नेहमीच्या ठरावीक पर्यटन स्थळांऐवजी काही तरी वेगळं पाहण्यासाठी कायमच वाट वाकडी करण्याची गरज नसते. कधी कधी महामार्गालगतच थोडं धुंडाळल्यास काही पुरातन ठेवा सापडू शकतो. अनेक वेळा प्रसिद्ध लेणी, मंदिरं यांबद्दल खूप लिहिलं जातं. प्रसिद्ध पर्यटन स्थळांच्या यादीतदेखील त्यांचा समावेश असतो. संपुर्ण भारतात आढळणाऱ्या १२०० लेण्यांपैकी साधारण ८५० लेणी एकटया महाराष्ट्रात आहेत. हे ऐकायला जरी बरे वाटत असले तरी यातील ३०-४० लेणी वगळता इतर लेणी अज्ञातवासात आहेत हे वास्तव आहे. अज्ञातवासात असलेल्या या लेण्यांपैकी एक लेणे म्हणजे टाकळी ढोकेश्वर.

अहमदनगर जिल्ह्य़ातील पारनेर तालुक्यात टाकळी ढोकेश्वरची लेणी, सोमेश्वर मंदिर आणि जामगावचा किल्ला ही अशीच काही ऐतिहासिक ठिकाणं मुंबई-पुण्याहून एका दिवसातही व्यवस्थित पाहता येणारी. कल्याण-नगर रस्त्यावर नगरच्या अलीकडे ४० किलोमीटरवर आणि कल्याणपासून १७० किलोमीटरवर टाकळी ढोकेश्वर गाव आहे. पारनेर या तालुक्याच्या ठिकाणाहुन २१ कि.मी.अंतरावर आहे. कान्हूरपठार-नगर, पुणे जिल्ह्यांमधे पसरलेला एक ओसाड, रखरखीत, बोडका प्रदेश, फारशा खोल नसलेल्या पण तरीही भरपूर दर्याखोर्यांनी व्यापलेला पठारी भाग. इथल्या विशिष्ट भूरचनेमुळे त्याहीपेक्षा निसर्गाच्या किमयेने इथे भूरूपांच्या चित्रविचित्र संरचना तयार झाल्या आहेत जशी निघोजची रांजणकुंडे, गुळूंचवाडीचा नैसर्गिक शिलासेतू, वडगाव दर्याचे लवणस्तंभ. ह्या नैसर्गिक भूरूपांबरोबरच विविध देवस्थांनांनीसुद्धा हा प्रदेश समृद्ध आहे जसे निमगावचा खंडोबा, कन्हेरसरची देवी, कवठ्याची यमाई. पश्चिम महाराष्ट्रातील बर्याच जणांची कुलदैवते ही याच प्रदेशातील आहेत. ह्या मध्ययुगीन देवस्थांनांबरोबरच इथे प्राचीन म्हणजेच साधारण ६ व्या, ७ व्या शतकात राष्ट्रकूट, कलचुरी कालखंडात खोदली गेलेली ब्राह्मणी शैलीची लेणीसुद्धा आहेत.
![]() |
| टाकळी ढोकेश्वरची लेणी असलेली छोटीशी टेकडी |
ढोकेश्वराचा डोंगर
टाकळी गाव ते ढोकेश्वर लेणी हे अंतर साधारण ५ कि.मी.आहे. कल्याण-नगर महामार्गाने टाकळी गाव पार केल्यावर महामार्गाच्या डाव्या बाजुस ढोकेश्वरची लेणी असलेली लहानशी टेकडी दिसते. या टेकडीच्या मध्यातच ढोकेश्वरची शैवलेणी कोरलेली आहेत. महामार्ग सोडून गावात जाणाऱ्या रस्त्याने गाव पार करून पुढे गेल्यावर टाकळी ढोकेश्वरची लेणी असलेली छोटीशी टेकडी दिसते. लेण्याचा ताबा पुरातत्व खात्याकडे असुन त्यांनी लेणींपर्यंत जाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधलेल्या आहेत.काही बांधीव तर काही खोदीव अशा पायर्या लेणीपर्यंत जाण्यासाठी आहेत. साधारण दोनशेच्या आसपास पायर्या असाव्यात. टेकडीच्या पायथ्यापासुन टेकडीच्या मध्यात असलेले लेण्याचे प्रवेशद्वार व तटबंदी ठळकपणे दिसुन येते.

