मांगी
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : नाशिक
उंची : ३८९५ फुट
श्रेणी : मध्यम
बागलाण प्रांतांची भटकंती करत असताना सेलबारी-डोलबारी डोंगर रांगेवर असलेले दोन सुळके सतत आपले लक्ष वेधुन घेतात व त्या सुळक्याविषयी ओढ आपल्या मनात निर्माण होते. हे सुळके म्हणजे जैन धर्मीयांची प्राचीन लेणी असुन त्यांचे महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे तर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे तीर्थक्षेत्र आहे. बागलाण मधील किल्ल्यांची भटकंती या सुळक्यांना भेट दिल्याशिवाय पूर्ण होत नसल्याने या सुळक्याना भेट देणे क्रमप्राप्त आहे. सटाणा तालुक्यात असलेल्या मांगी तुंगी सुळक्याना भेट देण्यासाठी आपल्याला या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या भिलवड गावात यावे लागते. नाशिक–सटाणा- ताहराबाद मार्गे भिलवड गाव साधारण १५० कि.मी. अंतरावर आहे. भिलवाडी गावामध्ये जैनांची काही मंदीरे असुन हि मंदीरे देखील मांगीतुंगी या नावाने ओळखली जातात. मांगीतुंगी सुळक्यावर जाण्यासाठी गावातुन दोन मार्ग आहेत. भिलवडी गावातील मुख्य रस्त्याने या शिखरांच्या दिशेने पुढे आल्यावर रस्त्याला दोन फ़ाटे फ़ुटतात. उजवीकडील रस्ता मांगीतुंगी डोंगराच्या पायथ्याशी जातो तर डावीकडील रस्ता न्हावी गडाच्या दिशेने जातो. उजवीकडील रस्त्याने डोंगराच्या पायथ्याशी गेल्यास या दोन्ही सुळक्यांवर जाण्यासाठी सुमारे २५०० पायऱ्या चढाव्या लागतात. तळातून पायऱ्यांच्या वाटेने सुरवात केल्यास अर्धे अंतर पार केल्यावर डाव्या बाजुस कातळात कोरलेल्या दोन गुहा आहेत. यातील एका गुहेत भगवान नैनीनाथांची मुर्ती असुन दुसऱ्या गुहेत भगवान सुव्रतनाथांची मुर्ती आहे. गुहेत दालने कोरलेली असुन जवळच पाण्याची टाकी देखील आहेत पण यातील पाणी पिण्यायोग्य नाही. या वाटेने सुमारे २००० पायर्यां चा चढ चढून गेल्यावर आपण एका दगडी कमानीपाशी पोहोचतो. पायथ्यापासून या कमानी पर्यंत येण्यास २ तास लागतात. सुळक्यावर जाणारी दुसरी वाट न्हावीगडच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याने साधारण अर्धा कि.मी. पुढे आल्यावर सुरु होते. हि वाट कमी श्रमाची व कमी वेळ खाणारी असुन काहीशी खर्चिक आहे. मांगी सुळक्याखाली ४००० फुट उंचीवर जैन धर्मीयांचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांची १०८ फ़ूट उंच मुर्ती कातळात कोरण्यात आली असुन या मूर्तीचा प्राण-प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळा फेब्रुवारी २०१६ मध्ये करण्यात आला. या मुर्तीपर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता बनविलेला आहे. या रस्त्याने वर भाविकांची ये-जा करण्यासाठी येथील संस्थेने खाजगी वाहनांची सोय केली असुन त्यासाठी प्रतिव्यक्ती १०० रुपये देणगी शुल्क आकारले जाते. हा मार्ग खूपच सोयीचा असुन रस्ता कच्चा व उभा चढ असल्याने त्यावर ४ x ४ वाहनाचा वापर केला जातो. आपले खाजगी वाहन या वाटेने वर नेणे धोक्याचे असल्याने त्यासाठी परवानगी दिली जात नाही. या वाटेने १५ मिनीटात आपण भगवान महावीरांच्या मुर्तीपर्यंत पोहोचतो. भगवान महावीरांचे दर्शन घेऊन १० मिनीटात आपण खालुन वर येणाऱ्या पायऱ्यांवर पोहोचतो. पुढे पिण्याचे पाणी नसल्याने पुरेसे पाणी महावीरांच्या मुर्ती कडूनच भरून घ्यावे. दुसऱ्या वाटेने आल्यास आपले साधारण १८०० पायऱ्या चढण्याचे श्रम कमी होतात. येथुन साधारण २०० पायऱ्या चढुन गेल्यावर आपण सुरवातीला उल्लेख केलेल्या दगडी कमानीजवळ पोहोचतो. या वाटेने वर चढताना अनेक ठिकाणी कातळात कोरलेला जुना पायरीमार्ग दिसुन येतो. या कमानीतून आत आल्यावर उजवीकडील वाट तुंगी सुळक्याकडे जाते तर डावीकडील वाट मांगी सुळक्याकडे जाते. सर्वप्रथम तुंगी सुळका पाहुन नंतर मांगी सुळक्याकडे यावे. कमानीपासून मांगी सुळक्यापर्यंत जाण्यासाठी अर्धा तास लागतो. सुळक्याच्या सुरवातीला एका कपारीत २४ तीर्थंकर कोरलेले शिल्प असुन या शिल्पाच्या तळाशी शिलालेख कोरलेला आहे. या शिल्पाशेजारी एका तीर्थंकरांची मुर्ती असुन या मूर्तीवर देखील शिलालेख कोरलेला आहे. या ठिकाणी मांगी सुळक्याची समुद्रसपाटीपासुन उंची ३८९५ फुट आहे. तुंगी सुळक्याप्रमाणे मांगी सुळक्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी प्रदक्षिणा मार्ग असुन या मार्गावर काही ठिकाणी पादुका कोरलेल्या आहेत. सुळक्याच्या पोटात पाण्याची चार टाकी असुन यातील एक टाके गुहाटाके आहे. यातील कोणत्याही टाक्याचे पाणी पिण्यायोग्य नाही. मांगी सुळक्याच्या पोटात लहानमोठ्या पाच गुहा असुन यातील काही गुहेत थोड्याफार प्रमाणात कोरीवकाम केलेले आहे. पहिल्या गुहेत प्रभु रामचंद्रांची कृतांतवक्र सेनापती रूपातील मानवी मुर्ती असुन या मुर्तीच्या एका हातात गदा तर दुसऱ्या हातात जपमाळ आहे. दुसऱ्या प्रशस्त गुहेत महावीरांची मोठी मुर्ती कोरलेली असुन मुर्तीच्या डावीकडील बाजुस वरील कोपऱ्यात तीन तीर्थंकर कोरलेले आहेत. यापुढील गुहा आदिनाथांची असुन या गुहेत तिन्ही बाजुस जैन तीर्थंकर व इतर मुनींच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. या गुहा पाहताना दोन गुहामंदिरात आपल्याला देवनागरी लिपीतील दोन शिलालेख वाचायला मिळतात. प्रदक्षिणा मार्गावर जागोजागी २४ तिर्थंकरांच्या मुर्ती कोरलेल्या असुन या मुर्ती कातळात उघडयावर असल्याने उन-वारा-पाऊस याने त्यांची झिज झालेली आहे. आता लेप देऊन या मुर्तींचे जतन करण्याचे काम सुरु केले आहे. या सर्व मुर्तीतील वैशिष्ट्यपूर्ण मुर्ती म्हणजे बलभद्राची मुर्ती. श्रीकृष्णाचा भाऊ बलराम याचा जैन पुराणात बलभद्र म्हणुन उल्लेख येतो. बलभद्राची मुर्ती पाठमोरी कोरलेली आहे. डोंगराकडे तोंड करुन तपाला बसल्यामुळे आपल्याला त्याची केवळ पाठच पाहाता येते. कमानीपासूण मांगी सुळक्याला वळसा मारून परत येण्य्साठी एक तास पुरेसा होतो. भिलवाड गावात जैन धर्मीयांची धर्मशाळा असुन येथे नाममात्र शुल्क भरून राहण्याची तसेच जेवणाची सोय होते.मांगी-तुंगी हे एक जैन सिद्ध-क्षेत्र असुन येथे हनुमान, सुग्रीव, नल, नील, महानील, गव, गवाक्ष आणि रामायणातील इतर ९९ वानररूपी योद्ध्यांना जीवनातून मुक्त होऊन मोक्ष मिळाला अशी जैन धर्मीयांची श्रद्धा आहे. बागलाणच्या बागुलवंशीय राठोड घराण्याचा ११ वा राजा विरमशहा राठोड याने मांगी तुंगीची लेणी खोदवून घेतली. टीप- मांगीतुंगी सुळक्यांवर चालत जाण्यासाठी सकाळी लवकर सुरवात केल्यास उन्हाचा त्रास कमी जाणवतो. पायथ्यापासून दोन्ही सुळके पाहुन परत येण्यासाठी ६ तास लागतात. मांगीतुंगी सुळक्यांच्या वाटेवर व सुळक्यांवर कोठेही पिण्यायोग्य पाणी नाही त्यामुळे पाणी तळातून अथवा वाटेवर भगवान महावीर यांच्या मुर्तीकडून भरून घ्यावे.
