Thursday, October 20, 2022

त्रिंगळवाडी

  नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागातून सह्याद्रीची डोंगररांग दक्षिण -उत्तर धावते. सह्याद्रीच्या परिसरातच नाशिकचे हिल स्टेशन इगतपुरी वसले आहे. विपश्यना केंद्रामुळे इगतपुरीला पर्यटकांची मोठी वर्दळ असते. मात्र याच परिसरात असलेला त्रिंगळवाडी गड पर्यटकांना काय, बहुतेक ट्रेकर्सनाही अपरिचित आहे. इगतपूरीच्या पश्चिमेस पसरलेल्या सह्याद्री डोंगररांगेत बळवंतगड. त्रिंगलवाडी, भास्करगड, हरीहर असे अनेक किल्ले दिसुन येतात. त्रिंगलवाडी हा या रांगेतील एक महत्वाचा टेहळणी किल्ला. प्राचिन काळापासून नाशिक हे बाजारपेठ म्हणून प्रसिध्द होते. चौल, कल्याण या बंदरात उतरणारा माल थळ घाटामार्गे नाशिकच्या बाजारपेठेत येते असे.
 
 
 
उत्तर कोकणातुन नाशिककडे येणाऱ्या थळघाट- गोंडाघाट -अंबोली घाट- या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी घाटावर बांधलेल्या दुर्गशृंखलेत त्रिंगलगड किल्ल्याची निर्मिती करण्यात आली. या किल्ल्य़ांच्या मार्गात लागणारी गावं, डोंगर माथ्यापर्यंत आलेले रस्ते, माणसांची वर्दळ यामुळे येथील भटकंती ही कमी कष्टाची आहे. आज याच त्रिंगळवाडीगडाची सैर आपण करणार आहोत. त्रिंगळवाडी आणि कावनई हे दोन्ही किल्ले जवळजवळ असल्यामुळे एका दिवसात दोन्ही करणे शक्य आहे.
 
मात्र या त्रिंगळवाडीगडावर जायचे तर यातायात खुप होते. गडावर जाण्यासाठी ३ मार्ग आहेत.
१) त्रिंगलवाडी मार्गे:- गाडीने किंवा रेल्वेने इगतपुरी गाठावे.
त्रिंगलवाडीगडास भेट देण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला त्रिंगलवाडी हे पायथ्याचे गाव गाठावे लागते. मुंबई ते त्रिंगलवाडी हे अंतर १३० कि.मी.असुन मुंबई नाशीक महामार्गावरील इगतपुरीहुन तेथे जाता येते तर नाशिकहून हे अंतर ५० कि.मी.असुन टाकेघोटी मार्गे तेथे जाता येते. त्रिंगलवाडी हे गाव निशाणवाडी,पत्र्याची वाडी आणि तळ्याची वाडी या तीन वाड्यांनी बनलेले असल्याने त्रिंगलवाडी म्हणुन ओळखले जाते. यातील गावाच्या शेवटी असलेल्या तळ्याची वाडी या वाडीतून किल्ल्यावर जाणारी जवळची पायवाट आहे. त्रिंगलवाडीला जायायला एकही एसटी नाही. शिवाय शेअर जीप किंवा रिक्षाही मिळत नाहीत. त्यामुळे एकतर पायगाडीने त्रिंगळवाडी गाव गाठायचे किंवा स्वतःचे वाहन हाच पर्याय आहे. गावातील बहुतेक लोक बाईक वापरतात, त्यामुळे रस्त्यात कोणाकडे हि लिफ्ट मागितली कि देतात.
रेल्वेने :- इगतपुरीच्या पूर्वेकडे म्हणजेच कसार्याच्या दिशेन बाहेर पडावे एसटी स्टँडच्या बाजूला बाहेर पडावे. एसटी स्थानकाच्या अलीकडे आंबेडकर चौक लागतो. तेथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि बुद्ध विहार आहे. तिथून डावीकडे एक रस्ता वर जातो.  हा रस्ता त्रिंगलवाडीला जातो.  या वाटेने पुढे पंधरा मिनिटे चालत गेल्यावर उजवीकडे वळावे. अर्ध्या तासात आपण वाघोली नावाच्या खिंडीत पोहोचतो.या खिंडीतून नजर फिरवली तर आपल्याला बुध्या डोंगर, समोर काळविहीर डोंगर आणि डावीकडे त्रिंगळवाडी किल्ला दिसतो. हि खिंड 'वाळविहीर' डोंगरामुळे निर्माण झाली आहे. खिंडीत एक छोटेसे मंदीर आहे. जर त्रिंगळवाडीचा ट्रेक रात्री उशीरा सुरु केला तर या मंदीरात मुक्काम करुन पहाटे लवकर चालायला सुरवात करता येईल. जर त्रिंगळवाडीची भ्रमंती आपण सरत्या पावसात म्हणजे श्रावण, भाद्रपद किंवा सप्टेंवर महिन्यात आलो तर या रत्यावरील वाटचालीचा मनोमन आनंद घेता येतो. वाटेत असणारे टुमदार बंगले, हिरवाईमे भरलेल्या टेकड्या, आणि निळ्या,पिवळ्या, लाल फुलांचे दुतर्फा गालिचे पसरलेला रस्ता, यामुळे हि वाट्चाल आनंददायी होते. खिंडीतून खाली उतरल्यावर आपण त्रिंगलवाडी नाक्यावर पोहोचतो. येथून डावीकडे (त्रिंगलवाडी गावाकडे) वळावे. 
अर्ध्या तासात आपण त्रिंगलवाडी गावात पोहोचतो. गावाच्या मागे त्रिंगलवाडी धरण आहे. धरणाच्या भिंतीवर चढून डावीकडे वळावे. भिंत संपल्यानंतर उजवीकडची वाट पकडावी. या वाटेने अर्ध्या तासात आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. पायथ्याशीच पांडवलेणी नावाची गुहा आहे.
रस्त्याने :- कसारा घाट चढून इगतपूरीच्या पुढे ९ किमीवर टाके गाव लागते. या गावातून रस्ता त्रिंगलवाडी - पत्र्याचीवाडी मार्गे तळ्याची वाडी या त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याच्या गावापर्यंत जातो. टाके गावापासून हे अंतर अंदाजे ८ किमी आहे. तळ्याचीवाडी गावामागे तलाव आहे. तलावाच्या बाजूने वाट शेताच्या बांधावरुन किल्ल्याच्या पायथ्याच्या लेण्यांपर्यंत जाते. या गुहेवरून गडावर जाण्यास रस्ता आहे. गड चढण्यास अर्धा तास लागतो.

२) विपश्यना विद्यापीठामार्गे:-
इगतपुरी स्थानकावरून उत्तर दिशेला म्हणजेच ‘विपश्यना विद्यापीठा’कडे उतरावे. विद्यापिठाचे प्रवेशद्वार आल्यावर तेथून समोर असणारी डोंगराची सोंड चढावी. ती वाट आपल्याला प्रचंड कड्याखाली आणून सोडते. तो प्रचंड कडा उजवीकडे ठेवत दोन तासात किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. येथून वर चढण्यास आपल्याला अर्धा तास पुरतो. हा मार्ग पुढे दोन मार्गांमध्ये विभागलेला आहे. पूर्वेकडून वर चढणारा मार्ग हा वर सांगितलेल्या क्र १ च्या वाटेला जाऊन मिळतो, तर पश्चिमेकडे जाणारी वाट किल्ल्याला उजवीकडे ठेवत एका घळीपाशी पोहोचते. या घळीतून वर चढल्यावर पुढे कातळात कोरलेल्या पायर्‍या लागतात. या पायर्‍यांनी वर चढल्यावर किल्ल्याचा दरवाजा लागतो.

३) चिंचोली मार्गे:-
   या मार्गाने गडावर जाण्यासाठी कसारा गाठावे. कसार्‍यावरून जव्हार, मोखाडा किंवा खोडाळा या ठिकाणी जाणारी कुठलीही बस पकडावी आणि ‘विहीगाव’ फाट्यावर उतरावे. या फाट्याच्या समोरच एक देऊळ आहे. या देवळाच्या मागे म्हणजेच रस्त्याच्या उजवीकडे जाणारी वाट पकडावी. पाऊण तासानंतर चिंचोली नावाचे गाव लागते. या गावाच्या मागून जंगलातून जाणार्‍या रस्त्याने किल्ल्याच्या मध्यभागी असणार्‍या पठारावर पोहोचावे. येथे चांदवाडी व जांभूळवाडी ह्या पठारावर वसलेल्या २ वाड्या आहेत. या वाड्यांच्या मधून गडावर वाट जाते. येथून क्र. १ मध्ये सांगितल्याप्रमाणे २ वाटा जातात कोणत्याही वाटेने गडावर पोहोचावे. ही वाट फारच लांबची असल्याने या वाटेने गड गाठण्यास ४ तास लागतात. वाट चुकण्याचा देखील संभव आहे.चिंचोली गावातून जाणारी वाट निसरडी आहे.
१) त्रिंगलवाडी गावापासून१ तास लागतो. २) चिंचोली गावापासून ३ तास लागतात. ३) विपश्यना केंद्रामार्गे २ तास लागतात.

खुद्द त्रिंगळवाडी गावात एक एतिहासिक वास्तु आहे.त्रिंगळवाडीगडाच्या फेरीत याला न चुकता भेट द्यावी. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लेण्यांपासून साधारण ८०० मीटर अंतरावर गर्द झाडीत एक वाडा  पडक्या स्थितीत असून या वाड्याला कोणत्याही भिंती नाहीत.जवळपास १०० X १०० लांब रुंदीचा हा वाडा असल्याने त्याच्या चारही बाजूला बुरुज आहेत. बुरुजाची उंची ६ फुट एवढी आहे. तर मध्यभागी मोठा चौथऱ्याच्या खुणा आहेत. हा एखाद्या सरदाराचा वाडा असावा असे प्राथमिक स्वरुपात वाटते. स्थानिक यास हत्ती महल असे म्हणतात.


   हा वाडा बघून गडाच्या दिशेन निघुया.जाताना या गडाच्या इतिहासाची उजळणी करुया. 
त्रिंगलवाडी  किल्ल्याला तीरमकुल किल्ला असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रात आढळतो. जैनांनी महाराष्ट्रात आठव्या शतकात लेणी बांधायला सुरुवात केली. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली लेणी ही शेवटच्या टप्प्यातील लेणी आहे.लेणीतील शिलालेखावरून लेणी शके १२६६ मध्ये १३व्य शतकात कोरली गेली असे दिसते. तसेच किल्ल्यावर हि दोन लेण्या आहेत.इ. स.१६३६ पासून हा किल्ला शहाजी महाराज व छत्रपती शिवाजींच्या ताब्यात असल्याचे कॅप्टन ब्रिग्जने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात केव्हा आला ते कळत नाही पण नाशीक प्रांत काबीज करताना मोरोपंत पिंगळ्यांनी हा किल्ला स्वराज्यात आणला असावा.  कळवण तालुक्यातील मार्केंडेय पिंपरी येथील मूळचे असलेले कवि जयराम पिंड्ये यांच्या ‘पर्णाल-पर्वत-ग्रहणाख्यान’ या काव्यात त्रिंगलवाडीचा उल्लेख आलेला दिसतो. 
अलंकुरंगतिंगलवाटिका नामथोध्दतम् |
अहिवंतोऽचल गिरिर्मार्कण्डेयाभिधानकः॥
साल्हेर विजयानंतर अलंग,कुरंग, त्रिंगळवाडी येथे मराठे व मोघल यांच्यात सन १६७१-७२ मध्ये कडाक्याचे युद्ध सुरु असताना त्रिंगळवाडी गड मराठ्यांकडे राहिला. पुढे इ.स. १६८८ च्या शेवटी मोघलांचा सरदार मातबरखानाने त्रिंगळवाडीला वेढा घालून फितुरीने हा किल्ला फेब्रुवारी ते एप्रिल १६८९ मध्ये मराठ्यांकडून जिंकून घेतला.मातब्बरखानाने औरंगजेबाला पाठविलेल्या पत्रात त्रिंगलवाडीला वेढा घातल्याची नोंद आढळते.तर पेशवेकाळात  हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. इ.स. १८१८ साली पेशवाई बुडाल्यावर मराठ्यांनी  पुन्हा प्रतिकार करू नये म्हणून इंग्रज अधिकारी  कॅप्टन ब्रिग्जने (Captain Briggs) तोफा डागून व सुरूंग लावून हा किल्ला उद्धवस्त केला.त्रिंगलवाडी ताब्यात घेतल्यानंतर कॅप्टन ब्रिग्ज यावर एक रिपोर्ट लिहिला होता. यातून या गडाबद्दल चांगली माहिती मिळते. १६३६ पासून हा किल्ला शहाजी महाराज व छत्रपती शिवाजींच्या ताब्यात असल्याचे त्याने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. कॅ. ब्रिग्जनेही येथील लेणीचे सौंदर्य अनुभवल्याचे त्याने म्हटले आहे.
त्रिंगलवाडी धरणाच्या कवेत वसलेले गाव लागते. त्रिंगलवाडीचे वैभव अशासाठी वेगळे आहे की, त्याच्या आजूबाजूला भास्करगड, उतवड, ढोऱ्या डोंगर, वैतरणा धरणाजवळील डोंगररांगा, कसारा घाटाचा प्रदेश, कळसूबाई, अलंग-मदन-कुलंग अन्‌ त्रिंगलगडाचा सहवास या गावाला लाभला आहे. त्रिंगलवाडी हे गाव पत्र्याचा पाडा, तळ्याचा पाडा अन्‌ निशाणवाडी या तीन वाड्यांनी बनलेले आहे. त्यामुळे याला त्रिंगलवाडी म्हटले गेले असावे. आदिवासीबहुल असलेल्या गावात ठाकूर व कोळी समाज राहतो. १९८२ मध्ये धरण झाल्यावर पाण्यासाठी कासावीस झालेल्या त्रिंगलवाडीला ओलावा मिळाला अन् बागायती शेतीमुळे आर्थिक स्थैर्यही मिळाले. भात, विविध डाळी, नागली ही पिके घेणारे त्रिंगलवाडीकरांना बेंजू अन् कापडनाथ ही आदिवासी वाद्ये वाजवायला आवडतात.मात्र ऐतिहासिक वैभव लाभलेल्या त्रिंगलवाडी विकासापासून अजूनही वंचित आहे. 
     तळ्याच्या वाडीत गाडी लावून पाण्याने भरलेल्या तळ्याच्या डावीकडून गावाच्या आधाराला पहुडलेल्या त्रिंगलगडाकडे जाता येते.डावीकडचा म्हळुंग्याचा डोंगर आपल्या दणकट शरीरयष्टीने लक्ष वेधून घेत असतो. गावाच्या मागे असलेल्या धरणाच्या भिंतीवर चढून गेलो कि समोर लाटांच्या तालावर झुलणारे धरणाचे पाणी व त्यापल्ल्याड ध्यानस्थ बसलेला त्रिंगलवाडी किल्ला असे सुंदर निसर्गचित्र सामोरे येते. धरण अगदी मोठे असले तरी भिंत पुर्णपणे बांधलेली नाही.. साहाजिकच पाणी भरुन ओसंडून वाहणेच नाही.धरणाचे पाणी एका जागेतून बाहेर पडते.
धरणाच्या काठावरून पॅनोरमा मोड मध्ये टिपलेले दृश्य. 
 गडाकडे जाण्यासाठी आपल्याला धरणाच्या डाव्याबाजूने वाटेने जायायला लागते. त्यामुळे सतत डाव्याबाजूला डोंगर तर उजव्याबाजूला धरण लागतो.समोर त्रिंगलवाडीचा वाटेने चालत असताना ध्यानात ठेवणे, डाव्या बाजूला लागणाऱ्या डोंगरावरती न चढता. त्याचा पायथ्याचा कडेने चालत राहणे. कारण काही ठिकाणी धरणाजवळची जमीन तारेचा कुंपण केला आहे. त्यामुळे वाट सुरवातीला धरणाच्या काठाने जाते. नंतर थोडी वरुनच जाते. गडाचा जवळ पोहचल्यावर मला लेण्याची वाडी लागते.  तळ्याच्या वाडीतून १० मिनटात आपण त्रिंगलवाडी गडाच्या पायथ्याचा लेणीजवळ पोहचतो.त्रिंगलवाडीतून लेणीपर्यंत पोहचेपर्यंत १ तास लागतो.  
गावामागे असलेल्या तलावाच्या वाटेने शेताच्या बांधावरून २० मिनिटात आपण किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पांडवलेणी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या दहाव्या शतकातील जैन लेण्यांकडे पोहोचतो. सध्या हि लेणी पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असुन येथे उत्खननाचे काम चालु आहे. लेणीच्या बाहेर भग्न अवशेषांचा खच पडलेला असुन यात बऱ्याच भग्न मुर्ती पहायला मिळतात. महाराष्ट्रात जैनानी आठव्या शतकात लेणी बांधायला सुरवात केली पैकी ही लेणी १३ व्या शतकात १२६६ च्या असपास बांधली गेली असावीत असे शिलालेखातून दिसते. जैन लेणी इ.स. पाचव्या शतकापासून सापडतात हे सर्वमान्य असले तरी जैन लयनस्थापत्याची प्राचीनता इ.स. पहिल्या शतकापर्यंत जाते.जैन लेणीनिर्मिती पुढे यादव आणि सुलतानकाळातही सुरु राहिली तरी तीचा गौरवशाली कालखंड प्रथम वेरुळ येथेच दिसतो.. आवारात अनेक भग्नावशेष दिसून आले. महाराष्ट्रात बौद्धांप्रमाणे जैनांनीही आपल्या धर्माच्या प्रसारासाठी अनेक जैन साधू सगळीकडे पाठविले त्यांनी तीर्थंकर व जैन देवतांची अशी अनेक शिल्पे बनवली. मात्र त्रिंगलवाडीतील ग्रामस्थ या लेण्यांना पांडव लेणी म्हणतात आणि पांडवांनी ती आपल्या बोटांच्या नखांनी ही खोदलीअसल्याचे ते सांगतात. 

caves

caves1
त्रिंगलगडाच्या पायथ्याजवळची मुख्य लेणी आयताकार आहे. हे लेणे ३ भागात कोरलेले असुन ओसरी, सभामंडप व गाभारा अशी याची रचना आहे. 
















