Thursday, October 20, 2022

हरिश्चंद्रगड

 हरिश्चंद्रगड आणि कोकणकडा - Harishchandragad

राजूर वरून पाचनई २७ कि.मि. आहे. रस्ता शेवटी ८-१० कि.मि. खराब आहे पण सह्याद्रीच्या बेलाग कड्यांची नक्षी आणि पार आभाळाला खेटलेल्या पर्वतांची शिखरे त्याची जाणीव होऊन देत नाहीत.  



खालच्या बाजूला पाचनई गाव व मंगळगंगा नदी 
डावीकडे मागे दिसतोय तो कलाडगड व त्यामागे रतनगड व खुट्टा सुळका




पाचनई गावातून थोडे वर चढून आले की हि घळ नजरेत भरते.
घळीला  वळसा घालुन पुढे जावे लागते.  


घळीची व्याप्ती लक्षात यावी म्हणून खालील फोटो दिला आहे .


रानडुकराच्या शिकारीसाठी गडावर निघालेले पाचनईतील गावकरी





 पहिला टप्पा पार केल्यावर मंगळगंगा नदीचे पात्र समोर दिसते .
पात्रासोबत चालत राहिल्यास दहा ते वीस मिनिटातच दुरून हरिश्चंद्रेश्वर मंदिराशेजारील पुष्करणी नजरेत येते.

पुष्करणीच्या आजूबाजूला अनेक मंदिरे व शिल्प विखुरलेली आहेत .
 





हरिश्चंद्रेश्वर मंदिरा शेजारीच पाण्याचे काही टाके आहेत. या टाक्यांमाधुनच मंगळगंगेचा उगम होत असावा.



हरिश्चंद्रेश्वर मंदिर









मंदिराच्या आवारात इतरही अनेक मंदिरे आहेत.
















मंदिराचे अवषेश इतरत्र विखुरलेले दिसून येतात.

केदारेश्वर गुंफा :





शिवपूजन


केदारेश्वर
हरिश्चंद्रगडाचे मुख्य आकर्षण - कोकणकडा मंदिराच्या मागे साधारण २० मिनिटांच्या अंतरावर आहे. 









तारामती शिखर

तारामती शिखर हे गडावरील सर्वोच्च ठिकाण आहे.
शिखरावर बालेकिल्ला आणि काही शिवलिंग आहेत. तसेच शिखराच्या पोटात काही कोठ्या व मंदिरे आहेत आहेत.  



सहा फुटी गणेश मुर्ती

निसर्गराजा


सोनकी








  

Malabar crested lark

सूर्यास्त (ठिकाण-पाचनई)





महत्वाची सूचना : १. कोकणकडा कितीही वेळा पहिला तरी तहान भागत नाही :) तेव्हा जेवढे शक्य होईल तेवढ्या लवकर गडावर पोहोचण्याचा प्रयत्न करावा.
२. पाचनई ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार तारामती शिखराच्या उजव्या बाजूच्या डोंगरावर ( घळीच्या वर ) रानडुकरे आणि बिबटे आढळतात. संध्याकाळच्या वेळी तिकडे जाणे  टाळावे.



6 जून अगदी महत्वाचा आणि जवळचा दिवस...
शिवराज्याभिषेक दिन आणि आमच्या लग्नाचा 1 वर्षपूर्तीचा दिवस...
अशातच सह्याद्रीची चाहूल लागली मग मोहीम ठरली ऐतिहासिक आणि पौराणिक सहयाद्रीतील पंढरपूर अर्थात हरिश्चंद्रगडावर जाण्याची...
निघालो धडक द्यायला सोबत माझं प्रेम म्हणजे माझी बायको आणि दुसरं म्हणजे सहयाद्री आणि सोबत आमच्या बहीणाबाईंची साथ...
निसर्गाने आम्हाला या मंगल दिनी भेट म्हणून स्वर्गनुभव करून दिला.
स्वप्नपूर्ती म्हणून इंद्रव्रजचा अविष्कार डोळ्यांनी पाहण्याचे सुख ‘याची देही याची डोळा...’ अनुभवले.
कोकणकड्याची रौद्र पण शांत अशी भव्यता पुन्हा एकदा जाणवली.
तारामतीची ऊंची जणू अगदी ढगाच्या वरच नेऊन ठेवलेली.
साधारण 2000 वर्षांपूर्वीचा पश्चिम घाटातील सह्य पर्वत रांगेतील भौगोलिक तसेच ऐतिहासिक महत्त्व असलेला किल्ला म्हणजे हरिश्चंद्रगड. हरिश्चंद्रगड या किल्ल्याचा इतिहास हा ज्ञानेश्वर माऊलीच्या समकालीन घटनांची आठवण करून देणारा आहे, तर या परिसरातील भूगोल हा ऊन, पाऊस, वारा आणि थंडी यांचा सतत अनुभव देणारा आहे.
कलचुरी राजवंशाच्या राजवटीतील हा किल्ला ६ व्या शतकातील आहे. ११ व्या शतकातील विविध लेणी कोरण्यात आल्या. संत चांगदेव 14 व्या शतकात येथे ध्यान करायचे. गुहा त्याच काळातल्या आहेत. गडावरील विविध बांधकामे आणि आजूबाजूच्या प्रदेशातील विस्तीर्ण संस्कृती अस्तित्त्वात असल्याचे दर्शविते. हरिश्चंद्रेश्वर मंदिरात आणि केदारेश्वरच्या गुहेत नागेश्वर मंदिरात आणि केदारेश्वरच्या गुहेत कोरीव काम दर्शवितात की हा किल्ला कोली महादेवाच्या कुलदेवतेच्या रूपात महादेवाशी संबंधित आहे. ते मोगलांच्या आधी किल्ल्यावर नियंत्रण ठेवत होते. नंतर किल्लावर मुगलांचे नियंत्रण होते आणि मराठ्यांनी ई.स. १७४७ मध्ये ताब्यात घेतला. किल्ला पौराणिक आणि फार पुरातन असून सूक्ष्म मनुष्याचे अवशेष येथे सापडले आहेत. मत्स्यपुराण, अग्निपुराण आणि स्कंदपुराण यासारख्या अनेक पुराणात हरिश्चंद्रगडाचे अनेक संदर्भ आहेत.
सह्याद्रीतील अत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे. महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांच्या तुलनेत हरिश्चंद्रगड हा वेगळा आहे. इतर किल्ल्यांप्रमाणे येथे तटबंदी नाहीत. परंतू या अजस्त्र डोंगरावर काही प्राचीन लेणी आहेत.तसेच शालिवाहन काळातील शिव मंदिर आहे.
रोहिदास, तारामती आणि हरिश्चंद्र हे हरिश्चंद्रगडमधील तीन शिखरे आहेत.
तारामती या गडावरील सर्वोच्च शिखरावरून परिसरातील नाणेघाट, जीवधन, रतनगड, कात्राबाईची खिंड, आजोबाचा डोंगर, कळसूबाई, अलंग, कुलंग, भैरवगड, हडसर आणि चावंड पर्यंतचा निसर्ग पाहता येतो.
अशा प्रकारे मनमुराद हरिश्चंद्र गडावर स्वर्गनुभव घेतला आणि त्याने दिलाही
 
 प्रारंभ...
 
 
 
गडाच्या दिशेने आगेकूच...
 
पाऊलोपावली कड्याबद्दल प्रेम वाढतच जाते
 
जंगलात शिरताना...
 
हरिश्चंद्रगड सहवास...
 
तारामती.... एक स्वर्ग वाट
 
सर्वोच्च शिखरावरील महादेवस्थान

स्वर्गातून जमिनीकडे...
 
रौद्र कडा....कोकणकडा

बेलांग सुलक्यांचा साक्षीदार...
      
 "इंद्रव्रज" याचा योग येणे कठीणच...
भौगोलिक आणि वातावरणातील परिस्थिती जेव्हा एकरूप होते, त्याच वेळीयाचे दर्शन घडते.
सहयाद्रीने मुक्त हस्ताने दर्शन करून दिले
 
"इंद्रव्रज" चा साक्षात्कार...
 
 केदारेश्वर महादेवस्थान
इथल्या खांबांना एक विलक्षण अर्थ आहे असे म्हणतात. चार स्तंभ हे चार युगांचे प्रतीक आहेत, 'सत्ययुग', 'त्रेतायुग', 'द्वापर युग' आणि 'कलियुग '...
आता कलियुगाचा खांब तेवढा बाकी आहे.
 
 महाविष्णू मंदिरायच्या बाहेरील सुबक दगड कोरीव गाभरा..
 
 गडावर महादेव पूजनीय होते त्यामुळे बरेच ठिकाणी पिंडिंचे अस्तित्व बगायला मिळते

 भग्न अवस्थेतील पिंड...
  
एकावर एक दगड उभेकरून भक्कम भिंत उभारताना खाचे प्रणालीचा केलेला उपयोग
 
दगडी मंदिर...
 
 कातळ कोरीव पाण्याचे टाके
 
सध्याच्या घडीला गड पठरावर बरीच पडझड झालेली आहे. तरीही दिमाखात उभ्या असलेल्या वास्तू त्याकाळची भव्यता दर्शवतात.
 
सुबक कळस असलेले गणपती बाप्पा 
 
कलाकृती आणि संस्कृतीचा एक नमुना...
चराचरात समावलेली सनातनता दगडावरची न पुसणारी रेघ असते, त्याच प्रकारे सुबकतेने उतरवलेली दिसून येते.
 
महादेव मंदिराच्या बाजू कडील डोळे विसफारतील असे दगडी कोरीव बांधकाम... 

पाचपिंडी महादेवासमोरील दगडी गाभाऱ्यात असणारे गणपती बाप्पा आणि महादेव...

राक्षस आणि किन्नर हे सुध्दा महाकाल यांचे पूजक होते. त्यांची प्रतिकृती शेंदूर लांबवलेल्या दगडावरून दिसून येते.

याठिकाणी खूप लोकं महादेवाची आराधना आणि पूजा करीत. गावाकऱ्याच्या मते गड ढासळल्यामुळे बराच मातीचा ढिगारा वाहून येतो त्यामुळे गडावर आजही उतखनन केल्यास बरेच महादेव पिंडीचे असतित्व दिसून येईल.

मंगळगंगेच्या प्रवाहात उठून दिसणारी सप्तर्षी पुष्करणी... 
 
 कातळातील गणेश लेणी...
 
 पिण्याच्या पाण्याचा स्रोत...
 
कातळ कोरीव गुहा...
 
आधुनिकतेला लाजवणारी त्यावेळची शिल्पकला...

खांब गुहा...

गुहेतील भव्य श्री महागणपती 
 
 
 
गुहेच्या प्रत्येक खिडकीमधून हरिश्चंद्र मंदिराचे दर्शन बगायला मिळते.
 
चौथारा शिल्प...




प्लास्टिकच्या पिशव्यांनी भरलेली पाण्याची टाकी, दारूच्या बाटल्यांचा खच, खरकट्या पत्रावळी या सगळ्याच्या गराड्यात अडकलेला हरिश्‍चंद्रगड हे महाराष्ट्रातल्या गडकिल्लांच्या दुरावस्थेचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. या कचऱ्यामुळेच हरिश्‍चंद्रगडावर मुक्काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाचे स्वागत केले जात असले तरी ट्रेकर्समध्ये अस्वस्थता पसरली आहे. गडकिल्ल्यांवरचा वाढत जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी नाही झाले तर बाकीच्या किल्ल्यावरही मुक्कामास बंदी येऊ शकते. एकुणात ट्रेकर्सचे लाडके आणि हक्काचे असलेले हे गडकोट त्यांच्यापासून दुरावणार का ?


अहमदनगर, पुणे आणि ठाणे या तीन जिल्ह्याच्या सीमेवर एैसपैस पसरलेला हरिश्‍चंद्रगड हा भटक्‍यांची सर्वार्थाने 'पंढरी'. वर्षानुवर्षे येथे गडकऱ्यांचा राबता अव्याहतपणे सुरू आहे. गडावर असलेला मुबलक पाणीसाठा, मुक्कामासाठी उपलब्ध गुहा, एैसपैस पसरलेली वनसंपदा, ऐतिहासिक मंदिर यामुळे बारा महिने अभ्यासक, ट्रेकर्स, फोटोग्राफर्स यांची मांदियाळी येथे जमलेली असते. हरिश्‍चंद्रगडावरचा कोकणकडा म्हणजे सह्याद्रीचा अदभुत आविष्कार, पावसाळा सुरू होण्याच्या आधी कधी गडावर आले तर 'इंद्रवज्रा'चे विस्मयकारक दृश्‍य येथे हमखास दिसते. गडाच्या या वैशिष्ट्यांमुळे हरिश्‍चंद्रगडावर मुक्काम न केलेला ट्रेकर सापडणे विरळा. या गडावरचा मुक्काम म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यातली एक नितांत सुंदर अनुभूती असते. नव्वदच्या दशकापर्यंत, गडावर असणारे मंदिर आणि गुहा येथे ट्रेकर्सच्या मुक्कामाची सोय होत होती. कालांतराने पर्यटकांची गर्दी वाढू लागली. तशी गडावरच्या या गुहा आणि मंदिरातील जागा अपुरी पडू लागली. तेव्हा गडावरच्या मोकळ्या जागेत तंबू लावून मुक्कामाची सोय होऊ लागली. पर्यटकांची ही गरज ओळखून गावकऱ्यांनी हे तंबू लावून देण्याची व्यवस्था केली तसेच गडावर येणाऱ्या पर्यटकांच्या चहा, नाश्‍ता, जेवणाची सोय हे गावकरी करू लागले. गडावर मुक्कामाची आणि खाण्यापिण्याची सोय आयती उपलब्ध झाल्याने पर्यटकांची गर्दी बेसुमार वाढली. मानवी गर्दी वाढल्यामुळे पर्यायाने प्लास्टिकचा कचरा वाढायला सुरवात झाली. हा कचरा इतकी वाढला की गडावरचे पाण्याचे स्रोत दूषित झाले. गडावरचे वन्यप्राणी हा परिसर सोडून गडाखाली निघून गेले. हरिश्‍चंद्रगडाला लागलेले हे ग्रहण दूर करण्यासाठी राजूर वनपरिक्षेत्रातील वनाधिकाऱ्यांनी कडक पाऊल उचलली. गडावर होणारा मोठ्या प्रमाणातील कचरा, प्लॅस्टिकचे वाढलेले धोकादायक प्रमाण, कचऱ्यामुळे गडावरील वन्यप्राण्यांचे झालेले स्थलांतर यामुळे गडावर येणाऱ्या पर्यटकांना मुक्कामास बंदी घालण्यात आली आहे. हरिश्‍चंद्रगडावर गेल्या काही वर्षात टपरीवजा हॉटेले उभी राहिली आहेत. आजमितीला सुमारे पंचवीस ते तीस हॉटेले गडावर उभी आहेत. यातून स्थानिकांना रोजगार मिळतो पण या हॉटेलात येणारे पर्यटक आणि काही प्रमाणात हॉटेल मालकही गडाचे पावित्र्य आणि पर्यावरणाचे महत्त्व जाणत नाहीत. 'नाइट आउट'च्या नावाखाली गडावर उशिरापर्यंत चालणारा धुडगूस, 'बोन फायर'च्या नावाखाली जंगलातले मोठे मोठे ओंडके जाळणे, सोबत आणलेल्या पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे प्लास्टिक गडावर सोडून जाणे, मद्यपींची वाढती संख्या, दारूच्या फुटक्‍या बाटल्यांचा खच यामुळे आत्तापर्यंत या गडाच्या पर्यावरणाचे प्रचंड नुकसान झाले आहे. हॉटेल मालकही त्यांच्याकडून होणारा कचरा हा गडावरच जाळून त्याची विल्हेवाट लावतात. यातून पर्यावरणाची अजूनच हानी होते. गडावर इतक्‍या जास्त प्रमाणात कचरा साठला आहे हा कचरा गडावरून खाली नेणेसुद्धा अशक्‍य झाले आहे. जागतिक वारसा असलेल्या पश्‍चिम घाटाच्या पट्ट्यात हा भाग येत असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असा हा भाग आहे. अनेक दुर्मिळ वनस्पती, प्राणी यांची विपुल जैवविविधता या गडाच्या परिसरात आहे. या सर्व प्रकारांचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन वनविभागाकडून उशिरा का होईना पण ही कारवाई करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी गडावरील हॉटेल चालकांना या सर्व प्रकाराची कल्पना देण्यात आली होती. पण हॉटेल चालकांच्या बेफिकीरपणामुळे कचऱ्याचे प्रमाण कमी झाले नाही. त्यामुळे गडावर आता यापुढे कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक नेण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे तसेच गडावर संध्याकाळनंतर मुक्काम करण्यासदेखील बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता गडावर येणाऱ्या पर्यटकांना एका दिवसात गड बघून खाली उतरणे भाग आहे. कचरा पर्यटकांचा, मनस्ताप डोंगरयात्रींना हरिश्‍चंद्रगडावर झालेला कचरा आणि त्यामुळे मुक्काम करण्यास घालण्यात आलेली बंदी हे सह्याद्रीमधल्या गडकोटांची अवस्था दाखवणारे प्रातिनिधिक उदाहरण आहे. महाराष्ट्रातल्या इतर गडकोटांवर थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती आहे. रस्ताचे जाळे सर्वत्र पसरल्याने आणि खासगी वाहनांची सोय, असंख्य ट्रेकिंग संस्था यामुळे पूर्वी अनवट वाटेवर असणारे बहुतांश गड आता वहिवाटेवर आले आहेत. त्यामुळे हौशी, नवशे यांचा वावर सर्वच गडांवर वाढल्याचे बघायला मिळते. सोशल मिडीयामुळे सह्याद्रीमधील या अनवट ठिकाणांचा बाजार केला जातो. पावसाळ्यात शेकडोंच्या ग्रुपने ट्रेकिंग संस्थांकडून ऍक्‍टिव्हिटी आखल्या जातात. या पर्यटकांना गडाचा इतिहास, पर्यावरणाचा वारसा याच्याशी काहीही घेणे देणे नसते त्यामुळे गडकोटांच्या भिंतींवर नावे कोरणे, पाण्याची टाके दूषित करणे, कचरा फेकणे, मद्यपान करणे यासारखे प्रकार गडकोटांवर सर्रास घडतात. याउलट जबाबदारीने ट्रेकिंग करणारा एक वर्ग आहे जो पर्यावरणाला धक्का लागणार नाही अशा रीतीने भटकंती करत असतो. मात्र मुक्काम बंदीच्या निर्णयाचा फटका डोंगरयात्रींनाही बसणार आहे. यासंदर्भात वनखात्याची नेमकी भूमिका काय हे सांगताना, राजूर वनपरिक्षेत्राचे वनअधिकारी अमोल आडे म्हणाले '' हरिश्‍चंद्रगडावर येणाऱ्या सर्व पर्यटकांना आता गडावर मुक्काम करता येणार नाही. गडावर झालेले प्लास्टिकचा अफाट कचरा आणि त्यामुळे होणारी निसर्गाची हानी यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या हा नियम अहमदनगर जिल्ह्यातील पाचनई गाव आणि गडाचा परिसर येथे लागू होणार आहे. गडावर येणाऱ्या इतर प्रमुख वाटा पुणे जिल्हातील खिरेश्‍वर आणि ठाणे जिल्हातील बेलपाडा या गावांमधून येतात. तिथल्या नागरिकांशी बोलून त्यांना हा कचरा प्रश्‍नाचे गांभीर्य समजावून सांगण्यात येईल आणि गडाच्या सुरवातीलाच पर्यटकांकडून गडावर प्लॅस्टिक जाण्यास अटकाव कसा करता येईल याची काळजी घेण्यात येईल. तसेच यापुढे गडावर कचरा करणाऱ्यास 500/- दंड ठोठावण्यात येणार आहे. गडाच्या परिघातील संबंधित गावे ज्या वन परिक्षेत्रात येतात तिथल्या वनधिकाऱ्यांशी याविषयी चर्चा चालू आहे आणि लवकरच या गावातही प्लास्टिक बंदीचा नियम लागू करण्यात येणार आहे. ही बंदी सध्या तीन महिन्यांसाठी लागू करण्यात आली आहे. तीन महिन्यानंतर पुन्हा गडावरच्या कचराच्या आढावा घेऊन पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे''. हरिश्‍चंद्रगडावर मुक्कामास बंदी करण्यात आल्यामुळे गडावर ज्यांची हॉटेल्स आहेत त्यांचा रोजगार संकटात सापडला आहे. त्यामुळे या हॉटेल व्यावसायिकांनी एकत्र येऊन राजूरच्या वनअधिकाऱ्यांची भेट घेतली तेव्हा गडावर हॉटेलचालकांना प्लास्टिक नेता येणार नाही या हमीवर त्यांना व्यवसाय करण्यास तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे. गडावर हॉटेल असणारे भास्कर बादड यांनी वनखात्याच्या या नियमाला पाठिंबा देत या निर्णयाचे स्वागत केले असले तरी स्थानिकांची अडचण सांगताना म्हणाले की,'' भौगोलिक दुर्गमतेमुळे पावसाळ्यातील चार महिने भातशेतीचे सोडले तर या भागातील स्थानिकांना उदरनिर्वाहाचे दुसरे कोणतेही साधन नाही. त्यामुळे गडावर येणाऱ्या पर्यटकांमुळे स्थानिकांना रोजगार मिळत होता. दर पावसाळ्यानंतर या झोपड्यांची डागडुजी करावी लागते. तसेच हे सगळे सामान पाचनईतून वर गडावर चढविणे जिकरीचे काम आहे. इतक्‍या कष्टातून जे काही दोन पैसे मिळतात तेसुद्धा हॉटेलं बंद झाली तर बंद होतील आणि सगळ्यांचेच रोजगार बंद पडतील. तसे होऊ नये आणि गडावरही स्वच्छता राहावी यासाठी आम्ही सर्व हॉटेल व्यावसायिकांनी प्लास्टिकचा एकही जिन्नस विकण्यास ठेवणार नाही आणि पर्यटकांनाही गडावर कचरा करू देणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊ अशी हमी या हॉटेल व्यावसियाकांनी वनाधिकाऱ्यांना दिली आहे.'' मुक्काम बंदीची अंमलबजावणी होणार का ? वनाधिकाऱ्यांनी केलेला हा नियम स्वागतार्ह जरी असला तरी त्यांची अंमलबजावणी कशी होते हा एक प्रश्‍नच आहे. कारण गडाचा विस्तार हा अफाट आहे. तसेच गडावर येणाऱ्या तीन मुख्य वाटा आहेत आणि चार ते पाच उपवाटा आहेत. या सर्व वाटांवरुन कोण गडावर येते किंवा जाते यांची नोंद ठेवणे अवघड आहे. शिवाय हा गड तीन जिल्ह्यात पसरला असल्यामुळे तीनही जिल्हातील वनाधिकाऱ्यांनी एकत्रित निर्णय घेतल्याशिवाय ही बंदी प्रभावी ठरणार नाही कारण सध्या जी बंदी घालण्यात आलेली आहे ती केवळ पाचनई भागात घालण्यात आली आहे. गडावरचे महादेवाचे मंदिर हे या भागातील भाविकांचे श्रद्धास्थान असून दरवर्षी महाशिवरात्रीला गडावर काही हजार भाविक दर्शनासाठी येतात. तेव्हादेखील गडावर मोठ्या प्रमाणात कचरा होतो. या कचऱ्याचे नियंत्रण कसे केले जाणार हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. वनखात्याकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने गडावर येणाऱ्या प्रत्येक पर्यटक आणि ट्रेकरची तपासणी करणे ही अवघड बाब आहे. पुरातत्त्व खाते असो किंवा वनविभाग, या बंदीची अंमलबजावणी होण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता हा एक प्रमुख अडथळा आहे. या सर्व घटकांचा विचार करून ही बंदी प्रभावीपणे कशी अमलात आणता येईल याची विचार करणे गरजेचे आहे. प्रसंगी जबाबदार ट्रेकर्स, दुर्गसंवर्धन संघटना,स्थानिक यांनी एकत्र करून हे कार्य तडीस न्यावे लागेल. 'रानवाटा'ची सफाई मोहीम गेली बारा वर्षे हरिश्‍चंद्रगडावर होणाऱ्या कचऱ्याची साफसफाई मुंबईमधील 'रानवाटा' नावाची संस्था करत आहे. कुठल्याही सरकारी मदतीशिवाय हे काम 'रानवाटा'चे स्वयंसेवक करतात. या संस्थेचे प्रमुख स्वप्नील पवार या गडावरील कचरा प्रश्‍नाचे स्वरूप सांगताना अशी माहिती दिली की, दर वर्षी पावसाळ्याच्या सुरवातीच्या काळात आम्ही ही स्वच्छता मोहीम गडावर राबवितो. या वर्षी तब्बल दोन आठवडे 'रानवाटा' संस्थेचे कार्यकर्ते गडावर कचरा गोळा करत होते. आम्ही गोळा केलेल्या कचऱ्यामध्ये तब्बल अडीच हजार दारूच्या बाटल्या निघाल्या तसेच एक छोटा टेंपो भरून कचरा जमा झाला ज्यात प्रामुख्याने प्लॅस्टिकच्या कचऱ्याचा समावेश होता. हा सगळा कचरा गडावरून खाली पायथ्याच्या पाचनई गावात आणण्यात आला आणि तिथून वनखात्याच्या गाडीने तो राजूरला नेण्यात आला. या स्वच्छता मोहिमेसाठी आम्हाला सुमारे पंचवीस हजार रुपये खर्च आला. बारा वर्ष सलग ही स्वच्छता मोहीम राबविल्यानंतरसुद्धा दरवर्षी कचऱ्याचे प्रमाण वाढतच आहे. या पार्श्‍वभूमीवर वनखात्याने घेतलेला मुक्काम बंदीचा निर्णय स्वागतार्ह आहे. गडावर जे ट्रेकर्स येतात त्यांना गड, गडाचे महत्त्व याची जाण असते मात्र पर्यटकांची जी कॅटेगरी असते ती नुसती धुडगूस घालण्यासाठीच गडावर येते. त्यात गडावर जेवण,चहा,नाश्‍त्याची सोय आयती झाल्याने त्यांची संख्या वाढली पर्यायाने कचऱ्याचे प्रमाणही प्रचंड प्रमाणात वाढले आहे. आता या वन खात्याने मुक्कामास बंदी घातलेला हरिश्‍चंद्रगड हा काही पहिला किल्ला नाही या आधी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातले वासोटा, प्रचितगड, जंगली जयगड, भैरवगड यासारख्या किल्लांवरही वनखात्याकडून मुक्कामास कायमची बंदी घालण्यात आलेली आहे. या पट्ट्यातील वनसंपदा आणि पर्यावरणाचे जतन करण्यासाठी अशी बंदी गरजेची असली तरी खरंच या बंदीचे परिणाम लक्ष्यात येण्यासाठी दोन पावसाळे जावे लागतील. पर्यटकांच्या उपद्रव जरी यामुळे थांबणार असली तरी जबाबदारीने ट्रेकिंग करणाऱ्या डोंगरयात्रींना मात्र याचा फटका निश्‍चितच बसणार आहे. कारण हरिश्‍चंद्रगडावरची मंतरलेली सकाळ असो किंवा मनावर गारूड टाकणारा कोकणकड्यावरचा सूर्यास्त या दोन्ही गोष्टींना आता ट्रेकर्स कायमचे दुरावणार आहेत.
-------------------------------------


हरिश्‍चंद्रगडावर 'अति तिथे माती' असा प्रकार घडला आहे. त्यामुळे ही बंदी कधी ना कधी घातली जाणारच होती. किल्ल्यांवर फिरताना पर्यटक आणि ट्रेकर्स या दोघांनी जबाबदारीचे भान ठेवायला हवे. आपण जे काही प्लास्टिक गडावर नेतो ते आपणच खाली आणायला हवा. एक ट्रेकर म्हणून या मुक्काम बंदीच्या निर्णयामुळे मी नक्कीच हळहळलो आहे पण कचऱ्याचा गंभीर प्रश्‍न लक्ष्यात घेता या निर्णयाशिवाय गत्यंतर नाही. सोशल मिडीयामुळे सह्याद्रीमधल्या अशा ठिकाणांचा जास्त प्रसार होतो आणि पर्यटकांची संख्या वाढते. कधी कधी ट्रेकर्स मंडळींकडूनसुद्धा उत्साहाच्या भरात अनुचित प्रकार घडतात. रांगणा किल्ल्यावर तटाचे दगड काढून चुलीसाठी वापरल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे स्वतःची जबाबदारी ओळखून भटकंती करणे आवश्‍यक आहे. भगवान चिले , दुर्ग अभ्यासक
--------------------------------------
पुर्व प्रकाशित - साप्ताहिक सकाळ - 16 डिसेंबर 2017

https://rohitharip.blogspot.com/2018/01/blog-post.html


 डोंगरवाट, जंगलवाट, घाटवाट प्रत्येक घाटवाट ही डोंगरवाट असते. मात्र प्रत्येक डोंगरवाट ही घाटवाट नसते. त्या डोंगरानुसार घाटवाटेची नजाकत बदलते. जसं जंगलवाटेचं सौंदर्य ती ज्या प्रकारच्या जंगलातून जाते त्यानुसार बदलत जाते तसंच घाटवाटांचही. घाट आणि घाटाच्या वर राहणारी लोकं म्हणजे घाटी, ही संकल्पना मराठी जनमानसात शेकडो वर्षापासून रुजलेली असावी. पुढे इंग्रजांनी भारताच्या पुर्व व पश्चिम दोन्ही किनारपट्यांवरून देशांतर्गत भागात विस्तार सुरु केल्यानंतर डोंगररांगा आडव्या आल्या आणि त्यांचे नामकरण करताना त्यांनी इथल्या मातीत रुजलेल्या घाट शब्दाला त्यांचा दृष्टिकोन जोडत ईस्टर्न घाट (पूर्व घाट) आणि पश्चिम घाट (वेस्टर्न घाट) असे नामकरण केलं. ते बरेच दिवस कायम होतं. पुढे शासनदरबारी पूर्व घाट कायम राहीला, मात्र पश्चिम घाटाचा सह्याद्री आणि पश्चिम सह्याद्री असे नामरुपांतरण झाले. वापराच्या प्रकारानुसार घाटवाटांचे अनेक प्रकार पडतात. रेल्वे जाणारे, मोटरगाडी जाणारे, पाऊलवाटेचे आणि प्रस्तरारोहन तंत्र अत्यावश्यक असलेले असे साधारणतः चार ढोबळ प्रकार आहेत.

https://www.maxmaharashtra.com/max-blog/detail-information-about-western-ghats-part-in-maharashtra-1154607 
घाटवाटांच्या देशा... महाराष्ट्राला सर्वाधिक लांबीचा सागर किणारा लाभलाय. तसा सह्याद्रीचा सर्वाधिक सहवासही महाराष्ट्राला लाभलाय. त्याच्या मुख्य रांगेसोबत पुर्व पश्चिम विस्तारलेल्या डोंगररांगाही आहेतच. या सर्वामध्ये असंख्य ज्ञात अज्ञात घाटवाटा आजही वापरात आहेत. काही घाटवाटा इतिहासाच्या पाऊलखुणा जपत आहेत तर काही नव्याने रुप पालटत पर्यटकांच्या, साहसवीरांच्या भावविश्वात रुंजी घालत आहेत. घाट व त्यासंलग्न खिंडी हिमालयातही आहेत आणि पश्चिम व पुर्व घाटासंलग्न इतर राज्यांतही. घाटच नाही अशीही काही राज्य असू शकतील. पण या सर्वात महाराष्ट्र आणि घाटवाटा हे जे काही समिकरण आहे, ते एकमेकाद्वितीय आहे. Also Read - लई मजबूत माझ्या भीमाचा किल्ला- संजय आवटे घाटदार लोकसाहित्य घाटवाटा आणि मराठी भावविश्व याचं अतुट नातं आहे. लोकसाहित्यात, लोकगितात, कथा, कविता, कादंबऱ्यांत ते अगदी मुरलेल्या राजकारणातही घाटवाटांनी आपली अमिट छाप सोडलेली आहे. मग एखादी सासुरवाशीन जात्यावर दळता दळता घाटापलीकडून येणाऱ्या भाऊरायाला साद घालते, एखादी लावण्यवती आपल्या रायाच्या आठवणीत हुरहुरत आपल्या जवानीचा घाट घालते तर एखादा पक्का मुरलेला राजकारणी आपल्या प्रतीस्पर्ध्याला कात्रज चा घाट दाखवतो. आचार्य अत्रेंच्या साहित्यात तर खंडाळा घाटाची पखरण आहेच. याशिवायही खुप काही सापडतं प्रत्यक्ष घाटवाट चालताना... Also Read - एकदाचे आंबेडकर अनुयायांना दादर बंदीचे आदेशच काढा म्हणजे आपला जीव शांत होईल .... मुळात घाटवाट ही फक्त चालण्याची गोष्ट नाही. ती पाहण्याची आहे, तेवढीच ऐकण्याची, अनुभवण्याची आणि त्यातील अनुभुती अंगभर, मन व मेंदूभर रुजवण्याचीही गोष्ट आहे. त्या त्या घाटासंबंधीत कथा, कहाण्या, किस्से यांचा खजिना स्थानिकांकडून ऐकायला मिळतो. तो लुटला नाही तर काय घाटवाट पाहिली. तुम्ही किती घाट पाहिलेत, किती घाटवाटा केल्यात याला महत्व नाही. तुम्ही त्या घाटवाटेचा ठेवा किती समग्रतेने, तल्लिनतेने काळजात शोषून घेतलाय ते महत्वाचं. नुसतं भोज्याला हात लावून पळायचं तर त्यासाठी घाटवाटा हे क्षेत्र नाही. त्यासाठी इतर तिर्थक्षेत्र आहेत. घाटवाट अंगी मुरवताना... ज्ञात असो वा अज्ञात पण प्रत्येक घाटाला इतिहास असतो. भुगोल हा तर त्याचा पाया आहेच, पण वनस्पतीशास्र, प्राणीशास्र, सुक्ष्मजीवशास्र, अर्थशास्र, नागरिकशास्र, मानसशास्र, समाजशास्रानंही तो अलंकृत असतो. एक घाट समजून घ्यायचा तर एक वारी पुरेशी ठरेल असे नाही. अर्थात तुम्ही कोणत्या वारीचे वारकरी त्यावरही बरंच काही अवलंबून. उदाहरणादाखल विचार करायचा तर महाराष्ट्राच्या इतिहासाची शेकडो पानं एकट्या नानेघाटाच्या वाटेभोवती गुंफलेली आहेत. त्याला महाराष्ट्राच्या सर्वांगिण समृद्धीचा ऐतिहासिक महामार्ग म्हटलं तर वावगं ठरणार नाही. महाराष्ट्राच्या कैक राजधान्या नानेघाटाच्या वाटेवर उदयास आल्या, वाढल्या, विस्तारल्या आणि लयास गेल्या... याच नानेघाटवाटेवर (कल्याण ते पैठण मार्ग) महाराष्ट्रानं स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, प्रयोग झाला, शिवजन्म झाला आणि अवघ्या विश्वाला स्वराज्याचा नवा अर्थ, नवा आयाम देणाऱ्या स्वराज्य संस्थापक शिवरायांचा जन्मही याच वाटेवरील. या एका वाटेला येवून मिळणारे, उर्वरीत महाराष्ट्राला या व्यापारी मार्गाला जोडणारे उभे आडवे असे असंख्य घाट आहेत. या सर्व शिरा आणि धमण्यांतून महाराष्ट्राचा साम्राज्यविस्तार, धर्मविस्तार आणि इतर सर्व आयामांचे विस्तार झाले आहेत ही बाब ध्यानात घेतली तर घाटवाट तुडवताना तिचे आयामही आपसूक बदलून जातात. आपलं घाटवाट तुडवणं स्वतःला अधिक समृद्ध करणारं ठरतं. जुन्नर आणि घाटवाट जुन्नर तालुका हा सह्याद्रीच्या कुशीतील अशा मोजक्या तालुक्यांपैकी एक आहे की जो जगाशी घाटवाटांनी जोडला गेला आहे. पुर्वेला गुळंचवाडी - आणे घाट, पश्चिमेला माळशेज, नानेघाट, दाऱ्याघाट, दक्षिणेला पेठ अवसरी घाट तर उत्तरेला अकोले व जुन्नर तालुक्याच्या सिमेवरील अनेक घाटांचे दक्षिणोत्तर जाळे. त्याही पुढे जायचं तर चंदनापुरीचा घाट. या घाटांचा, डोंगररांगाचा जुन्नरच्या सर्व क्षेत्रांवर मोठा प्रभाव आहे. इथं स्थानिक मायक्रोक्लायमेट डेव्हलप होण्यापासून अनेक गोष्टी आहेत. विविधता आहे त्याच्या मुळाशी ही सर्व नैसर्गिक यंत्रणा आहे. जुन्नरमधील सर्व किल्ल्यांचे जाळे हे ही घाटवाटांभोवती, त्यांना संरक्षण देण्यासाठी वा त्यांच्या अनुषंगाने सत्ता राखण्यासाठी आहेत. हरिश्चंद्रगड, सिंदोळा, भैरवगड, निमगिरी, हनुमंतगड, हडसर, जिवधन, चावंड, शिवनेरी, नारायणगड, दुर्ग व ढाकोबा हे सर्व या वाटांवर पहारा देते आहेत. त्यांना पाठबळ देते आहेत. आजही जुन्नरच्या जनजीवनात या घाटवाटांचे महत्व अनन्यसाधारण आहे. घाटवाटा समजून घेताना, पर्यटकांना, ट्रेकर्स मंडळींना त्याची अनुभूती देताना हे सर्व संदर्भ आयाम महत्वाचे ठरतात. घाटांची गावं एकट्या जुन्नर तालुक्याचा विचार केला तर सह्याद्रीच्या मुख्य गाभ्याला भिडलेली खिरेश्वर, खुबी, तळेरान, निमगिरी, देवळे, अंजनावळे, घाटघर, फागुळ गव्हाण, आंबोली, भिवडे बुद्रुक, हातवीज ही गावं आणि पश्चिम पूर्व रांगांमधील कोल्हेवाडी, सांगनोरे, कोपरे, जांभुळशी, मांडवे, मुथाळणे, चिल्हेवाडी, आंबेगव्हाण, ओतूर, खामुंडी, आणे, नळावणे, गुळंचवाडी, औरंगपूर-निमगाव सावा ही सर्व गावे घाटांची गावे आहेत. आणि त्याही सर्वाधिक घाट गेलेल्या गावांचा विचार केला तर त्यात आंबोली, अंजनावळे, तळेरान आणि खिरेश्वर या चार गावांचा अग्रक्रम लागतो. जुन्नर तालुक्यातील घाटसमुह जुन्नर तालुक्यात सुमारे 25 हून अधिक घाटवाटा आहेत. त्यांची वर्गवारी करायची झाल्यास हरिश्चंद्रगड घाटसमुह, नानेघाट घाटसमुह, दाऱ्याघाट घाटसमुह, भिमाशंकर घाटसमुह आणि इतर असा विचार करता येईल. साध्या सोप्या सुखद अनुभूतीपासून जीवघेणा थरार देणाऱ्या सर्व ग्रेडच्या घाटवाटांचा यात समावेश आहे. तुम्ही अजान बालक असा वा एव्हरेस्टवीर प्रत्येकाला जुन्नरच्या घाटवाटा अमर्यात आनंद व अनुभूती देतात. त्यामुळेच महाराष्ट्राच्या घाटवाटा पर्यटनात नानेघाट आणि माळशेज अग्रस्थानी आहेत, यात नवल नाही. जुन्नरमधील काही घाटवाटांचा अल्पपरिचय पुढीलप्रमाणे... 1) डोणीदार - त्रिगुण धारा या नावानेही ओळखली जाते. - दुर्गवाडी व आंबेगावच्या हद्दीवर . - जुन्नरमधून आंबेगावमध्ये जाणारी घाटवाट 2 ) खुटेदार - दुर्गवाडी (जुन्नर) ते रामपूर (मुरबाड) वाट - दुर्ग, ढाकोबा, गडद लेणी यांच्याजवळ - दुय्यम वाट, मात्र ऐतिहासिक वापराच्या पाऊलखुणा - उभ्या कातळात ठिकठिकाणी खोदलेल्या खोबण्यांच्या रांगा - सोप्या श्रेणीचे अनेक कातळारोहण टप्पे, उतराई अवघड, पावसाळ्यात टाळावी. - रामपूर व दुर्गवाडी दोन्ही ठिकाणी मंदीरात मुक्काम शक्य - या वाटेला साधारणतः 4 तास लागतात 3) दाऱ्याघाट - मीना नदीच्या खोऱ्यातून कोकणात डोकावणारी घळ - आंबोली (जुन्नर) ते धसई (मुरबाड), दुर्ग, ढाकोबाचा शेजार - नाळेत खोदीव पावठ्या ट्रेकर्सनी नोंदवल्या आहेत. - घाट उतरायला लागल्यावर माथ्यापाशी झरा - घाटाच्या तळाशी रांजणखळग्यांमध्ये फेब्रुवारीपर्यंत पाणी - तांत्रिक कातळारोहणाची आवश्यकता भासत नाही. 4) रिठ्याचं दार 5) घोडे पाण्याचं दार - या दोन्ही वाटा आंबोली जवळ येतात - दाऱ्या घाटाजवळच आहे. संलग्न वाटा 6) नाणेघाट 7) भोरांडेची नाळ - नानेघाटाच्या शेजारीच 8) नांगरदरा - भैरवगड (मोरोशी) ते अंजनावळे - अतिशय अवघड, फिटनेसचा अंत पाहणारी, पावसाळ्यात न करण्याची - फेब्रुवारीनंतर गिर्यारोहणातील ज्ञानी व अनुभवी व्यक्तीसोबतच करावी. 9) अस्वलदरा घाटवाट - नांगरदरा वाटेच्या शेजारी 10) भोजदारा - तळेरान घाटवाट - शिनलोप डोंगर, वाघ्या डोंगर, भोजदारा डोंगर, दिवाणपाडा माथा, आणि अंजणावळ्याचा व-हाडी डोंगर - या ठिकाणाहून विविध घाटवाटांनी माळशेज घाटात उतरता येते. - यापैकी ऐतिहासिक मार्ग म्हणजे श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला खिंडीचा मार्ग. - यावाटेवर पुरातन कातळकोरीव टाक्या पहावयास मिळतात. 11) जुनी माळशेज घाटवाट - एमटीडीसी रिसॉर्टच्या बाजूने खाली उतरणारी - हीच वाट खालच्या दिशेने पुढे काळू धबधब्याकडेही जाते. 12) जुन्नर दरवाजा मार्गे हरीचंद्रगड - खिरेश्वर ते हरिश्चंद्रगड, अतिशय सुंदर मार्ग - उजव्या हाताला नेढं, डाकीकडे विस्तिर्ण पठारं 13) टोलार खिंड घाटवाट - खिरेश्वर - टोलार खिंड - हरिश्चंद्रगड - जुन्नर व अकोले तालुक्यांना जोडणारी महत्वाची खिंड 14) म्हसवंडी घाट - पिंपरी पेंढार ते म्हसवंडी 15) वाघाचं द्वार घाटवाट - आडोशी ते आवळ्याची वाडी - थोडी नामशेष झाली आहे 16) औरंगपूर - गांजवेवाडी घाटवाट - भागडोबा डोंगररांग. - पुर्वी राजरोस वापरातली. आता फक्त गुराख्यांकडून वापर 17) निमगाव सावा/सुलतानपूर - भागडी घाटवाट - भागडोबा डोंगररांगांच्या माथ्यावरुन जाणारी वाट - कॅनाल ही पाऊलवाट पासून सुरु होते. - पुढे डोंगरमाथ्यावर जावून संपूर्ण डोंगररांग ओलांडून भागडोबा जवळ उतरते 18) आणे घाट - गुळंचवाडी व आणे यांना जोडणारी वाट - याच वाटेचे रुंदीकरण करुन पक्का रस्ता आणि नंतर महामार्ग - या वाटेच्या पॅरलल पाण्याच्या प्रवाहालगत पायवाट - या व्हॅलीत जुन्नरमधील सर्वोत मोठा नैसर्गिक पूल - अतिशय सुंदर वनसंपदा, पक्षिसंपदा व जैवविविधता - चांगल्या पावसाचा भाग व दुष्काळी भाग यांच्या सिमेवर 19) वाघोबाचा घाट - वाघाबोच डोंगर, व्याघ्रशिल्प - मांदारणे - मुथाळणे - मांडवे - राजूर, जांभुळशी, कोतुळ, फोफसंडी इ. भागातील वाड्या वस्त्यातुन दररोज सुमारे 50 पिकअपमधून सुमारे 2 ते अडीच हजार लोकं दररोज कामाला येतात. 20) खामुडी - बदगी बेलापूर घाट - डांबरी रस्ता, मुथाळणे सारखाच मोठा घाट - लोड च्या गाड्या जात नाहीत, जाग्यावर चढ व टर्न 21) लागाचा घाट - ओतूर - ब्राम्हणवाडा - नाशिक हायवेला पॅरलल वापरला जातो. 22) इतर घाटवाटा - नळावणे घाटवाटा - दावल मलीक देवस्थाने घाटवाटा - दुर्गवाडीकडून डिंभेला जाणारी खोदीव पायऱ्यांची ऐतिहासिक घाटवाट - इत्यादी गाईड आणि घाटवाटा घाटावाटांचे वाटाडे म्हणून काम करण्यासाठी जुन्नर तालुक्यातील, विशेषतः आदिवासी भागातील तरुणांना विपूल संधी आहेत. पर्यटनाच्या अनुषंगाने विचार केला तर गाईड किंवा वाटाड्या हा फक्त वाट दाखवणारा नसतो. त्याहून अधिक जबाबदारी त्याच्यावर असते. ती वाट, तो घाट, तो परिसर, त्याच्याशी संलग्न इतिहास, लोकांच जगणं आणि संलग्न सर्व आसमंत पर्यटकासमोर, ट्रेकरसमोर खुला करुन आयुष्यभरासाठी त्या भागाशी त्या व्यक्तीची नाळ जोडू शकला तर तो गाईड संबंधीत ट्रेकरचा आयुष्यभराचा साथीदार होतो. त्यासाठी इतिहास व वर्तमानाची गुंफण घालणं, वर उल्लेख केलेल्या घाटवाटांसंबंधीत सर्व शास्रांची पर्यटकांसमोर लिलया उकल करणं, त्याला आपल्या बोलीची, त्यातील रंजक बाबींची साथ देणं, तुमचा सहवास त्यांच्यासाठी आश्वासक व सुखद करणं आणि हे करता करता संबंधीत पर्यटकाची सुरक्षा व वैयक्तिक स्पेस, एकांत जपणे महत्वाचे आहे. जबाबदारी पर्यटक घडवण्याची. चांगला गाईड व अनुभवी ट्रेकर यांची अलिखित जबाबदारी असते जबाबदार पर्यटक व ट्रेकर घडवण्याची. यासाठी मॉब किंवा गृप हँडलिंग आणि सेफ्टी च्या अनुषंगाने नो मिन्स नो चे स्किल आणि ठामपणा स्वतःत विकसित करायला हवाच. पर्यटकांच्या सुरक्षेचीही जबाबदारी गाईडवर असते. घाटवाटांच्या ट्रेकमध्ये मोहाचे अनेक क्षण येतात. कधी मनोहारी धबधबे तर कधी विहंगम कोकणकडे साद घालतात. अशा वेळी संभाव्य धोके, डु अॅन्ड डोन्ट ची जाणिव त्यांना करून देणे आणि त्यासाठी प्रसंगी कठोर होणे जमले पाहिजे. घाटवाटांचे संदर्भ साहित्य घाटवाटा संदर्भात विपूल संदर्भ साहित्य आपल्या आसपास उपलब्ध आहे. ते धुडाळायची, अभ्यासायची,पुस्तकं व मानसं वाचायची सवय जोडून घ्यायला हवीच. घाटवाटा संदर्भात डॉ प्रिती पटेल यांचे भटकंती घाटवाटांची आणि आनंद पाळंदे सरांचं चढाई उतराई सह्याद्रीतील घाटवाटांची ही पुस्तकं अतिशय उत्तम आहेत. त्याशिवाय गुगल गेल्यास अनेक ट्रेकर मंडळींचे घाटवाटांच्या अनुभवाचा मौल्यवान ठेवा असलेले ब्लॉग, लेख सापडतात. त्याशिवाय आपल्या परिचयातील ट्रेकर मंडळींचे मार्गदर्शनही मौल्यवान ठरते. मोहिमेच्या पूर्वतयारीचा हा संस्कार प्रत्येकानं स्वतःवर बिंबवून घ्यायलाच हवा. हे सर्व करायचं तर गाईडनं आपलं वैयक्तिक शारिरिक व मानसिक आरोग्यही उत्तम राखणं आवश्यक असतं. गुटखा खाणारा, तंबाखूच्या पिचकाऱ्या मारणारा, आपल्या भागाशी, इतिहासाशी, वैशिष्ट्यांशी भावनिक, अस्मितीक नातं नसलेला गाईड कोणाला हवाहवासा वाटेल ? महाराष्ट्राच्या डोंगरदऱ्यातील लोकप्रिय गाईड, वाटाड्यांचा अभ्यास केला तर त्यांचं त्या वाटेशी, त्या घाटाशी वा वास्तुशी असलेलं समर्पन पटकन नजरेस भरतं. गाईड वा इतर पर्यटनपुरक व्यवसायिक म्हणून उभे राहू पाहणाऱ्या तरुणांनी या बाबी काळजीपुर्वक अभ्यासणे आणि उत्तमोत्तम ते आत्मसाद करणे गरजेचे आहे. जुन्नर वन विभाग यासाठी विशेष प्रयत्न करतो आहे, आदिवासी भागातील तरुणांना पर्यटन गाईड म्हणून प्रशिक्षित करतो आहे. त्यांच्या व्यवसाय विकासासाठी हातभार लावतो आहे, हे विशेष कौतुकास्पद आहे. त्याबद्दल जुन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. अजित शिंदे आणि त्यांच्या सर्व टिमचे मनपुर्वक अभिनंदन. संतोष डुकरे - संचालक, शेकरू आऊटडोअर्स - सचिव, शिवनेरी ट्रेकर्स, जुन्नर

https://www.maxmaharashtra.com/max-blog/detail-information-about-western-ghats-part-in-maharashtra-1154607 



महाराष्ट्रातील पुणे व ठाणे जिल्ह्यांच्या सरहद्दीलगत असलेला अहमदनगर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध डोंगरी किल्ला. हा किल्ला अहमदनगरपासून १२५ किमी. अंतरावर व अकोले तालुक्यात असून तो समुद्रसपाटीपासून ४६९१ फूट उंचीवर आहे.

हरिश्चंद्रेश्वर मंदिर, हरिश्चंद्रगड, अहमदनगर.

या किल्ल्यावर येण्यासाठी अनेक मार्ग असून तोलारखिंडीच्या व पाचनईकडून येणाऱ्या वाटेचा पर्यटक जास्त उपयोग करतात. पुण्याहून आळेफाटा आणि पुढे खुबी फाट्यावरून खिरेश्वर मार्गे गडावर जाता येते. पाचनई मार्ग हा सर्वांत सोपा मार्ग असून या वाटेवर किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष दिसतात. खुबी फाटामार्गे किल्ल्यावर जाताना वाटेतील खिरेश्वर गावात यादवकाळातील ‘नागेश्वराचे’ प्राचीन मंदिर दिसून येते.

तोलारखिंडीतून वर चढून गेल्यावर डाव्या हाताला असणाऱ्या टेकडीवर हरिश्चंद्रगडाचा तटबंदीयुक्त बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार उद्ध्वस्त स्थितीत असून माथ्यावर अनेक लहान-मोठ्या घरांच्या जोत्यांचे अवशेष, दोन पाण्याची टाकी व काही गुहा आढळतात. या गुहांचा वापर कोठार म्हणून केला जात असे. याच्या बरोबर खालच्या बाजूस दक्षिणेस किल्ल्याचा मुख्य जुन्नर दरवाजा असून या मार्गे येणारी वाट दरड पडल्यामुळे आणि वापरात नसल्याने दुर्लक्षित झाली आहे. दरवाजा उद्ध्वस्त स्वरूपात आहे. किल्ल्याच्या माथ्यावरून कळसुबाई, रतनगड, आजोबा, घनचक्कर, भैरवगड, कुलंग, अलंग, मदन असा उत्तरेकडील, तर माळशेज घाट, भैरवगड, नानाचा अंगठा, जीवधन यांपर्यंतचा दक्षिण- पश्चिमेकडील मुलूख दृष्टिक्षेपात येतो.

किल्ल्याच्या सर्वोच्च माथा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तारामती शिखराच्या खालील बाजूस खडकात कोरलेल्या आठ-नऊ लेण्या आहेत. यातील एका गुहेच्या द्वारपट्टीवर शिव आणि गणपतीच्या मूर्ती कोरलेल्या असून गुहेत असणाऱ्या शिलालेखावरून या गुहा दहाव्या–अकराव्या शतकात कोरलेल्या असाव्यात, तसेच येथील लेणी हिंदू लेणी असावीत, असे अभ्यासकांचे मत आहे. या लेणी समूहातील एक अर्धवट कोरलेल्या गुहेत सहा फूट उंचीची गणपतीची महाकाय मूर्ती कोरलेली आहे. या लेण्यांच्या थोडे खाली उत्तरेला एक कुंड असून त्याला ‘सप्ततीर्थ’ म्हणून ओळखले जाते. कुंडांत चौदा देवळ्या असून त्यात विष्णुमूर्ती ठेवलेल्या होत्या. यांतील काही विष्णुमूर्ती आज अस्तित्वात नसून उरलेल्या मंदिरामागील गुहेमधे ठेवलेल्या आहेत. कुंडासमोर ‘काशितीर्थ’ नावाने ओळखले जाणारे एक छोटे मंदिर आहे. मंदिरासमोर काही अपूर्ण शिल्प आहेत. कुंडाच्या पश्चिमेला ‘हरिश्चंद्रेश्वराचे’ हेमाडपंती बांधणीतील वैशिष्ट्यपूर्ण शिवमंदिर असून पंचावन्न ते साठ फूट उंचीच्या मंदिराच्या पायऱ्यायुक्त कळसापर्यंत आकर्षक व शैलीदार कोरीव काम केलेले आहे. मंदिराला प्रासाद व त्यामध्ये जाण्यासाठी पूर्व व पश्चिम अशा दोन बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत. मंदिराच्या दक्षिणेकडील बाजूस कोरीव गणेशमूर्ती असून, मूर्तीच्या वरील बाजूस देवनागरी लिपीत शिलालेख कोरलेला आहे. बांधीव मंदिराच्या प्रांगणाला बंदिस्त भिंत आहे. मंदिराच्या पश्चिमेस दोन गुहा असून त्यांतील एका गुहेच्या तळघरात योगी चांगदेव तपश्चर्येला बसत असल्याचे सांगितले जाते. गुहेलगत पाण्याची दोन टाकी आहेत. सांप्रत मंदिराच्या प्राकाराची भिंत व मंदिराच्या पश्चिम बाजूची बरीच पडझड झालेली आहे. मंदिराच्या उत्तरेला थोडे खालील बाजूस ‘केदारेश्वराचे लेणे’ म्हणून ओळखली जाणारी भव्य गुंफा असून आतील पाण्यातील चौथऱ्यावर भव्य शिवलिंग आहे. चौथऱ्याच्या चार कोपऱ्यांवर छताला आधार देणारे खांब असून त्यांपैकी तीन खांब तुटलेले आहेत. गडावर इतिहासाची साक्ष देणारे आठ शिलालेख आहेत.

किल्ल्याचा डोंगर फार प्राचीन असून स्कंद, अग्नीमत्स्य पुराणांत त्याचा उल्लेख सापडतो. या किल्ल्याचे बांधकाम कधी केले गेले, हे सांगता येत नाही. इ. स. बाराव्या-तेराव्या शतकात येथे योगी चांगदेव वास्तव्यास असावेत, असे मानले जाते. चांगदेवच्या तत्त्वसार ग्रंथाच्या एका ओवीत शके १२३४ मधे हरिश्चंद्रगडावर हा ग्रंथ पूर्ण केल्याचा उल्लेख आहे. हा किल्ला छ. शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या सुरत लुटीनंतर स्वराज्यात दाखल झाला. सभासद बखरीत छ. शिवाजी महाराजांनी वसवलेल्या किल्ल्यांच्या यादीत या किल्ल्याचा उल्लेख जरी मिळतो. पुढे औरंगजेबाच्या दक्षिण मोहिमेत हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. १७४७–४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली होती. या किल्ल्याच्या खर्चासाठी २० गावांचे उत्पन्न लावून देण्यात आलेले होते. शाहू रोजनिशीत सुद्धा या किल्ल्याचा उल्लेख सापडतो. पुढे १७७५-७६ मध्ये या किल्ल्याचा हवालदार म्हणून संताजी सावंत याची नेमणूक केलेली तत्कालीन कागदपत्रांतून आढळते. इंग्रजी सैन्यातील अधिकारी कर्नल साईक्सच्या फौजेने मराठेशाहीच्या अखेरच्या युद्धात हा गड काबीज केला (मे १८१८). नंतर अहमदनगरचा जिल्हाधिकारी (कलेक्टर) हेन्री पॉटींजर याच्या हुकमानुसार तत्कालीन शिवनेर तालुक्याचा कमाविसदार रामराव नरसिंह याने बोइट याच्या ताब्यात हा किल्ला दिला (१४ जून १८१८). पुढे १८ डिसेंबर १८१८ मधे हा किल्ला पाडण्यासाठी कॅप्टन इस्टनर या भागात आला. त्याने किल्ल्यावर जाणारे रस्ते, पाण्याची टाकी, तटबंदी उद्ध्वस्त केली. मात्र त्याने हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर व लेण्यांना धक्का लावला नाही. किल्ल्याच्या कोकणकड्यावरून अतिशय दुर्मीळ असे वर्तुळाकार इंद्रधनुष्य ज्याला इंद्रवज्र म्हणतात, ते दिसल्याची नोंद कॅप्टन साईक्स या इंग्रज अधिकाऱ्याने करून ठेवली आहे.

संदर्भ :

  • Abhang, Chandrakant, Unpublished documents of East India Company regarding destruction of forts in Junnar region, Indian History Congress, 2014.
  • गोगटे, चिं. गं. महाराष्ट्र देशातील किल्ले : भाग १ व २ (सुधारित आवृत्ती), शिवसमर्थ सेवा प्रकाशन, नाशिक, २०१९.
  • पारसनीस, द. ब.; वाड, ग. चि. पेशवे रोजनिशी: खंड ३, ५, डेक्कन व्हर्न्याक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी, पुणे, १९०७; १९०८.

https://marathivishwakosh.org/55267/

हरिश्चंद्रगडाशी संलग्न असलेल्या वाटा


ट्रेकर आहे आणि हरिश्चंद्रगड पाहिलेला नाही, अशी व्यक्ती सापडणं जवळजवळ अशक्यच. भटक्यांची पंढरी म्हणून नावाजल्या गेलेल्या ह्या सर्वांगसुंदर आणि सर्वगुणसंपन्न गिरिदुर्गावर ट्रेकर्स व पर्यटकांची बाराही महिने रीघ असते. हरिश्चंद्रगडाशी संलग्न अनेक वाटांनी गडावर लोक येत असतात. यातील काही वाटा रोजच्या वापरातील आहेत, तर काही जवळपास मोडायला आलेल्या. मला आतापर्यंत माहीत झालेल्या व हरिश्चंद्रगडाशी संबंधित असलेल्या वाटांची यादी खाली देत आहे. ह्यात गडावर थेट चढणाऱ्या वाटांबरोबरच गडाच्या विविध दिशांच्या पायथ्याच्या अनेक गावांमधून चढणाऱ्या व गडांच्या मुख्य वाटांना जाऊन मिळणाऱ्या वाटाही समाविष्ट करत आहे.

ही सर्व यादी मला वैयक्तिकरीत्या माहीत असलेल्या वाटांची असून, ह्यात निश्चितच भर पडू शकते. त्यामुळे तुम्हाला खाली दिलेल्या वाटांच्या व्यतिरिक्त अजून काही वाटा माहीत असल्यास त्या नक्की मेन्शन करा.

ही पोस्ट लिहिण्यामागे गडावरील गर्दीचा ताण वाढवणे हे उद्दिष्ट नसून आपल्या लाडक्या हरिश्चंद्रगडाची वेगवेगळी रूपं सर्वांना माहीत व्हावीत इतकाच प्रामाणिक हेतू आहे (तसंही हरिश्चंद्रगडावर आत्ताच इतकी गर्दी होत आहे, त्यात काय अजून वाढ होणार म्हणा!!)

तेव्हा खाली दिलेली यादी नक्की वाचा व काही चुकलं किंवा राहिलं असल्यास नक्की सांगा.

A) नगर जिल्ह्यातून गडावर चढणाऱ्या वाटा

१. पाचनईची वाट/कपारीची वाट : नगर जिल्ह्यातील पाचनई गावातून गडावर येणारी सोप्या चढाईची व सध्या सगळ्यात जास्त वापरात असलेली वाट.

२. वेताळदार/वेताळधारेची वाट : पाचनई गावातून वाघ्या फाट्याच्या समोरून गडावर चढणारी लांबलचक वाट. ह्या वाटेवर वेताळ दरवाजाचे अवशेष, तटबंदी, पाण्याची टाकी व वेताळाचे मंदिर आहे. हरिश्चंद्रगडाच्या पुरातन मार्गांपैकी एक.

३. टोलारखिंड कोथळे बाजूने (तटाची वाट) : नगर जिल्ह्यातील कोथळे गावापासून टोलारखिंडीमार्गे गडावर चढणारी वाट. टोलारखिंडीतील तटबंदी ह्या वाटेने बघता येते.

४. गायवाट : पाचनई गावातून कपारीच्या वाटेने गडावर जाणाऱ्या वाटेच्या समोरच्या डोंगरावरून चढणारी स्थानिक पायवाट

५. बेटाची नळी : पाचनई गावातून सीतेच्या डोंगराच्या व हरिश्चंद्रगडाच्या मधल्या जंगलातून कोकणकड्यावर चढणारी वाट. अनेकदा पेठेच्या वाडीतील लोक थेट कोकणकड्यावर यायचं असल्यास ह्या वाटेचा वापर करतात.

६. परिचित राईची वाट : पाचनई गावातून परिचित राईच्या जंगलामार्गे कोकणकड्याजवळ येणारी वाट.

७. वाघरानाची वाट : पाचनई गावातून परिचित राईच्या जंगलामार्गे गडावर चढणारी व पूर्वीपासून वापरात असलेली स्थानिक पायवाट.

८. बैलघाट/कोकण दरवाजा : पाचनई गावातून भग्न दरवाजातून हरिश्चंद्रेश्वर मंदिर किंवा थेट कोकणकड्यावर चढणारी वाट. मंदिराकडे गेल्यास साठ पायऱ्यांची वाटही ह्यात बघता येते. ह्या वाटेवर दरवाजाची भग्न कमान, तसंच तटबंदी आहे. सादडे घाटाने चढून आल्यास किंवा सादडे घाटाकडे उतरायचं असल्यास ह्याच वाटेचा वापर होतो. हरिश्चंद्रगडाच्या पुरातन मार्गांपैकी एक.

९. पायऱ्यांची वाट/राजदरवाजा : पाचनईच्या अलीकडच्या लव्हाळी गावातून गडावर चढणारी वाट. ह्या वाटेवर दरवाजाचे व तटबंदीचे भग्न अवशेष आहेत. हरिश्चंद्रगडाच्या पुरातन मार्गांपैकी एक.

१०. गणपतीची वाट : पाचनईच्या अलीकडच्या लव्हाळी गावातून गडावर येणारी गुरांची वाट. लव्हाळीतील अनेक स्थानिक ह्या वाटेचाच वापर करतात. वाटेवर गणपतीची मूर्ती व एक गुहा आहे.

B) ठाणे जिल्ह्यातून गडावर चढणाऱ्या वाटा (वरील वाटांच्या क्रमांकावरून पुढे सुरू)

११. नळीची वाट : तांत्रिकदृष्ट्या कठीण व अतिशय वेळखाऊ अशी बेलपाडा/वालिव्हरे गावातून कोकणकड्यावर चढणारी वाट.

१२. सादडे घाट : बेलपाडा किंवा शेजारच्या केळेवाडी गावातून पाचनईजवळील ‘हपाट्याचा कडा’ इथे चढणारी वाट. ह्या वाटेने कलाडगड किंवा बैलघाटाने हरिश्चंद्रगड करता येतो. हरिश्चंद्रगडावर थेट चढत नसली, तरी गडाशी संलग्न असलेली वाट. काही लोक ह्या वाटेचा उच्चार करताना ‘साधले घाट’ असा करतात, जो पूर्ण चुकीचा आहे. ह्या वाटेत ‘अर्जुन सादडा’ची अनेक झाडे असल्याने ह्या वाटेला सादडे घाट हे नाव मिळाले आहे.

१३. करपदरा : बेलपाडा किंवा शेजारच्या केळेवाडी गावातून पाचनईजवळील ‘हपाट्याचा कडा’ इथे चढणारी वाट. ह्या वाटेने कलाडगड किंवा बैलघाटाने हरिश्चंद्रगड करता येतो. हरिश्चंद्रगडावर थेट चढत नसली तरी गडाशी संलग्न असलेली वाट. ‘करप’ नावाची भरपूर झाडं ह्या वाटेच्या दरीत असल्याने करपदरा हे नाव प्राप्त झालं आहे, असे स्थानिक सांगतात.

१४. थिटबीची नाळ/रोहिदास नाळ : माळशेज घाटातील थिटबी गावातून रोहिदास शिखरापाशी येणारी वाट. ही थेट गडावर जात नसली, तरी रोहिदास शिखर हा हरिश्चंद्रगडाचाच भाग मानला जात असल्याने ह्या वाटेचा उल्लेख केला आहे.

१५. माकडनाळ : बेलपाडा गावातून चढणारी वाट. ही रोहिदास शिखराजवळून हरिश्चंद्रगडाच्या आडराई ह्या भागाला जाऊन मिळते. ह्या वाटेने गड चढायचा असल्यास आडराईतून पुढे गेल्यावर तारामती नाळ किंवा जुन्नर दरवाजाचा वापर करता येऊ शकतो.

१६. खिदऱ्याचा दरा : माळशेज घाटातील थिटबी गावातून आडराईपाशी चढणारी वाट. ही थेट गडावर जात नसली, तरी ह्या वाटेने अर्धा गड चढून पुढे तारामती नाळ किंवा जुन्नर दरवाजाने हरिश्चंद्रगड चढता येईल.

१७. तवली : माळशेज घाटातील थिटबी गावातून आडराईपाशी चढणारी वाट. ही थेट गडावर जात नसली, तरी ह्या वाटेने अर्धा गड चढून पुढे तारामती नाळ किंवा जुन्नर दरवाजाने हरिश्चंद्रगड चढता येईल.

१८. तारामती नाळ : माळशेज घाटातील थिटबी गावातून तारामती शिखरापाशी चढणारी वाट. 

C) पुणे जिल्ह्यातून हरिश्चंद्रगडावर चढणाऱ्या वाटा

१९. टोलारखिंड : पुणे जिल्ह्यातील माळशेज घाटाजवळच्या खिरेश्वर गावातून गडावर चढणारी वाट. 

२०. जुन्नर दरवाजा/राजमार्ग : खिरेश्वर गावातून गडावर चढणारा राजमार्ग. हरिश्चंद्रगडाच्या पुरातन मार्गांपैकी एक.

ह्या वाटांची यादी काढताना एका गडावर चढणाऱ्या इतक्या वाटा कशा काय असू शकतात, ह्या विचाराने मी स्वतःच स्तिमित झालो होतो. माझ्या वैयक्तिक अभ्यासानुसार हरिश्चंद्रगड ज्या तीन जिल्ह्यांच्या म्हणजेच ठाणे, पुणे व नगर ह्यांच्या सीमेवर उभा आहे, ह्या तिन्ही जिल्ह्यांमधून पूर्वी गडावर चढणारे तीनच राजमार्ग म्हणजेच आजच्या काळात Official Gates असावेत.

१. पुणे जिल्ह्यातून खिरेश्वरकडून येणारा राजमार्ग

२. ठाणे जिल्ह्यातून सादडे घाट व नंतर बैलघाट, हा ऑफिशियल म्हणता येईल. कारण ठाणे जिल्हा कोकणात असल्याने ह्याच दरवाजाला कोकण दरवाजा हे नाव आहे.

३. नगर जिल्ह्यातून लव्हाळी गावातून चढणारी राजदरवाजाची किंवा पायऱ्यांची वाट.

मित्रांनो, हा सगळा लेखनप्रपंच तुमच्यापुढे मांडताना हरिश्चंद्रगडाबद्दलचा माझा अभिमान शतगुणित झाला हे वेगळं सांगायलाच नको. आपल्या लाडक्या हरिश्चंद्रगडाची एक अतिशय वेगळी ओळख ह्यातून व्हावी हीच प्रामाणिक इच्छा आहे. तरी काही चुकलं किंवा राहिलं असल्यास हक्काने सांगा.

(विशेष आभार : दिलीप वाटवे,भास्कर बादड, बाळू रेंगडे, तुकाराम भोईर,प्रकाश सावळे व ज्ञानेश्वर बादड.)

- ओंकार ओक

https://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=4872355735747941794

माकडाची नाळ आणि कोकणकड्याचा उत्सव...

स्वप्नील खोत

माकडाची नाळ आणि कोकणकड्याचा उत्सव...

सह्याद्री या नावाची आणि प्रदेशाची एक वेगळीच धुंदी आहे. एकदा तुम्ही या मायाजालात अडकलात, की मग या प्रेमळ पाशात स्वत्व हरवून एका वेगळ्याच विश्वात रमता. इथे असलेले गडकोट, घाटवाटा, नाळी, बेलाग सुळके मोहात पाडतात आणि मग आयुष्याची एक नवीन इनिंग सुरू होते.

तसे पाहता भटक्‍यांना पूर्ण सह्याद्रीच आपलासा वाटतो. त्यात हरिश्‍चंद्रगड म्हणजे भटक्‍यांची पंढरीच. तारामतीचे खुणावणारे शिखर असो, की केदारेश्वराच्या गुहेतील थंडगार पाणी, गणेश गुहेतील भव्य देखणी मूर्ती असो, की आपला लाडका जिवश्‍च कोकणकडा! हरिश्‍चंद्रगड नेहमी नव्याने प्रेमात पाडतो. एखादा गड सर्वांगाने बघायचा असेल, तर त्याच्या सर्व वाटा, घळी हाच एक उत्तम पर्याय. त्यात हरिश्‍चंद्रगड म्हणजे तर अनेक बहुढंगी वाटांनी समृद्ध असलेले सह्याद्रीतील दुर्गरत्न! तोलारखिंड, राजमार्ग, पाचनई, तटाची वाट, सादळे घाट, माकडनाळ, नळीची वाट, थिटबीची घळ, गणेशधार, वेताळधार... या त्यातल्या काही वाटा.   

प्रत्येक वाट या गडाचे वेगळ्या ढंगात दर्शन घडवणारी आहे. यातल्या बहुतांश वाटा आधी बऱ्याचवेळा झाल्या होत्या, पण माकडाची नाळ ही एक बरेच दिवस करायची राहिलेली दुखती नस होती. नळीच्या वाटेतून दरवेळी वाकुल्या दाखवायची, तर कधी कोकणकड्यावर उभे राहिल्यावर आमंत्रण द्यायची. पण संधी कशी आणि कधी येईल हे सांगता येत नाही. एकदा मंदारने फक्त विचारायचा अवकाश होता. त्यात कोकणकड्याच्या महोत्सवाचे आमंत्रणपण भास्कर कडून होतेच. मग काय सोने पे सुहागा! पण सगळे ठरविल्याप्रमाणे होतेच हा अनुभव विरळच.
 स्वप्न जेव्हा सत्यात उतरत असते ना, तेव्हा नियती सर्व प्रकारे अडवणूक करण्याचा प्रयत्न करतेच. पहाटे बैलपाड्यात पोचायचे असल्यामुळे आदल्या रात्रीच आम्ही दोघे पुण्यातून निघालो. आमचे काही सवंगडी मुंबईहून येणार होते. पण रात्री गाडीने दगा दिलाच. ती बंद पडलेली गाडी म्हणजे पुन्हा एकदा माकडनाळ एक स्वप्नच राहणार की काय, हा प्रश्न आणि त्यासोबतच असंख्य शंका कुशंकांनी मनात घर केले. सुदैवाने जुन्नरमध्ये गाडी बंद पडल्यामुळे रात्र वैऱ्याची नव्हती. गौरवला फोन करून गाडी सुरक्षित ठिकाणी लावून घरी मुक्काम केला. रात्रभर झोप काही लागली नाही. डोळ्यासमोर माकडनाळ वाकुल्या दाखवत उभी होती...

आता राज्य परिवहन मंडळावर आमची मदार होती. सकाळच्या पहिल्या लाल परीने मोरोशी आणि तिथून पुढे वाल्हिवरे गाठले. पण या सगळ्या रामरगाड्यात एव्हाना मुंबईहून आलेले आमचे मित्र खूप पुढे निघून गेले होते. ६.३० ला ट्रेक सुरू करायचा होता आणि घड्याळजी चक्क ९.३० च्या ठोक्‍यावर होते. मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे त्यांच्याशी संपर्कही झाला नव्हता. त्या दिवशी पहिल्यांदा मी बैलपाड्यातून अजस्र कोकणकड्याऐवजी जरा उजवीकडे असलेल्या माकडाच्या नाळेकडे रडवेल्या चेहऱ्याने पाहत होतो.

आता दोनच पर्याय उरले होते. एक तर नेहमीच्या नळीच्या वाटेने वर जाऊन त्यांची वाट पाहणे किंवा माकडनाळ शक्‍य तेवढ्या लवकर सर करून पॅच जवळ पोचणे. कमादादाच्या मोबाईलवरून कमळूला सतत फोन करत होतो. अखेर फोन खणाणला. जमेल तेवढ्या सगळ्या शब्दांचा मारा एकाच श्वासात करत कमळूला थांबायला सांगितले. कमळूने आम्हाला सांगितले, की सगळ्यांचा पॅच चढून झाला आहे, तेव्हा तुम्ही नळीच्या वाटेने या. पण आज नळीच्या वाटेने गेलो, तर पुन्हा माकडनाळेसाठी वाट पहावी लागणार होती. जर ट्रेक करायचा असेल, तर नाश्‍ता, बसून जेवण अशा सगळ्या थांब्यांना नाकारावे लागणार होते. आम्ही येतोय एवढेच कमळुला सांगून वेळेशी शर्यत सुरू केली. तोपर्यंत बाकी मंडळींना आराम करावा लागणार होता. 

