० वाजेपर्यंत.
  • मंदिराच्या बाहेरील अभिषेक : सकाळचे ७.०० ते दुपारच्या १२ वाजेपर्यंत.
  • एखादी विशेष पूजा, रुद्राभिषेक, महामृत्युंजय जप : सकाळच्या ७ ते सकाळच्या ९ वाजेपर्यंत.
  • दुपारची पूजा : दुपारचे १.०० ते १.३० वाजेपर्यंत.
  • संध्याकाळची आरती : रात्री ७.०० ते ९.०० वाजेपर्यंत.

वरील दिलेल्या वेळ ह्या विशेष उत्सवाच्या दिवशी बदलू सुद्धा शकतात.

त्र्यंबकेश्वर मंदिरा जवळील पाहण्यासारखी इतर ठिकाणे :
●     त्र्यंबकेश्वराचे मंदिर 
●     कुशावर्ता कुंड 
●     ब्रम्हगिरी पर्वत 
●     गंगाद्वार 
●     नील पर्वत 
●     अंजनेरी पर्वत 
●     गजानन आश्रम 
Nearest Places from trimbakeshwar

त्र्यंबकेश्वर ला कसे जावे – How to Reach Trimbakeshwar

त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी आपण रेल्वे मार्ग, सडक मार्ग, आणि वायुमार्ग या तीनही मार्गांचा अवलंब करू शकता, जर आपण नागपूर कडून येत असणार तर तुम्हाला रेल्वेने प्रवास करून येणे सोयीचे. नागपूर वरून मुंबईला येणाऱ्या भरपूर एक्सप्रेस रेल्वे गाड्या आहेत, आणि नाशिकला उतरून तेथून बसच्या माध्यमाने आपण त्र्यंबकेश्वरला जाऊ शकता.
हवाईमार्ग – जवळचे विमानतळ नाशिक. ३९ कि.मी.
रेल्वेमार्ग – जवळचे रेल्वेस्थानक नाशिकरोड, मध्यरेल्वे पासून ४० कि.मी. अंतरावर.
बसमार्ग – मुंबई- त्र्यंबकेश्वर १८० कि.मी, पुणे – त्र्यंबकेश्वर २०० कि.मी
नाशिक-त्र्यंबकेश्वर २९ कि.मी.
नाशिकच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून नाशिक-त्र्यंबकेश्वर अशा एस. टी. महामंडळाच्या गाडया दर अर्ध्या तासाने चालू असतात.
त्र्यंबकेश्वर हे नाशिकरोड रेल्वे स्टेशनपासून ४० कि.मी अंतरावर आहे.
  • नाशिक ते त्र्यंबक मार्ग  त्र्यंबकेश्वर ते नाशिक हे २९.५ कि.मी. इतके अंतर आहे.
  • पुणे ते नाशिक मार्ग - हे अंतर २४०.५ किमी इतके आहे.
  • मुंबई ते त्र्यंबकेश्वर मार्ग - हे अंतर १८५.७ किमी इतके आहे.
  • शिर्डी ते त्र्यंबकेश्वर मार्ग - हे अंतर ११६.५ किमी इतके आहे.
  • ठाणे ते त्र्यंबकेश्वर मार्ग – हे अंतर घोटीमार्गे १५७ किमी इतके आहे.
  • औरंगाबाद ते त्र्यंबकेश्वर मार्ग - अनेक भाविक औरंगाबाद जिल्ह्यातून त्र्यंबकेश्वरला येण्यासाठी औरंगाबाद-नाशिक महामार्गाने येऊन पुढे नाशिक पासून त्र्यंबकेश्वरला पोचतात. औरगांबाद ते नाशिक १९७ किमी व पुढे २८ असे एकूण २२५ किमी इतके अंतर आहे.
  • जव्हार ते त्र्यंबकेश्वर मार्ग – हे अंतर ५१ किमी इतके आहे.
 त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी बस व टॅक्सी उपलब्ध असतात. तेथे सोयी सुविधांनी युक्त अशा धर्मशाळा मिळतात. तसेच तेथील क्षेत्रोपाध्याय आवश्यकतेनुसार रहाण्याची व खाण्याची सोय करतात.

 ब्रह्मगिरी प्रदक्षिणा :-

    ब्रह्मगिरी प्रदक्षिणा हा आनंददायी प्रवास आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराजांना याच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेच्या दरम्यान योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला आणि भागवत धर्माची स्थापना झाली. अशा पुराणकालापासून ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा प्रचलीत आहे. पुण्यप्राप्तीसाठी, तर कधी पापक्षालनासाठी प्रदक्षिणा झाल्या आहेत.या ब्रम्हगिरी प्रदक्षिणेबाबत बरेचसे एतिहासिक उल्लेख सुध्दा मिळतात. पेशवेकाळात गुन्हेगाराला गुन्ह्याचे प्रायश्चित म्हणून ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा घालायला सांगितली जाई.त्याचा उल्लेख असा. 'नरहरी रत्नाळकर ब्राम्हण भ्रष्ट झाला. यास्तव नरहरीचा चुलतभाउ नारो यादव याजकडून त्याचा घटस्फोट करवून प्रायश्चितार्थ श्री त्र्यंबकेश्वराच्या दहा कोसाच्या एकशे एकवीस प्रदक्षिणा कराव्यात आणि करुन झाल्यावर पत्र देउन पाठवावे.
  एवढेच नाही तर पेशवेकाळात या मार्गाचे सुशोभीकरण देखील करत असत.त्याचा उल्लेख असा, त्र्यंबक मुकुंदतीर्थापासून नरसिंहतीर्थ, तळेगावपर्यंत प्रदक्षिणेच्या वाटेवर झाडे लावावीत, हे काम नारो शंकर देवालयाच्या कामावर त्याकरवी करावावे. पंचवीस हातावर झाडे लावावीत. दुतर्फा लावावीत.
  यावरुन हे समजते कि प्रदक्षिणामार्गाला पुर्वीपासून महत्व होते. किल्ल्याच्या प्रदक्षिणामार्गावर रामतीर्थ, नृसिंहतीर्थ, प्रयागतीर्थ अशी कुंडे आहेत. 
 इतिहासात शिक्षा म्हणून प्रदक्षिणा करण्यास सांगितले आहे. तथापि प्रदक्षिणा तिस-या सोमवारीच करावी हा नवा पायंडा सुमारे १५ वर्षांपासून रूढ झाला आहे. यामध्ये सलग पाच वर्षे तिस-या सोमवारी प्रदक्षिणा केली, तरच लाभ होतो असादेखील प्रचार झाला.
    वास्तविक पाहता ब्रह्मगिरी प्रदक्षिणा वर्षभरात केव्हाही केली, तरी सारखाच लाभ देणारी आहे. त्यात श्रावणात केल्यास अधिक चांगले. केवळ श्रावणातील तिस-या सोमवारचा आग्रह धरल्याने ठराविक वेळेत काही लाख भाविक या २० किलोमीटच्या मार्गावर चालतात तेव्हा अनेक समस्या निर्माण होत असतात. यामध्ये नाशिक-त्र्यंबक वाहतुकीपासून ते स्वच्छता आणि सर्वच बाबतीत ताण निर्माण होतो. तशात रात्री-अपरात्री ही प्रदक्षिणा होत असल्याने सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. श्रावणी सोमवारला फेरी करणे विशेष फलदायी मानले जाते. पहिले दोन श्रावण पूर्वी त्र्यंबकला विशेष गर्दी असायची. पौर्णिमेपर्यंत लिंगार्चन, पोथीपुराण व पारायण आदी धार्मिक विधींची रेलचेल, भाविकांची गर्दी त्यातून व्यावसायिकांना उसंत मिळायची नाही. श्रावण उतरणीला लागल्यानंतर तिस–या सोमावरी फेरीला प्राधान्य दिले जायचे. तशात औरंगाबाद, नाशिक आदी भागातून याच सोमवारी फेरीसाठी भाविक यायचे. यातूनच तिस–या सोमवारचे महत्त्व उदयाला आले आणि १९९६ नंतर तिसरा सोमवार अक्षरश: लाखोंच्या गर्दीने फुलायला लागला आणि त्यातून नव्या समस्याही निर्माण झाल्या. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा तीन प्रकारची आहे. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा, हरिहर ब्रह्मगिरी प्रदक्षिणा आणि इंद्रपर्वत (अंजनेरी पर्वत) यासह ब्रह्मगिरी प्रदक्षिणा. या प्रदक्षिणेत ब्रह्मगिरी पर्वतास फेरी मारणे साधले आहे. सर्वसाधरणत: फेरी म्हणून संबोण्यात येते ही ब्रह्मगिरी पर्वतास असलेली लहान प्रदक्षिणा आहे. सुमारे २० किलोमीटरचा हा मार्ग आता पक्का रस्ता झाला आहे. या मार्गावर कित्येक तीर्थ आहेत. त्यापैकी बहुतेक आज काळाच्या ओघात लुप्त झाले आहेत. प्रदक्षिणेचा मार्गदेखील सोयीचा ठरेल, असा बदलला आहे. त्यात काही तीर्थ राहून जातात. ही प्रदक्षिणा करण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. प्रदक्षिणेला सुरुवात करताना पंचपंच उषका:ली सूर्योदयापूर्वी दोन तास उठून कुशावर्तावर स्नान करून श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन मार्गक्रमण करावे, म्हणजे साधारणत: पहाटे पाच वाजता ही फेरी सुरू करावी. सूर्योदय होताना प्रयाग तीर्थास वळसा घालून पेगलवाडीमार्गे सृष्टी सौंदर्याचा अस्वाद घेत बहरलेल्या निसर्गाचे अवलोकन करत, शिवाचे नामस्मरण करत सात्वीक मनाने फेरी करावी. 