व्हरांडा लांबलचक असून, द्वारशाखेपूर्वी छतावर सुशोभित छताच्या तुळ्या हातात हात गुंफलेल्या गण-यक्षांनी पेलल्याची शिल्प मन मोहून टाकते. हे शिल्प कसे घडविले असेल हा प्रश्न त्या कलाकारांच्या मेहनतीला आणि चिकाटीला सलाम करतो. तर उजव्या बाजूला कातळात फूल कोरले आहे. छताला आधार देण्यासाठी कोरलेले खांब आता पडले असून, वरची बाजू फक्त शिल्लक आहे. त्यावर यक्ष दिसतात. व्हरांड्याच्या आतील भागात नक्षीकाम आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर नक्षीकाम करण्यासाठी जसे पाच सुशोभित चौकटी एकात एक गुंफून त्यावर नाजूक काम केले असावे. हे करताना त्या कलाकारांना हे करताना किती कालावधी लागला असेल हा प्रश्न त्यांच्या प्रतिभेचे कौतुक करतो. व्हरांड्यात उजव्या व डाव्या बाजूला चौकोनी आकाराच्या बसण्यासाठी जागा दिसते. तर द्वारपट्टीवर दोन चौकटी तीर्थंकरांच्या मूर्ती व गणांची देखणी शिल्पे आहेत. ललाटपट्टीवर खंडित झालेली गजलक्ष्मीची प्रतिमा तर प्रवेशद्वाराच्या हातील बाजूस लाकडी दरवाजांसाठी खोबणी असल्याचे दिसते. म्हणजेच लेणीला पूर्वी लाकडी दरवाजांची व्यवस्था असावी. लेण्यांचा सभामंडप प्रशस्त आहे. लेणीच्या मुख्य मंडपाला सालंकृत असे चार स्तंभ होते. त्यापैकी फक्त एकच खांब आता शिल्लक असून, त्याच खांबावर लेणी उभी आहे. त्यावर सुंदर नक्षी आहे. उरलेल्या खांबांचा स्तंभशीर्षाचे अलंकृत हस्त (ब्रॅकेट्‌स) अजूनही पहायला मिळतात. त्यावरील यक्ष अजूनही लेणीला उचलून आधार देत असल्याचे पाहता येते. हा आविष्कार अनुभवण्यासारखा आहे. हे यक्ष नसते तर लेणीचा महाकाय दगड अंगावर आला असता असे वाटायला लागते. सभामंडपात हवा आणि उजेड येण्यासाठी नऊ चौकोनी झरोके असलेल्या दोन खिडक्या कातळात कोरलेल्या आहेत. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर नक्षी कोरलेली आहे. त्रिंगलवाडीच्या लेणीत बौद्ध लेणींप्रमाणे कलेचा मुक्त आविष्कार दिसत नसला तरी जैन लेणीतील स्तंभांवरची सजावट, त्यांना दिलेले विविध आकार, छतावरची कामे, वेलबुट्टी, भौमितिक आकार जैन कलाकारांचे वैशिष्ट्‌य दाखवून देते. गाभाऱ्यात जैन धर्मीयांचे प्रथम तीर्थंकर भगवान आदिदेव ऊर्फ वृषभनाथांची पद्मासनात बसलेली मूर्ती असून, मूर्तीच्या आसनावर दानाचा शिलालेख कोरलेला आहे. मात्र तो आता झिजला आहे. हा शिलालेख प्राकृत संस्कृत असून, नागरी लिपीत आहे.लेण्यांच्या बाजूला पाण्याचे कुंड आहे. 
किल्ल्याजवळ असणाऱ्या पाली भाषेत लिहिलेल्या शिलालेख व स्तूपांची झालेली दुरवस्था.


जैन लेणी
प्रवेशद्वार

प्रवेशद्वारावरील शिल्प
आतील बाजूस असलेले खांब



बाहेरील शिल्प
        
काही काळ विसाव्यासाठी ही गुहा उत्तम आहे.बरीच पडझड झालेली आहे पण जे काही अवशेष शिल्लक आहेत ते पाहूनच त्याकाळची सुंदरता, कल्पकता सहज लक्षात येते.आत किर्र काळोख असल्याने आतील वास्तू नजरेस पडत नाही पण गुहेच्या बाहेरील बाजूस असणारे कोरीवकाम आजही आपले लक्ष वेधून घेते. ह्या लेणीच्या बाहेर बरीच मोडकळीस आलेली शिल्पे दिसतात. 
त्रिंगलवाडी गडाचा नकाशा

या लेण्यांच्या वरील बाजूस असलेल्या डोंगरावरच त्रिंगलवाडी किल्ला असुन लेण्यांच्या डाव्या बाजूने गडावर जाण्यासाठी पायवाट आहे. साधारण अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आपण गडाखालील माचीवर पोहोचतो. गडाची एक सोंड या माचीवर उतरताना दिसते. माचीवरून १५ मिनिटात आपण या डोंगरसोंडेवर पोहोचतो. डोंगरसोंडेवरील या वाटेने वर जाताना मातीखाली गाडलेल्या पायऱ्या दिसुन येतात. समोरच त्रिंगलवाडी किल्ल्याचा कातळमाथा दिसतो. दक्षिणोत्तर पसरलेल्या या किल्ल्याला पुर्वपश्चिम असे दोन दरवाजे असुन गडाचा पश्चिम दरवाजा कोकण दरवाजा म्हणुन ओळखला जातो. या कातळमाथ्याखालून या दरवाजाकडे जाण्यासाठी उजवीकडून व डावीकडून अशा दोन वाटा आहेत. किल्ला चढतांना डावीकडील म्हणजेच पश्चिमेकडील कोकण दरवाजाने चढुन पूर्वेकडील दरवाजाने खाली उतरल्यास संपुर्ण किल्ला व्यवस्थित फिरून होतो. 
लेणीच्या वाडीच्या अगोदर वाटेत हि शिळा दिसली, बहुतेक समाधी शिळा असावी.
डावीकडील वाट कडा उजवीकडे व दरी डावीकडे ठेवत एक सोपा कातळटप्पा पार करत किल्ल्याच्या पायऱ्यापर्यंत पोहोचते. 



किल्ल्यावर जाण्यासाठी कातळ फ़ोडून दिड फुट उंचीच्या साधारण ६० पायऱ्या कोरलेल्या आहेत. 

या पायऱ्यांच्या शेवटी उजव्या बाजुला खडकात खोदलेला दक्षिणाभिमुख दरवाजा असुन पायऱ्यासमोरील चौथऱ्यावर सहा-सात फुट उंचीची हनुमान मुर्ती कोरलेली आहे. दरवाजावरील दोन्ही कोपऱ्यात दोन शरभ कोरलेले असुन त्याखाली चंद्रसुर्य प्रतिमा कोरलेल्या आहेत. नुकताच सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान  या संस्थेने लोकवर्गणीतून सागवानी प्रवेशद्वार लावले आहे.





दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्यासाठी अर्धवट कोरलेल्या देवड्या आहेत. दरवाजाच्या आतील वाटेवर मोठमोठे दगड ढासळून आले आहेत. दरवाजातून आत आल्यावर उजव्या बाजुला दरी तर डाव्या बाजुला बालेकिल्ल्याचा कातळ माथा आहे. येथे एक वाट वरील बाजूस या कातळ पायथ्याकडे जाताना दिसते. 

या वाटेने वर आले असता आपल्याला कातळात खोदलेले पाण्याचे एक भलेमोठे जोडटाके दिसते. सध्या या टाक्यात दगड पडलेले असुन टाके कोरडे ठणठणीत आहे. येथुन परत खाली येऊन बालेकिल्ल्याच्या कातळमाथ्याला वळसा घालत आपण किल्ल्याच्या पुर्वभागात येतो. येथे बऱ्यापैकी सपाटी असुन गडाचे बहुतेक अवशेष या सपाटीवर आहेत. गडाची उंची समुद्रसपाटीपासून ३१४८ फुट असुन गडाचा परीसर साधारण २४ एकरवर पसरलेला आहे. 

येथे आल्यावर समोरच भिंती शिल्लक असलेल्या एका मोठया वाड्याचे अवशेष दिसतात. वाडयाच्या मागील बाजुस गडाचा दक्षिण बुरुज असुन या बुरुजावरून आपण चढुन आलेली डोंगरसोंड नजरेस पडते. वाड्यासमोरच एका दुसऱ्या वास्तुचे अवशेष दिसुन येतात. या वास्तुच्या खालील बाजुस गडाचा पुर्व दरवाजा आहे पण तेथे न जाता प्रथम गडाच्या माचीवर फेरी मारून घ्यावी. 



दुसरी टाकी

तिसरी टाकी

मंदिराच्या मागाहून शिखर माथ्यावर जाताना. हा शेंदूर लावलेला पाषाण दिसतो.

दुसऱ्या वाड्याजवळ आढळणारी खोबी

या भागात असलेले कातळातील खळगे व घरांचे अवशेष पहाता गडावरील वस्ती या भागात असावी. पायवाटेवरुन पुढे जातांना एक वाट खाली उतरताना दिसते. हि किल्ल्याच्या पुर्व दरवाजातुन येणारी वाट आहे. पुढे चालत गेल्यावर उजव्या बाजुला खडकात खोदलेले पण पाणी नसलेले एक टाके आहे व त्यापुढे गाळाने भरलेले दुसरे लहान टाके आहे. वाटेच्या उजव्या बाजूस कडयाच्या टोकाला चौकीचे अवशेष दिसुन येतात. 

गडावरील खांब टाकी किंवा गुहा आणि त्याचा बाजूला खाली टाकी दिसत आहे.
वाटेच्या डाव्या बाजुला साचपाण्याचा तलाव असुन त्याच्या वरील भागात बालेकिल्ल्याच्या टेकडीत एक बुजलेले टाके व त्यालगत अर्धवट तोंड बुजलेली एक गुहा दिसुन येते. वर चढुन हे टाके व गुहा पाहुन पुढे निघाल्यावर कातळात कोरलेली दुसरी मोठी गुहा दिसते. या गुहेत २० ते २५ जण सहज राहु शकतात. 

35_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg
या दोन्ही गुहा पाहून पुढे निघाल्यावर वाटेत दोन सुकलेली टाकी लागतात व त्यापुढे पिण्याच्या पाण्याचे खांबटाके लागते. गडावर पिण्याच्या पाण्यासाठी हि एकमेव बारमाही सोय आहे. टाक्यांवरून पुढे जाणारी वाट गडाच्या उत्तर टोकावर असलेल्या घुमटीवजा भवानी मंदिराकडे घेऊन जाते. 

महादेवाचं मंदिर
हर हर महादेव
     




मंदिरातील मूर्ती

या मंदिरात शेंदूर लेपलेली भवानी,गणपती व भैरोबाची सुबक मुर्ती असुन मंदिराबाहेर उघडयावर शिवलिंग आहे. मंदिरासमोर खालच्या बाजूला विरगळाचे शिल्प ठेवलेले आहे. मंदिराच्या उत्तरेकडील बुरुजावरून पूर्वेला कळसुबाई तर उत्तरेला हरिहर, बसगड हे किल्ले दिसतात. मंदिरामागुन गडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी असलेल्या पायवाटेने वर चढुन दुसऱ्या बाजुने खाली उतरता येते. बालेकिल्ल्यावर कोणतेही अवशेष नाहीत पण येथुन संपुर्ण गडाची माची पहाता येते. 

लेणीचे गाभाऱ्याचे दृश्य

गडाच्या शिखर माथ्यावरून दिसणारे दृश्य. पॅनोरमा मोड मध्ये टिपले आहे

गडाच्या शिखर माथ्यावरून दिसणारे दृश्य. पॅनोरमा मोड मध्ये टिपले आहे

गडाच्या शिखर माथ्यावरून दिसणारे दृश्य. पॅनोरमा मोड मध्ये टिपले आहे
गडाला तुरळक तटबंदी असुन गडमाथ्यावरून सह्यादीची सुंदर रांग दिसते. इथून त्रिंगलवाडीचा जलाशय, दक्षिणेला इगतपुरी, वैतरणा खोरे, त्र्यंबकरांग, कावनाई, मोरधन,अलंग, कुलंग असा संपूर्ण प्रदेश पहाता येतो. बालेकिल्ल्यावरून आपण सुरवातीला पाहीलेल्या वाड्याकडे उतरतो.येथुन गडाच्या पूर्वेकडील दरवाजाने गड उतरण्यास सुरवात करावी. या ठिकाणी असलेला गडाचा दरवाजा पुर्णपणे ढासळलेला असुन केवळ तटबंदी शिल्लक आहे. गडाच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या उतरतांना उजव्या बाजूला कातळात कोरलेली एक लहान गुहा दिसते. अशीच एक गुहा पायऱ्या उतरल्यावर समोरच्या बाजूस कोरलेली दिसते.पायऱ्या उतरल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. संपुर्ण गड फिरण्यास २ तास लागतात.
   संदर्भ :-
१) नाशिक जिल्हा गॅझेटीयर
२) सांगाती सह्याद्रीचा -यंग झिंगारो ट्रेकर्स
३) डोंगरयात्रा -आनंद पाळंदे
४) दुर्गभ्रमंती नाशिक जिल्ह्याची - अमित बोरोले
५) साद चाकोरीबाहेरील किल्ल्याची -पांडूरंग पाटणकर
६) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा -सतिश अक्कलकोट
७)  www.trekshitiz.com हि वेबसाईट
८)  www.durgbharari.in  हि वेबसाईट
९)  https://www.deshdoot.com, https://bijoor.me, https://www.facebook.com/Arihantgyan/posts/1264693183671799/ या वेबसाईट
 
 
 
 
 
त्रिंगलवाडी

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नाशिक

उंची : २८४० फुट

श्रेणी : सोपी



















इगतपूरीच्या पश्चिमेस पसरलेल्या सह्याद्री डोंगररांगेत बळवंतगड. त्रिंगलवाडी, भास्करगड, हरीहर असे अनेक किल्ले दिसुन येतात. त्रिंगलवाडी हा या रांगेतील एक महत्वाचा टेहळणी किल्ला. प्राचिन काळापासून नाशिक हे बाजारपेठ म्हणून प्रसिध्द होते. उत्तर कोकणातुन नाशिककडे येणाऱ्या थळघाट- गोंडाघाट -अंबोली घाट- या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी घाटावर बांधलेल्या दुर्गशृंखलेत त्रिंगलगड किल्ल्याची निर्मिती करण्यात आली. त्रिंगलगडास भेट देण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला त्रिंगलवाडी हे पायथ्याचे गाव गाठावे लागते. मुंबई ते त्रिंगलवाडी हे अंतर १३० कि.मी.असुन मुंबई नाशीक महामार्गावरील इगतपुरीहुन तेथे जाता येते तर नाशिकहून हे अंतर ५० कि.मी.असुन टाकेघोटी मार्गे तेथे जाता येते. त्रिंगलवाडी हे गाव निशाणवाडी,पत्र्याची वाडी आणि तळ्याची वाडी या तीन वाड्यांनी बनलेले असल्याने त्रिंगलवाडी म्हणुन ओळखले जाते. यातील गावाच्या शेवटी असलेल्या तळ्याची वाडी या वाडीतून किल्ल्यावर जाणारी जवळची पायवाट आहे. गावामागे असलेल्या तलावाच्या वाटेने शेताच्या बांधावरून २० मिनिटात आपण किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पांडवलेणी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या दहाव्या शतकातील जैन लेण्यांकडे पोहोचतो. सध्या हि लेणी पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असुन येथे उत्खननाचे काम चालु आहे. लेणीच्या बाहेर भग्न अवशेषांचा खच पडलेला असुन यात बऱ्याच भग्न मुर्ती पहायला मिळतात. जैनांनी महाराष्ट्रात आठव्या शतकात लेणी बांधायला सुरुवात केली. त्यातील त्रिंगलवाडी लेणी शके १२६६ मध्ये कोरल्याचे शिलालेखातून दिसते. आयताकार आकाराचे हे लेणे ३ भागात कोरलेले असुन ओसरी, सभामंडप व गाभारा अशी याची रचना आहे. व्हरांड्यात उजव्या व डाव्या बाजूला चौकोनी आकाराच्या बसण्यासाठी जागा असुन द्वारपट्टीच्या खालील भागात तीर्थंकरांच्या मूर्ती व गणांची शिल्पे आहेत. दरवाजावरील द्वारपट्टीवर सुंदर कोरीवकाम केलेले असुन दरवाजाच्या दोन्ही बाजूस सभामंडपात हवा आणि उजेड येण्यासाठी जाळीदार गवाक्ष कोरलेले आहेत. व्हरांड्यात दरवाजाच्या वरील बाजूस छतावर हातात हात गुंफलेले यक्ष गोलाकार कोरलेले आहेत. लेण्यांचा सभामंडप प्रशस्त असुन मंडपाच्या आतील कोनाड्यात कोरीवकाम केलेले आहे. मंडपात छताला आधार देण्यासाठी कोरलेल्या ४ खांबापैकी ३ खांब पडलेले असुन त्यांच्या शिल्लक असलेल्या वरील भागात यक्ष कोरलेले दिसतात. विहाराच्या आतील गाभाऱ्यात जैन धर्मीयांचे प्रथम तीर्थंकर भगवान आदिदेव ऊर्फ वृषभनाथांची पद्मासनात बसलेली भग्न मुर्ती असून मूर्तीच्या आसनावर झिजलेला शिलालेख आहे. संस्कृत भाषेतील हा शिलालेख देवनागरी लिपीत कोरलेला आहे. लेण्यांच्या बाजूला पाण्याचे कुंड आहे. या लेण्यांच्या वरील बाजूस असलेल्या डोंगरावरच त्रिंगलवाडी किल्ला असुन लेण्यांच्या डाव्या बाजूने गडावर जाण्यासाठी पायवाट आहे. साधारण अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आपण गडाखालील माचीवर पोहोचतो. गडाची एक सोंड या माचीवर उतरताना दिसते. माचीवरून १५ मिनिटात आपण या डोंगरसोंडेवर पोहोचतो. डोंगरसोंडेवरील या वाटेने वर जाताना मातीखाली गाडलेल्या पायऱ्या दिसुन येतात. समोरच त्रिंगलवाडी किल्ल्याचा कातळमाथा दिसतो. दक्षिणोत्तर पसरलेल्या या किल्ल्याला पुर्वपश्चिम असे दोन दरवाजे असुन गडाचा पश्चिम दरवाजा कोकण दरवाजा म्हणुन ओळखला जातो. या कातळमाथ्याखालून या दरवाजाकडे जाण्यासाठी उजवीकडून व डावीकडून अशा दोन वाटा आहेत. किल्ला चढतांना डावीकडील म्हणजेच पश्चिमेकडील कोकण दरवाजाने चढुन पूर्वेकडील दरवाजाने खाली उतरल्यास संपुर्ण किल्ला व्यवस्थित फिरून होतो. डावीकडील वाट कडा उजवीकडे व दरी डावीकडे ठेवत एक सोपा कातळटप्पा पार करत किल्ल्याच्या पायऱ्यापर्यंत पोहोचते. किल्ल्यावर जाण्यासाठी कातळ फ़ोडून दिड फुट उंचीच्या साधारण ६० पायऱ्या कोरलेल्या आहेत. या पायऱ्यांच्या शेवटी उजव्या बाजुला खडकात खोदलेला दक्षिणाभिमुख दरवाजा असुन पायऱ्यासमोरील चौथऱ्यावर सहा-सात फुट उंचीची हनुमान मुर्ती कोरलेली आहे. दरवाजावरील दोन्ही कोपऱ्यात दोन शरभ कोरलेले असुन त्याखाली चंद्रसुर्य प्रतिमा कोरलेल्या आहेत. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्यासाठी अर्धवट कोरलेल्या देवड्या आहेत. दरवाजाच्या आतील वाटेवर मोठमोठे दगड ढासळून आले आहेत. दरवाजातून आत आल्यावर उजव्या बाजुला दरी तर डाव्या बाजुला बालेकिल्ल्याचा कातळ माथा आहे. येथे एक वाट वरील बाजूस या कातळ पायथ्याकडे जाताना दिसते. या वाटेने वर आले असता आपल्याला कातळात खोदलेले पाण्याचे एक भलेमोठे जोडटाके दिसते. सध्या या टाक्यात दगड पडलेले असुन टाके कोरडे ठणठणीत आहे. येथुन परत खाली येऊन बालेकिल्ल्याच्या कातळमाथ्याला वळसा घालत आपण किल्ल्याच्या पुर्वभागात येतो. येथे बऱ्यापैकी सपाटी असुन गडाचे बहुतेक अवशेष या सपाटीवर आहेत. गडाची उंची समुद्रसपाटीपासून ३१४८ फुट असुन गडाचा परीसर साधारण २४ एकरवर पसरलेला आहे. येथे आल्यावर समोरच भिंती शिल्लक असलेल्या एका मोठया वाड्याचे अवशेष दिसतात. वाडयाच्या मागील बाजुस गडाचा दक्षिण बुरुज असुन या बुरुजावरून आपण चढुन आलेली डोंगरसोंड नजरेस पडते. वाड्यासमोरच एका दुसऱ्या वास्तुचे अवशेष दिसुन येतात. या वास्तुच्या खालील बाजुस गडाचा पुर्व दरवाजा आहे पण तेथे न जाता प्रथम गडाच्या माचीवर फेरी मारून घ्यावी. या भागात असलेले कातळातील खळगे व घरांचे अवशेष पहाता गडावरील वस्ती या भागात असावी. पायवाटेवरुन पुढे जातांना एक वाट खाली उतरताना दिसते. हि किल्ल्याच्या पुर्व दरवाजातुन येणारी वाट आहे. पुढे चालत गेल्यावर उजव्या बाजुला खडकात खोदलेले पण पाणी नसलेले एक टाके आहे व त्यापुढे गाळाने भरलेले दुसरे लहान टाके आहे. वाटेच्या उजव्या बाजूस कडयाच्या टोकाला चौकीचे अवशेष दिसुन येतात. वाटेच्या डाव्या बाजुला साचपाण्याचा तलाव असुन त्याच्या वरील भागात बालेकिल्ल्याच्या टेकडीत एक बुजलेले टाके व त्यालगत अर्धवट तोंड बुजलेली एक गुहा दिसुन येते. वर चढुन हे टाके व गुहा पाहुन पुढे निघाल्यावर कातळात कोरलेली दुसरी मोठी गुहा दिसते. या गुहेत २० ते २५ जण सहज राहु शकतात. या दोन्ही गुहा पाहून पुढे निघाल्यावर वाटेत दोन सुकलेली टाकी लागतात व त्यापुढे पिण्याच्या पाण्याचे खांबटाके लागते. गडावर पिण्याच्या पाण्यासाठी हि एकमेव बारमाही सोय आहे. टाक्यांवरून पुढे जाणारी वाट गडाच्या उत्तर टोकावर असलेल्या घुमटीवजा भवानी मंदिराकडे घेऊन जाते. या मंदिरात शेंदूर लेपलेली भवानी,गणपती व भैरोबाची सुबक मुर्ती असुन मंदिराबाहेर उघडयावर शिवलिंग आहे. मंदिरासमोर खालच्या बाजूला विरगळाचे शिल्प ठेवलेले आहे. मंदिराच्या उत्तरेकडील बुरुजावरून पूर्वेला कळसुबाई तर उत्तरेला हरिहर, बसगड हे किल्ले दिसतात. मंदिरामागुन गडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी असलेल्या पायवाटेने वर चढुन दुसऱ्या बाजुने खाली उतरता येते. बालेकिल्ल्यावर कोणतेही अवशेष नाहीत पण येथुन संपुर्ण गडाची माची पहाता येते. गडाला तुरळक तटबंदी असुन गडमाथ्यावरून सह्यादीची सुंदर रांग दिसते. इथून त्रिंगलवाडीचा जलाशय, दक्षिणेला इगतपुरी, वैतरणा खोरे, त्र्यंबकरांग, कावनाई, मोरधन,अलंग, कुलंग असा संपूर्ण प्रदेश पहाता येतो. बालेकिल्ल्यावरून आपण सुरवातीला पाहीलेल्या वाड्याकडे उतरतो.येथुन गडाच्या पूर्वेकडील दरवाजाने गड उतरण्यास सुरवात करावी. या ठिकाणी असलेला गडाचा दरवाजा पुर्णपणे ढासळलेला असुन केवळ तटबंदी शिल्लक आहे. गडाच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या उतरतांना उजव्या बाजूला कातळात कोरलेली एक लहान गुहा दिसते. अशीच एक गुहा पायऱ्या उतरल्यावर समोरच्या बाजूस कोरलेली दिसते.पायऱ्या उतरल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. संपुर्ण गड फिरण्यास २ तास लागतात. किल्ल्याच्या पायथ्याशी असणाया जैन लेण्यांवरून या किल्ल्याची निर्मिती साधारण १०व्या शतकात झाली असावी. कवि जयराम पिंड्ये यांच्या पर्णाल-पर्वत-ग्रहणाख्यान या काव्यात त्रिंगलगडाचा उल्लेख आलेला आहे. अलंकुरंगतिंगलवाटिका नामथोध्दतम् |अहिवंतोऽचल गिरिर्मार्कण्डेयाभिधानकः॥ हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात केव्हा आला ते कळत नाही पण नाशीक प्रांत काबीज करताना मोरोपंत पिंगळ्यांनी हा किल्ला स्वराज्यात आणला असावा. १६८८ साली मोगलांनी फितुरीने मराठ्यांकडून हा किल्ला जिंकून घेतला. मातब्बरखानाने औरंगजेबाला पाठविलेल्या पत्रात त्रिंगलगडला वेढा घातल्याचा उल्लेख मिळतो. थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळात २० एप्रिल १७४४ रोजी कर्णाजी शिंदे यांनी त्रिंगलवाडी किल्ला फत्ते केल्याची नोंद आढळते. १८१८ साली त्रिंगलगड ताब्यात घेतल्यानंतर कॅप्टन ब्रिग्जने तोफा डागून व सुरूंग लावून हा किल्ला उध्वस्त केला.
© Suresh Nimbalkar