उन्हाचा तडाखा जबरदस्त होता. त्यात जवळपास पळतच पॅच गाठायचा होता. पावले वाटेने चालत होती आणि डोळे अजस्र कोकणकड्याचे लोभसवाने रुपडे मनमुराद जगत होते. नळीच्या वाटेचे वळण मागे पडले. नळीची वाट तशी थोडी कड्याच्या लांबून जाते, माकडनाळ थेट कड्याच्या कुशीतून. कोकणकडा नावाच्या गारुडाने आयुष्यात खूप काही भरभरून दिले आहे. त्याच्या ऋणातून उतराई होणे या जन्मात तरी शक्‍य नाही. अधाश्‍यागत कड्याकडे नजर लावून बघताना घटकाभर पाय थबकलेच. समोर नळीच्या वाटेत रांग लागलेली दिसत होती. गर्दीजवळ असूनही मी गर्दीपासून बरेच दूर कोकणकडा मनसोक्त जगत होतो. फार वर्दळ नसल्यामुळे अनवट असलेली पायाखालची वाट जरा जपूनच चालावी लागत होती. अनेक ठिसूळ दगड पायाखालून क्षणार्धात गायब होत होते. घशाला कोरड पडली होती. पण माकडाची ती नाळ तिच्या मोहिनीने आम्हाला वश करण्यात यशस्वी झाली होती. बराच वेळ झाला, आम्ही एकमेकांशी काहीही न बोलता ती अनवट नाळ चढत होतो, पूर्णपणे जगत! अनेक छोटे-मोठे टप्पे पार पाडून ७० फुटांच्या ‘त्या’ टप्प्याचे दर्शन झाले. अंग अक्षरश: थरारून गेले. त्या टप्प्याला जाऊन स्पर्श केला. स्वप्नाचा स्पर्श सत्यात अनुभवणे हे शब्दांच्या पलीकडचे आहे. बऱ्याच दिवसानंतर कमळूला भेटल्याचा आनंदही होताच. दोराच्या मदतीने त्या ठिसूळ टप्प्याची चढाई संपवून वर पोचलो. थेट शेंडी सुळक्‍याच्या बाजूला. नळीच्या वाटेवरून छोटासा दिसणारा हा सुळका बऱ्याच जणांना मोहिनी घालत असतो. 

एव्हाना आमच्या मुंबईच्या चमूचा बराच आराम आणि जेवण झाले होते. उशीर झाल्यामुळे बसून जेवण करणे, तर नशिबात नव्हते, पण माकडनाळेसाठी काहीही! चालता चालताच बिस्किटे आणि चॉकलेट या जेवणासोबत वाट मोडत होतो. या वाटेची महत्त्वाची बाब अशी, की वाटेत पाणी नसल्यामुळे जे काही पाणी लागणार आहे, ते सुरुवातीलाच भरून घ्यावे लागते. त्यात एक अखंड वळसा मारून पुन्हा तारामतीच्या बाजूने मुख्य रस्ता पकडून कोकणकडा गाठायचा हा द्राविडी प्राणायाम करावा लागतो. 

असो, आता गप्पांची मैफल सजत होती, सोबतीला रोहिदासाची घळ, तारामतीची घळ दर्शन देत होत्या. जवळच असलेल्या सिंदोळा, उधळ्या, घोण्या, भोजगिरी, वऱ्हाडी यांना दुरूनच सलाम ठोकत आमचा चमू हरिश्‍चंद्राच्या अंगाखांद्यावर यथेच्छ बागडत होता. मधेच जंगल, कड्यालगतची वाट असा रंजक खेळ खेळत जुन्नर दरवाजाच्या नेढ्याजवळ येऊन पोचलो. सूर्यास्त होत होता. मागे पसरलेला अथांग सह्यपसारा, संध्याकाळच्या त्या नीरव शांततेत भंग पाडणारे दरीखोऱ्यातून घुमत येणारे ते पक्ष्यांचे आवाज माझ्यासारख्या दररोज हिंजवडीत येणाऱ्यासाठी तर मेजवानीच. पठारावरून तारामतीच्या मागे अस्ताला जाणाऱ्या त्या भास्कराचा अलौकिक सोहळा अनुभवून आता पाय वळत होते ते आमच्या गडावरच्या भास्करला आणि सावळ्याला भेटण्यासाठी आणि कोकणकडा महोत्सव याही वर्षी जगण्यासाठी. 
 घरी पोचताच आधी नथू बाबा आणि माईला भेटलो. यांच्याविषयी मी बापड्याने वेगळे काय सांगावे... त्यांचे प्रेम त्यांच्या त्या आपुलकीने केलेल्या चौकशीत आणि त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होते. कोकणकड्याच्या महोत्सवात सामील झालो. शिस्तबद्ध कार्यक्रम, लघुपट, बरेच लोक ज्याच्याबद्दल अनभिज्ञ आहेत, असे ते कांबडनृत्य. सोहळा मस्त पार पडला... आणि मग प्रथेप्रमाणे ताऱ्यांच्या अंगणात नक्षत्रांचे देणे जगत, हातात वाफाळणारा चहा घेऊन, कोकणकडा नावाच्या गारुडाच्या सान्निध्यात रंगलेल्या गप्पा...    

दिवसभर कितीही थकलेले असलात, तरी त्या गप्पा सगळे काही विसरायला लावतात. त्या लाडक्‍या कड्याशी मन मोकळे करत मी किती तरी वेळ तसाच पहुडलो. त्यानंतर येणाऱ्या त्या निद्रादेवीच्या सुखाने अधीन झालो. सकाळी पुन्हा कड्यावर थोडा वेळ घालवला. पाय निघत नव्हता, पण उशीर होईल म्हणून सकाळी लवकर नळीच्या वाटेने गड उतरायला सुरुवात केली. पुन्हा एकदा नेहमीच्या वाटेतल्या दगडांशी खेळत नाळ उतरत होतो. कालच्या माकडनाळेच रूप धडकी भरवणारे पण तरीही लोभसवाणे! नळीची वाटही तशी सगळ्यांना प्रेमात पाडणारी पण सध्या गर्दीच्या विळख्यात अडकलेली. गावात आलो, आता मात्र पोटातल्या कावळ्यांनी उच्छाद मांडला होता. शेखर सर, अतुल सर, पंढरी सर, प्रकाश सर या दिग्गजांच्या सहवासात घडलेला हा ट्रेक केवळ अफाट! मंदार, मयुरेश, इशान यांनीही यात रंगत आणली... 

  कालची उपाशी पोटी केलेली भटकंती आजही डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी होती. गाडी पुन्हा मोरोशीच्या दिशेने दौडत होती. कड्याचा साश्रुनयनाने निरोप घेत होतो. कड्याचा निरोप घेऊन निघालो खरे, पण मन मात्र अजूनही गडाच्या अंगाखांद्यावर, मल्हार सह्याद्रीच्या कुशीत निरागसपणे बागडत होते. सह्याद्रीच्या निखळ, निरपेक्ष प्रेमाच्या सोबतीने.

टीप : माकडनाळ ही तांत्रिक चढाई असून पूर्वानुभवाशिवाय करणे घातक ठरेल. याकरिता प्रस्तरारोहणाचा अनुभव असणे महत्त्वाचे आहे.

https://www.saptahiksakal.com/sakalsaptahik-trekstory-swapnil-khot-marathiarticle-2820

माकडनाळ हरिश्चंद्रगड


माकडनाळ हरिश्चंद्रगड

   खुबी गावातून दिसणारा हरिश्चंद्रगड..उंच शिखर तारामती..डावीकडे माकडनाळ खिंड 

दिवस १:२४ मार्च २०१८

हरिश्चंद्रगड म्हणजे जातीवंत भटके,नवखे,हौशी अन ट्रॅकिंग वाल्यांमध्ये गिर्यारोहणासाठी आदर्श जागा.हरिश्चंद्रगडाला खिरेश्वर,पाचनई आणि नळीची वाट या प्रसिद्ध अन अगदीच वापरात असलेल्या वाटा तर जुन्नर दरवाजा राजमार्ग,सादडे घाट,बैल घाट,कोथळे(लव्हाळे) या कमी वापरातल्या वाटांनीही काही मंडळी हरिश्चंद्रगडावर पोहोचतात.

     खिरेश्वर गावातील प्रसिद्ध नागेश्वर मंदिर 

वरील सर्व वाटा पायाखालून गेल्या होत्या त्यामळे राहिलेल्या दोन वाटा ज्यांचं नावही फार क्वचितच घेतलं जात अशा माकडनाळ अन तारामती घळ वाटांपैकी एका वाटेला भिडायचं प्रसादने ठरवलं अन ठरल्याप्रमाणे पुण्यनगरीतून रात्री १२ ला १२ जणांचं भ्रमणमंडळ वालीवरे गावाकडे मार्गस्थ झालो.पहाटे झुंजूमुंजू व्हायच्या वेळी वालीवरे गाठले अन तडक कमळूच्या घरी जाऊन आजचा मनसुबा सांगितला.कमळू सांदणला गेल्यामुळे काशीदादा बरोबर येणार होता.

      वालीवरे गावातून दिसणारा नाफ्ता 
मॅग्गी अन चहाचा नाश्ता करून पाणी भरून घेतले.माकडनाळ चढून खिरेश्वर गाठेपर्यंत पाणी कुठेच नसल्यामुळे प्रसाद,निळू भाऊ,योगिता अन अविनाश सरांनी विविध पाणीदार फळे घेतली होती.अविनाश सावंत सरांनी ७-८ लिटर पाणी,४-५ खरबूज अन बाकीचा शिधा घेऊन रकसॅक चांगलीच जड केली होती.नेपाळमधील आयलंड शिखर(६१८९ मीटर्स) मोहिमेसाठी पूर्वतयारी म्हणून गेल्या बऱ्याच ट्रेकमध्ये अविनाश सरांनी घाम गाळला होता अन त्याचच फळ म्हणून मागच्याच आठवड्यात आयलंड शिखर पादांक्रात करण्यात त्यांना यशही मिळालं.

सकाळी ७ ला वालीवरे-मुरबाड मुक्कामी येष्टी मुरबाडकडे अन आम्ही माकडनाळेकडे निघालो.डावीकडे नाफ्ताने सुंदर दर्शन दिले.सुरुवातीला तासभर नळीच्या वाटेनेच कोकणकड्याच्या पायथ्याला पोहोचलो.नळीच्या वाटेतला तीन टप्प्यात पडणारा छोटासा धबधबा पार केल्यावर डावीकडची नळीची वाट सोडून सरळ मोठ्या ओढ्यातून पुढे निघालो.२० मिनिटांत मोठ मोठ्या दगडांमधून वाट काढत भव्य कोकणकड्याच्या अगदीच पायथ्याला पोहोचलो अन कोकणकड्याचं वेगळंच रूप बघायला मिळालं.डाव्या बाजूला नळीची वाट बघून या वाटेने बऱ्याचदा गेलोय यावर विश्वास बसेना एवढ रौद्र तीच रूप होत.समोर सरळसोट कोकणकड्याचा माथा अन उजवीकडे उंचच गेलेली माकडनाळ असा कॅनवास बघताना मानेचा चांगलाच व्यायाम झाला.मागे वालीवरे अन दूरवर नानाचा अंगठा दर्शन देत होता.वेळ सकाळी:८.२०

         

वालीवरे गावातून दिसणारा कोकणकडा  

                      कोकणकड्याचं पायथ्यातून दर्शन 

काही क्षण विसावल्यानंतर उजवीकडून येणाऱ्या माकडनाळेला भिडलो.बऱ्याच माकडांचा आवाज नाळेत घुमत होता त्यात आमचे दोन वानर टॅंगो अन शेखर आण्णा त्यांचीच नक्कल करून माकडांना अजून प्रोत्साहन देत होते.या माकडांमुळेच या नाळेला माकडनाळ म्हणत असावेत असा पहिला अंदाज काढला. छोट्या-छोट्या कोरड्या धबधब्यातून,नाळेच्या भिंतीवरून अन मोठाल्या दगडांवरून चढताना हात अन पायांचा उपयोग माकडनाळेत करावाच लागत होता.म्हणजे एकूणच ही नाळ चढायची तर बऱ्याच ठिकाणी माकडांसारखं चढाई करावी लागत होती म्हणून ही माकडनाळ असा दुसरा अंदाज काढला असो. 

                     नळीची वाट हरिश्चंद्रगड 

नाळेची वाट अन सकाळची वेळ असल्यामुळे छानसा गारवा जाणवत होता.नळीच्या वाटेपेक्षा माकडनाळेतील दगड अगदीच स्थिर असल्यामुळे भराभर उंची गाठत पुढच्या तासाभरात एका अवघड कातळटप्प्याच्या खाली पोहोचलो.वेळ सकाळी:९.१५

काशी दादांनाही होल्ड्स लवकर सापडत नव्हते म्हणजेच या टप्प्यावर नविन माणसाला वेळ लागणार हे नक्कीच होतं.काशी दादांनी काळजीपूर्वक हा ७०-८० फूट टप्पा चढुन रोप खाली सोडला.सर्वात आधी काही हलकी मंडळी वर चढून बाकीच्यांना बिले द्यायचं ठरलं.मंडळामध्ये वजनाला सर्वात हलके पण हिंमतीने चांगलेच जड निळू भाऊंना पहिला मान देण्यात आला.दुसऱ्या रोपने लॉकिंग सिस्टिम बनवत टॅंगोने त्याला अधिक सुरक्षित केले.निळू भाऊंनी काळजीपूर्वक चढाई करत कुठेही न धडपडता १५ मिनिटांत हा टप्पा पूर्ण केला.नंतर अमोल,मी,शेखर आण्णा,टॅंगो यांनी २५-३० मिनिटांत माथा गाठल्यावर वरून बिले दयायला मजबूत टीम तयार झाली.बाकीचे मंडळ पोहोचल्यावर सर्वांच्या सॅक रोपने ओढून घेतल्या अन शेवटी प्रसादने चढाई करून रोप काढून घेतला.काही मंडळींना हा अवघड टप्पा जास्तच आवडल्याने त्यांनी या टप्प्याची चांगलीच गळाभेट घेत चढाई केली त्यात थोडा अधिक वेळ गेला.सर्व मंडळाने कुठेही न धडपडता न खरचटता सुरक्षितपणे हा टप्पा पार केला. वेळ दुपारी:दुपारी:१२.३०

     

माकडनाळेतुन  नळीची वाट हरिश्चंद्रगड 

      माकडनाळ अवघड कातळटप्पा 

     

माकडनाळ माथ्यातून नळीची वाट हरिश्चंद्रगड
थंडगार माकडनाळ आता उन्हाने तापून निघाली होती.२०-२५ मिनिटांची तीव्र चढाई करत माकडनाळ माथा गाठला. उत्तरेला नळीच्या वाटेचा माथा अन माकडनाळ माथा समांतर उंचावर भासत होता.रौद्र दिसणारे हरिचंद्रगडाची शिखरे,नळीची वाट अन माकडनाळ दृश्य माकडनाळेच्या खिंडीतून सुखावह होते.माथ्यावर चांगला झाडोरा बघून शिदोऱ्या उघडल्या.पोटोबा करून बराचसा फलाहार झाला.वेळ दुपारी:२

         माकडनाळ खिंड अन शेंडी सुळका 
माकडनाळ माथ्यापासूनच पश्चिमेला रोहिदास शिखराकडे जायला वाट आहे(२-२.१५ तास).आम्ही मात्र प्लॅननुसार पूर्वेला खिरेश्वरकडे उतराई सुरु केली.काही वेळ जंगलातून उतरल्यावर डावीकडे शेंडी सुळका लक्ष वेधून घेतो.उजवीकडे माळशेज घाटाचं सुंदर दृश्य अजून बराच वेळ सोबती राहणार होत.डावीकडे तारामती शिखर ५२० मीटर उंचावलेले दिसते.आता तापत्या उन्हात हरीशचंद्रगडाला वळसा घालून राजमार्गाला गाठायचे होते.वाट चढाईची नसल्याने तितकासा त्रास जाणवत नव्हता पण एवढ्या मोठ्या पठारावर बराच वेळ चालूनही सावलीसाठी झाड मिळेना.अखेर तासाभराने जंगलटप्पा आल्यावर गर्द सावलीत आडवेच झालो.निळू भाऊंनी आणलेलं कलिंगड मार्गी लावल.शरीर थंड झाली.वेळ:दुपारी:३.१५

       

खिरेश्वर वाटेवर...मागे रोहिदास शिखर

       

खिरेश्वर वाटेवर..हरिश्चंद्र शिखर अन नेढं 

                             क्षणभर विश्रांती 

१० मिनिटात बालेकिल्ल्याच्या डावीकडून येणाऱ्या नाळेत पोहोचलो.या नाळेतून ४०० मीटर चढाई करून बालेकिल्ल्याचा पायथा गाठता येतो.(२ ते २.३० तास).तसंच या नाळेने खाली कोकणात उतरून थिटबी गाठता येत(तारामती घळ वाट) या वाटेचा शोध लवकरच घ्यायचा असं ठरवून नाळेतून उजवी घेत एक चढाई टप्पा पार केला.आता डावीकडे जुन्नर दरवाजाची खिंड तर समोर नेढं दिसत.एका खिंडीत चढून राजमार्ग गाठला.वेळ:दुपारी:४

         

तारामती घळ वरचा टप्पा अन बालेकिल्ला 

   जुन्नर दरवाजा वाटेवरून खिरेश्वर अन पिंपळगाव धरण 

खिरेश्वर गाव आता हाकेच्या अंतरावर दिसत.पिंपळगाव जोगा धरणाचे सुंदर दृश्य बघत खिरेश्वर गावात लँडिंग सुरु केले.मळलेल्या ऐसपैस राजमार्गाने ३० मिनिटांत खिरेश्वर गाठले.उजवीकडे टोलार खिंड गर्द जंगलात विसावली होती.डावीकडे तारामती शिखरापर्यंत नजर फिरवली हरिश्चंद्रगड भव्य दिसत होता.  माकडनाळेने आज हरिश्चंद्रगडाची भव्यता अजूनच जवळून चाखायला मिळाली होती. 

 अविनाश,अमोल,विजय,मंदार,मुकुंद,कीर्ती,योगिता,शेखर,रवी,निळू अन प्रसन्न ..फोटो:प्रसाद 

या डोंगरयात्रेचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा 

नोट:

 १.माकडनाळेतील कातळटप्पा अवघड असुन कातळारोहणासाठी आवश्यक सर्व साहित्य गरजेचे. 

 २.नळीच्या वाटेपेक्षा माकडनाळीतील दगड स्थिर असून घसारा अन दृष्टीभय देणारे ट्रॅव्हर्स नाहीत.

महत्वाच्या नोंदी :

सुरवात:वालीवरे शेवट:खिरेश्वर 

मार्ग: वालीवरे-माकडनाळ-जुन्नर दरवाजा मार्ग-खिरेश्वर 

श्रेणी:अवघड

एकूण डोंगरयात्रा: १३.२ किमी

चढाई उतराईतील टप्पे:

वालीवरे (२६०मीटर्स)-माकडनाळ माथा(८९५ मीटर्स)-खिरेश्वर(७०० मीटर्स)

प्रसन्न वाघ

https://www.prasannawagh.com/2018/04/blog-post_21.html

FacebookTwitter


दुर्गभटक्यांची पंढरी 'हरिश्चंद्रगडावरील शिलालेख'


'हरिश्चंद्रगड' येथील हे सर्व शिलालेख जर आपण नीट बघितले तर आपल्याला एक महत्वाची गोष्ट समजते ती म्हणजे या शिलालेखांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींची नावे आपल्याला कोरलेली दिसून येतात. ह्या शिलालेखांच्या मध्ये जी व्यक्तींची नावे दिसतात ती नावे म्हणजे 'हरिश्चंद्रगड' येथे राहणारे 'योगी' किंवा 'हरिश्चंद्रेश्वर' मंदिरात दर्शनाला आलेले 'भक्त' याबाबत कोणतीही शंका आजिबात नाही. 'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेखांमध्ये क्रमांक १ आणि ४ हे शिलालेख खूप महत्वाचे आहेत. यामध्ये पहिल्या क्रमांकाच्या शिलालेखामध्ये 'चक्रपाणी वटेश्वर' हा उल्लेख आढळतो आणि क्रमांक ४ शिलालेखात आपल्याला जे नाव दिसते ते म्हणजे 'चांगा वटेश्वर' हे अत्यंत महत्वाचे नाव दिसून येते. 

प्राचीन महाराष्ट्रामध्ये एक महत्वाचे संत होऊन गेले ते म्हणजे 'चांगा वटेश्वर'. हे 'चांगा वटेश्वर' म्हणजेच 'चांगदेव' नावाचे प्रसिद्ध संत. 'चांगदेव महाराज' यांचे गर्वहरण 'ज्ञानेश्वर' महाराजांची बहिण संत 'मुक्ताबाई' यांनी 'कोरा' असे संबोधून केले. या गर्वहरणानंतर 'ज्ञानेश्वर' महाराजांनी 'चांगदेव महाराज' यांना उद्देशून 'चांगदेव पासष्टी' हा ग्रंथ लिहिला. 'चांगदेव महाराज' यांनी लिहिलेल्या अभंगामध्ये ते स्वत:ला 'चांगा वटेश्वर' आणि 'वटेश्वर चांगा' असेच संबोधले आहे. 'चांगदेव पासष्टी' या ग्रंथामध्ये 'ज्ञानेश्वर महाराजांनी' 'चांगदेव महाराज' यांना जी ओवी  लिहिली आहे ते पुढीलप्रमाणे:-

तया पुत्र तूं वटेश्वराचा । रवा जैसा कापुराचा । चांगया मज तुज आपणयाचा । बोल ऐके ॥ ३७ ॥ 

चांगदेवा! ज्या परमात्म्याला वटेश्वर इत्यादि अनेक नामें आहेत; त्याचाच तू पुत्र आहेस. अरे कापराचा कण हा कापूररूपच असतो ना! तसा तू परमात्मस्वरूप आहेस. आत्म्यात आणि परमात्म्यात ऐक्य असते. तुझ्यामाझ्यात तसा ऐक्यभाव कोणत्या रीतींने आहे ते तू आता ऐक! ॥३७॥

या वरील ओवीमध्ये आपण नीट पाहिले तर 'चांगदेव महाराज' यांना 'वटेश्वराचा पुत्र' असे म्हटलेले आहे. तसेच संत 'मुक्ताबाई' यांच्या अभंगात  देखील 'चांगदेव महाराज' यांचा उल्लेख आलेला आहे. तो उल्लेख पुढीलप्रमाणे:-

संत 'मुक्ताबाई' यांनी 'चांगदेव महाराज' यांचा केलेला हा उल्लेख अत्यंत महत्वाचा ठरतो. 'तत्वसार' हा ग्रंथ स्वतः चांगदेव महाराज यांनी लिहिलेला आहे. या ग्रंथामध्ये ते स्वत:चा उल्लेख जो करतात तो पुढीलप्रमाणे:-

या अभंगावरून हे सिद्ध होते की 'वटेश्वराचा सुतु' आणि 'वटेश्वर सुत' म्हणजेच 'चांगदेव महाराज' हेच आहेत यामध्ये काही शंका उरत नाही. तसेच 'ज्ञानेश्वर महाराज' यांनी 'चांगदेव महाराज' यांना 'चक्रपाणी' असे देखील संबोधलेले आहे. तो उल्लेख पुढीलप्रमाणे:-

एवं ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे । दोन्ही डोळस आरिसे । परस्पर पाहतां कैसें । मुकले भेदा ॥ ६२ ॥

ओवीचा अर्थ:-

अशा प्रकारे ज्ञानदेवांनी या पत्राद्वारे चक्रपाणी(चांगदेव )यांना ज्ञाननिष्ठ (डोळस) केल्यामुळे त्यांचे आरसे(ज्ञानदेव आणि ते स्वतः) परस्परांना पाहताना आपआपसातला भेद विसरून गेले.

या ओविवरून आपल्याला हे समजून येते की 'चांगा वटेश्वर' आणि 'चक्रपाणी वटेश्वर' ही एकाच व्यक्तीची नावे आहेत. या व्यक्ती कोणी भिन्न नाहीत हे यामधून आपल्याला समजते. 'हरिश्चंद्रगड' येथील चौथा शिलालेख जो आहे त्यामध्ये 'चांगा वटेस्वर' असा उल्लेख आलेला आहे. 'चांगा वटेस्वर' म्हणजे 'तत्वसार' ग्रंथाचे निर्माता आहेत. या तत्वसार ग्रंथाच्या शेवटी त्यांनी स्थळाचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो तो उल्लेख पुढीलप्रमाणे:-

हरिश्चंद्र नाम पर्वतु | तेथ महादेव भक्तु 

सूरसिद्धीगणींं विख्यातु | सेवेजी जो ||

हरिश्चंद्र देवता | मळगंगा सरिता ||

सर्वतीर्थ पुरविता | सप्तस्थान ||

ब्रम्हस्थळे ब्रम्ह न संडीतु | चंचळ वृक्षु अनंतु 

लिंगी जग्गनाथु | महादेओ ||

ऐसा सर्वांचा समाओ | कळी संसारू दु:खाचा प्रवाहो 

तो देओ मोक्षाचा उत्साओ | शनै: शनै: ||

जो तीर्थांंसि तीर्थ | केदारेसिंं तुकिताति

आणि क्षेत्रिं निर्माती | प्रबंधु हा || (तत्वसार:-१०२९- ३३)

या तत्वसार ग्रंथाच्या श्लोकामधून एक महत्वाची गोष्ट समजते ती म्हणजे 'अकोले' तालुक्यातील 'हरिश्चंद्र पर्वत' म्हणजेच दुर्गभटक्यांची पंढरी 'हरिश्चंद्रगड' हा आहे. याच दुर्गभटक्यांची पंढरी 'हरिश्चंद्रगडावर' आपल्याला 'हरिश्चंद्रेश्वर' मंदिर आपल्याला पाहायला मिळते तसेच 'केदारेश्वर' हे मोठे शिवलिंग देखील 'हरिश्चंद्रगड' येथे आहे. एकंदरीतच 'हरिश्चंद्रगड' येथे मोठ्या प्रमाणात सिद्ध योगी हे राहात असावेत हे वरील शिलालेखांच्यावरून समजते.

'अकोले' तालुक्यातील 'हरिश्चंद्र पर्वत' म्हणजेच दुर्गभटक्यांची पंढरी 'हरिश्चंद्रगड' हा आहे.

वरील शिलालेखांच्यापैकी आपण जर शिलालेख क्रमांक १ आणि शिलालेख क्रमांक ४ जर नीट पाहिले तर त्यामध्ये क्रमांक १ शिलालेखामध्ये आपल्याला 'वटेश्वरनंदनु चक्रपाणी' हे नाव आढळून येते तसेच क्रमांक ४ शिलालेखामध्ये 'वटेश्वराचा चांगा' हे नाव आढळून येते. यामधील 'चक्रपाणी' हे नाव 'चांगदेव महाराज' यांचे दुसरे नाव आहे. तसेच 'चांगा' हे नाव देखील त्यांचेच आहे असे दिसते. तसेच शिलालेख क्रमांक ३ यामध्ये 'वटेश्वर नंदनु' असे नाव दिसते. या शिलालेखात 'चक्रपाणी' याचा 'सुत' म्हणजे शिष्य असल्याचे म्हटले आहे. या शिष्याचे नाव 'विकटदेव' असे आहे. आता हा 'विकटदेव' कोण हे मात्र निश्चितपणे सांगता येत नाही असे 'डॉ. वि. भि. कोलते' यांचे म्हणणे आहे.

'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेख क्रमांक ५ हा अत्यंत महत्वाचा आहे. हा शिलालेख देखील 'डॉ. वि. भि. कोलते' यांनी वाचायचा प्रयत्न केला त्यामध्ये त्यांनी या शिलालेखाचे दोन भाग केलेले आपल्याला दिसतात पहिल्या भागाचे वाचन हे '[नि]वृत(ति) पुत्र  ज्ञाना(न)देउ नाम(दे)उ' वारी हे वाक्य आहे. या वाक्यावरून मात्र हे समजते कि महाराष्ट्रातील काही मोठे संत हे देखील 'हरिश्चंद्रगड' येथे त्यांची वारी झाली असावी. यामध्ये एक गोष्ट महत्वाची बघायला पाहिजे म्हणजे आपल्याला वरील शिलालेखातील संदर्भ समजण्यास मदत होते. 'ज्ञानेश्वर महाराज' यांचे बंधू आणि गुरु हे 'निवृत्तीनाथ महाराज' हे होते. 'ज्ञानेश्वर महाराज' यांनी 'निवृत्तीनाथ महाराज' यांच्याकडूनच 'गुरुपदेश' घेतलेला होता. 'ज्ञानेश्वर महाराज' यांनी लिहिलेल्या 'ज्ञानेश्वरी' मध्ये पुढीलप्रमाणे लिहितात:-

ते माहेशान्वयसंभुतेंं | श्रीनिवृत्तीनाथसुतेंं | केले ज्ञानदेवें गीते | देशीकार लेणे ||१८०६|| (अध्याय १८)

ज्ञानेश्वरीमधील या वरील ओवीमध्ये आपल्याला 'निवृत्तीसुत' असा शब्द दिसतो. यामध्ये 'निवृत्तीसुत' म्हणजे 'सुत' म्हणजे 'शिष्य' या अर्थाने उपयोग केला आहे. तसेच याच अर्थाने 'चांगदेव पासष्टी' मध्ये ओवी क्रमांक ३७ मध्ये 'शिष्य' या अर्थानेच पुत्र हा शब्द वापरलेला आहे. 'चांगदेव पासष्टी' मधील ओवी क्रमांक ३७ पुढीलप्रमाणे:-

तया पुत्र तूं वटेश्वराचा । रवा जैसा कापुराचा । चांगया मज तुज आपणयाचा । बोल ऐके ॥ ३७ ॥

यामध्ये 'तया पुत्र तुंं वटेश्वराचा' यामध्ये 'पुत्र' हा शब्द शिष्य म्हणून वापरलेला आहे. म्हणून वरील 'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेख क्रमांक ५ अत्यंत महत्वाचा आहे. तसेच वरील शिलालेख क्रमांक ५ यामध्ये 'नामदेउ' हे देखील नाव आलेले आहे. हे 'नामदेउ' म्हणजे  दुसरे तिसरे कोणी नसून 'नामदेव महाराज' हे होत. या वरील शिलालेख क्रमांक ५ यावरून मात्र असे दिसते कि निवृतीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज हे सर्वजण 'हरिश्चंद्रगड' येथे नक्की येऊन गेले असावेत. जेव्हा हे मोठे संत 'हरिश्चंद्रगड' येथे आले असतील तेव्हा 'चांगदेव महाराज' हे देखील गडावर असतील. तसे 'हरिश्चंद्रगड' बघायला गेले तर 'हरिश्चंद्रगड' हे  नाथपंथीयांचे एक महत्वाचे ठिकाण असावे. वरील शिलालेखावरून हे मात्र स्पष्ट होते कि निवृतीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज हे सगळेजण 'हरिश्चंद्रगड' येथे येऊन गेलेत हे नक्की. म्हणून 'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेख क्रमांक ५ हा अत्यंत महत्वाचा ठरतो.

तया पुत्र तुंं वटेश्वराचा' यामध्ये 'पुत्र' हा शब्द शिष्य म्हणून वापरलेला आहे.

'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेख क्रमांक ५ मधील उत्तरार्धात जी नावे आलेली आहेत 'श्रीधरदेव' आणि 'हरीश्चंद्रदेव' ही दोन्ही नावे 'हरिश्चंद्रगडावरील' देवतांची नावे आहेत. आज 'हरिश्चंद्रगडावर' आपल्याला गणपती, शिव-पार्वती, विठ्ठल-रुक्मिणी, देवी ह्या देवता गडावर पाहायला मिळतात. तसेच शिलालेखातील 'श्रीधर' या नावामुळे गडावर एखादे 'विष्णूचे' मंदिर देखील असावे असे वाटते. दुर्गभटक्यांची पंढरी असलेल्या 'हरिश्चंद्रगडावर' एक पुष्करणी आहे त्या पुष्करणीच्या वर जे देवकोष्ठ आहेत त्यामध्ये पूर्वी काही विष्णूमूर्ती होत्या याबाबत गो.नि.दांडेकर आपल्या 'दुर्गदर्शन' या पुस्तकात पान क्रमांक १६९ वर लिहितात ते पुढीलप्रमाणे:-

देऊळ हेंंच गडावरलं एकटंं नवल नव्हे. आश्चर्याचा पहिला भर ओसरल्यावर मग धांंवत चहूंं दिशांना सुटलों. मंदिराचा प्राकार सोडून बाहेर पडलों, तो उजव्या तास हेमाडपंन्ती बांधणीचा एक तलाव दिसला. त्याच्या दक्षिण दिशेला काळ्या पाषाणांत बांधलेले चौदा कोनाडे, अन् अतिशय नवलाची गोष्ट अशी, की त्या चौदा नकशीदार कोनाड्यांंत चतुर्भुज विष्णूच्या चौदा मूर्ती! चारी हातांंतील आयुधांच्या जागा मात्र निरनिराळ्या.

'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेख क्रमांक ५ 'हरी[श्चं]द्र देवो' हा जो उल्लेख आलेला आहे तो 'हरिश्चंद्रगड' येथील गडदेवता 'हरीश्चंद्रदेव' म्हणजेच 'हरीशचंद्रेश्वर' याचा उल्लेख आहे या 'हरीश्चंद्रदेव' यावरूनच या पर्वताचे नाव 'हरिश्चंद्रगड' असे पडले आहे. तसेच मागील एका लेखामध्ये आपण 'हरिश्चंद्रगड' याचे नाव कसे पडले याबाबत देखील आढावा घेतला तो देखील संदर्भ नक्की पाहावा. 

गडदेवता 'हरीश्चंद्रदेव' म्हणजेच 'हरीशचंद्रेश्वर' याचा उल्लेख आहे.

'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेखांमधून अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला समजते ती म्हणजे 'हरिश्चंद्रगडावरील' शिलालेख क्रमांक १, शिलालेख क्रमांक ३ आणि शिलालेख क्रमांक ४ या सर्व शिलालेखांच्यामध्ये 'वटेस्वर' या नावाचा उल्लेख आलेला दिसतो. यामध्ये शिलालेख क्रमांक ३ या लेखामध्ये 'श्री वटेस्वर शिवस्य प्रणति:' असे म्हटलेले आहे. वटेश्वर म्हणजेच शिव हे यावरून आपल्याला समजायला मदत होते. 'हरिश्चंद्रगडावरील' शिलालेख क्रमांक २ यामध्ये 'गुहेश्वर भैरव' हे 'हरिश्चंद्रगड' येथील देवतेचे नाव असावे किंवा एखाद्या तेथे राहणाऱ्या 'भैरव' या योग्याचे देखील नाव असावे. शिलालेख क्रमांक ६ मध्ये देखील काही नावे आहेत परंतु ती नावे अस्पष्ट झाली असल्याने  त्यांचा अर्थ लागत नाही.

'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेख क्रमांक ७ या शिलालेखात 'नंदनाथ' तसेच 'गयनाथ' ही नावे आलेली आहेत. तसेच शिलालेख क्रमांक ८ मध्ये 'दखिणनाथ' आणि त्यांचा शिष्य 'सकपनाथ' यांची नावे आलेली आहेत. परंतु या व्यक्ती कोण आहेत हे मात्र 'डॉ. वि. भि. कोलते' यांना हे माहिती नाही असे ते सांगतात. तसेच 'डॉ. वि. भि. कोलते' यांनी एक अनुमान याबाबत असेही काढलेले आहे कि हे कोणी नाथसंप्रदायातील योगी आहेत हे स्पष्ट होते मात्र हे 'गयनाथ' म्हणजे गहिनीनाथ असावेत काय? हा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. वरील सर्व शिलालेख पाहता आपल्याला असे मात्र दिसून येते कि 'हरिश्चंद्रगड' हे नाथपंथीयांचे खूप महत्वाचे ठिकाण होते.

'हरिश्चंद्रगडावरील' या आठ शिलालेखांच्या बद्दल आपल्याला आणखी उल्लेख मिळतो तो म्हणजे 'साद सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची' या 'प्र. के. घाणेकर' यांनी लिहिलेल्या ८४ क्रमांकाच्या 'हरिश्चंद्रगड' या प्रकरणात पान क्रमांक ३२५ येथे आठ शिलालेख असा उल्लेख केलेला असून यामध्ये प्र.के.घाणेकर लिहितात ते पुढीलप्रमाणे:-

याच परिसरात एकंदर आठ शिलालेख आहेत. पहिला आहे हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या प्राकाराच्या दर्शनी भिंतीच्या बाहेरील प्रवेशद्वाराचे डावीकडे. दुसरा व तिसरा केदारेश्वर लेण्याच्या मधल्या दोन खांबावर मध्यभागी. चौथा आहे हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिरातील लेण्याच्या दर्शनी डाव्या खांबावर, तर पाचवा, सहावा, आणि सातवा तेथेच आहेत. आठवा मात्र हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या डावीकडील भिंतीला बाहेरील बाजूने ओट्यावरील गणेशमूर्तीच्या मागील चौकटीवर, माथ्याच्या भागात आहे. पहिल्या व चौथ्या लेखांत चांगा वटेश्वराचा म्हणजे योगी चांगदेवांचा उल्लेख आहे.

दुर्गभटक्यांची पंढरी असलेल्या 'हरिश्चंद्रगड' येथे ८ ते ९ लेण्या आहेत.

तसेच शिवनेरी, नाणेघाट, हरिश्चंद्रगड व परिसर या पुस्तकामध्ये प्र.के. घाणेकर यांनी पान क्रमांक १०६ आणि १०७ यामध्ये 'प्र. के. घाणेकर' लिहितात ते पुढीलप्रमाणे:-

एका बाजूला सुटी श्रीगणेशमूर्ती. अलीकडेच तिलाही शेंदूर लावलेला दिसतो. या देवळाच्या पूर्व व दक्षिण दिशांना डोंगर खोदुन गुहा खोदलेल्या. पश्चिम व उत्तर (थोडा भाग) प्राकार भिंत पडून गेलेली. उत्तर प्राकार भिंतीवरील बाहेरील बाजूस प्रवेशद्वाराच्या डावीकडे खूप मोठ्या अक्षराचा अतिशय महत्वाचा शिलालेख:-

चक्रपाणी वटेश्वर:नंदतु तस्य सुतु वीकटदेॐ  

डॉ. रा. चिं. ढेरे यांच्यामते प्राकार भिंतीवर प्रवेशद्वाराच्या उजव्या हातासही काही अक्षरे आहेत. पुढे प्र. के. घाणेकर लिहितात हरिश्चंद्रगडावरील शिलालेखांचे वाचन करण्याचे २-४ प्रयत्न झाले. बहुदा पहिला श्री. गो. नि. दांडेकरांचा. दुसरा 'डॉ. वि. भि. कोलते' यांचा. तिसरा प्रयत्न 'डॉ. रा. चिं. ढेरे' यांचा. 'डॉ. रा. चिं. ढेरे' यांनी त्यांच्या 'चक्रपाणि' या ग्रंथात 'सिद्धपीठ हरिश्चंद्र' या लेखात खूप उहापोह केला आहे. श्री हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या मागील लेण्याच्या दर्शनी दोन खांबांपैकी डाव्या दगडी खांबावर डावीकडील बाजूस एक लेख आहे:-

"(चां) गा वटेस्वराचा"

असे त्या शिलालेखाचे वाचन आहे. याच खांबावर दर्शनी बाजूस आणखी तीन लेख आहेत ते असे:-

१) (नि) वृत (ति) पुत्र ज्ञाना (न) देउ नाम (दे) उ वारी स्त्रीधर देवदेउ स्त्रीहरी(श्चं)द्र देवो 

२) व्वाल्लर्वाकु सिवा स्त्री मह (हे) षाजचा 

३) .....देवी स्त्रीनंदनाषु (थु)वावि गयनाषु (थु)

हे तिनही लेख खुपच अस्पष्ट झालेले आहेत. त्यांचे पूर्ण वाचन करून अर्थ लावणे फार कठीण झाले आहे. या पाच शिलालेखांशिवाय आणखी एक शिलालेख हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या डावीकडील भिंतीला बाहेरील बाजूच्या ओट्यावर बसविलेल्या श्रीगणेशमूर्तीच्या मागील चौकटीच्या माथ्याकडील भागात आहे. 'श्री दषि (खि) णनाथ का सिष सकपनाथ' तसेच या लेखाच्या वरच्या बाजूस 'म (य) नाथ'  उथळ कोरलेली अक्षरे दिसतात.


दुर्गभटक्यांची पंढरी 'हरिश्चंद्रगड' आज खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेला आहे. डोंगरभटके या किल्ल्यावर येतात कोकणकड्याला भेट देतात 'इंद्रवज्र' बघण्यासाठी अनेक तास घालवतात मात्र हे शिलालेख मात्र फार कमी जण बघतात तसेच त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करतात. 'हरिश्चंद्रगड' येथील शिलालेख यांची आज मात्र दुरवस्था झालेली त्यामुळे ते वाचता नाही आले तरी त्यांचे जतन होणे फार महत्वाचे आहे.  

______________________________________________________________________________________________


संदर्भग्रंथ:-

१) Gazetteer of The Bombay Presidency  Ahmadnagar:- पान क्रमांक 718, 719, 720, 1884.
२) Notes on The Ahamadnagar Collectorate Indian Antiquery (Year V):- पान क्रमांक ११, W. F. Sinclaire.
३) Cave Temples of India:- पान क्रमांक ४७८, Fergusson James and Burges James, 1880.
४) दुर्गदर्शन प्रकरण ११ हरिश्चंद्र दुर्ग:- पान क्रमांक १७०, १७१, गो.नि.दांडेकर, मृण्मयी प्रकाशन, २००४.
५) महाराष्ट्रातील काही ताम्रपट आणि शिलालेख:- डॉ. वि.भि. कोलते, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, १९८७.
६) सार्थ अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी:- पान क्रमांक १३२,१३६, ओवी ३७, ओवी ६२ ,संत ज्ञानेश्वर महाराज, संपादक ह.भ.प. दत्तराज देशपांडे, सारथी प्रकाशन.
७) तत्वसार:- (१०२९- ३३चांगदेव महाराज.
८) ज्ञानेश्वरी:- अध्याय १८ ओवी १७८४. संत ज्ञानेश्वर महाराज.
९) तीन शोधनिबंध प्रकरण तिसरे चांगदेव राउळ - एक चिंतन:- डॉ. ब्रम्हानंद देशपांडे, परिचय प्रकाशन,

१०) साद सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची प्रकरण ८४. हरिश्चंद्रगड:- पान क्रमांक ३२५, प्र. के. घाणेकर, स्नेहल प्रकाशन, २०११.

११) शिवनेरी, नाणेघाट, हरिश्चंद्रगड व परिसर:- पान क्रमांक १०६, १०७, प्र. कें. घाणेकर, स्नेहल प्रकाशन, २००५.

१२) चक्रपाणि:- पान क्रमांक १६५, डॉ. रा.चिं. ढेरे.  

हरिश्चंद्रगड - एक प्राचीन दुर्गवैभव

Codingest

कळसुबाई रांगेच्या दक्षिणेस सह्याद्रीतील जे पहाड आहेत ते हरिश्चंद्रगडाचे पहाड म्हणून प्रसिद्ध आहेत. सह्याद्रीच्या घाटमाथ्याची सुरुवात ही खऱ्या अर्थी कळसुबाई हरिश्चंद्रगड येथून सुरु होऊन ती दक्षिणेस फोंडा घाटापर्यंत जाते.

समुद्रसपाटीपासून अदमासे ४५०० फूट उंचीवर वसलेला हरिश्चंद्रगड म्हणजे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध दुर्ग. सह्याद्रीतील नाणेघाट, माळशेज घाट आणि टोलार खिंड या प्राचीन घाटवाटांचा पहारेकरी म्हणून या गडाची ख्याती होती.

महाराष्ट्रातील ठाणे, नगर आणि नाशिक या जिल्ह्यांच्या सीमा कळसुबाई डोंगररांगेत एकमेकांना मिळाल्या आहेत. याच कळसुबाई रांगेच्या दक्षिणेस सह्याद्रीतील जे पहाड आहेत ते हरिश्चंद्रगडाचे पहाड म्हणून प्रसिद्ध आहेत. सह्याद्रीच्या घाटमाथ्याची सुरुवात ही खऱ्या अर्थी कळसुबाई हरिश्चंद्रगड येथून सुरु होऊन ती दक्षिणेस फोंडा घाटापर्यंत जाते.

गडावर जाण्यास एकूण चार मार्ग आहेत. पुण्याहून खिरेश्वर मार्ग, कल्याणहून सावर्णे-बेलपाडा मार्ग, नगर येथून पाचनई मार्ग आणि नळीची वाट. या चार मार्गांमध्ये पाचनई मार्ग सर्वाधिक प्रचलित आहे. 

पाचनई हे गाव समुद्रसपाटीपासून ८६६ मीटर उंचीवर असून येथून जाणारी वाट ही सदाहरित अशा अरण्यातून आपल्याला गडाच्या माथ्यावर घेऊन जाते. माथ्यावर सुरुवातीस एक छोटेखानी मात्र प्राचीन असे शिवमंदिर दृष्टीस पडते. मंदिराची स्थापत्यशैली ही १२ व्या शतकाहून पूर्वीची असावी असे लक्षात येते. मंदिरात शिवलिंग असून बाजूला मूर्ती व वीरगळ पाहावयास मिळते. मंदिराच्या समोर पाण्याचे एक छोटे कुंड देखील आहे.

येथून काही अंतरावर गडावरील लेण्यांचा प्रसिद्ध समूह दृष्टीस पडतो. या लेण्या प्राचीन असून लेण्यांच्या समोर एक भव्य पुष्करणी तलाव आहे. हा संपूर्ण परिसर हरिश्चंद्रेश्वर मंदिर आणि केदारेश्वर लेण्यांचा परिसर म्हणून ओळखला जातो व या परिसरात एकूण ८ यादवकालीन शिलालेख आढळले आहेत.  याच आसमंतात यादवकालीन चक्रपाणी वटेश्वर यांनी तत्त्वसार या ग्रंथाची निर्मिती केली होती. पुष्करणीच्या बाजूस एका भग्न मंदिराचे जोते व पाण्याचे खोदलेले टाके दृष्टीस पडते.

बाजूलाच गडाचे आदिदैवत हरिश्चंद्रेश्वराचे अतिशय देखणे हेमाडपंथी मंदिर आहे. अतिशय अद्भुत पद्धतीने बांधलेल्या या मंदिराची तुलना बुद्धगयेच्या मंदिरासोबत केली जाते. काळ्या पाषाणात घडवलेल्या या मंदिरातील देवाची पूजा चारही दिशांनी आत जाऊन करता येते मात्र मंदिराच्या गाभाऱ्यात शिरण्यापूर्वी मंगळगंगेवर बांधलेला छोटासा पूल ओलांडावा लागतो. पूल ओलांडताच समोर प्रवेशद्वाराच्या दोन बाजूस भव्य कीर्तिमुखे दिसतात. मंदिराच्या आवारात एक गणेशमंदिर असून आतील गणेशमूर्ती अतिशय भव्य व देखणी आहे व आवारात अनेक वीरगळी सुद्धा पाहावयास मिळतात.

परिसरात असंख्य मंदिरे, लेणी, गुहा आणि टाकी आहेत. हे सर्व स्थापत्य उभारण्यास किती कलाकारांचे हात लागले असतील याचा विचार करून मन थक्क होते. याच परिसरात प्रसिद्ध असे केदारेश्वराचे लेणे आहे. अदमासे ६०० फूट रुंद असलेली ही लेणी आतमध्ये पाच फूट खोदलेली असल्याने यामध्ये वर्षभर पाणी भरलेले असते. लेण्यात केदारेश्वराचे ३ फूट उंच व ६ फूट रुंद असे भव्य शिवलिंग असून शिवलिंगाच्या भोवती असलेल्या एकूण चार खांबांपैकी एकच खांब सुस्थितीत आढळतो. या संदर्भात अशी आख्यायिका आहे की हा खांब समस्त विश्वाचा भार सांभाळून आहे व ज्यावेळी हा खांब पडेल त्यावेळी प्रलय ओढवेल. लेण्याच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर शिवपूजनाचा प्रसंग कोरलेला दिसून येतो.

हे सर्व बांधकाम पाहता हा किल्ला पूर्वी एखाद्या राजवटीचे प्रमुख ठिकाण असावा हे लक्षात येण्यास वेळ लागत नाही मात्र गेल्या शेकडो वर्षात झालेल्या नैसर्गिक आणि परकीय आघातांनी या गडावरील पूर्वीचे वैभव आता राहिलेले नाही. 

हरिश्चंद्रगडाचा सर्वात रोमांचित करणारा भाग म्हणजे सुप्रसिद्ध असा कोकणकडा. मंदिरामागील सोंड ओलांडून पश्चिमेकडे पाऊण मैल पायवाटेने चालत गेल्यावर हा रौद्र भीषण कडा दृष्टीस पडतो. माथ्यापासून पायथ्यापर्यंत खाली ४००० फूट तुटलेला हा कडा अंतर्गोलाकार असून मध्यभागी अदमासे ५० फुटी भकळ आहे. कोकणकड्याची लांबी सुद्धा अदमासे २ मैल एवढी असावी.

हा किल्ला इतर किल्ल्यांहून अतिशय वेगळा असून प्राचीन काळातील दुर्ग जसाच्या तसा पाहावयाचा असल्यास हरिश्चंद्रगड हा किल्ला डोळ्यासमोर उभा राहतो. गडास एकूण तीन शिखरे असून त्यांची नावे तारामती, रोहिदास आणि हरिश्चंद्र अशी आहेत. यामधील तारामती हे शिखर सर्वोच्च असून त्यांची उंची समुद्रसपाटीपासून १४०० मीटर आहे.

महाराष्ट्राच्या प्राचीन दुर्ग संस्कृतीचे प्रतीक असा हा हरिश्चंद्रगड हा नुसताच गड नसून खऱ्या अर्थी हरिश्चंद्र पर्वतच आहे.

हरिश्चंद्रगड - DOT-Maharashtra Tourism - Maharashtra Tourism

Test Test Modified 7 Days ago.

हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात भारताच्या पश्चिम घाटावर आहे. हा एक डोंगराळ गड आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध ट्रेकिंग ठिकाणांपैकी एक आहे.  मुख्य आकर्षण म्हणजे कोकणकडा येथील सूर्यास्ताचे दृश्य.

जिल्हे/ प्रदेश 

अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र, भारत.

इतिहास       

हरिश्चंद्रगड हे महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज भागातील कोथळे गावात आहे. ऐतिहासिक दृष्ट्या हा गड माळशेजघाटाशी संबंधित आहे ज्याने आजूबाजूच्या प्रदेशाचे रक्षण आणि नियंत्रण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. हा किल्ला ६ व्या शतकात, कलाचुरी घराण्याच्या कारकिर्दीत बांधला गेला. या गडात ११ व्या शतकातील विविध गुहा, भगवान शिव आणि विष्णूच्या मूर्ती धारण करणारी मंदिरे आहेत. नंतरच्या काळात मुघलांकडून मराठ्यांनी पुन्हा या गडावर नियंत्रण मिळवले.  येथील शिव मंदिरावर एक मोठा खडक आहे आणि त्याच्या सभोवतालचे चार खांब पाण्याच्या तलावातील गुहेला आधार देतात. या बाबत अशी आख्यायिका आहे कि हे चार खांब सत्य, त्रेता, द्वापार आणि कली या चार युगाचे प्रतिनिधित्व करतात. असे मानले जाते की प्रत्येक युगाच्या शेवटी एक खांब स्वतःहून तुटतो. किल्ल्यावरील विविध बांधकामे येथील विविध संस्कृतींच्या खुणा दर्शवितात.

भूगोल

हरिश्चंद्रगड पुणे, ठाणे आणि अहमदनगरच्या सीमारेषेवर आहे. हा गड माळशेजघाटाजवळील जुन्नर भागात आहे. खिरेश्वर गावापासून ८ किमी अंतरावर, भंडारापासून ५ किमी, पुण्यापासून १६६ किमी आणि मुंबईपासून २१८ कि.मी. येथील डोंगर रांगेची उंची समुद्रसपाटीपासून ४७१० फूट उंचीवर असून कोकणकडा (कड्याची) उंची ३५०० फूट आहे. हरिश्चंद्राची तारामती (सर्वोच्च), रोहिदास आणि हरिश्चंद्र ही ३ शिखरे आहेत. या किल्ल्याला विविध वनस्पती आणि प्राणिमात्रांसह डोळ्यांचे पारणे फिटेल असे नैसर्गिक सुंदरता मिळाली आहे. हा ट्रेक तुम्हाला वनविभाग, भातशेती, मोठे खडकांचे ठिपके, उंच पर्वत आणि लहान ओढे यांचे दर्शन घडवेल.

हवामान       

या प्रदेशात वर्षभर उष्ण-अर्ध-शुष्क हवामान असते आणि सरासरी तापमान १९-३३ अंश सेल्सिअस असते.

एप्रिल आणि मे हे सर्वात उष्ण महिने असतात जेव्हा तापमान ४२ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

हिवाळा अत्यंत तीव्र असतो आणि रात्री तापमान १० अंश सेल्सिअस इतके खाली जाऊ शकते, परंतु दिवसाचे सरासरी तापमान सुमारे २६ अंश सेल्सिअस असते.

प्रदेशात वार्षिक पाऊस सुमारे ७६३ मिमी आहे.

करायच्या गोष्टी       

हरिश्चंद्रगडासह खालील ठिकाणी भेट देऊ शकता:

● केदारेश्वर गुहा - प्राचीन भारतातील दगडातून शिल्पे कोरण्याच्या ललित कलेचे हे मंदिर एक अद्भुत उदाहरण आहे. मंगल गंगा नदीचा उगम मंदिराच्या जवळ असलेल्या एका टाक्यातून झाल्याचे सांगितले जाते.

● कोकण कडा - हरिश्चंद्रगड येथील एक विशाल खडक जो कोकण आणि सूर्यास्ताचे नेत्रदीपक दृश्य पाहता येते.

● केदारेश्वर गुहेत- या गुहेतील शिवलिंग बर्फा सारख्या थंड पाण्याने वेढलेले आहे. पावसाळ्यात आजूबाजूचा परिसर पाण्याने बुडाल्यामुळे ही गुहा उपलब्ध होत नाही.

● तारामती शिखर- तारामाची म्हणून ओळखला जाणारा हा गडावरील  सर्वात वरचा बिंदू आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे. या शिखरापलीकडील जंगलात बिबट्या दिसतात. या ठिकाणाहून नाणेघाटाची संपूर्ण रेंज आणि मुरबाडजवळील बाले-यांची झलक आपल्याला पाहायला मिळू शकते.

जवळचे पर्यटन स्थळ        

आपण एका दिवसासाठी हरिश्चंद्रगड सहल करू शकता. यात एक्सप्लोर करण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. तथापि, आपल्याला हवे असल्यास इतर किल्ले आणि भेट देण्याची ठिकाणे आहेत. त्यापैकी काही आहेत:

● पिंपळगावजोगे धरण (८. ४ कि.मी.) : ओतूर, जुन्नर, नारायणगाव आणि आळेफाटा सारख्या भागांना पाणी पुरवणारे हे पुष्पवती नदीवरील धरण आहे. ट्रेक पूर्ण केल्यानंतर तुम्ही धरणाला भेट देऊ शकता आणि तलावाच्या बाजूला राहू शकता. आपला तंबू घेऊन तिथेही तळ ठोका.

● रिव्हर्स धबधबा (१५ किमी) : ही एक पर्वतरांग आहे जिथे पाणी उलट्या दिशेने वाहते. याचे कारण पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे. हरिश्चंद्रगड ट्रेक संपल्यानंतर तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता.

● अमृतेश्वर मंदिर : हे राजा झांज यांनी बांधलेले शिवमंदिर आहे. हे १२०० वर्षांहून अधिक जुने मानले जाते. या मंदिरात काळ्या आणि लाल दगडांनी बांधलेले काही सुंदर खडकाळ कोरीव काम आहे. हे ठिकाण महाराष्ट्राचे काश्मीर म्हणूनही ओळखले जाते. तर, केवळ सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी या मंदिराला भेट दिली पाहिजे.

● माळशेज घाट (५. ३ किमी): सुंदर बांधलेले धरण आणि उंच, उदात्त किल्ल्यांपर्यंत मंत्रमुग्ध करणारे धबधबे, माळशेज घाट निसर्ग प्रेमींच्या आनंदासाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे. खडकाळ भाग, हिरवीगार झाडे आणि धुळीच्या थरांमधून डाइविंग करणे या सारखा आनंद घेता येतो.

अंतर आणि आवश्यक वेळेसह रेल्वे, हवाई, रस्ता (ट्रेन, उड्डाण, बस) द्वारे पर्यटन स्थळाचा प्रवास कसा करावा

  • मुंबईपासून अंदाजे २०१ किमी  अंतरावर, येथे पोहोचण्यासाठी NH३ चे अनुसरण करून सामान्य रहदारी दिवशी ४ तास आणि ३० मिनिटांच्या आत येथे पोहोचता येते घोटी-शुक्लतीर्थ रोड किंवा खंबाळे येथील नागपूर-औरंगाबाद-मुंबई महामार्ग. मुंबईहून कल्याण, खुबीफाटा ते खिरेश्वर हा सर्वात चांगला मार्ग आहे. तुम्ही शिवाजीनगर एसटी बस स्टँड (पुणे) पासून खिरेश्वर गावापर्यंत रोज बसने जाऊ शकता. वैकल्पिकरित्या, कल्याणहून बसने  माळशेजघाटमार्गे आळेफाटा येथे जाता येते.
  • सर्वात जवळील रेल्वे स्थानक इगतपुरी आहे, जे ४१ किमी (१ तास २० मि.) अंतरावर आहे
  • मुंबईतील छत्रपती शिवाजी विमानतळ हे १५४किमी (४तास २५ मि.) येथील सर्वात जवळचे विमानतळ आहे.

विशेष खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल

  • महाराष्ट्रीयन जेवण झुणका भाकर हे या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे, किल्ल्यावर अन्न उपलब्ध नसले तरी. जवळच्या हॉटेल्समध्ये जेवण मिळू शकते.
  • निवास सुविधा जवळ आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट
  • किल्ल्याच्या परिसरात खूप कमी हॉटेल्स उपलब्ध आहेत.
  • कार्यालय/पोलीस स्टेशन        सर्वात जवळचे हॉस्पिटल ९३ किमी अंतरावर आहे.
  • सर्वात जवळचे पोस्ट ऑफिस १२. ४ किमी अंतरावर आहे.
  • सर्वात जवळचे पोलीस स्टेशन ९५ किमी अंतरावर आहे.

भेट देण्याचा नियम आणि वेळ, भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिना

  • या ठिकाणी भेट देण्यासाठी कोणतीही कालमर्यादा नाही.
  • किल्ला आणि प्रेक्षणीय स्थळांचा आनंद घेण्यासाठी हरिश्चंद्रगडाला भेट देण्याची ऑक्टोबर ते मार्च ही सर्वोत्तम वेळ आहे. तथापि, येथे खूप पाऊस पडतो त्यामुळे नैसर्गिक धबधबे आणि ओसंडून वाहणाऱ्या धरणांचा आनंद घेऊ शकतो.
  • पावसाच्या दिवशी ट्रेकिंगची शिफारस केली जात नाही कारण उतार खूप निसरडे होऊ शकतात.

परिसरात बोलली जाणारी भाषा    

इंग्रजी, हिंदी, मराठी.

सह्याद्रीच्या कुशीत अनेक ट्रेकिंग पॉईण्टस आहेत. त्यातील हरिश्चंद्रगड म्हणजे हौशी ट्रेकर्सचा, दुर्गवेड्यांचा ‘विक पॉईण्ट’. ‘भटक्यांची पंढरी’ म्हणून ओळख असलेल्या त्या गडाच्या परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण भूरूपे, कातळ शिल्पे, खोल दऱ्या, उरात धडकी भरवणारे उभे कडे, समृद्ध वनसंपदा, प्राचीन वास्तू कलेचे दर्शन घडवणारी देखणी मंदिरे, लेणी समूह…

सह्याद्रीत अनेक कोकणकडे आहेत, परंतु हरिश्चंद्र गडाचा हा थोरला कडा म्हणजे सृष्टीला पडलेले सुंदर स्वप्नच जणू! देशभरात अत्यंत दुर्मिळ दिसणाऱ्या वर्तुळाकार इंद्रधनुष्याचा (इंद्रवज्र) अद्भुतरम्य देखावा काही दुर्गवेड्यांनी तेथे पाहिला आहे. म्हणूनच तो गड हा एक अनमोल ठेवा आहे.

एकेकाळी अतिशय दुर्गम व लोकवस्तीपासून दूर असलेल्या हरिश्चंद्रगडाने महायोगी संत चांगदेवापासून निसर्गवेड्या मिलिंद गुणाजीपर्यंत अनेक दुर्गवेड्यांना, हौशी पर्यटकांना मोहित केले आहे. वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक, भूगर्भशास्त्रवेत्ते, भाषा अभ्यासक, धाडसी गिर्यारोहक, विरक्त योगी आणि सामान्य श्रद्धाळू असे कितीतरी जण त्या गडाच्या प्रेमात पडले. तो गड पाचव्या शतकातील त्रेकुटक व कलचुरी राजघराण्याच्या कारकिर्दीपासून प्रसिद्ध आहे. स्कंद, अग्नी व मत्स्य पुराणात त्याचा उल्लेख आहे. इंग्रजी सैन्यातील अधिकारी कर्नल माकिनटोशच्या फौजेने मराठेशाहीच्या अखेरच्या युद्धात मे १८१८ मध्ये गड काबीज केला. त्याने किल्ल्याच्याही अवघड वाटा, पाण्याची टाकी, तटबंदी उध्वस्त केली. मात्र त्याने हरिश्चंद्रेश्वराचे देखणे मंदिर व लेण्यांना धक्का लावला नाही. गेल्या काही वर्षात ऊन, वारा, पाऊस या बाह्य कारणांनी मात्र त्या प्राचीन वास्तूच्या वैभवास सुरुंग लावले आहेत. मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. कळसापर्यंत पंचावन्न ते साठ फूट उंचीच्या मंदिराच्या भिंतीवर पायऱ्यांवर आकर्षक व शैलदार कोरीव काम केलेले आहे. सभामंडपाच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी पूर्व व पश्चिम अशा दोन बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत. मंदिराच्या दक्षिणेकडील बाजूस कोरीव गणेशमूर्ती असून, मूर्तीच्या वरील बाजूस देवनागरी लिपीत शिलालेख कोरलेला आहे. बांधीव मंदिराच्या प्रांगणाला बंदिस्त करण्यासाठी प्राकाराची भिंत बांधलेली आहे. मंदिराच्या पश्चिमेस दोन ऐसपैस गुहा आहेत. त्यातील एका प्रशस्त गुहेच्या तळघरात योगी चांगदेव तपश्चर्येला बसत असल्याचे सांगितले जाते. तेथेच चांगदेवांनी ‘तत्त्वसार’ या प्रसिद्ध ग्रंथाची रचना केली. मंदिर परिसरातील शिलालेख त्याची साक्ष देतात. शेजारील गुहेत विठ्ठल – रुख्मिणीची मूर्ती वारकरी सांप्रदायाच्या संदर्भाने मनात कुतूहल निर्माण करते. गुहेलगत पाण्याची दोन टाकी आहेत. भिंतीशेजारून एक प्रवाह उत्तरेकडे उताराच्या दिशेने वाहत जातो. त्या प्रवाहाला चांगदेवांनी ‘मंगळगंगा’ म्हटले आहे. प्रवाहावर पुलासारखे बांधकाम असून तेथूनच पूर्वेकडून मंदिरात प्रवेशता येते. त्या वास्तुवैभवाला बाह्यकारकांची जणू दृष्ट लागली असून, कालौघात प्राकाराची भिंत व मंदिराच्या पश्चिम बाजूची मोठी पडझड झाली आहे. त्यातील काही दगड मंगळगंगेच्या वेगवान प्रवाहाबरोबर घरंगळत लांबवर गेले आहेत.

हरिश्‍चंद्र गडमंदिराच्या उत्तरेला घारापुरीच्या लेण्याची आठवण करून देणारी भव्य गुंफा आहे. ते केदारेश्वराचे लेणे. गुहेत चौथऱ्यावर भव्य शिवलिंग आहे. त्याच्या चारही बाजूंला बारा महिने थंडगार पाणी असते. चौथऱ्याच्या चार कोपऱ्यांवर छतापासून कोरलेले खांब असले तरी त्यांपैकी तीन पूर्णपणे तुटले आहे. त्यांचा अर्धवट भाग लोंबकळत आहे. लेण्याच्या दर्शनी बाजूच्या कोरलेल्या खांबांपैकी तीन खांबांवर अस्पष्ट शिलालेख दिसतात.

मंदिराच्या पूर्वेला हेमाडपंथी वापी म्हणजेच सप्ततीर्थ (सर्वतीर्थ) आहे. त्या प्रशस्त तीर्थकुंडात डिसेंबरअखेरपर्यंत पाणी असते. कुंडांच्या दक्षिणेला चौदा देवळ्यांमध्ये चौदा विष्णुमूर्ती विराजमान होत्या. देवालयाची व या बांधीव तीर्थकुंडाची मोठी पडझड झाली. तेथील काही विष्णुमूर्ती गायब झाल्या तर उर्वरित विष्णुमूर्ती मंदिरामागील गुहेत अस्ताव्यस्त पडल्या आहेत. तीर्थकुंडासमोर छोटेखानी मंदिर असून, ते काशितीर्थ नावाने ओळखले जाते. मंदिरासमोर अपूर्ण शिल्प आहे. त्याचा अर्थबोध होत नाही. मंदिराचीदेखील मोठी पडझड झाली आहे.

तारामती शिखराच्या उत्तरेला पायथ्याशी नऊ लेण्यांचा समूह आहे. त्या लेण्यांच्या दर्शनी बाजूच्या चौकटीवर गणेशमूर्ती कोरलेल्या आहेत. अभ्यासकांच्या मते ही लेणी दहाव्या किंवा अकराव्या शतकातील असावीत. समूहातील दुसरे लेणे आकाराने सर्वात मोठे आहे. तिसरी गुंफा अपूर्ण अवस्थेत आहे. त्या गुंफेचे वैशिष्ट्ये म्हणजे तेथे सहा फुट उंचीची भव्य गणेशमूर्ती आहे. मूर्तीचे बारकाईने निरीक्षण केल्यास ती दिगंबर अवस्थेत असल्याचे दिसते. दिगंबरावस्थेतील गणेशमूर्ती अतिशय दुर्मीळ असल्याचे सांगितले जाते. समोरच्या गणेश मंदिरातील मूर्तीदेखील दिगंबरावस्थेत आहे.

गडावर इतिहासाची साक्ष देणारे आठ शिलालेख आहेत. विदेशी संशोधकांनी सर्वप्रथम त्या लेखांकडे लक्ष वेधले. जेम्स फर्ग्युसन, जेम्स बर्जेस, सिंक्लेअर यांनी प्रथम त्यावर टिपणे तयार केली. गो. नी. दांडेकर, रा.चिं. ढेरे, वि.भी.कोलते, म.रा.जोशी, आनंद पाळंदे, राजेश्वर गोस्वामी आदींनी शिलालेखांचे वाचन केले आहे. ‘तत्वसार’च्या शेवटी एका ओवीत शके १२३४ ला हरिश्चंद्र गडावर ग्रंथ पूर्ण केल्याचा उल्लेख आहे. प्राचीन काळात हा गड धर्मपीठ म्हणून मान्यता पावलेला होता.

गडावरील कातळ शिल्पे…

हरिश्‍चंद्र गडहरिश्चंद्रगडावरील सर्व भूरूपे म्हणजे निसर्गनिर्मित भव्य शिल्पेच आहेत! सामान्यभ्रंशामुळे तयार झालेला येथील रौद्रभीषण तरीही मोहक असणारा कोकणकडा, गडाच्या माथ्यावरील बालेकिल्ला, तारामती शिखराच्या पश्चिमेकडील उतारावर एकावर एक रचल्यासारख्या शिळा दिसतात. सकृतदर्शनी ती कुणाची तरी रिकामपणाची कामगिरी वाटते. मात्र वस्तुस्थिती तशी नाही. उन, वारा, पाऊस यांसारख्या बाह्यकारकामुळे झालेल्या झीजेचा तो परिणाम असून, भौगोलिक भाषेत झाला tor असे म्हणतात.

दख्खनचे पठार ज्वालामुखीच्या भेगी उद्रेकापासून निर्माण झाले. लाव्हा रसापासून सह्याद्री पर्वताची निर्मिती झाली. साडेतेरा कोटी वर्षांपूर्वी भूगर्भातून उफाळून आलेला हा लाव्हा पृष्ठभागावर क्षितीज समांतर पसरून दख्खनच्या पठाराचा जन्म झाला. उन, वारा, पाऊस यामुळे त्याची झिज होत राहिली आणि त्याला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले. निसर्गनिर्मित अशी अनेक शिल्पे गडावर पाहण्यास मिळतात.

सामान्यभ्रंशामुळे तयार झालेला येथील कोकणकडा वर्षानुवर्षे धाडसी गिर्यारोहकांना साद घालत आहे. भ्रंश रेषेच्या एका बाजूची (पश्चिमेची) भूमी खाली सरकल्याने कड्यासारखा तीव्र उतार तयार झाला आहे. सुमारे दोन हजार फूट खोलीचा तो सरळसोट उतार हे तर कोकणकड्याचे रौद्रभीषण तरीही मोहक वाटणारे रूप. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत अनेक कोकणकडे आहेत. पण अंतर्वक्र नालाकृती कोकणकड्याची सर कोणत्याच कड्याला येणार नाही. कितीतरी वेळ बघत बसले तरी मन तृप्त होत नाही. त्या कड्याचे सौंदर्य, मोहकता न्याहळताना अनामिक भीतीने अंगावर काटा येतो. तरीही भयमिश्रित कुतूहलाने तेथे येणारा प्रत्येकजण त्याचे ते रौद्र रूप पुन्हा पुन्हा पाहत बसतो; डोळ्यांत साठवण्याची धडपड करतो. तेथील पावसाळ्यातील धुक्याचा अनुभव तर केवळ स्वप्नवतच! काळजात धडकी भरवणाऱ्या त्या कड्यालाही काही धाडसी गिर्यारोहकांनी नमवले आहे. अरविंद बर्वे नामक मुंबईकर निसर्गवेड्या तरुणाने तर स्वतःला त्या कड्यावरून खाली झोकून देऊन आपली इहलोकीची जीवनयात्रा संपवली. गडावरच्या पाण्याची व्यवस्था नष्ट करतानाच बालेकिल्ल्यालाही त्या गोष्टीची झळ बसली तशीच ती कोकणकड्यालाही बसली. माकिनटोश नामक ब्रिटीश सेनाधिकाऱ्याने कड्यावर चढाई करताना आधारासाठी असलेल्याय खोबणीची पुरती नासधूस केली.

इंद्रवज्राचा देखावा

कड्यावरून अतिशय दुर्मीळ असे वर्तुळाकार इंद्रधनुष्य दिसल्याची नोंद कॅप्टन साईक्स या इंग्रज अधिकाऱ्याने करून ठेवली आहे. ते अद्भुत दृश्य पश्चिमेस धुके आणि पूर्वेकडून सूर्यप्रकाश असला आणि रिमझिम पाऊस सुरू असला तरच दिसू शकेल. अशा विशिष्ट वेळी साईक्स घोड्यावरून रपेट मारत तेथे आला आणि त्याला त्याच्या सहकाऱ्यांसह त्याची प्रतिमा समोरच्या गोलाकार इंद्रधनूत पाहण्यास मिळाली. तो अचंबित झाला. कडा पाहण्यासाठी मंदिरापासून पश्चिमेस दोन किलोमीटर पायपीट करावी लागते.

बालेकिल्ला

हरिश्चंद्रगडाच्या दक्षिण माथ्यावर तोलारखिंडीतून वर चढून गेल्यावर डाव्या हाताला व्होल्कॅनिक प्लगसारखी (म्हणजे भूगर्भातील लाव्हा बाहेर पडतो ते मुख) रचना दिसते. लाव्हा रस बाहेर पडण्याच्या क्रियेमुळे तो भूभाग बाजूच्या भूभागापेक्षा उंच झालेला आहे. तोच हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला होय. तेथून कळसुबाई, रतनगड, आजोबा, घनचक्कर, भैरव, कुलंग,अलंग, मदन असा उत्तरेकडील तर माळशेज घाट, भैरव, नानाचा अंगठा, जीवधन यांपर्यंतचा दक्षिण पश्चिमेकडील मुलुख दृष्टिक्षेपात येतो. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी खास असा रस्ता नाही; मस्त रान तुडवत रस्ता शोधत जाणे हाच मार्ग!

हरिश्‍चंद्र गड

तारामतीच्या शिखरावरील टॉर (tor)

हरिश्‍चंद्र गडहरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराच्या दक्षिणेकडील शिखर म्हणजे तारामती शिखर. त्या शिखराची समुद्र सपाटीपासूनची उंची चार हजार सातशे बहात्तर फुट इतकी आहे. शिखराच्या दक्षिणेला तीव्र उताराचा कडा आहे. शिखराच्या धारेवरून पश्चिम बाजूला एकमेकांवर मुद्दाम रचून ठेवल्यासारख्या बऱ्याच शीळा (गाडग्या-मडक्याच्या उतरंडी प्रमाणे) दिसतात. प्रथमदर्शनी ती कामगिरी रिकामटेकड्या गुराख्याची असावी असे वाटते. मात्र वस्तुस्थिती तशी नसून ऊन, वारा आणि धो-धो कोसळणाऱ्या पावसाच्या क्रियेमुळे त्यातील मृदू खडकाची झीज होऊन त्यांचे विदारण झाले आणि कठीण खडक एकमेकांवर रचून ठेवल्याप्रमाणे दिसू लागले. भौगोलिक भाषेत त्याला tor असे म्हणतात. माथ्याचे ते दुर्मीळ असे वैशिष्ट्य. तेथेच विविधरंगी स्फटिके व खनिजे आढळून येतात. मात्र भटकंती करणाऱ्याने धोपटमार्ग सोडल्याखेरीज त्याला तेथील भू-शिल्पे दिसणार नाहीत. पश्चिमेला एकांटी मोठ्या दिमाखात उभे असलेले, तुलनेने कमी उंचीचे शिखर म्हणजे रोहिदासाचे शिखर. मात्र पुराणकाळातील हरिश्चंद्र राजा, तारामती व रोहिदास यांचा या शिखरांशी अर्थाअर्थी काही संबंध नाही.

रेड बोलची कपार

पाचनई गावातून गडाची चढण चढताना अंगावर येणाऱ्या उंच कड्याच्या अजस्र कपारीत खडकांच्या दोन थरांच्या मध्ये लाल-हिरवी राख सापडते. तिला भौगोलिक भाषेत ‘रेड बोल’ म्हणतात. ज्वालामुखीच्या भेगी उद्रेकामुळे भूपृष्ठाला तडे गेले, मोठमोठ्या भेगा पडल्या, भ्रंश झाले. त्यानंतर त्या दख्खनच्या पठारावर पर्वत, पठारे, टेकड्या तयार झाल्या. त्या नैसर्गिक घटना तेवढ्यावरच थांबल्या नाहीत. सोसाट्याचा वारा, धो-धो कोसळणारा पाऊस त्यावर तुटून पडला. उन्हाचा आणि थंडीचाही त्यावर परिणाम होऊ लागला. त्यामुळे सतत क्षरण कार्य होत राहिले. मूळचे भू-आकार पुन्हा बदलू लागले. काही पर्वतांची उंची कमी होऊ लागली आणि पाण्याच्या वेगवान प्रवाहांनी दऱ्या खोल होत गेल्या. तेथील नव्वद टक्के झीज पावसाने केली असून, त्यातूनच निसर्ग नावाच्या शिल्पकाराने असंख्य शिल्पे निर्माण केली!