       ब्रह्मगिरी प्रदक्षिणा तीन प्रकारची आहे. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा, हरिहर ब्रह्मगिरी प्रदक्षिणा आणि इंद्रपर्वत (अंजनेरी पर्वत) यासह ब्रह्मगिरी प्रदक्षिणा. या प्रदक्षिणेत ब्रह्मगिरी पर्वतास फेरी मारली जाते. सर्वसाधरणत: त्यास ‘फेरी’ म्हणून संबोधण्यात येते. ही ब्रह्मगिरी पर्वतास असलेली लहान प्रदक्षिणा आहे. सुमारे २० किलोमीटरचा हा मार्ग असून या मार्गावर अनेक तीर्थ आहेत. त्यापैकी काळाच्या ओघात लुप्त झाले आहेत.
श्रावणामध्ये दर रविवारी रात्री कुशावर्तापासून फेरीची सुरुवात होते. प्रचंड गर्दी असते तेथे २० किमी आणि ४० कि.मी अशा दोन प्रदक्षिणा आहेत. अनुभवी लोक मोठी प्रदक्षिणा करतात. बाकी छोटी प्रदक्षिणा करतात. त्यासाठी १२ तास लागतात. ही सगळी प्रदक्षिणा अनवाणी होते. दहा ते पंधरा वर्षापूर्वी फक्त श्रावण महिन्यातील तिसर्या रविवारी रात्री १२ वा. कुशावर्त तीर्थावर स्नान करून फेरीस भाविक सुरूवात करत असत. आता श्रावणातील प्रत्येक सोमवारी ब्रम्हगिरीची फेरी घातली जाते. प्रदक्षिणा ही दोन प्रकारे असते. एक फक्त ब्रम्हगिरी पर्वताला फेरी मारणे-ती साधारणत: ३० किलोमीटरची आणि दुसरी म्हणजे ब्रम्हगिरी आणि हरिहर पर्वत – ६० किलोमीटरची तर ६० किलोमीटरची प्रदक्षिणा ही कठीण आहे. त्यात ७ पर्वत चढावे आणि उतरावे लागतात. याठिकाणचा जंगल परिसर आहे.
 भाविकांमध्ये जास्त प्रसार नसल्याने मोठ्या प्रदक्षिणेला कोणी जास्त जात नाही. पण घनदाट जंगल  निसर्गाचा आस्वाद घेणे यापासून भाविक वंचित राहतात. कारण या भागाचा विकास झालेला नाही. मोठ्या प्रदक्षिणा मार्गात १०८ तीर्थ लागतात तसेच प्रसिद्ध हरीहर किल्ल्याला  वळसा घालीत ही प्रदक्षिणा होत असल्याने मोठ्या अंतरातून कोणीही जात नाही. ही प्रदक्षिणा जादा अंतराची आहे. अधिक माहिती नसल्याने आणि मार्गाचा विकास नसल्याने भाविक वंचित राहत असल्याची वस्तूस्थिती आहे. तरी शासनाने या प्रदक्षिणा मार्गाकडे लक्ष घालावे. मोठ्या प्रदक्षिणा मार्गाचा विकास झाला तर, या भागातून पर्यटकांचा ओघ वाढेल, पर्यायाने या भागातील आदिवासींना रोजगाराची संधीही मिळेल.होईल तसेच लहान या प्रदक्षिणा मार्गावर होणारा गर्दीचा ताण कमी होऊन मोठ्या प्रदक्षिणा मार्ग आणि तीर्थ यांचे दर्शन होईल.
     छोट्या प्रदर्शनाला जाणे येण्यासाठी सहा तास लागतात १८ किलोमीटर आहे. तर मोठ्या जाणे येण्यासाठी बारा तास लागतात ही प्रदक्षिणा ३५ किलोमीटर आहे. त्र्यंबक गावातून परिसरातून जाणारे भाविक शक्यतो मोठ्या प्रदक्षिणेला जात असतात. विशेष म्हणजे दोन्ही प्रदक्षिणेसाठी वैतरणा नदी , गणेश मंदिर येथून रस्ता जातो. लगत डाव्या बाजूने थोडा पुढे जाणारा कच्चा रस्ता मोठ्या प्रदर्शनी मार्गेकडे (धाडोशी) जातो. तर गणपती मंदिर पासून खेटून जाणारा रस्ता लहान (सिमेंटचा) प्रदक्षिणामार्गाकडे जातो. अस्वलीचे नदी म्हणजेच ब्रह्मकमंडळ कुंड लागते जवळ झरवड आहे.
     नदी पासून पुढे उतरताना रडकुंडी घाट आहे. काट्या कुट्यातून उतरावे लागते. घाट पार केला की पुढे डोंगर उजव्या बाजूला जवळ वेताळ डोंगर लागतो. हा डोंगर लागला म्हणजे मोठ्या प्रदक्षिणामार्गात योग्य दिशेने वाटचाल चालू आहे हे लक्षात येते. कारण पूर्ण वाटचाली जंगलातून आणि राना वनातून तसेच कधी कच्चा रस्ता तर कधी तर कधी पायवाट्ने होत असते. वेताळ म्हणजे हरिहर किल्ल्याचा पायथा येथे दर्शन घेऊन प्रसिद्ध सरोवर लागते.
      मोठ्या मोठ्या प्रदक्षिणामार्गात लागणारे हरिहर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले प्रसिद्ध सरोवर सरोवरातील पाणी कायम अतिशय स्वच्छ असते.येथे गणेश मूर्ती आहे. हे सरोवर कलात्मक पद्धतीने दगडी बांधनीचे आहे . या सरोवरात तांब्याचा पैसा टाकल्यास तो तुम्हाला तळाशी गेलेला दिसतो असे जुने लोक सांगतात.इतके स्वच्छ तीर्थ आहे. जूने कुशावर्त म्हणूनही या तीर्थाची ख्याती आहे.
   श्रावण मासात भावीक दर्शन साठी जातात. (जवळजवळ कळमुसते रोड लेकुरवाळीचे दर्शन होते). पुढे देवी चालत रस्त्याने रस्ता जव्हार रोड वर आले की गणपत बरीतून त्र्यंबकेश्वर मध्ये परतता येते. काही ठिकाणी कच्चा रस्ता झाला होता काही ठिकाणी पुन्हा तो वाहून गेला काही ठिकाणी डोंगराची अडचण असल्याने रस्ता झालेला नाही. निदान कच्चा रास्ता शासनाने केल्यास मोठ्या प्रमाणावर भाविक या रस्त्याने मोठ्या प्रदक्षिणेस जातील तसेच आसपासच्या अती दुर्गम खेइताना रोजगार उपलब्ध होईल.
       पंरतु, छोटी प्रदक्षिणा ही किमान ६-७ तासात अगदी आरामात पुर्ण करता येत असल्याने भाविक या प्रदक्षिणेलाच जास्त महत्व देतात. सुर्योदयापूर्वी दोन तास आधी तिर्थराज कुशावर्तावर स्नान करून आणि नंतर श्री ञ्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन प्रदक्षिणेला मार्गक्रमण करतात. ही वेळ आदर्श मानली जाते कारण त्यानंतर सुर्योदय होतांना नाशिक मार्गावर स्थित असलेल्‍या प्रयागतिर्थास वळसा घालून पेगलवाडी आणि पुढे पहिनेमार्गे सृष्टीसौंदर्याचा आणि सुर्यादयाचा आस्वाद घेत पुढे जाण्याचा आनंद मिळतो. ब्रम्‍हगिरी पर्वतावर गोदावरी नदीचा उगम आहे आणि त्याचमुळे या महाकाय पर्वताची ही प्रदक्षिणा तितकीच महाकाय आहे.
     