त्रिंगलवाडी (Tringalwadi) किल्ल्याची ऊंची :  3238

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: कळसूबाई

जिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम

इगतपुरी परिसरातून सह्याद्रीची एक रांग पश्चिमेकडे पसरली आहे. याच रांगेत त्रिंगलवाडी, बळवंतगड आणि कावनई हे किल्ले आहेत. त्रिंगलवाडी किल्ल्याच्या डोंगरावर दहाव्या शतकातील जैन लेणी आहेत. चौल, कल्याण या बंदरात उतरणारा माल थळ घाटामार्गे नाशिकच्या बाजारपेठेत येते असे. या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी त्रिंगलवाडी किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. या किल्ल्य़ांच्या मार्गात लागणारी गावं, डोंगर माथ्यापर्यंत आलेले रस्ते, माणसांची वर्दळ यामुळे येथील भटकंती ही कमी कष्टाची आहे.


इतिहास :

किल्ल्याच्या पायथ्याशी असणाया जैन लेण्यांवरून या किल्ल्याची निर्मिती साधारण १०व्या शतकात झाली असावी. हा किल्ला मराठ्यांनी कधी घेतला हे ज्ञात नाही. मात्र १६८८ च्या शेवटी मुघलांनी फितुरीने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला.

पहाण्याची ठिकाणे :

त्रिंगलवाडी गावातून गडावर जाताना पायथ्याशी पांडवलेणी नावाची लेणी (गुहा) आहे. इथे ८ गुहा असून त्यापैकी ६ गुहा पायथ्याशी आहेत. तर २ गुहा डोंगरावर आहेत. दहाव्या शतकात कोरलेली ही जैन लेणी आहेत. पायथ्याजवळचे मुख्य लेणे आयताकार आहे. ओसरी, मंडप व गाभारा अशी त्याची रचना आहे. मंडपाच्या प्रवेशद्वारावर सुंदर कोरीवकाम आढळते. मंडपाच्या विहाराच्या आत असलेल्या कोनाड्यात कोरीव काम केलेले आहे. गाभार्‍यात वृषभनाथाची पद्मासनातील भग्न मूर्ती आहे. सभामंडपाच्या ४ खांबांपैकी ३ खांबांची पडझड झाली आहे. लेण्यांच्या बाजूला पाण्याचे कुंड आहे.


लेण्यांच्या बाजूने गडावर वाट जाते. साधारण १५ मिनिटात आपण डोंगरसोंडेवर पोहोचतो. समोरच त्रिंगलवाडी किल्ल्याची कातळ टोपी दिसते. कातळटोपी खाली आल्यावर दोन वाटा दोन वाटा फ़ुटतात. कातळटोपीच्या उजवीकडून जाणारी वाट सोपी आहे. तर डावीकडून जाणारी वाट थोडी कठीण आहे. पण किल्ला चढतांना डावीकडून जावे आणि उतरतांना उजवीकडील वाटेवरून उतरावे. डावीकडून किल्ल्यावर जातांना पायर्‍यांच्या अगोदर एक छोटासा कातळटप्पा आहे. तो सहज चढून जाता येतो. किल्ल्यावर जाण्यासाठी कातळ फ़ोडून उंच पायर्‍या बनवलेल्या आहेत. शेवटच्या टप्प्यात पायर्‍यांना एक वळण दिलेल आहे. पायर्‍या संपल्यावर समोरच ५ फ़ूट उंच हनुमानाची मुर्ती आहे. उजव्या बाजूला कातळात कोरलेले अप्रतिम सुंदर प्रवेशव्दार आहे. त्यावर दोन कोपर्‍यात दोन शरभ कोरलेले आहेत. प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर आपण किल्ल्याच्या सर्वोच्च शिखराला वळसा घालून पुढे गेल्यावर वाड्याचा चौथरा दिसतो. त्याच्या समोरच कातळात खांब रोवण्यासाठी बनवलेले खळगे पाहायला मिळतात. पूर्वीच्या काळी या ठिकाणीही घर असावीत. पायवटेवरुन पुढे जातांना एक पायवाट खाली जातांना दिसते. ती पायवाट किल्लावर उजवी कडून येणारी वाट आहे.



त्यापुढे चालत गेल्यावर डावीकडे असणार्‍या किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्याकडे जाणारी पायवाट दिसते. यावाटेने चढून गेल्यावर कातळाच्या पोटात कोरलेली एक मोठी गुहा दिसते. या गुहेत २० ते २५ जणांना राहता येते. त्याच्या डाव्या बाजूला अजून एक गुहा आहे. दोन्ही गुहा पाहून परत पायवाटेवर येऊन पुढे चालत गेल्यावर पिण्याच्या पाण्याचे टाके लागते. या टाक्यांपासून पुढे गेल्यावर शंकराचे मंदिर लागते. या मंदिरा समोरच्या कड्यावरून पूर्वेला कळसुबाई, उत्तरेला त्र्यंबकरांग, हरिहर, बसगड असा परिसर दिसतो. मंदिराच्या मागुन गडाच्या सर्वोच्च शिखरावर जाण्यासाठी पायवाट आहे. शिखरावर एक झेंडा लावलेला आहे, काही अवशेष नाहीत.


शिखर पाहून झाल्यावर आल्या मार्गाने परत फ़िरून दोन वाटा फ़ुटतात तिथ पर्यंत यावे. तिथून खाली उतरणार्‍या पायवाटेने गेल्यावर उजव्या बाजूस वाड्याचा चौथरा दिसतो. तो पाहून पायर्‍यांपाशी यावे. येथे पूर्वीच्याकाळी प्रवेशव्दार असावे आता फ़क्त तटबंदीचे अवशेष आहेत. पायर्‍या उतरतांना उजव्या बाजूला कातळात कोरलेली गुहा दिसते. तशीच एक गुहा पायर्‍या उतरल्यावर समोरच्या कातळात वर कोरलेली दिसते. या दोनही गुहा टेहळणीसाठी बनविण्यात आल्या होत्या. त्यांची रचना अषी केली होती की, वेगवेगळ्या भागावर नजर ठेवता येईल. गड फिरण्यास साधारण १ तास लागतो.

पोहोचण्याच्या वाटा :

गडावर जाण्यासाठी ३ मार्ग आहेत.

१) त्रिंगलवाडी मार्गे:- गाडीने किंवा रेल्वेने इगतपुरी गाठावे.

रेल्वेने :- इगतपुरीच्या पूर्वेकडे म्हणजेच एसटी स्टँडच्या बाजूला बाहेर पडावे. एसटी स्थानकाच्या अलीकडे आंबेडकर चौक लागतो. या चौकातून एक वाट वर जाते. या वाटेने पुढे पंधरा मिनिटे चालत गेल्यावर उजवीकडे वळावे. अर्ध्या तासात आपण वाघोली नावाच्या खिंडीत पोहोचतो. खिंडीतून खाली उतरल्यावर आपण त्रिंगलवाडी नाक्यावर पोहोचतो. येथून डावीकडे (त्रिंगलवाडी गावाकडे) वळावे. अर्ध्या तासात आपण त्रिंगलवाडी गावात पोहोचतो. त्रिंगलवाडी गावापर्यंत इगतपुरी - त्रिंगलवाडी अशी जीपसेवा देखील उपलब्ध आहे. गावाच्या मागे त्रिंगलवाडी धरण आहे. धरणाच्या भिंतीवर चढून डावीकडे वळावे. भिंत संपल्यानंतर उजवीकडची वाट पकडावी. या वाटेने अर्ध्या तासात आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. पायथ्याशीच पांडवलेणी नावाची गुहा आहे.



रस्त्याने :- कसारा घाट चढून इगतपूरीच्या पुढे ९ किमीवर टाके गाव लागते. या गावातून रस्ता त्रिंगलवाडी - पत्र्याचीवाडी मार्गे तळ्याची वाडी या त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याच्या गावापर्यंत जातो. टाके गावापासून हे अंतर अंदाजे ८ किमी आहे. तळ्याचीवाडी गावामागे तलाव आहे. तलावाच्या बाजूने वाट शेताच्या बांधावरुन किल्ल्याच्या पायथ्याच्या लेण्यांपर्यंत जाते.

या गुहेवरून गडावर जाण्यास रस्ता आहे. गड चढण्यास अर्धा तास लागतो.


२) विपश्यना विद्यापीठामार्गे:-

इगतपुरी स्थानकावरून उत्तर दिशेला म्हणजेच ‘विपश्यना विद्यापीठा’कडे उतरावे. विद्यापिठाचे प्रवेशद्वार आल्यावर तेथून समोर असणारी डोंगराची सोंड चढावी. ती वाट आपल्याला प्रचंड कड्याखाली आणून सोडते. तो प्रचंड कडा उजवीकडे ठेवत दोन तासात किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. येथून वर चढण्यास आपल्याला अर्धा तास पुरतो. हा मार्ग पुढे दोन मार्गांमध्ये विभागलेला आहे. पूर्वेकडून वर चढणारा मार्ग हा वर सांगितलेल्या क्र १ च्या वाटेला जाऊन मिळतो, तर पश्चिमेकडे जाणारी वाट किल्ल्याला उजवीकडे ठेवत एका घळीपाशी पोहोचते. या घळीतून वर चढल्यावर पुढे कातळात कोरलेल्या पायर्‍या लागतात. या पायर्‍यांनी वर चढल्यावर

किल्ल्याचा दरवाजा लागतो.


३) चिंचोली मार्गे:-

या मार्गाने गडावर जाण्यासाठी कसारा गाठावे. कसार्‍यावरून जव्हार, मोखाडा किंवा खोडाळा या ठिकाणी जाणारी कुठलीही बस पकडावी आणि ‘विहीगाव’ फाट्यावर उतरावे. या फाट्याच्या समोरच एक देऊळ आहे. या देवळाच्या मागे म्हणजेच रस्त्याच्या उजवीकडे जाणारी वाट पकडावी. पाऊण तासानंतर चिंचोली नावाचे गाव लागते. या गावाच्या मागून जंगलातून जाणार्‍या रस्त्याने किल्ल्याच्या मध्यभागी असणार्‍या पठारावर पोहोचावे. येथे चांदवाडी व जांभूळवाडी ह्या पठारावर वसलेल्या २ वाड्या आहेत. या वाड्यांच्या मधून गडावर वाट जाते. येथून क्र. १ मध्ये सांगितल्याप्रमाणे २ वाटा जातात कोणत्याही वाटेने गडावर पोहोचावे. ही वाट फारच लांबची असल्याने या वाटेने गड गाठण्यास ४ तास लागतात. वाट चुकण्याचा देखील संभव आहे.

राहाण्याची सोय :

किल्ल्यावर १५ जणांना राहता येईल एवढी मोठी गुहा आहे.

जेवणाची सोय :

जेवणाची सोय आपण स्वत…: करावी.

पाण्याची सोय :

गडावर बारामाही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ :

१) त्रिंगलवाडी गावापासून१ तास लागतो. २) चिंचोली गावापासून ३ तास लागतात. ३) विपश्यना केंद्रामार्गे २ तास लागतात.

सूचना :

चिंचोली गावातून जाणारी वाट निसरडी आहे.


ऐतिहासिक त्रिंगलवाडी किल्ला, लेण्यांची दुरवस्था! पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी (जि. नाशिक) : तालुक्यातील शिवकालीन ऐतिहासिक वारसा असणाऱ्या त्रिंगलवाडी गावाजवळ असलेल्या त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याजवळ असणाऱ्या डोंगराच्या कुशीतील २९ लेण्यांचा समूह आहे. परंतु पर्यटकांना या लेण्यांची पुरेशी माहिती मिळत नाही.


या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांपासून ऐतिहासिक वारसा असूनही केवळ पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे स्थळाला अवकळा आली आहे. पुरातत्त्व विभागाने कोणत्याही प्रकारची जबाबदारी पार न पडल्यामुळे लेण्यांना भग्नावस्था प्राप्त झाली, तर त्याचबरोबर येथील पायऱ्यांचीही दुरवस्था झाली आहे. (Historic Tringalwadi Fort Caves are in disrepair Neglect of Archeology Department nashik news)




किल्ल्याजवळ असणाऱ्या पाली भाषेत लिहिलेल्या शिलालेख व स्तूपांची झालेली दुरवस्था.

येथील लेण्यांवर कोणत्याही प्रकारची वीजसुविधा, पिण्यायोग्य पाणी तसेच सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने पर्यटकांची गैरसोय होत आहे. पावसाळ्यातील शेवाळ व वणव्यामुळे दरवर्षी या लेण्या धोक्यात येत असतात. तसेच लेण्यात असलेले स्तूप झिजतात, तर लेण्यांच्या पायथ्याशी असलेले दोन स्तूप बेवारस स्थितीत पडलेले आहेत.

या लेण्यांमध्ये पाली भाषेत लिहिलेले शिलालेख असून, शिलालेखांची व स्तूपांची दुरवस्था झाल्याने त्यावरील लिखाण समजत नाही. कडक उन्हाळ्यातही येथील जलकुंडात पाणी असते. परंतु कुंडाचीही दुरवस्था झाली आहे. कुंडांची स्वच्छता करणे, गाळ काढणे अशी कामे न केल्याने कुंडात अस्वच्छता मोठ्या प्रमाणात पसरली आहे.

त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या लेण्या कुंभोज वंशातील विष्णुपुलीत राजाच्या काळात खोदलेल्या आहेत. पहिल्या वरच्या स्तरात वीस आणि दुसऱ्या या स्तरात नऊ व उर्वरित अशी २९ लेणी आहेत. लेणी एकमध्ये भव्य सभागृह आहे. एका शिळेवर प्रलंबपदासन मुद्रेतील बुद्धमूर्ती आहे.

सिंहासनावर भगवान बुद्धाच्या पायाजवळ धम्मचक्र व हरिणाची प्रतिमा आहे. ध्यानधारणेसाठी खोल्या व प्रार्थना घरे, पाली भाषेतील शिलालेख, खोल्या, सभागृह, दालन, वाळूच्या घड्याळासारखी नक्षी, चैत्यगृह, ओटे, नक्षीकाम, लहान-मोठी प्रवेशद्वारे, भोजनगृह, स्तूप, दगडी पाण्याची टाके, प्रतिमा, दीर्घिका, स्तंभ, अर्धस्तंभ खांबावरती असे सुंदर कोरीवकाम या लेण्यांमध्ये पाहावयास मिळते.

त्रिंगलवाडी किल्ल्याचा इतिहास :

त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या जैन लेण्यावरून या किल्ल्याची निर्मिती साधारण १० व्या शतकात झाली असावी. मात्र १६८८ च्या शेवटी मुघलांनी फितुरीने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला.

या लेण्या तीन भागांत आहेत. प्रवेशद्वारावर सुंदर कोरीव काम आढळते. विहाराच्या आत असलेल्या कोनाड्यात गौतम बुद्धांची ध्यानस्थ मूर्ती आहे. मूर्तीखाली शिलालेख आहे. विहाराच्या चार खांबांपैकी तीन खांबांची पडझड झाली आहे.

पिण्याच्या पाण्याचे भुयारी टाके आहेत. त्याच्यावर सुंदर नक्षीकाम आढळते. शंकराचे मंदिर असून, कड्यावरून दक्षिणेस तळेगड, इगतपुरी, पूर्वेला कळसूबाई, उत्तरेला त्र्यंबकरांग, हरिहर, बसगड परिसर दिसतो. दरवाजाच्या उजवीकडे हनुमानाची मूर्ती कोरली आहे.