गड परिसरातील जैवविविधता

हरिश्‍चंद्र गडभौगोलिक व नैसर्गिक अनुकूलतेमुळे हरिश्चंद्रगडाच्या परिसरात जैविक विविधताही मोठ्या प्रमाणावर आहे. त्या बाबतीत ‘हरिश्चंद्रा’चे जंगल देशातील समृद्ध ठिकाणांपैकी एक समजले जाते. असंख्य प्रकारच्या वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक व सरपटणारे प्राणी या सगळ्यांचे तेथे वैपुल्य आहे. गडावर स्वयंचलित वाहने जाण्याची सोय नसल्याने मानवी हस्तक्षेपापासून परिसर पुष्कळ सुरक्षित आहे.

गडाच्या माथ्यावर उत्तराभिमुख उतारावर सदाहरित जंगलाचा हिरवाजर्द पट्टा दिसतो आणि पठारावर असंख्य अल्पजीवी वनस्पती आढळतात. त्या पावसाळ्यात सजीव होतात. तेथे सुमारे पाच हजार मिलीमीटरच्या आसपास पाऊस कोसळतो. पावसाळा सुरू झाला की एरवी भकास वाटणारी तेथील पठारे हिरव्या चैतन्याने बहरतात. राजतेरडे, रानतीळ, रानकांडे, रानलसूण, सोनकी, पालेचिराईत, डायसोफिलिया, सायप्रस, शेराला अशा असंख्य अल्पजीवी वनस्पती सर्वत्र डोकावू लागतात. त्यांना फुलेही अवघ्या पंधरवड्यात येऊ लागतात. पठार जांभळ्या, हिरव्या, पिवळ्या, तांबड्या, गुलाबी अशा विविधरंगी रंगछटांनी नटून जाते. जुलै ते ऑक्टोबर या काळात पठारावर फुलोत्सवच सुरू असतो.

हरिश्चंद्रगडाच्या परिसरात जांभूळ, रामेठा, बामणी, दिंडा, सुरुंगी, फापती, करवंद, आंबा, पळस, फणस, शाल्मली, हिरडा, पळसवेल, पांढरी आदी वृक्ष आढळतात. वृक्षांची उंची कमी असते. घनदाट वृक्षांवर चढलेल्या राक्षसी वेली आणि खाली दाट उंच गवत, हे तेथील जंगलाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. इमारतीसाठी किंवा फर्निचरसाठी त्या लाकडांचा उपयोग नाही. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या उपयुक्त नसल्याने जंगलतोडीचे प्रमाण कमी आहे. मात्र जैविकदृष्ट्या त्या वनांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

हरिश्‍चंद्र गडकारवी ही वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती सह्याद्रीच्या माथ्यावर हजार-बाराशे मीटर उंचीवर आढळते. तिचे विपुल अस्तित्व हरिश्चंद्रगडाच्या चहुबाजूंनी आहे. ती दर सात वर्षांनी जांभळ्या रंगाच्या फुलांनी बहरते. वनस्पती फुललेल्या काळात पाहणे, ही अपूर्व आनंद देणारी घटना असते. कारवीने डोंगरउतारावरील मातीचे संधारण करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. गिरिभ्रमण करणाऱ्यांनाही कारवीचा मोठा आधार तीव्र चढणीच्या अवघड पायवाटेने चढत असताना असतोच. अन्यथा डोंगरउतारावरील खोल दरीकडे पाहून अनेकांचे डोळे गरगरल्याशिवाय राहिले नसते. कोणत्याही रस्त्याने गडावर जाताना कारवीची भेट होतेच. फुले येऊन गेल्यावर कारवी मरते. नव्या कारवीचा दरवर्षी जन्म होतो.

तारामती शिखराच्या उत्तर उतारावरील विस्तीर्ण पठारावर मोठी झाडी, झुडपे कमी असली तरी असंख्य अल्पजीवी वनस्पतींचे वसतिस्थान तेथे आहे. अभ्यासकांनी त्याबाबत अभ्यास व सर्वेक्षण केले आहे. उन्हाळ्यात वाळलेल्या गवतामुळे आणि दिवसादेखील तालात गाणाऱ्या रातकिड्यांच्या आवाजाने भकास वाटणारे ते निर्जन पठार पावसाळ्यात चैतन्याने न्हाऊन निघते. पिवळी सोनकी फुलल्यावर सारे पठार पीतवर्णी शालू पांघरते. कळलावी, चित्रक, देवनाळ, शतावरी, पांढरी यांसारख्या दुर्मीळ औषधी वनस्पतींचा तेथे आढळ आहे.

कळसुबाई अभयारण्यात कोल्हे, रानडुकरे, तरस, भेकर, खोकड, ससे, बिबटे, रानमांजर, साळींदर व भीमाशंकर अभयारण्य ज्यासाठी प्रसिद्ध आहे ते शेकरू त्या परिसरात आढळतात. मात्र बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. गरुड, ससाणे, खंड्या, बुलबुल, पर्वत कस्तूर, सुतार, मोर, तित्तर, पारव, घार, सुभग या पक्ष्यांचाही तेथील परिसरात वावर असतो. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये नाग, फुरसे, घोणस, मण्यार या जातींचे विषारी साप त्या भागात आढळतात. विषारी- बिनविषारी इतर सापांचेही वास्तव्य असतेच.

संशोधन व सर्वेक्षण

हरिश्‍चंद्र गडगडावर पर्यटकांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत आहे. ३१ डिसेंबरला तर तेथे जत्रेचे स्वरूप येते.

शिलालेखांचा उल्लेख १८८४ च्या नगर जिल्ह्याच्या गॅझेटिअरमध्ये आढळतो. त्यात जेम्स फर्ग्युसन, जेम्स बर्जेस, सिंक्लेअर यांचा समावेश आहे. शिलालेख वाचण्याचे काम वि. भि. कोलते, रा. चिं. ढेरे या देशी संशोधकांनी केले. त्याशिवाय म.रा. जोशी, आनंद पाळंदे, गो,नी,दांडेकर, राजेश्वर गोस्वामी, मिलिंद बोकिल आदींनी त्या गडाला भेट देऊन इतिहास, भाषा व आध्यात्मिक दृष्ट्या अभ्यासात भर घातली. ज्ञानदेवादी भावंडेदेखील तेथे येऊन गेल्याचा उल्लेख यात्रापर्वात एका लेखात आढळतो. तो लेख सुवर्णाक्षरांनीच मढवण्यात यावा अशी ‘गोनीदां’ची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

गड तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांचेही आकर्षणबिंदू ठरल्याचे उपलब्ध कागदपत्रे व नोंदींवरून दिसून येते. साईक्स नावाच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्याने तर तेथे बांधकामही केले होते. त्याचे अवशेष तेथे दिसतात. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या चरित्रात, ते ठाण्याचे उपजिल्हाधिकारी असताना (सन १९२९) गडावर आल्याचा उल्लेख आहे. त्यांना गडावरच थंडी वाजून आल्याने त्यांना डोली करून खाली नेण्यात आल्याचा मजकूर त्यांच्या चरित्रात आहे.

त्याखेरीज कितीतरी योगी सिद्धसाधक तेथे येऊन गेल्याचे उल्लेख आहेत. शैव, वैष्णव तसेच शाक्त संप्रदायांचे अवशेषही तेथे सापडतात.

हरिश्‍चंद्र गडतेथील वनस्पतीसृष्टीचे संशोधन ब्रिटिश काळापासून सुरू झाले आहे. १९०८ सालात तत्कालीन मुंबई इलाख्याचे (बॉम्बे प्रेसिडेन्सी) वनस्पती शास्रज्ञ डॉ. कुक यांनी तेथील झाड-झाडोऱ्याचा अभ्यास केला. १९६९ मध्ये पुणे येथील वनस्पती संरक्षणालयातील डॉ.बिलोरी व डॉ. हेमाद्री या दुकलीने तेथील तीनशेतीस जातींच्या वनस्पतींची नोंद केली आहे. त्याच विभागातील डॉ. सिंग व डॉ. प्रधान यांनी १९९० मध्ये गडाला भेट देऊन अभ्यास केला. तर संगमनेर येथील संशोधक प्रा. डॉ. मोहन वामन यांनी तेथील वनस्पतीसृष्टीचा तपशीलवार अभ्यास केला आहे. तेथील वनस्पतीसृष्टीचे ते महत्त्वाचे संशोधन मानले जाते. गुणवैशिष्ट्यांनुसार विश्लेषण करताना डॉ. वामन यांनी सहाशेएकोणतीस वनस्पतींची नोंद केली आहे. त्यात देशभरातूनच नामशेष होण्याच्या मार्गावरील ऐंशी औषधी वनस्पतींचे अस्तित्व त्यांनी शोधून काढले आहे. तर सोळा प्रकारच्या ऑर्किड जातीच्या वनस्पती त्यांनी निदर्शनास आणून दिल्या आहेत.

भीमाशंकर अभयारण्य ज्या शेकरू जातीच्या खारीसाठी देशभर प्रसिद्ध आहे, ती शेकरू तेथील तोलारखिंड परिसरात बऱ्यापैकी संख्येने दिसून येते. इतरही विविध प्राण्यांचे वसतिस्थान येथे आहे. तेथील प्राणिसृष्टीवर हवा तेवढा अभ्यास झालेला दिसत नाही. त्याचप्रमाणे तेथील भूगर्भशास्त्राच्या अभ्यासालादेखील बराच वाव असल्याचे दिसून येते. गडाच्या पायथ्याशी असलेल्या कोथळे, पाचनई, लव्हाळी, कुमशेत, खिरेश्वर येथील आदिवासींचे गडाशी भावनिक नाते जुळलेले आहे. ते लोक महाशिवरात्रीच्या दिवशी गडावर जाऊन मोठ्या भक्तिभावाने व श्रद्धेने हरिश्चंद्रेश्वराला अभिषेक घालतात.

भाऊसाहेब चासकर

https://www.thinkmaharashtra.com/%E0%A4%AD%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6/

हरिश्चंद्रगड :  


९ - १० सप्टेंबर २०१७ 



हरिश्चंद्रगड आणि भूतकाळातील आठवणी : 

जेव्हा भटंकती आणि ट्रेकिंगची माहिती नव्हती  तेव्हा एक पुस्तक माझ्या हाती सापडले होते . त्यात हरिश्चंद्रगड आणि कोकणकड्याचे सुंदर वर्णन होते . कोकणकड्यावर दिसणारे इंद्रवज्र आणि सह्याद्रीच्या महादेवाच्या मंदिराचे खूप  मोहक वर्णन त्या पुस्तकात होते . ट्रेक्स सुरू केल्यावर मला समजले की हरिश्चंद्रगड म्हणजे हौशी ट्रेकर्सची " पंढरी " आहे . २०१४ च्या हिवाळ्यात जेव्हा हरिश्चंद्रगड आणि कोकणकड्यास भेट दिली तेव्हा मला निसर्गाचे मंत्रमुग्ध करणारे रूप दिसले .उरात धडकी भरवणाऱ्या आणि  " सह्याद्रीचे रौद्रभीषणसौन्दर्य " असे बिरुद असलेल्या कोकणकड्याच्या प्रेमात मी पडलो . महादेवाचे सुंदर हेमाडपंथी मंदिर आणि पाण्याचा बारमाही विसृतसाठा असल्यामुळे २ दिवसांच्या ट्रेक साठी ही पूरक जागा आहे . सह्याद्रीच्या कुशीतली ही माझी आवडती जागा बनली आहे . 


हरिश्चंद्रगडावरील मंदिर



हरिश्चंद्रगडावरील मंदिर : दक्षिण दिशा 



हरिश्चंद्रगड संक्षिप्त माहिती  :

ठाणे, पुणे आणि नगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे एक पर्वतरांग आहे जी बालाघाटची रांग म्हणून ओळखली जाते. या पर्वत रांगेच्या सुरुवातीलाच हरिश्चंद्रगड आहे . हरिश्चंद्रगड हा  " कळसुबाई - हरिश्चंद्रगड अभयारण्य " क्षेत्रात आहे . हरिश्चंद्रगडाला दोन चार हजार वर्षापूर्वीची पौराणिक पाश्वर्भूमी लाभली आहे. साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्नीपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो. मुख्य हेमाडपंथी मंदिराच्या मागे असणार्‍या गुहेमधील चौथर्‍यात चांगदेव ऋषींनी' चौदाशे वर्ष तप केलं आहे असे स्थानिक गावकरी म्हणतात. हरिश्चंद्रगडाचे शिखर तारामती नावाने ओळखले जाते. १७४७-४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली. हरिश्चंद्रगड समुद्र सपाटीपासून १४२४ मीटर उंच आहे . गडावर जाण्यासाठी तीन चार वाटा सध्या प्रचलित आहेत. खिरेश्वरकडून जाणाऱ्या वाटांमध्ये तोलारखिंडीची वाट , नळीची वाट , साधले घाट आणि बालेकिल्ल्याची वाट येते.  अहमदनगर राजूरकडून जाणारी पाचनईची वाट येते.  त्यापैकी पाचनईकडून जाणारी वाट ही सोपी आहे. पण  खिरेश्वरकडून जाणाऱ्या वाटा जास्त आव्हानात्मक आहेत .   
हरिश्चंद्रगडावरील मंदिर

हरिश्चंद्रगडावरील मंदिर आणि सप्ततीर्थ परिसर 

एक सुंदर टेन्ट 

९ सप्टेंबर २०१७ : 

९ सप्टेंबर ! माझ्या बाबांचा वाढदिवस ! ते नेहमीच मला ट्रेक्ससाठी पाठिंबा द्यायचे. त्यामुळे ह्या दिवशी हरिश्चंद्रगडला जाणे माझ्यासाठी खूप खास होते. हरिश्चंद्रगडाचे सौन्दर्य प्रत्येक ऋतूमध्ये अनुभवण्यासारखे असते. रमा दादाच्या विशेष प्रयत्नांमुळे पावसाळ्यात हरिश्चंद्रगडाला जाण्याचा योग्य जुळून आला . ह्यावेळी पाचनईच्या मार्गे जाण्याचे ठरले . रात्री शेवटची कसारा ट्रेन पकडून आम्ही  १४ जण एका खासगी गाडीने राजूर मार्गे पाचनईला पोहोचलो . ह्यावेळी सर्वच ट्रेकिंगमध्ये  मुरलेले सवंगडी होते . अनेकांची हरिश्चंद्रगडाला येण्याची दुसरी खेप होती . पावसाळ्यात हरिश्चंद्रगडाचा अनुभव चांगलाच असणार ह्याबद्दल सर्वांना हमी होती . पहाटेच आम्ही पाचनईला भास्करदादाच्या घरी पोहोचलो. गडावर आमची व्यवस्था सुखकर जावी ह्यासाठी आम्ही भास्करदादास टेन्ट आणि जेवणाबद्दल सुविधा करण्यास सांगितली . भास्कर दादा हा ट्रेकर्स साठी काही नवीन नाही . भास्कर दादा हा पश्चिम घाटातील सर्वोत्तम वाटाड्यांपैकी एक आहे . थोड्याश्या विश्रांती नंतर फक्कड चहा पिऊन आम्ही ट्रेकला सुरुवात केली . पहाटेचे वातावरण हिरवेगार होते आणि समोरच दिसणारा धबधबा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता . कोणता डोंगर पार केला की  हरिश्चंद्रगडाच्या मंदिराचे दर्शन घडेल ह्याचा विचार करत करत मी धवल मागोमाग चालू लागलो. 

पाचनई गाव : प्रवासाची सुरुवात ( अभि - वैशू - राजू - सोनल - भाग्यश्री अनिकेत - विग्नेशा - रोहन -रमाकांत - नरेंद्र - सचिन- राहुल - भास्कर दादा - धवल )

" कळसुबाई - हरिश्चंद्रगड अभयारण्य " क्षेत्र


 सचिन लांडे आणि आडवाटेचा रास्ता  : 
अभि आणि वैशूचे लग्न झाल्यावर आम्ही पहिल्यांदाच एकत्र एका ट्रेक मध्ये भेटलो . त्यांच्याशी गप्पा मारत आम्ही सर्व एका छोट्या पठारावर आलो . येथे येण्यासाठी एक दम भरवणारी चढण पार करावी लागली.  उजव्या बाजूला जाणारा रस्ता  कपारीकडे जाणाऱ्या जिन्यांकडे जात होता . गडावर जाणारा धोपट मार्ग तोच होता पण लांडे साहेबांनी डाव्या बाजूने जाणारा आडवाटेचा रस्ता धरायचे ठरवले . खरे तर श्वास फुलाला होता आणि हृदयाचे ठोके पण वाढले होते त्यात आडवाटेने ज्याचे म्हणजे मोठा लॉंग कट  होणार ! कष्टपण वाढणार ! अश्या वातावरणात मी , रमा दादा आणि विग्नेशाने आडवाटेला न जात नेहमीच्या वाटेने जाण्याचा मिश्किल हट्ट धरला . पण आमचा हट्ट फार काळ टिकला नाही . ट्रेक म्हणजे नवीन वाटा सावधपणे चोखंदळून पाहणे आणि नवीन वाटांचे नवीन अनुभव गाठीशी बांधणे  होय.  ४ जण असो किंवा १४ जण,  सर्वांनी एकाच वाटेने जायचे हा नियम आम्ही पाळला.  आम्ही सर्व मताने आडवाटेने गेलो आणि घनदाट जंगलात वाट कापत कपारीजवळ पोहोचलो . सकाळच्या उन्हात  पाचनई गाव फार सुंदर दिसत होते . साल्हेर किल्ल्याची आठवण ह्या कपारीतून जाताना आली . भविष्यात कॅम्पिंग साठी उत्तम जागा हेरून आम्ही गडाकडे चालू लागलो 

पाचनई गावाचा सुंदर नजारा 

कपारीतून दिसणारा सुंदर धबधबा 
आडवाटेवरील सुंदर फुल 


अडवाटेच्या पुढचा सुखकर प्रवास : 
एरव्ही टंगळमंगळ न करता , जास्त फोटोग्राफीसाठी  वेळ न घालवता  गडमाथ्यावर पोहचायचे असा हेतू असतो . ह्या वेळी मात्र सरळसोट साधा रस्ता मिळाल्याने प्रवास सुखकर झाला होता आणि छोट्या ओहोळापासून ते पाण्याच्या मोठ्या पात्रात आम्ही डुबून धमाल केली.  चालताना पण दमछाक झाली नाही. पाऊस नव्हता पण छोट्या छोट्या धबधब्यांचे शिंतोडे मनाचा थकवा दूर करत होते. मधेच लागलेल्या ओढ्यामध्ये पाय बुडवले की असे वाटत होते की पुढे न जाता ओढ्याच्या पाण्यात लोळत पडावे . सोनल आणि भाग्यश्रीने येथे जी धमाल केली आहे ती अवर्णनीय आहे . धमाल मस्ती करून आम्ही पुढे चालू लागलो . एक चढण चढून गडमाथ्यावर आलो आणि जगातले सर्वोकृष्ठ नजारे दिसण्यास सुरुवात झाली . ढगांनी अर्धे झाकलेले उंचच उंच कडे आणि त्यावरून वाहणारे ढग जणू आम्हाला स्पर्श करून जात आहेत असा भास होत होता . समोरचे पर्वत कधी स्वच्छ दिसत होते तर कधी क्षणातच दाट धुक्यानी झाकोळून जात होते . धुक्यांचा तो लपंडावाचा खेळ न संपणारा होता. पठारावरची सोनकीच्या फुलांचा पिवळा गर्द गालिचा आणि त्यामागील धुक्यांची झालर असा नजारा स्वप्नवत होता . वाऱ्यासोबत सोनकीची फुले छान डोलत होती. कास पठारावर गालिचे पाहायचे जे हुकले ते येथे पाहावयास मिळाले ह्याचा आनंद फार झाला . 



सोनकीच्या फुलांचा गालिचा 

धुक्यांचा  लपंडाव 


गडमाथ्यावरील पठार 

सोनकीच्या फुलांचा गालिचा 


हरिश्चंद्रगडावरील मंदिर : 

पठारावरून पुढे जाताना आम्हाला झुपकी कारवी दिसली . झुपक्या करावीला फुले ही १२ वर्ष नंतर येतात असे समजले . रोहनला हरिश्चंद्रगडावरील जैव विविधतेबद्दल खूप माहिती होती. कंदीलपुष्प नावाचे एक फुल हे ह्याच परिसरात सापडते असे रोहन ने सांगितले आणि त्याला ते पाहण्यास ही  मिळाले . पुढेच आम्हाला मंदिराचे व त्याच्या सोनेरी कळसाचे दर्शन झाले . कळसाचे पहिले दर्शन मनाला खूप सुखदायी होते . मंदिरात शंकराची एक पिंड आहे जिच्यावर कुणीतरी माळलेला हार व फुले घालून मनोभावे पूजा केलेली होती. मंदिरावरील कोरीवकाम हे विरळ होत चालले आहे परंतु लक्षवेधी आहे . गडावर मंगळगंगेचा उगम आहे असे म्हणतात जी पुढे नदीचे स्वरूप घेते . मंदिराच्या दक्षिण दिशेस शेंदूर फासलेला सुंदर गणपती आपले लक्ष लगेच ओढून घेतो . मंदिर परिसरात अनेक गुहा असून त्यामध्ये आपण राहू शकतो . मंदिर परिसरातील टाकीत जे पाणी आहे  ते अत्यंत सुमधुर आहे.  मंदिराच्या मागे असणार्‍या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथर्‍यात जमिनी खाली एक खोली आहे, यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत ’चांगदेव ऋषींनी’ चौदाशे वर्ष तप केलं होते अशी स्थानिक गावकर्‍यांची श्रध्दा आहे.  श्री चांगदेवांनी येथे तपश्चर्या करून ’तत्वसार’ नावाचा ग्रंथ लिहिला. येथे एक शिलालेख आहे असे मी वाचाले आहे पण तो मला पुढच्या वेळी पाहावा लागेल कारण त्या बद्दलची माहिती आत्ताच वाचनात आली .


हरिश्चंद्रगडावरील मंदिर

मंदिरात शंकराची पिंड


दक्षिण दिशेस शेंदूर फासलेला सुंदर गणपती


 तीर्थकुंड: 
अनेकजण मंदिराजवळ असणाऱ्या तीर्थकुंडातील देवळ्यांमद्ये फोटो काढतात . आम्हीही ही संधी सोडली नाही . तीर्थकुंडातील पाण्यात देवळ्यांचे आणि तारामती शिखराचे सुंदर प्रतिबिंब दिसते . तीर्थकुंडात डिसेंबरअखेरपर्यंत पाणी असते. येथील चौदा देवळ्यांमध्ये चौदा विष्णुमूर्ती विराजमान होत्या असे वाचनात आले. तीर्थकुंडासमोर छोटेखानी मंदिर असून, ते काशितीर्थ नावाने ओळखले जाते.

तीर्थकुंडातील देवळ्यांमद्ये फोटो

तीर्थकुंडातील  १४  देवळ्यां

तीर्थकुंडातील  १४  देवळ्यां
तीर्थकुंडातील देवळ्यांमद्ये फोटो


गणेश गुहा : 

तारामती शिखराच्या पायथ्याला ९ लेणी आहेत . ही लेणी दहाव्या किंवा अकराव्या शतकातील असावीत असा अंदाज आहे .सहा फुट उंचीची भव्य गणेशमूर्ती जी दिगंबर अवस्थेत आहे अशी गणेश गुहा येथे आहे . दिगंबर अवस्थेतील गणपतीची मूर्ती खुप दुर्मिळ असते असे म्हणतात. भास्करदादा आणि सावळादादा ह्यांनी आमची राहणायची सोय याच गणेश गुहेत केली . आमचे सामान एका भिंतीजवळ रांगेत रचून आम्ही थोडा वेळ निवांत पडून राहिलो . दुपारी खूपच भूक लागली होती . सावळादादा आणि वहिनी ह्यांच्या हातचे जेवण खूप छान होते . दमून भागून आल्यानंतर जे जेवण मिळते त्याची गोडी वेगळीच असते. जेवल्यानंतर आम्ही ४ च्या सुमारास कोकण कड्यावर गेलो . 



 दिगंबर अवस्थेतील गणपतीची खुप दुर्मिळ मूर्ती 

दुपारचे जेवण 



कांदे पोहे : पाचनई 


कोकणकडा आणि भ्रमनिरास :

कोकणकडा म्हणजे हरिशचंद्र गडावरील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध आकर्षण आहे .संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताचा नयनरम्य सोहळा या कड्यावरून पहाण्यात जो आनंद आहे तो अवर्णनीयच आहे. अगदी लोटांगण घालून कड्याच्या ३००० फुटापेक्षाही जास्त खोलीच्या अंदाज घेताना जी उरात धकडी भरते ती आपण लिहून सांगू शकत नाही . बाह्यबाजूने हा चंद्रकोरी सारखा अर्धवर्तुळाकृती आहे . कोकणकड्याची सुंदरता , त्याची भीषणता , त्याचे भय आणि त्याठिकाणवरून सृष्टीचं जे विलोभनीय दर्शन घडते ह्याचा अनुभव ज्याला येतो त्याला निसर्गाच्या चमत्कारासोबत एक नाते तयार होते. तेच नाते त्याला कोकणकड्यास पुन्हा पुन्हा भेट देण्यास भाग पाडते . पावसाळ्यात मात्र येथे ढग आणि धुक्यांचे सावट होते. कोकणकड्याच राखट  आणि कणखर रूप पाहायचे असेल तर पावसाळा हा योग्य कालावधी नाही . प्रचंड धुक्यात नवख्या माणसाला कोकणकड्याची विस्तृतताही समजणार नाही. ह्या वेळी सोसाट आणि बेभान वारा प्रचंड वेगाने अंगावर येत होता . कोकण कड्यात टाकलेला रुमाल ही आकाशी झेप घेऊन पुन्हा आपल्याकडे येईल इतकी शक्ती  वाऱ्यात होती . माझा भगवा पटका मी कड्यात झोकावला पण आकाशात उंच जाऊन पुन्हा कोकणकड्यात विलीन झाला . सर्वांनी खूप धमाल केली आणि फोटो काढले . तुषारने गमतीने अर्ध्या मिनिटाचा व्हायरल डान्स पण केला . परत पुढल्यावेळीस येऊ असे म्हणून आम्ही गणेशगुहेकडे निघालो . 

भगवा पटका कोकणकड्यात पडल्याचा आनंद - वैशू - विग्नेशा - लांडे आणि एक प्रवासी मित्र 


पाऊल ट्रेकर्स 

पाऊल ट्रेकर्स 

 गणेशगुहेतील रात्र : 

त्याच दिवशी रात्रीचे पिठले भाकरी - लोणचे - भात आणि चवळीच्या भाजीची जी चव होती ती या पुढील अनेक ट्रेक मध्ये लक्षात राहणारी असेल हे नक्की !रात्री बाहेर पाऊस खूप असल्याने आम्ही गणेश गुहेतच टेन्ट मध्ये राहण्याचा निर्णय घेतला . स्टे ट्रेकचा अनिवार्य भाग म्हणजे रात्री झोपण्याआधी भुताखेतांच्या गोष्टी सांगणे आणि ऐकणे . भुतांवर विश्वास नसला तरी आणि त्या गोष्टी पूर्वी सांगितल्या गेल्या असल्या तरी त्या नव्या पद्धतीत सांगण्याचे काम आम्ही सर्वांनी केले. माझ्या टेन्ट मध्ये धवल - सोनल - भाग्यश्री - अनिकेत - राहुल - राजू - विग्नेशा अशी मंडळी गप्पा मारायला आली. आली कसली आम्ही त्यांना आमंत्रणच दिले होते जणू !  ह्या वेळी भुताखेतांच्या विषयाबरोबर अजून एक विषय आला . विषय होता कि "पहिले प्रेम  " ...  ! सर्वांनी आपली पहिली प्रेम कहाणी सांगितली तेव्हा कळले की विषयाचे नाव " अधुरी प्रेम कहाणी " असे असते तरी चालले असते कारण आमच्या पैकी पहिल्या प्रेमाचा झेंडा लग्नापर्यंत कुणीच रोवलेला नव्हता ! काही हरकत नाही. अपयश हि यशाची पहिली पायरी असते असे समजून चर्चेस आलेली मंडळी आपापल्या टेन्ट मध्ये झोपण्यास गेली . माझ्या टेन्ट मध्ये अनिकेत - राहुल आणि राजू  ह्यांनी झोपायची चांगली सोय केली होती . मला मस्त गाढ झोप लागली . काही मंडळींना रात्री घोरणाऱ्या मंडळांनी त्रास दिला अशी बातमी सकाळी समजली. 

नरेंद्र - रोहन - सावळादादा - सचिन आणि वाहिनी 


केदारेश्वराची गुहा आणि परतीचा प्रवास : 

सकाळी लवकर उठून आम्ही परतीचा प्रवास सुरु केला . हरिश्चंद्राच्या मंदिरात पुन्हा महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही केदारेश्वराकडे निघालो. केदारेश्वराच्या गुहेत एक मोठे शिवलिंग आहे . येथे ४ खांब होते परंतु आता फक्त १ खांब आपणास पाहायला मिळतो . ह्या गुहेत कंबरभर पाणी असते. हे पाणी अतिशय थंडगार असते . अनेक जण ह्या सुन्न करणाऱ्या पाण्यातून महादेवास अर्ध प्रदक्षिणा घालतात . गुहेतील पाणी अशुद्ध होऊ नये म्हणून या गुहेतील पाण्यात पोहणे किंवा उतरणे व्यर्ज करण्याची विनंती करण्यात आली आहे . आपण कोणत्याही गड  किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्यांमध्ये पोहू नये ही विनंती खूप रास्त आहे . आपण सर्वांनी हा नियम पाळला तर आपल्या सर्व गडावर पिण्याच्या पाण्याचा साठा स्वच्छ राहील . गड उतरताना एका डोहात मस्त डुबून सर्व ताण आणि थकवा विसरवून आम्ही पाचनईत उतरलो ते पुन्हा  हरिश्चंद्राचे दर्शन व्हावे ही इच्छा मनात ठेवून. 

केदारेश्वराची गुहा

गड उतरताना एका डोहात 







टीम : धवल , रमाकांत , रोहन , वैशाली , अभिनव , विग्नेशा , तुषार , राहुल ,सचिन , भाग्यश्री , सोनल , अनिकेत , राजू (मंगेश) , नरेंद्र 



गड उतरताना एका डोहात 



तुषार : HD 

थोडीशी मस्ती 

नरेंद्र रविंद्रनाथ लाखण 

http://narendralakhan7.blogspot.com/2017/10/harishchandragad.html

 ट्रेकर्सची पंढरी...

Submitted by इंद्रधनुष्य on 31 May, 2016 - 03:30

बर्‍याच कालावधी नंतर मायबोलीकर भटक्यांचे पाय पुन्हा एकदा ट्रेकर्सच्या पंढरी कडे निघाले. यंदाची पाणी टंचाई आणि हवेतील उष्मा यामुळे ट्रेकला जाणे टाळले होते... परंतू मान्सुन पुर्व ट्रेकची ओढ आम्हाला स्वस्थ बसू देईना... मग एक से भले दो करत तब्बल १७ भटके एकत्र जमले ते हरिश्चंद्रगडाच्या मोहिमेला.. या मोहिमेने काय नाही दिले...

स्वागतला पाचनईतील सरडा... इडली विथ मार्टिन... चढाईच्या वेळची चुकामूक.. भास्कर कडील पिठलं भाकरी.. सूर्यास्ताच्या पार्श्वभुमी वरील उडीबाबांचा जल्लोष... कोकणकडयाच्या विशाल रंगमंचावर रंगलेला फाल्कन पक्षाचा वेगवान थरार.. रात्री टेन्टवर टपटपणारा पाउस.. धुक्यात हरवलेली पहाट.. सकाळी आठच्या सुमारास हुडहुडी भरवणारी कोकणकडयावरील थंडी... या रिफ्रेशमेन्टच वर्णन ना शब्दात मांडता येत ना फोटो मधे.. ते फक्त अनुभवायचंच... अट्टल भटक्यांच्या साथीनेच. Happy

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३ कलालगड

प्रचि ४ सौ. योरॉक्स यांच्या कृपेने...

प्रचि ५ Dusky Crag Martin

प्रचि ६ रांजण खळगे

प्रचि ७

प्रचि ८ केदारेश्वर

प्रचि ९ कोकणकडा

प्रचि १० कोकणकडा

प्रचि ११ कड्या वरुन दिसणारा माळशेज घाट

प्रचि १२ मावळतीचे रंग

प्रचि १३ रोहित मावळा

प्रचि १४ स्वछंदी

प्रचि १५

प्रचि १६ स्वरगंधारचा शिलेदार

प्रचि १७ योरॉक्स

प्रचि १८ आमचे प्रेरणास्थान Proud

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२ इंद्रवज्र टिपताना जिवेश..

प्रचि २३

प्रचि २४ गणेशगुहा

प्रचि २५ पुष्करणी

प्रचि २६ अलविदा

https://www.maayboli.com/node/58875
नळीची वाट आणि राजनाळ
      आम्हा निवडक मायबोलीकर मित्रांचा व्हॉट्स ऍप ग्रुप आहे तसे हल्ली बरेच ग्रुप असतात. पण या ग्रुपची बातच न्यारी, एक से बढकर एक वल्ली इथे आहेतच. त्यात कोणत्याही विषयावर चर्चा ! मग ती कोणत्या थराला कुठपर्यंत जाईल हे काही सांगता येत नाही. थोडक्यात सांगायचे झाले तर "सर्व समस्या समाधान" इथे नक्कीच होते. तर असा हा KCBC ग्रुप... कुणाला फुल्ल फॉर्म काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर व्यक्तिगत पातळीवर सांगण्यात येईल. अधून मधून फोटोमेळावा (निमंत्रक-गिरी)मग सह्यमेळावा नंतर सुसह्यमेळावा होत होत ट्रेक व ट्रेकची चर्चा तशी कमी होते गेली. पण तरीही सह्याद्रीच्या ओढीने अधून मधून का होईना इथली दोन चार टाळकी ट्रेक करतातच. 
    अश्याच एका दिवशी यो रॉक्स ने नळीच्या वाटेचा विषय काढला हो ना हो करता सात आठ जण तयार झाले. पुन्हा या ट्रेक चा वेगळा ग्रुप जास्तीची मेजोरिटी या नुसार २७ -२८ ऑक्टोबर तारीख फायनल केली. मग हळूहळू वातावरण निर्मिती होत चर्चा सुरू झाली. मनोज भावे यांनी बेलपाडा गावात बोलून रात्री मोरोशीहून जीपची तर दुसऱ्या दिवशी चहा नाश्ता पासून गडावर मुक्कामाची सोय करून ठेवली. तर सतीश उर्फ सूनटूण्या याने तांत्रिक जबाबदारी घेतली. पन्नास फुटी रोप, दोन क्रॅब, दोन सीट हार्नेस इ.सुरक्षा साहित्य घेत मोठं काम केलं. सुरुवातीला माझेही थोडे डळमळीत होते, एकतर मोठी दीर्घ चढाई त्यात माझे हल्लीचे टाचेचे दुखणं आणि अधून मधून येणाऱ्या क्रॅम्प. त्यात भर म्हणजे त्याचं दिवशी कंपनीत Annual Day Celebration. त्यामुळे शुक्रवारी रात्री शेवटची एसटी मिळणं ही मुश्किल. यो, रोमा, गिरी उर्फ नरेश काका आणि मनोज याच्या आग्रहाखातर कसे तरी जमवलेच, थोडक्यात निसर्गाची ओढ आणि ट्रेकची आवड. 
     नेमकं निघायच्या दोन दिवस आधी नेमका यो टांगारू झाला. शुक्रवारी रात्री कल्याण एसटी स्टँडवर पोहचलो तेव्हा सुनील आधीच येऊन थांबला होता. त्याच्या समोर दोन ग्रुप आधीच्या एसटीने पुढे गेले होते. अकरा नंतर डोंबिवलीहून आका आणि सतीश आले तर ठाण्याहून मनोज, रोमा आणि विनय आले. इंद्रा थोडक्यात बदलापूर पोहचता राहिला कसातरी मोठी सॅक घेऊन कल्याणात उतरला. गिरीची वाट पाहत तोवर अजुन दोन ग्रुप स्टँड वर, विचारल्यावर कळाले की ते सुद्धा नळीची वाट. मला तर वाटतं हल्ली रात्री उशिरा निघणारे हमखास नळीची वाटवाले ट्रेकर अगदी एखादा थोडी तयारी करून गेला तर कुणालाही जॉईन होऊ शकतो. असो..गमतीचा भाग सोडला तर खरच अशी स्थिती आहे. दिल्लीहून सायंकाळी निघून घरी जाऊन सॅक पॅक करून गिरी बारा वाजता स्टँडवर हजर. मागच्या सहा तासात विमान, टॅक्सी, रिक्षा, रेल्वे आणि एसटी असे सारे वाहतुकीची साधन वापरून फक्त आणि फक्त ट्रेकसाठी.. क्या बात है. 
साडेबारा वाजता शेवटची कल्याण नगर लागली त्यात जागा मिळाली, याही एसटीत ऐन वेळी एक ग्रुप आलाच. रात्री रहदारी नसल्यामुळे कुठेही न अडखळत दोनच्या सुमारास मोरोशीत उतरलो. मनोजने फोन केल्याप्रमाणे जीपवाला आमच्या आधीच येऊन थांबला होता. नेमका हाच जीपवाला त्या आमच्या बस मधल्या दुसऱ्या ग्रुपला ही घेऊन जाणारा निघाला. आम्ही नऊ जण आणि ते पाच सोबत मोठ्या सॅक एकत्र जाणे शक्यच नव्हते. आम्ही पुढे निघालो आम्हाला सोडून तो यांना घ्यायला पुन्हा येणार. न्याहाडी फाटा मग आत जात तळेगाव रोड सोडून जीप वालीवऱ्हे बेलपाडासाठी उजवीकडे वळली. काही अंतर काळू नदीच्या बाजूने जाणारा शांत निर्जन रस्त्यावर काही ठिकाणी नाईट जार निवांत बसलेले. कच्या पक्क्या रस्त्याने अर्ध्या पाऊण तासात कमळूच्या घरी दाखल झालो. तिथेही दोन ग्रुप वेगवेगळ्या कोपऱ्यात, आम्ही नऊ जणांनी उरलेले दोन कोपरे घेत पथाऱ्या पसरल्या. डोळे लावतो तोच मागचा ग्रुप पण आला कमळू बहुतेकांची सोय लावून देत होता. मला तर त्याचे घर टप्पा टप्प्याने येणाऱ्या पाहुण्यांचे लग्न घर वाटू लागले. आजूबाजूला घोणससुर असल्यामुळे खास अशी अखंड झोप लागली नाहीच. थोड उजाडताच उठून आवरते घेत नाश्त्याला पोहे तयार. कमळूचे घर भारीच, त्याच्या अंगणातून थेट समोर कोकणकडा दिसतो. ते बघताच मन थेट कड्यावर पोहचलं सुद्धा. हा हरिश्चंद्रगड किती त्या आठवणी त्याच्या या विविध ठिकाणहून चढणार्या वेगळ्या वाटा खरंच 'गड जितका मोठा तितक्या वाटा अधिक' हे म्हणतात ते इथे तंतोतंत लागू पडते. 
बरोब्बर पावणे सात वाजता गावातून निघालो कमळू मागून दुसऱ्या ग्रुप सोबत येणार होता. एक दोन ग्रुप आधीच निघालेले, आमच्या सोबत त्याचा पुतण्या रामदास चार टेंट घेऊन निघाला. ही मंडळी भारीच एका दिवसात थोडफार सामान घेऊन आरामात या नळीच्या वाटेने वर जाऊन खाली येतात. कोकणकडा समोर ठेऊन चालू पडलो सूर्य पूर्वेला पलीकडे असल्यामुळे सकाळच्या थंड हवेत जास्तीत जास्त मजल मारायची हा हेतू. डावीकडे नाफ्ता तर उजवीकडे रोहिदास पासून दूरवर देवदांड्याची रांग. सुरुवातीला शेताच्या बांधावर चालत हळूहळू वाट मोकळं वनातून रानात शिरली. ओढ्याला अगल बगल देत मळलेल्या वाटेने त्यात सकाळच्या वातावरणात रानात विविध पक्ष्यांचे आवाज. गिरी, विनय व इंद्रा तर आवाजावरून आणि दुरून दिसला तरी तो पक्षी अचूक ओळखायचे. कधी मुख्य ओढ्याला उजवीकडे ठेवत तर कधी ओढ्यात उतरत मोठमोठ्या दगड धोंड्यातून मिळेल तशी वाट काढत काय ते ‘थ्री जायंट स्टेप’ म्हणतात तिथे मोठा थांबा घेतला.
ओढ्यात काही ठिकाणी अजूनही पाण्याची धार वाहत होती. थोडफार खाऊ तोंडात टाकून पुढे निघालो. डावीकडून वाट वर चढू लागली आणखी थोडे वरच्या बाजूला आल्यावर ओढ्याच्या उजवीकडे माकडनाळच्या दिशेने वाट जाते. 
वाट म्हणजे अशीच दगडांची रास, हल्ली या उजव्या नाळेने जाण्याचे प्रमाण ही वाढले आहे. या जंक्शन पर्यंत यायला आम्हाला मधला विश्रांती थांबा पकडून सव्वादोन तास लागले. इथेच कमळू मागून दुसरा ग्रुप घेऊन आला. कधी आम्ही पुढे तर कधी ते पुढे, ठराविक अंतराने थोड थांबत फोटो घेत जात होतो. दगड धोंड्यांच्या या नाळेत एक मात्र खरं उगाचच धावत उड्या मारत मोठमोठी स्टेप्स ढांगा टाकत जाण्यात काही अर्थ नाही त्यापेक्षा एका लयीत छोट्या ठराविक अंतराने पावलं टाकत चढाईची मजा घेत होतो. यामुळे फार दम लागला असं मुळीच जाणवलं नाही. तसेही आम्हाला विक्रमी वेळात नाळ पार करून अमुक वाजता पोहचलो तमुक केले असे काहीही दाखवायचे नव्हते. कारण नळीच्या वाटेचा ट्रेक म्हटलं तर या नळीच्या चढाईची मजा घेणं, काय ते म्हणतात "जहा रास्ते ही मंजील है" असं काहीतरी. 
मुख्य नळीची सुरुवात झाली, जसं जसे आत घुसत होतो तसे नळी आणि बाजूचे आकाशात घुसलेले उंच उंच कडे तर उजवीकडे महाकाय कोकणकडा, फार थरारक वगैरे नाही पण भन्नाट वाटत होते. उजवीकडून डावीकडून मिळेल तशी वाट काढत आणि महत्वाचं म्हणजे ठिसूळ दगडी सांभाळत. नाळेच्या सुरुवातीला तसेच अधेमधे लहान उंबराची झाडं त्यामुळे त्यांच्या सावलीत थोड टेकून घोट भर पाणी पिऊन चालू पडायचं. 
दुसरी एक गोष्ट म्हणजे दरवर्षी पावसानंतर नाळेत थोडफार बदल होतो, छोटे मोठे पॅच काही जातात तर काही नव्याने तयार होतात. दहा वाजेच्या सुमारास पहिला रॉक पॅच जवळ आलो. तसा पाहिलं तर हा पॅच खालचा ठिसूळ दगडी भाग सोडला तर फार कठीण नाहीच. 
सतीश पुढे होता पटकन वर जाऊन दोर सोडला सुद्धा, कुठलाही कमीपणा न वाटून घेत दोराच्या सहाय्याने सॅक पाठीवर घेऊन सर्वांनीच हा पॅच अगदी आरामात पार केला. पुन्हा मोठे धोंडे चढाई तर काही ठिकाणी स्लेट सारखी ठिसूळ बारीक दगडांची रास, परिणाम घसारा. त्यात आता नाळेत उन जाणवू लागले, ही नाळ साऊथ वेस्ट त्यामुळे इथे ठराविक वेळेत हमखास उन असतेच. उजवीकडे कड्याखाली थोडीफार सावली होती व कपारीत थोडे पाणी तिथेच थांबून सुका खाऊ, काकडी, लिंबू सरबत तर आकाने आणलेली साजूक तुपातली कचोरी. तिथे बसून खात असताना अचानक मनात आले कड्याला बिलगून बसलो आहोत चुकूनही जर वरून माकडं गेली आणि त्यांच्या धक्क्याने दगडी पडली तर काही खरं नाही!  
हीच ती सावलीतली जागा जिथे आम्ही होतो. 
नाळेत वर पाहिलं तर मध्ये एक भिंतीचा भाग सुळक्या सारखा दिसत होता. नीट निरीक्षण केल्यावर तिथे दोर लावलेला दिसला आधी गेलेल्या ग्रुपचा आवाजही ऐकु आला हाच तो तिसरा उंबराच्या झाडाचा पॅच. आम्हाला तिथे पोहचण्यासाठी मधला दुसरा पॅच पार करायचा होता. 
दुसरा साधारण वीस फुटांचा असेल डावीकडच्या बाजूने स्लेटच्या पावठ्या करत मध्ये किंचितसा चिमणी क्लाईम प्रकार त्यातून मोठी सॅक पाठीवर घेऊन चढाई सुरक्षेसाठी इथेही सतीशने रोप लावला, तर काहींनी हार्णेस ही घातली. एक एक जण वर जाई पर्यंत बाजूच्या उंबराच्या झाडाच्या सावलीत आराम केला. 
पॅच चढून आल्यावर समोर दूरवर माकडनाळ व शेंडी सुळका आणि खाली आमची नाळ (सह्याद्री सोबत जुळलेली) 
एका लयीत असेच एक एक लहान मोठे पॅच पार करत तिसऱ्या पॅच जवळ आलो इथल्या भागात चढ अधिक तीव्र आणि जोडीला घसारा भरपूर. एक एक जण मिळेल तशी जागा पकडून उभे राहिलो. हा उंबराच्या झाडाचा पॅच म्हणजे आपण ज्या नाळेने येतो त्या नाळेसमोर मोठी कातळभिंत आडवी येते त्यावर सरळ रेषेत न चढता थोडे मागून उजव्या बाजूने तिरके चढायचे. इथेच आधाराला उंबराच्या झाडाला रोप बांधता येतो. अंदाजे वीस पंचवीस फुटाचा हा पॅच सतीशने आरामात जाऊन वर रोप लावला सुद्धा. झाडा व्यतिरिक्त काही ठिकाणी वरच्या अंगाला बोल्ट ही मारलेले आहेत पण झाडाचा बुंधा अधिक विश्वासार्ह हे आमचे मत. 
रामदास, मनोज, सुनील, इंद्रा वर गेले, माझा नंबर आला हातात रोप पाठीवर सॅक, दोन स्टेप जात नाही तोच पायात जोरदार क्रॅम्प. कुठलाही रॉक पॅच चढताना मुख्य म्हणजे पायावर जोर देऊन, थ्री पॉईंट टेकनिक वापरणे. पण पायाची हालत खराब त्यामुळे हातावर जोर देऊन चढताना दोरीवरच्या उड्या, मग घडला प्रसंग पाहून सतीश ही वैतागला. वर जाऊन शांत दम खात उभा राहिलो इथेही बसायला जागा कमी त्यामुळे पुढचा ट्रेव्हर्स पार करून पलीकडे जाऊन बसलो.
घोटभर पाणी आणि चिक्कीचा तुकडा टाकला. काय माहित पण मला या ठिकाणाहून नाळ भलतीच गूढ वाटत होती. मध्येच एखाद दोन पाकोळ्या भुर्रकण उडत जात त्या नाळेतली शांतता भंग करत होत्या. सावधपणे एक एक जण तर सतीश इंद्रा वाईंड अप करून आले. मुख्य नाळेतून हा ट्रेव्हर्स पार करून दुसऱ्या नाळेत आलो. या नाळेत ही घसारा होताच थोड वर जाताच नाळेच्या मुखाशी झाडी दिसू लागली. थोडक्यात नाळ प्रकरण पूर्ण झाले तर! बहुतेकांनी जरी सुस्कारा सोडला तरी एक मात्र खरं आम्ही सर्वांनी मिळून हसत खेळत, रमत गमत, गप्पा टप्पा हाणत पूर्ण नाळ व्यवस्थित पार केली. वर आल्यावर डावीकडे जंगलात एक वाट उतरते त्या वाटेने खाली उतरून साधले घाटाकडे तर उजवीकडची कोकणकडा मार्गे गडावर. वेळ पहिली तर दुपारचा सव्वा वाजले होते. आम्ही अर्थातच उजवी पकडली, वाट झाडीतून चढणीला लागली. कातळ टप्पा, छोटा ट्रेव्हर्स मग पुन्हा वाट बाहेर आली. 
मागे वळून पाहिले पाचनई पेठेची वाडी रस्ता तर नकटा त्यामागे नाफ्ताची जुळी शिखरं आणि कलाडगड फारच जवळ भासत होते. हा सारा मुळा खोर्याचा भाग. पुढे जातो तोच अजुन एक पॅच आमची वाट पाहत होता तो पार करून एका मैदानावर आलो एके ठिकाणी अजूनही पाणी, बारीक का होईना पण वाहती धार. 
जोडीला सोनकी, जांभळी मंजिरी, घाणेरी, काटेकोरांटी, रानजीरे सारखी रानफुलें. आमच्यातला आका त्याला फुलांबद्दल भरपूर माहिती त्यांचे मिळेल तसे फोटो टिपत होता. झाडांच्या सावलीत जेवणाची पंगत मांडली. सुनील आणि मनोज यांनी लिंबू सरबत तयार केले. याच जागी शनिवार रविवार पेठेची वाडी येथील दोघे जण लिंबू सरबत विकायला बसतात कारण नळीची वाट चढून येणाऱ्यांची वाढलेली संख्या. असो... सारे काही वेळेत होते घाई अशी काही नव्हतीच जेवण करून भर दुपारी चांगलीच झोप काढली. इंद्रा मनोज व विनय तर पाठ टेकताच घोरायला लागले. पण त्या दिड एक तासाच्या विश्रांतीमुळे चांगलेच रिफ्रेश झालो. इथून आता समोर असलेले झाडी भरलेलं हे शेवटचे टेपाड मग आलाच कोकणकडा. निघतो तोच कमळू परत येताना दिसला. आधीच्या ग्रुपला वर सोडून आता एकटाच घरी परत या नळीच्या वाटेने जात होता. घड्याळात पाहिलं तर साडेतीन होत आले होते, खरंच मानलं बुवा. हे खरे सह्याद्रीतील शेर्पा. 
      सुस्तावलेल्या शरीराला सुरुवातीला थोड जड गेलं. नंतर चांगलीच लय गवसली. 
शेवटचा सोपा कातळ टप्पा पार करून वर आल्यावर दूरवर तारामती शिखर नजरेस आले. 
पठारावर पिवळ्या धमक सुकलेल्या गवतातून शेवटचा चढ संपवून कड्यावर पोहचलो. 
वेळ पहिली चार वाजत आले होते. खूप काही वेगळं केलं असं मुळीच नाही पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान आणि वेगळाच आनंद होता. मुक्काम कोकणकड्यावर करायचा ठरलं होत. आता कोकणकडा म्हणजे भास्कर आलाच. त्याच्याकडे सॅक व इतर सामान टाकले. एव्हाना गर्दी जमायला सुरुवात झाली होती. चहा पाणी करून बाहेर बसलो होतो तोच समोरून डोक्यावर अंडरवियर टोपी सारखी घातलेला एक जण येताना दिसला जवळ आल्यावर समजले अरे हा तर महाभयानक मंगू नंगू उर्फ ‘मंगेश सपकाळ’ या इरसाल अवलिया बद्दल सांगायचं झालं तर वेगळा विषय होईल. तरी कुणाला उत्सुकता असेल तर त्याचे फेसबुक प्रोफाइल स्वतः च्या रिस्क पाहावे. थोडफार बोलणं झाल्यावर तो त्यांच्या ग्रुप सोबत निघून गेला. आम्ही सुद्धा कोकणकड्यावर मिळेल तशी जागा पटकावून बसलो. हो सद्या विकेंडला कोकणकड्याची अवस्था जुहू चौपाटी सारखी झाली आहे. बरेच अतरंगी तऱ्हेतऱ्हेचे पोज देणारे विदूषक त्यांचे फोटो? घेणारे महाभाग एकंदरीत साराच विचित्र मामला. थोड अलिप्त राहण्याचा प्रयत्न करत थोडेफार फोटो आम्हीही घेतले. हरिश्चंद्रगडाचा मुख्य आकर्षण असलेला साधारण अर्ध्या किलोमीटर लांबीचा अर्धवर्तुळाकार प्रसिद्ध असा कोकणकडा याबद्दल फार काही सांगायची गरज नाही. ते फक्त अनुभवायचं अर्थातच गर्दी टाळून यातच खरी मजा आहे. 
सूर्यास्त पाहत नजर सारखी नळीच्या वाटेवर जात होती. खाली सरळ रेषेत बेलपाडा कुठे सकाळी तिथे होतो आणि कसे कुठून वर आलो यावर विश्वास बसत नव्हता.
सावळाने तीन टेंट लावून दिले त्यातच बिस्तरा मांडला. इंद्राने चांगले स्ट्रेचिंग सेशन घेतलं त्यामुळे खूपच रिलॅक्स वाटलं. जसा अंधार दाटू लागला तशी थंडी जाणवायला लागली. आजूबाजूला जिथे नजर जाईल तिथे टेंट कमीत कमी चाळीस पन्नास सहज असतील त्यात आणखी लोकं येत होतेच. भास्करचे हॉटेल दुसरं लग्नघर सात वाजेपासून जेवणाच्या पंगती सुरू. इंद्रा आणि विनय पटकन नंबर लावून आले, ते आल्यावर आम्ही गेलो. कधी नव्हे तर आमच्यातील काही जेवण करून चक्क आठ वाजता झोपले सुद्धा. अर्थात शुक्रवारची दिवसभर कामाची दगदग, रात्रीचा प्रवास, अर्धवट झोप आणि मोठा रूट हे पाहता स्वाभाविक होते. 
बहुतेक ठिकाणी कॅम्पफायर, कुणी गाणी म्हणतय तर कुणी स्पीकर वर वाजवतंय, तर कुठे डफ तुणतुणे. रात्री उशिरापर्यंत लोकांची ये जा सुरू होती. 
सकाळी लवकरच जाग आली. पुन्हा स्ट्रेचिंग मग इतर आवराआवर चहा नाश्ता करून निघालो. परतीला राजनाळेची वाट सर्वानुमते उतरायचे ठरले. याच वाटेने राजनाळ चढून बैल घाट पुढे साधले घाट असा ट्रेक मी फेब २०१७ मध्ये केला होता. असो तर...
सकाळी मंदिर आणि आजूबाजूच्या परिसरात खूपच प्रसन्न वाटत होते. सकाळचे कोवळे ऊन, मंद गतीने वाहणारा गार वारा. आता पर्यंत कोकणकड्यावर तीन वेळा मुक्काम केला पण मंदिर परिसरात खुद्द मंदिराच्या मागच्या गुहेत, वरच्या भागात असणाऱ्या गणेश गुहेत मुक्कामाची मजाच वेगळी. 
मंदिरात जाऊन दर्शन घेतले बाजूच्या टाक्यातील थंडगार पाणी मनसोक्त पिऊन सोबतचा साठा पूर्ण भरून घेतला. बाकी मंदिर, शिलालेख, गणेश गुहा, केदारेश्वर, पुष्करणी, तारामती, डोंबाची घुमटी, विश्वामित्र, चांगदेव इतर अनेक गोष्टी तसेच या गडाबद्दल भरपूर माहिती पुस्तकात तसेच आंतरजालावर उपलब्ध आहे. 
    साडेआठच्या सुमारास मंदिर परिसरातून निघून टोलार खिंडीच्या वाटेला लागलो डावीकडे मोठी वाट पाचनईच्या दिशेने जाते. बरोब्बर पंधरा मिनिटे टोलारच्या वाटेने गेल्यावर एक झोपडी लागते लव्हाळीचा एक माणूस इथे चहा लिंबू सरबत विकायला बसतो. 
सांगायचं मुद्दा हा की या झोपडी जवळून दोन वाटा फुटतात डावीकडची टोलार खिंडीची प्रचलित वाट तर उजवीकडची वाट राजनाळ उर्फ जुन्नर दरवाजाने खिरेश्र्वर उतरते. हाच आमचा आजचा रूट असल्याने आम्ही उजवी मारली. वळसा घेत पुढे झाडीत शिरून वाट चढणीला लागली. वरच्या टप्प्यात आल्यावर डावीकडे दूरवर मुळा खोरं थेट वायव्येला नाफ्ता मागे आजोबा, करोंडा, कात्राबाई, मुडा, गवळदेव, घनचक्कर, भैरवगड ही सारी रांग तर या मागे अधून मधून डोळे बारीक केल्यावर दिसणारे कुलंग, कळसूबाई तसेच पट्टा सुध्दा ओळखता आला. चढ संपवून वाट मोकळ्या मैदानात आली समोरच बालेकिल्ला त्याच्या पायथ्याशी काही गावकरी कुठल्यातरी कामात व्यस्त होते. 
मनात विचार आला एवढ्या लवकर खिरेश्र्वर उतरून करणार काय ? वेळ आहे तर इतक्या जवळ आलो आहोत तर बालेकिल्ला सहज करता येईल. सोबतच्या सहकाऱ्यांना हे सांगितले भरपूर विनवण्या केल्या पण कुणी तयार होईना. शेवटी डावीकडची बालेकिल्ला जाणारी वाट सोडून उजव्या हाताला वळून तसेच पुढे निघालो. अगदी छोटासा चढ चढून बालेकिल्ला आणि तारामती शिखर या मध्ये आलो. दक्षिणेला पूर्ण माळशेज ते काळू नदीचं खोरं. आज आमचं नशीब जोरात, हवा खूपच स्वच्छ असल्यामुळे त्या प्रसन्न वातावरणात खूपच छान नजारा मिळाला. 
आग्नेय दिशेला हाटकेश्र्वर पासून हडसर निमगिरी तर समोरचा सिंदोळा, उधळ्या, गुण्या, भोजगिरी ते पार नैऋत्येला देव दांड्या, नाणेघाट, भैरवगड ढाकोबा, गोरख मच्छिंद्र पर्यंतचा मुलुख. खरच कॅमेराला मर्यादा हे सारं डोळ्यात साठवावे. 
डावीकडे वळून किंचितसा अरुंद असा ट्रेव्हर्स तो सावकाश पार करून वाट खालच्या भागात आली. आता मागे उजवीकडे तारामती शिखर तर डाव्या हाताला बालेकिल्ला. 
या ठिकाणी भरपूर फोटो काढले. आणखी एक टप्पा उतरत वाट मैदानात आली काही अंतर गेल्यावर पाण्याचे टाके. 
पाणी बऱ्यापैकी स्वच्छ थोड पिऊन तेच गार पाणी तोंडावर मारून निघालो समोर एक धार उजवीकडे उतरत होती त्याच धारेवर हरिश्चंद्र गडाचे नेढे जे खिरेश्र्वरहून चढताना व्यवस्थित दिसते. 
हिच ती राजनाळेची सुरुवात. काही ठिकाणी कोरीव पायऱ्या आहेत. 
पण अरुंद अशा नाळेत काही टप्पे सावकाश उतरावे लागले. कधीकाळी हा राजमार्ग होता पण काळानुसार बरीच पडझड होत सद्या मात्र बिकट परिस्थिती आहे. 
थोड खाली उतरल्यावर डावीकडे कातळात शिवलिंग कोरलेले पुढे कड्यात काही पायऱ्या. 
आणखी खालच्या टप्प्यात उजवीकडे कातळात कोरलेले पाण्याचे कोरडे टाके हे सहजी नजरेत येत नाही. एक पॅच चढून वर जात सतीशने फोटो घेतला. 
नाळ आता बऱ्यापैकी रुंद झाली वाटेत एका लहान उंबराच्या झाडाच्या सावलीत थांबलो, इथून एक वाट डावीकडे कड्याला चिकटून कारवीतून आडवी जात होती. थोड चाचपडायला झाले पुढे जाऊन पाहून आलो वाट अस्पष्ट होत होती. काही मंडळी तशीच नाळेतून हाकेच्या अंतरावर पुढे होती. बरोब्बर या झाडापासून अंदाजे दहा मिनिटे उतरलो असू तेव्हा स्पष्ट अशी वाट डावीकडे झाडीत शिरली. 
नाळेतून बाहेर येत त्या वाटेला लागलो मागे तारामती त्या पलीकडे रोहिदास तर दूरवर नाणेघाट आणि भैरवगड. तसेच खाली खिरेश्र्वर, पिंपळगाव जोगा धरण. झाडी भरली आडवी वाट पार केल्यावर कळशा डोंगर आणि त्याची खिरेश्र्वर दिशेने उतरत गेलेली सोंड.
त्या कळशा डोंगराला जोडणाऱ्या धारेवरचा मधला गवताळ घसरडा टप्पा सावकाश पार करून खिंडीत आलो. इथून डोंगराला उजवीकडे ठेवत झाडी भरल्या वाटेने उतराई करत सपाटीवर आलो. वाटेत एक छानसा ओढा लागला, मी सुनील व आका अंघोळीसाठी थांबलो. इथेच लक्षात आलं की रोमा कुठे दिसत नाहीये. त्याला शोधायला बाकी मंडळी पुढे गेली. 
गावात गेल्यावर कळलं की रोमा खाली उतरल्यावर कुठली तरी ढोरवाट पकडून आमच्या आधी गावात पोहचला. नंतर समजले की या आधी पण त्याने असे केले आहे काय करणार KCBC ग्रुप. असो.. खिरेश्र्वरात दुपारचे जेवण करून निघालो. एका भल्या जीपवाल्याने लगेच पारगाव फाट्या पर्यंत सोडले उतरत नाही तितक्यात पंढरपूर कल्याण एसटी मिळाली. कधी नव्हे तर रविवारी सायंकाळी कुठेही ट्रॅफिक मध्ये न अडकता सहा वाजता कल्याण स्थानकात उतरलो. एक दमदार ट्रेक पोतडीत जमा करून. 

अवांतर : नळीची वाट ही काही पुरातन घाट वाट नाही. जुनी ट्रेकर मंडळी त्यांचे या वाटेचे किस्से, काहींचे चुकणे किंवा फसलेले नियोजन मग मदतीसाठी स्थानिकांनी रात्री अपरात्री केलेली मदत. अजूनही तग धरून असलेली दुर्गमता गडाचे एका वेगळ्या कोनातून होणारं दर्शन, धडकी भरवणारा कोकणकडा त्याच्या घळी हे सारं या वाटेच्या लोकप्रियतेचे किंबहुना आकर्षणाचे मुख्य कारण.  
       हा काही खूप फार असा अवघड ट्रेक मुळीच नाही. पण तरीही दीर्घ चढाई आणि कस पाहणाऱ्या या वाटेला जाताना अनुभव, तुमची शारीरिक मानसिक क्षमता या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. चांगली दणकट टीम, अनुभवी सहकारी, पुरेसे सुरक्षा साहित्य तसेच वेळेचे नियोजन फार गरजेचे. 

योगेश चंद्रकांत आहिरे.


https://ahireyogesh.blogspot.com/2018/11/nalichi-vaat-rajnaal.html

हरिश्चंद्राची फॅक्टरी

Submitted by जिप्सी on 7 December, 2011 - 23:19

गेले कित्येक दिवस, महिने आणि वर्षापासुन मनात असलेला आणि ट्रेकर्सची पंढरी म्हणुन ओळखल्या जाणार्‍या हरिश्चंद्रगडाची वारी अखेरीस संपन्न झाली. इतके दिवस फक्त फोटोतच त्याला पाहत होतो, भेटत होतो आणि आंतरजालावर, पुस्तकात त्याच्याविषयी वाचत होतो, पण खरं सांगायच तर हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आणि परीसर, महाराष्ट्रातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर "तारामती", रौद्रभीषण कोकणकडा यांना प्रत्यक्ष पाहिल्यानंतर "जो बात तुझमें है तेरी तस्वीरमें नही" असाच काहिसा फिल या दोन दिवसात आला आणि पुन्हा एकदा सह्याद्रीच्या प्रेमात पडलो.

खरंतर मी वृत्तीने जिप्सी, पण हाडाचा ट्रेकर्स नाही, त्यामुळे आत्तापर्यंत जेव्हढे झेपेल, जमेल , सोसेल तेव्हढेच ट्रेक केले. त्यातही हरिश्चंद्रगडाविषयी आकर्षण खुपच होते, पण त्याला भेटण्याचा योग अजुन काही येत नव्हता. तोच योग ३-४ डिसेंबर रोजी जुळुन आला. अहमदनगर, पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या या गडाचा विस्तार मोठा असल्याने येथे पोहचण्याच्या वाटाही वेगवेगळ्या आहेत.माळशेज घाट, खुबी फाट्याहुन खिरेश्वर मार्गे येणारी ५-६ तासाची वाट, साहसाशीच ज्यांची नाळ जोडली आहे त्यांची नळीची वाट, आमच्यासारख्या ट्रेकर्ससाठी सोप्पी पाचनईची दोन तासाची वाट, अशा विविध मार्गाने गड सर करू शकतात. वारकर्‍याला जशी विठठ्ल भेटीची ओढ असते तशीच ओढ प्रत्येक ट्रेकर्सला हरिश्चंद्रगडाची असते. असं म्हणतात कि या गडाचा इतिहास कुतुहलजनक तर भूगोल विस्मयकारक आहे. इतर सर्व किल्ल्यांना ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे तर हरिश्च्चंद्रगडाला हजारो वर्षापूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली असुन याचा उल्लेख अग्नीपुराण आणि मत्स्यपुराणात आढळतो. हिच हरिश्चंद्राची फॅक्टरी जैवविविधतेनेही नटली आहे. गडाच्या पायथ्याचा परीसर कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य म्हणुन ओळखला जातो.

हरिश्चंद्रगड आणि परीसरः
हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर: येथेच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेली आहे. सोळा मीटर आहे. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच `मंगळगंगेचा उगम' असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथर्‍यात जमिनीत खाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत `चांगदेव ऋषींनी' चौदाशे वर्ष तप केलेले आहे असे स्थानिक गावकरी सांगतात. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी
आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिरावर कोरीव गुहा आहे. मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली धळ आहे. या धळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये भलीमोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते.प्रदक्षिणा मारता येते. गडपणाच्या खाणाखुणा लोप पावत असल्यातरी निसर्गाची मुक्त उधळण, त्याचे रौद्रत्व, निसर्गाचे वेगवेगळे आविष्कार आपल्याला हरिश्चंद्राच्या भटकंतीमध्ये पहायला मिळतात. मात्र हे सर्व पहाण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपण किमान दोन दिवसांची सवड हाताशी ठेवणे गरजेचे आहे.

तारामती शिखर: उंची साधारणतः ४८५० फूट्.. शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत. त्यापैकी एका गुफेत गणेशाची सुमारे साडेआठ फुटाची भव्य आणि सुंदर मूर्ती आहे. याच गणेशगुहेच्या आजूबाजूला अनेक गुहा आहेत. त्यातही राहण्याची सोय होते. गुहेच्यासमोर उभे राहिल्यावर डावीकडे जाऊन पुढे वर जाणारी वाट आपल्याला अर्ध्या तासाच्या चढाईनंतर तारामती शिखरावर घेऊन जाते. या शिखरावरून समोरच दिसणारे जंगल, घाटावरचा आणि कोकणातील प्रदेश न्याहाळता येतात. शिखरावर जाताना वाटेत अनेक गोमुखे लागतात. माथ्यावर दोनतीन शिवलिंगे आहेत.

कोकणकडा: या किल्ल्याचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे येथील कोकणकडा. हा कडा महाराष्ट्रातील सर्वांत उंच कडा आहे. हा कडा रोमन लिपीतील यू 'U' या अक्षराच्या आकाराचा आहे. हा इतर कड्यांसारखा ९० अंशात नसून बाह्य गोल आकाराचा आहे. समोरून बघितला तर नागाच्या फण्यासारखा दिसतो.
(आंतरजालाहुन साभार)

चला तर मग आज हरिश्चंद्राच्या या फॅक्टरीतील विविधतेची एक सफर करूया.