     श्रावणात केल्‍या जाणा-या या प्रदक्षिणेच्या मागे जसे एक अध्यात्म आहे तशीच निसर्गाची एक अनुभूती देखील आहे. निसर्गाचा निरागस आणि स्वच्छ चेहरा इथे पावलोपावली बघायला मिळतो. बहुतांश वेळेला दुतर्फा असलेले डोंगर अर्धेअधिक धुक्यांनी झाकलेलेच असतात. क्षणभरासाठी हे धुके बाजुला सरते आणि मग नव्या नवरीने तिच्या डोक्यावरचा पदर हळूच दुर सारून तिचे मुखदर्शन घडवावे तसा या डोंगराचा उजळलेला माथा तुम्हाला बघायला मिळतो. नाट्यगृहात जावून नाटक बघतांना, रंगमंचावर नेपथ्यकाराने विशीष्ट ठिकाणी अधून मधून प्रकाशझोत टाकावा तसा दुरवर कुठेतरी सुर्यप्रकाशाचा फोकस देखील अधूनमधून बघायला मिळतो.
 श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे,
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे…
        बालकवींच्या कवितेतला हाच ‘श्रावण’ तुम्ही पायी चालत असतांना तुमच्या पासून काही अंतरावर पडत असलेल्या पावसातून इथे नक्कीच अनुभवता येतो. आपण उभे आहोत आणि पाऊस आपल्या दिशेने येतोय…..नंतर पुढच्याच काही क्षणात तुमच्या अवतीभोवती देखील पाऊस पडतोय हा अनुभव तुम्ही कधीच घेतलेला नसेल तर तो योग तुम्हाला या प्रदक्षिणेत घेता येईल. जवळ येत जाणारा टपटप आवाज, अंगात शिरणारा गारवा, अवघ्या काही अंतरावर पडत असलेला पाऊस आणि नंतर तुम्हीच त्या पावसाखाली भिजणं ही प्रक्रिया जितकी पटकन होते तितकीच त्यानंतर होणारी पावसाची उघडीप आणि मग सुरू रहाणारा ऊन – पावसाचा खेळ परमोच्च आनंद देवून जातो.