"राज्यात असणाऱ्या किल्ल्याचे अथवा लेणींचे संवर्धन होणे गरजेचे आहे. मात्र वेळोवेळी मागणी करूनही विविध दुर्लक्षित किल्ले व लेण्यांचे संवर्धन करण्याकडेही पुरातत्त्व विभागाने दुर्लक्ष होत आहे. पुरातत्त्व विभागाने लक्ष घातले नाही, तर हा पुरातन वारसा लोप पावेल."

- बिपीन गोडबोले, पर्यटक (मुंबई)

"ऐतिहासिक वारसांचे संवर्धन करणे ही शासनासह प्रत्येकाची जबाबदारी आहे. इगतपुरी तालुक्यातील अशा वारसास्थळांकडे लक्ष देणे गरजेचे असून, पर्यटकांना सोयी सुविधा मिळणे आवश्यक आहे. वारसास्थळांचे संवर्धन झाल्यास तालुक्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल." - भागीरथ मराडे, अध्यक्ष, कळसूबाई मित्रमंडळ, इगतपुरी

https://www.deshdoot.com/local-news/nasik/tringalwadi-fort-relics-of-old-wada-found-at-foothills

त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी आढळले भव्य वाड्याचे अवशेष; जाणून घ्या इतिहास

Mohan Kankate

नाशिक । Nashik

जिल्ह्यातील ऐतिहासक वारसा असलेला त्रिंगलवाडी किल्ला (Tringalwadi Fort) हा निसर्ग पर्यटननाने (Nature tourism) सजलेला असून आपल्या प्राचीनतेची आणि इतिहासाची साक्ष देत उभा आहे. याच किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लेणी (Caves) पासून साधारण ८०० मीटर अंतरावर गर्द झाडीत एक वाडा (wada) पडक्या स्थितीत असून या वाड्याला कोणत्याही भिंती नाहीत.

तसेच पर्यटकांपासून (Tourists) हा वाडा नेहमी दुर्लक्षित राहिला असून जवळपास १०० X १०० लांब रुंदीचा हा वाडा असल्याने त्याच्या चारही बाजूला बुरुज (Tower) आहेत. बुरुजाची उंची ६ फुट एवढी आहे. तर मध्यभागी मोठा चौथऱ्याच्या खुणा आहेत. हा एखाद्या सरदाराचा वाडा असावा असे प्राथमिक स्वरुपात आढळते. स्थानिक यास हत्ती महल असे म्हणतात.


दुसरीकडे नाशिक जिल्हा (Nashik District) हा गीरीदुर्गांच्या सोबत आव्हानात्मक सुळके, लेणी, धारातीर्य स्थळ, मंदिरे, बारव अशा विविधतेने नटलेला आहे. त्यातीलच त्रिंगलवाडी किल्ला हा निसर्गरम्य असून या किल्ल्यावर पर्यटकांची वर्षभर वर्दळ असते. तसेच किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लेणीमुळे किल्ल्याचे वास्तव प्राचीनतेशी जोडले गेले आहे.

पूर्वी नालासोपारा-कल्याण-कसारा-अंजनेरी (नाशिक) हा व्यापारी मार्ग (Trade route) होता. या मार्गावर व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून लेणीसाठी दाने दिली जायची म्हणून येथे ही लेणी कोरलेली आहे. इ.स.१८१८ नंतर इंग्रज राजवटनंतर पुढे नव्याने बांधण्यात आलेल्या धरणांमुळे (dams) या मार्गात मोठे बदल झाले. त्यामुळे त्याकाळात व्यापारी मार्गावर त्रिंगलवाडी किल्ला हा टेहळणीचे प्रमुख ठिकाण असावे.

किल्ल्यावरील दुर्ग अवशेषात पडक्या वाड्याचे अवशेष, कातळातील तुटलेल्या पायऱ्या, कातळात कोरलेले प्रवेशद्वार व पाच फुटाची हनुमानाची मूर्ती, बुरजांचे अवशेष पहायला मिळतात. 

असा आहे त्रिंगलवाडी किल्ल्याचा इतिहास

त्रिंगलवाडी (Tringalwadi) किल्ल्याला तीरमकुल किल्ला (Tiramkul Fort) असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रात (historical documents) आढळतो. जैनांनी महाराष्ट्रात आठव्या शतकात लेणी बांधायला सुरुवात केली. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली लेणी ही शेवटच्या टप्प्यातील लेणी आहे.

लेणीतील शिलालेखावरून (Cave inscriptions) लेणी शके १२६६ मध्ये १३व्य शतकात कोरली गेली असे दिसते. तसेच किल्ल्यावर हि दोन लेण्या आहेत. कळवण तालुक्यातील (Kalvan taluka) मार्केंडेय पिंपरी येथील मूळचे असलेले कवि जयराम पिंड्ये (Poet Jayaram Pindye) यांच्या ‘पर्णाल-पर्वत-ग्रहणाख्यान’ या काव्यात त्रिंगलवाडीचा उल्लेख आलेला दिसतो.

इ. स.१६३६ पासून हा किल्ला शहाजी महाराज व छत्रपती शिवाजींच्या (Shahaji Maharaj and Chhatrapati Shivaji Maharaj) ताब्यात असल्याचे कॅप्टन ब्रिग्जने (Captain Briggs) आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. मराठ्यांच्या ताब्यात हा किल्ला असून इ.स. १६८८ च्या शेवटी मोघलांनी फितुरीने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला.

मातब्बरखानाने औरंगजेबाला पाठविलेल्या पत्रात त्रिंगलवाडीला वेढा घातल्याची नोंद आढळते.तर पेशवेकाळात (Peshwa period) हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. इ.स. १८१८ साली पेशवाई बुडाल्यावर मराठ्यांनी (Marathas) पुन्हा प्रतिकार करू नये म्हणून इंग्रज अधिकारी (English officer) कॅप्टन ब्रिग्जने (Captain Briggs) तोफा डागून व सुरूंग लावून हा किल्ला उद्धवस्त केला.

संकलन : श्री.गणेश द. रघुवीर

दुर्ग अभ्यासक

सदस्य-सह्याद्री प्रतिष्ठान

जैनांनी महाराष्ट्रात आठव्या शतकात लेणी बांधायला सुरुवात केली. त्यातील त्रिंगलवाडी ही शेवटच्या टप्प्यातील म्हणजेच शके १२६६ मध्ये कोरल्याचे शिलालेखातून दिसते. गडाच्या पायथ्याच्या कातळात कोरलेली ऐतिहासिक लेणी पाहिली की नवल वाटायला लागतं. लेणीच्या बाहेर भग्न अवशेषांचा खच पडलेला दिसतो. लेणीचं कोंदण लाभलेल्या त्रिंगलवाडीचा प्रवास पुरातन अन् ऐतिहासिक असला तरी उपेक्षित ठरतो…


नाशिक परिसरातील वारसास्थळे जितकी पुरातन तितकी दुर्लक्षित असं समीकरण होऊ पाहत असल्याने पावलोपावली विखुरलेल्या वारसास्थळांची अवस्था पाहून अस्वस्थ व्हायला होतं. नद्यांवरचे प्राचीन घाट, यादवकालीन विहिरी व अहिल्याबाईंच्या बारव, जमीनदोस्त झालेल्या गढ्या, वाडे अन् कोनाड्यात पडून असल्यागत उभे असलेले, देह ठेवू पाहणारे गड-किल्ले, इतिहासाला पारख्या होत असलेल्या गाववेशी, परंपरेचा पदर सोडत जमिनीत गाडल्या जात असलेल्या वीरगळी, हेमाडपंती, नागर शैलीतील मोडकळीस आलेली जिह्याभरातील अनेक मंदिरे तसेच असंख्य मंदिरांमधील भग्न झालेल्या अन्‌ सौंदर्याने ओतपोत सजलेल्या भग्न मूर्ती तसेच तपश्चर्येचा इतिहास सांगणाऱ्या असंख्य समाधींकडे, त्याच्या इतिहासाकडे झालेल्या दुर्लक्षाचा फटका लेणीचे कोंदण व गडकिल्ल्यांच्या वैभव लाभलेल्या त्रिंगलवाडीलाही सोसावा लागतो आहे. बौद्धांप्रमाणे जैनांनीही आपल्या धर्माच्या प्रचारार्थ देशाच्या वेगवेगळ्या भागांत जैन साधूंना पाठवत धर्मप्रसाराचे कार्य केले. जैन लेण्यांत तीर्थंकर व जैन दैवतांची शिल्पे दिसतात. मात्र, त्यातील सहजाविष्कार जाणवत नाही. त्रिंगलवाडीच्या लेणींवर बौद्ध व ब्राह्मणी लेण्यांची छाप जाणवते. मात्र त्रिंगलवाडी ग्रामस्थांच्या मते ही लेणी पांडवलेणी आहे. पांडवांनी बोटांच्या नखांनी डोंगर कोरून ही लेणी खोदल्याचे ते सांगतात अन् त्याचे वय हजारोवर्ष असल्याचे ते सांगतात.


मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिकहून घोटीचा टोलनाका ओलांडला की, उजव्या हाता लागणारे पहिले गाव म्हणजे टाके. टाके या गावाला घोटीटाके असेही म्हटले जाते. महाराणा प्रतापांनंतर राजस्थान व उत्तर भारतातून विस्थापित झालेला आग्री समाज टाके गावात स्थिरस्थावर झाला. यांना आग्री अन्‌ आगळी असेही म्हटले जाते. त्यावेळी आजूबाजूच्या ग्रामस्थांनी या समाजाला वेगळे टाकले असावे, म्हणून त्यांच्या वस्तीला टाकून दिलेले गाव म्हणून टाके नाव पडले असावे, असे अर्जून आडोळे सांगतात. टाके गाव मोठे असले तरी येथे फक्त मारूतीचे एकमेव मंदिर आहे. त्यामुळे हनुमान जयंती एवढाच उत्सव गावात होतो. तर गावाला सहा वेसदेव आहेत. यात यळोबा, वाघोबा, माऊल्याआई, बडेबुवा, शंकर अन्‌ म्हसोबा या गावाच्या रक्षणकर्ते असल्याचे पूनजा आडोळे व कोंढाजी आडोळे सांगतात. मारूती मंदिराशेजारी काही विरगळी आहेत. त्या पाहून टाकेगावातून त्रिंगलवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याने निघाले की पुढे बलायदुरी व त्यानंतर पारदेवी हे गाव लागते. तेथून दोन तीन किलोमीटरवर त्रिंगलवाडी धरणाच्या कवेत वसलेले गाव लागते. त्रिंगलवाडीचे वैभव अशासाठी वेगळे आहे की, त्याच्या आजूबाजूला भास्करगड, उतवड, ढोऱ्या डोंगर, वैतरणा धरणाजवळील डोंगररांगा, कसारा घाटाचा प्रदेश, कळसूबाई, अलंग-मदन-कुलंग अन्‌ त्रिंगलगडाचा सहवास या गावाला लाभला आहे. त्रिंगलवाडी हे गाव पत्र्याचा पाडा, तळ्याचा पाडा अन्‌ निशाणवाडी या तीन वाड्यांनी बनलेले आहे. त्यामुळे याला त्रिंगलवाडी म्हटले गेले असावे, असे तुकाराम पारधी सांगतात. आदिवासीबहुल असलेल्या गावात ठाकूर व कोळी समाज राहतो. तळ्याच्या वाडीत गाडी लावून पाण्याने भरलेल्या तळ्याच्या डावीकडून गावाच्या आधाराला पहुडलेल्या त्रिंगलगडाकडे जाता येते. गडाच्या पायथ्याला सहा तर गडाच्या कपारीत दोन लेणी आहेत. येथे घोटीपासून इतक्या आत लेणी का बांधली असावी असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र पूर्वी नालासोपारा-कल्याण-कसारा-अंजनेरी (नाशिक) हा व्यापारी मार्ग होता. आजही याच्या खाणाखुणा पहायला मिळतात. या व्यापाऱ्यांकडून लेणीसाठी दाने दिली जायची म्हणून येथे ही लेणी कोरलेली दिसते. इंग्रजांमुळे व पुढे धरणांमुळे या मार्गात बदल झाले. त्यामुळे व्यापारी मार्गावर त्रिंगलगड हा टेहळणीचे ठिकाण असावे. नंतरच्या काळात या टेहळणी डोंगराचा किल्ला म्हणून वापर झाला.

जैनांनी महाराष्ट्रात आठव्या शतकात लेणी बांधायला सुरुवात केली. त्यातील त्रिंगलवाडी ही शेवटच्या टप्प्यातील म्हणजेच शके १२६६ मध्ये कोरल्याचे लेणीतील शिलालेखातून दिसते. म्हणजेच ही लेणी १३ व्या शतकातील असल्याचे दुर्ग अभ्यासक सुदर्शन कुलथे सांगतात. तळ्याच्या वाडीकडून डाव्या अंगाच्या पायवाटेने एक किलोमीटर शेतातून गेल्यावर गडाच्या पायथ्याच्या कातळात कोरलेले अद्भुत लेण पाहिलं की नवल वाटायला लागतं. लेणीच्या बाहेर भग्न अवशेषांचा खच पडलेला दिसतो. ही वास्तू केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्याअंतर्गत असल्याने परिसरात स्वच्छता दिसते; मात्र कोणताही फलक दिसत नाही. त्यामुळे पर्यटकांना ही लेणी कोणती व तिचे महत्त्व लक्षात येत नाही. त्रिंगलगडाच्या पायथ्याजवळची मुख्य लेणी आयताकार आहे. लेणीचा व्हरांडा, सभामंडप आणि गाभारा असे तीन भाग आहेत. व्हरांडा लांबलचक असून, द्वारशाखेपूर्वी छतावर सुशोभित छताच्या तुळ्या हातात हात गुंफलेल्या गण-यक्षांनी पेलल्याची शिल्प मन मोहून टाकते. हे शिल्प कसे घडविले असेल हा प्रश्न त्या कलाकारांच्या मेहनतीला आणि चिकाटीला सलाम करतो. तर उजव्या बाजूला कातळात फूल कोरले आहे. छताला आधार देण्यासाठी कोरलेले खांब आता पडले असून, वरची बाजू फक्त शिल्लक आहे. त्यावर यक्ष दिसतात. व्हरांड्याच्या आतील भागात नक्षीकाम आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर नक्षीकाम करण्यासाठी जसे पाच सुशोभित चौकटी एकात एक गुंफून त्यावर नाजूक काम केले असावे. हे करताना त्या कलाकारांना हे करताना किती कालावधी लागला असेल हा प्रश्न त्यांच्या प्रतिभेचे कौतुक करतो. व्हरांड्यात उजव्या व डाव्या बाजूला चौकोनी आकाराच्या बसण्यासाठी जागा दिसते. तर द्वारपट्टीवर दोन चौकटी तीर्थंकरांच्या मूर्ती व गणांची देखणी शिल्पे आहेत. ललाटपट्टीवर खंडित झालेली गजलक्ष्मीची प्रतिमा तर प्रवेशद्वाराच्या हातील बाजूस लाकडी दरवाजांसाठी खोबणी असल्याचे दिसते. म्हणजेच लेणीला पूर्वी लाकडी दरवाजांची व्यवस्था असावी. लेण्यांचा सभामंडप प्रशस्त आहे. लेणीच्या मुख्य मंडपाला सालंकृत असे चार स्तंभ होते. त्यापैकी फक्त एकच खांब आता शिल्लक असून, त्याच खांबावर लेणी उभी आहे. त्यावर सुंदर नक्षी आहे. उरलेल्या खांबांचा स्तंभशीर्षाचे अलंकृत हस्त (ब्रॅकेट्‌स) अजूनही पहायला मिळतात. त्यावरील यक्ष अजूनही लेणीला उचलून आधार देत असल्याचे पाहता येते. हा आविष्कार अनुभवण्यासारखा आहे. हे यक्ष नसते तर लेणीचा महाकाय दगड अंगावर आला असता असे वाटायला लागते. सभामंडपात हवा आणि उजेड येण्यासाठी नऊ चौकोनी झरोके असलेल्या दोन खिडक्या कातळात कोरलेल्या आहेत. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर नक्षी कोरलेली आहे. त्रिंगलवाडीच्या लेणीत बौद्ध लेणींप्रमाणे कलेचा मुक्त आविष्कार दिसत नसला तरी जैन लेणीतील स्तंभांवरची सजावट, त्यांना दिलेले विविध आकार, छतावरची कामे, वेलबुट्टी, भौमितिक आकार जैन कलाकारांचे वैशिष्ट्‌य दाखवून देते. गाभाऱ्यात जैन धर्मीयांचे प्रथम तीर्थंकर भगवान आदिदेव ऊर्फ वृषभनाथांची पद्मासनात बसलेली मूर्ती असून, मूर्तीच्या आसनावर दानाचा शिलालेख कोरलेला आहे. मात्र तो आता झिजला आहे. हा शिलालेख प्राकृत संस्कृत असून, नागरी लिपीत आहे.

त्रिंगलवाडी लेणी अपूर्ण व पडक्या अवस्थेत असली तरी तिचे सौंदर्य पर्यटकांना मोहिनी घालते. गडावरही दोन लेणी असून, त्याही भग्नाअवस्थेत आहेत.

ऐतिहासिक त्रिंगलगडही भग्नाअवस्थेत आहे. पडक्या वाड्याचे अवशेष, कातळातील तुटलेल्या पायऱ्या, कातळात कोरलेले प्रवेशद्वार व पाच फुटाची हनुमानाची मूर्ती, बुरजांचे अवशेष पहायला मिळतात. हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात केव्हा आला ते कळत नाही. पण १६८८ च्या शेवटी मोघलांनी फितुरीने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला. १८१८ साली पेशवाई बुडाल्यावर मराठ्यांनी पुन्हा प्रतिकार करू नये म्हणून इंग्रजांनी तोफा डागून व सुरूंग लावून हा किल्ला उद्धवस्त केला. हा किल्ला कोणी बांधला व त्रिंगलगडाच्या पराक्रमाच्या नोंदी मिळत नसल्या तरी हा किल्ला टेहळणी चौकची काम करीत असल्याचे दिसते. कळवण तालुक्यातील मार्केंडेय पिंपरी येथील मूळचे असलेले कवि जयराम पिंड्ये यांच्या ‘पर्णाल-पर्वत-ग्रहणाख्यान’ या काव्यात त्रिंगलवाडीचा उल्लेख आलेला दिसतो.

अलंकुरंगतिंगलवाटिका नामथोध्दतम् |

अहिवंतोऽचल गिरिर्मार्कण्डेयाभिधानकः॥

१६८८ मध्ये मुघलांनी फितुरी घडवून हा किल्ला मराठ्यांकडून घेतला. मातब्बरखानाने औरंगजेबाला

पाठविलेल्या पत्रात त्रिंगलवाडीला वेढा घातल्याचा उल्लेख मिळतो. पेशवे काळात त्रिंगलवाडीने आपला दबदबा कायम ठेवल्याचे दिसतो, असे दुर्ग अभ्यासक सुदर्शन कुलथे सांगतात. त्रिंगलवाडी ताब्यात घेतल्यानंतर कॅप्टन ब्रिग्ज यावर एक रिपोर्ट लिहिला होता. यातून या गडाबद्दल चांगली माहिती मिळते. १८१८ ला पेशवाई अस्तानंतर ब्रिग्जने जे किल्ले ताब्यात घेत उद्धवस्त केले. यात त्रिंगलवाडीचाही समावेश होता. १६३६ पासून हा किल्ला शहाजी महाराज व छत्रपती शिवाजींच्या ताब्यात असल्याचे त्याने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. कॅ. ब्रिग्जनेही येथील लेणीचे सौंदर्य अनुभवल्याचे त्याने म्हटले आहे.