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६
मंदिर आणि परीसर
प्रचि ०७

प्रचि ०८
पुष्करणी
प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७
गणेशगुहा
प्रचि १८

प्रचि १९
केदारेश्वर गुहा
प्रचि २०
तारामती शिखरावरून दिसणारी सह्याद्रिची डोंगररांग
प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८
तारामती शिखरावरून दिसणारी श्री हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर
प्रचि २९

प्रचि ३०
रौद्रभीषण कोकणकडा
प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

प्रचि ३९

प्रचि ४०

प्रचि ४१

प्रचि ४२
आभार्स
प्रचि ४३

प्रचि ४४

प्रचि ४५

गुलमोहर: 

                 ‘हरिश्चंद्रगड’ व्हाया ‘गणेश दरवाजा’

गेल्या वर्षी नोव्हेंरमध्ये कुठल्यातरी तरी अनवट वाटेचा प्लान ठरत होता. साथीला होते अजयराव, राजेश मास्तर आणि विनायक. सारं काही जमलं असताना अचानक अश्विनीने काहीही करून मी ट्रेकला येणारच असा आक्रमक पवित्रा घेतला. बरं आता अश्विनी येणार म्हणजे सोबत आमची दोन्ही मुलं चार्वी आणि निशांत ही आलीच. छोटी चार्वी आता बऱ्यापैकी सरावलीय पण चौदा महिन्याचा निशांत, हे सर्व पाहता पुन्हा कुठं जावं इथपासून सुरुवात. मग फार डोकं न चालवता सोयीचं असे पाचनई मार्गे हरिश्चंद्रगड ! आता हे सगळं एका अनवट आणि खेची ट्रेक साठी तयार झालेल्या भिडूंना स्पष्ट सांगितले. ते सर्व कुठलीही आडकाठी न घेता येण्यासाठी ठाम राहिले. शेवटी एकत्र बाहेर पडतोय तर चांगला ट्रेक होणं महत्वाचं, हेच मत पडलं.
शुक्रवारी रात्री आम्ही दोन फुल दोन हाफ आणि अजयराव व विनायक आमच्या गाडीतून थेट लव्हाळीच्या दिशेने. आधी जरी पाचनई मार्गे विचार होता पण सोबत जवळची खंबीर मंडळी असल्यामुळे लव्हाळीतून गणेश दरवाजाने चढाई करायचे ठरवले. अर्थात हा निर्णय पूर्णत: माझा होता आणि सर्वांची साथ यामुळे तो अचुक ठरला.
पहाटे साडेतीनच्या सुमारास लव्हाळीत पोहचलो तेव्हा किरण त्याच्या मावस भाऊ श्रीकांतच्या घरी आमची वाटच पाहत होता. तर पुण्याहून रात्री निघून कडाक्याच्या थंडीत बाईक चालवत राजेश मास्तर व अनिल आमच्या आधीच हजर होते. प्रवास आणि थंडी यामुळे कुणीही गप्पा टप्पा या भानगडीत न पडता सरळ कॅरीमेट टाकून स्लिपिंग बॅग मध्ये गुडूप. सकाळी उठायला अंमळ उशीरच झाला. विनायकने चुलीचा ताबा घेत चवीष्ट उपमा तयार केला. चहा नाश्ता इतर आवराआवरी करून निघपर्यंत साडेआठ वाजले.
555_2.jpg
लव्हाळी गावाच्या एका बाजूला भला मोठा डोंगर आडवा पसरलेला दिसतो. हरिश्चंद्रगडाचा भाग असलेल्या यालाच गणेशसोंड / गणेशधार तसेच वेताळधार असेही म्हणतात. साधारणपणे सांगायचे झाले तर गडाच्या मंदिरातील आवारात उभं राहून पूर्वेला पाहिलं तर मोठं पठार लाभलेली सोंड नजरेस पडते ती हीच. याच धारेच्या अल्याड पल्याड पाचनई आणि लव्हाळी.
फारशा वापरात नसलेल्या या गणेश दरवाजाच्या वाटेबद्दल माहितगार घेणं गरजेचं, आमच्या सोबत खुद्द श्रीकांत होता. गावातून धनगर वस्तीत आलो. नोव्हेंबर महिना सुगीच्या हंगामाची सुरुवात ठिकठिकाणी शेत खळं स्वच्छ सारवून ठेवलेले. त्यात जागो जागी पेंढा रचलेला, ते सारं खूपच छान दिसत होतं. मागे एकदा साल्हेर ट्रेक वेळी अशाच खळ्यात गडाकडे बघत निवांत सायंकाळ घालवत मुक्काम केलेला आठवलं. डावीकडे ओढ्याला समांतर अशी सपाट वाट. सकाळच्या स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणाचा फायदा घेत जमेल तितके जास्तीत जास्त अंतर कापायचे, उन्हात मुलांना घेऊन चढाईचा वेग आपसूकच कमी होणार.
डाव्या हाताला भैरोबा दुर्ग, उजवीकडे वेताळ / गणेशधार तर समोर सरळ रेषेत टोलारखिंड. निघाल्यापासून पाऊण तासात ओढ्यात तयार झालेल्या नैसर्गिक कुंडा जवळील देवाच्या स्थानी आलो.
IMG_2272.JPG
शेंदूर लावलेले हे देवीच ठाणं, शुक्रवारी ग्रामस्थांची या देवीला ये जा असते. जागा बाकी भारीच रमणीय.
IMG_2271.JPG
बच्चे कंपनी एकदम खुश, थोडा सुका खाऊ खात मोठा ब्रेक घेतला. इथून पुढची वाट वरच्या बाजूला सरकू लागली, लव्हाळीतील लोकांची गडावर जाण्यासाठी मुख्य वाट. पण खरी गंमत तर पुढे आहे, वीस एक मिनिटांच्या चाली नंतर आम्ही आलो ती मळलेली वाट सरळ टोलार खिंडीत जाते. याच वाटेला डावीकडून म्हणजेच कोतुळ भैरोबा दुर्ग कडून येणारी वाट मिळते. आमचं गणेश दरवाजा ठरलं असल्याने आम्ही उजवीकडे जाणारी बारीक वाट घेतली. पटकन सहजासहजी लक्षात न येणारी ही वाट त्या साठी कुणी माहितगार हवाच. आता खडी चढाई सुरू झाली, खालचा झाडीचा भाग पार करून कातळ टप्प्यावर आलो. वळून पाहिलं विरुद्ध दिशेला भैरोबा दुर्ग मागे पडला होता तर डावीकडे झाडी भरली टोलारखिंड बऱ्यापैकी जवळ वाटतं होती.
IMG_2294.JPG
खिंडीला तसेच टाटा बाय बाय करत पुन्हा झाडीमध्ये शिरलो, या दिवसात जंगल चांगलेच बहरलेले. नागमोडी चढाईने मात्र दम काढला, खरतर दोन दिवसाचा ट्रेक असल्याने सर्वांच्या सॅक वजनदार त्यात निशांतला कडेवर घेऊन वेळ ही थोडा जास्तच लागत होता. चार्वी तरी आमच्यात सामील झालेल्या भुभू बरोबर मजा मस्तीत दंग पण निशांतचे थोडे टेन्शन होतेच. सुरुवातीला कुरकुर करणारा निशांत काही वेळाने गप्प झाला यामुळे थोडा थोडा वेळ त्याला प्रत्येकाकडे पासिंग पास. खरंच सोबत्यांचे आभार मानावे तेवढे कमीच. मुलांच्या हिशोबाने जेव्हा जिथे वाटेल तिथे थांबायचं दम घेत तोंडत काहीतरी टाकून पुढे निघायचं. मुक्कामी ट्रेक त्यात आमच्यात कुणीही असं नव्हतं ज्याने गड पाहिला नाही, त्यामुळे ही वाट हेच मुख्य आकर्षण असल्याने एक निवांतपणा होता. कड्याला उजवीकडे ठेवत कधी दगड धोंड्यातून तर कधी झाडीतून तर कधी लहान लहान कातळ टप्प्यातून वाट तिरक्या रेषेत वर जात मुख्य कड्याला बिलगली.
IMG_2332.JPG
इथेच शेंदूर फासलेला दगडाचा देव. आता अरुंद वाट वर जाऊ लागली, मधले किरकोळ कातळ टप्पे पार करून समोर आल्या त्या कातळात कोरलेल्या दीड दोन फूट रुंद अशा पायऱ्या.
IMG_2340.JPG555_0.jpg
मोजल्या नाहीत तरी अंदाजे साठ सत्तर किमान असाव्यात. निरीक्षण केल्यावर एक जाणवलं ते म्हणजे या पायऱ्या असलेल्या मोठ्या कातळटप्प्यातच त्या बाजूचा टोलार खिंडीचा कातळटप्पा जो खिरेश्र्वरहून येताना लागतो. थोडक्यात दोन्ही एकाच आणि समान पातळीवर.
IMG_2323.JPG
पायऱ्या चढून जेव्हा वर आलो तेव्हा भैरोबा दुर्ग बराच खाली वाटू लागला. आता सुरू झाली ती कमरे एवढ्या झाडीतून चढाई. काही ठिकाणी उंचीच्या मानाने चार्वी तर पूर्ण झाकली जाऊ लागली. आता पर्यंत मजा मस्ती करणारी साहजिकच इथे ती वैतागली. हे जंगल कधी संपणार असे विचारू लागली. अजयरावांनी तिला खांद्यावर घेत झटपट पुढे नेलं. झाडी भरला चढाईचा टप्पा संपून वर मोठ्या नैसर्गिक गुहेजवळ आलो.
IMG_2391.JPG
अर्धवर्तुळाकार गुहेसमोर वरून येणाऱ्या पावसाळी ओढ्यामुळे पाण्याची कुंड तयार झालेली. बऱ्यापैकी प्रशस्त अशा गुहेत इथली मंडळी पावसाळ्यात गाई गुरे ठेवतात. गुहेला डावीकडे ठेवत वरच्या पठारावर आलो.
IMG_2402.JPG
बाजूलाच गणपतीचं स्थान तसेच या पठारावरील या कातळ भागात काही ठिकाणी पॉट होल्स. हे सारं पाहून आम्हा सर्वांना गडाच्या या काहीश्या दुर्गम वाटेने आल्याचं वेगळेच समाधान वाटले.
IMG_2438.JPG
फोटोग्राफी, सुका खाऊ, लिंबू सरबत मग निशांतची पावर नॅप यात जवळपास पाऊण तासाचा ब्रेक झाला. घड्याळात पाहिलं तर पावणे दोन, आता पुढची चाल ही हिरव्या पिवळ्या गवतातून. लहानशी टेकडी चढून वाट उजवीकडे आडवी जाऊ लागली. इथून मागे वळून पाहिले तर भैरोबा दुर्गला जोडलेली डोंगर रांग तर पूर्वेला कारकाई कडील रांग सहज नजरेत आली.
IMG_2444.JPG
पुन्हा पंधरा वीस मिनिटांची खडी चढाई करत वर आलो तेव्हा बालेकिल्ला समोर आला. नीट निरखून पाहिलं तर काही मंडळी भगवा झेंडा घेऊन वर जाताना दिसली. बालेकिल्ला डावीकडे ठेवत आणखी एक टेकडी चढून वर आलो तेव्हा काही अंतरावर टोलार खिंडीतून वर येणारी वाट येऊन मिळाली.
IMG_2459.JPG
आता इथून पुढची मंदिरा पर्यंतची वाट म्हणजे लहान चढ उतार असणारा हायवेच जणू. चार्वीला अजय, अनिल व श्रीकांत सोबत पुढे पाठवून दिले, आम्ही आरामात निशांत सोबत साडेतीन वाजता पोहचलो.
मंदिर परिसरात तुरळक गर्दी होती, विकेंड असल्याने तेवढं चालायचं. गुहेत काही मंडळी आधीपासून होती तसेही लहान मुलांना घेऊन गुहेत फारसं सुरक्षित नाही वाटत. आमचा ढेरा वाळीबाकडे टाकला. पाहिलं काम पोटोबा, घरातून आणलेले जेवण संपवले.
IMG_2487.JPG
मग फ्रेश होऊन निवांत, मुलं तर अंघोळ झाल्यावर मोकळ्या जागेत दंगा मस्ती करू लागली. खरंच डोंगरातल्या या हवेत वेगळीच जादू असते. सायंकाळी अर्थातच कोकणकडा हे वेगळं सांगायला नको.
IMG_2529.JPG
गेल्या पंधरवड्यात नळीच्या वाटेने आलो होतो त्या आठवणी ताज्या झाल्या. सूर्यास्त पाहून झाल्यावर पुन्हा माघारी मंदिर परिसरात. थोडाफार शिधा घरातून आणला होता, बाकी वाळीबा कृपा. जेवणानंतर बराच वेळ गप्पा टप्पा त्यात काल लव्हाळीच्या तुलनेत इथे गडावर थंडी कमीच.
777.JPG
दुसऱ्या दिवशी सकाळी महादेवाचं दर्शन घेतल्यावर नऊच्या सुमारास गड सोडला. सुरुवातीला बैलघाटाने जाऊ असा विचार केला. मागे सादडे घाटाच्या वेळी बैलघाट माझा झाला होता, त्यामुळे अंतर आणि वेळ याचा अंदाज होताच. पण मुलांना घेऊन जास्त वेळ जाणार परत घाट संपल्यावर उलटं कच्च्या डांबरी रस्त्याने भर उन्हात पाचनईत येणं कंटाळवाणे. मुख्य म्हणजे गाडी लव्हाळीत त्यामुळे पाचनईतून अकराच्या सुमारास असलेली बस पकडणे गरजेचं होतं. सर्वानुमते पाचनईने उतरणे फिक्स केले.
IMG_2554.JPG
पाचनईचा रूट तसा हवशे नवशे गवशे अशा सर्वांना सोयीचा. मंदिरा समोर डावीकडे जाणारी प्रशस्त वाट दहा पंधरा मिनिटांनी सौम्य उतरण घेत वाट रानात शिरली. फार तीव्र उतरण नाही तसेच वर येताना दम लागेल अशी चढाई नाही. अर्ध्या तासात वाट ओढयाजवळ बाहेर आली, मागेच काही वर्षांपूर्वी पावसाळ्यात ओढा पार करणं सोपं व्हावं म्हणून वन विभागाने लोखंडी पुल बांधला आहे. ओढ्याला डावीकडे समांतर ठेवत, नंतर उजवीकडे वळून पुढची वाट कड्याच्या पोटातून.
IMG_2596.JPG
आरामात अर्धा तास तशी आडवी चाल झाल्यावर वाट कातळटप्प्यातून उतरू लागली इथे काही ठिकाणी आधाराला रेलिंग लावलेले आहेत.
IMG_2619.JPG
त्या पुढे जेमतेम पंधरा मिनिटांची उतराई, थेट पाचनई पेठेचीवाडी रस्त्यावर आलो. पाचनईत जिकडे तिकडे गाड्यांची गर्दी, रविवार त्यात दिवाळीच्या सुट्टया असल्यामुळे असावे. घड्याळात पाहिलं तर अकरा वाजत आलेले, बसची चौकशी केली असता सुट्टीच्या दिवशी वेळेचा भरवसा नसतो कधी कधी येत पण नाही असं समजले. थोडा वेळ वाट पाहून जीप मध्ये बसलो. चालकाचा महिंद्रा अँड महिंद्रावर प्रचंड विश्वास तो प्रुव्ह होता ते क्षमतेपेक्षा अडीच पट माणसं बोझ्यासकट डांबून. अर्ध्या तासाची थरारक सवारी अनुभवत लव्हाळीत उतरलो. श्रीकांतच्या घरी फ्रेश होऊन दुपारचं जेवण उरकून आरामात चारच्या सुमारास निघालो. राजेश मास्तर व अनिल लव्हाळी-कोहणे-कोतुळ-ब्राम्हणवाडा-ओतूर मार्गे पुण्याकडे रवाना झाले. जाता जाता त्या दोघांनी भैरोबा दुर्ग पाहून घेतला. पुढच्या वेळी वेताळधार जोडून राजदरवाज्याची वाट नक्की करायची असे ठरवून परतीच्या वाटेला लागलो.

अधिक फोटोसाठी हे पहा : https://ahireyogesh.blogspot.com/2019/10/harishchandragad-ganeshdarvaja....

                 ‘हरिश्चंद्रगड’ व्हाया ‘गणेश दरवाजा’

गेल्या वर्षी नोव्हेंरमध्ये कुठल्यातरी तरी अनवट वाटेचा प्लान ठरत होता. साथीला होते अजयराव, राजेश मास्तर आणि विनायक. सारं काही जमलं असताना अचानक अश्विनीने काहीही करून मी ट्रेकला येणारच असा आक्रमक पवित्रा घेतला. बरं आता अश्विनी येणार म्हणजे सोबत आमची दोन्ही मुलं चार्वी आणि निशांत ही आलीच. छोटी चार्वी आता बऱ्यापैकी सरावलीय पण चौदा महिन्याचा निशांत, हे सर्व पाहता पुन्हा कुठं जावं इथपासून सुरुवात. मग फार डोकं न चालवता सोयीचं असे पाचनई मार्गे हरिश्चंद्रगड ! आता हे सगळं एका अनवट आणि खेची ट्रेक साठी तयार झालेल्या भिडूंना स्पष्ट सांगितले. ते सर्व कुठलीही आडकाठी न घेता येण्यासाठी ठाम राहिले. शेवटी एकत्र बाहेर पडतोय तर चांगला ट्रेक होणं महत्वाचं, हेच मत पडलं.
शुक्रवारी रात्री आम्ही दोन फुल दोन हाफ आणि अजयराव व विनायक आमच्या गाडीतून थेट लव्हाळीच्या दिशेने. आधी जरी पाचनई मार्गे विचार होता पण सोबत जवळची खंबीर मंडळी असल्यामुळे लव्हाळीतून गणेश दरवाजाने चढाई करायचे ठरवले. अर्थात हा निर्णय पूर्णत: माझा होता आणि सर्वांची साथ यामुळे तो अचुक ठरला.
पहाटे साडेतीनच्या सुमारास लव्हाळीत पोहचलो तेव्हा किरण त्याच्या मावस भाऊ श्रीकांतच्या घरी आमची वाटच पाहत होता. तर पुण्याहून रात्री निघून कडाक्याच्या थंडीत बाईक चालवत राजेश मास्तर व अनिल आमच्या आधीच हजर होते. प्रवास आणि थंडी यामुळे कुणीही गप्पा टप्पा या भानगडीत न पडता सरळ कॅरीमेट टाकून स्लिपिंग बॅग मध्ये गुडूप. सकाळी उठायला अंमळ उशीरच झाला. विनायकने चुलीचा ताबा घेत चवीष्ट उपमा तयार केला. चहा नाश्ता इतर आवराआवरी करून निघपर्यंत साडेआठ वाजले.
555_2.jpg
लव्हाळी गावाच्या एका बाजूला भला मोठा डोंगर आडवा पसरलेला दिसतो. हरिश्चंद्रगडाचा भाग असलेल्या यालाच गणेशसोंड / गणेशधार तसेच वेताळधार असेही म्हणतात. साधारणपणे सांगायचे झाले तर गडाच्या मंदिरातील आवारात उभं राहून पूर्वेला पाहिलं तर मोठं पठार लाभलेली सोंड नजरेस पडते ती हीच. याच धारेच्या अल्याड पल्याड पाचनई आणि लव्हाळी.
फारशा वापरात नसलेल्या या गणेश दरवाजाच्या वाटेबद्दल माहितगार घेणं गरजेचं, आमच्या सोबत खुद्द श्रीकांत होता. गावातून धनगर वस्तीत आलो. नोव्हेंबर महिना सुगीच्या हंगामाची सुरुवात ठिकठिकाणी शेत खळं स्वच्छ सारवून ठेवलेले. त्यात जागो जागी पेंढा रचलेला, ते सारं खूपच छान दिसत होतं. मागे एकदा साल्हेर ट्रेक वेळी अशाच खळ्यात गडाकडे बघत निवांत सायंकाळ घालवत मुक्काम केलेला आठवलं. डावीकडे ओढ्याला समांतर अशी सपाट वाट. सकाळच्या स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणाचा फायदा घेत जमेल तितके जास्तीत जास्त अंतर कापायचे, उन्हात मुलांना घेऊन चढाईचा वेग आपसूकच कमी होणार.
डाव्या हाताला भैरोबा दुर्ग, उजवीकडे वेताळ / गणेशधार तर समोर सरळ रेषेत टोलारखिंड. निघाल्यापासून पाऊण तासात ओढ्यात तयार झालेल्या नैसर्गिक कुंडा जवळील देवाच्या स्थानी आलो.
IMG_2272.JPG
शेंदूर लावलेले हे देवीच ठाणं, शुक्रवारी ग्रामस्थांची या देवीला ये जा असते. जागा बाकी भारीच रमणीय.
IMG_2271.JPG
बच्चे कंपनी एकदम खुश, थोडा सुका खाऊ खात मोठा ब्रेक घेतला. इथून पुढची वाट वरच्या बाजूला सरकू लागली, लव्हाळीतील लोकांची गडावर जाण्यासाठी मुख्य वाट. पण खरी गंमत तर पुढे आहे, वीस एक मिनिटांच्या चाली नंतर आम्ही आलो ती मळलेली वाट सरळ टोलार खिंडीत जाते. याच वाटेला डावीकडून म्हणजेच कोतुळ भैरोबा दुर्ग कडून येणारी वाट मिळते. आमचं गणेश दरवाजा ठरलं असल्याने आम्ही उजवीकडे जाणारी बारीक वाट घेतली. पटकन सहजासहजी लक्षात न येणारी ही वाट त्या साठी कुणी माहितगार हवाच. आता खडी चढाई सुरू झाली, खालचा झाडीचा भाग पार करून कातळ टप्प्यावर आलो. वळून पाहिलं विरुद्ध दिशेला भैरोबा दुर्ग मागे पडला होता तर डावीकडे झाडी भरली टोलारखिंड बऱ्यापैकी जवळ वाटतं होती.
IMG_2294.JPG
खिंडीला तसेच टाटा बाय बाय करत पुन्हा झाडीमध्ये शिरलो, या दिवसात जंगल चांगलेच बहरलेले. नागमोडी चढाईने मात्र दम काढला, खरतर दोन दिवसाचा ट्रेक असल्याने सर्वांच्या सॅक वजनदार त्यात निशांतला कडेवर घेऊन वेळ ही थोडा जास्तच लागत होता. चार्वी तरी आमच्यात सामील झालेल्या भुभू बरोबर मजा मस्तीत दंग पण निशांतचे थोडे टेन्शन होतेच. सुरुवातीला कुरकुर करणारा निशांत काही वेळाने गप्प झाला यामुळे थोडा थोडा वेळ त्याला प्रत्येकाकडे पासिंग पास. खरंच सोबत्यांचे आभार मानावे तेवढे कमीच. मुलांच्या हिशोबाने जेव्हा जिथे वाटेल तिथे थांबायचं दम घेत तोंडत काहीतरी टाकून पुढे निघायचं. मुक्कामी ट्रेक त्यात आमच्यात कुणीही असं नव्हतं ज्याने गड पाहिला नाही, त्यामुळे ही वाट हेच मुख्य आकर्षण असल्याने एक निवांतपणा होता. कड्याला उजवीकडे ठेवत कधी दगड धोंड्यातून तर कधी झाडीतून तर कधी लहान लहान कातळ टप्प्यातून वाट तिरक्या रेषेत वर जात मुख्य कड्याला बिलगली.
IMG_2332.JPG
इथेच शेंदूर फासलेला दगडाचा देव. आता अरुंद वाट वर जाऊ लागली, मधले किरकोळ कातळ टप्पे पार करून समोर आल्या त्या कातळात कोरलेल्या दीड दोन फूट रुंद अशा पायऱ्या.
IMG_2340.JPG555_0.jpg
मोजल्या नाहीत तरी अंदाजे साठ सत्तर किमान असाव्यात. निरीक्षण केल्यावर एक जाणवलं ते म्हणजे या पायऱ्या असलेल्या मोठ्या कातळटप्प्यातच त्या बाजूचा टोलार खिंडीचा कातळटप्पा जो खिरेश्र्वरहून येताना लागतो. थोडक्यात दोन्ही एकाच आणि समान पातळीवर.
IMG_2323.JPG
पायऱ्या चढून जेव्हा वर आलो तेव्हा भैरोबा दुर्ग बराच खाली वाटू लागला. आता सुरू झाली ती कमरे एवढ्या झाडीतून चढाई. काही ठिकाणी उंचीच्या मानाने चार्वी तर पूर्ण झाकली जाऊ लागली. आता पर्यंत मजा मस्ती करणारी साहजिकच इथे ती वैतागली. हे जंगल कधी संपणार असे विचारू लागली. अजयरावांनी तिला खांद्यावर घेत झटपट पुढे नेलं. झाडी भरला चढाईचा टप्पा संपून वर मोठ्या नैसर्गिक गुहेजवळ आलो.
IMG_2391.JPG
अर्धवर्तुळाकार गुहेसमोर वरून येणाऱ्या पावसाळी ओढ्यामुळे पाण्याची कुंड तयार झालेली. बऱ्यापैकी प्रशस्त अशा गुहेत इथली मंडळी पावसाळ्यात गाई गुरे ठेवतात. गुहेला डावीकडे ठेवत वरच्या पठारावर आलो.
IMG_2402.JPG
बाजूलाच गणपतीचं स्थान तसेच या पठारावरील या कातळ भागात काही ठिकाणी पॉट होल्स. हे सारं पाहून आम्हा सर्वांना गडाच्या या काहीश्या दुर्गम वाटेने आल्याचं वेगळेच समाधान वाटले.
IMG_2438.JPG
फोटोग्राफी, सुका खाऊ, लिंबू सरबत मग निशांतची पावर नॅप यात जवळपास पाऊण तासाचा ब्रेक झाला. घड्याळात पाहिलं तर पावणे दोन, आता पुढची चाल ही हिरव्या पिवळ्या गवतातून. लहानशी टेकडी चढून वाट उजवीकडे आडवी जाऊ लागली. इथून मागे वळून पाहिले तर भैरोबा दुर्गला जोडलेली डोंगर रांग तर पूर्वेला कारकाई कडील रांग सहज नजरेत आली.
IMG_2444.JPG
पुन्हा पंधरा वीस मिनिटांची खडी चढाई करत वर आलो तेव्हा बालेकिल्ला समोर आला. नीट निरखून पाहिलं तर काही मंडळी भगवा झेंडा घेऊन वर जाताना दिसली. बालेकिल्ला डावीकडे ठेवत आणखी एक टेकडी चढून वर आलो तेव्हा काही अंतरावर टोलार खिंडीतून वर येणारी वाट येऊन मिळाली.
IMG_2459.JPG
आता इथून पुढची मंदिरा पर्यंतची वाट म्हणजे लहान चढ उतार असणारा हायवेच जणू. चार्वीला अजय, अनिल व श्रीकांत सोबत पुढे पाठवून दिले, आम्ही आरामात निशांत सोबत साडेतीन वाजता पोहचलो.
मंदिर परिसरात तुरळक गर्दी होती, विकेंड असल्याने तेवढं चालायचं. गुहेत काही मंडळी आधीपासून होती तसेही लहान मुलांना घेऊन गुहेत फारसं सुरक्षित नाही वाटत. आमचा ढेरा वाळीबाकडे टाकला. पाहिलं काम पोटोबा, घरातून आणलेले जेवण संपवले.
IMG_2487.JPG
मग फ्रेश होऊन निवांत, मुलं तर अंघोळ झाल्यावर मोकळ्या जागेत दंगा मस्ती करू लागली. खरंच डोंगरातल्या या हवेत वेगळीच जादू असते. सायंकाळी अर्थातच कोकणकडा हे वेगळं सांगायला नको.
IMG_2529.JPG
गेल्या पंधरवड्यात नळीच्या वाटेने आलो होतो त्या आठवणी ताज्या झाल्या. सूर्यास्त पाहून झाल्यावर पुन्हा माघारी मंदिर परिसरात. थोडाफार शिधा घरातून आणला होता, बाकी वाळीबा कृपा. जेवणानंतर बराच वेळ गप्पा टप्पा त्यात काल लव्हाळीच्या तुलनेत इथे गडावर थंडी कमीच.
777.JPG
दुसऱ्या दिवशी सकाळी महादेवाचं दर्शन घेतल्यावर नऊच्या सुमारास गड सोडला. सुरुवातीला बैलघाटाने जाऊ असा विचार केला. मागे सादडे घाटाच्या वेळी बैलघाट माझा झाला होता, त्यामुळे अंतर आणि वेळ याचा अंदाज होताच. पण मुलांना घेऊन जास्त वेळ जाणार परत घाट संपल्यावर उलटं कच्च्या डांबरी रस्त्याने भर उन्हात पाचनईत येणं कंटाळवाणे. मुख्य म्हणजे गाडी लव्हाळीत त्यामुळे पाचनईतून अकराच्या सुमारास असलेली बस पकडणे गरजेचं होतं. सर्वानुमते पाचनईने उतरणे फिक्स केले.
IMG_2554.JPG
पाचनईचा रूट तसा हवशे नवशे गवशे अशा सर्वांना सोयीचा. मंदिरा समोर डावीकडे जाणारी प्रशस्त वाट दहा पंधरा मिनिटांनी सौम्य उतरण घेत वाट रानात शिरली. फार तीव्र उतरण नाही तसेच वर येताना दम लागेल अशी चढाई नाही. अर्ध्या तासात वाट ओढयाजवळ बाहेर आली, मागेच काही वर्षांपूर्वी पावसाळ्यात ओढा पार करणं सोपं व्हावं म्हणून वन विभागाने लोखंडी पुल बांधला आहे. ओढ्याला डावीकडे समांतर ठेवत, नंतर उजवीकडे वळून पुढची वाट कड्याच्या पोटातून.
IMG_2596.JPG
आरामात अर्धा तास तशी आडवी चाल झाल्यावर वाट कातळटप्प्यातून उतरू लागली इथे काही ठिकाणी आधाराला रेलिंग लावलेले आहेत.
IMG_2619.JPG
त्या पुढे जेमतेम पंधरा मिनिटांची उतराई, थेट पाचनई पेठेचीवाडी रस्त्यावर आलो. पाचनईत जिकडे तिकडे गाड्यांची गर्दी, रविवार त्यात दिवाळीच्या सुट्टया असल्यामुळे असावे. घड्याळात पाहिलं तर अकरा वाजत आलेले, बसची चौकशी केली असता सुट्टीच्या दिवशी वेळेचा भरवसा नसतो कधी कधी येत पण नाही असं समजले. थोडा वेळ वाट पाहून जीप मध्ये बसलो. चालकाचा महिंद्रा अँड महिंद्रावर प्रचंड विश्वास तो प्रुव्ह होता ते क्षमतेपेक्षा अडीच पट माणसं बोझ्यासकट डांबून. अर्ध्या तासाची थरारक सवारी अनुभवत लव्हाळीत उतरलो. श्रीकांतच्या घरी फ्रेश होऊन दुपारचं जेवण उरकून आरामात चारच्या सुमारास निघालो. राजेश मास्तर व अनिल लव्हाळी-कोहणे-कोतुळ-ब्राम्हणवाडा-ओतूर मार्गे पुण्याकडे रवाना झाले. जाता जाता त्या दोघांनी भैरोबा दुर्ग पाहून घेतला. पुढच्या वेळी वेताळधार जोडून राजदरवाज्याची वाट नक्की करायची असे ठरवून परतीच्या वाटेला लागलो.

अधिक फोटोसाठी हे पहा : https://ahireyogesh.blogspot.com/2019/10/harishchandragad-ganeshdarvaja....

 भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेला हरिश्चंद्रगड पाहायची इच्छा खूप होती, नियोजन काही होत नसल्यामुळे पाहायचा राहिला होता. पण अचानक संजय शेंडकरने प्लान बनवून कळवले. शनिवारी २३-०१-२०२१ रोजी पहाटे ०६:०० वाजता पुणे येथून निघालो. ️ वाटेमध्ये नारायणगांवला नाश्ता करून ०९:३० वाजता खिरेश्वर या गावी पोहचलो. मुक्ताई मातेच्या मंदिराला 🛕 लागून असलेले अक्षय मुठे यांचे घर व हॉटेल मुक्ताई येथे गाडी लावून आम्ही आमच्या बॅगवर तंबू, चटई बांधून १०:०० वाजता टोलारखिंड मार्गाने हरिश्चंद्रगडाच्या दिशेने चालायला सुरवात केली. 


मुक्ताई मातेचे मंदिर खिरेश्वर
मुक्ताई मातेचे मंदिर खिरेश्वर 

मुक्ताई मातेची मूर्ती - मुक्ताई मंदिर, खिरेश्वर
मुक्ताई मातेची मूर्ती - मुक्ताई मंदिर, खिरेश्वर
गावामधूनच पूर्ण मोठ्या उंच झाडांच्या जंगलामधुन वाट चालू झाली. भटक्यांचा गर्दी मुळे वाट चांगलीच मळलेळी आहे. वाटे मध्ये ठिक ठिकाणी 🍋 लिंबू सरबत, कोकम सरबत, काकडी विकणारे 🥒 गावकरी यांची दुकाने आहेत. त्या जंगलाचा वाटेमध्ये ऐकू येणारे पक्षाचे आवाज 🕊️ ऐकत आम्ही चालत होतो. पुढे एका झाडाखाली थोडे पाणी पिण्यासाठी विसावलो. तेथील शांततेमध्ये अचानक अफाट मधमाशांचा आवाज 🐝 कानावरती ऐकू येताच आम्ही वरती पाहू लागलो तर ते झाड पूर्ण पणे फुलांनी मोहरले होते🌳🌸.
वाटेमधील फुलांनी मोहरलेले झाड
वाटेमधील फुलांनी मोहरलेले झाड

पुढे पायथ्यापासून तासभराच्या चढाई नंतर आम्ही टोलारखिंड येथे येऊन पोहचलो. येथे समोरच वाघ्रशिल्प नजरेस आले🐯.🛕गावकरी याला वाघोबाचे देवस्थान असे म्हणतात. तसेच तेथे एका दगडावरती शिवलिंग पाहायला मिळाले. गड वनक्षेत्र 🎋🌳असल्याने, येथुन वनविभागाकडून प्लास्टिक व इतर तपासणी करून पुढे गडावरती सोडले जाते. टोलारखिंडीतुन खालील बाजूला कोथळे व लव्हाली 🏘️ या गावी वाट जाते. खिंडीमधून वरती गडाचा दिशेला २ मिनिट चालून येताच समोर उभा ठाकतो तो म्हणजे थोडाशा भीतीचा दगडाच्या चढाईचा मार्ग 🧗🏼‍♀️(rock patch). तेथे काही ठिकाणी दगडा मध्ये पायऱ्या बनवलेल्या आहेत. जंगल वाट संपवून पुढे आल्यामुळे दुपारचे ऊन खुप लागत होते. पुढे डोंगराचा काठावरून जाणारी वाट व दगडाच्या चढाईची (rock patch) वाट पार करून एका गुहे मध्ये येऊन विसावलो. तेथून पुढे चालून जाताच पूर्वे कडून गडाचा पठारावती पोहचलो. पुढे दोन वाटा जातात एक डाव्या बाजूने बालेकिल्ला कडून व एक उजव्या बाजूने, दोन्ही वाटा शेवटी मुख्य मंदिरापाशी जातात. आम्ही उजव्या बाजूने चालत वाटेमधील कोरडे ओढे, व आजू बाजूचा परिसर निहालत २:०० वाजता मुख्य मंदिरा पाशी येऊन पोहचलो. मंदिरा जवळील एका वाटेने बरेच लोक एक जात होते, विचारणा केली व थोडे पुढे वाट पाहून आलो. ती वाट पाचनई गावातून येते, सध्या चढाईसाठी सर्वात जवळची व सोपी वाट म्हणून या वाटेचा जास्त उपयोग करत आहेत. गडावरती वनविभागाणे दिलेल्या नियमा प्रमाणे पाचनई मधील गावकऱ्यांनी लहान हॉटेल बनवलेत त्या पैकी कैलास भारमल यांचे हॉटेल राजयोग येथे जाऊन आम्ही आमचा पाठीवरील बोझा उतरविला. तेथेच घरून घेतलेले दुपारचे जेवण उरकून🍲 एक तास भर विश्रांती घेतली. व पुढील नियोजन ठरविले.

तोलारखिंड येथिल वाघ्रशिल्प
तोलारखिंड येथिल वाघ्रशिल्प
तोलारखिंड येथिल शिवलिंग
तोलारखिंड येथिल शिवलिंग
तोलारखिंड नंतर असलेला दगडाचा चढाईचा मार्ग
तोलारखिंड नंतर असलेला दगडाचा चढाईचा मार्ग
वाटेतील गुहा
वाटेतील गुहा

दुपारच्या विश्रांती नंतर आम्ही मुख्य मंदिराचा परिसर पाहायला निघालो. प्रथम केदारेश्वर लेणी व केदारेश्वराचा पाण्यातील लेणी मधील शिवलिंग पाहिले व त्या थंडगार बर्फाळलेल्या पाण्यामधून शिवलींगाला प्रदक्षिणा मारली. या शिवलिंगा भोवती ४ खांब होते त्या पैकी आता एकच खांब पूर्ण शाबूत आहे व बाकीचे ३ खांब भग्न अवस्थेत आहेत.
पुढे गडावरील मुख्य 🛕🛕 हरिश्चंद्रेश्वर मंदिर, गाभाऱ्यातील शिवलिंग, तसेच या मंदिराला दोन बाजूने दरवाजे व त्या समोर नंदी पाहायला मिळतात. हरिश्चंद्रेश्वर मंदिरातील गणपती, मंदिरावरील सुबक सुंदर नक्षीकाम, मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या काही गुहा, त्यातील एका गुहेत पुरातन काळातील काही मूर्ती ठेवलेल्या आहेत. मंदिरा मधील पिण्याच्या पाण्याचे टाके, मंदिराचा बाजूने असलेली लहान मंदिरे पाहून बाहेर आलो.
मुख्य मंदिरा समोरील लहानशा मंदिरा मध्ये देखील गणपती व पाण्याखाली शिवलिंग पाहायला मिळाले. तसेच मंदिरा बाहेरील बाजूला असलेली पुष्करणी व इतर लहान सहान शिवलिंग व गणपती मंदिरे पाहायला मिळाली.

केदारेश्वर लेणी
केदारेश्वर लेणी

केदारेश्वराचा लेणी मधील पाण्यातील शिवलिंग
केदारेश्वराचा लेणी मधील पाण्यातील शिवलिंग

हरिश्चंद्रेश्वर मंदिर
हरिश्चंद्रेश्वर मंदिर
गाभाऱ्यातील शिवलिंग
गाभाऱ्यातील शिवलिंग
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा वरती असलेल्या मूर्ती व नक्षीकाम
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा वरती असलेल्या मूर्ती व नक्षीकाम
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा एका बाजूला असलेला गणपती
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा एका बाजूला असलेला गणपती
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा वरती असलेल्या मूर्ती व नक्षीकाम
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा वरती असलेल्या मूर्ती व नक्षीकाम
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा एका बाजूला असलेला नंदी
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा एका बाजूला असलेला नंदी
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा आतील एका लहान मंदिर व शिवलिंग
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा वरती असलेल्या मूर्ती व नक्षीकाम
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा वरती असलेल्या मूर्ती व नक्षीकाम

हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा आतील पाण्याचे टाके
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा आतील पाण्याचे टाके
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा आतील गुहे मध्ये असलेल्या पुरातन काळातील काही मूर्ती
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा आतील गुहे मध्ये असलेल्या पुरातन काळातील काही मूर्ती
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा समोरील लहानशे गणपती व शिवलिंग मंदिर
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा समोरील लहानशे गणपती व शिवलिंग मंदिर
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा बाहेरील बाजूला असलेली पुष्करणी
हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा बाहेरील बाजूला असलेली पुष्करणी
पुष्करणीचा मागील बाजूला असलेले गणपती मंदिर
पुष्करणीचा मागील बाजूला असलेले गणपती मंदिर

पुढे तेथूनच जवळ तारामती शिखराच्या पायथ्याला सात लेणी आहेत. त्यापैकी एका गुंफेत गणेशाची सुमारे आठ फूटाची भव्य आणि सुंदरमूर्ती पाहायला मिळाली. याच गुहेच्या आजुबाजूला अनेक गुहा पाहायला मिळाल्या.

हरिश्चंद्रेश्वर मंदिरा जवळ, तारामती शिखराच्या पायथ्याला असलेली लेणी / गुहा
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा जवळ, तारामती शिखराच्या पायथ्याला असलेली लेणी / गुहा
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा जवळ, तारामती शिखराच्या पायथ्याला असलेली गुहेतील गणेश मूर्ती
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा जवळ, तारामती शिखराच्या पायथ्याला असलेली गुहेतील गणेश मूर्ती
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा जवळ, तारामती शिखराच्या पायथ्याला असलेली गुहेतील गणेश मूर्ती
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा जवळ, तारामती शिखराच्या पायथ्याला असलेली गुहेतील गणेश मूर्ती
पुढे संध्याकाळचा चहा घेऊन मंदिरा पासून १२०० मीटर लांब व पश्चिम दिशेला असलेला कोकण कडा पाहायला निघालो.⛰️ तो अप्रतिम मनमोहक कोकण कडा पाहून मन प्रसन्न झाले. त्यातच कोकण कडा वरून सूर्यास्त 🌤️पाहणे म्हणजे नयन सुखचं !! कोकण कडा येथे देखील लहान हॉटेल व बऱ्याच प्रमाणात तंबू ⛺ लावलेले दिसले. कोकण कडाच्या सूर्यास्ता नंतर विजेरीचा 🔦 प्रकाशामध्ये आम्ही माघारी फिरलो व मंदिर जवळ मुक्कामाच्या ठिकाणी आलो. मग आम्ही तेथेच अंगणा मध्ये आमचा तंबू ⛺ लावला तो पर्यंत जेवण तयार झाले. मग रात्री त्या गरमा गरम जेवणा वरती ताव मारला आणि मग त्या अंधाऱ्या रात्री शेकोटी पेटवून 🔥गप्पा गोष्टी केल्या.

कोकण कडा
कोकण कडा
कोकण कडा येथून सूर्यास्त
कोकण कडा येथून सूर्यास्त
कोकण कडा येथून सूर्यास्त
कोकण कडा येथून सूर्यास्त
कोकण कडा येथून सूर्यास्त
कोकण कडा येथून सूर्यास्त
हरिश्चंद्रेगडा वरील रात्रीचे जेवण
हरिश्चंद्रेगडा वरील रात्रीचे जेवण
तंबूमधील रात्र
तंबूमधील रात्र
हरिश्चंद्रेगडा वरील रात्रीची शेकोटी
हरिश्चंद्रेगडा वरील रात्रीची शेकोटी

दुसरे दिवशी रविवार २४-०१-२०२१ सकाळी पुन्हा ताजे तवाने होऊन चहा घेतला व ०६:०० वाजता अंधारा मध्ये महाराष्ट्रामधील चौथे उंच "तारामती शिखर" चढायला सुरवात केली. अर्धा तास भरात चढाई करून आम्ही शिखरावर सूर्यनारायणाची वाट पाहत बसलो. व ०७:१४ मिनिटाने सुर्य ️ डोंगर रांगेतून बाहेर डोकावून पाहू लागला. तो नयनरम्य सूर्योदयाचा नजारा डोळ्यात सामावून घेतला. व तारामती शिखरावरील शिवलिंग, ध्वजस्तंभ, शिखरावरून दिसणारा कालभैरी डोंगर, कोकणकडा, आजू बाजूची डोंगर रांग️,खाली दिसत असलेले गडावरील मंदिर पाहून शिखराला फेरा मारला व शिखर उतरून आलो. तो पर्यंत सकाळचे ०९:०० वाजले होते. मग आम्ही नाश्ता उरकून आमचा तंबू काढला व बॅग वरती बांधून गड उतरायला सज्ज झालो. सकाळी ०९:३० वाजता राजमार्ग जुन्नर दरवाजाने गड उतरायचा असे ठरवून निघालो. वाटेमध्ये दिसत असलेला बाल्लेकिल्ला पाहत आम्ही चालू लागलो. वेळे अभावी बाल्ले किल्ला वरती चढाई केली नाही. पण खालून बाल्ले किल्याला थोडीशी तटबंधी दिसत होती. राजमार्गाचा रस्ता काही सापडला नाही मग तेथील गावकऱ्यांचा माहिती नुसार आम्ही मार्ग शोधायचा प्रयत्न केला. पण खूप घनदाट झाडीतुन मार्ग शोधत थोडे अंतर आत चालून गेलो. पण कदाचित ती प्राण्याची वाट असावी व पुढे जाऊन ती वाट पण बंद झाली व दुसरी कोणतीच वाट नसल्यामुळे माघारी फिरलो. व ज्या मार्गाने गडावरती आलो होतो त्या मार्गे गड उतरला. गडाखाली पोहचल्या नंतर चौकशी केली असता जुन्नर दरवाजाने आधी जाऊन आलेले किंवा वाटाड्या शिवाय शक्यतो कोणी येत जात नाही असे समजले. पुढे आम्ही पिंपळगाव जोग धरणावरती पोहूण पुन्हा माघारी हॉटेल मुक्ताई येथे आलो. व दुपारचे जेवण उरकुन ०३:०० वाजता पुणे कडे निघालो.

तारामती शिखर वरून सूर्योदय
तारामती शिखर वरून सूर्योदय
तारामती शिखर वरून सूर्योदय पाहताना
तारामती शिखर वरून सूर्योदय पाहताना
तारामती शिखर वरील शिवलिंग
तारामती शिखर वरील शिवलिंग

तारामती शिखर वरील ध्वज स्तंभ
तारामती शिखर वरील ध्वज स्तंभ
तारामती शिखर
तारामती शिखर

तारामती शिखर
तारामती शिखर
सकाळचा नाष्टा
सकाळचा नाष्टा
मुक्कामाचे हॉटेल राजयोग
मुक्कामाचे हॉटेल राजयोग
पठारावरून दिसणारा बाल्ले किल्ला
पठारावरून दिसणारा बाल्ले किल्ला
पिंपळगाव जोग धरण येथील पुरातन शिवलिंग
पिंपळगाव जोग धरण येथील पुरातन शिवलिंग
पिंपळगाव जोग धरणाचा जलाशय व मागे दिसणारा शिंदोळा किल्ला
पिंपळगाव जोग धरणाचा जलाशय व मागे दिसणारा शिंदोळा किल्ला

पूर्ण गड पाहून झाल्या नंतर येथे पुन्हा पुन्हा येण्याची इच्छा निर्माण झाली, म्हणूनच कदाचित हरिश्चंद्रगडाला भटक्यांची पंढरी असे म्हणतात........

सोबती: संजय शेंडकर, वैभव सोनावणे, अकाश भोसले.

©सुशील राजगोळकर




पुरातन बंधारा हरिश्चंद्रगडावरचा ancient water resiorvior of harishchandra fort

कातळात खोदलेली टाकी गडाच्या चहुबाजूंना असायला हवी होती, ती का नाहीत? हा प्रश्न नेहमी सतावत होता. गडाला चहुअंगांना नैसर्गिक तटबंदी असल्याने मोठ्या संरक्षणाची आणि पर्यायोने गडाच्या सुदूर भागात पाण्याच्या फार मोठ्या नियोजनाची गरज भासली नसावी? या शक्यतेवर विश्वास नव्हता, परंतू कुणाच्या सांगण्यात किंवा वाचनातही अशा व्यवस्था असल्याची माहिती मिळत नव्हती. २५ नोव्हेंबरला कोकणकड्याची उत्तर बाजु व डोंबांच्या डोंगराच्या मधल्या मार्गाने, अर्थातच प्रचलित अशा नळीच्या वाटेने नाशिक-पुणे-मुंबई अशा विविध ठिकाणच्या २० डोंगरभटक्यांनी ट्रेकसोल्सच्या झेंड्खाली एकदिवसाची छान भटकंती केली आणि अचानक एके ठिकाणी एका भल्या मोठ्या तलावाच्या अवशेषांनी आमचे लक्ष वेधून घेतले. एक तर या तलावाची अभ्यासकांकडे नोंद आहे की नाही याची मला काहीच माहिती नाही, परंतू ती असेल त या तलावाविषयी फार गांभीर्याने बघितले गेले नसावे, अन्यथा तो असा दुर्लक्षित राहिला नसता. असा प्राचीन तलाव, हरिश्चंद्रगडासारख्या ठिकाणी म्हणजे इतिहासातला मोठा खजिना आहे.
सप्तीतीर्थ पुष्कर्णी...यातील चौदा विष्णू मुर्ती आता हरिश्चंद्रेश्वराच्या गुहेत अडगळी सारख्या टाकून दिल्या आहेत...
''गडावरचे तलाव फक्त स्वच्छ पाणी मिळावे इतक्या क्षुल्लक हेतूने कधीच साफ करायचे नसतात''. त्यांचे उत्खनन करायचे असते. त्यात इतिहासाचे मुक साक्षीदार, नाणी, बांगड्या, कौल, माठ यांचे तुकडे दडलेले असू शकतात. अशा संशोधनातून इतिहासाचा एक धागा सुद्धा आपल्याला कुठच्या कुठे नेऊन जाऊ शकतो, परंतू या बद्दल कोणतेही गांभीर्य नसल्याने आज महाराष्ट्रात गड स्वच्छतेची जी लाट आली आहे ती फक्त दगड, गाळ उपसण्यात सार्थकी मानण्या इतपत! फार मोजक्या संस्था असतील ज्यांनी काळजीपूर्वक पाण्याचे कुंड, तळी, टाकी स्वच्छ करून पुरातत्वीय अवशेष वेगळे केले, अभ्यासकांना उपलब्ध करून दिले. त्याला हरिश्चंद्रगडही अपवाद नाही. आज ह्या तलावाचा परिसर चक्क मौजमजेचे ठिकाण बनला आहे. तिथे आता कित्येक तंबु लागु लागलेत, ते तंबु लावणार्‍यांच्या, तिथे मुक्काम करणार्‍यांच्या गावी तरी असेल का की, आपण ज्याठिकाणी रात्री डेरा टाकलाय ते ठिकाण नेमके आहे तरी काय?
हरिश्चंद्रगडावर अलिकडेच दिसणारे साधूबाबा
(आता सप्ततीर्थ पुष्कर्णीचेच बघा: काही वर्षांपूर्वी एका साधूने तिची स्वच्छता केली, त्यात त्याला तीन गोण्या भरतील इतकी पुरातन नाणी मिळाली. गडाचा जिर्णोद्दार करण्यासाठी ती तो घेऊन गेला अशी वदंता आहे. त्याचे पुढे काय झाले हे ठाऊक नाही.)
रविवारचा दिवस आमच्याकरिता सह्याद्रीतल्या एका अविस्मरणीय भटकंतीचा होता. नळीच्या वाटेच्या चढाईचा प्रत्यक क्षण ह्याद्रीतल्या एका उत्तभ भटकंतीला आल्याचा आनंद पदोपदी मिळवून देत होता. खरे तर नळीच्या वाटेबद्दल जितके ऐकुन होतो, त्यामानाने ही वाट बघण्याचा योग इतका उशिरा का आला याचे माझे मलाच आश्यचर्य वाटत आहे.
सरावाची भटकंती: नळीची वाट!
हा योगही मोठा विचित्र जुळून आला, आमची ही भटकंती खरे तर सरावासाठी होती, म्हणजे आम्ही येऊ घातलेल्या डिसेंबरच्या सुरूवातीला सातमाळा रांगेत सलग नऊ दिवसांची भटकंती करणार आहोत. त्याकरिता रोज थोडा थोडा सराव सुरू होता. एक मोठा सराव गरजेचा होता, तो नळीच्या वाटेच्या रूपाने इतका मोठा करायला मिळावा? आहे का नाही आश्चर्याची गोष्ट. आमच्या दृष्टीने या भटकंतीचे हे एकमात्र आश्चर्य होते. परंतू तिथले पेटारे उघडायला लागले की, एक एक गोष्टी बाहेर येऊ लागतात.
नळीच्या वाटेने गेल्यावर हरिश्चंद्रगडावर मुक्काम करावा लागतो हे मी ऐकत आलो आहे. तिन ठिकाणच्या छोट्या कातळारोहणात वरच्या दोन भागात सुरक्षा म्हणून कमरेला दोर बांधून किंवा शिडी लावण्याची प्रथा होती, त्यात अर्थातच बराच वेळ जायचा आणि बेलपाडा किंवा वालिवर्‍हे वरून कोकणकडा गाठायला आठ/नऊ तासांचा अवधी लागायचा. काहींना तर अकरा, बारा तासही लागलेत, तेव्हा नळीच्या वाटेने वर गेल्यावर मुक्काम हमखास घडायचा. एक तर तुम्ही बेलपाड्यातून सुरूवात करणार म्हटल्यावर तुमच्या गाड्या बेलपाड्यात राहणार किंवा तिथे बसने आलात तरी दुपारी हरिश्चंद्रगडावर पोहोचल्यानंतर पलिकडे उतरून पाचनईवरून परतीच्या प्रवासाची  व्यवस्था नसल्याने या मुक्कामाला पर्याय नव्हता. अलिकडे वनखात्याने हरिश्चंद्रगडावर रात्रीच्या मुक्कामाला बंदी घातल्यानंतर तर आमचा नळीच्या वाटेचा बेत बारगळल्यात जमा होता.

कोकणकड्याचा स्थानिक मार्गदर्शक बेलपाड्याचा कमा पोकळा नेहमी म्हणायचा, सात तासात सहज वर पोहचता येते, गावातली मंडळी बायका मुलांसकट तीन तासात वर जातात. नळीच्या वाटेने वर जायचे, कोकणकडा बघायचा आणि बैलघाटाने वालिवर्‍हेत परतायचे असाही बेत शिजत होता, परंतू आज काही तरी वेगळेच योग जुळून आले होते. आम्हाला बेलपाड्यात सोडायला आलेली गाडी पाचनईत जाऊन थांबणार होती. मुक्कमाची अवश्यकता नव्हती. लवकर पोहोचलो तर तारामती किंवा बालेकिल्ला असे एखादे दान पदरात पाडून घेण्याची संधी होती. आमच्यासाठी मात्र कोणती संधी वाट बघतेय? याची सुतराम कल्पना नव्हती.
पन्नास फुटाचे दोन दोर, आणि फारच माफक असे आरोहणाचे साहित्य घेऊन आम्ही सहा तासाच कोकणकड्यावर पोहोचलो. आमच्या २० जणांच्या चमुत तीन महिला होत्या, चाळीशी पार केलेले अनेक होते तरी त्यामानाने बर्‍यापैकी वेग राखता आला. आमच्या गार्गीचा तर हा तिसराच ट्रेक होता, तोही ती सातमाळेच्या सरावाकरिता आलेली. सराव ट्रेक कुठे? हरिश्चंद्र नळीची वाट! हीपण एक आश्चर्याची गोष्ट. या आनंदात असताना दोन गोष्टी आम्हाला सतत खुणावत होत्या: एक म्हणजे दक्षिण बाजुला दिसणारी माकडनाळ (जी २००६च्या जानेवारीत मध्यापर्यंत पोहचूल्यानंतर दोर कमी पडल्याने अर्धवट सोडून आम्हाला माघारी परतावे लागले होते). दुसरे म्हणजे रोहीदासचा डोंगर.

नळीची वाट, माकडनाळ, रोहीदास या तिन गोष्टींभोवती विचाराचे चक्र फिरत आमचे आरोहण सुरू असताना मध्येच कोणी तरी, कोकणकड्याच्या मध्यमार्गावर लटकलेला दोर दिसतोय, असे सांगितले.
पहाटे साडेचारला उठून आम्ही बरोबर ६-०५ वाजता कोकणकड्याच्या दिशेन प्रस्थान केले. चाळीस मिनीटात हरिश्चंद्रेश्वरी नदीच्या पात्राजवळ पोहोचलो तोच बिबट्याची विष्टा दृष्टीस पडली. एव्हाना आमच्या आगमनाने हुप्प्यांचे सतर्कतेचे इशारे सुरु झाले होते. ७-१० वाजता आम्ही तीन महाकाय पायर्‍यांवर पोहोचलो. कोकणकड्यावरून जिचा प्रवास होतो, त्या नदीत फक्त एकाच ठिकाणी या तीनपायर्‍या, अन्यत्र का नाही?
याभौगोलिक रचनेचे कुतुहल वाटल्यावाचून राहत नाही. ''हरिश्चंद्रगड नावाचे हे गारूडच असे की, त्याच्या कोपर्‍यान कोपर्‍यात अशी असंख्य आश्चर्य दडली आहेत, ती धुंडाळता आली तर? त्याकरिता एकदा सहा दिवस, एकदा तीन दिवस, एकदिवसांचे तर अगणीत अशा माझ्या मुक्कामात हरिश्चंद्रगडाचे भग्नावशेष, कोसळलेले तट, मंदिरे, लेणी, तळी, टाकी नजरेखालून घालण्यातला आनंद आजवर नेहमीच गडभ्रमंती सार्थकी लावणारा ठरला आहे. एकदा तर हरिश्चंद्रगडाच्या पूर्व भागात असलेल्या नेढ्यापर्यंत आम्ही तिन मित्र मुसंडी मारून आलो आहोता. आज असे काही बघायला मिळेल का? असा कोणताच विचार मनात नव्हता.'' नळीच्या वाटेने जाण्याचा आनंदच काही और.
कातळारोहण हा आमचा विषय नसल्याने कोकणकड्याच्या मध्यमार्गावर जाण्याचे योग कधीही येणार नाही हे आमच्या दृष्टीने सष्ट असले तरी त्या दिशेने चालत जाण्याची भावनाही मोठा आनंद देते. आज तर आम्ही लाडका रोहीदास, माकडनाळ आणि भवानी धार यांचे जवळून दर्शन घेत नळीच्या वाटेने जाणार होतो.
तब्बल दोन तास नदीतल्या मोठमोठ्या शिळांची धम्माल वाट पार करून ८-०० वाजता आम्ही नळीच्या वाटेला लागलो.

या पैशाला केवढे मोल!
आजही माझा मोबाईल फोन मधला कॅमेरा एक एक गोष्टीची नोंद ठेवण्याची आठवण करून देत होता. पूर्व बाजूने येणार्‍या सूर्यकिरणांमुळे मध्यमार्ग, रोहीदास छान विरोधाभासी चित्र मिळवून देत होते. डॉ. अभिजीत इंगळे वरच्या टप्प्यावरून कसलासा ग्लास दाखवून, 'तुझ्यासाठी सरबत ठेवले आहे', असे सांगत होता. आता इतक्या अवघड ठिकाणी याला ग्लास कुठून सापडला? आमच्या चुमतला पुढचा जत्था एका मोठ्या दगड सपाटीवर विश्रांतीकरिता थांबला होता. सगळ्यांच्यात हातात काचेचे मोठे ग्लास होते. पाचनईचा एक ग्रहस्थ आपल्या मुलीसमवेत लिंबूपाणी विकण्यासाठी येथे आला होता. 'शनिवार, रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवसात आम्ही येथे लिंबुपाणी घेऊन येतो', अशी माहिती त्याने दिली. इतकी अवघड चढण चढून आल्यानंतर हातात आयता लिंबुपाण्याचा ग्लास मिळावा? या परिस्थितीत सुख: यापेक्षा वेगळे असू शकते का? विक्रीचे ठिकाणही असे की, हमखास विक्री होणारच. तरी पण पाचनई पासून हरिश्चंद्रगड, तिथून नळीच्या वाटेचे सगळे कातळटप्पे पार करून इथपर्यंत डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन दोन अडीचशेची कमाई म्हणजे या पैशाला केवढे मोल?

लिंबूपाणी, कोकमचे सरबत खुपच छान होते. वर उंबराला लाल चुटूक फळे लगडली होती, त्यातली तीन चार तोडून खाल्ली त्याची चव अप्रतिम होती, तोच आमच्यात कोणी तरी ओरडलं, अरे तोडू नका...माकडांसाठी गडांवर फार थोडी फळझाडे उरलीत, त्यामुळे वेळीच सावरून उंबर तोडण्याचा कार्यक्रम रहित करण्यात आला.
कोरड्याठाक नळीच्या वाटेत उंबराची काही झाडे कुणाच्या जिवावर तगुन राहिलीत. येथे पाण्याचे टिपूस नसताना अनेक झुडपांने पाणी कोण देतं? पारंपारिक शेती करणार्‍यांचे हे म्हणणे आहे, 'झाडांना पाणी खुप कमी लागते, वाफसा लागतो तो पालापाचोळ्यातून त्यांना आपसूकच मिळतो, त्यांचे खरे खुरे अन्न तर सूर्य प्रकाश!' याची प्रचिती येथे येत होती. तशी ती कोळेश्वराच्या पठारावर अनूभवली आहे. तिथल्या बापू खुटेकरांनी हिवाळ्यात दवाच्या पाण्यावर भरगोस गव्हाचे पिक घेतल्याचे आमच्या मागच्या दोन्ही भेटीत अभूवले आहे. (कोळेश्वराच्या यंदाच्या मार्चच्या भेटीत मात्र बापुंची गहूशेती बघण्याचा योग जवळ असून सुद्धा चुकला त्याची रूखरूख लागून आहे.)

इथून आता आम्ही नळीच्या मध्ये मध्ये शिरू लागलो, तसा पश्चिम धारेवरचा फॅन्टमहेड नजरे आड होऊ लागला आणि डोंगराच्या दोन्ही धारा विशाल होऊ लागल्या. ९-०० वाजेच्या सुमारास आम्ही कोकणकड्याच्या ईशान्य कातळ मार्गाला लागलो, तिथून दहा मिनीटात पहिला सोपा कातळटप्पा लागला.


सकाळचे ९-४०: 
दुसर्‍या कातळ टप्प्याजवळ माझा प्रवेश झाला तोवर काशिनाथने वरच्या झाडाला दोर लाऊन सहा सात जणांना वर घेतले होते. दोर शिवाय वर येता येते हे त्याने सांगितले, माझ्याकडे ५० फुटाचा दोर होता, तेव्हा एकाने बॅगा वर घ्यायच्या व दुसर्‍याने माणसांना वर घ्यायचे असे गट प्रमुखाने ठरविले. खरोखरच हात आणि पायांना पुरेसे आधार सापडतात त्यामुळे ही छोटीशी चढाई मजेदार ठरली. काशिनाथने झाडाला केलेले अँकरिंग बघून समाधान वाटले. मुंबई, पुण्यातील गिर्यारोहकांच्या सानिध्यात राहून गिर्यारोहणातले तंत्र ही मंडळी उत्तमरित्या शिकली आहे.
११-०० वाजता हा टप्पा पार करून वरच्या उंबराच्या सावलीत जिथे एका वेळेस मुश्कीलीने पाच सहा जण थांबू शकतात, असे सुंदरशा ठिकाणी थोडी पोटपूजा करण्याचा योग आला. तिथून आता नळीचा शेवटचा कातळटप्पा दहा मिनीटांच्या अंतरावर. 'हा देखिल दोर न लावता चढता येतो', मॅरेथॉनपटू डॉ. विजय नेमाडेंनी त्याची प्रात्यक्षिके करून दाखविली.
या ठिकाणी पुन्हा एकदा ताज्या ताज्या लिंबुपाण्याचा लाभ झाला. पाचनईचे आणखी एक ग्रहस्थ काचेच्या मोठ्या ग्लासात लिंबूपाणी तयार करून देत होते. हे ग्लास धुवून स्वच्छ करण्यासाठी त्यांनी दोन भांड्यात पाणी आणले होते. हे पाणी अर्थातच हरिश्चंद्रेश्वर मंदिरातले. खरेदी आणि विक्रीच्या मध्ये एक रेषा असते ती 'अनोखी...कष्टप्रद...मजेदार...काम भागविणारी...दाम मिळवून देणारी', कोणत्याही एका किंवा सगळ्या दृष्टीकोणातून त्याकडे बघितले जाऊ शकते. जगातल्या काही सर्वात अनोख्या व्यावसायातला हा एक व्यवसा, हे मात्र नक्की!
आता नळीच्या वाटेचा दगड धोंड्यांचा मार्ग संपण्याच्या बेतात होता. नळीची वाट म्हणजे डोंगराचे मोठ मोठे दगड, शिळा एका अरूंदशा धारेतून पाणी वाहत जावे तशा खाली वाहण्याच्या अविर्भावात निश्चीत भासतात. त्यांना पाण्यासारखा प्रवाह नसला तरी हळूहळू त्यांचा तळापर्यंत कुर्मगती प्रवास सुरू असतो, त्यामुळेच हा मार्ग नेहमी अस्थिर असतो. संपुर्ण डोंगरावर याच भागात हा चमत्कार! तो आमच्या पूरता आज संपणार होता.
कातळाला एक छोटासा वळसा घेऊन प्रथमच पायाखाली माती आल्याचे जाणवले. एक वीस पंचवीस फुटाचा घसारा पार करून वर गेल्यावर नाफ्ता आणि त्याचे नेढे अशा सुखावणारे चित्राने आमचे स्वागत केले. येथपासून हिरवेगार झुडपी वन लक्ष वेधून घेत होते. उन्हात सतत चढाई केलेल्या काहीली झालेल्या जिवाला इथला गारवा म्हणजे चित्राची दुसरीच बाजी. दगड, धोंड्यांच्या तिव्र चढाच्या नदीमार्गाने चढाई जसजशी वर जात होती, तसतशी दमछाक वाढत होती. त्यामुळे गारवा जाणवत असला तरी दमछाक अजून तास दिड तास तरी सुरू राहणार होती.

सभोवतालचे नाफ्ता, कलाडगड, भैरवगड, घनचक्कर, कात्रा, गवळदेव, आजोबा डोंगरांची ओळख पटवून आम्ही २५ मिनीटात एका लहानशा पठारावर पोहोचलो. आजचा दिवस हा रोहीदासच्या डोंगराचे अनेक कोनातून दर्शन घेण्याचा होता. तो आनंद असा सहजीसहजी वाट्याला येत नसतो. येथे दाट  झाडीच्या सावलीत पोहोचल्यावर सोबत आणलेल्या विविध पदार्थांवर ताव मारत, सोबतचे पाणी यथेच्छ पिऊन झाल्यावर १२-४५ वाजता आम्ही शेवटच्या छोट्याशा चढणीला लागलो आणि दहा मिनीटात कोकणकड्याच्या सपाटीला लागलो. येथे एक बुरूजाचे अवशेष विखुरलेल्या स्थितीत होते.

तारामतीचे शिखर आता डोकावत होते. पुढच्या काही मिनीटात कोकणकडा नावाचा चमत्कार पुन्हा एकदा नजरेत समावणार होता. कोकणकड्याच्या मध्यमार्गाजवळून प्रस्तरावरोहण (रॅपलिंग) म्हणजे कमरेला दोर बांधून दरीत उतरण्याचा उपक्रम सुरू होता. सर्वसामान्यांना कोकणकडा इतका जवळून आणि तोही इतक्या रोमांचक पद्दतीने बघण्याची संधी त्यामुळे मिळते. साधारणपणे एक किलो मिटरचा आणि पायथ्यापासून ३००० फुट उंचीच्या या कड्यावर सुमारे १८०० फुटांचे प्रस्तरावरोहण गेल्या काही वर्षांपासून कमालीचे लोकप्रिय ठरले आहे. जे लोक गिर्यारोहण करू शकत नाही, अशांना सुरक्षितपणे डोंगरावरून खाली उतरविण्याचा हा साहसी क्रीडा प्रकार. यात धोके मात्र भरपूर असतात. कोणत्या वेळी कशा प्रकारची स्थिती निर्माण होईल हे सांगता येत नाही. त्यासाठी कृत्रिम गिर्यारोहणाच्या तांत्रिक ज्ञानासोबतच असे उपक्रम आयोजित करण्याचा अनूभव आवश्यक असते. साधारण १००० फुटाच्या टप्प्यावर सहभागींना उतरवले जात होते. तिथून दुसर्‍या टप्प्याचे ८०० फुटाचे प्रस्तरोवरोहण. ते केले की, साधारण तीन तास जंगल आणि मोठमोठ्या शिळा असलेल्या नदीतून प्रवास करून ही मंडळी बेलपाड्याला पोहोचते.
तलावाचे मुख्यस्त्रोत असलेल्या ओढ्यावरची बंधार्‍याची भिंत कोसळली आहे...
पाठ कुठे टेकलीयं?
आमची कन्या गार्गी हिची पहिलीच हरिश्चंद्रगड भेट असल्याने तिला कोकणकड्याचे दिव्य दर्शन घडले. त्यानंतर आम्ही ओढ्या लगतच्या झाडाच्या सावलीत दुपारच्या जेवणाकरिता विसावलेल्या आमच्या चमूत सामिल झालो. बेलपाड्यावरून कमा पोकळा यांच्याकडून पिठलं आणि तांदळाच्या भाकरी बांधन घेतल्या होत्या, परंतू सतत पाणी पिल्यामुळे जेवण काही जात नव्हते. बाकी मंडली मात्र सफरचंद, चिक्की, खजूर, लाडू, असे विविध पदार्थ सादर करत होती. पोटपूजा आटोपून आमच्यात जे प्रथमच या ठिकाणी आले आहेत त्यांना तारामतीच्या शिखराकडे रवाना करून आम्ही आठ दहा जणांनी झाडाच्या सावलीत मस्त ताणून देण्यासाठी जमिनीला पाठ टेकवली.

बशी सारखा आकार
वेस्टर्न ट्रेकर्स संस्थेच्या प्रस्तरावरोहण मोहिमेकरिता बरेच सहभागी आले होते. आसपासच्या झोपड्यात त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्या मोठ्याने बोलण्यामुळे झोप काही लागत नव्हती.
पुण्याचे आर्किटेक्ट केळकर हे ईशान्य दिशेकडे गेले, परतल्यावर त्यांनी हा तलाव असावा अशी शक्यता बोलून दाखवली. समोरच्या बाजुला तलावाच्या भिंतीचे दगड बघितल्याचे त्यांनी सांगितले. लागोलाग मी व मोहिम प्रमुख डॉ. हेमंत बोरसे आम्ही चाचपणी केली तेव्हा खरोखरच ओढ्याच्या मोठ्या प्रवाहावर दोन चौकोनात तासलेल्या लंबाकृती शिळा दिसल्या. त्याच्या आजुबाजूला आणखी काही चौकानी तासलेल्या शिळा इस्तत: विखुरलेल्या दिसल्या. 

कोकणकड्याकडे जाताना तारामतीच्या खालच्या पठारी भागातून आग्नेय बाजूने एक ओढ्यचा प्रवाह आहे, या प्रवाहाचे पाणी या तलावाचा मुख्य स्त्रोत आहे. याचा आकार बशी सारखा असून तळाला तो खोलगट आहे. पूर्व बाजूने दगडांची भली मोठी भिंत बांधण्यात आली आहे. ही भिंत सोडल्यास बाकी सगळे काठ हे नैसर्गिक आहेत. त्या भिंतीच्या चिरांना झाडी झुडपांनी वेढल्यामुळे ती लक्षात येत नाही.

पुरातन बंधारा मुक्कामाचे ठिकाण?
वर्तुळाकार अशा नैसर्गिक खोलकट भागाला घातलेला हा पुरातन बांध असून आसपासचे इतरही प्रवाह यात येऊन मिळतात. या भागात पावसाचे खुप जास्त प्रमाण असल्याने तो लवकर भरून त्याचे जास्तीचे पाणी त्या भिंतीवरून वाहून जाण्याची त्या काळी व्यवस्था केली असावी. गडाच्या एकुण विस्ताराच्या मानाने हा बंधारा छोटा असला तरी हरिश्चंद्रेश्वर मंदिरा समोर असलेल्या सप्ततीर्थाचा शंभरपट जास्त पाणीसाठविण्याची याची क्षमता असावी. पुरातत्व विभागाने किंवा जिज्ञासूंनी या तलावाचा अभ्यास केला तर त्याच्या पोटात दडलेल्या गाळात न जाणो कुठल्याशा जुन्या इतिहासाचे काही संदर्भ मिळू शकतील. दुर्दैवाने त्याचे महत्व न समजल्याने या ठिकाणी आता पर्यटकांचे तंबु लागतात.

मधल्या काळात वनखात्याने हरिश्चंद्रगडावर भेट देण्यासाठी येणारे लोक प्लास्टिकचा कचरा अफाट प्रमाणेवर इस्तत: फेकून पर्यावरणाची हानी करतात ही सबब सांगून गडावर रात्रीच्या मुक्कामीची बंदी घोषित केली होती. ती बंदी कधी उठविली? नियमीत व सर्व नियमांचे पालन करून ट्रेक करणार्‍या भटक्यांना अजून पर्यंत यांची माहिती कळविण्यात आलेली नाही. पायथ्याला मात्र सूर्योदय ते सूर्यास्त इतकाच वेळ गडावर राहता येइल, असे दोन फलक आहेत. त्यामुळेच नळीच्या वाटेसारखी खडतर चढाई केल्यानंतर आम्ही गडावर मुक्कामाचे नियोजन केले नव्हते. आदल्या दिवशी मात्र येथे हजार लोक मुक्कामाला होते अशी माहिती मिळाली. ही संख्या किमान पाचशे तरी असावी. या सगळ्यांचे तंबु या प्राचीन बंधार्‍याच्या पात्रातच लागले होते हे विशेष.








कोकणकड्या लगत काही वर्षांपर्यंत या भागात कार्वीची उंच व जाड बुंधा असलेली प्रजाती बघायल मिळायची. हा बुंधा माणसाच्या मनगटा इतका जाड असायचा. यंदा ती कारवी दिसली नाही.  आमची गड सोडण्याची वेळ समीप आली होती. ३-३७ वाजता हरिश्चंद्रेश्वर मंदिर परिसरात पोहलो. या परिसरातली भग्न मंदिरे व पुरातत्वीय भग्नावशेषातही मन पार रमून जाते. तासभर या परिसरात व्यतित केल्यानंतर आम्ही पाचनईला पोहोचलो तेव्हा अंधार दाटला होता. तिथे एक गृहस्थ सांगत होता, त्यांचे पाहुणे गडावर आहेत, त्यांना नीट दित नाही, त्यांचा गडावर कोणी तरी चष्मा फोडला. येथे फोनला रेंज नाही, अशी चिंता त्यांनी प्रकट केली.

गडावर आमच्या नंतर भरपूर संख्येने लोक जाताना दिसत होते. वरती भोजन व मुक्कामाची सोय असल्याने बाबांना भरपूर सोबत राहील. रात्र आज गडावरच जाणार असा विचार करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो, तोच खबर आली की, हरिश्चंद्रगडावर ट्रेकर्स अडकुन पडलेत. ही बातमी एका वृत्तवाहिनीवर प्रसारीत होत होती. आमचाही वीस जणांचाच गट असल्याने आमच्या मित्रांपैकी काहींनी, तुम्ही सुखरूप आहात ना? अशी विचारणा केली.
थोड्याच वेळात स्पष्ट झाले की, कोकणकड्यवर प्रस्तरारोहण करण्यार्‍यातील काही मंडळी ही १००० फुटाच्या टप्प्यावरच अडकून पडली. आम्ही आयोजकांपैकी एकाशी चर्चा करताना, सहभागींना पहिला टप्पा उतरवून, दुसरा टप्पा उतरवून बेलपाड्यात पाठवताना अता अंधार दाटेल अशी शंकाही उपस्थित केली होती. दुसर्‍यादिवशी त्यांना मदत व शोध पथकाच्या मदतीने काढण्यात आले, ही बचाव मोहिम सायंकाळ पर्यंत सुरू असल्याची माहिती मिळाली.
अभ्यासकांच्या मते यादव, सातवाहन काळाच्या काळात हा गड नावारूपाला होता. पुराणातले काशीमहात्म्य, दक्षिणप्रयोग महात्म्य, देवी भागवत, विष्णूपूराण, स्कंदपूराण, मत्स्य पुराण, पद्मपुराण, अग्नीपुराणादी काव्यात हरिश्चंद्रगडाचा उल्लेख असल्याचे निरीक्षण ज्यष्ठे अभ्यासक दिवंगत रा.चिं.ढेरे यांनी नोंदविले आहे.
डॉ. वा.वि.मिराशी यांनी आपल्या टिपणात हरिश्चंद्रगडाच्या नावाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांनी नाशिकच्या अंजनेरी येथे भोगशक्ती राजाच्या काळातील दोन ताम्रपटांचा उल्लेख केला आहे. या पैकी एक ताम्रपट इसवी सनाच्या आठव्या शतकातला असून त्यात जयपूर नगरातील यात्रेकरिता व मंदिरे, अन्नछत्राकरिता नाशिक जिल्हा व उत्तर कोकण भागातील काही प्रदेशावर कर बसविण्याचे निर्देश आहेत. दुसर्‍या ताम्रपटात कालउल्लेख नाही, त्यात समगिरिपट्टानातील व्यापार्‍यास दिलेल्या काही सवलतींचा व तेथील गुन्हेगारांना दिलेल्या जाणार्‍या दंडात्मक शिक्षेचे निर्देश आहेत. या ताम्रपटात स्वामीचंद्र-सिंहवर्मन-भोगशक्ती अशी वंशावळ दिलेली असून स्वामीचंद्राला 'हरिश्चंद्रवंशस्यालंकारभूत:' असे विशेषण लावले आहे. मिराशींच्या मते हरिश्चंद्र हा पौराणिक राजा नसावा, तर खरोखरच भोगशक्तीचा वंशज असावा. त्याने हरिश्चंद्रगडावरचे शिवालय बांधून तेथे प्रतिष्ठापना केलेल्या शिवलिंगाला आपले नाव दिले असावे.
ढेरे म्हणतात त्या प्रमाणे भारताच्या प्राचीन इतिहासात देवालये बांधणार्‍यांनी त्यास आपली नावे दिल्याची उदाहरणे आहेत.
अंजनेरी समोरचे शिवलिंग साधर्म्या साधणारे
काही वर्षांपूर्वी आम्ही अंजनेरी समोरच्या एका टेकडीवर पॅराग्लायडींगकरिता गेलो होतो. या टेकडीवर एक छोटेसे कातळातले कुंड होते, त्याला स्थानिक मंडळी सीतेने तेथे आंघोळ केल्याने त्यास सीता कुंड असे म्हणतात अशी माहिती दिली. या कुडाच्या लगत असलेल्या ओळ्याच्या उत्तर बाजुला कातळात एक शिवलिंग कोरलेले दिसले हे शिवलिंग हरिश्चंद्र मंदिरातल्या शिवलिंगाशी साधर्म्या साधणे आहे. जर खरोखरच भोगशक्ती राजवंशाकडून हरिश्चंद्रगडावरचे शिवालय बांधण्यात आले असेल तर या दोन शिवलिंगातली साधर्मे लक्षात घेण्या जोगी आहेत.
ब्रिटिश संशोधक डब्ल्यू.एफ.सिंक्लेर यांनी दी इंडियन अँटिक्वेरीच्या पाचव्या खंडात हरिश्चंद्रगडाची भव्यता, कोकणकडा, तारामतीचे शिखर, गडावरील विस्तृत पठार, लेणी, मंदिरे, समाध्या व इतर अवशेषांचे धावते पण नेमके वर्णन केल्याचे निरीक्षण ढेरेंनी नोंदविले आहे. हा खंड माझ्या वाचनात आलेला नाही, त्यामुळे कोकणकड्याच्या तलावाचा त्यात उल्लेख आहे की नाही, हे कळायल मार्ग नाही, परंतू या खंडाची सविस्तर माहिती ढेरे देतात त्यात कोकणकड्यावरच्या विशाल बशीच्या आकाराच्या मात्र तलावाबद्दल त्यांनी लिहीले नाही. ढेरेंनी प्रख्यात पुरातत्वज्ज्ञ जेम्स फर्ग्यूसन व प्रख्यात शिल्पज्ज्ञ जेम्स बर्जेस ज्यांनी हरिश्चंद्रगडावरच्या पुरातत्वीय अवशेषांची, मंदिरे, लेणी आदी सर्व माहिती संशोधकीय दृष्टीतून बारीक सारीक वर्णनासह, 'भारतातील गुंफा मंदिरावरच्या बृहदग्रंथात नोंदविली आहे त्याचाही आढावा आपल्या लेखात घेतला आहे, त्यातही त्यांनी कोकणकड्यावरच्या तलावाचा उल्लेख केलेला नाही. तो त्यांच्याकडून राहून गेला की, फर्ग्युसन, बर्जेस यांनी संशोधन केले त्यावेळी तो झाडी झुडपांच्या आड दडून होता हे कळायला मार्ग नाही.
या दोन लिखाणांच्या प्रती हाती आल्यावर त्यावर अधिक प्रकाश पडू शकेल. तुर्तास तरी असेच दिसते की, एकतर कोकडकड्यावरचा हा मोठा बशीच्या आकाराचा तलाव अभ्यासकांना, पुरातत्ववेत्त्याना एकतर ठाऊक नाही, किंवा त्यांच्याकडे त्या संदर्भात माहिती असूनही त्याचे जतन, जिर्णोद्धार करण्याची कोणी तसदी घेतली नाही. त्यामुळे इतिहासातला अनमोल ठेवा आज अक्षरश: गाळ बनून दडला गेला आहे. त्यावरची धुळ कोणी झटकेल का?
 अद्भुत निसर्गरम्य हरिश्चंद्रगड

आतापर्यंत ताम्रपट, शिलालेखातून दानशूर राजे, धनाढ्य व्यापारी, श्रेष्ठी आणि सर्वसामान्य रयतेने लोककल्याणाकरिता जी दाने अथवा देणगी दिली त्याबद्दलची माहिती त्यांनी आपल्या कोरीव लेखातून कायमस्वरूपी लिहून ठेवलेली आपण मागील काही लेखांतून वाचली असेल. या साऱ्या लेखांतून तत्कालीन आर्थिक सुबत्तेचे चित्र प्रामुख्याने आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते, मात्र ठाणे परिसरातील काही गड-किल्ल्यांवरील लेखातून साहित्य, कला व अध्यात्माचे दर्शनही घडते. अशा गडांपैकी एक आहे नगर, पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील हरिश्चंद्रगड.