      इथल्‍या डोंगरावरच्या अंगाखांद्यावर उसळी घेत छोटया छोटया खळीतून जमिनीच्‍या दिशेने येणारी धबधब्यांची रांग म्हणजे जणूकाही एखाद्या सौंदर्यवतीच्या अंगावर घातलेले दागिनेच. याच धबधब्यातून पुढे तुमच्यासोबत जमिनीवर वाहत पुढे जाणारे ओहोळ हे एखाद्या कथ्थक करणा-या नर्तकीच्या पायातल्या घुगंरासारखे सतत वाजत असतात आणि त्या संगिताच्या सानिध्यात तुमचे पाय नकळतपणे मैलाचा एक एक दगड कसा मागे टाकत जातात हे तुम्हाला समजतही नाही. भात, नागली, खुरसणी, वरई या पिकांची शेती. त्या शेतीत घोंगडीच्या मदतीने पावसाचेही आव्हान परतवून लावणारे कष्टकरी शेतक-यांचे कुटूंब, हा प्रवास या सगळया गोड वातावरणात कधी संपतो हे समजतही नाही.
      धार्मिक ग्रंथात असा उल्लेख केलेला आहे की ब्रम्हगिरीच प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य मिळते. असा पुराणात उल्लेख आहे.  ही प्रदक्षिणा करण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. प्रदक्षिणेला सुरुवात करताना पंचपंच उषका:ली सूर्योदयापूर्वी दोन तास उठून कुशावर्तावर स्नान करून ओल्या अंगाने श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन मार्गक्रमण करावे असे सांगितले जाते. मात्र गर्दी खुप असल्यास कुशावर्तावरून त्र्यंबकेश्वर मंदिरासमोरून जाताना कळसाला नमस्कार करावा, मनोमन श्रीशंकराला साद घालावी आणि सरळ रस्ता धरावा. दर्शनासाठी थांबण्याची आवश्यकता नाही. बरेच भाविक कुशावर्तात स्नान करून भाविक कुशावर्ताला एक प्रदक्षिणा घालून पुढे त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतात. आमची प्रदक्षिणेला सुरुवात करतात. गुरुमंत्र, आवडते इतर मंत्र, शंकराचे ध्यान, किंवा नामस्मरण करणे सुरु करावे. हि फेरी गौतमाच्या मंदिरापर्यंत जाऊन परतते, त्यामुळे ते मंदिर येईपर्यंत गप्पाटप्पा शक्यतोवर नको. गौतमाच्या डोंगराच्या पुढचा प्रवास हा गप्पांमध्ये करावा, तोपर्यंत साधनेची कास धरावी. साधारणत: पहाटे पाच वाजता ही फेरी सुरू करावी. तिथून सरळ बाहेर पडल्यानंतर नाशिक च्या दिशेचा रस्ता धरावा. थोड्या अंतरावर उजव्या हाताला प्रयागतीर्थ नामक कुंड लागते. त्या कुंडाला दोन्ही बाजूला पायऱ्या आहेत. त्या कुंडाला प्रदक्षिणा घालावी आणि दोन्ही बाजूंच्या पायऱ्यांवरून उतरून पाण्यात पाय टाकून कुंडास आणि पायऱ्यांवरील मंदिरास नमस्कार करावा.हि प्रदक्षिणा घातली, कि उजवीकडील पेगलवाडी मार्गे जाणारा घोटी मार्ग पकडावा.हा रस्ता संपूर्ण डांबरी आहे. सर्वात प्रथम संत निवृत्तीनाथांनी ब्रम्हगिरीस प्रदक्षिणा घातली आहे. ज्या ठिकाणी संत निवृत्तीनाथ थांबले त्याठिकाणीच फेरी मारणारे भाविक थांबून आराम करत असतात. यावेळी लाखो भाविक ब्रम्हगिरी पर्वताला फेरी मारत असतात.
वर नजर टाकली तर ब्रह्मगिरीच्या अंगाखांद्यावर नांदणारे ढग थकवा पळवून लावतात. प्रयाग तीर्थास वळसा घालून पेगलवाडीमार्गेसृष्टी सौंदर्याचा अस्वाद घेत बहरलेल्या निसर्गाचे अवलोकन करत, शिवाचे नामस्मरण करत सात्विक मनाने फेरी करावी. 
Trimbak Feri Map
   प्रदक्षिणा मार्गावर अनेक तिर्थे लागतात. प्रयाग तीर्थ, सरस्वती तीर्थ, नागा तीर्थ, राम तीर्थ, वैतरणा बाणगंगा निर्मल तीर्थ, बाणगंगा धवलगंगा पद्मतीर्थ, नरसिंह तीर्थ, बिल्व तीर्थ आदी आणि नद्या व मंदिरे लक्ष वेधून घेतात. प्रदक्षिणेदरम्यान गौतमाची टेकडी उतरल्यानंतर नमस्काराचे ठिकाण लागते. येथे पंचमुखी शिवस्वरूप ब्रह्मगिरीस आपण पूर्वाभिमुख होऊन साष्टांग नमस्कार घालावा, अशी प्रथा आहे.
   इथून एक तासाभरात उजवीकडे जाणारा रस्ता येतो. उजवीकडे वळलात कि लगेचच तुम्हाला उजव्या हाताला एक वस्ती लागते. त्या वस्तीमध्ये विचारा कि ‘शबरीचे मंदिर कुठे आहे’?हे लहानसे पुरातन मंदिर अगदी शेतामध्ये लपले आहे. सिमेंटच्या रस्त्यावरून आत गेल्यानंतर शेतामधून जावे लागते. ह्या रस्त्यावर चपला बूट उपयोगी नाहीत. चिखलात पाय टाकत हा रस्ता धुंडाळावा लागतो. नाहीतर तिथे बाहेरच्या चहाच्या टपरीवर कोणी रिकामे असेल तर त्याला सोबत न्यावे, आणि त्यास काही बिदागी द्यावी.एकदा शबरी मंदिर झाले, कि पुन्हा डांबरी सडकेवरून चालणे सुरु करावे. थोडे पुढे गेल्यावर एक गाव गेल्यानंतर उजवीकडे एक तळे लागते, ज्याला लागून सिमेंटचा एकपदरी रस्ता जातो. हा फेरीमार्ग आहे.काही वर्षांआधी इथून आम्ही शेतामध्ये उतरायचो, आणि चिखलातून मार्गक्रमणा करायचो. पण आता सरकारने अतिशय उत्तम असा सिमेंटचा पायी चालण्यासाठी मार्ग बनवला आहे. जेमतेम एक पदरी असल्यामुळे वाहनांना येथे प्रवेश नाही, पण चालण्यासाठी मात्र हि उत्तम सोय आहे. रस्त्यामध्ये वैतरणा नदीवरचा एक पूल पार कराल, ज्याच्या अखेरीस एक गणपती मंदिर आहे. नदीकाठच्या ह्या छोट्याश्या मंदिराचे दर्शन घेऊन मार्गस्थ व्हावे. शेजारच्याच वैतरणा नदीमध्ये थोडा श्रमपरिहार देखील करता येईल. ह्या रस्त्यावरून घाट सदृश्य चढण पार केल्यानंतर गौतमाच्या डोंगराच्या पायथ्याशी हा रस्ता अकस्मात संपतो, आणि इथून ट्रेक सुरु होतो. आधीच्या काळी हा रस्ता शेतातून आणि चिखलातून येत असल्यामुळे जरा तरी वॉर्मअप व्हायचा, पण आता चांगल्या सडकेवरून थेट वाटचाल सुरु होत असल्यामुळे थोडा मानसिक धक्का बसतो!
 (  फेरीच्या दिवसामध्ये या मार्गावर गाडी नेण्याचा विचारही करू नका. एकपदरी रस्ता असल्यामुळे गाडी उलट फिरवण्यासाठीदेखील जागा नाही, आणि बऱ्याच वेळ गाडी रिव्हर्स आणल्यानंतर मला यु-टर्नसाठी जागा सापडली. रस्त्यावर भाविकांची गर्दी असल्यास गाडी बिलकुल जाऊ शकणार नाही.)
 गौतम डोंगराच्या वर गौतम ऋषींनी स्थापिलेले मंदिर आहे. मंदिराचे दर्शन घेतले, कि तुमची अर्धी फेरी संपली. आता फक्त ‘परतणे’ शिल्लक. डोंगर उतरताना निसरड्या दगडांमुळे सांभाळून उतरावे लागते. पुढचा आपला रस्ता हा आदिवासी पाड्यांमधून येतो. इथे अमाप गरिबी आहे, त्यामुळे शक्य झाल्यास इथे कपडे, पेन, पेन्सिल नक्की द्यावेत.
     परतीच्या रस्त्यावर डांबरी सडक लागल्यानंतर छोटी छोटी देवळे रस्त्यात लागतात. त्यांच्या दर्शनाचा लांबूनच आनंद घेत घेत आपण परत त्रंबकेश्वर मंदिरापुढे पोहोचतो.सकाळाच्या वेळेस प्रदक्षिणा सुरू केल्यानंतर येथे हा अर्धा प्रवास संपतो. येथून होणारे ब्रह्मगिरीचे विलोभनीय दर्शन पाहायला मिळते. श्रावण महिना सुरू होताच महिनाभर प्रदक्षिणा करणारे भाविक या मार्गावर असतात. तसेच श्रावणात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी निसर्गप्रेमीदेखील येतात.
”दृष्टी पडता ब्रम्हगिरी । त्यासी नाही यमपुरी ॥
”नामा म्हणे प्रदक्षिणा । त्याच्या पुण्या नाही गणना ।।
    पाच सहा तासापूर्वी आपल्याला अलविदा करणारा शंकर आता आपले प्रेमाने स्वागत करीत असतो, ख्यालीखुशाली विचारात असतो. ठुसठुसणारे पाय आणि तृप्त मनाने आपण तुडुंब भरलेले असतो. मंदिरासमोर उभे राहून पुन्हा कळसाकडे पाहून दर्शनाचा आनंद घ्यावा, मनोमन श्रीशंकराचे आभार मानावेत, आणि आपल्या निवासस्थानाचा रस्ता धरावा.
 
 ब्रम्हगिरी प्रदक्षिणा मार्गावरील देवालये :-
प्रदक्षिणा मार्गावर अनेक तीर्थ आहेत. प्रयाग तीर्थ, सरस्वती तीर्थ, नागतीर्थ, रामतीर्थ, वैतरणा, बाणगंगा, निर्मल तीर्थ, धवल गंगा, बिल्व्तीर्थ, आदी तीर्थ मंदिरे लक्ष वेधतात. प्रदक्षिणा दरम्यान गौतमाची टेकडी उतरल्यानंतर नमस्काराचे ठिकाण लागते. येथे पंचमुखी शिव स्वरूप ब्र्म्हगिरीस पूर्वाभिमुख होत साष्टांग नमस्कार घालावा, अशी प्रथा आहे.

हे सोबत घ्या
छोट्या प्रदक्षिणेत सर्वसाधारणपणे २०-२१ कि.मी. चा पायी प्रवास करावा लागतो. शक्यतो श्रावणातल्या एखाद्या सोमवारी तुम्ही निघणार असाल तर ब-यापैकी गर्दी असल्यामुळे रस्त्यात चहा आणि नाष्त्याची स्थानिक ग्रामस्थांनी लावलेली तात्पुरती दुकाने इथे मिळतात. लिंबाचे सरबत, पिण्याच्या पाण्याची बाटल्या मिळतात. काही ठिकाणी गरम भजी अाणि वडे देखील खायला मिळतात. त्यामुळे फेरीसाठी निघतांना खाण्यापिण्याची व्यवस्था सोबत नेलीच नसेल तर फारसं काही बिघडत नाही. परंतु, सोमवार सोडून इतर दिवशी तुम्ही जाणार असाल तर मात्र खाण्यापिण्याची थोडीफार व्यवस्था सोबत ठेवलेलीच बरी.