© Suresh Nimbalkar
तुंगी
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : नाशिक
उंची : ३६१२ फुट
श्रेणी : मध्पम
बागलाण प्रांतांची भटकंती करत असताना सेलबारी-डोलबारी डोंगर रांगेवर असलेले दोन सुळके सतत आपले लक्ष वेधुन घेतात व त्या सुळक्याविषयी ओढ आपल्या मनात निर्माण होते. हे सुळके म्हणजे जैन धर्मीयांची प्राचीन लेणी असुन त्यांचे महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे तर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे तीर्थक्षेत्र आहे. बागलाण मधील किल्ल्यांची भटकंती या सुळक्यांना भेट दिल्याशिवाय पूर्ण होत नसल्याने या सुळक्याना भेट देणे क्रमप्राप्त आहे. सटाणा तालुक्यात असलेल्या मांगी तुंगी सुळक्याना भेट देण्यासाठी आपल्याला या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या भिलवड गावात यावे लागते. नाशिक–सटाणा- ताहराबाद मार्गे भिलवड गाव साधारण १५० कि.मी. अंतरावर आहे. भिलवाडी गावामध्ये जैनांची काही मंदीरे असुन हि मंदीरे देखील मांगीतुंगी या नावाने ओळखली जातात. मांगीतुंगी सुळक्यावर जाण्यासाठी गावातुन दोन मार्ग आहेत. भिलवडी गावातील मुख्य रस्त्याने या शिखरांच्या दिशेने पुढे आल्यावर रस्त्याला दोन फ़ाटे फ़ुटतात. उजवीकडील रस्ता मांगीतुंगी डोंगराच्या पायथ्याशी जातो तर डावीकडील रस्ता न्हावी गडाच्या दिशेने जातो. उजवीकडील रस्त्याने डोंगराच्या पायथ्याशी गेल्यास या दोन्ही सुळक्यांवर जाण्यासाठी सुमारे २५०० पायऱ्या चढाव्या लागतात. तळातून पायऱ्यांच्या वाटेने सुरवात केल्यास अर्धे अंतर पार केल्यावर डाव्या बाजुस कातळात कोरलेल्या दोन गुहा आहेत. यातील एका गुहेत भगवान नैनीनाथांची मुर्ती असुन दुसऱ्या गुहेत भगवान सुव्रतनाथांची मुर्ती आहे. गुहेत दालने कोरलेली असुन जवळच पाण्याची टाकी देखील आहेत पण यातील पाणी पिण्यायोग्य नाही. या वाटेने सुमारे २००० पायर्यां चा चढ चढून गेल्यावर आपण एका दगडी कमानीपाशी पोहोचतो. पायथ्यापासून या कमानी पर्यंत येण्यास २ तास लागतात. सुळक्यावर जाणारी दुसरी वाट न्हावीगडच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याने साधारण अर्धा कि.मी. पुढे आल्यावर सुरु होते. हि वाट कमी श्रमाची व कमी वेळ खाणारी असुन काहीशी खर्चिक आहे. मांगी सुळक्याखाली ४००० फुट उंचीवर जैन धर्मीयांचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांची १०८ फ़ूट उंच मुर्ती कातळात कोरण्यात आली असुन या मूर्तीचा प्राण-प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळा फेब्रुवारी २०१६ मध्ये करण्यात आला. या मुर्तीपर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता बनविलेला आहे. या रस्त्याने वर भाविकांची ये-जा करण्यासाठी येथील संस्थेने खाजगी वाहनांची सोय केली असुन त्यासाठी प्रतिव्यक्ती १०० रुपये देणगी शुल्क आकारले जाते. हा मार्ग खूपच सोयीचा असुन रस्ता कच्चा व उभा चढ असल्याने त्यावर ४ x ४ वाहनाचा वापर केला जातो. आपले खाजगी वाहन या वाटेने वर नेणे धोक्याचे असल्याने त्यासाठी परवानगी दिली जात नाही. या वाटेने १५ मिनीटात आपण भगवान महावीरांच्या मुर्तीपर्यंत पोहोचतो. भगवान महावीरांचे दर्शन घेऊन १० मिनीटात आपण खालुन वर येणाऱ्या पायऱ्यांवर पोहोचतो. पुढे पिण्याचे पाणी नसल्याने पुरेसे पाणी महावीरांच्या मुर्ती कडूनच भरून घ्यावे. दुसऱ्या वाटेने आल्यास आपले साधारण १८०० पायऱ्या चढण्याचे श्रम कमी होतात. येथुन साधारण २०० पायऱ्या चढुन गेल्यावर आपण सुरवातीला उल्लेख केलेल्या दगडी कमानीजवळ पोहोचतो. या वाटेने वर चढताना अनेक ठिकाणी कातळात कोरलेला जुना पायरीमार्ग दिसुन येतो. या कमानीतून आत आल्यावर उजवीकडील वाट तुंगी सुळक्याकडे जाते तर डावीकडील वाट मांगी सुळक्याकडे जाते. तुंगी सुळक्याचे अंतर व उंची मांगी सुळक्यापेक्षा जास्त असल्याने सर्वप्रथम तो भाग पाहुन घ्यावा. दरवाजातुन उजवीकडे वळल्यावर आपण आपण मांगी-तुंगी सुळक्यामध्ये असलेल्या डोंगरसोंडेवर येतो. या सोंडेवरून १५ मिनिटे चालल्यावर आपण तुंगी सुळक्याच्या पायथ्याशी येतो. या वाटेवर आपल्याला एका संगमरवरी मंदीरात श्रीराम व बलभद्र यांच्या पादुका तसेच कृष्णकुंड नावाचे कातळात कोरलेले पाण्याचे टाके पहायला मिळते. कृष्णकुंड कृष्णाच्या शेवटच्या दिवसाचे प्रतीक समजले जाते. या डोंगर सोंडेवर बलरामाने श्रीकृष्णावर अग्निसंस्कार केले व त्यानंतर त्याने जैन धर्माची दिक्षा घेतली अशी आख्यायिका आहे. येथुन साधारण ३०० पायर्या चढून अर्ध्या तासात आपण तुंगी सुळक्याच्या पोटात असलेल्या जैन लेण्यांकडे येतो. या ठिकाणी तुंगी सुळक्याची समुद्रसपाटीपासुन उंची ३६१२ फुट आहे. तुंगी सुळक्याला प्रदक्षिणा मार्ग असुन या मार्गाने संपुर्ण सुळक्याला प्रदक्षिणा मारता येते. या प्रदक्षिणा मार्गावर पाण्याचे एक टाके व तीन गुहा असुन या तीनही गुहेत जैन तिर्थंकरांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. या मुर्तीना लेप देऊन त्यांचा टिकाऊपणा वाढवलेला आहे. पहिली गुहा रामचंद्र भगवान यांची असुन या गुहेत तीन ध्यानस्थ जैन मुनी कोरलेले आहेत. दुसरी गुहा चंद्रप्रभू भगवान यांची असुन त्यांच्या मुर्तीच्या दोन्ही बाजुस तीन-तीन जैन मुनी कोरलेले आहेत.यापुढील गुहा म्हणजे पंचबालायती गुहा. या गुहेत महावीरांच्या विविध रूपातील पाच मुर्ती कोरलेल्या आहेत. सुळक्याच्या पोटात पाण्याचे एकमेव टाके असुन त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. गुहेत कोरलेल्या या मुर्ती व्यतिरिक्त बाहेर कातळावर देखील काही देवतांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. तुंगी शिखराला वळसा मारून झाल्यावर मांगी सुळक्याच्या दिशेने आपला प्रवास सुरु करावा. तुंगी शिखर पाहुन कमानीपर्यंत यायला एक तास पुरेसा होतो. भिलवाड गावात जैन धर्मीयांची धर्मशाळा असुन येथे नाममात्र शुल्क भरून राहण्याची तसेच जेवणाची सोय होते.मांगी-तुंगी हे एक जैन सिद्ध-क्षेत्र असुन येथे हनुमान, सुग्रीव, नल, नील, महानील, गव, गवाक्ष आणि रामायणातील इतर ९९ वानररूपी योद्ध्यांना जीवनातून मुक्त होऊन मोक्ष मिळाला अशी जैन धर्मीयांची श्रद्धा आहे. बागलाणच्या बागुलवंशीय राठोड घराण्याचा ११ वा राजा विरमशहा राठोड याने मांगी तुंगीची लेणी खोदवून घेतली. टीप- मांगीतुंगी सुळक्यांवर चालत जाण्यासाठी सकाळी लवकर सुरवात केल्यास उन्हाचा त्रास कमी जाणवतो. पायथ्यापासून दोन्ही सुळके पाहुन परत येण्यासाठी ६ तास लागतात. मांगीतुंगी सुळक्यांच्या वाटेवर व सुळक्यांवर कोठेही पिण्यायोग्य पाणी नाही त्यामुळे पाणी तळातून अथवा वाटेवर भगवान महावीर यांच्या मुर्तीकडून भरून घ्यावे.
खिंड ओलांडल्यावर झालेले मांगी(डावा सुळका) आणि तुंगीचे(उजवा सुळका) दर्शन-
मांगीजी-तुंगीजी सुळके हे जैन धर्मीयांचे एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. पायथ्याच्या गावाचे नाव भिलवडी. इथे अनेक (बघायला) मंदिरे आणि (रहायला) धर्मशाळा आहेत. :) जेवणाचीही सोय होते. इथून दोन किमीवर प्रत्यक्ष मांगी-तुंगीचा पायथा आहे. तिथून साडेतीन हजार पायऱ्या चढून सुळक्यांवर जावे लागते. आमच्या प्लॅननुसार आधी मांगी-तुंगी दोन्ही बघून सूर्यास्त बघून खाली भिलवडीमध्ये मुक्कामाला यायचे असे होते. वाटेत कुणाशीतरी बोलताना ’मांगीवरती गुहा आहेत’ असे कळल्यामुळे तर आम्ही मांगी बघून तिथेच मुक्काम करून उद्या तुंगी पाहू असे ठरवले. भिलवडीला पोहोचलो तेव्हा चार वाजले होते. धर्मशाळेच्या कार्यालयामध्ये गेल्यावर असे कळले की वर राहता येत नाही आणि जेवण साडेपाच ते साडेसहा याच वेळात असते. सूर्यास्तानंतर जैन भोजन करत नाहीत, म्हणून असेल. इतकेच नव्हे, तर आवारात शिजवायलाही परवानगी नाही. तसेच, पायथ्यापर्यंत जीपची सोय होऊ शकेल पण चारनंतर जीप बंद असतात. आमच्यापुढचे पर्यात अशा प्रकारे संपले होते. उरलेली संध्याकाळ तिथेच घालवून पहाटे लवकर पहिल्या जीपने मांगीकडे निघणे, लवकरात लवकर दोन्ही सुळके पाहून भिलवडीमध्ये येणे आणि साडेअकराची नाशिक एसटी पकडण्यासाठी ताहराबाद गाठणे हा सर्वोत्तम पर्याय उरला होता.