नागमोडी पायऱ्या, मधे कमान ही रचना छान वाटते. तटबंदी पेशवेकालीन बांधली आहे.

लेण्यांभोवतीचा तट
महामार्ग सोडून गावात जाणाऱ्या रस्त्याने गाव पार करताच छानश्या वळणदार रस्त्याने थोडं पुढे गेल्यावर टाकळी ढोकेश्वरची ही लेणी असलेली एक छोटीशी टेकडी आपल्या दृष्टीस पडते. टेकडीचा हा संपुर्ण परिसर गावाबाहेरील एक माळरान जरी असलं तरी आजमितीला तेथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले गेले असून शोभेची झाडे व फुलझाडे यांच्यासाहाय्याने येथील परिसर अतिशय सुंदर आणि सुखावह बनवण्यात आला आहे. त्यामुळे येथे पोहोचताच मन तर अगदी प्रसन्न होतेच होते शिवाय हे स्थळ गावापासून एवढ्या दूर असूनही इथं असं उत्तम व्यवस्थापन करून काही चांगल्याची जोपासना केल्याबाबत कौतुकही वाटतं. टेकडीवरील या लेण्यांपर्यंत जाण्यासाठी छानपैकी रुंदसा दगडी पायरीमार्ग बनविण्यात आला असून यामार्गे साधारण आठ-दहा मिनिटांतच आपण मुख्य लेण्यांपर्यंत पोहोचतो.
टाकळी ढोकेश्वर या गावाजवळील हे ढोकेश्वर लेणे मंदिर खूप प्राचीन मंदिर असून ते मंदिर डोंगरात कोरलेले आहे. किंबहुना, या मंदिरावरूनच या गावाला टाकळी ढोकेश्वर असे नाव पडले आहे. या मंदिरात महादेवाची खूप मोठी आकर्षक अशी पिंड आहे. श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आणि महाशिवरात्रीला येथे खूप मोठी यात्रा भरते. पंचक्रोशीतील अनेक भाविकही या यात्रेसाठी आवर्जून जमतात.

जवळ जाताच अगदी समोर असलेलं मध्ययुगीन प्रवेशद्वार आणि त्याच्या बाजूची तटबंदी जी खरे तर दुरूनच आपलं लक्ष वेधून घेते. पायऱ्यांच्या सुरुवातीला डाव्या बाजुस एक दगडी रांजण पहायला मिळतो. येथुन साधारण ५०-६० पायऱ्या चढुन गेल्यावर प्रवेशद्वाराआधी उजव्या हाताला यादवकालीन शंकराचे मंदिर आहे
.मंदिरावरच्या दगडांवर वेगवेगळे फुले कोरलेली आहेत ,तर एक वेगळेच चिन्ह
कोरलेले दिसते.मंदिरातीलं पिन्डीसमोर एक गोमुख कि नंदी आहे. मंदिराच्या छताची रचना त्रिमित्रिक भासते.