याखेरीज, रस्त्यात तुम्हाला पावसाच्या सरी हमखास लागणार असल्याने प्रदक्षिणेला निघतांना अगदीच हलक्या वजनाचा रेनकोट, टोपी, मोबाईलची काळजी घेणारे कव्हर, फार तर फार पाठीवर हलक्या वजनाची बॅक सॅग सोबत असेल तर पुरे. छत्रीचा मात्र काहीही उपयोग होत नाही. त्र्यंबकेश्वर मधून फेरीला सुरूवात करण्यापुर्वी मंदीराजवळ स्थानिक दुकानात प्लास्टीक कापडाचे घोंगडे देखील विकत मिळतात. शिवाय प्रदक्षिणा मार्गावर पायी चालत असतांना वयोमानानुसार थोडाफार त्रास जाणवला तर आधार म्हणून लाकडाच्या काठया देखील विकत मिळतात.

तुमचा डीएसएलआर कॅमेरा सोबत न्यायचा असेल तर पावसापासून त्याचा बचाव करता येईल याची आधीपासूनच व्‍यवस्‍था करून ठेवा. संपुर्ण पावसाळी वातावरण असेल, तर तुमचा कॅमेरा त्या दर्जाचा असल्याशिवाय तुम्हाला फोटोग्राफीचा आनंद घेता येणार नाही. शास्त्रानुसार ही प्रदक्षिणा अणवानीच करावी असे शास्त्र सांगते. बाहेरगावाहून येणार असाल तर रेल्‍वेने तुम्‍हाला नाशिकरोड रेल्‍वे स्‍थानकावर उतरावे लागेल.नंतर तिथून तुम्‍ही नाशिक शहरात बस किंवा रिक्षा व्दारे सी.बी.एस. बसस्थानकावर आल्यास तिथूनच तुम्‍हाला खास फेरीसाठी सोडण्‍यात येणा-या एस.टी. बसेस देखील मिळू शकतील.

हे करू नका
भाविकांबरोबरच इथल्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी काही निसर्गप्रेमी देखील सहकुटूंब येतात आणि त्याचबरोबर रस्त्यात नशापाणी करून धांगडधिंगा घालणारे काही हौशी तरूण देखील येतात. अर्थात, हे दुदैव असले तरी ते सत्य आहे व त्याकडे डोळेझाक करीत तुम्हाला फेरी पुर्ण करावी लागते. ही फेरी पुर्ण करतांना तुमच्याकडून इथल्या निसर्गाला कुठलीही बाधा पोहोचणार नाही याची मात्र काळजी घ्या. प्लास्टीक बॉटल, पिशव्या किंवा प्लास्टीक कागद इथेच टाकून पुढे जावू नका. ते वेस्‍टेज तुमच्‍या बॅगेत घालून पुढे न्‍या. चालत असतांना सहज टाईमपास म्हणून रस्त्यावरच्या झाडांना उगाच जखमी करू नका.

शेतक-याने लावलेले पिक तुमच्या पायदळी तुडवले जाणार नाही याची प्रकर्षाने काळजी घ्या. स्थानिकांची काही लहान मुलं तुमच्यासमोर येवून पैसे मागतांना तुम्हाला रस्त्यावर भेटतील. त्यांच्याकडे तुच्छतेच्या भावनेने बघू नका. त्यांना काहीतरी देण्याच्‍या पुर्वतयारीने जा. त्यांच्या हातावर पैसे ठेवा असे मी म्हणणार नाही, पण मग शालेय वस्तु, खाद्यपदार्थ असे काही सोबत नेता आल्यास नक्की न्या आणि त्यांना त्या वस्तू देतांना, त्या बदल्यात त्यांच्या चेह-यावरचा निरागस आनंद नक्कीच अनुभवून बघा.

काही सल्ले:

  1. थोडक्यात: पहाटे पाचच्या सुमारास निघणे – तीर्थराज कुशावर्तात डुबकी – त्र्यंबकेश्वर मंदिरास नमस्कार – प्रयागतीर्थास प्रदक्षिणा – शबरीचे मंदिर – वैतरणा गणेश – गौतमाचा डोंगर – पुन्हा त्र्यंबकेश्वर मंदिर
  2. फेरी करताना कित्येक लहान मुले ‘खाऊ द्या नाहीतर पैसे द्या’ म्हणत मागे लागतात. कित्येक वर्षांची हि परंपरा आहे, आणि ह्यात दानापेक्षा कौतुकाची भावना जास्त आहे. अगदी लहान बाळे देखील समोर येतात! या बालसेनेसाठी काही खाऊ, पेन्सिल, रबर वैगेरे शालेय सामान नक्की न्यावे.
  3. गौतम डोंगराच्या पुढच्या आदिवासी पाड्यांमध्ये भीषण गरिबी आहे. तिथल्या आपल्या माई-भगिनींसाठी साड्या वैगेरे कापडे शक्य झाल्यास सोबत न्यावी.
  4. बरेच भाविक फेरी अनवाणी करतात, पण आधी शेतातल्या चिखलात पाय टाकल्यावर थंड वाटायचे, तसे आता पक्क्या सडकेवर पाय घासताना वाटणार नाही, त्यामुळे हा निर्णय वैयक्तिक घ्यावा.
  5. सर्वात महत्वाचे: हि फेरी शारीरिक क्षमतेचा कस बघणारी आहे. आता जरी बराचसा रस्ता डांबरी आणि सिमेंट चा झाला आहे, तरी ५-६ तास सलग चालणे, आणि गौतमाचा डोंगर चढून उतरणे ह्या गोष्टी थोड्या कठीण आहेत. शेवटी ईश्वरभक्तीचे अनेक मार्ग आहेत, तेव्हा स्वत:च्या शरीराचा कल पाहून फेरीचा निर्णय घ्यावा.
संदर्भ :-
१) नाशिक जिल्हा गॅझेटीयर
२) https://warkarirojnishi.in
३) https://indiadarpanlive.com/special-article-brahmagiri-pradakshina-by-jagdish-deore/
४) https://kahitari.com
५) https://www.pktipsonline.com
६) https://mr.quora.com
७)  https://www.trimbakeshwar.org/marathi
८) https://www.majhimarathi.com
९) www.trumbakeshwartrust.com
१०) https://alotmarathi.com
११)  रमेश पडवळ, प्रशांत परदेशी यांचे लिखाण
१२) https://www.marathisocial.com
१३) https://www.santsahitya.in

The Nassak (Nashik) Diamond
The Nassak (Nashik) diamond also known as the Eye of the Idol diamond, is a large, 43.38 carats (8.676 g) diamond that originated as a larger 89 carat diamond in the 15th century in India. It was found in Golconda mines of Kollur, Andhra Pradesh and was the adornment of Shivalingam in the Trimbakeshwar Shiva Temple, near Nashik, in the state of Maharashtra.
The Nashik diamond was looted by British East India Company during the Third Anglo-Maratha War in 1817 and sold to British jewellers Rundell and Bridge in 1818 for 3,000 pounds (equivalent today to £224,000). Rundell and Bridge recut the diamond after which it made its way into the handle of the 1st Marquess of Westminster's dress sword.
The Nassak Diamond was imported into the United States in 1927, and was considered one of the first 24 great diamonds of the world by 1930. American jeweller Harry Winston acquired the Nassak Diamond in 1940 in Paris, France and recut it to its present flawless 43.38 carats (8.676 g) emerald cut shape. Currently the diamond is held at a private museum in Lebanon, though there are calls for its return and restoration to the Indian temple










हमारे महान पुर्वज कलाकारों द्वारा अद्भुत अद्वितीय कलाकृतियाओं से बनाया गया श्री #गजानन_त्रयंबकेश्वर_मंदिर का दर्शन करें और अधिक से अधिक उन मंदिरों का प्रचार करें और ज्यादा से ज्यादा देखें,
न कि उस जगह का प्रचार करें और देखें जिसमें हमारे पुर्वज कलाकारों के हाथ काट दिए गए थे उस जगह का,समझदारों के लिए इशारा ही बहुत है
जय श्री गणेश 🙏🔱🙏
!! नासिक , महाराष्ट्र।
Shri Gajanan #Trimbakeshwar Temple created by our great forefather artists with amazing unique artworks and promote those temples as much as possible and see more,
Do not promote and see the place in which the hands of our forefather artists were cut off, it is a sign for the wise.
Jai Shree Ganesh 🙏🙏
, Nashik, Maharashtra.