मांगी-तुंगी आणि निरोप
पायवाटा आणि पायऱ्या या शब्दांची सुरूवात सेम आणि शेवट वेगळा असला तरी दोन्ही चढून संपल्यावर होणारा आनंद मात्र अगदी सेम असतो. आणि पायऱ्या जर अडीच हजार वगैरे असतील, तर मग तो चढल्यावर आनंद सुळक्यावरून थेट आभाळात पोचतो. आणि या अडीच हजार पायऱ्या जर पाऊण तासात आणि तेही एकदाही न थांबता पार झाल्या तर मग काय सांगावे? सुदैवाने या तिन्ही घटना एकाच दिवशी एकाच ठिकाणी माझ्या बाबतीत घडल्या आणि पाऊणतासात अडीच हजार पायऱ्या चढल्याच्या आनंदापेक्षाही गुडघा एकदाही दुखला नाही अथवा दुखणार असं वाटलं नाही हा आनंद कितीतरी जास्त होता! :)
चार वाजता गजर झाला आणि योला पाच वाजता तयार राहण्याचे वचन
दिल्यामुळे बरोबर चार वाजताच उठलो. बरोब्बर पाच वाजता सगळे तयार झालो.
खोलीमध्ये चक्क लाईट मिळाल्यामुळे सगळ्यांच्या बॅटऱ्या चार्ज झाल्या
होत्या. कॅमेरा, पाण्याच्या बाटल्या आणि थोडेसे खायला यासाठी अविची एकच सॅक
घेतली. भिलवडीच्या जैन मंदिरांच्या आवारातूनच पायथ्यापर्यंत जीप असतात.
अनेक जैन कुटुंबे अत्यंत भक्तिभावाने दर्शनासाठी येत असतात. आदल्या दिवशी
भिलवडीदर्शन आणि दुसर्या दिवशी पहाटे मांगीजी-तुंगीजी दर्शन असा
बहुतेकांचा प्रोग्राम असतो. आम्हीही तसेच केले. भिलवडीमधील मंदिरांचे फोटो-





परंतु त्यांपैकी बऱ्याच कुटुंबातील सदस्यसंख्या जीपच्या क्षमतेपलिकडे असल्यामुळे आम्हाला सुरूवातीच्या दोन जीपमध्ये जागा मिळाली नाही. तिसऱ्यावेळी मात्र मुंबईच्या लोकलमध्ये शिरण्याचे कसब वापरून आम्ही जीपमध्ये जागा मिळवली. सुळके अंधारात बुडाले होते. त्याच डोंगरावर आदिनाथांची १०८ फुटी उंच मूर्ती उभारण्याचे काम सुरू आहे. त्या बांधकामाचा लाईट तेवढा सुरू होता.
पायथ्याशी उतरलो तेव्हा साडेपाच वाजले होते. भिलवडीला पोचेपर्यंत पायऱ्यांची संख्या ३५०० आहे असं वाचलं होतं. काल भिलवडीमध्ये एका पुस्तकामध्ये हाच आकडा ४५०० वाचला होता. त्यामुळे नक्की किती पायऱ्या आहेत हे प्रत्यक्षच मोजूया असे अवि आणि रोमाचे मत बनले. (अर्थात वयस्कर आणि गरजूंसाठी डोलीचीही सोय आहे.) हा उत्साह पहिल्या पन्नास पायऱ्यांपर्यंत टिकला. पन्नासाव्या पायरीवर बेंचमार्क दिसल्यावर मग त्यांनी एकदमच हुश्श केले. इथून पुढे नियमीत बेंचमार्क्स असल्यास मोजण्याची आवश्यकता नव्हती. शंभराव्या पायरीच्या आसपास चौघे दम खायला बसले. मी मात्र I think i can go असे म्हणून पुढे निघालो. १००, २००, ५००... १०००... १५००... दम लागला तरी बसण्याची गरज वाटत नव्हती. एकही पायरी स्किप करून चढत नव्हतो. (त्या प्रयत्नात दम जास्त लागतो) आणि गुडघाही All is well सांगत होता. त्यामुळे मग कुठेही न बसता, तोंड बंद ठेऊन, संथ पण एकाच गतीने, अजिबात चुकीचे, अतिरिक्त पाऊल न टाकता चढत राहिलो. आमच्या आधी केवळ २ जीप आल्या असल्यामुळे त्यातून उतरलेले सर्व भाविक हळूहळू मागे पडत गेले. अपवाद फक्त तीन छोटी मुले आणि एका आजीबाईंचा. ती तीन मुले दोन हजाराव्या पायरीलाही अत्यंत उत्साहात होती. फक्त त्यातल्या एककडची पिशवी तो दमल्यामुळे तिथपासून अस्मादिकांनी स्वत:कडे घेतली होती. खरं सांगायचं तर मांगी-तुंगीच्या दर्शनाला जात असलो तरी आम्ही यात्रिक अथवा भाविक नव्हतो, फक्त पर्यटक होतो. त्यामुळे दर्शनासाठी शूचिर्भूत वगैरे होण्याच्या इतरांच्या आणि आमच्या संकल्पनाच वेगळ्या होत्या. तरीही वर चढणाऱ्या भक्तांना जमेल तेवढी मदत करावी म्हणून तो पिशवीप्रपंच!
अशा प्रकारे एकाग्रतेने, स्वत:च्या क्षमतेवर चढत मांगीच्या गुहांजवळ पोहोचलो तेव्हा सव्वासहा वाजले होते. माझ्या स्वागताला तिथे फक्त रात्रपाळीचा वॉचमन हजर होता. ;) मुले पाठोपाठ चढून आली. आणि अवघ्या पाच दहा मिनिटात त्या आजीबाईही चढून वर आल्या. मी त्यांच्या या कर्तृत्वामुळे खरोखर थक्क झालो. मीही नुकताच त्याच पायऱ्यांनी चढून आलो असल्यामुळे त्या कर्तृत्त्वाचे मोल जाणत होतो. या वयातही ज्या गतीने त्या चढून आल्या होत्या ती खरंच कौतुकास्पद होती. :) पायवाटांपेक्षा पायऱ्यांनी चढणे सोपे असते असा एक मतप्रवाह मी ऐकला आहे. मला तो व्यक्तिश: पटत नाही. चार मजल्यांच्या जास्तीत जास्त सत्तर पायऱ्या आणि अडीच हजार पायऱ्या यात नक्कीच फरक आहे. एवढ्या पायऱ्या चढायलाही तेवढाच स्टॅमिना, तेवढीच मनाची तयारी लागते. in fact, कधीकधी सरळसोट चढ परवडला पण पायऱ्या नको असे वाटण्याइतका ताण दर पायरीला गुडघ्यांवर येत असतो! आजीबाईंच्या त्या ’करामतीकडे’ बघून श्रद्धा श्रद्धा म्हणतात ती हीच असावी असे क्षणभर वाटून गेले. आणि त्यांच्या या चढाईला सलाम म्हणून मी त्यांना फक्त वाकून नमस्कार केला. त्यांनीही ’बहुत जियो बेटा’ असे तोंडभर आशीर्वाद दिले. :)
कमालीची थंडी होती आणि वाराही सुटला
होता. अंधारात मी एकटाच आसमंत पाहत उभा होतो. त्या चढाईमध्ये कुठेतरी माझा
उजवा हॅण्डग्लोव्ह पडला आणि त्यामुळे थंडिपासून बचाव करण्यासाठी एका वेळी
एकाच हातात ग्लोव्ह घालावा लागला. पंधरा-वीस मिनिटात उरलेले चार
’गडवाले’सुद्धा दाखल झाले आणि सुव्रतनाथांचे दर्शन पटापट उरकून आम्ही
सूर्योदय बघायला धावलो. मांगीच्या सुळक्यावर घालवलेला पुढचा जवळजवळ पाऊणतास
आयुष्यभर लक्षात राहणार आहे. मांगीच्या "बालेकिल्ल्याला" प्रदक्षिणा घालता
येते. त्या वाटेवर तुंगीच्या दिशेने एक माचीवजा सोंड जाते. त्या ठिकाणी
जोरदार वारा होता. त्या सोंडेच्या टोकापर्यंत जाऊन आम्ही उड्या मारल्या,
फोटो काढले. त्या उड्या आपण इथे पाहिल्या आहेतच. -
http://www.maayboli.com/node/22277
http://www.maayboli.com/node/12975
सूर्योदयाचे हे काही फोटो-


यो महाराज-
उडीमास्तर यो, मग ज्यो, मग रोमा आणि मग अविने बिनधास्त उड्या मारल्या. शेवटी मलाही उड्या मारायचा आग्रह झाला आणि मी त्या सोंडेच्या टोकावरच्या छोट्या जागेमध्ये उभा राहिलो. वारा सुटला होता. मला अशी (प्रामाणिक) भीती वाटत होती की मी उडी मारल्यावर हवेत असताना वाऱ्याच्या झोताबरोबर उडून तर जाणार नाही ना? :D :D अखेर योने तू अजिबात उडणार नाहीस अशी खात्री दिल्यावर एक दोन ’पायलट’ उड्या मारून पाहिल्या आणि मग मारली उडी!! :)
आठ वाजत आले होते. आम्ही तुंगीकडे निघालो. मांगी चढताना दोन हजारव्या पायऱ्यीपाशी तुंगीकडे वाट जाते. तिथपर्यंत उतरून आलो. 
