|
संगमेश्वर |
|
एक महान तीर्थक्षेत्र व ऐतिहासिक ठिकाण |
|
कालभैरव जोगेश्वरी, कसबा, संगमेश्वर |
|
कसबा |
|
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर हे तीर्थक्षेत्र वसलेले आहे. अलाहाबाद, प्रयाग हे महान तीर्थक्षेत्र आहे. तेथे ज्याप्रमाणे गंगा,यमुना व सरस्वती यांचा त्रिवेणी संगम पहावयास मिळतो त्याच प्रमाणे संगमेश्वर येथे अलकनंदा,वरूणा व शास्त्री या नद्यांचा संगम पहावयास मिळतो. शास्त्री नदी वरूणा नदीला गुप्तपणे मिळाली आहे. अलकनंदा नदीच्या काठावर गोमती तीर्थ, वरूणा तीर्थ, कपील तीर्थ, गोवल तीर्थ अशी सुमारे दहा तीर्थ तसेच कालभैरव मंदीरा शेजारील ज्ञानवापी हे जलयुक्त शिवमंदीर सर्व तीर्थामध्ये सर्वश्रेष्ठ तीर्थ मानेले गेले आहे. चालुक्यवंशी या शीलाहाराने ही दक्षिण काशी वसविली आहे. या क्षेत्राचे वर्णन सह्याद्री खंडामध्ये संगमेश्वरमहात्म्य मध्ये कर्णसुदयनिती या विभागात शेषकवी यांनी केले आहे. येथे असलेली ३६० मंदीरे बहुतांशी शिवमंदीरे असून हेमाडपंथीय रचनेची आहेत. हा कालखंड सुमारे सहाव्या शतकापूर्वीचा असावा असे तज्ञांचे म्हणने आहे. ज्या भागामध्ये ही ३६० मंदीरे वसलेली आहेत त्या गावांला कसबा असे ओळखले जाते. कसबा (फारशी) या शब्दाचा अर्थ मुळ वस्ती आहे असे समजले जाते. या भागामध्ये जैन व लिंगायत धर्मीयांची राज्ये होती. जैन राज्यकर्त्यांची कपील तीर्थ ही राजधानी होती. चौथ्या शतकापर्यंतच्या शाक्तपंथाच्या भयुरी व गोलंकी मठाचा उल्लेख खारेपाटण व संगमेश्वर येथे सापडतो. त्यामुळे महात्मा बसवेश्वर यांनी कोकणामध्ये खारेपाटण ते चिपळूण येथे धर्मप्रसार केला व या शिलाहार राजाने या मंदीराच्या व्यवस्थेसाठी वृत्तीरूपाने सात गावे इनाम दिली होती. त्याची नोंद अजूनही सरकार दरबारी आढळते. अलकनंदा नदीच्या मध्यभागी एक महान शिवतीर्थ (लिंग) होते, परंतु कोकणात होणा-या अतिवृष्टीमुळे उलथापालथ होऊन ते शिवलिंग आज वाहून गेलेले आहे. त्या भागाला ``परटवणे'' असे बोलले जात होते. या ठिकाणी हिंदू धर्मीय आपली धार्मिक कृत्य व विधी करीत असत. त्यामुळे हे धार्मिक तीर्थ म्हटले तर वावगे होणार नाही. येथे असलेल्या ३६० मंदीरांपैकी बरीचशी मंदीरे भुईसपाट झालेली आहेत व जी दृष्य स्थितीत उभी आहेत ती देखील कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत. या क्षेत्राचे उत्खनन झाले असते तर बरीचशी शिवमंदीरे पहावयास मिळाली असती. हे क्षेत्र महाराष्ट्र शासनाने पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे. केवळ (दशायतनयुक्त) कणेंश्वर मंदीरास `अ' श्रेणी मिळाली आहे. कालबाह्य होत असलेल्या मंदीरातील नक्षीकाम, कोरीव काम, शीलालेख हे कणेंश्वर मंदीरा इतकेच अमोलिक असून या मंदीरांकडे शासनाच्या (पुरातत्व खात्याचे) संपूर्ण दुर्लक्ष