ज्ञानेश्वर माउलींच्या जीवनावरील कादंबरी वाचन श्री पद्माकर गोवईकर यांनी "मुंगी उडाली आकाशी " या ध्वनिफितीत अतिशय सुंदर केले होते. मी ते सतरा अठरा वर्ष्याचा असताना ऐकले होते. आणि वारंवार ऐकत होतो. त्यामध्ये एक प्रसंग होता की आळंदीच्या ब्राम्हणांच्या छळाला कंटाळून विठ्ठल पंत मुलांना घेऊन ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा करायला त्य्रंबकेश्वर येथे जातात व ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा करतात. तेथे असा उल्लेख केलेला ऐकला होता कि ब्रम्हगिरिचि प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य मिळते. कारण ब्रम्हगिरीचा पर्वत म्हणजे साक्षात शंकर आहे. असा पुराणात उल्लेख आहे.

तेव्हापासून मनात होते कि आपण सुद्धा एक तरी प्रदक्षिणा करावी पण खूप वर्षे योगच आला नाही. परंतु या वर्षी भगवान शंकराच्या कृपेने योग जुळून आला. श्रावण अनायासे चालूच होता. आणि जायची तारीख ठरविली ३१ आणि १ बरोबर कोणी मिळते का म्हणून बऱ्याच मित्रांना विचारले पण सुरुवातीला होकार भरणारे शेवटी गळले व शेवटी एक चुलत भाऊ आणि मी असे दोघेच निघालो.
तसे याअगोदर मी त्य्रंबकेश्वर गेलो होतो. पण प्रदक्षिणेची सविस्तर माहिती नव्हती. नेटवरून थोडी मिळाली पण तिचा फारसा उपयोग झाला नसता. म्हणून एकतीस तारखेला सकाळी लवकरच निघालो म्हणजे लवकर पोहचलो तर अजून माहिती घेत येईल. आणि ठरल्याप्रमाणे तिथे पाच वाजता पोहचलो आळंदीतील कैलास ढगे महाराजांच्या ओळखीने खोली सुद्धा चांगली मिळाली .

खोलीवर जाऊन सर्व समान ठेवले आणि लगेच कुशावर्तावर जाऊन हातपाय धुऊन त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला गेलो. अर्ध्या तासात छान दर्शन झाले. दर्शन घेऊन परत येताना सहज एका दुकानात एक पुस्तक चाळत होतो काही पाने पालटया नंतर एक ओवी दिसली

"दृष्टी पडता ब्रम्हगिरी । त्यासी नाही यमपुरी ॥
"नामा म्हणे प्रदक्षिणा । त्याच्या पुण्या नाही गणना ।।

ओवी मनात घोळवतच खोलीवर आलो आणि खोली मालक सतीश पवार यांची भेट घेतली आणि त्यांना प्रदक्षिणे विषयी माहिती विचारली तेव्हा त्यांनी सविस्तर माहिती सांगितली.
प्रदक्षिणा हि दोन प्रकारे असती एक फक्त ब्रम्हगिरी पर्वताला फेरी मारणे ती साधारणता तीस किलोमीटरची आणि दुसरी म्हणजे ब्रम्हगिरी आणि हरिहर पर्वत अशी मोठी साठ किलोमीटरची , तर साठ किलोमीटरची प्रदक्षिणा हि कठीण आहे त्यात सात पर्वत चढावे आणि उतरावे लागतात. शिवाय जंगल आणि निर्जन परिसर आहे. शिवाय वाघाचे देखील भय असते. ती प्रदक्षिणा ग्रुपने केली तर शक्यतो धोका नसतो.

सतीश पवार यांनी पूर्ण श्रावण महिनाभर रोज एक अशी प्रदक्षिणा केल्या आहेत त्यात त्यांच्या दोन तीन प्रदक्षिणा ह्या साठ किलोमीटरच्या असतात. सगळी माहिती जमविल्या नंतर आम्ही लगेच झोपी गेलो कारण सकाळी चारला उठायचे उद्धिष्ट ठेवले होते. आणि उठलोही कुशावर्तात स्नान केले कुशावर्ताला एक प्रदक्षिणा घालून पुढे त्र्यंबके श्वराचे दर्शन घेतले. देवाला मनोभावे बेल फुल वाहिले आणि आमची प्रदक्षिणेला सुरुवात झाली. पहाटेची रम्य वेळ आणि त्र्यंब केश्वराच्या मंदिरातून येणारा ओम नमः शिवाय चा मंद स्वर तोच स्वर मनात ठेऊन त्याचाच जप करत आम्ही चालू लागलो. सुरुवातीला रस्त्याची अडचण येईल असे वाटत होते पण आमच्या मागे पुढे खूप प्रदक्षिणा करणारे भाविक होते. त्यामुळे आमचाही उत्साह वाढला. आणि पावलांनी वेग घेतला. साधारणता मंदिरापासून एक किलोमीटरवर एक तले लागते त्या तळ्याला प्रद्क्सिना घालून पुढे निघावे लागते. पहाटेच्या वेळी पाण्याने तुडूंब भरलेले तळे खूपच सुंदर दिसत होते. उगवतीला लालिमा पसरली होती.

***** फोटो

या सुंदर तळ्याला प्रदक्षिणा घालून पुढे अतिशय चांगल्या डांबरी रस्त्याला लागलो. माहितीप्रमाणे आता जवळजवळ सात ते आठ किलोमीटर असाच रस्ता होता . चालत होतो त्याच्या डाव्या बाजूला अंजनेरी अतिशय सुंदर दिसत होता. आणि त्याला लागून असलेला एक खूप उंच पर्वत वरती आभाळातच घुसला होता.

निसर्गाचे मनमोहक रूप इतके सुंदर दिसत होते कि चालायचे कष्ट अजिबात जाणवत नव्हते. उजव्या हाताला ब्रम्हगिरी पर्वतावर दोन सुळके आकाशाशी स्पर्धा करत होते. आणि धुक्याने त्यांच्या मध्यभागाला लपेटले होते.
पाच सहा किलोमीटर अंतर झाल्यावर रस्ता मोठा वळसा घेणार होता. तिथेच गवतातून जाणारी एक पायवाट दिसली आणि खूप लोक तेथून चालत गेलेल्या खुणा होत्या तेव्हा आम्ही ती पायवाटच पकडली आणि आम्हाला त्याचा फायदा झाला. कारण थोडे पुढे चालून गेल्यानंतर छोटे पण सुंदर राममंदिर लागले. समोर मारुतीराय दर्शन घेतले. एक आदिवासी स्त्री दिवाबत्ती करायला आली होती. मंदिराला उजवी घालून पुढचा रस्ता पकडला आणि थोड्या वेळातच पुन्हा डांबरी रस्त्याला लागलो. काही प्रदक्षिणा करणारे आमच्या पुढे होते ते आता आमच्या मागे पडले.
रामंदिर (फोटो)

एक साधू आमच्या मागून झपझपा चालत येत होते. त्यांना विचारले कि कुठले तुम्ही तर म्हणाले कि त्र्यंबकेश्वरचाच आहे . त्यावर त्यांना म्हटले कि प्रदक्षिणेसाठी आजचाच दिवस का निवडला तर ते म्हणाले कि ,
या महिन्यात दररोज एक अशी महिनाभर प्रदक्षिणा करतो.
एवढे बोलले आणि त्यांचे पुटपुटणे चालू झाले मनात म्हटले महाराजांचे नामस्मरण चालू आहे. त्यांना व्यत्यय नको म्हणून मीही नामस्मरण करत चालू लागलो . वाटेत मारुतीरायांचे एक छोटे मंदिर लागले तिथे नमस्कार केला आणि निघालो.