सह्याद्रीतील सर्वात उंच गिरीशिखरे माळशेज घाट, बालाघाट ते थळघाट दरम्यान एकवटली आहेत. कळसूबाई शिखर, अलंग-कुलंग, अजापर्वत, कातुरबा आणि माळशेज घाटातील तारामती शिखर यांची जणू आकाशात उंच झेपावण्याची स्पर्धा चालू असते. आपण माळशेज घाट चढून आल्यावर डाव्या बाजूला खुबी गावाची पाटी दिसते. तेथून पिंपळगाव जोगे धरणाच्या भिंतीवरील रस्ता थेट टोलार खिंडीच्या पायथ्यापर्यंत जातो. त्या आधी डाव्या बाजूला प्राचीन खिरेश्वर मंदिराला भेट देऊन मग टोलार खिंडीची वाट पकडून तिच्या माथ्यावर यावे. आता आपण नगर आणि पुणे यांच्या सीमेवर उभे राहतो. थोडी विश्रांती घेऊन पलीकडे न उतरता डाव्या बाजूच्या कातळात खोदलेल्या खोबणीत हात-पाय गुंतवीत वर चढू लागावे. जसजसे वर चढू लागावे तसतशी दोन डोंगरामधली दरी आ वासून रुंदावत जाते. तिचे रौद्ररूप न्याहाळत माथ्यावर येतो. येथे थोडीशी तटबंदी दिसते. हरिश्चंद्रगडावर आल्याची ती पहिली खूण पुढे डाव्या बाजूला गच्च झाडीतून डोके वर काढत रोखून राहणारा रोहिदास शिखर आपले लक्ष वेधून घेतो. या शिखराला तटाबुरूजांचे आंगडे टोपडे आहे, तर लहानसे मंदिर असून राजवाड्याचे व काही घरांचे अवशेष व खडकात खोदलेल्या पाण्याची टाकी आहे. हरिश्चंद्रगडावरील रोहिदास शिखराची तटबंदी सोडल्यास या गडाला कोठेही तटबंदी नाही.

हरिश्चंद्रगडावरील तारामती शिखराची उंची ४८५० फूट असून तिच्या पोटात एकूण सात लेण्या आहेत. यापैकी एका लेण्यात श्री गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. बाकीच्या लेण्या साध्या व निवासासाठी वापरात असाव्यात. तारामती शिखरावर उगम पावलेली मंगलगंगा नदी या लेण्यांच्या डाव्या बाजूने झेपावत खाली येते आणि हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या गर्भगृहाखालून महादेवाच्या चरणकमळांना स्पर्श करून गोमुखावाटे उत्तरेकडे अवखळपणे स्वत:भोवती गिरक्या घेत, अनेक डोह आणि जलप्रपात निर्माण करून खाली पांचणई गावाजवळ मुळा नदीत सामावून जाते. मंगलगंगा नदीला बंदिस्त करून तिच्यावर भव्य दगडी सेतुवजा प्रांगण बनवून त्यावर हरिश्चंद्रेश्वर मंदिराची उभारणी केली आहे. मंदिराच्या शिखराभोवती चहूबाजूने कोंदण केले आहे. असे म्हणतात की, या कोंदणात पूर्वी हिरे-माणके बसवली होती. या गडावर शैव व वैष्णव हे दोन्ही पंथ गुण्यागोविंदाने नांदले असावेत. कारण मंदिराच्या समोर 'सप्ततीर्थ' नावाचे तलाव असून त्याच्या भिंतीमध्ये चौदा कोनाडे आहेत. त्यामध्ये विष्णूच्या निरनिराळ्या रूपांतील आयुधधारी मनमोहक मूर्ती होत्या. १९७९ला मी गडाला पहिली भेट दिली तेव्हा आठ मूर्ती ह्या जागेवर होत्या, तर तीन गुहेमध्ये आणून ठेवल्या होत्या. आता येथील देवकोनात एकही मूर्ती नाही.

येथील प्रमुख आकर्षण म्हणजे मंदिराच्या खाली मंगलगंगा नदीच्या पश्चिमेला एका प्रचंड गुहेत कमरेइतके खोल थंडगार पाणी असून गुहेच्या मध्यावर पाषाणातून वर आलेली महादेवाची भव्य पाषाणाची पिंडी आहे. आपल्याला कंबरभर पाण्यातून चालत जाऊन शिवलिंगाची पूजा करता येते. पण एकूण तिथल्या अनामिक गूढ वातावरणामुळे मनावर प्रचंड दडपण येऊन आपण दुरूनच दर्शन घेऊ लागतो. या गुहेला केदारेश्वर गुहा असे म्हणतात. श्री चांगदेव महाराज यांची ही तपश्चर्येची जागा, येथेच त्यांनी हटयोगी सिद्धी आत्मसात करून या गडाच्या सहवासात 'तत्त्वसार' नावाचा ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथाच्या शेवटी त्याने लिहिले आहे.

हरिश्चंद्र नाम पर्वतु। तेथ महादेओ भक्तु

सुरसिद्धगणी विख्यातु। सेविजे जो।।

हरिश्चंद्र देवता। मंगलगंगा सरिता

सर्वतीर्थ पुरविता। सप्तस्थान।।

ब्रम्हस्थळें ब्रम्ह न संहितु। चंचल वृक्ष अनंतु

लिंगि जगन्नाथु। महादेओ।।

ऐसा सर्वांचा समाओ। कळी संसारू दु:खाचा प्रवाहो

तो देओ मोक्षाचा उत्साओ। शनै: शनै:।।

जो तीर्थासि तीर्थ। केदारेंसिं तुकीताति।

आणि क्षेत्रिं निर्माती। प्रबंधु हा।।

हरिश्चंद्रेश्वर मंदिर आणि येथील लेण्यांवर एकूण आठ शिलालेख आहेत. त्यावरून येथे निवृत्तीनाथ, ज्ञानदेव व संत नामदेव येऊन गेल्याचे दिसते. तसा स्पष्ट उल्लेख पाच क्रमांकाच्या शिलालेखात आहे. या लेखाचे वाचन डॉ. वि. भ. कोलते यांनी केले असून 'महाराष्ट्रातील काही ताम्रपट व शिलालेख' या आपल्या ग्रंथात प्रसिद्ध केले आहे. निवृत्तीनाथ हे ज्ञानदेवाचे मोठे बंधू पण नाथ परंपरेनुसार निवृत्तीनाथ ज्ञानदेवांचे गुरू आणि ज्ञानदेव त्यांचे शिष्य आहेत. क्रमांत सात आणि आठव्या शिलालेखात नंदनाथ आणि गयनाथ तथा गहिनीनाथ व दखिणनाथ व त्याचा शिष्य सपकनाथ यांचा उल्लेख असून हे तिन्ही लेख हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या मागील लेण्यांच्या दर्शनी स्तंभावर कोरलेले आहेत. यावरून हरिश्चंद्रगडावर अनेक नाथयोगी राहत होते व येथे ९-१०व्या शतकातील मच्छिंद्रनाथ-गोरक्षनाथांपासून सुरू झालेली गुरू शिष्यांची परंपरा जोपासणारे नाथ संप्रदायाचे गुरूकुल असल्याचे सिद्ध होते.

हरिश्चंद्रगडावरील लेण्यात व मंदिरात कोरलेल्या शिलालेखावर प्रथम लक्ष गेले ते डब्ल्यू. एफ. सिंक्लेर याचे इ. स. १८७७ मध्ये. त्यानंतर फर्ग्युसन आणि बर्जेस यांच्या 'दि केव्ह टेम्पल ऑफ इंडिया' या पुस्तकात उल्लेख आढळतो. पण इ. स. १९६९मध्ये गो. नी. दांडेकर यांनी 'दुर्गदर्शन' या पुस्तकात 'चक्रपाणी वटेश्वर नंदतु (तु) / तस्य सुतु वीकट देऊ' अशा ओळी लिहिल्या आहेत. यानंतर नागपूर विद्यापीठातील संशोधक प्रा. म. रा. जोशी यांनी हरिश्चंद्रगडावरील सर्व लेख शोधून त्याचे फोटो व ठसे महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाचे संचालक वि. गो. खोबरेकर यांच्याकडे पाठविले व तेथून ते डॉ. वि. भि. कोलते यांच्याकडे आले.

निसर्गप्रेमी मित्रांचे सर्वांत आवडते ठिकाण म्हणजे कोकण कडा. या ठिकाणी आल्यावर देहभान हरपून जाते. चंद्राच्या कोरीसारखा अंतर्वक्र आणि सुमारे अडीच हजार फूट खोली असलेला कोकण कडा अधिक उग्र रूप धारण करतो. त्याची भीषणता आणि भव्यताही मनाला स्तिमीत करून जाते. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अनेक रंगरूप धारण करणारा हा अद्भुत कोकण कडा ज्यांनी पाहिला त्यांना जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटते. येथे शैव-वैष्णव पंथाबरोबरच येथील आदिवासी, गिरीवासींचा देव जागरही वेतोबाच्या रूपात पाहावयास मिळतो. गडाच्या उत्तरेस धावत गेलेल्या ऑक्टोपससारख्या लांबच लांब डोंगरधारा आहेत त्यापैकी मधल्या धारेवर सुमारे तीन मैल अंतरावर दगडाचे तांदळे व एका काठीला दोन-चार फूटके घाट (घंटी) बांधलेले दिसतात हाच तो आदिवासींचा वेतोबा.

हरिश्चंद्रेश्वर मंदिर, त्याच्या मागील टेकडीवरील विश्वामित्र ऋषींचे लहानसे मंदिर, केदारेश्वर गुहा तारामती शिखराच्या पोटातील गणेशलेणे, सप्ततीर्थ तलाव, रोहिदास आणि तारामती शिखराभोवती असणारी घनदाट झाडी, त्यामध्ये वास्तव्यास असणारे भेकर, सांबर, मोर, ससे आणि निरनिराळे पक्षी, अद्भुतरम्य कोकण कडा आणि मंगलगंगा नदीने केलेले लहानमोठे डोह आणि जलप्रपात यामुळे असे वाटते की निसर्गाने त्याच्या ठेवणीतील जे जे काही आहे ते सर्व येथे उधळून टाकले असावे. सरत्या पावसात रंगबिरंगी तेरड्याच्या फुलांनी बहरलेला किंवा अगदी मणिकांचन योग असेल तर कारवी फुललेली असताना गडाचे रूप म्हणजे त्रिभुवनातील सारे सौंदर्य लेवून काश्मीरच्या नंदनवनाशी स्पर्धा करणारे स्वर्गीय सुखाचा परमोच्च आनंद देणाऱ्या मयपुरीत आपण आल्याचा भास होऊ लागतो. खरोखर भाविकांनी, दुर्गयात्री आणि निसर्गमित्रांनी या गडाला आवर्जून भेट द्यावी, असे हे नितांत सुंदर आणि संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, निवृत्तीनाथ आणि नवनाथ संप्रदायांच्या पवित्र पदरवाने पुनित झालेल्या गूढरम्य परिसराला भेट द्यावी, असे ठिकाण आहे.
 
 राजूरपासून पाचनई ३० किलोमीटर अंतर आहे. पाचनई गावातूनच समोर डोंगरांच्या कड्यांवरून कोसळणारे धबधबे आमचे स्वागत करायला तयार होते. गावात वाट विचारून सरळ गडाकडे निघालो आणि प्रचंड पाऊस सुरु झाला. गडाची वाट एकदम सोपी आहे, दीड-दोन तासात आपण गडावर पोचतो.

४. 

५. 

आता थोडं ह्या किल्ल्याविषयी, हरिश्चंद्र म्हटलं की आठवतो महाकाय कोकणकडा. हा किल्ला पुणे, नगर आणि ठाणे हे तिन्ही जिल्हे जिथे एकत्र मिळतात, त्यातल्या सर्वात उंचावर असलेल्या डोंगरावर वसलेला आहे. किल्ल्याचे बांधकाम साधारण पाचव्या-सहाव्या शतकातील आहे. गडावर पोचाताक्षणी हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर दिसते. नवव्या शतकातील हे मंदिर म्हणजे, मानवी कलाकृतीचा उत्तम नमुना. साधारण १६ मीटर उंची असलेले हे मंदिर, काळ्या कातळात असलेले ही मंदिर आपला श्रमपरिहार करते. गडावर अनेक भग्नावशेष पडून आहेत, त्यावरून जाणवते की तिथे खूप सारी मंदिरे आणि छोटेखानी महाल वगैरे होते. गावकऱ्यांच्यानुसार गडावर ५००-५५० शंकराच्या पिंड्या होत्या, त्या लोकांनी चोरून नेल्या आणि आता गडावर मोजून ३०-४० पिंड्या आहेत. लहान लहान मंदिरावर केलेली कलाकुसर निव्वळ अप्रतिम आहे. गणेश आणि महादेव ह्या दोन्ही देवांच्या अनेक लहान मोठ्या प्रतिकृती आपल्याला बघायला मिळतात. दानवरूपी असलेली काही शिल्पं ही गडावर आहेत. शंकराची खूप लहान-मोठी मंदिरे गडावर आहेत. हरिश्चंद्रेश्वर मंदिरासमोर १४ कोनाडे असलेली, विष्णूतीर्थ नमक पुष्करणी आहे. मंदिराच्या बाजूला ओढ्याच्या रुपाने वाहणारी मंगळगंगा नदी आहे. तिच्या प्रवाहाला लागून उजव्या बाजूला केदारेश्वराचे लेणं लागतं. साधारण ५ फुट थंडगार पाण्यात असेलेले ते शिवलिंग बघू आपसूक हर हर महादेव अशी आरोळी निघाली.

६. 

७. 

८. 

९. 

१०. 

११. 

१२. 

१३. 

१४. 

१५. 

१६. 

१७. 

१८. 

१९. 

२०. 

21. 

22. 

23. 

24. 

 

पा
 
 एक अतिशय अविस्मरणीय ट्रेक 
म्हणजे जसे वारकरी लोक आळंदी - पंढरपूर ची वारी नित्यनियमाने करतात तसे दुर्ग यात्रींची पंढरी म्हणजे हरिश्चंद्रगड 

महाकाय अजस्त्र  हरिश्चंद्र गडाचा(१४२९ meters) ट्रेक केला आणि तो सुद्धा अगदी कमी वेळात म्हणजे सकाळी ७ वाजता घरून निघालो ,माळशेज घाटातल्या खिरेश्वर गावात सकाळी १०:०० वाजता दाखल झालो,
माळशेज घाटात माझ्या बायकोचा भावाची भेट झाली. त्यांचे कुटुंब माळशेज  घाट पाहण्या साठी कल्याणहून आले होते त्यामुळे मी माझ्या बायकोला त्यांच्याबरोबर सोडले आणि मी हरिश्चंद्र गडाच्या ट्रेक ला निघालो
१०:३० वाजता ट्रेक  ला सुरुवात केली, दुपारी १:०० पर्यंत मंदिरा पर्यंत पोहोचलो ,केदारेश्वर च्या बर्फ सारखे थंड पाण्यात अंघोळ केली,कोकण कडा पहिला ,पुन्हा दुपारी ३:०० पर्यंत मंदिरा जवळ आलो ,  फक्त तीन लाडू खाल्ले आणि परत परतीच्या वाटेवर लागलो ,वाटेत बालेकिल्ला पाहिला आणि ४:४५ पर्यंत खिरेश्वर गावात परतलो  आणि घरी ९:१५  ला पोहोचलो
मागच्याच आठवड्यात केलेली  रायगड ची सहल आठवली आणि या सध्या सहली साठी किती वेळ झाला हे मुद्दाम नमूद करावेसे वाटते
हरिश्चंद्रगड ट्रेक म्हणजे रायगडचा १० - १२ पट जास्त चालणे म्हणजे जवळ जवळ ३०-३२  kilometer चालणे,भरपूर खडी  चढण, खूपच दाट निर्बीड अरण्य म्हणजे कित्येकदा मला दुपारी सुद्धा torch चालू करून जावे लागत होते, फसव्या वाटा आणि त्यात मी एकटा ट्रेक करत होतो ,  रायगडाच्या २.५ पट चढाई (खिरेश्वर गाव ते बालेकिल्ला ८०० meter उंच.रायगड तर जमिनी पासून  फक्त ३५० meter उंच आहे आणि वर जाण्या करिता त्यावर पायर्या  आहे . हरिश्चंद्र गडा बाबत असलं काही नव्हत )
एवढ करून देखील मी घरी ९:१५ वाजता  पोहोचलो  जेव्हा कि पुणे ते रायगड आणि पुणे ते माळशेज हे अंतर जवळ जवळ सारखेच आहे आणि रस्त्यांची अवस्था सारखीच आहे , रायगडला तर मी सकाळी ६;०० वाजता निघालो म्हणजे एक तास आधी आणि तरी पण घरी पोहोचायला मला रात्रीचे १२:०० वाजले जेव्हा कि महाकाय ,अजस्त्र हरिश्चंद्रगड(रायगडाच्या १० ते १२ पट जास्त अवघड, खूप अवघड वाट ) असून देखील मी घरी खूप लवकर पोहोचलो

खिरेश्वर गाव हे फिल्म च्या शूटिंग साठी प्रसिद्ध आहे.
मणिरत्नम च्या रावण चित्रपटाचे शूटिंग इथेच झाले म्हणजे त्या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेले ते निर्बीड अरण्य हे खिरेश्वर,माळशेज, हरिश्चंद्रगड ते रतनगड या भागात शूटिंग केली होती आणि मी ट्रेक करत असताना मला ती गोष्ट  स्पष्ट जाणवली कि मणिरत्नम ने हीच जागा का निवडली असेल
खिरेश्वर गाव हे तिथल्या दही साठी पण प्रसिद्ध आहे म्हणजे तिथला माणूस सांगत होता कि मणिरत्नम जर इथे जवळपास आला तर न चुकता खिरेश्वर गावात येतोच .त्याला या गावातल दही फार आवडत असे इथले लोक सांगतात  
हा संपूर्ण भाग कळसुबाई - हरिश्चंद्रगड अभयारण्यात येतो


खिरेश्वर गावातल्या लोकांचे कौतुक जितके करावे ते कमीच आहे मी एकटा ट्रेक करत होतो आणि काही वेळात एक ७० - ७५  च्या जवळपास वय असलेल्या तरी पण चेहऱ्यावर  एक विलक्षण  वेगळेच तेज  असणाऱ्या  आजीबाई त्या दाट रानात भेटल्या .त्यांच्याशी बोलताना असे कळले कि त्यांना गडाच्या पलीकडच्या कोथळे या गावात त्यांच्या भावाकडे फक्त निरोप देण्याकरिता जायचे होते( पुढच्या आठवड्यात राजूर ला भरणाऱ्या बैलांच्या बाजार मध्ये खरेदी संबंधी ) पण कोथळे गावात जायचे म्हणजे पुन्हा माळशेज रोड वर जाऊन ST पकडून ओतूर ला जाऊन दुसरी ST पकडून ब्राह्मणवाडा -कोतूळ ला जावे लागते आणि मग पुन्हा आणखीन ST किंवा जीप ने कोथळे ला जावे लागते म्हणजे वेळ भरपूर लागतो आणि पैसा हि त्या पेक्षा हि १९ kilometer ची पायपीट परवडती
मी  थक्क झालो , आहो या वयात देखील त्या आजीबाई त्या दाट रानातून आणि एका साध्याशा कामासाठी  एकट्या १९ kilometer ची पायपीट करून कोथळे गाव कडे चालल्या होत्या .
मी एक गोष्ट observe केली म्हणजे कि त्या आजींच्या बोलण्यात कुठेही negative बोलण्याचा अजिबात लवलेश नव्हता  न कुठल्याही प्रकारची भीती आणि विशेष म्हणजे त्यांच्या हातात काठी देखील नव्हती. त्या आजी सामान्य नव्हत्या असे का बर मला वाटत होते कोणास ठाऊक 
तोलार खिंड आली आणि त्या आजीबाई कडून  "सांभाळून जा मुला " असे आशीर्वाद वजा  प्रेमळ बोल ऐकून निरोप घेतला . मी त्या खिंडीत थोडा वेळ थांबलो आणि काही क्षणात दाट राना मधून त्या आजीबाई केव्हाच दिसेनासे झाल्या म्हणजे आता इथे होत्या आणि पुढे झाडीतून कुठे गेल्या हे समजले नाही.
तोलार खिंड आली म्हणजे १ तास कठोर मेहेनत करून तुमचा ट्रेक २५ टक्के झाला असे समजायचे .हरिश्चंद्रगड आणि कारकाई डोंगर या मधील हि खिंड या खिंडीतून भरपूर वाटा फुटतात .अतिशय दाट झाडीतून डावी कडे हरिश्चंद्रगडा कडे  वाट जाते ,आणि उजवीकडे सरळ हि वाट कोथळे , विहीर ,कोहोने, लव्हाळी गावाकडे जाते
तोलार खिंडीत मी हरिश्चंद्र गडाला जाणारी डावीकडची वाट धरली ,अरण्य खूपच दाट होते म्हणजे मी खिरेश्वर गावातून १ तास या दाट झाडीतून चालत आलो होतो पण डोक्यावर आकाश दिसणे हि गोष्ट पण खूपच क्वचित पणे घडत होती
थोडे पुढे आलो आणि खूप वेळाने आकाश दर्शन झाले आणि तेव्हाच माझ्या समोर एक २०० फुटाचा कडा आ वासून उभा होता .त्या कड्या मधून वाट काढत एका डोंगर माळेवर दाखल झालो
समोर एक रुळलेली पाउल वाट दिसत होती आणि खूप दूरवर  मला हरिश्चंद्र गडाचे तारामती शिखर दिसत होते . या डोंगर माळेवरून मला सात डोंगर चढून उतरून मंदिरापर्यंत जाता येते हि गोष्ट कळली .इथे वाट चुकण्याची काहीच शक्यता नाही कारण तुम्हाला ठराविक अंतरावर चहा,लिंबू सरबत,ताक विकणारे लोक सापडतील पण आता मंदिर जवळ जवळ ८ kilometer लांब आहे आणि वाट कधी दाट निर्बीड अरण्यातून तर कधी ओसाड माळरानावरून जाती आणि त्यात खूपच फसव्या वाटा असतात म्हणजे तुम्ही कुठेही वाट चुकलात कि हात पाय आपटून भोकाड पसरले तरी ऐकायला जवळपास कोणी नसते(अपवाद फक्त जंगली प्राण्यांचा ) म्हणून वाट चुकणार नाही याची काळजी घेणे खूपच आवश्यक आहे.
माझ्या १ किलोमेतर पुढे एक ट्रेक करणार्यांचा ग्रुप अधून मधून  दिसत होता त्यामुळे या वाटे बद्दल खात्री होती
इथे ताक लिंबू सरबत विकणाऱ्या लोकांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे .सगळे लोक जवळच्या कोथळे, लव्हाळी, कोहोने,पेठाची वाडी  गावातून एवढी पायपीट करून येतात हे एक आश्चर्य आहे कारण या वाटेवरून खूप कमी लोक फिरकतात तरी देखील हे लोक येथे ताक, सरबत विकायला येतात .त्यांचा उद्देश एकाच असतो कि इथे येणाऱ्या लोकांना वाट दाखवावी आणि ते हि पैश्यांची मागणी न करता म्हणजे तुम्ही त्यांच्याकडून तक सरबत घ्या अथवा नका पण ते तुम्हाला योग्य रस्ता दाखवतीलच याची खात्री आहे ( या भागात जवळ जवळ सर्व लोक माळकरी आहेत त्यामुळे त्यांना महाबळेश्वर, माथेरान , लोणावळा ,खंडाळा,भीमाशंकर,भंडारदरा   इत्यादी सारखे "पैसे घेतल्याशिवाय काहीही सांगायचे नाही"  चे वारे नाही लागले अजून ) .ताक सरबत विक्री तर त्यांच्या साठी गौण विषय आहे .
त्यामुळे सगळीकडे चांगला अनुभवच येतो 
त्यांना धन्यवाद देत आपण आपल्या वाटेने चालू लागायचे
त्या रुळलेल्या पाउल वाटेवरून,त्या अरण्यातून, माळरानातून डोंगरवाटा तुडवीत कधी चढण तर कधी उतरण करीत  मी चालू लागलो आणि जवळ जवळ १.५ तासांनी सातवा डोंगर चढल्यावर मंदिर दृष्टीक्षेपात येऊ लागले आणखीन ५ मिनिटांनी मंदिर गाठले.

वास्तविक पाचनई ची वाट खूपच सोपी आहे आणि त्या वाटेवरून  एका रुळलेल्या मोठ्या पाउलवाटेने( राजमार्गच म्हणा ना )  फक्त ५०० meters चढून आपण १.५ तासात मंदिरापर्यंत पोहोचतो पण पाचनई  पर्यंत पोहोचणे पुण्यापासून सोपे नाही .म्हणजे तुम्हाला पुण्याहून ओतूर- ब्राह्मणवाडा -कोतूळ- कोहोने -लव्हाळी मार्गे पाचनई पर्यंत पोहोचावे लागते म्हणजे जवळ जवळ ४.५  ते ५ तास.
 पुण्याहून माळशेज घाट मार्गे खिरेश्वर जवळ पडतो पण या वाटणे हरिश्चंद्रगड फार अवघड आहे आणि लांब लचक आहे पण या वाटेने गेलात तर तुमचे संपूर्ण हरिश्चंद्र गडाचे भ्रमण होते .
आणखीन एक खूपच अवघड वाट आहे आणि ती म्हणजे माळशेज घाट पूर्ण उतरल्यावर कोकणात सावरणे गावात उतरून बेलपाडा या गावात जाणे आणि 'नळीच्या वाटेने'  जवळ जवळ ११०० meter ची कोकण कड्यावरून चढाई करून तुम्ही मंदिरा पर्यंत येऊ शकता पण या वाटेने यायला तुम्हाला १० ते १२ तास लागतात  अर्थात हि वाट नवख्या लोकांच्या आवाक्या बाहेरची आहे हे कळले असेलच एव्हाना .


दुपारी १:०० वाजे पर्यंत म्हणजे २.५ तासात मी मंदिराजवळ पोहोचलो (साधारण या मार्गे ट्रेक ला ४ तास लागतात असे बरेच ट्रेकच्या संबंधित websites  सांगत होते पण गावातील लोक अगदी बरोबर सांगत होते .खिरेश्वर गावातून एका माणसाने मला २ ते २.५ तास लागतील हे अगदी बरोबर सांगितले होते )

सातव्या डोंगराच्या वाटेवरून  तुम्ही खाली उतरताच त्या वाटेला  पाचनई गावाकडून येणारी वाट मिळते  आणि मग येथून उगम पावणाऱ्या मंगलगंगा च्या ओढ्यावर एक सेतू ओलांडून आपला प्रवेश मंदिरात होतो .हि नदी पुढे जाऊन पाचनई गावाजवळ मुळा नदीला मिळते
इतक्या अवघड जागी हे सुंदर आणि भव्य मंदिर १०,००० वर्षापूर्वी  या निर्बीड जंगलात  कसे बांधले असेल याचा विचार करू लागलो
या हरिश्चंद्रगडावर ज्ञानेश्वर माउलींच्या समकालीन संत चांगदेव  महाराजांचे वास्तव्य होते आणि त्यांनी इथेच तपश्चर्या केली होती. चांगदेव महाराजांबद्दल येथे काही शीलालेख आढळतात पण त्या साठी काही माहितगार लोकांना विचारावे लागेल
वटेश्वर चक्रपाणी चांगदेव महाराजांनी याच हरिश्चंद्रगडावर 'तत्वसार' लिहिले होते आणि त्याचे शिलालेख मंदिराच्या प्रवेशद्वारा जवळ आढळतात
हरिश्चंद्रगडावर तारामती शिखरात तुम्हाला ९ लेण्या दिसतील त्या मुक्काम योग्य आहेत म्हणजे जर एका वेळी १००  ते २०० लोक इथे मुक्काम करू शकतात इतका भव्य हा किल्ला आहे
आणि या पुरातन मंदिराच्या मागे कोकण कड्या कडे जातांना तुम्हाला टेकडी वरती एक छोटीशी देऊळी दिसेल त्याला विश्वामित्राने बांधलेली "डोंबची  घुमटी" असे म्हणतात 
म्हणजे हा किल्ला किती पुरातन आहे याची कल्पना तुम्हाला आली असेलच .म्हणजे स्कंद पुराणात पण          " हरीश्चान्द्राय नामे पर्वतः " असा उल्लेख आढळतो
इतिहासात तुम्ही बघाल तर हा किल्ला शिवाजी महाराजांकडे पण नव्हता आणि मुघल लोकांकडेही .या गडाची जागा अशा अवघड ठिकाणी होती कि कोणालाच याचा पत्ता नव्हता.म्हणजे १६७१ च्या सुरत च्या लुटी नंतर शिवाजी महाराज हे शेजारच्या कुंजर गडावर (याला पेठाची वाडीजवळ  कोंबड किल्ला अस म्हणतात ) राहिले होते आणि नंतर नाणे घाट जीवधन उतरून कल्याण मार्गे रायगड ला रवाना झाले होते
१७ व्या शतका मध्ये(सन १७४७) मुघल लोकांना हरिश्चंद्र गडाचा पत्ता लागला होता पण लगेचच सहा महिन्याच्या आत हा किल्ला पेशव्यांनी मुघलांकडून जिंकून  आपल्या ताब्यात घेतला आणि बालेकिल्ल्यावर तटबंदी केली आणि तिथे एक किल्लेदार नेमला(आज या बालेकिल्ल्याचे काही अवशेषच शिल्लक आहेत ) . पुण्या-मुंबई कडे तुम्हाला हरिश्चंद्रे किंवा हरिश्चंद्रकर आडनावाचे लोक सापडतील ते मुळचे कोकणामधील चिपळूण चे जोशी पण पेशव्यांनी नेमलेले किल्लेदार म्हणून त्यांचे आडनाव हरिश्चंद्रकर जोशी असे झाले
या कोकण कड्या बाबत एक किस्सा असा आहे कि कोकणातील जोशी यांनी आपली मुलगी जुन्नर मध्ये दिली होती आणि एके दिवशी जुन्नर मध्ये त्यांनी पेशव्यांची दवंडी ऐकली कि जो माणूस त्या रौद्रभीषण कोकण कड्यावरून किल्ल्यात येईल त्याला हरिश्चंद्र गडाची किल्लेदारी देण्यात येईल आणि त्या प्रमाणे श्री जोशींनी तो महाकाय कोकण कडा चढला आणि हरिश्चंद्र गडाची किल्लेदारी मिळवली.
पुढे सन १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात घेतला     
ताजमहालाला "seven  wonders  of  world " असे म्हणतात पण तुम्ही हरिश्चंद्र गडावर या आणि हे पुरातन  मंदिर बघा ताजमहाल या मंदिरापुढे खूपच फिके आहे(अगदी कीस झाड कि पत्ती) म्हणजे ताजमहालाचे या मंदिराबरोबर कुठल्याही शब्दात आणि कुठल्याही रुपात,कुठल्याही दृष्टीकोनातून तुलना करताच येणार नाही.  हो पण या मंदिरा कडे येताना खूप सारे कष्ट सोसण्याची तयारी हवी(अगदी पाचनई च्या सोप्या वाटेने सुद्धा कष्ट करावे लागतात ) . इतक्या सहजपणे तुम्हाला इकडे येत येणार नाही . हरिश्चंद्र गडावर यायचे म्हणजे कष्टा शिवाय पर्याय नाही
मंदिरात दर्शन घेवून खाली केदारेश्वर मंदिराकडे गेलो आणि आज खूप कमी लोक गडावर होते याचा फायदा म्हणून कमरेपर्यंत बर्फा सारख्या थंड पाण्यात उतरून केदारेश्वराचे दर्शन घेण्याचे ठरवले आणि मी त्या पाण्यात उतरलो आणि त्या पाण्यात उतरलो तर ते पाणी इतके थंड होते कि एका क्षणात मला पाय आहेत कि नाही असे वाटू लागले कमरेपासूनचा खालचा भाग बधीर झाला होता .त्या पाण्यात अंघोळ करून मी पुन्हा बाहेर आलो आणि इतका वेळ वाजणारी थंडी कोठे पळून गेली हा प्रश्न मला पडू लागला .
खडी चढण आणि १२ kilometer ची पायपीट यामुळे आलेला थकवा केदारेश्वर च्या थंड पाण्यात  अंघोळ केल्यावर केव्हाच नाहीसा झाला होता .
कपडे बदलून मी पुन्हा हरिश्चंद्रेश्वर मंदिरात आलो आणि bag मधून भूक लाडू काढले (राजगिरा लाडू ) आणि थोडे खजूर खाऊन पाचच मिनिटात कोकण कड्या कडे निघालो
कोकण कडा हा मंदिरापासून साधारण २ ते २.५ kilometers आहे पण मला ५ वाजायच्या आत खिरेश्वर गावात पोहोचायचे होते म्हणून आता पायाला चाक लावणे भागच होते .१५-२०  मिनिटात मी कोकण कड्यापर्यंत पोहोचलो आणि कोकण कडा जिथे संपतो तिथ पर्यंत जाऊन आलो,काही फोटो काढले आणि पुन्हा मंदिरात २० मिनिटात आलो
तीन वाजत आले होते आणि मला निघणे भागच होते कारण एक अशक्य गोष्ट करायची होती आणि ती म्हणजे जिथे ३ तास लागतात ती गोष्ट २ तासात करायची होती म्हणजे पायथ्याच्या खिरेश्वर या गावात जाणे
मंदिरात असणाऱ्या पाण्याच्या टाक्यातून मी माझ्याकडील ३ पाण्याच्या बाटल्या भरून घेतले,हरीशचंद्रेश्वर चे पुन्हा दर्शन घेतले आणि परतीच्या वाटेवर निघालो
मंदिरा बाहेर मला एक चांगलीच जाड आणि ५ फुट लांब काठी सापडली .पुढे  मी एका ताक विकणाऱ्या माणसाकडून त्या काठीला तासून भाल्या सारखे टोक करून घेतले .
आता मी निर्धास्त होतो कारण ती काठी अशी होती कि एका फटक्यात कुठल्याही जंगली जनावराचा कपाळमोक्ष करण्यासाठी (आणि तासून धारदार केल्यामुळे कोथळा बाहेर काढण्यासाठी पुरेशी होती) आणि त्या दाट अरण्यात मला हवा असलेला short cut सापडला वास्तविक त्या सात डोंगराची चढण आणि उतरण करण्यात २ तास जाणार होते आणि या short cut ने बालेकिल्ल्यावरून जाऊन खाली उतरून सरळ तोलार खिंडीत जाता येते आणि ते हि अर्ध्या तासात पण हि वाट खूपच भयानक दाट झाडीतून जाते आणि त्यातून मी एकटा होतो पण काही हरकत नाही कारण दाट झाडीतून जर वाट असेल तर वाट चुकण्याची शक्यता कमी असते कारण मला माहित होते कि कितीही फसव्या वाटा आल्या तरी पण मला डावीकडेच जायचे होते म्हणजे वाट चुकली तरी पण डावीकडे जात गेलो तर मी त्या सात डोंगरांच्या वाटेला तर निश्चित लागेल
पण त्या दाट झाडीतील वाट खूपच सोपी निघाली म्हणजे दोन्ही बाजूने खूपच दाट झाडी,कुठेही त्या वाटेला फाटा फुटत नव्हता म्हणजे वाट चुकण्याची शक्यता नव्हती
त्या वाटेवरून मी बालेकिल्ल्याचा डोंगर चढलो आणि उतरलो आणि एका डोंगराच्या माळ्यावर पोहोचलो आणि परत दाट झाडीतून वाट काढत, उतरत बरोबर अर्ध्या तासात मी त्या कड्या जवळ आलो .
माझा जवळ जवळ १.५ तास वाचला होता याचा आनंद झाला
एक गोष्ट मनाशी बांधली कि कोठेही थांबायचे नाही .पायाला चाक कायम लावलेले पाहिजे आणि म्हणूनच मंदिरापासून जे सुरुवात केली ती मी खिरेश्वर गावापर्यंत कोठेच थांबलो नाही कारण मला माहित होते कि २ ते ५ मिनिटे जरी थांबलो कि पुढे अजून time pass करण्याची सवय लागेल आणि नंतर  दाट अरण्यात अंधारात चालण्याची वेळ सुद्धा येऊ शकते. आता माझ्या जवळ १.५ तास वाचल्याचा advantage होता आणि त्याचा फायदा हा घेतलाच पाहिजे या विचाराने मी चालू लागलो .मला खाली उतरणारा एक माणूस सुद्धा दिसला नाही .फक्त तोलार खिंडीत राहणारे ताक लिंबू सरबत विकणाऱ्या लोकांखेरीज मला पहिला माणूस दिसला तो खिरेश्वर गाव अगदी १०-१५ मिनिटावर आले होते तेव्हा   
२०० फुट कडा उतरून मी तोलार खिंडीत दाखल झालो आणि परतीची वाट धरली आणि जवळ जवळ १ तासांनी मी खिरेश्वर गावा जवळ आलो वाटेत माळरानात एक कोल्हा दिसला होता पण मी माझी काठी अशा थाटात त्या खडकावर आपटली कि त्या आवाजाने त्याने जी धूम ठोकली तो पुन्हा कधी दिसला नाही
बालेकिल्ल्या जवळ माळरानात मला एक साळींदर दिसले होते पण कॅमेरा काढे पर्यंत ते कोठे एका बिळात गेले आणि तिथे पुष्कळ बिळे होती 
तरासाचे खिदळण्याचे  आवाज येत होते पण आता गाव अगदी पाच मिनिटावर आले होते आणि तरस मला काही नवीन नाही. हल्ली तर लहान पोर देखील तरसला हुसकावून लावतात
खिरेश्वर गावात आलो आणि सगळी नातेवाईक मंडळी गावात थांबली होती .एक मराठी फिल्म ची शूटिंग चालली होती   संध्याकाळ चे ४:४५ झाले होते मग आपला थोडा आराम केला गावात दोन छोटे हॉटेल आहेत ,तिथे थांबून चहा घेतला ,
गावकर्यांशी थोड्या गप्पा झाल्या आणि इथे कोठल्या फिल्म ची शूटिंग झाली होती इथपासून ते हरिश्चंद्रगड पूर्वी कसा होता आणि आता ट्रेक ला येणाऱ्या लोकांनी त्याला कसा खराब केलाय या बद्दल चर्चा झाली (मला एका कोलेज च्या तरुण मुला मुलींचा मुंबई कडचा ग्रुप दिसला होता हरिश्चंद्रेश्वर मंदिरा जवळ त्यांचे मद्यपान ,धुम्रपान आणि मोबाईल वर जोर जोरात गाणी लावणे इत्यादी प्रकार सर्रास  चालले होते.एक बरे झाले कि गावकर्यांनी त्यांना हुसकावून लावले आणि या फालतू  लोकांनी पाचनई गावाची वाट धरली  )
वास्तविक या असल्या फालतू लोकांमुळेच डोंगरयात्रा करणाऱ्या लोकांची टिंगल टवाळी आणि माकड चेष्टा इतर बरेच लोक करतात
मी इतक्या कमी वेळात कोकण कड्या पर्यंत जाऊन परत आलो या गोष्टीवर गावात कोणाचाही विश्वास बसत नव्हता पण मी जेव्हा फोटो दाखवले तेव्हा त्यांना खरे वाटले. आहो कोकण कडा सोडा,मी तर जवळ जवळ साढले घाटा च्या जवळ पास गेलो होतो म्हणजे कोकण कडा आणि ती नळीची वाट  जिथून सुरु होते तिथपर्यंत

माळशेज घाटामध्ये सूर्यास्ताचे दृश्य कॅमेर्यात टिपून निघालो .म्हणजे आम्ही  पुण्याला आणि आमचे नातेवाईक कल्याण ला
नाशिक हायवे  ला भरपूर ट्राफिक होती,शिवाय जेवणासाठी थोडा वेळ थांबलो होतो  तरी पण ९:१५ मिनिटांनी मी घरी सुद्धा आलो (म्हणजे एक साध्या रायगड ट्रिप च्या  तुलनेने हा तर एक चमत्कारच म्हणावा लागेल )

Here is a guidance map for Harishchandragad trek prepared by me
This map is for guidance purpose only.It has nothing to do with exact dimensions and distance






Here are some photos

Harishchandragad from Malshej Ghat.This fort spans around 10 to 12 kms.Just look from right to left.This much vast mountain is Harishchandragad

From Khireshwar village,the trek starts.Between the two mountains is the Tolar Khind.From here,left is the way to Harishchandragad

You have to trek through such dense trees for almost all the trek

                                      Approaching the Tolar Khind


 There is a rock patch of 200 feets from Tolar Khind.After climbing this rock patch,you have to travel seven mountains through very very dense forests to reach Harishchandragad temple
या कड्या मध्ये खोबण्या आहेत आणि लोखंडी खांब बसवले आहेत आणि त्यातूनच वाट कडून हा कडा चढावा लागतो (सोपी श्रेणी, फक्त चढताना खाली बघू नये )



 After climbing the rock patch.view of Karkai dongar(करकाई डोंगर ) 1488 meters fifth highest mountain in Maharashtra

After the rock patch,you have to travel through seven hills through dense forests like this

View of Ghanchakkar(Left-1532 meters) and Muda(Right-1520 meters) third highest and fourth highest mountains in Maharashtra

 खूप चालून झाल्यावर हरिश्चंद्रगड बालेकिल्ला(समोर डावीकडे ) आणि तारामती(बालेकिल्ल्या शेजारचे ) शिखर दिसायला लागते .इथून मंदिर अजून १ तास लांब आहे आणि अजून ५ डोंगर चढून जायचे आहेत

 On the way to Harishchandragad

After walking for 2.5 hours,here is the first sight of the temple


           This is the 10,000 year old temple the Harishchandreshwar temple
         
मंदिराजवळ पोहोचे पर्यंत २.५ ते ३ तासाच्या पायपिटीने एकदम घामेघूम झालो होतो .चला केदारेश्वरच्या बर्फा सारख्या  थंड पाण्यात अंघोळ केली पाहिजे !              



 Caves inside the temple



 Kedareshwar temple immersed in ice cold water


 Harishchandreshwar temple,It is believed to be 10,000 years older(एक प्रश्न असा पडतो कि अशा अवघड जागेवर हे एक सुंदर कलाकृती असलेल मंदिर कसे उभारले असेल.आग्र्याच ताजमहाल पण खूपच फिक पडेल या मंदिरा समोर. दर्शनी भागात गणपतीची मूर्ती आणि आतल्या गाभ्यात शिवशंकराची पिंड असे हे मंदिर आहे)
पुष्करणी तलाव (या तलाव मध्ये भगवान विष्णूंचे १४ वेगवेगळे आयुधे धारण केलेल्या मूर्ती आहेत )




केदारेश्वर च्या गोठवणाऱ्या पाण्यात कशीतरी अंघोळ  केली .कमरे पर्यंत असलेल्या पाण्यात शिरताच तुम्हाला पाय आहेत कि नाही असा प्रश्न पडतो आणि हे पाणी अगदी मे महिन्यात सुद्धा एवढेच थंड असते

  हरिश्चंद्रगड चा सुप्रसिध असलेला कोकण कडा.खाली टाकलेली हलकी वस्तू पुन्हा वर येती . हा कडा ४००० फुट खोल आणि ३ kilometer लांब आहे . हा सह्याद्रीतला सर्वात उंच कडा आहे
  

                                        कोकण कडा 
                       
                                        Myself at Kokan Kada
    हा तो  कोकण कडा.कितीही प्रयत्न केले तरी हा संपूर्ण कडा अखंड पणे कॅमेर्यात  टिपता येत नाही इतका उंच आहे .जो दिसतो आहे तो अर्धाच आहे .अजून अर्धा कडा सरळसोट खाली शिल्लक आहे .तुम्हाला कल्पना आली असेलच कि हरिश्चंद्रगडाला  येणारा प्रत्येक माणसाला या कड्याचे आकर्षण का आहे .हा कडा तुम्ही बघितला नाही तर तुमचा हरिश्चंद्रगडावर येऊन काहीच उपयोग होणार नाही किंबहुना तुमच्या सारखा अरसिक माणूस जगात दुसरा कोणी नसेल



                                       कोकण कड्यावरून दिसणारे माळशेज घाट आणि  नाणे घाटाचे  दृश्य 


  एका वेगळ्या कोनातून रौद्रभीषण  कोकण कड्याचे टिपलेले छायाचित्र (हा फोटो कसा घेतला असेल याची कल्पना करा )
कोकण कड्यावरून दिसणारे हरिश्चंद्र गडाचे संपूर्ण पठार.लांब दिसणारा तो बालेकिल्ला आणि समोर जवळ दिसणारे ते तारामती शिखर  

                            परती च्या वाटेवर हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला
                                        पुन्हा हा कडा २०० फुट  उतरायचा आहे

खाली दिसणारे कोथळे लव्हाळी गाव 

                                      परतीच्या वाटेवर तोलार खिंडीत 

                                         खिरेश्वर गाव 

                                             माझी काही photography try केली 
                          
                                          माझी काही photography try केली 
               
                                      माळशेज घाटातला सूर्यास्त

                                         माझी काही photography try केली 

                                          पिंपळगाव जोगे धरण


माझ्या साठी हरिश्चंद्रगड म्हणजे स्वर्गाहून श्रेष्ठ असे एक ठिकाण आहे म्हणजे पुनर्जन्म,आत्मा, स्वर्ग, नरक  वगैरे गोष्टी जर सत्य असतील तर मी म्हणेल कि मला पुनर्जन्म नको आणि स्वर्ग तर मुळीच नको .मला स्वर्गा पेक्षा श्रेष्ठ जागा या पृथ्वीवर मिळाली आहे. मी शरीराने जगाच्या पाठीवर कोठेही असलो तरी पण आत्म्याने मी कायम हरिश्चंद्रगडावर असेल
हरिश्चंद्रगड आहेच मुळी तसा 
 
 http://ontheedgeofsahyadris.blogspot.com/2011/12/harishchandragad-trek-from-malshej-ghat.html


  जुन्नरहुन आज लवकरच निघालो होतो. त्यामुळे सकाळचे सुर्योदयाचे विहंगम दृश्य पिंपळगाव जोग धरणाच्या भिंतीवरून सुर्यदेवतेच्या प्रतिबिंबासह धरणाच्या अथंग पसरलेल्या पुर्वेकडील पाण्यात पाहायला मिळत होते. अंगाला जाणवणारी बोचरी थंडी, जलाशय परिसरात थव्याने विहार करणारे पक्षी, धरणाच्या पाण्याच्या लाटांचा होणारा मंजुळ आवाज व पक्षांच्या गाण्यांचे कानावर ऐकु येणारे मधुर स्वर सर्व काही आनंद देणारे होते.
मी, अक्षय व ओंकार खिरेश्वरकडे हे दृश्य डोळ्यांमधे साठवत चारचाकिमधुन चाललो होतो. समोरच हरिश्चंद्र गड रांगेचे चारचाकीच्या समोरच्या काचेतून दिसणारे दृश्य पाहून असे वाटत होते की जणू ती सिनेरीच काचेवर लावली आहे की काय? खिरेश्वर मध्ये दत्ता बहुर्ले व त्याचा मित्र चिंतामण गाईड म्हणून येणार होते. कारण आजपर्यंत कधीही कुणीही न गेलेल्या अवघड व चित्तथरारक ठिकाणी अनुभव घ्यायला जायचे होते. समोरच चिंतामण चे ऐश्वर्या हाॅटेल होत. हाॅटेल छोटसच परंतू कुटुंबाची उपजिविका यावरच त्याची चालते. माणुसकीला जपणारा चिंतामण चारचाकी पाहताच पळत आला. कारण दत्ताने त्यास सांगितले होते कि आज सरांबरोबर आपणास भ्रमंतीला जायचय. चारचाकी पार्क केली व आम्ही खाली उतरलो. दत्ता पोहचला नव्हता. तोपर्यंत चिंतामणने नाष्ट्याला गरमागरम पोहे केले. दत्ता पण पोहचला. चहा नाश्ता करत आमचे जुन्नर दरवाजाने जाण्याची तयारी झाली परंतु त्या रस्त्याने जायचे हे फक्त चिंतामणलाच माहीत. दत्ता पण या रस्त्याने एकदाच गेलेला. चिंतामणला हाॅटेलची ऑर्डर असल्याने येणे शक्य नव्हते. त्यामुळे दत्ता व आम्ही निघालो. एक जिवघेण्या मार्गाकडे. जायचे कसे माहित नव्हते परंतु निघालो मात्र नक्की.
खुप मोठी रिस्क आज मी घेणार होतो. पुर्वजांनी अशा मोठ्या रिस्क घेतल्याने आपणास आज खुप काही शिकायला मिळते. म्हणूनच एक चान्स घ्यायचाच व तेथील ऐतिहासिक व नैसर्गिक खुणा पहायच्याच व ते पण फक्त आणि फक्त एकट्यानेच हा निर्धार मनात होता. आज पर्यंत खिरेश्वर गावातील एकाही व्यक्तीने येथे जाण्याचे धाडस केले नव्हते. जुन्नर तालुक्यातुन येथे कुणी कधी गेल्याचे ऐकण्यात नाही व यावर कुणी काही लिहिले हे पण वाचनात नाही असे खिरेश्वर ग्रामस्थ सांगतात. ते म्हणतात फक्त तेथे जायचे म्हटले तरी अंगावर काटा येतो. अशा ठिकाणी मला जायचे होते.
आमचा प्रवास जंगलवाटा तुडवत सुरू झाला तो हरिश्चंद्रगडावर जाणाऱ्या जुन्नर दरवाज्याने. माझ्या निरीक्षणातुन एक गोष्ट लक्षात आली की हरिश्चंद्र गडावर पुर्वी जाण्यासाठी मुख्य वाट म्हणजे हाच जुन्नर दरवाजा होय. कारण या वाटेवर कोरलेले पायरीमार्ग,हाताच्या बोटांच्या सपोर्ट साठी कातळात कोरलेल्या खोबण्या, घळीतील पाण्याचे टाके, विशिष्ट पद्धतीने खडकात कोरलेल्या पायर्‍या व घळीतील पायरीमार्गावर असलेल्या खिरेश्वर येथील नागेश्वर मंदिराचे दगडी शिल्प खुप काही सांगुन गेले. ही घळ जेथे संपते ते ठिकाण म्हणजेच हरिश्चंद्रगडाच्या बालेकिल्ल्याचा पायथा होय, म्हणुन या मार्गाला खुप महत्व. दुसरा संदर्भ म्हणजे जुन्नर तालुक्यातील असलेले सात किल्ले याच मार्गाने जवळचे. लवकरात लवकर व कुणाच्या निदर्शनास न येता छुप्यामार्गाने येथे पोहचण्याची ही वाट असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. असो
पाऊल वाटा झपझप तुडवत व मार्ग काढत आम्ही आता तीन चढाईचे टप्पे चढून वर आलो होतो. घड्याळात 10 वाजले होते. उजव्या हाताला ज्या ठिकाणी जायचे होते तो भाग दिसत होता. परंतु राॅकपॅच अवघड वाटत होता. आमच्या कडे कोणतेही चढाईचे साधन नव्हते. सोबत पाण्याच्या बाटल्या व न्याहरीची शिदोरी होती. कॅमेरा व ट्रायपाॅड बगलेत अडकवलेले होते. एक राॅकपॅच दत्ताने बोट करून दाखवत बोलला येथुन आपण चढूया. मी हो म्हटले व चढण्यास प्रारंभ केला. मध्यभागापर्यंत काहीच वाटले नाही परंतु तेथुन पुढे प्रसंग खुपच अवघड होता. दत्ताला सांगत होतो तुम्ही चढू नका. परंतु त्यांनी ऐकले नाही व तेथेच थरथर कापु लागले. त्यांना धिर देत देत सपोर्ट करत कसेबसे थोड्या सपाटीवर पोहचलो. जवळपास एकतास आमचा येथे खर्च झाला. त्या डोंगरावर चढण्यासाठी कुठून जागा मिळते का? ते मी त्यांना तेथेच थांबवत शोधू लागलो. डोंगराचा पुर्व, दक्षिण व पश्चिम भाग संपूर्ण पायाखाली घालत. चढाई मार्ग शोधु लागलो परंतु यश काही प्राप्त झाले नाही. खुप खिन्न व निराश झालो. कडेकपारीने जुन्नर दरवाजाकडे मित्रांना पुढे या आवाज देत चालू लागलो.
ते तिघे वाळलेल्या कारव्यांमधून मार्ग काढत घळीच्या वाटेकडे येत होते. मला आता जंगली जनावरांचा मार्ग मिळाला होता. मी पटपट चालू लागलो. घळीतील अर्धी वाट चढून मित्रांची वाट पाहू लागलो. बसल्या बसल्या मला पुरातन कोरीव खुणा उजव्या हाताला दिसुन आल्या. त्यांचा मागोवा घेत घेत मी पुन्हा अवघड कड्याकडे चालु लागलो. अतिशय निसरडी वाट व जवळपास 300 फुट शेजारी खोल दरी. परंतु प्रयत्न सोडायचे नाही हाच निश्चय मनी. आता एका अवघड राॅकपॅच जवळ आलो होतो.
तेथुन वर जवळपास पन्नास फुट वर चढायचे होते. चढता येईल का हा विचार करत असताना खाली दरीत उतरण्याचा एक पायरीमार्ग दिसु लागला. काळाच्या ओघात तो पुसला गेला होता. खडकात कोरलेल्या पायर्‍या होत्या. हाताच्या बोटांच्या सपोर्ट खोबण्या मात्र चांगल्या स्थितीत होत्या. वर वळुन पाहीले तर दहा बारा खोबण्या निदर्शनास आल्या. थोडा धीर आला. त्या खोबण्यांच्या मदतीने वर चढायला सुरुवात केली. चढणे अवघड होते परंतु भक्कम व विश्वासु सपोर्ट त्या खोबण्यांचा होता. मित्रांचा आवाज कानी येत होता सर तुम्ही कोठे आहेत. मी आवाज दिला तेथेच घळीत बसून रहा. मला तुमच्या पर्यंत यायला कमीत कमी दिड, दोन तास लागतील. मी कोठे आहे हे त्यांना समजने शक्य नव्हते. परंतु त्या घळीत त्यांना आवाज मात्र पोहचला होता. मी आता एका सपाट भागावर आलो होतो. माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मी दक्षिणेकडे चालू लागलो व पुढे पन्नास फुटावर जावून अचानकपणे थांबलो. गगनात मावेनासा झालेला आनंद क्षणात नाहीसा झाला. समोरचे दृश्य खुप भयानक होत. पुढे एक फुट रूंद एवढीच जागा होती. ज्या ठिकाणाची उत्सुकता होती त्या ठिकाणी पोहचता येईल का? हा प्रश्न होता. मी एकटाच होतो. सटकलो तर त्या कड्याला माझे नाव दिले जाईल हे मात्र नक्की. काय करावे सुचेना. पुर्वेकडे खिरेश्वर दृश्य, दक्षिणेकडे माळशेजघाट दृश्य तर पश्चिमेला तारामती शिखर दृश्य फक्त मान 180 डिग्री फिरवली की दिसत होते.दोन, तीन हजारहून जास्त खोल दर्या दोन्ही बाजूला राक्षसी रूपात दिसत होत्या. दृश्य मात्र लाजवाब परंतु भयानक रूपात. क्षणात स्वर्गात मी अवतरल्याचा भास मला झाला. येथुन परतायचे नाही हाच मी निर्णय घेतला. घोड्याच्या पाठीवर दोन बाजुला पाय सोडून बसावे तसा मी त्या दोन्ही बाजुला पाय खाली सोडत तीन हजार फुट खोल दरी असलेल्या कातळ भिंतीवर बसलो. हळु हळु पुढे सरकू लागलो. पुढे दहा फुट खोल कातळाच्या नैसर्गिक खाचेत उतरायचे होते. तेथपर्यंत अगदी धाडसाने उतरलो. या ठिकाणी तर जागा फक्त अर्धाफुट पेक्षाही कमी होती, परंतु भिती न बाळगण्याचे कारण म्हणजे येथील असलेला पक्का व भरोसेमंद खडक होता. येथुन पण मला ज्या ठिकाणाची उत्सुकता होती ते ठिकाण दिसत नव्हते. पुन्हा मनाचे खच्चीकरण झाले. आता खिरेश्वर बाजुने जवळपास पंचवीस फुट खोल उतरायचे होते. मार्ग अवघड होताच. फसलोच तर हेलिकॉप्टर शिवाय सुटका होणे नाही हे मात्र नक्की लक्षात येत होते. आणि सटकलोच तर खिरेश्वर गावात समाधी बनणार हे ही तीतकेच खरे होते.
आता आर या पार हाच पर्याय होता. धाडस करत मी खाली पंचवीस फुट उतरलो. व त्या कातळ कड्याचा आधार घेत समोरचे दृश्य पाहून नाचू लागलो. समोरच्या दृश्याचे वर्णन कोणत्या शब्दात करावे असे शब्दच सुचेनासे झाले. माझे ध्येय माझ्या समोर होते. परतीच्या मार्गाला काय वाढून ठेवलंय सर्व काही विसरून गेलो होतो. वाचताना वाचक निश्चितच माझी तुलना वेडा, सटकू किंवा अन्य काही करतील यात शंकाच नाही. परंतु मी जे काही पहात होतो अनुभवत होतो ते मात्र माझ्या जीवनात काही वेगळच होत. माझ्या समोर एक निसर्ग निर्मित जवळपास 35 ते चाळीस फुट लांबीचा पिस्तुल पुल होता. तो 2200 वर्षापासुन येथे असावा कारण येथील दृश्य पाहण्यासाठी कातळात कोरलेला मार्ग आजही दिसून येत आहे. कदाचित तो मार्ग आज चांगल्या स्थितीत असता तर जगातील लाखो पर्यटक येथील दृश्य पहायला निश्चितच आकृष्ट झाले असते. व जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर गावचा इतिहास काही वेगळाच असता. मित्रांनो हे क्षण व हे निसर्ग वैभव मनाच्या कोपऱ्यात व सोबत असलेल्या कॅमेरात टिपायचे थोडेच विसरेल बर. हे तुमच्या पर्यंत पोचायलाच पाहिजे हा माझा नेहमीचा निर्धार असतो. मला माहित नव्हते कि मी माघारी पोहचेल की नाही परंतु ते कॅमेरात टिपण्याचा प्रयत्न करने गरजेचे होते. (हा थ्रिल प्रसंग आपण माझ्या “निसर्ग रम्य जुन्नर तालुका” या यूट्युब चायनलवर पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून सब्स्क्राईब करायला विसरू नका व इतर आपल्या मित्रमंडळीना पाहण्यासाठी शेर करायला विसरू नका.
https://www.youtube.com/c/NisargramyaJunnarTaluka… )
माझी एकाग्रता व एकनिष्ठता माझ्या कामी आली व आपले सर्वांचे “निसर्ग रम्य जुन्नर तालुका” पेजला असलेल्या अशिर्वादाने मी अतिशय जीवघेण्या प्रसंगातून मित्रांपाशी घळीत सुखरूप 2:00 वाजता पोहचलो. (आपणास विनंती असेल की आपण या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू नये) पुन्हा जुन्नर दरवाजाने चढण्यास सुरूवात केली. या जुन्नर दरवाजा मध्ये कोरलेल्या पायर्‍या काळाच्या ओघात व अतिवृष्टीच्या वेगाने वाहणाऱ्या पाण्याने लुप्त होत गेल्याने त्यांचे अवशेष मात्र पहावयास मिळतात. तसे जुन्नर दरवाजाने चढणे अवघड नाही. वर चढून गेल्यावर बालेकिल्ल्याचे रमणीय दृश्य दिसते. बालेकिल्ल्यावर दगडी तटबंदी पाण्याच्या टाक्या पाहता येथे 25 ते 30 जण येथे राहत असावेत असे येथील राहण्यासाठीचे बांधकाम अवशेषांवरून समजते.
बालेकिल्ल्यावर सध्या नवतरूणांनी श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थापण्य केलेली प्रतिमा फारच सुरेख दिसत होती परंतु त्यावर छत असणे गरजेचे वाटले. यानंतर तारामती शिखर, गणेश लेणी व मंदिर परीसर भ्रमंती करत व दर्शन घेत कोकणकड्याचे अलौकिकतेचे डोळेभरून सौंदर्य पाहत परतीला लागलो.
एकदिवसीय हा प्रवास अगदीच दमछाक करतो परंतु निसर्ग सौंदर्य मात्र ही दमछाक क्षणात विसरण्यास भाग पाडते. पुन्हा जुन्नर दरवाजातून उतरताना सुर्यास्ताचे मावळतीचे विलोभनीय दृश्य “महाबळेश्वर “च्या सुर्यास्ताच्या ठिकाणाची आठवण करून देते. अगदी हुबेहुब सुर्य या ठिकाणाहून नभात लुप्त होताना दिसतो हे मात्र पाहण्यासारखे आहे. पुन्हा उतरणीला लागलो व त्या अंधुक प्रकाशात उतरणीच्या वाटेवर सरकत सरकत डोंगर पायथ्याशी पोहचलो. खिरेश्वर गावातील विजेचे दिवे जवळ जवळ येऊ लागले होते. त्या माळराणावरच्या कुसळीगवतावर पडणार्‍या पावलांचा आवाज घेत घेत चारचाकी पार्क केली तेथे पोहोचलो. चिंतामणीने पुन्हा ब्लॅक टी चा आग्रह केला. त्याला नाराज न करता चहाची चुस्की घेतली. घराच्या वाटेकडे लक्ष लागले होते. दत्ताचे आभार मानत पिंपळगाव धरणाच्या भिंतीवरील वरखाली असलेल्या रस्त्याने हळु हळु जुन्नरच्या दिशेने वाटचाल केली. ती विसावा घेण्यासाठी.

खिरेश्वरच्या नेढ्याचा चित्तथरारक अनुभव | A breathtaking experience of Khireshwar Loop | Khireshwar

खिरेश्वरच्या नेढ्याचा चित्तथरारक अनुभव.

      जुन्नरहुन आज लवकरच निघालो होतो. त्यामुळे सकाळचे सुर्योदयाचे विहंगम दृश्य पिंपळगाव जोग धरणाच्या पाण्यात सुंदर असे प्रतिबिंब रुपातही पाहायला मिळत होते. अंगाला जाणवणारी सकाळची बोचरी थंडी, जलाशय परिसरात थव्याने विहार करणारे पक्षी, धरणाच्या पाण्याच्या लाटांचा होणारा मंजुळ आवाज व पक्षांच्या गाण्यांचे कानावर ऐकु येणारे मधुर स्वर सर्व काही आनंद देणारे होते.
   मी, अक्षय व ओंकार हे दृश्य डोळ्यांमधे साठवत खिरेश्वराकडे चारचाकिमधुन चाललो होतो. हरिश्चंद्र गड रांगेचे चारचाकीच्या समोरच्या काचेतून दिसणारे दृश्य पाहून असे वाटत होते की जणू  ती सिनेरीच काचेवर लावली आहे की काय? खिरेश्वर मध्ये दत्ता बहुर्ले व त्याचा मित्र चिंतामण गाईड म्हणून येणार होते. कारण आजपर्यंत कधीही कुणीही न गेलेल्या अवघड व चित्तथरारक ठिकाणी अनुभव घ्यायला जायचे होते. समोरच चिंतामण चे ऐश्वर्या हाॅटेल होत. हाॅटेल छोटसच परंतू कुटुंबाची उपजिविका यावरच त्याची चालते. माणुसकीला जपणारा चिंतामण चारचाकी पाहताच पळत आला. कारण दत्ताने त्यास सांगितले होते कि आज सरांबरोबर आपणास भ्रमंतीला जायचय. चारचाकी पार्क केली व आम्ही खाली उतरलो. दत्ता पोहचला नव्हता. तोपर्यंत चिंतामणने नाष्ट्याला गरमागरम पोहे केले. दत्ता पण पोहचला. चहा नाश्ता करत आमचे जुन्नर दरवाजाने जाण्याची तयारी झाली परंतु त्या रस्त्याने जायचे हे फक्त चिंतामणलाच माहीत. दत्ता पण या रस्त्याने एकदाच गेलेला. चिंतामणला हाॅटेलची ऑर्डर असल्याने येणे शक्य नव्हते. त्यामुळे दत्ता व आम्ही निघालो. एक जिवघेण्या मार्गाकडे. जायचे कसे माहित नव्हते परंतु निघालो मात्र नक्की.
         खुप मोठी रिस्क आज मी घेणार होतो. पुर्वजांनी अशा मोठ्या रिस्क घेतल्याने आपणास आज खुप काही शिकायला मिळते. म्हणूनच एक चान्स घ्यायचाच व तेथील ऐतिहासिक व नैसर्गिक खुणा पहायच्याच व ते पण फक्त आणि फक्त एकट्यानेच हा निर्धार मनात होता. आज पर्यंत खिरेश्वर गावातील एकाही व्यक्तीने येथे जाण्याचे धाडस केले नव्हते. जुन्नर तालुक्यातुन येथे कुणी कधी गेल्याचे ऐकण्यात नाही व यावर कुणी काही लिहिले हे पण वाचनात नाही असे खिरेश्वर ग्रामस्थ सांगतात. ते म्हणतात फक्त तेथे जायचे म्हटले तरी अंगावर काटा येतो. अशा ठिकाणी मला जायचे होते.
     आमचा प्रवास जंगलवाटा तुडवत सुरू झाला तो हरिश्चंद्रगडावर जाणाऱ्या जुन्नर दरवाज्याने. माझ्या निरीक्षणातुन एक गोष्ट लक्षात आली की हरिश्चंद्र गडावर पुर्वी जाण्याची मुख्य वाट म्हणजे हाच जुन्नर दरवाजा असावा. कारण या वाटेवर कोरलेले पायरीमार्ग,हाताच्या बोटांच्या सपोर्ट साठी कातळात कोरलेल्या खोबण्या, घळीतील पाण्याचे टाके, विशिष्ट पद्धतीने खडकात कोरलेल्या पायर्‍या व घळीतील पायरीमार्गावर असलेल्या खिरेश्वर येथील नागेश्वर मंदिराचे दगडी शिल्प खुप काही सांगुन गेले. ही घळ जेथे संपते ते ठिकाण म्हणजेच हरिश्चंद्रगडाच्या बालेकिल्ल्याचा पायथा होय, म्हणुन या मार्गाला खुप महत्व. दुसरा संदर्भ म्हणजे जुन्नर तालुक्यातील असलेले सात किल्ले याच मार्गाने जवळचे. लवकरात लवकर व कुणाच्या निदर्शनास न येता छुप्यामार्गाने येथे पोहचण्याची ही वाट असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. असो
     पाऊल वाटा झपझप तुडवत व मार्ग काढत आम्ही आता तीन चढाईचे टप्पे चढून वर आलो होतो. घड्याळात 10 वाजले होते. उजव्या हाताला ज्या ठिकाणी जायचे होते तो भाग दिसत होता. परंतु राॅकपॅच अवघड वाटत होता. आमच्या कडे कोणतेही चढाईचे साधन नव्हते. सोबत पाण्याच्या बाटल्या व न्याहरीची शिदोरी होती. कॅमेरा व ट्रायपाॅड बगलेत अडकवलेले होते. एक राॅकपॅच दत्ताने बोट करून दाखवत बोलला येथुन आपण चढूया. मी हो म्हटले व चढण्यास प्रारंभ केला. मध्यभागापर्यंत काहीच वाटले नाही परंतु तेथुन पुढे प्रसंग खुपच अवघड होता. दत्ताला सांगत होतो तुम्ही चढू नका. परंतु त्यांनी ऐकले नाही व तेथेच थरथर कापु लागले. त्यांना धिर देत देत सपोर्ट करत कसेबसे थोड्या सपाटीवर पोहचलो. जवळपास एकतास आमचा येथे खर्च झाला. त्या डोंगरावर चढण्यासाठी कुठून जागा मिळते का?  ते मी त्यांना तेथेच थांबवत शोधू लागलो. डोंगराचा पुर्व, दक्षिण व पश्चिम भाग संपूर्ण पायाखाली घालत. चढाई मार्ग शोधु लागलो परंतु यश काही प्राप्त झाले नाही. खुप खिन्न व निराश झालो. कडेकपारीने जुन्नर दरवाजाकडे मित्रांना पुढे या आवाज देत चालू लागलो.
      ते तिघे वाळलेल्या कारव्यांमधून मार्ग काढत घळीच्या वाटेकडे येत होते. मला आता जंगली जनावरांचा मार्ग मिळाला होता. मी पटपट चालू लागलो. घळीतील अर्धी वाट चढून मित्रांची वाट पाहू लागलो. बसल्या बसल्या मला पुरातन कोरीव खुणा उजव्या हाताला दिसुन आल्या. त्यांचा मागोवा घेत घेत मी पुन्हा अवघड कड्याकडे चालु लागलो. अतिशय निसरडी वाट व जवळपास 300 फुट शेजारी खोल दरी. परंतु प्रयत्न सोडायचे नाही हाच निश्चय मनी. आता एका अवघड राॅकपॅच जवळ आलो होतो. तेथुन वर जवळपास पन्नास फुट वर चढायचे होते. चढता येईल का हा विचार करत असताना खाली दरीत उतरण्याचा एक पायरीमार्ग दिसु लागला. काळाच्या ओघात तो पुसला गेला होता. खडकात कोरलेल्या पायर्‍या होत्या. हाताच्या बोटांच्या सपोर्ट खोबण्या मात्र चांगल्या स्थितीत होत्या. वर वळुन पाहीले तर दहा बारा खोबण्या निदर्शनास आल्या. थोडा धीर आला. त्या खोबण्यांच्या मदतीने वर चढायला सुरुवात केली. चढणे अवघड होते परंतु भक्कम व विश्वासु सपोर्ट त्या खोबण्यांचा होता. मित्रांचा आवाज कानी येत होता सर तुम्ही कोठे आहेत. मी आवाज दिला तेथेच घळीत बसून रहा. मला तुमच्या पर्यंत यायला कमीत कमी दिड, दोन तास लागतील. मी कोठे आहे हे त्यांना समजने शक्य नव्हते. परंतु त्या घळीत त्यांना आवाज मात्र पोहचला होता. मी त्यांना पुन्हा ओरडुन सांगत होतो की मी जर दोन तासांनी परत आलो नाही तर तुम्ही कुणीही या मार्गाने वर येऊ नका.मला शोधन्यासाठी पुन्हा माघारी फिरुन खाली खिरेश्वराच्या जंगलात पडलेलो असेल तेथेच शोधा. निरोप देऊन मी ५० फूट कडा चढून एका सपाट भागावर आलो होतो.समोरचे दृश्य खुपच मनमोहक होते. माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मी दक्षिणेकडे चालू लागलो व पुढे पन्नास फुटावर जावून अचानकपणे थांबलो. समोरचे दृष्य पाहून माझा आनंद क्षणात नाहीसा झाला. समोरचे दृश्य खुपचं भयानक होत. जवळपास १५ फुट लांब व एक फुट रूंद एवढी जागा होती की जी मला पार करायची होती.मला ज्या ठिकाणी जायची उत्सुकता होती त्या ठिकाणी पोहचता येईल का? हा मोठा प्रश्न डोळ्यासमोर उभा होता. मी एकटाच होतो. माझा निर्णय मलाच घ्यायचा होता. जर मी सटकलोच तर त्या कड्याला माझे नाव दिले जाईल हे मात्र नक्कीच होत. काय करावे सुचेना. पुर्वेकडे खिरेश्वर दृश्य, दक्षिणेकडे माळशेजघाट दृश्य तर पश्चिमेला तारामती शिखर दृश्य फक्त मान 180 डिग्री फिरवली की दिसत होते.दोन, तीन  हजारहून जास्त खोल दर्या दोन्ही बाजूला राक्षसी  रूपात दिसत होत्या. दृश्य मात्र लाजवाब परंतु भयानक रूपात. क्षणात मी स्वर्गात असल्याचा भास मला झाला. येथुन पुन्हा माघारी परतायचे नाही हाच मी निर्णय घेतला. घोड्याच्या पाठीवर दोन बाजुला पाय सोडून बसावे तसा मी त्या कातळभिंतीवर दोन्ही बाजुला पाय खाली सोडत बसलो. खाली पाय सोडलेल्या दोन्ही बाजूंनी तीन हजार फुट खोल द-या होत्या. हळु हळु मी त्या भिंतीवर पुढे सरकू लागलो. हे दृश्य प्रत्यक्ष कुणी पाहणारा असता तर नक्कीच बेशुद्ध पडला असता. आता १५ फुट अंतर पार झाले होते.येथुन खाली दहाफुट खोल खोबणीत उतरायचे होते. आयुष्यात प्रथमतःच एवढं जीवघेण धाडस मी केले होते. सर्व देवी देवतांची मला आज आठवण होत होती. प्रसंगाला कुणी ही देवता धावून येणे शक्य नव्हते. कारण हा मी केलेला सरळ सरळ मुर्खपणा होता. माझी छोट्यात छोटी चूक मला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावणार होती.  पुढे दहा फुट खोल कातळाच्या नैसर्गिक खाचेत उतरायचे होते. आता माघार नाही हा माझा निर्णय पक्का होता. एकतर मी माझे ध्येय तरी गाठणार नाही तर मृत्यूच्या खाईत तरी फेकलो जाणार हे निश्चित होते. अतिशय सावधपणे मी त्या खोबनित उतरलो. येथे खोबनित तर फक्त अर्धाफुट पेक्षाही कमी जागा उभी राहण्यासाठी होती, परंतु भिती न बाळगण्याचे कारण म्हणजे येथील असलेला पक्का व भरोसेमंद खडक होता. येथुन पण मला ज्या ठिकाणाची जाण्याची उत्सुकता होती ते ठिकाण दिसत नव्हते. पुन्हा मनाचे खच्चीकरण झाले. खुपच नर्वस झालो. खोबनितुन खिरेश्वराच्या दिशेने वाकून पाहिले तर डोळेच फाटले. कारण आता खिरेश्वर बाजुने जवळपास पंचवीस फुट खोल उतरायचे होते. मार्ग अतिशय अवघड होताच. जर येथे फसलोच तर हेलिकॉप्टर शिवाय माझी सुटका होणे नाही हे मात्र नक्की लक्षात येत होते. आणि सटकलोच तर खिरेश्वर गावात समाधी बनणार हे ही तीतकेच खरे होते.
      आता आर या पार हाच पर्याय उरला होता. धाडस करत व मनाची एकाग्रता करत मी खाली पंचवीस फुट उतरलो. उतरताच माझी नजर दक्षिणेला असलेल्या ठिकाणास पाहून नाचू लागली. मी त्या कातळ कड्याचा आधार घेत समोरचे दृश्य पाहून नाचू लागलो. समोरच्या दृश्याचे वर्णन कोणत्या शब्दात करावे असे शब्दच सुचेनासे झाले होते. माझे ध्येय माझ्या समोर मला अलिंगण देण्यासाठी उभे होते.मी परतीच्या मार्गाला काय वाढून ठेवलंय सर्व काही विसरून गेलो होतो. वाचताना वाचक निश्चितच माझी तुलना वेडा, सटकू किंवा अन्य काही करतील यात शंकाच नाही. परंतु मी जे काही पहात होतो अनुभवत होतो ते मात्र माझ्या जीवनात काही वेगळच होत. माझ्या समोर एक निसर्ग निर्मित जवळपास 35 ते चाळीस फुट लांबीचा पिस्तुल आकाराचे नेढ होत. हे कदाचित 2200 वर्षापासुन येथे असावे अशी शंका येऊन गेली. येथील दृश्य पाहण्यासाठी कातळात कोरलेला मार्ग आजही जिर्ण झाले दिसून येत होता. कदाचित तो मार्ग आज चांगल्या स्थितीत असता तर जगातील लाखो पर्यटक येथील दृश्य पहायला निश्चितच आकृष्ट झाले असते. व जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर गावचा इतिहास काही वेगळाच असता. मित्रांनो हे क्षण व हे निसर्ग वैभव मनाच्या कोपऱ्यात व सोबत असलेल्या कॅमेरात टिपायचे थोडेच विसरेल बर. हे तुमच्या पर्यंत पोचायलाच पाहिजे हा माझा नेहमीचा निर्धार असतो. मला माहित नव्हते कि मी माघारी पोहचेल की नाही परंतु ते कॅमेरात टिपण्याचा प्रयत्न करने गरजेचे होते.
     माझी एकाग्रता व एकनिष्ठता माझ्या कामी आली व आपले सर्वांचे "सह्याद्रीचे सौंदर्य या ग्रुपला" असलेल्या अशिर्वादाने मी अतिशय जीवघेण्या प्रसंगातून मित्रांपाशी घळीत सुखरूप पुनर्जन्म रुपात मी 2:00 वाजता पोहचलो. (आपणास विनंती असेल की आपण या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू नये) पुन्हा जुन्नर दरवाजाने चढण्यास सुरूवात केली. या जुन्नर दरवाजा मध्ये कोरलेल्या पायर्‍या काळाच्या ओघात व अतिवृष्टीच्या वेगाने वाहणाऱ्या पाण्याने लुप्त होत गेलेल्या दिसून येत होत्या. मी एक एक पावलागणिक केलेल्या मुर्खपणाच्या धाडसाचा पुन्हा डोळ्यासमोर चित्रपट पाहु लागलो होतो....... ते धाडस आपणास पहायचं असेल तर नक्कीच पुढील लिंकवर क्लिक करा पण एक लक्षात ठेवा एक हाथ ह्रदयावर नक्कीच ठेवा लिंक.    https://youtu.be/IEOS2d5T_CE
लेख / छायाचित्र -
श्री.खरमाळे रमेश
 वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद)
मो.नं. 8390008370
"शिवाजी ट्रेल"
 फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .
  विकसित अंड्राॅईड अॅप- निसर्ग रम्य जुन्नर तालुका अँड्रॉइड अँप डाऊनलोड करीता  लिंक खालील प्रमाणे देत आहोत. त्यावर क्लिक करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.njunnartaluka



 











Dawn hit just as we started climbing up towards Malshej Ghat. The ride there on was a dream come true – great road surface, meandering roads through stunning mountains, cool fresh air and a sturdy bike – what more can one ask for!