लेणीचे कोंदण असलेल्या त्रिंगलवाडी गावचे मूळ वैभव आहे ते बोहाडे. चैत्रात निशाणवाडीत होणारे बोहाडे तिन्ही वाड्या अन् आजूबाजूंच्या गावांसाठी उत्सुकतेचा विषय असतो. गावात संप्तश्रृगी देवी ही गावची ग्रामदैवता आहे. तर हनुमान हा संरक्षणकर्ता, असे शांताराम शेलार सांगतात. होळी, पोळा, हनुमान जयंती व दिवाळी हे उत्सव त्रिंगलवाडीकर जल्लोषात साजरे करतात. १९८२ मध्ये धरण झाल्यावर पाण्यासाठी कासावीस झालेल्या त्रिंगलवाडीला ओलावा मिळाला अन् बागायती शेतीमुळे आर्थिक स्थैर्यही मिळाले. भात, विविध डाळी, नागली ही पिके घेणारे त्रिंगलवाडीकरांना बेंजू अन् कापडनाथ ही आदिवासी वाद्ये वाजवायला आवडतात.

मात्र ऐतिहासिक वैभव लाभलेल्या त्रिंगलवाडी विकासापासून अजूनही वंचित असून, निशाणवाडीला स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे उलटूनही रस्ता अन् वीज अजूनही मिळालेली नाही. हा उपेक्षितपणा सोबत घेऊन त्रिंगलवाडीकर गावात येणाऱ्या पर्यटकांचे स्वागताला सज्ज असते. लेणीचे कोंदण मिळाले आता विकासाचेही कोंदण मिळाले तर धन्य होऊ, अशी प्रतिक्रिया त्रिंगलवाडीकर व्यक्त करताना दिसतात. त्रिंगलवाडीच्या ऐतिहासिक वारशाला विकासाचे कोंदण लाभले तर हे लेण जगभर पोहचेल.




 यात तिथल्या मामांना त्रिंगलवाडीचा खात्री करण्यासाठी पत्ता विचारला तर मामा जोशमध्ये विचारु लागले.. ‘कुठे जायचे ते सांगा.. सिंगलवाडी की टिंगलवाडी’ !!!!’ चटकन ठस्सका लागला.. जल्ला मिसळीशिवाय !

‘आम्ही बघतो काय ते’ म्हणत पाय काढला.. नि पुन्हा मागे फिरलो… एका दुकानात चौकशी केली तर कळले स्टेशनबाहेर डाव्या बाजूला उडपी हॉटेल, बॉम्बे कॅफे अशी चांगली हॉटेल्स आहेत.. तिथूनच मग दुपारच्या खाण्याचे मेंदुवडा-इडली पार्सल (अगदी चटणी-सांबारासकट !!!) घेउन आम्ही पुन्हा एसटी स्टँडकडे जाणार्‍या वाटेला लागलो.. वाटेतच डॉ. आंबेडकर यांचे चौक लागते तिथेच डावीकडे एक चढणीचा रस्ता जातो तिथून पुढे सरकलो.. ते चढण काय पार केले नि अगदी शांतमय परिसरात येउन थडकलो.. अगदी सुनसान रस्ता.. तिथल्या भयावह शांततेला थंड हवेची सोबत.. तिथेच एक जुने चर्च नि मागच्या झाडीत वसलेली कबरीस्तान.. नि कुठूनतरी खाटीक पक्ष्याचा चिरकणारा आवाज.. शिवाय पावसाने काळोख केला होता तेव्हा अगदी भुतपटात शोभेल असे चित्र !
पुढे सरळ चालू लागलो तसे थंड हवेचा झोत वाढू लागला.. एव्हाना पावसाने थोडेफार शिंतोडे उडवायला सुरवात केली होती.. काही अवधीतच दोन वाटा झाल्या एक डावीकडे वळून लगेच संपत होती तर दुसरी उजवीकडच्या चढणीवर जाउन लुप्त झालेली.. त्या दुसर्‍याच वाटेने आम्ही चालून गेलो नि समोर सुंदर नजारा उभा राहीला..
एका बाजूला हिरव्या डोंगरांची रांग.. तर उजवीकडे भलामोठा तलाव.. रेल्वे टँक म्हणतात.. नि त्या तलावाला अगदी शोभुन दिसेल असा हिरव्या रंगाचा काठ.. त्यात उमललेली छोटछोटी रानफुले नि गवत रवंथ करणारी गुरे.. पलिकडे एका अवाढव्य पहाड हा तलाव आपल्याच मालकीचा असल्याचे भासवत होता.. त्याचा माथा ढगांमध्ये बेधुंद झालेला..अर्धाभाग सुर्यकिरणांमध्ये न्हाउन निघालेला.. तर अर्धाभाग मेघांच्या सावलीत गुरफटलेला.. इतरत्र सुद्धा अशेच पडसाद उमटताना दिसत होते.. सरत्या पावसाळ्यात दृष्टीस पडणार्‍या निसर्गाचे हे अगदी साजेसे रुप.. त्या ‘मालक’ पहाडाची एक सोंड डावीकडच्या डोंगराच्या सोंडेशी हातमिळवणी करताना दिसली.. नि आमच्या ट्रेकमध्ये लागणार्‍या वाघोली खिंडीची ओळख पटली..

– –

– –

एकंदर ट्रेकारंभ अगदी दणक्यात झाला होता.. ही तर खरी सुरवात होती.. पावसाची इथे कृपादृष्टी असतेच तेव्हा इथला निसर्ग सुंदर नजराणा पेश करणारच.. अश्या रम्य परिसरात कोणीही खुळावेल.. इथेच तलावाकाठी बसून निसर्गाविष्कार अनुभवावा असे वाटत होते.. पण रो.मा चे आपले भलतेच.. गेला लगेच तलावकाठच्या झुडूपात मासे पकडायला ! जल्ला ट्रेक दोन दिवसाचा असो वा एक दिवसाचा या साहेबांना कळ लागतेच.. !!
या तलावकाठच्या बाजूनेच डांबरी रस्ता थेट वाघोली खिंडीकडे घेउन जातो.. प्रथमदर्शनी हा रस्ता थेट पहाडाच्या उदरात घुसतो की काय असेच वाटते..
इथली वाटचाल करताना ट्रेकमध्ये नेहमीच मोहक वाटणार्‍या रानफुलांचा ताटवा लागला.. नि साहाजिकच आमचा वेग अगदी कासवछाप झाला.. इगतपुरी रेल्वे स्टेशनपासून इतक्या जवळ असा रमणीय परिसर असेल असे वाटले सुद्धा नव्हते.. पुढच्या खेपेस या तलावाकाठीच एक फॅमिल पिकनिक करु असे स्वतःशीच खोटे आश्वासन देत आम्ही खिंडीकडे निघालो..

– –

– –

रस्ता अगदी सरळ.. पण खिंड जशी जवळ आली तसा उंचीला मोठा पण लांबीला छोटा चढ लागतो.. ‘खिंड’ या इतिहासातील सुप्रसिद्ध शब्दालाच इतके वजन आहे की कोणालाही साहाजिकच कुतुहल वाटावे.. खिंडीत उभे राहीले की वार्‍याचा झोत स्वागत करणारच… दोन्ही कडून खिंडीत येणारा रस्ता दिसणारच.. दोन प्रदेशांना एकत्र आणण्याचे महत्त्वाचे काम ही खिंडच करते.. इथेही या खिंडीमुळेच पलिकडच्या गावांना इगतपुरीच्या अगदी जवळ आणले गेले.. या खिंडीतच देवीचे मंदीर आहे..
खिंडीपासून पलिकडचा रस्ता सुरु होतो.. रस्ता म्हणाल तर अगदी कच्चाही नाही पक्काही नाही.. पण गाडी नक्कीच जाउ शकते.. इथूनच इगतपुरीला कॉलेजला जाणार्‍याला त्रिंगलवाडीची दिशा विचारली तर ‘कुठे चालत जाताय.. गाडी आणायची ना’ असा सल्ला मिळाला… त्याच्या बोलण्यात तथ्य होते खरे.. त्रिंगलवाडी दुरवर अगदी मुंगीसदृश वाटत होती… पल्ला बराच मोठा गाठायचा होता.. पण त्याचसाठी तर आम्ही आलेलो.. घडयाळ्याकडे बघून लेटस गो केले.. ट्रेकमध्ये सर्वात त्रासिक बाब म्हणजे रस्त्यावरुन चालणे.. इथे तर अगदी वळसे घेत जाणारा होता.. आम्हाला त्रिंगलवाडीची दिशा तर कळली होती.. साहाजिकच मागचा पुढचा विचार न करता रस्त्याला फाटा देत आम्ही शेतमळयातून जाणारी पाउलवाट पकडली.. रस्त्याला उजवीकडे ठेवले.. आमच्यासाठी शॉर्टकट पेक्षा हिरव्यागार रानाने नटलेल्या वाटेचा आस्वाद घेणे महत्त्वाचे होते..

(दुरवर समोर दिसतोय तो त्रिंगलवाडी किल्ला)
– –

कधी एखादा धनगरवाडा लागतोय.. तर कधी छोटेसे घर.. कधी पिवळ्याधम्मक फुलांची शेती लागतेय.. तर कधी हिरवीगार भातशेती.. कधी विविधरंगी रानफुलांनी सजलेले हिरवे रान.. शेतमळ्यातून जाणारी वाट म्हणजे नांगी वर करुन अभिवादन करणार्‍या खेकडयांची भेट तर ठरलेली.. नि सभोवताली क्षितीजाच्या आड येणारी सह्याद्रीरांग.. आमच्या ट्रेकचे प्रायोजन तर इथेच सफल झाले होते..
अशावेळी आपले ट्रेकमार्क उडडाण असतेच !! (फोटो By रो.मा)

– –

(बुध्या डोंगर नि मागे कावनईचे डोके दिसतेय)
पुढे दोन- तीन घरांची वाडी लागली नि तिथून मात्र रस्त्याची वाट धरावी लागली.. एक छोटा ओहळ पार करुन पुढे कंटाळवाण्या रस्त्यावर आलो… आतापर्यंत बरीच वाट तुडवली होती.. गेले दोन तास चालतच होतो.. सध्या वारंवार ट्रेक्स होत नाहीत म्हणून की काय माहीत नाही पण रो.मा. ची थकबाकी सुरु झाली.. रस्त्यावरच मग क्षणभर विश्रांती घेउन पुन्हा तंगडतोड सुरु केली..

रस्त्याच्या दुतर्फा असलेली हिरवीगार शेतं, शेतामध्ये वेढलेली पिटुकली घरं व शेतापलिकडे दिसणारे हिरवे डोंगर.. असा नजारा असताना चालणेही सुसह्य होउन गेले.. काही अवधीतच त्रिंगलवाडी गावात पोहोचलो.. गावातल्या मंदीरातील देवीला मनोमन नमस्कार करुन गावच्या मागून जाणारी बटबटीत चिखलाची ढोरवाट पकडली.. धरणाच्या भिंतीवर चढून गेलो नि समोर… समुद्रापरी लाटांच्या तालावर झुलणारे धरणाचे पाणी व त्यापल्ल्याड ध्यानस्थ बसलेला त्रिंगलवाडी किल्ला !

किल्ल्याची चढाई फारशी वाटत नव्हती.. पण एव्हाना मध्यदुपार होउन गेलेली.. किल्ल्याचे चरण स्पर्श जरी करायचे तरी बराच पल्ला गाठणे बाकी होते.. तिथे पोचणार कधी.. चढणार कधी.. फिरणार कधी नि उतरणार कधी.. सार्‍या प्रश्नांचा कल्लोळ बाजूस सारुन डावीकडून लेटस गो केले.. इथूनच आमची आतापर्यंतची खिंडीपासूनची घोडदौड दिसून येत होती.. जल्ला बरीच पायपीट झाली होती.. नि अजुन बरीच बाकी होती..

(आतापर्यंतची घोडदौड.. अगदी उजवीकडच्या खिंडीतून इथवर मजल मारली होती)
धरण अगदी मोठे असले तरी भिंत पुर्णपणे बांधलेली नाही.. साहाजिकच पाणी भरुन ओसंडून वाहणेच नाही.. धरणाचे पाणी जिथून बाहेर पडते तिथूनच आम्ही उतरुन पुढे गेलो.. ही जागा खूपच मस्त वाटली.. क्षणभर इथेच ट्रेक संपवूया असा खोडकर विचारही आला..

– –

उजवीकडची पाउलवाट पकडली नि धरणाच्या काठाकाठाने मार्गाक्रमण सुरु ठेवले.. भेटलेल्या एका गुराखीला विचारले तर किल्ल्याचा माथा गाठण्यास अजुन दिडेकतास तरी लागणार होता.. ! पण त्रिंगलवाडीचे स्थान आता लक्षात आल्याने चुकण्याचा संभव नव्हता तेव्हा लवकारात लवकर अंतर कापण्याचे ठरवले.. वातावरणही ढगाळ असल्याने उन्हाच्या तडाख्याचा प्रश्नच नव्हता. तिथे डावीकडचा म्हळुंग्याचा डोंगर आपल्या दणकट शरीरयष्टीने लक्ष वेधून घेत होता.. शेवटी एकदाचे धरणाचा जलाशय मागे पडला तसे म्हळुंग्याला पाठ करत गर्द हिरव्या झाडीत जाणारी वाट पकडली.. तत्पुर्वी हातात बेचकी मिरवता जाणारी शाळकरी पोरांची भेट झाली..

सभोवतालची हिरवाई तशीच असली तरी पाउलवाटेचे स्वरुप पदोपदी बदलत होते.. नि पुन्हा एकदा उत्तम क्षणभर विश्रांतीसाठी अगदी योग्य जागा सामोरी आली.. अगदी हिरवागार गालिचा पांघरलेला नि त्यावर एकच लाल मातीची रेघ उमटवलेली.. जन्मतः शीतल वाटणार्‍या हिरवळीवर थकल्याभागल्या जीवांना मस्तपैंकी लोळून डुलकी काढण्याची हुक्की येणारच.. पण आम्ही या मोहात फसलो नाही..

त्या मोहजलातून बाहेर पडलो नि त्रिंगलवाडी अगदीच समोर आला.. पण वाट मात्र उजवीकडे जात होती.. वेळही आता भराभर निसटून जात होता.. तेव्हा पुन्हा एकदा मुळ वाटेला बगल देत बिनदिक्तपणे बंधार्‍यावरुन चालायला घेतले.. पण त्रिंगलवाडीने त्याच्यापर्यंत पोहोचण्यातच इतके नैसर्गिक अडथळे निर्माण करुन ठेवलेले की थांबणे मस्टच होते.. मग ती अगदी यशचोप्रांच्या सिनेमांमध्ये दिसणार्‍या पिवळ्या फुलांसारखी बाग असो वा गर्द जांभळ्या रानफुलांची वस्ती असो..

– –

– –

अखेरीस आम्ही त्रिंगलवाडीला चरणस्पर्श झालो.. इथेच एक भलीमोठी गुहा आढळते.. दहाव्या शतकात कोरलेली जैन लेणी म्हणे.. इतकी प्राचिन लेणी पहाणे खरच भाग्यवान समजावे.. बरीच पडझड झालेली आहे पण जे काही अवशेष शिल्लक आहेत ते पाहूनच त्याकाळची सुंदरता, कल्पकता सहज लक्षात येते.. मग ते प्रवेशद्वार असो वा प्रवेशद्वाराच्या बाहेरील ओसरीचा परिसर.. सारे काही शिल्पकामाने बांधलेले.. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस झरोक्यासाठी बांधलेल्या खिडक्या.. सारे काही अप्रतिम.. हे न्याहाळतच आत शिरलो तर गुहेतील ऐसपैस अशा सभामंडपात झिरपणार्‍या पाण्याचाच काय तो खळखळाट निनादत होता.. चार खांबांपैंकी सध्या एकच खांब शिल्लक आहे.. अनपढ लोकांचे गिरवणे सोडले तर खांबावरील नक्षीकामही उल्लेखनीय.. नि समोरच अजुन एक गुहा (गाभारा) तिथे जैन धर्माचे प्रथम तीर्थकर भगवान आदिनाथजी (ऋषभदेव) यांची भग्नावस्थेतील मुर्ती आहे.. त्रिंगलवाडीच्या कुशीत असलेली ही लेणी म्हणजे खरच एक खजिना आहे..

– –

– –
प्रवेशद्वाराची एक सुंदर बाजू

– –

– –
प्रवेशद्वारावरील सुंदर नक्षीकाम

– –
गुहेच्या आतील परिसर

इथेच आम्ही आमचे पार्सल उघडून खादाडी कार्यक्रम उरकला नि गुहेच्या डाव्या बाजूने वरती जाणारी वाट पकडली.. फारसा चढ नाही.. जेमतेम पंधरा वीस मिनीटांचा चढ असावा.. पण आमची तंगडतोड अगदी इगतपुरीपासून सुरु असल्याने दमछाक होणे भाग होते.. वाटेत एक छोटी माची लागते जिथे एक घर व शेती आहे.. पुढे ही वाट त्रिंगलवाडीच्या सोंडेवर आणून सोडते.. इथे पोहोचलो नि सभोवतालच्या परिसराने वेड लावले.. चोहोबाजुंचा निसर्ग हिरव्या रंगात माखला होता.. वार्‍याला उधाण आले होते.. कडयावरची सोनकी तेरडयाचे ताटवे अगदी प्रसन्न मनाने डोलत होते.. आम्ही सगळे शांतपणे बघत पुढे जात होतो.. तरीसुद्धा अधुनमधून घडयाळ्याकडे लक्ष जात होतेच.. तीन वाजत आले होते नि आम्ही अजुन माथा गाठला नव्हता..

– –

—

– –

समोरच त्रिंगलवाडीच्या शेंडयाची कातळभिंत उभी राहिली.. जाण्यासाठी दोन्ही बाजूने वाट होत्या त्यापैंकी आम्ही मागची सरळ वाट पकडली.. काही अंतरावरच कातळात कोरलेल्या पायर्‍या नजरेस पडल्या.. म्हटले गुप्त दरवाज्याकडे नेणार्‍या पायर्‍या असाव्यात.. पुढे जाउन अजुन काही वाट दिसतेय का म्हणून खात्री केली नि त्या पायर्‍यांकडेच वळालो.. सहजासहजी नजरेस न पडणार्‍या या पायर्‍या सध्याच्या पावसाने चांगल्याच ओल्याचिंब नि शेवाळाच्छादीत झालेल्या.. पायर्‍या चढून गेल्यावर समोरच कातळात कोरलेली हनुमानाची मोठी मुर्ती आशिर्वाद देण्यासाठी उभी दिसली नि बाजूलाच गुप्त दरवाजा.. हे पाहताच ट्रेक सार्थक झाल्याचे समाधान मिळाले..

– –

आतापर्यंत आम्ही फक्त दोघेच या परिसरात होतो तोच कुठूनतरी खालच्या गावातला एक कॉलेजकुमार समोर आला.. गुरांना घेउन आला होता.. एकटेपणा कंटाळलेला तेव्हा आमच्याबरोबर स्वतःहून फिरण्यास आला… आमच्यासाठी बरेच झाले कारण आधीच वेळ कमी होता.. शिवाय माथ्यावर भरमसाठ रान वाढलेले.. त्याचे अजुन दोन सवंगडीदेखील आमच्यामध्ये येउन सामिल झाले.. त्याच्याच मागून रानातून वाट काढत आम्ही वाडयाचे अवशेष, खांबटाके व बारामाही पाण्याचे टाके पाहीले..

– –
गुहेच्या पुढील पाण्याच्या टाकीतील बारामाही असणारे पाणी चवीला उत्तम

– –

आकाशात ढगांची गर्दी झाली असल्याने दुरवरचा प्रदेश काही पहायला मिळणार नव्हता पण माथ्यावरची भटकंतीदेखील समाधान देण्यास पुरेशी होती.. नि त्यामध्ये सर्वोच्च क्षण म्हणजे माथ्यावरील मंदीराचा परिसर… अख्खा दिवस त्या जागेवर बसून काढण्याइतपत सुंदर जागा… ! गाभार्‍यात शेंदुर लावलेल्या गणपतीची, देवीच्या मुर्ती आहेत.. तर बाहेर शिवलिंग आहे.. इथेच मग त्या सवंगडयांसोबत गप्पाटप्पा करत क्षणभर विश्रांती घेतली.. तो कॉलेजकुमार म्हणे रोज पहाटे साडेचार उठून इगतपुरीच्या कॉलेजमध्ये चालत जातो !! आम्ही तर आजच्या दिवसभरच्या तंगडतोडीपुढे हतबल झालेलो..