प्रवेशद्वाराअलीकडील मंदिर
मंदिरद्वाराच्या उंबरठ्यावरील शिल्प

मंदीराच्या प्रवेशद्वारावर कोरलेले शिल्प

छत

वेगळा पक्षी
वेगळा पक्षी
मंदीरातील शिवपिंड

शरभशिल्प
समोर एक दगडात बांधलेली समाधी आहे. समाधी मंदीरावर काही प्रमाणात कोरीवकाम केलेले असुन दरवाजावर गणेशशिल्प कोरलेले आहे. समाधी मंदीराच्या आतील चौथऱ्यावर शिवलिंग मांडले आहे. बाहेरील दुसऱ्या समाधी चौथऱ्याला लागुनच एक एक शरभशिल्प ठेवलेले आहे. हे शिल्प बहुधा लेणीच्या तटबंदीतील असावे.डाव्या बाजूला शरभ कोरलेली एक शिळा आहे.त्यावर भस्म लावून या मूर्तीची आणखीन हानी होत आहे हे कोण सांगणार?आणि कोणाला? वाईट वाटलं.शरभ हा आठ पायांचा अशंत: सिंह आणि अंशतः पक्षी स्वरूपातील काल्पनिक प्राणी आहे.तो सामर्थ्यवान असून सिंहालाही मारू शकतो.तर बौध्द जातक कथांनुसार शरभ हा बुद्धाच्या पुर्वाव्तारांपैकी एक आहे.हा दरवाजा आणि त्याच्या बाजूची तटबंदी जेव्हा बांधली असेल तेव्हा प्रवेशद्वारावर शरभ शिल्प असणार, पण कालांतराने डागडुजी करताना ते मूळ जागेवरून काढून टाकलं असावं. इथल्या पायरीमार्गातही अनेक ठिकाणी असे नक्षीकाम असलेले अवशेषस्वरूपी अनेक दगड वापरलेले आपल्याला दिसून येतात.
लेणींपासून पाऊण उंचीवर मध्य युगात बांधलेलं प्रवेशद्वार आणि त्याच्या बाजूची तटबंदी दुरूनच आपलं लक्ष वेधून घेते. लेण्यांभोवती तट बांधला आहे आणि त्यातूनच प्रवेशद्वार केले आहे. तटाचे हे बांधकाम पेशव्यांच्या कालखंडात केव्हातरी झाले आहे.
प्रवेशद्वारातील शिलालेख
तटाच्या दरवाजात तत्संबंधी एक शिलालेख आहे. तटबंदीमधील दरवाजाने लेण्याच्या आवारात प्रवेश केल्यावर चौथऱ्यावर उभारलेली दगडी दीपमाळ दिसुन येते.
लेण्याबाहेरची दिपमाळ
टाकळी ढोकेश्वर लेण्याची रचना
टाकळी ढोकेश्वरचं मुख्य लेणं प्रशस्त आहे. चार खांब असलेल्या या गुहेत महादेव मंदिराभोवती कोरण्यात आलेली ब्राम्हणी लेणी राष्ट्रकूटकालीन इ. स. ५५० ते ६०० या काळातील आहे.
लेण्याचा दर्शनी भाग
दर्शनी भागातील नक्षीदार स्तंभ
कूर्माधिष्ठित यमुना

मकरारूढ गंगा
गंगेशेजारीच मकराजवळ एका सेविकेची उत्कृष्ट मूर्ती कोरलेली आहे.
पहिल्यांदा बाहेर यमुना आणि नर्मदा या भव्य अशा सुंदरी भासणाऱ्या कोरलेल्या मूर्ती आहेत.त्यांचा पायाशी सुबक अशा मूर्ती आहेत तर वरील बाजूसही सुंदर असे आकाशातून
त्यांना नमन करणारे देवगण कोरलेले आहेत.
लेणीत शिरताना दोन्ही बाजूला शालभंजिकेच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. सभामंडप चार खांबांवर तोललेला आहे.

खांब अतिशय सुंदर नक्षीकाम आणि जातक कथेतील प्राणी कोरलेले आहेत.तसेच
खांबाखालील दगडांवर मूर्ती कोरल्या आहेत ज्या वाद्य वाजवत आहेत असा भास होत
आहेत. लेण्यातील भिंतीवर गजलक्ष्मीचे शिल्प आहे. सभामंडपातील डाव्या बाजूच्या भिंतीवर पाच वृक्षांखाली बसलेल्या सप्तमातृका त्यांच्या वाहनांसह कोरलेल्या आहेत. त्यांच्या एका बाजूला गणेशाची तर दुसऱ्या बाजूला वीरभद्राची मूर्ती कोरलेली आहे.

सप्तमातृका अधिक जवळून अनुक्रमे ब्राह्मणी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, ऐन्द्राणी आणि चामुंडा
वीरभद्र