झालेले आहे. त्यापैकी काही मंदीरांचे फोटो व त्यांची माहिती आपणांस या फोटोद्वारे पहावयास मिळेल. हा झाला पुरातन काळाचा महिमा. छत्रपती संभाजी महाराज पन्हाळगडावरून नजरकैदेहून सुटल्यावर आपल्याला थोडेसे स्वास्थ्य मिळेल म्हणून त्यांनी संगमेश्वर हे स्थान निवडले. चारही बाजूंनी डोंगर पर्वत व समुद्र व त्याच्या खाडया यामुळे मोगल सैन्य या भागाकडे फिरकणार नाही म्हणून छत्रपती संभाजी राजांनी येथे सरदेसाई घराण्याकडील पुरातन चौसोपी वाडयाकडे राहण्याचे निवडले. सरदेसाई यांच्या वाडयामध्ये मोगल बादशहा औरंगजेबाचे सैन्य व मराठयांच्या घनघोर लढाया झाल्या होत्या. रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकामध्ये संगमेश्वरचा उल्लेख आहे. असे एक हिंदू धर्मीयांचे महान तीर्थक्षेत्र व इतिहासाची साक्ष देणारी मंदीरे व त्यांची भग्नावस्था पाहिली की मन उदास होते. ज्या प्रमाणे ``मार्लेश्वर क्षेत्र'' आहे त्याचप्रमाणे त्याचकाळातले (शीलाहार) सप्तेश्वर हे हेमाडपंथी रचनेचे मंदीर डोंगरावर वसलेले आहे. येथून शास्त्री नदीचा उगम होत असून येथे ``सप्तकुंड'' आहेत. या मंदीराकडे जाणा-या रस्त्याची नुकत्याच सुरू झालेल्या पावसामुळे दुर्दशा सुरू झालेली आहे. संगमेश्वर येथे पैसाफंड हायस्कूलच्या पटांगणामध्ये माननीय शरदरावजी पवार यांनी संभाजी महाराजांचे स्मारक म्हणून घोषणा केली होती, परंतु या घोषणेचे मूळ उध्ष्टि बाजूला राहून तेथे एक छोटीसी वास्तू उभी केलेली अहे. बाकीची सर्व कामे अपूरी आहेत. कसबा ``लेंडी'' येथे ग्रामस्थांनी संभाजीराजे यांचा एक अर्ध पुतळा बसविला आहे. माजी आमदार श्री. सुभाष बने यांच्या सत्कारप्रसंगी संभाजी महाराजांच्या स्मारकापासून सुप्रसिद्ध काळभैरव मंदीर, काशीविश्वेश्वर मंदीरापर्यंत सुमारे एक किलोमिटर रस्त्यायाचे डांबरीकरण करून देण्याचे आश्वासन दिले होते, इतकेच नव्हे तर महाराष्ट्र शासनाकडून ह्या पर्यटन क्षेत्रास ``अ'' श्रेणी मिळवून देण्याचे वचन दिले होते. अद्याप डांबरीकरण नाही किंवा ``अ'' श्रेणी देखील नाही. निदान सामाजिक बांधिलकी तसेच धार्मिक कामाची नैतिक जबाबदारी संबंधित खात्याने ओळखून डांबरीकरणाचे काम पावसाळयानंतर मार्गी लावावे. कालभैरव-भैरीभवानी हे ब-याचश्या हिंदू धर्मीयांचे कुलदैवत असल्यामुळे महाराष्ट्रातील कानाकैंप-यातून अनेक साधक येथे येत असतात. अशी ही सर्व हेमाडपंथी मंदीरे मरणावस्थेत आहेत. पुरातत्व खात्याने योग्य दखल न घेतल्यास यांचे नामनिर्देशसुद्धा राहणार नाहीत. महाराष्ट्रातील उद्योगपतींनी, दानशूर व्यक्तींनी या मंदीरांची दखल घेऊन जिणोंद्धाराचे काम हाती घ्यावे हे कळकळीचे आवाहन करीत आहे .ह.भ.प. - श्री. सदाशिव हरी लिंगायत गुरूजी, किर्तनकार व प्रवचनकार, कसबा, संगमेश्वर. दूरध्वनी क्र. ०२३५४- २५२८०३.