– –

त्या सवंगडयांचा निरोप घेउन आम्ही आता पुढच्या बाजूस असणार्‍या पायर्‍यांनी खालीउतरण्यास सुरवात केली.. चारच्या आत खाली म्हणत सुसाट निघालो..

पण मघाशी वरती येतानाच सोंडेवरच्या एका खडकाने ‘पुन्हा भेटा’ म्हटले होते.. सो इथे उडयांचे प्रकार झाले.. तंगडतोडीने अगदी मेटकुटीस आलेला रो.मा देखील उडया मारण्यासाठी मात्र अगदी ताजातवाना झाला.. या एकमेकांच्या फोटोशूटमध्ये पंधरा मिनीटे आमची अशीच गेली.. जल्ला त्यावेळेत खाली पोहोचलो पण असतो… नॉssनसेन्स !

खाली उतरुन आता आलो त्याच वाटेने जायचे नव्हते.. म्हणजेच त्रिंगलवाडी गावातून येताना धरणाच्या डाव्या बाजूने आलो होतो तर आता उजव्या बाजूने जायचे ठरले होते.. एवढी तंगडतोड थकलेल्या रो.मा ला तरी सोसवणारी नव्हती.. तेव्हा आम्ही जिथपर्यंत रस्ता येतो त्या गावाकडे मोर्चा वळवला.. शिवाय त्या सवंगडयांनी गावातून इगतपुरी/घोटी कडे जाण्यास पिकअप गाडी मिळेल असे अगदी छातीठोकपणे सांगितले होते.. त्यावर मी त्याला ‘जर असे घडले तर तू यंदा बारावीला बोर्डात नक्कीच पहिला येशील’ अशी गोड शुभेच्छाही दिलेली.. पण कसले काय.. गावात पोहोचलो तर सांगितले गेले त्रिंगलवाडीतूनच गाडी मिळेल.. रो.मा अजूनही आशावादी होता तर एकीकडे आता पायदळीच इगतपुरी गाठावे लागणार हे मी समजुन गेलेलो.. धरणाला पुरता वळसा घालत वाटेतल्या तीन- चार छोटया गावांचे थांबे घेत गेलेल्या लांबलचक अश्या रस्त्याने नुसते चालणे म्हणजे खूपच कंटाळात्मक नि वेदनादायी होते.. संपुर्ण वाटचालीसाठी दिडेकतासाची तंगडतोड करावी लागली.. या रस्त्याने यायचे तर गाडी हवीच.. अन्यथा सरळ धरणाच्या त्या डावीकडील पाउलवाटच पकडावी !!

हाशहूश करत एकदाचे त्रिंगलवाडीत पोहोचलो.. मला तरी त्रिंगलवाडी हे पायथ्याचे गाव वाटलेच नाही.. जल्ला इथून किल्ला दिडेक तासावर पडतो.. शिवाय या रस्त्याने गेलो तर तीन चार गावंही लागतात.. एव्हाना पाच वाजत आले होते.. आता त्रिंगलवाडीहून इगतपुरी गाठायचे तर अजुन दिड-दोन तासांची अजुन तंगडतोड शिल्लक होती !! तरीसुद्धा आम्ही अंधुक आशा ठेवून इथे-तिथे चौकशी केली.. पण दुपारी दोन-तीन नंतर घोटीकडे जाणारी गाडी मिळणे म्हणजे चमत्कारच.. रो.मा तर अगदी कुणाच्या घरासमोर दोन-तीन बाईक लावलेल्या पाहून विचारायला निघाला.. पण घरात बायकाच दिसत होत्या तेव्हा बाईकचा विचार सोडून दिला.. फिदीफिदी शेवटी पुन्हा त्याच वाटेने, त्याच बंधार्‍यावरुन जाण्यास सुरवात केलेली… त्रिंगलवाडीकडे येताना अगदी जोशमध्ये होतो पण आता सारे अवसान गळत चालले होते.. रो.मा ने पुरती शरणागती पत्करलेली तेव्हा त्याला तर अगदी चालत-ढकलत नेत होतो.. संध्याकाळी साडेसहाच्या ट्रेनचे लक्ष्य ठेवले होते.. तेव्हा जल्ला भाग रो.मा भाग म्हणत रो.मा ला चालते केले.. एसटी महामंडळाने या गावापर्यंत एसटीची सोय का नाही केली म्हणून मनोमनी लाखोल्यादेखील अर्पण केल्या..
अखेरीस इगतपुरी स्टेशन एकदाचे आले.. बहुतेक जण स्वेटर घालून हिंडताना दिसत होते.. आम्ही मात्र घामाघूम झालेलो.. शेवटी संध्याकाळी सातची ट्रेन पकडून मुंबईकडे रवाना झालो..
म्हटले त्रिंगलवाडी.. एक सोप्पा ट्रेक म्हणून ख्याती.. पण आपल्यासाठी कुठलाच ट्रेक सोप्पा नसतो.. खासकरुन तुमचे स्वतःचे वाहन नसेल वा एसटीची सोय नसेल अशा परिसरात ट्रेक करणे म्हणजे अवघडच.. पिक-अप ची वडापदेखील जर नाही मिळाली तर अधिकच समस्या.. त्यात पहाटे निघून एकादिवसात आटपून परतायचे म्हणजे आपल्याच तंगडीची पिसे काढत ट्रेक करणे.. टोटल लावली तर दिवसभरात सात-आठ तासांची तंगडतोड झालेली.. पण संपुर्ण वाटचाल नेत्रसुखद निसर्गामुळे प्रसन्न वाटली.. त्रिंगलवाडी किल्ल्याचा परिसर खरे तर ह्याच मोसमात पहाण्यासारखा.. अगदी निसर्गकोंदण..नि ट्रेकींग कम नॅचरल ट्रेलची असली मजा चाखायची असेल तर इगतपुरी गाठा नि सुरवात करा तंगडतोडीला..

जायचं ठरलं होतं पण कुठे ते ठरलं नव्हतं. गेल्यावेळी राहून गेलेला एक ऑपशन होता पण मजा नव्हती त्याच्यात! मग काय; परीक्षेच्या आदल्या दिवशी करतात तसा रट्टा मारला आणि अगदी, रविवारी सकाळी ५ वाजता, बाईकवर बसता बसता त्रिंगलवाडीचा पेपर फुटला.


त्रिंगलवाडी किंवा त्रिंगलगड; इगतपुरी पासून ९ किमी पुढे टाके गावातुन एक रस्ता त्रिंगलवाडीकडे जातो. आम्ही तो तुडवू लागलो. रस्त्याची अवस्था, कधीकाळी तो इथे असावा अशीच होती. पुढे पत्र्याची वाडी इथे एका अंगणात गाडी लावून आम्ही वाटेसाठी विचारपूस केली. वाडीच्या चारी बाजूचे डोंगर धुक्यात लपलेले होते त्यामुळे आमचा डोंगर कोणता ह्या प्रश्नाच उत्तर घेतलं आम्ही गावकऱ्यांकडून. शेवटच्या दिवशी घाईघाईत केलेल्या अभ्यासामुळे, सुरवातीलाच आमचा अर्धा मार्क गेला; पत्र्याच्या वाडीच्या पुढे तळ्याच्या वाडीतून वाट किल्ल्यावर जाते आणि या वाडीपर्यंत बाईक जात होती. असो, काही भाताच्या मळ्या पार करून आम्ही तळ्याच्या वाडीपर्यंत पोहोचलो. इथे एका लहानश्या दुकानात माहिती काढली आणि लागलो वाटेला. पुन्हा काही भाताच्या मळ्या आणि लहानसहान ओढे पार करून आम्ही एका तळ्यापाशी आलो. या तळ्याच्या डाव्या बाजूने वाट पुढे घेऊन गेली. वाटेत एक सुंदर वीरगळ एका शेताच्या बांधावर ठेवली होती ती पाहून पुढे थोड्याच वेळात आम्ही जैन लेण्यांच्या समोर येऊन उभे ठाकलो.

महाराष्ट्रात जैनानी आठव्या शतकात लेणी बांधायला सुरवात केली पैकी ही लेणी १३ व्या शतकात १२६६ च्या असपास बांधली गेली असावीत. आवारात अनेक भग्नावशेष दिसून आले. महाराष्ट्रात बौद्धांप्रमाणे जैनांनीही आपल्या धर्माच्या प्रसारासाठी अनेक जैन साधू सगळीकडे पाठविले त्यांनी तीर्थंकर व जैन देवतांची अशी अनेक शिल्पे बनवली. मात्र त्रिंगलवाडीतील ग्रामस्थ या लेण्यांना पांडव लेणी म्हणतात आणि पांडवांनी ती आपल्या बोटांच्या नखांनी ही खोदलीअसल्याचे ते सांगतात. त्रिंगलवाडी गडाच्या पायथ्याशी ही लेणी आयताकार गुहेत कोरलेली आहेत. व्हरांडा, सभामंडप आणि गाभारा अशी एका मंदिराप्रमाणे रचना आहे. व्हरांड्यातील खांब पूर्णपणे उध्वस्त झालेले आहेत. सभामंडप चार दगडी खांबांवर उभे होते पैकी फक्त एकच आता शाबूत आहे. पूर्ण सभामंडप आणि खांब नक्षीकाम केलेले आहेत. गाभाऱ्यात जैन धर्मीयांचे प्रथम तीर्थंकर भगवान आदिदेव ऊर्फ वृषभनाथांची पद्मासनात बसलेली मूर्ती असून, मूर्तीच्या आसनावर दानाचा शिलालेख कोरलेला आहे. मात्र तो आता झिजला आहे. हा शिलालेख प्राकृत संस्कृत असून, नागरी लिपीत आहे. सुरवातीला बाहेर पाहिलेले भग्न अवशेषांमध्ये गाभ्यार्यातील मूर्तीचा अर्धा भाग असावा असा आमचा अंदाज आहे. असो, तो आपला प्रांत नव्हे!



गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे लेण्यांच्या डाव्या बाजूने एक वाट गडावर घेऊन जात होती. त्याप्रमाणे आम्ही डावीकडे चालू लागलो, पाऊस आणि धुकं यामुळे अजूनही आम्हाला गडाचं मुखदर्शन झालं नव्हतं. थोडी उभी चढण तोडून आम्ही एका पठारावर आलो, येथे एका पल्यापासून आम्ही पुन्हा डावी वाट धरली, गावकऱ्याने सांगितल्याप्रमाणे. पुढे डोंगराच्या धारेवर दोन लहान दगड एका विशिष्ट उभ्या दगडांपाशी आलो. इथून समोर किल्ल्याच्या उभा कातळकडा दिसत होता. या कड्याची उजवी वाट सोपी आहे तर डावीकडची वाट थोडी कठीण असून सुंदर आहे. आम्ही डावी वाट घेतली. ही वाट कातळाला चिटकून चालत कोरलेल्या पायऱ्यां पर्यंत घेऊन गेली. या पायऱ्यां अगोदर एक लहानसा  कातळटप्पा लागला. दोन-तीन स्टेप्स मध्ये तो पार केला आणि कातळात खोदलेल्या उंच पायऱ्या चढू लागलो. जोराचा पाऊस आणि सोसाट्याचा वारा त्या दगडाच्या खिंडीत एक घुमून कानांना सुखावत होता. पावसाळ्यात हाच अनुभव वर्षभर पुरतो आमच्यासारख्या भटक्यांना. या पायऱ्या शेवटच्या टप्प्यात फिरून एका ५ फुटी मारुतीच्या मूर्तीच्या समोर संपल्या. या मूर्तीच्या उजव्या बाजूला कातळात खोदलेलं किल्ल्याच सुंदर प्रवेशद्वार आहे. दोन शरभ शिल्प आणि चंद्र-सूर्य या दरवाज्यावर कोरलेले आहेत. या प्रवेशद्वारातून आता जात आम्ही उजवीकडून गडफेरी सूरु केली. काही अंतरावर दगडात खांब रोवण्यासाठी केलेले खोबणी दिसल्या या पुढे वाड्याचे अवशेष होते. इथून जवळच असलेली किल्ल्याच्या माथ्यावर असणारी वाट आम्ही धरली. तिथे काहीच अवशेष नव्हते आणि पाऊस आणि धुख्यामुळे सभोवतालचा परिसरही पाहता आला नाही. ही वाट तुडवून आम्ही किल्ल्याच्या माथा उतरून आलो इथे उजव्या बाजूला शंकराच  लहान  मंदीर आहे. ते पाहून आम्ही पुन्हा प्रवेशद्वारासाठीची डावीकडची वाट धरली. वाटेत दोन पाण्याची टाकी लागली आणि पुढे उजवीकडची सोपी वाट दिसत होती. आमच्या वाचन्याप्रमाणे किल्ल्यावर २०-२५ माणसे राहू शकतील अशी गुफा आहे पण ती काय आम्हाला सापडत नव्हती. पुन्हा एक फेरी मारली पण नाहीच सापडली म्हणून मग नाईलाजाने उजव्या वाटेने उतरायला सुरुवात केली. या वाटेवर देखील काही कातळात खोदलेल्या पायऱ्या लागल्या सुरवातीला. पुढे जाऊन मागे वळता एक पुसटशी वाट डावीकडे जात आहे असं वाटलं म्हणून मग गुफेसाठीचा शेवटचा प्रयत्न करायचं ठरवलं. सचिन पुढे गेला आणि मला आवाज दिला त्याने. खरंच ही गुफा अश्या ठिकाणी आहे की ती शत्रुलाही शोधता येऊ शकत नव्हती. पायऱ्या जिथे संपतात तिथे डाव्या बाजूला ५ मिनिटांवर कातळात एक २.५x२.५ फुटाचा एक चौकोन खोदलेला आहे. तो जवळ जवळ २५ फूट आत जाऊन गुफेत उघडत होता. नेहमीप्रमाणे खबरदारी म्हणून आम्ही जोरात आवाज काढून, दगड मारून आत कोणी प्राणी तर नाही ना ही खात्री केली आणि मग गुढघ्यावर रांगत आत गेलो. आत खरंच २०-१ माणसं राहू शकतील अशी मोठी गुफा होती. ती पाहून आमची गडफेरी संपवली आणि गावात उतरून आलो. 







या रांगड्या सह्याद्रीत अनेक आडवाटेवरचे दुर्लक्षित किल्ले आहेत पैकी एक त्रिंगलवाडी आज आम्ही पहिला होता. आता हा किल्ला इथे का? चौल, कल्याण या बंदरात उतरणारा माल थळ मार्गे नाशिक बाजारपेठेत येत असे या मार्गाच्या रक्षणासाठी हा किल्ला बांधला गेला होता.  हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात केव्हा आला ते कळत नाही. पण १६८८ च्या शेवटी मोघलांनी फितुरीने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला. १८१८ साली पेशवाई बुडाल्यावर मराठ्यांनी पुन्हा प्रतिकार करू नये म्हणून इंग्रजांनी तोफा डागून व सुरूंग लावून हा किल्ला उद्धवस्त केला. हा किल्ला कोणी बांधला व त्रिंगलगडाच्या पराक्रमाच्या नोंदी मिळत नसल्या तरी हा किल्ला टेहळणी चौकची काम करीत असल्याचे दिसते.

त्रिंगलवाडी (लेणी व दुर्ग)
त्रिंगलवाडीला जायला मुंबई – आग्रा महामार्गावर घोटी आणि इगतपुरीच्या दरम्यान टोलनाक्यावर जातानाचे ९० अन् येतानाचे ९० असा टोल ‘उग्गाच’ भरावा लागला. उग्गाच अश्यासाठी कारण, टोल भरल्यावर अवघ्या १ कि.मी.वर त्रिंगलवाडीकरता ‘टाके’ गावापाशी उजवीकडे वळलो. मग अर्थातंच ‘आपण भरलेल्या टोलच्या पैश्याचे लाभार्थी कोण’, यावर रवंथ करणं आलंच..

डावीकडे म्हाळुंगे डोंगराचे करकरीत कडे मागे टाकत त्रिंगलवाडी गावात आलो. त्रिंगलवाडी धरणाच्या पल्याड असलेल्या त्रिंगलवाडी किल्ल्याला चालत जाण्यापेक्षा पेठेच्या वाडीपर्यंत खराब रस्त्यावरून गाडी नेऊन पाऊणेक तास वाचवला. इतक्या उन्हांतही गडाचं पहिलं दर्शन सुखावह होतं.
24_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

वाटाड्या मागितला नसतानाही गावातली पोरं (पांडुरंग अन् त्याचा दोस्त) आमच्याबरोबर गडावर निघाली.
25_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

पायथ्याच्या जैन लेण्या पाहून थक्क व्ह्यायला होतं.
26_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

लेण्यांवरचा डोंगर चढून गडाच्या कातळमाथ्याजवळ गेलो. पाठीमागे इगतपुरी अन् कोकणाचं उत्तम दर्शन झालं.
27_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

कातळकड्यापासून डावीकडे आडवं गेलो.
28_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

नैसर्गिक घळ अन् तासलेले कातळ यांतून ७०-८० उंचंच उंच पाय-यांची सुरेख वाट चढू लागलो.
29_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg30_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

विशाल मारुतीरायाची मूर्ती अन् कातळकोरीव प्रवेशद्वारावरील शरभ शिल्पानं लक्ष वेधून घेतलं.
31_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg32_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

गडाच्या माथ्यावरून भास्करगड, उतवड, हर्षगड, त्र्यम्बक, अंजनेरी, डांग्या, गडगडा, कावनई, मोरधन आणि कळसूबाई रांग लक्षवेधी होती. दुर्गेच्या राऊळापाशी उतरलो.
33_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg34_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

गुहा-टाक्याचं थंड पाणी..

उतरताना दुस-यां बाजूची पाय-यांची वाट घेतली, अन् त्रिंगलवाडी दर्शन संपवलं.
36_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

परत निघाल्यावर आता ऊन्हातलं पोळणं - आलेला घाम - लागलेला दम – घश्याला पडलेली कोरड, असंलं काहीच आठवत नव्हतं... वाटलं, वैशाख-वणव्यात वणवण करून एका दिवसात ३ किल्ले बघून आपण काय साध्य केलं.. फक्त ‘ईगो’ सुखावा या हट्टानं केलं, की खरंच काही आनंद मिळाला या प्रवासात. अन् मग डोळ्यासमोर तरळू लागली गेल्या १० तासांमधली काही देखणी दृश्यं.

ढगांआडून झालेला देखणा सूर्योदय..
38_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

ऐन मे महिन्यात कोरड्या ठणठणीत करपलेल्या जमिनीत उमललेली फुलं पाहून, ‘जगण्याची – उमलायची उत्कट प्रेरणा कुठून आली असावी’ या विचारानं चकित झालो.
07_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

दारणा नदीच्या पार्श्वभूमीवर मोरधन अन् windshield वर ढगांची मोहक नक्षी दिसत होती.
11_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

कावनईचा जोडीदार दास्कोनच्या दांडावर गुरांच्या वाटांचं mosaic design मोठ्ठं विलक्षण दिसत होतं..
14_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

ट्रेकची धुंदी तनामनावर चढली असताना, परतीचा प्रवास सुरू केला.. कारमध्ये गाणंही असलं apt लागलं – अग्गदी मनातलं गुज सांगणारं:: 

 

इगतपुरी रेल्वे स्थानक ते त्रिंगलवाडी पर्यंतचा प्रवासाचं वर्णन:
सकाळी ८. ५० ला इगतपुरीला पोहचलो. बाहेर जाऊन त्रिगलवाडी साठी शेअर जीप कुठे भेटतात म्हणून विचारला असता कळल. शेअर जीप आता बंद झाल्या आहेत. त्यासाठी रिक्षा करून जायायला लागेल. मग मी एसटी आगार मध्ये गेलो. तर तिथे कळलं त्रिंगलवाडीला जायायला एकही एसटी नाही.