रस्ता अजूनही डांबरीच होता. वाटेत एक छोटी नदी लागली तिचे नाव माहिती नव्हते पण नंतर खोली मालकाने सांगितले कि ती वैतरणा नदी आहे ब्रम्हगीरीवरच तिचा उगम असल्यामुळे तिचे स्वरूप छोटे होते. पूर्वी गळाभर पाण्यातून तिला पार करावी लागत होती. पण आता तिच्यावर छोटा पूल आहे. आणि पुलाला लागुनच एक गणपतीचे छोटे मंदिर आहे.

आता चढ लागला होता. चालता चालता आळंदीतील दोन साधक विध्यार्थी भेटले आमच्यासारखेच अनवाणी पायाने प्रदक्षिणा करत होते. आज त्यांचा दुसरा दिवस होता. काल आज आणि उद्या अश्या तीन प्रदक्षिणा ते करणार होते. त्यांच्यातीलच एकाने सांगितले कि , आळंदीतील ज्ञानेश्वर कदम म्हणून आहे त्यांनी ८० दिवसात १०८ प्रदक्षिणा केल्या आहेत. काही दिवस एका दिवसात दोन दोन प्रदक्षिणा केल्या मनोमन त्या ज्ञानेश्वर कदमला नमस्कार केला. आणि त्यांनी अजून एका साधकाचे कथा सांगितली ते म्हणजे त्र्यंबके श्वरचेच गणपत बुवा त्यांनी दररोज एक अश्या एक हजार प्रदक्षिणा केल्या त्यांना साडेतीन वर्षे लागली धन्य ते गणपत बुवा आणि धन्य ते ज्ञानेश्वर कदम , कारण एकाच प्रदक्षिणा करण्यासाठी आम्हाला एवढा आटापिटा करावा लागला होता.

आता खरी दमदार चढण लागली. रस्ताही नव्हता दगड धोंड्यातूनच चालावे लागत होते. बरयाच दमछाकी

नंतर खिंडीच्या माथ्यावर आलो आणि आमची अर्धी प्रदक्षिणा पूर्ण झाली. अडीच तासात १५ किलोमीटर

अंतर तोडले होते. खिंडीच्या माथ्यावर गौतम आश्रम होता. आश्रम म्हणजे एक छोटे मंदिर होते
त्यामध्ये

गौतम ऋषी आणि अहिल्या मातेची मूर्ती होती

. आश्रम म्हणजे एक छोटे मंदिर होते त्यामध्ये गौतम ऋषी आणि अहिल्या मातेची मूर्ती होती .

सर्वजन इथे आले कि विश्रांती घेतात पण आम्ही थांबलो नाही आतापर्यंत न थांबतच आलो होतो. म्हणून आताही थांबलो नाही शक्यतो न थांबतच प्रदक्षिणा पूर्ण करायचा विचार होता .
आता निसरडा उतार अगदी हळू उतरावा लागत होता. आमच्यापुढे एक आजोबा साधारणता
७ ५ ते ७ ८

वर्ष्याचे आणि आजी सत्तर बहात्तर वर्ष्याच्या अगदी हळुवारपणे तो निसरडा उतार उतरत होत्या.

आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या दहा बारा आणि पंधरा वर्ष्याच्या नाती प्रदक्षिणा करत होत्या. आजोबा आजीचे कौतुक वाटले श्रावणात एक प्रदक्षिणा करायचा त्यांचा नियम होता .
उतार उतरल्यानंतर दोन छोट्या नद्यांचा संगम लागला नावे माहिती नव्हती पण त्या छोट्या संगमात स्नानासाठी उतरलेल्या भाविकाने सांगितले कि एक गोदावरी आहे जिच्यासाठी गौतम ऋषींनी ताप केले ती दुसर्याही नदीचे नाव त्यांनी सांगितले. आम्ही फक्त हातपाय धुवून नमस्कार करून पुढे निघालो.
संगम फोटो ***

पुढे आल्यानंतर आदिवासी मुली आडव्या आल्या 'काका खाऊ द्या ना , म्हणू लागल्या पण आमच्याकडे त्यांना खायला द्यायला काहीच नव्हते. मी त्यांचा फोटो काढला तर म्हणू लागल्या आमचा फोटो काढला आता काहीतरी द्या असे म्हणू लागल्या मग त्या प्रत्येकीला एक एक रुपया दिला .

पुढे आल्यानंतर एके ठिकाणी खूप प्रदक्षिणा करणारे विश्रांतीसाठी थांबले होते. पण आम्ही न थांबता पुढे निघालो आता खरी कसोटी होती कारण रस्ता खडीचा होता वीस एक किलोमीटर अनवाणी चालल्यामुळे पाय हुळ हुळ करत होते. दगड टोचालकी भरपूर वेदना व्हायच्या पण तरीही आमची प्रदक्षिणा अगदी आनंदात नामस्मरण करत चालू होति.
काही वेळाने माझी गती मंदावली पाय खुब्यात चमकू लागला. प्रत्येक पावलागणिक चमकायचा भाऊ म्हणाला काय रे काय झाले म्हटलं तू चल तुझ्या वेगाने माझा पाय दुखतोय आणि मग आमच्या दोघातले अंतर वाढत चालले

पाय जरी दुखत होता तरी निसर्गाच्या सुंदर रूपाचे अवलोकन करत आणि ओम नमः शिवाय जप करत

असल्यामुळे काहीच वाटत नव्हते. जवळचे पाणी संपून बराच वेळ झाला होता पुन्हा तहान लागली

होती.

पण पाणी मिळण्याचे चिन्ह नव्हते. तसाच चाललो होतो . भाऊ बराच पुढे होता. आणि हाताने काहीतरी

खुणावत होता. जवळ गेल्यावर कळले कि त्याने पुन्हा एकदा पाय वाटेचा रस्ता पकडला होता. गवतातून

जाणारी पायवाट खूपच सुखद वाटली कारण पाय खूपच भाजत होते

पायांना गारवा लागताच बराचसा शिण कमी झाला. पुढे गेल्यानंतर भाऊ थांबलेला दिसला तिथे अजूनही

एक प्रदक्षिणा करणारे कुटुंब थांबले होते . त्यांना पाणी मागितले तर म्हणाले हा डबा घ्या आणि ते

वाहतंय तिथले पाणी प्या

हे असले पाणी प्यायचे ?

अहो डब्यात घेऊन तर पहा स्वच्छ दिसले तर प्या

मी ते डब्यात घेतले तर इतके स्वच्छ पाणी होते कि ते छोटे तीन डबे पाणी पिलो चवीलाही छान लागत

होते. पाणी प्यायल्या नंतर लगेच निघालो आणि थोड्या वेळात पुन्हा मुख्य रस्त्याला लागलो. आणि पुढे

बोर्ड दिसला त्र्यंबके श्वर १ किलोमीटर आनंद झाला.

तसा बोर्ड किलोमीटर दाखवत होता पण कुशावर्त अजून तीन किलोमीटर होते . पण हरकत नाही प्रदक्षिणा

तर पूर्ण होत आली.

प्रदक्षिणा पूर्ण होत आली पण पाय खूपच दुखू लागला होता. शिवाय आता डांबरी वरचा बारीक खडाही

पायाला टोचलेला सहन होत नव्हता . मग नामस्मरणाचा जोर वाढविला आणि त्य नादातच राहिलेले

अंतर पूर्ण केले. कुशावर्तावर आलो हातपाय धवून प्रदक्षिणा घातली त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. नि

आमची प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि ती सुद्धा काहीही न खाता व अनवाणी पायाने. तीस किलोमीटर ला

वेळगला सहा तास.

