मुळा-मुठा काठाशी वसलेल्या पुनवडीने बघता बघता एका महानगराचे स्वरुप धारण केल आणि आजुबाजुचा परिसर शहराचा भाग बनले. केवळ पेठांपुरते मर्यादित असलेल्या पुणे शहराने आजुबाजुची गाव आपल्या आवाक्यात आणली आणि ती शहराची उपनगर बनली.यामध्येच बाणेर परिसर देखील आला.जबरदस्त वेगाने विकसित झालेल्या टाऊनशिप्स - छोट्या आणि मध्यम आकाराच्या आयटी कंपन्या यामुळे बाणेरचं असंच काहीसं झालंय. अर्थात या तथाकथित विकासात इथे काही इतिहासाच्या खुणा होत्या याचे विस्मरण झाले.मुळ निवासी तर विखुरले गेले आणि बाहेरुन आलेल्यांना पोटभरु लोकांना कसलेच सोयरसुतक नाही. यापरिस्थितीत बाणेर परिसरात कातळकोरीव लेणी आहेत, याची साधी माहिती अनेकांना नसते.
हि लेणी बघायची तर पुणे विद्यापीठाकडून बाणेर गावापाशी आल्यावर तुकाई देवी मंदिराची टेकडी हा पत्ता विचारायचा. बाणेर लेणी असे विचारल्यास किती स्थानिक लोकांना याची माहिती असेल ? हा प्रश्नच आहे.योग्य दिशा पकडली कि इमारतीच्या गराड्यातून तुकाई देवी मंदिराची टेकडी खुणावू लागते. बाणेरच्या स्वागतकमानी जवळून डावीकडच्या हनुमान मंदिरापासून चालत निघायचे. सोबत वाहन आणले असेल तर इथेच पार्क करायचे. चिंचोळ्या रस्त्यावरून पुढे गेल्यावर, डावीकडे वळावे.इथे घरांच्या बेशिस्त गजबटातून जाणारी चिंचोळी वाट दिसते.यातून पुढे गेले कि मिनिटाभरात समोरे येते ते 'श्री बाणेश्वर देवस्थान'!
अर्थात देवस्थानामुळे असेल कदाचित, हा परिसर कथित विकासातून वाचून अभ्यासकांना आणि भाविकांसाठी सुरक्षित राहीला. टेकडीच्या माथ्यावर असलेल्या तुकाई देवी मंदिरामुळे इथे थोडी वर्दळ असते. या टेकडीच्या पायथ्याच्या बाणेश्वर लेणी खोदली आहेत. दर्शनी भागात कातळात खोदलेल्या भिंती दिसतात,
पण इथे फार कोणी येत नसल्यामुळे गुहांकडे नेणाऱ्या चिंचोळ्या मार्गाला लोखंडी ग्रील आणि कुलूप लावून बंद केलेले दिसते. हाच लेण्यात प्रवेश करायचा मूळ मार्ग असावा. बाणेर लेण्या दुपारच्या वेळेत बंद केलेल्या असतात.त्यामुळे आपण त्याच्वेळी तिथे असलो तर उजव्याबाजूस एक गुरव राहतात त्यांच्याकडे चावी उपलब्ध असते,त्यांच्याकडून चावी घेउन या लेण्यांना भेट देता येइल.इथले मंदीराचे ट्रस्टी श्री. सुधीर करमरकर आहेत.
अन्यथा उजवीकडच्या पायऱ्या चढून वरच्या कातळावर पोहोचलो कि समोर उभट दगड रचून उभी केलेली दगडी दीपमाळ, बाजूला चार बाजूंना नंदीबैलमुख खोदलेला कोरीव चौकोनी दगड (बहुधा बलिवेदी) आणि बाजूला एक वीरगळाचा उभट दगड दिसतो.
एव्हाना समोरच्या कातळाच्या पोटात खोदलेली लेणी खुणावू लागलेली असतात. १०-१२ फूट उतरून गेल्यावर कातळछताला आधार देणारे, चौकोनी आकाराचे दोन खांब आणि कातळात खोदलेला सभामंडप दिसतो. नेहमीप्रमाणे स्थानिकांनी या लेण्याचा संबंध पांडवाशी जोडलेला दिसतो.देवस्थानाच्या बोर्डवर 'प्राचीन पांडवनिर्मित लेणी' अशी नोंद देखील दिसते. मात्र एकंदरीत रचना पाहता हि लेणी राष्ट्रकुटकालीन असावी.क्दाचित यांचा काळ पाचवे शतक असावा.
लेण्यात डावीकडून प्रवेश करू लागलो कि डाव्या बाजूस अनेक वीरगळ (hero stone) काचेच्या शटरमागे रचलेले दिसतात. वीरगळाच्या शिल्पपटाचे तीन भाग करून त्यावर वीर झुंजताना, शिवपूजन करताना आणि स्वर्गात जाताना अश्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात. इतके सारे वीरगळ असलेल्या बाणेरला कोणते युध्द झाले असेल, हे वीरगळ मुळचे इथलेच कि दुसरीकडून आणून इथे बसवले ? असे प्रश्न मनात उभे रहातात.