तुंगी
सुळक्यासाठी तिथून पाचशे पायऱ्या आहेत. अशी एकूण तीनहजार शंभर पायऱ्यांची
चढाई आहे. तुंगीपर्यंतची वाट लांब आहे. वाटेत एक वृंदावन लागते. - मागे
तुंगी.
मांगी-तुंगीवरील मूर्तींचे हे काही फोटॉ-

तुंगी
बघून उतरतांना एका डोलीवाल्याने मला माझ्या उजव्या हाताचा सकाळी पडलेला
ग्लोव्ह आणून दिला. मला आश्चर्यही वाटले आणि आनंदही झाला. :)
तुंगीवरून मांगी-
(हा माझा एक आवडता फोटो)
मांगी-तुंगी
’फाट्यापाशी’ आलो तेव्हा नऊ वाजले होते. माणसांचे पूर्वज सगळीकडे विहरत
होते. ज्यो आणि रोमाने त्यांचे (आणि त्यांच्याबरोबर) फोटो काढण्याची हौस
पूर्ण करून घेतली. :D आता ट्रेकमधली शेवटची उतरण - २००० पायऱ्या - नऊ वाजून
दहा मिनिटांनी उतरायला सुरूवात केली. 



उतरतांना अजून काळजी घ्यावी लागणार होती कारण चढण्यापेक्षा उतरताना गुडघ्यावर जास्त जोर येतो. त्यामुळे योने मला तू तुझ्या स्पीडने उतर, आम्ही तागडाक् तागडाक् करत जातोय असे सांगितले.
येथे एक जैन तीर्थक्षेत्रदेखील असून, तेथे चढून जाण्यासाठी सुमारे दोन हजारांहून अधिक पायऱ्या आहेत.
नुकतीच येथे जैन धर्मीयांचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांची १०८ फूट उंच मूर्ती साकारण्यात आली आहे. या मूर्तीचा पंचकल्याणक, प्राण-प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळा फेब्रुवारी २०१६ मध्ये संपन्न झाला. हा पुतळा मांगी डोंगरावर सुमारे ४५०० फूट उंचीवर साकारण्यात आलेला आहे. हे काम पूर्ण होण्यास सुमारे एकोणीस वर्षे एवढा अवधी लागला.
अत्यंत टणक मानल्या जाणाऱ्या सह्याद्री पर्वतराजीच्या काळ्या बॅसाल्ट पाषाणात डोंगर कापून तयार केलेली ही मूर्ती अन्य मूर्तीच्या तुलनेत अधिक टिकाऊ व सर्वांग सुंदर मानली जात आहे. जैन तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांच्या या १०८ फुटी मूर्तीची नोंद लवकरच गिनीज बुकमध्ये केली जाणार आहे.
या मूतीची साधारण मापे अशी आहेत:
डोक्याचे केस - ५ फूट
मुख - १२ फूट
मान - ४ फूट
कान - १४ फूट
मान ते छाती - १२ फूट
छाती ते नाभी - १२ फूट
नाभी ते टोंगळे - ३६ फूट
टोंगळे - ४ फूट
टोंगळे ते पायाचा घोटा - २९ फूट
तळपाय - ४ फूट
कमळ - ५ फूट
चौथरा - ३ फूट
अशा भव्य आकाराची ही मूर्ती आहे.
या मूर्तीपर्यंत पोहोचण्यास तीन प्रकारचे मार्ग तयार करण्यात येत आहेत. या पुतळ्याच्या जागी पोहोचण्यास ४ लिफ्टही तयार करण्यात येत आहेत
हे एक जैन तीर्थस्थान असल्याने भाविकांची येथे कायम गर्दी असते. महावीर जयंती हा येथील महत्त्वाचा सण असतो. भिलवड गावातच असलेल्या मांगी-तुंगी ट्रस्ट द्वारे याची देखरेख ठेवली जाते. पायथ्याशीच मोठे आदिनाथ मंदिर असून मोठ्या आणि भव्य अश्या महावीराच्या पुतळा/प्रतिमा येथे आहेत.
डोंगरावर ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भ असलेल्या अनेक गुहा असून त्या महावीर गुहा, शांतीनाथ, आदिनाथ, पार्श्व म्हणून ओळखतात. मांगी डोंगरावर कृष्णकुंड असून, ते कृष्णाच्या शेवटच्या दिवसाचे प्रतीक समजतात. येथे सात मंदिरे असून अनेक जातानाच्या मार्गात अनेक पादुका कोरलेल्या दिसतात. तुंगी डोंगरावर पाच मंदिरे आणि दोन गुहा आहेत. मांगी आणि तुंगी यांना जोडणाऱ्या खिंडी सदृश मार्गातही २ गुहा आणि एक मंदिर आहे.
गडावरील राहायची सोय
भिलवाड गावातील ट्रस्टच्या धर्मशाळा आहेत. राहायचे ५० रु. प्रतिदिवस इतके नाममात्र भाडे आहे.
गडावरील खाण्याची सोय
भिलवाड गावातील ट्रस्टच्या मंदिरात खाण्याची सोय आहे. जेवण केवळ रु. ४० प्रतिव्यक्ती इतके नाममात्र आहे.
गडावरील पाण्याची सोय
गडावर पाणी नाही. त्यामुळे पायथ्यापासूनच पाणी घेऊन जावे.
गडावर जाण्याच्या वाटा
मार्ग
2 तास==जाण्यासाठी लागणारा वेळ
मांगी तुगी मंदीर
मांगी तुगी मंदीर नाशिक पासुन 125 कि.मि. अंतरावर सटाणा तालुक्यात आहे.समुद्रसपाटीपासुन 4343 फुट उंचीवर मांगी शिखर तर समुद्र सपाटीपासून 4366 उंचीवर तुंगी शिखर आहे. मांगी तुंगी हे प्रसिध्द धार्मिक स्थळ आहे. मांगी तुंगीच्या पायथ्याशी ‘’भिलवाडी’’ हे गांव आहे. येथे साधना केल्याणे मोक्ष प्राप्ती मिळते असे मानले जाते.
मांगी
मांगी शिखराची उंची जास्त नसली तरी येथे सराईत गिर्यारोहकच चढु शकतात. शिखराच्या पायथ्याशी भगवान महावीर, अदिनाथ, पार्श्वनाथ, हनुमान, वाली, सुग्रीव इ. यांच्या 356 कोरीव मुर्ती आहेत. गुफांमध्ये देखील काही कोरीव काम आढळते. या ठिकाणी “ मांगीगिरी मंदीर ‘’ आहे.
तुंगी
तुंगी शिखर मांगी शिखरापेक्षा उंच आहे. या शिखराला देखील तुंगी शिखरासारखीच प्रदक्षिणा करता येते. प्रदक्षिणा मार्गावर तीन गुंफा आहे. त्या पैकी एका गुंफेत “ तुंगीगिरी मंदीर ‘’ असून. भगवान बुध्दांच्या 99 कोरीव मुर्ती येथे आहेत.
कसे पोहोचाल?:
हवाई मार्गे
सर्वात जवळचे विमानतळ ओझर नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळ शहराच्या मध्यभागीपासून सुमारे 24 किलोमीटर अंतरावर आहे.