शेवटी एक मुद्दा सांगायचा राहिला आम्ही ज्यांच्याकडे होतो. ते सतीश पवार आणि आळंदीतील कैलास

ढगे महाराजांचा चांगला परिचय होता. सगळे उरकल्यानंतर आम्ही ढगे महाराजांबरोबर सतीश पवारांच्या

घरी गेलो आणि सोप्यावर बसलो तेवढ्यात सतीश यांची छोटी मुलगी वय फक्त (अडीच ते तीन वर्षे )

जवळ आली आणि ओळीने अगदी पायावर डोके ठेवून आमच्या तिघांच्याही पाया पडली. तिला पाया पड

म्हणून कोणीही सांगितले नव्हते.त्यानंतर तीने आम्हा तिघांनाही प्रसाद दिला म्हणजे हातात काहीही नव्हते .
पण नुसता द्यायचा अभिनय केला. आम्हाला खुपच कौतुक वाटले. त्यानंतर आम्हाला तिच्या आईने

चहा दिला तेव्हा तर त्या मुलीने कळसच केला ती आमच्या जवळ आली नि आपल्या बोबड्या बोलीत

म्हणालीथांबा काका मी तुम्हाला चहा फुकून देते. गरम आहे. आणि अक्षरशा तिने तिघांच्याही कप फुंकून

दिले. आम्हाला त्यामुलीवरील संस्कार पाहून अक्षरशा मन भरून आले.

आणि मनोमन जाणवले कि हि मुलगी सामान्य नाही.

ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय

(फोटो टाकायचे होते पण मला जमले नाही )
anilbtapkir.blogspot.in या लिंकवर काही आहेत


We came back by afternoon and then left.

BrahmagiriTrekTrimbakeshwar_01

There are a few old houses on the way,

BrahmagiriTrekTrimbakeshwar_03

Some locals stay on the way in small huts.

BrahmagiriTrekTrimbakeshwar_05

As we are ascending, the houses looked smaller and smaller.

BrahmagiriTrekTrimbakeshwar_07

Being a pilgrimage, a lot of people do this walk, most of them bare-feet.

BrahmagiriTrekTrimbakeshwar_09

Time for some rest after the climb.

BrahmagiriTrekTrimbakeshwar_12

The walk resumes.

BrahmagiriTrekTrimbakeshwar_15

The trail is quite nicely made with cobbled stones.

BrahmagiriTrekTrimbakeshwar_20
BrahmagiriTrekTrimbakeshwar_21

We found these two sisters who were worshipping every god on the way. We had a chat with them. They sell flowers at the top of the hill.

BrahmagiriTrekTrimbakeshwar_22
BrahmagiriTrekTrimbakeshwar_23

The landscape.

BrahmagiriTrekTrimbakeshwar_29

The cave of Shiva

BrahmagiriTrekTrimbakeshwar_30

As we went up, at one point, the road became very narrow and there was a traffic jam. It was all wet due to rains and we had to be a bit careful.

BrahmagiriTrekTrimbakeshwar_33

Some more caves.

BrahmagiriTrekTrimbakeshwar_34
BrahmagiriTrekTrimbakeshwar_36
BrahmagiriTrekTrimbakeshwar_37

There are numerous small temples on the way...

BrahmagiriTrekTrimbakeshwar_38

We paused for a moment to talk to these pilgrims and take the pictures.

BrahmagiriTrekTrimbakeshwar_40

As we ascended, the visibility reduced. We were in the clouds.

BrahmagiriTrekTrimbakeshwar_41

We found some beautiful flowers on the way. BrahmagiriTrekTrimbakeshwar_43 We still had a long way to go. We continued...

BrahmagiriTrekTrimbakeshwar_47
BrahmagiriTrekTrimbakeshwar_48

The temple on the top.

BrahmagiriTrekTrimbakeshwar_54

There is a small space which is believed to be the origin of the river. Pilgrims offer their prayers to the river goddess.

BrahmagiriTrekTrimbakeshwar_55
BrahmagiriTrekTrimbakeshwar_58
BrahmagiriTrekTrimbakeshwar_61
BrahmagiriTrekTrimbakeshwar_62

The Godavari temple.

BrahmagiriTrekTrimbakeshwar_65
BrahmagiriTrekTrimbakeshwar_67

It was time go get back to civilization. We started our way down.

BrahmagiriTrekTrimbakeshwar_70

Lot of people come from small villages had some unique costumes. This lady wearing the two rings caught our attention.

BrahmagiriTrekTrimbakeshwar_74

Hanuman - the monkey god is ubiquitous with almost all pilgrimages.

BrahmagiriTrekTrimbakeshwar_81
BrahmagiriTrekTrimbakeshwar_77

Video on Trimbakeshwar by Smita

https://siaphotography.in/blog/brahmagiri-trimbakeshwar-nashik-source-of-godavari-river/


 

Shri Trimbakeshwar Temple is about 28 kilometers from Nashik, Maharashtra, near the mountain Brahamagiri, from which the river Godavari flows.
It was constructed on the site of an existing temple by the third Peshwa, Balaji Bajirao (1740-1760).

ganpati bappa statue

Trimbakeshwar Temple is a religious place that hosts one of the twelve Jyotirlingas. Trimbakeshwar is situated at the foot of Brahamagiri hill, which rises 3000 feet above sea level. Temple Trust looks after Trimbakeshwar Temple.
They built Shivprasad Bhakta Niwas, which has 24 rooms (2 bed, 3 bed, 5 bed), a conference hall, a lift, and hot water facilities.

Insights about temple

The temple is surrounded by a 20-25 foot high stone wall. Photography is not permitted; you can not bring a camera inside but can bring a cell phone.
They have two cameras/mobile lockers right in front of the temple’s main entrance (basically it’s just a shop that keeps your times). In one shop I paid Rs 10 to put my camera. The shoe stand is located next to the main gate (Rs 1 per pair).
There is no need for autos since the temple is just a 10-minute walk from the bus stop.

while moving towards the temple, there was this old man blowing and selling a flute and got captured in my cam.

The entrance gate will guide you to the queue, which has a logical separation of roughly 6-7 lines.

The queue of the main temple runs through the Nandi Temple, constructed before the Shiva temple (as you know Shiva temple always has Nandi Idol where Nandi always faces Shivalingam with an exception of Kapileshwar Temple in Panchavati where Nandi is not present at its place).

Nandi Idol is seated on a platform made of white marble that is about a foot or two high.

Trimbakeshwar temple entry
After passing through the Nandi temple, you enter the Shiva temple. From the inside, you enter a large hall with a dome-shaped roof. The sanctum is small and houses the main Shivlingam as well as three lings that live in a hollow building.
We could only see all three miniature lingams through the mirror I described earlier.

Shiv Jyotirling at Trimbakeshwar

Outside the temple just in front of the entrance gate, one can see few cows self-feeding the grass, there must be some story behind this which I didn’t bother to find out.

People were supposed to purchase fodder and need to feed these cows and also there are many smalls temples on roads and poor people’s houses.

Kushavarta

Holy pond Kushavarta at Trimbakeshwar
Holy pond Kushavarta at Trimbakeshwar

A holy pond called “Kushavarta” is just a 5-minute walk away and is where the Ganga begins its journey to the rest of India.
I spent the day exploring Trimbakeshwar! It’s a very small town, and I had a great time walking around. The management had done an excellent job, and most areas were nice and clean.

There were just a few crowds around the temple and the main Kushavrat ghat. The other routes and places were not at all overcrowded.
According to Hindu mythology, taking a bath here purifies one of all sins. According to legend, Sage Gautam forced the river Ganga to halt within the enchanted grass area he created and swore a vow to her.
Kushavarta, a holy pond inside the temple grounds, is the source of the Godavari River, peninsular India’s longest river.
According to legend, Trimbakeshwar was the birthplace of Lord Ganesh, the ‘Tri-Sandhya Gayatri.’
Trimbakeshwar is also thought to be the home of the revered sage Gautama.

About Kushavarta

Gautama worshipped Lord Shiva at Brahmagiri Mountain for the Ganges’ down-flow in order to be free of the sin of gohatya.
The wish was granted, and Goddess Ganges took the form of River Godavari, which flowed from Brahmagiri Mountain’s Kushavarta.
This he did in order to take a holy bath in this water to atone for his sin of slaughtering a cow.
Sheemant Rao Sahib Parnekar built the temple that stands here today around the stalled water.
The walls within the hall are inscribed with various Idols, and there are small temples in each corner.

 https://nashikblogger.com/trimbakeshwar-shiv-temple-nashik/

 

 

 

 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...