एकंदरीत हे लेणेमंदीर असावे असे वाटते. बाणेश्वरच्या लेण्यात मोठा मंडप, त्याला आधार देणारे चार चौकोनी खांब आणि समोर ३ कोरीव विहार अशी रचना दिसते.मंडप ३० फूट रुंद, ९ फूट उंच, ३५ फूट खोल असा आकाराचा आहे. खांब २ जाडी-रुंदीचे. खांबांना अधिक आधार मिळण्यासाठी माथ्याजवळ रुंद केले आहेत.
समोरच्या विहारांपैकी डावीकडच्या अंधाऱ्या विहारात स्वच्छ पाण्याचे टाके आहे. वरच्या कातळात मोठ्या प्रमाणात क्षार असावेत त्यामुळे जिवंत झरे झिरपून त्याचे बाष्पीबभन होउन इथे लवणस्तंभ तयार झालेले दिसतात. पावसाळ्यात या टाक्याचे पाणी ऊतू जाऊन लेण्यात पसरते आणि पंप लावून उपसावे लागते.
मधल्या कक्षाचा आकार ५ फूट रुंद, ५ फूट खोल आणि ६ फूट उंच आहे. इथेच बाणेश्वर महादेव शिवलिंगाची स्थापना केलेली दिसते.हे हिंदु लेणे असले तरी हे शिवलिंग प्राचीन वाटत नाही.कदाचित या शिवलिंगाची स्थापना गेल्या कदाचित ५०-७० वर्षातली असणार. डाव्या बाजूच्या कक्षामध्ये पाण्याचा झरा असून त्याच्यामध्ये इथे येणार्या भाविकांनी नाणी टाकलेली दिसतात. तिसरी गुहा मात्र बंद अवस्थेत आहे.
तसेच एका खांबावर गणपती कोरलेला दिसतो. तसेच या गणपतीला शेंदूर फासण्यात आलेला आहे. याबरोबरच मंदिरात नंदी, गणपती, विष्णू आणि लक्ष्मी यांच्या ग्रॅनाईट मध्ये घडविलेल्या नव्या मूर्ती स्थापन केलेल्या दिसतात.
मंदिराच्या उजवीकडची साध्या खोदाईची गुहा आता देवस्थानाची स्टोअररूम झालेली बघायला मिळते. बाणेश्वर लेण्यात देवस्थान झाल्याने वीज आली, वावर वाढला आणि स्टील खांबांच्या रांगा लेण्यात उभ्या राहिल्या याबद्दल खंत बाळगायची, की हा ठेवा कचरा-दारुडे-प्रेमी युगुलांपासून वाचला याबध्दल समाधान मानायचे ?
तुकाई देवी मंदिराची टेकडी चढून माथ्यावर गेल्यावर, बाणेरचं काँक्रीट जंगल आणि लांब वळसा घेत जाणारी मुळा नदी खुणावते.
राष्ट्रकुटकालीन पर्वतीवरचे लेणे :-
पुणे शहर मुठा,मुळेच्या दुतर्फा वसले आहे, शहराच्या परिसरात अनेक टेक्ड्या आहेत.यापैकी एक म्हणजे पर्वती. नावात पर्वत असला तरी जेमतेम उंचीच्या या टेकडीला एतिहासिक महत्व आहे. कदाचित पुणेकरांच्या मनात अन्य टेकड्यांपेक्षा जास्त या पर्वतीला जास्त स्थान आहे. पेशव्यांच्या खुणा सांगणारी पर्वती, व्यायामाची पातळी ठरवणारी पर्वती, देवदर्शनाची आवर्जून जायची पर्वती, पर्वती पाचगाव वनविहार घडवणारी पर्वती,नुसते भटकण्यासाठी आणि छोटा ट्रेक घडवून आणणारी पर्वती.. आता मात्र प्रेमी युगुलांचा वावर असणारी, झोपडपट्टी आणि हागणदरी, कचऱ्यानी व्यापलेली पर्वतीच! एकेकाळी पुणे शहरातून कोठूनही हि पर्वती दिसायची. मात्र टॉवरच्या गर्दीत हरवलेल्या या पर्वतीला बघताबघता झोपडपट्टीचा विळखा पडला. मात्र माथ्यावर असलेल्या देवस्थानांमुळे असेल पण पर्वतीच्या एतिहासिक खुणा अबाधित राहिल्या अन्यथा कदाचित हि पुर्ण टेकडी झोपडपट्ट्यांनी गिळंकृत केली असती.मात्र या पर्वतीच्या उतारावर एक प्राचीन इतिहासाशी नाते सांगणारा दुवा आहे, ते म्हणजे राष्ट्रकुटकालीन लेणे ! पर्वतीच्या उतारावर असे काही लेणे आहे, हे बहुतेक जणांना माहिती नाही.आज याच लेण्याची आपण माहिती करुन घेणार आहोत.