http://www.sangameshwar.org/?i=1 यावेळी
भारतात जाताना, मालेश्वरला जायचे असे ठरवले होते. माझी आजी तिथे जात असे,
त्यावेळी तिथे जायची वाट फार अवघड होती, असे ती सांगत असे. पुढे मिलिंद
गुणाजीने काढलेला तिथल्या धबधब्याचा फोटो पण बघितला होता, पण माझे तिकडे
कधीच जाणे झाले नव्हते. मकरसंक्रांतीला श्री मार्लेश्वराचे गिरिजेशी लग्न लागते आणि त्यानिमित्त जत्रा असते ते माहीत होते पण यावर्षी मकरसंक्रांत १५ जानेवारीला येणार आहे ते लक्षात आले नाही. त्यामूळे आम्ही गेलो होतो तो दिवस, नेमका मंगलसोहळ्याचा होता. आणि वेळही शुभमुहुर्ताची. दर्शनासाठी हजारो लोक रांगेत वाट बघत होते. (आता वर चढायला सुबक पायर्या आहेत.) आम्ही गुहेजवळ न जाता आधी धबधब्यापर्यंत गेलो. रांग तिथपर्यंत होती. मग परत फिरलो तेवढ्यात मामाचे साडू भेटले (ते मारळवासीच) त्यांच्या ओळखीने थेट गुहेत प्रवेश मिळाला. प्रचंड गर्दीमूळे तिथे काही मिनिटेच थांबता आले. मग मामाच्या आग्रहावरुन संगमेश्वरच्या जवळ असलेल्या कर्णेश्वर देवळाला भेट दिली. प्रत्यक्ष देवस्थान मात्र खुपच अनोखे आहे. सर्व बाजूनी मोकळे आवार आहे आणि मधोमध भरपुर कोरीव काम असलेले देवालय आहे. मी त्यातला तज्ञ नाही, पण मला काही गोष्टी तिथे प्रकर्षाने जाणवल्या.
तिथे दिसणार्या मूर्ती या वेगवेगळ्या शैलीतल्या वाटतात. त्या वेगवेगळ्या
कलाकारांनी किंवा वेगवेगळ्या काळात घडवल्या असतील का ? १६०० वर्षांपूर्वी
ते बांधल्याचे, कुठेतरी वाचले. त्या आवारातच सूर्यदेवाचे देवालय आहे. ती मूर्ती पण विद्रुप केलेली होती. गावकर्यांनी मग तिचे जोडकाम केले आणि ते जोडकाम दिसू नये म्हणून ती मुर्ती रंगवली आहे. तरी ती प्राचीनच आहे, असे पुजारी म्हणाले. मी कुठेतरी वाचले होते, कि सूर्याची मानवरुपात आपल्याकडे पूजा होत नसे. ती प्रथा आपल्याकडे इराणमधून आली. पण तिथल्या मूर्तींच्या पायात चामड्याचे बूट असत आणि तोपर्यंत आपण चामडे देवळात वर्ज्य मानले होते. त्यामूळे आपल्याकडे ती मूर्ती कायम रथात दाखवलेली असते (म्हणजे बूट घातलेले पाय दिसायला नकोत. ) पण ही मूर्ती वेगळी आहे. म्हणजे रथात नाही आणि प्रभावळीत बारा राशी कोरलेल्या आहेत. दुसरे म्हणजे या देवळाच्या बांधकामात सरळ रेषांचा वापर आहे, नेहमीप्रमाणे कमानी नाहीत. नक्षीकामातही काही वेगळे नमुने दिसतात, छत आणि भिंतीवर तर ते आहेच पण पायर्यांवर पण आहे. इथे काही मोजके फोटो देतोय (बाकीचे फेसबुक वर आहेत.) २) मार्लेश्वराच्या गुहेच्या समोर असणारा हा धोकादायक धबधबा. हे कुंड फारच खोल आहे. ३) हा मागचा प्रसिद्ध धबधबा. पावसाळ्यात तो अनेक टप्प्यात कोसळतो. पण एरवी क्षीण का असेना, वाहता असतोच. ४) हे कर्णेश्वराच्या देवळाचे प्रथम दर्शन ५) देवळाचे एक प्रवेशद्वार ६) दीपमाळ ७) छत ८) खांब ९) दशावतार १०) समुद्रमंथन ११) ओवरीमधला खांब १२) पायरी १३) शेषावरचा विष्णू, लक्ष्मी, ब्रम्हा (त्यावर दशावतार आहेत, पण दाखवल्याशिवाय दिसत नाहीत.) १४) भिंतीवरच्या मंगलमूर्ती १५) छतावरचा आणखी एक नमुना १६) वेगळ्या शैलीतले कोरीवकाम १७) १८) आतल्या बाजूचा खांब १९) २०) २१) सूर्यदेव २२) मागच्या बाजूचा संगम (इथेही काही देवळे आहेत.) https://www.maayboli.com/node/32515 |
No comments:
Post a Comment