वराहमुखी वाराही
मुळात सप्त मातृका म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे म्हणजे हे शिल्प सौंदर्य पाहताना आजून आनंद पल्लवित होतो. हिंदू धर्माच्या ऋग्वेद, मार्कन्डेय पुराण, चंडी महात्म्य, आणी शाक्त संप्रदायात ह्या सप्त मातृकांचा उल्लेख येतो.
चला तर पाहुयात ह्या सप्त मातृका देवींची नावे आणि त्यांची माहिती. सप्त मातृका पुढील प्रमाणे आहेत. 1.ब्रम्हानी, 2.वैष्णवी, 3.माहेश्वरी, 4.इंद्राणी, 5.कौमारी, 6.वाराही, 7.चामुंडा. काही विद्वानांच्या मते ह्या शैव देवी आहेत. महाभारतात आणी पुराणांत ह्यांची संख्या ही सात, अठरा, आणि बत्तीस अशी दिलेली आहे. नेपाळ मध्ये अष्ट मातृकांची पूजा होते आणि पश्चिम भारतात सप्त मातृकांची पूजा होते. वराह मिहिरच्या बृहत्संहितेत आणी शुद्रकच्या मृच्छकटिक मध्ये ह्या सप्त मातृकापूजनाचा स्पष्ट उल्लेख आहे. चालुक्य आणी कदंब राजवंश हे ह्या सप्त मातृकांचे उपासक होते.
आता ह्या सप्त मातृका आपण त्यांच्या नावासहित समजावून घेऊ.
चामुंडा- देवी चामुंडाच्या शक्तींचे प्रतिनिधित्व करणारी. हिलाच चामुंडा किंवा चर्चिका असेही म्हणतात. ह्या देवीचा रंग हा महाकालीशी साधर्म्य दाखविणारा आहे.
नर मुंडांची माळा गळ्यात घालणारी आणि कृष्ण वर्ण असणारी ही देवी आपल्या चार भुजांमध्ये (भुजा- हातात) डमरू, तलवार, त्रिशूळ आणि पाणपत्र धारण करणारी आहे. मृत्यू झालेल्या शवांच्या सानिध्यात ही देवी अत्यंत भीतिदायक दिसते. हिचे वाहन कोल्हा आहे.
इंद्राणी- ही देव इंद्राच्या शक्ती प्रदर्शित करणारी. हिलाच एन्द्री, महेंद्री, किंवा वज्रेश्वरी असेही म्हणतात. हिला चार भुजा आणि एक हजार नेत्र असून इंद्रासारखीच ही वज्र धारण करणारी आहे. ह्या देवीचे वाहन एरावत (हत्ती) आहे.
वाराही- भगवान विष्णूचा अवतार वराह, आणि यमदेवाच्या शक्ती प्रदर्शित करणारी. ही देवी आपल्या चार हातांत दंड, नांगर, तलवार, आणी पाणपत्र धारण करणारी आहे. हिलाच अर्ध नारी आणी अर्ध वराहच्या रूपातही दाखविले जाते. ह्या देवीचे वाहन म्हैस आहे. पण शिल्पात हिचे वाहन वराहच दाखविलेले आहे.
वैष्णवी- भगवान विष्णूच्या शक्ती प्रदर्शित करणारी. हिला चार भुजा असून विष्णू सारख्याच ह्या देवीच्या हातात शंख, चक्र, गदा आणि कमळ आहे. हि देवी ऐश्वर्य प्रदर्शित करणारी आहे. ह्या देवीचे वाहन गरुड आहे.
ब्रम्हानी / ब्राम्हणी- ब्रम्हदेवाच्या शक्ती प्रदर्शित करणारी. ही पित वर्णाची (पिवळ्या रंगाची) असून हिला चार भुजा (हात) आहेत. ब्रम्हदेवा सारखेच हिचे आसन कमळाचे आहे. ह्या देवीचे वाहन हंस आहे.
माहेश्वरी- महादेवाच्या शक्ती प्रदर्शित करणारी. हिला चार भुजा असून हिलाच दुसरं नाव रुद्राणी असंही आहे; जी महारुद्राच्या शक्ती प्रदर्शित करते. हिच्या हातात त्रिशूळ, डमरू, आणि रुद्राक्षमाला आहे. महादेवासारखीच ही त्रिनेत्रधारी आणि त्रिशूळ धारण करणारी आहे. ह्या देवीचे वाहन ऋषभ आहे.
कौमारी- शिवपुत्र कार्तिकेयाच्या शक्ती प्रदर्शित करणारी. हिलाच कुमारी, कार्तिकी आणी अंबिका अशीही नावे आहेत. ही देवी आपल्या चार हातांत परशु, भाला, धनुष्य आणी मुद्रा धारण करणारी आहे.ह्या देवीचे वाहन मोर आहे. पण शिल्पात हिची कुमारीची मूर्ती दाखविलेली आहे.
तर अश्या ह्या सप्त मातृका.
सगळ्यात महत्वाचे: शेवटची मूर्ती म्हणजे एकदम डावीकडील मूर्ती ही शंकराची असून त्याचे वाहन नंदी हे मूर्ती खाली दर्शविलेले आहे. लोक चुकीने ह्या आठव्या मूर्तीलाही देवी समजतात आणि परत परत मोजत आता ही आठवी मूर्ती कुठल्या देवीची? असा विचार करत बसतात.