पर्वतीच्या पुर्व उतारावर शाहू महाविद्यालयाच्या बाजूच्या उतारावरून पायऱ्यांच्या दिशेने आडव्या वाटेने गेले कि टेकडीच्या उतारावरील कातळकड्यात खोदलेलं लेणं दृष्टीक्षेपात पडते.
लेण्याचा आकार मुख्य द्वार ८ फूट उंच आणि ६ फूट रुंद आणि डावीकडे - उजवीकडे ४ फूट लांबी-रुंदीच्या खिडक्या. लेण्याच्या आत डोकावल्यास फूटभर खोली असलेल्या भागात पाणी साठलेले दिसते आणि अर्थातच अपेक्षित दृष्य म्हणजे प्लास्टिक कचर्याने गच्च भरलेले आहे. पर्वतीच्या उतारावर साधारण एक चतुर्थांश उंचीवर हे कातळलेणे कोरलेले आहे.पाण्याच्या टाकीच्या खालच्या बाजुला गेल्यास हे लेणे सापडू शकते.
अर्थात या लेण्यात कोणतेही विशेष कोरीवकाम किंवा शिलालेख असा सबळ पुरावा नसल्यामुळे याची नेमकी कालनिश्चिती होउ शकली नाही, मागे १९७० मध्ये राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत शाहु कॉलेजतर्फे या लेण्यात स्वच्छता मोहिम राबवण्यात आली होती, मात्र त्यातून काही ठोस हाती आले नाही. मात्र लेण्याच्या रचनेवरुन हि लेणी राष्ट्रकुटकालीन असावीत असा अंदाज आहे. एकंदरीत पुण्याच्या प्राचीन इतिहासाचा दुवा म्हणून तरी या लेण्यांना महत्व द्यायला हवे,
Baaneshwar | Tukai Devi (Baner Hills)
26 November 2021|Hindu Temples, Pune Heritage, Ride+Trek
Did you know, nestled away in Pune's bustling by lanes, there lies a 5000-year-old cave that was briefly the home of Pandavas?
In
a bid to find something unexplored, we, Everglade Pedal Demons,
stumbled upon ancient Baaneshwar cave temple in Baner which have
significant importance in the Hindu mythology, and the Tukai Mata
Temple.
Baaneshwar
is a cave in Baner gaon which has a lot of historic importance.
According to a folklore, these caves date back to the Pandava era and is
said to be where the Pandavas lived during their exile almost 5000
years ago. Alternative tales say that they were founded during the reign
of Rashtrkut Raja some 2,500 years ago. We are of course unlikely to
ever discover its true origins. This is a Swayambhu temple with a
Shivlinga in one of the caves. Swayambhu
(स्वयम्भू) is a Sanskrit word that means 'self-manifested',
'self-existing', or 'that is created by its own accord'. The word
'Swayambhu' is derived from two Sanskrit words- 'Swayam' (स्वयम्) which
means 'self' and 'bhu' (भू) which means 'arising'. So the definition of
the word is 'arising on its own'.
Baaneshwar cave temple entrance
Baaneshwar cave temple
Shivlinga
Nandi
Do
you know, why does Nandi occupy a prime position in front of the
Shivlinga, in almost all the Shiva temples and is worshipped along with
the Lord?
Here is the
answer – Lord Shiva loves to spend time in meditation, but the poison in
his throat is always a burning sensation for him...so, he ordered Nandi
to sit in front of him and blow some air on to his throat so that he
gets some relief from this burning sensation, and can focus on
meditation.
Another interesting
point from our Hindu mythology is that, if anyone whispers about his/her
problem in Nandi's ear, it is believed that it reaches to Lord Shiva
literally and the solution or wish fulfillment of that devotee's problem
is done as soon as possible. 😊😊
It is said that no one should stand between Shiva Linga and Nandi.
These
ancient caves are located near Tukai tekdi and one has to climb 250
stairs from the Baner gaon to reach the Tukai Mata temple, which was
established around 400 years ago but renovated in 2005. Atop the hill,
2224m above sea level, is the temple of Tukai Mata installed by Kavji
Kalamkar. He was a ‘Sardar’ in Shinde gharana of Satara. Baner was given
as a ‘watan’, a promise. There is a folk lore which states that
Kalamkars could not sire children, and one night in a dream, the goddess
requested them to build her a temple so that she could help give them
children to look after the village.
Sign board alongside staircase
Stairs leading to Tukai mata
Tukai mata
The
peace this place offers enables you to exercise properly and proves to
be a perfect start to the day. What attracts the
joggers/cyclists/trekkers is the fresh and non-polluted air along with
the natural beauty of the place. In order to make the area greener,
volunteers carry out regular plantation drives on weekends and have
installed tanks and pipes for watering the plants.
View from the top
Please
‘Recommend’ or add a comment if you enjoyed this blog post. And, if you
would like to be notified of any new content, just subscribe by
clicking the ‘Sign Up’ button.
No comments:
Post a Comment