आता पुन्हा पाठी फिरून चहा घेऊन दुसऱ्या कुठचा ट्रेक करता येईल का विचार करायचा ठरवलं. पुन्हा पाठी रिक्षा स्टॅन्डला आलो. एका रिक्षावाल्याला पुन्हा विचारला. त्याने मला त्रिगलवाडीला रस्ता जातो  तिथे जीप आहेत का बघायला सांगितले. आता मला हि माहिती होत, जीप नाहीत आणि त्याला हि. तरी हि मी बघायला गेलो.  

त्या रस्त्यात एका बाईक वाल्याला विचारला असता, तो हि मला तेच बोलला "जीप बंद" झाल्या.  तो बोलला, मी सोडतो तुम्हाला मी हि तिथेच चाललो आहे.  त्याचा नाव अर्जुन शेलार, खरतर त्याचा लिफ्ट देण्यामुळेच मी पुढे ट्रेक करू शकलो. त्याबद्दल मी त्याचा आभारी राहील. तरी हि माझ्या मनात प्रश्न पडला. परत येताना काही वाहन नाही भेटल तर?.  मग विचार केला येईल ५ किमी चालत.

नंतर मला अर्जुन आणि इतर गावातल्याकडून कळलं, इगतपुरी वरून गावात येण्या-जाण्यासाठी गाड्या
नसल्यामुळे. गावातील बहुतेक लोक बाईक वापरतात, त्यामुळे रस्त्यात कोणाकडे हि लिफ्ट मागितली कि देतात. त्यामुळे जातेवेळी हि, मी तसाच लिफ्ट मागत गेलो.

इगतपुरी वरून त्रिंगलवाडीला कसा रस्ता जातो त्याचे वर्णन:
इगतपुरी ते त्रिंगलवाडी अंतर ५ किमी आहे. इगतपुरी रेल्वे स्थानकाचा बाहेर आल्यावर इगतपुरी एसटी स्थानकासाठी रस्ता जातो. त्या रस्त्याने पुढे गेलो असता एक चौक लागते तेथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि बुद्ध विहार आहे. तिथून डावीकडे एक रस्ता वर जातो.  हा रस्ता त्रिंगलवाडीला जातो. रस्त्याने चालत गेलो तर अंदाजे १ ते १. ३० तास लागेल, पण रस्त्यामध्ये कुठे वस्ती लागत नाही. आणि एक छोटा घाट लागतो. 

बाइकवरून  १० मिनटात त्रिंगलवाडी गावात पोहचलो. तिथून त्यांनी मला धरणावरून चालत जायायला सांगितले. मी हि मग तिकडूनच गेलो. 

त्रिगलवाडी गाव ते त्रिगलवाडी किल्ल्या पर्यंतचा वाटेचे वर्णन:
दहा वाजता मी त्रिगलवाडी गावातून ट्रेक सुरु केला. गावामागे धरणावर एक वाट जाते. विचारात विचारात पाच  मिनटात मी धरणाजवळ पोहचलो. धरणाचा भिंतीवर आलल्यावर समोर धरणाच्या पलिकडे त्रिंगलवाडी किल्ला दिसतो. त्यासाठी आपल्याला धरणाच्या डाव्याबाजूने वाटेने जायायला लागते. त्यामुळे सतत डाव्याबाजूला डोंगर तर उजव्याबाजूला धरण लागतो.

समोर त्रिंगलवाडीचा वाटेने चालत असताना ध्यानात ठेवणे, डाव्या बाजूला लागणाऱ्या डोंगरावरती न चढता. त्याचा पायथ्याचा कडेने चालत राहणे. कारण काही ठिकाणी धरणाजवळची जमीन तारेचा कुंपण केला आहे. त्यामुळे वाट सुरवातीला धरणाच्या काठाने जाते. नंतर थोडी वरुनच जाते. गडाचा जवळ पोहचल्यावर मला लेण्याची वाडी लागली. वाडीतून १० मिनटात मी त्रिंगलवाडी गडाच्या पायथ्याचा लेणीजवळ पोहचलो

त्रिंगलवाडीतून लेणीपर्यंत पोहचेपर्यंत मला १ तास लागला. पण परत जाते वेळी ४० मिनटात गावात पोहचलो.  ११ वाजता मी लेणीजवळ पोहचलो.

पायथ्याचा लेणीचे थोडक्यात वर्णन:
गडाच्या पायथ्याशी ह्या जैन लेणी आहे. लेणीच्या आत चार दगडी खांबाचा मोठा गाभारा आहे. पण त्यातील एकच खांब अखंड आहे. गाभाऱ्याचा पुढे गुहेच्या खोलीत भगवान महावीरची मूर्ती भग्न अवस्थेत आहे.

लेणी पासून त्रिगलवाडी किल्ल्यावर जाणाऱ्या वाटेचे वर्णन: 
लेणीच्या डाव्याबाजूने गडावर वाट जाते. ह्या वाटेने मी १० मिनटात त्रिंगलगड डोंगराच्या सोंडेवर पोहचलो.
सोंडेवरून सरळ चढत गेल्यावर आपल्याला गडाच्या शिखराचा मुख्य कातळ लागतो. ह्या कातळाच्या दोन बाजूने, उजवीकडून आणि डावीकडून गडावर वाट जाते. 

मी सगळ्या ट्रेककर्स प्रमाणे डाव्या वाटेने गेलो. डाव्यावाटेने गेलो असता, आपल्याला कातळाच्या पायऱ्या आणि गडाचा दरवाजा लागतो. पायऱ्या चडून आल्यावर, समोर मारुतीची ७/८ फुटाची कातळावर कोरलेली मूर्ती दिसते आणि बाजूलाच उजवीकडे दरवाजा आहे.दरवाजाने  वर गेल्यावर आपण गडावर पोहचतो. 

बाराला दहा मिनटं असताना, म्हणजेच साधारण अर्ध्यातासात मी लेणी पासून दरवाज्याने गडावर पोहचलो.

त्रिगलवाडी किल्ल्यावरील पाहिलेल्या वास्तू:
दरवाज्याने वर आल्यावर एक वाट समोर जाताना दिसते. ह्या  वाटेने चालत गेलो असता आपण वाड्याचा अवशेषजवळ पोहचतो. 

वाड्याचे अवशेष 
ह्या पहिल्या वाड्याचा खाली थोड्या अंतरावर अजून एक वाड्याचे अवशेष दिसतात.  ह्या वाड्याचा बाजूने उजवीकडील वाट गडावर येते. ह्या वाटेचे वर्णन मी उतरतेवेळी शेवटी केले आहे. गवतामुळे मला वाडा नीट पाहता आला नाही. ह्या वाड्यांच्या व्यतिरिक्त तिथे आजूबाजूला ३ / ४  नुसते दगड रचून चौकोनी चौथरे केलेले दिसतात. पण त्यांना बघून प्राचीन अवशेष वाटत नाही.

पहिल्या  वाड्याचा येथे आल्यावर आपल्याला गडाच्या सर्वोच माथ्यावर जाताना एक वाट दिसते. ह्या वाटेने शिखर माथ्यावर पोहचता येते. पण ह्या वाटेने मी उतरलो आणि डावीकडील वाटेने पुढे गेलो. 

खांब टाकी किंवा गुहा आणि पाण्याचा तीन टाकी:
डावीकडील वाटेने पहिली मला गडावरील खांब टाकी किंवा गुहा लागली. टाकीचा बाजूला खाली एक आयताकृती टाकी लागते.  इथून वाटेने पुढे गेलो असता. मंदिर जवळ पोहचेपर्यंत, अजून दोन टाकी दिसतात. त्यातील एक जरा वाटेवरून उतरून बाजूला लागते. दोन हि टाकी बघून मी पुढे गडावरील मंदिराजवळ पोहचलो

गडावरील मंदिर:
मंदिरात दोन देवीच्या मूर्ती मध्ये गणपतीची लहान मूर्ती दिसते. मंदिराचा समोरील जागेत शंकराची पिंड आहे.  ह्या जागेच्या खाली बहुतेक समाधी सारखे दोन पाषाण दिसतात. 

शिखर माथ्यावर पोहचल्यावरचे वर्णन:
शिखर माथ्यावर जाण्यासाठी मंदिराचा पाठून माथ्यावर जाणारी वाट दिसते.त्या वाटेने मी ५ मिनटात शिखर माथ्यावर पोहचलो.  सगळे अवशेष बघून मी १२.३० ला शिखर माथ्यावर पोहचलो.

मंदिराच्या बाजूने वर आल्यावर, इथून समोर त्रंबक डोंगररांग स्पष्ट दिसत होती. इथून पुढे मी झेंड्याजवळ गेलो. तिथून त्रिंगलवाडी धरण आणि त्याचा पुढचा परिसर दिसत होता. तर त्याचा अजून डाव्या बाजूला डोंगराचा पाठी लांब कावनई  गड दिसत होता. उजवीकडे दूरवर डोंगररांग न दिसता. पठार आणि जंगल दिसत होता. डावीकडेच पाठी मध्य वैतरणा धरणाचं पाठीमागचा जलाशय दिसत होता.

पूर्ण गड पाहून झाला होता, मग माथ्यावरच जेवण करून सव्वा एकला गड उतरायला सुरवात केली. उतरतेवेळी  उजव्या वाटेने गड उतरायला सुरवात केली.  

उजव्या वाटेचे उतरतेवेळी वर्णन:
वर सांगितल्याप्रमाणे दुसऱ्यावाड्याचा बाजूने उजवीवाट वर येते. तिथूनच उतरायला सुरवात केली. 
वाड्याचा खाली आल्यावर आपल्याला कातळात कोरलेल्या तुटलेल्या पायऱ्या लागतात . पायऱ्यांचा वर आपल्याला भिंती सारखे अवशेष दिसतात. बहुतेक छोटा दरवाजा असल्यासारखे अवशेष वाटतात.  पायऱ्या  उतरतेवेळी उजव्याबाजूला एक छोटी गुहा लागते.  गुहेच्या पुढे पायऱ्या संपतात आणि वाट उजवीकडे वळते. आणि आपल्याला जेथे दोन वाटा लागतात तिथे घेऊन जाते.

२. ४० ला मी त्रिंगलवाडी गावात पोहोचलो. 

हि खालील माहिती, माझ्या आठवणी साठी मी लिहिली आहे
त्रिंगलवाडी गाव ते इगतपुरी पर्यंतचा परतीचा प्रवास कसा केला:
गावातून इगतपुरीला जातेवेळी गाडी नव्हती म्हणून चालायला सुरवात केली. गावातले बोलले वाटेत काही ना काही भेटेल. पाच मिनटं चाललो आणि तितक्यात एक डम्पर आला, त्याने मला पारदेवी फाट्याला सोडला आणि तो दुसऱ्या गावात गेला.  मग इगतपुरीच्या दिशने पुढे थोडा चाललो असता. एका बाईकवाला घाटा मध्ये चालला होता, त्यांनी मला तिथपर्यंत सोडला. पुढे मी घाट उतरू लागलो पुन्हा ५ते १० मिनटात दुसरा बाईक वाला आला. त्याने मला इगतपुरी रेल्वे स्थानकापर्यंत सोडला. अशा प्रकारे मी ३. १५ ला इगतपुरीला पोहचलो. काही गाडी नसती भेटली तरी मी ५ किमी म्हणजे साधारण १ ते दिड तास चालायची तयारी ठेवली होती. पण गावातल्याने सांगितल्याने मला गावातल्या लोकांनी लिफ्ट दिली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.


 त्रिंगलवाडी ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  
https://youtu.be/A3v69AXmZEg


त्रिंगलवाडी म्हणजे इगतपुरीहुन सुमारे आठ किलोमीटरवर असणारं छोटंसं गाव. ट्रेक जरी त्रिंगलवाडी असला तरी त्याचं पायथ्याचे गाव म्हणजे "तळ्याची वाडी". भर पावसात ११.३० च्या सुमारास आम्ही गावात पोहोचलो. गावात पोहोचल्यावर गावचं निसर्ग डोळ्यात भरणारं होतं, पावसाळा असल्याने शेतातली कामे जोरात चालू होती. वाटेत काही गुराखी गुरांना घेऊन बाहेर पडले होते.

कसारा घाट

गावातली हिरवळ
गुराखी
                इकडे यायच्या आगोदर ऐकलं होतं धबधब्याच्या दिशेने जायचं आहे पण इकडे पोहोचल्यावर पाहिलं तर जिथे बघावं तिथे धबधबेच आहेत. त्यात त्रिंगलवाडी कुठे आहे तेच दिसत नव्हतं म्हणून गावातून गाईड घायचं ठरवलं.
कुठे जायचं नक्की???
                   मग मोठ्या माणसाला कोणाला तरी घेण्यापेक्षा गावातली लहान मुलं बरी पडतात म्हणून मग एका लहान मुलाला विचारलं येतो का?? तर तो खुश होऊन हो म्हणाला.  सोबत त्याची बहीण पण आली. पण त्यांच्या कडे ना छत्री होती ना रेनकोट. पण फक्त पैसे मिळणार म्हणून ह्या तुफान पावसात यायला तयार झाले त्या मुलाचं नाव देविदास आणि ताईचं नाव कल्पना. देविदासकडे पाहिलं तर तो बिचारा कुडकुडत होता पण त्याने पूर्ण प्रवासात एकदाही माघार नाही घेतली त्यांच्याकडे बघून एक गोष्ट नक्की लक्षात आलं की "आपल्याकडे आधीपासूनच अच्छे दिन आहेत ह्यांच्यापर्यंत ते पोहचण्याची गरज आहे". त्या दोघांकडे बघून मन भावुक झालं.
कल्पना आणि देविदास
              गडावर जाणाऱ्या वाटेची सुरुवातच ओढ्यातून झाली आमचा पूर्ण ग्रुप तो ओढा ओलांडून शेतातल्या वाटेला लागला. आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य म्हणायचं झाला तर चहूबाजूंनी डोंगर आणि त्यावरून बेफामपणे कोसळणारे धबधबे. सगळं सौंदर्य कॅमेरात टिपून पुढे निघालो.


किल्ल्याकडे जाणारी पायवाट
                  किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जैन लेण्यांवरून लक्षात येते की  किल्ल्याची निर्मिती हि १० व्या शतकात झालेली असावी. पायथ्याशी असलेल्या ह्या लेणीमध्ये जैन धर्मगुरू पाहिले हे आसनस्थ असलेली एक गुहा आहे. आत किर्र काळोख असल्याने आतील वास्तू नजरेस पडत नाही पण गुहेच्या बाहेरील बाजूस असणारे कोरीवकाम आजही आपले लक्ष वेधून घेते. ह्या लेणीच्या बाहेर बरीच मोडकळीस आलेली शिल्पे दिसतात. काही काळ विसाव्यासाठी ही गुहा उत्तम आहे.

       तिथून डाव्या बाजूस पडणाऱ्या दिसणाऱ्या धबधब्याच्या दिशेने वर गेल्यास आपण गडाच्या दिशेने मार्गस्थ होतो. चालता चालता मध्येच मागे वळून पाहिल्यास गावचा सुंदर नजारा पहावयास मिळतो. पुढे थोडंस चालत गेल्यावर आपण एका पठारावर पोहोचतो तिथे पोहोचल्यावर समोर त्रिंगलवाडी व डाव्याबाजूस तळ्याची वाडी. इथे तुफान वारा असल्याकारणाने ५ मिनिटं थांबून पुढे निघालो.




 तळ्याची वाडी 
            पुढे जात असता दोन दगडाच्या मध्यभागी एक विंचू दृष्टीक्षेपात आला इतक्या वर्षात साप खेकडे हे येता जाता दिसायचे पण विंचू हा पहिल्यांदाच दिसला होता त्याचं परफेक्ट फोटो सेशन करून पुन्हा आपला प्रवास सुरु ठेवला.



            आता पुढे धुकं असल्याकारणाने आम्ही देविदास आणि कल्पनाच्या सोबत चालायचं  ठरवलं. गावकरी असल्याचा एकमेव फायदा म्हणजे त्यांना सोपे रस्ते चांगले माहिती असतात म्हणूनच गडावर जाण्यासाठी असलेल्या दोन रस्त्यांपैकी त्यातल्या त्यात चढण्यासाठी सोप्प्या असलेल्या वाटेवरून ते आम्हाला घेऊन गेले. वाटेत त्रिंगलवाडीच्या महाकाय खडकाच्या खाली बसण्यासाठी एक जागा दिसली तिथं २ मिनिटं शांत बसलो व पुढे निघालो.
 ऐसी आझादी और कहा?? 
धुक्यातला  त्रिंगलवाडी
ध्यानमंदिर  
            आता आली ती गडावर थेट वर जाण्याची असलेली वाट ती म्हणजे खडकात खोदून तयार केलेल्या पायऱ्या. सुरवातीला खडतर असणाऱ्या ह्या पायऱ्यांची नंतर आपल्याला सवय होते. धुकं असल्याकारणाने सुरवातीला पायऱ्याचं वरचं स्वरूप काहीच दिसत नव्हतं म्हणजे खऱ्या अर्थाने ते सगळ्यासाठी चकित करणारं होतं. त्या पायऱ्यांची उंची म्हणजे चालताना गुडघे छातीपर्यंत पोहोचतात. पायऱ्या संपल्यावर हनुमानाची एक भव्य कलाकृती डोळ्यासमोर उभी ठाकली. गडद भगव्या रंगात रंगवलेल्या ह्या हनुमानाच्या मूर्तीचं तेज डोळ्यात भरतं.
जाण्यासाठी असणारी पायऱ्यांची वाट

जय हनुमान      
 गडाचं मुख्य प्रवेशद्वार 
              शेजारीच गडाचं मुख्य प्रवेशद्वार आहे त्यातून प्रवेश केल्यावर आपण थेट गडाच्या आवारात प्रवेश करतो. त्यापुढे चालत गेल्यावर डावीकडे असणार्‍या किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्याकडे जाणारी पायवाट दिसते. ह्यावाटेवरून गेल्यावर सर्वात वरती एक शंकराचे मंदिर लागते. त्या मंदिराचे दर्शन घेतले. एव्हाना एक वाजल्याकारणाने भोजनाची वेळ झाली होती म्हणून आम्ही सगळे व कल्पना आणि देविदास ह्यांना सुद्धा आमच्या सोबत जेवायला बसवले.
सर्वोच्च माथा

          देविदासच्या थंडीमुळे कुडकुडणाऱ्या शरीराकडे बघून पडणाऱ्या पावसाकडे बघून सुद्धा राग येत होता. त्यांना पोटभर जेवायला देऊन आम्ही पुन्हा परतीच्या वाटेला लागलो येताना आमच्याकडे बराच वेळ असल्याने आरामात खाली उतरण्याचा निर्णय घेतला  परतीचा प्रवास  वेगळ्या वाटेने असल्याने उतरताना  एका बाजूस एक धान्याचे कोठार दिसले व पुढील बाजूस उतरण्यासाठी असणाऱ्या पायऱ्या. ह्या पायऱ्यांच्या बाजूसच एक धबधबा होता तिथे तोडा वेळ घालवून  व निसर्गाचा पूर्ण आस्वाद घेऊन सुमारे तीन वाजताच्या सुमारास आम्ही पुन्हा तळ्याच्या वाडीत उतरलो.

धान्याचं कोठार


छोटेखानी गुहा

Trek to Tringalwadi Fort and Jain Caves

Trekking  Aug 16, 2018

Tringalwadi is a village near Igatpuri, that is about 120 km from Mumbai along the Mumbai - Nashik highway (NH 160). Tringalwadi is about 7 kms from Igatpuri and is on the banks of the Tringalwadi reservoir held together by the Tringalwadi Dam.

Tringalwadi Fort is located on a hill behind the village, at a height of 987 msl. The climb to the fort is an easy 30-45 minute trek that is largely gentle sloped with the last steep section covered by steps cut into the rock.