 Bikes in the mountains

 Bikes halt near Malshej

 Flamingo Resort MTDC at Malshej

 


कोकणकड्याचा आकाशकंदिल


 


हा आकाशकंदिल कोकणकड्याच्या अंधारात उठून दिसत होता. उद्देश होता गडावर दुर्ग दिवाळी साजरी करण्याचा, तिथे पडलेल्या विरांना श्रद्धांजली वाहण्याचा. कोकणकड्याने आजवर अमाप समाधानाचे क्षण दिलेत. आपल्याकडून त्याच्यासाठी ही छोटीशी पुजा! तो ती स्विकारेल? 

तो नजरेत तो मावत नाही। छायाचित्रात समावत नाही। एक मैलाचा अर्धवर्तुळ। जमिनीपासून ३००० फुट।
हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा। कितीही पहा मन भरत नाही। महाराष्ट्राला पडलेलं हे राकट कणखर स्वप्नच! त्याच्या सानिध्यात अनेक उन्हाळे पावसाळे व्यतित केलेत. 'एखादी दिवाळी तिथे साजरी करावी, कोकणकड्याच्या भव्यतेला साजेसा एखादा मोठा पारंपारिक आकाशकंदिल तिथे लावावा', हे स्वप्न अनेक वर्षांपासून मनामध्ये रुंजी घालत होते. यंदा तो योग आला. तसं कोणतंही पूर्व नियोजन नव्हतं. आमचा व्यवसाय हा दिवाळीशी निगडीत असल्याने घरून सुट्टी मिळण्याचा प्रश्नच नव्हता. लक्ष्मी पूजनच्या दिवशी `घरात एक मोठा लक्ष्मीबॉम्ब फुटला', अशा प्रसंगी सर्वात मोठा आधार असतो तो मित्रांचा. सह्याद्रीतर मित्रांचा मित्र, ठरवलं त्याच्या कुशीत जाऊन दिवाळी साजरी करायची. 'कोकणकड्यावर जाऊन धडक मारायची. तिथे एक भव्य आकाराचा कंदिल बसवायचा'. सणावाराला कोणी सोबत येण्याची शक्यता नव्हती, तेव्हा एकट्यानेच जाण्याचा निर्णय घेतला. सहज म्हणून सन्मित्र दीपक पवारला साद घातली तर तो तयार झाला. जोडीला संतोष उगले तयार झाले. एक बारा पंधरा फुटाचा कंदिल बनविण्याचा बेत पक्का झाला. 

इतकामोठा कंदिल हरिश्चंद्रगडावर नेणे अशक्य; तेव्हा तो तिथे जाऊन बनविण्याचे ठरवले. त्यासाठी भरपूर तयारी करावी लागणार होती. लक्ष्मीपूजनचा संपुर्ण दिवस त्यासाठी हातात होता. आपला पारंपारिक पद्धतीचा भारतीय आकाशकंदिल म्हणजे भूमितीची एक आकृती. ती  त्रेरिकोणात काही रेषा जोडून तयार होते. त्रिमितीय पद्धतीने बनवायचा तर बांबूच्या किंवा लाकडाच्या बारीक काड्या योग्य मापात तयार कराव्या लागतात. त्यांची जोडणी करण्यासाठी त्यांची टोकं योग्य कोनात छाटावी लागतात. ही सगळी तयारी सुरू केली. आमच्या कार्यशाळेतून देवदार लाकडाच्या एकसमान अडीच फुटाच्या काड्या गोळा केला. एकसमान नव्हत्या. पण काम भागणार होते. योगायोग म्हणजे अगदी मोजक्या काड्या मिळाल्या. एकही जास्तीची नाही मिळाली. 

या कंदिलाच्या आकृतीत ८ त्रिकोण, ८ आयात, ८ चौकोन तयार करावे लागतात. ४८ काड्यांचा संच तयार झाला. कोकणकड्यावर जोरदार वारे वाहत असतात त्यामुळे कागदा ऐवजी कॉटनचे रंगीबिरंगी कपडे लावण्याचे ठरवले. रंगसंगती ठरवून ते आकारात कापून घेतले. साचा तयार करण्यासाठी तारचुका, हाथोडी, पक्डक, दोरी इत्यादी साहित्य जमा केले. इतका मोठा कंदिल लावायचा तर त्यावर गडाच्या नावाचे सुलेखन करणे आवश्यक होते. त्यासाठी प्रसिद्द चित्रकार सूदर्शन तळेकर आणि मुर्तिकार मानसिंग ढोमसे यांची मदत घेतली. सामानाची तजवीज करताना रात्रीचे १०-०० वाजून गेले. घरात लक्ष्मीपूजनाचा सण असूनही दोघांनीही त्यासाठी वेळ दिली. ढोमसे यांच्या कार्यशाळेत जाऊन कंदिलाच्या चार बाजूंकरिता हरिश्चंद्रगड ही अक्षरे पिवळ्या कपड्यावर रेखाटून घेतली. आता रात्रीचे ११-३० वाजलेले. तोच लक्षात आले की, कंदिलासाठी लागणार्‍या झिरमिळ्या तयार करायच्या राहून गेल्या. मग परत माझ्या कार्यशाळेत जाऊन ७ फुटाच्या झिरमिळ्या कापून घेतले.

पुनर्वापर केलेल्या देवदार लाकडाच्या काड्या

दिडएक महिन्यापासून सह्याद्रीत कोणतीही मोठी भटकंती झालेली नव्हती, त्यामुळे ट्रेकचे सामान इस्तत: पसरले होते. ते गोळा करून घरी आकाशकंदिलाचे सामान एकदचे गोळा झाले. ६० लिटरची पाठपिशवी भरून तयार झाली. तोवर १-३० वाजून गेला. 

दीपकची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पहाटे ४-४० वाजता त्याचा फोन घणघणला. प्रेमभराने त्याने, 'उठ', म्हणून साद घातली. कालचा दिवस दगदगीचा होता. त्याअगोदरचा महिना दिड महिन्या काळ कामाच्या धामधूमीचा होता. रोज रात्री एक दिड वाजता काम आटोपायचे. दिवसभर सतत कामच काम सुरू असायचे, त्याचाही शीणवटा होता, अन्यथा रात्रीच पाचनईत धडक मारून अंधारात चढाईचा बेत होता. मरगळ झटकून तयार झालो. पावणे सहा वाजता गंगापूर पाईपलाईन रस्त्यावर दीपकचे घर गाठले. दोघे असतो तर मोटरसायकलने रवाना झालो असतो. आता तिघे असल्याने दीपकने त्याची चारचाकी काढली. 

नासिक ते पाचनई हे अंतर एका बाजूने सव्वाशे किलो मिटरचे. पाचनईतून हरिश्चंदगडावर चढाईचा सर्वात सोपा मार्ग. घोटी पर्यंतचे ४८ किलो मिटरचे अंतर चहाचा थांबा धरून ४० मिनीटात पार झाले. तिथून पुढचा टप्पा म्हणजे राजूर. नगर जिल्हयाती अकोले तालुक्यातले हे ठिकाण म्हणजे तमाम भटक्यांचा महत्वपूर्ण थांबा. घोटीवरून ३२ किलो मिटरचा हा टप्पा म्हणजे एक मोठे आव्हानच. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि वनविभाग यांनी घोटी ते राजूर परिसरात दहा वीस पर्यटन स्थळे तरी विकसीत केली आहेत. त्यावर कोट्यावधी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. या मार्गावर बारा महिने आठोकाळ पर्यटकांचा राबता असतो. गेल्या काही दिवसांपासून मुंबई परिसरातून शिर्डीला जाणारे भाविक नासिकला न जाता घोटी वळण मार्गाने शिर्डीला जाणे पसंत करतात. त्याने त्यांचे सुमारे पन्नास किलो मिटर अंतर वाचते. असे असूनही घोटी - सिन्नर रस्ता हा चंद्राच्या पुष्ठभागाशी स्पर्धा करणारा, म्हणजे चंद्रावर जास्त खड्डे की या मार्गावर. पर्याटन विकास करताना अगोदर तिथे जाणारा रस्ता उत्तम करण्याची गरज आहे. आजमितीला महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी हेच चित्र थोड्या फार फरकाने बघायला मिळते. त्या उलट शेजारील गुजरात, गोवा, कर्नाटक, आंध्र यांनी आपल्या रस्त्यांचा दर्जा सर्वोत्तम राखला आहे. महाराष्ट्राला तो राखण्यात कोणती अडचण आहे? झालं आम्हाला या ३२ किलो मिटर अंतरासाठी एक तास लागला. सुदैव म्हणजे पूर्वीपेक्षा रस्त्याचे काही टप्पे दुरूस्त करण्यात आलेत. घोटीपासून संपूर्ण रस्ता हा डोंगर भागातून जाणारा, जास्त पावसाच्या प्रदेशातला. त्याला साजेशे रस्ते बनविणे  आजवर कोणत्याही राजवटीत शक्य झाले नाही. रस्ते दुरूस्तीचा हा अनूशेष भरून काढल्याशिवाय पर्यटन विकासाला गती येणार नाही. तेव्हा ठरवून या ठिकाणी जागतिक दर्जाचा मार्ग तयार करण्याची आवश्यकता आहे. 

राजूर ते पाचनई हा मार्ग अधिक डोंगराळ व दोन लहान घाटरस्त्यांचा. इथे प्रवासाची खरी परिक्षा. बघूया २७ किलो मिटरसाठी किती वेळ लागतो ते. 

हा संपूर्ण परिसर वनविभागाने वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटन विकासासाठी संरक्षित केला आहे. अलीकडे त्यात काजवा महोत्सवाची भर टाकली आहे. त्यावर अनन्यसाधारण असा खर्च केला आहे. दर दोन पाच वर्षांनी पर्यटन स्थळावर बांधलेले निवारा स्थळे (पॅगोडे), लोखंडी नळकांड्यांचे संरक्षक कठडे, शिड्या इत्यादीवर कोट्यावधी रूपये खर्च केला जातो. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सोबत घेऊन जर एकत्रितपणे पर्यटनाचा विकास केला तर या नितांत सुंदर निसर्गस्थळी उत्तम दर्जाचे रस्त्यांचे जाळे तयार करता येऊ शकते. जास्त पावसात टिकणारे रस्ते तसेच सरपटणार्‍या प्राण्यांच्या व पावसाच्या पाण्यासाठी ठिकठिकाणी निष्काषन मार्ग असलेले रस्ते ही काळाची गरज आहे. 

आम्ही पाचनईला अडीच तासात पोहोचलो. मध्ये कुठलाही थांबा घेतला नाही. म्हणजे ५ किलो मिटर अंतरासाठी सरासरी अर्धा तास लागला. आता आमची स्पर्धा वेळे सोबत सुरू होणार होती. इतका मोठा आकाशकंदिल बनविण्यासाठी पाच तास लागणार होते. जास्त वेळ लागला असता तर अंधारात कोकणकड्यावर आकाशकंदिल बसविणे दुरापास्त ठरले असते. बरेच दिवस डोंगरावर चालण्याचा सराव नव्हता हे जाणवत होते. पाठीवर गच्च भरलेली ६० लिटरची पाठपिशवी. त्यात मागच्या महिन्यात शरीरात बी१२ व्हिटॅमिनची घटलेली मात्रा आणि दिवाळीत जाणवलेला सर्दीपडशाचा त्रास, याचा परिपाक चालण्याच्या वेगावर झाला नसता तर नवल. एरवी दिडतास हरिश्चंद्रगड चढून होतो, आज दोन तास लागणार अशी चिन्ह दिसू लागली. दीपक हा नियमीतपणे गडकिल्ले फिरणारा असल्याने तो सूसाट निघाला. वर जाऊन कंदिल लावण्या सोबतच आम्हाला हरिश्चंद्रगड परिक्रमेचे नियोजन करायचे होतो. हा महाराष्ट्रातला आकारमानाने सर्वात मोठा किल्ला याच्या वीसहून अधिक वाटा. त्यासाठी आम्ही बेलपाड्याचा कमा आणि कमळू पोकळा यांच्याशी संपर्क केला. मागे भास्कर बादडशी या विषयी बोलणे झाले होते. आज भास्करचा संपर्क होऊ शकला नाही. तेव्हा कमाला नळीच्या वाटेने गडावर येण्यास सांगितले. तो म्हणाला तुम्ही पोहोचा, मी दोन तासात वर येईन. 

गड चढत असताना कमाचा फोन आला, ''वातावरण ढगाळ झाले असून भात झोडून तो कणग्यात सुरक्षित करणे महत्वाचे आहे आज येऊ शकणार नाही.'' ढगाळ वातावरणामुळे हवेत दमटपणा वाढला होता. चालताना त्याचाही त्रास जाणवत होता. 

गणपती धारेला खेटून असलेल्या विशाल कड्याची आडवी वाट गाठायलाच ५१ मिनीटे लागली. इथुन पुढे पाण्याच्या वाटेपासून मंदिराच्या दिशेने न जाता कोकण दरवाजाच्या वाटेला लागून असलेल्या आडवाटेने कोकणकडा गाठायचा प्रस्ताव मांडला. ही वाट आजवर न केल्याने ती शोधण्याचे आव्हान होते. सुदैवाने पाचनईचा सुदाम बादड त्याच्या झोपडीसाठी लागणारे सामान घेऊन जात होता, वाटेत त्याची भेट घडली. स्थानिक मंडळी त्याच मध्यम मार्गाने जाते. तो म्हणाला यंदा ही वाट मळलेली नाही, पण या वाटेने गेलो तर लवकर पोहोचू. 

पर्यटक, ट्रेकर मंडळी सहसा या वाटेचा वापर करत नसल्याने वाटेचे निर्जन रूप टिकून आहे. मंगळगंगेचा प्रवाह ओलांडल्यानंतर मात्र काहीसा अंगावर येणारा घसारा लागतो. इथे आमच्या तंदूरूस्तीचा कस लागला. कोकणकडा गाठायला २ तास १५ मिनीटे लागली. पाठीवरचे ओझे, सरावाचा अभाव आणि इतर कारणांमुळे पंचवीस एक मिनीटे जास्तीची लागली. सव्वा वाजेच्या सुमारास आम्ही कोकोकणकड्यावर स्थितीत सुदाम बादडच्या झोपडीत बस्तान मांडले. तो त्याच्या कारवीच्या झोपडीला बाहेरच्या बाजूने शेतात वापरली जाणारी हिरवी नायलॉन जाळी चहूबाजूंनी लावणार होता. झोपडी पाना गवताने शाकारलेली होती तर पाण्याची गळती थांबविण्यासाठी प्लास्टिकचा वापर करण्यात आला होता. आज तो जमिन धोपटून सारवून घेणार होता. 

कंदिल बनविण्यासाठी पाच तास मिळणार होते. आजवर डोंगरावर जाऊन कधीही कंदिल बनवला नव्हता. तिथे कोणकोणत्या अडचणी येणार काहीच कळत नव्हते. सुदामने छान कोरा चहा टाकला. तो रिचवून कंदिलासाठी लागणार्‍या लाकडाच्या चौकटी बनवायला घेतल्या. मातीवर पट्ट्या उभ्या करून खिळा बसत नव्हता. मग आम्ही बाहेर खडकावर जाऊन चौकटी ठोकू लागलो. खडक सपाट नसल्याने काही वेळा खिळे बाहेर निघत होते तर काही खिळे बरोबर बसत होते. ही सर्व कसरत सूरू असताना पावसाचे टपोरे थेंब सुरू झाले. 

कंदिलासाठी लागणार्‍या लाकडाच्या ४८ काड्या मोजून आणल्या होत्या. त्यातील काहींना योग्य त्या कोनात छाटून घेतले होते. एकपण जास्तीची काडी नव्हती. हाथोडीची घाव जपून मारणे क्रमप्राप्त होते. एका काडीला गाठ असल्याचे लक्षात आले. नेमकं त्या काडीला खिळा नीट बसला नाही आणि झालं, काडी गेली मोडून!

काडी मोडल्यावर ऐनवेळी जोडण्यासाठी काही बारीक पट्ट्या आणल्या होत्या. चौकटीची एक काडी कमी भरली. 'घरून निघताना एक काडी कशी काय कमी पडली. की ती सामान भरताना राहून गेली'. आता मोठी पंचाईत झाली. सुदामला विचारलं की एखादी बारीक पट्टी मिळेल का? तो म्हणाला कारवीची चालेल का? एक मोडलेली आणि एक कमी! आजवर कारवीला कधीही खिळा मारण्याचा प्रसंग आला नव्हता. तिची टोकं ४५ अंशात छाटावी लागणार होती. त्यासाठी वर कोणाकडे करवत नव्हती. मग संतोष अण्णांनी कोयत्याने ती छाटून दिली. कारवीच्या काडीतून किमान एक खिळा अचूक मारणे आवश्यक होते. शिवाय कंदिलाची जोडणी करताना कारवी आणि गाठेची काडी असलेली चौकट कंदिलाचा भार येणार नाही अशा बेताने लावावी लागणार होती. चौकटी तयार होईस्तोवर ३-२० वाजून गेले. आता पुढेआणखी एक संकट आमची वाट बघत होते.

इतका मोठा लाकडी सांगाडा कशाने जोडायचा कशाने? त्यासाठी तारेची आवश्यकता होती. नेमकं तारा राहून गेल्या. बांधकामाच्या तारा कुठेही सजपणे मिळतात. गडावर इतक्या झोपड्या आहेत पण त्या सर्व झाडाच्या फांद्याच्या खाचेत बांबू बल्ल्या लाऊन उभ्या केलेल्या. पकड, हाथोडी, करवत अशी अवजारे ही मंडळी वापरत नाही. तोच दीपकने भोजन अवकाश घोषित केला. लोणचं, पोळी, पापडाची चटणी असा मोजका बेत पोटात गेला आणि डोक्याची वात पेटली. गिर्यारोहणात कशाच्याही पक्क्या गाठी मारल्या जाऊ शकतात. दीपकला सोबत दोरी आणायला सांगितली होती. ती कशाची हे सांगितले नव्हते. या ठिकाणी जाड चांभारी दोरा उपयोगाचा ठरला असता. दीपकने कपडे वाळविण्याची नायलॉनची दोरी आणली होती. त्याला वाटलं या दोरीला कंदिल बांधायचा आहे. त्यासाठी मी पक्की सूती दोरी आणली होती. दीपकला नायलॉन दोरीचे एक फुटाचे तुकडे करायला सांगितले. तिचे वेणी सारखे तीन पदर सोडविल्यानंतर बारीक दोरी मिळाली. साधी बैलगाठ आणि त्याला अंगठागाठीने सुरक्षित करून आमचा साडे पाच फुटाचा भव्य असा सांगाडा दुपारी साडे चारच्या सुमारास उभा राहिला. 

कंदिल चालला कोकणकड्यावर...

कोर्‍या चहाची आणखी एक फेरी घेतल्यानंतर कंदिलेला रंगसंगती प्रमाणे कापड चढवायला सुरूवात केली. त्यासाठी गन टेकर आणली होती. जसे कागद स्टेपलरच्या पीनने एकत्र ठेवतात तशी ही गन टेकर. चित्रकार मंडळी हिच्या मदतीने लाकडी चौकडीवर कॅनव्हास ठोकतात. एक प्रकारे लाकडावर चालणारे हे स्टेपलर. आता आणखी एक संकट उभे राहिले, स्टेपलरच्या पुरेशा पिना सोबत आणल्या नव्हत्या. काल सामानाची जुळवा जुळव करताना दोन पाकिटे टाकली, परंतू त्यात पिना कमी होत्या. प्रत्येक चौकट, त्रिकोण आयाताला किती पिना लागणार याचा हिशेब करून सोबतच्या पिना पूरविल्या. झिरमिळ्या आणि सजावटीसाठी सोनेरी चमकीचे काठ लाऊन बरोबर ६-०७ वाजता कंदिल एकदाचा उभा राहिला.

आता वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. सोबत दोन बॅटर्‍या आणल्या होत्या. त्या कंदिलात लावण्याचे ठरवले होते. सोपानने त्याची सौर वीजेवर चालणारा एलईडीचा बल्ब देऊ केला. कोकणकड्याला उंचावर कंदल बांधणे गरजेचे होते. त्यासाठी त्याच्या झोपडीचे दोन उंच बांबू काढून घेतले. ढगाळ हवामानामुळे कोकणकड्यावर सूर्यास्त दिसला नाही. तिथे काही जणांचे तंबू लागले होते. त्यातील काही मित्रांना साद घालून मध्यमार्गाच्या बरोबर वर कंदिल लावण्याची तयारी सुरू केली. त्यात बॅटरीचा उजेड टाकताच 'हरिश्चंद्रगड' ही अक्षरे उठून दिसत होती. पिवळ्या चौकोनांना बाजूने भगवे, हिरवे, निळे त्रिकोण आणि वर व खालच्या बाजूला लाल पांढरे आयात अशा बहूरंगातला हा कंदिल कोकणकड्याच्या अंधारात उठून दिसत होता. उद्देश होता गडावर पडलेल्या विरांना आजव दिवाळा पाडव्याच्या दिवशी श्रद्धांजली वाहण्याचा. कोकणकड्याने आजवर अमाप समाधानाचे क्षण दिलेत. आपल्याकडून त्याच्या लेकरासाठी ही छोटीशी पुजा तो स्विकारेल का? हा प्रश्न मनात डोकावून गेला. कोकण कड्याला नळकांड्यांचे संरक्षक कठडे बसविल्याने तो काहीसा खट्टू झाला आहे. भला मोठा आकाशकंदिल पाहून त्याने मोठ्या मनाने त्याचा स्विकार केला. दोन काठ्या एकमेकांना जोडून त्याच्या मध्ये हा कंदिल मध्यमार्गाच्या अगदी वर ऐटीत विराजमान झाला. अवघा कोकणकडा दिपावलीच्या आनंदात न्हाऊन निघाल्यासारखा भासला. तळाच्या बेलपाडा आणि आसपासच्या वाड्यांचे लुकलूक दिवे जणू कोकणकड्याच्या आकाशकंदिलाकडे न्याहाळताता भासत होते. उरी बाळगलेले अनेक वर्षांपासूनचे स्वप्न साकार झाले होते. 

पूर्ण अंधार दाटला आणि कोकणकड्याचा हा आकाशकंदिल दुर अंतरावर जाऊन आम्ही न्याहाळत राहिलो. दुरून तो आणखी सुंदर भासत होता. वार्‍याचा वेगही मंद होता. इकडे सुदामने बाजरी व तांदळाचे पिठ एकत्र केलेली भाकरी, वरणभात आणि झणझणीत रशाची बटाटा बाजी बनवून ठेवली होती. अडीच तीन गरमागरम भाकरी भाजी अशी भरपेट पोटपूजा आटोपून झोपडीबाहेर आलो तर कंदिल हवे सोबत डोलताना दिसला. कड्या जवळ झोपून नका आज वारं जास्त असेल अशी कल्पना सुदामने दिली. त्याच्या झोपडीबाहेरच दोन तंबु लावण्याची तयारी केली. तोच एक पाणदिवड सळसळताना दिसली. हा काळ्या रंगाचा बिनविषारी साप, चावतो मात्र कडकडून, वृत्तीने अतिशय आक्रमक, प्रसंगी तो मांस बाहेर काढतो अशी त्या बद्दलची ख्याती ऐकलेली. तो पकडण्याच्या भानगडीत न पडता सुदामने त्याला काढीवर उचलून झोपडीपासून दूर नेले. 

हल्ली शनिवार व रविवार नेहमीच जोरदार गार वारे वाहते ही माहिती त्याने पुरवली. आम्ही दोन एक चकरा मारून कोकणकड्यावरचा कंदिल बघून आलो. तो त्याने स्विकारलेला होता. त्याची कुठलीही मोडतोड झाली नव्हती. रात्रभर खरोखरच जोरदार वारे वाहत होते. त्यातही त्याची कोणतीच क्षती झालेली नव्हती. सकाळी आन्हिके उरकून कंदिलात लावलेला दिवा काढून घेतला आणि पुन्हा तो नव्याने बांधला. मग आमची पावल कोकणकड्याच्या दक्षिण टोकाकडे वळली. तिथून रोहीदास आणि माकडनाळेचे विहंगावलोकन केले. दुर अंतरावरून कंदिल छोटा छोटा होत दिसेनासा होईस्तोवर आम्ही कोकणकड्याचा एक टोक गाठले. तिथून तारामतीचे शिखर आणि बालेकिल्ला हा बेत तडीस नेण्यासाठी आम्ही कोकणकड्याच्या आकाशकंदिलाला नमस्कार केला!

।।जय हो।।

नासिक ते पाचनई प्रवासासाठी लागलेला अंतर आणि वेळ...

नासिक (०) किलो मिटर) ६-२०

घोटी (४८ किलो मिटर) - ७-०५

राजूर (३२ किलो मिटर) - ८-०५

पाचनई (२७ किलो मिटर) १०-३५

------

एकूण अंतर व वेळ = (१०७ किलो मिटर) 

४ तास ०५ मिनीटे

 -

या छायाचित्राचे वैशिष्ट्य म्हणजे रात्रीच्या अंधारात उजळलेल्या तळाच्या वाड्या, पारूंडी नदी आणि हरिश्चंद्रगडावर उगम पावणार्‍या काळू, हरिश्चंद्रेश्वरी नदीच्या कुशीतल्या


दीपक पवार,  संतोष उगले...मोलाची साथ.


इथे याची आवश्यकता नाही

इथे कशाला हवे नळकांड्यांचे  संरक्षक कठडे....



हरिश्चंद्रगडावर काय विज नेण्याचे नियोजन आहे


तिथल्या निसर्गसौंदर्याची हे कळेना मेळ साधे


Lost & found at Harishchandra gad


After the jungle trek to vasota and trek through dense of Junglee Jaigad, we were thinking about to plan on ourselves going without any trekking club.  And there was the time for our most awaited trek, The Harishchandra gad. One of the ancient forts in Maharashtra.The trek route is quite difficult for newbie, but we were having enough experience of   Vasota and junglee Jaigad. So we could dare to take on this.


Accordingly I asked Rhishi and Ramesh about this. They both agreed along with my cousin Aditya and his friends.So we started planning and arranging the things. It was winter of 2011, might be Oct-Nov, I don’t remember exactly,but there was enough cool atmosphere and ultimately the best season for hiking.

There are lot of places at Harishchandra gad to explore. So we should have to plan for 2 days. Because of the stay, we needed to have cooking and sleeping stuff. We packed all the things.I would like to thank my bro and sister-in-law , who helped me out  for the packing. And We decided to leave on Saturday morning.

Our journey started form home at 8 AM in the saturday morning. Meeting point was Shivajinagar, from where Ramesh was about to join us ,also we were about to catch the bus for Alephata. Getting stomuch packed with heavy breakfast,we headed towards Alephata.

Around 11:00 AM we reached Alephata. Alephata, one of the most hot spot in terms of road connectivity. From here Kalyan, Nashik, and Pune are just at around 100 km. So the bus stand is always crowded. Next destiny, we needed to reach at Khubi phata.

Unfortunatrely we didnt get bus for Khubi phata,so asked Zeep driver who were wating for passenger at corner. After lot of bargaining with one Zeep driver, he agreed to ride us upto base village Khireshwar in 800 bucks. we headed towards Khireshwar. The Zeep was fantastic, complete safari material .Fully air conditioned(Natural) and double decker. Therefore we could sit on top of zeep, aditya and his friends were enjoying sitting on the top.













Meanwhile we got the lunch parcel at Khubi phata.Passing khubi phata, we were feeling cool air while riding on dam side road. We started our cameras for clicking beautiful images of Pimpalgaon Jog dam.

Around 12:20 PM,we reached the Khireshwar.Little beautiful village.After getting promise to pick ourselves on the next day from Zeep driver,we started walking towards the harishchandreshwar temple. 






Wow ,what an eye sight we were experiencing after hiking little bit.Fantastic! The dam was getting smaller as we were climbing. Everywhere lush green trees as winter season.After walking for half an hour,we decided to take a lunch as everyone's face was looking like a sign of hunger.we finished lunch and started hiking towards Tolar Khind,The first challange,100 Ft Rock patch. 




After walking for 15-20 mins we reached Tolar Khind .There is small temple of Lion and big Upper Arrow sign  on the big rock,showing the way towards rock patch.

Here only our group was divided. Aditya and his friends were walking ahead of us.Finally we came across the little dangerous and risky rock patch.The famous one!!! . however using the fixed railing,we could easily climbed up the patch.

And here after crossing the hill,thrilling challenge was about to start. There are around 6-7 hills we need to ascend and descend,examining the real stamina at every point.Before starting walk, we can see less dense forest plateau.












There are two routes to reach temple from the plateau, one is going through very dense forest,crossing only one hill and other one is through hiking 6-7 hills up and down. We took rest for a while,being only three there , Rishi,Ramesh and me and thinking about which route to take.Rest of our group was ahead. Pushing some buttermilk in tank,we started walking towards temple and decided to go through straight path hiking 7 hills.









We were only walking, walking and walking ,clicking some awesome images.Also we were searching for Aditya and his friends,but no luck.




And at last we could see the Harishchandreshwar temple.uhhh......! Ramesh pull out some eatables from his bag.we started eating,still no sign of three monkeys.we finished eating and drinking.Feeling was like drinking nectar.....We thought of waiting for them,but the sun was about to set in hour,so decided to go straight to catch the sunset at Konkan Kada.


Ramesh was about to stop there.So I and Rhishi were just running to catch sunset,forgetting all the pain.and yes we got there. wowww.... awesome!!!! This is the nature.The small yellowish red sphere was just about to set.We were standing at the very middle of spot.on both the side,being the highest peaks.what a breathtaking view of surrounding! One can see the Kalbhairav pinnacle from here.

At this point one famous Mumbai based Trekker committed suicide in the love of Konkan Kada.One cant see over hang by standing there,one has to be laid on the ground to experience depth.

After clicking beautiful images we started searching for Aditya and his friends.Now the big problem was,the group was then scattered in three.Ramesh,me and Rhishi,Aditya and his friends and enough darkness in which one could lost himself in the jungle.oh my god!

And sigh of relief was the enough crowd,but leading to challenge as all the shelters for night stay was PACKED....

At last ,at around 8:30 PM,we got together after searching each other a lot here and there.And then the problem was where to stay in the night??,but here Monkeys already comes with the solution......"To spend night in the Open space,sleeping on the ground and the vast dark sky to the open eyes" and they already started the cooking for dinner.

So we stayed at open home where three little children used to live with there parents.Unfortunately their parents went to Alandi.House of no walls and no roof on the head.Seems like the whole dense forest and ultimately whole world belongs to them.they also belonged one cow.
I remembered one proverb in the Marathi there
"हे विश्वची माझे घर ".

we did the dinner and thinking about where to sleep. It was risky to sleep in the open space in the jungle at night,but there was no option,so went to sleep thinking about any calamities.After sometime Aditya shouted and we all woke up,trying to figure out what happened. The cow came running directly towards the place where we slept in the night.It was just about to step on one of our head,screwing the sleep.But fortunately we all saved.
















We woke up early in the next morning. . It was too much cold in the morning. Everyone looking for warmth and trying to grab seat near traditional chulha .Body was not responding properly, feeling crams in legs. We finished morning activities and headed towards Konkan Kada again.
On the way ,this is the temple, I was talking about. The Harishchandreshwar temple.It is a marvelous example ancient fine art of all the time.There are lot of places to exlore on the Hirishchandra gad.Taramati Peak,Kedareshwar temple,ShivLinga,SaptaTirtha Pushkarni,Ganesh Guha,etc. We visited place one by one and back to our Jungle temporary home.


































We made Maggie for breakfast.Packed with breakfast,we decided to commence our return journey.And this time we were going another route which goes dense forest skipping up and down hike of 7 hills.We gave money to children who help us in the night and clicking the images with them,started walking towards Khireshwar.






And as promised the Zeep driver was ready to pick us at right time...........Fantastic!!!!!!!!!!!!!!!!!



Trek Details

History: The fort is quite ancient. Remnants of Microlithic man have been discovered here. The various Puranas (ancient scriptures) like Matsyapurana, Agnipurana and Skandapurana include many references about Harishchandragad. Its origin is said to have been in 6th century, during the rule of Kalchuri dynasty. The citadel was built during this era. The various caves probably have been carved out in the 11th century. In these caves are idols of Lord Vishnu. Though the cliffs are named Taramati and Rohidas, they are not related to Ayodhya. Great sage Changdev (one who created the epic “Tatvasaar”), used to meditate here in 14th century. The caves are from the same period. The various constructions on the fort and those existing the surrounding region point to the existence of diverse cultures here. The carvings on the temples of Nageshwar (in Khireshwar village), in the Harishchandreshwar temple and in the cave of Kedareshwar indicate that the fort belongs to the medieval period, since it is related to Shaiva, Shakta or Naath. Later the fort was under the control of Moguls. The Marathas captured it in 1747. 
[Courtesy: Wikipedia]

Click here for Detail Info


Height: 4671 ft above sea level

Level:Difficult

Distance from Pune: There are many routes by which one can reach Harishchandra gad.we did it by khireshwar way.The very popular one from Khireshwar.There are daily buses from Swargate to Khireshwar.Total 9 km distance foothills of the village,takes around 3-4 hr to reach temple. otherwise one has to alight at Alephata.from Alephata Reaching Khubi phata and start walking towards Khireshwar on Pimpalgaon dam side road.

Sightseeing:Saptatirtha Pushkarni,Konkan Kada, Harishchandreshwar temple,Kedareshwar temple,Ganesh Guha,Balekilla,Taramati peak,etc.

Accommodation:One can stay at Khireshawar village otherwise on the top in Ganesh Guhas which can accomodate around 130 people at a time.

https://trekventure.blogspot.com/2012/08/lost-found-at-harishchandra-gad.html

हरिश्चंद्रगड नळीच्या वाटेने - एक आव्हान

सह्यपर्वताच्या अधिपत्यात असणाऱ्या आणि ट्रेकर्सचा स्वर्ग समजला जाणारया  हरिश्चंद्रगडावर बरेचदा जाणं झालं ते खिरेश्वर मार्गे.नेहमीच भुरळ पाडणाऱ्या  कोंकण कड्याच्या बाजूला रात्री राहण्याची आणि खालून कोंकण कडा पाहण्याची इच्छा अजूनही इछाच होती. आणि कोंकणातल्या बेलपाडा गावातून नळीची वाट साद घालत होती.नळीच्या वाटेबद्दल खूप काही ऐकून होतो. बराच कठीण आहे,भरपूर रॉक पचेस आहेत,बहुतेक ठिकाणी खडी चढण आहे,चढायला रोप ची गरज लागते,वगैरे वगैरे.आधी एकदा प्लान केला होता जाण्याचा,पण काही कारणास्तव तो फसला आणि जमलेच नाही. यावेळी मात्र नळीच्या वाटेचं आव्हान काहीही झाल्या पेलायचं आम्ही ठरवलं होतं. येणारया शुक्रवारला रात्री निघायचं ठरलं.

गुरुवारी रात्री प्रसन्नाचा चा मेसेज आला "प्रसादचं आणि माझं नाही जमणार यायला",झालं.गळणाऱ्याच्या संख्येत आणखी दोघांची भर. आधीच ऋषी आणि वासू चं रद्द झालेलं. अतुल आणि सागरचं चाललेलं यायचं पण ऑफिस च्या वेळेमुळे त्याचं पण रद्द झालेलं. आता राहिलो होतो चौघं केसागर,इंद्रा,निखिल आणि मी. कमीत कमी चार जण तरी जाऊ शकतो ना ? या गोड विचारांनी झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी केसागर ला काल केला तर पठ्ठ्या कॉलेजची शेवटची ग्यादरिंग असल्यामुळे जावं लागणार म्हणून काहीतरी बडबडत होता. ऐनवेळी हा माणूस टांग देण्याचा प्रयत्न करत होता . मी ओळखलं "अजून एक पान गळणार " .आणि फोन संपेपर्यंत गळालं सुद्धा. राहिलो तिघेच. 


प्रसादला फोन केला, त्यानी "हडसर-जीवधन-नाणेघाट-चावंड" हा ट्रेक सुचवला. जायला हरकत नव्हती,पण नळीच्या वाटेचा विचार आणि खूप दिवसांपासून रखडलेला ट्रेक पूर्ण करायचं स्वप्न यामुळे दुसरं काही सुचत नव्हतं. ठरवलं. आता आपण तिघेच हा ट्रेक करायचा.निखिलला पातेलं,टेंट वगैरे घेऊन संध्याकाळी साडेसहापर्यंत स्वारगेटला यायला सांगितलं. इंद्र पण तिथेच पोहोचणार होता. 

ठरल्याप्रमाणे मी ऑफिस मधुन लवकर निघालो. घरी येताना वाटेतच मामाजींचा फोन आला,"तुझं विद्यापीठातून पत्र आलंय,उद्या पदवीप्रदान समारंभ आहे." झालं,अजून एक संकट. लगेच इंद्राला सांगणार तेवढ्यात  विचार केला आधी पाहावं तर पत्र काय आहे ते ? घरी पोहोचलो,पत्रं पाहिलं. समारंभाला न जाता पदवी पोस्टाने घरी येण्याची खात्री पटली. ते सगळं बाजूला सारून sack भरायला सुरुवात केली. मामाजीचं चाललं होतं " अरे जाऊन ये,ट्रेक करायला काय सगळं आयुष्य पडलंय. पदवी हातात घेऊन फोटो काढण्याची संधी गमावशील." पण या फोटो पेक्षा मला नळीच्या वाटेच्या फोटोची भुरळ पडली होती. जाऊ दे. ट्रेकला जायचा निर्धार अजुन पक्का झाला.

व्हायचा तो उशीर झाला आणि सगळ्यांना स्वारगेटला जमायला सात-साढे सात झाले. चौकशी केल्यावर कळाले बस साढेंआठला आहे. वाट बघत बसलो. बस आली साढे नऊला. बस मध्ये बसल्यावर कळलं,बस "खोपोली मार्गे जाणार आहे" बोंबा. आम्हाला जायचं होतं माळशेज घाटमार्गे. डेक्कनला उतरून शिवाजीनगरला गेलो आणि नाशिकच्या बस मध्ये बसुन आळे फाट्याला उतरलो. रात्रीचे बारा-सव्वा बारा झाले असतील. सगळीकडे सामसूम. सरत्या हिवाळ्याची थंडी जाणवत होती.आम्ही कल्याण रोडला येऊन थांबलो. बॉटल काढायला हात पाठीमागे टाकला तर बस मधला येतानाचा प्रसंग आठवला.
बस मध्ये एकाने माझ्याकडे पाण्याची बाटली बघून प्यायला पाणी मागितले. सहप्रवासीधर्म म्हणून मी त्याला बाटली दिली. स्वतः तर पाणी कधी न पिल्यासारखा चांगली अर्ध्यापेक्षा जास्त खाली केली. आणि वरून कहर म्हणजे त्याच्या मित्रांना प्याऊ सुरु केल्यासारखं पाणी पाजून बुडाला लागलेली बाटली परत केली. म्हटलं "धन्यवाद ,आभारी आहे ". आता याला काय म्हणावं ? म्हणजे "एखाद्याला खायला ऊस द्यावा आणि त्याने तो मुळासकट उपटून खावा " अशीच अवस्था झाली होती.
अर्थात दोघांकडच पाणी  आधीच संपलं असल्यामुळे आम्हाला पाणी शोधणं गरजेचं होतं. आजुबाजुला कुठे चहाची टपरी पण नव्हती. तेवढ्यात दोघे वयस्कर माणसे बस चीच वाट पाहत असताना दिसले. त्यांना बस बद्दल विचारलं. तर बीड-कल्याण बसची वेळ झालेली आहे येईल इतक्यात असं समजलं. बस येईपर्यंत पाणी भरायला आळेफाट्याच्या स्थानकावर गेलो तोच त्या माणसांनी बस आलीये म्हणून ओरडायला सुरुवात केली. अर्धवट पाणी भरून बस मध्ये बसलो.

आम्हाला उतरायचं होतं सावर्णे या गावी. एक तर या गावाचं ठिकाण,स्वारगेट बस स्थानकावर कंडक्टर पासून डेपो मनेजर पर्यंत कुणालाच धड सांगता येत नव्हतं. त्यामुळे गावात व्यवस्थित बस स्थानक असेल याची दाट शक्यता नव्हती. आणि वरून या कंडक्टर ला पण माहित असेल की नाही याची भीती होती. कंडक्टरला सावर्णेचं  तिकीट मागितलं. "कुठे आलं ते ?",कंडक्टर उत्तरला. बोंबल,ह्याला पण माहित नव्हतं. ज्या गोष्टीची भीती होती, तेच झालंय."माळशेज घाट संपायच्या थोडसं अलीकडे. ",मी बोललो. इंद्रा आणि निखिल मागे बसले होते. "गाडी थांबत नाही",कंडक्टरची प्रतिक्रिया.मी विनवणी करत होतो. कंडक्टर मोठ्याने ओरडला,"रात्री घाटात गाडी थांबणार नाही". माणूस ऐकालाच तयार नव्हता. ओतूरला उतरलो. रात्रीचे दीड-दोन वाजले असावेत. आता सूर्योदयाची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. दिली ताणून बस स्थानकावर.

सकाळी चार-साढे चारला उठलो. गडबडीत आवरलं आणि सकाळची पहिली बस पकडायची म्हणून कल्याण रोडला येउन थांबलो. आजूबाजूला काळं कुत्रं सुद्धा नव्हतं दिसत. रात्रभर भुंकणारं पण नेमकं यावेळेस साखरझोपेत असावं कदाचित कारण त्याचाही आवाज बंद झालेला . आणि आम्ही भटके बस ची वाट पाहत भूतासारखे रस्त्यात उभे होतो. पाच वाजले ,सहा झाले तरी बस चा पत्ता नाही,आणि लांब पल्ल्याच्या गाड्या थांबायलाच तयार नव्हत्या. वैतागुन एका उघडलेल्या टपरीवर चहा घेतला आणि परत काही मिळतं का याची वाट पाहत रस्त्यावर येउन थांबलो. आणि शेवटी एकदाची एका माणसाने त्याची क्रुझर थांबवली आणि माळशेज घाटातुन आमचा प्रवास सुरु झाला. इंद्रा आणि निखिलनी तर बसल्या बसल्या ताणुन दिली. मी जागा होतो. ड्राईवर म्हटला तर खरा,पण त्याला पण सावर्णे गावाची माहिती असेल की नाही यात शंका होती.

सहयपर्वताची मुख्य रांग कापत गाडीने घाट उतरायला सुरुवात केली आणि दक्षिणेस  डाव्या बाजूला भैरवगडाच्या कातळ भिंतीने आणि नानाच्या अंगठ्याने लक्ष वेधून घेतले. उजव्या बाजूला(उत्तरेकडे) नाफत्याचे उंचच उंच कडे,हरिश्चंद्रगडाचा भाग असलेल्या रोहिदासाचे शिखर यांचं दर्शन झालं. दोहोंच्या मधल्या कोंकण कड्याने जणू काही तुमचीच वाट बघतोय अशा अविर्भावात दुरून हातवारे केल्यासारखं जाणवलं. हे बघण्याच्या नादात आम्ही पार मोरोशी जवळ येऊन पोहोचलो.प्रसादनी सांगितल्यानुसार मध्ये एक पोलिस चौकी लागते,त्याच्या अलीकडे थांबायचं होतं. बोलण्याच्या नादात ड्रायव्हरला पण नाही कळलं.
जवळपास १० किमी पुढे आलो होतो. तेथून वालीवरेला जायला रस्ता दिसत होता,पण ते अंतर बरंच असल्यामुळे तसंच परत एका ट्रकमध्ये बसुन सावर्णे चा प्रवास सुरु झाला. सकाळचा मंद वारा ती सकाळ अतिप्रसन्न करण्यास समर्थ होता. भैरव गडाच्या कातळकड्याचे परत दर्शन होताच,गडाला भेट देण्याची इच्छा अजून तीव्र होत चालली होती. माळशेज घाटचा दृष्ट लागण्यासारखा रस्ता न्याहाळत आम्ही ट्रक मधल्या प्रवासाचा आनंद घेत होतो.  रस्त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या झाडांचा पालापाचोळा वाऱ्या मुळे इकडे-तिकडे उडत होता. हा प्रकार बघत बघत आम्ही सावर्णे गावाजवळ येउन पोहोचलो.

सकाळचे साधारण सात सव्वा-सात झाले असतील. पैसे देताना ट्रक ड्रायव्हर विचारता झाला, "इकडे कुठं भटकले?" आम्ही त्याला बोट दाखवुन म्हटलं,"तो जो डोंगर दिसतोय ना!, हा तो! चढून जाणार आहे आम्ही."कमाल हाये बा तुमची!",डोक्याला हात लावुन ड्रायव्हर पुटपुटला. त्याच्याकडे हसरा कटाक्ष टाकत आम्ही रस्त्याच्या बाजूला असलेल्या हॉटेल मध्ये जाऊन बसलो. चहा घेऊन हुशार झालो आणि बेलपाड्याकडे चालत निघालो.

दहा बारा घरांची वस्ती असलेलं सावर्णे गाव. सकाळची वेळ असल्यामुळे बायाबापडयांची कामे चाललेली. त्यातली काही जण आमच्याकडे आश्चर्याने पाहत होती. रस्ता विचारून पुढे निघालो.मला नेहमी विचार पडतो,"या गावकर्यांना आम्हा भटक्याबद्दल काय वाटत असेल?" म्हणजे,"उगाच हे डोंगर चढून या लोकांना काय मिळत असेल",असाच विचार करत असतील,नाही? एका आजोबाला वाट विचारून आम्ही बेलपाड्याच्या खिंडीकडे चालायला सुरुवात केली. वाटेत लागणारा ओढा पार करून अर्ध्या तासाच्या चढाई नंतर आम्ही खिंडीजवळ येउन पोहोचलो. खिंडीतून नाफ्त्याचा कडा अजूनच भीषण वाटत होता. थोडा वेळ शांत बसुन आसमंत न्याहाळला.खिंड उतरायला सुरुवात केली.खाली उतरून शेत-शिवाराच्या दांडाला लागलो. वसंताची चाहूल लागल्यामुळे आंब्याच्या,जांभळा-करवंदाच्या झाडांना मोहोर यायला सुरुवात झाली होती. असंच एका आंब्याच्या बागेतून जाताना मोहरलेल्या झाडांनी मन मोहरून टाकले.



एका तासात आम्ही बेलपाड्याला पोहोचलो.आणि वालीवारे म्हणजेच बेलपाडा होय, हे तेव्हा कळलं. मध्ये एक नदी,ओढा लागला. नदीवरचा सांकव ओलांडुन पलीकडे गेलो तर,विहिरीवर पाणी भरणाऱ्या बायाबापड्या आमच्याकडे बघत लाजऱ्याबुजऱ्या झाल्या. "आता हे ध्यान कुठून आलं म्हणावं?" असाच विचार कदाचित ते आमच्याबद्दल करत असतील. त्यांच्याकडून पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि गावातल्या मुख्य रस्त्यावरून चालत,दोन तीन शेत-शिवार पार करून नाळेच्या तोंडाशी म्हणजे मघाच्या नदीच्या उगमा जवळ येउन पोहोचलो. नदीचं नाव काळू नदी. नळीच्या वाटेच्या पाण्यानी पावसाळ्यात तुडुंब भरून वाहणारी.आता थोडेफार पाणी होते.नदी बाजूला ठेवून आम्ही नळीच्या वाटेकडे चालायला लागलो.

अरे बापरे ! समोर नाफ्ता,कोंकण कडा आणि रोहिदास शिखर. आम्हा भटक्यांची वाचा बंद. म्हणजे याला काय म्हणावं सुचत नव्हतं. निसर्गाने जणु सह्यापर्वताचा आकाशाला भिडणारा उंचच उंच बांधुन तयार ठेवलेला मंच. जवळपास समुद्रसपाटीच्या उंचीवरून अजूनच अक्राळ विक्राळ वाटत होता.सकाळच्या पहिल्या सुर्यकिरणांना देखील आपल्यापर्यंत पोहोचायला एवढा वेळ लागावा,इतका तो उंच आणि पसरलेला उभा कातळकडा.वाह ! रात्रीच्या जागरणाच चीज इथेच झालं असं वाटायला लागलं.


दाट जंगलातुन वाटा काढत आम्ही नाळ गाठायला सुरवात केली. मध्ये एक झोपडी दिसली.आजूबाजूला शेत केल्यासारखी जागा होती. जाऊन पाहिलं तर एका आजोबांची भेट झाली. मनात विचार आला, पुढच्या वेळेस आलो तर झोपडीच्या बाजूला राहण्याचा मस्त बेत होईल. आजोबांना रस्ता विचारला तर त्यांनी हातातला विळा रोखून वाट दाखवली. "अहो आजोबा,इथे सात-आठ जणांची राहण्याची सोय होईल का ?",मी विचारलं. "पन्नास येऊ दे." ऑ! आजोबांच्या उत्तराने सुखावलो आणि परत आमची भटकंती चालू झाली.  थोड्याच वेळात दगड धोंडे सुरु झाले म्हणजेच नाळ सुरु झाली.

उजव्या बाजूला भीषण कोंकण कडा. त्यामागून सुर्यनारायण उगवत तापायला सुरुवात झाली होती. कोंकण कडा आणि रोहिदास यांच्या मधल्या खाचेतून सूर्यकिरणे डोकावत होती. जणू काही सह्यकड्याचा आणि सूर्यकिरणाचा लपंडाव चाललेला आहे असं भासत होतं. निसर्गाच्या या निरागस खेळाचा आनंद घेत आम्ही नाळेतून चालत होतो. मोठ-मोठे दगड चढताना बोराटाच्या नाळेची आठवण येणार नाही असे कसे होणार. पण यावेळेस आम्ही नाळ चढत होतो. 

अर्ध्या-पाऊण तासाच्या चढाई नंतर आम्ही नाळेच्या मुख्य तोंडाशी म्हणजे खरंतर जेथून घसरड्या दगडांचा रस्ता चालू होतो तिथे येउन पोहोचलो. अंतर जास्त वाटत नव्हतं,मनात विचार आला एक दोन तासात चढून होईल,लोकांनी इतका का बाऊ करून ठेवलाय या वाटेचा ? कळत नाही. पण लगेच थोडं पुढे चढत गेलो आणि भ्रमनिरास झाला, कळाले आम्हाला,इथे येणारे बरोबर बोलतात!

खरी कसोटी येथुन लागणार होती. इंटरनेट वर तसं बरंच पारायण करून आलो होतो. त्यामुळे नाळेत वर चढेपर्यंत किती रॉक पचेस आहेत यांची इत्यंभूत सगळी माहिती होती. सह्याद्रीच ते भीषण,रौद्र निसर्ग सौंदर्य अनुभवत आम्ही पहिल्या खडकाच्या कठीण तुकड्या(रॉक प्याच) पर्यंत पोहोचलो.तो भाग सहज पार करत पुढे निघालो. पहिला भाग पार केला खरा पण जवळचे सगळे पाणी संपले होते.पुढे चालत राहिलो. ऊन वाढत होतं,तोंड सुकली होती,घशाला कोरड पडायला सुरुवात झाली होती. तेवढ्यात पुढच्या रॉक प्याचला दोघे-तिघे जण बसले होते. त्यांनी प्यायला पाणी दिले,जीव भांड्यात पडला. तिथे भास्कर ची ओळख झाली. भास्कर - म्हणजे कोंकण कड्याचा मालक :) हा हा! निदान आम्हाला तरी तो कोंकण कड्याचा मालकच वाटतो निखिल पुढे दुसरा प्याच चढून आमची वाट बघत बसला होता. भास्करच्या माहितीनुसार आता कोंकण कडा येईपर्यंत पाण्याचा दुष्काळ.थोडा वेळ शांत बसलो, नाळेच निरीक्षण करत. अप्रतिम म्हणजे चाबुक,महादेवाने तांडव करावा तसं निसर्गाने अक्षरशः तांडव मांडला होता. पण तांडव मात्र शांत वाटत होता.सह्याद्रीचे ते उंचच उंच कडे जणू काही चाकूने तुकडे केलेल्या केकचे चिरे भासत होते. आणि ते उंच कातळ-कडे आता आकाशाला भिडतात कि काय असं वाटायला लागतं.निसर्गाच्या सादेला हाक देत आम्ही दुसरा खडतर भाग चढून पुढे निघालो. 




आणि आता तर निसर्गाने  काहीतरी वेगळंच वाढून ठेवलं होतं आमच्या ताटात. तिसरा रॉक प्याच यायच्या आधीच ही खडतर वाट! या वाटेवरून चालायचे/चढायचे म्हणजे अधे मध्ये थांबणे नाही. थांबला तो संपला. थांबला तर ज्या दगडांना तुम्ही धरलंय तो दगड एकतर हातात येईल,नाहीतर ज्या दगडावर थांबलाय तो तरी घसरून खाली पडेल. याचा अर्थ तुमचा तोल जाऊन तुम्ही खोल दरीमध्ये पडू शकता. ही वाट पार करून तिसऱ्या रॉक प्याच च्या तोंडाशी येऊन पोहोचलो. याला मुळीचा प्याच असेही म्हणतात. हा प्याच थोडा ट्रिकी असुन चढायला रोपची मदत लागती. आधीच एका टीमने रोप बांधला असल्यामुळे,आम्ही आमच्या रोप चे उत्घाटन न करता त्याच रोपने वर चढलो. त्यानंतर मोठ्या खडकाला वळसा घालून एक धोकादायक ट्रवर्स पार केला. ट्रवर्स पार करताना खोल दरीची भीषणता जाणवत होती. पण आता थोडीफार सवय झाल्यामुळे लगेच पार करून खिंडीत येऊन पोहोचलो. नळीची वाट संपली. हायसे वाटले. 


धन्यवाद - आभारी आहे 

हरिश्चंद्रगड नळीच्या वाटेने - कोंकण कडा

समुद्रसपाटीपासून तब्बल 3२०० फूट उंचावर. जवळपास १ किमी खोलीची नाळ पार करून आम्ही खिंडीत पोहोचलो होतो. बेलपाडा गावातुन निघाल्यापासून वारं काय हे विसरलो होतो. दोन्ही बाजूंनी उंचच उंच कडे असल्यामुळे वाऱ्याचा पत्ताच नव्हता. पाय पुरते थकलेले. तहान-भूक सपाटून लागलेली. पण चालणे भाग होते. नळीची वाट संपली होती. आता एका छोट्याश्या घाटवाटेतून वर चढायचे होते.७००-८ ०० फुटाची चढाई अजुन बाकी होती.थोडा वेळ थांबुन चढायला सुरुवात केली. दाट झाडीतुन वाट काढत एका मोठ्या आणि अखंड खडकाजवळ पोहोचलो. तो खडक सहज पार करून वर चढलो तर कलाडगडाचे आणि प्रचंड नाफ्त्याचे सुंदर व विहंगम दृश्य आमची वाट पाहत होते. नाफ्त्याच्या नेढयाने लक्ष वेधून घेतले. ऊन वाढत चालले होते.उन्हाचे चटके अंगावर घेण्यापेक्षा आम्ही लगेच झाडीत शिरलो. येथुन जवळपास अर्धा तास लागणार होता कोंकण कड्या पर्यंत पोहोचायला.

घाटातला शेवटचा रॉक प्याच चढून आम्ही हरिशचंद्र गडाच्या पठारावर पोहोचलो आणि निसर्गानी आमची घनचक्कर,कात्राबाई ,आजोबा गड,कलाडगड,इत्यादी दुर्ग सख्यांची भेट घालवून दिली. भर उन्हात चालताना या दुर्गा रत्नांची भेट म्हणजे नळीच्या वाटेने आल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. भुकेमुळे पोटात कावळे जरी ओरडत असले तरी तेथून पाय काढावासा वाटत नव्हता. पण कोंकण कड्याच्या भेटीची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. चालायला लागलो कोंकण कड्याकडे.


कोंकण कडा .निसर्गाची एक अफलातून किमया. लहान-थोरांचे, प्रत्येकाचे म्हणजे ज्यांना कमीत कमी माहिती आहे अशांना एक जबरदस्त आकर्षण असलेला सह्यपर्वतामधला भव्यदिव्य कातळकडा.इथे येणाऱ्या प्रत्येकाला "निसर्ग आपल्याशी बोलतो" असा अनुभव देणारा.जवळपास अर्धा किमी परिघाचा अंतर्वक्र कडा.नळीच्या वाटेतुन आल्यामुळे त्याचे हे वेगळेच भन्नाट रूप आम्ही अनुभवत होतो. इंद्रानी तर पुढे  कड्यासमोर जाऊन बैठकच मांडली. अक्षरशः तहान-भुक विसरून आम्ही कड्याचे हे अजब रूप न्याहाळत बसलो होतो.दक्षिणेकडे भैरव गडाची कातळ भिंत महाकाय कोंकण कड्याच्या समोर केवढी छोटी भासत होती. सिंडोळा किल्ला,नानाचा अंगठा लक्ष वेधुन घेत होते. नळीच्या वाटेतून उंचच उंच दिसणारे रोहीदासाचे शिखर आता आमच्या बरोबरीचे वाटत होते.  उठावसं वाटत नव्हतं. पण पोटात कावळ्यांनी आता  ओरडण्याबरोबर थैमान घालायला  सुरवात केली होती. भास्करला जेवणाचं आधीच सांगितलं असल्यामुळे निश्चिंत होतो.

कोंकण कड्यावर पोहोचलो. शरीर चांगलंच थकलं होतं. पण कड्यावरच्या गार वारयानी थकवा थोडासा दूर झाला होता. सर्वात आधी पाण्याची तहान भागवली आणि लिंबू सरबताचे दोन-तीन ग्लास रिचवून हुशार झालो.तंबू ठोकायला सुरवात केली.आमचा छोटासा आशियाना सज्ज झाला आणि जेवण पण तयार होते. पिठलं-भाकरी वर यथेच्छ ताव मारून पोटभर जेवण उरकलं. वामकुक्षी म्हणून दिली ताणुन. इंद्रा आणि निखिल तर मेल्यासारखे झोपले होते. तिकडीच्या चेहऱ्यावर समाधानाच्या छटा स्पष्ट दिसत होत्या. माझा तर मागच्या दोन वर्षापासुनचा स्वप्नवत ट्रेक पूर्ण झाला होता. 





एकदम सुर्यास्तालाच जाग आली. कोंकण कड्यावर आता नेहमीप्रमाणे सुर्यास्ताचा अविस्मरणीय सोहळा पाहण्यासाठी बरीच गर्दी झाली होती.आलेले सहलीकर आपापल्या परीने चित्रविचित्र पोज देऊन फोटो काढण्यात दंग होते. पण आम्हाला यात काहीच इंटरेस्ट नसल्यामुळे एका जागी जाऊन बसलो.निसर्गाचा विलक्षण सोहळा डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होतो. खूप दिवसांनी कोंकण कड्याशी आम्हा भटक्यांच्या निवांत गप्पा रंगल्या होत्या.खरच आम्ही आज भारावलो होतो.शेवटी सुर्यनारायणानी निरोप घेतला आणि आम्ही आमच्या तंबुत परतलो. 


Maggie !!!! रात्रीच्या जेवणाचा बेत. सरपण गोळा झाले. थोड्याच वेळात गरमागरम maggie तयार झाली. पोटभर हादडली. गप्पा मारता मारता कधी झोपेच्या अधीन झालो कळालेच नाही. 



सकाळी जाग आली तेव्हा चांगलंच उजाडलं होतं. बापरे केवढी ती झोप. म्हणजे ट्रेकला एवढं निवांत आम्ही कधीच नव्हतो. सकाळची आन्हिक उरकताना इंद्राच्या दातघासनीच अजब कौतिक,"म्हणे मी घाबरलो नळीच्या वाटेला!" :) पटापट आवरलं. कोंकण कड्याचा निरोप घेतला. परत भेटण्याचे वचन देऊन खिरेश्वर मार्गे परतीचा प्रवास सुरु झाला.  

हरिश्चंद्रगड

हरिश्चंद्रगड पुण्याहून नाशिक मार्गावर आळेफाटा येथे येऊन कल्यान मुरबाडकडे जाणाऱ्या हमरस्त्यावर माळशेज घाटाच्या अलीकडे खुबी हे गांव आहे. येथे उतरून खुबी रस्त्याने खिरेश्वर गावातून गडावर जाण्यासाठी पायी रस्ता आहे. ( पायी अंतर ४ ते ५ तास ) हा गड पूर्व-पश्चिम असा पसरला आहे. पश्मिमेला कोकणकडा हा एक अद्वितीय निसर्गाविष्कार आहे. अर्धवर्तुळाकार आणि डोकावणाऱ्या ह्या कातळकड्याची सरळ उंची १५०० फूट आहे. खिरेश्वर येथील एक प्रेक्षणीय मंदिर व लेणे धरणाच्या पाण्याखाली गेले आहे. किल्ल्याची उंची : ४००० फुट किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग : माळशेज जिल्हा : नगर श्रेणी : मध्यम हरिश्चंद्रगड(Harishchandragad) म्हणजे नगर जिल्ह्याचे महाबळेश्वर ! ठाणे, पुणे आणि नगर यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्त्र पर्वत म्हणजे हरिश्चंद्रगड, एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड. या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल हा विस्मयकारक आहे. इतर सर्व किल्ल्यांना मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहेत हरिश्चंद्रगडाला तर दोन चार हजार वर्षांपूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहुबाजूंनी नटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींनी नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्राचा उल्लेख प्राचीन अग्नीपुराणात व मत्स्यपुराणात आढलतो. १७४७ - ४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली. गडावरील पहाण्यासाखी ठिकाणे : टोलारखिंडीच्या वाटेने गडावर आल्यावर आपण रोहीदास शिखरापाशी पोहचतो. येथून तास दीड तासात आपण तारामती शिखरापाशी पोहचतो. पायथ्याशीच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर : तळापासून या मंदिराची उंची साधारणतः सोळा मीटर आहे. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच `मंगळगंगेचा उगम' असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहाआहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथऱ्यात जमिनीत खाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत `चांगदेव ऋषींनी' चौदाशे वर्ष तप केल आहे असे स्थानिक गावकरी सांगतात. 'शके चौतिसे बारा । परिधावी संवत्सरा । मार्गशिर तीज (तेरज) रविवार । नाम संख्य ॥ हरिश्चंद्रनाम पर्वतु । तेथ महादेव भक्तु । सुरसिद्ध गणी विरुयातु । सेविजे जो ॥ हरिश्चंद्र देवता ॥ मंगळगंगा सरिता । सर्वतीर्थ पुरविता सप्तस्थान । ब्रम्हस्थळ ब्रम्हन संडीतु । चंचळ वृक्षु अनंतु । लिंगी जगन्नाथु । महादेओ ॥ जोतीर्थासि तीर्थ । केदारांसि तुकिनाति । आणि क्षेत्री निर्मातिबंधु हा ॥' हे चांगदेवाविषयीचे लेख मंदिराच्या प्राकारात, खांबावर, भिंतीवर आढळतात. श्री चांगदेवांनी येथे तपश्चर्या करून `तत्वसार' नावाचा ग्रंथ लिहिला. येथील एका शिलालेखावर, चक्रपाणी वटेश्वरनंदतु । तस्य सुतु वीकट देऊ ॥ अशा ओळी वाचता येतात. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच एक छोटे मंदिर आहे. यातही महादेवाची पिंड आहे. या छोट्या मंदिरासमोरच एकभाग्न अवस्थेतील मूर्ती आहेत. त्यातील पाषाणावर राजा हरिश्चंद्र डोंबाऱ्यांच्या घरी कावडीने पाणी भरत असलेला प्रसंग चित्रित केला आहे. केदारश्वराची गुहा : मंगळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यावर डाव्या हातास एकगुहा लागते. याला केदारेश्वराची गुहा असेही म्हणतात. या गुहेत १ मीटर उंच आणि २ मीटर लांब असे शिवलिंग आहे. यात कमरभर पाणी आहे. ही गुहा खरंतर चार खांबावर तोलली होती पण सद्यःस्थितीला एकच खांब शाबूत आहे. याच गुहेत एक खोलीही आहे. खोलीच्या डाव्या हाताच्या भिंतीवर शिवपूजनाचा प्रसंग कोरलेला आहे. या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालावयाची असल्यास बर्फतुल्य पाण्यातून जावे लागते. तारामती शिखर : तारामती शिखर गडावरील सर्वात उंच शिखर आहे. साधारणतः उम्ची ४८५० फूटा. शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत. त्यापैकी एका गुफेत गणेशाची सुमारे साडेआठ फूटाची भव्य आणि सुंदरमूर्ती आहे. याच गणेशगुहेच्या आजुबाजुला अनेक गुहा आहेत. यातही राहण्याची सोय होते. गुहेच्यासमोर उभे राहिल्यावर डावीकडे जाऊन पुढे वर जाणारी वाट आपल्याला अर्ध्या तासाच्या चढाईनंतर तारामती शिखरावर घेऊन जाते. या शिखरावरून समोरच दिसणारे जंगल, घाटावरचा आणि कोकणातील प्रदेश न्याहाळता येतात. शिखरावर जाताना वाटेत अनेक गोमुख आढळतात. माथ्यावर दोन ते तीन शिवलिंग आढळतात. कोकणकडा : कोकणकडा म्हणजे हरिश्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण. कोकणकडा म्हणजे गिर्यारोहकांना आकर्षणाचे स्थान. अर्ध्या किलोमीटर परिघाचा , वाटीसारखा अर्धगोल आकाराचा काळाकभिन्न रौद्रभीषण कोकणकडा हा एकमेवाद्वितीय असावा. कड्याची सरळधार १७०० फूटा भरेल. पायथ्यापासून कड्याची उंची साधारणतः ४५०० फूट भरते. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्तचा नयनरम्य सोहळा या कड्यावरून पहाण्यात जो आनंद आहे तो अवर्णनीयच आहे. १८३५ मध्ये कर्नल साईक्सला येथे आहे. गडावर चहापाण्याची व जेवणाची सोय होते. पावसाळ्यात मात्र या गडाचे सौंदर्य काही औरच असते. विविधता या गडाएवढी इतरत्र कुठेही आढळणार नाही. करवंद, कारावीच्या जाळी, धायटी, उक्षी, मदवेल, कुडा, पांगळी, हेकळ, पानफुटी, गारवेल इत्यादी वनस्पती येथे आढळतात. या भागातील प्राणीवैभव मात्र शिकाऱ्यामुळे बरेच कमी झाले आहे. तरीही कोल्हे, तरस, रानडुकरे, बिबळ्या, ससे, भेकर, रानमांजरे इत्यादी प्राणी आढळतात. गडाचे सर्वोच्च शिखर तारामतीवरून नाणेघाट, जीवधन, रतनगड, कात्राबाईची खिंड, आजोबाचा डोंगर, कळसूबाई, अलंग, मदन, कुलंग, भैरवगड, हडसर आणि चावंड हा परिसर दिसतो. अशा तऱ्हेने अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेला हरिश्चंद्रगड `ट्रेकर्सची पंढरी' ठरतो. गडावर जाण्याच्या वाटा : हरिश्चंद्रगड पूर्ण पाहवयाचा असल्यास दोनते तीन दिवसांची सवड हवी. गडाचा घेरा फार मोठा असल्याने गडावर जाण्याच्या वाटाही फार आहेत. खिरेश्वर गावातून वाट : सर्वात प्रचलित असणारी वाटही खिरेश्वर गावातून गडावर येते. या वाटेने येण्यासाठी पुण्याहून आळेफाटा मार्गे अथवा कल्याणहून मुरबाड-माळशेज घाट मार्गे खुबी फाट्यास उतरावे. खुबी फाट्यावरून धरणावरून चालत गेल्यावर ५ कि.मी. अंतरावर खिरेश्वर गाव लागते. हरिश्चंद्रगडावर जाताना खिरेश्वर गावातून अदमासे एक कि.मी. अंतरावर खिरेश्वराचे प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर अकराव्या शतकातील यादवकालीन मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरील सभामंडप छताला शिल्प पट्टीका बसवलेले आहे. आतील गाभारा असलेल्या दाराच्या माथ्यावर शेषयायी विष्णू व परिवाराचे अप्रतिम कोरीव शिल्प आहे. मूषकवाहन मकर-रति, अशा अनेक कोरीव प्रतिमा येथील पाषाणावर आढळतात. या मंदिराला `नागेश्वराचे मंदिर' असेही म्हणतात. या गावातून दोन वाटा गडावर जातात. १. एक वाट ही टोलार खिंडीतून गडावर सुमारे ३ तासात मंदिरापर्यंत पोहचते. २. दुसरी वाट ही राजदरवाजाची वाट आहे. ही वाट पूर्वी प्रचलित होती. आता मात्र वाटाड्याशिवाय या वाटेने गडावर जाऊ नये. या वाटेने आपण गडाच्या जुन्नर दरवाज्यापाशी पोहचतो. या मार्गाने जाताना गावातील विहिरीतून पाणी भरून घेतले पाहिजे कारण वाटेत कुठेच पाणी नाही. नगर जिल्ह्यातून : हरिश्चंद्रगडावर जाण्याची एक वाट ही नगर जिल्ह्यातून आहे. यासाठी मुंबई-नाशिक हमरस्त्यावरील घोटी या गावी उतरावे. तिथून संगमनेर मार्गावरील राजूर या गावी जावे. राजूरवरून गडावर दोन मार्गांनी चढाई करता येते. १. राजुर-पाचनई अशी बससेवा उपलब्ध आहे. हे अंतर सुमारे २९ कि.मी. भरते. पाचनई हे गडाच्या पायथ्याचे गाव असून येथून गड गाठण्यास सुमारे ३ तास लागतात. वाट फारच सोपी आहे. पाचनई ते हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर हे अंतर सुमारे ६ कि.मी. आहे. २. हल्लीच राजूर ते टोलारखिंड अशी खाजगी वाहनसेवा उपलब्ध झाली आहे. राजूर, अंबीट, पाचनई, मूळा नदीच्या खोऱ्यातून, धनचक्कर या बालेश्वर रांगेतील टेकाडास वळसा घालून ही वाट टोलारखिंडीत पोहचते. ही वाट सरळ एक तासात टोलारखिंडीत घेऊन जाते. समोरच एक व्याघ्रशिल्प आढळते. येथून वर जाणारा रस्ता हा दमछाक करणारा आहे. येथून २ तासात मंदिरात पोहचता येते. सावर्णे-बेलपाडा-साधले असा घाटमार्ग : गड सर करण्यासाठी एक सावर्णे-बेलपाडा-साधले असा घाटामार्ग आहे. परंतु हा मार्ग फारच अवघड असल्याने प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असलेल्यांनीच हा मार्ग अवलंबाना. या मार्गे येण्यासाठी कल्याण-मुरबाड मार्गे माळ्शेजघाट चालू होण्यापूर्वी सावर्णेगावात उतरावे. येथून `बेलपाडा' या कोकणकड्याच्या पायथ्याच्या गावात यावे. येथून कड्यातून काढलेल्या साधले घाटाच्या सहाय्याने कोकणकड्याच्या पठारावर जाता येते. या वाटेने मंदिर गाठण्यास सुमारे दीड दिवस लागतो. या वाटेलाच `नळीची वाट' असेही म्हणतात. राहण्याची सोय : गडावर हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या मागच्या गुहेत आणि गणेशगुहा व आजुबाजूच्या गुहेत सहता येते. जेवणाची सोय : जेवणाची सोय गडावर जेवणाची सोय उपलब्ध आहे. पाण्याची सोय : पाणी विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. जाण्यासाठी लागणारा वेळ : खिरेश्वर मार्गे ४ तास तर पाचनई मार्गे ३ तास लागतात.

http://sahayadriratna.blogspot.com/


सह्याद्रीतलं नंदनवन: करोली घाट, सांधण घळ अन् रतनगड ते हरिश्चंद्रगड

DiscoverSahyadri

हरिश्चंद्रगड परिक्रमा - जुना माळशेज घाट, काळूचा वोघ, सादडे घाट, कोकणकडा, जुन्नर दरवाजा (राजनाळ)


लाभले आम्हांस भाग्य, की जन्म झाला सह्याद्रीच्या कुशीत...
लाभले आम्हांस भाग्य, की शिव-सह्याद्री आराध्य दैवत म्हणून लाभले...
लाभले आम्हांस भाग्य, की सह्याद्रीच्या आडवाटांच्या भटकंतीचं ‘वेड’ मनी रुजलं, अंगी भिनलं...
लाभले आम्हांस भाग्य, की सह्याद्रीच्या भूगोलासोबतच इथल्या मातीतल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाच्या आणि संस्कृतीच्या पाऊलखुणा म्हणजेच दुर्ग-लेणी-मंदिरे-घाटवाटा धुंडाळण्यात निखळ आनंद मिळू लागला... 
     
... आणि, याच आनंदाच्या ध्यासापायी गेले कित्येक दिवस एका भन्नाट ट्रेकचा बेत शिजत होता. ज्याप्रमाणे भाविक लोक एखाद्या पवित्र नदी-मंदिर-पर्वताची श्रद्धायुक्त अंत:करणाने परिक्रमा करतात, त्याचप्रमाणे आम्ही ट्रेक-परिक्रमा करणार होतो शिव-सह्याद्रीचं मनस्वी दर्शन घडवणाऱ्या ‘हरिश्चंद्रगडा’ची. अर्थातच, नेहेमीच्या रुळलेल्या वाटांवरून खिरेश्वर किंवा पाचनई गावातून करायचा हा ट्रेक नव्हता. तर 'प्रगतं दक्षिणमिति प्रदक्षिणं’ या वचनानुसार आम्ही दक्षिणेकडून (डावीकडून) गडाला सुरुवात करून प्रदक्षिणा घालणार होतो. हरिश्चंद्रगडाची अनुभूती घेणार होतो - ‘जुन्या माळशेज’ घाटवाटेतून, ‘काळूच्या वोघा’जवळून, पश्चिमेच्या बेलपाडा गावातून, उत्तरेच्या ‘सादडे घाटा’तून, गडाच्या कोकणकड्यावरून आणि आग्नेयेच्या ‘जुन्नर द्वारातून राजनाळे’तून. बेत होता तीन दिवसांच्या खडतर परिक्रमेचा, पण साकेत आणि मिलिंद हे कसलेले ट्रेकरदोस्त सोबत असल्यामुळे ही परिक्रमा आनंददायी होणार याची खात्री होती.
         