रेल्वे द्वारे
जवळचे रेल्वे स्थानक नाशिकरोड 130 किमी आहे
रस्त्याने
नाशिक सेंट्रल बस स्थानकापासून 125 कि.मी. आहे
यह सिद्ध क्षेत्र सूरत से 225 किमी0 की दूरी पर स्थित है यहाँ से गजपंथा 125 किमी0, महुआ 180 किमी0, एलोरा 190 किमी0, पैठन 260 किमी0 की दूरी पर स्थित है। यहाँ का रेल्वे स्टेशन मनमाड 100 किमी0 पर है। बस स्टेण्ड तहाराबाद 11 किमी0 है। इस क्षेत्र पर धूलिया होते पहुचा जाता है। यहाँ 49 कमरे अटैच बाथरूम व 36 बिना अटैच के है। यहाँ सशुल्क नियमित भोजनशाला है। यहाँ एक औशधालय है। यहाँ के प्रबन्धक डा0 सूरजमल गणेशलाल जैन है। यहाँ का फो0 न0 02555-242519 व 285531 है।
मांगी-तुंगी जी क्षेत्र का विहंगम दृश्य
मांगी-तुंगी जी पहाड पर चढने के लिए सीढिया
चरण
मन्दिर के बाहर रखी खण्डित प्रतिमा
गुफा मे पहाड पर उकेरे गये भगवान
पहाड के नीचे कुछ सीढियां चढ कर मन्दिर का प्रवेश द्वार
मांगी गिरि पहाड पर दि0 जैन आचार्यो की प्रतिमाए व चरण
गुफा मे जाने का रास्ता
मुनि की प्रतिमा पहाड मे खुदी
महावीर भगवान की वेदी
मांगीगिरि पहाड पर खुदे भगवानो की प्रतिमाए
गुफा का भीतरी भाग व सामने महावीर भगवान
तपस्वी मुनि देवेन्द्र कीर्ति जी की अत्यन्त प्राचीन प्रतिमा
श्रीकृष्ण के भाई बलराम जी की दि0 जैन अवस्था मे चतुर्थ कालीन अत्यन्त प्राचीन प्रतिमा जिनके दर्शन पीठ के होते है।
आदिनाथ भगवान की गुफा में पहाड पर खुदे भगवान
पार्श्वनाथ भगवान की वेदी
आदिनाथ भगवान की वेदी
दि0 जैन जिन प्रतिमाए
वेदी मे विराजमान ‘शान्तिनाथ भगवान
शान्तिनाथ भगवान की पूर्ण वेदी
पहाड पर स्थित बावडी
मांगी गिरि से लिया तुंगी गिरि का चित्र
पहाड से लिया तलहटी स्थित मन्दिर का विहंगम दृश्य
तुंगी गिरि पहाड पर स्थित जिन प्रतिमाए
तुंगीगिरि पर पंचबालयति भगवान
पंचबालयति मे से पार्श्वनाथ भगवान की प्रतिमा
तुंगीगिरि की खडी चढाई की सीढिया
तुंगी से लिया गया मांगी गिरि का चित्र
तुंगी गिरि के रास्ते मे बनी चरण छतरी
बलभद्र महामुनि के चरण चिन्ह
तुंगी पहाड का विहंगम दृश्य
तलहटी में मार्ग से दिखता मांगी तुंगी पहाड का विहंगम दृश्य
तलहटी स्थित मन्दिर का शिखर मानस्तम्भ सहित पूर्ण स्वरूप
शिखर सहित मुनिसुव्रत नाथ भगवान के मन्दिर का प्रवेश द्वार
पार्श्वनाथ भगवान के मन्दिर का प्रवेश द्वार
मन्दिर मे दीवार पर बने साने के भाव
धर्मशाला
मूलनायक पार्श्वनाथ भगवान की वेदी
वेदी मे विराजमान पार्श्वनाथ भगवान व अन्य भगवान
पार्श्वनाथ की पूर्ण वेदी
मन्दिर की छत पर कांच का काम
बीच मे पार्श्वनाथ भगवान की वेदी व मन्दिर का भीतरी भाग
सरस्वती मां व साने के भाव बने
वेदी मे विराजमान आदिनाथ भगवान व अन्य भगवान
वेदी मे विराजमान चन्द्रप्रभु भगवान
वेदी मे विराजमान पार्श्वनाथ भगवान
पार्श्वनाथ भगवान की पूर्ण वेदी
आदिनाथ भगवान की पूर्ण वेदी व मन्दिर की छत पर कांच का काम
मुनिसुव्रतनाथ भगवान के मन्दिर का प्रवेश द्वार
मन्दिर प्रांगण मे विराजमान चैबीसी
मुनिसुव्रतनाथ भगवान की वेदी
भरतेश्वर स्वामी
बाहुबली भगवान की वेदी
महाराजो के चित्र
छत पर विराजमान ‘शान्तिनाथ भगवान
छत पर विराजमान चैबीसी
शिखर सहित मन्दिर का प्रवेश
शिखर
शिखर सहित वेदी मे विराजमान भगवान
सहस्त्रकूट कमल मन्दिर का प्रवेश द्वार
भोजनशाला
त्यागी भवन
जल मन्दिर (प्याऊ)
तलहटी मन्दिर से लिया पहाड का दृश्य
मन्दिर के शिखर
मान स्तम्भ सहित मन्दिर के शिखर
दवाखाना
प्रवेश द्वार
https://hi.encyclopediaofjainism.com/
नाशिक जिल्हा अनेक आश्चर्यांनी नटलेला आहे. यात समेधशिखर म्हणून प्रसिद्ध असलेले मांगीतुंगी हे क्षेत्र. मांगीतुंगी पहायचे म्हणजे एका दिवसाची अनोखी सहलच होते. मुंबई-आग्रा हायवेवरून सोग्रस फाट्यावरून देवळा व पुढे सटाणा तालुक्यात आपण पोहचतो. सटाण्यात गेल्यावर तेथून ३० किलोमीटरवर ताहाराबादच्या पुढे मांगीतुंगी फाटा लागतो. तेथून ६ किलोमीटरवर तुंगाडी नदीच्या कुशीत विसावलेले भिलवाड हे छोटेसे आदिवासी गाव लागते. गावात प्रवेश करताना समोर दोन्ही बाहू पसरून उभा असलेला मांगीतुंगी पर्वत आपले स्वागत करतो. गावात पांढरीशुभ्र जैन मंदिरे, परिसरात श्री १००८ विश्वहितंकर सातीशय चिंतामणी पार्श्वनाथ मंदिर, सहस्रकूट कमल, मानस्तंभ, मुनीसुव्रतनाथ, आदिनाथ आदी मंदिरे पहायला मिळतात. येथे राहण्याची सोयही आहे. त्यामुळे एखाद्या दिवसाची मुक्कामी सहलही होऊ शकते. जैन मंदिरातील मूर्तींचे वेगळेपण चिमुकल्यांना मोहात पाडते. अगदी तळहातापासून ३१ फूट उंचीची भगवान सुव्रतनाथ यांची शनिग्रह निवारक मूर्तीपर्यंत विविध जैन मूर्ती पहायला मिळतात. सहस्त्रकूट कमल मंदिर, मानस्तंभही आहेच. त्याशिवाय आदिवासी बांधवांची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती अन् त्यांचे जीवनमानही अनुभवता येते. ही सफर झाली गावाची आता मांगीतुंगी पर्वताकडे वळूया. मांगीतुंगीबाबत अनेक अख्यायिका आहेत. त्या तेथील ग्रामस्थांकडून समजून घेणे मजेशीर ठरते. तर मांगीतुंगी अनुभवणे हा एक थरारच आहे. मांगीतुंगी चढताना दोन अप्रतिम सुंदर लेण्या लागतात. त्या सुद्धबुद्धीजींच्या नावाने ओळखल्या जातात. मांगी व तुंगी हे पर्वताचे दोन टोके आहेत. येथे जाण्यासाठी साडेचार हजार पायऱ्या चढाव्या लागतात. तुंगी पर्वतावर प्राचीन लेणी आहेत. गिरीराज नावाचे जलकुंड, अंतरिक्ष चैत्यालय, चंद्रप्रभू भगवंतांची मूर्ती पहाते येते. मांगीतुंगीच्या मांगी या शिखराच्या खालच्या टप्प्यावर जगातील अखंड दगडातील सर्वात उंच १०८ फूटी श्री ऋषभदेवाची मूर्ती सध्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. त्यात १३ फुटाचे कमळ व १०८ फूट उंचीची १२१ फूट उंचीची मूर्ती पाहताना नवल वाटते. हा सोहळा अनुभवताना बच्चेकंपनी नक्कीच खूश होईल.
मांगी-तुंगी हे एक जैन सिद्ध-क्षेत्र आहे. सिद्ध-क्षेत्र याचा अर्थ असा की सिद्धी/ मोक्ष मिळवण्याचा मार्ग (gateway to the state of enlightenment.).
ह्या जैन समाजाच्या सिद्ध क्षेत्री, हनुमान, सुग्रीव, नल, नील, महानील, गव, गवाक्ष आणि इतर रामायणातील ९९ वानररूपी योद्ध्यांना जीवनातून मुक्त होऊन मोक्ष मिळाला.
मांगी-तुंगी किल्ला ताहाराबाद पासून हा अंदाजे २५ किमी वर असून नाशिक जिल्ह्यातील सेलबारी-डोलबारी पर्वत रंगांमध्ये/ डोंगररांगेतील हा महाराष्ट्रातील उत्तर-दक्षिणेचा शेवटचा किल्ला आहे. येथूनच डोलबारी डोंगररांगा सुरू होतात असा समज आहे. ऐतिहासिक असा बागलाण जिल्हाही येथूनच चालू होतो.
हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून जैन लोकांचे तीर्थ स्थान हि आहे.
मांगी शिखराची उंची ४३४३ फूट एवढी आहे तर त्याच्या जुळे शिखर तुंगीची उंची ४३६६ फूट आहे. दोन्ही शिखरे एकमेकांना जोडून असल्याने ती मांगी-तुंगी या नावाने ओळखली जातात.
मांगी तुंगी हा एक वैशिष्ठ्यपूर्ण दुर्ग सेलबारीपर्वत शृंखलेत मुडतो. ह्या सेलबारी रांगेत दुर्गांना उंच व तीक्ष्ण सुळकेयेतात . साल्हेर पासून सेलबारी आणि डोलबारी हि पर्वत रांग सुरु होते.सेलबारी पर्वत रांगेत मांगी-तुंगी, घाण्यागड, तांबोळ्या, न्हावीगड, धामण्या-वघाई, गवळण, नांद्या, जिभ्या, शेंदोड , हनुमान ही गड -दुर्गपर्वत शृंखला येते थेट गुजरात राज्यातील पूर्णा अभयारण्यातील डोंगर रांगेतसंपते. मुल्हेर तख्ताच्या संरक्षणार्थ हि पर्वत शृंखला असणे हेच मुल्हेरराजधानीच्या दृष्टीने भौगोलीक कवच आहे. मांगी तुंगी पर्वत अनेक नैसर्गिक स्रोतांनीपरिपूर्ण आहे.
मांगी पर्वताची उंची :४३४३ फूट (समुद्रसपाटी पासून )
तुंगी पर्वताची उंची: ४३३६ फूट
मांगी शिखराची उंची: २२५ फूट,
तुंगी शिखराची उंची: २७५ फूट,
मांगीशिखर ते तुंगी शिखर अंतर :१४०० फूट .
मांगी पर्वतावर : ७ मंदिरे
तुंगी पर्वतावर :३ मंदिरे.
तसेच पायथ्याला भिलवाड गावात काही मंदिरे आहेत.पैकी पद्मावती देवीचेहे मुख्य शक्तीपीठ आहे.