Video Summary of the Trek

Here is a summary video of the trek:

Tringalwadi Fort


The trek starts at Tringalwadi village. A small mud path leads from the village through rice fields and small streams, along the coast of the reservoir northward till we reach the Jain cave at the foothill of the fort. From there, one starts climbing the hill behind the cave to the left of the cave to reach the ridge, then walk along the western rock face till the narrow set of stairs cut into the rock face lead up to the main gate.


The main gate is the most impressive part of the fort, with a large relief of Lord Hanuman on the wall adjoining the doorway with a holding chamber behind it. Being extremely cloudy, we did not explore the farther areas on the fort itself. We examined the ruins of the castle on the fort and a few water tanks dug into the rock for holding water.


The return path is from the east adjoining the castle ruins, till it meets the ascending path at the ridge. The entire trek can be completed in an hour without breaks.

The Tringalwadi Jain Caves


The Jain caves are built in a rock outcropping at the foothills of the fort. The entrance is decorated with a carved frame with pillars that are now disintegrated. The caves were excavated by the Yadavas, who ruled the Deccan region in the 12th and the 13th centuries with their capital at Chandradityapura (modern Chandor, District Nasik) and Devagiri (modern Daulatabad, District Aurangabad) (ref: An inscribed Jain Image from Daulatabad Fort, by M. N. Deshpande in Satabda-kaumudi (1954))


The cave has a verandah on the outside, that has carved walls that are largely disintegrated or destroyed. Along the front of this verandah is a low parapet wall from which rise two pillars, one on either side of the entrance, supporting the outer eave of the verandah. The front of the cave with the main doorway was originally painted, traces of which still remain.


Opposite these pillars are pilasters, and between the latter, is the main doorway into the hall. Beyond these pilasters, and between them and each end of the verandah there is a grille window — two square bars each way dividing it into nine lights. The front of these bars is prettily chased with lotus rosettes at the junctions.
In the centre of the verandah ceiling, and in front of the doorway, hanging in deep relief, is a group of five figures in a circle. The middle figure appears to be assisted or carried through the air by another on either side, while two others, beneath, also help.
The partition wall between the verandah and the inner hall has been entirely built of great irregular blocks of stone well fitted together (ref: Mediaeval Temples Of The Dakhan Vol.27, by Henry, Cousens)


The inner chamber is a large hall, 35 feet square, off the back of which are an antechamber and a shrine. The hall ceiling was supported upon four columns set square in the middle of the hall, The walls and ceiling are plain. Bound the two sides of the south-west and north-west comers are very low continuous altars for images while round the two sides of the north-east and south-east comers are high benches which are not altare. The south-east pillar, only, remains intact; the south-west one is continuous from floor to ceiling, but is much corroded about the middle. The north-west and north-east pillars have completely gone, fragments hanging from the ceiling, and their stumps on the floor, being all that is left of them.
The shrine doorway is much disintegrated, but it was not so elaborately decorated as the front door. Over it, one above the other on three of mouldings, are three Jinas. (ref: Mediaeval Temples Of The Dakhan Vol.27, by Henry, Cousens)


Within the shrine, which is quite measuring 13 by 12 feet, are the remains of a Jaina image upon an altar placed against the back wall. The chest, head and umbrella have been smashed and thrown away — part of the umbrella lies outside the cave — but the legs and the cushion are left. On the middle of the cushion is the bull, showing that the image was that of a Rishabdeva, while on either side of it is an inscription dated Saka 1266.
There was a very fine inscription upon the wall in the north end of the cave, but only a very small fragment of it remains. The letters are small and well shaped. The inscribed surface seems to have been about four to five feet across, but it is not certain how deep. (ref: Mediaeval Temples Of The Dakhan Vol.27, by Henry, Cousens)

Getting To Tringalwadi

The easiest way to get to Tringalwadi village is from Igatpuri. There are jeeps that ply from Igatpuri station to Tringalwadi that could be used to arrive at the base village.

https://bijoor.me/2018/08/16/trek-to-tringalwadi-fort-and-jain-caves/





























लेणीच्या कोंदणातली त्रिंगलवाडी

जैनांनी महाराष्ट्रात आठव्या शतकात लेणी बांधायला सुरुवात केली. त्यातील त्रिंगलवाडी ही शेवटच्या टप्प्यातील म्हणजेच शके १२६६ मध्ये कोरल्याचे शिलालेखातून दिसते. गडाच्या पायथ्याच्या कातळात कोरलेली ऐतिहासिक लेणी पाहिली की नवल वाटायला लागतं. लेणीच्या बाहेर भग्न अवशेषांचा खच पडलेला दिसतो. लेणीचं कोंदण लाभलेल्या त्रिंगलवाडीचा प्रवास पुरातन अन् ऐतिहासिक असला तरी उपेक्षित ठरतो…

caves

नाशिक परिसरातील वारसास्थळे जितकी पुरातन तितकी दुर्लक्षित असं समीकरण होऊ पाहत असल्याने पावलोपावली विखुरलेल्या वारसास्थळांची अवस्था पाहून अस्वस्थ व्हायला होतं. नद्यांवरचे प्राचीन घाट, यादवकालीन विहिरी व अहिल्याबाईंच्या बारव, जमीनदोस्त झालेल्या गढ्या, वाडे अन् कोनाड्यात पडून असल्यागत उभे असलेले, देह ठेवू पाहणारे गड-किल्ले, इतिहासाला पारख्या होत असलेल्या गाववेशी, परंपरेचा पदर सोडत जमिनीत गाडल्या जात असलेल्या वीरगळी, हेमाडपंती, नागर शैलीतील मोडकळीस आलेली जिह्याभरातील अनेक मंदिरे तसेच असंख्य मंदिरांमधील भग्न झालेल्या अन्‌ सौंदर्याने ओतपोत सजलेल्या भग्न मूर्ती तसेच तपश्चर्येचा इतिहास सांगणाऱ्या असंख्य समाधींकडे, त्याच्या इतिहासाकडे झालेल्या दुर्लक्षाचा फटका लेणीचे कोंदण व गडकिल्ल्यांच्या वैभव लाभलेल्या त्रिंगलवाडीलाही सोसावा लागतो आहे. बौद्धांप्रमाणे जैनांनीही आपल्या धर्माच्या प्रचारार्थ देशाच्या वेगवेगळ्या भागांत जैन साधूंना पाठवत धर्मप्रसाराचे कार्य केले. जैन लेण्यांत तीर्थंकर व जैन दैवतांची शिल्पे दिसतात. मात्र, त्यातील सहजाविष्कार जाणवत नाही. त्रिंगलवाडीच्या लेणींवर बौद्ध व ब्राह्मणी लेण्यांची छाप जाणवते. मात्र त्रिंगलवाडी ग्रामस्थांच्या मते ही लेणी पांडवलेणी आहे. पांडवांनी बोटांच्या नखांनी डोंगर कोरून ही लेणी खोदल्याचे ते सांगतात अन् त्याचे वय हजारोवर्ष असल्याचे ते सांगतात.

caves1

मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिकहून घोटीचा टोलनाका ओलांडला की, उजव्या हाता लागणारे पहिले गाव म्हणजे टाके. टाके या गावाला घोटीटाके असेही म्हटले जाते. महाराणा प्रतापांनंतर राजस्थान व उत्तर भारतातून विस्थापित झालेला आग्री समाज टाके गावात स्थिरस्थावर झाला. यांना आग्री अन्‌ आगळी असेही म्हटले जाते. त्यावेळी आजूबाजूच्या ग्रामस्थांनी या समाजाला वेगळे टाकले असावे, म्हणून त्यांच्या वस्तीला टाकून दिलेले गाव म्हणून टाके नाव पडले असावे, असे अर्जून आडोळे सांगतात. टाके गाव मोठे असले तरी येथे फक्त मारूतीचे एकमेव मंदिर आहे. त्यामुळे हनुमान जयंती एवढाच उत्सव गावात होतो. तर गावाला सहा वेसदेव आहेत. यात यळोबा, वाघोबा, माऊल्याआई, बडेबुवा, शंकर अन्‌ म्हसोबा या गावाच्या रक्षणकर्ते असल्याचे पूनजा आडोळे व कोंढाजी आडोळे सांगतात. मारूती मंदिराशेजारी काही विरगळी आहेत. त्या पाहून टाकेगावातून त्रिंगलवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याने निघाले की पुढे बलायदुरी व त्यानंतर पारदेवी हे गाव लागते. तेथून दोन तीन किलोमीटरवर त्रिंगलवाडी धरणाच्या कवेत वसलेले गाव लागते. त्रिंगलवाडीचे वैभव अशासाठी वेगळे आहे की, त्याच्या आजूबाजूला भास्करगड, उतवड, ढोऱ्या डोंगर, वैतरणा धरणाजवळील डोंगररांगा, कसारा घाटाचा प्रदेश, कळसूबाई, अलंग-मदन-कुलंग अन्‌ त्रिंगलगडाचा सहवास या गावाला लाभला आहे. त्रिंगलवाडी हे गाव पत्र्याचा पाडा, तळ्याचा पाडा अन्‌ निशाणवाडी या तीन वाड्यांनी बनलेले आहे. त्यामुळे याला त्रिंगलवाडी म्हटले गेले असावे, असे तुकाराम पारधी सांगतात. आदिवासीबहुल असलेल्या गावात ठाकूर व कोळी समाज राहतो. तळ्याच्या वाडीत गाडी लावून पाण्याने भरलेल्या तळ्याच्या डावीकडून गावाच्या आधाराला पहुडलेल्या त्रिंगलगडाकडे जाता येते. गडाच्या पायथ्याला सहा तर गडाच्या कपारीत दोन लेणी आहेत. येथे घोटीपासून इतक्या आत लेणी का बांधली असावी असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र पूर्वी नालासोपारा-कल्याण-कसारा-अंजनेरी (नाशिक) हा व्यापारी मार्ग होता. आजही याच्या खाणाखुणा पहायला मिळतात. या व्यापाऱ्यांकडून लेणीसाठी दाने दिली जायची म्हणून येथे ही लेणी कोरलेली दिसते. इंग्रजांमुळे व पुढे धरणांमुळे या मार्गात बदल झाले. त्यामुळे व्यापारी मार्गावर त्रिंगलगड हा टेहळणीचे ठिकाण असावे. नंतरच्या काळात या टेहळणी डोंगराचा किल्ला म्हणून वापर झाला.

जैनांनी महाराष्ट्रात आठव्या शतकात लेणी बांधायला सुरुवात केली. त्यातील त्रिंगलवाडी ही शेवटच्या टप्प्यातील म्हणजेच शके १२६६ मध्ये कोरल्याचे लेणीतील शिलालेखातून दिसते. म्हणजेच ही लेणी १३ व्या शतकातील असल्याचे दुर्ग अभ्यासक सुदर्शन कुलथे सांगतात. तळ्याच्या वाडीकडून डाव्या अंगाच्या पायवाटेने एक किलोमीटर शेतातून गेल्यावर गडाच्या पायथ्याच्या कातळात कोरलेले अद्भुत लेण पाहिलं की नवल वाटायला लागतं. लेणीच्या बाहेर भग्न अवशेषांचा खच पडलेला दिसतो. ही वास्तू केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्याअंतर्गत असल्याने परिसरात स्वच्छता दिसते; मात्र कोणताही फलक दिसत नाही. त्यामुळे पर्यटकांना ही लेणी कोणती व तिचे महत्त्व लक्षात येत नाही. त्रिंगलगडाच्या पायथ्याजवळची मुख्य लेणी आयताकार आहे. लेणीचा व्हरांडा, सभामंडप आणि गाभारा असे तीन भाग आहेत. व्हरांडा लांबलचक असून, द्वारशाखेपूर्वी छतावर सुशोभित छताच्या तुळ्या हातात हात गुंफलेल्या गण-यक्षांनी पेलल्याची शिल्प मन मोहून टाकते. हे शिल्प कसे घडविले असेल हा प्रश्न त्या कलाकारांच्या मेहनतीला आणि चिकाटीला सलाम करतो. तर उजव्या बाजूला कातळात फूल कोरले आहे. छताला आधार देण्यासाठी कोरलेले खांब आता पडले असून, वरची बाजू फक्त शिल्लक आहे. त्यावर यक्ष दिसतात. व्हरांड्याच्या आतील भागात नक्षीकाम आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर नक्षीकाम करण्यासाठी जसे पाच सुशोभित चौकटी एकात एक गुंफून त्यावर नाजूक काम केले असावे. हे करताना त्या कलाकारांना हे करताना किती कालावधी लागला असेल हा प्रश्न त्यांच्या प्रतिभेचे कौतुक करतो. व्हरांड्यात उजव्या व डाव्या बाजूला चौकोनी आकाराच्या बसण्यासाठी जागा दिसते. तर द्वारपट्टीवर दोन चौकटी तीर्थंकरांच्या मूर्ती व गणांची देखणी शिल्पे आहेत. ललाटपट्टीवर खंडित झालेली गजलक्ष्मीची प्रतिमा तर प्रवेशद्वाराच्या हातील बाजूस लाकडी दरवाजांसाठी खोबणी असल्याचे दिसते. म्हणजेच लेणीला पूर्वी लाकडी दरवाजांची व्यवस्था असावी. लेण्यांचा सभामंडप प्रशस्त आहे. लेणीच्या मुख्य मंडपाला सालंकृत असे चार स्तंभ होते. त्यापैकी फक्त एकच खांब आता शिल्लक असून, त्याच खांबावर लेणी उभी आहे. त्यावर सुंदर नक्षी आहे. उरलेल्या खांबांचा स्तंभशीर्षाचे अलंकृत हस्त (ब्रॅकेट्‌स) अजूनही पहायला मिळतात. त्यावरील यक्ष अजूनही लेणीला उचलून आधार देत असल्याचे पाहता येते. हा आविष्कार अनुभवण्यासारखा आहे. हे यक्ष नसते तर लेणीचा महाकाय दगड अंगावर आला असता असे वाटायला लागते. सभामंडपात हवा आणि उजेड येण्यासाठी नऊ चौकोनी झरोके असलेल्या दोन खिडक्या कातळात कोरलेल्या आहेत. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर नक्षी कोरलेली आहे. त्रिंगलवाडीच्या लेणीत बौद्ध लेणींप्रमाणे कलेचा मुक्त आविष्कार दिसत नसला तरी जैन लेणीतील स्तंभांवरची सजावट, त्यांना दिलेले विविध आकार, छतावरची कामे, वेलबुट्टी, भौमितिक आकार जैन कलाकारांचे वैशिष्ट्‌य दाखवून देते. गाभाऱ्यात जैन धर्मीयांचे प्रथम तीर्थंकर भगवान आदिदेव ऊर्फ वृषभनाथांची पद्मासनात बसलेली मूर्ती असून, मूर्तीच्या आसनावर दानाचा शिलालेख कोरलेला आहे. मात्र तो आता झिजला आहे. हा शिलालेख प्राकृत संस्कृत असून, नागरी लिपीत आहे.

त्रिंगलवाडी लेणी अपूर्ण व पडक्या अवस्थेत असली तरी तिचे सौंदर्य पर्यटकांना मोहिनी घालते. गडावरही दोन लेणी असून, त्याही भग्नाअवस्थेत आहेत.

ऐतिहासिक त्रिंगलगडही भग्नाअवस्थेत आहे. पडक्या वाड्याचे अवशेष, कातळातील तुटलेल्या पायऱ्या, कातळात कोरलेले प्रवेशद्वार व पाच फुटाची हनुमानाची मूर्ती, बुरजांचे अवशेष पहायला मिळतात. हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात केव्हा आला ते कळत नाही. पण १६८८ च्या शेवटी मोघलांनी फितुरीने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला. १८१८ साली पेशवाई बुडाल्यावर मराठ्यांनी पुन्हा प्रतिकार करू नये म्हणून इंग्रजांनी तोफा डागून व सुरूंग लावून हा किल्ला उद्धवस्त केला. हा किल्ला कोणी बांधला व त्रिंगलगडाच्या पराक्रमाच्या नोंदी मिळत नसल्या तरी हा किल्ला टेहळणी चौकची काम करीत असल्याचे दिसते. कळवण तालुक्यातील मार्केंडेय पिंपरी येथील मूळचे असलेले कवि जयराम पिंड्ये यांच्या ‘पर्णाल-पर्वत-ग्रहणाख्यान’ या काव्यात त्रिंगलवाडीचा उल्लेख आलेला दिसतो.

अलंकुरंगतिंगलवाटिका नामथोध्दतम् |

अहिवंतोऽचल गिरिर्मार्कण्डेयाभिधानकः॥

१६८८ मध्ये मुघलांनी फितुरी घडवून हा किल्ला मराठ्यांकडून घेतला. मातब्बरखानाने औरंगजेबाला

पाठविलेल्या पत्रात त्रिंगलवाडीला वेढा घातल्याचा उल्लेख मिळतो. पेशवे काळात त्रिंगलवाडीने आपला दबदबा कायम ठेवल्याचे दिसतो, असे दुर्ग अभ्यासक सुदर्शन कुलथे सांगतात. त्रिंगलवाडी ताब्यात घेतल्यानंतर कॅप्टन ब्रिग्ज यावर एक रिपोर्ट लिहिला होता. यातून या गडाबद्दल चांगली माहिती मिळते. १८१८ ला पेशवाई अस्तानंतर ब्रिग्जने जे किल्ले ताब्यात घेत उद्धवस्त केले. यात त्रिंगलवाडीचाही समावेश होता. १६३६ पासून हा किल्ला शहाजी महाराज व छत्रपती शिवाजींच्या ताब्यात असल्याचे त्याने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. कॅ. ब्रिग्जनेही येथील लेणीचे सौंदर्य अनुभवल्याचे त्याने म्हटले आहे.

लेणीचे कोंदण असलेल्या त्रिंगलवाडी गावचे मूळ वैभव आहे ते बोहाडे. चैत्रात निशाणवाडीत होणारे बोहाडे तिन्ही वाड्या अन् आजूबाजूंच्या गावांसाठी उत्सुकतेचा विषय असतो. गावात संप्तश्रृगी देवी ही गावची ग्रामदैवता आहे. तर हनुमान हा संरक्षणकर्ता, असे शांताराम शेलार सांगतात. होळी, पोळा, हनुमान जयंती व दिवाळी हे उत्सव त्रिंगलवाडीकर जल्लोषात साजरे करतात. १९८२ मध्ये धरण झाल्यावर पाण्यासाठी कासावीस झालेल्या त्रिंगलवाडीला ओलावा मिळाला अन् बागायती शेतीमुळे आर्थिक स्थैर्यही मिळाले. भात, विविध डाळी, नागली ही पिके घेणारे त्रिंगलवाडीकरांना बेंजू अन् कापडनाथ ही आदिवासी वाद्ये वाजवायला आवडतात.

मात्र ऐतिहासिक वैभव लाभलेल्या त्रिंगलवाडी विकासापासून अजूनही वंचित असून, निशाणवाडीला स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे उलटूनही रस्ता अन् वीज अजूनही मिळालेली नाही. हा उपेक्षितपणा सोबत घेऊन त्रिंगलवाडीकर गावात येणाऱ्या पर्यटकांचे स्वागताला सज्ज असते. लेणीचे कोंदण मिळाले आता विकासाचेही कोंदण मिळाले तर धन्य होऊ, अशी प्रतिक्रिया त्रिंगलवाडीकर व्यक्त करताना दिसतात. त्रिंगलवाडीच्या ऐतिहासिक वारशाला विकासाचे कोंदण लाभले तर हे लेण जगभर पोहचेल.



https://www.facebook.com/Arihantgyan/posts/1264693183671799/












No comments:

Post a Comment

Aihole

 आयहोळ येथील डोल्मेन :        सध्या बहुतेक पर्यटक आयहोळला चालुक्यांच्या सुरवातीच्या काळात बांधलेल्या मंदीरांना भेट देण्यासाठी येतात. मात्र ल...