(छायाचित्र: दौन्ड्या डोंगरावरून हरिश्चंद्रगड. साभार: श्री. अनुप अचलेरे)

माळशेज पठारावरून हरिश्चंद्रचं मनोहारी दर्शन
.... अवसरी घाटात ढाब्यातलं जेवण, नारायणगावचं ‘एक्स्ट्रा-मलई-मारके’ मसाला दूध आणि खुबी फाट्यावर कडक चहामुळे ट्रेकच्या आदल्या रात्रीचा गाडीप्रवास सुसह्य झाला. मुक्कामाला हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी खिरेश्वर गावी पोहोचेपर्यंत मध्यरात्र झाली. चिंतामण कवटे यांच्या ‘ऐश्वर्या’ नामक घरगुती हॉटेलपाशी मुक्काम आणि गाडीपार्किंगची सोय झाली. गावात मुक्कामाला असलेल्या बेशिस्त टूरीस्टांचा कोलाहल आणि दणदणीत थंडी यांच्याकडे दुर्लक्ष करत स्लीपिंगबॅगमध्ये गुरफटलो.

उजाडला परिक्रमेचा पहिला दिवस! आजचा पल्ला दमदार होता. दक्षिणेकडील ‘जुन्या माळशेज’ घाटाच्या पाऊलवाटेवरून, गडाच्या पोटातल्या ‘काळूचा वोघ’ धबधब्याजवळून आणि खोरं ओलांडून पश्चिमेकडून बेलपाडा गावातून गडाचं दर्शन घ्यायचं होतं. सकाळी साडेसहा वाजता पाठीवरच्या भल्याथोरल्या सॅक्स चढवल्या आणि खिरेश्वरच्या प्राचीन राऊळातल्या नागेश्वर महादेवाला वंदन करून हरिश्चंद्राच्या परिक्रमेचा शुभारंभ केला. उभ्या-आडव्या पसरलेल्या डोंगरवाटांनी भटकून, आता थेट तीन दिवसांनंतर आम्ही खिरेश्वरला परतणार होतो.
             


गडाच्या दक्षिण पायथ्याशी असलेल्या पठारावरून प्रदक्षिणा घालत निघालो. दमदार ब्रेकफास्ट करून निघाल्याने पायगाडी मस्त दौडवली. नागेश्वर राऊळ आणि शेजारच्या कातळकोरीव लेण्यापासून माळशेज घाटाकडे जाणारी पाऊलवाट आम्ही निवडली होती. वाटेतल्या कातळावरचं कोरलेलं शिवलिंग बघता, ही वाट पुरातन काळापासून वापरात असणार असं वाटलं. दीडतासाची पठारावरून चाल, पण किती मनोहारी. पूर्वेला सूर्य अजूनही निरोळी-रांजणाच्या डोंगरांमागे दडलेला. तरीही, हरिश्चंद्रगडाच्या शिखरांचे (हरिश्चंद्र-तारामती-रोहिदास) माथे हलकेच उजळू लागलेले. वाटेवरून कधी दिसलं गडाचं देखणं प्रतिबिंब पुष्पावती नदीतल्या पात्रात, तर कधी गड उठून दिसला वाऱ्यावर डोलणाऱ्या सोनसळी गवताळ पठारामागे. कधी खिळवून ठेवलं तळ्याच्या काठी उमललेल्या निळ्या मंजिऱ्या, पोहोणारी बदकं आणि मागे गडाच्या विस्तृत पॅनोरमाने. आमच्या परिक्रमेची सुरुवात अशी प्रसन्न झालेली...

     
माळशेज जुन्या घाटवाटेवरून हरिश्चंद्रचं सर्वांगसुंदर दर्शन
घाटमाथ्यापासून कोकणात उतरणाऱ्या माळशेज घाटाचा ‘गाडीरस्ता’ बनायच्या काहीशे वर्षे आधीपासून वापरात होती ‘जुन्या माळशेज’ घाटाची पाऊलवाट. मराठ्यांच्या वसई मोहिमेत या घाटातून भिवंडीकडे सैन्य गेल्याचे अनेक उल्लेख आढळतात. त्यामुळे हरिश्चंद्रच्या परिक्रमेत या पुरातन घाटवाटेने उतरतण्यासाठी आम्ही आतुर झालेलो. घाटापाशी पोहोचण्यासाठी खुबी गावापासून महामार्गावरून कल्याणच्या दिशेने चालत निघालो. उधळ्या, घोण्या, भोजगिरी, दौंड्या-देवदांड्या अश्या सह्यमाथ्याच्या अजस्त्र डोंगरांच्या कुशीतल्या निवांत शांत घळीत दडलेल्या घाटदेवाच्या राऊळापाशी विसावलो, तेंव्हा जुनी घाटवाट सापडणार का असा प्रश्न पडलेला. 


राऊळापासून परत महामार्गावर आलो, तेंव्हा डावीकडे होतं रस्त्याचं लपेटदार वळण, तर उजवीकडे होतं पर्यटन महामंडळाच्या विश्रामगृहाच्या (MTDC) प्रवेशद्वार. समोर घाटाचा लोखंडी सुरक्षा कठडा (गार्डरेल) किंचित मोकळा ठेवला होता आणि इथूनच होती माळशेजच्या जुन्या घाटवाटेची सुरुवात! 

खडकां-झुडूपांमधून उतार उतरू लागलो आणि लवकरच सुरू झाली दगड घट्ट बसवून बनवलेली फरसबंदीची मोठ्ठी मोकळी-ढाकळी जुनी घाटवाट आणि दिशादर्शक बाण. काही वर्षांपूर्वी गच्च कारवीच्या रानात हरवू पाहणारी ही वाट अलिकडेच वनखात्याने वाट मोकळी केली होती. समोर दिसणारी माळशेजच्या गाडीरस्त्याची वळणे आणि निरीक्षणे-टोके उंचावत गेली. वाट आता झपाट्याने डावीकडे (दक्षिणेला) माळशेज घाटाच्या मुख्य दरीच्या कुशीत शिरू लागली. वायव्येकडे उघडत जाणाऱ्या या दरीमधला ओढा पावसाळ्यात काय सणसणीत वाहत असेल. माथ्यापासून १०० मी उतरल्यावर कातळात कोरलेल्या खोबण्या आणि पायऱ्या लागल्या. 


उजवीकडे ओढ्यापाशी उतरल्यावर खुणावत होतं अजस्त्र खडकांच्या कुशीतलं उंबराचं झाड - डवरलेलं, झुकलेलं. खोबणीत होता निखळ थंड पाण्याचा स्त्रोत. माळशेजच्या उंचचउंच कड्यांच्या पोटातल्या दाट झाडीतली नीरव शांतता अनुभवली.


थोडं पुढे उभ्या खडकाळ उतरंडीवरून उतरताना जुन्या घाटवाटेच्या पाऊलखुणा सामोऱ्या आल्या. खोदीव पायऱ्या उतरत गेल्यावर उजवीकडच्या कातळात होती शेंदूरचर्चित गणेशमूर्ती आणि चंद्र-सूर्याची महिरप असलेली छत्री. 


पल्याड उंचावर कातळात होतं खोलवर खोदत नेलेल्या थंड पाण्याचं टाकं आणि त्याच्याबाजूला आणखी एक अर्धवट खोदाई सोडलेलं टाकं! कित्येकशे वर्षे सैन्य-व्यापार-वाटसरू यांना उपयुक्त असलेली पुरातन वहिवाट आजच्या व्यावहारिक गरजांसाठी निकामी झाली होती. जुन्या वाटेचं कवतिक आता फक्त लाकूडतोडे, गुराखी, शिकारी आणि चुकूनमाकून फिरकणाऱ्या कोण्या ट्रेकर्सना!


सकाळी निघाल्यापासून अडीच तास आणि माथ्यावरून घाट उतरायला सुरुवात केल्यापासून अर्धा तास झालेला. खजूर-चिक्की-फळांचा खुराक घेऊन आणि टाक्यातलं गोड गार पाणी पिऊन टीम तरतरीत झाली. माळशेज घाटरस्त्यालगतच्या मुख्य ओढ्याच्या उजव्या काठावरून दाट झाडीच्या टप्प्यांतून आता वाट झपाट्याने उतरू लागली. माळशेज घाटरस्त्यात बेताल पर्यटकांनी अव्याहत फेकलेला तऱ्हेतऱ्हेचा कचरा याच ओढ्यातून इतक्या लांब वाहत आलेला, साचत राहिलेला, विषण्ण करून गेला! 

फरसबंद मोठ्ठ्या पाऊलवाटेवरून लांबलचक वळणं घेत उतरणाऱ्या वाटेवर झुकलेल्या झाडोऱ्यावर भल्या मोठ्ठ्या कोळ्यांनी जाळं विणलेली. अजूनही काही ठिकाणी कातळकोरीव पायऱ्या होत्या. गच्च जंगलातून निवांत रुंद वाट ओढ्यात रेंगाळलेल्या पाण्यापाशी थबकली. दोन तासात माळशेज घाटाची ६०० मी उतराई केल्यावर पायथ्याशी निसर्ग आणि तथाकथित विकास यातली विसंगती अंगावर आली – एकीकडे सह्याद्रीचं विराट दृश्य, तर दुसरीकडे रान कापून रस्ते-रिसॉर्टचा भस्म्या आणि गुंठामंत्रांच्या स्कोर्पिओ! 

ओढ्यातल्या रांजणकुंडांच्या नक्षीजवळून चालताना हरिश्चंद्राची उंची आणि विस्तार नजरेत मावेना. गडाची कोकणात कोसळलेली कातळभिंत आणि तारामती-रोहिदास शिखरं कोवळ्या उन्हांत न्हाऊन निघत होती. वाघराच्या शेंदूर फासलेल्या शिल्पाच्या बाजूने, मोकळ्या पठारावरून जीपरस्ता अर्ध्या तासात थिटबी गावाकडे घेऊन जाणार होता. डावीकडे झाडोऱ्यात घाटाचं रक्षण करणाऱ्या मारुतीचं ठाणं, त्याच्या पूर्वेला एक कबर. घाटाकडे जाणाऱ्या वाटेवर खडकात व्याघ्र-चंद्र-सूर्य अश्या निसर्गदेवता खोदलेल्या. कोरलेल्या व्याघ्राचे लांब पाय, लपेटदार शेपूट आणि टवकारलेले कान रानच्या राजाचा रुबाब आणि दरारा दाखवणारे. 


माळशेजच्या जुन्या महत्त्वाच्या घाटवाटेवरून उतराई करत आम्ही हरिश्चंद्र-दर्शन घेतलं होतं. असा हा परिक्रमेचा पहिला टप्पा आम्हांला सुखावून गेलेला... 

काळूच्या वोघापासून हरिश्चंद्रचं रौद्रविराट दर्शन
माळशेज घाटाच्या पश्चिम कातळकड्यामध्ये एक निसर्गनवल दडलंय – ‘काळूचा वोघ’ नावाचा अजस्त्र धबधबा. धबाबा तोय आदळून धबधब्याच्या पोटापाशी बनलेला ‘वोघ’ (म्हणजे घळ) आणि रांजणखळगे बघण्याची उत्सुकता होती. थिटबी गावामध्ये सॅक्स ठेवून परत एकदा आल्या वाटेने पूर्वेला सह्याद्रीकडे निघालो. माळशेजघाटाची जी जुनी पाऊलवाट आम्ही उतरलो होतो, त्याच्या उत्तरेला (डावीकडे) ‘काळूचा वोघ’ असणार होता. घाटाकडे जाणारा कच्चा रस्ता सोडून डावीकडील रानातल्या वाटेने निघालो. एव्हाना ऊन तापायला लागलेलं आणि वारं पडलेलं. दोन कोरडे ओढे पार केले आणि समोरचं दृश्य बदलू लागलं. सह्याद्रीच्या भिंतीच्या जवळ-जवळ जाणारी वळणां-वळणांची हलक्या चढाईची वाट आता काळूच्या मुख्य मोठ्ठ्या ओढ्याच्या पात्रात उतरली. समोर होता अक्षरश: थ-रा-रू-न टाकणारा पॅनोरमा. हरिश्चंद्रगडाची शिखरे आभाळात घुसलेली. डावीकडे मागे अफाट उंचीची रोहिदास-तारामती शिखरे, रोहिदासजवळचा सुळका ‘काट्याची लिंगी’ आणि समोरचे अजस्त्र धबधबे - डावीकडचा ‘काळूचा वोघ’ आणि उजवीकडचा ‘रेठीचा झुरा’. 


आता आम्ही ओढ्याच्या पात्रामधून डाव्या बाजूने चढत काळूच्या वोघाजवळ पोहोचलो. थिटबी गावातून सॅक्स न घेता काळूच्या वोघापाशी पोहोचायला तासभर लागलेला. समोर होता घाटमाथ्यापासून पाच टप्प्यांमध्ये उतरणारा अजस्त्र धबधबा - काळूचा वोघ आणि पाण्याने दोहोबाजूचा कातळ कातून बनवलेली रांजणकुंडं आणि एक जबरदस्त घळ - २५०-३०० फूट लांब आणि ७०-८० फूट खोलीची. 


रौद्रविराट सह्याद्रीच्या दर्शनाने भारावून गेलेलो. पावसाळ्यात धबाबा कोसळणाऱ्या जलौघाचं काय देखणं तांडव असेल इथे! आता मात्र डिसेंबरमध्ये आम्ही कातळाला पाठ टेकून, खळाळणाऱ्या अल्लड पाण्याच्या झऱ्याचा नाद आणि हलक्या वाऱ्यासोबत घुमत येणारा कारवीचा मंद सुवास अनुभवत होतो... 


बेलपाड्यातून डोळ्याचं पारणं फेडणारा कोकणकडा
आता गाठायचा होता हरिश्चंद्रच्या परीक्रमेतला पुढचा टप्पा! थिटबी गावातून माळशेजच्या सुपाच्या आकाराच्या खोऱ्यातून उत्तरेला जात हरिश्चंद्रगडच्या रोहिदास शिखराच्या पायथ्याची डोंगरसोंड चढून पल्याडच्या खोऱ्यात उतरायचं होतं. दुपारचे अडीच वाजलेले. भूक लागलेली. अनायासे समोर आलेलं नदीचं गारेगार पात्र, रेंगाळलेल्या पाण्याची साथ आणि गर्द सावलीचं आवताण नाकारणं शक्यच नव्हतं. काठाशी शिदोरी सोडली अन दोन घास खाऊन घेतले. नदीच्या पाण्यापल्याडच्या उभ्या दरडीवरून उतरणाऱ्या, आणि आपल्याच प्रतिबिंबाने दचकून घसरणाऱ्या शेरडाची गंमत बघत विश्रांती घेतली. 

काळू नदीपासून मुक्कामाचं बेलपाडा गाव गाठण्यासाठी, आमच्या चालीने अजून दोन तास लागणार होते. रोहिदास शिखराच्या पश्चिमेला उतरणाऱ्या सोंडेवर नक्की कुठे चढायचं म्हणजे पल्याडच्या खोऱ्यात उतरणारी वाट मिळेल, ते एका गुराखी आजानं समजावून सांगितलं. सपाटीवरची शेताडी पार करून खिंडीकडे चढणारी योग्य वाट शोधली. आम्ही होतो रोहिदास शिखराच्या अगदी पायथ्याशी. खरंतर, हरिश्चंद्रगडावरून रोहिदास शिखराची उंची कळत नाही. इथून तळातून बघताना मात्र त्याचे एकावर एक रचल्यासारखे दिसणारे कातळ-झाडीभरले टप्पे आणि वरचा कातळमाथा बघताना मान अवघडली.


एव्हाना रोहिदासच्या सोंडेवर चढताना आमची टीम धापा टाकू लागलेली. उभा तीव्र चढ, दिवसभराचे श्रम आणि पाठीवरच्या वजनदार सॅक्समुळे वेग मंदावलेला. आधी काही काळ कोकणातल्या आर्द्रतेमुळे घामानं निथळत होतो. पुढेतर वेळोवेळी पाणी पिऊनही घाम न येता, नुस्तंच इंजिन तापायला लागलं. रोहिदास शिखरापासून उतरणाऱ्या सोंडेवर कसंबसं पोहोचलो होतो. शरीर काय सिग्नल्स देतंय, त्याचा अंदाज घेऊन सक्तीचा ब्रेक घेतला. पाण्यासोबत संत्री-खजूर-चिक्की-राजगिरा असा शक्तीदायक पण हेल्दी खाऊ घेतला. 

आता पल्याड खोऱ्यातून हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्याच्या दर्शनाची विलक्षण आस लागलेली. उतारावरच्या झाडीभरल्या वाटेमुळे अजूनही कुठलं दृश्य दिसलं नव्हतं. जास्तीत जास्त जलद निघालो. एका क्षणी मळलेली वाट मोकळवनात आली आणि समोर उलगडलेल्या नजऱ्याने आम्ही अक्षरश: स्पीचलेस!!!  ...ओढ्यापाशी रेंगाळलेलं पाणी, उंबरांनी लगडून झुकलेली झाडाची फांदी, घरी परतणाऱ्या गायी आणि सोनेरी गवताळ उतारांमागे मावळतीच्या सूर्यकिरणांनी उजळून काढलेला कोकणकडा आणि आकाशाला भिडलेली कोंबडा-न्हाप्ता-रोहिदास शिखरं!!!

          
....ट्रेकर्सना मदत करणाऱ्या बेलपाड्यातल्या ‘कमळू पोकळे’च्या घरी मुक्कामाची झक्क सोय झालेली. रानोमाळ भटकलेल्या ट्रेकर्सना गर्रम पाण्याच्या अंघोळी, घरगुती जेवण आणि विश्रांतीमुळे तरतरी आली. 


दऱ्याकड्यांची, ऊन्हावाऱ्याची, रानझाडीची, दमवणाऱ्या-सुखावणाऱ्या रानवाटांची दृश्यं स्वप्नातही रुंजी घालत होती. पहाटे खणखणीत आवाजात कोंबडेबुवा आरवू लागले आणि साखरझोपेतून हलकेच जाग आली. घरासमोर सारवलेल्या अंगणात आलो. बाहेर मिट्ट काळोख आणि दूरवरून घुमत येणारा पहाट भूपाळीचा मृदुंग. अंगावर काटा आला मंद थंडीमुळे आणि समोरच्या दृश्यानेही. कारण, पूर्वेला होती चांदण्या रातीनं मढवलेल्या आभाळाला छेदत जाणारी भव्य कोकणकड्याची अंधुक धूसर अंतर्वक्र रेषा!!! 

न्हाप्ता शिखराचं वि-रा-ट दर्शन आणि कसदार चढाईने तृप्त करणारा सादडे घाट
परिक्रमेच्या दुसऱ्या दिवसाची आता ओढ लागलेली. मजबूत न्याहारी करून सकाळी सातच्या आत आम्ही कूच केलं. हरिश्चंद्रगडाच्या उत्तरेला असलेल्या अजस्त्र न्हाप्ता (नकटा) शिखराच्या पोटातून “सादडे घाटा”ने (याला ‘साधले घाट’ असंही म्हणतात) चढाई करून सह्याद्रीमाथा आणि पुढे मुक्कामासाठी हरिश्चंद्रगडाची चढाई – अशी भरपूर चढाई वाट पाहत होती. 


बेलपाडा गावातून बाहेर पडल्यावर सह्याद्रीतलं एका सर्वोत्तम दृश्य सामोरं आलं. पॅनोरमामध्ये उजवीकडे कोकणकड्याचं आणि डावीकडे त्याचा तालेवार सोबती ‘न्हाप्ता’ शिखराचं - अशी दोन अर्धवर्तुळाकार खोरी दिसत होती. घोडीसुळके, अजस्त्र न्हाप्ता शिखर, सादडे घाटाची खिंड, कोंबडा शिखर, उतरणाऱ्या सोंडेवरचा केळेवाडी सुळका, कोकणकड्याची गूढ धूसर कातळभिंत आणि रोहिदास शिखर अश्या अतिभव्य दृश्याने अक्षरशः वेड लावलं. 


भुऱ्या गवताळ माळावरून-झुडुपांमधून जाणारी, वाहत्या ओहोळांशी लगट करणारी हलक्या चढउताराची मळलेली वाट न्हाप्ता शिखराच्या पायथ्याशी घेऊन गेली. अवघं खोरं साखरझोपेत हरवलं असताना, सूर्याची हलकी नाजूक किरणं न्हाप्ताच्या माथ्याला अलगद उजळवू लागली. एकावर एक रचलेले कातळटप्पे, भुरे गवताचे-झाडी टप्पे आणि अतिशय दिमाखात तोऱ्यात उठवलेलं माथ्याचं नाकाड हे दृश्य बघून अंगावर सुखद शहारा आला. 

बेलपाड्यातून निघाल्यापासून निवांत चालीने तासभर चालल्यावर एका मोठ्या ओढ्याशी पोहोचलो होतो. “आसं बगा, त्यो ओढा गावला ना, की गेलात तुमी सरळ सादड्याच्या वाटेनं. बाकी रानात जाणाऱ्या इतर ढोरवाटांवर हरवू नका”, असं गावकर्यांनी बजावलं होतं. न्हाप्ताच्या पूर्वेला कातळभिंतीतली सर्वात कमी उंचीची जागा म्हणजे सादडेघाट. तिथल्या खिंडीच्या दिशेने ओढ्याला लगटून घाटवाट चढणार होती. 


घाटाच्या सुरुवातीला हळूहळू चढणारी प्रशस्त वाट होती. सकाळची वेळ. कारवीचा किंचित तिखट गंध आणि अनवट पक्ष्यांचे सूर आसमंतात घुमत होते. प्रत्येक क्षणी थबकून निरखावेसे वाटावे अशी न्हाप्ता शिखराची रूपं अनुभवत होतो. ओढ्याच्या बाजूने चढत अर्ध्या तासात पदरातल्या मोकळवनात पोहोचलो. कातळाला पाठ टेकवून हाताची उशी करून पडल्यावर समोर होतं सुरेख दृश्य - कोकणकड्याच्या कोंबडा शिखराकडून उतरणारी करवती धार, केळेवाडी सुळका, सादडे घाटाची झाडीभरली खिंड आणि न्हाप्ता शिखराचा उभी भिंत! एव्हाना आम्हांला चढाईची मस्त लय गवसलेली आणि अधूनमधून चिक्की-फळं-खजूर असा हेल्दी खुराक चालू होताच. त्यामुळे, सह्याद्रीतल्या एका सुरेख घाटाच्या चढाईची मजा अनुभवत होतो. 

वाऱ्यावर डोलणाऱ्या सोनेरी गवताच्या दांडावरून उभी चढाई सुरू झाली. कातळात खोदलेल्या दोन-चार पायऱ्या बघून ही घाटवाट पुरातन आहे, याची खात्री पटली. घनदाट झाडीतून, मोठ्ठाल्या कातळांच्या बाजूने आणि नुकताच बहर येवून गेलेल्या कारवीच्या झुडुपांमधून वळणे घेत चढाई चालू होती. ओढ्याच्या पात्रातल्या कातळापाशी फुलपाखरांची अन मधमाश्यांची लगबग चाललेली दिसली. निरखून बघितलं, तर कातळाच्या ओंजळभर खोबणीत नितळ थंड पाण्याचा स्त्रोत होता. सादडे घाटात ६०% उंचीवर असलेला हा पाणीसाठा साधारणत: जानेवारीपर्यंत ट्रेकर्सना आधार देतो.


उभ्या उताराच्या वळणवाटेवर दगड घट्ट बसवून फरसबंदीची उभी वाट चढताना घामटं निघू लागलं. आता यापुढची चढाई बऱ्यापैकी ओढ्यातूनच होती. ओढ्यातून डावीकडे जाणारी उभ्या धारेवरची वाट घाटमाथ्याकडे पेठेच्या वाडीकडे जाते. साकेत आणि मिलिंदने ओढ्याच्या उजव्या काठावरून चढणारी आणि पुढे खिंडीतून पाचनईकडे नेणारी वाट अचूक पकडली. मी मात्र डोंगरउतारावरून माती-धोंडे-काटक्यांमधून धस्सक-फस्सक करत उगा जीवाला त्रास करून घेतला. मग योग्य वाट गाठल्यावर क्षणभर विश्रांती घेतली. ऊर धपापत होतं - चढाईमुळे आणि समोरच्या दृश्यानेही. गच्च झाडीतून चढत कसं आणि कित्ती चढलो याचा आलेख डोळ्यांसमोर होता. निळंशार आभाळ, हिरवंगर्द कारवीचं रान आणि काळ्या कातळाच्या पार्श्वभूमीवर न्हाप्ता शिखर, त्याचे पूर्वेकडचे कडे, जोडशिखरे आणि माथ्याजवळचं छोटंसं नेढं भन्नाट दिसत होते. 


आता सादडे घाटाची नाळ सुरू झाली. दोहोबाजूच्या उंचच उंच कातळभिंतींमधून अजस्त्र धोंड्यांच्या राशीवरून चढत गेलो. पावसाळ्यात धबाबा तोय आदळून बनलेल्या खोलगट घळीतून चढताना क्वचित खोदलेल्या पायऱ्या कवतिकाने निरखल्या.


अखेरीस पोहोचलो सादडे घाटाच्या खिंडीत - सह्यघाटमाथ्यावर. बेलपाड्यातून निघाल्यापासून इथे पोहोचायला चार तास लागलेले. खिंडीत कातळावर बसून भर्राट वारं खाताना ऊर धपापलेलं, घामाने गच्च भिजलेलो; पण न्हाप्ता शिखराच्या अ-ज-स्त्र दर्शनाने अग्गदी तृप्त झालेलो. सादडे घाट फक्त ट्रेकर्ससाठी. उभ्या चढाईची, पण वापरातली पाऊलवाट आहे. कोठेच दोर किंवा इतर उपकरणांची गरज नाही. हरिश्चंद्रगडाच्या परीक्रमेतला महत्त्वाचा टप्पा गाठलेला. ट्रेकचा उत्तरार्ध सुरू झाला... 


कोकणकड्याचं रौद्र दर्शन घडवणारी हरिश्चंद्राची चढाई
हरिश्चंद्रगडाची परिक्रमा करताना आता आम्हांला पोहोचायचं होतं थेट गडावरच. पाचनईच्या नेहेमीच्या वाटेपेक्षा आम्ही शोधणार होतो, कोंबडा शिखराजवळून थेट कोकणकड्याकडे चढणारी आडवाट! 

सादडे घाटाच्या खिंडीतून पूर्वेला सदाहरित रानातून उतरणारी वाट पकडली. वाहत्या झऱ्याच्या शेजारून उतरत १० मिनिटात गवताळ माळावर आलो, अन समोर आला मुळा खोऱ्यातून घुमणारा वारा. डावीकडे उत्तरेला कलाडगड आणि ‘कलाडचा कोंबडा’ नावाचा सुळका, वनखात्याचा निरीक्षण मनोरा, उजवीकडे दक्षिणेला अस्ताव्यस्त पसरलेला हरिश्चंद्र पर्वत आणि कोंबड्याचा तुरा असावा अश्या आकाराचं गडाचं ‘कोंबडा’ शिखर. वाट कशी असेल याचा अंदाज घेऊन, वाटांच्या चौकापासून उजवीकडे दक्षिणेला वळलो. वाऱ्याने पठारावर डोलणारे गवत, मध्येच कातळाची सपाटी, रेंगाळलेले पाण्याचे ओहोळ, रानफुलांची दुलई अशी गवताळ माळावरची परिसंस्था (ecosystem) अनुभवत तासभर सुरेख चाल होती. पाणथळ भागापाशी शेरळाच्या फुलांची तुरे, शेताच्या खळ्याशेजारी शेंदूरचर्चित रानदेवाचं ठाणं आणि पल्याड वाहत्या ओहोळापाशी गारेगार सावली होती. खादाडी, थोडकी विश्रांती आणि गप्पाष्टकासाठी परफेक्ट स्पॉट! 

मंजिऱ्याच्या तणांच्या दुलईमागे कोंबडा आणि त्याची झाडीभरली खिंड खुणावत होते. थेट खिंडीची दिशा पकडून माळ तुडवत निघालो. 


खिंडीकडे चढणाऱ्या वाटेची सुरुवात किंचित शोधावी लागली. आणि, गच्च सदाहरित जंगलातून ओढ्याच्या उजवीकडून कारवीतून चढणारी सुरेख मळलेली वाट लागली. खिंडीत पोहोचलो आणि लक्षात आलं, की कोकणकड्याशेजारून ट्रेकर्समध्ये प्रसिद्ध असलेली ‘नळीची वाट’ जिथे घाटमाथ्यावर पोहोचते त्याच खिंडीत आम्ही पोहोचलेलो. 


पश्चिमेकडील काळू नदीच्या आणि पूर्वेच्या मुळा नदीच्या खोऱ्याच्या दृश्याने थकवा कुठच्या कुठे पळून गेला. एकीकडे नळीच्या थरारक वाटेचं आणि रोहिदास शिखराचे दर्शन; तर दुसरीकडे मुळा खोऱ्यातून झाडीतून चढून आलेली वाट! आता गडावर पोहोचण्यासाठी १५० मी चढाई बाकी होती. कोंबड्याच्या भव्य कातळाकडे पाठ फिरवून, समोरच्या उतरंडीच्या कातळावर १० मी सोप्या श्रेणीचे कातळारोहण करायचं होतं. वाऱ्यामुळे सॅक हेलकावे घेत होती आणि ट्रेकर्सची भंबेरी उडवत होती. कातळ चढल्यावरच्या पठारावर डहाणीच्या तुर्यांवर मोहून भुंगे आणि मधमाश्या गुणगुणत होते. पठार पार करून झुडुपांमधून चढत, शेवटी कातळावरून आम्ही पोहोचलो हरिश्चंद्रगडावर! सादडे घाटातून निघाल्यापासून घाटमाथ्यावरच्या प्रसन्न वाटांनी अडीच तासात गडमाथा गाठलेला आणि समोर आलं अदभूत दर्शन कोकणकड्याचं....


कोकणकड्यावर अनुभवला नितांतसुंदर मुक्काम
रविवारची पर्यटकांची गर्दी ओसरू लागली आणि सख्या कोकणकड्यासोबत आम्हाला निवांत मोकळा वेळ मिळाला. सोनेरी उतरत्या उन्हात उजळलेल्या कोकणकड्याचं - एकाच वेळी हृदयाचा थरकाप उडवणारं आणि त्याचवेळी उत्कट मनस्वी आनंद देणारं - दृश्य अनुभवत निवांत तासनतास बसलो.


ट्रेकर्सना मदत करणाऱ्या भास्करकडे नेहेमीप्रमाणे मुक्काम होता. गडावर भास्कर नव्हता, पण यावेळी भेटला भास्करचा बाबा. शेवग्याच्या शेंगांची विलक्षण चवदार भाजी, तांदूळ-ज्वारी मिश्रित कडक भाकरी, पिठलं भात आणि ठेचा असं जगात भारी जेवण बाबाने आग्रह करकरून वाढलं. आजच्या कमर्शियल युगात भास्करच्या बाबाकडून मात्र जे निखळ मैत्र आणि प्रेम अनुभवलं, त्याला तोडंच नाही. मिश्कील, प्रेमळ, गप्पिष्ट, सारखं गदागदा हसणाऱ्या भास्करच्या बाबाने आमच्या मनात कायमचं घर केलं. 


जेवणं झाल्यावर परत कोकणकडा फक्त आमच्यासाठी मोकळा मिळाला. चंद्रप्रकाशात उजळलेल्या कोकणकड्यावर वाफाळलेल्या कॉफीच्या मगने हात शेकत, तारांगणातल्या उल्का धुंडाळत आणि दूरवरच्या धूसर गूढ शिखरांची टोकं न्याहाळण्यात कसला आनंद आहे, हे समजायला ट्रेकरचं काळीज हवं...

राजनाळेमधून जुन्नर दरवाज्याची भन्नाट उतराई
दिवस तिसरा. आज हरिश्चंद्रगड परिक्रमेची सांगता करण्यासाठी जुन्नर दरवाजाची आडवाट निवडलेली. कोकणकडा आणि भास्करच्या बाबाला अलविदा करून सातच्या आत पूर्वेला मंगळगंगेच्या काठावरचं कुळकुळीत काळ्या पाषाणातले भव्य हरिश्चंद्रेश्वर राऊळ गाठलं. 


विश्वामित्र-हरिश्चंद्राच्या पौराणिक कथेची पार्श्वभूमी असल्याने परिसरात लेणी-राऊळं-टाकी-शिलालेख-शिल्पे यांचा खजिना होता. समोरच्या पुष्करणीतलं पाणी ओंजळीत घेऊन एका गावकऱ्याने अर्घ्य वाहिला, अन पाण्यातल्या तारामती शिखराच्या प्रतिबिंबावर तरंग उमटले. 


आता आम्हांला हरिश्चंद्र शिखराजवळ चढून जुन्नर दरवाजाची वाट गाठायची होती. सूर्याची कोवळी किरणं दाट झाडीपासून निसटून गवतातून-कातळावरून जाणाऱ्या वाटेला बिलगू लागली. नेहेमीची खिरेश्वरची वाट सोडून उजवीकडे हरिश्चंद्र शिखराकडे चढणारी ठळक वाट घेतली. सुरेख कारवीतून, झुकलेल्या फांद्यांखालून चढत जाताना देखण्या मदम-पुष्पापाशी मधमाश्या गुणगुणत होत्या. 

हरिश्चंद्र आणि तारामती शिखरांना जोडणाऱ्या धारेवर पोहोचल्यावर, सकाळच्या कोवळ्या उन्हांत समोर आली काहीच्या काही अशक्य लँडस्केप्स. 


निळ्या आभाळात हलकेच विखुरलेले ढगाचे पुंजके, त्याचे क्षणाक्षणाला बदलत जाणारे रंग. 


उत्तरेला तालेवार दुर्ग-डोंगर - अलंग-कुलंग-मदन-कळसूबाई-कलाडगड-आजोबा-कात्राबाई-मुडा-गवळदेव-घनचक्कर-भैरवगड-पाबरगड-औंढा-पट्टा-बितन; पश्चिमेला नागफणीसारखं उठवलेलं तारामती आणि मागचं रोहिदास शिखर आणि दक्षिणेला सिंदोळा, निमगिरी, माळशेजची शिखरे, ढाकोबा, गोरख-मच्छिंद्र, हटकेश्वर आणि पिंपळगाव जोगा धरणाचं पाणी असं विलक्षण पॅनोरमा!!!


हरिश्चंद्र शिखराला डावीकडे ठेवून गेल्यावर, खोलवर घळीत डोकावणारी चिंचोळी आडवी वाट होती. हरिश्चंद्र शिखराच्या उतारावर कातळात कोरलेलं पाण्याचं टाकं, घराचं जोतं आणि खोदीव पायऱ्या न्याहाळल्या. पठारावरून डावीकडे पूर्वेला जात दक्षिणेला उतरणारी ‘राजनाळ’ गाठली. सकाळी कोकणकड्यापासून निघाल्यापासून गडदर्शन करत, इथे पोहोचायला २ तास लागलेले. 


आता दगड-धोंड्यातून अरुंद नाळेची उभी उतराई सुरू झाली. काही ठिकाणी उभ्या कातळाकडे तोंड करून उतरणं भाग होतं, तेंव्हा आजूबाजूच्या कातळातले गोल आधार खळगे सहजीच हातात येत होते. 


शिवलिंग आणि पूजक खोदलेले शिल्प, खोदलेल्या पायऱ्या, मेटाच्या जागा बघता, पूर्वी कदाचित हीच मुख्य वाट असेल असं वाटलं. 



नाळ संपून धोंडे भरलेला ओढा सुरू झाला, ओढ्यात झुडुपे सुरू झाली, डावीकडच्या धारेमधले आरपार छिद्र नेढे डोक्यावर आलं. मागे वळून हरिश्चंद्रच्या भव्य कातळकड्यांना डोळ्यात साठवलं आणि ओढा सोडून डावीकडची आडवी वाट पकडली. 

मोठ्ठी नैसर्गिक गुहा बाजूला ठेवत गच्च कारवीमधून पुढे धारेवर पोहोचलो. कोरांटीसारखी दिसणाऱ्या कारवीच्या जातीतल्या ‘आखरा’ नावाच्या झुडुपांमधून वाट होती. कमरेएवढ्या उंचीची ही झुडुपं अतिशय बोचत होती. चार वर्षांनी फुलणाऱ्या आखराचा मध औषधी असतो म्हणे. उभ्या धारेवरची घसारायुक्त उतराई केली. सुळकेवजा डोंगरास डावीकडून वळसा घालून आडव्या वाटेवरून कोरीव पावठ्या न्याहाळत ओढ्याजवळच्या गच्च झाडीत विसावलो. तापलेल्या उन्हांतल्या चालीने धाप लागलेल्या इंजिनला पाणी-ताक देवून थंड केलं. झाडीतून उतरणाऱ्या उभ्या वाटेने खिरेश्वर गावची सपाटी गाठली. हरीश्चंद्राच्या थरारक परीक्रमेची सांगता करणारी राजनाळ उतरायला आम्हाला तीन तास लागलेले... 

समृद्ध केलं होतं हरीश्चंद्राच्या परीक्रमेने...
परतीच्या वाटेवर निघालो, तरी तीन दिवसांच्या हरीश्चंद्राच्या परीक्रमेची दृश्यं दीठीपुढून हलेनात…
मंगळगंगा-मुळा-पुष्पावती नद्यांची गूढ खोरी...
विराटरौद्र अनुभूतीने थरारून टाकणारे कडे-सुळके, अन भारावून टाकणाऱ्या अजस्त्र डोंगरसोंडा...
भक्ती-योग-ज्ञान-वैराग्याची साधना झाल्याची साक्ष देणारी लेणी-मंदिरं-पुष्करणी-शिल्पे अन शिलालेख...
भोळ्या भाविकांना आधार देणारा हरिश्चंद्रेश्वर महादेव, लेण्यातला गणपतीबाप्पा अन गारेगार पाण्यातला केदारेश्वर...
जुन्या वहिवाटीच्या, पण आता हरवत चाललेल्या घाटवाटा...
जैववैविध्याने नटलेलं घनदाट अरण्य, अन मोहक फुलपाखरांच्या रंगांच्या छटा...
घाटमाथ्याचा भर्राट वारा, अन पठारावर सळसळणाऱ्या सोनेरी गवताच्या लाटा... 
गिरीमित्राचं निखळ प्रेम, आणि जिगरी ट्रेकमित्रांची साथ...
होतो थोडा दमलेला, पण होतो तृप्त आणि कृतज्ञ...

शिवसह्याद्रीचं स्मरण-दर्शन करण्यासाठी केलेली, ही होती आमची “हरिचंद्राची परिक्रमा”. 


------------------------------------
महत्त्वाच्या नोंदी:

१. पूर्वप्रकाशित: लोकप्रभा २२-एप्रिल-२०१६

२. छायाचित्रे: मिलिंद लिमये, साकेत गुडी, साईप्रकाश बेलसरे

३. कृतज्ञता: गुरुवर्य आनंद पाळंदे यांचे पुस्तक 'चढाई उतराई'

४. भौगोलिक स्थान: http://wikimapia.org/529306/Harishchandragad

५. सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असून, जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take nothing but memories.

६. ब्लॉगवरील सह्याद्रीची माहिती वाचून ट्रेक्स करण्याचे मुक्त हक्क सह्यभक्तांना.

ब्लॉगमधील लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित - @साईप्रकाश बेलसरे, २०१६. सर्व हक्क सुरक्षित.

पुन्हा एकदा नळीची वाट -

हरीश्चंद्रगड हा ट्रेकर्स आणि नॉन-ट्रेकर्स दोन्हीकडे प्रसिद्ध असलेला किल्ला आहे. बहुतेकांना तो परिचित आहे ते निसर्गाचा अविष्कार असलेल्या रौद्रभीषण कोकणकड्यामुळे, त्याच्या लांबच लांब न संपणारया खिरेश्वर / टोलार खिंडीच्या वाटेमुळे, किंवा अतिप्राचीन आणि शिल्पकलेचा उत्तम नमुना असणाऱ्या तेथील शिवमंदिरा मुळे. ह्या किल्ल्याचा विस्तार बघता त्याला एक किल्ला न म्हणता अनेक डोंगरांचा समूह म्हणणे जास्त योग्य राहील. विस्तार आणि उंची दोन्ही बाबतीत हा किल्ला भव्य म्हणावा असाच आहे. दक्षिणेला तारामती हे सर्वोच्च शिखर, बालेकिल्ला, पश्चिमेला कोकणकडा, पूर्वेला टोलार खिंड, मुख्य गडा पासून जरासे बाजूला पडलेले रोहिदास शिखर असा साधारण ह्याचा विस्तार आहे. हा किल्ला सह्याद्रीच्या मुख्य रांगेत ऐन घाट माथ्यावर वसलेला आहे. सह्याद्रीची एक उपशाखा, हरिश्चंद्र-बालाघाट सुरु होते ती इथेच. सह्याद्रीच्या मुख्य रांगेत असल्याने निसर्गाचे मनमोहक आणि तितकेच रौद्र असे दर्शन येथे घडते. पावसाळ्या दरम्यान निसर्गाचा चमत्कार, इंद्रवज्र, देखील येथे पाहायला मिळते.

भव्य विस्तारामुळे गडावर येणाऱ्या वाटा देखील बऱ्याच आहेत. त्यातील माळशेज घाटाच्या सुरवातीला उतरून खुबी-खिरेश्वर-टोलार खिंडी मार्गे येणारी वाट आणि पलीकडून पाचनई वरून येणारी तुलनेने सोपी वाट ह्या दोन वाटा बहुतेकांना परिचित आहेत. ह्या सोडून खिरेश्वर वरूनच जुन्नर दरवाज्यातून येणारी फारशी प्रचलित नसलेली वाट आहे. नियमित ट्रेकर्सना मात्र अजून एका वाटेचे खास आकर्षण नेहमीच असते ती म्हणजे ‘नळीची वाट’. हे नाव ऐकताच ट्रेकर्स मंडळीना वेगळेच स्फुरण चढते. ही वाट कोकणातून, बेलपाड्यातून, सुमारे १००० मीटर्स चढून कोकणकड्या पाशी येते. नळी म्हणजे दोन डोंगरांच्या मध्ये असणारी अरुंद जागा. ह्या वाटेची वैशिष्ट्ये म्हणजे मोठ मोठ्या खडकातून असणारी, प्रस्ताराचे ३-४ टप्पे असणारी, सुमारे ६०-७० अंशातील खडी चढण. तसेच कोकणातून थेट गडावर चढत असल्याने चढायला लागणारी १००० मीटर्स ची सलग उंची. एवढी सलग उंची सह्याद्रीत क्वचितच कुठे चढायला मिळते. ह्या सर्व वैशिष्ट्यांमुळे ह्या वाटेचे ट्रेकर्सना आकर्षण वाटल्यास नवल नाही.

Nalichi Waat

नळीच्या वाटेची सुरुवात
अशा ह्या आव्हानात्मक वाटेने गडावर पोहचायला क्षमते नुसार ५-६ ते अगदी ८-९ तास देखील लागू शकतात. मात्र ह्या वाटेने जाण्या साठी बरोबर माहितगार व्यक्ती आणि सुरक्षे साठी दोर असणे आवश्यक आहे. तसेच प्रस्तरारोहणाचा अगदी तांत्रिक नसला तरी प्राथमिक अनुभव असणे मात्र गरजेचे आहे. ह्या वाटेने जाताना कोकणकड्याचे भव्य रूप दिसते.

ह्या वैशिष्ट्यपूर्ण वाटेने हरिश्चंद्र गडावर जायचा योग अगदी अवचितपणे बराच लवकर आला. म्हणजे बरोबर ८ वर्षांपूर्वी आम्ही (तेव्हाच्या) सडाफटिंग मंडळींनी (मी, प्रशांत, ऋतुराज इ.) हरिश्चंद्रगडावर जायचा बेत आखला. नेहमीच्या वाटेने नको म्हणून जुन्नर दरवाजाने जाऊयात असे ठरले होते. पण अचानक कुठून तरी ‘नळीची वाट’ हा शब्द आला आणि ही वाट नक्की कशी आहे ह्याची काहीही माहिती नसताना बेत जुन्नर दरवाजावरून थेट नळीच्या वाटेवर आला. नळी च्या वाटेने आधी कोणी गेलेले नाही, वाटेच्या काठीन्य पातळीचा अंदाज नाही बरोबर पुरेशी सामुग्री नाही अशा परिस्थितीत काय काय होऊ शकते ते सर्व आम्ही अनुभवले. पुण्यातून निघाल्या पासूनच कोलमडलेले वेळापत्रक, बेलपाड्यात पोहचायलाच ३ वाजून गेले. तिथून भर उन्हात गच्च भरलेल्या पोटाने चढायला केलेली सुरवात, बरोबरच्या वाटाड्याला देखील नीट वाट माहित नाही (हे त्याने नंतर कबूल केले) ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही दमत, चुकत, धडपडत रात्री १२ च्या सुमारास कोकणकड्याच्या अलीकडच्या पठारावर पोहचलो होतो. तिथे उघड्यावर हाडे गोठवणाऱ्या थंडीत रात्र काढून दुसऱ्या दिवशी गड गाठला होता. असा हा अनुभव आमच्या सर्वांच्या चांगलाच स्मरणात राहिला आहे.
असे असले तरी नळीच्या वाटेने पुन्हा एकदा नीट तयारी करून जायचे आमच्या सर्वांच्याच मनात होते. पण तो योग यायला २०१४ उजाडावे लागले. तसा प्रशांत मागच्या वर्षी पासूनच सारखा नळीच्या वाटेचा विषय काढत होता. पण तो फायनल होता होता ह्या वर्षी चा सीझन आला.

Naali1

कातळातून ६०-७० अंशाची चढण

प्रथेप्रमाणे बरोबर येणार्यांची संख्या ही निघायच्या दिवशी पर्यंत नक्की होत नव्हती. शुक्रवारी सगळ्यांनी ऑफिस मध्ये backpacks घेऊन यायचे आणि इथूनच निघायचे असे ठरले. पण शुक्रवारी ऑफिस मध्ये प्रशांतच दिसेना तेव्हा मला शंका आली. त्याला फोन केला तर बरे नाही म्हणून सुट्टी घेतली आहे असे म्हणाला. मी मनात म्हंटले गेला सगळा बेत गाळात! तितक्यात त्याने खुलासा केला की दोन दिवस सर्दीने त्रस्त होतो आणि आता बरे आहे पण नळीच्या वाटे साठी जरा विश्रांती मिळावी म्हणून आज आराम करतोय. हे ऐकून जरा जीवात जीव आला. मग लगेच बरोबर येणाऱ्या अंतिम सदस्यांच्या नावाची उजळणी केली आणि किती वाजता कुठून निघायचे हे नक्की केले. एकूण शिलेदारांची संख्या ७ झाली. बहुतेक सगळे अनुभवी होते.

Marathon पटू आणि गटनेता आदित्य, नुकताच मनाली-लेह सायकल वर करून आलेला श्रीनिधी, सह्यभ्रमंतीची पन्नाशी-शंभरी पार केलेले तरुण भिडू भूषण आणि केतन, तसेच थेट तंजावरच्या प्रांतातून आलेला जॉन, प्रशांत आणि मी असा पंचविशी ते पस्तीशी पर्यंत पसरलेला गट तयार झाला. गिरीभ्रमणाचा हा एक फायदा आहे तिथे मैत्री पटकन जुळते त्यात वय, व्यवसाय, प्रदेश, भाषा असे अडसर फारसे येत नाहीत. डोंगरयात्री ह्या धाग्याने सगळे जोडले जातात.

बरोबर ६:३० ला laptop hibernate वर टाकला आणि packup करून खाली उतरलो. शुक्रवारच्या संध्याकाळच्या भयानक traffic मधून वाट काढत बरोबर ७:३० ला गाडी प्रशांतच्या पार्किंग मध्ये लावली. प्रशांत खाली उतरतच होता. आदित्य यायच्या वाटेवर होता. श्रीनिधी इतर तिघांना घेऊन नाशिक फाट्याला थांबणार होता. प्रशांतने ओझे कमीत कमी करण्याच्या दृष्टीने कॅमेरा बरोबर न घेण्याचा निर्णय घेतला होता. कॅमेरया शिवाय प्रशांत म्हणजे bat शिवाय सचिन तेंडुलकर ! माझ्या सूचनेचा आदर करून प्रशांत परत कॅमेरा घ्यायला वर गेला. तितक्यात धडधडत (बुलेट!) आदित्य तेथे येऊन पोहचला.एव्हाना पावणेआठ वाजून गेले होते. नाशिक फाट्यावर मंडळी कधीच येऊन पोहोचली होती. लगेचच backpacks गाडीत टाकल्या आणि निघालो. नवीनच झालेल्या JRD TATA उड्डाणपुलामुळे ५-१० मिनिटातच नाशिक फाट्याला पोहचलो. तिथे मग दोन्ही गाड्यांतील सर्व सदस्यांची ओळख परेड झाली आणि दोन्ही गाड्या मार्गस्थ झाल्या.

निघे पर्यंत आठ वाजून गेले होते. आता वाटेत गाडया आणि उतारू आणि दोघांच्याही पोटात इंधन भरणे आवश्यक होते. अशात सर्वानुमते उतारूंच्या उदरभरणाला प्राधान्य देण्यात आले. तिथून पुढे मग गाड्यांच्या पोटात पण इंधन टाकून पुढे निघालो. रात्रीची वेळ लक्षात घेऊन जुन्नर वरून न जाता सरळ आळेफाट्या वरून जायचे ठरले. आळेफाट्याला चहा मारला आणि गाड्या ओतूरच्या रस्त्याला लागल्या. हवेत गारवा फारसा जाणवत नव्हता. रात्रीच्या वेळे मुळे वाहनांची गर्दी पण माफकच होती. माळशेजच्या अलीकडे पोलिसांची वाहन तपासणी सुरु होती. सुदैवाने त्यांना आम्ही सज्जन असून कुठलेही इतर धंदे करायला निघालेलो नाही हे पटवून द्यायची गरज पडली नाही. मस्त पसरलेल्या चंद्रप्रकाशात दोन्ही गाड्या माळशेज घाट उतरू लागल्या. खुबी मागे पडले तसे उजवीकडे हरिश्चंद्राचा विस्तार जाणवू लागला. पटकन सावर्णे पण मागे पडले. इथून खरे तर नळीच्या वाटेच्या ट्रेक ची सुरुवात होते. इथे गाड्या लावून एक छोटासा डोंगर ओलांडून १.५-२ तासात बेलपाड्यात पोहचता येते. पण पुढून मोरोशी वरून गाडीवाट थेट बेलपाड्यात जात असल्याने आम्ही तो मार्ग निवडला. मोरोशी च्या अलीकडे पुन्हा पोलीस भेटले. इथेहि त्यांनी फार चौकशी न करता उलट आम्हाला बेलपाड्याचा रस्ता समजावून दिला. मोरोशी फाट्यावर गाड्या वळविल्या. पुढे एका छोट्या पुलावर गाड्या थांबवून बंद केल्या आणि नीरव शांततेत धवल चंद्रप्रकाश अनुभवला. इथून पुढे फार तर अर्धा तास लागणार होता. त्यामुळे मग तिथे काही वेळ आकाशदर्शन केले. मग ज्याने त्याने आपापल्या खगोलशास्त्राच्या माहितीची पोतडी उघडली. मी पण मग आनंद कडून घेतलेल्या जुजबी माहितीच्या जोरावर Orion, Canis Major, Big Dipper अशी नक्षत्रांची विंग्रजी नावे टाकून आपणही मागे नाही हे दाखवून द्यायचा प्रयत्न केला. अर्थात त्रिपुरी पौर्णिमा नुकतीच होऊन गेली असल्यामुळे तारका फारशा स्पष्ट दिसत नव्हत्या हा भाग वेगळा!

बेलपाड्यात पोहचे पर्यंत एक वाजून गेला होता. खरे तर ह्या गावाचे नाव वालीवरे आहे पण समस्त ट्रेकर्स मंडळीमध्ये बेलपाडाच प्रचलित आहे. एक वाजून गेला असला तरी गावात जाग होती. त्यावरून इतर ग्रुप्स आपल्या आधीच येथे मुक्कामी येऊन राहिले असावेत असा अंदाज आला. मग गावातल्या मारुतीच्या देवळाच्या बाजूला एक प्रशस्त सभागृह दिसले. तिथेच मुक्काम टाकायचा ठरले. सर्वजण झोपायच्या तयारीला लागले. तेवढ्यात प्रशांत गावांत जाऊन दुसरया दिवशीच्या चहा-नाष्ट्याची सोय करून आला. इतर दोन ग्रुप्स आल्याच्या अंदाजावर त्याने शिक्कामोर्तब केले. आल्या आल्या त्याने इतर ग्रुप्स निघायच्या आत निघता यावे ह्या उद्दात हेतूने सकळी ४:३० ला उठायचे फर्मान काढले. सर्वजण झोपायच्या तयारीत होते त्यामुळे त्याचे बोलणे कुणी फारसे मनावर घेतले नसावे. त्यातून गटातील ५०% लोक तरी पट्टीचे घोरणारे असल्याने मुळात झोप लागेल की नाही हीच शंका होती. पण सुदैवाने कुणाचीहि पट्टी लागायच्या आतच झोप लागली.

बरोबर ४:३० ला गजर (आधी घड्याळाचा आणि मग प्रशांतचा) ठणाणला. ‘आत्ताच तर पहिला गजर झालाय झोपू अजून ५ मिनिटे’ ह्या विचारला प्रशांत ने लगेचच सुरुंग लावला. सगळ्यांना वेळेत (खरे तर वेळेच्या आधी) नळीच्या वाटेवर लावयचा त्याने चंगच बांधला होता. आता उठावेच लागणार होते. एक एक करत सगळे जागे झाले आणि वळकट्या (स्लीपिंग bags) आवरायला लागले. श्रीनिधी मात्र काही उठायचे नाव घेईना. म्हणजे तसा तो जागा होता पण त्याने रात्री उठायची वेळ (सोयीप्रमाणे) ४:३० च्या ऐवजी ५:३० अशी ऐकली होती त्यामुळे तो निषेधाच्या पवित्र्यात होता. पण प्रशांतच्या ठोस भूमिके पुढे त्याला नमते घ्यावेच लागले. प्रत्येकाने मग निघायच्या तयारीने backpacks आवरून पाठीवर लोड केल्या. प्रशांत ने अखेर कॅमेरा बरोबर न घेण्याचा निर्णय घेतला. तिथून श्री. कमळूमामा ह्यांच्या अंगणात सगळे जमले. आधीच्या ग्रुप पैकी एका ग्रुप चे हि जवळपास आवरून झाले होते. तिथे मग पहाटे ५:३० ला पोह्याने होणारी acidity ह्यावर चर्चा करत एक-एक plate पोहे आणि चहा रिचवला. आमचे पोहे खाऊन होई पर्यंत मुंबईहून आलेल्या ९ जणांच्या ग्रुपला घेऊन कमळूमामा मार्गस्थ झाले. ते पाहून आम्हीही पटापट आवरून निघालो. कमळू मामांनी त्यांच्या पुतण्याला आम्हाला नळी च्या तोंडापर्यंत वाट दाखविण्या साठी सांगून ठेवले होते. त्याला सोबतीला घेतले आणि झपाझप पावले टाकत नळीच्या वाटेकडे निघालो.

सूर्योदय उशिरा असल्याने बाहेर अजूनही अंधार होता. त्यातून बेलपाडा कोकणकड्याच्या अगदी कुशीत असल्याने येथे सूर्यकिरणे उशिरानेच पोहचतात. ह्याचाच फायदा घेऊन सूर्य वर यायच्या आत शक्य तेवढे अंतर कापायचे होते. अंधारातही कोकणकड्याच्या भव्यतेचा अंदाज येत होता. माथ्यापासून सरळ ४०० मीटर्स तुटलेला अर्धवर्तुळाकार असा हा कडा आहे. खालून पाहिल्यास दोन्ही हात पसरून आपल्याला कवेत बोलावत असल्या प्रमाणे भासतो.

Kokankada

कोकणकडा !

थोड्याच वेळात ओढ्याच्या सुरवातीलाच पुढे गेलेला गट भेटला. तिथून थोडे पुढे गेल्यावर मग कमळू मामांच्या पुतण्याला परत पाठवून दिले आणि कमळूमामांना पुढे ठेवून मार्गक्रमण सुरु केले. पहाटेची वेळ, हवेतला गारवा ह्यामुळे पावले झपाझप पडत होती. मध्ये एका ठिकाणी अजून पाणी वाहत होते. इथून पुढे पाणी नसल्याने इथे पाणी पिऊन घेतले. प्रशांतने तेवढ्यात तहाने बरोबरच tiger pose मध्ये पाणी प्यायची हौस भागवून घेतली!

इथून मागे पहिले तर सूर्याची कोवळी किरणे दूरवर शेतांवर पडलेली दिसत होती. नळी मध्ये मात्र पूर्ण सावली होती. आल्हाददायक वातावरणामुळे आणि मुख्यत्वे ऊन लागत नसल्याने फारसे न थांबता मार्गक्रमण सुरु होते.

Prashant

Nali2

पुढे काहीच वेळात नळीच्या तोंडा पर्यंत येऊन पोहचलो. नळीची ओळख पटली असली तरी मागील वेळे सारखा घोळ नको म्हणून कमळूमामा मागून येत होते त्यांच्यासाठी थांबलो. त्यांनी येऊन हीच नळीची सुरुवात असल्याची खात्री दिल्या नंतर उठून नळीतून वरती चढायला सुरुवात केली. मोठ -मोठ्या खडकांवरून कमीत कमी efforts ची वाट शोधत वर चढायला मजा येत होती. थोड्याच वेळात पहिला तुलनेने सोपा प्रस्ताराचा टप्पा लागला. तिथे उजव्या बाजूने मार्ग काढत प्रशांत वर सरकला. त्याच्या मागोमाग एक एक करत सगळे जण वर आले. इथून पुढे असे छोटे मोठे प्रस्ताराचे टप्पे पार करत जायचे असल्याने सगळे जण फार अंतर न ठेवता बरोबरच निघालो.

From John

वाटेत असे अनेक छोटे-मोठे प्रस्ताराचे टप्पे लागतात - फोटो सौजन्य - जॉन

काहीच वेळात पहिला मोठा प्रस्ताराचा टप्पा लागला. साधारण २० फूटाचा हा टप्पा आहे. मागल्या खेपेस इथे येई पर्यंत पूर्ण अंधार झाला होता आणि अंधारात तोंडात torch घेऊन चढताना प्रशांतचा torch खाली पडला होता त्याची आठवण झाली. आम्ही खडकांमधील खोबणी शोधे पर्यंत कमळू मामा सरसर चढून वर गेले आणि सुरक्षे साठी दोर बांधायच्या कामाला लागले. तोपर्यंत natural holds चा वापर करून प्रशांत वर गेला. तोपर्यंत मामांनी सुरक्षे साठी दोर बांधून तो खाली सोडला होता. पण शक्य तेवढे नैसर्गिक आधाराने वर जावे असा विचार करून मी चढायला सुरुवात केली. अगदी वरच्या टप्प्यात पोहचल्यावर पाठीवरच्या backpack मुळे जरा त्रिशंकू अवस्थेत अडकल्या सारखी स्थिती झाली तेव्हा मग शहाणपणाने दोराचा आधार घेऊन वर आलो. पाठोपाठ एक एक करत दोन्ही गटातील भिडू वर आले. प्रशांतकडे कॅमेरा नसल्याने त्याने शक्य तिथे mobile शूट करून आमच्या ट्रेक चा video blog तयार करण्याचे ठरवले होते. त्याप्रमणे तो वर येणाऱ्या लोकांचे शूट घेत होता. नळीत आधीच चिंचोळी जागा असल्याने गर्दी होऊ नये म्हणून एक एक करून पुढे सरकू लागलो (क्रमश:)

Patch1

पहिला मोठा प्रस्तराचा टप्पा - फोटो सौजन्य - जॉन

आतापर्यंत निम्म्या पेक्षा जास्त अंतर पार झाले होते. सलग साधारण ६०-७० अंशातील खडी चढण गेले ३-४ तास चढत होतो. काही वेळात मी आणि प्रशांत नळीच्या वाटेतील प्रसिद्ध अशा उंबराच्या झाडाच्या patch पाशी आलो. अतिशय चिंचोळी होते गेलेली घसाऱ्या ची वाट, समोर आलेला dead end आणि उजवी कडे साधारण २० फुटांचा काहीसा कठीण rock patch आणि त्याच्या वरती ते बाहेर डोकावणारे छोटेसे उंबराचे झाड. ह्या खुणा बघून माझ्या आणि प्रशांत च्या २००६ मधील ट्रेकच्या आठवणी जाग्या झाल्या. तेव्हा ह्याच patch ने आमचा सगळ्यात जास्त वेळ घेतला होता. अर्थात आता आम्ही इथे सकाळी ९:३०-१० ला उभे होतो आणि तेव्हा रात्री १० वाजता हा मोठा फरक होता. तितक्यात आदित्यही तिथे आला त्याने मात्र हा तो patch नसून अजून पुढे चढत जायचे असल्याचे सांगितले. पण पुढे dead end होता आणि प्रशांतच्या आणि माझ्या ह्या ठिकाणच्या आठवणी अगदी पक्क्या असल्याने आम्ही हाच तो patch ह्या मतावर ठाम होतो. पण आदित्यही त्याच्या मतावर ठाम होता. मग तिघेही मामा तिथे यायची वाट पाहत बसलो. थोड्याच वेळात मागून मामा आणि इतर भिडू आले.

मामांनी हाच तो patch असल्याचे जाहीर केले आणि बघता बघता सरसरत ते तो २० फुटांचा patch चढून वर झाडा पाशी गेले आणि लगेचच दोर झाडाला बांधून खाली सोडला. तोपर्यंत मी आणि प्रशांत नैसर्गिक holds वर हा patch चढून जाता येईल का ह्याचा अंदाज घेत होतो. आम्ही उभे होतो तिथून एकदम ९० अंशातील चढण होती. मात्र थोडे खालच्या बाजूस सरकल्यास काही holds दिसत होते ज्याचा वापर करून चढता आले असते. पण मागे तीव्र उताराची आणि घसारा असलेली नळीची वाट होती त्यामुळे अतिशय जपून चढावे लागणार होते. तेवढ्यात वरून मामांनी तिकडून चढू नका आणि सरळ झाडाखाली येऊन दोराचा आधार घेत वर या असे सांगितले. backpacks घेऊन वर चढणे अजून अवघड होते होते त्यामुळे त्या काढून खालीच ठेवून चढायला सुरुवात केली.

major patch

नळीच्या वाटेतील सर्वात अवघड patch - फोटो सौजन्य जॉन

सुरवातीला १-२ holds मिळाले. निम्मे अंतर गेल्यावर मात्र पक्के holds शोधणे जिकीरीचे झाले. प्रस्तरारोहणाचे काही मुलभूत नियम आहेत त्यातला एक म्हणजे दोन हात आणि दोन पाय ह्या एकूण ४ holds पैकी कायम ३ holds तरी हे पक्के असलेच पाहिजेत. शिवाय आपल्या शरीराचा गुरुत्वमध्य हा कातळभिंतीच्या शक्य तेवढा जवळ असला पाहिजे. इथे तसे holds सापडत नसल्याने दोराचा होल्ड सारखा वापर करत उरलेला निम्मा टप्पा पार करून वर पोहचलो. पाठीमागून प्रशांत, आदित्य, श्रीनिधी आणि भूषण हे पण आले. जॉन आणि केतन ह्यांनी वर सांगितलेली जराशी खालच्या बाजूची वाट नैसर्गिक holds चा वापर करून कौशल्याने पार केली आणि वर आले. मग कमळू मामा दोरावरून पुन्हा सरसरत खाली गेले आणि त्यांनी एक एक करत आमच्या backpacks वाहून वर आणून दिल्या. आम्ही वरून त्या ओढून घेतल्या आणि त्यांचे आभार मानून परत bottleneck नको म्हणून पुढे चालायला लागलो.

ह्या अवघड patch वरून वर आल्यावर खाली बघून आपण किती अंतर आणि उंची पार केली आहे ह्याचा अंदाज घेत्ल. जवळपास ७०-८०% अंतर पार झाले होते. इथून एक छोटासा अर्धवर्तुळाकार traverse मारून नळीच्या पलीकडच्या एका दुसऱ्या नळीत आपण शिरतो. इथून परत १५-२० मिनिटांची चढण चढून आलो आणि नळी संपत आलेली दिसली. त्यामुळे उत्साहाने झपाझप पावले टाकत वर गेलो आणि नळी सिम्प्ते तिथे एक छोटीशी खिंड आहे तिथे जाऊन थांबलो. थुन उजवीकडे नेहमीची पायवाट सुरु होते. इथूनच एक वाट खाली साधले घाटाच्या माथ्यावरील पठारावर उतरते. काही लोक नळीतून चढून इथूनच साधले घाटाकडे जाऊन तिथून परत खाली बेलपाड्यात उतरतात. साधले घाटाने उतरणे हा आमच्या योजनेचा भाग होतच. पण आम्ही आज गडावर चढून तिथे मुक्काम करणार होतो आणि दुसऱ्या दिवशी आधी बैलघाटाने साधले घाटाच्या माथ्यावरील पठारावर उतरून तिथून साधले घात उतरून बेलपाड्यात परतणार होतो. कमळूमामांनी आम्हाला ह्या वाटेने नेण्याचे मान्य केले होते. हरिश्चंद्रगडावर येणाऱ्या वाटेत ही पण अजून एक वाट आहे. ह्या वाटेने देखील गडावर यायला ६-७ तास लागतात.

topview

खिंडीतून दिसणारा साधले घाटाच्या माथ्याचा परिसर

एक एक करून सगळे खिंडीत आले तिथून मग लगेच उजवीकडील वाटेने वर चढू लागलो. ही वाट झाडीतून वर चढत असल्याने उन्हाचा त्रास होत नव्हता काहीच वेळात वाट कोकणकड्याच्या अलीकडच्या पठारावर आली. आता इथून काहीच वेळात आम्ही कोकणकड्यावर पोहोचणार होतो. बेलपाड्यापासून इथवर आम्ही साधारण ५ तासात आलो होतो. पहाटे चढायला सुरुवात केल्यामुळे अपेक्षेपेक्षा बरेच लवकर आम्ही नळीची वाट पार केली होती. इथून समोर न्हापता, उजवी कडे कलाडगड, त्याच्या मागे लांबवर कात्राबाई, घनचक्कर, भैरवगड असा सह्याद्रीचा पसारा दिसत होता. सह्याद्रीतील डोंगरांची पारंपारिक नावे फार मजेशीर आहेत काही वेळा डोंगराच्या वैशिष्ट्यावरून घनचक्कर, खुटा, बुधला, नागफणी, नानाचा अंगठा अशी नावे तर काही ठिकाणी एकदम डोंगराशी जवळकीचे जोडणारी कात्राबाई, आजोबा, नवरा-नवरी, रवळ्या-जवळ्या अशी. बाकी सह्याद्रीत काही नावे ही एका पेक्षा जास्त डोंगरांना आहेत. भैरवगड हे त्यातलेच. इथून लांबवर दिसणारा हा शिरपुंजेचा, माळशेज उतरून गेल्यावर डावीकडे दिसणारा मोरोशीचा आणि खाली चांदोली अभयारण्यातला असे तीन वेगवेगळे भैरवगड आहेत.

ह्या पठारावर थोडी विश्रांती घेतली. पोटपूजा केली आणि पुढे निघालो. इथून थोडीशीच चढण बाकी होती. परत एकदा झाडीतील नागमोडी वाटेने जात एका छोट्या कातळटप्प्या पाशी आलो. हा टप्पा पार केला की आपण थेट कोकण कड्याच्या पठारावर पोहोचतो. इथे उजव्या बाजूला एक अरुंद सापटी आहे त्यातून चढणे सोपे असल्याने त्यातून अंग चोरत वर चढून गेलो. पाठोपाठ प्रशांत, भूषण आणि श्रीनिधी आले. आदित्य मात्र दुसरी कडून natural holds वर चढून आला. मग जॉन आणि केतनने पण त्याचाच कित्ता गिरवला. इथून कोकणकड्याचा माथा साधारण अर्धा किमी वर आहे. पण अर्धवर्तुळाकार पसरल्याने इथूनही त्याचे दर्शन होते होते. मग उजवीकडे धारेवर जाऊन कोकण कड्याचा विस्तार पहिला. त्याच्या माथ्यावर काही लोक दिसत होते. त्यामुळे त्याची भव्यता अजूनच अधोरेखित होत होती. खरोखरच अद्वितीय म्हणावा असाच हा निसर्गाचा अविष्कार आहे. सुमारे अर्धा किमी परिघाचा अर्धवर्तुळाकार आडवा विस्तार आणि उभा सरळ ४०० meter तुटलेला रौद्रभीषण असा हा कोकणकडा. ह्यावर चढण्याचे धाडस करावे ते वाघाचे काळीज असणाऱ्यांनीच!

John

कोकणकड्याच्या माथ्यावर आलो. इथे भास्करने आमचे दिलखुलास स्वागत केले. भास्कर हा सह्याद्रीच्या कुशीत वाढलेला असाच एक गडी. गडावर लोकांचा राबता वाढल्याने त्याने येथे एक छोटेखानी झोपडी बांधली आहे. तेथे तो आणि त्याचे साथीदार पाचनईतून वर येतात आणि गडावर येणाऱ्या लोकांना जेवण, चहा इ. पुरवतात. मुक्काम करायला तंबूची सोय देखील करतात. सुट्टीच्या दिवशी गडावर बरीच मंडळी येत असल्याने त्यांचा चांगला व्यवसाय होतो. कोकणकडा आणि एकूणच ह्या परिसरात होणाऱ्या बऱ्याचशा साहसी climbing / rappelling च्या मोहिमांत भास्कर आणि कमळूमामा ह्यांचा सहभाग असतो. ह्या परिसरातील वाटांची त्यांना अगदी खडा न खडा माहिती आहे. नेहमीच इकडे येत असल्याने भास्करची आणि आमच्या अनुपची चांगलीच मैत्री आहे.

बोलत बोलतच भास्कर च्या झोपड्या पाशी आलो आणि backpacks खाली पाठीवरून सोडवून मस्त झाडाखाली आडवे झालो. लगेचच २-२ ग्लास लिंबू पाणी पिऊन तरतरी आली. मग तिथेच जरा गप्पा गोष्टी करत बसलो. नंतर भास्करकडील पिठले भाकरी, कांदा, झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा आणि प्रशांतने आणलेले पराठे ह्यावर ताव मारला. जेवण झाल्यावर साहजिकच मंडळी आडवे होण्यासाठी जागा शोधू लागली तेव्हा भास्करनेच मागील बाजूला असलेल्या जांभळी खाली जाऊन निवांत पडा असे सांगितले. मग एक-एक करत सगळे जांभळी खाली जाऊन पहुडलो. झाडीतून कुठूनतरी एक तिरीप बरोबर माझ्या डोळ्यावर येत होती. त्यामुळे टोपी तोंडावर ठेवून पडलो. जरा डोळा लागत असतानाच मागील बाजूला कोकणकड्यावर काही मंडळींनी फोटो काढण्याचा उच्छाद मांडला होता. उच्छाद ह्यासाठी कारण फोटो बरोबर त्यांचा जोरदार हल्लागुल्ला सुरु होता. २०-२५ मिनिटे झाली तरी त्यांचा हा उद्योग सुरूच होता. मग सरळ उठलो. बाकीची मंडळी ह्या सगळ्यापासून अलिप्त राहून छान झोपली होती. चालत कोकण कड्यावर गेलो. दुपारचे ऊन जाणवत होते. तिथे मग पूर्ण आडवे झोपून खाली बघत त्याचे रौद्र रूप अनुभवले. तिथून उठून मग तसाच फिरत कोकण कड्याच्या बाजूने जी वाट तारामती कडे जाते त्या वाटेने पुढे जाऊन फिरून आलो. मग परतून भास्कर च्या दारात येऊन बसलो. आत अजून भाकरी थापण्याचे चालूच होते. मग कॅमेरा काढला आणि काही frames घ्यायचा प्रयत्न केला. तास दीड तासाने परत जांभळी खाली गेलो. मंडळी अजून झोपेतच होती. थोडावेळ तसाच सकाळपासून काढलेले फोटो बघत बसलो. एव्हाना ४ वाजत आले होते. एक एक करून मंडळी जागी होऊ लागली.

Sarbat

आता आमच्या खाण्यापिण्याची पूर्ण जबाबदारी भास्कर ने घेतलेली मग दुपारचा चहा तर हवाच! चहा घेतला आणि परत भास्करशी गप्पा गोष्टी करत बसलो. सूर्य कलायला लागला तसे मग सगळे उठून कोकणकड्यावर गेलो. कोकणकड्यावरून सूर्यास्त हा एक अनोखा नजारा आहे. भास्कर चे झोपडे मात्र अगदी मोक्यावर आहे. इथून कोकणकडा समोरच अंगणात असल्या सारखा आहे!

चांगली landscapes मिळवायला golden hour फार महत्वाचा आहे. golden hour म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त ह्यांचा अलीकडील आणि पलीकडील काही काळ. ह्या वेळेत सूर्य किरणे तिरपी पडत असल्याने दिवसा सारखी प्रखर नसतात. त्यामुळे उत्तम landscapes ला आवश्यक असा soft light ह्याच काळात मिळतो. landscapes च काय पण कुठल्याही उत्तम छायाचित्राचा प्रकाश हा प्राण आहे. म्हणून तर काहीजण ह्या कलेचा उल्लेख छायाचित्रण असा न करता प्रकाशचित्रण असा करतात. पण वातावरणात haze बरीच असल्याने फोटो काढायला फार काही वाव मिळेल असे वाटत नव्हते. तरी गळ्यातला कॅमेरा स्वस्थ बसू देणार नव्हताच!