मांगी-तुंगी शिखर येथून २ किमीवर आहे मांगीतुंगी वर जाण्यासाठी एकूण ४५०० पायऱ्याआहेत. २०० पायऱ्या चढल्या नंतर ३ गुहा व ३ जैन लेण्या आहेत त्यातशुद्धबुद्धदेव, मुनीसुव्रतनाथ व नेमिनाथ यांच्या समवेत अनेक मुर्त्याकोरल्या आहेत. हा मांगीतुंगी पर्वत चढत असताना अनेक नैसर्गिक दरवाजेलागतात. पुढे अर्ध्यावर डावीकडे एक वाट जाते तेथे विश्वातील सर्वात उंच१०८ फूट अखंड पाषाणातील भगवान वृषभदेव ह्यांची मूर्ती लागते. त्यांनावंदन करूनपुन्हा मांगीगिरी कडे जावे. मांगी शिखरावर एकूण ७ गुहा असून त्यात ६५० जैनशिल्पे कोरलरली आहेत. पैकी एका गुहेत बागुल राजा विरामशाह देव राठोडह्याची प्रतिमा कोरली आहे व त्या बाजूला त्याने ह्या जैन लेण्या खोदवल्याह्या संदर्भातला शिलालेख आहे. मांगी शिखरावर गेल्यास टोकावर पुन्हा २ गुहा वएक पाण्याचे टाके आहे. व टेहळणी बुरुज आहे. तसेच मांगीगिरीच्या प्रदक्षिणामार्गात मागील बाजूस मंगल चंडिका देवीची प्राचीन शिल्प आहे हीच मांगीदेवीम्हणून भक्तांची काळजी घेते. पुढे मांगी ते तुंगी मार्गावरश्रीकृष्णाचे अंतिमस्थळ व कृष्णकुंड आहे. तुंगीगीरीवर ३ गुहावजा मंदिरेआहेत त्यात राम, बलराम ह्यांच्या मूर्ती आहेत. सर्व लेण्या काळ्यापाषाणातील असून देखण्या आहेत. ह्याच मांगीतुंगी पर्वतावर आदिवासी बांधवांचीडोंगऱ्यादेवाची गुहा आहे. डोंगऱ्यादेव हेअतिशय विज्ञाननिष्ठ असे शास्त्र आहे त्यात कुठेही दांभिकता व अंधश्रद्धानाही. एकदा आयुष्यात ह्या यात्रेचा अनुभव घ्यावाच. पावसाळ्यात ह्या मांगीतुंगी पर्वतावरून १००१ धबधबे कोसळतात. आपण खालून ते मोजू शकतो. त्याससहस्त्रधारा म्हणतात .त्यामुळे हिरव्या शालूवरून दुधाच्या धारा कोसळाव्याअसा हा परिसर विलोभनीय दिसतो. रात्री तेथे सप्तसुरांचे ध्वनी ऐकू येतात.अशा ह्या ठिकाणी निसर्गाची मुक्त उधळण बघण्यासाठी एकदा तरी यावे.
राहण्याची व्यवस्था – मांगीतुंगी-भिलवाड जैन धर्मशाळा,
जेवणाची व्यवस्था : मांगीतुंगी-भिलवाड जैन भोजनालय
दुर्गभ्रमंतीचा काळ – ऑक्टोबर ते जानेवारी
जाण्याचा मार्ग – नाशिक – सटाणा -ताहाराबाद -मांगीतुंगी
नाशिक -सटाणा : ९५ किमी
सटाणा -मांगीतुंगी : ३४ किमी
http://www.safarbaglanchi.com/
मांगीतुंगी : ज्ञानमती माताजी यांच्याकडून भगवान ऋषभदेव विश्वशांती वर्ष घोषित
- अझहर शेख
नाशिक (ऋषभदेवपुरम) : 'अहिंसा परमो धर्म' हे जैन धर्माचे मूलतत्त्व आहे. हजारो वर्षांचा इतिहास लाभलेल्या जैन धर्माच्या सध्याच्या सर्वाेच्च आर्यिका १०८ फूट प्रतिमा निर्माणच्या प्रेरणास्त्रोत, भारतगौरव गणिनीप्रमुख श्री ज्ञानमती माताजी यांच्या संकल्पनेतून विश्वशांती अहिंसा संमेलनाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. जगात निर्माण झालेल्या अशांतीचे वातावरण व समाजातील वैरभाव, हिंसा रोखण्यासाठी शासकिय यंत्रणेसह संरक्षण विभागाचे सर्वच दल प्रयत्नशील आहेत. अशा स्थितीत विश्वशांतीसाठी जैन धर्माच्या मूलतत्त्वाचा जगभरात प्रचार-प्रसार करण्यासाठी व पाप-पुण्याच्या कल्पना स्पष्ट होण्यासाठी माताजी यांनी हे वर्ष ऋषभदेव विश्वशांती वर्ष घोषित केले आहे. यानिमित्ताने देशभरात यज्ञ, जप, अनुष्ठान, चर्चासत्र, मार्गदर्शन शिबिरे यांसारखे उपक्रम राबविले जाणार आहेत. याची सुरुवात विश्वशांती अहिंसा संमेलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या संमेलनाचे उद्घाटना भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. संमेलनाच्या माध्यमातून भारतासह संपूर्ण जगाला अहिंसा व शांतीचा संदेश देण्यात येत आहे. या संमेलनाला जागतिक स्तरावर महत्त्व प्राप्त झाले आहे. असे संमेलन दहा वर्षांपूर्वी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हस्तिनापूर येथे पार पडले होते.
असे झाले श्री भगवान ऋषभदेव यांच्या विश्वविक्रमी मूर्तीचे निर्माण
मांगीतुंगी हे जैन धर्मीयांचे दुस-या क्रमांकाचे प्राचीन सिद्धक्षेत्र आहे. या तीर्थक्षेत्राला दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक भेट देतात. मांगीतुंगी पर्वतावर ९९ कोटी मुनींनी तपसाधना करुन मोक्षप्राप्ती केल्याची अख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे या पर्वताला जैन धर्मात अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त आहे. पर्वतावर प्राचीन मंदिरे, लेणी, गुहा असून वर्षानुवर्षांपासून येथे जैन समाजबांधवांकडून उपासना केली जाते. जैनधर्माच्या सर्वोच्च गणिनीप्रमुख आर्यिका ज्ञानमती माताजी १९९६साली चातुर्मासाच्या निमित्ताने मांगीतुंगी येथे आल्या होत्या. त्यावेळी तप, अंतर्ध्यानाने झालेल्या साक्षात्कारानुसार या पवित्र पर्वतावर प्रथम तीर्थंकर आदिनाथ भगवान ऋषभदेव यांची १०८ फूटी अखंड पाषाणातील मूर्ती निर्माणाचे कार्य हाती घेण्यात आले होते. माताजी यांनी निश्चित केलेली मूर्तीची जागा पर्वताच्या मध्यावर जमिनीपासून साडेतीन हजार फूट उंचीवर होती. त्याठिकाणी जाण्यासाठी रस्ता तर दूर मात्र पायवाटही अस्तित्वात नव्हती. जगाच्या पाठीवर अखंड पाषाणात १०८ फूटी मुर्ती कोठेही नसल्यामुळे या मूर्तीला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले आहे. पर्वताच्या मध्यावर अखंड शिळा शोधून त्यात भगवान ऋषभदेव यांची १०८फूट उंच मूर्ती साकारणे हे एक दिव्यच होते. माताजी यांच्या नेतृत्वाखाली व समितीचे अध्यक्ष कर्मयोगी पीठाधीश स्वस्तीश्री रवींद्रकीर्ती स्वामीजी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली पार पडले. २०१६ साली या विश्वविक्रमी मूर्तीचा प्रथम महामस्तकाभिषेक सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह उपस्थित होते. मूर्तीचा हा पंचकल्याणक महोत्सव सोहळाही विश्वविक्रमी ठरला होता. असा सोहळा दर सहा वर्षांनी मांगीतुंगी या सिध्दक्षेत्रावर साजरा होणार असून यासाठी राज्य शासनाकडून पुढाकार घेतला जाणार आहे. समाजाच्या संघटनासाठी मूर्ती निर्माणाचे कार्य महत्त्वाचे ठरले.
ज्ञानमती माताजी यांच्याविषयी थोडसं...
सध्या देशाच्या जैन धर्मातील सर्वोच्च आर्यिका असलेल्या ज्ञानमती माताजी या विसाव्या शतकातील पहिल्या कुमारिका आर्यिका आहेत. उत्तर प्रदेशातील टिकेदनगर येथे त्यांचा जन्म इ.स.१९३४ मध्ये झाला. १९५२मध्ये त्यांनी गृहत्याग करून जैन धर्माची दिक्षा घेतली. त्याकाळी कुमारवयात दीक्षा घेणा-या त्या पहिल्याच बालब्रम्हचारी होत्या. त्यांचे शिक्षण इयत्ता चौथीपर्यंत झालेले असले तरी मात्र गेल्या ६६ वर्षांच्या तपश्चर्येच्या काळात प्राप्त झालेल्या दैवी ज्ञानाच्या जोरावर सुमारे साडेचारशेहून अधिक धार्मिक ग्रंथांची रचना केली आहेत. यामध्ये संस्कृत, हिंदी, प्राकृत, कन्नड व अन्य भाषांमध्ये ग्रंथांच्या रचना आहेत. जैन धर्मातील नवदेवता पूजा व दक्षिण भारतात घरोघरी होणारी कन्नड भाषेतील बारह भावना या धार्मिक विधींचा शोध माताजींनीच लावला. त्यांचे सध्याचे वय ८५ वर्ष असून धार्मिक कार्यात त्यांनी संपूर्ण भारतभ्रमंती केली आहे. मागील ६६ वर्षांपासून दिवसभरातील २४ तासांत केवळ एकदाच आहार व जल त्या घेतात. २०१५ साली हस्तिनापूर येथून सुमारे १६०० किलोमीटरचा पायी प्रवास करुन माताजी यांनी नाशिकमधील मांगीतुंगी सिध्दक्षेत्र गाठले आहे. माताजींनी अद्याप दहा ते बारा ठिकाणी जैन तिर्थंकारांच्या जन्मभूमीचा विकास घडवून आणला आहे. राजसत्तेचे धर्मसत्तेसोबत असलेल्यां जिव्हाळ्यामुळे राजकारण व समाजकारण संस्कारक्षम होण्यास मदत होते, असा माताजींचा विश्वास आहे.