शिवतांडव

शिवतांडव जवळून
शिवतांडव पटाच्या दोन्ही बाजूच्या भिंतीत नागप्रतिमा आहेत.
सप्तमातृकांच्या बरोबर समोर म्हणजेच प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजवीकडे एक उपमंडप आहे. त्यात आहे नटराज शिव अथवा शिवतांडव. दोन स्तंभांमुळे हा उपमंडप सभामंडपातून काहीसा वेगळा झाला आहे. उजव्या बाजूला शिवतांडव भव्य मूर्ती कोरलेली आहे ,जिच्या दोन्ही बाजूंना वेटोळे घातलेले फणाधारी नाग आहेत. त्रिशूळ, नाग, डमरू आदी आयुधे हाती धरून शिव तांडवनृत्य करत असून पार्वती, शिवगण, देवगंधर्व हे नृत्य पाहात आहेत.
सप्तमातृकाशिल्पपटाशेजारील कक्षातील जुन्या मूर्तींचे अवशेष (विष्णू)
सप्तमातृकाशिल्पपटाशेजारील कक्षातील जुन्या मूर्तींचे अवशेष
शिवतांडवपटासशेजारच्या क़क्षात काही वीरगळ आडवे करून ठेवलेले आहेत.
सप्तमातृका तसेच शिवतांडव अशा दोन्ही पटांच्या बाजूला कक्ष खोदलेले आहेत. मातृकांशेजारच्या कक्षात कुठल्याश्या जुन्या मंदिरातल्या मूर्तींचे बहुत अवशेष आहेत. बहुधा पायथ्याचे हे कुठलेतरी यादवकालीन मंदिर असावे. कक्ष जाळी लावून कुलूपबंद केला असल्याने हे नीट पाहता येत नाहीत.
ढोकेश्वर लेण्यात पुढे भिंतीवर हातात फुले घेतलेल्या दोन द्वारपालांची शिल्पे असून, त्यांच्या डोक्यामागील प्रभामंडळ आणि त्यांच्या वर असलेले विद्याधर केवळ पाहण्याजोगे आहेत. सभामंडपात नंदी आहे.

गर्भगृहाचा दर्शनी भाग
गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या बाजूंना आयुधपुरुष मूर्ती आहेत.कलचुरी, राष्ट्रकूट कालखंडात आयुधपुरुष द्वारपालांच्या भरपूर मूर्ती
खोदल्या गेल्या. त्या आपल्याला वेरूळ, घारापुरी, टाकळी ढोकेश्वर अशा
ब्राह्मणी लेण्यांत तसेच वेरूळ येथेच बौद्ध लेण्यांतही दिसून येतात.
सर्वसाधारणपणे द्वारपाल आणि त्यांच्या शेजारी खालच्या बाजूस एक ठेंगणी
व्यक्ती अशी यांची रचना. ह्या ठेंगण्या मूर्ती म्हणजेच द्वारपालांच्या
हातातील आयुधे, इति आयुधपुरुष. तर टाकळी ढोकेश्वरच्या गाभार्याच्या
प्रवेशद्वाराच्या बाजूंना अशा आयुधपुरुष मूर्ती आहेत. पैकी उजवीकडील
द्वारपालानजीकची आयुधपुरुष मूर्ती पूर्णपणे भग्न झाली आहे मात्र डावीकडील
पूर्णपणे दृग्गोचर आहे. ती आहे त्रिशुळपुरुषाची. आता ही मूर्ती ओळखायला
अगदीच सोपी कारण ह्याने हाताची घडी घातली असून मस्तकी त्रिशुळ धारण केला
आहे. साहजिकच हा त्रिशुळपुरुषाकडे निर्देश करतो. शिवाय हे शैव लेणे
असल्याने द्वारपाल त्रिशुळधारी असणे हे ही अगदी सुसंगतच.