हा नजारा पाहायला अपेक्षे प्रमाणे बरीच गर्दी तिथे जमा झाली होती. अगदी महाबळेश्वरच्या ‘sun-set point’ एवढी नसली तरी बरीच गर्दी होती. श्रीनिधी, प्रशांत, भूषण, केतन आणि आदित्य कड्या जवळ गप्पा मारत बसले होते. जॉन त्याचा कॅमेरा घेऊन कुठेतरी अज्ञातात गेला होता. मी कड्या पासून जरा मागे एकटाच थांबलो होतो. सूर्य अस्ताला जाऊ लागला तसे वातावरण वेगळेच भासू लागले. समोर गर्दी असूनही आता त्या गर्दीचा त्रास जाणवत नव्हता. कुठेतरी स्वतःचाच स्वतःशी संवाद घडत होता. कित्येक वेळेला ऐकलेले पूरीयाधनाश्रीचे सूर कानात गुंजत होते आणि मन त्या श्रेष्ठतम निसर्गापुढे नतमस्तक होत होते. अशा काही निवडक क्षणांचे जगणे हेच तर जगण्याला खरा अर्थ देते.

shrini

Light ची अपेक्षित साथ नसल्याने मग समोर कड्यावर गप्पा मारत बसलेल्या मंडळींची silhouette घेत होतो. तेवढ्यात श्रीनिधी ने कड्याच्या टोकावर बसून दोन हात पसरून ‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले’ ह्या style मधली pose दिली. अंधार पडला तसे सगळे बसले होते तिथे जाऊन बसलो. भास्करही आमच्या इथे येऊन बसला. मग गप्पा गोष्टीतून त्याने त्याचे अनुभव उलगडले. भास्करचे समोरच्याशी संवाद साधायचे कौशल्य अगदी त्याच्या व्यवसायाला पूरक आहे. त्याच्याशी बोलून इथले जनजीवन, येथील प्राणी, दुर्गम वाटा, इथे झालेल्या साहसी मोहिमा ह्याबद्दल बरीच माहिती मिळाली. त्यातच ह्यावर्षी पावसाळ्याच्या आधी कोकणकड्यावरून एका राजस्थानच्या तरुणाने मारलेल्या para-jump ची माहिती मिळाली आणि कमळू मामांनी त्याचा थरारक video पण दाखविला. कोकणकड्याशी निगडीत अशा बऱ्याच साहस कथा आहेत.

भास्कर उठून त्याच्या कामाला गेला. इकडे आमच्या गप्पा सुरूच होत्या. ८ च्या सुमारास तो परत आला ते जेवायला यायचे आमंत्रण घेऊनच. आम्ही पण मग गर्दी व्हायच्या आत जावे म्हणून त्याच्या बरोबरच निघालो. मस्त भाजी भाकरी आणि भात आणि जोडीला कांदा, ठेचा होताच. बाहेर भास्कर चे साथीदार तंबू जोडत होते. कोकणकड्यावर मुक्कामी ४०-५० तरी लोक असावेत. जेवण झाल्यावर परत कोकणकड्यावर गप्पांचा फड जमविला. जेवण झाल्याने हवेत गारवा जाणवत होता. गप्पात मग उद्याचा plan नक्की केला. ७:३० ला आवरून निघायचे आणि बैलघाट-साधलेघाट मार्गे दुपार पर्यंत बेलपाड्यात पोहोचायचे असे ठरले. कमळू मामा सोबत असणारच होते. रात्र चढत होती तसा गारवा पण वाढत होता. तंबूत आलो आणि sleeping bag उलगडून आत शिरलो. पडल्या पडल्या लगेच झोप लागली.

सकाळी जाग आली तेव्हा केतन बाहेरून सगळ्यांना उठवत होता. उठून बाहेर आलो तोपर्यंत ७ वाजले होते. तोपर्यंत आदित्य चहा घेऊन आला. आता आवरून निघायचे होते. पण त्या आधी मुख्य प्रश्न होता तो म्हजे एवढ्या गर्दीत गडावर आडोसा शोधणे !! आदित्यने कोकण कड्याच्या बाजूने पुढे चालत जाऊन मस्त निर्मनुष्य जागेचा शोध लावला आणि हा प्रश्न सोडवला. आवरून निघे पर्यंत ८:३० वाजलेच. भास्करकडे भरपेट नाष्टा झालाच होता पण तरीही त्याने वाटेत खायला म्हणून बरोबर पोळ्या आणि ठेचा बांधून दिला. त्याचा निरोप घेऊन कमळू मामांबरोबर निघालो.

बैलघाटाची वाट ही गडाच्या साधारण उत्तरे कडून खाली उतरते. चालताना समोर कलाडगड, घनचक्कर, कात्राबाई दिसत होतेच. मामांनी एकदम मळलेली वाट सोडून झाडीत घुसून कुठून तरी short-cut ने आम्हाला थेट बैलघाटाच्या तोंडाशी आणले. ह्यामुळे २०-२५ मिनिटे तरी वाचली असावीत. बैलघाटाची वाट मोठ मोठ्या खडकांवरून खाली उतरते. पण नळीच्या वाटे सारखे अवघड patches इथे नाहीत. पण मोठ्या खडकांतून उतरताना गुडघ्यांचा कस लागत होता. ही वाट खरोखरच फक्त बैलांसाठीच योग्य आहे असेही क्षणभर वाटून गेले. पूर्वीच्या काही ट्रेक्स मधील अनुभवावरून डाव्या गुडघ्याला support साठी knee-cap सकाळीच चढवलेली होती. तरीही गुडघ्याने हळू हळू आपले अस्तित्व दाखवायला सुरुवात केली. ह्या वाटेने उतरताना तटबंदीचे काही अवशेषही पाहायला मिळाले. साधारण १.५ तासात बैलघाटाची वाट संपवून साधले घाटाच्या पठारावर आलो. येथे वस्ती फारशी नाही. पठारावर आल्यावर एका झाडाखाली बसून भास्करने दिलेली शिदोरी आणि आमच्या बरोबर असलेले काही खाद्यपदार्थ ह्यांचा फडशा पाडला आणि साधले घाटाच्या दिशेने चालू लागलो. इथून साधारण वायव्येला २ किमी वर साधले घाट सुरु होतो.

bailghat

बैलघाटाच्या वाटेतील तटबंदी

पठारावरून चालत जाऊन झाडीतून छोटीशी चढण चढून साधले घाटाच्या तोंडाशी आलो. थोडेसे उतरून पुढे गेलो तर अप्रतिम दृश्य दिसले दोन डोंगरांच्या मधून उतरणारी अरुंद तीव्र उताराची वाट आणि समोर लांबवर पसरलेला कोकणचा परिसर.

sadhaleghat

साधले घाटाची सुरुवात

इथे वाराही मस्त होता. आज जवळपास १००० मीटर्स उंची आम्ही उतरणार होतो. त्यातील अजून २/३ उतरण बाकी होती. त्यामुळे सगळे पटपट उतरत होते. सगळ्यात पुढे केतन होता. गुडघ्याची कुरकुर आता पावलागणिक वाढत होती. डाव्या गुडघ्यावर फार ताण येणार नाही ह्या बेताने उतरणे सुरु होते. थोडे पुढे जाऊन सगळे जण वाटेत एका ओढ्यापाशी थांबले. तिथे विश्रांती साठी जरा टेकलो. तिथे फुलपाखरे बरीच होती. त्यांचे फोटो काढण्याचे काही निष्फळ प्रयत्न झाले. थोड्या विश्रांती नंतर निघालो. गुडघ्याने आता पूर्ण असहकार पुकारला होता. पण निरुपाय होता. अजून ३०-३५% अंतर बाकी होते. कधी एकदा उतार संपून सपाट प्रदेश लागेल असे झाले होते. अशावेळी एकवेळ डोंगर चढणे परवडले पण उतरणे नको असे वाटते. शेवटी एकदाचा सपाटीवर आलो. मग निवांत पणे चालत बेलपाड्याकडे निघालो. इथून बेलपाडा साधारण २ किमी वर आहे. गावात प्रवेशतानाच भात सडणीची कामे सुरु असलेली दिसली. मग मी आणि जॉन त्याचे फोटो काढावेत म्हणून जरा थांबलो. प्रशांत ने लगेच ‘एवढ्या ‘harsh light’ मध्ये portraits काढताय?’ अशी encouraging (!) टिप्पणी केली.

bhatsadani

मामांच्या घरी पोहचलो तर पुढे आलेली मंडळीं नदीवर डुंबायला निघाली होती. ट्रेक वरून दमून भागून आल्यावर गार पाण्यात मस्त डुंबायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नाही. नदीवरून डुंबून येऊन मामांकडे भाजी-भाकरी खाल्ली आणि पुण्याकडे निघालो.

गाडीतून परताना डावीकडे परत कोकणकडा दिसत होता दोन्ही हात पसरून जणू तो 'पुन्हा या बर का' असे अगत्याने म्हणत होता. त्याच्या कडे बघून मनात एक परिपूर्तीची भावना उमटली आणि वाटले इतका अट्टाहास करायचा तो ह्यासाठीच !!


हरिश्चंद्रगड -नळीच्या वाटेने, साधले घाटाने.
टंक लेखनाविना बरीच हस्तलिखिते पडून होती आज लक्ष गेले न इरीलाच पेटलो…घेतलाना भो टायपायला. ;)
असो,
सह्याद्रीच्या मुख्य रंगांपासून थोडी वेगळी झालेली हरिश्चंद्र- बालाघाट रांग, यामध्ये असणारा हा गड व तो सर्व भटक्यामध्ये प्रसिद्ध करणारा सह्याद्रीने प्रसवलेले रौद्र भीषण अस सौदर्य प्रदान झालेला कोकणकडा , महाराष्ट्रतील सर्वोच्च शिखरांपैकी एक असे तारामती शिखर. या सर्व गोष्टीं पाहण्याची, जगण्याची एक अनामिक ओढ आंतरिक ओढ इच्छा नसेल असा गिर्यारोहक मिळणार नाही. माझ्याही मानगुटीवर हे भूत होताच कि.!!!! मध्ये मध्ये google map वर satellite mode ताकाने तहान भागवत होतोच. आणि याच धामधुमीत आबासाहेबांचा मेसेज आला "गडवाट आयोजित हरिश्चंद्रगड" येतोय का ??? योग जुळला. मी निघालो. !!
या गडाला बुरुज, तटबंदी, तोफा यासारखी दुर्ग सौदर्याची आभूषणे दिसणार नाहीत पण याचा इतिहास मात्र २००० वर्षापुर्वीपर्यंत घेऊन जातो. राजा हरिश्चंद्र, तारामती, रोहिदास, चांगदेव या ऐतिहासिक लोकांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी या गडाला लाभली आहे.
गडाचा विस्तार तसा खूप मोठा. त्यामुळे आपसूकच वाटाही खूप गडाला. खिरेश्वर - टोलार खिंड, पाचनाई या सर्वश्रुत परिचयाच्या पूर्वेकडील तुलनेने सोप्या वाटा पूर्वेकडेच ठेऊन आम्ही पश्चिमेकडील नळीच्या वाटेने जायचा बेत केला व उतरण भरीस भर म्हणून तितकाच अवघड साधले घाटमर्ग. व्वा… !!! मेजवानी तर भन्नाट होती वwhatsapp वर मिटक्या मारता मारता प्रत्याक्ष तव मारण्याचा दिवस आला आणि सुरु झाला एक marathon ट्रेक . माझी तर bike ride हि Marathon झाली होती कारण हि तसच होत, रात्री १०;३५ सांताक्रूझ मधून दिप्याची Unicorn घेतली., सांताक्रूझ ते कल्याण या मार्गाचा काहीही गंध नसताना Domestic Airport वरून जीतुदाला Pickup करून साकीनाक्यावर बापू पवार चा नकार घेऊन, पश्चि- पूर्व उपनगरे पालथी घालत कांजूर-मुलुंड-तीनहात नाका-ठाणे-भिवंडी बायपास- दुर्गाडी-कांदा-लसुन-कल्याण अस करत १२;३० ला कल्याण गाठलं. तिथ आधीपासूनच ताटकळत उभे असलेल्यांनी मी दिसताच क्षणार्धात आपापल्या गाड्या मुरबाडच्या दिशेने फेकल्या, एकूण ७ दुचाक्यांचा आमचा ताफा त्या नगर रोड वर मध्यरात्री सप्तर्षी तारकासमुहाप्रमाणे झळकू लागला,मुरबाडच्या पुढे टोकवडे हा आमचा पहिला थांबा होता, तिथे बस ने आलेल्यांना tripsy घेऊन घेऊन पुढील नियोजित प्रवास होता.
त्या किर्रर्र ज्झादीतून जाणार्या रस्त्यात मध्यरात्रीच्या वेळी भयाण शांतता कापत गाड्या आडव्या तिडव्या झापझुप करत मार्गक्रमण चालू होत. या रस्त्याचे वैशिष्ठ म्हणजे कावळा बसायला पण पथ दिवे नाहीत पण ठेचेला गतिरोधके!!याच्या आठवणी जीतुदा च्या मनावर/तनावर चांगल्याच कोरल्या गेलेत ;) असाच एका गतीरोधाकाने मला सरळ कोकणकड्याला जाऊन धड्कल्याची जाणीव करून दिली होती,,,,,असो ,, !!!
आदल्या रात्री कराड-मुंबई प्रवास व आजचा ५ तासाचा यामुळे गलितगात्र झालेला मी मागे तिसरा कोण आहे हेही माहित नवते सिद्धेश होता नंतर कळले . मोरोशीवरून डावीकडे जायचे होते पण झापाझुपगिरीच्या नादात समोरच्याच्या पृच्छदिव्याकडे पाहत सच्या व स्नेहल अगदी माळशेज घाटाला भिडले,आबाने वेळीच मला रोखण्यात यश मिळवल्याने माझा माळशेज घाट हुकला :( तब्बल पाऊन तासाने हि स्वारी चहा मारून परत आली आणि आम्ही शेवटच्या टप्प्यातील ८ किमी चे अंतर पार करून बेल्पद्यातील वेळीवारे या गावी दाखल झालो. तातडीने कामादादाच्या घरी सामसूम झालो.
५;३०ला उठलो, अगदी थंडगार हवेत, सह्याद्रीच्या कुशीत, कोकणकड्याला खेटून वसलेले त्या गावाचे सौंदर्य न्याहाळत असतानाच पूर्वेकडे तांबड फुटू लागल. गावांत झुन्झुमुन्झू झाल, पाखरांची किलबिल, माणसांची शेतावर जायची लगबग पाहत असतानाच अजस्र सह्याशिखारांचा पट हळूहळू उलगडू लागला व लक्षात आले रात्रीच्या त्या किरर्र जंगलातील खाचखळग्याच्या वाटेने आपल्याला सरळ कोकणकड्याच्या पुढ्यातच आणून सोडलाय. तारामतीसह रोहिदास शिखर आपल्या इतर साथीदारांसह आपापली करवतीसारखी शिखरे आकाशात खुपसून निवांत असलेली दिसत होते तर नजर नळीच्या वाटेचा शोध घेत होती पण अजूनही तिने आपली ओळख दाखवली नव्हती. ती वाट कुठेतरी कोकणकड्याच्या डाव्या बाजूला असणार याचे अंदाज बांधतच नाष्टापाणी उरकून प्रतक्ष चढाईला सुरुवात केली हवेतील गारवा, समोरून कोकणकाड्याचे व उजविकडून रोहिदास शिखराचे प्रेरणास्थान याचा एकत्रित परिणाम म्हणून आम्ही जोशातच नदीतील मोठमोठ्या शिळा पार करत किंबहुना उड्या मारतच म्हणा ९ ला नळीच्या वाटेच्या तोंडाला आलो. आघाडीवरून टीम कामादादा तर पिछाडीवरून टीम विठ्ठल नेतृत्व करत होते…!
1.
आता इथून पुढचा प्रवास खरा नळीच्या वाटेने होता, नळीची वाट म्हणजे काय ???? तर २ कड्यांमधून जाणारी चिंचोळी वाट. उजवीकडे १८०० फुटाचा उभा कोकण कडा तर समोर ३०/४०अंशातून जाणारी उभी चढण तीही जवळ जवळ १००० फुटाची सह्याद्रीमध्ये क्वचितच अशी सलग उभी चढण आढळेल कारण हि वाट कोकणातून सरळ घाटमाथ्यावर जते. इथून पुढे वाट घासार्याची होत जाते, तर चढण खडतर,,,!!
2.
! काही वेळातच आपण एका प्रस्तारापाशी (Rockpatch )येतो, वाटेतील हे पहिले प्रस्तरारोहण (climbing )इथ २० ते २५ फुटाचे साधे प्रस्ताराहोण करावे लागते, जवळ रस्सी (rope) असावीच,, ! आम्ही मात्र काहीजणांनी मुक्त प्रस्तरारोहणाचा (free climbing) आनंद घेतला, ;)
सूर्यदेव माथ्यावर येउन आग ओकाण्याच्या तयारीत होतेच त्यामुळे पाण्याच्या बाटल्या खाली करत आपण जवळ जवळ मध्यावर आलेले असतो ,दोन्ही बाजूना प्रचंड उंच कातळ कडे, माकडांनाहि धडकी भरेल असे कोरीव कडे जणू काही आपणास गिळंकृत करतायत कि की अशा अविर्भावात उभे. तर पाठीमागे उजवी नळी जी माकडनळ म्हणून ओळखली जाते. ती अतिप्रचंड अवघड या सदरात येते.
2. 4.सदरहु ब्लोग लेखकाची एक दुर्मिळ छबीtech te
नळीची वाट ज्यासाठी प्रसिद्ध आहे तो प्रकार एव्हाना सुरु झालेला असतो (वरीलफोटोतील रोहिणीच्या धडपडीवरून लक्षत येईलच )समोर उभी चढण त्यात मोठ मोठे कडे आपल्याला खिजवायला आ वासून पुढ्यात उभे। !!!! पाय ठेवलेला दगड निसटेल कि हातात पकडलेला हातात येईल काही नेम नसायचा. जराशी चूक उरत धडकी भरवायची, चूक झालीच तर सरळ जिथून आलो तिकडेच मध्ये आधी थांबा नाहीच !!
5.एका अवघड patch वर रोहिणी
जस जस वर चढू तस एक एक पाऊल आपणास आणखी अवघड वाटेवर आणून ठेवत असे, आणि हाच तो थरार आहे ज्याच भूकेला गिर्यारोहक असतो. ;) 'वाट लागणे' हा वाक्प्रचार या वाटेतूनच प्रसवला असावा असाही विचार मनाला चाटून गेला !! एव्हाना सर्व द्विपाद प्राण्यांनी चातुष्पद्गिरी चालू केलेलीच होती. छायाचित्रकारांची विविध कोनासाठी चाललेली फोटोग्राफी दिसून येत होती. यामध्ये राहूल आघाडीवर होता.
इथून पुडे थोड वर आल्यावर वाट दुभंगते व एक उजवीकडे तर एक डावीकडे जाते उजवीकडे वर काहीही दिसत नसल्याने आपण डावीकडे कूच करतो व काही वेलची चढाई कुचकामी ठरून आपण परत उतरतो व उजवीकडे जातो (एक अनुभव ) अ सर्वात अवघड टप्पा अत्यंत अरुंद जागा खाली नजर जाईल तिथेपर्यंत खोल दरी उजवीकडे कातळ कडा तर डावीकडे निव्वळ दगड धोंड्यांची उतरण,
6.
ek baryapaiki changala click
अशा या खतरनाक घळीत गिर्यारोहणाचे सर्व कसब पणाला लाऊन चढाई करावी लागते एवढे दिव्य पार करून आपण एका छोट्याच पण अवघड अशा प्रस्तारापाशी येतो रस्सिशिवाय काम होत नाही इथे. एक एक मावळे स सर सर वर चढू लागले (८ न छायाचित्र )खाली रांगेत बसलेले वर चढनार्यांची लटकेगिरी पाहत होते. व स्वताचाही नंबर येणार हे आठउन आवंढा गिळत असणार नक्कीच !!!!!!
7.दुसरा rockpatch
मी सुरुवातीस चढून आल्याने वरून निवांत पाहण्याची मजा घेत होतो. इथला थरारक गम्मत तर वेगळीच, इथून वर चढून आलेला कार्यकर्ता त्याला नीटसा बसून आराम करायलाही एका अवघड प्रस्तरला वळसा घालून जाव लागते व नळीची वाट कधी विसरणार नाही याची जाणीव ठेवून पलीकडील नाळीत चढून जावे लागायचे, इथ एक मस्त सावली देणार टिकण आहे. इथ आपले बरेचसे कष्ट संपले असे वाटते कारण आपण जवळ जवळ वर पोहोचलो असतोच. इथे साधले घाटातून आलेली वाट मिळते. व आणखी एक rock patch वाटेत हजर.
8.
चिढून चवताळून तो पार करून आता आपण थेट हरिश्चंद्र गडावर पोह्चल्याच्या आनंदात उड्या मारण्याचा मोह आवराव लागतो कारण आणखी १ rockpatch जरास मध्यम श्रेणीचा पण कोकण कड्यावरून खाली आपला देह कुठे पोहचू शकतो हे LIVE दाखवणारा आहे. जिकिरीने ते कार्य उरकले व सरळ कोकण कड्याच्या मुखाशी अवतीर्ण झाल्यासारखं झाल. दूरवर पसरलेलं सह्यमंडळ, ती भव्यदिव्य शिखरे, विराट खोली, खोलगट आकाराचा अंतर्गोल कोकण कडा, चाहु बाजूंची सुप्तावस्थेतील पर्वतराजी … वाह !!!!! निव्वळ अप्रतिम …. !! एवढ सह्याद्रीच सौदर्य पाहायच, अनुभवायचं असेल तर अशा नळीच्या वाटा धुंडाळाव्या लागतातच …
9.अडवा करून पहा ;)
४ वाजले होते सलग ९ तासांची चढाई झालेली, कड्यावर निशब्द होऊन मन:शांती होईपर्यंत, शांत चित्ताने मंद डोळ्यांनी ते चित्र मन:पटलावर कोरून हरिश्चन्द्रेश्वरच्या मंदिराकडे निघालो. तहान भूक तर विसरली होतीच पण झोपायची जम इच्छा होती.
मंदिर परिसर अभ्यास व निरीक्षण हा कार्यक्रम उद्यावर टाकून एका गुहेत जागा मिळवली व पुन्हा डोम्बाच्या मंदिरापाशी एका टेकडीवर मी, सुरज, राहुल, समीर गप्पांत रंगून गेलो इतक्यात जेवण तयार झालेले वृत्त आले. सोबतच रोहिणीनेजेवण बनवण्यास चिक्कार मदत केल्याच खात्रीलायक वृत्त होत ;)
10. gappa martana amhi tighe
८ वाजता हा कार्यक्रम आटोपले व त्या duplex गुहेत जे अग्निकुंड होत त्यामध्येच आग पेटउन त्या तांबड्या पिवळ्या मंद प्रकाशात सचिन, आबासाहेब, देवा, अनिकेत, सुरज, शंकर बापू, जीतुदा,अशा दिग्गजांसोबत वैचारिक जुगलबंदी सुरु झाली. ऐतिहासिक, सामाजिक, भौगोलिक, जातीय-आंतरजातीय, राजकीय, शैक्षणिक तसेच संघटनात्मक विचारप्रवाहिक , बखर-कादंबऱ्या ते दिल्ली निर्भया - आतपासून इतपर्यंत असे एक वैचारिक चर्चासत्र झडल, व त्या चांगदेव गुहेत गपगार झालो …11.
त्या चांगदेव गुहेत झालेली झोप कोणत्याही आलिशान शयनगृह पेक्षा नक्कीच छान होती.पहाटे थंडगार वाऱ्याने जाग आली. संधिप्रकाशत हरिश्चंद्रेश्वर मंदिर उजळून निघाले होते। बाहेर थोड़ा फेरफटका मारला, उत्कृष्ट बांधकाम शैलीमध्ये हरवून गेलो. मध्यभागी शिवलिंग दोन्ही बाजुंना नंदी एक छोटा मोठा, पश्चिम बाजूला चांगदेव गुंफासमूह, प्रत्येक गुहेच्या अथवा लेण्याच्या प्रवेशद्वाराखाली अतिशय ठण्ड आशा पिण्याच्या पाण्याचे टाके, दक्षिणेला दोन मंदिरे तिहि खोदीव व् आखीव रेखीव, 12. या सर्वांच्या उत्तरेकडून केदारेश्वर मंदिर किंवा गुहेकडे जाणारा मार्ग व् मंगळगंगा नदीचे उगमस्थान, अन पूर्वेला या सौंदर्यलेण्यात येण्यासाठी एक बांधीव प्रवेशद्वार. पूर्वेला बरेचश्या दगडी मूर्त्या व् भग्नावस्थेतील शिल्पे, व् तय बाजूला पुष्करणी तलाव तलवाच्या दक्षिण तीराला कही कही बंधिव देवदया आहेत बजुलाच जमिनीखाली आणखी एक गुम्फामूह आहे, या एकंदर परिसरात काही शिलालेख दिसून आले (बहुदा ८ होते) पैकी चाँगदेवगुहेतील शिलालेखावर चांगदेवानी या गुहेत बसून 'तत्वसार' ग्रंथ लिहल्याचा उल्लेख अहे. तर 'नंदतुतस्तसुतुविकटदेउ' हा शिलालेख ७०० वर्षे जूना आहे. पुढे तारामती शिखराच्या उत्तर उतारावर ४ मोठ्या गुहा आहेत त्या गणेशगुम्फ़ा या नावाने ओळखल्या जातात।
13. केदारेश्वर
मुख्य हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या उत्तरेला थोड़े खाली उतरून गेल्यावर वैशिष्ठ्यपुर्ण अशी केदारेश्वराची गुहा त्यामध्ये साधारण ४ फुट पाण्यात असणारे शिवलिंग, साधारण ३०*३० फुट प्रचंड सभागृह कृती गुहेत मध्यभागी शिवलिंग आहे, याला ४ खंबानी आधार दिलेला दिसतो पण यातील एकच खांब आपल्या प्रचीनतेची साक्ष देत उभा आहे.
14.हरिश्चंद्रेश्वर मंदिर
केदारेश्वर पाहून आपण पुन्हा आलेल्या वतीने वाटेने बालेकिल्याकडे जायचे शेवटी राहते ते तारामती शिखर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरांपैकी एक. इथून उत्तरेला कळसूबाई, रतनगड ,कात्राबाई खिंड तर तर दक्षिण-पश्चिमेला माळशेज घाट,सिद्धगड, आजोबा, नाणेघाट, इ. चे स्पष्ट दर्शन घडते।15
16. jarashi hava
तारामती शिखरावर एक उत्तुंग भगवा फडकवून आम्ही परतीचा प्रवास सुरु केला,,,,,
17.तारामती शिखरावर एक उत्तुंग भगवा लावताना गडवाटकरी
पश्चिमेकडील वाटेने पुन्हा कोकणकड़ा डोळ्यात साठवून नळीची वाट दावीकडे ठेवून साधले घटाची वाट तुडवायला सुरु केली, ही वाट नलीसारखी अवघड नसली तरी थकवणारी आहे जंगल संपताच कलाडगड उजवीकडे ठेऊन एका निमुळत्या खिंडीपाशी पोहोचलो.
18.kaladgad
19.नळीच्या वाटेसारखेच दोन्ही बाजूला खडे पाषाण, काही साधे patch पार करून घात तर उतरलो पण नंतर बेलपाडा हे गाव मृगजळा प्रमाणे भासू लागले, कित्येक मैल रान तुडवला तरी गावाचा मागमूस लागत नव्हता. हरिश्चंद्रची दाहकता इथे स्पष्ट होते.
बेलाग आणि अफाट या शब्दांतही अचूक पकडणे या गडाला शक्य नाही , मग केव्हातरी ४ वाजता गावात पोहोचलो व एक भला मोठा ट्रेक संपत आला होता. सह्याद्रीतून परतताना अंत:करण जड होत होते, खूप काही शिकऊन अनुभव देऊन सह्याद्री पुन्हा एकदा खुणावत होता, याच विचारचक्रात असतानाच समोर आलेल पिठलं भाकरीच ताट कांद्यासह कधी फस्त झालेलं समजलाच नाही !!!
20.साधले घाटातील एक कातळी दृश्य
21.
व सरतेसामयी कोकणकड्याला राम राम ठोकून गाड्या चालू केल्या व वेल्हिवरे-मोरोशी-टोकावडे-मुरबाड-कल्याण-ठाणे-मुंबई पोहोचलो एकदाचं !!!!
22. mage bahucharchit kokankada
संयमी वाचनाबद्दल धन्यवाद :) :)
23. RIDERS


आता पुढे -
आज माझा दिवस हरिश्चंद्रगडावर उशिराच उगवला. आजसाठी सकाळचा काहीही कार्यक्रम ठरलेला नव्हता. दोन महिन्यांपूर्वी आलो होतो तेव्हा तारामती शिखर बघून झालं होतं. सकाळी उठून चहा नाश्ता करून साधले घाटा मार्गे उतरायचं, एवढंच ठरलं होतं. या ट्रेकचा मूळ उद्देश 'नळीची वाट' एवढाच होता मुळी. त्यामुळे बाकी काहीही कार्यक्रम नव्हता. मात्र आज झोपेतून जागं होतानाच एक मजेशीर गोष्ट घडली. कसं कुणास ठावूक, पण अचानक माझ्या तोंडात कालचं "गापू ची गापू ची गम गम ……" गाणं आलं होतं. काल प्रयत्न करूनसुद्धा हे शब्द आठवायला काही तयार नव्हते आणि आज झोपेतून जागा झाल्या झाल्या माझ्या तोंडात हे गाणं बसलं होतं. आता तोंडातल्या टेप रेकॉर्ड च्या कॅसेट ची ‘बी’ साईड चालू झाली होती. बाहेर आल्या आल्या सिडनी, मेलबर्न च्या दिशेने पळालो. या हरिश्चंद्रगडावरच्या माझ्या काही आवडत्या जागा आहेत, जिथे सकाळी मी "बॅटिंग" करायला जातो. मग पटापट आवरलं आणि बाकीच्यांनाही आवरायला लावलं.

तुकाराम चे पोहे खायला बसलो, तेव्हा तिथे पुण्यातला एक अनुभवी ट्रेकर भेटला. हरिश्चंद्रगडाविषयी त्याच्याकडून बरंच काही काही ऐकायला मिळत होतं. टोलार खिंडीतून येणाऱ्या आणि पाचनई वरून येणाऱ्या या दोन वाटा सामान्यतः माहित असतात, पण त्याशिवाय गडावर येणाऱ्या इतर कित्येक वाटांची माहिती त्याच्या तोंडून मिळत होती. काल आम्ही आलो होतो ती नळीची वाट, त्याच्या समोर म्हणजे कोकण कड्याच्या डाव्या बाजूने वर येणारी आणि अति तीव्र उताराची माकड वाट, जुन्नर दरवाज्यामार्गे जाणारी वाट, आज आम्ही जाणार होतो ती कोकण दरवाज्यामार्गे जाणारी वाट अश्या एक ना अनेक वाटा गडावर येतात. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा किल्ला असावा. लांबी रुंदीच्या बाबतीत हा गड प्रचंड पसरला आहे. निसर्गतःच याला एखाद्या आश्चर्याप्रमाणे असलेला कोकण कडा आणि अतिशय उंच असं तारामती शिखर, या गोष्टी लाभल्या आहेत. पूर्वीच्या काळी गडावर राबता चांगलाच होता हे नक्की. त्याशिवाय हरिश्चंद्रेश्वराच्या देवळाची आणि पुष्करणीची शिल्पकला बहरली नसती. समोरच्या खोदीव गुहा तर त्याही पूर्वीच्या असाव्यात. संपूर्ण गडावरच्या शिवलींगांची मोजणी केली तर शेकड्यांच्या घरात सापडतील. खालचं केदारेश्वराचं शिवलिंग तर अतिशय सुंदर. नाही म्हंटलं तरी गडावर अजून 'किल्ला' म्हणण्याजोगं असं बऱ्यापैकी बांधकाम शिल्लक आहे. बालेकिल्ल्याचे काही अवशेष आहेत. कोकण दरवाजा, जुन्नर दरवाजाच्या कमानींच्याही काही खुणा शिल्लक आहेत. एकूणच गड बघायचं म्हंटलं तर आठवड्याभराची सुट्टी काढून यायला हरकत नाही असं त्या ट्रेकर च्या बोलण्यातून कळून येत होतं. आपल्या पुरातत्व खात्याच्या उत्साहामुळे सध्या आहे तेवढंही बांधकाम गायब व्हायच्या आत लवकरात लवकर हे सगळं पाहून घ्यायचा विचार मनात आला. गप्पा मारता मारता चहा पोहे संपवले आणि एक गृप फोटो काढून परतीच्या प्रवासाला निघालो.

घड्याळात दहा वाजून गेले होते. तुकाराम आमच्या सोबत बेलपाड्यापर्यंत येणार होता. तो म्हणे इथून तिथे तीन तासात पोहोचतो. आम्हाला साडे चार किंवा फार फार तर पाच तास लागतील असा सरळ सोपा अंदाज आम्ही बांधला होता. कारण तोपर्यंत 'कोकण दरवाज्यामार्गे साधले घाट' हे काय प्रकरण आहे हे आम्हाला कळलं नव्हतं. त्यामुळे उशिरात उशिरा म्हणजे दुपारी तीन वाजता कमाच्या घरी पोहोचू अशी आमची अटकळ होती. म्हणून जेवणाची सोय तिथेच करायला सांगितली होती. आमच्या जवळचं खाण्याचं साहित्य अजूनही थोडं शिल्लक होतं. पोहेही पोटभर झाले होते, त्यामुळे वेगळं काही जेवण बांधून घ्यायची गरज वाटली नाही. तुकाराम ही निर्धास्त होता. केदारेश्वराला नमस्कार करून त्याच्या उजव्या बाजूने वर आलो आणि त्या पठारावरून साधारण ईशान्येकडे चालू लागलो. काही पावलं चालून गेल्यावर काही नैसर्गिक रित्या तयार झालेल्या पायऱ्या लागल्या. ह्यांना सात पायऱ्यांची वाट असं म्हणतात असं तुकाराम ने आम्हाला सांगितलं. आता त्या सगळ्या दगडांमध्ये नक्की सात पायऱ्या कोणत्या आणि कुठपासून कुठपर्यंत धरायच्या असा विचार करत होतो, तेवढ्यात बाकीची मंडळी पुढे निघून गेली आणि मग मी ही तो नाद सोडून दिला. सुरुवातीपासूनच किरण चा काल दुखावलेला एक पाय आज चांगलाच ठणकत होता. त्यामुळे उतारावरून चालायला तिला वेळ लागत होता. तरी नजर पडत राहील इतकं अंतर एकमेकांपासून ठेऊन सर्व जण चालत होतो. माझ्या तोंडून 'गापू ची गापू ची गम गम' ची आवर्तनं चालू झाली होती. अधूनमधून बाकीचेही मला साथ देत चालत होते. साधारण ३०-४० मिनिटं चालून गेल्यावर तुकाराम एकदम वाट सोडून डावीकडे खाली झाडा-झुडपांच्या दिशेने वळला. आत्तापर्यंत आम्ही पठारावरच चालत होतो. आता एक एक टेकाड उतरत आम्हाला कोकण दरवाज्याच्या दिशेने जायचं होतं. 'इथे या ठिकाणी वाट आहे' असं कोणाला सांगूनही खरं वाटणार नाही, अश्या ठिकाणी तुकाराम झाडाझुडपांमध्ये घुसला.
1
त्याच्या मागोमाग आम्हीही घुसलो. अतिशय दाट झाडी. आमच्या डोक्याच्याही वर जाणारी.
2
आमच्या पाठीवरच्या बॅग्ज ना आम्ही आमच्या झोपण्यासाठीच्या मॅट्स आडव्या बांधल्या होत्या. त्या दोन-अडीच फुट रुंदीच्या मॅट्स सुद्धा त्या झाडांमधून जाऊ शकत नव्हत्या. बॅग्ज काढून हातात घेऊन न्याव्या लागत होत्या. सरळ-सोट उभं राहून चालताही येत नव्हतं. तसंच कसंबसं एकमेकांना हाकारे देत देत समोरचा जाईल त्याच्या मागे त्या दाट झाडांमधून पुढे जात होतो. अगदी अपेक्षितपणे एक जण चुकला आणि त्याच्या मागचे तसेच त्याच्या मागे मागे गेले. अगदी काहीच पावलं चालून गेल्यावर वाट चुकल्याचं कळलं आणि पुन्हा माघारी यायला निघालो. अशातच त्या चुकलेल्या वाटेवर नेहाचा एक पाय मुडपला आणि चांगलाच लचकला. नेहा बॅग टाकून खालीच बसली. तिला उभंच राहवेना. थोडा वेळ ती तिथेच बसली. बाकीच्यांना एक एक करून परत पाठवलं आणि शेवटी नेहा ला घेऊन उठलो. तश्या त्या झाडांमध्ये आणि दगडांमध्ये ती लंगडत, कण्हत पायाला घट्ट रुमाल बांधून चालू लागली. उतार तीव्र होता पण आजूबाजूला गच्च झाडी होती. ती पार करून, खरचटवून, ओरबाडून घेऊन खाली उतरलो. मागे वळून बघितलं तर इथून आपण आलो असा विश्वास सुद्धा बसत नव्हता.
5
असंच थोडं अजून खाली गेल्यावर कोकण दरवाजा लागला. दरवाज्याची कमान आता काही शिल्लक नाहीये, पण बाजूच्या बुरुजाचं भक्कम बांधकाम शाबूत आहे.
3
4
त्या बुरुजावरून उजवीकडे चालत गेलो तर समोर कलाडगड आणि कोंबडा हे दोन किल्ले दिसत होते. त्याच्या डावीकडे साधले घाट जिथून उतरतो ती जागा दिसत होती. सगळा विस्तीर्ण परिसर पटकन नजरेखाली घालून मागे वळलो आणि दरवाजाच्या दिशेने चालत आलो. तेवढ्यात बुरुजावरच्या वाळलेल्या गवतावरून माझा पाय घसरला आणि माझ्या पुढे चालणाऱ्या नाना ला माझ्याकडून साष्टांग नमस्कार घडला. माझे गुडघ्यापासून पुढचे पाय बुरुजाच्या बाहेर होते आणि बाकीचे शरीरही त्या दिशेने घसरत होते. तसाच पटकन उठून दोन पायांवर उभा राहिलो. त्या नादात माझ्या एका हाताच्या बोटाचं नख तुटलं. नाना डोळे विस्फारून माझ्याकडे बघत होता. केवळ २-३ सेकंदांचा वेळ लागला हे सगळं घडण्यात, पण आज माझी पालखी होता होता राहिली होती.

या कोकण दरवाज्यातून उतरताना काही वेळ आपल्याला उजव्या हाताला बांधीव तटबंदी सोबत करते. आम्ही वर जाऊन आलो होतो त्याच बुरुजाची ही तटबंदी. पुढे तटबंदी संपून सरळसोट उभा कातळ आपल्या उजव्या हाताला लागत राहतो. तसंच डाव्या हातालाही थोडं अंतर सोडून एक उभा कडा आहे. डोंगराच्या एका गचपणात सहजासहजी दिसणार नाही असा हा दरवाजा बांधलेला आहे. दोन्ही बाजूचे मूळ कडेच उंच उंच आहेत.
6
त्यामुळे कदाचित दरवाजा आणि त्या बाजूच्या बुरुजांची आणि तटबंदीची उंची फारशी वाढवली नसावी. पुढे काही अंतर दगडांच्या वाटेने पार केल्यावर या संपूर्ण टेकाडाच्या पायथ्याशी येउन पोहोचलो. भरपूर मोठी सपाटी दृष्टीस पडत होती. अर्ध्या लोकांना तर वाटलं की पोहोचलोच आपण बेलपाड्यात. मलाही काही विशेष अंदाज येत नव्हता. फक्त आपल्याला अपेक्षित ठिकाण अजून लांब असावं हे कळत होतं. मी भरभर चालत सर्वात पुढे चालणाऱ्या तुकारामला गाठायला निघालो. तो एका झाडाखाली बसून आमची वाट बघत थांबला होता. (म्हणून सापडला.) मग आम्हाला बघून उठला आणि पुढे चालायला लागला. मी ही त्याच्यासोबत चालू लागलो. त्याला पहिला प्रश्न केला, "तुकारामदादा, आता कसा रस्ता आहे बेलपाड्यापर्यंत?"
तुकारामदादाने समोरच्या एका V आकाराकडे बोट केलं. "त्ये तिथं त्या दोन डोंगरांच्या मधून आपल्याला खाली उतरायचं हाय. त्यो साधले घाट."
म्हणजे साधले घाट अजून आलाच नव्हता! तो V सुद्धा चांगलाच लांबवर दिसत होता.
मी आता थेट मुद्द्यावर आलो, "बेलपाड्याला पोहोचायला अजून किती वेळ लागेल?"
त्यावर तुकाराम उद्गारला, "अजून लई येळ हाय. साधले घाट उतराया लागल्यावर आपल्याला अडीच-तीन तास तरी लागतील."
मी घड्याळात बघितलं, सव्वा वाजला होता. अजून अडीच-तीन तास म्हणजे ४ वाजणार हे नक्की. त्यानंतर जेवण. तोपर्यंत काही नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे आधीच तीन तास चाल झाली आहे. त्यातच नेहाचा पाय मुरगळलाय. किरणचा ही पाय दुखतोय. आणि अशातच एवढ्या उन्हात अजून तीन तास? ते ही हा सरळ तोंडाने सांगतोय, म्हणजे प्रत्यक्षात किती लागतील? मी जरा काळजीतच पडलो. सकाळी निघताना ह्याच्या तीन तासांना आमचे साडे चार - पाच तास असा आम्ही हिशोब लावला होता, पण गुणोत्तर आता जरा चुकल्यासारखंच वाटत होतं.

मी तसाच त्याच्यासोबत चालत गेलो. थोडा वेळ गप्पा मारल्या. मग पुढे एक कच्ची सडक लागली. जाड खडी असलेली. हा रस्ता पाचनईपासून महामार्गाकडे जातो. ह्या रस्त्यावर थोडावेळ गाणी म्हणत म्हणत चाललो आणि पुढे रस्ता सोडून एका ओढ्यावर बांधलेल्या बांधाकडे वळलो. तिथे सर्वांनी आपापल्या रिकाम्या पाण्याच्या बाटल्या भरण्यासाठी बाहेर काढल्या. मागून सर नेहाची बॅग घेऊन येत होते. नेहा बिचारी थकून गेली होती. कशीबशी लंगडत चालत होती. पाणी भरून झाल्यावर तुकाराम उठला आणि जंगलाच्या दिशेने चालू लागला. पाणी भरून झाल्यावर आळीपाळीने सर्व जण फार न थांबता निघाले. आता नेहाची बॅग मी हातात घेऊन चालत होतो. तुकाराम पुढे जाऊन एका जंगलात घुसला. थोडा आतपर्यंत चालून गेल्यावर एका ठिकाणी थांबला. मला म्हणाला, "इथून साधले घाट चालू. सर्वांनी वेवस्थित या." मी "बरं" म्हंटलं. मनगटाच्या घड्याळात दोन वाजले होते. मी मागून येणाऱ्यांची वाट पाहत जरा पाणी पिण्यासाठी बसलो. तुकाराम ला पुढे व्हायला सांगितलं. गायकवाड साहेब ही त्याच्या सोबत होते. लगेचच मागची मंडळी गाणी म्हणत म्हणत येऊन पोहोचली. त्यांनाही साधले घाट सुरु होतोय हे सांगितलं आणि निघालो. तिथून काही पावलं चालून गेल्यावरच आम्ही एका मोठ्या तीव्र उताराच्या खिंडीच्या तोंडाशी येउन पोहोचलो. जंगल आता आमच्या पाठीमागे होतं. दोन्ही बाजूला उंच कडे आणि त्यांच्या मधून ही वाट उतरत होती. नळीच्या वाटेसारखी. नळीच्या वाटेवर पहिला रॉक पॅच आणि दुसरा रॉक पॅच च्या मध्ये जशी वाट आहे तशीच.
7
माझ्या हातात नेहाची बॅग होती. उतार तीव्र होता; त्यामुळे पावलं जपून टाकावी लागत होती. मागून येणाऱ्या किरण चा एक पाय आधीच दुखत होता. त्यामुळे या वाटेवरून उतरणं तिला जरा जड जात होतं. थोड्या वेळासाठी तीने तिची बॅग विनीत च्या हातात दिली आणि काळजीपूर्वक उतरू लागली. हा साधारण २००-३०० मीटर्स चा सरळसोट उतार होता. पुढे ही वाट उजव्या बाजूच्या कड्याला खेटून खाली उतरत होती. आता ह्या वाटेवर सर्वांचीच गाणी (अजून समर्पक शब्द - बोलती) बंद झाली होती. फक्त एकच घोष चालू होता, ‘गापू ची गापू ची गम गम’. बाकी अक्खा आसमंत शांत होता.

ह्या घाटाचा खरं नाव 'सादडे घाट'. कारण हा भाग अर्जुन-सादड्याच्या झाडांनी भरलेला आहे. पण त्या शब्दाचा अपभ्रंश होऊन आता ‘साधले घाट’ हेच नाव गावकऱ्यांमध्ये प्रचलित आहे. दोन कड्यांच्या मधली वाट संपल्यानंतर हे जंगल सुरु झालं होतं. उतार अजूनही होताच, पण त्याच्या जोडीला आता पायाखाली दगडांच्या ऐवजी भुसभुशीत माती आली होती. इतकी भुसभुशीत की त्यात एखादा मोठाला दगड बघून आपण त्यावर जरी पाय ठेवला तरी आपण त्या दगडासकट खाली घसरत जाऊ. म्हणजे कितीही काळजी घेतली तरी घसारा नशिबी होताच. एका जागी पाय ठहरणे कठीण जात होते. त्यामुळे इथेही सर्वांच्या पायांची गती ही मंदच होती. दर दोन मिनिटांनी कोणी तरी घसरून पडत होतंच. घड्याळ पुढे पुढे धावत होतं, वरती ऊन 'मी' म्हणत होतं आणि ही घसरडी वाट काही संपायचं नाव घेत नव्हती. किरण आणि नेहा अक्षरश: कश्या बश्या उतरत होत्या. एक एक पाउल पुढे टाकताना घाबरत होत्या. किरण चा दुखावलेला पाय त्या मातीच्या रस्त्यात काही फार चांगली साथ देत नव्हता. तरीही ती पाठीवर बॅग घेऊन चालत होती. नेहाची बॅग माझ्याकडेच होती. एका ठिकाणी मी किरण ला बॅग विनीत कडे द्यायला सांगितली. ती 'नाही' म्हणाली. बॅगेशिवाय चालणं जरा सोपं होईल, असं ही सांगून बघितलं, पण तरीही नाही म्हणाली. पण तिच्या मागे बरेच जण खोळंबून राहिले होते आणि तिला वेग वाढवणं काही जमेना. दोन मिनिटांनी मी पुन्हा तिला तेच सांगितलं, पण "माझ्यामुळे इतरांना वजन उचलायला का लागावं?" असं मनाशी म्हणत तिने पुन्हा नकार दिला. आता मात्र मला नाईलाजाने माझा आवाज थोडा वाढवावाच लागला. नाखुषीने तिने शेवटी बॅग विनीत कडे दिली, पण आपल्या डोळ्यातले अश्रू काही ती मानी मुलगी थांबवू शकली नाही. साधले घाटाने आत्तापर्यंत नेहा-किरण च्या डोळ्यात पाणी आणलं होतंच, पण बाकीच्यांचीही परिस्थिती काही फार वेगळी नव्हती. मयुराचीही बॅग आता पिके च्या हातात आली होती. पायाखालची भुसभुशीत जमीन, त्यामुळे पडल्यावर लागणारे दगड-गोटे आणि त्यावर कहर म्हणजे अजिबात न संपणारा असा हा लांबलचक रस्ता. त्यात मोठी गम्मत म्हणजे इतके उतरून सुद्धा आम्ही जमिनीच्या सपाटीपासून अजूनही बरेच वर होतो. ही घाटाची वाट अजून किती लांब उरली आहे हे तुकाराम सोडून कोणालाही माहित नव्हतं. अगदी आमच्या सरांनाही नाही. रस्ता लांब असण्याबद्दल किंवा खडतर असण्याबद्दल काही तक्रार नाही, पण हा असा प्रकार आणि तो ही त्या विशिष्ट वेळी अगदी म्हणजे अगदीच अनपेक्षित होता. ट्रेकचा मुख्य उद्देश हा 'नळीची वाट' हा होता आणि तो पूर्ण झाला होता. त्यामुळे घरी जाताना आता काही विशेष कष्ट नाही करावे लागणार, अगदी आरामात जायचं, असा सर्वांचा अंदाज होता. पण समोर जे दिसत होतं ते त्या समजुतीच्या अतिशय विरुद्ध होतं. 'नळीच्या वाटेसारखा' खडतर प्रकार सर्वांनी अगदी लीलया पूर्ण केला होता, कारण तशी प्रत्येकाला पूर्व कल्पना होती आणि त्याप्रमाणे प्रत्येकाची मनाची तयारी होती. इथे असं काहीच नव्हतं. सगळं अनपेक्षितपणे आणि इच्छा नसताना अंगावर येउन पडलं होतं. बराच वेळ चुपचाप राहिल्यानंतर शेवटी न राहवून नाना म्हणालाच, "च्यायला, काल नळीच्या वाटेने जितका कॉन्फिडंस आला होता त्या सगळ्याची आई माई एक केली या वाटेने!"

दोन वाजता उतरायला सुरुवात केलेला साधले घाट, अजून चार वाजले तरीही आम्ही उतरतच होतो. मध्येच एका ठिकाणी तुकाराम आणि गायकवाड साहेब बसलेले आम्हाला दिसले. ते आमची वाटच बघत होते. एका ओढ्याच्या समोर आम्ही येऊन पोहोचलो होतो. ओढा पावसाळ्यात. आता फक्त बाजूला पाण्याचं एक छोटंसं डबकं होतं. वरच्या बाजूने पाणी झिरपत होतं आणि खालच्या बाजूला एक छोटासा ओघळ वाहत होता. बाकी सगळे ओढ्यातले दगड-गोटे खालच्या बाजूला पसरलेले दिसत होते. आधी मी आणि पिके, नानाच्या वाक्यावर हसत हसत तिथे येऊन पोहोचलो. तुकाराम आणि गायकवाड साहेबांनी आमचं हसत हसत स्वागत केलं. आमच्या मागून आळीपाळीने एक एक जण येऊन पोहोचला. गायकवाड साहेब येणाऱ्या प्रत्येकाची भलावण करत होते. "शाब्बास शाब्बास" म्हणत होते. रडवेल्या तोंडाच्या मुली, थकलेला तुषार, आदित्य, कैवल्य असे सगळे खांद्यावरची बॅग अक्षरशः फेकून खाली बसले. तुषार दुसऱ्याच क्षणाला आडवा पडून घोरायला लागला. 8
बाजूला डबक्यात तळाशी थोडं पाणी होतं. ते वाघासारखं थेट तोंड लावून आणि झोपून प्यावं लागणार होतं. आमच्यातल्या काहींनी ती हौस पूर्ण करून घेतली. पण अर्थात जे खूप थकले होते ते काही जागचे हलले नाहीत. त्यांच्यासाठी मोठ्या तोंडाच्या बाटल्यांमध्ये त्या डबक्यातलं पाणी अलगद भरून घेतलं आणि त्यांना नेऊन दिलं. सकाळी साडे नऊ - दहा वाजता तुकारामकडे जो नाश्ता झाला होता त्यानंतर कोणीही काहीही खाल्लं नव्हतं. माझ्या बॅगेतलं शेझवान स्टिक्स चं पाकीट मी बाहेर काढलं. हा सद्यपरिस्थितीतला आमच्याकडचा अन्नाचा शेवटचा स्रोत होता. त्या पलीकडे कोणाकडेही काहीही नव्हतं. पाव किलोची ती पिशवी अर्थातच थोड्याच वेळात रिकामी झाली. सर, पिके, गायकवाड साहेब, विनीत, नाना असे आम्ही काही जण वातावरण हलकं करण्यासाठी गप्पा मारत होतो. सर अधून मधून काही जुन्या गोष्टी, विनोद वगैरे सांगत होते. "मी लाडू आणलेत. खायचे का?" असं म्हणून त्यांच्या पुतण्याची - आदित्य ची गम्मत करत होते. वातावरण खरंच थोडंसं निवळत होतं. गप्पा, खाणं, पाणी करता करता शेवटी पुन्हा महत्वाचा विषय निघालाच. "अजून किती वेळ?" तुकारामला प्रश्न गेला. यावेळी दुपारचे चार वाजून गेले होते. ओढ्याच्या दिशेला काही झाडांच्या मागे दिसणाऱ्या दरीकडे पहात पहात (अजूनही समोर दरीच दिसत होती! आम्ही अजूनही डोंगरावरच!) तुकारामने उत्तर दिलं, "अजूनबी लई येळ हाय. कमीत कमी तास - दीड तास!" तुकारामच्या या उत्तराने घोरणारा तुषार खडबडून उठला! सगळ्यांच्या तोंडातल्या शेझवान स्टिक्स ची कुरकुर अचानक थांबली!! झोपलेल्या पोरींनी सुद्धा चक्क डोळे उघडले!!! अजून तास - दीड तास? 'या तुकाराम नावाच्या माणसाने आज फक्त आपली मस्करीच करायला तर इथे आणलं नाही ना?' अश्या नजरेने सगळे त्याच्याकडे बघायला लागले. तुकारामसाहेब निर्विकार चेहऱ्याने उठले आणि चालू लागले. "चला. आता कुठंबी थांबायचं नाय!" असंही जाता जाता ऐकवून गेले.

आलीया भोगासी…… म्हणता म्हणता एक एक जण उठत होता. सर्वात तरुण आणि तंदुरुस्त असे पन्नाशीचे गायकवाड साहेब तुकारामच्या मागे मागेच निघून गेले होते. सर ही उठून आमची निघण्याची वाट बघत थांबले होते. किरण ने निश्चयाने आपली बॅग उचलून पुन्हा खांद्यावर घेतली आणि कोणाचीही वाट न बघता पुढे निघून गेली. कितीही नाही म्हंटलं तरी त्या थोड्याश्या विश्रांतीने सुद्धा थोडंसं बरं वाटत होतं. आता आम्हाला निदान आमच्या आत्ताच्या परिस्थितीवर हसायची तरी ताकद मिळाली होती. उतार अजूनही संपत नव्हताच. मध्येच चालता चालता तुषारचा फोन वाजला. तो त्याच्या बॅगेत होता. त्याने दुर्लक्ष केलं. तरी फोन दोनदा तीनदा वाजतच राहिला. आता मात्र तुषारचा संयम संपला. त्याने तो फोन कोणी केला हे न बघताच त्याला शिव्यांची लाखोली वाहायला सुरुवात केली. अक्ख्या दिवसभराचं फ़्रस्ट्रेशन हे असं बाहेर निघत होतं. आम्ही ते बघून जोरजोरात हसत होतो. सगळेच कमी अधिक प्रमाणात वैतागले होतेच. सरांबरोबर विनीत आणि पिके ने शेवटपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर हसू टिकवून ठेवलं होतं. त्याबद्दल त्यांचं खरंच कौतुक वाटलं. माझ्या ‘गापू ची गापू ची गम गम’ ने सुद्धा पूर्ण वेळ वातावरण हलकं ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. इतका की हे गाणं आता आयुष्यात पुढे कधीही ऐकलं तरी समोर ही कोकण दरवाजा आणि साधले घाटाची वाट उभी राहील. पण आता मलाही चालायचा मनापासून कंटाळा यायला लागला होता. सर्व जण कंटाळले होते, पण तरीही चालतच होते, ते फक्त एका कारणामुळेच. ते म्हणजे 'दुसरा पर्याय नव्हता'!

तो डोंगरउतार एकदाचा संपला. घाट संपवून आम्ही सपाटीवर आलो होतो. डोंगर मागे पडत चालला होता आणि आम्ही गावाच्या दिशेने चाललो होतो. चारचे पाच आणि पाचा चे साडे पाच सुद्धा झाले होते, पण गाव म्हणावं अशी कुठलीही खूण अजूनही दिसत नव्हती. तरीही पाय ओढत सर्व जण चालतच होते. सूर्य देव मावळतीला आले होते. निदान सूर्यास्ताच्या आधी तरी कमाच्या घरात पोहोचावं असं आम्हाला वाटत होतं. आजचा सूर्यास्त हा असा अर्धवट वाटेत बघण्याची कोणाचीही इच्छा नव्हती आणि काल मात्र आम्ही सूर्यास्त पाहण्यासाठी कोकण कड्यावर जागा पकडून आणि कॅमेरे सरसावून बसलो होतो. काल हवाहवासा वाटणारा सूर्यास्त आज आम्हाला नकोनकोसा होता. कष्ट कालही नळीची वाट चढताना घेतले होते आणि आजही साधले घाट उतरताना घेतले होते; मात्र कालचा दिवस आमच्यासाठी जितका विशेष होता तितकाच आजचा दिवस खडतर होता. काल याच वेळी आमचे चेहरे जितके शांत आणि समाधानी होते तितकेच आज त्रासलेले आणि रडवेले झाले होते. सूर्य तोच होता, सूर्यास्ताची वेळही तीच होती, मात्र बदलली होती ती आमची जागा! ‘NOTHING IS PERMAMANT IN LIFE - आयुष्यात सर्व काही अशाश्वत आहे’, हेच महान तत्व मूकपणे हे सूर्य देव आम्हाला शिकवून त्यांच्या पुढच्या प्रवासाला चालले होते.

बऱ्याच वेळाने गावाची म्हणावी अशी पहिली खूण दिसली, ती म्हणजे पाण्याची टाकी. जीव थोडासा भांड्यात पडला. पावणे सहा झाले होते. तो प्रचंड हरिश्चंद्रगड आता आमच्या पाठीमागे राहिला होता. पण बेलपाड्यातून अगदी सरळ समोर कोकण कडा दिसतो, त्याचा तर इथे कुठेही मागमूसही दिसत नव्हता. आम्ही मागच्या डोंगराला वळसा घालून डावीकडे चाललो होतो, पण एवढा सहज दिसेल असा कोकण कडा काही दृष्टीस पडत नव्हता. अजूनही तासभर तर चालायचं नाही ना? विचारानेच छातीत धस्स झालं. गाव जवळ येत चाललं होतं. आमच्या डाव्या हाताला अजूनही टेकड्याच दिसत होत्या. गावच्या वस्तीत शिरलो. आजूबाजूला काही पाट्यांवर 'वालीवरे' असं काहीसं लिहिलेलं दिसत होतं. आमच्या बरोबरच्या कैवल्य आणि आदित्य ला आम्ही सांगायला सुरुवात केली, "बेलपाडा अजून बरंच लांब आहे, हे वालीवरे आलं!" त्यांना खरंच वाटलं. ते दोघेही बिचारे तोंड पाडून इकडेतिकडे बघू लागले. एका ठिकाणी समोर चालणारा प्रत्येक जण उजवीकडे वळण घेऊन नाहीसा होत होता. आम्हीही त्या जागेवर आलो. मी उजवीकडे वळलो आणि समोर दिसलं ते बेलपाड्यातलं कमाचं घर! हेच मी आजच्या दिवसात पाहिलेलं सर्वात सुंदर दृष्य! मागे वळून कैवल्यकडे कडे पाहिलं, त्याने तर अक्षरशः लगान मधल्या आमिर खान सारखे- तो जेव्हा शेवटचा चेंडू मारतो आणि तो सिक्सर आहे हे जाहीर होतं, तेव्हा तो देतो, अगदी तसेच एक्स्प्रेशन्स दिले. फक्त गुडघ्यावर बसायचा बाकी होता कैवल्य. सर्व जण हाश्श-हुश्श करत अंगणातच फतकल मारून बसले. बरोब्बर आठ तासांच्या अतिशय खडतर आणि पूर्णपणे अनपेक्षित पायपिटीनंतर आम्ही सर्व जण इच्छित स्थळी पोहोचलो होतो. हात पाय ओरबाडले गेले होते, मुरगळले होते, डोळे निस्तेज झाले होते पण तरीही प्रत्येकाने स्वत:च्या पायाने चालत हा ट्रेक पूर्ण केला होता ह्याचंच आम्हाला मोठं समाधान होतं. आमच्यासाठी कमाच्या घरी स्वयंपाक करून ठेवला होता. दुपारचं जेवण झालंच नव्हतं, तरीही फार कोणालाही जेवायची इच्छा नव्हती. अजून कल्याण पर्यंत पोहोचायला चार तास तर सहज लागणार होते. त्यामुळे बळजबरीने प्रत्येकाला धरून धरून जेवायला बसवलं. जितके जातील तितके दोन दोन घास सर्वांनी खाऊन घेतले. दिवसभराच्या सगळ्या दगदगीनंतर ते संध्याकाळी साडेसहा वाजता केलेल्या जेवणातले दोन घास सुद्धा खूप गोड लागत होते. जेवण झाल्यावर फार वेळ न घालवता जीपने मुरबाड च्या दिशेने निघालो आणि सर व आदित्य, गायकवाड साहेबांच्या गाडीतून (ज्या गाडीमुळे हा साधले घाट करायचा प्रसंग आला) पुण्याकडे रवाना झाले.

माझ्या आयुष्यातला हरिश्चंद्र गडावर जाण्याचा हा पाचवा प्रसंग आणि नळीच्या वाटेने जाण्याचा दुसरा. 'राहिलेल्यांसाठी पुन्हा एकदा नळीची वाट' हाच खरं तर या ट्रेक चा उद्देश होता. पण साधले घाटाने उतरणे हा कार्यक्रम त्यात आयत्या वेळी ठरवला गेला. दोन दिवसांचा एक ट्रेक होण्याच्या ऐवजी एक दिवसाचे दोन ट्रेक झाले होते. एकावर एक फ्री! त्यामुळेच मात्र आम्ही अभिमानाने म्हणू शकतो की नळीची वाट आणि साधले घाट आम्ही एकाच ट्रेक मध्ये केला. तसं बघायला गेलं तर या वाटेचा एवढा बाऊ करायची काही आवश्यकता नाही. जशी नळीची वाट तशीच ही साधले घाटाची वाट. कमी अधिक प्रमाणात सारखीच. पण स्वतःहून विहिरीत उडी मारणे आणि कोणीतरी मागून धक्का देऊन विहिरीत पाडणे यात जो फरक असतो तोच फरक आम्ही केलेल्या नळीच्या वाटेमध्ये व साधले घाटाच्या वाटेमध्ये. आपल्याही आयुष्यात सगळंच काही आपल्याला अपेक्षित असेल असं घडतंच असं नाहीच! अश्या वेळी 'शो मस्ट गो ऑन' म्हणत आपल्याला त्यातूनही मार्गक्रमणा करत जावं लागतंच की. हा ट्रेक आम्हाला त्याच गोष्टीची एक छोटीशी झलक देऊन गेला. आणि अर्थात शिकवण ही! त्या दिवशी आणि त्यानंतरही साधले घाटाच्या नावाने आम्ही कितीही ओरडा केला तरीही हा ट्रेक, नळीच्या वाटेपेक्षा मुख्यत्वे लक्षात राहील तो साधले घाटामुळेच!

१९७५ साली मी आणि माझे मित्र श्री.विजय देव - गोनीदांचे जामात - असे दोघेजण एक रात्रभर हरिश्चंद्रगडावर राहिलो होतो. त्यावेळेस डिजिटल छायाचित्रण कोणाच्या स्वप्नात पण नव्हते. माझ्या साध्या कॅमेर्‍याने आणि रंगीत फिल्मवर मी जे काही फोटो काढले ते येथे दाखवीत आहे. ते आता चाळीस वर्षांचे जुने असल्यामुळे त्यांचे रंग उडाले आहेत.

आमच्या सहलीचे रसभरित वर्णन करण्याचा येथे हेतु नाही कारण ते जालावर पुष्कळ ठिकाणी मिळेल. आजहि बरेच उत्साही तरुण तेथे जात असतात. ४० वर्षांपूर्वी ती जागा कशी दिसत होती आणि आज कशी आहे अशी तुलना करून पाहण्याची कोणास इच्छा असल्यास त्याला उपयोगी पडतील अशा हेतूने ही छायाचित्रे येथे दाखवीत आहे. प्रत्येक चित्राच्यावर त्याचे त्रोटक वर्णन आहे.

मुख्य मंदिर आणि शिखर


गणपति


मंदिराच्या आतील एक विष्णुमूर्ति


आवारातील वीरगळ



पुष्कळ जुन्या गावांमधून आणि मंदिरांजवळ असे वीरगळ दिसतात. केव्हातरी जुन्या काळात युद्धात पडलेल्य कोणा अनाम वीराचे हे स्मारक. ह्यावर ते स्मारक कोणाचे आहे अशा स्वरूपाचा काहीच उल्लेख नसतो. त्यावरील शिल्पकामहि एकाच प्रकारचे असते. सर्वात वर तो वीर आणि त्याची पत्नी स्वर्गामध्ये शंकराची पूजा करीत बसलेले दिसतात. मधल्या पातळीवर तोच वीर कोणाशीतरी झुंजतांना दिसतो. सर्वात खाली त्या वीराने आपले पृथ्वीवरचे आयुष्य ईश्वराची भक्ति करण्यात घालविले असे दाखविणारे काम असते.

मंदिरासमोरील पुष्करिणी आणि मूर्तींसाठी जागा



मंदिरासमोर एक बांधीव पण आता बरीच पडझड झालेली पुष्करिणी आहे आणि तिच्या चारी बाजूंनी अनेक कोनाडेवजा जागा आहेत. देवादिकांच्या मूर्ति ठेवण्यासाठी त्यांचा उपयोग होत असावा. आम्हांस मात्र ते सर्व कोनाडे मोकळेच दिसले.

मंदिराभोवतालची ओवरी



मंदिराभोवती ओवरी आहे. त्यातीलच एका खणात आम्ही रात्रीचा मुक्काम केला. त्या मुक्कामाची एक मजेदार आठवण. आम्ही वर जातांना एकदोन भांडी, डाळतांदूळ, फोडणीचे सामान आणि डाळीचे पीठ नेले होते, अशासाठी की वर स्वहस्ते खिचडी किंवा पिठलेभात करून खाता यावा. वर कसलीच वस्ती नाही आणि चिटपाखरू नाही. सर्वात जवळ म्हणजे डोंगर उतरल्यावरचे गाव. आसपासच्या टेहळणीत विजयरावांना गचपणामध्ये राजगिर्‍याची झुडुपे दिसली आणि त्यांनी जाहीर केले की मी आता ह्या राजगिर्‍याची परतून भाजी करणार. वस्तीपासून दोनचार मैल दूर डोंगरावर कुठलातरी रानपाला खाणे मला धोकादायक वाटत होते आणि मी तसे सुचवूनहि पाहिले. पण त्यांच्या दृढनिश्चयापुढे माझा विरोध टिकू शकला नाही. परिणामतः अतिशय रुचकर अशी राजगिर्‍याची भाजी मला मिळाली.

जवळच्या लेण्यातील गणपति



देवळाबाहेर आसपासच्या खडकांमध्ये काही ओबडधोबड लेणी आहेत आणि त्यांमध्ये काही अस्पष्ट शिलालेखहि आहेत. पैकी 'चांगा वटेश्वराचा' असा एक लेख आम्ही प्रयत्नपूर्वक वाचला. ज्ञानेश्वरांचा समकालीन चांगदेव योगी ह्या डोंगरावर राहात असे असे ह्या संदर्भात मी वाचलेले आहे. अशाच एका लेण्यामध्ये ही महाकाय गणपतिमूर्ति आहे.

पश्चिमेचा कोकणकडा १


पश्चिमेचा कोकणकडा २


परतीच्या वाटेवरून मंदिर


खिरेश्वराचे मंदिर


मंदिरातील शेषशायी विष्णु



ही अखेरची दोन चित्रे मी आदल्या दिवशी डोंगर चढायला सुरुवात करण्यापूर्वी मी घेतली होती पण ती येथे अखेरीस दाखवीत आहे. डॉगराच्या पायथ्याशी खिरेश्वर नावाचे एक कुग्राम आहे. हे नाव गावात शिरतांना लागणार्‍या खिरेश्वराच्या मंदिरावरून पडलेले आहे. मंदिर अगदी छोटे - एक मंडप आणि छोटा गाभारा - आहे. बाहेरून त्याची बांधणी ह्या भागातच आढळणार्‍या अन्य मंदिरांसारखीच - उदा. कुकडेश्वर - आहे. ते शिलाहारकालीन असावे असा तर्क मी वाचला आहे. आम्ही पाहिले तेव्हा मंदिर उभे होते पण त्याची बरीच पडझड झाली होती. बाहेरून साधे दिसणारे मंदिर आत नाना शिल्पांनी गजबजलेले आहे. संपूर्ण छतावर सुमारे एक फूट चौरस आकाराचे आणि पानाफुलांच्या वेगवेगळ्या नक्षीने सजविलेले दगड जडविले आहेत. गाभार्‍याच्या प्रवेशद्वारावर ५' गुणिले २' आकाराचा एकसंधी शिलाफलक आहे आणि त्यावर शेषशायी विष्णूचे शिल्प आहे. विष्णूच्या पायापाशी बसलेली लक्ष्मी स्पष्ट दिसत आहे. विष्णूच्या मस्तकामागे शेषनागाचा फणा आणि मूर्ति दिसत आहे. मंदिराच्या छतातून पावसाचे पाणी झिरपत राहते त्यामुळे शिल्पावर पाण्याच्या ओघळाचे डाग भरपूर पडलेले आहेत. आम्ही पाहिले त्यावेळी तरी येथे पुरातत्त्व खात्याची सुरक्षित स्थानाची कसलीच वैधानिक सूचना नव्हती.

परतीच्या वाटेवरील अजून एक न विसरलेला अनुभव. आम्ही परतीसाठी सकाळी ९च्या सुमारास खाली गावात उतरलो. गावाकडे जायचा रस्ता शेतांच्या पाळींवरून जात होता. अचानक मला आपल्यासमोरून काहीतरी हलल्याचा भास झाला. उजव्या बाजूस पाहिले तसा एक सुमारे ६ फूट लांबीचा साप शेपटाचा आधार घेत उडया मारत दूर जातांना दिसला. सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये तो पाळीवर ऊन्ह खात आडवा पडलेला असावा आणि - आमच्या सुदैवाने - आमच्या चाहुलीमुळे सावध होऊन तो आपणहून दूर गेला असावा. तो नाग होता आणि येथे तो अनेकदा दिसतो असे जवळ शेतात काम करणार्‍या एका शेतकर्‍याने सांगितले.

https://aisiakshare.com/node/3900

महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील सह्यद्रीच्या डोंगररांगांतअहमदनगर जिल्ह्यतला अकोले तालुका वसला आहे.

महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील सह्यद्रीच्या डोंगररांगांतअहमदनगर जिल्ह्यतला अकोले तालुका वसला आहे. याच तालुक्यात कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचा विस्तार झाला आहे. हा परिसर डोंगराळ, निसर्गरम्य आणि विलोभनीय आहे. डोंगराच्या कुशीतून जाणारी नागमोडी वळणे, हिरवीगर्द वनराई, अप्रतिम निसर्गसौंदर्य, उंच उंच गिरिशिखरे, मुळा, प्रवरा, आढळा, पावसाळ्यात जागोजागी दिसणारे धबधबे आपल्याला मोहून टाकतात.

निसर्गाने भरभरून दान दिलेला हा प्रदेश केवळ प्रेक्षणीय नाही तर जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत संपन्न प्रदेश आहे. मनाला भुरळ पाडणाऱ्या या प्रदेशाने नेहमीच साहसी पर्यटकांना आव्हान दिले आहे. रानवाटांवर प्रेम करणाऱ्या पर्यटकांना येथील वाटांनी नेहमीच खुणावले आहे. ज्याला निसर्गाची आवड आहे त्याला हा निसर्ग अतिशय उत्कटपणे साद घालतो. महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचे शिखर कळसूबाई याच भागात येते. सहय़ाद्रीच्या डोंगररांगातून उगम पावणाऱ्या प्रवरा नदीच्या उगमाखाली भंडारदरा धरण बांधण्यात आले आहे. भंडारदरा धरणामुळे निर्माण झालेला सर आर्थर लेक जलाशय आणि त्याच्या सभोवतालचा प्रदेश अनेक प्रजातींच्या पक्ष्यांना आकर्षति करतो. कळसूबाई हरिश्चंद्रगड परिसर महाराष्ट्र शासनाने वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ नुसार १९८६ साली अभयारण्य म्हणून घोषित केला आहे. अभयारण्याचे क्षेत्र ३६१.७१० चौ.कि.मी. आहे. या डोंगररांगांमधूनच प्रवरा आणि मुळा नदीचा उगम होतो. प्रचलित इतर अभयारण्यांप्रमाणे येथे काही वन्यजीव सफारी वगैरे प्रकार नाही.  काही वाडय़ा, वस्ती, गावं या अभयारण्याच्या परिसरात येतात. आणि त्या वाडय़ा वस्त्यांमध्ये नित्य व्यवहार सुरु असतात. वाहतूकही बरीच आहे.

वन्यजीव अधिवासास उत्तम स्थान असलेला हा परिसर जैवविविधतेने अतिशय समृद्ध असा परिसर आहे. येथे हिरडा, आंबा, बेहडा, उंबर, कळंब, सादडा, अर्जुन, आवळा, लोखंडी, धामण, सावर, जांभूळ, बेल, बहावा, मोह, तांबट, चंदन, भूतकेश, अर्जुन सादडा रिठा, गणेर, पळस, पांगारा यांसारखी अनेक प्रजातींची वनसंपदा दिसून येते. कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात बिबळ्या, वाघ, जंगली मांजर, कोल्हा, तरस, भेकर, रानडुक्कर, मोर, मोठे घुबड, वानर, माकडे, शेकरू, सायाळ, सांबर, निलगाय, घोरपड पाहायला मिळते. येथील जलाशयात विविध प्रकारचे मासे आणि कासव आढळून येतात. या ठिकाणी विविध प्रकारचे पक्षी सहज निरीक्षणात येतात. महाराष्ट्राचे मानचिन्ह असलेला हरियाल पक्षीदेखील येथे पाहावयास मिळतो.

पावसाळ्यात येथे संततधार असते. हे अभयारण्य मुंबई, नाशिक, अहमदनगर, पुणे या प्रमुख शहरांपासून जवळ असल्याने अभयारण्यास भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. कळसूबाई शिखराबरोबर अभयारण्याच्या परिसरात रतनगड, मदनगड, अलंग, कुलंग, कुंजरगड किल्ला हे गड-किल्ले तर रंधा धबधबा, अम्ब्रेला फॉल पाहण्यासारखे आहेत. ही उंच गिरिशिखरे धाडसी मनाला साद घालतात, आव्हान देतात. हरिश्चंद्रेश्वर -अमृतेश्वरासारखी जुनी राऊळं भक्तगणांना प्रिय आहेत. पांजरे बेट, उडदावणे, उंबरदरा व्ह्यू, घाटघर, लव्हाळी व्ह्यू पॉइंट ही पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.

या अभयारण्य क्षेत्रात हिंदू ठाकर, हिंदू महादेव कोळी या अनुसूचित जमातीचे लोक राहतात. त्यांची लोककला, लोकनृत्ये, पारंपरिक सण, उत्सव ही पाहण्यासारखे असतात. वेगवेगळ्या प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे आवाज काढण्याची त्यांची कला अफलातून आहे. ऑगस्ट ते डिसेंबर हा काळ पर्यटनासाठी उत्तम आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटन संकुल, पाटबंधारे विभाग, सावर्जनिक बांधकाम तसेच वन विभागाचे विश्रामगृह ही पर्यटकांच्या सोयीसाठी उपलब्ध आहे. भंडारदरा धरण परिसरात खासगी निवास व्यवस्थेची ही सोय आहे.

कसे जाल?

रस्ता मार्ग : मुंबई- नाशिक महामार्गावर घोटी येथून भंडारदरा येथे जाण्यासाठी फाटा आहे. मुंबईहून अंतर १८५ किमी. नाशिकहून ७२ किमी.

रेल्वे- मध्य रेल्वेने घोटी हे जवळचे स्थानक आहे. ते ३५ किमीवर आहे.

डॉ. सुरेखा म. मुळे drsurekha.mulay@gmail.com




























No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...