मांगी तुंगी, स्टॅच्यू ऑफ अहिंसा, धर्मवाद, निसर्ग आणि आपण
आपल्या भारत देशाचं एक फार मोठं दुर्दैव आहे. इथे नैतिकाची पूजा करणारे लोक नगण्य आहेत, आणि भौतिकाची पूजा करणारे असंख्य. त्यात इथे पुतळे, स्मारकं यांचं लोकांना व्यसनच आहे असं म्हणायला हवं. त्या मूर्ती, पुतळ्यांकडून लोकं काय आणि कशी प्रेरणा घेतात हा एक प्रश्नच आहे कारण लोकांचं आचरण कुठेच बदलताना दिसत नाही.
अशाच एका पुतळ्याविषयी एक व्यथित करणारी बातमी पाहिली. महाराष्ट्रात नाशिकच्या पुढे सटाणा येथे एक 'मांगी-तुंगी' नावाची जागा आहे. हा एक सुमारे ४४०० फूट उंचीचा पर्वत आहे ज्यावर जायला ४५०० हून अधिक पाय-यांचा मार्ग आहे. इथे वर गुहा आहेत ज्यांमधे जैनपंथीयांच्या आकृती कोरलेल्या असून हे जैन सिद्धक्षेत्र म्हणून मानलं जातं. या ठिकाणाला अद्भुत निसर्गसौंदर्य लाभलेलं आहे. चारही दिशांना पसरलेली सह्याद्रीची शिखरं आहेत. त्यामुळे जैनपंथीयांबरोबरच इतर अनेक पर्यटक, ट्रेकरही इथे येत असतात. या ठिकाणाबद्दल वाचलेली बातमी अशी की या पर्वताचा एक भाग पोखरून तिथे रिशभदेव या जैन देवाचा १०८ फुटी पुतळा उभारण्यात आला आहे. याविषयीच्या एका कार्यक्रमात तेथील विश्वस्त व्यक्ती सांगत होती की, "ये स्टॅच्यू ऑफ अहिंसा" है. यहां आनेवाले सभी जैन भाविक इसके दर्शन का लाभ पा सकते है. ये अपने आप में एक अनुभूती है" इत्यादी.
एक व्यक्ती म्हणून, एक ट्रेकर म्हणून, मला त्या निसर्गाच्या वैभवाच्या या लचका तोडलेल्या, पोखरलेल्या रूपाने विषण्ण केलं. अनेक प्रश्न पडले. या पुतळ्याच्या उभारणीला मान्यता देणारे स्वतः माननीय मुख्यमंत्री आहेत. त्यांना यात होणारं निसर्गाचं विदृपीकरण दिसलं नाही का? पुढे या पुतळ्याच्या निमित्ताने तिथे उत्सव भरवला जाणार आहे. त्यासाठी रस्त्यांचं रूंदीकरण केलं जाणार आहे, पाण्याची सोय, भक्तांसाठी रहाण्याची सोय केली जाणार आहे. यासाठी मंजूर झालेला खर्च ७० कोटी रुपये, टाईम्स ऑफ इंडियात बातमी आहे. रस्ते, पाणी यांची कामं होण्यासाठी या पुतळ्याचं निमित्तच हवं होतं का? ती कामं अशीही व्हायलाच हवी होती; इथेच नाही सगळीकडे.
या पुतळा उभारणीतून नेमकं काय सिद्ध करायचं आहे हाही एक वादाचा मुद्द होऊ शकतो. मांगी तुंगी हे जैन तीर्थ होतं आणि ते कुणीही नाकारलं नव्हतं. मग हा जैन देवतेचा पुतळा बांधण्याचं प्रयोजन काय? त्यासाठी डोंगर पोखरलेला कसा चालला? हे एका प्रकारचं शक्तिप्रदर्शन आहे असं का वाटू नये? आणखी एक गोष्ट अशी की काहीही सोयी सुविधा नसताना ज्या लोकांनी अशा खडतर जागी कोरीवकामं केली, गुहा बांधल्या, त्यांच्यापुढे आज सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जर तुम्ही एखादा पुतळा बांधलात तर त्यात तुमचा मोठेपणा काहीच नाही. पैसे असले की आज हे असं काही करणं सहज शक्य आहे. त्यामुळे यात भक्तीचा भाग कमी आणि इतर सूप्त हेतूचा भाग जास्त आहे, हे जाणवतं.
मुळात, भौतिकाचं कौतुक जास्त असल्याने हे प्रत्येक बाबतीत होत आलंय. मग शिवाजी महाराजांचं स्मारक काय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक काय, सरदार पटेलांचा पुतळा काय किंवा आणि कुणाचं स्मारक काय. या गोष्टीतून काय साध्य होतं हे अनाकलनीय आहे. शिवाजी महाराजांचे विचार घ्यावे, बाबासाहेबांची बुद्धिमत्ता घ्यावी, साधूसंतांची शांतता, संयम व इतर गुणवैशिष्ट्य घ्यावीत; परंतु ते होत नाही. ते फक्त नावापुरतं असतं.
मांगी-तुंगी बद्दलच्या त्या कार्यक्रमात त्या विश्वस्तांनी सांगितलं की आणखी एका डोंगरावर ते अशा प्रकारचा पुतळा बांधणार आहेत. आनंद आहे. यालाही शासन मंजूरी देईलच. सर्वांना खूश ठेवायचं म्हटल्यावर सर्वांना हवे तसे हवे तिथे पुतळे बांधायला द्यायला हवेतच. विकास यालाच तर म्हणतात! पण एक ट्रेकर म्हणून, एक सह्याद्रीत रमणारा म्हणून मला तरी आता त्या ठिकाणी जावंसं वाटणार नाही. कदाचित तो पुतळा बांधणा-यांचा हेतू काही अंशी यातून साध्य होईल.
मांगी तुंगी | दक्षिणेचे संमेदशिखर | Discover Maharashtra

दक्षिणेचे संमेदशिखर – मांगी तुंगी…
जैन स्थापत्य अथवा जैन मूर्ती महाराष्ट्राला काही नवीन नाहीत. अगदी वेरुळच्या ठिकाणी सुद्धा सुंदर जैन लेणी पाहायला मिळतात. परंतु उंच डोंगरावर वसलेली आणि अत्यंत सुंदर अशी जैन लेणी पहायची असतील तर नाशिक जिल्ह्यातील सेलबारी रांगांकडे जावे लागे. साल्हेर–सालोटा हे देखणे दुर्ग याच सेलबारी-डोलबारी रांगेमध्ये वसले आहेत. आणि त्यांच्याच समोर आहेत हे मांगी तुंगीचे जुळे डोंगर. लांबून पाहताना सुद्धा हे अत्यंत आकर्षक असे दोन सुळके दिसतात. या मांगी तुंगीच्या जुळ्या डोंगरामध्ये जैन लेणी खोदलेली आहेत. मध्ययुगीन जैन स्थापत्याचा हा एक अजोड नमुना म्हणावा लागेल. सटाणा तालुक्याच्या पश्चिम सीमेवर लागून असलेला हा परिसर आहे. नाशिक-सटाणा-ताहराबाद मार्गे हे अंतर होते १२३ कि.मी.
समुद्रसपाटीपासून १३२६ मीटरवर असलेली ही दोन्ही शिखरे एका अरुंद नैसर्गिक धारेने जोडलेली आहेत. दोन्ही शिखरे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे अगदी लांबूनसुद्धा ओळखता येतात. पायथ्यापासून इथे जाण्यासाठी अंदाजे ३००० पायऱ्या चढून जावे लागते. कमी उंचीच्या आणि टप्प्याटप्प्यावर विश्रांतीची सोय असलेल्या या पायऱ्या चढणे तुलनेने खूपच सोपे आहे. ज्या भक्तांना हे चालणे जमत नाही त्यांच्यासाठी इथे काही पैसे भरून डोलीची व्यवस्था केली जाते. पायथ्याशी मांगी-तुंगी देवस्थान असून तिथे राहण्याची सोय सुद्धा सुंदर केलेली आहे. इथली लेणी आणि त्यातील जैन शिल्पे इ.स.च्या ९ व्या शतकापासून ते इ.स.च्या १५ व्या शतकापर्यंत कोरली जात होती. मांगी या शिखराच्या दक्षिण बाजूच्या कातळावर जवळजवळ ८० जैन प्रतिमा कोरलेल्या दिसतात. दोन्ही सुळक्यांना जोडणाऱ्या एका अरुंद वाटेने आपण तुंगी या सुळक्याकडे गेलो की तिथे दोन गुहा असून त्या सुळक्यावर ८ प्रतिमा कोरलेल्या आहेत. मांगी सुळक्याच्या खालच्या अंगाला असलेल्या गुहेला स्थानिक भाषेमध्ये श्री शुद्धबुद्धमुनिराज गुहा असे म्हटले जाते.. इथे एक छोटीशी मार्गिका आणि एक लहान सभागृह एवढेच कोरलेले दिसते. या गुहांमध्ये अनेक जैन प्रतिमांची अगदी रेलचेल आढळते. गुहेच्या भिंतींवर तीर्थंकर, सर्वानुभूती-अंबिका या यक्ष-यक्षी, चक्रेश्वरी, ऋषभनाथ आणि सरस्वती या सर्व प्रतिमा अंकित केलेल्या दिसतात.