आयुधपुरूष द्वारपाल
त्रिशुळपुरुष
प्रवेशद्वाराच्या उजवीकडील कुबेर
पैकी उजवीकडील द्वारपालानजीकची आयुधपुरुष मूर्ती पूर्णपणे भग्न झाली आहे मात्र डावीकडील पूर्णपणे दृग्गोचर आहे. ती आहे त्रिशुळपुरुषाची. आता ही मूर्ती ओळखायला अगदीच सोपी कारण ह्याने हाताची घडी घातली असून मस्तकी त्रिशुळ धारण केला आहे. साहजिकच हा त्रिशुळपुरुषाकडे निर्देश करतो. शिवाय हे शैव लेणे असल्याने द्वारपाल त्रिशुळधारी असणे हे ही अगदी सुसंगतच. ह्या आयुधपुरुषाच्याच बाजूला एक बैठी मूर्ती आहे तसेच त्याच्या खालच्या बाजूला कुठलासा प्रसंग शिल्पांकित केलेला आहे. ह्या मूर्ती खडकाचे विदारण झाल्यामुळे नीटशा ओळखता येत नाही. उजव्या बाजूच्या द्वारपालाच्या वरचे बाजूस मात्र धनाची थैली घेऊन चाललेला कुबेर सहजी ओळखू येतो. इतर दिक्पालांचा मात्र येथे अभाव आहे. सभामंडप आणि अंतराळ ह्यांना विभाजीत करणाऱ्या स्तंभचौकटीवर गजान्तलक्ष्मी आणि उमा महेश्वर आहेत.

गाभार्यातील शिवलिंग
गर्भगृहामध्ये शिवलिंगावर मानवी चेहरा असलेला तांब्याचा मुखवटा आहे.

गर्भगृहाला फेरी मारण्यासाठी कातळातच खोदून काढलेला मार्ग आहे.

वीरगळ
गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणापथ कोरून काढला आहे. या प्रदक्षिणामार्गावर अनेक वीरगळ आज व्यवस्थितरित्या बंदिस्त करून सुरक्षित ठेवलेल्या दिसून येतात.मंदिरात दोन नांदी आहेत.एक समोर तर एक उजवीकडे?दोन कसे हे समजले नाही.तसेच सर्पशिळा येथे ठेवलेली दिसते.
मुख्य लेण्याच्या बाजूला पाण्याचे टाकेदेखील कोरलेले आहे. त्यात पाणी येण्यासाठी टेकडीच्या वरपासून दगडात पन्हाळी कोरून काढलेली आहे.
या टाक्याच्या वरच्या बाजूला दुसरे पाण्याचे टाके आहे. त्याला सीता न्हाणी या नावाने ओळखतात. या टाक्यापर्यंत जाण्यासाठी दगडात खोबण्या आहेत.स्थानिकांच्या मदतीने पुरातत्व खात्याने लेण्याचा परिसर नीटनेटका आणि स्वच्छ ठेवलेला आहे.येथे एक पुजारीही असून त्यांना या लेण्यांच्या इतिहासाविषयी बरंच काही माहिती आहे. ते तिथं असल्यास व आपल्याला त्यांत रस असल्याचे दाखविल्यास आपणांस याबाबत सहकार्य होऊन त्यांचेकडून बरीच माहिती मिळू शकते. या ठिकाणी श्रावण महिन्यात सोमवारी व महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते.हा संपूर्ण परिसर पाहायला साधारण एक तास लागतो. पर्यटकांची वर्दळ नसलेले हे सुंदर ठिकाण आवर्जुन भेट देण्यायोग्य आहे.
संदर्भ :-
१) महाराष्ट्र शासन गॅझेटीयर
२) श्री. अमित सामंत, श्री. सागर बोरकर यांचे लिखाण
३) www.trekshitiz.com हि वेबसाईट
४ ) www.durgbharari.in हि वेबसाईट
५ ) https://www.discovermh.com/takli-dhokeshwar-caves/ हि वेबसाईट
---X---X---X ---

No comments:
Post a Comment