या गुहा मागे टाकून पुढे गेले की तिथे नव्याने केलेल्या पायऱ्यांच्या मार्गाने आपल्याला त्या सुळक्याच्या शिखरावर पोहोचता येते. हा मार्ग काहीसा खडतर आणि खूप चढाईचा आहे परंतु त्यावरून वर गेल्यावर डोळ्याचे पारणे फिटते. मांगी सुळक्यावरील दोन गुहा तर निसर्गनिर्मित असून त्यामध्ये काही डागडुजी केलेली दिसते. या गुहांना सध्या महावीर गुफा, शांतीनाथ गुफा, श्री आदिनाथ गुफा, पार्श्वनाथ गुफा, आणि बलभद्रस्वामी गुफा अशा नावांनी ओळखल्या जातात. गुहेमधील प्रतिमा तसेच गुहेच्या बाहेरील खडकाच्या पृष्ठभागावरील प्रतिमा म्हणजे जैन ऋषी आणि भक्तांच्या रांगाच्या रांगाच दिसतात. खडकाच्या पृष्ठभागावरील प्रतिमा पाहण्यासाठी तिथे उपलब्ध असलेल्या एका अरुंद अशा मार्गाचाच अवलंब करावा लागतो. सध्या या मार्गाच्या बाजूला संरक्षक कठडे बसवलेले आहेत. दोन्ही सुळक्यांवरील जवळजवळ सर्व गुहा आणि त्यांच्या बाह्यांगावर कोरलेल्या प्रतिमा या उत्तराभिमुख अथवा पूर्वाभिमुख कोरलेल्या दिसतात. सह्याद्रीच्या अजस्त्र रांगा आणि मोसम व पांजरा नद्या आणि त्यांच्यामुळे सुपीक झालेली जमीन या डोंगरावरून पाहताना भान हरपून जाते.
मांगी-तुंगी डोंगर हे इ.स.च्या १२ व्या शतकापासून एक महत्वाचे आणि अत्यंत लोकप्रिय असे दिगंबर जैन तीर्थ आहे. या ठिकाणाला सिद्धक्षेत्र असे म्हटले जाते आणि या ठिकाणाबाबतची दंतकथा अशी की या ठिकाणी जवळजवळ ९९ कोटी जैन मुनींना निर्वाण अवस्था प्राप्त झाली. या ठिकाणाचे उल्लेख अनेक मराठी आणि संस्कृत साहित्यामध्ये आलेले आढळतात. भारतातील गिरनार, शत्रुंजय, पावापुरी या जैन तीर्थक्षेत्रांसोबतच या ठिकाणाला सुद्धा अनेक यात्रेकरूंनी भेट दिलेली आहे. पायथ्याशी दोन जैन मंदिरे आणि एक मानस्तंभ पाहायला मिळतो. तसेच मांगी आणि तुंगी या दोन सुळक्यांना जोडणाऱ्या अरुंद भागावर दोन नवीन इमारतींची उभारणी केलेली आढळते. शेजारीच एक छोटे कुंड असून त्याला कृष्ण कुंड असे म्हणतात. प्रचलित दंतकथेनुसार इथेच भगवान श्रीकृष्णाचे दहन त्याचा भाऊ बलरामाने केल्याचे समजले जाते. बिहारमधील प्रसिद्ध आणि पवित्र अशा संमेद शिखरावरून मांगी-तुंगी या स्थानाला दक्षिणेचे संमेद शिखर असे नाव जैन मंडळींनी दिलेले आहे. सटाणा इथे मुक्काम करून यासोबत आजूबाजूचा बराच परिसर आवर्जून बघण्यासारखा आहे.
-आशुतोष बापट
https://www.discovermh.com/mangi-tungi/
मांगी - तुंगी हा महाराष्ट्रातील एक किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात भिलवड गावानजीक हा किल्ला उभा आहे. येथे एक जैन तीर्थक्षेत्रदेखील असून, तेथे चढून जाण्यासाठी सुमारे दोन हजारांहून अधिक पायऱ्या आहेत.
मांगी - तुंगी
मांगी-तुंगी, भिलवड
नाव मांगी - तुंगी
उंची
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण नाशिक, महाराष्ट्र
जवळचे गाव सटाणा
डोंगररांग सह्याद्री
सध्याची अवस्था
स्थापना {{{स्थापना}}}
नुकतीच येथे जैन धर्मीयांचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांची १०८ फूट उंच मूर्ती साकारण्यात आली आहे. या मूर्तीचा पंचकल्याणक, प्राण-प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळा फेब्रुवारी २०१६ मध्ये संपन्न झाला. हा पुतळा मांगी डोंगरावर सुमारे ४५०० फूट उंचीवर साकारण्यात आलेला आहे. हे काम पूर्ण होण्यास सुमारे एकोणीस वर्षे एवढा अवधी लागला.
ही मूर्ती उभारण्यासाठी प्रथम १२० फूट लांबीच्या कापडावर या प्रस्तावित मूर्तीचे चित्र रेखाटण्यात आले व त्याबरहुकूम ही मूर्ती घडविण्यात आली. मूर्तीची रचना निश्चित करण्यासाठी अनेक दिवस अभ्यास सुरू होता. त्यासाठी ग्रीक तत्त्वज्ञानासह पाली, संस्कृतसह दहा भाषांतील ग्रंथांचा अभ्यास करण्यात आला. जैन परंपरेतील वसुनंदी ग्रंथातील उल्लेखांचाही अभ्यास करण्यात आला. संस्कृत, ताडपत्रांवरील ग्रंथ, तामिळ, कन्नड, तेलगू, वैष्णव ग्रंथ, द्रविड, हीडा, ग्रीक मायथॉलॉजी आदी ग्रंथांतील वर्णनांचा अभ्यास झाला. त्यात उल्लेख असलेले अंगुलीचे प्रमाण अभ्यासण्यात आले. त्याचे रूपांतर फुटांत करून मूर्तीचे परिमाण निश्चित करण्यात आल्याने ही विश्वातील सर्वांग सुंदर मूर्ती तयार झाली आहे. त्यामुळे मांगीतुंगी हे जैन धर्मीयांचे जागतिक तीर्थस्थळ होऊ घातले आहे.
अत्यंत टणक मानल्या जाणाऱ्या सह्याद्री पर्वतराजीच्या काळ्या बॅसाल्ट पाषाणात डोंगर कापून तयार केलेली ही मूर्ती अन्य मूर्तीच्या तुलनेत अधिक टिकाऊ व सर्वांग सुंदर मानली जात आहे. जैन तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांच्या या १०८ फुटी मूर्तीची नोंद लवकरच गिनीज बुकमध्ये केली जाणार आहे.
या मूतीची साधारण मापे अशी आहेत:
डोक्याचे केस - ५ फूट
मुख - १२ फूट
मान - ४ फूट
कान - १४ फूट
मान ते छाती - १२ फूट
छाती ते नाभी - १२ फूट
नाभी ते टोंगळे - ३६ फूट
टोंगळे - ४ फूट
टोंगळे ते पायाचा घोटा - २९ फूट
तळपाय - ४ फूट
कमळ - ५ फूट
चौथरा - ३ फूट
अशा भव्य आकाराची ही मूर्ती आहे.
या मूर्तीपर्यंत पोहोचण्यास तीन प्रकारचे मार्ग तयार करण्यात येत आहेत. या पुतळ्याच्या जागी पोहोचण्यास ४ लिफ्टही तयार करण्यात येत आहेत.[1]
भौगोलिक स्थान
कसे जाल ?
सटाणा -ताहाराबाद -मांगी-तुंगी जर उत्तर भारतातून किंवा उत्तर महाराष्ट्रतुन आपण येत आसाल तर मालेगाव ला यावे मालेगाव आग्रा मुंबई महामार्गावर मोठे शहर आहे. तिथून नामपूर अथवा सटाणा मार्गे ताहाराबाद येऊन मांगी तुंगी ला येवू शकता. जर आपण दक्षिण भारतातून येतात तर नाशिक मार्गे सटाणा यथे येऊन ताहाराबाद वरून मांगी तुंगी येवू शकतात. रेल्वे : नवापूर रेल्वे स्टेशन ला उतरून पिंपळनेर मार्गे ताहाराबाद पुढे मांगी तुंगी. मनमाड रेल्वे स्टेशन ला उतरून मालेगाव मार्गे ताहाराबाद
छायाचित्रे
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
हे एक जैन तीर्थस्थान असल्याने भाविकांची येथे कायम गर्दी असते. महावीर जयंती हा येथील महत्त्वाचा सण असतो. भिलवड गावातच असलेल्या मांगी-तुंगी ट्रस्ट द्वारे याची देखरेख ठेवली जाते. पायथ्याशीच मोठे आदिनाथ मंदिर असून मोठ्या आणि भव्य अश्या महावीराच्या पुतळा/प्रतिमा येथे आहेत.
डोंगरावर ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भ असलेल्या अनेक गुहा असून त्या महावीर गुहा, शांतीनाथ, आदिनाथ, पार्श्व म्हणून ओळखतात. मांगी डोंगरावर कृष्णकुंड असून, ते कृष्णाच्या शेवटच्या दिवसाचे प्रतीक समजतात. येथे सात मंदिरे असून अनेक जातानाच्या मार्गात अनेक पादुका कोरलेल्या दिसतात. तुंगी डोंगरावर पाच मंदिरे आणि दोन गुहा आहेत. मांगी आणि तुंगी यांना जोडणाऱ्या खिंडी सदृश मार्गातही २ गुहा आणि एक मंदिर आहे.
गडावरील राहायची सोय
भिलवाड गावातील ट्रस्टच्या धर्मशाळा आहेत. राहायचे ५० रु. प्रतिदिवस इतके नाममात्र भाडे आहे.
गडावरील खाण्याची सोय
भिलवाड गावातील ट्रस्टच्या मंदिरात खाण्याची सोय आहे. जेवण केवळ रु. ४० प्रतिव्यक्ती इतके नाममात्र आहे.
गडावरील पाण्याची सोय
गडावर पाणी नाही. त्यामुळे पायथ्यापासूनच पाणी घेऊन जावे.
गडावर जाण्याच्या वाटा
मार्ग
2 तास==जाण्यासाठी लागणारा वेळ==
संदर्भ
सिद्धक्षेत्री सज्जता " "लोकमत ई-पेपर नागपूर पान क्रमांक-१०. ११ फेब्रुवारी, इ.स. २०१६. रोजी पाहिले.
सांगाती सह्याद्रीचा
डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
बागलाण दुर्गभ्रमंती : मांगी- तुंगीची
https://www.wikiwand.com/mr/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80
















































No comments:
Post a Comment